Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आम्हाला रामायण संग्रहालयाचे लॉलीपॉप नको, तर राममंदिर हवे आहे ! - भाजपचे खासदार विनय कटियार

        अयोध्या - राममंदिराच्या उभारणीसाठी प्रयत्न करायला हवेत. रामायण संग्रहालयासारख्या लॉलीपॉपने काही होणार नाही, अशी टीका भाजपचे उत्तरप्रदेशातील खासदार आणि रामजन्मभूमी आंदोलनातील नेते विनय कटियार यांनी केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या नियोजित रामायण संग्रहालयावर केली आहे. लोकसभेत आपले बहुमत असल्याने सरकारने राममंदिर बांधण्यासाठी कायदा आणावा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. अयोध्येपासून १५ कि.मी. अंतरावर केंद्र सरकार हे संग्रहालय उभारणार असून राज्य सरकारने त्यासाठी भूमी उपलब्ध करून दिली आहे.
        कटियार पुढे म्हणाले की, केंद्रीय सांस्कृतिकमंत्र्यांंच्या या संदर्भातील कार्यक्रमाला मी उपस्थित रहाणार नाही; कारण अयोध्येतील संत, महंत आणि लोक मला राममंदिराविषयी विचारतील. अयोध्येत विकासकामे केली आहेत. तेथे साडेसहा सहस्र मंदिरे आहेत; मात्र आम्हाला राममंदिर हवे आहे. राममंदिराविना अयोध्या अपूर्ण आहे.

महाराष्ट्र १ वाहिनीकडून सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना अपमानास्पद वागणूक !

श्री. अभय वर्तक
        मुंबई, १८ ऑक्टोबर (वार्ता.) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगद्गुरु नरेंद्र महाराज यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून धर्मसत्ता ही राजसत्तेपेक्षा श्रेष्ठ आहे, अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. या संदर्भात १७ ऑक्टोबर या दिवशी महाराष्ट्र १ या वाहिनीने चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये सहभागी होण्यासाठी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनाही निमंत्रित करण्यात आले होते; मात्र आझाद मैदान दंगलप्रकरणी केलेल्या एका वक्तव्यावरून चर्चासत्राचे सूत्रसंचालक निखिल वागळे यांनी अपमानास्पद वागणूक देऊन श्री. अभय वर्तक यांना कार्यक्रमातून निघून जाण्यास सांगितले. (सभाशास्त्राचे साधे नियमही न पाळणारी महाराष्ट्र १ वाहिनी चर्चांमधून समाजाला काय विधायक संदेश देत असेल, याचा विचारच न केलेला बरा. सूत्रसंचालकाने चर्चेत सहभागी झालेल्या वक्त्यांचे म्हणणे पूर्ण आणि तटस्थ राहून ऐकून घेणे अपेक्षित असते. असे न करता स्वतःच्या मताच्या विरोधात मते मांडणार्‍यांच्या अंगावर ओरडून त्याचे म्हणणे बंद पाडून त्यांना वाहिनीवरून जाण्यास सांगणे, ही सभ्यता नव्हे ! एरवी विचारांचा लढा विचारांनी द्यावा असे दृष्टीकोन देणारे स्वतःच इतरांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करत आहेत, असेच नव्हे का ? संपादक)
१. चर्चासत्राच्या वेळी अंनिसचे अविनाश पाटील यांच्याकडून वारंवार जगद्गुरु नरेंद्र महाराज यांचा भोंदू असा उल्लेख करून त्यांची अपकीर्ती करण्यात येत होती.

राज्य सरकारकडून ध्वनीप्रदूषणाविषयी चुकीची माहिती आणि खोटी आश्‍वासने देऊन न्यायालयाची दिशाभूल !

  • उच्च न्यायालयाची दिशाभूल करणारे सरकार आणि प्रशासन सर्वसामान्यांशी कसे वागत असेल, याचा विचारच न केलेला बरा !
  • मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे !
       मुंबई - उत्सवकाळातील ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी ध्वनीमापक उपकरणे पोलिसांना उपलब्ध करून देण्याचे आदेश वारंवार देण्यात आले; परंतु आदेश धाब्यावर बसवण्यासमवेत चुकीची माहिती सादर करून आणि खोटी आश्‍वासने देऊन राज्य सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली आहे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर १७ ऑक्टोबर या दिवशी ताशेरे ओढले.
१. उत्सवकाळातील ध्वनीप्रदूषण, तसेच उत्सवी मंडळांचे वाढते प्रमाण यांच्या विरोधात ठाणे येथील डॉ. महेश बेडेकर यांनी केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली.
       त्या वेळेस अतिरिक्त गृहसचिव के.पी. बक्षी यांनी स्वतः उपस्थित राहून सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर न्यायालयाने ताशेरे ओढले.
२. या वेळी शासनाच्या वतीने सांगण्यात आले की, संबंधित विदेशी आस्थापनाने ध्वनीमापक उपकरणे देण्यात दिरंगाई केल्याने त्यांच्याशी केलेला करार रहित केला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी ही उपकरणे उपलब्ध करता येऊ शकत नाहीत. शेवटी सरकारने मुदतवाढ मागितली.

फटाक्यांच्या अवैध दुकानांवर ८ दिवसांत कारवाई करा !

  • प्रत्येक गोष्ट न्यायालयानेच सांगितली पाहिजे, तर सरकार हवेच कशाला ? याऐवजी न्यायालयानेच राज्यकारभार करावा, असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ?
  • राष्ट्राची आर्थिक हानी करणार्‍या फटाक्यांवरच न्यायालयाने बंदी आणावी, ही राष्ट्रप्रेमी नागरिकांची अपेक्षा !
  • मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश
        मुंबई - फटाक्यांमुळे होणारी जीवितहानी ही गंभीर गोष्ट आहे. निवासी वसाहतींत अनुमती न घेता अवैध दुकाने थाटून फटाक्यांचा साठा आणि विक्री करणार्‍यांची केवळ अनुज्ञप्ती (परवाना) रहित करून भागणार नाही, तर त्यांच्यावर ८ दिवसांत कारवाईचा बडगा उगारा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. फटाक्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी निवासी वसाहतींमधील फटाक्यांच्या अवैध दुकानांवर कारवाईची मागणी करणारी जनहित याचिका नाशिकचे रहिवासी चंद्रकांत लासुरे यांनी उच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे. त्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपिठाने १७ ऑक्टोबर या दिवशी हे आदेश दिले.

संघाच्या स्वयंसेवकांना शस्त्र बाळगण्याची अनुमती द्या ! - कर्नाटकातील भाजप नेत्याची मागणी

      बेंगळुरू - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना सुरक्षा देणे जमत नसेल, तर त्यांना शस्त्र बाळगण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एस्. सुरेश कुमार यांनी केली आहे. संघाचे स्वयंसेवक रुद्रेश यांच्या हत्येच्या विरोधात शिवाजीनगर परिसरात मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी सुरेश कुमार बोलत होते. संघ आणि भाजप यांच्या वरिष्ठ नेत्यांनी या विधानाचे समर्थन केलेले नाही.
      सुरेश कुमार म्हणाले की, संघ स्वयंसेवक कुट्टप्पा, प्रवीण पुजारी, राजू आणि रुद्रेश यांच्या झालेल्या हत्यांवरून पोलीस त्यांना सुरक्षा देण्यात असक्षम आहेत, हे सिद्ध होत आहे. आम्ही पोलीस आयुक्तांकडे सुरक्षेसाठी शस्त्र बाळगण्याची अनुमती देण्याची मागणी केली आहे. या वक्तव्यावर प्रसारमाध्यमांनी स्पष्टीकरण मागितल्यानंतर सुरेश कुमार म्हणाले की, आम्ही पीडित नसून योद्धे आहोत. स्वतःची सुरक्षा कशी करावी, हे आम्हाला माहीत आहे. आरोपींच्या विरोधात कारवाई न करण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव आहे. संघाने म्हटले की, आमचा पोलीस आणि न्यायव्यवस्था यांवर विश्‍वास आहे. न्याय मिळवण्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करू.

जगभरात भारतीय सैन्याच्या पराक्रमाची चर्चा ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

        मंडी (हिमाचल प्रदेश) - भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची जगभरात चर्चा आहे. यापूर्वी इस्रायलच्या सैन्याची होत होती. आता भारतीय सैनिकांची होत आहे. पूर्ण देशाला भारतीय सैन्याच्या पराक्रमावर अभिमान आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथे तीन विद्युत प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी आयोजित सभेत ते बोलत होते. मोदी म्हणाले की, हिमाचल ही फक्त देवभूमी नसून, वीरभूमीसुद्धा आहे. येथील प्रत्येक कुटुंबातील नागरिक सैन्यात आहे. या सैनिकांंना मी नमन करतो. देवभूमीवर येऊन येथील नागरिकांना भेटण्याचे भाग्य मला मिळाले, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. मी काशीचा खासदार असून आज छोट्या काशीत येण्याची संधी मला मिळाली. आम्ही लोकसभा निवडणुकीत वन रँक वन पेन्शनचे आश्‍वासन दिले होते. आम्ही हे आश्‍वासन पूर्ण केले आहे.

भारतात चिनी वस्तूंवरील बहिष्कार यशस्वी होणार नाही ! - सर्वेक्षणाचा निष्कर्ष

हे सर्वेक्षण खोटे ठरवण्यासाठी भारतियांनी 
संघटित होऊन चिनी वस्तूंवर बहिष्कार घालावा !
     नवी देहली - भारतात चिनी उत्पादनांवरील बहिष्कार यशस्वी होणार नाही, असे इंडियास्पेंड संस्थेने केलेल्या विश्‍लेषणात म्हटले आहे.
१. चीन भारताचा सर्वात मोठा व्यावसायिक भागीदार देश आहे. भारताच्या एकूण आयातीतील सहावा भाग चीनमधून आयात होतो. त्याच वेळी भारतातून चीनमध्ये होणारी निर्यात अल्प होऊन अर्ध्यावर आली आहे.
२. मागील २ वर्षांत चीनमधून होणार्‍या आयातीत २० टक्क्यांहून अधिक वृद्धी झाली आहे.
३. मागील ५ वर्षांत यात ५ पट वाढ होऊन ६१ अब्ज डॉलर्स झाली आहे. यात पॉवर प्लँट पासून सेट बॉक्स आणि गणेश मूर्ती यांचाही समावेश आहे.

नोएडा येथे धर्मांधाने हिंदु नाव धारण करून युवतीची फसवणूक केली !

हिंदु तरुणींनो, लव्ह जिहादच्या धोक्यापासून सावध व्हा !
अश्‍लील छायाचित्रे पसरवण्याची धमकी देऊन मागितले १० लाख रुपये !
      नोएडा - येथे यासिर या धर्माधाने हिंदु नाव धारण करून हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पीडितेने विमानाच्या तिकिटासाठी त्याच्याकडे वैयक्तिक माहिती मागितल्यावर त्याचे खरे स्वरूप उघड झाले; परंतु पीडितेची अश्‍लील छायाचित्रे पसरवण्याची धमकी देऊन त्याने युवतीला फसवले आणि तिच्याकडून ५ लाख रुपये उकळले; परंतु त्याने अधिक पैशांची मागणी केल्यामुळे पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पीडितेने मानहानीपोटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांनी यासिरला सोडून दिले.

बेळगाव जिल्ह्यात गुंडांना सामोरे जाण्यासाठी तरुणी घेत आहेत लाठीकाठीचे प्रशिक्षण !

गुंड प्रवृत्तीला आळा न घालू शकणारी निरर्थक लोकशाही !
      बेळगाव (कर्नाटक) - बेळगाव जिल्ह्यातील तरुणींनी विनयभंग करणार्‍या गुंडांना सामोरे जाण्यासाठी लाठीकाठीचे प्रशिक्षण घेणे चालू केले आहे. बेळगाव जिल्ह्यातील वाघवाडे गावातील मुलींना बर्‍याच वर्षांपासून शेजारच्या मर्कंडे गावातील तरुणांकडून होणार्‍या लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. याविषयी वाघवाडे गावातून ५-६ विनयभंगाची प्रकरणे पोलिसांत नोंदवण्यात आली आहेत; मात्र पोलीस किंवा सरकार यांच्याकडून त्यांना कुठलेच साहाय्य मिळत नाही. (असे पोलीस आणि सरकार लोकशाही निरर्थक ठरवतात ! - संपादक) त्यामुळे या गावातील तरुणींनी स्वसंसरक्षणासाठी लाठीकाठीचे प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. शेजारच्या गावातील तरुण मोटरसायकलवरून येऊन मुलींना छळतात आणि नंतर पळ काढतात. गावातील महिला आणि वयस्कर पुरुष यांच्यावरही ते आक्रमण करतात, असा आरोप या तरुणींनी केला आहे.

हुबळी (कर्नाटक) येथे श्रीराम सेनेच्या दुर्गा दौड कार्यक्रमात रणरागिणी शाखेचा सहभाग

      हुबळी (कर्नाटक) - नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्रीराम सेनेकडून येथे आयोजित करण्यात आलेल्या दुर्गा दौड कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी या महिला शाखेने भाग घेतला. हुबळी-धारवाडच्या उपमहापौर सौ. लक्ष्मी उप्पार यांनी येथील मूरुसविरा मठामध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला श्रीराम सेनेचे बेळगाव जिल्हा संघटक श्री. रमाकांत कोंडोस्कर, रणरागिणी शाखेच्या कु. स्फुर्ति बेनेकवारी, श्री. मोहन गुरुस्वामी उपस्थित होते. श्रीराम सेनेचे श्री. राघवेंद्र कटरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि ओळख करून दिली. या वेळी कु. स्फुर्ति बेनेकवारी यांनी लव्ह जिहादच्या माध्यमातून होणारे धर्मांतर आणि प्रतिदिन वाढणारे महिलांवरील अत्याचार यांविषयी विचार मांडले. याबरोबरच त्यांनी नवरात्री उत्सव, दुर्गादेवीचा जप आणि धर्माचरण यांचे महत्त्व विषद केले.(म्हणे) ५ पती असणार्‍या हिंदु महिलांना मुलाचा बाप कोण हे माहीत नसते !

उत्तरप्रदेश राज्यात अशी विधाने करणार्‍यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावला जाणार नाही; 
मात्र इस्लामवर कथित टीका करणार्‍या हिंदूंच्या नेत्यांवर या कायद्यांतर्गत कारवाई केली जाते ! 
ऑल इंडिया इत्तेहादे मिल्लत काऊंसिलचे अध्यक्ष मौलाना तौकीर रजा यांचे संतापजनक विधान ! 
      बरेली (उत्तरप्रदेश) - हिंदु धर्मामध्ये एका महिलेला ५ पती असतात. तिला हेही माहिती नसते की, तिच्या मुलाचे वडील कोण आहेत ?, असे संतापजनक विधान ऑल इंडिया इत्तेहादे मिल्लत काऊंसिलचे अध्यक्ष मौलाना तौकीर रजा यांनी केले. मी हे अनेक ठिकाणी पाहिले आहे; मात्र कधी त्याविषयी बोललो नाही, असे स्पष्टीकरण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला; मात्र जर तुम्ही (हिंदु) तीनदा तलाकच्या सूत्रामध्ये हस्तक्षेप करणार असाल, तर आम्हीही तुमच्या प्रत्येक सूत्रात हस्तक्षेप करू, अशी धमकीही त्यांनी दिली. येथे आयोजित सामाजिक एकता सम्मेलन ते बोलत होते. या वेळी राष्ट्र्रीय लोकदल पक्षाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह उपस्थित होते.

मुंबईसह देशातील अतिमहत्त्वाच्या शहरांमध्ये अतीदक्षतेची चेतावणी !

      मुंबई - सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तय्यबा, हिजबुल मुजाहिद्दीन या आतंकवादी संघटना आक्रमण करण्याच्या सिद्धतेत असल्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे गृहमंत्रालयाकडून अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी पाकमधील आतंकवादी देशात घातपात घडवण्याचा कट रचत असल्याची माहिती समोर आली आहे.

भुवनेश्‍वरमध्ये रुग्णालयातील अतीदक्षता विभागाला लागलेल्या भीषण आगीमध्ये ३० रुग्णांचा मृत्यू !

      भुवनेश्‍वर/नवी देहली - भुवनेश्‍वरमधील सर्वांत मोठ्या सम रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागामध्ये १७ ऑक्टोबरला लागलेल्या आगीत ३० रुग्णांचा मृत्यू झाला. काही रुग्णांचा गुदमरल्याने, तर काहींचा होरपळून मृत्यू झाला. १०० हून अधिक जण घायाळ झाले आहेत. त्यातील २० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ४ मजली या रुग्णालयात १ सहस्र २०० खाटा आहेत. आग लागली तेव्हा ५०० रुग्ण दाखल होते.

पापुआ न्यू गिनी बेटांवर ६.८ तीव्रतेचा भूकंप !

      सिडनी - प्रशांत महासागरातील पापुआ न्यू गिनी या बेटावर १७ ऑक्टोबरला ६.९ तीव्रतेचा भूकंप झाला. न्यू ब्रिटेन बेटाच्या ३५ किलोमीटर खोल समुद्रात याचे केंद्र होते. 
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
      १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (प्रशांत महासागरातील पापुआ न्यू गिनी या बेटावर १७ ऑक्टोबरला ६.९ तीव्रतेचा भूकंप झाला. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

असुरक्षित देशांच्या सूचीत पाक चौथ्या क्रमांकावर !

काश्मीर घेण्याची भाषा करणार्‍या पाकने जगातील त्याची पत समजून घ्यावी !
      नवी देहली - जगात असुरक्षित देशांच्या सूचीत पाकचा चौथा क्रमांक लागतो, असे ग्लोबल ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टूरिझम्च्या वतीने घोषित करण्यात आलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. या आकडेवारीनुसार भारताचा तेरावा क्रमांक आहे. यापूर्वीही अमेरिकेतील इंटेलिजन्स थिंकटॅन्क इंटेल सेंटरने घोषित केलेल्या सूचीत पाकला जगातील पाचवा सर्वाधिक धोकादायक देश म्हटले होते.

माझ्यासाठी माझा देश सगळ्यात आधी आहे ! - मुकेश अंबानी, रिलायन्स इंडस्ट्रिज

     मुंबई - माझ्यासाठी माझा देश सगळ्यात आधी आहे, कला-संस्कृती वगैरे त्यानंतर येते, असे मत उद्योगपती तथा रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनी मांडले. एका कार्यक्रमात अंबानी यांना पाकच्या कलाकारांवर बंदी घालणे योग्य आहे का? असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. मी बुद्धीजिवी नसल्याने मला सगळ्या गोष्टींचे ज्ञान नाही; पण इतर भारतियांप्रमाणे माझ्यासाठी देशाच्या स्वाभिमानापेक्षा मोठे काही नाही, असा टोलाही त्यांनी पाक कलाकारांचे समर्थन करणार्‍या कलाकारांना लगावला.

चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासाठी पतंजली योग समितीच्या वतीने मुंबईत भव्य मोर्चा !

      मुंबई - चीन भारतातील अधिकाधिक पैसा उत्पादनांच्या विक्रीच्या माध्यमातून जमा करून तो पाकला भारतातील आतंकवादी कारवायांसाठी देत आहे. शत्रूराष्ट्र चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी पतंजली योग समितीच्या वतीने २२ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी चार वाजता मुंबईत भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. आझाद मैदान येथून हा मोर्चा निघून छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकापर्यंत जाईल. भारत स्वाभिमान, युवा भारत आणि किसान सेवा समिती या संघटनाही यात सहभागी होणार आहेत.

पाकला धडा शिकवण्यासाठी भारताकडून काबूल नदीचे पाणी अडवण्याचा प्रयत्न !

इतकी वर्षे असा प्रयत्न का झाला नाही ?
      नवी देहली - पाकला धडा शिकवण्यासाठी भारत अफगाणिस्तानमधून पाकमध्ये वाहणार्‍या काबूल नदीवर धरण बांधण्याचा विचार करत आहेत. धरण बांधून अडवलेले पाणी अफगाणिस्तानमध्ये सिंचन आणि वीज निर्मितीसाठी वापरण्याचा विचार करण्यात येत आहे.हेरगिरीच्या संशयावरून १५३ कबुतरे पकडली !

हेरगिरीसाठी पक्षांचाही वापर करणारा पाकिस्तान !
गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी
      जम्मू - येथे १५० कबुतरे नुकतीच पकडण्यात आली आहेत. ही कबुतरे पंजाब सीमेलगत असलेल्या पुलवामा जिल्ह्यातून तस्करीच्या माध्यमातून आणण्यात आली होती. नियंत्रण रेषेच्या पलिकडील गुप्तचर संस्थांना गोपनीय माहिती पोचवण्यासाठी या कबुतरांचा वापर करण्यात येणार होता, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कबुतरांना घेऊन जाणार्‍या लोकांच्या विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. याप्रकणी गुन्ह अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे.
     टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार जम्मूचे एसएस्पी सुनील गुप्ता यांनी सांगितले, काही दिवसापूर्वी चौकशी करतांना पोलिसांनी एका वाहनातून काही पेट्या जप्त केल्या. या पेट्यांमध्ये बंदिस्त असलेली १५३ कबुतरे तस्करीच्या माध्यमातून काश्मीरमध्ये नेण्यात येत होती. या कबुतरांच्या शरिरावर गुलाबी चिन्हे अंकित केलेली आढळून आली, तसेच त्यांना रिंग घालण्यात आली होती. पाकिस्तान काही अपारंपारिक पद्धतीने भारतात हेरगिरी करवून घेऊ शकतो, अशी शक्यता काही दिवसांपूर्वी जम्मूमध्ये भारतीय वायू सेनेने वर्तवली होती.मुसलमानांच्या लांगूलचालनाची एकही संधी न सोडणारे दिग्विजय सिंह म्हणतात, काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास मुसलमानांचे हित साधणार !

धर्माच्या आधारे समाजात फूट पाडणारी धर्मांध काँग्रेस !
      पणजी - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने चार मुसलमान उमेदवारांना तिकिटे द्यावीत, अशी मुसलमानांनी केलेली मागणी उचलून धरतांना अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव तथा काँग्रेसचे गोवा प्रभारी दिग्विजय सिंह यांनी मुसलमानांची ही मागणी आपण पक्षाच्या समन्वय समितीकडे मांडणार असल्याचे म्हटले आहे, तसेच काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास पक्ष मुसलमान समाजाचे हित साधणार असल्याचे म्हटले आहे. (गेल्या ६९ वर्षांत बहुतांश काळ काँग्रेसकडेच सत्ता होती, असे असतांनाही मुसलमान समाजाचे हित साधले गेले नाही, तर ते आता काय साध्य होणार, याचा मुसलमान समाजाने विचार करावा ! - संपादक)

सर्व धर्मियांसाठी समान कायदा असावा ! - अर्थमंत्री अरुण जेटली

सर्व धर्मियांसाठी समान कायदा असावा, 
असे सरकारला वाटते, तर ते समान नागरी कायदा लागू का करत नाही ?
      नवी देहली - सर्व धर्मियांसाठीचे वैयक्तिक कायदे समान असावेत, असे घटनेतच नमूद करण्यात आले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी येथे केले. तीन वेळा तलाक या तोंडी घटस्फोट पद्धतीविषयी त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकसंदर्भात एक पोस्ट फेसबूकवर टाकली आहे. बहुपत्नीकत्व आणि तोंडी तलाक पद्धत ही कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, असे केंद्र सरकारने अलीकडे सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
    जेटली पुढे म्हणतात की, तोंडी पद्धतीने घटस्फोट मिळणे, ही गोष्ट न्यायाला किंवा घटनेला धरून नाही. सध्या सर्वोच्च न्यायालायासमोरील याचिका ही या प्रथेच्या घटनासापेक्षतेविषयीची आहे. धर्मातील महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग म्हणून अशा चालिरितींकडे पहाणे चुकीचे आहे. समान नागरी कायद्याविषयी चर्चा चालू राहू शकते.सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्मप्रसार !

महाराष्ट्र समाज उज्जयिनीचा शरदोत्सव उत्साहात साजरा ! 
      उज्जैन, १८ ऑक्टोबर (वार्ता.) - महाराष्ट्र समाज उज्जयिनीच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने गायक आणि संगीत दिग्दर्शक श्री. दिलीप महाशब्दे आणि कनकश्री भट्ट यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सरस्वतीदेवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. या कार्यक्रमात भावगीत, अभंग, नाट्यगीत यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. येथील टिळक स्मृती मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मध्यप्रदेशच्या मराठी साहित्य अकादमीचे संचालक श्री. अश्‍विन खरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री. रविंद्र उज्जैनकर यांनी केले.

पाकिस्तानमध्ये ५ कोटी मनोरुग्ण !

पाकमध्ये लहानपणापासून देण्यात येणारी हिंसक शिकवण, 
गरिबी, अशांतता यांचा हा परिणाम आहे, असे म्हटल्यास नवल वाटणार नाही !
      कराची - पाकिस्तानमध्ये अनुमाने ५ कोटी लोक विविध मानसिक आजारांनी ग्रस्त असून दुर्दैवाने या देशात केवळ ४०० मानसोपचार तज्ञ डॉक्टर्स आहेत, असे मत आगा खान विद्यापिठाच्या मानसोपचार शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. आयेशा मियान यांनी व्यक्त केले. कराची येथील पत्रकार दालनात मानसिक आरोग्य या विषयावर पत्रकारांना संबोधित करतांना डॉ. मियान बोलत होत्या.
     या वेळी डॉ. मियान म्हणाल्या, मनोरुग्ण व्यक्ती जास्त हिंसक असतात, ते इतरांपेक्षा वेगळे दिसतात, ते कधीच सुधारू शकत नाही इत्यादी समजुती चुकीच्या आहेत. त्यामुळे मानसिक आजारातून बाहेर पडू पहाणार्‍यांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
     या मानसिक आजारातून मुक्तता मिळवण्यासाठी धडपडणार्‍या रुग्णांना कुटुंबातील इतर सदस्य, मित्रमंडळी आणि समाज यांनी साहाय्य केले पाहिजे. आपल्याला इतरांनी समजून घ्यावे, अशी त्यांची इच्छा असते. सगळेच मानसिक आजार आपण टाळू शकत नाही; मात्र बर्‍याच जणांच्या जीवनात आपण सकारात्मक पालट घडवून आणू शकतो.चीनमध्ये अद्भुत घटना : इमारतीच्या ढिगार्‍याखाली मृत वडिलांच्या मिठीत ३ वर्षीय मुलगी चमत्कारिकरीत्या बचावली !

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
      बीजिंग - चीनच्या झेजियांग प्रांतामध्ये एक इमारत कोसळून झालेल्या अपघातात ३ वर्षीय मुलगी चमत्कारिकरित्या बचावल्याची अद्भुत घटना नुकतीच येथे घडली. या इमारतीच्या ढिगार्‍याखाली सापडून २२ लोक ठार झाले होते. यामध्ये या ३ वर्षीय मुलीच्या आई-वडिलांचाही समावेश आहे. इमारतीच्या ढिगार्‍याखाली सापडून मृत्यूला सामोरे जाणार्‍या वडिलांनी वु निग्शी नावाच्या त्यांच्या ३ वर्षीय मुलीला मिठीत पकडून ठेवल्याने चमत्कारिकरित्या बचावली. मृत वडिलांनी मरता मरता प्रयत्नांची पराकाष्ठा करून मिठीच्या पोकळीत मुलीला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी मुलीला सुरक्षितपणे बाहेर काढले; मात्र तिचे वडील त्यापूर्वीच मृत्युमुखी पडले होते. ५ मजली इमारतीच्या ढिगार्‍याखालून जिवंत बाहेर काढलेली ती एकमेव मुलगी होती. मुलीच्या अंगावर अल्प जखमा झाल्या आहेत: मात्र ही घटना चमत्कारापेक्षा कमी नाही, असे मत साहाय्यकार्यात गुंतलेल्या स्वयंसेवकांनी व्यक्त केले. पंजाब, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतील तेल शुद्धीकरण आस्थापनांवर आतंकवादी आक्रमणाची शक्यता !

आतंकवादाने पोखरलेला भारत ! 
ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
        नवी देहली - गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार जिहादी आतंकवादी पंजाब, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतील तेल शुद्धीकरण आस्थापनांवर आक्रमण करण्याचे षड्यंत्र रचत आहेत. सर्जिकल स्ट्राईकचा सूड उगवण्यासाठी हे आक्रमण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या माहितीनंतर सर्व शुद्धीकरण आस्थापनांची सुरक्षा वाढवण्यासह अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. या आतंकवादी षड्यंत्रामागे जैश-ए-महंमद आणि लष्कर-ए-तोयबा असल्याचे म्हटले आहे.

लहान तोंडी मोठा घासवाले बिलावल भुत्तो म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात आणि काश्मीर यांचे कसाई !

       कराची - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात आणि काश्मीर राज्यांचे कसाई असून काश्मीर खोर्‍यातील अत्याचारांपासून लक्ष वळवण्यासाठीच ते पाकिस्तानला दोष देत आहेत, असे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो यांनी म्हटले आहे. (पाकिस्तानातील हिंदूंचा वंशसंहार करणारे तेथील सर्व राज्यकर्तेच कसाई आहेत ! - संपादक)
       येथील करसाझ भागातील मेळाव्यात बोलतांना भुट्टो यांनी मोदी यांचे वर्णन आतंकवादी असेही केले आणि त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवली जाऊ शकत नाही, असे सांगितले. (चोर तो चोर वर शिरजोर वृत्तीचे बिलावल भुत्तो ! - संपादक)

विश्‍वस्त मंडळाची निवडणूक खेळीमेळीत होण्यासाठी मठाधिपतीं कडून उमेदवारांना शपथ

देवस्थान विशस्त मंडळ म्हणजे कुस्तीचा आखाडा, असे 
समजणार्‍या विश्‍वस्तांपुढे संतांना शिष्टाई करण्याची वेळ का यावी ? 
धर्मशिक्षणाच्या अभावाचा परिणाम ! 
     सातारा, १८ ऑक्टोबर (वार्ता.) - अखिल महाराष्ट्राला परिचित असणार्‍या पुसेगाव येथील श्री सेवागिरी देवस्थान विश्‍वस्त मंडळाची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक २३ ऑक्टोबर या दिवशी आयोजित करण्यात आली आहे. विद्यमान मठाधिपती आणि विश्‍वस्त मंडळाचे पदसिद्ध विश्‍वस्त महंत प.पू. सुंदरगिरी महाराज यांनी निवडणूक रिंगणात उभे असलेल्या १९ उमेदवारांना ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडावी म्हणून शपथ दिली. 

न्यायालयाच्या आदेशावरील स्थगितीला मुदतवाढ !

हजीअली दर्ग्यात महिलांना मजारपर्यंत प्रवेशाचे प्रकरण
      मुंबई - हाजीअली दर्ग्यात महिलांना प्रवेशावरील बंदी रहित करण्याच्या आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीला सर्वोच्च न्यायालयाने २४ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. स्थगितीची मुदत पुढील सुनावणीपर्यंत वाढवण्यात यावी, ही हाजीअली दर्गा ट्रस्टच्या वतीने ज्येेष्ठ अधिवक्ता गोपाल सुब्रह्मण्यम् यांनी केलेली विनंती खंडपिठाने मान्य केली.
     महिलांना प्रवेशास असेलली बंदी उठवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या वतीने ही याचिका करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारे दर्गा ट्रस्ट या सूत्रावर पुरोगामी भूमिका घेईल, अशी आशा ७ ऑक्टोबरच्या सुनावणीत व्यक्त केली होती. त्यावर दर्ग्याच्या वतीने सुब्रह्मण्यम् यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन !

       श्रीनगर - पाक सैन्याने १७ ऑक्टोबरच्या मध्यरात्री पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत राजौरी तालुक्यातील नौशेरा सेक्टरमध्ये भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. रात्री साडेआठच्या सुमारास चालू झालेला गोळीबार रात्री दीड वाजेपर्यंत चालू होता. भारतीय सैनिकांनीही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. पाक सैन्याने ८२ एम्एम् मॉर्टरही फेकले. भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाककडून सीमेवर कुरापती चालूच आहेत.

फसवणुकीच्या प्रकरणी चीनमध्ये ४३ सहस्र लोकांना शिक्षा !

       बीजिंग - चीनने या वर्षी सप्टेंबरपर्यंत दूरसंचार आणि इंटरनेट या क्षेत्रांत फसवणूक करण्याच्या ७७ सहस्र तक्रारी सोडवल्या असून त्यात ४३ सहस्र लोकांना शिक्षा करण्यात आली आहे. शिक्षा करण्यात आलेल्यांमध्ये २०१५ च्या तुलनेत २.३ टक्के लोकांची संख्या अधिक आहे. (चीन जे करू शकतो, ते भारत कधीही करू शकणार नाही; कारण ज्यांना शिक्षा करण्याचा अधिकार आहे, तेही प्रामाणिक नाहीत ! - संपादक)

पाटण (जिल्हा सातारा) येथील नळ पाणी योजनेसाठी ४६ लक्ष रुपयांच्या निधीला मान्यता

     सातारा, १७ ऑक्टोबर (वार्ता.) - पाटण तालुक्यातील सद्यस्थितीतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून तो असुरक्षित पद्धतीने होत आहे. स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधींना भेटून याविषयी माहिती दिली होती. ही समस्या सोडवण्याच्या कामासाठी आमदार शंभूराजे देसाई यांनी पाठपुरावा घेऊन जिल्हाधिकार्‍यांकडून ४६.५७ लक्ष रुपयांचा निधी मान्य करून घेतला आहे. 

बांगलादेशची आतंकवादविरोधी कारवाई अन्य देशांसाठी आदर्श ! - नरेंद्र मोदी

गोव्यातील बिमस्टेक संमेलनात आतंकवादाविषयी सखोल चर्चा 
     पणजी, १८ ऑक्टोबर (वार्ता.) - बांगलादेशमध्ये हॉले आर्टिसन कॅफेवर जुलै २०१६ मध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी आतंकवाद मोडून काढण्यासाठी केलेल्या सर्वंकष कारवाईचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. आतंकवाद कसा मोडून काढावा, याचा आदर्श बांगलादेशने घालून दिला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी बिमस्टेक संमेलनात बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यासमवेत झालेल्या द्विस्तरीय बैठकीत म्हणाले. याविषयी विदेश व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

एम्आयएम्चा उमेदवार मनमाड नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरण्याची शक्यता !

१५ मिनिटांत हिंदूंना संपवण्याची भाषा करणार्‍या धर्मांध 
ओवैसी बंधूंच्या एम्आयएम्चा महाराष्ट्रात वाढता प्रभाव, ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा ! 
     मनमाड - येथील नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एम्आयएम् (मजलिस-ए-इत्तेहादुल-मुस्लिमिन) पक्षात येथील अकबर सोनावाला यांनी प्रवेश केला आहे. येत्या निवडणुकीत या पक्षाचा उमेदवार म्हणून ते येथून उभे रहाणार आहेत. (हिंदूंनो, इसिसच्या भारतातील हस्तकांना पाठिंबा देणार्‍या एम्आयएम्ला येथील निवडणुकीत मतपेटीच्या माध्यमातून जागा दाखवा ! - संपादक) 
       मनमाड शहरात या पुढील काळात या पक्षाचे नगरसेवक, आमदार, तसेच पक्षप्रमुख ओवैसी बंधूही येणार आहेत. अल्पसंख्यांक बहुजन समाजाला न्याय मिळवून देऊ, असे अकबर सोनावाला यांनी म्हटले आहे. सोनावाला परिवारातील सबिहा सोनावाला या येथील विद्यमान नगरसेविका आहेत.

ब्राह्मणद्वेष पसरवणार्‍यांच्या विरोधात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून तक्रार प्रविष्ट

पोलीस निरीक्षकांना निवेदन
देतांना महासंघाच्या महिला कार्यकर्त्या
     पुणे, १८ ऑक्टोबर - शिवप्रतिष्ठान संस्थेचे नागपूर येथील कार्यकर्ता शंकर चव्हाण यांनी फेसबूक या सामाजिक संकेतस्थळावरून ब्राह्मण समाज आणि महिला यांच्याविषयी अश्‍लाघ्य विधाने केली आहेत. याची गंभीर नोंद घेत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने येथील फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक दीपक पायगुडे यांच्याकडे १६ ऑक्टोबर या दिवशी चव्हाण यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. 
      या वेळी महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी चव्हाण यांच्यावर लवकरात लवकर कठोर करण्यात यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही सांगितले. महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री. विश्‍वजीत देशपांडे, जिल्हाध्यक्ष श्री. आनंद दवे, प्रदेश युवाध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत धडफळे, जिल्हा युवाध्यक्ष श्री. अविनाश कुलकर्णी, अधिवक्ता अर्चिता जोशी यांसह महासंघाचे अनेक पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. 
      शंकर चव्हाण यांच्या विरोधात आतापर्यंत रत्नागिरी, संभाजीनगर, बदलापूर आणि नागपूर या ठिकाणी पोलीस तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रप्रेमी नागरिकांनी फटाक्यांसह चीनच्या सर्वच उत्पादनांवर बहिष्कार घालावा ! - गजानन पाटील, श्रीशिवप्रतिष्ठान

सनातन संस्थेद्वारे आदर्श पद्धतीने दिवाळी साजरी करण्याविषयी प्रबोधन
डावीकडून श्री. संतोष देसाई, 
श्री. गजानन पाटील, सौ. मधुरा 
तोफखाने आणि अधिवक्त्या (सौ.) भारती जैन
      ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली), १८ ऑक्टोबर (वार्ता.) - दुसर्‍या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने जपानवर अणुबाँब टाकला. यानंतर आज जपानमध्ये अमेरिकेतील सुईपण विकली जात नाही. उरी आक्रमणानंतर पाकिस्तानच्या विरोधात सर्वच भारतियांच्या भावना तीव्र आहेत. अशा पाकिस्तानला आज चीन साहाय्य करत आहे. त्यामुळे जपानचा आदर्श ठेवत राष्ट्रप्रेमी नागरिकांनी फटाक्यांसह चीनच्या सर्वच उत्पादनांवर बहिष्कार घालावा, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. गजानन पाटील यांनी केले. येथील दत्त मंगल कार्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने फटाके विषयाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष पाटील, सनातन संस्थेच्या सौ. मधुरा तोफखाने आणि हिंदू विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या (सौ.) भारती जैन उपस्थित होत्या.

काश्मिरी हिंदूंच्या समर्थनासाठी पुणे शहर उभे ठाकले !

एकच ध्येय, एकच वचन ! काश्मीरमध्ये हवे हिंदूंचे सन्मानाने पुनर्वसन !! 
भाजपचे योगेश गोगावले यांना
निमंत्रण देतांना समितीचे कार्यकर्ते
     पुणे, १८ ऑक्टोबर (वार्ता.) - आम्ही काश्मिरी हिंदूंच्या समवेत आहोतच, काश्मीरमध्ये हिंदूंचे सन्मानाने पुनर्वसन झालेच पाहिजे, राष्ट्रकार्यात आम्ही सदैव सोबत आहोत, अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराच्या कालावधीत अनुभवायला मिळत आहेत. काश्मिरी हिंदूंप्रती नागरिकांमध्ये असलेला जिव्हाळा पाहून काश्मिरी हिंदूंच्या समर्थनासाठी जणू संपूर्ण पुणे शहरच उभे ठाकले असल्याचे वातावरण शहर आणि परिसरात निर्माण झाले आहे. येथील रमणबाग शाळेच्या पटांगणावर २३ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता पनून कश्मीर, हिंदु जनजागृती समिती, काश्मिरी हिंदु सभा, लष्कर-ए-हिंद आणि हिंदु एकता आंदोलन पक्ष यांच्या वतीने विराट हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या प्रसारासाठी समितीचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी, तरुण मंडळांचे कार्यकर्ते यांच्यासह खानावळी, अधिकोष, वसतीगृहे, उपहारगृहे, महाविद्यालये आदी ठिकाणी धर्मजागृती सभेचा प्रसार करत आहेत.

ठरावाच्या सूचीतून पाकिस्तानातील आतंकवादी संघटनांची नावे वगळली ?

'ब्रिक्स' परिषद !     
     'शत्रूचा शत्रू तो मित्र' या न्यायाने नेहमीच पाकचा कैवार घेणारा चीन, भारताशी मैत्री असल्याचे दाखवून पाकला साहाय्य करणारा रशिया भारतासाठी का लढतील ? आतातरी भारत इतरांवर विसंबून न रहाता पाकच्या विरोधात पावले उचलणार आहे का ? 
     नवी देहली - गोव्यात नुकतेच पार पडलेल्या 'ब्रिक्स' परिषदेच्या अंतिम ठरावामध्ये संयुक्त राष्ट्राने घोषित केलेल्या आतंकवादी संघटनांवर म्हणजेच 'लष्कर-ए-तोयबा', 'जैश-ए-महंमद' आदींवर कारवाई करण्याचे म्हटलेले असले, तरी या सूचीमध्ये या संघटनांची नावे नाहीत. या सूचीमध्ये केवळ चीन आणि रशिया यांना धोका असलेल्या 'इस्लामिक स्टेट' आणि 'अल्-कायदा'चे प्रतिनिधीत्व करणारी 'जमात अल् नुसरा' या आतंकवादी संघटनेचाच समावेश आहे, असे वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. 

'हिंदुत्वा'चा अर्थ लावणार्‍या २० वर्षांपूर्वीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा न्यायालय स्वतः फेरविचार करणार !

     नवी देहली - २० वर्षांपूर्वी मुंबईतील प्रसिद्ध विलेपार्ले पोटनिवडणुकीत धर्माचा राजकीय लाभासाठी गैरवापर करण्याविषयीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय आता फेरविचार करणार आहे. या निकालात न्यायालयाने 'हिंदुत्व ' या शब्दाची व्याख्या केली होती. 

रणरागिणी शाखेच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त केलेल्या प्रबोधनाचा ३०० हून अधिक भाविक महिलांकडून लाभ !

मार्गदर्शन करतांना सौ. गौरी खिलारे आणि भाविक महिला
     सांगली, १८ ऑक्टोबर (वार्ता.) - नवरात्रोेत्सवाच्या निमित्ताने रणरागिणी शाखेच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आले. यात नवरात्रोत्सव आणि देवीपूजनामागील शास्त्र सांगणे, याच समवेत कुंकूमार्चन, घागर फुंकणे, गरबा, भोंडला यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले आणि या कृती भाविक महिलांकडून करवून घेण्यात आल्या. हे कार्यक्रम कुरुंदवाड (जिल्हा कोल्हापूर), विश्रामबाग-सांगली येथे सौ. कांचन सूर्यवंशी यांच्या घरी, तसेच श्री. रमेश खिलारे यांच्या घरी घेण्यात आले. शास्त्रोक्त पद्धतीने नवरात्र साजरा केल्याने खूप आनंद मिळाला, अशी प्रतिक्रिया अनेक महिलांनी व्यक्त केली. तसेच बोरगाव येथेही प्रवचन घेण्यात आले. या सर्व ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांचा लाभ ३०० हून अधिक भाविक महिलांनी घेतला. बोरगाव येथे धर्मशिक्षण वर्गाची मागणी असून दिवाळीचे प्रवचन घ्यावे, अशी मागणीही करण्यात आली. 

भारतात चालू वर्षात आतापर्यंत १०० वाघांचा मृत्यू !

गायींचे रक्षण करू न शकणारे 
सरकार वाघांचे रक्षण काय करणार ?
       नवी देहली - भारताच्या वन्यजीव संरक्षण सोसायटीच्या माहितीनुसार २०१६ मध्ये आतापर्यंत १०० वाघांचा मृत्यू झाला आहे. यात ३६ वाघांची शिकार करण्यात आली. २०१५ मध्ये ९१ वाघांना मारण्यात आले होते.

कोथरूड (पुणे) येथे एका महिलेची पहाटे निर्घृण हत्या

पुण्यातील वाढती गुन्हेगारी !
      पुणे, १८ ऑक्टोबर - येथील कोथरूड भागातील राहुलनगरमध्ये १८ ऑक्टोबर या दिवशी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास शुभांगी खटावकर यांच्यावर अज्ञात व्यक्तीने आक्रमण करून निर्घृण हत्या केली. खटावकर या दुचाकीवरून कामावर जात असतांना त्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर वार केले. त्यामुळे खटावकर यांचा जागीच मृत्यू झाला. ही हत्या केल्यानंतर आक्रमणकर्ता हा खटावकर यांची दुचाकी घेऊन पसार झाला आहे. या प्रकरणी कोथरुड पोलीस अधिक तपास करत आहेत.

फलक प्रसिद्धीकरता

श्रीराम मंदिर होण्यासाठी हिंदूंना किती दिवस वाट पहावी लागणार ? 
     राममंदिराच्या उभारणीसाठी प्रयत्न करायला हवेत. रामायण संग्रहालयासारख्या 'लॉलीपॉप'ने काही होणार नाही, अशी टीका भाजपचे खासदार विनय कटियार यांनी केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या नियोजित रामायण संग्रहालयावर केली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : 
Hame Ramayan sangrahalay ka  'Lolipop' nahi, 
Rammandir chahiye. - Vinay Katiyar, sansad, BJP 
Hinduoka Ram mandir ka sapna kab pura hoga ?

 जागो ! : 
हमें रामायण संग्रहालय का 'लॉलीपॉप' नहीं, 
राम मन्दिर चाहिए । - विनय कटियार, सांसद, भाजपा 
हिन्दुआें का राम मन्दिर का सपना कब पूरा होगा ?

कायद्याचे भय संपल्याचे दर्शवणारी घटना !

      पुणे - येथील वाहतूक पोलीस हवालदार पांडुरंग पोकळे यांना शिवीगाळ करून वाद घालणार्‍या दोघांना हिंजवडी पोलिसांनी १६ ऑक्टोबर या दिवशी अटक केली. वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने नवनाथ नामदेव कौठाळे यांनी चारचाकी वाहन उभे केले होते. त्या वाहनाच्या चाकाला जॅमर लावला म्हणून कौठाळे आणि अक्षय सुनील हुलावळे यांनी पोकळे यांना शिवीगाळ करत वाद घातला. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

ठाणे पोलिसांकडून देवतांची चित्रे असलेल्या आणि अधिक आवाजाच्या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी

हा निर्णय स्तुत्य असला, तरी त्याची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक !
     ठाणे - दिवाळीत उडवण्यात येणार्‍या फटाक्यांमध्ये देवतांची चित्रे असलेले आणि १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाजाचे फटाके विक्री करणारे, तसेच ते उडवणारे यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत ठाणे पोलिसांनी दिले आहेत. तसेच अशा फटाक्यांच्या विक्रीवरही मनाई आदेश लागू केले आहेत. २५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत कोणत्याही व्यक्तीस त्रास अथवा हानी होईल, अशा प्रकारे कोणत्याही रस्त्यात किंवा इमारतीपासून ५० फुटांच्या आत फटाक्यांचे प्रदर्शन भरवणे अथवा वाजवणे यांवर बंदी घातली आहे. या आदेशांचे उल्लघंन करणार्‍यास ८ दिवसांचा तुरुंगवास अथवा १ सहस्र २५० रुपये इतका दंड अथवा संबंधित व्यक्ती दोन्ही शिक्षेस पात्र राहील, असे ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १७ ऑक्टोबर या दिवशी एका पत्रकाद्वारे कळवले आहे.
      हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था फटाक्यांच्या वेष्टनावरील देवतांच्या चित्रांच्या विडंबनाच्या विरोधात गेली काही वर्षे चळवळ राबवत आहे.पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

हिंदूंवर आक्रमण करणार्‍या 
मुसलमानांवर नव्हे, तर हिंदूंच्या विरोधात 
तक्रार नोंदवणारे पोलीस भारताचे कि पाकचे ?
       कोंढवा, पुणे येथील मेहतानगर परिसरातील कुष्ठरोग्यांच्या वसाहतीत केवळ दोन मुसलमान कुटुंबे रहातात; मात्र तोथील हिंदूंमध्ये भय माजवण्याचा प्रयत्न करत असतात. या मुसलमान कुटुंबांनी काही कारणास्तव जवळच्या परिसरातील मुसलमानांना ७.३.२०१३ या दिवशी एकत्र बोलावले. मुसलमानांच्या एका घरात मेजवानी झाडून झाल्यावर ४० मुसलमानांनी तेथील पटांगणावर खेळत असणार्‍या ८ ते १० हिंदूंवर सशस्त्र आक्रमण केले. त्यानंतर तेथे जमलेल्या हिंदूंनी मुसलमानांच्या आक्रमणाचा संघटितपणे प्रतिकार केला. त्यामुळे नमते घेत कालांतराने मुसलमानांनी तेथून काढता पाय घेतला. या प्रकरणी खडी मशीद पोलीस चौकी येथे गार्‍हाणे प्रविष्ट करण्यास गेलेल्या हिंदूंना पोलिसांनी कोणतीही दाद दिली नाही. याउलट मुसलमानांचे गार्‍हाणे मात्र लगेचच नोंदवून हिंदूंवर भा.दं.वि. कलम ३०७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिसांविषयी चांगले आणि वाईट अनुभव असल्यास 
वाचकांनी नजीकच्या दैनिक कार्यालयात कळवावेत !

काँग्रेसमुक्त भारत, जिहादमुक्त जग !

श्री. भाऊ तोरसेकर
१. पुरोगामी भूतकाळात अडकून पडणे नि 
मोदी जिहादमुक्त जगाच्या पथावर मार्गक्रमण करत असणे !
     ज्येष्ठ समाजवादी विचारवंत अशी ख्याती असलेले डॉ. कुमार सप्तर्षी यांनी एका लेखात पुरोगामी म्हणजे कोण, याची व्याख्या सांगितली होती. जो पुढे बघतो किंवा भविष्याकडे बघतो आणि भूतकाळात गुंतून पडलेला नसतो, अशा व्यक्तीला पुरोगामी म्हणतात, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र त्यांच्याच व्याख्येत ते किंवा त्यांच्या गोतावळ्यातले कोणी बसत नसावेत. कारण त्यांना अजूनही गांधीहत्येच्या भूतकाळातून बाहेर पडता आलेले नाही. सहाजिकच आज एकविसाव्या शतकात काय घडते आहे आणि राजकारण अन् समाजकारण कुठल्या जागी जाऊन पोहोचले आहे; त्याचा थांगपत्ता त्यांना लागू शकलेला नाही.

अभ्यास कसा करावा ?

परीक्षेच्या पार्श्‍वभूमीवर मुलांना मार्गदर्शक अशी लेखमालिका
     आजकाल बहुतेक मुले आईच्या आग्रहामुळे, बाबांच्या भीतीपोटी अन् एकमेकांमध्ये असलेल्या चढाओढीमुळे काहीशा तणावाखालीच अभ्यास करतांना दिसतात. अशा वेळी अभ्यास मनापासून होतोच, असे नाही. त्यामुळे परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही की, दुःख होते. त्यामुळे मुलांनो, अभ्यास करण्यामागील योग्य दृष्टीकोन समजून घेतला, तर अभ्यास कंटाळवाणा न वाटता आनंददायी वाटेल. अभ्यास करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत. त्याप्रमाणे अभ्यास केल्यास अभ्यास चांगला होतो. परीक्षेची भीती कशी घालवावी, उत्तरपत्रिका आत्मविश्‍वासाने कशी लिहावी, अभ्यासात एकाग्रता कशी साधावी आदींची माहिती सांगणारा हा लेखप्रपंच...

ओडिशा राज्यातील सप्टेंबर २०१६ मधील हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्याचा आढावा !

१. नवीन धर्मशिक्षणवर्ग चालू केल्यावर 
उपस्थितांपैकी दोघांनी ग्रंथ आणि सात्त्विक साहित्य विकत घेणे
      अधिवक्ता करमचंद जेना यांच्या घरी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यात आला. उभयतांनी अधिवक्ता करमचंद यांचे भाऊ, त्यांची बहीण आणि तिचे यजमान अन् काही मित्रांना या वर्गासाठी बोलावले होते. धर्मशिक्षणवर्गात सांगितलेल्या सूत्रांविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. वर्ग संपल्यावर उपस्थितांपैकी दोघांनी ग्रंथ आणि सात्त्विक साहित्य विकत घेतले. 
२. पितृपक्षामागील धर्मशास्त्र या विषयावर सत्संग !
     सौ. प्रमिला झा यांच्या घरी पितृपक्षाच्या निमित्ताने पितृपक्षामागील धर्मशास्त्र या विषयावर सत्संग घेऊन दत्ताचा नामजप करण्यात आला. सौ. झा हे सर्व कुटुंब वेदव्यास, राऊरकेला येथील सनातनच्या आश्रमात आरती आणि नामजपासाठी दोन वेळा उपस्थित राहिले. 
३. हिंदु सेनेच्या वतीने युवकांच्या बैठकीचे आयोजन
      राऊरकेला येथील भाजी मंडईमध्ये हिंदु सेनेच्या वतीने युवकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला ६० युवकांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये राष्ट्र आणि धर्म यांची सद्यस्थिती, कारणे अन् उपाययोजना या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे ओडिशाचे राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर यांनी ध्वनीचित्रफितीच्या (व्हीसीडीच्या) साहाय्याने मार्गदर्शन केले.
- श्री. प्रकाश मालोंडकर, राऊरकेला

सर्जिकल नव्हे; तर सर जिगरपासून वेगळे करणे, हाच शांतीचा मार्ग !

      उरी येथील पाकच्या आक्रमणाला भारताने सर्जिकल स्ट्राईकने दिलेल्या प्रत्युत्तरानंतर देशवासियांकडून व्यक्त करण्यात आलेले समाधान आणि साजरा करण्यात आलेला आनंद ही स्वाभाविक प्रतिक्रिया नागरिकांतील राष्ट्रप्रेमाचे द्योतक आहे. अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटणे, हे राष्ट्रचेतना जागृत असल्याचे द्योतक आहे; मात्र या कारवाईनंतर पाक वठणीवर येईल, असा भ्रम कुणाला होऊ नये. पाकचे बारसे झाल्यापासून भारतविरोधी कारवाया चालू झाल्या आहेत. आतापर्यंत पाकसोबत झालेल्या तीनही युद्धांत भारताने पाकला धूळ चारली आहे; मात्र पाकच्या आतंकवादी कारवाया न्यून न होता दिवसेंदिवस वाढल्याच आणि या वाढतच रहाणार. कारण पाकची निर्मितीच भारतद्वेषातून झाली आहे. द्वेषातून निर्माण झालेले हे अपत्य कधीही शांतीची भाषा करणार नाही.

समाज आणि राष्ट्र यांची भयावह स्थिती

      समाजजीवनात जीवनमूल्यांवरील निष्ठा फार क्षीण होत आहे. गुंडगिरी, भ्रष्टाचार, धर्म, श्रद्धा आणि संस्कृती यांचा उच्छाद करणारी मानसिकता, दैदीप्यमान इतिहासाचे विकृतीकरण करण्याची धडपड, परधर्मियांचे आक्रमण, त्यांचा सर्वत्र मुक्त संचार, जातीयतेचे भयानक विष, त्याचाही उपयोग स्वार्थासाठी करवून घेण्याची निंदास्पद मनोवृत्ती, प्रान्त-भाषा-शिक्षण-प्रादेशिक सीमा यांमुळे राष्ट्रीयतेवर फुटीरतेचे सावट, विचारवंतांची समाजपराङ्मुख उदासीन मनोवृत्ती, बेधुंद फंदफितुरी, राजकारणाचे गुन्हेगारीकरण, कर्तव्यांकडे पाठ फिरविण्याची वृत्ती, निष्क्रीय उदासीनता इत्यादी समस्या राक्षसी तांडव करीत आहेत. हिंदुस्थानात समाजजीवनाची ही स्थिती फार फार भयावह आहे. स्वतःला हिंदू म्हणविणारे आम्ही, संघटित होऊन प्रतिकार करण्याऐवजी अगतिक आणि हताश होऊन निष्क्रीयपणे पहात आहोत, सोसत आहोत. 
- श्री. अनिरुद्ध (संपादकीय, ज्ञानेश्‍वरी स्वर्णिमा, १३.५.२००७, वर्ष १, अंक ९, पृ. २, ३) या देशाला जे आपली मातृभूमी आणि पितृभूमी मानतात, ते सर्व हिंदू होत, असे सावरकरांनी सांगणे

      या देशाला जे आपली मातृभूमी आणि पितृभूमी मानतात, ते सर्व हिंदू होत, असे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटले आहे. हिंदुस्थानला हिंदु राष्ट्र म्हणणे म्हणजे संकुचितपणा आहे, असे म्हणणार्‍यांना स्वातंत्र्यवीर सावरकर विचारत की, संपूर्ण मानवतेच्या दृष्टीकोनातून आपण म्हणता ते इंडियन नेशन हीसुद्धा संकुचित कल्पना नाही का ? अधिक व्यापक दृष्टीतून विचार केला, तर सबंध पृथ्वी हीच आपली मातृभूमी आणि जग हे आपले राष्ट्र म्हणता येईल. एवढेच नव्हे तर पृथ्वीच्याही पलीकडे जाऊन संपूर्ण विश्‍व हे आपले राष्ट्र मानता येईल; परंतु राष्ट्राच्या व्यापक विचाराला असणार्‍या व्यवहाराच्या मर्यादेची जाणीवही स्वातंत्र्यवीर सावरकरांनी करून दिली. जोपर्यंत एक राष्ट्र दुसर्‍या राष्ट्रावर आक्रमण करत आहे, तोपर्यंत मानवतेच्याच हितासाठी सबंध जगाला एक राष्ट्र म्हणता येणार नाही. 
- केशव आचार्य (स्वातंत्र्यवीर शतकोेत्तर रौप्य जन्मोत्सव विशेषांक २००८) भारतमातेच्या वैर्‍यांना सरकारने क्षमा का करावी ?

१. अपरिपक्व युवकांवर राजकीय पक्षांकडून आपले 
स्वार्थी राजकारण लादण्यात येणे, ही स्थिती देशासाठी भयावह !
      अखंड भारत देशात राहून भारत माता की जय म्हणायला लाज वाटते अशा भारत मातेच्या वैर्‍यांना (शत्रूंना) सरकारने क्षमा करायची की नाही ? याचा निर्णय करण्याची वेळ सरकारवर आली आहे. रहायचे भारतात, पोट भरायचे भारतात, प्रसंग पडल्यावर मरायचेही भारतात, असे असूनही गोडवे गायचे मात्र पाकिस्तानचे ! आज-काल शिक्षण क्षेत्राकडे या धर्माधांनी आपला मोर्चा वळवलेला दिसतोय ! मग तो जेएनयूतील प्रकार असो नाहीतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधील प्रकार असो. हळूहळू देशातील युवकांना भ्रमीत करण्याचे कारस्थान चालू आहे. याचे संपूर्ण दायित्व येथील सर्वच राजकीय पक्षांकडे जाते !

नापाक पाकिस्तान !

        उरी येथील घटना म्हणजे महाभारतातील हताश कौरव आणि आंधळ्या सूडभावनेने पेटलेल्या अश्‍वत्थाम्याने पांडवपुत्रांची केलेल्या हत्याकांडासारखी घटना आहे. १८ हुतात्मा सैनिकांपैकी १४ सैनिक हे जिहाद्यांनी लावलेल्या आगीत जळाले. पाकस्थित जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेने याचे दायित्व घेतले. काश्मीरमध्ये संघर्ष कसा चालू आहे, हे ठळकपणे जगापुढे मांडण्याची पाकची नीती होती; परंतु त्यांच्या दुर्दैवाने घटनास्थळी पाक बनावटीचे रॉकेट लॉन्चर्स आणि पाक बनावटीची शस्त्रास्त्रे मिळाली. त्यामुळे पाकची नापाक कृती पुन्हा जगासमोर अधोरेखित झाली. सैन्य, आयएस्आय आणि आतंकवादी यांचा प्रभाव असणारा पाक मागील दोन दशकांपासून भारतीय भूमीत आतंकवादी घुसवण्याचे षड्यंत्र रचतोच आहे. पाकने आतापर्यंत आतंकवाद्यांचे लांगूलचालन केल्यामुळे लवकरच जगातील आतंकवादी संघटना त्याला त्यांचे हक्काचे माहेरघर बनवतील. भारताबरोबर झालेल्या मागील ४ युद्धांमधील पराभवामुळे पाकिस्तानने पारंपरिक युद्धाचा प्रकार बाजूला ठेवून अपारंपरिक युद्ध आरंभले आहे. भ्याड आक्रमणाची ही पाकनीती हळूहळू जगाला ज्ञात होत आहे. बलुचिस्तानी जनतेवर पाक करत असलेले अत्याचार आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर मुत्सद्दीपणाने निदर्शनास आणणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशविदेशात दौरे करून सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. जोडण्याची कला हे त्यांचे वैशिष्ट्य ग्लोबल प्लॅटफार्मवर (जागतिक पातळीवर) उपयोगी पडू शकेल. - श्री. चंद्रशेखर गुरव, कोल्हापूर.

शारीरिक व्याधींवर आधी वैद्यकीय उपचार करून पहा आणि उपचार करूनही दुखणे बरे होत नसेल, तरच त्यावरील आध्यात्मिक उपाय उन्नत जाणकारांना विचारा !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
     अनेकदा साधकांना दात दुखणे, पोटात असह्य यातना होणे, डोके दुखणे, डोळे दुखणे, दृष्टी न्यून होणे, यांसारख्या व्याधींनाही सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात एक अनुभव आला. एका आश्रमात एका साधिकेची दाढ दुखत होती. दंतवैद्यांकडे जायची भीती वाटते; म्हणून तिने त्यांच्याकडे जाण्याचे टाळले आणि रात्रभर आपल्या दाढेचे दुखणे बरे व्हावे, अशी श्रीकृष्णाला प्रार्थना केली. तिने सांगितले, दंतवैद्यांपेक्षा देवच माझे दुखणे बरे करील, असा मला विश्‍वास वाटतो. हे सर्व खरे असले, तरी हीसुद्धा एक सात्त्विक भावनाच झाली. साधकांनी असे न करता त्वरित दवाखान्यात जाऊन दात दुखणे यासारख्या व्याधीवर उपचार करून घ्यावेत. जे दुखणे आधुनिक वैद्यांकडे गेल्यावर लगेचच बरे होते, त्यासाठी देवाची शक्ती व्यय करायला नको. यात आपलीही साधना व्यय होते. असे करणे साधकांनी टाळावे. प्रत्येक दुखण्याचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक असे तीन स्तरांवर असते. शारीरिक दुखण्यांवर त्वरित वैद्यकीय उपचार करून घ्यावेत, नाहीतर पुढे आपत्कालात आधुनिक वैद्य मिळणेही दुरापास्त होईल. आधुनिक वैद्यांच्या माध्यमातून देवच मला बरे करणार आहे, असा भाव ठेवून उपचार केल्यास आधुनिक वैद्यांची मनात वाटत असलेली भीतीही संपेल.
     साधना करतांना नेहमी योग्य दृष्टीकोन ठेवून ती केली पाहिजे आणि इतर साधक सांगतात, ते ऐकून लगेचच दंतवैद्यांकडे जाऊन उपचार केले पाहिजेत.

साधकांनो, आध्यात्मिक त्रासावर उपाय करण्याचे क्रियमाण चुकवू नका !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
(सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ
     आपत्कालात त्रासांची तीव्रता वाढत आहे. अनेक साधकांना काही न सुचणे, विस्मरण होणे, शारीरिक व्याधीमुळे सेवेवर परिणाम होणे, तसेच मनात साधना सोडून देण्याचे विचार येणे, असे त्रास होत आहेत. यावर उपाय म्हणून साधकांनी उत्तरदायी साधकांनी अथवा संबंधित संतांनी सांगितलेले उपाय आपल्याकडून नियमित होत आहेत ना ?, याकडे लक्ष द्यावे. बर्‍याचदा साधक आपले नियमित उपाय करत नाहीत, असे आढळून येत आहे. महर्षींनी सांगितले आहे, प.पू. डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला तंतोतंत पाळायची आहे. पुढे आपत्कालाची तीव्रता वाढतच जाणार आहे. उपाय केले नाहीत आणि आपले क्रियमाण चुकवले, तर त्याला देव काय करणार ?
- (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, कांचीपूरम्, तमिळनाडू. (१६.१०.२०१६, रात्री ७.३१)


एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या एका साधिकेला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१. ध्यानमंदिरात असलेल्या छायाचित्रातील प.पू. भक्तराज महाराज
साधिकेकडे पाहून स्मित करत असल्याचे जाणवणे
     २६.७.२०१६ या दिवशी मी ध्यानमंदिरात नामजपासाठी गेले होते. तेथील प.पू. बाबांच्या (प.पू. भक्तराज महाराज यांच्या) छायाचित्राकडे पाहिल्यावर ते माझ्याकडे पाहून स्मित करत आहेत, असे मला जाणवले. त्यांचे छायाचित्र जिवंत झाले असून ते माझ्याशी बोलत आहेत, असे मला वाटले. हे सर्व अद्भुत होते.
२. नामजप करतांना मी तुझ्याजवळच आहे, असे ईश्‍वर सांगत असल्याचे जाणवून
भाव जागृत होणे आणि प्रत्येकामध्ये ईश्‍वर दिसत असल्याचे अनुभवणे
     २८.७.२०१६ या दिवशी कार्यशाळेच्या सकाळच्या सत्रात सामूहिक प्रार्थना करत असतांना माझा भाव जागृत झाला. मी ईश्‍वराला प्रार्थना केली, माझ्यासमवेत रहा आणि मला तुझे अस्तित्व दाखव. मला प्रत्येकामध्ये तुला अनुभवता येऊ दे. त्यानंतर मी नामजप करत असतांना ईश्‍वर मला त्याच्या कवेत घेऊन कुरवाळत आहे, असे मला अनुभवायला आलेेे. मी तुझ्याजवळच आहे. तू केवळ पहा, मी तुला दिसेन, असे तो सांगत असल्याचे मला जाणवले. त्यामुळे माझा भाव जागृत होऊन माझ्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. मला या स्थितीतून बाहेर येऊच नये, असे वाटत होते.
     माझी ही स्थिती पाहून श्‍वेताताईंनी (सौ. श्‍वेता क्लार्क यांनी) मला त्याविषयी कार्यशाळेत सांगण्यास सांगितले; पण मला ते जमले नाही. त्यानंतर कार्यशाळेत एखादा साधक बोलत असतांना ईश्‍वर माझ्या कानात हळू आवाजात पहा, मी तुझ्याजवळच आहे, असे सांगत असल्याचे मला जाणवत होते.

प.पू. डॉक्टरांकडून ब्राह्मतेज मिळवण्यासाठी त्यांना अपेक्षित असे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन अन् भावजागृती यांसाठी प्रयत्न करा !

श्री. व्यंकटेश अय्यंगार
१. वसिष्ठऋषींनी त्यांच्या अरण्यातील आश्रमात राजा विश्‍वामित्र
यांचे यथायोग्य आदरातिथ्य करणे आणि त्यामागे
कामधेनु गाय असल्याचे विश्‍वामित्र यांना कळणे
     महर्षि विश्‍वामित्र जेव्हा राजा होते, तेव्हा ते एकदा वसिष्ठऋषींच्या अरण्यात असलेल्या आश्रमात गेले होते. तेथे वसिष्ठऋषींनी त्यांचे यथायोग्य आदरातिथ्य केले. त्यांच्या आदरातिथ्याने विश्‍वामित्र संतुष्ट झाले; पण अशा अरण्यात वसिष्ठऋषि एवढे चांगले आदरातिथ्य कसे करू शकतात ?, असा प्रश्‍न त्यांच्या मनात आला. तेव्हा त्यांना कळले की, इंद्राने वसिष्ठऋषींना दिलेल्या कामधेनु गायीमुळे (जे मागेल ते देणार्‍या गायीमुळे) त्यांना हे शक्य होते.
२. कामधेनु देण्यास नकार दिल्याने विश्‍वामित्रांनी वसिष्ठऋषींशी युद्ध करणे; पण
त्यांच्यातील ब्राह्मतेजाने राजा पराभूत झाल्याने राजाने ब्राह्मतेजाचे महत्त्व विशद करणे
     आश्रमातून परत जातांना राजा विश्‍वामित्रांनी वसिष्ठऋषींना ती कामधेनु मागितली; पण वसिष्ठऋषींनी ती देण्यास नकार दिला. तेव्हा विश्‍वामित्रांना क्रोध आला आणि त्यांनी युद्ध करून ती गाय बलपूर्वक मिळवण्याचा प्रयत्न केला; पण वसिष्ठऋषींनी आपल्या ब्रह्मदंडाने विश्‍वामित्रांच्या सैन्याला पराभूत केले. यामुळे विश्‍वामित्र आश्‍चर्यचकित झाले.

होणारे त्रास आणि त्यांवर केलेले आध्यात्मिक उपाय यांचे नियमित लिखाण करा !

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
     साधकांनी त्यांना होत असलेले त्रास आणि त्यांवर सांगितलेले आध्यात्मिक उपाय यांचे लिखाण नियमित करायला हवे. हे लिखाण करणे पुढील कारणांसाठी महत्त्वपूर्ण आणि आवश्यक आहे.
१. व्यष्टी साधनेसाठी लाभदायक !
१ अ. त्रास आणि त्यांवरील आध्यात्मिक उपाय, याच्या माहितीचा पुढे त्रासाच्या वेळी उपयोग होणे : हे लिखाण नियमितपणे केल्याने आपल्याला दिवसभरात कोणकोणते त्रास झाले आणि त्यांवर कोणकोणते आध्यात्मिक उपाय केले, याची माहिती आपल्याकडे जमते. पुढे जेव्हा तशाच प्रकारचे त्रास आपल्याला होतात, तेव्हा या माहितीचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. यामुळे आपण थोडेफार स्वावलंबी बनू शकतो.
१ आ. त्रासाला कारणीभूत असलेल्या स्वभावदोष, अहं इत्यादी कारणांचे चिंतन होऊन आपल्यात सतर्कता येणे : लिखाण केल्याने आपल्याला झालेले त्रास कोणत्या कारणांमुळे झाले, याचे आपल्याकडून चिंतन होते. त्यामुळे या त्रासांना आपले स्वभावदोष, अहं कारणीभूत आहेत का ? कि आपण आध्यात्मिक उपायांकडे दुर्लक्ष केले; म्हणून आपल्याला हे त्रास झाले इत्यादी कारणे कळतात. त्यामुळे पुढे आपण सतर्क राहू शकतो. अध्यात्मशास्त्रानुसार आपला एखादा स्वभावदोष आणि त्यामुळे होणारा विशिष्ट त्रास, हे समीकरण ठरलेलेच आहे.
१ इ. आपले प्रबळ स्वभावदोष कोणते ?, हे कळणे : लिखाणामुळे आपल्या एखाद्या त्रासाची वारंवारता कळते आणि त्यामागे असलेले आपले प्रबळ स्वभावदोष कळतात. त्यामुळे त्या स्वभावदोषांवर आपल्याला प्रामुख्याने लक्ष देता येते.
१ ई. आपली त्रासाशी लढण्याची क्षमता कळणे : आध्यात्मिक उपायांमुळे आपला त्रास किती वेळात न्यून झाला, हेही आपल्या लक्षात येते. त्यावरून आपली त्रासाशी लढण्याची क्षमता वाढत आहे का ?, हे आपल्या लक्षात येते.

कु. वर्षा जबडे यांना रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरातील देवतांकडे पाहून सुचलेले विचार

कु. वर्षा जबडे
१. ध्यानमंदिरातील देवतांना पाहून देवतांच्या परिवारात
असल्यासारखे वाटणे आणि देवाने सुचवल्याप्रमाणे मनातले
विचार देवतांना सांगितल्यावर मनाला समाधान मिळणे
     मी ध्यानमंदिरात उपायांसाठी बसले होते. ध्यानमंदिरातील अष्टदेवता, श्री महालक्ष्मीदेवी, महर्षि, अन्य देवता यांची चित्रे आणि श्री भवानीदेवीची मूर्ती यांकडे पाहून माझ्या मनात विचार आला, आपण देवतांच्या परिवारातच आहोत. मला ध्यानमंदिरातील सर्व देवता जागृत असल्याचे जाणवत होते. मला देवाने सुचवले, काही वेळा आपल्याला कुणाच्या तरी आधाराची आवश्यकता वाटतेे. आपल्याला मनातील काहीही सांगायचे असेल, तर आपण आपल्या परिवारातील सदस्यांना सांगतो. तसे आपण कोणत्याही देवतांना सांगू शकतो. ध्यानमंदिरातील देवता जागृत असल्याने त्या मी सांगत असलेले विचार ऐकून त्यावर योग्य काय असायला हवे, ते सुचवत होत्या. हे सर्व अनुभवतांना मला वेगळेच समाधान मिळत होते. त्यामुळे मन उत्साही झाले आणि माझ्या प्रयत्नांना दिशा मिळाली. कलियुगात देवतांच्या परिवारात रहाण्यास मिळणेे, हे केवळ प.पू. गुरुमाऊलीमुळेच शक्य होत आहे.
२. व्यष्टी साधनेच्या तुपाने समष्टी साधनेची ज्योत प्रज्वलित करायची असल्याचे देवाने सुचवणे
      एकदा मी ध्यानमंदिरात नामजप करण्यासाठी बसले होते. त्या वेळी माझे लक्ष श्री महालक्ष्मीदेवीच्या चित्रासमोर लावलेल्या निरांंजनाकडे गेले. त्याची ज्योत स्थिर होती. त्या वेळी देवाने सुचवले, ती ज्योत दिव्यातील तुपामुळे स्थिर आहे.

प.पू. भक्तराज महाराज यांचा अध्यात्मप्रसार जगभर करायचा आहे, हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प.पू. डॉक्टरांंनी घेतलेले परिश्रम आणि साधकांना चैतन्याने जोडणारी अद्वितीय गुरुमाऊली !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
३. प.पू. डॉक्टरांवरील श्रद्धेमुळे साधकांना आलेल्या अनुभूती
३ अ. साधकांची तळमळ आणि श्रद्धा
     गुरुपौर्णिमा जवळ आल्यावर अनेक साधक सुट्टी (रजा) घेऊन सेवेत सहभागी व्हायचे. एकदा एका साधकाला सुट्टी (रजा) मिळाली नाही, तर त्याने चाकरीचा राजीनामा दिला. गुरुपौर्णिमा झाल्यावर त्याला दुसरीकडे चांगल्या पगाराची त्वरित चाकरी मिळाली, अशा अनेक अनुभूती अनेक साधकांना आल्या.
श्री. अशोक लिमकर
३ आ. साधनेमुळे स्वीकारण्याची क्षमता वाढणे
     एका गुरुपौर्णिमेला ३०० विशेषांक शिल्लक होते. वेळ अपुरा असल्याने ४ - ५ साधकांचे बसस्थानकावर सकाळी आणि संध्याकाळी २ घंटे थांबून अंक वितरीत करण्याचे नियोजन केले होते. सकाळी ९.३० वाजता मी विशेषांकाचा गठ्ठा घेऊन सांगली बसस्थानकाजवळ अंक वितरीत करतांना माझ्या गावातली सुपरिचीत व्यक्ती जवळ येऊन म्हणाली, अरे ! अशोक, पेपर विकत आहेस का ? बँकेत काही अफरातफर केलीस का ? तुला नोकरीवरून काढून टाकले आहे का ? त्यावर शांत राहून त्या व्यक्तीला संस्थेविषयी सर्व सांगता आले. त्याला विशेषांक देऊन वाचण्यास सांगितले. समाजातील लोकांच्या अशा प्रतिक्रियाही शांतपणे स्वीकारण्याची क्षमता प.पू. डॉक्टरांनीच दिली.
४. प.पू. डॉक्टरांची साधकांवरील प्रीती
४ अ. साधकांच्या काळजीपोटी कार्याला दुय्यम प्राधान्य देणारी गुरुमाऊली !
     १९९७-९८ मध्ये प.पू. डॉक्टरांच्या अनेक ठिकाणी जाहीर सभा झाल्या. सभांचा आरंभ सांगली जिल्ह्यातून झाला. नोव्हेंबरमध्ये जत या गावी सभेची पूर्ण सिद्धता झाल्यावर संकेत नसतांना १५ ते २० मिनिटे पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

गुरुकार्याची तीव्र तळमळ आणि त्यासाठी सर्व प्रकारचा त्याग करण्याची सिद्धता असलेल्या सांगली येथील सौ. विद्या जाखोटिया (वय ५६ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सौ. विद्या जाखोटिया यांचा सत्कार करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये (डावीकडे)
     मिरज - तीव्र शारीरिक त्रास असूनही त्यावर तळमळीने मात करणार्‍या आणि प्रेमभाव, त्याग, सतत सेवेचा विचार, भाव हे गुण असलेल्या सांगली येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. विद्या (भाभी) सुरेश जाखोटिया (वय ५६ वर्षे) यांनी १७ ऑक्टोबर या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सनातन संस्थेच्या ब्राह्मणपुरी येथील आश्रमात झालेल्या एका सत्संगात ही घोषणा केली. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. दिवाळीच्या काही दिवस अगोदर सांगली जिल्ह्याला श्रीकृष्णाने भेट दिल्याने सर्वच साधकांनी कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी सौ. जाखोटिया यांचे पती ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सुरेश जाखोटिया हेही उपस्थित होते.
सतत सकारात्मक विचार करून गुरुदेवांना आवडेल अशी सेवा करा ! - सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
     या वेळी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये म्हणाल्या, आपण सर्वजण श्रीकृष्णाचे भक्त आहोत, तसेच श्रीगुरूंनीही आपल्याला भरभरून दिले आहे. त्यामुळे आपण नेहमी नकारात्मक विचार टाळून सतत सकारात्मक विचार करून गुरुदेवांना आवडेल अशी सेवा केली पाहिजे.
     या वेळी सौ. जाखोटिया यांनी त्यांचा साधनेतील प्रवास, येणार्‍या अडचणी, नातेवाइकांकडे गेल्यावरही सतत साधनेचे विचार ठेवून तिथे केलेल्या कृती, तसेच भावाच्या स्तरावर केलेले प्रयत्न विशद केले.

भावस्थिती टिकवून ठेवण्याचे महत्त्व !

     काही दिवसांपासून मी मनात येणार्‍या प्रत्येक विचाराची नोंद करून त्या मागील दोष आणि अहं यांचा अभ्यास करण्याचे ठरवले. तेव्हा पुष्कळ अहंयुक्त विचार येऊन माझे मन अस्थिर होत होते. मी भावस्थितीत असायचे, तेव्हा मन स्थिर राहून आनंद जाणवत असे. त्या वेळी लक्षात आले, दोष आणि अहं यांचा तलाव आहे. त्या तलावातील एक कमळाचे फूल म्हणजे भावस्थिती. मी त्या कमळाच्या फुलावरून बाजूला झाले की, दोष आणि अहं यांच्या तलावात डुंबते. यावरून मला भावस्थिती टिकवून ठेवण्याचे महत्त्व लक्षात आले.
- कु. वर्षा जबडे (१५.५.२०१६)

धर्मप्रसाराची तळमळ असणारी आणि चुकांची खंत वाटणारी ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पनवेल येथील कु. इंद्रश्री भावे (वय ८ वर्षे) !

कु. इंद्रश्री भावे
१. मनातले सर्व सांगणे
      कु. इंद्रश्री शाळेत जायला लागल्यावर आम्ही दोघांनीही तिला प्रेमाने समजावून सांगितले, तुझ्या वर्गात तुझे मित्र-मैत्रिणी असतीलच; पण आई-बाबा हे सगळ्यांत जवळचे आणि कायमचे मित्र-मैत्रीण असतात. आपण मित्र-मैत्रिणीला मनातले सगळे सांगतो. तेव्हापासून इंद्रश्रीला एक चांगली सवय लागली, ती म्हणजे ती मनातला प्रत्येक विचार, शाळेतील घटना, खेळतांनाचे प्रसंग इत्यादी सगळे त्या त्या वेळी आम्हा दोघांनाही सांगू लागली.
२. प्रसंग स्वीकारणे
     मध्यंतरी इंद्रश्रीच्या शाळेत क्रीडास्पर्धा झाल्या. त्यात तिला कुठल्याही खेळात पारितोषिक मिळाले नाही. याविषयी मी तिला विचारल्यावर ती म्हणाली, आई, या वेळी माझे प्रयत्न अल्प पडले; पण पुढच्या वर्षी मी प्रयत्न वाढवीन आणि बक्षीस आणीन. तिच्या बोलण्यात स्थिरता होती. बक्षीस न मिळाल्याचे तिला वाईट वाटले नाही. स्वतःचेे प्रयत्न न्यून पडले, हे तिच्या मनाने स्वीकारले आणि आणखी प्रयत्न करायचे, हेही तिने ठरवले.

प्रेमळ आणि चुकांविषयी गांभीर्य असलेली ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कुडाळ, सिंधुदुर्ग येथील कु. वैदेही मनोजकुमार खाडये (वय १० वर्षे) !

कु. वैदेही खाडये
      (वर्ष २०१५ मध्ये वैदेहीची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती. - संकलक)
      आश्‍विन कृष्ण पक्ष चतुर्थी (१९.१०.२०१६) या दिवशी कु. वैदेही खाडये हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
कु. वैदेही खाडये हिला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. प्रेमभाव
अ. एकदा माझ्या हाताचे बोट दाराच्या कडीत चिमटले होते. तेव्हा वैदेहीनेे माझी इतक्या प्रेमाने विचारपूस केली की, मला तिचा फार आधार वाटला.

साधकांनो, दीपावली आणि कार्तिकी एकादशी यांच्या निमित्ताने लावण्यात येणार्‍या ग्रंथप्रदर्शनातून सनातन-निर्मित ग्रंथसंपदा सर्वदूर पोचवा !

     दीपावली आणि कार्तिकी एकादशी यांच्या निमित्ताने पुढील ग्रंथ, लघुग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांच्या वितरणासाठी विशेष प्रयत्न करावेत.
१. ग्रंथ
अ. पूजासाहित्याचे महत्त्व
आ. पूजेपूर्वीची वैयक्तिक सिद्धता
इ. देवपूजेपूर्वीची सिद्धता
ई. पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र
उ. देवळात दर्शन कसे घ्यावे ? (भाग १ आणि २)
ऊ. सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र
ए. धार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र
ऐ. शक्ति (भाग १ आणि २)
ओ. अलंकारशास्त्र
अं. स्त्रियांच्या अलंकारांमागील शास्त्र (बिंदीपासून कर्णभूषणांपर्यंतचे अलंकार)
क. कंठभूषणांपासून मेखलेपर्यंतचे अलंकार
ख. हाता-पायांत घालायचे अलंकार
ग. सात्त्विक रांगोळ्या - भाग १
घ. विष्णु आणि विष्णूची रूपे
च. श्रीविष्णु
२. लघुग्रंथ
अ. शक्ति (अध्यात्मशास्त्रीय ज्ञान)
आ. करवीरनिवासीनी श्री महालक्ष्मीदेवी 
इ. श्री सरस्वतीदेवी
ई. देवीपूजनाचे शास्त्र
उ. श्रीकृष्ण (अध्यात्मशास्त्रीय ज्ञान

शब्द नाही या प्रीतीला, श्रीगुरुचरणी सदैव राही ।

प.पू. बाबा (प.पू. भक्तराज महाराज) म्हणतात,
श्री गुरूंनी दिधल्या मुक्ती चारी ।
तेच श्रीगुरु आमुचा हात धरी ॥ १ ॥ 

श्रीगुरूंची प्रीती पहाता ।
बोलायला शब्द न उरले आता ॥ २ ॥
 
काही न उरले आता श्री गुरुराया ।
सगळे घेतले, सर्व दिले ॥ ३ ॥
 
या भावंडांना कोटी कोटी उपकृत केले ।
काय मागू आता शब्द नाही ओठी ॥ ४ ॥
 
अपार अपार कृतज्ञता मज बोलवेना काही ।
शब्द नाही या प्रीतीला, श्रीगुरुचरणी सदैव राही ॥ ५ ॥

सुप्रिया नावाचा सुचलेला भावार्थ
सु : सुटका सर्वातून केली ।
प्रि : प्रिय श्रीकृष्णाला झाली ।
या : याच जन्मी मुक्त झाली ।
- श्री. शशिकांत गजेंद्र टोणपे (कु. सुप्रियाचा भाऊ), पिंपरी-चिंचवड, पुणे. (२८.८.२०१६)

विद्यार्थी-साधकांनो, दीपावलीच्या सुटीच्या काळात चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवून सर्वांगीण विकास साधणार्‍या विविध सेवांमध्ये सहभागी व्हा !

१. राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी वेळ देणे, ही काळाची आवश्यकता !
     भावी आपत्कालीन स्थिती निर्माण होण्यापूर्वी धर्मप्रसार आणि सनातनच्या संशोधनाचे कार्य समाजापर्यंतच नाही, तर जगात सर्वत्र अधिकाधिक पोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे शिक्षण, तसेच अन्य व्यावहारिक कामे सांभाळून अधिकाधिक वेळ राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी देणे काळाची आवश्यकता आहे.
२. पालकांनो, १३ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या साधक-पाल्यांना सुटीत आश्रमात पाठवा !
     थोड्याच दिवसांत शाळा आणि महाविद्यालये यांमधील विद्यार्थ्यांना दीपावलीची सुटी लागेल. या कालावधीत १३ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या साधक-पाल्यांना सेवेत सहभागी होण्यासाठी सनातनच्या रामनाथी (गोवा), देवद (पनवेल) येथील आश्रमात अथवा मंगळुरू (कर्नाटक) सेवाकेंद्रात पाठवता येईल. आश्रमांमध्ये विविध सेवा उपलब्ध आहेत.
३. आश्रमातील सेवा
३ अ. सनातन-निर्मित ग्रंथांच्या संदर्भातील १. मराठी भाषेत टंकलेखन करणे
२. लिखाणाचे भाषांतर, तसेच भाषाशुद्धी करणे
३. ग्रंथसंरचना करणे
४. ग्रंथासाठीची मुखपृष्ठे बनवण्यासाठी संगणकीय छायाचित्रांवर काम करणे
५. रेखाचित्रे (आऊटलाईन्स्) सिद्ध करणे
६. सात्त्विक कलाकृती सिद्ध करणे
७. छायाचित्रांचे वर्गीकरण करणे
३ आ. नियतकालिक विषयक १. वृत्तांचे संकलन करणे
२. विज्ञापनांची (जाहिरातींची) संरचना

सनातनने धर्मप्रसारासाठी बनवलेल्या आकाशकंदिलात थर्माकोलचा वापर करण्यामागील उद्देश लक्षात घ्या !

     श्री गणेशोत्सवात श्री गणेशाची सात्त्विकता अधिकाधिक मिळावी, यासाठी त्याच्या मूर्तीभोवती थर्माकोलने आरास न करता नैसर्गिक वस्तूंनी, उदा. पाने, फुले इत्यादींनी आरास करावी, अशी सूचना देण्यात आली होती. यावरून सनातनने दिवाळीसाठी आकाशकंदील थर्माकोलचा कसा काय बनवला, अशी शंका काहींच्या मनात आली. त्याचे उत्तर पुढीलप्रमाणे देता येईल.
     कृतीपेक्षा त्या कृतीमागील उद्देश महत्त्वाचा असतो, या तत्त्वानुसार सनातनने आकाशकंदील शोभेसाठी बनवला नसून धर्मप्रसारासाठी बनवला आहे. त्यामुळेच त्यावरील लिखाण धर्मजागृतीपर आहे. धर्मजागृतीचा उद्देश सहजसाध्य व्हावा, यासाठी त्याच्यामध्ये थर्माकोलचा सांगाडा म्हणून वापर केला आहे आणि त्यावर धर्मप्रसाराचा उद्बोधक लिखाण चिकटवले आहे. म्हणजेच थर्माकोलचा वापर आकाशकंदील आकर्षक दिसण्यासाठी केलेला नसून धर्मप्रसारासाठीचे एक माध्यम म्हणून केला आहे. आकाशकंदिलातील थर्माकोलचा सांगाडा सात्त्विक लिखाणानेे पूर्णपणे झाकला जात असल्यामुळे त्यातून सात्त्विकता प्रक्षेपित होते.

साधकांनो, येणार्‍या आपत्काळाची तीव्रता लक्षात घ्या आणि आध्यात्मिक उपाय गांभीर्याने करा !

१. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांना झालेले आध्यात्मिक त्रास - तोंडवळा थकल्याप्रमाणे होणे, सेवेनिमित्त चर्चा करतांना गळा पकडल्याप्रमाणे जाणवून बोलणेच अशक्य होणे आणि आध्यात्मिक उपाय केल्यानंतर तीन दिवसांनी थोड्या प्रमाणात बरे वाटणे : 'हिंदु जनजागृती समितीच्या प्रसारकार्याच्या निमित्ताने मी उत्तर भारतात असतो. पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी मी गोवा येथील रामनाथी आश्रमात आल्यानंतर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देण्यासाठी झालेल्या चित्रीकरणामध्ये माझा तोंडवळा पुष्कळ थकल्याप्रमाणे आणि वातावरणात कार्यरत असलेल्या त्रासदायक शक्तीमुळे काळपट झाल्याचे लक्षात आले. काही वेळा सेवेनिमित्त चर्चा करतांना माझा गळा पकडल्याप्रमाणे जाणवून मला बाहेरील रज-तमात्मक वातावरणामुळे बोलणेच अशक्य झाले होते. आध्यात्मिक उपाय केल्यानंतर तीन दिवसांनी मला थोड्या प्रमाणात बरे वाटले.' - पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. 
       साधकांनो, तुम्ही राष्ट्र आणि धर्म यांसाठी सर्वस्वाचा त्याग करत आहात. त्यामुळे भगवंत तुम्हाला आपत्काळात तारून तर नेईलच; पण तो तुम्हाला आपले करून घेईल, याची खात्री बाळगा !
       क्रांती ही सीतेसारखी असते. राम वनवासात जातो, तेव्हा ती त्याच्यासोबत असते आणि तो जेव्हा राजवैभव भोगू लागतो, तेव्हा ती भूमिगत होते.
- ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
हास्यास्पद साम्यवाद !
       अध्यात्मातील प्रारब्ध या शब्दाकडे आणि ईश्‍वराकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे साम्यवाद १०० वर्षांतच समाप्त व्हायला आला आहे !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
देवाकडे ऐहिक सुख मागू नये 
     मुलाने विष मागितले, तरी आई आणि डॉक्टर त्याला विष देत नाहीत. तसेच देवही ऐहिक सुख देत नाही; कारण त्याला ठाऊक असते की, हे त्याला पेलवणार नाही. म्हणून देवाकडे भीक (ऐहिक सुख) मागण्यात अर्थ नाही. 
भावार्थ : देव, म्हणजे गुरु, हे देवापासून दूर नेणारे ऐहिक सुख देत नाहीत. देवापासून दूर जाणे हे साधकाच्या दृष्टीने मरणच होय; म्हणून ऐहिक सुख हे विषासमान मानले आहे. (संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण.') 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

चुकीतून शिकणे महत्त्वाचे ! 
मानवी आयुष्यात कालक्रमण करतांना चुका घडतातच; पण प्रत्येक 
चुकीपासून आपण काहीतरी शिकलो, तर पुढील आयुष्य यशस्वी होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

राष्ट्रघातकी मेनन !

संपादकीय
      राष्ट्राच्या सुरक्षेला कुठल्या राष्ट्रांपासून धोका उद्भवतो आणि तो टाळण्यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, याविषयी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पंतप्रधानांना सल्ला देतात. सध्या हे पद श्री. अजित डोवाल भूषवत आहेत. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या पदाला एक वलय प्राप्त झाले. पाकच्या राजकीय वर्तुळात, तसेच पाक सैन्यातही त्यांच्या नावाने बोटे मोडली जातात. याला त्यांचे कार्यकर्तृत्व कारणीभूत आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. डोवाल यांच्या आधी या पदावर शिवशंकर मेनन आरूढ होेते. हा कालावधी साधारण जानेवारी २०११ ते मे २०१४ असा होता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn