Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

पंत महाराज पुण्यतिथी, बाळेकुंद्री, बेळगाव

बिहारमधील ६ जिल्ह्यांत धर्मांधांनी दुर्गामूर्ती विसर्जनावर आक्रमण केल्याने तणाव !

हिंदु सहिष्णु असल्यामुळे त्यांच्या धार्मिक 
 मिरवणुकीवर धर्मांधांकडून आक्रमण होऊनही ते शांत रहातात ! 
 हिंदूंनी त्यांच्या धार्मिक मिरवणुकीचे पोलीस रक्षण करू 
शकत नसल्याने मिरवणूक काढतांना सुरक्षेच्या उपाययोजनाही केल्या पाहिजेत ! 
     पाटलीपुत्र (पाटणा) - बिहार राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणुकीवर मोहरमच्या मिरवणुकीतील धर्मांधांनी आक्रमण केल्याने जातीय तणाव निर्माण झाला आहे, असे पोलिसांच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. या घटनांत पोलिसांसह ८ जण घायाळ झाले. या दंगलींमुळे गोपालगंज, भोजपूर, मधुबनी, पूर्व चम्पारण, मधेपुरा आणि किशनगंज या जिल्ह्यांतील जनजीवनावर परिणाम झाला. वरील सर्व जिल्ह्यांत कलम १४४ नुसार जमावबंदीचे आदेश देण्यात आले. या प्रकरणी ५२ जणांना अटक करण्यात आली. 

बंगालमध्ये दुर्गामूर्ती विसर्जनाच्या दिवशी धर्मांधांनी अनेक गावांत दंगली घडवल्या !

ममता(बानो) बॅनर्जी सरकारच्या राज्यात हिंदु असुरक्षित ! 
मुसलमानबहुल भागांतून हिंदूंचे पलायन !
या दंगलींविषयी देशातील कोणत्याही प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले नाही; मात्र अन्य
 धर्मियांवर एक दगड जरी भिरकावण्यात आला, तरी त्यांना आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी दिली जाते !
     कोलकाता - बंगाल राज्यात मोहरम, दुर्गापूजा आणि दुर्गामूर्ती विसर्जनाच्या प्रसंगी अनेक गावांत जातीय दंगली घडवून आणण्यात धर्मांधांनी पुढाकार घेतला. 
१. खङ्गपूर येथील गोलबझार येथे रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत घडलेल्या घटनांत ३ हिंदूंना भोसकण्यात आले. विसर्जन मिरवणुकींवर पेट्रोल बॉम्ब फेकणे, लुटालूट, मंदिरे, वाहने, घरे, दुकाने यांची जाळपोळ असे हिंसाचाराचे अनेक प्रकार घडले. दंगली शमवण्यात पोलिसांना अपयश आल्याने शीघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आले. शहरातील दुकाने आणि कार्यालये सतत ३ दिवस बंद होती. हाजीनगर आणि हलीशहर येथील मुसलमानबहुल भागातील हिंदूंनी पलायन करण्यास प्रारंभ केला आहे. 

गंधवानी (मध्यप्रदेश) येथे २०० धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण

हिंदू असंघटित असल्यामुळेच त्यांच्यावर पुनःपुन्हा धर्मांधांकडून मार खाण्याची वेळ येते ! 
  • आक्रमणाला विरोध करणार्‍या हिंदूंवर सशस्त्र आक्रमण
  • २ हिंदूंची प्रकृती गंभीर देवीचे यज्ञकुंड लाथांनी तोडले !
      गंधवानी (मध्यप्रदेश) - येथील आवळीपुरा भागात २०० धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले. (भाजप शासित मध्यप्रदेशचे इस्लामिस्तान झाले, असे समजायचे का ? राज्यात हिंदूंना अभय देण्यासाठी आणि धर्मांधांवर वचक बसण्यासाठी भाजप शासन काय पावले उचलणार ? - संपादक) त्यांनी देवीचे पूजन करण्यासाठी बनवण्यात आलेले जळते यज्ञकुंड लाथा मारून तोडले. (असे धर्मांध हे आधुनिक गझनीच होत ! भारतात कुठेही धर्मांध कायदा हातात घेण्याचे दुःसाहस करतात, हे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी त्यांना वारंवार डोक्यावर घेतल्याचे फलित ! - संपादक) याला विरोध केल्यावर त्यांनी हिंदूंवर सशस्त्र आक्रमण केले, तसेच दगडफेकही केली. या वेळी अनेक हिंदू घायाळ झाले. धर्मांधांनी नितेश बैरागी आणि राजू गोविंद सीरवी यांना घेरून त्यांच्यावर तलवारीने वार केले. नितेश बैरागी या तरुणाचा हात मनगटापासून तोडला, तर राजू सीरवी गंभीर घायाळ झाला आहे. दोघांचीही स्थिती गंभीर आहे. धर्मांधाने एका पोलिसावरही आक्रमण करून त्याला गंभीर घायाळ केले आहे. (धर्मांधांकडून मार खाणारे पोलीस आतंकवाद्यांपासून समाजाचे रक्षण काय करणार ? - संपादक) 
      अखलाख याच्या हत्येनंतर उर बडवणारी प्रसारमाध्यमे या वृत्ताला प्रसिद्धी देणार नाहीत, तसेच पुरस्कार वापसी करणारी टोळीही काही कृती करणार नाही, हे लक्षात घ्या ! हिंदूंचे संघटन, हेच सर्व समस्यांवर उत्तर होय ! - संपादक

सनातन संस्थेवर बंदीचा कोणताही प्रस्ताव केंद्रशासनाकडे नाही ! - किरेन रिजीजू, केंद्रीय गृहराज्यमंत्री

सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणारे तथाकथित 
पुरो(अधो)गामी आणि धर्मद्रोही यांना सणसणीत चपराक ! 
शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील
 यांनी लिहिलेल्या पत्रावर केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांचे लिखित उत्तर 
     पुणे, १७ ऑक्टोबर (वार्ता.) - केंद्रशासनाकडून सनातन संस्थेला कोणत्याही प्रकारे 'कायद्याद्रोही संघटना' असे घोषित करण्यात आलेले नाही, तसेच सद्यस्थितीत केंद्रशासनाकडे सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव आणि विचार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. किरेन रिजीजू यांनी शिवसेनेचे खासदार श्री. शिवाजीराव आढळराव-पाटील यांना ३ ऑक्टोबर या दिवशी लिहिलेल्या पत्रात केले आहे. 

केवळ विकासाच्या सूत्रावरून निवडणूक जिंकता येत नसल्याने भाजपने उत्तरप्रदेशमध्ये राममंदिरचे सूत्र घ्यावे ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

'ज्या राजकीय पक्षांना अयोध्येत राममंदिर बांधता 
आले नाही, ते कधी रामराज्य (आदर्श राज्य) देऊ शकतील का ?' 
     प्रयाग - केवळ विकासाच्या सूत्रावर कोणताही पक्ष निवडणुका जिंकू शकत नाही. पी.व्ही. नरसिंह राव यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रचंड विकासकामे केली होती; पण त्यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. अटलबिहारी वाजपेयी यांनीही वर्ष २००४ ची निवडणूक विकासाच्या सूत्रावर लढवली; पण त्यांनाही हार पत्करावी लागली. त्यामुळे उत्तरप्रदेशात भाजप विकासाचाचे सूत्र चालवणार असेल, तर ते चुकीचे ठरेल. विकासाबरोबरच ठराविक मुदतीत राममंदिर बांधण्याचे आश्‍वासन दिले आणि लोकांमध्ये तसा विश्‍वास निर्माण केला, तर उत्तरप्रदेशमध्ये सत्तेत येण्याची संधी भाजपला आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले आहे.

मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीमुळे देश मागास ! - केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह

      नवी देहली - भारत शिक्षणात अग्रणी होता; मात्र लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीमुळे भारत मागास राहिला. त्यामुळे भारतीय संस्कृतीवरही परिणाम झाला. तो आपण आज भोगत आहोत, असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांनी केले. (मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीला झुगारून गुरुकुल शिक्षणपद्धतीचे पुनरुज्जीवन होण्यासाठी केंद्रशासनाने पाऊले उचलावी, अशी राष्ट्राभिमान्यांची अपेक्षा आहे. - संपादक) सिंह पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर आयुर्वेदावर लक्ष दिले गेले असते, तर औषधी वनस्पतींमुळे विविध रोगांवर औषधे बनवली गेली असती. त्यामुळे आरोग्य क्षेत्राला व्यवसायिक रूप आले नसते.निवडणूक न्यासांना आता सरकारी उपक्रम आणि विदेशी संस्था यांच्याकडून देणग्या घेता येणार नाहीत !

निवडणुकांना कोट्यवधी रुपये लागतात. त्यामुळे राजकीय पक्ष दुसर्‍या मार्गाने 
देणग्या मिळवणार नाहीत कशावरून ? त्यामुळे निवडणूक प्रणालीच का पालटत नाही ?
     नवी देहली - आयकर विभागाने राजकीय पक्षांना मिळणार्‍या आर्थिक देणग्यांविषयीचे नियम अधिक कडक केले आहेत. विभागाने सरकारी उपक्रम आणि विदेशी संस्था यांच्याकडून निवडणूक न्यासांना मिळत असलेल्या आर्थिक देणग्यांवरही बंदी घातली आहे. देणग्या मिळण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध न्यासांची निर्मिती करण्यात येते. आयकर विभागाने आय टी कायद्यातील नियम १७ सीएमध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार ५० टक्क्यांहून अधिक शेअरधारक असणार्‍या विदेशी आणि भारतीय आस्थापनांकडूनही या न्यासांना देणग्या स्वीकारता येणार नाहीत. यापूर्वीही निवडणूक न्यासांना विदेशी लोकांकडून, तसेच विदेशी संस्थांशी संबंधित व्यक्तींपासून देणग्या मिळवण्याची अनुमती नव्हती.

भूकग्रस्त देशांच्या सूचीमध्ये भारत ९७ व्या स्थानी !

७० वर्षांच्या लोकशाहीचे अपयश !
      नवी देहली - जगभरातील भूकग्रस्त देशांच्या सूचीमध्ये एकूण ११८ देश अंतर्भूत असून त्यामध्ये भारताचा भूक निर्देशांक ९७ वर आहे. सर्वांत जलदगतीने वाढणारी एक अर्थव्यवस्था असल्याचा दावा करणारा भारत लहान मुलांचे पोषण करू शकत नाही, ही वस्तूस्थिती ग्लोबल हंगर इन्डेक्स (जीएच्आय) ने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून परत एकदा जगासमोर आली आहे. ग्लोबल हंगर इन्डेक्स ही संघटना विविद देशांतील भूक स्थितीचा आढावा घेऊन त्याविषयी आकडेवारीसह अहवाल प्रसिद्ध करते. भारताची भूकस्थिती खूप गंभीर असल्याचे या अहवालात म्हटले आहे. (जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न पहाणार्‍या भारताने प्रथम जनतेच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी प्रयत्न करावेत ! - संपादक) भूक आणि कुपोषण यांत पाकिस्तानची स्थिती भारतापेक्षाही वाईट आहे. या सूचीमध्ये पाकचा क्रमांक १०७ आहे.

बिकानेर (राजस्थान) येथून पाकच्या दोन हेरांना अटक !

      बिकानेर - येथील सीमेलगतच्या खाजूवाला भागातून सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी सुभाष आणि सुरेंद्र या दोन हेरांना कह्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले आहे. पोलीस त्यांची चौकशी करत आहे. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघे गाववाल्यांना २५ लाख रुपये देऊन सीमा सुरक्षा दलाची माहिती मागत होते. येथेच काही दिवसांपूर्वी काश्मीरमधून येणार्‍या सफरचंदांवर पाकचे समर्थन करणारा मजकूर लिहिण्यात आला होता.

'तुमचे मित्र मुसलमान बनले, तर त्यांना काय करावे लागेल ?'

केरळमध्ये डॉ. झाकीर नाईक यांच्या शाळेतील पुस्तकातील प्रश्‍न ! 
     नवी देहली / कोची - आतंकवाद्यांसाठी आदर्श बनलेल्या डॉ. झाकीर नाईक यांच्या केरळमधील कोची येथे असलेल्या 'पीस इंटरनॅशनल स्कूल'च्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकात धर्माच्या आधारावर प्रश्‍न विचारण्यात आले आहेत. पुस्तकात एक प्रश्‍न आहे की, कल्पना करा, 'आपला चांगला मित्र अ‍ॅडम/सुजान याने मुसलमान बनण्याचे ठरवले, तर त्याला काय करावे लागेल ?' या प्रश्‍नासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. धर्मांतर करून मुसलमान बनवणे, हाच यामागे उद्देश असल्याचा आरोप या शाळेवर करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शाळेची चौकशी चालू केली आहे. 

सीमेवरील चकमकीत २४ वर्षीय सैनिक हुतात्मा !

भारतीय सैनिक हुतात्मा होत असतांना सर्जिकल स्टाईकचा सैन्याला किती लाभ झाला 
आणि त्याचा राजकीय लाभ किती उठवला जात आहे, याचाही आता विचार व्हायला हवा ! 
     जम्मू - जम्मूतील राजौरी भागात नियंत्रणरेषेजवळ १६ ऑक्टोबरला सायंकाळी पाक सैनिकांनी केलेल्या गोळीबारात भारतीय सैनिक सुदीस कुमार हे हुतात्मा झाले आहेत. सुदीस कुमार हे केवळ २४ वर्षांचे होते.

मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्येही पाकिस्तानी चित्रपट दाखवण्याला विरोध

भारतात पाकिस्तानी चित्रपट न दाखवण्यासाठी केंद्र शासन कठोर भूमिका घेईल का ?
      मुंबई - पाकिस्तानी कलाकारांना केला जाणारा विरोध हा वाढत चालला असून आता मुंबईमध्ये होणार्‍या मामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पाकिस्तानी चित्रपट दाखवण्यालाही विरोध केला जात आहे. येथील संघर्ष फाऊण्डेशनने अंबोली येथील पोलीस ठाण्यामध्ये एक पत्र लिहून प्रदर्शनाची माहिती दिली आहे. (राष्ट्रप्रेमासाठी पाकिस्तानी चित्रपटांना विरोधाची भूमिका घेणार्‍या संघर्ष फाऊण्डेशनचे अभिनंदन ! - संपादक)
    त्या पत्रानुसार २० ऑक्टोबरला मुंबईमध्ये एका मल्टिप्लेक्समध्ये चालू होणार्‍या मामी महोत्सवात पाकिस्तानचा जागो हुआ सवेरा हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. आतंकवादी कारवायांना पाकिस्तान ज्याप्रमाणे खतपाणी घालत आहे, त्याकडे बघता भारतात पाकिस्तानी चित्रपट दाखवण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी होत आहे.अनंतनाग येथे आतंकवाद्यांनी पोलिसांच्या बंदुका पळवल्या !

बंदुका पळवण्यात आल्या कि पोलिसांनी स्वतःहूनच दिल्या ? 
स्वतःची बंदूक सांभाळू न शकणारे काश्मिरी पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ? 
     श्रीनगर - काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील टीव्ही टॉवरच्या पहार्‍यावर असलेल्या ५ पोलीस कर्मचार्‍यांच्या बंदुका आतंकवाद्यांनी पळवून नेल्याची घटना १६ ऑक्टोबरच्या रात्री घडली. आतंकवादी संख्येने अधिक, तसेच शस्त्रसज्ज असल्याने पोलिसांना प्रतिकार करता आला नाही.

ओमर अब्दुल्ला यांना न्यूयॉर्क विमानतळावर अडवले !

ओमर अब्दुल्ला यांना का अडवले जाते, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे !
     न्यूयॉर्क - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना अमेरिकेतील न्यूयॉर्क विमानतळावर तपासणीसाठी २ घंटे अडवून ठेवण्यात आले. अब्दुल्ला यांची अमेरिकेतील विमानतळावर अडवणूक होण्याची ही तिसरी वेळ आहे. या प्रकारानंतर अब्दुल्ला यांनी ट्विटद्वारे त्यांचा संताप व्यक्त केला आहे.


आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घाला ! - योगऋषी रामदेवबाबा यांचे आवाहन

संतांच्या या राष्ट्रप्रेमी आवाहनाला जनतेने प्रतिसाद देऊन कर्तव्य बजावावे ! 
     नवी देहली - आतंकवाद्यांना पाठीशी घालणार्‍या चीनला धडा शिकवण्यासाठी चीनच्या वस्तूंवर जनतेने बहिष्कार घालावा, असे आवाहन योगऋषी रामदेवबाबा यांनी केले आहे. योगऋषी रामदेवबाबा म्हणाले, "आमच्या घरात भगवान राम आणि कृष्ण यांच्या मूर्तीही आता चीनमधून येऊ लागल्या आहेत. दिवाळीतील दिव्यांच्या माळा चीनमधून येऊ लागल्या आहेत. या वस्तूंमुळे देशाची एकता आणि अखंडता यांना धोका निर्माण झाला आहे. सध्या देशात चीनच्या विरोधात जनमत झाल्याने अनेक ठिकाणी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात आला आहे. चीन पाकला साहाय्य करत असल्याने, तसेच अणूपुरवठा देशांच्या गटात भारताला प्रवेश देण्याला विरोध केल्यामुळे जनतेकडून चीनला विरोध होत आहे."

उत्तराखंड आणि तिबेट येथे भूकंप !

     देहरादून - उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यात १७ ऑक्टोबरला सकाळी भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्र पिथौरागड-नेपाळ सीमेवर भूमीखाली १० कि.मी. अंतरावर होता. याची तीव्रता ३.३ इतकी होती. यात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. याचबरोबर चीनच्या तिबेटमध्येही भूकंपाचे धक्के बसले. याची तीव्रता ६.२ इतकी होती. गेल्या एक महिन्यातील हा दुसरा धक्का होता. 
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
     १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यात १७ ऑक्टोबरला सकाळी भूकंपाचे धक्के बसले. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

तीनदा तलाक आणि बहुपत्नीत्व यांना अनेक मुसलमान महिला संघटनांचा विरोध, तर समान नागरी कायद्याला पाठिंबा !

महिलांच्या अधिकारासाठी, समानतेसाठी प्रसिद्धीलोलुप 
आंदोलने करणार्‍या तृप्ती देसाई आणि त्यांच्या संघटना तीनदा 
तलाक आणि बहुपत्नीत्व यांसारख्या समस्यांच्या वेळी कुठल्या बिळात लपून बसतात ?
      लक्ष्मणपुरी (लखनौ) - मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने भारतात पुरुषप्रधान संस्कृती लादण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्याला अनेक वेळा मुसलमान महिला कार्यकर्त्या आणि संघटना यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तसेच भारतात समान नागरी कायदा आणण्याच्या केंद्र शासनाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात तीन वेळा तलाक आणि बहुपत्नीत्व यांना समर्थन देणारे शपथपत्र प्रविष्ट केले आहे. तसेच राष्ट्रीय कायदा आयोगाने समान नागरी कायद्यावर नागरिकांची मते आजमावण्यासाठी चालू केलेल्या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन बोर्डाने सर्व मुसलमानांना केले आहे.

विज्ञान प्रगत झाल्याचे वाटत असले, तरी जुने तंत्रज्ञान मागासलेले नव्हते, हे यावरून दिसून येते !

अमेरिकेत ९३ वर्षे जुना पूल तोडतांना तंत्रज्ञांची दमछाक 
     न्यूयॉर्क - महाडमधील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पुलाच्या दुर्घटननेनंतर महाराष्ट्रात जुने पूल पाडून नवीन पूल बांधण्याची मागणी होत आहे; परंतु अमेरिकेत असाच एक पूल पाडतांना तो पाडणार्‍या तंत्रज्ञांची दमछाक झाली.
     लिटल रॉक या भागात अरकान्सास नदीवरचा ९३ वर्षे जुना असलेला ब्रॉडवे ब्रिज हा पूल पाडून तेथे नवीन आणि रुंद पूल बांधण्याचे ठरले. हा पूल पाडण्यासाठी तेथे नियंत्रित स्फोटही करण्यात आले. जुना पूल असल्याने तो काही मिनिटांमध्येच कोसळेल, असे सर्वांनाच वाटत होते; मात्र सर्व स्फोटके वापरल्यावर त्याला केवळ तडे गेले होते. त्यामुळे पुन्हा काही स्फोट करण्यात आले. त्यानंतर ५ घंटे अधिक श्रम केल्यानंतर हा पूल पाडण्यात यश आले.

वझिरीस्तानमध्ये पाक सैन्याच्या आक्रमणांमुळे सहस्रो पश्तुन नागरिकांचे अफगाणिस्तानमध्ये पलायन

पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यापासून न 
थांबवणार्‍या पाकला काश्मीरवर हक्क सांगण्याचा काय अधिकार ?
      काबूल (अफगानिस्तान) - पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमारेषेवरील वझिरीस्तानमध्ये पाकचे सैन्य आणि हवाई दल यांनी आक्रमणे चालू केली आहेत. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याच्या भीतीपोटी सहस्रो पश्तून नागरिकांनी पाक सोडून थेट अफगाणिस्तानमध्ये आश्रय घेतल्याचे समोर आले आहे. एएन्आय या वृत्तसंस्थेशी बोलतांना एका पश्तून नागरिकाने सांगितले, तालिबानला लक्ष्य करण्याच्या नावाखाली पाकच्या सैन्याने त्यांच्या मार्गात जो येईल त्यांना उद्ध्वस्त केले. पाकिस्तानी सैन्याने कोणतीही पूर्वसूचना न देता हवाई आक्रमणे केली. खरे आतंकवादी हे इस्लामाबाद आणि कराची या ठिकाणी लपलेले आहेत, असा आरोपही पश्तून नागरिकांनी केला आहे. वझिरीस्तान हा भाग पाकिस्तानमधील आतंकवाद्यांचे आश्रयस्थान म्हणून ओळखला जातो; मात्र या भागात हवाई आक्रमणे करतांना निवासी भागांनाही लक्ष्य केले जात असल्याने स्थानिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

सतत एकाच ठिकाणी बसणे प्रकृतीसाठी धोकादायक !

एकाच ठिकाणी बसण्याच्या सवयीमुळे जगात प्रतिवर्षी ४ लक्ष ३३ सहस्र लोकांचा मृत्यू !
भारतीय संस्कृतीच्या आधारे जीवन जगणे आरोग्यासाठी सर्वाधिक लाभदायक आहे !
     न्यूयॉर्क - एकाच जागेवर अधिक काळ बसून रहाणे हृदयासाठी धोकादायक ठरू शकते. जगात होणार्‍या एकूण मृत्यूंपैकी ४ टक्के लोकांचा मृत्यू केवळ दिवसातून ३ - ४ घंटे पर्यंत सतत बसून रहात असल्यामुळे झाला, असा निष्कर्ष एका संशोधनातून काढण्यात आला आहे. याकरता जगातील ५४ देशांमध्ये संशोधन करण्यात आले आहे. (सध्याच्या यंत्रयुगात मानुष्य अधिकाधिक कामे यंत्राद्वारेच करत असतो. त्यामुळे े त्याचा वेळ वाचत असला, तरी यातून त्याच्या आयुष्याची हानीच होत असते. हे लक्षात घेऊन प्रत्येकाने भारतीय संस्कृतीतील आदर्श जीवन पद्धतीचा अंगीकार केला पाहिजे ! - संपादक)

झारखंड आणि आसाम राज्यांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या आदर्श नवरात्रोत्सव मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मार्गदर्शन करतांना श्री. चित्तरंजन सुराल 
आणि डावीकडे श्री. सुदामा शर्मा
     जमशेदपूर (झारखंड) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने झारखंड आणि आसाम या राज्यांतील विविध जिल्ह्यांमध्ये आदर्श नवरोत्रोत्सव कसा साजरा करावा ? याविषयी मोहीम राबवण्यात आली. या अंतर्गत झारखंडमध्ये ९९ आणि आसाममध्ये १०४ नवरात्रोत्सव मंडळांना निवेदने देण्यात आली. या मोहिमेत साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
जमशेदपूर आणि धनबाद 
येथील नवरात्रोत्सवांमध्ये मार्गदर्शन 
     जमशेदपूर येथील आदित्य सिंडीकेट कॉलोनी तसेच आशियाना गार्डन कॉलनी येथील नवरात्रोत्सव मंडळांमध्ये हिदु जनजागृती समितीचे श्री. चित्तरंजन सुराल यांनी मार्गदर्शन केले. ट्युब बारीडीह नवरात्रोत्सव मंडळात समितीचे श्री. आलोक पांडे आणि सनातन संस्थेचे श्री. सुदामा शर्मा यांनी मार्गदर्शन केले. बागुननगर नवरात्रोत्सवात श्री. सुदामा शर्मा आणि श्री. सुराल यांनी मार्गदर्शन केले. हिंदुुस्थान मित्र पूजा मंडळामध्ये सनातनच्या कु. मधुलिका शर्मा आणि समितीचे श्री. आनंद महाराणा यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनांचा ६०० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला.

(म्हणे) 'पाकने दिलेल्या बलीदानाला सार्‍या जगाने मान्यता द्यावी !'

पाकला आतंकवादाची जन्मभूमी म्हटल्याने चीन संतप्त ! 
 पाकने बलीदान कधी केले नाही, तर बळीच
 घेतले आहेत, ही गोष्ट चीनच्या अध्यक्षांना कोणीतरी सांगावी लागेल ! 
     बीजिंंग - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स परिषदेत बोलतांना पाकिस्तानला 'आतंकवादाची जन्मभूमी ' म्हटल्यावर चीनने पाकची बाजू घेतली आहे. आम्ही कोणताही देश अथवा धर्म यांना आतंकवादाशी जोडण्याच्या पूर्णपणे विरोधात आहोत. पाकिस्तानने दिलेल्या 'बलीदाना'लाही सार्‍या जगाने मान्यता द्यावी, असे आवाहन चीनने केले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुवा चनिइंग यांनी म्हटले की, आम्ही आतंकवादाच्या विरोधात आहोत. चीन आणि पाक जुने मित्र आहेत. भारत आणि पाक आमचे शेजारी देश आहेत. दोन्ही देश शांतता आणि चर्चेद्वारे आपसातील मतभेद दूर करू शकतात. दोन्ही देशांतील संबंध सुधारावेत, अशी आमची इच्छा आहे. त्यातच सर्वांचं भलं आहे.

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

श्री एकनाथी भारूड म्हणणार्‍या वारकर्‍यांना कारागृहात डांबणारे हिंदुद्रोही पोलीस ! 
     नाशिक जिल्ह्यातील वणी खुर्द येथे श्री एकनाथी भारूड म्हणणार्‍या १२ वारकर्‍यांना 'अ‍ॅट्रॉसिटी'च्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य आणि राष्ट्रीय वारकरी सेनेचे अध्यक्ष ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांनी तत्कालीन गृहमंत्री रा.रा. पाटील आणि वारकरीद्रोही पोलीस यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले, "वारकर्‍यांना अपमानास्पद वागणूक देणारे दिंडोरी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना तातडीने निलंबित करावे आणि त्यांच्या कार्यकाळात किती हिंदूंवर अन्याय झाला, याचीही सखोल चौकशी करावी. 'थरारली वीट' या वारकरीद्रोही नाटकाची निर्मिती करणार्‍यांवर गृहमंत्री रा.रा. पाटील या प्रकरणात काय कारवाई करणार आहेत ?"
 पोलिसांविषयी चांगले आणि वाईट अनुभव 
असल्यास वाचकांनी नजीकच्या दैनिक कार्यालयात कळवावेत !

नेत्यांनी केलेले पाप हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यावरच संपेल ! - पू. बाबा अल्पहारी महाराज

लष्कर-ए-हिंद आणि सनातन जागृती मंच यांच्या 
संयुक्त विद्यमाने शौर्य सन्मान दिवस कार्यक्रमाचे आयोजन
दीपप्रज्वलन करतांना श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, 
श्री. देवदास शिंदे, श्री. सुनील घनवट, पू. बाबा 
अल्पहारी महाराज आणि अन्य मान्यवर
     मौजे बेबड ओहोळ (जिल्हा पुणे), १७ ऑक्टोबर (वार्ता.) - धर्म हा निसर्गनिर्मित आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्वांनी तन, मन आणि प्राण ओतून प्रयत्न करायला हवेत. फाळणीच्या वेळी नेत्यांनी हिंदूंचा घात केला. नेत्यांनी केलेले हे पाप तेव्हाच संपेल, जेव्हा आपले राष्ट्र हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होईल. आज घराघरात अफजल जन्माला येईल, अशी घोषणा होते. आम्हीही प्रत्येक घरातून नाही, तर प्रत्येक गावातून एक छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील, अशी प्रयत्नांची शिकस्त केली पाहिजे, असे प्रतिपादन सनातन जागृती मंचचे संस्थापक पू. बाबा अल्पहारी महाराज यांनी केले. येथील अथर्व मंगल कार्यालय येथे १६ ऑक्टोबर या दिवशी लष्कर-ए-हिंद आणि सनातन जागृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शौर्य सन्मान दिवस या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते.

भ्रष्टाचारी अंनिसला जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्यावर आक्षेप घेण्याचा नैतिक अधिकारच नाही ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात सनातनचा सहभाग !
श्री. अभय वर्तक यांनी जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्यजी 
महाराज यांच्यावर टीका करणार्‍या अंनिसची भोंदूगिरी केली उघड !
चर्चासत्रात सहभागी झालेले डावीकडून भाजपचे
माधव भंडारी, समाजवादी नेते कुमार सप्तर्षी
आणि सनातनचे श्री. अभय वर्तक
       मुंबई - सातार्‍याच्या धर्मादाय आयुक्तांनी (चॅरिटी कमिशनरने) अंनिसच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले आहेत. अंधश्रद्धेच्या नावाखाली अंनिसने शाळेतील मुलांचे आर्थिक शोषण केले आहे. त्यांच्या समितीवर प्रशासक नेमला जावा, असे धर्मादाय आयुक्तांनी नमूद केले आहे. आज अंनिसवाले महाराष्ट्रातील सर्वात मोठे भोंदू आहेत. त्यामुळे जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्यासारख्या मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य करणार्‍या संतांची टीका करण्याचा अंनिसला नैतिक अधिकारच नाही, असे परखड मत सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी मांडले. १५ ऑक्टोबर या दिवशी एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीवर जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेणे योग्य कि अयोग्य ? या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. (राजकारण्यांनी हिंदु संतांची भेट घेतल्यावरच धर्मनिरपेक्षतेचे ढोल वाजवणारी प्रसिद्धीमाध्यमे अशाप्रकारे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारे प्रश्‍न उपस्थित करून चर्चासत्रांचे आयोजन करतात. परंतु दूसरीकडे एखाद्या राजकारण्याने अल्पसंख्यांक पंथातील एखाद्या संतांची अथवा नेत्यांची भेट घेतली, तर हीच प्रसिद्धीमाध्यमे राजकारण्यांवर स्तुतीसुमने उधळतात. हिंदूंनो, प्रसिद्धीमाध्यमांचा हा हिंदुद्वेष आणि कावेबाजपणा ओळखा ! - संपादक) या वेळी श्री. अभय वर्तक यांच्यासह कार्यक्रमात भाजपचे प्रवक्ता श्री. माधव भंडारी, समाजवादी नेते कुमार सप्तर्षी आणि अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सहभाग घेतला. एबीपी माझाच्या नम्रता वागळे यांनी सूत्रसंचालन केले.

संतांच्या कार्याने राष्ट्र घडते ! - सरसंघचालक मोहनजी भागवत

७३ सहस्रांहून अधिक असणार्‍या रक्तदात्यांचा नाणीज (रत्नागिरी) येथे प्रातिनिधिक सत्कार !
चर्चा करतांना जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज 
(उजवीकडे) आणि सरसंघचालक मोहनजी भागवत
      नाणीज ( रत्नागिरी), १७ ऑक्टोबर - संतांच्या कार्याने राष्ट्र घडत असते. त्यामुळे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या धर्म उन्नतीच्या प्रत्येक कार्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा राहील. संतांच्या कार्याला दीर्घायुष्य लाभो, ही शुभेच्छा, अशा शब्दांत सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम चालू असून स्वामीजींच्या प्रेरणेतून भाविकांनी सैन्य आणि महाराष्ट्र शासना यांना ७३ सहस्र ३५२ बाटल्या रक्त दिले. त्याबद्दल रक्तदात्यांचा प्रातिनिधिक सत्कार मोहनजी भागवत यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

पुण्यात होणार्‍या धर्मजागृती सभेला बहुसंख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन

हिंदुत्वनिष्ठ, तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांचा काश्मिरी हिंदूंना पाठिंबा
श्री. गणेश भिंताडे (उजवीकडून पाचवे)
धर्मसभेचे निमंत्रण स्वीकारतांना
      पुणे, १७ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील रमणबाग शाळेच्या पटांगणावर २३ ऑक्टोबरला काश्मिरी हिंदूंच्या समर्थनार्थ धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. धर्मसभेच्या प्रसाराने वेग घेतला असून विविध हिंदुत्वनिष्ठ, तसेच लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी काश्मिरी हिंदूंना ठाम पाठिंबा दर्शवत अधिकाधिक संख्येने धर्मसभेला उपस्थित रहाणार असल्याचे सांगितले आहे. येथील हिंदुगर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. धीरज घाटे, तसेच भाजपचे नगरसेवक श्री. श्रीनाथ भिमाले आणि गणेश भिंताडे, तसेच शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख श्रद्धा कदम यांनी एक भारत अभियान - चलो काश्मीर या उपक्रमाला भक्कम पाठिंबा व्यक्त केला असून उत्स्फूर्तपणे अधिकाधिक कार्यकर्त्यांसह सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन केले आहे.

विवाहितेने साडी नेसण्याची अपेक्षा करणे योग्य नाही ! - मुंबई उच्च न्यायालय

       नागपूर - आपण एकविसाच्या शतकात जगत असून या काळात विवाहितेने साडी नेसण्याची अपेक्षा करणे योग्य नाही. सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी पतीने अशा अनावश्यक अपेक्षा टाळल्या पाहिजेत, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले आहे. येथील एका पती-पत्नीच्या वादाच्या सदंर्भातील खटल्याचा निकाल देतांना न्यायालयाने वरील मतप्रदर्शन केले. (आधुनिक काळाच्या अनुषंगाने पतीने अशी अपेक्षा करणे योग्य नाही, हे जरी योग्य असले, तरी भारतीय पारंपरिक पोषाखांतून मिळणार्‍या सात्त्विकतेमुळे जीवन अधिक समृद्ध होते, हेही तितकेच योग्य आहे ! - संपादक)

भिवंडीतील चाचा नेहरू हिंदी शाळेच्या प्रश्‍नपत्रिकेत खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनावर प्रश्‍न

शिक्षणाची ही दुर्दशा थांबवण्यासाठी शासन काय प्रयत्न करणार ?
      मुंबई - भिवंडीतील चाचा नेहरू हिंदी शाळेच्या प्रश्‍नपत्रिकेत विराट कोहलीची गर्लफ्रेंड कोण ? असा प्रश्‍न विचारण्यात आला; एवढेच नव्हे, तर उत्तरासाठी त्याला अभिनेत्रींच्या नावाचे पर्यायही देण्यात आले होते. (अशा प्रश्‍नपत्रिका काढणार्‍यांच्या नैतिक आणि बौद्धिक स्तराची कीव करावी तेवढी थोडीच आहे. खेळाडूंच्या वैयक्तिक जीवनावरील अनावश्यक प्रश्‍न विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिकेत विचारण्यापर्यंत शाळांचा आणि परीक्षांचा दर्जा खालावण्याला मेकॉलेप्रणीत शिक्षणप्रणालीच आणि धर्मनिरपेक्ष राज्यपद्धतीच उत्तरदायी आहे. - संपादक) मुलांनी शालेय अभ्यासासोबत याचाही अभ्यास करावा, अशी अपेक्षा शाळेची आहे का ? हा पेपर सध्या सामाजिक संकेतस्थळावर प्रसारीत (व्हायरल) झाला आहे.

राष्ट्रविघातक कृत्य करणार्‍या तरुणांवर राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याखाली कठोर कारवाई करा ! - हिंदु धर्मसेनेची मागणी

तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांना मागणीचे 
निवेदन देतांना हिंदु धर्मसेनेचे संस्थापक-अध्यक्ष 
श्री. शिव शिंदे आणि अन्य कार्यकर्ते
      विटा (जिल्हा सांगली), १७ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील भाजी मंडईतील फळविक्रेता बद्रुद्दीन बागवान याने व्हॉटस् अ‍ॅपया सामाजिक संकेतस्थळावर आय लव्ह पाकिस्तान अशी पोस्ट टाकली होती. असेच राष्ट्रविघातक कृत्य शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील मोहसीन कोल्हापुरे यानेही केले होते. अशा प्रकारे राष्ट्रविघातक कृत्य करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याखाली कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी हिंदु धर्मसेनेने निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचे निवेदन नुकतेच तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांना देण्यात आले.

धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसारखे कार्य कोणी करत नाही ! - श्री. राम गावडे, पुणे जिल्हाप्रमुख, शिवसेना

डावीकडून खासदार श्री. शिवाजीराव आढळराव-पाटील
यांना धर्मजागृती सभेचे निमंत्रण देतांना समितीचे
श्री. दिलीप शेटे आणि त्यांच्या उजव्या
बाजूला श्री. राम गावडे
     पुणे, १७ ऑक्टोबर (वार्ता.) - धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसारखे कार्य कोणी करत नाही. सध्या अनेक संघटना या फक्त बोलतात; पण कृती मात्र तुम्हीच करता. तुमचे कार्य अप्रतिम आहे. तसेच काश्मिरी हिंदूंच्या समर्थनार्थ राष्ट्रीय स्तरावर राबवण्यात येत असलेल्या एक भारत अभियानाला शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख म्हणून आमचा जाहीर पाठिंबा आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख श्री. राम गावडे यांनी केले. या वेळी त्यांनी २३ ऑक्टोबरला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेस शिवसैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले. न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शाळेच्या पटांगणावर होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण खासदार श्री. शिवाजीराव आढळराव-पाटील आणि श्री. राम गावडे यांना देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिलीप शेटे, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री किरण शेटे, किरण दारोळे, मनोज शिंदे आणि निखील पोखरकर यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी श्री. गावडे बोलत होते.महापालिकेचे कर्मचारी आणि नागरिक यांच्यात वाद

महानगरपालिकेकडून भगव्या पताका आणि ध्वज काढण्याची मोहीम !
 भगव्याद्वेषाची कावीळ झालेले बेळगाव महानगरपालिका प्रशासन ! 
भगवा ध्वज काढतांना महापालिकेचे कर्मचारी
     बेळगाव, १७ ऑक्टोबर (वार्ता.) - चव्हाट गल्ली येथे ध्वज आणि पताका लावण्यावरून निर्माण झालेल्या दंगलीमुळे पोलीस प्रशासनाने उपाययोजना म्हणून महापालिकेच्या वतीने १३ ऑक्टोबरपासून शहर आणि उपनगर परिसरातील भगव्या पताका आणि ध्वज हटवण्याची कारवाई केली; मात्र या कारवाईस आनंदनगर, वडगाव येथे विरोध झाल्याने मोहीम थांबवावी लागली. दसरा आणि श्री दुर्गामाता दौड यांच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील प्रत्येक रस्त्यावर भगव्या पताका आणि भगवे ध्वज लावण्यात आले होते; मात्र महापालिकेच्या अधिकार्‍यांनी पताका हटवण्याची मोहीम हाती घेतली. (बेळगाव येथे धर्मांधांनी अनेकवेळा दंगल घडवल्याचे स्पष्ट असतांनाही त्यांच्यावर कारवाई न करता भगवे पताके आणि ध्वज हटवण्याची कारवाई करणारे महापालिका प्रशासन भ्याड आणि हिंदुद्वेषी आहे. हिंदूंनो, यासाठी संघटित होऊन महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात न्याय मिळेपर्यंत वैध मार्गाने लढा दिला पाहिजे ! - संपादक) 

अभ्यास कसा करावा ?

परीक्षेच्या पार्श्‍वभूमीवर मुलांना मार्गदर्शक अशी लेखमालिका
       आजकाल बहुतेक मुले आईच्या आग्रहामुळे, बाबांच्या भीतीपोटी अन् एकमेकांमध्ये असलेल्या चढाओढीमुळे काहीशा तणावाखालीच अभ्यास करतांना दिसतात. अशा वेळी अभ्यास मनापासून होतोच, असे नाही. त्यामुळे परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही की, दुःख होते. त्यामुळे मुलांनो, अभ्यास करण्यामागील योग्य दृष्टीकोन समजून घेतला, तर अभ्यास कंटाळवाणा न वाटता आनंददायी वाटेल. अभ्यास करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत. त्याप्रमाणे अभ्यास केल्यास अभ्यास चांगला होतो. परीक्षेची भीती कशी घालवावी, उत्तरपत्रिका आत्मविश्‍वासाने कशी लिहावी, अभ्यासात एकाग्रता कशी साधावी आदींची माहिती सांगणारा हा लेखप्रपंच...

नागरिकांच्या समस्यांविषयी गांभीर्य अल्प का ?

     पुणे शहरातील पर्यावरणाची माहिती देणारा अहवाल पुणे महानगरपालिकेच्या वतीने काही दिवसांपूर्वी घोषित करण्यात आला. प्रतिवर्षीप्रमाणे शहरातील पर्यावरणाची माहिती देणारा हा अहवाल सिद्ध करण्यात येत असतो. तीच परंपरा या वर्षीही पाळण्यात आली; परंतु या महत्त्वाच्या अहवालाला मान्यता देण्यासाठी बोलावलेल्या विशेष सभेला केवळ ५ नगरसेवकांची उपस्थिती होती. त्या नगरसेवकांनी केलेल्या चर्चेनंतर या अहवालाला मान्यता देण्यात आली. येथे नमूद करण्याची महत्त्वाची गोष्ट ही की, त्या विशेष सभेला जैवविविधता समितीचे सदस्यही अनुपस्थित होते. असेच दुसरे महत्त्वाचे उदाहरण म्हणजे, पुणे महानगरपालिकेच्या विविध खात्यांची प्रलंबित कामे आणि चौकशी समितीचे अहवाल यांवर चर्चा करण्यासाठीही अशाच विशेष सभेचे आयोजन ८ जून या दिवशी केले होते आणि त्या सभेलाही केवळ ७ नगरसेवक उपस्थित होते. अल्प उपस्थितीच्या कारणामुळे ही सभा २ मास पुढे ढकलली; परंतु त्यासही ३ मास उलटून गेले, तरी कोणीही नगरसेवक वा पालिकेचे प्रशासन त्याविषयी साधा ब्र ही काढत नाही.

प्रत्येक हिंदूने धर्माभिमान वाढवण्यासाठी धर्मशिक्षण घेणे आवश्यक ! - सौ. सुनिता पाटील, रणरागिणी शाखा

     डोंबिवली - 'प्रत्येक हिंदूने स्वतःमध्ये धर्माभिमान वाढवण्यासाठी धर्मशिक्षण घ्यावे, घरातून बाहेर जातांना कपाळावर टिळा लावून जाणे, भ्रमणभाषवरून बोलण्याचा प्रारंभ मातृभाषेतून करणे आणि जेवणापूर्वी अन्नदेवतेला नमस्कार करणे, या धर्माचरणाच्या कृती करणे आवश्यक आहे', असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या सौ. सुनीता पाटील यांनी दावडी येथील युवा प्रतिष्ठान यांनी 'माता की चौकी' आयोजित कार्यक्रमाच्या वेळी केले. या वेळी त्यांनी नवरात्रोत्सव आणि गरबा खेळण्यामागील अध्यात्मशास्त्रही सांगितले. या कार्यक्रमाचा लाभ एक सहस्राहून अधिक लोकांनी घेतला. या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. सुरेंद्र पांडे, भाजपचे नगरसेवक श्री. जालिंदर पाटील, नगरसेवक श्री. महेश पाटील उपस्थित होते. 

आेंकारेश्‍वर मंदिराला पेशवेकालीन सौंदर्य प्राप्त होणार !

     आेंकारेश्‍वर मंदिर देवस्थान ट्रस्टने मंदिराच्या दुरुस्तीचे काम काढले असून मंदिराला पेशवेकालीन रंगयोजनेत रंगवण्यात येणार आहे. मंदिराला १३ कळस असून कळसांना सोन्याचा मुलामा करण्याचे काम चालू आहे. मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन राज्य सरकारने मंदिराचा वारसा म्हणून 'अ' श्रेणी, तर पर्यटन केंद्र म्हणून 'क' श्रेणी दिली आहे. यातून उपलब्ध झालेल्या निधीतून मंदिराचे सुशोभीकरण केले जात आहेत. महाशिवरात्रीपर्यंत ही कामे पूर्ण होण्याचा अंदाज आहे.

काँग्रेसी आणि डावे 'सर्जिकल स्ट्राईक'चे बळी ! - माधव भंडारी

     पुणे - भारतीय सैनिकांनी 'सर्जिकल स्ट्राईक' करून आतंकवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर देशभरात कौतुक होत असतांना काँग्रेस आणि डावे यांनी मात्र याचे राजकारण करत अनुचित विधाने केली. त्यांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले. पाकिस्तान जी भाषा करत होते, तीच भाषा काँग्रेस आणि डावे यांच्या तोंडी होती. त्यामुळे काँग्रेस आणि डावे हेच सर्जिकल स्ट्राईकचे बळी आहेत असे वाटते, असे प्रतिपादन भाजपचे प्रवक्ते श्री. माधव भंडारी यांनी केले. येथील प्राचीन आेंकारेश्‍वर मंदिराच्या २८० व्या वर्धापनदिनानिमित्त मंदिराच्या प्रांगणात १४ ऑक्टोबर या दिवशी 'महाराष्ट्रातील सद्य राजकीय आणि सामाजिक परिस्थिती' या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. रवींद्र वंझारवाडकर, तसेच मंदिराचे विश्‍वस्त धनोत्तम लोणकर उपस्थित होते. 

नवी मुंबईतील कामोठे पोलीस ठाण्यात माथेफिरूकडून तोडफोड

पोलिसांचा धाक संपला कि काय ? 
     पनवेल - येथील आनंद सरगर या माथेफिरू व्यक्तीने १५ ऑक्टोबर या दिवशी सकाळी नवी मुंबईतील कामोठे पोलीस ठाण्यामध्ये घुसून तोडफोड केली. त्याने पोलीस ठाणे आणि अधिकारी कक्षातील कपाट, आसंद्या, पटल, काचेचे आणि इतर सामान फोडून नासधूस केली. (एवढी तोडफोड होईपर्यंत पोलीस कर्मचारी काय करत होते ? एका माथेफिरूला रोखू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांना कसे रोखणार ? - संपादक) पोलिसांनी सरगर याला अटक केली असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईला पाठवले आहे.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. 
दोन दिवसांपूर्वी पौर्णिमा झाली.

साधकांना सूचना

काही पालट करून वितरण करण्यासाठी पुढील गुजराती ग्रंथ उपलब्ध !
 सूचना : या सर्व ग्रंथांच्या वरील आवृत्तींना ४ सामाईक पानांचे संच जोडू नये. या ग्रंथांच्या एक्सेल शीट आणि पी.डी.एफ्. धारिका नेहमीच्या ठिकाणी ठेवल्या आहेत.

भोगवटा प्रमाणपत्र रहित आणि मान्यता मिळालेल्या नकाशाप्रमाणे वाहनतळ करावे ! - पतित पावन संघटना

आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी 
     कोल्हापूर, १७ ऑक्टोबर (वार्ता.) - प्रभाग ईमधील रि.स.क्र. १७५३, राजारामपुरी चौथी गल्ली येथील मिळकतीमधील असलेले (सि लाई वर्ल्ड हे कपड्याचे शोरूम आहे) भोगवटा प्रमाणपत्र १० मार्च २०१६ या दिवशी महापालिकेच्या साहाय्यक शहर रचनाकार येथील कार्यालयातून घेतले आहे. ते देतांना ज्या काही अटी होत्या, त्या भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यापासून १ मासाच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घेण्याचे होते; मात्र तशी कोणत्याही प्रकारची अट आजपर्यंत पूर्ण करून घेतली नाही. त्यामुळे सदरचे भोगवटा प्रमाणपत्र रहित ठरवावे, या मागणीचे निवेदन पतित पावन संघटनेच्या वतीने महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांना नुकतेच देण्यात आले. या वेळी पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सर्वश्री सुनील पाटील, उपाध्यक्ष आकाश नवरुखे, सतेज मांडवकर, ऋषभ मोरे, स्वरूप पाटील, सुदर्शन भोसले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

समान नागरी कायदा आणि तोंडी तलाकच्या विरोधातील प्रतिज्ञापत्र यांना मुसलमान महिलांचा विरोध

     संभाजीनगर - समान नागरी कायद्याला विरोध करण्यासाठी मराठवाड्यात मुसलमान महिलांची स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. शासनाने तोंडी तलाकची प्रथा महिलांसाठी अन्याय्यकारक असल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दिले होते, त्यालाही या महिलांनी विरोध केला आहे. मौलानाच्या सांगण्यावरून या महिलांनी मोदी शासन आमच्या धर्मात लुडबुड करत आहे, असा आरोप केला आहे. धाराशिव येथील मशिदींमध्ये ही मोहीम चालू आहे. (तथाकथित स्त्री स्वातंत्र्यासाठी धार्मिक परंपरांना पायदळी तुडवणार्‍या पुरो(अधो)गामी महिला मुसलमान महिलांकडून धर्मप्रेम शिकतील का ? - संपादक) विधी आयोगाने समान नागरी कायद्यासंदर्भात मत मागवले आहे, याला मुस्लिम लॉ बोर्डाने विरोध केला आहे.

पाक राजकारणात भारतापेक्षा हुशार !

     अमेरिका आता जागतिक शक्ती नाही आहे, तिचे महत्त्व अल्प होत आहे, तिला विसरून जा. जर काश्मीर आणि भारत यांच्या संदर्भात अमेरिका पाकला महत्त्व देत नसेल, तर तो चीन आणि रशिया यांच्याकडे जाईल. - मुशाहिद हुसैन सैयद, पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे दूत

भिंतीचा अर्धा व्यय पाकिस्तानकडून घ्या !

     पाकशी वाढता तणाव पाहून भारत सरकार इस्राईल-पॅलेस्टाईन सीमेच्या धर्तीवर भारत-पाक सीमेवर उंच भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपुरात मेट्रो रेल्वेच्या डब्यांच्या निर्मितीस चिनी आस्थापनाला कंत्राट

विकासाचा विचार करतांना राष्ट्रहिताला अधिक प्राधान्य द्यावे, अशी जनतेची अपेक्षा आहे ! 
     नागपूर - राज्य सरकारने नागपूर येथे मेट्रो रेल्वेचे डबे बनवणार्‍या चिनी आस्थापनाला जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. या कारखान्यासाठी १६ ऑक्टोबरला महाराष्ट्र सरकार आणि चिनी आस्थापन यांच्यात सामंजस्य करार झाला. या आस्थापनाला २५० एकर जागा बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत दिली जाणार आहे. चीनशी व्यापारी सहमती दर्शवतांना भारताने सुरक्षेचाही विचार करावा, असा सल्ला भारतीय राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सल्लागाराने यापूर्वी दिला होता. 

बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार !

     बार्शी (जिल्हा सोलापूर), १७ ऑक्टोबर - तालुक्यातील पिंपरी (आ.) येथील ग्रामदैवत असलेल्या दुर्गा देवस्थानामधील ४९ किलो चांदीच्या दागिन्यांची चोरी झाली होती. सात ते आठ महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर चोरीच्या तपासामध्ये यश येऊन आरोपी गौतम भगवान अदमाने याला आणि त्याच्या सहकार्‍याला पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून १५ किलो चांदी हस्तगत केली होती. तसेच उर्वरीत चांदी आणि इतर आरोपींचा शोध चालू होता; मात्र १५ ऑक्टोबरला या आरोपीनेे दोन पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून पळ काढला. (पोलिसांचे कुचकामी सापळे ! - संपादक)

फलक प्रसिद्धीकरता

केंद्र सरकार बंगालला काश्मीर होण्यापासून वाचवणार ?
      बंगालमध्ये मोहरम, श्री दुर्गापूजा आणि श्री दुर्गामूर्ती विसर्जनाच्या प्रसंगी अनेक गावांत धर्मांधांनी जातीय दंगली घडवून आणल्या. ३ हिंदूंना भोसकले. विसर्जन मिरवणुकींवर पेट्रोल बॉम्ब फेकलेे, तसेच मंदिरे, वाहने, घरे, दुकाने यांची लुटालूट आणि जाळपोळ करण्याचे अनेक प्रकार घडले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bangal me Durgapratima visarjan ke din dharmandhone anek gaome Hinduoke ghar, dukan lute aur aag lagai. - kya sarkar Bangal ko kashmir hone se rokegi ? 

जागो ! : बंगाल में दुर्गाप्रतिमा विसर्जन के दिन धर्मांधों ने अनेक गावों में हिन्दुआें के घर, दुकान लूटे और आग लगाई । - क्या सरकार बंगाल को कश्मीर होने से रोकेगी ?

भारताला दारिद्य्राकडे नेणारे सर्वपक्षीय राज्यकर्ते !

काल झालेल्या जागतिक दारिद्य्रनिर्मूलन दिवसाच्या निमित्ताने... 
काल १७ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या जागतिक दारिद्य्रनिर्मूलन दिवसाच्या निमित्ताने ... 
१. विविध वर्षे आणि दारिद्य्ररेषेखालील जीवन जगणार्‍या भारतियांची संख्या ! 
 २. दारिद्य्ररेषेखालील नागरिक म्हणजे काय ?
     आंतरराष्ट्रीय दारिद्य्ररेषेखालील नागरिक म्हणजे प्रतिदिन १.२५ डॉलरहून अल्प, म्हणजेच ५५ रुपयांहून अल्प उत्पन्न असणारे नागरिक. भारतातील ४१ कोटी ८० लाख दरिद्री लोकांची प्रतिदिन मिळकत २० रुपयेही नाही. 

सनातनच्या विद्यालयात (आश्रमात) साधना करण्याची इच्छा असलेल्यांना प्रवेश दिला जाऊन त्यांची आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणे, ही प.पू. गुरुदेवांची साधकांवर असलेली कृपा आणि प्रीती !

श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी
     माझ्यासारख्या तीव्र स्वभावदोष आणि अहं असलेल्या साधकाला रामनाथी आश्रमात प्रवेश मिळाल्यावर मनात विचार आला, गुरुदेवांनी केवळ प्रगती होत असलेल्या साधकालाच रामनाथी आश्रमात येथे येता येईल, असे केले असते, तर माझी स्थिती काय झाली असती ? गुरुदेवांची कृपा आणि त्यांची प्रीती यांमुळे मला आश्रमात रहायला मिळाले. केवळ सनातनच्या विद्यालयातच (आश्रमात) सर्वांना प्रवेश मिळून त्यांना उच्च कोटीचा आनंद मिळेल, असे शिक्षण दिले जाते, तसेच त्यांना मायेतील ज्ञान न देता सत्विषयीच्या ज्ञानाचे मार्गदर्शन देऊन ईश्‍वरप्राप्ती कशी होईल ?, याकडे लक्ष दिले जाते. हेच सनातनचे वैशिष्ट्य आहे. यावरून जगातील अन्य प्रसिद्ध विद्यालये आणि सनातनचे आश्रम यांतील भेद माझ्या लक्षात आला.
१. जगातील प्रसिद्ध विद्यालये
    जगातील सर्व प्रसिद्ध विद्यालयांमध्ये प्रवेश मिळवायचा असेल, तर कठीण परीक्षा द्यावी लागते आणि केवळ अतिशय हुशार विद्यार्थ्यांनाच तेथे प्रवेश मिळतो. तेथे त्यांना पुढचे शिक्षण दिले जाते. साहजिकच असे विद्यार्थी गुणवत्ता सूचीत येऊन विद्यालयाचे नाव उज्ज्वल करतात; पण ढ विद्यार्थ्यांना गुणवत्ता सूचीत आणण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत.
२. सनातन विश्‍वविद्यालय (आश्रम)
     या विश्‍वविद्यालयात तीव्र स्वभावदोष आणि अहं असलेल्या साधकांपासून संतपदाच्या जवळ पोचलेल्या उत्तम शिष्यावस्थेतील व्यक्तींनाही प्रवेश दिला जातो. त्यांच्यामध्ये केवळ स्वतःला पालटण्याची तीव्र तळमळ असणे आवश्यक आहे. स्वभावदोष आणि अहं नष्ट झाल्यावर त्यांच्यात पालट घडून येतात अन् त्यांची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी प्रयत्न केले जातात.

तरुणांनो, जर हे राष्ट्र जिवंत रहावं अशी आपली धडपड असेल, तर हे राष्ट्र पूर्णपणे हिंदु धर्माधिष्ठित जीवनप्रणाली स्वीकारलेले असले पाहिजे. - स्वामी विवेकानंददेवा, का खेळतोस लपंडाव रे !

कु. प्रतीक्षा हडकर
देवा, सांग ना कुणीकडे आहेस तू रे ।
आठवण येते तुझी,
वेड्यासारखी रडते मी रे ॥ १ ॥

माझ्यासमवेत का खेळतोस लपंडाव रे ।
सुचव ना रे तू मला भक्तीभावाचा डाव रे ॥ २ ॥

सोन्यासारखे जपलेस ना तू ।
मोत्याप्रमाणे सांभाळलेस ना तू ॥ ३ ॥

चंदनासारखे झिजव ना रे तू ।
एकमेव असा आधार आहेस ना रे तू ॥ ४ ॥

सत्च्या मार्गात आणलेस ना तू ।
साधनेतील अडथळे दूर करतोस ना तू ॥ ५ ॥

मायेपासून अलिप्त करतोस ना रे तू ।
नामानिराळा मात्र आहेस ना रे तू ॥ ६ ॥

वेड लावले सर्वांना रे तू ।
सत्यम्-शिवम्-सुंदरम् आहेस रे तू ॥ ७

साधकांनो, स्वतःची आणि सहसाधकांची जलद प्रगती होण्यासाठी एकमेकांच्या चुका तत्परतेने अन् मोकळेपणाने सांगा !

कु. स्वाती गायकवाड
     प्रसारातील साधक स्वत:हून एकमेकांना चुका सांगत नाहीत. विचारल्यावर सांगतात. आश्रमात मात्र एखाद्या साधकाची चूक लक्षात आल्यास त्या जिवाला साधनेत साहाय्य व्हावे; म्हणून साधक तत्परतेने चूक सांगतात. त्यामुळे आश्रमात साधकांची प्रगती लवकर होते. स्वत:ची आणि सहसाधकांची जलद प्रगती होण्यासाठी चूक लक्षात आल्यास तत्परतेने आणि मोकळेपणाने सांगाव्यात.
- कु. स्वाती गायकवाड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.९.२०१६)

महर्षींनी साधकांना पायाला बांधायच्या लाल दोर्‍याला ३३ गाठी मारा, असे सांगण्याविषयी एका साधिकेला लक्षात आलेली कारणे

सौ. नीलिमा सप्तर्षि
     महर्षींनी साधकांना आध्यात्मिक उपाय म्हणून लाल दोर्‍याला ३३ गाठी मारून तो पायात बांधा, असे जीवनाडीपट्टीद्वारे सांगितले आहे. एक दिवस मी लाल दोर्‍याला ३३ गाठी बांधत असतांना माझ्या मनात विचार आला, महर्षींनी लाल दोर्‍याला ३३ गाठीच मारायला का सांगितल्या असाव्यात ? तेव्हा ईश्‍वरी कृपेने मला पुढील कारणे लक्षात आली.
१. विविध विचारसरणीनुसार प्रमुख ३३ देवता याप्रमाणे आहेत.
 टीप - इंद्र आणि प्रजापति यांच्याऐवजी विश्‍वेदेव २ किंवा प्रजापति आणि वषट्कार किंवा वाक् अन् ईश्‍वर असेही दोन देव तेहतीस देवांमध्ये गणले जातात.
२. ब्रह्मा, विष्णु आणि महेश या प्रमुख देवतांशी संबधित प्रत्येकी ११ कोटी देव आहेत

काही साधकांच्या मनात शिबिरांतील सेवा मिळत नसल्याच्या नकारात्मक विचारावर श्री. व्यंकटेश अय्यंगार यांना निर्जीव वस्तूकडून (छत्रीकडून) मिळालेले उत्तर आणि तिच्याशी झालेला सूक्ष्मातून संवाद

श्री. व्यंकटेश अय्यंगार
     प.पू. डॉक्टरांच्या कृपेने रामनाथी आश्रमात निरनिराळ्या शिबिरांची पर्वणी चालू झाली आहे. या शिबिरांच्या संदर्भात काही साधकांच्या मनात पुढील नकारात्मक विचार आले असतील, आमच्यात ही क्षमता आहे. आम्हीही पुष्कळ काही करू शकतो; पण आम्हाला सेवा मिळाली नाही. २६.८.२०१६ या दिवशी मी माझ्या निवासस्थानी पोचलो. तेथील मांडणीमध्ये (रॅकमध्ये) ठेवलेली छत्री माझ्याकडे पहात होती. त्या वेळी तिच्यात आणि माझ्यात पुढील संवाद झाला.
मी :
तू माझ्याकडे अशी का पहात आहेस ?
छत्री : तुम्हा सर्वांच्या मनातील विचार ऐकून मला हसू येत आहे.
मी : का ?
छत्री : तुम्ही सगळे माझा पाऊस आणि उन्हात वापर करता. आता पाऊसही न्यून झाला आहे आणि उन्हाळाही अधिक नाही; म्हणून मला या मांडणीमध्ये ठेवले आहे; पण तरीही मी मला सेवा मिळाली नाही. मला बाजूला ठेवण्यात आले आहे आणि माझ्याकडे कोणी पहातही नाही, असा नकारात्मक विचार करत नाही. मला हे ठाऊक आहे की, पाऊस आणि उन्हाच्या वेळी मला पुष्कळ सेवा करण्याची संधी मिळणार आहे. माझे गुरुदेव (प.पू. डॉक्टर) मला माझ्या आवश्यकतेनुसार सेवा देतील, अशी माझी अढळ श्रद्धा आहे.
     छत्रीने दिलेले उत्तर ऐकून आश्‍चर्य वाटणे आणि निर्जीव वस्तूंमधूनही शिकवणार्‍या गुरुदेवांच्या अपेक्षेनुसार शिकून त्यांच्या कृपेला पात्र झाले पाहिजे, हे लक्षात येणे : छत्रीचे हे उत्तर ऐकून मी आश्‍चर्यचकित झालो आणि निर्जीव वस्तूतून मला शिकण्याची संधी दिल्यामुळे मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. निर्जीव वस्तूंमधूनही शिकवणारे गुरु आम्हाला लाभले आहेत.

देवद, पनवेल येथील श्री. अरविंद गाडगीळ यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

प.पू. फडकेआजी यांच्या घरी साधकांनी अनुभवला भावसोहळा !
श्री. गाडगीळ यांना भेटवस्तू देतांना
श्री. विनायक आगवेकर (उजवीकडे)
      देवद (पनवेल), १७ ऑक्टोबर (वार्ता.) - कर्म हीच पूजा या भावाने सेवा केल्यास ईश्‍वरप्राप्ती होते, असे म्हटले जाते; पण या उक्तीची खरी प्रचीती सनातनच्या साधकांना एका साधकाच्या उदाहरणातून घेता येईल. येथील सनातन संकुलात रहाणारे आणि प.पू. फडकेआजी यांचे जावई, तसेच वक्तशीरपणा, परिपूर्ण सेवा, प्रेमभाव, स्थिरता या सर्वच गुणांचा समुच्चय असलेले कर्मयोगी व्यक्तीमत्त्व श्री. अरविंद गाडगीळ यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आणि जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले, ही आनंदवार्ता ६९ टक्के पातळीच्या सौ. अश्‍विनी पवार यांनी दिली.

तीव्र आध्यात्मिक त्रासातही परिपूर्ण सेवा करणारे श्री. अरविंद गाडगीळ !

     देवद, पनवेल येथील सनातन संकुलात रहाणारे श्री. अरविंद गाडगीळ (वय ६२ वर्षे) यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत. 
१. मितभाषी 
    श्री. गाडगीळ हे पहिल्यापासूनच मितभाषी आहेत. पूर्वीपासूनच नोकरीच्या ठिकाणी किंवा नंतर प्रसारात, तसेच आश्रमात सेवा करत असतांना त्यांनी जास्त बोलण्यापेक्षा कृती किंवा सेवा करण्यासच प्राधान्य दिले. 
२. परिपूर्ण सेवा 
    वर्ष १९९९ मध्ये ते मुंबईला दैनिक सनातन प्रभातच्या अहवालाची सेवा करत होते. त्या वेळी ते अंकांचा हिशोब परिपूर्ण करण्याचा प्रयत्न असे. सेवा हीच देवपूजा आहे, असे ते नेहमी म्हणतात. कुणाकडून दैनिकाची वर्गणी यायची असल्यास ते स्वतः त्या साधकाला दूरभाष करून त्याची आठवण करून द्यायचे.

विद्यार्थी-साधकांनो, दीपावलीच्या सुटीच्या काळात चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवून सर्वांगीण विकास साधणार्‍या विविध सेवांमध्ये सहभागी व्हा !

१. राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी वेळ देणे, ही काळाची आवश्यकता !
     भावी आपत्कालीन स्थिती निर्माण होण्यापूर्वी धर्मप्रसार आणि सनातनच्या संशोधनाचे कार्य समाजापर्यंतच नाही, तर जगात सर्वत्र अधिकाधिक पोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे शिक्षण, तसेच अन्य व्यावहारिक कामे सांभाळून अधिकाधिक वेळ राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी देणे काळाची आवश्यकता आहे.
२. पालकांनो, १३ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या साधक-पाल्यांना सुटीत आश्रमात पाठवा !
     थोड्याच दिवसांत शाळा आणि महाविद्यालये यांमधील विद्यार्थ्यांना दीपावलीची सुटी लागेल. या कालावधीत १३ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या साधक-पाल्यांना सेवेत सहभागी होण्यासाठी सनातनच्या रामनाथी (गोवा), देवद (पनवेल) येथील आश्रमात अथवा मंगळुरू (कर्नाटक) सेवाकेंद्रात पाठवता येईल. आश्रमांमध्ये विविध सेवा उपलब्ध आहेत.
३. आश्रमातील सेवा
३ अ. सनातन-निर्मित ग्रंथांच्या संदर्भातील १. मराठी भाषेत टंकलेखन करणे
२. लिखाणाचे भाषांतर, तसेच भाषाशुद्धी करणे
३. ग्रंथसंरचना करणे
४. ग्रंथासाठीची मुखपृष्ठे बनवण्यासाठी संगणकीय छायाचित्रांवर काम करणे
५. रेखाचित्रे (आऊटलाईन्स्) सिद्ध करणे
६. सात्त्विक कलाकृती सिद्ध करणे
७. छायाचित्रांचे वर्गीकरण करणे

ईश्‍वराकडून ज्ञान मिळण्याची प्रक्रिया

श्री. राम होनप
     साधक ईश्‍वरी ज्ञानाच्या पाठी लागला, तर त्याला काही मिळत नाही; पण तो ईश्‍वराच्या पाठी लागला, तर ज्ञान अशा साधकाच्या पाठी लागते, म्हणजे ईश्‍वराकडून आपोआप ज्ञान प्राप्त होते. - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.६.२०१६) ॐ


हिंदु जनजागृती समितीच्या प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग या नवीन उपक्रमाविषयी सूचना

     प्रथमोपचार म्हणजे रुग्णाला वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत त्याच्यावर केले जाणारे प्राथमिक उपचार ! भावी आपत्काळाचा, अर्थात् भविष्यात होऊ शकणारे महायुद्ध, नैसर्गिक आपत्ती, दंगली आदींचाही विचार करता समाज आणि राष्ट्र यांच्याप्रतीचे कर्तव्य म्हणून प्रथमोपचार प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाने घेणे आवश्यक झाले आहे. यासाठी सनातनने प्रथमोपचार प्रशिक्षण ही तीन भागांची ग्रंथमालिका प्रकाशित केली आहे. भावी आपत्काळात नागरिकांचे रक्षण व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समिती लवकरच सर्वत्र निःशुल्क प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग हा उपक्रम चालू करणार आहे. सनातन-निर्मित प्रथमोपचार प्रशिक्षण ग्रंथमालिका हाच या प्रशिक्षणवर्गांचा अभ्यासक्रम असणार आहे.
उपक्रमाचे स्वरूप
     प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग हा हिंदु जनजागृती समितीचा सामाजिक उपक्रम असेल. त्याद्वारे समविचारी डॉक्टर (आधुनिक वैद्य), परिचारिका, प्रथमोपचार या संदर्भात कार्य करणार्‍या संस्था अन् व्यक्ती यांचे संघटन करायचे आहे. या उपक्रमाद्वारे भावी आपत्काळाच्या दृष्टीने समाजाला प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देऊ इच्छिणारे अथवा साहाय्य करू इच्छिणारे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी यांची सिद्धता करवून घेणे अपेक्षित आहे. समाजातील डॉक्टर, परिचारिका आदींनाही या उपक्रमात सहभागी करून घेता येऊ शकते.
जिल्हासेवकांनी प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग चालू करण्यापूर्वी करावयाची पूर्वसिद्धता
१. प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग स्वतः घेऊ शकतात, असे आपल्या भागातील प्रासंगिक सेवा करणारे साधक, तसेच हितचिंतक डॉक्टर अन् परिचारिका यांची सूची बनवावी.
२. जिल्हास्तरावर प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग उपक्रमाचे दायित्व घेऊ इच्छिणार्‍यांचे ३ दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील शिबीर गोवा येथे घेण्याचे नियोजन करत आहोत.

प.पू. भक्तराज महाराजांचा अध्यात्मप्रसार जगभर करायचा आहे, हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प.पू. डॉक्टरांंनी घेतलेले परिश्रम आणि साधकांना चैतन्याने जोडणारी अद्वितीय गुरुमाऊली !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
१. भविष्यात संस्थेच्या कार्यात महिलांचा सहभाग अधिक असणार
असल्याची प.पू. डॉक्टरांनी २२ वर्षांपूर्वी केलेली भविष्यवाणी खरी होणे
     वर्ष १९९४ मधील रामनवमीला कांदळीला बरेच साधक जमले होते. त्या वेळी कोणीतरी सूत्र मांडले, प्रसाराला, संपर्काला गेल्यावर बहुधा वयस्कर व्यक्ती आणि महिलाच अधिक भेटतात. तरुण मुले-मुली अध्यात्माकडे वळत नाहीत. त्या वेळी प.पू. डॉक्टर म्हणाले, संस्थेच्या कार्यात ७० प्रतिशतपेक्षा अधिक महिला सहभागी होऊन कार्य करतील. आजची स्थिती तशीच आहे. संस्थेच्या सर्व कार्यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे. स्त्री म्हणजे शक्तीचे रूप आहे. शक्तीविना शिवतत्त्व कार्य करू शकत नाही, हे आपण वाचलेच आहे.
२. प.पू. डॉक्टरांनी अध्यात्मप्रसाराची केलेली पायाभरणी
श्री. अशोक लिमकर
२ अ. प्रारंभीच्या प्रसारकार्याचे स्वरूप
     संंस्थेचे कार्य चालू झाले, तेव्हा आतासारखे ग्रंथ किंवा अन्य प्रसारसाहित्य उपलब्ध नव्हते. प.पू. डॉक्टरांनी वेळोवेळी सांगितलेली सूत्रे घेऊनच आम्ही प्रसारासाठी जात असू. प्रवचन, अभ्यासवर्ग किंवा सत्संग यांचे नियोजन झाल्यावर त्याचे फलक हातांनी बनवून पुठ्ठ्यावर चिकटवून ते मंदिरांमध्ये आणि महत्त्वाच्या ठिकाणी लावत असू. एक प्रवचन झाल्यावर पुढच्या प्रवचनाचा फलक सिद्ध करण्याची सेवा चालू होत असे. एखाद्या जिज्ञासूला अध्यात्माची आवड आहे, असे लक्षात आल्यावर त्याला वरचेवर संपर्क करून सत्संग, अभ्यास यांचे महत्त्व पटवून देण्याचे नियोजन आणि त्यानुसार कृती केली जात असे.

साधकांनो, मायारूपी अंधःकार नष्ट करून चैतन्यदायी प्रकाशाची उधळण करणारा सनातन आकाशकंदिल घरोघरी पोचवण्याची सेवा भावपूर्ण करा !

सनातन आकाशकंदिल असे चैतन्यदायी ज्ञानदीप ।
जणू गुरुदेवांनी दिला हिंदु राष्ट्राचा हा प्रकाशदीप ॥
१. सनातन आकाशकंदिलाचे महत्त्व
     २६.१०.२०१६ पासून दीपावलीला आरंभ होत आहे. या काळात आकाशकंदिलाला अनन्यसाधारण महत्त्व असते. सनातनचा आकाशकंदिल केवळ आकाशदिवा नव्हे, तर श्री गुरूंचा ज्ञानदीप आहे. तो चैतन्यदायी प्रकाश घरोघरी पोचवतो. हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी देवता, ऋषिमुनी आणि संत यांचा संकल्प कार्यरत झाला आहे. हा संकल्प फळास येेण्यासाठी हा दीप प्रयत्नरत आहे. वास्तूत सनातन आकाशकंदिल लावल्याने अनेकांना चांगल्या अनुभूती आल्या आहेत.
२. सनातनचा आकाशकंदिल बनवतांना कसा भाव ठेवावा ?
     चैतन्याची उधळण करणारा हा आकाशकंदिल बनवण्याची संधी साधकांना लाभत आहे. प्रत्यक्ष भगवंतच ही सेवा माझ्याकडून करून घेणार आहे, असा कृतज्ञतेचा भाव ठेवून नामजपासहित सेवा करावी. मनोभावे, अचूकपणे आणि परिपूर्णतेने सेवा होईल, याकडे लक्ष द्यावे.
३. श्री गुरूंचा ज्ञानदीप सर्वत्र पोचवा !
     आकाशकंदिलाच्या वितरणाची सेवा म्हणजे गुरूंनी दिलेले चैतन्य सर्वदूर पोचवण्याची अमूल्य संधी ! हा आकाशकंदिल मायारूपी अंधःकार नष्ट करून देवतांचा दैदीप्यमान प्रकाश सर्वत्र प्रक्षेपित करतो.

घराच्या अथवा आश्रमाच्या परिसरात करणीच्या त्रासाने भारित केलेले साहित्य आढळल्यास त्यावर कुंकू घालून त्याला लिंबाने तीन वेळा ओवाळून हा उतारा दूर कुठेतरी फेकून द्यावा !

साधकांना सूचना !
     सध्या बर्‍याच वेळा साधकांच्या घराच्या किंवा आश्रमाच्या परिसरात करणीच्या त्रासाने भारित केलेले उतारे, उदा. लिंबू, कुंकू, भाकरी आणि त्यांवर काळे तीळ, मेलेले पक्षी, विड्याचे पान, तांदूळ आणि त्यावर सुपारी, तसेच खिळे इत्यादी साहित्य अल्प-अधिक प्रमाणात पडलेले साधकांना आढळून येत आहे. सध्या सनातनच्या साधकांना करणीच्या माध्यमातून अनिष्ट शक्ती त्रास देत आहेत. या त्रासातून मुक्त होण्यासाठी महर्षींनी सांगितलेला उपाय पुढीलप्रमाणे करावा.
     करणीच्या त्रासाने भारित असलेेल्या या साहित्यावर आपल्या कुलदेवतेचे नाव घेऊन आणि तिलाच प्रार्थना करून कुंकू घालावे. त्यानंतर या साहित्यावरून तीनदा घड्याळाच्या काट्याप्रमाणे एक लिंबू ओवाळावे आणि नंतर हे लिंबू दूर कुठेतरी फेकून द्यावे. नंतर हा उतारा जवळच्या पाण्यात विसर्जन करावा. पाणी प्रवाही असेल, तर अधिक चांगले. जवळ पाण्याची जागा नसेल, तर चार रस्ते किंवा तीन रस्ते मिळतात, त्या जागेवर हा उतारा ठेवावा.

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे ॐ

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

॥ हरि ॐ तत्सत् ॥

Add caption
ईश्‍वरालाच जिंकणे
 विषयांपेक्षा विषयांच्या निर्मात्यालाच का जिंकू नये ?
भावार्थ : एकेक विषय जिंकत जायचे म्हटले तर वासना, आवडी-निवडी, स्वभावातील दोष, असे लाखो विषय जिंकायला, म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण मिळवायला लाखो जन्म लागतील. त्यापेक्षा त्या सर्वांच्या निर्मात्यालाच भक्तीने या जन्मात जिंकले, तर त्या सर्वांवर या जन्मातच नियंत्रण मिळविता येईल; म्हणूनच म्हटले आहे, 'एक साधै सब साधै । सब साधै सब जाय ॥' म्हणजे एका नामाला, भगवंताला (नाम आणि भगवंत एकच आहेत.) साध्य केले म्हणजे सर्वच साध्य होते. सर्व साध्य करायला गेलो, तर काहीच साध्य होत नाही. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     
     'जात्यंधता, सर्वधर्मसमभाव 
आणि बुद्धीप्रामाण्यवाद यांच्या आहारी गेलेल्या हिंदूंनी 
स्वातंत्र्यानंतर प्रगती केली आहे, असे एकतरी क्षेत्र आहे का ?'
 - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योग्य आचार-विचार
संस्कृती म्हणजे विद्वत्तापूर्ण चर्चा नसून कायम 
स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणे आणि इतरांच्या दु:खाची जाणीव ठेवणे !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

मुसलमान आणि भारतातील कायदे !

संपादकीय
      भारतात सध्या मुसलमानांच्या तीन वेळा तलाक पद्धतीवरून गदारोळ चालू आहे. वास्तविक मुसलमान महिलांच्या मानवी अधिकारांच्या संदर्भात विचार करावयाचा झाल्यास या तरतुदी अत्यंत जाचक आहेत; मात्र मुसलमान संघटनांची एकी आणि दबाव एवढा आहे की, तो झुगारण्याचे धैर्य कोणत्याही शासनाकडे नाही. असे असले, तरी सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट झालेल्या याचिकेवर भाजप शासनाने मात्र ठाम निर्णय घेत तीन वेळा तलाक पद्धत अन्यायकारक असून त्यांची भूमिका स्पष्टपणे लोकांसमोर मांडण्याचे धाडस दाखवले आहे, हे स्तुत्य आहे. केंद्रीय कायदामंत्री अरुण जेटली यांनीही पत्रकार परिषद घेऊन, तसेच त्यांच्या ब्लॉगद्वारे मुसलमान महिलांना न्याय दिला जाईल, अशी शासनाची भूमिका स्पष्ट केली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn