Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

श्रीलंकेत दसर्‍याच्या दिवशी ख्रिस्ती, मुसलमान आणि बौद्ध गुंडांकडून हिंदूंवर आक्रमण !

 • केंद्र सरकारने श्रीलंकेतील हिंदूंच्या रक्षणासाठी कृती करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !  
 • ख्रिस्ती मिशनर्‍यांचे खरे स्वरूप ओळखा !
 • आक्रमणामागे ख्रिस्ती मिशनर्‍यांचा हात !
        कोलंबो - श्रीलंकेतील अनुराधापुरा या मुसलमानबहुल जिल्ह्यातील निरावी या गावी ख्रिस्ती, मुसलमान आणि बौद्ध गुंडांनी ११ ऑक्टोबर या दसर्‍याच्या दिवशी शक्ती मंदिरात नवरात्रीचा उत्सव साजरा करणार्‍या हिंंदूंवर आक्रमण करून त्यांना मंदिरातून हुसकावून लावले. या धर्मांधांच्या तावडीत सापडलेल्या एका हिंदूला प्राणघातक शस्त्रांनी वार करून गंभीररित्या घायाळ करण्यात आले. ख्रिस्ती मिशनर्‍यांनी कट रचून हे आक्रमण केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
१. निरावी या गावी आंध्रप्रदेशातील ३०० हिंदु कुटुंबे रहात आहेत. त्यांचा स्वच्छता करणार्‍या कामगारांत समावेश होतो. त्यातील २०० कुटुंबांचे ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हळूहळू धर्मांतर केले. गावात एक चर्चही उभे राहिले आहे. 

वाघोदा (जिल्हा जळगाव) येथे दुर्गादेवीची मूर्ती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या हिंदूंवर धर्मांधांकडून दगडफेक

 • हिंदूंनो, किती काळ हिंदूंकडून मार खाणार आहात ? यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
 • २ हिंदू घायाळ, तक्रार नोंदवण्यास पोलिसांची टाळाटाळ
      वाघोदा (जिल्हा जळगाव) - येथे १२ ऑक्टोबरला रात्री १०.३० वाजता दुर्गादेवीची मूर्ती विसर्जन करण्यासाठी जाणार्‍या हिंदूंना धर्मांधांनी शिवीगाळ केली, तसेच त्यांच्यावर दगडफेकही केली. (हिंदू संघटित नसल्याचाच हा परिणाम ! - संपादक) या वेळी २ हिंदूंच्या डोक्याला मार लागून ते घायाळ झाले.
      या प्रकरणी हिंदू पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेल्यावर त्यांनी ती नोंदवण्यास टाळाटाळ केली. (हिंदूंची तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करणारे पोलीस एकप्रकारे धर्मांधांना वाचवण्याचाच प्रयत्न करत आहेत. असे पोलीस हिंदु राष्ट्रात नसतील ! - संपादक)
      तक्रार करण्यासाठी आलेल्या हिंदूंना पोलीस म्हणाले, तुम्ही तक्रार दिल्यास तुम्हाला सतत फेर्‍या माराव्या लागतील. तुम्हाला त्रास होईल. (हिंदूंचे रक्षण करण्याऐवजी उलट भीतीच दाखवणारे पोलीस हवेच कशाला ? हिंदूंनो, अशा पोलिसांची त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार नोंदवा ! - संपादक)
      याच्या निषेधार्थ वाघोदा येथील ग्रामस्थांच्या वतीने बंद पाळण्यात आला आहे. (हिंदूंनो, केवळ बंद पाळू नका, तर हिंदूंवर आक्रमणे होऊ नयेत, यासाठी प्रयत्न करा ! - संपादक) सर्वांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. श्री गणेश चतुर्थीच्या काळातही त्याच परिसरात धर्मांधांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. (हिंदूंच्या उत्सवांमध्ये वारंवार अडथळे आणणार्‍या धर्मांधांवर शासन कठोर कारवाई करणार का ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही ! - संपादक)

दसर्‍याच्या दिवशी घरी केलेल्या शस्त्रपूजेचे छायाचित्र फेसबूकवर ठेवल्यामुळे हिंदु मक्कल कत्छीचे अध्यक्ष अर्जुन संपथ यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट !

हिंदूंच्या धार्मिक सणांच्या वेळेला 
केल्या जाणार्‍या पूजेवरही गुन्हा नोंदवणे, 
ही धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपीच होय !
       चेन्नई - येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु मक्कल कत्छी (हिंदू जनता पक्ष)चे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांनी दसर्‍याच्या दिवशी घरी केलेल्या शस्त्रपूजेचे छायाचित्र स्वतःच्या फेसबूक पानावर ठेवले होते. त्यावरून २ धर्मांमध्ये शत्रूत्व निर्माण केल्याच्या आरोपावरून त्यांच्या विरोधात कलम १५३(ए) आणि २५(ए) नुसार हा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. यानंतर श्री. संपथ यांनी ही छायाचित्रे फेसबूक पानावरून काढली आहेत.
       येथील काही राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. यामुळे समाजात अशांतता निर्माण होते, असा त्यांनी दावा केला आहे. तसेच श्री. संपथ यांच्याकडे शस्त्र बाळगण्याची अनुज्ञप्ती (लायसन्स) आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.
       या आरोपांवर श्री. संपथ म्हणाले की, त्या बंदुका नव्हत्या, तर मुलाची खेळणी होती आणि ज्या धातूच्या वस्तू होत्या त्या भेट म्हणून मिळाल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी चालू केली आहे.

भिवंडी येथे धर्मांधांनी अल्ला हो अकबरच्या घोषणा देत नवरात्रीची कमान तोडली !

 • उद्दाम धर्मांधांकडून पोलिसांची अशी स्थिती केली जाते, यावरून धर्मांधांना पोलिसांचा कोणताही धाक वाटत नाही, हेच सिद्ध होते. हिंदूंवर कायद्याचा बडगा उगारणारे पोलीस धर्मांधांसमोर नेहमीच नांगी टाकतात, हेच या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अशा पोलिसांकडून जनतेचे रक्षण कसे होणार ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
 • छोटे पाकिस्तान बनलेली भिवंडी ! सरकार अशा धर्मांधांवर पायबंद कसा घालणार ?
 • पेट्रोलबॉम्ब फेकून पोलीस मिनीबस आणि दुचाकी जाळली !
 • पोलिसांच्या ३ गाड्यांची तोडफोड !
        भिवंडी - येथील गायत्रीनगरात १२ ऑक्टोबरला मोहरमच्या मिरवणुकीत धर्मांधांनी अल्ला हो अकबरच्या घोषणा देत नवरात्रीची कमान तोडली. या वेळी झालेल्या दंगलीत हस्तक्षेप करणार्‍या पोलिसांवरही धर्मांधांनी आक्रमण केले. पेट्रोलबॉम्ब फेकत पोलिसांची मिनीबस आणि दुचाकी जाळली. पोलिसांच्या तीन गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. या घटनेत ७ पोलीस आणि १ पत्रकार घायाळ झाला. मोहरमचा ताजिया जात नसल्याने धर्मांधांनी नवरात्रोत्सवाची कमान तोडली. या घटनेमुळे संपूर्ण भिवंडीत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहेे.

तिसर्‍या महायुद्धाच्या धोक्यामुळे परदेशात रहाणार्‍या रशियन नागरिकांना देशात बोलावून घ्या ! - राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा आदेश

रशियाला जे लक्षात आले आहे, 
ते भारत सरकारला कधी येणार ?
       मास्को - तिसर्‍या महायुद्धाचा धोका असल्याने रशियाने त्यांच्या जनतेला सूचना दिल्या आहेत की, परदेशात रहाणार्‍या जवळच्या लोकांना, रशियन नागरिकांना आपल्या देशात तात्काळ बोलावून घ्या.
       स्थानिक प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, देशातील सर्व मोठ्या नेत्यांनी आणि उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनीच हा आदेश दिला आहे. हा आदेश पुतिन यांच्या कार्यालयातून देण्यात आला आहे. रशियन संकेतस्थळ झ्नाक डॉट कॉम(Znak.com) च्या वृत्तानुसार पुतिन यांनी हे पाऊल त्यांनी त्यांचा फ्रान्सचा दौरा रहित केल्यानंतर उचलले आहे. सिरीयामधील युद्धामुळे तिसरे महायुद्ध होण्याची रशियाला शक्यता वाटत आहे, असे म्हटले जात आहे.
       ऑक्टोबरच्या प्रारंभी पुतिन यांच्या सरकारमधील एका उत्तरदायी मंत्र्याने घोषणा केली होती की, त्यांनी राजधानी मास्कोत १२ लाख लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अण्वस्त्रविरोधी बंकर बनवले आहेत. रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी म्हटले आहे की, रशिया आणि अमेरिका यांच्यातील तणावपूर्ण स्थितीने जग एका धोकादायक वळणावर पोचले आहे.

न्यायालयात योग्य व्यवस्थापनाचा अभाव आदी कारणे खटले प्रलंबित रहाण्यास कारणीभूत !

खटले निकालात काढण्यासाठी शासन आणि न्यायालय यांनी योग्य तोडगा काढणे आवश्यक !
कायदा विभागाच्या अहवालात खटले प्रलंबित रहाण्यामागे विविध कारणांचा उहापोह !
     नवी देहली - न्यायाधिशांच्या कमतरतेसह न्यायालयात योग्य व्यवस्थापनाचा अभाव, कामकाज वारंवार स्थगित होणे, अधिवक्त्यांचे संप, आव्हान याचिका साठून रहाणे, रिट पद्धतीचा नको तेवढा वापर, खटल्यांचे सुसूत्रीकरण नसणे ही कारणेही खटले प्रलंबित रहाण्यामागे कारणीभूत आहेत, असे कायदा विभागाने म्हटले आहे. 
    देशात न्यायाधिशांची कमतरता असल्याने खटले प्रलंबित रहाण्याचे प्रमाण अधिक आहे, असा सामान्य समज असला, तरी प्रलंबित खटल्यांचे ते एकमेव कारण नाही, असे कायदा विभागाने स्पष्ट केले आहे. कायदा विभागाने न्यायदान आणि कायदा सुधारणाविषयक राष्ट्रीय अभियानाच्या सल्लागार परिषदेसाठी एक अहवाल सिद्ध केला आहे. त्यात ही कारणे सांगितली आहेत.

(म्हणे) नरेंद्र मोदी हे युद्धखोर !

मोदी युद्धखोर असते, तर एव्हाना पाकचे नामोनिशाण केव्हाच मिटले असते !
पाकप्रेमी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांची पुन्हा गरळओक !
      नवी देहली - युद्धखोर मोदी हे भारताला हळूहळू पाकशी युद्ध करण्याच्या दिशेने नेत आहेत. पुढची निवडणूक जिंकण्याचा हाच एकमेव मार्ग असल्याची त्यांची धारणा झाली आहे; मात्र असे करण्याने ते केवळ आयएस्आय आणि पाक सैन्याचे हात बळकट करत आहेत. मोदी यांच्या या धोरणाने पाकमधील राजकीय नेतृत्व दुर्बळ होत आहे. आण्विक सामर्थ्य असलेल्या २ देशांना युद्ध करणे परवडणार आहे का ?, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी पाकशी पुन्हा एकदा चर्चा करण्याची मागणीही केली. भारत-पाक यांनी एकमेकांविरोधात लढण्यापेक्षा भूक अन् कुपोषणाविरोधात लढावयास हवे, असेही सिंह म्हणाले. (दिग्विजय सिंह यांनी हे पाकिस्तानात जाऊन त्याला सांगण्याचे धाडस करून दाखवावे ! - संपादक)

अ‍ॅन इन्स्टिट्यूटचे आनंदराव नागवेकर यांनी सनातन संस्थेची सत्य बाजू दिग्दर्शकांना सांगून देवाक दिउया आर्गा या तियात्रातील सनातनची अपकीर्ती करणारा भाग वगळण्यास लावला !

आनंदराव नागवेकर यांच्यासारखे सनातन प्रभातचे विज्ञापनदाते, 
सक्रीय वाचक आणि हिंदु धर्माभिमानी हीच सनातनची खरी शक्ती !
श्री. आनंदराव नागवेकर
      म्हापसा, १३ ऑक्टोबर (वार्ता.) - देवाक दिउया आर्गा या तियात्रात (संगीत नाटकाच्या एक प्रकारात) सनातनला अपकीर्त केले जात होते. ही गोष्ट लक्षात आल्यावर दैनिक सनातन प्रभातचे विज्ञापनदाते, सक्रीय वाचक, हिंदु धर्माभिमानी तथा अ‍ॅन इन्स्टिट्यूटचे श्री. आनंदराव नागवेकर यांनी तत्परतेने तियात्राचे दिग्दर्शक उल्हास तारी यांना संपर्क साधून त्यांच्याकडे सनातनची सत्य बाजू मांडली. सनातनला अपकीर्त केल्यास तियात्राला विरोध होणार असल्याचेही श्री. नागवेकर यांनी दिग्दर्शक उल्हास तारी यांना सांगितले. श्री. नागवेकर यांनी केलेल्या प्रबोधनानंतर उल्हास तारी यांनी तियात्रातील सनातनला अपकीर्त करणारा भाग वगळला. त्यानंतर म्हापसा येथील हनुमान नाट्यगृह येथे ९ ऑक्टोबर या दिवशी सनातनला अपकीर्त करणारा भाग वगळून तियात्राचे सादरीकरण करण्यात आले.

दुर्लक्षित भाजप कार्यकर्त्यांनी गोवा सुरक्षा मंचमध्ये यावे ! - आनंद शिरोडकर, अध्यक्ष, गोवा सुरक्षा मंच

      पणजी - भाजपला सत्तेवर आणण्यासाठी प्रामाणिक आणि नि:स्वार्थी वृत्तीने कार्य केलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आज भाजपमध्ये कोंडमारा होत आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गोवा सुरक्षा मंचमध्ये अशा कार्यकर्त्यांना योग्य संधी आहे. या कार्यकर्त्यांनी उघडपणे मंचच्या राजकीय पक्षात सहभागी व्हावे. भाजप चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेतले जात नाही. शासनाने माध्यमप्रश्‍नी जनतेची फसवणूक केली. कार्यकर्ते आणि जनता यांचा अपेक्षाभंग केला. राज्यातील राजकीय प्रदूषणाचे शुद्धीकरण होणे आवश्यक आहे, असे आवाहन गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी केले आहे. दैनिक गोवन् वार्ता या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आनंद शिरोडकर यांनी हे आवाहन केले आहे.

बिकानेर येथे विश्‍व हिंदु परिषदेचा चिनी उत्पादनांच्या विरोधात मोर्चा

आता सरकारनेच चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकावा !
चिनी उत्पादनांची विक्री न करण्याचे व्यापारांना आवाहन !
      बिकानेर (राजस्थान) - चीनकडून पाकला करण्यात येत असलेल्या आर्थिक आणि सैनिकी साहाय्याच्या विरोधात विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने शहरात मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात परिषदेच्या पदाधिकार्‍यांसह मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. या वेळी देशाच्या सैन्याच्या समर्थनार्थ चिनी उत्पादनांची विक्री न करण्याचे व्यापार्‍यांना आवाहन करण्यात आले. चिनी उत्पादनांचा मुख्य आयातदार भारतच आहे. त्यामुळे देशाने चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकल्यास चीनवर दबाव निर्माण करता येईल, असे परिषदेचे शहर अध्यक्ष मुकेश शर्मा यांनी सांगितले.

तमिळनाडूतील मंदिरात कोट्यवधी रुपये मूल्याच्या पाचूच्या प्राचीन शिवलिंगाची चोरी !

     त्रिची - नागपट्टनम् जिल्ह्यातील किझ्हाईयुरजवळ असलेल्या त्यागराज स्वामी मंदिराच्या कुलुपबंद कप्प्यातून (लॉकर) पाचू रत्नापासून बनवलेले कोट्यवधी रुपये मूल्याचे प्राचीन शिवलिंग ९ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी चोरीला गेले. 
     तमिळनाडूत भगवान शंकराला भगवान त्यागराज अथवा सोमास्कंद या नावाने ओळखले जाते. तमिळनाडूत भगवान शंकराची ७ मंदिरे आहेत. त्यांपैकी भगवान त्यागराज मंदिर हे एक आहे. त्याचे व्यवस्थापन थीरुक्कौवालाई धर्मापुराम अधिनाम बघत आहे. तेथील शिवलिंगाला प्रत्येक दिवशी सकाळी ९ आणि सायंकाळी ६.३० वाजता पुजारी अभिषेक करत असत. हे शिवलिंग ज्या लॉकरमध्ये ठेवण्यात येत होते, त्याची एक किल्ली पुजार्‍याकडे, तर दुसरी रविचंद्रन् या कर्मचार्‍याकडे असते. ९ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी अभिषेक करण्यासाठी पुजारी आणि कर्मचारी गेले असता त्यांना लॉकर उघडे दिसले. ही माहिती मिळताच तंजावूर विभागाचे साहाय्यक महानिरीक्षक सेन्थीकुमार, नागपट्टनम् जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दुराई आणि इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोचले. त्यांनी मंदिरचे पुजारी, कर्मचारी आणि अधिकारी यांची चौकशी केली. पोलिसांचे श्‍वान आणि फॉरेन्सिक तज्ञ यांचेही साहाय्य घेण्यात आले. पोलीस निरीक्षकाच्या नेतृत्वाखाली ३ विशेष पथके शिवलिंगाचा शोध घेण्यासाठी सिद्ध करण्यात आली आहेत.

गायीचे दूध, तूप, मूत्र आणि शेण चेहर्‍यावर लावल्याने लाभ होतो ! - गुजरात गोसेवा विकास बोर्ड

     कर्णावती - गुजरात गोसेवा विकास बोर्डाने महिलांना सूचना केली आहे की, त्यांनी गोयीचे दूध, तूप, मूत्र आणि शेण चेहर्‍यावर लावण्याचा प्रयोग करून पहावा. यामुळे चेहर्‍यावर चांगले परिणाम दिसून चेहरा सुंदर होतो. दूध १५ मिनिटे चेहर्‍यावर लावले पाहिजे. त्यानंतर तूप आणि हळद याने १५ मिनिटे मसाज करावा. त्यानंतर १५ मिनिटे गोमूत्र लावावे आणि फेसपॅक प्रमाणे शेण लावून शेवटी कडूलिंबाच्या पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे तोंडवळा मेकअपपेक्षा (सौंदर्यवर्धनापेक्षा) अधिक सुंदर दिसतो. 
    बोर्डाने पुढे म्हटले आहे की, देशातील सर्वांत सुंदर मानली जाणारी राणी क्लिओपात्रा दूधाने स्नान करत होती. बोर्डाकडून एक पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. यात गोमूत्र, शेण, दूध यांमुळे विविध रोगही दूर होतात, असे म्हटले आहे. तसेच अमेरिका, रशिया आणि इटली येथील शास्त्रज्ञांनीही याला दुजोरा दिला आहे, असे यात म्हटले आहे.

(म्हणे) मूळ गोमंतकीय ख्रिस्ती असलेल्या पाकिस्तानी पत्रकाराला पाकने देश सोडण्यास मनाई केल्याविषयी त्याच्याशी चर्चा करण्यासंबंधी केंद्रशासनाकडे मागणी करणार !

 • पाकिस्तानमधील हिंदूंवरील अनन्वित अत्याचारांविषयी गोवा फॉर्वर्डचे तिंबलो किंवा अन्य नेते यांनी कधी अशी मागणी केली आहे का ?
 • गोव्यातील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अल्पसंख्यांकांना खुश करण्यासाठी गोवा फॉर्वर्डचे नाटक ! 
     पणजी - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तानी सैन्याला आतंकवाद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची बातमी पाकिस्तानमधील प्रसिद्ध डॉन या वृत्रपत्रात प्रसिद्ध केल्याप्रकरणी पत्रकार सिरील आल्मेदा यांना पाक शासनाने देश न सोडण्याची सूचना केली आहेे. सिरील आल्मेदा हे मूळ गोमंतकीय आहेत. या घटनेसंबंधी गोवा फॉर्वर्ड पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर तिंबलो यांनी म्हटले आहे की, याविषयी दोन्ही देशांमध्ये चर्चा करण्यासाठी केंद्रशासनाकडे मागणी करणार आहे. (पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही देशांत हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले जातात, त्याविषयी मूळ हिंदु असलेल्या तिंबलो यांनी कधी चिंता व्यक्त केली आहे का ? का हिंदूंनी असेच धर्मांधांच्या हातून मरायचे असते, असे त्यांना वाटते ? आल्मेदा ख्रिस्ती आहे म्हणून ही मागणी करण्यात येत आहे. सिरील आल्मेदा यांनीही स्वतःच पाकिस्तानात रहायचा निर्णय घेतलेला नाही का ? त्याविषयी गोंमतकियांनी चिंता करण्याची काय आवश्यकता ? यावरून गोव्यातील ख्रिस्त्यांची येत्या निवडणुकीत मते मिळावीत यासाठीच हे चिंतेचे नाटक आहे, हे जनता जाणून आहे. पाकच्या सैन्याने हल्लीच चुकून पाकच्या हद्दीत गेलेल्या चव्हाण नावाच्या भारतीय सैनिकाला पकडून नेले होते. त्याच्या सुटकेसाठी तिंबलो आणि त्यांचा गोवा फॉर्वर्ड केंद्रशासनाकडे मागणी करील का ? - संपादक)

कालाहांडी (ओडिशा) येथे ओडिशा सरकारची बंदी झुगारून भाविकांकडून नवरात्रीत ५० सहस्र पशूंचा बळी !

बकरी ईदच्या दिवशी देशभरात लक्षावधी पशूंची कत्तल केली 
जात असतांना कोणत्याही सरकारने अद्याप त्यावर बंदी का घातली नाही ? 
धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या धार्मिक प्रथांवर बंदी कशासाठी ?
      कालाहांडी (ओडिशा) - कालाहांडी जिल्ह्यातील मानिकेश्‍वरी मंदिरात ९ ऑक्टोबरला अष्टमीच्या दिवशी वार्षिक छत्तर यात्रेच्या वेळी ५० सहस्र पशू आणि पक्षी यांचा बळी देण्यात आला. प्रत्येक वर्षी या तिथीला पशूबळी दिला जातो. ओडिशा सरकारकडून या बळी प्रथेवर प्रतिबंध लावण्यात आला होता; मात्र भाविकांनी त्याकडे दुर्लक्ष करत बळी दिले. स्थानिक भाविकांच्या म्हणण्यानुसार सरकारकडून अशी बंदी घालणे हे त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यामध्ये दखल देण्यासारखे आहे. सरकारने बळीच्या विरोधात येथे जनजागृती केली होती. प्रशासनाने मंदिर परिसरात सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेरेही लावले होते. तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या यात्रेमध्ये दीड लाखाहून अधिक भाविक सहभागी झाले होते.श्रीलंकेच्या नौदलाचा तमिळ मच्छीमारांवर पुन्हा आक्रमण !

      रामेश्‍वरम् - श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या आक्रमणात तमिळनाडूचे ७ मच्छीमार घायाळ झाले. यातील एकाची स्थिती गंभीर आहे. हे मच्छीमार लंकेच्या कह्यात असलेल्या लहान बेटावर मासेमारी करत होते, असा श्रीलंकेच्या नौदलाचा त्यांच्यावर आरोप आहे. रामनाथपुरम् जिल्हा मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष एस्.पी. रयप्पन यांनी वरील माहिती दिली.

पाकच्या पंजाबमधील मशिदीच्या इमामाकडून ८ व्या पत्नीला घटस्फोट !

हिंदूंच्या संतांवर कथित आरोप करून त्यांची अपकीर्ती करणारी ढोंगी निधर्मीवादी प्रसारमाध्यमे 
पाद्री आणि इमाम यांच्या अनैतिक कृत्यांची वृत्ते कधी प्रसिद्ध करत नाहीत, हे लक्षात घ्या !
इमामाकडून मशिदीमध्ये अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण !
      लाहोर - पाकच्या पंजाब प्रांतातील कारी महंमद अस्लम या इमामाने त्याच्या मुसरत बीबी नावाच्या ८ व्या पत्नीस घटस्फोट दिला आहे. १५ वर्षांपूर्वी या दोघांचा विवाह झाला होता. मुसरत बीबी हिने तिच्या पतीला मशिदीमध्ये एका अल्पवयीन मुलाबरोबर अनैसर्गिक शारिरिक संबंध ठेवतांना पकडले होते. अस्लमने तिने या प्रकाराची कुठेही वाच्यता करू नये, यासाठी तिला अत्यंत निर्दयतेने मारझोड केली. अत्याचार सहन करत असलेल्या मुसरतला अखेर ५ दिवसांनी अस्लम यानेच घटस्फोट दिल्याचे सूत्रांनी सांगितले. मुसरतनंतरही अस्लमने आणखी दोन महिलांना आश्रय देण्याच्या नावाखाली त्यांच्याशी विवाह केल्याचे आढळून आले आहे.

हिंदूंनी इस्लामिक स्टेट हवे कि हिंदु राष्ट्र ? याचा निर्णय घ्यायचा आहे ! - चेतन जनार्दन, आंध्रप्रदेश समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून श्री. रवि, 
श्री. दत्तात्रेय राव, श्री. राजू गौडा, सौ. तेजस्वी 
आणि श्री. चेतन जनार्दन
     रंगारेड्डी (आंध्रप्रदेश) - आज धर्मनिरपेक्षवादाच्या नावावर देशात सरकारकडून हिंदूंची मंदिरे कह्यात घेतली जात आहेत; परंतु मशिदींना कधी हातही लावला जात नाही. आता आमच्या समोर धर्मनिरपेक्ष राष्ट्र कि हिंदु राष्ट्र ?, असा प्रश्‍न नाही, तर इस्लामिक स्टेट कि हिंदु राष्ट्र ? असा प्रश्‍न आहे आणि याविषयी आम्हाला निर्णय घ्यायचा आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे आंध्रप्रदेश समन्वयक श्री. चेतन जनार्दन यांनी केले.
     हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तंदूर येथील एका नवरात्रोत्सवात हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि स्त्रीजागृती यांविषयी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. तेजस्वी, तेलगु देसम पक्षाचे श्री. राजू गौडा, श्री. रवि आणि विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. दत्तात्रेय राव आदी उपस्थित होते.
     या वेळी सौ. तेजस्वी म्हणाल्या, महिलांनी त्यांच्या रक्षणासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकले पाहिजे. शारीरिक, मानसिक बळासह आध्यात्मिक बळ असणारी स्त्री खरी रणरागिणी आहे. श्री. दत्तात्रेय राव म्हणाले, हिंदु धर्म महान आहे. भारतीय पंचांगात भविष्यातील कालमान अनेक वर्षांपूर्वीच लिहिले आहे. अशा महान धर्माचे आपण आचरण केले पाहिजे.

बांगलादेशमध्ये बांगलादेश मायनॉरिटी वॉचच्या कार्यकर्त्यावर आक्रमण !

बांगलादेशात एका हिंदु मंत्र्याकडूनच हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यावर आक्रमण होणे, 
म्हणजे तेथे हिंदूंना कोणी वाली उरला नाही, हे स्पष्ट होते ! या हिंदूंकडे भारत सरकार लक्ष देईल का ?
बांगलादेशचे मंत्री नारायणचंद्र चंदा यांच्यावर आक्रमणाचा आरोप
      ढाका - खुलना येथील मानवाधिकार कार्यकर्ते आणि बांगलादेश मायनॉरिटी वॉच या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे समन्वयक श्री. अमरेश गइन यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. त्यानंतर त्यांना खुलना येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हालवण्यात करण्यात आले. या आक्रमणामागे बांगलादेशचे मासेमारी आणि पशुखात्याचे मंत्री नारायणचंद्र चंदा असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 
१. या आक्रमणानंतर श्री. गइन यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांनी दुमुरीया येथील पोलीस ठाण्यात जाऊन प्रथमदर्शी अहवाल (एफ्.आय.आर्.) प्रविष्ट करण्यासाठी प्रयत्न केला.
२. या घटनेत मंत्र्यांचा सहभाग असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे नाकारले.

इसिसकडून भारतातही शिरच्छेद आतंकवाद पसरवण्याचे षड्यंत्र !

आतंकवाद संपवण्यासाठी भारत कठोर कारवाई कधी करणार ?
      नवी देहली - इसिसच्या प्रमुखांनी भारतातील त्यांच्या सदस्यांना भारतातही शिरच्छेद आतंकवाद करण्याचा आदेश दिला आहे. शिरच्छेद आतंकवाद म्हणजे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांचा शिरच्छेद करून लोकांमध्ये आतंक पसरवणे होय. असे करतांना विदेशी नागरिकांना लक्ष्य करण्यास सांगण्यात आले आहे. 
    एका वरिष्ठ गुप्तचर अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार इसिसच्या आतंकवाद्यांना त्यांच्या प्रमुखांनी सांगितले आहे की, मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रे ठेवण्याऐवजी शिरच्छेद करण्यासाठी आवश्यक असणारी शस्त्रे ठेवातीत. यामुळे त्याचा खर्च अल्प होईल.

कळंबा (जिल्हा कोल्हापूर) कारागृहात अपमानास्पद वागणूक दिली जाते ! - श्री. समीर गायकवाड यांची न्यायालयात तक्रार

 • श्री. समीर गायकवाड यांच्यावर आरोप निश्‍चित करण्याच्या संदर्भातील सुनावणी २५ ऑक्टोबरला
 • कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
        कोल्हापूर, १३ ऑक्टोबर (वार्ता.) - कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी आणि सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्या विरोधात आरोप निश्‍चित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. तेथे अद्याप याविषयी निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुढील सुनावणी २५ ऑक्टोबर या दिवशी ठेवण्यात आली आहे. या वेळी अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन, तर शासकीय पक्षाच्या वतीने अधिवक्ता चंद्रकांत बुधले उपस्थित होते. कळंबा मध्यवर्ती कारागृहात कारागृह अधीक्षक चंद्रकांत आवळे यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळते आणि माझी मानहानी केली जाते, अशी तक्रार श्री. समीर गायकवाड यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल्.डी. बिले यांच्याकडे केली. न्यायाधीश नियमित कारागृह भेटीवर आल्यानंतर गेल्या आठवड्यात ही लेखी तक्रार केली आहे, अशी माहिती श्री. समीर गायकवाड यांनी त्यांचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांना दिली.
        कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी श्री. समीर गायकवाड यांना १० ऑक्टोबर या दिवशी न्यायालयात उपस्थित केले होते. न्यायालयात सुनावणी चालू होण्यापूर्वी अधिवक्ता पटवर्धन यांनी श्री. समीर यांची भेट घेतली असता, त्यांनी ही माहिती दिली.

गुजरातच्या कच्छमध्ये पाकच्या २ हस्तकांना अटक !

      कर्णावती - कच्छ जिल्ह्यामधील भारत-पाक सीमेजवळच्या गावामध्ये पाकच्या आयएस्आय या गुप्तचर यंत्रणेच्या २ हस्तकांना अटक करण्यात आली आहे. महंमद अलाना आणि सुफूर सुमारा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या भागातील भारतीय सैन्य आणि अर्धसैनिक दलांच्या हालचालींच्या संदर्भातील माहिती स्पष्ट करणारी कागदपत्रे या दोघांकडून हस्तगत करण्यात आली आहेत.

गुन्हेविषयीचे वार्तांकन कसे कराल ?

वार्ताहर प्रशिक्षण 
श्री. चेतन राजहंस
     
     वार्ता मिळवून देणार्‍या प्रत्येक क्षेत्राला पत्रकारितेच्या भाषेत 'बीट' असे म्हणतात. गुन्हेविषयक वृत्त देणार्‍या वार्ताहराला पत्रकारितेच्या क्षेत्रात 'क्राईम रिपोर्टर' म्हणून ओळखले जाते. वर्तमानपत्रांत लक्षवेधी ठरणार्‍या गुन्हेविषयक वार्तांचे संकलन कसे करावे, हे आज पाहूया. 
                                      श्री. चेतन राजहंस, उपसंपादक, सनातन प्रभात 
१. वार्ताहराचे परिक्षेत्र 
     'गुन्हेविषयक बातम्यांच्या क्षेत्राला 'क्राईम बीट' असे म्हटले जाते. या 'बीट'च्या अंतर्गत समाजातील अपराध आणि अपघात यांच्या संदर्भातील घटनांचे वार्तांकन केले जाते. त्यामुळे या वार्ताहरांचा संबंध शहर/जिल्हा पोलीस, आतंकवादविरोधी पथक, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), राष्ट्रीय अन्वेषण विभाग (एन्आयए), रेल्वे पोलीस, अग्नीशमन दल, रुग्णालय आणि न्यायालय यांच्याशी येतो. या संदर्भातील वृत्त गोळा करण्यासाठी या वार्ताहराला त्या क्षेत्राच्या कार्यपद्धतीचा आणि प्रशासकीय व्यवस्थेचा अभ्यास हवा. उदा. शहरातील एकूण पोलीस ठाणे, त्या पोलीस ठाण्यातील पोलिसांची पदे, त्यांचे कार्य, या पोलीस ठाण्यावर लक्ष ठेवणारे वरिष्ठ अधिकारी आदी. पोलीस यंत्रणेत पोलीस प्रशिक्षण, गृहनिर्माण, लाचलुचपत खाते, अंमली पदार्थ विरोधी पथक, आतंकवाद विरोधी पथक, नक्षलवादविरोधी पथक आदी विभाग असतात. त्यांच्या राज्यस्तरीय कार्यालयांत पत्रकारांसाठी नियंत्रण कक्ष असतो. त्यातून राज्यात घटनांची माहिती मिळते. 

(म्हणे) 'सनातन हे हिंदु धर्माचे खरे रक्षक नव्हेतच !' - मनोहर जांबेकर

     पिंपरी, १३ ऑक्टोबर - सनातन हे हिंदु धर्माचे खरे रक्षक नव्हेतच, असे प्रतिपादन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक मनोहर जांबेकर यांनी केले. अंनिसच्या वतीने प्रतिभा महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. (अंधश्रद्धेच्या नावाखाली श्रद्धेचे उच्चाटन करू पहाणार्‍यांनी हिंदु धर्माच्या रक्षणकर्त्यांविषयी न बोललेलेच बरे ! - संपादक)

रखडलेल्या निविदाप्रक्रियेमुळे सरकारी रुग्णालयांमध्ये चिकनगुनियाच्या औषधांचा तुडवडा !

     पुणे, १३ ऑक्टोबर - राज्यभर सध्या डेंग्यू आणि चिकनगुनिया या रोगांची साथ असतांना सरकारी रुग्णालयांमध्ये चिकनगुनियावरील औषधांचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत चिकनगुनियाच्या रुग्णांसाठी दिल्या जाणार्‍या हायड्रोक्सिक्लोरोक्विन आणि लिंगर लॅक्टेट ही औषधे काही रुग्णालयांमध्ये संपली असल्याचे, तर काही ठिकाणी मर्यादित स्वरूपात उपलब्ध असल्याचे समितीच्या सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. राज्याच्या आरोग्य खात्यात औषध खरेदीची प्रक्रिया ठप्प झाल्याने या औषधांची निविदाप्रक्रिया पूर्ण झाली नाही, अशी माहिती ससून रुग्णालयातील डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दिली. सरकारी रुग्णालयातील औषधे संपली असली, तरीही बाजारपेठेत ही औषधे मुबलक असल्याचे औषधविक्रेत्यांनी सांगितले. (सरकारचा भोंगळ कारभार ! रखडलेली निविदाप्रक्रिया पूर्ण होऊन आवश्यक औषधे रुग्णांना उपलब्ध कशी होतील, यासाठी संबंधित अधिकार्‍यांनी पहायला हवे, तसेच निविदाप्रक्रिया रखडण्याच्या कारणांचा शोध घेऊन त्यावरही उपाययोजना करायला हवी. - संपादक)

काश्मिरी हिंदूंच्या समर्थनार्थ पुणे येथे आयोजित विराट हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात !

चला गाजवूया ही विराट हिंदु धर्मजागृती सभा । 
काश्मिरी हिंदूंच्या मागे आता, शिवरायांचा मावळा आहे उभा ।
येतो आहे काश्मीरला हा शिवरायांचा मावळा । धर्मांधांनो, आता काश्मीर सोडून पळा ॥
 • पुणेकरांमध्ये धर्मजागृती सभेची उत्सुकता 
 • व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटर, फेसबूक यांसारख्या सामाजिक 
 • संकेतस्थळांच्या माध्यमातून सर्वत्र सभेची चर्चा 
 • राष्ट्रकार्यात सहभागी होण्यासाठी तरुण वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद
        पुणे, १३ ऑक्टोबर (वार्ता.) - जिहादी आतंकवादाने होरपळलेल्या काश्मिरी हिंदूंना देशभरातील धर्मबांधवांचा भरभक्कम पाठिंबा मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विराट हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात पोहोचला असून राष्ट्रकार्यात सहभागी होण्यासाठी नागरिकांचा विशेषतः युवकांचा आणि महिलांचा भरघोस प्रतिसाद लाभत आहे. हिंदुत्वनिष्ठांच्या बैठका घेणे, महिलांच्या बचतगटांमध्ये सभेची माहिती सांगणे या पारंपारिक प्रसारपद्धतीच्या जोडीला व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटर, फेसबूक यांसारख्या सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून सभेचा प्रसार करण्यात येत आहे. त्याद्वारे आतापर्यंत लक्षावधी लोकांपर्यंत सभेचा विषय पोचला असून समाजाच्या सर्वच स्तरांतून राष्ट्रकार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित केली जात आहे.

ट्रीपल तलाकमध्ये पालट करण्याचा सरकारला अधिकार नाही ! - मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

स्वतःच्या प्रथांमध्ये ढवळाढवळ 
करणार्‍या सरकारचा विरोध करणार्‍या 
मुसलमानांकडून हिंदू काही शिकतील का ?
       नवी देहली - ट्रीपल (तिनदा) तलाक हा पर्सनला लॉ असून त्यात केंद्र सरकारला पालट करण्याचा अधिकार नाही, असे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने म्हटले आहे. याप्रकरणी बोर्डाने कायदा आयोगावर बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे. ट्रीपल तलाक आणि अन्य महिलांविरोधी प्रथांवर जनमत जाणून घेण्यासाठी कायदा आयोगाने बनवलेली प्रश्‍नावली म्हणजे बनाव असल्याचेही बोर्डाने म्हटले आहे. कायदा आयोगाने मागच्या आठवडयात सर्वोच्च न्यायालयात ट्रीपल तलाकच्या प्रथेला विरोध केला होता.
       कायदा आयोग स्वतंत्रपणे काम न करता केंद्र सरकारच्या वतीने काम करत असल्याचा आरोपही बोर्डाने केला आहे.

पाकचा वरवरचा देखावा !

     'पाकमधील जैश-ए-महंमद आणि अन्य आतंकवादी संघटनांच्या विरोधात सैन्याने आता निर्णायक कारवाई करावी, असे आवाहन पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ सरकारने केले आहे.'

विश्‍वासार्हता संपवणारे राजकीय नेते !

     'काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात वर्ष २०१३-१४ मध्येही पाकच्या विरोधात सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते; मात्र काँग्रेसने त्यांचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला नाही, असे विधान काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी केले होते. हे विधान तत्कालीन सैन्य कारवाईचे महासंचालक (डीजीएम्ओ) निवृत्त लेफ्ट. जनरल विनोद भाटिया यांनी खोडून काढले.'

या संदर्भात अंनिसला काय म्हणायचे आहे ?

     'भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यापासून भारतीय सीमेवर तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत सीमेवरील सैनिकांचे रक्षण व्हावे, या हेतूने राजस्थान सरकारने जैसलमेर सीमेवरील श्री मातेश्‍वरी तानोत राय मंदिरात यज्ञ केला. या यज्ञासह २६ वेद विद्यालयांमध्येही सैनिकांसाठी मंत्रोच्चारांच्या पठणाचे आयोजन करण्यात आले.'

साहित्य संमेलन संवादी असावे ! - डॉ. अक्षयकुमार काळे

     पुणे, १३ ऑक्टोबर - साहित्य संमेलन खर्चिक अथवा साधे यापेक्षाही ते संवादी असावे, असे मत समीक्षक आणि आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीचे उमेदवार डॉ. अक्षयकुमार काळे यांनी व्यक्त केले. आगामी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आतापर्यंत डॉ. काळे, डॉ. जयप्रकाश घुमटकर आणि कवी प्रवीण दवणे यांचे अर्ज आले आहेत. 

मराठा आरक्षणाच्या संदर्भातील सुनावणी ७ डिसेंबरपर्यंत तहकूब

     मुंबई - मराठा आरक्षणाच्या विरुद्ध आणि समर्थनार्थ अशा दोन्ही प्रकारे प्रविष्ट केलेल्या याचिकांवरील सुनावणी ७ डिसेंबरपर्यंत तहकूब करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने १३ ऑक्टोबर या दिवशी घेतला आहे.
   या वेळी राज्य सरकारने उच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रकरणी प्रतिज्ञापत्र सिद्ध असून फेरपडताळणीसाठी आणखी अवधी द्यावा, अशी मागणी केली. त्यावर या प्रकरणी सरकारने लवकरात लवकर प्रतिज्ञापत्र प्रविष्ट करावे. ही सर्वांसाठी शेवटची संधी असेल, असे सांगत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना प्रतिज्ञापत्र प्रविष्ट करण्यासाठी २ आठवडे, तर माहिती गोळा करण्यासाठी राज्य सरकारला ४ आठवडे असा अवधी दिला आहे.डोनाल्ड ट्रम्प यांना निवडा अन्यथा अण्वस्त्रयुद्धाला सिद्ध व्हा ! - पुतिन याच्या सहकार्‍याची अमेरिकेला धमकी

       मास्को - जर अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांना निवडले नाही आणि हिलरी क्लिंटन यांना सत्ता दिली, तर अण्वस्त्रयुद्ध होणे निश्‍चित आहे, अशी धमकी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे सहकारी असणार्‍या व्लादिमिर झिरनोस्की यांनी दिली आहे. झिरनोस्की म्हणाले की, ट्रम्प यांच्या हातातच अमेरिका सुरक्षित आहे आणि जगही सुरक्षित आहे.

पनवेल येथे विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन !

प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवतांना रणरागिणी
     पनवेल - विजयादशमीनिमित्त तरुणांामध्ये धर्माचे बळ निर्माण व्हावे; म्हणून येथील कळंबोली परिसरात श्री राम मंदिर समितीच्या वतीने शस्त्रपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी कामोठे येथून निघालेली शिवप्रतिष्ठानच्या धारकर्‍यांची दुर्गादौड कळंबोली येथे पोहोचली. श्री राम मंदिर समितीच्या कार्यकर्त्यांनी दुर्गादौडीचे स्वागत केले आणि तेही त्यात सहभागी झाले. रणरागिणी शाखेच्या सौ. नंदिनी सुर्वे यांनी ध्वजाचे पूजन केले. श्रीराम मंदिरात शस्त्रपूजन करून मंदिरात सामूहिक आरती करण्यात आली. हिंदु राष्ट्राच्या विजयाचा जयघोष करण्यात आला. रणरागिणी शाखेच्या वतीने स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या वेळी शिवप्रतिष्ठान, हिंदु जनजागृती समिती, महाराणा प्रताप बटालियन आणि रणरागिणी शाखा यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

शामनशाहवली बाबांच्या दर्ग्यावरील चादर फडफडल्याने दर्ग्याने श्‍वास घेतल्याचा दावा

अंनिसला याविरोधात अंधश्रद्धा म्हणून आवाज उठवण्याचे धैर्य आहे का ? 
     अकोला - सिसा-बोंदरखेड येथील हजरत शामनशाहवली बाबांच्या दर्ग्या वरील चादर फडफडत होती त्यामुळे दर्ग्याने श्‍वाच्छोश्‍वास घेतल्याचा दावा १० ऑक्टोबरला भाविकांनी केला. याची ध्वनीचित्रफीतही व्हायरल झाली आहे. हजरत शामनशाहवली बाबांच्या समाधीवर असलेल्या फुलांची चादर आणि गलेबच्या खाली काहीतरी असेल, अशी शंका उपस्थितांना आल्याने त्यांनी एक एक करून फुलांची चादर आणि गलेब काढले; परंतु त्यात काही निघाले नाही. बाबांची समाधी धडकत असल्याचे मी प्रत्यक्ष पाहिले. माझ्या समक्ष समाधीवरील फुलांची चादर व गलेब काढण्यात आले होते, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. 
     अंनिसने भाविकांचा हा दावा फेटाळला असून कुठल्याही कारणाशिवाय घटना घडत नसल्याचे म्हटले आहे.

देशासाठी बलीदान करणार्‍या सैनिकांचा विसर पडू देऊ नका ! - पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)

अलोट उत्साहात श्रीदुर्गामाता दौडीचा समारोप ! 
पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)
     सांगली, १३ ऑक्टोबर (वार्ता.) - सीमेवर असणारे सैनिक आपल्या प्राणांची तमा न बाळगता देशाचे संरक्षण करतात. त्यामुळे देशासाठी बलीदान करणार्‍या सैनिकांचा आपल्याला कधीही विसर पडता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला प्रत्येक क्षेत्रात आदर्शच आहेत. त्यामुळे 'राजा शिवछत्रपती' हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरात असलाच पाहिजे, असे मार्गदर्शन पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी केले. श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात आलेल्या श्रीदुर्गामाता दौडीचा समारोप मोठ्या उत्साहात ११ ऑक्टोबर या दिवशी पार पडला. त्या वेळी शिवतीर्थावर धारकर्‍यांसमोर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. 

विजयदशमीच्या शुभमुहूर्तावर जळगाव येथे होणार्‍या धर्मजागृती सभेच्या प्रसारास प्रारंभ !

धर्मजागृती सभेप्रीत्यर्थ श्रीरामरायांच्या चरणी श्रीफळ
अर्पण करतांना पू. नंदकुमार जाधव आणि श्रीफळ
स्वीकारतांना ह.भ.प. मंगेश महाराज (उजवीकडे)
  जळगाव, १३ ऑक्टोबर (वार्ता.) - विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर जळगावचे ग्रामदैवत प्रभु श्रीराम यांच्या चरणी सनातनचे पू. नंदकुमार जाधव यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून २५ डिसेंबर २०१६ या दिवशी जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचारास प्रारंभ करण्यात आला. या वेळी प्रभु श्रीरामास हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील सर्व अडथळे दूर करून शीघ्रातीशीघ्र हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ दे, अशी प्रार्थना करण्यात आली. जळगाव श्रीराम संस्थानचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज यांनी सभेच्या प्रसारकार्यास, तसेच आयोजनास रामरायाचे आशीर्वाद असल्याचे सांगितले.
     या प्रसंगी हिंदु महासभेचे अधिवक्ता गोविंद तिवारी, युवा सेनेचे श्री. कपिल ठाकूर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय पाटील, सनातन संस्थेचे श्री. दत्तात्रय वाघुळदे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील अधिकाधिक हिंदु धर्माभिमान्यांपर्यंत पोचण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला.छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधाने करणार्‍या साहित्यिकांची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई व्हावी ! - श्री. शंभूराजे देसाई, आमदार, शिवसेना

पाटण येथील महाराष्ट्र साहित्य परिषद
      सातारा, १३ ऑक्टोबर (वार्ता.) - महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पाटण येथील विभागीय साहित्य संमेलनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्ये केल्याच्या प्रकरणी शिक्षणतज्ञ रावसाहेब कसबे आणि कवयित्री प्रज्ञा पवार यांच्या भाषणांची उच्चस्तरीय चौकशी होऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पाटण येथील शिवसेनेचे आमदार श्री. शंभूराज देसाई यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

बारावीनंतर उच्च शिक्षण घेणार्‍या ईबीसी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी कुटुंबाची उत्पन्न मर्यादा अडीच लाख रुपये करणार !

राज्य शासनाचा राजर्षी छत्रपती शाहू महाराज 
शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या अंतर्गत निर्णय
       मुंबई - विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याविषयीची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वांना दिली. बारावीनंतर उच्च शिक्षण घेणार्‍या ईबीसी वर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी कुटुंबाची उत्पन्न मर्यादा अडीच लाख करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी ईबीसी सवलतीसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाख इतकी होती.

धर्माभिमान्यांनी साधनेचा पाया भक्कम करण्यासाठी गुरुकृपायोगानुसार साधना करावी ! - सद्गुरु पू. (कु.) स्वाती खाडये

कोल्हापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 
आयोजित कार्यशाळेत ५५ धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
सनातनच्या संत सद्गुरु पू. (कु.) स्वाती खाडये
यांचे मार्गदर्शन ऐकतांना धर्माभिमानी
      कोल्हापूर, १३ ऑक्टोबर (वार्ता.) - कलियुगात व्यक्ती तितक्या प्रकृतीनुसार आज अनेक मार्ग साधना करण्यासाठी उपलब्ध असून गुरुकृपायोगानुसार साधना करून आपण जलद आध्यात्मिक प्रगती करू शकतो. आनंदी जीवन जगण्यासाठी स्वभावदोष आणि अहं-निमूर्लन प्रक्रिया राबवणे महत्त्वाचे आहे. केवळ साधनेचा पाया असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी बोटावर मोजण्याइतक्या मावळ्यांना घेऊन पाच मोठ्या पातशाह्यांचा बीमोड केला. त्यामुळे सर्व धर्माभिन्यांनी साधनेचा पाया भक्कम करण्यासाठी गुरुकृपायोगानुसार साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातनच्या संत सद्गुरु पू. (कु.) स्वाती खाडये यांनी येथे केले. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि बेळगाव या चार जिल्ह्यांतील धर्माभिमान्यांना कृतीशील करण्यासाठी आयोजित केलेल्या एकदिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. या वेळी ५५ धर्माभिमानी सहभागी झाले होते.

मुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नका, अन्यथा मुलांमध्ये नैराश्य येईल !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा 
मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांचे पालकांना आवाहन !
     कुडाळ - आजच्या जगात पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये अजिबातच सुसंवाद नाही. फक्त भौतिक सुविधा आपल्या मुलांना उपलब्ध करून दिल्या की, आपले उत्तरदायित्व संपले असे करू नका. मुलांवर अपेक्षांचे ओझे न लादता, तसेच त्यांची क्षमता बघूनच त्यांना योग्य मार्गदर्शन करा, अन्यथा मुलांमध्ये नैराश्य येईल, असे मत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी कुडाळ येथे व्यक्त केले.

फलक प्रसिद्धीकरता

ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! 
     भिवंडी येथे १२ ऑक्टोबरला मोहरमच्या मिरवणुकीत धर्मांधांनी नवरात्रीची कमान तोडली. या वेळी झालेल्या दंगलीत हस्तक्षेप करणार्‍या पोलिसांवरही त्यांनी आक्रमण केले. पेट्रोलबॉम्ब फेकत पोलिसांची मिनीबस, दुचाकी जाळली आणि त्यांच्या तीन गाड्यांचीही तोडफोड केली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 

 Maharashtra ke Bhivandi me dharmandhone 
navratra ki kaman todi aur police ke vahan jalaye. 
 Muslimbahul kshetra me Hinduonke utsav asurakshit ! 

जागो ! 

 महाराष्ट्र के भिवंडी में धर्मांधों ने 
नवरात्र की कमान तोडी और पुलिस के वाहन जलाए ! 
 मुस्लीमबहुल क्षेत्र में हिन्दुओ के उत्सव असुरक्षित !

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

संतांच्या विरोधात खोटी जबानी देण्यासाठी 
संतांच्या सेवकांवर दबाव आणणारे पोलीस !
       पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांनी कथित लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणात पीडित मुलीने, प.पू. बापूंचे सेवक श्री. शिवा यांनीच मला प.पू. आसारामजी बापूंकडे पाठवले, असा आरोप केला होता. त्यानंतर श्री. शिवा यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी श्री. शिवा यांची पी ७ या हिंदी वृत्तवाहिनीवर विशेष मुलाखत घेण्यात आली. त्या वेळी त्यांनी, प.पू. आसारामजी बापू कधीही कोणत्याही महिलेला एकांतात भेटत नाहीत. मुलीने सांगितला तसा कोणताही प्रकार (लैंगिक शोषणाचा) झालेला नाही. पोलिसांनी मला मारले, धमकी दिली आणि आम्ही जे सांगतो, तेच सांगावे लागेल, असे सांगितले. प.पू. आसारामजी बापू यांच्या संदर्भात माझ्याकडे कोणत्याही प्रकारची ध्वनीचित्रचकती नाही, असेही सांगितले.
पोलिसांविषयी चांगले आणि वाईट अनुभव असल्यास 
वाचकांनी नजीकच्या दैनिक कार्यालयात कळवावेत !

पाक हस्तक कसे काम करतात ?


श्री. भाऊ तोरसेकर
      भारतातील घातपाती केवळ लष्कर-ए-तोयबा किंवा मुजाहिदीन आहेत, ही आपली समजूत आहे. त्या स्फोट घडवणार्‍या जिहादींपेक्षाही भयंकर मोठी हानी करणारे प्रतिष्ठीत घातपाती आपल्या आसपास उजळमाथ्याने वावरत आहेत. गेल्या १० वर्षांत त्यांचा मस्तवालपणा किती बोकाळला होता, त्याची चर्चा होत नाही; म्हणून आजसुद्धा असे लोक प्रतिष्ठीत चेहर्‍याने समाजात वावरत आहेत; मात्र त्यांच्या कारवाया कायद्याच्या चौकटीतील असल्याने, त्यांना सरकार हात लावू शकत नाही.
सैन्यकारवाई संदर्भातील अफवा सुरक्षेशी पोरखेळ करणारी !
      तीन-चार वर्षांपूर्वी देशामध्ये लष्करी उठाव होणार असल्याची अफवा पाकिस्तानने नाही, तर भारतातीलच एका प्रतिष्ठीत इंग्रजी वृत्तपत्राने तसे वृत्त दिले होते. या बातमीत प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय राजधानी देहली कह्यात घेऊन भारतात लष्करी राजवट लादण्याचे कारस्थान शिजवले गेले होते.

ठाणे जिल्ह्यातील हिंदु जनजागृती समितीच्या सप्टेंबर २०१६ मधील प्रसारकार्यात धर्माभिमान्यांचा सहभाग !

१. प्रवचनानंतर धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी करणे
      पितृपक्ष आणि श्राद्ध यांमागील अध्यात्मशास्त्र लोकांना कळावे, याकरिता ठाणे येथे तीन ठिकाणी प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. याचा लाभ अनुमाने ३५ जणांनी घेतला. विषय मांडल्यानंतर एका ठिकाणी नियमित धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी करण्यात आली.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावरील आरोपांतील फोलपणा दर्शवणारी डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची वक्तव्ये !

१. धर्मांतराला विरोध केल्याने पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू 
यांच्याविरुद्ध रचलेले आंतरराष्ट्रीय षड्यंत्र उघड !
      पूज्य बापूजींविरुद्ध केलेल्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचे पितळ उघडे पाडतांना सुप्रसिद्ध विधीज्ञ डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी म्हणाले, विदेशांतून येऊन धर्मांतर करणार्‍या लोकांचा पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांनी दृढतेने विरोध केला. गुजरात आणि इतर क्षेत्रांतही प्रलोभन देऊन धर्मांतर करण्याच्या प्रयत्नांना विफल केले. यामुळे व्हॅटिकनमध्ये नाराजी पसरली. त्यानंतर कसेही करून बापूजींना अपकीर्त करण्यासाठी प्रयत्न चालू झाले. डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी हे वक्तव्य संभाजीनगर येथे (औरंगाबाद येथे) झालेल्या एका संमेलनात केले.
     पूज्य बापूजींना अशा प्रकारच्या षड्यंत्रात फसवण्यासाठी पुष्कळ वर्षांपासून आणि मोठ्या प्रमाणावर अतोनात प्रयत्न केले जात होते. याविषयी डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी म्हणाले, एकदा आम्ही विमानाने समवेत येत असतांना मी पूज्य बापूजींना सांगितले होते की, सत्तेत (तत्कालीन सत्ताधारी शासनात) जे लोक आहेत, ते त्यांच्यावर चिडलेले आहेत आणि ते काहीही करू शकतात. शेवटी तेच घडले, ज्याची मला शंका होती.

अर्थहीन भूतानुकरण कशासाठी ?

     इंग्रजांनी मेकॉले शिक्षणपद्धती भारतियांवर थोपवल्यापासून भारतियांना त्यांच्या गौरवशाली इतिहासाचे आणि बुद्धीमत्तेचे विस्मरण झाले. त्यातून स्वतःला अनावश्यक दूषणे देण्याचा आणि इंग्रज अथवा पाश्‍चात्त्य यांचा उदोउदो करण्याचा प्रकार वाढू लागला. केवळ कारकून निर्माण करणार्‍या शिक्षणपद्धतीमुळे उपजत बुद्धीमान असलेल्या भारतियांच्या मन आणि बुद्धी यांवर न्यूनगंडाचे आवरण वाढले. आपला तो कोळसा आणि पाश्‍चात्त्यांचा तो हिरा, अशी भावना बळावल्याने मोठ्या प्रमाणावर पाश्‍चात्त्य प्रथांचे अंधानुकरण केले जाऊ लागले. वेशभूषा, केशभूषा, आहारपद्धतीपासून कला अन् संस्कृती ही क्षेत्रेही अंधानुकरणाने व्यापून गेली. योग्य-अयोग्य, चांगले-वाईट यांचा विचार करण्याची सारासार बुद्धी गहाण असल्याने अंधानुकरणाचे प्रमाण वाढतच राहिले.

अभ्यास कसा करावा ?

परीक्षेच्या पार्श्‍वभूमीवर मुलांना मार्गदर्शक अशी लेखमालिका
     आजकाल बहुतेक मुले आईच्या आग्रहामुळे, बाबांच्या भीतीपोटी अन् एकमेकांमध्ये असलेल्या चढाओढीमुळे काहीशा तणावाखालीच अभ्यास करतांना दिसतात. अशा वेळी अभ्यास मनापासून होतोच, असे नाही. त्यामुळे परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही की, दुःख होते. त्यामुळे मुलांनो, अभ्यास करण्यामागील योग्य दृष्टीकोन समजून घेतला, तर अभ्यास कंटाळवाणा न वाटता आनंददायी वाटेल. अभ्यास करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत. त्याप्रमाणे अभ्यास केल्यास अभ्यास चांगला होतो. परीक्षेची भीती कशी घालवावी, उत्तरपत्रिका आत्मविश्‍वासाने कशी लिहावी, अभ्यासात एकाग्रता कशी साधावी आदींची माहिती सांगणारा हा लेखप्रपंच...
         लोक जागे होण्यासाठी लोकांचे सर्व प्रश्‍नांवर लोकजागर केले पाहिजे. (लोकजागर, १९.८.२०११)

अशांना फाशी का देत नाही ? पहिल्याच गुन्ह्यात फाशी दिली, तर पुढचे गुन्हे होणार नाहीत ! यासाठी कठोर कायदे बनवणे आवश्यक !

     ऑक्टोबर २००९ मधील मालतीया यादव या युवतीच्या हत्येप्रकरणी गोव्यातील म्हापसा येथील केंद्रीय अन्वेषण विभाग न्यायालयाच्या न्यायाधीश विजया पोळ यांनी आरोपी सायरन रॉड्रिग्स आणि चंद्रकांत तलवार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या दोघा आरोपींनी अशा पद्धतीने मुंबई, सुकूर, वेर्णा, मेरशी आणि खोर्जुवे येथे एकूण ५ हत्या केल्या होत्या.

सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडला नसल्याचे प.पू. नाना काळेगुरुजी यांना सूक्ष्मातून सांगितल्यावर त्यांनी तो ऐकल्याचे जाणवणे, त्यानंतर जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणे आणि त्याविषयी ही सर्व प.पू. गुरुदेवांची आशीर्वादरूपी कृपा आहे, असे गुरुजींनी सांगणे

पू. महादेव नकाते
     श्री योगीराज वेद विज्ञान आश्रम, कासारवाडी, सोलापूर येथील प.पू. नाना काळेगुरुजी यांनी अवर्षणग्रस्त भागात पर्जन्ययाग केले. परिणामत: या वेळी मराठवाडा, विदर्भ, लातूर अशा बर्‍याच ठिकाणी पाऊस पडला; पण जून, जुलै, ऑगस्ट २०१६ मध्ये सोलापूर जिल्ह्यात पाऊस मुळीच पडला नाही. विशेष करून सोलापूर शहरात ५ दिवसांत महानगरपालिकेकडून होणारा पिण्याचा पाणीपुरवठाही अनियमित होत होता. उन्हाळ्यासारखी उष्णता जाणवत होती. त्या वेळी प.पू. नाना काळेगुरुजींना मी सूक्ष्मातून म्हणालो, महाराज ! सर्वत्र पाऊस आहे. आपण रहाता त्या ठिकाणीच पाऊस नाही. लोक काय म्हणतील ? तत्क्षणीच हे विचार त्यांच्या कानी पडून त्यांनी ते ग्रहण केल्याचे जाणवले. नंतर १५ दिवस सोलापूर जिल्ह्यात जोरात पाऊस झाला आणि अजूनही आहे.
     मी हा प्रसंग गुरुजींना दूरभाषवरून सांगितला. त्या वेळी ते म्हणाले, ही सर्व प.पू. गुरुदेवांची आशीर्वादरूपी कृपा आहे. त्यातून गुरुजींचा मोठेपणा दिसून आला. हे मजचीस्तव झाले । परी म्या नाही केले ॥ ही उक्ती आठवली. मग लक्षात आले, प.पू. डॉक्टरांनी जे काही संत-महंत जोडले आहेत, त्या महान विभूतीच आहेत. ही अनुभूती प.पू. गुरुदेवांच्या कृपेने अनुभवता आली. ती त्यांच्या सुकोमल चरणी अर्पण करतो.
- (पू.) श्री. महादेव नकाते, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.९.२०१६)

प.पू. नाना काळे गुरुजी यांच्या देहत्यागाविषयी सनातनचे संत पू. सौरभ संजय जोशी यांंनी दिलेल्या पूर्वसूचना !

प.पू. नाना काळेगुरुजी
पू. सौरभ जोशी
     अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांनी ११ ऑक्टोबरला देहत्याग केला त्याविषयी पू. सौरभ जोशी यांनी दिलेल्या पूर्वसूचना आणि पू. महादेव नकातेकाका यांना आलेली अनुभूती येथे देत आहोत.
१. दिनांक ७.१०.२०१६
पू. सौरभदादांचे नख लागून त्यांच्या छातीवर आडवा ओरखडा येणे आणि याविषयी विचारल्यावर त्यांनी ब्लॉकेज, ब्लॉकेज, असे शब्द उच्चारणे : सकाळी दोन घंटे काही कारणाने वीज नसल्याने खोलीतील वातावरण गरम होते. पू. सौरभदादा अंगावरील पांघरुण काढण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांच्या छातीला त्यांचेच नख लागून आडवा ओरखडा आला. मी त्यांना विचारले, दादा, हे काय केले ? त्यांनी त्वरित ब्लॉकेज, ब्लॉकेज, असे शब्द उच्चारले. तेव्हा माझ्या मनात कुणालातरी हृदयविकाराचा त्रास होत असावा, असा विचार आला. सायंकाळी डॉ. दुर्गेशदादा पू. सौरभदादांना पहायला आले. तेव्हा मी पू. सौरभदादांना जिथे नख लागले होते, तिथे हात लावून हे काय झाले, ते दुर्गेशदादांना सांगा, असे म्हटले. तेव्हाही त्यांनी ब्लॉकेज असे शब्द उच्चारले.
सौ. प्राजक्ता जोशी
२. दिनांक ९.१०.२०१६
पाऊस, पाऊस, असे म्हणून पू. सौरभदादांनी हात जोडून नमस्कार करणे : रात्री ८.०५ वाजता पू. सौरभदादा अकस्मात् पाऊस, पाऊस, असे म्हणून हात जोडून नमस्कार करण्याचा प्रयत्न करू लागले. नंतर काही वेळाने पाऊस चालू झाला. पू. सौरभदादा हातात माळ घेऊन रात्रभर जागे होते.
३. दिनांक १०.१०.२०१६
पू. दादांनी हळू आवाजात ना ना ना ना, असे म्हणणे आणि सायंकाळी ४.४० वाजता मोठ्याने सलग तीन वेळा ओरडणे : सकाळी पू. दादा हळू आवाजात ना ना ना ना, असे म्हणत होते. या वेळी पावसाचाही वेगळा नाद येत होता. हे ऐकून मी त्यांना विचारले, दादा, काय नाही ? तरीही ते ना ना ना ना, असे म्हणत होते.

संतांनी देहत्याग केल्यानंतर त्यांच्या देहातील चैतन्य ग्रहण होण्यासाठी प्रार्थना करा !

श्री. गिरिधर वझे
साधकांना सूचना आणि हिंदु धर्माभिमान्यांना विनंती !
     सध्या धर्म-अधर्म मधील सूक्ष्मातील लढ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. तरीही ईश्‍वर, गुरु आणि संत यांच्या कृपेमुळेच सर्व साधक अन् हिंदु धर्माभिमानी हे जिवंत राहून धर्मकार्यात खारीचा वाटा उचलत आहेत. गुरु आणि संत यांनी देहत्याग केल्यानंतर त्यांच्या देहातून ब्रह्मांडात सर्वाधिक प्रमाणात ईश्‍वरी शक्ती आणि चैतन्य प्रक्षेपित होत असते. ते ग्रहण होण्यासाठी प्रार्थना केल्यास त्यांची शक्ती आणि चैतन्य मिळून धर्मकार्याला अधिक गती प्राप्त होईल. त्या दृष्टीने संतांच्या देहत्यागानंतर साधक आणि हिंदु धर्माभिमानी यांनी भगवान श्रीकृष्ण अन् संबंधित संत यांच्या चरणी प्रार्थना करावी. - श्री. गिरिधर वझे (११.१०.२०१६)


शरणागत होऊनी श्रीचरणांसी । भूतली हिंदु राष्ट्र स्थापूया ॥

परजूनी शस्त्र भाव-भक्तीचे षड्रिपूंना सीमा पार करूया ॥ १ ॥
उधळूनी सोने सद्गुणांचे अंतरी श्रीहरीला बसवूया ॥ २ ॥
करण्या निर्दालन दुर्गुणांचे आज कटीबद्ध होऊया ॥ ३ ॥
हिंदु राष्ट्र अंतरी स्थापण्या । ब्राह्म अन् क्षात्र तेज वाढवूया ॥ ४ ॥
घडविण्या हिंदुराष्ट्र श्रीधरासी नित्य आळवूया ॥ ५ ॥
शरणागत होऊनी श्रीचरणांसी भूतली हिंदु राष्ट्र स्थापूया ॥ ६ ॥
- सौ. अंजली अजय जोशी, सनातन आश्रम, मिरज. (१०.१०.२०१६)

दैवी प्रवासाच्या माध्यमातून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा मिळणारा अनमोल सत्संग आणि या सत्संगात येणार्‍या अनुभूती !

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
१. पूजेसाठी श्री दुर्गादेवीची अपेक्षित अशी मूर्ती न मिळाल्याने सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंना प्रार्थना करणे आणि लगेचच हवी ती मूर्ती मिळणे
     गोवा येथील रामनाथी आश्रमात पूजेसाठी काही देवतांच्या मूर्ती हव्या होत्या. या मूर्ती पहाण्यासाठी आम्ही एका दुकानात गेलो होतो. तेथे आपल्याला अपेक्षित अशा मूर्ती मिळाल्या; मात्र श्री दुर्गादेवीची मूर्ती मिळाली नाही. दुकानदाराने ती इतरत्र आणि त्याच्या गोडाऊनमध्ये पाहूनही ती मिळाली नाही. त्यानंतर मी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांना मनोमन प्रार्थना केली आणि त्या दुकानात मूर्ती शोधण्यास आरंभ केल्यावर थोड्या वेळातच आपल्याला अपेक्षित अशी मूर्ती मिळाली.
२. सद्गुरु गाडगीळकाकूंनी सांगितल्यानुसार रस्त्यातील एका दुकानात साडी घेण्यास जाणे, 
दुकान मालकांनी सनातन संस्थेची माहिती समजून घेऊन साडी वाजवी मूल्यात देणे
     एकदा नवीन साडी घेण्यासाठी आम्हाला दुकानात जायचे होते. श्री. विनायक शानबाग यांनी आम्हाला २ - ३ दुकानांची नावे सांगितली होती. सद्गुरु गाडगीळकाकूंनी रस्त्यातून जातांना वळणावर असलेल्या एका दुकानात जाण्यास सांगितले. त्या दुकानातून आम्ही साडी विकत घेतली. त्या दुकान मालकाला आम्ही सनातन संस्थेची माहिती सांगून आश्रमातील साधकांसाठी खरेदी करत आहोत, असे सांगितले.

साधकांनो, साधनेच्या प्रयत्नांमध्ये मागे मागे राहू नका, नाहीतर प्रगतीत मागे मागे रहाल !

पू. संदीप आळशी
     काही साधक चुका होतील, या भीतीमुळे एखादी सेवा करण्यास किंवा एखाद्या सेवेचे दायित्व घेण्यास कचरतात. काही साधक मला हे जमणार नाही, असा चुकीचा ग्रह मनाशी बाळगतात; त्यामुळे क्षमता असूनही त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार सेवा करणे जमत नाही. काही साधकांमध्ये सेवेच्या अनुषंगाने अभ्यासू वृत्ती अल्प असते किंवा सेवेमध्ये प्राविण्य मिळवण्याची तळमळ अल्प असते. असे साधकही पुढाकार घेऊन सेवा करण्यात मागे मागे रहातात. नोकरी, व्यवसाय आदी व्यावहारिक क्षेत्रांत काम करणारेही त्या त्या क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी धडपडत असतात; मग साधकांची सेवेत प्रवीण होण्याची धडपड अल्प का पडते ?
     सध्याचा आपत्काळ गतीने पुढे पुढे सरकत आहे. अशा आपत्काळात टिकून रहाता येण्यासाठी साधकांच्या प्रयत्नांमध्येही गतीमानता हवी. जे साधक प्रयत्नांमध्ये मागे मागे रहातात, त्यांच्यात नेतृत्व, धैर्य, आत्मविश्‍वास, विजिगीषू वृत्ती आदी गुणांचा विकासही होत नाही. त्यामुळे असे साधक हळूहळू आध्यात्मिक प्रगतीतही मागे मागे पडतात. साधकांनी याचा अंतर्मुख होऊन विचार करावा.
     मनुष्याला श्रद्धेनुरूप फळ प्राप्त होते, असे एक संस्कृत वचन आहे. साधकांनी गुरु किंवा देव यांवर श्रद्धा ठेवल्यास त्यांना सर्व प्रयत्न करायला जमतील.
     आध्यात्मिक त्रास असणार्‍या बर्‍याच साधकांना मला जमणारच नाही, असे वाटत असते.

सनातन प्रभातमध्येे सांगितलेले सर्वांसाठीचे आध्यात्मिक उपाय नियमित करण्याचे महत्त्व विशद करणारी अनुभूती

श्री. अपूर्व ढगे
१. रात्री षट्चक्रांवर देवतांची चित्रे धारण न करता झोपणे
आणि त्या वेळी वातावरणात उष्णता जाणवणे, अस्वस्थता
वाढणे, शांत झोप न लागणे आदी त्रास जाणवणे
     वर्ष २०११ मध्ये मी एकदा रात्री उशिरा घरी आलो आणि सर्वांसाठीचे आध्यात्मिक उपाय यात सांगितल्यानुसार चक्रांवर देवतांची चित्रे न लावताच झोपलो. तेव्हा मला शांत झोप लागत नव्हती, वातावरणात उष्णता जाणवत होती आणि माझी अस्वस्थताही वाढली होती. नंतर मी उठून उपास्यदेवतेला प्रार्थना केली. तेव्हा माझ्या लक्षात आले, मी देवतांची सात्त्विक चित्रे उपायांसाठी चक्रांवर लावलेली नाहीत.
      (परात्पर गुरु डॉ. आठवले हे सनातन प्रभात नियतकालिकांमध्ये सर्वांसाठीचे आध्यात्मिक उपाय या सदरात सध्याचा काळ आणि आध्यात्मिक त्रास यांच्या तीव्रतेनुसार प्रतिदिन कोणत्या चक्रांवर कोणत्या देवतांची सात्त्विक चित्रे वा नामपट्ट्या धारण कराव्यात ? कोणत्या देवतेचा नामजप करावा ? आदी मार्गदर्शन करतात. या दृष्टीने देवतांच्या तत्त्वांचा सर्वांना अधिक लाभ होण्यासाठी सनातनने प्रत्येक देवतेचे सर्वाधिक तत्त्व आकृष्ट होणारी सात्त्विक चित्रे आणि नामजपाच्या सात्त्विक अक्षरांतील पट्ट्या उपलब्ध केल्या आहेत. साधकाला रात्री अवस्थता जाणवतांना त्याने उपास्यदेवतेला प्रार्थना केल्यामुळे त्याच्यावरील काळ्या शक्तीचे आवरण दूर झाले आणि त्याला चक्रांवर देवतांची चित्रे धारण न केल्याचे लक्षात आले. - संकलक)
२. षट्चक्रांवर देवतांची सात्त्विक चित्रे धारण केल्यावर
वातावरणात शांतता जाणवून शांत झोप लागणे
     मी लगेच उठून सर्वांसाठीचे आध्यात्मिक उपाय यात सांगितल्यानुसार चक्रांवर देवतांची सात्त्विक चित्रे लावली. त्यानंतर माझे मन शांत झाले आणि मला वातावरणातही शांतता जाणवली.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

प.पू. डॉक्टर हे सर्वज्ञ, सर्वशक्तीमान आणि सर्वव्यापी परमेश्‍वर असल्याचे अन् त्यांच्या अनुसंधानातील महत्त्व अनुभवणे

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
१. अंगावर अचानक पाण्याचे थेंब पडणे आणि भावस्थितीत, आठवणीत
अथवा अनुसंधानात असतांना असे होत असल्याचे लक्षात येणे
     साधारण डिसेंबर २०१५ पासून अचानक माझ्या अंगावर पाण्याचे थेंब पडायचे. याचे प्रमाण फेब्रुवारी २०१६ मध्ये वाढले. मी कुठेही असले, तरी आकाशातून हे पाण्याचे थेंब पडायचे आणि नकळत माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त व्हायची. काही दिवसांनी निरीक्षण केल्यावर माझ्या लक्षात आले की, माझ्या मनात प.पू. डॉक्टरांप्रतीचा भाव दाटून येतो, त्यांची पुष्कळ आठवण येते किंवा अनुसंधान असते, त्या वेळी हे थेंब अंगावर पडतात. या कालावधीत रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्‍या एका साधकाशी माझे बोलणे झाले. तेव्हा माझी ही अनुभूती मी त्यांना संक्षेपाने सांगितली.
सौ. मानसी राजंदेकर
२. पुन्हा अंगावर पाण्याचे थेंब पडल्यावर सूक्ष्मातून प.पू. डॉक्टरांना त्याबद्दल
विचारणे आणि आतूनच त्यांनी ती वायुतत्त्वाची अनुभूती असल्याचे सांगणे
     त्यानंतर ५-६ दिवसांनी पुन्हा दुपारी माझ्या अंगावर असे पाण्याचे थेंब पडले. तेव्हा मी मनातल्या मनातच प.पू. डॉक्टरांना विचारले, देवा, हे काय आहे ? मला काहीच कळत नाही. तेव्हा आतून प.पू. डॉक्टरांनी उत्तर दिले, स्पर्श जाणवतो ही वायुतत्त्वाची अनुभूती आहे.
३. प्रत्यक्ष लिहून पाठवलेली नसतांना एक संतांनी अनुभूती वाचल्याचे आणि
ती वायुतत्त्वाची अनुभूती असल्याचा निरोप साधकाकडून मिळणे
     २-३ दिवसांनंतर त्या साधकाचा मला भ्रमणध्वनी आला. ते म्हणाले, ताई, एक संत म्हणाले की, मी ही अनुभूती वाचली आहे आणि सौ. मानसीला याचे उत्तरही कळवले आहे.

श्रीमती शिरीन चाइना यांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट

श्रीमती शिरीन चाइना
     साधारण १० ते १५ दिवसांपासून स्वतःमध्ये पुढील पालट झालेले माझ्या लक्षात आले.
१. मन स्थिर आणि निर्विचार असल्याचे जाणवणे
     या कालावधीत माझे मन स्थिर आणि निर्विचार असते. केवळ आज, म्हणजे ७.७.२०१६ या दिवशी एका वैयक्तिक प्रसंगामुळे माझ्या मनाचा गोंधळ होऊन माझे मन काही काळ मायेत अडकले होते; परंतु ती स्थिती २ - ३ मिनिटेच होती. मी डोळे बंद करून स्वतःच्या मनाकडे पाहिल्यावर ते लाटा किंवा तरंग विरहित शांत तळ्याप्रमाणे असल्याचे दिसते.
२. चूक सहजतेने स्वीकारता येणे
     मला माझी चूक दाखवून दिली असता मनात कोणतीही प्रतिक्रिया न येता माझ्याकडून ती स्वीकारली जाऊन कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्या वेळी मी पूर्णपणे शांत असते.
३. अवतीभोवती चाललेल्या गोष्टींकडे साक्षीभावाने पहाणे
     स्त्री अथवा पुरुष यांच्याकडे पहातांना मला त्यांच्यामध्ये कोणताही भेद दिसून येत नाही. मला प्रत्येकामधील आत्माच दिसतो. माझ्या अवतीभोवती काय चालले आहे ?, याकडे मी साक्षीभावाने पहात असते. मी एका वेगळ्याच शांत जगात असल्याचे मला जाणवते.
४. निरपेक्षता जाणवून आनंदी वाटणे
     गेल्या दहा दिवसांपासून मला स्वतःकडून अथवा इतरांकडून कोणत्याही अपेक्षा नाहीत. मी एकटी असतांनाही आनंदी असते. इतरांशी बोलतांना विचार करून नंतरच बोलते.
५. श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असणे आणि नामजप अखंड चालू असल्याचे जाणवणे
     बहुतेक वेळा मी श्रीकृष्णाच्या अनुसंधानात असते किंवा त्याला आत्मनिवेदन करत असते. मी सेवा करायचे थांबवल्यावर माझा नामजप चालू असलेले लक्षात आल्यामुळे तो आतून अखंडपणे चालू असल्याचे आणि झोपेतही माझा नामजप होत असल्याचे मला वाटते.
६. ओठांवर ईश्‍वरप्राप्ती हाच शब्द पुष्कळ वेळा येणे
     मला ईश्‍वरप्राप्तीची तीव्र तळमळ लागली असून त्यासाठी सतत ईश्‍वराला कळकळीने विनंती करत असल्याप्रमाणे माझ्या ओठांवर नामजपापेक्षा ईश्‍वरप्राप्ती हाच शब्द पुष्कळ वेळा येतो.
७. आनंदावस्थेत असणे आणि वात्सल्यभाव जागृत होणे
     बहुतांश वेळा मी आनंदावस्थेत असते आणि प्रीती ओसंडून वहात आहे, असे मला जाणवते.

घ्यावी अध्यात्मातील गरूडझेप श्रीगुरूंच्या संकल्पपूर्तीसाठी ।

वेदमूर्ती केतन शहाणेगुरुजी
     भाद्रपद कृष्ण पक्ष अष्टमी (२३.९.२०१६) या दिवशी सनातन साधक पुरोहित पाठशाळेचे अध्यापक वेदमूर्ती केतन शहाणेगुरुजी यांचा तिथीनुसार वाढदिवस झाला. त्यानिमित्त पाठशाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांना पुढील काव्यरूपी भेट दिली.

श्रीगुरूंच्या कृपेने आपण वेदमूर्ती पद भूषविले ।
महर्षींच्या आशीर्वादे यज्ञगुरु हे नामकरण झाले ॥ १ ॥

मुखावर प्रत्यक्ष देवी सरस्वती वास करील ।
असा आशीर्वाद आपणाला संतकृपेने प्राप्त झाला ॥ २ ॥

म्हणूनच जणू महर्षि वसिष्ठांसम गुरुमाऊलीच्या ।
सनातन कुटुंबाचे कुलगुरु आपण झालात ॥ ३ ॥

श्रीमत् नारायणस्वरूप सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा आपली असे ।
त्यामुळेच कोणतीही शंका आपल्यासमोर मान झुकवत असे ॥ ४ ॥

न केवळ तात्त्विक अभ्यास, साधनेचे महत्त्वही आपण बिंबवत असे ।
अशा गुरुतत्त्वस्वरूप आपणास आमचा साष्टांग प्रणिपात असे ॥ ५

प.पू. भक्तराज महाराजांना भेटण्याची आणि आश्रमात पूर्णवेळ साधक होऊन साधना करण्याची इच्छा असणारी ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून आलेली ठाणे येथील कु. श्रावणी पेंडभाजे (वय ८ वर्षे) !

कु. श्रावणी पेंडभाजे
१. गुणवैशिष्ट्ये 
१ अ. प्राणीमात्रांची आवड असणे : श्रावणीला गोअर्क प्यायला पुष्कळ आवडते. उपाय म्हणून गोअर्क सेवन करतांना ती ते सहजतेने, आनंदाने आणि स्वतःहून सेवन करते. तिला गायींना चारा घालायला आवडतो. रस्त्याने येता-जाता गाय दिसली की, लगेच मला दाखवते आणि मला तिला हात लावायचा आहे, असे म्हणते. तिला मांजरही पुष्कळ आवडते. दोन वर्षांची असल्यापासून ती मांजरांना न घाबरता हात लावते, त्यांना पकडते आणि त्यांच्या अंगावरून हात फिरवते.
१ आ. समजूतदारपणा आणि प्रगल्भता : वयाच्या मानाने तिच्यात समजूतदारपणा अधिक आहे. तिच्या वर्गातील मुला-मुलींपेक्षा शारीरिक आणि मानसिक यांदृष्ट्या ती पुढे आहे, असे जाणवते.

भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करणारे उज्जैन येथील कुंभक्षेत्री ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले सोलापूर येथील श्री. हिरालाल तिवारीकाका (वय ५१ वर्षेे) !


श्री. हिरालाल तिवारी
     सोलापूर येथील साधक श्री. हिरालाल तिवारीकाका हे श्रीक्षेत्र उज्जैन येथे कुंभपर्वानिमित्त सेवेसाठी गेले होते. तेथे २१.५.२०१६ या दिवशी काकांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानिमित्त सोलापूर येथील साधक आणि कुंभक्षेत्री काकांसमवेत सेवा केलेले साधक यांना काकांच्या प्रगतीविषयी मिळालेल्या पूर्वसूचना अन् त्यांना काकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहोत.
१. पूर्वसूचना
१ अ. सोलापूर येथील साधक १. मागच्या काही दिवसांत सेवा करतांना काका कशी सेवा करतात ? याची आठवण आली. तसेच काकांची प्रगती कधी होणार ? असा प्रश्‍न माझ्या मनात आला. देवाने त्या प्रश्‍नाचे आज उत्तर दिले. - कु. अश्‍विनी पैलवान, सोलापूर
२. काकांनी साधकांचे मन कधीच दुखावले नाही. ते तळमळीने आणि उत्तरदायित्व घेऊन सेवा करायचे. मागील काही दिवसांपासून काकांची सेवा पुष्कळ चांगली होत असल्याने मला त्यांची प्रगती होणार, असे वाटायचे. ते आज सत्य झाले. - सौ. उल्का जठार, सोलापूर
१ आ. उज्जैन कुंभक्षेत्री काकांसमवेत सेवा केलेले साधक १. मागील तीन दिवसांपासूनच काकांना सेवा करतांना पाहून त्यांची प्रगती झाली आहे, असे वाटायचे. - श्री. अजित धुळाज, कोल्हापूर आणि कु. जूही भुरे, नाशिक (२१.५.२०१६)
२. आम्ही सेवा करतांना ते मला माझ्या स्वभावदोषांची जाणीव करून द्यायचेे. २१.५.२०१६ या दिवशी सकाळी मी श्रीकृष्णाशी बोलत असतांना त्याने सांगितले, आज तिवारीकाकांची पातळी घोषित होणार.

रामनाथीतील देवाची दोन मुले ।

श्री. प्रतीक घोंगाणे
      श्री. प्रतीक जाधव (कु. वैष्णवीचा मोठा भाऊ) यांनी केलेली कविता येथे देत आहोत.

रामनाथीतील देवाची दोन मुले ।
होण्यास आतुरलेली चरणांवरची फुले ॥ १ ॥

त्यातील छोटेसे फूल नाव तिचे वैष्णवी ।
वैष्णवीवर कविता करण्याइतका मी नाही कवी ॥ २ ॥

प्रक्रियेतील काठी, माझ्या जीवनाचा आधार ।
वैष्णवी बोलते, तेव्हा कधीतरीच घेतो माघार ॥ ३ ॥

कुणाशी ना बोलायचे, कुणाला ना सांगायचे, अशी माझी प्रकृती ।
वैष्णवीच्या प्रेमामुळे न्यून झाली माझी विकृती ॥ ४ ॥

शिकता-शिकता कधी मी शिकवू लागतो तिलाच ।
ती मला समजून घेते, याचा तोटा मलाच ॥ ५

ठेव सदैव दैवी गुणांचा ध्यास !

कु. वैष्णवी घोंगाणे
     आज, आश्‍विन शुक्ल पक्ष त्रयोदशी (१४.१०.२०१६) या दिवशी कु. वैष्णवी जाधव हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिने केलेली कविता येथे देत आहोत.
सनातन परिवाराच्या वतीने कु. वैष्णवी घोंगाणे
हिला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

आज्ञापालन असे गुणांचा पंतप्रधान ।
त्यामुळे सूक्ष्म देहांचा लय होतो छान ॥ १ ॥

नम्रता हा तर असे राष्ट्रपती ।
त्यामुळे सर्व दोषांची गुंग होते मती ॥ २ ॥

प्रेमभाव हा गुण असे मुख्यमंत्री ।
यातूनच मिळे लवकर देवाजवळ जायची संधी ॥ ३ ॥

प्रेमभावानंतर असे भावाची बारी ।
त्याच्यावीण देवही येईना कधी दारी ॥ ४ ॥

व्यवस्थितपणा हा तर देवाचा लाडका ।
म्हणून तो आपल्यात असायला हवा बरं का ॥ ५

भ्रमणभाष भारीत करण्यासाठी अन्य आस्थापनांचे चार्जर आणि पॉवरबँक नको, तर भ्रमणभाषचा मूळ चार्जरच वापरा !

साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची माहिती
१. भ्रमणभाषच्या मूळ चार्जर व्यतिरिक्त अन्य चार्जर वापरल्याने बॅटरी लवकर खराब होणे
    बरेच जण भ्रमणभाष भारीत (चार्ज) करण्यासाठी सारखीच पीन असणारा; पण वेगळ्या आस्थापनाचा (कंपनीचा) चार्जर वापरतात. त्या चार्जरचे व्होेल्टेज किंवा अ‍ॅम्पियर अल्प-अधिक असेल, तर भ्रमणभाष गरम होणे, बॅटरी चार्ज होण्यासाठी अधिक वेळ लागणे, भ्रमणभाष बंद पडणे अशा अडचणी येतात. यामुळे भ्रमणभाष आणि त्याची बॅटरी लवकर खराब होते.
     भ्रमणभाष भारीत करण्यासाठी त्याचा मूळ (ओरिजिनल) चार्जरच वापरणे आवश्यक आहे. चार्जर खराब झाल्यास भ्रमणभाष ज्या मॉडेलचा आहे, त्या मॉडेलसाठी बाजारात उपलब्ध असलेला संबंधित आस्थापनाचा चार्जर विकत घ्यावा. अल्प मूल्यात उपलब्ध असलेले अन्य आस्थापनांचे चार्जर वापरू नयेत.
२. संगणक, पॉवरबँक यांचा भ्रमणभाष चार्जिंगसाठी वापर करणे टाळा !
     काही जण भ्रमणभाषची बॅटरी संगणक, भ्रमणसंगणक किंवा पॉवरबँक यांना जोडून भारीत करतात. अत्यावश्यक असतांनाच हे पर्याय वापरावेत. अन्य वेळी भ्रमणभाषच्या मूळ चार्जरचाच वापर करावा. पॉवरबँक, एम.पी.३ प्लेयर इत्यादी उपकरणेही संगणक किंवा भ्रमणसंगणक यांना चार्जिंगसाठी लावू नयेत.
३. भ्रमणभ्राषच्या बॅटरीचे आयुष्य वाढण्यासाठी पुढील काळजी घ्या !
     भ्रमणभाषची बॅटरी १० ते १५ टक्के असतांना तो चार्जिंगला लावावा आणि १०० टक्के बॅटरी चार्ज झाल्यावरच तो वापरावा. चार्जिंग पूर्ण होण्यापूर्वी तो मध्ये मध्ये डिस्कनेक्ट करणे टाळावे.

साधकांना सूचना

     पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. 
प्रारंभ - आश्‍विन शुक्ल पक्ष चतुर्दशी (१५.१०.२०१६) दुपारी १.२६ वाजता 
समाप्ती - आश्‍विन पौर्णिमा/कृष्ण पक्ष प्रतिपदा (१६.१०.२०१६) सकाळी ९.५३ वाजता 
दोन दिवसांनी पौर्णिमा आहे.
       हिंदूंनी हिंदुत्व हा आपला प्राण कुडीतून बाहेर काढून ठेवला आणि ते जिवंतपणाच्या हालचाली करू लागले; परिणामी हिंदूंचा सांगाडा झाला आहे. 
- श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.
       हिंदूंचा देव विश्‍वात्मके असतो. दुरितांचे तिमिर जावो । विश्‍व स्वधर्म सूर्ये पाहो ॥, अशा प्रार्थना करत हिंदु लहानाचा मोठा झालेला असतो. आपल्याप्रमाणे सारे जग साधे आणि सरळ आहे, अशी समजूत तो करून घेतो आणि फसतो; कारण जग कधीच साधे आणि सरळ नसते ! 
- श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      स्वातंत्र्यानंतर ६९ वर्षे झाली, तरी अजूनही इंग्रजी भाषेची गुलामगिरी नष्ट करावी, असे एकाही शासनकर्त्याला वाटत नाही. भावी हिंदु राष्ट्रात तामसिक इंग्रजी भाषेचे नव्हे, तर सात्त्विक संस्कृत भाषा आणि अन्य भारतीय भाषा यांचे संवर्धन अन् प्रसार केला जाईल.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
कर्माचे महत्त्व 
 कर्माविना तुम्हाला गती नाही; कारण कर्मालाच गती आहे. 
भावार्थ : दैनंदिन जीवनव्यापार असो, सुखप्राप्तीच्या साधनांचा शोध असो, दुःख टाळण्याचे उपाय असोत... सारी जगरहाटी, सारे विश्‍वचक्र कर्मामुळेच चालते. आध्यात्मिकदृष्ट्याही मनुष्याचा जन्म ही त्याच्यासाठी कर्मभूमीच आहे; कारण मनुष्य कर्म (साधना) करूनच ईश्‍वरप्राप्ती करून घेऊ शकतो. 
 (संदर्भ : 'सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.') 

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
कर्माचे महत्त्व 
 कर्माविना तुम्हाला गती नाही; कारण कर्मालाच गती आहे. 
भावार्थ : दैनंदिन जीवनव्यापार असो, सुखप्राप्तीच्या साधनांचा शोध असो, दुःख टाळण्याचे उपाय असोत... सारी जगरहाटी, सारे विश्‍वचक्र कर्मामुळेच चालते. आध्यात्मिकदृष्ट्याही मनुष्याचा जन्म ही त्याच्यासाठी कर्मभूमीच आहे; कारण मनुष्य कर्म (साधना) करूनच ईश्‍वरप्राप्ती करून घेऊ शकतो. 
 (संदर्भ : 'सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.') 

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा पुरुषार्थ 
कठीण परिस्थिती आणि संकटे यांना न घाबरता धैर्याने 
आणि हुशारीने त्यांना सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढणे, हाच खरा पुरुषार्थ ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


केक कापण्याची कुप्रथा बंद करा !

संपादकीय
      अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ७४ व्या वाढदिवसाला केक कापण्याचे नाकारून या कुप्रथेविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून ती बंद करण्याचे आवाहन केले. वलयांकित व्यक्तींचे अनुयायी अधिक असल्याने हे वाचून हिंदु धर्मप्रेमींना नक्कीच बरे वाटले असेल. वरील आवाहन करतांना त्यांनी उपस्थित केलेले प्रश्‍न महत्त्वाचे आणि बुद्धीवादी आंग्लाळलेल्यांना चपराकच आहेत. अमिताभ यांचा मोठेपणा हा की, त्यांनी प्रामाणिकपणे मीही पूर्वी केक कापत होतो, असे अतिशय प्रांजळपणे सांगून आता मी केक कापण्याच्या विरोधात आहे, असे सांगितले आहे. वाढदिवसाला केक आणणे, तो कापणे, त्यावर मेणबत्त्या लावणे, त्या विझवणे, या निरर्थक गोष्टींमागील कार्यकारणभाव काय ? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.

चिनी चेतावणीला उत्तर द्या !

संपादकीय
      १३ऑक्टोबरला ब्रीक्स (ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या) वाणिज्य मंत्र्यांची बैठक दिवसभर चालू आहे. मुख्यत्वे व्यापार वाढण्याच्या संदर्भातील ही बैठक आहे. भारताच्या गृहमंत्र्यांनी पाकलगतची सीमा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घोषित केल्याच्या पार्श्‍वभूमीवर चीनने चीन आणि भारत यांमधील आधीच रखडत चालू असलेला व्यापार अधिक बाधीत होईल, अशी धमकीच त्याचे शासकीय दैनिक ग्लोबल टाइम्समधून दिली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn