Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नवरात्रोत्सव (आज सातवा दिवस)


सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥
      एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.
 (संदर्भ : सनातनचा ग्रंथ 'शक्ती (भाग २ - शक्तीची उपासना') 

नवरात्र विषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका 

https://www.sanatan.org/mr/navratri

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे ९ वे संत 
पू. सदानंद (बाबा) नाईक यांचा वाढदिवस !

आतंकवाद्यांच्या प्रशिक्षणकेंद्रांच्या विरोधात पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांचेच आंदोलन !

     श्रीनगर - पाकिस्तान सरकार आतंकवाद पोसत असल्याचा आरोप करत पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकवादी प्रशिक्षणकेंद्रांंच्या विरोधात तेथील लोक रस्त्यावर उतरले आहेत. 'पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकवाद्यांचे तळ बंद करा', अशी मागणी या आंदोलकांनी केली. या आंदोलनामुळे पाकचा खरा चेहरा उघड झाला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून येथील लोक पाक सरकार आणि पाक सैन्य यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. आता त्यांनी आतंकवाद्यांच्या विरोधातही मोर्चा उघडला आहे. 

लोहियानगर (पुणे) येथील देवीच्या मूर्तीची धर्मांधाकडून विटंबना !

धर्मांधांकडून वारंवार होणारे हिंदूंच्या 
देवतांचे विटंबनेचे प्रकार थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे ! 
  • पोलिसांकडून गुन्हा प्रविष्ट 
  • धर्मांध मतीमंद असल्याचा मुसलमानांचा कांगावा 
     पुणे, ६ ऑक्टोबर (वार्ता.) - ऐन नवरात्रोत्सवामध्ये येथील लोहियानगर भागातील जय तुळजाभवानी मित्रमंडळाच्या देवीच्या मूर्तीची धर्मांध सय्यद परवेज सय्यद गुलाम नबी (वय १९ वर्षे) याने ५ ऑक्टोबरला रात्री विटंबना केली. हे कळताच स्थानिक धर्माभिमानी हिंदु भाविक मोठ्या संख्येने एकत्र जमले आणि त्यांनी धर्मांधाला पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. 

पाक कलाकारांच्या चित्रपटांवर बंदी घाला !

हिंदु जनजागृती समितीचे आवाहन 
अशी मागणी का करावी लागते ? 
शासनाने स्वतःहून अशा चित्रपटांवर बंदी घालणे अपेक्षित आहे ! 
     मुंबई - पाकिस्तानने भारतावर वारंवार आक्रमणे करून अघोषित युद्ध पुकारले असूनही या शत्रूराष्ट्राच्या कलाकारांना घेऊन भारतातीलच काही नतद्रष्ट चित्रपट-निर्माते गल्लाभरू चित्रपटांची निर्मिती करत आहेत. उरी आक्रमणानंतर देशभरात पाकविरोधी प्रतिक्रिया उमटत असतांना करण जोहर, शाहरुख खान, तसेच 'ऐ दिल है मुश्किल' आणि 'रईस' या चित्रपटांत काम करणार्‍या पाक कलाकारांनी एका शब्दानेही पाकचा निषेध केलेला नाही. 'ऐ दिल है मुश्किल' आणि 'रईस' हे आगामी चित्रपट, तसेच पाक कलाकारांचा समावेश असलेल्या सर्वच आगामी चित्रपटांचे प्रदर्शन करण्यास चित्रपटगृहाचे मालक आणि व्यवस्थापक यांनी ठामपणे नकार द्यावा, तसेच भारतीय प्रेक्षकांनी या चित्रपटांवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे. 

(म्हणे) 'आम्हा मुसलमानांना कधीकधी देशाचे दुय्यम नागरिक असल्यासारखे वाटते !' - केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी

काश्मीरमधून धर्मांध आणि देशद्रोही यांनी मशिदीतून धमक्या देऊन हिंदूंना 
हाकलून लावले, त्यांच्याविषयी मुसलमानांना काय वाटते, हे नक्वी यांनी सांगितले पाहिजे ! 
  • बंगाल, आसाम, केरळ येथे हिंदूंवर धर्मांधांकडून आक्रमणे केली जातात, त्याविषयी मुसलमानांना काय वाटते, हेही नक्वी यांनी सांगावे ! 
  • मुंबईतील आझाद मैदानाजवळ सहस्रावधी धर्मांधांनी म्यानमारच्या मुसलमानांसाठी दंगल घडवून कोट्यवधी रुपयांची हानी केली, हुतात्म्यांचा स्मृतीस्तंभ तोडला, याविषयी त्यांना काय वाटते, हेही नक्वी यांनी सांगावे ! 

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक झाले ! - पाकव्याप्त काश्मीरमधील पोलीस अधिकार्‍याची स्वीकृती

पाक पुन्हा तोंडघशी !
     नवी देहली - भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये आतंकवाद्यांसह ५ पाकिस्तानी सैनिकही मारले गेले होते, अशी स्वीकृती पाकव्याप्त काश्मीरमधील एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने दिली आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने या विषयीचे वृत्त दिले आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या मीरपूरमधील विशेष पथकाचे पोलीस अधीक्षक गुलाम अकबर यांनी म्हटले की, पाकिस्तानी अधिकार्‍यांना याची कल्पना आणि माहितीही नव्हती. यात ५ सैनिक मारले गेले. त्यानंतर पाक सैन्याने आतंकवाद्यांचे मृतदेह तात्काळ तेथून हटवले. भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाक सैन्याने संपूर्ण परिसराला घेरले होते. सर्व मृतदेह रुग्णवाहिकेत टाकून नेण्यात आले. जवळच्या गावांमध्ये हे सर्व मृतदेह दफन करण्यात आले. रात्री २ वाजल्यापासून ते पहाटे ४ ते ५ वाजेपर्यंत म्हणजे ३-४ घंटे आक्रमण चालू होते, असे सांगितले आहे.

अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी वायूदलाच्या विंग कमांडरला अटक !

असे अधिकारी देशाचे रक्षण कसे करणार ? 
आता सैन्याला त्यांच्याच अधिकार्‍यांवर लक्ष ठेवायला हवे ! 
      नवी देहली - अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय टोळीचे अन्वेषण करतांना केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने भारतीय वायूदलाच्या कार्यरत विंग कमांडरला अटक केली आहे. या विभागाच्या आदेशावरून नांदेड पोलिसांनी राजशेखर रेड्डी नावाच्या या विंग कमांडरला अटक केली आहे. तो नांदेड येथून गोवा येथे पलायन करण्याच्या सिद्धतेत होता. त्याच्याकडून साडेसात लाख रुपये रोख, ५ भ्रमणध्वनी संच आणि एंफिटेमिन बनवण्याचा रासायनिक फॉर्म्युला हस्तगत करण्यात आला. रेड्डी याच्या व्यतिरिक्त अन्य काही अधिकारीही यात सहभागी असल्याचा संशय आहे. रेड्डी सध्या देहलीत असलेल्या पश्‍चिम विभागात तैनात होता. यापूर्वी तो बराच काळ बेंगळुरू येथे तैनात होता आणि तेथेच त्याने या गुन्ह्याला आरंभ केला, असे म्हटले जात आहे.

पाकमधील आतंकवादी संघटनांवर कारवाई करा !- नवाज शरीफ सरकारचे पाक सैन्याला आवाहन

     नवी देहली - पाकमधील जैश-ए-महंमद आणि अन्य आतंकवादी संघटनांच्या विरोधात सैन्याने आता निर्णायक कारवाई करावी, असे आवाहन नवाज शरीफ सरकारने केले आहे. आतंकवादी संघटनांच्या विरोधात पाकमधील पोलीसदलाकडून कारवाई करण्यात आली, तर त्यामध्ये सैन्याचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, अशी चेतावणीही सरकारकडून देण्यात आली. शरीफ सरकारमधील उच्चस्तरीय अधिकारी आणि पाक सैन्यामधील अधिकारी यांच्या झालेल्या सुरक्षाविषयक बैठकीमध्ये ही चेतावणी देण्यात आली. पाकिस्तान जागतिक पातळीवर एकटा पडत असल्याचे मत येथील परराष्ट्र खात्याचे सल्लागार सरताज अझीझ यांनी या बैठकीत व्यक्त केले. चीनने पाकला पाठिंबा दर्शवला असला, तरी पाकच्या धोरणामध्ये पालट केला जावा, असे संकेतही चीनकडून देण्यात आले असल्याचे निरीक्षण परराष्ट्र सचिवांनी या बैठकीत दिले. बैठकीत सरकारी अधिकारी आणि सैन्य यांच्यात शाब्दिक संघर्ष झाल्याचेही वृत्त सूत्रांनी दिले.

पाकिस्तानी कलाकारांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत ! - ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित राजन आणि साजन मिश्रा

केंद्र सरकार असे कठोर पाऊल उचलेल का ?
      पुणे, ६ ऑक्टोबर - कलाकारांना धर्माच्या चौकटीत अडकवता येत नाही. समाजात घडणार्‍या वाईट घटनांना उघडपणाने विरोध करता आला नाही, तर तो कलाकार कसला ? असे अनेक कलाकार येथे येऊन पैसे कमावतात; परंतु आतंकवादी आक्रमण झाले की, त्यावर चकार शब्दही बोलत नाहीत. अशा पाकिस्तानी कलाकारांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी केले. येथील तालायन संस्थेच्या वतीने पंडित साजन मिश्रा यांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त हर्षोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यासंबंधीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कबड्डी विश्‍वचषक स्पर्धेतून पाकला बाहेर काढले !

आंतरराष्ट्र्रीय कबड्डी महासंघाचा अभिनंदनीय निर्णय !
      नवी देहली - आंतरराष्ट्र्रीय कबड्डी महासंघाने पाकिस्तानी कबड्डी संघाला कबड्डीच्या विश्‍वचषक स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले आहे. ७ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला कर्णावती येथे आरंभ होत आहे. यात १२ देश सहभागी होणार आहेत.
     पाकिस्तानने कबड्डी महासंघाने आपल्यासमवेत भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. जर दोन्ही देशांमध्ये तणाव आहे, तर दोन्ही देशांना बाहेर काढले पाहिजे, असा दावा पाकने केला आहे. आमच्याशिवाय कबड्डी विश्‍वचषक म्हणजे ब्राजीलशिवाय फुटबॉल विश्‍वचषक खेळण्यासारखे आहे, असेही पाकने म्हटले आहे. (आतंकवाद म्हणजे पाकिस्तान, पाकला वगळून आतंकवादाविषयी बोलताच येणार नाही, अशी पाकची ओळख झाली आहे, त्याविषयी पाकने बोलावे ! - संपादक)
     आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे अध्यक्ष देवराज चतुर्वेदी यांनी म्हटले की, पाकला घेऊन विश्‍वचषक खेळण्यासाठी ही योग्य वेळ नाही. पाकिस्तानी कबड्डी संघाचा कर्णधार नासिर अली म्हणाला की, आम्ही भारताचा पराभव करून विश्‍वचषक जिंकण्याची आशा होती. (पाक प्रत्येक वेळी विश्‍वचषक स्पर्धेत भारताकडून पराभूत झालेला आहे, हे त्याने कायमच लक्षात ठेवायला हवे ! - संपादक)

ढाका आक्रमणासाठी बिहारमधून शस्त्रे पाठवण्यात आली !

जंगलराज असलेले बिहार आता आतंकवादी 
कारवायांसाठीही कुप्रसिद्ध होत आहे, हे लज्जास्पद ! 
      नवी देहली - ढाका शहरात १ जुलै या दिवशी विविध ठिकाणी आतंकवाद्यांनी आक्रमण केले होते. या आक्रमणात आतंकवाद्यांकडून वापरण्यात आलेल्या शस्त्रांना भारतातील बिहारमध्ये आधुनिक स्वरूप देण्यात आले होते. या आतंकवाद्यांकडून मिळालेल्या ३ बंदुकांवर बिहारच्या एका कारखान्याची मुद्रा लावलेली होती आणि त्यांना आक्रमणाच्या एक मासापूर्वी आंब्यांच्या पेट्यांमध्ये भरून बांगलादेशात पाठवण्यात आले होते, असा दावा ढाका ट्रिब्यून या वृत्तपत्राने केला आहे. (जनता दल (संयुक्त) आणि राजद यांची सत्ता असलेल्या बिहारमध्ये याहून वेगळे काय होणार ? हे रोखण्यासाठी राज्यशासन काय पावले उचलणार का ? - संपादक) 
       या वृत्तपत्रानुसार बांगलादेशाचे काऊंटर टेरेरिझम अ‍ॅण्ड ट्रान्सनॅशनल क्राईम चे प्रमुख मोनिरुल इस्लाम यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांच्या मते, या शस्त्रास्त्रांना बिहारच्या मुंगेर शहरात आधुनिक स्वरूप देण्यात आले होते आणि सीमा ओलांडून त्यांना ढाका येथे पाठवण्यात आले होते. १ जुलैला ढाक्याच्या गुलशन पार्क भागात आर्टिसन बेकरी कॅफेत आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात एका भारतीय युवतीसह २० विदेशी ठार झाले होते.

शिवसेना उत्तरप्रदेशात विधानसभेच्या २०० जागा लढवणार !

     लक्ष्मणपुरी - शिवसेना उत्तरप्रदेश राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत २०० जागांवर उमेदवार उभे करणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे नेते आणि खासदार श्री. संजय राऊत यांनी येथे दिली. निवडणूक प्रचाराचा आरंभ शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे लवकरच वाराणसी येथून करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. 
      श्री. राऊत म्हणाले की, शिवसेनेने कधीही उत्तरप्रदेश आणि बिहार येथील लोकांचा द्वेष केलेला नाही. आम्ही वैचारिक स्तरावर कोणतीही तडजोड करत नाही. सध्या पक्ष म्हणून आम्ही देशातील अन्य राज्यांवर लक्ष केंद्रीत करत आहोत.

पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम करू नये ! - हेमा मालिनी

      मुंबई - सैन्यदलाने केलेले सर्जिकल स्ट्राईक अगदी योग्य आहे. देशवासीयांनी सर्जिकल स्ट्राईकचे समर्थन केले पाहिजे. त्याचे पुरावे का मागितले जात आहेत ? असा प्रश्‍न भाजपच्या मथुरा येथील खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी ट्विटद्वारे विचारला. मी शंभर टक्के सैनिकांसमवेत आहे, मला नाही वाटत की, पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी अर्ध्या ऐवजी पूर्ण विजारीत पथसंचलन करावे ! - मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश

      नवी देहली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी पथसंचालनाच्या वेळी पुर्ण पँट (विजार) घालावी, असा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. तमिळनाडूचे महान संत रामानुज यांची ९ ऑक्टोबर दिवशी एक सहस्रावी जयंती आहे. त्यानिमित्त तमिळनाडूच्या संघाच्या शाखेच्या वतीने राज्यातील १४ शहरांमध्ये पथ संचालन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांनी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडे अनुमती मागितली होती; परंतु प्रशासनाकडून कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे संघाने न्यायालयात याचिका दाखल केली होती. (एखादी संघटना वैध मार्गाने अनुमती मागत असतांना त्यावर उत्तर न देणारे प्रशासन कायदाद्रोहीच होत ! अशांवर न्यायालयाने कारवाई करायला हवी ! - संपादक) त्यावर न्यायालयाने वरील आदेश दिला. संघ स्वयंसेवकांचा पांढरा शर्ट आणि खाकी हाफ पँट हा गणवेश राज्य पोलिसांच्या प्रशिक्षणादरम्यान वापरल्या जाणार्‍या गणवेशासारखा आहे. त्यामुळे न्यायालयाने संघाला हाफ पँट ऐवजी फुल पँट घालण्याचा आदेश दिला आहे. विशेष म्हणजे संघाने याचवर्षी आपल्या गणवेशात पालट करून हाफ पँट ऐवजी फुल पँट करण्याचा निर्णय घेतला आहे.
     संघाने पथसंचलन करतांना कोणाच्या भावना दुखावतील, असे कोणतेही काम किंवा घोषणाबाजी करू नये. तसेच पोलिसांच्या देखरेखी खालीच हे पथसंचलन करण्यात यावे, अशा सूचना उच्च न्यायालयाने संघाला केल्या. 
     राज्यातील निवडणुकींचा निकाल असल्यामुळे संघाने ऑक्टोबर ऐवजी नोव्हेंबर ६ किंवा १३ नोव्हेंबरला पथसंचलन करावे. दसरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कोणतेही पथसंचलन करू नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे.काश्मीरमधील हिंदूंच्या ऐतिहासिक वास्तूंच्या नावांचे इस्लामीकरण रोखण्यासाठी हिंदूंना जागृत होण्याचे आवाहन

वैष्णोदेवीच्या पुजार्‍याचे देशवासियांना खुले पत्र 
       मी जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिरातील पुजारी आहे. काही काळापासून येथील परिस्थिती चांगली नाही. येथील हिंदूंच्या ऐतिहासिक ठिकाणांचे नावे पालटण्यात येत आहेत. याविषयी मी सरसंघचालक श्री. मोहन भागवत आणि विश्‍व हिंदु परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगाडिया आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना पत्र लिहले होते; परंतु कोणाचेही उत्तर मिळाले नाही. जम्मू-काश्मीरमध्ये पूर्वी अशी स्थिती नव्हती; परंतु काही मासांपासून चालू आहे, असे वैष्णोदेवीच्या पुजार्‍याने देशभरातील हिंदूंसाठी लिहिलेल्या खुल्या पत्रात म्हटले आहे. ही स्थिती पालटण्यासाठी समस्त हिंदु बांधवांनी जागृत होऊन त्याविरोधात वैध मार्गाने विरोध करावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

ध्वनीमापक यंत्रे उपलब्ध करून द्या, अन्यथा फौजदारी कारवाईला सामोरे जा ! - मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल

        मुंबई - सण-उत्सवाच्या काळात होणारे ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी शासन ठोस पावले उचलण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. केवळ सणांच्या वेळी ध्वनीप्रदूषणाची पातळी तपासली जाऊ नये, म्हणून ध्वनीमापक यंत्र (डेसिबल मीटर्स) उपलब्ध करून देण्यास जाणूनबुजून टाळाटाळ करत आहात. हे खपवून घेतले जाणार नाही. तुम्ही दिलेल्या मुदतीत ही यंत्रे उपलब्ध करून द्या, अन्यथा फौजदारी कारवाईला सामोरे जा, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती ए.ए. सय्यद यांच्या खंडपिठाने ४ ऑक्टोबर या दिवशी राज्य सरकारला सुनावले.
        ध्वनीप्रदूषण आणि रस्त्यावरील अवैध मंडपांच्या पार्श्‍वभूमीवर ठाण्याचे डॉ. महेश बेडेकर यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने वरीलप्रकारे सुनावले आहे. ध्वनीमापक यंत्रांची खरेदी करण्यास चालढकलपणा केल्याने उच्च न्यायालयाने सरकारच्या कारभारावर तीव्र असंतोष व्यक्त केला, तसेच राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांना १७ ऑक्टोबर या दिवशी होणार्‍या सुनावणीच्या वेळी उपस्थित रहाण्याचे निर्देशही दिले.

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

     सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वी पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे प्रसिद्ध करत आहोत. 

सर्जिकल स्ट्राईकची माहिती सार्वजनिक करणे चुकीचे ! - शरद पवार

       नागपूर, ६ ऑक्टोबर - सर्जिकल स्ट्राईकद्वारे पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून आतंकवाद्यांचा नायनाट करण्याच्या कारवाईत आम्ही सरकारला साथ दिली; मात्र सर्जिकल स्ट्राईकची माहिती सार्वजनिक करणे चुकीचे आहे. मनमोहन सिंह सरकारमध्ये मी केंद्रीय मंत्री असतांना चार वेळा सर्जिकल स्ट्राईकस् झाले होते. नागालँडमधून आम्ही शेजारच्या देशात घुसलो होतो; पण आम्ही त्याचा कधीही गवगवा केला नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी व्यक्त केले. (युद्धामध्ये कोणतेही विशिष्ट धोरण कायमस्वरूपी लागू पडतेच असे नाही. जर सर्जिकल स्ट्राईकची माहिती देण्यातून शत्रूराष्ट्रावर जरब बसण्याच्या जोडीला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये देशाची बाजू सकारात्मक होत असेल, देशवासियांमध्ये राष्ट्रभावना निर्माण होत असेल, तसेच सैन्याचे मनोधैर्य वाढत असेल, तर हा युद्धनीतीचाही एक भाग असू शकतो, याची जाणता राजा म्हणवून घेणार्‍यांना जाणीव असायला हवी. देशहितापेक्षा राजकारण करण्यालाच प्रथम प्राधान्य असल्याने अशा मंडळींकडून अशी विधाने बाहेर पडत आहेत. यामागे भाजपला श्रेय मिळण्याचा मत्सरही दिसून येतो. - संपादक)

वर्ष २०१३-१४ मध्ये कोणतेही सर्जिकल स्ट्राईक झाले नाही ! - माजी डीजीएमओ लेफ्ट. जनरल विनोद भाटिया यांचे स्पष्टीकरण

काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् यांचा खोटारडेपणा उघड !
      नवी देहली - काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात वर्ष २०१३-१४ मध्येही पाकच्या विरोधात सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते; मात्र काँग्रेसने त्यांचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला नाही, असे विधान काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी केला होते. हे विधान तत्कालीन सैन्य कारवाईचे महासंचालक (डीजीएमओ) निवृत्त लेफ्ट. जनरल विनोद भाटिया यांनी खोडून काढले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यांनी म्हटले की, या काळात कोणतेही सर्जिकल स्ट्राईक झाले नाही. कोणत्याही विशेष सिद्धतेविना सीमा पार करून काही कारवाया करण्यात आल्या; मात्र त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणता येणार नाही. या दोन्ही कृतींमध्ये पुष्कळ अंतर आहे. त्याला एखादे ऑपरेशन म्हणता येईल.

रोहित वेमुला स्वत:च स्वतःच्या आत्महत्येला उत्तरदायी ! - चौकशी आयोग

रोहितने आत्महत्या केली असून त्याला केंद्र सरकार उत्तरदायी 
आहे, असे म्हणणारे केजरीवाल, काँग्रेस आणि अन्य राजकीय नेते तोंडघशी !
      नवी देहली - रोहित वेमुला स्वत:च त्याच्या आत्महत्येला उत्तरदायी आहे. दलित असल्याच्या भेदभावामुळे नाही, तर त्याने व्यक्तीगत नैराश्यातून आत्महत्येचे पाऊल उचलले. केंद्रीयमंत्री बंडारू दत्तात्रय आणि स्मृती इराणी यांनी केवळ त्यांचे कर्तव्य बजावले. त्यांच्याकडून भाग्यनगर केंद्रीय विद्यापिठावर कोणताही दबाव टाकण्यात आला नाही, असा निष्कर्ष रोहित वेमुला मृत्यू प्रकरणाचे अन्वेषण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए.के. रुपनवाल यांच्या एक सदस्यीय आयोगाने काढला आहे. वसतीगृहातून रोहित याला बाहेर काढण्याचा निर्णय काही प्रमाणात योग्य होता, असा निष्कर्षही या अहवालात काढण्यात आला आहे.

सर्जिकल स्ट्राईकवरून श्रीलंका आणि जर्मनी यांचा भारताला पाठिंबा !

      बर्लिन - आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे कोणत्याही देशाला आतंकवादापासून स्वत:ला वाचवण्याचा अधिकार आहे, असे जर्मनीचे भारतातील राजदूत डॉ. मार्टिन ने यांनी सांगितले आहे. सीमारेषेपलीकडचा आतंकवाद हे मुख्य सूत्र असून सार्क देशांनी यावर चर्चा करणे आवश्यक आहे, असे श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी म्हटले आहे. भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला रानिल विक्रमसिंघे यांनी या वेळी समर्थन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तणाव कमी करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पाऊले उचलली आहेत; मात्र युद्ध हा पर्याय नाही. असेही ते म्हणाले. चीनसमवेत आमचे व्यावहारिक संबंध असून कोणतेही सैनिकी संबंध नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

युरोपमधील ज्यू लोक सापडले आहेत ज्यूसंबंधी द्वेष आणि इस्लामी आतंकवाद यांच्या कात्रीत !

     लंडन - युरोपमध्ये ज्यू लोकांची स्थिती एकाच रूळावरून एकमेकांवर धडकण्यासाठी धावणार्‍या दोन रेल्वेगाड्यांच्या मध्ये सापडलेल्या व्यक्तीसारखी झाली आहे, असे प्रतिपादन मॉस्को येथील ज्यू धर्मगुरु पिन्चास गोल्डस्किम्ट यांनी युरोपच्या संसदेला संबोधित करतांना केले. यांतील एक रेल्वेगाडी इस्लामी आतंकवादाची आणि दुसरी युरोपमधील ज्यूद्वेषाची असल्याचे गोल्डस्किम्ट यांनी सांगितले. ज्यूसंबंधी द्वेष आणि इस्लामी आतंकवाद यांपासून असलेला धोका ओळखून फ्रान्स, बेल्जियम यांसह युरोपमधील अनेक देशांतील सहस्रावधी ज्यू नागरिक पलायन करत आहेत. ज्यूविषयी ओळख न दाखवण्याचा या लोकांचा प्रयत्न असतो. इस्लामी आतंकवाद निपटण्यासाठी आतंकवाद विरोधी कृतीदल स्थापन करण्यात यावे, अशी मागणी गोल्डस्किम्ट यांनी संसदेमध्ये केली.

सैनिकांच्या रक्षणासाठी सीमेवर राजस्थान सरकारकडून यज्ञ !

राजस्थान सरकारचे अभिनंदनीय प्रयत्न ! 
      जयपूर - भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यापासून भारतीय सीमेवर तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत सीमेवरील सैनिकांचे रक्षण व्हावे, या हेतून राजस्थान सरकारने सीमेवर यज्ञ केला. २१ ब्राह्मणांनी यज्ञाचे पौरोहित्य केले. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांच्या सूचनेवरून राजस्थान संस्कृत अकादमीने भारत-पाकिस्तान सीमेपासून जवळच असलेल्या जैसलमेर येथे हा यज्ञ योजिला होता. तेथील 
     श्री मातेश्‍वरी तानोत राय मंदिरात हा यज्ञ झाला. वसुंधराराजे या यज्ञासाठी उपस्थित होत्या. तसेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह हे देखील यज्ञास उपस्थित होते. त्यांनी सीमेवरील सैनिकांसाठी सुरक्षाकवच द्यावे, अशी प्रार्थना केली. या यज्ञासोबतच २६ वेद विद्यालयांमध्ये सैनिकांसाठी मंत्रोच्चारांचे पठण चालू आहे.

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु धर्मसेना यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली विश्‍व हिंदु परिषदेच्या नेत्या साध्वी डॉ. प्राची यांची भेट !

      जबलपूर (मध्यप्रदेश), ६ ऑक्टोबर (वार्ता.) - हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु धर्मसेना यांच्या कार्यकर्त्यांनी विश्‍व हिंदु परिषदेच्या प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेत्या साध्वी डॉ. प्राची यांची येथील सदर चौकात भेट घेतली. या वेळी त्यांना सनातन संस्था प्रकाशित धर्मशिक्षा फलक हा ग्रंथ भेट देण्यात आला, तसेच गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमास भेट देण्याचे आमंत्रणही देण्यात आले. या वेळी हिंदु धर्मसेनेचे श्री. योगेश अग्रवाल, रिंकू मुलचंदानी, अधिवक्ता कमल श्रोती, हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश व्हनमारे आणि श्री. आनंद जाखोटिया उपस्थित होते. 

दूरचित्रवाहिनीवरील चर्चासत्रात धर्मांध अधिवक्त्याकडून सुधारणावादी इमामावर जोड्याने आक्रमण

धर्मांध कधीच त्यांच्या धर्मातील सुधारणांविषयी ऐकून घेत नाहीत, हे लक्षात घ्या !
     सिडनी - एका दूरचित्रवाहिनीवरील चर्चासत्रात मुसलमान महिलांनी डोक्यावर स्कार्फ बांधायचा कि नाही ?, या विषयावर चर्चा चालू असतांना चर्चेत सहभागी रशियाचे धर्मांध अधिवक्ता नबीह-अल-वहशा यांनी सुधारणावादी इमाम मुस्तफा राशिद यांना जोडा फेकून मारला. 
     इमाम मुस्तफा मुसलमानांशी संबंधित प्रकरणांमध्ये उदारमतवादी धोरण अवलंबतात. त्यामुळे त्यांना नेहमीच कट्टरतावादी धर्मांधांच्या विरोधाचा सामना करावा लागतो. या चर्चासत्रामध्ये मुस्तफा यांनी मुसलमान महिलांनी डोके झाकण्याविषयी जे उदारमतवादी विचार मांडले, त्यामुळे धर्मांध नबीह यांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी त्यांच्या उजव्या पायातील जोडा काढला आणि मुस्तफा यांच्या दिशेने फेकला. त्यानंतर कार्यक्रमाचे निवेदक आणि दूरचित्रवाहिनीचे कर्मचारी यांनी दोघांतील वाद सोडवला. त्यानंतर इमाम मुस्तफा त्वरित स्टूडिओमधून निघून गेले. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण चालू असतांना ही घटना घडल्यामुळे निवेदकाने दर्शकांची क्षमा मागितली. यापूर्वीही मुस्तफा यांनी वर्ष २०१४ मध्ये एक फतवा काढून मुसलमान महिलांना बुरखा अनिवार्य नाही, असे वक्तव्य केले होते.

इटलीच्या समुद्रात २२ शरणार्थी बुडाले, तर ६ सहस्र जणांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश !

     सब्रता (लिबिया) - इसिसच्या आक्रमणापासून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी लिबियातून युरोपमध्ये निघालेल्या सहस्रावधी शरणार्थींपैकी २२ शरणार्थी समुद्रात बुडाले, तर ६ सहस्र जणांना वाचवण्यात इटलीच्या तटरक्षक दलाला यश मिळाले. लिबियाची किनारपट्टी आणि सिसिली यांच्या मध्यभागी समुद्रात नौका बुडाली. यामध्ये ९ शरणार्थी बुडून मरण पावले, अशी माहिती इटलीच्या तटरक्षक दलाने दिली. सब्राता शहरापासून जवळच समुद्रात एक नौका बुडाल्याने काही शरणार्थ्यांचा मृत्यू झाला. त्रिपोली शहराच्या किनारपट्टीवर ११ मृतदेह वाहून आल्याचे लिबियाच्या अधिकार्‍याने सांगितले. 
     इटलीच्या तटरक्षक दलाच्या एका जहाजाने ७२५ जणांना बुडतांना वाचवले. तटरक्षक दलाची एकूण १० जहाजे मदतकार्यात सहभागी झाली होती. या वर्षाच्या प्रारंभापासून इटलीमध्ये १ लक्ष ३२ सहस्र शरणार्थींनी आश्रय घेतला आहे. जी सॅट-१८ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण !

      बेंगळुरू - भारतीय अंतराळ संशोधन केंद्राच्या (इस्रोच्या) अत्याधुनिक जी सॅट-१८ या उपग्रहाचे ६ ऑक्टोबरला यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले. फ्रान्समधील कौरो येथून या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण करण्यात आले. इस्रोने निर्मिती केलेला हा विसावा उपग्रह आहे. या अत्याधुनिक उपग्रहाचा भारताच्या माहिती दूरसंचार सेवेला उपयोग होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे याविषयी शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या अवकाश कार्यक्रमासाठी हा आणखी एक मैलाचा दगड ठरला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हुशार गुगल !

       गुगलने वादग्रस्त नाकाशांच्या संदर्भात डोमेनमध्ये पालट केला. त्यानुसार भारतात गुगलवर नकाशा पाहिल्यास पाकव्याप्त काश्मीर भारताच्या नकाशात दिसेल, तर पाकिस्तान्यांना तो पाकमध्ये दिसणार आहे. अरुणाचल प्रदेशावरून भारत आणि चीन या देशांमध्ये फार पूर्वीपासून वाद आहे. हा वादही गुगलने त्याच्या पद्धतीने सोडवला आहे. आता चिन्यांना गुगलच्या नकाशात अरुणाचलचा वादग्रस्त भाग त्यांच्या समवेत, तर भारतियांना भारताच्या हद्दीत पहायला मिळेल.

सनातन संस्था सातारा यांच्या वतीने तणावमुक्तीसाठी अध्यात्म या विषयावर मार्गदर्शन !

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे

        बेळगाव, ६ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील कर्नाटक लॉ सोसायटीच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षक आणि कार्यालयीन शिक्षक, कर्मचारी वर्ग यांच्यासाठी सनातन संस्था सातारा न्यासाच्या वतीने तणावमुक्तीसाठी अध्यात्म या विषयावर मार्गदर्शन घेण्यात आले. हे मार्गदर्शन सनातन संस्था साताराच्या डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी केले. याचा लाभ ५० जणांनी घेतला. या वेळी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे विषय समजावून सांगण्यात आला.

बिहारमध्ये २ पाकिस्तानी नागरिकांसह ५ जण पोलिसांच्या कह्यात !

     पाटलीपुत्र (पाटणा) - बिहारच्या दरभंगा आणि मधुबनी सीमेवर ५ संशयितांना कह्यात घेण्यात आले आहे. यात २ पाकिस्तानी नागरिक आहेत. ते नेपाळमार्गे भारतात घुसले होते. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने दिलेल्या माहितीवरून बिहार पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

काश्मीरच्या हंदवाडा येथे सैनिकी तळावर आक्रमण करणारे ३ आतंकवादी ठार !

     हंदवाडा - सर्जिकल स्ट्राईकनंतरही पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी भारताच्या सैनिकी तळांवर आक्रमण करणे चालूच ठेवले आहे. उरीनंतर बारामुल्ला येथील सैनिकी तळावर झालेल्या आक्रमणाच्या प्रयत्नानंतर ६ ऑक्टोबरला आतंकवाद्यांनी हंदवाडा येथील सैनिकी तळावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या चकमकीत ३ आतंकवादी ठार झाले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके हस्तगत करण्यात आली. यावर पाकिस्तानचे नाव लिहिण्यात आले आहे. आतंकवाद्यांनी एकाच आठवड्यात सैन्याच्या तळावर आक्रमण करण्याची ही दुसरी वेळ आहे.

जगप्रसिद्ध द्वारका मंदिर लक्ष्य

गुजरातमध्ये १२ ते १५ आतंकवादी घुसल्याची शक्यता ! 
     नवी देहली - गुजरातमध्ये १२ ते १५ जिहादी आतंकवादी समुद्रमार्गे घुसले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. जगप्रसिद्ध द्वारका मंदिर आतंकवाद्यांचे लक्ष्य असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. (जिहादी आतंकवाद्यांना धर्म असतो, हेच यातून अधोरेखित होते ! - संपादक)

श्रीलंकेच्या नौदलाकडून भारतीय मच्छीमारांवर आक्रमण !

भारताने आता श्रीलंकेच्या नौदलाच्या 
विरोधातही कारवाई करून त्यांच्या कुरापतींना चाप लावावा ! 
     रामेश्‍वरम् (तमिळनाडू) - श्रीलंकेच्या नौदलाकडून येथील मच्छीमारांवर आक्रमण करण्यात आले, तसेच त्यांनी एक नौकाही बडुवून टाकली आणि त्यांचे मासेमारीसाठी वापरण्यात येणारे जाळेही नष्ट केले. येथील धनुषकोडीच्या किनार्‍यालगत हे मच्छीमार मासेमारी करत असतांना ही घटना घडली. तमिळनाडू मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष पी. सेसुराजा यांनी सांगितले की, सैनिकांनी ७० जाळी नष्ट केली. त्यांनी दगडफेक केली. यामुळे २ सहस्र मच्छीमारांना पलायन करावे लागले.

तातडीने कार्यवाही न झाल्यास भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल ! - अधिवक्ता महेश मोहिते, जिल्हाध्यक्ष, भाजयुमो

क्रांतीकारकांच्या समाधीस्थळी विटंबना करणार्‍यांच्या 
विरोधात पाऊल उचलणार्‍या भाजपचे अभिनंदन !
सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधीच्या परिसरात 
नगरपालिकेकडून शौचालय बांधण्याचे प्रकरण
      रामनाथ (अलिबाग) - येथील संरक्षित स्मारक सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधीच्या परिसरात नगरपालिका प्रशासनाने शौचालय बांधण्याचे ठरवले आहे. ३० सप्टेंबरला समाधीची संरक्षक भिंत तोडून कामाला प्रारंभ करण्यात आला. कान्होजी आंग्रे यांच्याविषयी सर्व जनता आणि भाजप यांना पुष्कळ आदर अन् सन्मान आहे. तेथे शौचालय बांधण्यात येत असल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या जातील. या प्रकरणाची तातडीने नोंद घ्यावी. नगरपरिषदेने या प्रकरणी पुरातत्व विभागाच्या अनुमतीद्वारे तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अधिवक्ता महेश मोहिते यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी सौ. शीतल उगले यांना निवेदनाद्वारे दिली आहे.

स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांमध्ये युवक-युवतींनी सहभागी होऊन स्वयंसिद्ध व्हावे ! - निवृत्त सैनिक लान्सनायक संदीप कुंभार

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भू (राजापूर) येथे स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर
डावीकडून श्री. संजय जोशी, श्री. वसंत दळवी
आणि दीपप्रज्वलन करतांना निवृत्त
सैनिक लान्सनायक संदीप कुंभार
      भू (रत्नागिरी) - सध्या महिला आणि युवती यांवरील अत्याचारांच्या प्रकरणांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोपर्डीसारख्या घटनांमध्ये झालेले अत्याचार संतापजनक आहेत. अशा घटना रोखण्यासाठी धाडस, प्रसंगावधान आणि शारीरिक क्षमता वाढवणे आवश्यक आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी घेण्यात येत असलेल्या स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांच्या माध्यमातून हे गुण आत्मसात करू शकतो. समितीचे कार्य कौतुकास्पद असून या प्रशिक्षणवर्गांमध्ये अधिकाधिक युवक-युवतींनी सहभागी होऊन स्वतःचे रक्षण कसे करावे, हे शिकून घ्यावे, असे आवाहन निवृत्त सैनिक लान्सनायक संदीप कुंभार यांनी केले. ते राजापूर तालुक्यातील भू येथील आचार्य नरेंद्र देव विद्यामंदिराच्या सभागृहात २ ऑक्टोबरला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरामध्ये बोलत होते. या वेळी व्यासपिठावर समितीचे जिल्हा समन्वयक श्री. संजय जोशी आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रमाचे रत्नागिरी विभाग समन्वयक श्री. वसंत दळवी उपस्थित होते. या शिबिराचा भू, तेरवण, पेंडखळे, खिणगिणी, कोतापूर आणि ओणी येथील ६० युवक-युवतींनी लाभ घेतला.

मनसेच्या आंदोलनानंतर मुंबई महापालिका अभियंत्यांचे राजीनामा नाट्य !

       मुंबई - मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांचे खापर फक्त पालिका अभियंत्यांवर फोडले जात असल्याच्या कारणावरून ६ ऑक्टोबर या दिवशी मुंबई महापालिकेच्या ४ सहस्र २०० अभियंत्यांनी राजीनामे दिलेे. ५ ऑक्टोबरला मनसेच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या मुख्य अभियंत्याला रस्त्यात उभे करून खड्ड्यांना मुख्य अभियंता उत्तरदायी असल्याची पाटी हातात दिली होती. मनसेचे गटनेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत काम न करणार नाही, असा पवित्रा अभियंत्यांनी घेतला आहे. आयुक्तांनी त्यांचे राजीनामे स्वीकारले नाहीत. वरळी हब येथे अभियंते धरणे आंदोलन करत आहेत.

अमरावती येथे पत्रकारांवरील आक्रमणांचा श्रमिक पत्रकार संघाद्वारे निषेध !

श्री. श्रीकांत पिसोळकर, अमरावती 
       अमरावती - राज्यात पत्रकारांवर होणार्‍या आक्रमणांचा येथील श्रमिक पत्रकार संघाद्वारे निषेध करण्यात आला. ही आक्रमणे रोखण्यासाठी प्रभावी कायदा करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या माध्यमातून शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यापूर्वीच्या आणि आताच्या सरकारकडून कायद्यासंदर्भात दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाने पत्रकारांच्या भावनांची नोंद घेऊन कायदा करावा, अशी मागणी करण्यात आली. या वेळी अनेक पत्रकार उपस्थित होते. जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाकडून दुर्गामाता दौडला अनुमती देण्यास विलंब !

हिंदूंनो, अनुमती न देणार्‍या पोलिसांना खडसवा !
धर्माभिमान्यांकडून धरणे आंदोलनाद्वारे निषेध व्यक्त
आंदोलनात सहभागी संत आणि मान्यवर
     जळगाव - येथे ६ ऑक्टोबर या दिवशी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी आयोजित केलेल्या दुर्गामाता दौडीला येथील पोलीस प्रशासनाने कोणतेही कारण न देता अनुमती देण्यास विलंब केला. (अन्य धर्मियांच्या कार्यक्रमांना अनुमती देण्यास विलंब करण्याचे धाडस पोलिसांनी दाखवले तरी असते का ? - संपादक) त्यामुळे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर ५ ऑक्टोबरला सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत धरणे आंदोलनाद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला. सनदशीर मार्गाने जळगाव जिल्हा पोलीस ठाण्यात निवेदन देऊनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. मागील वर्षीही पोलिसांनी या दौडीला विलंबानेच अनुमती दिली होती. 
      या वेळी करण्यात आलेल्या आंदोलनात श्री शिवप्रतिष्ठानचे श्री. नारायणशेठ अग्रवाल, अधिवक्ता श्री. गोविंद तिवारी, ह.भ.प. वरसाळेकर महाराज, आेंकारेश्‍वर मंदिर संस्थानचे श्री. दीपक जोशी, श्री. योगेश्‍वर जोशी, सनातन संस्थेचे संत पू. नंदकुमार जाधव, श्री. दत्तात्रेय वाघुळदे, स्वराज्य निर्माण सेनेचे श्री. महेश सपकाळे यांसह अनेक धर्माभिमानी या वेळी उपस्थित होते. आंदोलनानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

तरुणांनी दुर्गामाता दौडीमध्ये सहभागी होऊन देव, देश आणि धर्म कार्याची प्रेरणा घ्यावी ! - भरत माळी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

कोपरखैरणे येथील दुर्गादौड
     नवी मुंबई, ६ ऑक्टोबर (वार्ता.) - नवरात्रीच्या काळात शक्तीच्या उपासनेची आवश्यकता असतांना हिंदू मात्र गरबा आणि रास यांमध्ये मग्न आहेत. यामुळे उत्सवाचे खरे स्वरूप लोप पावत आहे. तरुणाई भरकटत आहे. तरुणांनी दुर्गामाता दौडीमध्ये सहभागी होऊन देव, देश आणि धर्म कार्याची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे नवी मुंबईचे प्रमुख श्री. भरत माळी यांनी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलतांना केले. या वेळी ते पुढे म्हणाले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दुर्गामाता दौड उपक्रम ठिकठिकाणी चालू आहे. या माध्यमातून देव, देश आणि धर्म प्रेमाचा जागर होत आहे. देव, देश आणि धर्म कार्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने पूज्य संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्या आशीर्वादाने दुर्गामाता दौड हा अभिनव उपक्रम चालू करण्यात आला आहे. दुर्गामाता दौडीचे सर्वसाधारण स्वरूप म्हणजे परिसरातील तरुण घटस्थापना झालेल्या देवीच्या ठिकाणी सकाळी ६ वाजता एकत्र येतात. त्या ठिकाणी जयमंत्र म्हणून दौडला प्रारंभ होतो. या वेळी पू. भिडेगुरुजी यांनी रचलेले श्‍लोक आणि राष्ट्र-धर्म, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांवरील पद्ये, गीते यांचे उत्स्फूर्त गायन होते. त्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या जातात. साधारणत: १ ते दीड घंटा दुर्गादौड चालते. पुन्हा श्री दुर्गादेवी स्थापनेच्या ठिकाणी येऊन प्रेरणामंत्र आणि आरती करून दुर्गादौडीची सांगता होते. सध्या कामोठे, नेरूळ, वाशी, कोपरखैरणे, दिघा, घणसोली, चिंचपाडा, कळवा, ईश्‍वरनगर येथे दुर्गादौड चालू आहे. याला तरुणवर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अधिकाधिक युवकांनी दुर्गादौडीमध्ये सहभागी व्हावे.

नवी मुंबई येथे हिंदु जनजागृती समितीचे पोलीस आयुक्तांना निवेदन

सार्वजनिक नवरात्रोत्सवातील गैरप्रकार थांबवावेत !
डावीकडून वसंत सणस, पंकज आंबेरकर,
डॉ. उदय धुरी आणि निवेदन स्वीकारतांना
सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय्
     नवी मुंबई, ६ ऑक्टोबर (वार्ता.) - सध्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात अनेक अपप्रकार शिरले आहेत. चित्रपटगीतांच्या तालावर गरबा खेळणे, मद्यपान करणे, अंगविक्षेप करत नाचणे, बळजोरीने वर्गणी गोळा करणे, सजावटीवर अनाठायी व्यय करणे, मंडपात जुगार खेळणे आदी कारणांनी उत्सवाचे पावित्र्य नष्ट होत आहे. उत्सवाच्या काळात अनैतिक कृत्यांमध्ये वाढ होऊन गर्भपाताच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याची वृत्ते अनेक दैनिकांत प्रसिद्ध झाली आहेत. या अपप्रकारांमुळे समाज, राष्ट्र आणि धर्म यांची अपरिमित हानी होत आहे. नवरात्रोत्सवातील हे अपप्रकार रोखून आदर्श उत्सव साजरा करावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ ऑक्टोबर या दिवशी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन नवी मुंबईचे सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय् यांनी स्वीकारले. निवेदन देतांना डॉ. उदय धुरी, सर्वश्री वसंत सणस, पंकज आंबेरकर हे उपस्थित होते. या वेळी सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय् यांनी या अपप्रकारांविषयी प्रबोधन करू, असे सांगितले.

कल्याण येथे नवरात्रोत्सवानिमित्त पथनाट्य आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिके सादर


प्रात्यक्षिके सादर करतांना कार्यकर्ते
       कल्याण, ६ ऑक्टोबर (वार्ता.) - भारताचार्य वैद्य चौक, कल्याण पश्‍चिम येथील नवजीवन उत्सव मंडळामध्ये नवरात्रोत्सवानिमित रणरागिणी शाखेच्या वतीने पथनाट्य आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या पथनाट्याचा लाभ ८० जणांनी घेतला. सौ. उमा कदम यांनी लव्ह जिहादचे भीषण वास्तव आणि काळानुसार स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता यांचे महत्त्व पटवून दिले. तेथील महिलांनी नवरात्रोत्सवानंतर प्रशिक्षण वर्ग चालू करण्यास सांगितले आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त कळवा (ठाणे) येथे श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गादौैडीचे आयोजन

दौडीत सहभागी कार्यकर्ते
      कळवा (ठाणे) - येथे नवरात्रोत्सवानिमित्त श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गादौैडीचे आयोजन करण्यात आले. श्रीशिवप्रतिष्ठानचे सर्वश्री शिवानंद परब, मनोज डाकवे आणि समीर विचारे यांनी दौडीचे आयोजन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत सुर्वे यांनीही सहभाग घेतला. श्री. सुर्वे यांनी एक भारत अभियानच्या निमित्ताने मुंबई येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त काश्मिरची सध्याची स्थिती हा विषय मांडला.

कुठे पूर्वीची अस्त्रे, तर कुठे खेळण्यासारखी असणारी हल्लीची अस्त्रे !

सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने...
गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी 

हिंदु जनजागृती समितीच्या ठाणे जिल्ह्यातील प्रसारकार्याचा सप्टेंबर २०१६ च्या तिसर्‍या सप्ताहातील आढावा

१. अंबरनाथ येथील नगरपालिकेत 
महिलांसाठी गणेशोत्सवाचे शास्त्र आणि 
गणेशोत्सवातील अपप्रकार या विषयावर मार्गदर्शन !
     अंबरनाथ येथील नगरपालिकेत १४ सप्टेंबर या दिवशी हळदी-कुंकू समारंभाच्या निमित्ताने नगरपालिकेतील महिला कर्मचारी आणि अन्य महिला यांच्यासाठी गणेशोत्सवाचे शास्त्र आणि गणेशोत्सवातील अपप्रकार या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी गणेशाविषयी शास्त्र सांगणारे धर्मशिक्षणाचे फलक आणि गणेशाविषयी विविध विषयांचे शास्त्र सांगणारे सनातनचे ग्रंथप्रदर्शनही लावण्यात आले होते. 
२. हिंदु जनजागृती सभेच्या 
आयोजनात धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त सहभाग 
२ अ. श्री योग वेदांत सेवा समिती आणि हिंदी भाषी जनता परिषदेचे श्री. हरिशंकर पांडेजी यांनी पुढाकार घेऊन सभेचे आयोजन करणे : डोंबिवली पूर्व भागातील दावडी गाव येथील समाज मंदिर सभागृह येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. श्री योग वेदांत सेवा समिती आणि हिंदी भाषी जनता परिषदेचे श्री. हरिशंकर पांडेजी यांच्या पुढाकाराने ही सभा पार पडली. सभेचा प्रसार करणे, सभेची निमंत्रण पत्रिका वाटणे, कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी करणे, गावातील इतर कार्यक्रमांमध्ये सभेचे निमंत्रण देणे, तरुणांच्या विविध गटांना भेटणे, यांसारख्या सेवा त्यांनी मनापासून आणि तळमळीने केल्या.

संथ निर्णय = अल्प फलनिष्पत्ती

     प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात असंख्य वेळा घ्यावी लागणारी गोष्ट म्हणजे निर्णय ! आपल्या दैनंदिन जीवनातही प्रत्येकाला प्रतिदिनच छोटे-मोठे निर्णय घ्यावे लागतात. योग्य निर्णय होण्यासाठी संबंधित विषयाचा अभ्यास, स्थिरता, तत्परता, तज्ञांचे मार्गदर्शन घेण्याची अन् ऐकण्याची वृत्ती, तसेच परिणामांचा विचार असे अनेक गुण आवश्यक असतात. साधनेमुळे ईश्‍वरी विचार अथवा संकेत ग्रहण करण्याची क्षमता निर्माण झाली असेल, तर ही निर्णयप्रक्रिया अधिकाधिक परिपूर्ण, सहज, तत्पर आणि समष्टीचे कल्याण साधणारी होते. 

करू हिंदु राष्ट्र निर्माण ।

गुलामगिरी नाही आमच्या रक्तात ।
केवळ हिंदुत्वाचा भगवाच हातात ॥ १ ॥

हिंदु राष्ट्रासाठी ठेवला आहे तळहाती प्राण ।
केवळ वाढवण्या भगव्याची शान ॥ २ ॥

विसरलोय आम्ही धर्मरक्षणार्थ भान ।
आहे मातृभूमीच्या अब्रूची जाण ॥ ३ ॥

सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे !

श्री. भाऊ तोरसेकर
१. दिग्विजय सिंह किंवा संजय निरूपम यांनी 
केलेली ताजी वक्तव्ये म्हणजे राजकीय आत्महत्याच !
       राजकीय आत्महत्या कशी करावी, याचे नवनवे राजकीय धडे सध्या काँग्रेस पक्ष घालून देत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी वा भाजपला काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी वेगळी मेहनत करण्याचे कारण उरलेले नाही. लोकशाहीत राजकीय पक्षांना लोकमताच्या बळावर उभे रहाता येते. साहजिकच अधिकाधिक लोकसंख्येला आवडणारे काही करावे लागते किंवा लोकप्रिय होऊ शकतील, अशा भूमिका घ्याव्या लागत असतात. अनेकदा अशा भूमिका पक्षाच्या वा नेत्याच्या मूलभूत भूमिकेला छेद देणार्‍या असतात. नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यापासून महात्मा गांधी यांचे पदोपदी नाव घेतले आहे, कारण महात्मा गांधी ही भारतियांच्या मनातली आदराची जागा आहे, हे त्यांनाही पक्के ठाऊक आहे. मात्र ज्या संघाच्या मुशीतून मोदी आलेले आहेत, त्यांच्यावरच सतत गांधीहत्येचाही आरोप होत राहिला आहे. आजही तसा आरोप होत असतो. साहजिकच पंतप्रधान मोदी कितीही गांधीप्रेम दाखवत असले, तरी ते गांधीभक्त नाहीत, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही; पण आजच्या त्यांच्या राजकीय वाटचालीत गांधींचे प्रतीक धूर्तपणे वापरणे त्यांनाही भाग आहे. त्याकडे त्यांनी पाठ फिरवलेली नाही. मोदींनी सत्ता मिळवली आहे; पण टिकवायची असेल, तर जनमताला इजा होईल, असे काहीही करायचे नाही, याची ते काळजी घेत असतात. ज्यांनी त्यांना आजवर विरोध केला, त्यांना हाच व्यवहारीपणा उमजलेला नाही कि समजलेला नाही. तो समजला असता, तर पाक हद्दीत जाऊन भारतीय सेनेने केलेल्या कारवाईविषयी काँग्रेसी नेते भलतेसलते बरळले नसते. दिग्विजय सिंह किंवा संजय निरूपम यांनी केलेली ताजी वक्तव्ये म्हणूनच राजकीय आत्महत्या आहे. किंबहुना त्यांनी मोदींचे काम खूपच सोपे करून टाकले आहे.

हिंदु राष्ट्रातील मुख्यमंत्री म्हणतील, सर्वोत्तम अध्यात्मकेंद्र बनवू !

      निसर्ग सौंदर्यामुळे कोकण हे पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे पर्यटनस्थळ आहे. ते जगातील सर्वोत्तम पर्यटनस्थळ व्हावे, यासाठी स्वतंत्र पर्यटन संचालनालय आणि महामंडळ यांसह राज्यशासनाकडून सर्व सुविधांचे जाळे उभारण्यात येत आहे. 
- श्री. उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख आणि संपादक, सामना
      ज्या देशात विद्वानांना त्रास दिला जातो, तो देश तुटलेली नौका जशी पाण्यात नष्ट होते, त्याचप्रमाणे नष्ट होतो. 
- अथर्ववेद (मासिक अभय भारत, १५ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०१०)

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्‍लील बोलणे आणि 
दगडफेक करणे या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल ! 
     सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्‍लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ६ वर्षे ३१४ वा दिवस ! 
४.१०.२०१६ : रात्री १० वाजता चारचाकीमधून साधक जात असतांना एका दुचाकीवरून जाणारे सनातन बॉम्ब, असे ओरडत गेले.
     'शिवाजी महाराजांच्या वेळी हिंदवी स्वराज्य मिळण्याअगोदर समाजाची जशी स्थिती होती, तशी स्थिती आजही आहे. निधर्मीवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी विचारांचे लोक आपल्या देशात सर्वधर्मसमभावाचे विचार पसरवून समाजाची फारच हानी करत आहेत. याच लोकांनी या देशाचे तीन तुकडे केले, ते धर्माच्या नावावर !'  - पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान 

     देशभक्ती, स्वातंत्र्यभक्ती, त्यागाची निष्ठा यांच्या प्रसूतीवेदना हिंदुस्थानला जोपर्यंत जाणवणार नाहीत, तोपर्यंत आपण स्वातंत्र्यविश्‍वाच्या त्रिखंडात टिकणार नाही. आजचा सुशिक्षित समाज अशाच क्षुद्र विचारांचा झाला आहे. आपल्या देशाचे पंतप्रधानही तसेच आहेत. - पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान

मोक्षगुरूंनी शिष्याला सिद्धीत न अडकवण्याचे कारण

श्री. राम होनप
     साधकाला साधना करतांना ईश्‍वराची सूक्ष्म सृष्टी, सूक्ष्म लोकांची, तसेच देवतांची दर्शने होतात. या सर्व गोष्टी ईश्‍वराशी संबंधित असल्या, तरी येथे पहाणारा आणि दृश्य यांत भिन्नता आहे. त्यामुळे त्याला सात्त्विक दृश्य माया म्हणतात; म्हणून मोक्षगुरु शिष्याला या गोष्टींत, म्हणजेच सिद्धीत न अडकता पुढची वाटचाल करण्यास सांगतात.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.२.२०१६)


दैनिक सनातन प्रभातमधील सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचा प.पू. नाना काळेगुरुजी यांच्या संदर्भातील लेख वाचून पुणे येथील प.पू. आबा उपाध्ये यांनी काढलेले कौतुकोद्गार !

प.पू. आबा उपाध्ये
सद्गुरु (सौ.) अंजलीताई,
     आम्हाला तुमच्याकडून पुष्कळ महत्त्वाची माहिती मिळाली. २८.८.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातच्या अंकात प.पू. डॉक्टरांचे आयुष्य सुधारावे, यासाठी झालेल्या आयुष्यकामेष्टि यज्ञाची माहिती वाचली. (सद्गुरु (सौ.) अंजलीताई गाडगीळ यांच्या लेखातून ही माहिती प्रसिद्ध झाली होती.) हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी अविश्रांत धडपडणारे प.पू. नाना काळेगुरुजी यांनी अश्‍वमेध यज्ञ करण्याचा संकल्प रामनाथी आश्रमात प.पू. डॉक्टरांकडून करवून घेणे, या संदर्भात दैनिकात आलेली माहिती वाचल्यानंतर आम्ही थक्कच झालो. अश्‍वमेध यज्ञ करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात, हे त्यावरून समजले. आम्हाला केवळ प्रभु श्रीरामचंद्रांनी हा यज्ञ केल्याचे ज्ञात आहे. त्यानंतर हा यज्ञ प.पू. नाना काळेगुरुजी यांनी प.पू. डॉक्टरांकडून संकल्प सोडून करण्याचे ठरवले.
     या लेखात प.पू. डॉक्टरांवर काळी जादू करणे, असे वारंवार का होते ?, याची माहिती दिली आहे. प.पू. डॉक्टरांना काही होता कामा नये, आम्हाला झाले, तरी चालेल, असे प.पू. नाना काळेगुरुजी म्हणाल्याचे वाचले. यावरून लाख गेले, तरी चालतील; पण लाखांचा पोशिंदा जाता कामा नये, हे वाक्य आठवले

मुलांचे किंवा वास्तूचे नाव ठेवतांना ते सात्त्विकच असावे, याचा महर्षींनी घालून दिलेला आदर्श !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
     शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, या नियमाप्रमाणे नाव ठेवतांना नेहमी सात्त्विकच ठेवावे; कारण यातून मिळणार्‍या दैवी स्पंदनांचा आपल्याला लाभ होत असतो.
१. मुलांना निरर्थक नावांनी हाक मारल्याने त्यांची आध्यात्मिक स्तरावर हानी होणे आणि सात्त्विक नावे
ठेवून त्या नावाने हाक मारल्यास त्यांना आध्यात्मिक लाभ होणे
     आजकाल लहान मुलांनाही निरर्थक नावाने हाक मारतात. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक स्तरावर हानी होते. बर्‍याचदा चांगल्या नावाचाही अपभ्रंश केला जातो, उदा. निशिगंधा हे एका फुलाचे सुंदर नाव आहे, तर तिला निशा म्हणजे रात्र या नावाने हाक मारली जाते. रात्र या शब्दात तमोगुणी स्पंदने आहेत. हे आपण टाळले पाहिजे. आशिष नाव असेल, तर त्याला आशू अशी हाक मारली जाते. आशिष म्हणजे आशीर्वाद. संपूर्ण नाव घेतले, तर किती चांगले वाटते ना ? आशू या नावातून काहीच साध्य होत नाही. हाक मारतांना आवाजातून वातावरणात जी नादस्पंदने पसरतात, त्याकडेच ईश्‍वरी लहरी लवकर आकृष्ट होऊन त्याचा त्या मुलाला आध्यात्मिक लाभ होत असतो; म्हणून पूर्वीच्या काळी मुलाला अथवा मुलीला देवतांची नावे ठेवण्याची पद्धत होती. ती किती योग्य होती, ते कळते.
    आजकाल टिंकू, रिंकी अशीही अयोग्य स्पंदने असणारी नावे ठेवली जातात, तर कधी कधी फॅशन म्हणून आई-वडिलांच्या नावांतील प्रथम असणारे एकेक अक्षर घेऊनही निरर्थक नाव ठेवले जाते.

श्री गुरुदेव दत्त । हा नामजप करू लागल्यानंतर श्री. संकेत भोवर (वय २२ वर्षे) यांच्यात आध्यात्मिक स्तरावर झालेले पालट

श्री. संकेत भोवर
१. श्री दत्तगुरूंचा नामजप करण्यापूर्वी होत असलेले त्रास
     श्री गुरुदेव दत्त । हा नामजप चालू करण्यापूर्वी मला पुष्कळ त्रासांना सामोरे जावे लागत होते. माझ्या स्वभावदोषांमुळे आई-वडिलांना पुष्कळ त्रास व्हायचा. माझी पुष्कळ चिडचिड होत असे. काही सेवा सांगितली, तर मी आज्ञापालन करत नसे. आईने आश्रमात किंवा अन्य कुठेही जायला सांगितले, तर मी तिच्यावर चिडत असे. मला आश्रमात जायला नको वाटायचे आणि कंटाळा यायचा. आई-बाबा मला प्रतिदिन साधनेविषयी मार्गदर्शन करायचे. ते मला दैनिक वाचन, नामजप आणि सेवा करायला प्रोत्साहन देत; मात्र मी त्या गोष्टी टाळत असे. मी नामजप करत नव्हतो, तसेच दैनिक सनातन प्रभात हातातही घेत नव्हतो. आश्रमात सेवेसाठी जात नव्हतो.
२. श्री गुरुदेव दत्त । हा नामजप करण्यास चालू केल्यावर स्वतःत जाणवलेले पालट
२ अ. श्री दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन होऊ लागणे, निळा रंग असलेली उभी मूर्ती दिसू लागणे आणि ती मूर्ती श्रीविष्णूची असल्याचे वाटणे : एक दिवस मला दत्तगुरूंच्या सोन्याच्या पादुका दिसल्या. त्या दिवसापासून मला प्रतिदिन पादुकांचे दर्शन होत होते. तसेच त्यानंतर नामजप करत असतांना आज्ञाचक्रावर लक्ष केंद्रित करून जप करतांना ज्याप्रमाणे विष्णूच्या कपाळावर उभा नाम असतो, त्याप्रमाणे मला प्रतिदिन नाम दिसत होता आणि त्यासमवेतच एक उभी निळा रंग असलेली मूर्ती दिसत होती. मूर्तीच्या उजव्या हातात सुदर्शनचक्र असल्याने ही मूर्ती विष्णूची असावी, असे वाटले.
२ आ. प्रतिदिन उत्साह जाणवू लागणे आणि श्री दत्तगुरूंचे कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन होऊन भाव जागृत होणे : एकदा सायंकाळी नामजप करतांना मी रडू लागलो. माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू येऊ लागले. मला साक्षात् दत्तगुरु हसतांना दिसले. दत्तगुरूंना तीन मुखे होती आणि त्यांचा रंग निळा होता.

स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन प्रक्रिया, म्हणजे शुद्ध अन् निर्मळ होण्याची संधी आहे, याची अनुभूती घेतलेले श्री. भास्कर खडपे !

श्री. भास्कर खडपे
     कु. दीपाली मतकर यांनी मला स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेसाठी रामनाथी आश्रमात जाऊ शकता का ?, असे विचारले. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. प.पू. डॉक्टरांनी मला शुद्ध आणि निर्मळ होण्यासाठी ही संधी दिली आहे, या विचाराने मी ते लगेच स्वीकारले. घरातूनही प्रक्रियेला जाण्यासाठी मला लगेच अनुमती मिळाली.
१. प्रक्रियेसमवेत भावसत्संगाला जायला मिळाल्यामुळे प्रक्रिया
 आनंददायी वाटून कृतज्ञताभावात वाढ होणे आणि स्वतःला
झोकून देण्याची अन् पालटण्याची तळमळ वाढणे
      मला रामनाथीला जाण्याचा निरोप मिळाल्यापासूनच माझ्या प्रार्थना आणि कृतज्ञता यांत वाढ झाली. इकडे प्रक्रियेसमवेत भावसत्संगालाही जायला मिळाल्यामुळे ही प्रक्रिया पुष्कळ आनंददायी वाटली. देव नेहमी मला पालटण्यासाठी किती करतो !, या विचाराने अनेकदा माझी भावजागृती झाली. भावसत्संग घेणार्‍या ताईंनी भावजागृतीचे प्रयत्न कसे करायचे ?, हे पुष्कळ चांगल्या प्रकारे समजावून सांगितले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे १ - २ दिवसांनंतर कृती होऊ लागली आणि आनंद मिळत गेला. माझ्या कृतज्ञताभावात वाढ होऊन माझी स्वतःला झोकून देण्याची आणि पालटण्याची तळमळ वाढली. भावसत्संगातही भाव ठेवायला कुठे न्यून पडलो ?, हा दृष्टीकोन दिला गेल्याने माझे प्रयत्न वाढत असल्याचे मला समाधान मिळाले. पूर्वी माझे कृतज्ञताभावासाठी प्रयत्न अल्प होत होते. त्यामुळे प्रक्रियेत दिवसेंदिवस कृती होत आहे आणि सकारात्मकता वाढत आहे, याचा आनंद वाढत गेला.
२. मनाचा संघर्ष कसा होतो आणि त्यावर मात कशी करायची ?, याविषयी चांगले
दृष्टीकोन मिळून ऐकण्याची स्थिती आणि विचारून घेण्याची वृत्ती यांत वाढ होणे
     मला स्वयंपाक विभागात सेवा मिळाल्याने स्वभावदोष आणि अहं निर्मूलन होण्यासाठी दिशा मिळायला पुष्कळ साहाय्य झाले. साधनेतील मार्गदर्शनानुसार वागण्यासाठी प्रयत्न वाढावेत; म्हणून माझी प्रार्थना आणि कृतज्ञता यांत वाढ झाली आहे.

लागली आस गुरुचरणांची ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त...

तुझ्या कृपेने हे जीवन मिळाले ।
देवा, मी तुला शरण आले ॥ १ ॥

अनेक जन्म असेच गेले ।
त्यात मी प्रारब्ध निर्माण केले ॥ २ ॥

कल्पना नाही मजला त्याच्या तीव्रतेची ।
झळ नाही लागू दिली कृपाळू माऊलीने प्रारब्धाची ॥ ३ ॥

देवा, कुठच्या जन्माची आहे ही पुण्याई ।
लाभली थोर अशी गुरुमाऊली ॥ ४ ॥

थोरवी तिची कळली जगी सर्वांना (टीप) ।
वंचित मी अजूनी, न्यून पडेे माझी साधना ॥ ५ ॥

देवा, करते मी प्रतिदिन चुका अनेक ।
घडते पाप त्यातूनी अनेक ॥ ६

साधिकेने अनुभवलेले प्रार्थनेतील अलौकिक सामर्थ्य !

श्रीमती वसुधा देशपांडे
प.पू. गुरुदेवांच्या चरणी,
शिरसाष्टांग नमस्कार.
     प.पू. गुरुदेवा, प्रार्थना हा ग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वीच आपण माझ्याकडून प्रार्थना करवून घेतल्या. प्रसंग लहान आणि वेगवेगळे असायचे. प्रार्थना शब्दबद्ध होतांना त्यांचे वेगळेपण जाणवले; पण भावतरंग गाढ होता. त्यामुळे त्याची फलश्रुती लगेच मिळायची. प.पू. गुरुदेवा, कर्ते-करविते आपणच असल्याने काही प्रसंग सांगत आहे.
१. यजमान (प.पू. देशपांडेकाका) तापाने आजारी असतांना
१ अ. फॅमिली डॉक्टरांकडे गर्दी असतांना औषध लवकर मिळू दे, अशी प्रार्थना केल्यावर कंपाऊंडरने स्वतःहून आतमध्ये बोलावणे आणि आधुनिक वैद्यांनी लगेच औषधे लिहून देणे : वर्ष १९९८ मध्ये माझे यजमान (प.पू. देशपांडेकाका) तापाने फारच आजारी होते. एके दिवशी सायंकाळी ४ वाजता त्यांचा ताप फारच वाढला. मी औषध आणायला बाहेर पडले. आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेले, तर तेथे पुष्कळ गर्दी होती. घरी यजमान एकटेच तापाने फणफणत असल्याने काय करावे ?, ते सुचत नव्हते. मी मनातून गुरुदेवांना प्रार्थना केली, औषध लवकर मिळू दे, म्हणजे यांना लवकर बरे वाटेल. गुरुदेवा, तुम्हीच आता साहाय्य करा. माझी अशी प्रार्थना झाल्यावर आतून कंपाऊंडर येऊन त्याने मला विचारले, काकू, कशा काय आलात ? त्या वेळी मी त्याला सर्व सविस्तरपणे सांगितले. त्याने आत जाऊन वैद्यांना सांगितले आणि लगेच मला आत बोलावून औषधे लिहून दिली.
१ आ. मुसळधार पावसात औषधे आणण्यासाठी गेल्यानंतरही प्रार्थना केल्याने अंगावर पावसाचा एक थेंबही न पडणे आणि रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले असूनही साडी कोरडीच रहाणे : मी घाईने औषधे आणायला निघाले. तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता. सर्व जण मला थांबायला सांगत होते; पण मला पावसाची पर्वा नव्हती. औषधालयात गेल्यावर त्यांनी मला लगेच औषधे बांधून दिली. मी भिजतच घरी जायला निघाले. ते पाहून एक व्यक्ती तिची छत्री घेऊन जायला सांगू लागली; पण माझे तिच्याकडे लक्षच नव्हते.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या वेळी आलेल्या अनुभूती

१. सत्यवती गंगाधरैय्या, बेंगळुरू
१. २२.९.२०१५ या दिवशी मी ध्यानमंदिरात बसून प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पहात होते. त्या वेळी माझ्या हातातून चैतन्य आत जात असल्याचे मला जाणवले.
२. काही वेळानंतर मी डोळे मिटले असता मला त्या छायाचित्राच्या जागी साईबाबांचे दर्शन झाले.
३. मला चैतन्याची स्पंदने जाणवून ती माझ्या हातांच्या माध्यमातून वेगाने आतमध्ये जात होती.
४. माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी फिकट पिवळा प्रकाश दिसत होता.
२. श्री. सुजित काळभोर, पुणे
     सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यशाळेच्या वेळी श्री. सुजित काळभोर यांना आलेल्या अनुभूती
१. आश्रमात प्रवेश करताच क्षणी मला तेथे पावित्र्य जाणवले.
२. आश्रमात वास्तव्यास असतांना माझ्या मनात सकारात्मक विचार होते

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी स्थापित केलेल्या आणि नियमित देवापुढे लावण्यात येणार्‍या दिव्याच्या ज्योतीभोवती प्रभावळ दिसून त्या माध्यमातून देवाने निर्गुणातून त्याच्या अस्तित्वाची दिलेली साक्ष !

सौ. अंजली कणगलेकर 
      १.१०.२०१६ या दिवशी नवरात्राला आरंभ झाला. या दिवशी पूजा करून नवरात्रीचा दिवा स्थापन केल्यानंतर त्या दिव्याच्या ज्योतीभोवती गुलाबी प्रभावळ दिसली; म्हणून देवापुढे नियमित लावण्याच्या दिव्याचेही छायाचित्र काढण्यास माझा मुलगा श्री. अंजेश याला सांगितले. त्या दिव्यातील ज्योतीभोवतीही गुलाबी प्रभावळ दिसली. ही प्रभावळ खालीही दिसते. 
१. नवरात्रीच्या दिव्याच्या 
ज्योतीभोवतीची प्रभावळ आणि नियमित 
दिव्याच्या ज्योतीभोवतीची प्रभावळ यांत जाणवलेला भेद
    नवरात्रीच्या दिव्याच्या ज्योतीभोवतीची प्रभावळ सरळ वर जाणारी दिसली, तर नियमित दिव्याच्या ज्योतीभोवतीची प्रभावळ फवार्‍याप्रमाणे दिसली.

नियमित व्यष्टी साधना करणारी, तत्परतेने सेवा करणारी ५३ टक्के आध्यात्मिक स्तर असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मथुरा, उत्तरप्रदेश येथील कु. हिमांशी सिंह जादौन (वय २० वर्षे) !

कु. हिमांशी सिंह जादौन
१. प्रेमभाव
     कु. हिमांशी नेहमी दुसर्‍यांना साहाय्य करायला सिद्ध (तयार) असते.
२. आसक्ती नसणे
     तिला कशाचीच आसक्ती नाही. ती स्वतःची वस्तू दुसर्‍यांना सहज देते.
३. व्यष्टी साधना
     ती प्रार्थनेसह नामजप करणे, सर्व आध्यात्मिक उपाय करणे, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवणे, भावजागृतीचे प्रयत्न करणे आणि ग्रंथ वाचन हे सर्व करते.
४. दोष स्वीकारणे
     तिला तिचे दोष सांगितल्यावर ती लगेच स्वीकारून त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करते.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने घेण्यात येणार्‍या शिबिरांत जिज्ञासूंना सहभागी करून घेण्याच्या उद्देशात ऑगस्ट २०१६ पासून झालेला पालट

पू. सिरीयाक वाले
     महर्षिअध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ५ दिवसांची शिबिरे आयोजित करण्यात येतात. त्यांना देश-विदेशांतून जिज्ञासू येतात.
१. आतापर्यंतचा (ऑगस्ट २०१६ पर्यंतचा) दृष्टीकोन
     शिबिरात सहभागी होऊ इच्छिणार्‍या जिज्ञासूंची छायाचित्रे मागवण्यात येतात. छायाचित्रातून एखाद्या जिज्ञासूला वाईट शक्तींचा तीव्र त्रास आहे, असे जाणवल्यास शिबिरातील चैतन्यामुळे त्याला त्रास होईल. त्याला विषय ग्रहण करता येणार नाही. त्यामुळे त्याचे पैसे फुकट जातील, या विचारांमुळे त्याला शिबिरात सहभागी करून घेत नसू. त्याला वाईट शक्तींचा त्रास अल्प व्हावा; म्हणून ५ - ६ महिने आध्यात्मिक उपाय करून नंतर शिबिराला येण्यास सांगत असू.
२. आताचा (ऑगस्ट २०१६ पासूनचा) दृष्टीकोन
     आता हे प्रकर्षाने जाणवले की, वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्यांना उपाय म्हणून साधना कोणती करायची, हे ज्ञात नसते. एखाद्याला ज्ञात असले किंवा सांगितले, तरी त्यांना घरी साधना करणे अशक्य होते. ते शिबिरासाठी आले आणि त्यांना त्रासामुळे शिकवलेले समजले नाही, तरी शिबिराच्या स्थानी असलेल्या चैतन्यामुळे त्यांचा त्रास थोडातरी न्यून होतो. त्यामुळे त्यांची अध्यात्मावरील श्रद्धा वाढते. हे खूप महत्त्वाचे आहे. वाईट शक्तीचा त्रास न्यून झाल्यामुळे घरी परत गेल्यावर त्यांना साधना करून त्रासावर मात करणे शक्य होते. त्यामुळे ते पुढे साधना करू शकतात.

तीव्र आध्यात्मिक त्रास होतांनाही स्वतः आनंदी राहून साधकांना सर्वतोपरी साहाय्य करणारी आणि प.पू. डॉक्टरांप्रती कृतज्ञताभाव असणारी कु. मयुरी डगवार !

कु. मयुरी डगवार
     माझे पोट दुखत असल्यामुळे मी काही दिवस कु. मयुरी डगवार हिच्या खोलीत राहून विश्रांती घेत होते. मला असा शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास प्रथमच होत असल्यामुळे त्या वेळी मी गांगरून गेले होते. त्या काळात मयुरीताईने मला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर साहाय्य केले. तसेच देवाने सर्व साधकांच्या माध्यमातून माझी पुष्कळ काळजी घेतली. प्रत्येक साधक माझी प्रेमाने विचारपूस करत होता. त्या वेळी माझ्यात प्रेमभावाची किती न्यूनता आहे ?, याची मला जाणीव झाली. त्या कालावधीत मयुरीताईची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.
१. तत्परता आणि सतर्कता
     आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) पोटदुखी थांबण्यासाठी दिलेल्या गोळ्या आणि इंजेक्शन यांचा माझ्यावर काहीच परिणाम होत नव्हता. तेव्हा ताई लगेच आधुनिक वैद्यांना त्याविषयी कल्पना द्यायची आणि संतांना आध्यात्मिक उपायही विचारून घ्यायची. एखाद्या वेळी मी ते उपाय करायला विसरले, तर ती मला आठवण करून माझ्याकडून ते उपाय करून घ्यायची आणि मला सांगायची, आपण सतत सतर्क असायला हवे, नाहीतर वाईट शक्ती कधी त्रास वाढवतील ?, हे आपल्याला कळणारही नाही.
२. सेवेची तळमळ
     ताईला तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांनाही तिला स्वतःकडून सेवा कशी होईल ?, याचा ध्यास लागलेला असतो आणि ती झोकून देऊन सेवा करते. ती अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाच्या कालावधीत रुग्णाईत होती, तरी तिने सहसाधिकेच्या साहाय्यानेे दायित्व घेऊन परिपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न केला.
३. साधकांना साहाय्य करणे
     ताई साधकांना त्यांच्या प्रकृतीनुसार उत्तम प्रकारे हाताळते.
अ. ती साधकांना शारीरिक आणि मानसिक त्रास होत असतांना औषध घेण्याचे महत्त्व काय ? गुरुकृपेने आपल्याला सहज उपचार कसे मिळतात ? सेवा करण्यासाठी शरिराची काळजी का घ्यायला हवी ? देह हे देवाचे कसे मंदिर आहे, याविषयी सांगून उत्साहित करते.
आ. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना ती प्रार्थना करणे, आध्यात्मिक उपाय करायची आठवण करणे, एखाद्या संतांनी किंवा प.पू. डॉक्टरांनी त्या साधकाविषयी पूर्वी काढलेले कौतुकोद्गार सांगणे अशा प्रकारे आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करते.

कुटुंबियांनी साधना करावी, ही अपेक्षा नको !

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
     काही साधकांना आपल्या कुटुंबियांनी साधना करावी, असे वाटते. साधनेत मला काय वाटते, याला महत्त्व नाही. कुटुंबियांनी साधना करावी, ही स्वेच्छाच आहे. स्वेच्छेऐवजी परेच्छेने वागणे आणि त्याही पुढे जाऊन ईश्‍वरेच्छेने वागणे, ही साधनेची शिकवण आहे.
     या घोर आपत्काळात जीवन्मुक्त होण्यासाठी विष्णुस्वरूप मोक्षगुरूंचे (प.पू. डॉक्टरांचे) कृपाशीर्वाद सर्वांना लाभले आहेत. त्यामुळे कुटुंबियांकडून अपेक्षा करण्याऐवजी ईश्‍वरप्राप्तीसाठी स्वतः तळमळीने प्रयत्न करावेत !
- (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.९.२०१६)


शक्ती आणि आनंद

     शक्तीमुळे कार्य घडते. जितकी शक्ती अधिक तितके अधिक कार्य घडते. यामध्ये साधकात अहं निर्माण होण्याची शक्यता असते. आनंदाच्या स्थितीला साधक अंतरंगात परमेश्‍वरी सत्ता अनुभवत असल्याने त्याचा अहं अल्प रहाण्यास साहाय्य होते आणि त्याच्या माध्यमातून कार्यही आपोआप घडते. त्यामुळे शक्तीचा पुढील स्तर आनंद आहे.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.६.२०१५)

सनातन संस्थेच्या संपर्कात येऊन श्री कुलदेवतायै नमः । हा नामजप केल्यावर कुलदेवतेचे स्थान समजणे

     मी सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर श्री कुलदेवतायै नमः । असा जप करू लागलो. मी हा जप करू लागल्यापासून चौथ्या दिवशी मला अकस्मात् श्री. कृष्णन् भेटले. ते श्री कांजीरगाट्ट वैद्यनाथ शिवक्षेत्राहून आले होते. त्यांच्याशी बोलत असतांना ते आमच्या आजोबांच्या मोठ्या भावाचा मुलगा असल्याचे समजले. ते कुलदेवतेच्या देवळाच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्नरत असल्याचे समजले. त्यांनी त्या देवळाचा ठावठिकाणाही दिला. त्यांनी सांगितले, तेथील कुलदेवाची (श्री सोमेश्‍वरदेवाची) प्रतिष्ठापित केलेली मूर्ती तेथील एका विहिरीत आहे. त्यामुळे कुटुंबातील सर्वांना श्‍वसनाचे विकार होत आहेत.
- श्री. श्रीनाथ पद्मनाभन, केरळ (२३.७.२०१६)
प्रसिद्धीसाठी शाळा सोडणार्‍या अभिनेत्रीचे कौतुक; मात्र साधना अन् धर्मकार्य करण्यासाठी शाळा सोडणार्‍या साधिकांना नावे (?)

ही आहे समाजाची धर्मद्वेषी मानसिकता !
        सैराट या चित्रपटातील नायिका रिंकू राजगुरु (आर्ची) हिने चाहत्यांची शाळेतही गर्दी होत असल्याने, तसेच अनेक कामांच्या ऑफर्स असल्याने शाळा सोडल्याची, तसेच १० वीची परीक्षा बाहेरून (१७ क्रमांकाचा अर्ज भरून) देणार असल्याचे वृत्त अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले. प्रसिद्धीसाठी शालेय शिक्षण सोडणार्‍या अभिनेत्रीचे वारेमाप कौतुक केले जाते; मात्र साधना आणि धर्मकार्य करण्यासाठी शाळा सोडून देणार्‍या साधिकांना समाजाकडून नावे ठेवली जातात. सनातनच्या काही साधिका साधनेचे महत्त्व बिंबल्याने शालेय शिक्षण सोडून साधनामार्गावर वाटचाल करत आहेत. ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने युवा साधिकांनी घेतलेल्या या निर्णयाकडे अनेक जणांकडून हेटाळणीच्या स्वरूपात पाहिले जाते. यावरून हिर्‍याला दगड समजण्याची, तर दगडाला हिरा समजण्याची समाजाची दृष्टी निर्माण झाल्याचे लक्षात येते. याचा दोष समाजाला नव्हे, तर काळालाच द्यावा येईल. - श्री. पराग गोखले, पुणे
       अंध, अज्ञानी नेत्यांनो, राष्ट्रद्रोह्यांना शिक्षा करा आणि देशभक्तांना सन्मानित करा, नाहीतर तुम्हीही वाचणार नाही अन् तुमचे पदही रहाणार नाही, तसेच तुम्ही अधर्माने मिळवलेला अब्जावधी पैसा आणि सर्वकाही पाण्यात जाईल ! (सावरकर टाइम्स,मे २०१०)

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या 
वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !
        सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

फलक प्रसिद्धीकरता

विस्थापित काश्मिरी 
हिंदूंविषयीही नक्वी यांनी बोलावे !
       देशाच्या राज्यघटनेने सर्वांना समान हक्क दिले असले, तरी त्यामध्ये काहीतरी उणीव असल्याचे जाणवते. कधीकधी आम्हाला या देशाचे दुय्यम नागरिक असल्यासारखे वाटते, असे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Musalmanonko kabhi kabhi lagta hai ki ham is desh ke dvitiya nagrik hai. - Mukhtar Abbas Nakvi, BJP neta
Visthapit Kashmiri Hinduonke vishayme ye chup kyo ?
जागो ! : मुसलमानों को कभी कभी लगता है कि हम इस देश के द्वितीय नागरिक है । - केंद्रीय मंत्री और भाजप नेता मुख्तार अब्बास नक्वी
विस्थापित कश्मीरी हिन्दुआें के विषय में ये चुप क्यों ?
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

'स्वार्थासाठी राजकीय पक्ष पालटणारे सहस्रो असतात; पण स्वार्थत्यागी सांप्रदायिकांच्या मनाला संप्रदाय पालटण्याचा विचार एकदाही शिवत नाही !'  - (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
वेळ न मिळणे
      जे व्यय (खर्च) करायचे आहे, ते तुम्ही गोळा (जमा) करता व जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता. याउलट कसे करायचे ते शिका.
भावार्थ :
जे व्यय करायचे आहे, ते तुम्ही गोळा करता म्हणजे पैसा गोळा करता आणि जे गोळा करायचे आहे, ते व्यय करता म्हणजे साधना करण्याचा बहुमूल्य वेळ वाया घालविता. याउलट कसे करायचे ते शिका म्हणजे वेळेचा जास्तीतजास्त वापर साधना करण्यासाठी करा.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सत्याची कास कधीही सोडू नये ! 
परमेश्‍वराची साथ नित्य रहावी, ही इच्छा असेल, 
तर कधीही सत्याची कास सोडू नये. सतत सत्याचे अधिष्ठान ठेवावे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

राष्ट्रवादीच्या फैरी !

संपादकीय 
     कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची चेतावणी खासदार सुप्रिया सुळे यांनी ५ ऑक्टोबर या दिवशी दिली. मुख्यमंत्र्यांनी महिनाभरात आरोपपत्र प्रविष्ट करण्याचे आश्‍वासन न पाळल्याने त्यांनी ही चेतावणी दिली आहे. विरोधी पक्षाच्या एक नेत्या म्हणून शासनावर अशा प्रकारे अंकुश ठेवण्याचे कर्तव्य त्यांनी बजावले आहे, ही चांगलीच गोष्ट आहे; मात्र नुकत्याच मुख्यमंत्र्यांना काम झेपत नाही, त्यांची चीडचीड होते, त्यांनी राज्याचा बट्ट्याबोळ केला, यांसारख्या आरोपांच्या फैरींची जी पोपटपंची त्यांनी केली आणि आता पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर जे शरसंधान केले, यामागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मोठी पार्श्‍वभूमी आहे. अन्यथा ज्या मुसलमान युवतींना मेळाव्याला बोलावून राष्ट्रवादीचे महिला मेळावे होतात, त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात राष्ट्रवादीने आजवर कधीही आवाज उठवलेला ऐकला नाही कि बलात्कार, छेडछाड आणि स्त्रियांचे अन्य प्रश्‍न याविरोधात काही ठोस कृतीशील प्रयत्न केलेले ऐकले नाही. त्यामुळे मराठा मोर्च्याच्या लाटेवर आरूढ होऊन कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे धमकीवजा चेतावणी देणे, हे राष्ट्रवादीचे राजकारणच आहे. याही प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अविचल राजाप्रमाणे निर्णय घेऊन ठाम रहावे, ही जनतेची अपेक्षा आहे.

चीनचे दिवाळे काढाच !

संपादकीय 
     हरियाणामधील रेवाडी या शहरातील विविध व्यापारी संघटनांनी मिळून यंदाच्या ऑक्टोबरमध्ये येणार्‍या चिनी मालावर बहिष्कार घालून शत्रूराष्ट्र चीनला धडा शिकवण्याचा दृढ निश्‍चय केला आहे. सर्जिकल आक्रमणानंतर चीनकरवी ब्रह्मपुत्रेचे पाणी रोखण्याची उलट धमकी पाकने दिली होती. या पार्श्‍वभूमीवर तेथील राष्ट्राभिमानी व्यापार्‍यांनी हा धडक निर्णय घेऊन त्याची कार्यवाही चालू केली आहे. शाळा, महाविद्यालये यांमधूून प्रबोधन, पत्रके वाटून प्रबोधन, स्वतः माल खरेदी न करणे आदी गोष्टी करणे त्यांनी चालू केले आहे. त्यामुळे यंदा या भागात येणारा ३०० कोटी रुपयांचा चिनी माल घेतला जाणार नाही, असा अंदाज आहे. रेवाडीच्या राष्ट्रप्रेमी व्यापार्‍यांचा आदर्श समस्त भारतियांनी घेऊन यंदाच्या दिवाळीत चीनचे दिवाळे काढण्याचा कृतनिश्‍चय आता केला पाहिजे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn