Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नवरात्रोत्सव (आज तिसरा दिवस)

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥
        एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ शक्ती)
नवरात्र विषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका
https://www.sanatan.org/mr/navratri

काश्मीर समस्येमागील मूळ हे इस्लाममध्ये ! - राहुल राझदान, नेता, विस्थापित काश्मिरी हिंदू

म्हापसा (गोवा) येथे एक भारत अभियान-
कश्मीर की ओर चळवळीच्या अंतर्गत जाहीर सभा ! 

डावीकडून श्री. मनोज खाडये, श्री. शिवप्रसाद जोशी,
दीपप्रज्वलन करतांना श्री. राहुल राझदान आणि श्री. चेतन राजहंस

      म्हापसा, २ ऑक्टोबर (वार्ता.) - काश्मीर समस्येमागील मूळ इस्लाममध्ये आहे. काश्मीरच्या इस्लामीकरणात काश्मिरी हिंदू हा मोठा अडथळा आहे; म्हणून त्यांना ठार केले जाते. तेव्हा हिंदु-मुसलमान तेढ निर्माण होणार या भीतीने कोणी आवाज उठवला नाही. सर्व बुद्धीवादी, खासदार गप्प राहिले. वर्ष १९९१ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात काश्मिरी हिंदूंसाठी सोय केली. काश्मिरी हिंदू आणि हिंदुत्वाचे पुनर्वसन होईल, असे राज्य म्हणजेच पनून कश्मीर निर्माण होणे आवश्यक आहे, असे परखड प्रतिपादन विस्थापित काश्मिरी हिंदूंचे नेते श्री. राहुल राझदान यांनी येथे केले.

हिंदू सुरक्षित, तरच सरकार सुरक्षित ! - आमदार राजासिंह ठाकुर

जबलपूर (मध्यप्रदेश) येथील हिंदु धर्मसभेला 
२ सहस्रांहून अधिक धर्माभिमान्यांची उपस्थिती ! 

डावीकडे बोलतांना आमदार श्री. राजासिंह ठाकुर,
श्री. आनंद जाखोटिया (उजवीकडे) आणि अन्य मानवर

         जबलपूर (मध्यप्रदेश), २ ऑक्टोबर (वार्ता.) - भारतामध्ये जर हिंदूच सुरक्षित नसेल, तर सरकार सुरक्षित रहाण्याची खात्री देता येत नाही. हिंदू सुरक्षित राहिला, तरच सरकार सुरक्षित राहील, असे प्रतिपादन भाग्यनगर येथील भाजपचे आमदार श्री. राजासिंह ठाकुर यांनी येथे केले.
         हिंदु धर्मसेनेच्या वतीने आयोजित विशाल धर्मसभेला श्री. राजासिंह संबोधित करत होते.

राष्ट्रीयत्व असलेला हिंदु समाज निर्माण करणे हे आपले ध्येय ! - पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)

श्री दुर्गामाता दौडीचा पहिला दिवस 

सांगली येथे श्री दुर्गामाता दौडीत झेंडा घेऊन सहभागी
असलेले आमदार श्री. सुधीर गाडगीळ आणि अन्य धारकरी

         सांगली, २ ऑक्टोबर (वार्ता.) - आज हिंदु समाजाला धर्म, संस्कृती यांच्याशी काही देणे-घेणे राहिले नसून तो संकुचित झाला आहे. राष्ट्रीयत्व असलेला हिंदु समाज निर्माण करणे, हे आपले ध्येय आहे. हे ध्येय आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी दाखवलेल्या मार्गातूनच साध्य करू शकतो. तरी श्री दुर्गामातेने त्यासाठी आपल्याला शक्ती द्यावी, असे मागणे मागण्यासाठी आपण इथे आलो आहोत, असे मार्गदर्शन श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी केले. ते श्री दुर्गामाता मंदिराच्या समोर धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना पहिल्या दिवशी बोलत होते. आजच्या दौडीसाठी सांगली विधानसभा मतदारसंघातील आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्यासह मोठ्या संख्येने धारकरी उपस्थित होते.

पाककडून होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेचे आंदोलन !

        कोटली (पाकव्याप्त काश्मीर) - पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद, गिलगिट, कोटली यांसह अन्य ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून पाककडून होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. कोटली येथे एका नागरिकाच्या हत्येनंतर स्थानिक लोकांनी निदर्शने केली. यापूर्वीही येथे अशा प्रकारची निदर्शने केली गेली आहेत. त्यांच्या समर्थनार्थ लंडन, जर्मनी, व्हीएन्ना आदी राष्ट्रांतही निदर्शने करण्यात येत आहेत. आयएस्आयपेक्षा कुत्रे अधिक एकनिष्ठ असतात काश्मिरींचे हत्याकांड घडवणारे कसाई पाकिस्तानी सैन्य, अशा प्रकारच्या घोषणाही आंदोलकांकडून देण्यात आल्या.
१. पाकव्याप्त काश्मीरमधील एक मुख्य काश्मिरी राष्ट्रवादी नेते असलेले आरिफ शाहिद यांच्या झालेल्या हत्येची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. 
२. ६२ वर्षीय शाहिद यांनी पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचारांच्या विरोधात तीव्र लढा दिला होता. वर्ष २०१३ मध्ये रावळपिंडी येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येमागील सूत्रधार अजूनही सापडलेले नाहीत. शाहिद यांची हत्या आयएस्आयनेच घडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

अणूयुद्ध केल्यास पाक जगाच्या नकाशावरून नष्ट होईल !

  • भारतातील पाकप्रेमी धर्मांधांनी याचा विचार करावा !  
  • पाकच्या पत्रकाराकडून घरचा अहेर !
         इस्लामाबाद - पाकचे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्‍लेषक हसन निसार यांनी पाकला घराचा अहेर दिला आहे. पाकने भारताच्या विरोधात अणुयुद्ध छेडल्यास त्यात पाक जगाच्या नकाशावरून कायमचा नष्ट होईल. त्यामुळे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल जे सांगत आहेत, ते पाकने ऐकावे, असे निसार यांनी म्हटले आहे. पाकमधील दुनिया न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. पाकमध्ये वेड्यांचा बाजार भरला आहे, असेही त्यांनी या वेळी म्हटले.
         निसार पुढे म्हणाले की, येथे जी अशिक्षितांची टोळी आहे त्यांना अणूबॉम्ब कसा असतो, हेही माहिती नाही. भारताची लोकसंख्या १०० कोटींहून अधिक आहे आणि पाकची २० कोटी आहे. जर अणूयद्ध झाले, तर पाकची १८ कोटी जनता नष्ट होईल आणि भारताची कमीतकमी २० कोटी जनता शिल्लक राहील, हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. हे मूर्ख लोक स्वतःच्या विनाशाचा आनंद साजरा करत आहेत. त्यांचा हा मूर्खपणा फार जुना आहे. हसन निसार पुढे म्हणाले की, पाकने अणूबॉम्ब बनवले; मात्र त्यांनी देशातील मुलांना पुस्तके दिली नाहीत. रुग्णांना उपचाराची सोय केली नाही. त्यांना न्याय दिला नाही. केवळ अणूबॉम्ब बनवला.

श्री महालक्ष्मी मंदिरातील व्यापार्‍यांना आतंकवादविरोधी पथकाच्या सूचना !

वारंवार अशा सूचना द्याव्या लागणे किंवा 
रंगीत तालीम घेणे, असे उपाय करावे लागू नयेत, 
यांसाठी आतंकवादमुक्त भारतासाठी हिंदु राष्ट्र स्थापा !
       कोल्हापूर - देशातील आतंकवादी कारवायांच्या अनुषंगाने पोलिसांकडून नागरिकांमध्ये सतर्कता वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर २८ सप्टेंबर या दिवशी आतंकवादविरोधी पथकाने श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील फेरीवाले, साहित्य विक्रेते दुकानदार यांना सूचना केल्या. मंदिरात एखादा अनुचित प्रकार घडला, तर काळजी आणि सुरक्षितपणे बाहेर पडण्याची रंगीत तालीम चारही दरवाजांवर घेण्यात आली.
       २८ सप्टेंबर या दिवशी पहाटे पथकाने महाद्वारचौकात दुचाकी उभी केली होती. त्यावर एक पिशवी ठेवण्यात आली; मात्र दुपारपर्यंत याकडे कोणाचेही लक्ष गेलेच नाही. आतंकवादविरोधी पथकातील स्थानिक अधिकार्‍यांनी दुपारी ४ वाजता मंदिराला भेट दिली. त्यांनी महाद्वार चौकात जाऊन या दुचाकी आणि बेवारस पिशवीची पाहणी केली. येथील फेरीवाले, पूजेचे साहित्य विकणारे दुकानदार यांची भेट घेतली. येथील विक्रेत्यांना विश्‍वासात घेऊन त्यांना याविषयी माहिती देण्यात आली. मंदिराच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने स्थानिक नागरिक आणि फेरीवाल्यांमध्ये सतर्कता यावी, यासाठी हा प्रयोग चारही दरवाजांवर करण्यात आला.

भारताने कधी इतरांवर आक्रमण केलेले नाही ! - पंतप्रधान मोदी यांची पाकवर टीका

भारताने इतरांवर आक्रमण केलेले नाही; मात्र 
आक्रमण करणार्‍यांना नेहमीच धडा शिकवलेला 
आहे, याचे पालन नेहमीच करता आले पाहिजे !
        नवी देहली - भारत कधीही भूमीचा भुकेला राहिलेला नाही. त्याने कधीही इतरांवर आक्रमण केलेले नाही. भारताने नेहमी इतरांसाठी बलीदान दिले आहे. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धात भारताचे दीड लाख सैनिक हुतात्मा झाले आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकला उद्देशून केले. ते येथे प्रवासी भारतीय केंद्राचे उद्घाटन करतांना बोलत होते.

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सर्जिकल स्ट्राइक घडले नसल्याचे दाखवण्याचा पाकचा अयशस्वी प्रयत्न !

        नवी देहली - भारताने २८ सप्टेंबरच्या रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेला सर्जिकल स्ट्राईक खोटा असल्याचे दाखवण्यासाठी पाकने आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील सर्जिकल स्ट्राईक झालेल्या ठिकाणी नेले होते. या संदर्भातील वृत्त या प्रसारमाध्यमांनी दिले आहे. पाकने २० प्रसारमाध्यमांच्या ४० पत्रकारांना येथे नेले होते. (२८ सप्टेंबरला घडलेल्या घटनेविषयी प्रसारमाध्यमांना ३ दिवसांनी तेथे नेऊन जगाला मूर्ख बनवण्याचा पाकचा प्रयत्न हास्यास्पद आहे ! या ३ दिवसांत पाकने सर्जिकल स्ट्राईक झालेल्या जागेची स्वच्छता केल्याचे आधीच वृत्त प्रसिद्ध झाले होते ! - संपादक)
        डॉन आणि द न्यूज इंटरनॅशनल यांच्या वृत्तानुसार पाक सैन्याचे प्रवक्ता लेफ्टनंट जनरल असीम बाजवा यांनी पत्रकारांना सांगितले की, तुम्ही येथे पाहु शकता की, येथे सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे कोणतीही खूण नाही. भारतीय सैन्य खोटे बोलत आहे. तुम्ही येथील नागरिकांना भेटू शकता. संयुक्त राष्ट्र, प्रसारमाध्यमे आणि सामान्य नागरिक यांसाठी हा भाग मोकळा आहे. बाजवा यांनी सांगितेल्या सूत्रांचा किंवा दाव्यांची निश्‍चिती करणे शक्य नव्हते, असे फ्रान्समधील वृत्तसंस्था एएफ्पीने म्हटले आहे. (यावरूनच पाकवर प्रसारमाध्यमांचा विश्‍वास नसल्याचे उघड होते ! - संपादक)

भारत-पाक यांच्यात अणूयुद्ध झाल्यास ४ कोटी लोक ठार होतील ! - इंडिया स्पेंडचा अहवाल

राज्यकर्त्यांनी अणूयुद्धाची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना त्यासाठी सिद्ध करावे !
      नवी देहली - भारत आणि पाक यांच्यातील तणाव टोकाला पोचला आहे. भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्रईक नंतर नियंत्रणरेषा आणि भारत-पाक सीमेवर सतर्कता वाढवण्यात आली आहे. दोन्ही देशांमध्ये आण्विक आक्रमणाची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. याविषयी भारताने कोणतीही धमकी दिली नसली, तरी पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी अशा प्रकारची धमकी दिली आहे. अशा स्थितीत या दोन देशांमध्ये आण्विक आक्रमण झाले, तर ४ कोटी लोक प्राणांना मुकतील, असे इंडिया स्पेंडच्या अहवालात म्हटले आहे. (अणूयुद्धांसारख्या परिणामांना ध्यैर्याने समोरे जाण्यासाठी साधनेशिवाय पर्याय नाही ! - संपादक)

पाकला आतंकवादी राष्ट्र घोषित करा !

संयुक्त राष्ट्राच्या सचिवांना रक्ताने लिहिले पत्र
      धर्मशाळा (हिमाचल प्रदेश) - आतंकवाद्यांना आश्रय देणार्‍या पाकिस्तानला आतंकवादी राष्ट्र घोषित करण्यात यावे, अशी मागणी धर्ममशाळा येथील कार्यकर्ते डॉ. महेश यादव यांनी केली. यासाठी त्यांनी त्यांच्या रक्ताने संयुक्त राष्ट्र्राचे सचिव बान की मून यांना हिंदी भाषेत पत्र लिहिले. (सरकारने आता अधिकृतरित्या अशी मागणी करणे अपेक्षित आहे. - संपादक) अमेरिकेतील संसदेतही पाकला आंतकवादी राष्ट्र घोषित करण्याविषयी प्रस्ताव मांडण्यात आला आहेे. त्यापाठोपाठ ब्रिटनही पाकला आतंकवादी राष्ट्र घोषित करण्याच्या सिद्धतेत असल्याचे सांगितले जात आहे. उरी येथील आक्रमणानंतर पाक आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडला आहे.

लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी देहलीतील महिला सत्र न्यायाधिशांना अटक !

भ्रष्टाचारातही स्त्री-पुरुष समानता असल्याचे दर्शक असलेली घटना !
राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराची लागण झालेले न्यायाधीश ! 
     नवी देहली - वादग्रस्त मालमत्ता खटल्याच्या प्रकरणी तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देण्यासाठी ५ लक्ष रुपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने तिस हजारी जिल्हा न्यायालयाच्या वरिष्ठ सत्र न्यायाधीश रचना तिवारी लखनपाल यांना अटक केली आहे. या प्रकरणी न्यायाधिशांचे पती अलोक लखनपाल आणि अधिवक्ता विशाल मेहन यांनाही अटक करण्यात आली आहे. (न्यायाधीशच जर भ्रष्ट निपजले, तर सामान्य जनतेने न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी ? रचना लखनपाल यांनी आतापर्यंत दिलेल्या सर्व निर्णयांची पुन्हा पडताळणी करणे आवश्यक आहे. त्यांनी लाचखोरी करून निर्णय दिल्याची शक्यता नाकारता येत नाही ! - संपादक)

वर्ष १९०३ पासून बंद असलेले कोणार्कचे सूर्यमंदिर उघडण्याची मागणी !

११३ वर्षांपूर्वी परकीय सत्तेने बंद केलेले हिंदूंचे मंदिर 
उघडण्यासाठी अजूनही हिंदूंना आंदोलन करावे लागणेे, हे हिंदूंसाठी दुर्दैव !
हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे देहली येथील भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या मुख्यालयासमोर धरणे आंदोलन
सूर्यमंदिर उघडण्यासाठी
धरणे आंदोलन करणारे आंदोलक
      नवी देहली - कोणार्क सूर्यमंदिर उघडण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. चंद्र प्रकाश कौशिक यांच्या नेतृत्वाखाली दारा सेना आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी येथील भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या मुख्यालयासमोर नुकतेच धरणे आंदोलन केले. या वेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे महासंचालक राकेश तिवारी आणि संस्कृतीमंत्री महेश शर्मा यांना निवेदन देऊन कोणार्क सूर्यमंदिर त्वरीत उघडण्याची मागणी करण्यात आली.

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना मारहाण करणार्‍या पोलिसांवर कारवाई व्हावी ! - हिंदुत्वनिष्ठांची मागणी

फरिदाबाद (उत्तरप्रदेश) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
राष्ट्रीय हिंदू आंदोलनात
सहभागी झालेले धर्माभिमानी हिंदू
     फरिदाबाद - देशद्रोह्यांचे समर्थन करणारी अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया, काश्मीरमधील फुटीरतावादी, समाजात अश्‍लीलता पसरवणार्‍या सनी लिओन, कॉ. पानसरे हत्येप्रकरणी सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अन्यायकारक अटक करून त्यांना मारहाण करणारे पोलीस अधिकारी या सर्वांवर कठोर कारवाई करावी आणि पंजाब गोरक्षक दलाचे प्रमुख श्री. सतीशकुमार प्रधान यांची अटक रहित करावी यांसाठी येथील सिटी पार्क, आंबेडकर चौक, वल्लभगड येथे २५ सप्टेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला गोमानव सेवा समिती, राष्ट्रीय हिंदू सेना, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते आणि धर्माभिमानी उपस्थित होते.

बूट घालून आरती करणार्‍या आमदाराचा हिंदूंकडून निषेध !

धर्मशिक्षणाच्या अभावाचा दुष्परिणाम ! 
      करीमनगर - येथील मानेर पाटबंधारा पाण्याने भरल्याने २४ सप्टेंबर २०१६ या दिवशी त्याची आरती करण्यात आली. तेलंगण राष्ट्र समितीचे आमदार गांगुला कमलाकर यांच्या हस्ते ही आरती करण्यात आली. या वेळी आमदारांनी बूट घालूनच आरती केल्याने तेथे उपस्थित असलेल्या हिंदूंना खूप वाईट वाटले. बूट घालून आरती करणे उचित नसून त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांचा त्या ठिकाणी अनादर झाला. यापूर्वीही त्यांनी मंदिरासमोर नारळ फोडतांना बूट परिधान केले होते. हिंदूंच्या पारंपरिक धार्मिक विधीच्या वेळी पायांत बूट घालण्याच्या कृतीचा हिंदूंनी निषेध केला आहे. 

भारत-पाक युद्धाला काफिरांविरुद्ध इस्लामचे युद्ध असे स्वरूप देण्याचा पाकचा प्रयत्न !

भारतातील निधर्मीवादी आणि पाकप्रेमी पुरोगामी यावर काही बोलतील का ?
       गुरुदासपूर (पंजाब) - १ ऑक्टोबरला पंजाबच्या काही भागांत पाकमधून सोडण्यात आलेले काही फुगे (बलून) आढळले. त्यापैकी घेसी गावाजवळ सापडलेल्या २ फुग्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे संदेश लिहिला होता. त्यात अयुबची तलवार अद्याप आमच्याकडे आहे, इस्लाम झिंदाबाद असे लिहिण्यात आले होते. हा अयुब म्हणजे पाकचे माजी अध्यक्ष अयुब खान. यांनीच भारताशी १ सहस्र वर्षे युद्ध करण्याची वल्गना केली होती. त्यामुळे पाकिस्तान भारत-पाक युद्धाला काफिरांविरुद्ध इस्लामचे युद्ध असे स्वरूप देण्याचे प्रयत्न करत आहे हे दिसून येते. (एक तर भारताविरुद्ध युद्ध म्हणजे भारताच्या लोकांविरुद्ध युद्ध ! या लोकांत पाकच्या लोकसंख्येपेक्षा अधिक मुसलमान भारतात आहेत, हे पाकिस्तान विसरला आहे का ? भारताने पाकच्या आतंकवाद्यांवर छोटेसे आक्रमण केले, तर ५०० पैकी ३०० आतंकवादी प्रशिक्षण शिबिरातून घाबरून पळून गेल्याचे वृत्त आहे. अशा शूरवीरांच्या जोरावर पाक १ सहस्र वर्षे काय तेवढी मिनिटेही तग धरू शकणार नाही हे वास्तव पाक लक्षात घेईल का ? - संपादक)
     भारत-पाक युद्धाला असे स्वरूप दिल्याने जगातील इसिससारख्या इतर आतंकवादी संघटना आणि काही कट्टरवादी इस्लामी देश पाकला साहाय्य करतील, अशी अपेक्षा पाकिस्तान ठेवून आहे. तसेच युद्धाला काफिर विरुद्ध इस्लाम असे स्वरूप दिल्याने भारतातील मुसलमान बंड करून उठतील, असा पाकचा समज आहे.

गांधी जयंतीच्या दिवशी हिंदु महासभेकडून पं. नथुराम गोडसे यांच्या मूर्तीची स्थापना !

     मेरठ - गांधी जयंतीच्या दिवशी अखिल भारतीय हिंदु महासभेच्या कार्यकर्त्यांनी येथील शारदा मार्गावरील कार्यालयात पं. नथुराम गोडसे यांच्या मूर्तीची स्थापना केली आहे. त्यांनी गांधी जयंतीचा दिवस धिक्कार दिवस म्हणून घोषित केला. हिंदु महासभेचे उत्तरप्रदेश राज्याचे अध्यक्ष श्री. योगेंद्र वर्मा म्हणाले की, आपल्याला गांधी यांनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गाचा त्याग करायला हवा, हे सांगण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक हे सर्वांत योग्य उदाहरण आहे.

पाकमध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेवर भारताचा बहिष्कार !

कधी नव्हे, तो योग्य निर्णय घेणार्‍या भारतातील क्रीडा संघटना !
     नवी देहली - इस्लामाबाद येथे होत असलेल्या पाकिस्तान आंतरराष्ट्र्रीय बॅडमिंटन स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने घेतला आहे. पाकपुरस्कृत आतंकवाद्यांकडून भारतात होत असलेल्या आक्रमणांच्या पार्श्‍वभूमीवर बॅडमिंटन असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. 
      बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अखिलेश दास गुप्ता यांनी म्हटले आहे की, १८ ते २१ सप्टेंबर या कालावधीत होत असलेल्या या स्पर्धेत कुणीही भारतीय खेळाडू सहभागी होणार नाही. भारतीय नागरिकांच्या भावनांचा आदर करत आम्ही हा निर्णय घेतला आहे.पाकमध्ये हिंदू विवाह कायदा विधेयक अखेर संमत !

पाकमधील हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने दिलेल्या या 
लढ्याचा हा परिणाम होय ! भारतातील हिंदूंनी यातून बोध घ्यावा !
     इस्लामाबाद - पाकच्या संसदेत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हिंदू विवाह कायदा हे विधेयक अखेर संमत झाले. या विधेयकाच्या संमतीमुळे गेल्या ६६ वर्षांपासून हिंदूंच्या विवाहांच्या नोंदणीतील महत्त्वाचा अडसर दूर झाला आहे, तसेच पाकमधील अल्पसंख्यांक हिदूंच्या विवाहांना कायदेशीर मान्यता मिळणार आहे. तलाक आणि बलपूर्वक धर्मांतर अशा प्रकारच्या समस्यांवर सहजपणे उपाय काढता येणार आहे. असे असले, तरी यातील काही जाचक अटींमुळे हिंदूंना त्रास होऊन धर्मांध त्याचा लाभ उठवू शकतात. (हिंदूद्वेषाने पछाडलेला पाक हिंदूंच्या मागण्या सहज मान्य करेल, अशी आशाच नाही ! - संपादक)

पाकमधील मदरसे आतंकवादाची नर्सरी बनले आहेत ! -क्राइसिस ग्रुप

भारत सरकार देशातील मदरशांमध्येही काय चालू आहे, याचा शोध घेईल का ?
    नवी देहली - पाकिस्तान स्वत:ला आतंकवाद पीडित असल्याचे सांगत असला, तरी पाकचे नेते पूर्णत: खोटे बोलत आहेत. पाकमध्ये चालवण्यात येत असलेले मदरसे आतंकवादाची नर्सरी बनले आहेत. असे ब्रुसेल्सच्या क्राइसिस ग्रुप या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. 
१. क्राइसिस ग्रुपच्या मते पाकचा पंजाब प्रदेश जिहाद्यांचे हृदयस्थान बनला आहे. पाकच्या मदरशांमध्ये धार्मिक कट्टरतेचे शिक्षण दिले जाते. 
२. क्राइसिस ग्रुपच्या अहवालानुसार पाकच्या राजकीय पक्षांच्या कचखाऊ भूमिकेमुळे जैश-ए-महंमद ही आतंकवादी संघटना तिचे सामर्थ्य वाढवत आहे. या संघटनेचे प्रमुख पाकिस्तान सरकारला समांतर व्यवस्था चालवत आहे. ही संघटना शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून पाकच्या निरागस मुलांच्या मनात आणि डोक्यामध्ये द्वेषाचे विष भिनवत आहे.

मेक्सिकोच्या बलात्कारी पाद्य्राला कॅथलिक चर्चने केले निर्दोष घोषित !

भारतातील प्रसारमाध्यमे ख्रिस्ती पाद्य्रांच्या वासनांधतेचे 
वृत्त प्रकाशित करत नाहीत; कारण बहुतेक वृत्तवाहिन्या ख्रिस्ती मालकांच्या आहेत !
अश्‍लीलतेला मान्यता देणारे कॅथलिक चर्च !
      ऑक्साका - ३० तरुणींवर बलात्कार करून त्यांना एच्आयव्हीची लागण करणार्‍या मेक्सिकोच्या पाद्य्राला कॅथलिक चर्चने निर्दोष घोषित केले आहे, असे वृत्त डेली मेलने दिले आहे. जोस गार्सिया अ‍ॅटॉल्फो नावाच्या ख्रिस्ती पाद्य्राने मेक्सिकोच्या ऑक्साका राज्यातील तरुणींवर बलात्कार केल्याचे मान्य केले होते; मात्र कॅथलिक चर्चच्या दबावामुळे पाद्रीच्या विरोधात फौजदारी गुन्हा प्रविष्ट केला गेला नाही. (वासनांध ख्रिस्ती पाद्य्रांना पाठीशी घालणारी चर्च संघटना धर्माचे रक्षण करते कि अधर्माचे ? - संपादक)

प्रकाशाच्या नवीन आकाराचे संशोधन

प्रकाशाविषयीच्या मूलभूत सिद्धांताला आव्हान !
      लंडन - शास्त्रज्ञांनी प्रकाशाच्या नवीन आकाराचा शोध लावला आहे. त्यामुळे प्रकाशाविषयीच्या मूलभूत सिद्धांतावर त्याचा परिणाम होणार आहे. प्रकाश किरणाच्या एका मोजण्यासारख्या विशेष गुणधर्माला अँग्युलर मोमेन्टम (कोनविषयी गती) असे म्हणतात. आतापर्यंत प्रकाशाच्या सर्व आकारांमध्ये अँग्युलर मोमेन्टम हा प्लॅन्क काँस्टंटच्या (प्लॅन्क काँस्टंट म्हणजे प्रकाश मोजण्याच्या मोजमापातील स्थिर घटक) बहुगुणित असतो, असे मानले जात असे. इंग्लंडमधील ट्रिनिटी महाविद्यालय आणि क्रॅन इन्स्टिट्युट मधील भौतिकशास्त्रज्ञांनी प्रकाश किरणावर केलेल्या प्रयोगाच्या द्वारे नवीन आकाराचा शोध लावला आहे. प्रकाशाच्या प्रत्येक कणाचा (फॉटन) अँग्युलर मोमेन्टमचे मोल त्याच्या अर्धे असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे.
     प्रकाश किरणाच्या गुणधर्मामध्ये कसा पालट होतो, याचा शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न चालवला आहे. प्रकाशाच्या मूळ गुणधर्मात पालट होऊ शकतो, हे यातून सिद्ध होणार आहे, असे साहाय्यक प्राध्यापक पॉल इस्थॅम यांनी सांगितले. आमच्या संशोधनातून प्रकाश लहरींच्या अभ्यासावर खर्‍या अर्थाने परिणाम होणार आहे, असे प्राध्यापक जॉन डोनेगन यांनी सांगितले.

निष्पाप साधकांना पूर्वग्रहाने छळणारे पोलीस अधिकारी खरोखरच राष्ट्राचा विचार करत असतील का ?

सुहेल शर्मा
        विशेष अन्वेषण पथकाचे (एस्आयटीचे) अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी आपल्या ट्विटर खात्यावर स्वत: चहाप्रेमी, उत्साही, दर्‍याखोर्‍यांची आवड असलेला, गिर्यारोहक, एव्हरेस्टवीर इत्यादी गुणवैशिष्ट्ये लिहिली आहेत. त्याचसमवेत नेशन फर्स्ट असे म्हणून स्वत:चे कौतुक करून घेतले आहे.
        सुहेल शर्मा खरोखर प्रथम राष्ट्राचा विचार करत असतील, तर पोलीस खात्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक या पदावर कार्य करत असतांना गुन्हेगारीला किती प्रमाणात आळा घातला, समाजाची हानी करणार्‍या किती घटकांवर पायबंद घातला, अशी माहिती दिल्यास महाराष्ट्र पोलिसांच्या सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याला साजेशी ठरेल. (या उलट सनातनचा असा अनुभव आहे की, सुहेल शर्मा यांनी पूर्वग्रहाने राष्ट्रप्रेमी सनातनच्या साधकांचा मनमानी आणि घटनाविरोधी छळ केला आहे. असे पोलीस अधिकारी खरोखर प्रथम राष्ट्राचा विचार करत असतील का, असा प्रश्‍न समाजाला पडल्यास नवल ते काय ? - संपादक)

कुर्‍हाडीच्या आक्रमणात कारागृह पोलिसाने हात गमावला

पोलिसांच्या सुरक्षेची ही स्थिती, तर 
सामान्यांच्या सुरक्षेचा विचारच न केलेला बरा !
        संभाजीनगर - अंधाराचा अपलाभ घेत कारागृह पोलिसावर ६ जणांनी कुर्‍हाडीने केलेल्या प्राणघातक आक्रमणात त्यांचा हात कापला गेला आहे. त्यात ते गंभीररित्या घायाळही झाले आहेत. प्रकाश बमणे असे त्यांचे नाव आहे. रात्री एका परिसरातून जातांना अचानक काही जणांनी त्यांच्यावर आक्रमण केले. २४ घंट्यांनी ते शुद्धीवर आले. याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू होती.

विश्‍वचषक कबड्डी स्पर्धेसाठी पाकला आमंत्रण नाही !

        लुधियाना - पंजाबमध्ये ३ नोव्हेंबरपासून चालू होणार्‍या विश्‍वचषक कबड्डी स्पर्धेसाठी पाकला आमंत्रित केले जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी पाकला यासाठी आमंत्रण देण्यात आले होते. सुरक्षेच्या कारणावरून हा निर्णय घेतल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. (पाकला कोणत्याही स्थितीत निमंत्रण द्यायला नकोच, याची जाणीव आयोजकांना असली पाहिजे आणि जनतेनेही अशा आयोजकांना जाब विचारला पाहिजे ! - संपादक)

मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत पावसाचा हाहाःकार

मराठवाड्यावर ओल्या दुष्काळाचे सावट !
  • काही जिल्ह्यांत २२५ हून अधिक जण अडकल्याची भीती 
  • राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला पाचारण केले
  • लातूरमधील ७ पाझर तलाव फुटले 
  • लातूर, नांदेड, धाराशिव आणि बीड येथे पुराची स्थिती 
     अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: । 
     स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥ - कौशिकपद्धति 
अर्थ : धर्माचे पालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात. तात्पर्य, साधना केली, तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा तो सुसह्य होईल.

सनातन संस्थेचे कार्य पवित्र ! - आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी

श्री चतुःशृंगीदेवी मंदिर (पुणे) येथे सनातन संस्थेच्या 
ग्रंथप्रदर्शनास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
श्रीकृष्णाच्या चित्राला नमस्कार
करतांना आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी
     पुणे, २ ऑक्टोबर (वार्ता.) - सनातन संस्था ही हिंदु धर्म जोपासण्याचे पवित्र कार्य करत आहे. हे कार्य राष्ट्ररक्षणाचे आहे. राज्यकर्त्यांना न जमणार्‍या अनेक गोष्टी सनातनने केल्या आहेत. साधकांच्या साधनेला मी सलाम करते, असे उद्गार आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी काढले. येथील श्री चतुःशृंगीदेवी मंदिराच्या आवारात लावण्यात आलेल्या सनातननिर्मित ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, भाजपचे श्री. प्रसाद श्रीखंडे, सनातन
आमदार प्रा. (सौ.) मेधा कुलकर्णी यांचा
सत्कार करतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
संस्थेच्या कु. वैभवी भोवर, सौ. मनीषा पाठक, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि श्री. अभिजित देशमुख उपस्थित होते.
    आमदार सौ. कुलकर्णी पुढे म्हणाल्या, प्रत्येक संस्थेवर संकटे असतात; पण जो अविरतपणे चालत रहातो, तोच यशस्वी होतो. सनातनच्या साधकांना आता विचलित होण्याची आवश्यकता नाही. हिंदु धर्मासाठी जे काही करावे लागेल, ते मी करीन. हिंदूंची संघटित शक्ती शत्रूला जरब बसवू शकते. आपण सर्व मिळून हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करूया.

जोधपूर येथील साधिका सौ. राखी मोदी यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी

सौ. राखी मोदी (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना पू. (सौ.) सुशिला मोदी

         जोधपूर (राजस्थान) - येथील साधिका सौ. राखी मोदी यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची घोषणा १ ऑक्टोबर या दिवशी सनातनचे संत पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी एका कार्यक्रमात केली. या वेळी सौ. मोदी यांचा सत्कार पू. (सौ.) सुशिला मोदी यांच्या हस्ते श्रीकृष्णाचे चित्र (प्रतिमा) देऊन करण्यात आला.

उत्तरप्रदेशमध्ये ३५० पाक नागरिक बेपत्ता !

अशामुळे पाकच्या नागरिकांना भारतात येण्यास 
बंदीच घातली पाहिजे ! पाकचे नागरिक बेपत्ता होईपर्यंत 
पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या ?
        लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) - उत्तरप्रदेशात जवळपास ३५० पाकिस्तानी नागरिक बेपत्ता आहेत. हे नागरिक रितसर व्हिसा काढून भारतात आल्यावर येथून बेपत्ता झाले आहेत. गुप्तचर यंत्रणा या नागरिकांचा शोध घेत आहेत. यातील काही नागरिक वृद्ध आहेत; मात्र काही जण आतंकवाद्यांचे साहाय्यक असू शकतात, असा गुप्तचर यंत्रणांचा संशय आहे.

श्री म्हसोबा देवालय आझाद मंडळाने ६५ वर्षांत उत्कृष्टपणे कार्यक्रम चालवले ! - संजय पवार

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांची माहिती देणार्‍या फॅक्ट प्रदर्शनाचे उद्घाटन ! 
नवरात्रोत्सवानिमित्त विलोभनीय स्वागत कमानीचे उद्घाटन ! 
आझाद मंडळाच्या कार्यक्रमात बोलतांना
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार
   कोल्हापूर, २ ऑक्टोबर (वार्ता.) - येथील आझाद गल्लीतील श्री म्हसोबा देवालय आझाद मंडळाने गेल्या ६५ वर्षांत उत्कृष्टपणे कार्यक्रम चालवले आहेत. या मंडळाने अनेक वेळा शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम घेतले आहेत. अनेक मंडळे, तालीम स्थापन करणे सोपे असले, तरी ते चालवणे अवघड असते; मात्र आझाद मंडळाने ६५ वर्षे अखंडपणे मंडळ चालवल्याविषयी मी त्यांचे कौतुक आणि अभिनंदन करतो, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार यांनी येथे केले. शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आझाद गल्ली येथे श्री म्हसोबा देवालय आझाद मंडळाच्या वतीने विलोभनीय स्वागत कमानीचे उद्घाटन श्री. पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. त्या वेळी ते बोलत होते.

पोरबंदर येथे पाकची नौका आणि त्यातील ९ जण कह्यात !

        पोरबंदर (गुजरात) - येथे पाकमधून आलेली संशयास्पद नौका आढळली आहे. तटरक्षक दलाने ही नौका आणि त्यातील ९ जणांना कह्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी चालू आहे. ते स्वतःला मच्छीमार असल्याचे सांगत आहेत.

घटस्थापनेच्या शुभमुहुर्तावर दुर्गादौडीचे रणरागिणी शाखेच्या वतीने स्वागत !

ध्वजाचे पूजन करतांना महिला कार्यकर्त्या 
     सोलापूर - येथे घटस्थापनेच्या शुभमुहुर्तावर हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सोलापूर यांनी काढलेल्या दुर्गादौडीचे स्वागत करण्यात आले. रणरागिणी शाखेच्या महिला कार्यकर्त्यांनी नऊवारी साडीत त्यांचे स्वागत केले. मधला मारुति, सोलापूर येथे ध्वजाला औक्षण करून पूजनही करण्यात आले. या वेळी रणरागिणी शाखेच्या सौ. अलका व्हनमारे, सौ. सुनीता न्यामणे, सौ. तंगी, कु. अश्‍विनी पैलवान, कु. रोहिणी कवडे या उपस्थित होत्या.पत्रकार संरक्षण कायद्यासाठी पत्रकारांचा मूक मोर्चा !

सांगलीत पत्रकारांनी काढलेला मूक मोर्चा
    सांगली, २ ऑक्टोबर - पत्रकार संरक्षण कायदा त्वरित संमत करा या मागणीसाठी आणि पत्रकारांवरील वाढती आक्रमणे याच्या निषेधार्थ सांगलीत २ ऑक्टोबर या दिवशी वृत्तपत्र आणि दूरचित्रवाहिनीच्या पत्रकारांनी मूक मोर्चा काढला. यात ४०० हून अधिक पत्रकार सहभागी झाले होते. गांधी जयंतीच्या निमित्ताने राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानातही पत्रकार सहभागी झाले होते.
       मुंबई, २ ऑक्टोबर - १८ वर्षांखालील व्यक्तीने दुचाकी वाहन चालवल्यास दुचाकी वाहन मालकावर कारवाई करण्यात येणार असून राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. मोटार वाहन कायद्याच्या कलम १८० नुसार १८ वर्षांखालील व्यक्तीने वाहन चालवल्यास वाहन मालकास कारावास किंवा १ सहस्र रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा आहे.

देशसेवा म्हणून प्रत्येक हिंदूने काश्मिरी हिंदूंच्या पाठीशी उभे रहाणे आवश्यक !

श्री. गोविंद चोडणकर
      वर्ष १९४७ पासून स्वातंत्र्यानंतरच्या काळातील भारताला ग्रासणारी आपल्या देशातील गंभीर समस्या म्हणजे काश्मीर ! आपल्या मातृभूमीला झालेली ही एक सर्वांत मोठी जखम आहे. या समस्येमुळे आज आपले कितीतरी सैनिक मारले जात आहेत. अलीकडेच उरी प्रकरणात तर १८ सैनिक मारले गेल्यावर संपूर्ण देशभरातून एकच प्रतिक्रिया निघाली की, काश्मीर समस्येला खतपाणी घालणार्‍या पाकिस्तानला भारत सरकाने त्यांच्या भाषेतच उत्तर दिले पाहिजे.
     काश्मीर समस्या नेमकी काय आहे ? दोन देशांतील भूभाग वाटपाच्या वेळी निर्माण झालेला सीमाप्रश्‍न, काश्मीरचा स्वातंत्र्यलढा कि आणखीन काही ? अशा अनेक दृष्टीकोनांतून या समस्येकडे पाहिले जाते; मात्र जर आपण या समस्येकडे एका देशभक्ताच्या दृष्टीकोनातून पहात असू, तर आपल्यासमोर येणारे एक उत्तर, ते म्हणजे जिहाद, जिहाद आणि जिहाद !
संकलक : श्री. गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती, अस्नोडा, गोवा.

हिंदु जनजागृती समितीच्या १४ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने केलेला ट्विटर ट्रेंड १४ व्या स्थानी !

१५ लाखांहून अधिक लोकांमध्ये जागृती !
        घटस्थापनेच्या दिवशी स्थापना झालेल्या हिंदु जनजागृती समितीचा १ ऑक्टोबर २०१६ या दिवशी १४ वा वर्धापनदिन झाला. गेल्या १४ वर्षांपासून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समिती कार्यरत आहे. त्यानिमित्ताने समितीद्वारे ट्विटर वर #14YearsOfHJS हा ट्रेंड करण्यात आला. या ट्रेंडचा विषय १५ लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोचला. #14YearsOfHJS हा ट्रेंड ट्विटरवर मुख्य २० विषयांमध्ये प्रथम १९ व्या स्थानावर आला. नंतर तो १४ व्या स्थानापर्यंत काही काळ टिकून होता.
        या ट्रेंडद्वारे समितीने आतापर्यंत केलेल्या कार्याची माहिती देणार्‍या ट्विट्स करण्यात आल्या. यामध्ये समितीच्या विविध मोहिमा, उदा. हिंदु धर्मजागृती सभा, फलकप्रदर्शन, जागो संदेश, उत्सवांमधील अपप्रचार रोखणे, राष्ट्रीय हिंदु आंदोलनातील सहभाग, मंदिर सरकारीकरणाला विरोध, राष्ट्रध्वजाचा मान राखणे, लव्ह-जिहादविषयी जागृती इत्यादी विषयांंसंदर्भातील ट्विट्स करण्यात आल्या. समितीच्या अधिकृत ट्विटर खात्यावर करण्यात आलेल्या या ट्विट्सला समाजातील राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

       सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वी पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे प्रसिद्ध करत आहोत.
पुनः पुन्हा त्याच चाचण्या करण्यात 
वेळ आणि राष्ट्राचा पैसा खर्च करणार्‍या 
पोलिसांवर शासन कारवाई करणार का ?
       कर्णावती येथील पोलिसांच्या कह्यात असलेले पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची पौरुषत्वाची चाचणी घेण्यात आली. या पूर्वी जोधपूर येथील पोलिसांनीही प.पू. बापूंची अशीच चाचणी घेतली होती.
पोलिसांविषयी चांगले आणि वाईट अनुभव असल्यास 
वाचकांनी नजीकच्या दैनिक कार्यालयात कळवावेत !

तत्त्वनिष्ठता, राष्ट्रप्रेम आणि निःस्पृहता आदी गुणांनी युक्त असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री डॉ. सी.डी. देशमुख

२ ऑक्टोबर या दिवशी डॉ. सी.डी. देशमुख यांचा स्मृतीदिन झाला. त्यानिमित्ताने...
१. तत्त्वनिष्ठता
१ अ. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या चुकीच्या राजकीय धोरणाचा निषेध करण्यासाठी सर्वांनी त्यागपत्र द्यावे, असे ठरणे; पण प्रत्यक्षात केवळ सी. डी. देशमुख यांनी भारताच्या अर्थमंत्रीपदाचे त्यागपत्र देणे : संयुक्त महाराष्ट्र संग्रामाच्या वेळी काही राजकीय धोरणे चुकीची ठरवली गेली. मुंबईच्या प्रश्‍नावर रणकंदन झाले. मुंबई केंद्रशासित राहील, अशी घोषणा पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी केली. तेव्हा या प्रश्‍नावर सर्वांनी त्यागपत्र द्यावे, असे ठरले होते; मात्र या संकेतानुसार केवळ सी.डी. देशमुख यांनी भारताच्या अर्थमंत्रीपदाचे त्यागपत्र दिले. अनेकांनी त्यांना यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला; पण बोलल्या वचनाला जागण्याचे तत्त्व त्यांनी सोडले नाही.

सामर्थ्य आहे चळवळीचे...।

      संघे शक्ति कलौयुगे । यानुसार संघटित प्रयत्नच आपल्याला यशापर्यंत घेऊन जातात. सध्या महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने विराट क्रांती (मूक) मोर्चे काढले जात आहेत. या मोर्च्यांमध्ये लाखोंच्या संख्येने सर्वजण सहभागी होतांना दिसत आहेत. यामध्ये राजकीय नेते मंडळीही एकत्र येत आहेत. मराठा समाज हा हिंदु धर्माचाच एक घटक आहे आणि हे संघटन राजकारण्यांना नक्कीच धडकी भरवणारे आहे. भगवान श्रीकृष्णाने कलियुगात संघटन हीच शक्ती, असे गीतेत सांगितलेले आहे. त्याचा प्रत्यय या मोर्च्याच्या माध्यमातून सर्वजण घेत आहेत. मराठा समाज अशा प्रकारे यापूर्वी एकत्र आला नव्हता. कोणत्याही एका संघटनेचा फलक न घेता अशा प्रकारे एकत्रीकरणाचा प्रयोग अभिनव असाच म्हणावा लागेल. सर्वच राजकीय पक्षांना काहीसा धक्का देणारे हे आंदोलन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे कोणतेही नेतृत्व नाही, असे हे मोर्चे यशस्वीपणे पार पडले आणि पडतीलही.

हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्‍लील बोलणे आणि 
दगडफेक करणे या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल ! 
     सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्‍लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ६ वर्षे ३११ वा दिवस ! 
१.१०.२०१६
   रात्री ११.१६ वाजता एका दुचाकीवरून खडपाबांध येथील इमारतीसमोरून रस्त्यावरून दोघे जण सनातन विरोध, कण्डोम आणि बॉम्बस्फोट, असे ओरडत गेले.हत्तींचा बंदोबस्त करू न शकणारे प्रशासन छुप्या आतंकवाद्यांवर आळा काय घालणार ?

     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाबरवाडी, घाटीवडे, विजघर, बांबर्डे येथे हत्तींचा वावर चालू असून या हत्तींनी नारळ, सुपारी, केळी बागायतीसह भातशेतीची मोठी हानी करणे चालूच ठेवले आहे. हत्तींची समस्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली अनेक वर्षे असूनही यावर ठोस उपाययोजना काढण्यात शासनाला यश आलेले नाही. वीर आणि महावीर यांना घडवणारे परमवीर प.पू. डॉक्टर !

श्री. राम होनप
     एका सांप्रदायिक सत्संगात पुढील सूत्र सांगण्यात आले. जे स्वतःतील दोष दूर करतात, ते वीर आणि जे इतरांना दोष घालवण्यास साहाय्य करतात, ते महावीर ! या सूत्रानुसार विचार केला असता असे लक्षात येते, जे साधक स्वतःतील दोष दूर करतात, ते वीर आहेत. जे संत इतरांना दोष घालवण्यास साहाय्य करतात, ते महावीर आहेत. या दोघांना घडवणार्‍या प.पू. डॉक्टरांना परमवीर म्हणावे लागेल !
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, गोवा. (१२.४.२०१६)
अन्न हे पूर्णब्रह्म !

प.पू. पांडे महाराज
प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन
     वनस्पती पानांच्या माध्यमातून सूर्याद्वारे भगवंताची चैतन्यशक्ती आणि ओजशक्ती ग्रहण करून साठवतात. आपण वनस्पतीला अन्न म्हणतो; परंतु प्रत्यक्ष ते आपल्यासाठी औषध असते. वनस्पतीने साठवलेली ओजशक्ती ही औषध आहे. ही चैतन्ययुक्त ओजशक्ती ग्रहण केल्यानंतर रक्तात मिसळली जाते आणि अन्नातील अनावश्यक उर्वरित भाग मल म्हणून बाहेर पडतो. जेवढी तुमची धारणाशक्ती, म्हणजे जठराग्नीची क्षमता असेल, तेवढी शक्ती ग्रहण केली जाते. हत्तीचे उदाहरण पहाता हे अधिक स्पष्ट होईल. हत्तीने खाल्लेल्या कवठातील चैतन्यशक्ती तो ग्रहण करतो आणि मलस्वरूप जळलेले कवठ जसेच्या तसे बाहेर पडते. एवढी त्याच्या जठराग्नीची शक्ती असते. याप्रमाणे आपणही अन्नातील चैतन्यशक्ती घ्यायची असते, बाकीचे फेकून द्यायचे. अन्न हे चैतन्याचा साठा आहे; म्हणून अन्नाला पूर्णब्रह्म म्हटले आहे.
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (एप्रिल २०१५)

महर्षींनी कुंभकोणम्जवळ असलेल्या तिरुचेंगाटंगुडी, जिल्हा तिरुवरूर येथील शिव मंदिराच्या दर्शनाला जाण्यास सांगणे आणि तेथील शिव मंदिर जागृत असल्याने तुमच्यावरील संकट लवकर दूर होईल, या अर्थाचा संकेत देणे

महर्षींची शिकवण आणि कार्य !
     २२.६.२०१६ या दिवशी महर्षींनी आम्हाला कुंभकोणम्जवळ असलेल्या तिरुचेंगाटंगुडी, जिल्हा तिरुवरूर येथील शिव मंदिराच्या दर्शनाला जाण्यास सांगितले. येथील शिव हा भक्तांची विशेष काळजी घेणारा आहे. येथे एका भक्ताची पुढीलप्रमाणे कथा सांगितली जाते.
१. तिरुचेंगाटंगुडी येथील शिवमंदिराचे स्थानमहात्म्य
     एक सहस्र वर्षांपूर्वी येथे एक थोर शिवभक्त होऊन गेला. तो शिवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय अन्न ग्रहण करत नसे. एके दिवशी पुजारी नैवेद्य दाखवण्यास विसरला. तेव्हा प्रत्यक्ष शिवच एका मनुष्याच्या रूपात त्या भक्तासमोर भिक्षापात्र घेऊन प्रकट झाला आणि त्याला म्हणाला, आज मला तुझ्याकडून एक विशेष भिक्षा हवी. ती म्हणजे नरमांस हवे. भक्ताने मागे-पुढे न पहाता हो म्हणून सांगितले. त्याने आपल्या लहान मुलाला याविषयी विचारले, तर तोही हो म्हणाला. तो लहान मुलगा म्हणाला, देवासाठी माझा बळी जात असेल, तर यासारखे माझे भाग्य ते कोणते ? भक्त आपल्या घरी असणार्‍या कामवालीवर हे काम सोपवतो. बायकोला काही वाटू नये, म्हणून तिच्याकडे मुलाचे केवळ धड भाजी करण्यासाठी पाठवतो आणि कामवालीला सांगतो की, तू या मुलाच्या शिराची भाजी कर. असा तयार झालेला नैवेद्य तो शिवाला अर्पण करतो. शिव त्याच्या भक्तीवर प्रसन्न होतो.

मित्राच्या घरी कार्यक्रमासाठी गेल्यावर त्यांच्याकडेही चुकांची बैठक घेऊन एकमेकांना चुकांची जाणीव करून देणे

सौ. शालिनी मराठे
     मित्राच्या घरात पूजेच्या दिवशी आपल्याकडूून कोणत्या चुका झाल्या, त्या कोणत्या स्वभावदोषांमुळे झाल्या आणि त्या पुन्हा होता नये, यासाठी उपाययोजना म्हणून काय करायला हवे, ते प्रत्येकाने आपापले सांगायचे ठरले. यातून पुढे कशा चुका करायच्या नाहीत, हेच या बैठकीतून समजले. घर, संस्था, कार्यालये आणि सर्वच ठिकाणी आपण अशा बैठका घेऊन स्वभावदोष आणि अहंचे पैलू दूर करून स्वतःमध्ये पालट घडवू शकतो अन् स्वतःमध्ये आणि समाजात रामराज्य आणू शकतो. आपण केवळ ईश्‍वराला संपूर्ण शरण जाऊन प्रयत्न करायला हवेत.
१. पूजेच्या दिवशी अपरिहार्य कारणासाठी मित्राला आणि त्याच्या पत्नीला 
बाहेरगावी जावे लागल्याने उत्सवाचे दायित्व आमच्यावर येणे
     आमच्या एका मित्राकडे गणेशोत्सव आणि अनंतचतुर्दशीचे व्रत मोठ्या प्रमाणावर साजरे होतेे. त्यांचे नातेवाईक आणि गावातील काही मंडळी अनंतचतुर्दशीच्या दिवशी महाप्रसादासाठी येतात. रात्री भजन किंंवा कीर्तन असते. दुसर्‍या दिवशी दुपारी श्री अनंताचे आणि रात्री श्रीगणपतीचे विसर्जन असते. या वेळी मित्राने आग्रह करून दोन दिवस रहाण्याच्या सिद्धतेनेच बोलावले होते. काही अपरिहार्य कारणासाठी मित्राला आणि त्याच्या पत्नीला बाहेरगावी जावे लागले. ते रात्री ९ वाजेपर्यंत घरी येणार होते.

सनातन राख्यांची सेवा समयमर्यादेत पूर्ण होतांना साधकांनी अनुभवली गुरुमाऊलीची कृपा !

सौ. उषा पुराणिक
१. या वर्षी राख्या बनवायच्या आहेत, असा निरोप मिळाल्यावर
देवानेच धर्माभिमानी, हितचिंतक, राष्ट्रप्रेमी यांना या स्नेहबंधनात 
बांधून हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापनेच्या कार्याला 
जोडण्याचा संकल्प केला आहे, असे वाटणे
     या वर्षी आपण राख्या बनवणार आहोत, असा निरोप मिळाला. तेव्हा क्षणभर सुखद आश्‍चर्याचा धक्का बसला. पुढच्याच क्षणी विचार आला की, हे राख्या बनवण्याचे नियोजन प्रत्यक्ष परमेश्‍वरानेच केले आहे. देवाने धर्माभिमानी, हितचिंतक आणि राष्ट्रप्रेमी यांना स्नेहाच्या बंधनात बांधून आपल्या हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापनेच्या कार्याला जोडण्याचा हा संकल्प केला आहे. त्यात सहभागी व्हायचे परम भाग्य आणि संधी गुरुकृपेने आपल्याला लाभली आहे. त्यामुळे आपण स्थिर राहून, सकारात्मक आणि शरणागत भावाने या सेवेत आपला खारीचा वाटा उचलूया.
२. राख्या बनवण्याच्या सेवेच्या नियोजनांतर्गत सर्व सेवा अल्पावधीत
होऊन सर्व साधकांची मने एकरूप होऊन सर्वांचे सहकार्य लाभणे
     राख्या बनवणार आहोत, हे कळल्यावर उत्साहाचे वातावरण पसरले. सर्वांनीच सकारात्मक राहून सहभागी होण्याचे ठरवले. केवळ १५ दिवसांत ही सेवा कशी होणार ?, असा विचार कोणाच्याही मनात आला नाही.

स्वतःच्या कृतीतूनच साधकाने कसे वागावे ?, याचा आदर्श सर्वांसमोर ठेवणारे प.पू. डॉक्टर !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
१. कुठलेही आर्थिक उत्पन्न नसतांना धनाचा अपव्यय टाळणारे आणि मिळालेले 
धनही धर्मकार्यासाठी देणारे त्यागाचे मूर्तीमंत रूप असलेले प.पू. डॉक्टर !
     सुमारे २४-२५ वर्षांपूर्वी संस्थेचे प्रसारकार्य चालू झाले, तेव्हा प.पू. डॉक्टरांचा दवाखाना बंद झाल्यामुळे त्यांचे आर्थिक उत्पन्न बंद झाले होते. जेव्हा ते प.पू. भक्तराज महाराजांकडे (प.पू. बाबांकडे) जायचे, तेव्हा परतीच्या प्रवासासाठी प.पू. बाबाच त्यांच्या गाडीत पेट्रोल भरून द्यायचे. प्रसाराला जाताना पेट्रोलची गाडी आर्थिक दृष्ट्या महाग पडते; म्हणून प.पू. बाबांनी त्यांची स्वतःची डिझेलवर चालणारी चारचाकी गाडी त्यांना वापरण्यासाठी दिली होती. अशी आर्थिक स्थिती असतांनाही त्यांनी पुढील कृती करून समष्टीला आणि साधकांना त्यागाची उच्च शिकवण दिली.
१ अ. स्वतःच येण्या-जाण्याचा व्यय करून आणि मानधनही न घेता विविध ठिकाणी अध्यात्मावर विनामूल्य प्रवचने करणे : बर्‍याच ठिकाणी अनेक प्रवचनकार किंवा मार्गदर्शक आयोजकांकडून कार्यक्रम स्थळी येण्या-जाण्याचा व्यय (खर्च) घेतात. तसेच प्रवचन केल्यावर त्याचे मानधनही घेतात. याउलट प.पू. डॉक्टर जेव्हा अनेक जिल्ह्यांत किंवा शहरांत प्रवचनासाठी जात, तेव्हा ते स्वतःच गाडी चालवायचे. ते अनेक घंट्यांचा प्रवास करून साधकांना विनामूल्य मार्गदर्शन करत आणि प्रवचनही विनामूल्यच घेत असत. त्यांनी कधीही जाण्या-येण्याचा किंवा कसलाच व्यय (खर्च) घेतला नाही.
१ आ. प्रवचनातील हारफुले इत्यादींवरील अनावश्यक व्यय टाळण्यास सांगणे : प.पू. डॉक्टर नेहमी प्रवचनाच्या आरंभी हार नको, तर त्याऐवजी एखादे फूल किंवा फुलांचा गुच्छ द्या, असे सांगत.

सकाळी देवीकवच म्हटल्यावर देवीमाहात्म्य वाचायला घेतल्यानंतर सभोवताली नवरात्रोत्सवाप्रमाणे वातावरण असल्याचे जाणवणे

      २२.८.२०१६ या दिवशी सकाळी स्नान झाल्यावर मी देवीकवच म्हटले आणि त्यानंतर देवीमाहात्म्य या पोथीतील बारावा अध्याय वाचायला घेतला. पूर्ण अध्याय वाचून होईपर्यंत मला माझ्या सभोवताली प्रत्यक्षात पितृपक्ष असूनही नवरात्रोत्सवात असते, त्याप्रमाणे वातावरण जाणवत होते. ही निराळीच अनुभूती होती. या अनुभूतीचा विचार करतांना पुढील सूत्रे देवाने सुचवली.

रामनाथी आश्रमात बगलामुखी यज्ञ झाल्यानंतर सद्गुरु (सौ.) बिंदाताई सुवासिनींची ओटी भरत असतांना आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे !

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने...
    सनातन संस्थेवर येणार्‍या नित्य नवीन संकटांच्या निवारणासाठी महर्षींनी प.पू. डॉक्टरांच्या जन्मदिनांकांच्या, म्हणजेच ६.५.२०१५ ते ६.५.२०१६ या कालावधीत ज्यांचे विवाह झाले, त्या सुवासिनींची १७.८.२०१६ या दिवशी ओटी भरून त्यांना सुवर्णदान करण्यास सांगितले. सद्गुरु (सौ.) बिंदाताईंनी ५ सुवासिनींची ओटी भरली. त्या वेळी त्या सुवासिनींना आणि अन्य एका साधिकेला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. सौ. वेदश्री गोरल आणि सौ. कीर्ती जाधव
१ अ. ओटी भरणार असल्याचे समजल्यावर 
    साक्षात् सद्गुरु (सौ.) बिंदाताई आम्हा पाच जणींची ओटी भरणार असल्याचे समजल्यावर साक्षात् महालक्ष्मीदेवीकडूनच ओटी भरून घेण्याचे सौभाग्य आम्हाला लाभणार, या विचाराने सतत कृतज्ञताच वाटत होती. प.पू. डॉक्टर, महर्षीं आणि सद्गुरु (सौ.) बिंदाताईं यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटून आतून भाव दाटून येत होता. 

देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील साधिका कु. महानंदा पाटील यांना आलेल्या अनुभूती

कु. महानंदा पाटील
१. नामजप करतांना आध्यात्मिक त्रास होणे आणि आरतीनंतर
 श्रीरामाला प्रार्थना करून आरती ग्रहण करतांना स्वतःवरील
त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होऊन उत्साही वाटणे
     २.८.२०१६ या दिवशी सकाळी ७.४५ वाजता देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत होते. तेव्हा मला आध्यात्मिक त्रास होत होता. आरती चालू झाल्यावर माझे लक्ष आरतीकडे लागत नव्हते. आरती झाल्यानंतर माझ्या मनात शबरीचा भाव होता. नंतर मी दोन्ही हात पुढे करून आरती ग्रहण करत होते. प्रथम माझ्याकडून श्रीरामाला प्रार्थना झाली, रामा, मला तुझे चैतन्य मिळू दे. त्या वेळी माझ्या दोन्ही हातात चैतन्याचा मोठा गोळा आला. मी आरती ग्रहण करतांना स्वतःच्या डोक्यापासून पायापर्यंत हात फिरवला. तेव्हा माझ्या देहावरील त्रासदायक शक्तीचे आवरण निघून गेले आणि मला उत्साही वाटू लागले. तेव्हा मी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.
२. राम आणि कृष्ण यांनी साधिकेला काळानुसार श्रीकृष्णाची उपासना करणे योग्य आहे,
याविषयी अनुभूती देणे आणि शेवटी तिच्या राम अन् कृष्ण एकच आहेत, हे लक्षात येणे
     नंतर मी डोळे मिटून श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत होते. तेव्हा मला श्रीकृष्णाच्या चित्राजवळ खालच्या बाजूला राम दिसला. तो कृष्णाला नमस्कार करत होता. तेव्हा माझ्या मनात प्रश्‍न आला, आता प्रेम कुणावर करायचे, रामावर कि कृष्णावर ? (साधिकेची श्रीकृष्णावर श्रद्धा वाढावी, यासाठी देवाने साधिकेला रामही श्रीकृष्णाला नमस्कार करत आहे, अशी अनुभूती दिली.

महर्षींच्या आदेशानुसार रामनाथी आश्रमात झालेल्या तीन गणेशयागांच्या कालावधीत साधिकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत
     महर्षींच्या आदेशानुसार सनातन संस्थेवरील सर्व संकटांचे निवारण करण्यासाठी १२ ते १४.९.२०१६ या कालावधीत सनातनच्या रामनाथी आश्रमात गण होमाचे (गणेशयागाचे) आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी आलेल्या अनुभूती पुढे देत आहे.
१. पूर्वसिद्धता चालू असतांना
१ अ. तिन्ही दिवस गणेशयागाची पूर्वसिद्धता चालू असतांनाच एकेका देवतेचे यज्ञस्थळी आगमन होतांना जाणवले.
१ आ. देवता, ऋषिमुनी, प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे :
ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचे अस्तित्व सतत जाणवत होते. श्री महागणपति, श्री बगलामुखीदेवी यांसह अनेक देवता, ऋषिमुनी आणि संत यांचीही उपस्थिती जाणवत होती. प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले हेही यागाला उपस्थित असल्याचे जाणवत होते.
२. यागाच्या वेळी
२ अ. पहिल्या दिवशी यज्ञस्थळी बसल्यानंतर त्रास उणावणे : २ ते ८.९.२०१६ या कालावधीत मी गणेशचतुर्थीनिमित्त आश्रमाबाहेर गेले असल्याने माझा नेहमीचा बसून करायचा नामजप होऊ शकला नाही. त्यामुळे मला पुष्कळ त्रास होत होता. यज्ञाच्या पहिल्या दिवशी यज्ञस्थळी बसल्यानंतर माझा त्रास उणावला.
२ आ. दुसर्‍या दिवशी पुष्कळ आनंद जाणवला.
२ इ. तिसर्‍या दिवशी शांती जाणवली आणि याग चालू झाल्यानंतर दुपारी १ वाजता देवता पुष्पवृष्टी करतांना जाणवल्या.
२ ई. यागाच्या तिन्ही दिवशी जाणवलेली सूत्रे
२ ई १. यज्ञवेदीतून सर्वत्र पुष्कळ प्रमाणात चैतन्य पसरत होते. ते चैतन्य सर्वत्रच्या साधकांपर्यंत जाऊन त्यांच्याकडून ग्रहण होत आहे, असे जाणवले.
२ ई २. वेदमूर्ती केतन शहाणेगुरुजी यांनी केलेली भावपूर्ण प्रार्थना ऐकून देवता प्रसन्न होऊन आशीर्वाद देत असल्याचे जाणवणे :
वेदमूर्ती केतन शहाणेगुरुजी यांनी प्रत्येक दिवशी यागाच्या शेवटी दिलेली पूर्णाहुती आणि नंतर ते करत असलेली प्रार्थना अतिशय भावपूर्ण असायची.

दुःखी असे संसारी पुत्र मानवाचा ।

श्री. विनय शास्त्री
दुःखी असे संसारी पुत्र मानवाचा ।
मूळ त्याचे आहे त्याची अपेक्षा ॥ १ ॥

करुनिया अपेक्षा न्यून । सोडूनिया अहंचाही अहं ।
जाऊनिया देवासी संपूर्ण शरण । करावे त्याचेच ध्यान ॥ २ ॥

सोडूनिया कर्तेपण । टाकूनिया अहंभाव ।
वाढवूनिया देवांप्रती भाव । व्हावे ईश्‍वराशी एकरूप ॥ ३ ॥

सोडूनिया चिंता आणि अपेक्षा ।
व्हावे सदानंदी, ब्रह्मानंदी लीन ॥ ४ ॥

आठवावा तोची एक तारणहार ।
केवळ ईश्‍वर, ईश्‍वर आणि ईश्‍वरच ॥ ५ ॥
- श्री. विनय शास्त्री, नागपूर (२७.११.२०१४)

धर्माचरण करणारी, श्रीकृष्णावर आणि प.पू. डॉक्टरांवर निस्सीम श्रद्धा असलेली ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सांगलीतील कु. प्रविणा प्रशांत जोशी (वय १२ वर्षे) !

कु. प्रविणा जोशी
     (कु. प्रविणाची आध्यात्मिक पातळी वर्ष २०११ मध्ये ५१ टक्के होती. - संकलक)
१. वय ५ ते ९ वर्षे
१ अ. उपायांचे गांभीर्य : मी साधनेत असल्याने प्रविणा लहानपणापासून प्रतिदिन ३० ते ४० मिनिटे बसून नामजप करते. ती शिकवणीला, शाळेत किंवा बाहेर जाण्यापूर्वी अत्तर, उदबत्ती आणि कापूर यांचे उपाय करून जाते.
२. वय ९ ते १२ वर्षे 
२ अ. कर्मकांडाची आवड
२ अ १. श्रीविष्णूच्या मंदिरातील उत्सवात भाविकांच्या पंगतीत वाढणे : वैशाख मासात आमच्याकडे तीन दिवस श्रीविष्णूच्या देवळात उत्सव असतो. दुसर्‍या दिवशी महाप्रसादाला २०० ते २५० भाविक येतात. त्या वेळी पहिल्या पंगतीपासून शेवटच्या पंगतीपर्यंत भाविकांना वाढायची सेवा प्रविणा आनंदाने करते. इतर दोन दिवशीही श्रीविष्णूला दोन्ही वेळेला नैवेद्य दाखवल्यानंतरच ती जेवते.

पू. सौरभदादांना पाहिल्यावर आनंद होऊन ते खोडकर श्रीकृष्णासारखे आहेत, असे वाटणे

कु. मधुरा चतुर्भुज
      मी रामनाथी आश्रमात आल्यावर माझी पू. सौरभदादांशी भेट झाली. त्यांना पाहिल्यावर मला आनंद झाला. त्यांच्या तोंडवळ्यावरील चैतन्य वाढले आहे, असे मला जाणवले. मी त्यांना माझा कवितासंग्रह भेट दिला. तो त्यांनी पुष्कळ वेळ हातात धरून ठेवला होता. मी त्यांना कानडा राजा पंढरीचा हा अभंग म्हणून दाखवला. तेव्हा ते मला खोडकर श्रीकृष्णासारखे, म्हणजे कानडासारखेच दिसत होते. नंतर मी त्यांना भाऊ ही कविता ऐकवली. तेव्हा मला स्वतःला पुष्कळ हलके वाटत होते. त्यांचे वास्तव्य या वैकुंठलोकात (आश्रमात), तसेच प.पू. डॉक्टरांच्या हृदयातही आहे, असे मला जाणवत होते. - कु. मधुरा चतुर्भुज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.८.२०१६)
        भारत हे जगाचे देवघर आहे; मात्र इथला हिंदु विकलांग, भ्रष्ट आणि दुर्बल झाला आहे. स्वत्व, आत्मभान आणि राष्ट्रीयत्व गमावलेल्या हिंदूंना जागे करावे लागेल. हिंदुत्व हा आपला प्राण आहे. हिंदु समाजावरील आक्रमण थांबवण्यासाठी हिंदु समाज बलवान होण्याची गरज आहे. असे झाले, तरच भारत पुन्हा जगद्गुरुपदी विराजमान होईल !
- श्री. अरविंदराव हर्षे, निवृत्त प्राचार्य, पुणे

फलक प्रसिद्धीकरता

पाकच्या नागरिकांना 
भारतात येण्यास बंदी का घालू नये ?
       उत्तरप्रदेशात जवळपास ३५० पाकिस्तानी नागरिक बेपत्ता आहेत. हे नागरिक रितसर व्हिसा काढून भारतात आल्यावर येथून बेपत्ता झाले आहेत. यातील काही जण आतंकवाद्यांचे साहाय्यक असू शकतात, असा गुप्तचर यंत्रणांना संशय आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : UP se 350 Pakistani nagrik gayab. Inme se kuch log atankiyoke sahayak ho sakte hai - Guptchar vibhag 
Pakistaniyoka Bharatme aana pratibandhit kiya jaye!
जागो ! : उत्तरप्रदेश से ३५० पाकिस्तानी नागरिक गायब. इनमें से कुछ लोग आतंकियों के सहायक हो सकते हैं ! - गुप्तचर विभाग 
पाकिस्तानियों का भारत में आना प्रतिबंधित किया जाए !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     सत्ययुगात, संकेतस्थळे, नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या इत्यादींची आवश्यकताच नव्हती; कारण वाईट बातम्या नसायच्या आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी होते.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र


॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
संतांचे विश्‍लेषण करू नये
      संतांचा शोध घेऊन काही सापडत नाही; कारण तेथे केवळ शून्य असते.
भावार्थ :
प्रकृतीतील गोष्टी पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे शोध घेऊन सापडणे शक्य आहे; पण पुरुष, शिव किंवा ब्रह्मतत्त्व यांचा शोध घेता येत नाही; कारण ते पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे आहे. संत ब्रह्माशी एकरूप झालेले असल्याने त्यांचा शोध घेऊन काही सापडत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

कुणाचेही वाईट चिंतू नये !
वाईट बोलणे हे केव्हाही अयोग्यच; पण कुणाचेही वाईट 
चिंतणे आणि त्याच्या र्‍हासाची इच्छा करणे, हे अधिक अयोग्य ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

अण्वस्त्र युद्ध !

संपादकीय 
     पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय सैनिकांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाक चक्रावलेला आहे. त्याला काय करावे आणि काय करू नये, हेच लक्षात येत नसल्याचे दिसून येत आहे. अशा वेळी पाककडून आततायीपणा होण्याची शक्यता आहे. पाकने भारताच्या विरोधात अणूयुद्ध चालू करण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाहीतरी पाकचे राज्यकर्ते सातत्याने भारताला अणूयुद्धाची धमकी देतच आले आहेत. या सैनिकी कारवाईच्या एक दिवस आधीच पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकचे अणूबॉम्ब शोकेसमध्ये ठेवण्यासाठी नसल्याची दर्पोक्ती केलीच होती.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn