Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नवरात्रोत्सव (आज दुसरा दिवस)

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥
        एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ शक्ती)
नवरात्र विषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका
https://www.sanatan.org/mr/navratri

घोटाळेबाज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर प्रशासक नेमा ! अभय वर्तक, सनातन संस्था

डावीकडून ह.भ.प. बापू महाराज रावकर, पू. सुनील चिंचोलकर, श्री. अभय
वर्तक, अधिवक्ता संजीव पुनाळेकर, श्री. रामभाऊ पारीख आणि श्री. सुनील घनवट

  • सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या चौकशी अहवालातून अंनिसची भोंदूगिरी उघड
  • न्यासावरील गंभीर आरोपांची फेरचौकशी करा ! - सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे ताशेरे
  • न्यासामधील आर्थिक घोटाळ्यांशी दाभोलकर यांच्या हत्येचा संबंध आहे का ?, याचीही चौकशी करण्याची मागणी
        पुणे - विवेकवादाची भाषा करणार्‍या आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक श्रद्धा पायदळी तुडवण्याचा ठेका घेतलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा ढोंगीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, तसेच हिंदु विधीज्ञ परिषद यांच्याकडून सातत्याने अंनिसच्या न्यासामधील आर्थिक गौडबंगालाचे सूत्र उपस्थित केले जात होते. केवळ आरोप नाही, तर त्या संदर्भात विविध शासकीय खात्यांमध्ये रीतसर तक्रारीही करण्यात आल्या होत्या. यांपैकी ४ तक्रारदारांच्या तक्रारींच्या संदर्भात सातारा येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधीक्षकांनी चौकशी अहवाल सादर करून अंनिसच्या न्यासामधील आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे नमूद केले आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या न्यासावर प्रशासक नेमावा, त्याचे विशेष लेखा परीक्षण (स्पेशल ऑडिट) करावे, तसेच न्यासावरील गंभीर आरोपांची मोघम चौकशी केल्याने पुन्हा फेरचौकशी करावी, असे गंभीर ताशेरेही ओढले आहेत.

पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा येथे बालमृत्यूंमध्ये वाढ

       पालघर, १ ऑक्टोबर - येथील जव्हार आणि मोखाडा या दोन तालुक्यांमध्ये गत वर्षाच्या तुलनेत यंदा बालमृत्यूंमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. गतवर्षी जव्हार तालुक्यात असलेली बालमृत्यूची नोंद ४२ वरून यंदाच्या वर्षी ४७, तर मोखाडा येथील नोंद ५७ वरून ७५ वर गेली आहे. संपूर्ण जिल्ह्यात यंदा १९५ अर्भक मृत्यू आणि २५४ बालमृत्यू झाले आहेत. (स्वातंत्र्योत्तर ६९ वर्षांत अशी बालमृत्यूची संख्या असल्यास देश विकसित राष्ट्र म्हणून कशी वाटचाल करणार ? - संपादक)
       कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ सप्टेंबर या दिवशी घेतला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी पालघर जिल्ह्यातील कुपोषणाची तीव्रता स्पष्ट केली आणि हे प्रमाण चिंताजनक असू बालमृत्यू रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दल स्थापन करण्याची घोषणा या वेळी केली.

(म्हणे) बॉलिवूड कोणाच्या बापाचे नाही !

  • पाकच्या अशा कलाकारांच्या समर्थनार्थ बोलणारे भारतीय आता तोंड उघडतील का ?
  • पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याने दाखवली स्वतःची औकात (लायकी) !
       मुंबई - चित्रपट निर्मात्यांची संघटना इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशनने (इम्पाने) पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली आहे. या निर्णयाच्या विरोधात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याने बॉलिवूड कोणाच्या बापाचे नाही, अशी प्रतिक्रिया दिल्याचे वृत्त स्पॉटबॉय संकेतस्थळाने दिले आहे. याला इम्पाचे अध्यक्ष आणि निर्माता अग्रवाल यांनी दुजोरा दिला आहे. फवाद खानच्या या वक्तव्यावर अग्रवाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
       मनसेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीदेखील फवादच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, भारतीय लोकांचे मन उदार नाही, असे फवाद बोलल्याची माहिती मला मिळाली आहे. पाकिस्तानी कलाकार भारतात वेगळे बोलतात आणि स्वतःच्या देशात जाऊन राग व्यक्त करतात.

पाकमधील अण्वस्त्रे आत्मघातकी जिहाद्यांच्या हातात पडण्याची शक्यता ! - हिलरी क्लिंटन

पाकमधील जिहाद्यांना अणुबॉम्ब मिळाला आणि त्यांनी 
तो भारतावर टाकला, तर त्याला सामोरे जाण्याची भारताची क्षमता आहे का ?
     वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटीक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी पाकमधील अण्वस्त्रे आत्मघातकी जिहाद्यांच्या हातात पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे भयानक स्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. 
     व्हर्जिनिया येथील निवडणूक निधी संकलनासाठी आयोजित केलेल्या खाजगी बैठकीत बोलतांना हिलरी क्लिंटन म्हणाल्या की, भारताशी शत्रुत्व घेतल्यामुळे पाकच्या अण्वस्त्रनिर्मिती कार्याला वेग आला आहे. पाकमध्ये बंड होण्याची शक्यता आहे. जिहादी आतंकवादी सत्तेत येणार आहेत आणि अण्वस्त्रांवर नियंत्रण मिळवणार आहेत, अशी शक्यता आहे. त्यामुळे ही अण्वस्त्रे आत्मघातकी जिहाद्यांच्या हातात येतील आणि संपूर्ण जगाला धोका निर्माण होईल. (पाकशी चांगले संबंध असलेल्या अमेरिकेने पाकच्या अण्वस्त्रांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, असेच जनतेला वाटते ! - संपादक) अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच मुसलमानांना अमेरिकेत प्रवेश न देण्याची घोषण केली होती. त्यामुळे अमेरिकेत पाकविषयी नकारात्मक भावना वाढीस लागली आहे, हे स्पष्ट होते.

पाककडून पुन्हा गोळीबार !

भारत आणखी किती दिवस शस्त्रसंधी कराराचे 
पालन करून हा गोळीबार सहन करत रहाणार ?
        जम्मू - पाकने १ ऑक्टोबरला पहाटे पुन्हा एकदा सीमेवर शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करून गोळीबार केला. अखनूर सेक्टरमधील दारकोटे, प्लाटन आणि छाननी देवानू येथे हा गोळीबार करण्यात आला.

पुन्हा कारवाई होण्याच्या भीतीने ५०० पैकी ३०० आतंकवाद्यांचे पलायन !

भारताच्या सैनिकी कारवाईनंतर
 पाकने रिकामी केली आतंकवादी केंद्रे !
        श्रीनगर - भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सैनिकी कारवाईचा धसका घेतलेल्या पाकने येथील आतंकवाद्यांची प्रशिक्षणकेंद्रे स्थलांतरीत केली आहेत. यातील ५०० पैकी ३०० आतंकवाद्यांनी पलायन केल्याचे म्हटले आहे. भारताच्या कारवाईनंतर येथे भीतीचे वातावरण असल्याचे म्हटले जात आहे. पाकने यापूर्वीच १८ केंद्रांचे स्थलांतर केले होते. उरलेली २४ केंद्रे आता स्थलांतरीत केली आहेत. यात मुंबईवरील २६/११ च्या आतंकवाद्यांना जेथे प्रशिक्षण देण्यात आले होते त्या मुजफ्फराबादजवळील लष्कर-ए-तोयबाच्या मानशेरा केंद्राचाही समावेश आहे. पळून गेलेले आतंकवादी त्यांच्या घरी गेले आहेत, तर काहींना आयएस्आयने सुरक्षित स्थळी नेले आहे. येथे २०० हून अधिक आतंकवादी प्रशिक्षणानंतर घुसखोरीसाठी सिद्ध होते.

नागपूर येथे कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

कायदा सुव्यवस्थेचा बट्याबोळ !
       नागपूर, १ ऑक्टोबर - येथील सुदामनगरी परिसरातील कुख्यात गुंड सचिन उपाख्य डुंडा प्रकाश सोमकुंवर याच्यावर २९ सप्टेंबर या दिवशी १० गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गोकुळपेठ बाजारपेठेत पोलीस ठाण्याच्या समोर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दोन टोळ्यांमधील संघर्षातून ही हत्या झाली असून भविष्यात टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (गुन्हेगारांच्या टोळ्यांना नियंत्रणात ठेवू न शकणारे आणि जनतेला सुरक्षित वातावरणाची शाश्‍वती देऊ न शकणारे पोलीस काय कामाचे? - संपादक)

(म्हणे) लवकरच भारतावर सूड उगवू !

भारताच्या सैनिकी कारवाईवर हात चोळत बसलेल्या हाफिज सईदचा थयथयाट !
     नवी देहली - भारताने केलेल्या सैनिकी कारवाईचा सूड उगवू, अशी धमकी जिहादी आतंकवादी हाफिज सईद याने दिली आहे. 
     ट्विटद्वारे त्याने म्हटले आहे की, पाक असा सूड उगवेल की, भारत पहात राहील. बांगलादेश निर्मितीचाही सूड उगवला जाईल. त्याला अमेरिकाही साहाय्य करू शकणार नाही. 
     एकीकडे असे ट्विट करतांना हाफिज असेही ट्विट करतो की, भारताकडून सैनिकी कारवाई झालीच नाही. भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे हे मानसशास्त्रीय नाटक आहे.काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांची योगऋषी रामदेवबाबा यांच्यावर टीका !

     नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याचा सल्ला आपण दिल्याचा दावा चूर्णवाल्याबाबांनी केला आहे. जर हे खरे असेल, तर हे देवा तूच भारताला वाचव, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी दिली आहे. (देव भारताला वाचवणार आहे ते दिग्विजय सिंह यांच्या प्रार्थनेमुळे नव्हे, तर भारत धर्माची बाजू घेऊन लढतो म्हणून ! - संपादक) उरी येथील आक्रमणानंतर रामदेवबाबा यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करावेत, असे म्हटले होते. त्यावरून दिग्विजय सिंह यांनी वरील टीका केली आहे. यासाठी त्यांनी रामदेवबाबा यांना चूर्णवालेबाबा असे म्हटले आहे. (संतांचा असा अवमान करणार्‍या दिग्विजय सिंह यांच्यावर पोलिसांनी कारवाई करायला हवी ! - संपादक)

चीनने हायड्रो प्रकल्पासाठी ब्रह्मपुत्रेच्या साहाय्यक नदीचे पाणी रोखले !

कुरापतखोर चीन !
      पेचिंग - चीनने तिबेटमधील ब्रह्मपुत्रा नदीची साहाय्यक नदी असणार्‍या यारलुंग जेंगबो या नदीचे पाणी रोखले आहे. चीन येथे एक जलविद्युत प्रकल्प उभारत आहे. २०१४ पासून हा प्रकल्प चालू असून २०१९ मध्ये तो पूर्ण होणार आहे. एकीकडे भारत पाकबरोबरचा सिंधु पाणी वाटप करार रोखण्याचा विचार करत असतांना चीनने अशा पद्धतीने पाणी रोखून पाकला साहाय्य केले आहे, असे यातून दिसून येत आहे. चीनने पाकच्या दबावापोटी असे केल्याचा भारताने आरोप केला आहे. हा प्रकल्प तिबेटच्या जाइगस येथे चालू आहे. हे ठिकाण भारताच्या सिक्कीमपासून जवळ आहे. येथूनच ब्रह्मपुत्रा वहात जाऊन अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते.

पाकमध्ये भूकंपाचे धक्के !

     इस्लामाबाद - १ ऑक्टोबरच्या दुपारी पाकच्या पेशावर, गिलगिट, चिलास आणि इस्लामाबाद येथे ३० सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ५.५ इतकी मोजण्यात आली. याचे केंद्र पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबाद येथे भूमीखाली ४३.४ किमी खोल होते. यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. 
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
      १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (१ ऑक्टोबरच्या दुपारी पाकच्या पेशावर, गिलगिट, चिलास आणि इस्लामाबाद येथे ३० सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के बसले. या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

सलमानला पाकिस्तानी कलाकारांचा पुळका असेल, तर त्याने पाकमध्ये जाऊन चित्रीकरण करावे ! - राज ठाकरे, मनसे

      मुंबई - पाकिस्तानी कलाकार अतिरेकी नसतील; पण खबरी नसतील कशावरून ? सलमानला पाकिस्तानी कलाकारांचा एवढा पुळका असेल, तर त्याने पाकमध्ये जाऊन चित्रीकरण करावे. सलमानसारख्यांच्या चित्रपटांवर लोकांनी बहिष्कार टाकावा, तोवर हे सुधारणार नाहीत, असा टोला मनसेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांनी सलमान खान याला लगावला. संपूर्ण प्रकरणात पाकिस्तानी कलाकारांपेक्षा भारतीय निर्मातेच जास्त दोषी असल्याची टीकाही त्यांनी केली. ते पुढे म्हणाले, कलाकार काय आभाळातून पडले आहेत का? तुम्हाला देशात टॅलेन्ट मिळत नाही का ? पाकिस्तानातून का आणावे लागते ? पाकिस्तान कधीही सुधारणार नाही. धोनीवरील सिनेमा का बॅन केला तिथे ?शिवसेना गोव्यातील २० जागांवर निवडणुका लढवणार

      पणजी, १ ऑक्टोबर (वार्ता.) - हिंदुत्व आणि मातृभाषा, तसेच चांगले प्रशासन या विषयांवर शिवसेना गोव्यातील येती विधानसभा निवडणूक लढवणार आहे. शिवसेनेद्वारे राज्यातील २० जागांवर निवडणुका लढवण्यात येणार आहेत. यासंदर्भात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पणजी येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली. 
      खासदार राऊत म्हणाले, शिवसेनेने हिंदुत्व मानणार्‍या पक्षांची मते विभागली जाऊ नयेत म्हणून गोव्यात गेली अनेक वर्षे निवडणुका लढवल्या नव्हत्या; मात्र गोव्यातील भाजप हिंदुत्वाच्या सूत्रावरून ढळत असल्याने शिवसेनेने निवडणुकीच्या रिंगणात प्रत्यक्ष उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मातृभाषेच्या विषयावरून भाजपच्या धोरणांना विरोध असलेले प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याशी युती करतांना जागा लढवतांना शिवसेनेने तडजोड करण्याची सिद्धता दाखवली होती. युती झालेली नसल्याने आता शिवसेनेने २० जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यातील सरकार बदलणे हे उद्दिष्ट शिवसेनेने ठेवले आहे. गोवा विधानसभेत आता शिवसेनेचे मंत्री असतील.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांची नुसती वरवरची चौकशी नको, तर ब्रेनमॅपिंग, नार्को इत्यादी सर्व चाचण्याही करा !

सुहेल शर्मा
       सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना मारहाण केल्याच्या प्रकरणाची, तसेच देवद, पनवेल येथील सनातन आश्रमावरील छाप्याच्या वेळी नियमबाह्य कृती करणारे, तसेच सनातनची अपकीर्ती करणारे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यावर कारवाई करण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात येईल, असे आश्‍वासन कोल्हापूर येथील पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी हिंदुत्वनिष्ठांच्या संघटनांच्या शिष्टमंडळाला दिले.
      निर्दोष आरोपींना कारागृहात टाकणार्‍या अधिकार्‍यांचीही वरीलप्रमाणे ब्रेनमॅपिंग, नार्को इत्यादी सर्व चाचण्या करा !

पाकमध्ये भारतीय दूरचित्रवाहिन्यांच्या प्रसारणावर बंदी !

पाकचे समर्थन करणारे आता यावर तोंड उघडतील का ?
      नवी देहली - पाकच्या कलाकारांना भारतीय चित्रपटांत काम करण्यावर बंदी घालण्यात आल्यानंतर पाकने भारतीय दूरचित्रवाहिन्यांच्या प्रसारणावर बंदी घातली आहे. पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने म्हटले आहे, १५ ऑक्टोबरनंतर या आदेशाचे पालन न केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. पाकच्या चित्रपटगृहांमध्येही भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे.गांधीजींमुळेच देशात हिरवा आतंकवाद पसरला ! - अजयसिंह सेंगर, राष्ट्रीय अध्यक्ष, महाराणा प्रताप बटालियन

डावीकडून श्री. प्रियेश जयस्वाल, अधिवक्ता ईश्‍वरप्रसाद
खंडेलवाल, (बोलतांना) श्री. अजयसिंह सेंगर
आणि श्री. संभाजी कावीर
    मुंबई, १ ऑक्टोबर (वार्ता.) - देशाच्या फाळणीच्या वेळी पाकिस्तान मुसलमानांना देण्यात आला. त्या वेळी केवळ गांधीजींमुळेच मुसलमान भारतात राहिले. त्याच्या परिणामस्वरूप आज देशात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात. आतंकवादी कारवाया होत आहेत. गांधीजींमुळेच देशात हिरवा आतंकवाद पसरला, असे प्रतिपादन महाराणा प्रताप बटालियनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजयसिंह सेंगर यांनी केले. भारत शासनाच्या वतीने साजरा करण्यात येणारा २ ऑक्टोबर हा दिवस गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जावा. महाराणा प्रताप बटालियनच्या वतीने २ ऑक्टोबर या दिवशी काळा दिवस पाळून पनवेल येथील पृथ्वी हॉलमध्ये सकाळी ८ वाजता निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. याची माहिती देण्यासाठी महाराजा प्रताप बटालियनच्या वतीने ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी व्यासपिठावर लष्कर-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, हिंदू राष्ट्रसेनेचे श्री. प्रियेश जयस्वाल, धर्माभिमानी श्री. संभाजी कावीर उपस्थित होते.

देशात ६५ सहस्र कोटी रुपयांचे काळे धन घोषित !

      नवी देहली - केंद्र सरकारने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी घोषित केलेल्या उत्पन्न प्रकटीकरण योजनेची मुदत संपत असतांना ३० सप्टेंबरच्या रात्री ८ वाजेपर्यंत सुमारे ६५ सहस्र कोटी रुपयांचा काळा पैसा करदात्यांनी घोषित केला आहे. याला अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दुजोरा दिला आहे. काळा पैसा बाहेर काढण्यास सरकारने ही योजना घोषित केली होती. बेनामी उत्पन्नावर ४५ टक्के कर भरून उत्पन्न नियमित करून घेण्याची सोय यात होती.

सनातनच्या साधिका सौ. मोहिनी मांढरे यांचा आदर्श शिक्षिका म्हणून सत्कार !

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली 
सेवा करत असल्यानेच यश मिळाले 
सौ. मोहिनी मांढरे
        खारघर - शिक्षकदिनाचे औचित्य साधून मराठा समाज खारघरच्या वतीने आदर्श शिक्षिका म्हणून सनातनच्या साधिका सौ. मोहिनी मांढरे यांंचा सुधागड एज्युकेशन सोसायटी कोपरा, खारघर या विद्यालयातून आदर्श शिक्षिका म्हणून सत्कार करण्यात आला.
        सौ. मांढरे या १२ गेली वर्षे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सेवा करत असून त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीही गाठली आहे. त्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्यासह राष्ट्र आणि धर्मप्रेमी बनवण्यासाठीही प्रयत्नशील असतात.

धादांत खोटे वृत्त प्रसिद्ध करून सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याप्रकरणी दैनिक लोकसत्ताला सनातनची कायदेशीर नोटीस !

        पणजी, १ ऑक्टोबर (वार्ता.) - सनातन संस्थेच्या धर्मप्रसाराच्या वाढत्या कार्याची व्याप्ती आणि त्यामुळे सनातन संस्थेचा समाजात असलेला नावलौकिक माहिती असतांना मानहानी करण्याच्या हेतूने दैनिक लोकसत्ता या मराठी वृत्तपत्राने १२ सप्टेंबर २०१६ या दिवशीच्या अंकात पृष्ठ ७ वर सनातनच्या आठवलेंची चौकशी करा, या मथळ्याखाली मानहानीकारक खोटे वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे संस्थेची अपरिमित हानी झाली आहे; म्हणून सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी मानद कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता श्री. रामदास केसरकर यांच्या मार्फत दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, मालक इंडियन एक्स्प्रेस प्रा.लि., मुद्रक आणि प्रकाशक वैदेही ठकार यांना कायदेशीर नोटीस बजावून मानहानी भरपाईपोटी १० कोटी रुपयांची मागणी केली आहे. हानीभरपाईची रक्कम नोटीस मिळाल्यापासून १० दिवसांच्या मुदतीत न दिल्यास हानीभरपाई वसूल करण्यासाठी संस्थेला न्यायालयात दिवाणी दावा दाखल करणे भाग पडेल आणि तसे करावे लागल्यास दाव्याचा खर्च अन् होणार्‍या सर्व परिणामांना आपणास उत्तरदायी धरण्यात येईल, अशी समज या नोटिशीतून देण्यात आली आहे, तसेच कायदेशीर नोटिशीचा खर्च ५ सहस्र रुपये देण्याचे दायित्वही आपलेच असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

ठाणे येथे सनातनच्या वतीने पितृपक्ष या विषयावर मार्गदर्शन !

       ठाणे - कोलशेत येथील सनातनच्या साधिका सौ. धनश्री केळशीकर यांनी पितृपक्षातील श्राद्धाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. अशा प्रकारचे मार्गदर्शन एकूण पाच ठिकाणी घेण्यात आले होते. या मार्गदर्शनाचा लाभ ५० जणांनी घेतला. अंबरनाथ येथे अधिवक्ता सौ. किशोरी कुलकर्णी यांनीही अशाच प्रकारचे मार्गदर्शन केले. मार्गदर्शनानंतर तेथे धर्मशिक्षण वर्ग चालू करण्यात आला.

उत्तरप्रदेशात तीन धर्मांधांकडून विधवेवर सामूहिक बलात्कार !

उत्तरप्रदेशात कायद्याचे राज्य आहे का ? या बलात्कार्‍यांना शरीयत कायद्याप्रमाणे शिक्षा का देण्यात येऊ नये ? 
     नवी देहली - उत्तरप्रदेशात शामली जिल्ह्यातील एका गावात तीन धर्मांधांनी ३० वर्षीय विधवा महिलेवर तिच्या घरात घुसून सामूहिक बलात्कार केला. (वासनांध धर्मांध ! - संपादक) तसेच याविषयी इतरांना माहिती दिल्यास पीडितेला जिवानिशी ठार करण्याची धमकीही दिली. याप्रकरणी पोलिसांनी सलमान, सलीम आणि सदा हसन यांच्यावर बलात्काराचा गुन्हा प्रविष्ट केला आहे. सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. (बलात्कारांच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी समाजवादी पक्षाचे शासन काही पावले उचलणार का ? - संपादक)

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने करण्यात यावी ! - अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्याकडून न्यायालयात विनंती अर्ज

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची १४ ऑक्टोबर या दिवशी पुढील सुनावणी
     पुणे, १ ऑक्टोबर - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी संशयित म्हणून अटक केलेले डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची न्यायालयीन कोठडी १ ऑक्टोबर या दिवशी संपत आल्याने या प्रकरणाची पुढील सुनावणी झाली. या वेळी जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय. लाडेकर यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ ऑक्टोबर या दिवशी होणार असल्याचे सांगितले. डॉ. तावडे न्यायालयात यांना उपस्थित करण्यात आले नव्हते. तसेच केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचे अधिवक्ता आणि अधिकारीही उपस्थित नव्हते. (यावरून अन्वेषण यंत्रणांचा वेळकाढूपणाच दिसून येतो ! - संपादक) या वेळी डॉ. तावडे यांच्या बाजूने अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी कामकाज पाहिले. या वेळी अधिवक्ता श्री. पुनाळेकर यांनी या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने करण्यात यावी, यासाठी न्यायालयात विनंती अर्ज सादर केला. न्यायालयाने हा अर्ज प्रविष्ट करून घेतला आहे.

भारतात वायूप्रदुषणामुळे वर्षभरात ६ लाख २१ सहस्र १३८ लोकांचा मृत्यू ! - जागतिक आरोग्य संघटना

भौतिक विकास हा मानवाला वरदान ठरण्याऐवजी शापच ठरू लागला आहे. त्यामुळे मानवाच्या उन्नतीसाठी असा विकास नाही, तर आनंद आणि शांती देणारी हिंदु संस्कृती अंगिकारणे आवश्यक आहे ! 
     मुंबई - जगात प्रतिदिन लागणार्‍या नवनवीन तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सुलभ होत आहे; मात्र यासह मानवाचे सरासरी आयुर्मानही घटत चालले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात भारतात वायूप्रदूषणामुळे वर्षभरात ६ लाख २१ सहस्र १३८ लोकांचा मृत्यू होतो, असे म्हटले आहे. 
१. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१२ च्या आकडेवारीनुसार भारतात होणार्‍या एकूण मृत्यूंपैकी ७५ टक्के मृत्यू हे वायू प्रदूषणाशी संबंधित असतात. 

युवकाने हातगाडीवरून वाहून नेला वडिलांचा मृतदेह

देशात माणुसकी नावाची गोष्ट शिल्लक आहे कि नाही ?
     पिलिभीत (उत्तरप्रदेश) - उत्तरप्रदेशच्या पिलिभीत जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या पिलिभीत शहरात एका युवकाला त्याच्या ७० वर्षीय वडिलांचा मृतदेह हातगाडीवरून वाहून न्यावा लागला. याविषयीची ध्वनिचित्रफीत संकेतस्थळावर प्रसारित झाली असून त्यामध्ये मोलमजुरी करणारा सुरज नावाचा युवक त्याचे मृत वडील तुलसीराम यांचा मृतदेह हातगाडीवरून नेतांना दाखवण्यात आला आहे. 

कोल्हापूर येथे आजपासून श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्रीदुर्गामाता दौडीचे आयोजन !

      कोल्हापूर, १ ऑक्टोबर (वार्ता.) - श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, कोल्हापूर महानगर आणि समस्त हिंदू बांधव आणि संघटना यांच्या वतीने २ ते १० ऑक्टोबरअखेर नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिदिवशी सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ही दौड चालू होईल. या दौडीमध्ये सर्वांत पुढे भगवा ध्वज असेल. ध्वजमार्गावर माता-भगिनी भगव्या ध्वजाचे औक्षण करतील. ध्वजामागे किमान चार धारकरी आणि त्यामागे दोन-दोनच्या रांगेत भक्त असतील. शहरातील सर्व गल्ल्यांमधून पदयात्रा काढण्यात येणार आहे. दौडीमध्ये गीते आणि जयजयकार करण्यात येईल. दौड भवानीमाता मंदिरात पोहोचल्यानंतर सहभागी मंडळातील प्रत्येकी दोन दांपत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. याचठिकाणी भवानीमातेच्या आरतीने दौड संपन्न होईल. तरी सर्व हिंदूंनी मोठ्या संख्येने श्री दुर्गामाता दौडीत सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूर महानगरचे अध्यक्ष श्री. रणजीतसिंह घाटगे यांनी केले. घोटाळेबाज अंनिसच्या न्यासाची सामाजिक भोंदूगिरी उघड करणारा 'सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालया'चा अहवाल !

     महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या न्यासात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांची चौकशी करण्यासंदर्भात डोंबिवली येथील माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. सुधांशू जोशी, रायगड येथील राष्ट्रीय वारकरी सेनेचे कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. बापूमहाराज रावकर आणि हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी विविध शासकीय खात्यांमध्ये तक्रारी केल्या होत्या. या प्रकरणी सातारा येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या निरिक्षकांचा चौकशी अहवाल माहितीच्या अधिकारात उपलब्ध झाला आहे. यातून या गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत. अंनिसच्या न्यासाच्या कारभारात घोटाळा झाल्याचे सनातनने वारंवार आरोप केले होते. त्याला यामुळे पुष्टी मिळाली आहे. 
      हा अहवाल येथे सादर करत आहोत. अहवालातील शासकीय भाषा तशीच ठेवली आहे, याची वाचकांनी येथे नोंद घ्यावी. 
अहवाल सादर करतांना दिलेली पार्श्‍वभूमी 
 १. अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महाराष्ट्र) सातारा या न्यासात झालेल्या विविध घोटाळ्याच्या प्रकरणी विश्‍वस्त आणि तक्रारदार यांनी सादर केलेले म्हणणे आणि या कार्यालयातील अभिलेखा व कागदपत्रे यांचा विचार करून खालीलप्रमाणे वस्तूस्थितीदर्शन एकत्रित अहवाल सादर करण्यात येत आहे. 
२. अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महाराष्ट्र), १५५, सदाशिव पेठ, सातारा हा सार्वजनिक न्यान नोंदणी क्रमांक ई/४६१/सातारा या क्रमांकाने दिनांक ३०.६.१९९२ या दिवशी नोंदवण्यात आलेला आहे. न्यास नोंदणीचे वेळी खालीलप्रमाणे एकूण ८ लोकांची न्यासाचे विश्‍वस्त म्हणून नोंद केलेली आहे. 
१. श्री. प्रतापराव पवार, ५६८, बुधवार पेठ, पुणे. 
२. श्री. निळूभाऊ लिमये, पुनम हॉटेल, डेक्कन जिमखाना, पुणे. 
३. श्री. निळू फुले, सोनाई, आयडीयल कॉलनी, पौड फाटा, पुणे. 
४. डॉ. राम ताकवले, यशवंतराव चव्हाण विद्यापीठ, नाशिक. 
५. श्री. राजा पाटील, राजाबडे चौक, बॉम्बे डाईंग शोरूम, दादर, मुंबई. 
६. श्री. सदाशिव अमरापूरकर, पंचधारा, वर्सोवा, अंधरी, मुंबई. 
७. डॉ. विद्याधर बोरकर, ११, स्वप्ननंदा हौ. सोसायटी, कोथरूड, पुणे. 
८. डॉ. नरेंद्र दाभोलकर, १५५, सदाशिव पेठ, पुणे. 
विश्‍वस्त मंडळाच्या निवडीविषयी अंनिसच्या न्यासाने केलेली तरतूद 
      न्यासाच्या घटनेचे अवलोकन करता न्यासाचे विश्‍वस्त मंडळ कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १३ लोकांचे असून प्रथम विश्‍वस्त मंडळ तहहयात राहील. पहिल्या ५ वर्षांनंतर विश्‍वस्त मंडळातील २ विश्‍वस्त निवृत्त होतील व त्यांच्या जागी उरलेले विश्‍वस्त बहुमताने नवीन विश्‍वस्तांची निवड करतील. त्यानंतर याच पद्धतीने २ विश्‍वस्त निवृत्त होऊन नवीन विश्‍वस्त निवडण्यात येतील; मात्र निवृत्त होणारे विश्‍वस्त पुन्हा विश्‍वस्त निवडण्यास पात्र असतील, अशी तरतूद असल्याचे दिसून येते. 
अंनिसच्या न्यासाने सोयीस्कररित्या इतिवृत्तात सुधारणा केल्याचे आणि तक्रारदारांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे नमूद !
     न्यासाच्या विश्‍वस्तांनी विश्‍वस्तांमधील बदलाबाबत बदल अर्ज कार्यालयात सादर केले. प्रस्तुत बदल अर्जाचे अवलोकन करता, सदरचे बदल अर्ज विलंबाने दाखल करण्यात आल्याचे दिसून येते. बदल अर्जासोबत सादर केलेल्या सभेच्या इतिवृत्तामध्ये काही ठिकाणी खाडाखोड झाल्याचेही सकृत दर्शनी दिसून येते. शिवाय सभा संपल्यानंतर पुन्हा सभेचे इतिवृत्त लिहिण्यात आल्याचे दिसून येते. एकंदरित बदल अर्ज वेळेत दाखल न करता विश्‍वस्तांनी विलंबाने आणि सोयीस्कररित्या इतिवृत्तामध्ये दुरुस्ती करून दाखल केले आहेत, या तक्रारदारांच्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे सकृतदर्शनी आढळून येते. तथापि सदरचे बदल अर्जांची धर्मादाय आयुक्त, सातारा यांच्यासमोर न्यायिक चौकशी चालू असल्याने बदल अर्जांचा गुणदोषावर न्यायनिर्णय अद्याप झालेला नसल्याने त्याबाबत भाष्य करणे उचित वाटत नाही. 
अंनिसच्या न्यासाने हिशोबपत्रके नियमितपणे आणि प्रतिवर्षी सादर केली नसल्याचे अहवालात नमूद ! 
      या कार्यालयातील उपलब्ध रेकॉर्ड तपासले असता, विश्‍वस्तांनी वर्ष १९९२ ते २००२ अखेरची हिशोबपत्रके दिनांक १९.९.२००३ या दिवशी विलंबाने दाखल केलेली आहेत. तसेच वर्ष २००३ आणि २००४ या वर्षांची हिशोबपत्रके दिनांक ५.३.२००४, वर्ष २००४, २००५, २००६, २००८, २००९ आणि २०१० या वर्षांची हिशोबपत्रके दिनांक ३.१.२०१२ आणि वर्ष २००७, २०११, २०१२, २०१३ आणि २०१४ या वर्षांची हिशोबपत्रके दिनांक १५.१०.२०१५ या दिवशी दाखल केल्याचे दिसून येते. प्रस्तुत हिशोबपत्रकांसोबत विश्‍वस्तांनी विलंब माफीचा अर्ज सादर केल्याचेही दिसून येते. सदर अर्जावर मा. साहाय्यक धर्मादाय आयुक्त, सातारा यांनी दिनांक ५.१०.२०१५ या दिवशी आदेश पारित करून हिशोबपत्रके रुपये ५०० विलंब शुल्क आकारून स्वीकारण्यात आलेली आहेत आणि त्यानुसार हिशोबपत्रकाच्या नोंदी परिशिष्ट १० वर घेण्यात आल्याचे दिसून येते. मात्र न्यासाने हिशोबपत्रके नियमितपणे आणि दरवर्षी सादर केलेली नाहीत, या तक्रारदाराच्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे दिसून येते. 
कोट्यवधी रुपयांच्या देणग्या मिळवणारा; मात्र अंशदान न भरणारा अंनिसचा न्यास !
      न्यासाने प्रत्येक वर्षी हिशोबपत्रके वर्ष संपल्यापासून ६ मासांच्या (महिन्यांच्या) आत दाखल करणे आवश्यक असतांना हिशोबपत्रके विलंबाने दाखल केली आहेत. तसेच न्यासाचा उद्देश मिश्र स्वरूपाचा असतांना हिशोब तपासनीसाने न्यासाचे उद्देश शैक्षणिक दाखवले आहेत. वर्ष १९९२ ते २००४ अखेर हिशोबपत्रके वर्ष २००३ या वर्षी दाखल केलेली असून लेखापाल यांनी शैक्षणिक बाब म्हणून अंशदानातून सूट दाखवली आहे. वास्तविक न्यासाकडून २ टक्के दराने अंशदानाची वसूली करणे आवश्यक होते, अशी तक्रारदाराची तक्रार आहे. याबाबत असे सादर करण्यात येते की, न्यासाने वर्ष १९९२ ते २०१५ अखेरची हिशोबपत्रके कार्यालयास दाखल केलेली आहेत. न्यासाच्या उत्पन्नावर अंशदान आकारणी करण्याबाबत मा. धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्याकडील पत्र जावक क्र. अंदाज/अंशदान/७३३८/२०१० दिनांक २९.११.२०१० नुसार मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील जनहित याचिका क्र. ४०/२००७, १८६४/२००७ आणि १७८०/२००६ मधील दिनांक २५.९.२००९ या दिवशीच्या आदेशानुसार न्यासाकडून अंशदान वसूलीस स्थगिती देण्यात आलेली आहे. तथापि सदर याचिकेमधील अंतिम आदेशास अधीन राहून अंशदान आकारण करून सद्य:स्थितीत अंशदान भरून घेणे वा त्याबाबत कार्यवाही करणे उचित वाटत नाही. 
अंनिसच्या न्यासाकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून आणि त्याविषयी नोंद न ठेवून कायद्याचा भंग ! 
      न्यासाच्या उत्पन्नामध्ये सन २००४ पुढील कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून न्यासाने मोठ्या रकमेची गुंतवणूक केली आहे, या तक्रारदाराच्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे दिसून येते. न्यासाने सादर केलेल्या हिशोबपत्रांची छाननी केली असता न्यासाने ठेवी, कायम ठेव, म्युच्युअल फंड, शेअर्स यांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणूक केल्याचे स्पष्ट होते. तसेच त्याबाबतच्या सविस्तर तपशील दर्शवणार्‍या नोंदवह्या अनुसूची १० अ अ (नियम २१(२) भाग ३ प्रमाणे ठेवलेल्या नसल्याचेही दिसून येते. तसेच त्याबाबतचे विहित बदल अर्ज कार्यालयास सादर केलेले नाहीत. यावरून न्यासाने मुंबई सार्वजनिक विश्‍वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ३५ चे उल्लंघन केल्याचे सकृत दर्शनी दिसून येते. 
अंनिसच्या न्यासाला विदेशातून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो !
     न्यासाने सादर केलेल्या हिशोबपत्रकावरून न्यासाला मोठ्या प्रमाणात परदेशी देणग्या मिळाल्याचे आढळून येते. तथापि प्रस्तुत न्यासाच्या विश्‍वस्तांचे नक्षलवादी संघटना किंवा 'फॉरेन मिशनरीज्' यांच्याशी लागेबांधे आहेत अगर कसे याबाबत भाष्य करता येत नाही; कारण सदरची बाब कार्यालयाशी संबंधित नाही. तसेच नियतकालिके, वार्तापत्र, मुखपत्राबाबत संबंधित नोंदणी कार्यालयास (आर्.एन्.आय) वार्षिक अहवाल सादर करण्याची बाबही या कार्यालयाच्या कार्यकक्षेत येत नसल्याने त्याबाबत भाष्य नाही. तथापि सदर साहित्याचे प्रकाशनाचे संपादक हे न्यासाचे विश्‍वस्त असल्याचेही दिसून येते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निमूर्लन समिती संचलित 'वैज्ञानिक जाणीव प्रकल्प' या नावाने संस्थेने उपक्रम राबवला असल्याचे दिसून येते. तसेच सदर प्रकल्पाद्वारे शाळांमधून स्वयंअध्ययन परीक्षेद्वारे लाखो रुपयांची संपत्ती जमा झाल्याचे न्यासाच्या कीर्द आणि खतावणीरून आढळून येते. 
विदेशातून मिळणार्‍या देणग्यांविषयी अंनिसच्या न्यासाने दिलेल्या माहितीत तफावत !
      न्यासाची नोंद परकीय चलन नियंत्रण कायदा अन्वये केंद्र शासनाच्या गृह खात्याकडे नोंदणी असल्याचे दिसून येते. तसेच त्याद्वारे लाखो रुपयांच्या देणग्या जमा झाल्या असल्याचेही दिसून येते. तथापि त्याबाबतच्या जमा पावत्या तपासल्या असता सदर पावत्यावर एफ्सीआरए नोंदणी क्रमांक आढळून येत नाही किंबहुना आयकर कायदा कलम ८०(ग) अन्वये नोंदणी क्रमांकही दिसून येत नाही. अशा प्रकारे जमा झालेल्या रकमा न्यासाच्या उद्देशाव्यतिरिक्त इतर उद्देशांवर खर्च झाल्याचे दिसून येते. त्यामधून विश्‍वस्तांनी मोठ्या प्रमाणावर मानधन आणि अन्य संस्थांना देणग्यांचे वाटप केल्याचे आढळून येते. त्याबाबतचा ठराव केल्याचे दिसून येत नाही. वर्ष २००६ मध्ये महाराष्ट्र फाऊंडेशन इंडिया (अमेरिका) यांनी रुपये १० लाख इतकी रक्कम नरेंद्र दाभोलकर यांच्या नावे दशकातील सर्वोत्तम कार्यक्रम म्हणून पुरस्कार स्वरूपात दिली. ती सर्व रक्कम त्यांनी न्यासास दिल्याचे नमूद केले आहे. प्रत्यक्षात चौकशीमध्ये आणि कागदपत्रे पहाता, वर्ष २००६ या वर्षीच्या ऑडीट रिपोर्टमध्ये अथवा कीर्द खतावणीमध्ये सदरची रक्कम नमूद नसल्याचे दिसून येते. न्यासास परदेशामधून मोठ्या प्रमाणात देणग्या प्राप्त झाल्या आहेत. त्याची माहिती केंद्रीय गृह खात्याला दरवर्षी दिल्याचे संस्थेने जबाबामध्ये नमूद केले असले तरीही सदर दिलेली माहिती आणि न्यासाकडील त्याबाबतची कागदपत्रे, यांमध्ये तफावत असल्याचे आढळून येते. 
स्थावर आणि जंगम मिळकतीविषयी माहिती लपवली ! 
अ. न्यासाच्या कीर्द खतावणीवरून न्यासाने इंडिका क्रूझर गाड्यांवर दुरूस्तीसाठी व्यय (खर्च) केल्याचे दिसून येते. तथापि न्यासाने किती गाड्या घेतल्या आहेत, त्यांची नोंद नोंदवहीमध्ये नाही. त्याचप्रमाणे स्थावर मिळकत आणि जंगम मिळकत, यांबाबतच्या अद्ययावत नोंदवह्या नाहीत किंबहुना त्याबाबचे बदलअर्ज कार्यालयास दाखल केल्याचे आढळून येत नाही. 
ब. न्यासाने पथनाट्य, एकांकिका याबाबत संबंधित करमणूक कर खात्याची अनुमती (परवानगी) घेतली किंवा कसे, याबाबत माहिती उपलब्ध होत नाही. 
 अंनिसच्या न्यासाचा कारभार पारदर्शक नाही !
     एकंदरित तक्रारदारांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये तथ्यच असल्याचे आढळून येते, तसेच न्यासाच्या कारभारामध्ये अनियमितपणा असल्याचे दिसून येते. तथापि तक्रारदार हे प्रस्तुत न्यासाचे सभासद अथवा देणगीदार नाहीत. त्यामुळे तक्रारदार हे कायद्यातील तरतुदीनुसार न्यासाचे हितसंबंधित आहे अगर कसे, हा प्रश्‍न निर्माण होत असला तरीही न्यासाचा कारभार कायद्यातील तरतुदीनुसार आणि पारदर्शकपणे चालू आहे, असा निष्कर्ष काढणे उचित वाटत नाही. 
अंनिसच्या ट्रस्टकडून जमा केलेल्या निधीचा दुरुपयोग !
     निरीक्षक अहवाल वाचला. सोबतची कागदपत्रे पडताळली. चारही तक्रारअर्ज वाचले. सर्व तक्रारदारांची तक्रार थोड्याफार फरकाने एकाच स्वरूपाची असल्याचे दिसून येते. न्यासाने परदेशातून मोठ्या प्रमाणात अनुदान/देणगी मिळवली असून विविध स्वरूपाचे निधी शासनाकडून आणि शाळांमध्ये जाऊन जमा केले आहेत आणि त्याचा विनियोग ज्या कारणासाठी जमा केले, त्या कारणासाठी केला नाही. त्याचा दुरूपयोग झालेला आहे. अंधश्रद्धा निमूर्लनाच्या नावाखाली मोठे प्रकाशन केले जाते; पण ते न्यासाचे उद्देश नाहीत, अशा स्वरूपाची (थोडक्यात) तक्रार असल्याचे दिसते. 
अंशदान न भरून सरकारचे उत्पन्न बुडवणारा अंनिसचा न्यास ! 
     न्यासाचे त्या त्या वेळी ऑडीट केले किंवा नाही, हा संभ्रम आहे; कारण ते विलंबाने दाखल झालेले आढळतात. त्या त्या वेळी दाखल करण्यात आले असते, तर वर्ष २००८ पूर्वीच्या हिशोबपत्रकांची छाननीनंतर त्यांना/न्यासाला अंशदान भरावे लागले असते. कोट्यवधी रुपयांची देणगी उत्पन्नात असतांना वेळेत दाखल न केल्याने या अर्ध्या लक्षाचेही अंशदान न मिळाल्याने (शासनाचे) मोठे नुकसानच झालेले आहे. तसेच वरील तक्रारीत एका तक्रारदाराने अंशदानाची बाबही नमूद केलेली आहे. न्यासाच्या स्थापनेपासून न्यासाचे विश्‍वस्त निधीपत्रात नमूद केल्याप्रमाणे विश्‍वस्तांमधील बदल दाखल केलेले नाहीत. 
 न्यासावर अधिकृत कार्यकारिणी/विश्‍वस्त नसल्याने प्रशासक नेमणे आवश्यक !
     न्यासाची घटना पाहिली असता घटनेप्रमाणे प्रथम विश्‍वस्तमंडळ ५ वर्षे रहाणार असून त्यानंतर दरवर्षी २ विश्‍वस्त निवृत्त होणार आणि त्यांच्याजागी उर्वरित विश्‍वस्त जागा भरणार असल्याचे नमूद आहे; परंतु याप्रमाणे विश्‍वस्तांच्या बदल पूर्वी दाखल झालेले नसल्याने कार्यालयीन रेकॉर्डप्रमाणे न्यासाचे केवळ १-२ विश्‍वस्त दिसतात. इतर सर्व मयत आहेत. दाखल बदल अर्ज मंजूर होईपर्यंत न्यासास कोणीही विश्‍वस्त नाही. ज्या व्यक्ती न्यासाचा कारभार करत आहेत त्या defacto manager (प्रत्यक्षात व्यवस्थापक) आहेत. त्यांनी केलेल्या व्यवहारास त्या जबाबदार रहातील. वरील सद्यःस्थितीवरून असे लक्षात येते की, न्यासास अधिकृत कार्यकारिणी विश्‍वस्त नाहीत. सबब न्यासाचा कारभार पहाण्यासाठी विधी तज्ञांची नेमणूक होणे आवश्यक (प्रशासक म्हणून) आहे. 
अंनिसच्या न्यासाची सखोल चौकशी व्हावी, असे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधीक्षकांचे ताशेरे ! 
     न्यासाने दाखल केलेले ऑडीट रिपोर्ट आणि तक्रारदाराच्या तक्रारीचा स्वरूप पहाता विशेष लेखापरिक्षण होणे आवश्यक वाटते. निरीक्षकांनी अहवाल सादर करतांना /करण्यापूर्वी सर्व तक्रारींच्या अनुषंगाने पावत्या कीर्द, खतावणी, बँकेचे पासबूक इत्यादी तपासणे आवश्यक आहे. असे असतांना निरीक्षकांनी अहवाल मोघम दिलेला आहे. त्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केलेली दिसून येत नाही, तसेच सध्या हयात असलेले परंतु स्थापनेच्या वेळच्या विश्‍वस्तांचा जबाब घेतलेला नाही. सबब निरीक्षकांनी पुन्हा चौकशी करून, तपासणी करून अहवाल दाखल करावा, असे आदेश व्हावेत. न्यासाची अभिलेखा पहाता न्यासाचे विलीनीकरण झाले असून जो न्यास (इ-४०७) या न्यासात विलीन झाला आहे त्या न्यासाची मालमत्ता (जंगम/स्थावर) सदर न्यासाच्या रेकॉर्डला येणे आवश्यक आहे. याबाबतही निरीक्षकांनी चौकशी केली नाही आणि अहवाल सादर केलेला नाही. सबब निरीक्षकांनी फेरचौकशी करून अहवाल सादर करावा. 
अंनिसच्या न्यासाच्या कारभारात अनियमितता असल्याचे उघड !
एकंदरित उपरोक्त परिस्थितीवरून दिसून येते की, 
१. न्यासाने विश्‍वस्तांमधील बदलाबाबत बदल अर्ज मुदतीत दाखल केलेले नाहीत. 
२. न्यासाने हिशोबपत्रके वेळेवर आणि नियमितपणे सादर केलेली नाहीत. 
३. स्थावर आणि जंगम मिळकतीच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवलेल्या नाहीत, तसेच त्याबाबते बदलअर्ज सादर केलेले नाहीत. 
४. न्यासाकडून दरवर्षी अंदाजपत्रक वेळेत सादर केले जात नाही. 
५. न्यासाला मोठ्या प्रमाणात देणग्या मिळालेल्या असून, तसेच मोठ्या प्रमाणात ठेवी स्वरूपात रक्कम गुंतवलेल्या असतांनाही कर्ज म्हणून काही रकमा घेतल्याचे ऑडीट रिपोर्टवरून दिसून येते. सदरच्या रकमा कोणाकडून आणि कशासाठी घेतल्या, त्याकरिता कायद्यातील तरतुदीनुसार अनुमती (परवानगी) घेतली अगर कसे, याबाबत बोध होत नाही. 
६. न्यासाने ठेवी ठेवतांना कलम ३५ चे उल्लंघन केल्याचे दिसून येते. काही रकमा रयत सेवक सहकारी बँक, शामराव विठ्ठल को-ऑप बँक अशा अनेक बँकेत ठेवण्यात आल्या आहेत. 
७. हिशोब तपासनीसाने हिशोब पत्रकासोबत परदेशी देणग्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर केलेला नाही. 
८. न्यासाने विविध प्रकारचे फंड निर्माण केले आहेत. तथापि त्याबाबत विहित प्रमाणपत्र सादर केलेले नाही. 
९. न्यासाने नियमबाह्य अंशदानामधून सूट घेतलेली आहे.

पुणे येथील अंनिसच्या संदर्भातील पत्रकार परिषदेत झालेली प्रश्‍नोत्तरे !

१. अंनिसच्या विश्‍वस्तपदी प्रतापराव पवार, तसेच अन्य प्रतिष्ठित लोकांची नावे आहेत. समाजातील मोठ्या व्यक्ती विश्‍वस्तपदी असूनही असा घोटाळा झाला. या संदर्भात तुम्ही काय सांगाल ? 
अधिवक्ता पुनाळेकर : समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची नावे घेऊन कार्य करण्याची अन् व्यासपिठावर जाण्याची डॉ. दाभोलकर यांची शैली होती. अन्वेषण यंत्रणांवर दबाव टाकण्यासाठी ते असे करत होते. त्यांनी मोठ्या माणसांच्या नावांचा ढालीसारखा उपयोग केला. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या चौकशी अहवालातून भ्रष्टाचाराचे एवढे घबाड मिळाले. याची अजून सखोल चौकशी केल्यास त्यातून अनेक गोष्टी बाहेर पडतील. विश्‍वस्त न्यासांमध्ये बडी धेंडे असल्यानेच आजपर्यंत राजकीय दबावातून ही कारवाई झाली नव्हती. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास करण्याचे निर्देश दिल्याने आज हा भ्रष्टाचार समोर तरी आला आहे. अंनिसने FCRA कायद्याचेही उल्लंघन केले आहे. त्यामुळे अंनिसची सखोल चौकशी होऊन त्यांची मालमत्ता जप्त झाली पाहिजे. या प्रकरणी अंनिसने धर्मादाय आयुक्तांकडे त्यांची आर्थिक चौकशी होऊ नये, म्हणून पत्रेही दिले आहेत. मनात खोट असल्यानेच अंनिसवाल्यांना अशी पत्रे पाठवावी लागली.

काही देवींच्या उपासनेची वैशिष्ट्ये

सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने...
१. कुमारी
    हिच्या पूजेत फुले, फुलांच्या माळा, गवत, पाने, झाडांच्या साली, कापसाचे धागे, भंडारा (हळद), शेंदूर, कुंकू इत्यादींना महत्त्व असते. लहान मुलींना आवडतात अशा गोष्टी या देवीला अर्पण करतात.
२. रेणुका, अंबाबाई आणि तुळजाभवानी
    विवाहासारख्या एखाद्या विधीनंतर या कुलदेवता असलेल्यांच्या घरी देवीचा गोंधळ घालतात. काही जणांच्या घरी विवाहादी कार्य नीटपणे पार पडले म्हणून सत्यनारायणाची पूजा करतात किंवा कोकणस्थ ब्राह्मणांत देवीचे बोडण भरतात, तसेच हे आहे.
३. अंबाजी
गुजरातमधील अंबाजीच्या (अंबामातेच्या) देवळात दिव्यासाठी तेल वापरीत नाहीत. तेथे तुपाचा नंदादीप (अखंड) तेवत असतो.

हिंदु जनजागृती समितीच्या हिंदुत्वकार्याचे निराळेपण

अ. समितीच्या प्रत्येक उपक्रमाला साधनेचा पाया आहे. प्रत्येक कार्यकर्ता स्वत:ची साधना म्हणून हिंदुत्वाचे कार्य करत आहे. त्यामुळे कार्यास ईश्‍वराचे अधिष्ठान प्राप्त होते आणि कार्याला खर्‍या अर्थाने यश लाभते, याची प्रचीती आज हिंदु जनजागृती समितीच्या प्रचंड वेगाने वाढणार्‍या कार्याकडे पाहून लक्षात येते. या माध्यमातून सांप्रतकाळी समितीने धर्मनिष्ठ हिंदुत्वाच्या नव्या पर्वाला प्रारंभ केला आहे.
आ. व्यापक हिंदूसंघटनाचे ध्येय उराशी बाळगून देशभरातील शेकडो हिंदुत्वनिष्ठ संघटनांना समवेत घेऊन हिंदु जनजागृती समितीने ५ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांचे यशस्वी आयोजन केले. अशा प्रकारे संघटनांचे संघटन हा एक नवा आणि अनोखा अध्याय हिंदुत्वाच्या कार्यात समितीने लिहिला आहे.

हिंदु जनजागृती समितीचे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी चालू असलेले ऐतिहासिक, अविरत आणि अथक कार्य !

हिंदु जनजागृती समितीच्या १४ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने !

धर्माधिष्ठित व्यापक हिंदूसंघटनच हिंदु राष्ट्राची स्थापना करील !

श्री. अरविंद पानसरे
      हिंदु जनजागृती समितीचा आश्‍विन शुक्ल पक्ष प्रतिपदा (१ ऑक्टोबर २०१६ या दिवशी) अर्थात् शारदीय नवरात्राच्या प्रथम दिनी १४ वा वर्धापनदिन झाला. त्या निमित्ताने समितीच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या राष्ट्रव्यापी कार्याचा मागोवा घेणारा लेख !
    हिंदु जनजागृती समिती ! आज हे नाव केवळ देशातील काही राज्यांपुरते मर्यादित नसून देशाच्या कानाकोपर्‍यात पोचले आहे. देशातील प्रमुख हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या सूचीत समितीचे नाव घेण्यात येते. लक्षावधी हिंदूंमध्ये धर्म आणि राष्ट्र यांविषयीचा अभिमान आणि प्रेम निर्माण करण्यात समितीला यश आले आहे. असंख्य हिंदूंनी समितीच्या मार्गदर्शनाखाली हिंदुत्वाच्या धर्मनिष्ठ कार्याला आरंभ केला आहे, तर शेकडो हिंदुत्वनिष्ठ नेते आणि कार्यकर्ते ईश्‍वरी अधिष्ठान ठेवून हिंदुत्वाचे कार्य करत आहेत. एवढेच नव्हे तर, साधना केल्याने ईश्‍वरी अधिष्ठान प्राप्त झालेल्या सहस्रो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून समितीचे चालू असलेले आदर्शवत् असे धर्मजागृती, राष्ट्ररक्षण आणि हिंदुत्वरक्षण यांचे कार्य पाहून अनेक विचारवंत, हिंदुत्वनिष्ठ, तसेच सहस्रो हिंदूंच्या मनात भरतखंड हिंदु राष्ट्राची पहाट लवकरच पाहील, असा विश्‍वास निर्माण झाला आहे.

नवरात्रोत्सवातील अपप्रकार रोखून उत्सवाचे पावित्र्य राखा !

      गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते. पूर्वी गरबा या नृत्याच्या वेळी देवीची, कृष्णलीलेची आणि संतरचित गीतेच म्हटली जात असत. आज भगवंताच्या या सामूहिक नृत्योपासनेला विकृत स्वरूप आले आहे. चित्रपटांतील गीतांच्या तालावर अश्‍लील अंगविक्षेप करून गरबा खेळला जातो. गरब्याच्या निमित्ताने व्यभिचारही होतो. पूजास्थळी तंबाखूसेवन, मद्यपान, ध्वनीप्रदूषण इत्यादी प्रकारही घडतात. हे अपप्रकार म्हणजे धर्म आणि संस्कृती यांची हानी होय. हे अपप्रकार रोखणे, हे काळानुसार आवश्यक धर्मपालनच आहे. सनातन काही वर्षांपासून या अपप्रकारांविरुद्ध जनजागृती चळवळ राबवते. यात तुम्हीही सहभागी व्हा !

मराठा मोर्चे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने कृतीशील होवोत !

श्री. यज्ञेश सावंत
      कोपर्डीच्या पाशवी बलात्काराच्या घटनेनंतर एक मराठा लाख मराठा या घोषवाक्याने कोणत्याही नेतृत्वाशिवाय शिस्तबद्धरित्या लाखोंच्या संख्येने एकत्र येणार्‍या मराठा समाजाचे संघटन राजकारण्यांसह अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले आहे. गुन्हेगारांवर त्वरित कारवाई होत नाही म्हणून संताप, तसेच मराठा समाज खुल्या वर्गात येत असल्याने आरक्षणामुळे झालेल्या परवडीमुळे प्रत्येक ठिकाणी झालेली घुसमट या मोर्च्यांच्या निमित्ताने दिसून येते.
१. कोपर्डी येथील घटना आणि पक्षपाती पत्रकारिता !
      नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे १३ जुलै या दिवशी एका १५ वर्षांच्या शाळकरी मुलीवर तीन नराधमांनी बलात्कार करून तिच्या देहाची अक्षरश: चाळण करत तिची हत्या केली.तिच्या शरिरावर जखमा नाहीत, अशी एकही जागा शिल्लक नव्हती. तिच्यावर केलेले अत्याचार येथे लिहूही शकत नाही, इतके भयंकर होते; मात्र घटना घडल्यावर सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून ते तात्काळ सर्वदूर पसरले आणि सर्वांच्या पायाखालची जमीन सरकल्याप्रमाणे सर्वांना धक्का बसला. एरव्ही अनेक अनावश्यक विषयांवरील बातम्या देण्यास पुढे पुढे करणार्‍या माध्यमांनी या भयंकर घटनेला २ दिवस उलटूनही एकही बातमी देण्याचे सौजन्य दाखवले नाही. तिसर्‍या दिवसापासून प्रचंड जनक्षोभ उसळायला लागल्यावर पत्रकार जागे झाले आणि १६ जुलैपासून पुढचा घटनाक्रम देण्यात आला. पक्षपाती पत्रकारिता म्हणजे काय, याचा आणखी काही पुरावा हवा का ? या थंड पत्रकारितेमुळे देहलीतील निर्भया प्रकरणापेक्षाही भयंकर प्रकरण घडूनही सर्वसामान्य जनतेला घटनेची भीषणताच अनेक दिवस लक्षात आली नाही.

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

       सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वी पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे प्रसिद्ध करत आहोत.
लव्ह जिहादी धर्मांधांना नव्हे, तर त्यांना हटकणार्‍या 
हिंदुत्वनिष्ठांना तात्काळ अटक करणारे रझाकारी पोलीस !
       रमझान ईदच्या निमित्ताने अब्दुल समद (वय २१ वर्षे) आणि महंमद जलाल (वय १८ वर्षे) हे दोन मुसलमान युवक पाच हिंदु युवतींना घेऊन कर्नाटकमधील पत्तूर येथील एका उपाहारगृहात एकाच ताटात मांसाहार करत होते. हे सर्व जण पंडेश्‍वर शहरातील श्रीनिवास महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत. त्या वेळी तेथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे युवक आले. त्यांनी यावर आक्षेप घेत या मुसलमान युवकांना हटकले. त्यानंतर हे मुसलमान युवक आणि हिंदु युवती वाहनाने निघून जात असतांना हिंदुत्वनिष्ठ युवकांनी त्यांचे वाहन अडवले अन् घडलेल्या प्रकाराविषयी मुसलमान युवकांकडे स्पष्टीकरण मागितले. त्यानंतर या मुसलमान युवकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी ताबडतोब ४ हिंदु युवकांना अटक केली.
पोलिसांविषयी चांगले आणि वाईट अनुभव असल्यास 
वाचकांनी नजीकच्या दैनिक कार्यालयात कळवावेत !

प्राचीन काळाचे स्मरण करून देणारे अन् धर्माचा विजय समीप आला आहे, याची ग्वाही देणारे ध्वज !

      यापूर्वीच सप्तर्षि जीवनाडीच्या माध्यमातून महर्षींनी दिलेल्या आज्ञेप्रमाणे रामनाथी आश्रमावर कळसांची स्थापना करण्यात आली आहे. आता भृगु महर्षींच्या आज्ञेप्रमाणे आश्रमावर ध्वजांची स्थापना झाल्यामुळे अध्यात्मप्रसार अन् हिंदु धर्मप्रसार यांचा विश्‍वदीप असलेला रामनाथी आश्रम मंदिराप्रमाणे शोभून दिसत आहे. कळस आणि ध्वज यांकडे पाहून प्राचीन काळातील ऋषींच्या गुरुकुलाचे स्मरण होते, तर हनुमानध्वज पाहून महाभारतकाळातील साक्षात् भगवान श्रीकृष्ण सारथ्य करत असलेल्या अर्जुनाच्या रथाचे स्मरण होते. हे ध्वजच धर्माचा विजय समीप आला आहे, याची ग्वाही देत आहेत.
     रामनाथी, गोवा येथील आश्रमात सूक्ष्मातील अनेक पालट होत आहेत. त्याचबरोबरीने महर्षींच्या आज्ञेने स्थुलातून लाभलेल्या या शुभचिन्हांमुळे रामनाथी आश्रमातील वातावरण आता उच्च लोकांत असल्याप्रमाणेच झाले आहे. पदोपदी आढळणार्‍या अलौकिक शुभचिन्हांमुळे त्याला अधिक शोभा येत आहे.
      सप्तर्षि, भृगु महर्षि आणि अन्य संत यांच्या कृपेमुळेच साधकांना हे सर्व अनुभवता येत आहे. त्यासाठी आम्ही सर्व साधक महर्षींच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत !

कल्का, हरियाणा येथील भृगु संहितावाचक श्री. अमरदासजी महाराज यांच्या आज्ञेनुसार रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चार ध्वजांची स्थापना !

ध्वजांचे पूजन करतांना
साधक-पुरोहित पाठशाळेतील पुरोहित
       रामनाथी - श्री चतुर्भुज बालाजी हनुमान मंदिर, त्रिमूर्तीधाम, कल्का, हरियाणा येथील भृगु संहितावाचक श्री. अमरदासजी महाराज यांच्या आज्ञेनुसार रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ४ वैशिष्ट्यपूर्ण ध्वजांची नुकतीच स्थापना करण्यात आली. यामुळे अनेक लोक संस्थेशी जोडले जातील, महर्षींची कृपादृष्टी राहील आणि संकटनिवारण होईल, असे संहितेद्वारे भृगुमहर्षींनी सांगितले आहे.
ध्वजांचे स्थान
     आश्रमाच्या प्रवेशद्वारावर एका बाजूला हत्तीचे चित्र असलेला गजध्वज आणि एका बाजूला सिंहाचे चित्र असलेला शार्दुलध्वज, तसेच आश्रमाच्या इमारतीवर हनुमंताचे चित्र असलेला हनुमानध्वज आणि सर्वांत वरती मध्यभागी वृषभ (बैलाचे) चिन्ह असलेला वृषभध्वज यांची स्थापना करण्यात आली.
     १६ सप्टेंबर या दिवशी सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी या ध्वजांचे विधीवत् पूजन केल्यानंतर ध्वजांची स्थापना करण्यात आली. या वेळी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची वंदनीय उपस्थिती होती.

कुंकुमार्चन करण्याचे महत्त्व !

पद्धत : देवीचा नामजप करत एक-एक चिमूट कुंकू देवीच्या चरणांपासून डोक्यापर्यंत वहात यावे किंवा तिला कुंकवाने स्नान घालावे. काही ठिकाणी कुंकुमार्चनात कुंकू फक्त चरणांवर वहातात.
शास्त्र : शक्तीतत्त्वाची निर्मिती लाल प्रकाशातून झाली आहे. कुंकवात शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अधिक असते; म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्तीतत्त्व कुंकवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते.
(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ देवीपूजनाशी संबंधित कृतींचे शास्त्र) देवतातत्त्वे आणि आनंद आदी स्पंदने आकृष्ट अन् प्रक्षेपित करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या (भाग १)

विविध प्रसंगी काढावयाच्या रांगोळ्यांविषयी 
मार्गदर्शन करणारा सनातनचा नूतन ग्रंथ प्रकाशित !
(रांगोळ्यांच्या सात्त्विकतेमागील शास्त्रासह)
                                           १. रांगोळी भावपूर्ण काढण्याचे महत्त्व काय ?
                                           २. देवतांशी संबंधित आकार आणि रंग कोणते ?
                                           ३. रांगोळीची स्पंदने अवलंबून असलेले विविध घटक कोणते ?
                                           ४. रांगोळीच्या आकृतीबंधाला रंगांपेक्षा अधिक महत्त्व का आहे ?
                                           ५. रांगोळीत गडद रंगांऐवजी सात्त्विक फिकट रंग का भरावेत ? 
६. रांगोळीद्वारे होणारी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना कशी टाळावी ?


भावी महायुद्धकाळात डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध नसतांना अन् नेहमीसाठीही उपयुक्त सनातनचा ग्रंथ !

भावी आपत्काळात अन् नेहमीसाठीही उपयुक्त 
ठरणारी सनातनची ग्रंथमालिका : भावी आपत्काळातील संजीवनी !
रिफ्लेक्सॉलॉजी
(हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन)
      संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना (आजारांना) तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील १३ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या ग्रंथांचा अभ्यास आतापासूनच केला, तर प्रत्यक्ष आपत्काळात विकारांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होईल. यासाठी हे सर्व ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत !
  • रिफ्लेक्सॉलॉजीतील अनेक पाठभेदांतून तज्ञांनी निश्‍चित केलेले बिंदू !
  • चित्रांच्या साहाय्याने नेमकेपणाने बिंदू शोधण्याविषयी मार्गदर्शन !
  • लहान-थोर कोणालाही, कधीही, कुठेही करता येण्याजोगे उपाय ! 
  • दैनंदिन जीवनात आढळणार्‍या १०० हून अधिक विकारांवर उपचार !
     हा ग्रंथ वाचून स्वतःच स्वतःच्या रोगांवर उपचार करा आणि निरोगी रहा !
संपर्क : ९३२२३१५३१७ 
सनातनची ग्रंथसंपदा आता SanatanShop.com वर उपलब्ध !
    आज प्रत्येक आई-वडील माझा मुलगा डॉक्टर, अभियंता वगैरे व्हावा, असे म्हणतात; पण कोणीही सत्पुरुष व्हावा, असे म्हणत नाहीत !
- प.पू. झुरळे महाराज, डोंबिवली   

इतके होईपर्यंत भारतीय सैन्य झोपले होते का ?

   ९ सप्टेंबर २०१६ या दिवशी चिनी सैनिकांनी अरुणाचल प्रदेशातील भारतीय सीमेत ४५ कि.मी. आत घुसखोरी केल्याची घटना समोर आली. त्यानंतर चार दिवसांनी म्हणजे १३ सप्टेंबरला भारतीय सैन्याने त्यांना हाकलून लावले.
   बंगालच्या मुख्यमंत्री नागरी पोलिसांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक मुसलमानांची भरती करत आहेत. - श्री. उपानंद ब्रह्मचारी, संपादक, हिंदु एक्सिस्टन्स

सर्वपक्षीय राज्यकर्त्यांच्या मूर्खपणाची कमाल !

   भारताने वर्ष १९९६ मध्ये पाकला मोस्ट फेवर्ड नेशन (सर्वाधिक पसंतीचे राष्ट्र) हा दर्जा दिला होता; मात्र पाककडून भारताला कधीही अशा प्रकारचा दर्जा देण्यात आला नाही.

भारतातील शिक्षणाची दयनीय स्थिती !

   देशातील २० टक्के शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यास योग्य नाहीत आणि ८४ टक्के शिक्षकांना प्रथमोपचार येत नाहीत, अशी माहिती कॅगच्या अहवालात दिली आहे.

देवतेचे विडंबनात्मक चित्र, देवतेचे कलात्मक चित्र आणि स्पंदनशास्त्रानुसार सिद्ध केलेले सात्त्विक चित्र यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा परिणाम अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

     प्रत्येक देवता हे एक विशिष्ट तत्त्व आहे. देवतेची उपासना करतांना पूजकाच्या मनात त्या देवतेविषयी सतत भावजागृती होईल, असे तिचे रूप असणे महत्त्वाचे ठरते. देवतेचे द्विमितीय रूप (चित्र) अथवा त्रिमितीय रूप (मूर्ती) जितके त्या देवतेच्या मूळ रूपाशी जुळणारे असेल, तितके त्यात त्या देवतेचे तत्त्व अधिक आकृष्ट होते. हल्ली सर्वसाधारणतः देवतांची चित्रे वा मूर्ती बनवत असतांना सूक्ष्मातून देवतेची स्पंदने जाणून घेऊन त्यानुसार चित्र किंवा मूर्ती बनवण्यापेक्षा कल्पनाविष्कारावर अधिक भर दिला जातो.
     देवतांच्या उपासनेच्या मुळाशी श्रद्धा असते. देवतांचे कोणत्याही प्रकारचे विडंबन हे श्रद्धेवर घाला घालतेे. सध्या देवतांचे विविध प्रकारे विडंबन होते, उदा. हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची नग्न चित्रे काढून ती जाहीर विक्रीसाठी ठेवली होती. व्यापारी हेतूने विज्ञापनांमध्ये देवतांचा मॉडेल म्हणून वापर केला जातो.
     देवतेचे विडंबनात्मक चित्र, पेठेत (बाजारात) मिळणारे चित्र आणि स्पंदनशास्त्रानुसार सिद्ध केलेले चित्र यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी यू.टी.एस्. (युनीव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि तिचे विवरण पुढे दिले आहे.

प्रयोग : छायाचित्र क्र. १ आणि २ या छायाचित्रांकडे २ मिनिटे पाहून काय वाटते ? ते अनुभवा अन् नंतर उत्तर आणि पुढील भाग वाचा.

छायाचित्र क्र. १ : वस्त्र नेसवलेल्या देवीचे छायाचित्र
छायाचित्र क्र. २ वस्त्र न नेसवलेल्या देवीचे छायाचित्र

साधकाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी सुचलेली आरती

जय देव जय देव जय गुरुराया । 
सर्व देवाआधी तू देव माझा जय देव जय देव ॥ धृ. ॥

रायगड ग्रामी देह धारण केला ।
मायानगरीमाजी निवास केला ॥
देशी-विदेशी भ्रमण केले ।
दु:खी जनांसाठी संमोहन उपचारशास्त्र विकसित केले ॥ १ ॥

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला भेट देणार्‍या मान्यवरांचे अभिप्राय

१. आश्रमात रामराज्य नांदत आहे, असे वाटले. - श्री. संजय मारुति घुले, पुणे (२४.६.२०१६)
२. आश्रमात येऊन मनाला शांती मिळाली ! : आश्रमात आल्यावर बाहेरच्या जगापासून पुष्कळ वेगळे वाटले. येथील प्रत्येक वस्तू विलक्षण आहे. आश्रमात येऊन पुष्कळ चांगले वाटले आणि मनाला शांती मिळाली.
२ अ. ज्याचा कधीही विचार केला नव्हता, अशा सूक्ष्म-जगतातील गोष्टी येथे आल्यावर कळल्या ! : येथील लादीवरही नैसर्गिकरित्या अशा सकारात्मक (उदा. ॐ) आणि नकारात्मक आकृत्या (उदा. बलाढ्य आसुरी शक्तीचा तोंडवळा) उमटतात. असा विचारही कधी मनाला शिवला नव्हता. ज्याचा कधी विचारही करू शकत नाही, कधी विचारही केला नव्हता, ते येथे आल्यावर कळले की, असेही काही असते. ईश्‍वरावर पूर्ण विश्‍वास आणि भक्ती असली, तर अनिष्ट शक्ती आमचे काहीही वाईट करू शकणार नाही. - अनिता कँवर (२६.६.२०१६)
३. आश्रमात देव माझ्या जवळपासच आहे, असे मला वाटले ! : २६.६.२०१६ या दिवशी मी आश्रम पाहिला. आश्रम पाहिल्यावर माझ्या मनाला पुष्कळ शांत वाटले. आश्रमात शांती आहे. त्याचा प्रत्यय म्हणजे देव माझ्या जवळपासच आहे, असे मला वाटले. आश्रमातील भिंतींना स्पर्श करून काय जाणवते ?, हे पहायला सांगितल्यावर जे मला अनुभवायला मिळाले, ते मी माझ्या आयुष्यात प्रथमच अनुभवले.

पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांच्या अंत्यसंस्कार विधीनंतर तिसर्‍या दिवशी केलेले अस्थिसंचयन आणि नंतर केलेले रक्षाविसर्जन या विधींचे सूक्ष्म-परीक्षण

कै. पू. (सौ.) आशालता सखदेव
    
कु. मधुरा भोसले
सनातनच्या २० व्या संत पू. (सौ.) आशालता सखदेव (वय ८१ वर्षे) यांनी १७ ऑगस्ट या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात देहत्याग केला. त्यांच्या अंत्यसंस्कार विधीनंतर तिसर्‍या दिवशी केलेले अस्थिसंचयन आणि नंतर केलेले रक्षाविसर्जन या विधींचे सूक्ष्म-परीक्षण येथे देत आहोत. मागील रविवार, २५ ऑगस्ट या दिवशी दहनविधीमुळे झालेला सूक्ष्म स्तरावरील परिणाम, अस्थिसंचयनासाठी गेल्यानंतर जाणवलेली सूत्रे, सामान्य व्यक्तीचा अंत्यसंस्कार विधी आणि संत किंवा उन्नत यांचा अंत्येष्टी विधी हा भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.
५. पू. (सौ.) सखदेवआजी यांच्या अस्थींचा संचय करतांना 
आणि नंतर केलेल्या कृती अन् त्यांचा सूक्ष्म-परिणाम 
६. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे झालेल्या पू. सखदेवआजी यांच्या रक्षाविसर्जनाचे
 सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमातून केलेले सूक्ष्म-परीक्षण
     २२.८.२०१६ या दिवशी दुपारी पू. सखदेवआजींच्या अस्थींचे श्रीनृसिंहवाडी या तीर्थक्षेत्री त्यांच्या मुलाने (श्री. गुरुदत्त सखदेव यांनी) विसर्जन केले.

कायद्याचे पालन करणे आणि माणुसकी न शिकवणारे पोलीस प्रशिक्षण आता नको. हिंदु राष्ट्रात हे प्राधान्याने शिकवले जाईल. अशा गंभीर चुका करणार्‍यांना निलंबित करून आजन्म कारागृहात ठेवा, तरच इतर अधिकारी अशी चूक करणार नाहीत !

       कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वेषण (तपास) जमत नसेल, तर तसे सांगा; पण बॅलेस्टिक अहवालाचे कारण पुढे करून वेळकाढूपणा करू नका. तुमचा हा वेळकाढूपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा अत्यंत खरमरीत शब्दांत केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला (सीबीआयला) उच्च न्यायालयाने २९ सप्टेंबर २०१६ या दिवशी बजावले.
       या वेळी न्या. धर्माधिकारी विशेष तपास पथका (एस्आयटी)चे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांना म्हणाले, ज्यांची तपासणी केली जाते त्या साक्षीदारांची नावे आणि आरोपींची माहिती वृत्तपत्रात कशी छापून येते ? मी वृत्तपत्रांत ही वृत्ते वाचली आहेत. ती पोलीस अधिकार्‍याच्या नावानिशी दिली आहेत. साक्षीदार कोण तपासले आणि आरोपी कोणती माहिती देतो, असे तुमचा हवाला देऊन छापले जाते, हे कसे काय ?

फलक प्रसिद्धीकरता

सलमान खानच्या 
पंगतीतील पाकचे अभिनेते फवाद खान !
       चित्रपट निर्मात्यांची संघटना इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशनने (इम्पाने) पाकच्या कलाकारांवर बंदी घातली आहे. या विरोधात पाकचे अभिनेता फवाद खान यांनी बॉलिवूड कोणाच्या बापाचे नाही, अशी प्रतिक्रिया दिली. यावर इम्पाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Pak ke kalakaropar pratibandh par Pak ke abhineta Fawad Khan ne kaha, Bollywood kisike baapka nahi.
Aise kalakaroki filmoka ab bahishkar karo !
जागो ! : पाक के कलाकारों पर प्रतिबंध पर पाक के अभिनेता फवाद खान ने कहा, बॉलीवुड किसी के बाप का नहीं !
ऐसे कलाकारों की फिल्मों का अब बहिष्कार करो !
      स्वधर्म आणि स्वभाषा यांच्यामुळे मुसलमान जगभर दबाव आणू शकतात, तर स्वधर्म अन् स्वभाषा सोडल्यामुळे जगात काय भारतातही हिंदूंची किंमत शून्य झाली आहे !

सनातनच्या निरपराध साधकांवरील हा अन्याय लक्षात ठेवा !

       कोणताही गुन्हा केला नसतांना श्री. समीर गायकवाड यांना मागील १ वर्ष १३ दिवसांपासून, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ३ महिने २१ दिवसांंपासून कारागृहात डांबण्यात आले आहे.
       केवळ हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी सनातनच्या निरपराध साधकांना कारागृहात डांबणार्‍यांना हिंदु राष्ट्रात दामदुप्पटीने शिक्षा देण्यात येईल !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       हिंदु राष्ट्रात (सनातन धर्म राज्यात) नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींचा वापर केवळ धर्मशिक्षण आणि साधना यासंदर्भात केला जाईल. त्यामुळे गुन्हेगार नसतील आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी असतील.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

ज्ञानाचा वापर सुयोग्य करायला हवा !
   नुसते ज्ञान संपादन केले, तर त्याचा उपयोग होईलच, असे नाही. त्याचा सुयोग्य वापर करण्याचा चाणाक्षपणा आणि हुशारी नसेल, तर ते ज्ञान म्हणजे इंजिनविना असलेली गाडी !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
तीर्थयात्रा
      पंढरपूरला जाऊनसुद्धा पुन्हा आपल्याला परत येण्याची इच्छा होते; म्हणून म्हणतात, इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं ।
भावार्थ :
इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं । म्हणजे पंढरपूरला जाणार, या कल्पनेने वाट पहाण्यात जो आनंद आहे, तो प्रत्यक्ष पंढरपूरला गेल्यावर होत नाही; कारण तेथे गेल्यावर परत घरी यायची इच्छा होते. तसेच परमेश्‍वराच्या भेटीपेक्षा भेट होणार यात जास्त आनंद आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

सर्वधर्मसमभावाची निरर्थकता स्पष्ट करणारी हिंदु धर्म आणि निरनिराळे पंथ (धर्म) यांच्यातील तुलना !

देशभक्तांची देशभक्ती !

पाकिस्तानमध्ये मानवी बॉम्ब बनून घुसण्याची सिद्धता गुजरातच्या सुरत शहरातील शिवसैनिकांनी दाखवली आहे. पाकला समजेल अशा भाषेत त्याला उत्तर देण्याची ही सिद्धता आहे, असे या शिवसैनिकांना वाटते. उरी येथे पाकच्या आतंकवाद्यांनी आक्रमण केल्यावर त्या प्रसंगाला तोंड देतांना देशाचे १८ सैनिक नाहक हुतात्मा झाले, या गोष्टीमुळे या शिवसैनिकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी पाकला स्वतः प्रत्युत्तर देण्याचा निश्‍चय केला. त्यासाठी त्यांनी निवडलेला मार्ग म्हणजे मानवी बॉम्ब बनून कारवाई करणे ! तसे पहाता ही हिंदूंची संस्कृती नाही. तरीही देशासाठी प्राणाचीही पर्वा न करण्याची ही सिद्धता आहे. देशाला क्रांतीकारकांचा इतिहास आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी देशभक्तांनी त्या वेळी विविध प्रकारचे क्रांतीचे मार्ग पत्करले. त्यात त्यांनी प्राण गमावले. देशासाठी प्राण गमावले पण ते अजरामर झाले. मानवी जीवन जो देशासाठी समर्पित करतो, तो वीरपुरुष ठरतो.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn