Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

पाकने आक्रमणासाठी भारतातील महत्त्वाची ठिकाणे केली निश्‍चित !

पाकवर आक्रमण करावे कि करू नये, या विवंचनेत 
असलेल्या भारताच्या आधीच पाकने भारतातील कोणत्या 
ठिकाणांवर आक्रमण करावे, हे निश्‍चित केले आहे, यावरून 
पाकची सतर्कता आणि तत्परता भारत शिकेल तो सुदिन !
        नवी देहली - भारताने पाकिस्तानवर आक्रमण केले, तर भारतातील कोणत्या ठिकाणांवर आक्रमण करायचे याची सूची पाकने सिद्ध केली आहे, अशी माहिती पाकच्या प्रसारमाध्यमांकडून दिली जात आहे. तसेच भारताच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने संपूर्ण नियोजनही केले आहे.
        भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानवर आक्रमण करू शकतो, अशी भीती पाकिस्तानी राज्यकर्ते आणि सैन्याधिकारी यांच्या मनात निर्माण झाली आहे. अशा क्षणी भारताला योग्य उत्तर देता यावे यासाठी पाकने भारतातील काही महत्त्वाची ठिकाणे हेरून ठेवली आहेत. त्यासाठी आवश्यक सैन्य आणि शस्त्रास्त्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत, असे सैन्याने सिद्ध केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. (भारतासाठी ही चेतावणीच आहे. त्याला समर्थपणे तोंड देण्याची भारताची सिद्धता आहे का ? - संपादक)

(म्हणे) उरी येथील आक्रमण ही काश्मीरमधील अत्याचारांची प्रतिक्रिया ! - नवाज शरीफ यांचा कांगावा

पाकच्या सिंध आणि बलुचिस्तान येथील अत्याचारांच्याही 
अशा प्रतिक्रिया उमटू लागतील, हे पाकने लक्षात ठेवावे !
       इस्लामाबाद - गेल्या काही दिवसांत भारतीय सुरक्षा दलाच्या अत्याचाराचे बळी ठरलेल्या काश्मिरी नागरिकांच्या जवळच्या लोकांनी उरीमध्ये आक्रमण केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र भारत कोणत्याही चौकशी आणि पुराव्याव्यतिरिक्त थेट पाकला दोषी धरत आहे. हे वर्तन दायित्वशून्यतेचे आहे, असा कांगावा पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी केला आहे. ते लंडन येथे पत्रकारांशी बोलत होते.
       शरीफ पुढे म्हणाले की, काश्मिरी नागरिकांवर भारत सरकारकडून होणार्‍या अत्याचारांविषयी सगळे जग जाणत आहे. आतापर्यंत काश्मीरमध्ये १०८ लोक मारले गेले आहेत, तर १५० हून अधिक लोक घायाळ झाले आहेत. भारताने पाकला दोष देण्याआधी काश्मीरमधील अत्याचारांकडे पहावे. तेथील मृत्यूंची चौकशी करावी, असा सल्लाही शरीफ यांनी दिला.

सनातनला नाहक त्रास देणार्‍यांनी सनातनसमवेत हिंदुत्वनिष्ठ संघटना आहेत, हे विसरू नये ! - अधिवक्ता चेतन मणेरीकर, हिंदु विधीज्ञ परिषद

डावीकडून श्री. मनोज खाडये, अधिवक्ता श्री. शरदचंद्र मुंडरगी,
श्री. अभय वर्तक, अधिवक्ता श्री. चेतन मणेरीकर आणि श्री. व्यंकटेश शिंदे

        बेळगाव - डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या संदर्भात महाराष्ट्रातील अन्वेषण यंत्रणा पुरोगामी अन् हिंदुद्रोही यांच्या दबावाखाली सनातन संस्थेच्या साधकांना अटक करून त्यांचा नाहक छळ करत आहेत. या हत्येशी सनातनचा कोणताही संबंध नसतांना आणि अन्वेषणातून काहीही निष्पन्न झालेले नसतांना समीर गायकवाड यांचा एक वर्षाहून अधिक काळ अन् डॉ. वीरेंद्र तावडे यांनाही अटक करून त्यांचा छळ केला जात आहे. कर्नाटक पोलिसांनी प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येच्या सर्व शक्यतांचा सारासार विचार करून नि:पक्षपाती चौकशी करावी. केवळ दबावाखाली येऊन सनातनला नाहक त्रास देणार्‍यांनी सनातन संस्थेसमवेत समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आहेत, हे विसरू नये, असे परखड प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता श्री. चेतन मणेरीकर यांनी केले. ते येथील कन्नड साहित्य भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक, बेळगाव येथील आघाडीचे अधिवक्ता आणि भारतीय सेना दलातील निवृत्त कॅप्टन श्री. शरदचंद्र मुंडरगी, अभिनव हिंदु राष्ट्र संघटनेचे श्री. व्यंकटेश शिंदे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये उपस्थित होते.

पाक कलाकारांना देशातून हाकलून द्या ! - गायक अभिजीत भट्टाचार्य

पाक भारतावर सातत्याने आक्रमणे करत असतांना भारताने एक साधीशी निषेधाची कृती तरी करावी, अशी जनतेची रास्त अपेक्षा आहे !
 जे एका गायकाला वाटते, ते राजकारण्यांना का वाटत नाही ? 
      मुंबई, २४ सप्टेंबर - काश्मीरमधील उरी येथे आतंकवाद्यांनी आक्रमण केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांना देश सोडून जाण्यास सांगितल्यानंतर आता चित्रपटगायक अभिजीत भट्टाचार्य यांनीही ट्विटर या सामाजिक संकेतस्थळावर 'पाकिस्तानी कलाकारांना हाकलून द्या', अशी मागणी २३ सप्टेंबर या दिवशी केली आहे. 

पाकिस्तानी कलाकारांना संरक्षण देण्याचा मुंबई पोलिसांचा विचार, तर मनसेच्या कार्यकर्त्यांवर नजर !

देशात आणि राज्यात अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या होत असतांना त्यांना संरक्षण न देता पाकिस्तानी कलाकारांना संरक्षण देण्याचा विचार होतो, हे लक्षात घ्या !
 ही कृती म्हणजे हुतात्मा सैनिकांशी प्रतारणा नव्हे का ?
 आतंकवाद्यांऐवजी राष्ट्रप्रेमी कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवणारे मुंबई पोलीस !
      मुंबई, २४ सप्टेंबर - 'पाकिस्तानी कलाकारांनी येत्या ४८ घंट्यांमध्ये देश सोडून जावे, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने हुसकावून लावू', अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या सर्व हालचालींवर नजर ठेवली आहे. तसेच आवश्यकता भासल्यास पाकिस्तानच्या कलाकारांना पोलीस सुरक्षा पुरवण्यात येईल, असे मुंबई पोलिसांच्या कायदा-सुव्यवस्था विभागाच्या प्रमुखांनी स्पष्ट केले.

(म्हणे) धैर्य असेल, तर राज ठाकरेंनी आत्मघातकी पथके बनवून पाकिस्तानला पाठवावीत !

पाकप्रेमी अबू आझमींचे फुत्कार ! 
     नवी देहली - सरकारच्या अनुमतीने आलेल्या पाकिस्तानी कलाकारांना नाहक धमकावण्यापेक्षा धैर्य असेल, तर राज ठाकरेंनी आत्मघातकी पथके बनवून पाकिस्तानला पाठवावीत. कलाकारांना धमकी देणे हा मनसेचा राजकीय डाव आहे, असे फुत्कार समाजवादी पक्षाचे पाकप्रेमी अबू आझमी यांनी काढले आहेत. (अबू आझमी इतरांनाही स्वतःप्रमाणेच समजतात कि काय ? - संपादक) पाक कलाकारांनी ४८ घंट्यांत देश सोडावा अन्यथा त्यांना पळवून लावण्यात येईल, अशी धमकी मनसेने २३ सप्टेंबरला दिली होती. 

सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी दैनिक लोकमतचे संपादक, मालक, प्रकाशक आणि मुद्रक यांच्या विरोधात सनातन संस्थेचा मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दिवाणी दावा दाखल

        रामनाथी (गोवा), २४ सप्टेंबर (वार्ता.) - सनातन संस्थेच्या धर्मप्रसाराच्या समाजातील वाढत्या कार्याची व्याप्ती आणि संस्थेचा समाजात असलेला नावलौकिक माहिती असतांना संस्थेची अपकीर्ती करण्याच्या हेतूने दैनिक लोकमतचे संपादक राजू नायक यांनी सनातन्यांचे काय करावे ? या मथळ्याखाली संस्थेच्या विरोधात मानहानीकारक संपादकीय पणजी, गोवा येथून प्रकाशित होणार्‍या दैनिक लोकमतच्या गोवा आवृत्तीच्या ३ जून २०१६ या दिवशीच्या अंकात प्रसिद्ध करून संस्थेची मानहानी केली. त्यामुळे सनातन संस्थेची अपरिमित हानी झाली. त्यामुळे सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी संस्थेचे मानद कायदेविषयक सल्लागार श्री. रामदास केसरकर यांच्यामार्फत या दैनिकाचे संपादक, मालक, मुद्रक आणि प्रकाशक यांना १४.७.२०१६ या दिवशी कायदेशीर नोटीस बजावून मानहानी भरपाईपोटी १० कोटी रुपयांची मागणी केली होती; परंतु त्यांनी कायदेशीर नोटिशीतील संस्थेच्या मागणीची पूर्तता केली नाही. त्यामुळे सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते श्री. गजानन नाईक, श्री. नागेश ताकभाते, कु. दीपा तिवाडी आणि श्री. रामदास केसरकर यांच्यामार्फत दैनिक लोकमतचे संपादक राजू नायक, मालक लोकमत मिडिया प्रा. लि., मुद्रक आणि प्रकाशक बालाजी मुळे यांच्या विरोधात मानहानी भरपाईपोटी १० कोटी रुपये मागणीचा दिवाणी दावा फोंडा, गोवा येथील दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांच्या न्यायालयात प्रविष्ट केला आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमासमोरून दुचाकीवरून जातांना समाजकंटकांकडून अश्‍लाघ्य शिवीगाळ !

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील 
आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !
       रामनाथी (गोवा) - मंगळवार, २० सप्टेंबर २०१६ या दिवशी रात्री ९.१५ ते ९.३० या कालावधीत येथील सनातन आश्रमाच्या समोरील रस्त्यावरून जीए-०५-के-४४०५ या क्रमांकाच्या सुझुकी अ‍ॅक्सेस १२५ या बनावटीच्या पांढर्‍या रंगाच्या स्कूटरवरून दोन समाजकंटक सनातन बॉम्ब, सनातन कंडोम, असे मोठ्या आवाजात ओरडत गेले. १५ मिनिटांच्या कालावधीत ४ वेळा ते अशा प्रकारे ओरडत गेले. या संदर्भात आश्रम व्यवस्थापकांनी २१ सप्टेंबर या दिवशी फोंडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली होती. (गाडीचा क्रमांक देऊनही पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. पोलीस नेहमीप्रमाणे शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्‍लील बोलणे आणि दगडफेक करणे या गोष्टी अदखलपात्र ठरवून गप्प बसले असणार. या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल ! - संपादक) वाहतूक खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार समाजकंटक ज्या दुचाकी वाहनावरून ओरडत गेले, ती दुचाकी तुषार सावंत यांच्या मालकीची आहे.

सनातन संस्थेवर बंदी येऊ नये, यासाठी सर्व संप्रदायांनी रस्त्यावर उतरून विरोध करावा ! - ह.भ.प. प्रसाद महाराज बागुल

जळगाव येथे दोन दिवसीय प्रांतीय हिंदु अधिवेशन 
डावीकडून पू. नंदकुमार जाधव, कु. रागेश्री देशपांडे,
ह.भ.प. प्रसाद महाराज बागुल, ह.भ.प बाळासाहेब अनवर्देकर
     पाळधी (धरणगांव) - हिंदु राष्ट्रासाठी समर्पित भावाने कार्य करणे आवश्यक आहे. संस्कार नसल्यानेच हिंदु धर्माची वाईट स्थिती आहे. ध्येय ठेवून जगणारे लोक अल्प आहे. त्यामुळे सर्व हिंदूंनी धर्माची स्थिती सुधारण्यासाठी सर्वस्व पणाला लावणे आवश्यक आहे. संघर्ष केल्याविना हिंदु राष्ट्र येणार नाही. समष्टी साधना करतांना संप्रदायात अडकणे योग्य नाही. सनातन संस्था ही सर्वांना सामावून घेणारी संस्था असल्यामुळे संस्थेवर बंदी नको, यासाठी सर्व संप्रदायांनी रस्त्यावर उतरून विरोध करावा, असे मार्गदर्शन ह.भ.प. प्रसाद महाराज बागुल यांनी केले. येथील दोनदिवसीय प्रांतीय हिंदु अधिवेशनात ते बोलत होते. येथील साईबाबा मंदिर सभागृहात २४ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समिती आयोजित अधिवेशनास उत्साहात प्रारंभ झाला. 

फिलीपिन्स आणि रोमानिया यांना बसले भूकंपाचे धक्के !

     मनीला - फिलीपिन्सच्या मिंडानाओ बेटाला २४ सप्टेंबरच्या सकाळी भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ६.३ इतकी मोजली गेली. याचा केंद्रबिंदू समुद्रतळापासून ६९ कि.मी. खोल होता; मात्र सुनामी येण्याची शक्यता नाकारण्यात आली आहे. युरोपमधील रोमानियामध्येही या दिवशी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर हा धक्का ५.६ इतका मोजण्यात आला. भूकंप केंद्रबिंदू समुद्रतळापासून ९१.२५ किलो मीटर खोल असल्याने त्याच्यामुळे खूप हानी झाली नाही. 

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना

पोलिसांनी केलेल्या चौकशीची माहिती त्वरित दैनिक सनातन प्रभातला कळवा !
      डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांची ठिकठिकाणी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी प्रत्यक्ष बोलावून, घरी येऊन किंवा भ्रमणभाषवर संपर्क करून चौकशी केल्यास त्या चौकशीची माहिती (कोणत्या दिवशी चौकशी झाली, काय प्रश्‍न विचारले, पोलिसांचे नाव, पोलीस ठाणे, किती वेळा चौकशी केली आदी सर्व तपशील) नजीकच्या दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयात त्वरित पाठवावी. आपल्या जिल्ह्यातील साधक किंवा कार्यकर्ते यांनी झालेल्या चौकशीचा तपशील पाठवला आहे कि नाही, याचा जिल्हा समन्वयकांनी आढावा घ्यावा. 

अमेरिकेतील मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात ४ जण ठार !

     वॉशिंग्टन - येथील कास्केड मॉलमध्ये अज्ञात आक्रमणकर्त्यांनी केलेल्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मॉल रिकामा केला असून आक्रमणकर्त्यांचा शोध घेतला जात आहे. हिस्पॅनिक समुदायाच्या व्यक्तीकडून हा गोळीबार झाल्याचा संशय आहे. आक्रमणकर्त्याने करड्या रंगाचे कपडे परिधान केले होते. स्पेन किंवा स्पॅनिश भाषा बोलणार्‍या देशांशी संबंंधित असणार्‍या लोकांंना 'हिस्पॅॅनिक' असे संंबोधले जाते. हे लोक मध्य आणि दक्षिण अमेरिकेत रहातात.

हिंदूंच्या सणाच्या दिवशी ऑनलाईन मद्य विक्री करण्याचा निर्णय घेणारे माहिती महासंघाचे अध्यक्ष एम्. मेहबूब !

मुसलमान किंवा ख्रिस्ती यांच्या सणानिमित्त असा निर्णय कधी घेतला जातो का ?
     लोकांना सणाच्या दिवशी मद्यासाठी रांगा लावायला लागू नयेत; म्हणून केरळ शासनाच्या अखत्यारित असलेल्या सहकार महासंघाने ऑनलाइन मद्यविक्रीचा निर्णय घेतला असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष एम्. मेहबूब यांनी दिली. देहलीत प्रतिदिन सरासरी ४ महिलांवर बलात्कार !

       गेल्या ४ वर्षांत राजधानी देहली येथे प्रतिदिन सरासरी ४ महिलांवर बलात्कार, तर ९ महिलांचा विनयभंग होत असल्याचा अहवाल देहली पोलिसांनी प्रसिद्ध केला होता. १-२ मासांचे वय असणार्‍या मुलींवर अत्याचार होणे, ही तर विकृती आहे.

पाकला धडा शिकवण्यासाठी वर्ष १९६० चा सिंधू पाणीवाटप करार मोडण्याची देशवासियांकडून मागणी !

       १९ सप्टेंबर १९६० या दिवशी तत्कालीन पंतप्रधान नेहरू आणि पाकचे तत्कालीन राष्ट्रपती जनरल आयुब खान यांनी सिंधू पाणीवाटप हा करार केला होता. या करारानुसार जम्मू-कश्मीरमधून वहाणार्‍या सिंधू, झेलम, चिनाब, सतलज, व्यास आणि रावी या सहा भारतीय नद्यांचे पाणी पाकला देण्यात आले. या नद्यांचे ८० टक्के पाणी पाकड्यांना मिळते. या पाण्यावर पाकची बहुतांश शेती अवलंबून आहे. हे पाणी बंद केले, तर पाकला धडा शिकवता येईल. (देशाला काँग्रेसमुक्त करण्याचे ध्येय असणार्‍या सरकारने काँग्रेसने केलेले देशद्रोही करारही मुक्त म्हणजेच नष्ट करावेत ! - संपादक) पाकला पाणी जात असल्यामुळे जम्मू-कश्मीरची ६० सहस्र कोटी रुपयांची हानी होत आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

भारतीय वंशाचे जितेश गढीया यांच्याकडून ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डस्मध्ये ऋग्वेदावर हात ठेवून शपथ !

जितेश गढीया यांचे अभिनंदन !
      भारतीय वंशाचे जितेश गढीया यांनी ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डस्मध्ये भारताचा प्राचीन वैदिक ग्रंथ ऋग्वेदावर हात ठेवून शपथ घेतली. ते हाऊस ऑफ लॉर्डस्मधील सर्वांत अल्प वयाचे सदस्य आहेत. ब्रिटनच्या संसदेत नव्या सदस्यांना शपथ घेतांना बायबल व्यतिरिक्त दुसर्‍या एका धार्मिक ग्रंथाची निवड करण्याची अनुमती असते.

वाराणसीत हिंदु जनजागृती समितीने हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रसारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

  वाराणसी - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ सप्टेंबर या दिवशी शिवपूरमधील श्री रामलीला मैदानात हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त २२ सप्टेंबरला येथे प्रसारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची मागणी करण्याबरोबरच उरी येथील आक्रमणाचा निषेध करण्यात आला.
   २५ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता चालू होणार्‍या या सभेला धर्माभिमान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समितीचे श्री. नीलेश सिंगबाळ यांनी या वेळी केले. प्रसारफेरीमध्ये जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय आदी घोषणा देण्यात आल्या. या प्रसारफेरीमध्ये हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, अधिवक्ता विजय सेठ, अधिवक्ता अरुणकुमार मौर्य, अधिवक्ता संजिवन यादव, हिंदु युवा वाहिनीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. मनीष पाण्डेय, सनातन संस्थेचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि धर्माभिमानी सहभागी झाले होते.

हज यात्रेमध्ये मृत्यू पावलेल्या मुसलमानांच्या नातेवाइकांना १० लक्ष, तर हुतात्मा सैनिकांच्या नातेवाइकांना केवळ २ लक्ष रुपयांचे आर्थिक साहाय्य !

ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला सत्तेवर बसवणार्‍या बंगालमधील हिंदूंना
हे लज्जास्पद आहे ! बंगालमधील निद्रिस्त जन्महिंदू जागे होतील तो सुदिन !

ममता बॅनर्जी यांच्या सरकारकडून हुतात्मा सैनिकांचा अवमान !
    कोलकाता - बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उरी येथील सैनिकी मुख्यालयावरील आक्रमणात हुतात्मा झालेल्या राज्यातील २ सैनिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लक्ष रुपयांचे आर्थिक साहाय्य घोषित केले आहे. यावरून त्यांच्यावर सामाजिक संकेतस्थळांवरून टीकेची झोड उठली आहे.
    वर्ष २०११ मध्ये दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात विषारी दारूने बळी पडलेल्या १५० जणांच्या कुटुंबियांना ममता बॅनर्जी यांनी प्रत्येकी २ लक्ष रुपये साहाय्य दिले होते, तर सौदी अरेबियामध्ये हज यात्रेच्या वेळी झालेल्या अपघातात राज्यातील जे हज यात्रेकरू मृत्यूमुखी पडले होते, त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लक्ष रुपयांचे साहाय्य देण्यात आले होते.

राजधानी देहलीत होणारा 'पाकिस्तान एक्झिबिशन' कार्यक्रम रहित

     इस्लामाबाद - पाकने ऑक्टोबर महिन्यात भारताची राजधानी देहलीत होणारा आलीशान पाकिस्तान एक्झिबिशन कार्यक्रम रहित केला आहे. पाकच्या ट्रेड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीने म्हटले आहे की, 'भारत आणि पाक यांच्यातील सद्यस्थिती पहाता हे प्रदर्शन रहित करण्यात येत आहे'. २०१२ आणि २०१४ मध्ये असे प्रदर्शन भरले होते.

वाचकांना विनंती !

भारतातील पोलीस लाखो निरपराध्यांना छळतात ! अशांची नावे सनातन प्रभातला कळवा !
     पोलिसांनी गुन्हेगार म्हणून पकडलेले ९१ टक्के आरोपी निर्दोष सुटतात, असे गुन्हे अन्वेषण विभागाने प्रकाशित केलेल्या 'महाराष्ट्रातील गुन्हे २०१०' या अहवालातून उघड झाले आहे. यावरून असे लक्षात येते की, भारतातील पोलिसांनी अशा लाखो निरपराध्यांना गुन्हेगार ठरवून त्यांचा छळ केलेला असतो. निष्पाप असूनही पोलिसांचा छळ अनुभवणार्‍यांनी त्यांचे अनुभव (कोणत्या दिवशी चौकशी झाली, काय प्रश्‍न विचारले, पोलिसांचे नाव, पोलीस ठाणे, किती वेळा चौकशी केली आदी सर्व तपशील) सनातन प्रभातच्या कार्यालयात (पत्ता : सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा - ४०३ ४०१, फॅक्स : ०८३२ - २३१८१०८ किंवा इ-मेल dspgoa1@gmail.com) पाठवावेत. 
- संपादक

स्वतःचा देश सांभळता येत नसतांना म्हणे 'काश्मीर हवे' ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

      कोझीकोड (केरळ) - 'पाकव्याप्त काश्मीर तुमच्याकडे असूनदेखील तुम्ही ते सांभाळू शकत नाही, बलुचिस्तान, पख्तूनीस्तान, गिलगिट, हे प्रदेशही सांभाळू शकत नाही मात्र काश्मीरविषयी बोलून जनतेला भरकटवले जात आहे. जे घरात आहे ते तरी आधी सांभाळून दाखवा', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकवर टीका केली. ते येथे आयोजित सभेला मार्गदर्शन करतांना बोलत होते. 
मोदी यांच्या भाषणातील काही सूत्रे 
१. जगात कुठेही आतंकवादी आक्रमण झाले की, दुसर्‍या दिवशी आतंकवादी पाकिस्तानचे होते किंवा लादेनप्रमाणे पाकमध्ये जाऊन आश्रय घेतला, असे वृत्त समोर येते. 
२. भारत आतंकवादासमोर झुकला नाही आणि झुकणारही नाही. 
३. शेजारच्या देशातील नेते एक सहस्र वर्ष लढण्याची भाषा करायचे; पण काळानुसार कुठे गायब झाले कळतच नाही. 

गुणवत्ता हे एकच आरक्षण हवे ! - खासदार उदयनराजे भोसले

नाशिकमध्ये मराठा क्रांतीचा 
मूकमोर्चा, लक्षावधींची उपस्थिती !
        नाशिक, २४ सप्टेंबर - गुणवत्ता (मेरीट) हे एकच आरक्षण हवे. दुसरे आरक्षण लागू केले, तर प्रगती होणार कशी ? स्पर्धात्मक युगात टिकणार कसे, असे ठाम प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा येथील खासदार उदयनराजे भोसले यांनी येथील मराठा क्रांती महा मूक मोर्च्यानंतर गोल्फ क्लब येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर पत्रकार परिषदेत केले.
        मराठा क्रांती विराट मूक मोर्च्यामध्ये विविध तालुक्यांतून आलेले मराठा समाजातील शाळकरी विद्यार्थी, तरुण, तरुणी, महिला, वयोवृद्ध आदी लक्षावधी नागरिक सहभागी झाले होते. निषेधाचे फलक, भगवे ध्वज, काळे कपडे या गोष्टींमुळे या मोर्च्याने लक्ष वेधून घेतले. कोपर्डी येथील बलात्काराच्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी आदी विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

सनातनच्या निरपराध साधकांवरील हा अन्याय लक्षात ठेवा !

     कोणताही गुन्हा केला नसतांना श्री. समीर गायकवाड यांना मागील १ वर्ष ६ दिवसांपासून, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ३ महिने १५ दिवसांंपासून कारागृहात डांबण्यात आले आहे. 
 केवळ हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी सनातनच्या निरपराध साधकांना कारागृहात डांबणार्‍यांना हिंदु राष्ट्रात दामदुप्पटीने शिक्षा देण्यात येईल !

पंतप्रधान मोदी यांची तिन्ही दलांच्या प्रमुखांसमवेत बैठक !

        नवी देहली - उरी येथील आतंकवादी आक्रमणानंतर पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताची सिद्धता चालू आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ सप्टेंबरला सैन्यदल प्रमुख दलबीरसिंह सुहाग, नौदल प्रमुख सुनील लांबा आणि वायूदल प्रमुख अरुप राहा यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांच्या ७, लोककल्याण मार्ग या निवासस्थानी ही बैठक झाली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही या वेळी उपस्थित होते.

उमरखेड (जिल्हा यवतमाळ) येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक !

      अनंतचतुर्दशीच्या दिवशी उमरखेड येथील शिवाजी वॉर्ड परिसरातील छावा गणेशोत्सव मंडळाची श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक शहरातील रोहिलीपुरा या भागात आल्यावर मिरवणुकीवर दगडफेक चालू झाली. यात तीन पोलिसांसह १५ भाविक घायाळ झाले.

जळगाव येथे पोलीस प्रशासनाकडून हिंदुत्वनिष्ठांना गणेशभक्तांचे प्रबोधन करण्यासही मज्जाव !

     जळगाव येथील सागर पार्क मैदानाच्या आजुबाजूला थांबून गणेशभक्तांचे प्रबोधन करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना थांबवत पोलीस कर्मचार्‍यांनी अनुमती काढली आहे का ?, अशी विचारणा केली, तसेच सर्व हिंदुत्वनिष्ठांचे संपूर्ण नाव, संपर्क क्रमांक आणि पत्ता नोंदवून घेतला. त्यात त्यांनी महिला कार्यकर्त्यांचीही माहिती घेतली. काही पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांच्या भ्रमणभाषवरून महिला कार्यकर्त्यांचेही छायाचित्रण केले. (पोलिसांनी अशीच कार्यतत्परता मदरसे आणि धर्मांधांच्या संघटना यांच्या संदर्भात दाखवल्यास देशातील आतंकवादी कृत्यांना आळा बसेल ! - संपादक)

पुणे येथे विसर्जन घाटांवर हिंदु जनजागृती समितीच्या वैध मोहिमेस पोलिसांचा विरोध !

पोलिसांनी प्रबोधन मोहीम थांबवण्यास सांगितली ! 
      हिंंदु जनजागृती समितीच्या वतीने अनंतचर्तुदशीच्या दिवशी प्रतिवर्षीप्रमाणे पुणे शहरातील घाटांवर आदर्श गणेशोत्सव मोहीम राबवण्यात आली. समितीच्या प्रबोधनानंतर भाविकांना श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याकडे पुष्कळ कल वाढला. महानगरपालिकेने बांधलेले हौद ओस पडू लागल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यानंतर डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी अन्य पोलिसांसमवेत येऊन मोहिमेस विरोध करून ती थांबवण्यास सांगितले. (पोलिसांच्या अशा मनमानी आणि अन्याय्य वर्तणुकीमुळेच सर्वसामान्यांना त्यांचा आधार वाटत नाही ! - संपादक) 
      भिडे पूल येथे समितीचे कार्यकर्ते प्रबोधनात्मक फलक हातात धरून, तसेच उद्घोषणा करून भाविकांना धर्मशास्त्र सांगून श्री गणेशमूर्तींचे नदीमध्ये विसर्जन करण्याचे आवाहन करत असतांना तेथील महिला पोलिसाने समितीच्या कार्यकर्त्यांना उद्घोषणा करणे थांबवण्यास सांगितले.

पोलिसांविषयी असलेल्या जनभावना पोलीस दल समजून घेईल का ? - श्री. विद्याधर सराफ, नाशिक

अ. पोलिसांनी केलेल्या छळाची वृत्ते वाचून ऋषि-मुनी आणि भक्त यांनी भोगलेल्या छळाची आठवण येते ! 
      सनातनचे साधक असो, साध्वी प्रज्ञासिंह असो, प.पू. आसारामजी बापू असोत, ही सूची आता वाढतच चालली आहे. या सर्वांच्या केलेल्या छळाची वर्णने वाचली की, पुराणात ऋषि-मुनी आणि भक्त यांचा असुरांनी केलेला छळ आठवतोे. साधकांना छळणे ही पोलिसांची विनाशकाले विपरीतबुद्धिः । आहे, असे म्हणावे लागेल. 
आ. पोलिसांना जनता मित्र मानत नाही, हेच सत्य !
      शिक्षण आणि संस्कार या दोन्ही गोष्टींची वानवा असलेल्या पोलीस खात्याकडून आता जनतेला काहीच अपेक्षा राहिलेल्या नाहीत. पोलिसांना कोणी मित्र म्हणणे शक्य नाही. अर्थात् बर्डस् ऑफ सेम फेदर फ्लॉक टुगेदर (समान चारित्र्य असलेल्यांमध्ये मैत्री होते.) या म्हणीप्रमाणे यांचे मित्रही यांच्याच विचारांचे असणार, हे वेगळे सांगायला नको.

पोलीस हिंदूंचे रक्षक कि भक्षक ? - श्री. श्रीपाद शंभूप्रसाद पांडे, तालुका अध्यक्ष, विश्‍व हिंदु परिषद, धरणगाव, जळगाव

       पोलीस म्हटले म्हणजे कायद्याचे काटेकोर पालन करणारे, शीस्तप्रिय आणि सत्याची बाजू घेणारे कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची ओळख होती; परंतु आजकाल पोलिसांचे काम हे चोर सोडून संन्याशाला फाशी आणि दाम करी काम या म्हणींप्रमाणे चालू आहे, हे नागरिक आणि हिंदू यांना पदोपदी अनुभवायला मिळते. आजचे पोलीस हे कोणत्याही गुन्ह्याचे तपासकाम अयोग्य दिशेने, कायद्याच्या चौकटीत न राहता आणि घडलेल्या गुन्ह्याचा सखोल तपास न करता करत असतात. त्यामुळे मालदार असलेले आणि राजकीय नेत्यांशी संबंध असलेले खरे गुन्हेगार राजरोस फिरतात, तर गरीब आणि निर्दोष हिंदु धर्माभिमानी व्यक्तींना खोट्या स्वरूपाच्या गुन्ह्यांना तोंड देऊन बळी पडावे लागते. निष्पाप आणि निर्दोष व्यक्तींनी कोणताही गुन्हा केलेला नसतांना आणि निर्दोष असतांनाही पोलीस कोठडीत रहावे लागते आणि पोलीस कोठडीत पोलिसांच्या अत्याचाराला देखील सामोरे जावे लागते.

दोन वासरांना धर्मांधांपासून वाचवून त्यांना गोशाळेत घेऊन जाण्यासाठी दिला लढा !

कल्याण येथील हिंदुत्वनिष्ठांची अभिनंदनीय कृती !
   कल्याण, २४ सप्टेंबर (वार्ता.) - येथील भाजपचे शहराध्यक्ष श्री. उपेंद्र डहाके यांनी पुढाकार घेऊन पोलिसांच्या साहाय्याने दोन वासरांना गोशाळेत पाठवून त्यांचे प्राण वाचवले आहेत. या वेळी दोन हवालदारांनी धर्मांधांच्या बाजूने भूमिका घेऊनही उपनिरीक्षिका सौ. प्रिया कटके यांनी केलेल्या चांगल्या सहकार्यामुळे वासरांना गोशाळेत पाठवणे शक्य झाले.
१. येथील एक हिंदुत्वनिष्ठ श्री. नीलेश कुलकर्णी यांना आग्रा रोड येथे दोन वासरे दिसल्यावर त्यांनी भाजप शहराध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके यांना कळवले. डॉ. डहाके यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात याविषयी लिखित अर्ज दिला.
२. तेथील पोलीस उपनिरीक्षिका सौ. प्रिया कटके यांनी दोन पोलीस हवालदारांना त्या ठिकाणी जाऊन वासरे पाहून पोलीस ठाण्यात त्यांच्याविषयी कळवण्यास सांगितले.
३. घटनास्थळी वासरांना पाहून त्या पोलीस हवालदारांनी आपसात चर्चा केली आणि काही वेळात ते घोड्याला बांधायचा पट्टा जवळ असलेल्या दोन मुलांना घेऊन आले. त्या मुलांना पाहून दोन्ही वासरे दुर्गडीच्या दिशेने पळत सुटली.

एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात सनातन संस्थेच्या प्रवक्त्यांना विषय पूर्ण करू न देणारे वाहिनीचे सूत्रसंचालक !

       एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीवरील पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाविषयीच्या चर्चासत्रात सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक कृत्रिम तलावातील मूर्ती विसर्जनाचे वास्तव सांगत असतांना सूत्रसंचालक मयुरेश कोण्णूर यांनी त्यांना थांबवून विषय दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. (यावरून हिंदूंचे प्रबोधन होऊन त्यांनी धर्माचरण करू नये, असे कोण्णूर यांना वाटते का ? - संपादक) महाराष्ट्रात गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत १५ मृत्यूमुखी

१. विसर्जनाच्या वेळी महाराष्ट्रात विविध घटनांमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण बेपत्ता झाले. 
२. जुन्नर येथील सदाबाजारमध्ये अनंतचतुर्दशीच्या आदल्या रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास माही मोहल्ल्यामधून काही धर्मांधांनी दगडफेक केली. 
३. मुंबई आणि पुणे येथे गणेशोत्सव मंडळांच्या अनेक घंट्यांच्या विसर्जन मिरवणुका काढल्यामुळे काही ठिकाणी वाहतूककोंडीही झाली. 
४. श्रीगणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत पुण्यातील कँटोन्मेंट बोर्ड येथील भाजपचे नगरसेवक विवेक यादव यांच्यावर गोळीबार झाला. यात श्री. यादव यांच्या तोंडाला गोळी घासून गेल्याने ते घायाळ झाले. 
५. श्रीगणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या वेळी अलका चित्रपटगृह परिसरात पोलीस हवालदार विजयकुमार पाटणे यांना मारहाण होण्याची घटना घडली. 
६. पुण्यात विसर्जनाच्या दिवशी बेलबाग चौक ते अलका चौक या परिसरात १ सहस्रांहून अधिक भ्रमणभाष चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आल्या.

लातूर शहराचा दुष्काळ पूर्णत: दूर होत असल्याचे चित्र

        लातूर, २४ सप्टेंबर - लातूर शहराला गेली ३ वर्षे सातत्याने दुष्काळाला सामोरे जावे लागले होते. यंदाच्या वर्षी लातूर शहराला रेल्वेद्वारेही पाणीपुरवठा करावा लागला होता. सध्याच्या स्थितीमध्ये शहराचा दुष्काळ पूर्णत: दूर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सरासरीच्या १०५ टक्के पाऊस नोंदवण्यात आला असून नदी-नाले दुथडी भरून वहात आहेत. उत्तरा नक्षत्रात प्रतिदिन पाऊस पडत असल्यामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी शेतशिवाराची अवस्था झाली आहे. लातूर जिल्हयाच्या इतिहासात आतापर्यंत परतीचा पाऊस इतक्या प्रचंड प्रमाणात कधीही झालेला नव्हता.

काश्मिरी हिंदूंचा आवाज बुलंद करण्यासाठी आयोजित हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्याचा पुणे येथील राष्ट्रप्रेमी हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

हुतात्मा झालेल्या भारतीय सैनिकांना नामजप करून
श्रद्धांजली अर्पण करतांना राष्ट्रप्रेमी नागरिक
श्री. राहुल कौल (बोलतांना) आणि बसलेले (डावीकडून) श्री. सुनील घनवट,
अधिवक्ता श्री. देवदास शिंदे, श्री. अभिजीत देशमुख
सभा यशस्वी करण्यासाठी गटचर्चेच्या माध्यमातून
नियोजनात सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ
पुणे, २४ सप्टेंबर (वार्ता.) - विश्‍वभरातील कोणत्याही देशात देशवासियांनाच निर्वासिताचे जिणे जगण्याची वेळ आली नसेल; पण ही दुर्दैवी स्थिती बहुसंख्य हिंदू असलेल्या हिंदुस्थानात हिंदूंच्या वाट्याला आली आहे. पृथ्वीचे नंदनवन समजले जाणारे काश्मीर पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच धुमसत असून तेथील हिंदूंना प्रतिदिन जिहादी आतंकवादाचा सामना करावा लागत आहे. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे, तसेच धर्मबांधवांविषयीच्या भावना बोथट झाल्याने हा प्रश्‍न अजूनही चिघळतोच आहे. एकीकडे ही स्थिती असतांना दुसरीकडे हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी अनेक राष्ट्रप्रेमी हिंदुत्वनिष्ठांची देशव्यापी चळवळ चालू आहे. या निमित्ताने हिंदु राष्ट्र स्थापनेतील महत्त्वाचा टप्पा म्हणून काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समिती, पनून कश्मीर, काश्मिरी हिंदु महासभा आणि लष्कर-ए-हिंद यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात विविध ठिकाणी धर्मजागृती सभांचे आयोजन करण्यात येत आहे. पुण्यातही २३ ऑक्टोबरला विराट हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

राजस्थान येथील सवाई माधोपूर येथील त्रिनेत्र गणेशाच्या दर्शनाला गेल्यावर लक्षात आलेले उत्सवांचे बीभत्स रूप आणि धर्मशिक्षणाची लक्षात आलेली आवश्यकता !

जत्रेत भुतांच्या प्लास्टिकच्या काळ्या मुखवट्यांची 
मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत होती
पाणी पिऊन आणि खाऊ खाऊन कागदाचा आणि 
प्लास्टिकच्या पेल्यांचा लोकांनी रस्त्यावरच केलेला कचरा

दैनिक सनातन प्रभात वाचल्याने सनातनचे कार्य आणि साधक यांच्याविषयी नागपूर येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. वामनराव जोशी यांच्यात झालेला सकारात्मक पालट !

पू. नंदकुमार जाधव
      नागपूर येथील हिंदुत्वनिष्ठ प्रा. श्री. वामनराव जोशी दैनिक सनातन प्रभातचे वाचक आहेत. त्यांची भेट झाल्यावर जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.
१. दैनिक सनातन प्रभातमधील लिखाण पटू लागल्याने त्यामधील 
सूत्रे संघटनेतील व्यक्तींना सांगणे आणि विशेषांक परिचितांना देणे
      श्री. वामनराव जोशी यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य आवडू लागले. त्यांना दैनिक सनातन प्रभातधील लिखाण पटू आणि आवडूही लागले. पूर्वी त्यांचे मत फारसे अनुकूल नव्हते; परंतु आता ते या विषयी पुष्कळ सकारात्मक झाले आहेत. ते प्रतिदिन त्यांच्या कार्यालयात दैनिक सनातन प्रभात घेऊन जातात. ते त्याचे वाचन करतात आणि त्यातील सूत्रे इतरांनाही सांगतात. ते दैनिक सनातन प्रभातच्या प्रत्येक विशषांकाचे २५ अंक घेऊन त्यांच्या परिचितांना देतात.

लोकांना मद्यपी बनवणारे केरळमधील कम्युनिस्ट सरकार !

श्रीमती रजनी नगरकर
१. केरळमध्ये ओणम् या सणापासून सणांच्या वेळी 
ऑनलाइन मद्य उपलब्ध करून देणारे कम्युनिस्ट सरकार !
      २०.८.२०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये आलेली वार्ता वाचून मला आश्‍चर्याचा धक्का बसला. कलियुगातील आईसुद्धा मुलांसाठी करणार नाही, ते केरळमधील कम्युनिस्ट सरकार करत आहे. किती कौतुक (?) करावे या कम्युनिस्ट सरकारचे ! या कम्युनिस्ट सरकारने केले तरी काय कौतुक करण्यासारखे ? अहो, केरळमध्ये ओणम् या सणापासून कम्युनिस्ट सरकारची योजना काय, तर सणांच्या वेळेस ऑनलाइन मद्य उपलब्ध होणार (इंटरनेटद्वारे मद्याची मागणी करायची आणि ते घरपोच मिळवायचे) ! आहे कि नाही गोड आणि आश्‍चर्यकारक वार्ता ! असे आहे आताच्या मुलांची काळजी (?) घेणारे आणि त्यांना काय हवे ते सहजतेने उपलब्ध करून देणारे सरकार !

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

       सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वी पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे क्रमशः प्रसिद्ध करत आहोत.
बळजोरीने आणि आक्रमकरित्या प्रश्‍न विचारल्याने 
शारीरिक अन् मानसिक स्थिती बिघडलेल्या साधकाच्या 
मृत्यूला कारणीभूत ठरलेले एका अन्वेषण यंत्रणेचे अधिकारी !
१. पोलिसांच्या अनावश्यक प्रश्‍नांमुळे चौकशी झालेल्या साधकाची शारीरिक आणि मानसिक स्थिती खालावत जाऊन तो अंथरुणाला खिळणे : फेब्रुवारी २०१२ मध्ये एका साधकाला मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या त्याच्या नातेवाइकाविषयी चौकशीच्या उद्देशाने ३ वेळा दूरभाष आला. पोलिसांच्या अनावश्यक आणि आक्रमकरित्या विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांमुळे त्या साधकाची शारीरिक आणि मानसिक स्थिती खालावत गेली अन् ते अंथरुणाला खिळून राहिले. रुग्णाईत असल्यामुळे त्यांना बोलताही येत नव्हते.

बहुजनांनो, कुणीही हाका, अशी मेंढरे बनू नका !

अधिवक्ता योगेश
जलतारे
        मथळ्यात बहुजन असा शब्दप्रयोग वाचताच अनेकांच्या भुवया उंचावतील की, हा लेख कुणा ब्राह्मणवाद्याचा आणि समाजातील पुरोगामी विचारवाल्यांसाठी असेल; परंतु बंधूंनो, येथे बहुजन हा शब्द संख्येने बहुल असलेल्या हिंदूंसाठी वापरत आहे, हे सुस्पष्ट असावे, असो. अलीकडे सर्वच वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे यांद्वारे सनातनविरोधी बातम्या प्रसृत केल्या जात आहेत. पूर्वी साध्वी प्रज्ञासिंह यांना अटक झाल्यावर त्यांच्याविषयी चालू होत्या. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापूंविषयी तर वृत्तवाहिन्यांनी बरीच गरळओक केली आहे. या बातम्यांचा प्रतिवाद करणे किंवा सनातनची किंवा अन्य संत-महात्मे यांची बाजू मांडणे, हा या लेखाचा उद्देश नाही; मात्र प्रसारमाध्यमे समाजाला दिशादर्शन करणारी असल्याने त्याविषयी साकल्याने विचार होणे आवश्यक होते.

पंतप्रधानांना मंत्र्यांना असे सांगावे लागते, हे लज्जास्पद !

     काश्मीरमधील उरी येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात १८ सैनिक मृत्यूमुखी पडले. त्यानंतर संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी त्यांच्या गोव्यातील भेटींना आळा घालून देशाच्या सीमांचा विकास करण्यावर भर द्यावा, अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली.


भारतीय शास्त्रीय संगीत कलाकारांची दयनीय स्थिती

श्री. गिरीजय प्रभुदेसाई
     मी मागील १५ वर्षांपासून तबलावादन करत असल्याने मी शास्त्रीय संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. या कालावधीत मला अनेक प्रसिद्ध कलाकारांसमवेत रहाण्याची संधी मिळाली. त्यामुळे माझ्या लक्षात आलेली शास्त्रीय संगीतातील कलाकारांची दयनीय स्थिती येथे देत आहे.
१. एका प्रसिद्ध तबलावादकांना 
व्यसनामुळे तबला वाजवता न येणे 
      एका सुप्रसिद्ध तबलावादकांकडे मी तबला शिकत होतो. एक दिवस त्यांच्याशी वार्तालाप करतांना मला असे कळले की, पूर्वी एक प्रसिद्ध तबलावादक होते. आता दारूचे व्यसन लागल्याने त्यांना पूर्वीसारखा तबला नीट वाजवता येत नाही.

जुगाराला प्रोत्साहन देणारे सरकार कधी जनतेचे हित करील का ?

     कॅसिनोला आम्ही वर्ष २००७ मध्ये विरोध दर्शवला होता; परंतु त्यानंतर काँग्रेस शासनाने राज्यात ६ कॅसिनोंना अनुज्ञप्ती दिल्याने कॅसिनो राज्य कारभारातील एक भाग झाला आहे. यानंतर वर्ष २०१२ मध्ये भाजप शासन सत्तेवर आले; मात्र आता कॅसिनो व्यवसाय चालू ठेवणेच योग्य आहे. - संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि माजी मुख्यमंत्री, गोवा

६ वर्षांनी जामीन हे भारताला लज्जास्पद !

      वर्ष २००७ मध्ये झालेल्या समझौता एक्स्प्रेस स्फोटाच्या प्रकरणातील संशयित आरोपी स्वामी असीमानंद यांना १६ सप्टेंबरला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने जामिनावर मुक्त केले. त्यांना डिसेंबर २०१० मध्ये अटक करण्यात आली होती.

पुणे महानगरपालिकेतील उत्तरदायींना हिंदु राष्ट्रात आयुष्यभर साधना करून विषय समजून घेण्यास सांगण्यात येईल !

अ. जलप्रदूषणाच्या बागुलबुव्याला घाबरत पुणे महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात कृत्रिम हौदांचा प्रचार केला. कृत्रिम हौदातील गणेशमूर्तींचे पुढे काय करायचे ? छोट्याशा हौदात शेकडो गणेशमूर्ती विरघळू शकतील का ? या प्रश्‍नांची कोणतीही समाधानकारक उत्तरे महानगरपालिकेकडे नव्हती. 
आ. महानगरपालिकेने कृत्रिम हौदांच्या एक पाऊल पुढे जात अमोनियम बायकार्बोनेटमध्ये गणेशमूर्ती विरघळवा असा अजब पर्याय उपलब्ध करून दिला.
इ. त्यामुळेच अमोनियम बायकार्बोनेटचा प्रचार अचानकपणे भित्तीपत्रके, हस्तपत्रके आदी माध्यमातून करण्यामागे नक्कीच गहन अर्थ असायला हवा. हा अर्थ शोधून काढल्यास महानगरपालिकेचे आणखी कारनामे समोर येऊ शकतील.
ई. नदीमध्ये गणेशमूर्ती विसर्जित करू पहाणार्‍या भाविकांची गैरसोय होईल, यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न केले.


भारताकडे अण्वस्त्रे असतांना पाकिस्तानी घाबरत नाहीत, मग भारतीय का घाबरतात ?

      उरी येथील आत्मघातकी जिहादी आक्रमणाविषयी जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने वाचकांकडून ऑनलाईन जनमत घेतले. यात सुमारे २७ टक्के म्हणजे २७ सहस्र ५०० लोकांनी मात्र सैन्य कारवाईच्या विरोधात मत व्यक्त करून जगातील इतर देशांच्या साहाय्याने पाकिस्तानला वेगळे पाडावे, असे सुचवले. ४.६ टक्के लोकांनी सैन्य कारवाईत धोका असला, तरी काहीतरी उत्तर देणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे; मात्र आण्विक शस्त्रे असलेल्या पाकशी युद्ध करण्यास विरोध केला. ४ टक्के लोकांनी पाकला चेतावणी देऊन त्याच्याशी बोलणी करावीत, असे सुचवले.

तस्करांना रोखू न शकणारे सीमा सुरक्षा दल कधी आतंकवाद्यांना रोखू शकेल का ?

      सीमा सुरक्षा दलाच्या माहितीनुसार बांगलादेशच्या सीमेवरून प्रतिवर्षी भारतातून साडेतीन लाख गायींची तस्करी केली जाते. प्रतिवर्षी या व्यवसायाची उलाढाल १५ सहस्र कोटी रुपयांची आहे. बंागलादेशात भारतीय गायींची मागणी अधिक असल्याने त्यांच्यासाठी पाहिजे ते मूल्य दिले जाते.

पक्षनिष्ठा नसलेल्यांमध्ये कधी राष्ट्रनिष्ठा असेल का ?

      अरुणाचल प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या ४५ पैकी ४४ आमदारांनी बंड पुकारत पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमध्ये (पीपीएमध्ये) प्रवेश केला.

हिंदु जनजागृती समितीचा केरळ राज्याचा सप्टेंबर २०१६ च्या दुसर्‍या सप्ताहातील प्रसारकार्याचा आढावा !

१. गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवचने, फ्लेक्स फलक आणि ध्वनीचित्र-चकती
यांद्वारे समितीचे कार्यकर्ते अन् धर्माभिमानी यांनी केलेली जनजागृती ! 
 १ अ. एर्नाकुलम् : जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने २ ठिकाणी प्रवचने झाली.
१ आ. एरूर : येथे एका धर्माभिमान्याने त्यांच्या घराजवळ सार्वजनिक गणपतीची स्थापना केली होती. तेथे त्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना प्रवचन करण्यास सांगितले. समितीच्या कार्यकर्त्यांनी श्री गणपति आणि गणेश चतुर्थी याविषयी उपस्थितांना माहिती दिली. याचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला. तेथे धर्मशिक्षण देणार्‍या फ्लेक्स फलकांचे प्रदर्शनही लावले होते. गणेश विसर्जनाच्या वेळी धर्माभिमान्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना आरती करण्यास सांगितले.
१ इ. मट्टांचेरी : १४.९.२०१६ या दिवशी महाराष्ट्र मंडळाने मट्टांचेरी येथील श्रीकृष्ण मंदिरात समितीच्या कार्यकर्त्यांना श्री गणपतीचे आणि देवतांचे विडंबन रोखणे याविषयी माहिती सांगण्यास सांगितली.
     भारत हे जगाचे देवघर आहे; मात्र इथला हिंदु विकलांग, भ्रष्ट आणि दुर्बल झाला आहे. स्वत्व, आत्मभान आणि राष्ट्रीयत्व गमावलेल्या हिंदूंना जागे करावे लागेल. हिंदुत्व हा आपला प्राण आहे. हिंदु समाजावरील आक्रमण थांबवण्यासाठी हिंदु समाज बलवान होण्याची गरज आहे. असे झाले, तरच भारत पुन्हा जगद्गुरुपदी विराजमान होईल !
- श्री. अरविंदराव हर्षे, निवृत्त प्राचार्य, पुणे.

महालय श्राद्धाचा श्राद्धकर्त्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

    भाद्रपदातील कृष्ण पक्षात (पितृपक्षात) पितरांचे महालय श्राद्ध केले असता ते वर्षभर तृप्त रहातात, अशी मान्यता आहे. यावर्षी १७ ते ३०.९.२०१६ हा पितृपक्षाचा काळ आहे. या काळात केलेल्या महालय श्राद्धाचा श्राद्ध करणार्‍यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे. 
१. वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश
     पितृपक्षात महालय श्राद्ध करणे श्राद्धकर्त्या व्यक्तीसाठी लाभदायक आहे का ?, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासणे, हा या चाचणीचा उद्देश आहे.
२. चाचणीचे स्वरूप
     या चाचणीत एका साधकाची २२.९.२०१६ या दिवशी महालय श्राद्ध करण्यापूर्वी आणि श्राद्ध केल्यानंतर यू.टी.एस्. या उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या दोन्ही निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
३. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती
३ अ. श्राद्धकर्ता (चाचणीत सहभागी झालेला) साधक : आपल्या पितरांसाठी श्राद्ध करणारा तो श्राद्धकर्ता होय. चाचणीत सहभागी झालेला श्राद्धकर्ता साधक (श्री. शॉन क्लार्क) गेल्या १० वर्षांहूनही अधिक काळापासून साधना करत आहे.
३ आ. श्राद्धाचे पौरोहित्य करणारे पुरोहित : श्राद्धकर्ता, श्राद्धासाठी वापरलेली सामुग्री आणि श्राद्ध करणारा पुरोहित सात्त्विक असल्यास श्राद्धविधीची परिणामकारकता सर्वाधिक असते. या श्राद्धाचे पौरोहित्य सनातन-साधक पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी केले होते. ते नियमित साधना करत असल्याने सात्त्विक आहेत.

श्राद्धकर्माचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व सांगणारे सनातनचे ग्रंथ !

अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण करण्याचा उपाय !
श्राद्ध (भाग १) 
महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन
१. श्राद्धामुळे पूर्वजांना गती कशी मिळते ?
२. श्राद्धामुळे पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण कसे होते ?
३. श्राद्ध कोणी, कधी आणि कोठे करावे ?
४. पितृपक्षात श्राद्ध केल्याने काय लाभ होतो ?
५. कावळा पिंडाला शिवणे, यामागील शास्त्र काय ?
श्राद्धविधीमागील शास्त्र समजून घेऊन तो भावपूर्ण करा !
श्राद्ध (भाग २) 
कृतींमागील अध्यात्मशास्त्र
१. श्राद्धात जानवे उजव्या खांद्यावरून (अपसव्य) का घालतात ?
२. श्राद्धात ब्राह्मणांना दिलेले अन्न पितरांपर्यंत कसे पोचते ?
३. श्राद्धात अर्पण करण्यात येणारे पिंड गर्भवतीने का पाहू नयेत

तिसरे महायुद्ध केव्हा होईल ?

     एका मोठ्या शास्त्रज्ञाला एका माणसाने सहज विचारले, तिसरे महायुद्ध केव्हा होईल ? तो शास्त्रज्ञ म्हणाला, मी तिसर्‍या महायुद्धाविषयीचे भविष्य सांगू शकणार नाही; पण चौथ्या महायुद्धाविषयीचे खात्रीशीर भविष्य सांगू शकेन.
     प्रश्‍न विचारणार्‍या त्या माणसाला मोठे आश्‍चर्य वाटले. तो उत्सुकतेने म्हणाला, शास्त्रज्ञसाहेब, हे तुमचे म्हणणे अजबच आहे. चौथ्या महायुद्धाविषयीचे तुमचे भविष्य अगदी खात्रीचे असेल, तर मला सांगाच !
     शास्त्रज्ञ गंभीर तोंडवळ्याने म्हणाला, चौथे महायुद्ध होणार नाही, हेच चौथ्या महायुद्धाचे
     भविष्य ! कारण तिसरे महायुद्ध झाल्यावर चौथे युद्ध करायला कुणी उरणारच नाही !
(संदर्भ : मासिक धार्मिक, वर्ष १६, अंक २, फेब्रुवारी १९८४)

दैनिक सनातन प्रभात वाचून त्यातून साधनेसाठी मार्गदर्शन घेणार्‍या शासकीय अधिकारी !

       एका राज्यातील सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे विभागातील (पी.डब्ल्यू.डी.मधील) संचालिकेकडे मी दैनिक सनातन प्रभातमधील विज्ञापनावर स्वाक्षरी घेण्यासाठी गेलो होतो. मी त्यांना माझी ओळख करून दिल्यावर त्यांच्यात आणि माझ्यात पुढील संवाद झाला.
१. दैनिकातील लिखाण वाचून स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करणे
     संचालिका : मी दैनिक सनातन प्रभातची वाचक आहे. त्यातून मला चांगले मार्गदर्शन मिळत आहे. दैनिकातील लिखाण वाचून मी माझ्यातील स्वभावदोषांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करत आहे; पण अद्याप माझ्यातील राग येणे हा दोष गेला नाही. 
२. दैनिकात येत असलेल्या पूर्वजांच्या त्रासांच्या लिखाणावरून 
स्वतःला पूर्वजांचा तीव्र त्रास आहे, असे संचालिकेला वाटणे
     माझा ५-७ वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे. माझे पती आणि माझ्यात विशेष मतभेद नव्हते. आमचे एकमेकांवर प्रेमही होते, तरीही असे झाले. तुमच्या दैनिकात पूर्वजांच्या त्रासावर लिखाण येते. मला पूर्वजांचा तीव्र त्रास असावा, असे वाटते.

दैनिक सनातन प्रभात वाचून साधनेला आरंभ करणारे आणि मुळातच साधकत्व असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील एक जिज्ञासू !

श्री. धनंजय हर्षे
१. मागील वर्षी आंबे ठेवण्यासाठी घेतलेल्या 
गाळ्यासमोरचे एक जिज्ञासू सनातनचे कार्य 
जाणून घेऊन दैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदार बनणे
     मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही आंब्याच्या काळात आंबे ठेवण्यासाठी मी कोल्हापूरमध्ये एक गाळा भाड्याने घेतला होता. माझ्या गाळ्यासमोर एका सोन्याच्या व्यापार्‍यांचा गाळा होता. गेल्या वर्षी याच ठिकाणी त्यांनीही गाळा भाड्याने घेतला होता. त्यामुळे त्यांची ओळख झाली होती. त्या वेळी त्यांनी सनातन संस्थेचे कार्य जाणून घेतले आणि लगेच ते दैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदार बनलेे.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट देणार्‍या मान्यवरांचे अभिप्राय

१. आश्रमात पुष्कळ ऊर्जात्मक आणि चैतन्यदायी वातावरण असून ते उत्तरोत्तर वाढत आहे !
     माझ्या मागील २ वर्षांच्या अनुभवावरून आश्रमात पुष्कळ ऊर्जात्मक आणि चैतन्यदायी वातावरण आहे, जे उत्तरोत्तर प्रगतीपथावर अग्रेसर होत आहे. माझ्या आध्यात्मिक चेतनेच्या आधारावरून येथे ब्रह्मांडातील ऊर्जा स्थलांतरित होत असल्याचे जाणवते, जी काळानुरूप भविष्यामध्ये अधिक वाढेल.
(समादेश - आश्रमामध्ये जर शिवलिंगाची शास्त्रशुद्ध वैदिक पद्धतीने स्थापना केली, तर विशेष चमत्कार पहायला मिळतील. माझ्या शिवचक्राच्या आधारावरील अनन्य श्रद्धेच्या अनुभवावरून मी हे सांगत आहे.)
- आध्यात्मिक गुरु राजेंद्र शर्मा, मुंबई (२४.६.२०१६)
२. आश्रम पाहून माझ्या मनाला शांती मिळाली !
     माझे धर्माविषयी ज्ञान वाढले. आश्रमातील स्वच्छता आणि व्यवस्थापन पाहून मला चांगले वाटले. आश्रमातील स्वयंपाकघरही फार स्वच्छ आहे. येथे मला सण कसे साजरे करायचे ?, याविषयी माहिती मिळाली.
- श्री. कमलेश कनौजिया, महानगर अध्यक्ष, हिंदु धर्म सेना, जबलपूर, मध्यप्रदेश. (२४.६.२०१६)
३. आश्रमात मला एक दैवी शक्ती अनुभवायला मिळाली !
     या देेेवस्थानाचे रक्षण परमब्रह्मच करत आहे, असे मला वाटले.

मृत्यूसमयी व्यक्तीला होणार्‍या वेदना न्यून होणे आणि मृत्त्यूत्तर चांगली गती प्राप्त होण्यासाठी मनुष्यासाठी लाभदायी सात्त्विक ठिकाणे, त्यांचे महत्त्व अन् अपघातप्रसंगी मृत्यू ओढवल्यास करावयाचा आध्यात्मिक उपाय !

श्री. राम होनप
१. आयुष्यभर साधना केली नाही किंवा अल्प 
प्रमाणात साधना झाली, याची खंत असलेल्या जिवांचा 
मृत्यूसमयीचा त्रास न्यून होऊन त्यांना चांगली गती प्राप्त 
होण्यासाठीच्या आध्यात्मिक उपायांविषयी ज्ञान मिळणे 
      कलियुगात बहुतेक व्यक्तींकडून चालू जन्मात साधना होत नाही किंवा अल्प प्रमाणात होते. त्यांपैकी संसाराच्या दुःखात होरपळलेल्या काही जिवांना या जन्मात साधना केली नाही, तर आता पुढील जन्मात कसे होणार ?, याची काळजी सतावत असते, तसेच त्यांना या जन्मात साधना न करता मायेत अडकून जीवन व्यर्थ गेले. आता पुढील जन्मी तरी साधना करता यावी, अशी खंत वाटते. अशा व्यक्तींना मृत्यूच्या वेळी होणार्‍या वेदनांचे प्रमाण अल्प व्हावे आणि पुढील जन्मी साधना करता यावी, यासाठी ज्ञानातून प्राप्त झालेले काही आध्यात्मिक उपाय येथे देत आहे.

धर्म आणि मोक्ष यांकडे वाटचाल करण्याऐवजी अर्थ आणि काम वाढवण्यास प्रोत्साहन देणारी आधुनिक शिक्षणप्रणाली !

सौ. तारा शेट्टी
      आमच्या गावातील अत्यंत प्रसिद्ध असलेल्या शिक्षण संस्थेत आमच्या परिचयाची एक मुलगी शिक्षण घेत आहे. ती विद्यार्थिनींसाठी असलेल्या वसतीगृहात (लेडीज हॉस्टेलमध्ये) रहाते. नुकतीच तिची भेट झाली असता तिने आम्हाला विद्यालयात घडत असलेल्या कटू घटनांविषयी सांगितले. ते ऐकून देशातील युवा पिढी अनैतिकतेकडे कशी ओढली जात आहे, हे लक्षात आले आणि मला धक्का बसून माझ्या मनावर आघात झाला.
१. प्राचीन भारतीय विद्यापिठांचा गौरवशाली इतिहास 
      पूर्वी भारतात विश्‍वविख्यात असलेली नालंदा, तक्षशिला यांसारखी विद्यापिठे होती. येथे शिक्षण घेण्यासाठी देश-विदेशांतून विद्यार्थी येत असत. ते उत्तम शिक्षण घेऊन आपल्या नीतीपूर्ण आचरणाने स्वतःला आणि इतरांना हितकर असे वर्तन करत आनंदमय जीवन व्यतीत करत असत. हे सर्व आमचे आजचे शिक्षण का देऊ शकत नाही ?

अनाचार अन् अपप्रकारांचे आगर बनलेली प्रचलित शिक्षणपद्धत नाकारून प्राचीन गुरुकुल पद्धत अंगीकारणे आवश्यक !

श्री. राज धनंजय कर्वे
१. परीक्षेच्या वेळी मित्राने 
अनुभवलेल्या अपप्रकारांची भीषणता
      एका मित्राला परीक्षेविषयी आलेला अनुभव त्याने मला सांगितला. माझा मित्र इयत्ता दहावीची परीक्षा देण्यासाठी गेला, तेव्हा प्रश्‍नपत्रिका सोडवण्याआधी वर्गातील शिक्षकच विद्यार्थ्यांना म्हणाले, तुम्ही सर्वजण नक्कल (कॉपी) करू शकता; पण आम्ही अनुमती दिली, असे मात्र वरिष्ठांना सांगू नका. झाले, मुले एकदम खुश; परंतु माझा मित्र प्रामाणिक होता. त्यामुळे त्याने नक्कल केली नाही; त्याउलट शेजारी बसलेल्या विद्यार्थ्याने मात्र त्याच्या उत्तरपत्रिकेची नक्कल केली. अंती हात दुखायला लागल्याने त्याला तेही करणे जमले नाही ! वर्गातील इतर विद्यार्थ्यांचे तर सांगायलाच नको; ते चक्क मार्गदर्शक (तयार प्रश्‍नोत्तरे असलेले पुस्तक) उघडून बसले ! यावर कहर म्हणजे त्या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या पालकांना म्हणाले, आम्हाला १५ सहस्र रुपये दिलेत, तर तुमच्या मुलाच्या सर्व प्रश्‍नपत्रिका आम्ही सोडवू. त्यावर काही महाभागांनी तर पैसेही दिले. हे सर्व ऐकून मन उद्विग्न झाले आणि राष्ट्राचे भवितव्य अंधःकारमय असेल, असे वाटले.

बाळासंदर्भात आईंनी केलेल्या आदर्श प्रार्थना

     बहुतांश आई आपल्या बाळाच्या कल्याणासाठीच्या प्रार्थना करतात. सौ. लीना प्रशांत सूर्यवंशी आणि सौ. आदिती अमित देखणे यांनी हिंदु राष्ट्राशी संबंधित प्रार्थना करून सर्वांपुढे एक आदर्श ठेवला आहे.
१. हे गुरुदेवा, या बाळाचे रक्षण करा आणि त्याला राष्ट्र अन् धर्म कार्यात सहभागी करून घेऊन त्याच्या जीवनाचे सार्थक करा, अशी तुमच्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे ! - सौ. लीना प्रशांत सूर्यवंशी (चि. ओमची आई), सुकापूर, नवीन पनवेल. (१३.४.२०१६)
२. माझ्या पोटी जन्माला येणारे बाळ श्रीकृष्णाचे रूप असू दे आणि त्याच्या येण्याने हिंदु राष्ट्राशी संबंधित समष्टी सेवा होऊ दे, असे मला दिवस जाण्याच्या आधीपासून वाटत होते. - सौ. आदिती अमित देखणे, संयुक्त अरब अमिराती (१७.६.२०१६)
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले


हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे श्रेय कोणाला घेता येणार नाही !

     श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनी सनातन धर्म राज्याची स्थापना केली. ते अवतारी कार्य होते. आता हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना होणार आहे, ती कालमहिम्यानुसार होणार आहे. त्यामुळे त्याचे श्रेय कोणाला घेता येणार नाही.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने अमेरिकेतील सौ. कल्पना शर्मा यांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
१. अमृतमहोत्सवाच्या दिवशी आलेल्या अनुभूती
१ अ. अमृत महोत्सव सोहळ्याचा दिवस पुष्कळ वेगळा असून तो सूक्ष्मातून अधिक सकारात्मक आणि प्रकाशमान आहे, असे मला जाणवत होते.
१ आ. माझा तोंडवळा कोमल आणि चमकदार झाला होता आणि मी लावलेले कुंकूही तेजस्वी दिसत होते.
१ इ. माझे मन निर्विचार झाल्याने मला पुष्कळ हलके वाटून माझ्या सर्व कृती सहजपणे होेत होत्या.
१ ई. जपमाळेविषयी प्रेम वाटून ती नामजप मोजायला साहाय्य करणार असल्यामुळे तिच्याप्रती कृतज्ञताही वाटणे : श्रीश्री जयंत बाळाजी आठवले, जय गुरुदेव । हा जप १०८ वेळा करण्यासाठी मी पिशवीतून जपमाळ बाहेर काढली. जपमाळेकडे पाहून मला तिच्याप्रती प्रेम वाटले आणि ही जपमाळ मला प्रत्येक नाम मोजायला साहाय्य करणार असल्याने माझा प्रत्येक नामजप भावपूर्ण होईल, या विचाराने मला तिच्याविषयी कृतज्ञता वाटू लागली.
२. महर्षींनी केलेल्या नाडीवाचनाच्या वेळी आलेली अनुभूती
२ अ. प.पू. डॉक्टरांच्या नावाचा जयघोष केल्यावर त्यांच्या मुखमंडलाचे दर्शन होऊन स्वतःच्या ठिकाणी ते उभे असल्याचे जाणवणे : महर्षींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार मी डोळे आणि कान बंद करून प.पू. डॉक्टरांच्या नावाचा जयघोष केला. तेव्हा मला प.पू. डॉक्टरांच्या मुखमंडलाचे स्पष्ट दर्शन झाले आणि माझ्या ठिकाणी प.पू. डॉक्टर उभे आहेत, असे मला जाणवले.
- सौ. कल्पना शर्मा, शिकागो, अमेरिका.

श्री. राम होनप यांना मिळालेल्या मृत्यूसंबंधीच्या ज्ञानाच्या धारिकेत दिलेली प्रार्थना केल्यावर एका साधकाच्या मृत्यूशय्येवर असलेल्या नातेवाइकाचा मृत्यू सुलभरित्या होणे

       १९.९.२०१६ या दिवशी रामने मला त्याला ईश्‍वरी ज्ञानातून मिळालेल्या मृत्यूसमयी व्यक्तीला होणार्‍या वेदना न्यून होणे आणि मृत्यूत्तर चांगली गती प्राप्त होण्यासाठी मनुष्यासाठी लाभदायी सात्त्विक ठिकाणे, त्यांचे महत्त्व अन् अपघातप्रसंगी मृत्यू ओढवल्यास करावयाचा आध्यात्मिक उपाय ! या विषयाची धारिका वाचण्यास पाठवली. ती वाचल्यानंतर त्याच रात्री संभाजीनगर येथील एका साधकाने मला सांगितले, माझी एक नातेवाईक गेल्या १२ ते १४ वर्षांपासून मृत्यूशय्येवर असून त्यांना बराच त्रास होत आहे. नुकतीच मृत्यूसंबंधीची ज्ञानाची धारिका वाचली असल्याने त्यातील एका सूत्रानुसार मी त्यांना संबंधित स्त्रीचा मृत्यू होण्यामधील अडथळे दूर होण्यासाठी भगवान शिवाला सोडव, सोडव, सोडव !, अशी प्रार्थना करण्यास सांगितली. ही प्रार्थना साधक आणि त्याची पत्नी यांनी संबंधित स्त्रीसाठी रात्री ११.३० वाजता केली आणि दुसर्‍या दिवशी सकाळी त्या स्त्रीचा मृत्यू झाल्याचे समजले. या प्रसंगानंतर संबंधित साधक पती-पत्नीची प्रार्थना भगवान शिवापर्यंत पोचल्याने संबंधित स्त्रीची शिवाने सुटका केली, असा विचार माझ्या मनात आला. 
- (पू.) श्री. पद्माकर होनप, संभाजीनगर (२१.९.२०१६)


पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांच्या अंत्यसंस्कार विधीनंतर तिसर्‍या दिवशी केलेले अस्थिसंचयन आणि नंतर केलेले रक्षाविसर्जन या विधींचे सूक्ष्म-परीक्षण

१. दहनविधीमुळे झालेला सूक्ष्म स्तरावरील परिणाम
पू. (सौ.) आशालता सखदेव
कु. मधुरा भोसले
पृथ्वी आणि आप या तत्त्वांनी युक्त असणार्‍या पार्थिव देहातील चैतन्यलहरींचे अग्नितत्त्वाच्या साहाय्याने एकत्रीकरण होऊन त्यांचे रूपांतर तेजप्रधान रक्षेमध्ये होणे
२. अस्थिसंचयनासाठी स्मशानात गेल्यानंतर जाणवलेली सूत्रे
अ. स्मशानातील चितेच्या ठिकाणी असणार्‍या पू. आजींच्या अस्थींमुळे संपूर्ण स्मशानात चैतन्य पसरल्याचे जाणवत होते.
आ. अस्थींच्या आजूबाजूला असणारी राख काळ्या किंवा राखाडी रंगाची नसून पांढर्‍या रंगाची असल्याचे दिसले. तेव्हा चितेच्या ठिकाणी रक्षारूपी पांढर्‍या रंगाच्या भस्माचे आच्छादन घातल्याप्रमाणे दिसले आणि या रक्षेतून वातावरणात सर्वत्र ॐकाराचे प्रक्षेपण होतांना जाणवले.
इ. या रक्षेकडे पहात असतांना मंद सुगंध येत होता आणि त्वचेला चैतन्यदायी शक्तीच्या लहरींचा स्पर्श जाणवून मनाला आल्हाद (आनंद) जाणवत होता. तेव्हा ही रक्षा सामान्य नसून ती देहयज्ञाची विभूती आहे, असे जाणवले.
ई. रक्षेतील पवित्र लहरींच्या अस्तित्वामुळे ती यज्ञाच्या विभूतीप्रमाणे पवित्र असल्याचे जाणवले.

पितरांचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व

     आपल्या हिंदु संस्कृतीत मातृ-पितृ पूजनाला अतिशय महत्त्व आहे. तसेच मागील दोन पिढ्यांचेही स्मरण ठेवावे. पितृवर्ग ज्या लोकात रहातात, त्याला पितरांचे जग किंवा पितृलोक म्हणतात. ते नेहमी मुक्तीची वाट पहात तेथे वावरत असतात. तसेच ते आपल्या पुढच्या पिढीचे कर्तृत्व आणि यश-अपयश पहात असतात. त्यांचे स्मरण ठेवून श्राद्धानुसार जे अन्नदान करतात, त्यांचे कल्याण होते. एखाद्यावर पितर प्रसन्न असल्यास त्यांची भरभराटही होऊ शकते. 
(अधिक माहितीसाठी वाचा : सनातनचा ग्रंथ श्राद्धातील कृतींमागील शास्त्र)

सनातन प्रभातसाठी वार्तांकन करू इच्छिणारे साधक, वाचक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी सुवर्णसंधी !

८ आणि ९ ऑक्टोबर २०१६ या दिवशी 
रामनाथी आश्रमात आयोजित करण्यात 
आलेल्या वार्ताहर प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हा !
       सनातन प्रभात म्हणजे ज्वलंत हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांचा वसा घेतलेले एकमेव नियतकालिक ! सनातन प्रभातमध्ये प्रतिदिन राष्ट्र आणि धर्म यांवरील संकटांविषयी जागृती करणारी वृत्ते, लेख, तसेच अन्य लिखाण प्रसिद्ध केले जाते.
१. वार्तांकन करण्यास शिकून अर्धवेळ 
किंवा पूर्णवेळ वार्ताहराची सेवा करण्यास इच्छुक 
असलेल्यांसाठी रामनाथी आश्रमात शिबिराचे आयोजन !
       प्रतिदिन घडणार्‍या राष्ट्र-धर्म विरोधी घटनांचे वार्तांकन करण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर, नागपूर, जळगाव आदी प्रमुख शहरांमध्ये वृत्तसंकलनाच्या सेवेसाठी पूर्णवेळ वार्ताहर, तर अन्य जिल्ह्यांमध्ये अर्धवेळ वार्ताहर आवश्यक आहेत.

साधकांनो, नवरात्रोत्सव, विजयादशमी, दीपावली आणि कार्तिकी एकादशी यांच्या निमित्ताने लावण्यात येणार्‍या ग्रंथप्रदर्शनातून सनातन-निर्मित ग्रंथसंपदा सर्वदूर पोचवा !

        ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मासांत नवरात्रोत्सव, विजयादशमी, दीपावली अन् कार्तिकी एकादशी आहे. त्या निमित्ताने पुढील ग्रंथ, लघुग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांच्या वितरणासाठी विशेष प्रयत्न करावेत.
१. ग्रंथ
अ. पूजासाहित्याचे महत्त्व
आ. पूजेपूर्वीची वैयक्तिक सिद्धता
इ. देवपूजेपूर्वीची सिद्धता
ई. पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र
उ. देवळात दर्शन कसे घ्यावे ? (भाग १ आणि २)
ऊ. सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र
ए. धार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र
ऐ. शक्ति (भाग १ आणि २)
ओ. अलंकारशास्त्र
अं. स्त्रियांच्या अलंकारांमागील शास्त्र (बिंदीपासून कर्णभूषणांपर्यंतचे अलंकार) 

प.पू. डॉक्टरांनी संकलित केलेल्या ग्रंथांच्या संख्येने उच्चांक गाठण्याची कारणे

       गेल्या २० वर्षांत, म्हणजे ऑगस्ट २०१६ पर्यंत मी संकलित केलेल्या आणि सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या अध्यात्मविषयक ग्रंथांची स्थिती अशी आहे - १५ भाषांतील २७३ ग्रंथांच्या सुमारे ६४ लक्षांहून अधिक प्रती प्रसिद्ध झाल्या आहेत !
       अध्यात्मविषयक ग्रंथांचे लिखाण करणार्‍या काही जणांनी प्रश्‍न केला, आपण एवढे ग्रंथ एवढ्या कमी काळात कसे संकलित करू शकलात ? या प्रश्‍नाचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.
१. इतरांच्या ग्रंथांत धर्मात काय सांगितले आहे, याचा उल्लेख असतो; पण तसे का सांगितले आहे, याचे स्पष्टीकरण नसते, उदा. एखाद्या देवाला विशिष्ट फूलच का वाहतात ? बायकांनी कुंकू लावण्याचे कारण काय ? इत्यादी. मी संकलित केलेल्या ग्रंथांत अशा प्रश्‍नांची उत्तरे असतात, म्हणजेच अध्यात्मातील का ?, या प्रश्‍नांची उत्तरे असतात. त्यामुळे वाचकांच्या बुद्धीचे समाधान होते. शंकांचे निरसन झालेले वाचक अधिकाधिक ग्रंथांचे वाचन करतात आणि पुढे साधनेला लागतात.

आजचे वाढदिवस

चि. श्रीवेद वनकर
      चंद्रपूर येथील चि. श्रीवेद राहुल वनकर याचा आज २५.९.२०१६ या दिवशी पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्यातील लक्षात आलेली काही दैवी गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
चि. श्रीवेद राहुल वनकर 
याला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून शुभाशीर्वाद !
चि. कृष्णांश भट
      ठाणे जिल्ह्यातील चि. कृष्णांश योगेश भट याचा भाद्रपद कृष्ण पक्ष दशमी (२५.९.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्याच्या द्वितीय वाढदिवसानिमित्त लवकरच त्याची गुणवैशिष्ट्ये प्रसिद्ध करत आहोत.
चि. कृष्णांश योगेश भट 
याला सनातन परिवाराकडून 
वाढदिवसाचे अनेक शुभाशीर्वाद !

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

सनातनच्या विविध आश्रमांमध्ये 
खालील उपकरणांची आवश्यकता !
        सनातनच्या विविध आश्रमांमध्ये शेकडो साधक पूर्णवेळ साधना करत आहेत. राष्ट्र-धर्म यांच्या कार्यासाठी अधिकाधिक वेळ देता यावा, यासाठी पूर्णवेळ साधनेस आरंभ करणारे साधक, तसेच राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सध्या आश्रमांमध्ये खालील उपकरणांची तातडीने आवश्यकता आहे. 
        जे वाचक, हितचिंतक अथवा धर्माभिमानी वरील उपकरणे विकत घेण्यासाठी धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी श्री. विनायक आगवेकर यांना vaastunirmiti@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा ०८४५१००६०३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
धनाच्या त्यागाद्वारे राष्ट्र आणि धर्म यांच्या 
कार्यात सहभागी होण्याची संधी दवडू नका !

साधकांना सूचना

दिवाळीच्या निमित्ताने 
प्रबोधनासाठी हस्तपत्रके उपलब्ध !
       दिवाळीच्या निमित्ताने पुढील प्रसारसाहित्य नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे. या प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचा सुयोग्य ठिकाणी वापर करावा.
१. दीपावली सणामागील अध्यात्मशास्त्र सांगणारे ए-४ आकारातील पाठपोट हस्तपत्रक
२. फटक्यांद्वारे होणारी राष्ट्र आणि धर्म यांची हानी टाळा ! या विषयावरील ए-५ या आकारातील पाठपोट प्रबोधनपर हस्तपत्रक
३. सनातनच्या उत्पादनांचे महत्त्व सांगणारे ए-५ आकारातील ४ पानी पाठपोट हस्तपत्रक

फलक प्रसिद्धीकरता

भारत जिहादी पाककडून तत्परता का शिकत नाही ?
        भारताने पाकवर आक्रमण केले, तर भारतातील कोणत्या ठिकाणांवर आक्रमण करायचे याची सूची पाकने सिद्ध केली आहे. पाकिस्तानी सैन्याने याचे संपूर्ण नियोजनही केले आहे, अशी माहिती तेथील प्रसारमाध्यमांकडून दिली जात आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bharatke kounse thikanopar akraman karna hai, iski puri suchi Jihadi Pak ne bana li hai.
Kya Bharat Pak ki is chetavnika samna karneke liye samarth hai ?
जागो ! : भारत के कौन से ठिकानों पर आक्रमण करना है, इसकी पूरी सूची जिहादी पाक ने बना ली है.
क्या भारत पाक की इस चेतावनी का सामना करने के लिए समर्थ है ?
      स्वातंत्र्यानंतर समाजात अनैतिकता, संस्कारहीनता आणि चारित्र्यहीनता आली असून गुंडगिरी, दहशतवाद आणि भ्रष्टाचार हे सर्व वाढत चालले आहे ! (लोकजागर)
      स्वधर्म आणि स्वभाषा यांच्यामुळे मुसलमान जगभर दबाव आणू शकतात, तर स्वधर्म अन् स्वभाषा सोडल्यामुळे जगात काय भारतातही हिंदूंची किंमत शून्य झाली आहे !
      धर्महीनतेमुळे जगात किंमत शून्य असलेले हिंदू कुठे आणि धर्मपालनाने जगाला भारी ठरलेले मुसलमान कुठे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
शालेय शिक्षणात हिंदु धर्माचे शिक्षण 
न दिल्यामुळे हिंदूंची झालेली दुःस्थिती !
       शाळेतील अभ्यासक्रमात हिंदु धर्मात सांगितलेले ज्ञान, विज्ञान, तसेच चांगले संस्कार करणार्‍या गोष्टी अंतर्भूत केल्या असत्या, तर हिंदु धर्माची महानता मुलांच्या लक्षात येऊन राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी त्यांना अभिमान वाटला असता. या अभावी मुलांच्या मनात आणि ती पुढे मोठी झाल्यावरही त्यांच्या मनात हिंदु धर्म अन् भारत यांच्याविषयी उगाचच न्यूनगंड निर्माण होतो. हिंदु राष्ट्रात शालेय शिक्षणाची ही स्थिती आमूलाग्र बदलली जाईल.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंनी दिलेले नाव
       लक्षणांवरून दिलेले नाव निर्गुणातील, तर बाकीची नावे सगुणातील असतात.
भावार्थ : लक्षणांवरून दिलेले नाव निर्गुणातील, यातील निर्गुणातील म्हणजे आध्यात्मिक प्रगतीच्या लक्षणांवरून किंवा संप्रदायाप्रमाणे गुरूंनी शिष्याचे नाव ठेवलेले असते. याउलट आई-वडील सगुणातील लक्षणांवरून किंवा त्यांच्या प्रकृतीनुसार मुलाचे नाव ठेवतात.
       गुरु मिळाले असे म्हणू नये. गुरु दिले गेले, असे म्हटले पाहिजे. ज्याचा जो गुरु (नाम), तो त्याला आम्ही दिला. तोच तारील.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा हितचिंतक !
अहो रूपम् अहो ध्वनिः । म्हणजे (गाढवाने उंटाला म्हणावे) वा ! काय रूप आहे आणि 
(उंटाने गाढवाला म्हणावे) वा ! काय आवाज आहे, असे म्हणणारा कधीही मित्र नसतो. 
तुम्हाला तुमच्यातील दोष सांगणाराच तुमचा खरा मित्र आणि खरा हितचिंतक असतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

राजकीय पक्षांचे कर्तव्य !

संपादकीय 
     देशातील विविध राज्यांत तिरंगा यात्रा काढण्याचे भाजपचे नियोजन आहे. राजकीय पक्षांचे स्वतःचे असे कार्यक्रम चालूच असतात, त्यापैकी भाजपचा हा कार्यक्रम असावा. तेलंगणच्या सत्ताधारी तेलंगण राष्ट्रीय समितीने या कार्यक्रमाचा विरोध केला आहे. या पक्षाने म्हटले आहे की, भाजपने तेलंगणसारख्या शांत राज्यात तिरंगा यात्रा काढण्यापेक्षा दंगलग्रस्त जम्मू-काश्मीर राज्यात ती काढावी. दोन राजकीय पक्ष एकमेकांच्या कार्यक्रमांकडे कसे पहातात, याचा अनुभव यातून येऊ शकतो.

देशविरोधी षड्यंत्र जाणा !

संपादकीय 
     देहली मेट्रो स्थानकावर पाकिस्तान झिंदाबाद आणि इंडियन आर्मी मुर्दाबाद अशा घोषणा देणार्‍या तीन युवकांना पोलिसांनी कह्यात घेतले. भारतात राहून भारताशीच वैर, असा हा प्रकार पोलिसांनी अनुभवला. त्यांची चौकशी करण्यासाठी गुप्तचर विभाग आणि विशेष पोलीस पथक अशा दोन यंत्रणा व्यग्र झाल्या आहेत. काश्मीरमधील उरी प्रकरण ताजे असतांना राजधानीत असा प्रकार होणे, हे शत्रूचा किंवा देशद्रोह्यांचा फैलाव देशभर झाला असल्याचे द्योतक आहे. कोणतेही कारण नसतांना रेल्वे स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी देशविरोधी घोषणा देणे, याकडे असहिष्णुता म्हणूनच पाहिले गेले पाहिजे. अशा प्रकारच्या देशविरोधी गोष्टी भारतीय जनता सहन करत राहिली, ही सहिष्णुता असतांना देशात सहिष्णुतेचा अभाव आहे, असा अपप्रचार करणारेही या देशात आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn