Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या चौकशीसाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करणार !

  • पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांचे हिंदुत्वनिष्ठांना आश्‍वासन !
  • कॉ. पानसरे हत्येच्या प्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना केलेल्या अटकेचे प्रकरण

पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना निवेदन देतांना समस्त हिंदुत्वनिष्ठ
संघटनांचे शिष्टमंडळ (छायाचित्रकार : श्री. गजानन नागपुरे, कोल्हापूर) 

      कोल्हापूर, २३ सप्टेंबर (वार्ता.) - सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना मारहाण केल्याच्या प्रकरणाची, तसेच पनवेल येथील सनातन आश्रमावरील छाप्याच्या वेळी नियमबाह्य कृती करणारे, तसेच सनातनची अपकीर्ती करणारे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यावर कारवाई करण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात येईल, असे आश्‍वासन पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी हिंदुत्ववनिष्ठांच्या संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.

अवैध शस्त्रास्त्रे विकणारे संजय साडविलकर यांचे अन्वेषण यंत्रणांकडून आजतागायत अन्वेषण का नाही ? - अधिवक्ता समीर पटवर्धन

संजय साडविलकर यांची सीआयडी 
चौकशी तात्काळ चालू करा ! - श्री. अभय वर्तक 

पत्रकार परिषदेत डावीकडून श्री. सचिन पवार, अधिवक्ता समीर पटवर्धन,
श्री. अभय वर्तक, श्री. श्रीकृष्ण माळी, सौ. मधुरा तोफखाने आणि श्री. संतोष देसाई

        सांगली, २३ सप्टेंबर (वार्ता.) - १४ जुलै २०१६ ला संजय साडविलकर यांचा पोलिसांनी जबाब घेतला. हा जबाब न्यायाधिशांसमोर नोंदवण्यात आला. या जबाबात साडविलकर यांनी वर्ष १९८५ ते १९८८ या कालावधीत माझ्याकडे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याने गावठी पिस्तुले खरेदी आणि विक्री करणे, त्यांची दुरुस्ती करणे आणि तयार करणे, हा व्यवसाय करत होतो, असे स्पष्टपणे सांगितले आहे. अशा प्रकारे अवैध शस्त्रास्त्रे विकणारे संजय साडविलकर यांचे अन्वेषण यंत्रणांनी आजतागायत अन्वेषण का केले नाही ? त्याहीपुढे जाऊन अन्वेषण यंत्रणांनी याउलट अशा गुन्हेगारी वृत्तीच्या साडविलकर यांच्या जबाबाच्या आधारे डॉ. तावडे यांना कॉ. पानसरे हत्या प्रकरणात अटक केली. त्यामुळे एकांगी अन्वेषण करून सनातनच्या साधकांना जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे, असे स्पष्ट मत सांगली जिल्ह्याचे अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष श्री. समीर पटवर्धन यांनी व्यक्त केले. ते हरिदास भवन येथे २३ सप्टेंबर या दिवशी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

तमिळनाडूमध्ये हिंदू मुन्नानीच्या प्रवक्त्याची धर्मांधांकडून हत्या !

  • तमिळनाडूत गेल्या आठवडाभरात हिंदुत्वनिष्ठांवरील आक्रमणाच्या ४ घटना झाल्यावरही त्याविरोधात देशभरातील एकही हिंदुत्वनिष्ठ संघटना अथवा नेता आवाज उठवत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद होय !
  • काश्मीरपासून तमिळनाडूपर्यंत हिंदूंचा निर्वंश करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हिंदूंनी आता हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीशील व्हावे !
सी. शशिकुमार
      कोइम्बत्तूर (तमिळनाडू) - येथील सुब्रह्यण्यम्पलायम् येथे ४ धर्मांधांच्या टोळीने २२ सप्टेंबरच्या रात्री सी. शशिकुमार या हिंदू मुन्नानीच्या (हिंदू आघाडीच्या) प्रवक्त्याची तीक्ष्ण शस्त्रांंनी भोसकून अमानुष हत्या केली. या घटनेने तमिळनाडूतील कोइम्बत्तूर आणि तीरुपूर जिल्ह्यांत तणाव निर्माण झाला. हिंदू मुन्नानीचे राज्य अध्यक्ष श्री. कडेश्‍वर सुब्रह्मण्यम् यांनी २३ सप्टेंबरला राज्यभर बंद पाळण्याचे आवाहन केले होते.
         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शशिकुमार (वय ३६ वर्ष) दुचाकीवरून घरी परतत असतांना ४ जणांनी त्यांचा दुचाक्यांवरून पाठलाग केला आणि त्यांना कोयात्यांनी भोसकून ते फरार झाले. शशिकुमार यांच्या अंगावर ११ जखमा झाल्याने ते गंभीर घायाळ झाले. त्यांना त्वरित एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची प्राणज्योत मावळली. हिंदू मुन्नानीचे राज्य अध्यक्ष श्री. कडेश्‍वर सुब्रह्मण्यम् यांनी सांगितले की, अनंत चतुर्दशीपासून हिंदू नेत्यांवर आक्रमणे होण्याच्या घटना वाढल्या आहेत. यावरून पोलिसांची अकार्यक्षमता लक्षात येते. कोइम्बत्तूर आणि तीरुपूर जिल्ह्यांत शुक्रवारी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. घटनास्थळी शांतता राखण्यासाठी ५०० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. काही व्यक्तींनी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक केली.

धार्मिक दंगली घडवणार्‍यांच्या गोमाफियांशी असलेल्या संबंधांविषयी चौकशी करा ! - ओडिशातील गोज्ञान फाऊंडेशन आणि भारत रक्षा मंच यांची मागणी

      भुवनेश्‍वर - ओडिशातील गोमाफियांनी धार्मिक दंगली घडवणार्‍यांच्या साहाय्याने सोरो, पट्टमुंडई आणि रौर्केला येथे हल्लीच धार्मिक दंगली घडवून आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या तिन्ही ठिकाणच्या दंगलीची गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गोज्ञान फाऊंडेशन आणि भारतीय रक्षा मंच यांनी केली आहे. सोरो आणि पट्टमुंडई येथे यापूर्वी कधीच दंगली झाल्या नाहीत. राज्यशासनाने या दंगलीच्या मागे गोमाफियांच्या भूमिकेविषयी चौकशी करावी, अशी मागणी भारत रक्षा मंचचे प्रवक्ता श्री. मुरली मनोहर शर्मा यांनी केली आहे.

आगामी पद्मावती चित्रपटाला पटेल-पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांच्याकडून विरोध !

भन्साळी यांनी बाजीराव-मस्तानी चित्रपटाच्या वेळीही इतिहासाची मोडतोड 
केल्याचा अनुभव असल्यामुळे या चित्रपटातूनही तसेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही !
राणी पद्मिनीला अल्लाउद्दीन खिलजीची प्रेयसी दाखवण्याचा प्रयत्न !
      उदयपूर - निर्माता आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी पद्मावती या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होणार आहे. हा चित्रपट चित्तोडचे राजे रतनसेन यांची पत्नी राणी पद्मिनी (पद्मावती) हिच्या जीवनावर आधारित असणार आहे. या चित्रपटात राणी पद्मिनी ही अल्लाउद्दीन खिलजी याची प्रेयसी असल्याचे दाखवले जाणार असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास चित्तोडच्या आत्मसन्मानासाठी धगधगत्या कुंडात झोकून देणार्‍या राणी पद्मिनीच्या शौर्याचा तो अपमान ठरेल. त्यामुळे लोकभावना दुखावल्या जातील, असे या चित्रपटाला विरोध करणार्‍यांचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर राजस्थानमध्ये राजपूत करणी सेना आणि गुजरातमधील पटेल-पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांच्या पाटीदार नवनिर्माण सेनेने चित्रपटाला विरोध केला आहे.

काश्मीर प्रश्‍नावर पाकला समर्थन नाही ! - चीनचे स्पष्टीकरण

पाकला जगाने वाळीत टाकले, तरी पाकची खुमखुमी न्यून होणार नाही, 
त्यासाठी पाकला चिरडणेच सर्वाधिक योग्य होणार आहे !
       नवी देहली - उरी येथील आक्रमणानंतर अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनी, अफगाणिस्तान, बांगलादेश, जपान यांसारखे देश भारताच्या बाजूने उभे रहात असतांना आता पाकचा भरवशाचा सहकारी चीनही त्याच्यापासून दूर जाऊ लागला आहे. चीनने म्हटले आहे की, तो काश्मीरच्या सूत्रावर पाकसमवेत नाही. पाकच्या प्रसारमाध्यमांमध्ये अशा बातम्या चालू होत्या की, चीन काश्मीरच्या सूत्रावर पाकसमवेत उभा रहाणार आहे; पण चीनने या गोष्टीचे खंडण करत याला नकार दिला आहे.
        चीनचे परराष्ट्र मंत्री लू केंग यांनी म्हटले आहे की, आम्ही आशा करतो की, दोन्ही देश यावर शांतीपूर्वक चर्चा करतील. आम्ही काश्मीरच्या सूत्रावर पाकला कोणतेही समर्थन देणार नाही.पाक धोकेबाज असल्याने काश्मिरींनी त्याच्यापासून सावध रहावे ! - अल्-कायदाचा सल्ला

आतंकवाद्यांचाही होऊ न शकलेला पाक कधीतरी भारताशी प्रेमाचेे आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवेल का ?
      नवी देहली - काश्मिरी युवकांनी पाकच्या आमिषाला भुलू नये. पाक स्वतःच्या लाभासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. तो केवळ राजकीय लाभासाठीच काश्मिरी युवकांचा वापर करत आहे. पाक सरकार, सैन्य आणि त्याची गुप्तचर संस्था आयएस्आय धोकेबाज आहेत, असा घणाघात आतंकवादी संघटना अल्-कायदाने केला आहे. अल्-कायदाने पाक, भारत आणि बांगलादेश येथील मुसलमानांसाठी उर्दू, हिंदी आणि बंगाली भाषेत प्रसिद्धीस दिलेल्या ११ पानांच्या वक्तव्यात वरील घणाघात केला आहे. अल्-कायदाने या वक्तव्याला जिहाद ऑफ कश्मीर : ए कॉल टू रिफ्लेक्शन अ‍ॅण्ड अ‍ॅक्शन असे नाव दिले आहे. यात अल्-कायदाचा प्रवक्ता उस्ताद उसामा महमूदने म्हटले आहे की, आतापर्यंतचा इतिहास राहिला आहे की, पाकने नेहमीच काश्मीरचा त्याच्या लाभासाठी वापर केला आहे.

विश्‍वभरात हिंदु संस्कृतीचा प्रचार करणार्‍या सनातन संस्थेवर खोटे आरोप करू नका ! - पू. ईश्‍वरबुवा रामदासी

तासगाव येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलन
मार्गदर्शन करतांना पू. ईश्‍वरबुवा रामदासी
      तासगाव, २३ सप्टेंबर (वार्ता.) - सनातन संस्था आज विश्‍वभरात हिंदु संस्कृतीचा प्रचार करत आहे. संस्थेवर खोटे आरोप करू नका. त्याचप्रकारे डॉ. तावडे आणि श्री. समीर गायकवाड या निष्पाप साधकांना त्रास देऊ नका आणि सनातनच्या साधकांचा छळ थांबवा, असे मार्गदर्शन भाळवणी (विटा) येथील पू. ईश्‍वरबुवा रामदासी उपाख्य पू. दादा महाराज यांनी केले. ते येथील बागणे चौक येथे आयोजित राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलत होते. या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हा सहसंयोजक श्री. अभिजित घुले, श्रीशिवप्रतिष्ठानचे सर्वश्री हैबतराव पाटील, ऋषिकेश पेटकर, सिद्धेश्‍वर लांब, माळी समाजाचे श्री. राजेंद्र माळी, भाजप सौ. आशाताई पोतदार यांच्यासह ५० हून अधिक हिंदुत्ववादी उपस्थित होते.

५२ सहस्र प्राथमिक शाळांमधील वर्गाला स्वतंत्र शिक्षक नाही !

स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतरही शिक्षणक्षेत्रासारखी 
मूलभूत गरजही पूर्ण न करू शकणे, हे लोकराज्याचे अपयश !
ओडिशातील शिक्षणाची दुरावस्था 
         भुवनेश्‍वर (ओडिशा) - येथील तब्बल ५२ सहस्र प्राथमिक शाळांमधील प्रत्येक वर्गाला स्वतंत्र शिक्षक नाही, तर ४१ सहस्र शाळांमध्ये प्रत्येक इयत्तेला स्वतंत्र वर्गही नाहीत, अशी माहिती राज्याचे शालेय आणि समूह शिक्षणमंत्री देवीप्रसाद मिश्रा यांनी विधानसभेत दिली. या संदर्भात भाजपचे आमदार दिलीप रॉय यांनी सभागृहात प्रश्‍न उपस्थित केला होता. मिश्रा म्हणाले, राज्यातील २१२ शाळांमध्ये शौचालयाची सुविधा नाही; मात्र त्यांनी ५१ सहस्र ८१५ शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा आहे. राज्यातील ३४ सहस्राहून अधिक शाळा या ओडिशा सरकारच्या समूह शिक्षण विभागामार्फत अखत्यारित येतात.

(म्हणे) हिंदूंचा पक्ष अशी समाजातील धारणा पुसून टाकण्यास भाजपला यश ! - लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्यमंत्री, गोवा

भाजप हिंदूंचा पक्ष नाही ही प्रतिमा पुसण्यासाठी गोव्यात माध्यमप्रश्‍नी 
इंग्रजीला प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य पणाला लावले जात आहे का ?
      पणजी - भाजप हा एक निधर्मी पक्ष आहे आणि धर्माच्या आधारावर कोणीही भाजपला योग्य-अयोग्य याचा सल्ला देऊ नये. हिंदूंचा पक्ष अशी समाजातील धारणा पुसून टाकण्यास भाजपला यश आले आहे. भाजपने मागील अनेक वर्षांमध्ये अल्पसंख्यांकांमध्ये भाजप त्यांच्या भल्यासाठीच वावरत असल्याचा विश्‍वास निर्माण केला आहे, असे मत गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी माध्यमप्रश्‍नावर प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केले. (आर्चबिषपांच्या एका भाजपविरोधी फतव्याने या विश्‍वासाला कधीही तडा जाऊ शकतो ! - संपादक)

देशात २३ लक्ष न्यायालयीन प्रकरणे १० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रलंबित !

खटले तातडीने निकालात काढण्यासाठी शासन आणि न्याययंत्रणा काय पावले उचलणार ?
      नवी देहली - देशभरातील न्यायालयांमध्ये एकूण २ कोटी २९ लाख प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यांपैकी २३ लक्ष प्रकरणे १० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रलंबित आहेत, तर ४० लक्ष प्रकरणे ५ वर्षांपेक्षा अधिक काळ प्रलंबित आहेत. २३ लाखांपैकी ९० टक्के प्रकरणे केवळ ६ राज्यांमध्ये प्रलंबित असल्याचे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. उत्तरप्रदेशमध्ये ३० टक्के प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यानंतर बिहार १० टक्के, बंगाल ८ टक्के, ओडिशा ८ टक्के, गुजरातमध्ये २२ टक्के आणि महाराष्ट्र ११ टक्के अशी प्रकरणे प्रलंबित आहेत.
      उत्तरप्रदेशमध्ये जवळ जवळ ७ लक्ष न्यायालयीन प्रकरणे १० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रलंबित आहेत. बिहार २ लक्ष ३७ सहस्र, बंगालमध्ये १ लक्ष ७२ सहस्र, ओडिशा १ लक्ष ८२ सहस्र, गुजरातमध्ये ५ लक्ष १३ सहस्र आणि महाराष्ट्रमध्ये २ लक्ष ५७ सहस्र न्यायालयीन प्रकरणे १० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रलंबित आहेत. यांपैकी ७१ टक्के प्रकरणे ही फौजदारी स्वरूपाची आहेत.

भाजपने दंगलग्रस्त जम्मू-काश्मीरमध्ये तिरंगा यात्रा काढून दाखवावी ! - तेलंगण राष्ट्रीय समितीचे आव्हान

      भाग्यनगर - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर तेलंगण राष्ट्रीय समिती (टीआर्एस्) या सत्ताधारी पक्षाने टीका केली आहे. भाजपने तेलंगणसारख्या शांत राज्यामध्ये तिरंगा यात्रा काढण्याऐवजी धाडस असल्यास ती दंगलग्रस्त जम्मू-काश्मीरमध्ये काढून दाखवावी, असे आव्हान टीआर्एस् पक्षाने केले आहे.
     राजकीय लाभ उठवण्यासाठी भाजपने तेलंगण राज्यातील निधर्मी जडणघडण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. तेलंगण धार्मिक सलोख्यासाठी प्रसिद्ध आहे. भाजप धार्मिक सलोखा बिघडवण्यासाठी प्रसिद्ध आहे, असे तेलंगणाचे जलस्रोत मंत्री टी. हरिष राव यांनी सांगितले. 
     पंतप्रधान मोदी यांनी तेलंगणला भेट दिल्यानंतर भाजप आणि टीआर्एस् यांमधील वादावर पडदा पडला होता; मात्र अमित शहा यांनी तेलंगण सरकारवर टीका केल्यानंतर दोन्ही पक्षांतील संबंध परत बिघडले आहेत. टीआर्एस् पक्षाच्या खासदार आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांनी अमित शहा यांचा केंद्रीय अनुदानाविषयीचा दावा खोडून काढतांना शहा यांच्यावर टीका केली आहे.

पॉर्न अभिनेत्री सनी लिओन हिच्यावर कारवाई करा !

हिंदु जनजागृती समितीकडून तेलंगणामधील 
करीमनगर आणि इंदूर येथे प्रशासनाला निवेदन !
      करीमनगर (तेलंगण) - हिंदु जनजागृती समितीकडून करीमनगरचे प्रशासकीय अधिकारी वीर ब्रह्मय्या यांना ३ विषयांसंदर्भात निवेदन देण्यात आले. यात सनातनचे साधक डॉ. तावडे यांचा पोलिसांकडून होणारा छळ रोखणे, पॉर्न अभिनेत्री सनी लिओन हिच्यावर कारवाई करणे आणि पंजाब गोरक्षादलाचे प्रमुख श्री. सतीशकुमार प्रधान यांना पोलिसांनी अयोग्य पद्धतीने अटक केली असून त्यांचा सुटका केली जावी, या मागण्यांचा समावेश होता. निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. सत्यनारायण चारी, आर्य समाजाचे शहर अध्यक्ष सूर्य प्रकाश राव उपस्थित होते. याच प्रमाणे इंदूर (निझामाबाद) येथे जिल्हाधिकार्‍यांना याच मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. नेला तुकाराम आणि श्री. शरत चंद्रा उपस्थित होते.

पाककडून युद्धसराव !

      इस्लामाबाद - उरी येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारताकडून पाकवर आक्रमण होण्याच्या शक्यतेने पाकने युद्धसराव चालू केला आहे. पाकची राजधानी इस्लामाबादमध्ये पाकच्या वायूदलाने एफ्-१६ लढाऊ विमानांद्वारे हा सराव चालू केल्याची माहिती पाकच्या जिओ टीव्हीचे पत्रकार हामीद मीर यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रसिद्ध केली आहे. त्यांच्या ट्विटनंतर अनेक लोकांनी शंका, तसेच प्रश्‍न विचारण्यास प्रारंभ केला. त्यामुळे त्यांनी लगेचच दुसरे ट्विट करून लोकांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. आपले सैन्य कोणत्याही आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यास सिद्ध आहे, असे ट्विटमध्ये सांगितले. यासंदर्भात पाक सरकारने अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. (एकीकडे भारत आक्रमण करील या भीतीने पाकने युद्ध सराव आणि बचाव करण्याच्या दृष्टीने हालचाली चालू केल्या आहेत, तर दुसरीकडे पाकवर आक्रमण करण्याच्या संदर्भात भारताने अद्याप कोणतीही हालचाल चालू केलेली नाही आणि भारत तशी तयारी करील अशीही शक्यता नाही ! - संपादक)कोकण, तसेच भाग्यनगर आणि आंध्रमध्ये पावसाने जनजीवन विस्कळित

      नवी देहली - गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात रायगड, मुंबई तसेच भाग्यनगर आणि आंध्रप्रदेश येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आंध्रप्रदेशच्या गुंटूरमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोघे बेपत्ता आहेत. भाग्यनगरमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणात पडणार्‍या पावसामुळे २३ सप्टेंबरला मुंबई-गोवा महामार्ग बंद करण्यात आला होता. तेलंगणच्या रंगा रेड्डी जिल्ह्यात शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
      १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

देहलीच्या मेट्रो स्थानकावर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणारे तिघे पोलिसांच्या कह्यात !

       नवी देहली - देहली पोलिसांनी येथील मेट्रो स्थानकावर मद्य पिऊन पाकिस्तान झिंदाबाद आणि इंडियन आर्मी मुर्दाबाद अशा घोषणा देणार्‍या ३ युवकांना कह्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करण्यात येत आहे. गुप्तचर विभाग आणि विशेष पोलीस यांचे पथक त्यांची चौकशी करत आहेत. या तिघांची नावे समजू शकलेली नाहीत.

किल्ले संवर्धनासाठी केंद्रसरकार सहकार्य करणार !

जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणार्‍या किल्ल्यांचे 
आतापर्यंत संवर्धन होऊ न शकणे प्रशासनाला लज्जास्पद !
      नवी देहली - रायगड, सिंधुदुर्ग, चंद्रपूर आणि बल्लारपूर येथील ऐतिहासिक किल्ल्यांचे नूतनीकरण अन् संवर्धन यांसाठी आवश्यक अनुमती देण्यासाठी केंद्रसरकारच्या पुरातत्व विभागाचे अधिकारी आढावा घेतील, असे आश्‍वासन केंद्रीय पर्यटनमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी महाराष्ट्र्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले रायगड आणि सिंधुदुर्ग हे किल्ले पहाण्यासाठी लाखो पर्यटक येतात. याशिवाय चंद्रपूर येथील गोंड राजाचा किल्ला, बल्लारपुरातील राणीमहाल, तसेच गडचिरोलीतील मार्कंडेश्‍वर मंदिराचे नूतनीकरण आवश्यक असून त्यासाठी केंद्राने अनुमती द्यावी, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली. देहलीतील बालभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या नीर, नारी, नदी संमेलनात मुनगंटीवार बोलत होते. मोहनदास गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त सेवाग्रामच्या विकासासाठी २६६ कोटी रुपयांच्या खर्चापैकी दोन तृतीयांश खर्च केंद्राने उचलावा, अशीही मागणी मुनगंटीवार यांनी या वेळी केली.आक्रमणात घायाळ झालेल्या संघनेत्याचा मृत्यू

संघाने याविषयी आवाज उठवणे अपेक्षित !
       लुधियाना (पंजाब) - दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात गंभीररित्या घायाळ झालेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंजाब प्रांताचे उपाध्यक्ष ब्रिगेडियर (निवृत्त) जगदीश गग्नेजा (वय ७० वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. आक्रमणानंतर गेल्या पावणेदोन मासांपासून त्यांची मृत्यूशी चाललेली झुंज अपयशी ठरली आहे. लुधियानातील हिरो हार्ट इन्स्टिट्युटमध्ये त्यांनी आज अखेरचा श्‍वास घेतला. हल्लेखोरांनी ६ ऑगस्ट या दिवशी गग्नेजा यांच्यावर जालंधर बाजारपठेत अगदी जवळून ३ गोळ्या झाडल्या. ओटीपोटात वर्मी मार लागल्याने गग्नेजा रस्त्यातच कोसळले. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि गेल्या आठवडाभरापासून त्यांची प्रकृती खालावत गेली आणि २२ सप्टेंबर या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. शरिरातील अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.अनिर्बंध जमावावर नियंत्रण मिळण्यासाठी पॅलेट गनचा वापर आवश्यकच ! - जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय

पॅलेट गनच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणारे मानवतावादी, 
सैनिकांवर दगडफेक करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी का करत नाहीत ?
पॅलेट गनच्या वापरावरील बंदीच्या मागणीची याचिका फेटाळली !
       श्रीनगर - अनिर्बंध जमावावर नियंत्रण मिळवयासाठी पॅलेट गन (छर्‍यांच्या बंदुकीसारखे शस्त्र) या बंदुकीचा वापर करणे आवश्यकच आहे, असे मत जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने व्यक्त केले. काश्मीर खोर्‍यातील हिंसक आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सैन्याकडून पॅलेट गनच्या होणार्‍या वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी काश्मीरमधील अधिवक्त्यांच्या संघटनेने एका याचिकेद्वारे केली होती. जोपर्यंत अनिर्बंध जमावाकडून हिंसाचार घडवला जात आहे, तोपर्यंत बळाचा वापर आवश्यक आहे, असे सांगत मुख्य न्यायाधीश एन्. पॉल वसंतकुमार आणि अली महंमद मगरे यांनी ही याचिका फेटाळून लावली. या याचिकेत पॅलेट गनचा वापर करण्याचा आदेश देणार्‍या सेनाधिकार्‍यांवरही खटला भरण्याची मागणी करण्यात आली होती.

अ‍ॅट्रॉसिटी कायदा रहित होणार नाही; मात्र पालट शक्य ! - केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले

      मुंबई - अ‍ॅट्रॉसिटी कायदा रहित होणार नाही; मात्र त्यात आवश्यक ते पालट करण्याविषयी विचार केला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी एका पत्रकार परिषदेत केले.
     आठवले म्हणाले, राज्यभरातील मराठा समाज मोर्चाच्या माध्यमातून प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला असला, तरी या मोर्चामुळे दलित समाजात कोणतीही अस्वस्थता नाही. इतर समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. प्रत्येक राज्यात विविध समाजाकडून आरक्षणाची मागणी होत आहे. त्यांना क्रिमीलेयर मध्ये आरक्षण देता येण्यासाठी घटनादुरुस्ती आवश्यक आहे. त्यादृष्टीने केंद्रात प्रयत्न करू. मराठा समाजाने आरक्षणाविषची पूर्वीच्या मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारायला हवा. दलित आणि मराठा या दोन्ही समाजाला एकमेकांची आवश्यकता आहे. या दोन्ही समाजात ऐक्य निर्माण करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ७ ऑक्टोबरला शिर्डीत दलित मराठा ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि सनातन संस्था यांना न्याय मिळावा !

धनबाद (झारखंड) येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात मागणी !
धनबाद शहरात आंदोलन करतांना धर्माभिमानी
     धनबाद (झाडखंड) - येथील रणधीर वर्मा चौकामध्ये २२ सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. सनातन संस्थेचे निरपराध साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना कॉ. पानसरे हत्या प्रकरणात जाणीवपूर्वक अडकवण्यात येऊन त्यांचा पोलिसांकडून छळ करण्यात येत आहे. याद्वारे हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या सनातन संस्थेची अपकीर्ती करण्यात येत आहे. हे दुर्दैवी आणि क्लेषदायक आहे. या प्रकरणी डॉ. तावडे आणि सनातन संस्था यांना त्वरित न्याय मिळावा, अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. निशाली, समितीचे पूर्व आणि उत्तरपूर्व भारताचे समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल आदी हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी उपस्थित होते.

१८ सैनिकांचा जीव घेणार्‍या आतंकवादी आक्रमणाचा सूड घ्या !

हिंदु धर्माभिमान्यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठवली पत्रे !
      आग्रा - काश्मीरमधील उरी येथे १८ सैनिकांचा जीव घेणार्‍या आतंकवादाला समूळ नष्ट करावे आणि या आक्रमणाचा सूड घ्यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि धर्माभिमानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रे पाठवून केली. १९ सप्टेंबरला सर्व धर्माभिमान्यांनी येथील प्रतापपुरा मुख्य डाक कार्यालयात जाऊन सामूहिकपणे पत्रे लिहून ती पंतप्रधान मोदी यांना पाठवली. या उपक्रमात ठाकूर सिंह, शुभम् सौनी, नवीन भारद्वाज, उत्सव, संजीव शर्मा आदींनी सहभाग घेतला.माळा (केरळ) येथे श्री नारायण गुरु समाधी दिनाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीकडून प्रवचन

       त्रिचूर (केरळ) - श्री नारायण गुरु समाधी दिनाच्या निमित्ताने त्रिचूर जिल्ह्यातील माळा येथे श्री नारायण धर्म परिपालन (एस्.एन्.डी.पी.) या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कु. रश्मी परमेश्‍वरन् यांनी धर्माचरणाचे महत्त्व, धर्माचरणाच्या कृती आणि त्यामागील शास्त्र अन् नामजप या विषयांवर मार्गदर्शन केले. ह्या कार्यक्रमाचा लाभ १०० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला. हे प्रवचन दैनंदिन जीवनात अतिशय लाभदायक आहे, असे उपस्थितांनी सांगितले.

अमेरिकेच्या शेर्लोट शहरात कृष्णवर्णीय नागरिकाचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर हिंसाचार !

अमेरिकेत सातत्याने वर्णद्वेषी हिंसाचार होत आहे; मात्र जागतिक 
शांततेचा ठेका घेतलेल्या अमेरिकेला स्वतःच्या देशात शांतता निर्माण करता आलेली नाही !
      शेर्लोट - अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना प्रांतातील शेर्लोट शहरामध्ये २० सप्टेंबरला ४३ वर्षीय कीथ लैमोंट स्कॉट ही कृष्णवर्णीय व्यक्ती पोलीस अधिकार्‍याच्या गोळीबारात ठार झाल्यानंतर येथे निदर्शने करण्यात येत आहेत. तसेच काही ठिकाणी हिंसाचारही झाला आहे. यामुळे येथे तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी येथे आपत्काळाची घोषणा केली आहे.


संगीतकार दादलानी यांनी जैन मुनींची कान पकडून क्षमा मागितली !

जैन मुनींविषयी उपहासात्मक ट्वीट केल्याचे प्रकरण
      नवी देहली - संगीतकार आणि गायक विशाल दादलानी यांनी जैन मुनी तरुण सागर यांच्या चंदीगडमधील आश्रमात जाऊन त्यांची कान पकडून क्षमा मागितली आहे. हरियाणाच्या विधिमंडळात मुनी तरुण सागर यांनी प्रवचन दिले होते. त्यानंतर मुनी माकड आहेत, असे ध्वनित होणारे ट्वीट त्यांनी केले होते. (मुल्ला मौलवींना असे म्हणण्याचे धारिष्ट्य दादलानी यांनी केले असते का ? - संपादक) त्यानंतर त्यांनी क्षमा मागत संबंधित ट्वीट काढून टाकले होते. त्यांच्या विरोधात प्रथमदर्शी अहवाल प्रविष्ट झाल्यावर त्यांनी कान पकडून क्षमा मागितली.इस्लामचा स्वीकार केलेल्या हिंदु तरुणाला जमावाकडून मारहाण !

     मंगळुरू - दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुळ्या येथील सतीश आचार्य या २४ वर्षीय हिंदु तरुणाला इस्लाम धर्माचा स्वीकार केल्याच्या प्रकरणी जमावाकडून मारहाण करण्यात आली. केरळमध्ये काम करत असतांना या तरुणाने अनुमाने १ वर्षापूर्वी इस्लाममध्ये धर्मांतर केले होते. सतीश याने त्याचे नामकरण महंमद मुस्ताकीम असे केले आहे.
     सतीश याने धर्मांतर केल्याचे लक्षात येताच काही हिंदूंनी त्याला हिंदु धर्मात परतण्याविषयी आवाहन केले होते. तसेच एक निषेधमोर्चा काढून सतीश याच्या धर्मांतराच्या प्रकरणी चौकशीची मागणी केली होती. एका स्थानिक राजकीय नेत्याने सतीश याला त्यांच्या घरी भेटण्याचे नियोजन केले होते; मात्र सतीश याला भेट टाळायची असल्याने त्याने घरातून पळ काढला; मात्र स्थानिक कार्यकर्त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि मारहाण केली. (सतीश याच्यासारख्या हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच ते धर्मांतर करतात ! हिंदूंचे धर्मांतर रोखायचे असेल, तर त्यांना धर्मशिक्षण देणे अपरिहार्य आहे, हेच या घटनेतून दिसून येते ! - संपादक)(म्हणे) सनातनच्या पायाला पत्रे ठोकायलाही कमी करणार नाही !- अधिवक्ता के.डी. शिंदे यांची धमकी

सनातन अशा धमक्यांना भीक घालत 
नाही, हे पुरो(अधो)गाम्यांनी लक्षात घ्यावे !
       सांगली, २३ सप्टेंबर (वार्ता.) - आम्ही दांडके घेऊन मागे लागल्यानेच आज दुपारी सांगलीतील डॉ. सामंताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी धादांत खोटी विधाने पुरो(अधो)गामी नेते अधिवक्ता के.डी. शिंदे यांनी सांगलीतील संघर्ष यात्रेत स्टेशन चौक येथे झालेल्या सभेत केली. (डॉ. सामंत यांना अटक झालेली नसतांना पुरो(अधो)गाम्यांचे खोटारडे विधान ! खोटे बोला; पण रेटून बोला या गोबल्स नीतीने वागणारे अधिवक्ता शिंदे यांच्यासारख्या पुरो(अधो)गाम्यांची विश्‍वासार्हता शून्य का आहे, हे यातून लक्षात येते ! खोटी विधाने करून सनातनची अपकीर्ती करणारे अधिवक्ता शिंदे यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे ! - संपादक) या वेळी शिंदे यांनी हा जिल्हा क्रांतीवीर नाना पाटील यांचा जिल्हा असून आम्ही सनातनच्या पायाला पत्रे ठोकायलाही मागेपुढे बघणार नाही, अशी उघड धमकी दिली. (देशात लोकशाही व्यवस्था असतांना अधिवक्ता शिंदे यांना घटनाद्रोही विधाने करणे शोभते का ? - संपादक)
अधिवक्ता शिंदे यांची धादांत खोटी विधाने
१. ज्यांनी गांधीजींना मारले, त्याच औलादीने डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि कलबुर्गी यांना मारले. या हत्या सनातन्यांनीच केल्या आहेत. (पुरोगाम्यांचा पराकोटीचा सनातनद्वेष ! - संपादक)
२. स्वातंत्र्य हे फडणवीसाच्या बाने मिळवलेले नाही ! (मुख्यमंत्र्यांच्या विरोधात खालच्या थराला जाऊन टीका करणार्‍यांवर शासन काही कारवाई करणार आहे का ? - संपादक)

मुंबई आणि नवी मुंबई येथे हिंदुत्वनिष्ठ संघटना अन् राष्ट्रप्रेमी नागरिक यांच्याकडून पाकिस्तानचा तीव्र निषेध !

उरी येथील आतंकवादी आक्रमणाचे प्रकरण
     मुंबई, २३ सप्टेंबर (वार्ता.) - हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांच्या वतीने ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने यांद्वारे उरी येथील भ्याड आक्रमणाप्रकरणी पाकिस्तानचा तीव्र निषेध करण्यात आला. 
भांडुप 
विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने आंदोलन 
     भांडुप रेल्वेस्थानक येथे २२ सप्टेंबर या दिवशी विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी आंदोलन केले. बजरंग दलाचे कोकण प्रांत संयोजक श्री. उमेश गायकवाड यांनी देशातील युद्धजन्य परिस्थिती पहाता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय सैन्यात भरती व्हावे आणि देशाचे रक्षण करावे, असे आवाहन केले. या आंदोलनाला विश्‍व हिंदु परिषदेचे मुलुंडचे जिल्हाध्यक्ष श्री. भाऊ बागवे यांसह १५० हून अधिक राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.

४८ घंट्यांमध्ये भारत सोडा अन्यथा आमच्या पद्धतीने हुसकावून लावू !

  • किती पक्षांचे राष्ट्रप्रेम अशा प्रकारे जागृत आहे ?
  • मनसेची पाक कलाकारांना चेतावणी !
        मुंबई - उरी येथील आतंकवादी आक्रमणानंतर देशभरातून पाकविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या आक्रमणामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही संताप व्यक्त केला आहे आणि भारतात आलेल्या पाक कलाकारांना तीव्र विरोध दर्शवला आहे. सीमेवर सैनिक हुतात्मा होत असतांना ही पाकसोबत मैत्री करण्याची वेळ नव्हे. येत्या ४८ घंट्यांत पाक कलाकारांनी भारत सोडून पाकिस्तानात परत जावे अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने हुसकावून लावू.
        मुंबईसह महाराष्ट्रात जिथे कुठे पाक कलाकारांचे शुटींग चालू असेल, ते उधळून लावू, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिली आहे. पाक कलाकारांचा सहभाग असलेले अभिनेते शाहरूख खान यांचे रईस आणि दिल है मुश्किल हे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी चेतावणीही त्यांनी दिली आहे.

पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बेंद्रे यांच्या विभागीय चौकशीचे आदेश

सातारा येथील सनातन प्रभातचे वार्ताहर 
राहुल कोल्हापुरे यांना कह्यात घेतल्याचे आणि 
भाविकांना कपडे फाटेपर्यंत धक्काबुक्की केल्याचे प्रकरण
       सातारा, २३ सप्टेंबर (वार्ता.) - येथे १० सप्टेंबर या दिवशी श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कुटुंबियांसमवेत आलेले सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांना कोणत्याही कारणाविना पोलिसांनी कह्यात घेतले होते. या वेळी काही भाविकांना शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बेंद्रे यांनी अक्षरश: कपडे फाटेपर्यंत धक्काबुक्की केली होती. याविषयी शहरातील हिंदुत्वनिष्ठांनी १३ सप्टेंबर या दिवशी जिल्हा पोलीसप्रमुख संदीप पाटील यांना निवेदन दिले होते. या वेळी पाटील यांनी विभागीय चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार संदीप पाटील यांनी नुकतेच पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बेंद्रे यांच्या विभागीय चौकशीचा आदेश दिला. अधिक चौकशीसाठी सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे आणि काही भाविक यांच्यांशी शाहूपुरी पोलीस ठाण्याकडून यासंबंधी अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
       १० सप्टेंबर या दिवशी पाच दिवसांच्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी येथील खाजगी मंगळवार तळ्यावर भाविकांनी गर्दी केली होती. या वेळी स्थानिक पोलीस प्रशासनाने श्री गणेशमूर्ती पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यासाठी बंदी असल्याचे कारण पुढे करत भाविकांना मूर्ती विसर्जनास मज्जाव केला.

भारत सिंधुनदी पाणीवाटप करार रहित करण्याची शक्यता !

       नवी देहली - पाकचे नाक दाबवण्याचा प्रयत्न भारताकडून होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारताकडून सिंधू पाणीवाटप करार रहित करण्याचा विचार चालू आहे. सिंधू नदीच्या खोर्‍यातील ६ नद्यांचे उगम भारतात असून या नद्यांचे पाणी कसे वाटायचे या संदर्भात १९६० मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात जागतिक बँकेच्या मध्यस्थीने करार झाला होता. हा करार रहित करण्याचा भारत विचार करत आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी एका पत्रकार परिषदेत या संदर्भातील सुतोवाच केले. ते म्हणाले, सिंधू पाणी करारासंदर्भात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मतभेद तुम्हाला माहीतच आहेत. अशा प्रकारचे कोणतेही करार अंमलात येण्यासाठी परस्पर सहकार्य आणि परस्परांवर विश्‍वास आवश्यक असतो. एकतर्फी असे काही होऊ शकत नाही. या करारानुसार बियास, रावी आणि सतलज या नद्यांवर भारताचे, तर सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांवर पाकचे नियंत्रण आहे. या कराराला जम्मू-काश्मीरचाही विरोध आहे. कारण राज्यात उगम पावणार्‍या ३ मोठ्या नद्यांवर त्याचा अधिकार नाही.

अन्वेषण यंत्रणांनी दाभोलकर कुटुंबियांची चौकशी करावी ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

सातारा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन 
आंदोलनाला संबोधित करतांना सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता
श्री. अभय वर्तक (डावीकडे) आणि उपस्थित हिंदु धर्माभिमानी
    सातारा, २३ सप्टेंबर (वार्ता.) - दाभोलकर कुटुंबियांनी न्यासांमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले आहेत. जवळपास २० वर्षांचा हिशोब धर्मादाय आयुक्त कार्यालयात सादर केलेला नाही. डॉ. दाभोलकर यांच्या न्यासांची चौकशी करण्यात यावी, अशा मागण्या करूनही त्याकडे तपास यंत्रणांनी दुर्लक्ष केले. महाराष्ट्रातील शाळांमध्ये वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प राबवून शालेय विद्यार्थ्यांना लुबाडून अंनिसच्या कार्यकर्त्यांना आलिशान गाड्या वाटण्यात आल्या. अंनिसची पार्श्‍वभूमी वादग्रस्त असूनही डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातनला संपवण्यासाठी एकांगी तपास केला जात आहे. वास्तविक अन्वेषण यंत्रणांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कुटुंबियांची चौकशी केल्यास संपूर्ण महाराष्ट्राला सत्य समजेल, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. २२ सप्टेंबर या दिवशी येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. या वेळी वारकरी संप्रदाय, विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु महासभा, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी संघटनांचे ८० हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आसाममध्ये ६ आतंकवादी ठार

      दिफू (आसाम) - आसाममधील अंगलोंग जिल्ह्यातील बनीपाथपूर येथे २२ सप्टेंबरला रात्री झालेल्या चकमकीत ६ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. या चकमकीत एक सैनिक घायाळ झाला आहे. हे आतंकवादी कार्बी पिपल्स लिबरेशन टायगर्स या संघटनेचे होते.

पुण्यात होणारी हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करून काश्मिरी हिंदूंचा आवाज बुलंद करण्याचा राष्ट्रप्रेमींचा निर्धार !

      पुणे, २३ सप्टेंबर (वार्ता.) - काश्मिरी हिंदूंच्या समर्थनार्थ, तसेच त्यांच्या पुनर्वसनाच्या न्याय अधिकाराचा आवाज बुलंद करण्यासाठी येथे २३ ऑक्टोबरला विराट हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु जनजागृती समिती, पनून कश्मीर, काश्मिरी हिंदु महासभा, तसेच लष्कर-ए-हिंद यांच्या संयुक्त विद्यमाने होणार्‍या धर्मजागृती सभेच्या पूर्वनियोजनासाठी २२ सप्टेंबर या दिवशी धनकवडी येथील विणकर सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपस्थित राष्ट्रप्रेमी हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्याचा निर्धार केला. 
याविषयीचे सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

नगर येथे मराठा क्रांतीचा विराट मूकमोर्चा

मोर्च्यात सहभागी झालेले मराठा समाजाचे नागरिक
       नगर, २३ सप्टेंबर (वार्ता.) - येथे मराठा क्रांतीचा विराट मूकमोर्चा लक्षावधी नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. कोपर्डी येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर नगरमध्येच हा मोर्चा झाल्याने मोर्च्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. हा मोर्चा वाडिया पार्कपासून चालू होऊन चांदणी चौक येथे थांबला. या वेळी कोपर्डी येथील पीडित मुलीचे वडील, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, भाई जगताप आणि बबनराव पाचपुते हेही सहभागी झाले होते. चांदणी चौक येथे मोर्चा थांबल्यानंतर काही मुलींनी भाषण केले.

उरणमध्ये दिसलेल्या सशस्त्र संशयित तरुणांचे रेखाचित्र सिद्ध !

      पनवेल (रायगड) - २२ सप्टेंबरला उरणमध्ये दिसलेल्या पाच सशस्त्र संशयित तरुणांचे रेखाचित्र सिद्ध करण्यात आले आहे. या संदर्भात सतर्कतेची चेतावणी दिली असतांनाच ७ सप्टेंबर या दिवशी उरणजवळ एक संशयास्पद बोट आढळली होती, अशी माहिती उघड झाली आहे. या बोटीची चौकशी चालू असल्याचे राज्यातील गृहखात्यामधील अधिकार्‍यांनी सांगितले आहे. या बोटीचा आणि संशयित तरुणांचा काही संबंध आहे का, याचा तपास आता पोलिसांनी चालू केला आहे. या संदर्भात एन्एस्जी आणि नवी मुंबई पोलीस यांची संयुक्त बैठक झाली. विद्यार्थ्यांकडून माहिती घेऊन जबाब नोंदवण्यात आला आहे. उरणमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा ठेवण्यात आला आहे.

हिंदु जनजागृती समितीचा मुंबई जिल्ह्याचा सप्टेंबर २०१६ च्या दुसर्‍या सप्ताहातील प्रसारकार्याचा आढावा !

१. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या 
माध्यमातून करण्यात आलेली जनजागृती !
१ अ. धर्माभिमान्यांच्या पुढाकाराने श्री गणपति आणि गणेशोत्सव यांविषयी धर्मशास्त्रीय माहिती देणार्‍या धर्मशिक्षण फलकांच्या (फ्लेक्सच्या) माध्यमातून जनजागृती ! : घाटकोपर येथील धर्माभिमानी सर्वश्री अविनाश पवार, महेश राजपूरकर आणि राहुल भुजबळ यांनी अनेक मंडळांना भेटून आदर्श गणेशोत्सव, गणेशोत्सवातील शास्त्र, तसेच धर्मशिक्षण देणारे धर्मशिक्षण फलक (फ्लेक्स) लावण्याचे महत्त्व सांगितले. परिणामी घाटकोपर येथील अनेक मंडळांनी स्वतः फ्लेक्स प्रायोजित करून मंडळांत लावले. असल्फा मार्केट येथील सेव्हन स्टार स्पोर्टस क्लब, खैराणी रोड येथील खैराणी रोडचा राजा, असल्फा व्हिलेज येथील असल्फा भाजी मार्केट गणेशोत्सव मंडळ आणि अखिल शिवाजीनगर गणेशोत्सव मंडळ, तसेच घाटकोपर येथील माणिकलाल गणेशोत्सव मंडळ यांनी फ्लेक्स लावून जागृती केली.

साथीच्या रोगांची निर्मिती

     सनदी अधिकार्‍यांची इमारत म्हणून ओळखल्या जाणार्‍या मंत्रालयाजवळील यशोधन इमारतीतील काही सनदी अधिकार्‍यांच्या घरी डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. हा चर्चेचा विषय ठरला असला, तरी उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकार्‍यांचे हेच का ते व्यवस्थापन ?, असा प्रश्‍नही उपस्थित झाला. पावसाळ्यात साथींचे आजार बळावतात, ते अशा गलिच्छपणामुळेच. साधे घरही स्वच्छ ठेवू न शकणारे अधिकारी प्रशासकीय कामकाज कसे सांभाळत असतील ? अशा अधिकार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात कच खाल्ली जात असल्याने पुन्हा तशीच चूक ते करत रहातात.

गणेशोत्सवात राष्ट्र आणि धर्म यांचा प्रसार करणारे वरळी येथील 'हिंदचा राजा हिंदसायकल महाराजा गणेशोत्सव मंडळ' !

असा आदर्श सर्वत्रच्या गणेशोत्सव मंडळांनी घ्यावा ! 
     मुंबई, २३ सप्टेंबर (वार्ता.) - वरळी येथील 'हिंदचा राजा हिंदसायकल महाराजा गणेशोत्सव मंडळा'च्या वतीने गणेशोत्सवात राष्ट्र आणि धर्म यांविषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मागील ३ वर्षांपासून हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संपर्कात राहून हे मंडळ आदर्श गणेशोत्सव साजरा होण्यासाठी प्रयत्नरत आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात श्री गणेशाच्या संदर्भात घडणार्‍या धर्मद्रोही कृती

अशांवर श्री गणेशाची कृपा कधीतरी होईल का ? 
१. यवतमाळ येथील काही मूर्तीकार स्वार्थासाठी मूर्ती हौदात विसर्जन न करता त्या दान देण्यास सांगतात. त्यांच्याकडे आलेल्या मूर्तींना ते पुन्हा जोडून पुढील वर्षी त्याच मूर्ती गणेशोत्सवाच्या कालावधीत विक्रीसाठी ठेवतात. 
२. प्रतीवर्षी श्री गणेशचतुर्थीपूर्वी पोस्टल ग्राऊंडवर गणेशमूर्तीकारांचा मूर्ती विक्रीसाठी मेळा असतो. प्रवासाच्या काळात खराब झालेल्या मूर्ती मूर्तीकार मैदानावरच सोडून जातात. काहीजण त्याच मूर्तींना पुन्हा जोडून विक्रीसाठी ठेवतात. 
३. कृत्रिम हौदात विसर्जन झालेल्या मूर्ती नगरपरिषदेकडून खड्ड्यात गुप्तपणे पुरल्या जातात.

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

       सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वी पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे क्रमशः प्रसिद्ध करत आहोत.
मंदिरांवर हक्क प्रस्थापित करू पहाणार्‍या 
मुसलमानांवर कार्यवाही करण्याऐवजी हिंदूंनाच दर्शनाची
 अनुमती नाकारणारे पोलीस म्हणजे आधुनिक रझाकार !
       नांदेड येथील गोदावरीच्या पात्रात ब्रह्मपुरीजवळ जुन्या पुलाच्या शेजारी महानुभाव पंथाची पुरातन गोमुखी देवाची मूर्ती आहे. पूर्ण पाषाणरूपी या गोमुखी देवाच्या मूर्तीची महानुभावपंथीय पूजाअर्चा करतात. बाजूलाच मुसलमान समाजाचा दर्गा आहे. मंदिराच्या जागेवर दर्ग्याचा अधिकार सांगून काही मुसलमान संघटनांनी नवा वाद निर्माण केला. नांदेड जिल्ह्यात महानुभावपंथीय समाज विरळ असल्याने पूजेसाठी येणार्‍या भक्तांना, महिलांना मुसलमानांकडून त्रास होत होता. मंदिरावर भगवा झेंडा आणि मोठ्या पाषाणाला भगवा रंग होता; परंतु मुसलमानांनी रातोरात हिरवा रंग दिला आणि येणार्‍या भक्तांना दर्शनास विरोध करत पिटाळून लावले. या वेळी हिंदूंनी आमच्या मंदिरात आम्हाला दर्शन का नाही ?, असे विचारत त्यांना खडसवले. यानंतर हिंदूंनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांची भेट घेऊन दर्शनाची अनुमती मागितली होती; परंतु शासनाच्या अधिकार्‍यांनी मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळत हिंदूंनाच दर्शनाची अनुमती नाकारली.
पोलिसांविषयी चांगले आणि वाईट अनुभव असल्यास 
वाचकांनी नजीकच्या दैनिक कार्यालयात पाठवावेत !

ठाणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने 'आदर्श गणेशोत्सव' मोहीम !

१. ठाणे येथे अनेक ठिकाणी गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याच्या संदर्भात प्रबोधन करण्यात आले. शाळेत केलेल्या प्रबोधनाचा अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. 
२. कल्याण येथे केलेली सर्वच मार्गदर्शने आवडल्याचे अनेक भाविकांनी कळवले. येथे दोन ठिकाणी प्रवचनाच्या वेळी विषय मांडणार्‍या साधकांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !

English : www.hindujagruti.org
हिंदी : www.hindujagruti.org/hindi/

जुगाराला प्रोत्साहन देणारे सरकार कधी जनतेचे हित करील का ?

     'कॅसिनोला आम्ही वर्ष २००७ मध्ये विरोध दर्शवला होता; परंतु त्यानंतर काँग्रेस शासनाने राज्यात ६ कॅसिनोंना अनुज्ञप्ती दिल्याने कॅसिनो राज्य कारभारातील एक भाग झाला आहे. यानंतर वर्ष २०१२ मध्ये भाजप शासन सत्तेवर आले; मात्र आता कॅसिनो व्यवसाय चालू ठेवणेच योग्य आहे. '
- संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि माजी मुख्यमंत्री, गोवा

निवडणूक अधिकार्‍याला मारहाण करणारे सरपंच आणि उपसरपंच यांना अटक

     राजगुरूनगर (जिल्हा पुणे), २३ सप्टेंबर - येथील दरकवाडी ग्रामपंचायतीच्या पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि काही सदस्य यांनी निवडणूक अधिकार्‍याला मारहाण केली. यासंदर्भात खेड पोलीस ठाण्यात गुन्हाही प्रविष्ट करण्यात आला होता. मारहाण करणार्‍या सरपंच माया सूर्यकांत सुपे, उपसरपंच नंदा वसंत लगड, ग्रामपंचायत सदस्या सावित्राबाई कौदरे यांसह अन्य तिघांना पोलिसांनी अटक केली असून २ जण पसार झाले आहेत. (अशांवर निवडणूक लढण्याची कायमची बंदी करायला हवी. - संपादक)

फलक प्रसिद्धीकरता

तमिळनाडूची बिहारच्या दिशेने वाटचाल ! 
     तमिळनाडूच्या कोइम्बत्तूर येथे ४ धर्मांधांच्या टोळीने सी. शशिकुमार या हिंदू मुन्नानी (आघाडी) संघटनेच्या प्रवक्त्याची तीक्ष्ण शस्त्रांंनी भोसकून अमानुष हत्या केली. तमिळनाडूत गेल्या ८ दिवसांत हिंदु नेत्यांवर आक्रमण होण्याची ही चौथी घटना आहे.

जयतु जयतु हिन्दुराष्ट्राचे गाऊया गान ।

श्रीहरि रे गोड तुझी अधरीची फुंकर ।
ज्ञान-भक्तीचे निघती त्यातून सुस्वर ।
गोकुळातला हरि शोभते अलगूज करी ।
सुरातील ही प्रीत तुझी नाना परि ॥ १ ॥

तुझ्या जादुमय सुरा भुलल्या गोपगौळणी ।
येती यमुनातीरी खाऊनी घरची बोलणी ।
घरकाम विसरती ओढ यमुनेतिरी ।
साद येता तुझ्या बासरीची हरि ॥ २ ॥

बघता बघता वर्षे सरली गेलास द्वारका नगरी ।
समजूत घालूनी गोपींची अपुल्या परी ।
बासरी राहिली राधेकडे आले सुदर्शन करी ।
सांगशी आता धरा कर्तव्य उरी

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Tamilnadume dharmandhone ki Hindu Munnanike netaki hatya,8 dinme Hinduopar choutha akraman!
Kya Tamilnadume Kashmirjaisa jihadi itihas likha ja raha hai 


जागो ! 
तमिलनाडु में धर्मांधों ने की हिन्दू मुन्नानी के नेता की हत्या; ८ दिन में हिन्दुआें पर चौथा आक्रमण ! 
 क्या तमिलनाडु में कश्मीर जैसा जिहादी इतिहास लिखा जा रहा है ?

साधक कोणाला म्हणावे ?

श्री. रमेश दाते
१. आत्मोन्नतीसाठी साधना करणारा खरा साधक !
     खरा साधक आत्मोन्नतीसाठी साधना करतो. तो स्वत:च्या आध्यात्मिक प्रगतीसह समाजातील लोकांची उन्नती व्हावी; म्हणून भगवंताच्या नामजपासह व्यष्टी, तसेच समष्टी साधना करतो. अशा साधकाला अहं असत नाही. त्याला दुसरे काही नको, तर केवळ देवच हवा, अशी तळमळ असते. त्याच्यामध्ये कपट, द्वेष आणि असूया हे दोष नसतात. तसेच तो काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू न्यून करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तो शुद्ध मनाचा होऊन देवाचा अत्यंत प्रिय होतो.
२. प्रपंचात अडकलेला साधक (?) भवसागरात पुनःपुन्हा अडकणे
    प्रपंचात काहीतरी साध्य करू इच्छिणारा जीवनातील सर्व वेळ स्वत:ला हे हवे, ते हवे याचाच जप करत असतो. त्याचा अध्यात्माकडे ओढा अल्पच असतो. त्याला स्वत:च्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंत हवा असतो. असा नावालाच साधक असणारा भवसागरात पुनःपुन्हा अडकतो.
३. साधकाची लक्षणे
     साधक हा शब्द मनात आणताच गुरूंच्या आदेशानुसार साधना करणारा, हेच चित्र स्पष्ट होते. साधक म्हटले की, कोणत्याही स्थितीत साधनेविषयी विकल्प न आणता गुरुदेवांच्या संकल्पानुसार साधना करणारा, अशीच कल्पना सदैव मनी असावी, तरीही सर्वांना समजण्यास सोपे जाण्यासाठी साधकाची लक्षणे येथे दिली आहेत.
३ अ. पृथ्वीवर कोट्यवधी जीव असून त्यांतील १ - २ टक्केच साधक असतात आणि त्यांपैकी मी एक आहे, असा विचार करणारा ! : अन्य साधकांप्रमाणे आध्यात्मिक उन्नती होत नाही, असे वाटून निराश होत नाही आणि साधनेत सातत्य ठेवल्यानेच स्वत:ची आध्यात्मिक उन्नती होईल, हे तो जाणतो.

मनोराज्यात रमणे या दोषावर कशी मात करायची ? यासंदर्भात देवाने सुचवलेली सूत्रे

सौ. प्राची रोहन मेहता
     २ - ३ वर्षांपासून माझा मनोराज्यात रमणे हा दोष पुष्कळ उफाळून येत होता. नंतर त्रासामुळे मला दृश्य दिसायची आणि ऐकूही यायचे. त्यावर उपाय म्हणून दिवसात स्वयंसूचनांची २० सत्रे करूनही काहीच उपयोग होत नव्हता; मात्र मागच्या १ आठवड्यापासून मनोराज्यात रमतांना मला जाणीव होत असे, उदा. ३० वेळा असे मनोराज्यात रमणे होत असेल, तर त्याची जाणीव होऊन २८ वेळा मी त्यावर मात करू शकायचे. नंतर पुन्हा मी देवाला शरण गेले. तेव्हा देवाने मला पुढील सूत्रे सुचवली.
१. दोष उफाळून येण्याची कारणे
     तीव्र स्वेच्छा असते किंवा आपल्याला हवे असलेले काही कारणांनी मिळत नसेल, तर मनोराज्यात रमणे होते. मन तसा विचार करून त्याच विचारांमध्ये सुखावते. त्यामुळे मनाचा संबंध वास्तवाशी रहात नाही.
२. दुष्परिणाम
अ. मोठी वाईट शक्ती असत्य प्रसंग दाखवून आपल्याला मनामध्ये गुंतवून ठेवतो. त्यामुळे मनोमयकोषात आणि इतरत्र काळी शक्ती पसरते.
आ. मोठी वाईट शक्ती मनोराज्यात रमणे आणि तीव्र स्वेच्छा या दोष अन् अहंच्या केंद्रांवर आवरण आणतो. त्यामुळे दोष आणि अहं यांच्याशी लढायला संघर्ष होतो.
इ. निराशेमुळे आणि साधनेत मरगळ आल्याने अष्टांग साधनेवर विपरीत परिणाम होतो. साधनेचा अमूल्य वेळ वाया जातो.
ई. मोठी वाईट शक्ती काळ्या शक्तीचे आवरण वाढवते. त्यातून बाहेर पडायला पुष्कळ लढून उपाय करावे लागतात.
३. मात करण्यासाठी करायचे प्रयत्न
३ अ. स्वतःला चिमटा काढणे : मनोराज्यात रमत आहे, हे कळल्यावर लगेच स्वतःला चिमटा काढू शकतो.
३ आ. देवाला शरण जाऊन प्रार्थना करणे : त्याक्षणी देव किंवा गुरु यांना शरण गेल्यास त्यांची शक्ती आपल्याला मिळते.

श्री विठ्ठलाने भेटायला बोलावले आहे, असे सांगणारा ६१ टक्के आध्यात्मिक स्तर असणारा चि. वल्लभ पाध्ये !

चि. वल्लभ पाध्ये
१. मिरवणूक पाहिल्यावर श्री विठ्ठलाने चंदनपुरीला
 भेटण्यास बोलावले आहे, असे वल्लभने सांगणे
     ७.२.२०१६ या दिवशी नागेशीला गेल्यावर रस्त्यावरून एक फेरी गेली. त्यात गाडीवर श्री विठ्ठल रखुमाईचे मोठे चित्र होते आणि मागे-पुढे दुचाकीवरून अनेक माणसे हातात ध्वज घेऊन होते. ध्वनीक्षेपकावर श्री विठ्ठलाची गाणी लावलेली असल्याने चि. वल्लभ ती मिरवणूक पहात होता. त्यानंतर वल्लभ माझ्याकडे आला आणि म्हणाला, आई मला विठ्ठल दिसला. त्याने मला चंदनपुरीला भेटण्यास बोलावले आहे. मी म्हणाले, कशाला बोलावले आहे ? त्यावर तो म्हणाला, भेटून नमस्कार करून येऊया ! हे तो मला सांगत असतांना त्याला प्रत्यक्ष श्री विठ्ठल दर्शन झाल्याचे त्याच्याकडे पाहून जाणवत होते.
- सौ. पूर्वा राकेश पाध्ये, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.२.२०१६)
२. संतांनी त्याचे बोलणे आध्यात्मिक स्तरावरील असल्याचे सांगितल्यावर
तेथे जाण्याचे नियोजन करणे, गाडीतील श्री विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती 
पाहून वल्लभने तोच आपल्याला न्यायला आला आहे, असे सांगणे
      वल्लभचे वरील बोलणे संतांना सांगितल्यावर त्यांनी ते आध्यात्मिक स्तरावरील असल्याचे सांगितले. वल्लभच्या सांगण्याप्रमाणे चंदनपुरी या गावाचा उल्लेख आला आहे. प्रत्यक्षात श्री विठ्ठल मंदिर पंढरपूरला आहे. त्यामुळे आम्ही तिथे जायचे नियोजन केले. नृसिंहवाडीला श्रीनृसिंह सरस्वतींचे दर्शन घेतल्यावर आम्ही एका बसमध्ये बसल्यावर चंदनपुरीला जाण्याविषयी चौकशी केल्यावर चालकाने सांगितले की, जेजुरी-सासवड मार्गावर चंदनपुरी गाव आहे आणि तिथे मोठे विठ्ठलमंदिरही आहे.

उटी येथील वृंदावन गार्डनमधील वृक्षाने प.पू. डॉक्टरांना उद्धार करायला सांगण्याविषयी सांगणे

सौ. नेहा जोशी
     डिसेंबर २०१५ मध्ये मी आणि माझे पती उटीला गेलो होतो. फिरतांना आम्ही तेथील वृंदावन गार्डन मध्ये गेलो होतो. तिथे पुष्कळ मोठे वृक्ष होते. ते वृक्ष पहातांना त्यामधील एका वृक्षाशी माझा संवाद झाला. मी त्याला म्हटले, तू किती उंच आहेस ?, तुला पाहून मला पुष्कळ आनंद झाला. तेव्हा तो वृक्ष मला म्हणाला, प.पू. डॉक्टरांना आमचा उद्धार करायला सांगशील का ? हे ऐकल्यावर माझ्या अंगावर पुष्कळ रोमांच आले आणि मी त्या वृक्षाला म्हटले, हो. मी हे त्यांना नक्की सांगेन. ही अनुभूती टंकलेखन करतांनाही माझी भावजागृती झाली. - सौ. नेहा जोशी, पुणे (३.९.२०१६)
स्वतःच्या मुलीची इतर मुलींसमवेत तुलना करतांना श्री भवानीमातेने प्रत्येक मुलीमध्ये माझेच एक रूप आहे, असे सांगणे

सौ. श्रेया शशांक साने
     २२.२.२०१६ या दिवशी ध्यानमंदिरात जप करायला बसले असता मला माझ्या मुलीविषयी पुष्कळ विचार येत होते, ती कधी शहाण्यासारखी वागेल ? मनात असे विचार येऊन तिच्या वयाच्या इतर मुलींशी माझे मन तुलना करून निराश होऊ लागले. तेवढ्यात तेथे असलेल्या भवानीमातेकडे माझे लक्ष गेले. मातेने मला सांगितले, अगं ! या मुली म्हणजे माझीच विविध रूपे आहेत. या रूपांच्या माध्यमातून मला निरनिराळी कार्ये करायची आहेत. तू माझ्या एका रूपाची तुलना दुसर्‍या रूपाशी कशी करू शकतेस ? मी महालक्ष्मी असते, तेव्हा माझ्या हातात कमळ असते. मी महाकाली असते, तेव्हा माझ्या हातात अग्नी आणि खड्ग असते. मी महासरस्वती असते, तेव्हा माझ्या हातात वीणा असते. त्यामुळे तू ही काळजी आणि तुलना करणे बंद कर. मला ज्यांच्याकडून जे कार्य करवून घ्यायचे आहेत, ते गुण मी त्यांना दिले आहेत. ते गुण म्हणजे त्यांना दिलेली शस्त्रेच आहेत. त्या शस्त्रांचा केव्हा, कधी आणि कसा उपयोग करायचा, हे सर्वस्वी मला ठाऊक आहे आणि योग्य वेळ आल्यावर मी ते करवून घेणार आहे. ते गुण कौतुकाचे माध्यम नसून अध्यात्मात पुढे जाण्याचे साधन आहे, हे लक्षात ठेव आणि चिंता करू नको.

इतरांचा विचार करणारा आणि साधनेची आवड असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला भाग्यनगर (तेलंगण) येथील चि. साईवर्धन नेला (वय ९ वर्षे)

चि. साईवर्धन नेला
१. गुणवैशिष्ट्ये 
१ अ. इतरांचा विचार करणे 
१. चि. साईवर्धनजवळ काही खाऊ असला, तर तो एकटा न खाता सर्वांना देतो.
२. त्याच्या आईची शारीरिक स्थिती चांगली नसली, तर तो तिची पुष्कळ काळजी घेतो.
३. तो प्रतिदिन सेवाकेंद्रातील देवपूजेसाठी फुले आणतो. एक दिवस त्याने पुष्कळ फुले आणलेली पाहून मी सर्व फुलांची वेगळ्या प्रकारे रचना करून ती वापरली. तेव्हा तो म्हणाला, ताई, मी जास्त फुले आणली, तरी तुम्ही त्यांचा देवासाठी चांगला वापर केला. त्यामुळे ध्यानमंदिर अतिशय चांगले दिसते.
- कु. कनकमहालक्ष्मी, भाग्यनगर, तेलंगण. (२३.५.२०१६)

इतरांचा विचार करणारे आणि साहाय्यास सदैव तत्पर असणारे ६५ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले देवद आश्रमातील श्री. अजय प्रजापती !

श्री. अजय प्रजापती
     ६५ प्रतिशत आध्यात्मिक स्तर गाठलेले श्री. अजय प्रजापती हे देवद येथील आश्रमात पुष्कळ वर्षांपासून सेवा करतात. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते संगणक तज्ञ आहेत. संगणकातील कोणतीही अडचण ते लगेच सोडवतात. प.पू. डॉक्टरांच्या कृपेने त्यांच्या व्यक्तीमत्त्वातील काही वैशिष्ट्ये मला जाणवली. ती मी पुढे देत आहे.
१. इतरांचा विचार करणे
     श्री. अजय प्रजापती यांची मूळ भाषा गुजराती आहे. ते गुजराती भाषिक असूनही इतरांना समजावे, यासाठी आश्रमातील भोजनकक्षात चुका सांगतांना आणि फलकावर चुकांचे लिखाण करतांना मराठी भाषेत करतात.
२. साहाय्यास सदैव तत्पर असणे
      मी टंकलेखनाची सेवा करत असलेला भ्रमणसंगणक जुन्या मॉडेलचा आहे. त्यामुळे टंकलेखन करतांना त्यामध्ये पुष्कळ वेळा अनेक अडचणी येतात. तो नादुरुस्त होतो. अशा वेळी जी अडचण कुणालाही सुटत नाही, ती अजयदादा पटकन सोडवतात. ते स्वतःच्या सेवेत कितीही व्यस्त असले, तरी मी दूरध्वनी केल्यावर ते लगेच येतात. केवळ संगणकाच्या संदर्भातच नव्हे, तर मला पलंगावरून चाकाच्या सायकलवर घ्यायचे असू दे किंवा सायकलवरून पलंगावर ठेवायचे असू दे, प्रत्येक वेळी ते तत्परतेने सेवेसाठी येतात आणि साहाय्य करतात.

नामजपाचे गांभीर्य आणि गुरुकार्याची तीव्र तळमळ असलेल्या देवद आश्रमातील कु. महानंदा पाटील !

कु. महानंदा पाटील
१. नामजपाचे गांभीर्य
     कु. महानंदा पाटील प्रतिदिन ३ घंटे नामजप करतात. सेवेचा वेळ जाऊ नये; म्हणून त्या सेवा संपल्यावर रात्री १२ वाजेपर्यंत जागून नामजप पूर्ण करतात. नामजपाचे महत्त्व आणि गांभीर्य कसे असावे, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळते.
२. गुरुकार्याची तीव्र तळमळ
     रक्षाबंधनाच्या निमित्ताने सनातनच्या राख्या सर्व जिल्ह्यांना पाठवायच्या होत्या. या राख्यांच्या बांधणीच्या सेवेच्या सुमारास ताईंचा पाय ऊन पाण्याने भाजला. त्यांना तीव्र वेदना होत होत्या. त्या दिवशी आवश्यक ते उपचार करून दुसर्‍याच दिवशी त्या सेवेला उपस्थित झालेल्या बघून सर्वांना आश्‍चर्य वाटले. आम्हाला वाटत होते, ताई आता २ - ३ दिवसतरी सेवेला येऊ शकणार नाहीत. या प्रसंगातून ताईंची गुरुकार्याची तीव्र तळमळ शिकायला मिळाली.
- सौ. उषा पुराणिक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.८.२०१६)
साधिकेने अनुभवलेली संत तुकाराम महाराज यांची उत्कट भावावस्था आणि संत तुकाराम महाराज अन् ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अश्‍विनी पवार यांच्या प्रीतीतील लक्षात आलेले साम्य

सौ. अश्‍विनी पवार
१. सेवा करतांना एका बाटलीतील अत्तर सांडल्याने ही चूक लिहून द्यावी 
लागेल, हे विचार येणे आणि दायित्व घेऊ नये, असे वाटणे
      ३०.७.२०१६ या दिवशी मी दुपारी चमेली अत्तर भरलेल्या बाटल्यांना बूच लावत होते. तेव्हा त्यातील एक बाटली लवंडून अडीच मि.ली. अत्तर सांडले. त्यामुळे मला ताण आला. मी लक्षपूर्वक कृती न केल्याने अत्तर सांडले. मी निराश झाले. मला काही सुचेनासे झाले. मी दुपारी ३ वाजता विश्रांती घेण्यासाठी खोलीत आले; पण मनाला रुखरुख लागली. त्यामुळे झालेली चूक लिहून तो कागद अश्‍विनीताईला देण्यासाठी गेले; पण ती भेटली नाही; म्हणून परत खोलीत आले. मी विश्रांतीसाठी पहुडले असता मला झोपच येईना. माझ्या मनात सतत विचार चालूच होते. तेव्हा नको ती अत्तर सेवा; कारण दायित्व घेतले नाही, तर चूक होणार नाही, असा नकारात्मक विचार आला.
२. अश्‍विनीताईला स्वतःची चूक सांगितल्यावर तिने प्रेमाने 
चूक होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यास सांगणे
     त्यानंतर मी दुपारी ४.३० वाजता चूक लिहिलेला कागद घेऊन पहिल्या माळ्यावर आले. तेथे अश्‍विनीताई भ्रमणभाषवर बोलत होती. मी तिच्याजवळ जाऊन तिच्या हातात कागद देत होते. तेव्हा भ्रमणभाषवरील बोलणे थांबवून तिने मला अगदी प्रेमाने विचारले, काय झाले ? तेव्हा मी म्हणाले, माझ्याकडून अडीच मि.ली. अत्तर सांडले आहे

अविधवा नवमीच्या दिवशी श्राद्धविधीच्या वेळी आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे !

सौ. सुजाता कुलकर्णी
      ६.१०.२०१५ या दिवशी अविधवा नवमी असल्याने रामनाथी आश्रमात महालय श्राद्ध करण्याचे नियोजन केले होते. आश्रमातील पुरोहित साधकांनी सर्व सिद्धता करून ठेवली होती. साधारण आठ-नऊ जणांच्या श्राद्ध विधीचे नियोजन होते. त्या वेळी आलेल्या अनुभती आणि जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.
१. अनुभूती 
१ अ. वातावरणात दाब न जाणवणे : श्राद्धविधी चालू असतांना मला दाब मुळीच जाणवला नाही. सर्वजण मंगलकार्य असल्याप्रमाणे उत्साहाने विधी करत होते. घरी श्राद्ध करतांना प्रचंड दाब जाणवतो. इथे आम्ही ४ - ५ साधिका पिंड बनवत होतो. तेव्हा पिंड करत आहोत, असे न वाटता चांगल्या कार्यक्रमासाठी लाडू करत आहोत, असेच सर्वांना वाटत होते.

पितृपक्षातील श्राद्ध !

       ४ ऋणांपैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. श्राद्धाचे इतके महत्त्व असतांनाही आज हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे श्राद्धविधी दुर्लक्षिला जाऊ लागला आहे; म्हणूनच अन्य संस्कारांइतकाच श्राद्ध हा संस्कारही अत्यावश्यक कसा आहे, हे सांगणे क्रमप्राप्त ठरते. १७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्यानिमित्ताने श्राद्धविषयक लिखाण देत आहोत.

तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही स्वतःतील दोष आणि अहं नष्ट करून प.पू. डॉक्टरांच्या चरणी विलीन होण्यासाठी तळमळीने प्रार्थना करणारी कु. नीलिमा कुलकर्णी

कु. नीलिमा कुलकर्णी
प.पू. डॉक्टरांना साष्टांग नमस्कार
     प.पू. डॉक्टर, सध्या माझी नकारात्मक स्थिती पुष्कळ वाढली आहे. सगळे साधक म्हणतात, तुम्ही आहात; म्हणून माझे एवढे तरी चालू आहे. प.पू. डॉक्टर, मी तुम्हाला कुठल्याही क्षणी सोडेन; पण तुम्ही मला सोडू नका. तुम्ही जिथे जाल, तिथे मला न्या. तुमची कृपादृष्टी माझ्यावर अखंड असू दे.
     प.पू. डॉक्टर, मला सदेह मुक्ती हवी आहे. मला तुमच्या कृपाछत्राखालीच रहायचे आहे. कायमस्वरूपी देवाच्या जवळच रहायचे आहे. मेल्यावरही देवाच्या जवळच रहायचे आहे. मला कायमस्वरूपी देवाचेच व्हायचे आहे. ही सगळी माझी स्वप्ने आणि माझ्या इच्छा आहेत; पण माझे दोष आणि माझा अहं यांमुळे माझी ही स्वप्ने पूर्ण होणार नाहीत, असे मला वाटते.
     प.पू. डॉक्टर, माझ्यातील स्थूल आणि सूक्ष्म स्तरावरील तीव्र दोष आणि तीव्र अहं नष्ट करा. माझी भाव-भक्ती वाढवा. मला तुमच्या अनुसंधानात ठेवा. या पृथ्वीवरून मला सोडवा. मला याच जन्मात तुमच्यात विलीन करा. मला माहीत आहे की, माझी लायकी नाही; पण मला तुमची व्हायचे आहे.
     प.पू. डॉक्टर, मला सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्यासारखे व्हायचे आहे. मला रणरागिणी व्हायचे आहे. तुमची कृपा संपादन करायची आहे. माझ्या मनात मायेतले विचार अजिबातच येऊ देऊ नका.

प.पू. डॉक्टरांच्या चैतन्यमय आवाजातील ध्वनीफिती ऐकल्यावर केवळ ५ मिनिटांत शांत झोप लागणे आणि सकाळी वेळेत जाग येऊन उत्साही वाटणे

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...      १९ ते २६ एप्रिल २०१६ या कालावधीत रात्री झोपतांना माझ्या मनात असंख्य अनावश्यक विचार यायचे आणि मला २ - ३ घंटे झोप लागत नसे. काही वेळा विचारांचे प्रमाण अती होऊन मन थकल्याने झोप लागे; मात्र थोड्या वेळाने जाग येऊन पुन्हा २ - ३ घंटे झोप लागत नसे. अशा वेळी अंथरुणात पडून नामजप आणि प्रार्थना करणे, भ्रमणभाषवर भजने ऐकणे, दैनिक सनातन प्रभातचे वाचन करणे, असे प्रयत्न केले; पण परिणाम जाणवत नसे. अनावश्यक विचारांमुळे मनाची पुष्कळ ऊर्जा व्यय होत असे. प्रत्येक रात्री होणार्‍या जागरणामुळे पित्त वाढणे, दुसर्‍या दिवशी निरुत्साह वाटणे, असे शारीरिक त्रासही होऊ लागले.
     यावर उपाय म्हणून सहसाधकाकडून प.पू. डॉक्टरांच्या चैतन्यमय आवाजातील प्रवचनाच्या क्लिप्स घेतल्या. २७.४.२०१६ पासून रात्री झोपण्यापूर्वी सर्व उपाय केल्यावर उपरोक्त क्लिप भ्रमणभाषवर लावल्या आणि हेडफोन कानांना लावून झोपलो. तेव्हापासून त्या चैतन्यमय आवाजामुळे केवळ ५ मिनिटांत शांत आणि गाढ झोप लागते, तसेच सकाळी गजर वाजताच वेळेत जाग येऊन उत्साही वाटत आहे.

सनातन संस्थेतील साधकांची देवतांची अन् इतर वैशिष्ट्यपूर्ण नावे

     काही दिवसांपूर्वी मनात विचार आला की, अध्यात्मात एक नियम आहे, शब्द, स्पर्श रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती हे एकत्र असतात. सनातन संस्थेतील साधकांची नावेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी भगवंताने असे साधक देऊन सनातन संस्थेला आशीर्वाद दिला आहे, असे वाटते. यातील काही नावे पुढीलप्रमाणे आहेत.
१. श्रीविष्णूच्या दशावतारांपैकी आणि त्रिदेवतांपैकी काही नावे
     विष्णु, महेश, शंकर, श्रीराम, परशुराम, श्रीकृष्ण, लोमेश (वराह अवताराचे नाव), विठ्ठल, लक्ष्मीनारायण, घनःशाम, वासुदेव, किसन कन्हैया, नागेश, गजानन, आेंकार
२. श्रीविष्णूच्या हातातील आयुधांची नावे
सुदर्शन, कौमुदी (गदा)
३. देवींची नावे
रुक्मिणी, सावित्री, लक्ष्मी, पार्वती, शांता, अंबिका, वैष्णवी, शुभांगी
४. पंचतत्त्वांची नावे
पृथ्वी : अवनी; आप : सागर; तेज : रवि, भानू; वायू : अनिल, पवन; आकाश : आकाश
५. संतांची नावे
ज्ञानेश्‍वर, रामदास, तुकाराम
६. नवविधा भक्तींपैकी काही नावे
भक्ती, श्रावणी (श्रवण), अर्चना (अर्चन), कीर्तन
७. पूजेच्या संदर्भातील नावे
पूजा, अक्षता, आरती, प्रार्थना, प्रसाद,

सौ. आदिती देखणे यांना बाळाच्या संगोपनाची सेवा करतांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !

     श्रीकृष्णाच्या कृपेने मला प्रतिदिन बाळाचे संगोपन करतांना पुढील प्रार्थना आणि कृतज्ञता सुचल्या. १. हे श्रीकृष्णा, तुझ्या कृपेने मला हे बाळ मिळाले आहे, यासाठी मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे.
२. हे श्रीकृष्णा, हे बाळ तुझेच सगुण रूप आहे, याचे मला सतत भान राहू दे.
३. तुझ्या कृपेने मला आणि बाळाला अन्न अन् पाणी मुबलक प्रमाणात मिळत आहे, याची मला सतत जाणीव राहू दे.
४. हे श्रीकृष्णा, बाळाचे संगोपन ही साधना कशी होईल, हे तूच मला शिकव. मला काहीही कळत नाही. मी तुझ्या चरणी शरण आले आहे.
५. हे मूल तूच दिले आहेस. त्याला उत्तम साधक म्हणून कसे घडवायचे, हे तूच मला शिकव.
६. स्वतःवर आणि बाळावर उपाय करण्याची सतर्कता आणि तत्परता माझ्यामध्ये निर्माण होऊन माझ्याकडून उपाय करण्याची कृती होऊ दे.
७. बाळाच्या प्रत्येक बाललीलेच्या वेळी माझे मन शांत आणि स्थिर राहू दे.
८. बाळाच्या सेवेमध्ये असतांना मला तुझ्या सेवेचा आनंद अनुभवायला मिळू दे.
९. बाळाची सेवा करत असतांना माझ्याकडून अखंड नामजप होऊ दे.
१०. बाळाची सेवा करतांना माझे स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू प्रकट होतात. त्या वेळी मला त्यांची जाणीव होऊन माझ्याकडून त्वरित स्वतःमध्ये पालट घडवण्यासाठी प्रयत्न होऊ देत.
११. बाळाच्या सहवासात मला त्याचे आनंदी असणे, हसतमुख असणे, वर्तमान काळात रहाणे इत्यादी सर्व गुण शिकता येऊ देत आणि ते माझ्याकडून आत्मसात होऊ देत.
१२. बाळाच्या सत्संगाचा मला मन, बुद्धी आणि चैतन्य यांच्या स्तरावर लाभ होऊ दे.
१३. प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकणे, उदबत्ती लावणे, प्रार्थना, नामजप आदी सर्व उपायांचा बाळालाही लाभ होऊ दे
      आज प्रत्येक आई-वडील माझा मुलगा डॉक्टर, अभियंता वगैरे व्हावा, असे म्हणतात; पण कोणीही सत्पुरुष व्हावा, असे म्हणत नाहीत !
- प.पू. झुरळे महाराज, डोंबिवली

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ 
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥ 
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
 - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
कुठे पाश्‍चात्त्यांची वेळकाढू संशोधनपद्धत, तर कुठे 
क्षणात कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर देणारी भारतीय साधना !
       पाश्‍चात्त्यांची संशोधनपद्धत आहे, माहिती गोळा करा, तिचे सांख्यिकी विश्‍लेषण (Statistical analysis) करा आणि मग निष्कर्ष काढा. याला अनेक वर्षे लागतात. याउलट साधनेत प्रगती झाली की, क्षणात जगातील कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर मिळते.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
आनंद माझ्या मागे आहे. दुःख माझ्या पुढे आहे. माझ्या मागे जो आनंद आहे, तो तुमच्या मागे येईल, तेव्हा मी सुखी होईन. मी दुःखी आहे. 
भावार्थ : 'आनंद माझ्या मागे आहे', याचा अर्थ याप्रमाणे आहे. सुषुम्ना नाडीतून शक्तीप्रवाह जाऊ लागला की, आनंदाची अनुभूती येते. ही सुषुम्ना नाडी पाठीच्या मणक्यातून, म्हणजे शरीराच्या मागच्या भागातून जात असल्याने 'आनंद माझ्या मागे आहे', असे म्हटले आहे. 'दुःख माझ्या पुढे आहे' म्हणजे प्रकृतीमुळे निर्माण झालेले भोग समोर येतात, त्याचे दुःख होत असते. 'मी दुःखी आहे' म्हणजे तुम्ही नामजप करून आनंदी होत नाही, याचे मला दुःख आहे. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

चुकांकडे कसे पहावे ? 
कालक्रमणा करतांना मनुष्याकडून चुका घडतातच; पण प्रत्येक चुकीपासून 
आपण काहीतरी शिकलो, तरच पुढील आयुष्य यशस्वी होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बलाढ्य कोण पाक कि भारत ?

संपादकीय 
       जम्मू-काश्मीर राज्यातील उरी येथील सैन्याच्या मुख्यालयावर आतंकवादी आक्रमण झाले. यातील ४ आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले आणि देशाचे १८ सैनिक मोहरे हुतात्मा झाले. क्रूर कृत्ये करणार्‍या ४ आतंकवाद्यांमुळे देशाच्या १८ सैनिकांना प्राण गमवावे लागणे, ही गोष्ट देशवासियांच्या जिव्हारी लागली. दूरचित्रवाहिन्यांनी हुतात्मा सैनिकांच्या पार्थिवाचे दर्शन, शोकाकूल कुटुंबीय, अंत्ययात्रा यांचे चित्रण प्रसारित करून त्यात आणखीनच भर घातली. त्याच वेळी भारतीय शासन मात्र या वेळी पाकला धडा शिकवेलच, असा एक विश्‍वास देशवासियांच्या मनात निर्माण झाला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn