Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

 कोटी कोटी प्रणाम !

सनातनच्या ६३ व्या
संत पू. (सौ.) सुशिला मोदी
यांचा आज वाढदिवस 


सनातनच्या आश्रमातील साधकांचा छळ होतो; मात्र पाकवर कारवाई होत नाही !

दैनिक सामनाच्या संपादकियातून सरकारवर कडक शब्दांत टीका 
     मुंबई - आमच्या देशात कारवाई कोणावर होते, तर साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर होते. काश्मिरात अतिरेक्यांशी लढणार्‍या कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यावर होते. अन्वेषण यंत्रणा 'सनातन'सारख्या आश्रमात जाऊन वृद्ध, अपंग साधकांचा छळ करतील. हिंदुत्ववाद्यांवर, प्रखर राष्ट्रभक्तांवर कठोर कारवाई करण्याची एकही संधी ही मंडळी सोडणार नाही; पण १८ सैनिकांचे बळी घेणार्‍या पाकड्यांवर म्हणावी, तशी कठोर कारवाई होत नाही. ती आता तरी होईल, अशी अपेक्षा आहे, असेे परखड प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी २१ सप्टेंबरच्या दैनिक सामनाच्या संपादकियातून केले आहे. (सातत्याने सनातनवरील अन्यायाला वाचा फोडणार्‍या दैनिक सामनाचे आभार ! - संपादक)

डॉ. दाभोलकर कुटुंबियांची चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण 
डावीकडून सर्वश्री विजय गावडे, शैलेंद्र दीक्षित, सुनील घनवट,
अभय वर्तक, पू. सुनील चिंचोलकर, अधिवक्ता देवदास शिंदे, पराग गोखले

तमिळनाडूत धर्मांधांनी हिंदुत्वनिष्ठ नेते अर्जुन संपथ यांचे चारचाकी वाहन पेटवले !

हिंदूंच्या जिवावर उठलेले धर्मांध ! 
हिंदूंनो, तुमच्या नेत्यांच्या रक्षणासाठी हिंदूसंघटनाविना पर्याय नाही ! 
श्री. अर्जुन संपथ 
     हिंदु नेत्याच्या ऐवजी एखाद्या अल्पसंख्यांक समुदायाच्या नेत्याच्या गाडीला आग लावण्यात आली असती, तर एव्हाना संपूर्ण 'धर्मनिरपेक्ष' भारताने 'देश असहिष्णू झाला आहे. येथील अल्पसंख्यांक असुरक्षित झाले आहेत', अशी आरोळी ठोकायला आरंभ केला असता. आता मात्र कोणी काहीच बोलत नाही. त्यामुळे हिंदूंना त्यांच्याच देशात सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याचे हे आणखी एक ढळढळीत उदाहरण आहे. ही स्थिती पालटण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन करून हिंदु राष्ट्राची अर्थात् सनातन धर्म राज्याची स्थापना करणे, हा एकमेव उपाय आहे, हे लक्षात घ्या ! 

कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्तींची विटंबना

हिंदु जनजागृती समितीने आवाज उठवल्यावर कृत्रिम हौदातील 
शिल्लक राहिलेल्या अनुमाने १ सहस्र श्री गणेशमूर्तींचे तलावात विसर्जन ! 

     भाविकांनो, कृत्रिम हौदातील गणेशमूर्तींची कशा प्रकारे विटंबना होते, हे जाणा आणि कृत्रिम हौदाची संकल्पनाच विसर्जित करण्यासाठी प्रयत्न करा ! शास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करणे आवश्यक आहे. तसे न करता मनानेच धर्माचरणाला फाटा देणे, तसेच चुकीच्या संकल्पनांचा पुरस्कार करणे, हे श्री गणेशाच्या अवकृपेला पात्र होण्यासारखे आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी सर्वांना धर्मशिक्षण देणारे हिंदु राष्ट्रच हवे ! 

पाकला आतंकवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी अमेरिकेत खाजगी विधेयक !

     वॉशिंग्टन - काश्मीरमधील उरी येथील सैन्याच्या मुख्यालयावर झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून भारताला समर्थन मिळत आहे. त्यातच अमेरिकेतील २ लोकप्रतिनिधींनी 'पाकला आतंकवादाचा पुरस्कार करणारे राष्ट्र' घोषित करण्यासाठी अमेरिकी संसदेत खाजगी विधेयक सादर केले आहे. 

उरी येथील आक्रमणामागे घरभेद्याच्या सहभागाची शक्यता !

       नवी देहली - उरी येथील सैन्य मुख्यालयावर आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांना तेथील मुख्य कमांडरचे घर आणि कार्यालय यांची इत्यंभूत माहिती होती. त्यामुळे कोणातरी घरभेद्याने मुख्यालयाची सर्व माहिती दिली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार चौकशी करण्यात येत आहे. 
     आतंकवादी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सुखदर येथून उरी येथे पोचले. या मार्गावर जंगल आहे. चार कि.मी.च्या या मार्गातही त्यांना साहाय्य मिळाले असण्याची शक्यता आहे. आतंकवाद्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा पार केल्यानंतर मुख्यालयाचे कुंपण आणि नंतर सीमा सुरक्षा दलाची चौकीही पार केली होती. त्यासाठी घरभेद्याने साहाय्य केल्याची शक्यता आहे. कारण येथे घुसणे अशक्यच आहे. येथे चारही बाजूंनी सुरक्षारक्षक तैनात असतात. एका किल्ल्याप्रमाणे येथे सुरक्षा असते. एखाद्या परिचित व्यतिरिक्त कोणीही येथे येऊ शकत नाही. 
      येथे काम करणार्‍या ५०० हमालांपैकी कोणीतरी साहाय्य केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हे सर्व हमाल उरीच्या आजूबाजूच्या गावात रहातात. आक्रमणानंतर काही हमाल घरी परतलेले नाहीत, अशीही माहिती मिळालेली आहे.(म्हणे) 'पाकच्या आधी भारताचा आण्विक कार्यक्रम बंद करण्यास सांगा !' - पाकिस्तान

भारताचा आण्विक कार्यक्रम पाकच्या कार्यक्रमाच्या आधीपासून
 आहे; मात्र भारताने कधीही 'पाकवर अण्वस्त्रे सोडू', असे म्हटलेले 
 नाही; मात्र पाककडून भारतावर अण्वस्त्रे सोडण्याची अनेकदा धमकी
 देण्यात आली आहे. त्यामुळे पाकनेच आण्विक कार्यक्रम बंद केला पाहिजे ! 
     नवी देहली - संयुक्त राष्ट्रसंघामधील पाकच्या कायमस्वरूपी प्रतिनिधी मलीहा लोढी यांनी पाकच्या आण्विक कार्यक्रमावर निर्बंध घातले जाणार नाहीत, अशी स्पष्टोक्ती केली. पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या समवेतच्या भेटीमध्ये अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी पाकच्या आण्विक कार्यक्रमावर मर्यादा घालण्याचे आवाहन केले होते; मात्र पाककडून जी अपेक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे, त्याच अपेक्षेची कार्यवाही भारताकडूनही व्हावयास हवी, असे शरीफ यांनी या भेटीत केरी यांना सांगितल्याची माहिती लोढी यांनी दिली. पाकच्या आधी भारताचा आण्विक कार्यक्रम बंद करा, असे लोढी यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले. आतंकवादाविरोधात पाकइतकी लढाई अन्य कोणत्याही देशाने केली नसल्याचा दावा त्यांनीही केला. या परिषदेमध्ये लोढी यांच्यासमवेत पाकचे परराष्ट्रमंत्री अझीझ चौधरी हेही उपस्थित होते.

अंकारा (तुर्कस्थान) येथे इस्रायलच्या दूतावासावर आक्रमण !

     नवी देहली - तुर्कस्थानची राजधानी अंकारामध्ये असलेल्या इस्रायलच्या दूतावासावर आक्रमण करण्यात आले. पोलीस अधिकार्‍यांच्या माहितीनुसार आक्रमण करणार्‍यास अटक करण्यात आली आहे. तो पोलिसांच्या प्रत्युत्तरात घायाळ झाला आहे. या आक्रमणकर्त्याने दूतावासावर गोळीबार करत आक्रमण केले होते.

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

     सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वी पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे क्रमशः प्रसिद्ध करत आहोत. 

तमिळनाडूमध्ये गरिबांसाठी ठिकठिकाणी अम्मा विवाह सभागृह बांधणार ! - जयललिता

कुठे प्रसिद्धीपराङभिमुख राज्यकारभार करणारे पूर्वीचे तेजस्वी हिंदु राजे, 
तर कुठे स्वत:च्या नावाने योजना चालू करणारे प्रसिद्धीलोलुप राजकारणी !
      चेन्नई - राज्यात लवकरच ठिकठिकाणी अम्मा विवाह सभागृह बांधणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री जयललिता उपाख्य अम्मा यांनी केली. अम्मा पुढे म्हणाल्या, विवाह समारंभासाठी गरिबांना सभागृहाचे अधिक भाडे भरावे लागत असल्याने त्यांच्यासाठी सभागृहांची उभारणी करण्यात येत आहे. गरिबांना हे सभागृह अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येतील. राज्यातील ११ ठिकाणी ही सभागृहे बांधण्यात येणार असून ती वातानूकुलित असतील. या सभागृहांची ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधाही उपलब्ध केली जाणार आहे. या सभागृहांच्या बांधकामासाठी ८३ कोटी रुपये व्यय करण्यात येणार आहे.

मंगळुरू (कर्नाटक) येथे सात दिवसीय राज्यस्तरीय शिबीर भावपूर्ण वातावरणात संपन्न

साधकांना मार्गदर्शन करतांना
सद्गुरु सत्यवान कदम (डावीकडे)
     मंगळुरू - साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती व्हावी आणि विहंगम धर्मप्रसार व्हावा, याकरता १० ते १६ सप्टेंबर या कालावधीत येथे साधनावृद्धी आणि विहंगम धर्मप्रसार हे ७ दिवसीय राज्यस्तरीय शिबीर उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात पार पडले. या शिबिराला कर्नाटक राज्यातून ६५ साधक उपस्थित होते. या शिबिराला सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
१. शिबिराचा उद्देश सद्गुरु सत्यवान कदम यांनी स्पष्ट केला. 

इंडोनेशियामध्ये पूर आणि भूस्खलन यांमुळे १० जणांचा मृत्यू !

महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
      १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (इंडोनेशियामध्ये पूर आणि भूस्खलनाच्या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक) 
     जकार्ता - इंडोनेशियामध्ये पूर आणि भूस्खलन यांमुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे. जावा बेटावर ३ जण बेपत्ता झाले आहेत. ३० जण घायाळ असून त्यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. पुरामुळे शेकडो लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील महिला संसद कार्यक्रमात लव्ह जिहादवर चर्चा

नारी संसदेला संबोधित करतांना हिंदु जनजागृती
समितीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर आणि व्यासपिठावर
हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या महिला पदाधिकारी
     गाझियाबाद (उत्तरप्रदेश) - हिंदु महिलांवरील अत्याचारांविषयी जागृती करण्यासाठी हिंदु स्वाभिमान संघटनेच्या वतीने डासना येथील प्राचीन देवी मंदिरामध्ये नुकतेच दोन दिवसीय हिंदु नारी संसदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आर्य समाज, हिंदू महासभा, वैदिक उपासना पीठ, विश्‍व हिंदू सेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखंड भारत मोर्चा, हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा या संघटनांच्या अनेक महिला पदाधिकार्‍यांनी त्यांची मते व्यक्त केली.

भारतात प्रत्येक वर्षी होते ६७ लाख टन अन्नाची नासाडी !

९२ सहस्र कोटी रुपयांची हानी !
  • देशात अनुमाने ३० टक्के लोक अर्धपोटी रहात असतांना एवढ्या प्रचंड प्रमाणात अन्नाची नासाडी होऊ देणे, हा एकप्रकारे सामाजिक गुन्हाच म्हणावा लागेल ! याला जनताही तितकीच उत्तरदायी आहे. सरकारनेही केवळ अहवाल प्रसिद्ध न करता त्यावर उपाययोजना काढणे अपेक्षित आहे !
  • हिंदु धर्मात अन्न हे पूर्णब्रह्म, असे सांगितले आहे. त्यामुळे अन्नाची नासाडी हे पाप समजले जाते. हे धर्मशिक्षण समजाला दिले, तर अन्नाची नासाडी निश्‍चितपणे टाळता येऊ शकेल !
     नवी देहली - एकीकडे देशात कोट्यवधी लोक अर्धपोटी असतांना दुसरीकडे मात्र प्रत्येक वर्षी ६७ लाख टन अन्नाची नासाडी होत असल्याचे उघड झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. वाया जाणार्‍या या अन्नाची एकूण रक्कम ९२ सहस्र कोटी रुपये असून ती केंद्रसरकारच्या राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कार्यक्रमाच्या अंतर्गत व्यय करण्यात येणार्‍या रकमेच्या दोन तृतीयांश इतकी आहे.

योगामुळे हृदयविकार, कर्करोग, क्षयरोग यांसारख्या अनेक व्याधींवर नियंत्रण मिळवणे शक्य ! - केंद्रीय आरोग्यमंत्री

     कोलंबो (श्रीलंका) - योगामुळे हृदयविकार, कर्करोग, क्षयरोग, फुफ्फुसाचे विकार यांसारख्या व्याधींवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी येथे सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिणपूर्व आशियाच्या ६९ व्या परिषदेत योगवर्गाला संबोधित करतांना ते बोलत होते.
      नड्डा पुढे म्हणाले, आपल्या अयोग्य जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या व्याधींवरही योगाद्वारे नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे. आपले शरीर हे मंदिर असेल, तर योगामुळे ते मंदिर सुंदर बनते. योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून ती एक शिस्तबद्ध आणि आदर्श जीवन जगण्याची पद्धत आहे. योगामुळे ध्यानावस्था प्राप्त होते आणि आत्मशक्ती जागृत होते. (एकीकडे योगातून ॐ वगळायचे आणि दुसरीकडे योगामुळे ध्यानावस्था प्राप्त होते, असेही म्हणायचे. याला काय म्हणावे ? - संपादक) या वेळी नड्डा यांनी जागतिक आरोग्य क्षेत्राविषयी भारताचा दृष्टीकोन स्पष्ट केला.

इसिसला पाठिंबा दिल्याच्या प्रकरणी लंडनमधील ओल्ड बेले न्यायालयाकडून दोघे दोषी !

हिंदुबहुल भारतात इसिसच्या समर्थकांचे समुपदेशन 
केले जाते, तर ख्रिस्ती राष्ट्रांत त्यांना दोषी ठरवले जाते !
     लंडन - इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेला पाठिंबा दिल्याच्या प्रकरणी लंडनमधील ओल्ड बेले न्यायालयाने चौधरी (वय ४९ वर्षे) आणि त्याचा साथीदार महंमद मिझानुर रहमान (वय ३३ वर्षे) या दोघांना दोषी ठरवले आहे. चौधरी आणि त्याच्या समर्थकांनी लंडनमध्ये आणि लंडनच्या बाहेर आतंकवादी आक्रमणे घडवून आणली होती. ते दोघेही धोकादायक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.राजस्थानमधील जयपूर येथे गोकुळाष्टमीनिमित्त लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनात धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त सहभाग !

      गोकुळाष्टमीच्या निमित्याने रंगजी मंदिरात ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या ठिकाणी प्रदर्शन लावण्यासाठी ११५ वर्षे पुरातन असलेल्या रंगजी मंदिराचे पुजारी श्री. दिनेश शर्मा आणि श्री. नवरत्न शर्मा यांचे पूर्ण सहकार्य लाभले. प्रदर्शनासाठी पटल आणि आसंद्या धर्माभिमानी आशा टेंट हाऊसचे श्री. दुर्गालाल मेवाडा यांनी निःशुल्क मिळवून दिले.
- सौ. शुभ्रा भार्गव, जयपूर, राजस्थान. (५.९.२०१६)बलात्काराची शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर सलीम नावाच्या वासनांधाकडून पुन्हा बलात्कार !

अशा वासनांधांना आता न्यायालयाने कठोरातील कठोर शिक्षा केली पाहिजे !
     रामपूर (उत्तरप्रदेश) - बलात्काराच्या गुन्ह्यात केवळ ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या २२ वर्षीय सलीम नावाच्या वासनांधाने दुसरीत शिकणार्‍या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना बरेलीतील कामेरी तालुक्यात घडली आहेे. या घटनेत त्याच्या आई-वडिलांसह त्याचा चुलत भाऊ जुनेद यानेही त्याला साथ दिली. याप्रकरणी पोलिसांनी सलीमच्या पालकांना अटक केली आहे; मात्र सलीम आणि त्याचा भाऊ अद्याप फरार आहेत. सलीम याने २०१२ मध्ये ८ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता, त्या गुन्ह्यासाठी त्याला ४ वर्षांची शिक्षा झाली होती.

पाकिस्तानात लष्कर घुसवा ! - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी

आक्रमणाच्या निषेधार्थ महासभा तहकूब
      पिंपरी, २१ सप्टेंबर - काश्मीरमधील उरी येथील सैन्याच्या मुख्यालयावर झालेल्या आतंकवादी आक्रमणामध्ये १८ सैनिक हुतात्मे झाले. पाकपुरस्कृत हे भ्याड आक्रमण अत्यंत दु:खद आणि संतापजनक आहे. पाकिस्तानविरोधात युद्ध पुकारा, पाकिस्तानात लष्कर घुसवा, पाकड्यांचे वाईट हेतू उद्ध्वस्त करा, अशा संतप्त प्रतिक्रिया पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी २० सप्टेंबर या दिवशी आयोजित केलेल्या महासभेत व्यक्त केल्या. या महासभेत महापौर शकुंतला धराडे अध्यक्षस्थानी होत्या. ही महासभा पाकिस्तानचा निषेध करत २८ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली. (पालिकेने पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी योग्य असून अशा प्रकारे निषेध सभा तहकूब करणे अयोग्य आहे. ही सभा चालू ठेवून जनतेच्या विकासाचे काही प्रश्‍न सोडवले असते, तर त्या आक्रमणामध्ये हुतात्मे झालेल्या सैनिकांना खरी श्रद्धांजली ठरली असती. - संपादक)

गणेशोत्सवानिमित्त संभाजीनगर येथील धर्मप्रेमी हिंदूंच्या संघटनातून दिसला हिंदुत्वाचा हुंकार

गणेशमंडळाकडून गणेशाची प्रतिमा स्वीकारतांना
१. कु. प्रियांका लोणे २. कु. क्रांती पेटकर
आणि ३. कु. प्रतिक्षा कोरगावकर
१. गणेशोत्सव मोहिमेला 
उत्स्फूर्त प्रतिसाद !
अ. संभाजीनगर जिल्ह्यात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मोहिमा राबवण्यात आल्या. समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने १६ ठिकाणी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. त्याला गणेशभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आ. काश्मिरी हिंदूंची समस्या, पुरोगामित्वाच्या नावाखाली हिंदूंच्या धर्मशास्त्रात ढवळाढवळ करण्याचा होणारा प्रयत्न यांसारख्या धार्मिक समस्या, तसेच महिलांची असुरक्षितता या समस्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे या अनुषंगाने ११ ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आले.

नेवासा (जिल्हा नगर) येथे हिंदुत्ववाद्यांकडून पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन !

अशा राष्ट्रप्रेमी नागरिकांचे अभिनंदन !
काश्मीरमधील उरी येथे आतंकवाद्यांनी आक्रमण केल्याप्रकरणी निषेध आंदोलन

    नेवासा, २१ सप्टेंबर - पाकपुरस्कृत आतंकवाद्यांकडून काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर आक्रमण करण्यात आले होते. याचा निषेध म्हणून नेवासा येथील बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद, भाजप आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांनी एकत्रितपणे पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. आंदोलनाच्या वेळी आक्रमणामध्ये हुतात्मा झालेल्या सैनिकांनाही उपस्थित हिंदुत्ववाद्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

पाकिस्तानला आता कठोर उत्तर देण्याची आवश्यकता ! - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

अहिंसावादी ज्येष्ठ समाजसेवकाला जे वाटते, ते केंद्र शासनाला का वाटत नाही ?
      पुणे, २१ सप्टेंबर - काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी केलेले आक्रमण हे भ्याड असून पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. भारत सरकारने आदेश दिला, तर भारतीय सैन्य लाहोरपर्यंत जाईल. मी ८० वर्षांचा असलो, तरी मी सीमेवर जायला सिद्ध आहे. (असे किती लोकप्रतिनिधींना वाटते ? - संपादक) सहनशक्तीला मर्यादा असते. पाकिस्तानने या मर्यादेचा अनेकदा अंत पाहिला आहे. आता त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानला आता कठोर उत्तर म्हणजे इट का जबाब पत्थर से अशा प्रकारे देण्याची आवश्यकता आहे, असे परखड मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. येथील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयामध्ये आयोजित पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी.एन्. रावळ उपस्थित होते.नगर येथे पोलिसांवरील आक्रमणांच्या विरोधात पोलीस कुटुंबियांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

      नगर, २१ सप्टेंबर - राज्यातील पोलिसांच्या वाढत्या आक्रमणांच्या निषेधार्थ पोलीस कुटुंबियांनी १९ सप्टेंबर या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला होता. या मोर्च्यात पोलिसांचे कुटुंबीय काळ्या फीती बांधून, तसेच निषेध फलक हातात घेऊन सहभागी झाले होते. या वेळी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या मागण्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक ठिकाणी पोलिसांवर आक्रमण केल्यास आक्रमणकर्त्यांना गुन्ह्यात जामीन मिळू नये, आक्रमण करणारा न्यूनतम पुढील १० वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र असावा, सर्व आक्रमणांच्या चौकशींसाठी स्वतंत्र चौकशी आयोग नेमावा, स्वतंत्र न्यायालयांची व्यवस्था करावी. (पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांना मोर्चा काढावा लागणे, हे लज्जास्पद ! पोलिसांनाच जर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी झगडावे लागत असेल, तर सामान्य जनतेच्या सुरक्षिततेची काय व्यथा ? - संपादक)पुणे जिल्ह्यातील श्री एकवीरादेवीच्या कार्ला गडाच्या पायर्‍यांवर चौथ्यांदा दरड कोसळली !

आणखी किती दरडी कोसळल्यावर पुरातत्व 
विभाग आणि वन विभाग उपाययोजना करणार आहे ?
      पुणे, २१ सप्टेंबर - येथील लोणावळ्याजवळील श्री एकवीरादेवीच्या गडावर १७ सप्टेंबर या दिवशी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे. ही दरड गडाच्या पाच पायरी मंदिराजवळील डोंगरावरून खाली आली आहे. पावसाळा चालू झाल्यापासून गड परिसरात दरड कोसळण्याची ही चौथी घटना आहे. श्री एकवीरादेवीच्या मंदिरात दर्शन घेणे आणि कार्ला लेणी पहाणे, यांसाठी नेहमीच गर्दी असते. असे असतांना गडावर भारतीय पुरातत्व विभाग आणि वन विभाग यांच्या वतीने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. (या प्रकरणी राज्य सरकार लक्ष घालेल का ? - संपादक) असे असल्यामुळे श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टने त्या दोन्ही विभागांकडे तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.स्वत:च्या रक्षणासाठी प्रत्येक स्त्रीने रणरागिणी व्हायला हवे ! - कु. प्रतिक्षा कोरगांवकर, महाराष्ट्र राज्य संघटक, रणरागिणी शाखा

संभाजीनगर येथील घारेगांव आणि अंधानेर येथे गणेशोत्सवानिमित्त 
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु संघटन मेळावा
       छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राने महिलांवरील अत्याचारात १ ला आणि बलात्कारात २ रा क्रमांक मिळवला आहे. स्वत:च्या रक्षणासाठी प्रत्येक स्त्रीने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन रणरागिणी व्हायला हवे. तसेच धर्मांधांच्या लव्ह जिहादसारख्या षड्यंत्रांना बळी न पडता धर्माचरण करून धर्माभिमानही वृद्धींगत करायला हवा. लोकमान्य टिळकांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रबोधनाच्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला. आज उत्सवाचे स्वरूप बिघडत चालले आहे. याविषयी जागृती निर्माण करण्यासाठीच हा हिंदु संघटन मेळावा आहे, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतिक्षा कोरगांवकर यांनी केले. घारेगांव येथील मारुति मंदिरात गौरी विसर्जनाच्या दिवशी गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समिती आणि विघ्नहर्ता गणेश मंडळ यांच्या वतीने हिंदु संघटन मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

उरी आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर नंदुरबार येथील कार्यक्रमात हिंदुत्वनिष्ठांच्या संतप्त प्रतिक्रिया !

जे हिंदुत्वनिष्ठांना कळते, ते केंद्र शासनाला का कळत नाही ?
पाकिस्तानशी चर्चा पुष्कळ झाल्या, आता युद्धाविना पर्याय नाही !
अप्पर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
देतांना धर्माभिमानी
      नंदुरबार - पाकिस्तानशी चर्चा पुष्कळ झाल्या असून आता युद्धाविना पर्याय नाही. आवश्यकता पडल्यास आम्ही आमची मुलेही राष्ट्ररक्षणासाठी युद्ध भूमीवर पाठवायला सिद्ध आहोत. सरकारने ठोस पावले उचलली नाहीत, तर आम्ही काश्मीरमध्ये जाऊन पाकिस्तानधार्जिण्या आतंकवाद्यांना धडा शिकवल्याविना रहाणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया हिंदुत्वनिष्ठांकडून देण्यात आल्या. उरी येथे आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ आणि हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी २० सप्टेंबर या दिवशी येथील सुभाष चौकात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नवी मुंबई आणि सोलापूर येथे मराठा क्रांतीचा विराट मोर्चा

      मुंबई, २१ सप्टेंबर - नवी मुंबई आणि सोलापूर येथे २१ सप्टेंबर या दिवशी मराठा क्रांती मूकमोर्चा झाला. दोन्ही ठिकाणी लक्षावधी नागरिकांनी सहभाग घेतला. नवी मुंबईतील मोर्चा सेंट्रल पार्क ते कोकण भवन असा पार पडला. त्यात भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला. सोलापूर जिल्ह्यात झालेला मोर्चा छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून चालू झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिल्यानंतर होम मैदानावर मोर्च्याचा समारोप झाला. सध्या राज्यात होत असलेल्या मराठा मूक मोर्च्याद्वारे अ‍ॅट्रॉसिटी कायदा रहित न करता त्यात पालट करणे, मराठा समाजाला आरक्षण द्या आणि कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, या प्रमुख मागण्या करण्यात येत आहेत.

मुंबईत २० नवे उड्डाणपूल बांधणार ! - मुंबई महानगरपालिका

      मुंबई - येथील वाहती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि भविष्यातील या समस्येवर मात करण्यासाठी येथे २० नवे उड्डाणपूल, पादचारी पूल आणि भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी जवळजवळ ३१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही कामे पूर्ण झाल्यास मुंबईतील प्रवास सुसाट होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. उड्डाणपुलांची कामे वेळेत पूर्ण केली जातील. त्यामुळे मुंबईकरांना निश्‍चितच दिलासा मिळेल, असे पालिकेच्या प्रमुख अभियंता शीतल कोरी यांनी म्हटले आहे.

नदीपात्रातील अपुर्‍या पाण्यामुळे होणारी विटंबना टाळण्यासाठी भाविकांकडून मूर्तींचे जलाशयात विसर्जन !

नंदुरबार येथील हिंदु जनजागृती समितीच्या 
गणेशमूर्ती विसर्जन मोहिमेला यश !
जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांना निवेदन
देतांना महामंडळाचे आणि समितीचे कार्यकर्ते
 
     नंदुरबार - अनंत चतुर्दशीच्या दिवशी येथील तापी नदीच्या पुलावर हिंदु जनजागृती समितीने राबवलेल्या गणेशमूर्ती विसर्जन मोहिमेला प्रतिसाद देऊन ९० टक्के भाविकांनी गणेशमूर्तीचे गौतमेश्‍वर मंदिराजवळील जलाशयाच्या खोल पाण्यात विसर्जन केले. गणेशोत्सवात अनंत चतुर्दशीपूर्वी तापी नदीच्या पात्रात विसर्जन केलेल्या असंख्य मूर्तींची अपुर्‍या पाण्यामुळेे विटंबना होत होती. यासंदर्भात जागृती करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली होती.
    या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांसह जयबजरंग व्यायाम शाळेचे अध्यक्ष शेखर मराठे, यांनी सकाळपासून रात्रीपर्यंत हातात फलक घेऊन पुलावरून गणेशमूर्ती पाण्यात फेकणे अयोग्य
असल्याचे सांगितले. तसेच पाणी अपुरे असल्याने नदीपात्राऐवजी जलाशयात मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन केले. वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस असूनही कार्यकर्ते दिवसभर उभे होते.

पनवेल येथील हिंदु जनजागृती समितीच्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !

     पनवेल, २१ सप्टेंबर (वार्ता.) - रायगड जिल्ह्यातील नवीन पनवेल, खांदा वसाहत आणि कळंबोली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत घेण्यात आलेल्या आदर्श गणेशोत्सव मोहिमेला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
१. कळंबोली येथील राजे शिवाजीनगर मित्रमंडळ आणि बीमा कॉम्प्लेक्स गणेशोत्सव मंडळ येथे प्रत्येकी दोन दिवस क्रांतिकारकांची माहिती सांगणारे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले. तसेच बीमा कॉम्प्लेक्स गणेशोत्सव मंडळात लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाचा १ सहस्र २०० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला. 
२. कळंबोली येथील श्री. प्रकाश चांदिवडे यांनी तसेच दर्यासागर मित्रमंडळ, समर्थ मित्रमंडळ, राजे शिवाजी नगर मित्रमंडळ, नवीन पनवेल येथील युथ स्पोर्ट क्लब यांनी गावातील चौकात आणि विसर्जन तलावाजवळ महिलांच्या सुरक्षेसाठी प्रबोधनात्मक फ्लेक्स लावले.

एक भारत अभियानाच्या अंतर्गत विराट धर्मसभेच्या पूर्वनियोजनासाठी आज बैठक

     पुणे - चलो काश्मीर - एक भारत अभियानातर्गत काश्मीरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी देशभरात ठिकठिकाणी सभा घेण्यात येत आहेत. पृथ्वीचे नंदनवदन आणि भारताचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मीरसाठी चलो काश्मीरचा नारा देत पुण्यातही २३ ऑक्टोबर या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या पूर्वनियोजनासाठी पनून काश्मीर आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर या दिवशी धनकवडी भागातील चव्हाणनगर येथील विणकर सभागृहात सायंकाळी ७ वाजता एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी बांधवांनी या बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रकार्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. राष्ट्रउभारणीच्या या कार्यात सहभागी होण्यासाठी ८९८३३३५५१७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

सांगली जिल्ह्यात श्री गणेशोत्सव मोहिमेला मिळालेला प्रतिसाद !

१. सांगली जिल्ह्यात आमदार, खासदार अशा २४ लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले. 
२. शाळा, महाविद्यालये येथे शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक यांना निवेदन देण्यात आले. एकूण ४० शाळा आणि महाविद्यालये यांना निवेदन देण्यात आले. 
३. काही शाळांच्या फलकांवर गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रबोधनात्मक भित्तीपत्रके लावण्यात आली, तर काही शाळांत श्री गणेश या विषयावर प्रवचन घेण्यात आले. 
४. श्री गणेशोत्सव कालावधीत ७७ मंडळांना भेटून त्यांचे प्रबोधन करण्यात आले. गणेशवाडी (कोल्हापूर) येथे काही लोकांचा विरोध होऊनही सिद्धीविनायक मित्रमंडळाने पुढाकार घेऊन सनातन संस्थेचे प्रवचन घेतले आणि ज्ञिज्ञासूंचा त्याला चांगला प्रतिसाद लाभला.

धूम्रपान आणि मद्यपान करून शाळेत शिकवणार्‍या शिक्षकांची सूची सिद्ध करण्याचे शिक्षण खात्याचे आदेश

      पुणे - धूम्रपान आणि मद्यपान करून शाळेत शिकवणार्‍या शिक्षकांची सूची सिद्ध करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण खात्यातील उपसंचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत. गोसावी यांनी पुढे म्हटले आहे की, राज्यातील सर्वच शाळांकडून ही माहिती मागवली असून येत्या ८ दिवसांत ती प्राप्त होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर संबंधित शिक्षकांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल. मुंबईतील संकल्प युवा प्रतिष्ठानने प्राथमिक शिक्षण खात्याकडे, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर प्रभाव पडत असल्याने गैरवर्तन करणार्‍या शिक्षकांवर कठोर कारवाई करून बढती, शिक्षक पुरस्कार आणि शासनाच्या अन्य सुविधांपासून त्यांना वंचित ठेवावे. तसेच जे शिक्षक नियमांचे पालन करणार नाहीत त्यांना निलंबित करावे अशी मागणी केली होती. (शिक्षण खात्याकडे अशी मागणी का करावी लागते ? देशाच्या उन्नतीसाठी सुसंस्कृत पिढी घडवणे हे त्यांना स्वत:चे दायित्व वाटत नाही का ? - संपादक)

कावेरीच्या पाणी वाटपाचा वाद : इतिहास आणि वस्तुनिष्ठ कारणे !

कावेरी नदीचे संकेतस्थळावरील छायाचित्र
     कावेरी नदीच्या पाणीवाटपावरून गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये नेहमीप्रमाणे वाद चालू झाला असून त्याने हिंसक वळण घेतले आहे. या पार्श्‍वभूमीवर हा वाद नेमका काय आहे, त्याचा इतिहास, त्याची वस्तुनिष्ठ कारणे आणि त्यास कारणीभूत असलेले घटक यांचे सदर लेखातून अभ्यासपूर्ण विवरण करण्यात आले आहे. दैनिक तरुण भारतने प्रसिद्ध केलेला हा लेख आमच्या वाचकांसाठी येथे साभार प्रसिद्ध करत आहोत.

गणेशोत्सवात उघड झालेला भ्रमनिरास !

     यंदाचा गणेशोत्सव अखेर पार पडला. वाजत-गाजत गणरायाला आपण घरी आणले. त्याच्या आगमनाने सुखावलेल्या भाविकांनी अगदी भक्तीभावाने त्याची सकाळ संध्याकाळ पूजाअर्चा आणि आराधना केली. हे सर्व करतांना निरोप देण्याचा दिवस उजाडला. त्या वेळी आपण विसरलो की, श्री गणपती आमचे आराध्य दैवत आहे. तो केवळ मातीची मूर्ती नाही, तर प्राणप्रतिष्ठापना करून १० दिवस पुजलेली देवता आहे. त्याचा आशीर्वाद देणारा हात विसर्जनसमयी आम्हाला खेळणे (?) वाटू लागला. आपली सगळी शास्त्रे मिथ्या वाटू लागली.

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्‍लील बोलणे आणि 
दगडफेक करणे या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल ! 
    सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्‍लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ६ वर्षे ३०० वा दिवस ! 
२०.९.२०१६
     रात्री ९.१५ वाजता जीए-०५के - ४४०५ या पांढर्‍या रंगाच्या दुचाकीवरून आश्रमासमोरील रस्त्यावरून दोघे जण ४ वेळा सनातन बॉम्ब, सनातन कंडोम, असे ओरडत गेले. (या संदर्भात आश्रमाकडून फोंडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंद करण्यात आली आहे.)हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Pakse pehle Bharatka anvastra karyakram band ho- Sanyukt Rashtrame Pak ki pratinidhi  
Bharat anvastroka pehle upyog kar Pak ki dhajjiya kyu nahi udata
जागो !
पाक से पहले भारत का अण्वस्त्र कार्यक्रम बंद हो ! - संयुक्त राष्ट्र में पाक की प्रतिनिधी
भारत अण्वस्त्रों का पहले उपयोग कर पाक की धज्जियां क्यों नहीं उडाता ?

फलक प्रसिद्धीकरता

अण्वस्त्रांचा वापर आधी करून भारत पाकला धडा शिकवेल का ?
    पाकच्या आण्विक कार्यक्रमावर निर्बंध घातले जाणार नाहीत. तसेच पाकच्या आधी भारताचा आण्विक कार्यक्रम बंद करा, असे वक्तव्य संयुक्त राष्ट्रसंघामधील पाकच्या कायमस्वरूपी प्रतिनिधी मलीहा लोढी यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले.

सामाजिक उपक्रम राबवणे, ही समष्टी साधना आहे, या संदर्भात साधकाचे झालेले चिंतन !

डॉ. अंजेश कणगलेकर
सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या शिबिरात सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजामध्ये संघटन आणि जागृती करणे, हा विषय मांडण्यात आला होता. मी व्यक्तीच्या शारीरिक आरोग्याशी तुलना करून हा विषय पडताळून पहाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी असे उपक्रम घेणे म्हणजे धर्मसंस्थापनेच्या प्रक्रियेतील एक टप्पाच आहे, असे माझ्या लक्षात आले.
१. शरिराचे कार्य शरिरातील संस्थांद्वारे, तर
समाजपुरुषाचे कार्य सामाजिक संस्थांद्वारे चालत असणे
    शरिराचे कार्य शरिरातील संस्थांद्वारे (सिस्टिम्सद्वारे) चालते, उदा. श्‍वसनसंस्था, पचनसंस्था इत्यादी. त्या संस्थांची कार्यकारी अंगे (फंक्शनल युनिट्स) असतात, उदा. फुफ्फुसातील कोष. याचप्रमाणे समाजात असलेल्या विविध सामाजिक संस्था या संपूर्ण समाजपुरुषाचे अंग (युनिट) आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते हे घटक आहेत.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुसळधार पावसामुळे परिसरातील पाणी घरात शिरण्याची भीती असणे, पाणी दूर करण्याचा प्रयत्न करूनही काही लाभ न झाल्याने शेवटी थकून देवासमोर अर्धा घंटा नामजप करणे, त्यानंतर पाऊस थांबून साठलेले पाणीही ओसरल्याचे कळल्यावर नमस्कार करतांना सूक्ष्मातून गुरुदेवांचे दर्शन होणे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांचे दर्शन झाल्याने कृतज्ञता वाटणे

    १९.७.२०१६ या दिवशी गुरुपौर्णिमा होती आणि सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता. पाऊस विश्रांती घेण्याचे नाव घेत नव्हता. आमच्या वाड्यावर गटाराची कामे न केल्यामुळे सर्व गटारे तुंबली होती. त्यामुळे आजूबाजूचे सर्व घाणेरडे पाणी येऊन आमच्या घरात शिरण्याच्या स्थितीत होते. माझ्या पत्नीने गावच्या सरपंचांना दूरभाष केला; पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ते गावातील चर्चचे सुशोभीकरण करण्याच्या कामात व्यस्त असल्याने त्यांनी येण्यास नकार दिला. ते घाणेरडे पाणी घरात शिरणार, या भीतीने आम्ही दोघे नवरा-बायको पावसात भिजत बालद्या घेऊन ते पाणी भरून दुसर्‍या बाजूला टाकत होतो; पण पाऊस मुसळधार पडत असल्याने त्याचा काहीच लाभ झाला नाही. आम्ही दोघेही थकलो होतो. दुपारचा एक वाजला होता. त्यानंतर मी घरात जाऊन देवासमोर हात जोडून आणि डोळे मिटून अर्धा घंटा नामजप केला. हा जप केल्यानंतर मी पावणेदोन वाजता कामावर जाण्याच्या सिद्धतेला लागलो. पत्नीही मुलीला शाळेतून आणायला जायच्या सिद्धतेत होती.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

श्री. अविनाश जाधव
माझा देव केवढा । त्याचा आकार आकाशाएवढा ।
नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन या दिवशी श्रीकृष्णाने मला प.पू. डॉक्टरांविषयी पुढील काव्य सुचवले.
 
माझा देव केवढा, केवढा ।
त्याचा आकार आकाशाएवढा ॥ १ ॥
 
माझा देव केवढा, केवढा । 
त्याचा प्रकाश तळपत्या सूर्याएवढा ॥ २ ॥ 
 
माझा देव केवढा, केवढा । 
त्याचा नाद घुमतसे तिन्ही लोकांत ॥ ३ ॥

शांत, आसक्ती अल्प असणारा आणि कोणतीही गोष्ट मनापासून करणारा डोंबिवली येथील श्री. प्रथमेश संभूस (वय २५ वर्षे) !

श्री. प्रथमेश संभूस
हल्लीच्या काळात एखादा तरुण असा असू शकतो, याचा कोणाला
विश्‍वासही वाटणार नाही.
- परात्पर गुरु डॉ. आठवले
१. प्रथमेशचा स्वभाव मुळातच शांत आहे.
२. मित्रपरिवारात, तसेच नातेवाइकांशी त्याचे वागणे आपुलकीचे असते. - श्री. अजय आणि सौ. अमृता संभूस (प्रथमेशचे आई-बाबा), डोंबिवली (पू.)
३. त्याला मोठ्या व्यक्तींविषयी आदर आहे. तो सर्वांशी नम्रतेने बोलतो. - सौ. प्रियांका भाटीया (प्रथमेशची बहीण)
४. कार्यालय, तसेच मित्रपरिवारात झालेले प्रसंग तो मनमोकळेपणाने सांगतो. - श्री. अजय संभूस
५. दुसर्‍यांना साहाय्य करण्यास तो तत्पर असतो. - सौ. प्रियांका भाटीया
६. आसक्ती अल्प असणे : प्रथमेशला ऐहिक वस्तूंविषयी आसक्ती अल्प आहे. त्याला खाणे-पिणे, तसेच कपड्यांच्या संदर्भात आवड-निवड नाही. त्याला इतरांकडून अपेक्षा अल्प प्रमाणात असतात.

विकलांग असूनही साधनेची तीव्र तळमळ असलेली ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली बार्शी, सोलापूर येथील कु. विशाखा आगावणे (वय १७ वर्षे) !

  
कु. विशाखा आगावणे
  (वर्ष २०११ मध्ये कु. विशाखा हिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती.- संकलक)
    बार्शी, जि. सोलापूर येथील साधक श्री. राजेंद्र आणि सौ. राजश्री आगावणे यांची धाकटी कन्या कु. विशाखा राजेंद्र  (वय १७ वर्षे) ही ११ मासांची (महिन्यांची) असतांना मोठ्या बालदीतील पाण्यात पडली होती. देवाच्या कृपेने तिला वेळेत पाण्यातून बाहेर काढल्याने तिचा जीव वाचला; पण नंतर ती पाच दिवस बेशुद्ध (कोमात) होती. तेव्हापासून तिच्या लहान मेंदूवर काहीतरी विपरीत परिणाम झाला आहे आणि त्यामुळे ती विकलांग झाली आहे. तिला स्वतःला स्वतःचे काहीच करता येत नाही. ती सतत झोपून रहाते. तिची शारीरिक आणि बौद्धिक वाढ पूर्ण झाली आहे. त्यामुळे तिला बोललेले सर्व कळते; पण बोलता येत नसल्याने ती तिच्या कृतीतून आणि डोळ्यांच्या माध्यमातून सांगते. तिला आध्यात्मिक त्रासही आहे. ते पूर्ण कुटुंब साधनेत असल्याने त्यांना आणि तिला होणारे हे सर्व ते प्रारब्ध म्हणून आनंदाने भोगत आहेत. विशाखात काही दैवी गुणही आहेत. भाद्रपद कृष्ण पक्ष सप्तमी (२२.९.२०१६) या दिवशी कु. विशाखा हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला आणि तिच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.

पितृपक्षातील श्राद्ध !

      ४ ऋणांपैकी पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठीचा संस्कार म्हणजेच श्राद्ध. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते. श्राद्धात पितरांना हविर्भाग दिला गेल्याने ते संतुष्ट होतात. श्राद्धाचे इतके महत्त्व असतांनाही आज हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे श्राद्धविधी दुर्लक्षिला जाऊ लागला आहे; म्हणूनच अन्य संस्कारांइतकाच श्राद्ध हा संस्कारही अत्यावश्यक कसा आहे, हे सांगणे क्रमप्राप्त ठरते. १७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत पितृपक्ष येत आहे. त्यानिमित्ताने श्राद्धविषयक लिखाण देत आहोत.

दैनिक सनातन प्रभातमधील डॉ. दुर्गेश सामंत यांच्या लेखावर निळ्या रंगाचा मोठ्या आकारातील दैवी कण प्रगटणे

    दैनिक सनातन प्रभातवर आजकाल सातत्याने दैवी कण येतात; पण १६.६.२०१६ या दिवशीच्या दैनिकातील डॉ. दुर्गेश सामंत यांच्या लेखावर एक अप्रतिम सुंदर निळ्या रंगाचा मोठ्या आकारातील दैवी कण प्रगटला. आज्ञाचक्रांत दिसणार्‍या नीलबिंदूची चमक घेऊन निळा रंग प्रगटला. त्याची निळाई शब्दांत सांगू शकत नाही.- पुष्पांजली, बेळगाव (१६.६.२०१६)

व्याप्ती न काढताच प्रक्रिया राबवणे म्हणजे जाळे न घेता मासे पकडायला जाणे

श्री. प्रकाश करंदीकर
    स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया राबवतांना आपल्या चुका, दोष आणि अहंचे विचार, यांकडे लक्ष देऊन ते शोधायचे असतात. १३.७.२०१५ या दिवशी पहाटे मी सारणी लिखाण करायला बसलो. तेव्हा पुष्कळ वेळ मला चुका सापडत नव्हत्या; म्हणून मी भगवान श्रीकृष्णाला आर्ततेने प्रार्थना करून साहाय्य मागितले. तेव्हा देवाने मला एका सुंदर उदाहरणाच्या माध्यमातून स्वभावदोष आणि चुका शोधण्याची पद्धत सांगितली. ती येथे देत आहे.
१. कोळी मासेमारीसाठी जातांना जाळे घेऊन जातो, त्याप्रमाणे
आपणही स्वभावदोष आणि चुका शोधण्यासाठी व्याप्ती समवेत घ्यावी !
     स्वभावदोष आणि चुका शोधणे, म्हणजे कोळी मासेमारीसाठी जातांना समवेत जाळे घेऊन जातो, तसे स्वभावदोष आणि चुका लिहितांना व्याप्ती काढून समोर ठेवावी, म्हणजे चुका लवकर सापडतात. कोळ्याचे ध्येय मासे पकडणे, तसेे साधकाचे ध्येय चुका शोधणे, हे असते.
२. व्याप्ती जेवढी चिंतन करून काढली असेल, तेवढ्या चुका अधिक मिळतील !
    कोळी पाण्यात जाळे टाकून बसतो. ते जाळे मोठ्या चौकोनी वीणीचे असेल, तर त्यात केवळ मोठे मासेच अडकतात आणि लहान मासे निसटून जातात, तसे आपण दोष आणि अहं यांची काढलेली व्याप्ती ढोबळमानाने काढली, तर आपल्याला केवळ ढोबळ चुकाच लक्षात येतात आणि चिंतन करून काढली, तर ढोबळ बरोबर लहान चुकाही सापडतात.

श्री दुर्गादेवीची मूर्ती सिद्ध करतांना मूर्तीकाराने पाळावयाचे आचारधर्म, करावयाची साधना अन् त्यामागील शास्त्र

१. श्रीगणेशमूर्ती शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवल्या जात नसल्याने गणेशभक्त खर्‍या आनंदाला मुकणे
  मनुष्याला मूर्तीच्या माध्यमातून देवाशी जोडले जाणे सुलभ होते. श्री गणेशचतुर्थीच्या काळातील सर्व भक्तांचा केंद्रबिंदू, म्हणजे श्री गणेशमूर्ती. देवतेची मूर्ती घडवतांना अध्यात्मशास्त्र महत्त्वाचे असते. मूर्तीचा रंग, आकार, उंची आणि त्या मूर्तीत देवत्व आणणे ही दैवी कला आहे. मूर्तीकाराला आचारधर्माचे पालन आणि साधना केल्यामुळे ही कला आत्मसात होते; परंतु मूर्तीकाराला याचे ज्ञान नसल्याने आणि मूर्ती सिद्ध करण्यामागे केवळ व्यावसायिक दृष्टीकोन असल्यामुळे मूर्तीत देवत्व अल्प प्रमाणात येते. परिणामी मूर्तीकारावर देवतेची कृपा होत नाही आणि गणेशभक्तही खर्‍या आनंदाला मुकतो.
२. देवाने धर्मपालनाच्या संदर्भात या लेखाच्या माध्यमातून ज्ञान देऊन मानवावर कृपा करणे
     काही मासांपूर्वी धर्मद्रोही महिलांनी मंदिरातील नियम मोडून गर्भगृहात प्रवेश करणे, मूर्तीला कोणतेही नियम नसून हे सगळे मानवनिर्मित असल्याचा प्रसार करणे, अशा प्रकारे धर्महानी करण्याचा प्रयत्न केला; परंतु मानवाने कोणते नियम पाळणे अपेक्षित असून त्यामागे शास्त्र काय आहे ?, हे देवाने पुढील ज्ञानात सांगून मानवावर एक प्रकारे कृपाच केली आहे.
३. साधक मूर्तीकार काळानुसार श्री दुर्गादेवीची मूर्ती बनवत
असतांना पाळावयाच्या आचारधर्मासंदर्भातील ज्ञान मिळणे
    साधकांचे आपत्काळात रक्षण होऊन देवीची कृपा व्हावी, हिंदु राष्ट्राच्या निर्मितीच्या कार्यातील अडथळे दूर व्हावेत आणि श्री दुर्गादेवीच्या कार्याचा आरंभ व्हावा, यासाठी रामनाथी आश्रमातील मूर्तीकार श्री. गुरुदास खांडेपारकर प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली श्री दुर्गादेवीची मूर्ती सिद्ध करत आहेत. या मूर्तीत देवीचे अधिकाधिक तत्त्व येण्यासाठी मूर्तीकाराने कोणती साधना करावी ? कोणते आचारधर्म पाळावेत ? तसे केल्यावर मूर्तीकाराला कोणता लाभ होणार आहे ? आचारधर्माचे पालन न केल्यास काय हानी होऊ शकते ? इत्यादी विविध पैलूंचे या लेखात शास्त्रीय भाषेत वर्णन केले आहे.
   मूर्तीकार आणि भक्त या दोघांनाही खरा आनंद प्राप्त व्हावा, यासाठी या लेखातील ईश्‍वरी ज्ञान उपयोगी ठरेल.
४. प्रार्थना
   हा लेख वाचून हिंदूंना आचारधर्माचे महत्त्व लक्षात यावे, धर्मप्रेमींची श्रद्धा वृद्धींगत व्हावी आणि मूर्तीकारांनी आचारधर्माचे पालन करून समाजाला अधिकाधिक देवतेचे तत्त्व आकृष्ट करणार्‍या मूर्ती उपलब्ध करून द्याव्यात, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना !
२१ सप्टेंबर या दिवशी मूर्ती घडवतांना पाळावयाचे आचारधर्म पाहिले. आज त्यापुढील भाग पाहुया.

दिवाळीच्या निमित्ताने प्रबोधनासाठी फलक आणि भित्तीपत्रक उपलब्ध !

साधकांना सूचना 
     दिवाळीच्या निमित्ताने प्रबोधन करण्यासाठी दीपावलीत हिंदु संस्कृतीची जोपासना करा ! हा १२ फूट १० फूट या आकारातील फलक आणि फटाक्यांच्या दुष्परिणामांच्या संदर्भातील ए-२ या आकारातील भित्तीपत्रक नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे. यातील भित्तीपत्रकाची मागणी नेहमीप्रमाणे जिल्ह्यातील उत्तरदायी कार्यकर्त्यांनी त्यांच्या जिल्ह्याशी संबंधित समन्वयकांकडे करावी. या प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचा सुयोग्य ठिकाणी वापर करावा.

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !
    सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

काश्मिरी हिंदूंवरील अन्यायाविरुद्धच्या एक भारत अभियानाच्या संदर्भात जागृती करणारा फलक उपलब्ध !

      
   धर्मांधांच्या जिहादी आतंकवादामुळे ४.५ लक्ष काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधून परागंदा व्हावे लागले. या घटनेला २६ वर्षे उलटूनही या हिंदूंचे काश्मीरमध्ये अद्याप सन्मानाने पुनर्वसन करण्यात आलेले नाही. या विरोधात एक भारत अभियानाच्या अंतर्गत पनून कश्मीर, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने स्वाक्षरी चळवळ, सभा, बैठका, पत्रक वितरण आदी माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृतीच्या वेळी उपयोगी असणार्‍या एक भारत अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करणारा ६ फूट ४ फूट आकारातील फ्लेक्स फलकाची कलाकृती हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे. या फलकाचा जिल्ह्यातील उपक्रमांच्या वेळी सुयोग्य वापर करावा.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
प्रेम आणि प्रीती
१. प्रेम असल्यावर सहवासाची ओढ लागते व मग प्रेम वृद्धींगत होते. ते केवळ प्रकृतीतीलच असते.
२. आपण अशाश्‍वतावर प्रेम करतो आणि ते सुटून जाईल म्हणून भितो. जे शाश्‍वत आहे, त्यावर प्रेम करीत नाही.
३. द्वैतात प्रेम असते; पण प्रेमात द्वैत नसते. प्रकृतीत प्रेम असते; पण ब्रह्मात द्वैत नसते.
४. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करीत असाल, तर मी प्रेमात आहे.
भावार्थ : येथे प्रेम हा शब्द प्रीती, म्हणजे पारमार्थिक प्रेम, या अर्थाने वापरला आहे. ॐ
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सदा प्रयत्नरत रहाण्याचेे महत्त्व !
निष्क्रीय रहाण्याची सवय लागली की, कोणतीही गोष्ट करण्याचा कंटाळा येतो 
आणि अंगीभूत गुणांवरही गंज चढतो; म्हणून नेहमी कार्यरत रहावे !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

आक्रमणानंतरचा वांझोटा सोपस्कार !

संपादकीय 
     पाककडून भारतावर आक्रमण होणे, हे जसे नवीन नाही, तसे पाकचा निषेध करणे, हेही नवीन नाही. पाकने एकामागोमाग आक्रमणे करायची आणि आपण न चुकता त्याचा शाब्दिक निषेध नोंदवायचा, हा खेळ गेल्या अनेक दशकांपासून चालू आहे. ज्या देशाला आतंकवादाची समस्या भेडसवते तो देश स्वत:च्या हिंमतीवर आतंकवादाचा बीमोड करतो. इस्रायल, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आदी देश त्याची उत्तम उदाहरणे आहेत. भारताने अशी कठोर भूमिका कधीही घेतली नाही. स्वातंत्र्योत्तर काळापासून देशावर राज्य करणार्‍या काँग्रेसची पाकच्या बाबतीत असलेली कणाहीन धोरणे या दु:स्थितीस सर्वस्वी कारणीभूत आहेत. आपण पाकला तेव्हाच जशास जसे उत्तर दिले असते, तर आज चित्र निश्‍चित वेगळे दिसले असते. दुर्दैवाने असे कधी झाले नाही.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn