Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सनातन प्रभातचे वार्ताहर राहुल कोल्हापुरे यांना दमदाटी करून त्यांच्यावर कारवाईचा प्रयत्न !

या संदर्भात गृहखाते काय करणार आहे ? पारंपरिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी सातारा येथे प्रशासनाकडून स्वयंघोषित बंदी !
 • श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या कारणावरून एका भाविकाला कपडे फाटेपर्यंत पोलिसांकडून धक्काबुक्की !
 • दोघांवर गुन्हा प्रविष्ट करण्याची धमकी !
 
१. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बेंद्रे, २. श्री. राहुल कोल्हापुरे
    सातारा - पाच दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी येथील खाजगी मंगळवार तळ्यावर भाविकांनी गर्दी केली होती. या वेळी स्थानिक पोलीस प्रशासनाने श्री गणेशमूर्ती पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यासाठी बंदी असल्याचे कारण पुढे करत भाविकांना श्री गणेशमूर्ती विसर्जनास मज्जाव केला. (पोलीस हिंदूंना धार्मिक परंपरांचे पालन करण्यास प्रदूषणाचे कारण पुढे करत अटकाव करतात, तसे ते अन्य धर्मियांच्या धार्मिक गोष्टी प्रदूषणाला बाधक असूनही त्यांना अटकाव करत नाहीत, ही वस्तूस्थिती जाणायला हवी. हिंदूंनी शास्त्रीय परंपरांचे पालन करायला हवे ! - संपादक) पोलिसांनी मंगळवार तळ्याच्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जन करू दिले नाही. या वेळी तेथे मूर्तीविसर्जनास गेलेले दैनिक सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांनी पोलिसांना समजावून आणि विविध प्रकारची कायदेशीर कागदपत्रे दाखवली, तरीही उलट त्यांनाच दमदाटी करून पोलिसांनी कह्यात घेतले. (रझाकारी पोलीस ! पुरोगाम्यांच्या दबावामुळे पोलीस हिंदुत्वनिष्ठांचा असा छळ करत असतील, तेथे सामान्यांची काय स्थिती असेल, याची कल्पना करू शकतो ! - संपादक) या वेळी एका भाविकाची पोलिसांसमवेत वादावादी झाली. कोणताही विचार न करता पोलिसांनी अक्षरशः त्यांचे कपडे फाटेपर्यंत त्यांना धक्काबुक्की केली.

काश्मीरमधील २ चकमकींत ४ आतंकवादी ठार, तर १ पोलीस हुतात्मा !

     श्रीनगर - काश्मीरमध्ये ११ सप्टेंबरला आतंकवाद्यांबरोबर नौगम आणि पुंछ या दोन ठिकाणी सुरक्षा दलांसमवेत झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार झाले, तर एक पोलीस शिपाई हुतात्मा झाला. या आतंकवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला.

पुणे महानगरपालिकेने ट्विटर खात्यावरून श्री गणेशाचे विडंबन करणारे विज्ञापन हटवले !

हिंदु जनजागृती समितीच्या कृतीशील निषेधाचा परिणाम !
हिंदूंनो, या यशाविषयी ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्त करा !
     पुणे - पुणे महानगरपालिकेच्या pmc care या ट्विटर खात्यावरून वाहतूक नियमांच्या संदर्भात नागरिकांचे प्रबोधन करणार्‍या विज्ञापनाच्या चित्रामध्ये श्री गणेशाचे विडंबन करण्यात आले होते. या संदर्भात दैनिक सनातन प्रभातमध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी महापालिकेच्या pmc careचे राहुल जगताप यांना संपर्क साधून सदर विडंबनात्मक विज्ञापन तातडीने हटवण्याची मागणी केली होती, तसेच विज्ञापन काढले न गेल्यास धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कायदेशीर मार्ग अवलंबण्याची चेतावणी दिली होती. त्यानंतर जगताप यांनी ते चित्र काढण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर सदर विडंबनात्मक विज्ञापन पुणे महानगरपालिकेच्या ट्विटर खात्यावरून हटवल्याचे आढळून आले. (हिंदूंनो, या यशाविषयी श्री गणेशाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा ! अन्यत्र आढळून येणारे श्रद्धास्थानांचे होणारे विडंबन रोखण्यासाठी सनदशीर मार्गाने कृतीशील व्हा ! श्रद्धास्थानांचे होणारे विडंबन रोखणे ही एक प्रकारे देवतेची उपासनाच आहे. - संपादक) अरे भक्ता, तुझ्या डोक्याची काळजी घे. प्रत्येक जण माझ्यासारखा नशीबवान नसतो दुसरे डोके मिळायला, असे वाक्य श्री गणेशाच्या तोंडी दाखवून हातात हेल्मेट घेऊन श्री गणेश हेल्मेटच्या वापराचा संदेश देत असल्याचे विज्ञापनाच्या चित्रात दाखवण्यात आले होते.

पोलीस कोठडीमध्ये जीविताला धोका असल्याने अन्यत्र हालवण्याची सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची मागणी

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण !
     कोल्हापूर - राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. या कोठडीत ठेवण्यात आलेल्या अन्य गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगारांकडून कोणत्याही क्षणी माझ्यावर वाईट प्रसंग बेतला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीऐवजी अन्यत्र कुठेही हालवण्यात यावे, अशी मागणी कॉ. पानसरे खून प्रकरणातील संशयित आरोपी आणि सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांनी त्यांचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांच्याकडे १० सप्टेंबर या दिवशी केली. श्री. पटवर्धन यांनी डॉ. तावडे यांची सकाळी ९ वाजता राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीमध्ये भेट घेऊन चर्चा केली. न्यायालयाच्या अनुमतीनुसार अधिवक्ता श्री. पटवर्धन यांना भेटीसाठी अर्धा घंटा वेळ देण्यात आला होता. या वेळी अन्वेषण करणार्‍या अधिकार्‍यांनी उपस्थित केलेले प्रश्‍न, पोलीस कोठडीमधील असुरक्षिततेसह तेथील सुविधांच्या अभावाविषयी डॉ. तावडे यांनी अधिवक्ता श्री. पटवर्धन यांच्याकडे तक्रारी मांडल्या आहेत.

आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्यावर मेहुण्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा आरोप !

आम आदमी पक्षाचे खरे स्वरूप !
     नवी देहली - आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्यावर मेहुण्याच्या पत्नीने विनयभंगाचा आरोप केला आहे. यापूर्वी २० जुलैला एका ३५ वर्षीय महिलेनेही खान यांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला होता. दुसर्‍यांदा विनयभंगाचा आरोप झाल्यामुळे अमानतुल्लाह यांनी पक्षाच्या सर्व पदांचे त्यागपत्र दिले आहे. मी प्रामाणिकपणे काम करत असून माझे काम काही लोकांना बघवत नाही आणि म्हणूनच आमच्या कुटुंबावर खोटे आरोप केले जात आहेत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

बकरी ईदच्या दिवशी वाराणसी येथे उंटांची हत्या करण्यावर बंदी घालण्यासाठी अधिवक्त्यांचे वाराणसी आयुक्तांना निवेदन !

      वाराणसी - १३ सप्टेंबर २०१६ या दिवशी बकरी ईदच्या निमित्ताने वाराणसीतील मदनपुरा (पंचपेडवा), जमालुद्दीनपुरा आणि सलेमपुरा येथे उंटांची कत्तल करण्यात येणार आहे. या कत्तलीवर प्रतिबंध घालण्यासाठी अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखालील अधिवक्त्यांच्या शिष्टमंडळाने वाराणसीच्या आयुक्तांना निवेदन दिले. यापूर्वी जिल्हाधिकार्‍यांनाही याविषयी निवेदन देण्यात आले होते.
      वर्ष २०१५ मधे जिल्हाधिकार्‍यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांना उंटांच्या कत्तलीवर प्रतिबंध घालण्याचा आदेश दिला होता; मात्र त्यावर कारवाई करण्यात न आल्याने वरील तीनही ठिकाणी उंटांची कत्तल करण्यात आली, असे श्री. त्रिपाठी यांनी या वेळी सांगितले. (अशा अधिकार्‍यांवर कायदाद्रोह केल्याच्या प्रकरणी कारवाई केली पाहिजे ! हिंदूंच्या मंदिरांच्या ठिकाणी पशू बळी देण्याला विरोध करणार्‍या संघटना मुसलमानांकडून देण्यात येणार्‍या बळींच्या विषयी नेहमीच मौन बाळगतात ! - संपादक)
      शिष्टमंडळात अधिवक्ता नीरज कुमार शुक्ला, अभय अग्निहोत्री, संजीवन यादव, राजेशसिंह कुशवाहा, सोनू कुमार, विनोद पाण्डेय उपाख्य भैयाजी, विकासकुमार सिंह, गुरुप्रसाद पाण्डेय, शशि यादव, दुर्गा प्रसाद, संदीप कुमार सिंह, बृजेश सिंह, संजीवन सिंह आदी अधिवक्ता सहभागी होते.

नाशिकमध्ये आदर्श गणेशोत्सव मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद !

(डावीकडे) श्री. राहुल ढिकले
यांची भेट घेतांना समितीचे कार्यकर्ते

       नाशिक - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरात विविध गणेशोत्सव मंडळे, लोकप्रतिनिधी आणि शासकीय कार्यालये यांमध्ये विविध प्रकारचे उपक्रम गणेशोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात येत आहेत.
       गणेशोत्सवाच्या निमित्ताने उत्साहाचे अवडंबर रोखून आदर्शरित्या साजरा करण्यासाठी विविध मंडळांना भेटून प्रबोधन करण्यात येत आहे.
       आदर्श गणेशोत्सवाच्या चळवळीला पाठिंबा मिळण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नाशिक येथील मनसेचे नगरसेवक अधिवक्ता राहूल ढिकले यांची भेट घेण्यात आली. समितीने गणेशोत्सवातील गैरप्रकार रोखण्यासाठी उभारलेल्या चळवळीविषयी त्यांना माहिती देऊन सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. या वेळी त्यांनी समितीच्या उपक्रमाचे आणि चळवळीचे कौतुक करून पाठिंबाही दिला. हिंदूंमध्ये जनजागृती करणे आणि त्यांचे कल्याण साधणार्‍या चळवळी, उपक्रमांसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यातच करण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी त्यांनी केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. अनिल पाटील, श्री. रविंद्र सोनईकर, श्री. शैलेश पोटे हे उपस्थित होते.

डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणांतील चौकशांच्या बातम्या वस्तूनिष्ठपणे प्रसिद्ध करणारी आणि पक्षपातीपणे प्रसिद्ध करणारी वृत्तपत्रे !

पक्षपाती वृत्तांकन करणारी वृत्तपत्रे समाजाचे काय प्रबोधन करणार ?
     डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणांचे अन्वेषण सध्या चालू आहे. ५ सप्टेंबरला विशेष अन्वेषण विभागाने कॉ. पानसरे हत्या प्रकरणात पनवेल आश्रमात येऊन तपास केला. ७ सप्टेंबरला डॉ. तावडे यांच्यावर सीबीआयने डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपपत्र सादर केले. पनवेल आश्रमात आलेल्या विशेष अन्वेषण विभागाने साधकांचा केलेला छळ आणि खोटारडेपणा यांविषयी ९ सप्टेंबरला सनातनने मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन सत्यकथन केले. या तीन घटनांच्या बातम्या प्रसिद्ध करतांना केवळ दैनिक सामनामध्ये वस्तूनिष्ठता होती, तर अन्य वृत्तपत्रांनी पक्षपातीपणा केला. सनातनच्या विरोधातील घटनांना त्यांनी पान १ वर ठळक प्रसिद्धी दिली, तर सनातनच्या पत्रकार परिषदेचे वृत्त थोडक्यात आतील पानांवर प्रसिद्ध केले किंवा केलेच नाही. पुढील सारणीत याचे विश्‍लेषण दिले आहे.

मिरज येथे गणेशोत्सवानिमित्त सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन !

   मिरज, ११ सप्टेंबर (वार्ता.) - मंगळवार पेठेतील भोसले चौक येथे हनुमान गणेशोत्सव मंडळासमोर सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन १० सप्टेंबर या दिवशी माजी नगरसेवक श्री. प्रसाद मदभावीकर यांच्या हस्ते नारळ वाढवून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या वेळी डॉ. भालचंद्र साठे आणि श्री. इसापुरे, तसेच सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) शरदिनी कोरे उपस्थित होत्या. हे प्रदर्शन १५ सप्टेंबरअखेर चालू रहाणार असून भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

सिद्धीविनायक मित्रमंडळाचे अध्यक्ष अविनाश भूषिंगे यांनी सनातन संस्थेच्या व्याख्यानाला होणारा विरोध मोडून काढून व्याख्यान यशस्वी केले !

सौ. वैशाली राजहंस
असे हिंदू धर्माभिमानी सर्वत्र हवेत !
    गणेशवाडी (जिल्हा कोल्हापूर), ११ सप्टेंबर (वार्ता.) - गणेशवाडी येथील सिद्धीविनायक मित्रमंडळ येथे ७ सप्टेंबर या दिवशी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानास स्थानिक नागरिक, काही गणेशोत्सव मंडळे यांनी सनातन संस्थेचा कार्यक्रम नको, असे सांगून या व्याख्यानास मोठ्या प्रमाणात विरोध केला; मात्र सिद्धीविनायक मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री. अविनाश भूषिंगे आणि त्यांचे सहकारी यांनी या विरोधाला न जुमानता सदरचे व्याख्यान एक दिवस अगोदरच आयोजित करून ते यशस्वी करून दाखवले. हे व्याख्यान सर्वांपर्यंत पोचण्यासाठी श्री. भूषिंगे यांनी स्थानिक केबल न्यूजच्या वार्ताहरांना बोलावून सौ. सरिता चौगुले यांची मुलाखत घेतली. या संदर्भात श्री. अविनाश भूषिंगे यांनी व्याख्यान खूप प्रेरणादायी झाले, असे मत व्यक्त केले. (सनातन संस्थेच्या होणार्‍या कार्यक्रमास होत असलेला विरोध मोडून काढून तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धडपड करणार्‍या श्री. अविनाश भूषिंगे यांचे अभिनंदन ! प्रत्येक हिंदू धर्माभिमान्याने श्री. अविनाश भूषिंगे यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे ! - संपादक)

जगभर प्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाचा पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर नामोल्लेखही नाही !

        पुणे, ९ सप्टेंबर (वार्ता.) - पुणे येथील गणेशोत्सव हा जगभरातील भाविकांचे आकर्षण आहे. या काळात अनेक विदेशी पर्यटकही येथील गणेशोत्सव पहाण्यासाठी येतात. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभही याच शहरातून केला. गणरायांच्या आगमनाच्या पार्श्‍वभूमीवर एकीकडे गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वहात असतांना पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर मात्र कमालीची उदासीनता पसरली असल्याचे वाटते; कारण पुण्याच्या गणेशोत्सवाचा महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर नामोल्लेखही नाही.
        विद्येचे माहेरघर ही पुणे शहराची ओळख ! त्याच्या जोडीला आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही पुणे शहराने भरारी घेऊन आय.टी.हब अशी ओळख निर्माण केली आहे. एकीकडे ही प्रगती होत असतांना त्या शहराच्या महानगरपालिकेचे संकेतस्थळ मात्र अजून प्राथमिक टप्प्यालाच चाचपडत आहे.

ऋषितुल्य व्यक्ती सत्काराच्या उपक्रमास महापालिकेकडून प्रतीवर्षी २ लक्ष रुपये मिळण्यासाठी प्रयत्न करणार ! - महापौर प्रशांत जगताप यांचे आश्‍वासन

ऋषितुल्य १२ व्यक्तींचा महापौर 
श्री. प्रशांत जगताप यांच्या हस्ते सत्कार ! 
       पुणे, ११ सप्टेंबर (वार्ता.) - माझ्यासारख्यांच्या राजकीय आयुष्यात थोरामोठ्यांमुळे नतमस्तक होण्याचे भाग्य फार थोड्यांना लाभते. पुणे महापालिका ही देशातील एकमेव महापालिका असेल कि जी पंडित गाडगीळ यांच्या पुढाकाराने गेली ४१ वर्षे हा ऋषितुल्य व्यक्तींच्या सत्काराचा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमास प्रतीवर्षी २ लक्ष रुपये पुणे महापालिकेकडून मिळावेत, यासाठी मी अवश्य प्रयत्न करीन, असे आश्‍वासन महापौर श्री. प्रशांत जगताप यांनी येथे दिले. येथील शारदा ज्ञानपीठम् या संस्थेच्या वतीने पुणे महापालिका आणि माईर्स पुणे, विश्‍वशांती गुरुकुल, सिंबॉयासिस आणि इतर ३० संस्थांच्या वतीने ६ सप्टेंबर या दिवशी सकाळी १०.३० वाजता एम्आयटीच्या श्री ज्ञानेश्‍वर सभागृहात ऋषिपंचमीच्या निमित्ताने १२ ऋषींचा भावस्पर्शी सत्कार महापौर श्री. प्रशांत जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
       शारदा ज्ञानपीठम्चे कार्याध्यक्ष श्रीवर्धन गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने या भावपूर्ण कार्यक्रमाची सांगता झाली.
सत्कार झालेल्या १२ 
ऋषितुल्य मान्यवरांची नावे अशी...
       ह.भ.प. रामचंद्रजी दंडवते (वय १०७ वर्षे), प्राचार्य वसंतराव अरगडे (वय १०० वर्षे), स्वामी श्री शिवलिंग शिवाचार्य महाराज (वय १०० वर्षे), श्री. हिरोजी नारायण तोडणकर गुरुजी (वय ९८ वर्षे), पत्रकारश्रेष्ठी श्री. माधव पारधी (वय ९६ वर्षे), श्रीमती मालतीबाई दास्ताने (वय ९२ वर्षे), श्रीमती इंदिराजी पित्ती (वय ९० वर्षे), ह.भ.प. श्री. ज्ञानदेव काळेगुरुजी (वय ९० वर्षे), पं. बबनराव हळदणकर (वय ८९ वर्षे), प्राचार्य श्री. यशवंतराव लेले (वय ८७ वर्षे), चित्रमहर्षी श्री. रवी परांजपे (वय ८१ वर्षे), डॉ. कांतीलाल संचेती (वय ८१ वर्षे) या महत्तेच्या मानदंडांना डॉ. शां.ब. मुजुमदार, डॉ. विश्‍वनाथ कराड, डॉ. विजय भटकर आणि पं. वसंतराव गाडगीळ यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

अंबरनाथ नगरपालिकेमध्ये गणेशोत्सवात सनातनचे फ्लेक्स प्रदर्शन

   
नगरपालिकेमध्ये फ्लेक्सचे प्रदर्शन
    अंबरनाथ - अंबरनाथ नगरपालिका गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सकाळी १० वाजता कु. प्रज्ञा बनसोडे यांच्या हस्ते श्रीगणेशाच्या मूर्तीची स्थापना झाली. त्याच दालनामध्ये गणेशपूजा आणि धार्मिक विधी यांसंदर्भातील सनातन संस्थेचे फ्लेक्सचे प्रदर्शन मंडळाच्या सहमतीने लावण्यात आले.
     नगरपालिका गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. आर्.बी. पाटील, श्री. सुहास सावंत, भजनी मंडळाचे श्री. गोरख मुकादम आणि येथील अन्य कर्मचारी म्हणाले, आपण नंतर येऊन आरती कशी करावी या संदर्भातील शास्त्र आरतीच्या वेळी येऊन सर्वांना सांगावे. तसेच त्या ठिकाणी उपस्थित सेवानिवृत्त श्री. विनायक पाटील श्री साईबाबा सेवा मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले की, आमच्या मंडळात गुरुवारी संध्याकाळी आरतीला येऊन उपस्थितांना या संदर्भात धार्मिक शिक्षण द्यावे.

सानपाडा (नवी मुंबई) येथे गुरुकृपा प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श गणेशोत्सव कसा साजरा कसा करावा, याविषयी मार्गदर्शन

    
भाविकांना मार्गदर्शन करतांना सौ. कमल गिरमकर
     सानपाडा - ५ सप्टेंबर या दिवशी येथील प्रियांका पॅलेस सोसायटीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गुरुकृपा प्रतिष्ठान या न्यासाच्या वतीने आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ? याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. न्यासाच्या वतीने सौ. कमल गिरमकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सवामागील लो. टिळक यांचा उद्देश आणि सध्याचे उत्सवाचे पालटलेले स्वरूप, शास्त्रानुसार श्रीगणेशमूर्ती कशी असावी, श्रीगणेशाला लाल फुले-दुर्वा वहाण्याचे महत्त्व, विज्ञापनाच्या माध्यमातून होणारी श्री गणेशाची विडंबना आणि ती रोखण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ ६० जिज्ञासूंनी घेतला. या वेळी उपस्थित जिज्ञासूंनी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.

आदर्श गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीचे अंबरनाथच्या नगराध्यक्षांना निवेदन

     
निवेदन स्वीकारतांना नगराध्यक्ष कु. प्रज्ञा बनसोडे (उजवीकडे)
      अंबरनाथ - कृत्रिम हौदात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन, श्री गणेशमूर्तींचे दान यांसारख्या धर्मशास्त्रविरोधी प्रथा आणि गणेशोत्सवातील अपप्रकार रोखून आदर्श गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ सप्टेंबर या दिवशी अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष कु. प्रज्ञा बनसोडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीच्या वतीने अधिवक्ता (सौ.) किशोरी कुलकर्णी यांनी नगराध्यक्षा कु. प्रज्ञा बनसोडे यांना आदर्श गणेशोत्सवाविषयी माहिती दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यातील ४०० धरणे असुरक्षित ! - महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचा अहवाल

राज्यातील धरणे आणि पूल यांचे परीक्षण होते कि नाही आणि प्रशासकीय
 यंत्रणा अस्तित्वात आहे कि नाही, असा प्रश्‍न पडल्यास आश्‍चर्य ते काय ?
     मुंबई - पुण्यातील टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे उघड झाल्यानंतर आता राज्यातील इतर धरणांविषयीची भयावह माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (मेरी) राज्यातील ४०० धरणे धोकादायक असल्याचा अहवाल सरकारला दिला आहे. त्यामध्ये धरणांच्या किरकोळ ते गंभीर स्वरूपाच्या दुरुस्त्या करणे आवश्यक असून त्या तातडीने करण्याची शिफारसही संस्थेने केली आहे. (पाट्याटाकूपणे कारभार करणारा जलसंधारण विभाग ! या प्रकरणी शासन संबंधितांची चौकशी करून कारवाई करेल का ? - संपादक) त्यामुळे राज्यातील इतर धरणे सुरक्षित असल्याचा शासनाचा दावा फोल ठरला आहे.
     संस्थेकडून नवीन धरणांसाठीचा आराखडा सिद्ध करणे, धरणांची सुरक्षितता पडताळणे, संभावित धोके ओळखणे आणि त्यावर उपाय सुचवणे, धरणांचे मान्सूनपूर्व आणि मान्सुनोत्तर परीक्षण करणे अशी कामे केली जातात. टेमघर धरणाच्या गळतीची चर्चा झाल्यानंतर सरकारने गळती थांबवण्यासाठी १०० कोटींची निविदा काढली. आता ४०० धरणांच्या दुरुस्तीविषयी राज्य सरकार कोणती उपाययोजना करते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

भाजपला धडा शिकवून मातृभाषा आणि संस्कृती यांचे रक्षण करण्याचा निर्धार !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोवा विभागाच्या कार्यकर्ता मेळाव्याला २ सहस्र स्वयंसेवकांची उपस्थित
    पणजी - गोव्यातील प्राथमिक शिक्षणातील माध्यमप्रश्‍नी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांताशी फारकत घेऊन नव्याने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोवा विभागाने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकवून मातृभाषा आणि संस्कृती यांचे रक्षण करण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे केवळ मातृभाषेचे रक्षणच नव्हे, तर भाजप शासनाच्या अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्याच्या प्रयत्नांना विरोध दर्शवण्याचा निर्णय या मेळाव्यात झाला. गोव्यात अल्पसंख्यांक आयोग स्थापण्याचा निर्णय, दुहेरी नागरिकत्व देणे, फोन्तेनाससारखे पोर्तुगीजधार्जिणे उत्सव गोव्यात भरवून पोर्तुगीज संस्कृतीला चालना देणे या भाजप शासनाच्या प्रयत्नांना पूर्णपणे विरोध करण्याचा निर्णयही या मेळाव्यात झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोवा विभाग स्थापन झाल्यानंतर प्रथमच घेतलेल्या या कार्यकर्ता मेळाव्याला सुमारे २ सहस्र स्वयंसेवकांनी उपस्थित राहून भाजपच्या विरोधातील मातृभाषा आणि संस्कृती रक्षणार्थ आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा दर्शवला.

खामगाव (जिल्हा बुलढाणा) येथे श्रीगणेशाची मूर्ती संघाच्या गणवेशात देवतांच्या मूर्तींचे मानवीकरण करणे, हे धर्मशिक्षणाच्या अभावाचा परिणाम !

    खामगाव, ११ सप्टेंबर - येथील कासलीवाल ले-आऊट भागात असलेल्या सप्तश्रुंगी गणेश मंडळाने श्री गणेशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाच्या भूमिकेत साकारले आहे. त्या गणेशमूर्तीला संघाचा गणवेश असलेली खाकी पॅन्ट, पांढरा सदरा, डोक्यावर काळी टोपी परिधान केली आहे. तसेच भगवा ध्वजही हाती दिला आहे.

मुख्यमंत्र्यांना जातपंचायतमधून बहिष्कृत म्हणून भेटण्यास गेलेला व्यक्ती निघाला एक आरोपी !

मुख्यमंत्री निवासस्थानाच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे !
    सावंतवाडी, ११ सप्टेबर - गाव आणि जातपंचायत यांनी वाळीत टाकल्याची आवई उठवणार्‍या अन् मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महादेवाचे केरवडे येथील परमानंद सावळाराम हेवाळेकर हा संशयित आरोपी असल्याचे समोर आले आहे. (यावरून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्या व्यक्तीची कोणत्याही प्रकारची यथोचित चौकशी केलेली नसल्याचे दिसून येते. या प्रकरणी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हायला हवी. मुख्यमंत्री निवासस्थानाच्या सुरक्षेची ही स्थिती, तर त्या राज्यातील सर्वसामान्यांच्या व्यक्तीच्या सुरक्षेची स्थिती किती दयनीय असेल, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक)
१. हेवाळेकर याला गावातून कोणी बाहेर काढले नसून गावात कोठेही जातपंचायत हा प्रकार अस्तित्वात नाही.
२. साधारण ३ वर्षांपूर्वी हेवाळेकर घराशेजारी एकट्या रहाणार्‍या महिलेच्या घरात रात्री शिरला. यानंतर त्या महिलेने त्याच्या विरोधात कुडाळ पोलिसांत तक्रार दिली होती आणि त्यानंतर तो पसार झाला. पोलिसांनी त्याच्या विरोधात अटक वॉरंट बजावले आहे. (पोलिसांनी अजूनपयर्र्ंत हेवाळेकर याला अटक करू न शकणे, हे पोलीस प्रशासनाचे अपयश नव्हे का ? - संपादक)

(म्हणे) माझ्यावर आघात म्हणजे भारतीय मुसलमानांवर आघात ! - डॉ. झाकीर नाईक यांची धमकी

डॉ. झाकीर नाईक म्हणजे पाकमध्ये लपलेला दाऊद नाही, तरीही त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारला वेळ का लागत आहे, असा प्रश्‍न जनतेच्या मनात उठत आहे !
वलयांकित मुसलमान आरोपींचे नेहमीचे तुणतुणे !
    नवी देहली - इस्लामिक रिसर्च फाउंडेशनवर बंदी घालण्यात आली, तर ती २० कोटी भारतीय मुसलमानांवरील अन्याय असेल, अशी धमकी आतंकवाद्यांचे आदर्श ठरलेले डॉ. झाकीर नाईक यांनी दिली आहे. माझ्यावरील कोणत्याही प्रकारचा आघात हा भारतीय मुसलमानांवरील आघात असेल, अशीही धमकी त्यांनी दिली आहे.
    भारत सरकार आणि भारतीय जनतेच्या नावे लिहिलेल्या खुल्या पत्रातून डॉ. झाकीर यांनी ही धमकी दिली आहे. यात त्यांनी पुढे म्हटले आहे की, मी असा कोणताही गुन्हा केलेला नाही, तरी मला देशाच्या शत्रूप्रमाणे सादर केले जात आहे आणि माझ्या अनुपस्थितीत माझ्या संस्थेवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.

डॉ. झाकीर नाईक यांच्या संस्थेला विदेशातून देणगी स्वीकारण्यास बंदी !

    नवी देहली - केंद्रीय गृह मंत्रालयाने डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाउन्डेशनला विदेशातून थेट देणगी स्वीकारण्यास बंदी घातली आहे. अशी देणगी घेण्याविषयी रिझर्व्ह बँकेची अनुमती घेण्यास फाऊंडेशनला सांगितले आहे. विदेशातून देणगी घेण्याच्या संदर्भात या संस्थेकडून नियमांचे उल्लंघन झाल्याने ही बंदी घालण्यात आली आहे. या संस्थेला मिळणार्‍या सर्व देणग्यांची माहिती आणि त्यांच्या विनियोगाची माहिती रिझर्व्ह बँकेला द्यावी लागणार आहे.

शास्त्रानुसार श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन होण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून प्रबोधन मोहीम !

   सांगली, ११ सप्टेंबर (वार्ता.) - भाविकांनी श्रीगणेशमूर्ती वहात्या पाण्यातच विसर्जन करण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सांगली, उदगाव आणि कुरुंदवाड (जिल्हा कोल्हापूर) येथे प्रबोधन मोहीम राबवण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांनी नदीच्या काठावर हातात विसर्जनाचे शास्त्र सांगणारे फलक धरले होते. उदगाव येथे सर्वश्री संजय घाटगे, अण्णासाहेब घाटगे, अशोक केंगार, प्रदीप कुलकर्णी आणि विनायक शिंगाडे उपस्थित होते. उदगाव ग्रामपंचायत आणि ग्रीन युथ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मूर्तीदान मोहीम राबवण्यात आली. यात नदीपासून काही अंतरावर खड्डा खणून दान घेतलेल्या मूर्ती त्यात विसर्जित करण्यात येत होत्या; मात्र ९५ प्रतिशत भाविकांचा मूर्तीदानाऐवजी मूर्ती विसर्जनाकडेच कल होता. या वेळी अनेक भाविकांनी तुम्ही चांगला उपक्रम राबवला. फलकांमुळे माहिती मिळाली, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

जेएन्यूतील निवडणुकीत डावे, तर देहली विद्यापिठाच्या निवडणुकीत अभाविप विजयी !

      नवी देहली - डाव्या विद्यार्थी चळवळींचे केंद्र असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (जेएन्यूत) पुन्हा एकदा डाव्यांनी, तर देहली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविपने) बाजी मारली आहे. डाव्यांनी जेएन्यूतील सर्व ४ जागा जिंकल्या आहेत. जेएन्यू स्टुडंटस् युनियनचा मावळता अध्यक्ष कन्हैयाकुमार याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाल्यामुळे हे विद्यापीठ चर्चेत आले होते. तरीही या विद्यापिठाच्या निवडणुकीत पुन्हा डावेच विजयी झाले आहेत. जेएन्यूमध्ये अभाविपला भोपळाही फोडता आला नाही. अभाविपने देहली विद्यापिठात विजय मिळवला; मात्र ४ वर्षांनंतर प्रथमच काँग्रेस प्रणित नॅशनल स्टुडंटस् युनियन ऑफ इंडियाचा (एन्एसयूआयचा)एक जण निवडून आला आहे. जेएन्यू आणि देहली विद्यापीठ येथे ९ सप्टेंबरला निवडणुका झाल्या. जेएन्यूतील निवडणुकीत ५९ टक्के मतदान झाले. हे मतदान मागच्या वर्षाच्या तुलनेत ६ टक्के अधिक होते, तर देहली विद्यापिठातील निवडणुकीत ३५ टक्के मतदान झाले. हे मतदान मागील वर्षाच्या तुलनेत ८ टक्क्यांनी कमी आहे.

अमेरिकेच्या धमक्यांना घाबरणार नाही ! - उत्तर कोरिया

        प्योंगयांग (उत्तर कोरिया) - आमच्या अणुचाचण्यांविषयी अमेरिकेने दिलेल्या धमक्यांना जराही घाबरणार नाही, असा रोखठोक पवित्रा उत्तर कोरियाने घेतला आहे. उत्तर कोरियाने दोनच दिवसांपूर्वी यशस्वी अणूचाचणी घेतली होती. ही चाचणी उत्तर कोरियाची सर्वांत मोठी म्हणजे १० किलो टन एवढी आहे. ही चाचणी घेतल्यामुळे अमेरिकेने उत्तर कोरियाला दम दिला आहे. उत्तर कोरियातील सत्ताधारी पक्षाचे मुखपत्र असलेल्या रोडोंग सिनमुनने अमेरिकेच्या अणूदबावाचा काळ संपला आहे, असे म्हटले आहे. अणूचाचणीच्या विरोधात दक्षिण कोरियाचे राष्ट्र्रपती पार्क ग्यून यांच्या प्रतिक्रियेवरही यात टीका केली आहे. संयुक्त राष्ट्र्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने मात्र उत्तर कोरियावर लवकरात लवकर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी दिली आहे. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या राष्ट्रांनी उत्तर कोरियावर निर्बंध लादण्याची मागणी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे केली होती.

(म्हणे) डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहीम राबवणार !

श्रमिक मुक्ती दलाच्या मेळाव्यात ठराव
     कराड - येथील पलाश मंगल कार्यालयात श्रमिक मुक्ती दलाचा मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात विविध ठराव करण्यात आले असून यात डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहीम राबवणार, असा ठराव करण्यात आला आहे. (एखाद्या व्यक्तीचा खून झाल्यावर त्याला पकडण्याचे दायित्व हे शासनाने आहे. असे असतांना जाणीवपूर्वक शासनावर दबाव आणण्यासाठी स्वयंघोषित पोलीस असल्यासारखे वरील तिघांच्या हल्लेखोरांना पकडण्याची मोहीम राबवण्याची कृती म्हणजे एकप्रकारे धमकीच होय ! असे करून श्रमिक मुक्ती दल सनातन संस्थेला लक्ष्य करू पहात आहे, हे हिंदू जाणून आहेत. त्यामुळे शासनाने श्रमिक मुक्ती दलाच्या ठरावाची योग्य ती नोंद घेऊन त्याच्या विरोधात तात्काळ कायदेशीर कृती करावी ! - संपादक)


आम्ही श्री गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम हौदात करण्याविषयी कोणावरही बळजोरी करणार नाही ! - धैर्यशील जाधव, मुख्याधिकारी, फलटण

मुख्याधिकारी जाधव (मध्यभागी) यांना निवेदन
देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते
   फलटण (जिल्हा सातारा), ११ सप्टेंबर (वार्ता.) - आम्ही श्री गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम हौदात करण्याविषयी कोणावरही बळजोरी करणार नाही. गणेशमूर्ती शाडूच्या बनवण्याविषयीचे प्रबोधन आम्ही करत आहोत, तुम्हीही करा. श्री गणेशमूर्तीचे विसर्जन पिण्याच्या पाण्यात करू नये आणि ते कृत्रिम हौदात करा, असे शासनाचे आदेश असल्याने आम्हाला कृत्रिम हौद सिद्ध करावे लागत आहेत. श्री गणेशमूर्तीदानाचे प्रकार येथे होत नाहीत. गणेशमूर्ती शाडूमातीच्याच बनविण्याविषयी शासनाने कायदा करायला हवा, असे मत फलटणचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी व्यक्त केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदात न करता धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात करावे, तसेच मूर्तीदान मोहीम राबवू नये, याविषयीचे निवेदन जाधव यांना ८ सप्टेंबर या दिवशी देण्यात आले. त्या वेळी शिष्टमंडळाशी बोलतांना त्यांनी वरील मत व्यक्त केले.

विनाअनुमती मंडप उभे केल्याप्रकरणी ५ गणेशोत्सव मंडळांना पुणे महानगरपालिकेची नोटीस

पालिकेने अशीच तत्परता मशिदींवर बसवलेले अवैध भोंगे काढण्यासाठी दाखवावी !
    पुणे, ११ सप्टेंबर - विनाअनुमती रस्त्यांवर मंडप उभारलेल्या गणेशोत्सव मंडळांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय पुणे महानगरपालिका प्रशासनाने घेतला असून गेल्या ४ दिवसांत अशा २८ मंडळांची सूची सिद्ध केली आहे. अनुमतीपेक्षा अधिक आकाराचा मंडप उभारलेल्या ५ गणेशोत्सव मंडळांना तशा नोटिसाही देण्यात आल्या आहेत. या संदर्भातील कारवाईचे धोरण ठरवून ती केली जाणार असल्याचे पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या प्रमुख संध्या गागरे यांनी सांगितले आहे.

अकोला येथे क्रिकेट खेळणार्‍या गणपतीचा देखावा

    अकोला, ११ सप्टेंबर - येथील सिंधी कॅम्प पक्की खोली येथील सिंधी गणेश उत्सव मंडळाच्या युवकांनी गणपती क्रिकेटची फळी (बॅट) घेऊन खेळतांना दाखवला आहे. यामध्ये झुलेलाल स्टेडीयम दाखवले असून गणपतीच्या क्रिकेट सामन्यात १६ मूषक क्षेत्ररक्षण करतांना दाखवले आहेत. (धर्मशास्त्रानुसार सिद्ध केलेल्या श्री गणेशमूर्तीमध्ये श्री गणेशतत्त्व आकर्षित होते, हे धर्मशिक्षण नसल्यामुळे जन्महिंदूंकडून अशा पद्धतीने देवतांना दाखवले जाते. - संपादक)

हिंदूंच्या ऐतिहासिक घटनेवरील चित्रपटात ऐतिहासिक माहिती वगळण्याचा प्रयत्न निंदनीय ! - राहुल कलाटे, शिवसेना पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख

चिंचवड (पुणे) येथे शिवसेनेचे चापेकर ब्रदर्स चित्रपटातील 
ऐतिहासिक प्रसंग वगळल्याच्या निषेधार्थ आंदोलन !
   
आंदोलन करतांना शिवसैनिक
  चिंचवड - हिंदुस्थानात राहून हिंदूंच्या ऐतिहासिक घटनेवर आधारित चित्रपटातील ऐतिहासिक माहिती वगळण्याचा प्रयत्न निंदनीय आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. या संदर्भात केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांना शिवसेनेच्या खासदारांसमवेत भेटून शहरवासियांच्या तीव्र भावना व्यक्त करण्यात येणार असल्याचे शिवसेना पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख श्री. राहुल कलाटे यांनी सांगितले. चापेकर ब्रदर्स हा चित्रपट २ सप्टेंबर या दिवशी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार होता; पण त्यातील काही ऐतिहासिक घटना असणारी दृश्ये वगळण्याविषयी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने आग्रह धरल्याने त्याचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे.

शहीद शिरीषकुमारांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक घोषित करावे - हिंदु जनजागृती समितीची मागणी

     नंदूरबार - येथील हुतात्मा शिरीषकमार यांच्या निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे केली आहे.
     या निवेदनात म्हटले आहे की, शिरीषकुमार मेहेता, शशिधर केतकर, लालदास शाह, धनसूखलाल वाणी आणि घनशामदास शाह हे बालक्रांतिकारक हुतात्मा झाले. त्यांच्या बलीदानाला ७५ वर्षे पूर्ण होणार असल्याच्या निमित्ताने हे वर्ष अमृतस्मृती वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. त्यानिमित्ताने हुतात्मा शिरीषकुमार याचे टिळक रोडवरील तत्कालीन निवासस्थान स्मारक घोषित करून पाचही बालक्रांतिकारांच्या स्मृतींना उजाळा द्यावा.
या निवेदनातील अन्य मागण्या
१. तेथे त्यांच्या प्रतिमा आणि माहितीपट कायमस्वरुपी लावावेत.
२. पाचही हुतात्म्यांचे अर्धपुतळे तेथे स्थापन करावेत.
३. ९ ते १५ सप्टेंबर हुतात्मा सप्ताह साजरा केला जावा.

मुख्यमंत्र्यांकडे बाजू मांडू ! - पालकमंत्री जयकुमार

रावल आणि माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे आश्‍वासन 
माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती
समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. रजनी नटावदकर, भावना कदम
नंदूरबारचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन देतांना
हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, भावना कदम
    नंदूरबार - सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना कॉ. पानसरे हत्याप्रकरणी अन्याय्य अटक करून मारहाण करणे, वकिलांना भेटू न देणे या प्रकारांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि न्याय मिळवून देऊ, असे आश्‍वासन महाराष्ट्राचे पर्यटनविकास आणि रोजगार हमीमंत्री, तसेच नंदूरबारचे पालकमंत्री जयकुमार रावल आणि नंदूरबारचे आमदार आणि माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले. या संदर्भात सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी त्यांना भेटून निवेदन दिले.

फलक प्रसिद्धीकरता

डॉ. झाकीर नाईक यांचा सरकारच्या विरोधात थयथयाट !
     इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी घालण्यात आली, तर तो २० कोटी भारतीय मुसलमानांवरील अन्याय असेल आणि माझ्यावरील कोणत्याही प्रकारचा आघात हा मुसलमानांवरील आघात असेल, अशी धमकी आतंकवाद्यांचे आदर्श ठरलेले डॉ. झाकीर नाईक यांनी दिली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Merepar hua aghat 20 karod Bharatiya Musalmanopar aghat hoga - Dr. Zakir Naik
     Dharmik rang deneka yah prayas hai, aisa koi secularwadi kyu nahi kah raha
जागो !
: मेरे पर हुआ आघात २० करोड भारतीय मुसलमानों पर आघात होगा ! - डॉ. जाकिर नाईक
     धार्मिक रंग देने का यह प्रयास है, ऐसा कोई सेक्युलरवादी क्यों नहीं कह रहा ?

पिंपरी-चिंचवड येथे नदीच्या वहात्या पाण्यात श्रीगणेश मूर्तीविसर्जन करण्याकडे भाविकांचा कल, कृत्रिम हौदाला अत्यल्प प्रतिसाद

   पिंपरी, ११ सप्टेंबर (वार्ता.) - येथील मोरया गोसावी घाट, काकडे पार्क घाट, रावेत घाट, सांगवी घाट, औंध घाट या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधनात्मक फलक, प्रबोधनात्मक हस्तपत्रके, उद्घोषणा या माध्यमातून भाविकांना गणेशमूर्ती विसर्जनाचे शास्त्र सांगून धर्मशास्त्रानुसार नदीच्या वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत भाविकांनी नदीच्या वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन केले, तर कृत्रिम हौदामध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन करणार्‍यांची संख्या अत्यल्प होती. रात्री १० नंतरही अनेकांनी नदीच्या वहात्या पाण्यातच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले.

घोडाझरी कालव्याच्या (जिल्हा चंद्रपूर) सिंचन घोटाळ्यातील ६ जणांविरुद्ध पहिले आरोपपत्र प्रविष्ट

       नागपूर, ११ सप्टेंबर - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर अधीक्षक कार्यालयाने सिंचन घोटाळा प्रकरणातील गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील घोडाझरी कालव्याच्या बांधकामात झालेल्या घोटाळ्याशी संबंधित ६ जणांविरुद्ध पहिले आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. या ६ जणांविरुद्ध पदाचा अपवापर करणे, भ्रष्टाचार करणे आणि फसवणूक करण्याचे आरोप असून विशेष सत्र न्यायाधीश के.जी. राठी यांच्या न्यायालयात ६ सहस्र ४५० पानांचे आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. यामध्ये तत्कालीन अधिकार्‍यांसमवेत विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे तत्कालीन कार्यकारी संचालक आणि कंत्राटदार एफ.ए. कन्स्ट्रक्शन आस्थापनाचे संचालक निसार फतेह मोहंमद अब्दुला खत्री या आरोपींची नाव आहेत.

गौरीविसर्जनाच्या दिवशीही पुणे महापालिकेकडून भाविकांसाठी असुविधांची जंत्री !

नदीला पाणी न सोडल्याने भाविकांमध्ये असंतोष !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विसर्जन घाटांवर प्रबोधन चळवळ !
आेंकारेश्‍वर पूलावर अशाप्रकारे कसरत करत भाविकांना करावे लागत होते गणेशविसर्जन
पुणे महानगरपालिकेची हिटलरशाही ! महानगरपालिकेच्या
कलशावर चक्क उलटे स्वस्तिक काढण्यात आले आहे.
निर्माल्यकलश नाही, तर चक्क कचराकुंडी ! निर्माल्याची
महानगरपालिकेच्या लेखी असणारी किंमत यातून दिसून येते.
नेने आपटे घाट सोडून अन्य कुठल्याही घाटावर
विसर्जनासाठी अशाप्रकारे व्यवस्था करण्यात आली नाही.
    पुणे, ११ सप्टेंबर (वार्ता.) - पुणे महानगरपालिकेने दीड दिवसांच्या विसर्जनासाठी नदीला पाणी न सोडून धर्माशास्त्रानुसार गणेशमूर्तींचे विसर्जन करू पहाणार्‍या भाविकांसाठी अप्रत्यक्ष अडवणूक केली होती. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीसह अनेक गणेशभक्तांनी आवाज उठवल्यानंतर पुणे महानगरपालिकेची कृती सुधारेल, असे वाटले होते. महापालिकेने मात्र धर्मशास्त्रविरोधी कृती न सुधारता गौरीविसर्जनाच्या दिवशीही नदीला पाणी न सोडून भाविकांची पुन्हा फसवणूक आणि प्रचंड गैरसोय केली. यामुळे अनेक भाविकांचा हिरमोड झाला. पाणी न सोडण्याच्या जोडीलाच नदीपात्राकडे जाणारा रस्ता खडबडीत ठेवणे, विसर्जन घाटांवर गणेशमूर्ती ठेवण्यासाठी टेबलांची (पटलांची) कमतरता ठेवणे यांसह अनेक गोष्टींमधून महानगरपालिकेने भाविकांसाठी असुविधांची जंत्रीच समोर ठेवल्याचे चित्र पहायला मिळत होते.
     स्वा. सावरकरांचे कोणतेही साहित्य वाचा त्यातून सुगंध येतो, मातृभूमीच्या मातीचा. तसे सनातन प्रभातचा कोणताही अंक वाचा त्यातून हुंकार येतो, राष्ट्रप्रेमाचा आणि हिंदु राष्ट्राचा ! - श्री. विद्याधरपंत नारगोलकर, महामंत्री, सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे

काश्मीरचा प्रश्‍न संवादाने अथवा चर्चेने सुटणे अशक्य !

१. बुर्‍हान वानीचे समर्थन 
करणार्‍यांविषयी समंजसपणा का ? 

सैन्यावर दगडफेक करतांना
फुटीरतावादी (संकेस्थळावरील छायाचित्र)

         काश्मीर आज पेटलेला आहे आणि तिथे कठोर कारवाई करण्यापेक्षा सामंजस्याचा मार्ग आवश्यक आहे, असे सांगणारे भरपूर शहाणे आहेत; पण हा भडका कशामुळे उडाला आणि त्यामागची प्रेरणा कुठली आहे ? बुर्‍हान वानी नावाचा एक जिहादी घातपाती चकमकीत मारला गेला. त्याच्या समर्थनासाठी लोक रस्त्यावर आले, असेच म्हटले जाते. ते लोक कशामुळे रस्त्यावर आले ? त्यांच्या भावना इतक्या तीव्र कोणासाठी झाल्या ? बुर्‍हान वानीसाठीच ना ? म्हणजे जे कोणी शेकडो सहस्र काश्मिरी रस्त्यावर आले, त्यांना लाठ्या झेलून आणि दगड मारून कुणाचे समर्थन करायचे होते ? वानीचे समर्थन म्हणजे एका जिहादीचे समर्थन होय; पण त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत.
     साधकांनो, तुम्ही राष्ट्र आणि धर्म यांसाठी सर्वस्वाचा त्याग करत आहात. त्यामुळे भगवंत तुम्हाला आपत्काळात तारून तर नेईलच; पण तो तुम्हाला आपले करून घेईल, याची खात्री बाळगा !

रामनाथी (गोवा) येथे जून २०१६ मध्ये झालेले हिंदू अधिवेशन आणि समन्वयकांचे शिबिर यांत जाणवलेली सूत्रे

सौ. संगीता लोटलीकर
१. परात्पर गुरु डॉ. आठवले हे स्वयं विष्णूचे अवतार आहेत, हे महर्षींना सांगावे लागले, याची खंत वाटून आपणच कुठेतरी न्यून पडतो, याची जाणीव होणे : प.पू. गुरुदेव, अधिवेशनाच्या माध्यमातून पुष्कळ काही शिकवलेत आणि दिलेत; म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमच्याजवळ शब्दच नाहीत. प.पू. गुरुदेव, आरंभीच्या काळात तुम्ही गुरुपौर्णिमेला नेहमी भेटत होता. तेव्हाचे दिवस आठवून कृतज्ञता व्यक्त झाली आणि सर्व गोष्टींचे गांभीर्य लक्षात आले. आपण सांगत असलेल्या गोष्टी, स्वभावदोष-अहं निर्मूलन आणि व्यष्टी साधनेत आम्ही न्यून पडतो, तरीही आपण आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर तेवढ्याच प्रेमाने आम्हाला सांगतात आणि आई जशी मुलांवर प्रेम करते, तसेच प्रेमही आमच्यावर करतात. प.पू. गुरुदेव, आपण प्रत्यक्ष भगवान विष्णूचे अवतार आहात, हे महर्षींना सांगावे लागले, याची पुष्कळ खंत वाटते; कारण आपणच कर्ता-करविता आहात, हे ठाऊक असूनही ती जाणीव सतत नसते. त्यासाठी प.पू. गुरुदेव, आपली, सद्गुरु बिंदाताई आणि सद्गुरु अनुताई यांच्या चरणी क्षमा मागते.

तेच तेच अन्वेषण पुन:पुन्हा करण्यात वेळ वाया घालवणार्‍या अन्वेषण यंत्रणा !

     डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचे अन्वेषण करणारी केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) आणि विशेष अन्वेषण पथक (एस्आयटी) सनातनच्या साधकांची चौकशी करत आहेत. चौकशीच्या नावाखाली या दोन्ही अन्वेषण यंत्रणा स्वत:चा आणि सनातनच्या साधकांचा वेळ वाया घालवत असल्याचे खालील उदाहरणांतून स्पष्ट होते. १. दोन्ही अन्वेषण यंत्रणा (सीबीआय आणि एस्आयटी) एकाच साधकाला बोलावून दोन्हीकडे तेच ते प्रश्‍न पुन:पुन्हा विचारतात. या दोन्ही यंत्रणा या दोन्ही प्रकरणांचे अन्वेषण एकमेकांच्या सहकार्याने करत आहेत, असे सांगतात; म्हणजे मिळालेल्या माहितीचे आदानप्रदान एकमेकांना होत असतांना एकाच साधकाची पुन्हा चौकशी केली जाते. विशेष म्हणजे सर्वांचे प्रश्‍न एकसारखेच असतात.
२. एकच अन्वेषण यंत्रणेचे अधिकारी एकाच साधकाला दोन किंवा त्याहीपेक्षा अधिक वेळा चौकशीसाठी बोलावतात. या सर्व चौकशीत पूर्वी विचारलेलेच प्रश्‍न पुन्हा विचारतात. याविषयी त्या अधिकार्‍यांना विचारल्यावर ते सांगतात की, अन्वेषण करणारे अधिकारी पालटले की, नवीन अधिकारी पुन्हा चौकशी करतात. (क्रमश:)

गणेशचतुर्थीनिमित्त प्रतिदिन भ्रमणभाषवर पाठवायचे लघुसंदेश आणि धर्मशिक्षण फलकावर लिहायची वाक्ये

कु. गायत्री बुट्टे
सध्या चालू असलेल्या 
गणेशोत्सवाच्या निमित्ताने...
१. कोणत्याही शुभकार्याच्या 
आरंभी गणपतीचे पूजन केले जाते !
गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया ।
मंगलमूर्ती विघ्नविनाशक आधी वंदू तुज मोरया ॥
        विवाह, गृहप्रवेश अशा कोणत्याही शुभकार्याच्या आरंभी प्रथम संकटांचा नाश करणार्‍या श्री गणपतीचे पूजन केले जाते.
२. वक्रतुंड
        वक्रान् तुण्डयति इति वक्रतुण्डः ।, म्हणजे वक्रमार्गाने (वाईट मार्गाने) चालणारे आणि बोलणारे अशांना शिक्षा करून जो सरळ मार्गावर आणतो, तो वक्रतुंड.

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

     सध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वीही पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे आजपासून क्रमशः प्रसिद्ध करत आहोत.
हिंदूंच्या मिरवणुकीसाठी अनुमती देतांना वाहतूक शाखेतील मुसलमान पोलिसाचा वेळकाढूपणा !
     २०.११.२०१३ या दिवशी सोलापूूर येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या मिरवणुकीसाठी अनुमती अर्ज सिद्ध करणारा वाहतूक शाखेचा कर्मचारी मुसलमान होता. त्याने अनेक कारणे सांगून अर्ज रखडवला. त्यांच्या अधिकार्‍यांपर्यंत विषय पोचला. अधिकार्‍याने होर्डिंगसाठी अनुमती द्यायला सांगितले. सदर कर्मचार्‍याने या ना त्या कारणाने दिवस घालवला, म्हणजे तो अधिकार्‍याच्या पश्‍चात टाळाटाळ करत होता. त्या मुसलमान लिपिकाशेजारी (पोलीस) एक हिंदु लिपिक (पोलीस) होता. त्याला सांगितले, हा मुद्दाम वेळकाढूपणा करतोय, जरा तू तरी लक्ष घाल. तेव्हा तो म्हणाला, तसे करता येत नाही. - एक साधक, सोलापूर

एका संतांनी रचलेले भक्तीगीत ऐकल्यानंतर सौ. उमा रविचंद्रन् यांनी अनुभवलेली भावावस्था

       सत्संगात घेतल्या जाणार्‍या भावप्रयोगांचा लाभ आम्हाला प्रतिदिन होतो. संतांच्या संकल्पामुळे आपले अंतःकरण शुद्ध होऊन भावाने भरून जाते. थोर संत श्री. अरुणाचल कवियार यांनी श्रीरंगम्च्या प्रभु श्रीरंगनाथाला उद्देशून एक भक्तीगीत रचले आहे. अवतारी कार्य करून थकलेले भगवान विष्णु विश्रांती घेण्यासाठी शेषशय्येवर पहुडला आहे. भगवंताविषयी चिंता वाटत असल्याने श्री. अरुणाचल कवियार यांनी आत्यंतिक प्रेमाने आणि आपुलकीने भगवंताला प्रश्‍न विचारून त्याची विचारपूस केली. भक्तीरसाने ओतप्रोत भरलेले हे भक्तीगीत ऐकल्यानंतर माझा भाव जागृत झाला.
       या गीतामध्ये म्हटले आहे, हे रंगनाथ ! तू त्रेतायुगात श्रीराम आणि द्वापरयुगात श्रीकृष्ण यांचा अवतार घेऊन पुष्कळ कार्य केलेस. अवतारी कार्यामुळे तू इतका थकून गेला आहेस की, तू शेषशय्येवर अनंत काळापर्यंत शयन करत आहेस, प्रभु !
१. श्रीरंगनाथा, त्रेतायुगात श्रीरामाचा 
अवतार घेऊन पुष्कळ कार्य केल्यामुळे 
थकून तू शेषशय्येवर पहुडला आहेस का ?
       तू कावेरी नदीच्या दोन्ही शाखांच्या मध्यभागी असणार्‍या बेटावर विश्रांती घेत आहेस. कौशिकनंदन विश्‍वामित्र यांच्या यज्ञाचे रक्षण करून तू आज्ञापालन केले. त्यामुळे तू थकलास का ? तू त्राटिका राक्षसिणीचा वध केलास. सीतेच्या स्वयंवरात तू शिवधनुष्य उलचलले. संतापलेल्या भगवान परशुरामाला तू शांत केलेस. त्यामुळे तू थकलास का ? तू तपस्वी सीतेसमवेत गंगेच्या तटापर्यंत पुष्कळ अंतर चालत गेलास. तू गुह नावाड्याच्या नौकेत बसून गंगा नदी ओलांडली आणि बराच काळ चित्रकूट पर्वतावर वास्तव्य केले. त्यामुळे तू थकलास का ?

समाजातील सर्वच स्तरांतील नागरिकांकडून सनातन संस्थेला मिळत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद !

   डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्या प्रकरणांत अन्वेषण यंत्रणांनी संशयावरून सनातनचे निष्पाप साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि श्री. समीर गायकवाड यांना अटक करून कारागृहात ठेवले आहे. पुरोगाम्यांच्या दबावापोटी आणि हिंदुत्वाचे दमन करण्यासाठी सनातनला हत्या प्रकरणात गोवण्याचे कारस्थान चालू आहे. पोलीस आणि अन्वेषण यंत्रणा यांच्याकडून अटकेतील साधक, तसेच अन्य साधक यांचाही अतोनात छळ होत आहे. हिंदुविरोधी प्रसिद्धीमाध्यमांकडूनही सनातनची अपकीर्ती केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सनातन प्रभातने पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्तव, हा विशेषांक ६ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध केला. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. या अनुषंगाने समाजातील मान्यवर आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया येथे देत आहोत. 

देवतांचे ब्रह्मरंध्र आणि देह यांतून प्रक्षेपित होणारी शक्ती मानवाला पेलवता यावी, यासाठी देवतांनी विविध गोष्टी धारण करणे किंवा वाहनांवर आरूढ होणे, याविषयी श्री. निमिष म्हात्रे यांना मिळालेले ज्ञान

श्री. निमिष म्हात्रे
         एकदा मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात बसलो असतांना माझी दृष्टी तेथे ठेवलेल्या विष्णूच्या नृसिंह अवतारातील चित्राकडे गेली. चित्रात भगवान नृसिंहाच्या मागे शेषनाग दाखवला होता. कोल्हापूर येथील महालक्ष्मीदेवीच्या मूळ मूर्तीमागेही शेषनागाची आकृती असल्याचे एकदा मी वृत्तपत्रातील चित्रात पाहिले होते. अनेक देवतांच्या मागे नाग असल्याचे शास्त्रीय कारण काय असावे ?, असा विचार माझ्या मनात आला. त्यावर देवाने पुढील उत्तर सुचवले.
१. देवतांकडून प्रक्षेपित होणारी उग्र शक्ती मानवाला सहजतेने ग्रहण करता यावी, यासाठी डोके आणि देह वेगवेगळ्या माध्यमातून झाकलेले असणे : देवतांच्या ब्रह्मरंध्रातून पुष्कळ उग्र स्वरूपातील शक्ती सर्वत्र प्रक्षेपित होत असते. ही शक्ती भक्तांना पेलता यावी, यासाठी देवतांच्या डोक्यावर मुकुट, जटा आणि सर्पाचा फणा इत्यादी गोष्टी असतात. त्यामुळे देवतांमधील शक्ती सौम्य होते आणि भक्तांना देवतांकडून प्रक्षेपित होणार्‍या शक्तीचा लाभ घेता येतो. देवतांच्या देहातूनही प्रचंड प्रमाणात शक्ती प्रक्षेपित होत असल्याने देवतांच्या मूर्तींना वस्त्र नेसवणे, गंधाचे लेपन करणे आणि दागिने घालणे इत्यादी प्रथा आहेत.

साधकांना नकारात्मक विचारांतून बाहेर काढतांना त्यांना मनमोकळेपणाने बोलण्यास प्रोत्साहन देऊन त्यांच्या मनाची सिद्धता करून घेणारे पू. डॉ. चारुदत्त पिंगळे !

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
१. साधकांच्या नकारात्मक विचारांकडेही सकारात्मकतेने पाहिल्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळून योग्य दृष्टीकोन स्वीकारण्याची त्यांच्या मनाची सिद्धता होणे : एकदा सत्संगात साधकांनी नकारात्मक विचार सांगितले. त्या वेळी पू. पिंगळेकाकांनी हे किती नकारात्मक विचार आहेत. किती चुकीचे विचार आहेत, असे न म्हणता सर्वांनी मनमोकळेपणाने बोलण्याचा चांगला प्रयत्न केला, असे सांगितले. त्या वेळी त्यांनी नकारात्मक विचारांवर योग्य दृष्टीकोनही सांगितले. त्यामुळे साधकांना मोकळेपणाने बोलण्यास प्रोत्साहन मिळाले आणि चुकीच्या किंवा नकारात्मक विचारांमुळे वाटणारा अपराधीपणा अन् प्रतिमेचे विचार यांवर मात करून मनातील विचार व्यक्त करायला हवेत, असेही वाटू लागले. योग्य दृष्टीकोन स्वीकारण्याची अन् स्वतःमध्ये पालट करण्याची मनाची सिद्धता झाली.

देवाप्रती आणि गुरूंप्रती भाव असणार्‍या अन् देव सतत समवेत आहे, याची अनुभूती घेणार्‍या सौ. गौरी म्हात्रे !

सौ. गौरी म्हात्रे
१. कर्करोग झाल्याचे समजल्यावरही स्थिर राहून मुलाला घरी न बोलावता सेवा करायला सांगणे : काही मासांपूर्वी माझ्या आईला कर्करोग झाल्याचे निदान झाले. आईला कर्करोग झाल्याचे समजल्यावर कुटुंबातील सर्वच सदस्यांना ताण आला होता; पण ती मात्र निश्‍चिंत होती. देवच आपली काळजी घेईल यावर तिची श्रद्धा होती. तेव्हा मी रामनाथी आश्रमात सेवा करत होतो. मला काही कारणाने गेली काही वर्षे घरी जाता आले नव्हते. असे असूनही आईने माझ्याकडे भेटायला येण्याचा आग्रह धरला नाही. आई मला तू तुझी सेवा चालू ठेव. माझी काळजी घ्यायला देव आहे, असे सांगत असे. त्यामुळे माझ्या सेवेत खंड पडला नाही.
२. देव काळजी घेत असल्याने कसलेच भय नसल्याचे सांगणे : काही मासांनी आईची प्रकृती खालावली. आईला सतत १०४ डिग्रीपर्यंत ताप येऊ लागला. त्यात कर्करोगावर केलेल्या उपचारांमुळे तिच्या रक्तातील पांढर्‍या पेशींची संख्या पुष्कळ घटली. त्यामुळे ती आजारपणातून लवकर बाहेर पडत नव्हती. या वेळी आईशी बोलल्यावर ती म्हणाली, कितीही मोठे आधुनिक वैद्य आणि जवळचे नातेवाईक आले, तरी कोणी काहीच करू शकत नाही. शेवटी जे देवाच्या मनात आहे, तसेच होणार आहे, यावर माझी ठाम श्रद्धा आहे. मला कसलेच भय नाही. मी मृत्यूलाही घाबरत नाही. माझे काहीही झाले, तरी देवच माझी काळजी घेणार आहे. मी आईचे हे बोलणे ऐकून देवाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

सौ. उमा रविचंद्रन् यांना त्यांचे जावई श्री. वेणुगोपालन् यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

श्री. वेणुगोपालन्
१. बालपणापासून समाधानी
       श्री. वेणुगोपालन् यांनी लहानपणी कुणालाही कधीच त्रास दिला नाही. ते स्वावलंबी असल्याने स्वतःची कामे स्वतःच करत असत. त्यांनी कधीही कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट केला नाही. ते शांत आणि समाधानी होते.
२. शांत आणि स्थिर चित्त
       वेणुगोपालन् शांत आणि स्थिर असतात. अनपेक्षितपणे घडलेल्या एखाद्या प्रसंगातही ते शांत रहातात आणि स्थिर चित्ताने अन् सुस्पष्ट विचार करून त्या प्रसंगातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग काढतात. एकदा आम्ही सर्व बाहेरगावी जात होतो. तेव्हा माझे पती घरून विमानतळावर येतांना बॅग आणायला विसरले. त्या वेळी वेणुगोपालन् शांत आणि स्थिर होते. त्यांनी कुटुंबातील एका सदस्याच्या माध्यमातून ती बॅग वेळेत मिळवण्यासाठी साहाय्य केले. आम्हाला वेळेवर बॅग मिळाली नसती, तर नंतरच्या विमानाने ती घेऊन येण्यासही ते सिद्ध होते.

बालपणापासूनच देवाची आवड असणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५१ टक्के पातळीचा राजाजीनगर (कर्नाटक) येथील चि. हरिकृष्ण (वय २ वर्षे) !

चि. हरिकृष्ण
गर्भारपण
१. मला पूर्वी नामजप करावा, असे वाटत नव्हते. मी गर्भवती असतांना आईंनी (सासूबाईंनी) मला नामजप करण्यास सांगितले. तेव्हा मला श्रीकृष्णाविषयी पुष्कळ प्रेम वाटू लागले.
२. मला श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र दिसे आणि त्यातून मला पुष्कळ चैतन्य मिळत आहे, असे जाणवत असे.
३. आधुनिक वैद्यांकडे गेले असता त्यांनी मला बाळ पुष्कळ चपळ आहे, असे सांगितले.
जन्म
       चि. हरिकृष्णच्या जन्माच्या वेळी भरपूर पाऊस पडत होता. तेव्हा आधुनिक वैद्यांनी सांगितले, मी असा पाऊस कधीच पाहिला नाही. या बाळाचे नाव कृष्ण ठेवा.

गुरुमाऊलीच्या चरणस्पर्शाने साधकांचा अहं सदोदित नियंत्रणात रहाणार असल्याने सर्व साधकांचे रूपांतर त्याच्या चरणांखालील चौरंगात होण्यासाठी तळमळीने प्रार्थना करणार्‍या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चेन्नई येथील सौ. उमा रविचंद्रन् !

सौ. उमा रविचंद्रन
१. सिंहासनाधिष्ठित प.पू. गुरुदेवांचे दर्शन झाल्यामुळे आनंद होणे, या दृश्यात साधकांचे स्थान कुठे आहे ?, या प्रश्‍नाला सर्व साधकांचे स्थान नेहमीच माझ्या हृदयात असते, असे गुरुदेवांनी सांगणे : माझी कन्या कु. वर्षा हिच्या विवाहाच्या आदल्या दिवशी, म्हणजे ९.७.२०१६ या दिवशी पहाटे मला ही अलौकिक अनुभूती आली. त्यामुळे मी पूर्णवेळ आनंदाच्या स्थितीत होतेे. त्या दिवशी मला सिंहासनावर बसलेल्या प.पू. गुरुदेवांच्या अमृतस्वरूपाचे दर्शन झाले आणि या दृश्यात आम्हा साधकांचे स्थान कुठे आहे ?, असा विचार माझ्या मनात आला; म्हणून मी हा प्रश्‍न त्यांनाच विचारला, प्रभो, तुम्ही प्रीती आणि करुणा यांचे महासागर आहात. देवा, तुझ्या या अमृतस्वरूपात आम्हाला स्थान नाही का ? तेव्हा ते म्हणाले, तुम्हा सर्व साधकांचे स्थान नेहमीच माझ्या हृदयात असते. तुला अशी शंका तरी का आली ?

प्रारब्धाचे प्रकार आणि त्यांची लक्षणे

श्री. राम होनप
१. वाईट प्रारब्ध
       अन्न आहे; पण भूक नाही किंवा भूक आहे; पण अन्न नाही, अशी परिस्थिती असणे.
२. चांगले प्रारब्ध
       मनुष्याकडे भूक आहे, अन्नही आहे आणि ते पचवण्याची क्षमताही आहे.
३. उत्तम प्रारब्ध
       बाह्य परिस्थिती कशीही असो, हरि स्मरणात दंग आहे. ही स्थिती साधनेने प्राप्त करता येते.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.८.२०१६)

दैनिक सनातन प्रभात एवढ्या स्पष्टपणे आणि परखडपणे सत्य का प्रतिपादन करते ?, यामागील प.पू. पांडे महाराज यांनी सांगितलेला अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोन !

१. व्यष्टी साधना 
प.पू. पांडेमहाराज
स्वभावदोषांमुळे चुका होऊन त्याचे पाप लागत असल्याने अंतःकरण शुद्ध होऊन ईश्‍वरप्राप्ती हे ध्येय साध्य होण्यासाठी स्वभावदोष घालवणे आवश्यक ! : दैनिक सनातन प्रभात एवढ्या स्पष्टपणे आणि परखडपणे सत्य का प्रतिपादन करते ? याचे कारण हे की, जीवन जगत असतांना प्रत्येक जिवाचे कर्तव्य आहे की, त्याने स्वतःत असलेले स्वभावदोष घालवण्यासाठी ते दुसर्‍याला कथन करावेत. नंतर त्यावर प्रायश्‍चित्त घेऊन, उपाय करून त्यांचे निर्मूलन करावे, तसेच गुरूंद्वारे मिळणारे जीवनाला उन्नत करणारे ज्ञान ग्रहण करावे आणि त्याप्रमाणेे वागावे. असे केल्यास आपल्या चुकांमुळे जे पाप धारण झाले आहे, त्याचे निःसारण होऊन अंतःकरण शुद्ध होते. यामुळे देहाच्या आतील आत्म्यावर आलेले आवरण निघून जाऊन आत्मचैतन्य प्रकट होते. या आत्मचैतन्यामुळे आपल्यावर झालेल्या गुरुकृपेने जी व्यष्टी साधना झालेली असते, तिच्यामुळे आध्यात्मिक उन्नती होते आणि जीवनातील ईश्‍वरप्राप्ती हे लक्ष्य साध्य होते.

चि. कृष्ण नरेंद्र सुर्वे (वय ९ वर्षे) याने काढलेले श्री गणेशाचे चित्र

चि. कृष्ण सुर्वे
        हे गुरुदेवा, आमचा मुलगा चि. कृष्ण नरेंद्र सुर्वे (वय ९ वर्षे) हा चौथ्या इयत्तेत असतांना त्याने देवतांची चित्रे काढली आहेत. चित्रे काढतांना भाव कसा ठेवावा, हे त्याला कळत नाही; परंतु चित्रे काढतांना तो तुम्हाला तुम्हीच माझ्याकडून चित्रे व्यवस्थित काढून घ्या, अशी प्रार्थना करतो.
- श्री. नरेंद्र मधुकर सुर्वे, नवीन पनवेल, जिल्हा रायगड. (२५.४.२०१६)

कृपाळू थोर गुरुमाऊली ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
किती थोर गुरुमाऊली ।
तिच्यासम नसे दुजा कोणी ॥ १ ॥
जाऊया गुरुचरणी शरण ।
दोष नि अहं यांचे करतील ते हरण ॥ २ ॥
करूया प्रार्थना तवसमान घडण्या ।
करतील पूर्ण ते मोक्ष मिळण्याची कामना ॥ ३ ॥ 
कु. वर्षा जाधव
कृपाळू थोर गुरुमाऊली ।
तिचाच घेऊया आधार ॥ ४ ॥
वाढवूया प्रयत्न तत्पर ।
जाऊया गुरुचरणी सत्वर ॥ ५ ॥
धरूया प्रार्थना-कृतज्ञतेची कास ।
धरूया मोक्षप्राप्तीची आस ॥ ६ ॥
- कु. वर्षा जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.९.२०१४)

समाजात सनातन संस्थेचे साधक आणि तिचे कार्य यांविषयी असलेला आदर

वर्षा नकाते
१. आयुर्वेदीय उपचारासाठी वैद्यांकडे गेल्यावर त्यांनी चौकशी करून सनातनविषयी प्रश्‍न विचारणे आणि नंतर आश्रमात सेवा करत असल्याचे कळल्यावर विनामूल्य उपचार करणे : ७.७.२०१६ या दिवशी मी कमरेच्या उपचारासाठी एका आयुर्वेदीय वैद्यांकडे गेले होते. त्या वेळी वैद्यांनी माझी चौकशी केली. तेव्हा आमच्यात पुढीलप्रमाणे संवाद झाला.
मी : मी सनातनच्या आश्रमात सेवा करते.
वैद्य (एक क्षण माझ्याकडे पाहून) : तुमचे पुढे कसे होणार ?
मी : देव माझी काळजी घेईल. आपण कशाला काळजी करायची !
वैद्य : तिकडे तुम्हाला पगार मिळतो का ?
        तेव्हा मी केवळ शांतपणे त्यांच्याकडे पाहिले. त्या क्षणी माझ्या मनात विचार आला, आमचे गुरु आम्हाला काय देतात, हे शब्दांत सांगता येणार नाही. ती तर गुरुमाऊली आहे; पण हे यांना कसे कळणार ?

समाजातील लोक, तसेच सहसाधक यांची इतरांना नक्कल करून दाखवून अमूल्य वेळ वाया घालवणारे बहिर्मुख कार्यकर्ते !

१. सर्वोच्च न्यायालयातील 
अधिवक्त्यांची नक्कल करून दाखवणे
       एका सेवाकेंद्रातील एका कार्यकर्त्याची सेवेनिमित्त सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्त्यांशी भेट होते. तो कार्यकर्ता इतर साधकांना त्यांची नक्कल करून दाखवतो. या कार्यकर्त्याकडून विविध धर्माभिमानी, तसेच साधक यांचीही नक्कल केली जाते, असे आढळले. ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेदरम्यान प्रदर्शनाला भेट दिलेल्या जिज्ञासूंनी काही निराळे प्रश्‍न विचारल्यास त्या संदर्भात सहसाधकांना नक्कल करत बहिर्मुखतेने सांगणे त्याच्याकडून होते.
२. ज्येष्ठ साधकांची नक्कल करणे
       एक कार्यकर्ता सहसाधकासह प्रसारसेवेला जाऊन आल्यावर सहसाधकाने कशा प्रकारे विषय मांडला, याची नक्कल करून दाखवायचा. खरेतर ते सहसाधक या कार्यकर्त्यापेक्षा वयाने बरेच मोठे आहेत आणि ते तळमळीने विषय मांडतात. त्यामुळे असे करणे उद्धटपणाचेच लक्षण आहे. अशाच प्रकारची चूक अन्य एका कार्यकर्तीकडून झाली आहे.

नियतकालिक वितरकांसाठी महत्त्वाची सूचना

वाचकाऐवजी त्याच्या आडनावात साधर्म्य असणार्‍या 
व्यक्तीला अंक दिला जात नाही ना, याची निश्‍चिती करा !
      पुणे जिल्ह्यातील मराठी साप्ताहिकाच्या एका वाचकाला २ आठवडे अंक मिळत नव्हता. अंक न मिळण्यामागील कारण शोधल्यावर साप्ताहिक वितरित करणारा साधक वाचकाच्या इमारतीतील त्याच्या आडनावाशी साधर्म्य असणार्‍या दुसर्‍याच व्यक्तीला अंक देत होता, असे लक्षात आले. त्यामुळे ते वाचक २ आठवडे अंकातील अमूल्य ज्ञानापासून वंचित राहिले.
      वितरक साधकांनी वाचकाचे नाव, आडनाव, पत्ता आदी माहिती पडताळून घेऊनच त्यांना अंक द्यावा.

श्री गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक आदर्श काढा !

अशी बेशिस्त मिरवणूक काढू नका !

 • मिरवणुकीत भारतीय वेशभूषा करा ! 
 • फटाक्यांवर व्यय (खर्च ) करू नका ! 
 • मिरवणूक रस्त्याच्या कडेने रांगेत न्या ! 
 • मिरवणुकीत भजने म्हणा, श्री गणेशाचा नामजप करा वा अथर्वशीर्षचे पठण करा ! 
 • मिरवणुकीत गुलाल उधळणे, मद्यपान, हिडीस नाच वा महिलांची छेडछाड होऊ देऊ नका ! 
 • बँड, बँजो यांसारख्या वाद्यांपेक्षा टाळ, मृदुंंग, ढोल, ताशा यांसारखी वाद्ये वाजवा ! 
 • मिरवणूक वेळेत आरंभ करून रात्री १० वाजेपर्यंत संपवा अन् त्याविषयी इतरांनाही सांगा !

श्री गणेशाचा अवमान रोखणे, ही गणेशभक्तीच !

 • वेष्टनावर श्री गणेशाचे चित्र असलेली उत्पादने (उदा. मिठाई, उदबत्ती) खरेदी करू नका ! 
 • चित्रविचित्र रूपांतील गणेशमूर्ती बनवून श्री गणेशाचे विडंबन करणार्‍यांचे प्रबोधन करा ! 
 • श्री गणेशाचे विडंबन करणार्‍या प्रसारमाध्यमांवर सनदशीर मार्गाने बहिष्कार घाला !

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमेश्‍वरावर दृढ श्रद्धा ठेवा 
       परमेश्‍वरावरील दृढ श्रद्धा कोणत्याही संकटाशी सामना करण्याचे बळ देते. परमेश्‍वराने कितीही परीक्षा घेतली, तरी श्रद्धा स्थिर असावी.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरूंकडे काय मागावे ?
माझ्याकडे सुख मागू नका, 
दुःख सहन करण्याचे बळ मागा.
भावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
हिंदूंचा कल्पनातीत सर्वधर्मसमभाव
     विष्णूचा अवतार असलेल्या रामाने रावणाला युद्धात मारले. त्या रावणाची रावण महाराज या नावाची भारतात २-३ ठिकाणी मंदिरे आहेत ! म्हणूनच हिंदूंना कोणी सर्वधर्मसमभाव शिकवायला नको ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

याचाही विचार व्हावा !

       सध्या गणेशोत्सव चालू आहे. दीड दिवसाचे, पाचव्या आणि सहाव्या दिवशीचे विसर्जन झाले आहे. वर्षातून एकदाच गणेशोत्सव साजरा होत असूनही पर्यावरणवाद्यांनी नेहमीप्रमाणे यंदाही नकारघंटा चालू ठेवली होती. मूर्तीच अशी करा, पूजा तशी करा आणि विसर्जन बालदीत करा, एका ना अनेक सूचना ! वास्तविक हिंदूंचे प्रत्येक सण म्हणजे धर्मशास्त्र आणि निसर्ग यांचा संगमच आहेत ! धर्मशास्त्राचे तंतोतंत पालन केल्यास कुठेच नैसर्गिक हानी होत नाही. तरीही अनेक ठिकाणी नगरपालिका कृत्रिम हौद, फिरते कृत्रिम हौद, निर्माल्य संकलन कलश आदी धर्मद्रोही उपक्रम राबवून हिंदूंच्या धर्माचरणात आडकाठी आणतात. गणेशोत्सवाच्या कालावधीत ज्याप्रमाणे पर्यावरणवाद्यांचे निसर्गप्रेम दाटून येते, तसे ते इतर पंथियांच्या विशेष दिनांच्या कालावधीत होत नाही. त्यामुळेच नुकतेच बंगाल शासनाने ईदच्या कालावधीत अडचण येऊ नये, यासाठी दसरा साजरा करण्यावर प्रतिबंध घातले आहेत. बकरी ईद तोंडावर असूनही इको-फ्रेंडली ईदची संकल्पना त्यांच्याकडून पुढे आलेली नाही कि प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणार्‍या पशूहत्येविषयी कुणी आवाज उठवलेला नाही. कदाचित् ईदला केलेल्या पशूहत्येमुळे पर्यावरणीय हानी होत नसावी..., असो, गणेशोत्सवाच्या पवित्र कालावधीत हे उद्धृत करण्याचे कारण इतकेच की, याचाही थोडा विचार व्हावा !

हिंदु राष्ट्राची अनिवार्यता !

       भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी मागे एका मुलाखतीत म्हटले होते की, जेथे मुसलमान अल्पसंख्य असतात, तेथे ते हिंदूंच्या कुरापती काढतात आणि जेथे ते बहुसंख्य असतात, तेथे ते हिंदूंवर उघड आक्रमणे करतात. धर्मांधांनी गेल्या काही वर्षांत अनुसरलेल्या अत्यंत हिंसक मार्गामुळे भारतातील हिंदू त्रस्त आहेत. भारतात अनेक मिनी पाकिस्तान निर्माण होत आहेत आणि तेथील हिंदूंना जिवानिशी अन्यत्र पलायन करावे लागत आहे. वर्ष १९९० च्या दशकात काश्मीरमध्ये ते घडले, नुकतेच उत्तरप्रदेशातील कैराना येथूनही हिंदु कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर विस्थापन झाल्याचे जगासमोर आले. भारतातील अनेक गल्ल्या, मोहल्ले असे आहेत, जेथे इस्लामीकरणाची प्रक्रिया चालू झाल्यामुळे हिंदूंचे जीवन त्रस्त झाले आहे. स्वयंभू हिंदु राष्ट्र असलेल्या भारतातच जिथे हिंदू सुरक्षित नाहीत, तिथे अन्य देशांतील हिंदू किती सुखात असतील, याची कल्पनाच न केलेली बरी.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn