Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

गोपालकाला

श्री तुळजाभवानी मंदिरातील मौल्यवान वस्तू आणि पैसे यांचा मंदिर संस्थानकडून अपहार : ४२ जणांवर ठपका !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !
 मंदिरे शासनाच्या कह्यात गेली की, त्या मंदिरांमध्ये भ्रष्टाचारच होतो, हेच आतापर्यंतच्या उदाहरणांतून सिद्ध झाले आहे. घोटाळेबाजांवर कठोर कारवाई होण्यासाठी आणि मंदिरे शासनाच्या कह्यातून भक्तांच्या कह्यात येण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे !
 लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी दबाव टाकून अहवाल पालटण्यास भाग पाडले !
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचा अहवाल 
     तुळजापूर, २४ ऑगस्ट - महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीमातेच्या चरणी भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम यांचा मंदिर संस्थानने अपहार केला आहे. त्यामध्ये ३९ किलो सोने आणि ६०८ किलो चांदी यांची लूट करण्यात आली असून ४२ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे प्रविष्ट करण्याची शिफारस राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने आपल्या अहवालात केली असल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार अन्वेषण विभागाने संबंधित अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हे प्रविष्ट केले आहेत. त्यात ११ जिल्हाधिकारी आणि ८ नगराध्यक्ष यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. त्याचसमवेत अन्वेषण विभागाच्या चौकशी अहवालात लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी दबाव टाकून पालट करण्यास भाग पाडले, असे स्पष्ट झाले आहे. (यावरून अन्वेषण यंत्रणा या लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या हातचे बाहुले झाले आहे, हेच स्पष्ट होते. अन्वेषण यंत्रणांकडून निष्पक्षपणे अन्वेषण होण्यासाठी राज्यशासन कोणते प्रयत्न करणार ? - संपादक) 

४५ दिवसांमध्ये ३ सहस्र ५०० कोटी रुपयांचा फटका

हिंसाचारामुळे झालेली राज्याची हानी देशद्रोही संघटना आणि आंदोलक यांच्याकडून वसूल करा !
काश्मीरमधील हिंसाचार
काश्मीरमध्ये हिंसाचार घडवणारे
दगडफेकी आतंकवादी
     जम्मू - काश्मीरमध्ये मागील ४५ दिवसांपासून चालू असलेल्या हिंसाचारामुळे जम्मू-काश्मीरच्या व्यापार्‍यांना ३ सहस्र ५०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. यात जम्मू येथील व्यापार्‍यांनी काश्मीरच्या व्यापार्‍यांना आगाऊ दिलेल्या १ सहस्र कोटी रुपयांचाही समावेश आहे. 
     चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष राकेश गुप्ता यांच्यानुसार फळे आणि ड्रायफ्रूट आदींचे पिक पूर्ण होताच त्याचा पुरवठा करण्यासाठी काश्मीरच्या व्यापार्‍यांना जम्मूच्या व्यापार्‍यांकडून आगाऊ रक्कम देण्यात आली होती. काश्मीरमधील परिस्थितीमुळे साहित्याची देवाण-घेवाण बंद झाली आहे. काश्मीरच्या परिस्थितीवर शांतीच्या मार्गाने उपाय काढण्यात यावा, अशी सूचना गुप्ता यांनी केली आहे.

जगातील श्रीमंत देशांमध्ये भारताचा ७ वा क्रमांक !

ज्या देशातील अर्धी जनता अर्धपोटी जगत आहे, तो देश जगातील
७ वा श्रीमंत देश गणला जात असेल, तर ते मृगजळच होय !
याचा अर्थ भारतातील श्रीमंतांकडे अधिकाधिक
पैसा असून त्यांच्याच श्रीमंतीत वाढ होत आहे ! 
    नवी देहली - न्यू वर्ल्ड वेल्थ या संस्थेने व्यक्तिगत संपत्तीच्या आधारे श्रीमंत देशांचा अहवाल घोषित केला. यात भारत सातव्या स्थानी आहे. भारतातील व्यक्तिगत संपत्ती ५ सहस्र ६०० अब्ज डॉलर एवढी झाली आहे. जून महिन्यात जगभरातील देशांतील संपत्तीचा अभ्यास करण्यात आला. त्याआधारे जगभरातील श्रीमंत देशांची ही सूची घोषित करण्यात आली आहे. याला व्यक्तिगत संपत्ती आधार मानण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये हिंदु व्यापार्‍यावर आक्रमण !

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्य असतांना आणि भारतात बहुसंख्य
असतांनाही हिंदूच मुसलमानांकडून मार खातात !
ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !
पाकिस्तानमध्ये हिंदू असुरक्षित !
पाकमधील हिंदूंना कोणीही
वाली नाही !
      कराची - पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये २ आक्रमणकर्त्यांनी एका हिंदु व्यापार्‍यावर गोळ्या झाडल्याची घटना नुकतीच घडली. आक्रमणकर्ते दुचाकीवरून आले आणि त्यांनी गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. प्रकाश कुमार नावाच्या या हिंदु व्यापार्‍याला अत्यवस्थ स्थितीत स्थानिक रुग्णालयात प्रविष्ट करण्यात आले आहे. 
      दोन मासांपूर्वी एका स्थानिक महिलेने प्रकाश कुमार यांच्या दुकानातून काही कपडे खरेदी केले आणि त्या कपड्यांचे ५०० रुपयांचे देयक नंतर देईन, असे त्यांना सांगितले. काही दिवसांपूर्वी ती महिला आणखी काही कपडे खरेदी करण्यासाठी दुकानात आली. तेव्हा प्रकाश कुमार यांनी त्या महिलेला मागचे देयक भरण्याची विनंती केली. दोन मासांपूर्वी घेतलेले कपडे निकृष्ट दर्जाचे निघाल्याचे कारण पुढे करून त्या महिलेने मागचे देयक भरण्यास नकार दिला. ते कपडे परत करणार असल्याचे त्या महिलेने सांगितले. दोन मास कपडे वापरल्यानंतर कुठलाच व्यापारी ते कपडे परत घेणार नाही, असे प्रकाश कुमार यांनी त्या महिलेला सांगितले.

तरुणांनो, जर हे राष्ट्र जिवंत रहावे अशी आपली धडपड असेल, तर हे राष्ट्र पूर्णपणे हिंदु धर्माधिष्ठित जीवनप्रणाली स्वीकारलेले असले पाहिजे. - स्वामी विवेकानंद


तुळजापूर देवस्थान घोटाळ्यातील प्रशासकीय अधिकार्‍यांना सवलत का ? - श्री तुळजाभवानी देवस्थान संरक्षक कृती समिती

     'तुळजापूर देवस्थान समितीतील घोटाळ्याच्या प्रकरणी राज्य गुन्हा अन्वेषण विभागाचा (सीआयडीचा) तपास अहवाल उघड झाल्याचे अनेक प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झाले आहे. या घोटाळ्याच्या प्रकरणी हिंदु विधीज्ञ परिषदेने दाखल केलेल्या याचिकेत उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपिठाने अन्वेषणाविषयी असमाधान व्यक्त केले आहे. या घोटाळ्यात शासनाचे ४२ अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाईची शिफारस करतांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने, ज्या वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांकडे देवस्थानचे अध्यक्षपद असते, त्यांच्यावर मात्र खात्याच्या अंतर्गत कारवाईची शिफारस करून हात झटकले आहेत. ज्यांच्यावर देवस्थानातील प्रत्येक घटनेची जबाबदारी आहे, अशा ११ वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांना सीआयडीने पाठीशीच घालण्याचा प्रकार आहे. भाविकांचा पैसा घशात घालणार्‍या कोणालाही कारवाईतून सूट देणे हे देवीभक्त कदापीही होऊ देणार नाहीत.

अटलबिहारी वाजपेयी हे अधिक काळ पंतप्रधानपदी असते, तर काश्मीर प्रश्‍न सुटला असता ! - सरसंघचालक मोहन भागवत

पाकिस्तानला धडा शिकवणे, हाच काश्मीर प्रश्‍नावर एकमेव
उपाय आहे, हे आम्हाला कधी समजणार ? 
    आग्रा - भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संयम बाळगत हळूहळू काश्मीरमधील परिस्थिती मार्गावर आणली होती. त्यांना आणखी कालावधी मिळाला असता, तर काश्मीरचा प्रश्‍न सुटला असता, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे एका कार्यक्रमात व्यक्त केले. 
     सरसंघचालक भागवत म्हणाले, इतका व्यय करूनही काश्मीरचा विकास झालेला नाही, रोजगार निर्माण झालेला नाही. याचे दायित्त्व प्रशासनाचे आहे. गेल्या काही दिवसांत याठिकाणी ज्या घटना घडल्या आणि जनमत प्रक्षुब्ध झाले, याचा विचार झाला पाहिजे. सध्याचे सरकार काश्मीरमध्ये असंतोष पसरवणार्‍यांचा छडा लावण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. हे अशाचप्रकारे चालू राहिले आणि जनतेनेही सरकारला पाठिंबा दिला, तर काश्मीरच्या पाठिशी संपूर्ण भारत उभा आहे, हे पाकिस्तानात बसून षड्यंत्र रचणार्‍यांना कळेल, असेही भागवत म्हणाले.

पाकऐवजी अरबी समुद्रमार्गे विमान वाहतूक करण्याची अनुमती देण्याची विमान आस्थापनांची केंद्र शासनाकडे मागणी

     नवी देहली - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्‍वभूमीवर देशातील विमान वाहतूक क्षेत्रातील आस्थापनांनी पाकिस्तानऐवजी अरबी समुद्रावरील आकाशमार्गाने अरब देशांकडे प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती केंद्र शासनाकडे केली आहे. 
    एअर इंडिया, इंडिगो, जेट एअरवेज आणि स्पाईसजेट या भारतातील विमान आस्थापनांची विमाने पाकिस्तानमार्गे अरब देशांकडे वाहतूक करतात. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध काही प्रमाणात तणावाचे असल्यामुळे गेल्या काही दिवसांत केंद्र शासनाने काही प्रासंगिक विमानांना अरब देशांकडे जातांना पाकिस्तानचा मार्ग टाळण्याची सूचना केली होती. त्यामुळे आता प्रवासी वाहतूक करणार्‍या व्यावसायिक आस्थापनांनाही पाकिस्तानऐवजी पर्यायी मार्गाचा अवलंब करू द्यावा, अशी मागणी केली आहे. स्पाईसजेट या खासगी विमान वाहतूक करणार्‍या आस्थापनाने कर्णावतीहून अरबी समुद्रावरील आकाशमार्गाने अरब देशांकडे वाहतूक करण्याची अनुमती मागण्यासाठी केंद्र शासनाला पत्रही पाठवले आहे.
     वास्तविक हा मार्ग भारतीय वायूदल आणि नौदल यांच्यासाठी राखीव आहे; पण त्याच मार्गावरून व्यावसायिक विमानांच्या उड्डाणासाठी अनुमती मागण्यात आली आहेे.
     या मार्गाचा वापर केल्यामुळे विमान आस्थापनांची इंधनबचत होणार आहे. त्याचबरोबर कार्बनच्या उत्सर्जनाचे प्रमाणही अल्प होऊ शकते, असे आस्थापनांचे म्हणणे आहे.

विद्यार्थिनींना दोन वेण्यांची सक्ती नको ! - केरळ राज्य बालहक्क आयोग

      थिरुवनंतपुरम् - शाळेत येतांना विद्यार्थिनींनी केसांच्या दोन वेण्या घालूनच आले पाहिजे, अशी सक्ती करणे म्हणजे त्यांच्या बालहक्कांचे उल्लंघन आहे, असा निर्णय केरळ राज्य बालहक्क आयोगाने दिला आहे. केरळमधील कासरगोड जिल्ह्यातील चिमीनी येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयातल्या विद्यार्थिनीने शाळेने दोन वेण्या घालण्याची सक्ती केल्याची तक्रार आयोगाकडे केली होती. त्यावर आयोगाच्या अध्यक्षा शोभा कोशी, सदस्य के. नासिर आणि सी. यू. मीना यांनी हा निर्णय दिला.

कॅनडामध्ये भारतीय मुलाचा हिंदु विवाह पद्धतीनुसार समलैंगिक मुलाशी विवाह !

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे धर्मविरोधी कृती करणारे हिंदू !
      ओकविल (कॅनडा) - येथे रहाणार्‍या एका भारतीय दांपत्याने त्यांच्या ३५ वर्षीय ऋषी अग्रवाल या मुलाचा विवाह कॅनडातील समलैंगिक डॉनियल लँगडन या मुलाशी हिंदु विवाह पद्धतीनुसार करून दिला आहे. हा विवाह लावणार्‍या पुरोहिताने मोठा विरोध केला होता. समलिंगी संबंध भारतात अवैध आहे. यासाठी शिक्षेची देखील तरतूद आहे.

पाकमध्ये १७५ संशयित आतंकवादी अटकेत !

     लाहोर - पाकमधील पंजाब प्रांतात २ दिवस चालू असलेल्या कारवाईत १७५ संशयित आतंकवाद्यांना पकडण्यात आले आहे. बलुचिस्तानमध्ये एका रुग्णालयात झालेल्या आत्मघातकी आक्रमणात ७४ जणांचा मृत्यू झाला होता, या आक्रमणानंतर ही कारवाई करण्यात आली.

पूरग्रस्त राज्यांना संपूर्ण साहाय्य करणार ! - पंतप्रधान मोदी

     नवी देहली - देशातील ५ पूरग्रस्त राज्यांना संपूर्ण साहाय्य करण्यात येईल, असे आश्‍वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. मोदी यांनी ट्विटरवर म्हटले की, केंद्र शासन साहाय्य आणि पुनर्वसन अभियानासाठी संपूर्णपणे राज्यांना साहाय्य करत असून पूरग्रस्त भागातील स्थिती लवकरात लवकर पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षा बाळगतो. उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. 
    उत्तरप्रदेश, बिहार आणि बंगाल या राज्यांतील जिल्ह्यांत २१ ऑगस्टला गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. उत्तरप्रदेशमध्ये यमुना नदीलाही पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे राजस्थानच्या काही भागांतही पूरजन्य परिस्थिती निर्मिाण झाली आहे. आतापर्यंत तेथे ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

भारत अफगाणिस्तानला शस्त्रास्त्रे पुरवणार

     नवी देहली - आतंकवादाच्या विरोधात लढत असणार्‍या अफगाणिस्तानला भारत शस्त्रास्त्रे पुरवणार असल्याची माहिती अफगाणिस्तानमधील भारताच्या राजदूताने दिली आहे. या संदर्भातील आर्थिक व्यवहाराविषयी अजून स्पष्ट झाले नाही; मात्र भारताकडून अफगाणिस्तानला थेट सैनिकी साहाय्य पुरवण्याच्या संदर्भात घेण्यात आलेला निर्णय अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.
      गेल्या १५ वर्षांमध्ये भारताकडून अफगाणिस्तानला २ अब्ज डॉलरहून अधिक अर्थसहाय्य करण्यात आले आहे. गेल्या डिसेंबर मासात अनेक वर्षांच्या रखडलेल्या प्रस्तावाला मान्यता देत भारताने अफगाणिस्तानला ४ लढाऊ हेलिकॉप्टर्स पुरवली होती. अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकार उलथवण्यात आल्यानंतर भारताकडून प्रथमच अशाप्रकारचे युद्धसाहित्य पुरवण्यात आले होते. त्यानंतर अफगाणिस्तानला हव्या असलेल्या युध्द साहित्याची एक सूची त्यांच्या सैन्य प्रमुखांकडून भारताकडे सोपवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.पंतप्रधान मोदी यांनी गोरक्षकांविषयीचे विधान मागे न घेतल्यास संत समाज अन्न-जल यांचा त्याग करणार !

अन्न-जल त्याग करून सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही.
त्यासाठी परिणामकारक धोरण आखणे आवश्यक आहे ! 
     जयपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांना समाजकंटक ठरवणे आणि राजस्थानच्या हिंगोनिया गोशाळेतील शेकडो गायींचा मृत्यू होणे या घटनेवरून येथील संतांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. संतांनी संमत केलेल्या ठरावाद्वारे पंतप्रधान मोदी यांना चेतावणी देण्यात आली आहे की, त्यांनी केलेले विधान सप्रमाण सिद्ध करावे, तसेच राज्यातील सर्व गोशाळांची स्थिती सुधारावी. या दोन्ही मागण्या एक महिन्यात पूर्ण न केल्यास संत समाज अन्न आणि जल यांचा त्याग करण्याचे आंदोलन करील, अशी चेतावणी येथील संत संमेलनात देण्यात आली आहे. 

गाय मुसलमानांचीही माता ! - शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

     हरिद्वार - गायीच्या दुधाने जेवढी प्रथिने हिंदु नागरिकांना मिळतात, तेवढीच मुसलमानांनाही मिळतात. यामुळे गाय ही मुसलमानांचीही माता आहे, हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही, असे प्रतिपादन द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले आहे. 
     शंकराचार्य म्हणाले, "धर्म कोणाताही असो, तरी गायीला वाचवणे देशाच्या हिताचे आहे. देशभरात अनेक ठिकाणी गोहत्येच्या विरोधात कायदे बनवण्यात आले आहेत, यात काही चुकीचे नाही. गोहत्येसमवेत आता गोमांस विक्रीवर बंदी आणणारा कायदा आणला पाहिजे. गायीपासून प्राप्त होणारे दूध, गोमुत्र आणि इतर सर्व काही उपयोगी आहे. एवढेच नव्हे, तर तिच्या मृत्यूनंतरही कातडी आणि हाडे यांचाही उपयोग होतो; म्हणून ती पूजनीय आहे आणि गायीचे संरक्षण करणे आवश्यक आहे."

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांची एके-४७ रायफल घेऊन सभा !

काश्मीरमध्ये राज्य कुणाचे, पीडीपी-भाजपचे कि आतंकवाद्यांचे ? 
     श्रीनगर - काश्मीरमध्ये गेल्या एका महिन्यात जिहादी आतंकवाद्यांनी ६ पेक्षा अधिक मोर्चे काढून सभा घेतल्या आहेत. जिहादी आतंकवादी या सभेत थेट देशाच्या विरोधात भाषण करत आहेत. १९९० च्या दशकानंतर हे पहिल्यांदा घडले आहे. गेल्या महिन्याभरात एकाही मोठ्या नेत्याने, मंत्र्याने किंवा आमदाराने मोर्चा काढलेला नाही; मात्र आतंकवादी मोर्चे काढून सामान्यांना फुटीरतावाद्यांसमवेत येण्यासाठी धमकावत आहेत. येथील हिंसाचाराला पायबंद घालण्यासाठी १२ वर्षांनंतर सीमा सुरक्षा दलाला (बीएस्एफ्) तैनात करण्यात आले आहे. 
     जम्मू-काश्मीरच्या राजधानीमधील अनेक भागांतील संचारबंदी आता उठवण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांतून परिस्थिती सुधारत असल्याचा अहवाल आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

'स्कॉर्पिअन' प्रकारातील पाणबुड्यांची बांधणी करणार्‍या आस्थापनाची गोपनीय माहिती फुटली !

संरक्षणमंत्री पर्रीकर यांचा चौकशी करण्याचा आदेश !
    सिडनी - फ्रान्समधील डीसीएन्एस् या पाणुबड्यांची बांधणी करणार्‍या आस्थापनाची २२ सहस्र ४०० पानांची कागदपत्रे उघड झाली आहे, असे वृत्त ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. या कागदपत्रांमध्ये भारतीय नौदलातील 'स्कॉर्पिअन' पाणबुड्यांविषयीच्या गोपनीय आणि संवेदनशील माहितीचा समावेश आहे. ही गोपनीय माहिती भारतातून नाही, तर परदेशातून उघड झाल्याचे प्रथमदर्शी निष्पन्न झाले आहे, अशी माहिती या प्रकरणी भारतीय नौदलाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. असे असले, तरी गोपनीय माहिती उघड होण्याचा प्रकार फ्रान्सकडून न होता भारताकडूनच झाला असल्याचे संकेत डीसीएन्एस् आस्थापनाने दिल्याचे वृत्तही 'द ऑस्ट्रेलियन' या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. 

आतंकवादी आक्रमणामुळे पॅरिसला जाणार्‍या पर्यटकांच्या संख्येत घट !

     पॅरिस - जिहादी आतंकवादी आक्रमण, संप आणि पूर यांमुळे पॅरिसला भेट देणार्‍या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. पॅरिसला प्रतिवर्षी सरासरी दीड कोटी पर्यटक भेट देत असतात. फ्रान्सला पर्यटन उद्योगाला मिळत असलेल्या अल्प प्रतिसादामुळे फ्रान्सला ७५० मिलियन यूरोची (५६ सहस्र ८६२ कोटी रुपये) हानी झाली आहे. पॅरिसच्या आजुबाजूच्या भागात रहाणारे ५ लक्षांहून अधिक लोक पर्यटनाच्या व्यवसायाशी जोडलेले आहेत. एटीएम्मधून पैसे काढल्यानंतर पावती जपून ठेवा !

     मुंबई - एटीएम्च्या यंत्रातून पैसे काढल्यानंतर आपण फेकून दिलेल्या पावतीचा कोणीही अपवापर करणार नाही, असे आपल्याला वाटत असेल, तर तुमचीही फसवणूक होऊ शकते. फेकून दिलेल्या एटीएम् पावतीवरील माहिती डिकोड करून हॅकर्स तुमच्या बँक खात्यातून रक्कम काढून घेऊ शकतात, असे वृत्त प्रसारित होत आहे. अर्थात हे सहज शक्य नसले, तरी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. सायबर गुन्हेगार तुमच्या खात्यावर लक्ष ठेऊन असतात. त्यामुळे वेळोवेळी स्वत:च्या बँक खात्यामधील शिल्लक तपासत राहणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे एटीएम्मधून पैसे काढल्यावर त्याची पावतीही जपून ठेवणे आवश्यक आहे.

काश्मीरमध्ये दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याची आणि मोदी यांनी गोरक्षकांविषयीचे विधान मागे घेण्याची मागणी !

वाराणसीमध्ये राष्ट्रीय हिंदू आंदोलन
आंदोलन करतांना धर्माभिमानी हिंदू
     वाराणसी - काश्मीरमधील हिंसाचार रोखण्यासाठी भारतीय सैन्याला सर्वाधिकार द्यावा आणि आतंकवादी अन् त्यांचे समर्थक यांच्याविरोधात कारवाई करावी, तसेच पंतप्रधान मोदी यांनी गोरक्षकांविषयी केलेले विधान मागे घ्यावे या संदर्भात वाराणसी येथील शास्त्रीघाटाजवळ २० ऑगस्टला राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हिंदु युवा वाहिनी, अध्यात्म न्यास समिती, संतश्री आसारामजी आश्रम, भारत विकास परिषद, होप फाऊंडेशन, इंडिया विथ विज्डम, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी सहभाग घेतला. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 
      आंदोलनामध्ये हिंदुुत्त्वनिष्ठ अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी, डॉ. अजयकुमार जायसवाल, श्री. सतीश शर्मा, श्री. मुन्नालाल जायसवाल, श्री. महेश प्रसाद, डॉ. आर्.आर्, शर्मा, श्री. सुजीत चौबे, श्री. राजकुमार मिश्र, श्री. शिवप्रसाद मिश्र, श्री. प्रवीण श्रीवास्तव, श्री. जयशंकर सिंह, श्री. अभिषेक सिंह, श्री. बृजेशकुमार पाण्डेय, श्री. विनीत श्रीवास्तव यांनी त्यांचे विचार मांडले.

सनातनच्या कार्याला, तसेच धार्मिक आणि सामाजिक कार्याला वाहून घेतल्याने सनातनच्या साधिका कुंदा सामंत यांचा स्वातंत्र्यदिनी गोव्याच्या पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

सनातनच्या साधिका सौ. कुंदा सामंत यांचा सत्कार
करतांना पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर
      म्हापसा - सनातन संस्थेच्या कार्याला, तसेच धार्मिक आणि सामाजिक कार्याला वाहून घेतल्याने आणि अंगणवाडी सेविका म्हणून केलेले कार्य यांसाठी सनातनच्या म्हापसा येथील साधिका सौ. कुंदा गजानन सामंत यांचा पर्यटनमंत्री दिलीप परूळेकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी गिरी पंचायत सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

पाकपुरस्कृत आतंकवाद्यांपेक्षा इस्लामिक स्टेट देशासाठी अधिक धोकादायक ! - एन्आयए

  • भारतातील मुसलमान इस्लामिक स्टेटकडे वळणार नाहीत, असे म्हणणारे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यावर काही बोलतील का ?
  • इसिसच्या समर्थकांचे समुपदेशन करून त्यांना सोडून देणारे सरकार, पोलीस आणि प्रशासन यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
     नवी देहली - केवळ १८ मास अगोदर इस्लामिक स्टेटने भारतात भरती प्रक्रिया प्रारंभ करूनही त्यांच्या जाळ्यात अडकलेल्या धर्मांधांची संख्या पहाता देशाच्या सुरक्षेला पाकपुरस्कृत आतंकवाद्यांपेक्षा इसिस अधिक धोकादायक असल्याचे मत राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे (एन्आयएचे) उपमहानिरीक्षक आलोक मित्तल यांनी एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत देतांना व्यक्त केले.

वैष्णोदेवी येथे दरड कोसळून एकाचा मृत्यू !

     जम्मू - २४ ऑगस्टला माता वैष्णोदेवी भवनच्या तिसर्‍या प्रवेशद्वारजवळ दरड कोसळल्याने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका शिपायाचा मृत्यू झाला. दरडीखाली काही भाविक अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. 
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे 
      १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, "हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे". (२४ ऑगस्टला भारतातील ९ राज्यांना भूकंपाचा धक्का बसला, तसेच म्यानमार येथेही धक्के बसले. पहाटे इटलीमध्ये भूकंप झाला. या घटनांवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

बिहार, झारखंड, बंगाल आणि पूर्वोत्तर राज्ये अन् म्यानमार यांना भूकंपाचे धक्के !

     नवी देहली - २४ ऑगस्टला दुपारी ४.१५ वाजता भारतातील ९ राज्यांना भूकंपाचा धक्का बसला. तसेच म्यानमार येथेही धक्के बसले. बिहार, झारखंड, बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम, नागालॅण्ड आणि ओडिशा या राज्यांना हे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ६.८ इतकी होती. भूकंपाचे केंद्र म्यानमारमध्ये आहे. म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे म्हटले जात असले, तरी भारतात जीवित अथवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही.

इटलीतील भूकंपात ३७ जण ठार, तर १५० हून अधिक जण घायाळ

     रोम - २४ ऑगस्टच्या पहाटे इटलीमध्ये झालेल्या भूकंपात ३७ जण ठार, तर १५० हून अधिक बेपत्ता झाले आहेत. येथील अनेक इमारतींची पडझड झाली. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.१ इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचा धक्का बसण्यास प्रारंभ झाल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. अनेक इमारतींची पडझड झाली आहे. इटलीचे पंतप्रधान मॅटो रेंझी यांनी हानीची पाहणी करण्याचा आदेश दिला आहे.

पूजा, विवाहादी कार्यक्रमांसाठी १०० पेक्षा अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यासाठी पोलिसांची अनुमती आवश्यक !

शासनाच्या नव्या कायद्याचा मसुदा ! 
     मुंबई - पूजा, विवाह, मेजवानी आदी कौटुंबिक कार्यक्रमांसाठी १०० च्या वर पाहुण्यांना आमंत्रित करायचे असेल, तर यापुढे पोलिसांची अनुमती घेणे आवश्यक आहे. 'महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरनल सेक्युरिटी अ‍ॅक्ट' या कायद्याचा मसुदा शासनाने सिद्ध केला आहे. या कायद्याचा मसुदा १९ ऑगस्टला शासकीय संकेतस्थळावर ठेवण्यात आला आहे. शासनाने यासाठी सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. विनाअनुमती कार्यक्रमाचे आयोजन करणार्‍यांवर ३ वर्षे कारावास आणि ५० सहस्र रुपयांच्या दंडाची तरतूद या मसुद्यात करण्यात आली आहे. अंतर्गत सुरक्षेच्या बळकटीचे कारण या कायद्यासाठी शासनाने दिले आहे. 

ऑस्ट्रेलियात अल्लाहू अकबर म्हणत केलेल्या आक्रमणात एका तरुणीचा मृत्यू !

अशा जिहादी आक्रमणाविषयी निधर्मीवादी कधीही तोंड उघडत नाहीत !
     सिडनी - ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य भागात २३ ऑगस्टच्या रात्री २९ वर्षीय फ्रेंच नागरिकाने 'अल्लाहू अकबर' म्हणत केलेल्या आक्रमणात एका २१ वर्षी ब्रिटीश तरुणीचा मृत्यू झाला. दोघा घायाळांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेत एखाद्या जिहादी आतंकवादी संघटनेचा हात आहे का, याविषयी अन्वेषण चालू आहे.

कलिना मिलिटरी कॅम्पमधील भारतीय सैनिकांना कोकण कट्टा मंडळाच्या वतीने रक्षाबंधन !

       विलेपार्ले, २४ ऑगस्ट (वार्ता.) - सण-उत्सव काळात घर आणि परिवार यांपासून दूर राहून देशाचे रक्षण करणार्‍या सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून कलिना मिलिटरी कॅम्पमधील सैनिकांना कोकण कट्टा मंडळाच्या वतीने राखी बांधण्यात आली. यात विलेपार्ले विभागातील शालेय विद्यार्थिनींनी १०० हून अधिक सैनिकांनी जय हिंद आणि भारतमाता की जय या घोषणा देत राखी बांधली. या वेळी सैनिकांनी कोकण कट्टा मंडळाचे कौतुक केले. तसेच हा उपक्रम आम्हाला प्रेरणादायी ठरेल. यामध्ये सातत्य ठेवा, असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन कोकण कट्टा मंडळाचे संस्थापक श्री. अजित पितले आणि सहसचिव श्री. दीपेश सावंत यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्वश्री विपुल गांधी, सुजित कदम आणि दाभोलकर यांनी सहकार्य केले.

हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत गणेशोत्सव महामंडळाच्या मागण्यांवर चर्चा करून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा सकारात्मक प्रतिसाद !

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी
     नंदुरबार - शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांना एकत्रित करून हिंदु जनजागृती समितीने स्थापन केलेल्या गणेशोत्सव महामंडळाच्या मागण्यांवर चर्चा करून येथील जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्या सोडवण्याचे आश्‍वासन दिले. २१ ऑगस्ट या दिवशी मोठा मारुति मंदिर येथे त्यांनी शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांची एकत्रित बैठक घेतली होती. शहरातील विविध मंडळांचे ९५ हून अधिक पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. 

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सूर्यनमस्कार सक्तीचे करणार !

मुंबई महापालिकेचा स्तुत्य निर्णय ! 

     मुंबई - विद्यार्थ्यांमध्ये स्फूर्ती निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या शाळांमध्ये सूर्यनमस्कार सक्तीचे करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. याविषयीच्या ठरावाची सूचना पालिकेच्या महासभेत मंगळवारी बहुमताने संमत करण्यात आली. समाजवादी पक्षाने त्यास आव्हान देत उर्दू शाळांमध्ये 'सलाम वालेकुम' म्हणूू, अशी धमकी दिली. सर्वच विरोधी पक्ष भाजपाच्या विरोधात उभे राहिले; मात्र शिवसेनेन भाजपच्या बाजूने मत दिले. १७७ देशांमधील शाळांमध्ये योगाभ्यास सक्तीचा आहे़. यांपैकी ४७ हे इस्लामी देश आहेत, असे या वेळी भाजपकडून सांगण्यात आले. 

हिंदु गोवंश रक्षा समितीने ख्रिस्ती शाळेला परीक्षा रहित करून गोकुळाष्टमीची सुटी देण्यास भाग पाडले !

धर्म आणि संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न करणार्‍या 
हिंदु गोवंश रक्षा समितीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! 
हिंदूंनो, ख्रिस्ती शाळांचा हिंदुद्वेष जाणा ! 
आणि आपल्या पाल्यांना ख्रिस्ती शाळांत घालायचे का ते ठरवा ! 
     नालासोपारा, २४ ऑगस्ट - येथील 'वेलंकनी प्री प्रायमरी स्कूल' या ख्रिस्ती शाळेने गोकुळाष्टमीच्या दिवशी शाळेला शासनाचा अध्यादेश असूनही सुटी न देता उलट शाळेत परीक्षा ठेवली होती. याची माहिती हिंदू गोवंश रक्षा समितीच्या कार्यकर्त्यांना मिळताच हिंदू गोवंश रक्षा समितीने शाळेच्या व्यवस्थापकांना निवेदन दिले आणि त्यांचे प्रबोधन केले. परिणामस्वरूप व्यवस्थापकांनी झालेली चूक मान्य करून परिक्षा रहीत करून शाळेला सुटी घोषित केली. 

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या न्यायालयीन कोठडीत ६ सप्टेंबरपर्यंत वाढ

     पुणे, २४ ऑगस्ट - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी संशयित म्हणून अटक केलेले सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची न्यायालयीन कोठडी २४ ऑगस्ट या दिवशी संपल्याने या प्रकरणाची पुढील सुनावणी झाली. या वेळी न्यायाधीश व्ही.पी. गुळवे-पाटील यांनी डॉ. तावडे यांच्या न्यायालयीन कोठडीत ६ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. या वेळी डॉ. तावडे यांना उपस्थित करण्यात आले नव्हते. डॉ. तावडे यांच्या बाजूने अधिवक्ता नीता धावडे यांनी कामकाज पाहिले.

दहीहंडीची उंची २० फुटापर्यंतच !

न्यायालयाचा स्वागतार्ह निर्णय ! 
     मुंबई, २४ ऑगस्ट - दहीहंडीची उंची २० फुटांपर्यंतच राहील, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. दहीहंडीच्या उंचीवर फेरविचार करावा, यासाठी जोगेश्‍वरीतील 'जय जवान' गोविंदा पथकाने प्रविष्ट केलेली पुनर्विचार याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागच्या आठवडयात १८ वर्षांखालील गोविंदाच्या पथकातील सहभागावरही बंदी घातली आहे. 

अंनिसच्या मोर्च्यात विद्यार्थ्यांच्या सहभागाच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांकडून शिक्षणसंचालकांना निवेदन !

जे हिंदुत्वनिष्ठांच्या निदर्शनास येते, ते शिक्षण विभागाच्या 
का येत नाही ? याला उत्तरदायी असणार्‍यांवर शासन काय कारवाई करणार ? 
     पुणे, २४ ऑगस्ट (वार्ता.) - डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला ३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने २० ऑगस्ट या दिवशी येथे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यामध्ये येथील रावसाहेब पटवर्धन शाळेतील २०० विद्यार्थ्यांना संपूर्ण गणवेशासह सहभागी करण्यात आले होते. याच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठ श्री. गजानन मुंज आणि श्री. प्रवीण नाईक यांनी प्राथमिक अन् माध्यमिक विभागाच्या शिक्षण संचालकांना २३ ऑगस्ट या दिवशी निवेदन दिले. (अंनिसच्या आंदोलनातील चुकीच्या प्रकाराला वैध मार्गाने विरोध करणार्‍या हिंदुत्ववाद्यांचे अभिनंदन ! - संपादक) 

अमोनियम बायकार्बोनेट वापरून बादलीत अथवा हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे पुणे महानगरपालिकेचे आवाहन

पुणे महानगरपालिकेचा धर्मशास्त्रविरोधी उपक्रम !
     गणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे, असे धर्मशास्त्र सांगते. गणेशमूर्तींमधील सात्त्विकता वाहत्या पाण्यासोबत सर्वदूर पोचून सर्वांना त्याचा लाभ व्हावा, हा त्याचा उद्देश आहे. हिंदूंचे सर्व सण हे पर्यावरणपूरकच आहेत. गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे कोणत्याही प्रकारचे जलप्रदूषण होत नाही, असा अहवाल उपलब्ध आहे. असे असतांना जलप्रदूषणाचा बागुलबुवा निर्माण करून हिंदूंना धर्माचरणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एरव्ही सांडपाणी अथवा प्रदूषित पाणी यांमुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी कोणतीही कृती न करणारे गणेशमूर्तींच्या विसर्जनाने मुळातच न होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी उपक्रम राबवत आहेत, हे हास्यास्पद आहे ! 

दादर येथील सीकेपी बँकेत ८५ कोटींहून अधिक रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस !

अधिकोषांमधील वाढते गैरव्यवहार हे अर्थ विभागाचा 
अनागोंदी कारभार वाढल्याचेच लक्षण आहे.  या प्रकरणी रिझर्व्ह बँक
ऑफ इंडिया आणि अर्थ मंत्रालय कोणती उपाययोजना करणार आहे ? 
     मुंबई, २४ ऑगस्ट - येथील दादरमधील सेनापती बापट मार्गावर असलेल्या सीकेपी बँकेत ८५ कोटींहून अधिक रुपयांचा अपव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. हा अपव्यवहार आर्थिक वर्ष २०११-१२ यामधील असून तत्कालीन अध्यक्ष विलास गुप्ते यांच्यासह संचालक मंडळातील २३ जणांवर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (जनतेच्या पैशांवर घोटाळा करणार्‍या समाजद्रोह्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी. - संपादक) 

पुणे येथे बळजोरीने गणेशोत्सवाची वर्गणी गोळा करणार्‍या २ कार्यकर्त्यांना अटक

  • देवतांच्या उत्सवातील अपप्रकार रोखण्यासाठी धर्मशिक्षणच हवे ! 
  •  जन्महिंदूंच्या अशा वागण्यामुळेच हिंदूंना 'नको ते उत्सव' असे वाटते ! 

     पुणे, २४ ऑगस्ट - येथील गुरुवार पेठेतील गवारी आळी मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी २ भाजी विक्रेत्या महिलांकडे बळजोरीने २ सहस्र रुपयांच्या वर्गणीची मागणी केली. त्या वेळी तिथेच रहाणारे विशाल सुरेंद्र नवगिरे यांनी मध्यस्थी करत "त्या महिला गरीब आहेत, त्यांच्याकडे इतकी वर्गणी कशाला मागता ?" असे म्हटले. तेव्हा त्या कार्यकर्त्यांनी त्या महिलांकडील वजन काटे आणि भाजी रस्त्यावर फेकून दिली, तसेच नवगिरे यांना मारहाण केली. या अपप्रकाराविषयी नवगिरे हे पोलिसांकडे तक्रार करण्यास निघाले असता त्यांना अपशब्द बोलून ठार मारण्याची धमकीही त्या कार्यकर्त्यांनी दिली. (धार्मिक उत्सवाचा उद्देश न लक्षात घेता त्याचे बाजारीकरण करून पाप ओढावून घेणारे असे जन्महिंदू काय कामाचे ? अशा अपप्रकारांमुळे उत्सवाला काळिमा लागतोे. - संपादक) 
     या प्रकारानंतर खडक पोलीस ठाण्यामध्ये ४ जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा प्रविष्ट केला आहे आणि २ कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

डोंबिवली येथे खड्डे बुजवण्याच्या आंदोलनाच्या वेळी गणपतीचे बहुरूप घेऊन खड्डे बुजवले

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे देवतांचा प्रसिद्धीसाठी वापर ! 
     डोंबिवली, २४ ऑगस्ट - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने २३ ऑगस्ट या दिवशी 'खड्डे बुजवा' आंदोलन करण्यात आले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन खड्डे बुजवत नसल्याने या वेळी एका कार्यकर्त्याने गणपतीचे बहुरूप घेऊन काही खड्डे बुजवले. (अशा प्रकारे देवतेचे रूप घेऊन खड्डे बुजवणे म्हणजे देवतेचे विडंबन करणेच होय. याऐवजी कार्यकर्त्यांनी सनदशीर मार्गाने आंदोलन करून प्रशासनाला खड्डे बुजवण्यास भाग पाडायला हवे होते. - संपादक)

हिंदुत्व आणि भारत यांची शत्रुराष्ट्रे ! - श्री. फ्रान्सुआ गोतिए

श्री. फ्रान्सुआ गोतिए
      प्रस्तुत लेखाच्या माध्यमातून प्रसिद्ध फ्रेंच पत्रकार श्री. फ्रान्सुआ गोतिए यांनी हिंदुत्व आणि भारताचे शत्रू असलेल्या राष्ट्रांची सूची दिली आहे. आमच्या वाचकांसाठी त्यांच्या लेखातील निवडक सूत्रे प्रसिद्ध करत आहोत.
    हिंदू जेथे रहातात, त्या वातावरणात मिसळून जाऊन तेथील लोकांशी एकरूप होण्याकडे त्यांचा कल असतो. या प्रक्रियेत ते स्वत:चे अस्तित्व आणि एकजूट विसरतात. आता आपण भारताचे आणि हिंदुत्वाचे शत्रू राष्ट्रांविषयी पहाणार आहोत.
१. चीन 
१ अ. भारतावर कुरघोडी करणारा धूर्त चीन ! : द्विअर्थी बोलणे, धोका देणे आणि द्वेष करणे, या चीनबद्दलच्या ६ दशकांच्या कडवट अनुभवानंतर, भारत अजूनदेखील चीनच्या गोड बोलण्याने भारावून जातो. येथे लक्षात ठेवायला हवे की, एकीकडे चीनने आजही वर्ष १९६२ च्या युद्धात बळकावलेला लडाखचा एक तृतीयांश भाग व्यापलेला आहे, तर दुसरीकडे पूर्ण अरुणाचल प्रदेशवर स्वत:चा अधिकारही सांगतो. चीनने पाकला उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्रे दिली आहेत, एवढेच नव्हेतर तो आण्विक-अस्त्रे बनवण्याचे शास्त्रदेखील पाकला उपलब्ध करून देत आहे.

भारतद्वेषी अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल !

श्री. शिरीष देशमुख
१. देशद्रोहाचा आरोप असलेली अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल संघटना !
     गेल्या काही दिवसांपासून अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल नावाची आंतरराष्ट्रीय (कथित) सेवाभावी संस्था (एन्.जी.ओ.) चर्चेत आहे. या संस्थेने बेंगळुरू येथे आयोजित केलेल्या एका परिसंवादात काश्मीरमधील जिहादींच्या कुटुंबियांना निमंत्रित करून त्यांच्यावर झालेल्या कथित अत्याचारांसंबंधी भारताच्या विरोधात गरळओक केली होती. परिसंवादात देशद्रोही घोषणा दिल्या गेल्या आणि त्याविरुद्ध अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले. अखेर पोलिसांनी अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल विरुद्ध देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून चौकशी प्रारंभ केली. दरम्यान या संस्थेने त्यांच्या बेंगळुरू येथील कार्यालयास टाळे ठोकले आहे. या संस्थेबद्दल माहिती आणि तिची भारतात काय आवश्यकता आहे, याची या लेखातून मीमांसा करण्यात आली आहे.

भडकाऊ विचारांविरुद्ध ट्विटरचे ऑनलाइन युद्ध !

      आतंकवादाला प्रोत्साहन देणारी अडीच लाख संदिग्ध ट्विटर खाती ट्विटर आस्थापनाने बंद केली आहेत. या खात्यांची ओळख स्पॅम फायटिंग टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आली. ही ओळख पटल्यानंतर गेल्या ६ मासांत ही खाती बंद करण्यात आली. मागील वर्षीही ट्विटरने सव्वा लक्ष खाती बंद केली होती. आतंकवादी विचारांचे समर्थन करणार्‍या जगभरातील लोकांची कोंडी करण्यासाठी ट्विटरने उचललेले पाऊल योग्यच आहे. ट्विटरने अशा लोकांची विखारी टिवटिवाट बंद करण्यासाठी असेच प्रयत्न चालू ठेवावेत.
     ख्रिस्ती पंथामध्ये स्त्रीला शापित मानले आहे. या पंथात विवाह पवित्र मानला गेलेला नाही. स्त्रीला मातृत्वाचा शाप असल्याने तिला भयंकर प्रसववेदना सहन कराव्या लागतात. स्त्री सृष्टीचा भाग नाही, असे हा पंथ मानतो.
- प्रा. कुसुमलता केडिया, संचालिका, धर्मपाल शोधपीठ, भोपाळ      सध्या मूठभर असलेले पुरोगामी हे सरकारला वेठीस धरून सनातनवर बंदी घालू पहात आहेत. हे आम्ही कदापीही सहन करणार नाही. यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू ! 
- अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, हिंदु विधीज्ञ परिषद
      हिंदू चराचरात ईश्‍वर पहात असल्याने ते मूलतत्त्ववादी असूच शकत नाहीत.
- शिवनारायण सेन, सचिव, राष्ट्र-धर्म प्रचार सभा, बंगाल

साधकाचा ६१ टक्के आध्यात्मिक पातळी ते मोक्षप्राप्तीचा प्रवास

कु. लक्ष्मी राऊळ
चित्राचा भावार्थ : या चित्रात आपल्याला ९ पायर्‍या दिसत आहेत आणि साधिका १० व्या पायरीवर उभी आहे. हा साधनाप्रवास ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केल्यानंतरचा आहे. त्या वेळी श्रीकृष्ण हात पुढे करतो आणि साधिका त्याच्या बोटाला पकडून तो नेईल, तशी साधनेतील एक-एक पायरी, म्हणजेच पुढील टप्पे चढत जाते. हा प्रवास संतपदाकडे वाटचाल करणारा आणि गुरुकृपा संपादन करून मोक्षप्राप्तीकडे नेणारा असतो. या पूर्ण साधना प्रवासात ईश्‍वरेछेने वागण्यास अधिक महत्त्व असते; म्हणून या चित्रातील साधिकेचे पूर्ण लक्ष भगवंताकडे आहे. ती त्याच्याकडे पहात आहे, म्हणजेच ती श्रीकृष्णाच्या पूर्ण अनुसंधानात आहे. चित्रात असलेली गुलाबी फुले प्रीती दर्शवतात. हा रंग समष्टीला पूरक असणारा व्यापक प्रेमभाव दर्शवतो.
- कु. लक्ष्मी चंद्रकांत राऊळ (वय १७ वर्षे), सिंधुदुर्ग (१८.१.२०१५, वेळ दुपारी २.४५) (हे भावचित्र मला नामजप करतांना सुचले आहे.)

श्रीकृष्णमूर्तीच्या संदर्भात सूक्ष्मातील प्रयोेग केल्यावर आलेली अनुभूती

सौ. नंदिनी सामंत
       १२ ते १४ फेब्रुवारी २०१५ असे तीन दिवस रामनाथी आश्रमात भोजनकक्षातील पटलावर पांढर्‍या रंगाच्या एका पिशवीमध्ये सूक्ष्मातील प्रयोगासाठी श्रीकृष्णाची मूर्ती ठेवण्यात आली होती. दोन दिवस ही मूर्ती पांढर्‍या रंगाच्या पिशवीमध्ये झाकून ठेवण्यात आली होती आणि तिसर्‍या दिवशी केवळ श्रीकृष्णाची मूर्ती ठेवण्यात आली होती. ती झाकलेली असतांना साधिकेला आलेली अनुभूती पुढे देत आहोत.
भोजनकक्षातील पटलावरील वस्तूने लक्ष वेधून घेणे, वस्तू खेचून घेत असल्याचे जाणवणे आणि त्या वस्तूच्या ठिकाणी नतमस्तक होऊन मन निर्विचार होणे : भोजनकक्षातील पटलावरील पांढर्‍या पिशवीत लपेटलेल्या वस्तूने माझे लक्ष वेधून घेतले. फलकावर पाहिले, तर त्या वस्तूचा सूक्ष्मातील प्रयोग करायचा आहे, हे माझ्या लक्षात आले. मी डोळे मिटून घेतले. तेव्हा ती वस्तू मला खेचून घेत असल्याचे लक्षात आले. त्या वस्तूच्या ठिकाणी मी पूर्णतः नतमस्तक झाले. क्षणात माझे मन निर्विचार झाले. तिथून हलूच नये, असे मला वाटत होते. विभागात गेल्यावरही ती वस्तू सतत माझ्या डोळ्यांसमोर तरळत होती.
- सौ. नंदिनी सामंत, रामनाथी, आश्रम, गोवा. (११.२.२०१५)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनातून सिद्ध झालेल्या सनातन-निर्मित श्रीकृष्णाच्या चित्रामुळे पंचतत्त्वाच्या स्तरावरील, तसेच चित्रात जिवंतपणा आल्याविषयी येणार्‍या कृष्णानुभूती !

१. सनातन-निर्मित श्रीकृष्णाच्या 
चित्राची निर्मिती करण्यामागील पार्श्‍वभूमी ! 
सनातन-निर्मित श्रीकृष्णाचे चित्र
         आजच्या काळात धर्मसंस्थापनेचे कार्य करणार्‍या पूर्णावतार श्रीकृष्णाच्या तत्त्वाची प्रत्येक जिवाला नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २००३ मध्ये सनातनच्या साधकांना श्रीकृष्णाचा नामजप करण्यास सांगितला. श्रीकृष्णाच्या कृपाशीर्वादाने सनातन संस्थेचे कार्य दिवसेंदिवस वाढू लागले. साधकांची साधना योग्य दिशेने चालू असल्याने साधकांवर अनिष्ट शक्तींची सूक्ष्मातील आक्रमणे अधिक प्रमाणात होऊ लागली. काळानुसार अनिष्ट शक्तींच्या सूक्ष्मातील वाढत्या आक्रमणांना सामोरे जातांना साधकांना बळ मिळावे आणि श्रीकृष्णाच्या तत्त्वाचा समष्टीला अधिक लाभ व्हावा, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रामनाथी आश्रमातील साधकांना श्रीकृष्णाचे चित्र बनवण्यास सांगितले. वर्ष २००८ मध्ये पहिले चित्र सिद्ध झाले आणि २०१५ पर्यंत या चित्रात नवीन सुधारणा करण्याची सेवा चालू होती. साधक ही सेवा करत असतांना चित्रात अनेक सूक्ष्म-स्तरावरील पालट, स्पंदने, रंगांची टक्केवारी यांविषयी प.पू. डॉक्टरांनी साधकांना मार्गदर्शन केले. प.पू. डॉक्टरांनी केलेले हे मार्गदर्शन म्हणजे जणू सगुणच निर्गुणाला साकारत असल्याची अनुभूती चित्राची सेवा करणार्‍या साधकांनी घेतली.

हसतमुख, आनंदी आणि प.पू. डॉक्टरांप्रती भाव असणार्‍या मुंबईतील साधिका सौ. विभूति विनोद गायकवाड यांची ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. स्वाती गायकवाड (नणंद) यांनी टिपलेली गुणवैशिष्ट्ये !

       सात वर्षांपूर्वी माझ्या मोठ्या भावाचा विवाह झाला. सनातनची साधिका असलेली वहिनी मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्न केले; पण तसे झाले नाही; मात्र गुरुमाऊलीच्या कृपेमुळे साधकत्व असलेली गुणी वहिनी मला दिली, असे वाटते. वहिनींचा आध्यात्मिक स्तर चांगला असावा, असे वाटते. श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला (२५ ऑगस्टला) सौ. वहिनींचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने श्री गुरूंच्या कृपेने इतक्या वर्षांच्या सहवासात वहिनींची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
सौ. विभूति गायकवाड
सौ. विभूति गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. सासरच्या सर्व मंडळींशी प्रेमाने वागणे
       वहिनी सतत हसतमुख, आनंदी आणि उत्साही असतात. त्या सतत इतरांचा विचार करतात आणि घरातील सर्वांच्या आवडी-निवडी मनापासून जपतात. मामा, मावशी आणि आत्या अशा अन्य सर्व नातेवाइकांशीही त्या प्रेमाने वागतात. एकदा मी त्यांना विचारले, तुम्ही सासरच्या व्यक्तींंसाठी एवढे मनापासून कसे करता ? मनात काय विचार असतो ? त्या म्हणाल्या, माझे लग्न झाल्यापासून तुम्ही सर्वजण माझे आहात, असे मला वाटते. त्यामुळे सर्वांवर प्रेम करावेसेे वाटून सर्व सहजतेने होते. त्यांचे उत्तर ऐकून माझ्यातील प्रेमभाव वाढावा, यासाठीच देवाने त्यांच्या तोंडून मला हे सांगितल्याचे जाणवले.

बालपणापासून भक्तीभाव असणारी आणि संतांचे आज्ञापालन करणारी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. मोक्षदा मयुरेश कोनेकर (वय ५ वर्षे) !

कु. मोक्षदा कोनेकर
        (कु. मोक्षदा हिची वर्ष २०१५ मध्ये ६२ टक्के आध्यात्मिक पातळी होती.) 
१. वय ४ वर्षे 
१ अ. प्रत्येक वेळी फ्रॉक घालतांना संतांप्रती कृतज्ञताभाव असणे : वर्ष २०१४ मध्ये नागपंचमीला मोक्षदाच्या वाढदिवसाला तिची आध्यात्मिक पातळी घोषित झाली. त्यानंतर सनातनच्या संत पू. (कु.) अनुराधा वाडेकर यांनी तिला भेट म्हणून एक फ्रॉक दिला. त्यानंतर आम्ही रामनाथी येथे गेलो असता तिची एका संतांसमवेत भेट झाली. तेव्हा तिने एक फ्रॉक घातला होता. अशा प्रकारे संतांचे चैतन्य ग्रहण झालेल्या त्या दोन्ही फ्रॉकविषयी तिला अतिशय कृतज्ञता वाटते. नंतरही ती प्रत्येक वेळी ते फ्रॉक कृतज्ञताभावानेच घालते.

सनातनच्या संत पू. (सौ.) सखदेवआजी यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

श्री. विक्रम डोंगरे
१. पू. (सौ.) सखदेवआजींना 
भेटण्याची अपूर्ण राहिलेली इच्छा देवाने 
देहत्यागानंतरची त्यांची सेवा देऊन पूर्ण करणे
       साधारण १ मासापूर्वी पू. (सौ.) सखदेवआजी यांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली होती. त्या काही दिवसांतच देहत्याग करतील, असे मनात आलेे; परंतु त्यांचे दर्शन घेण्याचा योग आला नाही. १७ ऑगस्टला पू. आजींनी देहत्याग केल्याचे कळल्यावर त्यांचे दर्शन आधीच न घेतल्यामुळे थोडे वाईट वाटले. नंतर १८ ऑगस्टला सकाळी त्यांच्या अंत्यविधीच्या सेवेअंतर्गत त्यांना खांदा देण्याची सेवा मिळाली आणि पुष्कळ कृतज्ञता वाटली. सकाळी ११ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत त्यांचे चैतन्य ग्रहण करता आले. देव कोणतीच इच्छा अपूर्ण ठेवत नाही. देवाचे आपल्याकडे लक्ष आहे, असे वाटून कृतज्ञताभाव जागृत झाला.

शिबिरात संतांमधील चैतन्यामुळे स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंचे विघटन होत असल्याचे जाणवून हलके वाटणे अन् देव प्रत्येक साधकाच्या मनाची प्रक्रिया करून घेतो, याची जाणीव होणे

१. शिबिराचे प्रथम सत्र चालू झाल्यानंतर माझ्या तोंडवळ्यातून पुष्कळ उष्णता बाहेर पडत होती. मला सतत अनावर झोप येत होती. नंतर मी संतांच्या मार्गदर्शनानुसार प्रार्थना आणि कापराचे उपाय केल्यामुळे मला शांत वाटले. मला माझ्यात जे स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू शरिरात ठाण मांडून बसले आहेत, त्यांचे संतांमधील चैतन्यामुळे विघटन होऊन ते बाहेर पडत आहेत, असे जाणवले.
२. मला या शिबिरात देव प्रत्येक साधकाच्या मनाची प्रक्रिया करून घेतो, याची जाणीव झाली. मला शिबीर चालू होण्यापूर्वी शरीर पुष्कळ जड वाटत होते; पण शिबिरातील प्रक्रियेनंतर मला हलकेपणा जाणवला. 
- सेवक, श्री. कृष्णा पाटील, सिंहगड रस्ता, पुणे (५.७.२०१६)

शिबीर म्हणजे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे एक रूप आहे, असे वाटून स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन प्रक्रिया सत्संग ऐकतांना दोष अन् अहंची जाणीव होणे

१. मला शिबिरातील स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन प्रक्रिया सत्संग ऐकतांना माझ्यातही अनेक दोष आणि अहं आहेत. त्यामुळे मी आजपर्यंत वैयक्तिक जीवनात आणि साधनेच्या मार्गावरही योग्य पद्धतीने वाटचाल करू शकलो नाही. माझ्यातील अहंमुळे माझ्याकडून समाजातील अनेक लोक दुखावले गेले असतील, याची जाणीव होऊन डोळ्यांत अश्रू आले.
२. सत्संगात साधक अंतर्मुख होऊन प्रामाणिकपणे त्यांच्या चुका सांगत असतांना मला वातावरणात चैतन्य जाणवत होते आणि आनंद वाटत होता.
३. सत्संगात साधक चुका सांगत असतांना जेव्हा ते स्वीकारण्याच्या स्थितीत नव्हते किंवा स्पष्टीकरण देत होते, तेव्हा मला विषय आकलन होण्यास कठीण जात असे.
३. मला हे शिबीर म्हणजे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे एक रूप आहे, असे वाटले.
४. लहानपणी एका संतांचे जीवनचरित्र वाचल्यावर भारतभ्रमण करावे, अशी माझी इच्छा होती. प.पू गुरुदेवांच्या कृपेमुळे संपूर्ण भारतातील साधक येथे एकत्र आले आहेत, या विचाराने माझी भावजागृती झाली.
- श्री. प्रसाद म्हैसकर, रत्नागिरी (२९.६.२०१६)

देहत्याग केलेल्या पू. (सौ.) सखदेवआजींचे दर्शन घेतांना आणि त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची अन् महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. राधा गडोया (वय साडेपाच वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

१. पू. आजींचे दर्शन घेतांना 
कु. राधा गडोया
अ. मला पू. आजींच्या खोलीत चांगले वाटत होते.
आ. पू. आजी पलंगाभोवती नृत्य करत आहेत (याचा भावार्थ - पू. आजी आनंदावस्थेत आहेत), असे मला जाणवले.
२. पू. आजींच्या अंत्यविधीच्या वेळी
अ. अत्यंविधी आरंभ होण्यापूर्वी मला पू. आजींवर चैतन्याचा वर्षाव होत असल्याचे जाणवले.
आ. प.पू. डॉक्टर आले, तेव्हा सर्वत्र फुलांचा वर्षाव होत होता. त्या फुलांनी आणि पिवळ्या चैतन्याने पू. आजींना वेढून टाकले.
इ. अंत्यविधींना आरंभ झाल्यावर पिवळ्या चैतन्याने पू. आजींना पुष्कळ प्रमाणात वेढून टाकले असून ते वातावरणातही पसरले आहे, असे मला जाणवले.

पू. (सौ.) सखदेवआजींचे अंत्यदर्शन घेतांना आणि त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी सौ. रिशिता गडोया यांना आलेल्या अनुभूती

१. पू. आजींचे दर्शन घेतांना 
सौ. रिशिता गडोया
अ. त्यांची खोली प्रकाशमान दिसली.
आ. त्यांचा श्‍वासोच्छ्वास चालू आहे, असे जाणवले.
इ. नमस्कार करत असलेल्या प्रत्येक साधकाला पू. आजीसुद्धा अतिशय प्रेमाने हसून प्रतिनमस्कार करत आहेत, असे वाटले.
२. पू. आजींच्या अंत्यविधीच्या वेळी
२ अ. पू. आजींच्या अंत्यविधीच्या वेळी वातावरणात पुष्कळ चैतन्य आणि शक्ती जाणवणे अन् या अंत्यविधीच्या माध्यमातून ईश्‍वर आम्हाला किती भरभरून चैतन्य देत आहे, याची जाणीव होऊन पुष्कळ कृतज्ञता वाटणे : १८.६.२०१६ या दिवशी मला पू. सखदेवआजींच्या अत्यंविधीला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी वातावरणात पुष्कळ चैतन्य आणि शक्ती जाणवत होती. या अंत्यविधीच्या माध्यमातून ईश्‍वर आम्हाला किती भरभरून देत आहे, याची जाणीव होऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

पू. सौरभ जोशी आणि पू. (सौ.) सखदेवआजी यांच्यातील आगळेवेगळे आध्यात्मिक नाते !

श्रींना (प.पू. डॉक्टरांना) सांगितले का की, मी
पू. आजींना भेटायला आलो आहे, असे पू. सौरभदादा यांना
विचारतांना सौ. प्राजक्ता जोशी आणि पू. दादांशी
प्रेमाने बोलतांना पू. सखदेवआजी (ऑगस्ट २०१४)

        पू. आजींना त्रास होत असेल, तेव्हा पू. सौरभदादा आजींची आठवण काढायचे. पू. आजींना श्‍वास घ्यायला त्रास होत असेल, तेव्हा पू. सौरभदादांनाही श्‍वास घेण्यास त्रास होत असे. पू. आजींचे नातलग किंवा कु. राजश्रीताई पू. सौरभदादांना भेटायला आल्यावर ते पू. आजींची विचारपूस करायचे. वर्षभरापूर्वी पू. आजींना तीव्र त्रास होत होता. त्या वेळी पू. सौरभदादांनी त्यांना भेटण्याचा आग्रह केला होता. तेव्हा पू. आजी म्हणाल्या होत्या, माझा थांबलेला श्‍वास पू. सौरभनीच चालू केला. पू. आजी न विसरता पू. सौरभदादांना खाऊ पाठवायच्या आणि पू. सौरभदादाही पू. आजींना खाऊ पाठवायचे. पू. आजींना त्यांचा जन्मदिनांक ठाऊक नव्हता. त्या वेळी पू. आजींचा जन्मदिनांक आणि त्यांच्या शेवटच्या श्‍वासाची वेळ पू. सौरभदादांनी अचूक सांगितली.
- सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.८.२०१६)

गुरुमहिमा

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
ज्याच्या जीवनात आले गुरु ।
त्याचे जीवनच होई कल्पतरु ॥ १ ॥
ज्याला मिळाली गुरुमाऊली ।
त्याला मिळे कृपेची सावली ॥ २ ॥
सुकलेली वेल पानांनी बहरते ।
आटलेल्या सरितेत जल पाझरते ॥ ३ ॥
सुनामीलाही वाटे भीती ।
कडाडणार्‍या विजाही भयाने कापती ॥ ४ ॥
कंपित होई वसुंधरा ।
भय वाटे त्या अंबरा ॥ ५ ॥
मज गुरूंसमोर ब्रह्मांड झुके सारे ।
म्हणूनी सारे श्रीगुरूंना होऊया प्यारे ॥ ६ ॥
- कु. प्रियांका स्वामी, मंगळुरु, कर्नाटक. (१७.५.२०१६)

पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांच्या देहत्यागाच्या संदर्भात मिळालेल्या पूर्वसूचना

कै. पू. (सौ.) सखदेवआजी
        सनातनच्या २० व्या संत पू. (सौ.) आशालता सखदेव (वय ८१ वर्षे) यांनी १७ ऑगस्ट या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात देहत्याग केला. देहत्यागासंदर्भात मिळालेल्या पूर्वसूचना आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
पू. आजींच्या डोक्यावरून हात फिरवतांना यानंतर पू. आजींची सेवा करायला मिळेल का ?, असा विचार मनात येणे आणि त्याच संध्याकाळी पू. आजींनी देहत्याग केल्याचे समजणे : १७.८.२०१६ या दिवशी सकाळी पू. आजींना पुष्कळ वेदना होत असल्याने कु. राजश्रीताईंनी (त्यांच्या मुलीने) मला खोलीत बोलावले. त्या वेळी पू. आजींना असह्य त्रास होत होता, तरीही त्या विचारलेल्या प्रश्‍नांना प्रतिसाद देत होत्या. मी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत असतांना माझ्या मनात विचार आला, आतापर्यंत पू. आजी अनेक वेळा गंभीर आजारातून बर्‍या झाल्या; पण या वेळी आजींची प्रकृती अधिक खालावली आहे. त्यामुळे आपल्याला पू. आजींच्या सेवेची संधी परत मिळेल का ? त्याच क्षणी मी असा कसा विचार करते ?, असा विचार मनात येऊन मी त्याकडे दुर्लक्ष केले. त्याच दिवशी सायंकाळी पू. आजींनी देहत्याग केल्याचे समजले.
- कु. शर्वरी बाकरे (१८.८.२०१६)

गोकुळाष्टमीनिमित्त विश्‍वामित्र महर्षि, सप्तर्षि आणि भृगु महर्षि यांनी त्या त्या नाडीवाचकांद्वारे एकाच दिवशी प.पू. डॉक्टरांना आम्ही नाडीवाचन करून आशीर्वाद देणार आहोत, असे कळवणे आणि यावरून प.पू. डॉक्टरांचे कार्य हे वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे लक्षात येणे

महर्षींचे आशीर्वाद

१. आम्ही जवळजवळ १० सहस्र लोकांचे तरी नाडीवाचन केले असेल; परंतु तुमचे गुरुच केवळ अवतार आहेत, हे आम्हाला कळून चुकले आहे, असे नाडीवाचक गोविंदराजू यांनी दूरभाष करून सांगणे : वैदिश्‍वरन् हे तमिळनाडूतील गाव ताडपत्रांवरील नाडीपट्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. मागच्या वर्षी आम्ही येथील जवळजवळ सर्वच नाडीकेंद्रांना भेट देऊन त्यांच्या कार्याविषयी जाणून घेतले होते, तसेच त्यांचे अनुभव ध्वनीचित्रबद्ध करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यांतीलच एक होते श्री. गोविंदराजू. या नाडीवाचकांकडे शिववाक्य नाडी आहे. हिलाच महाशिव नाडी, असेही म्हणतात. तसेच त्यांच्याकडे कौशिक नाडी (विश्‍वामित्र नाडी) आहे. याच ठिकाणी आम्ही प.पू. डॉक्टरांच्या कार्याविषयी नाडीशास्त्र काही सांगते का ?, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा आज (२३.८.२०१६ या दिवशी) अचानक दूरभाष आला आणि ते म्हणाले, विश्‍वामित्र महर्षींनी आज मला सांगितले, उद्या बरोबर सव्वानऊ ते सव्वादहा या कालावधीत तुला प.पू. डॉक्टरांसाठी याग करायचा आहे, तसेच पुढे त्यांच्यासाठी ९६ दिवस गायत्री यंत्राची पूजाही करायची आहे. उद्या गोकुळाष्टमी आहे. या यागातून महर्षींना विशेष प्रकारची शक्ती प.पू. डॉक्टरांना द्यायची आहे. आम्ही आजवर जवळजवळ १० सहस्र लोकांसाठी तरी नाडीवाचन केले असेल, तसेच खूप पैसे मिळवले असतील; परंतु केवळ तुमचे गुरुच अवतार आहेत, हे आम्हाला कळून चुकले आहे. त्यांचे एकदा तरी आम्हाला दर्शन मिळेल का ? तेथे गोव्याला गेल्यावर त्यांचे दर्शन मिळावे, अशी आमची इच्छा आहे. त्याच वेळी त्यांच्याबरोबरच त्यांचे शिष्य बालस्वामीही माझ्याशी बोलले. तेही म्हणाले, आम्हा सर्वांचीच तशी इच्छा आहे.

पू. आजींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी श्री. अमोल हंबर्डे यांना आलेल्या अनुभूती

श्री. अमोल हंबर्डे
१. पू. सखदेवआजी यांचा देह पुष्कळ हलका झाला असून तो जमिनीपासून जवळपास २-३ फूट उंच हवेत तरंगत आहे, असे जाणवले.
२. त्यांच्या पावलांकडे पाहिल्यावर मन शांत झाले आणि विचार थांबले.
३. त्यांच्या पार्थिवाच्या चारही बाजूंनी चैतन्याचे वलय जाणवत होते.
४. त्यांचे अंत्यविधी चालू असतांना कुठला तरी सोहळा चालू आहे, असे जाणवले. माझा नामजप अखंड चालू होता.
- श्री. अमोल हंबर्डे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.८.२०१६)

पू. (सौ.) आजींच्या देहत्यागाविषयी संगीताच्या माध्यमातून वीणेची तार छेडल्याप्रमाणे नाद येऊन मिळालेली पूर्वसूचना !

श्री. राम होनप
        १७.८.२०१६ च्या सायंकाळी ४.१५ वाजता खोलीत विश्रांती घेत असतांना मला अकस्मात् जाग आली. त्या वेळी मला ७ - ८ वेळा वीणेचा नाद ऐकू आला. नाद ऐकू येतांना मनाला चांगले वाटत होते. घडाळ्याचा काटा ठराविक अंतराने टिक टिक करतो, त्या गतीत वीणेची तार छेडली जात होती. हा नाद ध्वनीमुद्रित करण्यासाठी भ्रमणभाष हातात घेताच तो ऐकू यायचे बंद झाले. याच दिवशी सायंकाळी ५.१० वाजता पू. (सौ.) सखदेवआजींनी देहत्याग केल्याचे वृत्त समजले.
        हा प्रसंग मी एका संतांना सांगून प्रश्‍न विचारला, वीणेचा नाद ऐकू येणे आणि पू. आजींचा देहत्याग होणे, यांचा काही संबंध आहे का ? त्या वेळी ते म्हणाले, आध्यात्मिक पातळी न्यून असलेल्या साधकांना गंधाच्या, म्हणजेच पृथ्वीतत्त्वाच्या माध्यमातून पूर्वसूचना मिळते. प्रत्येकाचा साधनामार्गही वेगळा आहे. तुम्हाला संगीताच्या, म्हणजेच आकाशतत्त्वाच्या माध्यमातून पूर्वसूचना मिळाली !
- श्री. राम होनप (२१.८.२०१६)

हे सरकारला लज्जास्पद ! सरकारकडून न्याय मिळेल याची खात्री नसल्याने दोन्ही बाजूच्या समर्थकांना मोर्चे काढावे लागतात !

       डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला तीन वर्षे पूर्ण झाली, तरी त्यांचे मारेकरी सापडले नाहीत, हे निमित्त करून अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अन्य पुरोगामी संघटना यांनी, तर सनातन संस्थेवरील अन्याय्य कारवाईच्या विरोधात हिंदु धर्माभिमान्यांनी पुणे येथे २० ऑगस्ट या दिवशी मोर्चे काढले.

७० वर्षांच्या अनुभवातून काही न शिकणारा भाजप ! काश्मीरच्या युवकांची श्रद्धा भारतावर असेल कि इस्लामवर, हेही न कळणारे भाजप सरकार !

       काश्मीरमधील ३०० युवक भारतीय सैन्यात भरती झाले आहेत. येथील बाना सिंह परेड मैदानात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल एन्.एन्. वोहरा यांच्या उपस्थितीत या युवकांना भरती करून घेण्यात आले.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा !
        महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या चरणी भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम यांचा मंदिर संस्थानने अपहार केला असून यात ३९ किलो सोने आणि ६०८ किलो चांदीची लूट केली आहे, असे सीआयडीच्या अहवालात उघड झाले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Maharashtra ke Tulajabhavani mandir me mandir sansthan ne kiya 39 kg sona aur 608 chandi gayab. 
Hinduo, mandironka sarkarikaran roko !
जागो ! : महाराष्ट्र के तुलजाभवानी मंदिर में मंदिर संस्थान ने किया ३९ किलो सोना और ६०८ किलो चांदी गायब 
हिन्दुओ, मंदिरों का सरकारीकरण रोको !
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
बुद्धीप्रामाण्यवादी खरंच बुद्धीप्रामाण्यवादी आहेत का ?
      त्या त्या विषयातील तज्ञ एकमेकांशी वाद करू शकतात, उदा. आधुनिक वैद्य (डॉक्टर) आधुनिक वैद्यांशी, वकील वकिलांशी, संगणकतज्ञ संगणकतज्ञांशी; पण अध्यात्माचा काहीच अभ्यास नसलेले आणि साधना न केलेले बुद्धीप्रामाण्यवादी अध्यात्मातील अधिकार्‍यांशी वाद करतात. यापेक्षा मूर्खपणाचे दुसरे उदाहरण आहे का ? 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
भांडे स्वच्छ हवे
       तुम्हाला भिक्षा हवी आहे. तुम्ही म्हणता मी दाता आहे, तर तुमचे पात्र चांगले घासून स्वच्छ करून आणा. भांड्यात आधीचे काही खरकटे रहाता कामा नये. नाहीतर तुम्हालाच भिक्षा न्यून (कमी) मिळेल. भिक्षापात्र रिकामे हवे.
भावार्थ :
तुमचे पात्र चांगले घासून स्वच्छ करून आणा, याचा अर्थ आपण शुद्ध, निर्मळ अंतःकरणाने बाबांकडे (गुरूंकडे) गेले पाहिजे. भांड्यात आधीचे काही खरकटे राहता कामा नये म्हणजे आपल्यात कुठलाही विषय, वासना किंवा कामना असता कामा नये.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरे ज्ञान 
माणूस जेव्हा खरे ज्ञान प्राप्त करतो, तेव्हा त्याला कळते की, मी विश्‍वातील 
अमर्याद ज्ञानभांडारातील अत्यल्प असे ज्ञान प्राप्त केले आहे. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

मंदिरातील लुटारू !

संपादकीय 
      साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या आणि अवघ्या महाराष्ट्राची कुलदेवी असलेल्या श्री तुळजाभवानीदेवीच्या मंदिरात झालेल्या भ्रष्टाचारामुळे येत्या काही दिवसांत अवघा महाराष्ट्र ढवळून निघण्याची शक्यता आहे. घटनाही तशीच आहे. या मंदिरात भाविकांनी श्रद्धेने अर्पिलेले ३९ किलो सोने आणि ६०८ किलो चांदी यांची मोठ्या प्रमाणात लूट झाल्याचा ठपका या प्रकरणाचे अन्वेषण करणार्‍या गुन्हे अन्वेषण विभागाने ठेवला आहे. ही घटना भाविकांमध्ये निश्‍चितच संताप निर्माण करणारी आहे. मंदिरांचा कारभार सरकारकडे का नसावा ? याचे हे उत्तम उदाहरण आहे. जे जे मंदिरात भ्रष्टाचार करतात, ते सर्वजण धर्मद्रोहीच होत. तुळजापूर मंदिरात झालेला भ्रष्टाचार साधासुधा नाही. त्याची व्याप्ती चक्रावून टाकणारी आहे. ती काही अंशी तरी जाणून घेतली पाहिजे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn