Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

संत नरहरि महाराज यांची आज जयंती

अत्याचारांच्या विरोधात पाकमध्ये अल्पसंख्यांकदिनी हिंदूंकडून निदर्शने !

पाकमधील हिंदूंचे अत्याचार थांबवण्यासाठी स्वातंत्र्यापासून आतापर्यंत 
भारतातील एकाही शासनकर्त्याने प्रयत्न केले नाहीत, हे लज्जास्पद आहे !
     इस्लामाबाद - पाकच्या २० कोटी लोकसंख्येत केवळ १० टक्के अल्पसंख्यांक आहेत. त्यात अधिक हिंदू आहेत. त्यांच्यावर स्वातंत्र्यापासून आतापर्यंत अत्याचार होत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक दिवस साजरा केला गेला. या वेळी पाकच्या प्रत्येक शहरातील हिंदूंनी रस्त्यावर येऊन पाकचा विरोध केला.
     सध्या पाकमधील हिंदू संतप्त आहेत. याला पाकिस्तान पीपल्प पार्टीचे माजी खासदार अब्दुल हक उत्तरदायी आहेत. हक यांना मियां मिठ्ठू या नावानेही ओळखले जाते. पाकमध्ये हिंदूंच्या धर्मांतराचे सूत्रधार मिठ्ठू हेच असल्याचा आरोप हिंदूंकडून होत आहे. मियां मिठ्ठू हिंदु मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर करतात. आतापर्यंत त्यांच्यावर ११७ गुन्हे प्रविष्ट करण्यात आलेले आहेत. अल्पसंख्यांकदिनी हिंदूंनी मियां मिठ्ठू यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. पाकच्या संसदेत सत्ताधारी पक्षाचे खासदार डॉ. रमेश कुमार वांकवानी यांनी पाकमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांची माहिती दिली. मियां मिठ्ठू यांच्याकडून हिंदूंच्या करण्यात येत असलेल्या धर्मांतरावरही त्यांनी अनेकदा आवाज उठवला आहे.

बांगलादेशी हिंदूंच्या पुनर्वसनाला आसाममध्ये विरोध

गेल्या अनेक वर्षांपासून आसाममध्ये बांगलादेशी मुसलमान येत 
असतांना त्यांना विरोध करण्याचे धारिष्ट्य कधी दाखवले जाते का ?
     गौहत्ती (आसाम) - आसाममध्ये बांगलादेशी हिंदु शरणार्थींचे पुनर्वसन करण्याच्या आणि त्यांना नागरिकत्व देण्याच्या सरकारच्या निर्णयाला राज्यात विरोध होत आहे. या निर्णयाच्या विरोधात कृषक मुक्ती संग्राम समिती, तसेच ऑल असम स्टुडंट युनियन या संघटनांनी आंदोलन चालू केले आहे. आसाम साहित्य सभा या प्रमुख साहित्य संघटनेनेही बांगलादेशातील हिंदु शरणार्थ्यांना भारतीय नागरिकत्व देण्यास विरोध दर्शवला आहे.
     शेजारील राष्ट्रांमधून विशेषत: पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांमधून धार्मिक अत्याचारामुळे भारतात आलेल्या अल्पसंख्यांकांना (हिंदूंना) नागरिकत्व देण्याच्या संदर्भातील नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१६ हे विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे विचाराधीन आहे. या विधेयकाला वरील संघटनांचा विरोध आहे. या संघटनांच्या मते हे विधेयक पारीत झाल्यानंतर बांगलादेशातील अनुमाने १ कोटी ७५ लाख हिंदूंना आसाममध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होईल.

(म्हणे) गांधी यांची हत्या ही पहिली आतंकवादी घटना ! - असदुद्दीन ओवैसी

आतंकवादी कृत्य कशाला म्हणतात, हेही ज्ञात नसलेले हिंदुद्वेषी ओवैसी !
     लक्ष्मणपुरी - गांधी यांची हत्या ही भारतातील पहिली आतंकवादी घटना होती, अशी टीका एम्आयएम्चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी येथे एका सभेत केली. गोरक्षणाच्या नावाखाली लोकांना मारणार्‍यांनी प्रथम गायीपासून बनणारे बूट घालणे आणि इन्सुलिनचे इंजेक्शन घेणे बंद करावे, असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला.
ओवैसी यांनी केलेली गरळओक
१. पंडित नथुराम गोडसे यांना वाचवण्यासाठी भाजपच्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पैसे गोळा केले होते, असा आरोप त्यांनी केला. हे मी सांगत नाही, तर पुस्तकांमध्ये लिहिले आहे.
२. मी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या डोळ्यांना डोळे भिडवून म्हटले की, गोरक्षणाच्या नावाखाली दलितांना मारणारे तुमच्या पक्षातील लोक आहेत.
३. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर भाजपने तिरंगा यात्रा चालू केली आहे; मात्र एका मुसलमानाद्वारे बनवण्यात आलेल्या या तिरंग्याला राष्ट्रध्वज मानण्यास स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी नकार दिला होता. भाजप त्याच सावरकरांना आदर्श मानते.

राजस्थानमध्ये जैन पंथियांनी विवाहातील धर्मशास्त्रविरोधी डीजेच्या कार्यक्रमावर बंदी घातली !

जैन पंथियांची अभिनंदनीय कृती ! असा धर्माभिमान किती हिंदूंमध्ये आहे ?
हिंदूंनो, जर धर्मशास्त्रानुसार लग्नसमारंभादी सोहळे केले, तर 
त्याचा आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होईल, हे लक्षात घ्या !
     जयपूर - राजस्थानमधील जैन समुदायाने राज्यातील अनेक गावांमध्ये विवाहाच्या वेळी करण्यात येत असलेल्या अनावश्यक कार्यक्रमांना बंद करण्याचा संकल्प केला आहे. यामध्ये विवाहात होत असलेल्या संगीतांचे कार्यक्रम अथवा डीजे वाद्य यांवर बंदी घालण्यात आली आहे. सदर कार्यक्रम धर्मशास्त्राला अनुसरून नसल्याचे जैन पंथियांचे मत आहे. या कार्यक्रमांनी केवळ अनावश्यक खर्च वाढतो, असे त्यांचे म्हणणे आहे. या निर्णयाचे जैन पंथियांसह अन्य काही लोकांनीही स्वागत केले आहे.
     यासाठी जयपूर, जोधपूर आणि सिरोही जिल्ह्यांच्या जैन संघाने काही आदेश काढले आहेत. हे आदेश न पाळणार्‍यांना दंड ठोठावला जाणार आहे. बहुतेक गावांमध्ये दंडाची रक्कम ३५ सहस्र रुपये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे कुटुंब अनेकवेळा या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे जैन संघाला लक्षात येईल, त्यांना ६ मास अथवा १ वर्षासाठी समाजातून बहिष्कृत केले जाईल. या समवेतच तख्तगड, बाली, सादरी आणि जालौर जिल्ह्यांच्या काही गावांमध्ये जेवणाचे पदार्थही अल्प करण्याचे ठरवण्यात आले आहे.

बलुचिस्तानमध्ये पाक सैन्याच्या अत्याचारांवर भारताने लक्ष घालावे ! - बलुची नेते ब्रह्मदघ बुगती यांचे आवाहन

     नवी देहली - बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये होत असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकला उत्तर देण्याच्या मागणीनंतर बलुचिस्तानच्या राजकीय पक्षांनी आपला आवाज मोठा केला आहे. त्यांनीही बलुचिस्तानमध्ये पाक सैन्याकडून होत असलेल्या अत्याचारांवर भारताने लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे. बलोच रिपब्लिकन पक्षाचे ब्रह्मदघ बुगती यांनी बलुचिस्तानमध्ये पाकच्या सैन्याच्या कारवायांची काळी स्थिती उघड केली आहे.
बुगती यांनी म्हटले की,   १. बलुचिस्तानमध्ये कोणाचे अपहरण केले जात नाही अथवा कोणाचा मृतदेह सापडला नाही, असा एकही दिवस जात नाही !
२. गेल्या काही वर्षांत पाकच्या सैन्याकडून अपहरणाचे प्रकार वाढवले आहेत. पाकसैन्याचे काम चिनी आस्थापनांना बलुचिस्तानमध्ये आणून येथील संपत्तीला लुटण्याचे आहे. याचा विरोध करणार्‍यांचा छळ केला जातो; त्यामुळे अनेक जण बलुचिस्तान सोडून जात आहेत.
३. पाकचे मुख्य लक्ष डेरा बुगती आणि ग्वादर शहरांवर आहे. येथे पाक सैन्य त्याचा तळ बनवत आहे. त्याद्वारे येथील जनतेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आहे.

पतंजलीचा कारभार ५० सहस्र कोटी रुपयांपर्यंत नेणार ! - योगऋषी रामदेवबाबा

     नवी देहली - पतंजलीचा सध्याचा कारभार केवळ ५ सहस्र कोटी रुपयांचा आहे. तरीही परदेशी आस्थापने घाबरलेली आहेत. हा कारभार पुढे २५ ते ५० सहस्र कोटी रुपयांपर्यंत नेणार आहे. देशातील जनतेला चांगले आणि स्वस्त उत्पादन देऊ आणि त्यातून जो नफा मिळेल तो देशसेवेसाठी खर्च करू, असे प्रतिपादन योगऋषी रामदेवबाबा यांनी केले.
१. योगऋषी रामदेवबाबा यांनी विदेशी गुंतवणुकीवर टीका करतांना म्हटले की, भारताला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून द्यायचे आहे. सरकार अनेक बंधनांमध्ये काम करत असते; मात्र मी स्वतंत्र आहे आणि मी विदेशी आस्थापनांचा विरोध करू शकतो.
२. अ‍ॅडर्व्हटाइजिंग स्टॅण्डर्ड काऊन्सिल ऑफ इंडियावर (एएस्सीआयवर) योगऋषी रामदेवबाबांनी टीका केली. दिशाभूल करणारी विज्ञापने केल्याच्या प्रकरणी एएस्सीआयने पतंजलीला ७ नोटीस पाठवल्या आहेत. त्यावर योगऋषी रामदेवबाबा म्हणाले, एएस्सीआय तिचा सदस्य बनण्यासाठी दबाव निर्माण करत आहेत. या संस्थेची युनिलिवर, पेप्सी आदी बहुराष्ट्रीय आस्थापने आहेत. मी एएस्सीआयच्या विरोधात पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिणार आहे, तसेच तिच्या विरोधात मानहानीचा दावा प्रविष्ट करणार आहे.

विग किंवा कृत्रिम दाढी लावून नमाज पठण करू नये !

दारूल उलूम देवबंदचा फतवा
हिंदूंनी सात्त्विक वेष परिधान करून मंदिरात दर्शन घ्यावे, अशी
 सूचना करण्यात आली असती, तर पुरो(अधो)गाम्यांच्या पोटात दुखले असते !
     नवी देहली - मुसलमानांनी नमाजाच्या वेळी डोक्याला विग (कृत्रिम केसांचा टोप) किंवा कृत्रीम दाढी लावून नमाज पठण करू नये, असा फतवा दारूल उलूम देवबंद या इस्लामी शिक्षण संस्थेने काढला आहे. असे केल्यास तो नमाज अपूर्ण समजण्यात येईल, असेही त्यात म्हटले आहे.
     दारूल उलूम देवबंदचे प्रवक्ता अशरफ उस्मानी म्हणाले, वुजू (नमाजापूर्वी हात आणि चेहरा धुणे) आणि गुसल (संपूर्ण शरिराची स्वच्छता) ह्या महत्त्वाच्या धार्मिक गोष्टी आहेत. विग घातल्यामुळे डोक्याच्या त्वचेला पाण्याचा स्पर्श होत नाही. त्यामुळे वुजू आणि गुसलचा उद्देश यशस्वी होत नाही. (मुसलमानांची अतिरेकी धर्मंधता अशा फतव्यांतून दिसून येते ! - संपादक) हेअर ट्रान्सप्लान्टविषयी त्यांना कोणतीही अडचण नाही. ज्याप्रमाणे जीवनशैलीमध्ये पालट होत आहेत, त्यामुळे नमाज पठण करणार्‍यांचाही गोंधळ होत आहे, असेही उस्मानी म्हणाले.

रामसेतू निर्मितीतील तंत्रज्ञानाचे आयआयटी संशोधन करणार !

राम झालाच नाही, रामाने रामसेतू बांधलाच नाही, 
असे म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
     नोएडा - भारताची संस्कृती आणि पुराण यांमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान असणार्‍या रामायणातील रामसेतूवर भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटीच्या) विद्यार्थ्यांकडून नव्याने संशोधन करण्यात येणार आहे.
     श्रीरामांनी जेव्हा लंकेवर आक्रमण केले, तेव्हा त्यांनी वानरसेनेच्या साहाय्याने समुद्रावर या सेतूचे निर्माण केले होते. भगवान विश्‍वकर्मा यांचे पुत्र नल आणि नील यांच्या अतिशय प्रगत स्थापत्य तंत्रज्ञानाने निर्माण करण्यात आलेला हा सेतू पाण्यावर तरंगत होता. वानरसेनेने दगडांवर राम लिहून पाण्यात टाकल्यामुळे ते तरंगले, अशी आख्यायिकाही या संदर्भात प्रसिद्ध आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या सीमेवर असलेला हा सेतू कोणत्या तंत्रज्ञानाने निर्माण केला होता, या रहस्याचा शोध अद्याप जगातील एकही शास्त्रज्ञ लावू शकले नाहीत. अशाच प्रकारे भारतातील अनेक रहस्य ज्याच्यापर्यंत आजचे विज्ञान पोहचू शकले नाही, अशा भारतातील प्राचीन स्थळांवरील स्थापत्यकलेचा शोध घेण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे (आयआयटीचे) विद्यार्थी त्या काळातील संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करणार आहेत.

निदर्शने करतांना पोलिसांसमवेत झालेल्या चकमकीत भाजपचा समर्थक ठार

     आग्रा - उत्तरप्रदेश राज्यातील बालिया जिल्ह्यात एका ट्रकमधून नेण्यात येत असलेल्या ३ गायी आणि २ वासरे कह्यात घेण्यात आल्यानंतर पोलिसांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या विरोधात गोतस्करीचा गुन्हा नोंदवला आहे. त्यानंतर १२ ऑगस्टला सायंकाळी भाजपचे आमदार उपेंद्र तिवारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने करण्यात आली. त्या वेळी पोलिसांसमवेत झालेल्या चकमकीत भाजपचा एक समर्थक ठार झाला.

गिलगिट-बाल्टिस्तान भागातून पाकने माघार घेतल्यास काश्मीर प्रश्‍न सुटेल ! - अमेरिकेतील संस्थेचे मत

     वॉशिंग्टन - पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान भागातून पाकने माघार घेतल्यास काश्मीर प्रश्‍न सुटण्यास साहाय्य होईल, असे मत वॉशिंग्टन येथील गिलगिट-बाल्टिस्तान नॅशनल काँग्रेसचे संचालक सेंगे सेरिंग यांनी व्यक्त केले आहे. सेरिंग पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गिलगिट-बाल्टिस्तानातील मानवी अधिकारांच्या उल्लंघनासंदर्भात धोरणात्मक उल्लेख केला आहे, तो सकारात्मक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने त्यांच्या ठरावात पाकने गिलगिट आणि बाल्टिस्तान या भागात घुसखोरी केल्याचे म्हटलेले आहे. (असे आहे, तर आजपर्यंत संयुक्त राष्ट्रांनी सत्याची बाजू घेत पाकव्याप्त काश्मीरला अवैध ठरवत अखंड काश्मीर भारताकडे सुपुर्द करण्याची मागणी लावून का धरली नाही ? या समवेतच आतापर्यंतच्या बहुतांश भारतीय शासनकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळेच काश्मीर प्रश्‍न चिघळला, हे लक्षात घ्यायला हवे ! - संपादक)
     सेरिंग पुढे म्हणाले, गिलगिट-बाल्टिस्तान हे वादग्रस्त प्रदेश असून, तेथील लोकांना संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधींशी, काश्मीर सरकारशी आणि भारत सरकारशी थेट बोलण्याचा अधिकार आहे. त्यातूनच काश्मीर प्रश्‍नावर तोडगा निघू शकेल !

नागपूर येथे संघाच्या कार्यक्रमातील नकाशात पाकव्याप्त काश्मीर नाही !

     नागपूर - येथील भाजपचे नगरसेवक डॉ. रवींद्र अर्थात छोटू भोयर यांच्या मातृभूमी प्रतिष्ठानने १३ ऑगस्ट या दिवशी साम्ूहिक वन्दे मातरम्चा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या मंचावरील नकाशात पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग दाखवलेला नव्हता.
     संघाच्या अखंड भारत संकल्प दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय परिवहनमंत्री श्री. नितीन गडकरी आणि आतंकवादविरोधी अभियानाचे प्रमुख मनिंदरजितसिंग बिट्टा या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सक्करदरा चौकात मोठा मंच उभारण्यात आला होता. मंचाच्या मागील भागात अखंड भारताच्या नकाशाचे फ्लेक्स होते. त्यात भारत तीन रंगात होता, मात्र पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सोबतीला पाकव्याप्त काश्मीर, अक्साई चीन हे खंडित आणि वेगळ्या पिवळ्या रंगात दाखवण्यात आले. एरवी अखंड भारत सांगणार्‍या संघाच्या या कार्यक्रमातील नकाशात सध्याच्या भारताचाही पूर्ण भाग तिरंग्यात अधोरेखित नव्हता. वास्तवात अधिकृत भारताचा नकाशा हा काश्मीरसहच सर्व सरकारी कार्यालयांमध्ये असतो.

मुसलमान आणि ख्रिस्ती यांना पक्षाशी जोडण्यासाठी भाजपचे अल्पसंख्यांक संमेलन

भाजप हिंदूंची अशी संमेलने कधी घेणार ?
     नवी देहली - अल्पसंख्यांक समाजात विशेषत: मुसलमान आणि ख्रिस्ती समाजाच्या युवकांमध्ये पक्षाची प्रतिमा ठसवण्यासाठी भाजपकडून देहलीत अल्पसंख्यांक संमेलन आयोजित करण्यात येत आहे. यात या युवकांच्या समस्या सोडवण्याचा पक्षाकडून प्रयत्न करण्यात येणार आहे. याकरता या युवकांचे विचार, त्यांच्या समस्या, सरकारची नीती यांवर चर्चा करण्यात येणार आहे. हे संमेलन ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. पक्षाला पुढे घेऊन जाण्यासाठी अल्पसंख्यांक समाजात विश्‍वास निर्माण केला पाहिजे, असे पक्षाच्या नेत्यांना वाटते. त्याचबरोबर पुढील वर्षी देहलीत महानगर पालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांना समोर ठेवून भाजपचे प्रयत्न चालू झाले आहेत.

बांगलादेशमध्ये उत्खननात सापडले १ सहस्र वर्षे जुने विष्णूचे मंदिर !

     ढाका - बांगलादेशातील कहरोलमध्ये पुरातत्त्व विभागाच्या चमूला अनुमाने १ सहस्र वर्षे जुन्या हिंदु मंदिराचे अवशेष मिळाले आहेत. हे मंदिर श्री विष्णूचे असल्याचे सांगण्यात येते. पुरातत्व तज्ञांच्या मते या मंदिराच्या भिंतींवर नवरत्न नक्षी कोरण्यात आली आहे, जी त्या काळातील विशेष मंदिरांवरच पहायला मिळाली आहे.
     गेल्या एप्रिलमध्ये या ठिकाणी उत्खनन करत असतांना पुरातत्व विभागाच्या चमूला ७ मीटर उंचीचा स्तंभ आढळून आला होता. त्यानंतर सलग ५ मास उत्खनन केल्यावर त्या ठिकाणी हिंदु मंदिर असल्याचे स्पष्ट झाले. या मंदिरातून भगवान विष्णूची मूर्तीही कह्यात घेण्यात आल्याचे समजते. या मंदिराचे वैशिष्ट्ये पाहून पुरातत्व चमूने हे मंदिर १ सहस्र वर्षे जुने असल्याचे सांगितले. वर्ष १९४७ मध्ये भारत-पाक फाळणी होण्यापूर्वी बांगलादेश भारताचाच एक भाग होता. त्यामुळे त्या ठिकाणी मंदिर मिळणे, ही काही आश्‍चर्याची गोष्ट नाही; परंतु १ सहस्र वर्षांपूर्वीच्या या मंदिरावरून हिंदु धर्माची महानता लक्षात येते.

पुणे आणि नागपूर येथेही रात्री उशिरापर्यंत उपाहारगृहे आणि मद्यालये (बार) चालू ठेवण्यास शासनाकडून अनुमती

रात्री उशिरापर्यंत मद्यालये चालू ठेवण्याने समाज विकासाकडे नव्हे, तर अधोगतीकडे जाईल !
     पुणे - मुंबईच्या पाठोपाठ आता पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये रात्री उशिरापर्यंत म्हणजेच रात्री १.३० वाजेपर्यंत विविध उपहारगृहे आणि मद्यालये (बार) उघडे ठेवण्यास शासनाने अनुमती दिली आहे. (यावरून शासनाला राज्यातील जनतेने व्यसनाधीन होऊन वाममार्गाला लागावे आणि राज्याची तिजोरी भरावी, असे वाटत आहे, असे सामान्य जनतेला वाटल्यास चुकीचे काय ? - संपादक) राज्यपालांच्या आदेशाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथील आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी हा निर्णय घेतला होता.
     पुणे आयुक्तालयातील उपहारगृहे रात्री ११ वाजता पोलिसांकडून बंद करण्यात येत होती. काही ठराविकच उपहारगृहे आणि मद्यालये यांना पोलिसांकडून अभय दिले जात होते. अनेकदा ओरड होऊनही त्यांच्यावर कारवाई केली जात नव्हती; परंतु या नव्या आदेशामुळे सर्वच मद्यालये आणि उपहारगृहे यांना आयती संधीच मिळाली आहे. नव्या आदेशानुसार संभाजीनगर, नाशिक, अमरावती आणि सोलापूर आयुक्तालयाच्या हद्दीतील उपहारगृहे रात्री १२.३० वाजेपर्यंत, तर उर्वरीत महाराष्ट्रासाठी उपहारगृहे रात्री ११.३० अन् मद्यालये यांची वेळ रात्री १० वाजेपर्यंत करण्यात आली आहे.

पायाभूत चाचणी परीक्षेत विद्यार्थ्याने लिहिली सैराट चित्रपटाची गोष्ट !

विद्यार्थ्यांवर चित्रपटांचा असा अवाजवी दुष्परिणाम होऊ 
नये, यासाठी चित्रपटांचे उदात्तीकरण थांबवणे आवश्यक आहे !
     पुणे - महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वतीने २ री ते ८ वी पर्यंतच्या वर्गांसाठी पायाभूत चाचणी घेतली जाते. या चाचणीत परिक्षेत, दिलेल्या चित्रावर कल्पनाशक्तीच्या आधारे कथा लिहितांना एका विद्यार्थ्याने सैराट चित्रपटातील व्यक्तिरेखांवर कथा लिहिली आहे. विशेष म्हणजे शिक्षकांनी या कथेसाठी ५ पैकी ४ गुण दिले आहेत.
     याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना परिषदेचे संचालक गोविंद नांदेडे म्हणाले की, चित्रपट किंवा चित्रीत माध्यमांचा विद्यार्थ्यांवर किती परिणाम होतो, हे यावरून दिसते; मात्र त्या विद्यार्थ्याने त्याच्या कल्पनाशक्तीने लिहिलेली ही गोष्ट योग्य आहे. त्यासाठी त्याने केवळ चित्रपटातील पात्रांचा आधार घेतला. (असे संचालक असणार्‍या शिक्षणक्षेत्राची दूरवस्था न झाली तरच नवल ! - संपादक)

मनमाड (नाशिक) येथील देना बँकेत अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून ६१ लक्षाहून अधिक रुपयांचा अपहार

कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार !
     मनमाड - शहरातील देना बॅँक या राष्ट्रीयीकृत अधिकोषात मृत झालेल्या निवृत्ती वेतनधारकांच्या खोट्या स्वाक्षर्‍या आणि त्यांची कागदपत्रे सिद्ध करून ६१ लक्ष ७४ सहस्र ९८० रुपयांचा अपहार झाला आहे. (हे म्हणजे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखे आहे. या प्रकरणी पोलिसांनी संबंधितांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. - संपादक) या प्रकरणी अधिकोषातील २ अधिकारी आणि ३ कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
      अधिकोषातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपापसात संगनमत करून १५ निवृत्तीवेतनधारक आणि १ कर्ज खातेधारक यांच्या खात्यातून स्वत:च्या नावांचा संकेतांक वापरून कागदपत्रे सिद्ध केली आणि मनमाड अन् शिर्डी येथील पैसे काढण्याच्या केंद्रातून पैसे काढले.

असहिष्णुतेची गोष्ट करणार्‍या डाव्यांच्या असहिष्णुतेला मोठा इतिहास ! - खासदार विनय सहस्रबुद्धे

     पुणे - डाव्यांच्या ढोंगबाजीला अनेक रूपे आहेत. वैचारिक स्वातंत्र्याची भूमिका मांडणारे आणि लोकशाहीचा घोष करणारे डावे स्वतःच्या विचारांच्या विरोधात बोलणार्‍यांची भाषणे थांबवतात. हेच त्यांच्या असहिष्णुतेचे प्रतीक असून याला मोठा इतिहास आहे. साम्यवादी आणि डावे यांच्या दांभिकतेमुळे लोकशाही मूल्ये अन् राजकीय विचारधारा यांची हानी झाली, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी च्या वतीने १२ ऑगस्ट या दिवशी भाजपचे प्रवक्ता माधव भंडारी यांनी लिहिलेल्या डाव्यांची ढोंगबाजी : भ्रष्टाचार, हिंसाचार आणि दंडुकेशाही या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी माधव भंडारी, भाजपचे पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले, प्रसिद्ध स्तंभलेखक संदीप बालकृष्णन, स्तंभलेखिका शेफाली वैद्य आणि रवींद्र साठे आदी मान्यवर उपस्थित होते.
     या वेळी माधव भंडारी म्हणाले, डाव्यांचा आर्थिक अप्रामाणिकपणा आणि बौद्धिक अप्रामाणिकपणा या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्यात आला आहे. आई प्रतिमास ३ सहस्र रुपये कमवत असतांना स्वतः अंगावर ७ सहस्र रुपयांचे जॅकेट घालणारे आणि विमानांतून तसेच महागड्या चारचाकी गाड्यांतून प्रवास करणारे कन्हैय्यासारखे लोक शोषितांचे प्रतिनिधी कसे असू शकतात ?

श्रीनगर येथील परिस्थितीचा अपलाभ उठवत अतिरिक्त शुल्काद्वारे खाजगी विमान आस्थापनांकडून प्रवाशांची लूट !

     पुणे - श्रीनगर येथे पर्यटनासाठी गेलेले पुणे येथील श्री. संदीप खर्डेकर आणि सौ. अनुराधा कापडे यांच्यासह अन्य १५० गाड्यांमधून आलेल्या यात्रेकरूंना सोनमर्ग येथून श्रीनगरमध्ये जाण्यास तेथील परिस्थिती चिघळल्याने प्रतिबंध करण्यात आला. सरकारी आदेशानुसार यात्रेकरूंना प्राप्त परिस्थितीत पुढील दिनांकाचे विमानाचे प्रवासदेयक देणे बंधनकारक असतांनाही त्यांना स्पाइसजेट आणि जेट एअरवेज या खाजगी विमान आस्थापनांनी विमानाच्या प्रवासदेयकात पालट करण्यास उद्दामपणे नकार दिला. तसेच त्यांच्याकडून ४ प्रवासदेयकांसाठी अतिरिक १५ सहस्र रुपये आकारले. (परिस्थितीचा अपलाभ उठवणार्‍या विमान आस्थापनांवर शासन आणि विमान प्राधिकरण कोणती कारवाई करणार आहे ? - संपादक)
    
अतिरिक्त २ दिवस वास्तव्य, तसेच मानसिक तणाव असल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव अतिरिक्त भाडे भरावे लागले. तरी त्यांच्यावर झालेल्या या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री श्री राजनाथ सिंह, नागरी उड्डयनमंत्री अशोक गजपती राजू आणि नागरी उड्डयन राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्याकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी भरावी लागलेली अतिरिक्त रक्कम परत मिळावी, अशी मागणी केली आहे. (भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी शासनाने येथे जाणार्‍या पर्यटकांची सर्वतोपरी काळजी घेणे अनिवार्य आहे. तसेच परिस्थितीचा अपलाभ उठवणार्‍या संधीसाधू विमान आस्थापनांवर कठोर कारवाई केल्यासच त्यांना वचक बसेल ! - संपादक)

शिंगणापूर येथे जिल्हा परिषदेच्या आदेशानंतरही भाविकांकडून पथकराची वसुली चालू !

     शिंगणापूर - जिल्हा परिषदेच्या आदेशानंतरही येथे पथकराची वसुली अजून चालूच आहे. राजकीय वादामुळे करवसुलीही चालू असल्याचे सांगण्यात येत आहे. (जिल्हा परिषदेचा आदेश धुडकावून भाविकांची असुविधा करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! - संपादक) उत्पन्नाचे साधन म्हणून शिंगणापूर येथे येणार्‍या भाविकांकडून यात्रेकरू कर घेण्यास जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने अनुमती दिली होती; मात्र १४ जुलै २०१६ या दिवशी जिल्हा परिषदेने गेल्या १० वर्षांपासून चालू असलेली ही पद्धत बंद करण्याचे आदेश दिले होते.

सामाजिक संकेस्थळावर पंतप्रधानांची अपकीर्ती केल्याविषयी ३ जण कह्यात !

     हुपरी/सांगली - पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात सामाजिक संकेस्थळांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याविषयी हुपरी येथील दोघे, तर सांगलीतून एकाला हुपरी पोलिसांची चौकशीसाठी कह्यात घेतले आहे.

(म्हणे) आमदारांची गुणवत्ता वाढवण्यासाठी वेतनवाढीचा निर्णय !

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून वेतनवाढीचे समर्थन !
राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक महागाईने त्रस्त अन 
राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असतांना आमदारांची वेतनवाढ कितपत योग्य ?
     पुणे - आमदारांची गुणवत्ता वाढवण्यासाठी वेतनवाढीचा निर्णय घेण्यात आला असून इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातील आमदारांचे वेतन अल्पच होते, असे प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी करत आमदारांच्या वेतनवाढीचे समर्थन केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाने ११ ऑगस्ट या दिवशी आयोजित केलेल्या वार्तालापात ते बोलत होते. (राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी अभ्यासू आणि पात्र नसतांना आणि त्यांचे दायित्व नीट निभावत नसतांना त्यांना वेतनवाढ कशाला द्यायची, असा प्रश्‍न सामान्य जनतेला पडला तर नवल ते काय ? - संपादक) या वेळी संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे आणि सरचिटणीस अजय कांबळे हे उपस्थित होते.
     ते पुढे म्हणाले की, आमदारांच्या वेतनवाढीवरून जी टीका केली जात आहे, ती चुकीची आहे. विविध भत्ते, वाहनावरील व्यय, दूरध्वनीवरील व्यय आदींमध्येही वाढ करण्यात आली असून नागरिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी त्याचा विनियोग होतो.

देशात गेल्या दीड वर्षात १ सहस्र ८३१ घटस्फोटांना मान्यता !

     नागपूर - गेल्या दीड वर्षात नागपूर कौटुंबिक न्यायालयात प्रविष्ट झालेल्या प्रकरणांपैकी १ सहस्र ८३१ घटस्फोटांना मान्यता देण्यात आली असून ४१६ घटस्फोट समुपदेशनामुळे टळले आहेत, असे माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी सांगितले. (पाश्‍चात्त्य विचारांचे अंधानुकरण टाळून साधना केल्यास घटस्फोटांचे प्रमाण निश्‍चितच न्यून होईल ! - संपादक)

राज्यातील १७१ सिंचन प्रकल्पांच्या चौकशींमध्ये अनियमितता आणि त्रुटी - पानसे समितीचा अहवाल

आंधळा पीठ दळतो आणि कुत्रा खातो, असा चालणारा जलसंपदा विभागाचा कारभार !
     संभाजीनगर - राज्य सरकारने जलआराखडा नसतांना १९१ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. त्यामध्ये मान्य केलेल्या १९१ सिंचन प्रकल्पांतील घोटाळ्यांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने ताशेरे ओढले होते. त्यानंतर राज्य सरकारने चौकशीसाठी आर्.व्ही. पानसे समिती नेमली. पानसे समितीने १९१ पैकी १७१ प्रकल्पांच्या मान्यता आणि कंत्राटदारांना देण्यात आलेली अग्रीम रक्कम यांच्या केलेल्या पडताळणीत अनेक प्रकारच्या अनियमितता आणि त्रुटी आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (उच्च न्यायालयाने ही समिती नेमलीच नसती, तर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असता. - संपादक) पानसे समितीने अहवाल ११ ऑगस्ट या दिवशी सरकारकडे सादर केला.
     राज्यातील १९१ सिंचन प्रकल्पांवर सुमारे ५ सहस्र ६०० कोटी रुपये व्यय होणार होते; परंतु प्रकल्पांच्या कामांची चौकशी झाल्यानंतर कामे चालू झाली नसतांनाही ठेकेदारांना मात्र कोट्यवधींच्या अग्रीम रकमा देण्यात आल्या आहेत. (अशी रक्कम दिलीच कशी गेली ? जनतेच्या पैशाचे खिरापतीप्रमाणे वाटप करणार्‍या संबंधित सर्वांवर कठोर कारवाई व्हायला हवी. - संपादक)

यापुढे वर्षातून एकदाच शिवजयंती साजरी करण्याचा मराठा समाजाचा निर्णय !

मराठा समाजाप्रमाणेच सर्वत्रच्या हिंदूंनीच संघटित होणे 
काळानुसार आवश्यक असून हिंदूसंघटनासाठीही प्रयत्न करायला हवेत !
     संभाजीनगर - कोपर्डी हत्याप्रकरणी निषेध करण्यासाठी एकत्र आलेल्या मराठा समाजाने यापुढेही एकत्र येऊन वर्षातून एकदाच शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या २० वर्षांपासून तिथीनुसार आणि दिनांकानुसार अशी दोन वेळा शिवजयंती साजरी करण्यात यायची; मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेते एकत्र येऊन कोणत्या दिवशी साजरी करण्यात यावी, यावर निर्णय घेणार आहेत.
     या वेळी छत्रपती संभाजी महाराजांचीही जयंती साजरी करण्यात यावी, असे सुचवण्यात आले. हा महोत्सव राज्यपातळीवर किंवा सर्वत्र असावा, याविषयीही निर्णय घेण्यात येईल. सर्व पक्षांतील मराठा समाजाने मतभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मानहानी करणारा लेख प्रसिद्ध केल्याविषयी सामाजिक कार्यकर्ते विनय जोशी यांच्या वतीने दै. लोकमतला कायदेशीर नोटीस !

     पुणे - दैनिक लोकमतने १० ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध केलेल्या संपादकीय लेखामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मानहानी करणारे अनेक चुकीचे संदर्भ देण्यात आले होते. या विरोधात सामाजिक कार्यकर्ते श्री. विनय जोशी यांनी दैनिक लोकमतचे संपादक आणि प्रकाशक यांनी क्षमा मागावी आणि संघाचे स्पष्टीकरण हा लेख प्रसिद्ध करावा, अशा आशयाची कायदेशीर नोटीस बजावली आहे. (हिंदुत्ववादी संघटनांची मानहानी करणारे लेख प्रसिद्ध करणार्‍या दै. लोकमतच्या विरोधात तत्परतेने कृती करणारे श्री. विनय जोशी यांचे अभिनंदन ! - संपादक )       यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील २ शिक्षकांनी १७ मुलींवर लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खासदार विजय दर्डा आणि सचिव किशोर दर्डा यांनी कारवाई न करता पलायन करणे पसंत केले. त्यामुळे संघाच्या संस्थांनी आदिवासी मुलींवर अत्याचार केले, असे म्हणणार्‍या दैनिक लोकमतने दर्डा यांच्या चष्म्यातून जग पहाण्याचा प्रयत्न करू नये. या आचारटपणाविषयी त्यांनी बिनशर्त माफी मागावी. अन्यथा संपादक आणि प्रकाशक यांच्या विरोधात फौजदारी खटला प्रविष्ट केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

मुंबईतील डेव्हिड ससून औद्योगिक संस्थेच्या सुधारगृहातून १० अल्पवयीन मुले पसार

राज्यातील असुरक्षित सुधारगृहे !
     मुंबई - माटुंगा येथील डेव्हिड ससून औद्योगिक संस्थेच्या सुधारगृहातून विविध गुन्हे प्रविष्ट असलेल्या १० अल्पवयीन मुलांनी १३ ऑगस्टच्या रात्री पलायन केले. बंदोबस्ताला असलेल्या ४ सुरक्षारक्षकांना चकवा देत संस्थेतील शौचालयाच्या खिडकीतून मुले पसार झाली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

मराठवाड्यातून अटक केलेल्या इसिसच्या संशयितांच्या कोठडीत वाढ

     संभाजीनगर - परभणी येथून इसिसच्या संपर्कात असलेल्या ३ आणि हिंगोलीतून १ अशा ४ संशयितांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली होती. त्या सर्वांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्यातील नासेरबिन चाऊस याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, तसेच शाहीद, इकबाल आणि रईसोद्दीन यांच्या पोलीस कोठडीत २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयाने वाढ केली आहे. आतंकवादी पथकाने न्यायालयात बाजू मांडतांना या संशयित आतंकवाद्यांकडून आणखी माहिती मिळवणे आणि त्यांचे आणखी काही साथीदार आहेत का, या चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती.

कल्याणमध्ये पोलीस कर्मचार्‍याला मारहाण करणार्‍या ५ मद्यपींना अटक

कायदा-सुव्यवस्था मोडीत निघाल्याचे लक्षण !
     डोंबिवली - कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सतीश देसाई यांना १२ ऑगस्टच्या रात्री ५ मद्यपींनी पुष्कळ मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी विश्‍वनाथ भोसले, राहुल चौधरी, करण चौधरी, सुधीर तयवलकर, राजेश करुणाकर या ५ जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.
     श्री मलंग रस्ता येथे सतीश देसाई हे गस्त घालत असतांना ५ जणांनी मद्यधुंद अवस्थेत मद्यालयाच्या बाहेर येऊन देसाई यांच्या दुचाकीशी गैरकृत्य केले. देसाई यांनी त्यांना समज दिल्यावर मद्यपींनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. घायाळ अवस्थेतील देसाई यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून अधिक कुमक मागवून घेतली आणि मद्यपींना अटक केली.

श्री दत्तगुरूंच्या जयघोषात कन्यागत महापर्वकाल प्रारंभाची सांगता !

  •  कन्यागत महापर्वकाल सोहळा !
  •  ३५ घंटे चालली मिरवणूक !
     
शुक्लतीर्थावर श्रींच्या उत्सवमूर्तीस स्नान घालतांना पुजारी
           नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) - श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कन्यागत महापर्वकाल सोहळ्याची ३५ घंटे चाललेल्या मिरवणुकीने आणि श्रींच्या महापूजेने धार्मिक वातावरणात आणि श्री दत्तगुरूंच्या जयघोषात सांगता झाली. हा सोहळा पुढे वर्षभर चालू रहाणार असून भाविक वर्षभर स्नानाचा लाभ घेणार आहेत. १३ ऑगस्ट या दिवशी दुपारी ३ वाजता चालू वर्षातील दुसरा उतरता दक्षिणद्वार सोहळा पार पडला. सहस्रो भाविकांनी दक्षिणद्वार सोहळ्याचा लाभ घेतला.

मुंबईमध्ये ९ बांगलादेशींना अटक !

बांगलादेशींची घुसखोरी रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच (सनातन धर्म राज्य) आवश्यक !
     मुंबई - मुंबईसह ठाणे ग्रामीण परिसरात अवैधपणे वास्तव्यास असलेल्या ४ महिलांसह ९ बांगलादेशी नागरिकांना १२ ऑगस्ट या दिवशी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी दहिसर आणि नालासोपारा येथून अटक केली. त्या सर्वांना येथील स्थानिक न्यायालयाने २० ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यांना लवकरच त्यांच्या मायदेशात पाठवण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दहिसर येथील तरे कंपाऊंड आणि नालासोपारा येथील प्रगतीनगरात काही बांगलादेशी नागरिक अवैधपणे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यावरून ही कारवाई करण्यात आली.

कतरास (झारखंड) येथे दोन दिवसीय साधकत्ववृद्धी शिबीर संपन्न

बंगाल आणि झारखंड राज्यांतील साधकांचा सहभाग
    
शिबिरात साधकांना मार्गदर्शन करतांना श्री. प्रदीप खेमका
      कतरास (झारखंड) - सनातन संस्थेच्या वतीने बंगाल आणि झारखंड राज्यांतील साधकांसाठी येथे एकत्रितपणे दोन दिवसीय साधकत्ववृद्धी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला संस्थेचे झारखंड समन्वयक श्री. प्रदीप खेमका, हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारताचे समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात धनबाद, बोकारो, कतरास, मलकेरा, भेलाटांड, जमशेदपूर, कोलकाता येथून ३८ हून अधिक साधक सहभागी झाले होते. यात साधकांच्या साधनेची वर्तमान स्थिती, साधकांनी त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचे नियोजन कसे करावे ?, अचानक सेवेमध्ये पालट झाल्यावर मनाची होणारी प्रक्रिया आदी सूत्रांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात धर्मशिक्षण वर्ग घेतांना आलेले अनुभव, महर्षींच्या दिव्य वाणीमधील महत्त्वपूर्ण सूत्रे, राजस्थान येथील संत पू. (सौ.) सुशिला मोदी यांनी केलेले साधनेविषयीचे प्रयत्न आणि अनुभूती आदी विषयांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली.

फलक प्रसिद्धीकरता

पाकिस्तानमधील हिंदूंची दैनावस्था !
     पाकमधील संतप्त हिंदूंनी १२ ऑगस्टला झालेल्या अल्पसंख्यांकदिनी सर्व शहरांमध्ये माजी खासदार अब्दुल हक उपाख्य मियां मिठ्ठू यांच्या विरोधात आंदोलन केले. त्यांच्यावर हिंदु मुलींचे अपहरण करून धर्मांतर करण्याचे आरोप आहेत. पाकमध्ये प्रत्येक वर्षी ३०० हिंदु मुलींचे अपहरण होते.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Pakistanme Hindu ladkiyonke apharan aur dharmantaranke virodhme sabhi shaharome Hinduoka ugra andolan.
     Pak ke Hinduoki vyathake virodhme awaaj uthao !
जागो !
: पाकिस्तान में हिन्दू लडकियों के अपहरण और धर्मांतरण के विरोध में सभी शहरों में हिन्दुआें का उग्र आंदोलन
     पाक के हिन्दुआें की व्यथा के विरोध में आवाज उठाओ !

२१ व्या शतकाचा विचार करता तरुण पिढीला अत्यंत आवश्यक असे कार्य तुम्ही करत आहात ! - आमदार उल्हास (दादा) पाटील

शिरोळ येथील शिवसेनेचे आमदार उल्हासदादा पाटील यांची सनातनच्या प्रदर्शनास सदिच्छा भेट
   
  श्रीक्षेत्र नृसिंहवाडी - सनातन संस्था करत असलेल्या कार्याची सध्या पुष्कळ आवश्यकता आहे आणि हे कार्य करणे अपेक्षितही आहे. सनातनचे ग्रंथही समाजासाठी उपयुक्त असेच आहेत. २१ व्या शतकाचा विचार करता तरुण पिढीला अत्यंत आवश्यक असे कार्य तुम्ही करत आहात, अशी प्रतिक्रिया शिरोळ मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार श्री. उल्हास (दादा) पाटील यांनी व्यक्त केली. त्यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनास १४ ऑगस्ट या दिवशी सदिच्छा भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. किरण पोळ यांच्या हस्ते ग्रंथ आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री. पाटील यांनी संपूर्ण ग्रंथप्रदर्शन वेळ देऊन पाहिले. काही ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादनेही जिज्ञासेने पाहिली.

मद्यपी शिक्षकाकडून विद्यार्थिनींची छेड काढण्याची घटना !

     नांदगांव (नाशिक) - येथील सावरगांव येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत १३ ऑगस्ट या दिवशी मधल्या सुट्टीत संदीप पाटील या शिक्षकाने मद्य प्राशन करून इयत्ता ७ वीतील विद्यार्थिनींची छेड काढली. विद्यार्थ्यांनी याविषयी मुख्याध्यापकांना सांगितल्यानंतर त्यांनी पाटील यांना घरी पाठवले. (केवळ घरी पाठवून काय उपयोग ? अशा व्यसनी आणि वासनांध शिक्षकांना बडतर्फच करायला हवे ! - संपादक) दुसर्‍या दिवशी त्यांच्या खणाची झडती घेतली असता त्यात मद्याची बाटली आढळली. पालकांनी खडसवल्यावर मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकार्‍यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. (पालकांनो, शिक्षकांना शाळेतून काढून टाकेपर्यंत मुख्याध्यापकांचा पाठपुरावा घ्यायला हवा ! - संपादक)

खडसे अपकीर्तीप्रकरणी अंजली दमानिया यांच्याविरुद्ध न्यायालयात तक्रार

     धुळे - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि भाजप यांची अपकीर्ती केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या माजी पदाधिकारी अंजली दमानिया यांच्या विरोधात शिरपूर न्यायालयात भाजप युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष डॉ. मनोज महाजन यांनी १३ ऑगस्ट या दिवशी तक्रार प्रविष्ट केली आहे. दमानिया यांनी वर्ष २०१५ मध्ये वेळोवेळी खोटी विधाने करून माजी महसूलमंत्री खडसे यांची अपकीर्ती केली. पर्यायाने भाजपचीही अपकीर्ती झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच त्यांनी विविध मुलाखती देतांनाही खडसेंसह पक्षाची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने आरोप केले आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे.

मसुरी, मेरठमध्ये मदरशावर घुमट बांधण्यावरून तणाव

 आधी मदरसा चालू करून त्याचे मशिदीत रूपांतर करण्याचे डावपेच लक्षात घ्या !
  •  प्रशासनाने घुमटाचे बांधकाम थांबवले  
  • घुमट बांधू न देण्याचा ग्रामस्थांचा निर्धार
      गंगासागर (उत्तरप्रदेश) - मेरठ जिल्ह्यातील मसुरी या गावात मदरशावरील घुमटाच्या बांधकामावरून धार्मिक तणाव निर्माण झाला आहे. तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनी घटनास्थळी पोहचून घुमटाचे बांधकाम थांबवले. तणावाची स्थिती लक्षात घेऊन गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
     मसुरी गावात १५ वर्षांपासून एक मदरसा चालवण्यात येत आहे. त्याच ठिकाणी नमाजाचे पठणही करण्यात येते. गावकर्‍यांच्या मते काही मासांपूर्वी या मदरशामध्ये ध्वनीक्षेपकही लावण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे आणि आता मदरशावर घुमटही बांधण्यात येत आहे, जे चुकीचे आहे. गावकर्‍यांनी या घुमटाला आक्षेप घेतला असून हे बांधकाम होऊ देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांच्या मते गावातील एका गटाने घुमट बांधण्यासाठी साहाय्याची भूमिका घेतली असतांना गावातीलच दुसरा गट मात्र विरोध करत आहे, हे राजकारण आहे.

देशद्रोह्यांवर स्वतःहून कारवाई न करणार्‍या पोलिसांना तात्काळ निलंबित करा !

      फेसबूकवर भारतविरोधी मजकुराला समर्थन देणारा तौफीक अहमद या काश्मिरी तरुणास छत्तीसगड पोलिसांनी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली. तौफीकने फेसबूकवर भारतविरोधी मजकुराचे नुसतेच समर्थन केले असे नाही, तर तो मजकूर इतरांनाही पाठवला. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर बजरंग दलाचे भिलाई जिल्हाप्रमुख रतन यादव यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली.
     देशद्रोह्यांच्या विरोधात तत्परतेने पोलीस तक्रार करणारे रतन यादव यांचे अभिनंदन ! जी घटना एका हिंदुत्वनिष्ठाला लक्षात येते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना का लक्षात येत नाही ?
     हिंदूंना मी आवाहन करतो की, त्यांनी आतापासून देवाकडे केवळ स्वतःसाठीच न मागता राष्ट्र अन् धर्म रक्षणासाठीही मागण्याची सवय लावावी ! - ह.भ.प. रामकृष्णबुवा गर्दे, डिचोली, गोवा.

हिंदु धर्माविषयी पुष्कळ प्रेम असलेले आणि धर्मप्रसारासाठी आलेल्या साधकांप्रती भाव असणारे राजस्थानमधील मोडायत येथील ग्रामस्थ !

राजस्थानच्या ग्रामीण 
क्षेत्रात प्रसार करतांना आलेला अनुभव !
        मोडायत हे राजस्थानच्या बीकानेर जिल्ह्यातील एक छोटेसे गाव आहे. तेथे अत्यंत विरळ आणि अल्प वस्ती आहे. या गावातील एका शिक्षकाचा संपर्क आम्हाला मिळाला. राजस्थानातील ग्रामीण क्षेत्रात धर्मप्रसाराचा काय अनुभव येतो ?, हे पहाण्यासाठी आम्ही तेथे जायचे ठरवून त्या शिक्षकाशी संपर्क केला. शिक्षकाने हिंदु धर्मप्रसारासाठी येणार आहात, तर अवश्य या, असे सांगितले. दिवस ठरला. बीकानेरहून अंदाजे ५ घंट्यांचा प्रवास करून आम्ही दुपारी २ वाजता मोडायतला पोचलो. कार्यक्रम दुपारी २ वाजता ठरला असल्याने गावातील मुख्य रस्त्यालगत मोठ्या झाडाखालच्या कट्ट्यावर त्यांनी गावातील लहान मुले, युवक आणि प्रतिष्ठित मंडळी यांना बोलवले होते आणि सर्व जण ठीक २ वाजण्यापूर्वी तेथे उपस्थितही होते. आमची बस या झाडाजवळच थांबली. आम्ही उतरताच गावातील सर्वांनी हिंदु धर्म की जय !, हा जयघोष एकमुखाने चालू केला. त्यानंतर आम्हाला लगेच बैठकस्थळी बसवून त्यांनी पाणी दिले. दोघांचे स्वागत हिंदु धर्मानुसार टिळा लावून केले आणि बैठक चालू करण्यास सांगितले. बैठक अत्यंत उत्स्फूर्त झाली. सर्वांचा सहभाग होता. मध्ये मध्ये देण्यात येणार्‍या घोषणा बैठकीचा उत्साह वाढवत होत्या. बैठकीत भारतात विविध ठिकाणी हिंदूंची काय स्थिती आहे ?, याची आम्ही माहिती दिली. त्यानंतर गावातील एक प्रतिष्ठिताने पुढे येऊन त्यांच्याकडे असलेली जैसलमेर सीमावर्ती भागात चालू असलेल्या हिंदुविरोधी कारवायांची माहिती दिली. अशा प्रकारे एक वेगळा अनुभव या गावात आला.

गुप्तचर विभागाची (अ)कार्यक्षमता !

     कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या चांदीच्या रथामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी मुख्ममंत्र्यांनी सीआयडीचे विशेष अन्वेषण पथक नेमले; मात्र सीआयडीची चौकशी चालू होऊन सवा वर्ष उलटले, तरी श्री महालक्ष्मीदेवीच्या रथात शेकडो किलो चांदीचा घोटाळा करणारे कारागीर संजय साडविलकर आणि देवस्थानचे पदाधिकारी यांच्यावर अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. दोषींवर गुन्हे देखील प्रविष्ट झालेले नाहीत.

औषध खरेदी : निद्रिस्त ग्राहक आणि दायित्वशून्य फार्मासिस्ट !

१. औषधविक्रीचा व्यवसाय करण्यासाठी 
फार्मसीची पदविका असणे आवश्यक !
          औषधांच्या दुकानात आपल्याला जावेच लागते. आपल्या देशात औषधांच्या अनेक दुकानांमध्ये आईस्क्रीमपासून जीवरक्षक औषधांपर्यंत अनेक गोष्टी मिळतात. त्याचे नावच अनेकदा मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स असे असते; परंतु एक ग्राहक म्हणून आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की, मेडिकल स्टोअर आणि जनरल स्टोअर यांमध्ये भेद असतो. याचे भान दुकानदारांपासून ग्राहकांपर्यंत सर्वांनाच असायला हवे. मेडिकल स्टोअर्स चालू करण्यासाठी लागणारा परवाना असा कोणालाही मिळत नाही. त्यासाठी फार्मसी म्हणजे औषधनिर्माणशास्त्रातील किमान पदविका तरी असणे आवश्यक आहे. ही पात्रता असणार्‍या व्यक्तीलाच औषधांची विक्री करता येते.

हिंदूंनो, साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होणे, हे खरे स्वातंत्र्य असून ते मिळवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करा !

प.पू. परशराम पांडे
          या लेखाचा पूर्वार्ध आपण कालच्या अंकात पाहिला. आज उत्तरार्ध पाहूया.
३. गांधी घराणे पुन्हा सत्तेवर 
आल्यास संभाव्य धोक्यापासून सावधान !
      तिकडे राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचा प्रयत्न होत आहे. ते निष्क्रीय आहे. असे दिसल्यास प्रियांका वडेराला गांधी म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न राहील. एकूण गांधी घराणे चालू ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे. या गोष्टी जाणून हिंदूंनी जागृत होणे आवश्यक आहे आणि आता हिंदु राष्ट्र येण्याच्या दृष्टीने प्रयत्नरत रहायला पाहिजे, नाहीतर दुष्ट अशा आय.एस्.आय.एस्. सारख्यांकडून धर्मांतरासाठी सिद्ध रहाणे, अन्यथा आत्महत्या करणे, एवढेच उरणार आहे. तेव्हा हिंदूंनो, सावधान ! सावधान !!
४. धर्मावर आलेली ग्लानी दूर होण्यासाठी भगवंताने 
प.पू. डॉक्टरांच्या रूपाने अवतार घेतलेला असणे आणि 
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सनातन संस्थेची स्थापना करणे
      आज लोकसभेत आणि राज्यविधानसभेतसुद्धा गुंडांचाच भरणा आहे. अशा विस्कळीत झालेल्या लोकशाहीमुळे उलट मुसलमान आणि ख्रिस्तीच बलवत्तर होऊन तेच राज्य करू लागतील. यासाठी हिंदु राष्ट्र येणेच आवश्यक आहे, हे दिसून येते. ही आता ईश्‍वराचीच इच्छा आहे; कारण आजच्या या निधर्मीपणामुळे धर्मावर ग्लानी आली आहे. ती दूर करण्यासाठी भगवंताने अवतार घेतला आहे. सप्तर्षींनी १०.५.२०१५ या दिवशी प.पू. डॉक्टर हे विष्णूचे अवतार असल्याचे सांगितले आहे. तेच धर्मग्लानी दूर करून सनातन धर्माची प्रतिष्ठापना करू शकतात आणि तेच सर्व जीवप्राण्यांना खर्‍या अर्थाने स्वतंत्रता देऊ शकतात.

भारतात सरकार आहे का ? असे कोणालाही वाटावे अशी स्थिती !

     लष्कर-ए-इस्लाम या संघटनेने काश्मिरी हिंदूंना काश्मीर खोर्‍यातून निघून जावे अथवा मरण्यास सिद्ध व्हावे, असे लिखाण असलेली भित्तीपत्रके लावली आहेत. येथे ७ - ८ जुलैला विस्थापित काश्मिरी पंडित कर्मचार्‍यांच्या घरांवर देशद्रोह्यांनी दगडफेक केली होती, तसेच येथील हिंदूंच्या रिकाम्या घरांना आग लावली होती. त्यामुळे ६०० हिंदूंनी काश्मीरमधून पलायन केले होते.

हिंदूंची केविलवाणी सद्यस्थिती !

     आधुनिकतेच्या मोहक, रंगीबेरंगी व विषारी अजगराने सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांना विळख्यात घेतले आहे. आमची ‘हिंदु ही ओळखच नष्ट होऊ पहात आहे. हिंदु हा किड्या-मुंगीसारखे पुरुषार्थहीन जीवन जगतो व मरतो ! - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

सनातनची पत्रकारिता तेव्हाची आताही... !

श्री. भूषण केरकर
        सनातन प्रभातसाठी वार्ताहरसेवा करतांना सनातनची पत्रकारिता हा ग्रंथ आवर्जून वाचला होता. त्या वेळी त्या ग्रंथात दिलेली सनातनच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये मनाला भावली होती. मध्यंतरी काही संदर्भ शोधतांना पुन्हा सनातनची पत्रकारिता ग्रंथ हाती आला. त्या ग्रंथाविषयी असलेल्या आत्मियतेमुळे पुन्हा तो चाळला असता लक्षात आले की, वर्ष २००० मध्ये हा ग्रंथ प्रकाशित झाला, तेव्हाची सनातन प्रभातची वैशिष्ट्ये आताही तंतोतंत लागू पडतात. काळाची पावले ओळखून वर्ष १९९८ मध्येच सनातन प्रभातच्या माध्यमातून पत्रकारितेला एक नवा आयाम देणारे सनातन प्रभात नियतकालिकांचे संस्थापक संपादक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे द्रष्टेपण अधिकच ठळकपणे जाणवू लागले. सध्या चालू असलेल्या सनातन प्रभात वाचकवृद्धी मोहिमेच्या निमित्ताने त्या वैशिष्ट्यांचे मला लक्षात आलेले आताच्या काळातील संदर्भ उलगडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
१. वितरणवाद नव्हे, ध्येयवाद ! 
        आताच्या पत्रकारितेचे एकूण स्वरूप पाहिले, तर कोणती बातमी छापली, तर दैनिकाचे वितरण वाढेल, हितसंबंध कसे जपले जातील, याचाच प्राधान्याने विचार केला जातो. एका अनौपचारिक चर्चेच्या वेळी एका संपादकांनी सांगितले होते, आमच्या मालकाने आम्हाला एकच सांगितले आहे, वितरण अमुक सहस्र व्हायला हवे. त्यासाठी सर्व मोकळीक आहे. असेच अन्य दैनिकांचेही असते. इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचेही गणित टीआर्पीवरच अवलंबून असते. सनातन प्रभातचे मात्र तंत्रच आगळे आहे. 
        सनातनची पत्रकारिता ग्रंथात सनातन प्रभातच्या ध्येयाविषयी लिहिले आहे, सध्या विविध रोगांनी पीडित असलेल्या समाजपुरुषाला निरोगी बनवण्यासाठी समाजाला धर्मपालन करायला शिकवण्याबरोबरच समाजातील रज-तमांकित दुष्प्रवृत्तींचा परिहार करणे आवश्यक ठरते. सध्याच्या अनीती, अशांती, अनिश्‍चितता आणि स्वार्थ यांनी ग्रासलेल्या समाजव्यवस्थेच्या जागी सत्त्वगुणप्रधान, म्हणजे नीती, सहिष्णुता आणि प्रीती या दिव्य गुणांना प्रमाण मानणार्‍या समाजव्यवस्थेची रचना करायला हवी. असे करणे म्हणजे व्यक्तीची आणि समाजाची ऐहिक अन् पारमार्थिक उन्नती साधणेे होय. अशा सत्त्वगुणाधिष्ठित राष्ट्ररचनेच्या, म्हणजे हिंदु राष्ट्राच्या निर्मितीच्या कार्यात भाग घेणार्‍यांना वरील ध्येयाच्या अनुरोधाने सातत्याने मार्गदर्शन करणे, हेच ध्येय सनातनच्या पत्रकारितेने आपल्या समोर ठेवले आहे. 

खाजगी रुग्णालये रुग्णांना महागडी औषधे खरेदी करायला का लावतात ?

       रुग्णांमध्ये स्वत:च्या व्याधींविषयी असलेली एक प्रकारची भीती, तसेच त्याचे निदान, उपचार आदींविषयी असलेले अज्ञान यांचा अपलाभ अनेक खाजगी रुग्णालये उठवत असतात. रुग्णांची ही आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी सरकारी पातळीवर आजतरी उदासीनताच दिसून येत आहे. रुग्णांच्या चालत असलेल्या या लुटीविषयी संकेतस्थळांवरील माहितीच्या आधारे पुढील सूत्र संकलित करण्यात आली आहेत.
१. स्वस्त दरातील इंजेक्शन देणे शक्य 
असतांना त्याच आजारासाठी महागडे इंजेक्शन 
देऊन रुग्णांची लूट करणारी खाजगी रुग्णालये ! 
       खाजगी रुग्णालये औषधे आणि उपकरणे मोठ्या प्रमाणात सवलतीच्या दरात खरेदी करतात आणि ती रुग्णांना छापील किंमतीला विकून १५ ते ३५ टक्के नफा मिळवतात. एक प्रकारे ते रुग्णांचे शोषण करत असतात. वाढीव दराने औषधे खरेदी करण्याशिवाय रुग्णांकडे दुसरा पर्याय नसतो. या संदर्भात देहलीतील एका रुग्ण महिलेचे उदाहरण पाहुया. सदर महिलेला एक प्रकारचा कर्करोग झाला होता. या आजारासाठी त्यांना गुरुग्राम (गुडगाव) येथील एका नामांकित खाजगी रुग्णालयात नोव्हार्टीस कंपनीचे झोमेटा हे इंजेक्शन दर ३ ते ४ आठवड्यांतून एकदा, असे २ वर्षे देण्यात येत होते. त्यासाठी प्रत्येक वेळी त्यांच्याकडून १५ सहस्र २०० रुपये घेतले जात होते. त्या कामानिमित्त बेंगळुरू येथे गेल्या असता तेथील रुग्णालयाने तेच इंजेक्शन त्यांना ४ सहस्र रुपयांना दिले. किंमतीमध्ये असलेल्या या फरकाविषयी त्यांनी गुरुग्राम येथील रुग्णालयाकडे विचारणा केल्यानंतर रुग्णालयाने त्यांना सिप्ला कंपनीचे झोलड्रीया हे इंजेक्शन २ सहस्र ८०० रुपयांना देऊ केले. यावर त्या म्हणाल्या, त्यांनी हा अल्प किंमतीचा पर्याय मला अगोेदर का सांगितला नाही ? मला भाजी मंडई प्रमाणे घासाघीस का करावी लागली ? नंतर मी दुसर्‍या रुग्णालयात गेले असता नॅटको कंपनीचे झोल्डोनॅट नावाचे तेच इंजेक्शन ८०० रुपयांना मिळाले आणि त्यामुळे मला पुष्कळ चांगले वाटले.

बलात्कार करण्याच्या हिंस्र कृतीवर वेसण घालण्याचा एकमेव उपाय म्हणजे साधना !

डॉ. अजय जोशी
       डॉ. अजय जोशी यांनी पशूवैद्यकीय आणि पशूसंवर्धन या विषयात फ्रान्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी भारतीय ऋषि उद्योग प्रतिष्ठान, पुणे येथे कार्यकारी अधिकारी म्हणून १६ वर्षे चाकरी केली आहे. व्हेंट्री बॉयोलॉजिकल्स, पुणे येथे १६ वर्षे उत्पादन व्यवस्थापक म्हणून सेवा केली आहे. आता ते सनातनच्या रामनाथी आश्रमात पूर्णवेळ सेवा करत आहेत. पशूवैद्यकीयचे शिक्षण घेत असतांना आणि चाकरी करत असतांना प्राणीसुद्धा आचारधर्माचे पालन करतात, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी टिपलेली प्राण्यांमधील आचारधर्माची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
१. बलात्काराचे सर्वाधिक 
प्रमाण असलेला भारत देश !
       भारत जगात विकसित देशांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. याच भारतात प्रत्येक दिवशी ९२ स्त्रियांवर बलात्कार होतात. हे प्रमाण अधिक आहे. पुरुषांनी बलात्कार करण्याचा धोका म्हणजे स्त्रियांवर एक टांगती तलवारच आहे.

मराठी भाषेतील अनेकार्थी शब्द !

      एका शब्दाला शतकावर प्रतिशब्द असणारी साक्षात् देववाणी संस्कृत जिची जननी आहे, अशा माय मराठीमध्येही एका शब्दातून अनेक अर्थबोध होतात. अमृतातेही पैजा जिंके, अशा मराठी भाषेचे हे भाषासौष्ठवच म्हणावे लागेल ! (एका शब्दाच्या अनेक अर्थांमुळे शब्दजन्य विनोदाची निर्मितीही काही प्रसंगांत होते.) असे काही अनेकार्थी शब्द, त्यांचे अर्थ, तसेच व्याकरणाच्या विरामचिन्हांमुळे पालटणारे वाक्याचे अर्थ सांगणारे हे सदर ! 

व्हिडिओ गेम्स : मती गुंग करणारे राक्षस !

प्रा. कु. शलाका सहस्रबुद्धे
        गेल्या काही दिवसांपासून जगभरातील भ्रमणभाषधारकांना पोकेमॉन गो या खेळाने वेड लावले आहे. जपानच्या निंटेंडो या आस्थापनाने या खेळाची निर्मिती केली असून अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांच्या पाठोपाठ दुर्दैवाने आता भारतातही हा खेळ लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आतापर्यंत ५ टक्के अ‍ॅन्ड्रॉईड भ्रमणभाषधारकांनी हा खेळ डाऊनलोड केला असून निंटेंडो या आस्थापनाचा व्यापार अनुमाने ५० सहस्र कोटी रुपयांनी वाढला आहे. या खेळातून प्रतिदिन १६ लाख डॉलर्स म्हणजे ११ कोटी रुपयांची कमाई होते. व्हॉटस् अ‍ॅप वापरणार्‍यांच्या संख्येपेक्षाही अधिक लोक हा खेळ खेळू लागले आहेत. आतापर्यंतचे व्हिडिओ गेम्स आणि स्मार्ट फोन्स यांवरील खेळ या सर्वांना या खेळाने मागे टाकले आहे.
१. पोकेमॉन गो : वास्तव 
जगाशीही संबंध असणारा घातक खेळ ! 
        पोकेमॉन हा शब्द पॉकेट मॉन्स्टर या शब्दांचे लघुरूप आहे. काही वर्षांपूर्वी पोकेमॉन हे लोकप्रिय कार्टून पात्र होते. पोकेमॉन गो हा खेळ भ्रमणभाषचा छायाचित्रक आणि जीपीएस् यंत्रणा वापरून खेळला जातो. यामध्ये आपल्या आजूबाजूला असणारे पोकेमॉन पकडून गुण (पॉईंटस्) मिळवून टप्पे (लेव्हल्स) पार करायचे असतात. यामध्ये वास्तव जगातील परिसर या खेळाची पार्श्‍वभूमी बनत असल्याने अन्य खेळांप्रमाणे या खेळात केवळ काल्पनिक पार्श्‍वभूमी नसून वास्तव जगाशीही त्याचा संबंध येतो.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

पुणे येथील दाते कुटुंबियांनी प.पू. डॉक्टरांच्या सहवासात अनुभवलेली त्यांची अनमोल प्रीती आणि संस्मरणीय स्मृतींची आनंददायी शिदोरी !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
         वर्ष १९९५ पासून पुण्यातील पू. दातेआजी, त्यांचे दोन्ही सुपुत्र आणि कुटुंबीय यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाचा लाभ ते त्यांच्या घरी राहिल्यामुळे मिळाला. प.पू. डॉक्टरांच्या अनमोल सत्संगात त्यांना पदोपदी शिकायला मिळाले, तसेच अनेक अनुभूतीही आल्या. कौटुंबिक अडचणीच्या वेळी साहाय्य करणार्‍या गुरुमाऊलीची दाते कुटुंबियांनी बहुमूल्य प्रीती अनुभवली. सहजसोप्या पद्धतीने कृतीतून शिकवणार्‍या आणि सतत आनंदावस्थेत ठेवणार्‍या परात्पर गुरूंच्या सौ. ज्योती दाते, त्यांचे दीर श्री. निरंजन दाते आणि कुटुंबीय यांनी जपलेल्या अविस्मरणीय स्मृती त्यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त येथे देत आहोत.
१. सर्वांना आपल्या 
प्रीतीने जोडणारी प्रेमळ माऊली ! 
पू. दातेआजी
१ अ. पहिल्याच भेटीत प.पू. डॉक्टरांनी आपण परके नसून घरातील एक सदस्य असल्याचे सांगून औपचारिकता न्यून करणे : वर्ष १९९५ मध्ये जेव्हा सर्वप्रथम प.पू. डॉक्टर पुण्याला आमच्या घरी आले, तेव्हा दारात पणत्या लावणे, फुलांच्या पायघड्या घालणे, तोरण लावणे, प.पू. डॉक्टरांना ओवाळणे अशा प्रकारे त्यांचे स्वागत आमच्याकडून केले गेले. दुसर्‍यांदा प.पू. डॉक्टर घरी येणार होते, तेव्हाही आम्ही अशाच प्रकारे त्यांचे स्वागत करण्याचे नियोजन केले होते. त्या वेळी प.पू. डॉक्टरांनी सांगितले, तुम्ही अशा प्रकारे स्वागत करणे, याचा अर्थ मी तुम्हाला परका वाटतो. मी तुमच्या घरचाच आहे. त्यामुळे असे काहीही इथून पुढे करायचे नाही. 

देवस्थानाला अर्पण केलेला निधी धर्मकार्यासाठी उपयोगात आणला जावा ! - श्री. सतिश कोचरेकर, प्रवक्ता, सनातन संस्था

जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर देवस्थान देईल का दान ? या विषयावर चर्चासत्र
    
श्री. सतिश कोचरेकर
मुंबई - देवस्थानांच्या निधीतील ५० टक्के निधी रुग्णसेवेसाठी उपयोगात आणावा, हा महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांचा हेतू उदात्त असल्याने आम्हाला त्यासंदर्भात काहीच वावडे नाही; मात्र भाविक जेव्हा मंदिरात धन अर्पण करतात, तेव्हा त्यांनी धार्मिक हेतूने अर्पण केलेले असते. याचा विनियोग धर्मकार्यासाठीच व्हायला हवा. देवस्थान सामाजिक कार्यासाठी सरकारला कराच्या रूपातून पैसा देतच आहे. हा पैसादेखील सरकारला अल्प पडत असेल, तर आमदारांचे वेतन वाढवण्यापेक्षा तो पैसा रुग्णांसाठी उपयोगात आणता येऊ शकतो. वक्फ बोर्डाकडेही पुष्कळ संपत्ती आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी ४ एकर परिसरात अफझलखानाचे स्मारक उभारले जाते. चर्चलाही सातत्याने निधी मिळतो. हा निधी धर्मांतरासाठी वापरण्यात येतो. सर्वांसाठी समान न्याय आहे तर ख्रिस्ती आणि मुसलमान यांनीही त्यांचा निधी मानवतावादी कार्यासाठी द्यावा, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. सतिश कोचरेकर यांनी केले. जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या, देवस्थानांनी ५० टक्के निधी रुग्णसेवेसाठी द्यावा या सूचनेच्या पार्श्‍वभूमीवर देवस्थान देईल का दान ? या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सतिश कोचरेकर यांच्यासह श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे माजी अध्यक्ष अधिवक्ता शशिकांत पागे, सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे, श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, भाजपचे प्रवक्ता माधव भंडारी, शिर्डी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष निलेश कोते तसेच हिंदु महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रमोद जोशी हे उपस्थित होते. प्रसन्न जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

स्वेच्छेपेक्षा ईश्‍वरेच्छेला महत्त्व देणारे आणि पत्नीला साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणारे श्री. कृष्णा आय्या !

श्री. कृष्णा आय्या
        श्रावण शुक्ल पक्ष त्रयोदशी (१६.८.२०१६) या दिवशी देवद आश्रमातील साधक श्री. कृष्णा आय्या यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
श्री. कृष्णा आय्या यांना वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. प्रामाणिकपणा
अ. माझे यजमान आर्.टी.ओ.च्या संदर्भातील कामे करत होते. त्यांच्यातील प्रामाणिकपणामुळे समाजातील व्यक्तींचा त्यांच्यावर पूर्ण विश्‍वास होता. त्यामुळे त्यांना अल्प कालावधीत यश मिळाले. 
आ. प्रामाणिकपणामुळे नात्यातल्या एका व्यक्तीने माझ्या यजमानांना त्यांच्या आस्थापनाचा पूर्ण कारभार सांभाळायला सांगितला होता; परंतु त्या वेळी यजमानांचा पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय झाल्याने त्यांनी या गोष्टीला नकार दिला. या व्यवहाराला बळी न पडता पूर्णवेळ साधक होण्याच्या निर्णयावर ते ठाम होते. 

हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयकांच्या कार्यशाळेमध्ये सहभागी झाल्यावर एका साधकाला थकव्याचा त्रास दूर होण्याविषयी आलेली अनुभूती

       मी पंचम अखिल भारतीय हिंदु अधिवेशन झाल्यानंतर हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयकांच्या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी रामनाथी (गोवा येथील) आश्रमात आलो. त्यापूर्वी माझ्यावर पुष्कळ प्रमाणात काळ्या शक्तीचे आवरण होते. त्यामुळे मला नेहमी थकवा जाणवत होता. अधिवेशनानंतर जेव्हा मी सनातन आश्रमात आलो, तेव्हा मला दुपारी २ घंटे तरी विश्रांती घ्यावी लागत होती. नंतर स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया सत्संग चालू झाला अन् माझ्यावरील काळ्या शक्तीचे आवरण नष्ट झाले. त्यामुळे मी सकाळी सकाळी ९.३० वाजल्यापासून रात्री ११.३० वाजेपर्यंत विश्रांती घेतल्याविना सहभागी होऊ शकलो. त्या वेळी अन्य साधकांच्या स्वभावदोषांवर प्रक्रिया सत्संग चालू असतांना सत्संगाचा माझ्यावर चांगला परिणाम होत आहे, असे मला जाणवले. - श्री. प्रसाद म्हैसकर, रत्नागिरी. (२८.६.२०१६)

साधनेविषयीची प्रेरणादायी सूत्रे !

१. परमार्थ साधणे, हाच खरा स्वार्थ !
२. साधना हा सुखाच्या विरोधातील लढा आहे !
३. जेव्हा आपण साधनेसाठी पळण्याचा प्रयत्न करू, त्या वेळी आपण पडू शकतो (चुका होऊ शकतात); पण आपल्याला पुन्हा उठायचे आहे. ससा पडण्यामुळे नाही, तर पडून राहिल्याने शर्यत हरला.
४. जमेल तसे करणे, असा विचार साधकाचा नसावा. ईश्‍वराशी एकरूप होण्यासाठी सर्व करायचे आहे आणि परिपूर्ण करायचे आहे, असा विचार साधकाने करायला हवा, तरच क्षमता वाढेल.
(संदर्भ : अज्ञात)
- श्री. आनंद जाखोटिया, भुवनेश्‍वर, ओडिशा. (२.८.२०१६)

भोपाळ (मध्यप्रदेश) येथील ज्येष्ठ विचारवंत प्रा. रामेश्‍वर मिश्र (वय ७० वर्षे) यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे

प्रा. रामेश्‍वर मिश्र
        भोपाळ (मध्यप्रदेश) येथील ज्येष्ठ विचारवंत प्रा. रामेश्‍वर मिश्र (वय ७० वर्षे) हे जून २०१६ मध्ये अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी रामनाथी (गोवा) येथे आले होते. त्या वेळी ते येथील सनातन आश्रमामध्ये भावसत्संगाला उपस्थित राहिले होते. तेव्हा मला त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.
१. प्रा. रामेश्‍वर मिश्र यांची प.पू. डॉक्टरांवर अतिशय श्रद्धा आहे. साधनेतील सर्व सूत्रे त्यांना अंतर्मनापासून ग्रहण होतात.
२. त्यांच्यात विद्वत्तेचा अहं नसून कमालीची विनयता आहे. तसेच त्यांची विचारप्रक्रिया आध्यात्मिक स्तरावरची असते.
३. भावसत्संगामध्ये त्यांचे ध्यान लागत होते. तसेच त्या प्रसंगी एका संतांचे एवढा वेळ सान्निध्य मिळाले, या विचाराने त्यांना फार कृतज्ञता वाटत होती आणि आनंदही होत होता.
४. भावसत्संगानंतर ते म्हणाले, आजचा दिवस अतीशुभ आहे.
५. प्रा. मिश्र यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के आहे, असे मला वाटले.
        (जून २०१६ मध्ये झालेल्या अखिल भारतीय हिंदु अधिवेशनात प्रा. रामेश्‍वर मिश्र यांची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. - संपादक)
- श्री. नीलेश सिंगबाळ, वाराणसी. (२४.६.२०१६)

देवाच्या कार्याचा कार्यकारणभाव कळणे कठीण !

अधिवक्ता नीलेश सांगोलकर
      श्री. नीलेश सांगोलकर वर्ष २००२ ते २००७ या काळात मिरज आश्रमात पूर्णवेळ साधक म्हणून रहात होता. पुढे त्याने वकिलीचे शिक्षण घ्यायचे ठरवले. तेव्हा आम्हा सर्वांना वाटले, साधना करायची सोडून हा मायेत काय चालला ? पुढे तो वकील झाला आणि व्यवसाय करू लागला. आता तो हिंदु विधीज्ञ परिषदेचे कार्य करतो. त्याने आतापर्यंत काही वकिलांना कार्याशी जोडले आहे. लवकरच तो सर्वत्र जाऊन अनेक वकिलांना कार्याशी जोडणार आहे. पुढे आपल्याला हिंदुत्वनिष्ठ वकील लागतील; म्हणून देवाने त्याला वकील बनण्याची बुद्धी दिली, हे आता लक्षात आले. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती निर्मित धर्मसत्संगांचे केबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून प्रसारण करण्याचे नियोजन करावे !

जिल्हासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना
     १८.८.२०१६ या दिवशी राखीपौर्णिमा आहे. त्या निमित्ताने या संदर्भातील महत्त्व विशद करणारा हिंदी विशेष धर्मसत्संग उपलब्ध आहे.
     २४.८.२०१६ या दिवशी श्रीकृष्ण जयंती आहे. त्या निमित्ताने धार्मिक कृतियोंका शास्त्र या अंतर्गत २ आणि ईश्‍वरप्राप्ती के लिए अध्यात्मशास्त्र या विषयांतर्गत ४ असे हिंदी भाषेतील एकूण ६ धर्मसत्संग उपलब्ध आहेत.
     या प्रत्येक सत्संगाचा कालावधी २८ मिनिटे आहे.
     या धर्मसत्संगांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार होण्यासाठी साधकांनी पुढील प्रयत्न करावेत.
१. स्थानिक केबल अथवा दूरचित्रवाणी यांवरून या धर्मसत्संगांचे प्रसारण करण्याचे नियोजन करावे.
२. गावोगावी चालू असणार्‍या धर्मशिक्षणवर्गात आवश्यकतेनुसार हे धर्मसत्संग दाखवावेत.
     धर्मसत्संग एम्.पी.४ (MP4) फॉरमॅटमध्ये उपलब्ध असून त्याची लिंक मेलद्वारे जिल्ह्यांना पाठवण्यात आली आहे. वाचक, हिंदुत्ववादी किंवा हितचिंतक यांना हे धर्मसत्संग आपल्या गावात, संघटनेत, स्थानिक मंदिरात, तसेच इतरत्र दाखवायचे असल्यास त्यांनी स्थानिक साधकाकडून त्याची लिंक घ्यावी.
     या संदर्भात काही शंका असल्यास सौ. वृंदा मराठे यांना ८४५१००६०८५ या क्रमांकावर अथवा avmagani@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क करावा.

सनातनच्या ग्रंथनिर्मितीच्या कार्यात मुद्रणसेवेसाठी साधकांची आवश्यकता !

     परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांपैकी २९० ग्रंथ-लघुग्रंथ यांची निर्मिती आतापर्यंत झाली असून आणखी सुमारे ४ सहस्र ५०० हून अधिक ग्रंथ होऊ शकतील इतके ज्ञान संग्रही आहे. या ग्रंथांच्या निर्मितीची प्रक्रिया अधिक वेगाने होण्याच्या दृष्टीने, तसेच समाजातून येणार्‍या ग्रंथांच्या प्रचंड मागणीमुळे मुद्रणसेवेसाठी साधकांची आवश्यकता आहे. तरी ज्या साधकांना मुद्रणासंबंधी ज्ञान आहे (उदा. ऑफसेट प्रिंटींग, मल्टीकलर प्रिंटींग, सिंगल करल प्रिंटींग), तसेच पूर्णवेळ अथवा अर्धवेळ आश्रमात राहून मुद्रणसेवा करण्याची इच्छा आहे अथवा शिकण्याची इच्छा आहे, त्यांनी मुद्रणसेवेत सहभागी होण्यासाठी स्वत:ची पुढील माहिती जिल्हासेवकांच्या मार्फत पाठवावी. इच्छुकांना ओपन ऑफीस, एक्सेल, कोरल ड्रॉ, इनडिझाईन, ई-मेल यांचे जुजबी ज्ञान असावे.
१. माहिती
अ. पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्र., वय आणि शिक्षण
आ. मुद्रणसेवेचा काही अनुभव आहे का ?
इ. सेवेचे स्वरूप - पूर्णवेळ कि अर्धवेळ
२. माहिती पाठवण्यासाठी पत्ता
     माहिती श्री. संदेश हजारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (भ्रमणभाष क्र. ८४५१००६०८७) यांना टपालाने किंवा granthchapai@gmail.com या संगणकीय पत्त्यावर पाठवावी.

पितृपक्षाच्या निमित्ताने प्रबोधन करण्यासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !

साधकांना सूचना !
     पितृपक्षाच्या निमित्ताने प्रबोधन करण्यासाठी पितृपक्षाचे धर्मशास्त्र सांगणारे ए ४ आकारातील पाठपोट हस्तपत्रक सिद्ध करण्यात आले आहे. या हस्तपत्रकांचे नियोजनपूर्वक सुयोग्य ठिकाणी वितरण करता येईल. तसेच मृत्यूनंतरच्या क्रियाकर्माचे शास्त्र याविषयीचे २.२५ फूट ३.५ फूट आकारातील १६ धर्मशिक्षण फलक आणि दत्ताच्या नामजपाचे महत्त्व या संदर्भातील १ फलक उपलब्ध करण्यात आला आहे. हे फलक सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करता येतील. हस्तपत्रक आणि वरील फलक यांसाठी प्रायोजक मिळवू शकतो. हे फलक नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध आहेत.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. 
प्रारंभ - श्रावण शुक्ल पक्ष चतुर्दशी (१७.८.२०१६) दुपारी ४.२७ वाजता 
समाप्ती - श्रावण पौर्णिमा (१८.८.२०१६) सकाळी ११.५३ वाजता
दोन दिवसांनी पौर्णिमा आहे.

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

आपल्या अंतरातील राष्ट्र-धर्म प्रेमाची ज्योत 
प्रज्वलित करणारे नियतकालिक सनातन प्रभात 
अनेकानेक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्यासाठी श्री. दिनेश 
एम्.पी. यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून प्रयत्न करा !
         कर्नाटक राज्यातील मंगळुरू येथील श्री. दिनेश एम्.पी. हे एक व्यावसायिक आहेत. मागील ४ वर्षांपासून ते सनातन संस्थेच्या कार्यात कृतीशीलतेने सहभागी होत आहेत. त्यांनी स्वतःचा व्यवसाय सांभाळून साप्ताहिक सनातन प्रभातचे १ सहस्र वाचक बनवण्याचे ध्येय काही दिवसांपूर्वी निश्‍चित केले आहे. त्यांच्याकडे येणार्‍या ग्राहकाला ते नियतकालिकाचे महत्त्व अभ्यासपूर्ण सांगून वाचक होण्याची विनंती करतात. अशा प्रकारे त्यांचे अखंड प्रयत्न चालू असून आतापर्यंत त्यांनी ३०० जणांना वाचक होण्यास उद्युक्त केले आहे. त्यांच्यातील तळमळीमुळे या ध्येयाची लवकरच पूर्तता होईल, यात शंका नाही !
         सर्वत्रचे साधक, तसेच वाचक, हितचिंतक आणि कृतीशील धर्माभिमानी यांनीही श्री. दिनेश एम्.पी यांच्याप्रमाणे अधिकाधिक जणांपर्यंत हे नियतकालिक पोचवण्यासाठी ध्येय ठेवून प्रयत्न करावेत. आपले नातेवाईक, स्नेही आणि परिचित यांनाही या नियतकालिकाचे वाचक होण्यासाठी प्रवृत्त करावे !

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

बुद्धीवाद संपल्यावर ईश्‍वरी 
शक्तीच्या उत्क्रांतीचा उगम होणे
       बुद्धीवादाच्या मर्यादा जेथे संपतात, तेथेच ईश्‍वरी शक्तीच्या उत्क्रांतीचा उगम होतो. इथेच मनुष्य आध्यात्मिक विचार करू लागतो.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
खरे समजून घेणे
सुनो सोचो समझो ।
सुनो समझो सोचो ।
भावार्थ : सुनो म्हणजे ऐका, सोचो म्हणजे विचार करा आणि समझो म्हणजे समजून घ्या. पहिल्या ओळीत सुनो सोचो समझो आहे. त्याचा अर्थ असा की, ऐकल्यावर मन आणि बुद्धी यांद्वारे विचार करून काय ते समजून घ्या. यातील समजून घेणे मन आणि बुद्धी यांच्या माध्यमातून असल्याने ते मायेच्या संदर्भात आहे. अभिमन्यूला केवळ हीच ओळ ठाऊक होती, म्हणून तो चक्रव्यूहात अडकला. याउलट दुसर्‍या ओळीत सुनो समझो सोचो आहे. त्याचा अर्थ असा की, ऐकल्यावर जिवाने ती गोष्ट समजून जाणे, त्याची अनुभूती घेणे आणि नंतर त्याविषयी विचार करणे. हे ब्रह्माच्या संदर्भात आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
पांडित्य दाखवणारे केवळ पुस्तकाप्रमाणे असणे !
     पुस्तकात शाब्दिक ज्ञान असते. ते पुस्तकाला स्वतःला समजत नाही, तसेच पांडित्य दाखवण्यापुरते ज्यांना शाब्दिक ज्ञान असते, त्यांना त्या ज्ञानाची अनुभूती आलेली नसते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संपादकीय

अमेरिकेचे पाप ! 
       अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी बराक ओबामा हे इसिसचे संस्थापक आणि हिलरी क्लिंटन या इसिसच्या सहसंस्थापिका आहेत, असे विधान केले आहे. अमेरिकेतील पुढारलेली आणि स्वतःला आधुनिकतावादी म्हणणारी जनता ट्रम्प यांना गांभीर्याने घ्यायला सिद्ध नाही. वरकरणी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला लक्ष्य करण्यासाठी ट्रम्प यांनी हे विधान केले, असे राजकीय धुरीणांना वाटत असले, तरी ट्रम्प यांच्या विधानात तथ्य आहे. आतापर्यंत ट्रम्प यांनी जी आतंकवाद आणि मुसलमान यांच्याविषयी विधाने केली आहेत, ती अतिशयोक्तीची वाटत असली, तरी त्यामागे गहन विचार आहे. इसिसच काय, अनेक जिहादी संघटनांच्या निर्मितीला अमेरिका उत्तरदायी आहे. ट्रम्प यांनी इसिसच्या उदयाला ओबामा यांना उत्तरदायी धरले असले, तरी या पापाला अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आणि ट्रम्प ज्या रिपब्लिकन पक्षाचे आहेत, त्याचे नेते जॉर्ज बुशही उत्तरदायी आहेत, हेही ट्रम्प यांनी लक्षात घ्यावे. थोडक्यात अमेरिकेचा डेमोक्रॅटिक पक्ष असो किंवा रिपब्लिकन पक्ष, त्यांनी अमेरिकेचे हित जपत जगात दादागिरी गाजवण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेने केलेल्या कित्येक पापांचे फळ जगाला भोगावे लागत आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn