Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

एबीपी माझाच्या पत्रकाराने मागितली गोरक्षकांची क्षमा !


आंदोलन करतांना गोरक्षक आणि मध्यभागी बोलतांना श्री. मिलिंद एकबोटे
बोगस गोरक्षक असा आरोप करत विपर्यस्त वृत्त प्रसारित केल्याचे प्रकरण  
संघटितपणे आणि वैध मार्गाने आंदोलन करून एबीपी माझाच्या पत्रकाराचे 
बिंग फोडणारे श्री. मिलिंद एकबोटे आणि अन्य गोरक्षक यांचे अभिनंदन !
गोरक्षकांनी उत्स्फूर्तपणे दिलेल्या घोषणा
  •  मंदार गोंजारीचे करायचे काय, खाली डोके वर पाय !
  •  एबीपी माझाचे करायचे काय, खाली डोके वर पाय !
  •  भ्रष्टाचारी एबीपी माझाचा धिक्कार असो !
  •  गोमातेशी गद्दारी करणार्‍या एबीपी माझाचा धिक्कार असो !
     पुणे - येथील गोरक्षक श्री. शिवशंकर स्वामी आणि श्री. मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे पुण्यातील पत्रकार मंदार गोंजारी यांनी बोगस गोरक्षक असा आरोप करत विपर्यस्त वृत्त प्रसारित केले होते. त्या वृत्ताचा निषेध करण्यासाठी अखिल भारत कृषी गोसेवा संघ आणि समस्त हिंदु आघाडी यांच्या १५० हून अधिक गोरक्षकांनी ९ ऑगस्ट या दिवशी एबीपी माझाच्या पुण्यातील कार्यालयाबाहेर हातात भगवे झेंडे आणि भगव्या टोप्या परिधान करून वैध मार्गाने आंदोलन केले. त्यानंतर निवेदन सादर करून मंदार गोंजारी यांना क्षमा मागण्यास भाग पाडले.

राजस्थानच्या भरतपूरमध्ये गोतस्करांकडून गोरक्षकाची गोळ्या झाडून हत्या !

गोरक्षकांना समाजकंटक ठरवतांना गोतस्करांना प्रोत्साहन
 मिळत नाही ना, असे या घटनेवरून वाटल्यास आश्‍चर्य वाटू नये !
     भरतपूर (राजस्थान) - येथील कनवाडी येथे हरिराम उपाख्य हरिसिंह ठाकूर या ४२ वर्षीय गोरक्षकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हे गोरक्षक येथे झोपलेले असतांना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर येथील गावकर्‍यांनी गोतस्करांवर हत्येचा आरोप करत आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी येथे मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात केले आहे. पोलिसांनी या हत्येप्रकरणी ३ जणांना कह्यात घेतले आहे. हरिराम यांनी आतापर्यंत गोतस्करी करण्यात येणारे अनेक ट्रक पकडून गायींची सुटका केली आहे. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.

मुसलमान आणि दलित यांची गोमांस निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी !

केंद्रसरकारने हिंदूंची नाही, तर किमान मुसलमान आणि दलित यांची मागणी तरी पूर्ण करावी !
     नवी देहली - गोमांसाच्या निर्यातीत मुसलमानेतर पैसे कमवत आहेत. देशातील गोमांस निर्यात करणारी चार मोठी आस्थापने मुसलमानेतरांची आहेत. असे असतांना मुसलमान आणि दलित यांना गोहत्येवरून लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे देशातील गोमांसाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी मुसलमान धर्मगुरु आणि दलित यांनी केली आहे. येथील मावळंंकर सभागृहात इत्तेहाद मिल्लत काऊन्सिलने आयोजित केलेल्या संमेलनात ही मागणी करण्यात आली.
     मोदी यांनी गोरक्षकांविषयी केलेल्या विधानावर या संमेलनात टीका करण्यात आली. मोदी यांचे विधान केवळ दिखाऊपणा आहे. कारण मुसलमान आणि दलित यांना लक्ष्य करणारे भाजप अन् त्याच्याशी जोडलेल्या संघटनांचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.

थायलंडमध्ये ७ बॉम्बस्फोटांत ४ जण ठार !

उघूर मुसलमानांवर संशय !
     हुआ हीन (थायलंड) - थायलंडमध्ये ११ ऑगस्टच्या रात्रीपासून १२ ऑगस्टच्या सकाळपर्यंत झालेल्या ७ बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ४ नागरिकांचा मृत्यू झाला, तर २४ जण घायाळ झाले. घायाळांमध्ये ८ जण विदेशी नागरिक आहेत. हुआ हीन, सुरत थानी, त्रांग, फांग न्गा आणि फुंकेत बेटावरील पतोंग येथे हे स्फोट घडवण्यात आले. या स्फोटांचे दायित्व अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेले नसले; तरी हे कृत्य चीनमधील उघूर मुसलमानांच्या गटाने केल्याचा संशय सूत्रांनी वर्तवला आहे. गेल्या महिन्यात थायलंड सरकारने १०० उघूर लोकांना चीनमध्ये पाठवण्यात आले होते. त्याच्या सूड घेण्यासाठी हे स्फोट घडवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
     थायलंडच्या राणींच्या वाढदिवसानिमित्त येथे सुट्टी घोषित करण्यात आली होती. त्या वेळी हे स्फोट घडवण्यात आले. हुआ हीन आणि फुंकेत बेट ही दोन्ही ठिकाणे पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. थायलंडमध्ये संभ्रम आणि गोंधळ निर्माण करण्यासाठी हे स्फोट घडवण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान ओचा यांनी दिली आहे.

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर टाळा ! - राष्ट्रध्वज अंबरनाथ तालुका स्तरीय समितीचे आवाहन

हिंदु जनजागृती समितीचा सहभाग 

डावीकडून तालुक्याचे तहसीलदार श्री. जोशी,
श्री. मंदाडे, श्री. पाटील, श्री. अहीर आणि श्री. सोनोने

       अंबरनाथ (जिल्हा ठाणे), १२ ऑगस्ट (वार्ता.) - शासकीय आणि निमशासकीय कार्यालयाच्या आवारात, शाळांमध्ये, तसेच सार्वजनिक ठिकाणी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी ध्वजारोहण करण्यात येते. त्या दिवशी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी अंबरनाथ येथे ११ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रध्वज अंबरनाथ तालुका स्तरीय समितीच्या वतीने बैठक घेण्यात आली होती. या वेळी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वज वापरणे गुन्हा आहे. प्लास्टिकचा राष्ट्रध्वज इतरत्र कुठे विकत असल्यास त्यावर कारवाई करण्यात यावी आणि रस्त्यावर ध्वज टाकून त्याची विटंबना होऊ नये, या संदर्भात तसेच शाळांमधून राष्ट्रध्वजाचा मान राखावा यावर व्याख्याने घेण्यात यावी, असे परिपत्र तालुक्याचे तहसीलदार श्री. प्रशांत जोशी यांनी उपस्थित अधिकार्‍यांना काढण्यास सांगितले. त्याचसमवेत नगरपरिषदेला सूचना देऊन ठिकठिकाणी फ्लेक्स लावून त्याविषयी जागृती करू, असेही सांगितले. या बैठकीत शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी श्री. गजानन मंदाडे, अग्निशमन विभागाचे अधिकारी श्री. पाटील आणि श्री. सोनोने, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. विरेश अहीर उपस्थित होते.

कराड आणि वडूज येथेही पोलीस अन् प्रशासन यांना निवेदन

राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम 

कराड येथे नायब तहसीलदारांना
(मध्यभागी) निवेदन देतांना राष्ट्राभिमानी

निवेदन स्वीकारतांना वडूज येथील पोलीस निरीक्षक


        कराड - राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी येथील नायब तहसीलदार मीनल भामरे, कराड तालुका ग्रामीण पोलीस, कराड शहर पोलीस, गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. नागरिकांचे प्रबोधन व्हावे, यासाठी समितीने सिद्ध केलेली राष्ट्रध्वजाचा मान राखा ही विशेष चित्रफीत चित्रपटगृहे आणि केबलवाहिन्या यांना दाखवण्यास अनुमती द्यावी, अशी विनंतीही निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे श्री. सोमनाथ वेदपाठक, श्री. अनिल कडणे, श्री. चिंतामणी पारखे, हिंदु एकताचे श्री. सुहास बाबर, भाजपचे श्री. गणेश कापसे आणि कराड गोरक्षक प्रमुख श्री. गोरख शिंदे उपस्थित होते. वडूज येथील पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के यांनाही याच विषयाच्या अनुषंगाने निवेदन देण्यात आले.

शुक्लतीर्थावर उत्साहात श्री नृसिंह सरस्वती मूर्तीचे आगमन आणि मूर्तीस मंगलमय स्नान !

श्री नृसिंह सरस्वती यांची मूर्ती
सहस्रों भाविकांनी कृष्णा तीरावर घेतला पवित्र स्नानाचा लाभ !
     नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) - कन्यागत महापर्वकाळ महोत्सवास ११ ऑगस्टपासून उत्साहात प्रारंभ झाल्यानंतर १२ ऑगस्ट या दिवशी पहाटे ४ वाजता श्री नृसिंह सरस्वतींच्या उत्सवमूर्तीचे शुक्लतीर्थाकडे आगमन झाले. या वेळी कन्यागत वर्षातील चातुर्मासासाठी आलेले करवीरपिठाचे पीठाधीश्‍वर स्वामी विद्यानृसिंह भारती आणि गाणगापूर येथील श्री वल्लभानंद महाराज यांची वंदनीय उपस्थिती होती. पुराचे पाणी ओसरल्याने भाविकांना शुक्लतीर्थावर पवित्र स्नान करता आले. श्रींचे पर्वकाळ स्नान झाल्यावर कृष्णा तीरावर सहस्रों भाविकांनी पवित्र स्नानाचा लाभ घेतला.
     ११ ऑगस्ट या दिवशी दुपारी २ वाजता श्रींच्या उत्सवमूर्तीची पालखीतून मिरवणूक शुक्लतीर्थाकडे मार्गस्थ झाली. १२ ऑगस्टला पहाटे ६.२० वाजता सूर्योदयाच्या वेळी शुक्लतीर्थावर ब्रह्मवृंदाने केलेल्या मंत्रघोषात श्रींच्या उत्सवमूर्तीला विधीवत् गंगास्नान घालण्याचा मुख्य कार्यक्रम झाला. ११ ऑगस्टला दुपारी २ वाजता निघालेली श्रींच्या उत्सवमूर्तीची पालखी पेठभाग, ग्रामपंचायत, मरगुबाई मंदिर, ओतवाडी भाग मार्गे शुक्लतीर्थावर १२ ऑगस्टला पहाटे ४ वाजता आली.

पुणे आकाशवाणी केंद्राच्या प्रादेशिक बातम्या चालू रहाणार !

वाढत्या जनक्षोभाचा परिणाम !
       पुणे, १२ ऑगस्ट - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अध्यादेशानुसार पुणे आकाशवाणी केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्यात येणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली. त्यानंतर पुणेकर नागरिक, काही राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी यांचा जनक्षोभ वाढला. परिणामी पुणे केंद्रातील सकाळी ७ वाजून १० मिनिटांच्या मराठी बातम्या देणारा प्रादेशिक वृत्त विभाग बंद होणार नसून बातम्या चालू ठेवल्या जातील, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी १२ ऑगस्ट या दिवशी स्पष्ट केले. (केंद्र सरकारला घेतलेला निर्णय पालटण्यास भाग पाडणार्‍या नागरिकांचे अभिनंदन ! - संपादक)
       हा निर्णय मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी वृत्त निवेदकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येथील आकाशवाणी केंद्राबाहेर केंद्र सरकारचा निषेध करणारी निदर्शने करण्यात आली. पुण्यातील भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांनीही आकाशवाणी केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याच्या निर्णयाच्या विरोधात केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू यांना पत्र पाठवले होते.

कोईम्बतूर येथील जगप्रसिद्ध ईश योग केंद्रावर करण्यात येणारे सर्व आरोप निराधार ! - भाजपचे नेते एच्. राजा

    यापूर्वीही हिंदूंच्या अनेक संतांवर आणि त्यांच्या आश्रमांवर असे खोटेनाटे आरोप करून त्यांना अडकवण्याचा आटोकाट प्रयत्न काही हिंदुद्वेष्ट्यांकडून करण्यात आले. त्यातून कांची पीठाधीश्‍वर जगद्गुरु स्वामी जयेंद्र सरस्वती, स्वामी नित्यानंद आदी निर्दोष सुटले. हिंदू असंघटित असल्यानेच त्यांच्या संतांवर कोणीही ऊठसूट चिखलफेक करतो. हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच (सनातन धर्मराज्यच) हवे !
   कोइम्बतूर (तमिळनाडू) - गेल्या काही दिवसांपासून येथील ईश योग केंद्रावर विविध आरोप करण्यात येत आहेत. भाजपचे नेते एच्. राजा यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळत हिंदूंना हिंदुत्वापासून दूर नेण्याचे हे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. (एच्. राजा यांनी हिंदूंची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी त्यांचे अभिनंदन ! - संपादक) राजा यांनी १० ऑगस्ट या दिवशी सदर आश्रमाला भेट दिली. या वेळी त्यांनी आध्यात्मिक संस्थेविषयी आपली आस्था प्रदर्शित केली.
   या वेळी पत्रकारांना संबोधित करतांना राजा म्हणाले, आश्रमाची भूमी ही हिंदूंचीच असून त्यांना तेथे काहीही करण्याचा अधिकार आहे. हिंदु धर्म हा सर्वाधिक समंजस धर्म आहे. आम्ही इतर धर्मांप्रमाणे लोकांना धर्मांतरित करण्यासाठी त्यांना अमुक गोष्टींचे प्रलोभन दाखवत नाही; तर त्यांचा आत्मिक विकास घडवून त्यांना मोक्षाच्या पथावर मार्गक्रमण करण्यासाठी त्यांचे दिशादर्शन करतो.

महिन्याभरापासून आंदोलन करणार्‍या काश्मीरमधील हिंदु कर्मचार्‍यांकडे मोदी यांनी दुर्लक्ष केल्याने हिंदू निराश !

कोणताही पक्ष सत्तेवर आला, तरी तो हिंदूंना न्याय देत नसल्याने आता 
हिंदूंनी हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना करण्यासाठी कटीबद्ध व्हावे !
     जम्मू - काश्मीर खोर्‍यात दगडफेक करणार्‍या लोकांविषयी बोलतांना पंतप्रधान मोदी यांनी या दगडफेकीचे खरे बळी असलेल्या आमच्याविषयी (हिंदूंविषयी) एक शब्दही न उच्चारल्यामुळे आमची निराशा झाली. तरीही आम्ही आमची निदर्शने चालूच ठेवू. आमचा संघर्ष यशस्वी होण्याची आम्हाला आशा आहे, अशी प्रतिक्रिया काश्मीरमधील हिंदूंच्या सर्वपक्षीय स्थलांतरित समन्वय समितीचे अध्यक्ष श्री. विनोद पंडिता यांनी दिली आहे. हा केवळ येथे निदर्शने करणार्‍या ७०० हिंदूंचा प्रश्‍न नसून संघर्षांचा फटका सहन करावा लागलेल्या ७०० हिंदु कुटुंबियांचा प्रश्‍न आहे, असे त्यांनी सांगितले. काश्मीर खोर्‍यातील संक्रमण शिबिरावर झालेल्या दगडफेकीच्या विरोधात गेल्या महिन्याभरापासून हिंदु सरकारी कर्मचारी निदर्शने करत आहेत. काश्मीरमध्ये काम करणे आमच्यासाठी सुरक्षित नसल्यामुळे आमची पदे जम्मूत स्थलांतरित केली जावीत, अशी मागणी हिंदु कर्मचार्‍यांनी केली. धर्मांध आम्हाला पुन्हा लक्ष्य बनवणार नाहीत, याची काहीच खात्री नाही. त्यांनी आम्हाला ठार मारण्याची धमकी दिली आहे. अशा वातावरणात काश्मीर खोर्‍यात परत जाऊन काम करण्याची अपेक्षा सरकार आमच्याकडून कशी करू शकते ? हिंदूंना सोसाव्या लागत असलेल्या यातनांकडे राज्य आणि केंद्र सरकार कानाडोळा करत असून हिंदूंशी बोलण्याकरता सरकारने अद्याप प्रतिनिधी पाठवला नाही, असा आरोप एका आंदोलक हिंदु महिलेने केला.

ठाणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम !

जोंधळे विद्यालयाच्या मुख्याध्यापक
सौ. खुळेबाई (उजवीकडे) यांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी

       ठाणे, १२ ऑगस्ट, (वार्ता.) - राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांवर बंदी घालण्यात यावी, या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठाणे, डोंबिवली आणि अंबरनाथ येथील शाळांमध्ये मुख्याध्यापकांना निवेदन देण्यात आले. या शाळांमध्ये चारुबामा शाळा, किडलॅण्ड हायस्कूल, प्रगती महाविद्यालय, टिळक शाळा, जोंधळे विद्यालय यांचा समावेश आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे साधक संततुल्य आहेत ! - श्री. जय नारायण सेन, उपाध्यक्ष, शास्त्र धर्म प्रचार सभा

श्रीमद् श्रीउपेन्द्रमोहनजी यांचा १४४ वा जन्ममहोत्सव साजरा !
    
धर्मसभेला मार्गदर्शन करतांना श्री. चित्तरंजन सुराल
      कोलकाता - शास्त्र धर्म प्रचार सभेच्या वतीने येथील चौरंगी क्षेत्रात असणार्‍या सभेच्या कार्यालयात श्रीमद् श्रीउपेन्द्रमोहनजी यांचा १४४ वा जन्ममहोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त ३ ते १० ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ८ ऑगस्टला शास्त्र धर्म प्रचार सभेच्या वतीने एका धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रचार सभेचे उपाध्यक्ष श्री. जय नारायण सेन म्हणाले, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे साधक-कार्यकर्ते हिंदु राष्ट्र स्थापना करण्यासाठी समर्पित होऊन जे कार्य करत आहेत ते केवळ अतुलनीय आहे. असे प्रयत्न करणारे साधक संततुल्य आहेत.
     सभेच्या प्रारंभी शास्त्र धर्म प्रचार सभेद्वारे चालवण्यात येणार्‍या बालक सभेतील सेवकांनी त्यांच्या अनुभूती सांगितल्या. प्रचार सभेच्या विविध जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्याचा आढावा सादर केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारताचे समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल म्हणाले की, केवळ धर्मशास्त्राच्या आधारे कृती केल्यावरच हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकते. शास्त्र धर्म प्रचार सभेद्वारा धर्मशास्त्राच्या प्रचाराचे होत असलेले कार्य कौतुकास्पद आहे.

कर्नाटकातील केएल्ई ध्वनी एफ्एम् ९०.४ वर राष्ट्रध्वजाविषयी प्रबोधन

हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ
    
केएल्ई ध्वनी एफ्एम् ९०.४ या रेडिओ वाहिनीवर कार्यक्रम सादर
 करतांना डावीकडून कु. स्फूर्ती नागमणी आणि सौ. विदुला हळदीपूर
      हुब्बळी (कर्नाटक) - स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा मान कशा प्रकारे राखावा, याविषयी प्रबोधन करण्यासाठी केएल्ई ध्वनी एफ्एम् ९०.४ या नभोवाणीवर हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते. यात समितीच्या सौ. विदुला हळदीपूर आणि कु. स्फूर्ती नागमणी या सहभागी झाल्या होत्या. अनेकांकडून प्लास्टिकचे ध्वज वापरणे, तिरंग्याच्या स्वरूपात अन्नपदार्थांची मांडणी करणे, तिरंग्याचे टी-शर्ट, तसेच हाताचे बॅन्ड वापरणे, तसेच तोंडवळ्यावर तिरंगा रंगवणे आदी अयोग्य कृती करण्यात येतात. या अयोग्य कृती टाळून कर्तव्य म्हणून प्रत्येकाने आपल्या राष्ट्रध्वजाचा मान राखावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रसारण १५ आणि १६ ऑगस्ट या दिवशी होणार आहे.

केंद्रसरकारच्या नमामि गंगे परियोजनेसाठी २ सहस्र ९५८ कोटी रुपये खर्च !

   लक्ष्मणपुरी (लखनऊ) - पवित्र गंगा नदीची स्वच्छता करण्यासाठी नमामि गंगे कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत आतापर्यंत संमत करण्यात आलेल्या ३ सहस्र ७०३ कोटी रुपयांपैकी २ सहस्र ९५८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत; मात्र खर्चाच्या मानाने जे काम व्हायला हवे होते, ते झाल्याचे दिसत नाही. गंगा स्वच्छता योजनेवर ५ वर्षांमध्ये २० सहस्र कोटी रुपये खर्च करण्याचे मोदी शासनाने ठरविले आहे.
    लक्ष्मणपुरी शहरातील ऐश्‍वर्या शर्मा या दहावीच्या विद्यार्थिनीने माहितीच्या अधिकाराखाली पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती मिळवली आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखा ! - पलूस येथे पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांना निवेदन

        पलूस, १२ ऑगस्ट (वार्ता.) - स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या माध्यमातून होणारी विटंबना रोखावी, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने पलूस येथे पोलीस निरीक्षक आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिवप्रतिष्ठानचे सर्वश्री संजय फडतरे, नवनाथ राडे, योगेश खोत, रोहित माने यांसह अन्य उपस्थित होते.

हिंगोली येथून अटक केलेला इसिसचा सूत्रधार धर्मांध शिक्षक निलंबित

       हिंगोली, १२ ऑगस्ट - इसिस या आतंकवादी संघटनेचा येथील अटक केलेला सूत्रधार आणि जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक मोहंमद रईसोद्दीन सिद्दीकी यास जिल्हा परिषदेने ११ ऑगस्ट या दिवशी निलंबित केले असल्याची माहिती परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी यांनी दिली.
       आतंकवादविरोधी पथकाने १० ऑगस्ट या दिवशी सिद्दीकी कामाला असलेल्या शाळेस भेट देऊन त्याच्या सर्व सहकारी शिक्षकांकडे त्याच्या एकूण वर्तणुकीविषयी चौकशी केली, तसेच शाळेत सिद्दीकी याच्यासाठी असलेल्या कपाटातील कागदपत्राची पडताळणी केली. शाळेतील संगणक विभाग हा सिद्दीकी याच्याकडे होता. त्यामुळे पथकाने संगणक विभागाचीही संपूर्ण पडताळणी केली. पथकाने त्यानंतर सिद्दीकीच्या मुमताजनगरातील घराची कसून झडती घेतली आहे.

श्रीराम सेनेच्या वतीने बेळगाव येथे अखंड हिंदुस्थान संकल्प दिनाचे आयोजन

     बेळगाव (कर्नाटक) - श्रीराम सेनेच्या वतीने १४ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ७ वाजता येथील टिळक चौकात अखंड हिंदुस्थान संकल्प दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला विजया हॉस्पिटलचे डॉ. रवी बी. पाटील, यूथ फॉर पनून कश्मीरचे राष्ट्रीय समन्वयक श्री. राहुल कौल उपस्थित रहाणार आहेत. या वेळी हुतात्मा वीर सैनिकांच्या मातांचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीराम सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

(म्हणे) धर्म ही मानवनिर्मित संकल्पना !

डॉ. सदानंद मोरे यांचा दिशाभूल करणारा बुद्धीवादी तर्क !
     पुणे - सध्याचा समाज हा धर्माला महत्त्व देणारा आहे. धर्म ही मानवनिर्मित संकल्पना असल्याने त्याच्यावर अवलंबून रहाण्याची आवश्यकता नाही, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. समकालीन प्रकाशनाच्या वतीने आयोजित सबा नक्की यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. (धर्माचा अभ्यास होण्यासाठी धर्माचरण म्हणजेच साधना करणे आवश्यक असते. धर्माचा कोणताही अभ्यास न करता त्याविषयी वाटेल ती विधाने करणारे डॉ. मोरे म्हणे संमेलनाध्यक्ष ! - संपादक)
     ते पुढे म्हणाले, समाजात आंतरधर्मियांमध्ये होणार्‍या देवाण-घेवाणीकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ती इतरांना मार्गदर्शक ठरू शकते. (प्रत्यक्षात ही देवाणघेवाण नसून अन्य धर्मियांकडून हिंदूंचे होणारे शोषण आहे. - संपादक) समाजातील विषमता आणि संघर्ष रोखण्यासाठी एकमेकांच्या धर्माविषयी आदर बाळगायला हवा. (समाजात विषमतेची दरी निर्माण करून संघर्ष वाढवणार्‍यांना हा सल्ला डॉ. मोरे का देत नाहीत ? - संपादक)

सनातन संस्था चेन्नई न्यासाच्या वतीने बालाजीनगर येथे क्रांतीकारकांचे फलकप्रदर्शन !

  
फलकप्रदर्शनाचा लाभ घेतांना विद्यार्थी
   बालाजीनगर (पुणे) - येत्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सातारा रस्ता येथील ज्ञानेश प्राथमिक स्कूल या शाळेत सनातन संस्था चेन्नई न्यासाच्या वतीने ८ ऑगस्ट या दिवशी क्रांतीकारकांचा गौरवशाली इतिहास फलकांमधून स्पष्ट करणार्‍या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. ८१५ विद्यार्थी आणि शिक्षक यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला.
     चंद्रशेखर आझाद, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके आदी क्रांतीकारकांच्या कार्याची सचित्र माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी फलकांवरील माहिती उत्स्फूर्तपणे लिहून घेतली. प्रदर्शनासाठी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सविता सणस आणि प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा जाधव यांचे सहकार्य लाभले.

शासनाने नियुक्त केलेली शिक्षणतज्ञांची समिती हा एक फार्स ! - प्रा. सुभाष वेलिंगकर, राज्य समन्वयक, भाभासुमं

गोव्यातील प्राथमिक शिक्षणातील माध्यमप्रश्‍न !
    पणजी - शासनाने नव्याने नियुक्त केलेली १७ सदस्यीय शिक्षणतज्ञांची समिती हे गोव्यातील जनतेला पुन्हा एकदा हातोहात फसवण्यासाठी केलेले एक नाटक आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी नुकतेच विधानसभेत डायोसेसनच्या इंग्रजी प्राथमिक शाळांना दिले जाणारे अनुदान चालूच राहील, अशी घोषणा केली आहे. या घोषणेने ते सिद्ध झालेले आहे, असे भारतीय भाषा सुरक्षा मंचचे (भाभासुमं) राज्य समन्वयक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी म्हटले आहे.
   प्रा. वेलिंगकर यांनी पुढे म्हटले आहे की, मुख्यमंत्री पार्सेकर यांनी शिक्षणतज्ञांची समिती स्थापन करण्यापूर्वी चार दिवस संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नावेली मतदारसंघातील दवर्ली येथे आयोजित एका जाहीर कार्यक्रमात दवर्ली चॅपेलचे (छोटे चर्च) फादर प्रॉतासियो सुवारीश आणि उपस्थित लोकांसमोर डायोसेसनच्या इंग्रजी प्राथमिक शाळांना दिले जाणारे अनुदान कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही आणि कोणीही हे बंद करू शकणार नाही, अशी घोषणा केली. या घोषणेच्या विरोधात जाऊन इंग्रजी प्राथमिक शाळांना चालू असलेले अनुदान रहित करण्याचे सामर्थ्य भाजपचे मंत्रीमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये नाही.

बदलापूर (जिल्हा ठाणे) आणि कर्जत (जिल्हा रायगड) येथे प्रवाशांचे रेल्वे अडवण्याचे आंदोलन

प्रवाशांना आंदोलन करण्यास 
भाग पाडणारे दायित्वशून्य रेल्वे प्रशासन !
        मुंबई, १२ ऑगस्ट - मध्य रेल्वेच्या वाहतुकीत सातत्याने होणार्‍या तांत्रिक बिघाडांमुळे १२ ऑगस्ट या दिवशी सकाळी बदलापूर आणि त्यानंतर कर्जत रेल्वेस्थानक या दोन्ही ठिकाणी प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. या वेळी मुंबईच्या दिशेने जाणार्‍या लोकलगाड्या अडवून प्रवाशांनी ६ घंटे आंदोलन केले. याचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर झाला. त्यामुळे लोकल गाड्यांसमवेत जलद गतीच्या गाड्याही रखडल्या.
        केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्यासह रेल्वे प्रशासन, पोलीस आणि स्थानिक नेते यांच्याकडून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करूनही संतप्त प्रवाशांनी आंदोलन चालू ठेवले होते. सुरेश प्रभु यांनी ही परिस्थिती हाताळण्यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना बदलापूरला जाऊन प्रवाशांशी बोलण्यास सांगितले. आश्‍वासन मिळाल्यानंतर प्रवाशांनी आंदोलन मागे घेतले.

भारताचे क्रीडामंत्री विजय गोयल यांच्यावर ऑलिंपिक आयोजन समिती नाराज

जगात देशाची लज्जा घालवणारे भारताचे मंत्री !
         रिओ दी जॅनेरिओ (ब्राझिल) - भारताचे क्रीडामंत्री विजय गोयल यांच्या समवेत असणार्‍या अधिकार्‍यांच्या वागणुकीला कंटाळून रिओ ऑलिंपिकच्या आयोजन समितीने गोयल यांचे अधिस्वीकृती कार्ड रहीत करण्याची चेतावणी दिली आहे.
         याविषयी रिओ ऑलिंपिक आयोजन समितीच्या जागतिक व्यवस्थापक सारा पीटरसन यांनी भारतीय पथकाचे प्रमुख राकेश गुप्ता यांना पत्र लिहून कळवले. यात ऑलिंपिक मैदानांच्या प्रतिबंधित परिसरात केवळ अधिस्वीकृतधारकांना प्रवेश असतांना भारताचे क्रीडामंत्री त्यांच्या सहकार्‍यांनाही तेथे घुसवण्याचा प्रयत्न करतात. तेथील स्वयंसेवकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यास ही मंडळी त्यांच्याशी अरेरावी करतात. कधीकधी धक्काबुक्कीही करतात. या प्रकारांना आळा घातला नाही, तर आम्ही गोयल यांची अधिस्वीकृती रहित करू, अशी चेतावणी दिली आहे. ऑलिंपिक आयोजन समितीकडून एका लहान घटनेला गंभीर प्रकरणाप्रमाणे उपस्थित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे गुप्ता यांनी म्हटले आहे.

यापुढे रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत याचे दायित्व कंत्राटदारांचे असेल ! - मुंबई उच्च न्यायालय

     मुंबई - मुंबईत प्रतिवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात; मात्र त्याची वेळेवर दुरुस्ती केली जात नाही. रस्त्यांवर यापुढे खड्डे पडणार नाहीत याचे दायित्व कंत्राटदारांचे असून त्यांच्याकडून तसे लिहून घेण्यात यावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. दक्षिण मुंबई ते बोरिवली असा प्रवास करतांना खड्ड्यांमुळे पाठदुखीचा त्रास झाल्याचेही न्यायमूर्ती व्ही.एम्. कानडे यांनी या वेळी सांगितले.

नगरसेवकांचे प्रगतीपुस्तक अपुरे आणि एकांगी !

सर्वपक्षीय नगरसेवकांचा सूर
     पुणे - शहरातील सर्व नगरसेवकांच्या चार वर्षांतील कार्याचा मांडण्यात आलेला अहवाल स्वागतार्ह असला, तरी तो अपुरा आणि एकांगी आहे. नगरसेवकांच्या समवेत प्रशासनाच्या कार्याचीही नोंद अहवालात घेणे अपेक्षित होते, असे मत सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केले. सजग नागरिक मंचाच्या वतीने नगरसेवकांचे प्रगतीपुस्तक : राजकीय पक्षांची भूमिका या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे अशोक हरणावळ, भाजपचे गणेश बिडकर, काँग्रेसचे अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर केमसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर शिंदे आणि रिपब्लिकन पक्षाचे डॉ. सिद्धार्थ धेंडे, तसेच सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर आणि परिवर्तनचे तन्मय कानिटकर आदी उपस्थित होते. परिवर्तन संस्थेच्या वतीने नगरसेवकांच्या प्रगतीपुस्तकाचा अहवाल काही दिवसांपूर्वी प्रकाशित करण्यात आला. नगरसेवकांना देण्यात आलेला प्रभागनिधीचा वापर, त्यांची सभागृहातील उपस्थिती, सभागृहात किती लेखी प्रश्‍न विचारले, तसेच किती नगरसेवकांवर गुन्हे प्रविष्ट झाले आहेत, या निकषांवर हा अहवाल प्रकाशित करण्यात आला होता. (नगरसेवकांचे प्रगतीपुस्तक मांडणारी परिवर्तन संस्था आप या राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने हा अहवाल एकांगी असल्याचा आरोप केला जात आहे. म्हणूनच राजकीय हेतूने प्रेरित न होता वस्तूनिष्ठपणे अहवाल सादर करणे स्वयंसेवी संघटनांकडून अपेक्षित आहे, तर नगरसेवकांनीही आत्मस्तुती न करता आत्मपरीक्षण करणे अपेक्षित आहे. - संपादक)

सोलापूर जिल्ह्यातील संत आणि मान्यवर यांनी सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीला केलेला विरोध

सनातनच्या पाठीशी उभे रहाणार्‍या हिंदुत्वनिष्ठांची सनातन संस्था आभारी आहे !
 ईश्‍वरी कार्य करणार्‍या सनातनवर बंदी घालण्यापूर्वी सरकारने एकदा नव्हे, तर सहस्र वेळा विचार करावा ! - भागवताचार्य ह.भ.प. पद्मनाभ व्यास, मु.पो. तेर, जिल्हा धाराशिव
      सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीची बातमी ऐकून मी काही वेळ सुन्न झालो. 'आपण स्वतंत्र भारतात कि पाकिस्तानात ?' असा प्रश्‍न मनाला पडला. विवेकबुद्धीला ही गोष्ट पटणारी नाही. सनातन संस्थेसारख्या राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी आणि ईश्‍वरी कार्य करून समाजाला सुसंस्कारित करणार्‍या संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यापूर्वी एकदा नव्हे, तर सरकारने सहस्र वेळा विचार करावा. पूर्वग्रहदूषित निर्णय घेऊ नये. कारण अशा संघटनांवर बंदी घातल्याने त्या आणि त्यांचे कार्य संपत वा सीमित न होता ते वृद्धींगतच होते, हा आजवरचा इतिहास आहे. 
सनातन संस्थेमुळे हिंदु धर्म पुनर्वैभवाकडे वाटचाल करत आहे ! - महंत मावजीनाथ महाराज, तुळजापूर.
     मी गेली ८ ते ९ वर्षे सनातनच्या संपर्कात असून संस्थेचे कार्य पहात आहे. राष्ट आणि धर्म जागृती कार्य सनातन संस्था करत आहे. सनातनमुळेच हिंदु धर्म कात टाकत असून परत एकदा पुनर्वैभवाकडे वाटचाल करत आहे. शासनानेही सनातन संस्थेच्या कार्यपद्धतीप्रमाणे समाजप्रबोधन करून चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावेत ! कुणाच्यातरी मागणीमुळे सनातन संस्थेवर बंदी आणू नये !

गोवा अर्बन को-ऑपरेटिव्ह अधिकोषातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करू !

मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्‍वासन गोवा विधानसभा अधिवेशन
   पणजी, १२ ऑगस्ट (वार्ता.) - शिखर अधिकोष म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोवा अर्बन को-ऑपरेटिव्ह अधिकोषात गहाण संपत्तीच्या अवैध लिलावाद्वारे ९० च्या दशकापासून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्यात येणार, असे आश्‍वासन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ११ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत दिले.
१. अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी हा विषय उपस्थित केला. सरदेसाई म्हणाले, वर्ष २००२ मध्ये निबंधकांचे संपत्तीचा लिलाव करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले होते. तरीसुद्धा अधिकार्‍यांनी अवैधपणे लिलाव केला आहे.
२. वर्ष १९९५ मध्ये एका लेखा परीक्षकाच्या अहवालानुसार बायंगिणी येथील ज्या संपत्तीची किंमत ८ कोटी १९ लक्ष रुपये होती, तीच संपत्ती वर्ष २००६ मध्ये १ कोटी ३६ लक्ष रुपयांत लिलावात काढण्यात आली आहे. अशा प्रकारे अनेक प्रकारची संपत्ती लिलावात काढून घोटाळा करण्यात आला आहे.

समीर गायकवाड यांच्यावर अंतिम दोषारोप दाखल करण्याविषयी कोल्हापूर न्यायालयातील पुढील सुनावणी ३० ऑगस्टला

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण !
        कोल्हापूर, १२ ऑगस्ट (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्यावर अंतिम दोेषारोप दाखल करण्यास उच्च न्यायालयात २४ ऑगस्टपर्यंत स्थगिती आहे. त्यामुळे कोल्हापूर येथील न्यायालयातील पुढील सुनावणी ३० ऑगस्ट या दिवशी घेण्यात येणार आहे. जिल्हा न्यायाधीश एल्.डी. बिले यांच्यासमोर कॉ. गोविंद पानसरे खून प्रकरणाची सुनावणी चालू आहे. कन्यागत महापर्व आणि मुख्यमंत्र्यांचा दौरा यांमुळे पोलीस बंदोबस्त पुरेसा नाही, असे कारण पुढे करत श्री. समीर गायकवाड यांना १२ ऑगस्टला न्यायालयात उपस्थित करण्यात आले नव्हते. श्री. समीर गायकवाड यांच्या वतीने अधिवक्ता समीर पटवर्धन हे बाजू मांडत आहेत.

नाशिक येथे संत, महंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिंहस्थपर्वाचे ध्वजावतरण

        नाशिक, १२ ऑगस्ट - श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथे सिंहस्थपर्वाचे ध्वजावतरण महंत नरेंद्रगिरीजी महाराज, महंत सागरानंद सरस्वती, महंत हरिगिरीजी महाराज आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय अन्न प्रक्रिया राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती, जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पुरोहित संघाचे अध्यक्ष जयंत शिखरे आदी उपस्थितीत होते.
        या वेळी अमित शाह म्हणाले की, नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वर येथे कुंभमेळा चांगल्या पद्धतीने साजरा झाला. आपल्या परंपरेचे संवर्धन करण्याचे दायित्व सर्वांवर असून ती नाशिक-त्र्यंबकेश्‍वर येथील शासन, प्रशासन आणि नागरिक यांनी चांगल्या प्रकारे पार पाडली. त्यानंतर शहा यांच्या हस्ते कुंभमेळ्यात चांगली कामगिरी केल्याविषयी अधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर फडणवीस, शहा आणि अन्य मान्यवर यांनी श्री त्र्यंबकेश्‍वराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

फलक प्रसिद्धीकरता

काश्मिरी हिंदूंचा संभाव्य वंशविच्छेद कोण रोखणार ?
     काश्मीर खोर्‍यात दगडफेक करणार्‍यांविषयी बोलतांना पंतप्रधान मोदी यांनी आमच्याविषयी एक शब्दही न उच्चारल्यामुळे आमची निराशा झाली, असे काश्मीरमध्ये रहाणार्‍या ७०० हिंदु कर्मचार्‍यांनी म्हटले. ठार करण्याची धमकी मिळाल्याने त्यांनी काश्मीरमधून जम्मूत पलायन केले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
     Modiji ne hamari vyathapar kuch nahi kaha - 700 Kashmiri Hindu karmchari. Inhe mar dalneki dhamki mili hai.
     Kashmiri Hinduoka vanshvished koun rokega
जागो !
     मोदीजी ने हमारी व्यथा पर कुछ नहीं कहा ! - ७०० कश्मीरी हिन्दू कर्मचारी. इन्हें मार डालने की धमकी मिली है.
     कश्मीरी हिन्दुआें का वंशविच्छेद कौन रोकेगा ?

सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनास भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद !

कन्यागत महापर्व विशेष
  • २ दिवसांत १० सहस्र भाविकांची प्रदर्शनाला भेट !
  • रात्री १० नंतरही प्रदर्शन पहाण्यासाठी भाविकांची गर्दी ! 
  • प्रदर्शन वारंवार भरवण्याची भाविकांची मागणी ! 
 पालखीतील श्री दत्तात्रेयांची उत्सवमूर्ती
     नृसिंहवाडी, १२ ऑगस्ट - येथील कमानीशेजारी असलेल्या श्री दत्तविद्यामंदिर येथे लावण्यात आलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथ, सात्त्विक उत्पादने, फ्लेक्स प्रदर्शनास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी २ सहस्रांपेक्षा अधिक भाविकांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. रात्री १० नंतरही प्रदर्शन पहाण्यासाठी भाविकांची गर्दी होत होती. प्रदर्शन पहाण्यासाठी पोलीस, प्रशासन, नागरिक, पुजारी, तरुण, महिला अशा प्रकारे सर्व स्तरांतील लोक आले होते. 
सनातन संस्थेच्या प्रदर्शन कक्षाचे प्रवेशद्वार
पालखी मिरवणुकीसाठी काढलेली आकर्षक रांगोळी
आणि पालखीच्या मार्गावर पसरलेल्या फुलांच्या पाकळ्या
 विशेष
     ११ ऑगस्ट या दिवशी दोन पोलीस प्रदर्शन पाहून गेले. १२ ऑगस्ट या दिवशी ते सकाळी प्रदर्शनस्थळी आले आणि त्यांनी साधकांकडून कपाळाला नाम लावून घेतले. (सनातन संस्था हिंदु धर्मप्रसाराचे योग्य कार्य करत असून हिंदूंना धर्मशिक्षण देत आहे. ही गोष्ट पोलीस दलातील काही चांगल्या पोलिसांनाही लक्षात येते ! - संपादक) 

भाभासुमंची १३ ऑगस्ट या दिवशी काणकोण येथे जाहीर सभा, ५ सहस्र मातृभाषारक्षक शपथ घेणार

   काणकोण - भाभासुमंच्या वतीने १३ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ४ वाजता काणकोण नगरपालिका सभागृहात घेण्यात येणार असून या वेळी सभेत ५ सहस्र मातृभाषारक्षक शपथ घेणार आहेत. ही माहिती भाभासुमंच्या वतीने येथे घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. ही सभा यशस्वी होण्यासाठी ठिकठिकाणी कोपरा बैठका घेण्यात आल्या असून या बैठकांना महिला आणि युवा वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभल्याची माहिती देण्यात आली.

पुरोगामी कार्यकर्ते डॉ. बाबूराव गुरव यांना कथित धमकी दिल्याच्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अविनाश थोरवत यांच्यावर गुन्हा प्रविष्ट !

        तासगाव, १२ ऑगस्ट (वार्ता.) - येथील पुरोगामी कार्यकर्ते डॉ. बाबूराव गुरव यांना जिवे मारण्याची कथित धमकी दिल्याच्या प्रकरणात तासगाव पोलिसांनी येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश थोरवत यांच्यावर गुन्हा प्रविष्ट केला आहे. या प्रकरणी थोरवत यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी विविध पुरोगामी संघटनांनी १२ ऑगस्ट या दिवशी मोर्चा काढून तासगाव पोलिसांना निवेदन दिले. अविनाश थोरवत यांनी डॉ. गुरव यांना प्रत्यक्षात अशी कोणतीही धमकी दिली नसून पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते पराचा कावळा करत आहेत, असे तासगाव येथील काही नागरिकांनी सांगितले.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विलंबामुळे तुळजाभवानीची शासकीय पूजा २ घंटे उशिरा !

       धाराशिव - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विलंबामुळे तुळजाभवानीची प्रक्षाळ पूजा २ घंटे उशिरा करण्याची घटना ११ ऑगस्टला घडली. मुनगंटीवार दुपारी ४ वाजता तुळजापुरात येणार होते; मात्र पंढरपूरहून यायला त्यांना रात्रीचे १०.१५ वाजले. ते येईपर्यंत देवीची प्रक्षाळपूजा आणि शेजारती थांबवण्यात आली.
       प्रतिदिन रात्री ९ वाजता होणारी प्रक्षाळपूजा रात्री ११ वाजता करण्यात आली आणि शेजारती होऊन मंदिर बंद करायला रात्रीचे साडेअकरा वाजले. वर्षानुवर्षे देवीच्या धार्मिक विधींचे हे वेळापत्रक मंत्र्यांच्या उशिरा येण्याने बिघडले. याविषयी भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.

देशाचे नाही, तर काही जातींचे हित सांभाळणारे राष्ट्रद्रोही सर्व राजकीय पक्ष !

     आगामी विधानसभेच्या निवडणुकीत अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी १२ टक्के आरक्षण देण्यासंबंधी अनुसूचित जमाती मोर्च्याने केलेल्या मागणीकडे भाजप लक्ष देणार आहे. यासंबंधी एक शिष्टमंडळ देहलीला नेण्याचा विचार आहे. - लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्यमंत्री, गोवा

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची मुंबईत सर्रास विक्री

मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्यात प्लास्टिकच्या 
राष्ट्रध्वजाच्या वापरावर बंदी असतांना त्यांची 
विक्री होणे, हा उच्च न्यायालयाचा अवमानच !
       मुंबई, १२ ऑगस्ट - प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी असतांनाही मुंबईमध्ये ठिकठिकाणी लहान मुले प्लास्टिकचे राष्ट्रध्वज सर्रास विकतांना आढळतात. (प्लास्टिकच्या राष्ट्र्रध्वजाच्या माध्यमातून होणारा अवमान टाळण्यासाठी राज्यशासनाने कठोर पावले उचलावीत, तसेच त्यांची निर्मिती करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करावी. - संपादक) मार्च २०१५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी आणण्याचा निर्णय दिला होता आणि त्यासाठी राज्य सरकारला पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते.

उत्तरदायींकडून त्यांना हानीभरपाई द्या आणि त्यांची क्षमा मागायला लावा !

     संभाजीनगर येथील वर्ष २००६ च्या शस्त्रसाठा प्रकरणी मुस्ताक अहमद मोहंमद इशाक शेख, जावेद अहमद अब्दुल मजीद अन्सारी, अफझल खान नबी खान या तिघांना विशेष मोक्का न्यायालयाने ८ वर्षांची शिक्षा सुनावली. या तिघांनी आधीच १० वर्षे शिक्षा भोगल्याने त्यांची आता सुटका करण्यात येईल.

शाळेतील मुलगाही असे म्हणणार नाही, जे काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री म्हणतात !

     सरकारच्या प्रसिद्धीच्या मोहापायी काश्मीरमध्ये हिंसाचार वाढला. - सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेस

गुन्हेगाराला ११ वर्षे पोसण्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करा !

     जौनपूर जिल्ह्यातील श्रमजीवी एक्स्प्रेस रेल्वेमध्ये वर्ष २००५ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणातील आरोपी महंमद आलमगीर याला येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने स्फोटाच्या घटनेच्या ११ वर्षांनंतर फाशीची शिक्षा ठोठावली.
हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !
English
: www.hindujagruti.org
हिंदी : www.hindujagruti.org/hindi/
मराठी : www.hindujagruti.org/marathi/
शहापूर येथे हिंदु धर्मजागृती सभा
स्थळ
: स्वातंत्रसैनिक किसनबाबा विद्यामंदिर, धसई, शहापूर
वार आणि दिनांक : रविवार, १४ ऑगस्ट २०१६
वेळ : दुपारी ४
संपर्क : ९३२४८६८९०६

राष्ट्रीय शिक्षणाच्या पुनर्रचनेची आवश्यकता !

प्रा. रामेश्‍वर मिश्र
         १९ व्या शतकाच्या आरंभी भारतात शिक्षणाची स्थिती कशी होती ? शिक्षण देण्याची प्रक्रिया कशी होती ? आणि शिक्षणाचे तंत्र कोणते होते ?, यावर श्री. धर्मपाल यांनी इंडिया ऑफीस लायब्ररी, लंडन येथे सुरक्षित केलेल्या कागदपत्रांच्या आधारे इंग्रजांच्या साक्षीनेच विस्तृत कागदपत्रे सादर केली आहेत. ही कागदपत्रे पुस्तकरूपाने श्री. सीताराम गोयल यांनी सर्वप्रथम वर्ष १९८३ मध्ये प्रकाशित केली होती; पण सध्याच्या शिक्षणयंत्रणेने त्या पुस्तकातील तथ्यांची कोणतीही नोंद घेतली नाही आणि ब्रिटीश काळातील प्रचलित तथ्ये दाबून ठेवून काँग्रेस-साम्यवादी शिक्षणतज्ञांनी आधीपेक्षाही अनेक पटींनी असा दुष्प्रचार करणे चालू केले की, परंपरागत भारतीय शिक्षणपद्धत ही केवळ द्विजांपुरतीच (द्विज म्हणजे मुंजीचा अधिकार असलेले ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य) मर्यादित होती. याउलट ब्रिटीश कागदपत्रे हे याचे पुरावे आहेत की, १८ व्या शतकाच्या शेवटच्या काळापर्यंत भारतात जी शिक्षणपद्धत होती, ती समकालीन ब्रिटिशांच्या शिक्षणपद्धतीपेक्षाही अतिशय प्रगत होती आणि त्या वेळी भारतातील जवळजवळ प्रत्येक गावात एक पाठशाळा होती. या पाठशाळांमध्ये प्रत्येक जाती आणि वर्ग यांतील विद्यार्थी शिकत होते आणि त्यांमध्ये शिकवणारे शिक्षकही सर्व जातींतील होते. तसेच उच्चशिक्षणाच्या विषयांमध्ये जी वैशिष्ट्ये होती, ती सामूहिक होती. मोठ्या गावांमध्ये एकाहून अधिक पाठशाळा आणि नगरांमध्ये अधिक संख्येत पाठशाळा होत्या.
हिंदूंनो, धर्माची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी, हिंदी आणि मराठी संकेतस्थळाला भेट द्या !

मराठी भाषेतील अनेकार्थी शब्द !

एका शब्दाला शतकावर प्रतिशब्द असणारी साक्षात् देववाणी संस्कृत जिची जननी आहे, अशा माय मराठीमध्येही एका शब्दातून अनेक अर्थबोध होतात. अमृतातेही पैजा जिंके, अशा मराठी भाषेचे हे भाषासौष्ठवच म्हणावे लागेल ! (एका शब्दाच्या अनेक अर्थांमुळे शब्दजन्य विनोदाची निर्मितीही काही प्रसंगांत होते.) असे काही अनेकार्थी शब्द, त्यांचे अर्थ, तसेच व्याकरणाच्या विरामचिन्हांमुळे पालटणारे वाक्याचे अर्थ सांगणारे हे सदर ! 


धर्मपालनानेच देवाचे साहाय्य प्राप्त होईल !

   मध्यप्रदेशातील इंदूर येथील खेडापट्टी मंदिरात एका तरुणाच्या रुसून गेलेल्या पत्नीला परत मिळवण्यासाठी देवाने चमत्कार करून कोणतेही साहाय्य न केल्याने आणि त्यामुळे संतापलेल्या तरुणाने भगवान श्री हनुमानाच्या प्राचीन मूर्तीची तोडफोड केली. व्यक्तीगत निराशेतून घडलेली अत्यंत विचित्र अशी ही घटना आहे. आजपावेतो देवतांच्या मूर्तींची तोडफोड आणि विध्वंस हा बहुतांश वेळा अहिंदूकडूनच होत होता. स्वातंत्र्यानंतरच्या ६८ वर्षांत हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्यामुळे, तसेच त्याचे व्यक्ती आणि समाज यांच्या उत्थानात असलेले महत्त्व न सांगितल्यामुळे जन्महिंदूंकडून अशी कुकृत्ये होतांना दिसत आहेत.

सनातनच्या निरपराध साधकांवरील हा अन्याय लक्षात ठेवा !

     कोणताही गुन्हा केला नसतांना श्री. समीर गायकवाड यांना मागील १० महिने २८ दिवसांपासून, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना २ महिने ४ दिवसांपासून कारागृहात डांबण्यात आले आहे.
     केवळ हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी सनातनच्या निरपराध साधकांना कारागृहात डांबणार्‍यांना हिंदु राष्ट्रात दामदुप्पटीने शिक्षा देण्यात येईल !

साधकांना चैतन्य मिळावे; म्हणून आश्रमाच्या अंतर्गत रचनेत सात्त्विक पालट करून साधकांची काळजी घेणारे प.पू. डॉक्टर !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
१. आश्रमातील चैतन्यात वाढ झाल्याचे आणि नामजप आपोआप होत असल्याचे जाणवणे : गेले अडीच मास मी सेवेनिमित्त अन्य ठिकाणी होते. पुन्हा सेवेसाठी देवद आश्रमात आल्यानंतर मला आश्रमातील चैतन्यात वाढ झाल्याचे जाणवले. मी बाहेर असतांना मला प्रयत्नपूर्वक करावा लागणारा नामजप आता आश्रमात आल्यानंतर आपोआप होऊ लागला आणि नामजप आणि प्रार्थना यांतील गुणवत्ताही वाढली आहे, असे जाणवते. मला आश्रमात आल्यानंतर शांत वाटत होते आणि माझी श्‍वासाची गती हळू झालेली जाणवत होती.

कु. अनास्तासिया वाले (वय ११ वर्षे) हिला वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छापत्राद्वारे आध्यात्मिक मैत्रीचे महत्त्व सांगणारी कु. मनुश्री साने (वय १० वर्षे) !

कु. अनास्तासिया वाले
नमस्कार अनास्तासिया !
        तू कशी आहेस ? तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! आपण मैत्रिणी व्हावे, ही देवाची इच्छा आहे. आपण दोघी मिळून साधना करण्याचे देवाला वचन देऊया आणि देवाची इच्छा पूर्ण करूया. आपण श्रीकृष्णाच्या गोपी बनूया, म्हणजे तो आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करील. आपण आपल्यातील दुर्गुणांना दूर करून देव आणि इतर साधक यांच्याकडून सद्गुण शिकूया. इतरांशी मनमोकळेपणाने कसे वागायचे ? इतरांशी मैत्री कशी करायची ? मैत्री कशी टिकून ठेवायची ?, हे मला तुझ्याकडून शिकायला मिळाले. 
कु. मनुश्री साने
        मी पुष्कळ भाग्यवान आहे; कारण मला तुझ्यासारखी उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मैत्रीण मिळाली. आपल्यातील दुर्गुण दूर करण्यासाठी आपण एकमेकींना साहाय्य करूया. तू माझी शालेय मैत्रीण व्हावीस, असे मला वाटते. आपण एकमेकींना साहाय्य केले, तर आपली शीघ्र आध्यात्मिक उन्नती होईल. तू एक कलाकार आहेस. तुझ्यामध्ये अनेक गुण असून त्यांचे वर्णन करण्यास मी असमर्थ आहे. तुला तुझ्या मनरूपी शत्रूचा नाश करायला हवा. आपल्याला लहानपणीच आध्यात्मिक गुरु लाभले असल्यामुळे आपण अत्यंत भाग्यवान आहोत; परंतु तू माझ्यापेक्षा अधिक भाग्यवान आहेस; कारण तुझे माता-पिता संत आहेत. तुला त्यांचे ऐकायला हवे आणि त्यांच्याकडून शिकायला हवे. - कु. मनुश्री साने, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.८.२०१५)

राखीपौर्णिमेला बहिणीला अशाश्‍वत भेट देण्याऐवजी चिरंतन तत्त्वाचा प्रसार करणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातचे वाचक बनवा आणि ज्ञानामृत असलेली अनोखी ओवाळणी द्या !

  • राखीपौर्णिमेनिमित्त सर्वत्रच्या हिंंदु बांधवांना आवाहन !
  • वाचकवृद्धी मोहिमेच्या निमित्ताने...
१. राखीपौर्णिमेचे महत्त्व !
       श्रावण पौर्णिमा, म्हणजेच राखीपौर्णिमा ! या वर्षी १८.८.२०१६ या दिवशी राखीपौर्णिमा आहे. हिंदु संस्कृतीनुसार या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भावाने आपले रक्षण करावे, यासाठी बहीण या दिवशी भावाला ओवाळते आणि राखी बांधते. भाऊ बहिणीला पैसे अथवा तिला उपयोगी पडेल, अशी वस्तू ओवाळणी म्हणून देतो.

अधिवेशनाच्या सेवेसाठी आल्यावर अमरावती येथील साधक श्री. नीलेश टवलारे यांचे झालेले साधनेचे चिंतन आणि प्रयत्न

१. कार्याला महत्त्व दिले जाणे आणि सेवा वरवरची होणे : सेवा असल्यास माझ्याकडून सेवेलाच प्राधान्य दिले जायचे. बाह्यतः दिवसभर सेवेची कृती होत असे. प्रार्थना वरवरची होत असे. भावाच्या स्तरावर उपाय आणि प्रार्थना केल्या जात नसत. आपण मोठमोठ्या प्रार्थना करून सेवेचा वेळ वाया घालवतो, असेही वाटायचे. प्रार्थना करतांनासुद्धा मनामध्ये पुढील कार्याचेच विचार मी करत असे. प्रत्येक प्रसंगात आध्यात्मिक स्तरावर विचार करणे, भाव ठेवणे मला जमत नव्हते.
        सेवा आणि साधना आनंदप्राप्तीसाठी होत नसून सेवेतून बर्‍याचदा ताण-तणाव, हेवे-दावे, मतभेद होऊन सेवा मानसिक स्तरावरच होत असे. बर्‍याच सूत्रांचा बारकाईने अभ्यास न करता सेवा वरवर आणि करायची म्हणून केली जात असे. बर्‍याचदा सर्वत्र वावरत असतांना आपल्या आसपास असलेल्या व्यक्ती माझे निरीक्षण करत आहेत आणि माझी काही चूक घडून ते मला न सांगता इतरांमध्ये बोलतील, अशा संशयाच्या विचारांतच वावरतो. त्यामुळे मनावर सतत ताण असतो आणि मोकळेपणाने वावरणे अन् बोलणे होत नाही.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेत सहभागी झालेले युरोप मधील साधक श्री. दाव्होर होर्वात यांना आलेल्या अनुभूती

श्री. दाव्होर होर्वात
१. पू. सिरियाकदादा यांनी कपाळावर कुंकवाचा टिळा लावल्यानंतर हृदयापाशी संवेदना जाणवून नंतर सभागृहातील प्रत्येक साधकाप्रती प्रेम दाटून येणे : ३०.७.२०१६ या दिवशी सकाळी मला आध्यात्मिक त्रास होत होता आणि माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार येत होते. कार्यशाळेच्या पहिल्या सत्राच्या आरंभी पू. सिरियाकदादा यांनी माझ्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावला. सत्राला आरंभ झाल्यानंतर अर्ध्या घंट्याने मला हृदयापाशी संवेदना जाणवल्या. काही वेळातच मला पुष्कळ शक्ती जाणवली आणि सभागृहात उपस्थित असणार्‍या प्रत्येक साधकाप्रती माझ्या मनात निरपेक्ष प्रेम दाटून आले. मी रडू आवरू शकत नव्हतो. माझ्या हृदयात उष्णता जाणवून सभागृहातील प्रत्येक साधकाप्रती मला पुष्कळ प्रेम जाणवत होते. माझ्या आयुष्यातील या विलक्षण अनुभूतीसाठी मी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञ आहे.

रामनाथी आश्रमात झालेल्या शिबिरातील शुद्धीकरण सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे !

१. शिबिरात झालेल्या शुद्धीकरण सत्संगातून मला एखादी चूक होण्यामागे मनातील घातक विचारप्रक्रिया लक्षात आली. त्या विचारप्रक्र्र्र्रियेच्या मुळाशी कसे जायचे ? आणि योग्य दृष्टीकोन कसा असायला हवा ?, हे शिकायला मिळाले.
२. जोपर्यंत आपली विचारप्रक्र्र्र्रिया योग्य दिशेने होत नाही, तोपर्यंत आपली कृती योग्य होत नाही, हे लक्षात आले.
३. आपण एखाद्या प्रसंगात अडकलो असतांना आपल्या मनात येत असलेले विचार जर आपण मनमोकळेपणाने सांगितले, तर आपली अडचण सुटते, हेे शिकायला मिळाले. माझ्यातही मनमोकळेपणाचा अभाव हा दोष आहे.

अन्य संत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील भेद !

श्री. आनंद जाखोटिया
१. अन्य संत, संप्रदाय आणि अध्यात्मातले अधिकारी साधकाच्या प्रारब्धाचे अडथळे काही प्रमाणात लांब किंवा पुढे ढकलू शकतात; मात्र दैनंदिन जीवनात सदैव आनंदी रहाण्याची किंवा अंतर्बाह्य पालटाची प्रक्रिया हवी असेल, तर परात्पर गुरु डॉ. आठवलेच हवेत !
२. व्यवहाराच्या ऐहिक अडचणी सोडवणारे संत साधकाच्या प्रारब्धाधीन अडचणी स्वतःच्या आध्यात्मिक सामर्थ्याच्या जोरावर थोपवून, त्याचे जन्म-मृत्यूचे फेरे वाढवतात; पण परात्पर गुरु डॉ. आठवले ते सहन करण्याची क्षमता देऊन साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सोडवतात.
- श्री. आनंद जाखोटिया, भुवनेश्‍वर, ओडिशा.(२.८.२०१६)

पू. (सौ.) सुमनमावशी घरी आल्या असतांना त्यांच्यासाठी परसातील फुले आणून गजरा बनवणे, तो पाहून आदल्या दिवशी एका परिचित बाईने उद्या मी तुला याच फुलांचा गजरा पाठवून देईन ! असे सांगितल्याचे आणि तू आज त्याच फुलांचा गजरा देत आहेस अन् ही ईश्‍वरेच्छा आहे, असे पू. मावशींनी सांगणे

पू. (सौ.) सुमन नाईक
       काही वर्षांपूर्वी पू. (सौ.) सुमनमावशी संपूर्ण गोवा राज्यात सत्संग घेण्यासाठी जात असत. एकदा वास्को येथील मुंडवेल येथील श्रीकृष्ण मंदिरात त्यांचा सत्संग ठेवला होता. त्या दिवशी पू. मावशी सकाळी १० वाजता आमच्या घरी पोचल्या. दुपारचा महाप्रसाद घेऊन त्यांनी आम्हाला थोडा वेळ मार्गदर्शन केले. देवळात ४.३० वाजता सत्संग असल्याने दुपारी मी त्यांना शेजारी रहाणार्‍या साधकांकडे घेऊन गेले. मला पू. मावशींची खणा-नारळाने ओटी भरायची होती; म्हणून मी खाली परसात जाऊन कुंदाची पांढरी फुले आणली आणि लगबगीने फुलांचा गजरा करून पू. मावशींना बोलावले. ताटात गजरा पाहून पू. मावशी म्हणाल्या, काल मी एका ठिकाणी गेले होते. तेथे एक परिचित बाई असाच फुलांचा गजरा करत होत्या. गजरा बनवण्यास त्यांना उशीर लागणार; म्हणून त्या मला म्हणाल्या, उद्या मी तुला याच फुलांचा गजरा पाठवून देईन ! आणि तू मला आज त्याच फुलांचा गजरा देत आहेस. ईश्‍वरेच्छा ! त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू पाहून माझाही भाव जागृत झाला. ईश्‍वरानेच मला फुले आणण्याचा आणि पू. मावशींना गजरा देण्याचा विचार दिला ! 
- सौ. सुशांती सा. मडगावकर, न्युवाडे, वास्को, गोवा. (२२.७.२०१६)

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ॐकारा संदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
१. सकाळपासून त्रास आणि थकवा जाणवणे अन् न्यायालयातून कार्यालयाकडे चालत जातांना अकस्मात् आतून चांगला जप होऊ लागणे : ४.६.२०१६ या दिवशी सकाळपासून मला त्रास आणि थकवा असे दोन्ही जाणवत होते; परंतु काही याचिकांची सुनावणी असल्याने मला न्यायालयात जाणे भाग होते. मी न्यायालयात दुपारी साडेबारा वाजेपर्यंत होतो. तोपर्यंत मला खरेतर जप प्रयत्नपूर्वकच करावा लागत होता. नंतर मी कार्यालयाकडे चालत जात असतांना माझा अकस्मात् आतून जप होऊ लागला. त्यानंतर मला मी जप करतच नाही. तो आतून होत आहे आणि बाहेरही होत आहे, असे जाणवू लागले. माझा जप पुष्कळ आर्ततेने होत होता आणि अकस्मात् ॐ कार चालू होऊन मला आनंद जाणवू लागला. मला आनंद जाणवण्याचे प्रमाण इतके होते की, त्या आनंदाच्या लहरींनी आता माझे शरीरच रहाणार नाही. त्याचे तुकडे तुकडे होऊन ते आसमंतात पसरतात कि काय ?, असे वाटू लागले.
२. मला माझे अस्तित्व नष्ट होऊन याच क्षणी अनंतात विलीन होऊन जाऊया आणि भगवंताशी एकरूप होऊया, असे आत्यंतिक तीव्रतेने वाटले.

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन !

प.पू. पांडे महाराज
कार्य सत्य नसून कार्याचा 
कर्ताकरविता ईश्‍वरच खरा सत्य होय !
        कार्याचे व्यक्त स्वरूप आपल्यात दृश्यमान होत असते. त्यालाच आपण सत्य समजण्याची चूक करतो. प्रत्यक्षात कार्याचा कर्ता करविता (मन आणि ईश्‍वर) अव्यक्त असून तोच खरा सत्य असतो. अशा प्रकारे असत्याला सत्य मानल्याने सूक्ष्मातील ईश्‍वराशी आपले अनुसंधान रहात नाही. वास्तविक अव्यक्तच श्रेष्ठ असते.
- प.पू. पांडे महाराज (संग्राहक - डॉ. मंगलकुमार कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.५.२०१५))

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना आलेल्या अन्य अनुभूती

१. सहज स्फुरलेले शब्द हे 
ब्रह्मांडातून आले असल्याचे जाणवणे
१ अ. मंदिरामधील भ्रष्टाचार उघडकीस आणण्याविषयीचे भाषण चालू असतांना अचानक काही सूत्रे स्फुरणे आणि त्या वेळी पुष्कळ चैतन्य अन् आनंद जाणवणे : हिंदू अधिवेशन २०१५ मध्ये माझे मंदिरामधील भ्रष्टाचार उघडकीस आणण्याविषयीचे भाषण होते. मंचावर जाण्याच्या आधी काही काळ मला अचानक काही सूत्रे स्फुरली. त्या वेळी पुष्कळ चैतन्य आणि आनंद जाणवत होता. भाषणाच्या वेळीही एकदम सहजपणे बोलले जात आहे, असे वाटत होते. काहीच वेगळेपणा जाणवत नव्हता. भाषण संपल्यानंतर कृतज्ञता व्यक्त होत असतांना हे ब्रह्मांडातून आलेले शब्द होते, असे आतून जाणवले. नंतर असेही जाणवले, ही प्रक्रिया इथेच संपलेली नाही, अजून काहीतरी व्हायचे शेष आहे.
१ आ. कायदेविषयक शंकानिरसनानंतर कृतज्ञता व्यक्त करतांना ब्रह्मांडातून आलेले विचार आणि शब्द बोलले गेले, असे जाणवून हलकेपणा जाणवणे अन् पुष्कळ चांगले वाटणे : हिंदु जनजागृती समितीच्या कार्यशाळेमध्ये कायदेविषयक शंकानिरसनाच्या सत्रात मला मंचावर बसायचे होते. तेव्हा मला त्रासही होत होता आणि साधक अन् संत यांच्यासमोर असे बसण्याची माझी पात्रता नाही, असे वाटून रडूही येत होते. हे सत्र झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करत होतो, तेव्हा आतून बोलले गेले सुद्धा ब्रह्मांडातून आलेले विचार आणि शब्द होते. ज्याचे होते त्याला गेले. ठीक झाले, असे जाणवून एक हलकेपणा जाणवला आणि पुष्कळ चांगले वाटले.

फलक वाचनाचा सर्वांना लागला ध्यास ।

सौ. मनीषा साठ्ये
माझी फलक प्रसिद्धी सेवा ।
जणू गुरुदेवांनी दिलेला सात्त्विक मेवा ॥ १ ॥
नव्या आठवड्याची पहाते वाट ।
मनी विषयांची गर्दी असे दाट ॥ २ ॥
खडू उचलून जेव्हा उचलते हात ।
जिज्ञासेने नजरा पहातात सात ॥ ३ ॥
कुणी काढे छायाचित्र वा ।
कुणी विचारी प्रश्‍न, मनी ठेवूनी आस ॥ ४ ॥
चहूकडूनी सर्वांना उत्सुकता ।
फलक वाचनाचा लागला ध्यास ॥ ५ ॥

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !

सर्वत्रच्या साधकांना सेवेची सुवर्णसंधी !
        सनातनचे ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे.
        समाजापर्यंत शीघ्रतेने पोहोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे लहान धर्मरथासाठी लाईट मोटर व्हेहिकल (LMV), दुसर्‍या लहान धर्मरथासाठी लाईट ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल आणि तीन मोठ्या धर्मरथांसाठी हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल (HGV) असे परवाने असणे आवश्यक आहे.
        जे साधक वरील सेवांमध्ये काही कालावधीसाठी किंवा पूर्णवेळ सहभागी होऊ शकतात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून श्री. माधव गाडगीळ यांच्याशी ०८४५१००६००८ या क्रमांकावर वरित संपर्क साधावा.

साधक, तसेच वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांनी आपल्या बहिणीला वाचक बनवण्याची इच्छा दर्शवल्यास लक्षात घ्यावयाची सूत्रे

      दैनिक वितरणाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी दैनिक चालू करण्यास प्राधान्य द्यावे. तसे शक्य नसल्यास साप्ताहिक, पाक्षिक अथवा मासिक सनातन प्रभात चालू करू शकतो. नियतकालिक वितरणाची व्यवस्था नसल्यास हितचिंतकांना पोस्टाद्वारे अंक पाठवता येईल. नियतकालिक चालू करतांना त्यांच्या भाषेचा विचार करणे अपेक्षित आहे.
      सनातन प्रभातच्या नूतन संकेतस्थळावरून वाचक बनण्यास इच्छुक असलेले जिज्ञासू वर्गणीदार होऊ शकतात, तर वाचक त्यांच्या अंकाचे नूतनीकरण करू शकतात. या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्यांना उद्युक्त करावे. ऑनलाईन वर्गणीदार अर्ज भरणे शक्य नसल्यास स्थानिक साधकांनी त्यांना संपर्क करावा. ही सुविधा दैनिक वगळून अन्य नियतकालिकांसाठी आहे.

कलियुगात ईश्‍वरप्राप्तीसाठी साधकांनी सर्वस्वाचा त्याग करणे, यातून सिद्ध होणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे श्रेष्ठत्व !

        सध्या कलियुग आहे. भौतिक जगतातील मायानगरीत सर्वजण सुख-सुविधांसाठी आपले आयुष्य व्यतीत करत आहेत. अशा स्थितीत या सर्व सुविधांचा त्याग करून देश-विदेशांतील अनेक साधक सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली केवळ ईश्‍वरप्राप्तीसाठी पूर्णवेळ साधना करत आहेत. अशा उच्च विचारांनी भारलेल्या संतांची आणि साधकांची मांदियाळी पाहिली की वाटते, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या सर्वश्रेष्ठतेमुळेच असा चमत्कार घडत आहे ! 
- श्री. आनंद जाखोटिया, नवी देहली (३०.७.२०१६)

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना

मंदिरांमध्ये येणार्‍या भाविकांना राष्ट्र आणि धर्म यांविषयी 
जागृती करणारे संदेश पाठवण्यासाठी त्यांचे भ्रमणभाष क्रमांक 
नोंदवून घेण्याविषयी देवस्थान समिती आणि पुजारी यांना विनंती करा !
        हिंदूंमध्ये राष्ट्र आणि धर्म यांविषयी अधिकाधिक जागृती होण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. अशाच प्रकारे आपल्या भागातील मंदिरांमध्ये पुढीलप्रमाणे अभिनव उपक्रम राबवू शकतो.
        आपल्या परिसरातील देवस्थान समिती आणि पुजारी यांची भेट घेऊन त्यांना मंदिरामध्ये एक नोंदवही ठेवण्याविषयी विनंती करावी. भाविकांना नियमित राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणारे संदेश (एस्.एम्.एस्. किंवा व्हॉट्स अ‍ॅप संदेश) पाठवण्यात येतील. त्यामुळे भाविकांनी आपले भ्रमणभाष क्रमांक (व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकासह) या वहीत नोंद करावेत, अशी विनंती नोंदवहीत ठळकपणे नमूद करावी. नोंदवहीत नोंदवलेल्या भ्रमणभाष क्रमांकांचा एक गट बनवून त्यांना नियमित संदेश पाठवावेत, तसेच मंदिरामध्ये ठेवलेली नोंदवही प्रत्येक आठवड्याला पहावी आणि त्यात नवीन क्रमांक गटामध्ये जोडावेत.

सुप्रसिद्ध हस्तरेषातज्ञ के.टी. बालामणी यांनी प.पू. डॉक्टरांच्या देहत्यागापूर्वीच हिंदु राष्ट्र येणार असल्याचे सांगणे आणि प.पू. डॉक्टरांच्या १८ वर्षांपूर्वी हिंदु राष्ट्र बघायला मीपण असणार, असे केलले भाष्य यांतील साम्य !

 श्री. तुकाराम लोंढे
     दैनिक सनातन प्रभातमध्ये 'दोन भविष्यवेत्त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संदर्भात सांगितलेली माहिती' हा लेख वाचनात आला. यामध्ये सुप्रसिद्ध हस्तरेषातज्ञ के.टी. बालामणी यांनी सांगितले, "प.पू. डॉक्टरांच्या देहत्यागापूर्वीच हिंदु राष्ट्र येणार असे योग यांच्या पत्रिकेत आणि हस्तरेषांतही आहेत." हे वाचल्यावर मला पुढील सूत्र आठवले. १९९७-९८ या वर्षी घाटकोपर, मुंबई येथील जाहीर सभेनंतर प.पू. डॉक्टरांचे साधकांना मार्गदर्शन होते. त्या वेळी प.पू. डॉक्टरांनी हिंदु राष्ट्राविषयी मार्गदर्शन केले होते. त्या वेळी मी प.पू. डॉक्टरांना प्रश्‍न विचारला, "हिंदु राष्ट्रात काय काय असणार ?" त्या वेळी ते म्हणाले, "गाई असणार, फळे-फुले भरपूर असणार ! पूर्वी गोकुळात होते त्याप्रमाणे गाईंना रानात चरायला न्यायचे तेथे नदी असणार. आता तुम्ही रात्र-दिवस सेवा करीत आहात. तेवढी हिंदु राष्ट्रात करावी लागणार नाही. हिंदु राष्ट्र बघायला मीपण असणार आहे ! (टीप)" 
- श्री. तुकाराम लोंढे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. 
 (टीप - 'असे जेव्हा म्हणालो, तेव्हा माझे वय ५६ वर्षे होते. आता वय ७५ चालू असल्याने वरील मजकूर वाचतांना हिंदु राष्ट्र बघायची स्वेच्छा उरली नाही. 'ईश्‍वरेच्छेने जे होईल, ते होवो', असा विचार मनात आला'. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

क्रांतीगाथा विशेषांक

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत
प्रसिद्धी दिनांक : १५ ऑगस्ट २०१६ 
पृष्ठ संख्या :
मूल्य : ४ रुपये
क्रांतीगाथा अंकात वाचाल...!
१. भारतमातेची शोकांतिका
२. कलियुगातील पुढार्‍याची प्रतिज्ञा !
३. राष्ट्रध्वज देऊ पहात असलेला संदेश
४. प.पू. पांडे महाराज यांचे राष्ट्राप्रतीचे जाज्वल्य विचार
       १५ ऑगस्टच्या क्रांतीगाथा या विशेषांकाची आणि १६ ऑगस्टच्या नियमित दैनिक सनातन प्रभातच्या अंकांची मागणी १३ ऑगस्टला दुपारी २ वाजेपर्यंत इआरपी प्रणालीत भरावी.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
अमृत आणि विष अमृतको जहरका डर होता है ।
भावार्थ : अमृत प्यायलेल्यालासुद्धा जहर म्हणजे विष घेतले, तर आपण मरू कि काय, अशी भीती वाटू शकते; मात्र ज्याने विषच पचविलेले आहे, त्याला कशाचीच भीती नसते. सुखात राहिलेल्या साधकाला दुःखाची भीती वाटू शकते; मात्र सर्व संकटांतून गेलेल्याला कशाचीच भीती वाटत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

   
परात्पर गुरु डॉ. आठवले
  भारतातील हिंदूंनाच नव्हे, तर जगातील मानवजातीला आधार वाटतो हिंदु धर्माचा ! त्यामुळे जगभरचे जिज्ञासू अध्यात्म शिकण्यासाठी भारतात येतात. बुद्धीप्रामाण्यवादी, धर्मद्रोही आणि साम्यवादी यांचे तत्त्वज्ञान शिकण्यासाठी भारतात कोणीही येत नाही; पण हेही त्यांच्या लक्षात येत नाही ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

श्रद्धेचे महत्त्व
    आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला श्रद्धास्थान असणे आवश्यक आहे. त्यामुळे मनाला शांती मिळून मानसिक तणावाचे निर्मूलन होते.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

एक दृष्टी काश्मीरकडे !

    काश्मिरी विस्थापितांच्या पुनर्वसन सूत्राने चांगलीच उकल घेतली आहे. नुकतीच ओडिशा राज्यात पार पडलेल्या धर्मनिष्ठांच्या सभेत सौ. अर्चना काक या महिलेने काश्मीरमध्ये वर्ष १९९० च्या सुमारास अनुभवलेला प्रसंग सांगितला. त्या वेळी केवळ सात वर्षांचे वय असलेल्या या मुलीने स्वतःच्या आई-वडिलांची एकाच वेळी निघालेली प्रेतयात्रा पाहिली. तेव्हा हिंदूंना वेचून काढून त्यांची हत्या करण्यात आली. कोणी लेखक, कोणी नोकरशहा, तर कोणी पोलीस अधिकारी, तर कोणी प्राध्यापक. असे विविध व्यवसायात गुंतलेले; पण केवळ हिंदु असणे हाच दोष ठरला आणि शेकडो हिंदूंचे शिरकांड करण्यात आले. सौ. अर्चना काक या अशाच घातपात झालेल्या कुटुंबातील एक व्यक्ती. २५ वर्षांपूर्वी असा प्रसंग एकदा काश्मीरमधील हिंदूंवर ओढवला होता. आजही त्याचीच पुनरावृत्ती होत असतांना दिसत आहे. पालट काहीच नाही. हिंदूंना धमकावणे आणि काश्मीरचे खोरे सोडून जाण्याची चेतावणी देणे हेच चालू आहे. सौ. अर्चना काक भारताच्या ओडिशा राज्यात स्थायिक झाल्या आहेत. साडेचार लाख काश्मिरी हिंदू तेव्हा विस्थापित झाले. भारतभर ते विखुरले गेले आहेत. त्यांनी काश्मीर राज्यातील वडिलोपार्जित साधन-संपत्ती तेथेच सोडली आणि केवळ जीव वाचवण्यासाठी घरादारावर पाणी सोडून जन्मभूमीचा त्याग केला. त्यांच्यासमवेत तेव्हा दुःख आणि भोग यांच्या व्यतिरिक्त काहीच नव्हते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn