Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

आज धर्मसम्राट करपात्रस्वामी जयंती

सावित्री नदीतून २ बसगाड्यांसह काही वाहने आणि ३० हून अधिक जण वाहून गेल्याची शक्यता !

रायगडमधील सावित्री नदीवरील ब्रिटीशकालीन पोलादपूर-महाड पूल कोसळला !
  • ब्रिटीशकालीन पूल कमकुवत होऊनही वाहतूक चालूच ठेवल्यामुळेच घडली दुर्घटना
  • विधीमंडळात पडसाद !
    पनवेल, ३ ऑगस्ट (वार्ता.) - मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील राजेवाडी फाट्याजवळील सावित्री नदीवर असलेला ब्रिटीशकालीन पोलादपूर-महाड पूल २ ऑगस्टला रात्री ११.३० वाजता पाण्याच्या प्रचंड वेगामुळे तुटला. या वेळी पुलावरून जाणार्‍या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या २ बसगाड्यांसह अंदाजे १५ वाहने आणि ३० हून अधिक प्रवासी वाहून गेल्याची शंका व्यक्त केली जात आहे. विविध आपत्कालीन यंत्रणांद्वारे येथे मोठ्या प्रमाणात शोधकार्य चालू असूनही ३ ऑगस्टला रात्री उशिरापर्यंत दासगावजवळ सापडलेल्या २ मृतदेहांव्यतिरिक्त विशेष काही हाती आलेले नव्हते. या दुर्घटनेचे तीव्र पडसाद ३ ऑगस्टला राज्य विधीमंडळात उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मदत आणि पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील आणि सार्वजनिक बांधकाममंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांनी घटनास्थळी भेट दिली.

जिल्हाधिकारी सैनी आणि गुन्हे अन्वेषण खात्याचे संजयकुमार या दोघांनी संजय साडवीलकर यांचा भ्रष्टाचार दाबू नये ! - अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

   
डावीकडून अधिवक्ता समीर पटवर्धन, श्री. महेश उरसाल, अधिवक्ता संजीव पुनाळेकर,
बोलतांना अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, श्री. सुनील घनवट, श्री. संभाजी साळुंखे आणि श्री. प्रमोद सावंत
कोल्हापूर, ३ ऑगस्ट (वार्ता.) - जिल्हाधिकारी अमित सैनी हे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. जनतेचा आणि हिंदुत्ववाद्यांचा विरोध असतांनाही कारागृहातील महिला कैद्यांकडून प्रसाद बनवून घेणारे आणि श्री अंबाबाईच्या मूर्तीवर केलेला चुकीचा वज्रलेप दडपून टाकणारे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमित सैनी कोट्यवधी रुपयांच्या चांदीच्या रथातील भ्रष्टाचाराबाबत गप्प का आहेत ? जिल्हाधिकारी देवस्थान समितीच्या भ्रष्टाचाराविषयी चकार शब्द बोलण्यास सिद्ध नाहीत, याउट केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि पोलीस यांनी उभा केलेला साक्षीदार संजय साडवीलकर याचे नाव त्या घोटाळ्यात आहे; म्हणून अमित सैनी मूग गिळून गप्प बसले आहेत का ? कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात प्रत्येक वेळी पत्रकारांसमोर येणारे संजयकुमार पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या भ्रष्टाचार प्रकरणात काय प्रगती झाली, याविषयी बोलण्यास सिद्ध नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि संजयकुमार या दोघांनी संजय साडवीलकर यांचा भ्रष्टाचार दाबू नये, अशी चेतावणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतीकारकांच्या स्मरणार्थ असलेल्या वटवृक्षाची कत्तल

कापलेला वटवृक्ष
  • ऐतिहासिक स्थळाच्या ठिकाणी अशी विटंबना म्हणजे तसे करणार्‍यांमध्ये राष्ट्राभिमान नसल्याचेच द्योतक ! अशांवर सरकार कठोर कारवाई करणार का ?
  • घटनेची चौकशी करणार्‍या राष्ट्रप्रेमीला अपमानास्पद वागणूक
       सातारा - येथे वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतीकारक आणि स्वातंत्र्ययोद्धे यांच्या स्मरणार्थ असलेल्या वटवृक्षाची २८ जुलै या दिवशी विघ्नसंतोषी आणि बलीदानाची चाड नसलेल्या मंडळींनी कत्तल केली. याही आधी वडाच्या फांद्या तोडून केवळ खोड शिल्लक ठेवण्यात आले. या संदर्भात चौकशी करणारे राष्ट्र्रप्रेमी श्री. प्रकाश शिंदे यांनाच अपमानास्पद वागणूक मिळाली.
१. वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात जे क्रांतीकारक आणि स्वातंत्र्ययोद्धे यांनी स्वत:ला झोकून दिले अन् स्वातंत्र्यसमरात यज्ञकुंड प्रज्वलीत केले, त्यांपैकी काही क्रांतीकारकांना ब्रिटिशांनी गेंडामाळावर सर्वांसमक्ष वडाच्या झाडाला जाहीर फाशी दिली.
२. जनतेमध्ये ब्रिटीश सरकारची दहशत बसावी; म्हणून ती प्रेते कितीतरी दिवस नातेवाइकांकडे सुपुर्द न करता तशीच झाडावर गिधाडांसाठी लटकवत ठेवली होती. तोच वटवृक्ष आता नागरिक आणि पर्यटक यांच्यासाठी ऐतिहासिक दर्शनीय स्थळ बनले होते.

वेदशक्ती नावाचा वापर, हे आमच्या संस्कृतीवर आक्रमण ! - आचार्य बालकृष्ण, व्यवस्थापकीय संचालक, पतंजली आयुर्वेद

आयुर्वेदाच्या नावाने व्यवसाय करू पहाणार्‍या विदेशी आस्थापनांना 
भारतीय संस्कृतीविषयी आस्था आहे का ?
पतंजलीची टूथपेस्ट दंतकांतीला कोलगेटच्या वेदशक्तीचे आव्हान ?
     मुंबई - पतंजलीची टूथपेस्ट दंतकांतीला आव्हान देण्यासाठी ओरल केअर या आस्थापनाचा कोलगेट-पामोलिव्ह प्रथमच आयुर्वेदीक सिबाका वेदशक्ती हा स्वदेशी ब्रॅन्ड बाजारात उतरवणार आहे. भारतातील ग्राहकांचा नैसर्गिकतेवर अतिशय विश्‍वास असल्यामुळे आम्ही या तिमाहीत सिबाका वेदशक्ती या नावाने एक टूथपेस्ट बाजारात आणणार आहोत, अशी माहिती कोलगेट-पामोलिव्हकच्या वरिष्ठ उपाध्यक्षा बीना थॉमसन यांनी दिली आहे. यावर वेदशक्ती नावाचा वापर करणे, हे आमच्या संस्कृतीवर सरळसरळ आक्रमण असल्याचे पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी म्हटले आहे.
    नैसर्गिक असलेल्या पतंजलीच्या दंतकांती या दूथपेस्टला देशात मोठ्या प्रमाण मागणी आहे. यात भारतातील कोलगेट यूनिटचा आतापर्यंत सहभाग नव्हता. त्यांनी गेल्या तिमाहित अ‍ॅक्टिव्ह सॉल्ट निम आणि सेंसिटिव्ही क्लोव्ह ही उत्पादने बाजारात आणली होती. कोलगेट टूथपेस्ट त्यांचा स्वदेशी ब्रॅन्ड बाजारात उतरवत असले, तरी आम्हाला याची चिंता नाही; कारण त्यांचे नावच व्यवस्थित नाही. त्यांनी वेदशक्ती नावाऐवजी जडी-बुटी नावाचा वापर करायला हवा होता, असे आचार्य बालकृष्ण यांनी म्हटले आहे.बुरहान वानीची वकिली करणारे अमेरिकेतील पत्रकार बशरत पीर आणि त्यांच्या लेखास प्रसिद्धी देणारे भारतद्वेषी न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्र !

      भारतासह जगभरातील सर्व वृत्तपत्रांना बुरहान वानी हा जिहादी आतंकवादी असल्याचे मान्य असतांना अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राला मात्र वानी आतंकवादी वाटत नाही. या वृत्तपत्राने २५ जुलै या दिवशी एक लेख प्रसिद्ध केला असून त्यात बुरहान वानीला निर्लज्जपणे निर्दोषत्व बहाल करण्यात आले आहे. हा लेख बशरत पीर नावाच्या पत्रकाराने लिहिला असून त्यांनी त्यात बुरहान वानीची वकिली केली आहे. यातून त्यांची धर्मांधता आणि भारतद्वेष ठळकपणे दिसून येतो. या लेखाचा संक्षिप्त भाग येथे देत आहोत.
१. बुरहान वानी या २२ वर्षीय बंडखोराला ८ जुलै या दिवशी भारतीय सैनिक आणि पोलीस यांनी गोळ्या घालून ठार मारले. (आतंकवाद्याला बंडखोर संबोधून आतंकवादाचे उदात्तीकरण करणारे भारतद्वेषी बशरत पीर ! - संपादक)

पावसाच्या हाहाकाराने राज्य जलमय, नगर आणि नाशिक येथे पुराची गंभीर स्थिती

  • पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग
  • नाशिकमध्ये गोदावरी नदीचे रौद्ररूप, ४३ गावांना सावधानतेची चेतावणी
  • गोदावरी नदीचे पाणी नगरमधील कोपरगावात शिरले
  • लातूरमधील पाणी कपात ३ वर्षांनंतर रहित
         पुणे, ३ ऑगस्ट - संपूर्ण राज्यात पावसाने हाहाकार केला असून राज्यच जलमय झाले आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीने रौद्ररूप धारण केले असून नांदूर-मधमेश्‍वरमधून २ लक्ष ४१ सहस्र क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या ४३ गावांना सावधानतेची चेतावणी देण्यात आली आहे. गोदावरीच्या पुराचे पाणी कोपरगाव शहरात शिरले आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. कोपरगाव शहराला जोडणारा गोदावरी नदीवरील छोटा पुलही आणि मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूकही ठप्प झाली आहे. पुण्यातील खडकवासला धरण ९६ टक्के भरले असून धरणातून ३१ सहस्र ४५० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. लातूर शहरातही धरणे भरत आल्याने शहरामध्ये चालू असलेली पाणी कपात ३ वर्षांनंतर रहित करण्यात आली आहे.

मदरशात मुलांना लोखंडी साखळ्यांनी बांधण्याची शिक्षा !

हिंदु संतांवर खोटे आरोप करणार्‍या प्रसारमाध्यमांना मदरशांतील वास्तव दिसत नाही का ? 
मौलवींच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट
      खिजराबाद (यमुनानगर) - पंजाबच्या मोहाली जिल्ह्यातील बोम्बेपूर मदरशात गृहपाठ करून न येणार्‍या मुलांना तेथील मौलवी लोखंडी साखळीने बांधून ठेवत असल्याचे नुकतेच समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुबारक आणि साबीर या मौलवींच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
     बोम्बेपूर येथील अयूबने सांगितले की, त्याची १० आणि २० वर्षांची दोन मुले स्थानिक मदरशात शिकतात. त्यांना लोखंडी साखळीने बांधण्यात येत असल्याचे मुलांनी त्याला सांगितले. सत्यस्थिती जाणून घेण्यासाठी अयूब मदरशात गेला असता त्याला त्याच्या मुलाचा पाय साखळदंडाने बांधला असल्याचे आढळून आले. त्याने मौलवीला त्याला सोडण्याची विनंती केली; मात्र मौलवीने मुलाला सोडण्यास नकार दिला. त्यानंतर अयूबने त्याचे छायाचित्रण करून ते व्हॉट्स अ‍ॅपवर टाकले. त्याचबरोबर पोलीस ठाण्यातही तक्रार नोंदवली. पोलीस अधिकारी राणा यांनी दोन्ही मौलवींच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. मुलांना असे बांधून ठेवणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.केंद्रसरकारकडून विज्ञापनांवर ३५ कोटी रुपयांचा व्यय !

      मुंबई - केंद्रसरकारला २ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकारने केलेल्या कामांचे विज्ञापन करण्यासाठी ३५ कोटी ५८ लाख रुपयांचा व्यय करण्यात आला आहे. (सरकरने २ वर्षांत शक्य असतांनाही राममंदिर, समान नागरी कायदा, कलम ३७० हटवणे, आदी न केलेल्या कामांविषयी कोण सांगणार ? - संपादक) या संदर्भात मुंबईतील कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. देशातील प्रादेशिक भाषांसह ११ सहस्र २३६ वृत्तपत्रांमध्ये विज्ञापने देण्यात आली होती.

खासदार शशिकला पुष्पा यांना पक्षातून काढले !

असे खासदार जनतेचे प्रतिनिधी म्हणण्यास लायक आहेत का ? 
खासदार तिरुची सिवा यांना कानशिलात लावल्याचे प्रकरण
     नवी देहली - द्रमुकचे राज्यसभा खासदार तिरुची सिवा यांना देहलीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्वांदेखत कानशिलात लावल्याच्या आरोपावरून अण्णाद्रमुकच्या राज्यसभेच्या खासदार शशिकला पुष्पा यांची तमिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि पक्षाच्या नेत्या जयललिता यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे. 
       सिवा यांनी आपल्या पक्षनेत्याच्या विरोधात टिप्पणी केल्यामुळे भावनेच्या भरात आपल्या हातून ते कृत्य घडल्याची स्वीकृती शशिकला यांनी राज्यसभेच्या सभागृहात दिली. खासदार सिवा तसेच द्रमुकच्या अन्य नेत्यांनी आपली क्षमा मागितल्याचे सांगून सिवा ही अत्यंत सज्जन व्यक्ती असल्याचेही शशिकला यांनी या वेळी सांगितले. २९ जुलैच्या सायंकाळी देहलीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर चेन्नईकडे एकाच विमानातून निघण्याच्या सिद्धतेत असतांना खासदार शशिकला पुष्पा यांनी खासदार सिवा यांना सर्वांदेखत कानशिलात लावली होती.पंढरपुरात ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे यांचे श्रावणमासानिमित्त श्रीमद् भागवत कथासारास प्रारंभ

श्री. बाळासाहेब बडवे
        पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ३ ऑगस्ट (वार्ता.) - श्रावण मास हा अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो. याचेच औचित्य साधून कोर्टी रोड येथील रघुकुल सोसायटीच्या श्रीराम मंदिरात स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघ आणि रघुकुल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र अशा संपूर्ण श्रावण मासात ज्येष्ठ पत्रकार श्री. बाळासाहेब बडवे यांच्या श्रवणीय श्रीमद् भागवत कथासाराचे आयोजन बुधवार, ३ ऑगस्टपासून २ सप्टेंबरपर्यंत करण्यात आले आहे. पंढरपूर शहरातील एक ज्येष्ठ आणि व्यासंगी पत्रकार म्हणून बडवे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्याच ओघवत्या शैलीतील वक्तृत्वाच्या वाणीने आता श्रीमद्भागवत कथासारही पंढरपूरकरांना ऐकावयास मिळणार आहे. तरी या भागवत कथासाराचा नागरिकांनी बहुसंख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री भागवतप्रेमी मंडळ पंढरपूरच्या वतीने करण्यात आले आहे.

आपचे खासदार भगवंत मान यांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवा ! - खासदारांची मागणी

लोकशाहीला निरर्थक ठरवणारे व्यसनी लोकप्रतिनिधी !
      नवी देहली - आम आदमी पक्षाचे पंजाबमधील खासदार भगवंत मान यांना मद्य आणि अमली पदार्थ यांचे व्यसन सुटण्यासाठी साहाय्य करणार्‍या व्यसनमुक्ती केंद्रात पाठवा, अशी विनंती लोकसभेतील अकाली दलाचे चंदू माजरा, भाजपचे महेश गिरी, आपचे निलंबित खासदार हरिंदरसिंग खालसा या खासदारांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पत्र लिहून केली आहे. व्यसनमुक्ती केंद्रात उपचार पूर्ण करूनच मान यांना संसदेत प्रवेश दिला जावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

पाकमध्ये मोठ्या प्रमाणात आतंकवादी निर्माण करण्यात येतात !

जिवंत पकडण्यात आलेल्या आतंकवाद्याकडून उघड
      नवी देहली - काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत पकडण्यात आलेला लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी बहादूर अली पाकमधील लाहोर येथे रहाणारा असल्याचे समोर आले आहे. त्याला नुकतीच भारतीय सैन्याने अटक केली आहे. त्याच्याजवळून २३ सहस्र रुपयांचे भारतीय चलन आणि ३ एके-४७ बंदुका आणि २ पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत.
     जिवंत पकडण्यात आलेला बहादूर आणि चकमकीत मारले गेलेले त्याचे ४ सहकारी आत्मघातकी आक्रमण करण्याच्या सिद्धतेत होते, तसेच ठार मारण्यात आलेल्या बुरहान वानीसारखा पोस्टर बॉय सिद्ध करण्याचेही दायित्व त्यांच्यावर देण्यात आले होते. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार या आतंकवाद्याने अत्यंत महत्त्वाच्या माहितीसह काश्मीरमध्ये किती आतंकवादी लपले आहेत, याचीही माहिती दिली आहे. त्याने सांगितले की, पाकच्या मुजफ्फराबादमध्ये मोठ्या प्रमाणात आतंकवादी निर्माण करण्यात येत आहेत.

(म्हणे) मोदी आणि ट्रम्प यांची भाषा एकच ! - देशद्रोहाचा आरोपी कन्हैया कुमार

कन्हैया कुमार आणि जिहादी आतंकवादी, काश्मीरमधील पाकचे झेंडे फडकवणारे देशद्रोही 
यांचीही भाषा एकच आहे, असे कोणी म्हटल्यास चुकीचे ते काय ?
     कोझीकोड - मुसलमान आणि अन्य अल्पसंख्यांक समाजाविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा एकच आहे, अशी टीका जेएन्यू विद्यार्थी संघटनेचा नेता आणि देशद्रोहाचा आरोप असलेला कन्हैया कुमार याने केली आहे.
     कोझीकोड येथे ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या (एआयवायएफ्) तीन दिवसीय राष्ट्रीय मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी कन्हैया बोलत होता.अमेरिकेत भारतीय वंशाच्या मुसलमान व्यक्तीच्या दुकानाची तोडफोड !

भारतात धार्मिक विद्वेष वाढला आहे, असे म्हणणार्‍या अमेरिकेने स्वतःच्या 
देशात काय चालले आहे, याकडे आधी लक्ष द्यावे ! 
दुकानाच्या भिंतीवर लिहिले भारतियांनो परत जा !
    लॉस एंजिल्स - अमेरिकेतील नेवाडाच्या पेहरंप येथे ६० वर्षीय डॉक्टर वकार विक अहमद यांच्या ऑटो पार्ट्सच्या दुकानाची अज्ञात आक्रमणकर्त्यांनी तोडफोड करून दुकानाच्या भिंतीवर इस्लामविषयी आक्षेपार्ह लिखाण केले. तसेच भारतियांनो परत जा, मी तुम्हाला मारीन असे लिहिले. अहमद यांच्यावर पूर्वीही धर्मावरून टीका केली जात होती, तसेच त्यांना दूरभाषवरून धमक्याही देण्यात येत होत्या; मात्र आक्रमणाची घटना पहिल्यांदाच घडली आहे.

पाकमध्ये एका हिंदु आधुनिक वैद्याचा रुग्णालयात संशयास्पद मृत्यू !

पाकमधील अल्पसंख्य हिंदू मृत्यूच्या सावटाखाली जगत आहेत ! त्यांच्या रक्षणार्थ भारत 
शासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
      कराची - येथील सरकारी रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात (आयसीयूमध्ये) अनिल कुमार हे हिंदु डॉक्टर मृतावस्थेत आढळून आले. त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्यामुळे चौकशी चालू आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले. आयसीयूचा बंद दरवाजा ठोठावल्यानंतर आतून उघडला न गेल्याने तो तोडण्यात आला. आत डॉ. कुमार हे एका खुर्चीत होते. त्यांच्या शरीराची हालचाल होत नव्हती. त्यांच्याजवळ एक इंजेक्शन सापडले. हेच इंजेक्शन त्यांच्या हातावर टोचल्याचे दिसत आहे. त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यात येत आहे. कुमार यांच्याजवळ आढळलेले इंजेक्शन तपासणीसाठी सहाय्यक न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.हेरॉइनची तस्करी करणार्‍या पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या १३ कर्मचार्‍यांना अटक

गुन्हेगार आणि आतंकवादी यांचा देश बनलेला पाकिस्तान !
     लाहोर - हेरॉइनची तस्करी करण्याच्या प्रकरणी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या (पीआयएच्या) १३ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर ६ कोटी रुपये किमतीच्या ६ किलो हेरॉइनची दुबईला तस्करी करण्याच्या प्रयत्नाचा आरोप आहे. गेली काही वर्षे पीआयएचे कर्मचारी अमली पदार्थ, सिगारेट्स, मोबाईल फोन , अवैध पारपत्र, रोकड यांची तस्करी करण्याच्या प्रयत्नात काही वेळा पकडले गेले आहेत. इतर देशांत त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे. विशेष करून युरोपीय देशात ते पकडले गेले आहेत.

सनातनच्या निरपराध साधकांवरील हा अन्याय लक्षात ठेवा !

    श्री. समीर गायकवाड यांना मागील १० महिने १८ दिवसांपासून, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना १ महिना २४ दिवसांपासून कोणताही गुन्हा न करता कारागृहात डांबण्यात आले आहे.
केवळ हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी सनातनच्या निरपराध
साधकांना कारागृहात डांबणार्‍यांना हिंदु राष्ट्रात दामदुप्पटीने शिक्षा देण्यात येईल !

कॉ. पानसरे हत्येच्या मुख्य सूत्रधाराचा छडा लावण्यासाठी अन्वेषण यंत्रणांनी व्याप्ती वाढवली !

   कोल्हापूर - कॉ. पानसरे यांच्या हत्येचे अन्वेषण निर्णायक टप्प्यावर असल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. कट रचणार्‍या सूत्रधारासह मारेकर्‍यांचा येत्या काही दिवसांत छडा लावण्याच्या दृष्टीने विशेष अन्वेषण पथकाने अन्वेषणाची वरिष्ठस्तरावर व्याप्ती वाढवल्याचे यात म्हटले आहे. यासाठी कोल्हापूरसह मुंबई, पुणे येथील ३ व्यक्तींना केंद्रित करून त्यांच्याकडे चौकशी चालू केली आहे. या प्रकरणी कोल्हापूर येथील एका संशयितास चौकशीसाठी कह्यात घेतल्याचे या वृत्तात म्हटले आहे. डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणार्‍या सातारा जिल्ह्यातील एका संशयिताची सीबीआयने दोन वेळा चौकशी केल्याचीही चर्चा आहे. हा संशयित डॉ. तावडे यांच्यासमवेत २०१२ मध्ये कोल्हापूर येथे काही दिवस वास्तव्याला होता, असेही म्हटले जात आहे. (संदर्भ : दैनिक पुढारी, ३.८.२०१६)

स्वामी नित्यानंद यांच्याविरुद्ध प्रविष्ट केलेला बलात्काराचा गुन्हा उच्च न्यायालयाकडून रहित !

स्वामी नित्यानंद यांच्यावर आरोप लावण्यात आल्यावर त्याचे
वृत्त प्रसिद्ध करणारी प्रसारमाध्यमे त्यांच्या निर्दोषत्वाची वृत्ते मात्र दडपतात, हे लक्षात घ्या !
   बंगळुरू - लेनिन करुप्पन नावाच्या व्यक्तीने त्याची मैत्रीण आरती राव हिच्या साहाय्याने स्वामी नित्यानंद यांच्याविरुद्ध वर्ष २०१० मध्ये प्रविष्ट केलेला बलात्काराचा गुन्हा खोटा आणि खोडसाळपणाचा प्रकार असल्याचा निर्णय देऊन तो रहित करण्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला. याआधीही कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वामी नित्यानंद यांच्या विरुद्ध त्यांच्या हितशत्रूंनी वर्ष २०१२ मध्ये दाखल केलेले गुन्हे रहित केले होते. (या प्रकरणी खोटा आरोप करणार्‍यांवर आणि त्यावर विश्‍वास ठेवणार्‍या पोलिसांवर कठोर कारवाई झाली पाहिजे ! - संपादक)
१. काही आठवड्यांपूर्वीच उच्च न्यायालयाने पोलिसांना लेनिन करुप्पन याने प्रविष्ट केलेल्या गुन्ह्याचा अन्वेषण अहवाल पुराव्यांसह सादर करण्यास सांगितले होते.
२. या पुराव्यात आरती राव हिने स्वामी नित्यानंद यांनी तिच्यावर वर्ष २००४ ते २००९ या कालावधीत बलात्कार केल्याचे आरोप केले होते; मात्र आरती राव हिच्या वैद्यकीय तपासणीत तिला ४ प्रकारचे अत्यंत संसर्गजन्य रोग असल्याचे आढळून आले होते की, जे केवळ स्पर्शाने दुसर्‍या व्यक्तीत संक्रमित होऊ शकतात.

अमेरिकन गॉड्स या मालिकेतील हिंदु देवतांचे विडंबन हटवण्याची हिंदूंची मागणी

देवतांच्या विडंबनाच्या विरोधात भारतातील किती हिंदू अशी जागरूकता दाखवतात ?
     नेवाडा (अमेरिका) - येथील स्टार्ज आणि फ्रीमॅन्टल मीडिया यांनी त्यांच्या अमेरिकन गॉड्स या आगामी मालिकेत श्री कालीमाता आणि श्रीगणेश यांचे विडंबन केले आहे. 
    श्री कालीमाता आणि श्रीगणेश या हिंदूंच्या देवता असून हिंदूंकडून त्यांची प्रतिदिन पूजा केली जाते. या देवतांचे स्थान हे मंदिर किंवा घरातील देवघरात असते. दूरदर्शनवरील मालिकेतून या देवतांचे विडंबन करून हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर होईल. त्यामुळे स्टार्ज आणि फ्रीमॅन्टल मीडिया यांनी हिंदु देवतांची विटंबना थांबवावी, अशी मागणी अमेरिकेतील धर्माभिमानी हिंदूंनी केली आहे. मनोरंजनात्मक कार्यक्रमांची निर्मिती करणार्‍या कंपन्यांना आमचा विरोध नाही; मात्र मनोरंजनाच्या नावाखाली हिंदु धर्म आणि हिंदु देवता यांचा अनादर खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दांत हिंदूंनी या विरोधात निषेध नोंदवला आहे. याविषयी अन्य हिंदूही सनदशीर मार्गाने निषेध नोंदवत आहेत.धर्मनिरपेक्ष देशात हिंदूंवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक ! - अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

हिंगणगाव, फलटण (जिल्हा 
सातारा) येथे हिंदु धर्मजागृती सभा 

डावीकडून अधिवक्ता नीलेश
सांगोलकर आणि सौ. अनिता बुणगे

        फलटण, ३ ऑगस्ट (वार्ता.) - १९७६ या वर्षी कलम ४२ मध्ये दुरुस्ती करून भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित करण्यात आले. या धर्मनिरपेक्ष देशात केवळ हिंदूंवरच अत्याचार होत आहेत. केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण करून हिंदूंनी दिलेला पैसा अन्य धर्मियांना दिला जात आहे. हज यात्रेसाठी मुसलमानांना ८२६ कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते; मात्र हिंदूंच्या कुंभमेळ्याला अधिभार लावला जातो. आतंकवादी इशरत जहांला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार बिहारची मुलगी, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड बहीण असे संबोधतात. दुसरीकडे सनातनच्या ८०० निरपराध साधकांचा मात्र हत्येच्या खोट्या आरोपांखाली छळ चालू आहे. हिंदु संघटनांवर अकारण बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. धर्मनिरपेक्ष देशात हिंदूंवर होत असलेला हा अन्याय थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही, असे प्रातिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता श्री. नीलेश सांगोलकर यांनी केले. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील हिंगणगाव येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. सभेच्या आरंभी अधिवक्ता सांगोलकर आणि रणरागिणी शाखेच्या सौ. अनिता बुणगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. वेदमंत्रपठणाने सभेचा प्रारंभ करण्यात आला.

मशिदीसाठी विदेशातून होणारे आर्थिक साहाय्य थांबवण्यास फ्रान्सच्या पंतप्रधानांचे समर्थन

मशिदींना विदेशातून होणारे आर्थिक साहाय्य थांबवण्याचा विचार करणार्‍या 
फ्रान्सकडून भारतीय राज्यकर्ते काही शिकतील का ? 
     पॅरिस - फ्रान्समधील मशिदींच्या बांधकामांसाठी विदेशातून होणारे आर्थिक साहाय्य तात्पुरते थांबवण्याच्या संकल्पनेला पंतप्रधान मॅन्युएल वॉल्स यांनी समर्थन दिले आहे.
    जिहादी आतंकवाद्यांनी फ्रान्समध्ये केलेल्या अनेक आक्रमणांच्या पार्श्‍वभूमीवर ल मॉन्द या वृत्तपत्राशी बोलतांना मॅन्युअल वॉल्स म्हणाले, एका जिहादी आतंकवाद्याने चर्चवर आक्रमण केले, हे सरकारचे अपयशच होते. या आक्रमणात एका वयोवृद्ध ख्रिश्‍चन धर्मगुरूला ठार करण्यात आले होते. फ्रान्समध्ये गेल्या १८ मासांत ३ जिहादी आक्रमणे झाली आहेत.

रासगोविंदपूर (ओडिशा) विमानतळाच्या धावपट्टीच्या शेजारी विमान अपघाताच्या स्मरणार्थ स्मृतीस्थळ उभारणार

      कटक (ओडिशा) - दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी येथील रासगोविंदपूर धावपट्टीवर २६ जुलै १९४५ या दिवशी ब्रिटीश वायूदलाच्या २ विमानांची हवेत धडक होऊन त्यातील वायूदलाचे १४ कर्मचारी मृत्यूमुखी पडले. त्यांच्या स्मरणार्थ रासगोविंदपूर धावपट्टीवर २६ जुलै २०१६ या दिवशी श्रद्धांजली वहाण्यात आली.
     या प्रसंगी इतिहासतज्ञ श्री. अनिल धीर, गांधीवादी श्री. आदित्य पटनाईक, गांधी नेत्र रुग्णालयाचा कर्मचारी वर्ग आणि स्थानिक लोक उपस्थित होते. या वेळी रासगोविंदपूर धावपट्टीजवळ असलेल्या गांधी गुरुकुलमध्ये जागा देऊन तेथे रासगोविंदपूर विमानतळाचा इतिहास दर्शवणारे संग्रहालय स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा श्री. आदित्य पटनाईक यांनी केली. तसेच पुढील वर्षी याच दिवशी या घटनेवर आधारित एका पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.

चिनी मांजावर बंदी घालण्यावरून देहली उच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या सरकारला फटकारले !

     देहली - पतंग उडवण्यासाठी चिनी मांजाच्या वापरावर बंदी घालण्यासाठी देहली सरकारने अद्याप अधिसूचना न काढल्याने देहली उच्च न्यायालयाने सरकारला फटकारत अधिसूचना कधी काढणार, असा प्रश्‍न केला आहे. (चिनी मांजाच्या वापरामुळे लोकांचे प्राण जात असतांना त्याच्यावर बंदी घाला, असे न्यायालयाला सांगावे लागते, हे लज्जास्पद ! - संपादक) सरकारने अधिसूचना स्वाक्षरीसाठी उपराज्यपालांकडे पाठवली असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. चिनी मांजाला काचेची पूड लावलेली असते, त्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. देहलीसह अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत.नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी रशियात वास्तव्य केल्याचा कोणताही पुरावा नाही !

     नवी देहली - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या रशियामधील १९५४ आणि त्यानंतरच्या वास्तव्याचा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. नवीन २५ धारिकांच्या छाननीनंतर ते समोर आले आहे. या धारिका सार्वजनिक करण्यात आल्या आहेत. 
    मॉस्कोतील भारतीय दूतावासाला पाठवलेल्या ८ जानेवारी १९९२ च्या एका पत्रात रशियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे की, मध्यवर्ती आणि गणराज्याच्या पुराभिलेखागारातील दस्तऐवजानुसार नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १९४५ आणि त्यानंतरच्या सोव्हिएत युनियन-रशियातील वास्तव्याची कुठलीही माहिती, पुरावा उपलब्ध नाही.

पॅरिसवरील आक्रमणाच्या प्रकरणी पाकच्या नागरिकासह दोघांवर आरोप !

आतातरी पाकला आतंकवादी राष्ट्र घोषित करा !
     लंडन/पॅरिस - पॅरिसमध्ये नोव्हेंबर २०१५ मध्ये झालेल्या जिहादी आतंकवादी आक्रमणात १३० जण ठार झाले होते. या प्रकरणी अल्जेरियाचा अदेल हद्दादी आणि पाकचा महंमद उस्मान यांच्यावर फ्रान्समध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. उस्मान हा लष्कर-ए-तोयबासह पाकिस्तानातील आतंकवादी संघटनांना बॉम्ब तयार करून देत असल्याचा संशय आहे. ऑस्ट्रियामध्ये निर्वासितांसाठी उभारण्यात आलेल्या छावणीतून या दोघांना अटक करण्यात आली.

डॉ. झाकीर नाईक यांच्या बांगलादेशातील पीस स्कूलवर बंदी येणार !

भारतातील पीस स्कूलवर बंदी केव्हा येणार ?
    ढाका - देशात डॉ. झाकीर नाईक यांच्या पीस स्कूल नावाने चालू असलेल्या सर्व शाळा बंद करा, असा आदेश बांगलादेश सरकारने काढला आहे. (भारतातील विशेषतः दक्षिण भारतात असणार्‍या पीस स्कूलवरही बंदी घातली पाहिजे. या पीस स्कूलमध्ये शिकवणार्‍या काही शिक्षकांचा इसिसशी संबंध असल्याचे समोर आले आहे. भारत सरकारने बांगलादेशकडून शिकले पाहिजे ! - संपादक) बांगलादेश सरकारने डॉ. झाकीर यांच्या बांगलादेशमधील पीस टीव्हीवरही अगोदरच बंदी घातली आहे. या शाळांची संख्या किती आहे, याची आकडेवारी सरकारकडे नाही. पीस स्कूल या नावाचे बांगलादेशात २७ इंटरनॅशनल स्कूल आणि काही महाविद्यालये आहेत. बांगलादेशमधील ढाका, म्यामेनसिंह, किशोरीगंज, गाझीपूर, नौखाली, फेनी या परिसरात असलेल्या शाळांचा यात समावेश आहे. ढाक्यात पीस स्कूलची लालमतिया, मलिबाग आणि उत्तरा या तीन ठिकाणी महाविद्यालये असून त्याचे प्राचार्य म्हणून डॉ. झाकीर नाईक हेच काम पहात आहेत.

बुरहान वानीला ठार केल्यासंदर्भात पोलिसांनी क्षमा मागावी, असा आदेश मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पोलिसांना दिल्याचा पोलीस अधिकार्‍याचा दावा !

आतंकवाद्यांचे समर्थक असणारे राज्यकर्ते हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) अपरिहार्य करतात !
    श्रीनगर - हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानी याला ठार केल्याच्या संदर्भात पोलिसांनी काश्मिरी तरुणांची क्षमा मागावी, असा आदेश जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिला आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकार्‍याने दिली. (मेहबुबा मुफ्ती यांनी यापूर्वीही बुरहान वानीला ठार केल्यावर थयथयाट केला होता, त्यामुळे त्यांनी असा आदेश दिल्याची शक्यता नाकारता येत नाही ! - संपादक) हा अधिकारी म्हणाला की, मुख्यमंत्र्यांच्या लांगूलचालनाच्या भूमिकेमुळे काश्मीरमधील स्थिती गंभीर होत असून येथे कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. वानीला ठार केल्यानंतर झालेल्या हिंसाचारात पोलिसांना लक्ष्य करण्यात येत आहे. पोलीस ठाणे, पोलिसांची घरे, त्यांचे कुटुंबीय यांच्यावर आक्रमणे होत आहेत. ३ मोठी पोलीस ठाणी बंद ठेवण्यात आली आहेत. दक्षिण काश्मीरमधील १० पोलीस ठाणी रिकामी करण्यात आली आहेत. (दंगलखोर धर्मांधांपासून स्वतःचे रक्षण करू न शकणारे पोलीस हिंदूंवर मात्र नेहमीच मर्दुमकी गाजवतात ! - संपादक)

ख्रिस्ती सेवेच्या आडून धर्मांतर करतात ! - योगगुरु बाबा रामदेव यांचा आरोप

हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी भारतात 
धर्मांतर विरोधी कायदा करणे आवश्यक 
आहे ! त्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित झाले पाहिजे !
        चेन्नई - ख्रिस्ती चांगली कामे करत असली, तरी सेवेच्या आडून ते धर्मांतरही करत आले आहेत, असा आरोप योगगुरु बाबा रामदेव यांनी केला आहे. ते म्हणाले, हे लोक सेवा करतात, शाळा, महाविद्यालय आणि दवाखाने चालवतात; मात्र यांसह ते धर्मांतरही करतात. हिंदू असे कधीच करत नाहीत. आम्ही योगाचे शिक्षण देण्यासह सेवा विनामूल्य देतो; परंतु आम्ही कोणाचा धर्म नाही पालटला, तर त्यांचे जीवन पालटले. लोक नेहमी ख्रिस्त्यांकडून परोपकार शिकण्यास सांगतात; परंतु लक्षावधी हिंदु साधू आणि धर्मदायी संस्था अशाच प्रकारे सेवा देत असतात, असेही बाबा रामदेव म्हणाले.

चिपळूण येथील कोंढे-करंबवणे फाट्यावरील भगवा ध्वज आणि चौक बांधकाम विभागाने रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्तात हटवला !

प्रशासनाने कधी अन्य पंथियांच्या संदर्भात अशी कारवाई करण्याचे धाडस दाखवले आहे का ?
प्रशासनाने हटवलेला हाच तो भगवा ध्वज
     चिपळूण - खाडीपट्टा येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि शिवसेना यांच्या पुढाकाराने कोंढे-करंबवणे फाट्यावर उभारलेला भगवा ध्वज अन् चौक सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनी अनधिकृत ठरवत दंगल नियंत्रण पथक आणि मोठ्या पोलीस फौजफाट्यात २८ जुलैच्या रात्री ११ वाजता हटवला. यामुळे परिसरातील हिंदुत्वनिष्ठांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या कारवाईच्या वेळी चिपळूणचे तहसीलदारही उपस्थित होते.
    याविषयी शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण आणि जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या उपस्थितीत शिवसेना आणि हिंदुत्वनिष्ठ यांची पुढील धोरण ठरवण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत कोंढे-करंबवणे फाट्याच्या परिसरातील अन्य अनधिकृत बांधकामावर सार्वजनिक बांधकाम खात्याने याच तत्परतेने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सलग चौथ्या दिवशी अखंड महाराष्ट्रचे सूत्र विधान परिषदेत गाजले !

       मुंबई, ३ ऑगस्ट (विशेष प्रतिनिधी) - स्वतंत्र विदर्भाच्या सूत्रावरून गेल्या २९ जुलैपासून विधीमंडळात चालू असलेला गदारोळ २ ऑगस्ट या दिवशीही कायम राहिला. विधानसभेप्रमाणेच विधान परिषदेतही विरोधकांची घोषणाबाजी आणि गदारोळ यांमुळे प्रथमपासूनच कामकाजात वारंवार व्यत्यय येऊन दुपारी अखेर उर्वरित संपूर्ण दिवसासाठी कामकाज स्थगित करण्यात आले. (वारंवार गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज बंद पाडणारे लोकप्रतिनिधी जनतेपुढे कुठला आदर्श ठेवत आहेत ? - संपादक)
       भाजपने मोदी यांच्या नावे निवडणुका न लढता स्वतंत्र विदर्भाच्या सूत्रावर लढून दाखवाव्यात, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी शासनाला दिले. वेगळ्या विदर्भाचे सूत्र हा केवळ राज्यातील सध्याच्या प्रश्‍नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी केलेला प्रयत्न आहे, असा आरोप श्री. तटकरे यांनी केला, तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अखंड महाराष्ट्राचा प्रस्ताव सभागृहात मांडावा, अशी मागणी केली.

शिरगाव, देवगड येथून आतंकवादविरोधी पथकाने कह्यात घेतलेल्या दोघांना पोलीस कोठडी

अवैधरित्या सीमकार्डचा वापर होत असल्याचे उघड
एटीएस्च्या भ्रमणभाष संपर्क (कॉल) शोध मोहिमेत नेपाळला वारंवार संपर्क झाल्याचे उघड
     देवगड - देशात आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर अतीदक्षता असतांना देवगड तालुक्यातील शिरगाव येथून नेपाळमध्ये वारंवार कॉल केले गेल्याने राज्याच्या आतंकवादविरोधी पथकाने (एटीएस्) शिरगाव येथील संशयित नेपाळी युवकासह एका मोबाईल विक्रेत्याला अटक केली. युसन चंद्रमान तमांग असे या संशयित नेपाळीचे नाव आहे. तमांग याला अवैधरित्या भ्रमणभाषचे सीमकार्ड वापरण्यास देणारा शिरगाव येथील भ्रमणभाष विक्रेता नरेश सुभाष चव्हाण यालाही अटक करण्यात आली आहे. आतंकवादविरोधी पथकाने देवगड पोलिसांच्या साहाय्याने ही कारवाई केली असून दोन्ही संशयितांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
       नवी देहली - चीनच्या अरुणाचल प्रदेशजवळच्या सीमेवर ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या चौथ्या तुकडीला तैनात करण्याचा निर्णय सुरक्षा संदर्भातील केंद्रीय समितीने घेतला आहे. या तुकडीत १०० क्षेपणास्त्रे असणार आहेत. यासाठी ४ सहस्र ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची मारक क्षमता २९० कि.मी. पर्यंत आहे.

भुवनेश्‍वरवाडी (जिल्हा सांगली) येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक मद्य पिऊन उपस्थित

चारित्र्यसंपन्न आणि निर्व्यसनी शिक्षक
मिळण्यासाठी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) हवे !
        सांगली, ३ ऑगस्ट - येथील पलूस तालुक्यातील भुवनेश्‍वरवाडीमधील जिल्हा परिषद द्विशिक्षकी प्राथमिक शाळेचे शिक्षक उत्तम पाटील हे २ ऑगस्ट या दिवशी मद्य पिऊन शाळेत आले होते. (असे व्यसनी शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार ! अशांना तात्काळ पदावरून दूर करण्यात यावे ! - संपादक) या संदर्भात त्यांना जाब विचारल्यावर त्यांनी २ ऑगस्ट या दिवशी गटारी अमावस्या असल्याचे सांगितले. हा प्रकार गंभीर असून संबंधित शिक्षकांना निलंबित करण्यात येत असल्याची महिती प्राथमिक शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी दिली.
        उत्तम पाटील यांच्यावर शिक्षण विभागाकडून कारवाई होणार, असे कळल्यावर त्यांनी आत्महत्या करण्याची धमकी शिक्षणाधिकार्‍यांना दिली आहे. (चोर तो चोर, वर शिरजोर वृत्तीचे शासकीय कर्मचारी ! - संपादक) त्यामुळे शिक्षणाधिकारी वाघमोडे यांनी पाटील यांच्या विरोधात भिलवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

बलात्कार्‍यांना इस्लामी कायद्यानुसार दगड मारून ठार करावे ! - उत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान

       लक्ष्मणपुरी - उत्तरप्रदेशच्या बुलंदशहरमध्ये तीन दिवसांपूर्वी महामार्गावर एका महिलेवर आणि तिच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणी राज्याचे मंत्री आझम खान म्हणाले की, अशा आरोपींना इस्लामी कायद्यानुसार दगड मारून ठार केले पाहिजे. यापूर्वी आझम खान यांनी ही घटना राजकीय षड्यंत्र असल्याचे म्हटले होते.

राष्ट्रगीताचे अवमूल्यन अक्षम्यच !

कु. वैष्णवी येळेगांवकर
        गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात होणार्‍या मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा विविध कारणांवरून वादात सापडत आहेत. मग घोटाळ्यांमुळे गाजलेली राष्ट्रकुल स्पर्धा असो, आयपीएल् क्रिकेट स्पर्धा किंवा आताची प्रो-कबड्डी लीग स्पर्धा असो ! प्रो-कबड्डी लीगच्या आरंभी राष्ट्रगीत चुकीच्या पद्धतीने गायले गेल्यामुळे ती चर्चेत आली. अर्थात् हा वाद उद्भवणे साहजिकच होते; कारण या राष्ट्रगीताची सादरकर्ती ही अश्‍लीलतेला प्रोत्साहन देणारी सनी लिओन ही अभिनेत्री होती. राष्ट्रगीत म्हणतांना ती चुकली. त्यामुळे एका नागरिकाने तिच्या विरोधात खटला दाखल केला. राष्ट्रगीताच्या गायनासाठी आयोजकांकडून अपात्र व्यक्तीची निवड का करण्यात आली, त्यांना दुसरे कुणी मिळाले नाही का, हे कळायला मार्ग नाही. मुळात सनी लिओन आणि कबड्डी यांचा संबंधच काय ? हा प्रश्‍न उरतोच. अयोग्य व्यक्तीची निवड केल्यास त्याचे काय परिणाम होतात, हे या प्रसंगाने दाखवून दिले.

लिव्ह इन रिलेशनशिप नकोच !

      सध्या समाजातील अनेक युवक-युवती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र रहातात. चित्रपटातील कलाकारांचे अंधानुकरण करून ही विकृती जोपासली जात आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे अगदी कोवळ्या वयातील मुलेही यास बळी पडत आहेत. दायित्व नको, विवाहाचे बंधन नको किंवा विवाहानंतर आपापसांत होणारे मतभेद नकोत, यासाठी आताची तरुणाई हा मार्ग निवडते. असे करतांना आपण चुकत आहोत, याची त्यांना ना जाणीव असते, ना कसले सामाजिक भान ! धर्मशास्त्रानुसार विधीपूर्वक विवाह करून कुटुंबसंस्था निर्माण करणे, हा विवाहाचा खरा हेतू आहे; मात्र लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणारे तरुण-तरुणी विवाह करतीलच, असे नाही. त्यामुळे हा एकूण प्रकार नैतिकतेला तिलांजली दिल्यासारखा आहे.

चित्रपटांची निर्मिती करतांना परिणामांचा विचार हवाच !

श्री. कुशल गुरव
      काही मासांपासून सैराट चित्रपट पुष्कळ लोकप्रिय झाला आहे; पण चित्रपटाची संपूर्ण कथा पाहिली, तर त्यास एक आदर्श चित्रपट निश्‍चितच म्हणू शकत नाही. कारण २ घंटे चालणार्‍या या प्रेमप्रकरणामुळे कित्येक जणांच्या मनात प्रेमाचा भ्रम झाला असून तो वाढत चालला आहे. प्रत्येकाने या चित्रपटातील काही गोष्टींचे चिंतन केले पाहिजे. त्याविषयी काही सूत्रे पुढील दिली आहेत.
१. प्रेम या शब्दाची विटंबना !
     समाजात सर्वसाधारणपणे प्रेम हा व्यक्तीवरील प्रेम, या अर्थाने वापरला जातो. खरे तर प्रेम हा शब्द एकाच व्यक्तीपुरता मर्यादित नसतो. आई-वडिलांनी मुलांवर केलेले प्रेम, मुलांनी आई-वडिलांवर केलेले प्रेम, नातेवाईकांनी केलेले प्रेम, समाजाने आपल्यावर केलेले प्रेम, भगवंतावरील प्रेम, अशा अनेक गोष्टींवर आपल्याला प्रेम करता येते; पण सैराटमधील प्रेम केवळ दोन व्यक्तींपुरते सीमित असल्याचे दाखवण्यात आले आहे. यामुळे समाज प्रेम या शब्दाचा संकुचित अर्थ घेत आहे.

सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात केरळमधील विविध मान्यवर केंद्रशासनाला पत्र लिहिणार !

कठीण काळात सनातनला खंबीरपणे पाठिंबा दर्शवणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे आभार !
      काही पुरोगाम्यांकडून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे; मात्र त्याचसोबत सनातनला मिळणार्‍या पाठिंब्यातही वाढ होत आहे. सनातनवरील बंदीच्या संदर्भात केरळ राज्यातील विविध मान्यवरांनी सनातनला पाठिंबा दर्शवला असून या बंदीच्या विरोधात ते केंद्रशासनाला पत्र लिहिणार आहेत.
१. एका ज्येेष्ठ अधिवक्तांनी सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवणार असल्याचे सांगितले. तसेच सनातन संस्थेवरील बंदीच्या विरोधात पोस्टकार्डवर स्वाक्षर्‍या घेण्याची सिद्धता दर्शवली.

मराठी भाषेतील अनेकार्थी शब्द !

     एका शब्दाला शतकावर प्रतिशब्द असणारी साक्षात् देववाणी संस्कृत जिची जननी आहे, अशा माय मराठीमध्येही एका शब्दातून अनेक अर्थबोध होतात. अमृतातेही पैजा जिंके, अशा मराठी भाषेचे हे भाषासौष्ठवच म्हणावे लागेल ! (एका शब्दाच्या अनेक अर्थांमुळे शब्दजन्य विनोदाची निर्मितीही काही प्रसंगांत होते.) असे काही अनेकार्थी शब्द, त्यांचे अर्थ, तसेच व्याकरणाच्या विरामचिन्हांमुळे पालटणारे वाक्याचे अर्थ सांगणारे हे सदर !साधकांना सूचना

     पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. दोन दिवसांपूर्वी अमावास्या झाली.

दैनिक सनातन प्रभात 'सनातन गौरव विशेषांक'

सनातनच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने सनातनचे अद्वितीय कार्य आणि वैशिष्ट्ये सांगणारा रंगीत विशेषांक
प्रसिद्धी दिनांक : ७ ऑगस्ट २०१६
 विशेषांकात प्रसिद्ध करण्यात येणारे लेख 
* सनातनच्या २५ वर्षांच्या कार्याचे सिंहावलोकन 
* सनातनचे प्रचंड वेगाने वाढणारे प्रसारकार्य 
* सनातनच्या आश्रमांचे सुव्यवस्थापन 
* संत, मान्यवर आणि हिंदुत्ववादी यांनी गौरवलेला सनातन परिवार ... यासह अन्य वैशिष्ट्यपूर्ण लिखाण ! 
सनातनच्या सर्वव्यापी कार्याचे विविध पैलू जाणून घेण्यासाठी आपली मागणी आजच नोंदवा ! 
 संपर्क क्रमांक : ८४५१००६०३१, ९४०४९५६०८३

वर्धा येथे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासंदर्भात प्रशासनाला निवेदन सादर !

पोलीस अधीक्षकांना निवेदन देताना कार्यकर्ते
     वर्धा, ३ ऑगस्ट - येथे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वैभव नावडकर, पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी श्री. विवेक इलमे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिकांत पाध्ये, श्री. रमेश चिमुरकर, सौ. भक्ती चौधरी, कु. श्‍वेता जमनारे तसेच सनातन संस्थेच्या सौ. वनिता किरसान, सौ. रजनी थोटे उपस्थित होत्या. 
      साधकांनो, तुम्ही राष्ट्र आणि धर्म यांसाठी सर्वस्वाचा त्याग करत आहात. त्यामुळे भगवंत तुम्हाला आपत्काळात तारून तर नेईलच; पण तो तुम्हाला आपले करून घेईल, याची खात्री बाळगा !
     हिंदु धर्मातील संस्कृती जपण्याचे कार्य सनातन संस्था करत आहे. तिच्या पाठीशी सर्वांनी उभे रहावे. गोवर्धन पर्वत हिंदूंचा आहे आणि त्या पर्वताला प्रत्येकाने काठी लावण्याची आवश्यकता आहे ! 
- पू. मोहनबुवा रामदासी, सज्जनगड

फलक प्रसिद्धीकरता

संतांची मानहानी करणार्‍या प्रसारमाध्यमांचा हिंदुद्वेष जाणा ! 
     कर्नाटकातील स्वामी नित्यानंद यांच्याविरुद्ध २०१० मध्ये एका महिलेने दाखल केलेला बलात्काराचा गुन्हा खोडसाळपणाचा प्रकार होता, असा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे; परंतु २०१० मध्ये स्वामींची नाचक्की करणारी प्रसारमाध्यमे आता मात्र गप्प आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
Swami Nityanandjipar 2010 me lagaye gaye balatkarke arop jhuthe hai - Karnatak High Court 
2010me Swamijika apman karnewali Hindudweshi media ab chup kyu 
जागो ! 
 स्वामी नित्यानंदजी पर २०१० में लगाए गएं बलात्कार के आरोप झूठे हैं - कर्नाटक हाइकोर्ट 
२०१० में स्वामीजी का अपमान करनेवाली हिन्दूद्वेषी मीडिया अब चुप क्यों ?

प.पू. पांडे महाराजांच्या माध्यमातून ईश्‍वराची सगुण प्रीती अनुभवायला मिळणे !

प.पू. पांडे महाराज
१. देवद आश्रमात गेल्यावर प.पू. पांडे महाराजांची भेट होणे आणि त्यांनी यजमानांच्या तळहातावरील रेषा पाहून ते अध्यात्मात पुष्कळ प्रगती 
करणार असल्याचे सांगणे 
    एप्रिल २०१६ मध्ये काही वैयक्तिक कामानिमित्त मी, माझे यजमान (डॉ. अजय जोशी) आणि मुलगी (कु. प्रियांका जोशी) पुण्याला आणि त्यानंतर पनवेलला गेलो होतो. आम्ही काम झाल्यावर देवद आश्रमात थोड्या वेळासाठी गेलो. तेथे प.पू. पांडे महाराजांच्या दर्शनाची संधी मिळाली. माझे यजमान प.पू. पांडे महाराजांच्या चरणांशी बसले असता प.पू. पांडे महाराजांनी त्यांचे हात हातात घेतले आणि खांद्यापर्यंत दाबले. त्या वेळी प.पू. महाराज त्यांच्यावर उपाय करत आहेत, असे जाणवले. त्यानंतर त्यांनी यजमानांच्या तळहातावरील रेषा बघून तुम्ही अध्यात्मात पुष्कळ प्रगती करणार आहात, असे सांगितले.

नाशिक येथील सिंहस्थपर्वाच्या वेळी आलेले कटू-गोड अनुभव आणि त्यातून धर्मशिक्षणाची लक्षात आलेली आवश्यकता !

श्री. श्रेयस पिसोळकर
      भगवान श्रीकृष्णाच्या कृपेमुळे मला नाशिक येथील सिंहस्थपर्वाच्या विविध सेवांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. देवाने त्यातून बर्‍याच गोष्टी शिकवल्या. वेगवेगळे अनुभवही आले. या सर्वांमधून एक गोष्ट मात्र प्रकर्षाने लक्षात आली आणि ती म्हणजे प.पू. डॉक्टरांनी ज्या प्रकारे साधकांना घडवले आहे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला प्रारंभ केला आहे, तसे कार्य अन् मार्गदर्शन कुठेच नाही.
    कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक पर्वामध्ये बर्‍याच लोकांना धर्म म्हणजे काय ?, हेच कळले नसल्याचे लक्षात आले. त्यांना धर्मशिक्षण देण्याची किती आवश्यकता आहे, हे लक्षात आले. त्यामुळे ईश्‍वराने अध्यात्माविषयी अमूल्य मार्गदर्शन करणारे असे महान गुरु दिल्याविषयी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त झाली. विविध प्रसंगांत आलेले अनुभव सांगतो.

आंतरिक साधनेमुळे वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षीच साधनेचा निश्‍चय करून रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात साधनेसाठी आलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. मृण्मयी शैलेश कोथमिरे !

कु. मृण्मयी कोथमिरे
       कु. मृण्मयी शैलेश कोथमिरे हिचा श्रावण शुक्ल पक्ष द्वितीया (४.८.२०१६) या दिवशी तिथीनुसार १४ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त मृण्मयीचे आई-वडील आणि काका यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये आणि देवाने तिला पूर्णवेळ साधना करण्याच्या निर्णयाप्रत कसे आणले, यांविषयीची माहिती पुढे देत आहोत.
कु. मृण्मयी शैलेश कोथमिरे
हिला वाढदिवसानिमित्त सनातन
परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. श्री. शैलेश कोथमिरे (मृण्मयीचे वडील), डोंबिवली
१ अ. समंजस : मृण्मयीने लहानपणापासून कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट केला नाही. आम्ही तिला जो खाऊ आणि कपडे आणतो, त्यातच ती समाधानी असते.
१ आ. देवाची ओढ : ती लहानपणापासून देवाच्या अनुसंधानात असून कृष्णाशी बोलत असते, असे जाणवायचे. ती सतत अंतर्मुख असते आणि बर्‍याच वेळा नामजप करत असतांना तिचे ध्यान लागले असून ती निर्गुण उपासना करत आहे, असे जाणवते.

संयमी आणि समर्पित वृत्तीने संतुलित जीवन जगणारे अन् सर्व कुटुंबियांचा आधार असलेले ६६ टक्के आध्यात्मिक स्तर असणारे श्री. बलभीम येळेगावकरआजोबा (वय ८१ वर्षे) !

श्री. बलभीम
येळेगावकरआजोबा
      वर्ष २०१० मध्ये माझी आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यानंतर साधना होण्यासाठी ईश्‍वर सात्त्विक कुटुंबात जीव जन्माला घालतो, असे प.पू. डॉक्टरांनी म्हटलेले आठवले. आतापर्यंतच्या साधना प्रवासात देवाने त्याची अनुभूती दिली. आबांच्या प्रत्यक्ष सहवासाचा कालावधी अल्प असला, तरी त्यांच्या छत्रछायेखाली वाढलेल्या बाबांच्या पिढीकडून ते संस्कार आमच्यापर्यंतही पोचून सहजपणे रुजले. त्यामुळे पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय, साधनेच्या वाटचालीतील कठीण काळात सर्वांमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या या बीजरूपी संस्कारांना अंकुर फुटले आणि आता साधनेचे दृष्टीकोन अन् आश्रमातील आध्यात्मिक वातावरण या रोपाची निगा राखत आहे. पुत्र, बंधू, पती, पिता, आजोबा या सर्व नात्यांमध्ये आदर्श असलेल्या आबांचा ४ ऑगस्टला देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात सहस्रचंद्रदर्शन सोहळा होत आहे. त्यानिमित्ताने त्यांची विविध प्रसंगातून उलगडलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
श्री. बलभीम येळेगावकरआजोबा यांना सहस्रचंद्रदर्शन 
सोहळ्यानिमित्त सनातन परिवाराचा नमस्कार !

बुद्धीचा अहं उणावण्यासाठी भगवंताने योजलेली आगळी युक्ती !

श्री. अरुण डोंगरे
१. पदव्युत्तर विद्यार्थ्यांसमोर घ्यायच्या व्याख्यानामुळे 
मनात कौतुकाचे विचार येणे 
      मला मुंबई येथील आय्.आय्.टी.च्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान घ्यायला मिळाल्याचे पुष्कळ अप्रूप वाटत होते. तेथील प्रमुखांनी आंतरराष्ट्रीय फौंड्री विशेषांकात छापण्यासाठी माझ्याकडून झालेल्या कामाविषयी जाणून घेतले आणि माझ्याकडून त्या केस स्टडीज छापण्यासाठी अनुमती घेतली. त्या वेळी माझ्या मनात भगवंताने माझ्या माध्यमातून हे कसे काय करून घेतले ?, याविषयी कौतुकाचे विचार येत होते.

उच्च स्वर्गलोकातून आलेल्या बालसाधिकेची निरीक्षणक्षमता आणि तिच्या माध्यमातून तिच्या आजोबांना स्वत:तील अहंची झालेली जाणीव

कु. मृण्मयी जोशी 
      एकदा माझ्या नातीला (कु. मृण्मयी जोशी (वय ६ वर्षे) हिला) ताप आला होता. मी तिच्यासाठी द्रवरूप औषधाची बाटली आणली. तिच्या आजीने मला तिला औषध देण्यास सांगितले. मी पूर्वीच्या बाळबोध पद्धतीने सुरी घेऊन झाकणाच्या चारी बाजूचे वेष्टन घासून झाकण उघडण्याचा निष्फळ प्रयत्न करत होतो. मृण्मयी मी करत असलेले प्रयत्न पहात होती. नंतर तिने मला बाटलीवर लिहिलेली सूचना वाचायला सांगितली. मी ती सूचना वाचून बाटलीच्या झाकणावर असलेल्या रेघांवर अंगठा आणि दुसर्‍या बोटाने दाब देऊन झाकण फिरवल्यावर ते सहज निघाले.

हे गुरुदेवा, ३३ कोटी देवांच्या देवा ।

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त... 
तुमच्यामध्येच आहेत सारे ३३ कोटी देव ।
हीच आहे एकमेव सनातन प्रभातची ठेव ॥ १ ॥
तुमच्या कृपेमुळेच ही सारी दुनिया चालते ।
तुमच्या आदेशाची वाट देवाला बघायला लागते ॥ २ ॥
नका वाट पाहू कलियुग संपायची ।
घाई आहे आम्हाला तुमचे निर्गुण रूप बघायची ॥ ३ ॥
प.पू. गुरुदेवा, व्हा प्रगट तुम्ही निर्गुण रूपात ।
तेव्हाच होईल जगात हिंदु राष्ट्राची पहाट ॥ ४ ॥
तुम्हीच आहात या सार्‍या विश्‍वाची आई ।
सार्‍या जगाला प्रेम देणारी माझी गुरुमाऊली ॥ ५ ॥
माझी जन्मोजन्मीची आई तुम्हीच आहात.
तुमच्या चरणी येण्यास आतुरलेला वेडा जीव,
- सौ. स्नेहा राजकुमार जाधव, कोल्हापूर (१७.६.२०१६)

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

हिंदु राष्ट्र स्थापनेतील दीपस्तंभ असलेल्या नियतकालिक
सनातन प्रभातचे वाचक होण्यासाठी आप्तस्वकियांना प्रवृत्त करा ! 

वाचकवृद्धी मोहिमेच्या निमित्ताने...
        पत्रकारिता म्हणजे समाज, राष्ट्र आणि धर्म यांसाठी समर्पित वृत्तीने केलेली तपश्‍चर्या आहे, असा संदेश लोकमान्य टिळकांनी त्यांच्या पत्रकारितेतून दिला. आज समाजातील राष्ट्रनिष्ठा अन् धर्माभिमान ओहोटीला लागलेले असतांना लोकमान्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार पत्रकारिता करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. दुर्दैवाने आजची पत्रकारिता अर्थार्जनासाठी केली जाते. अशी स्थिती असतांनाही गेल्या १८ वर्षांपासून नियतकालिक सनातन प्रभात राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी अव्याहत कार्य करत आहे.
१. राष्ट्र आणि धर्म रक्षणार्थ
कार्यरत सनातन प्रभातची वैशिष्ट्ये !
        सनातन प्रभात हे केवळ नियतकालिक नव्हे, तर धर्माचा रखवालदार, धर्मशिक्षण देणारा धर्मगुरु, समाजसुधारणा करणारा लोकनायक आणि राष्ट्ररक्षणासाठी शब्दांचे शस्त्र धारण केलेला क्रांतीकारक आहे !
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.  - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
    पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका इत्यादी देशांतीलच नव्हे, तर भारतातील काश्मीरसह सर्वत्रच्या हिंदूंना आता कोणाचा आधार नाही. तो देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला न उमजणे, स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था आल्यास तो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे. 
भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
भावार्थ : 'दुसर्‍याला उमजू न देणे' म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. 'स्वतःचे स्वतःला न उमजणे' म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. 'स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे' म्हणजे आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो. 
(संदर्भ:  सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण) संत

सांगण्याचा केवळ शब्दार्थ नको, तर भावार्थही समजून घ्या !

      वैद्यांच्या सांगण्यानुसार मला अंगाला तेल लावून प्रतिदिन मालीश करतात. पाठीला लावलेले तेल जाण्यासाठी मालीश करणारा साधक पाठीला साबण लावून पाठ पाण्याने धुतो. एकदा तो साधक घरी जाणार असल्यामुळे त्याने दुसर्‍या साधकाला सांगितले, मालीश केल्यावर पाठीला साबण लाव. दुसर्‍या साधकाने मालीश केल्यावर पाठीला साबण लावला आणि तो स्नानगृहातून जाऊ लागला. तेव्हा मला त्याला सांगावे लागले, पाठ पाण्याने धू आणि नंतर जा. नवीन साधकाने पाठीला साबण लाव, याचा शब्दार्थ घेतल्यामुळे तो पाठीला साबण लावून जात होता. त्याने भावार्थ समजून घेतला असता, तर त्याने पाठीला साबण लावल्यावर ती पाण्याने धुतली असती. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले प्रीती आणि साक्षीभाव

      साधकांबद्दल प्रीती वाटली पाहिजे आणि वाईट घटनांकडे साक्षीभावाने पहाता यायला हवे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

चुकांकडे कसे पहावे ? 
कालक्रमणा करतांना मनुष्याकडून चुका घडतातच; पण प्रत्येक चुकीपासून आपण 
काहीतरी शिकलो, तरच पुढील आयुष्य यशस्वी होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


हलगर्जीपणाचे बळी !

संपादकीय
     मुंबई-गोवा महामार्गावर महाड येथील सावित्री नदीवरील भीषण दुर्घटनेने अवघे राज्य हादरले आणि हळहळले. महाराष्ट्रात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस चालू आहे. पाण्याच्या तडाख्यात सावित्री नदीवरील पूल वाहून गेला. त्यामुळे या पुलावरून जाणार्‍या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस्.टी.) २ बस आणि काही वाहने पुराच्या पाण्यात पडून वाहून गेली. या दुर्घटनेत अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले. बेपत्ता नागरिकांचे शोधकार्य अद्याप चालू आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn