Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

लोकमान्य टिळक पुण्यस्मरण

कोटी कोटी प्रणाम !

आज संत सावता महाराज पुण्यतिथी

सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात प्रसंगी रस्त्यावरही उतरू ! - चैतन्य छत्रेगुरुजी

बेळगाव पुरोहित संघाच्या वतीने सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात पत्रकार परिषद
सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणारे पुरोहित आणि उपरी ग्रामपंचायत यांचे आभार !
  
डावीकडून श्री. वसंत जोशीगुरुजी, श्री. चैतन्य वासुदेव छत्रेगुरुजी, 
श्री. हृषिकेश हेर्लेकरगुरुजी, श्री. संजय वाळवेकरगुरुजी, श्री. महेश कडवाडकरगुरुजी
   बेळगाव - सनातनचे कार्य हिंदूंना प्रेरणा देणारे आहे. असे असतांना तिच्या साधकांचा नाहक छळ केला जात आहे. कोणतेही आरोप सिद्ध झालेलेे नसतांना पुरोगाम्यांची सनातनवर बंदी घालण्याची ओरड का ? आम्हा पुरोहित सदस्यांचा सनातन संस्थेला पूर्ण पाठिंबा आहे. समाजाला दिशा देणार्‍या संस्थेवर बंदी घालण्याचा प्रयत्न अन्यायकारक आहे. या अन्यायकारक बंदीला आमचा पूर्ण विरोध आहे. यासाठी प्रसंगी आम्ही रस्त्यावरही उतरू, अशी चेतावणी श्री. चैतन्य छत्रेगुरुजी यांनी दिली. येथील अनसूरकर गल्ली, छत्रेवाडा येथे ३० जुलै या दिवशी बेळगाव पुरोहित संघाच्या वतीने सनातन संस्थेवरील बंदीच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. व्यासपिठावरील उपस्थित अन्य गुरुजींनीही सनातनच्या कार्याचा गौरव करत सनातन संस्थेला पाठिंबा दर्शवला.

(म्हणे) बुरहान वानी ठार होणे हा अपघात !

काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तीनंतर उपमुख्यमंत्री डॉ. निर्मल सिंह यांचे विधान !
काश्मीरसाठी शामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेल्या बलीदानाचा
 आदर्श समोर ठेवून राज्य करणार्‍यांचे तळ्यात-मळ्यात !
पीडीपी-भाजपची अशीही युती !
     कटरा - बुरहान वानी चकमकीत ठार होणे, हा अपघात होता. वानी या चकमकीत अडकला आहे, याची सरकारला माहिती नव्हती. जर तशी माहिती असती, तर सुरक्षा दल आणि पोलीस यांना तशी काळजी घेण्यास सांगण्यात आले असते, असे विधान जम्मू-काश्मीरच्या पीडीपी-भाजप युती सरकारमधील भाजपचे उपमुख्यमंत्री डॉ. निर्मल सिंह यांनी केले आहे. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, आतंकवाद्यांच्या विरोधात कृती करण्याची पद्धत अशीच असते. जर एखादा आतंकवादी शरण येत नसेल, तर त्याला असेच संपवावे लागते. अशा चकमकी पुढेही चालू रहातील. निर्मल सिंह यांच्यावर पक्षातून आणि विरोधी पक्षांतूनही टीका होऊ लागल्यावर त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले असून ते म्हणाले की,माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मी वानी ठार झाल्यानंतर झालेला हिंसाचार रोखण्याविषयीच्या दक्षतेसंबंधी बोलत होतो.
     दोनच दिवसांपूर्वी राज्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही बुरहान वानीच्या मृत्यूसंदर्भात सहानुभूती दर्शवणारे अशाच प्रकारचे विधान केले होते.

कर्नाटकमधील सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या व्यावसायिक जागा कंत्राटाने देतांना मागासवर्गियांसाठी २५ टक्के आरक्षण !

हिंदूंच्या मंदिर कारभारात सरकारी हस्तक्षेप कशाला ?
सरकार अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांचे सरकारीकरण करून 
कधी अशा प्रकारे जागांचे वाटप करतांना आरक्षण ठेवील का ?
     बेंगळुरू - कर्नाटकातील काँग्रेस सरकारने राज्यातील मंदिरांच्या व्यावसायिक जागा कंत्राटी पद्धतीने वाटप करतांना त्यात अनुसूचित जातींसाठी २० टक्के, तर अनुसूचित जमातींसाठी ५ टक्के आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसरकारच्या धर्मदाय खात्याच्या अंतर्गत ३४ सहस्र ४५३ मंदिरे आहेत. आरंभी त्यातील ८ मंदिरांमध्ये ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे.
     मंदिरांच्या आजूबाजूला असलेल्या मंदिरांच्या मालकीच्या जागा विविध व्यवसायासाठी भाडेपट्टीने देण्यात येतात. त्यातील २५ टक्के जागा मागासवर्गीयांना देण्यात याव्यात, यासंबंधीचे नियम आधीपासूनच सिद्ध होते; मात्र गेली ८ वर्षे त्यांचे पालन झाले नाही. कारण या जागेचे भाडे मागासवर्गीयांना परवडणारे नव्हते. या भाड्याचे येणारे पैसे हे मंदिरांच्या उत्पन्नाचा एक मोठा स्रोत आहे. मात्र आता काँग्रेस पक्षाने हे सूत्र उचलून धरल्याने सरकारने नियमांचे पालन करण्याचे निर्देश धर्मदाय विभागाला दिले आहेत.
     हे नियम करण्यामागे मागासवर्गीयांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे, असे शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. याआधी सरकारने सरकारी बांधकामाच्या कंत्राटातही मागासवर्गीयांंना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व निर्णय २०१८ वर्षी होणार्‍या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घेण्यात आल्याचे बोलले जाते.

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे गोहत्येच्या संशयावरून एका घरावर जमावाचे आक्रमण !

गोहत्येविषयी जनमत तीव्र असूनही त्याविषयी 
निष्क्रीय रहाणारे राज्यकर्ते लोकशाही निरर्थक ठरवतात !
     मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) - गोहत्या केल्याच्या संशयावरून संतप्त जमावाने येथील झिशाण कुरेशी या व्यक्तीच्या घरावर आक्रमण केल्याची घटना समोर आली आहे.
     जमाव घराच्या दिशेने येत असल्याचे समजल्याने कुरेशी हे पत्नी शहनाझ आणि कुटुंबातील अन्य २ सदस्यांसोबत तेथून दूर गेले. जमावाने कुरेशीच्या घराची तोडफोड करून पेटवून देण्याचा प्रयत्न केला; मात्र घटनास्थळी पोलीस पोचल्याने त्यांना तसे करता आले नाही. गोहत्येचा आरोप करण्यात आलेल्या कुटुंबाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सनातन संस्थेकडून राबवल्या जाणार्‍या उपक्रमांमुळेच चारित्र्यसंपन्न पिढी सिद्ध होऊन समृद्ध समाज प्रस्थापित होईल ! - सचिन इनामदार

सनातनवरील संभाव्य बंदीच्या 
विरोधात बेळगाव येथील हिंदुत्ववादी आणि 
राष्ट्र्रप्रेमी मित्र परिवार यांच्या वतीने पत्रकार परिषद 

डावीकडून सर्वश्री भालचंद्र जाधव, सचिन
इनामदार, व्यंकटेश शिंदे, पृथ्वीराज काकतकर

      बेळगाव - ऋषिमुनी, तसेच संत यांनी सांगितलेल्या शास्त्राप्रमाणेच सनातन संस्थाही समाजप्रबोधन करत आहेत. समाजातील अध्यात्म आणि धर्म यांविषयीचे चुकीचे समज दूर होऊन समाज नीतीवान होण्यासाठी सनातनकडून अनेक उपक्रम राबवले जातात. याच माध्यमांतून चारित्र्यसंपन्न पिढी सिद्ध होऊन समृद्ध समाज प्रस्थापित होईल, असे प्रतिपादन श्री. सचिन इनामदार यांनी केले. येथील रामनाथ मंगल कार्यालयात हिंदुत्ववादी आणि राष्ट्र्रप्रेमी मित्र परिवाराच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या होणार्‍या मागणीला विरोध करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (सनातनच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद घेणार्‍या सर्वच धर्मप्रेमींचे आभार ! - संपादक)

संतांची भूमी असणार्‍या महाराष्ट्रात देशाच्या तुलनेत अधिक नागरिक नास्तिक !

ढोंगी पुरोगाम्यांच्या प्रभावाखाली आलेला महाराष्ट्र !
     नवी देहली - २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार भारताच्या १२० कोटीपेक्षा अधिक लोकसंख्येत फक्त ३३ सहस्र जण स्वतःला नास्तिक मानतात, म्हणजेच देशात सध्या केवळ ०.००२७ टक्के जनता नास्तिक आहे. यात ५० टक्के प्रमाण महिलांचे आहे. तसेच गावातील लोक शहराच्या लोकांच्या तुलनेत धर्म सोडून नास्तिक बनण्यात पुढे आहेत. त्यातही महाराष्ट्र राज्य नास्तिक लोकांच्या संदर्भात सर्वांत पुढे आहे. येथे ९ सहस्र ६५२ लोकांनी स्वतःला नास्तिक घोषित केले आहे. दुसरीकडे बंगालसारख्या देव न मानणार्‍या बहुसंख्य साम्यवाद्यांच्या राज्यात केवळ ७८४ जणांनी स्वतःला नास्तिक म्हटले आहे.
     जगातील एकूण नास्तिक लोकांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागत असल्याचा दावा प्यू रिसर्च सेंटरने केला होता. अहवालात भारतात नास्तिकांची संख्या ७ लाखांपेक्षाही अधिक म्हटली गेली होती; मात्र जनगणनेच्या आकडेवारीनुसार ती खरी नसल्याचे दिसून आले आहे.

जल्लीकट्टू या क्रीडा प्रकाराच्या समर्थनार्थ केंद्रसरकारने दिला भगवान श्रीकृष्णाचा संदर्भ !

रुढी-परंपरा जपण्यासाठी हिंदूंच्या देवतांचा संदर्भ देणार्‍या सरकारने हिंदूंच्या 
समस्या सोडवण्यासाठीही ठोस पाउले उचलावीत, ही अपेक्षा !
तमिळनाडू सरकारकडूनही सिंधु संस्कृतीचा संदर्भ !
       केंद्रशासनाने तमिळनाडू, पंजाब आणि हरियाणा यांसह देशाच्या विविध भागांमध्ये चालणार्‍या जल्लीकट्टू हा क्रीडा प्रकार, बैलांच्या झुंजी, बैलगाड्यांच्या शर्यती यांचे समर्थन करतांना श्रीकृष्ण आणि महाभारताचा संदर्भ दिला आहे. बैलांच्या झुंजी आणि इतर प्रकार हे प्राचीन खेळांचे प्रकार आहेत. भगवान श्रीकृष्णाला राजकन्या नागनाजिती हिच्याशी विवाह करण्यासाठी ७ बैलांशी झुंज द्यावी लागली होती. बैलांच्या शर्यती, बैलगाड्यांच्या शर्यती किंवा जल्लीकट्टू आदी खेळ जैव विविधता जोपासण्यासाठी महत्त्वाचे आहेत, असे केंद्रसरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 
१. सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २०१४ मध्ये या पारंपरिक खेळांवर बंदी घातली होती. यावर ७ जानेवारी २०१५ या दिवशी केंद्रसरकारने सदर खेळ चालू ठेवण्याचा अध्यादेश काढला होता. 
२. न्यायालयाने त्यावरही स्थगिती आणली होती.

सश्रद्ध डॉक्टरांनी गरिबांना वैद्यकीय विनामूल्य सेवा पुरवल्यास त्यांना तिरुपती मंदिरासह अन्य मंदिरांमध्ये विशेष सवलती देऊ ! - आंध्रप्रदेश सरकारचा निर्णय

  • मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! डॉक्टरांनी गरिबांना विनामूल्य सेवा पुरवावी, यासाठी त्यांना दाखवलेले हे सरकारी आमीषच होय ! हिंदूंच्या मंदिरांच्या बाबतीत असे करण्याचा सरकारला काय अधिकार ? सरकारने कधी जनतेसाठी मशीद किंवा चर्चच्या बाबतीत अशी ढवळाढवळ केली असती का ?
  • मंदिरे ही भाविकांसाठी आहेत, तेथे भाविकांचा विचार प्राधान्याने झाला पाहिजे ! यासाठी मंदिरे भक्तांच्याच कह्यात असणे आवश्यक आहे !
     विजयवाडा - शासकीय रुग्णालयामध्ये गरिबांना विनामूल्य वैद्यकीय सेवा पुरवू इच्छिणार्‍या आणि देवावर श्रद्धा असणार्‍या डॉक्टरांना तिरुमला तिरूपती, श्रीशैलम्, श्री कनकदुर्गा, अण्णावरम्, सिंहाचलम् यांसारख्या मंदिरांमध्ये सर्वसमावेशक निवास अन् व्हीआयपी दर्शन यांसारख्या विशेष सुविधा बहाल करण्याचा निर्णय आंध्रप्रदेश मंत्रीमंडळाने घेतला आहे. या निर्णयासह शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय सेवा सुधारण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी अभारतीय तज्ञ डॉक्टरांनाही संपर्क करण्यात येणार आहे, अशी माहिती आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिली.

सनातन संस्थेवर बंदी आणणे म्हणजे हिंदु धर्मालाच कलंकित करण्याचा प्रयत्न ! - श्री. विजय पाटील, हिंदु जनजागृती समिती

जळगाव येथील हिंदूसंघटन मेळावा 

मेळाव्याला उपस्थित हिंदु धर्माभिमानी

       जळगाव - प्रत्येक हिंदूने धर्माचा प्रवक्ता व्हायला हवे. आज धर्म कुठेच शिकवला जात नसल्यामुळे हिंदूंना धर्मासाठी एक व्हा, असे सांगावे लागते. सनातन संस्था हिंदूंना धर्मशिक्षण देते; मात्र आज तिच्यावरच बंदी आणण्याचा प्रयत्न चालू आहे. हा एकप्रकारे हिंदु धर्माला कलंकित करण्याचाच प्रयत्न आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय पाटील यांनी केले. येथील एकचक्रनगरी (एरंडोल) येथे ३० जुलै या दिवशी झालेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात ते बोलत होते.

हिंदूंनी केलेल्या दुर्लक्षामुळे भारतातील हिंदूंवरच पलायनाची वेळ ! - श्री. सुशील तिवारी, स्वराज्य हिंदु सेना

हिंदु जनजागृती समितीच्या 
वतीने अंधेरी, मुंबई येथे हिंदूसंघटन मेळावा ! 

डावीकडून सौ. नयना भगत, श्री. प्रसाद
वडके आणि बोलतांना श्री. सुशील तिवारी

       मुंबई - हिंदूसंघटनाचा अभाव आणि धर्माविषयीचे अज्ञान हेच हिंदूंच्या अधःपतनाचे मुख्य कारण आहे. आज आतंकवाद काश्मीर, बंगाल, केरळ, उत्तर प्रदेश या राज्यांसह संपूर्ण देशभर पसरला आहे. आपल्या अनेक हिंदु बांधवांचे धर्मांतर होत आहे; परंतु हिंदू या समस्यांविषयी अजूनही जागृत होत नाहीत. उलट या समस्यांवर उपाय शोधण्यापेक्षा ते त्याकडे दुर्लक्ष करतात. त्याचेच फलित म्हणजे हिंदूंना भारतातच पलायन करण्याची वेळ आली आहे, असे मार्गदर्शन स्वराज्य हिंदु सेनेचे श्री. सुशील तिवारी यांनी केले. येथील अंधेरी (पू.) येथे ३० जुलै या दिवशी आयोजित केलेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात ते बोलत होते. असंघटित हिंदूंनी आता संघटित व्हायला हवे. काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात सनातनला छळले; मात्र हिंदू ज्यांच्याकडे आशेने बघतात, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातही सनातनचा छळ चालू आहे, हे अतिशय दुःखद आहे, असेही ते म्हणाले.

अंनिसचे कारस्थान हाणून पाडल्याविषयी हिंदु जनजागृती समितीकडून शिवसेना आणि भाजप यांचे पुन:श्‍च आभार अन् अभिनंदन !

     मुंबई - गुजरातमधील गोरक्षकांच्या आंदोलनात काही दलित तरुणांना मारहाण झाल्याच्या कथित तक्रारीला जातीय रंग देण्याचे काम मागील काही दिवसांपासून पुरोगामी, साम्यवादी आणि धर्मांध शक्ती हिरीरीने करत आहेत. सावन राठोडला पुण्यात जिवंत जाळले, तेव्हा याला दलित-मुसलमान असा रंग देऊ नका, असे आवाहन हीच मंडळी करत होती ? गोरक्षक संघटनांना कायदा कसा हातात घेता येईल ? त्यांच्या अतीउत्साहाला पोलिसांनी आळा घातला पाहिजे अन्यथा त्यातून भीषण अत्याचार उद्भवतील, असे आज कळवळून सांगणारे सर्व पुरोगामी आणि साम्यवादी हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिसने) बनवलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाच्या मूळ मसुद्याला सर्वतोपरी पाठिंबा देत होते, अशा शब्दात हिंदु जनजागृती समितीने तथाकथित पुरोगामी आणि अंनिस यांचे पितळ उघडे पाडले आहे. हिंदु जनजागृती समितीने हिंदूविरोधी कार्यकर्त्यांना सामाजिक पोलिसाचा दर्जा देण्याच्या डॉ. दाभोलकर यांच्या या मूळ मसुद्याला कडाडून विरोध केला होता. त्या वेळी विरोधी पक्ष असणार्‍या शिवसेना आणि भाजप यांच्या नेत्यांनी हिंदु जनजागृती समितीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता, असे सांगत हिंदु जनजागृती समितीने शिवसेना आणि भाजप यांचे आभार व्यक्त केले आहेत.

समाजात योगासनांचा प्रसार करणारे आणि सर्वांना पतंजलीची औषधे मिळावीत, यासाठी स्वतःची फार्मसी बंद करून तेथे पतंजलीची औषधे ठेवणारे अरविंद फार्मसीचे मालक श्री. रत्नाकर राव !

    ८.६.२०१६ या दिवशी मी अरविंद फार्मसीचे मालक श्री. रत्नाकर राव यांच्याकडे विज्ञापन घेण्यासाठी गेले होते. प्रत्येक वर्षी ते आम्हाला विज्ञापन देतात आणि सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादनेही घेतात. ते इतरांना सात्त्विक उत्पादनांविषयी आवर्जून सांगतात. ते पूर्वीपासून कन्नड साप्ताहिकाचे वर्गणीदार आहेत. स्वतःची फार्मसी बंद करून त्यांनी प.पू. रामदेवबाबांची, म्हणजे पतंजलीची उत्पादने, औषधे इत्यादी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मी त्यांना विचारले, तुमची फार्मसी एवढी चांगली चालत असतांना तुम्ही असा निर्णय का घेतला ? तेव्हा ते म्हणाले, मी योगासनांच्या वर्गाला जातो. इतरांना त्याचे महत्त्व सांगून त्यांनाही योगासनाला जाण्यास सांगतो. पुष्कळ जणांना योगासनांचा लाभ झाला आहे. त्यामुळे लोक अ‍ॅलोपथीची औषधे न वापरता पतंजलीची औषधे वापरतात. त्यांना पतंजलीची औषधे देणे, हे माझे कर्तव्य आहे. मी माझ्या तत्त्वाशी एकनिष्ठ रहाण्यासाठी फार्मसी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऐकून मला पुष्कळ चांगले वाटले. - सौ. सुशांती सावळो मडगावकर, वास्को, गोवा. (९.६.२०१६)केरळच्या फारूक महाविद्यालयातील अजीज नावाच्या वासनांध प्राध्यापकाकडून मुलीवर बलात्कार !

धर्मांध प्राध्यापकाचा लव्ह जिहाद ! हिंदूंनो, याविरोधात संघटित होऊन सनदशीर मार्गाने 
आवाज उठवा आणि सदर धर्मांधाला शासन होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करा !
अजिजच्या विरोधात गुन्हा दाखल 
      कोझीकोडे (केरळ) - येथील फारूक महाविद्यालयातील अजीज थारुवन्ना या प्राध्यापकाने एका मुलीला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर अजीज फरार झाला आहे. तो आखाती देशात पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजीज हा विवाहित असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या वाढत्या हत्यांच्या विरोधात हिंदु आणि बौद्ध यांची त्रिपुरा येथे निदर्शने !

बांगलादेश या इस्लामी राष्ट्रात अल्पसंख्यांक हिंदू आणि बौद्ध असुरक्षित !
      अगरतला (त्रिपुरा) - बांगलादेशमध्ये हिंदु आणि बौद्ध या धार्मिक अल्पसंख्यांकांना जिहाद्यांकडून लक्ष्य केले जात आहे. अल्पसंख्यांकांच्या हत्यांच्या विरोधात त्रिपुरा राज्यातील कुंजबन येथे हिंदु आणि बौद्ध यांनी नुकतीच निदर्शने केली. धर्म जागरण समिती या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने या निषेध मोर्च्याचे आयोजन केले होते. (बांगलादेशी हिंदूंच्या नरसंहाराच्या विरोधात आवाज उठवणार्‍या धर्म जागरण समितीचे अभिनंदन ! हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीही संघटित होऊन राष्ट्रव्यापी आंदोलन उभे करायला हवे ! - संपादक) जिहादी संघटनांकडून अल्पसंख्यांकांवर सतत अत्याचार केले जातात. या जिहादी गटांना अवामी लीग या बांगलादेशातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे साहाय्य मिळत आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. यापूर्वी जून मासात (महिन्यात) अशाच प्रकारचा एक निषेध मोर्चा काढण्यात आला होता. कुंजबन येथील बांगलादेश उपउच्चायुक्तांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात आला. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने उपउच्चायुक्तांना एक निवेदन सादर केले. या निवेदनात अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेसाठी बांगलादेश सरकारने कडक पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.देशात पावसामुळे ५० जणांचा मृत्यू !

      नवी देहली - देशात पडणार्‍या मुसळधार पावसामुळे अनेक राज्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात आतापर्यंत ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. बिहार, आसाम, कर्नाटक आदी राज्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. यामुळे प्रचंड आर्थिक हानी झाली आहे. 
      आसाममध्ये २१ जिल्ह्यांमध्ये पूर आला असून सुमारे २० लाख लोकांना त्याचा फटका बसला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हेलिकॉप्टरद्वारे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासह आसाममधील पूरस्थितीची पाहणी केली. बिहारच्या १० जिल्ह्यातील सुमारे १७ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. देहलीत पावसामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत करून टाकले आहे. शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. कर्नाटकची राजधानी बेंगळुरू शहर पुरामुळे ठप्प झाले आहे. संपूर्ण शहरात पाणीच पाणी झाले असून शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. शहरातील काही सखल भागांत इमारतींचे तळमजले पाण्याखाली गेले आहेत.

काश्मीरमध्ये चकमकीत २ सैनिक हुतात्मा !

काँग्रेसच्या राजवटीत सैनिक हुतात्मा होत तसेच आताच्या सरकारच्या काळातही होत आहेत ! ही 
स्थिती सरकार पालटल्याने नाही, तर हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना झाल्यावरच पालटेल !
    जम्मू - येथील नौगाव सेक्टरमध्ये ३० जुलैच्या रात्री आतंकवादी आणि सुरक्षादल यांच्यात झालेल्या चकमकीत २ सैनिक हुतात्मा झाले, तर २ आतंकवाद्यांना ठार मारण्यात यश आले. हे आतंकवादी येथून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यात एक सैनिक घायाळही झाला आहे. २ दिवसांपूर्वीही येथे २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले होते, तर एका आतंकवाद्यांला जिवंत पकडण्यात आले होते.कळंब, जिल्हा धाराशिव येथे पर्जन्ययाग आणि सुवृष्टीकारक प्रवर्ग्य विधीची पुर्णाहुती

मांजरा नदी

  • यज्ञयागादी विधींवर टीका करणार्‍या अंनिसवाल्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
  • पर्जन्ययागानंतर मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली, तर नागझरी धरण पाण्याने पूर्ण भरले !
        धाराशिव - मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे अवर्षण दूर व्हावे आणि लातूर आणि कळंब परिसरातील धरण क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस व्हावा, या उद्देशाने प्राकृती फाऊंडेशन बेंगळुरू आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कासारवाडी येथील श्री योगिराज वेद विज्ञान आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने कळंब शहरातील ढोकी रोडवरील श्री साई मंगल कार्यालयात पर्जन्ययाग आणि सुवृष्टीकारक प्रवर्ग्य विधीचे आयोजन करण्यात आले होते. २६ जुलैला प्रारंभ झालेल्या या विधीचा ३० जुलैला दुपारी २ वाजता पूर्णाहुती दिल्यानंतर समारोप झाला. कळंब येथील श्री. समीर देशपांडे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. दीपाली देशपांडे यांनी यागाचे यजमानपद भूषवले. श्री योगीराज वेद विज्ञान आश्रमचे अहिताग्नि सोमयाजी श्री. चैतन्य काळे गुरुजी त्यांच्यासह आश्रमातील १६ ऋत्विजांनी या यज्ञाचे पौरोहित्य केले.

हिंदुत्वनिष्ठांच्या अधिवेशनात घडले हिंदु राष्ट्र्र (सनातन धर्मराज्याच्या) स्थापनेचे वैचारिक मंथन !

नंदुरबार येथील 
एकदिवसीय हिंदु अधिवेशन 

दीपप्रज्वलन करतांना डावीकडून श्री. दिलीप
ढाकणे-पाटील, पू. नंदकुमार जाधव आणि कु. रागेश्री देशपांडे

        नंदुरबार, ३१ जुलै (वार्ता.) - आक्रमक बनलेल्या इसिसने उद्या भारतात इस्लामिक राष्ट्र स्थापन केल्यास भारतातील हिंदूंना आश्रयासाठी जगात अन्य कुठेही हिंदु राष्ट्र्र नाही. त्यामुळे हिंदु राष्ट्र्राची (सनातन धर्मराज्याची) स्थापना अपरिहार्य आहे, असे विचार हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु अधिवेशनात मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आले. ३१ जुलै या दिवशी नंदुरबार शहरातील अग्रवाल भवन येथे एकदिवसीय हिंदु अधिवेशन पार पडले. सनातन संस्थेचे पू. नंदकुमार जाधव, रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे आणि हिंदुस्थान शिवप्रतिष्ठानचे श्री. दिलीप ढाकणे-पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनाला प्रारंभ करण्यात आला.

पंढरपूर येथे श्री विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांकडून पैसे घेणारे २ कर्मचारी निलंबित !

मंदिर सरकारीकरणाचे असे दुष्परिणाम 
टाळण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात द्या ! 
धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच हिंदूंच्या 
मंदिरांमध्ये अशी अयोग्य कृत्ये होत आहेत.
ही स्थिती पालटण्यासाठी जनतेला धर्मशिक्षण देणे अपरिहार्य आहे !
     पंढरपूर - येथील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांकडून पैसे घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंदिर समितीच्या २ सुरक्षा कर्मचार्‍यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी संजय तेली यांनी ही कारवाई केली असून संबंधितांच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत. (चौकशीअंती कठोर कारवाई होणेही अपेक्षित आहे, तसेच आतापर्यंत भाविकांकडून घेतलेले पैसे व्याजासह मंदिर समितीकडे जमा करायला हवेत ! - संपादक) १. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी सुरक्षा कर्मचारी आणि मंदिर समितीचे काही कर्मचारी पैसे घेत असल्याच्या तक्रारी अनेक भाविकांकडून करण्यात येत होत्या.
२. मंदिर समितीच्या क्लोज्ड सर्किट टीव्हीमध्ये गोवर्धन बोंबाळे आणि मुकुंद शिंदे यांनी एका भाविक मुलीकडून दर्शनासाठी पैसे घेतल्याचे आढळून आले होते.
३. तत्पूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा करणार्‍या पुजार्‍यांची बैठक घेऊन श्री विठ्ठलाचे नित्योपचार, पोषाख आणि परंपरा यांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना तेली यांनी केल्या होत्या, तसेच कोणत्याही प्रकारची चूक झाली, तर विनासूचना तात्काळ निलंबित करण्यात येईल, असेही पुजार्‍यांना सांगण्यात आले होते.

देशाविरुद्ध बोलणार्‍यांना धडा शिकवू ! - संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर

संरक्षणमंत्र्यांनी 
तात्काळ कृती करण्याची अपेक्षा !
       पुणे, ३१ जुलै (वार्ता.) - भारतीय सैन्य कोणत्या परिस्थितीत सीमेवर लढा देते, याची सर्वांनी जाणीव ठेवण्याची आवश्यकता आहे. सैन्य प्राणांची बाजी लावत असतांना भारतमातेच्या विरोधात कोणालाही कोणतेही अपमानास्पद भाष्य करण्याचा अधिकार नाही. तसे करणार्‍यांना धडा शिकवला जाईल, अशी चेतावणी संरक्षणमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांनी दिली. ३० जुलै या दिवशी पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि भारतशक्ती डॉट इन यांच्या वतीने नितीन गोखले लिखित सियाचीन : धगधगते हिमकुंड या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी सियाचीन येथे भारताचा तिरंगा प्रथम फडकवणारे लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी, (निवृत्त) एअर मार्शल भूषण गोखले आदी मान्यवर उपस्थित होते. (देशद्रोह्यांना शासनाने लगेचच अद्दल घडवावी, अशी राष्ट्रप्रेमी नागरिकांची भावना आहे. - संपादक)
श्री. पर्रीकर पुढे म्हणाले की,
१. भारतीय सैन्य अत्यंत सक्षम, संवेदनशील आणि शक्तीशाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा हेच अंतिम ध्येय डोळ्यांसमोर ठेवून सैन्य देशासाठी प्राणपणाने लढत आहे.

एका पोलीस हवालदाराने १८ लक्ष रुपयांचा माल पळवला !

भ्रष्टाचाराने पोखरलेली पोलीस यंत्रणा !
       मुंबई, ३१ जुलै (वार्ता.) - एका पोलीस शिपायाने त्याच्या कह्यातील मुद्देमालापैकी १८ लक्ष रुपयांचा माल पळवला. या प्रकरणी कुरार पोलिसांनी २८ जुलै या दिवशी रात्री गुन्हा प्रविष्ट केला. पसार झालेल्या पोलिसाचा शोध चालू आहे. रमजान तडवी असे गुन्हा प्रविष्ट करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. ४ मेपासून तडवी हे पसार आहेत. पोलिसांचे एक पथक त्यांच्या शोधासाठी जळगाव या त्याच्या गावी जाणार असल्याचे समजते. (पोलिसांच्या अशा वागण्याने समाजाचा पोलिसांवरील विश्‍वास उडाला आहे. यासाठी पोलीस यंत्रणेतील भ्रष्टाचाराची कीड दूर करण्यासाठी भ्रष्ट पोलिसांना बडतर्फ करणे आवश्यक आहे. - संपादक)

देशातील प्रत्येक चौथा भिकारी मुसलमान !

     नवी देहली - जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार देशातील ३ लाख ७० सहस्र नागरिक कोणत्याही प्रकारचे काम करत नाहीत. त्यांना या आकडेवारीत भिकारी या श्रेणीत दाखवण्यात आले आहे. यातील २५ टक्के म्हणजे ९२ सहस्र ७६० नागरिक मुसलमान आहेत. भारतात मुसलमानांची लोकसंख्या १४.३३ टक्के आहे. २००१च्या तुलनेत २०११ मधेे भिकार्‍यांच्या संख्येत घट झाली आहे. २००१ मध्ये ती ६ लाख ३० सहस्र होती. अन्य धर्मियांमध्ये हिंदु २ लाख ६८ सहस्र, ख्रिस्ती ०.८८ टक्के, बौद्ध ०.५२, शीख ०.४५ टक्के भिकारी आहेत. ५३.१३ टक्के पुरुष आणि ४६.८७ टक्के महिला भिकारी आहेत.

बार्शी येथील उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेचा विनयभंग करणार्‍या ५ धर्मांध शिक्षकांवर गुन्हा प्रविष्ट

असे वासनांध शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवत असतील, याचा विचारच न केलेला बरा !
     बार्शी - येथील मंगळवार पेठ भागातील अँग्लो उर्दू हायस्कूलच्या नूतन मुख्याध्यापिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी ५ धर्मांध शिक्षकांवर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. एका शिक्षकाला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. सनाउल्लाह कुमठे, महिबूब खिस्तके, फारुक बागवान, इब्राहिम साचे, मुसेब कुमठे अशी गुन्हा प्रविष्ट झालेल्या शिक्षकांची नावे आहेत. याप्रकरणी मुख्याध्यापिकेने तक्रार प्रविष्ट केली आहे. ही मुख्याध्यापिका १ जुलैपासूनच शाळेत रुजू झाली होती.
     नूतन मुख्याध्यापिकेस या धर्मांध शिक्षकांनी त्यांच्या कार्यालयात घुसून आसंदीवरून ओढले आणि त्यांच्या समवेत लज्जास्पद वर्तन केले. पटलही (टेबल) फेकून दिले. तसेच उद्यापासून शाळेत यायचे नाही अन्यथा हातपाय तोडून टाकू, अशी धमकी दिली. या प्रकाराच्या विरोधात शाळा बंद ठेवण्यात आली. गटशिक्षणाधिकारी विष्णु कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सर्व शिक्षकांनी कार्यालयात यावे, असा आदेशही दिला.

अमेरिकी महिलेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी वासनांध चित्रपट दिग्दर्शक महमूद फारूकी दोषी !

     नवी देहली - भारतीय चित्रपटांंवरील संशोधनाच्या निमित्ताने देहलीत आलेल्या अमेरिकेच्या महिलेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी पिपली लाइव्ह या हिंदी चित्रपटाचा सहदिग्दर्शक महमूद फारुकी याला येथील साकेत न्यायालयाने दोषी ठरवले आहे. फारुकीच्या शिक्षेची सुनावणी २ ऑगस्टला करण्यात येणार आहे.

माओवाद्यांकडून चर्चच्या धर्मगुरूची हत्या

माओवाद्यांची वाढती आक्रमणे दूर करण्यासाठी सरकार ठोस पावले उचलणार का ?
     गडचिरोली - पोलिसांचा माहीतगार (खबर्‍या) असल्याच्या संशयावरून माओवाद्यांनी एका चर्चचे धर्मगुरु उईके मारय्या यांची हत्या केली. ही घटना आंध्रप्रदेशच्या पश्‍चिम गोदावरी जिल्ह्याच्या चिंतूर लच्चीगुडा येथे ३० जुलै या दिवशी घडली. आतापर्यंत माओवाद्यांनी पोलिसांचे माहीतगार असल्याच्या संशयावरून शेकडो जणांना ठार मारले आहे; पण धर्मगुरूंची माओवाद्यांकडून हत्या करण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे.

सनातन संस्थेसारख्या अध्यात्माचा प्रसार आणि प्रचार करणार्‍या संघटनेवर बंदी नको !

मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) येथील विविध मान्यवर आणि हिंदुत्ववादी संघटना यांचा सनातनला पाठिंबा
      मंगळवेढा (जिल्हा सोलापूर), ३१ जुलै (वार्ता.) - सनातन संस्थेसारख्या अध्यात्माचा प्रसार आणि प्रचार करणार्‍या संस्थेवर पुरोगाम्यांच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता शासनाने बंदीचा निर्णय घेऊ नये. सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करावी तर्काच्या आधारे कोणतीही कार्यवाही करू नये, अशी मागणी मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) येथील विविध मान्यवर आणि हिंदुत्ववादी संघटनांनी शासनाकडे एका पत्राद्वारे केली आहे. यामध्ये शिवसेनेचे नेते श्री. समाधान अवताडे, भाजपचे सोलापूर जिल्ह्याचे (ग्रामीण) जिल्हा उपाध्यक्ष श्री. शशिकांत चव्हाण, जिल्हा कोषाध्यक्ष श्री. सुरेश जोशी, तालुकाध्यक्ष श्री. राजेंद्र सुरवसे, मंगळवेढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. राखी कोंडूभैरी यांनी पत्र शासनाकडे पाठवून सनातन संस्थेला पाठिंबा दिला आहे. (सनातन संस्थेच्या पाठीशी उभे रहाणार्‍या सर्व मान्यवरांची सनातन संस्था आभारी आहे. - संपादक)

सरकारने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांवर बंदी घालू नये ! - प्रा. दादासाहेब जाधव

       सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या धर्म अन् राष्ट्र कार्य करणार्‍या संघटना आहेत. अत्यंत तळमळीने दिवस-रात्री एक करून या संघटनांचे कार्यकर्ते देव, देश आणि धर्म यांसाठी कार्य करीत आहेत. सरकारने या संघटनांना सर्व प्रकारचे सहकार्य केले पाहिजे, संरक्षण दिले पाहिजे; परंतु याउलट धर्मद्वेष्ट्यांच्या दबावाला बळी पडून या संघटनांवर बंदीचा विचार पुढे येतोय. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांच्यावर बंदी आणणे म्हणजे वेश्येला घरात आणून पतिव्रतेला घराच्या बाहेर काढण्यासारखे नीच कृत्य होईल. तरी या संघटनांवर मुळीच बंदी येता कामा नये. सरकारने या नास्तिक, धर्मद्रोह्यांच्या दबावाला बळी पडू नये ही विनंती. 
- प्रा. श्री. दादासाहेब गणपतराव जाधव प्रवचनकार व व्याख्याते, हिंदुत्ववादी, श्री. विद्या महायोग परंपरा, तुळजापूर.चंद्रभागेत मिसळणारे मैलामिश्रीत पाणी न थांबल्यास मुख्याधिकार्‍यांना त्याच पाण्याने आंघोळ घालू ! - गणेश अंकुशराव

       पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ३१ जुलै - चंद्रभागेच्या तिरावरील खिस्ते घाट ते वडार घाट या दरम्यानचे भुयारी गटारीचे चेंबर फुटून त्यातील मैलामिश्रीत पाणी चक्क चंद्रभागेच्या पात्रात मिसळत आहे. या घाण पाण्यामुळे चंद्रभागेचे पावित्र्य धोक्यात आले आहे. यावर त्वरित उपाययोजना न केल्यास याच पाण्याने पंढरपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना आंघोळ घालू, अशी चेतावणी महर्षि वाल्मिकी संघाचे संस्थापक कार्याध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
     आषाढी वारी नंतर भुयारी गटारीचे येथील चेंबर फुटलेले आहेत. महाद्वार घाट आणि कुंभार घाट आदी ठिकाणी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून वारीकाळात बसवलेल्या तात्पुरत्या शौचालयांची स्वच्छता याच चेंबरनजीक झालेली आहे. यामधून बाहेर पडलेल्या शौचाची घाणसुद्धा चंद्रभागेच्या पात्रात मिसळत आहे. तसेच नगरवाचन मंदिराच्या पिछाडीस असलेल्या बदबदीमधील लाखो लिटर सांडपाणीसुद्धा चंद्रभागेच्या पात्रात मिसळत आहे. ही घटना नमामी चंद्रभागा उपक्रमाला छेद देणारी तर आहेच; मात्र त्याचसमवेत चंद्रभागेला मातेसमान मानणार्‍या वारकरी सांप्रदायाचा घोर अपमान करणारी आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस !

     मुंबई - महाराष्ट्रात सर्वत्रच ३० जुलैच्या रात्रीपासून पडणार्‍या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली. कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी मुख्य रस्तेही जलमय झाले होते. पावसाच्या तडाख्यामुळे अनेकांना २६ जुलैची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटले.
१. मुंबईत भिवंडी येथील गेबीनगर येथे महानगरपालिकेने धोकादायक ठरवलेली दुमजली इमारत कोसळली. यात ८ जणांचा मृत्यू झाला.
२. ठाण्यातील पाचपाखाडी भागातील सूर्यदर्शन इमारतीच्या मागची भिंतही कोसळली; मात्र तेथे जीवितहानी झाली नाही. बैठ्या घरांमध्ये, तसेच डोंबिवलीतील काही दुकानांमध्ये पाणी शिरले.
३. मध्य रेल्वेच्या कळवा-मुंब्रा दरम्यान असलेल्या बोगद्याजवळील रेल्वे रुळावर डोंगरातून पाण्यासमवेत माती वाहून आली. त्याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला.
४. चंद्रपूर, लातूर, नाशिक, यवतमाळ, सोलापूर आणि रायगड येथेही मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली.
५. सोलापुरात जोरदार पावसामुळे तलावातील पाणी वाहून शेतात घुसले.

पुणे येथे वाहतूक पोलिसांशी वाद घालून त्यांच्या दुचाकीला लाथ मारणार्‍या तरुणीवर गुन्हा प्रविष्ट

तरुणाईकडून होणारा असा उद्दामपणा रोखण्यासाठी पोलीस कृतीशील पावले कधी उचलणार ?
     पुणे - येथील प्रवेश निषिद्ध असलेल्या रस्त्यावरून आलेल्या तरुणीला वाहतूक पोलिसांनी थांबवले. संतप्त होऊन तिने पोलिसांशी अर्वाच्य भाषेत वाद घातला आणि पोलिसांच्या दुचाकीला लाथ मारून ढकलून दिली. परिणामी गाडीच्या काही भागांची हानी झाली. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याने पोलिसांच्या तक्रारीनुसार तिच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (तरुणीने पोलिसांशी केलेले असभ्य वर्तन म्हणजे पोलिसांचा धाक संपल्याचेच लक्षण ! - संपादक) वाहतूक पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या तरुणीविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
     नवी देहली - महिलेच्या आत्महत्येच्या प्रकरणी नरेला येथील आपचे आमदार शरद चौहान यांच्यासह ७ जणांना देहली पोलिसांनी अटक केली आहे. यात देहली पोलिसांतील एका उपनिरीक्षकाचाही समावेश आहे. देहलीतील आपच्या महिला समर्थक सोनी यांनी १९ जुलैला विष पिऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिची छेडछाड झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

पिंपरी महानगरपालिकेच्या पॉलीहाऊसची दुरवस्था !

     पिंपरी, ३१ जुलै - आधुनिक तंत्रज्ञानाची शेतकर्‍यांना ओळख व्हावी, महानगरपालिकेची दैनंदिन फुलांची आवश्यकता पूर्ण व्हावी, तसेच महानगरपालिकेस उत्पन्नही मिळावे, या उद्देशाने पिंपरी महानगरपालिकेच्या वतीने तळवडे येथे पॉलीहाऊस प्रकल्प उभारण्यात आला होता. वर्ष २००० मध्ये उभारलेल्या या पॉलीहाऊसची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून पॉलीफिल्म छिन्नविछिन्न झाली आहे. जागोजागी गवत उगवले आहे, तर ठिबक सिंचन व्यवस्थेची दुरवस्था झाली आहे. या बांधकामाचे केवळ सांगाडे शिल्लक राहिले असून केवळ दिखाव्यापुरते पीक घेतले जात आहे. (या बांधकामांला एवढी अवकळा येईपर्यंत संबंधित उत्तरदायी अधिकारी काय करत होते ? जनतेच्या पैशांतून उभारल्या जाणार्‍या या प्रकल्पांची देखभाल व्यवस्थित न करणार्‍या दायित्वशून्य अधिकार्‍यांकडूनच या प्रकल्पाच्या दुरुस्तीचा व्यय वसूल करावा, तरच अधिकार्‍यांचा पाट्याटाकूपणा नियंत्रणात राहील. - संपादक) या प्रकल्पाच्या स्थळ पाहणीनंतर महापौर शकुंतला धराडे यांनी उद्यान विभागाच्या गलथान कारभाराच्या संदर्भात संताप व्यक्त केला. (नुसता संताप व्यक्त करून काय उपयोग ? महापौरांनी जर त्यांच्या कार्यकक्षेअंतर्गत येणार्‍या सर्व विभागांच्या कामांचे अभ्यासपूर्ण नियोजन केले असते, कामांचा नियमित आढावा घेतला असता, तर असा संताप व्यक्त करण्याची वेळच आली नसती. - संपादक)

राष्ट्रीयकृत अधिकोष कर्मचार्‍यांच्या संपामुळे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प

राष्ट्रहित साधणारे कर्मचारी मिळण्यासाठी हिंदु राष्ट्र (सनातन धर्मराज्य) आवश्यक !
       पुणे, ३१ जुलै - केंद्र सरकारकडून अधिकोष (बँकिंग) सुधारणेच्या नावाखाली अधिकोषांचे खाजगीकरण आणि विलीनीकरण करण्याच्या प्रक्रियेला विरोध म्हणून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या नेतृत्वाखाली देशभरातील १० लक्ष अधिकोष कर्मचार्‍यांनी २९ जुलै या दिवशी संप पुकारला होता. (देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असतांना असा संप पुकारणे, हे राष्ट्रद्रोही कृत्य नव्हे का ? - संपादक) या संपामुळे राष्ट्रीयकृत अधिकोषांच्या देशभरातील ८० सहस्र शाखा बंद होत्या. त्यामुळे पुणे शहरातील ५ सहस्र कोटी रुपयांचे धनादेश क्लीअरिंगचे व्यवहारही ठप्प झाले होते. अनेक ठिकाणी एटीएम् आणि क्लीअरिंग हाउसही बंद राहिल्याने सामान्यांची गैरसोय झाली; परंतु हा लढा सर्वसामान्य नागरिकांसाठीच असल्याचा दावा संप पुकारणार्‍या संघटनांनी केला आहे. (असा संप पुकारून सर्वसामान्यांचे हित साधण्याऐवजी आर्थिक नुकसानच केले आहे. त्यामुळे अधिकोष कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप हा समाजद्रोहीच नाही का ? - संपादक)फलक प्रसिद्धीकरता

देशद्रोह्यांसमोर लोटांगण घालणारे लाचार राज्यकर्ते !
     बुरहान वानी चकमकीत ठार होणे, हा अपघात होता. वानी या चकमकीत अडकला आहे, याची सरकारला माहिती नव्हती, असे विधान जम्मू-काश्मीरच्या पीडीपी-भाजप युती सरकारमधील भाजपचे उपमुख्यमंत्री डॉ. निर्मल सिंह यांनी केले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Muthbhedme Burhan Wanika mara jana, durghatna thi- BJPke Jammu Kashmirke upmukhyamantri Nirmal Singh
     Kya deshdrohiyoka apratyaksha samarthan uchit hai?
जागो !
: मुठभेड में बुरहान वानी का मारा जाना, दुर्घटना थी ! - भाजपा के जम्मू-कश्मीर के उपमुख्यमंत्री निर्मल सिंह
     क्या देशद्रोहियों का अप्रत्यक्ष समर्थन उचित है ?

बारामती (जिल्हा पुणे) येथील सुधारगृहातून पलायन केलेल्या १३ बांगलादेशी मुलींना अटक

राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचे लक्षण म्हटल्यास चुकीचे काय ?
     बारामती, ३१ जुलै - येथील प्रेरणा सुधारगृहातून २९ जुलै या दिवशी रात्री २ वाजण्याच्या सुमारास केअरटेकरला धमकावून आणि धक्काबुक्की करत वसतिगृहाच्या मुख्य दरवाजातूनच १३ बांगलादेशी मुलींनी पलायन केले. (महिला सुधारगृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचा बट्ट्याबोळ ! - संपादक) पलायन केलेल्या त्या मुलींना निरगुडे येथे पोलिसांनी पुन्हा अटक केली. 
       रात्रीच्या वेळी एवढ्या मुली संशयास्पद वाटल्याने ग्रामस्थ आणि पोलीस हे त्या मुलींची चौकशी करत होते. त्या वेळी त्या मुली आक्रमक झाल्या होत्या. सुरुवातीला काही वेळ त्या मुली ग्रामस्थ आणि पोलीस यांना दाद देत नव्हत्या. नंतर महिला पोलिसांच्या साहाय्याने बळाचा वापर करून त्या सर्व मुलींना अटक केली.

राष्ट्रध्वजाच्या मान राखण्याच्या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना नागपूर येथे निवेदन

निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना (उजवीकडे)
निवेदन देतांना कार्यकर्ते
      नागपूर - १५ ऑगस्टला प्लास्टीकचे ध्वज विकत घेतले जाऊन नंतर ते रस्त्यात कुठेही टाकले जातात. त्यामुळे ध्वजाची विटंबना होते. त्यादृष्टीने प्रबोधन व्हावे, तसेच प्लास्टीकच्या ध्वजाच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी, यासाठी नागपूर शहराचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पाटील यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री अतुल आर्वेन्ला, अभिजीत पोलके, संकेत चिंचोळकर उपस्थित होते. या वेळी श्री. पाटील यांनी आपण करीत असलेले कार्य चांगले आहे. याची अत्यंत आवश्यकता आहे. हे निवेदन शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांना सर्व शाळांमधून प्रबोधन करण्यासाठी पाठवत आहे, असे सांगितले. यासोबतच पोलीस उपआयुक्त नागपूर शहर यांनासुद्धा निवेदन देण्यात आले.

नगर येथे रिपब्लिकन सेनेच्या १५ कार्यकर्त्यांना अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केल्याप्रकरणी अटक

नैतिकतेचे अध:पतन झालेला पक्ष समाजाला नैतिकतेचे राज्य देईल का ?
     नगर, ३१ जुलै - जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली असल्यामुळे पोलीस अधीक्षकांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करणार्‍या रिपब्लिकन सेनेच्या १५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. (आंदोलन करण्यासाठी अन्य सनदशीर मार्गांचा अवलंब करता आला नसता का ? - संपादक) 
       येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन २८ आणि २९ जुलै या दिवशी केले. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी त्या कार्यकर्त्यांनी अंगातील शर्ट काढून अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचार्‍यांनी कोतवाली पोलीस ठाण्याकडे दूरध्वनी करून तक्रारी केल्या. आंदोलन करणार्‍या त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी कपडे घाला, आंदोलन करू नका !, असे समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु आंदोलकांनी पोलिसांचे ऐकले नाही. त्यामुळे पोलिसांनी रिपब्लिकन सेनेच्या १५ कार्यकर्त्यांना अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करणे आणि जमावबंदी आदेश मोडणे, या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करून २९ जुलै या दिवशी अटक केली.विश्‍वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक आणि भाजप नेते सुरेश हावरे यांची नियुक्ती

शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानचे विश्‍वस्त मंडळ जाहीर
     नगर, ३१ जुलै - येथील शिर्डी येथे असलेल्या श्री साईबाबा संस्थानच्या नव्या विश्‍वस्तांची नावे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहेत. विश्‍वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक आणि भाजप नेते सुरेश हावरे यांची नियुक्ती, तर उपाध्यक्ष म्हणून राहुरीचे भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर लक्ष्मणराव कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिर्डीचे आमदार हे विश्‍वस्त मंडळाचे पदसिद्ध सदस्य असतात; पण या वेळी शिर्डीचे आमदार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना विश्‍वस्त मंडळात न घेता शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांना पदसिद्ध सदस्य म्हणून घेण्यात आले आहे. (संस्थानच्या विश्‍वस्त मंडळामध्ये अधिकाधिक भक्तांचा समावेश असणे उचित आहे. - संपादक)

११ ऑगस्ट या दिवशी सिंहस्थ कुंभपर्वाची समाप्ती !

ध्वजावतरण सोहळा आणि भव्य शोभायात्रा यांचे आयोजन 
      नाशिक - ऑगस्ट २०१५ मध्ये चालू झालेले सिंहस्थ कुंभपर्व ११ ऑगस्ट या दिवशी संपत आहेत. त्या दिवशी रात्री ९.३० वाजता गुरु कन्या राशीत प्रवेश करणार असल्याने कुंभकाल समाप्त होत आहे. या वेळी ध्वजावतरण सोहळा होईल. हा सोहळा त्र्यंबकेश्‍वर येथे कुशावर्त तीर्थ आणि नाशिक येथे गोदावरीच्या काठावर पार पडणार आहे. त्र्यंबक येथील सोहळ्यास मुख्यमंत्र्यांना उपस्थित रहाण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. 
      सोहळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्‍वर आखाडा परिषद, त्र्यंबक नगरपालिका, पुरोहित संघ, सिंहस्थ नागरी समितीच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. ध्वजपर्व समाप्ती निमित्त त्र्यंबक शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यात सिंहस्थ काळात उल्लेखनीय योगदान देणारे शासकीय अधिकारी, संत, महंत यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

पॅलेट गन किती हानीकारक ?

ब्रिगेडियर (निवृत्त)
हेमंत महाजन
      काश्मीरमध्ये हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पॅलेट गनच्या करण्यात येणार्‍या वापरावर त्वरित बंदी आणावी, अशी मागणी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी नुकतीच केली. पॅलेट गनवरून मानवाधिकार संघटना अकांडतांडव करत आहेत; परंतु आपण अप्रत्यक्षपणे हिंसक फुटीरतावाद्यांचे समर्थन करत आहोत आणि सुरक्षा दलांचे मानवाधिकार विसरत आहोत, हे या संघटनांच्या अन् नेत्यांच्या गावीही नाही.
१. काश्मीरमध्ये हिंसक जमावाने सुरक्षा अधिकार्‍याचे डोळे फोडले !
    काश्मीर खोर्‍यातील हिजबुल मुजाहिदीनचा आतंकवादी बुरहान वानी याचा खात्मा केल्यापासून आतापर्यंत सुरक्षा दले आणि समाजकंटक यांच्यात ४०० हून अधिक वेळा झटापटी झाल्या आहेत. यात जमावाने शफाकत अहमद नावाच्या सुरक्षा अधिकार्‍याचे डोळे फोडल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यांच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार चालू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. याशिवाय आंदोलकांनी श्रीनगर येथील सुरक्षा अधिकारी अहमद यांना १४ जुलै या दिवशी बेदम मारहाण करून त्यांचे डोळे फोडले. त्यानंतर तेथील वाहनही जाळले. सरकारी आकडेवारीनुसार काश्मीरमध्ये झालेल्या हिंसाचारात अनुमाने २ सहस्र नागरिक आणि १ सहस्र ५०० पोलीस कर्मचारी अन् सुरक्षा दलाचे कर्मचारी घायाळ झाले आहेत. कुलगाम येथील दमहल हांजी पोरा पोलीस ठाण्यावर आक्रमण करून आंदोलकांनी ७० रायफली पळवल्याचेही प्रसारमाध्यमांनी सांगितले.

कोट्यवधी दलितांसह बौद्ध धर्मात करणार प्रवेश ! - मायावती

        लक्ष्मणपुरी - बौद्ध धर्मात प्रवेश करणे आणि पंचशीलाप्रमाणे जीवन आचरण करणे ही काशीराम यांची इच्छा होती आणि मी काशीराम यांची ती महत्त्वपूर्ण इच्छा पूर्ण करणार आहे. कोट्यवधी दलितांसह बौद्ध धर्मात प्रवेश करणार आहे, अशी घोषणा बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी केली आहे.
        केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मायावती यांच्यावर टीका करतांना म्हटले होते की, मायावतींनी यापूर्वी अनेकवेळा बौद्ध धर्मं स्वीकार करण्याची घोषणा केली; परंतु त्यांनी अजूनही हा धर्म स्वीकारला नाही. आताही त्या एक हिंदूच आहेत. या टीकेवर उत्तर देतांना मायावती यांनी वरील घोषणा केली. तसेच आठवले त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी भाजपची गुलामी करत आहेत. भाजप आठवले यांचा चेहरा पुढे करून दलित मतांचे ध्रुर्वीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे.

जिहादमुळे काश्मिरी हिंदूंना वर्ष १९९० मध्ये ८ सहस्र ७५० एकर भूमी आणि २३ सहस्र २७८ वास्तू यांवर पाणी सोडावे लागले !

* जिहाद्यांचा बीमोड करणे, हाच काश्मीर समस्येवरील मूळ तोडगा आहे. तथापि मतांच्या राजकारणासाठी आजपर्यंत याविषयी एकाही सरकारने ठोस कृती केली नाही, हे लक्षात घ्या !
* हिंदूंनो, अशी परिस्थिती भारतात इतरत्र येऊ नये, यासाठी तरी संघटित व्हा !
      वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये हिंदूंवर झालेल्या सशस्त्र जिहादी आक्रमणानंतर साडेचार लाख काश्मिरी हिंदूंना स्वत:ची रहाती घरे आणि मालमत्ता सोडून पळून जावे लागले होते. त्या वेळी काश्मिरी हिंदूंनी त्यांच्या मालकीची ८ सहस्र ७५० एकर भूमी मागे सोडली होती. यापैकी श्रीनगर जिल्ह्यात काश्मिरी हिंदूंच्या मालकीची ८३६ एकर एवढी भूमी होती. बडगाम जिल्ह्यामध्ये ४०० एकर, अनंतनागमध्ये २ सहस्र २५० एकर, कुलगाममध्ये ९८७ एकर, बांदिपोर्‍यात १५० एकर, कुपवाडामध्ये १ सहस्र ८५० एकर, गंदेरबालमध्ये २६९.२५ एकर, बारामुल्ला १,३२९.२५ एकर, शोपियनमध्ये ६७६ एकर, तर पुलवामा जिल्ह्यात १ सहस्र एकर भूमी होती.

इटलीत आजही कौतुकाने सांगितल्या जातात दुसर्‍या महायुद्धातील शीख सैनिकांच्या शौर्यगाथा !

      दुसर्‍या महायुद्धात जर्मनी, जपान आणि इटली या देशांची युती होती. त्यांच्या विरोधात इंग्लंड, अमेरिका, रशिया आदी देशांची सैन्यदले उभी ठाकली होती. त्या वेळी भारतावर ब्रिटनचे राज्य असल्याने भारतीय सैन्य त्या देशाकडून लढत होते. भारतीय सैन्यातील शीख बटालियन ही दक्षिण आफ्रिकेत इटलीच्या सैन्याविरुद्ध लढा देत होती. तरीही इटलीत आजही या युद्धातील शीख सैनिकांच्या शौर्यगाथा मोठ्या कौतुकाने सांगितल्या जातात.

शिस्तीचा बडगा हवाच अन् अंतःप्रेरणाही !

    पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी ३ ऑगस्टपासून नगरसेवकांची बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती नोंदवण्यात येणार असल्याचे नगरसचिव कार्यालयाने सांगितले. २ वर्षांपूर्वीही नगरसेवकांची बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवण्याचे प्रयत्न झाले होते. तेव्हा एकूण १५२ नगरसेवकांपैकी ९५ नगरसेवकांनी त्या यंत्रणेत नोंद केली होती. अन्य लोकप्रतिनिधींनी मात्र त्यास विरोध दर्शवला; कारण या पद्धतीमुळे सर्वसाधारण सभेला उपस्थित न रहाताही २-४ दिवसांनी येऊन हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करण्याच्या सवयीला आळा बसणार होता. आता पुन्हा एकदा ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी तो प्रत्यक्ष कृतीत कसा उतरतो ते पहाणे महत्त्वाचे आहे; कारण या यंत्रणेच्या कार्यपद्धतीतूनही पळवाटा शोधणारे महाभाग प्रत्येक क्षेत्रात असतातच.

अरूणाचल प्रदेशमधील श्री. कुरू ताई यांचा धर्माभिमान !

श्री. कुरू ताई
१. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला येण्यासाठी रेल्वेचे
 तिकीट मिळत नसल्याने विमानाने येणे
     पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला अरूणाचल प्रदेशमधील श्री. कुरू ताई हे हिंदु धर्माभिमानी आले होते. उत्तर भारतात प्रसार करणारे साधक श्री. चित्तरंजन सुराल यांनी अधिवेशनाविषयी त्यांना सांगितल्यावर पहिल्या भेटीतच ते अधिवेशनाला येण्यास सिद्ध झाले. श्री. सुराल म्हणाले, अधिवेशनाला येण्यासाठी त्यांना रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळत नव्हते. त्यामुळे ते विमानाने आले. एवढी त्यांना हिंदु धर्माविषयी ओढ आहे.
२. आश्रमातील साधक गुरुचरणांजवळ, म्हणजे सर्वांत पवित्र 
ठिकाणी असल्याचे सांगतांना डोळ्यांत पाणी येणे
      श्री. कुरू ताई आम्हाला उद्देशून म्हणाले, आप सब सही जगह पे आये हो । पवित्र जगह में ही हो । आप गुरु के चरणों में हो और आप इधर कितने सुरक्षित हो । हे बोलतांना त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले; कारण त्यांच्याकडे धर्मांतर अतिशय वेगाने चालू आहे. त्यामुळे तेथील परिस्थिती फारच बिकट आहे; म्हणून येथे त्यांना शांती, आनंद आणि सुरक्षितता जाणवली.
- सौ. देवी कपाडिया आणि सौ. अनुपमा जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.६.२०१६)

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी झालेल्या धर्माभिमान्यांची लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१. कोणत्याही संघटनेशी न जोडलेल्या युवकांनी अधिवेशनाचा खरा लाभ करून घेतल्याचे वाटणे
     या अधिवेशनाला अनेक जण राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी तळमळ असणारे; परंतु कोणत्याही संघटनेशी न जोडलेले, असे होते. त्यामुळे एरव्ही संघटनात्मक कार्य करणार्‍यांमध्ये असणारा अहंकार त्यांच्यात दिसत नव्हता. ते अधिवेशनातील प्रत्येक गोष्ट शिकून आत्मसात करत होते किंबहुना राष्ट्र आणि धर्म यांविषयी त्यांच्या मनात जी काही कल्पना होती; ती त्यांना अधिवेशनात प्रत्यक्षात दिसत होती. त्यामुळे अधिवेशनाचा या युवकांनी खरा लाभ करून घेतला, असे वाटले.

देशातील भगवान शिवाची ८ मंदिरे ही वास्तूरचनेचा अद्भूत नमुना !

भारतीय संस्कृतीची महानता आणि भव्यता दर्शवणारे उदाहरण !
      या पवित्र भारत भूमीत केदारनाथ, कालहस्ती, एकंबरानाथ, थिरुवनामलई, थिरुवनाईकालम्, चिदंबरम् नटराज, रामेश्‍वरम् आणि कालेश्‍वरम् ही भगवान शिवाची एकाहून एक सुबक आणि स्वयंभू मंदिरे आहेत. या मंदिरांची वास्तूरचना भारतीय संस्कृतीची महानता आणि भव्यता तर दर्शवतेच; पण ती वास्तूरचनेचा अद्भूत नमुना असल्याची पुष्टी वास्तूविशारदांनीही दिली आहे. या मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या काळी कोणत्याही अत्याधुनिक यंत्रणा आणि जीपीएस् यंत्रणा नसतांना भूमीपासून १०० मीटर उंचीवर ही सर्व मंदिरे बांधली आहेत. आधुनिक यंत्रणेअभावी एका सरळ रेषेत मध्यावर अत्यंत सुबक आणि शिल्पाकृतीची सांगड घालून ही मंदिरे कशाप्रकारे वसवण्यात आली असतील, याचे कोडे वास्तूविशारदांना अद्यापही उलगडलेले नाही.

दैवदुर्विलास

     लोकमान्य टिळक यांच्या स्मरणार्थ लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने १ ऑगस्ट या दिवशी माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाविषयी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. एक लक्ष रुपये, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. खरे तर ज्या व्यक्तीच्या स्मरणार्थ पुरस्कार दिला जातो ती व्यक्ती आणि पुरस्कारार्थी यांच्यामध्ये थोडीतरी साम्यस्थळे असावीत, असा सर्वसाधारण संकेत आहे; पण लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार मात्र यंदा अपवाद ठरला आहे.
१. आस्तिक टिळक आणि नास्तिक पवार !
     देव, देश आणि धर्म यांच्यासाठी लोकमान्य टिळक यांनी त्यांचे आयुष्य समर्पित केले, तर शरद पवार देव मानत नाहीत. महाराष्ट्रातील कोट्यवधी जनता देवाला मानते. त्यामुळे मी देव मानत नसलो, तरी त्यांच्या धार्मिक भावनांचा आदर करण्यासाठी मी पंढरपूरच्या देवळात आलो, असे वक्तव्य त्यांनी केले होते. शनिशिंगणापूर येथे धार्मिक परंपरेच्या विरोधात जाऊन तेथील चौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी काही प्रसिद्धीलोलुप महिलांनी आंदोलन आरंभले होते, त्या वेळीही पवार यांनी पुरुष आणि महिला असा भेद मानणारा देव असेल, तर तो माझ्या लेखी देवच नाही, असे प्रतिपादन केले होते. त्यामुळे आध्यात्मिक पिंड असणारे आणि कारागृहात असतांना गीतारहस्य हा ग्रंथ लिहणारे लोकमान्य टिळक आणि शरद पवार यांच्यात आस्तिक आणि नास्तिकाएवढा भेद आहे, असेच म्हणावे लागते.
दैनिक सनातन प्रभात सनातन गौरव विशेषांक
सनातनच्या रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने सनातनचे 
अद्वितीय कार्य आणि वैशिष्ट्ये सांगणारा रंगीत विशेषांक
प्रसिद्धी दिनांक : ७ ऑगस्ट २०१६
विशेषांकात प्रसिद्ध करण्यात येणारे लेख
  •  सनातनच्या २५ वर्षांच्या कार्याचे सिंहावलोकन
  •  सनातनचे प्रचंड वेगाने वाढणारे प्रसारकार्य
  •  सनातनच्या आश्रमांचे सुव्यवस्थापन
  •  संत, मान्यवर आणि हिंदुत्ववादी यांनी गौरवलेला सनातन परिवार
        ... यासह अन्य वैशिष्ट्यपूर्ण लिखाण !
सनातनच्या सर्व व्यापी कार्याचे विविध पैलू
जाणून घेण्यासाठी आपली मागणी आजच नोंदवा !
संपर्क क्रमांक : ८४५१००६०३१, ९४०४९५६०८३

मराठी भाषेतील अनेकार्थी शब्द !

     एका शब्दाला शतकावर प्रतिशब्द असणारी साक्षात् देववाणी संस्कृत जिची जननी आहे, अशा माय मराठीमध्येही एका शब्दातून अनेक अर्थबोध होतात. अमृतातेही पैजा जिंके, अशा मराठी भाषेचे हे भाषासौष्ठवच म्हणावे लागेल ! (एका शब्दाच्या अनेक अर्थांमुळे शब्दजन्य विनोदाची निर्मितीही काही प्रसंगांत होते.) असे काही अनेकार्थी शब्द, त्यांचे अर्थ, तसेच व्याकरणाच्या विरामचिन्हांमुळे पालटणारे वाक्याचे अर्थ सांगणारे हे सदर !

हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !
English
: www.hindujagruti.org  
      हा देश जोपर्यंत देशभक्तीचा सागर होत नाही, तोपर्यंत हे राष्ट्र म्हणून टिकणे शक्य नाही. - पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान

नोव्हेंबर २०१५ मध्ये स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या वतीने सिंगापूर येथे घेण्यात आलेल्या प्रवचनांचा आढावा

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात २६ जुलै ते १ ऑगस्ट या कालावधीत 
चालू असलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्यशाळेच्या निमित्ताने...
सौ. श्‍वेता क्लार्क
१. प्रथम प्रवचनातील वैशिष्ट्ये 
१ अ. प्रवचनाला आलेल्या ४ जिज्ञासूंचा चांगला सहभाग असणे आणि चांगले प्रश्‍न विचारून त्यांनी शंकानिरसन करवून घेणे : १७.११.२०१५ या दिवशी घेतलेल्या स्वभावदोष-निर्मूलन या विषयावरील प्रथम प्रवचनाला २० जिज्ञासू आले होते. त्यांच्यापैकी अनेेकांनी एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ वाचून नामसाधनेला आरंभ केला होता. त्यांपैकी ४ जिज्ञासूंचा सहभाग चांगला होता. त्यांनी कोणता नामजप करावा ? ॐ लावून नामजप करणे योग्य आहे का ? साधना न करता केवळ स्वभावदोष-निर्मूलनासाठीचे प्रयत्न केले, तर काय होईल ? मासिक पाळी चालू असतांना साधना केली, तर चालेल का ?, यांसारखे चांगले प्रश्‍न विचारून शंकांचे समाधान करून घेतले.

चीनने मुसलमानांवर घातलेले निर्बंध

चीनला कळते, ते भारतातील एकाही राजकीय पक्षाला का 
कळत नाही ? त्याचे राष्ट्रावर मुळीच प्रेम नाही, हे यातून सिद्ध होते !
     मुसलमान धर्मगुरु अथवा नागरिक प्रक्षोभक भाषणे करू शकत नाहीत किंवा तरुणांना भडकावू शकत नाहीत. असे केल्यास संबंधितांना प्रसंगी थेट फाशीच्या, तर अनेक घटनांत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जाते अथवा त्यांना देशाबाहेरचा रस्ता दाखवला जातो. (संदर्भ : पॅट्रीयट्स फोरम्)

साधकांनो, महर्षींच्या आज्ञेनुसार सर्वही तिर्थे घडली देवा सद्गुरुचरणांसी । ही भजनपंक्ती सार्थ करणारे गुरुस्मरण अखंड करा !

महर्षींचे करूनी आज्ञापालन, 
करिता गुरुस्मरण, साधकांना 
ठायी ठायी मिळे आनंदाची देण ।
         कृपावत्सल सद्गुरु हेच खर्‍या शिष्याचे सर्वस्व ! त्यांचे मन जिंकण्यासाठी शिष्याची अहोरात्र धडपड असते. गुरुस्मरणाने कठीणातील कठीण गोष्टही साध्य होते, याची अनुभूती शिष्याने घेतलेली असल्याने त्याच्यासाठी सर्वकाही सुकर असते. गुरुगीतेत गुरुस्मरणाचे महत्त्व पुढील प्रमाणे सांगितले आहे,
         यावत्कल्पान्तको देहस्तावदेव गुरुं स्मरेत् ।
         गुरुलोपो न कर्तव्यः स्वच्छन्दो यदि वा भवेत् ॥ - गुरुगीता, श्‍लोक १०२
अर्थ : देहाचा नाश होईतो, म्हणजेच देह आहे, तोपर्यंत श्री गुरूंचे स्मरण केलेच पाहिजे. स्वतःचा छंद लागला, साक्षात्काराचा अनुभव आला, तरीही गुरूंचे स्मरण चुकवू नये.

रामनाथी आश्रमातील वास्तव्यात एस्.एस्.आर्.एफ्.चे बेंगळुरू येथील साधक श्री. सिराज दत्ता यांना आलेल्या अनुभूती

श्री. सिराज दत्ता
१. देवाचे घर असलेला रामनाथी आश्रम !
१ अ. आश्रमाकडे पाहून तो लहान असल्याचा विचार मनात येणे आणि आत प्रवेश करताच हा विचार चुकीचा असून हा आश्रम देवाचे घर असून सर्वत्र श्रीकृष्णाचे अस्तित्व असल्याची याची जाणीव होणे : १७.९.२०१५ या दिवशी मी प्रथमच गोव्यातील सनातनच्या रामनाथी आश्रमात आलो. आश्रमाकडे प्रथमच पहातांना आश्रमाची जागा आणि क्षेत्रफळ या दृष्टीने आश्रम किती लहान आहे !, असा विचार माझ्या मनात आला. मात्र आश्रमात प्रवेश केल्यानंतर आश्रमाची जागा आणि क्षेत्रफळ या दृष्टीने माझा हा विचार चुकीचा असल्याचे माझ्या लक्षात आले. त्या वेळी केवळ जागा आणि क्षेत्रफळ या दृष्टीकोनातून विचार न करता देह आणि आत्मा यांचा जसा परस्परांशी संबंध आहे, तसा त्याला सखोल असा काही तरी अर्थ आहे, याची मला जाणीव झाली. आपला लहान, स्थूल, नश्‍वर आणि मायेशी संबंधित देह म्हणजे अमर अशा आत्म्याचे मंदिर आहे, अगदी तसेच आश्रम म्हणजे देवाचे घर असून आश्रमातील वातावरण आणि प्रत्येक गोष्ट यांमध्ये श्रीकृष्णाचे अस्तित्व आहे.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ सद्गुरुपदी विराजमान होण्याविषयी चेन्नई येथील साधक श्री. श्रीराम लुकतुके यांना मिळालेल्या पूर्वसूचना !

श्री. श्रीराम लुकतुके
१. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू या चेन्नई येथे असतांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी सद्गुरूंचे दर्शन होत आहे, असे सहसाधकाला सांगणे : १९.७.२०१६ या गुरुपौर्णिमेच्या दिनी मी आणि अन्य एक साधक चेन्नईहून तिरुवण्णामलई येथे करण्यात येणार्‍या अभिषेकासाठी जात होतो. सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळकाकू याच दिवशी तिरुवण्णामलई येथून महाराष्ट्रात जाण्यासाठी निघणार होत्या. त्या वेळी मी सहसाधकाला म्हणालो, आपण किती भाग्यवान आहोत ! आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सदगुरूंचे दर्शन होत आहे. आपण पू. काकूंना ५ - १० मिनिटे भेटूया.
२. सद्गुरु (सौ.) काकूंची आठवण झाल्यावर प्रार्थना करतांना त्यांना सद्गुरु असे संबोधले जाणे : गेल्या दीड मासापासून मला पू. काकूंची आठवण झाल्यावर प्रार्थना करतांना त्यांना सदगुरु असे संबोधले जायचे आणि ही आनंदवार्ता गुरुपौर्णिमेच्या दिवशी ऐकायला मिळेल, असे वाटत होते. तेव्हा मी मनाला हे कळण्याची माझी पात्रता नाही आणि मी याचा विचार करण्याची आवश्यकताही नाही, असे सांगत असे; पण मला हे विचार आतून येत आहेत, असे जाणवून आनंद व्हायचा.

पतीने घरातील नामपट्ट्या काढण्यास आणि तुपाचा दिवा न लावण्यास सांगितल्यावर झालेली विचारप्रक्रिया अन् आलेली अनुभूती

१. पतीने तुपाचा दिवा आणि घरातील नामपट्ट्या काढायला सांगितल्यावर आध्यात्मिक संरक्षण मिळण्यासाठी या दोन्हींची आसक्ती असल्याने पतीविषयी पुष्कळ प्रतिक्रिया येणे : घरातील सात्त्विकता टिकून रहाण्यासाठी मी घरात नामपट्ट्यांचे छत लावले आहे, तसेच आध्यात्मिक उपायांसाठी मी रात्री झोपतांना तुपाचा दिवा लावत असे. माझ्या पतीने भिंतीवरील नामपट्ट्या आणि तुपाचा दिवा या दोन्ही गोष्टींमुळे त्यांना अस्वस्थ वाटत असल्याचे मला सांगितले. प्रारंभी मला पुष्कळ प्रतिक्रिया आल्या. मला बळजोरीने नामपट्ट्या काढाव्या लागणार असल्याने माझा अहं दुखावला. परेच्छा म्हणून तसे कर, असे श्रीकृष्णाने सुचवूनही मला तसे करणे अवघड गेले. मला आध्यात्मिक संरक्षण मिळावे, यासाठी नामपट्टया आणि दिवा यांच्या प्रती मला आसक्ती होती, याची मला प्रार्थना केल्यावर जाणीव झाली.

आर्ततेने प्रार्थना केल्यावर देहाभोवती वरून येणार्‍या अनुक्रमे पिवळ्या आणि लाल रंगांच्या प्रकाशाचे संरक्षककवच निर्माण होणे

       ८.३.२०१६ या दिवशी पौर्णिमा आणि पूर्ण चंद्रग्रहण होते. मी आध्यात्मिक उपाय करण्यासाठी माझ्या चारही बाजूंना रिकामे खोके लावून नामजप करायला बसले. काही वेळाने माझा नामजप भावपूर्ण आणि गुणात्मक होऊ लागला. त्या वेळी मी परमेश्‍वराला मानसरित्या वंदन करून माझे सर्व नकारात्मक विचार, साधनेतील अडथळे, जडपणा, भीती, शरीर, मन, बुद्धी, अहं आणि सर्वस्व अर्पण करत होते. जीवनात स्थिरता आणि साधनेतील आनंद मिळण्यासाठी मी सलगपणे प्रार्थना करू लागले. त्या वेळी मला पुढील दृश्य दिसले. मला वरून पिवळा प्रकाश येतांना दिसला. तो माझ्या सहस्रारातून आत येत होता. त्यामुळे वाईट शक्तींपासून संरक्षण होण्यासाठी माझ्या भोवती एक संरक्षककवच निर्माण झाले. त्यानंतर शक्तीचे प्रतीक असलेल्या लाल प्रकाशाचे कवच माझ्या भोवती निर्माण झाले. त्या वेळी ईश्‍वराचे मला अस्तित्व जाणवले. नंतर दुर्गादेवी प्रगट झाली आणि तिने मला तिने मला शक्ती दिली. त्यामुळे देवच माझी काळजी घेत आहे, याची जाणीव होऊन मला सुरक्षित वाटले आणि मी कृतज्ञताभावात डुंबून गेले. 
- सौ. सिल्विया विझकारा नामजप करतांना स्वतःभोवती असंख्य दैवीकण आणि श्रीकृष्णाचे विराट रूप दिसणे, थोडा वेळ धूर दिसून तो हवेत विरून जाणे अन् धूर म्हणजे ईश्‍वराचे सूक्ष्म रूप असल्याचे नंतर समजणे

        ८.२.२०१६ या दिवशी दुपारी २ वाजता घराबाहेर हिरवळ असलेल्या एका शांत ठिकाणी मी नामजप करत बसले. दूरवर असलेल्या एका छताकडे मी टक लावून पहात एकाग्र चित्ताने नामजप करण्याचा प्रयत्न करत होते. अकस्मात् माझ्या सभोवताली चकाकणारे लहान रुपेरी कण दिसू लागले. त्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. हे आनंददायी दृश्य पहातांना मला श्रीकृष्णाचे विराट रूप दिसले. माझ्या अनाहत चक्राच्या ठिकाणी चैतन्याची तीव्र संवेदना जाणवून डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हे अनुभवत असतांनाच मला मोठ्या प्रमाणात धूर दिसू लागला आणि थोड्या वेळाने तो हवेत विरून गेला. या अनुभूतीचा अर्थ मला समजला नसला, तरी ती सकारात्मक आणि आनंददायी होती. त्यानंतर जानेवारी २०१६ मध्ये झालेल्या कार्यशाळेतील सूत्रे वाचल्यावर धूर म्हणजे ईश्‍वराचे सूक्ष्म रूप, हे लक्षात आले.
     हे श्रीकृष्णा, माझी श्रद्धा वाढून तुझ्यापर्यंत येण्यास माझ्याकडून होणार्‍या प्रयत्नांमधे सातत्य यावे, यासाठीच तू मला ही अनुभूती दिलीस. यासाठी मी तुझ्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. - सौ. सिल्विया दत्तोली, बोलिव्हिया (२२.३.२०१६)

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...

गुरुचरणी अर्पण !
प.पू. बाबांना वाढदिवसाचा नमस्कार !
कलश स्थापना, कलश स्थापना । केली रे केली गुरुदेवा ॥
तूच बनवले हे तीर्थक्षेत्र । कृतज्ञ आम्ही तुझ्या चरणी ॥ १॥
काय देऊ तुला । सुचत नाही मला ॥
म्हणून तुला रे । पत्ररूपी भेट देतो रे ॥ २ ॥
काय मागू तुला । सुचत नाही मला ।
आशीर्वाद दे तू मला ॥ ३ ॥
- कु. विश्‍व कृष्णा आय्या (वय ९ वर्षे), रामनाथी आश्रम, रामनाथी, गोवा आणि कु. वैभवी महेंद्र साळुंके (वय १५ वर्षे), पुणे (३०.५.२०१६)

गणेशोत्सवाविषयी प्रबोधन करणारी हस्तपत्रके उपलब्ध !

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना
     गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांना धर्मशिक्षण देणे आणि समाज प्रबोधन करणे या उद्देशाने ४ प्रकारची हस्तपत्रके बनवली आहेत. या हस्तपत्रकाचे प्रकार आणि त्यापुढे त्या पत्रकाचे वितरण कोठे करावे, यांविषयीचे विवरण दिले आहे.
पत्रक क्र. १
श्री गणेशचतुर्थी शास्त्रानुसार साजरी करा ! : गणेशोत्सवाचे धर्मशिक्षण अंतर्भूत असलेले हे पत्रक घरात श्री गणेशमूर्तीची स्थापना करणार्‍या भाविकांना द्यावे.
पत्रक क्र. २
सनातनची प्रकाशने आणि सात्त्विक उत्पादने ! : सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादनांची माहिती या पत्रकात अंतर्भूत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वितरकांकडे आवश्यकतेनुसार या पत्रकाची मागणी नोंदवावी आणि वितरकांनी त्या मागणीची पूर्तता करावी.
पत्रक क्र. ३
गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा करा ! : सार्वजनिक गणेशोत्सव आदर्शरित्या कसा साजरा करावा ? गणेशोत्सव मिरवणूक कशी असावी, मूर्ती दान का करू नये, मूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होत नसून कारखान्यांतील सांडपाण्यामुळे कसे होते इत्यादी.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - आषाढ कृष्ण पक्ष चतुर्दशी (१.८.२०१६) उ.रा. ३.१५ वाजता
समाप्ती - आषाढ अमावास्या (२.८.२०१६) उ.रा. २.१५ वाजता
उद्या अमावास्या आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
ईश्‍वरालाच जिंकणे
विषयांपेक्षा विषयांच्या निर्मात्यालाच का जिंकू नये ?
भावार्थ : एकेक विषय जिंकत जायचे म्हटले तर वासना, आवडी-निवडी, स्वभावातील दोष, असे लाखो विषय जिंकायला, म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण मिळवायला लाखो जन्म लागतील. त्यापेक्षा त्या सर्वांच्या निर्मात्यालाच भक्तीने या जन्मात जिंकले, तर त्या सर्वांवर या जन्मातच नियंत्रण मिळविता येईल; म्हणूनच म्हटले आहे, एक साधै सब साधै । सब साधै सब जाय ॥ म्हणजे एका नामाला, भगवंताला (नाम आणि भगवंत एकच आहेत.) साध्य केले म्हणजे सर्वच साध्य होते. सर्व साध्य करायला गेलो, तर काहीच साध्य होत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी धर्मविरोधी विधाने करणे हा धर्मद्रोह !
     धर्म पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे आहे. असे असतांना बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी धर्माविरुद्ध विधाने करणे केवळ अज्ञानदर्शक नसून तो धर्मद्रोह आहे. एखाद्या शाळेतल्या मुलाने पदवीधरावर त्याच्या ज्ञानासंदर्भात टीका करावी, असे ते आहे ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधना 
समुद्रातील वादळे अल्पकाळात नाहीशी होतात; पण मनातील वादळे एकदा निर्माण झाली की, ती आवरणे अतिशय कठीण; म्हणून ती निर्माण होऊ न देण्यासाठी साधना करणेच श्रेयस्कर ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

नक्षलवादी आणि आतंकवादी यांची हातमिळवणी !

संपादकीय 
    काही दिवसांपूर्वी भारताची सर्वोच्च अन्वेषणयंत्रणा एन्.आय.ए.ने देहलीतील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. त्यात भारतात आतंकवादी कारवाया घडवून आणण्यासाठी इसिस भारतातील नक्षलवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवण्याच्या सिद्धतेत आहे, असे नमूद करण्यात आले आहे. ही गोष्ट भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे. भारतात बोकाळलेल्या नक्षलवादाची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पूर्वी केवळ सामान्य नागरिकांना लक्ष्य करणारे नक्षलवादी सध्या बिनबोभाटपणे सुरक्षा जवान आणि पोलीस यांना लक्ष्य करतात. या नक्षलवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे सापडली आहेत. पूर्वी चीन आणि पाक भारतातील नक्षलवादाला खतपाणी घालत असल्याचे समोर आले आहे. आता इसिसही भारतात कारवाया घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांचा वापर करणार असेल, तर भारत ही समस्या कशी सोडवणार, हे पहावे लागेल.

कलंकित बॉलीवूड !

संपादकीय
     पिपली लाईव्ह हा चित्रपट आठवतो का तुम्हाला ? शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर आधारित हा चित्रपट वर्ष २०१० मध्ये प्रसारित झाला होता. त्या वेळी एका संवेदनशील विषयाला हात घालणार्‍या या चित्रपटाला चित्रपट समीक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. आताही या चित्रपटाचे सहदिग्दर्शक पुन्हा चर्चेत आले आहेत; मात्र चांगल्या कारणासाठी नव्हे, तर एक बलात्कारी म्हणून ! चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारुकी याने अमेरिकेतील एका संशोधक तरुणीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजीव जैन यांनी त्याला दोषी ठरवले आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn