Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

गुरुमहात्म्य विशेषांक


गुशब्दस्त्वन्धकारः स्यात् रुशब्दस्तन्निरोधकः ।
अन्धकारनिरोधत्वात्
गुरु इत्यभिधीयते ॥
अर्थ : गुकार म्हणजे अज्ञानरूपी अंधकार आणि रुकार म्हणजे त्या अंधकाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज. अज्ञानरूपी अंधकार ज्ञानरूपी तेजाने घालवणारा, तो गुरु.
गुरुज्ञान नाही ज्यासी ।
तरणोपाय नाही त्याशी ।
तो नावडे ऋषीकेशी ।
व्यर्थ जन्मासी तो आला ॥
- ज्ञानदेवगाथा, अभंग ६९८, ओवी १
अर्थ : ज्याला श्री गुरूंपासून ज्ञानप्राप्ती झालेली नाही, त्याला तरून जाण्यासाठी कुठलाच उपाय नसतो. तो श्रीहरीलाही आवडत नसल्याने त्याचा जन्मच व्यर्थ गेल्यासारखा आहे.

कोटी कोटी प्रणाम !

कल्याणस्वामी यांची आज पुण्यतिथी

गुरुपौर्णिमेला २ दिवस शिल्लक

गुरूंचा प्रश्‍न, इच्छा आणि आज्ञा एकत्र असते ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
भेट द्या ! : http://www.sanatan.org/mr/guru-shishya

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही ! - मुख्यमंत्री

श्री. देवेंद्र फडणवीस
पू. निवृत्ती महाराज वक्ते
सनातनवर बंदी नको या मागणीसाठी पंढरपूर येथे राष्ट्रीय वारकरी सेनेचे अध्यक्ष आणि धर्माचार्य ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर !
 पंढरपूर, १७ जुलै (वार्ता.) सनातनवर बंदी आणू नये या मागणीचे निवेदन राष्ट्रीय वारकरी सेनेचे अध्यक्ष धर्माचार्य ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना दिले. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलपूजेसाठी मुख्यमंत्री पंढरपूर येथे आले होते. त्या वेळी मुख्यमंत्र्यांची शासकीय विश्रामगृहावर भेट घेऊन त्यांना हे निवेदन देण्यात आले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे आश्‍वासन या शिष्टमंडळाला दिले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी १५ मिनिटे ह.भ.प. पू. वक्ते महाराजांशी चर्चा केली. या शिष्टमंडळात राष्ट्रीय वारकरी सेनेचे कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, राष्ट्रीय वारकरी सेनेचे युवा अध्यक्ष ह.भ.प. शुभम महाराज वक्ते आणि ह.भ.प. तुनतुने महाराज उपस्थित होते.

प.पू. भक्तराज महाराज (बाबा) यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना धर्मप्रसारासाठी दिलेले आशीर्वाद !

१. वर्ष १९९२ : प.पू. बाबांनी मला सांगितले, आता महाराष्ट्रभर धर्माचा प्रसार करा.
२. वर्ष १९९३ : प.पू. बाबांनी सांगितले, आता भारतभर धर्माचा प्रसार करा.
३. वर्ष १९९५ : प.पू. बाबांनी सांगितले, आता जगभर धर्माचा प्रसार करा.
या कार्यासाठी जणू आशीर्वाद म्हणून बाबांनी ख्रिस्ताब्द १९९३ मध्ये स्वतःच्या मोटारीचा झेंडा मला दिला आणि सांगितले, हा झेंडा लावून सर्वत्र प्रसार करायला फिरा !
४. ९.२.१९९५ - प.पू. भक्तराज महाराज यांनी सनातन संस्थेचे कार्यालय गोव्यात असेल, असे सांगणे आणि प्रत्यक्षातही तसे होणे ! : ८ आणि ९.२.१९९५ या दिवशी देवदुर्लभ असा बाबांच्या अमृतमहोत्सवाचा सोहळा झाला. त्या वेळी माझ्या हातात श्रीकृष्ण-अर्जुन असलेला चांदीचा एक रथ दिला आणि म्हणाले, गोव्याला आपले कार्यालय होईल. तिकडे ठेवा ! सनातन संस्थेचे मुख्य कार्यालयही (आश्रमही) आता गोव्यातच आहे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सनातन संस्थेवर कृपाछत्र धरणारे श्रीमद् सदगुरु
 प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

पुरोगाम्यांच्या दबावापोटी सनातनवर बंदी खपवून घेणार नाही !

वारकरी संप्रदाय सनातनच्या पाठीशी !
पंढरपूरमध्ये वारकरी संप्रदायाच्या वतीने पत्रकार परिषदेत चेतावणी ! 
    पत्रकार परिषदेत बोलतांना ह.भ.प. बापू महाराज रावकर, श्री. अभय वर्तक, भागवताचार्य वा.ना. उत्पात,
ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते, ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने, ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, श्री. सुनील घनवट
     पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १६ जुलै (वार्ता.) - तथाकथित पुरोगाम्यांच्या दबावापोटी सनातन संस्थेवर बंदी खपवून घेतली जाणार नाही, अशी चेतावणी वारकरी संप्रदायाच्या वतीने पंढरपूर येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत वारकरी संप्रदायाच्या वतीने देण्यात आली. समस्त वारकरी संप्रदाय सनातनच्या सदैव पाठीशी असेल, असे ठोस आश्‍वासन वारकरी संप्रदायच्या वतीने या वेळी देण्यात आले. सनातन संस्थेवर संभाव्य बंदीच्या विरोधात १६ जुलै या दिवशी पंढरपूर येथील सावरकर वाचनालयाच्या सभागृहात वारकरी संप्रदायाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी राष्ट्रीय वारकरी सेनेचे अध्यक्ष ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते, राष्ट्रीय वारकरी सेनेचे उपाध्यक्ष ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने, भागवताचार्य वा.ना. उत्पात, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, राष्ट्रीय वारकरी सेनेचे युवा अध्यक्ष ह.भ.प. शुभम महाराज वक्ते, राष्ट्रीय वारकरी सेनेचे कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर, सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते.

तुर्कस्तानमध्ये सैन्याचा उठाव चिरडल्याचा सरकारचा दावा !

* १६१ ठार 
* सहस्र १५४ घायाळ 
* १ सहस्र ५०० बंडखोर सैनिकांना अटक
     इस्तंबूल - तुर्कस्थानमध्ये सैन्याने सरकारच्या विरोधात केलेला उठाव चिरडल्याचा दावा तुर्कस्थानच्या सरकारने केला आहे. १५ जुलैच्या रात्री सैन्याने सत्ता हाती घेत केलेल्या या उठावामुळे झालेल्या संघर्षात १६१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १७ पोलिसांचा समावेश आहे. तसेच १ सहस्र ५०० बंडखोर सैनिकांना अटक करण्यात आल्याचे म्हटले आहे. देशातील लोकशाहीप्रेमी नागरिकांनी सरकारला पाठिंबा घोषित केला आहे. सैन्याने रात्री संसदेवर नियंत्रण मिळवून इंटरनेट, सामाजिक संकेतस्थळे आणि प्रसारमाध्यमे यांना ई-मेल पाठवून सत्तापालट केल्याची माहिती दिली होती.

देवा, होऊ कशी मी उतराई !

सौ. अंजली कणगलेकर
       गेल्या काही दिवसांपासून मन पुष्कळ विव्हळ झाले. भगवंतासाठी रडू लागले. अश्रू ढाळू लागले. भगवंताच्या प्राप्तीसाठी तळमळू लागले. काय करावे कळेनासे झाले. श्रीगुरूंच्या वाक्याचे स्मरण होऊन तगमगू लागले. आपल्याला भगवंतासाठी जगायचे आहे, हे वाक्य सतत डोळ्यांसमोर येते. ते समर्पणासाठीच आपला जन्म आहे, हे मनावर बिंबवते; मात्र त्यासाठी काय करायला हवे, हे सांगत नाही. त्यामुळे मनाची पुष्कळच घालमेल होते. त्या वेळी समर्पण हा एकच शब्द आठवतो. अशा स्थितीत कृतज्ञतास्वरूप पुढील काव्यपंक्ती ओळी स्फुरल्या. त्या श्रीगुरुचरणी अर्पण ! 
       केवढी जिवाची पुण्याई, घेतले गुरूंनी श्रीचरणी ।
                                                   काय वर्णू मी त्यांची थोरवी, काढले अलगद मायेतूनी ।
                                                   साक्षित्व दिले या मनी, देवा, होऊ कशी मी उतराई ॥ १ ॥

महाराष्ट्रात बॉम्बस्फोट आणि जातीय दंगली करण्याचे इसिसचे कारस्थान होते !

परभणीतील अटक केलेल्या धर्मांधाने दिली माहिती !
     नागपूर, १६ जुलै - रमजान मासात आतंकवादी आक्रमण करणे आणि पाठोपाठ महाराष्ट्रात जातीय दंगली पेटवायच्या, त्यातून निरपराधांचे बळी घेत अराजकता निर्माण करायची, असे दुहेरी कुटील कारस्थान इसिसने रचले होते. नसीरबिन याफी चाऊस हा गोंधळलेल्या स्थितीत असल्याने त्याला बॉम्ब बनवता आला नाही. त्यामुळे इसिसचे वरील दोन्ही मनसुबे प्रत्यक्षात आले नाहीत आणि राज्यात होणारे एक मोठे षड्यंत्र उधळले गेले, अशी माहिती परभणीतून आतंकवादविरोधी पथकाने अटक केलेल्या नसीरबिनच्या चौकशीतून पुढे आली आहे. पथकाने दिलेल्या माहितीनुसार चाऊस हा गेल्या वर्षभरापासून इसिसच्या संपर्कात होता. महाराष्ट्रात मोठा घातपात घडवून आणण्याची सिद्धता चाऊसने केली होती. त्याला बॉम्ब कसा बनवायचा, त्याचा स्फोट कसा घडवून आणायचा, त्याचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यासाठी चाऊसने साहित्य खरेदी केले होते. ऑनलाईन प्रशिक्षणामुळे अनेक गोष्टी चाऊसला कळल्या नाहीत, त्यामुळेच बॉम्ब बनवण्याचा चाऊसचा प्रयत्न फसला.

सनातनवर बंदी येणार नाही ! आमचा सनातनला पूर्ण पाठिंबा आहे !

ठाणे येथील मंत्री, आमदार आणि खासदार यांचे सनातनच्या साधकांना निवेदनानंतर आश्‍वासन ! 
डावीकडून निवेदन देतांना श्री. कोंडीबा जाधव, सौ. सुनीता
पाटील, सौ. सविता लेले आणि खासदार श्री. राजन विचारे
डावीकडून सौ. सविता लेले, सौ. सुनीता पाटील, श्री. कोंडीबा 
जाधव आणि निवेदन स्वीकारतांना सार्वजनिक बांधकाम 
मंत्री एकनाथ शिंदे

फलक प्रसिद्धीकरता

अतीलांगूलचालनामुळे उद्दाम झालेले धर्मांध !
    राऊरकेला (ओडिशा) - येथे महंमद सुभान या महाविद्यालयीन मुलाने फेसबूकवर श्रीरामाविषयी अवमानकारक प्रतिक्रिया दिली. त्यावर अंकित तिवारी या विद्यार्थ्याने फेसबूकवरच प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सुभानने १५ धर्मांधांकरवी अंकितला मारहाण केली. एवढे होऊनही पोलिसांनी अंकितलाच अटक केली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
    Rourkela,Odishame dharmandhone Ankit namak Hindu vidyarthiko peetnepar policene dharmandh chod usehi pakda - Aise Hindudweshi Tushtikaranka virodh karein !
जागो !
     राऊरकेला, ओडिशा में धर्मांधों ने अंकित नामक विद्यार्थी को पीटने पर पुलिस ने धर्मांध छोड उसे ही पकडा. - ऐसे हिन्दूद्वेषी तुष्टीकरण का विरोध करें !

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या न्यायालयीन कोठडीत २९ जुलैपर्यंत वाढ

   पुणे, १६ जुलै - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी संशयित म्हणून अटक केलेले डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची न्यायालयीन कोठडी १६ जुलै या दिवशी संपल्याने या प्रकरणाची पुढील सुनावणी झाली. या वेळी येथील केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.पी. गुळवे-पाटील यांनी पुन्हा २९ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. या वेळी डॉ. तावडे यांना काही कारणास्तव उपस्थित करण्यात आले नव्हते. या वेळी शासकीय अधिवक्ता उज्ज्वला पवार यांनी, तर डॉ. तावडे यांच्या बाजूने अधिवक्ता नीता धावडे यांनी कामकाज पाहिले.

गुरुपौर्णिमा मास २०१६

१९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. या दिवशी गुरुतत्त्व १ सहस्रपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.

देवाचेच रूप असलेल्या पू. बिंदाईंप्रती साधिकेने व्यक्त केलेली कृतज्ञता !
१. दगडातून मूर्ती घडवणार्‍या कारागिराप्रमाणे साधकांना घडवणार्‍या पू. बिंदाई !

कु. वैष्णवी जाधव
सर्वाठायी देव धावेल कसा ? देवाला कामे ही खूप ।
प्रेम देण्यासाठी आई निर्मिली । आई हे देवाचेच रूप ।

   खरं सांगू ! आज हक्काने 'आई' म्हणून तुलाच सर्व सांगावेसे वाटते. तुझे प्रेमही आवडते आणि तू दिलेला मारही आवडतो. आई, तुझ्या सर्व गुणी मुलांमध्ये मी एक खोडकर बाळ आहे ना ? आई, कारागीर जेव्हा दगडातून मूर्ती घडवतो, तेव्हा सर्व जण त्या मूर्तीला नमस्कार करतात; पण घडवणारी तर तूच आहेस ना ? आता 'संतच घडवतात', असे म्हणू नकोस. संत तर आहेतच; पण माध्यम तू आहेस ना ? आई, इतकी कशी गं तू प्रेमळ ! मला तुझी नुसती आठवण आली, तरी येऊन तुला मिठी मारावीशी वाटते.

पू. (सौ.) बिंदाताईंसम व्यापक होऊन अखंड भावस्थितीत रहाता येणे आणि संतांचे मन जिंकणे यांसाठी प्रयत्न करवून घेण्याविषयी साधिकेने त्यांना केलेली विनवणी !

कु. योगिता पालन
पू. ताई, मलाही तुमच्यासारखे व्यापक बनवा ना ! तुमच्याप्रमाणे सतत समष्टीचा विचार करायला आम्हालाही शिकवा ना ! आम्हालाही तुमच्यासह कृष्णाच्या अनुसंधानात घेऊन चला ना ! पू. ताई, आम्हाला तुमच्यासारखे परिपूर्ण व्हायचे आहे. आम्ही संतांचे मन जिंकण्यासाठीचे प्रयत्न करायला न्यून पडतो. तुमच्यासारखा ध्यास आणि तळमळ यांत अल्प पडते. तुम्हीच तो ध्यास आमच्यात निर्माण करा आणि हा देह, हे चित्त चंदनाप्रमाणे अखंड गुरुसेवेमध्ये झिजू द्या.

पू. ताई, पुष्कळ काही करायचे आहे, असे मला वाटते; पण स्वची झीज झाल्याविना आम्ही ते करू शकत नाही. तुम्हीच त्या स्वचा नाश होण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न करवून घ्या ना !

पू. ताई, तुमच्या पहाण्यातून मनाला मिळणारा आनंद, तुमच्या वाणीतून मनाला मिळणारी उभारी, तुमच्या वावरण्याने मनाला मिळणारा उत्साह यांतून आणि तुमचा ध्यास अन् समर्पण पाहून आम्हाला किती करायला पाहिजे ?, याची जाणीव होते. तुमचा प्रीतीमय स्पर्श आठवून सतत तो हवाहवासा वाटतो. तुमच्या मिठीतून बाहेरच येऊ नये, असे वाटते. या सगळ्यासाठी, तसेच तुमच्या वात्सल्यभावासाठी तुमच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करते.

पू. ताई, २ - ३ दिवसांपासून कारण नसतांना तुम्हाला भेटावे आणि मिठी मारावी, असे वाटत होते; पण आज मानस मिठी मारते हं ! वरील प्रार्थना केवळ प्रार्थना नसून तुमच्याकडे केलेला हट्ट आहे.

एक लहानसा सामान्य जीव,

- कु. योगिता पालन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१०.२०१५)

प्रत्येक सेवा चांगली होण्यासाठी आपलेपणाने प्रयत्न करतांना इतरांना आनंद देणार्‍या पू. (सौ.) बिंदाताई सिंगबाळ !

कु. गौरी मुद्गल
१. पू. (सौ.) बिंदाताई भेटल्यावर त्यांनी कौतुक करणे आणि 'त्या एक क्षण भेटल्यावरही प.पू. गुरुदेवांना भेटल्यासारखा अतिशय आनंद होतो', असे असे लक्षात येणे : एकदा मी दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झालेली संतांची छायाचित्रे लॅमिनेशन करून त्यांचा भावजागृतीसाठी संग्रह केला. काही दिवसांनी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांची विविध कार्यक्रमांतील छायाचित्रे वहीमध्ये चिकटवली. ती छायाचित्रे पाहिल्यावर पू. (सौ.) बिंदाताई मला म्हणाल्या, "तू किती छान छान करतेस, नवनवीन ! हे तुला कसे सुचले ?" मी म्हटले, देवाने सुचवले. तेव्हा मला देवाप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.

पू. बिंदाताई एक क्षण भेटल्यावरही इतरांना आनंद आणि चैतन्य देऊन जातात. मला त्या भेटल्यावर प.पू. गुरुदेव भेटल्यासारखा अतिशय आनंद होत असल्याचे लक्षात आले.
प्रीतीचे मूर्तीमंत रूप तू ।
साधकांच्या साधनेतील दिशादर्शक तू ॥
गुरुमाऊलीच्या भेटीचा आनंद तू ।
उच्चप्रतीच्या तळमळीचा आदर्श तू ॥
चैतन्याची पखरण करणारी तू ।
प.पू. डॉक्टरांच्या कृपेस प्राप्त तू ॥
सर्व वाचकांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

गुरुपौर्णिमा विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : १९ जुलै २०१६ पृष्ठ संख्या : १६, मूल्य : ५ रुपये
गुरुपौर्णिमा विशेषांकाची वाढीव मागणी १७ जुलैला दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

तुझ्याच मागे मागे येईन मी माते ।

कु. सायली डिंगरे
पू. (सौ.) बिंदाताई (यांच्या वाढदिवसानिमित्त) यांच्या प्रती
कु. सायली डिंगरे यांनी व्यक्त केलेली काव्यरूपी कृतज्ञता येथे देत आहोत.


दोषांच्या दलदलीत होते मी ।
साहाय्याचा हात दिलात तुम्ही (टीप) ॥ १ ॥ 

तीव्र अहंपायी आनंदापासून वंचित होते मी ।
फटकारून त्याला ताळ्यावर आणले तुम्ही ॥ २ ॥ 

  अती मायेत गुरफटले जेव्हा मी ।
सांगा बरे मज सावरले कुणी ? ॥ ३ ॥ 

हतबल, धैर्यहीन झाले मी जेव्हा ।
पंखांना बळ दिले तुम्हीच तेव्हा ॥ ४ ॥ 

आहे मी बहु कृतघ्न माते ।
कृतज्ञता म्हणतांनाही जीभ अडखळते ॥ ५ ॥ 

आश्‍वासन देणार नाही अती मोठे ।
पण एवढेच अवश्य सांगते ॥ ६ ॥ 

रडत-पडत, धडपडत-अडखळत का होईना
तुझ्याच मागे मागे येईन मी माते, ॥ ७ ॥ 

टीप : पू. (सौ.) बिंदाताईंनी
- कु. सायली डिंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१०.२०१५)

पू. राजेंद्र शिंदे यांच्या चैतन्यदायी सत्संगामुळे स्वतःमध्ये पालट झाल्याची साधिकेला आलेली प्रचीती !

पू. राजेंद्र शिंदे
      अन्नपूर्णा कक्षात सेवा करतांना अनेक संतांचा सहवास लाभला. त्यांच्या चैतन्यामुळे प्रतिदिन चैतन्य मिळून आनंद घेण्यास, त्रासांवर मात करण्यास, तसेच स्वभावदोष आणि अहं घालवण्यास पुष्कळ साहाय्य झाले. त्रास होत असतांना संतांच्या सहवासात राहिल्यास चैतन्याचा परिणाम होऊन सेवा करण्याचा उत्साह वाढत असे आणि साधनेला पुष्कळ प्रेरणा मिळत असे. पू. राजेंद्र शिंदे (पू. राजेंद्रदादा) यांचे मार्गदर्शन, सत्संग आणि प्रीती यांमुळे झालेले पालट अन् साधनेला मिळत असलेली दिशा यांमुळे प.पू. गुरुदेवांना सूक्ष्मातून अनुभवता यायचे, त्याचप्रमाणे स्थुलातून ते जवळच आहेत, असे वाटायचे.
१. पू. राजेंद्रदादांमध्ये प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व जाणवून प.पू. डॉक्टरांना भेटायला पाहिजे, हा मनातील विचार विरून जाणे : एक दिवस प.पू. डॉक्टरांच्या आठवणीने मन पुष्कळ व्याकुळ झाले होते. आता त्यांचे दर्शन व्हायला हवे, असे वाटत होते. त्यांच्या आठवणीनेसुद्धा मनाला पुष्कळ आनंद मिळत होता आणि त्यांच्याशी सूक्ष्मातून बोलत मी चहा घेण्यासाठी भोजनकक्षात आले. त्यांना सांगितल्यावरच बरे वाटणार, हे मला ठाऊक होते. तेवढ्यात पायर्‍यांवर उभे राहून हसत असलेले पू. राजेंद्रदादा दिसलेे. त्यांचे ते हसणे प.पू. डॉक्टरांसारखेच होते.

महर्षींनी परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीविष्णुस्वरूप असल्याचे सांगणे आणि साधकांना हे सर्व अनुभवता येणे, ही दृश्य स्वरूपातील श्रीविष्णूची एक लीलाच !

परात्पर गुरु डॉ. आठवले
१. श्रीराम आणि श्रीकृष्ण या अवतारांचा सहवास लाभावा, ही लहानपणीची 
इच्छा श्रीमत् नारायणाने अवतारी कार्यात सहभागी होण्याची संधी देऊन या 
घोर कलियुगातही पूर्ण केल्याने कृतज्ञता वाटणे
     मला लहानपणी दूरदर्शनवरील रामायण आणि महाभारत या मालिका पहाण्याचा दैवी योग लाभला. मी रामायण ही मालिका इतकी मन लावून पहात असे की, मी त्या काळातच आहे, असे मला जाणवायचे. दूरदर्शनवरील या मालिका संपल्यानंतर मला माझा जन्म त्या काळात व्हायला हवा होता. मला देवाचा सहवास अनुभवता आला असता. साक्षात् श्रीराम आणि श्रीकृष्ण हे देव मला पहायला मिळाले असते. त्यामुळे किती मजा आली असती, असे लहानपणी वाटायचे. देवाने या घोर कलियुगातही मला अवतारी कार्यात सहभागी होण्याची संधी दिली. हे माझ्यासह सर्वच साधकांचे परमभाग्यच आहे. देवाने ती अंतरातील इच्छा पूर्ण केल्याची जाणीव होऊन देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होऊ लागली.

साधकांना सकारात्मक दृष्टीकोन देऊन साधनेसाठी प्रोत्साहित करणारे पू. नकातेकाका !

१. पू. नकातेकाका यांचे वागणे 
पू. महादेव नकाते
१ अ. पू. नकातेकाकांच्या सहज बोलण्यातून पुष्कळ हलकेपणा जाणवून भावजागृती होणे : मी सेवेनिमित्त रत्नागिरी येथील दैनिक कार्यालयात गेलो होतो. तेथे अचानक माझी पू. नकातेकाकांशी भेट झाली. त्या वेळी त्यांनी माझी अनौपचारिक चौकशी केली. त्यांच्या सहज बोलण्यातून पुष्कळ हलकेपणा वाटून माझी भावजागृती होऊ लागली. त्यांच्याकडून येणार्‍या चैतन्यलहरींनी अंगावर रोमांच येत होते. त्या वेळी त्यांनी माझ्या पत्नीची चौकशी करून त्यांची भेट झाली नाही, असे सांगितले. त्यांनी आठवण काढल्यावर मी आणि पत्नी दोघेजण त्यांच्या भेटीच्या उद्देशाने रत्नागिरी सेवाकेंद्रात गेलो. - श्री. प्रसाद म्हैसकर
१ आ. प्रेमभाव कृतीतून कसा व्यक्त करावा, हे स्वतःच्या आचरणातून शिकवणारे पू. नकातेकाका ! : मी पू. नकातेकाकांसाठी लाडू बनवून नेले होते. ते त्यांना देत असतांना पू. काका म्हणाले, हा प्रसाद आपण सर्वांना देऊया. असे म्हणून त्यांनी स्वतः लाडूचा डबा हातात घेऊन सर्व साधकांना लाडू दिले. - सौ. आरती म्हैसकर

साधकांच्या रक्षणासाठी सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे ईरोड (तमिळनाडू) येथे महासुदर्शन महायाग संपन्न

साधकांच्या रक्षणासाठी सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे ईरोड (तमिळनाडू) 
येथे झालेल्या महासुदर्शन महायागाची छायाचित्रे
महासुदर्शन याग करतांना तिरुपति बालाजी मंदिराच्या वेदपाठशाळेतील 
वेदब्राह्मण आणि (वर्तुळात) पू. (सौ.) अंजली गाडगीळ   

स्पर्श मिळो प्रत्यक्ष गुरुचरणांचा !

लावूनी ओढ आश्रमाची ।
घेतली परीक्षा सेवकाची ॥
दावूनी कर्तव्य पामराला ।
आश्रम स्वगृही दाविला ॥ १ ॥ 

लागता गुरुचरणाचा लळा ।
पाठी राही कृष्ण सखा ॥
मज सेवेचा मार्ग दावी ।
अन् साधनेची शिदोरी देई ॥ २ ॥

रामनाथी आश्रम या तीर्थक्षेत्री दोष आणि अहं-निर्मूलन प्रक्रियेत न्हाऊन निघाल्याने खर्‍या अर्थाने पवित्र झाल्याची घेतलेली अनुभूती !

विश्‍वदीप असलेला सनातनचा रामनाथी आश्रम
        प.पू. डॉक्टरांनी पूर्वी सांगितलेले मनाच्या आजाराला मनाचे औषध हवे, हे वाक्य मनावर बिंबले. त्यामुळे कितीही संघर्ष झाला, तरी स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन प्रक्रिया करायला हवी, असेे वाटले आणि आवड निर्माण झाली.
कु. कविता कुलकर्णी
१. स्वभावदोष आणि 
अहं-निर्मूलन प्रकियेविषयी झालेले चिंतन
१ अ. स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन प्रक्रिया समुद्रमंथनाप्रमाणे असणे : धुलाई यंत्राचे बटण दाबताच यंत्रातील सर्व कपडे घुसळले जातात. त्या वेळी मला समुद्रमंथनाची आठवण झाली. स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन प्रक्रिया समुद्रमंथनाप्रमाणे आहे. समुद्रमंथनातून प्रारंभी विष बाहेर आले आणि नंतर अमृत बाहेर पडले. त्याचप्रमाणे या प्रक्रियेत प्रारंभी आपले दोष आणि अहं हे मुळापासून विषाप्रमाणे बाहेर पडतात. त्यामुळे आपल्याला वाईट वाटू शकते; परंतु नंतर अमृत चाखायला मिळणार असते, हे जाणून प्रयत्न केल्यास खरोखरच आत्म्याच्या आनंदस्वरूप अमृतत्त्वाची गोडी चाखता येते. त्यामुळे देवाने या कलियुगात ही संधी देऊन पापक्षालनाची संधीच दिली, असे जाणवले.

गुरुप्राप्तीची खूण

     ज्या वेळी गुरुशक्तीचा अंतर्यामी प्रवेश झाल्याचा अनुभव येईल, त्या वेळी तुम्हाला आपल्या गुरूंची ओळख पटेल. गुरु प्राप्त झाल्याची ती खूण आहे. - कल्पवृक्षातळी (६१/४२)

गुरुप्राप्तीसाठी काय करावे ?

     शिष्यत्वाचे गुण तुमच्यात जितक्या प्रकर्षाने प्रगट होऊ लागतील, ईश्‍वरप्राप्तीची तुमची तळमळ जितकी तीव्र बनेल, तितकी तुम्हाला सद्गुरुप्राप्ती शीघ्र होईल. - कल्पवृक्षातळी (६१/४२)

गुरुमाऊलीने सर्व काही दिल्यासाठी आणि तिला अपेक्षित असेच प्रयत्न होण्यासाठी विनवणी करून कृतज्ञताभावाने एका साधिकेने पू. (सौ.) बिंदाताईंना लिहिलेले पत्र !

सौ. विनुता शेट्टी
पू. (सौ.) बिंदाताईंच्या चरणी प्रार्थनापूर्वक नमस्कार !
१. प.पू. डॉक्टरांना रामनाथी आश्रमातील शिकवणीनुसार बाहेरच्या जगात आचरण करणे अपेक्षित आहे, याची जाणीव होणे : पू. ताई, मी रामनाथी आश्रमातून घरी गेल्यानंतर मला प.पू. डॉक्टरांची आणि तुमची पुष्कळ आठवण यायची. मला मी रामनाथी आश्रमात अनुभवलेला प्रत्येक क्षण आणि दिवस आठवायला लागला. नंतर मनात प.पू. डॉक्टरांना मी या विचारात रहाणे अपेक्षित नाही, तर आश्रमातील शिकवणीनुसार बाहेरच्या जगात आचरण करणे अपेक्षित आहे, असा विचार आला.
२. देवाने बाहेरच्या लोकांसारखे मायेत किंवा भौतिक सुखात न अडकवता त्याच्याप्रती प्रेम असलेल्या आणि साधना करणार्‍या साधकांसमवेत ठेवल्याने सर्व काही दिले आहे, असे वाटणे : एक दिवस मला प.पू. डॉक्टरांची पुष्कळ आठवण यायला लागली. तेव्हा माझ्या मनात असा विचार आला, हे गुरुराया, मी बाहेरच्या रज-तम वातावरणात न रहाता तुझे अस्तित्व असलेल्या चैतन्यमय वातावरणात रहाते. मी बाहेरच्या लोकांसारखे मायेत किंवा भौतिक सुखात न अडकता देवा, मला तुझी पुष्कळ आठवण येते. मी आई-बाबा आणि नवरा यांच्या मायेत न अडकता देवा, तुझ्याप्रती प्रेम असलेल्या आणि साधना करणार्‍या साधकांसमवेत असते. मी मला, माझे, अशा स्वार्थी विचारात न रहाता देवा, तू मला राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात आणि हिंदु राष्ट्राची स्थापना, या विचारात ठेवले आहेस. मला याच्यापेक्षा अजून काय पाहिजे ? देवा, हे भगवंता, मला अजून काहीच नको. तू मला सर्व काही दिले आहेस. तू मला प्रत्येक क्षणी सांभाळून घेत आहेस. देवा, तुझी माझ्यावर अशीच अखंड कृपा असू दे.

गुरुपादुकांचे महत्त्व (गुरुचरण पादुकांमध्ये गुरुदेवांनी त्यांची प्राणशक्ती संक्रमित केलेली असल्याने त्या साक्षात गुरुदेवच असणे)

      गुरुचरण पादुका या केवळ लाकडी पादुका नव्हेत. प.पू. गुरुदेवांनी प्राणप्रतिष्ठा करून आपली तपःशक्ती आणि चिन्मय शक्ती यांद्वारे चरणपादुकांत प्राण संक्रमित केले आहेत. आता त्या चरणपादुकांतून तीच गुरुदेवांची करुणा, तेच परम प्रेम, तोच कृपाप्रसाद, संक्रमित होईल, जो साक्षात गुरुदेवांतून होतो. चरणपादुका साक्षात गुरुदेवच आहेत; कारण त्यात स्वतः गुरुदेवांनी प्राणशक्ती संक्रमित केलेली आहे. 
(साप्ताहिक सनातन चिंतन, अंक १४)

दैनिक सनातन प्रभातमधील सूचनेनुसार आज्ञापालन केल्यावर विज्ञापनदात्याने विज्ञापन प्रसिद्ध होण्यापूर्वीच आनंदाने पैसे देणे

      २०१६ च्या गुरुपौर्णिमेनिमित्त दैनिक सनातन प्रभातमध्ये विज्ञापनदात्यांचे (जाहिरातदारांचे) विज्ञापन प्रसिद्ध होण्यापूर्वीच त्यांच्याकडून पैसे घ्या, अशी साधकांना सूचना प्रसिद्ध झाली होती. त्या वेळी माझ्या मनात प्रथम पैसे कसे मागायचे ?, असा नकारात्मक विचार येत होता. नंतर ईश्‍वराने विचार सुचवला, ईश्‍वराने दैनिक सनातन प्रभातच्या माध्यमातून सांगितले आहे, तर तसा प्रयत्न करून बघूया. मग मी विज्ञापन मोहिमेच्या सेवेला गेल्यावर विज्ञापन मागण्याचे प्रयोजन सांगितले. त्या वेळी पुन्हा माझ्या मनात विचार आला, विज्ञापनदात्यांना विज्ञापन प्रसिद्ध होण्यापूर्वी पैसे द्या, हे कसे सांगायचे ? तेव्हा मी देवाला प्रार्थना करून विज्ञापनदात्यांना विज्ञापनाचे पैसे प्रथम का मागत आहोत, ते सांगितले आणि विज्ञापनदाते पैसे देण्यास लगेचच सिद्ध झाले. तसेच त्या विज्ञापनदात्यांना अन्य व्यक्तीकडून ४ मास (महिने) मिळत नसलेले पैसे त्या दिवशी लगेच मिळाल्याने त्यांना पुष्कळ आनंद झाला. तेव्हा ते उत्स्फूर्तपणे मला म्हणाले, देवाला (अर्पण) दिले, तर देव लगेच साहाय्य करतो. - श्री. विलास सुर्वे, नवीन पनवेल (२.५.२०१६) 

प.पू. डॉक्टरांना जन्मदिवसानिमित्त सौ. सविता मनोहर शेणवी यांनी लिहिलेले पत्र !

सौ. सविता शेणवी
प.पू. गुरुमाऊली, 
कोटी कोटी साष्टांग नमन !
      आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणे आहे. आमच्यासारख्या असंख्य जिवांना साधनेची अमूल्य चिरंतन अशी अमृतरूपी आध्यात्मिक वाट दाखवून मोक्षाला घेऊन जात आहात, यासाठी आपल्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई वापरून आपले गुणगान करण्यासाठी पुरणार नाही. असे असतांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही शब्द पुरणार नाहीत. असे आपले हे ऋण आम्ही कधीच फेडू शकणार नाही. प.पू. डॉक्टर, आपण मला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सोडवलेत आणि पुढे घेऊन चालला आहात. माझ्याकडून आपणच प्रयत्न करून घेतलेत आणि पुढे पुढे कठोर साधना आपणच करून घ्यावी, अशी आपल्या कोमल चरणी शरणागतीची प्रार्थना आहे !

श्रीमद् नारायणाचे गुणगान गाऊ किती ।

श्रीमती उषा बडगुजर
त्रैलोक्याचा अधिपती आहे श्रीविष्णु भगवान ।
सोडवणार आम्हा जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून ॥ १ ॥
प्रथम सिंहासनी बसले प्रभु श्रीरामचंद्र ।
श्रीराम नामरूपी दगडांचा सेतू तरंगला समुद्रात ।
लंकेत केला अहंकाररूपी रावणाचा वध ॥ २ ॥
द्वितीयम सिंहासनी बसले श्रीकृष्ण भगवान ।
बालरूपात सवंगड्यांसह खेळले गोकुळात ।
अहंकाररूपी दुर्योधनाचा वध करवला रणांगणात ॥ ३ ॥
तृतीयम सिंहासनी बसले श्रीजयंतरूपी नारायण ।
सर्व विश्‍वाचे सार असे त्यांच्या चरणांत ।
आशीर्वाद मिळतो त्यांचा क्षणाक्षणात ॥ ४ ॥

सतत इतरांचा विचार करणारे आणि उत्तम निर्णयक्षमता असलेले पू. नकातेकाका !

१. इतरांचा विचार करणे
       पू. महादेव नकातेकाका वेगाने लिहीत असले, तरी त्यांचे लिखाण सुस्पष्ट आहे. लिखाणात केलेले पालट लगेच इतरांच्या लक्षात यावेत, या दृष्टीने ते वेगवेगळ्या रंगांतील स्केचपेन वापरतात.
२. उत्तम निर्णयक्षमता
       पू. काका झटकन योग्य तो निर्णय घेतात. एखाद्या वेळी मनात शंका असेल, तर ते त्वरित उत्तरदायी साधकाला विचारून निर्णय घेतात.
३. मनमोकळेपणाने बोलणे
       सर्वांशी सहजतेने आणि मनमोकळेपणाने कसे बोलावे, हे मला त्यांच्याकडून शिकता आले. प्रसंगी ते आमच्यावर रागावत; पण पुढच्याच क्षणी आम्हाला ते विसरायला व्हायचे; कारण त्यात आमचेच हित असते.
- श्री. विलास महादेव महाडिक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.३.२०१६)

आश्रमात जाण्यासाठी निघतांना पाऊस येणे आणि पू. नकातेकाकांनी सांगितल्याप्रमाणे ते बाहेर पडेपर्यंत पाऊस थांबून ऊन पडल्याचे दिसणे

       ४.३.२०१६ या दिवशी सकाळी ९.३० ते १२.३० या कालावधीत ग्रंथपडताळणीची सेवा पूर्ण झाल्यावर पू. नकातेकाका महाप्रसादाला निघाले. त्या वेळी बाहेर मध्यम पाऊस पडत होता. त्या वेळी मी पू. काकांना म्हणाले, पू. काका, तुम्ही आश्रमात जाईपर्यंत भिजाल. त्या वेळी पू. काका सहजपणे म्हणाले, मी बाहेर गेलो की, तो थांबेल. आपला विश्‍वास, श्रद्धा पाहिजे. त्यानंतर ते पू. भाऊकाका बसले होते, त्या खोलीत गेले. त्या वेळी मी अन्य एका साधकाला छत्री आहे का ?, विचारत होते. दादा खाली छत्री आहे, असे म्हणेपर्यंत मला खिडकीतून ऊन पडल्याचे दिसले. त्या वेळी पू. काका महाप्रसाद घ्यायला निघाले; म्हणून पाऊस लगेच थांबला आणि सूर्यदेव प्रसन्न होऊन त्यांनी दर्शन दिले, असे वाटले.
       तसेच संतांच्या वाणीतील चैतन्य अनुभवयाला मिळाले. असे १०० संत निर्माण झाले की, प.पू. डॉक्टर हिंदु राष्ट्रासाठी संतांना दिशा देऊन त्यांच्याकडून सेवा करवून घेतील आणि त्याप्रमाणे हिंदु राष्ट्र निश्‍चित येईल, असे मला वाटले.
- सौ. संगीता लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

महान गुरु-शिष्य परंपरा !

        हिंदु संस्कृतीच्या महानतेतील एक रत्नजडित कोंदण म्हणजे गुरु-शिष्य परंपरा ! वसिष्ठऋषि-श्रीराम, सांदीपनिऋषि-श्रीकृष्ण, आर्य चाणक्य-चंद्रगुप्त ही आदर्श गुरु-शिष्यांची उदाहरणे आहेत. गुरु आणि शिष्य हे दोन दिव्यांप्रमाणे असतात. तेलवात नसलेला दिवा १०० वेळा जरी प्रकाशमान दिव्याजवळ गेला, तरी तो प्रकाशत नाही. शिष्याच्या दिव्यातील ही तेल-वात म्हणजे त्याची निष्ठा, श्रद्धा अन् भक्ती ! 
---------------------------------------------
        मी कोण याचा शोध आणि गुरूला शरणागती, असे आध्यात्मिक उन्नतीकरता दोन मार्ग आहेत. मन स्वस्थ ठेवणे, गुरूला शरणागत होऊन कृपेची मार्गप्रतीक्षा करत रहाणे, हे वाटते तितके सोपे नाही. गुरूच्या अखंड स्मरणरूपी अभ्यासाची आवश्यकता असते. हाही अभ्यास गुरुकृपेचे साहाय्य असेल, तरच होतो. रात्री मूल झोपलेले असता आई त्याला पाजते. दुसर्‍या दिवशी मुलाला वाटते की, आपण काहीच खाल्ले नाही. आई मात्र जाणते की, रात्री मूल दूध प्यायले. तसेच शिष्याची उन्नती कशी काय होत आहे, ते गुरु जाणतो. गुरु आपल्या डोळ्यांतून, शब्दांतून किंवा स्पर्शाने कृपेचा ओघ बुद्धीपुरःसर भक्ताकडे लावतो. ही कृपा शिष्याला गुरूच्या प्रयत्नाने दिलेली असते. गुरूच्या कृपेचा पूर्ण उपयोग व्हावा, यासाठी शिष्यालाही सारखा प्रयत्न चालू ठेवावा लागतो. मी कोण आहे हा विचार, हाच प्रयत्न होय. - श्री रमण महर्षी (९)

गुरु हा प्राणविसावा माझा ।

पू. दत्तात्रेय देशपांडे
गुरु हा संतकुळीचा राजा ।
गुरु हा प्राणविसावा माझा ।
गुरुवीण नाही दुजा तारक, या जगतामाजी ॥ १॥
गुरु सत्याचा सागर, असे ज्ञानाचा आगर ।
गुरु हा हिमालय, जणू धैर्याचा डोंगर ।
गुरु हा महामेरू, आश्रय सकल साधकांचा ॥ २ ॥
गुरु हा कामधेनू वा असे कल्पतरू ।
करी भक्तांचा आत्मिक उद्धार ।
गुरु हा देवतांचा देवदूत, नव्हे देवापेक्षा श्रेष्ठ ॥ ३ ॥
गुरु नव्हे केवळ समाजसुधारक ।
तो आहे धर्माचा रक्षक ।
राष्ट्ररक्षक नि समाजसंघटक ॥ ४ ॥
गुरु हाच प्राणविसावा माझा ! ११ १२
- पू. दत्तात्रेय देशपांडे, वर्धा

गुरुकृपायोग हा सर्व योगांचा मेरूमणी असणे

      गुरुकृपायोग ज्याला कळला आणि वळला, तो सुटला. गुरुकृपायोग हा सर्व योगांचा मेरूमणी आहे. जितके गुरुकृपायोगावर चिंतन आणि मनन करावे, तितके त्याचे अंतरंग उलगडत जाते. गुरुकृपायोग हा यो बुद्धेः परतस्तु सः । म्हणजे बुद्धीच्या पलीकडील स्तरावरील असल्यामुळे ज्यांनी आपल्या विश्‍वबुद्धीने गुरुकृपायोग निर्माण केला, ते परात्पर गुरुच गुरुकृपायोगाला पूर्णत्वाने जाण शकतात.
- (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (अप्पाकाका), चेंबूर, मुंबई. (४.३.२०१३))
       गुरुप्राप्तीची जनार्दनाला तळमळ लागली होती. जागृती, स्वप्न आणि झोप या अवस्थांत २४ घंटे तो दत्तात्रेयांचे चिंतन करतो. दत्त प्रसन्न होऊन प्रकट झाल्यावर त्याने जनार्दनाच्या डोळ्यांवर हात ठेवताच तात्काळ त्याला बोध झाला. तो निर्मनस्कावस्थेत होऊन मूर्च्छित पडला. दत्तगुरु म्हणाले, ही सत्त्वावस्था आहे. याही पलीकडे तुरीयावस्थेत, आत्मबोधात जायचे आहे. जनार्दनस्वामींनी पूजा केली आणि ते पाया पडले. तेव्हा योगमायेने दत्तगुरु अदृश्य झाले. - एकनाथी भागवत ९

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

सनातनच्या विविध आश्रमांमध्ये खालील उपकरणांची आवश्यकता !
   सनातनच्या विविध आश्रमांमध्ये शेकडो साधक पूर्णवेळ साधना करत आहेत. राष्ट्र-धर्म यांच्या कार्यासाठी अधिकाधिक वेळ देता यावा, यासाठी पूर्णवेळ साधनेस आरंभ करणारे साधक, तसेच राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सध्या आश्रमांमध्ये खालील उपकरणांची तातडीने आवश्यकता आहे. 

   जे वाचक, हितचिंतक अथवा धर्माभिमानी वरील उपकरणे विकत घेण्यासाठी धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी श्री. विनायक आगवेकर यांना vaastunirmiti@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा ०८४५१००६०३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
धनाच्या त्यागाद्वारे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्याची संधी दवडू नका !

साधकांना सूचना !

पोटाच्या तक्रारी दूर करण्यासाठी शक्यतो तांब्याच्या पात्रात पेलाभर
पाणी घेऊन त्यात १० मिरे आणि तीन चिमूट हळदपूड घालून
रात्रभर हे मिश्रण ठेवून ते सकाळी प्यावे, असे महर्षींनी सांगणे
    या दिवसांत साधकांच्या पोटाच्या तक्रारी पुष्कळच वाढल्या असल्याचे दिसून येत आहे. याविषयी महर्षींना सांगितले असता त्यांनी १४.७.२०१६ या दिवशी चेन्नई येथे झालेल्या नाडीवाचनात (सप्तर्षि नाडीपट्टीवाचन क्र. ८७ यामध्ये) पुढील उपाय सांगितला आणि ते म्हणाले -
   साधकांच्या या तक्रारी मुख्यतः वाईट शक्तींच्या त्रासामुळे आहेत. त्यांच्या पोटात विष साठल्याने असे होत आहे. त्यांनी रात्री शक्यतो तांब्याच्या पात्रात पेलाभर पाणी घेऊन त्यात १० मिरे आणि तीन चिमूट हळदपूड घालून हे पाणी एकदा ढवळून रात्रभर तसेच ठेवावे. दुसर्‍या दिवशी सकाळी तोंड धुतल्यानंतर हे पाणी मिर्‍यांसकट प्यावे. त्यानंतर पोटावर हात गोल फिरवून श्री गणेशाचे स्मरण करून जीर्णयामि । श्रीकृष्णार्पणमस्तु । असे तीनदा म्हणावे. याचा अर्थ असा आहे - घेतलेल्या आहाराचे (श्री गणेशाच्या कृपेने) मी पचन करतो. हा आहार श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण होऊ दे. यामुळे साधकांना देवतांचा आशीर्वादही मिळेल आणि त्यांच्या व्याधी दूर होण्यास साहाय्यही होईल.
   वरील उपाय सलग तीन दिवस करावा. तरीही पोटाच्या तक्रारी दूर झाल्या नाहीत, तर आणखी दोन-तीन दिवस हा उपाय करावा.
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (१४.७.२०१६, दुपारी २.५१)

सर्वत्रच्या साधकांना सेवेची सुवर्णसंधी !

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !
   सनातनचे ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे.
   समाजापर्यंत शीघ्रतेने पोहोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे लहान धर्मरथासाठी लाईट मोटर व्हेहिकल (LMV), दुसर्‍या लहान धर्मरथासाठी लाईट ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल आणि तीन मोठ्या धर्मरथांसाठी हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल असे परवाने असणे आवश्यक आहे.

गुरुपौर्णिमेच्या संदर्भात सनातन संस्थेची वैशिष्ट्ये

१. सनातन संस्थेत अनेक संत असूनही सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते.

२. विविध संत आणि संप्रदाय यांत एक प्रमुख असतात; म्हणून त्यांची गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते आणि त्यांच्या विषयीची माहिती स्मरणिकेत किंवा पत्रकात असते. सनातनमध्ये अनेक साधक संत झाले असल्यामुळे त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे सनातन प्रभात नियतकालिकांत प्रकाशित करण्यात येतात.

- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

समष्टी साधनेमुळे व्यापकत्व आल्याने प्रगती जलद व्हायला साहाय्य होते ! 
परात्पर गुरु डॉ. आठवले
   समष्टी साधना केल्यास, म्हणजे इतरांनाही साधनेला लावल्यास वातावरणातील रज-तम प्रधानता घटण्यास थोडेफार साहाय्य होते. त्यामुळे व्यष्टी साधना करणे थोडेफार सुलभ होते. समष्टी साधना करणारा साधक केवळ मी आणि माझी साधना याचा विचार न करता इतरांच्या साधनेचाही विचार करतो. त्यामुळे त्याच्यात व्यापकत्व येते आणि त्यामुळे प्रगती वेगाने व्हायला साहाय्य होते.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
अढळपद
अशा ठिकाणी बसा की, तुम्हाला जिथून कोणी ऊठ म्हणून सांगणार नाही. असे बोला की, हे खोटे आहे असे कोणी बोलणार नाही.
भावार्थ : ब्रह्मस्थितीला पोहोचल्यावर ऊठ असे म्हणायला दुसरा कोणी उरतच नाही आणि ती सर्वव्यापी अवस्था असल्याने तिथून उठायचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. हे खोटे आहे असे कोणी बोलणार नाही, असा बोलण्याचा विषय म्हणजे ब्रह्माची किंवा परमेश्‍वराची अनुभूती. मायाच खोटी असल्याने मायेतील सत्य बोलणेही खोटेच असते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - आषाढ पौर्णिमा (१९.७.२०१६) पहाटे ४.४० वाजता
समाप्ती - आषाढ कृष्ण पक्ष प्रतिपदा (२०.७.२०१६) पहाटे ४.२७ वाजता
दोन दिवसांनी पौर्णिमा आहे.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योग्य आचार-विचार
दुसर्‍याच्या आधाराची अपेक्षा करीत राहिलो, तर कधीच उभे रहाता येणार नाही; म्हणूनच धडपडत 
का होईना; पण स्वत:च्या हिमतीवर उभे राहून स्वावलंबी होणे इष्ट ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

काँग्र्र्रेसचे वाचाळवीर !

संपादकीय
      पीस टीव्हीवर बंदी, तर सुदर्शन टीव्हीवर बंदी का नाही ? हा प्रश्‍न विचारला आहे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी ! पीस टीव्ही म्हणजे काय आणि सुदर्शन टीव्ही म्हणजे काय हे जणू ठाऊक नसल्याप्रमाणे दिग्विजय सिंह यांनी हा प्रश्‍न विचारला आहे. एरव्ही सुद्धा दिग्विजय सिंह हे एक वाचाळ व्यक्तीमत्त्व म्हणून प्रसिद्ध पावले आहेत. त्यांनी केलेली कित्येक सार्वजनिक विधाने वादग्रस्त ठरली आहेत, तरीही ते काँग्रेस या जाणत्या पक्षाचे नेते आहेत, हे विशेष. ओसामा बिन लादेन या जागतिक आतंकवाद्याला ओसामाजी असे संबोधणारे हेच ते महाभाग आणि आतंकवादी इशरतजहाँ मेरी बेटी जैसी है, असे म्हणणारे हेच ते काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह. याव्यतिरिक्त धर्मांधांच्या तुष्टीकरणासाठी त्यांनी शेकडो वादग्रस्त विधाने केलेली आहेत, ज्यायोगे हिंदु बांधव दुखावले गेले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn