Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

६ जुलै वारीचे ठिकाण - तरडगाव, सातारा 
द्वैताद्वैत भाव आहे ठायी ।
अनुभव नाही स्वरूपाचा ॥

न्यूयॉर्कमध्ये मशिदीबाहेर २ मुसलमान तरुणांवर आतंकवादीअसल्याचे म्हणत आक्रमण !

अमेरिकेत मुसलमानांवर वाढती आक्रमणे !
आक्रमणकर्त्यांनी म्हटले, जगभरातील समस्यांचे मूळ तुम्ही मुसलमान आहात !
    न्यूयॉर्क - शहरात एका मशिदीत नमाज पठण करून बाहेर पडलेल्या २ मुसलमान युवकांवर आक्रमण करून त्यांना घायाळ करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आठवडाभरात अशा प्रकारचे आक्रमण होण्याची ही तिसरी घटना आहे.
१. येथील इस्लामी संस्था सीएआयआर्च्या माहितीनुसार आक्रमण करणार्‍यांनी या मुसलमान युवकांना आतंकवादी म्हणत मारहाण केली. संपूर्ण जगभरातील समस्यांचे मूळ तुम्ही मुसलमान आहात, असेही ते म्हणाले. (आतंकवाद्यांना धर्म असतो, असे समजून प्रगत देश असणार्‍या अमेरिकेत अशा घटना घडतात, यावर भारतातील निधर्मीवादी काही बोलतील का ? - संपादक)

डॉ. झाकीर नाईकच्या विचारांनी जिहादसाठी कृतीशील झाले होते बांगलादेशातील आक्रमणातील आतंकवादी !

हिंदूंनो, भारतातही असे जिहादी युवक निर्माण होऊन आतंकवादी
कृत्य करण्यापूर्वीच हिंदुद्वेषी डॉ. झाकीर यांच्यावर बंदी घालण्याची मागणी करा !
    मुंबई - ढाका येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणामध्ये सहभागी असलेले २ आतंकवादी मुंबईतील तथाकथित मुसलमान विचारवंत डॉ. झाकीर नाईक आणि बेंगळुरू येथील इस्लामिक स्टेटचा समर्थक मसरूर बिस्वास यांच्यामुळे जिहाद करण्यासाठी कृतीशील झाले होते. सध्या मसरूर कारागृहात असून त्याच्या विरूद्ध खटला चालू आहे. बिस्वास याने ट्विटर खात्याच्या माध्यमातून इसिसचे समर्थन केले होते. डिसेंबर २०१४ मध्ये त्याला अटक करण्यात आल्यानंतर त्याचे शेकडो समर्थक असल्याचे आढळून आले होते.
१. डॉ. झाकीर यांनी ओसामा बिन लादेनला आतंकवादी म्हणण्यास नकार दिल्याने वाद निर्माण झाला होता.
२. त्यांना ब्रिटनमध्ये प्रवेशबंदी केल्यानंतर त्यांनी सर्व मुसलमानांना आतंकवादी बनण्याचे आवाहन केले होते.

नागोरी आणि खंडेलवाल यांचा खटला बंद करण्यासाठी विनंतीअर्ज सादर

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण
    पुणे, ५ जुलै - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात यापूर्वी संशयित म्हणून अटक केलेले आरोपी मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांच्या विरुद्ध न्यायालयात प्रविष्ट केलेला खटला बंद करण्यात यावा, तसेच पोलिसांनी हा खटला बंद करण्याच्या संदर्भातील अहवाल (क्लोजर रिपोर्ट) न्यायालयात सादर करावा, असा विनंतीअर्ज आरोपींचे अधिवक्ता बी.ए. अलुर यांनी ४ जुलै या दिवशी न्यायालयात प्रविष्ट केला. यासंदर्भात अन्वेषण अधिकारी आणि शासकीय अधिवक्ते यांनी आपले म्हणणे सादर करावे, असे आदेश न्यायाधीश व्ही.बी. गुळवे-पाटील यांनी दिले. (सनातनवरील द्वेषापोटी आणि तिच्यावर बंदी आणण्यासाठी हा खटला अन्वेषण यंत्रणांनी रहित केल्यास आश्‍चर्य वाटायला नको ! - संपादक)

सौदी अरेबियामध्ये पवित्र मदिना मशीद आणि अन्य दोन ठिकाणी आत्मघातकी आक्रमण !

आक्रमणामागे पाकचा हात असल्याची सौदी अरेबियाची शंका !
    बांगलादेश आणि सौदी अरेबिया येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात पाकचा हात असल्याचे समोर येत असल्याने पाकला आतंकवादी राष्ट्र घोषित करून त्यांच्यावर जगाने बहिष्कार घालावा !
   रियाध (सौदी अरेबिया) - मदिना शहरातील पैगंबरांच्या पवित्र मशिदीसमोर ४ जुलै या दिवशी सायंकाळी सुरक्षारक्षकांच्या वाहनतळामध्ये बॉम्बस्फोट झाला. गल्फ वृत्तानुसार एका आक्रमणकर्त्याने मशिदीसमोर स्वत:ला उडवून घेतले. यामध्ये ४ पोलीस, तसेच ३ आतंकवादी ठार झाले. हा आत्मघातकी आतंकवादी पाकिस्तानी असल्याचे सौदी अरेबियाच्या गृहमंत्रालयाने म्हटले आहे. अल्-अरेबिया वृत्तवाहिनीच्या थेट प्रक्षेपणानुसार मशिदीच्या पार्किंगमध्ये आग लागल्याचे दृश्य होते. तत्पूर्वी जेद्दा शहरात अमेरिकेच्या दुतावासाबाहेर आणि कातिफमधील शिया मशिदीवर आक्रमण झाले. यामध्ये ३६ जणांचा मृत्यू झाला असून १५० जण घायाळ झाले आहेत.

चीनमध्ये मुसळधार पाऊस, पुरामुळे १०० मृत्यूमुखी

  • ११ प्रांतांना फटका
  • १० लाख नागरिकांनी इतरत्र आश्रय घेतला
   शांघाय - चीनमध्ये मुसळधार पावसामुळे किमान ११ प्रांतांना फटका बसला आहे. मध्य आणि दक्षिण चीनमध्ये आलेल्या पुरामुळे किमान १०० नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. मृतांचा आकडा याहून अधिक वाढण्याची शक्यता आहे. सुमारे १५ लाख हेक्टर शेतभूमीवरील पीके उद्ध्वस्त झाली असून २० अब्ज युआनपेक्षाही (३ अब्ज डॉलर्सहून अधिक) आर्थिक हानी झाल्याचे येथील शासनाने म्हटले आहे. या संकटामुळे सुमारे १० लाख नागरिकांना इतरत्र आश्रय घ्यावा लागला आहे.

मुंबईवर आतंकवादी आक्रमणाचे सावट

आतंकवादग्रस्त भारत ! देश आतंकवादमुक्त होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
मुंबईसह महाराष्ट्रात अतिदक्षतेची चेतावणी
     मुंबई - बांगलादेशमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मुंबईत आतंकवादी आक्रमणाचे सावट असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने महाराष्ट्रातील सुरक्षायंत्रणांनाही अतिदक्षतेची चेतावणी दिली आहे. 
    ईदच्या वेळेस मुंबईवर आतंकवादी आक्रमणाची शक्यता असून या आठवड्यात, तसेच महिन्याभरातही आतंकवादी आक्रमण होऊ शकते. मुंबईतील पूल आणि गजबजलेले परिसर यांना लक्ष्य करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून काही दिवसांपूर्वी एक दूरभाष मुद्रित (टॅप) केला होता. हा दूरभाष भारताला हव्या असलेल्या एका आतंकवाद्याचा आहे.आता चीनने सैनिकी संघर्षासाठी सिद्ध रहावे !

चीनचे सरकारी दैनिक ग्लोबल टाइम्सचे चिनी नागरिकांना आवाहन
    बीजिंग - दक्षिण चिनी समुद्रामधील सीमारेषेच्या वादासंदर्भात सैनिकी संघर्षासाठी चीनने सिद्ध रहावे, असे मत येथील ग्लोबल टाइम्स या चीनच्या सरकारी वृत्तपत्रामधून व्यक्त करण्यात आले आहे. या संदर्भातील चीन आणि फिलिपिन्स यांच्यामधील वादावर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल पुढील आठवड्यात येणे अपेक्षित आहे. या पार्श्‍वभूमीवर या भागातील राजकीय तणाव प्रचंड वाढला आहे.

जुनो अवकाश यान गुरु ग्रहाच्या कक्षेत स्थिरावले !

नासाचे ऐतिहासिक यश !
     पासाडेना, कॅलिफोर्निया - अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने सोडलेले जुनो हे अवकाश यान सूर्यमालेतील सर्वांत मोठ्या समजल्या जाणार्‍या गुरु ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे स्थिरावले आहे. त्यामुळे नासाच्या प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी आनंद व्यक्त केला. 
     गुरु ग्रहाच्या उत्पत्तीचे गूढ जाणून घेण्यासाठी नासाने वर्ष२०११च्या ऑगस्टमध्ये मानवरहित जुनो प्रक्षेपित केले होते. ५ वर्षांनी २.७ अब्ज किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर ते ५ जुलै या दिवशी अपेक्षित ठिकाणी स्थिरावले आहे. जुनोच्या उपलब्धीला ऐतिहासिक यश समजले जात आहे. 
     अनुमाने १८ मास हे यान गुरु ग्रहाभोवती प्रदक्षिणा घालेल. कॅलिफोर्नियातील प्रयोगशाळेतून त्याच्या हालचालींवर २४ घंटे लक्ष ठेवण्यात येत आहे.बॉम्बे हायकोर्ट आता मुंबई हायकोर्ट !

   मुंबई - बॉम्बे हायकोर्टाचे आता मुंबई हायकोर्ट, मद्रास हायकोर्टाचे चेन्नई हायकोर्ट, तर कॅलकटा हायकोर्टाचे कोलकाता हायकोर्ट, असे नामकरण करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे.

शेंदुर्णी (जिल्हा जळगाव) येथे धर्मांधाकडून हिंदु गुराख्याला मारहाण

हिंदूंनो, किती काळ धर्मांधांच्या आक्रमणांना सामोरे जाणार आहात ?
ही स्थिती पालटण्यासाठी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
    शेंदुर्णी - येथील गुलाबबाबा दर्ग्याजवळ शेळ्या चारण्यासाठी घेऊन आलेल्या हिंदु गुराख्याला धर्मांधाने पुष्कळ मारहाण केली. (आतापर्यंत झालेल्या धर्मांधांच्या तुष्टीकरणाचाच हा परिणाम ! - संपादक) याप्रकरणी हिंदू आणि मुसलमान यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
१. गोविंदा अमृत धनगर गुराखी गुलाबबाबा दर्ग्याजवळील शेताच्या बांधावर शेळ्या चारत होता. धर्मांध शेख दानिश शेख जैनुद्दीन याने त्याला हटकले आणि पुष्कळ मारहाण केली. त्यात गुराखी गंभीररित्या घायाळ झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले.

अंमलबजावणी संचालनालयाची कार्ती चिदंबरम् यांना नोटीस

एअरसेल-मॅक्सिस घोटाळा
      नवी देहली - अंमलबजावणी संचालनालयाने माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांचे पुत्र कार्ती चिदंबरम् यांना २ जी घोटाळ्यातील एयरसेल-मॅक्सिस प्रकरणी समन्स पाठवले आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात कार्ती यांना प्रथमच नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांना व्यक्तिगत स्वरूपात किंवा अधिकृत प्रतिनिधीच्या माध्यमातून तपास यंत्रणेच्या समोर उपस्थित होण्यास सांगण्यात आले होते; मात्र याकरिता कार्ती यांनी वेळ मागितला आहे. हा तपास अ‍ॅडव्हॉन्टेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टींग प्रा. लिमिटेड आणि चेस ग्लोबल अ‍ॅडव्हायझरी सर्विसेस प्रा. लिमिटेड या आस्थापनांशी संबंधित असून त्यांचे कार्ती चिदंबरम् संचालक आहेत. कार्ती यांच्यावर धन शोधन निरोधक अधिनियमचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. (सत्तेचा अपवापर करून देशाला अब्जावधी रुपयांनी लुटणार्‍या अशा घोटाळेबाजांचा त्वरित तपास करून त्यांना आजन्म कारागृहात पाठवा ! - संपादक)

केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार : १९ नवीन मंत्री, तर ५ जणांना हटवले !

     नवी देहली - केंद्रीय मंत्रीमंडळाचा ५ जुलैला विस्तार करून १९ नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला, तर ५ जणांचे मंत्रीपद काढून घेण्यात आले. आता मंत्रीमंडळातील मंत्र्यांची संख्या ८३ झाली आहे. राष्ट्र्रपती भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या मंत्र्यांना पद आणि गोपनीयता यांची शपथ दिली. प्रकाश जावडेकर यांना बढती देण्यात आली आहे. जावडेकर यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना राज्यमंत्री करण्यात आले आहे. शपथ घेतांना ते स्वतःचे नाव घेण्यास विसरले. त्यांना राष्ट्रपतींनी आठवण करून दिली.

सनातनचे साधक सागर निंबाळकर यांचे फरारी म्हणून छायाचित्र छापून अपकीर्ती करणार्‍या दैनिक पुढारीला कायदेशीर नोटीस !

    रामनाथी (फोंडा), ५ जुलै (वार्ता.) - दैनिक पुढारीने कोल्हापूर आवृत्तीच्या १७ जून २०१६ च्या अंकात पृष्ठ ५ वर दाभोलकर यांना धक्काबुक्की केलीच या मथळ्याखाली एक वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्या वृत्तातील छायाचित्राखाली लिहिले आहे, डिसेंबर २००४ या दिवशी डॉ. दाभोलकर यांचा संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त गाडगे महाराज चौकात कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमाला पत्रकार म्हणून उपस्थित असलेला आणि सध्या एन्आयएने फरारी घोषित केलेला प्रवीण लिमकर. प्रत्यक्षात हे छायाचित्र रामनाथी येथील सनातन आश्रमात सेवा करणारे श्री. सागर निंबाळकर यांचे आहे. दैनिक पुढारीच्या या खोट्या आणि अपकीर्तीकारक वृत्ताच्या विरोधात श्री. सागर निंबाळकर यांनी त्यांचे अधिवक्ता श्री. नागेश ताकभाते यांच्यामार्फत ५० लक्ष रुपये हानीभरपाई मिळावी, यासाठी कायदेशीर नोटीस बजावली आहे.

अमरावती येथे भारतीय जनता युवा मोर्चा आणि भाजप महिला आघाडी यांची निदर्शने

यवतमाळ पब्लिक स्कूलमधील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण
    अमरावती - लैंगिक अत्याचाराचा निषेध असो, दर्डा हाय हाय, अशा घोषणा देत येथील लोकांनी यवतमाळ पब्लिक स्कूलमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा काळ्या फीती बांधून तीव्र शब्दांत निषेध केला. या वेळी भारतीय जनता युवा मोर्चा आणि भाजप महिला आघाडी यांच्या वतीने राजकमल चौकात निदर्शने करण्यात आली. संस्थेच्या संचालक मंडळातील सर्व सदस्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांकडे केली.

समान नागरी कायद्याकरता संघाचा मुस्लिम राष्ट्रीय मंच मुसलमानांमध्ये जागृती करणार !

काही मुसलमानांना समान नागरी कायदा हवा असला, तरी जिहादी विचारसरणीचे ओवैसी यांच्यासारखे 
नेते मुसलमानांना त्यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगून भडकवत रहाणार. हे रोखण्यासाठी 
शासनाने उपाययोजना करायला हवी ! 
     नागपूर - समान नागरी कायदा करण्याविषयी केंद्रशासनाने विधी आयोगाचे मत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला स्वाभाविकपणे मुसलमानांचा विरोध होऊ लागल्यामुळे त्यांचे मतपरिर्वतन करण्यासाठी संघपरिवारातील मुस्लिम राष्ट्रीय मंच पुढे आला आहे. या संघटनेकडून या कायद्याच्या आवश्यकतेविषयी येत्या काही मासांमध्ये मुसलमानांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. (एकीकडे समान नागरी कायद्याला विरोध करून आपले वेगळे अस्तित्व ठेवायचे आणि देशातील साधन संपत्तीवर समान हक्क मागायचा, हे मुसलमानांचे धोरण शासन कुठपर्यंत चालू देणार आहे ? - संपादक) 

शंकानिरसन झाल्यानंतरच मुसलमान समाज समान नागरिक कायदा स्वीकारील ! - अबिद रसूल खान

   भाग्यनगर (हैद्राबाद) - मुसलमान समाज तेव्हाच समान नागरिक कायदा स्वीकारील, जेव्हा त्याचा मसुदा जनतेसमोर ठेवला जाईल आणि त्यावर योग्य चर्चा होऊन मुसलमानांचे शंकानिरसन करण्यात येईल, अशी टिप्पणी आंध्रप्रदेश आणि तेलंगण राज्यांच्या अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष अबिद रसूल खान यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले, धर्म हा आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. आपण जीवनातील प्रत्येक कृती धर्माचा आधार घेऊनच करतो. मग ते मतदान असो की आपले भोजन असो. (किती हिंदूंमध्ये अशाप्रकारे धर्माभिमान आहे ? - संपादक) त्यामुळे शासनाने यासंदर्भात अत्यंत विचारपर्वूक पुढे जायला हवे. या कायद्यामुळे सर्व धर्मीय लोकांवरच परिणाम होणार आहे.

मुंबईत विषारी इंजेक्शनद्वारे झाडांची हत्या

    मुंबई - येथे झाडांच्या मारेकर्‍यांची एक टोळीच विषारी इंजेक्शन देऊन झाडांची हत्या करत असल्याचे उघडकीस आले आहे. (अशा पर्यावरण भक्षकांवर सरकारने कठोर कारवाई करावी ! - संपादक) रात्रीच्या वेळी दुचाकीवरून येणारे लोक झाडांना विषारी इंजेक्शन देऊन काही क्षणांत तेथून पळून जातात. याविषयी स्थानिकांना मागमूसही लागत नाही. काही आठवड्यांनी झाड कोमेजून गेल्यावर लोकांच्या ते लक्षात येते. मुंबईत दहिसरमध्ये झाडांना इंजेक्शन देण्याचा प्रकार क्लोज्ड सर्किट टीव्ही कॅमेर्‍याच्या माध्यमातून उघडकीस आला आहे.

सावकाराकडून भूमीच्या बदल्यात मुलगी आणि सून यांची मागणी

बीड जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासण्याचा प्रकार
     बीड - येथील धारूर तालुक्यात शेतकर्‍याला भूमीचे नियंत्रण देण्यासाठी सावकाराने मुलगी आणि सून यांची मागणी केली. (बलाढ्य लोकशाही असलेल्या भारतात अजूनही सावकारशाही चालू असल्याचे हे उदाहरण आहे. या सावकारशाहीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भाजप सरकार काय करणार आहे ? - संपादक) या प्रकरणी योग्य कारवाई करण्याचे आश्‍वासन बीडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिले आहे. सावकाराने कर्जाच्या बदल्यात भूमी कह्यात घेतल्याची तक्रार शेतकर्‍याने पोलीस ठाण्यात केली; मात्र त्यावर कारवाई झाली नाही. त्यानंतर सावकाराने वरीलप्रमाणे मागणी केली.
    हिंदु धर्मासाठी भारताबाहेरून आर्थिक वा इतर कोणतीही मदत येणे शक्य नाही. हिंदु धर्माच्या दृष्टीने विचार केला, तर हिंदूंना स्वबळावर उभे रहाण्याशिवाय पर्याय नाही ! (लोकजागर)

लोकांनी नाव दिले देशद्रोही का दंगल

अमीर खान यांच्या दंगलला ट्विटरवर तीव्र विरोध 
      मुंबई - अमीर खान यांनी मागील वर्षी देशातील कथित असहिष्णुतेविषयी वक्तव्य केले होते. त्या वेळी त्यांनी भारतात असुरक्षततेचे वातावरण पाहून भीती वाटते, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांना देशात प्रचंड विरोध झाला होता. अमीरचे ते वक्तव्य आजही लोक विसरले नाहीत. अमीर खानचा प्रदर्शनासाठी सिद्ध असलेला दंगल या चित्रपटाचे भित्तीपत्रक नुकतेच प्रदर्शित करण्यात आले; मात्र त्याच्या दुसर्‍या दिवसापासूनच सामाजिक संकेतस्थळ ट्विटरवर लोकांनी या चित्रपटाचा बहिष्कार करण्याची चळवळ चालू केली आहे. लोकांनी त्याचे देशद्रोही का दंगल असे नामकरण केले आहे. लोकांनी अमीर खान यांचा नवीन देश, धर्मही ठरवून टाकला आहे. त्यांनी भगवान शिव आणि भारत यांचा अवमान करणार्‍या अमीरला धडा शिकवा, असे आवाहन केले आहे.विद्यार्थिनीची छेड काढणारा धर्मांध पोलिसांच्या कह्यात; जामिनावर सुटका

हिंदूंनो, आपल्या मुलींना धर्मांधांच्या तावडीतून वाचवण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण द्या !
     शिरोळ (जिल्हा कोल्हापूर), ५ जुलै (वार्ता.) - येथे इयत्ता सहावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीला शाळेच्या पटांगणात मारहाण करणारा धर्मांध अमीर दिलावर शेख याला विद्यार्थी आणि शिक्षक यांनी चोप देऊन पोलिसांच्या कह्यात दिले. (शाळेच्या आवरात येऊन विद्यार्थिनीला मारहाण करण्यापर्यंत मुजोर धर्मांधांची मजल जाते, हे जाणा ! - संपादक) मुलीची छेड काढल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
१. येथील एका विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी ४ जुलै या दिवशी दुपारी पटांगणावर खेळत होत्या. या वेळी धर्मांध अमीर शेख तेथील एका मुलीचा हात धरून तू माझ्यासमवेत चल, असे म्हणून तो तिला ओढून घेऊन जाऊ लागला. मुलीने प्रतिकार करताच त्याने तिला मारहाण केली. 
२. हा प्रकार इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी पाहिला. मुलांनी अमीरला घेरल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. बाहेर जाण्यास मार्गच नसल्याने तो एका वर्गात लपून बसला. शेवटी शिक्षकांनी त्याला शोधून बाहेर आणले आणि चोप दिला. 
३. रात्री उशिरा त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. (शाळेच्या परिसरात अशी अरेरावी करणार्‍या धर्मांधाला कठोर शासन झाले, तर असे अपप्रकार टळतील ! - संपादक)

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा भारतीय संस्कृतीविरोधी विचार

मद्यप्राशन करून वाहने चालवू नका, हे फलक आता शासन काढून टाकणार का ?
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उभयचर (अ‍ॅम्फिबियस) बसमध्ये मद्य पुरवणार ?
     खरे तर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भारतीय संस्कृती, तसेच प्राचीन भारतीय वास्तूशास्त्र, लोककला आदींविषयीची ओळख करून देणारी चलचित्रे दाखवणे, भारतभूमीचे आध्यात्मिक वैशिष्ट्य सांगणे असे उपाय योजले जाऊ शकतात; पण ते सोडून पर्यटकांना मद्य पुरवण्याचा विचार करणे म्हणजे इतरांचे लक्ष वेधण्यासाठी भरजरी कपडे उतरवून फाटके कपडे घालण्यासारखे आहे. - संपादक 
     मुंबई, ५ जुलै - पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, तसेच पर्यटकांना प्रवासाचा आनंद (?) देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून भूमी आणि पाणी या दोन्ही ठिकाणी चालू शकणार्‍या उभयचर (अ‍ॅम्फिबियस) बसमध्ये मद्य (बियर आणि वाईन) पुरवण्याचा विचार केला जात आहे. सार्वजनिक रस्ते वाहतुकीत मद्य पुरवण्याचा हा देशातील पहिला प्रयोग असल्याचे मानले जात आहे. (रस्त्यावरील अपघातांच्या प्रचंड वाढलेल्या प्रमाणावर शासनाला उपाययोजना का करता आलेली नाही. मद्यपानामुळे घडणारे गुन्हे आणि अपघात यांचे दायित्व महामंडळ स्वीकारणार आहे का ? - संपादक)

(म्हणे) आतंकवाद्यांना धर्म नसतो !

मुसलमानांच्या मतांसाठी ममता (बानो) बॅनर्जी यांची हिंदूंच्या डोळ्यांत धूळफेक !
      कोलकाता - आतंकवाद्यांचा कोणताही धर्म नसतो. आतंकवादाशी लढण्यासाठी संघटित होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी बांगलादेशातील आक्रमणाचा निषेध करतांना विधानसभेत केले. (बंगालच्या शेजारचा देश बांगलादेशमध्येच जवळपास ३६ आतंकवादी संघटना कार्यरत असून त्या सर्व मुसलमानांच्या आहेत, हे ममता बॅनर्जी यांना ठाऊक नाही का ? तस्लिमा नसरीन यांनीही इस्लामला शांतीचा धर्म म्हणू नका, अशा शब्दांत मुसलमानांचा आतंकवादाशी असलेल्या संबंधावर बोट ठेवून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुसलमानांच्या मतांसाठीच ममता बॅनजी यांच्यासारखे नेते आतंकवाद्यांचा कोणताही धर्म नसतो किंवा भगवा आतंकवाद यांसारखी वक्तव्ये करतात. - संपादक) 

ढाका येथे आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांकडून हिजाब न वापरणार्‍या मुसलमान तरुणीची हत्या !

आतंकवाद्यांना धर्म नसतो, असे म्हणणार्‍या ममता बॅनर्जी, काँग्रेसवाले, 
तथाकथित धर्मनिरपेक्षतावाले यांना सणसणीत चपराक ! 
आतंकवाद्यांनी कुराणाची आयते म्हणणार्‍यांना आणि बांगलादेशी मुसलमानांनाही सोडले होते !
     देहली - बांगलादेशातील ढाका येथे होली आर्टिसन बेकरीत जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणाच्या प्रकरणी काही माहिती आता पुढे येत आहे. कोलकाता विश्‍वविद्यालयातील प्राध्यापक अलोक कुमार यांनी सामाजिक संकेतस्थळावर माहिती देतांना लिहिले आहे की, या आक्रमणाच्या वेळी इशरत अखोंड नावाच्या मुसलमान तरुणीची आतंकवाद्यांनी हत्या केली; कारण तिने इस्लामी प्रथेनुसार हिजाब (डोके झाकण्यासाठी वापरण्यात येणारे कापड) वापरला नव्हता. आतंकवाद्यांनी कुराणाची आयते म्हणणार्‍यांना आणि बांगलादेशी मुसलमानांना सोडले होते; मात्र इशरतने ती मुसलमान असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच तिने कुराणातील आयतेही म्हणून दाखवली नाहीत. (आतंकवाद्यांना धर्म नसता, तर त्यांनी इस्लामप्रमाणे आचरण करणार्‍यांना जीवदान का दिले ? जिहादी आतंकवाद्यांच्या या धर्मांधतेचा भारतातील एकही निधर्मीवादी विरोध करत नाहीत, हे जाणा ! - संपादक)

अरबी पेहराव करणार्‍या मुसलमानास चुकून अटक केल्यावरून अमेरिकेने मागितली संयुक्त अरब अमिरातीची क्षमा !

संयुक्त अरब अमिरातीचा विदेशात पारंपरिक पेहराव न करण्याचा त्याच्या नागरिकांना सल्ला !
     वॉशिंग्टन - एका मुसलमानाला त्याच्या वेशभूषेवरून अटक करण्यात आल्याच्या कारणास्तव अमेरिकेने क्षमा मागितली आहे. अमेरिकेतील ओहायो येथे पारंपरिक अरबी पेहराव केल्यावरून अहमद अल मेनहली नावाच्या मुसलमानास बंदुकीचा धाक दाखवून अटक करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. यावर वाद निर्माण झाल्याने अमेरिकेने लगेच क्षमा मागितली. दुसरीकडे संयुक्त अरब अमिरातीने त्याच्या नागरिकांना विदेशात सहलीला जातांना अशा प्रकारे पारंपरिक वेशभूषा न करण्याचा सल्ला दिला आहे. 

पहिल्याच पावसात पुण्यातील रस्त्यांची दैन्यावस्था !

    पुणे, ५ जुलै - यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्याच पावसात येथील ठिकठिकाणच्या रस्त्यांची दैन्यावस्था झाली आहे. येथे दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे विविध भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांप्रकरणी महानगरपालिकेच्या पथ विभागाकडे १०० तक्रारी आल्या असून आतापर्यंत केवळ १५ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. (स्मार्ट बनू पहाणार्‍या पुण्याच्या महानगरपालिकेचा कामे करण्याचा हाच का स्मार्ट वेग ? - संपादक) महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पावसाळ्यापूर्वीची रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या; मात्र त्याकडे कानाडोळा केला गेला असल्याचेच स्पष्ट होत आहे. (यावरून किती पाट्याटाकूपणे आणि दायित्वशून्यतेने कामे केली जातात, हे लक्षात येते. - संपादक)

जगातील १२४ दशलक्ष मुले शाळेपासून वंचित !

युनिसेफच्या अहवालाचा निष्कर्ष
    मुंबई - जगातील १२४ दशलक्ष मुले शाळेपासून वंचित आहेत. प्रति ५ विद्यार्थ्यांपैकी दोन मुले वाचन, लेखन करू शकत नाहीत आणि साधे गणितही सोडवू शकत नाहीत. ही चिंताजनक गोष्ट युनिसेफच्या जागतिक मुलांची सद्य:स्थिती या अहवालातून समोर आली. या अहवालाचे प्रकाशन ४ जुलै या दिवशी राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे झाले.

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांची पालखी बारामती, तर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी लोणंद (जिल्हा सातारा) येथे विसावली !

      पुणे, ५ जुलै - पहाटेची पूजा आणि काकड आरती करून जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांची पालखी उंडवडी-सुपे येथून प्रस्थान ठवून बारामती येथे, तर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी वाल्हे येथून लोणंद येथे ५ जुलै या दिवशी मुक्कामासाठी विसावली आहे.
१. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांची पालखी ४ जुलैच्या रात्री उंडवडी येथे मुक्कामास होती. उंडवडी-सुपे ग्रामवासियांनी संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे सनई-चौघडे वाजवत स्वागत केले. त्यानंतर येथील पालखीतळावर हा पालखी सोहळा विसावला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रा वाघ यांच्या पतीला लाच घेतांना अटक

केवळ अटक नको, तर शासनाने लाचखोरांची आणि त्यांच्या कुटुंबियांची संपत्ती 
जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे !
      मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या महाराष्ट्र अध्यक्षा चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ लाख रुपयांची लाच घेतांना अटक केली. त्यांच्यासमवेत आणखी दोन जणांना अटक केली आहे. (नेहमीच हिंदुत्ववाद्यांवर टीकेची झोड उठवणार्‍या चित्रा वाघ यांना आता याविषयी काय म्हणायचे आहे ? - संपादक)
    किशोर वाघ परळमधील महात्मा गांधी वैद्यकीय रुग्णालयात ग्रंथपाल आहेत. त्यांनी हानीभरपाईचा धनादेश देण्यासाठी ४ लाख रुपयांची लाच मागितली होती.

अकोल्यात शुद्ध हवेसाठी ऑक्सी पार्कची निर्मिती !

      अकोला, ५ जुलै - दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रदूषणामुळे नागरिकांना शुद्ध हवा मिळणे दुरापास्त होऊ लागले आहे. यावर पर्याय म्हणून येथील प्रभात किड्स या शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या साहाय्याने शाळेच्या परिसरात शुद्ध हवेसाठी ऑक्सी पार्कची निर्मिती केली आहे. या बागेत २४ घंटे प्राणवायू (ऑक्सिजन) उत्सर्जित करणारी तुळस आणि अन्य वनस्पती यांची लागवड करण्यात आली असून वनस्पतींची वैशिष्ट्ये सांगणारे फलकही झाडांवर लावण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिकवण्याच्या घंट्यांपैकी १ घंटा या बागेमध्ये भरवला जातो. (विकासाच्या नावाखाली निसर्गाला ओरबाडण्याचे काम केल्यानेच आता ऑक्सी पार्कसारख्या बागांची निर्मिती करण्याची वेळ आली आहे. निसर्गाची हानी करण्याचे वेळीच थांबवले नाही, तर शुद्ध पाण्याप्रमाणे उद्या शुद्ध हवाही पाकिटामधून खरेदी करण्याची वेळ येऊ शकते. यासाठी आताच जागृत होऊन निसर्गासाठी अनुकूल व्यवहार करायला हवेत. - संपादक)

(म्हणे), ढाका येथील आक्रमणात पाकचा हात नाही !

जिहादी आतंकवादी आक्रमणात पाकचा हात असल्याचे बांगलादेशच्या अधिकार्‍यांनी अधिकृतपणे 
सांगूनसुद्धा पाकचे परराष्ट्र प्रवक्ते नफीस झाकारिया यांची नेहमीचीच नकारघंटा ! 
      इस्लामाबाद - ढाका येथील आतंकवादी आक्रमणामध्ये पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. चा सहभाग असल्याच्या वृत्तावर पाकने टीका केली आहे. भारतीय प्रसिद्धीमाध्यमांनी प्रसारित केलेले वृत्त खोटे, बिनबुडाचे आणि चिथावणीखोर असून या आक्रमणात पाकचा हात नाही, असे पाकचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झाकारिया यांनी म्हटले आहे. (पाक प्रत्येक आतंकवादी आक्रमणानंतर असेच म्हणतो आणि नंतर पुरावे देऊनही सत्य स्वीकारत नाही. अशा पाकवर कोण विश्‍वास ठेवणार ? - संपादक) बांगलादेशच्या पंतप्रधानांचे सल्लागार गोहर रिझवी यांनीही हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे. यावरून भारतीय माध्यमांचा हेतू यातून स्पष्ट होतो, असे झाकारिया म्हणाले. 
     बांगलादेशातील बांधवांविषयी आम्हाला सहानुभूती असल्याने या आक्रमणाचा पाकने निषेध केला आहे. (पाकप्रमाणे बांगलादेशातील मुसलमान पक्के धर्मांध असल्यामुळे पाकला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटल्यास आश्‍चर्य ते काय ? - संपादक) गोहर रिझवींनी आतंकवादविरोधी मोहिमेसाठी पाककडे सहकार्य प्रस्ताव पाठवला असून पाकिस्तानने तो स्वीकारला असल्याचेही नफीस झाकारिया यांनी सांगितले.

मलेशियातील मंदिरात असलेल्या देवतेच्या मूर्तीची विटंबना !

विदेशातही हिंदूंची मंदिरे असुरक्षित ! भारतात चर्चवरील कथित आक्रमणानंतर भारतात 
असहिष्णुता असल्याचे सांगणार्‍या अमेरिकींप्रमाणे भारतीय राज्यकर्ते विदेशातील 
हिंदूंच्या श्रद्धास्थानांवरील आघातांचा जाहीरपणे निषेध करतील का ?
     जॉर्जटाऊन (मलेशिया) - पेनांग राज्यात असलेल्या बयान बारू येथील देवा श्री मथुराई वीरन मंदिरातील एका देवतेच्या मूर्तीची अज्ञातांनी विटंबना केल्याची घटना २ जुलैच्या रात्री घडली. सदर मूर्ती ही तूर्तास धार्मिक विधींसाठी वापरण्यात येत नसल्याची माहिती येथील दक्षिण पूर्व जिल्ह्याचे पोलीस प्रमुख सुप्त लाइ फाह हिन यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, मंदिर व्यवस्थापनाचे कार्यालय ज्या ठिकाणी होते, ती जागा रिकामी करण्याचे तेथील जागेच्या मालकाने सांगितले होते. हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची विटंबना झाल्याची गेल्या महिन्याभरातील ही तिसरी घटना आहे.

हिंदूंसाठी मंदिर आणि स्मशानभूमी निर्माण करा !

पाकिस्तान निर्माण होऊन ६९ वर्षे उलटून गेल्यावरही तेथील राजधानीत हिंदूंसाठी एकही मंदिर नसणे, 
हे पाकिस्तानचा पराकोटीचा हिंदूद्वेष दर्शवते ! याविषयी पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी झोडणारे 
मणिशंकर अय्यर यांसारखे तथाकथित धर्मनिरपेक्ष नेते, सुधींद्र कुलकर्णी आणि भारतीय राजकारणी 
यांपैकी कुणालाही ६९ वर्षांत काही वाटले नाही.
पाकच्या संसदीय समितीचे शासनाला आदेश !
      इस्लामाबाद - भारतात अनेक ठिकाणी शासनाच्या अनुमतीविना मशिदी उभ्या रहात असतांना पाकमध्ये मात्र मंदिर निर्माण करणेही अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. पाकची राजधानी इस्लामाबाद येथे हिंदूंना पूजेसाठी एकही मंदिर नाही. या पार्श्‍वभूमीवर येथे हिंदूंसाठी एक मंदिर आणि वैकुंठभूमी निर्माण करण्याचा आदेश पाकिस्तानातील संसदीय समितीने शरीफ शासनाला दिला आहे. पाकचे प्रमुख वृत्तपत्र डॉनच्या मते धार्मिक प्रकरणांच्या संदर्भात राष्ट्रीय संसद समितीची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत समितीला सांगण्यात आले की, इस्लामबाद येथे अधिकृतपणे किमान ५०० हिंदू निवास करतात; मात्र मृतकांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना रावळपिंडी येथे जावे लागते. हिंदूंसाठी राजधानीत स्मशान नसणे, ही अतिशय वाईट गोष्ट आहे.

(म्हणे) भारतात जिहाद करण्यासाठी दान करा !

पाकचा आतंकवादविरोध हा निवळ देखावा !
आतंकवादी संघटना जैश-ए-महंमदचे पाकमधील मुसलमानांना आवाहन
     नवी देहली - भारतात आतंकवादी आक्रमण करण्यासाठी पाकची प्रतिबंधित जिहादी आतंकवादी संघटना जैश-ए-महंमद कराचीतील मशिदीच्या बाहेर पैसा गोळा करत असल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्रात करण्यात आला आहे. या घटनेमुळे पाकचे खरे स्वरूप पुन्हा एकादा उघड झाले आहे.
    एका ध्वनीचित्रफितीच्या आधारे या वृत्तपत्राने दावा केला आहे की, रमजानच्या काळात मशिदींमध्ये नमाजासाठी जाणार्‍या लोकांना भारत आणि अफगाणिस्तान या देशांमधील जिहादींसाठी पैसा देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी हे चित्रीकरण करण्यात आले आहे, त्या ठिकाणी पोलीसही दिसून येत आहेत. आतंकवाद्यांशी संबंधित जामिया उलूम-ए-इस्लाम या मशिदीच्या बाहेरही चित्रीकरण करण्यात आले आहे. उत्तरप्रदेशमध्ये जन्मलेला आणि आता कराचीमधून सूत्र हालवणारा अल्-कायदाचा भारतीय उपखंडाचा प्रमुख शमी-उल-हक हाही या जामिया-उलूम-ए-इस्लामशी संबंधित आहे. त्याला काही दिवसांपूर्वी अमेरिकेने जागतिक आतंकवादी म्हणून घोषित केले होते. या शमीने एका ऑनलाईन संदेशात हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी जिहाद्यांना आवाहन केले होते. वर्ष २००२ मध्ये भारतीय संसदेवर आक्रमण केल्यानंतर जैश-ए-महंमद या संघटनेवर पाकने बंदी घातली होती; मात्र ही बंदी कागदोपत्रीच आहे.

फलक प्रसिद्धीकरता

भारताला असहिष्णू ठरवणार्‍या अमेरिकेची ही सहिष्णुता का ?
    अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २ मुसलमान युवकांवर आक्रमण करण्यात आले. आक्रमण करणार्‍यांनी त्या युवकांना संपूर्ण देशभरातील समस्यांचे मूळ तुम्ही मुसलमान आहात, असे म्हटले. गेल्या आठवड्याभरात मुसलमानांवर आक्रमण होण्याची अमेरिकेतील ही तिसरी घटना आहे.

बाजार समित्या आणि उपबाजार यांचा १ दिवसीय बंद

स्वार्थासाठी बंद पाळून आर्थिक हानी करणारे समाजद्रोही ! 
राज्यभरातील २०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प
     नवी मुंबई - राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात ३०५ बाजार समित्या आणि ६०३ उपबाजार येथील कामकाज ४ जुलै या दिवशी बंद ठेवण्यात आले. व्यापारी आणि कामगार यांच्या आंदोलनामुळे राज्यभर २०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. बाजार समित्यांमधील व्यापार्‍यांवर निर्बंध आणणे आणि बाहेरील व्यापार नियंत्रणमुक्त करणे या गोष्टीला व्यापार्‍यांचा विरोध आहे. गुजरातच्या धर्तीवर पूर्ण व्यापारच नियंत्रणमुक्त करण्याची मागणी व्यापारी आणि कामगार यांनी केली आहे. 
    वाशीतील एपीएम्सी मार्केटमध्ये व्यापार्‍यांची निषेध सभा झाली. नाशिक, यवतमाळ, धुळे, जळगाव, सोलापूर आदी जिल्ह्यांमधील व्यापारी आणि कामगारही या विरोधात सहभागी झाले होते.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या २५ प्रतिशत बसगाड्या बंद !

      पुणे - येथील महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये २ सहस्र ५४ बसगाड्या असल्याची नोंद असली, तरी प्रत्यक्षात केवळ १ सहस्र ५३० बसगाड्या रस्त्यावर असून २५ प्रतिशत बसगाड्या बंद अवस्थेत आहेत. सुट्या भागांचा अभाव, इंजिनमधील बिघाड, डेपो रनिंग, आर्टीओ पासिंग, तसेच इतर बिघाड यांमुळे ४०० बसगाड्या नादुरुस्त आहेत. रस्त्यावर असणार्‍या बसगाड्यांच्या ब्रेकमधील बिघाड, तसेच कर्णा आणि बॅटरी नसणे यांमुळेही बसगाड्यांचे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. (नागरिकांच्या जिवाशी खेळणार्‍या महामंडळावर प्रशासनाने दबाव आणून प्राधान्याने बसगाड्यांची दुरुस्ती करून घेणे आवश्यक आहे ! - संपादक) बालगंधर्व पोलीस चौकीच्या बाजूलाच तरुणाला चाकूने वार करून लुटले !

     पुणे - येथील बालगंधर्व पोलीस चौकीच्या बाजूलाच असलेल्या बस थांब्यावर अमोल ठोंबरे याला पहाटे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चाकूने वार करून लुटले. त्याच्याकडून भ्रमणभाष आणि २०० रुपये घेऊन ते पसार झाले. या वेळी श्री. अमोल यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला जखम झाली आहे. (पोलीस चौकीच्या शेजारी असे प्रकार घडणे म्हणजे पोलिसांचा चोरट्यांना धाक नसल्याचेच दर्शक ! - संपादक)संगमनेर (जिल्हा नगर) येथे ६ सहस्र किलो गोवंशियांचे मांस नेणार्‍या २ धर्मांधांना अटक

सरकार गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केव्हा करणार ?
      संगमनेर, ५ जुलै - नगरहून मुंबईकडे गोवंशियांचे मांस घेऊन निघालेले २ टेम्पो संगमनेर शहर पोलिसांनी ४ जुलैच्या रात्री पकडले. त्यात ६ सहस्र किलो गोमांस होते. या प्रकरणी पोलिसांनी सलीम अब्दुल कापडिया आणि मोहंमद जहीर इरफान कुरेशी या धर्मांध चालकांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ जुलैपासून आफ्रिकेच्या दौर्‍यावर !

पंतप्रधान मोदी यांनी बांगलादेशाचा दौरा करून तेथील हिंदूंची 
दुःस्थिती जाणून घ्यावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
     नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ जुलैपासून ५ दिवसांच्या आफ्रिका खंडाच्या दौर्‍यावर जाणार आहेत. या दौर्‍यामध्ये ते मोझांबिक, दक्षिण आफ्रिका, तांझानिया आणि केनिया या देशांचा दौरा करणार आहेत. या देशांसोबत भारताचे संबंध अधिक दृढ करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न रहाणार आहे. सध्या या देशांसोबत चीन संबंध वाढवू पहात आहे.

गुरुनानक यांचे परमसेवक मरदाना यांचे पाक सरकार स्मारक उभारणार !

     अमृतसर - शिखांचे पहिले गुरु श्री गुरु नानक देव यांचे अनन्य सेवक भाई मरदाना यांचे पाकमधील नानकानासाहिब येथे पाकिस्तान सरकार स्मारक उभारणार आहे. या संदर्भात भारताकडून आराखडा मागवण्यात आले आहे, अशी माहिती एक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डचे अध्यक्ष फारूक उल सिद्दीक यांनी दिली. भाई मरदाना हे गुरु नानक यांचे परमसेवक होते आणि आयुष्यभर त्यांनी नानक देव यांची सेवा करत जगभ्रमण केले. आजही त्यांचे वंशज पाकिस्तानात वास्तव्यास आहेत.

अयोध्येत श्रीराम मंदिराचे निर्माण व्हावे, अशी इच्छा असणार्‍या हनुमानभक्त नाजनीन !

देशात नाजनीन यांच्याप्रमाणे किती धर्मनिरपेक्ष मुसलमान आहेत ?
     वाराणसी - येथील हनुमानभक्त नाजनीन अंसारी या मुस्लिम महिला फाउंडेशनच्या राष्ट्र्रीय अध्यक्ष आहेत. त्यांची इच्छा आहे की, अयोध्येत श्रीराम मंदिराचे निर्माण व्हावे. यासाठी त्या अयोध्येला जाणार असून न्यायालयात या प्रकरणात चालू असल्याच्या खटल्यातील एक पक्षकार हाशिम अन्सारी यांची भेट घेणार आहेत. त्यांना येथे राममंदिर निर्माण करण्यासाठी अनुमती देण्याची मागणी करणार आहेत. तसेच त्या देशातील मुसलमानांनाही आवाहन करणार आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Americaki samasyonka mul karan musalman hai, aisa kehkar NewYorkme 2 musalmanopar akraman. - Sahishnu Bharatki ninda karnewale Americaki Asahishnuta !

जागो ! : अमरीका की समस्याआें का मूल कारण मुसलमान हैं, ऐसा कहकर न्यूयॉर्क में २ मुसलमानों पर आक्रमण. - सहिष्णु भारत की निंदा करनेवाले अमरीका की असहिष्णुता !

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या प्रसारकार्याचा एप्रिल २०१६ मधील आढावा

१. संकेतस्थळाच्या संदर्भातील संख्यात्मक आढावा 
१ अ. एप्रिल २०१६ मध्ये विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या 

वाड्रा यांच्यावर आरोप होत असतांना काँग्रेसचा कांगावा का ?

श्री. भाऊ तोरसेकर
      २०१३ या वर्षी नव्याने आम आदमी पक्ष स्थापन करतांना केजरीवाल आणि त्यांचे सहकारी यांनी सुरूवात आरोपबाजीने केलेली होती. त्यातील पहिला आरोप त्यांनी सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्यावर केलेला होता. वाड्रा यांच्या आस्थापनाच्या खात्यात लाखभर रुपये नसतांना त्यांनी एका मोठ्या बांधकाम आस्थापनाची साडेतीन एकर भूमी विकत घेतली होती. मजेची गोष्ट म्हणजे वाड्रा यांच्या आस्थापनाला किरकोळ किंमतीत विकलेली तीच भूमी काही काळानंतर त्याच बांधकाम आस्थापनाने अनेकपटीने अधिक किंमत मोजून परत विकत घेतली होती. त्यामागे एक रहस्य दडलेले होते. ती भूमी वाड्रा यांनी खरेदी करण्यापूर्वी साधी शेतभूमी होती आणि विकतांना ती व्यावसायिक भूमी झालेली होती. हा चमत्कार राज्याचे महसूल खाते करू शकते आणि तो घडवण्याची जादूची कांडी वाड्रा यांच्यापाशी होती; कारण महसूल खाते राज्य सरकारच्या अखत्यारित होते आणि तिथे काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपींदरसिंग हुडा आरूढ झालेले होते. त्यासाठी आवश्यक असलेले प्रशासनिक सहकार्य त्यांना मिळू शकले नाही.

गुर्वाज्ञापालनाने गुरुकृपा संपादन करणारे ब्रह्मचैतन्य प.पू. गोंदवलेकर महाराज !

बोधकथा
बालकांसाठी परिपाठ !
     तुकारामचैतन्य (तुकामाई) महाराजांनी आपल्या शिष्याला एक खड्डा काढून तेथे खेळत असलेल्या तीन मुलांना त्या खड्ड्यात पुरण्यास सांगणे, मुलांच्या पालकांनी येऊन शिष्याला मारूनही तो एक शब्द न बोलणे, नंतर महाराजांनी मुलांना सुखरूप बाहेर काढणे आणि शिष्याला आशीर्वाद देणे : एके दिवशी तुकारामचैतन्य हे आपला शिष्य गणूबुवा याच्यासह सकाळच्या वेळी नदीवर गेले. तेथे काही मुले खेळत होती. गुरूंनी गणुबुवांना एक खड्डा काढण्यास सांगितले. तेथे खेळत असलेल्या मुलांपैकी तीन मुलांना घेऊन ते खड्ड्याजवळ गेले आणि म्हणाले, गणू, या मुलांना खड्ड्यात बसवून तो वाळूने भरून टाक अन् त्यावर तू सिद्धासन घालून बसून रहा. माझ्या आज्ञेविना येथून उठशील किंवा एक शब्द बोलशील तर खबरदार ! असे सांगून आपण जाऊन एका झाडाच्या आड बसले.

कुठे वृद्ध झाल्यावर साधना करण्यासाठी वनात निघून जाणारे पूर्वीचे हिंदू, तर कुठे उतारवयात वेगळी चूल मांडून मायेत गुरफटलेले आजचे वयोवृद्ध !

       बांधकाम व्यावसायिक वयोवृद्धांवर खूश आहेत. त्यांच्या खास वयोवृद्धांसाठी निरनिराळी घरे बांधण्याच्या (हाऊसिंग) योजना चालू असतात. पूर्वी वयोवृद्धांना बळजोरीने मुलांसमवेत रहाण्याची शिक्षा असे. मुलांच्या आणि जुन्या पिढीच्या आवडी-निवडी एकदम भिन्न. एकाला शास्त्रीय संगीताची, तर दुसर्‍याला रॉक अ‍ॅण्ड रोलची आवड असते. एकाला सारंगी प्रिय, तर दुसर्‍याला गिटार. पूर्वी दूरदर्शन संच घ्यायला अधिक पैसे मोजावे लागत असत. दूरचित्रवाणी पहाण्यावरून घरात मारामार्‍या ठरलेल्या असत. आता घरात २-३ दूरदर्शन संच घेणे परवडते. त्यामुळे ती युद्धे टळली आहेत. बरेच समंजस आई-वडील वेगळे रहातात. पूर्वी मुले आई-वडिलांपासून वेगळी रहात असत. आता गंगा उलटी वाहू लागली आहे. बांधकाम व्यावसायिक वयोवृद्धांची निकड लक्षात घेऊन घरे बांधू लागले आहेत. बांधकाम व्यावसायिक त्याप्रमाणे सवलती देऊ लागले आहेत. वयोवृद्धांना जिने चढल्यामुळे धाप लागते. त्यांना जिने चढता-उतरतांना पडण्याचा आणि इजा होण्याचा संभव अधिक असतो.

आशीष खेतानजी, आप महान हैं ।

श्री. मानव बुद्धदेव
आशीष खेतानजी, आप महान हैं, आपका अभिनंदन करता हूं ।
सनातन संस्था को कलंक बताया, दुःसाहस को वंदन करता हूं ॥ १ ॥

पू. डॉ. आठवलेजी के लिए जेल ? आपकी अकल को मानना पडेगा ।
और क्या-क्या भरा है आपकी खोपडी में हमको अब जानना 
पडेगा ॥ २ ॥

महापुरुष पर कीचड उछालना, आम आदमी का नहीं है काम ।
इसीलिए कवि मानव बुद्धदेव करता है आशीषजी,
आपको प्रणाम ॥ ३ ॥

प्रतिसादापेक्षाही प्रतिकारक्षमता आवश्यक !

     महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाच्या वतीने प्रतिसाद अ‍ॅप कार्यान्वित करण्यात आले आहे. संकटकाळी या प्रणालीतील इमरजन्सी ही कळ दाबल्यानंतर नियंत्रण कक्षातील संगणकावर तसा संदेश येऊन संकटात असणार्‍या व्यक्तीपासून ३ किलोमीटरच्या आत कामावर असणार्‍या पोलिसांच्या भ्रमणभाषमध्ये तसा अ‍ॅलर्ट दिला जातो. या माध्यमातून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना साहाय्य मागणार्‍या व्यक्तीची पूर्ण माहिती आणि ठिकाण माहीत होते, तसेच संकटग्रस्त व्यक्तीलाही मदत कुठपर्यंत आली आहे, याची माहिती सतत पुरवली जाते. याशिवाय रेल्वेच्या प्रवासादरम्यान पिशव्या चोरी होणे, साखळी चोरी होणे, दरोडा पडणे यांसारख्या प्रकरणांत तातडीने साहाय्य मिळण्याच्या उद्देशानेही हे अ‍ॅप कार्यान्वित करण्यात आले आहे.

हिंदूंनो, मुसलमानांकडून शिका !

       ऑल इंडिया मुस्लीम बोर्डाचे अध्यक्ष कल्प सादिक यांनी स्पष्टपणे मुसलमान त्यांच्या शरीयत कायद्यात कोणतीही लुडबुड सहन करणार नाहीत, असे ठणकावून सांगितले आहे. समान नागरी कायद्याला मुसलमानांनी विरोध करणे राष्ट्रहिताच्या दृष्टीने अत्यंत चुकीचे असले, तरी मुसलमानांची त्यांच्या धर्माप्रती असलेली निष्ठा हिंदूंनी शिकण्यासारखी आहे. हिंदूंच्या धार्मिक कार्यात राजकीय ढवळाढवळ होत असतांना आपण किती सजगतेने त्याचा निषेध नोंदवतो, याचा विचार केल्यास उत्तर शून्याच्या जवळ जाणारे असेल. मध्यंतरी धर्मद्रोही तृप्ती देसाई आणि त्यांच्या कंपूने मंदिरातील गाभार्‍यात प्रवेश मिळवण्यासाठी सर्व यंत्रणांना धारेवर धरले. पुनःपुन्हा आंदोलने करून हिंदु धर्म स्त्रीविरोधी आहे, असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि ठराविक हिंदुत्वनिष्ठ संघटना वगळता आमच्या धर्मात ढवळाढवळ करू देणार नाही, असे सांगायला कोण पुढे आले ? विविध वाहिन्यांवर पुरोगाम्यांकडून हिंदु धर्मावर यथेच्छ गरळओक चालू असतांना कुणालाच ती थांबवावी वाटले नाही, हे हिंदु धर्मियांमध्ये असलेल्या धार्मिक अनास्थेचे लक्षण आहे. त्यामुळेच आताच्या प्रसंगात हिंदूंनी मुसलमानांकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. अर्थात समान नागरी कायद्याला विरोध होणे योग्य नाही. मुसलमानांनी मोठ्या मनाने तो स्वीकारून ते भारतमातेशी किती एकरूप झाले आहेत, हे दाखवण्याची ही संधी आहे, हेही खरेच !
- एक हिंदू

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) धर्माभिमानी हिंदूला साहाय्य न करणार्‍या जन्महिंदूंना ईश्‍वराने संकटकाळात सहाय्य का करावे ?

     २०१४ च्या मार्च मासात न्यायालयाचे कार्य चालू असतांना न्यायालयासमोरून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने अतिशय बेशिस्त रितीने, हिंदूंच्या विरुद्ध तोंडाला येईल ते अश्‍लाघ्य बरळत मिरवणूक निघाली होती. न्यायालय चालू असतांना मिरवणूक काढणे, घोषणा देणे हा अपराध आहे; म्हणून त्यांच्या विरुद्ध एफ्.आय.आर्. दाखल केला. त्यामुळे मला धमकी देण्यात आली. माझ्यासह इतर कोणीच न आल्याने वाईट वाटले. सध्या हिंदुत्वाचे कार्य करणारे अनेक आहेत, हे पाहून आनंद होतो. स्थानिक हिंदूंना येणार्‍या कोणत्याही समस्यांसाठी केव्हाही निःशुल्क सेवा करण्यास मी सिद्ध आहे. 
- अधिवक्ता श्री. प्रभाकर नायक, उडुपी, कर्नाटक.

साधकांनो, मनोनिग्रह करून साधनेत अडथळा ठरणार्‍या आवडी-नावडी न्यून करण्याचा प्रयत्न करा !

गुरुपौर्णिमा मास २०१६ 
        १९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व १ सहस्रपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.

श्री. व्यंकटेश अय्यंगार यांना देवाने दिलेल्या अनुभूतीतून शिकायला मिळालेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
१. भाववृद्धी होण्यासाठी प.पू. डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर संगणकाचा तळभाग प.पू. गुरुदेवांचे चरण आहेत, असे जाणवून भावपूर्ण सेवा होणे : व्यष्टी साधनेच्या आढाव्यात भावजागृती होण्यासाठी प्रयत्न वाढवायला सांगितले होते. एके दिवशी मी प.पू. गुरुदेवांना मला काहीच सुचत नाही. तुम्हीच माझ्यात भाववृद्धी होण्यासाठी मला मार्ग दाखवा, अशी प्रार्थना केली. मी संगणकाचा तळ, म्हणजे प.पू. डॉक्टरांचे चरण आहेत, असा भाव ठेवून संगणकाला घट्ट पकडले. प.पू. गुरुदेवांप्रती जागृत झालेला भाव दिवसभर टिकून राहिल्यामुळे दिवसभरात माझ्याकडून भावपूर्ण सेवा झाली. त्यानंतर ३ - ४ दिवसांनी मी संगणकाचा तळ धरून प.पू. डॉक्टरांना हे तुमचेच चरण आहेत, अशी मला अनुभूती द्या, अशी प्रार्थना केली. त्यानंतर प.पू. गुरुदेव माझ्या अंतर्मनातून हो. हे माझेच चरण आहेत, असे म्हणाल्याचे जाणवले. वैयक्तिक संगणकाला इंग्रजीत पी.सी., म्हणजेच पर्सनल कॉम्प्यूटर म्हणतात. मला त्याचा P म्हणजे प.पू. डॉक्टर आणि सी म्हणजे त्यांचे चरण असा अर्थ जाणवला.

कतरास (झारखंड) येथील श्री. प्रियेशरंजन वर्मा यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

श्री. प्रियेशरंजन वर्मा
     कतरास - येथील सनातनचे साधक श्री. प्रियेशरंजन वर्मा (वय ७० वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यामुळे त्यांचा ३ जुलै २०१६ या दिवशी येथे झालेल्या सत्संगात ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. प्रदीप खेमका यांच्या हस्ते श्रीकृष्णाची प्रतिमा आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांच्या पत्नी सौ. रागिनी वर्मा, तसेच सनातनचे साधक उपस्थित होते. सौ. वर्मा आणि अन्य काही साधकांनी या वेळी श्री. वर्मा यांची गुणवैशिष्ट्ये सांगितली.

६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. स्वाती गायकवाड यांनी केलेले भावजागृतीसाठीचे प्रयत्न

कु. स्वाती गायकवाड
      स्वत:मध्ये भाव निर्माण होणे हे ईश्‍वरप्राप्तीची तळमळ, अंतःकरणात ईश्‍वराबद्दल निर्माण झालेले केंद्र, प्रत्यक्ष साधना या घटकावर अवलंबून असते. कृती बदलली की, विचार बदलतात आणि विचार बदलले की, कृती बदलते. या तत्त्वानुसार मन अन् बुद्धी या स्तरावर सतत कृती करत राहिल्यास भाव लवकर निमार्र्ण होण्यास साहाय्य होते. भाव निर्माण होण्यासाठी करावयाच्या कृती येथे देत आहोत.
१. निराशा येत असल्यास 
आपल्या ध्येयाची आठवण करणे
      आपल्याला माझी साधना नीट होत नाही, या विचाराने निराशा येत असेल, त्या वेळी मी साधनेत आले, तेव्हा माझे ध्येय काय होते ?, हे आठवल्यास उत्साह वाढून मनाची मरगळ निघून जाते. अशा वेळी मनाला भावाच्या स्तरावर काही प्रश्‍नही विचारू शकतो. याचे एक उदाहरण येथे देत आहे.
प्रश्‍न : प.पू. डॉक्टरांनी मला रामनाथी आश्रमात कशासाठी आणले आहे ?
उत्तर
अ. अखंड गुरुसेवा होण्यासाठी
आ. गोप-गोपींसह साधकांच्या सहवासात राहून शिकण्यातला आनंद घेण्यासाठी

अखिल भारतीय साधनावृद्धी आणि धर्मप्रसार नियोजन शिबिराचा चैतन्यमय वातावरणात समारोप

     सनातन आश्रम, रामनाथी, ५ जुलै (वार्ता.) - सनातनच्या साधकांसाठी येथे १ जुलैपासून आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय साधनावृद्धी आणि धर्मप्रसार नियोजन शिबिराची ४ जुलैला सांगता झाली. या वेळी साधकांमध्ये असलेल्या गुरूंप्रतीच्या कृतज्ञताभावामुळे वातावरण चैतन्यमय झाले होते.
     जयपूर (राजस्थान) येथे तळमळीने प्रसाराची सेवा करणार्‍या साधिका सौ. सुशिला मोदी यांची गुणवैशिष्ट्येही सांगण्यात आली. साधकांनी पुढे येणार्‍या नैसर्गिक आपत्तीविषयी त्यांची विचारप्रक्रियाही सांगितली आणि या आपत्तीपासून रक्षण होण्यासाठी झोकून देऊन साधना करण्याचा निर्धार केला. 
क्षणचित्र : या वेळी पू. नंदकुमार जाधव यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी स्वतः रचलेले तुम ही राम हो, तुम ही कृष्ण हो, श्रीजयंत मे तुम समाए हो । हे गीत गायले. या भावपूर्ण गायलेल्या गीताच्या श्रवणाने संपूर्ण वातावरण परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयीच्या कृतज्ञता भावाने भारून गेले आणि साधकांची स्थितीही अत्यंत भावविभोर झाली होती.
साधक आणि धर्माभिमानी यांनी राष्ट्र अन् धर्मासाठी संघटित होणे, म्हणजे क्षात्रतेज 
आणि ब्राह्मतेज यांचा एकत्रित आविष्कारच होय !

चि. नंदन कुदरवळ्ळी या ३ वर्षांच्या बालसाधकाने आपण चांगली कृती केली, तर देवाच्या दिशेने आपले एक पाऊल पुढे जाऊन भगवंताच्या चरणांवर फूल अर्पण होते आणि चुकीची कृती केली, तर देवापासून दोन पावले मागे येऊन देवाच्या चरणी दगड अर्पण होतो, असे सांगणे

चि. नंदन कुदरवळ्ळी
        बहुतेक दैवी बालके भक्तीमार्गाने साधना करणारी आहेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
        १७.१२.२०१५ या दिवशी सौ. सौम्या कुदरवळ्ळीताई काही साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेत होत्या. त्या वेळी सौम्याताईंचा ३ वर्षांचा मुलगा चि. नंदन मलाही काहीतरी सांगायचे आहे, असे म्हणून आमच्याजवळ येऊन बसला. त्यानंतर तो म्हणाला, आपण चांगली कृती केली, तर देवाच्या दिशेने आपले एक पाऊल पुढे जातो आणि जर चुकीची कृती केली, तर आपण देवापासून दोन पावले मागे येतो. एक चांगली कृती केल्याने भगवंताच्या चरणांवर फूल अर्पण होते आणि चुकीची कृती केली, तर देवाच्या चरणी दगड अर्पण होतो. चिमुकल्या नंदनचे हे उद्गार ऐकून आम्ही सर्वजण आश्‍चर्यचकित झालो. चि. नंदनच्या माध्यमातून आम्हाला दृष्टीकोन दिले, यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे.
- श्री. व्यंकटेश अय्यंगार

चुकांची खंत वाटणारी, सात्त्विक जिवांकडे आकृष्ट होणारी आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली नाशिक येथील कु. राधा सुधीर शिंदे (वय ३ वर्षे) !

१. प्रेमभाव 
चि. राधा शिंदे
अ. एकदा मी घरी असतांना स्वयंपाक घरातील लादी धुण्याची सेवा करत होते. मी ओट्यावर चढलेली पाहून राधा (माझी भाची) मला म्हणाली, मनीषाआत्या, हळू ! नाहीतर पडशील. तिचे हे शब्द ऐकून माझी मोठी बहीण म्हणाली, आपल्यालाही कळले नसते, कसे बोलायला पाहिजे !
आ. एकदा माझे पोट दुखत होते; म्हणून मी झोपले होते. तेव्हा तिने माझी काळजी घेतली. ती मला म्हणाली, आत्या, तू झोप. बोलू नको.
२. चुकीची खंत वाटणे
         तिला खेळणी ठेवण्यासाठी एक खोका हवा होता. तिच्या आजीने आपल्याला सामान भरण्यासाठी तो खोका लागणार आहे, असे सांगूनही ती ऐकत नव्हती. तेव्हा आजीने तिच्या बाबांना सांगितलेे. आजीचे ऐकत नसल्याची चूक भावाने राधाच्या लक्षात आणून दिली. त्या वेळी क्षमा कर, आजी, असे पुष्कळ रडून ती आजीला सांगत होती. तिच्या मनातून ते जाईपर्यंत ती रडत होती आणि आजीची क्षमा मागत होती. यातून तिला चुकीची खंत किती वाटते, ते शिकायला मिळाले.

दायित्व घेऊन सेवा करणारे आणि कोणतीही परिस्थिती आनंदाने स्वीकारणारे देवद आश्रमातील श्री. रामचंद्र पांगुळ !

श्री. राम पांगुळ
सौ. आनंदी पांगुळ
श्री. राम यांच्याशी माझा विवाह होऊन ७ वर्षे होतील. ज्येष्ठ कृष्ण पक्ष चतुर्दशी (३.७.२०१६) या दिवशी श्री. रामचंद्र पांगुळ यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांची गुणवैशिष्ट्ये सांगतांना पत्नी या नात्याने कसे लिहावे ?, असा विचार माझ्या मनात आला आणि प.पू. डॉक्टरांना प्रार्थना झाली, प.पू. डॉक्टर, श्री. राम यांना साधनेत पुढे जाण्यासाठी त्यांना त्यांच्या दोषांवर मात करण्यासाठी त्यांच्यातील गुणांचे साहाय्य मिळावे, यासाठी आपणच त्यांना सतत अंतर्मुख राहून शिकण्याच्या स्थितीत ठेवा, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.
१. श्री. रामचंद्र यांची गुणवैशिष्ट्ये
१ अ. वेळेचे पालन करणे : श्री. राम सकाळी नियमित वेळी उठतात. विभागात जाण्याच्या वेळांचे काटेकोरपणे पालन करतात. हा गुण त्याच्या व्यष्टी लिखाणासाठीसुद्धा दिसून येतो. अलीकडे ते नियमितपणे व्यष्टी लिखाण करतात.
१ आ. दायित्व घेऊन आणि नियोजनबद्ध सेवा करणे : मागणी-पुरवठा विभागातील बांधणी विभागातील अनेक सेवा ते दायित्व घेऊन करतात. शक्तीरथाचे नियोजन असो किंवा एखाद्या मार्गावरील साहित्याचे वितरण असो, ते बारकाव्यांसह नियोजन करतात आणि त्याप्रमाणे काटेकोरपणे कृती करतात. त्यांच्या या गुणाचा त्यांच्या व्यष्टीसाठी उपयोग कसा करायचा ? स्वतःच्या दोषांना काटेकोरपणे सूचना घेऊन कसे घालवायचे ?, हे भगवंता, तूच त्यांना शिकव.

प.पू. गुरुदेवांची भेट झाल्यावर त्यांना काही विचारण्यापेक्षा त्यांच्या सत्संगामध्ये काहीतरी सूक्ष्मातले अनुभवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक

श्री. कृष्णा आय्या
       हे गुरुदेवा, सर्वप्रथम क्षमायाचना करतो. परत परत मी आपणास त्रास देत असतो. आतातर स्थुलातून आपला वेळ घेऊन त्रास देत आहे. हे भगवंता, महत्भाग्याने मला आपले प्रत्यक्ष दर्शन झाले होते. साधारण ६ मास (महिने) झाले असतील. मी आपणास काय विचारावे ? असा विचार करत होतो. त्या वेळी इतरांनी विचारलेल्या प्रश्‍नांना तुम्ही दिलेल्या उत्तरांतूनच मला माझ्या प्रश्‍नांची उत्तरे लगेच मिळत होती. तेव्हा मला सांगितलेली महावाक्ये आठवली. त्यात तुम्ही म्हटले आहे, मनातील प्रश्‍नांची उत्तरे तर मी ग्रंथातपण लिहून ठेवली आहेत. तुमच्या प्रश्‍नांची सर्व उत्तरे सत्संग घेणारेपण देतील. येथे आल्यावर नामजप कसा होत आहे, आल्यापासून काहीतरी वेगळाच आनंद मिळतो का ? , अशा प्रकारे काहीतरी सूक्ष्मातले अनुभवण्याचा प्रयत्न करा. त्यातूनच अध्यात्म जगता येईल.
- श्री. कृष्णा दत्तात्रेय आय्या (गंगाखेडकर), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.२.२०१६)

आपण चूक झाल्यावर प्रायश्‍चित्त घ्यायला जितका विलंब करतो, तितका आपल्यावर श्रीगुरूंची कृपा व्हायला विलंब होत असणे

कु. युवराज्ञी शिंदे
        एके दिवशी मी अल्पाहार करत असतांना त्याच पटलावर बसलेला बालसाधक कु. आदित्य वाघमारे आणि त्याची आई यांच्यातील संभाषण ऐकत होते. आदित्यकडून काहीतरी चूक झाल्याने त्याची आई त्याला उठाबश्या काढायला सांगत होती. तेव्हा तो ऐकत नव्हता; म्हणून त्याच्या आईने सांगितले, तू प्रायश्‍चित्त घेतले नाहीस, तर मी तुला चहा देणार नाही. तेव्हा इतर साधक म्हणाले, असू दे, तो लहान आहे. त्यावर त्याची आई म्हणाली, मी तुला चहा देते; पण अशाने तुझ्या पापाचे क्षालन होणार का ?, याचा तूच विचार कर. हे ऐकल्यावर त्याने लगेच उठाबश्या काढल्या.
        आदित्य पटलावर येऊन बसल्यावर एक साधिका म्हणाली, अरे, आदित्य, लगेच प्रायश्‍चित्त घेतले असतेस, तर तुला गरम चहा मिळाला असता.
        हे ऐकल्यावर देवानेच माझ्यासाठी हा प्रसंग घडवला आहे, असे जाणवले; कारण आपल्या बाबतीतही असेच घडत असते. आपण चूक झाल्यावर प्रायश्‍चित्त घ्यायला जितका विलंब करतो, तितका आपल्यावर श्रीगुरूंची कृपा व्हायला विलंब होतो.
        गुरुराया, आपण हे सूत्र शिकवलेत, यासाठी मी कृतज्ञ आहे. आपणच अहंने बरबटलेल्या आपल्या या मूढ बाळाकडून प्रयत्न करवून घ्या !, अशी आपल्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.
- कु. युवराज्ञी शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.५.२०१६)

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

प.पू. परशराम पांडे
साधकांनो, तुम्हाला 
चुका सांगणार्‍याचे आभार माना !
       एखाद्या व्यक्तीने चुका दाखवल्यावर आपल्याला वाईट वाटते; परंतु त्यामुळे आपल्याला आपल्यातील दोषांची जाणीव होते आणि तशी चूक पुन्हा होऊ नये; म्हणून स्वतःला सुधारण्यासाठी मिळालेली ती एक संधी असते. त्यासाठी त्याचे आभार मानायला पाहिजेत आणि सूक्ष्मातून त्याला नमस्कार केला पाहिजे.
       जो आपल्याला चुका सांगतो, तो आपला खरा मित्र असतो आणि त्याचे आपल्यावर खरे प्रेम असते, असे समजावे. भगवंतच त्याच्या माध्यमातून प्रकट होऊन आपली आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी प्रबोधन करतो, हे जेव्हा आपल्याला उमजते, तेव्हा आपली खर्‍या अर्थाने प्रगती व्हायला लागते. 
- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.५.२०१५)

प्रक्रिया म्हणजे काय ?

कु. प्रणिता सुखटणकर
प्रक्रिया म्हणजे ऐकणे,
प्रक्रिया म्हणजे प्रतिदिन साधना करणे,
प्रक्रिया म्हणजे मन अर्पण करणे,
प्रक्रिया म्हणजे आनंदाची देवाण-घेवाण करणे,
प्रक्रिया म्हणजे स्वतःला ओळखणे,
प्रक्रिया म्हणजे स्वतःला पहाणे,
प्रक्रिया म्हणजे स्वतःला सुधारणे,
प्रक्रिया म्हणजे कर्तेपणा देवाला देणे,
प्रक्रिया म्हणजे प्रगतीची किल्ली,
प्रक्रिया म्हणजे सोपी शिडी,
प्रक्रिया म्हणजे साधनेचे मूळ, प्रक्रिया म्हणजे भक्तीचे शिखर !
साधकांनो, आता ही प्रक्रिया मनापासून राबवूया आणि स्वतः गुरुकृपेसाठी पात्र होऊया !
- कु. प्रणिता सुखटणकर, केरळ (२०.४.२०१६)

बोलण्यातील आणि ऐकण्यातील दोषामुळे झालेली गंमत !

        ९.३.२०१६ या दिवशी कु. स्वाती गायकवाड आणि मी सकाळच्या न्याहरीला एकाच पटलावर बसलो होतो. तेव्हा माझे भोजनकक्षातील घड्याळ्याकडे लक्ष गेले. मी तिला म्हणाले, पावणे दहा वाजले, उशीर झाला. ती म्हणाली, मिरजेहून आले. त्या वेळी मी तिला सांगितले, न्याहरी करायला ९.४५ वाजले, म्हणजे उशीर झाला. तेव्हा मी घडाळ्यात सकाळचे ९.४५ वाजले, त्याविषयी बोलत आहे आणि स्वाती आश्रमात आलेल्या पाहुण्यांविषयी बोलत आहे, हे लक्षात आले.
        २०.३.२०१६ या दिवशी जेवत असतांना एक साधिका म्हणाली, माझे विश्‍व कुठे आहे ? तिने पुन्हा एकदा त्या वाक्याचा पुनरूच्चार केल्यावर तिला माझी पिशवी कुठे आहे ?, असे म्हणायचे आहे, हे लक्षात आले.
- सौ. रंजना गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.३.२०१६)

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

सनातनच्या विविध आश्रमांमध्ये खालील उपकरणांची आवश्यकता !
    सनातनच्या विविध आश्रमांमध्ये शेकडो साधक पूर्णवेळ साधना करत आहेत. राष्ट्र-धर्म यांच्या कार्यासाठी अधिकाधिक वेळ देता यावा, यासाठी पूर्णवेळ साधनेस आरंभ करणारे साधक, तसेच राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सध्या आश्रमांमध्ये खालील उपकरणांची तातडीने आवश्यकता आहे.
  

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
दोन दिवसांपूर्वी अमावास्या झाली.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
    शालेय शिक्षणात जीवनात सर्वात उपयुक्त असा विषय, म्हणजे साधना शिकवत नाहीत, तर इतर सर्व विषय शिकवतात. त्यामुळे समाजात सर्वत्र दुराचार पसरला आहे. याउलट हिंदु राष्ट्रात धर्मशिक्षण असल्यामुळे एकही गुन्हेगार नसेल ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुरुपौर्णिमेला १३ दिवस शिल्लक

    ज्याप्रमाणे मुलाला बोलायला शिकवतांना प्रारंभाला लहान शब्द शिकवतात, चालायला शिकवतांना हळूहळू चालवतात, तसेच गुरुही शिष्याला टप्प्याटप्प्याने हळूहळू शिकवतात.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
अमृत आणि विष अमृतको जहरका डर होता है ।
   भावार्थ : अमृत प्यायलेल्यालासुद्धा जहर म्हणजे विष घेतले, तर आपण मरू कि काय, अशी भीती वाटू शकते; मात्र ज्याने विषच पचविलेले आहे, त्याला कशाचीच भीती नसते. सुखात राहिलेल्या साधकाला दुःखाची भीती वाटू शकते; मात्र सर्व संकटांतून गेलेल्याला कशाचीच भीती वाटत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमेश्‍वरावर श्रद्धा ठेवा !
एखादी सुसंधी हातातून निसटली, तर परमेश्‍वरावर श्रद्धा ठेवून याची निश्‍चिती 
बाळगा की, याहीपेक्षा चांगली संधी मला मिळणार आहे. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

धर्मांधांच्या धमक्यांच्या मर्यादा !

संपादकीय
     बांगलादेशातील एका रेस्टॉरन्टमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी मुसलमानेतर २० पर्यटकांची नुकतीच हत्या केली. आयता ज्यांना म्हणता आली नाही, अशांचीच हत्या झाल्याचे या आक्रमणातून निदर्शनास आले. सहा आक्रमणकर्ते (आतंकवादी) मारले गेले. इसिस या आंतरराष्ट्रीय आतंकवादी संघटनेने या आक्रमणाचे दायित्व लगेचच स्वीकारले; पण नंतर हे आक्रमण पाकच्या आय.एस्.आय. या गुप्तचर संघटनेने घडवून आणल्याच्या सूत्रावर बांगलादेशच्या शासनासह सर्वांचेच एकमत झाले.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn