Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

होय होय वारकरी ।
पाहें पाहें रे पंढरी ॥

बांगलादेशातील इसिसच्या आक्रमणात २० विदेशी नागरिक ठार !

 • बांगलादेशात इसिस पोचली असून ती तेथील हिंदूंचे शिरकाण करत आहे, जिहाद्यांचा इतिहास पहाता उद्या भारतातही अशी स्थिती येईल, यात शंका नाही !
 • भारतीय नागरिक आणि शासनकर्ते अशा आक्रमणांना सरावले असल्याने त्यांना अशा आक्रमणांचे काहीच वाटणार नसल्याने ते नेहमीप्रमाणे निष्क्रियच रहाणार !
मृतांमध्ये एका भारतीय तरुणीचा समावेश
      ढाका - बांगलादेशची राजधानी ढाका शहरातील गुलशन परिसरातील होली आर्टिसन बेकरी या रेस्टॉरंटमध्ये १ जुलैच्या रात्री साडेनऊ वाजता इसिसच्या आतंकवाद्यांनी अल्लाहू अकबरच्या घोषणा देत आक्रमण केले. (आतंकवाद्यांना धर्म असतो आणि ते नेहमी अशाच घोषणा देतात ! - संपादक) त्यांनी बॉम्बस्फोट आणि गोळीबार करत हे आक्रमण केले. त्यांच्याशी १३ घंटे चाललेल्या चकमकीनंतर ६ आतंकवाद्यांना ठार करण्यात बांगलादेशच्या कमांडोंना यश आले.

  बांगलादेशमध्ये आणखी एका पुजार्‍यावर प्राणघातक आक्रमण !

   भाजप सरकारकडून हिंदूंच्या रक्षणाची अपेक्षा नाही. मोठ्या हिंदुत्ववादी संघटनांकडूनही अपेक्षा नाही; कारण त्या भारतातच हत्या होणार्‍या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात त्या काही करत नाहीत !
   अफगाणिस्तान आणि पाकिस्तान नंतर आता बांगलादेशात हिंदूंचा वंशविच्छेद !
   • गेल्या २४ घंट्यांमधील दुसरी घटना
   • एका मासातील ६ वी घटना
         ढाका - बांगलादेशामध्ये हिंदु पुजार्‍यांची हत्या करण्याचे सत्र चालूच असून ४८ वर्षीय बाबासिंधू रॉय या आणखी एका पुजार्‍यावर चाकूने आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात ते गंभीर घायाळ झाले असूत त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. बांगलादेशच्या सतखिरा जिल्ह्यात असलेल्या श्री श्री राधागोविंद मंदिरात ते पुजारी होते. गेल्या २४ घंट्यांमध्ये हिंदु पुजार्‍यावरील आक्रमणाची ही दुसरी घटना असून गेल्या मासाभरातील हिंदु नागरिकाच्या हत्येची ही ६ वी घटना आहे. या सततच्या आक्रमणामुळे तेथील हिंदू भयभीत झाले आहेत.

    यवतमाळमध्ये दर्डा यांच्याविरुद्ध जनक्षोभ; संतप्त नागरिकांकडून घोषणाबाजी आणि तोडफोड !

     पोलीस ठाण्यात साधी तक्रारही नोंद करण्यास टाळाटाळ करणारे पोलीस
     या प्रकरणी काही ठोस कारवाई करतील, यावर विश्‍वास नसल्यानेच जनतेने हे पाऊल
     उचलले का, असा प्रश्‍न कुणी उपस्थित केल्यास पोलीस काय उत्तर देणार आहेत ?
     जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेच्या पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकांनी
     विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण
             यवतमाळ - जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेच्या पब्लिक स्कूलमध्ये २ शिक्षकांनी शाळकरी मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या निषेधार्थ यवतमाळमधील पालक आणि नागरिक यांनी एकत्र येऊन दर्डा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पालक आणि नागरिकांनी कै. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रेरणास्थळाची तोडफोड केली. दुसरीकडे संतप्त महिला पालकांनी पब्लिक स्कूलचे सचिव किशोर दर्डा यांच्या घराबाहेर बांगड्या फोडून निषेध नोंदवला.

      चिंचली (जिल्हा बेळगाव) येथील मद्याची दुकाने बंद करा, अन्यथा मायाक्का देवीचे मंदिर उडवून देऊ ! - निनावी पत्राद्वारे देवस्थानला धमकी

      हिंदूंची असुरक्षित मंदिरे !
      मायाक्का देवीचे मंदिर
             रायबाग (जिल्हा बेळगाव), २ जुलै (वार्ता.) - चिंचली गावातील मद्याची दुकाने बंद न केल्यास मायाक्का देवस्थान उडवून देण्याच्या धमकीचे पत्र चिंचली येथील सुक्षेत्र मायाक्का देवीच्या देवस्थानातील दानपेटीत मिळाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

      तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीतील ६४ सहस्र रुपयांच्या नोटा उंदरांनी कुरतडल्या

            धाराशिव - येथील तुळजाभवानी मंदिरात दानपेटीत अर्पण केलेल्या ६४ सहस्र रुपयांच्या नोटा उंदरांनी कुरतडल्या आहेत. दानपेटीत ५७ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम आहे. याविषयी अधिकृत माहिती देण्यास मंदिर प्रशासनाने नकार दिला आहे. (भाविकांनी अर्पण केलेले धन देव किंवा धर्म कार्याकरिता वापरले जाणे अपेक्षित असते. सरकारीकरण झालेल्या या मंदिराचे व्यवस्थापन या अपप्रकाराला उत्तरदायी असणार्‍यांना आता काय शासन करणार आहे ? - संपादक)

      मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची पोलिसांची डिचोली येथील देवस्थान समितींना सूचना

      पोलिसांतील भ्रष्टाचार, लाचखोरी दूर करण्यासाठी पोलीस ठाण्यांतही सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजेत !
           गोवा राज्यातील वाढत्या चोर्‍यांच्या पार्श्‍वभूमीवर डिचोली तालुक्यातील मंदिर समिती सदस्यांबरोबर डिचोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण चिमूलकर यांनी बैठक घेतली. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सूचना निरीक्षकांनी या वेळी डिचोली भागातील देवस्थान समिती यांना केली. हे सीसीटीव्ही गाभारा, सभागृह, प्रवेशद्वार आदी महत्त्वाच्या भागांत लावावेत. मंदिरांमध्ये संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्याविषयी पोलिसांना त्वरित कळवायला हवे. मंदिरांमध्ये सुरक्षारक्षकांची नेमणूकही मंदिर समितींनी केली पाहिजे, असे पोलीस निरीक्षक चिमूलकर म्हणाले.

      केरळ येथे व्हॉट्स अ‍ॅपद्वारे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांची अपकीर्ती करण्याचा हिंदुद्वेष्ट्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न !

           केरळ राज्यातील एका हिंदुद्वेष्ट्याने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या विरोधात एका व्हॉट्स अ‍ॅप पोस्टद्वारे बिनबुडाचे आणि धादांत खोटे आरोप केले आहेत. सदर हिंदुद्वेष्ट्याने त्यात म्हटले आहे, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या आतंकवादी संघटना असल्याचे आरोप आहेत. त्यांचे कोची येथे कार्य असून त्यांचे साधक आणि कार्यकर्ते सर्वसाधारण समाजसेवकांसारखे दिसतात. हिंदूंनो, त्यांच्यापासून सावध रहा ! (सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या आतंकवादी संघटना असल्याचे आतापर्यंत भारतातील कोणत्याच अन्वेषण यंत्रणेने म्हटलेले नाही. सनातन संस्था किंवा हिंदु जनजागृती समिती यांच्यावर देशातील कोणत्याच पोलीस ठाण्यात साधा गुन्हाही नोंद नाही.एवढेच नाही, तर काही सनातनद्वेष्ट्यांनी सनातनला विविध प्रकरणांत गोवण्याचा प्रयत्न चालवला आहे, असे स्वत: न्यायालयाने म्हटले आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा आतंकवादी संघटना असा प्रचार करणार्‍या या हिंदुद्वेष्ट्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी या दोन्ही संघटना वकिलांचा सल्ला घेत आहेत. - संपादक)

      केंद्रीय कर्मचारी जाणार ११ जुलैपासून संपावर

      केवळ वेतनाढीच्या मागे लागलेले कर्मचारी कामाची
       गुणवत्ता कधी वाढवणार ? कर्मचार्‍यांचा वेतनवाढीच्या 
      न संपणार्‍या मागण्या थांबवण्यासाठी जनतेला धर्मशिक्षणच दिले पाहिजे.
              नगर, २ जुलै - केंद्रीय कर्मचारी संघटनांनी ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी फेटाळल्या असून त्या ११ जुलैपासून संपावर जाणार आहेत. (देशाच्या आर्थिक परिस्थितीच्या दृष्टीने केंद्रीय कर्मचार्‍यांनी संपावर जाणे, ही राष्ट्रद्रोही कृती आहे. - संपादक) अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या या संपाला पाठिंबा दर्शवण्यासाठी देशभरातील ७० लक्ष राज्य शासकीय कर्मचारी ११ जुलै या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करणार आहेत, अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष योगीराज खोंडे यांनी दिली.
              ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकार हेतुपुरस्सर जनतेच्या मनात ७ व्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने संभ्रम निर्माण करत आहे. या ७ व्या वेतन आयोगाने बरेचसे भत्ते आणि सेवासुविधा यांच्यावर बंधने आणली असून त्यामुळे कर्मचार्‍यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. (त्यागी वृत्तीचे सेवक मिळण्यासाठी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) आवश्यक आहे. - संपादक) नवीन निवृत्ती योजना रहित करणे, ४० टक्के रिक्त पदे भरा, निवृत्तीचे वय ६० वर्षे करा आदींसह अन्य मागण्यांच्या संदर्भात आणि केंद्रीय कर्मचार्‍यांच्या संपास पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी राज्यव्यापी निदर्शने करून राज्य शासनाचे सर्व प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधणार आहे.

      (म्हणे) सनातनने आमच्यावर आरोप केले !

      राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष अधिवक्ता 
      असिम सरोदे यांचे जनतेची दिशाभूल करणारे विधान
             पणजी - महाराष्ट्रातील नद्यांचे प्रदूषण न्यून करण्यासाठी श्री गणेशमूर्ती दानासारख्या गोष्टींचे पालन करावे, यासाठी मी स्वत: नदीत उतरलो; पण तेथे सनातनवादी लोक आले आणि त्यांनी तेथे धार्मिक पार्श्‍वभूमी मध्ये आणत आमच्यावर आरोप केले, असे जनतेची दिशाभूल करणारे विधान राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष तथा अधिवक्ता असिम सरोदे यांनी केले. (नद्यांत श्री गणेशमूर्ती विसर्जित केल्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही, असा अहवाल विविध प्रयोगशाळांनी दिला आहे.

      इसिसच्या आतंकवाद्यांना एम्आयएम् न्यायालयीन साहाय्य करणार !

      • पोलिसांना १५ मिनिटे बाजूला केल्यास १०० कोटी हिंदूंना संपवू, असे म्हणणार्‍या एम्आयएम्कडून वेगळे काय घडणार ? आतातरी त्यांच्यावर कारवाई होणार का ?
      • इसिसच्या आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या दुसरी मुस्लिम लिग असणार्‍या एम्आयएम्वर बंदी घालण्याची मागणी करा !
      भाग्यनगर - येथे अटक करण्यात आलेल्या इसिसच्या ५ आतंकवाद्यांना एम्आयएम् न्यायालयीन साहाय्य करणार आहे, असे एम्आयएम्चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे.
      ओवैसी म्हणाले की,
      १. आमच्या पक्षाचे आतंकवादाला समर्थन नाही; मात्र राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) एखाद्याला अटक केली म्हणून तो दोषी ठरत नाही. ते काम न्यायालयाचे आहे. न्यायालयाला योग्य निर्णय घेऊ द्यावा.
      २. अटकेत असलेल्या युवकांच्या कुटुंबियांशी मी संवाद साधला आहे, ते सर्व निर्दोष आहेत. आम्ही जरी त्यांना न्यायालयीन साहाय्य केले नाही, तरी अन्य कोणीतरी करील. तसेच न्यायालयही त्यांना अधिवक्ता देईल. एका वरिष्ठ अधिवक्त्यांच्या माध्यमातून आमचा पक्ष या युवकांना कायदेशीर साहाय्य करील.

      रमजान ईदच्या निमित्ताने गोहत्या होऊ नये, यांसाठी दक्षता घ्या ! - बजरंग दलाचे पोलीस ठाण्यात निवेदन

      पोलीस अधिकार्‍यांना निवेदन देतांना
      बजरंग दलाचे कार्यकर्ते
            जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर), २ जुलै (वार्ता.) - विद्यमान शासनाने गोहत्या बंदी कायदा लागू केला आहे. तरीही छुप्या पद्धतीने गोहत्या होत आहेत. शहर आणि शहराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये गोहत्या करून गोमांस वाहतूक करतांना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. ६ जुलै या दिवशी रमजान ईद हा मुसलमान समाजाचा सण साजरा होत आहे. तरी या दिवशी आणि दोन दिवस अगोदर काही समाजकंटक गोहत्या करतात. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते. तरी रमजान ईदच्या निमित्ताने गोहत्या होऊ नये, यांसाठी दक्षता घ्यावी, अशा मागणीचे निवेदन बजरंग दलाचे जयसिंगपूर शहर संयोजक श्री. विजय धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूर शहर पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय कदम यांना देण्यात आले. या वेळी सर्वश्री प्रदीप वरेकर, संभाजी शिंदे, मरयाप्पा लांडगे, अमर जुवे, विकी धंगेकर, सचिन मोहिते उपस्थित होते.

      अतिरिक्त शुल्काच्या विरोधात अभाविपचे परीक्षा नियंत्रकांवर खोट्या नोटा उधळण्याचे आंदोलन !

      शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत
           पुणे, २ जुलै - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाकडून एका विषयाच्या उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत देण्यासाठी २५० रुपये, तर पुनर्मूल्यांकन करण्यासाठी ४८० रुपये विद्यार्थ्यांकडून उकळले जातात. महाराष्ट्रातील इतर विद्यापिठांच्या तुलनेत ही रक्कम दुप्पट आहे. विद्यार्थ्यांची लूट करणार्‍या अतिरिक्त शुल्काच्या विरोधात अभाविपच्या वतीने परीक्षा नियंत्रकांवर खोट्या नोटा उधळून आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांनी १५ जुलैपर्यंत अतिरिक्त शुल्क अल्प करण्याचे, तसेच ज्या विद्यार्थ्यांकडून हे अतिरिक्त शुल्क घेण्यात आले आहे, त्यांना ते परत करण्याचे आश्‍वासन दिले. 
           या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही विद्यापिठाकडून त्याची नोंद घेण्यात आली नसल्याचा आरोप अभाविपने केला आहे. 
          (कुठे शस्त्र, शास्त्र, तसेच योग विद्या यांमध्ये पारंगत करणारे आणि निःस्वार्थी अन् समर्पण भावाने शिकवणारे शिक्षक असणारी पूर्वीची गुरुकुलपद्धती, तर कुठे विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचे विविध मार्ग शोधणारी सध्याची मेकॉले शिक्षणपद्धती ! या अपप्रकारांना चाप लावण्यासाठी गुरुकुलाच्या धर्तीवर शिक्षणकेंद्रे निर्माण होण्याची आवश्यकता आहे ! - संपादक)

      जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीने कावजी-खोतवाडी येथे ग्रामस्वच्छता अभियान !

            सांगली, २ जुलै (वार्ता.) - जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त सेवा मंडळाच्या वतीने मिरज तालुक्यातील कावजी-खोतवाडी येथे २७ जून या दिवशी ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात आले. यात गावातील रस्ते स्वच्छ करणे, स्मशानभूमीची स्वच्छता, तसेच तुंबलली गटारे स्वच्छ करणे यांचा समावेश होता. या अभियानासाठी कावजी-खोतवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती संगीता गुरव, उपसरपंच माणिक काळेकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी सहकार्य केले. सदर अभियानाचे प्रास्ताविक श्रीपाद पाटील यांनी केले. या वेळी माजी जिल्हाध्यक्ष श्री. प्रकाश गायकवाड, संगीता मडीवाळ, उर्मिला पाटील यांसह अन्य भक्तगण उपस्थित होते. 

      तुळजापूर येथे आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण !

            तुळजापूर (जिल्हा धाराशिव), २ जुलैै (वार्ता.) - येथील राजश्री शाहूनगरमध्ये ३० जून या दिवशी सकाळी ११ वाजता आयुर्वेदिक औषधी वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. हिमालयात निवासी असणारे योगी अरविंद यांनी १ कोटी आयुर्वेदिक औषधी वनस्पती लावण्याचा संकल्प केला आहे, त्याचाच एक भाग म्हणून श्री. अमित कदम यांनी आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास योगी अरविंद यांनी आयुर्वेदिक औषधी वनस्पतीविषयी बहुमूल्य मार्गदर्शन केले. या वेळी महंत इच्छागिरी, महंत मावजीनाथ गुरु तुकनाथ आणि प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी उपस्थित होते.


      -

      मी मुल्ला-मौलवींना घाबरत नाही ! - अभिनेता इरफान खान

             मुंबई - बकर्‍याचा बळी देण्याच्या संदर्भात विधान केल्यामुळे मौलवी आणि इमाम यांच्यांकडून अभिनेता इरफान खान यांच्यावर टीका केली जात आहे. इरफान यांनी धार्मिक परंपरांचे अर्थ लावत बसण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष द्यावे, असे मौलवी आणि इमाम यांनी टीका करतांना म्हटले आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देतांना इरफान खान यांनी मी मुल्ला-मौलवींना घाबरत नाही. मी धर्माचा ठेका घेतलेल्यांच्या देशात रहात नाही. माझ्या वक्तव्यामुळे जे दुःखी झाले आहेत, ते स्वतःचे आत्मपरिक्षण करण्यास सिद्ध नाहीत किंवा त्यांना निष्कर्षापर्यंत पोचायचे नाही, असे म्हटले आहे.
             मुंबईतील काझी खालिद उस्माई म्हणाले की, इरफान हा कलाकार आहे आणि त्याने आपल्या कामाकडेच लक्ष द्यावे. त्याला धर्माचे कोणतेही ज्ञान नाही. त्याने कोणत्यातरी धर्मगुरूशी चर्चा करून थोडे ज्ञान संपादन करावे आणि मगच कुर्बानी अथवा रमजानविषयी बोलावे.

      उत्तरपत्रिका पळवल्याप्रकरणी तीन विद्यार्थ्यांना अटक

      विद्यार्थ्यांना नैतिकता 
      शिकवू न शकणारी शिक्षणप्रणाली !
            पुणे, २ जुलै - येथील फर्ग्युसन महाविद्यालयात मूल्यांकनासाठी दिलेल्या संगणक शास्त्र (बीसीएस्) अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका सोडवण्यासाठी घरी घेऊन जाणार्‍या एका विदेशी विद्यार्थ्यासह ३ जणांना डेक्कन पोलिसांनी अटक केली. अब्दुल मतीन अब्दुल जब्बार खैरी (मूळ रहाणार अफगाणिस्तान), मनीष अशोक पिल्लई आणि प्रसाद प्रदीप कडू अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात फसवणूक आणि विद्यापीठ अपप्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणात फर्ग्युसन महाविद्यालयाचा शिपाई शिगवण याला यापूर्वीच अटक केली असून पोलिसांना आणखी ३ जणांवर संशय आहे. त्यांनाही लवकरच कह्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.

      गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन !

           मुंबई, २ जुलै (वार्ता.) - गोरेगावमधील आरे येथील अनधिकृत व्यायामशाळा, जोगेश्‍वरीतील एस्आर्ए प्रकल्प आणि बेहिशेबी मालमत्ता याप्रकरणी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्यावरील आरोपांची चौकशी करणार, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ३० जून या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. रवींद्र वायकर यांनी जीमच्या नावाखाली आरे येथील हडप केलेली भूमी आणि जीम या संदर्भातील पुरावे निरूपम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दिले. आरे येथील व्यायामशाळेचा अनधिकृत मजला पाडावा, सर्व अनधिकृत एस्आर्ए प्रकल्प थांबवावेत, जोगेश्‍वरी गुफेजवळ बांधलेली इमारत पाडून टाकावी आणि रवींद्र वायकर यांच्या मंत्रीपदाचे त्यागपत्र घेऊन संबंधित प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.

      पुण्यात ६ मासांत ज्येष्ठ नागरिकांच्या १ सहस्रांहून अधिक तक्रारी

           पुणे, २ जुलै - पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये ज्येष्ठांच्या समस्या निराकरणासाठी हेल्पलाईन चालू केली आहे. गेल्या ६ मासांत ज्येष्ठ नागरिकांनी १ सहस्र ८४ तक्रारी केल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये प्रामुख्याने मुले सांभाळत नाहीत, वीज नाही, गॅस संपला, गोळ्या-औषधे संपली आहेत, परिसरात गोंधळ चालू आहेत, अशा अनेक तक्रारी हेल्पलाईनवर करण्यात आल्या आहेत. (अशा समस्या सोडवण्यात पोसिलांचा वेळ गेला, तर ते गुन्हेगार आणि आतंकवादी यांचा बंदोबस्त कधी करणार ? - संपादक)

      चंद्रभागा नदीच्या वाळवंटात अवैध वाळू उपशामुळे मोठे खड्डे; भाविकांच्या जिवाला धोका

      महसूल आणि पोलीस 
      प्रशासन यांच्या सुस्ततेचा परिणाम !
             पंढरपूर, २ जुलै - चंद्रभागा नदीच्या वाळवंटामध्ये वाळूचोरांनी केलेल्या अवैध वाळू उपशामुळे नदीच्या पात्रामध्ये मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे पाणी सोडण्यापूर्वी न बुजवल्यास भाविकांच्या जिवाला धोका उद्भवू शकतो. महसूल आणि पोलीस यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे वाळूचोरांचे फावले आहे. (यावरून पंढरपूरमध्ये कायदा-सुव्यवस्था अस्तित्वातच नाही, असे वाटल्यास आश्‍चर्य ते काय ? - संपादक)
             चंद्रभागेच्या या पात्रात रात्रंदिवस वाळूउपसा चालू असतो. अनेक वारकरी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी हे प्रकार थांबवण्यासाठी बरेच प्रयत्न केले; पण महसूल आणि पोलीस यंत्रणा यांनी त्याकडे दुर्लक्षच केले आहे. वाळू तस्कर आणि काही भ्रष्ट अधिकारी यांची अभद्र युती असल्याने वाळू उपशाचे अपप्रकार चालू असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. (राज्य सरकारने संबंधितांची चौकशी करून कारवाई करावी ! - संपादक) १५ जुलैला आषाढी एकादशीच्या सोहळ्याच्या दिवशी प्रत्येक भाविक हा स्नानासाठी चंद्रभागा नदीमध्ये गेल्यास अन् सध्याच्या खड्ड्याची लांबी, रुंदी आणि उंची पहाता अनेकांना जलसमाधी मिळेल, अशी भयावह स्थिती आहे. त्यामुळे आषाढी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने या विषयाकडे गंभीरपणे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

      पुणे जिल्ह्यातील श्री एकवीरादेवीच्या गडावर पुन्हा पडले काही दगड

              पुणे, २ जुलै - येथील लोणावळ्याजवळील श्री एकवीरादेवीच्या कार्ला गडावर ३० जून या दिवशी रात्री पुन्हा काही दगड मंदिर देवस्थान कार्यालयाच्या शेजारी पडल्याने गडावरील दरडी पडण्याचा धोका वाढला आहे. या प्रकरणी देवस्थानने भारतीय पुरातत्व विभाग, वन विभाग, मावळ तालुका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी या घटनांची गंभीर नोंद घेऊन सुरक्षा उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. यापूर्वीही २५ जून या दिवशी रात्रीही मंदिरालगतच्या डोंगराचे काही मोठे दगड खाली पडले होते. सुदैवाने दोन्ही वेळेस दगड रात्रीच्या वेळी पडल्याने कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. (कोणाचा जीव गेल्यावर पुरातत्व विभाग आणि तालुका प्रशासन यावर उपाययोजना करणार का ? - संपादक)

      हिंदूंनो, मुसलमानांकडून धर्मप्रेम शिका !

      फलक प्रसिद्धीकरता
           चीन सरकारने मुसलमानांना रोजा ठेवण्यास प्रतिबंध केल्याच्या विरोधात उत्तरप्रदेशातील बरेली येथील मुसलमानांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला आहे. तसेच काही संघटनांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना निवेदन पाठवून चीन सरकारशी चर्चा करण्याची मागणीही केली होती.

      हिंदु राष्ट्र सेनेच्या एका कार्यकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन

      हडपसर (जिल्हा पुणे) 
      येथील मोहसीन शेख हत्या प्रकरण !
             पुणे, २ जुलै - मोहसीन शेख हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला हिंदु राष्ट्र सेनेचा कार्यकर्ता प्रतीक पंडित सांगळे यांनाा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनंत बदर यांनी १० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन संमत केला आहे. येथील जिल्हा न्यायालयाने सांगळे यांचा जामीन यापूर्वी फेटाळला होता. त्यानंतर अधिवक्ता अभिजीत देसाई, अधिवक्ता वृषाली मैंदाड आणि अधिवक्ता मिलिंद पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी आवेदन प्रविष्ट केले होते.
            फेसबुक या सामाजिक संकेतस्थळावर आक्षेपार्ह माहिती प्रसिद्ध केल्यानंतर जून २०१४ मध्ये येथील हडपसर भागात दंगल होऊन त्यामध्ये मोहसीन शेख याची हत्या झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी हिंदु राष्ट्र सेनेचे अध्यक्ष श्री. धनंजय देसाई, श्री. प्रतीक सांगळे यांसह एकूण २० जणांना अटक करण्यात आली होती. सध्या ते सर्वजण येरवडा कारागृहात आहेत.

      हिंदू तेजा जाग रे !

      Jago!
      Kya Dharm ke liye Hindu aisa kar sakate hai? 
      China me Roje par pratibandh lagne ke virodh me Bareli ke Musalmano ne chini vastuon ka bahishkar kiya!
      जागो !
      क्या धर्म के लिए हिन्दू ऐसा कर सकते हैं ?
      चीन में रोजे पर प्रतिबंध लगने के विरोध में उत्तरप्रदेश के बरेली में मुसलमानों ने चीनी 
      वस्तुआें का बहिष्कार किया !       -

      पुलवामामध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात २ पोलीस घायाळ !

             पुलवामा (जम्मू-कश्मीर) - पुलवामामधील लेथपुरा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तळावर १ जुलैच्या रात्री जिहादी आतंकवाद्यांनी ग्रेनेड फेकून आक्रमण केले. यात २ पोलीस घायाळ झाले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आतंकवादी पळून गेले.

      मुसलमानांचा चिनी वस्तूंवर बहिष्कार !

      • मुसलमान स्वधर्माने संघटित असल्यामुळे जगात कुठेही त्यांच्या धर्मावर आघात झाला, तर ते त्वरित एकत्र येतात; तर हिंदू, धर्मावरील आघाताचा साधा निषेधही करत नाही !
      • चीनच्या रोजाविरोधी निर्णयाचा भारतात विरोध
             बरेली (उत्तरप्रदेश) - चीन सरकारने रोजा ठेवण्यास प्रतिबंध केल्याच्या विरोधात येथील मुसलमानांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला आहे. विशेषत: मुसलमानांनी या वेळी चिनी बनावटीच्या गोल टोप्या खरेदी केल्या नाहीत. इतर चिनी वस्तूंही खरेदी न करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दुकानदारांकडे पूर्वीचे साहित्य होते, त्याचीच विक्री झाली नाही. त्यामुळे दुकानदारांनी या वेळी घाऊक बाजारातून कोणतेही चिनी साहित्य उचलले नाही.
            चीन सरकारच्या या निर्णयाचा विरोध भारतात विविध ठिकाणी झाला. बरेलीमध्ये काही संघटनांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना निवेदन पाठवून चीन सरकारशी चर्चा करण्याची मागणीही केली होती.

      सनातनद्वेष्ट्यांकडून राष्ट्रप्रेमी सनातनवर बंदी घालण्याची निराधार मागणी !

      सनातन संस्था करत असलेले तेजस्वी धर्मप्रसारकार्य पहावत नसल्यामुळेच हिंदु
      धर्मविरोधकांकडून सनातनच्या विरोधात द्वेषमूलक वावड्या उठवल्या जात आहेत ! सनातनचे कार्य धर्मनिष्ठ असल्यामुळे विरोधकांनी कितीही प्रयत्न केला, तरी सनातनचे कार्य थांबणार नाही; 
      उलट हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत ते वेगाने वाढत जाईल !
      सनातन संस्थेवर बंदी आणण्यासाठी रा.स्व. संघाचा महाराष्ट्र
      सरकारवर दबाव !
      - संघाच्या सूत्रांच्या हवाल्याने डीएन्एचे वृत्त
            राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सनातन संस्थेचे अस्तित्व नकोसे झाल्याने संघाने महाराष्ट्र सरकारला पुरेशी आवश्यक कारणे देऊन सनातन संस्थेवर बंदी घालण्याची प्रक्रिया चालू करण्यास सांगितले आहे. त्यामुळेच गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास सी.बी.आय.कडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे, अशी बातमी डीएन्ए या इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.

      तुम्हाला अन्वेषण करायचे आहे कि त्याची वाट लावायची आहे ? - मुंबई उच्च न्यायालयाचे अन्वेषण यंत्रणांवर कडक शब्दांत ताशेरे

           डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचे अन्वेषण मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालू असून त्याची सुनावणी २२ जून या दिवशी उच्च न्यायालयाचे न्या. एस्.सी. धर्माधिकारी आणि न्या. शलिनी फणसळकर-जोशी यांच्या खंडपिठापुढे झाली. या वेळी न्यायालयाने तीव्र शब्दांत अन्वेषण यंत्रणांवर ताशेरे मारून नाराजीही व्यक्त केली. त्यातील काही निवडक सूत्रे 
      १. अन्वेषण यंत्रणांनी गोपनीय म्हणून जो अहवाल आम्हाला दिला आहे तो आधीच माध्यमांत प्रसिद्ध झाला आहे. हे अन्वेषणाच्या नावाखाली काय चालले आहे ? 
      २. मृतांचे नातेवाईक आणि अन्वेषण करणारे अधिकारी चर्चा करतात आणि अन्वेषणाची दिशा ठरवतात का ? या सगळ्याला तुमचे मुख्य अधिकारीच उत्तरदायी आहेत का ? मृतांचे नातेवाईक ज्यांच्याकडे बोट दाखवतील त्यांचेच तुम्ही अन्वेषण करणार का ? उद्या मृतांचे नातेवाईक असे म्हणाले की, खुनी नाही मिळाले तरी चालतील, तर तुम्ही तपासच थांबवणार आहात का ? 

      हिंदुत्वनिष्ठांचा सनातनला भक्कम पाठिंबा !

           डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक झाल्यानंतर कथित पुरोगामी व्यक्ती, संघटना, तसेच माध्यमे सनातन संस्थेवर बंदी आणण्यासाठी दबाव टाकू लागली. प्रत्यक्षात या प्रकरणी न्यायालयात निकाल तर दूरच, साधे आरोपपत्रही प्रविष्ट झाले नसतांना सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे, हा निव्वळ हिंदुद्वेषच आहे. या संदर्भात मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया देत आहोत.
      सनातन संस्थेचे हिंदुत्वाचे कार्य न पटल्यानेच बंदीची मागणी ! - ह.भ.प. 
      प्रकाश महाराज जवंजाळ, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ
           डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी कोणतीही वस्तूस्थिती समोर आलेली नाही. न्यायालयानेही कोणती टिप्पणी केलेली नाही. असे असतांना सनातन संस्थेवर बंदीची मागणी करण्याचे काहीच कारण नाही. सनातन संस्थेचे कार्य चांगले आहे. संस्था प्रखर हिंदुत्वाचे कार्य करत असल्यानेच काहींच्या पोटात दुखू लागल्याने सनातन संस्थेवर आरोप केले जात आहेत. हे केवळ आरोप असून कुठल्याही निष्कर्षाप्रत पोहोचण्याच्या आधीच संस्थेवर बंदीची मागणी करणे अयोग्य आहे.

      पंढरपूर येथील पालख्या पुणे मुक्कामी असतांना जाणवलेल्या अयोग्य गोष्टी

            पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाची आस मनी बाळगत वैष्णवांचा मेळा ग्यानबा-तुकारामचा जयघोष करत प्रतिवर्षी लाखोंच्या संख्येने पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. शेतीची कामे आटोपल्यानंतर ऊन-पावसाची तमा न बाळगता सर्व भार भगवंतावर सोडून वारकरी ईश्‍वराच्या दर्शनासाठी देह झिजवतात. या वारीमध्ये भगवद्भक्तांच्या जोडीला हौशे, नवशे आणि गवशे यांचीही संख्या मोठी असते. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे या भक्तीच्या मेळ्यात अनेक अपप्रकार होतांना आढळून येतात. असे अपप्रकार येथून पुढे होऊ नयेत, तसेच होत असल्याचे आढळल्यास थांबवले जावेत, या उद्देशाने यंदाच्या वर्षी पालख्या पुणे मुक्कामी असतांना लक्षात आलेली सूत्रे देत आहे.

      ममता बॅनर्जी यांचे गोतस्करीच्या विरोधात कारवाईचे आदेश

      राज्यात ५ वर्षे सत्ता उपभोगल्यानंतर गोतस्करीविषयी 
      आता जागे होणार्‍या बंगालच्या मुख्यमंत्री ममता(बानो) !
             कोलकाता - बांगलादेशामध्ये होणारी गायींची तस्करी रोखण्यासाठी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रशासनाला कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. विकासकामांची माहिती घेण्यासाठी उत्तर २४ परगणा जिल्ह्याच्या दौर्‍यावर आल्या असतांना बॅनर्जी यांनी आढावा बैठकीमध्ये वरील आदेश दिला.

      सनातन संस्थेचा कोणत्याही आरोपपत्रात साधा उल्लेखही नसतांना तिच्यावर बंदी घालण्यासाठी उतावीळ झालेले पुरोगामी !

      १. (म्हणे) सनातनला पुरोगामी विचार नष्ट करता आले नाहीत; म्हणून त्यांनी दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी या पुरोगामी विचारवंतांना संपवले. आता सनातनविरोधी पुरावे हाती असतांनाही सनातनवर बंदी घालण्याची कारवाई होत नाही. या संस्थेवर बंदी घालण्यासाठी वेळकाढूपणा करणार्‍या सरकारला सनातनला काय महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायचा आहे का ? - काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
      २. (म्हणे) डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येस उत्तरदायी धरून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांना आतंकवादी संघटना घोषित करावे आणि त्यांच्यावर बंदी घालावी. - भारिप बहुजन महासंघ, रिपब्लीक सेना आणि बौद्ध संघर्ष समिती

      सीबीआयच्या अन्वेषणातील फोलपणा दर्शवणारी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी न्यायालयासमोर मांडलेली सूत्रे

      १. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने अद्यापपर्यंत आम्हाला सीबीआय कोठडीचा अहवाल दिलेला नाही.
      २. सध्या वर्तमानपत्रातून डॉ. तावडे यांच्या विरोधात येणार्‍या बातम्या म्हणजे मीडिया ट्रायल चालू आहे.
      ३. डॉ. तावडे यांची ९ दिवस चौकशी केल्यानंतर १० व्या दिवशी त्यांना अटक केली जाते. असे असतांना ज्या संगणकीय पत्रांच्या (इमेलच्या) आधारावर अटक केली जाते, तीच कारणे पुढे करून कोठडीची वाढ मागितली जाते. याचसमवेत एका जुन्या साक्षीदाराची साक्ष ग्राह्य मानून कोठीडीची मागणी केली जात आहे. मुख्य म्हणजे डॉ. दाभोलकर हत्येच्या प्रकरणातील अन्य एका खटल्याची पुढील सुनावणी उच्च न्यायालयात आहे. (ही सुनावणी २३ जूनला झाली. - संपादक) त्यामुळे उच्च न्यायालयाला खुश करण्यासाठी डॉ. तावडे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली जात आहे.

      सनातनवर बंदी घालण्याविषयी संघाचा शासनावर दबाव या वृत्ताविषयी संघ आणि भाजप यांनी अधिकृत भूमिका स्पष्ट करावी ! - सनातन संस्था

            मुंबई - डीएनए या इंग्रजी दैनिकाच्या २६ जून २०१६ च्या अंकात Pressure grown on government to ban Sanstha (सनातनवर बंदी घालण्याविषयी संघाचा शासनावर दबाव) या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. या वृत्तात संघाच्या उच्चपदस्थ व्यक्तीने दिलेल्या माहितीच्या आधारे सध्याचे राज्यशासन संघाच्या दबावामुळे सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा विचार करत आहे, असे म्हटले आहे. आतापर्यंत सीबीआयच्या अधिकार्‍यांच्या हवाल्याने वृत्ते दिली जात होती; मात्र प्रथमच रा.स्व. संघासारख्या एका मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या हवाल्याने वृत्त दिले गेले आहे. या वृत्तामुळे एक मोठी हिंदुत्ववादी संघटना दुसर्‍या लहान संघटनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा चुकीचा संदेश समाजात जात आहे. त्यामुळे सनातन संस्थेवर होणार्‍या आरोपांच्या संदर्भात रा.स्व. संघाची नेमकी अधिकृत भूमिका स्पष्ट होणे आवश्यक आहे. या दृष्टीने हिंदु समाजामध्ये योग्य संदेश जावा आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये फूट पाडणार्‍या शक्तींना रोखता यावे, यासाठी रा.स्व. संघ आणि भाजप शासन यांनी या वृत्ताविषयी खुलासा करावा, अशी मागणी सनातन संस्थचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

      विदेशी षड्यंत्रकार्‍यांकडून भारतीय संस्कृतीला नष्ट करण्याचाच एक भाग म्हणजे सनातनवर बंदी घालण्याची मागणी होणे ! - पू. सुनिल शास्त्री

           सत्यं सदा विजयते । असत्य, अधर्मी कितीही प्रबळ झाले, तरी सत्याला ते नाकारू शकत नाहीत. धर्मो रक्षति रक्षित:। धर्माचे रक्षण करणार्‍यांचे धर्म रक्षण करतो. परमेश्‍वर आणि सत्यावर विश्‍वास ठेवून सदैव त्यांच्यासाठी उभे रहायला हवे. सनातन संस्थेचा विचार केल्यास, विदेशी षड्यंत्रकारी सदैव भारतीय संस्कृतीला नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आलेले आहेत. सनातनवर बंदी घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु सत्याचा विजय होईल, हे निश्‍चित आहे.

      सनातन संस्था आणि सनातनचे साधक यांच्या चौकशीच्या संदर्भात त्यांचे निर्दोषत्व सिद्ध करणारे सत्य !

      १. आतापर्यंत एटीएस्, एन्आयए, एस्आयटी आणि सीबीआय या अन्वेषण यंत्रणांनी सनातनच्या ८०० साधकांची चौकशी केली. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.

      २. गडकरी स्फोट प्रकरणी ६ साधकांपैकी ४ साधकांची निर्दोष मुक्तता झाली आणि २ साधकांना जामीन मिळाला. या न्यायदानाच्या वेळी न्यायाधिशांनी न्यायालयाच्या आदेशात, 'आरोपींचा कोणाचीही हत्या करण्याचा उद्देश नव्हता', असे म्हटले आहे.

      ३. मडगाव स्फोट प्रकरणातून सनातनच्या ६ साधकांची निर्दोष मुक्तता झाली आहे. त्या वेळी न्यायदानाच्या प्रतीत न्यायाधिशांनी, 'हा प्रथमदर्शी अहवालच संशयाच्या भोवर्‍यात आहे आणि सनातन संस्थेला गुंतवण्यासाठीच यात तोडमोड (मॅनिप्युलेट) करण्यात आली आहे', असे म्हटले आहे.

      ४. समीर गायकवाड यांना १६ सप्टेंबर २०१५ या दिवशी पानसरे हत्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यांना अटक करून ८ महिने होऊनही अद्याप कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत.
      'कॉ. पानसरे हत्या प्रकरणी खरे मारेकरी शोधायचेच नाहीत, असे वाटते', असे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानेे ८ ऑक्टोबर २०१५ ला ओढले.

      ५. डॉ. तावडे यांना १० जूनला अटक केल्यानंतर आतापर्यंत त्यांच्या संदर्भात ठोस पुरावे आढळलेले नाहीत.

      -

      केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (सीबीआयकडून) हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची चौकशी

      • काँग्रेसप्रमाणे भाजप सरकारच्या राज्यातही पोलिसांकडून सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांचा नाहक छळ चालूच !  
      • सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्या मागे पोलिसांचा वाढता ससेमिरा
             मुंबईतील एका भागात रहाणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या एका कार्यकर्त्याची नुकताच केंद्रीय अन्वेषण विभागातील पोलीस अधिकार्‍यांनी भ्रमणभाषवरून चौकशी केली. या वेळी झालेले संभाषण येथे देत आहोत.
      पोलीस : मी सी.बी.आय. क्राईम ब्रँचमधून बोलत आहे. तुम्हाला भेटायचे आहे.
      कार्यकर्ता : आता मी कार्यालयात निघालो आहे. उद्या भेटू शकतो का ? (पोलिसांनी दुसर्‍या दिवशी येऊन भेटण्यास सांगितले. दोन दिवसांनी पोलिसांनी संपर्क करून त्या कार्यकर्त्याला एका हॉटेलमध्ये चहा घेण्याच्या निमित्ताने भेटण्यासाठी बोलवले.)
      पोलीस : इसिसचे प्राबल्य वाढले आहे. त्यामुळे लक्ष ठेवले पाहिजे. चांगले लोक दिसतात; पण गुन्हे करतात. (इसिसचे प्राबल्य वाढले आहे, तर त्यासाठी पोलिसांनी त्यांची यंत्रणा इसिसच्या आतंकवाद्यांना शोधण्यासाठी वापरली पाहिजे; मात्र पोलीस निरपराध हिंदूंना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यासाठी त्यांची शक्ती वाया घालवत आहेत ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! - संपादक)

      भारतभरातील विविध ठिकाणचे सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्यावर पोलिसांचे बारीक लक्ष !

      पोलिसांनी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्याऐवजी तोच वेळ आतंकवाद्यांच्या शोधासाठी वापरला असता, तर देश आतंकवादमुक्त झाला असता !

      १. महाराष्ट्र पोलिसांकडून सनातनच्या एका साधकाविषयी त्याच्या शेजार्‍यांकडून आणि अन्य व्यक्तींकडून जाणून घेण्याचा प्रयत्न
      काही दिवसांपूर्वी वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या एका साधकाच्या चिकित्सालयाच्या बाहेर येऊन पोलीस तेथील एका दुकानात आणि हॉटेलमध्ये जाऊन त्या साधकाविषयी चौकशी करायचे. बर्‍याच वेळा तेथे १ घंटा थांबायचे. असे २ - ३ दिवस करत होते. 
       त्यानंतर नुकतेच या साधकाच्या घराच्या आसपास येऊन ३ - ४ जणांकडे पोलीस चौकशी करत होते. शेजार्‍यांकडे चौकशी करतांना पोलीस 'साधक कसे आहेत?' 'त्यांचा संबंध सध्याच्या घटनांत असेल का ?', असे विचारतात. त्या वेळी शेजारच्या व्यक्तींनी चौकशीसाठी आलेल्या पोलिसांना ते साधक शांत स्वभावाचे आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब चांगले आहे. त्यामुळे त्या साधकांचा अशा घटनांमध्ये संबंध असणे शक्यच नाही, असे सांगितले.
      चि. कश्यपी तांबे
           ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली देहली येथील चि. कश्यपी मकरंद तांबे हिचा (३.७.२०१६) या दिवशी म्हणजे आषाढ कृष्ण पक्ष चतुर्दशीला पहिला वाढदिवस आहे. 
      चि. कश्यपी तांबे हिला वाढदिवसानिमित्त 
      सनातन परिवाराकडून शुभाशीर्वाद !
      श्री. रामचंद्र पांगुळ 
      कु. अदिती पवार
           देवद आश्रमातील श्री. रामचंद्र पांगुळ आणि कु. अदिती पवार यांचा आज आषाढ कृष्ण पक्ष चतुर्दशीला वाढदिवस आहे
      श्री. रामचंद्र पांगुळ आणि कु. अदिती पवार 
      यांना वाढदिवसानिमित्त सनातन 
      परिवाराकडून शुभेच्छा ! 
          चि. कश्यपी तांबे, श्री. रामचंद्र पांगुळ आणि कु. अदिती पवार यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

      गुरुपौर्णिमा विशेषांक (रंगीत)

      साप्ताहिक सनातन प्रभातचा अंक
            वर्ष अठरावे : अंक क्र. : ३५ (१४ जुलै ते २० जुलै २०१६) 
           गुरुपौर्णिमा म्हणजे साधकांसाठी अनमोल पर्वणीच ! गुरुकृपेनेच शिष्याचे परममंगल होते. अशा गुरूंची महती वर्णन करण्यासाठी सनातन प्रभात प्रकाशित करत आहे गुरुपौर्णिमा विशेषांक
      • पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् यांच्या शब्दांत सप्तर्षींनी गुरुपौर्णिमेनिमित्त दिलेला दिव्य संदेश !
      • गुरुचरणांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, ही खरी गुरुदक्षिणा !
      • गुरूंच्या विविध प्रकारांप्रमाणे प.पू. डॉक्टरांमध्ये दिसलेली विविध रूपे !
      अन्य वाचनीय लिखाण.....
      आपली मागणी आजच करा
            वितरकांनी अतिरिक्त अंकांची मागणी ४ जुलै २०१६ या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ईआरपी प्रणालीत भरावी.

      सात्त्विक देवनागरी अक्षरे आणि अंक लिहिण्याची पद्धत

      अक्षर सुंदर आणि सात्त्विक बनवण्यासाठी मार्गदर्शक सनातनचा नूतन ग्रंथ प्रकाशित !
      (देवनागरी अक्षरे म्हणजे संस्कृत, मराठी अन् हिंदी अक्षरे)
              पालक अन् शिक्षक यांनी मुलांकडून अक्षरे गिरवतांनाच त्यांच्यावर चांगले हस्ताक्षर काढण्याचा सुसंस्कार करायला हवा. त्यासाठी अक्षरे सात्त्विक हवीत. ती कशी काढावी, हे प्रस्तुत ग्रंथात दिले आहे. तशी काढणारा अन् वाचणारा यांना त्या अक्षरातून चैतन्य मिळते. तसेच ग्रंथातील धर्मशिक्षण देणारे अक्षरांशी निगडित शब्द अन् शब्दांशी निगडित वाक्ये यांचाही लाभ घ्या !
      वाचकांना विनंती : या ग्रंथातील सात्त्विक अक्षरांची संगणकीय लिपी सिद्ध करण्यासाठी साहाय्य करावे.

      आगींपासून रक्षण करण्याविषयी प्रायोगिक मार्गदर्शन करणारा सनातनचा ग्रंथ

      भावी आपत्काळात अन् नेहमीसाठीही उपयुक्त ठरणारी 
      सनातनची ग्रंथमालिका : भावी आपत्काळातील संजीवनी !
           संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना (आजारांना) तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील ११ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या ग्रंथांचा अभ्यास आतापासूनच केला, तर प्रत्यक्ष आपत्काळात विकारांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होईल. यासाठी हे सर्व ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत !

      भारत आणि बांगलादेश सीमेवरील घुसखोरी, तस्करी अन् भारत शासनाची अकार्यक्षमता !

      श्री. कुशल गुरव
            भारत आणि बांगलादेश सीमेवरील घुसखोरी, तस्करी अन् भारत शासनाची सुरक्षेच्या दृष्टीने अकार्यक्षमता दर्शवणारी काही उदाहरणे पुढे देत आहे. B.S.F. (Border Security Force) मधील एकाशी चर्चा करतांना आणि त्यांना विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देतांना त्यांनी ही माहिती सांगितली आहे.
      १. ढिसाळ सीमासुरक्षा
            भारत-बांगलादेश सीमेवरील भागात ५०० मीटरवर एक सैनिक सुरक्षेसाठी असतो आणि दोन सैनिकांमधील जागेत काय चालू आहे, हे समजत नाही. त्यामुळे ५०० मीटरमधील या अंतरात बरीच तस्करी होत असते. तस्करी करणारे लांबून दिसतात; पण सैनिकाला आपली जागा (एरिया) सोडून जाणे शक्य नसते. राखीव सैनिकांना संपर्क करून बोलवेपर्यंत तस्करी करणारे त्यांची कामे पूर्ण करून त्यांच्या देशांत (सीमेवर) जाऊन पोचलेले असतात.
      २. बांगलादेशी घुसखोरांना अडवण्याचा प्रयत्न 
      केल्यास त्यांनीच सैनिकांवर आक्रमण करणे
            बांगलादेशी घुसखोरांना अडवण्याचा प्रयत्न केल्यास तेच उलट सैनिकांवर आक्रमण करतात. त्यामुळे सैनिक घुसखोरांना पकडण्यासाठी अपेक्षित प्रयत्न करत नाहीत. त्यांना सहज विचारले, घुसखोरी होतांना तुम्ही पहाता, मग त्यांना अडवत का नाही ? यावर त्यांनी फार महत्त्वाची पुढील माहिती सांगितली.

      नमस्काराची योग्य मुद्रा केल्याने अभ्यासात सुधारणा होणे, तसेच मनःशांती मिळत असल्याने मित्रांनाही तसे करण्यास सुचवणे

            मी ए.के. जोशी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत आहे. एकदा शाळेतील संगीत स्पर्धेत मी भाग घेऊन कॅसिओ हे वाद्य वाजवले. माझ्या संगीत शिक्षकाने सांगितल्याप्रमाणे वाद्य वाजवण्यापूर्वी प्रथम मी नमस्काराची मुद्रा करून प्रार्थना केली. त्यांनी मला दोन्ही हात जोडून अंगठ्याची दोन्ही टोके आज्ञाचक्रावर ठेवून हाताच्या तळव्यात अल्पशी पोकळी ठेवून नमस्कार करायला सांगितले होते. अशा प्रकारे नमस्काराची मुद्रा अनेक वेळा केल्याने माझ्यात चांगले पालट झाले आहेत. मी करत असलेला अभ्यास माझ्या लक्षात राहू लागला. मला संगीत स्पर्धेत दुसरे पारितोषक मिळाले. मला नमस्काराची योग्य मुद्रा केल्यावर मनःशांती मिळत असल्यामुळे माझ्या वयोगटातील सर्व मित्रांना मी तसे करण्यास सुचवतो. - कु. आर्य शांतीलाल निशार, ठाणे (वय १४ वर्षे)

      तपासयंत्रणा कथानक रचत असून त्यांनी खोटे आणि विकत घेतलेले साक्षीदार उभे केले आहेत ! - श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

             खरे आरोपी मोकाट सुटले तरी चालतील; पण सनातन संस्थेवर बंदी आली पाहिजे, असे पुरोगामी संघटनांचे धोरण आहे. सनातन संस्था ही सनदशीर मार्गाने चालणारी संस्था आहे. आम्ही तपासयंत्रणेला सहकार्य केले आहे. असे असतांनाही सनातन संस्थेवर बंदीची मागणी कोणत्या निकषावर केली जात आहे ? तपासयंत्रणा कथानक रचत आहेत. निरपराध साधकांची मोठ्या संख्येने चौकशी चालू आहे. डॉ. तावडे यांना अटक केल्यापासून आजपर्यंत सीबीआय एकही पुरावा सादर करू शकली नाही; किंबहुना खोटे आणि विकत घेतलेले साक्षीदार उभे केले आहेत.

      अन्वेषण यंत्रणांनी हिंदु जनजागृती समितीच्या निरपराध कार्यकर्त्यांचा छळ करू नये ! - श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

            हिंदु जनजागृती समितीचे कार्य सनदशीर मार्गाने चालू आहे. तपास यंत्रणांनी तपास अवश्य करावा; पण निरपराध कार्यकर्त्यांचा छळ करू नये. दुर्दैवाने आज तेच होत आहे. शासनाने याची दखल घ्यावी.

      सनातनवर नाहक बंदीची मागणी करणार्‍यांवर गृहमंत्र्यांनी कारवाई करायला हवी ! - अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

             सनातनवर बंदी घालण्याच्या उलटसुलट बातम्या येत आहेत. या बंदीला कोठेही कायदेशीर अधिष्ठान नाही. कायद्यात बंदीविषयी तरतुदी आहेत. त्यातील एकही तरतूद सनातनला लागू होत नाही. तशी तरतूद लागू नसतांना अशा वावड्या उठवणे हा गृहमंत्रालयाचा सुद्धा अपमान आहे आणि त्याबद्दल गृहमंत्र्यांनी अशा व्यक्तींवर सुद्धा कारवाई करायला हवी. सनातनवर बंदी घाला, असे जी मंडळी सांगत आहेत, त्यांचे नक्षलवाद्यांशी असलेले संबंध, त्यांचे देशद्रोही रेकॉर्ड, त्यांच्यावर असलेले खटले हे सर्व पहायला हवे.

      तपासाची अत्यंत द्वेषमूलक पद्धत !

      १. विकास खंडेलवाल आणि मनीष नागोरी यांना महाराष्ट्र पोलिसांनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी पकडले आणि २५ लक्ष रुपये देऊन या हत्या प्रकरणात २ जणांची नावे घ्यायला सांगितली. ही गोष्ट या दोघांनीच न्यायालयात उघड केली. यामुळे अन्वेषण यंत्रणांचा सनातनला गोवण्याचा पहिला प्रयत्न फसला होता.
      २. त्यानंतर पोलिसांनी सनातनचे साधक, सनातनच्या साधकांच्या संपर्कात असलेले नेते, तसेच संपादक यांचे मिळून ३५२ जणांचे फोन टॅप केले; मात्र त्यांना काहीच सापडले नाही. अशा प्रकारे फोन टॅप करणे हे अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे हनन नव्हे का ?

      साक्षीदार संजय साडविलकर यांचे सत्य

          पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे घोटाळे आम्ही बाहेर काढले. संजय साडविलकर यांचा श्री महालक्ष्मीदेवीच्या चांदीच्या रथनिर्मितीतील घोटाळ्यात सहभाग आहे. त्याचा सूड उगवण्यासाठी संजय साडविलकर याने सनातनच्या विरोधात खोटी माहिती देऊन सनातनची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न चालवला आहे. - अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

      सनातनवरील बंदीविषयी शासनाची भूमिका !

      १. महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासनाचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही सनातनवर कारवाई करण्याचे धैर्य दाखवले नाही; कारण त्या वेळीही सनातनच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नव्हते.
      २. काँग्रेसच्या कार्यकाळात केंद्रीय गृह विभागाने महाराष्ट्रातील स्वतःच्याच पक्षाने सनातनवरील बंदीविषयीचा पाठवलेला १ सहस्र पानांचा अहवाल फेटाळला होता.
      ३. सध्याचे महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी अकोला येथेे खाजगी वृत्तवाहिनीशी बोलतांना सनातनवर बंदीसाठी पुरावे नाहीत, असे स्पष्ट केले होते.
      ४. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी १ नोव्हेंबर २०१५ या दिवशी सनातन संस्थेवर बंदी घालू शकणार नाही, असे लोकसभेत स्पष्ट केलेे आहे.

      तपासात अंनिसचा हस्तक्षेप संशयास्पद !

      १. पानसरेंच्या हत्येच्या वेळी दुचाकी वापरण्यात आली, असा पोलिसांच्या प्रथमदर्शनी अहवालामध्ये कोणताही उल्लेख नसतांना हमीद दाभोलकरांनी प्रसारमाध्यमांमध्ये दुचाकी वापरण्यात आली, असे खोटे वृत्त पसरवले. त्यानंतर हत्येच्या दुसर्‍या दिवशी एका मुलाने मारेकर्‍यांना दुचाकीवरून पळून जातांना पाहिले, अशी कपोलकल्पित कहाणी सांगितली.
      २. समीर गायकवाडच्या खटल्यात शासकीय बाजू मांडण्यासाठी महागड्या अधिवक्त्यांची नेमणूक करण्यासाठी अंनिसवाल्यांनी शासनावर दबाव आणला. या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यासाठी हे अधिवक्ता प्रयत्न करत आहेत. हे अधिवक्ता पूर्वी बनावट मुद्रांक घोटाळ्यातील मुख्य गुन्हेगार अब्दुल करीम तेलगी याचा अधिवक्ता होते.

      सनातनच्याच साधकांची चौकशी का ?

      १. डॉ. दाभोलकर यांची हत्या होण्यामागे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कारभारातील घोटाळा असण्याची शक्यता आहे. अंनिसच्या या घोटाळेबाज कारभाराविषयी हिंदु विधीज्ञ परिषदेने वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची चौकशी केल्यास खरे आरोपी सापडण्याची अधिक शक्यता आहे. 
      २. वर्ष २०१० ते २०१३ या कालावधीत (डॉ. दाभोलकर यांची हत्या होण्यापूर्वीपासून) सनातनने आणि हिंदु विधिज्ञ परिषद यांनी अंनिसच्या आर्थिक घोटाळ्यांसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्यांनी १५ वर्षांचे जमाखर्च अहवाल सादर केले नव्हते. त्यांच्या अहवालात जो जमिनींसंदर्भात व्यवहार सांगितला होता, त्या जमिनी नंतर विकण्यात आल्या होत्या. आवश्यक अनुमती नसूनही त्यांनी विदेशातून पैसे घेतले होते.

      सीबीआयवर नियंत्रण कोणाचे ?

      १. सनातनच्या संदर्भात अन्वेषणाची सगळी माहिती प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्धीस दिली जात आहे; मात्र सीबीआयवाले पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर ती माहिती का ठेवत नाहीत ? यावरून सीबीआयचा खोटारडेपणा उघड होतो.
      २. सीबीआय देत असलेल्या प्रत्येक सनातनविरोधी अहवालाला १ दिवस आधी आशिष खेतान या भ्रष्ट पत्रकाराने प्रसिद्धी दिली. यावरून सीबीआयवर कोणाचे नियंत्रण आहे, हे स्पष्ट होते.
           सनातन संस्थेच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याकडे विश्‍वभरातील जिज्ञासू आकृष्ट होतात आणि भारतातील खुज्या विचारसरणीचे पुरोगामी मात्र सनातनवर चिखलफेक करण्यात धन्यता मानतात !

      तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

           इस्लाम हा जर शांतताप्रिय धर्म आहे, तर कुराण आणि बंदुकांचा वापर या दोन्ही गोष्टी शिक्षण संस्थांमध्ये का शिकवतात ?  - पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस

      सनातन संस्था हिंदूंसाठी कलंक आहे, असे म्हणणारे आपचे नेते आशिष खेतान यांना त्यांच्या नेत्यावर झालेला भ्रष्टाचाराचा आरोप गौरवास्पद वाटतो का ?

           आपचे माटिया आमदार आसिम अहमद खान यांच्यावर सरफराज नावाच्या एका बांधकाम व्यवसायिकाने १५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला आहे. पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांना मारहाण करण्यात आली.

      हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याप्रमाणे कार्य करा !

           आपल्याला दुष्प्रवृत्तीचे भय नाही, केवळ निष्क्रीयतेचे भय आहे. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याप्रमाणे अनेक संघटनांनी पुढे यायला हवे अन् संतांना एकत्रित करण्यासाठी कार्ययोजना बनवली पाहिजे.
      - प.पू. श्रीराम बालकदासजी महात्यागी महाराज, संरक्षक, छत्तीसगढ गोसेवा आयोग.

      दैनिक लोकमतमध्ये ३ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखाचे खंडण


       सनातनला विवेकी सूज्ञ नागरिकच जाणू शकतात !
           दैनिक लोकमतच्या ३ जून या दिवशीच्या पृष्ठ ६ वरील संपादकियात आपण 'सनातन्यांचे काय करायचे ?' या मथळ्याखाली लेख प्रसिद्ध केला आहे. या लेखातून संपादकांनी पुन्हा एकदा सनातनविषयीचा त्यांच्या मनातील द्वेष प्रकट केला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. एकूणच लेख वाचकांची दिशाभूल करणारा आहे. वाचकांसाठी येथे वस्तूस्थिती मांडत आहोत.

      कपोलकल्पित बातम्यांच्या आधारे सनातनद्वेषाचा कंड शमवणारे दैनिक लोकमतचे संपादक राजू नायक !

          दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी हत्या प्रकरणात सनातनचे साधक गुंतले असल्याच्या प्राथमिक निष्कर्षाप्रतसुद्धा अन्वेषण यंत्रणा आलेल्या नाहीत. उच्च न्यायालयाने तर यातील तपासाला बालीश तपास असे संबोधून या प्रकरणाच्या तपासातील हवाच काढून घेतली आहे आणि त्याचबरोबर कपोलकल्पित म्हणजेच एखाद्या चित्रपटाची संहिता लिहितात तसा अहवाल असल्याचे ताशेरे ओढले आहेत. यातूनच खरेतर या तपासाचे चित्र स्पष्ट होते; परंतु ज्यांच्या विवेकाचाच र्‍हास झाला आहे असे काही सनातनद्वेष्टे उदा. अंनिसवाले, नक्षलवाद्यांशी संबंध असलेले साम्यवादी यांना हे चित्र दिसत नाही. त्यांना माध्यमांनी खरडलेल्या सनातनविरोधी कपोलकल्पित गोष्टी खर्‍या वाटतात. दैनिक लोकमतचे राजू नायक यांनी आपणही त्यातलेच एक असल्याचे १९ जूनच्या दैनिक लोकमतमध्ये सनातनी... नव्हे ! विकृत ! या मथळ्याखालील लेखात अशाच काही कपोलकल्पित गोष्टी घुसडून सिद्ध केले आहे. या लेखातील काही सूत्रांवरील खंडण येथे देत आहोत.

      सनातन संस्थेला संकेतस्थळाच्या माध्यमातून हिंदूंकडून मिळणारा पाठिंबा !

      १. कोणत्याही शिकलेल्या आणि डोळस विचाराच्या माणसाला सनातन संस्था कळेल ! - शेखर कदम
      सनातन संस्था केवळ कर्मकांड शिकवते. त्यांच्या लिखाणाकडे थोडे पहा. कोणत्याही शिकलेल्या आणि डोळस विचाराच्या माणसाला सनातन संस्था कळेल. कधी तुम्हाला संत तुकाराम समजणार देव जाणे ?
      २. कुठल्याही खटल्यात सनातन आरोपी नाही, मग कसली बंदी ? - बाळा नाडकर्णी
      आजवर देशातील न्यायालयात प्रविष्ट असलेल्या कुठल्याही खटल्यात सनातन संस्था आरोपी नाही. मग कसली बंदी घालणार आहात ?

      परात्पर गुरूंनी साधकांमधील भावजागृतीसाठी केलेल्या संकल्पाचा लाभ करून घेऊया !

      गुरुपौर्णिमा मास २०१६ 
               १९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व १ सहस्रपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.

      हिंदुत्वनिष्ठांनो, खोटे पुरावे निर्माण करून हिंदुत्वाला, म्हणजे सनातनला दडपणार्‍या अन्वेषण यंत्रणांपासून सावधान !

           सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या अटकेचा आणि त्यानंतरच्या चौकशीचा वृत्तांत विविध प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होत आहे. यात 'वरिष्ठांनी प्रोजेक्ट दाभोलकर उपक्रमावर डॉ. तावडे यांची नियुक्ती केली होती', 'डॉ. तावडे यांनी शस्त्रास्त्रे मिळवण्यासाठी काही जणांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या','डॉ. तावडे डॉ. दाभोलकरांच्या विरोधात बोलले होते', 'डॉ. तावडे यांना हिंदु राष्ट्रासाठी १५००० जणांचे सैन्य उभारायचे होते' आदी माहिती अन्वेषण यंत्रणांना प्राप्त झाल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे. खर्‍या गुन्हेगारांपर्यंत पोहोचता येत नसेल, तर खोटे पुरावे निर्माण करून निरपराध नागरिकांना अडकवण्यात अन्वेषण यंत्रणा वाक्बगार असतात, हे आतापर्यंत अनेक घटनांमधून सिद्ध झाले आहे.

      इंग्रजी भाषेची विशेष ओढ आणि आवड असलेल्या श्री. शॉन क्लार्क यांना संस्कृत (मराठी आणि हिंदी) अक्षरांतील सात्त्विकतेच्या संदर्भात आलेली अनुभूती

      श्री. शॉन क्लार्क
      १. इंग्रजी भाषेची विशेष ओढ असल्याने देवनागरी 
      लिपीचे आकर्षण न वाटणे
            माझा जन्म भारतात झाला असला, तरी माझे संगोपन इंग्रजी रितीनुसार झाले आहे. मानसिकदृष्ट्या मला इंग्रजी भाषेची विशेष ओढ आहे. हिंदी माझी मातृभाषा नसल्याने देवनागरी लिपीचे मला आकर्षण वाटत नव्हते. 
           प.पू. गुरुदेवांच्या मार्गदर्शनानुसार केलेल्या विविध भाषांच्या प्रयोगांवरून, तसेच बायोफीडबॅक मशीनद्वारा मिळालेल्या निष्कर्षावरून संस्कृत भाषा ही सर्वांत अधिक सात्त्विक भाषा असून मराठी भाषा हीसुद्धा अधिक सात्त्विक भाषेतच गणली जात असल्याचे शिकायला मिळाले आणि मी ते सूक्ष्म स्तरावर अनुभवलेसुद्धा.

      रामनाथी आश्रमाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय

               १९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन झाले. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली. त्यांनी दिलेले अभिप्राय येथे देत आहोत.
      १. हा आश्रम एखाद्या ऋषींच्या आश्रमासारखा आहे ! : आश्रमाचे व्यवस्थापन, नियोजन, साधकांमधील भाव आणि आश्रमात असणारे चैतन्य या गोष्टी सत्ययुगातील गुरुकुल परंपरेहून अल्प नाहीत. हा आश्रम एखाद्या ऋषींच्या आश्रमासारखा आहे. - डॉ. अजयकुमार जैस्वाल, अध्यक्ष, भारत विकास परिषद, वाराणसी, उत्तर प्रदेश. (२०.६.२०१६)

      सनातन संस्था - जीवन उद्धारासाठी भगवंताने निर्मिलेली कार्यशाळा !

      परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
      यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...
              सनातन संस्था ही एक प्राणज्योत आहे, जी मरगळलेल्या जिवाला पुनर्जीवित करते. ती स्वतः नित्य नूतन अवस्थेत चैतन्यमय स्वरूपातून कार्य करत असते. ती स्वसंवेद्य आहे. ती स्वतः आत्मस्वरूपातून प्रत्येकाच्या हृदयात राहून कार्य करते. ती सर्व चराचर प्राणीमात्रांत परिपूर्ण अशा चैतन्याने भरली आहे; परंतु ते चैतन्य सूक्ष्म स्वरूपात असल्यामुळे सर्वसामान्य जनांना ओळखता येत नाही.
      प.पू. परशराम पांडे
              सनातन संस्था हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्म रूप आहे. ते सर्वत्र परिपूर्ण आणि सर्वांच्या अंतस्थ आत्मस्वरूपात असल्यामुळे आपल्या जवळच आहे; परंतु श्रद्धारहित अज्ञानी पुरुषांना हे कळत नसल्याने हा परमात्मा त्यांच्यापासून दूर आहे. तेव्हा अशा अश्रद्ध जनांनी आपली मायेने बरबटलेली, घाण झालेली (स्वभावदोष आणि अहंयुक्त वृत्ती) वृत्ती टाकून सनातन संस्थेत आल्यास सनातन संस्था त्या जिवांस साधनेद्वारे त्याच्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन कसे करायचे ?, हे शिकवील. त्यामुळे त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त होऊन सत्य काय ?, ते कळायला लागेल. सर्व चराचर सृष्टी भगवंतानेच निर्माण झाली आहे. तोच तिचा कर्ता आहे. चराचराला व्यापलेला अविनाशी परमात्मा सर्वत्र समभावाने पहातो, तोच सच्चिदानंद परमात्मा सर्व जिवांना आनंद देतो, हे त्यांच्या लक्षात येईल.

      विज्ञान आणि अध्यात्म यांतील मूलभूत भेद

      श्री. नारायण पाटील
            पुढील सारणीत विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील भेद अतिशय सोप्या भाषेत दिला आहे. यातून समाजाला अध्यात्माची महती सहजरित्या समजू शकेल. 

      कर्नाटक येथील कोडीमठ शिवानंद शिवयोगी राजेंद्रस्वामी यांचे कालज्ञान भविष्यवाचन !

              कोडीमठ शिवानंद शिवयोगी राजेंद्रस्वामी हे कर्नाटक विश्‍वविद्यालयाचे एम्.एस्.सी. पदवीधर आहेत. ते १९८३ मध्ये कोडीमठाचे धर्माध्यक्ष झाले. ते ६९ वर्षांचे असून या वीरशैव मठाचे ५७वे अधिपती आहेत. कालज्ञानावर आधारित भविष्याचे विश्‍लेषण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. कोडीमठ क्षेत्रामधे जिवंत समाधी घेतलेल्या थोरल्या श्रींच्या तपःशक्तीमुळे त्यांना वाक्सिद्धी प्राप्त झाली आहे. ते म्हणतात, माझी वचने सत्यात उतरत असल्याच्या भीतीने भविष्य सार्वजनिकपणे उघड करू नये, असा दबाव असल्यामुळे मी राजकारण्यांपासून दूरच असतो.
      १. विज्ञानाला तोंडात बोटे घालायला लागावी, असे भविष्य सांगण्यात या गादीवर बसणार्‍यांचा सिद्धहस्त असणे : हे पिठाधिकार मिळवण्यासाठी, म्हणजेच या पिठाचे उत्तराधिकारी होण्यासाठी पदोपदी अग्निपरीक्षा द्यावी लागते; कारण ही गादी नीलमज्जय्या (सिद्ध शिवयोगी नीलकंठस्वामी) यांची जागृत गादी असल्याचे सांगण्यात येते. या गादीवर बसणारे विज्ञानाला तोंडात बोटे घालायला लागावीत, असे भविष्य सांगण्यात सिद्धहस्त आहेत. सामान्य लोकांच्या समस्यांपासून राष्ट्रनायकांपर्यंतच्या समस्यांना हे पर्याय सांगतात, अशी त्यांची ख्याती आहे.

      दुकानात जाऊन पैसे मोजून वस्तू विकत घ्याव्यात, त्याप्रमाणे संगीत शिक्षकाकडून प्रमाणपत्र मागणारे पालक !

             पाश्‍चात्य संगीत २ वर्षे शिकल्यानंतर पहिल्या वर्षीची परीक्षा देता येते, असे सांगूनही मला एका पालकाने त्यांचा मुलगा शिकवणी वर्गात येऊन ३-४ मासच झाल्यावर प्रमाणपत्र हवे, असे सांगितले. काही पालकांनी मला मुलांच्या परीक्षा घ्या आणि प्रमाणपत्र द्या, असे सांगितले. मी त्यांना म्हणालो, दुकानात पैसे देऊन वस्तू मिळतात, तसे पैसे घेऊन मी प्रमाणपत्र देत नाही. मी आरंभीच तुम्हाला मुलांना छंद म्हणून शिकायचे आहे, त्याला चांगला कलाकार बनायचा आहे कि पूर्ण संगीत शिकायचे ?, हे विचारले होते, तसेच पाश्‍चात्य संगीत आणि भारतीय संगीत शिकायला अन् आचरणात आणायला किती वर्षे लागतील, याचीही कल्पना दिली होती.
      - श्री. सुनील दत्तात्रय रेडकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.३.२०१६)

      मंदिरात सेवेसाठी येणारे गोव्यातील आदर्श वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी !

              नुकत्याच पार पडलेल्या श्रीरामनवमी उत्सवानिमित्त बांदोडे (गोवा) येथील श्री महालक्ष्मी मंदिरात दुपारी आरती झाली आणि सर्वजण महाप्रसादाला सभागृहात जमा झाले. या वेळी महाप्रसाद घेतांना माझ्यासमोर शासनातील एक वरिष्ठ शासकीय अधिकारी माझ्या समोरच्या खुर्चीत जेवायला बसले. त्यांच्याबरोबर झालेल्या संभाषणावेळी ते या मंदिरात बर्‍याच वेळा येऊन देवीची सेवा करतात, असे समजले. सेवा केल्यामुळे अहंभाव अल्प होण्यास साहाय्य होतेे. अधिकारी असल्यामुळे कधी कधी विदेशी दौर्‍यावर असतांना मिळणारा मानसन्मान, नोकर-चाकर, सुरक्षारक्षक आदींमुळे अहंभाव वाढतो. मंदिरात येऊन सेवा केल्यामुळे मनाला समाधान मिळते आणि अहंभावही अल्प होतो, असे या अधिकार्‍याने प्रांजळपणे सांगितले. हे अधिकारी कामातही अत्यंत प्रामाणिक आहेत. असे अधिकारी सर्व शासकीय अधिकार्‍यांसाठी आदर्श आहेत.
      - श्री. नारायण नाडकर्णी, फोंडा, गोवा

      अंनिसचे डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला सनातनला नाहक उत्तरदायी ठरवून पोलीस चौकशीला आल्यास डगमगून न जाता खंबीर रहा !

      साधकांना सूचना

      अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्थेला आणि साधकांना नाहक गोवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. पोलीस चौकशीला आल्यास साधकांनी घाबरून न जाता, पोलिसांनी विचारलेल्या प्रश्‍नांना योग्यप्रकारे शांतपणे उत्तरे द्यावीत. कारण सनातन संस्थेचे सर्व कार्य वैध मार्गाने चालते. यापूर्वीही अशा घटनांमध्ये साधकांची चौकशी करण्यात आलेली आहे; मात्र अशा चौकशांमधून काहीही निष्पन्न झालेले नाही. 'कर नाही, त्याला डर कशाला' या उक्तीप्रमाणे आपण काहीही केलेले नसल्यामुळे साधकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.

      भगवान श्रीकृष्ण पाठीशी असल्यामुळे साधकांनी अशा प्रसंगांत कोणतीही भीती न बाळगता प्रार्थना आणि नामजप करत खंबीरपणे प्रसंग हाताळावा.

      ध्यानमंदिरात जपाला बसल्यानंतर अकस्मात् नेहमीच्या जपाऐवजी श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले, जय गुरुदेव असा जप चालू होऊन वेगळाच उत्साह अनुभवणे

              १२.३.२०१६ या दिवशी सकाळी मी ध्यानमंदिरात जपाला बसल्यानंतर अकस्मात् नेहमीच्या जपाऐवजी माझा श्रीश्रीजयंत बाळाजी आठवले, जय गुरुदेव असा जप चालू झाला आणि मी एक वेगळाच उत्साह अनुभवला. त्यानंतर ज्याप्रमाणे आपण हर हर महादेव, जय श्रीकृष्ण असे उच्चारण करतो, त्याचप्रमाणे जय गुरुदेव, असे उच्चारण केले, तर उत्तम होईल, असे मला वाटले. नंतर १३.३.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये महर्षींनी सर्व साधकांना ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव । असा नामजप करण्यासंदर्भातील चौकट वाचल्यानंतर माझे मन आनंदित झाले. 
      - श्री. राजा सप्तर्षी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.३.२०१६)

      इस्लामिक देशातील विमानसेवा देणार्‍या आस्थापनाकडून धर्माभिमान शिका !

            २९.२.२०१६ या दिवशी मी कामानिमित्त अमेरिकेला जात होतो. मुंबईहून जातांना Etihad Airways या आस्थापनाच्या विमानाचे तिकीट होते. विमानातील सर्व ध्वनीक्षेपक यंत्रणेवर उड्डाणापूर्वी कुराणमधील प्रवासापूर्वीची पवित्र प्रार्थना लावण्यात आली. तेव्हा माझ्या मनात विचार आला की, समजा एअर इंडियाच्या विमानात गीतेतील प्रार्थना लावली, तर सर्व निधर्मी लोक धुमाकूळ घालतील !
      - श्री. नीलेश पाध्ये, फोंडा, गोवा. (५.६.२०१६)

      साधकांनो, चौकशीसाठी येणार्‍या पोलिसांपासून सतर्क रहा !

      पोलीस चौकशी करण्याच्या निमित्ताने आश्रमात किंवा घरी येतील, तेव्हा ते काही शस्त्रास्त्रेे अथवा आक्षेपार्ह वस्तू आश्रमात ठेवून मग छापा घालून ती जप्त केली, असे दाखवतील. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीच्या संदर्भात सावधानता बाळगा ! याची काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत.

      १. कोल्हापूर येथील एका हॉटेल मालकाला फसवण्यासाठी पोलिसांनीच हॉटेलमध्ये अमली पदार्थ ठेवले होते.

      २. आनंद संप्रदायाच्या आश्रमात पोलिसांनी प्लास्टिकच्या मानवी कवट्या ठेवून त्यांची मानहानी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली होती. संप्रदायाच्या गुरूंचे कारागृहातच निधन झाले. ही गोष्ट ३५ वर्षांनंतर एका निवृत्त पोलीस अधिकार्‍याने उघड केली.

      सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना

      पोलिसांनी केलेल्या चौकशीची माहिती 
      त्वरित दैनिक सनातन प्रभातला कळवा !
             डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांची ठिकठिकाणी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी प्रत्यक्ष बोलावून, घरी येऊन किंवा भ्रमणभाषवर संपर्क करून चौकशी केल्यास त्या चौकशीची माहिती (कोणत्या दिवशी चौकशी झाली, काय प्रश्‍न विचारले, पोलिसांचे नाव, पोलीस ठाणे, किती वेळा चौकशी केली आदी सर्व तपशील) नजीकच्या दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयात त्वरित पाठवावा. आपल्या जिल्ह्यातील साधक किंवा कार्यकर्ते यांनी झालेल्या चौकशीचा तपशील पाठवला आहे कि नाही, याचा जिल्हा समन्वयकांनी आढावा घ्यावा.
      इ-मेल : panveldainik@gmail.com
      संपर्क : ९४०४९ ५६०८७

      पोलिसांच्या नाहक छळाला बळी पडलेल्या निरपराध नागरिकांनी त्यांचे अनुभव सनातन प्रभातला कळवावेत !

             पोलिसांनी गुन्हेगार म्हणून पकडलेले ९१ टक्के आरोपी निर्दोष सुटतात, असे गुन्हे अन्वेषण विभागाने प्रकाशित केलेल्या महाराष्ट्रातील गुन्हे २०१० या अहवालातून उघड झाले आहे. यावरून असे लक्षात येते की, भारतातील पोलिसांनी अशा लाखो निरपराध नागरिकांना गुन्हेगार ठरवून त्यांचा छळ केलेला असतो. निष्पाप असूनही पोलिसांचा छळ अनुभवणार्‍या नागरिकांनी त्यांचे अनुभव सनातन प्रभातच्या कार्यालयात (फॅक्स : ०८३२ - २३१८१०८ किंवा इ-मेल dspgoa1@gmail.com) पाठवावेत. - संपादक

      सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना !

      सनातन संस्था अथवा समिती यांच्याविषयी प्रसारमाध्यमांकडून प्रसारित होणार्‍या मानहानीकारक वृत्तांची माहिती तत्परतेने कळवा !

      डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केल्यानंतर विविध राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही वृत्तवाहिन्या अन् नियतकालिके यांच्याकडून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी मानहानीकारक वृत्ते प्रसारित केली जात आहेत. साधकांनी अशा अपप्रचारामुळे किंचितही डगमगून जाऊ नये. सदर नियतकालिकाचा एक अंक विकत घ्यावा. या वृत्ताविषयी कायदेशीर कारवाई होेऊ शकते का, हे कायदेतज्ञांकडून जाणून घेण्यासाठी संबंधित वृत्ताचे छायाचित्र काढून व्हॉट्स अ‍ॅपवरून श्री. शिवाजी वटकर यांना (संपर्क क्रमांक ८४५१००६१११) पाठवावे. त्यासोबत नियतकालिक आणि आवृत्तीचे नाव, प्रसिद्धी दिनांक, पृष्ठ क्रमांक आदी माहिती कळवावी. शक्य असल्यास सदर वृत्त स्कॅन करून इ-मेलने (hjs.karya@gmail.com) पाठवावे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी अंक कुठे पाठवायचा, हे संबंधित साधकांना कळवले जाईल.

      गुरुपौर्णिमेला १६ दिवस शिल्लक

            पिता हा पुत्राला केवळ जन्म देतो, तर गुरु त्याची जन्ममरणातून सुटका करतात; म्हणून पित्यापेक्षाही गुरूंना श्रेष्ठ मानले आहे.

      साधकांना सूचना

      पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
      प्रारंभ - ज्येष्ठ कृष्ण पक्ष चतुर्दशी (३.७.२०१६) सायं ६.५३ वाजता
      समाप्ती - ज्येष्ठ अमावास्या (४.७.२०१६) दुपारी ४.३१ वाजता
      उद्या अमावास्या आहे.

      व्यष्टी आणि समष्टी साधनेसंदर्भात काही कृतीच्या स्तरांवरील सूत्रे

             २७ ते ३० जून २०१६ या काळात रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात हिंदु जनजागृती समितीचे अखिल भारतीय साधनावृद्धी शिबीर झाले. या निमित्ताने व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भात येणार्‍या अडचणींना सामोरे कसे जावे, याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनातील काही सूत्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.
      १. स्वभावदोष आणि 
      अहं निर्मूलन प्रक्रियेचे लाभ
      अ. प्रक्रियेतील सर्वच जण स्वतःच्या आणि इतरांच्या चुका मोकळेपणाने सांगतात. ते काही दिवस पाहिले की, स्वतःच्या चुका सांगायची लाज वाटत नाही. तसे झाले की, स्वतःची प्रतिमा जपणे, तसेच अहंभाव अल्प होण्यास आरंभ होतो.
      आ. आपल्याकडून एखादी चूक होत नसली आणि ती दुसर्‍याकडून होत असली, तरी तिच्या संदर्भातील प्रक्रियेत दिलेले दृष्टीकोन शिकल्यास पुढे आपल्याकडून ती चूक होणे टळते.

      परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

      (परात्पर गुरु) डॉ. आठवले
      वापरा आणि फेका हे तत्त्व वृद्ध 
      आई-वडिलांच्या संदर्भात वापरणारी तरुण पिढी !
             वापरा आणि फेका (Use and Throw) ही जी पाश्‍चात्त्यांची आधुनिक संस्कृती आहे, ती आता अनेक तरुणांंनीही आत्मसात केली आहे. त्यामुळे ज्या आई-वडिलांनी जन्म दिला, जन्मापासून स्वावलंबी होईपर्यंत सर्व तर्‍हेने काळजी घेतली, उदा. आजारपणात सर्व केले, शिक्षण दिले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता न वाटता हल्लीचे आंग्लाळलेले तरुण आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणी वापरा आणि फेका या पाश्‍चात्त्यांच्या आधुनिक संस्कृतीनुसार वृद्धाश्रमात पाठवतात किंवा त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. याचे पाप त्यांना जन्मोजन्मी भोगावेच लागणार आहे.
      - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

      ॥ हरि ॐ तत्सत् ॥

      संत भक्तराज
      सनातनचे श्रद्धास्थान
      माया आणि परमेश्‍वर
      अ. परमेश्‍वराची माया समजून घेऊन आहे तिथेच समाधानाने रहावे.
      भावार्थ : माया समजून घेऊन म्हणजे मायेतील ब्रह्म समजून घेऊन. ते झाले की समाधान, आनंदच आहे.
      आ. परमेश्‍वर पहाण्यापेक्षा परमेश्‍वराच्या रचनेची जाणीव करून घेणे, हेच खरे ज्ञान.
      भावार्थ : परमेश्‍वराची रचना म्हणजे माया. तिची खरी जाणीव, ओळख करून घेणे, म्हणजेच मायेतील ब्रह्म ओळखणे. हेच खरे ज्ञान.
      (संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)


      योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

      सत्याची कास कधीही सोडू नये ! 
      परमेश्‍वराची साथ नित्य रहावी, ही इच्छा असेल, तर कधीही सत्याची 
      कास सोडू नये. सतत सत्याचे अधिष्ठान ठेवावे ! 
      ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
      ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
      (योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

      पाकप्रेमी महाभाग !

      संपादकीय 
           सुधींद्र कुलकर्णी यांनी मुंबई-कराची फ्रेंडशिप फोरमच्या नावाखाली पाकच्या छायाचित्रकारांना भारतात बोलावून कलेची तथाकथित देवाण-घेवाण करण्याचा घाट घातला आहे. हे ऐकून ज्यांना काहीही वाटत नाही, अशी असंवेदनशील जनता देशात भरपूर आहे. शिवसेना पक्ष वगळता कोणीच या देशद्रोही कृतीच्या विरोधात आवाज उठवला नाही कि साधा निषेधही केला नाही. राष्ट्राभिमान बाळगून कृती करण्याचा पुरुषार्थ सध्यातरी केवळ शिवसेनेमध्येच आहे, हे वास्तव त्यामुळे स्पष्ट होते. पाकिस्तानी छायाचित्रकारांसाठीच्या तस्बीर-ए-मुंबई-तस्बी या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी प्रेस क्लब ऑफ मुंबई येथे आयोजित कुलकर्णी यांची पत्रकार परिषद शिवसैनिकांनी उधळली आणि कुलकर्णी या पाकप्रेमी महाभागाची करणी उघड झाली. पाकविषयी प्रेमाचा पुळका असलेले जे थोडे-फार लोक देशात आहेत, त्यांच्यापैकी सुधींद्र कुलकर्णी हे एक आहेत, असे म्हणायला पुराव्यादाखल भूतकाळातीलही अनेक प्रसंग आहेत.
      धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
      धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn