Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

संत निवृत्तीनाथ महाराज यांची आज पुण्यतिथी


इसिसचे आतंकवादी भाग्यनगरच्या भाग्यलक्ष्मी मंदिरात गोमांस फेकून दंगल घडवणार होते !

आतंकवाद्यांना धर्म असतो, हे आतातरी ढोंगी पुरोगामी मान्य करणार आहेत का ?
     भाग्यनगर - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) येथून २९ जूनला अटक केलेले ५ आणि संशयित म्हणून कह्यात घेतलेले ६ आतंकवादी भाग्यनगरमध्ये दंगल घडवण्याच्या सिद्धतेत होते. यासाठी ते येथील प्रसिद्ध श्री भाग्यलक्ष्मी मंदिरात गोमांस फेकणार होते. तसेच महनीय व्यक्तींवरही आक्रमण करणार होते. हे रमझानच्या महिन्यातच करण्याचा त्यांचा डाव होता. यासाठी ते शक्तीशाली बॉम्ब बनवत होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये २ संगणक अभियंता आहेत. (मागासलेपणामुळे आणि अशिक्षित असल्याने मुसलमान तरुण जिहादी आतंकवादाकडे वळतात, हे खोटे ठरवणारे उदाहरण ! - संपादक)

जिहादी आतकंवादी हाफीज सईदचा मेहुणा अब्दुल मक्की याची गरळओक ! (म्हणे) भारतीय सैनिक म्हणजे गिधाडे !

भारत सरकार कणाहीन असल्याने भारतीय सैनिकांची क्षमता
असतांनाही ते पाकचा नायनाट करू शकत नाहीत, हे देशाचे दुर्दैव !
भारतीय शासनकर्त्यांनी सैन्याचे खच्चीकरण केल्यामुळे आतंकवाद्यांना असे बोलण्याचे धाडस होत आहे !
     नवी देहली - पाकस्थित आतंकवादी संघटना जमात-उद-दवाचा प्रमुख हाफीज सईद याचा मेहुणा अब्दुल रेहमान मक्की याने भारतीय सैनिकांची तुलना गिधाडांशी करतांना म्हटले आहे की, पम्पोर येथे आक्रमण झाले, तेव्हा भारतीय प्रसारमाध्यमे ओरडत होती, आमचे हिरो प्रशिक्षण संपवून बसने येत असतांना २ आतंकवाद्यांनी त्यांना घेरले; पण मी म्हणतो, हिरो नव्हे, गिधाडांच्या ताफ्याला २ वाघांनी घेरले.
     जम्मू-काश्मीरमधील पम्पोर येथे २६ जूनला झालेल्या २ आतंकवाद्यांच्या आक्रमणात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ८ पोलीस हुतात्मा झाले होते. या आक्रमणानंतर दुसर्‍याच दिवशी गुजरानवाला येथे जमात-उद-दवाच्या सभेत मक्की याने हे वक्तव्य केले.

जम्मू-काश्मीरमध्ये २ आतंकवादी ठार, तर दोघे अटकेत !

अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांना आजन्म पोसण्यापेक्षा
तात्काळ खटला चालवून त्यांना फासावर लटकवले पाहिजे !
      श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये ३० जूनला सकाळी सुरक्षादलाच्या कारवाईत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. या वेळी आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २ पोलीस घायाळ झाले. दुसर्‍या एका घटनेत बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे सकाळी सुरक्षारक्षकांनी हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेच्या २ आतंकवाद्यांना अटक केली. शौकत अहमद भट आणि तन्वीर अहमद दार अशी या आतंकवाद्यांची नावे आहेत. या आतंकवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. २८ जूनला सुरक्षारक्षकांसमवेत झालेल्या चकमकीत ठार झालेला हिजबुलचा कमांडर समीर अहमद वाणी याचे ते सहकारी असल्याचे सांगण्यात येत आहे.


राजस्थान महिला आयोगाच्या सदस्याने काढला बलात्कार पीडितेसोबत सेल्फी !

महिला आयोगाची असंवेदनशीलता !
      जयपूर - उत्तर जयपूरमधील महिला पोलीस ठाण्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा सुमन शर्मा या आयोगाच्या सदस्या सौम्या गुर्जर यांच्यासह बलात्कार पीडितेची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. या वेळी गुर्जर यांनी त्या पीडितेसोबत सेल्फी (भ्रमणभाषवरून स्वत:च स्वत:चे छायाचित्र काढणे) काढला. या सेल्फीमध्ये अध्यक्षा शर्माही दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी हा सेल्फी व्हॉट्सअ‍ॅपवरून शेअर केला. यामुळे वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी आयोगाच्या अध्यक्षांनी लेखी खुलासा मागवला आहे.

इफ्तार पार्टी आयोजित करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हिंदू महासभेची टीका !

इफ्तार पार्टी देणारा संघ कधी नवरात्री किंवा हिंदूंचे अन्य उत्सव का साजरा करत नाही ?
      नवी देहली - येथे २ जुलैला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असणार्‍या मुस्लिम राष्ट्रीय मंचकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून टीका केली जात असतांना आता अखिल भारत हिंदू महासभेनेही टीका केली आहे. महासभाने संघावर मुसलमानांचे लांगूलचालन करण्याचा आरोप करत पार्टी रहित करून क्षमा मागण्याची मागणी केली आहे. संघाने यापूर्वीच मुस्लिम राष्ट्रीय मंचाचा संघाशी संबंध नसल्याचे म्हटले आहे; मात्र यावर कोणीही विश्‍वास ठेवण्यास सिद्ध नाही.

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे शिष्य स्वामी गोविंदानंद यांना शिर्डीमध्ये (जिल्हा नगर) एक दिवसाची प्रवेशबंदी

     नगर, ३० जून - शारदा आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे शिष्य स्वामी गोविंदानंद यांना शिर्डीमध्ये २८ जून या दिवशी प्रवेशबंदी करण्यात आली होती. त्यांच्याकडून शिर्डी येथील एका संमेलनाला विरोध दर्शवण्यात आला होता. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा कार्यक्रम होऊ शकलेला नाही.
     शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी श्री साईबाबा यांच्या संदर्भात काही वक्तव्ये केली होती. शिर्डी येथे भाग्यनगर येथील शिवशक्ती शिर्डी साई सामुग्रह महापिठाच्या वतीने २८ जून या दिवशी एक संमेलन आयोजित केले होते. त्या संमेलनाला शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेची एकूण स्थिती पाहून पोलिसांनीच या कार्यक्रमाला अनुमती नाकारली होती.

भारत आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या बराक-८ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी !

     बालासोर - भारत आणि इस्रायल यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या बराक-८ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ३० जूनला सकाळी ओडिशाच्या किनारपट्टीवरील चंडीपूर येथील संरक्षण तळावरून घेण्यात आली. ७० किमी पर्यंत लक्ष्याचा भेद करू शकणारे हे क्षेपणास्त्र रडारच्या कक्षेत येत नाही.

केदारनाथ मंदिराचा पाया कमकुवत होत आहे !

जगप्रसिद्ध केदारनाथ मंदिर
      डेहराडून (उत्तराखंड) - वर्ष २०१३ च्या जलप्रलयामध्ये भक्कमपणे टिकून राहिलेल्या केदारनाथ मंदिराचा पाया कमकुवत झाला असून त्यामुळे मंदिराच्या पुढच्या भागातील भिंत किंचित झुकल्याचे आयआयटी चेन्नईच्या अहवालामध्ये म्हटले आहे. मंदिराच्या संरक्षणाचे दायित्व असलेल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने हा पाया सशक्त करण्यासाठी परिसरातील पृष्ठभागाला जलरोधक (वाटरफ्रूप) बनवण्याचे काम चालू केले आहे.

पाकिस्तानी नागरिकांची स्विस बँकांमधील ठेवींत वाढ !

     जिनेव्हा - स्विस बँकांतील भारतियांच्या ठेवींमध्ये घट होत असतांना पाकिस्तानी नागरिकांच्या ठेवी मात्र १६ टक्क्यांनी म्हणजे १० सहस्र कोटी रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. गेल्या २ वर्षांतील ही सलग दुसरी वाढ असून चिनी नागरिकांच्या ठेवींत मात्र घट झाली आहे.

काबूलमध्ये सैन्याच्या बसवरील आक्रमणात ४० सैनिक ठार !

     काबूल (अफगाणिस्तान) - येथे ३० जूनला सकाळी सैन्यात नव्याने भरती झालेल्या सैनिकांना घेऊन जाणार्‍या बसवर झालेल्या आत्मघाती आक्रमणात ४० सैनिक ठार झाले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. तालिबानने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे. सैनिकी शिक्षणाचा पदवीप्रदान सोहळ्याचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर सैनिक परतत असतांना हे आक्रमण झाले.
अभिनेता इरफान खान यांची बकर्‍यांच्या बळीवर टीका !

विकत घेतलेल्या बकर्‍यांच्या बळीने प्रार्थना कशी स्वीकारली जाईल ?
       जयपूर - कुर्बानीचा अर्थ म्हणजे तुमच्या जवळील अतिशय महत्त्वाची वस्तू कुर्बान करणे (अर्पण करणे) आहे. बाजारातून २ बकर्‍या खरेदी करून आणायचे आणि त्यांची कुर्बानी द्यायची, असा त्याचा अर्थ नाही, अशी टीका अभिनेता इरफान खान यांनी केली आहे.
इरफान खान यांनी केलेली विधाने
१. तुमचा त्या बकर्‍यांशी काही संबंधच नाही, तर त्यांची कुर्बानी देण्यात काय अर्थ आहे ? त्यातून कोणता आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे ? प्रत्येक व्यक्तीने स्वतःला प्रश्‍न विचारावा की, कुणाचेतरी प्राण घेऊन आपल्याला कसे पुण्य लाभेल ?

माझ्याजवळील गुपिते उघड केली, तर देश हादरून जाईल ! - एकनाथ खडसे

खडसे यांनी असे बोलण्यापेक्षा देशहितासाठी ही माहिती उघड करावी !
      जळगाव - मी निष्कलंक आहे. माझ्यावर एका मागून एक बेछूट आरोप झाले. पुरावा मागितला, तर दिला जात नाही. हा सर्व ठरवून केलेला कट आहे. जर मी माझ्याजवळील गुपिते उघड केली, तर संपूर्ण देश हादरून जाईल; पण मी आज आणि भविष्यातही बोलणार नाही. तथापि पक्षातील गद्दारांना बाहेर काढावे, अशी मागणी भाजपचे नेते तथा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. खडसे पुढे म्हणाले की, विरोधी पक्षांनी आरोप केले नाहीत, तर अंजली दमानिया, प्रीती मेनन यांना पुढे केले गेले. या सर्व घडामोडींमागे कोण आहे हे मला माहीत असले, तरी मी त्याविषयी आता बोलणार नाही.


सनातन संस्थेला वेळीच ठेचले पाहिजे !

आमदार विष्णु वाघ यांचा सनातनद्वेष पुन्हा एकदा उघड !
एकांगी परिसंवाद घेऊन सनातनला अपकीर्त करणारे सनातनद्वेष्टे !
     डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या आरोपावरून सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केल्यानंतर यासंदर्भातील चौकशी चालू असतांनाच न्यायाधिशाच्या भूमिकेत जाऊन या प्रकरणी सनातनला दोषी ठरवून काही सनातनद्वेष्टे पत्रकार एकांगी परिसंवाद घेत आहेत. वास्तविक प्रसारमाध्यमांनी एखाद्यावर आरोप करतांना आरोप करणार्‍याला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे. हा पत्रकारितेतील सर्वसामान्य नियम आहे. हिंदु धर्म आणि सनातनद्वेषाची कावीळ झालेल्या वृत्तवाहिन्या मात्र त्याच नियमाची पायमल्ली करत आहेत. गेले काही आठवडे वृत्तवाहिन्यांवर आयोजित केल्या जाणार्‍या परिसंवादांमध्ये सनातनद्वेष्ट्यांना सहभागी केले जात असून यामध्ये सनातनविरोधात धादांत खोटी माहिती सांगून सनातनद्वेष्टेे तोंडसुख घेत आहेत.

अंमलबजावणी संचालनालयाकडून जगन मोहन रेड्डी यांच्या ७४९ कोटी रुपयांच्या संपत्तीवर जप्ती

राजकारणी अल्पावधीत इतकी मोठी संपत्ती कशी गोळा करतात ?
इतकी संपत्ती गोळा करेपर्यंत सरकारी यंत्रणा झोपलेल्या असतात का ?
     भाग्यनगर - अंमलबजावणी संचालनालयाने प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट, २००२च्या अंतगर्र्त वाय्.एस्. जगनमोहन रेड्डी यांच्या ७४९ कोटी रुपयांच्या चल आणि अचल संपत्तीवर जप्ती आणली आहे. जगनमोहन आंध्रप्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री सॅम्युअल राजशेखर रेड्डी यांचे पुत्र आहेत.

पाटलीपुत्र येथे जीन्स घालणार्‍या मुलींना महाविद्यालयात प्रवेश घेण्यास बंदी !

आता स्त्रीमुक्तीवाल्यांनी यावर थयथयाट केल्यास नवल ते काय ? 
     पाटलीपुत्र - येथील बी.एड्. महाविद्यालयात प्रवेशअर्ज भरण्यासाठी आलेल्या मुलींना सलवारकुर्ता परिधान करणे बंधनकारक असून जीन्स-टॉप परिधान करून आलेल्या मुलींना प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले. (असे नियम लावल्यास काही प्रमाणात तरी संस्कृती रक्षण होईल ! नैतिकतेच्या आधारावर ब्रिटन, तसेच अमेरिकेतील काही शाळांमध्ये मुलींना तोकडे स्कर्ट घालण्यावर निर्बंध आहेत. शासनामार्फत शाळेपासूनच मुलांना नैतिकतेचे शिक्षण दिल्यास, असे सांगण्याची वेळ महाविद्यालय प्रशासनाला येणार नाही ! - संपादक) २९ जून या दिवशी या मुली प्रवेश घेण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्यापैकी ज्या सलवारकुर्ता परिधान करून आल्या त्यांनाच प्रवेश देण्यात येऊन उर्वरित मुलींचा प्रवेश रहित करण्यात आला.

(म्हणे) इस्लाम अहिंसेची शिकवण देणारा धर्म !

मिरज शहर पोलीस ठाण्याच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन
संपूर्ण जग जिहादी आतंकवादाच्या सावटाखाली
असतांना जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांचे अजब मत !
     मिरज, ३० जून (वार्ता.) - प्रेषित महंमद पैगंबरांनी अहिंसावादाचा मार्ग सांगितला आहे; मात्र काही चुकीच्या प्रवृत्तीमुळे या धर्माविषयी अपसमज निर्माण होत आहे. इस्लाम हा धर्म अहिंसेचा प्रचार करणारा धर्म आहे, असे मत सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले. ते मिरज शहर पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी पोलीस अधीक्षक श्री. दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. कृष्णकांत उपाध्याय उपस्थित होते. (आज केवळ भारत नव्हे, तर जगच इस्लामच्या नावाखाली चालू असलेल्या आतंकवादाने त्रस्त आहे. इसिस इस्लामिक स्टेटच्या राज्याच्या नावाखाली आज लोकांचे गळे चिरत असून त्यांना जगावर शरियतचे राज्य निर्माण करायचे आहे. या वस्तूस्थितीकडे जिल्हाधिकारी डोळेझाक करणार आहेत का ? - संपादक)

विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी यवतमाळ येथे पालकांकडून दगडफेक

ज्ञानदानचे कार्य करणार्‍या शिक्षकी पेशाला
काळिमा फासणार्‍यांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !
     यवतमाळ - विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी यवतमाळ पब्लिक स्कूलमधील दोन शिक्षकांना २९ जून या दिवशी कह्यात घेण्यात आले आहे. या घटनेचे गंभीर पडसाद ३० जून या दिवशी यवतमाळ शहरात उमटले. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर नागरिकांकडून काढण्यात आलेल्या मोर्च्याला हिंसक वळण लागले आणि काही मोर्चेकर्‍यांनी वीणादेवी दर्डा नर्सरी शाळेवर दगडफेक केली. (जनतेची क्रांतीच्या दिशेने वाटचाल ! - संपादक)

माऊलींच्या दिंडीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ७०० युवकांची दिंडी

     उच्चशिक्षित तरुण-तरुणी आता वारीकडे वळू लागले आहेत, यावरूनच हिंदु धर्मातील प्रथा परंपरांचे श्रेष्ठत्व अधोरेखित होते. पुरोगाम्यांनी हिंदु धर्मावर टीका करण्याऐवजी धर्म समजून घ्यावा !
     पुणे, ३० जून - संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यास प्रारंभ झाली आहे. त्या पालखी सोहळ्यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ७०० युवकांची दिंडी सहभागी झाली आहे. ही दिंडी सर्वांचेच आकर्षण ठरली आहे. या दिंडीतील युवक इतर वारकर्‍यांप्रमाणे हातात टाळ घेऊन श्री विठ्ठलनामाचा गजर करत पायी चालत आहेत. यामध्ये ४०० पुरुष आणि ३०० महिला सहभागी झाल्या आहेत. हे सर्वजण टीसीएस्, इन्फोसिस, विप्रो आणि अन्य नामांकित आस्थापनात चाकरी करत आहेत. (वारीला जाण्याचा मूळ उद्देश साध्य होण्यासाठी आयटी क्षेत्रातील युवकांनी धर्माचरण आणि साधना यांचे महत्त्व जाणून तसे आचरण केल्यास या क्षेत्रातील ताण, स्पर्धा, आत्महत्या, व्यसनाधीनता, चंगळवाद आदी गोष्टी आपोआपच न्यून होण्यास साहाय्य होईल. - संपादक)

जर्मन बेकरीप्रकरणी राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका

     पुणे, ३० जून - येथील कोरेगाव पार्कमधील जर्मन बेकरीमध्ये वर्ष २०१० मध्ये इंडियन मुजाहिदीनच्या यासीन भटकळ आणि हिमायत बेग यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यातील मुख्य दोषी मिर्झा हिमायत बेग याला फाशाची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. हिमायत बेग याला विशेष न्यायालयाने वर्ष २०१३ मध्ये सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने रहित करून त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. (कूर्मगतीची न्यायप्रणाली ! - संपादक)

यावली (जिल्हा सोलापूर) येथील प.पू. सद्गुरुसेवक अरुणकाका यांचा देहत्याग

     यावली, ३० जून (वार्ता.) - येथील प.पू. सद्गुरुसेवक अरविंद उपाख्य अरुणकाका कुलकर्णी (वय ७४ वर्षे) यांनी २९ जून या दिवशी सायंकाळी ५ वाजता देहत्याग केला. त्यांना अल्पसा आजार होता. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार प.पू. अरुणकाका कुलकर्णी यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
     केरळ निवासी स्वामी रामदास यांचे शिष्य प.पू. सद्गुरुसेवक अरुणकाका यांनी यावली (तालुका मोहोळ) येथे वर्ष १९७२ मध्ये आनंदाश्रमाची स्थापना केली. या आनंदाश्रमामध्ये जगात कुठेही नसणार्‍या अष्टकुंड हवनकुंडाची स्थापना केली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू आदी ठिकाणी त्यांचे भक्तगण मोठ्या प्रमाणात आहे. मागील ४० वर्षांपासून साधनेद्वारे भाविकांचे अनेक प्रश्‍न मार्गी लावले आहेत. त्यांच्यावर ३० जूनला सकाळी १० वाजता आनंदाश्रमात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वारकर्‍यांचे राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रबोधन

     पुणे, ३० जून (वार्ता.) - पंढरपूर येथे वारीसमवेत निघालेल्या वारकर्‍यांसाठी येथील वडमुख वाडीतील होली बेसील हॉटेल येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रबोधन करण्यात आले. या वेळी समितीचे श्री. नागेश जोशी यांनी वारकर्‍यांना नमस्काराची योग्य पद्धत, तसेच यवतमाळ येथे वारकर्‍यांवर धर्मांधांनी केलेले आक्रमण, हिंदु राष्ट्र स्थापनेची अपरिहार्यता या विषयांवर प्रबोधन केले. समितीचे श्री. सागर शेटे या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाला ८० हून अधिक वारकरी उपस्थित होते.

काश्मीरमध्ये देशद्रोही मुसलमानांचे सैनिकांवर आक्रमण !

या देशद्रोह्यांनाही आतंकवाद्यांप्रमाणे शिक्षा द्या ! 
    श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात २८ जूनला झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचा आतंकवादी समीर वाणी ठार झाला. समीर सोपोर येथे रहाणारा होता. त्यानंतर सोपोर येथे सहस्रो देशद्रोही मुसलमानांनी देशविरोधी घोषणा देत हिंसाचार केला. त्यांनी पोलिसांची गाडीही जाळली. पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. (काश्मीरमधून आतंकवाद संपवायचा असेल, तर या देशद्रोह्यांचा नि:पात करणे आवश्यक ! - संपादक)

गोरखपूर येथे मशिदीवर पाकिस्तानचा झेंडा फडकवणार्‍या महंमद शरीफला अटक !

हिंदूंनो, संपूर्ण भारतावर पाकचा झेंडा फडकवण्यापूर्वी हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना करा !
    गोरखपूर (उत्तरप्रदेश) - येथील गुलरिहामधील महंमद चकखान या गावामध्ये महंमद शरीफ नामक युवकाने मशिदीवर झेंडा फडकवला. (हिंदूंना आतंकवादी ठरवणारे अशा घटनांविषयी तोंड उघडत नाहीत ! - संपादक) दुसर्‍या दिवशी सकाळी या घटनेची माहिती लोकांनी तेथील पोलीस चौकीचे प्रमुख संजय यादव यांना दिली. त्यानंतर तो झेंडा उतरवला आणि शरीफला अटक केली. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याची चौकशी करण्यात येत आहे. याशिवाय त्याच्याकडे पाकिस्तानचा झेंडा कसा आला याचा गुप्तचर संस्था शोध घेत आहेत.बिहारमध्ये १० कोटी रुपयांचा रेल्वे कूपन्सचा सर्वपक्षीय घोटाळा

घोटाळेबाज घोटाळ्यांसाठी एकत्र येतात; मात्र राष्ट्रप्रेमी राष्ट्रासाठी एकत्र येत नाहीत, हे दुर्दैव !
बिहारमधील जंगलराज !
     पाटलीपुत्र - बिहारमध्ये रेल्वे कुपन घोटाळा समोर आला आहे. यात सर्वच पक्षांच्या आमदारांचा सहभाग आहे. लेखरपरीक्षकांच्या अहवालात १० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा उघड झाला आहे. घोटाळ्यातील एकूण २२ आमदारांची ओळख पटली आहे. लेखपरीक्षकांनी विधानसभा सचिवांच्या भूमिकेविषयीही गंभीर प्रश्‍न उपस्थित केला आहे. या आमदारांनी बिहारच्या बाहेर दौरे करतांना रेल्वे कूपनद्वारे मिळणार्‍या रेल्वे तिकिटाचा प्रयोग करण्याचे टाळत कोणत्याही बिलाविना प्रवासभत्त्याचे कोट्यवधी रुपये पदरात पाडून घेतले. घोटाळ्याच्या अन्वेषणातून आमदारांची संख्या वाढू शकते. नितीशकुमार यांच्या सरकारमधील अनेक मंत्री तसेच सत्ताधारी राजद आणि जदयूचे आमदार अडकण्याची शक्यता पाहता सरकारने कारवाई टाळण्याचे प्रयत्न चालवले आहेत.

अंधेरीत औषधाच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत ९ जणांचा मृत्यू

     मुंबई - अंधेरी पश्‍चिम येथील एका औषधांच्या दुकानामध्ये आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत नऊ जणांचा मृत्यू झाला. जुहू गल्लीतील निगम मिस्त्री चाळीच्या तळमजल्यावर हे दुकान आहे. दुकानाच्या वरच्या मजल्यावर दुकान मालकाचे कुटुंब राहत होते. दुकानाला आग लागल्यानंतर आगीची झळ वरच्या मजल्यापर्यंत पोचली. घरातून बाहेर पडण्याचा रस्ता दुकानामधून जाणारा असल्याने दुकान मालक खान कुटुंबियांना सुटकेचा मार्गच मिळाला नाही आणि आगीत कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला. आग विझवण्यासाठी ३ फायर इंजिन, २ टँकर घटनास्थळी आले होते. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

सुधींद्र कुलकर्णी यांची पत्रकार परिषद उधळणार्‍यांचे उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुक

     मुंबई, ३० जून (वार्ता.) - पाकिस्तानी छायाचित्रकारांसाठीच्या तस्बीर-ए-मुंबई-तस्बी या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी २८ जून या दिवशी प्रेस क्लब ऑफ मुंबई येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी शिवसैनिकांनी पत्रकार परिषद उधळली, तसेच सुधींद्र कुलकर्णी यांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी ५ शिवसैनिकांची पाठ थोपटली तसेच मला अभिमान आहे, असे शिवसैनिक मला भेटले, अशी भावना श्री. ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केली.

अमेरिकेतही इस्तंबूलसारखे आक्रमण होऊ शकते ! - सीआयएची चेतावणी

     वॉशिंग्टन - इस्तंबूल येथे इसिसकडून घडवण्यात आलेल्या आक्रमणासारखेच आक्रमण अमेरिकेतही घडवले जाऊ शकते, अशी चेतावणी अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सीआयएचे संचालक जॉन ब्रेनन यांनी दिली आहे. ब्रेनन पुढे म्हणाले की, पश्‍चिम आशियाच्या प्रदेशामध्ये इसिसने अनेक आतंकवादी आक्रमणे घडवल्याचे आपण पाहिले आहे. इसीस आता या प्रदेशापलीकडील आजूबाजूच्या भागामध्ये आक्रमणे घडवण्यासाठी प्रयत्नशील असल्यास त्यामध्ये नवल नाही.

३ वर्षांत संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करणार ! - बबनराव लोणीकर

स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही मूलभूत प्रश्‍न सोडवू न शकणारे निष्क्रिय राज्यकर्ते !
     पंढरपूर - महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज यांनी स्वच्छतेचा संदेश यापूर्वीच दिला आहे. त्यांची ही शिकवण पुढे नेण्याचा केंद्र आणि राज्य शासनाचा प्रयत्न आहे. राज्यातील ५ सहस्र ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या असून ३ वर्षांत संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त करण्याचा मानस आहे, असे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. स्वच्छतेच्या संदेशाच्या वारकर्‍यांनी संपूर्ण देशभर प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले. पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने आयोजित शहर स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

उत्तरप्रदेशात एका साधूंची अज्ञातांकडून हत्या !

देशात हिंदु साधू, पुजारी, धर्माभिमानी यांच्या वाढत्या हत्या रोखण्यासाठी 
शासन आणि प्रशासन काही करणार आहे का ?
     उत्तरप्रदेश - येथील अमेठी जिल्ह्यात एका ६० वर्षीय साधूंची अज्ञातांकडून हत्या करण्यात आली. रामजस असे या साधूंचे नाव असून आलमपूर येथे एका कुटीत ते एकटेच रहात होते. २९ मे या दिवशी त्यांचे प्रेत कुटीच्या बाहेर पडलेले मिळाले. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत.

अल्पवयीन गुन्हेगाराचा जिहादी आतंकवाद्यांशी संबंध असण्याच्या शक्यतेवरून सतर्कतेचा आदेश !

कायद्यामधील पळवाटांमुळे गुन्हेगार पुन:पुन्हा गुन्हा करण्यास धजावतात !
निर्भया बलात्कार प्रकरण
     देहली - वर्ष २०१२ मध्ये देहलीत बसमध्ये एका महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगून सुटलेल्या अल्पवयीन धर्मांधाचे जिहादी आतंकवाद्यांशी संबंध असण्याच्या शक्यतेवरून गुप्तचर विभागाने सतर्कतेचा आदेश दिला आहे. आता सज्ञान झालेल्या या दोषीचे जिहाद्यांशी संबंध असू शकतात, असा गुप्तचर विभागाला संशय आहे. २०१५ मध्ये त्याला बालसुधारगृहातून मुक्त करण्यात आले होते. येथे तो २०११ मध्ये देहली उच्च न्यायालयामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये सहभागी असलेल्या एका काश्मिरी युवकासह रहात होता.

पडताळणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका पळवल्याप्रकरणी पुणे विद्यापिठाच्या परीक्षा विभागाचा हलगर्जीपणा

पुणे विद्यापिठाचा दायित्वशून्य कारभार !
      पुणे, ३० जून - फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये संगणक शास्त्र शाखेच्या (बीसीएस्) पडताळणीसाठी आलेल्या उत्तरपत्रिका पळवल्याप्रकरणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या परीक्षा विभागाचाही हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येत आहे. (हा अपप्रकार कोणाच्याच लक्षात कसा आला नाही ? या प्रकरणाची विद्यापीठ प्रशासन सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करेल का ? - संपादक)
       विद्यापिठाने उत्तरपत्रिकेला बारकोड लावण्यासारखी यंत्रणा स्वीकारलेली असतांना महाविद्यालयाकडून अल्प संख्येने आलेल्या उत्तरपत्रिका स्वीकारल्या कशा ? परीक्षेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना अनुपस्थित कसे दाखवण्यात आले ? परीक्षा विभागाने या प्रकाराकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले कि हलगर्जीपणा आहे, असे विविध प्रश्‍न या प्रकरणी उपस्थित होत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा प्रविष्ट !

योगदिनाच्या कार्यक्रमात राष्ट्र्रध्वजाचा अपमान केल्याचे प्रकरण
     पाटलीपुत्र (पाटणा) - राष्ट्र्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बिहारमधील मुझफ्फरपूर न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २१ जून २०१५ या दिवशी राष्ट्र्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी पोखरारीया गावातील प्रकाश कुमार या नागरिकाने मोदी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. कुमार यांनी पुरावे म्हणून छायाचित्रेही न्यायालयात सादर केली आहेत. याप्रकरणी १६ जुलैला मुझफ्फरपूर न्यायालयात सुनावणी होणार आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, मागील वर्षी मोदी यांनी योगदिनाच्या कार्यक्रमात एखाद्या कपड्याप्रमाणे राष्ट्र्रध्वज हात आणि तोंड पुसण्यासाठी वापरला. त्यामुळे राष्ट्र्रध्वजाचा अवमान झाला असून देशातील कोट्यवधी नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत.

ठाण्यात निधी संकलन करणार्‍या आस्थापनावर ९ कोटींचा दरोडा

राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा !
     ठाणे - ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयानजिक असणार्‍या चेकमेट सर्व्हिस प्रा. लि. या निधी संकलन आस्थापनामधून २८ जूनला पहाटे सात जणांनी बंदूक आणि चाकू यांचा धाक दाखवत नऊ कोटी रुपयांची रोकड लुटली. घटनेनंतर चोरट्यांनी आस्थापनातील सीसीटीव्ही फूटेज आणि डीव्हीआर् पळवल्याने पोलिसांच्या तपासाला अडथळे येऊ शकतात. यात ७ संशयितांना कह्यात घेण्यात आले आहे.

श्री क्षेत्र आळंदीमध्ये (जिल्हा पुणे) अवैध देशी मद्यसाठा शासनाधीन

राज्य सरकारने राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी
मद्यबंदी करून भक्तांना चांगले दिवस दाखवावेत !
     आळंदी, ३० जून - तळेगाव दाभाडेमधील राज्य उत्पादन शुल्क विभागाने २७ जूनला श्री क्षेत्र आळंदीमध्ये कारवाई करून अवैध देशी मद्याची ३९ खोकी असलेला एकूण ८८ सहस्र ७१४ रुपयांचा साठा शासनाधीन केला. हा साठा एका बंद घराच्या खोलीत विक्री करण्याच्या उद्देशाने आढळला असून या प्रकरणी एक व्यक्तीवर विभागाने कारवाई केली आहे.

गडकोटांच्या संवर्धनासाठी सरकारने स्वायत्त महामंडळाची स्थापना करावी - इतिहास संशोधक प्रफुल्लचंद्र तावडे

     पुणे, ३० जून - अत्यंत खडतर काळात जिजाबाईंच्या संस्कारांमुळेच शिवछत्रपती मुघलांना नेस्तनाबूत करण्यात यशस्वी झाले आणि रयतेला स्वराज्य मिळाले. या अलौकिक पराक्रमाचे साक्षीदार असलेले गडकोट मात्र आज जर्जर अवस्थेत आहेत. गडकोटांच्या संवर्धनासाठी सरकारने स्वायत्त महामंडळाची स्थापना करावी, असे प्रतिपादन इतिहास संशोधक प्रफुल्लचंद्र तावडे यांनी केले. येथील आंबेगाव पठार भागातील जिजामाता चौकात तिथीनुसार राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी २९ जून या दिवशी प्रतिमापूजन करून साजरी करण्यात आली.

धर्मांधाकडून २६ दुचाकींची चोरी

लोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र अग्रेसर !
     जळगाव - पुणे पोलीस आयुक्तालयात लिपिक असलेल्या आणि रावेर येथे रहाणार्‍या सरफराज तडवी याला जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात दुचाकी चोरतांना पकडले. बिंग फुटल्याची जाणीव होताच त्याने आपण निलंबित पोलीस आहोत, अशी बतावणी केली. जिल्हाधिकारी कार्यालय, उपनिबंधक कार्यालय, जिल्हा रुग्णालय आणि न्यायालयाचे आवार येथून आतापर्यंत २६ दुचाकी चोरल्या आहेत.

सातवा वेतन आयोग लागू करायचा झाल्यास राज्यावर १५ सहस्र कोटींचा बोजा

     मुंबई - सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी केंद्रीय कर्मचार्‍यांना लागू करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याच धर्तीवर राज्य सरकार कर्मचारी-अधिकारी यांना सुधारित वेतनाचे लाभ द्यायचे झाल्यास सरकारच्या तिजोरीवर १५ सहस्र कोटींचा अतिरिक्त वार्षिक बोजा पडण्याची शक्यता आहे.
१. सातवा वेतन आयोग लागू केल्यास राज्य सरकारला केवळ कर्मचार्‍यांच्या वेतनापोटी वर्षाला ९५ सहस्र कोटींची व्यवस्था करावी लागणार आहे. यामुळे विकास कामांच्या निधीवर परिणाम होऊ शकतो.
२. केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचार्‍यांना हा लाभ देण्याची तत्त्वतः भूमिका असली तरी यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी एका रुपयाचीसुद्धा तरतूद नाही.

संततधार पावसामुळे हिंगोली आणि नांदेड येथे पूर

अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: ।
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥ - कौशिकपद्धति

अर्थ : धर्माचे पालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात. तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत. तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा आपत्काळ सुसह्य होईल. 
     हिंगोली - जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आसना नदीला पूर आला आहे. या पुराचा फटका कुरुंदा, आंबा, सेलू या गावांना बसला आहे. पाणी गावात शिरल्यामुळे नागरिकांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला आहे. पुरामुळे १० ते १५ घरांची पडझड झाली आहे. अनेकांनी घराच्या गच्चीवर जाऊन आश्रय घेतला. पाण्यामुळे किनोला भागातील २००० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. पुरामुळे लक्षावधी रुपयांची हानी झाली आहे.

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे ११ आणि १२ ऑगस्टला कन्यागत महापर्वाचा मुख्य सोहळा

     नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर), ३० जून - श्री दत्तगुरूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे ११ आणि १२ ऑगस्ट या दिवशी कन्यागत महापर्वाचा मुख्य सोहळा होत आहे. हा सोहळा पुढे वर्षभर चालणार आहे. या सोहळ्याची सिद्धता राज्यशासन, ग्रामपंचायत, सर्व ग्रामस्थ, दत्तभक्त तसेच पुजारी यांच्या सहकार्याने चालू झाली आहे. या सोहळ्यास लक्षावधी भाविकांची उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थानचे अध्यक्ष श्री. राहुल पुजारी यांनी दिली. या वेळी सचिव श्री. संजय उपाख्य सोनू पुजारी उपस्थित होते.

वैदिक गणिताच्या पुढेही आहे गणित ! - शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंदसरस्वती, श्रीगोवर्द्धनमठ-पुरीपीठाधीश्‍वर, ओडिशा

     नवी देहली - वैदिक गणितामध्ये तज्ञ व्यक्तीला गणिताचे कोडे सोडवणे अतिशय सुलभ असते. यामुळे कठिणात कठीण प्रश्‍नही त्वरित सोडवल्या जाऊ शकतात; मात्र या वैदिक गणिताच्या पुढेही गणित असल्याचा शोध पूर्वाम्नाय श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंदसरस्वती, श्रीगोवर्द्धनमठ-पुरीपीठाधीश्‍वर, ओडिशा यांनी वेदादि शास्त्रांच्या आधारावर नुकताच लावला आहे. या शोधाच्या सिद्धांतांमुळे भौतिक विज्ञानाला एक नवीन दिशा मिळेल आणि विज्ञानाच्या विश्‍वात अनेक मोठे चमत्कार पहाण्यास मिळतील, असे म्हटले जात आहे.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या अतीवापरामुळे वृद्धत्वाची शक्यता ! - आरोग्यतज्ञांचे मत

विज्ञानाने केलेली प्रगती !
     नवी देहली - मोबाईल फोन, लॅपटॉप आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा प्रमाणापेक्षा अधिक वापर केल्यास त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे वृद्धत्व लवकर येऊ शकते, असे आरोग्यतज्ञांनी म्हटले आहे. 
    आरोग्यतज्ञांच्या मते इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या अतीवापरामुळे त्वचा सैल पडणे, जबडा मोठा होणे, चेहर्‍यावर सुरकुत्या पडणे, मानेवर चरबी वाढणे, चेहर्‍याच्या सौंदर्यावर विपरीत परिमाण होण्याची शक्यता आहे. संगणकासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या समोर अनेक घंटे बसून राहिल्यास डोके दुखणे, चेहर्‍यावर सुरकुत्या पडणे आणि खांद्यांचे दुखणे उद्भवत आहे. तसेच तरुणांमध्ये नकारात्मकता वाढत आहे. त्याचा त्वचा आणि मानेच्या हाडांवर विपरीत परिणाम होत आहे.

धर्मप्रसाराची तळमळ असणारे हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रतीक रिझवानी !

मंदिरात धर्मशिक्षण देणारा मजकूर असणारे
कागद भिंतीवर चिकटवलेले दिसत आहेत !
          रायपूर, छत्तीसगढ - येथील धर्माभिमानी श्री. प्रतीक रिझवानी यांनी त्यांच्याकडे धर्मशिक्षणाचा मजकूर प्रसिद्ध करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्ध केलेले फलक मागितले. ते उपलब्ध नसल्याने कागदांवर मजकूर लिहून ते कागद त्यांनी मंदिरांतील भिंतींवर लावले. धर्मप्रसारात येणार्‍या अडथळ्यांवर मात करून तळमळीने कार्य कसे करावे हे या उदाहरणातून सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठांना शिकता येईल. असे धर्माभिमानी हिंदू हीच हिंदु धर्माची खरी शक्ती होय !

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी दुर्ग प्रशासनाकडून दुर्लक्षित !

  • कुठे आहे पुरातत्व विभाग ?
  • अनमोल ऐतिहासिक ठेवा जतन करण्यात प्रशासनाची अक्षम्य कुचराई !
     जुन्नर (जिल्हा पुणे), ३० जून - येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवेनेरी दुर्गवरील बुरुज आणि भिंती ओल्या होण्यास प्रारंभ झाला आहे. ओल्या झालेल्या भिंती आणि बुरुज यांतील दगड सुटू लागले असून प्रशासन मात्र सुस्त असल्याचे नागरिक आणि शिवप्रेमी यांचे म्हणणे आहे. (या प्रकरणी राज्य शासनाने त्वरित लक्ष घालून शिवनेरी दुर्गाची डागडुजी करण्याचे आदेश संबंधित विभागांना द्यावेत आणि दुर्ग संवर्धन करावे, ही शिवप्रेमींची अपेक्षा ! - संपादक)

कचरा जमा केल्यावर चॉकलेट देणारे यंत्र लोणावळा नगरपरिषदेकडून प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित !

हास्यास्पद उपाययोजना !
     लोणावळा (जिल्हा पुणे), ३० जून - येथील नगरपरिषदेने मुंबईच्या एशियन गॅलट या आस्थापनाच्या साहाय्याने टेक्नॉलॉजिकल अ‍ॅडव्हान्स बिन अर्थात टेकबिन नावाचा कचरा गोळा करून चॉकलेट देणारे यंत्र जागोजागी ठेवण्याचा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर चालू केला आहे. एटीएमसारख्या दिसणार्‍या या यंत्रात कचरा टाकल्यावर त्यातून चॉकलेट बाहेर येणार आहे. नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे. (नागरिकांना अशी आमिषे दाखवण्यापेक्षा सध्या असलेल्या उपाययोजना आणि शिक्षा यांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे ! - संपादक)

कात्रज (जिल्हा पुणे) येथील प्राणीसंग्रहालयातून घुबड चोरीला

आता प्राणीसंग्रहालयातही चोरी !
     पुणे, ३० जून - येथील कात्रज भागातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील पिंजरा तोडून १४ सुरक्षारक्षक असूनही एक शृंगी जातीचे घुबड चोरण्यात आले आहे. (या प्रकरणी सुरक्षारक्षकांसह प्राणीसंग्रहालयातील कर्मचार्‍यांचीही चौकशी व्हायला हवी, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ? - संपादक)

इयत्ता बारावीच्या परीक्षेत कु. प्रणिता आणि कु. प्रतीक दिवटे यांना सुयश !

     कोल्हापूर, ३० जून (वार्ता.) - येथील सनातनचे साधक श्री. प्रमोद दिवटे यांची कन्या कु. प्रणिता आणि तिचे काका श्री. दीपक दिवटे यांचा मुलगा कु. प्रतीक यांनी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत वाणिज्य शाखेत अनुक्रमे ९२.१५ टक्के आणि ८४.७७ टक्के गुण मिळाले आहेत. हे दोघेही येथील देशभूषण रत्नाप्पा कुंभार वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. सातत्याने प्रार्थना, कृतज्ञता आणि उपाय केल्यामुळे आणि प.पू. गुरुदेव आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेने हे यश मिळाले आहे, असे त्या दोघांनी सांगितले.

पावसामुळे कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत; पण मार्ग अजून निर्धोक

     कणकवली - जून मासाच्या अखेरीस कोसळणार्‍या पावसामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले असले, तरी रेल्वेमार्ग अद्याप निर्धोक राहिला आहे. मुंबईहून कोकणात येणार्‍या बहुतांश गाड्या दोन ते तीन घंटे विलंबाने धावत आहेत, तर मुंबईकडे जाणार्‍या गाड्या एक घंटा विलंबाने पोचत आहेत.
     यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता असल्याने कोकण रेल्वे प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच संभाव्य दरड कोसळणार्‍या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था केली. पोमेंडी, निवसर येथील डोंगरांचे मोठ्या प्रमाणात सपाटीकरण करण्यात आले. याखेरीज ओरोस, बोर्डवे या ठिकाणीदेखील नव्याने बोल्डर नेटची कामे करण्यात आली आहेत. यामुळे आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही कोकण रेल्वेचा मार्ग सुरक्षित राहिला आहे.

सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरात चोरी !

     जोगलखेडा (ता.पारोळा) - येथील सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी दागिने आणि रोख रक्कमेसह एक लाखाचा ऐवज पळवल्याची घटना घडली. (हिंदूंनो, मंदिर चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी संघटित व्हा !- संपादक) याप्रकरणी चोरट्यांचा शोध चालू आहे.

चोरीला गेलेल्या वाकाटककालीन नाण्यांचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक खाते करणार

     नागपूर, ३० जून (वार्ता.) - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व विभागातून वाकाटककालीन नाणी गायब झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रा. सुनील मिश्रा यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे तक्रार केली होती. केंद्रीय अन्वेषण विभागाने हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग केले आहे.

आप सत्तेवर आल्यास इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना अनुदान चालूच राहील ! - अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, देहली

देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घेतली गोव्याच्या आर्चबिशपांची सदिच्छा भेट !
     पणजी - आगामी निवडणुकीनंतर आप सत्तेवर आल्यास इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना शासकीय अनुदान देणे चालूच रहाणार आहे, तसेच सर्वच इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना शासकीय अनुदान देण्यासंबंधी पुढे बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. (मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास मुलांचा बौद्धिक विकास चांगला होतो, हा जागतिक सिद्धांत असूनही उच्चशिक्षित केजरीवाल तो मान्य करायला सिद्ध नाहीत. सत्तेवर येण्यासाठी ते मुलांच्या भवितव्याशीही खेळायला सिद्ध आहेत, यातून तेही इतर राजकारण्यांप्रमाणेच आहेत, हे स्पष्ट होते. - संपादक) गोव्याचे आर्चबिशप फादर फिलिप नेरी फेरार्व यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री केजरीवाल यांचा गोवा भेटीचा हा शेवटचा दिवस होता.

फलक प्रसिद्धीकरता

आतंकवाद्यांना धर्म असतो, हे आतातरी ढोंगी पुरोगामी मान्य करणार आहेत का ?
     भाग्यनगर येथून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अटक केलेले ५ आतंकवादी दंगल घडवण्यासाठी प्रसिद्ध भाग्यलक्ष्मी मंदिरात गोमांस फेकणार होते. हे रमझानच्या महिन्यातच करण्याचा त्यांचा डाव होता.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
ISIS ke Atanki danga karwane ke liye Bhagyalakshmi
Mandir me Gomans feknkane wale the !
Atankwadiyonka Dharm hota hai ye Secular ab to manenge ?
जागो !
इसिस आतंकी दंगा करवानेे के लिए भाग्यलक्ष्मी मंदिर में गोमांस फेकनेवाले थे !
आतंकवादियों का धर्म होता है यह सेक्युलर अब तो मानेंगे ?

मलेशियातील विश्‍वविद्यालयाकडून हिंदू आणि शीख यांचा अवमान

हिंदूंवर जगभरात होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात त्या त्या ठिकाणचे हिंदु स्वतःच्या क्षमतेनुसार 
विरोध करतात; मात्र भारतातील बलाढ्य हिंदुत्वनिष्ठ संघटना निष्क्रीय रहातात ! 
हिंदराफकडून चौकशीची मागणी
     कुआलालंपूर - हिंदु आणि शीख यांचा अवमान करणारी ध्वनीचित्रफीत प्रदर्शित करणार्‍या मलेशियातील तंत्रज्ञान विश्‍वविद्यालयाची शिक्षण मंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी हिंदराफ मक्कल सक्ती या हिंदुत्ववादी संघटनेने केली आहे. विश्‍वविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडू पहाणार्‍या व्याख्यात्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. असे दायित्वशून्य वर्तन सहन केले जाऊ नये. या प्रकरणी सरकार गप्प राहिल्यास शैक्षणिक संस्थांमध्ये तिरस्कार पसरवण्यास ते साहाय्य करत असल्याचे सिद्ध होईल, असे हिंदराफचे अध्यक्ष पी. वेदमूर्ती यांनी सांगितले.

अफगाणिस्तानमध्ये हिंदूंची केवळ २२० कुटुंबे शिल्लक !

  • कुठे जगावर राज्य करणारे चक्रवर्ती राजे, तर कुठे शेजारी राष्ट्रातील हिंदूंकडेही लक्ष न देणारे आताचे राज्यकर्ते ! 
  • आताचे केंद्रशासन अफगाणिस्तानमधील हिंदूंकडे लक्ष देईल का ? 
     काबूल - महाभारताच्या काळात गांधार नावाने प्रसिद्ध असलेल्या अफगाणिस्तानमध्ये हिंदु कुटुंबांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. वर्ष १९९२ मध्ये हिंदु आणि शीख धर्मियांची २ लाख २० सहस्र संख्या असलेल्या या देशात आता केवळ २२० कुटुंबेच शिल्लक राहिली आहेत. नॅशनल काऊन्सिल ऑफ हिंदू अ‍ॅण्ड शीख या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. (भारतीय राज्यकर्त्यांनी मुसलमानांचे लांगूलचालन करत असतांना शेजारी राष्ट्रांतील हिंदूंकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळे कोणे एकेकाळी भारताचाच भाग असलेल्या अफगानिस्तानमध्येही हिंदूंची संख्या अत्यल्प झाली आहे ! त्यामुळे पुन्हा पूर्वीचा भारत निर्माण करण्यासाठी आता हिंदुराष्ट्राशिवाय पर्याय नाही ! - संपादक)

बेंगळुरू येथे पब्लिक टी.व्ही आणि टीव्ही ९ या वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रात रणरागिणी शाखेच्या कार्यकर्तींचा सहभाग

मंदिरात जातांना महिलांनी करावयाचा पोशाख या विषयावर कर्नाटकात वृत्तवाहिन्यांवर चर्चासत्र !
डावीकडून सौ. सुकन्या श्रीनिवास, टी.व्ही ९ च्या
निवेदिका, कु. भव्या गौडा आणि सौ. विदुला हळदीपूर
   बेंगळुरू - २४ जुलै या दिवशी बेंगळुरू येथील पब्लिक टी.व्ही या वृत्तवाहिनीवर मंदिरात जातांना महिलांनी करावयाच्या पोशाखासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या बेंगळुरू येथील समन्वयक कु. भव्या गौडा; धारवाड येथील समन्वयक सौ. विदुला हळदीपूर; मैसूर, हासन आणि तुमकूर येथील समन्वयक सौ. सुमा मंजेश, आंतरराष्ट्रीय महिला संघाच्या संस्थापक अध्यक्ष सौ. सुमित्रा अय्यंगार आणि वेदमाता संस्थेच्या संचालिका सौ. सुकन्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या.

चंद्रभागा नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी शाश्‍वत उपाय हवेत !

     महाराष्ट्र शासनाने नमामि चंद्रभागा म्हणत गंगा नदी प्रदूषणमुक्तीच्या धर्तीवर चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली. त्याच अनुषंगाने पंढरपूरमध्ये चंद्रभागा विकास परिषदेचे आयोजनही केले होते. चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त झाली पाहिजे, याविषयी कोणाचेच दुमत नाही. प्रतिवर्षी लक्षावधी वारकरी मोठ्या श्रद्धेने पंढरपूरला येऊन चंद्रभागेमध्ये स्नान करतात. चंद्रभागेचे पाणी तीर्थ म्हणून घेतात. सद्यस्थितीत चंद्रभागा नदीच्या पाण्यातील प्रदूषणात वाढ झाल्याने ते पाणी तीर्थ म्हणून प्राशन करू नये, असे प्रशासनानेच घोषित केले आहे. चंद्रभागा नदीचे पाणी सर्वांनाच तीर्थ म्हणून पिण्यास मिळेल, तेव्हाच ती प्रदूषणमुक्त झाली, असे म्हणता येईल. चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त करतांना तिच्यामध्ये सामावल्या जाणार्‍या उपनद्या, त्यांच्यामध्ये सोडले जाणारे प्रदूषित सांडपाणी आणि अन्य प्रदूषित द्रव्ये यांचाही विचार करायला हवा.

दोषी कोण ? शास्त्र कि त्याचा गैरवापर करणारे लोक ?

      इफेड्रीन (Ephedrine) हे सर्दी-खोकल्यावर बर्‍याचदा वापरले जाणारे आधुनिक वैद्यकातील एक संयुग. दमा किंवा वजन घटवणे यांसारख्या समस्यांवरही अनेक अलोपॅथीचे डॉक्टर्स हा घटक असलेली औषधे लिहून देतात. खरे तर केवळ प्रिस्क्रिप्शनवरच हे औषध द्यावे, असा नियम आहे. शिवाय या औषधाच्या निर्मितीसाठी लागणार्‍या कच्चा मालापासून ते विविध प्रक्रियांपर्यंत प्रत्येक गोष्टीला सरकारी परवाने लागतात.
१. जगातील बहुतेक देशांत इफेड्रीनच्या वापरावर कडक निर्बंध !
     असे का ? तर Methamphetamine किंवा Meth या नावाने बाजारात अधिक प्रसिद्ध असलेला अमली पदार्थ बनवण्यासाठी या इफेड्रीनचा वापर केला जातो. Ecstasy वा Ice नावाने आपल्या देशातही सध्या कित्येक तरुणांमध्ये प्रिय (!) असलेल्या पार्टी ड्रग्सचा प्रमुख घटकदेखील हा इफेड्रीनच आहे. याच कारणास्तव अमेरिका असो वा जर्मनी, जगातील बहुतेक देशांत या औषधांवर कडक निर्बंध आहेत. कित्येक देशांत ८ एम्जीच्या पलीकडील मात्रेत त्याच्या वापरावर बंदी आहे. अशा परिस्थितीत हे संयुग मिळवायचे कसे ? असा प्रश्‍न आंतरराष्ट्रीय अमली बाजारपेठेसमोर असतांना याचे उत्तर त्यांना आपल्या देशात सापडले. त्यापुढचा कहर म्हणजे आपल्याच महाराष्ट्रातील सोलापूरमधील एका कंपनीला यात सहभाग असल्याच्या आरोपावरून नुकतेच टाळेदेखील लागण्याची घटना घडली. याच कारभारात रायगड जिल्ह्यातील एक औषध निर्माण करणारी कंपनीदेखील सहभागी आहे, अशी चर्चाही माध्यमांत रंगत आहे.

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

१. इ.स. २००३-२००४ मध्ये एक मुसलमान राष्ट्राध्यक्ष, हिंदु प्रधानमंत्री आणि ख्रिश्‍चन संरक्षणमंत्री यांनी एकोप्याने राष्ट्राचा रथ चालविला, हिंदुस्थानशिवाय-भारताशिवाय इतरत्र कुठेही असे होऊ शकते काय ?
२. केरळीय विधानसभेचे सदस्य, संसदेचे सदस्य आणि मंत्री अल्ला अन् येशू ख्रिस्ताच्या नावाने शपथ घेतात. हे घटनेच्या विरोधी आहे. एखादा हिंदु राम किंवा कृष्णाच्या नावाने शपथ घेऊ शकतो का ?
- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस (क्रमश:)

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

घराणेशाहीची न्यायव्यवस्था देणारी लोकशाही कधीतरी न्याय देईल का ?

   आम्ही जोधपूर, राजस्थान येथील एका अधिवक्त्यांच्या भेटीसाठी गेलो होतो. त्या वेळी त्यांनी आम्हाला न्यायाधिशांविषयी झालेल्या एका सर्वेक्षणाची माहिती दिली. ते म्हणाले, जवळपास ३५० हून अधिक न्यायाधीश असे आहेत की, ज्यांच्या दोन-तीन पिढ्या या न्यायाधीश अथवा न्यायालयाशी संबंधित उच्च पदांवर आहे. हा योगायोग किंवा त्यांचे कर्तृत्व नाही, तर ही केवळ घराणेशाही आहे.
- श्री. आनंद जाखोटिया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.६.२०१६)

सार्वजनिक कार्यक्रमांत टाळ्या वाजवणे आणि घोषणा देणे यांविषयीच्या सूचना !

    आपल्याला हिंदु राष्ट्र अर्थात सनातन धर्माचे राज्य आणायचे आहे. हिंदु राष्ट्रात प्रत्येक गोष्ट आदर्शच असेल. त्यामुळे आपण या अधिवेशनात टाळ्या वाजवण्याच्या आणि घोषणा देण्याच्या संदर्भात आदर्श काय असावे, हे समजून घेऊ. या धोरणानुसार आपण सर्वांनी आचरण करावे, अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे.
१. टाळ्या वाजवणे
१ अ. टाळ्या कधी वाजवाव्यात ?
     अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासारखा जाहीर कार्यक्रम हा राष्ट्र आणि धर्म यांच्या जागृतीसाठी आहे. अशा कार्यक्रमांत एखाद्या भाषणातील यश ऐकल्यानंतर, तसेच एखाद्या धर्मप्रेमीचा सत्कार करण्यात आल्यानंतर आनंद व्यक्त करण्यासाठी आवर्जून टाळ्या वाजवाव्यात. त्यामुळे सर्वांचा कार्यक्रमातील सहभाग वाढतो, आनंद व्यक्त करण्याचे एक माध्यम मिळते आणि कार्यक्रमही शुष्क न होता वक्त्यांसह सर्वांचा उत्साह वाढतो.

सध्या कधी नव्हे एवढी हिंदुऐक्याची आवश्यकता असतांना हिंदूंमध्ये फूट पाडणारी हिंदुत्ववादी संघटना कधीतरी हिंदुहित साधील का ?

एका अधिवक्त्याचे सनातनशी असलेले संबंध तोडण्यासाठी एका हिंदुत्ववादी संघटनेकडून त्यांना पदाचे आमीष !
      महाराष्ट्रातील एका शहरातील एक अधिवक्ता हे दैनिक सनातन प्रभातचे वाचक असून ते सनातनच्या कार्यालाही साहाय्य करतात. मध्यंतरी एका हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी त्यांना भेटले. त्या वेळी ते पदाधिकारी अधिवक्त्यांना म्हणाले, तुमची एका आमदाराशी गाठ घालून देतो. तुम्हाला एका पक्षात किंवा एका संघटनेत पद देऊ. केवळ तुम्ही सनातन सोडा. त्यांची ही अट ऐकून सदर अधिवक्त्यांनी त्यांना नकार दिला.
      त्यानंतर सदर अधिवक्त्यांनी वरील प्रसंग हिंदु जनजागृती समितीच्या एका कार्यकर्त्याला सांगितला. त्या वेळी ते अधिवक्ता म्हणाले, मी सनातनमध्ये जाऊन एकवेळ भांडी घासण्याची सेवा करीन; पण त्यांच्याकडचे पंचपक्वान्नाचे जेवण जेवणार नाही.

साधकांना साधनेत पुढे नेण्याची तीव्र तळमळ असणारे आणि स्वतःच्या तीव्र शारीरिक त्रासांकडे दुर्लक्ष करून स्वतःला गुरुसेवेत झोकून देणारे सनातनचे संत पू. राजेंद्र शिंदे यांच्याकडून साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे

गुरुपौर्णिमा मास २०१६ 
        १९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रोपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.

पुलगावमधील दारूगोळा भांडाराला लागलेल्या आगीची कारणमीमांसा आणि उपाय !

पुलगाव येथील आग
   महाराष्ट्रातील वर्ध्याजवळच्या पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारात ३१ मे या दिवशी झालेल्या स्फोटात १६ सैनिक मृत्युमुखी पडले. यात पुष्कळ दारूगोळा नष्ट झाला. या स्फोटाचे वृत्तांकन करतांना प्रसारमाध्यमांकडून अतीउत्साह दाखवला गेला, असे संरक्षण क्षेत्रातल्या तज्ञांचे म्हणणे आहे. या घटनेला १ मास (महिना) होत आहे. या निमित्ताने या भांडाराचे महत्त्व, स्फोटामागची कारणे आणि या घटनेतून धडा घेऊन भविष्यात कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजेत, याविषयी ऊहापोह करणारा सकाळमधील हा लेख आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
१. पुलगावमधील केंद्रीय दारूगोळा भांडार हे भारतातील सर्वांत मोठे भांडार !
    पुलगावमधील केंद्रीय दारूगोळा भांडार (सेंट्रल म्युनिशन डेपो) हा भारतातील सर्वांत मोठा आणि आशियातील दुसर्‍या क्रमांकाचा डेपो होय ! एके ४७ बंदुकीच्या गोळ्या, ८१ मिलिमीटर बाँब, १५५ मिलिमीटर गन शेल्स, टँक शेल्स, हँड ग्रेनेड्स, भूसुरुंग, ब्रह्मोस, अन्य विध्वंसक क्षेपणास्त्रे आणि अन्य अमाप दारूगोळा या डेपोमध्ये असतो. या स्फोटामुळे शेजारील गावांना सर्वांत अधिक हानी सहन करावी लागली. या भीषण आगीची कारणमीमांसा करण्यासाठी कोर्ट ऑफ एन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. ३१ मे च्या रात्री १ ते दुसर्‍या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत अथक परिश्रम करून पुलगाव, वर्धा आणि नागपूर येथील १६ अग्नीशमन यंत्रणांनी ही भीषण आग आटोक्यात आणली. सीएडीमधले १२३० हून अधिक बंकर्स आणि इग्लू शेड्सपैकी केवळ एक दोन बंकर्स/शेड्सपर्यंतच आग मर्यादित राहिली, हे सुदैव ! यापूर्वी भरतपूर आणि अनंतनाग या ठिकाणी झालेल्या स्फोटांची आग १०-१२ दिवस धुमसत होती.

वात्सल्यभावाचे मूर्तीमंत प्रतीक असणार्‍या प.पू. डॉक्टरांच्या मिरज आश्रमातील वास्तव्यात त्यांच्यातील विविध गुणमोत्यांचे घडलेले दर्शन !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ...
          आम्ही लहानपणापासून मिरज आश्रमात वास्तव्याला असल्याने आम्हाला प.पू. डॉक्टरांचा अमूल्य सत्संग वेळोवेळी लाभला. त्या अल्पावधीतील सत्संगातून देवाने जणू काही आमच्यामध्ये साधनेचे बीज रोवून संतपदप्राप्तीसाठी आमच्या मनाचा निर्धारच करून घेतला. लहान-लहान प्रसंगातून साधकांवर अपार प्रेम करणार्‍या त्या कृपावत्सल गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करून ते भावस्पर्शी प्रसंग अर्पण करतो !
कु. सई कुलकर्णी
 १. प.पू. डॉक्टरांशी 
झालेली प्रथम अविस्मरणीय भेट !
        मी ५ वर्षांची असतांना कामाचे निमित्त करून आम्ही (मी, आई आणि बाबा) प.पू. डॉक्टरांच्या दर्शनासाठी शीव (सायन) गेलो होतो. तेव्हा प.पू. डॉक्टरांशी प्रथम भेट झाली. सर्वांना आपलेसे करून घेणार्‍या गुरुमाऊलीने त्या प्रथम भेटीतच आम्हाला तिच्या व्यापक सनातन परिवारात सामावून घेतले. सेवाकेंद्रातून परततांना त्यांनी मला विचारले, तुझा फ्रॉक छान आहे. मी घालू का ? प्रत्यक्ष भगवंताच्या या प्रश्‍नाला काय उत्तर द्यायचे, असा प्रश्‍न माझ्या बालमनाला पडून मी काहीच बोलले नाही. अनेकदा छायाचित्रात पाहिलेली ती प.पू. गुरुमाऊली साक्षात् समोर आल्यावर या जिवाला झालेला आनंद काय वर्णावा ? - कु. सई कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

लाघवी वृत्तीची आणि भावपूर्ण प्रार्थना अन् नामजप करणारी ५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेली जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथील चि. दुर्गा वरेकर (वय ५ वर्षे) !

चि. दुर्गा वरेकर
         जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथील चि. दुर्गा वरेकर हिचा ज्येष्ठ कृष्ण पक्ष द्वादशी (१.७.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्या नातेवाइकांना तिच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
चि. दुर्गा हिला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराकडून शुभाशीर्वाद !
         चि. दुर्गामध्ये असलेल्या स्वभावदोषांमुळे तिची वर्ष २०१४ मध्ये असलेली ५९ टक्के आध्यात्मिक पातळी वर्ष २०१६ मध्ये ५३ टक्के झाली आहे. बालक दैवी असले, तरी त्यांच्याकडे सातत्याने लक्ष दिले, तरच ती साधनेत पुढे जातात, हे चि. दुर्गाच्या उदाहरणावरून लक्षात येते. तिची पुढील प्रगती जलद व्हावी, यासाठी तिच्या आई-वडिलांनी तिच्या स्वभावदोषांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सर्वच पालकांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
२०१५ च्या गुरुपौर्णिमा महोत्सवानंतर वर्षभरात 
चि. दुर्गाची तिच्या नातेवाइकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. सौ. प्रीती वरेकर (चि. दुर्गाची आई), 
जयसिंगपूर, जि. कोल्हापूर. (२९.३.२०१६)
१ अ. चि. दुर्गाने श्रीकृष्णाला भावपूर्ण प्रार्थना केल्यावर आईचे दुखणे लगेचच थांबणे : एके दिवशी सायंकाळी माझे डोके, पोट आणि डावा पाय दुखत होता. त्यासाठी मी औषध घ्यायचे ठरवले. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, चि. दुर्गाला याविषयी सांगूया. मी चि. दुर्गाला मला होणार्‍या त्रासाविषयी सांगितल्यावर लगेच तिने श्रीकृष्णाला प्रार्थना केली. तिची प्रार्थना इतकी भावपूर्ण होती की, दुसर्‍याच क्षणी माझे दुखणे पूर्ण थांबले.

आध्यात्मिक खेळ खेळणारा आणि प्रगल्भतेने उत्तरे देणारा ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला फोंडा, गोवा येथील चि. श्रीरंग सुदेश दळवी (वय ५ वर्षे) !

चि. श्रीरंग दळवी
         चि. श्रीरंग याची २०१४ मध्ये आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती.
         ज्येष्ठ कृष्ण पक्ष द्वादशी (१.७.२०१६) या दिवशी फोंडा, गोवा येथील चि. श्रीरंग सुदेश दळवी याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
चि. श्रीरंग दळवी याला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. प्रेमभाव
१ अ. स्वतःला आवडणारी बिस्किटे समवेतच्या मुलांना वाटणे : देवदर्शन झाल्यावर दोन दिवसांनी आम्ही गोव्याला परतण्यापूर्वी श्रीरंगने त्याच्या बाबांना त्याच्या आवडीचा एक बिस्किटचा पुडा घेण्यास सांगितला. त्यातील एक बिस्किट त्याने खाल्ले आणि आमच्यासमवेत असणार्‍या इतर मुलांशी खेळायला गेला. थोड्या वेळाने येऊन त्याने मला विचारले, आई, आपण आता गोव्याला जाण्यासाठी निघायचे आहे का ? मी हो म्हणाले. तो परत गेला आणि दोन मिनिटांनी त्याच्यासमवेत खेळणार्‍या सर्व लहान मुलांना घेऊन आला आणि मला म्हणाला, आई, बाबांनी ती बिस्किटे घेतली आहेत ना, त्यातील एक-एक बिस्किट या सर्वांना दे. मला आश्‍चर्य वाटले; कारण त्याला ती बिस्किटे इतकी आवडतात की, एरव्ही तो ती बिस्किटे ४ - ५ दिवस पुरवून पुरवून खातो. मी त्याला पुन्हा विचारले, नक्की देऊ ना त्यांना ? त्यावर चि. श्रीरंग म्हणाला, हो, दे. आता हे सगळे मला पुन्हा लवकर भेटणार नाहीत ना, म्हणून मला ही बिस्किटे त्यांना द्यायची आहेत. मी त्याला म्हणाले, ठीक आहे. ही त्यांना देऊया आणि तुला पुन्हा दुसरा पुडा घेऊया. त्यावर श्रीरंग म्हणाला, नको नको. मी एक खाल्ले आहे. पुरे मला. त्या वेळी मला त्याच्या बोलण्या-वागण्यात पुष्कळ प्रेमभाव अनुभवायला मिळाला.

हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य, हे ईश्‍वरी कार्य असून ईश्‍वरेच्छेनेच ते घडत असल्याविषयी सुचलेले विचार

डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले
     ३.४.२०१६ या दिवशी माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे मी खोलीत उपाय करत बसले होते. त्या वेळी सध्या साधकांचे त्रास का वाढले आहेत ?, असा प्रश्‍न मनात येत होता. त्याच वेळी माझे लक्ष देवघरात ठेवलेल्या रामपंचायतनच्या चित्राकडे गेले. तेव्हा देवाने मला पुढील विचार सुचवले. 
१. हिंदु राष्ट्र म्हणजे रामराज्य !
     हिंदु राष्ट्र म्हणजे रामराज्य ! प्रजेला सर्वतोपरी स्वास्थ्य आणि परम आनंद देणारे कल्याणकारी राज्य होय. या रामराज्यात दुर्बळांच्या अधिकारांचे आणि जीवन जगण्याच्या हक्काचे संरक्षण करणारे राज्यकर्ते असतात.
२. त्रेतायुगात धर्म संस्थापनेसाठी घडलेली रामलीला
     त्रेतायुगात श्रीरामाने रावणाचा वध करून धर्मसंस्थापना केली, म्हणजे रामराज्य आणले, हे आपण जाणतोच. चित्रातील श्रीराम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान यांच्याकडे पहातांना हे सर्वजण धर्मसंस्थापना करण्यासाठी कराव्या लागलेल्या रामलीलेच्या व्युहासाठी एकत्र आले आहेत. या रामलीलेत प्रत्येकाचा वेगळा; पण महत्त्वपूर्ण सहभाग आहे, असा विचार आला.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

      हिंदु राष्ट्रात (सनातन धर्म राज्यात) जात, धर्म इत्यादींनुसार आरक्षण नसेल, तर क्षमतेनुसारच नोकर्‍या दिल्याने प्रशासन सक्षम असेल. त्यामुळे जनतेचे सर्व प्रश्‍न वर्षानुवर्षे न रेंगाळता तात्काळ मार्गी लागतील. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले परात्पर गुरु डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
आनंद माझ्या मागे आहे. दुःख माझ्या पुढे आहे.
माझ्या मागे जो आनंद आहे, तो तुमच्या मागे
येईल, तेव्हा मी सुखी होईन. मी दुःखी आहे.
भावार्थ : आनंद माझ्या मागे आहे, याचा अर्थ याप्रमाणे आहे. सुषुम्ना नाडीतून शक्तीप्रवाह जाऊ लागला की, आनंदाची अनुभूती येते. ही सुषुम्ना नाडी पाठीच्या मणक्यातून, म्हणजे शरीराच्या मागच्या भागातून जात असल्याने आनंद माझ्या मागे आहे, असे म्हटले आहे. दुःख माझ्या पुढे आहे म्हणजे प्रकृतीमुळे निर्माण झालेले भोग समोर येतात, त्याचे दुःख होत असते. मी दुःखी आहे म्हणजे तुम्ही नामजप करून आनंदी होत नाही, याचे मला दुःख आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

बोधचित्र


गुरुपौर्णिमेला १८ दिवस शिल्लक

गुरु शिष्याला माध्यम न करता स्वयंप्रकाशी करतात.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

समर्पित व्हा ! 
इतरांना प्रकाश देण्यासाठी ज्योत सतत तेवत रहाते. तोच आदर्श समोर ठेवावा 
आणि गरजू लोकांसाठी आपले जीवन समर्पित करावे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

संवेदनशून्यतेची परिसीमा !

संपादकीय 
     राजस्थान महिला आयोगाच्या सदस्या सौम्या गुर्जर यांनी बलात्कार पीडित महिलेला बरोबर घेऊन सेल्फी काढली. त्यांचा हा प्रताप छायाचित्रात कैद झाला आणि हे चित्र सर्वत्र प्रदर्शित झाले. त्यांच्यावर टीकेचे झोड उठल्यावर महिला आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यात चिड आणणारी बाब म्हणजे छायाचित्रात सौम्या गुर्जर या हसत आहेत, तर आयोगाच्या अध्यक्षा सुमन शर्मा बलात्कार पीडित महिला सेल्फीच्या फ्रेममध्ये यावी, यासाठी त्यांचा हात ओढत आहेत.

इसिसच्या मुसक्या कशा आवळणार ?

संपादकीय
   भाग्यनगरमधील मंदिरांमध्ये गोमांस ठेवून शहरात दंगली घडवून आणण्याचा इसिस (इस्लामिक स्टेट) या जिहादी आतंकवादी संघटनेचा डाव उघड झाला. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) भाग्यनगरमधील मीरचौक, मोगलपुरा, बरकास आणि जुन्या भाग्यनगर परिसरात छापे टाकून इसिसशी संबंधित ११ संशयितांना कह्यात घेतले. त्यांच्याकडून ही धक्कादायक माहिती मिळाली. खरेतर ही माहिती धक्कादायक आहे, असे म्हणण्यापेक्षा जिहादी आक्रमणात इतकी दशके पोळूनही अद्याप आतंकवादाच्या मुसक्या कशा आवळायच्या याविषयीचे धोरण निश्‍चित नसणे अधिक धक्कादायक आहे, असे म्हणणे सर्वार्थाने संयुक्तिक ठरेल. त्याचे कारण म्हणजे जेव्हा दोन वर्षांपूर्वी इसिसने इराकमध्ये हात-पाय पसरणे चालू केले होते, तेव्हा संपूर्ण जगासह भारतालाही या संकटाची चाहूल लागली होती.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn