Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडणार !

  • इंग्लंडमध्ये अशा प्रकारचे सार्वमत घेतले जात असेल, तर भारतातही राममंदिर, समान नागरी कायदा, कलम ३७० हटवणे, यासाठीही सार्वमत घेण्यात यावे, असे हिंदूंना वाटल्यास चुकीचे काय !
  • रुपयाचे मूल्य घसरले, शेअर बाजार गडगडला !
  • पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन त्यागपत्र देण्याच्या सिद्धतेत !
      लंडन - युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी २३ जूनला घेतलेल्या सार्वमतामध्ये ५२ टक्के नागरिकांनी बाहेर पडण्याच्या बाजूने कौल दिल्याने ब्रिटन युरोपातील २८ देशांचा महासंघ असलेल्या आणि युरोपसह जागतिक अर्थव्यवस्थेत दीर्घकाळ महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या ‘युरोपियन युनियन’मधून (‘इयु’मधून) बाहेर पडणार हे निश्‍चित झाले आहे. इराक-सिरियातील युद्धग्रस्त स्थितीमुळे तेथील मुसलमान निर्वासितांनी युरोपमध्ये आश्रय घेतल्यामुळे तेथील अर्थव्यवस्थेवर आणि सामाजिक स्थितीवर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळेच ब्रिटनमधील नागरिकांनी या महासंघातून बाहेर पडण्याची मागणी केली. त्यावर सार्वमत घेण्यात आले. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन म्हणाले की, मी ऑक्टोबरपर्यंत त्यागपत्र देईन. देश ज्या दिशेने चालला आहे, त्या स्थितीत नेतृत्व करण्याची मला इच्छा नाही. कन्झर्व्हेटीव्ह पक्षाने नवा नेता निवडला पाहिजे. मागील वर्षी झालेल्या सर्वसाधारण निवडणुकीपेक्षा अधिक लोकांनी या सार्वमतामध्ये भाग घेतला. मतदानाचे निकाल हाती येताच ब्रिटनच्या ‘पाऊंड’ या चलनाच्या मूल्यात विक्रमी घसरण झाली. ब्रिटनच्या जनतेने दिलेल्या या निर्णयाचा परिणाम युरोपबाहेरही दिसू लागला आहे. भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक १००० अंकांनी घसरला, तर डॉलरच्या तुलनेत रुपयाही घसरला आहे.

हिंदुत्वावरील आघात रोखण्यासाठी संतांनी संघटित होणे आवश्यक ! - प.पू. श्रीराम बालकदासजी महात्यागी महाराज

पंचम अखिल भारतीय हिंदू 
अधिवेशनाच्या अंतर्गत ‘हिंदु राष्ट्र-संघटक 
अधिवेशना’तील उद्बोधन सत्रात संत-महंतांना आवाहन 
        रामनाथी (गोवा) - हिंदुत्वावर विविध माध्यमांद्वारे आघात होत आहेत. संतांचा छळ होण्याचे प्रमाण प्रतिदिन वाढतच आहे. देशविरोधी आणि धर्मविरोधी षड्यंत्रकार्‍यांनी हिंदुत्व आणि हिंदु संत यांना घेरले आहे. देशभरातील हिंदु संतांचा असंघटितपणा हे याचे मुख्य कारण आहे. ही स्थिती पालटण्यासाठी देशातील संतसमाजाला एका ध्येयाच्या सूत्राने संघटित केले पाहिजे. हिंदु समाज हिंदुत्वनिष्ठांचा अभेद्य गड बनला पाहिजे. यादृष्टीने धोरण ठरवून योजनाबद्ध पद्धतीने ध्येय साध्य होईपर्यंत अविरत कार्य केले पाहिजे, असे मार्गदर्शन ‘छत्तीसगढ गोसेवा आयोगा’चे संरक्षक प.पू. श्रीराम बालकदासजी महात्यागी महाराज यांनी केले. रामनाथी, गोवा येथे २३ जून या दिवशी पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या द्वितीय सत्रातील ‘हिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशना’च्या ‘हिंदुत्वाचे रक्षण’ या उद्बोधन सत्रात ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील हिंदु विद्या केंद्राचे संचालक प्रा. रामेश्‍वर मिश्र, भोपाळ (मध्यप्रदेश) येथील धर्मपाल शोध पिठाच्या संचालिका प्रा. कुसुमलता केडिया आणि हिंदु जनजागृती समितीचे पूर्वोत्तर राज्यांचे समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी प.पू. श्रीराम बालकदासजी महात्यागी महाराज यांचा सन्मान केला.

राममंदिरासाठी शिळा आयात करण्यास अनुमती नाकारली

उत्तरप्रदेशातील समाजवादी 
पक्षाच्या सरकारची मोगलाई !
        अयोध्या - उत्तरप्रदेशच्या व्यावसायिक कर विभागाने विश्‍व हिंदु परिषदेला प्रस्तावित राममंदिराच्या बांधकामासाठी राजस्थान आणि गुजरातमधून शिळा आयात करण्यास अनुमती नाकारली आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये राज्य सरकारने मंदिराच्या कार्यशाळेत ठेवण्यासाठी शिळा आयात करण्याची अनुमती दिली होती. स्थानिय आयकर कर्मचार्‍यांनी विहिंपला शिळा आयात करण्यासाठी आवश्यक असणारा अर्ज क्र. ३९ नाकारला आहे. ‘वरून’ आलेल्या आदेशाचा हवाला देत हा अर्ज देण्यात आलेला नाही. राज्यात शिळा आयात करण्यासाठी वॅट कर लागतो आणि त्यासाठी या अर्जाची आवश्यकता असते. विहिंप या अर्जाच्या माध्यमातून आतापर्यंत शिळा आयात करत होती.
        व्यावसायिक कर विभागाचे अतिरिक्त आयुक्त अखिलेश शुक्ला म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने विवादित भूमी ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिलेला आहे. जर आम्ही मंदिराच्या उभारणीसाठी लागणार्‍या शिळांच्या आयातीची अनुमती दिली, तर तेे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होईल.

‘शोरगुल’ चित्रपटाला एका मुसलमान संघटनेकडून विरोध झाल्याने प्रदर्शन पुढे ढकलले !

एका सर्वसाधारण मुसलमान संघटनेकडून विरोध झाल्यावर 
चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले जाते; मात्र लक्षावधी हिंदूंनी आणि त्यांच्या 
संघटनांनी विरोध करूनही ‘पीके’ सारखे चित्रपट पोलीस संरक्षणात प्रदर्शित होतात !
        मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) - येथील खामन पीर बाबा कमिटीकडून हिंदी चित्रपट ‘शोरगुल’ला विरोध करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगलीविषयी हा चित्रपट बनवण्यात आला आहे. यातील काही संवाद मुसलमानांच्या भावना दुखावणार्‍या असल्याचे या कमिटीकडून सांगण्यात आले आहे. मात्र चित्रपट निर्मात्याने यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे म्हटले आहे. तरीही आधी २४ जूनला प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता १ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

(म्हणे) ‘सनातन संस्थेवर बंदीसाठी सोमवारपासून दलित महासंघाचे राज्यव्यापी आंदोलन करणार !’

प्रा. मच्छिंद्र 
सकटे यांचा हिंदुद्वेष जाणा !
         ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली), २४ जून (वार्ता.) - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर सनातन संस्था चर्चेत आली. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) तपासात डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या मागे सनातन संस्थेचे डॉ. वीरेंद्र तावडे यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. (न्यायालयाने निकाल देण्यापूर्वी स्वत:हूनच निर्णय जाहीर करणे, याला आगाऊपणा नाही तर काय म्हणणार ? - संपादक) यापूर्वी गोवा, पनवेल, वाशी येथे झालेल्या स्फोटातही सनातन संस्थेचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे देशविरोधी कृत्ये करून हिंदु राष्ट्र निर्मितीची स्वप्ने बघणार्‍या सनातन संस्थेवर बंदी आणावी या मागणीसाठी २७ जूनपासून राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती दलित महासंघाचे प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (सीबीआयने डॉ. तावडे यांना केवळ संशयित म्हणून अटक केले आहे. त्यांच्यावर अद्याप कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही. असे असतांना केवळ सनातनद्वेषातून राज्यव्यापी आंदोलनाची चेतावणी देणार्‍यांना त्यांची जागा आता जनताच दाखवून देईल ! - संपादक)

भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्च्याने हज हाऊसमध्ये आयोजित केलेल्या ‘इफ्तार पार्टी’त मुख्यमंत्र्यांनी गोल टोपी घालण्याचे टाळले ?

       मुंबई - भाजपच्या मुंबईतील अल्पसंख्यांक मोर्च्याच्या वतीने नुकत्याच हज हाऊस येथे आयोजित केलेल्या ‘इफ्तार पार्टी’त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत अनेक नेते उपस्थित होते. मागील वर्षी मुख्यमंत्री गोल टोपी घालून ‘इफ्तार पार्टी’त सहभागी झाले होते; परंतु या वर्षी त्यांनी गोल टोपी घालण्याचे टाळले. हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावामुळेच मुख्यमंत्र्यांनी गोल टोपी घालण्याचे टाळल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.
बजरंग दलाचे महाराष्ट्र प्रांत संयोजक 
शंकर गायकर यांची फडणवीस शासनावर टीका
       या प्रकरणी बजरंग दलाचे महाराष्ट्र प्रांत संयोजक शंकर गायकर यांनी फडणवीस शासनावर जोरदार टीका केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी ‘फेसबूक’ या सामाजिक संकेतस्थळावर ‘धर्म छोडा, लज्जा छोडी, कितने अपराध करोगे पाखंडी’ अशी कविता ‘पोस्ट’ केली आहे. (हिंदुत्ववाद्यांच्या भावना राज्यातील भाजप सरकार समजून घेईल का ? - संपादक) त्या कवितेमध्ये राज्याच्या अर्ध्याहून अधिक मंत्र्यांवर विविध प्रकारचे आरोप असल्याचा संदर्भही आहे. त्या ‘पोस्ट’ला भाजप कार्यकर्त्यांच्या सर्वाधिक आवड (लाइक्स) मिळाल्या आहेत.

पाण्याच्या टाक्या वितरण घोटाळा प्रकरणी माजी मंत्री चर्चिल आलेमाव आणि ५ अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंद !

काँग्रेस सत्तेतून हद्दपार होऊन चार वर्षे झाली, तरी अद्यापही घोटाळे
 उघड होण्याची मालिका चालूच आहे ! घोटाळे करून देशाची कोट्यवधी 
रुपये संपत्ती उधळणार्‍या या भ्रष्टाचार्‍यांकडून ती सव्याज वसूल करा !
       पणजी, २४ जून (वार्ता.) - पाण्याच्या टाक्या वितरण घोटाळा प्रकरणात गोव्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे तत्कालीन मंत्री चर्चिल आलेमाव आणि ५ शासकीय अधिकारी यांच्या विरोधात भ्रष्टाचारविरोधी पथकाने गुन्हा प्रविष्ट केला आहे.
       यापूर्वी कोट्यवधी रुपयांच्या जायका लाच प्रकरणातही आलेमाव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झालेला असून त्यांची चौकशी चालू आहे. वर्ष २००७-२०११ या काळात अवैधपणे १ कोटी ४५ लक्ष रुपयांचे कंत्राट देऊन ६ सहस्र ५११ पाण्याच्या टाक्या खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आलेमाव यांनी मूळ कंत्राटाची रक्कम २५ ते ३० टक्के वाढवून दिल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले आहे.

पाण्याचा अधिक वापर आणि कापडी घर्षण यांमुळे श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर पांढरे डाग !

रासायिनक संवर्धनाचा फटका !
         कोल्हापूर, २४ जून (वार्ता.) - पाण्याचा प्रमाणापेक्षा अधिक वापर केल्याने आणि पाणी पुसतांना होणार्‍या कापडी घर्षणामुळे श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर पांढरे डाग पडलेले आहेत, असा लेखी खुलासा पुणे येथील डेक्कन महाविद्यालयाचे सल्लागार रसायनतज्ञ डॉ. मॅनेजर सिंग यांनी देवस्थान समितीकडे पत्रव्यवहाराद्वारे केला आहे. मे मासात डॉ. सिंग यांनी मूर्तीची पाहणी करून मूर्तीवर आयुर्वेदिक लेपन केले होते; मात्र याची पूर्वसूचना त्यांनी देवस्थान समितीला दिली नव्हती. मूर्तीवर पडत असलेल्या पांढर्‍या डागांविषयी सविस्तर माहिती द्यावी, असे पत्र देवस्थान समितीने डॉ. सिंग यांना दिले होते. डॉ. सिंग यांनी पत्राद्वारे खुलासा करून समस्येचे कारण स्पष्ट केले आहे. (याला उत्तरदायी असणार्‍यांचा शोध घेऊन जिल्हाधिकारी दोषींवर कारवाई करतील का ? मुळात रासायनिक संवर्धनाच्या प्रक्रिया होऊनही मूर्तीची झीज होत आहे. दिवसेंदिवस मूर्तीची दुर्दशा वाढत आहे. यासाठी श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने श्री महालक्ष्मीदेवीची नवीन मूर्ती आणि इतर सांगितलेल्या गोष्टी देवस्थान समितीने पाळल्या असत्या, तर आज ही वेळ आली नसती. - संपादक)

आतंकवाद्यांना जामीन मिळवून देण्यासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासींचा वापर !

आतंकवादाचे लोण आता आदिवासी 
भागापर्यंत ! शासन आतंकवाद्यांच्या या 
नव्या कारवायांना कशाप्रकारे सामोरे जाणार आहे ?
       मोखाडा (जिल्हा पालघर) - आतंकवाद्यांच्या हस्तकांद्वारे मुंबईत घातपात घडवण्याच्या कटाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आतंकवाद्यांच्या जामिनासाठी पालघर जिल्ह्यातील मोखाडा परिसरातील गरीब आणि अशिक्षित आदिवासींचा वापर होत आहे, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पैशांचे प्रलोभन दाखवत किंवा कर्ज काढून देतो, असे सांगत त्यांच्या नावे सिद्ध करण्यात आलेल्या बनावट कागदपत्रांचा वापर आतंकवाद्यांना जामीन मिळवून देण्यासाठी केला जात आहे. आतंकवाद्यांचे हस्तक तीन वर्षांपासून या परिसरात सक्रीय आहेत. (आतंकवाद्यांचे हस्तक तीन वर्षांपासून या परिसरात कारवाया करत असतांना पोलीस यंत्रणा या विषयी अनभिज्ञ असणे, हे अनाकलनीय आहे. - संपादक)
१. आतंकवाद्याला जामीन रहातांना बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या प्रकरणी मोखाडा तालुक्यातील जोगलवाडी या खेड्यातील भीमा सारक्ते या अशिक्षित आदिवासीला ६ मासांचा तुरुंगवास भोगावा लागला.
२. मुंबईतील काळाचौकी पोलिसांनी ५ डिसेंबर २०१४ या दिवशी बाबू अब्दुल हक खान या आतंकवाद्याला अटक केली होती. त्याला जामीन रहाण्यासाठी आतंकवाद्यांच्या हस्तकांनी भीमाला कर्ज मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले.

‘पुणे मिरर’ या इंग्रजी दैनिकाने सनातनच्या आश्रमाची झडती घेतल्याच्या संदर्भातील आक्षेपार्ह वृत्त देण्याविषयी सीबीआय आणि एस्आयटी यांनी अहवाल सादर करावा ! - अधिवक्ता समीर पटवर्धन यांची न्यायालयात अर्जाद्वारे मागणी

  • कॉ. गोzद पानसरे हत्या प्रकरण
  • पुढील सुनावणी १२ जुलैला
        कोल्हापूर, २४ जून (वार्ता.) - ‘पुणे मिरर’ या इंग्रजी दैनिकाच्या २२ जूनच्या अंकात केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) आणि विशेष अन्वेषण पथक (एस्आयटी) यांनी संयुक्तिकरित्या गोवा राज्यातील फोंड्याजवळील सनातनच्या रामनाथी आश्रमाची झडती घेतली, असे आक्षेपार्ह वृत्त प्रसिद्ध केले आहे. असे जर असेल, तर सीबीआय आणि एस्आयटी यांनी आश्रमाची झडती घेण्याविषयी कोणत्या न्यायालयातून ‘सर्च वॉरंट’ जारी केले, त्याचा अहवाल न्यायालयात सादर करावा, असे आवेदन (अर्ज) श्री. समीर गायकवाड यांचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी २४ जून या दिवशी न्यायालयात सादर केले. सीआर्पीनुसार त्यांनी हे आवेदन सादर करून ही मागणी केली आहे. यावर १२ जुलै या दिवशी सुनावणी करण्याचा आदेश अतिरिक्त आणि सत्र न्यायाधीश एल्.डी. बिले यांनी दिला.
        या वेळी श्री. समीर गायकवाड यांचे दुसरे अधिवक्ता श्री. एम्.एस्. सुहासे उपस्थित होते. शासकीय पक्षाच्या वतीने अधिवक्ता चंद्रकांत बुधले उपस्थित होते.

मासानुसार देवतांची रेखाचित्रे असलेले ‘प्रतिष्ठा-लक्षण-सार-समुच्चय’ हे दुर्मिळ नेपाळी हस्तलिखित सापडले

       पुणे, २४ जून - प्रत्येक मासानुसार देवतांची रेखाचित्रे असलेले नेपाळी भाषेतील इसवी सन १६४५ मधील ‘प्रतिष्ठा-लक्षण-सार-समुच्चय’ हे दुर्मिळ हस्तलिखित सापडले आहे. सध्या ते काठमांडू येथील नेपाळ-जर्मनी राष्ट्रीय जतन ग्रंथालयामध्ये संग्रहित आहे, अशी माहिती हस्तलिखितांचे अभ्यासक वा.ल. मंजूळ यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की...
१. भारतीय उपासना परंपरेमध्ये ३३ कोटी देव आहेत. अशा देवतांच्या शेकडो पितळी मूर्ती पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरामधील संत नामदेव पायरीच्या वरच्या भागात होत्या. त्याला ‘३३ कोटी देव मंदिर’ असे संबोधले जात असे. त्या मूर्तींचे रेखाचित्र असलेल्या हस्तलिखितावर चित्रकाराचे नाव नाही.
२. नेपाळी शैलीतील वस्त्ररहित; परंतु आयुधासह अनेक देवता या हस्तलिखितावर पहावयास मिळतात.

अकोला येथील सनातनचे साधक श्री. राजेश राजंदेकर यांचा जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते सत्कार

श्री. राजेश राजंदेकर (डावीकडे)
यांचा सत्कार करतांना जिल्हाधिकारी
        अकोला (वार्ता.) - स्थानिक रॅलीज इंडिया कंपनीत असिस्टंट मॅनेजर या पदावर कार्यरत असणारे सनातनचे साधक श्री. राजेश श्यामसुंदर राजंदेकर यांचा २० सहस्र क्युबिक लिटर पाणी वाचवल्याचे उत्कृष्ट कार्य केल्याविषयी येथील जिल्हाधिकारी श्री. जी. श्रीकांत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री. राजंदेकर यांनी कंपनीच्या वतीने सिसा. बोंदरखेड या खेड्यात २.५ एकर शेतीमध्ये ‘पाणी जिरवा’ या कार्यक्रमाअंतर्गत गावकर्‍यांच्या मदतीने भरीव कार्य केले. सत्कार झाल्यावर ते म्हणाले, ‘‘अल्प कालावधीत मी हे केवळ गुरुकृपेनेच करू शकलो. यासाठी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञ आहे.’’

सौदी अरेबियातील हिंदूंची मोदी शासनाकडून अपेक्षा !

सौदी अरेबियातील हिंदूंच्या व्यथा ! : ‘फेसबूक’वर हिंदु जनजागृती समितीची पोस्ट पाहून मूळचे बिहारमधील आणि सध्या सौदी अरेबियात रहाणारे श्री. नंदूजी यांचा +८१७८८५९९ या क्रमांकावरून भ्रमणभाष आला. ते सौदी अरेबियातील हिंदूंच्या व्यथांविषयी बोलतांना म्हणाले, ‘‘येथे हिंदूंना इस्लाम स्वीकारायला लागतो. येथे नोकरीसाठी आलेल्यांचा प्रवेश परवाना काढून घेतला जातो; त्यामुळे मायदेशी परतणे अवघड होते. हिंदूंना पुष्कळ मारहाणही केली जाते. मला भारतातील कोणत्याही लोकप्रतिनिधीचा क्रमांक मिळाल्यास त्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत ही व्यथा आम्हाला पोचवायची आहे.’
- श्री. आनंद जाखोटिया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.६.२०१६)

सनातन संस्थेला संकेतस्थळाच्या माध्यमातून हिंदूंकडून मिळणारा पाठिंबा !

       डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सनातन संस्थेचे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर अंनिस आणि तथाकथित पुरो(अधो)गामी संघटना यांनी ‘सनातन संस्थेवर बंदी आणा !’ अशी आवई उठवली आहे. त्यांच्या या मागणीचा संकेतस्थळांवर खरपूस समाचार घेत हिंदूंनी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. त्यातून त्यांनी सनातन संस्थेला पाठिंबाच दर्शवला आहे. (सनातन संस्थेला पाठिंबा दर्शवणार्‍या हिंदूंचे आभार ! - संपादक) त्या प्रतिक्रिया आम्ही आमच्या वाचकांसाठी देत येथे आहोत.
१. कुठल्याही खटल्यात सनातन संस्था 
आरोपी नाही, मग कसली बंदी ? - बाळा नाडकर्णी
       आजवर देशातील न्यायालयात प्रविष्ट असलेल्या कुठल्याही खटल्यात सनातन संस्था आरोपी नाही. मग कसली बंदी घालणार आहात ?
२. कोणत्याही शिकलेल्या आणि डोळस विचाराच्या 
माणसाला सनातन संस्था कळेल ! - शेखर कदम
       सनातन संस्था केवळ कर्मकांड शिकवते. त्यांच्या लिखाणाकडे थोडे पहा. कोणत्याही शिकलेल्या आणि डोळस विचाराच्या माणसाला सनातन संस्था कळेल. कधी तुम्हाला संत तुकाराम समजणार देव जाणे ?

हिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशनातील ‘हिंदुत्वाचे रक्षण’ सत्राचा उर्वरित वृत्तांत

हिंदूंचा गौरवशाली इतिहास पुढे यावा, 
यासाठी लढा देणे आवश्यक ! - प्रा. रामेश्‍वर मिश्र 
        हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आम्हाला क्षात्रतेजाबरोबर ब्राह्मतेजाचीही आवश्यकता आहे. इतिहास हा विषय अपरा विद्येतील मोठा विषय आहे. हिंदु समाजामध्ये आपल्या धर्म, परंपरा, पूर्वज यांविषयी गौरव निर्माण व्हावा, यासाठी भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन झाले पाहिजे. युरोपमधील सर्व देशांना २०० वर्षांपूर्वीपेक्षा अधिक काळाचा इतिहास नाही. त्यामुळे युरोपियन समाजाने लंडनच्या राजांना केंद्रबिंदू मानून इतिहास लिहिला आहे. रामायण, महाभारत यांना हे लोक इतिहास म्हणत नाहीत. खोटारड्या, लबाड लोकांनी लिहिलेला खोटा इतिहास आमच्यावर थोपला जात आहे. इंग्लंड आणि फ्रान्स या देशांचा इतिहास शिकवून आम्ही देशाला महान बनवू शकत नाही. खर्‍या इतिहासासाठी आपण लढले पाहिजे. जर खरा इतिहास शिकवत नसतील, तर आम्ही दुसरी विश्‍वविद्यालये निर्माण करू, असे हिंदूंनी सांगितले पाहिजे. आपला महापराक्रमी सम्राट केंद्रबिंदू असलेला खरा इतिहास लिहिला गेला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या संस्कृतीनुरूप कायदे बनवण्यासाठी आपण शासनावर दबाव आणला पाहिजे. देवता आणि धर्म यांचा अवमान करणार्‍यांना कडक शासन करण्याची तरतूद या कायद्यांत असली पाहिजे. दुर्दैवाने भारतात अल्पसंख्यांकांना धार्मिक अधिकार असलेले कायदे आहेत; मात्र हिंदूंना नाहीत.

पुण्यात अवैधरित्या स्त्री-बीज विक्रीचा (सरोगसी) प्रकार उघडकीस

पोलीस प्रशासन, महानगरपालिका, राज्य आणि केंद्र शासन या समस्येला कसे रोखणार आहे ?
    पुणे, २४ जून - येथील हडपसर भागातील रामटेकडी झोपडपट्टीतील महिलांद्वारे अवैधरित्या स्त्री-बीज विक्रीचा (सरोगसी) व्यवसाय चालू असल्याचा अपप्रकार पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. येथील २५ दिवसांच्या एका बाळंतिणीची हत्या करून तिच्या बाळाचे अपहरण केल्याची घटना १८ जून या दिवशी उघड झाली होती. त्या गुन्ह्यातील महिला आरोपीने ही माहिती दिली. स्त्री-बीज विक्रीतून महिलांना १५ सहस्र रुपये मिळत असल्याचेही त्या महिला आरोपीने सांगितले, तसेच ती आरोपी महिला त्या महिलांना येथील विमाननगर भागातील एका खाजगी केंद्रामध्ये नेऊन स्त्री-बीज दान करून घेत असे.

सोलापूर येथे कत्तलीसाठी आणलेल्या १६ गोवंशियांची पोलिसांकडून मुक्तता

शासनाने आतातरी गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोरात कठोर अंमलबजावणी करावी !
   सोलापूर, २४ जून मुस्लीम पाच्छा पेठेतील शहीद भगतसिंग चौकाजवळ असलेल्या पत्र्याच्या गोडाऊनमध्ये कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या जवळपास १६ गोवंशियांना पोलिसांनी मुक्त केले. या प्रकरणी धर्मांध पंजाबी कुरेशी याच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
   पोलिसांनी टाकलेल्या धाडीत गोवंशियांच्या चारा-पाण्याची व्यवस्था केली नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांना कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचा संशय आल्याने १६ गोवंशियांची मुक्तता करण्यात आली. गायींना जीवदान दिल्यामुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पुण्यातील मुंढवा शुद्धीकरण प्रकल्पातून शेतीला अशुद्ध पाणी पुरवल्याप्रकरणी पालिकेवर कारवाईची मागणी

आता कुठे आहेत 
तथाकथित पर्यावरणवादी ?
        यवत (पुणे), २४ जून - पुणे महानगरपालिकेकडून नदीचे सांडपाणी मुंढवा शुद्धीकरण प्रकल्पातून छोट्या कालव्यात सोडतांना ते पूर्णपणे शुद्धीकरण करूनच सोडणे बंधनकारक आहे. असे असतांनाही ७५० कोटी लिटर (एम्एल्डी) एवढ्या सांडपाण्यापैकी ३५० कोटी लिटर (एम्एल्डी) पाणी प्रक्रिया न करताच सोडले जाते. सध्या प्रक्रिया केलेले आणि प्रक्रिया न केलेले सांडपाणी मुंढवा शुद्धीकरण प्रकल्पातून छोट्या कालव्यांद्वारे हवेली आणि दौंड तालुक्यातील शेतीला पुरवण्यात येते. परिणामतः कालव्यातील पाणी प्रदूषित आहे. त्यामुळे पर्यावरण खात्याने याची त्वरित नोंद घेऊन कारवाई करावी, अशी मागणी पुणे जिल्हा भाजप सरचिटणीस आणि दौंड भाजपचे ज्येष्ठ नेते तानाजी दिवेकर यांनी पर्यावरण मंत्रालयाकडे केली आहे. (नागरिकांच्या जिवाशी खेळणारे पालिका प्रशासन ! - संपादक)

चीनमध्ये वादळामुळे ५१ जणांचा मृत्यू !

       बीजिंग - चीनच्या पूर्वेकडील जियांग्सु भागात आलेल्या वादळामुळे ५१ जणांचा मृत्यू, तर अनेक जण घायाळ झाले आहेत. तसेच याचेंग शहरातील अनेक घरांची पडझड झाली आहे. चीनच्या शासकीय वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
       १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या ‘नाडीवाचन क्रमांक ६७’मध्ये महर्षि म्हणतात, ‘‘हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे.’’ (२३ जूनला चीनमध्ये झालेल्या वादळाच्या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती तंतोतंत आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

धर्मशिक्षणवर्गामुळे झालेल्या लाभांसंदर्भात धर्माभिमान्यांनी व्यक्त केलेले मनोगत

धर्मशिक्षणामुळे आपण सिंह असल्याची ओळख 
पटते ! श्री. विश्‍वनाथ कुंडू, हिंदू सेवा मंच, ढुबरी, आसाम 
        विद्याधिराज सभागृह, रामनाथी, २४ जून (वार्ता.) - धर्मशिक्षण हा आपला आरसा आहे. आधुनिक शिक्षण आम्हाला मांजर करते. जेव्हा आपल्याला धर्मशिक्षण मिळते, तेव्हा आपण मांजर नसून सिंह आहोत, ही ओळख होते. आपण सिंहासारखे धर्मरक्षणाचे कार्य करायला लागतो. धर्मशिक्षणातून एकतरी सिंह घडला, तर पूर्ण जंगलामध्ये राज्य करण्यास तो एकटा पुरेसा आहे; म्हणून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे आवश्यक आहे. धर्मशिक्षणामुळे आपले ब्राह्मतेज वाढते आणि आपल्याला स्वस्वरूपाची ओळख झाल्यामुळे आपल्यात क्षात्रतेजही निर्माण होते, असे प्रतिपादन आसाम येथील हिंदु सेवा मंचचे श्री. विश्‍वनाथ कुंडू यांनी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशनात केले.
        धर्मशिक्षणाचे महत्त्व सांगतांना ते पुढे म्हणाले, ‘‘जेव्हा प्रभु श्रीराम रावणाचा वध करण्यास निघाले, तेव्हा त्यांनीही श्री दुर्गादेवीची पूजा केली होती. पांडव धर्माच्या बाजूने होते, तरीही त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे साहाय्य घेतलेच होते. आज पांडवांसारखे धर्मरक्षणाचे कार्य करतांना आपणही भगवंताला सोबत घेऊन धर्मकार्य केले पाहिजे.’’

गोशाळेत ४ गायींचा संशयास्पद मृत्यू !

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेतील प्रकार
    पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २४ जून - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या यमाई तलावाजवळील गोशाळेतील चार गायींचा संशयास्पद मृत्यू झाला असून या गोशाळेत लहान-मोठे भाकड अशी जवळपास ६० जनावरे सांभाळली जातात; मात्र झालेल्या प्रकारामुळे मंदिर समितीच्या हलगर्जीपणाविषयी असंतोषाचा सूर निघू लागला असून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी, अशी मागणी भाविकांतून होत आहे. या प्रकारामुळे मंदिर समितीने गोशाळा विभागप्रमुख अनिल पंडित भणगे यांना नोटीस देऊन त्यांचे स्थानांतर करण्यात आले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी प्रशांत सर्वगोड यांनाही नोटीस काढण्यात आली आहे. तर चारा ठेकेदार सावता माळी यांना २५ सहस्त्र रुपयांचा दंड करण्यात आला आहे, अशी माहिती समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांनी दिली.

पुणे येथे स्मार्ट सिटी उद्घाटनाच्या कार्यक्रमावर ३ कोटी ४३ लक्ष व्यय होणार

देशातील अर्ध्याहून अधिक जनता उपाशी असतांना आणि राज्य दुष्काळाच्या 
छायेत असतांना एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यय करण्याची आवश्यकता आहे का ?
    पुणे, २४ जून - केंद्रशासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम येथे २५ जून या दिवशी होणार आहे. सदर कार्यक्रमाच्या आयोजनावर (इव्हेंट मॅनेजमेंट) १ कोटी ६० लक्ष रुपये, तर विज्ञापनावर एकूण १ कोटी ८३ लक्ष रुपये असे एकूण ३ कोटी ४३ लक्ष रुपये व्यय करण्यात येणार आहेत. हा सर्व व्यय ‘स्मार्ट सिटी’च्या माध्यमातून पालिका करणार आहे. ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या कार्यवाहीसाठी ‘स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशन’ या स्वतंत्र आस्थापनाची स्थापना केली आहे. (या आस्थापनात भ्रष्टाचार होणार नाही, याची काही निश्‍चिती मुख्यमंत्र्यांजवळ आहे काय ? - संपादक) त्या आस्थापनाच्या संचालक मंडळाची २१ जून बैठक झाली, त्यात व्ययाची चर्चा झाली. या व्ययाला पालिकेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी विरोध दर्शवला आहे.

थेरगाव (पुणे) अज्ञात टोळक्याकडून वाहनांची तोडफोड आणि नागरिकांना मारहाण

पुण्यामध्ये पोलिसांचे अस्तित्व संपल्याचे लक्षण !
    पिंपरी, २४ जून - थेरगावमधील पडवळनगर येथे एका १० जणांच्या टोळक्याने २२ जूनच्या रात्री ९ वाजता ४ दुचाकी आणि ४ चारचाकी वाहनांची तोडफोड केली. दुचाकीवरून आलेल्या टोळक्यांच्या हातात तलवार आणि कोयते होते. त्यांनी अक्षय जाधव या तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. नंतर काही तरुणांना मारहाण करत दगडफेकही केली. आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

लातूर येथे ढगफुटीमुळे पूरस्थिती

    लातूर - येथील औराद शहाजानीत दुपारी २.३० वाजता ढगफुटी झाल्याने तेरणा नदीवरील तीन बंधारे तुडुंब भरले. येथे ९० मिनिटांत ९४ मि.मी. पाऊस झाला. १५ वर्षांनंतर जून मासात येथे प्रथमच मोठा पाऊस झाला. त्यामुळे येथे पूरस्थिती निर्माण झाली होती. अधिक पावसामुळे बसस्थानकात पाणी शिरले. बाजारपेठेतील अनेक दुकानांत पाणी गेले. नंदुरबारलाही वादळी वार्‍याने झोडपले.

संभाजीनगर बस स्थानकात बसमध्येच आम्लाच्या बाटलीचा स्फोट !

बसगाड्यांमधून होणार्‍या अवैध वाहतुकीला उत्तरदायींवर कारवाई करायला हवी !
    संभाजीनगर - स्टेशनरी पार्सलच्या नावाखाली बसगाडीमधून होणारी आम्लाची (अ‍ॅसिड) चोरटी वाहतूक आज प्रवाशांच्या जिवावर बेतली. पार्सलमधील आम्लाची बाटली फुटल्याने बसमध्येच स्फोट होऊन सात जण घायाळ झाले. अचानक झालेल्या प्रकाराने घाबरलेल्या प्रवाशांनी बसमधून उड्या टाकल्या आणि मध्यवर्ती बस स्थानकात धावपळ उडाली. ही घटना २१ जूनला सकाळी अकरा वाजता घडली. राजन कांतिलाल झांबड विशाल एंटरप्राईजेसमार्फत महाविद्यालयांना आम्ल पुरवतात. पाथर्डीकडे जाणार्‍या बसमध्ये पार्सल ठेवताच आतील बाटली फुटून स्फोट झाला. अचानक धूर पसरून उग्र वास येऊ लागला. या घटनेने राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी आणि कर्मचारीही स्तंभित झाले.

देहू संस्थानचे माजी विश्‍वस्त रामराव मोरे आणि खासदार अमर साबळे यांची मागणी

श्री क्षेत्र देहू संस्थानच्या अवैध
 जमीन विक्रीची कसून चौकशी करावी !
         चाकण (जिल्हा पुणे), २४ जून - येथील श्री क्षेत्र देहू देवस्थान संस्थानच्या अंदाजे ५०० एकर जमिनीपैकी काही जमिनी विविध शेतकर्‍यांना उदरनिर्वाहासाठी देण्यात आल्या होत्या. त्यातील काही जमिनींची काही शेतकर्‍यांनी महसूल अधिकार्‍यांशी संगनमत करून परस्पर विक्री केली आहे. संस्थानचे जमीनक्षेत्र पुणे, पिंपरी-चिंचवड आणि चाकण औद्योगिक क्षेत्रांतर्गत येत असल्याने त्याचे मूल्य बाजारभावाप्रमाणे वाढले आहे. यामुळे त्या शेतकर्‍यांनी संस्थान आणि धर्मादाय आयुक्त यांच्या संमतीशिवाय अवैधरित्या जमीन व्यवहार करून संस्थानची फसवणूक केली आहे. या कारणास्तव हे सर्व व्यवहार रहित करून त्या अवैध जमीन विक्रीची कसून चौकशी करावी, अशी मागणी देहू संस्थानचे माजी विश्‍वस्त रामराव मोरे आणि खासदार अमर साबळे यांनी चाकण येथील एका कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. (या प्रकरणी शासनाने लक्ष घालून संबंधित महसूल अधिकार्‍यांची तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी. -संपादक) या संदर्भात संबंधित शेतकरी आणि महसूल अधिकारी यांची कसून चौकशी आणि त्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.

भगवान श्रीरामाचा अवमान करणारे म्हैसूर विश्‍वविद्यालयातील पत्रकारिता विभागाचे प्रा. महेशचंद्र गुरु यांना अटक !

       म्हैसूर (कर्नाटक) - भगवान श्रीरामचंद्रांचा अवमान करणारे म्हैसूर विश्‍वविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाचे प्राध्यापक महेशचंद्र गुरु यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्यांना विश्‍वविद्यालयाने निलंबित केले आहे. जानेवारी २०१५ ला झालेल्या एका कार्यक्रमात महेशचंद्र गुरु यांनी अवमानकारक विधान केले होते. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याची तक्रार तेथील निवासी श्री. रविशंकर यांनी जयलक्ष्मीपुरम् पोलीस ठाण्यात प्रविष्ट केल्यावर त्यांच्यावर कलम ‘२९५ अ’ अंतर्गत गुन्हा प्रविष्ट झाला होता. (देवतांच्या अवमानाविरोधात कृती करणारे श्री. रविशंकर यांचे अभिनंदन ! असे हिंदू सर्वत्र हवेत ! - संपादक)

अतिक्रमण पथकातील अधिकार्‍यालाही न जुमानता अतिक्रमण हटवण्याची कारवाई स्थगित केली

धर्मांध हरूण 
नदबी यांचा उद्दामपणा !
      जळगाव - येथील अशफाकनगरातील अतिक्रमण काढण्यास गेलेल्या अतिक्रमण पथकातील अधिकार्‍याला स्वयंघोषित मुसलमानांचा नेता म्हणवणारा समाजवादी पक्षाचा हरूण नदबी याने विरोध केला. या वेळी अतिक्रमण अधिकारी खान यांनी खडसवूनही नदबी ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. तो म्हणत होता, ‘‘रमझानच्या मासातच अतिक्रमण काढण्यास का आलात ? इथून निघा. मुसलमानांचे अतिक्रमणच दिसते का ? तुम्हाला अतिक्रमण हटवायचे असेल, तर महादेव गल्लीतील हटवा.’’ (हा आहे धर्मांधांचा हिंदुद्वेष ! - संपादक) अधिकार्‍याच्या बोलण्यालाही न जुमानता पदवीने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन ईदपर्यंत मुदत मागून घेतली. ईदनंतर अतिक्रमण स्वतःहून काढणार असल्याचे त्याने आश्‍वासन दिले. त्यानुसार महानगरपालिकेनेही अतिक्रमण काढणे तूर्तास स्थगित केले आहे. (धर्मांधासमोर नांगी टांगणारी महानगरपालिका काय कामाची ? - संपादक)

सुटाबुटात भारतीय नेते वेटर वाटतात !

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची 
नाव न घेता अरुण जेटली यांच्यावर टीका
       नवी देहली - भाजप नेत्यांनी विदेशात जातांना भारतीय पोषाखात जावे; कारण टाय आणि सूट घातलेल्या अवस्थेत ते वेटर वाटतात, अशी टिप्पणी डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली ‘बँक ऑफ चायना’चे अध्यक्ष तिआन गिली यांना नुकतेच भेटले. त्या वेळी त्यांनी सूट आणि टाय घातले होते. त्यांचे ते छायाचित्र प्रसिद्ध होताच डॉ. स्वामी यांनी वरील ट्वीट केले. नेत्यांनी तोंडाला आवर घालावा आणि शिस्त पाळावी अन्यथा रक्ताचे पाट वहातील, असेही डॉ. स्वामी यांनी ट्वीटमध्ये पुढे म्हटले आहे.

काश्मीरमध्ये ८ जिहादी आतंकवादी ठार !

       कुपवाडा - काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांशी झालेल्या दोन चकमकीत ८ आतंकवाद्यांना ठार करण्यात सैनिकांना यश मिळाले आहे.

तळोजा येथे ‘हिंदु धर्माची सद्यस्थिती आणि महिलांवरील अत्याचार’ या विषयावर मार्गदर्शन

सौ. किरण मुंबईकर यांना तलवार देतांना सौ. नंदिनी सुर्वे (उजवीकडे)
    पनवेल - रायगड जिल्ह्यातील तळोजा मजकूर या गावात धर्माभिमानी श्री. गुरुनाथ मुंबईकर यांच्या सूनबाई सौ. किरण प्रतीक मुंबईकर हिच्या ओटी भरणीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने ‘हिंदु धर्माची सद्यस्थिती आणि महिलांवरील अत्याचार’ या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला गावातील ६० महिला उपस्थित होत्या. या वेळेस समितीच्या सौ. नंदिनी सुर्वे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
   महाराणा प्रताप बटालियनच्या वतीने सौ. नंदिनी सुर्वे यांच्या हस्ते गर्भवती सौ. किरण मुंबईकर यांना तलवार भेट देण्यात आली. या वेळी गर्भवती महिलांवर शौर्य संस्कार व्हावेत, या उद्देशाने तलवार भेट दिल्याचे बटालियनचे अध्यक्ष ठाकूर अजयसिंह सेंगर यांनी सांगितले.

मराठवाड्यात ३ लक्ष ७५ सहस्र खोट्या शिधापत्रिका

    संभाजीनगर, २४ जून - मराठवाड्यात पुरवठा विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या खोट्या शिधापत्रिका शोध मोहिमेमध्ये ६ लक्ष ३६ सहस्र पत्रिकाधारकांची नोंदणी रहित करण्यात आली आहे. त्यापैकी ३ लक्ष ७५ सहस्र खोट्या शिधापत्रिका आढळल्याची माहिती पुरवठा उपायुक्त वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली. (इतक्या मोठ्या प्रमाणात खोट्या शिधापत्रिका सिद्ध झाल्याच कशा ? या प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी. - संपादक) पुरवठा विभागात सार्वजनिक वितरण प्रणाली राबवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. त्यानुसार शासनाने ‘ऑनलाईन’ वितरण प्रणाली राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या मोहिमेमध्ये हा भाग आढळून आला. (प्रत्येक गोष्टीत न्यायालयालाच का आदेश का द्यावे लागतात ? पुरवठा विभागाच्या हे लक्षात का आले नाही ? - संपादक)
१. या मोहिमेत ६ लक्ष ३६ सहस्र लोक स्वस्त धान्याच्या दुकानातून धान्य घेत नसल्याचे आढळून आले.
२. संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १ लक्ष २० सहस्र खोट्या शिधापत्रिका आढळून आल्या आहेत.

उर्वरित मांस रस्त्यावर टाकणार्‍या मांस विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई - महापालिका आयुक्तांची चेतावणी

       सांगली, २४ जून (वार्ता.) - मांस विक्रेते, ‘चिकन ६५’ ची विक्री करणारे यांनी त्यांचे उर्वरित मांस रस्त्यावर टाकल्यास फौजदारी कारवाई करू. या विक्रेत्यांच्या चुकांमुळे भटकी कुत्री पोसली जात असून ती हिंसक होत आहेत. त्यामुळे यापुढे अशा गेाष्टी खपवून घेणार नाही, अशी चेतावणी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दिली. ते मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी मांस विक्रेते, ‘चिकन ६५’ हातगाडीवाले यांच्या बैठकीत बोलत होते. या वेळी महापौर हारुण शिकलगार, उपायुक्त सुनील पवार, तसेच आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे उपस्थित होते.

हडपसर (जिल्हा पुणे) येथील वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात चोरी, ४ जण अटकेत

पोलिसांच्याच कार्यालयात जर चोरी होत असेल, तर 
सर्वसामान्य नागरिकांच्या घरांचा विचारच न केलेला बरा !
       पुणे, २४ जून - येथील हडपसर भागातील वाहतूक पोलिसांच्या कार्यालयातून ५ संगणकांचे कॅबिनेट (सीपीयू) आणि पावती पुस्तिका चोरी झाल्या आहेत. या प्रकरणी पोलीस हवालदार दिलीप पोटे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पसार झालेल्या एक रिक्षाचालकासह ३ महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. (आता पुण्यातील पोलीसही ‘असुरक्षित’ आहेत, असे म्हणायचे का ? - संपादक) रिक्षाचालक सारंग भाऊसाहेब पवार, संगीता अंगद गायकवाड, मंगल आनंद गायकवाड, जनाबाई नाना उदारे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
       पुणे-सोलापूर रस्त्यावर मगरपट्टा परिसरात गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या इमारतीच्या तळमजल्यावर वाहतूक पोलिसांच्या हडपसर विभागाचे कार्यालय आहे. वाहतूक पोलिसांनी २० जून या दिवशी रात्री कार्यालय बंद केले. मध्यरात्री आरोपी सारंग आणि त्याच्या साथीदार महिलांनी कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून उपरोक्त साहित्य चोरून ते पसार झाले. २१ जून या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आली.

वन विभाग ही एक भ्रष्ट यंत्रणा ! - डॉ. माधव गाडगीळ

        पुणे, २४ जून - जंगलातील जीवसृष्टीला हानी पोहोचेल, असे निर्णय शासनाच्या वतीने घेतले जातात. काही वेळा केवळ आर्थिक नफा मिळवण्यासाठीच खोटे अहवाल सादर करून चुकीचे निर्णय घेतात. वन विभागातील अधिकारी भ्रष्ट नसले, तरी वन विभाग ही एक भ्रष्ट यंत्रणा बनली आहे, असे पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी सांगितले. (या प्रकरणी पर्यावरण खाते आणि केंद्रशासन यांनी लक्ष घालून भ्रष्टाचार थांबवावा, ही अपेक्षा ! - संपादक) निसर्गसेवक आणि जिविधा संस्थांतर्फे कै. काशिनाथ पंडित यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित हिरवाई महोत्सव व्याख्यानमालेत ते बोलत होते.

पंचम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’ला उपस्थित हिंदुत्ववाद्यांची सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट आणि त्यांनी व्यक्त केलेले अभिप्राय !

      १९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी धर्मप्रेमी घडण्यासाठीचे अनमोल माध्यम : धर्मशिक्षणवर्ग !

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशनात डॉ. उदय धुरी यांनी केलेले मार्गदर्शन
डॉ. उदय धुरी
        ‘अधर्म मूलं सर्वरोगानाम्’ म्हणजेच ‘अधर्माचरण हेच सर्व समस्यांचे मूळ आहे’ असे प्रसिद्ध वचन आहे. धर्माचरण करण्यासाठी धर्माचे शिक्षण घेतले पाहिजे. मुसलमान-ख्रिस्ती यांच्याकडे तशी धर्मशिक्षणाची व्यवस्था निर्माण केलेली आहे; मात्र हिंदूंमध्ये या व्यवस्थेचा अभाव आहे. तसेच ‘धर्मशिक्षण नसणे, हे सर्व समस्यांचे मूळ आहे’, हे लक्षात न आल्यामुळे अनेक हिंदुत्ववादी संघटना कित्येक दशकांपासून कार्य करत असूनही धर्मशिक्षणच न दिल्याने त्या हिंदुबहुल भारतातही हिंदुत्व बळकट करू शकल्या नाहीत. त्यामुळे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी समाजाला धर्मशिक्षण देण्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार हे धर्मकार्य चालू केले.

हिंदूंमध्ये जागृती करण्याचे प्रभावी माध्यम : हिंदु धर्मजागृती सभा !

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशनात श्री. मनोज खाडये यांनी ‘
हिंदु धर्मजागृती सभा’ या विषयावर केलेले मार्गदर्शन
श्री. मनोज खाडये, समन्वयक,
हिंदु जनजागृती समिती
      सर्वसाधारणपणे सभा म्हटले की, निवडणुका आल्यावर होणार्‍या राजकीय पक्षांच्या सभांचीच सर्वांना आठवण येते. हिंदु जनजागृती समिती मात्र राजकीय उद्देशांसाठी नाही, तर हिंदुजागृती आणि हिंदूसंघटन यांसाठी वर्ष २००७ पासून प्रत्येक वर्षी ‘हिंदु धर्मजागृती सभा’ घेत आहे. या सभांचे महत्त्व, लाभ आणि ‘आयोजन कसे करावे’, या सूत्रांविषयी आज आपण जाणून घेऊया.
१. हिंदु धर्मजागृती सभेचे महत्त्व
    हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार १५ ते ३० दिवस सातत्याने होेतो. त्यामुळे परिसरातील हिंदूंच्या दृष्टीने सभा हा एक उत्सुकतेचा विषय बनतो. परिणामी हिंदुत्वाविषयी जागृती होते. सभेतील वक्त्यांची भाषणे ऐकण्याच्या उत्सुकतेने मोठ्या संख्येने लोक सभेला येतात. सभेत वक्त्यांनी मांडलेले हिंदु धर्मावरील संकटांचे विषय त्यांना कळतात. त्यातून काहीतरी करण्याची उर्मी निर्माण होऊन अनेकजण धर्मशिक्षणवर्ग, स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि आंदोलने अशा उपक्रमांच्या माध्यमातून कृतीशीलही होतात. आजपर्यंत झालेल्या १ सहस्रहून अधिक सभांतून लाखो हिंदूंमध्ये राष्ट्र आणि धर्म यांवरील संकटांविषयी जागृती केली असून त्यांच्यात धर्माभिमान निर्माण झाला आहे. त्यापैकी काही जण आता सक्रिय कार्यकर्तेही बनले आहेत.

अधिवेशनात ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा’ या ग्रंथाच्या हिंदी, कन्नड आणि इंग्रजी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन !

        अखिल भारतीय हिंदु राष्ट्र संघटक अधिवेशनाच्या प्रथम दिवशी प.पू. श्रीराम बालकदासजी महात्यागी महाराज आणि व्यासपिठावर उपस्थित अन्य मान्यवर यांच्या शुभहस्ते ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा’ या सनातनच्या मूळ मराठी भाषेतील ग्रंथाच्या हिंदी, कन्नड आणि इंग्रजी भाषांतील आवृत्तींचे प्रकाशन व्यासपिठावर उपस्थित संत आणि मान्यवर यांच्या हस्ते झाले.
ग्रंथप्रकाशन करतांना डावीकडून प्रा. कुसुमलता केडिया, प.पू. श्रीराम
बालकदासजी महात्यागी महाराज, प्रा. रामेश्‍वर मिश्र, श्री. चित्तरंजन सुराल

हिंदू संघटनाविषयी हिंदूंचे उदार प्रश्‍न !

      बिहारमध्ये ‘गोमांस खाल्ले नाही, इस्लाम स्वीकारला नाही, तर अश्‍लील चलचित्र (व्हिडीओ) बनवू’ अशी धमकी एका महिलेला नुकतीच काही धर्मांधांनी दिली. हिंदुबहुल राष्ट्रात अशी धमकी राजरोसपणे दिली जाते आणि अजूनही सर्वसामान्य हिंदू आपापल्या वैयक्तिक आयुष्यात मग्न आहेत ! आजूबाजूला घडणार्‍या या घटनांचे त्यांना काहीही सोयरसूतक नाही. इथे महत्त्वाचे दोन प्रश्‍न निर्माण होतात. एक म्हणजे या राष्ट्रात हिंदू सुरक्षित आहेत का ? आणि दुसरे म्हणजे अशा घटनांमधून समोर येणारी इस्लाम धर्माची आसुरी मानसिकता ! 
     आज हिंदु राष्ट्र किंवा हिंदूसंघटन म्हटले की, लगेच हिंदूंच्या उपजत सहिष्णुतेवर घणाघात केला जातो. इतर धर्मीय त्यांच्या त्यांच्या धर्माच्या राज्याची मागणी करतात, तसेच हिंदूही करतात. स्वतःच्या अधिकारांविषयी हिंदू काही बोलले की, ते असहिष्णु आहेत, असा सहज निष्कर्ष काढला जातो. ‘धर्मावरून भांडणे करून समाजात अशांतता माजवू नये, अशासारखे धर्मनिरपेक्षतावादाचे उपदेश केले जातात.

सनातन संस्थेला ‘आतंकवादी’ ठरवू पहाणार्‍या प्रसारमाध्यमांचा वैचारिक आतंकवाद !

  • एखाद्या सराईत रहस्यकथाकारालाही लाजवेल, अशा कपोलकल्पित कथा रचणार्‍या प्रसारमाध्यमांची पीतपत्रकारिता !
  • पीतपत्रकारिता म्हणजे कोणतीही शहानिशा न करता सनसनाटी निर्माण करण्यासाठी, वृत्तपत्रांचा खप वाढवण्यासाठी प्रसारित केलेली खोटी आणि निराधार वृत्ते होय !
        १० जून  दिवशी सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांतून त्यांच्याविषयी आणि सनातनविषयी धादांत खोटी माहिती देणारी अनेक वृत्तांची मालिकाच चालू झाली. यामुळे सनातन संस्था, संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समिती यांची मोठ्या प्रमाणात अपकीर्ती झाली. त्यामुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची सत्य बाजू लोकांच्या समोर येण्यासाठी अशा वृत्तांचे खंडण करणारे हे सदर क्रमशः चालू करत आहोत.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     ‘भाषाशुद्धीचे व्रत’ यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ ‘भाषाशुद्धीचा शब्दकोश’)

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाच्या सरकारची मोगलाई जाणा !
    उत्तरप्रदेशच्या व्यावसायिक कर विभागाने विश्‍व हिंदु परिषदेला प्रस्तावित राममंदिराच्या बांधकामासाठी राजस्थान आणि गुजरातमधून शिळा आयात करण्यास अनुमती नाकारली आहे. ‘वरून’ आलेल्या आदेशाचा हवाला देत ही अनुमती नाकारण्यात आली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : UP ke sarkarne VHP ko Rammandir ke liye Rajasthan aur Gujrat se shilayen mangane ki anumati nahi di.
Samajwadi party ka Hindudwesh !
जागो ! : यूपी के सरकारने विहिप को राममंदिर निर्माण के लिए राजस्थान और गुजरात से शिलाएँ मंगाने की अनुमती नही दी ।
समाजवादी पार्टी का हिंदुद्वेष !

साधकांना घडवणार्‍या प.पू. डॉक्टरांच्या अनमोल सत्संगात वेचलेले क्षणमोती !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ...
परात्पर गुरु
डॉ. जयंत आठवले
१. नवनवीन शिकण्यातला आनंद घ्यायला हवा ! 
      ‘वर्ष २००६ च्या शेवटी माझी प्रसारसेवा थांबवून मला ग्रंथ विभागात सेवा करण्यास सांगण्यात आले. त्या काळात अहं अधिकच वाढल्यामुळे माझ्या सेवेतील चुकांचे प्रमाणही अधिक होते. त्यामुळे माझी मनःस्थिती चांगली नव्हती. अशातच एके दिवशी प.पू. डॉक्टरांनी मला विचारले, ‘‘तुम्हाला हा पालट कसा वाटला ?’’ मी त्यांना म्हटले, ‘‘मला कुठलीही सेवा चालेल; पण तुमच्या चरणांशी ठेवा.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘अशी प्रतिक्रिया नको. नवीन शिकायला मिळणार आहे, याचा आनंद व्हायला हवा. आपण सतत नवनवीन शिकण्यातला आनंद घ्यायला हवा.’’ त्यानंतर दुसर्‍या दिवशी एक चौकट प्रसिद्ध झाली. त्यात सांगितले होते, ‘जी सेवा आपण अधिक कौशल्याने आणि आवडीने करू शकतो, ती केल्याने सेवेतील फलनिष्पत्ती वाढते. त्यामुळे आध्यात्मिक प्रगती जलद होते.’ माझ्या जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी या वेळी मला माझ्या आवडीची आणि कौशल्याची अनुभूती संकलनाची सेवा मिळाली होती.

साधिकेच्या मनाची स्थिती जाणून तिच्या साधनेच्या प्रयत्नांना अचूक दिशा देणारे पू. महादेव नकातेकाका !

गुरुपौर्णिमा मास २०१६
     १९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रोपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.

स्पष्टवक्ता, साधनेची आवड आणि देवाप्रती भाव असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर आलेला पुणे येथील कु. अथर्व मारुति भडाळे (वय १२ वर्षे !)

कु. अथर्व भडाळे
१. प्रेमभाव 
१ अ. ‘कु. अथर्व लहान मुले आणि मोठी माणसे अशा सर्वांशीच प्रेमाने बोलतो आणि सर्वांशी लगेचच मैत्री करतो.
१ आ. आई रुग्णाईत असतांना आध्यात्मिक उपाय करून तिला साहाय्य करणे : मी कधी आजारी असले आणि अंगदुखी, पायदुखी यांमुळे झोपून राहिले असले, तर कु. अथर्व मला कापूर, अत्तर लावतो. मोरपिसाने माझ्यावरील आवरण काढतो. मला प्रार्थना करण्याची आठवण करतो. त्यानंतर मला पुष्कळ बरे वाटून मी स्वयंपाक करू शकते.

व्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांमधील भेद

      व्यष्टी साधना करणार्‍या साधकाची दृष्टी मर्यादित असल्याने तो ठराविक विषयांद्वारे देवाला जाणण्याचा प्रयत्न करतो आणि तो एका विशिष्ट टप्प्यापर्यंत देवाशी एकरूप होतो. समष्टी साधना करणारा साधक व्यापक होऊन प्रत्येक गोष्टीत लपलेल्या ईश्‍वराचा शोध घेतो. त्यामुळे त्या साधकाची ज्ञानकक्षा अनंत बनते आणि त्यामुळे त्याला अनंताशी पूर्णपणे एकरूप होणे साध्य होते. 
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.८.२०१५) पू. (सौ.) आशालता सखदेव यांना आलेल्या अनुभूती

पू. (सौ.) सखदेवआजी
१. ‘त्रास जेव्हा अल्प व्हायचा, तेव्हा होईल’, हे जाणून पू. (सौ.) 
सखदेवआजींनी तो सहन करणे आणि ‘त्रासाकडे पहाण्याची 
दृष्टी कशी पालटते’, हे प.पू. डॉक्टरांनी लक्षात आणून देणे
      ‘८.२.२०१६ रोजी रात्री ११.३० वाजता ‘पू. (सौ.) सखदेवआजींना श्‍वास घेण्यास त्रास होत आहे’, असे मला वाटले; म्हणून मी त्यांना विचारले, ‘‘प.पू. डॉक्टरांना उपाय विचारायचा का ?’’ त्यावर त्यांनी ‘‘नको’’ म्हटले; परंतु त्रास जास्त होत असल्याचे लक्षात आल्याने मी प.पू. डॉक्टरांना उपाय विचारला. त्यांनी पू. आजींना ‘निर्गुण’ हा जप करण्यास सांगितले. दुसर्‍या दिवशी सकाळीही पू. आजींना तशाच प्रकारचा त्रास होत होता. त्याही वेळी त्यांनी म्हटले, ‘‘उपाय विचारायला नको. कितीदा त्यांचा वेळ घ्यायचा ? त्रास अल्प व्हायचा, तेव्हा होईल.’’ श्‍वास घेण्यास त्रास होत असतांना तो तसाच सहन करत रहाणे खरोखरच कठीण आहे. याविषयी प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘त्रासाकडे पहाण्याची दृष्टी कशी पालटते, हे यातून शिकण्यासारखे आहे.’’

भारतात २४ जून या दिवशी ट्विटरवर सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या विषयांमध्ये हिंदू अधिवेशनाचा विषय चतुर्थ क्रमांकावर !

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या 
भक्तांनी ट्विटरवर केला पंचम अखिल 
भारतीय हिंदू अधिवेशनाचा व्यापक प्रसार ! 
         सध्या रामनाथी, फोंडा, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन चालू आहे. २४ जून २०१६ या दिवशी पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या देशभरातील भक्तांनी ट्वीटर या सामाजिक संकेतस्थळावर या अधिवेशनाचा व्यापक प्रमाणात प्रसार केला. आज दिवसभरात अधिवेशनाच्या संदर्भात करण्यात आलेल्या ‘ट्वीट्स’मध्ये (ट्वीट म्हणजे ट्विटरवर लिहिला जाणारा संदेश. असा संदेश आपण आपल्या खात्यावर ठेवल्यास तोे आपल्या खात्याच्याशी संलग्न असणार्‍यांना दिसतो.) #5thHinduAdhiveshan असा ‘हॅश टॅग’ (चर्चिल्या जाणार्‍या विषयाचा संदर्भ) वापरण्यात आला होता. दिवसभरात ट्विटरवर भारतामध्ये सर्वाधिक चर्चिल्या जाणार्‍या विषयांमध्ये हिंदू अधिवेशनाचा विषय सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास चौथ्या क्रमांकावर पोहोचला होता. हा ‘हॅश टॅग’ चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर बराच वेळ टिकून होता. लक्षावधी लोकांपर्यंत पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा विषय पोचला आहे, असा अंदाज ट्विटरच्या माध्यमातून धर्मसेवा करणार्‍या पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या एका भक्ताने व्यक्त केला.

सनातनचा साधक कु. अभिनव घार्गे याला पदविका परीक्षेत ८० प्रतिशत गुण !

       कडेगाव-विटा (सांगली जिल्हा) - सनातन संस्थेचे साधक श्री. पांडुरंग आणि सौ. सीमा घार्गे यांचा मुलगा कु. अभिनव पांडुरंग घार्गे हा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका परीक्षेत ८० प्रतिशत गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. कु. अभिनव हा पुणे शासकीय तंत्रनिकेतनचा विद्यार्थी आहे. कु. अभिनव याला नियमित नामजप, तसेच सनातन निर्मिती कापूर, अत्तर वापरणे याचा लाभ झाला. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच हे यश मिळाले, असे कु. अभिनव याने सांगितले.

गुरुपौर्णिमेला २४ दिवस शिल्लक

        शिष्यात मुमुक्षुत्व असले, तर त्याच्या चुका झाल्या तरी गुरु त्याला सांभाळून घेतात. शिष्य कितीही अविचारी, हट्टी, अशिक्षित वा अयोग्य असला तरीही त्याला सांभाळून घेणे, हेच गुरूंचे खरे कौशल्य होय. शिष्य जरी गुरूंवर खूप रागावला असला, तरी गुरु मात्र त्याला सांभाळून घेतात.

गोपीभाव विशेषांक

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत
गोपीभाव वाढवण्यासाठी 
उपयुक्त मजकूर या अंकात वाचा !
प्रसिद्धी दिनांक : २६ जून २०१६
पृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी 
२५ जून या दुपारी ३ पर्यंत ‘इआरपी प्रणाली’त भरावी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       ‘पूर्वीचे राजे राज्याचा त्याग करून वानप्रस्थाश्रम स्वीकारायचे आणि अरण्यात जायचे. स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या एका तरी शासनकर्त्याने असे केले आहे का ? त्यांच्यामुळेच भारत अधोगतीच्या परमावधीला गेला आहे.’
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
सतत वर्तमानकाळात रहाणे
आम्ही कर्मधर्माला मानत नाही. कर्म मागे, तर धर्म आमच्या पुढे असतो. आम्ही दोन्हीच्या मध्ये असतो.
भावार्थ : ‘कर्म मागे’ म्हणजे भूतकाळातील असल्याने केलेल्या कर्माचा विचार करीत नाही. ‘धर्म आमच्या पुढे असतो’ म्हणजे भविष्यकाळातील योग्य आचरण. आम्ही ‘दोन्हीच्या मध्ये असतो’ म्हणजे सतत वर्तमानकाळात असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण.’)


बोधचित्र

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

आधाराची अपेक्षा नको 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
दुसर्‍याच्या आधाराची अपेक्षा करत राहिलो, तर कधीच उभे रहाता येणार नाही; म्हणूनच धडपडत 
का होईना, धारिष्ट्य करून स्वतःच्या पायांवर उभे रहाणे इष्ट ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

एक दुर्लक्षित गट !

संपादकीय 
     महाराष्ट्र राज्यशासनाने ज्यू धर्मियांना अल्पसंख्यांक दर्जा दिला आहे. वर्ष २००६ च्या ऑक्टोबर मासात इस्लाम, ख्रिस्ती, शीख, बौद्ध, पारसी आणि जैन या धर्मांतील लोकांना अल्पसंख्यांक लोकसमूह म्हणून घोषित केले होते. त्या वेळी ज्यूंना त्यात सहभागी करून घेतले नव्हते. दुसर्‍या महायुद्धापासून ज्यू भारतात रहात आहेत. त्यांची लोकसंख्या कदाचित् नगण्य असेलही, तरीही भारतीय स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही या समूहाची दखल घेतली गेली नाही, हा तत्कालीन काँग्रेसी शासनाचा निष्काळजीपणा आहे. ज्यू हे नाव ऐकल्यानंतर इस्रायल हा त्यांचा देश डोळ्यांसमोर येतो. दुसरे महायुद्ध संपतांना हा देश उदयास आला. जगभर पसरलेले ज्यू बांधव इस्रायल देशात एकत्र आले, त्यांना मायभूमी मिळाल्याचा आनंद झाला.

हिंदूंचे पलायन !

संपादकीय 
     कैराना हे उत्तरप्रदेशातील एका गावाचे नाव सध्या प्रसिद्धीमाध्यमांतून झळकत आहे. ३५० हिंदु कुटुंबांनी तेथून पलायन केल्याची घटना परत परत चर्चेसाठी येत आहे. त्यानंतर कांधला, आग्रा येथूनही हिंदु कुटुंबांनी त्यांचे घरदार आणि जमीनजुमला सोडून पलायन केल्याचे पुढे आले. आता त्यापुढील वृत्त आले आहे ते गाझियाबादच्या संदर्भातील ! तेथील म्हणे ३०० हिंदु परिवार परागंदा झाले आहेत. ही सर्व गावे/शहरे उत्तरप्रदेशमधील आहेत. एकेका गावाचे नाव परागंदा झालेल्यांच्या गावाच्या सूचीत हळूहळू समाविष्ट होऊ लागल्याने एक दिवस असा येईल की, ‘उत्तरप्रदेश राज्याची स्थिती काश्मीर राज्यासारखी झाली’, अशी नोंद होईल. बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूच परागंदा होतात, हे वास्तव उत्तरप्रदेशात पहायला मिळते. हिंदूंनी पलायन करण्यामागील एकमेव कारण म्हणजे धर्मांधांचा दबाव ! गाझियाबाद येथे झाले ते एका प्रत्यक्षदर्शीने कथन केले. ती व्यक्ती म्हणते,
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn