Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

बांगलादेशमध्ये इसिसकडून हिंदु पुजार्‍याचा शिरच्छेद !

  • देशातील हिंदूंचे रक्षण करू न शकणार्‍या केंद्र सरकारकडून बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण होईल, अशी अपेक्षा करणे व्यर्थ !
  • जगभरात कार्य करणार्‍या हिंदुत्ववादी संघटना याविरोधात काहीच का बोलत नाहीत ?
  • हिंदूंनो, अशा बातम्या वाचून झोपू नका, तर स्वरक्षणार्थ संघटित व्हा !
लवकरच भारतात अशी स्थिती निर्माण झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !
     ढाका (बांगलादेश) - बांगलादेशच्या झेनिदा जिल्ह्यातील नोलदांगा येथे आनंदा गोपाल गांगुली या ७० वर्षांच्या पुजार्‍याची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशमध्ये गैर मुसलमान आणि सुधारणावाद्यांच्या होणार्‍या हत्या पहाता इसिसच्या आतंकवाद्यांकडून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
१. येथील शेतामध्ये आनंदा गोपाल गांगुली यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती या परिसराचे पोलीस प्रमुख गोपीनाथ कांजीलाल यांनी दिली. आनंदा यांचे डोके शरिरापासून वेगळे केले असल्याविषयीही त्यांनी सांगितले.
२. गांगुली हे पुजारी होते आणि या भागातील हिंदूंच्या घरांमध्ये ते पूजाविधी करायचे. नेहमीप्रमाणे पूजेसाठी घरातून निघाल्यानंतर वाटेत अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली.

शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांसह ४० शिवसैनिकांवर गुन्हे प्रविष्ट !

धर्मरक्षणार्थ कृती करणार्‍या शिवसैनिकांवर गुन्हे प्रविष्ट करणारे पोलीस मात्र आझाद 
मैदानावर दंगल घडवणार्‍या धर्मांधांसमोर शेपूट घालतात ! अशी पोलीस यंत्रणा हवी कशाला ?

मनकर्णिका कुंडावरील शौचालय तोडल्याचे प्रकरण
     कोल्हापूर - येथील मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालय तोडून दीड लाख रुपयांची हानी केल्याच्या प्रकरणी शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर, नगरसेवक राहुल चव्हाण, गटनेते नियोज खान यांसह ४० कार्यकर्त्यांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात ६ जूनला रात्री उशिरा गुन्हा प्रविष्ट केला आहे. महापालिकेचे खाजगी ठेकेदार राजूरौशन श्रीकेदार सिंग (वय २६ वर्षे, रहाणार बलरा-इस्माईल, बिहार) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हे गुन्हे प्रविष्ट करण्यात आले. ७ जून या दिवशी आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांसह १० शिवसैनिकांना अटक करून न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने सर्वांची जामिनावर सुटका केली. (मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालय हटवण्यासाठी वारंवार निवेदने देऊन आणि आंदोलन करूनही अनधिकृत शौचालय प्रशासनाने पाडले नाही. सतत हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचे काम जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी आणि महापालिका आयुक्त पी. रविशंकर करत असल्याच्या हिंदूंच्या तक्रारी आहेत. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे भावनांचा उद्रेक होऊन शौचालय तोडण्यात आले. याला उत्तरदायी असलेले जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्यावर प्रथम गुन्हा प्रविष्ट करायला हवा. - संपादक)

घरबसल्या वेतन घेण्याच्या योजनेला स्वित्झर्लंडच्या नागरिकांचा विरोध

फुकटचा पैसा नकोच, काम करून घेऊ वेतन !
भारतात काम न करता वेतन घेणारे सहस्रावधी कर्मचारी सापडतील ! पाश्‍चात्त्यांचे 
अंधानुकरण करणारे भारतीय त्यांच्याकडून असा राष्ट्रप्रेम आणि बाणेदारपणा शिकतील का ?
     बर्न - स्वित्झर्लंडमध्ये ५ जूनला प्रत्येक नागरिकासाठीच्या युनिव्हर्सल बेसिक इन्कम या घरबसल्या वेतन घेण्याच्या योजनेसाठी जनमत घेण्यासंदर्भात मतदान झाले. याची मतमोजणी होऊन या योजनेचा ७८ टक्के नागरिकांनी विरोध केला, तर २२ टक्के लोकांनी समर्थन केले. या योजनेमुळे नागरिकाला घरी बसून विनासायास ठराविक रक्कम सरकारकडून देण्यात येणार होती. आम्हाला घरी बसून फुकटचा पैसा नको, आम्ही आधी काम करू, मगच वेतन घेऊ, असे या नागरिकांनी म्हटले आहे.
१. देशातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीला समान २५०० फ्रँक (सुमारे १ लाख ७१ सहस्र रुपये) आणि मुलांना ६२५ फ्रँक (सुमारे ४२ सहस्र ७७ रुपये) शासनाकडून प्रत्येक मासाला देण्यात यावेत. त्यामुळे देशातील गरिबी आणि असमानता संपेल, अशी बेसिक इन्कम समर्थकांची मागणी होती.
३. येथील राजकीय पक्ष या मोहिमेच्या विरोधात होते. असा प्रस्ताव मंजूर झाल्यास अर्थव्यवस्था ढासळू शकते, असे त्यांचे म्हणणे होते. हा प्रस्ताव फेटाळावा, असे आवाहन सरकारने लोकांना केले होते.
४. स्वित्झर्लंडमध्ये शासन कोणताही प्रस्ताव आणण्याआधी किंवा सुधारणा करण्याआधी जनमत चाचणी करते. त्याप्रमाणे या योजनेवर जनमत घेण्यात आले.

मद्य माफियांच्या दबावामुळे काँग्रेसचे सरकार असलेल्या कर्नाटकातील महिला पोलीस उपअधीक्षकांचे त्यागपत्र

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राज्यात रम राज्य चालू आहे !
रोहित वेमुला, कन्हैय्या कुमार यांच्या प्रकरणात ऊर बडवणारी काँग्रेस या प्रकरणी बोलत का नाही ?

काँग्रेसच्या राज्यात पोलीस अधिकार्‍याच्या या स्थितीवर 
सोनिया गांधी, राहुल गांधी, दिग्विजय सिंह तोंड उघडतील का ?
     बेंगळुरू - कर्नाटकातील बल्लारी जिल्ह्यातील कुडलिगी येथील पोलीस उपअधीक्षक अनुपमा शेणॉय यांनी राज्यातील मद्य माफियांच्या दबावामुळे त्यांच्या नोकरीचे त्यागपत्र दिले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राज्यात रम राज्य चालू आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. शेणॉय यांनी मद्य माफियांविरोधात कठोर कारवाई चालू केली होती. त्यामुळे त्यांच्यावर दबाव आणण्यात आला. शेणॉय यांनी मंत्र्यांचा दूरभाष स्वीकारला नाही म्हणून त्यांची यापूर्वी बदलीही करण्यात आली होती. त्यागपत्रानंतर त्यांनी फेसबूकवर लिहिले आहे की, मद्य लॉबीला सलाम बोला, कुडलिगीच्या जनतेने मद्य लॉबीला सलाम करावे राज्यातील जनतेने शेणॉय यांना त्यागपत्र मागे घेण्याचे आवाहन केले आहे. फेसबूक वरून हे आवाहन करण्यात आले आहे.

(म्हणे) सनातन संस्थेच्या विरोधात कोम्बिंग ऑपरेशन करणार !

कायदा हातात घेऊ पहाणारे श्रमिक मुक्ती दलाचे सनातनद्वेष्टे भारत पाटणकर यांची धमकी !
राज्यघटनेचे पाईक म्हणवणार्‍या भारत पाटणकर यांचा खरा चेहरा !
     मुंबई - ११ जूनपासून सनातनच्या गोव्यातील आश्रमापासून कोम्बिंग ऑपरेशन चालू करणार आहोत, असे श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर यांनी ७ जून या दिवशी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले. पाटणकर या वेळी म्हणाले, डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, प्राध्यापक कलबुर्गी यांचे मारेकरी अद्यापही मोकाटच आहेत. पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा तपासात अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे श्रमिक मुक्ती दलाने त्यांच्या मारेकर्‍यांना शोधण्याचा पवित्रा घेतला आहे. सनातन संस्थेच्या गोव्यातील आश्रमापासून याचा आरंभ होणार आहे. आम्ही आता जनतेलाच आवाहन केले आहे. आमचे कार्यकर्तेच आता शोधमोहीम हाती घेणार आहेत. सर्वांना एकत्र करून आम्ही नंतर १२ तारखेला आजरा येथे जाऊ.
ही धमकी म्हणजे भारत पाटणकर यांचा सामाजिक शांतता
 बिघडवण्याचा प्रयत्न ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था
     भारत पाटणकर यांची ही धमकी हा उथळ प्रसिद्धीचा हव्यास आहे. कोम्बिंग ऑपरेशन करायला श्रमिक मुक्ती दल शासकीय यंत्रणा आहे का ? पाटणकर हे अन्वेषण यंत्रणांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजतात का ? ही धमकी म्हणजे सनातनच्या विरोधात चिथवण्याचा आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न आहे. याविषयी अन्वेषण यंत्रणा पाटणकर यांच्यावर कारवाई करतील का ? या धमकीविषयी सनातन संस्था कायदेशीर सल्ला घेत आहे.

बिलिव्हर्सवाल्यांची अवैध प्रार्थना रोखणार्‍या म्हापसा (गोवा) येथील रहिवाशांच्या विरोधात गुन्हा नोंद !

* पोलीस बांधकाम व्यावसायिकाच्या खोट्या तक्रारीची तत्परतेने नोंद घेतात; मात्र अवैधपणे प्रार्थना घेणार्‍या बिलिव्हर्सवाल्यांवर कारवाई करणे टाळतात ! पोलीस आणि बिलिव्हर्सवाले यांच्यात काही साटेलोटे आहे का ?
म्हापसा पोलिसांची सालाझारशाही !
      म्हापसा (गोवा) - म्हापसा येथील देशमुख सोसायटीच्या इमारतीत बिलिव्हर्सवाल्यांना अवैधपणे प्रार्थना करण्यापासून रोखणार्‍या रहिवाशांच्या विरोधातच पोलिसांनी दडपशाही चालू केली आहे. बिलिव्हर्स पंथियांच्या आहारी गेलेले इमारतीचे बांधकाम व्यावसायिक विजय देशमुख यांच्या खोट्या तक्रारीवरून पोलिसांनी या इमारतीतील ५ रहिवाशांच्या विरोधात तक्रार (एफ्.आय.आर्) नोंद केली आहे.
१. पोलिसांनी फेअर, आल्त, म्हापसा येथील देशमुख आर्केड कॉ-ओप हाऊसिंग सोसायटीतील अश्‍विनी परब, सिद्धार्थ कांबळी, अशोक बाणावलीकर आणि सौ. नीना बाणावलीकर, प्रशांत पराडकर यांच्या विरोधात अवैधपणे जमाव जमवणे आणि देशमुख अन् त्यांचे नातेवाइक यांना इमारतीत प्रवेश करण्यापासून रोखणे या गुन्ह्यांखाली तक्रार नोंद केली आहे.

नवीन शैक्षणिक वर्षातही इंग्रजी शाळांना अनुदान देण्याचे गोवा शासनाचे धोरण कायम

भाषाप्रेमी वारंवार करत असलेल्या आंदोलनांची भाषा भाजपला कळत नाही, हेच यातून दिसून येते ! 
आता भाषाप्रेमींनी शासनाला कृती करणे भाग पडेल, अशा पद्धतीने आंदोलने करणे आवश्यक ! 
                                           गोव्यातील प्राथमिक शिक्षणातील माध्यमप्रश्‍न !
     पणजी - राज्यात ६ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला असून शासनाने या वर्षीही इंग्रजी प्राथमिक शाळांना शासकीय अनुदान देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होण्यापूर्वी इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना दिलेले शासकीय अनुदान रहित करण्याची मागणी भारतीय भाषा सुरक्षा मंचने (भाभासुमं) केली होती. ही मागणी धुडकावून शासनाने माध्यमप्रश्‍नी आपले पूर्वीचेच धोरण पुढे चालू ठेवले आहे.
    शासनाच्या या भूमिकेनंतर भाभासुमं कोणता निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. शासनाने इंग्रजी माध्यमातील शाळांना अभय दिल्याने आता मराठी-कोकणी शाळांतील पटसंख्येचा विषय ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

शरद पोक्षेंचे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आंदोलन तात्पुरते स्थगित

     मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दोन दिवसांपूर्वीच पहाटे शिवकर गावाजवळ झालेल्या भीषण अपघातातही १७ जण ठार झाले. हे सर्व अपघात रोखण्यासाठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी मुख्यमंत्र्यांना १० सहस्र पत्रे पाठवण्याची मोहीम हाती घेतली. त्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही, तर सर्व चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीतील कलाकारांसमवेत महामार्ग बंद पाडण्याची चेतावणी त्यांनी दिली होती; मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या आश्‍वासनानंतर त्यांनी हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.

राममंदिर राष्ट्रीय विषय असल्याने उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत त्याचा उल्लेख नाही ! - केंद्रीय मंत्री कलराज मिश्र

राष्ट्रीय विषय आहे, तर राष्ट्रीय स्तरावर त्याच्या 
सोडवणुकीविषयी केंद्र सरकारमधील कोणीच का बोलत नाही ?
     भरतपूर (राजस्थान) - राममंदिर हा राष्ट्रीय विषय आहे. तो उत्तरप्रदेशच्या निवडणुकीचा विषय नाही; मात्र तो भाजपच्या कार्यसूचीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री कलराज मिश्र यांनी केले आहे. भाजप विकासाच्या सूत्रावर उत्तरप्रदेशमध्ये निवडणूक लढवणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राममंदिर झाले पाहिजे ! - अमित शहा
     राजजन्मभूमीवर राममंदिर बनणे आवश्यक आहे. मग ते न्यायालयाच्या आदेशाने असो कि सर्व सहमतीने असो, हेच आमचे धोरण आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लक्ष्मणपुरी येथे एका कार्यक्रमात केले.

(म्हणे) अयोध्येत मंदिरासह मशीद आणि बुद्धमंदिरही उभारा ! - रामदास आठवले यांची मुक्ताफळे

भारतात मशिदींच्या ठिकाणी मंदिरे उभारा, असे रामदास आठवले कधी सांगतील का ?
     कोल्हापूर - अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी आमचा विरोध आहे; मात्र त्यातूनही ते बांधायचे असेल, तर मंदिराशेजारी मशीद आणि बुद्ध मंदिरही उभारण्यात यावे, अशी मुक्ताफळे रिपब्लिकन पक्षाचे खासदार रामदास आठवले यांनी ६ जून या दिवशी पत्रकारांशी बोलतांना उधळली. (अयोध्येत राममंदिर होते, हे अनेक संशोधकांनी प्राचीन मूर्तीचे अवशेष दाखवून सिद्ध केले आहे. असे असतांना रामदास आठवले यांनी अशी मागणी करणे, हे हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. नागपूर येथील बुद्ध धम्माच्या परिसरातील भूमीत कोणी मंदिर आणि मशीद बांधण्याची मागणी केली, तर ते रामदास आठवले यांना चालेल का ? - संपादक)      भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी नुकतेच त्यागपत्र दिले आहे. त्याविषयी विचारले असता आठवले म्हणाले, कोणा आर्टीआयखाली माहिती मागवणार्‍यांच्या दबावाखाली येऊन एकनाथ खडसे यांनी महसूलमंत्रीपदाचे त्यागपत्र देण्याची आवश्यकता नव्हती. त्यांनी जर काहीही चूक केली नाही, असे वाटत होते, तर त्यांनी त्यागपत्र देण्याची आवश्यकता नव्हती, अशा शब्दांत आठवले यांनी खडसे यांची पाठराखण केली.

जमीयत उलेमा-ए-हिंद जकातीच्या पैशांतून आतंकवादी मुसलमान आरोपींचे खटले लढवणार !

मुसलमानांच्या धार्मिक संघटना जिहादी आतंकवादी आरोपींच्या
 सुटकेसाठी सर्व प्रकारे साहाय्य करतात, तसे किती हिंदुत्ववादी आणि धार्मिक
 संघटना हिंदुत्वासाठी अटकेत असणार्‍या हिंदूंना साहाय्य करतात ?
     नवी देहली - जमीयत उलेमा-ए-हिंद या मुसलमानांच्या धार्मिक संघटनेने आतंकवादाच्या आरोपांतर्गत अटक करण्यात आलेल्या मुसलमान आरोपींचा जकातीच्या पैशातून खटला लढण्याचा निर्णय घेतला आहे. जकात म्हणजे मुसलमानांनी प्रत्येक वर्षी त्यांच्या उत्पन्नातील २.५ टक्के रक्कम द्यायची प्रथा. जकात मुसलमानांचे ५ वे कर्तव्य आहे. रमजानच्या काळात तो जमा केला जातो आणि वाटला जातो. जमीयत उलेमा-ए-हिंद यापूर्वीपासून आरोपी आतंकवाद्यांचा खटला लढवत आली आहे. आता तिने या लढाईसाठी जकातमध्ये पैसा देण्याचे आवाहन केले आहे.
      जमीयत उलेमा-ए-हिंदच्या विधी विभागाचे प्रमुख गुलजार आझमी म्हणाले की, कुराण आणि हदीसमध्ये जकातच्या उपयोगाचे ८ प्रकार सांगितले आहेत. त्यातच एक प्रकार आहे की, कारागृहात असणार्‍यांना साहाय्य करणे. गेल्या वर्षी संस्थेने ४१० मुसलमान आरोपींचे खटले लढण्यासाठी २ कोटी रुपये खर्च केले होते. हे सर्व आरोपी ५२ आतंकवादी प्रकरणात अटकेत होते. यातील १०८ जणांच्या विरोधातील आरोप काढण्यात आले.
     एका सर्वेक्षणानुसार जर भारतातील १७ कोटी ८० लाख मुसलमानांपैकी केवळ १० टक्के मुसलमानांनी जकात दिली, तरी ७ सहस्र ५०० कोटी रुपये होतील.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८५६ अंगणवाड्या वीज पुरवठ्यापासून वंचित

शिक्षणक्षेत्राची एवढी भीषण स्थिती असतांना राज्यात विकास 
प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात ! 
त्याऐवजी विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून दिल्यास खरा विकास साध्य होईल ! 
     सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील एकूण १ सहस्र ५६९ अंगणवाड्यांपैकी ५१९ अंगणवाड्या ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे वीजपुरवठ्यापासून वंचित असून ३४५ अंगणवाड्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे, ही माहिती महिला बालविकास समिती बैठकीत उघड झाली.
      बॅ. नाथ पै समिती सभागृहात महिला बालकल्याण समितीची सभा सभापती रत्नप्रभा वळंजू यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी सदस्या कल्पिता मुंज, रुक्मिणी कांदळगावकर, वंदना किनळेकर, सचिव सोमनाथ साळ उपस्थित होते.

दुर्मिळ कासवांच्या संवर्धनासाठी गालजीबाग (गोवा) समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांना बंदी घालावी !

     पणजी - कासवांच्या या उत्पत्तीस्थानांची हानी रोखण्यासाठी गालजीबाग समुद्रकिनार्‍यावर मासेमारी, तसेच पर्यटक यांना बंदी घालावी, अशी मागणी गोवा किनारी विभाग व्यवस्थापकीय प्राधिकरणाने (गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अ‍ॅथोरिटीने) केली आहे. यासंदर्भातील पत्र प्राधिकरणाने शासनाला पाठवले आहे. 
      ऑलिव्ह रिडली जातीचे अनेक मोठे कासव सहस्रो समुद्रीमैलांचा प्रवास करून विशिष्ट हंगामात गालजीबाग समुद्रकिनार्‍यावर प्रतिवर्षी अंडी घालण्यासाठी येत असतात. रात्रीच्या वेळी अंडी घालणार्‍या या कासवांना उजेड चालत नाही, तसेच माणसांची वर्दळही चालत नाही; मात्र येथे येणार्‍या पर्यटकांमुळे कासवांच्या अंडी घालण्याच्या ठिकाणांना (उत्पत्तीस्थानांना) हानी पोचत आहे, तसेच मोठ्याप्रमाणात होणार्‍या मासेमारीमुळेही कासवांच्या उत्पत्तीवर परीणाम होत आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटन, तसेच मासेमारी होऊ नये, अशी मागणी प्राधिकरणाने केली आहे.

गोव्यात मातृभाषेचा गळा घोटण्याचे कारस्थान !

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचा घणाघात !
श्री संजय राऊत
       पणजी (गोवा) - राज्यात एका बाजूने मातृभाषेचा गळा घोटण्याचे कारस्थान चालू आहे, तर दुसर्‍या बाजूने देशप्रेमाशी काहीही देणेघेणे नसलेल्या पोर्तुगीजधार्जिण्यांना दुहेरी नागरिकत्वाचे गाजर दाखवले जात आहे. केवळ मतांसाठी मातृभाषा आणि राष्ट्रभक्ती यांचा सौदा चालू आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे नेते तथा राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना खासदार राऊत यांनी ही टीका केली. या प्रसंगी व्यासपिठावर राज्याचे संपर्क प्रमुख प्रदीप बोरकर, विशेष निमंत्रित तथा आर्टीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर आदींची उपस्थिती होती.

भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी वेदपरंपरेकडे वळावे लागेल ! - प.पू. स्वामी गोविंददेवगिरीजी

याविषयी सरकारला काय म्हणायचे आहे ?
      पुणे - प्रत्येक राष्ट्राला अंतरंग प्राणशक्ती असते. राष्ट्राचे चैतन्य कशात आहे, हे जाणून त्याची प्रगती साधायची असते. अंतरंग शक्तीविना राष्ट्राची अधोगती होते आणि अंतरंग शक्तीचा विकास झाल्यास प्रगती होते. भारतीय समाजाची प्राणशक्ती त्याचा धर्म आहे. भारताचा धर्म जीवनमूल्यात्मक आहे; म्हणून आपल्याला देशाला उज्ज्वल बनवायचे असेल, तर पुन्हा आपला धर्म, प्राचीन वाङ्मय म्हणजेच वेदपरंपरा यांकडे वळावे लागेल, असे मार्गदर्शन प.पू. स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज (पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी व्यास) यांनी केले. (संतांच्या मार्गदर्शनाप्रमाणे राज्यकर्त्यांनी राज्यकारभार केल्यास भारताला पुनर्वैभव प्राप्त होईल, यात शंका नाही. - संपादक)
     साप्ताहिक विवेक आयोजित राष्ट्रद्रष्टा : पं. दिनदयाळ उपाध्याय या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते. ५ जून या दिवशी येथील गणेश कला क्रीडा मंच येथे हा कार्यक्रम पार पडला. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला भाजपचे राष्ट्र्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, हिंदुस्थान प्रकाशनचे अध्यक्ष डॉ. रमेश पतंगे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी अमित शहा म्हणाले,पंडित दिनदयाळ यांचे विचार केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नसून देशाच्या प्रगतीसाठी असल्याने भावी पिढीसाठी त्यांचे विचार अत्यंत प्रेरणादायी आहेत. जवाहरलाल नेहरू भारताचे नवनिर्माण करू पहात होते; परंतु पंडित दिनदयाळजींना भारताचे पुनर्निर्माण करायचे होते. हे केवळ धर्माचे पुनरुज्जीवन झाल्यानेच होऊ शकते, हे त्यांनी जाणले होते. (बहुमत असलेल्या भाजपने धर्माचे पुनरुज्जीवन करण्याचे पंडित दिनदयाळजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी साधूसंतांच्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रयत्न करावेत, अशी सर्वसामान्य हिंदूंची अपेक्षा आहे. - संपादक)

चीनने मुसलमानांच्या रमझानवर घातली बंदी !

देशातील शांततेसाठी कठोर निर्णय घेणार्‍या चीनकडून भारत काही शिकेल का ?
     बीजिंग - चीनमध्ये ६ जूनपासून चालू झालेल्या रमझानमध्ये रोजा (उपवास) ठेवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी मुसलमानबहुल भागात घालण्यात आली आहे. चीनमध्ये सध्या साम्यवादी पक्षाचे शासन असून ते नास्तिक आहे. म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे, असे म्हटले जात आहे. तसेच रमझानच्या पूर्ण महिन्यात खाद्यपदार्थांची दुकाने बंद ठेवू नयेत, असेही बजावण्यात आले आहे. तसेच या महिन्यात मुसलमानांना मशिदीत प्रवेश करण्यावर बंदी घालण्याचाही विचार चालू आहे.

गांधीजींच्या हत्येचा तपास नव्याने नाही !

उच्च न्यायालयाचे निर्देश 
     मुंबई - गांधी यांच्या हत्येची चौकशी एका आयोगाच्या माध्यमातून नव्याने करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका ६ जून या दिवशी उच्च न्यायालयाने फेटाळली. एवढ्या जुन्या प्रकरणाची चौकशी करण्याची आवश्यकता नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. 

जरीमरी माता आणि कालीमाता या पुरातन मंदिरांना हटवण्यास हिंदुत्ववाद्यांचा विरोध

हिंदूंची श्रद्धास्थाने जाणूनबुजून नष्ट करू पहाण्याचे षड्यंत्र ! अन्य धर्मियांच्या
 प्रार्थनास्थळांना हटवण्याचे पालिका अधिकार्‍यांचे धैर्य तरी झाले असते का ?
     मुंबई - मुख्याध्यापक नाल्यावरील जरीमरी मातेचे मंदिर आणि धोबी घाट नाल्यावरील कालीमातेचे मंदिर तेथील नाल्यांच्या स्वच्छतेच्या आड येत असून ती मंदिरे हटवल्याविना स्वच्छता करणे अवघड आहे; मात्र हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंदिरे हटवण्यास विरोध केला आहे. स्वच्छतेचे काम बंद पडल्याने धारावीसह माटुंगा, सायन सर्कल इथपर्यंतचा भाग पावसाळ्यात पाण्याखाली जाणार असल्याचे पालिका अधिकार्‍यांनी सांगितले आहे.
     मंदिरे हटवून नाल्यांच्या स्वच्छतेचा निर्णय महानगरपालिका अधिकार्‍यांनी घेतला होता; मात्र पुरातन मंदिरांच्या रक्षणार्थ हिंदुत्ववाद्यांची भूमिका ठाम असल्याने अधिकारी मंदिरे हटवण्याची कारवाई करू शकले नाहीत. पालिकेने पुन्हा २ जून या दिवशी मंदिरांच्या विरोधात कारवाई करण्याचा निर्णय घेतला; मात्र हा परिसर संवेदनशील असल्याने येथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, असे लेखी निवेदन धारावी पोलीस ठाण्याने पालिकेला पाठवल्यामुळे कारवाई रहित करण्यात आली. मंदिरे मोकळ्या जागेत हालवण्याची विनंती पालिका अधिकार्‍यांनी केली आहे; मात्र हिंदुत्ववाद्यांनी तसे करण्यास नकार दिला आहे.

कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी नाती जपा ! - अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर

अधिवक्त्या (श्रीमती)
अपर्णा रामतीर्थकर
     पुणे - आज भारतीय संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था यांची मृत्यूघंटा वाजू लागली आहे. भारतीय स्त्री नट्टापट्टा (फॅशन) आणि करियरं यांच्या मागे धावतांना धर्माचरण आणि संस्कार विसरल्याने ही स्थिती ओढावली आहे. जुळवून घेण्याच्या वृत्तीचा अभाव, शिक्षणामुळे निर्माण झालेला अहंकार आदी गोष्टींमुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी नाती जपा आणि निभावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या अधिवक्त्या (श्रीमती) अपर्णा रामतीर्थकर यांनी केले. मुक्ता महिला मंचच्या वतीने ५ जून या दिवशी येथील परिणय मंगल कार्यालयात नाती जपा या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर यांनी कुटुंबव्यवस्था टिकवण्याच्या तळीमळीतून केलेले व्याख्यान उपस्थित महिलांच्या अंतराचा वेध घेणारे ठरले.

दाभोलकर, कलबुर्गी आणि पानसरे या तिन्ही हत्यांचा तपास महाराष्ट्र अन् कर्नाटक पोलिसांनी संयुक्तपणे करण्याची मागणी करणार ! - डॉ. हमीद दाभोलकर

     नंदुरबार - माणसांना संपवले तरीही त्यांचे विचार कधीच संपवता येत नाहीत. दाभोलकर, कलबुर्गी आणि पानसरे या तिन्ही हत्यांचा तपास मडगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपींपाशीच येऊन थांबतो, ही बाब सनातन संस्थेवरील संशय बळकट करायला पुरेशी आहे. म्हणून आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन 'महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांनी संयुक्तपणे हा तपास करावा, तसेच फरार आरोपींचा वेगाने छडा लावावा', अशी मागणी करणार आहोत. (एखाद्यावर संशय घेऊन तपासाची दिशा भरकटवत रहाणे, हीच पुरोगाम्यांनी आतापर्यंत खेळी खेळली आहे. त्यामुळे खरे गुन्हेगार मोकाट आहेत. तपास यंत्रणांवर सातत्याने दबाव टाकणार्‍यांनाही शासनाने समज देणे अपेक्षित आहे. - संपादक) यापुढेही संविधानिक मार्गाने आंदोलने करून याचा पाठपुरावा करत रहाणार आहोत, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले. 

लातूर विभागात १६ शाळांचा निकाल शून्य टक्के

     लातूर, ७ जून - नुकताच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये लातूर विभागाचा निकाल अल्प म्हणजे ८१.५४ टक्के लागला आहे. लातूर विभागात १६ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. शून्य ते ३० टक्के निकालाच्या ४५ शाळा आहेत. (विभागातील सर्वच शाळांचा निकाल चांगला लागण्यासाठी शिक्षण विभाग कोणते प्रयत्न करणार ? - संपादक)

दाऊद इब्राहिमने रचले नवी देहलीमध्ये आक्रमण करण्याचे षड्यंत्र !

पाकमध्ये बसून आतंकवादी कट रचतात आणि भारत भित्र्या सशासारखा 
बचावाचा प्रयत्न करत रहातो किंवा मार खातो, हे आणखी किती दिवस चालू रहाणार ? 
     नवी देहली - कुख्यात जिहादी आतंकवादी दाऊद इब्राहिम याने देहलीमध्ये आक्रमण करण्याचा कट रचल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. या माहितीवरून सुरक्षा यंत्रणांना सतर्क रहाण्याचा आदेश देण्यात आला आहे. देहलीतील विमानतळ, विधानसभा, देहली रेल्वे स्थानक आदी ठिकाणी बॉम्बस्फोट होण्याची शक्यता आहे.

आर्क्टिक समुद्रातील बर्फ नष्ट होणार ! - केंब्रिज विद्यापिठातील वैज्ञानिकाचा दावा

विज्ञानाच्या कथित प्रगतीचे आणि लाभाचे हे दुष्परिणाम पृथ्वीला विनाशाकडेच नेत आहेत, 
हे पुरोगाम्यांना आणि आधुनिकतावाद्यांना लक्षात येईल तो सुदिन !
ग्लोबल वॉर्मिंगचा दुष्परिणाम !
आर्क्टिक समुद्रातील वितळत चाललेला बर्फ
     नवी देहली - आर्क्टिक समुद्रातील बर्फ यावर्षी किंवा पुढील वर्षी नष्ट होईल, असा दावा लंडन येथील केंब्रिज विद्यापिठातील पोलस ओशन फिजिक्स ग्रुपचे प्रमुख प्रा. पीटर वॅडहॅम्स या वैज्ञानिकाने केला आहे. त्यांनी ४ वर्षांपूर्वीच हे भाकित केले होते, असे त्यांनी म्हटले आहे.
१. यूएस् नॅशनल स्नो अँड आइस डाटा सेंटर या संस्थेच्या माहितीनुसार १ जून २०१६ च्या अखेरपर्यंत आर्क्टिकमध्ये १ कोटी ११ लक्ष चौरस किलोमीटर सागरी बर्फ होता. गेली ३० वर्षे तो सरासरी १ कोटी २७ लक्ष चौरस किलोमीटर असायचा. हा फरक १६ लक्ष चौरस किलोमीटरचा असून तो भाग ब्रिटनच्या ६ पट इतका क्षेत्रफळाने आहे.

दौंड (जिल्हा पुणे) येथील जलवाहिनी फुटल्याने लक्षावधी लिटर पाणी वाया

दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर जलवाहिनीतून लक्षावधी लिटर पाणी वाया जाणे, हे गंभीर आहे !
     दौंड - शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी ५ जून या दिवशी सायंकाळी फुटल्याने लक्षावधी लिटर पाणी वाया गेले. या विरोधात काही नागरिक दौंड नगरपालिकेमध्ये तक्रार करण्यासाठी गेल्यावर पाणीपुरवठा विभागातील एकही कर्मचारी तेथे नव्हता. तसेच रविवारची सुट्टी असल्याने कोणीही जलवाहिनी फुटलेल्या भागाकडे फिरकलेही नाही. (पाणी पुरवठा विभागाचा हलगर्जी आणि दायित्वशून्य कारभार ! - संपादक) एकीकडे दौंड शहरात पाणीबाणीची परिस्थिती असतांना पिण्याचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.
     दौंड-कुरकुंभ रस्त्यावर चैतन्य लॉन्सच्या समोर दौंड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिनीला अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती चालू आहे. या गळतीकडेही दौंड नगरपालिचे लक्ष नाही. (या प्रकरणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करतील का ? - संपादक)

कल्याण येथील पत्रकाराच्या घरावर आक्रमण करणारे धर्मांध मोकाट !

     कल्याण (वार्ता.) - येथील कोनगाव परिसरात रहाणारे पत्रकार सिद्धार्थ कांबळे यांच्या घरावर त्याच परिसारत राहणार्‍या भूमाफिया आणि समाजकंटक यांनी हल्ला केला. २ दिवसांपूर्वी रात्री १०.१५ च्या सुमारास हातात धारदार शस्त्रे घेवून नूर निशा खलील, तीचा नवरा खलील शेख, भाऊ अश्पाक आणि जाकिर या सर्वानी मिळून सिद्धार्थ कांबळे यांच्या घरात घुसून त्यांना आणि त्यांच्या परिवाराला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींना अजूनपर्यंत अटक करण्यात आली नाही.

पुणे येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला अटक

     पुणे, ७ जून - येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी जाबेर अब्दुलगनी बागवान याला अटक केली आहे. त्याला विशेष न्यायाधीश मंगला धोटे यांनी १० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. बागवान याने ३ जून या दिवशी त्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अपहरण केले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. या संदर्भात पीडित मुलीच्या वडिलांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. (अशा धर्मांधांना कडेलोट करण्याचीच शिक्षा करायला हवी ! - संपादक)

दोन दिवसांपासून सांडपाणी चंद्रभागा नदीत !

'हीच का नमामी चंद्रभागा ?' भाविकांचा प्रशासन आणि शासनाला प्रश्‍न 
     पंढरपूर (जिल्हा सोलापूर), ७ जून (वार्ता.) - चंद्रभागेत लाखो साधू-संतांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेली ही चंद्रभागा आज नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे चंद्रभागेच्या पात्रामध्ये (खिस्ते घाट आणि वडर घाट या दोन्हीच्या मध्ये असलेली) सांडपाण्याची वाहिनी फुटल्याने त्याचे (मैला) दूषित पाणी दोन दिवस चंद्रभागेच्या पाण्यात मिसळत आहे. 'हीच का नमामी चंद्रभागा', असा प्रश्‍न भाविकांना पडला आहे. या वेळी पाहणी करतांना 'महर्षी वाल्मिकी संघा'चे संस्थापक गणेश अंकुशराव, जयवंत अभंगराव, शहराध्यक्ष नीलेश माने आदि कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी त्यांनीही प्रशासनाकडून होणार्‍या दुर्लक्षाविषयी अप्रसन्नता व्यक्त केली. नुकतेच पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'नमामी चंद्रभागा' या उपक्रमाचा मोठ्या थाटामाटात शुभारंभ झाला. या वेळी डझनभर मंत्री, आमदार उपस्थित होते. 

एकनाथ खडसे यांची वेळेत चौकशी करावी ! - भाजप मंत्रिमंडळातील एका गटाची मागणी

     मुंबई, ७ जून (वार्ता.) - भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदाचे त्यागपत्र दिले खरे; मात्र त्यांच्या त्यागपत्राने भाजपला फायदा होण्यापेक्षा हानीच होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजप मंत्रिमंडळातील एक गटाने खडसे यांची वेळेत चौकशी करावी, अशी आग्रही मागणी केली आहे. मंगळवारी 'वर्षा'वर होणार्‍या भाजप मंत्र्यांच्या बैठकीत यावर चर्चा होईल. 

शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणार्‍या १९ यझिदी तरुणींना इसिसने जिवंत जाळले !

इस्लामच्या नावाने जगभरात राष्ट्र 
स्थापन करू पहाणार्‍या अशा आसुरी 
आतंकवाद्यांचा इस्लामी राष्ट्रे आणि इस्लामचे सर्वच 
अनुयायी उघडपणे विरोध करत नाहीत, हे लक्षात घ्या ! 
     मोसूल - आतंकवाद्यांसमवेत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणार्‍या १९ यझिदी तरुणींना इसिसकडून जिवंत जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. या तरुणींना लोखंडी पिंजर्‍यांत बंदिस्त करून शेकडो जणांच्या उपस्थितीत जाळण्यात आले. इसिसच्या कह्यात सध्या सुमारे ५ सहस्र यझिदी महिला आहेत. त्यांना अशा अत्याचारांस सामोरे जावे लागत आहे. या महिलांमध्ये अनेक अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे.

नीतीमत्ता आणि अध्यात्म यांद्वारेच युवा शक्ती देशात पालट घडवू शकते - शिवसेना आमदार अधिवक्ता गौतम चाबुकस्वार

     पुणे - आपला देश घडवण्यासाठी युवकांनी अगोदर स्वतः घडण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शिक्षणामध्ये नीतीमत्ता आणि अध्यात्म यांचा समावेश करणे आवश्यक आहे. नीतिमत्ता आणि अध्यात्म यांद्वारेच युवाशक्ती देशामध्ये मोठा पालट घडवू शकते, असे प्रतिपादन शिवसेना आमदार अधिवक्ता गौतम चाबुकस्वार यांनी केले. सकाळ वृत्तपत्र समूहाच्या वतीने ३ दिवसीय उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप आमदार चाबुकस्वार यांच्या व्याख्यानाने झाला.

कराचीमध्ये मद्याच्या दुकानावरील गोळीबारात २ हिंदूंसहित ३ जण ठार

     कराची - पाकमधील कराची शहरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आक्रमणकर्त्यांनी मद्याच्या दुकानावर केलेल्या गोळीबारात २ हिंदू आणि अन्य एक जण ठार झाला. दुकानदार तरू मल याला दुबईवरून धमकीचे दूरभाष येत होते. त्याच्याकडून पैशाची मागणी केली जात होती. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने हे आक्रमण झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पुण्यातील वारजे माळवाडी आणि हडपसर परिसरात वाहनांची तोडफोड

पुण्यात पोलीस प्रशासन अस्तित्वात आहे का ? 
     पुणे, ७ जून - येथील वारजे माळवाडी भागात ४ जूनला गुन्हेगारांच्या टोळीतील वादातून आणि हडपसर परिसरात एका टोळक्याने दहशत पसरवण्यासाठी २ जूनला त्या भागातील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणात वारजे माळवाडी येथील विठ्ठलनगर भागातील १० हून अधिक गाड्या, तर हडपसरमधील ससाणेनगरमधील ३ दुचाकी आणि १ चारचाकी वाहन यांची हानी झाली. वारजे माळवाडी येथील प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक तर हडपसर येथील प्रकरणात फरार ७ जणांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट केला आहे.

पुण्यात मान्सूनपूर्व पहिल्या जोराच्या पावसात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांमधील त्रुटी उघड

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे तीन-तेरा ! 
     पुणे, ७ जून - शहराला ५ जून या दिवशी रात्री सुमारे घंटाभर मान्सूनपूर्व पावसाने झोपडून काढले. या पावसाने शहरात नेहमीच्या सर्व ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले. अनेक प्रमुख रस्त्यांवरील चौकांमध्ये पाण्याची तळी साठली होती, तसेच सेवा-सुविधा कोलमडली होती. (प्रत्यक्षात आपत्ती आल्यावर काय परिस्थिती असेल, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक) त्यामुळे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांमधील त्रुटी उघड झाल्या. या सर्वांचा परिणाम म्हणून पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला येत्या काही दिवसांत अनेक कामे करावी लागणार असल्याचेही स्पष्ट झाले. (या प्रकरणी पालिका आयुक्तांनी लक्ष घालून पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करावीत. - संपादक) 

वारीतील वाहनांच्या पथकर माफीसाठी प्रयत्न करणार ! - पालकमंत्री गिरीश बापट

     पुणे, ७ जून (वार्ता.) - संत ज्ञानेश्‍वर महराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या कालावधीत दिंड्यांमधील वाहनांना पथकर माफी मिळावी, तसेच संबंधित ग्रामपंचायती आणि नगरपरिषदा यांच्या निधीमध्ये वाढ व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले. पालखी सोहळ्याच्या नियोजनाच्या सिद्धतेचा आढावा घेण्यासाठी विधान भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी हे आश्‍वासन दिले. दिंडी प्रमुखांनी अनुदानित सिलेंडरसाठी संबंधित विभाग अथवा त्यांच्याकडे अर्ज सुपुर्द केल्यास त्यांना अनुदानित सिलेंडर देता येईल, असे पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले. (हज यात्रेसाठी भरघोस अनुदान आणि पालखीसाठी केवळ पथकर माफीचा विचार, असा दुजाभाव का ? - संपादक)

ठाणे महापालिकेचा कर निरीक्षक आणि लिपिक यांना लाच घेतांना अटक

     ठाणे - जागेची मालमत्ता कर आकारणी करण्यासाठी तक्रारदाराकडून लाच स्वीकारणार्‍या ठाणे महापालिकेचा कर निरीक्षक देवचंद राठोड (वय ५४ वर्षे) आणि लिपिक विजय राठोड (वय ३५ वर्षे) यांना ठाणे लाचलुचपत विरोधी पथकाने ६ जून या दिवशी अटक केली. विजय राठोड याला १० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना अटक करण्यात आली. (भ्रष्टाचारग्रस्त भारत ! - संपादक)

शरिया कायदा पालटण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही ! - मौलाना खलिद रशीद महाली

स्त्री स्वातंत्र्याचा आव आणणार्‍या तृप्ती देसाई, कविता कृष्णन्, खुशबू, सबा नक्वी यांसारख्या 
पुरोगामी महिलांची अशा वक्तव्यांवर कृती तर सोडाच; परंतु निषेधाचे साधे शब्दही तोंडून 
काढण्याचे धाडस होत नाही !
     नवी देहली - इस्लामी शरिया कायदा हा काळानुसार आणि परिस्थितीनुसार पालटण्यासाठी नाही. या कायद्यात पालट केल्यास ते कदापी सहन केले जाणार नाही, असे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य मौलाना खलिद रशीद फरंगी महाली यांनी सांगितले. 
      तीन वेळा तलाक शब्द उच्चारण्यावरून वाद उफाळून आलेला असतांना महिलांविषयीच्या सूत्रावर त्यांनी गोंधळाची स्थितीही निर्माण केली आहे. बहुसंख्य मुसलमान महिला शरियत कायद्याविषयी समाधानी आहेत आणि त्या कायद्यामध्ये पालट करण्याची आवश्यकता नाही, असेही महाली यांनी सांगितले.

अखलाख यांच्या घरातील गोमांसाच्या अहवालातून धर्मनिरपेक्षतावाद्यांचे षड्यंत्र उघड ! - विहिंप

दादरी प्रकरण
     नवी देहली - विश्‍व हिंदु परिषदेचे संयुक्त आंतरराष्ट्रीय सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे अखलाखच्या प्रकरणात राज्याच्या सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या शासनावर टीका केली आहे. 
      डॉ. जैन यांनी म्हटले आहे की, अखलाखने हिंदूंना आवाहन देत गोहत्या केली होती, असे बिसाहडा येथील हिंदू ओरडून सांगत होते; मात्र तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांनी हिंदूना असहिष्णू ठरवून त्यांना अपकीर्त करण्यासाठी हा आवाज दाबला. उत्तरप्रदेश सरकारने ८ मास हा अहवाल दाबल्याने हे षड्यंत्र असल्याचे सिद्ध झाले. यामध्ये पुरस्कार वापसी ब्रिगेडचाही सहभाग आहे. यांना थोडी जरी लाज वाटत असेल, तर आपल्या अपराधांसाठी त्यांनी देशाची क्षमा मागायला हवी; मात्र मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केवळ क्षमा मागून चालणार नाही. त्यांनी दादरी येथील हिंदूंवर प्रविष्ट केलेले खोटे खटले काढून हिंदूंना कारागृहातून बाहेर काढले पाहिजे, तसेच त्यांना पुरेशी हानीभरपाई द्यायला हवी.

जिहादी आतंकवाद्यांकडून प्रमुखांशी संपर्क साधण्यासाठी कॅलक्युलेटर अ‍ॅपचा वापर !

      नवी देहली - पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात घुसखोरी करणारे पाक प्रशिक्षित आतंकवादी भारतीय सैन्याच्या स्मार्टफोनवर कॅलक्युलेटर हे विशेष अ‍ॅप वापरत असल्याचे उघड झाले आहे. घुसखोरी करणार्‍या आतंकवाद्यांच्या स्मार्टफोनमध्ये हे अ‍ॅप आढळलेे. यामुळे आतंकवाद्यांना पाकव्याप्त काश्मीर येथील त्यांच्या प्रमुखांशी संपर्क साधण्यात आणि भारतीय सैन्याकडून केल्या जाणार्‍या इलेक्ट्रॉनिक टेहळणीतून वाचण्यास साहाय्य मिळते.
१. सर्वांत आधी अमेरिकेच्या कॅटरिना चक्रीवादळाच्या वेळी वादळग्रस्तांशी संपर्क करण्यासाठी एका आस्थापनाने या तंत्रज्ञानाचा वापर केला होता, अशी माहिती लष्कर-ए-तोयबाच्या काही आतंकवाद्यांची चौकशी केल्यानंतर उघड झाली.

वर्ष २००६ मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील ४ आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

     मुंबई - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने २००६ मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील ४ आरोपींची जामीन याचिका फेटाळून लावली आहे. विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही.व्ही. पाटील यांनी मनोर सिंह, राजेंद्र चौधरी, धन सिंह आणि लोकेश शर्मा यांची जामीन याचिका फेटाळली.
     एप्रिल महिन्यात चारही आरोपींनी सहआरोपींची मुक्तता झाल्यानंतर विशेष न्यायालयात जामीन अर्ज केला होता. २००६ मध्ये झालेल्या स्फोटात चौघांना फसवले जात असून त्यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे अद्याप सापडले नसल्याचे त्यांच्या अधिवक्त्यांनी केलेल्या अर्जात नमूद करण्यात आले होते. ज्या वस्तू आरोपींकडून हस्तगत करण्यात आल्या, त्या वस्तू सहजरित्या बाजारात उपलब्ध होत असल्याचे आरोपींच्या अधिवक्त्यांनी नमूद केले होते; परंतु त्यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे असून त्यांचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे सरकारी पक्षाच्या अधिवक्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.फलक प्रसिद्धीकरता

किती हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुत्वासाठी अटकेत असणार्‍या हिंदूंना साहाय्य करतात ?
     जमीयत उलेमा-ए-हिंद या संघटनेने आतंकवादाच्या आरोपांंतर्गत अटक करण्यात आलेल्या मुसलमान आरोपींचा जकातीच्या पैशातून खटला लढण्याचा निर्णय घेतला. जकात म्हणजे रमजान मासात मुसलमानांनी स्वत:च्या वार्षिक उत्पन्नातील २.५ टक्के रक्कम धर्मासाठी द्यायची प्रथा !

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Atankavadke aropme bandi Musalmanoke liye Jamiat Ulema-E-Hind Jakatdwara abhiyog chalayega
     Hindutvake liye ladhnewaloki sahaytahetu kaun aage ata hai
जागो !
: आतंकवाद के आरोप में बंदी मुसलमानों के लिए जमीयत उलेमा-ए-हिन्द जकातद्वारा अभियोग चलाएगा.
     हिन्दुत्व के लिए लढनेवालों की सहायता हेतु कौन आगे आता है ?

हरियाणात खाजगी बसमध्ये झालेल्या स्फोटात १५ जण घायाळ

     फतेहबाद (हरियाणा) - हरियाणातील फतेहबाद जिल्ह्यातील भूना रस्त्यावर एका खाजगी बसमध्ये झालेल्या स्फोटात १५ जण घायाळ झाले आहेत. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बनला मृत्यूचा महामार्ग !

१४ वर्षांत ५ सहस्र अपघातांमध्ये १४०० बळी ! 

     मुंबई, ७ जून (वार्ता.) - मुंबई-पुण्याला जोडणार्‍या द्रुतगती महामार्गावर त्याच्या निर्मितीपासून म्हणजे २००२ पासून ५ सहस्र अपघात झाले असून त्यात १ सहस्र ४०० प्रवाशांचा बळी गेला आहे. या महामार्गावरील अपघात थोपवणारी यंत्रणा अपयशी ठरली असून देशाच्या आर्थिक राजधानीला जोडणारा हा रस्ता मृत्यूचा महामार्ग ठरला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झटपट प्रवासाच्या आनंदात वाहने चालवतांना वाहतुकीच्या नियमांच्या पालनाकडे पूर्ण दुर्लक्ष होऊ लागले. किमान ८० किलोमीटर वेगमर्यादा असतांनाही ताशी १२० ते १३० किमी वेगाने जवळपास ४० ते ५० सहस्र वाहने प्रतीदिन या मार्गावर धावतात. 

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन विशेषांक

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत 

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन विशेषांक

 प्रसिद्धी दिनांक : १२ जून २०१६
पृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ११ जून या 
दिवशी दुपारी ३.३० पर्यंत 'इआरपी प्रणाली'त भरावी !

झारखंडमधील भाकपच्या माओवाद्यांची सरपंचांना धमकी : गावांतून प्रत्येकी १० मुले नक्षलवाद्यांच्या बालपथकासाठी द्या !

देशाचा विकास करण्यासह नक्षलवाद्यांना नष्ट करण्यासाठी 
केंद्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी जनतेची अपेक्षा ! 
      गुमला (झारखंड) - भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या माओवाद्यांनी नक्षलवाद्यांचे बालपथक बनवण्यासाठी प्रत्येक गावातून १० मुले देण्याची मागणी केली आहे. त्यांनी गावच्या सरपंचांकडे ही मागणी केली आहे. काही ठिकाणी नक्षलवाद्यांनी म्हटले आहे की, आम्ही तुम्हाला निवडणुकीत साहाय्य केले आता तुम्ही आमच्या संघटनेला साहाय्य करा. गुमला, लोहरदगा आणि लातेहार जिल्ह्यातील काही सरपंचांना असे सांगण्यात आले आहे. नक्षलवाद्यांच्या भीतीपोटी कोणताही सरपंच या संदर्भात बोलण्यास सिद्ध नाही. यापूर्वी काही मुले देण्यातही आली होती; मात्र नंतर गावकर्‍यांनी मुले देण्यास विरोध केला.शिरस्त्राण (हेल्मेट) परिधान न करणार्‍या दुचाकीस्वारांना पेट्रोल न देण्याचा तेलंगण प्रशासनाचा आदेश !

केंद्रशासन असा निर्णय प्रत्येक राज्याला घ्यायला का सांगत नाही ? 
     भाग्यनगर - येथील अदिलाबाद जिल्ह्यामध्ये शिरस्त्राण (हेल्मेट) परिधान न करणार्‍यांना पेट्रोल न देण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे. या आदेशाची कार्यवाही २ जूनपासून चालू झाली आहे. प्रशासनाकडून दुचाकीस्वारांनी शिरस्त्राण परिधान करावे, यासाठी विशेष मोहीमही राबवण्यात येत आहे. आता जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर केवळ शिरस्त्राण परिधान करणार्‍यांनाच गाडीत पेट्रोल भरून मिळत आहे. शासनाच्या या निर्णयाचे पेट्रोल पंपचालकांनीही स्वागत केले आणि सुरक्षित प्रवासासाठी हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.अमेरिकेने भारताला सोपवल्या १२ मौल्यवान प्राचीन मूर्ती !

प्राचीन मूर्तींची तस्करी होत असतांना पुरातत्व विभाग झोपा काढत होता का ?
     न्यूयॉर्क - अमेरिकेच्या दौर्‍यावर गेलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अमेरिकेने भारतातून तस्करी करण्यात आलेल्या चोला आणि मौर्य राजवटीतील १२ प्राचीन मूर्ती सोपवल्या आहेत. या मूर्तींची किंमत कोट्यवधी रुपये आहे. या मूर्तींमध्ये तमिळनाडूतील मंदिरातून चोरी झालेल्या ब्राँझच्या श्री गणेशाच्या मूर्तीचाही समावेश आहे. या वेळी मोदी म्हणाले, भारतात काही पुरातन कलाकृती असून त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या कलाकृती पाहून आपले पूर्वज विज्ञान आणि कला क्षेत्रांत किती प्रगत होते, याची जाणीव होते. हा सर्व खजिना आम्हाला परत करण्याचा निर्णय घेतल्याविषयी मी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा आभारी आहे.मलेशियामध्ये महा हिंदु युथ युनिटी फेस्टिवल साजरा

     पेटलिंग जया (मलेशिया) - येथे २ दिवसीय महा हिंदु युथ युनिटी फेस्टिवल साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी मलेशियातील सहस्रावधी हिंदु युवकांनी गर्दी केली होती. ४ जून या दिवशी या सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. मलेशियन इंडियन काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. एस्. सुब्रह्मण्यम यांनी या सोहळ्याचे उद्घाटन केले. येथे मलेशियातील हिंदूंच्या इतिहासावर भव्य चित्र प्रदर्शन लावण्यात आले होते. मलेशियामध्ये हिंदूंचे झालेले आगमन, मलेशियातील हिंदूंचे ऐतिहासिक पुरावे याविषयीची चित्रे प्रदर्शित करण्यात आली होती.

पुरुष राष्ट्राचे संरक्षण करत असतील, तर महिलांनी मुलींचे संरक्षण करायला हवे ! - सौ. अनुपमा रेड्डी, सामाजिक कार्यकर्त्या

बेंगळुरू येथे हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेचे उद्घाटन !
डावीकडून दीपप्रज्वलन करतांना सौ. अनुपमा रेड्डी,
कु. भव्या गौडा आणि श्री. गुरूप्रसाद
     बेंगळुरू - आज पालक त्यांच्या मुलांना योग्य पोशाखाविषयी सांगत नाहीत. आज धर्माविषयी अभिमान नसल्याने आपल्या मुली लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळे आपल्या धर्मातील सर्व मुलींचे संरक्षण होण्यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा. पुरुष राष्ट्राचे संरक्षण करत असतील, तर महिलांनी मुलींचे संरक्षण करायला हवे, असे प्रतिपादन बेंगळुरू येथील अनुबंध न्यासाच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. अनुपमा शेट्टी यांनी केले. स्त्रियांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी या महिला शाखेचे आदीचुंचनगरी, समुदायभवन, विजयानगर येथे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. गुरुप्रसाद, रणरागिणी शाखेच्या समन्वयक कु. भव्या गौडा आणि मैसूर, हासन आणि तुमकूर येथील रणरागिणी शाखेच्या समन्वयक सौ. सुमा मंजेश यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

नक्षलवाद रणनीतीची अंमलबजावणी

(निवृत्त) ब्रिगेडियर
हेमंत महाजन
       नक्षलवाद जेथे-जेथे रुजतो, तेथे-तेथे मध्यमवर्गाचा अभाव, हे एक ठळक कारण दिसते. २ वेळेच्या जेवणाचा प्रश्‍न सुटलेला समाज सहजासहजी हातात बंदूक घेऊन दर्‍याखोर्‍यांतून हिंडायला तयार होत नाही. तसेच मध्यमवर्ग हा प्रस्थापित व्यवस्थेला पूरक असतो. त्याला ही सुरक्षित चौकट सोडायची नसल्याने तो नक्षलवादासारख्या हिंसक चळवळीला थारा देत नाही. आज भारतातील अन्य भागांप्रमाणेच छत्तीसगडमध्येही जेथे नक्षल चळवळ रुजली आहे, तेथे गरिबी, शोषण, विकासाच्या पायाभूत सुविधांचा अभाव आदी समस्या आढळतात. या भागात मध्यम वर्गापेक्षा दारिद्य्ररेषेखाली जगणारा वर्गच मोठा आहे.
      छत्तीसगड हा बरीच वर्षे मध्यप्रदेशासारख्या मोठ्या प्रांताचा एका बाजूला असलेला भाग राहिला. घनदाट जंगले, गरिबी आणि खुजे सामाजिक अन् राजकीय नेतृत्व यांमुळे हा भाग विकासाच्या पायवाटेवर मागेच राहिला. वर्ष २०००च्या नवीन राज्य स्थापनेनंतर या भागातील विकासात्मक कामांना गती मिळण्यास प्रारंभ झाला. असे असले, तरीही नक्षलप्रभावी क्षेत्रामध्ये ज्या प्रमाणात या कामांना आरंभ होणे अत्यावश्यक आहे, त्या प्रमाणात ती झालेली दिसत नाहीत. विकासाच्या सर्वसाधारण योजनांची गती नक्षलवादासारख्या संघटित उपद्रव शक्तीच्या कारवायांमुळे अल्प होते. या नियमाला छत्तीसगडही अपवाद नाही. दळणवळण, शिक्षण, आरोग्य, कृषी, रोजगार, उद्योग आदी सर्व गोष्टी या क्षेत्रात ठप्प झालेल्या दिसून येतात.

कुठे वृद्ध झाल्यावर साधना करण्यासाठी वनात निघून जाणारे पूर्वीचे हिंदू, तर कुठे उतारवयात वेगळी चूल मांडून मायेत गुरफटलेले आजचे वयोवृद्ध !

      बांधकाम व्यावसायिक वयोवृद्धांवर खूश आहेत. त्यांच्या वयोवृद्धांसाठी निरनिराळी घरे बांधण्याच्या (हाऊसिंग) योजना चालू असतात. पूर्वी वयोवृद्धांना बळजोरीने मुलांसमवेत रहाण्याची शिक्षा असे. मुलांच्या आणि जुन्या पिढीच्या आवडी-निवडी एकदम भिन्न. एकाला शास्त्रीय संगीताची, तर दुसर्‍याला रॉक अ‍ॅण्ड रोलची आवड असते. एकाला सारंगी प्रिय, तर दुसर्‍याला गिटार. पूर्वी दूरदर्शन संच घ्यायला अधिक पैसे मोजावे लागत असत. दूरचित्रवाणी पहाण्यावरून घरात मारामार्‍या ठरलेल्या असत. आता घरात २-३ दूरदर्शन संच घेणे परवडते. त्यामुळे ती युद्धे टळली आहेत. बरेच समंजस आई-वडील वेगळे रहातात. पूर्वी मुले आई-वडिलांपासून वेगळी रहात असत. आता गंगा उलटी वाहू लागली आहे. बांधकाम व्यावसायिक वयोवृद्धांची निकड लक्षात घेऊन घरे बांधू लागले आहेत. बांधकाम व्यावसायिक त्याप्रमाणे सवलती देऊ लागले आहेत. वयोवृद्धांना जिने चढल्यामुळे धाप लागते. त्यांना जिने चढता-उतरतांना पडण्याचा आणि इजा होण्याचा संभव अधिक असतो.

दारूगोळा भंडाराचे हादरे !

      पुलगाव येथील दारूगोळा साठ्याला आग म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आवर्जून यावा, तशी ही घटना झाली. आगीमुळे झालेल्या दारूगोळ्याच्या भीषण स्फोटांत १३० टन अटी टंक दारूगोळा भस्मसात झाला, तसेच लष्करी आणि अग्नीशमनदलाच्या जवानांवरही या वेळी काळाने घाला घातला. देशाच्या सेनेची कोणत्याही प्रकारची हानी होणे म्हणजे ती देशाचीच मोठी हानी असते. या घटनेमागील नेमके कारण लवकर समोर आले पाहिजे. अनेक तर्क या प्रकरणी लढवले जात आहेत. पैकी खरे काय ते या संबंधीचा तपास अहवाल आल्यावरच समजणार आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घटनेचा तपास चालू होण्यापूर्वीच घातपाताची शक्यता कोणत्या आधारावर नाकारली ? इतका उतावीळपणा कशासाठी ? ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेमुळे पठाणकोटवरील आक्रमण घडल्याचे या विषयीचा तपास करणार्‍या समितीनेच सांगितले होते. देशाला कपटी शत्रूचा असलेला धोका दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. असे असतांना दारूगोळा भंडाराच्या आग प्रकरणी आपल्या खात्याची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला कि काय ?
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
   
  या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

वाचकांच्या विशेष मागणीवरून बालवाचकांसाठीचे नियमित सदर !

बालकांसाठी परिपाठ !
      उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत बालवाचकांसाठी सुट्टीतील परिपाठ ! हे सदर प्रसिद्ध करण्यात आले. यातून विविध बोधकथा, लेख आदी माध्यमांतून सुसंस्कार आणि चांगल्या सवयी यांविषयी माहिती दिली गेली. आता सुट्टीचा कालावधी संपत आला असला, तरी वाचकांच्या विशेष मागणीवरून हे सदर नियमित प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हे सदर हिंदु राष्ट्राच्या भावी पिढीची जडणघडण होण्यास साहाय्यभूत ठरो, अशी श्रीगुरूंच्या चरणी प्रार्थना !
मुलांनो, पुस्तकाची काळजी अशी घ्या !
    निगा न करी पुस्तकाची । तो येक मूर्ख ॥
- समर्थ रामदासस्वामी (श्री दासबोध, दशक २, समास १, ओवी १०)
अर्थ : जो पुस्तकाची काळजी घेत नाही, तो मूर्ख होय.

कारागृहातील बंदीवानांची वर्णव्यवस्था !

       कारागृहातही चातुर्वर्ण्य आहे. स्मगलर्स हे कारागृहातील ब्राह्मण. त्याला सारे गुन्हे क्षम्य. खुनी कैदी म्हणजे क्षत्रिय. त्याला सारे टरकून असतात; कारण तो सर्वांना सांगतो, मी आधी एक खून केला आहे. एक काय किंवा चार खून काय शिक्षेत पालट होत नाही. फाशी एकदाच होणार आहे. फ्रॉड्स करणारे वैश्य. त्यांच्याजवळ काळा पैसा भरपूर असतो. त्यामुळे तो सर्वांना प्रिय असतो. लोकांना तो साहाय्यही करतो. सारे अगदी कारागृहातील अधिकारीही त्यांची हांजीहांजी करतो. रेपिस्ट (बलात्कारी) म्हणजे शुद्र. तो कोणालाच आवडत नाही. जो उठतो, तो त्याचे हालहाल करतो; म्हणून तो वॉर्डन व्हायच्या मागे असतो. त्यामुळे त्याची या हालातून सुटका होते. उलट इतरांवर दादागिरी करायची संधी प्राप्त होते. (संदर्भ : मासिक धर्मभास्कर, सप्टेंबर २०१५) राजकीय लाभासाठी ब्राह्मणविरोधी घोषणा देणारे लोक बुद्धांच्या शिकवणीलाच काळीमा फासत आहेत !

    भावबंधने झुगारून आणि मोहभावनारहित होऊन जो बुद्ध होतो, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. (धम्मपद- ब्राह्मणवग्ग/ १६)
   कित्येकांना हे वाचून आश्‍चर्य वाटेल; पण धम्मपदात एक संपूर्ण वर्ग हा ब्राह्मण कोणास म्हणावे, या उपदेशावर आला आहे. ब्राह्मणाचे बुद्धांना अपेक्षित गुण या अध्यायात वर्णन केलेले आहेत. धम्मपद स्वतः बुद्धांनी रचलेले नसून ते एक संकलन आहे. धम्मपद हा बौद्धांच्या पूज्य ग्रंथांपैकी एक आहे. तथागतांच्या या उपदेशांकडे आम्ही मात्र सोयीस्करपणे पाठ फिरवून केवळ द्वेष पसरवत आहोत हे दुर्दैव ! राजकीय लाभासाठी स्वतःला बुद्धाचे अनुयायी म्हणवत ब्राह्मणवाद खतम हो । अशा घोषणा देणारे लोक स्वतः बुद्धांच्या शिकवणीलाच काळीमा फासत आहेत, ही सत्य परिस्थिती आहे. 
    ते बुद्धच आता अशा द्वेषमूलक निर्बुद्धांना शांतीपदापर्यंत नेवोत ! बुद्धं शरणं गच्छामि । - वैद्य परिक्षित शेवडे, ठाणे
     स्वा. सावरकरांचे कोणतेही साहित्य वाचा त्यातून सुगंध येतो, मातृभूमीच्या मातीचा. तसे सनातन प्रभातचा कोणताही अंक वाचा त्यातून हुंकार येतो, राष्ट्रप्रेमाचा आणि हिंदु राष्ट्राचा ! - श्री. विद्याधरपंत नारगोलकर, महामंत्री, सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

      भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश
     काश्मीरमधील हिंदूंचा निर्वंश झाला, तरी झोपून राहिलेल्या सर्वत्रच्या हिंदूंवर मुंबईत बाँबस्फोट झाले, तशी स्थिती येईल. काश्मीरमधील हिंदूंचा निर्वंश होतांना बघ्याची भूमिका घेऊन पाप केल्याची ही हिंदूंना शिक्षाच असेल !

गुरुपौर्णिमेला ४१ दिवस शिल्लक


     गुरु विश्‍वासावर आहे. आपल्या विश्‍वासावर गुरूंची महती अवलंबून आहे. गुरु तुमच्यापण विश्‍वासावर आहे. तुमच्या विश्‍वासातच गुरु आहे.

गुरूंच्या विविध प्रकारांप्रमाणे प.पू. डॉक्टरांमध्ये दिसलेली विविध रूपे !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ... 
      प.पू. डॉक्टरांनी यापूर्वी स्वतःचा वाढदिवस कधीच साजरा केला नाही. मागील वर्षी मात्र महर्षींच्या आज्ञेप्रमाणे त्यांचा वाढदिवस १०.५.२०१५ या दिवशी साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून केलेल्या नाडीवाचनावरून त्यांचे अवतारत्व सिद्ध झाले आहे. त्याचा साधकांना झालेला आनंद शब्दातीत आहे. तो सोहळा पहाणारे आणि काही कारणांनी न पहाणारे यांचीसुद्धा त्या सोहळ्याचे वर्णन ऐकून साधनेत आल्यापासून अशी भावजागृती प्रथमच झाली असावी. त्यांच्या अवतारत्वाचा प्रवास डॉक्टर या नामाधिमानापासून आरंभ झाला. या प्रवासात जरी ते स्वतःला कुणाचेही गुरु म्हणवून घेत नसले, तरी ते सर्व साधकांना गुरुस्थानीच होते आणि त्यांचे अवतारत्व घोषित झाले असले, तरी आजही ते साधकांना गुरुस्थानीच आहेत.
      प.पू. डॉक्टरांनी लिहिलेल्या पूर्वीच्या गुरुकृपायोगानुसार साधना या ग्रंथात गुरूंचे विविध प्रकार दिले आहेत. तो ग्रंथ ग्रंथातील गुरूंचे प्रकार आणि प.पू. डॉक्टर अशा भावाने कधी वाचला नव्हता. या वेळी मात्र अकस्मात् अशा भावाने वाचायचा प्रयत्न केला आणि लक्षात आले की, ती सर्व गुरूंची रूपे प.पू. डॉक्टरांमध्ये सामावलेली आहेत. ती सूत्रे पुढीलप्रमाणे शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

अमरावती येथील चार साधक जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

विदर्भासाठी आनंदाची पर्वणी ! 
डावीकडून सौ. वनिता शेंद्रे, श्री. अरुण रावळे, पू. नंदकुमार जाधव, सौ. विभा चौधरी आणि सौ. चंदा बागडे
       अमरावती - ६ जून या दिवशी अमरावती येथील साधकांसाठी आयोजित भावसत्संगामध्ये पू. नंदकुमार जाधव यांनी येथील चार साधकांनी ६१ प्रतिशत आध्यात्मिक स्तर गाठल्याची आनंदवार्ता उपस्थितांना सांगितली आणि साधकांची भावजागृती झाली. सौ. वनिता शेंद्रे, श्री. अरूण रावळे, सौ. विभा चौधरी, सौ. चंदा बागडे हे ४ साधक ६१ प्रतिशत स्तर गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले. पू. नंदकुमार जाधव यांनी श्रीकृष्णाच्या चित्राची चौकट देऊन सर्व साधकांचा सत्कार केला.
       या वेळी प्रगती झालेल्या साधकांनी मनोगत व्यक्त केले.

बालपणापासूनच पूजा आणि आरती पाहून आनंद होणारा ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा अन् उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेला कुडाळ (सिंधुदुर्ग) येथील चि. दुर्गाप्रसाद ज्ञानेश्‍वर पालव (वय १ वर्ष) !

चि. दुर्गाप्रसाद पालव
      चि. दुर्गाप्रसाद ज्ञानेश्‍वर पालव याचा पहिला वाढदिवस ज्येष्ठ शुक्ल पक्ष चतुर्थी (८.६.२००६), या दिवशी आहे. त्यानिमित्त त्याचे आई-वडील आणि साधिका सौ. प्राजक्ता जोशी यांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. दुर्गाप्रसाद यास सनातन परिवाराकडून 
वाढदिवसानिमित्त अनेक शुभाशीर्वाद !
१. पूर्वसूचना मिळणे
      सनातनचे साधक श्री. श्रीकांत ठाकूर यांच्या मुलीची प्रसूतीची दिनांक २२.३.२०१६ ही दिली होती. ते इकडून जातांना चि. दुर्गाप्रसाद सारखा बेबी, बेबी असे म्हणत होता. ते रत्नागिरीला गेले असता त्याच दिवशी मुलीला रुग्णालयात भरती करावे लागले. १०.३.२०१६ या दिवशी त्यांच्या मुलीची शस्त्रक्रिया होऊन तिला कन्यारत्न झाले. तो बेबी बेबी म्हणत होता, ती पूर्वसूचना होती, असे नंतर वाटले.
२. पूजा आणि 
आरतीच्या वेळी आनंद होणे
अ. मी पूजा करत असतांना दुर्गाप्रसाद वडिलांच्या मांडीवर बसून मी करत असलेली पूजा बघतो. आरती ग्रहण करतो. माघ शुक्ल पक्ष पंचमीला (१२.२.२०१६) या दिवशी श्री. वर्देकाकांकडे अभिषेक आणि आरती होती. त्या वेळी तो पुष्कळ आनंदी दिसत होता. त्याचा आनंद पाहून पुरोहितही भारावून गेले.

सेवेची आवड असलेल्या आणि सर्वांनी साधना करावी, अशी तळमळ असल्याने संपर्कातील प्रत्येकाला साधनेविषयी सांगणार्‍या अमरावती येथील ६१ प्रतिशत आध्यात्मिक पातळीच्या सौ. वनिता शेंद्रे (वय ५० वर्षे) !

१. स्थिर असणे
       आर्थिक परिस्थिती बेताची असूनही काकू सतत स्थिर आणि आनंदी असतात.
२. सेवेची तळमळ
२ अ. प्रत्येकाला साधनेविषयी सांगणे : काकू घरखर्चाला हातभार लागण्यासाठी बाहेरची स्वयंपाकाची कामे करतात. कामाच्या ठिकाणी, तसेच अन्य ठिकाणीही त्या सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादनांचे वितरण करतात. संपर्कात येणार्‍या प्रत्येकाला त्या साधनेविषयी सांगतात.
२ आ. स्वत:च्या अडचणींकडे दुर्लक्ष करून सेवेतील आनंद घेणे : स्वतःच्या अडचणींविषयी त्या चर्चा करत नाहीत. सेवा करतांना सहसाधकांविषयी त्यांच्यात प्रतिक्रिया नसतात आणि तक्रारही नसते. त्यामुळे त्यांच्यासमवेत सेवा करत असतांना आनंद वाटतो.

प.पू. गुरुदेवांवरील श्रद्धेमुळे प्रतिकूल प्रसंगातही स्थिर आणि आनंदी रहाणार्‍या अमरावती येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. चंदा अशोकराव बागडे (वय ४५ वर्षे) !

       सौ. चंदा अशोकराव बागडे (४५ वर्षे) मागील १५ वर्षांपासून सनातन संस्थेच्या माध्यमातून सेवा करत आहेत. त्या प्रसाराची सेवा, तसेच सात्त्विक उत्पादनांचे वितरण करण्याची सेवा करतात. त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
१. वक्तशीरपणा
       त्या सेवेला नेहमीच वेळेत येतात. एखाद्या वेळी यायला जमणार नसेल, तर आधीच भ्रमणभाषद्वारे तसे कळवतात.
२. प्रामाणिकपणा
       सेवा करतांना त्यांच्या शारीरिक त्रासाकडे लक्ष न देता क्षमतेपेक्षा अधिक सेवा दिल्यास त्या प्रामाणिकपणे आणि मोकळेपणाने तसे सांगतात. ते सांगतांना त्यांना कोणत्याच प्रतिक्रिया नसतात.

रामनाथी आश्रमात कळसारोहण होत असतांना पुणे येथील साधिका सौ. ज्योती दाते यांना आलेल्या अनुभूती !

      दुपारी १२.१५ ते २ या वेळेत रामनाथी आश्रमात कळसारोहण आहे आणि चैतन्याचा लाभ होण्यासाठी सर्वांनी प्रार्थना करायची आहे, असा निरोप मिळाल्यावर मला पुढील अनुभूती आल्या.
१. दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी 
सौ. ज्योती दाते
      मी सूक्ष्मातून रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात गेल्यावर
अ. मला कळसपूजनाच्या ठिकाणी सर्व देवताच सनातनच्या संतांच्या माध्यमातून उपस्थित आहेत, असे दिसले. मला प.पू. गुरुमाऊलीचे विष्णुस्वरूप रूप दिसले, पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकू लक्ष्मीस्वरूप दिसल्या, तर पू. गाडगीळकाका मारुतिरायांच्या रूपात आणि पू. (सौ.) बिंदाताई एका देवतेच्या रूपात (दुर्गादेवी आणि सरस्वतीदेवी या दोघींची स्पंदने जाणवली) दिसल्या.
आ. ध्यानमंदिरात चैतन्याचा पिवळा प्रकाश पसरलेला दिसला.
इ. वेदमंत्रपठणाचा ध्वनी संपूर्ण ब्रह्मांडात पोचत असल्याचे जाणवले.
ई. रामनाथी आश्रमाभोवती सुदर्शनचक्र पुष्कळ वेगाने फिरत असल्याचे दिसले. जणू काही ते अनिष्ट शक्तींशी युद्ध करत आहे, असे वाटले.
उ. कळसांत सूर्याचे तेज एकवटले आहे आणि त्याचा प्रकाश सप्तलोकांत आणि सप्तपातळांपर्यंत पोचत आहे, असे जाणवले.

पवई (संघर्षनगर) येथे सनातन संस्था पुणे च्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरात ३५ रहिवाशांची तपासणी

    
रुग्णांची तपासणी करतांना डॉ. (कु.) जागृती गुलाटी (वर्तुळात)
     मुंबई (वार्ता.) - पवई संघर्षनगर (चांदिवली) येथे सनातन संस्था पुणेच्या वतीने २७ मे या दिवशी आरोग्य शिबीर घेण्यात आले. त्यात आधुनिक वैद्या (कु.) जागृती गुलाटी यांनी ३५ रहिवाशांची तपासणी केली. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. विद्या सांगळे आणि सौ. स्मिता पाणीग्रही उपस्थित होत्या.

प्रेमभाव, व्यष्टी साधनेचे गांभीर्य अन् नेतृत्व गुण असणार्‍या अमरावती येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. विभा चौधरी (वय ५० वर्षे) !

१. प्रेमभाव
        एकदा माझी मुलगी कु. गिरिजा मला पुष्कळ त्रास देत होती. सौ. चौधरीकाकूंना दूरध्वनीवरून तो प्रसंग सांगितला. तेव्हा त्यांनी माझी प्रेमाने समजूत काढली आणि पू. जाधवकाकांना विचारून घेऊया, असा उपायही लगेच सांगितला. मला सौ. चौधरीकाकूंचा आध्यात्मिक आईप्रमाणे आधार वाटतो.
२. सर्वांशी समभावाने वागणे
        सौ. चौधरीकाकूंच्या सोबत सेवा करतांना कधीच एखादा जवळचा साधक, तर दुसरा लांबचा असा भेदभाव त्या करत असल्याचे जाणवत नाही. जिल्ह्यातील प्रत्येक साधकाला त्या स्वतःचाच समजून आणि गुरुरूप पाहून सेवा देतात अन् सर्वांशी प्रेमाने बोलतात.

सेवेची तळमळ असणे आणि इतरांना समजून घेणे हे गुण असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले अमरावती येथील साधक श्री. अरुण रावळे (वय ६४ वर्षे) !

१. सेवेची तळमळ असणे
अ. माझ्या यजमानांना मधुमेह आणि रक्तदाब या दोन्ही व्याधी आहेत. त्यांचा रक्तदाब नेहमी अल्प असतो, तरीही ते सनातन प्रभातच्या नियतकालिकांचे (४२ साप्ताहिक, २३ हिंदी मासिक, १० नियमित दैनिक आणि १६ रविवारचे दैनिक यांचे), तसेच ते सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादनांचे वितरण करतात.
आ. ते भाजीवाले, गाडीचा पंक्चर काढणारे, नाभिक इत्यादींनाही सनातनची सात्त्विक उत्पादने देऊन साधना आणि आध्यात्मिक उपाय करण्याचे महत्त्व सांगतात.
२. इतरांना समजून घेणे
अ. आता यजमानांच्या अपेक्षा अतिशय न्यून झाल्या आहेत. ते कुटुंबियांना समजून घेतात.
आ. मला सेवेमुळे रात्री घरी येण्यास विलंब झाला, तरीही ते काही म्हणत नाहीत. अशा प्रसंगी मला घरातील सेवांमध्ये साहाय्य करतात आणि लवकर सिद्ध होईल, असा स्वयंपाक करायला सांगतात. तसेच मी जे जेवण बनवते, ते आनंदाने जेवतात.

कारंजा (वाशिम) येथील कु. तुषार काकड याला १० वीच्या परीक्षेत ८६ टक्के गुण !

    
कु. तुषार काकड
कारंजा (जिल्हा वाशिम) - येथील सनातनचा साधक कु. तुषार नारायण काकड ८६ टक्के गुण मिळवून शालांत परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. तो गेल्या ४ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे. ईश्‍वरी कृपेमुळेच मला हे यश प्राप्त झाले. परीक्षेच्या काळात काही उत्तरे आठवत नसतांना नामजप केल्यावर ती आठवू लागली. त्यामुळे मी उत्तरपत्रिका लिहू शकलो, असे त्याने सांगितले.
     कु. तुषार गावागावात जाऊन प्रवचने देतो. हिंदु धर्माविषयी त्याला पुष्कळ आदर आहे. धर्माच्या विरोधात कुणी काही बोलल्यास तो सडेतोड शब्दांत त्याचे खंडण करतो. त्यामुळे समोरचा निरुत्तर होतो, हे कु. तुषार याचे वैैशिष्ट्य आहे. काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमातही प्रवचन देण्यासाठी त्याला आमंत्रित केले जाते. त्याने एका चित्रपटातही काम केले आहे.

१.६.२०१६ या दिवसापासून सर्वांनी करावयाच्या उपायांसंदर्भात मार्गदर्शन

साधकांना सूचना
१. उपाय करण्याची आवश्यकता असणारे
     ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ । हा जप करावा. तो होत नसल्यास ॐ नमो भगवते वासुदेवाय । हा जप करावा.
२. उपाय करण्याची आवश्यकता नसणारे
      महर्षींनी सांगितलेला ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव । हा जप अधिकाधिक करावा.
२ अ. व्यष्टी आणि समष्टी साधनेनुसार जप : साधकांनी व्यष्टी साधनेसाठी श्रीकृष्णाचा आणि समष्टी साधनेसाठी महर्षींनी सांगितलेला जप साधारण सम प्रमाणात होईल, असे पहावे. वाटल्यास एक जप ५ - १० मिनिटे करावा आणि नंतर दुसरा जप ५ - १० मिनिटे करावा. असा एक-आड-एक जप करता येईल. हे करतांना अगदी घड्याळ लावून जप पालटण्याची आवश्यकता नाही.

संगणकीय प्रती काढण्यासाठी पाठकोर्‍या आणि कोर्‍या कागदांची तातडीने आवश्यकता !

साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !
      सनातनच्या आश्रमांमध्ये विविध सेवांच्या संगणकीय प्रती (प्रिंट) काढण्यासाठी प्रत्येक मासाला (महिन्याला) A4 आकारातील ४० सहस्र कागदांची (८० रिमची) आवश्यकता आहे. जे वाचक, हितचिंतक अथवा साधक A4, A3, Legal या आकारातील छपाईसाठी (प्रिटींगसाठी) उपयुक्त पाठकोरे (एका बाजूने वापरलेले) आणि कोरे कागद अर्पण स्वरूपात देऊ शकतात, त्यांनी रामनाथी आश्रमात श्री. नीलेश चितळे यांच्याशी ८४५२००१२०३ या क्रमांकावर किंवा goahardware@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
ईश्‍वरालाच जिंकणे विषयांपेक्षा विषयांच्या निर्मात्यालाच का जिंकू नये ?
भावार्थ : एकेक विषय जिंकत जायचे म्हटले तर वासना, आवडी-निवडी, स्वभावातील दोष, असे लाखो विषय जिंकायला, म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण मिळवायला लाखो जन्म लागतील. त्यापेक्षा त्या सर्वांच्या निर्मात्यालाच भक्तीने या जन्मात जिंकले, तर त्या सर्वांवर या जन्मातच नियंत्रण मिळविता येईल; म्हणूनच म्हटले आहे, एक साधै सब साधै । सब साधै सब जाय ॥ म्हणजे एका नामाला, भगवंताला (नाम आणि भगवंत एकच आहेत.) साध्य केले म्हणजे सर्वच साध्य होते. सर्व साध्य करायला गेलो, तर काहीच साध्य होत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
भारतातील स्वातंत्र्यापासूनची ६९ वर्षे भारतावर राज्य केलेल्या आतापर्यंतच्या शासनांनी नव्हे, तर संतांनीच भारताची जगात किंमत राखली आहे ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मन आणि इंद्रिय यांच्या आधीन होऊ नका !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
जो मन आणि इंद्रिये यांच्या आधीन नसतो, तोच खर्‍या अर्थाने स्वतंत्र होय. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


उत्तरप्रदेशात कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा !

संपादकीय
       उत्तरप्रदेशात जय गुरुदेव पंथाचा अनुयायी रामवृक्ष यादव याच्या नेतृत्वाखाली जमीन बळकावलेल्या समाजकंटकांवर कारवाई करतांना दोन पोलीस अधिकारी आणि २९ समाजकंटकांना जीव गमवावा लागला. हे प्रकरण म्हणजे केवळ पाण्यावरचा एक बुडबुडा असून समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाखालील उत्तरप्रदेश राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे कसे तीन-तेरा वाजले असून राज्यात बेबंदशाहीचेच वातावरण आहे, हेच पुढे येत आहे. झालेल्या घटनेच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाययोजना काढण्याची कोणाचीही इच्छा नसून त्यावर राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे आणि त्यातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. या प्रकरणी शासनाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री हे प्रकरण जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यावर ढकलत असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत देत आहे; मात्र या प्रकरणात प्रतिदिन नवनवीन खुलासे येत आहेत. उत्तरप्रदेश शासनातीलच काही मंत्र्यांचा रामवृक्ष यादवला पाठिंबा असल्यानेच प्रकरण इतके वाढले, अशाही गोष्टी आता समोर येत आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn