Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

आज महाराणा प्रताप जयंती

श्री महालक्ष्मी मंदिरातील पवित्र मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालय शिवसैनिकांनी तोडले !

शौचालय पाडण्याच्या हिंदूंच्या मागणीकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने शिवसेनेचा दणका !
मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालय शिवसैनिकांनी असे तोडले.
पोलीस निरीक्षकांशी चर्चा करतांना आमदार श्री. राजेश क्षीरसागर
     कोल्हापूर - श्री महालक्ष्मी मंदिरात असणार्‍या मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालय शिवसैनिकांनी तोडले. शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. हिंदुत्ववाद्यांनी हे अनधिकृत शौचालय पाडण्याची मागणी प्रशासनाकडे वेळोवेळी केली होती. जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांनीही ते पाडण्याचा आदेश दिला होता. तथापि हा आदेश धाब्यावर बसवण्यात आला. प्रशासन एकीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देऊन मंदिरे अनधिकृत ठरवून ती पाडत असल्याचे, तर दुसरीकडे मंदिरातील अनधिकृत शौचालयाला मात्र अभय देत असल्याचे विरोधाभासी चित्र दिसत आहे. हिंदूंनी वारंवार मागणी करूनही पवित्र मनकर्णिका कुंडावरील अनधिकृत शौचालय पाडण्याविषयी प्रशासन चालढकलपणा करत असल्यामुळे शेवटी शिवसैनिकांनी दणका देत सदर अनधिकृत शौचालय तोडून टाकले. यात शौचालयचा ७५ टक्के भाग उद्ध्वस्त झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणावरही गुन्हा नोंद केलेला नाही. अचानक झालेल्या या घटनेमुळे पोलिसांची तारांबळ उडाली.

मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकामाविषयी शासनाने कोणतीच कृती न केल्याने कारसेवा करून अवैध बांधकाम तोडावे लागले ! - आमदार राजेश क्षीरसागर

     कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि कोल्हापूरचे आयुक्त यांच्याशी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मनकर्णिका कुंडाविषयी लोकांच्या तीव्र भावना असून सदर कुंडावरील खाजगी तत्त्वावर उभारण्यात आलेल अवैध शौचालय पाडावे, यांसाठी चर्चा केली होती. तसेच या संदर्भात शासकीय यंत्रणेकडून १५ एप्रिल २०१६ पर्यंत न पाडल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने कारसेवा करून शौचालय पाडतील, असे सांगितले होते. यानंतर वेळोवेळी संबंधित यंत्रणेचा पाठपुरावा केला होता, तरीही शासनाकडून कोणतीही ठोस कृती झाली नाही. त्यामुळे आज शिवराज्याभिषेकदिनाच्या दिवशीच गनिमी काव्याने मोजके पदाधिकारी आणि शिवसैनिकांना घेऊन पहारी, कुदळ आणि हातोडे आदींच्या साहाय्याने शिवसेना अंगार है बाकी सब भंगार है । जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकाम तोडले, अशी माहिती कोल्हापूर येथील शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली.

गैर-मुसलमान देशांमध्ये जागतिक स्तरावर सर्वाधिक जिहादी आक्रमणे होण्यात भारत प्रथम !

भारतात जिहादी आतंकवाद न्यून झाल्याचे वक्तव्य करणारे केंद्रीय 
गृहमंत्री यांनी आता यावर जनतेला उत्तर द्यायला हवे !
जागतिक स्तरावर झालेल्या जिहादी आक्रमणांपैकी ५५ टक्के घटना घडलेल्या ५ देशांत भारत !
      वॉशिंग्टन - वर्ष २०१५ मध्ये जगात जेवढी आतंकवादी आक्रमणे झाली, त्यातील ५५ टक्के आक्रमणे भारत, पाकिस्तान, इराक, अफगाणिस्तान आणि नायजेरिया या देशांमध्ये घडली, अशी माहिती अमेरिकेतील अधिकृत शासकीय सूत्रांनी दिली आहे. (या ५ देशांत केवळ भारतच गैरमुसलमान राष्ट्र आहे, हे यातून लक्षात येते ! देशातील मुसलमान जिहादच्या विचारसरणीला बळी पडणार नाहीत, या केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर या अहवालाच्या आकडेवारीवरून विश्‍वास ठेवावा का, असा प्रश्‍न पडतो ! - संपादक) अमेरिकेच्या आतंकवादविरोधी शाखेचे समन्वयक जस्टिन सिबरेल यांनी या विषयी सांगितले की, आतंकवादी आक्रमणात बळी पडलेल्या व्यक्तींपैकी ७४ टक्के व्यक्ती पाकिस्तान, इराक, अफगाणिस्तान, नायजेरिया आणि सिरिया या देशांतील होत्या.

इसिसचा इस्लामशी संबंध मान्य करायला हवा ! - प्रा. अकील अहमद, बीबीसी

इसिसला इस्लामी न मानणार्‍यांना घरचा अहेर ! 
     लंडन - इसिस ही आतंकवादी संघटना ज्यू धर्माचा प्रसार करत नसून ती इस्लाम धर्माशी जोडलेली आहे, हे अडचणीचे वाटणारे सत्य मान्य करण्याची वेळ आली आहे, असे परखड विधान बी.बी.सी. या वृत्तवाहिनीच्या धर्म आणि नीतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. अकील अहमद यांनी केले आहे. 
प्रा. अकील अहमद यांनी मांडलेली सूत्रे 
१. इसिसला इस्लामशी काही देणेघेणे नसल्याचे अनेक जण म्हणतात; पण तसे मुळीच नाही. हे कदाचित चुकीचे असेल; परंतु ते जे काही सांगतात ती इस्लामी सिद्धांताच्या कुठल्यातरी प्रकारावर आधारित विचारधारा आहे. 
२. इसिसवाले मुसलमान आहेत, ही वस्तुस्थिती असून अशा प्रकारच्या गोष्टी आपण मान्य करायला हव्यात. बहुसंख्य मुसलमान त्यांच्याशी सहमत नसल्यामुळे अनेक पत्रकारांना हे समजून घेण्यात अडचण येते.

स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांत भारताने केलेली प्रगती !

जगात स्वीडन रहाण्यासाठी सर्वोत्तम देश : १६३ देशांमध्ये भारत ७०व्या क्रमांकावर ! 
     लंडन - जगात रहाण्यासाठी सर्वोत्तम देश कोणते, यासाठी १६३ देशांत केल्या गेलेल्या सर्वेक्षणात स्वीडनने प्रथम क्रमांक मिळवला आहे. या सूचीमध्ये भारत ७०व्या, तर चीन ६७ व्या स्थानावर आहे. सर्वांत शेवटी लिबियाचा क्रमांक आहे. ब्रिटीश शासनाचे सल्लागार सायमन एनहिल्ट यांनी या संदर्भातील अहवाल सिद्ध केला आहे. प्रतिवर्षी अशा प्रकारचा अहवाल बनवला जातो. त्यात नागरिकांच्या भल्यासाठी कोणता देश अधिक जागरूक आहे, यासह विज्ञान, संस्कृती, शांतता, आरोग्य, समानता, पर्यावरण सुरक्षा अशा अनेक विषयांचा परामर्श घेतला जातो. याशिवाय त्या त्या देशातील सरकारांनी स्वत:च्या देशातील नागरिकांसाठी केलेली कामेही लक्षात घेतली जातात.

प्रकृती बिघडल्याने पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू जोधपूरमधील रुग्णालयात दाखल !

     जयपूर - कथित लैंगिक शोषणाच्या आरोपावरून जोधपूरच्या कारागृहात असलेले पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना प्रकृती बिघडल्याने जोधपूरच्या गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही माहिती समजताच पू. बापूजींचे भक्त मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर गोळा झाले.
पू. बापूजींच्या भक्तांकडून चालवण्यात येणारे कॉल सेंटर !
     पू. बापूजी यांच्या देश-विदेशातील लाखो भक्तांना त्यांच्याविषयीची प्रत्येक माहिती मिळावी, यासाठी त्यांच्या भक्तांकडून सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून माहिती पुरवण्यात येते. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये कॉलसेंटरही बनवली आहेत. यात शेकडो युवक काम करत आहे. त्यात माहिती तंत्रज्ञानातील व्यावसायिक तज्ञही सहभागी आहेत. देशभरातील सर्व कॉल सेंटरचे मुख्यालय जोधपूरमध्ये आहे. प्रतिदिन सुमारे ७० लाख लोकांना निरोप आणि सूचना पाठवल्या जातात. पू. बापूजी यांना न्यायालयात कधी नेण्यात येणार आहे, त्यांच्या जाण्याचा मार्ग कोणता आहे, न्यायालयातून ते परत कधी येणार आहेत आदी माहिती पुरवली जाते. त्यामुळे पू. बापूजी यांचे दर्शन घेण्यासाठी सहस्रावधी लोक न्यायालयाबाहेर गोळा होतात.

बनावट मद्य विकणार्‍या ४ मद्यालयांच्या अनुज्ञप्ती रहित !

असे बनावट मद्य दुकानांपर्यंत पोचेपर्यंत प्रशासन काय करत असते ? बनावट मद्याच्या वाहतुकीकडे 
दुर्लक्ष करणारे आणि मद्यालयांमध्ये बनावट मद्य ठेवणारे यांवर कठोर कारवाई करा ! 
     पणजी, ६ जून (वार्ता.) - भारतीय बनावटीचे बनावट मद्य इतर ब्रॅण्डच्या बाटल्यांमध्ये भरून विक्री करणार्‍या ४ मद्यालयांच्या अनुज्ञप्त्या अबकारी खात्याने रहित केल्या आहेत. घोगळ, मडगाव, बाणावली आणि चिंचोणे या भागातील ही मद्यालये आहेत. ३० मार्च या दिवशी या मद्यालयावर छापे मारल्यानंतर या मद्यालयांत अवैध मद्य सापडले होते. या वेळी एकाच ब्रॅण्डच्या ३६३ बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या. जप्त केलेल्या बाटल्यांमधील मद्याच्या चाचणीत मद्याच्या दर्जात तफावत आढळून आली. हे मद्य खरेदी करण्याविषयी आवश्यक असलेली देयके आणि वाहतूक अनुज्ञप्ती मद्यालय मालकांकडे नव्हती. दोन महिने चौकशी केल्यानंतर अबकारी खात्याने या मद्यालयांच्या अनुज्ञप्ती रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. (एवढी चौकशी करायला दोन महिने कशाला लागतात ? ही आहे अबकारी खात्याची कार्यक्षमता ! - संपादक) अनुज्ञप्त्या निलंबित केलेल्या आस्थापनांच्या मालकांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

चेन्नईचा महंमद नासीर हा इसिसचा झेंडा आणि बोधचिन्ह यांचा रचनाकार !

भारतीय मुसलमान तरुणांवर इसिसचा प्रभाव पडणार नाही, असे वारंवार 
सांगणार्‍या केंद्रीय गृहमंत्र्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
     नवी देहली - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने आतंकवादी महंमद नासीर याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यात म्हटले आहे की, इसिसकडून वापरण्यात येणार्‍या झेंड्याची संरचना नासीर यानेच केली होती, तसेच इसिसचे बोधचिन्हही (लोगो) त्यानेच बनवला आहे. नासीर याने चेन्नई येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते. डिसेंबर २०१५ मध्ये तो सिरियात जाणार होता; मात्र त्याला सुदानमध्ये पकडण्यात आले आणि तेथून त्याचे भारतात हस्तांतरण करण्यात आले. नासीरच्या विरोधात त्याचे वडीलच मुख्य साक्षीदार आहेत.दुबईच्या विमानात प्रवाशाने अल्लाहू अकबर म्हटल्याने प्रवासी भयभीत !

     बर्मिंगम (ब्रिटन) - येथे येणार्‍या दुबईच्या अमिरात एअरलाईन्सच्या बोईंग विमानात प्रवास करणारा ३८ वर्षीय शहराज सरवर याने अल्लाहू अकबर असे मोठ्याने म्हटल्याने प्रवाशांत भीतीचे वातावरण पसरल्याची घटना घडली. या वेळी विमानात ३४७ प्रवासी होते. प्रवासामध्ये सरवर याचे वागणे संशयास्पद होते. त्याने सीट बेल्ट बांधण्यासही नकार दिला होता, तसेच एकदा उशी आणि एकदा केक प्रवाशांना फेकून मारले होते. तो स्वतःच्या हातावर डोके आपटून घेत होता.

निधर्मीवादाविना (सेक्युलॅरिझम) देशाला पर्याय नाही ! - अब्दुल कादर मुकादम यांची मुक्ताफळे

     सांगली - हा देश टिकून रहायचा असेल, तर सेक्युलॅरिझमविना देशाला पर्याय नाही. ही प्रणाली जर पराभूत झाली, तर देशाची शकले पडतील, अशी मुक्ताफळे सामाजिक कार्यकर्ते अब्दुल कादर मुकादम यांनी उधळली. ते शांतिनिकेतन येथे सेक्युलर मुव्हमेंटच्या राज्यस्तरीय अधिवेशनात उद्घाटन सत्रात बोलत होते.
* या वेळी अब्दुल कादर मुकादम म्हणाले... १. धर्मवाद अजूनही संपला नसल्याने आपण निधर्मवादी म्हणू शकत नाही. धर्माने समानता दिली नाही, तिथे सर्वधर्मसमभाव या सूत्राने कसा लढा देता येईल ? (जगाच्या पाठीवर हिंदु धर्मात जेवढी समानता आहे, तेवढी कुठेच नाही ! याउलट मुसलमान धर्मात स्त्रियांना कशा प्रकारे वागणूक दिली जाते, याचे जरा अब्दुल मुकादम यांनी परीक्षण करावे, मग लक्षात येईल. मुळात या देशाची राज्यघटना जेव्हा सिद्ध झाली, तेव्हा सेक्युलरहा शब्दच अस्तित्वात नव्हता. हा शब्द तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घुसडला ! त्यामुळे मुकादम यांनी अगोदर अभ्यास करावा आणि मगच तोंड उघडावे ! - संपादक)
२. मुसलमानांची मते जाऊ नयेत म्हणून काँग्रेसने इतकी वर्षे समान नागरी कायदा केला नाही, तर त्याविरुद्ध हयातभर ओरडणारे सत्तेवर येऊनही काही कसे करत नाहीत ?

(म्हणे) सनातन संस्थेवर बंदी घालायला हवी !

आम आदमी पक्षाचे आशिष खेतान यांची हिंदुद्वेषी मागणी
सनातन संस्थेसारख्या राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी झटणार्‍या हिंदुत्ववादी संघटनेवर बंदी 
घालण्याची मागणी करणारी आप कधीतरी जिहादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करते का ?
     पणजी - सनातन संस्था एक धोकादायक संघटना आहे. हिंदुत्ववादी म्हणवणारी ही संघटना धर्मद्रोही संबोधून काही हिंदूंनाच लक्ष्य करण्याचे काम करते. प्रा. कलबुर्गी आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागे या संघटनेचा हात असल्याचा दाट संशय आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांतील उदारमतवादी विचारवंतांना लक्ष्य केले जात आहे. भारत हा निधर्मी, आधुनिक आणि स्वतंत्र देश असल्याने कलबुर्गी अन् दाभोलकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी सनातन संस्थेसारख्या संस्थेवर बंदी घालणे आवश्यक आहे, असे आम आदमी पक्षाच्या प्रसिद्धी विभागाचे आशिष खेतान यांनी म्हटले आहे. आशिष खेतान यांनी पणजी येथे पत्रकार परिषद बोलवली होती. या पत्रकार परिषदेच्या वेळी एका इंग्रजी दैनिकाच्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना आशिष खेतान यांनी हे वक्तव्य केले.

ऑपरेशन ब्लू स्टारला ३२ वर्षे झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर सुवर्ण मंदिरात खलिस्तान झिंदाबादच्या घोषणा !

जिहादी आतंकवाद रोखू न शकणारे राज्यकर्ते खलिस्तान्यांना पुन्हा डोके वर काढण्यापूर्वी ठेचतील का ?
     अमृतसर - ६ जून १९८४ मध्ये येथील सुवर्ण मंदिरात खलिस्तानी आतंकवाद्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारला ३२ वर्ष झाल्याच्या विरोधात या मंदिरात खलिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. याविषयी राज्यात शांतता भंग होऊ नये म्हणून कडोकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती. या दिवशी खलिस्तानवादी संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. याच वेळी काही धर्मांध शीख संघटनांनी मोर्चा काढूनही खलिस्तान झिंदाबादच्या घोषणाही दिल्या होत्या. पोलिसांनी कारवाई करत १५० हून अधिक शिखांना कह्यात घेतले, तसेच नरजकैद केले. अकाल तख्तचे जत्थेदार गुरबचन सिंह यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. तसेच मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनीही शांतीचे आवाहन केले आहे.

(म्हणे) गांधीना फाळणी संमत नव्हती ! - शेषाद्री चारी

     नागपूर - मोहनदास गांधी यांनाही फाळणीचा निर्णय संमत नव्हता, तसेच नेहरू आणि पटेल यांनीसुद्धा फाळणीस विरोध केला होता, असे वक्तव्य भाजपच्या विदेश घडामोडी विभागाचे अध्यक्ष शेषाद्री चारी यांनी केले. (असे होते, तर गांधींनी फाळणीच्या विरोधात सत्याग्रह किंवा उपोषण का केले नाही ?, तसेच पाकिस्तानला ५५ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यास कशाला सांगितले ? - संपादक) येथील लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.
चारी यांच्या भाषणातील ठळक सूत्रे
१. भारत आणि पाकमध्ये कोणतीही भिंत नाही, ती मनुष्यनिर्मित आहे. (शेषाद्री यांचे पाकप्रेम ! - संपादक) २. दोन्ही देशात चर्चा व्हावी, यासाठी जवळपास सर्वच पंतप्रधानांनी प्रयत्न केले. (असे असले, तरी काहीच हाती आले नसून त्यामुळे आपल्याच देशाची सर्व प्रकारची हानी झाली आहे. - संपादक)
३. पाकमधील काही शक्तींना वाटते की, चर्चा व्हायला नको.
४. सर्व सूत्रांवर बोलण्यास भारत सिद्ध आहे. (आता बोलण्यापेक्षा पाकिस्तानच्या विरोधात प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता आहे. - संपादक)

राज्यसभा निवडणुकीत मते देण्यासाठी आमदारांनी पैसे मागितल्याच्या कृत्याचे देवेगौडा यांच्याकडून समर्थन !

लोकशाहीची निरर्थकता स्पष्ट करणारे राजकारणी ! अशा राजकारण्यांपेक्षा देशासाठी 
सर्वस्वाचा त्याग करणार्‍या धर्माचरणी हिंदूंचे हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही !
     बेंगळुरू - काही दिवसांतच राज्यसभेवर निवडून देण्यासाठी खासदारांची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत विधानसभेचे आमदार मतदार असतात. कर्नाटकातील जनता दल (निधर्मी) पक्षाच्या मतदारांनी निवडणुकीतील उमेदवारांना मते देण्यासाठी ५ ते १० कोटी रुपये मागितले. (राज्यसभेवर उद्योजक आणि कर्जबुडवे निवडून कसे येतात याचे गुपित आता लपून राहिले नाही. - संपादक) याविषयी इंडिया टुडे या वृत्तवाहिनीने माजी पंतप्रधान आणि जनता दल (निधर्मी) पक्षाचे सर्वेसर्वा एच्.डी. देवेगौडा यांना प्रश्‍न विचारले असता त्यांनी आमदारांचे समर्थन केल्याचे स्टिंग ऑपरेशन नुकतेच उघडकीस आले आहे. (असे देवेगौडा महाशय भारताचे पंतप्रधान होते, असे म्हणायलाही जनतेला लाज वाटते ! - संपादक)

अण्णा हजारे यांना पत्रांद्वारे धमकी देणार्‍यास अटक

कूर्मगतीने चालणारी पोलीस यंत्रणा !
     नगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पत्रांद्वारे धमकी देणारा समाधान निवासगृहाचा (लॉज) मालक ज्ञानेश पानसरे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ४ जून या दिवशी अटक केली आहे. अण्णा हजारे यांना एका वर्षात अनेक वेळा धमकी देणारी पत्रे आली होती. शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्‍वर देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बल्लाळ यांना आलेल्या धमकीच्या पत्रातील हस्ताक्षर आणि हजारे यांना मिळालेल्या पत्रांमधील हस्ताक्षर एकसारखे असल्याचे आढळले होते.

षड्यंत्र रचून हिंदूंचा विनाकारण बळी देण्याचा प्रकार थांबवावा !

जळगाव येथील हिंदुत्ववादी संघटनांची मागणी
नायब तहसीलदारांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
     जळगाव - पुणे येथील निरपराध हिंदुत्ववादी श्री. सारंग अकोलकर यांच्या घरी अवैधरित्या, तसेच त्यांच्या घरातील कोणालाही कल्पना न देता सीबीआयने धाड टाकली. बनावट चावीने कुलूप उघडून घरफोडी करून साहित्य कह्यात घेतले. अकोलकर यांच्या घरातील कुटुंबियांनी वेळोवेळी सहकार्य केलेले असतांनाही सीबीआय अशा प्रकारे कृती करून डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणात सारंग अकोलकर यांना विनाकरण गुंतवण्याचे षड्यंत्र रचत आहे. हिंदूंचा विनाकारण बळी देण्याचा प्रकार थांबवावा, यासाठी येथील समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने नायब तहसीलदार श्री. संजय समदाणे यांनी निवेदन स्वीकारले.

ज्यांना देशाविषयी अभिमान नाही, त्यांना भारतात रहाण्याचा अधिकार नाही ! - पू. नंदकुमार जाधव, सनातन संस्था

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे हिंदु धर्मजागृती सभा 
डावीकडून कु. माधवी चोरे, तलवार उंचावतांना श्री. सुनील घनवट,
पू. नंदकुमार जाधव आणि धर्माभिमानी श्री. पंकज राऊत
     अमरावती - कन्हैय्या कुमार, अरविंद केजरीवाल यांसारख्या देशद्रोह्यांना देशाविषयी अभिमान नसल्याने ते सातत्याने देशविरोधी वक्तव्ये करत असतात. आपले जवान दिवस-रात्र एक करून आणि स्वतःचा जीव संकटात घालून आपले रक्षण करतात; परंतु सातत्याने भारतीय सैनिकांविषयी वाईट शब्द बोलणार्‍यांनी लक्षात ठेवावे की, राज्यकर्त्यांनी अनुमती दिली, तर पाकिस्तानातसुद्धा आपले जवान भगवा फडकवतील. ज्यांना देशाविषयी अभिमान नाही, त्यांना भारतात रहाण्याचा अधिकार नाही, असे रोखठोख प्रतिपादन पू. नंदकुमार जाधव यांनी येथे केले. ५ जून २०१६ या दिवशी सायंकाळी ६ वाजता अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे ग्रामपंचायतीच्या मैदानामध्ये हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. तेव्हा ते बोलत होते. 

महाराष्ट्राचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा ८९.५६ टक्के निकाल; उत्तीर्णतेत मुली अग्रणी

     पुणे, ६ जून - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेचा राज्याचा निकाल ८९.५६ टक्के लागला आहे. ६ जून या दिवशी निकाल जाहीर झाला आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही परीक्षेत मुलीच पुढे आहेत. राज्यात एकूण ९१.४१ टक्के विद्यार्थिनी, तर ८७.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा १८ जुलै या दिवशी घेण्यात येणार आहे. 

अवैधरित्या ४ गायींची कोंबून वाहतूक करणार्‍या वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

     तुळजापूर (जिल्हा धाराशिव) - येथून अवैधरित्या ४ गायींची कोंबून आणि निर्दयपणे वाहतूक करणार्‍या वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. हिंदु धर्माभिमान्यांच्या तत्परतेमुळे या गायींची मुक्तता करण्यात आली. (अशा सतर्क आणि तत्पर धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! - संपादक) 

औषधोपचारासह भजन-कीर्तन, जप, संगीत आदी आध्यात्मिक उपचार रुग्णांसाठी अधिक परिणामकारक !

अध्यात्म, नामजप आदींना थोतांड म्हणणार्‍या बुद्धीप्रामाण्यावाद्यांना चपराक !
     अमृतसर - मादक द्रव्ये, मद्य आदी गोष्टींची सवय, नैराश्य इत्यादी वाईट सवयी अथवा रोगांवर केवळ औषधोपचार पुरेसे नाहीत. कालांतराने त्या सवयी पुन: पुन्हा लागतात. यांच्यापासून कायमस्वरूपी सुटका मिळवण्यासाठी औषधोपचारापेक्षा रुग्णाची दृढ इच्छाशक्ती अधिक परिणामकारक असते. इच्छाशक्ती वृद्धींगत करण्यासाठी आध्यात्मिक उपाय आणि सकारात्मक विचारांची आवश्यकता असते. यासाठी पंजाबच्या अमृतसर शहरात असलेल्या स्वामी विवेकानंद डी-एडिक्श्‍न सेंटरमध्ये (व्यसनमुक्ती केंद्रामध्ये) अशा स्वरूपाचे उपचार केले जातात. वाईट सवयी लागलेल्या रुग्णांवर संगीत थेरेपीद्वारे उपचार केले जातात. यात भजन, कीर्तन, गाणे आणि संगीत यांचा समावेश करण्यात येतो.

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी !

     नवी देहली - काँग्रेसचे नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग केला आहे. राज्यातील ३८ पैकी १५ आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. जोगी येत्या ६ जूनला नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत. जोगी यांच्या पत्नी रेणू या काँग्रेसच्या आमदार आहेत. (स्वतःच्या पक्षाशी एकनिष्ठ न रहाणारे राजकारणी जनतेशी कधीतरी एकनिष्ठ रहातील का ? - संपादक)

हॅकिंग आणि डेटा चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्रशासनाची शासकीय अधिकार्‍यांना स्मार्टफोन न वापरण्याची सूचना !

     नवी देहली - हॅकिंगच्या वाढत्या घटना आणि डेटा चोरीच्या प्रकारांना आळा बसण्यासाठी केंद्रशासनाने महत्त्वाच्या विभागांमध्ये काम करणार्‍या अधिकार्‍यांना विभागातील संवेदनशील गोष्टींवर तसेच कार्यालयीन कामाविषयी बोलतांना स्मार्टफोनचा वापर न करण्याविषयी सूचना दिली आहे. याबरोबरच चार्जिंग करण्यासाठीही स्मार्टफोन शासकीय संगणकांना जोडू नयेत असेही सांगण्यात आले आहे. 
     काही दिवसांपूर्वीच गृहमंत्रालय आणि केंद्रीय निमलष्करी दलाच्या झालेल्या एका विशेष बैठकीत कोणत्याही महत्त्वाच्या चर्चा स्मार्टफोनद्वारे न करता थेट भेटून किंवा दूरभाषद्वारे कराव्यात, असे अधिकार्‍यांना स्पष्ट सांगण्यात आले आहे. तसेच आर्एक्स् या यंत्रेणेचा वापर करण्यावरही भर देण्यात आला. (विविध मंत्रालयांना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी आर्एक्स् ही विशेष यंत्रणा भारतात वापरली जाते.) भारताच्या संकेतस्थळावर चीन आणि पाकिस्तान या देशांच्या हॅकर्सनी घुसखोरी केली होती म्हणून या घटना थांबवण्यासाठी मोदी शासन अधिक सतर्क झाले आहे.आर्ओ प्रक्रिया केलेले पाणी सतत पिणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण !

आर्ओ प्रक्रिया केलेल्या पाण्याने शरिराला आवश्यक असलेले कॅल्शियम 
आणि मॅग्नेशियम हे धातू ९२ ते ९९ टक्के होतात नष्ट !
     लुधियाना - जगभरातील वैज्ञानिक आणि संशोधनकर्त्यांनी केलेल्या संशोधनानंतर जागतिक स्वास्थ्य संघटनेने (डब्ल्यूएच्ओने) चेतावणी दिली आहे की, रीव्हर्स ऑस्मॉसिस (आर्ओ) ही प्रक्रिया केलेले पाणी सतत पीणे, हे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखेच आहे. पाणी शुद्धीकरणाच्या नावाखाली आर्ओ नावाची प्रक्रिया केलेल्या पाण्याने त्यातील बॅक्टेरिया मरण्यासह शरीराला आवश्यक असलेल्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या धातूंचे प्रमाण ९२ ते ९९ टक्के नष्ट होते. परिणामी पाण्याने शरिराला लाभ होण्यापेक्षा हानीच अधिक होते.
१. त्यामुळे एशिया आणि युरोप खंडातील अनेक देशांनी आर्ओ प्रक्रिया केलेल्या पाण्यावर संपूर्णत: बंदी घातली आहे.
२. अशा प्रकारच्या पाण्याने हृदयासंबंधी रोग, थकवा, अशक्तपणा, स्नायूंचे विकार आदी गंभीर परिणाम होतात.

ठाणे येथे विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे रवींद्र फाटक विजयी

     ठाणे - ठाणे विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार रवींद्र फाटक विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांचा पराभव केला आहे. १९९२ पासून सलग चार वेळा विधानपरिषदेवर निवडून गेलेले वसंत डावखरे यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न केले होते. रविंद्र फाटक १५१ मतांनी विजयी झाले. त्यांना ६०१ मते मिळाली. डावखरेंना ४५० मते मिळाली.

नांद्रे (जिल्हा सांगली) येथील दर्ग्यातील धर्मांध मौलाना जमीर अहमद मुजावर याला बलात्कार केल्याच्या प्रकरणी ७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा !

     सांगली, ६ जून (वार्ता.) - स्वत: धर्मगुरु असून दैवी शक्ती असल्याचे भासवून महिलेवर बलात्कार करणारा नांद्रे येथील दर्ग्यातील धर्मांध जमीर अहमद मुजावर (वय २४ वर्षे) याला ६ जून या दिवशी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम कलम ३(२) अन्वये, तसेच भा.द.वि. ३७६ अन्वये ७ वर्षे सक्तमजुरी आणि १० सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणी सरकारी अधिवक्ता सुरेश भोसले यांनी काम पाहिले, तसेच आरोपीला शिक्षा होण्यासाठी जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे यांनी युक्तिवाद केला. (नेहमीच अल्पसंख्य म्हणवून घेणारे गुन्हेगारी क्षेत्रात मात्र आघाडीवर असतात. तसेच नेहमी हिंदु धर्मगुरूंना कथित प्रकरणावरून अटक केल्यावर आरडाओरडा करणारे तथाकथित निधर्मी आणि पुरोगामी मंडळी या प्रकरणात मात्र आरोपीला शिक्षा झाल्यावर काहीच बोलत नाहीत, यावरून त्यांचाही दुतोंडीपणा लक्षात येते ! - संपादक) 

गरीब कार्यकर्त्यांच्या घरावर छापा टाकणार्‍या तपास अधिकार्‍यांना निलंबित करा ! - हिंदुत्ववादी संघटनांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जिल्हाधिकारी श्री. शेखर गायकवाड (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
     सांगली, ६ जून (वार्ता.) - डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटल्यात जाणीवपूर्वक निर्दोष आणि निरपराधी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा छळ केला जात आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी १ जून या दिवशी पहाटे ६ वाजता सौ. कांचन दिलीप अकोलकर यांच्या घरावर अवैधपणा छापा टाकला. घरातील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील साहित्य जप्त केले. अकोलकर कुटुंबियांना अंधारात ठेवून ही कारवाई करण्यात आली. सारंग अकोलकर यांचे नाव अकारण या प्रकरणात गोवण्यात येत आहे. त्याच्या वृद्ध आई-वडिलांची स्थिती हालाखीची असून ते केवळ १० बाय १० च्या खोलीत रहात होते; मात्र प्रसिद्धीमाध्यमांच्या सतत होणार्‍या छळाला कंटाळून ते गोवा येथे रहाण्यास गेले. त्यामुळे हिंदूंना जाणीवपूर्वक बळी देण्याचे प्रकार थांबवावेत, तसेच गरीब कार्यकर्त्यांच्या घरावर अवैध छापा टाकणार्‍या तपास अधिकार्‍यांना निलंबित करावे या मागणीसाठी ६ जून या दिवशी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी श्री. शेखर गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. 

शबरीमाला मंदिराच्या मुख्य उत्सवात हत्तींच्या वापरावर उच्च न्यायालयाची बंदी

मंदिरांच्या संदर्भातील सर्व निर्णय हे धर्माचार्यांनीच घ्यायला हवेत !
     कोची - केरळ राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या शबरीमाला मंदिराच्या मुख्य उत्सवात हत्तींच्या वापरावर केरळ उच्च न्यायालयाने ३ जूनपासून बंदी घातली आहे. केवळ वार्षिक उत्सवात एका हत्तीचा वापर करण्यास अनुमती दिली आहे. वरील निर्णय देण्यापूर्वी उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने मंदिराच्या दोन मुख्य पुजार्‍यांचे मत घेतले. पुजार्‍यांनी उत्सवात हत्तींचा वापर करण्याची आवश्यकता नाही आणि तशी परंपराही नाही, असे सांगितले. मात्र केरळ राज्यातील १ सहस्र २०० मंदिराचे व्यवस्थापन सांभाळणार्‍या त्रावणकोर देवस्थान बोर्डाने या मताशी असहमती दर्शवली. त्यावर उच्च न्यायालयाने मंदिर व्यवस्थापनाला वार्षिक उत्सवात एका हत्तीचा वापर करण्यास अनुमती दिली. 
    शबरीमाला मंदिरात दोन मास उत्सव चालतो. त्यातून त्रावणकोर देवस्थान बोर्डाला २०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. या उत्सवाला लक्षावधी भाविक शबरीमाला मंदिरात येतात. या मंदिरातील हत्ती हे भाविकांचे प्रमुख आकर्षण असते.

अखलाखच्या परिवाराला दिलेली हानीभरपाई उत्तरप्रदेश सरकारने परत घ्यावी ! - राष्ट्रवादी शिवसेना

     नवी देहली - उत्तरप्रदेशच्या दादरी येथील बिसाहडा गावात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात गोमांस असल्याच्या संशावरून गोरक्षकांनी केलेल्या आक्रमणात ठार झालेला अखलाक यांच्या परिवाराला राज्यशासनाने हानीभरपाई दिली आहे. अखलाकच्या घरात गोमांस असल्याचे त्याच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाल्याने अखलाकच्या परिवाराला देण्यात आलेली हानीभरपाई परत घेण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी शिवसेनेचे अध्यक्ष श्री. जयभगवान गोयल यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी १९ जणांवरील आरोप मागे घेण्यात यावेत. अखलाकच्या घरातून केवळ गोमांसच नव्हे, तर गायीचे शिर आणि पायही सापडले होते.

गोतस्करांना मारहाण केल्याच्या प्रकरणी बजरंग दलाच्या १० कार्यकर्त्यांना अटक

राजस्थान सरकारच्या पोलिसांची मोगलाई ! 
     उदयपूर / जयपूर - राजस्थानच्या प्रतापगड येथे गोतस्करांना पकडून मारहाण केल्याच्या प्रकरणी बजरंग दलाच्या १० कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी १५० जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कार्यकर्त्यांनी गोतस्करी करणारे ट्रक पकडून १०२ गोवंशांची सुटका केली होती आणि वाहन चालकांना मारहाण केली होती. 
    (बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना गोतस्करीची माहिती मिळते ती माहिती सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांना का मिळत नाही ? वर अशा सतर्क आणि गोप्रेमींनाच पोलीस अटक करतात. ही मोगलाईच होय ! - संपादक) सुटका करण्यात आलेल्या गोवंशापैकी ४ जणांचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला होता.पवित्र गंगाजल पोस्टाच्या माध्यमातून विकणे महापाप ! - स्वामी अच्युतानंद महाराज

      हरिद्वार - गंगाजल पोस्टाच्या माध्यमातून घरोघर पाठवण्याची योजना केंद्रशासनाने आखली आहे. त्याचा येथील संतांकडून विरोध केला जात आहे. भूमा निकेतनमध्ये पत्रकारांशी बोलतांना भूमापीठाधीश्‍वर स्वामी अच्युतानंद तीर्थ महाराजांनी म्हटले की, गंगा नदी लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. गंगाजल अशा पद्धतीने विकणे पापच नाही, तर महापाप आहे. जर केंद्रशासनाने ही योजना मागे घेतली नाही, तर येथील संत जंतरमंतर वर आंदोलन करतील, महामंडलेश्‍वर स्वामी प्रेमानंद महाराज आणि महंत विनोद गिरी महाराज यांनी म्हटले की, गंगाजल विकणे निंदनीय आहे. 
      मातृसदनाचे परमाध्यक्ष स्वामी शिवानंद सरस्वती यांनीही या योजनेचा विरोध केला आहे. बिहारमधील १२ वीच्या परीक्षेत प्रथम आलेला विद्यार्थी म्हणतो, राज्यशास्त्र हा पाककृतीचा विषय !

बिहारमध्ये शिक्षणक्षेत्राचे तीन तेरा वाजल्याचा पुरावा !
     पाटलीपुत्र (बिहार) - बिहार स्कूल एक्झामिनेशन बोर्डाच्या (बीएस्ईबीच्या) १२ वीच्या परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला पॉलिटिकल सायन्स (राज्यशास्त्र) हा शब्दही नीट उच्चारता येत नसून तो राज्यशास्त्राला पाककृतीचा विषय म्हणून सांगत आहे, तर अशीच गत विज्ञान विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थिनीची आहे. तिला या विषयातील संकल्पनाही माहिती नाहीत. (शिक्षणक्षेत्राचा खालावलेला स्तर उंचावण्यासाठी बिहार शासन काय पावले उचलणार ? - संपादक) या विद्यार्थ्यांच्या मुलाखतींचे व्हीडीओ सर्वत्र प्रसारित झाल्यानंतर बोर्डाने हे विद्यार्थी खरेच हुशार आहेत का, याच्या चौकशीचा आदेश दिला आहे.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंवर होणार्‍या अन्यायाला केवळ शिवसेनाच वाचा फोडते !
     कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील पवित्र मनकर्णिका कुंडावर अवैधरित्या बांधण्यात आलेल्या शौचालयाच्या विरोधात अनेक वेळा हिंदुत्वनिष्ठांनी तक्रारी करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह १०० शिवसैनिकांनी शौचालय तोडले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Shivsenane Mahalaxmi Mandir,Kolhapurke pavitra Kundpar bana avaidh shouchaylay toda.
     Hinduopar honewale atyacharoke virodhme keval Shivsena krutisheel !
जागो !
: शिवसेना ने महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुर के पवित्र कुंड पर बना अवैध शौचालय तोडा.
     हिन्दुआें पर होनेवाले अत्याचारों के विरोध में केवल शिवसेना कृतीशील !

'लव्ह जिहाद'ला विरोध करण्यासाठी हिंदु युवतींनी आध्यात्मिक सामर्थ्य वाढवणे आवश्यक ! - प्रियांका लोणे

श्री कचनेर क्षेत्र (जिल्हा संभाजीनगर) येथे 'स्वराज्य ग्रुप' आयोजित हिंदु धर्मजागृती सभा 
डावीकडून श्री. नागेश जोशी आणि कु. प्रियांका लोणे
     संभाजीनगर, ६ जून (वार्ता.) - हिंदु युवती धर्माचरण करत नसल्याने त्या अन्य धर्मियांच्या मुलांसमवेत पसार होतात, ही हिंदूंसाठी खेदाची गोष्ट आहे. हिंदु मुलींचे 'लव्ह जिहाद'ला बळी पडणे टाळायचे असेल, तर त्यांनी धर्माचरण करून आपले आध्यात्मिक सामर्थ्य वाढवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या कु. प्रियांका लोणे यांनी केले. धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचे संघटन व्हावे, या उद्देशाने श्री कचनेर क्षेत्र येथील बडजातेनगर येथे 'स्वराज्य ग्रुप'ने आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत त्या बोलत होत्या. (धर्मजागृती सभेचे आयोजन करणार्‍या 'स्वराज्य ग्रुप'चे अभिनंदन ! अशा संघटना या हिंदु धर्माची शक्ती आहेत. - संपादक) या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी उपस्थित होते. या सभेला २२५ हून अधिक धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती होती. 

गंगाखेड (जिल्हा परभणी) येथे अहल्याबाई होळकर यांनी बांधलेला घाट नगरपालिकेने केला उद्ध्वस्त, नागरिकांमध्ये संताप !

गंगाखेड नगरपरिषदेचा इतिहासद्रोह ! 
     परभणी, ६ जून - गंगाखेड नगरपरिषदेकडून गोदाकाठावर एका सभागृहाचे काम केले जात आहे. त्यासाठी पुण्यश्‍लोक अहल्याबाई होळकर यांनी प्रचंड मेहनत घेऊन बांधलेला गोदाकाठावरील घाट नगरपालिकेने उद्ध्वस्त केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. (आता कुठे आहे पुरातत्व खाते ? - संपादक) सभागृह बांधण्याच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार थांबवावे आणि हे बांधकाम दुसर्‍या ठिकाणी करून घाटाचे संरक्षण करावे, अशा मागण्या सर्व समस्त हिंदू आणि गंगाखेडवासीय यांच्याकडून केली जात आहे. (या प्रकरणी राज्यशासनाने लक्ष घालून पुरातन वास्तू जतन करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि संबंधितांवर कारवाई करावी, ही इतिहासप्रेमींची अपेक्षा ! - संपादक) 

एन्आयए साध्वी प्रज्ञासिंह यांच्या जामिनाला विरोध करणार नाही !

     मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून निर्दोष ठरवण्यात आल्यावर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. ६ जूनला झालेल्या सुनावणीच्या वेळी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने जामिनाच्या अर्जाला आपण विरोध करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ओरोस (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील शासकीय सुधारगृहातून मुलाला पळवले !

     सिंधुदुर्ग - ओरोस (सिंधुदुर्गनगरी) येथील शासकीय सुधारगृहात (मुले) असलेला कुमार ईशान या दहा वर्षीय मुलाला २ जून या दिवशी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात इसमाने पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. याविषयी बाल सुधारगृहाच्या कर्मचारी अलका अ‍ॅन्थोनी डिसोझा यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
    बालकल्याण समिती अध्यक्ष यांच्या आदेशाने कुमार ईशान याला १ जून या दिवशी रात्री ८ वाजता ओरोस येथील शासकीय मुलांचे सुधारगृह या संस्थेच्या कह्यात देण्यात आले होते. त्यानंतर हा मुलगा या संस्थेच्या कह्यात असतांना अज्ञात व्यक्तीने त्याला पळवून नेले.

अमेरिकेतील विमानतळांवर भारतीय नागरिकांना विशेष सूट

     वॉशिंग्टन - भारतीय प्रवाशांचा अमेरिकेतील प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी केंद्रशासनाने अमेरिकेशी करार केला आहे. ग्लोबल एन्ट्री प्रोग्राम या नावाने ओळखला जाणारा इंटरनॅशनल एक्स्पडिटेड इनिशिएटिव्ह हा करार करणारा भारत हा ९ वा देश ठरला आहे. भारतानेही अमेरिकेहून भारतात येणार्‍या प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी दीर्घकालीन व्हिसा आणि अमेरिकी नागरिकांसाठी इलेक्ट्रिक-टुरिस्ट व्हिसासारखे उपक्रम हाती घेतले आहेत. सद्यस्थितीत अमेरिकेत भारतीय वंशाचे ३० लाख नागरिक वास्तव्यास आहेत.

क्वेटा (पाकिस्तान) येथील मुसलमानाचे धर्मासाठी १०० अपत्ये जन्माला घालण्याचे लक्ष्य !

आम्ही पाच आणि आमचे ५० या मनोवृत्तीच्या लोकांना महिला म्हणजे मुले जन्माला घालण्याचे 
यंत्र वाटते ! या विरोधात कोणत्याही देशातील तथाकथित पुरोगामी पुढे येत नाही ! 
     क्वेटा (पाकिस्तान) - येथील सरदार जान महंमद खिलजी नामक ४६ वर्षांच्या व्यक्तीने १०० अपत्ये जन्माला घालण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अधिकाधिक विवाह करून अनेक मुलांना जन्म देणे आणि धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी तरुणांची संख्या वाढवणे हे आमचे कर्तव्य आहे आणि ते मी आनंदाने पार पाडत आहे, असे प्रतिमास २० सहस्र रुपये कमवणार्‍या खिलजीचे म्हणणे आहे. 
      महंमद दिवसातून ५ वेळा नमाज आणि कुराणाचे वाचन करतो. जान महंमद खिलजी मेडिकल टेक्निशियन आहे. आतापर्यंत त्याचे ३ विवाह झाले आसून १४ मुली आणि ११ मुले मिळून त्याला एकूण ३५ मुले आहेत. आता तो चौथ्या विवाहासाठी प्रयत्न करत आहे. त्याचा पहिला विवाह २६ व्या वर्षी झाला. त्याच्या सर्वांत मोठ्या मुलाचे वय १५ वर्षे आणि सर्वांत लहान मुलगी काही आठवड्यांची आहे. 
    पाकच्या प्रसारमाध्यमांनी त्याच्याविषयीचे वृत्त प्रकाशित केल्यावर सामाजिक संकेतस्थळावर तसेच प्रत्यक्ष भेटून अनेकांनी त्याला लग्नाचा प्रस्ताव दिला आहे. आता यातून योग्य मुलीची निवड करून लवकरच तो लग्न करणार आहे.महंमद अब्दुल्ला नावाच्या व्यक्तीने बनावट तिकिटावर विमानतळावर १० दिवस काढले !

भारतीय विमानतळांच्या सुरक्षेचे धिंडवडे !
     नवी देहली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भाग्यनगर येथील महंमद अब्दुल्ला नावाच्या व्यक्तीने खोट्या तिकिटांच्या आधारे १० दिवस वास्तव्य केल्याचे वृत्त समोर आले आहे. ही घटना जानेवारी मासांत घडली. अब्दुल्ला गुरुग्राममधील एका आस्थापनात कामाला आहे.
     विमानतळावर साफसफाई करणार्‍या कर्मचार्‍याच्या हे लक्षात आल्यानंतर त्याने विमानतळ सुरक्षारक्षकांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर महंमद याला अटक करण्यात आली. महंमदने ११ जानेवारीला संयुक्त अरब अमिरातीसाठी एतिहादच्या बोगस तिकिटावर विमानतळामध्ये प्रवेश मिळवला होता. देहली पोलिसांनी २० जानेवारीला त्याला अटक केली होती. 
    महंमदचे तिकीट बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले होते आणि नंतर त्याला सोडून देण्यात आले. यानंतर त्याने एका घंट्यात तिकिटाची पुन्हा एकदा प्रिंट काढून दुसर्‍या प्रवेशद्वाराने विमानतळावर प्रवेश मिळवला. पुढील १० दिवस त्याने विमानतळावर वास्तव्य केले.

केरळ विधानसभाध्यक्षाच्या निवडणुकीत भाजप आमदाराने साम्यवादी पक्षाच्या उमेदवाराला मत दिले !

     तिरूवनंतपुरम् - केरळ विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत राज्यातील एकमेव भाजपचे आमदार असलेले ओ. राजागोपाल यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार पी. श्रीरामकृष्णन् यांना मत दिले. तेच या निवडणुकीत विजयी झाले.

केरळमध्ये हिंदूंची पिछेहाट का होते ? - डॉ. सी.आय. आयसॅक

डॉ. सी.आय. आयसॅक
      हा लेख वर्ष २००४ मधील असला, तरी केरळमधील हिंदूंची आज म्हणजे १२ वर्षांनंतरची वस्तुस्थिती ही अशीच आहे. हिंदूंवर होणार्‍या या अन्याय आणि अत्याचाराला कोणी वाचा फोडली नाही, तर केरळची उत्तर-पूर्व भारतातील काही राज्यांसारखी दयनीय स्थिती व्हायला वेळ लागणार नाही. त्याचाच वेध घेणारा हा लेख !
१. केरळमध्ये अल्पसंख्यांक राजकीयदृष्ट्या पुष्कळ प्रभावशाली !
    शिक्षण हे समाजावर नियंत्रण ठेवणारे सर्वांत शक्तीशाली क्षेत्र आहे. सध्या केरळमध्ये शिक्षणक्षेत्र हे अल्पसंख्यांकांच्या (मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या) नियंत्रणाखाली आहे. केरळमध्ये अल्पसंख्यांक राजकीयदृष्ट्या प्रभावशाली आहेत, तर आर्थिकदृष्ट्या सबळ आहेत.

मोगल आक्रमक अकबराविरुद्ध धर्मयुद्ध पुकारणारा वीर योद्धा महाराणा प्रताप !

महाराणा प्रताप यांच्या जयंतीच्या निमित्ताने...
१. अकबराविरुद्ध धर्मयुद्ध पुकारणे
     ख्रिस्ताब्द १५६८ मध्ये अकबर बादशहाने चितोडवर स्वारी करून राजपूत स्त्री-पुरुषांची फार मोठी कत्तल केली. चितोड जिंकून तो देहलीला परत गेला. त्या वेळी चितोडने प्रचंड अग्नीदिव्य केले. चितोडमधील सर्व राजपूत स्त्रियांनी जोहार करून आत्मबलिदान केले. त्या वेळी मेवाडचा राजा उदेसिंग हा युद्धात मारला गेला. त्याचा मुलगा महाराणा प्रताप सूडाने पेटला. त्याने अकबराविरुद्ध मेवाडमध्ये धर्मयुद्ध पुकारले. ख्रिस्ताब्द १५७२ मध्ये मेवाड राज्याचा अधिपती म्हणून त्याने स्वतःवर राज्याभिषेक करून घेतला.

वाहिन्यांवरील गर्विष्ठ निवेदक !

     स्वामी विवेकानंदांनी एकदा म्हटले होते की, तुम्ही वर्तमानपत्र वाचत नसाल, तर तुम्हाला माहिती मिळणार नाही आणि वाचत असाल, तर खरी माहिती मिळणार नाही. स्वामीजींचे हे वाक्य सध्याच्या दूरदर्शन वाहिन्यांना शतप्रतिशत लागू पडते. सध्या अनेक वाहिन्यांवर साम्यवादी, डाव्या विचारसरणीचे आणि निरीश्‍वरवादी पत्रकार, वृत्तविश्‍लेषक आणि संपादक यांचा सुळसुळाट झाला आहे. काही वाहिन्यांवर, तर विशिष्ट चेहरे पहिले की, दर्शकही आता वाहिन्या पालटू लागले आहेत किंवा दूरदर्शन संच बंद करू लागले आहेत. याचे एकमेव कारण म्हणजे अहंकारी, बेताल, वस्तुस्थितीला सोडून बोलणारे, इतरांना महत्त्व न देणारे आणि आपलेच घोडे पुढे दामटण्याची सवय असलेले कथित निवेदक किंवा पत्रकार !

मित्रांचा मुलांवर कसा परिणाम होतो ?

वाचकांच्या विशेष मागणीवरून बालवाचकांसाठीचे नियमित सदर !
बालकांसाठी परिपाठ !
     उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत बालवाचकांसाठी सुट्टीतील परिपाठ ! हे सदर प्रसिद्ध करण्यात आले. यातून विविध बोधकथा, लेख आदी माध्यमांतून सुसंस्कार आणि चांगल्या सवयी यांविषयी माहिती दिली गेली. आता सुट्टीचा कालावधी संपत आला असला, तरी वाचकांच्या विशेष मागणीवरून हे सदर नियमित प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हे सदर हिंदु राष्ट्राच्या भावी पिढीची जडणघडण होण्यास साहाय्यभूत ठरो, अशी श्रीगुरूंच्या चरणी प्रार्थना !

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)      शिवाजी महाराजांच्या वेळी हिंदवी स्वराज्य मिळण्याअगोदर समाजाची जशी स्थिती होती, तशी स्थिती आजही आहे. निधर्मीवादी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि पुरोगामी विचारांचे लोक आपल्या देशात सर्वधर्मसमभावाचे विचार पसरवून समाजाची फारच हानी करत आहेत. याच लोकांनी या देशाचे तीन तुकडे केले, ते धर्माच्या नावावर ! - पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान
      जागोजागी बाँबस्फोटात हिंदू मारले जात असतांना कोणाला काहीच वाटत नव्हते. अमरसिंग यांच्यासारखे नेते २० कोटी मुसलमान ८० कोटी हिंदूंना भारी पडतील, असे सांगतात. दहशतवादी अफझल याला फाशी दिली जात नाही. हिंदुस्थान हा हिंदूंचा देश आहे. हिंदू आता हा अन्याय सहन करणार नाहीत !- श्रीमती हिमानी सावरकर, राष्ट्रीय अध्यक्षा, अभिनव भारत

गुरुपौर्णिमेला ४२ दिवस शिल्लक

   
  गुरु हे चोवीस घंटे शब्द आणि शब्दातीत अशा दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत मार्गदर्शन करत असतात. गुरु हे कोणत्याही संकटातून शिष्याला तारतात.

कलियुगातील मानवाला निष्काम कर्मयोगाद्वारे सत्ययुगात नेणारे अवतारी पुरुष परात्पर गुरु डॉक्टर जयंत बाळाजी आठवले आणि त्यांचे समष्टी रूप असलेल्या सनातन संस्थेद्वारेे होणारेे हिंदु राष्ट्र स्थापनेकडील मार्गक्रमण

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ... 
       देवद आश्रमात वास्तव्यास असलेले सनातनचे थोर संत प.पू. पांडे महाराज यांनी प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या अवतारी कार्याचे महत्त्व विशद केले आहे. या लेखांतून त्यांनी भगवंताने केलेली सृष्टीची सुंदर व्यवस्था, काळाच्या प्रभावामुळे त्यात होत गेलेली स्थित्यंतरे, धर्मग्लानीची अवस्था असल्याने हिंदूंची झालेली दयनीय स्थिती, इतर पंथियांचे हिंदु धर्मावरील वाढते आक्रमण यांविषयीचा उहापोह केला आहे. अशा काळाच्या पार्श्‍वभूमीवर धर्मग्लानी दूर करण्याचे ईश्‍वर नियोजित कार्य प.पू. डॉक्टरांकडून कशा प्रकारे केले जात आहे, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने कसे मार्गक्रमण होत आहे, याचे अत्यंत सुंदर आणि अभ्यासपूर्ण वर्णन त्यांनी केले आहे.
       या भागात आपण प.पू. डॉक्टरांनी स्थापन केलेल्या सनातन संस्थेकडून होणारे धर्मप्रसारकार्य, धर्मरक्षणार्थ चालू केलेल्या मोहिमा, निद्रिस्त हिंदूंना जागृत करण्याचे कठीण कार्य करण्यासाठी आणि त्यांच्यात राष्ट्र-धर्माप्रती प्रेम जागवण्यासाठी चालू केलेले अनेकविध उपक्रम, संघटितपणा अन् संतांचे आशीर्वाद यांमुळे कार्याला मिळत असलेले सुयश, तसेच हिंदु धर्मविरोधी शक्तींनी सनातनविरुद्ध आखलेलेे षड्यंत्र आणि हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी अवतरलेल्या भगवंताच्या कार्याची साकार होणारी प्रक्रिया यांविषयी सविस्तर समजून घेणार आहोत. या सर्व लेखांच्या माध्यमातून प.पू. पांडे महाराजांनी अवतारी पुरुष परात्पर गुरु डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांचे कार्य कशा प्रकारे साकार होत आहे, याविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन करून प.पू. डॉक्टरांचे, अवताराचे कार्य उलगडून सांगितले आहे.

उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला आणि शिक्षकांकडूनही आदर संपादन करणारा ५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला आदर्श विद्यार्थी कु. अनुज जयंत करोडदेव (वय १४ वर्षे) !

१. जन्मापूर्वी कु. अनुजच्या जन्मापूर्वी 
त्याच्या आईला आलेली अनुभूती 
कु. अनुज करोडदेव
      आधुनिक वैद्यांनी प्रसूती पुष्कळ कठीण होणार असल्याने ९ मास आराम करायला सांगणे आणि देवाच्या कृपेने प्रसूती नैसर्गिक होणे : गरोदरपणात आधुनिक वैद्यांनी प्रसूती पुष्कळ कठीण होणार आहे, असे सांगून ९ महिने आराम करायला सांगितले. त्या वेळी मी सतत पोटावर हात ठेवून कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप करत असे. तसेच माझ्याकडून चांगले बाळ जन्माला येऊ दे आदी प्रार्थना व्हायच्या. नंतर देवाच्या कृपेने प्रसूती नैसर्गिक झाली.
२. वयाच्या ८ व्या वर्षी अनुजला आलेली अनुभूती
      औषधोपचार करूनही बरा न होणारा डोळेदुखीचा त्रास प.पू. पांडे महाराज यांच्या सांगण्यानुसार श्री गणपतीचे स्तोत्रपठण आणि नामजप केल्यावर बरा होणे : वर्ष २०१० मध्ये त्याचे डोळे लाल होऊन दुखत असत. तेव्हा आधुनिक वैद्यांनी अ‍ॅलर्जी असे निदान करून औषधोपचार केले; तरीही त्याला डोळेदुखीचा त्रास होत असे. आम्ही देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात गेल्यावर प.पू. पांडे महाराज यांनी त्याला गणपतिस्तोत्र आणि श्री गणपतीचा नामजप करायला सांगितले. तसे केल्यावर त्याचा डोळेदुखीचा त्रास बरा झाला.

व्यष्टी साधना गांभीर्याने करणार्‍या आणि तत्त्वनिष्ठ असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुधा बिलावर !

सौ. सुधा बिलावर
१. व्यष्टी साधनेचे गांभीर्य 
१ अ. पहाटे लवकर उठून व्यष्टी साधना आणि सारणी लिखाण पूर्ण करूनच अल्पाहार घेणे : काकू व्यष्टी साधनेत कधीही सवलत घेत नाहीत. त्या पहाटे लवकर उठून व्यष्टी साधना आणि सारणी लिखाण पूर्ण करूनच अल्पाहार घेतात. त्याविना त्यांची दिवसभरात सेवा मन लावून होत नाही आणि त्याचा त्यांना त्रासही होतो.
१ आ. घरातल्या अन्य सदस्यांनाही व्यष्टी साधनेचे महत्त्व सांगणे : काकू घरातल्या अन्य सदस्यांनाही व्यष्टी साधना किंवा सारणी लिखाण केल्याविना अल्पाहार घेऊ नका, असे सांगायच्या; पण कोणी ते मनावर घेतले नाही. याविषयी काकूंचा आग्रह मात्र नसायचा. काकू आमचा व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावाही घ्यायचा. काकू समष्टी सेवेसंदर्भात जे सांगायच्या, ते सर्व जण उत्सुकतेने ऐकायचे.
१ इ. नातेवाइकांकडे गेल्यावर सनातन संस्थेविषयी आणि उपायांविषयी सांगणे : काकू नातेवाइकांकडे गेल्यावरही मायेतील अधिक बोलण्यापेक्षा त्यांना सनातन संस्थेविषयी आणि उपायांविषयी सांगतात. त्या वेळी काकू अनावश्यक चर्चा करण्यापेक्षा व्यष्टी साधना अधिक करण्याचा प्रयत्न करतात.

गुरूंचे मन जिंकण्याची तळमळ असलेले, सतत कृतज्ञता आणि शरणागत भावात रहाण्याचा प्रयत्न करणारे श्री. ज्ञानदेव पाटील !

१. पावन वास्तूमध्ये रहाण्याचे 
भाग्य मिळाल्यामुळे केलेली प्रार्थना
      प.पू. गुरुमाऊलीच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आणि तीन साधक जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झालेल्या वास्तूमध्ये रहाण्याचे भाग्य आम्हाला मिळाले आहे, या कृतज्ञतेच्या भावात अखंड रहाता येऊ दे. आम्हाला गुरु-चरणसेवेचा आनंद अनुभवता येऊ दे आणि चैतन्याच्या महासागरात अंघोळ करून जीवनमुक्त होता येऊ दे, अशी आपल्या पावन चरणी प्रार्थना !
२. व्यष्टी चांगली होण्याकरता 
समष्टी संकल्प करून गुरूंचे 
मन जिंकण्यासाठी केलेली प्रार्थना !
२ अ. साधकांनी एकत्रितपणे ठरवलेल्या उद्दिष्टातून समष्टी संकल्प होऊन ते कार्य देवाला पूर्ण करावे लागणे आणि कार्य पूर्ण झाल्यावर कृतज्ञतेचा भाव न राहिल्याने प्रगती न होणे : एखादा उपक्रम करायचा ठरल्यावर तो उपक्रम चांगला होण्यासाठी सर्व साधक एकत्र येतात आणि देवाला प्रार्थना करून नियोजन करतात. त्या वेळी समष्टी संकल्प होऊन कार्यपूर्तीचा ध्यास लागतो आणि देवाला ते कार्य पूर्ण करावे लागते. कार्य होण्यापूर्वी तळमळीने प्रार्थना होते, सतत देवाला हाक मारली जाते; मात्र कार्य झाल्यानंतर कृतज्ञतेचा भाव न रहाता सूक्ष्म अहं जागृत होतो. कार्य चांगले होण्यासाठी मी कसे प्रयत्न केले, हे समष्टीमध्ये सांगितले जाते. त्यामुळे साधनेत आपला तोटा होतो. आपल्याला सतत वाटत रहाते की, मी एवढे केले; मात्र माझी प्रगती होत नाही. या ठिकाणी मी नाही केले, देवाने करवून घेतले, असा भाव असेल, तरच केलेल्या सेवेतून साधना होऊन प्रगती होते.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे लोटे, जिल्हा रत्नागिरी येथील श्री. ज्ञानदेव पाटील यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. ज्ञानदेव पाटील
१. प्रगतीची पूर्वसूचना मिळणे
      श्री. पाटीलकाका गुहागर येथे सेवेला येतात. प्रसारसेवेच्या निमित्ताने वर्षभरापूर्वी मला त्यांच्या सहवासात सेवा करायला मिळाली. त्यांच्या बोलण्या-वागण्यातून पाटीलकाका लवकरच ६१ प्रतिशत आध्यात्मिक स्तर गाठतील, असे वाटायचे.
२. बोलण्यातील नम्रता 
आणि चैतन्य यांचा प्रभाव पडणे
      एखाद्या वर्गणीदाराकडे किंवा विज्ञापनदात्याकडे गेल्यावर काकांचा विनम्र स्वभाव आणि बोलण्यातील चैतन्य यांमुळे व्यक्ती आकृष्ट होतात आणि विज्ञापन किंवा वर्गणी देऊन ग्रंथही विकत घेतात, असा मला अनुभव आहे.
      एकदा आम्ही दोघे विज्ञापनाची सेवा करत असतांना गुहागर येथील एका सोनाराकडे गेलो होतो. प्रारंभी त्यांनी नकारात्मकता दर्शवली; परंतु काकांनी त्यांना सुवर्णालंकारांच्या संबंधीचे ग्रंथ दाखवले आणि माहिती सांगितली. त्या वेळी त्यांनी दोन ग्रंथ घेतले आणि विज्ञापनही दिले. इतकेच नव्हे, तर दुकानात खरेदीसाठी आलेल्या दोन ग्राहकांनीही काकांचे बोलणे ऐकून ग्रंथ घेतले.

प.पू. डॉक्टरच करतील उद्धार !

सौ. निलीमा सप्तर्षि
       एका साधिकेने माझी एक चूक लक्षात आणून दिली. तेव्हा चुकीविषयी चिंतन करतांना सुचलेले काव्य ! प.पू. गुरुदेवांच्या कृपेने हे काव्यरूपी विचार सुचले. त्यांच्या चरणी कृतज्ञता !
चुका, चुका, चुका ।
किती चुका करणार ? ॥
चुकांचा झाला ढिगारा ॥ १ ॥
ढिगार्‍याची झाली टेकडी ।
टेकडीचा झाला पर्वत ॥ २ ॥
पर्वताची उंची किती वाढणार ? ।
कसा फोडू हा पर्वत ? ॥ ३॥
विचार का केला नाही आधी ? ।
आता घे प.पू. डॉक्टरांचा आधार ॥
तेच करतील तुझा उद्धार ॥ ४ ॥
- सौ. निलीमा सप्तर्षि, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१०.२०१५)

श्री. विनोद काटे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. तळमळीने, 
भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करणे
       श्री. काटेकाका तळमळीने आणि भावपूर्ण साधना करतात. गुरुपौर्णिमेच्या वेळी आणि इतर विशेष प्रसंगी ग्रंथप्रदर्शन लावणे, अर्पण गोळा करणे आणि फलक लिहिणे या सेवा ते प्रामुख्याने करतात. ज्या व्यक्तीकडे ते अर्पण आणण्यासाठी जातात, तेथून ते अर्पण घेऊनच येतात. त्यांना दुसर्‍यांदा त्या व्यक्तीकडे जावे लागत नाही. विज्ञापनाची सेवाही ते परिपूर्ण करतात.

शास्त्र समजल्यावर तत्परतेने कृती करून दृढतेने आणि समर्पण भावाने सेवा करणारे नागपूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. विनोद काटे !

१. शास्त्र 
समजल्यावर तत्परतेने कृती करणे 
श्री. विनोद काटे
       श्री. काटेकाकांना नामस्मरणाचे महत्त्व कळल्यावर त्यांनी कर्मकांड सोडून नामस्मरणावर भर दिला. जोडीला विज्ञापने आणणे, समाजातील व्यक्तींकडून अर्पण गोळा करणे, सनातन प्रभातचे वर्गणीदार बनवणे, अंक वितरण करणे, ग्रंथ प्रदर्शनाची सेवा इत्यादी सेवा तळमळीने आणि समर्पण भावाने करण्यास आरंभ केला.
       त्यानंतर प्रत्येक वेळी आमची भेट झाल्यावर ते साधनेव्यतिरिक्त अन्य कुठल्याच विषयावर बोलत नसत.
२. प्रामाणिकपणा 
आणि इतरांचे मन जिंकणे
       लघुलेखक या पदापासून नागपूर येथील रेल्वे ट्रिब्यूनल बेंचच्या न्यायाधिशांचे स्वीय साहाय्यक या पदापर्यंत श्री. काटेकाकांंनी रेल्वेमध्ये चाकरी केली. त्यांचे इंग्रजी विषयावरील प्रभुत्व, प्रामाणिकपणे अन् निष्ठेने कार्यालयीन काम करणे आणि चांगली वर्तणूक या गुणांमुळे बदलीच्या प्रत्येक ठिकाणी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर आत्यंतिक प्रसन्न होते. रेल्वेचे उत्कृष्ट कर्मचारी म्हणून त्यांना चाकरीच्या काळात रेल्वे प्रशासनाकडून पुष्कळ पारितोषिकेही मिळाली आहेत.

सर्वसामान्य व्यक्ती आणि संत

श्री. अमर जोशी
१. केवळ संतच स्थिरचित्त असणे : शरीर पूर्णपणे स्वस्थ असणार्‍या अनेक व्यक्ती आपण समाजात पाहू शकतो; पण चित्त (मन) स्थिर असणारे केवळ संतच असू शकतात.
२. सर्वसामान्य व्यक्ती आणि संत यांच्या कृतींमधील भेद : सर्वसामान्य व्यक्तीच्या कृतींचा प्रमाणभूत म्हणून ऋषींनी वापर केलेला नाही; कारण सर्वसामान्य व्यक्तीच्या कृती या तिची शारीरिक अन् मानसिक स्थिती, वातावरण आणि काळ यांनुसार पालटू शकतात; पण नित्यस्वरूपी स्थिर असणार्‍या ब्रह्माशी एकरूप झालेल्या संतांच्या कृती नेहमीच एकसारख्या असतात. त्यांची गती, प्रमाण आणि गुणवत्ता यांमध्ये कधीही पालट होत नाही.
- श्री. अमर जोशी, सनातन साधक-पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांतील मान्यवर हिंदुत्वनिष्ठांची भाषणे प्रसारणासाठी उपलब्ध !

जिल्हासेवक, हिंदु जनजागृती समितीसेवक आणि प्रसिद्धी समन्वयक यांना सूचना !
     वर्ष २०१२, २०१३, २०१४ आणि २०१५ या वर्षांत झालेल्या अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांत हिंदुत्वनिष्ठांनी राष्ट्र आणि धर्म या विषयांवर उद्बोधक भाषणे केली. ही भाषणे लव्ह जिहाद, धर्मांतर, गोरक्षा, हिंदूंवरील आघात, काश्मीरची समस्या, मंदिरांवरील आघात, हिंदु राष्ट्राची आवश्यकता, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अधिवक्त्यांचा सहभाग, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी विचारमंथन, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ब्राह्मतेज आवश्यक, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी क्षात्रतेज आवश्यक अशी विषयवार एकत्रित करण्यात आली आहेत. अशी एकूण ५० घंट्यांची संकलित भाषणे प्रसारणासाठी उपलब्ध आहेत. ही भाषणे स्थानिक दूरचित्रवाहिनीवर कोणी दाखवण्यास इच्छुक असल्यास वरीलपैकी कोणकोणत्या विषयांवर, प्रतिदिन किती, एकूण किती कालावधीचे आणि कधी प्रसारण करणार, या संदर्भातील मागणी प्रसिद्धी समन्वयकांना शेअर केलेल्या Old_Adhiveshan_Videos या गुगल शीटमध्ये १०.६.२०१६ पर्यंत नोंद करावी.
     काही अडचण असल्यास जिल्हासेवकांमार्फत श्री. अमोल घाडगे यांना ९४२२०२९२५७ या क्रमांकावर किंवा सौ. विद्या शानभाग यांना ८४५०९०६३८८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
दोन दिवसांपूर्वी अमावास्या झाली.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

विविध नाड्या आणि संहिता यांत ऋषींनी मायेतील प्रश्‍नांची उत्तरे देण्याचे कारण

        विविध नाड्या आणि संहिता यांत विविध ऋषींनी सांगितलेली माहिती असते. नाडी आणि संहिता यांचे वाचन करणार्‍यांकडे येणारे बहुतेक सर्वच सकामातील, म्हणजे मायेतील प्रश्‍न विचारतात आणि त्यांना ऋषींकडून उत्तरही मिळते. त्यासंदर्भात मला वाटायचे, ऋषि एवढे ज्ञानी असूनही सकामातील, म्हणजे मायेतील प्रश्‍नांची उत्तरे का देतात ?, असा प्रश्‍न मनात येण्याचे कारण म्हणजे मी कोणाला कधीच मायेतील प्रश्‍नांची उत्तरे दिली नाहीत. आज या प्रश्‍नाचे उत्तर माझ्या लक्षात आले. ईश्‍वर जसा मायेतील प्रश्‍नांची उत्तरे देतो, तसेच ऋषीही देतात; कारण सगुण-निर्गुण नाही भेदाभेद ! हे तत्त्व त्यांच्यात भिनलेले असते आणि ते माझ्यात नाही; म्हणून मी केवळ साधनेत प्रगती करू इच्छिणार्‍या साधकांच्याच साधनेविषयक प्रश्‍नांची उत्तरे देतो.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
वाटाड्या देव वाटाड्या आहे. मार्गात ठेच लागते; कारण मार्गात खाचखळगे 
असतात. आपण वाटाड्यावर संतापतो, तरी तो सांगतो, पुढे मार्ग चांगला आहे.
भावार्थ : येथे वाटाड्या म्हणजे मोक्षाचा मार्ग दाखविणारे गुरु. ठेच लागते म्हणजे त्रास होतो, आध्यात्मिक प्रगती खुंटते. मार्गात खाचखळगे असतात म्हणजे साधनेत अडचणी असतात. पुढे मार्ग चांगला आहे म्हणजे आध्यात्मिक प्रगती चांगली होणार आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
एका अब्जाधिशाच्या मुलाने त्याची सर्व संपत्ती उधळून टाकावी, तशी हिंदूंच्या मागच्या पिढ्यांनी सर्व धर्मसंपत्ती मातीमोल केली आहे ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

श्रमाची कास धरा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
ईश्‍वरी शक्ती अगाध आहे. तुमच्या साधनेने तुमची दुःखे निश्‍चितच पळून जातील; 
पण त्यासाठी श्रमाची कास धरा. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


मनकर्णिका कुंडाची मुक्तता !

संपादकीय
     कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की, उद्रेक होतो. त्यात पीडितांचा दोष नसतो. दोष परिस्थितीचा असतो. बर्‍याचदा जनताद्रोही व्यवस्थेचाही तो परिणाम असतो; कारण कोणतेही असले, तरी मानवाच्या सहनशीलतेलाही काही मर्यादा असते. तिचा कधी कधी अंत होऊ शकतो, हे आजच्या कोल्हापूर येथील घटनेने सिद्ध झाले. श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील मनकर्णिका कुंडावर शौचालय बांधून त्याचे पावित्र्य भंग करणार्‍या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा यापूर्वी अनेकदा निषेध करण्यात आला आहे. अनेकदा निवेदने, निषेध आंदोलने यांद्वारे ते शौचालय तेथून हटवण्याची मागणीही हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली होती. तरीही कृतीशून्य राहिलेल्या देवस्थान समितीचा निषेध म्हणून ६ जून या दिवशी १०० शिवसैनिकांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शौचालयाचे बांधकाम फोडले. सहनशीलतेचा उद्रेक झाला की, असेच होते.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn