Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

एक्स-मेन : अपोकॅलीप्स या हॉलीवूडच्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी श्रीकृष्णाचे विडंबन असलेली दृश्ये वगळली !

परदेशातील धर्माभिमानी हिंदूंकडून भारतातील जन्महिंदू काही शिकतील का ?
फोरम फॉर हिंदू अवेकनिंगचे यश !
    न्यू जर्सी (अमेरिका) - हॉलीवूडमधील फॉक्स मुव्हीज्ने निर्मित केलेल्या एक्स-मेन : अपोकॅलीप्स या चित्रपटात श्रीकृष्ण या हिंदूंच्या उपास्य देवतेला एका अमानवी स्वरूपात दाखवून त्याचे विडंबन करण्यात आले होते. या प्रकरणी अमेरिकेतील अनेक हिंदूंनी तेथील फोरम फॉर हिंदू अवेकनिंग या हिंदुत्ववादी संघटनेशी आणि येथील हिंदू नेते राजन झेद यांच्याशी संपर्क साधला आणि हे विडंबन थांबण्यासाठी मोहीम राबवण्याची मागणी केली. त्यानंतर या संघटनेने या चित्रपट निर्मात्याशी पत्राद्वारे संपर्क साधला. त्याला प्रतिसाद म्हणून ट्वेंटीएथ सेन्चुरी फॉक्स मुव्हीज् आणि चित्रपटाचे निर्देशक ब्रायन सिंगर यांनी २७ मे या दिवशी प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून श्रीकृष्णाचे विडंबन असलेली दृश्ये वगळण्याचा निर्णय घेतला.
     फोरम फॉर हिंदू अवेकनिंगने ट्वेंटीएथ सेन्चुरी फॉक्स मुव्हीज् आस्थापनाला पत्र पाठवून या प्रकारचा निषेध केला होता आणि चित्रपटातून श्रीकृष्णाचा उल्लेख असलेली दृश्ये आणि संवाद वगळण्याची, तसेच या चित्रपटाचा ट्रेलर यु-ट्युबवरून काढून टाकण्याची मागणी केली होती. वरील प्रकारामुळे जगभरातील १०० कोटी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असेही या पत्रात नमूद करण्यात आले होते. शेवटी फोरम फॉर हिंदू अवेकनिंग या संघटनेच्या प्रयत्नांना यश आल्याने सर्व हिंदू श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहेत.

जिहादी आतंकवाद्यांचा अमरनाथ यात्रेवर आक्रमण करण्याचा कट ! - सीमा सुरक्षा दल

अमरनाथ यात्रेवर आक्रमण झाल्यास देशातून कुणालाही हज यात्रेला जाऊ 
देणार नाही, अशी चेतावणी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती !
     श्रीनगर - भारतीय गुप्तहेर यंत्रणेच्या माहितीनुसार जिहादी आतंकवाद्यांनी अमरनाथ यात्रेवर आक्रमण करण्याचा कट रचला आहे, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के.के. शर्मा यांनी दिली. अमरनाथ यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी सीमा सुरक्षा दलाने पूर्ण सिद्धता केली असून गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रा सुरळीत पार पडेल, असा विश्‍वास शर्मा यांनी व्यक्त केला.

गोरखपूरमध्ये भाजपच्या अल्पसंख्यांक शाखेकडून भगवान श्रीरामाचा फलकाद्वारे अवमान !

योगी आदित्यनाथ यांना भगवान श्रीरामाच्या, तर समाजवादी पक्ष, 
बहुजन समाज पक्ष, काँग्रेस आदी पक्षांना रावणाच्या रूपात दाखवले !
     गोरखपूर - येथे भाजपच्या अल्पसंख्यांक शाखेच्या मुसलमान कार्यकर्त्यांकडून एक फलक बनवून लावण्यात आला आहे. त्यात येथील भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांना ७ तोंडांच्या रावणासमोर धनुष्यबाण घेतलेल्या श्रीरामाच्या वेशात दाखवण्यात आले आहे. या चित्राखाली योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या संदर्भात भाजपच्या अल्पसंख्यांक शाखेचे इरफान अहमद म्हणाले, रावणाच्या ७ तोंडांना आम्ही समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, काँग्रेस, आम आदमी पक्ष, जनता दल (संयुक्त), पीस पार्टी आणि एम्आयएम् यांच्या रूपात दाखवले आहे. हे सर्व पक्ष उत्तरप्रदेशाच्या विकास आणि शांततेसाठी धोकादायक आहेत.

भ्रष्ट अधिकार्‍यांसह त्याचे कुटुंबीयही तितकेच दोषी ! - केंद्रीय अन्वेषण विभागाचे न्यायालय

सनातनही आतापर्यंत हेच सांगत आले आहे.
     जबलपूर (मध्यप्रदेश) - भ्रष्टाचारी अधिकार्‍याने भ्रष्टाचाराने मिळवलेला पैसा त्याचे कुटुंबीय वापरत असतील, तर ते सुद्धा तितकेच दोषी आहेत, असा निकाल जबलपूरच्या येथील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) न्यायालयाने दिला. ९४ लाख रुपयांचा घोटाळा केल्याच्या प्रकरणी सीबीआयच्या न्यायालयाने केंद्रसरकारच्या सेवेतील अधिकारी सूर्यकांत गौर यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा आणि स्नुषा (सून) यांना ५ वर्षे सश्रम कारावास, तसेच प्रत्येक दोषीला अडीच लाख रुपयाचा दंडही ठोठावला. गौर हा संरक्षण खात्यामध्ये अकाऊंटंट होते. भ्रष्टाचार रोखणार्‍या कायद्यामध्ये काही अशा तरतुदी आहेत, ज्यामध्ये कुटुंबियांनाही शिक्षा होऊ शकते.

गोवंडी (मुंबई) येथे हिंदु धर्माभिमानी विष्णु गुप्ता यांच्यावर धर्माधांकडून जीवघेणे आक्रमण !

  • धर्मांधांच्या तक्रारीवरून पोलिसांकडून हिंदूंच्याच विरोधात गुन्हा नोंद ! 
  • धर्मांधांचा उद्दामपणा आणि पोलिसांचा नाकर्तेपणा यांमुळे मुंबईतही आता हिंदूंवर घरदार सोडून जाण्याची वेळ !
      महाराष्ट्रातही आता छोटे छोटे पाकिस्तान निर्माण होत असल्याचे हे उदाहरण आहे ! महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपचे सरकार असतांना अशी आक्रमणे होणे हिंदूंना अपक्षित नाही ! हिंदूंवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई न करता उलट हिंदूंवरच गुन्हा नोंदवणारे पोलीस हिंदुद्वेषीच होय ! हिंदूंना सन्मानाने जगायचे असेल, तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविना पर्याय नाही !      मुंबई - येथील बैगनवाडी गोवंडी या मुसलमानबहुल भागात रहाणारे धर्माभिमानी श्री. विष्णु गयाप्रसाद गुप्ता यांच्यावर शुल्लक कारणावरून धर्मांधांनी तलवारीने जीवघेणे आक्रमण केले. या प्रकरणी हिंदूंनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आक्रमणकर्त्यांवर कारवाई करायची सोडून धर्मांधाच्या खोट्या तक्रारीवरून पोलिसांनी हिंदूंवरच गुन्हा दाखल. धर्मांधांचा उद्दामपणा आणि पोलिसांचा नाकर्तेपणा यांना कंटाळून काही मासांपूर्वी येथील श्री. गणेश गुप्ता आणि श्री. शिवमुरत गुप्ता हे घर सोडून अन्य भागात निघून गेले आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचार्‍यांच्या वेतनामध्ये लक्षावधी रुपयांचा घोटाळा

  • पालिकेच्या आरोग्य विभागातील एवढ्या मोठ्या अनागोंदी कारभाराकडे आरोग्य निरीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी यांनी दुर्लक्ष कसे केले ? कि त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग आहे ?
  • सर्व प्रकारच्या घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी नीतीमान कर्मचार्‍यांचे हिंदु राष्ट्रच हवे !
     पिंपरी, ५ जून - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ताथवडे-पुनावळेतील आरोग्य विभागातील कंत्राटी सफाई कर्मचार्‍यांच्या वेतनामध्ये प्रती मासाला १ लक्ष ५० सहस्रांहून अधिक रुपयांची अफरातफर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सफाई कर्मचारी म्हणून नियमानुसार २६ सफाई कर्मचार्‍यांनी प्रती दिवशी कामावर उपस्थित रहाणे अपेक्षित असतांना वास्तवात केवळ ४ महिला कर्मचारी काम करतांना आढळून आल्या. उर्वरित २२ कर्मचार्‍यांची खोटी उपस्थिती दर्शवून त्यांचे वेतन लाटले जात आहे. त्यामुळे पालिकेची लक्षावधी रुपयांची फसवणूक कंत्राटदार आणि काही पालिका अधिकारी यांच्या संगनमताने होत असल्याचा संशय आहे. (या प्रकरणाची पालिका आयुक्तांनी त्वरित सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी ! - संपादक)

पुणे येथील राहुल चव्हाण आणि कुटुंबीय यांच्यावरील अन्यायाच्या विरोधात मोर्चा

धर्मांधांनी आक्रमण केल्याचे प्रकरण
  • हिंदुबहुल राज्यात असा मोर्चा काढावा लागणे, हे चिंताजनक !
  • हिंदूंच्या मतांवर निवडून आलेले शासन याचा विचार करेल का ?
    पुणे, ५ जून - जनवाडी वसाहत येथे राहणारे श्री. राहुल चव्हाण आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर १५ मे या दिवशी धर्मांधांनी केलेल्या प्राणघातक आक्रमणाच्या प्रकरणी पोलिसांनी आक्रमणकर्त्यांवर नव्हे, तर घायाळ हिंदूंवरच कलम ३०७ अन्वये (हत्येचा प्रयत्न) गुन्हा प्रविष्ट केला आणि चव्हाण कुटुंबियांना खोट्या आरोपाखाली कारागृहात डांबले. या अन्यायाच्या विरोधात हिंदूंनी १ जून या दिवशी मोर्चा काढला. श्री. चव्हाण आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यावर झालेली अन्यायकारक कारवाई थांबवा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या प्रसंगी समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे यांच्यासह अन्य धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.
१. १५ मे या दिवशी शाहरुख शेख आणि त्याच्या गुंड साथीदारांनी श्री. राहुल चव्हाण यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले. या वेळी राहुल यांना वाचवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या वहिनी आणि आई यांचाही धर्मांधांनी विनयभंग केला.

(म्हणे) स्मशानातील राखेमुळे नदीचे प्रदूषण होते !

मुठा नदीच्या पात्रात लक्षावधी लिटर सांडपाणी, रासायनिक द्रव्ययुक्त पाणी आणि मैला मिसळल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असतांना (प्रदूषणाच्या नावाखाली) धर्मद्रोह्यांकडून ठोकली जाणारी बोंब !

    पुणे, ५ जून - वैकुंठ स्मशानभूमीतील गोवर्‍या, लाकडे आणि मृतदेहांची राख थेट मैलापाणी आणि कचरा असलेल्या आंबिल ओढा नाल्यात टाकली जात आहे. काही फुटांवरच हा नाला मुठा नदीत मिसळतो. त्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. मनुष्याच्या हाडांतील फॉस्फरसमुळे नदीतील जैवसंपदा लयास जात असल्याचे पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. येथील मुठा नदी शुद्ध करण्याच्या मोहिमेच्या दुसर्‍या टप्प्यात एका प्रथितयश वृत्तपत्राच्या पथकाने नुकतीच मुळा-मुठा संगमापासून ते खडकवासला धरणापर्यंतच्या नदीची तपशीलवार पाहणी करून स्मशानातील राखेमुळे नदीचे प्रदूषण होत असल्याची आरोळी ठोकली आहे. (आंबिल नाल्यात प्रामुख्याने मैलापाणी आणि कचर्‍याचे ढीग आहेत. त्यातच राख मिसळली जात असल्यामुळे स्मशानभूमी शेजारी नदीपात्रालगत गाळ निर्माण झाला आहे. या गाळाच्या विरोधात आवाज का उठवला जात नाही ? खरेच जर नदी प्रदूषणाचा एवढा कळवळा असेल, तर त्याविषयी आवाज उठवावा ! - संपादक)
    या पाहणीत असे आढळले की, परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचाही उपद्रव वाढला आहे. मैलापाणी, कचरा, राख यांमुळे नदीच्या पाण्यात मिथेन वायू सिद्ध होऊन पर्यावरणाचे संतुलन बिघडते. नदीत मेलेली जनावरे टाकण्याचे प्रमाणही वाढत आहे. (याविषयी पालिका प्रशासन काही उपाययोजना करणार कि स्मशानातील राखेमुळे प्रदूषण होते, याविषयी कांगावा करत रहाणार ? - संपादक)
धर्मद्रोही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांची धार्मिक गोष्टींत लुडबूड हवी कशाला ?
(म्हणे) वैकुंठ स्मशानभूमीतील राखेची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावा !
    वैकुंठातील राख नदीपात्रात न टाकता तिची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे शक्य आहे, अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्ष आणि खासदार अधिवक्ता वंदना चव्हाण यांनी महापौर प्रशांत जगताप आणि आयुक्त कुणाल कुमार यांना दिले आहे. (राष्ट्रवादी काँग्रेस हीच तत्परता नदीमध्ये कारखान्यांकडून सोडली जाणारी रासायनिक द्रव्ये, सांडपाणी, मैला, राडारोडा आणि कचरा यांच्याविषयी का दाखवत नाही ? - संपादक)
    याविषयी चव्हाण म्हणाल्या की, शहरातील मुठा नदीत यापूर्वी अनेक अतिक्रमणे झाली आहेत. (या अतिक्रमणांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन का करत नाही ? - संपादक) वैकुंठातील राख नदीपात्रात न टाकता पालिकेने ती राख कंटेनरमध्ये गोळा करून नंतर जिरवली पाहिजे. शहर एकीकडे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असतांना दुसरीकडे नदीपात्रात राख टाकणे शोभत नाही. (नदीमध्ये अतिक्रमण करणे, रासायनिक द्रव्ये, सांडपाणी, मैला, राडारोडा आणि कचरा टाकणे हे तरी शोभते का ? नदीमध्ये रक्षा विसर्जन करणे, याला हिंदु धर्मशास्त्राचा आधार आहे. संधी साधून हिंदु धर्माच्या विरोधात बोलणारी राष्ट्रवादी काँग्रेस हिंदुद्रोहीच होय ! - संपादक)

देशद्रोह्यांच्या समर्थकांवर कठोर कारवाई करावी ! - प्रियांका लोणे

माळेगाव (जिल्हा जालना) येथे हिंदु धर्मजागृती सभा
    जालना, ५ जून - सध्या देशविरोधी विचारसरणी आणि तशी कृती असणार्‍यांचे समर्थन होणे, हे दुुर्दैवी आहे. ज्या छत्रपती शिवरायांचा आपण वारसा सांगत आहोत, त्यांनी स्वराज्याच्या द्रोह्यांना काय शिक्षा असावी, हे खंडोजी खोपडे यांच्या उदाहरणांतून दाखवून दिले आहे. छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून देशद्रोह्यांच्या समर्थकांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रियांका लोणे यांनी केले. ह.भ.प. संतोष महाराज गोरे आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्त विद्यमाने माळेगाव येथे श्री मारुति मंदिर येथे २ जून या दिवशी आयोजित केलेल्या धर्मजागृती सभेत त्या बोलत होत्या.
   या वेळी व्यासपिठावर ह.भ.प. संतोष महाराज गोरे, हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. गौरी देशमुख, माळेगाव गावचे सरपंच श्री. सीताराम भानुदास गोरे आदी उपस्थित होते. या सभेला २२५ हून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन सौ. अनिता जोशी यांनी केले. 

(म्हणे) हिंदु-मुस्लिम तेढ निर्माण करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करा !

कराड येथील मुसलमान समाजाच्या चोराच्या उलट्या बोंबा !
     सातारा, ५ जून (वार्ता.) - मुसलमान समाजाला लक्ष्य करून त्यांची नाहक अपकीर्ती करण्यात येत आहे. मुसलमान धर्मगुरु आणि मौलवी यांवर चुकीच्या पद्धतीने आरोप करण्यात आले आहेत. याविषयी कराड येथील जैन समाजाने त्यांची क्षमा मागावी, तसेच शहरात काढण्यात आलेल्या मोर्च्यामुळे हिंदु-मुसलमान समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून केला जात आहे. अशा जातीयवादी शक्तींच्या विरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी मुसलमान समाजाच्या वतीने पोलिसांकडे करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. आहे. (प्रथम अन्य धर्मीय मुलीला फूस लावून पळवायचे आणि नंतर त्याचा विरोध केला, तर जातीयवादी म्हणून हिणवायचे, ही धर्मांधांची जुनी सवय आहे. - संपादक)

लोकशाही दिनात सार्वजनिक प्रश्‍नांच्या संदर्भातील तक्रारी दाखल करून घेण्यास परत चालू करा ! - शरद फडके

     सांगली - वर्ष २०१४ पूर्वी शासनाच्या वतीने घेण्यात येणार्‍या लोकशाही दिनात सार्वजनिक प्रश्‍नांच्या संदर्भात तक्रारी घेण्यात येत होत्या. त्यावर काही प्रमाणात कारवाईही होत होती; मात्र शासनाने अचानकपणे वर्ष २०१४ पासून लोकशाहीदिनात केवळ वैयक्तिक तक्रारीच घेणे चालू केले. यामुळे वर्ष २०१४ नंतर फारच थोडे लोक लोकशाही दिनात तक्रारी दाखल करत आहेत, असे आढळून आले आहे. त्यामुळे मी महापालिकेकडे वर्ष २०१४ आणि वर्ष २०१५ मध्ये प्रत्येक मासात प्रविष्ट झालेल्या तक्रारींची माहिती मागवली असून शासनाने लोकशाही दिनात सार्वजनिक विभागाच्या संदर्भातील तक्रारी परत प्रविष्ट करून घेण्यास प्रारंभ करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री. शरद फडके (वय ७६ वर्षे) यांनी केली आहे. (जी गोष्ट एका सामान्य नागरिकाच्या लक्षात येते, ती सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या शासन आणि प्रशासन यांच्या का लक्षात येत नाही ? - संपादक)
     या संदर्भात श्री. फडके पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, वीज, रस्ते, पाणी या संदर्भात वैयक्तिक तक्रार केल्यास त्यावर कोणताच निर्णय होत नसे; मात्र लोकशाहीदिनात याची नोंद तरी घेतली जात. सांगली येथे जकात बंद झाल्यावर अंकली रस्ता येथे जकात नाक्याची इमारत विनाकारण अडथळा करत रस्त्यावर उभी होती. याविषयी महापालिकेच्या लोकशाहीदिनात तक्रार दिल्यावर आयुक्तांनी लगेच ते काढण्यास सांगितले. यामुळे रस्त्यातील एक अनावश्यक अडथळा दूर झाला. अशाच प्रकारच्या समस्या मांडण्यासाठी आता व्यासपीठ उपलब्ध नाही. यामुळे या संदर्भात मी न्यायालयातही जाण्याचा विचार करत आहे.

(म्हणे) रमजानच्या पवित्र मासात (महिन्यात) सर्व धर्मांचे लोक सहभागी होतात !

  • पुण्याच्या आयुक्तांचे रमझानच्या पार्श्‍वभूमीवर मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी हिंदुघातकी वक्तव्य !
  • पुण्यातील अनेक परिसर आज संवेदनशील आणि अतिसंवेदनशील असे गणले जात आहेत. कोंढवा हा मुसलमानबहुल परिसर अनेक गुन्हेगारांचे आश्रयस्थान आहे, हे उघड गुपित आहे. ज्या ठिकाणाची सर्वसामान्यांमध्ये छोटा पाकिस्तान अशी ओळख आहे, त्या ठिकाणाला छोटा भारत असे संबोधून मुसलमानांचे लांगूलचालन करणे आणि हिंदू रमझानमध्ये सहभागी होतात, असे म्हणून त्यांना त्यात अप्रत्यक्षरीत्या सहभागी होण्यास प्रेरीत करणे, हे हिंदुघातकीच होय ! - संपादक
पुणे, ५ जून - कोंढवा हा छोटा भारत असून तेथे सर्व धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने रहातात. रमजानच्या पवित्र मासात (महिन्यात) सर्व धर्मांचे लोक सहभागी होतात, असे हिंदुघातकी मत आयुक्त रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केले. कोंढवा खुर्द येथील सोशल वेल्फेअर फाऊंडेशन आणि कोंढवा पोलीस ठाणे यांच्या वतीने रमजानच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

पुणे महानगरपालिकेत स्टीलचे बाक आणि खांब यांच्या खरेदीत घोटाळा !

  • ६ सहस्र रुपयांच्या बाकांची खरेदी १५ सहस्र रुपयांना
  • भ्रष्टाचाराचे कुरण बनत चाललेल्या स्थानिक स्वराज संस्था !
     पुणे, ५ जून - सध्या शहरातील रस्त्यांवर स्टीलचे खांब, तर रस्त्यांच्या कडेला आणि उद्यानांमध्ये स्टीलचे बाक बसवले जात आहेत. हे स्टीलचे खांब आणि बाक यांच्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. बाजारपेठेत ५ सहस्र रुपयांना मिळणारा बाक पालिकेने १५ सहस्र ८७६ रुपयांना, तर स्टीलच्या खांबाची खुल्या बाजारातील किंमत १ सहस्र ५०० रुपये असतांना ठेकेदारांकडून ते ७ सहस्र ५०० रुपयांना एक याप्रमाणे खरेदी केले आहेत. त्यामुळे या खरेदीत मोठा घोटाळा होऊन पुणे महानगरपालिकेची कोट्यवधींची हानी झाल्याचा आरोप नगरसेवक अविनाश बागवे यांनी केला आहे. (या प्रकरणी संबंधितांवर त्वरित कठोर कारवाई व्हायला हवी. - संपादक)

मुंबई-पुणे महामार्गावर शेडुंगजवळ (रायगड) बस आणि २ कार यांच्या भीषण अपघातात १७ जणांचा मृत्यू

    पनवेल - मुंबई-पुणे महामार्गावर रायगडमधील शेडुंगजवळ बस आणि स्विफ्ट-इनोव्हा या गाड्या यांचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण घायाळ आहेत. ही खाजगी बस सातार्‍याहून मुंबईच्या दिशेने येत असतांना बसचालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर या बसची रस्त्यात उजव्या बाजूला उभ्या केलेल्या इनोव्हा आणि स्विफ्ट या गाड्यांना धडक बसली. अपघातानंतर बससह दोन्ही कार रस्त्याशेजारील शिवारात कोसळल्या. विशेष म्हणजे त्यातील एका गाडीवरील पुढचा आणि मागचा क्रमांक वेगळा आहे.

नगर येथे हिंदु राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांमुळे गोवंशियांना हत्येसाठी नेणार्‍या धर्मांधासह एकाला अटक

शासन गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केव्हा करणार ?
     नगर, ५ जून - हिंदु राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मालवाहू टेम्पोतून १० गोवंशियांना हत्येसाठी घेऊन जाणारा धर्मांध नासिर सय्यद जमीर यासह गंगाराम भालसिंग यांना पोलिसांनी ३१ मे या दिवशी अटक केली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. गोवंशियांना हत्येसाठी नेण्यात येत असल्याचे हिंदु राष्ट्र सेनेचे शहराध्यक्ष परेश खराडे यांना समजले. (गोवंश रक्षणासाठी तत्परतेने प्रयत्न करणार्‍या हिंदु राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! - संपादक) त्यांनी याविषयी पोलिसांना कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांनी वरील कारवाई केली.

भिवंडी येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या आढावा बैठकीला धर्माभिमानी हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

     भिवंडी - येथे २८ मे या दिवशी घेण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेनंतर कार्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीला ४० धर्माभिमानी हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर करण्यात आलेल्या अत्याचारांच्या विरोधात १२ जून या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्याचे एकमताने निश्‍चित करण्यात आले. आंदोलनाचा प्रसार, प्रसिद्धी, पोलीस अनुमती, ध्वनीक्षेपण यंत्रणेची सोय आदी सेवांचे दायित्व अनेकांनी स्वीकारले. तसेच तीन ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची आणि एक ठिकाणी हिंदु धर्मजागृती सभा घेण्याची मागणीही उपस्थितांनी केली.
क्षणचित्रे 
१. बैठकीला उपस्थित असलेल्या महिला पत्रकाराने आंदोलनाला व्यापक प्रसिद्धी देणार असल्याचे सांगितले.
२. बैठकस्थळी संरक्षणासाठी २ पोलीस उपस्थित होते.


स्वा. सावरकर जयंतीचे औचित्य साधून लव्ह जिहाद विषयावरील ध्वनीचित्र-चकतीचे प्रकाशन

ध्वनीचित्र-चकतीचे प्रकाशन करतांना
व्यासपिठावर उपस्थित मान्यवर
     सातारा, ५ जून (वार्ता.) - हिंदु महासभेच्या वतीने शहरातील प्रतापसिंह उद्यानात स्वा. सावरकर जयंतीचा कार्यक्रम पार पडला. या वेळी हिंदु धर्मावर घोंगावत असलेल्या लव्ह जिहादसारख्या भयानक संकटाचे वास्तव प्रदर्शित करणारा लघुपट बेटी भूल ना जाना... याच्या ध्वनीचित्र-चकतीचे प्रकाशन करण्यात आले. 
     या वेळी व्यासपिठावर ज्येष्ठ लेखक जगन्नाथ शिंदे, प्रा. गिरीश बक्षी, हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद गांधी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश निकम, सहकार रत्न श्री. मधुकर पिसाळ, कलारत्न श्री. राजेंद्र शिंगटे, लेखापरीक्षक श्री. कटारीया, श्री. धनराज जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. या लघुपटातील कलाकार श्री. भरत जैन आणि कु. जगताप या कलाकारांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

पाबळ (जिल्हा पुणे) येथे अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारी बस पोलिसांनी पकडली

परराज्यातून होणार्‍या या अवैध धंद्यांना शासन कायमस्वरूपी कशाप्रकारे रोखणार आहे ?
     पाबळ, ५ जून - महाराष्ट्रात गुटखाबंदी असतांनाही मध्यप्रदेश येथून आलेली अवैधरीत्या गुटखा वाहतूक करणारी संजय ट्रॅव्हल्स एजन्सीची लक्झरी बस शिक्रापूर पोलिसांनी १ जूनला कह्यात घेतली. त्या बसच्या टपावर मोठ्या प्रमाणात गुटखा आणि गुटखामिश्रीत पदार्थांची पोती आढळली. त्याचे बाजारमूल्य ५ लाखांहून अधिक रुपये असण्याची शक्यता आहे. या वेळी बसचालकाने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी ट्रॅव्हल्ससह सर्व गुटखा कह्यात घेतला आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागास माहिती दिली; परंतु या विभागाचे कोणीही अधिकारी त्या ठिकाणी फिरकले नाहीत.

(म्हणे) मंदिर संस्थानच्या पैशांतून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना साहाय्य उपलब्ध करून देणे योग्य !

सबनीस यांनी अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळांना देण्यात येणारा 
निधी वापरावा, अशी मागणी कधी केली आहे का ?
डॉ. श्रीपाल सबनीस यांची मुक्ताफळे
     तुळजापूर, ५ जून - दुष्काळ आणि शेती यांविषयी शरद पवारांचे ज्ञान पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा अधिक आहे. त्यामुळेच मोदींपेक्षा पवारांना दुष्काळ जास्त कळतो. तुळजापूर मंदिर संस्थानच्या पैशांतून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना साहाय्य आणि भाविकांना सुविधा उपलब्ध करून देणे योग्य आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. (सबनीस यांनी दुष्काळप्रश्‍नी मंदिरांच्या अर्पणपेटीवर डोळा ठेवण्यापेक्षा सर्वच लोकप्रतिनिधींचे वेतन का नाही मागितले ? प्रभावी हिंदू संघटनाच्या अभावीच सबनीस यांच्यासारखे असे वक्तव्य करण्यास धजावतात. - संपादक) दुष्काळ हाताळणीत सर्वच सत्ताधारी अपयशी ठरले आहेत, असा आरोप करून शेतकर्‍यांच्या मुडद्यावर आपली राजकीय सिंहासने बांधू नका, असेही ते म्हणाले.

जैसलमेरमध्ये स्थानिकांनी पाकिस्तानी हिंदूंच्या झोपड्या जाळल्या !

पाकिस्तानी हिंदूंच्या झोपड्या जाळणार्‍यांना पाकमध्येच पाठवायला हवे !
     जैसलमेर (राजस्थान) - येथील मोहनगडमध्ये रहात असलेल्या पाकिस्तानी हिंदूंच्या झोपड्यांना स्थानिकांनी आग लावल्याची घटना समोर आली आहे. या हिंदूंना नागरिकत्व देण्याच्या नियमात सवलत देण्यात आल्याच्या रागातून ही आग लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात पाकिस्तानी हिंदूंनी त्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. या पाकिस्तानी हिंदूंकडे स्वतःची भूमी नाही, तसेच उत्पन्नाचे साधनही नाही. सध्या ते येथील शेतात मजूर म्हणून काम करत आहेत.

(म्हणे) मंदिरात आक्रमण करणार्‍यांना अटक करा !

मुसलमान आणि वृद्ध महिलांना घेऊन धर्मद्रोही तृप्ती देसाई यांचे कोल्हापूर येथे आंदोलन !
    कोल्हापूर, ५ जून (वार्ता.) - करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरातील गाभार्‍यात दर्शनासाठी जात असतांना मला मारहाण करणार्‍यांना (सीसीटीव्हीतील छायाचित्रण पाहून) अटक करा, तसेच दायित्वशून्यपणाने वागणारे पोलीस आणि पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांना निलंबित करा, या मागण्यांसाठी भूमाता ब्रिगेडच्या धर्मद्रोही तृप्ती देसाई यांंनी बहुसंख्य मुसलमान आणि वृद्ध महिलांना घेऊन ४ जूनला आंदोलनचे पुन्हा एकदा नाटक केले. ६५ ते ७० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या यांतील वृद्ध महिलांना त्या तेथे कशासाठी आल्या आहेत, हेही माहीत नव्हते.

शाळा चालू होण्यास काही दिवस बाकी असतांना सहावीची पाठ्यपुस्तके अनुपलब्ध

शिक्षण विभागाचा कूर्मगतीचा आणि नियोजनशून्य कारभार !
     पुणे, ५ जून - राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार यंदा इयत्ता ६ वीच्या अभ्यासक्रमात पालट करण्यात आला आहे. त्यानुसार एप्रिल मासाच्या अखेरीस सर्व माध्यमांची पाठ्यपुस्तके उपलब्ध होतील, असे बालभारतीने स्पष्ट केले होते; पण शाळा चालू होण्यास जेमतेम काही दिवस राहिलेले असतांनाही इंग्रजी माध्यमांची पुस्तके अजून बाजारात उपलब्ध झालेली नाहीत. (विद्यार्थ्यांसाठी अजूनपर्यंत पुस्तके उपलब्ध न होणे, हे शिक्षण विभागाचे अपयश नव्हे का ? पुस्तके उशिरा होण्यामागील कारणे शोधून त्यातील उत्तरदायींवर शिक्षण विभाग कारवाई करेल का ? तसेच विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करेल का ? - संपादक)

श्री साई संस्थानकडून शासकीय आणि निमशासकीय जिल्हा रुग्णालयांना ५० कोटी रुपयांचा निधी

हिंदूंनो, भक्तांनी अर्पण केलेल्या निधीचा विनियोग सामाजिक 
कार्यासाठी करणे, हा मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम !
     नगर, ५ जून - राज्यातील सार्वजनिक विभागाच्या अखत्यारीतील २४ शासकीय आणि निमशासकीय जिल्हा रुग्णालयांसाठी येथील श्री साई संस्थानने ५० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री रणजीत पाटील यांनीही या वृताला दुजोरा दिला आहे. श्री साई संस्थानने हा निधी देऊ नये, यासाठी २० मे या दिवशी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला होता. संस्थानने ग्रामस्थांचा हा विरोध डावलून जिल्हा रुग्णालयांना निधी देण्याचा घाट घातला आहे. (हिंदूंची शासनाकडे काय पत आहे, हेच यावरून दिसून येते. हिंदूंची पत निर्माण होणे आणि मंदिर सरकारीकरणातून मंदिरे मुक्त होणे, यांसाठी हिंदु राष्ट्रच अपरिहार्य आहे. - संपादक)
    राज्यातील सर्वांत श्रीमंत संस्थान असलेल्या श्री संस्थानने ही देणगी देण्याचे निश्‍चित केल्यामुळे त्यातून रुग्णालयात आधुनिक सोयी-सुविधा, सीटी स्कॅन आणि क्ष-किरण यंत्रे अशी आधुनिक उपकरणे खरेदी करण्याचा विचार आहे.

वीज खंडित केल्याच्या कारणावरून संतप्त नागरिकांकडून महावितरण कार्यालयाची तोडफोड !

     कल्याण, ५ जून (वार्ता.) - वीज खंडित केल्याच्या कारणावरून १ जूनला लोकांनी महावितरण कार्यालयाची तोडफोड केली. या वेळी संतप्त नागरिकांनी आग्रा रस्ता अडवून धरल्याने वाहतुकीचीही कोंडी झाली. येथील काही भागांत सलग २ दिवस रात्री ११ ते ३.३० पर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात आला. याविषयी विचारणा करण्यासाठी नागरिकांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधल्यावर अधिकारी, जनसंपर्क अधिकारी दूरभाष उचलत नव्हते. कर्मचार्‍यांकडून थातुरमातूर उत्तरे दिली जात होती. त्यामुळे हे छुपे भारनियमन असल्याच्या संशयावरून तोडफोड करण्यात आली.


फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, देवतांचा अवमान करणार्‍या अ‍ॅमेझॉनवर बहिष्कार घाला !
     विविध वस्तूंची ऑनलाईन विक्री करणारे अमेरिकेतील संकेतस्थळ अ‍ॅमेझॉनने विक्रीसाठी ठेवलेल्या पायपुसण्यांवर हिंदु देवतांची चित्रे आहेत. ट्विटरच्या माध्यमातून हिंदूंनी अ‍ॅमेझॉनवर बहिष्कार घालण्याची जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Hindu devtayonke chitravale paydan bechnepar Hinduone kiya Amazonka virodh. Twitterpar #BoycottAmazon ka trend.
     Hinduo, Amazonka vyapak bahishkar karo !
जागो !
: हिन्दू देवताआें के चित्रवाले पायदान बेचने पर हिन्दुआें ने किया एमेजॉन का विरोध. ट्विटर पर #BoycottAmazon का ट्रेंड !
     हिन्दुओ, एमेजॉन का व्यापक बहिष्कार करो !

सांगली महापालिकेच्या आयुक्तपदी रवींद्र खेबुडकर !

    सांगली, ५ जून (वार्ता.) - सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या आयुक्तपदी सातारा येथील उपजिल्हाधिकारी रवींद्र खेबुडकर यांची नियुक्ती झाली आहे. मावळते आयुक्त अजिज कारचे यांच्याकडून ते सोमवारी पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. कारचे हे जानेवारी २०१४ मध्ये सांगलीत रुजू झाले; मात्र सातत्याने त्यांच्यावर सत्ताधारी आणि विरोधक यांनी निष्क्रीयतेचे आरोप केले होते.

लोकमान्य टिळकांनी स्वराज्याची घोषणा दिलेले नगरमधील ठिकाण दुर्लक्षित

अशा ऐतिहासिक ठिकाणांकडे शासनाने लक्ष देऊन ती विकसित करावीत, हीच देशप्रेमींची अपेक्षा !
स्वराज्याच्या घोषणेला १०० वर्षे पूर्ण !
     नगर, ५ जून - स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच !, या लोकमान्य टिळक यांच्या सिंहगर्जनेला ३१ मे १९१६ या दिवशी १०० वर्षे पूर्ण झाली. ही सिंहगर्जना टिळकांनी ज्या अहमदनगर इमारत कंपनीच्या आवारामध्ये केली, ते ऐतिहासिक ठिकाण नगरवासीय आणि शासन यांच्याकडून दुर्लक्षित झाले आहे. 
     कापड बाजारात कोहिनूर वस्त्रदालनाच्या मागे इमारत कंपनीने लोकमान्य टिळकांचा पुतळा उभारला आहे. बाजारातील रस्ता अरुंद आहे, तसेच तेथे वाहने उभी केली जातात. फेरीवाले आणि रस्त्यावरील विक्रेते यांनीही तेथे गराडा घातला आहे. त्यातून वाट काढून लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापर्यंत जावे लागते. अनेकांना या पुतळ्याच्या उभारणीचे कारणच ठाऊक नाही. अहमदनगर इमारत कंपनीच्या स्मारक ग्रंथामध्ये या घटनेचा संदर्भ आढळतो.

कोल्हापूर येथे सावरकर जयंतीनिमित्त शोभायात्रा उत्साहात

शोभायात्रेच्या वेळी एकत्रित जमलेले धर्माभिमानी
     कोल्हापूर, ५ जून (वार्ता.) - २७ मे या दिवशी अच्छे दिन आमचेचा नारा देत अखिल भारत हिंदु महासभेचे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची १२३ वी जयंती शाहू महाराजांच्या कर्मभूमीत यंदा प्रथमच शोभा यात्रेच्या माध्यमातून साजरी करण्यात आली. 
      १०० सावरकरप्रेमींनी हिरवा झेंडा दाखवून शोभा यात्रेचा प्रारंभ केला. हिंदु महासभेचे राज्य उपाध्यक्ष संजय कुलकर्णी, राज्य सदस्य राजेश मेथे, विभागीय कार्यवाह मारुती मिरजकर, शहराध्यक्ष मनोहर सोरप, महिला अध्यक्षा निशा जाधव यांनी सर्व मान्यवरांचे आदराने स्वागत केले.

बारावीच्या परीक्षेत अपप्रकार करणार्‍या ७४१ विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास बंदी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा स्तुत्य निर्णय !
पुणे विभागातील ४४ विद्यार्थ्यांना परीक्षाबंदी
     पुणे, ५ जून - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०१६ मध्ये १२ वीची परीक्षा घेण्यात आली होती. गेली काही वर्षे परीक्षा कालावधीतील अपप्रकार अल्प व्हावेत, यासाठी गैरमार्गाशी लढा हे अभियान राज्य मंडळाने चालू केले आहे. असे असले, तरी या वर्षी १२ वीच्या परीक्षेच्या कालावधीत राज्यात एकूण ७२९ अपप्रकारांची नोंद राज्य मंडळाने केली आहे. (शिक्षण मंडळाने चालू केलेल्या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तसेच अशा अपप्रकारांना आळा घालण्यासाठी मंडळाने विद्यार्थ्यांसाठी कडक शिक्षापद्धतीही अवलंबायला हवी, तसेच नैतिकतेचे धडे द्यायला हवेत. - संपादक) या अपप्रकारातील एकूण ७४१ विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी बंदी घातली आहे. पुण्यात या वर्षी ४९ अपप्रकार उघड झाले असून त्यांतील ४४ विद्यार्थ्यांवर विभागीय मंडळाने कारवाई केली आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागणार आहे.

राजकीय हस्तक्षेपामुळे प्रशासन अपयशी ! - माधव गोडबोले, माजी केंद्रीय सचिव

     पुणे, ५ जून - प्रशासनातील राजकीय हस्तक्षेपामुळे दिवसेंदिवस प्रशासकीय यंत्रणा अपयशी होत चालल्याची टीका माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि विश्‍वकर्मा प्रकाशन यांच्या वतीने निवृत्ती सनदी अधिकारी राम प्रधानलिखित बियाँड एक्स्पेक्टेशन्स या पुस्तकाचे प्रकाशन शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी श्री. गोडबोले बोलत होते.

पुलगाव दारूगोळा भांडारामधील आगीची कारणमीमांसा आणि धडा !

ब्रिगेडियर हेमंत महाजन
      महाराष्ट्र्रातील वर्धा जिल्ह्यामधील पुलगाव येथे असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या दारूगोळा भांडारामध्ये लागलेल्या आगीमध्ये दोन अधिकार्‍यांसह २० जणांना प्राण गमवावे लागले आहे. देशाच्या संरक्षणसिद्धतेच्या दृष्टीने ही दुर्घटना अत्यंत चिंतेची आहे. या दुर्घटनेच्या निमित्ताने देशभरात इतरत्र जी सैन्याची दारूगोळ्याची भांडारे आहेत, त्या सर्वांचेच एकदा सेफ्टी ऑडिट करून घेणे आवश्यक आहे. त्यातून भविष्यातील दुर्घटना टाळण्यास साहाय्य होईल. 
१. सर्व व्यवस्था आणि सुरक्षेसंदर्भातील काळजी घेतलेली 
असूनही आग का लागली ? हा प्रश्‍न ! 
     देशाची संरक्षणसिद्धता वाढवण्यासाठी गेल्या काही मासांपासून सकारात्मक प्रयत्न होत असतांना, आधुनिकीकरणाला चालना देण्याचा प्रयत्न होत असतांनाच ही एक मोठी दुर्घटना घडली आहे. आपल्याकडे भारतीय सैन्य युद्धपरिस्थितीसाठीची सिद्धता म्हणून ३० ते ४० दिवस पुरेल इतका दारूगोळा साठवून ठेवत असते. हा साठा वेगवेगळ्या ठिकाणी असतो. अशा प्रकारचे दारूगोळ्यांचे काही डेपो हे सीमावर्ती भागातही आहेत. काही भांडारे ही देशाच्या मध्यभागी आहेत; तर काही इतर ठिकाणी आहेत.

मुसलमानांना छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशवे यांच्याप्रमाणे उत्तर द्या !

     वर्ष ७१२ मध्ये मुसलमानांचा मीर कासीमच्या रूपाने पहिला पाय आपल्या भारतभूमीला लागला. तेव्हापासून आजवर त्यांनी हिंदू, हिंदुत्व नि हिंदुस्थानची वाट लावण्याचा कोणता प्रकार शिल्लक ठेवलाय ? इतिहासकाळात मुसलमानांनी एक कोटी हिंदूंना कापून काढले, तर तीन कोटी हिंदूंना बाटवून मुसलमान केले. त्यांची पुढे गुणाकाराने वाढ होऊन आजमितीला भारत, बांगलादेश नि पाकिस्तान यांची एकूण लोकसंख्या तीस कोटींवर जाऊन पोचली आहे.
      पाकिस्तान, बांगलादेश निर्हिंदू करण्यात तेथील मुसलमानांना यश लाभले आहे. भारतातील काश्मीर खोरेही निर्हिंदू होत आले आहे. ते कसे झाले ? त्याचे काय ?
     गेल्या साठ वर्षांत मुसलमान आतंकवाद्यांनी काश्मीरसह भारतभरातून ठिकठिकाणी मिळून किती हिंदूंची हत्या केली ?
    अशा स्थितीत, परमसहिष्णू, अनाक्रमक हिंदूंनी मुसलमानांशी कसे वागावे ? त्याचे उत्तर देता येईल की, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवराय अन् पहिले चार पेशवे मुसलमानांशी वागले तसे ! असे वागणे जर हिंदूंना जमत नसेल, तर मग हिंदूंचे, हिंदुत्वाचे आणि हिंदुस्थानचे भवितव्य काय ? सर्वनाशाकडे वाटचाल !
- आपला एक ज्येष्ठ हिंदु नागरिक, द.स. हर्षे, (वय ८७ वर्षे) स्वातंत्र्यसैनिक आणि हिंदु राष्ट्रसेवक (संदर्भ : मासिक स्वातंत्र्यवीर दीपावली २००६)

अधिकोषांच्या विलिनीकरणाला विरोध का ?

     देशातील सार्वजनिक क्षेत्रातील अग्रणी स्टेट बँक ऑफ इंडियाचे अन्य ५ सहयोगी आणि १ महिला स्टेट बँक विलिनीकरणाचा प्रस्ताव मुख्य स्टेट बँकेच्या संचालिका अरुंधती रॉय यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे मांडला आहे. या ५ सहयोगी अधिकोषांची नावे अशी आहेत - स्टेट बँक ऑफ बिकानेर अ‍ॅण्ड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाळा व स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि भारतीय महिला बँक. सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाला ५ सहस्र कोटी रुपयांहून अधिक रुपयांचा तोटा झाला आहे. हा तोटा ६६ प्रतिशत झाल्याचेही रॉय यांनी सांगितले. या पार्श्‍वभूमीवर स्टेट बँक विलिनीकरणाचा प्रस्ताव हा कितपत योग्य ठरणार आहे, हे येणारा काळच सांगू शकतो.

वाचकांच्या विशेष मागणीवरून बालवाचकांसाठीचे नियमित सदर !

बालकांसाठी परिपाठ !
     उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत बालवाचकांसाठी सुट्टीतील परिपाठ ! हे सदर प्रसिद्ध करण्यात आले. यातून विविध बोधकथा, लेख आदी माध्यमांतून सुसंस्कार आणि चांगल्या सवयी यांविषयी माहिती दिली गेली. आता सुट्टीचा कालावधी संपत आला असला, तरी वाचकांच्या विशेष मागणीवरून हे सदर नियमित प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हे सदर हिंदु राष्ट्राच्या भावी पिढीची जडणघडण होण्यास साहाय्यभूत ठरो, अशी श्रीगुरूंच्या चरणी प्रार्थना !
दूरचित्रवाणीचे दुष्परिणाम
    दूरचित्रवाणीचे लाभ अल्प आणि दुष्परिणामच अधिक आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? नाही ना ? मग हे दुष्परिणाम कोणते ते पुढील लेखात पाहूया !

३ वेळा तलाक देण्याच्या प्रथेच्या विरोधात गोव्याचे उदाहरण आदर्श !

     इस्लाममधील शरीयातील नियमांनुसार, ३ वेळा तलाक म्हणून देता येणारा घटस्फोट आणि बहुपत्नीत्व हे अत्यंत जाचक ठरत आहे, असे मुसलमान महिलांचे मत आहे. यासंदर्भात समान नागरिक कायदा लागू करणे अत्यंत आवश्यक असून गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे, जेथे हा कायदा लागू आहे. त्यामुळे गोव्याचा हा आदर्श सर्व राज्यशासनांनी आणि केंद्रशासनाने घेणे आवश्यक आहे. या प्रकरणांची एकूण पूर्वपीठिका मांडून इकॉनामिक टाईम्सचे सल्लागार संपादक स्वामीनाथन एस्. अंक्लेसरिया अय्यर यांनी या विषयाचा मागोवा घेतला आहे. ३ एप्रिल २०१६ या दिवशी टाइम्स ऑफ इंडियाच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या त्यांच्या लेखातील काही निवडक सूत्रे येथे देत आहोत.

जन्माने ख्रिस्ती असूनही स्वतःचे हिंदु मूळ जाणून हिंदु धर्माप्रमाणे आचरण करणारे सनातन प्रभातचे एक वाचक !

     २२ फेब्रुवारी २०१६ ला आम्ही उसकई (गोवा) येथील इंग्रजी पाक्षिक सनातन प्रभातच्या एका अन्य पंथीय वर्गणीदाराकडे अंकाच्या नूतनीकरणासाठी गेलो होतो. त्यांच्याशी बोलतांना एका हिंदू बांधवाशी बोलत आहे, असे वाटत होते. ते अनेक वर्षांपासून सनातन प्रभातचे वाचक आहेत. त्यांनी भगवद्गीता पूर्ण वाचली असून ते हिंदु धर्माचे अभ्यासक आहेत. त्यांना खंत वाटते की, ते ख्रिस्ती कुटुंबांत जन्माला आले. आई-वडिलांनी चर्चमध्ये नेऊन बाप्तिस्मा केला म्हणून मी ख्रिस्ती झालो. मला जर पर्याय दिला असता, तर मी नक्की हिंदू झालो असतो. मी मांसाहार करत नाही. मी माझ्या मुलांना सांगितले आहे की, माझा मृत्यू झाल्यावर माझे शरीर दफन न करता दहन करावे जेणेकरून मला पंचमहाभूतात विलीन होता येईल, असे ते सांगतात. त्यांच्या मुलीनेही तिच्या घरात श्री गणेशाची मूर्ती ठेवायचे ठरवले आहे. त्यांनी त्यांच्या मुलांनाही धर्माच्या संदर्भात पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्यांचे हे विचार ऐकले, तर ख्रिस्ती बांधव त्यांना धर्मांतरित समजतील, असे त्यांना वाटते. माझा पिंड हिंदू आहे. माझे कूळ च्यारी आहे आणि विश्‍वकर्मा माझे आराध्यदैवत आहे, असे ते सांगतात.
- एक साधिका, गोवा.चला आपण सारे मिळून शेण खाऊ !

     महाराष्ट्रात सध्या सैराट हा चित्रपट गाजत आहे; परंतु जनतेच्या मन:पटलावर या चित्रपटाने उद्धृत केलेली विचारधारा ही महान भारतीय संस्कृतीशी विसंगत, कुटुंबद्रोही आणि पर्यायाने हिंदुद्रोहीच आहे. सदर चित्रपटाने वयात येणार्‍या युवक-युवती शाळेत असतांनाच त्यांना होणार्‍या कथित प्रेमाला प्रोत्साहन देऊन, ते कसे योग्य आहे हे रोचक पद्धतीने रंगवून सांगितले आहे. या चित्रपटाचे होणारे दूरगामी परिणाम जनतेचे अतोनात हाल करणार, हे निश्‍चित आहेच, परंतु बीड, अंबड आदी शहरांमध्ये चित्रपटाचे भयावह परिणाम आताच दिसू लागले आहेत. 
      या चित्रपटातून होणारा परिणाम सदर लेखाद्वारे उपरोधिकरित्या मांडण्यात आला आहे. पत्रकार आणि लेखक डॉ. संजय कळमकर यांनी हा लेख लिहिला असून आम्ही वाचकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

    भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
     धर्मशिक्षणाच्या अभावी धर्माचरण आणि धार्मिकता म्हणजे काय, हेही हिंदू विसरले. त्यामुळे बहुतेक सर्व केवळ जन्महिंदू झाले. कर्महिंदू फारच थोडे उरले. परिणामी हिंदु धर्माच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला. - परात्पर गुरु डॉ. आठवले

दंगलीसाठी निमित्त शोधणारे धर्मांध !

     मुदखेड (नांदेड) येथे दिवाळीत फटाका अंगावर उडाल्याचा कांगावा करत धर्मांधांनी अल्ला हो अकबरच्या घोषणा देत श्री दुर्गादेवीच्या मंदिरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. या दगडफेकीत महिलांसह ५ जणांची डोकी फुटली. तणाव निवळण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. 
(संदर्भ : दैनिक सामना, २९.१०.२०१४)
     स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्वाचे विचार आणि लोकमान्य टिळक यांचे सर्वसमृद्ध ज्ञान यांची हिंदूंना आवश्यकता आहे ! - कै. मिलिन्द गाडगीळ, ज्येष्ठ युद्धपत्रकार

सनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक संस्थेची अपकीर्ती करणार्‍या प्रसारमाध्यमांची पीत पत्रकारिता समाजाला कधीतरी दिशा देईल का ?

 
   पीत पत्रकारिता म्हणजे वस्तूनिष्ठ वार्तांकन न करता लोकांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी सनसनाटी वृत्ते प्रसारित करणारी, नैतिकतेला धरून नसणारी, खप वाढवण्यासाठी खोटी वृत्ते प्रसारित करणारी पत्रकारिता होय !
     १ जून २०१६ या दिवशी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) सनातनचा देवद (पनवेल) येथील आश्रम, सनातन संकुलातील एक साधकाचे निवासस्थान आणि पुणे येथील एका साधकाचे निवासस्थान यांची झडती घेतली. या संदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाने काही घोषित करण्यापूर्वीच आम आदमी पक्षाचे नेते आणि कथित पत्रकार आशिष खेतान यांनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती याच सहभागी असल्याचे ट्विट केले !
     सीबीआयने घातलेल्या छाप्याच्या घटनेचे वार्तांकन करतांना दैनिक सामना, दैनिक वार्ताहर आणि एखाद-दुसर्‍या सन्माननीय दैनिकाचा अपवाद वगळता दैनिक सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, पुढारी, तरुण भारत, पुण्यनगरी आदी वृत्तपत्रांनी, तसेच काही वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणाची कोणतीही शहानिशा न करता केवळ आशिष खेतान यांच्या ट्विटच्या आधारे सनातनला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न केला. वरील घटनेचे वृत्त प्रसारित करतांना वरील वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांनी सनातन संस्थेवर सीबीआयचे छापे डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी सनातन तपासात पुढचे पाऊल, हत्येचा कट पनवेलमध्ये शिजला ? अशा प्रकारचे कपोलकल्पित, तथ्यहीन आणि आधारहीन वृत्ते प्रसारित करून सनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक संस्थेची नाहक अपकीर्ती केली.

कलियुगातील मानवाला निष्काम कर्मयोगाद्वारे सत्ययुगात नेणारे अवतारी पुरुष परात्पर गुरु डॉक्टर जयंत बाळाजी आठवले !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ... 
       देवद आश्रमात वास्तव्यास असलेले सनातनचे थोर संत प.पू. पांडे महाराज यांनी प.पू. डॉक्टरांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या अवतारी कार्याचे महत्त्व विशद केले आहे. या लेखांतून त्यांनी भगवंताने केलेली सृष्टीची सुंदर व्यवस्था, काळाच्या प्रभावामुळे त्यात होत गेलेली स्थित्यंतरे, धर्मग्लानीची अवस्था असल्याने हिंदूंची झालेली दयनीय स्थिती, इतर पंथियांचे हिंदु धर्मावरील वाढते आक्रमण यांविषयीचा उहापोह केला आहे. अशा काळाच्या पार्श्‍वभूमीवर धर्मग्लानी दूर करण्याचे ईश्‍वर नियोजित कार्य प.पू. डॉक्टरांकडून कशा प्रकारे केले जात आहे, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने कसे मार्गक्रमण होत आहे, याचे अत्यंत सुंदर आणि अभ्यासपूर्ण वर्णन त्यांनी केले आहे.
       या भागात आपण प.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याचा आरंभ कसा झाला ? त्यांनी हिंदु धर्मातील महान धर्मशास्त्र कसे उलगडून सांगितले ? समाजाला आणि साधकांना सात्त्विकतेचा लाभ करून घेण्यास कसे शिकवले ?, तसेच त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण आणि सर्वांगस्पर्शी कार्य यांविषयी पहाणार आहोत.

नाशिक येथील सिंहस्थपर्वात भिंतींवर चैतन्यमय आध्यात्मिक लिखाण करतांना प.पू. गुरुदेवच सर्व सेवा करून घेत असल्याविषयी आलेल्या अनुभूती आणि अन्य कटू-गोड अनुभव !

      अकस्मात् नाशिक येथे सिंहस्थपर्वाच्या सेवेला जाण्याचे ठरले. एवढा दूरचा प्रवास करूनही मला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. देवाने सर्वतोपरी काळजी घेतली. सिंहस्थपर्वाच्या निमित्ताने अध्यात्म आाणि धर्म प्रसार होण्यासाठी शहरातील भिंतीवर आध्यात्मिक माहिती लिहिण्याची सेवा माझ्याकडे होती. प्राणशक्ती अल्प असूनही शिडीवर चढून अक्षरे रंगवण्याची ही सेवा देवानेच करून घेतली. या वेळी आलेले अनुभव आणि अनुभूती पुढे देत आहे.
१. समाजातून 
मिळालेला सकारात्मक प्रतिसाद 
श्री. रामानंद परब
 १ अ. भिंंतीवर सहजतेने लिखाण करता येणे, लिखाण पाहून लोकांनी थांबून कौतुक करणे आणि स्वतःच्या घराच्या भिंतीवर लिखाण करण्याचा आग्रह करणे : साधारण १४ वर्षांनी मी ब्रश हातात घेतले असूनही भिंंतीवर लिहितांना अक्षरे सहजतेने काढली जात होती. जणू काही देवच माझा हात पकडून अक्षरे काढत आहे, असे जाणवायचे आणि भिंत पूर्ण झाल्यावर आपण ती रंगवलीच नाही, असे वाटायचे. सहसाधक विचारायचे, एवढ्या सहजतेने अक्षरे कशी काढता येतात ? त्या वेळी कृतज्ञताभाव जागृत व्हायचा; कारण सर्वकाही प.पू. गुरुदेवच करून घेत होते. मला त्या वेळी शिडीवर चढणे, तर दूरच. बोटात आणि हातातही पुरेशी शक्ती नव्हती, तरीही दिवसभर ११ ते १४ घंटे शिडीवर उभे राहून ही सेवा होत होती. मला काहीच कळत नव्हते. सेवेत पुष्कळ आनंद मिळत होता. येणारे-जाणारे लोकही थांबून पहायचे. कौतुक करायचे आणि विचारायचे, तुम्ही व्यावसायिक कलाकार (कर्मशियल आर्टिस्ट) आहात का ? आम्ही सांगायचो, आमच्यापैकी कुणीही व्यावसायिक कलाकार नाही. आम्ही ही सेवा साधना म्हणून करतो. ते म्हणायचे, तुम्ही व्यावसायिक नसून एवढे चांगले कसे लिहू शकता ? त्या वेळी ही देवाची सेवा आहे. त्यामुळे देवच सर्व करून घेत आहे, असे आम्ही सांगायचो. ते थक्क व्हायचे. काही जण आमच्याही भिंतीवर ही माहिती लिहा, असे सांगायचे. काही जण स्वतःहून साहाय्य करायचे. आम्ही काही वेळा रंगाचे साहित्य घेऊन रहात्या ठिकाणाहून दूरवरच्या भिंतीकडे गेलो की, साहित्य ने-आण करणे कठीण व्हायचे. त्या वेळी तेथील लोक स्वतःहून आमचे साहित्य आपल्या घरात ठेवून घ्यायचे.

समजूतदार, हिंदु धर्माचा अभिमान असलेली आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कोट्टयम्, केरळ येथील कु. पार्वती तंगच्चन् (वय १३ वर्षे)

कु. पार्वती तंगच्चन्
१. शांत आणि समजूतदार
       कु. पार्वती पुष्कळ शांत स्वभावाची आहेे. तिच्या वयाच्या अन्य मुलांपेक्षा ती वेगळी आणि समजूतदार वाटते. ती स्वावलंबी असून ७ - ८ वर्षांच्या तिच्या दोन लहान भावंडांना व्यवस्थित संभाळते.
२. हिंदु धर्माविषयी अभिमान
       पार्वतीला अधिक सत्संग मिळाला नसूनही तिचे साधना आणि हिंदु धर्म यांविषयीचे दृष्टीकोन सुस्पष्ट आहेत. तिला हिंदु धर्माप्रती पुष्कळ अभिमान आहे.
२ अ. धर्मद्रोही बोलण्याला विरोध करणे : कुणी हिंदु धर्माविरुद्ध बोलत असले, अगदी तिच्या शाळेत असो किंवा अन्य कुठेही, ती त्या बोलण्याला विरोध करते. अगदी लहान असल्यापासून तिच्यात हा गुण दिसून आला.
२ आ. ख्रिस्ती गाणी म्हणू न देणे : एकदा शेजारी रहाणारी एक हिंदु मुलगी घरी येऊन तिच्या लहान भावंडांशी खेळत होती. तेव्हा ती मुलगी ख्रिस्ती गाणी म्हणत होती. पार्वतीने लगेच तिला ते म्हणण्यापासून थांबवले. याचे कारण असे होते की, ख्रिस्ती गाणी ऐकून स्वतःच्या भावंडांवर त्यांचा परिणाम होऊ नये.
- कु. सुखटणकर, केरळ (३०.८.२०१५)

आपल्या कृतीतून साधकांना सदोदित शिकवणारे सनातनचे संत !

पू. नंदकुमार जाधव 
पू. नंदकुमार जाधव
अ. पू. स्वातीताईंनी सेवेसाठी येणार्‍या पू. जाधवकाकांना विश्रांती घेण्यास सांगितल्यावर त्यांनी त्वरित आज्ञापालन करणे : पू. जाधवकाकांना एक दिवस पुष्कळ ताप आला होता. काही घंट्यांनी थोडे बरे वाटल्यावर त्यांनी सेवेला जाण्याची सिद्धता केली. त्याच वेळी पू. स्वातीताईंनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भ्रमणभाष केला. ते सेवेसाठी येत आहेत, असे कळल्यावर पू. ताईंनी पूर्ण विश्रांती घ्या. सेवेला यायला नको, असे पू. काकांना सांगितले. नंतर पू. काका लगेच विश्रांतीला गेले.
आ. साधकांचा वेळ जाऊ नये, यासाठी प्रयत्न करणे : पू. जाधवकाका दुपारची विश्रांती न घेता अविरत सेवा करत. त्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे. अधिक चालायचे नाही; म्हणून त्यांना खोलीतून सेवेच्या ठिकाणी जाण्यासाठी चारचाकी गाडीची व्यवस्था केली होती. त्या वेळी पू. काका पूर्ण सिद्धता करून झाल्यावरच वाहन आणण्याच्या संदर्भात संपर्क करत. साधकांचा वेळ जाऊ नये, यासाठी ते पुरेपूर प्रयत्न करत.

आईकडे साधक म्हणून पाहून तिला साधनेचे दृष्टीकोन देणारी आणि स्वतःच्या साधनेत उच्च ध्येय ठेवणारी कु. अमृता मुदगल (वय १२ वर्षे) !

कु. अमृता मुदगल
१. तातडीची सेवा असतांना 
तहानभूक विसरणारी कु. अमृता !
मी : जेवलीस का ?
अमृता : मी आज अल्पाहार केला नाही आणि जेवलेही नाही.
मी : का ?
अमृता : तातडीची सेवा होती. जेवणात वेळ जाईल; म्हणून नाही जेवले. सेवा करतांना नामजप आणि प्रार्थना होतात. त्यामुळे भुकेची जाणीव होत नाही. मी लहान आहे; पण पू. (सौ.) बिंदाताईही सेवेमुळे काही वेळा जेवत नाहीत. त्या सतत सेवेत असतात. त्यांच्यासारखे होण्यासाठी देव लहान लहान प्रयत्न करून घेत आहे.
२. ध्येय मोठे ठेवून ते प.पू. डॉक्टरांच्या 
चरणी अर्पण करायचे, असे सांगणारी कु. अमृता !
        अमृता सेवा करतांना सतत ध्येय ठेवते. दोन मासांत कोणते दोष घालवणार ?, असे ध्येय ठेवते. ध्येय मोठे ठेवायचे आणि ते ध्येय प.पू. डॉक्टरांच्या चरणी अर्पण करायचे, असे ती सांगते. तिला रात्री झोपायला कितीही विलंब झाला, तरी ती डोळे मिटून क्षमायाचना करूनच झोपते.

रामनाथी आश्रमात प्रसिद्ध गायक श्री. उदयकुमार उपाध्ये यांच्या गीतरामायण गायनाच्या स्वरसोहळ्यात साधकांची झाली भावजागृती !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत विभागाने प्रथमच केले आयोजन
डावीकडून तबल्यावर साथ देतांना गिरीजय प्रभुदेसाई, श्री. शैलेश बेहेरे, कु. स्नेहल खारवटकर, गातांना श्री. उदयकुमार उपाध्ये, कु. तेजल पात्रीकर, सौ. श्रेया साने, सौ. सायली करंदीकर आणि श्री. रामचंद्र च्यारी
     फोंडा - सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात प्रसिद्ध गायक श्री. उदयकुमार उपाध्ये यांच्या गीतरामायणाचा कार्यक्रम झाला. प्रभु श्रीरामचंद्र वनवासात जातांनाचा प्रसंग, श्रीराम-भरत भेट, रावणवध आदी गीत रामायणातील प्रसंगांवर आधारित गीतांमुळे उपस्थित साधकांची भावजागृती झाली.
      सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या संकल्पाला गीतरामायणातील दैवी स्पंदनांचे बळ लाभावे, यासाठी आनंद संप्रदायाचे आद्य प्रवर्तक परमगुरु श्री सदानंदस्वामी यांच्या आज्ञेने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्यांच्या माध्यमातून परमगुरु श्री सदानंदस्वामी मार्गदर्शन करतात, ते पुणे येथील संत प.पू. नरसिंह उपाख्य आबा उपाध्ये, त्यांच्या धर्मपत्नी सौ. मंगला उपाध्ये यांची वंदनीय उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. या वेळी प.पू. आबा यांचे चिरंजीव आणि प्रसिद्ध गायक श्री. उदयकुमार उपाध्ये आणि त्यांच्या शिष्या कु. स्नेहल खारवटकर यांनी गीतरामायणातील गीते सादर केली. या वेळी सनातनच्या संत पू. (सौ.) अंजली गाडगीळ, पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. डॉ. मुकुल गाडगीळ हे उपस्थित होते. या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले हेही काही काळ कार्यक्रमाला उपस्थित होते. या वेळी सनातनचे साधक श्री. गिरीजय प्रभुदेसाई यांनी तबला, श्री. शैलेश बेहेरे यांनी टाळ, तसेच श्री. रामचंद्र च्यारी यांनी संवादिनीवर गायकांना साथ केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधिका कु. तेजल पात्रीकर यांनी केले. गीते गातांना श्री. उपाध्ये यांनी त्यांविषयी अनेक पैलू उलगडले, तसेच अनेक आठवणीही सांगितल्या.

नैवेद्यावर अनिष्ट शक्तींनी माशांच्या माध्यमातून आक्रमण करणे आणि पूजा अन् वैश्‍वदेव केल्यानंतर पुष्कळ थकवा आल्याने २ घंटे झोपून रहावे लागणे

        २३.८.२०१४ या दिवशी मी ध्यानमंदिरात पूजेसाठी पंचामृत करण्याची सेवा करत होतो. त्यासाठी मी एका पितळी वाटीत दूध, मध, तूप आणि साखर काढली होती. मी दही घेऊन आल्यानंतर मला वाटीत एक मोठ्या आकाराची माशी मरून पडलेली दिसली. त्यानंतर काही क्षणातच अजून एक मोठी माशी वाटीच्या तळातून वर येऊन पृष्ठभागावर तरंगू लागली.
        २५.८.२०१४ या दिवशी ध्यानमंदिरात सकाळी ६ वाजता लादीवर ७ - ८ माश्या दिसल्या. एक माशी तीर्थाच्या झाकलेल्या कमंडलूूच्या आत पडली होती. त्या वेळी आणि रात्रभरही ध्यानमंदिराच्या खिडक्या आणि दार बंद होते. पूजा करतांना आणि त्यानंतर वैश्‍वदेव केल्यानंतर पुष्कळ थकवा आल्याने मला २ घंटे झोपून रहावे लागले.
- वेदमूर्ती श्री. केतन शहाणे, अध्यापक, सनातन साधक-पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.८.२०१४)

प.पू. आबा उपाध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती

प.पू. आबा उपाध्ये
१. प.पू. आबा उपाध्ये यांच्या ठिकाणी श्री रामकृष्ण परमहंस यांचे दर्शन होणे : १.६.२०१६ या दिवशी प.पू. आबा उपाध्ये यांचे रामनाथी आश्रमात आगमन झाले. तेव्हा ते आसंदीवर (खुर्चीवर) बसले होते. तेव्हा मला त्यांच्या तोंडवळ्याच्या (चेहर्‍याच्या) ठिकाणी भावावस्थेचे सगुण रूप असलेले श्री रामकृष्ण परमहंस यांचे दर्शन झाले. काही क्षण मला आजूबाजूला काय आहे, याचे भान राहिले नाही आणि माझे मन वेगळ्याच विश्‍वात गेले.
२. प.पू. आबा उपाध्ये हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वडिलांप्रमाणे दिसणे : २.६.२०१६ या दिवशी प.पू. आबा उपाध्ये हे आश्रमदर्शन करत असल्याचे पाहिले. तेव्हा ते मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील पू. बाळाजी आठवले यांच्याप्रमाणे दिसले.
- डॉ. (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.६.२०१६)

प.पू. आबा, कृतज्ञ आम्ही तव चरणांवरी ।

मुखकमल हे जैसे खुले चंद्रमा ।
नखशिखांत लीनता आपुल्या लोचना ॥ १ ॥
मधुर-मधुर आपुली वाणी ।
हास्य जैसे उमले कमलीनीदली ॥ २ ॥
सदैव विनम्र असता आपण ।
कैसे करावे ते शब्दांकन ॥ ३ ॥
साधकांचे तुम्हा कौतुक भारी ।
आम्हावरील तुमची प्रीतीच न्यारी ॥ ४ ॥
जरी असता करी तुमच्या दिव्य शक्ती ।
न ढळली कधी तुमची गुरुभक्ती ॥ ५ ॥
आज मी धन्य-धन्य जाहले ।
याची डोळा हे मनोहर रूप पाहिले ॥ ६ ॥

चंद्रपूर येथील कु. वैष्णवी लिमजे हिला सीबीएस्ई बोर्डाच्या १० वीच्या परीक्षेत ८४.८० प्रतिशत गुण !

    
कु. वैष्णवी लिमजे
चंद्रपूर - येथील सनातनचे साधक श्री. शेखर लिमजे यांची कन्या कु. वैष्णवी हिला सीबीएस्ई बोर्डाच्या १० वीच्या परीक्षेत ८४.८० प्रतिशत गुण मिळाले. ती प्रासंगिक सेवा, तसेच नियमितपणे नामजप करते. प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच हे यश मिळाल्याचे तिने सांगितले. भविष्यात प्राध्यापक होण्याचा मानस तिने व्यक्त केला.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल अमावास्या झाली.

सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ यांची अद्ययावत सूची प्रसारासाठी उपलब्ध !

साधकांना सूचना
     सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित केलेले सर्व ग्रंथ आणि लघुग्रंथ यांच्या ए ४ आकारातील अद्ययावत सूची प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या सूची दोन प्रकारांत उपलब्ध आहेत.
१. प्रकार १ : ही सूची केवळ मराठी भाषेतील ग्रंथांची आहे. यामध्ये ग्रंथांच्या नावापुढे केवळ पृष्ठसंख्या आणि मूल्य दिले आहे.
२ प्रकार २ : ही सूची मराठीसह अन्य सर्व भाषांतील ग्रंथांची आहे. या सूचीमध्ये ग्रंथ कोणकोणत्या भाषेत उपलब्ध आहे, हे देण्यात आले आहे.
     या दोन्ही सूची नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. साधकांनी ग्रंथप्रदर्शने, वाचनालये आदी सुयोग्य ठिकाणी आवश्यकतेनुसार योग्य प्रकारची सूची अधिकाधिक उपयोगात आणावी आणि धर्मशिक्षण देणारे ग्रंथ समाजात पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत.

पालटलेला नामजप करण्याच्या संदर्भातील महत्त्वाची सूचना

     १.६.२०१६ या दिवसापासून सर्वांनी करावयाच्या उपायांमध्ये पालट झाला आहे. त्यामध्ये म्हटले आहे - जाता-येतांना किंवा उपाय करण्याची आवश्यकता असल्यास ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ । हा जप करावा आणि तो होत नसल्यास ॐ नमो भगवते वासुदेवाय । हा जप करावा तसेच महर्षींनी सांगितलेला ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव । हा जपही अधिकाधिक करावा. त्यानुसार साधकांनी श्रीकृष्णाचा आणि महर्षींनी सांगितलेला जप साधारण सम प्रमाणात होईल, असे पहावे. शक्य असल्यास ते दोन्ही जप एक-आड-एक करू शकतो.

पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासंबंधी लघुचलचित्रांच्या (Videos) प्रसारणाचे नियोजन करा !

साधकांना आणि कार्यकर्त्यांना सूचना
     १९ जून ते २५ जून २०१६ या कालावधीत रामनाथी, फोंडा, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात प्रतिदिन होणार्‍या कार्यक्रमाचे आणि हिंदुत्ववाद्यांच्या संकलित मार्गदर्शनांचे ५ मिनिटांचे २ आणि १५ मिनिटांचे २ असे ४ लघुचलचित्र प्रतिदिन बनवण्यात येणार आहेत. या लघुचलचित्रांचे प्रसारण स्थानिक दूरचित्रवाहिन्यांवर करण्याचे नियोजन साधकांनी करावे. तसे नियोजन झाल्यावर त्याची नोंद गूगल स्प्रेडशीटमध्ये १०.६.२०१६ पर्यंत करावी. ही शीट संबंधित प्रसिद्धी समन्वयकांना शेअर केली आहे. यात काही अडचण असल्यास श्री. अमोल घाडगे (९४२२०२९२५७) किंवा सौ. विद्या शानभाग (८४५०९०६३८८)या क्रमांकांवर संपर्क करावा.

पोलिसांच्या नाहक छळाला बळी पडलेल्या निरपराध नागरिकांनी आपले अनुभव सनातन प्रभातला कळवावेत !

     पोलिसांनी गुन्हेगार म्हणून पकडलेले ९१ टक्के आरोपी निर्दोष सुटतात, असे गुन्हे अन्वेषण विभागाने प्रकाशित केलेल्या महाराष्ट्रातील गुन्हे २०१० या अहवालातून उघड झाले आहे. यावरून असे लक्षात येते की, भारतातील पोलिसांनी अशा लाखो निरपराध नागरिकांना गुन्हेगार ठरवून त्यांचा छळ केलेला असतो. निष्पाप असूनही पोलिसांचा छळ अनुभवणार्‍या नागरिकांनी त्यांचे अनुभव सनातन प्रभातच्या कार्यालयात (फॅक्स : ०८३२ - २३१८१०८ किंवा इ-मेल dspgoa1@gmail.com) पाठवावेत. - संपादक

पोलिसांनी केलेल्या चौकशीची माहिती त्वरित दैनिक सनातन प्रभातला कळवा !

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना
     डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांची ठिकठिकाणी पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी प्रत्यक्ष बोलावून, घरी येऊन किंवा भ्रमणभाषवर संपर्क करून चौकशी केल्यास त्या चौकशीची माहिती (कोणत्या दिवशी चौकशी झाली, काय प्रश्‍न विचारले, पोलिसांचे नाव, पोलीस ठाणे, किती वेळा चौकशी केली आदी सर्व तपशील) नजीकच्या दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयात त्वरित पाठवावा. आपल्या जिल्ह्यातील साधक किंवा कार्यकर्ते यांनी झालेल्या चौकशीचा तपशील पाठवला आहे कि नाही, याचा जिल्हा समन्वयकांनी आढावा घ्यावा.
इ-मेल : panveldainik@gmail.com
संपर्क : ९४०४९५६०८७
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
गुरु-शिष्य नात्याविषयी गुरूंचा दृष्टीकोन
मी कोणाचा गुरु नाही; पण शिष्य केल्याविना सोडणार नाही.
भावार्थ १ : मी कोणाचा गुरु नाही, यातील मी प्रकृतीतील मीविषयी आहे. शिष्य केल्याविना सोडणार नाही, म्हणजे पुरुषतत्त्वाचा किंवा बाबांच्या गुरूंचा, म्हणजे प.पू. अनंतानंद साईश यांचा शिष्य केल्याविना सोडणार नाही किंवा असा नामजप चालू करून देईन की, सर्वजण नामाचे शिष्य होतील.
भावार्थ २ : गुरु म्हणजे शिव. शिवदशेत मनात विचार येत नाहीत; म्हणूनच मी गुरु आहे हा विचार मनात येऊ शकत नाही. जीवदशेत आल्यावर मी शिष्य आहे एवढाच विचार मनात येतो; म्हणूनच माझ्या गुरूंकडे मी साधकांना घेऊन जाईन, त्यांना माझ्या गुरूंचे शिष्य करीन.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
गुरुपौर्णिमेला ४३ दिवस शिल्लक

गुरु हे सर्वज्ञ असल्याने ते शिष्याला सतत शिकवू शकतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
देशाच्या दुःस्थितीचे मूळ कारण लक्षात न घेता, वरवरचे उपाय करणारे शासन !
     देशाच्या आज झालेल्या दुर्दशेचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे जनता राजसिक आणि तामसिक होणे. ही परिस्थिती पालटण्यासाठी, म्हणजेच जनतेला सात्त्विक बनवण्यासाठी सनातन संस्था समाजात धर्मशिक्षण देऊन धर्मपालनाचा आणि साधनेचा प्रसार करते. धर्मपालन आणि साधना केल्याने व्यक्तीची सात्त्विकता वाढते. सनातनचे सर्वच उपक्रम समाजात सात्त्विकता वाढवणारे आहेत. समाजाची सात्त्विकता वाढल्यानंतरच देशाची स्थिती सुधारेल !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरे दान 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
खरे दान सत्पात्री असावे आणि त्याची वाच्यता दुसर्‍याजवळ होऊ नये. त्याची आठवणही क्षणार्धात विसरण्याचा प्रयत्न करावा. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पुलगाव अग्नीकांडाला उत्तरदायी कोण ?

संपादकीय
     भारतीय सैन्याचे सर्वांत मोठे सशस्त्र भांडार म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुलगाव येथील भांडाराला आग लागल्यानंतर अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. यांतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलीकडेच युद्धाला तोंड फुटल्यास भारताकडे असलेला शस्त्रसाठा अपुरा आहे, अशी माहिती पुढे आली आहे. अशा वेळी शस्त्रसाठा भांडाराला लागलेल्या आगीमुळे कोट्यवधी रुपयांचा शस्त्रसाठा शत्रूवर बरसण्याआधीच वाया गेला आहे. मागील तीन वर्षांत भारतातील १० शस्त्रसाठा भांडारांमध्ये दुर्घटना झाल्या आहेत. असे असतांनाही भारतीय सैन्य आणि राज्यकर्ते त्यातून काही शिकले नाहीत, असेच म्हणावे लागेल. भारतात शस्त्रसाठा करण्याची पद्धत ही जागतिक दर्जाची आहे, असे सांगण्यात येते; मात्र दुर्घटनांची आकडेवारी पहाता हा दावा फोल वाटतो. सध्या सुरक्षेच्या दृष्टीने भारतासाठी रात्र नव्हे, तर दिवसही वैराचा आहे. अशा वेळी जर शस्त्रसाठा करणार्‍या भांडारांना आग लागण्याची श्रृंखला चालूच रहाणार असेल, तर ही गोष्ट खूपच दुर्दैवी आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn