Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

आतंकवाद्यांच्या अड्ड्यांमध्ये शिरूही न शकणार्‍या केंद्रीय अन्वेषण विभागाचा (सीबीआयचा) सनातन आश्रम आणि साधकांची निवासस्थाने येथे छापा !

जसे धर्मद्रोह्यांच्या आरोपांतून कांची पीठाधीश्‍वर स्वामी
जयेंद्र सरस्वती निर्दोष सुटले, साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावरील आरोपही 

खोटे ठरले, त्याप्रमाणे आगामी काळात सनातनचेही निर्दोषत्व सिद्ध होईल !
       देवद (पनवेल) - आतंकवाद्यांच्या अड्डयांमध्ये शिरूही न शकणार्‍या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) येथील सनातन आश्रम, तसेच सनातन संकुलातील एका आणि पुणे येथील एका साधकाच्या निवासस्थनाची झडती घेतली. पोलिसांना या झडतीत काहीही आक्षेपार्ह आढळले नाही.
१. येथील सनातनच्या आश्रमात १ जून या दिवशी सकाळी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआयचे) अधिकारी आणि पोलीस चौकशीसाठी आले. या वेळी त्यांनी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांच्याविषयी विचारणा करून त्यांना भेटायचे आहे, असे सांगितले. त्यांच्याजवळ चौकशीचे वॉरंट (सर्च वॉरंट) होते.
२. या वेळी त्यांच्यासमवेत महिला पोलीसही उपस्थित होत्या.
३. अधिकार्‍यांनी सकाळी आल्यावर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची चौकशी करायची आहे, असे सांगितले आणि त्यांची काही वेळ चौकशी केली.

(म्हणे) डॉ. दाभोलकर हत्येमागे असलेल्या साधकांपर्यंत सीबीआय पोहोचली ! - आपचे नेते आशिष खेतान यांचा फुसका दावा

       मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागे असलेल्या सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या साधकांची ओळख केंद्रीय अन्वेषण विभागाला पटली आहे, असा दावा आम आदमी पक्षाचे (आपचे) आशिष खेतान यांनी
१ जून या दिवशी ट्विटरवरून केला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाचे अन्वेषण पूर्ण व्हायच्या आधीच आणि अन्वेषण विभागाने काही घोषित करण्यापूर्वीच आशिष खेतान यांनी सकाळी ९ वाजल्यापासूनच एकामागून एक ट्विट करणे चालू केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी त्यांना काही तरी घबाड मिळाले आहे, असा आव आणत त्यांनी ही उत्सुकता निर्माण होईल, अशी वाक्यरचना करणारी ट्विट पुढीलप्रमाणे करणे चालू केले -
१. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला ३ वर्षे होतील. त्या पाठीमागे उजव्या विचारसरणीच्या संस्था आहेत, हे माझे आधीपासून मत होते.

सीबीआयच्या कारवाईपूर्वी आप नेत्याचे ट्विट हे पूर्वनियोजित षड्यंत्र ! - सनातन संस्था

डावीकडून श्री. अरविंद पानसरे,
श्री. अभय वर्तक, अधिवक्ता संजीव पुनाळेकर
        मुंबई - १ जूनला सकाळी ८.५४ वाजता आपचे नेते आशिष खेतान यांनी ट्विटरवरून डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागे सनातन संस्थेच्या साधकाचा हात असल्याचे ट्विट केले. त्यानंतर त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या ट्विट मध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचा उल्लेख करून डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आल्याचे म्हटले. प्रत्यक्षात सीबीआयने कोणताही अधिकृत खुलासा केलेला नसतांना आपचे नेते आशिष खेतान यांनी केलेले ट्विट हे पूर्वनियोजित षड्यंत्र असल्याचेच उघड करते, अशी टीका सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. या वेळी सनातन संस्थेचे कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि सनातन संस्थेचे राज्य प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे उपस्थित होते.

सीबीआयने केलेल्या अन्याय्य कारवाईच्या विरोधात सौ. कांचन अकोलकर यांची पुणे पोलिसात तक्रार

श्री. अकोलकर यांच्या घरी 
घरफोडीत अस्ताव्यस्त केलेले साहित्य ! 
यातील काही साहित्य चोरीला
गेलेले असल्यास त्याला उत्तरदायी कोण ?
       पुणे - दाभोलकर हत्या प्रकरणी कारवाईच्या नावाखाली केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने १ जून या दिवशी पुणे येथील सनातनचे साधक दांपत्य श्री. आणि सौ. कांचन आकोलकर यांच्या घरी अक्षरशः घरफोडी केली. कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांनी घराचे कुलुप फोडून सर्व साहित्य अस्ताव्यस्त केले आहे, तसेच त्यातील काही मौल्यवान साहित्य गहाळ केले असण्याची अन् त्याचा वापर खोटे पुरावे बनवण्यासाठी केला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या या अन्याय्य कारवाईच्या विरोधात सौ. कांचन आकोलकर यांनी पुणे पोलीस आयुक्त आणि पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत बेकायदेशीररित्या घरात घुसून घरफोडी करणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे,
१. १ जून या दिवशी दुपारी साधारण २ वाजता माझे रहाते घर कोणीतरी फोडल्याची बातमी मला मिळाली. त्यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे माझ्या घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त स्थितीत पडले आहे.

हिंदूसंघटक तात्याराव सावरकर यांच्या पुतळ्यावर मेघडंबरी बसवण्यासाठी भूमीपूजन

       पुणे, १ जून - हिंदूसंघटक तात्याराव सावरकर यांची १३३ वी जयंती २८ मे या दिवशी झाली. येथील सारसबागेजवळ तात्याराव सावरकर यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्यावर मेघडंबरी बसवण्याच्या कार्याचा भूमीपूजन समारंभ पर्वती मतदारसंघातील शिवसेना नगरसेवक श्री. अशोक हरणावळ यांच्या प्रयत्नांमुळे पार पडला. या वेळी हिंदूसभा, हिंदु महिला सभा, समस्त हिंदु आघाडी यांच्या वतीने अभिवादनही करण्यात आले.
       या वेळी श्री. सात्यकी सावरकर यांनी सांगितले की, जातीभेद मोडकळीत काढून हिंदु समाजाला समतेच्या एका छत्रछायेखाली आणणार्‍या दांडग्या समाजसुधारकाच्या पुतळ्यावर छत्र बसवण्याचा निर्णय चांगला आहे. या निमित्ताने हिंदु समाजाने प्रतिकात्मकरित्या अल्प उतराई होण्याचे पाऊल टाकले आहे, हे स्तुत्य आहे. ४ स्तंभ आणि वर छत्र अशी मेघडंबरीची रचना आहे. हे ४ स्तंभ म्हणजे तात्याराव सावरकर यांनी सांगितलेली ४ अत्यंत महत्त्वाची तत्त्वे आहेत. ती म्हणजे सामाजिक समरसता, सैनिकीकरण, हिंदुत्व आणि विज्ञाननिष्ठा ! या ४ स्तंभांवर विराजमान झालेली हिंदु एकतेची मेघडंबरी अ-जिंक्य अशीच असेल आणि सिंधू-हिंदूला एकत्र आणेल.

म्हणे स्वतंत्र कोकण राज्यासाठी आंदोलन छेडणार ! - प्रा. महेंद्र नाटेकर

  • विकासाच्या नावाखाली प्रांतवाद वाढीस लागणे, हे लोकशाहीचे अपयश म्हटल्यास आश्‍चर्य ते काय ?
  • महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेले प्रा. महेंद्र नाटेकर
       मुंबई, १ जून - सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि पालघर अशा ७ जिल्ह्यांचा कोकण प्रदेशात समावेश होतो. त्यांचे मिळून स्वतंत्र कोकण सेनेचे राज्य निर्मितीसाठी जुलैमध्ये संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर महाआंदोलन छेडले जाईल, असे संघटनेचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी सांगितले. (स्वतःच्या संकुचित स्वार्थासाठी असे आंदोलन करून जनतेला वेठीस धरणे कितपत योग्य आहे ? - संपादक) या वेळी स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघर्ष समितीऐवजी स्वतंत्र कोकण सेना असे संघटनेचे नामकरण करण्यात आल्याचे नाटेकर यांनी जाहीर केले. (प्रत्येकाने असे स्वतंत्र व्हायचे ठरवले, तर महाराष्ट्र आणि देश तरी अस्तित्वात राहील का ? - संपादक)

सावरकरांच्या विचारांनुसार आता हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे अनिवार्य ! - श्री. नरेंद्र सुर्वे

शिवालय सेवा संघाच्या 
वतीने स्वा. सावरकर जयंती साजरी ! 
       मुंबई, १ जून (वार्ता.) - आज राष्ट्र आणि धर्म संकटात आहे. देशाला भ्रष्टाचार, आतंकवाद, लव्ह जिहाद, धर्मांतर, मंदिरांची तोडफोड अशा अनेक समस्यांनी घेरले आहे. अशा संकटांवर मात करण्यासाठी हिंदूंनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कृतीत उतरवण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, स्वत: जगणे आणि राष्ट्र जगवणे, हे आपले प्रथम कर्तव्य असले पाहिजे. स्वा. सावरकरांच्या या विचारांनी प्रेरित होऊन हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, अनिवार्य झाले आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले. भटवाडी, घाटकोपर पश्‍चिम येथे शिवालय सेवा संघाच्या वतीने २८ मे या दिवशी स्वा. सावरकर जयंतीनिमित्त सावरकरांचे हिंदुत्व आणि हिंदूंची सहिष्णुता या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील चंद्रभागा नदीमध्ये मैला आणि जनावरांचे रक्तमिश्रीत पाणी

       चंद्रभागा नदीच्या पात्रात धार्मिक विधी केल्यावर वादंग माजवणारे तथाकथित पर्यावरणवादी आता कुठे आहेत ? स्थानिक प्रशासनाच्या हे लक्षात येत नाही कि ते जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करते ? नद्यांचे पावित्र्य टिकवण्यासाठी प्रभावी हिंदूसंघटन असलेले हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे !
       पंढरपूर, १ जून - येथे आलेले भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचे दर्शन घेण्यापूर्वी चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करतात. तसेच श्रद्धेने चंद्रभागेतील पाणी तीर्थ म्हणून आपल्या घरी घेऊन जातात. अशा पवित्र असलेल्या चंद्रभागा नदीच्या पात्रात प्रतिदिन अनेक ठिकाणावरून मैला आणि जनावरांचे रक्तमिश्रीत पाणी मिसळले जात आहे. (या प्रकरणी सरकार संबंधितांवर काय कारवाई करणार आहे ? - संपादक) यामुळे समस्त वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदीचे पावित्र्य नष्ट होत असल्याचा प्रत्यय भाविकांना येत आहे.
१. शहरातील अनिलनगर, व्यासनारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, नगर वाचनालय आदी परिसरातून मैलामिश्रित पाणी चंद्रभागा नदीच्या पात्रात मिसळते.
२. येथील मटण मार्केट परिसरात हत्या केलेल्या जनावरांचे रक्तमिश्रीत पाणीही चंद्रभागेच्या नदीपात्रात मिसळते.

आदि शंकराचार्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय तत्त्वज्ञ दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव केंद्रशासनाच्या विचाराधीन !

      नवी देहली - भारतातील प्राचीन सनातन धर्माला पुन्हा नवचैतन्य प्राप्त करून देणारे आदि शंकराचार्य यांचा ११ मे हा जन्मदिवस राष्ट्र्रीय तत्त्वज्ञ दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव केंद्रशासनाच्या विचाराधीन आहे. ख्रिस्ताब्द ७८८ मध्ये केरळ राज्यातील कोचीपासून जवळ असलेल्या कलाडी येथे आदि शंकराचार्य यांचा जन्म झाला. त्यांच्या अद्वैत सिद्धांताच्या तत्त्वज्ञानाचे सार छान्दोग्य उपनिषदातील तत् त्वं असि म्हणजे आत्माच ब्रह्म आहे, असे होते. परब्रह्म हेच निर्गुण ब्रह्म आहे, असे त्यांचे मत होते. आदि शंकराचार्यांच्या या तत्त्वज्ञानाचे जगभरात मोठ्या संख्येने अनुयायी आहेत. भारतीय तत्त्वज्ञानाचे अनेक विचारवंत, अभ्यासक आदींवर आदि शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाची छाप पडली होती. भारताचे द्वितीय राष्ट्र्रपती डॉ. राधाकृष्णन् हे शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाचे अभ्यासक होते.
     आदि शंकराचार्य यांनी सनातन हिंदु धर्माच्या प्रसारासाठी भारताच्या ४ कोपर्‍यांत ४ शंकराचार्यांची पीठे निर्माण केली. आदि शंकराचार्य हिमालयातील केदारनाथ येथे वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी समाधीस्थ झाले. केंद्रशासनाने आदि शंकराचार्य यांचा ११ मे हा जन्मदिवस राष्ट्र्रीय तत्त्वज्ञ दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय त्वरित घ्यावा, अशी अपेक्षा हिंदूंनी व्यक्त केली आहे.केरळमध्ये डाव्या पक्षाच्या मंत्र्यांकडून १३ क्रमांकाची सरकारी गाडी घेण्यास नकार ! १३ हा क्रमांक अपशकुन असल्याचे मत !

एकीकडे हिंदूंच्या धर्मश्रद्धांना विरोध करायचा आणि दुसरीकडे 
शकुन-अपशकुन पाळायचे, हा डाव्यांचा दुटप्पीपणाच !
     थिरुवअनंतपुरम् - स्वत:ला विज्ञानवादी आणि नास्तिक म्हणवून घेणारे, तसेच इतरांच्या धर्मश्रद्धांची खिल्ली उडवणारे डावे स्वत: मात्र शकुन-अपशकुन पाळत अडकल्याचे उघड झाले आहे. केरळमध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळवल्यानंतर डाव्या पक्षांनी नव्या सरकारमध्ये एकूण १९ मंत्र्यांचा समावेश केला आहे. सरकारमधील मंत्र्यांसाठी १ ते २० या क्रमांकाच्या सरकारी गाड्या आहेत; मात्र या गाड्यांपैकी १३ क्रमांकाची गाडी घ्यायला कुणीही सिद्ध नाही. अनेकांना हा क्रमांक अपशकुनी वाटत आहे. यापूर्वीच्या काँग्रेसप्रणीत यु.डी.एफ्. सरकारमधील मंत्र्यांनीही १३ क्रमांकाच्या गाडीला हात लावला नव्हता; मात्र त्याविषयी फारशी चर्चा झाली नव्हती. डाव्या विचारांचे मंत्रीही हीच भूमिका घेत असल्याने अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला आहे.

चिनी उदबत्त्या श्‍वसनयंत्रणेस घातक ! - बॉम्बे टेक्सटाईल रिसर्च असोसिएशन आणि हिंदुस्थान इनसेक्ट कंट्रोल असोसिएशन

भारतियांनो, तुमच्या मुळावर उठलेल्या चिनी मालांवर सर्वंकष 
बहिष्कार घालून धूर्त चीनला त्याची जागा दाखवा !
     मुंबई - चीनहून आयात होणार्‍या उदबत्त्यांमध्ये आरोग्यास विशेषत्वाने श्‍वसनयंत्रणेस हानीकारक रसायने असल्याचे आढळून आले आहे. बॉम्बे टेक्सटाइल रिसर्च असोसिएशन आणि हिंदुस्थान इनसेक्ट कंट्रोल असोसिएशनने याविषयी केलेल्या तपासणीच्या तपशिलात ही गोष्ट उघड झाली आहे. याशिवाय डास घालवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या मच्छरछाप कॉईलमध्येही फेनोबुकार्ब हे प्राणघातक कीटकनाशक वापरले जात असल्याचे दिसून आले आहे. भारतासह अनेक देशांमध्ये या कीटकनाशकावर बंदी आहे.

आशिष खेतान यांचे विधान म्हणजे सनातनला अपकीर्त करण्याचे षड्यंत्रच ! - अधिवक्ता संजीव पुनाळेकर

       आशिष खेतान ही कुणी नावाजलेली प्रसिद्ध व्यक्ती नाही. खेतान हे केवळ संपत्ती आणि सत्ता यांच्या बाजूनेच असतात. आम्ही तर त्यांना पैसे दिलेले नाहीत. त्यामुळे अशांना कोण साहाय्य करते, याची चौकशी करायला हवी. त्यांनी ट्विटद्वारे केलेले विधान हे सनातनला अपकीर्त करण्याचे षड्यंत्रच आहे.
       दाभोलकर आणि पानसरे कुटुंबियांनी ज्या प्रकारे समाजसेवेच्या नावाखाली समाजाची दिशाभूल करून पैसा जमवला, त्याचप्रकारे खेतान असे करू पहात आहेत. आम्ही त्यांना सनदशीर मार्गाने धडा शिकवू. त्यांनी केलेले घोटाळे आम्ही लवकरात लवकर समाजासमोर आणू.
       राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे आम्ही समर्थन करत नाही; पण त्यांचे अधिकारी शरदकुमार यांनी मालेगाव स्फोट प्रकरणातील साध्वी प्रज्ञासिंह, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी यांना पुष्कळ त्रास दिला. त्यामुळे शरदकुमार यांना अटक करायला हवी. २००८ मध्ये मालेगाव स्फोटाच्या वेळी आतंकवादविरोधी पथकाला इंडिया बूलने विनामूल्य विमाने वापरण्यास दिली. असे असतांना तपास यंत्रणा इंडिया बूलवर का धाडी टाकत नाही ?

पुण्यातील खडकवासला धरणसाखळीत फक्त ९.६२ प्रतिशत पाणीसाठा शिल्लक !

      पुणे, १ जून - शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरणसाखळीत ९.६२ प्रतिशत, म्हणजेच २.८० अब्ज घनफूट (टीएम्सी) पाणीसाठा शेष राहिला आहे. या धरणसाखळीत पानशेत, खडकवासला, वरसगाव आणि टेमघर ही ४ धरणे आहेत. मागील वर्षी याच कालावधील १५.३८ प्रतिशत (४.४८ अब्ज घनफूट (टीएम्सी) पाणीसाठा शेष होता. जूनअखेरीस शहरात आगमन होणार्‍या पालखी सोहळ्यासाठी पाणी सोडावे लागणार असल्याने महानगरपालिकेसमोरील अडचणी वाढल्या आहेत. जून मासात पावसाला प्रारंभ न झाल्यास शहरातील पाणीकपात वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येईल.

पिंपरी येथे २५ चारचाकी वाहनांची तोडफोड !

गाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड करण्याचे सत्र चालूच... 
     पिंपरी, १ जून - पुणे शहर आणि परिसरात रात्रीच्या वेळी दुचाकी आणि चारचाकी वाहने पेटवून देण्याच्या अनेक घटना घडलेल्या असतांनाच पिंपरी परिसरात पुन्हा २५ ते ३० चारचाकी वाहनांची तोडफोड करण्याची घटना घडली आहे. ३१ मेच्या मध्यरात्री अज्ञातांनी सिमेंटचे ठोकळे, दगड आणि काठी यांच्या साहाय्याने प्राधिकरण, निगडी सेक्टर २७-२८, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी येथे रस्त्यावर उभ्या असणार्‍या वाहनांच्या काचा फोडल्या. काही गाड्यांमधील ध्वनीयंत्रणा चोरून नेण्यात आल्या आहेत. चिंचवड पोलीस या प्रकरणाचे पुढील अन्वेषण करत आहेत. (वारंवार होणार्‍या या घटना म्हणजे कायदा-सुव्यवस्था यांचा बोजवारा उडाल्याचेच निदर्शक आहेत. - संपादक)

सोलापूर येथील गिर्यारोहकाचा विवाहाचे विधी टाळून राज्यघटनेचे वाचन करून विवाह !

     पुणे - जागतिक गिर्यारोहक, विश्‍वविक्रमवीर आनंद बनसोडे याने विवाह विधी न करता राज्यघटनेचे वाचन करून विवाह केला. राज्यघटनेचे वाचन करून झालेला एकमेव विवाह म्हणून 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'ने नाना पाटेकर यांच्या हस्ते त्यांच्या प्रमाणपत्राचे अनावरण करण्यात आले. अनाथ मुलांच्या उपस्थितीत 'संस्कार फाउंडेशन' येथे हा विवाहसोहळा पार पडला होता. 

श्रीलंकेकडून ७ भारतीय मच्छीमारांना अटक : जयललितांकडून पंतप्रधानांना पत्र

वर्षानुवर्षे भारतीय मच्छीमारांना श्रीलंका आणि पाक यांच्याकडून
 होणार्‍या अशा प्रकारच्या अटकसत्रांवर उपाय न काढणारे राज्यकर्ते काय कामाचे ? 
     चेन्नई - श्रीलंकेच्या नौदलाने तमिळनाडूच्या ७ मच्छीमारांना अटक केली आहे. श्रीलंकेच्या सागरी क्षेत्रात मासेमारी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ४५ दिवसांनंतर मासेमारी चालू करणार्‍या मच्छीमारांवर पहिल्याच दिवशी कारवाई करण्यात आली. मासे प्रजननाच्या कालावधीमुळे ४५ दिवस मासेमारीवर बंदी घालण्यात आली होती. यासंबंधी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. 

मुसलमानांचे निराधार आरोपांपासून संरक्षण करण्यासाठी कायद्यात पालट करणार ! - सदानंद गौडा, केंद्रीय कायदामंत्री

निरपराध हिंदूंसाठीही कायद्यात 
पालट करावा, असे सरकारला वाटले पाहिजे !
       अलीगड - मुसलमानांचे निराधार आरोपांपासून संरक्षण करण्यासाठी कायद्यात पालट करण्याचा विचार सरकार करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांनी केले आहे. ते येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
       आतंकवादी घटनांच्या चौकशीसाठी पकडण्यात येणार्‍या संशयितांशी पोलिसांनी संवेदनशीलतेने वागावे, अशी शासनाची भूमिका आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्याच आठवड्यात सांगितले होते. त्या अनुषंगानेच गौडा यांनी वरील प्रतिपादन केले आहे. गौडा पुढे म्हणाले की, कायद्यात सुधारणा करण्यासाठी एक समिती बनवली जाणार असून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश या समितीचे अध्यक्ष असतील.
       गौडा म्हणाले की, चुकीच्या आरोपांमुळे अटक करण्यात आलेल्या मुसलमान आरोपींचे निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत अनेक वर्षे निघून जातात. त्यामुळे त्यांना पुन्हा समाजाशी समरस होणे अवघड जाते. समाजही त्यांना स्वीकारण्यास कचरतो. शरण येणार्‍या आतंकवाद्यांच्या पुनर्वसनासाठी आपल्याकडे नियमावली आहे; पण खोट्या आरोपांचा सामना करावा लागणार्‍यांना कुठलेही संरक्षण नाही.

छत्रपती शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळा उभा करण्यासाठी आज भव्य मोर्चा !

जळगाव येथे पत्रकार परिषद 
डावीकडून श्री. विलास चौधरी, श्री. विकास साबळे, श्री. सुनील घनवट, अधिवक्ता मनीष वर्मा

एकनाथ खडसे यांची मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थिती, जळगावला रवाना !

खडसे यांच्यावर कारवाई न केल्यास आंदोलनाची 'आप'ची चेतावणी ! 
     मुंबई, १ जून (वार्ता.) - ३० कोटी रुपयांची लाच, पुणे येथील भूखंड अपव्यवहार आणि दाऊदशी कथित संबंध यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ३१ मे या दिवशी असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहिले आणि जळगाव येथे मतदारसंघात गेलेे. खडसे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित रहाण्याऐवजी जळगावमधील मुक्ताईनगर येथील कोथळी येथे संत मुक्ताई तिरोभूत समाधी सोहळ्याला गेले. 

हिंदु महासभेच्या वतीने स्वा. सावरकर जयंतीनिमित्त सावरकर भक्तांचा मेळावा उत्साहात

श्री. मंगेश निकम (डावीकडून दुसरे) यांचा सत्कार करतांना ज्येष्ठ लेखक श्री. जगन्नाथ 
शिंदे, डावीकडे सहकाररत्न श्री. मधुकर पिसाळ आणि उजवीकडे अधिवक्ता गोविंद गांधी
     सातारा, १ जून (वार्ता.) - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त येथील हिंदु महासभेच्या वतीने सावरकर भक्तांचा मेळावा घेण्यात आला. हा मेळावा छत्रपती प्रतापसिंह उद्यानातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात उत्साहात पार पडला.
     या वेळी हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद गांधी, जिल्हाध्यक्ष श्री. दत्ता सणस, कार्यकारणी सदस्य श्री. उमेश गांधी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश निकम, सनातन संस्थेच्या सौ. माधुरी दीक्षित, सावरकर साहित्याचे ज्येष्ठ विचारवंत श्री. गिरीश बक्षी, ज्येष्ठ लेखक श्री. जगन्नाथ शिंदे आदी मान्यवर आणि समाजातील अनेक ज्येष्ठ सावरकर भक्त आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

५०० भारतीय मुसलमान युवकांमध्ये इसिसचे आकर्षण !

या युवकांना रोखण्याची क्षमता भारतीय सुरक्षा दल आणि राज्यकर्ते यांच्यात आहे का ? 
      नवी देहली - इसिसचा भारतीय मुसलमानांवर फारसा प्रभाव नसल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला असला, तरी केंद्रशासन आणि गुप्तचर विभाग यांच्या अंदाजानुसार देशातील सुमारे ४००-५०० मुसलमान युवक इसिसच्या खिलाफती विचारसरणीकडे आकर्षित झाले आहेत. यामुळे सुरक्षा संस्थांपुढे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. यांपैकी बहुसंख्य जणांची सुरक्षा संस्थेच्या वतीने चौकशी करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गंभीर पुरावा न आढळल्याने त्यांना मुक्तही करण्यात आले आहे.

पाठ्यपुस्तकांमध्ये राष्ट्रपुरुषांचा घोर अवमान करणार्‍या सर्व संबंधितांवर गुन्हा प्रविष्ट करण्यासाठी जळगाव येथे आंदोलन !

आंदोलनात घोषणा देतांना हिंदु धर्माभिमानी
     जळगाव - देहलीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये राष्ट्रपुरुषांचा घोर अवमान करणार्‍या सर्व संबंधितांवर गुन्हा प्रविष्ट करावा तसेच शासनाने हिंदूंच्या धार्मिक प्रथा-परंपरा मोडीत न काढता त्याविषयी धर्माचार्य आणि शंकराचार्य यांचे मार्गदर्शन घेऊन निर्णय घ्यावा या दोन विषयांवर २८ मे या दिवशी महापालिकेसमोर विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. 

राममंदिर हे निवडणुकीचे सूत्र नाही ! - केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद

     राममंदिर हा बहुसंख्य लोकांचा श्रद्धेचा विषय वादग्रस्त होऊन बसलेला असल्यामुळे बहुसंख्य जनतेचा जीव कासावीस झालेला आहे. त्यावर तोडगा काढण्याचे काम शासनाने का करू नये ? राममंदिर हे निवडणुकीचे सूत्र नाही, असे म्हणून दायित्व झटकण्याचे काम केंद्रशासनाने करू नये, ही हिंदूंची अपेक्षा ! 
     मथुरा - अयाध्येतील राम मंदिराची उभारणी हे निवडणुकीचे सूत्र नसून तो सर्वांच्या श्रद्धेचा विषय आहे, असे मत केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले. १९९० मध्ये झालेल्या निवडणुकीतही या सूत्राकडे श्रद्धेच्या दृष्टीने पाहिले गेले होते, असे ते येथे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले. २०१७ मध्ये उत्तरप्रदेशात होणार्‍या निवडणुकीच्या प्रचारासाठी राममंदिराचे सूत्र प्रचारात वापरणार नाही, असेही प्रसाद यांनी स्पष्ट केले.

दूरसंचार आस्थापनांकडून नव्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ग्राहकांची लूट !

कृत्रिम पद्धतीने नेटवर्क जोडण्याच्या तंत्रज्ञानाचा परिणाम 
      नवी देहली - दूरसंचार आस्थापनाने आता एका नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. यामुळे दूरभाषवर बोलणे चालू असतांना ग्राहकाचा संपर्क खंडित झाल्यास अथवा दुसर्‍या बाजूने आवाज न आल्यास कॉल खंडित न होता तो चालू असल्याचे दिसत रहाते. आपण तो खंडित केल्याशिवाय खंडित होत नाही. यापूर्वी जर दूरभाषवर बोलत असलेली व्यक्ती चांगला नेटवर्क नसलेल्या भागात असल्यास त्याचा संपर्क आपोआप तुटायचा आणि तो संपर्क कॉल ड्रॉप म्हणून गणला जायचा. कॉल ड्रॉप झाल्यामुळे ग्राहकाला त्या कॉलचे शुल्क भरावे लागत नव्हते; मात्र या नव्या तंत्रज्ञानानुसार संपर्क तुटला किंवा पलीकडून आवाज येत नसला तरी ग्राहकाचा कॉल चालूच असल्याचे दाखवले जात असल्याने त्या परिस्थितीत संभाषण करता आले नाही तरीही ग्राहकाकडून पूर्ण वेळेचे पैसे आकारले जातात.

देहलीत रहात असलेल्या पाकिस्तानी हिंदूंची दयनीय स्थिती दूर करा ! - राष्ट्रवादी शिवसेनेची केंद्र आणि राज्य शासनाकडे मागणी

निर्वासित पाकिस्तानी हिंदूंच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणारे राज्यकर्ते जनहित काय साधणार ? 
     नवी देहली - राष्ट्रवादी शिवसेनेचे राष्ट्रीय महासचिव जयभगवान गोयल यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून देहलीत रहाणार्‍या पाकिस्तानी हिंदूंच्या दयनीय स्थितीकडे लक्ष वेधले आहे. 
   पत्रात म्हटले आहे की, पाकमध्ये लुटले गेलेले हिंदू मोठ्या आशेने भारतात आले आहेत. त्यांना येथे नरकवास भोगावा लागत आहे. मजनू का टीला क्षेत्रात रहाणार्‍या ५५० हिंदूंना पाणी आणि वीज मिळत नाही. उन्हाळ्यामुळे एका हिंदूचा मृत्यूही झाला आहे. त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळत नाही, आदी समस्या आहेत. या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी यात करण्यात आली आहे.

स्कॉटलंडमधील प्रख्यात लोमंड शाळेत हिंदु धर्मावर कार्यशाळा

     एडिनबर्ग - स्कॉटलंडमधील हेलेन्सबर्ग या शहरातील ३ ते १८ वर्ष वयाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणार्‍या प्रख्यात लोमंड शाळेत हिंदु धर्मावर माहिती देणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना हिंदु धर्मातील रूढी, परंपरा, धर्माचा इतिहास आणि तत्त्वे यांची ओळख करून देण्यात आली. तसेच हिंदूंची श्रद्धास्थाने यांची माहिती देण्यात आली. 
     या कार्यशाळेत सहभाग घेणार्‍या विद्यार्थ्यांनी हिंदू पोशाख परिधान केले होते आणि ध्यानधारणा करण्याचा प्रयत्न केला. या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांचे जीवन संपूर्णपणे कसे जगावे आणि उत्तम जागतिक नागरिक कसे बनावे याचे शिक्षण देणे, असा होता. या शाळेच्या जगातील अमेरिका, जर्मनी, दक्षिण आफ्रिका आणि चीन या देशांतही शाखा कार्यरत आहेत. श्रीमती जोहाना उर्कहार्त या प्राचार्य असून अलिस्टर होप हे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत.

सिंधु संस्कृती साडेपाच सहस्र नव्हे, तर ८ सहस्र वर्षे प्राचीन !

     कोलकाता - मोहनजोदारो आणि हडप्पा या अतीप्राचीन शहरांतील सिंधु संस्कृतीवर प्रकाश टाकणारे नवे संशोधन पुढे आले आहे. त्यानुसार ही संस्कृती किमान ८ सहस्र वर्षांपूर्वी अस्तित्वात होती, असे स्पष्ट झाले आहे. या संस्कृतीचा कालखंड साडेपाच सहस्र वर्षे इतका जुना असल्याचे पूर्वीचे संशोधन सांगत होते. 
    इजिप्त (इ.स. पूर्व ७००० ते ३०००) आणि मेसोपोटोमिया (इ.स. पूर्व ६५०० ते ३१००) या संस्कृतीपेक्षाही सिंधु संस्कृती जुनी असल्याच्या निष्कर्ष आयआयटी खरगपूर आणि भारतीय पुरातत्व खाते यांनी काढला आहे. तसेच यापूर्वी एक सहस्र वर्षे हडाप्पा पूर्व संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. विकसित नगर संस्कृतीचा जन्म हा भारतात झाला होता, हेच या संशोधनातून अधोरेखीत होते. तसेच ही संस्कृती वातावरणांतील पालटांमुळे नद्यांना महापूर येवून लयाला गेल्याचे संशोधन सांगते. नेचर या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. ऑप्टिकली स्टिम्युलेटेड ल्युमिनेसन्स या तंत्रज्ञानाच्या साहायाने हे संशोधन करण्यात आले. ( हिंदु संस्कृती ही सर्वांत पुरातन संस्कृती आहे. काळाच्या ओघात तिच्यावर अनेक आघात झाले. तरीही ती टिकून राहिली. याचे कारण म्हणजे तिच्यात चैतन्य आहे; मात्र भारतातील नतद्रष्ट हिंदूंना त्याविषयी आदर नाही. हिंदु संस्कृतीची महानता ओळखून भारतातील हिंदू आपल्या संस्कृतीनुसार आचरण करतील, तो सुदिन ! - संपादक )

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी स्वतंत्र आयपीएस् अधिकारी नियुक्त !

पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांचे स्थानांतर रहित करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश 
     कोल्हापूर, १ जून (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी आयपीएस् दर्जाचा पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करण्यासमवेत अन्वेषणात महत्त्वाची भूमिका बजावणारे राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांचे नागपूर येथे झालेले स्थानांतर रहित करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. पानसरे कुटुंबियांसह विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शिष्टमंडळाने ३१ मे या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. 

२८ दिवसांच्या बालिकेवर बलात्कार करणार्‍या वासनांध धर्मांधांना देहदंडाची शिक्षा द्या !

     डिसेंबर २०१५ मध्ये उत्तरप्रदेशात खुरजा या गावातील असिफ नागला येथील २८ दिवसांच्या मुलीवर २५ वर्षांच्या नमिनो या धर्मांध मुसलमानाने बलात्कार करून तो फरार झाला. तिचे आई-वडील मतदान करायला गेले असतांना ही घटना घडली. त्या मुलीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिला खेड्याबाहेरील मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दादरीतील अखलाखच्या घरी सापडलेले मांस हे गोमांसच !

न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पडताळणीचा अहवाल
     नवी देहली - उत्तरप्रदेशच्या बिसहडा येथील अखलाख याच्या घरात गोमांस शिजवण्यात येत असल्याच्या कारणावरून संतप्त गोरक्षकांच्या झालेल्या उद्रेकात अखलाख मृत झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. यावरून देशात अहिष्णुता वाढली असल्याचे ढोल ढोंगी निधर्मीवाद्यांकडून वाजवले जात होते. 
    अखलाख याच्या घरी गोमांस नव्हतेच, अशा शोधही त्यांनी लावला होता. मात्र अखलाख याच्या घरी त्या वेळी सापडलेल्या मांसांच्या मथुरा येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत झालेल्या पडताळणीचा अहवाल न्यायालयाच्या आदेशानंतर सार्वजनिक झाला असून त्यातून ते मांस हे गोमांस असल्याचे निष्पन्न झाले आहे.

लक्षावधी रुपयांचा दंड भरू; पण सिरियातील निर्वासित नको ! - स्वित्झर्लंडमधील नागरिक

स्वित्झर्लंडमधील गावकर्‍यांचा सिरियातील निर्वासितांना शरण देण्यास विरोध
      लंडन - युरोपमधील स्वित्झर्लंडच्या ओबेरविल-लिली २२ सहस्र लोकसंख्येच्या गावाने सिरियातील १० निर्वासितांना गावात सामावून घेण्याऐवजी तब्बल २ कोटी रुपयांचा दंडनिधी भरला आहे. या गावात ३०० लक्षाधीश नागरिक आहेत. निर्वासितांना सामावून घेण्यासंदर्भातील प्रस्ताव या गावाने फेटाळून लावला. मात्र यावरून वाद झाला असून निर्वासितांना नाकारणारे नागरिक वंशवर्चस्ववादी असल्याचा आरोप इतरांनी केला. मात्र येथील महापौर अँड्रिआस ग्लार्नर यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक मोठ्या अंतराने जिंकणार ! - अमेरिकेचे वरिष्ठ पत्रकार आणि लेखक अ‍ॅन्ड्यू मॅक्लिऑड

अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाची निवडणूक !
     वॉशिंग्टन - डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये पोहोचतील, असे मला वाटत नव्हते. अमेरिकेच्या बर्‍याच नागरिकांनाही तसे वाटत नव्हते; परंतु आता रिपब्लीकन पक्षाचे उमेदवारच अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष होतील, याची शक्यता खूप बळावली आहे. ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक मोठ्या अंतराने जिंकणार आहेत, असा दावा अमेरिकेचे वरिष्ठ पत्रकार, लेखक आणि माजी सैन्याधिकारी अ‍ॅन्ड्यू मॅक्लिऑड यांनी दी इंडिपेन्डेन्ट या इंग्लंडच्या वृत्तसंकेतस्थळावर प्रसारित केलेल्या लेखात केला आहे.

चीनच्या आक्रमकतेस भारताचे प्रत्युत्तर !

ब्रिगेडियर (निवृत्त)
हेमंत महाजन
      गेल्या काही मासांपासून चीन अनेक भारतविरोधी कारवाया करत आहे. आपण त्याला प्रत्युत्तरही देत आहोत; मात्र हे प्रत्युत्तर पुरेसे आहे का ? याचा विचार होणे आवश्यक आहे. २ देशांमधील संबंध बिघडून जर लढाईची परिस्थिती निर्माण झालीच, तर आपण सिद्ध आहोत का ? यावरही लक्ष देणे आवश्यक आहे. 
चीनच्या विस्तारवादी धोरणांचा अमेरिकेने दिलेला अहवाल !
      चीनने भारताच्या सीमारेषेवर मर्यादेपेक्षा अधिक संरक्षण सज्जता केली असून लष्कराच्या संख्येत वाढ केली आहे, असे अमेरिकेच्या पेंटागॉनने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे. भारताचा पारंपरिक शत्रू असलेल्या पाकिस्तानमध्येही चीनचे प्रस्थ वाढत असल्याचे वृत्त आहे; मात्र ही वाढ कोणत्या कारणासाठी करण्यात आली आहे, याविषयी अनभिज्ञता आहे. चीनचा पाकिस्तानमधील वावर आणि लष्कराच्या तैनातीमध्येही मोठ्या प्रमाणात पालट झाले आहेत.

काँग्रेस, डावे, मिशनरी, जिहादी शक्ती यांच्या पाठिंब्यामुळेच जेएन्यूसारख्या शिक्षणसंस्थेत देशद्रोह्यांची निर्मिती !

१. भारताचे शेकडो तुकडे व्हावे, असे वाटणारे आणि देशविरोधी घोषणा देणारे 
खरोखर सुशिक्षित अन् विद्यार्थी आहेत का, असा प्रश्‍न पडणे
पू. दिव्य जीवनदासजी
महाराज
     आज माझ्या अंतःकरणात वेदना, आक्रोश आणि घृणा यांचा महापूर आला आहे. आपल्या महापुरुषांनी अशा प्रकारच्या शिक्षणसंस्थांची कल्पना केली होती का की, जेथे भारतविरोधी घोषणा दिल्या जातील ? भारताचे शेकडो तुकडे व्हावे, अशी भाषा करणारे हे तरुण खरोखर सुशिक्षित आहेत का ? आणि असतील, तर मग अडाणी कुणाला म्हणावे ? हे खरोखर विद्यार्थी आहेत का ? असे असेल, तर विभाजनवादी, आतंकवादी आणि अराजकतावादी कसे असतात ? 
२. देशाला शेकडो तुकड्यांत वाटण्यासाठी काँग्रेस, डावे, मिशनरी, 
जिहादी या शक्ती पूर्ण शक्तीनिशी कार्यरत असणे
      स्वत:ला सुशिक्षित आणि विद्यार्थी म्हणवणार्‍यांचे धाडस पहा की, राष्ट्राच्या राजधानीत कोणत्या घोषणा दिल्या जात आहेत, तर काश्मीरच्या स्वातंत्र्यापर्यंत हे युद्ध चालूच राहील, चालूच राहील ! भारत नष्ट होईपर्यंत हा लढा चालूच राहील ! भारतियांनो परत जा, पाकिस्तान झिंदाबाद ! किती याकूब आणि अफझल यांना माराल, प्रत्येक घरात अफझल जन्माला येईल ! या विघटनवादी शक्तींना कोण बळ देत आहे ? कोण या विषवल्लीसाठी भूमी अनुकूल करून देत आहे ? कुणाच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांच्या वेषात हे अराजकवादी, उत्तेजक, लंपट, गुंड रस्त्यावर उतरून नंगा नाच करत आहेत ? देशाला शेकडो तुकड्यांत वाटण्यासाठी आज काँग्रेस, डावे, मिशनरी, जिहादी या शक्ती पूर्ण शक्तीनिशी कार्य करत आहेत; मात्र आमच्यातील छद्मी बौद्धिकता आणि धर्मनिरपेक्षतेचा जिवाणू अजून मेलेला नाही. तो सक्रीय आहे.

मुंबई विद्यापिठाचा लांच्छनास्पद उत्तरपत्रिका घोटाळा !

     कुंपणच जेव्हा शेत खाऊ लागते तेव्हाच शेताची नासाडी होते, हे वाक्य मुंबई विद्यापिठाच्या उघडकीस आलेल्या पेपर घोटाळ्यास तंतोतंत लागू पडते. या प्रकरणात सहभागी असणार्‍या विद्यापिठाच्या कर्माचार्‍यांवरून (शिपाई, लिपिक, सुरक्षारक्षक) ते लक्षात येते. पेपर कठीण गेलेल्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका घरपोच करून पुन्हा विद्यापिठात जमा करण्याची एक मजबूत साखळीच मुक्तपणे २ वर्षांपासून कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील अभियांत्रिकीच्या ९२ उत्तरपत्रिका यांच्याकडून जप्त केल्या असून आणखी उत्तरपत्रिका हस्तगत करण्यात येणार असल्याचे पोलीस सांगत आहेत. घोटाळे करणारे निवडक असले, तरी अपकीर्ती होतांना घोटाळेबाजांच्या नावाची अल्प; मात्र विद्यापिठाच्या नावाचीच अधिक होते. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई होईल, अशी अजिबात आशा नाही; कारण मागील वर्षी याच विद्यापिठातील अभियांत्रिकीच्या पेपर पुनर्तपासाणीत झालेला घोटाळा उघडकीस आला होता. तथापि दोषींच्या चौकशीत काहीच निष्पन्न न झाल्याने ते सेवेत पुन्हा रुजू झाले. मग तो घोटाळा केला कुणी ? याचे उत्तर आजमितीपर्यंत मिळालेले नाही आणि त्यातच या वर्षी दुसरा घोटाळा उघडकीस आला आहे.

संत झाल्यावरही मूर्तीपूजा करणारे वासुदेवानंद सरस्वती !

सुट्टीतील परिपाठ !
     एका शिष्याने प.पू. टेंब्ये महाराज, म्हणजेच वासुदेवानंद सरस्वती यांना विचारले, महाराज, आपण स्वतःच देवस्वरूप असतांना स्वतःजवळ मूर्ती का ठेवता ? आता मूर्तीपूजेची काय आवश्यकता आहे ? महाराज म्हणाले, ज्या मूर्तीच्या योगाने मला ही परम भाग्याची अवस्था प्राप्त झाली, तिला विसरणे शक्य आहे का ? 
रामराज्य आदर्श का मानतात ?
    रामराज्यात लोकशाहीप्रमाणे प्रत्येकाला मत देण्याचा, म्हणजे राजा निवडायचा अधिकार नव्हता; पण प्रत्येकाला नकाराधिकार (व्हेटो) होता. याचाच अर्थ प्रत्येकाला राजापेक्षाही जास्त अधिकार होता. परिटाच्या बायकोने काय करावे किंवा काय करू नये, यात राम हस्तक्षेप करत नव्हता; पण रामाच्या बायकोने कसे वागावे, हे सांगण्याचा अधिकार साध्या परिटालाही होता; म्हणूनच त्याच्या सांगण्यावरून रामाने आपल्या प्राणाहून प्रिय अशा सीतेचाही त्याग केला. रामराज्यात समतेचे लाभ प्रजा उपभोगत होती, तर विषमतेचे तोटे राम भोगत होता.

भारताची राज्यघटना न मानणार्‍या देशद्रोह्यांना देशात ठेवल्यास देश टिकून राहील का ?

देशद्रोह्यांना पाठीशी घालणार्‍या शासनावर विश्‍वास न ठेवता आता राष्ट्रप्रेमी 
नागरिकांनीच देशद्रोह्यांविरुद्ध संघटितपणे कृतीशील होणे अपरिहार्य !
श्री. श्रीनिवास शेट्टीगार
१. हिंदूंमध्ये ज्ञानोदय होत आहे; म्हणून इस्लामी राष्ट्राचे 
स्वप्न पहाणार्‍यांनी विचार करणे आवश्यक !
    काही वर्षांपूर्वी भारताला हिंदी राष्ट्र म्हणून घोषित करून हिंदूंवर अन्याय करणारे या पूर्वीच मृत्यू पावले आहेत. आता काळ पालटला आहे. हिंदूंमध्ये ज्ञानोदय होत आहे; म्हणून इस्लामी राष्ट्राचे स्वप्न पहाणार्‍यांनी थोडा विचार केला, तर उत्तम होईल. 
२. भारताची राज्यघटना न मानणारे भारताचे नागरिक कसे ?
    अलीकडे देशातील वर्तमानपत्रे, प्रसारमाध्यमे यांमधून पुढील काही वार्ता पुनःपुन्हा प्रसिद्ध होत आहेत - आम्हाला भारताच्या राज्यघटनेतील कायदे लागू होत नाहीत. आम्ही ते मानत नाही. भारतात समान नागरी कायदा असणे योग्य नाही. आम्ही वन्दे मातरम् म्हणणार नाही. आम्ही भारतमाता की जय म्हणणार नाही. आम्ही तिरंग्याचा मान राखणार नाही. आम्ही शरीयत कायद्याचेच पालन करतो आदी. शरीयतला इस्लामी देशातच मान्यता असेल. हा भारत आहे. भारताच्या नागरिकांसाठी भारतीय राज्यघटना आहे. घटनेनुसार न्यायव्यवस्था आहे. घटनेत असलेल्या सर्व नीती-नियमांचे भारताचे नागरिक म्हणून काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित असते. भारतीय राज्यघटना भारताच्या सर्व नागरिकांना सर्व प्रकारचे अधिकार आणि सवलती देते. असे असतांना केवळ सवलती नव्हे, तर त्यापेक्षा अधिक लाभ घेणारेच आम्हाला घटनेतील कायदे लागू होत नाहीत. आम्ही ते मानत नाही, आम्ही शरीयतचे कायदेच मानतो, असा उद्धटपणा दाखवत असतील, तर ते भारताचे नागरिक असणे कसे शक्य आहे ?

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

विष्णुलोकात देवतांनी साजरा केलेला प.पू. डॉक्टरांचा अलौकिक अमृतमहोत्सव सोहळा देवाने दृश्य रूपात दाखवणे

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले 
यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ... 
सौ. राजश्री खोल्लम
       आज २८.५.२०१६ या दिवशी दुपारी १२ च्या सुमारास माझ्या मनात विचार आला की, प.पू. डॉक्टरांचा अमृतमहोत्सव सोहळा विष्णुलोकात देवता साजरा करतीलच ! एखादी घटना स्थुलातून घडण्याआधी ती सूक्ष्मातून घडलेली असते, या तत्त्वानुसार देवतांनी हा अमृतमहोत्सव सोहळा आधीच साजरा केला असावा, असे वाटले. तेव्हा विष्णुलोकात प्रत्यक्ष सोहळा साजरा होतांनाचे दृश्य देवाने सूक्ष्मातून दाखवले. ते पुढे देत आहे.
१. आरंभी विष्णुलोक दिसून तिथे अनेक देवता आणि ऋषीमुनी आल्याचे दिसणे अन् प.पू. डॉक्टर तिथे उपस्थित होऊन सुवर्ण सिंहासनावर विराजमान झाल्याचे दिसणे : विष्णुलोक अतिशय उच्च स्थानी असल्याचे जाणवले. तिथे आकाशी निळसर आणि पांढरा रंग दिसत होता. वातावरणात भावभक्तीची स्पंदने आणि आनंदमिश्रित शांतता जाणवत होती.
      प.पू. डॉक्टरांच्या अमृतमहोत्सव सोहळ्याची सर्व सिद्धता झाली असून लवकरच त्याला आरंभ होईल, असे वाटले. समोर एक मोठे सुवर्ण सिंहासन दिसत होते. थोड्या वेळाने प.पू. डॉक्टर तिथे उपस्थित झाले आणि त्या सिंहासनावर विराजमान झाले. सभोवती अनेक देवता आणि ऋषी-मुनी आल्याचे दिसत होते. सिंहासनाच्या मागे शेषनाग असून त्याने पाच फणे सिंहासनाच्या वर धरले होते.

श्रीमत् नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांनी मनुष्य जिवांमध्ये लावलेले साधनेचे बीज कधी ना कधी उगवणारच !

श्री. अविनाश जाधव
       सनातनच्या रामनाथी आश्रमात १५ ते १७.१.२०१६ या कालावधीत झालेल्या उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या दर्शनाचा लाभ गोव्यातील अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्ती यांसह अनेक साधकांनी घेतला. यांमध्ये काही वर्षांपूर्वी गोवा राज्यात झोकून देऊन सेवा करणार्‍या आणि अडचणींमुळे सनातन संस्थेपासून थोडे दूर गेलेल्या अनेक साधकांचाही समावेश होता. त्यांना पाहिल्यावर श्रीकृष्णाच्या कृपेने मनात विचार आला, श्रीमत् नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांनी लावलेले साधनेचे बीज कधीना कधी उगवणारच ! नंतर या वाक्यावरून देवाने माझ्या मनात करून घेतलेली विचारप्रक्रिया पुढे देत आहे.
१. शेतकर्‍याने पेरलेल्या बिजामध्ये भेसळ असल्याने त्याची उगवण्याची क्षमता अल्प असणे आणि त्याचा लाभ मर्यादित होत असणे : सर्वसामान्य शेतकरी शेतात पेरत असलेल्या बिजापैकी ५० ते ६० टक्के बीज उगवते; कारण त्या बिजामध्ये भेसळ असते आणि ते बीज शेतकर्‍याच्या, म्हणजे सर्वसामान्य मनुष्याच्या हातून पेरलेले असते. तो हे स्वतःच्या कुटुंबासाठी करत असल्याने त्याचा लाभही त्याच्या कुटुंबापुरताच मर्यादित होतो.

मिरज येथील श्री. रमेश वांडरे आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. कांता यांची गुणवैशिष्ट्ये

श्री. रमेश वांडरे, मुलगा अजिंक्य, मुलगी ऐश्‍वर्या आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. कांता
        १.६.२०१६ या दिवशी मिरज येथील श्री. रमेश वांडरे आणि त्यांच्या पत्नी सौ. कांता यांच्या लग्नाचा वाढदिवस झाला. या निमित्ताने त्यांचा मुलगा कु. अजिंक्य (वय १७ वर्षे) याच्या लक्षात आलेली त्याच्या आई-वडिलांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त म्हापसा (गोवा) येथील संत पू. सुशीला आपटेआजी या रामनाथी येथील सनातन आश्रमात आल्यावर त्यांच्या शिष्यभावातील काही क्षणमोती !

       (वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी (२९.५.२०१६) या दिवशी म्हापसा (गोवा) येथील संत पू. सुशीला आपटेआजी या परात्पर गुरु डॉ. आठवले (प.पू. डॉक्टर) यांच्या अमृतमहोत्सवासाठी सनातन कलामंदिरात आल्या. त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांना गुरुस्थानी मानतात. त्यामुळे चारचाकी गाडीतून उतरताच प.पू. डॉक्टरांना पाहून त्यांचा भाव जागृत झाला. त्या वेळी प.पू. आजी आणि प.पू. डॉक्टर यांच्यामध्ये पुढील संवाद झाला.
प.पू. आजी (प.पू. डॉक्टरांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार करतांना भावस्थितीत) : माझ्या देहापासून तुमच्यासाठी पादुका बनवा ! (माझ्या देहासह सर्वस्व तुमच्या चरणी अर्पण करून घ्या.)
       (त्या वेळी प.पू. डॉक्टरांनी स्वतः बसलेली आसंदी प.पू. आजींना बसण्यासाठी दिली.)
प.पू. डॉक्टर (प.पू. आजींचे हात धरून त्यांना आधार देत) : बसा !
प.पू. आजी : गुरुदेव उभे असतांना मी कशी बसू ?
       (तोपर्यंत अन्य साधकांनी प.पू. आजींसाठी दुसरी आसंदी आणून दिली.)

देवद येथील सनातन आश्रमातील साधक श्री. संदीप सकपाळ यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित होण्यापूर्वी एका साधकाला मिळालेली पूर्वसूचना

       मी मार्च मासाच्या (महिन्याच्या) पहिल्या आठवड्यात श्री. संदीप सकपाळ यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा काही दिवसांतच त्यांची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अधिक झाल्याचे घोषित होईल, असा विचार माझ्या मनात आला. नंतर १५ ते २० दिवसांनी, म्हणजे २२.३.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये त्यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्याचे वृत्त वाचले. तेव्हा पूर्वी माझ्या मनात त्यांच्या पातळीविषयी आलेला विचार ही पूर्वसूचना असल्याचे माझ्या लक्षात आले.
- श्री. सदानंद जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.३.२०१६)

देवाची आवड असणारी आणि धर्माचरण करणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कोल्हापूर येथील कु. राजलक्ष्मी निरंजन मगर (वय ५ वर्षे) !

कु. राजलक्ष्मी मगर
       कोल्हापूर येथील बालसाधिका कु. राजलक्ष्मी निरंजन मगर हिचा वैशाख कृष्ण नवमी (३०.५.२०१६) या दिवशी पाचवा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये आणि अन्य माहिती पुढे देत आहोत.
कु. राजलक्ष्मी मगर हिला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. गर्भारपण
१ अ. मंदिरातील प्रसाद पाहून देवाने राजलक्ष्मीच्या जन्माची पूर्वसूचना दिल्याचे जाणवणे : एकदा आम्ही पीठापूर (श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थान) येथे गेलो होतो. तेथील दत्त अनघालक्ष्मी मंदिरातील प्रसादात मला एक रुपया मिळाला. तेव्हा अनाहूतपणे माझ्या तोंडून मला लक्ष्मी मिळाली, असे उद्गार निघाले. थोड्याच दिवसांत मी गर्भवती असल्याचे लक्षात आले. तेव्हा देवाने ही बाळाच्या (राजलक्ष्मीच्या) जन्माची पूर्वसूचना दिली असावी, असे वाटले.
१ आ. मी गर्भवती असतांना गर्भातील बाळाला नामजप सांगणे, रामरक्षा आणि मारुतिस्तोत्र ऐकवणे आणि स्वत: नामजप करणे या कृती करत असे.

गुरुचरणी लीन भावाने प्रार्थना करून अनेक साधकांची ६१ टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळीकडे होणारी वाटचाल अचूकपणे हेरणारे कर्नाटकमधील साधक श्री. रमानंद गौडा !

श्री. रमानंद गौडा
      कर्नाटक राज्यातील साधक श्री. रमानंद गौडा यांनी प.पू. गुरुदेवांप्रती दृढ श्रद्धा, उत्कट भाव अन् अल्प अहं यांमुळे ६५ टक्के आध्यात्मिक स्तर गाठला आहे. सतत भावावस्थेत असणारे रमानंदअण्णा प.पू. डॉक्टरांच्या संदर्भातील सूत्रे इतकी भावपूर्ण सांगतात की, उपस्थितांचे नेत्र पाणावल्याविना रहात नाही. त्यांच्यातील अनन्यसाधारण भावासमोर केवळ साधकच नव्हे, तर हितचिंतक, धर्मप्रेमीही नतमस्तक होतात.
      स्वतःची जलद प्रगती साध्य करता करता त्यांनी कर्नाटकातील साधकांच्या साधनेची घडीही भावाच्या स्तरावर बसवली आहे. त्यामुळे तेथील अनेक साधक जीवन्मुक्त झाले आहेत.
१. अचूकतेने साधकांची आध्यात्मिक पातळी 
ओळखणारे रमानंदअण्णा आणि त्यांचा गुरुसेवेप्रतीचा भाव !
      साधकांची आंतरिक साधना ओळखून त्यांचे आध्यात्मिक मूल्यमापन अचूकतेने करणे, हे अण्णांचे वैशिष्ट्य ! वर्ष २०१५ च्या गुरुपौर्णिमेनंतर आतापर्यंत त्यांनी १०० ते १२५ साधक, तसेच संपर्कात असलेले हिंदु धर्माभिमानी, हितचिंतक आदींचा आध्यात्मिक स्तर अचूकपणे ओळखला आहे. त्यांच्यातील उत्तम निरीक्षणक्षमता, सूक्ष्मातील जाणण्याची अफाट क्षमता यांमुळे त्यांनी साधकांची आध्यात्मिक पातळी ओळखल्यावर त्या पातळीत थोडीसुद्धा तफावत येत नाही !

सौ. अंजली विभूते यांनी प.पू. पांडे महाराज यांच्या चरणी वाहिलेले कृतज्ञतारूपी भावपुष्प !

प.पू. पांडे महाराज
प.पू. पांडे महाराज यांच्या चरणी,
भावपूर्ण नमस्कार !
        प.पू. बाबा, आम्ही आश्रमात येऊन २ वर्षे पूर्ण झाली. मी आश्रमात आले, त्या वेळी मला वाताचा, तसेच शारीरिक आणि मानसिक त्रास होत होता. मी रुग्णाईत होते. त्या वेळी आपण मला भेटलात, ही माझी पूर्वजन्माची पुण्याई होती, असे मला वाटते.
१. प.पू. पांडे महाराज यांनी शारीरिक आणि 
आध्यात्मिक त्रासांवर उपाय केल्याने व्यक्त केलेली कृतज्ञता !
        बाबा, आपण या जिवाची पुष्कळ काळजी घेतलीत; म्हणून मी आपल्या चरणी अत्यंत कृतज्ञ आहे. आम्हा उभयतांना त्रास होत असतांना आपण वेळोवेळी आध्यात्मिक उपाय केले, तसेच वातासाठी तेल आणि इतर औषधे देऊन उपचार केलेत. आपल्या संकल्पानेच मला बरे केलेत; म्हणून आपल्या चरणी पुनःपुन्हा कृतज्ञता व्यक्त करते. आपण न कंटाळता मला तत्परतेने उपाय आणि नामजप कोणता करायचा ?, ते सांगता. आपले उपकार साधना करून फेडावेत, असे म्हटले तरी फिटणार नाहीत.

१.६.२०१६ या दिनांकापासून सर्वांनी करावयाचे उपाय

      आतापर्यंत सांगितलेले उपाय कोणत्या कालावधीत करायचे, हे मी सांगत असे. आता काळ झपाट्याने पालटत असल्याने आणि महर्षि वेळोवेळी साधना सांगत असल्यामुळे या वेळी कधीपर्यंत उपाय करायचे, हे या वेळी सांगत नाही.

साधकांनो, चौकशीसाठी येणार्‍या पोलिसांपासून सतर्क रहा !

       पोलीस चौकशी करण्याच्या निमित्ताने आश्रमात किंवा घरी येतील, तेव्हा ते काही शस्त्रास्त्रेे अथवा आक्षेपार्ह वस्तू आश्रमात ठेवून मग छापा घालून ती जप्त केली, असे दाखवतील. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीच्या संदर्भात सावधानता बाळगा ! याची काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत.
१. कोल्हापूर येथील एका हॉटेल मालकाला फसवण्यासाठी पोलिसांनीच हॉटेलमध्ये अमली पदार्थ ठेवले होते.
२. आनंद संप्रदायाच्या आश्रमात पोलिसांनी प्लास्टिकच्या मानवी कवट्या ठेवून त्यांची मानहानी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली होती. संप्रदायाच्या गुरूंचे कारागृहातच निधन झाले. ही गोष्ट ३५ वर्षांनंतर एका निवृत्त पोलीस अधिकार्‍याने उघड केली.
३. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणाच्या आरोपपत्रात कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या देवळाली येथील घरात महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकानेच (एटीएस्नेच)आर्डीएक्स ठेवून त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) म्हटले आहे.
       या गोष्टी लक्षात घ्या आणि पोलीस तसे काही करत नाहीत ना, यावर सतर्कतेने लक्ष ठेवा !
      सनातनच्या आश्रमांत पोलीस येतील, तेव्हा त्यांच्यावर लक्ष ठेवा, असे सनातन संस्था का सांगते, हे या उदाहरणावरून लक्षात येईल.
      काळाची आवश्यकता ओळखून स्वदेश आणि स्वभाषा यांवर मातेप्रमाणे प्रेम करा आणि मातेच्या संदर्भातील सर्व कर्तव्ये जागृत ठेवा ! - योगतज्ञ दादाजी वैशंपायन, कल्याण, ठाणे

सनातन ही संत घडवणारी शाळा !

      सनातन संस्थेचे कार्य संत तुकाराम, संत ज्ञानेश्‍वर व गाडगे महाराज यांच्यासारखे आहे. सनातन ही संत घडवणारी शाळा आहे !
- ह.भ.प. रेडे महाराज, अमरावती

साधकांना सूचना

अंनिसचे डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला 
सनातनला नाहक उत्तरदायी ठरवून पोलीस 
चौकशीला आल्यास डगमगून न जाता खंबीर रहा !
        अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्थेला आणि साधकांना नाहक गोवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. पोलीस चौकशीला आल्यास साधकांनी घाबरून न जाता, पोलिसांनी विचारलेल्या प्रश्‍नांना योग्य प्रकारे शांतपणे उत्तरे द्यावीत. कारण सनातन संस्थेचे सर्व कार्य वैध मार्गाने चालते. यापूर्वीही अशा घटनांमध्ये साधकांची चौकशी करण्यात आलेली आहे; मात्र अशा चौकशांमधून काहीही निष्पन्न झालेले नाही. कर नाही, त्याला डर कशाला या उक्तीप्रमाणे आपण काहीही केलेले नसल्यामुळे साधकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही.
        भगवान श्रीकृष्ण पाठीशी असल्यामुळे साधकांनी अशा प्रसंगात कोणतीही भीती न बाळगता प्रार्थना आणि नामजप करत खंबीरपणे प्रसंग हाताळावा.

फलक प्रसिद्धीकरता

कायद्याच्या रक्षणकर्त्यांनी 
कायदा हातात घेणे, हे लज्जास्पद !
       पुणे येथील सनातनचे श्री. आणि सौ. अकोलकर या साधक दाम्पत्याचे बंद असलेेले घर त्यांच्या अनुमतीविना उघडून आतील कपाटाचे कुलुप तोडून सर्व साहित्य अस्ताव्यस्त केलेले १ जून या दिवशी आढळले. देहली येथील सीबीआयच्या पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केल्याचे समजले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
        CBIne Puneke Sanatanke sadhak Akolkarjike band gharme bina anumati ghuskar chhanbeen ki.
Kya yah Kanoonka gairkanooni roop nahi ?
जागो !
        सीबीआय ने पुणे के सनातन के साधक अकोलकरजी के बंद घर में बिना अनुमति घुसकर छानबीन की.
क्या यह कानून का गैरकानूनी रूप नहीं ?

गुरुपौर्णिमेला ४७ दिवस शिल्लक

       कृपा हा शब्द कृप् या धातूपासून तयार होतो. कृप् म्हणजे दया करणे आणि कृपा म्हणजे दया, करुणा, अनुग्रह किंवा प्रसाद. गुरुकृपेच्या माध्यमातून जीव शिवाशी जोडला जाणे, याला गुरुकृपायोग असे म्हणतात.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

कर्तव्य 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
आई-वडील आणि इतर वडीलधारी माणसे देवघरातील मूर्तीसारखी सांभाळा. 
कर्तव्यात कुठेच न्यूनता ठेवू नका. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      पूर्वीचे राजे राज्याचा त्याग करून वानप्रस्थाश्रम स्वीकारायचे आणि अरण्यात जायचे. स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या एका तरी शासनकर्त्याने असे केले आहे का ? त्यांच्यामुळेच भारत अधोगतीच्या परमावधीला गेला आहे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

खरा शिष्य 
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
     रंगाच्या जशा अनेक छटा असतात, तशाच शिष्यत्वाच्याही अनेक पायर्‍या असतात.
१. मला कोणी शिव्या दिल्या, मारले, माझी कुणी हत्या (खून) केली, तरी त्याच्यावर तुम्ही दया केलीत, तर मी समजेन की, माझ्या गुरूने तुम्हाला सिद्ध (तयार) केले.
भावार्थ : शिव्या देणे, मारणे, हत्या करणे इत्यादी सर्व प्रकृतीतील आहे. हे समजून ते करणार्‍याविषयी राग न येणे, एवढेच नव्हे, तर करुणाकर भगवंताप्रमाणे त्याच्यावर दया करणे, हे शिष्याच्या खर्‍या प्रगतीचे लक्षण होय.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र

प्रसारमाध्यमे : हिंदूंच्या अपकीर्तीची केंद्रे !

संपादकीय
      एक खोटे हजार वेळा ओरडून सांगितले, की ते खरे वाटते, ही ग्लोबेल्स नीती जणू भारतातील निधर्मी (अर्थात् हिंदुद्वेषी) प्रसारमाध्यमांना समोर ठेवूनच रचली गेली असावी. तथाकथित सुशिक्षित, साम्यवादी, पुरोगामी, नास्तिक यांच्या हातात लेखणी गेली की, काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हल्लीची निधर्मी प्रसारमाध्यमे ! या प्रसारमाध्यमांचे वृत्तांकन बारकाईने पाहिल्यास हिंदुद्रोह हा त्यांचा केंद्रबिंदू असतो, हे पुन:पुन्हा जाणवते. दुर्दैवाने अशा हिंदुद्रोही प्रसारमाध्यमांवर दाखवल्या जाणार्‍या खोट्या वृत्तांच्या आधारे स्वत:चे मत बनवणारे आपल्याकडे कोटींच्या संख्येने आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn