Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातनच्या ४८ व्या संत 
पू. दातेआजी यांचा आज वाढदिवस !

कोटी कोटी प्रणाम !

 
संत मुक्ताबाई यांची आज पुण्यतिथी

रा.स्व. संघाकडून प्रशिक्षण घेतलेले भाजपचे कार्यकर्ते तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे खांदे तोडू शकतात ! - दिलीप घोष, बंगाल प्रदेशाध्यक्ष, भाजप

बंगालमधील भाजपच्या कार्यकर्त्यांवर 
होत असलेल्या आक्रमणांचे प्रकरण
      खडगपूर (बंगाल) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रशिक्षण घेतलेलेे भाजपचे कार्यकर्ते बंगालच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे खांदे केवळ हातानेच तोडू शकतात, अशी थेट चेतावणी भाजपचे बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी दिली आहे. इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, २७ मे या दिवशी बंगालच्या पश्‍चिमी मेदिनीपूर जिल्ह्यात घोष यांनी वरीलप्रमाणे प्रतिपादन केले.
ते पुढे म्हणाले की,
१. तृणमूलच्या कार्यकर्त्यांद्वारे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात अकारण चालू असलेली हिंसा खपवून घेतली जाणार नाही. ही हिंसा थांबली पाहिजे.
२. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी स्वत:मध्ये सुधारणा करावी अन्यथा ते जेव्हा बंगालच्या बाहेर जातील, तेव्हा त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल. बंगालच्या बाहेर भाजपचेच राज्य आहे.

आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमातून पुत्रप्राप्ती आणि चातुर्वर्ण्य यांच्या प्रचाराचा भाग काढून टाकणार ! - आयुर्वेद विभागाचे अधिष्ठाता डॉ. सतीश डुंबरे

आयुर्वेदातील एखाद्या भागाचा चुकीचा अर्थ काढून 
तो भागच अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय घेणार्‍यांनी 
उद्या संपूर्ण आयुर्वेदावरच बंदी आणल्यास आश्‍चर्य वाटायला 
नको ! हिंदूंना संपूर्ण आयुर्वेदाचे शिक्षण मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
       मुंबई, ३० मे (वार्ता.) - मुलीच्या जन्माला अल्प लेखत कोणत्याही स्वरूपात पुत्रप्राप्तीचा उपाय सुचवणे आणि त्याचा प्रचार अन् प्रसार करणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही बीएएम्एस्च्या आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमातून पुत्रप्राप्तीसाठी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र स्त्रीने करावयाच्या वेगवेगळ्या विधींचे उपाय सुचवण्यात आले आहेत. पूर्वजन्मीच्या कर्माचाही कसा संतानप्राप्तीवर परिणाम होतो, याचीही चर्चा त्यात आहे. त्यामुळे शासकीय अभ्यासक्रमानेच एकाच वेळी गर्भलिंग निदान प्रतिबंधक, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा भंग केला आहे. त्याचसमवेत चातुर्वर्णाचाही प्रचार करून जात, धर्म, वर्ण, लिंग या आधारांवर समाजात भेदभाव निर्माण करण्यास प्रतिबंध करणार्‍या राज्यघटनेचीही पायमल्ली करण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याविषयी विद्यापिठाच्या आयुर्वेद विभागाचे अधिष्ठाता डॉ. सतीश डुंबरे यांना चौकशी करण्यास सांगितले होते. त्यानुसार बीएएम्एस्च्या अभ्यासक्रमात पुत्रप्राप्तीचा आणि जातीवाचक उल्लेख असल्याचे मान्य करून ती माहिती काढून टाकण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे डॉ. डुंबरे यांनी सांगितले. (आयुर्वेदात पुत्रप्राप्तीसाठी उपाय दिले, तर त्यांचा योग्य कारणांसाठी वापर करण्याचे सोडून त्यावर बंदी आणण्याची मागणी करणे म्हणजे शास्त्रच नाकारण्यासारखे आहे, तसेच हिंदु धर्म पुनर्जन्म मानत असल्याने त्यात पूर्वकर्मांचा उल्लेख येणे साहजिकच आहे. समाजस्वास्थासाठी गुण-कर्मांनुसार चातुर्वर्ण्य व्यवस्था असतांना तिचा संबंध मानवनिर्मित जातींशी जोडणे हे अज्ञान नव्हे का ? - संपादक)

उत्तरप्रदेशमध्ये राममंदिर राजकीय सूत्र नाही ! - केंद्रीय मंत्री महेश शर्मा

जोपर्यंत राजकीय लाभ मिळत होता, तोपर्यंत राममंदिराचे 
सूत्र घेतले; आता या सूत्राला बाजूला ठेवले जात आहे. त्यामुळे 
उद्या हिंदूंही त्यांची फसवणूक करणार्‍यांना असेच बाजूला ठेवतील !
       नवी देहली - उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत राममंदिराचे सूत्र नसेल, तर विकास करणे आणि सुशासन आणणे यांसह भ्रष्टाचार समाप्त करण्यावर भर दिला जाईल. आम्ही राममंदिराला राजकीय विषय बनवू इच्छित नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी येथे दिले. (हे इतक्या वर्षांनंतर लक्षात आले का ? यापूर्वी त्याला राजकीय विषय बनवला, तेव्हा ते कळले नव्हते का ? - संपादक) शर्मा पुढे म्हणाले की, राममंदिराची उभारणी व्हावी, अशी कोट्यवधी लोकांची इच्छा आहे. ते अयोध्येत राममंदिर इच्छितात. आम्ही ते सर्वसंमतीने किंवा न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे करू इच्छितो. (गेली २७ वर्षे हेच सांगितले जात आहे; मात्र प्रत्यक्षात काहीही केले जात नाही, अशीच हिंदूंची भावना झालेली आहे, हे लक्षात घ्यायला हवे ! - संपादक) शर्मा यांनी दावा केला की, उत्तरप्रदेशमध्ये आम्हाला ४०३ पैकी २६५ जागांवर विजय मिळेल. (राममंदिर नसतांना अशा सत्तेचे काय करायचे आहे ? - संपादक)

वाराणसी येथे दुर्गावाहिनीकडून महिलांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण !

       नवी देहली / वाराणसी - उत्तरप्रदेशात बजरंग दलाने पुरुषांना हिंदूंच्या रक्षणासाठी शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम चालू केल्यावर त्याविरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांच्या संयोजकांना अटक करण्याची घटना नुकतीच घडली. आता अशा प्रकारचे प्रशिक्षण विश्‍व हिंदु परिषदेची महिला शाखा असणार्‍या दुर्गावाहिनीकडून वाराणसी येथे महिलांना शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण देण्यास आरंभ झाला आहे. यापूर्वी फैजाबाद, नोएडा येथेही अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र चालवण्यात येत आहे.
१. या प्रशिक्षणात महिलांना आणि मुलींना लाठीकाठी, तसेच एअर रायफल चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. देशातील वाढत्या आतंकवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी हे प्रशिक्षण देण्यात येत आहे, असे दुर्गावाहिनीकडून सांगण्यात आले आहे.

कॅनडामध्ये खलिस्तानी आतंकवाद्यांचे प्रशिक्षण तळ : भारतात आक्रमण करण्याचा कट

       चंडीगड - कॅनडामधील मिशन शहराजवळ खलिस्तानी आतंकवादी प्रशिक्षण तळ चालवत असल्याची माहिती भारतीय गुप्तचर संस्थांनी कॅनडा शासनाला दिली आहे. पंजाबमध्ये आक्रमण करण्याच्या सिद्धतेसाठी येथे प्रशिक्षण दिले जात असून शासनाने सावधानता बाळगावी, असे भारताने कळवले आहे.
१. पंजाब गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी यासंदर्भात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, कॅनेडातील हरदीप निज्जर याने खलिस्तान टेरर फोर्स (केटीएफ्) या आतंकवादी गटाची सूत्रे हाती घेतली आहेत. तो आतंकवादी कारवायांचा प्रमुख बनला आहे. भारतात आक्रमण करण्यासाठी निज्जर याने शीख तरुणांचा एक खास गट सिद्ध केला आहे.
२. निज्जर पाकिस्तानमधून हत्यारे आणण्याची सोय करणार होता; पण पठाणकोट येथील वायूदलाच्या केंद्रावरील आक्रमणानंतर सीमेवरील सुरक्षा वाढवण्यात आल्यामुळे तो यशस्वी होऊ शकला नाही.
३. निज्जर याच्याकडे कॅनेडाचे पारपत्र आहे. पंजाबमध्ये त्याला आतंकवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. लुधियानातील एका चित्रपटगृहात झालेल्या बाँबस्फोट प्रकरणी तो पंजाब पोलिसांना हवा आहे. त्या स्फोटात ६ जण मृत्युमुखी पडले होते.
४. पंजाब शासनाने केंद्रशासनाच्या गृह आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे निज्जर याला भारतात आणण्याची मागणी केली आहे.

पुणे येथे दुधाची वाहतूक करणार्‍या वाहनातून गोमांस नेणारे ५ जण गोरक्षकांच्या प्रयत्नांमुळे अटकेत

  • जे गोरक्षकांच्या निदर्शनास येते, ते पोलिसांच्या निदर्शनास का येत नाही ? कि ते हप्ते घेऊन असा अपप्रकार घडू देतात ?  
  • आणखी किती गोवंशियांच्या हत्या झाल्यावर गोवंश हत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही होणार ?
       पुणे, ३० मे - नगरजवळील एका गावातील शेतामध्ये गोवंशियांची हत्या करून त्यांच्या मांसाची वाहतूक करणारा टेम्पो गोरक्षकांनी खराडी बाह्यवळण मार्ग येथे पकडला. (गोमांस पकडून देणार्‍या गोरक्षकांचे अभिनंदन ! - संपादक)
       गोरक्षकांच्या जागरूकतेमुळे हे प्रकरण उघडकीस आले असून पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी दूध वाहतूक करणार्‍या वाहनाचा वापर करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला असून ५ जणांना अटक केली आहे.
१. गोमांसाची वाहतूक करणार्‍या टेम्पोच्या मागे चारचाकी होती. संशय येऊ नये, यासाठी गाडीवर भगवा ध्वज आणि अमूल दुधाचे विज्ञापन लावले होते. हालचाली संशयित वाटल्याने गोरक्षक स्वामी यांनी कोरेगाव भीमापासून (नगर) ते खराडी बाह्यवळणापर्यंत दुचाकीवरून या गाडीचा पाठलाग केला.

साध्वी प्रज्ञासिंह यांचा जामिनासाठी अर्ज

        साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर कोणतेही आरोप नसतांना त्यांना दोषमुक्त करण्यासाठी शासनाने स्वतःहून त्वरित न्यायालयात अर्ज दाखल केला असता, तर त्यांना त्वरित जामीन मिळू शकला असता; मात्र शासनाने हा अर्ज दाखल न केल्यामुळे पुढील निर्णयासाठी आणखी ११ दिवस वाट पहावी लागणार आहे. हेच शासनाचे चांगले दिवस (अच्छे दिन) का ?
        मुंबई -
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी यांनी ३० मेला न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर १० जूनला सुनावणी होणार आहे. त्याचसोबत सुधाकर चतुर्वेदी आणि प्रवीण तखलगी या दोन जणांनीही त्यांचे अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांच्या माध्यातून जामीनासाठी अर्ज केला आहे.

गांधी-नेहरूंऐवजी अन्य नेत्यांची टपाल तिकिटे अधिक प्रमाणात छापणार ! - केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद

     मुंबई - गांधी-नेहरू परिवारांतील सदमस्यांऐवजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची तिकिटे मोठ्या प्रमाणात छापणार असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी येथे दिली. भाजप कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रसाद पुढे म्हणाले, ‘‘केवळ नेहरू-गांधी परिवारातील लोकांची टपाल तिकिटे नेहमी का मिळत, अन्य नेत्यांची तिकिटे का मिळत नाहीत ? जर तुम्हाला या नेत्यांची तिकिटे मिळाली नाहीत, तर मला त्वरित दूरभाष करा.’’

कराड येथे 'लव्ह जिहाद'च्या विरोधात जैन समाजाच्या वतीने भव्य मूक मोर्चा

उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांना निवेदन 
मोर्च्यात सहभागी जैन समाज
     कराड - येथे घडलेल्या 'लव्ह जिहाद'च्या एका घटनेच्या विरोधात जैन समाजाचा भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. 'लव्ह जिहाद'चा वाढता प्रसार थांबवण्यासाठी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजलक्ष्मी शिवनकर यांना निवेदनही देण्यात आले. आतापर्यंत कराड येथे घडलेल्या 'लव्ह जिहाद'च्या प्रकरणांची चौकशी करून संबंधित धर्मांधांना कठोर शासन व्हावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

न्यूझीलंडमधील शाळेत इंग्रजी शिकवण्याआधी शिकवण्यात येते संस्कृत !

भारतात संस्कृत भाषेला मृत भाषा ठरवणार्‍यांना चपराक ! कुठे संस्कृतचे महत्त्व जाणणारे पाश्‍चात्त्य, 
तर कुठे या भाषेला मृत भाषा घोषित करून तिची उपेक्षा करणारे नतद्रष्ट भारतीय !
देववाणी संस्कृत भाषेची महानता !
    ऑकलॅन्ड (न्यूझीलंड) - आज स्वत:च्या देशात अर्थात् भारतात अपमान अन् उपेक्षा झेलत असलेली देवभाषा संस्कृत जगामध्ये मात्र एक सन्माननीय भाषा समजली जाते. संस्कृत शिकणे म्हणजे शिकण्यातील महत्त्वपूर्ण दर्जा प्राप्त करणे, असे मानले जाते. जगातील अनेक शाळांमध्ये संस्कृत भाषेला पाठ्यक्रमातील महत्त्वाचा भाग म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. न्यूझीलंडची राजधानी असलेल्या ऑकलॅन्डच्या माउंट इडेन क्षेत्रातील एका शाळेत विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी आधी संस्कृत शिकवले जाते. ‘फिकिनो’ नावाच्या या शाळेतील शिक्षकांचे म्हणणे आहे की, संस्कृतमुळे मुलांची शिकण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वृद्धींगत होते. शाळेचे मुख्याध्यापक पीटर क्रॉम्पटन म्हणाले, ‘‘संस्कृत ही एकमेव अशी भाषा आहे, जी व्याकरण आणि उच्चारण यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. जगातील कोणतीही भाषा शिकण्यासाठी संस्कृत आधार ठरते. संस्कृत शिकायला मिळाल्याने शाळेतील विद्यार्थी आनंदी आहेत. संस्कृत शिकल्यामुळे मुलांमध्ये इंग्रजी भाषा उत्तम पद्धतीने बोलणे आणि ती समजून घेण्याच्या क्षमतेत वृद्धी झाली आहे. शाळेत दाखला घेणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक आम्हाला विचारतात की, तुम्ही तुमच्या पाठ्यक्रमात संस्कृत भाषेला स्थान का दिले आहे ? त्यावर आम्ही त्यांना सांगतो की, ही भाषा श्रेष्ठ आहे. जगातील अत्युच्च प्रतीचे साहित्य याच भाषेत झाले आहे.’’

कोल्हापूर शहरातील केसापूर येथील देवस्थान भूमीच्या भाडेवाढीस तत्त्वत: मान्यता ! - मुख्यमंत्री

    मुंबई - स्वामी जगद्गुरु शंकराचार्य पिठाच्या कोल्हापूर शहरातील केसापूर पेठ येथील देवस्थानची भूमी भाड्याने देण्यात आली आहे. या भूमीस सध्याच्या सोन्याच्या आधारभूत किमतीप्रमाणे भाडेवाढ देण्यास मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे.
     २५ मे या दिवशी मंत्रालयात केसापूर येथील देवस्थान भूमीची भाडेवाढ मिळण्याविषयी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी महसूलमंत्री सर्वश्री एकनाथ खडसे, सहकारमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अमल महाडिक, श्रीमती शोभाताई फडणवीस, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, कोल्हापूर स्वामी जगद्गुरु शंकराचार्य पिठाचे सचिव शिवस्वरूप चंद्रकांत भेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. भूमीचा मोबदला म्हणून १८७४ ते २००१ पर्यंत १८६ रुपये ७० पैसे इतकी रक्कम देण्यात आली. त्यानंतरची २००१ ते २०१६ पर्यंतची थकबाकी रक्कमेच्या भाडेवाढीस वरीलप्रमाणे मान्यता दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदु राष्ट्राचे प्रखर पुरस्कर्ते ! - चैतन्य तागडे

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. चैतन्य तागडे
    पिंपरी, ३० मे (वार्ता.) - क्रांतिकारकांचे कुलपुरुष आणि हिंदुहृदयसम्राट असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदु राष्ट्राचे प्रखर पुरस्कर्ते होते. त्यांच्या या जयंतीदिनी त्यांच्या जाज्वल्य विचारांचे स्मरण करून हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प करूया, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. चैतन्य तागडे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त काळेवाडी येथील पार्वती इंग्लिश मिडियम शाळेच्या पटांगणावर आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी ५० हून अधिक सावरकरप्रेमी नागरिक उपस्थित होते.

डॉ. प्रकाश आमटे आणि कुटुंबीय हे समाजातील सकारात्मकेचे प्रतीक ! - विनोद तावडे

    पुणे, ३० मे (वार्ता.) - सुखाचे मोजमाप काय असले पाहिजे, हे तरुणांनी आमटे कुटुंबियांकडून शिकावे. समाजामध्ये अनेक सकारात्मक प्रवृत्तीची माणसे असतात. डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांचे कुटुंबीय समाजातील सकारात्मकतेचे प्रतीकच आहेत. डॉ. आमटे यांच्यासारखे महान काम नाही, तर किमान स्वतःच्या परिसरातील नकारात्मकता घालवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे विचार सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. सद्गुरु परिवार संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सद्गुरु भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी सद्गुरु परिवार संस्थेचे सर्वश्री आबा मोरे आणि सचिन मोरे, आमदार विनायक मेटे, आमदार भीमराव तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सहस्रो लिटर पाण्याची नासाडी !

प्रशासनाची असंवेदनशीलता ! 
     अमरावती, ३० मे (वार्ता.) - मराठवाडा एकीकडे दुष्काळाने होरपळत असतांना विदर्भात मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सहस्रो लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी येथील रस्ते चक्क पाण्याने स्वच्छ करण्यात आले. २८ मे या दिवशी मुख्यमंत्री रोजगार मेळाव्यासाठी येथे जाणार आहेत; मात्र त्यापूर्वी इर्विन चौक ते पंचवटी चौकापर्यंतचा रस्ता २७ मे या दिवशी सहस्रों लिटर पाणी टाकून स्वच्छ करण्यात आला. राज्याच्या काही भागांत दुष्काळ आहे. गावातील नागरिक पाण्यासाठी वणवण करत आहेत. त्याच वेळी येथेे मात्र टँकरद्वारे सहस्रो लिटर पाणी रस्त्यावर टाकले जात आहे. याविषयी प्रशासनाकडून कोणीही बोलायला सिद्ध नाही; मात्र हे पाणी रस्त्यावर कोणी टाकले, याचा प्रशासन शोध घेत आहे.

चिंचवड (पुणे) येथे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वतीने व्याख्यान आणि दुचाकी फेरी

     पिंपरी, ३० मे (वार्ता.) - स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वतीने दुचाकी वाहनफेरी आणि स्वातंत्र्यसूर्य सावरकर या विषयावर डॉ. परीक्षित सच्चिदानंद शेवडे यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन २८ मे या दिवशी येथील काशीधाम मंगल कार्यालयात करण्यात आले होते. 
     भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील महत्त्वाचे राजकारणी, हिंदूसंघटक, भाषाशुद्धी आणि लिपीशुद्धी या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे स्वातंत्र्यसूर्य सावरकर यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू डॉ. परीक्षित सच्चिदानंद शेवडे यांनी व्याख्यानातून उलगडले. डॉ. शेवडे यांच्या हस्ते घरोघरी आयुर्वेद या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी ब्राह्मण जागृती सेवा संघाचे अध्यक्ष श्री. अंकित काणे, चिंचवड शाखेचे अध्यक्ष श्री. श्रीनिवास कुलकर्णी, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. मोरेश्‍वर शेडगे हे उपस्थित होते. या वेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्‍वस्त श्री. मंदार देव महाराज यांचा विशेष सन्मान करण्यात आला. 

पाठ्यपुस्तकात क्रांतीकारकांना 'आतंकवादी' ठरवणार्‍यांवर गुन्हे प्रविष्ट करा !

निपाणी (जिल्हा बेळगाव) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन 

राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलतांना श्री. किरण दुसे आणि उपस्थित हिंदुत्ववादी
     निपाणी, ३० मे (वार्ता.) - देहली विद्यापिठाच्या 'भारत का स्वतंत्रता संघर्ष' या पाठ्यपुस्तकात हुतात्मा भगतसिंग यांच्यासह चंद्रशेखर आझाद, सूर्यसेन आदी क्रांतीकारकांना 'आतंकवादी' ठरवण्याचे घृणास्पद कृत्य केले आहे. अशा घटना कायमस्वरूपी रोखण्यासाठी याच्याशी संबंधित सर्वांवर त्वरित गुन्हे प्रविष्ट करण्यात यावेत. यासह हिंदु मंदिरांच्या गाभार्‍यात स्त्रियांना प्रवेश मागणार्‍या पुरोगाम्यांमुळे सहस्रो वर्षांच्या प्राचीन धार्मिक प्रथा-परंपरा शासनाने, तसेच न्यायालयाने परस्पर मोडीत काढू नयेत. त्याविषयी हिंदु धर्मातील धर्माचार्य, शंकराचार्य अथवा काशी विद्वत परिषद यांचे मार्गदर्शन घेऊन निर्णय घ्यावा, या मागण्यांसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने २६ मे या दिवशी येथे सकाळी ११ वाजता 'राष्ट्रीय हिंदू आंदोलन' करण्यात आले. या आंदोलनात श्री शिवप्रतिष्ठान, श्रीराम सेना, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे धर्माभिमानी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन श्री. जुगल वैष्णव यांनी केले. 

साध्वी प्रज्ञासिंग यांचा खोट्या आरोपाखाली छळ करणार्‍यांना कठोर शिक्षा होईपर्यंत लढा देण्याचा निर्धार करा ! - श्री. विक्रम भावे, हिंदु विधीज्ञ परिषद

भिवंडी (जिल्हा ठाणे) येथे हिंदु जनजागृती समितीच्या 
वतीने हिंदूंच्या रक्षणासाठी ऐतिहासिक हिंदु धर्मजागृती सभा ! 
 दीपप्रज्वलन करतांना डावीकडून सौ. नयना भगत, श्री. विक्रम भावे आणि श्री. प्रसाद वडके
     भिवंडी - आज इसिससारख्या संघटना आपल्या दारात येऊन पोहोचल्या आहेत. आझाद मैदानात महिला पोलिसांवर धर्मांधांनी अत्याचार करूनही पोलीस निष्क्रीय रहातात. या सर्व घटना हिंदु राष्ट्र स्थापनेची अपरिहार्यता दर्शवतात. हिंदूंनी कार्याला साधनेची जोड दिली, तरच धर्मक्रांती होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना होणे शक्य आहे. साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित आणि अन्य हिंदु आरोपी यांना खोट्या आरोपाखाली अनेक वर्षे अकारण कारागृहात रहावे लागले. याला उत्तरदायी असणार्‍यांना कठोर शिक्षा होईपर्यंत लढा देण्याचा निर्धार करूया, असे आवाहन हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. विक्रम भावे यांनी केले. वर्‍हाळदेवी माता मंगल भवन, कामतघर येथे २८ मे २०१६ या दिवशी सायंकाळी ६ वाजता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या प्रसंगी सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सभेसाठी ३५० हून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते. 

अणूबॉम्बचा जनक जेव्हा श्रीमद्भगवद्गीता उद्धृत करतो... !

      नवी देहली - अमेरिकेने ऑगस्ट १९४५ मध्ये जपानमधील हिरोशिमा शहरावर अणूबॉम्बद्वारे आक्रमण करून तेथील सुमारे १ लाख ४० सहस्र लोकांना ठार केले. त्या हिरोशिमा शहराला अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनी नुकतीच भेट दिली. या प्रसंगी ओबामा यांना अणूबॉम्बचे जनक रॉबर्ट ओपेनहायमर यांची आठवण झाली. याच ओपेनहायमर यांनी निर्मित केलेला अणूबॉम्ब तेव्हाचे अमेरिकेचे अध्यक्ष हॅरी टमन यांच्या आदेशाने हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर टाकण्यात आले होते. जन्माने ज्यू असलेले रॉबर्ट ओपेनहायमर यांनी अणूबॉम्बचा शोध लावण्यापूर्वी वर्ष १९३३ मध्ये संस्कृत शिक्षक आर्थुर रायडर यांच्याकडून संस्कृत भाषेचे शिक्षण घेतले. त्यांनी मूळ संस्कृत भाषेतील श्रीमद्भगवद्गीता वाचली. जपानमध्ये अणूबॉम्बचे आक्रमण झाल्यावर त्यांना या घटनेविषयी गीतेतील पुढील श्‍लोक आठवले आणि त्यांनी ते म्हणून दाखवले.

रमजानच्या वेळी ब्रिटनच्या बसमध्ये झळकणार ‘सुभान अल्ला’चे फलक !

मुसलमानांकडून धर्मप्रेम शिका !
       लंडन - रमझानच्या मासात लंडनसह ब्रिटनमधील सर्व शहरांतील शासकीय ‘बसेस’मध्ये ‘सुभान अल्ला’चे फलक झळकणार आहेत, अशी माहिती इंग्लंडमधील प्रसिद्ध वर्तमानपत्र ‘द डेली मेल’ने प्रसिद्ध केली आहे. सिरियाच्या युद्धामध्ये बळी पडलेल्यांना साहाय्य करण्यास ब्रिटनच्या मुसलमानांना उद्युक्त करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात येणार आहे. रमजान ६ जूनपासून चालू होत असून ७ जुलैपर्यंत चालणार आहे. लंडनच्या महापौरपदी सादिक खान या मुसलमान व्यक्तीची निवड होऊन एक मास उलटला नाही, तोच ही मोहीम राबवली जात आहे. (यातून मुसलमान संघटनांची जागरुकता आणि धर्मबंधूंवरील प्रेम दिसून येते ! दुसरीकडे जिहाद्यांच्या भयामुळे १९९० च्या दशकात लाखो काश्मिरी हिंदूंंना स्वत:च्याच देशात निर्वासित व्हावे लागले. त्या वेळी संपूर्ण भारतातील हिंदूंनी आवाज उठवला नाही. हे त्यांच्यासाठी लज्जास्पदच ! - संपादक)
      ‘इस्लामिक रिलीफ’ या मुसलमान धर्मादाय संस्थेच्या वतीने ही मोहीम लंडन, मँचेस्टर, बर्मिंघम आणि ब्रॅडफोर्ड या शहरांमध्ये राबवण्यात येणार आहे. ब्रिटनमध्ये मुसलमान समुदायाविषयी निर्माण झालेली नकारात्मक प्रतिमा दूर करण्यासाठी ही मोहीम साहाय्यभूत ठरेल, असे ‘इस्लामिक रिलीफ’चे संचालक इम्रान मादेन यांनी सांगितले.


मुसलमानेतरांनी इस्लामविषयी बोलू नये ! - मलेशियाच्या मंत्री आझालिना

भारतात एखाद्या केंद्रीय मंत्र्याने असे वक्तव्य हिंदुत्व रक्षणासाठी केले, 
तर त्याला लगेच ‘जातीय’ ठरवले जाते !
     क्वालालंपूर (मलेशिया) - मुसलमानेतरांनी इस्लामविषयी टिप्पणी करू नये, असे वक्तव्य मलेशियाच्या पंतप्रधानांच्या खात्याच्या मंत्री आझालिना ओथमन यांनी केले आहे. ‘मलेशियासारख्या बहुसांस्कृतिक देशामध्ये ऐक्य सांभाळण्यासाठी संवेदनशीलतेचा आदर केला पाहिजे’, असे मत आझालिना यांनी येथे एका पत्रकार परिषदेत बोलतांना व्यक्त केले. 
आझालिना पुढे म्हणाल्या की,
१. मुसलमानेतरांनी माझ्या धर्माविषयी बोलू नये. मी आपल्या धर्माविषयी बोलत नाही, मग आपणही माझ्या धर्माविषयी बोलू नका. (असा धर्माभिमान भारतातील हिंदुत्वनिष्ठ असल्याचे म्हणवून घेणारे राजकीय पक्ष का दाखवत नाहीत ? किमान त्यांनी तरी अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन न करता हिंदूंची न्याय्य बाजू उचलून धरायला हवी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे. - संपादक)
२. सामाजिक संकेतस्थळांवरून प्रतिक्रिया व्यक्त करतांना हल्लीच्या युवकांनी काळजी घेतली पाहिजे. शासन युवकांना टीका करण्यापासून परावृत्त करत नाही; मात्र युवकांनी देशाच्या संस्कृतीचा विचार करून प्रतिक्रिया द्याव्यात.

भ्रमणभाषवर सातत्याने ६ घंटे बोलल्याने ब्रिटनमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू !

विज्ञानाचे दुष्परिणाम !
      लंडन - कामानिमित्त भ्रमणभाषवर प्रतीदिन सातत्याने ६ घंटे बोलल्याने ब्रिटन येथील ४४ वर्षीय इयान फिलिप या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या व्यक्तीला ७ वर्षांपासून डोके दुखण्याचा त्रास होत होता. त्याच्या डोक्यात अचानक तीव्र वेदना होऊन डोळ्यांसमोर अंधारी आल्यावर केलेल्या मेंदूच्या चाचणीतून मेंदूमध्ये लिंबाच्या आकाराचा ‘ट्यूमर’ असल्याचे कळाले. तातडीने शस्त्रकर्म करूनही हा ‘ट्यूमर’ पूर्णपणे काढता आला नाही. फिलीप यांना जेव्हा भ्रमणभाषवर बोलल्याने झालेल्या ‘ट्यूमर’मुळे त्यांच्या जगण्याची शक्यता फारच अल्प असल्याचे लक्षात आल्यावर यांनी लोकांना भ्रमणभाषचे धोके सांगण्यास प्रारंभ केला.

आता पुढचा कायदा नको, तर आंदोलन लगेचच करा !

    देशातील शासनाने समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी उज्जैन येथे भरलेल्या हिंदु संसदेत देण्यात आली.
लोकसंख्यावाढीचे दुष्परिणाम
    एका ताटलीत एखादा खाद्यपदार्थ ठेवल्यावर त्यात निर्माण होणार्‍या सूक्ष्म जिवांची संख्या वाढत जाते. वाढता वाढता संख्या प्रमाणाबाहेर गेली की, तेथील सर्वच जीव मरतात. त्याप्रमाणे आता पृथ्वीवर होणार आहे. पृथ्वीवरील आताची लोकसंख्या ७१० कोटी झाली आहे. पृथ्वीची अधिकाधिक क्षमता ४५० कोटी मानवांना अन्न, पाणी, सर्पण इत्यादी देण्याची आहे. आता लोकसंख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे ताटलीतील जिवांप्रमाणे बहुतेक मानव मरतील. तिसरे महायुद्ध हे त्याचे वरवरचे कारण असेल. त्या काळात केवळ साधना करणारे भगवंताच्या कृपेमुळे वाचतील ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

स्वा. सावरकर जयंतीनिमित्त काढलेल्या भगव्या पदफेरीने सांगोल्यात (जिल्हा सोलापूर) हिंदुत्वाचा आवाज पुन्हा एकदा बुलंद !

पदफेरीत सहभागी सावरकरप्रेमी
     सांगोला (जिल्हा सोलापूर), ३० मे (वार्ता.) इस देशमे रहना होगा वन्दे मातरम् कहना होगा, वन्दे मातरम्, भारतमाता की जय, जय भवानी जय शिवाजी या जयघोषाने सांगोल्यात हिंदुत्वाचा आवाज पुन्हा एकदा बुलंद झाला. स्वा. सावरकर जयंतीनिमित्त २८ मेला सकाळी १० वाजता देशपांडे गल्लीत स्वा. सावरकरांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते अधिवक्ता शहाजीबापू पाटील, भाजपचे श्री. गणपतराव मिसाळ यांनी आपले विचार व्यक्त केले. या वेळी शेकापचे आमदार श्री. गणपतराव देशमुख उपस्थित होते. यानंतर डबीर चौक देशपांडे गल्लीपासून प्रारंभ झालेली पदफेरी शहरातील प्रमुख मार्गावरून जाऊन पुन्हा देशपांडे गल्ली येथे पदफेरीची सांगता झाली.

ज्या क्रांतीकारकांनी स्वतःच्या प्राणांचे मोल देऊन ही भूमी स्वतंत्र केली, त्या भूमीवर मद्यधुंद होऊन नाचतांना या दारूड्यांना त्यांची आठवणसुद्धा होऊ नये, हे या हिंदु राष्ट्राचे दुर्दैव ! (साप्ताहिक राष्ट्र्रपर्व, १७.१.२०११)

राज्यातील वन आणि पुरातत्व विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावाने १५० दुर्ग नामशेष होण्याच्या मार्गावर

शिवभक्तांनो, पराक्रमाची यशोगाथा सांगणार्‍या दुर्गांच्या 
अवस्थेला उत्तरदायी असलेल्या संबंधित विभागाला जाब विचारा ! 
     पुणे, ३० मे - राज्यभरातील १५० हून अधिक दुर्गांचा ताबा असणारा वन विभाग आणि पुरातत्व विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळेे हे दुर्ग नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या दोन्ही विभागांतील अधिकार्‍यांमध्ये संवाद होत नसल्याने अनेक गडांवरील संवर्धनाची कामे रखडली आहेत. त्यामुळे हे दुर्ग नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वन विभागाच्या कह्यात असलेल्या गडांवर संवर्धनाची कामे करायची झाल्यास त्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. (अशी किचकट प्रक्रिया आणि त्याचे कायदे भाजप शासन पालटेल का ? - संपादक) त्या वास्तूंच्या संवर्धनासाठी वन विभागाकडून पुरातत्व खात्याशी संपर्क करून कोणतेही पाऊल उचलले जात नाही. (यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम विस्मृतीत जाण्यासाठी वन विभाग प्रयत्न करत आहे, असे म्हटल्यास चुकीचे काय ? - संपादक)

एकनाथ खडसे यांचे मंत्रीपद काढण्याची काँग्रेसचे शिष्टमंडळ आणि अंजली दमानिया यांची मागणी

दाऊद-खडसे दूरध्वनी संपर्क प्रकरण 
     मुंबई, ३० मे (वार्ता.) - सायबर हॅकर मनीष भंगाळे यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट केलेली याचिका ३० मे या दिवशी न्यायालयाने स्वीकारली आहे. यावर ६ जून या दिवशी सुनावणी होणार आहे. खडसे-दाऊद दूरध्वनी संपर्काची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भंगाळे यांनी केली आहे. या प्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची ३० मे या दिवशी भेट घेतली. खडसे यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. आपच्या नेत्या अंजली दमानिया यांनीही अशी मागणी केली आहे.

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांत २२ प्रतिशतने वाढ

ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे ! 
     संभाजीनगर, ३० मे - मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत मिळून या वर्षी ४५४ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. वर्ष २०१५ मध्ये शेतकरी आत्महत्यांची संख्या ही ३७२ इतकी होती. ही आकडेवारी विचारात घेतली, तर मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण २२ प्रतिशतने वाढले आहे. गेली ४ वर्षे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये दुष्काळ आहे. यंदा येथील सर्व धरणांची पातळी कमालीची खाली गेली असून १ प्रतिशत इतकेच पाणी शेष आहे.

केरळ राज्यातील हिंदूंवरील हिंसाचार बंद करा ! - भाजप प्रदेशाध्यक्षाची साम्यवाद्यांना चेतावणी

केंद्रातील सरकार साम्यवाद्यांवर यासाठी दबाव का आणत नाही ?
     थ्रीशूर - भाजपचे केरळ राज्याचे प्रदेशाध्यक्ष कुम्मानम् राजशेखरन् यांनी शासनकर्ते साम्यवादी पक्षाला चेतावणी देऊन राज्यातील हिंदूंवरील हिंसाचार बंद करण्याची मागणी केली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यावर मार्क्सवादी कार्यकर्त्यांच्या हिंसाचारास उधाण आले असून भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि हिंदू यांच्यावर झालेल्या आक्रमणात अनेकजण गंभीररित्या घायाळ झाले आहेत, तर एका भाजप कार्यकर्त्याची हत्या झाली आहे.

मुसलमानांना आरक्षण देणे शक्य नाही ! - शिवपाल सिंह, मंत्री, उत्तरप्रदेश

     लक्ष्मणपुरी (लखनौ) - येथे जिल्हा नियोजनाच्या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रश्‍नांना उत्तरे देतांना मंत्री शिवपाल सिंह यांनी ‘सध्याच्या स्थितीत मुसलमानांना आरक्षण देणे शक्य नाही’, असे म्हटले आहे. समाजवादी पक्षाने त्यांच्या निवडणुकीच्या घोषणापत्रात मुसलमानांना १८ टक्के आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले होते. मुख्यमंत्री अखिलेश यादव मुसलमानांना २० टक्के आरक्षण देण्याच्या बाजूने आहेत. मुसलमानांच्या अधिकारांसाठी लढत राहून त्यांना आरक्षण देण्यात येणार्‍या अडचणी सोडवून लवकरच आरक्षण देण्यात येईल, असे मुख्यमंत्री यादव एका कार्यक्रमात म्हणाले होते. तथापि त्यांचे काका असणारे शिवपाल सिंह यांनी मात्र आरक्षण देणे अशक्य असल्याचे सांगितले.

अमेरिकेत शिकणारा भारतीय विद्यार्थी इसिसच्या ‘व्हिडिओ’त !

     नवी देहली - इसिसने प्रसारित केलेल्या ‘व्हिडिओ’त इसिसमध्ये भरती झालेल्या भारतीय मुसलमान युवकांच्या छायाचित्रांचा समावेश आहे. यातील अनेकांची ओळख भारतीय गुप्तहेर खात्याने पटवली आहे, तसेच यात अमेरिकेत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेला आणि आंध्रप्रदेशातील विद्यार्थ्याचा समावेश आहे. यापूर्वी एन्आयएच्या मते इसिसमध्ये भरती झालेल्या भारतीय आतंकवाद्यांची संख्या २५ असेल, असा अंदाज होता. आता मात्र ती ४० च्या वर असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (‘देशातील मुसलमान इसिसला स्वीकारणार नाहीत !’, असे म्हणणार्‍या केंद्रीय गृहमंत्र्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? - संपादक)भारतमाता की जय बोलणे, हा अधिकार ! - जावेद अख्तर

    पुणे, ३० मे - भारतमाता की जय बोलणे हे आपले केवळ कर्तव्यच नव्हे, तर अधिकारही आहे. त्यामुळे मी भारतमाता की जय म्हणणारच. शेरवानी आणि टोपी घालावी, असे संविधानात कुठे म्हटले आहे ? संविधानात ते लिहिलेले नाही, असा प्रतिवाद पद्मश्री जावेद अख्तर यांनी ओवैसीचे नाव न घेता केला. (हाच भाग अख्तर यांनी मुसलमान समाजाला सांगायला हवा. - संपादक) गोयल गंगा ग्रुपने उत्कृष्ट कामगिरी बजावणार्‍या सहकार्‍यांना गौरवण्यासाठी उंड्री येथील आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी गोयल गंगा ग्रुपचे अध्यक्ष जयप्रकाश गोयल आणि अन्य संचालक उपस्थित होते.

फलक प्रसिद्धीकरता

राममंदिर नसतांना काय करायचे आहे त्या सत्तेचे ? 
     'उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत राममंदिराचे सूत्र नसेल. विकास आणि सुशासन तसेच भ्रष्टाचार समाप्त करण्यावर भर दिला जाईल. आम्ही ४०३ पैकी २६५ जागांवर विजयी होऊन सत्तेवर येऊ', असे वक्तव्य भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी केले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
UP chunavme BJP RamMandirka sutra nahi uthayegi,403 me se 265 seatopar BJP chunkar ayegi -Mahesh Sharma 
 Ram Mandirke na rehte sattaka Hinduoko kya upyog ? 
जागो ! 
उत्तरप्रदेश चुनावों में भाजपा राममंदिर का सूत्र नहीं उठाएगी. ४०३ में २६५ सीटों पर भाजपा चुनकर आएगी !
 - महेश शर्मा 
 राममंदिर के न रहते सत्ता का हिन्दुआें को क्या उपयोग ?

भारतीय संस्कृती जगाला मार्गदर्शक ! - पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

केवळ असे सांगणे नव्हे, तर भारतीय संस्कृती आचरणात 
आणण्यासाठी तसे शिक्षण देण्याची व्यवस्था मंत्र्यांनी करणे अपेक्षित आहे ! 
     जत (जिल्हा सांगली), ३० मे (वार्ता.) - जगात शांतता, समानता यांची शिकवण देण्यासमवेत आनंदी जीवन जगण्याची परिभाषा शिकवणारी भारतीय संस्कृती जगासाठी मार्गदर्शक आहे, असे मत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. जत तालुक्यातील बालगाव येथे गो-सेवा समिती आणि गुरुदेव आश्रम बालगाव यांच्या वतीने आयोजित गो-आराधना महोत्सव आणि गो-शाळा उद्घाटन समारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आमदार विलासराव जगताप, प.पू. शांतमल्लिकार्जुन स्वामीजी, प.पू. महेशानंद स्वामीजी, माजी आमदार श्री. पृथ्वीराज देशमुख, तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (जतसारख्या दुष्काळी भागात गायींचे जतन होण्यासाठी प्रयत्नरत गोसेवा समिती आणि गुरुदेव आश्रम बालगाव यांचे अभिनंदन ! प्रत्येकाने गाय वाचवण्यासाठी अशा प्रकारे प्रयत्न केल्यास निश्‍चितच गायींच्या संख्येत वाढ होईल ! - संपादक) 

विनोदी कलाकार तन्मय भटकडून लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांची चलचित्राद्वारे खिल्ली

विनोदाच्या नावाखाली प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांची टर उडवणे ही विकृतीच ! 
 वादग्रस्त चलचित्र काढण्यासाठी पोलिसांकडून गुगल, यु-ट्यूबशी संपर्क 
     मुंबई - 'एआयबी'चा विनोदी कलाकार तन्मय भट याने सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांची विनोदाच्या नावाखाली खिल्ली उडवणारे अन् अश्‍लाघ्य टीका करणारे चलचित्र (व्हिडिओ) बनवून प्रदर्शित केले आहे. या चलचित्राचा बॉलीवूडमधील कलाकार आणि राजकीय पक्ष यांनी जोरदार विरोध केला असून मनसेने पोलीस तक्रार प्रविष्ट केली आहे. या तक्रारीनंतर सायबर सेलने या प्रकरणी कारवाईस आरंभ केला असून चलचित्र काढून टाकण्यासाठी गुगल, फेसबुक आणि यू-ट्युब यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती सायबर सेलचे साहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत पाठक यांनी दिली आहे. सचिन आणि लतादीदींवर टीका करणार्‍या तन्मय भटला ठोकून काढण्याची धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेेेने दिली आहे. भाजप आणि शिवसेनेनेही या प्रकरणी विरोध केला आहे.

वायूप्रदूषण आणि उपाय विशेषांक

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत 

 प्रसिद्धी दिनांक : ५ जून २०१६ 
पृष्ठ संख्या : १०, मूल्य : ५ रुपये 

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ४ जून 
या दिवशी दुपारी ३ पर्यंत 'इआरपी प्रणाली'त भरावी !

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यासाठी माजी पंतप्रधान नरसिंहराव यांनी शिफारस केल्याचे उघड !

तत्कालीन पंतप्रधानांनी स्वत: शिफारस करूनही नेताजी सुभाषचंद्र बोस यांना 
आजपर्यंत ‘भारतरत्न’ पुरस्कार न मिळणे संतापजनक !
     नवी देहली - नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची शिफारस भारताचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी केली होती, अशी माहिती नेताजींविषयीच्या उघड करण्यात आलेल्या गोपनीय धारिकांमधून समोर आली आहे. 
     १० ऑक्टोबर १९९१ या दिनांकाच्या पत्रात नरसिंहराव यांनी राष्ट्रपती आर्. व्यंकटरमण् यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी ही शिफारस केली होती.५ लाख रुपयांसाठी मेरठ (उत्तरप्रदेश) येथील हिंदु युवकाने ख्रिस्ती धर्म स्वीकारला !

हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावाचे फलित !
      मेरठ - येथे एका हिंदु युवकाने ५ लाख रुपयांसाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याची घटना घडली. हा युवक शिकवणीला जात असल्याचे सांगून चर्चमध्येे जात होता. (हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याने ते अन्य पंथियांकडून दाखवण्यात येणार्‍या आमीषांना बळी पडतात. यासाठी हिंदूंच्या संघटनांनी हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचा प्रयत्न करावा ! - संपादक) या घटनेची माहिती मिळताच ‘हिंदु स्वाभिमान संस्थे’चे पदाधिकारी त्याच्या घरी पोचले तेव्हा त्याने याची स्वीकृती दिली. याविषयी त्याच्या कुटुंबियांनाही कोणतीही माहिती नव्हती. ‘हिंदु स्वाभिमान संस्थे’च्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, सदर युवकाला त्यांनी चर्चमध्ये जातांना पाहिले होते. यानंतर संशय आल्याने त्याच्या घरी जाऊन झडती घेतल्यांनतर त्याच्या ‘बॅगे’त बायबल आणि ख्रिस्ती धर्माची काही पुस्तके, तसेच २४ लोकांच्या नावाची सूची मिळाली. आता त्याला पुन्हा हिंदु धर्मात घेण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

जेएन्यूमध्ये मुजीब याने देशविरोधी घोषणा दिल्या ! - अभाविप

     नवी देहली - जेएन्यू प्रकरणात एक नवीन ‘व्हिडिओ’ समोर आला आहे. हा ‘व्हिडिओ’ येथील एका बैठकीचा आहे. यात या प्रकरणातील एक आरोपी विद्यार्थी उमर खालिद समवेत मुजीब गट्टू नावाचा विद्यार्थी आहे, असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने म्हटले आहे. मुजीब यानेच ९ फेब्रुवारीला चेहरा लपवून देशविरोधी घोषणा दिल्या होत्या, असा दावा केला आहे. या प्रकरणात मुजीबवरही कारवाई करण्यात आली होती.

केरळमधील ‘मातृभूमी’ या मल्याळम् वृत्तपत्राकडून गणपतीचे विडंबन !

साम्यवाद्यांचा हिंदुद्वेष !
      तिरूवनंतपूरम् (केरळ) - ‘मातृभूमी’ या मल्याळम् भाषेतील दैनिकाने एका चित्रामध्ये २७ मे २०१६ या दिवशी माकपचे नेते व्ही.एस्. अच्यूतानंद यांना गणपतीच्या रूपात आणि त्यांच्यासमोर एक व्यक्ती प्रसाद घेऊन उभी आहे अन् ते सोंडेेने त्यातील प्रसाद घेत असल्याचे चित्रात दाखवले आहे. (साम्यवादी कधीपासून गणपतीची पूजा करू लागले ? हिंदूंच्या देवतांचा अनादर करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. - संपादक)
     हे चित्र हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी नसून देवतेचे केलेले विडंबन समाजावे, यासाठी छापण्यात आले आहे, याची वाचकांनी नोंद घ्यावी ! - संपादक

श्री जगन्नाथ मंदिरावर पडणार्‍या पावसाच्या थेंबाच्या आकारावरून वर्तवला जातो पावसाळ्याचा अंदाज !

प्राचीन हिंदु धर्मावर चिखलफेक करणार्‍यांना सणसणीत चपराक !
     कानपूर (उत्तरप्रदेश) - घाटपूरजवळील बेहाता येथे असलेल्या भगवान श्री जगन्नाथ मंदिरावर पडणार्‍या पावसाच्या थेंबाच्या आकारावरून ‘पावसाळा कसा जाईल’, याविषयी अंदाज व्यक्त केला जातो. मंदिराच्या आगाशीमध्ये पाणी साठवून हे भविष्य वर्तवले जाते. गत १०० वर्षांपासून हे मंदिर ‘रेन टेम्पल’ या नावाने ओळखले जाते. मंदिरावर पडणार्‍या पावसाच्या पाण्याच्या थेंबाचा आकार मोठा असल्यास चांगला पाऊस पडेल आणि थेंबाचा आकारा पुष्कळ लहान असल्यास दुष्काळ पडू शकतो, असे समजले जाते. अशा प्रकारे वर्तवलेला अंदाज समजून घेण्यासाठी अनेक संशोधन पथके आणि शास्त्रज्ञ येथे आले होते; मात्र कोणतेही निष्कर्ष समोर आलेले नाहीत. भगवान श्री जगन्नाथ मंदिराचे मुख्य पुजारी के.पी. शुक्ला म्हणाले, ‘‘या मंदिराची सुंदर कलाकृती ही एकमेव आहे. संपूर्ण राज्यामध्ये अशा तर्‍हेची कलाकृती असलेले दुसरे कुठलेच मंदिर नही. सम्राट अशोकाच्या काळामध्ये देशाच्या विविध भागांमध्ये निर्माण करण्यात आलेल्या स्तूपाप्रमाणे हे मंदिर बनवले आहे. या मंदिरामध्ये आमची ७ वी पिढी पूजा करत आहे.’’विद्यार्थ्याला इयत्ता आठवीपर्यंत वरच्या इयत्तेत ढकलण्याची पद्धत नको ! - सुब्रह्मण्यम् समितीची शिफारस

शिक्षणव्यवस्थेतील निरर्थकता !
     नवी देहली - विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीपर्यंत कोणतीही परीक्षा न देता वरच्या इयत्तेत ढकलण्याची पद्धत चुकीची आहे. ही ‘ढकलगाडी’ बंद करावी, अशी शिफारस टी.एस्.आर्. सुब्रह्मण्यम् यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केली. ५ सदस्यांच्या या समितीने बनवलेला अहवाल केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांना सादर केला. यात ‘इयत्ता पाचवीपासूनच परीक्षा घ्याव्यात. विद्यार्थी एकाच इयत्तेत ३ वेळा नापास झाल्यावर त्याला शाळेतून काढून टाकावे, आदी शिफारसी करण्यात आल्या आहेत.

इस्लामिक बँक उघडण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे असदुद्दीन ओवैसी यांना आनंद !

या बँकेत जमा केलेले पैसे जिहादी आतंकवाद्यांसाठी 
वापरले जाणार नाहीत, याची शाश्‍वती केंद्रसरकार देणार का ?
       नवी देहली - केंद्र सरकारने सौदी अरेबियातील शरिया कायद्यानुसार चालणार्‍या इस्लामिक डेव्हलपमेंट बँकेला देशात शाखा उघडण्याची अनुमती दिल्यावर एम्आयएम्चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी पुष्कळ आनंदी झाले आहेत. ओवैसी यांनी सरकारने एक चांगले पाऊल उचलले आहे, असे ट्विट केले.

हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदुजागृती डॉट ऑर्ग’ (Hindujagruti.org) या संकेतस्थळाच्या प्रसारकार्याचा एप्रिल २०१६ मधील आढावा

१. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या ही वाचकसंख्या 
‘गूगल अ‍ॅनॅलिटिक्स’ या ऑनलाईन संगणकीय प्रणालीतून मिळते. 
वाचकांसाठी टीप : सध्याच्या काळात इंटरनेटचा वापर करणारे अनेक जण फेसबूक, ट्विटर अशा प्रकारच्या सामाजिक (सोशल नेटवर्किंग) संकेतस्थळांच्या माध्यमातून क्रियाशील असतात. त्यामुळे समितीनेही काळाची आवश्यकता ओळखून फेसबूक, ट्विटर अशा ‘सोशल नेटवर्किंग’ संकेतस्थळांवर आपले खाते आणि पान (फेसबूक पेज) यांना काही वर्षांपूर्वी प्रारंभ केला होता. समितीच्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या वाचकांव्यतिरिक्त सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांच्या माध्यमातून समितीशी जोडल्या गेलेल्या वाचकांचाही एक वेगळा वर्ग असल्याने त्या संदर्भातील माहिती आम्ही प्रसिद्ध करतो.)

भारतीय ‘धर्मनिरपेक्षते’ची १० उदाहरणे !

भारतातील धर्मनिरपेक्षता ही किती तथाकथित आहे, हे पुढील उदाहरणांवरून लक्षात येईल.
१. ‘भारतात ८० टक्के हिंदु असूनही हिंदूंचे आराध्यदैवत श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या जन्मदिनी केंद्रसरकारने अनिवार्य सुटी घोषित केली नाही; मात्र सौदी अरेबियात जन्मलेले महंमद पैगंबर यांच्या जन्मदिनी, तसेच येशू ख्रिस्त यांना सुळावर देण्याच्या दिनानिमित्त मात्र अनिवार्य सुट्या घोषित करण्यात आल्या आहेत. यामुळे ‘श्रीराम आणि श्रीकृष्ण ही पौराणिक पात्रे असून महंमद पैगंबर आणि येशू ख्रिस्त हे ऐतिहासिक पुरुष होते’, या धर्मनिरपेक्षवाद्यांच्या मताला अप्रत्यक्षपणे पुष्टी मिळते.
२. शासन हिंदूंची मंदिरे अधीग्रहित करते आणि त्याचा निधी वाटेल तसा वापरते. याउलट मशिदी, मदरसे, चर्च आणि अल्पसंख्यांकांच्या इतर धार्मिक वास्तू शासन कह्यात घेत नाही. त्यांना जनतेच्या करातून मिळालेल्या पैशांवर शासनाचे काहीच नियंत्रण नसते. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये ‘हिंदूंची मालमत्ता शत्रूची आहे’, असे घोषित करून ती कह्यात घेण्याचे अधिकार शासनास आहेत. ‘धर्मनिरपेक्ष’ भारतात मात्र हिंदूंच्या बाबतीत असे चालू आहे.

हिंदूंनो, हिंदु धर्माचा सन्मान आणि राष्ट्राविषयी अभिमान हा केवळ तुमचा अधिकार नव्हे, तर ते तुमचे कर्तव्यच !

पू. दिव्य जीवनदासजी
महाराज
१. देशाचे सर्वांत मोठे शत्रू असणारे धर्मांध आणि मार्क्सवादी हे 
राष्ट्रप्रेमींना राष्ट्रभक्तीच्या मार्गापासून भरकटवण्याचे काम करत असणे 
     ‘धर्मांध आणि मार्क्सवाद, हे या देशाला असलेले २ सर्वांत मोठे धोके आहेत, हे सिद्ध करण्याची आता मला कणभरही आवश्यकता वाटत नाही. हे दोन्ही समूह त्यांची कलुषित (विकृत) मानसिकता आणि विषारी विचार यांमुळे समाजाला दूषित करण्याचा सतत प्रयत्न करत असतात. हे लोक नेहमी खर्‍या राष्ट्रप्रेमींना त्यांच्या मार्गापासून भरकटवण्याचा प्रयत्न करतात. या लोकांमध्ये तार्किक शक्तीचा पूर्णपणे अभाव असतो. त्यांच्या विचारांना कोणताच आधार नसतो. असेलच कसा ? ‘या देशाचा पाया उखडणे’, हे ज्यांचे लक्ष्य असेल, त्यांच्या विचारांचा आधार शोधणे’, याला मूर्खपणाच म्हटले जाईल. त्यांची री ओढणारे धर्मनिरपेक्षतावादी तर एवढे निर्लज्ज आहेत की, त्यांना तार्किक पातळीवर झोडपल्यानंतरही ते भोळेपणाचा आव आणतात !

कुटुंबव्यवस्थेचे पुनर्गठन हाच वृद्धाश्रमांना पर्याय !

     सध्या भारतीय कुटुंबव्यवस्था आणि तिची जडणघडण ही पाश्‍चात्त्यांच्या अभ्यासाचे आणि कुतुहलाचे सूत्र झाले आहे. भारतीय कुटुंबव्यवस्था ही सनातन हिंदु धर्माची मानवजातीसाठी असलेली देणगी म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. हिंदु धर्माचे महत्त्व पाश्‍चिमात्य देशांनी ओळखले असून तेथील शासनांनी विविध सामाजिक स्तरांवरील सर्व प्रश्‍नांसाठी उत्कृष्ट उपाययोजना म्हणून त्यातील सूत्रांचा अवलंब करण्यास आरंभ केला आहे; परंतु दुर्दैवाने आज आपल्या संस्कृतीच्या या अंगाला पाश्‍चिमात्यांच्या अंधानुकरणामुळे वाळवी लागली आहे. भारतातील प्रतिदिन वृद्धाश्रमांची वाढती संख्या ही नक्कीच भूषणावह नाही. पाल्य जेव्हा त्यांच्या कर्तव्यांपासून विन्मुख होतात, तेव्हा वृद्धाश्रमांसारख्या शापित वास्तूंची निर्मिती होते. भारतात वर्ष १९९८ पर्यंत वृद्धाश्रमांची संख्या साधारणत: ७२८, तर तीच संख्या वर्ष २०१६ मध्ये ३ पटींनी वाढली आहे. वृद्धाश्रमांसारख्या शापित वास्तूंची निर्मिती हे भारतीय संस्कृतीची नाळ तुटत चालल्याचे द्योतक आहे, असेच म्हणावे लागेल.

आक्रमक आणि इंग्रज यांनी भंग केलेली भारताची अखंडता !

     ‘भारत हा पुष्कळ प्राचीन देश आहे. विविधतेने नटलेल्या या देशात अनेक धर्म आणि संस्कृतीचे लोक रहातात; मात्र आज जसे भारताचे स्वरूप आहे तसे पूर्वी नव्हते. इतिहासात भारत एक विशाल राष्ट्र होते. काळाच्या ओघात या भव्य राष्ट्राचे तुकडे होत गेले. यामुळे भारतीय संस्कृती विभागली गेली. अशा काही देशांची नावे पाहूया जे कधीकाळी अखंड भारताचा एक भाग होते.
इराण - इ.स.पू.२००० मध्ये बलुचिस्तानमार्गे आर्य इराणमध्ये पोहोचले. आर्यांनी आपली संस्कृती आणि सभ्यतेचा तेथे प्रसार केला. आर्यांवरून या देशाचे ‘आर्याना’ असे नाव पडले. इ.स. ६४४ मध्ये अरबांनी इराणवर आक्रमण करून तेथे स्वत:चे साम्राज्य प्रस्थापित केले.

बंगालमध्ये हिंदूंच्या भविष्यावरील प्रश्‍नचिन्ह कायम !

बंगालमधील समस्यांच्या निराकरणासाठी ‘हिंदु राष्ट्र’ हाच एकमेव उपाय !
कु. प्राजक्ता धोतमल
     बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. निवडणुकांपूर्वीच्या तेथील चित्रातून प्रस्थापित राजवट उलथेल कि काय, असे संकेत मिळत होते; मात्र झंझावाती वादळातही झाडावरचे एखादे पान टिकून रहावे त्याप्रमाणे सगळ्या आरोपांच्या आणि घोटाळ्यांच्या दलदलीतून पूर्वीच्याच पक्षाची राजवट तेथे आली. राजकीय क्षेत्र ढवळून निघेल आणि चातकासारखा न्याय आणि सुरक्षा यांच्या प्रतीक्षेत असणारा हिंदु समाज थोडातरी निर्धास्त होईल, अशी १ टक्का तरी आशा होती; पण निकालानंतर परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे पाहून तीही मावळली. आजवरची बंगालमधील हिंदूंची दु:स्थिती पहाता त्यांच्या भविष्याविषयी पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह उभे राहिले !

उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर !

सुट्टीतील परिपाठ !
     सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. हा सुट्टीचा कालावधी मुलांमध्ये विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालवाचकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
त्याग
      सर्वकाही दिल्याने राजाला जर एवढा आनंद होतो, तर ते घेण्यात काहीच अर्थ नाही, हे उमगल्याने शिष्याने मायेचा त्याग करून पुन्हा स्वतःच्या गुरूंकडे जाणे : ‘पहाटेच्या वेळी तू राजाला जाऊन भेट. तो तुला हवे ते देईल’, असे एका गुरूंनी शिष्याला सांगितले. शिष्य भेटायला गेल्यावर राजा म्हणाला, ‘‘तू माझे राज्य जरी मागितलेस, तरी मी ते तुला देईन.’’ शिष्य म्हणाला, ‘‘मला तुझ्यापाशी असलेले सर्व दे.’’ राजाने त्याला राज्य दिले. त्यावर तो शिष्य म्हणाला, ‘‘मी तुझ्यापाशी असलेले सर्व मागितले आहे. त्यामुळे केवळ अंगावरच्या कपड्यानिशी मी तुला या महालातून बाहेर जाऊ देईन.’’ राजा आनंदी झाला. त्याने कृतज्ञतेने देवाचे आभार मानले; कारण गेली ३० वर्षे तो देवाला त्यासंदर्भात भावपूर्ण प्रार्थना करत होता. त्याची अवस्था पाहून शिष्य विचारात पडला, ‘सर्वकाही देऊन राजाला जर एवढा आनंद होतो, तर ते घेण्यात काय अर्थ आहे ?’ शिष्याने राजाला त्याचे राज्य परत दिले आणि तो पुन्हा आपल्या गुरूंकडे परतला.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

      ‘भाषाशुद्धीचे व्रत’ यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ ‘भाषाशुद्धीचा शब्दकोश’)
     ‘अन्यायाचा प्रतिकार करा आणि नंतर क्षमाशील बुद्धीने व्यवहार करा’, असे महाभारतातून व्यास सांगतात. ‘प्रतिकार न करता क्षमा कराल, तर तुम्ही तुमचे स्वातंत्र्य गमावून बसाल’, असा संदेश महर्षींनी दिला आहे.’ - सुघोष

सातत्याने इतरांचा विचार करणार्‍या प्रेमळ पू. निर्मला दातेआजी !

कु. वैभवी भोवर
     ‘पुणे येथील पू. निर्मला दातेआजी यांच्याकडून कु. वैभवी भोवर यांना शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहोत.
१. प्रेमभाव
१ अ. आपपर भाव न बाळगता सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणे : ‘पू. आजींचे घरातल्या व्यक्तींवर जसे प्रेम आहे, तसेच निरपेक्ष प्रेम साधकांवर, शेजारी रहाणार्‍या लहान मुलांवर आणि घरी येणार्‍या प्रत्येकावर आहे. त्यांच्या शेजारील वसाहतीच्या रखवालदाराची (वॉचमनची) लहान मुलगी दिवसभर पू. आजींकडेच असते. पू. आजी तिच्याकडून प्रार्थना आणि उपाय करून घेणे, तसेच तिचा अभ्यास घेणे, तिला घरात बनवलेले पदार्थ आठवणीने देणे या गोष्टी आपुलकीने करतात.
१ आ. पू. स्वातीताईंसाठी आईच्या मायेने सर्व करणे : पू. आजींना ‘पू. स्वातीताई पुण्यात येणार आहेत’, हे समजल्यावर आनंद होतो. पू. आजी आईच्या मायेने पू. ताईंसाठी सर्व करत असतात.

सर्वांवर अपार प्रीती करणार्‍या आणि उतारवयातही समष्टी सेवेची तळमळ असणार्‍या पू. निर्मला दातेआजी !

पू. निर्मला दातेआजी
       पुणे येथील पू. निर्मला दातेआजी (वय ८३ वर्षे) यांचा वैशाख कृष्ण पक्ष दशमी (३१.५.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे.
पू. निर्मला दातेआजी यांना
वाढदिवसानिमित्त सनातन
परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. प्रीती
१ अ. सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणे : ‘पू. आजींमधील प्रीतीचे वर्णन शब्दांत करू शकत नाही. त्या सर्वांवर निरपेक्ष प्रेम करतात. पू. आजींच्या संपर्कात नसणार्‍या साधकांनाही पू. आजींना भेटण्याची ओढ वाटते.
१ आ. रुग्णाईत मामीची विचारपूस करण्याची आठवण करून देणे : एकदा माझ्या मामीची प्रकृती ठीक नव्हती. त्या वेळी पू. आजी मला ‘मामीला भेटून आलीस का? त्यांना भ्रमणध्वनी केलास का ?’, असे विचारत असत.
१ इ. इतरांना देण्यासाठी स्वतः खाऊ बनवणे : घरात बनवलेला एखादा पदार्थ संपला असेल, तर शेजारच्या रखवालदाराच्या (वॉचमनच्या) मुलांना देण्यासाठी त्या स्वतः खाऊ बनवून देतात.

स्वीकारण्याची वृत्ती असलेला आणि ‘साधना करण्यासाठीच जन्म झाला आहे’, याची जाणीव असणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा श्री. अमेय कोटगी (वय १९ वर्षे) !

श्री. अमेय कोटगी
१. आध्यात्मिक मित्र 
        ‘ईश्‍वर अमेयला दैनंदिन जीवनात कोणत्याही गोष्टी आणि साधनेविषयी योग्य ते दृष्टीकोन सुचवतो. अमेय माझा आध्यात्मिक मित्र आहे. मला कधीही निराशा आली आणि काही सुचत नसेल किंवा एखादा निर्णय घेतांना संभ्रम निर्माण झाल्यावर त्याच्याकडे मन मोकळे केल्यावर मला पुष्कळ हलके वाटते आणि मला प्रसंगात न अडकता चटकन बाहेर पडता येते. त्याचे दृष्टीकोन सकारात्मक असतात. तो इतकी छान उदाहरणे देतो की, मनाला ती एकदम पटतात आणि साधनेसाठी एक नवा उत्साह मिळतो.
२. ‘१२ वीच्या परिक्षेत अल्प गुण 
मिळाले असूनही आयुर्वेदिक महाविद्यालयात 
प्रवेश मिळणे’, ही त्याच्यावरील ईश्‍वरी कृपा
       अमेयला १२ वीच्या परिक्षेत अल्प गुण मिळाले. त्यामुळे ‘पुढे कोणते शिक्षण घ्यायचे’, हे त्याला सुचत नव्हते. त्याचे बी.एस्.सी.चे शिक्षण घ्यायचे ठरले असतांना अकस्मात् एका संतांच्या माध्यमातून शिरोडा, गोवा येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाचा संदर्भ मिळाला आणि पुढील प्रक्रियाही ईश्‍वरानेच करवून घेतली. त्याला ‘आयुर्वेद शिकण्याची संधी मिळणे’, ही ईश्‍वराची कृपाच होय.

प.पू. डॉक्टरांना मर्दन करण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती आणि जाणवलेले पालट

१. आलेल्या अनुभूती
१ अ. सगुणापेक्षा निर्गुण श्रेष्ठ असल्याने प.पू. डॉक्टरांच्या खोलीतून बाहेर पडल्यावर ढेकरा येत असल्याचे त्यांनी सांगणे : ‘प.पू. डॉक्टरांना मर्दन करून त्यांच्या खोलीतून बाहेर पडल्यानंतर मला पुष्कळ ढेकरा येतात. त्याविषयी प.पू. डॉक्टरांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘खोलीत सगुण उपाय, तर बाहेर निर्गुण उपाय होत असल्याने तसे होते. सगुणापेक्षा निर्गुण श्रेष्ठ !’’
१ आ. प.पू. डॉक्टरांना मर्दन करतांना त्यांचा तोंडवळा नृसिंहासारखा दिसून भगवान विष्णूचे अनेक हात आणि त्यांतील आयुधे दिसणे : ‘प.पू. डॉक्टरांना मर्दन करतांना मला काय जाणवते ?’, ते बघत होतो. त्यांच्या बोटांना मर्दन करतांना भगवान विष्णूचे अनेक हात आणि त्यांतील आयुधे दिसत होती. त्यांचा तोंडवळा नृसिंहासारखा दिसत होता. ‘काळानुसार आवश्यक असे तत्त्व त्यांच्याकडून येत असणार’, असे वाटले.

सनातनच्या आश्रमभेटीचा असा लाभ घ्या !

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
१. अनुभूती घ्या !
अ. ‘मंदिरात आल्यावर मनाला जाणवते, तशी शांतता आणि पवित्रता यांची
आ. साधकांतील प्रेमभाव, नम्रता आणि भक्तीभाव यांची
इ. आश्रमाच्या वातावरणात असणारा पृथ्वीतत्त्वाचा सुगंध, आपतत्त्वाचे भावतरंग, तेजतत्त्वाच्या चैतन्याचा साठा, वायुतत्त्वाचा हलकेपणा आणि आकाशतत्त्वाचा दैवी नाद या पंचतत्त्वांची
ई. स्पर्श करा येथील मातीला, फरशीला आणि भिंतीला, साक्षात् सहवास ईश्‍वराचा जाणवेल तुम्हाला !
२. मनुष्यजन्माचे सार्थक करा !
अ. सोडा आपला अहं, धरा भक्तीची कास अन् व्हा ईश्‍वराचे दास !
आ. निश्‍चय करा प्रतिदिन साधनेचा, घ्या नाम ईश्‍वराचे त्याकरता !
इ. प्रेरित व्हा राष्ट्र-धर्माचे सत्कार्य करण्या, पाईक व्हा हिंदु राष्ट्र स्थापण्या !
ई. ईश्‍वरप्राप्ती हाच मार्ग खरा जगण्याचा, मनुष्यजन्माचे सार्थक करण्याचा !’
- (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, गोवा. (१८.५.२०१६)

सत्सेवा आणि स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया राबवणे, हेही एकप्रकारे प.पू. डॉक्टरांना केलेले मर्दनच !

        ‘आपल्याला अशी सेवा मिळेल का ?’, असे बर्‍याच साधकांच्या मनात असेल. त्यांची समजूत कशी घालावी ?’, असा विचार आला. त्या वेळी मनाची पुढील विचारप्रक्रिया झाली, ‘मर्मचिकित्सेत मर्दन करून शरिराचे स्वास्थ्य (निगा) राखणार्‍या सूक्ष्म नाड्यांवर उपचार केले जातात. नाड्यांच्या प्रवाहातील (शक्ती प्रवाहातील) अडथळे दूर करण्यासाठी मर्मचिकित्सेतील मर्दनाचा उपयोग होतो. पूर्वीच्या तुलनेत कलियुगात सर्वांचे शरिरस्वास्थ्य ढासळले आहे आणि अनेकांचा साधनेचा स्तरही अल्प आहे. मर्दन करून ज्याप्रमाणे आपण शरिरातील नाड्यांचा प्रवाह मोकळा करतो आणि शरिराला रोगाच्या पाशातून मुक्त करण्याचा प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे आपण करत असलेली साधना ही आत्म्याला अहं, दोष इत्यादींच्या पाशातून किंवा कर्मबंधनातून मुक्त करते. आपण जी सत्सेवा करतो, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवतो, हे सर्वसुद्धा एक प्रकारे आत्म्याला (प.पू. डॉक्टरांना) केलेले मर्दनच आहे.’
        हे विचार १३.१२.२०१४ या दिवशी मनात येऊन गेले. त्याच्या दुसर्‍या म्हणजे १४.१२.२०१४ या दिवशी प.पू. डॉक्टरांना मर्दन करतांना आश्रमातील एक साधिका तेथील खिडकीची स्वच्छता करायला आली होती, तेव्हा प.पू. म्हणाले, ‘‘ते पहा. येथे तुमचे मर्दन चालू आहे आणि तिथे त्यांचे मर्दन चालू आहे.’’ हे ऐकल्यावर आदल्या दिवशी मनात आलेले विचार योग्यच असल्याचे लक्षात आले.
- श्री. निमिष म्हात्रे (१.२.२०१५)

उर्ध्व लोकांत काळाची गती तीव्र असल्याचे ऋषीमुनींनी लिहिलेले असणे आणि रामनाथी आश्रम महर्लोक अन् जनलोक यांप्रमाणे झाला असल्यामुळे आश्रमात काळ पुष्कळ वेगाने जात असल्याचे जाणवणे

श्री. व्यंकटेश अय्यंगर
       ‘रामनाथी आश्रमात रहात असतांना अनेक दिवसांपासून ‘काळ पुष्कळ वेगाने पुढे सरकत आहे’, हा विचार मनात पुनःपुन्हा येत होता. त्यावर प.पू. गुरुदेवांच्या कृपेने उत्तर मिळाले.
       ‘ऊर्ध्व लोकांत काळाची गती तीव्र असते’, असे ऋषीमुनींनी लिहिले आहे. याचे एक उदाहरण म्हणजे ‘पितरांसाठी केलेला श्राद्धविधी’ ! वर्षातून एकदा श्राद्ध केले जाते; कारण भूलोकातील १ वर्ष हे पितृलोकातील एका दिवसासमान आहे. त्यातच ऊर्ध्व लोकांतील काळाची गती अधिकच तीव्र असते. रामनाथी आश्रमही तसे पहाता महर्लोक आणि जनलोक यांसारखा झाला आहे.
       ‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेनेच आश्रमात असे वातावरण निर्माण झाले आहे आणि त्यांच्या कृपेनेच त्याचा अनुभव घेण्याची क्षमताही प्राप्त झाली आहे.’
- श्री. व्यंकटेश अय्यंगर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.३.२०१६)

अशी माझी सद्गुरुमाई ।

कु. स्वाती गायकवाड
       ‘एके दिवशी मी ध्यानमंदिरात स्वयंसूचना सत्र करण्यासाठी बसले होते. हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी ध्यानमंदिरात ९६ दिवस अखंड दिवा तेवत ठेवला आहे. मला त्या दिव्याकडे पाहून पुढील ओळी आपोआप स्फुरल्या.
तेजोमय कण ते उधळती सार्‍यांवरती ।
अशी माझी सद्गुरुमाई ॥ १ ॥
हिंदु राष्ट्रात पात्र होण्यास आम्ही ।
धडपडे क्षणोक्षणी ।
अशी माझी सद्गुरुमाई ॥ २ ॥
कृपा आम्हावरी सदाच ती करी ।
अशी माझी सद्गुरुमाई ॥ ३ ॥
चराचराच्या अंतरात सूक्ष्मरूपे राही ।
भानही त्याचे तीच करवून देई ।
अशी माझी सद्गुरुमाई ॥ ४ ॥
॥ श्रीकृष्णचरणार्पणमस्तु ॥
- कु. स्वाती गायकवाड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.४.२०१५)

पावन प्रेममय नगरी में संतों ने दिया प्रेम अपार !

कु. कृतिका खत्री
उज्जैन - महाकाल की पवित्र नगरी में आगमन हुआ ।
सनातन के साधक और पूजनीय संतों का ॥ १ ॥
अहोभाग्य हमारे - इस महाकुंभ में मिला अवसर सेवा का ।
हुआ तन-मन का त्याग और मिला आनंद कृष्णसेवा का ॥ २ ॥
इस सेवा में स्वयं को भूलकर, हो गए सब साधक कृष्णमय ।
और जीता साधकों ने मन कृष्ण का, बनकर हर क्षण कृष्णमय ॥ ३ ॥
अमृत है सेवा का, जो धूप को भी छांव कर देता है ।
प्रेम है गुरु का, जो धूप से बचने के सहस्रों उपाय देता है ॥ ४ ॥
इस प्रेम की कैसी लीला कि साधक जन्म-मृत्यु के चक्र से मुक्त हुए ।
अल्प हुए स्वभावदोष-अहं, तो कृष्णप्रेम से युक्त हुए ॥ ५ ॥

कार्यशाळेत ११ घंटे सहभागी होऊनही थकवा न जाणवणे

        ‘बर्‍याच वेळा एखाद्या कार्यशाळेतील सत्रांमध्ये पुष्कळ काळ सहभागी झाल्यावर मला थकवा जाणवतो आणि झोप येऊ लागते; पण २३.५.२०१५ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कार्यशाळेतील पहिल्या दिवशी जवळजवळ ११ घंटे सहभागी होऊनही मला सत्रांच्या कालावधीत किंवा दिवसाच्या शेवटी थकवा जाणवला नाही कि झोपही आली नाही. आरंभापासून ते शेवटपर्यंत मी उत्साही होतो.’ 
- श्री. उज्ज्वल कपाडिया, पुणे, महाराष्ट्र.

अध्यात्मात मनाने काही करणे अयोग्यच !

कु. तृप्ती कुलकर्णी
       ‘३ - ४ दिवसांपासून माझा अचानकपणे श्रीरामाचा जप चालू झाला. खरंतर मी श्रीरामाचा जप करत नाही. त्याचा त्रयोदशाक्षरी नामजप म्हणणेही कठीण जाते, तरीही अचानक नामजप चालू होण्याचे कारण कळत नव्हते आणि त्या नामजपाने चांगलेही वाटत होते. त्यामुळे ‘माझ्या साधनेला तो जप करणे आवश्यक आहे कि हा माझा विचार आहे’, हे मला कळत नव्हते. यासंदर्भात ‘प.पू. गुरुदेवांना विचारून ते जसे सांगतील, त्याप्रमाणे करीन. माझ्या साधनेसाठी आवश्यक असेल, तर श्रीरामाचा नामजप करायला सांगतील, नाहीतर वाईट शक्तीचा विचार असेल, तर ‘करू नको’, असे सांगतील; पण त्यांच्याकडून काय ते कळू दे. मनाने कोणताही जप करायला नको’, असा विचार केला; पण काही कारणाने प.पू. गुरुदेवांना विचारायला जमत नव्हते आणि श्रीरामाचा नामजप मात्र आपोआपच मधूनच चालू व्हायचा. तेव्हा तो प्रयत्नपूर्वक थांबवून मला त्रासानुसार आवश्यक असलेला श्री आकाशदेवाचा नामजप चालू करावा लागायचा. आज मी प.पू. गुरुदेवांना ‘श्रीरामाचा जप करू का ?’, असे विचारले. तेव्हा ते ‘नको’ म्हणाले आणि त्यांनी पुढीलप्रमाणे दृष्टीकोन दिला, ‘वैद्य सांगतील, तशी औषधे आपण घेतो. मनाने घेत नाही. तसेच अध्यात्मातही मनाने काही करायचे नसते आणि वाईट शक्तीचा त्रास असतांना तर मनाने मुळीच काही करायचे नाही. हे लिहून दे, म्हणजे इतरांनाही योग्य दृष्टीकोन कळेल.’
- कु. तृप्ती कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.५.२०१६)

एका साधिकेने गोपी-साधिका कु. दीपाली मतकर यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याविषयी आलेली अनुभूती कळवण्यासाठी कृतज्ञताभावाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना लिहिलेले पत्र !

कु. दीपाली मतकर
        सनातनच्या साधिका कु. दीपाली मतकर (दीपालीताई) या पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथील साधिका सौ. मनीषा तांदळे यांच्या घरी सेवेनिमित्त काही दिवस रहायला होत्या. त्या कालावधीत त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याविषयी आलेली अनुभूती कळवण्यासाठी सौ. तांदळे यांनी कृतज्ञताभावाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना लिहिलेले पत्र येथे देत आहोत.
        प.पू. गुरुमाऊलीच्या चरणी साष्टांग नमस्कार !
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण आणि त्यांच्या समवेत अनुभवलेल्या निरपेक्ष प्रेमाचा स्मृतीरूपी दीप प्रसारातील साधकांच्या हृदयात तेवत ठेवण्यासाठी दीपालीताई कार्यरत असल्याचे वाटणे : ‘गोपी दीपालीताई आणि वैभवीताई (साधिका कु. वैभवी भोवर) यांच्या माध्यमातून आपण आमच्यावर प्रीतीचा वर्षाव करत आहात. या गोपी म्हणजे साक्षात् श्रीकृष्णाचे अनुसंधानच जणू ! त्यांच्या वागण्या-बोलण्यातून साक्षात् तुमचीच शिकवण आणि तुम्ही केलेले संस्कार आम्हाला अनुभवता येत आहेत. दीपालीताई यांनी रामनाथी आश्रमात तुमची शिकवण आणि तुमच्या समवेत अनुभवलेल्या स्मृतींच्या रूपातील जो दीप स्वतःसमवेत आणला, तो आम्हा प्रसारातील साधकांच्या हृदयात तेवत ठेवण्यासाठीच त्या कार्यरत असल्याचे वाटते.

गुरुपौर्णिमेला ४९ दिवस शिल्लक

गुरुप्राप्ती आणि गुरुकृपा होण्यासाठी काय करावे ? 
       तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्ती लवकर होते आणि गुरुकृपा सातत्याने रहाते.

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या 
वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !
       ‘सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.’
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
 
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      आधुनिक वैद्य, अभियंता, अधिवक्ता इत्यादींचे धर्माविषयी विचार काहीही असोत, त्यांच्या कार्यावर विचारांचा परिणाम होत नाही; पण पोलीस आणि न्यायाधीश यांच्या धर्माविषयीच्या व्यक्तीगत दृष्टीकोनामुळे, उदा. पोलीस आणि न्यायाधीश बुद्धीप्रामाण्यवादी असल्यास त्यांच्या कार्यावर परिणाम होतो.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संतांच्या दर्शनाने काहीतरी चांगले वाटणे किंवा काहीच न वाटणे

परात्पर गुरु डॉ. आठवले
        ‘एखाद्या संतांकडे गेल्यावर काही जणांना खूप चांगले वाटते किंवा त्यांचा भाव जागृत होतो, तर काही जणांना काहीच वाटत नाही. त्यातील काही जणांना काहीच न वाटल्यामुळे वाईटही वाटते. अनुभूती येणे किंवा न येणे याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. संतांच्या 
स्थूलदेहाकडे लक्ष जाणे
        साधनेच्या आरंभी फक्त संतांना डोळ्यांनी पहाणे आणि त्यांचे बोलणे कानांनी ऐकणे असे होते. तेव्हा संतांकडून येणार्‍या चैतन्य, आनंद इत्यादी लहरींची अनुभूती घेण्याची क्षमता नसल्याने काही निराळे वाटत नाही. साधनेत प्रगती केलेल्यांना ते जाणवते.
२. कृतज्ञताभाव 
असणे किंवा नसणे
        काही जणांचा संतांना पाहून भाव जागृत होतो. तो कृतज्ञताभाव असतो. संतांनी आतापर्यंत केलेले मार्गदर्शन आणि साहाय्य आठवून भाव जागृत होतो. प्राथमिक अवस्थेतील साधकांत कृतज्ञताभाव नसल्याने त्यांचा भाव जागृत होत नाही.
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
अढळपद
अशा ठिकाणी बसा की, तुम्हाला जिथून कोणी ऊठ म्हणून सांगणार नाही. असे बोला की, हे खोटे आहे असे कोणी बोलणार नाही.
भावार्थ : ब्रह्मस्थितीला पोहोचल्यावर ऊठ असे म्हणायला दुसरा कोणी उरतच नाही आणि ती सर्वव्यापी अवस्था असल्याने तिथून उठायचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. हे खोटे आहे असे कोणी बोलणार नाही, असा बोलण्याचा विषय म्हणजे ब्रह्माची किंवा परमेश्‍वराची अनुभूती. मायाच खोटी असल्याने मायेतील सत्य बोलणेही खोटेच असते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

आध्यात्मिक प्रगती होण्याचे महत्त्व 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
आध्यात्मिक प्रगती होऊ लागल्यावर माणसाचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन आपोआप 
पालटत जातो आणि शाश्‍वत सुखाच्या दिशेने त्याची वाटचाल चालू होते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

... तर पाकलाच बेचिराख करा !

संपादकीय 
     पाकचे केवळ राज्यकर्तेच नव्हे, तर सामान्य माणसे, कलाकार आणि आता शास्त्रज्ञही भारतावर सातत्याने गुरगुरतांना दिसतात. आताही तसेच झाले. निमित्त होते पाकने अणूचाचण्या केल्याच्या घटनेला १८ वर्षे पूर्ण होण्याचे. पाकचे अणूबॉम्बचे जनक डॉ. अब्दुल कादीर खान यांनी ‘पाकला वाटल्यास अण्वस्त्र डागून देहली पाच मिनिटांत बेचिराख करू’, अशी दर्पोक्ती केली आहे. अशी दर्पोक्ती करण्याची पाकची ही काही पहिलीच वेळ आहे, असे नाही. त्यामुळे भारतियांनी ‘या बोलण्याकडे दुर्लक्ष केलेले बरे !’, असे म्हणणे साहजिक आहे; पण ही गोष्ट तेवढ्यापुरती मर्यादित नाही.

मुसलमान कलाकारांचा हिंदुद्वेष !

संपादकीय 
     कलेचे भोक्ते असलेल्या हिंदूंनी नेहमीच गुणवान कलाकारांचा आदर केला. या कलाकारांच्या कर्तृत्वाचा गौरव करतांना हिंदूंनी कधीच त्यांची जात, धर्म पाहिला नाही. नसीरुद्दीन शाह हे त्यांपैकीच एक; पण नसानसांत ‘शाह’पण भिनलेल्या नसीरुद्दीन शाह यांना त्याची किंमत नसल्याने ते वारंवार ‘हिरवा’ रंग उधळतांना दिसतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘जे लोक कधी काश्मीरमध्ये राहिलेच नाहीत, तेच लोक आता काश्मिरी विस्थापितांसाठी लढा देत आहेत’, अशी नाव न घेता चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यावर ‘मी असे काही बोललोच नाही. चुकीचे वृत्त छापले गेले’, असे सांगत त्यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn