Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

इशरतजहाँ प्रकरणी काँग्रेस शासन आणि लष्कर-ए-तोयबा यांच्यात युती होती ! - केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू

काँग्रेसची नीती विचारांत घेता रिजिजू यांचा आरोप 
अतिशयोक्ती करणारा आहे, असे कुणाला वाटणार नाही !
       नवी देहली - तत्कालीन काँग्रेस शासनातील पी. चिदंबरम् यांच्या नेतृत्वाखालील गृहमंत्रालयाने इशरतजहाँ चकमकीच्या संदर्भातील सत्य लपवण्यासाठी पाकिस्तानी आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी युती करून काम केले होते, असा आरोप केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. इंडिया टुडे या नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला आहे.
किरेन रिजिजू यांनी मांडलेली सूत्रे....
१. इशरतजहाँ हिला निर्दोष ठरवण्याचा निर्णय केवळ चिदंबरम् यांनी एकट्यानेच घेतला असण्याची शक्यता नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाच्या सांगण्यावरून असे करण्यात आले असणार.
२. जर तुम्ही मालेगाव स्फोट, समझौता एक्स्प्रेस स्फोट आणि इशरतजहाँ प्रकरण यांना एकत्र जोडून पहाल, तर तुमच्या लक्षात येईल की, सर्व गोष्टी एकदम कशा पालटल्या.
३. मी व्यक्तिगत स्तरावर चिदंबरम् यांना चांगली व्यक्ती म्हणून ओळखतो; मात्र प्रश्‍न असा निर्माण होतो की, त्यांनी एका कट्टर आतंकवादी असणार्‍या इशरतला निर्दोष ठरवण्याचे कसे स्वीकारले ?

महर्षींची दिव्य वाणी : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे महाविष्णूचा श्रीजयंतअवतार म्हणून ओळखले जातील !

महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा 
५ वा जन्मोत्सव सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न ! 
        सनातन आश्रम, रामनाथी (गोवा), २९ मे (वार्ता.) - भूलोकीचे वैकुंठ म्हणजे सनातनचा रामनाथी आश्रम ! संतांची लगबग, साधकांच्या मुखावर ओसंडून वहाणारा उत्साह, सर्वांचे भरजरी पोशाख अन् सनईचे मंगल स्वर अशा अत्यंत चैतन्यमयी वातावरणात रामनाथी आश्रमात आजची पहाट झाली. २६ मेपासून चालू असलेल्या यज्ञ-यागांची सकाळी अत्यंत मंगलमय वातावरणात पूर्णाहुती झाली अन् खर्‍या अर्थाने उत्कंठा लागली अमृतमहोत्सव सोहळ्याची ! सेवांच्या धावपळीतूनही आनंद ओसंडून वहात होता. त्याला कारणही तसेच होते ! समाजाला अध्यात्माची वाट दाखवून त्यांच्या जीवनात आनंद भरणारे, साधकांसाठी कल्पतरू बनून प्रेमाचा वर्षाव करणारे, हिंदुत्वनिष्ठांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी मार्गदर्शन करणारे साक्षात् श्रीमन्नारायणाचा अवतार असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आज वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी या दिवशी पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केले. या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने महर्षींच्या आज्ञेने धार्मिक विधींसह एका सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. अभूतपूर्व असा या नेत्रदीपक सोहळा अनुभवून साधक कृतकृत्य झाले.

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांना जागतिक वारसास्थळाचे महत्त्व प्राप्त होणार ! - विनोद तावडे

राज्य शासनाची अभिनंदनीय कृती !
       पुणे, २९ मे (वार्ता.) - छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणार्‍या महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांना जागतिक वारसास्थळाचे महत्त्व प्राप्त व्हावे, यासाठी शासनाच्या वतीने विशेष कार्य चालू करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पुष्कळ आस्था आहे, हे गड-किल्ले जगाच्या नकाशावर येण्यासाठी हा प्रयत्न असल्याची माहिती महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी २८ मे या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. (भारतातील मोगलांच्या अनेक वास्तू जागतिक वारसास्थळे म्हणून घोषित झाली आहेत; परंतु महाराष्ट्राचे वैभव समजले जाणारे गड-किल्ले यांना अजूनपर्यंत हे नामांकन मिळाले नाही, हे महाराष्ट्रातील जनतेचे दुर्दैवच म्हणावे लागेल. यासाठी आतापर्यंतची सर्वपक्षीय शासने उत्तरदायी आहेत. - संपादक)
        केंद्रीय सांस्कृतिक विभाग आणि पुरातत्व विभाग यांच्याशी चर्चा करून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून किल्ल्यांंची अधिकृत सूची बनवण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सल्लागार आणि युनेस्कोच्या सदस्या डॉ. रिमा हुजा आणि डॉ. शिखा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक वारसास्थळांच्या नामांकनासाठीची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. यासाठी ३ वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे डॉ. जैन यांनी सांगितले.

दिलीप पाटीदार बेपत्ता प्रकरणी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या २ अधिकार्‍यांच्या विरोधात इंदूर न्यायालयाचे अटक वॉरंट !

       इंदूर (मध्यप्रदेश) - वर्ष २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी इंदूर येथून दिलीप पाटीदार यांना महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी पकडून नेले होते; मात्र नंतर त्यांचा काहीच पत्ता नाही. यासंदर्भात पाटीदार यांच्या भावाकडून इंदूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने या पथकातील तत्कालीन अधिकारी राजेश मोरे आणि राजेंद्र घुले यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावले आहे. त्यांना ३ जूनला न्यायालयात उपस्थित रहाण्यास बजावले आहे. तसेच हे प्रकरण समाप्त करण्याचा केंद्रीय अन्वेषण विभागाचा अहवालही न्यायालयाने फेटाळला आहे.
       केंद्रीय अन्वेषण विभागाने या अहवालात म्हटले होते, पोलीस निरीक्षक राजेंद्र घुले आणि उपनिरीक्षक रमेश मोरे यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १२०/ब (कट रचणे), ३४२ (पकडून ठेवणे), ३६५ (एखाद्याला पकडून ठेवण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण करणे), १९३ (खोटे पुरावे बनवणे) आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पुरावेही मिळाले आहेत; मात्र संबंधित प्राधिकार्‍याने या दोघांच्या विरोधात खटला चालवण्यास अनुमती दिलेली नाही. त्यामुळे हे प्रकरण येथेच संपवावे लागेल.
       न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आदेश देतांना म्हटले की, दोन्ही आरोपींची कृत्ये लोकसेवकांच्या कर्तव्याच्या परिघामध्ये येत नाहीत; म्हणून त्यांच्या विरोधातील खटला दाखल करण्यासाठी अनुमती घेण्याची आवश्यकता नाही. केस डायरीच्या अवलोकनावरून स्पष्ट होते की, घुले आणि मोरे यांच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांद्वारे खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत.

सैन्यदलात भरतीसाठी ४३ जणांकडून खोटी कागदपत्रे सादर; गुन्हा प्रविष्ट

यावरून कायद्याचा धाक संपला 
आहे, असे वाटल्यास चूक ते काय ?
         संभाजीनगर, २९ मे - सैन्यदलात भरतीसाठी ६ जिल्ह्यांतील ४३ जणांनी खोटी कागदपत्रे देऊन सैन्यभरती कार्यालयाची फसवणूक केली आहे. (या प्रकरणी संबंधितांची सखोल चौकशी करून कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. - संपादक) या प्रकरणी सैन्यभरती कार्यालयातील कर्नल मोहनलाल सिंह यांनी शहरातील छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्या ४३ जणांवर गुन्हा प्रविष्ट केला आहे. हे उमेदवार संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा आदी जिल्ह्यांतील आहेत.
        मागील वर्षी २१ जुलै ते ६ ऑगस्ट २०१५ या कालावधीत शहरातील विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर सैन्यदल भरतीची मोहीम राबवण्यात आली होती. यात सहभागी झालेल्या तरुणांनी नोकरीच्या आमिषाने सादर केलेली सर्व कागदपत्रे खरी असल्याचे भासवून सैन्यात भरती झाले. या उमेदवारांच्या कागदपत्रांविषयी कर्नल सिंह यांना काही दिवसांनी संशय आल्याने त्यांनी त्या कागदपत्रांची उलट पडताळणी केली. त्या वेळी सादर करण्यात आलेली सर्व कागदपत्रे खोटी असल्याचे निदर्शनास आले. आता त्या ४३ उमेदवारांकडे त्या कागदपत्रांविषयी कसून चौकशी केली जाणार असून त्यातील दोषी आढळणार्‍या सर्वांना अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्‍या साधकांच्या पाल्यांचे १२ वीच्या परीक्षेतील सुयश !

        पुणे, २९ मे - राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये सनातन संस्थेच्या साधकांचे पाल्यही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. येथील बाणेर भागातील कु. ऋत्विक विश्‍वास कुलकर्णी याला विज्ञान शाखेमध्ये ७७ प्रतिशत गुण मिळाले आहेत, तसेच औंध भागातील कु. भाग्यश्री रवींद्र धांडे हिला वाणिज्य शाखेमध्ये ७४ प्रतिशत गुण मिळून उत्तीर्ण झाले आहेत. त्या दोघांनी परीक्षेच्या वेळेस नामस्मरण आणि प.पू. पांडे महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे स्तोत्रपठणही केले होते. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण यांच्या कृपेने हे यश मिळाल्याचे या दोघांनी सांगितले.
        याचसमवेत कु. प्रांजली नारायण शिरोडकर ही विश्रांतवाडी भागातील असून तिला वाणिज्य शाखेमध्ये ६१ प्रतिशत गुण मिळाले आहेत. कु. प्रांजली सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना आणि सेवा करते. तिने केंद्रातील हस्तपत्रके वितरणाच्या सेवेचे दायित्व घेतले आहे. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी नाही, तर साधना होऊन देवाजवळ जाण्यासाठी प्रार्थना केली असल्याचे तिने सांगितले. शिरोडकर, कुलकर्णी आणि धांडे कुटुंबीय हे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करतात.

आणखी एका धर्मांधास अटक

मटका अड्डयावरील छाप्याचे प्रकरण
       सांगली, २९ मे (वार्ता.) - शहरातील खणभागातील हिंदू-मुस्लीम चौकातील मुस्लीम अर्बन बँकेच्या इमारतीच्या तळघरातील एका गाळ्यात चालू असलेल्या मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने धाड टाकून १६ धर्मांधांना २४ मे या दिवशी अटक केली होती. या प्रकरणातील आणखी एक धर्मांध आरोपी सलमान पखाली याला शंभरफुटी रस्ता येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक तलवार कह्यात घेण्यात आली आहे.

गांधींच्या हत्येप्रकरणी नव्याने चौकशी आयोग नेमा !

अभिनव भारतचे 
डॉ. पंकज फडणवीस यांची याचिका
      मुंबई - गांधीजी यांच्या हत्येची पुन्हा नव्याने चौकशी करा. त्यासाठी चौकशी आयोग नियुक्त करा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रविष्ट झाली आहे. मुंबईतील अभिनव भारतचे विश्‍वस्त, लेखक डॉ. पंकज फडणवीस यांनी ही याचिका प्रविष्ट केली असून त्यावर मुख्य न्यायमूर्ती डी.एच्. वाघेला यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर ६ जून या दिवशी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
      ३० जानेवारी १९४८ या दिवशी गांधी नवी देहली येथील बिर्ला भवनात प्रार्थना सभेसाठी जात असतांनाच नथुराम गोडसे यांनी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून गांधीजींची हत्या केली. पिस्तुलातील उर्वरित चार गोळ्या पोलिसांनी हस्तगत केल्या होत्या, असा सरकारी पक्षाचा दावा होता; परंतु गांधीजींच्या शरिरातून चार गोळ्या बाहेर काढल्या होत्या. त्यामुळे नथुराम गोडसेव्यतिरिक्त आणखी कोणी मारेकरी होता का, याचा शोध घेणे आवश्यक आहे. गांधीजींवर चौथी गोळी कोणी झाडली, याची चौकशी करण्यासाठी नवीन चौकशी आयोग स्थापन झाला पाहिजे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. गांधीजींना चार गोळ्या लागल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांनी माध्यमांच्या काही चित्रफीती याचिकेसोबत सादर केल्या आहेत.

महाराष्ट्रद्रोही श्रीहरी अणे यांचा पुतळा श्रीशिवप्रतिष्ठानने जाळला !

अणे यांचा पुतळा जाळतांना श्रीशिवप्रतिष्ठानचे धारकरी
       सांगली, २९ मे (वार्ता.) - विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा करण्याची भाषा करणारे महाराष्ट्रद्रोही श्रीहरी अणे यांचा निषेध करत श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने शिवतीर्थासमोर त्यांचा पुतळा जाळण्यात आला. या वेळी अणे यांच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या. पू. संभाजीराव भिडे (गुरुजी), सर्वश्री हरिदास पडळकर, सतीश स्वामी, सचिन पवार, अनिल तानवडे, मिलिंद तानवडे, अविनाश सावंत, श्रीराम माळी यांसह अन्य धारकरी उपस्थित होते. स्वतंत्र विदर्भाची मागणी हा महाराष्ट्रासाठी हुतात्मा होणार्‍यांचा अवमान आहे. महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणार्‍या अणे यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल, असे श्री. हरिदास पडळकर यांनी या वेळी सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विसरणार्‍या कृतघ्न, हिंदुद्वेषी आणि ढोंगी निधर्मीवादी प्रसारमाध्यमांचा अभिनेता शरक्ष पोंक्षे यांच्याकडून निषेध !

       मुंबई - २८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १३३ वी जयंती देशभरात साजरी करण्यात आली. मात्र सावरकर यांच्या जयंतीचा उल्लेखही टाळणार्‍या प्रसारमाध्यमांचा अभिनेता आणि सावरकरनिष्ठ शरद पोंक्षे यांनी निषेध केला आहे. या संदर्भात त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप वर प्रतिक्रिया पोस्ट केली आहे. यात त्यांनी पुढीलप्रमाणे म्हटले आहे -
दळभद्री पेपर.....निषेध निषेध निषेध !
        आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती. मराठी भाषेसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे फार मोठे योगदान आहे. फक्त भाषाच नव्हे, तर मनुष्य जातीच्या माणुसकी धर्मांच्या उद्धाराकरता त्यांनी अख्खे आयुष्य वेचले. २७ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा भोगली; पण आज दैनिक सामना आणि दैनिक सनातन प्रभात सोडला, तर महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता आणि सकाळ या गणमान्य मराठी वृत्तपत्रांमध्ये त्यांच्यावर लेख सोडाच; परंतु त्यांचा साधा उल्लेेख देखील नाही. मला कीव कराविशी वाटते त्यांची. धिक्कार आहे असल्या पत्रकारितेचा ! - शरद पोंक्षे

अजय देवगण यांच्या शिवाय चित्रपटाच्या विरोधात तक्रार

भगवान शिवाचा अवमान
         मुंबई - अभिनेता अजय देवगण यांच्या शिवाय या चित्रपटातून भगवान शिवाचा अवमान करण्यात आला आहे, असा आरोप करून अजय देवगण आणि दिग्दर्शक यांच्या विरोधात देहली येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. येथील मनमोहन शर्मा नावाच्या अधिवक्त्यांनी तिलक नगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. (देवतांच्या अवमानाच्या संदर्भात तात्काळ कृती करणारे अधिवक्ता मनमोहन शर्मा यांचे अभिनंदन ! - संपादक) हा चित्रपट अद्याप प्रदर्शित व्हायचा आहे. या चित्रपटाच्या फलकामधील चित्रात अभिनेता अजय देवगण भगवान शिवाच्या आकृतीवर पायात चपला घालून चढत आहे, असे दाखवण्यात आले आहे. यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, तसेच अन्य एका फलकावर बर्फाच्या कुर्‍हाडीने भगवान शिवावर वार करण्यात येत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

शिक्षणाचाही विकास आराखडा बनवणार - विनोद तावडे

        पुणे, २९ मे (वार्ता.) - शहर विकास आराखड्याप्रमाणे शिक्षणाचाही विकास आराखडा सिद्ध करणे आवश्यक आहे. कोणत्या अभ्यासक्रमाला अधिक मागणी आहे आणि कोणत्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी संख्या अल्प असते, याचा विचार करून प्रत्येकी ४ ते ५ वर्षांनी शिक्षण विकास आराखडा बनवण्यात येईल. यासाठी स्वतंत्र समितीही स्थापन करण्यात येईल, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
       ते पुढे म्हणाले, राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नीट) परीक्षेच्या गोंधळामुळे १२ वीचा अभ्यासक्रम पालटण्यात यावा, अशी चर्चा झाली होती. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अभ्यासक्रमाचा दर्जा आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अभ्यासक्रमाचा दर्जा सारखाच असून केवळ ११ वी आणि १२ वीच्या पुस्तकात तो विभागला गेला आहे. सध्याची शिक्षण पद्धत पालटण्याविषयी शिक्षणतज्ञांचा सल्ला घेतला जाईल. (ही शिक्षणपद्धत पालटतांना शासन गुरुकुल शिक्षणपद्धतीचाही विचार करेल का ? - संपादक) तसेच पूर्वप्राथमिक शिक्षणाचे बाजारीकरण झाले असून त्यावर निर्बंध घातले जातील, असेही त्यांनी सांगितले. (निर्बंध घालण्यासमवेत त्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि संबंधितांना कठोर शिक्षा होईल, यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक आहे. - संपादक)

इस्लामचे अनुकरण करू नका, म्हणणार्‍या चीनवर जिहादी आतंकवादी हाफिज सईदची टीका !

भारतातील साम्यवादी
 यावर काही बोलतील का ?
       लाहोर - इस्लामचे अनुकरण करू नका, त्यापेक्षा मार्क्सवादी विचारसरणीचा अवलंब करा, असे म्हणणार्‍या चीनच्या राज्यकर्त्यांवर मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार हाफिज सईद याने टीका केली आहे. तो म्हणाला की, चीनने पाकिस्तानला सर्व परिस्थितीत साथ दिली आहे; पण अशी कुठलीही टिप्पणी जी आमच्या इस्लाम धर्माच्या भावना दुखावत असेल, तर ती आम्ही खपवून घेणार नाही. चिनी नेतृत्वाने त्याचे म्हणणे मागे घ्यावे. अशा प्रकारे वक्तव्य करून चीन पाकिस्तानशी असलेले मैत्रीचे संबंध बिघडवत आहे.

(म्हणे), हिंदु राष्ट्रवाद अजेंडा असल्याने लोकशाही टिकण्याविषयी भीती निर्माण होत आहे !

 • हिंदुद्वेषाची कावीळ झालेले पुरो(अधो)गामी नेते !
 • ज्येष्ठ विचारवंत (?) किशोर बेडकिहाळ यांची मुक्ताफळे
       कोल्हापूर, २९ मे (वार्ता.) - सध्या शासनाचा प्राथमिक अजेंडा विकासाचा नसून हिंदु राष्ट्रवादाचा असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाजूने लिखाण करणारे लेखकही मान्य करू लागले आहेत. त्यामुळे लोकशाही टिकेल कि नाही, याची भीती त्यांच्यात निर्माण होऊ लागली आहे. अशा वेळी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी प्रक्षोभक भाषणे न करता कायद्याच्या चौकटीतून राहून पुरोगामी विचार पोहोचवण्याचे दायित्व पार पाडावे, अशी मुक्ताफळे ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी उधळली. (प्रक्षोभक भाषणे करून समाजात तेढ निर्माण करणार्‍यांना पुरोगामी कसे म्हणता येईल ? हिंदु राष्ट्राचा स्वत:ला काहीही अनुभव नसतांना त्याविषयी जाणीवपूर्वक भीती निर्माण करण्याचे कारण काय ? यातून हिंदुद्वेषच प्रतीत होत आहे ! - संपादक) २८ मे या दिवशी येथील शाहू स्मारक येथे भाई माधवराव बागल विद्यापिठाच्या वतीने भाई माधवराव बागल पुरस्कार देऊन बेडकिहाळ यांचा गौरव करण्यात आला, त्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक चौसाळकर होते.

हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधामुळे 'द भारत स्काऊट अ‍ॅण्ड गाईड्स'ने भारताचा चुकीचा नकाशा असलेली पुस्तकांतील चूक सुधारली !

द भारत स्काऊट अ‍ॅण्ड गाईड्स
संस्थेने प्रसारित केलेला
भारताचा विकृत नकाशा
 • शासकीय मान्यताप्राप्त राष्ट्रीय संस्थेकडून झालेली ही केवळ गंभीर चूक नव्हे, तर अक्षम्य चूकच !
 • केरळमधील हिंदुत्वनिष्ठ अभिजित के.ए. यांनी सदर प्रकार उघड करून या विरोधात आवाज उठवला ! 

     मुंबई - देशभरातील युवकांना देव आणि राष्ट्र यांच्याप्रती कर्तव्याचे शिक्षण देणार्‍या 'द भारत स्काऊट अ‍ॅण्ड गाईड्स' या शासकीय मान्यताप्राप्त स्वयंसेवी संघटनेच्या 'अ‍ॅप्रो भाग-२' आणि 'अ‍ॅप्रो भाग-३' नावाच्या पुस्तकांत तसेच त्यांच्या 'इंटरनॅशनल जांबोरी'च्या बोधचिन्हामध्ये भारतीय नकाशात काश्मीरचा भाग पाकमध्ये असल्याचे चित्र प्रसिद्ध करण्याचा संतापजनक प्रकार घडला होता. 
१. हा संतापजनक प्रकार सामाजिक संकेतस्थळांवर 'व्हायरल' (मोठ्या प्रमाणात प्रसारित) झाल्यानंतर आणि हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या विरोधानंतर या संघटनेच्या अधिकार्‍यांना ही गंभीर चूक सुधारावी लागली. 
२. नुकतेच भारताच्या नकाशात फेरफार करून तो प्रकाशित केल्यास त्यावर गंभीर कारवाई करण्याचा कायदा बनवणार असल्याचे केंद्रशासनाने म्हटले होते. याच्या विरोधात पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांकडे तक्रारही नोंदवली होती. 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्यावा !

अखिल भारतीय ब्राह्मण 
महासंघ, पुणे यांच्या वतीने मागणी 
निवासी जिल्हाधिकार्‍यांना (डावीकडे) निवेदन
देतांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते
        पुणे, २९ मे - स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अनमोल कार्य लक्षात घेता त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, तसेच विद्यार्थ्यांवर राष्ट्रप्रेमाचे संस्कार व्हावे, या दृष्टीने शालेय अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित धडा असावा, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या निमित्ताने वरील आशयाचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना २७ मे या दिवशी देण्यात आले. या वेळी महासंघाचे पुणे शहराध्यक्ष आनंद दवे, अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

(म्हणे) १९८४ मध्ये अवघ्या ५ मिनिटांत देहलीला नष्ट केले असते ! - डॉ. अब्दुल कादिर खान, माजी अणुशास्त्रज्ञ, पाकिस्तान

दिवास्वप्न पहाणारे पाकचे माजी अणुशास्त्रज्ञ !
       इस्लामाबाद - १९८४ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती जनरल झिया उल हक यांनी एका आण्विक चाचणीला संमती दिली असती, तर पाकमधील रावळपिंडीच्या कहुटा येथून अवघ्या पाच मिनिटांत देहली शहर नष्ट करता आले असते, असा गौप्यस्फोट आण्विक तंत्रज्ञानाची तस्करी केल्याचा आरोप असलेले पाकिस्तानचे माजी अणुशास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कादिर खान यांनी एका कार्यक्रमात केला. खान पुढे म्हणाले की, पाकने जर अशी चाचणी घेतली, तर पाकला मिळणारे विदेशी साहाय्य बंद होईल, अशी भीती जनरल झिया यांना होती.

गोहत्या करणार्‍यांना कारागृहाच्या शिक्षेला पर्याय म्हणून गोशाळेला प्रत्येकी ९ सहस्र रुपये भरण्याचा आदेश !

बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात एकीकडे महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह टिप्पणी करणार्‍या हिंदु महासभेच्या कमलेश तिवारी यांना गेल्या ६ मासांहून अधिक काळ कारागृहात डांबण्यात आले आहे, तर दुसरीकडे हिंदूंच्या मनात असलेले गोमातेचे स्थान पहाता, गोहत्या करणार्‍यांना देण्यात आलेली अत्यल्प शिक्षा यावरून हिंदूंना त्यांच्याच देशात सापत्नपणाची वागणूक मिळते, असे कोणी म्हटल्यास त्यात चूक ते काय ? 
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निर्णय 
     चंडीगड - पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने गोहत्येच्या दोषींच्या शिक्षेत पालट करण्याचा निर्णय नुकताच दिला. या अंतर्गत संबंधित गोशाळेला प्रत्येक दोषी व्यक्तीने ९ सहस्र रुपये दिल्यास त्यांना ठोठावण्यात आलेल्या ६ मासांच्या शिक्षेतील जेवढा काळ त्यांनी हा निर्णय यायच्या आधी कारागृहात घालवला आहे तेवढीच शिक्षा त्यांना भोगावी लागेल. 
     हे प्रकरण पानिपत येथील गोविंद गोशाळेसंदर्भात आहे. महंमद अस्लम, महंमद अकलाख, गुलजार, महंमद अर्शाद, महंमद गुल्फान आणि महंमद इस्तकर या धर्मांधांवर गोशाळेतील गायींची हत्या केल्याचा आरोप होता. कनिष्ठ न्यायालयाने सर्व धर्मांधांना दोषी ठरवत पंजाब राज्याच्या गोहत्येसंबंधी कायद्याअंतर्गत ६ मासांची साधी कैद आणि प्रत्येकी १ सहस्र रुपये दंड ठोठावला. अपील न्यायालयाने हा निर्णय योग्य असल्याचा निर्णय दिला. 

हैद्राबाद विद्यापिठाजवळ ठेवलेल्या शिवलिंग आणि नंदी यांच्या मूर्तींवरून विरोध !

विद्यापिठाच्या आवारात मध्यभागी असलेली पिंड आणि उजव्या बाजूला नंदी
बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात देवतांची पूजा
करण्यास मज्जाव करणारा जगातील एकमेव देश भारत ! 
     भाग्यनगर (हैद्राबाद) - येथील हैद्राबाद विद्यापिठाच्या मुख्य द्वारासमोर शिवलिंग आणि नंदीची मूर्ती असल्याचे निदर्शनास आल्यानंतर येथील काही विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. विद्यापिठाच्या परिसरामध्ये बाह्मणवाद्यांचे वर्चस्व आहे, असा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. (हिंदूंच्या देवतांना जातीयतेच्या चष्म्यातून पहाणारे जातीयवादी विद्यार्थी ! एकीकडे हैद्राबाद विश्‍वविद्यालयाचा कथित दलित विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्याप्रकरणी हिंदूंना आणि भाजपला उत्तरदायी ठरवणारे ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी, आता अशा जातीयवादी विद्यार्थ्यांच्या विरोधात काही कृती करणार नाहीत ! - संपादक) 
      या मूर्ती येथे कोणी आणल्या आणि कधी आणल्या याची माहिती मिळू शकलेली नाही. हे स्थान जरी विद्यापिठाच्या बाहेर असले, तरी प्रवेशद्वाराजवळील बागेमध्ये आहे. बागेची देखभाल-दुरुस्ती विद्यापिठाकडूनच करण्यात येते. 

स्वा. सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी !

उपस्थित सावरकरप्रेमी
        सांगली - येथील स्वा. सावरकरप्रेमींकडून २८ मे या दिवशी स्वा. सावरकर यांची १३३ वी जयंती मारुती चौक येथील विठ्ठल मंदिरासमोर उत्साहात साजरी करण्यात आली. प्रसिद्ध उद्योजक श्री. अरुण दांडेकर यांनी स्वा. सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. फडके स्नेहमंडळाचे श्री. शरद फडके यांनी पुढाकार घेऊन याचे आयोजन केले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय रेठरेकर, चित्पावन संघाचे श्री. अनिल पोंक्षे, ह.भ.प. शशिकांत ओक, सर्वश्री शंकरराव काळे, सचिन परांजपे. मुकुंद पटवर्धन, बाळासाहेब पोतदार, सुहास पवार, केदार आठवले, विनायक कुलकर्णी यांसह अन्य स्वा. सावरकरप्रेमी उस्थित उपस्थित होते.

(म्हणे) शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिल्लू !

 • वयोवृद्ध व्यक्तींविषयी अशी अवमानजनक भाषा वापरणारे असंस्कृत राजकारणी म्हणजे लोकशाहीला कलंकच !
 • नीतेश राणे यांचे ब्राह्मणद्वेषी आणि संघद्वेषी वक्तव्य !
        नगर, २९ मे - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मोठे करण्यात शिवसेना-भाजपचे मोठे पाठबळ आहे. पुरंदरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिल्लू असल्याची टीका काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी एका पत्रकार परिषदेत केली.
        ते पुढे म्हणाले की, पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी नेमके काय लिहिले ? त्यांच्याविषयी काय केले ? हे पडताळा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे पुस्तके प्रसिद्ध करून आणि ती विकून यांनी घरे चालवली. अशा पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आहे. (शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेले कार्य एकमेवाद्वितीय आहे. त्यांच्यावर टीका करण्याची नीतेश राणे यांची पात्रता तरी आहे का ? - संपादक)

श्री बाई समर्थ नाटकाचे नाव पालटण्यास निर्माते आणि कलाकार यांचा नकार : हिंदुत्ववाद्यांचा विरोध कायम !

         हिंदुत्ववाद्यांनी हे नाटक पाहिल्यानंतर या नाटकाला आमचा विरोध नसून केवळ नाटकाच्या शीर्षकाला विरोध असल्याचे प्रफुल्ल महाजन आणि नाटकांतील कलाकारांना सांगितले; मात्र नाटकातील सर्व कलाकार आणि प्रफुल्ल महाजन यांनी नाटकाचे शीर्षक पालटण्यास नकार दिला. हे नाटक सेन्सॉरकडून मान्य झाले आहे. विशेष म्हणजे या नाटकातील प्रमुख भूमिकेत असलेलेे अरुण नलावडे हे नाटक सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष असल्याने या नाटकाचे शीर्षक कसे पालटणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
         कोल्हापूर, २९ मे (वार्ता.) -
येथील केशवराव भोसले नाट्यगृह येथे २८ मे या दिवशी श्री बाई समर्थ या नाटकाच्या शीर्षकामुळे श्री स्वामी समर्थ यांचा अवमान आणि विडंबन होत असल्याने या नाटकाचे शीर्षक पालटण्यात यावे, अशी भूमिका श्री स्वामी समर्थ भक्त आणि हिंदुत्ववादी यांनी घेतली होती; मात्र या नाटकातील कलाकार आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष अरुण नलावडे अन् अभिनेत्री निर्मिती सावंत यांनी या नाटकाचे शीर्षक पालटण्यास पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दांत नकार दिला, तर नाटक संपल्यानंतर चर्चा करण्याचे आश्‍वासन देऊनही या नाटकाचे वितरक प्रफुल्ल महाजन यांनी थेट पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे हिंदुत्ववादी आणि भक्त हे संतप्त झाले. (हिंदु धर्माचे खरे वैरी हिंदूच ! धर्महानी करणार्‍या नाटकाच्या शीर्षकात पालट करण्यास नकार देणारे कलाकार हे धर्मद्रोही आहेत. प्रफुल्ल महाजन यांना जाब विचारून त्यांच्यात काहीच फरक पडत नसल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी हिंदुत्ववादी आणि श्री स्वामी समर्थ भक्त यांनी प्रयत्न केले पाहिजेत. - संपादक)

केरळमध्ये पाकिस्तानी नागरिकांची १ सहस्र ३७५ कोटी रुपयांची मालमत्ता !

स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनीही या मालमत्तेचे काय करायचे, याचा निर्णय घेऊ न शकणारे प्रशासकीय अधिकारी आणि शासन काय कामाचे ? 
     कोझीकोड - केरळमध्ये पाकिस्तानी नागरिकांच्या मालकीची 'एनिमी प्रॉपर्टी'च्या (शत्रूच्या मालमत्तेच्या) नावाखाली १ सहस्र ३७५ कोटी २२ लाख रुपये किमतीची मालमत्ता आहे. राज्यात भूमीच्या छोट्याशा तुकड्यासाठी लोकांना बरीच धडपड करावी लागत आहे; मात्र जवळ जवळ ६० पाकिस्तानी नागरिकांची राज्यात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. ही 'एनिमी प्रॉपर्टी' केंद्रीय गृहखात्याच्या अधिपत्याखालील 'कस्टडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी'कडे सोपवण्यात आली आहे. त्यांचे वारस या मालमत्तेचा उपभोग घेत आहेत. 
१. केरळ राज्य पाकिस्तानी नागरिकांची मालमत्ता असलेले देशातील ५वे सर्वांत मोठे राज्य आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तामिळनाडू नंतर केरळचा क्रमांक लागतो, असे केंद्रीय ग्रहमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. 

आण्विक साहित्य पुरवठादारांच्या गटात (एन्एस्जीमध्ये) भारताला प्रवेश मिळणार !

     वॉशिंग्टन - भारताचे आण्विक साहित्य पुरवठादारांच्या गटात ('न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप'मध्ये) प्रवेश देण्याच्या संदर्भातील पाकचे सर्व आक्षेप अमेरिकेने फेटाळले आहेत. भारताचा एन्एस्जीत प्रवेश करून देशाच्या विकासाकरता अणुऊर्जेचा वापर करण्याचा हेतू साध्य होणार आहे. एनएसजीमध्ये सध्या ४८ देश आहेत. अमेरिकेने म्हटले आहे की, एन्एस्जीतील देश आण्विक शक्तीचा ऊर्जा निर्मितीसाठी आणि विकासाकरता वापर करत आहेत. भारतालाही विकास कामांसाठीच अणुऊर्जेची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. अण्वस्त्रधारी देश झाल्यापासून भारत आणखी दायित्वतेने वागत आहे. अशा परिस्थितीत एन्एस्जीत भारताला प्रवेश दिल्यामुळे भारतीय उपखंडात अशांतता निर्माण होईल, ही पाकची भीती अनाठायी आहे. एन्एस्जीचा शस्त्रास्त्र स्पर्धेशी संबंध नाही.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने २५ लक्ष रुपयांचा दुष्काळ निधी !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !
       कोल्हापूर, २९ मे (वार्ता.) - राज्यातील मराठवाडा, विदर्भ, सोलापूर, सांगली यांसह अनेक जिल्ह्यांना दुष्काळाचा तडाखा बसल्याने तेथील जनतेस संकटांला तोंड द्यावे लागत आहे. या भागातील दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी कोल्हापूरच्या देवस्थान व्यवस्थापन समितीने मुख्यमंत्री साहाय्यता निधीस श्री महालक्ष्मी देवस्थानच्या वतीने २५ लक्ष रुपयांचा निधी देण्याचे संमत करण्यात आले होते. त्याप्रमाणे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २५ मे या दिवशी २५ लक्ष रुपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. या वेळी महसूलमंत्री श्री. एकनाथ खडसे, पालकमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील, आमदार श्री. अमल महाडिक, सदस्या संगीता खाडे, सचिव शुभांगी साठे उपस्थित होते. (देवस्थान समितीने भाविकांनी अर्पण केलेला पैशांचा वापर मंदिराच्या विकासकामांसाठी केला पाहिजे. दुष्काळग्रस्तांसाठी शासनाने आतापर्यंत भरघोस साहाय्य केले आहे. त्यामुळे देवस्थानाच्या निधीचा अशाप्रकारे वापर करणार्‍यांवर प्रथम कारवाई करायला हवी. - संपादक)

हिंदूंचा देव विश्‍वात्मके असतो. दुरितांचे तिमिर जावो । विश्‍व स्वधर्म सूर्ये पाहो ॥, अशा प्रार्थना करत हिंदु लहानाचा मोठा झालेला असतो. आपल्याप्रमाणे सारे जग साधे आणि सरळ आहे, अशी समजूत तो करून घेतो आणि फसतो; कारण जग कधीच साधे आणि सरळ नसते ! - श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.


स्मार्टफोनचा वापर अल्प करा आणि त्यातील माहितीची काळजी घ्या !

चीन आणि पाक यांच्याकडून सैन्यातील अधिकार्‍यांच्या हेरगिरीवर सैन्याची सूचना 
     नवी देहली - स्मार्टफोन बाळगणार्‍या सैन्यातील अधिकारी तसेच सैनिक यांची संवेदनशील माहिती असुरक्षित असून त्यांनी स्मार्टफोनचा वापर अल्प करून माहितीची काळजी घेण्याच्या सूचना गुप्तचर विभागाने दिल्या आहेत. 
१. शेजारील शत्रू राष्ट्रे इंटरनेटद्वारे व्हायरसचा वापर करून स्मार्टफोनमधील माहितीची चोरी करत असल्याचे अलिकडे घडलेल्या काही घटनांतून समोर आले आहे. हा प्रकार पाकिस्तान आणि चीनमधून होत असल्याचे उघड झाले होते. 
२. या पार्श्‍वभूमीवर गुप्तचर विभागाने स्मर्टफोनमध्ये संवेदनशील माहिती ठेवू नये तसेच कोणतेही अ‍ॅप वापरण्यापूर्वी विश्‍वासार्हतेची आणि सुरक्षेची पडताळणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. 

एकनाथ खडसे आणि दाऊद इब्राहिम संभाषण प्रकरणी हॅकर मनीष भंगाळे यांची याचिका प्रविष्ट !

       मुंबई, २९ मे (वार्ता.) - सायबर हॅकर मनीष भंगाळे यांनी खडसे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली असून खडसे यांना आलेल्या दूरध्वनी कॉल्स तपशिलाची केंद्रीय गुन्हे अन्वेषणच्या वतीने चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे खडसे-दाऊद दूरध्वनी प्रकरणाला पुन्हा एकदा नवे वळण लागले आहे. सबळ इलेक्ट्रॉनिक पुरावे असतांनाही मुंबई पोलिसांनी एकनाथ खडसे यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप मनीष भंगाळे यांनी केला आहे.
आरोप सिद्ध झाल्यास एकनाथ खडसे 
यांच्यावर कारवाई अटळ ! - गृहराज्यमंत्री किरेन रिजितू
       एकनाथ खडसे यांचे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याच्या कथित प्रकरणात कारवाई करण्यापूर्वी त्यांच्यावरील आरोप आधी सिद्ध होणे आवश्यक आहे, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी येथे सांगितले. खडसे यांच्यावर जर आरोप सिद्ध झाले, तर त्यांच्यावर कारवाई करायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एका महाविद्यालयातील इतिहासाच्या शिक्षकाने पडताळली भूगोलाची उत्तरपत्रिका

शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार !
       पुणे, २९ मे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या नसरापूर महाविद्यालयातील इतिहास विषयाच्या डॉ. रामकृष्ण ढेरे या शिक्षकाने भूगोल विषयाची उत्तरपत्रिका पडताळली आहे. (शिक्षकाचा दायित्वशून्य कारभार ! - संपादक) विद्यापिठाने या शिक्षकाला पुढील वर्षभर परीक्षेचे कोणत्याही प्रकारचे काम करण्यास प्रतिबंध केला आहे, तसेच भविष्यात पुन्हा अशी चूक करू नये, अशी समजही दिल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांनी यासंबंधी काढलेल्या परिपत्रकावरून समजते. (मुळात भूगोल विषयाची उत्तरपत्रिका त्या शिक्षकाकडे कशी पोहोचली, याचीही चौकशी विद्यापीठ प्रशासनाने करून संबंधितांवर कारवाई करावी. - संपादक) परीक्षा मूल्यमापनात चुकीचे काम केल्याचे निष्पन्न झाल्याने परीक्षा प्रमाद समितीच्या निर्णयानुसार त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

काश्मीरच्या ऐतिहासिक तीर्थस्थळांच्या इस्लामीकरणाचे मोठे षड्यंत्र !

 • हिंदूंनो, काश्मीरला भारताच्या हातून निसटू द्यायचे नसेल, तर हिंदूसंघटनाला पर्याय नाही, हे आतातरी जाणा आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेस सज्ज व्हा !
 • काश्मीरचे पीडीपी-भाजप शासन, फुटिरतावादी आणि धर्मांध हातात हात घालून काश्मीरची हिंदु ओळख पुसण्यासाठी प्रयत्नरत आहेत ! 
काश्मिरी हिंदूंची चेतावणी : हिंदूंच्या ऐतिहासिक स्थळांच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र कदापि सहन केले जाणार नाही ! 
     श्रीनगर - धर्मनिरपेक्ष भारतात २५ वर्षांपूर्वी काश्मीरमधील लाखो काश्मिरी हिंदूंना जिहादी आणि फुटिरतावादी शक्तींनी धर्माच्या आधारावर काश्मीरमधून बाहेर काढले. आता हिंदूंच्या तीर्थक्षेत्रांची नावे पालटण्याचे सुनियोजित षड्यंत्र चालवले जात आहे. एवढेच नव्हे, तर हिंदूंच्या तीर्थयात्रांमध्येसुद्धा विघ्ने आणण्याचे प्रयत्नही चालवण्यात येत आहेत. 

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे अहल्याबाई होळकरांच्या फलकाची प्रशासनाकडून मोडतोड !

घटनेच्या निषेधार्थ सांगोला बंद
        पंढरपूर/सांगोला (जिल्हा सोलापूर), २९ मे (वार्ता.) - अहल्याबाई होळकर यांची ३१ मे या दिवशी जयंती असल्याने उत्साही कार्यकर्त्यांनी विनाअनुमती फलक लावले होते. ते विनाअनुमती फलक काढण्याची मोहीम पंढरपूर प्रशासनाने घेतली. यामध्ये जयंतीनिमित्त लावलेल्या फलकाची मोडतोड झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्याधिकार्‍यांवर गुन्हा प्रविष्ट करण्याची मागणी केली. याच घटनेचे पडसाद सांगोला तालुक्यात उमटल्याने दुपारनंतर सांगोला बंदची हाक दिल्याने नागरिकांनी बंदला प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली होती. सांगोला येथे संतप्त कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी आणि संबधित कर्मचारी यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची सांगोला पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली होती. पंढरपूर पोलीस ठाण्यात मुख्याधिकारी शंकर गोरे आणि कर्मचारी यांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट झाला आहे, तर शिवीगाळ, नुकसान केल्याप्रकरणी १५ अज्ञातांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट झाला आहे.

खलिस्तानी आतंकवाद्यांच्या हिटलिस्टवर शिवसेना आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते !

     चंदीगड - पंजाबच्या जगराओं आणि नवांशहर येथून अटक करण्यात आलेल्या बब्बर खालसा या खलिस्तानी आतंकवादी संघटनेच्या मंदीप सिंह आणि अरविंदर सिंह या आतंकवाद्यांनी पोलीस चौकशीत काही गोपनीय माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, ते शिवसेनेसारख्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते, डेरा प्रमुख आणि काही निवृत्त पोलीस अधिकारी यांना ठार करणार होते.

उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे १ जण ठार, चारधाम यात्रा थांबवली !

       डेहराडून - उत्तराखंडमधील नशाली, पिथोरागड आणि कॉडिपाड परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे राज्यातील ६० घरे उद्ध्वस्त झाली. यात एका युवकाचा मृत्यू झाला. गंगोत्री-केदारनाथ मार्गाचा २० टक्के भाग पाण्याखाली आला आहे. (राज्यकर्ते अधर्माचरणी असले की, निसर्गाचा कोप होतो; म्हणून धर्माचरणी राज्यकर्त्यांचे हिंदु राष्ट्र हवे ! - संपादक)

उत्तरप्रदेश आणि काश्मीर यांना नष्ट करू ! - इस्लामिक स्टेटची धमकी

        गोरखपूर - इस्लामिक स्टेटने अरबी भाषेत एक व्हीडिओ प्रसारित करून उत्तरप्रदेश आणि काश्मीर यांना नष्ट करू, अशी धमकी दिली आहे. यानंतर पोलिसांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.
      सांगली, २९ मे (वार्ता.) - जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू असतांना अवैधरित्या जमाव जमवून विश्रामबाग पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून सभा घेतल्याप्रकरणी पोलिसांनी अवैध मेडीकल प्रॅक्टीस विरोधी कृती समितीचे अध्यक्ष असिफ बावासह २१८ जणांवर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा प्रविष्ट केला आहे. २७ मे या दिवशी असिफ बावा यांनी पोलिसांवर दबाव येण्यासाठी विविध मुस्लीम आणि पुरोगामी संघटनांना एकत्र करून विश्रामबाग पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पोलिसांच्या विरोधात चिथावणीची भाषा केली होती. मटकाप्रकरणी अटक करण्यात आलेले धर्मांध युवक निर्दोष असल्याचे बावा यांचे म्हणणे होते.

८ वर्षांनी आरोपी निर्दोष असल्याचे सांगणार्‍या अन्वेषण यंत्रणांच्या उत्तरदायींना आजन्म कारागृहात टाका ! हिंदूंनो, निरपराध्यांना अनेक वर्षे नाहक छळणार्‍यांना शिक्षा होईपर्यंत शासनाकडे पाठपुरावा घ्या !

वर्ष २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी साध्वी 
प्रज्ञासिंह यांच्यासह ४ जणांना निर्दोष ठरवत आरोपपत्रातून वगळले !
        राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) १३ मे २०१६ या दिवशी मुंबई येथील विशेष न्यायालयात वर्ष २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पुरवणी आरोपपत्र सादर केले. आरोपपत्रात या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून आतापर्यंत समोर आणण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि अन्य तिघांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा न मिळाल्याने त्यांचे नाव आरोपपत्रात प्रविष्ट करण्यात आलेले नाही, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने यात म्हटले आहे. तसेच या प्रकरणातील सर्व १२ आरोपींवरील मोक्का हटवण्यात आला आहे. (१५.५.२०१६)

मालेगाव : हिदु आतंकवादाची भाकडकथा !

श्री. भाऊ तोरसेकर
       जेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार देहलीच्या तिहार कारागृहातून फरार झाला होता. देशभरातील लोकांच्या तोंडी त्याचे नाव होते. चार्ल्स शोभराज हाच तो माणूस ! तिहारच्या रखवालदारांना गुंगी आणणारे काहीतरी खाऊ घालून, हा कैदी सहीसलामत निसटला होता. मग त्याला शोधून काढण्याचे आणि कह्यात घेण्याचे मोठे नाट्य रंगले होते. ज्यांनी त्याला सर्वप्रथम शिताफीने पकडले होते, त्याच एका ज्येष्ठ पोलीस अधिकार्‍यावर ही कामगिरी सोपवली गेली. त्याचे नाव होते मधुकर झेंडे ! त्यांनीच मग सापळा लावून शोभराजला गोव्यात अटक केली होती. असा चार्ल्स शोभराज याने केलेले विधान महत्त्वाचे आहे. तो म्हणतो, मी ३०-३५ देशांत गुन्हे केले आहेत; पण कुठलेच पोलीस मला गजाआड टाकू शकले नाहीत. भारतातच मी फसलो; कारण येथे खोटे पुरावे बनवण्याची कायदेशीर तरतूद आहे आणि न्यायालयातही खोटे पुरावे खरे सिद्ध करण्याची कायदेशीर मुभा आहे. आज मालेगावच्या स्फोट प्रकरणातून दीर्घकाळ अकारण तुरुंगवास सहन करून मुक्त झालेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांच्या संदर्भात शरद पवार यांनी व्यक्त केलेले मत ऐकल्यावर, मला त्या चार्ल्स शोभराजची आठवण झाली; कारण त्याचाच मुद्दा नव्याने पुढे आलेला आहे. इतकी वर्षे ज्यांना हिंदु आतंकवादी म्हणून गजाआड डांबण्यात आले आणि जामिनाची संधीही नाकारली गेली, त्यांच्या विरोधात कुठले पुरावे होते अन् कशासाठी त्यांना डांबण्यात आले, त्याचा खुलासा कुणीही करत नाही; पण त्यांच्या सुटकेविषयी मात्र अश्रू ढाळले जात आहेत. शरद पवार दीर्घकाळ प्रशासकीय दायित्व पार पाडलेले राजकारणी आहेत आणि त्यांना असे हवेत बोलून भागणार नाही. सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणाची छाननी करण्याची मागणी करूनही त्यांना हात झटकता येणार नाहीत; कारण याला प्रारंभच मुळात पवार यांच्या एका विधानापासून झाला होता.

भारतीय नागरिकांनो, जपानच्या नागरिकांकडून शिका !

     जपानमधील होजी तकाअशी या ७१ वर्षांच्या प्रेक्षकाने त्यांच्या देशातील दूरचित्रवाणीवरील राष्ट्रीय प्रसारणावर असंतोष व्यक्त करत या वाहिनीकडून होत असलेल्या इंग्रजीच्या अतीवापराच्या विरोधात खटला प्रविष्ट केला आहे. एवढेच नव्हे, तर त्याने त्याच्या काही समर्थकांसह जपानमधील वाढत्या इंग्रजीच्या वापराच्या विरोधातही निदर्शने प्रविष्ट केली. (संदर्भ : साप्ताहिक वीरवाणी)

हिंदूंनो, जागृत व्हा ! शरीयत कायद्यानुसार काम करणार्‍या इस्लामी बँकांना विरोध करा !

     संयुक्त अरब अमिरातमधील इस्लामिक डेव्हलपमेंट बँक त्याची भारतातील पहिली शाखा गुजरातमध्ये उघडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातचा दौरा केल्यावर या संदर्भात करार केला होता. ही बँक शरीयत कायद्यानुसार काम करतेे. जगातील ५६ इस्लामी देशांत हिच्या शाखा आहेत. या बँकेकडून राज्यात सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी ३० रुग्णवाहिकाही देण्यात येणार आहेत. 
     या बँका हिंदूंवरील अत्याचार, लव्ह-जिहाद, धर्मांतर आदी राष्ट्र आणि हिंदु धर्मविरोधी गोष्टींना अधिकृतपणे धन पुरवणार नाहीत कशावरून ? अशा वेळी तुम्हाला भारतीय न्यायालयही न्याय देऊ शकणार नाही ! त्याचप्रमाणे ३० रुग्णवाहिका मुसलमानांच्या दृष्टीने काफीर असणार्‍या अन्य धर्मियांना उपलब्ध होणार का आणि शरीयत कायदा अन्य धर्मियांना सेवा पुरवण्यास सांगतो का ?

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे अवतारत्व सिद्ध करणारेे काही वैशिष्ट्यपूर्ण दाखले !

१. सनातन संस्थेच्या कार्याचा वाढता विस्तार ! 
१ अ. संस्थेच्या स्थापनेपासून आतापर्यंत कोणालाही गुरुमंत्र दिला न जाता तन, मन आणि धन यांचा त्याग करण्यास शिकवण्यात येणे : सनातन संस्था सांगत असलेल्या गुरुकृपायोगाच्या स्थापनेपासून आतापर्यंत कधीही कोणालाही गुरुमंत्र देण्यात आलेला नाही. त्याऐवजी संस्थेत तन, मन आणि धन यांचा त्याग करण्यास शिकवण्यात येते. तसे टप्प्याटप्प्याने केल्याने साधकांची प्रगती जलद गतीने होत आहे, याउलट गुरुमंत्र घेणार्‍या लाखो भक्तांची प्रगती होतांना दिसत नाही; कारण ते कोणताच त्याग करत नाहीत.
१ आ. सनातन संस्थेमध्ये प्रत्येक साधक-जिवाची आध्यात्मिक उन्नती होण्यास अधिक प्राधान्य आणि महत्त्व दिले जाणे : सनातन संस्थेमध्ये प्रत्येक साधक-जिवाची आध्यात्मिक उन्नती होण्यास अधिक प्राधान्य आणि महत्त्व दिले जाते. साधकाला आध्यात्मिक त्रास असल्यास त्याच्या निवारणार्थ प्रथम संधी दिली जाते.

जगदंबे, लवकर हटव या जिल्हाधिकार्‍याला !

डॉ. अमित सैनी
     १६.५.२०१६ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या धार्मिक अपराधांविषयी केलेले लिखाण वाचल्यावर मला पुढील काव्य स्फुरले. 
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी । 
का करत आहात तुम्ही धर्माची हानी ? ॥ धृ. ॥ 
मनकर्णिका कुंडावरील शौचालय । 
का करताय अपवित्र देवालय ? ॥ १ ॥ 
केले अशास्त्रीय मूर्तीवज्रलेपन (टीप) । 
हे तर आहे आधुनिक मूर्तीभंजन ॥ २ ॥ 
धर्मद्रोही महिलांना गर्भगृहात प्रवेश । 
भाविकांना मात्र पोलीस दलाचा आवेश ॥ ३ ॥ 

उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर !

 सुट्टीतील परिपाठ ! 
     सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. हा सुट्टीचा कालावधी मुलांमध्ये विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालवाचकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
 सत्संगाचा परिणाम 
राजवाड्यात शिरलेल्या चोराने राजा-राणीचे संभाषण ऐकणे 
      एक चोर एका रात्री चोरी करण्यासाठी राजवाड्यात शिरला. त्या वेळी त्याने राजा-राणीचे संभाषण ऐकले. राजा राणीला म्हणाला, 'सध्या गंगातिरावर काही साधू उतरले आहेत. उद्या सकाळी त्यांच्यापैकी एकाशी मी राजकन्येचा विवाह करून देईन म्हणतो'. ते ऐकून चोराने मनात विचार केला, आपणही गंगाकिनारी जावे आणि साधूचे रूप घेऊन बसावे. भाग्यात असेल, तर राजकुमारीशी विवाह होईल. 

देवतांच्या लीलांत रममाण होणारा ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला गोवा येथील चि. निकुंज नीलेश मयेकर (वय ४ वर्षे) !

चि. निकुंज मयेकर
      म्हापसा येथील श्री. नीलेश मयेकर आणि सौ. प्रगती नीलेश मयेकर (पूर्वाश्रमीची कु. प्रगती पद्माकर चणेकर) यांचा मुलगा चि. निकुंज नीलेश मयेकर याचा वैशाख कृष्ण अष्टमी (२९ मे २०१६) या दिवशी चौथा वाढदिवस झाला. त्याच्याविषयी त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढेे देत आहोत.
१. २ ते ३ वर्षे
१ अ. मित आहारी : निकुंज मोजकेच जेवतो. त्याला आवश्यक आहे, तेवढेच खातो. त्याच्या कितीही आवडीचा पदार्थ असला, तरी तो जास्त खात नाही.
१ आ. आठवणीने उपाय करणे : त्याच्या अंगाला खाज आली, तर तो त्या ठिकाणी अष्टगंध लावायला सांगतो. तसेच तो प्रतिदिन टिळा लावणे, विभूती, अष्टगंध, अत्तर, कापूर लावणे, उदबत्तीने आवरण काढणे हे उपाय करतो. तो अंघोळीपूर्वी केसांना गोअर्क लावणे, अंगाला कापराचे तेल किंवा तेल मिश्रित उटणे लावणे हे उपाय करतो. एखादा उपाय करायला मी विसरले, तर तो मला त्याची आठवण करून देतो.
१ इ. बोलण्यात मी, माझे आणि मला न म्हणणे : निकुंजला त्याचे छायाचित्र दाखवून हे कोणाचे छायाचित्र ?, असे विचारल्यावर तो त्रयस्थाप्रमाणे बाबूचे, असे सांगतो. बाबूला काय हवे किंवा नको, असे सांगतो. त्याच्या मुखातून अजूनपर्यंत मी, माझे, मला हे शब्द ऐकले नाहीत.

'हिंदु राष्ट्र' म्हणजेच रामराज्य !

     'अखिल मानवजातीच्याच नव्हे, तर सर्व सजीव प्राण्यांच्याही उद्धारासाठी लाभदायक असणारे 'हिंदु राष्ट्र !', ही नेमकी संकल्पना समजून न घेता विरोधक, धर्मद्रोही आणि त्यांचे लांगूलचालन करणार्‍या वृत्तवाहिन्या त्याच्या विरोधात बोलत आहेत अन् सर्वसामान्य हिंदूंनाही भडकवण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्यासाठी 'हिंदु राष्ट्र' म्हणजे नेमके काय ?, हे पुढे दिले आहे. 
१. साधना करून स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणारे ते 'हिंदु'! 
     मानवाचा जन्म साधना करून स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून ईश्‍वरप्राप्ती करण्यासाठीच झाला आहे, जेणेकरून त्याला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत पुन्हा अडकावे लागू नये. यासाठी हिंदु धर्मामध्ये जिवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला आहे. साधना करून स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणार्‍यांना 'हिंदू' म्हटले आहे. 

अभ्यासदौरे नव्हे, सहलीच !

     पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील महापौरांसहित १४ अधिकारी ८ मे ते १३ मे या कालावधीत ईशान्य भारतातील सिक्कीम या राज्याच्या अभ्यासदौर्‍यावर गेले होते. ६ दिवस अभ्यास (?) करूनही सिक्कीममधील कोणते प्रकल्प कशा पद्धतीने महानगरपालिकेत राबवता येतील ? तेथील कोणत्या चांगल्या गोष्टींची अंमलबजावणी करता येऊ शकते ?, या मुख्य सूत्रांच्या संदर्भात मात्र अधिकारी (अपेक्षेप्रमाणे) ढिम्म होते. त्यात भर म्हणून सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनेत्या मंगला कदम यांना अजित पवार यांच्या दौर्‍यामुळे सिक्कीमला जात न आल्याने त्यांच्यासह ६ नगरसेविका २३ मे या दिवशी सिक्कीमला रवाना झाल्या. एवढे अल्प होते म्हणून कि काय, महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांनी ९ ते १६ जून या कालावधीत केरळ येथे अभ्यासदौर्‍याचे आयोजन केले आहे. 
 अभ्यास कि आभास ?
     वास्तविक महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांकडून काढण्यात येणार्‍या या तथाकथित अभ्यासदौर्‍यांची फलनिष्पत्ती शून्याच्या आसपास असते. तसेच सर्वसामान्य करदात्यांच्या पैशातून हे दौरे काढले जातात. अशा दौर्‍यांचे ना उद्दिष्ट स्पष्ट असते, ना अभ्यासाचे विषय स्पष्ट असतात, ना अंमलबजावणीची दिशा स्पष्ट असते. या माध्यमातून अभ्यासाचा आभासच निर्माण होत असल्याने याविषयी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. 

सात्त्विकतेची आवड असणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील चि. वेदांत हर्षवर्धन ठकार (वय १ वर्ष) !

चि. वेदांत ठकार
       वैशाख कृष्ण पक्ष नवमी (३०.५.२०१६) या दिवशी चि. वेदांत हर्षवर्धन ठकार याचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याच्या आजीला जाणवलेली त्याची वैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
१. गर्भारपण
       पुणे येथील आम्ही रहात असलेल्या घराला ५० वर्षे पूर्ण झाली; म्हणून मोठी वास्तूशांत केली होती. तेव्हा यज्ञाच्या वेळी हे नारायणा, ही वास्तू परम पूज्यांच्या कार्यासाठी उपयोगी पडू दे, अशी प्रार्थना सतत होत होती. वास्तूशांतीनंतर त्याच आठवड्यात सौ. अदितीला (सुनेला) दिवस गेल्याचे समजले.
१ अ. सौ. अदिती (वेदांतची आई) गर्भवती असतांना प्रतिदिन नियमितपणे मारुतिस्तोत्र आणि अथर्वशीर्ष म्हणत असे.
१ आ. बाळाच्या जन्माआधी एका पिवळ्या रंगाच्या सापाचे दर्शन होणे आणि तुला पुत्रप्राप्ती होऊन तो हिंदु राष्ट्रासाठी कार्य करायला जन्माला येणार आहे, असे सुनेला सांगितले जाणे : बाळाच्या जन्माआधीच्या संध्याकाळी घराच्या प्रवेशद्वारावर हिंदु राष्ट्रासाठी लावलेल्या भगव्या झेंड्याच्या बांबूवर चढून एका पिवळ्या रंगाच्या सापाने मला आणि अदितीला दर्शन दिले. तेव्हा मी अकस्मात् अदितीला म्हणाले, तुला पुत्रप्राप्ती होईल. हा मुलगा मोठा होऊन हिंदु राष्ट्रासाठी कार्य करायला जन्माला येणार आहे.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     'भाषाशुद्धीचे व्रत' यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
  (संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
      स्वधर्म आणि स्वभाषा यांच्यामुळे मुसलमान जगभर दबाव आणू शकतात, तर स्वधर्म अन् स्वभाषा सोडल्यामुळे जगात काय भारतातही हिंदूंची किंमत शून्य झाली आहे !

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे अमृतमहोत्सवी वर्ष विशेषांक

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु 
डॉ. जयंत आठवले यांचे अद्वितीय कार्य आणि वैशिष्ट्ये 
सांगणारा साप्ताहिक सनातन प्रभातचा रंगीत विशेषांक
वर्ष : १८ वे, अंक क्र. ३० (९ जून 
ते १५ जून २०१६) पृष्ठे : २४, सर्व पाने रंगीत
 • परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ ते परात्पर गुरु या प्रवासाचे वर्णन करणारा विशेषांक !
 • हिंदु राष्ट्राची स्थापना आणि जगभर हिंदु धर्माचा प्रसार करणे या कार्यासाठी त्यांनी सनातन संस्थेची स्थापना केली. सनातन संस्थेच्या स्थापनेनंतरचा त्यांचा कार्यकाल !
 • परात्पर गुरु डॉ. आठवले हे स्वयं भगवान श्रीविष्णूचे अवतार आहेत, असे महर्षींनी लाखो वर्षांपूर्वी जीवनाडीपट्टीत लिहून ठेवले आहे. १०.५.२०१५ या दिवशी झालेल्या नाडीवाचनाद्वारे तमिळनाडूतील होरामार्तंड पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारत्वाचा उलगडा केला. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या नाडीवाचनांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारत्वाचे उलगडलेले अनेक पैलू !
विशेष : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विविध भाव असलेली रंगीत छायाचित्रे
संपर्क : श्री. अविनाश पोयेकर, ९४०४९५६१८९
आपली मागणी ३० मे पर्यंत नोंदवू शकता !

अत्याचारी पोलिसांना कठोर शिक्षा करा !

       हिंदूंनो, साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित, सनातनचे साधक यांच्यासह असंख्य निरपराध हिंदुत्वनिष्ठांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये नाहक अडकवून त्यांना अनेक वर्षे नाहक कारागृहात डांबून त्यांचा अनन्वित छळ करणारे आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे पोलीस अन् तत्कालीन काँग्रेस सरकारमधील उत्तरदायी यांना फाशी देण्याची मागणी करा !
       हिंदुत्ववाद्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून भगव्या आतंकवादाची ओरड मारणारे तत्कालीन धर्मद्रोही काँग्रेसी राज्यकर्ते आणि अन्य हिंदुद्वेष्टेे यांनी हिंदूंची जाहीर क्षमा मागावी आणि प्रायश्‍चित्त घ्यावे ! इतकी वर्षे नाहक कारागृहात खितपत ठेवल्याविषयी सर्व निरपराध्यांना हानीभरपाई मिळालीच पाहिजे ! (१५.५.२०१६)

साधक, तसेच वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची माहिती

शेअर्स आणि म्युच्युअल फंड यांत पैशांची गुंतवणूक 
केल्याने होणारी संभाव्य आर्थिक हानी लक्षात घेऊन 
त्यात गुंतवलेेले पैसे लवकरात लवकर काढून घ्या !
       शेअर्स आणि म्युच्युअल फंड यांत पैसे गुंतवल्यास त्यातून मिळणारा परतावा (रिटर्न्स) अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवल्यावर मिळणार्‍या व्याजापेक्षा अधिक असतो, या विचाराने अनेक जण त्यामध्ये पैशांची गुंतवणूक करतात. बर्‍याच वेळा लाभ तर नाहीच; पण त्यात गुंतवलेली रक्कमही परत मिळत नसल्याने अनेकांची आर्थिक हानी झाल्याची उदाहरणे आहेत.
       सध्या चालू असलेल्या आर्थिक मंदीमुळे बर्‍याच आस्थापनांना आर्थिक हानी सोसावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या शेअर व्हॅल्यूवर विपरित परिणाम होत असल्याने गुंतवणूकदाराचे शेअर्स आणि म्युच्युअल फंड यांमधील पैसे बुडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेअर्स आणि म्युच्युअल फंड यांमध्ये रक्कम गुंतवली असल्यास ती लवकरात लवकर काढून घेणे आवश्यक आहे. भविष्यातही त्यात पैशांची गुंतवणूक करू नये.

पूर्णवेळ साधना करण्यास इच्छुक साधकांसाठी महत्त्वाची सूचना

साधनेतील अडचणींवर बुद्धीच्या निश्‍चयाद्वारे 
मात करण्यासाठी स्वयंसूचना घ्या आणि पूर्णवेळ 
साधनेचे जीवनोद्धारक पाऊल शीघ्रतेने उचला !
        आध्यात्मिक स्तर ५६ टक्क्यांच्या पुढे गेल्यावर पूर्णवेळ साधक होण्याच्या संदर्भात मनात विकल्प निर्माण होत नाहीत. त्याच्या खालील स्तरावरील साधकांना निर्णय घेणे कठीण जाते. त्यांनी निर्णय घेता येण्यासाठी काय करावे, याचे मार्गदर्शन पुढे केले आहे.
१. पूर्णवेळ साधना करण्यास इच्छुक 
साधकांनी बुद्धीचा निश्‍चय करणे आवश्यक !
        अनेक साधक स्वतःचे शिक्षण, नोकरी अथवा व्यवसाय सोडून पूर्णवेळ साधना करण्यास इच्छुक असतात आणि तशी इच्छाही उत्तरदायी साधकांकडे व्यक्त करतात. आंतरिक इच्छा असतांनाही कौटुंबिक अडचणी, तसेच मनाच्या स्तरावरील अडथळे यांमुळे ते पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय लवकर घेऊ शकत नाहीत. अशा साधकांनी बुद्धीचा निश्‍चय केल्यास ईश्‍वरकृपेने त्या अडचणी सहज दूर होतील, यात तीळमात्रही शंका नाही !

जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा हिंदुद्वेष !

       १७.५.२०१६ या दिवशी जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी एन्आयए झाली भगवी, म्हणून सुटली का साध्वी ? या शीर्षकाखाली चर्चासत्र पार पडले. अधिवक्ता गणेश सोवनी यांनी यावर आक्षेप घेऊन त्याचे खंडण केले. ते म्हणाले, एन्आयए भगवी झाली असती, तर ३ आठवड्यांपूर्वी वर्ष २००६च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील मुसलमान आरोपींना एन्आयएने मुक्त केले नसते. (२२.५.२०१६)

फलक प्रसिद्धीकरता

वक्तव्यांच्या पुढे जाऊन 
कारवाई करण्याची सरकारकडून अपेक्षा !
        तत्कालीन काँग्रेस शासनातील पी. चिदंबरम् यांच्या नेतृत्वाखालील गृह मंत्रालयाने इशरतजहाँ चकमकीच्या संदर्भातील सत्य लपवण्यासाठी पाकिस्तानी आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी युती करून काम केले होते, असा आरोप केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे.

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती

        परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्ष सोहळ्याच्या निमित्ताने दैनिक सनातन प्रभातचा दुसरा रंगीत विशेषांक ३१ मे २०१६ या दिवशी प्रसिद्ध करण्यात येणार होता; मात्र हा विशेषांक ३१ मे ऐवजी १ जून २०१६ या दिवशी प्रसिद्ध होणार आहे, याची कृपया वाचक, वितरक आणि साधक यांनी नोंद घ्यावी.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Tatkalin Gruhmantri Chidambaramne IshratJaha prakranka sach chhipane hetu LashkareToibaki sahayata li-Kiren Rijiju
Ab vaktavya nahi, karvaiki pratiksha
जागो ! : तत्कालीन गृहमंत्री चिदंबरम् ने इशरत जहाँ प्रकरण का सच छिपाने हेतु लष्कर-ए-तोयबा की सहायता ली - किरेन रिजिजू
अब वक्तव्य नहीं, कारवाई की प्रतीक्षा !

गुरुपौर्णिमेला ५० दिवस शिल्लक

       शिष्याचे अज्ञान घालवून, त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी जे त्याला साधना सांगून ती करवून घेतात आणि अनुभूती देतात, त्यांना गुरु असे म्हणतात.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
 
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
राष्ट्र आणि धर्म द्रोही 
झालेल्या भारतियांवर निसर्गदेवाचा प्रकोप !
      भारतात आता बर्‍याच ठिकाणी इतका उन्हाळा आहे की, अंघोळीसाठी नळातून बालदीत घेतलेले पाणी गरम असते. त्यात आदल्या दिवशी बालदीत साठवलेले थंड झालेले पाणी घालून मगच अंघोळ करता येते. या प्रकोपापासून रक्षण होण्यासाठी उपाय एकच आणि तो म्हणजे राष्ट्र आणि धर्म प्रेम जागृत करणे !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरे ज्ञान
 माणूस जेव्हा खरे ज्ञान प्राप्त करतो, तेव्हा त्याला कळते की,
मी विश्‍वातील अमर्याद ज्ञानभांडारातील अत्यल्प असे ज्ञान प्राप्त केले आहे. 
 ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ । 
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥ 
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान 
आनेवालेको कहना नहीं, जानेवालेको 
रोकना नहीं और पूछे बिगर रहना नहीं ।
भावार्थ : आनेवालेको कहना नहीं मधे कहना हे विचारणे या अर्थी आहे. येणार्‍याला, म्हणजे जन्माला आलेल्याला तू जन्माला का आलास ? असे आपण विचारू शकत नाही. सृष्टीचे निर्माण बंद होऊ शकत नाही. जानेवालेको, म्हणजे मृत्यू पावणार्‍याला रोकना नहीं, म्हणजे आपण थांबवू शकत नाही. पूछे बिगर रहना नहीं, म्हणजे तू खरोखर कोण आहेस ? हे स्वतःला विचारल्याविना राहू नये. या प्रश्‍नाने तरी तो स्वतःच्या खर्‍या रूपाची ओळख करून घ्यायचा प्रयत्न करील.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र

द्वितीयवर्षपूर्ती-आहे मनोहर तरी...!

     दहा वर्षांपासून बंद असलेला जम्मू-कटरा प्रकल्प चालू होऊन जम्मूपासून वैष्णोदेवीचे दर्शन सुलभ करणे, कैलास मानसरोवरचा रस्ता चालू करणे, महारस्ता बनवून अरुणाचल प्रदेशाला भारताशी जोडणे, 'एलईडी बल्ब' पुरवून २१ टक्के वीज वाचवणे, येथपासून ते भ्रष्टाचार्‍यांच्या धरपकडीचे सत्र चालवणे, तसेच अन्य संरक्षण, अर्थ, अणूऊर्जा आदींसंदर्भात अनेक वैशिष्टपूर्ण परराष्ट्रीय धोरणे राबवून शासनाने गतीमान आणि धोरणी शासनाचा प्रत्यय दिला आहे, यात शंका नाही; परंतु दुसरी वर्षपुरती साजरी करतांना 'या सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही', हे सूत्र सांगणे हे काही भूषणावह नक्कीच नाही. पहिले सरकार भ्रष्टाचारी होते, म्हणून जनतेने त्यांना दूर सारले. आदर्श राजाने भ्रष्टाचारी असणे अपेक्षितच नाही; त्यातून संघसंस्कारितांना तर नाहीच नाही. हे म्हणजे 'मुलगा दारू पीत नाही, म्हणजे चांगले स्थळ आहे', असे म्हणण्यासारखे झाले. केवळ भ्रष्टाचार न करणे हे मूलभूत मूल्यमापन आपण आदर्श म्हणून ठेवायचे का ? सरकारने केवळ स्वत: भ्रष्टाचार न करणे अपेक्षित नाहीच, तर कुठेच भ्रष्टाचार होऊच न देणारे रामराज्य आणणे जनतेला अपेक्षित आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn