Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

एस्.एस्.आर्.एफ्.च्या चौथ्या 
संत पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली यांचा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

संत चोखामेळा यांची आज पुण्यतिथी

(म्हणे) संबंध सुधारण्यासाठी लाहोरला गेलो होतो ! - नरेंद्र मोदी

गेल्या ६८ वर्षांत पाकशी संबंध सुधारलेले
 नाहीत, हा इतिहास असतांना त्यासाठी परत 
परत प्रयत्न करून काय साध्य होणार आहे ?
       नवी देहली - पाकिस्तान हा आपला शेजारी देश असून त्यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याची शासनाची इच्छा आहे. त्याच हेतूने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मी शपथविधी सोहळ्याला बोलावले होते आणि मध्यंतरी मैत्रीसाठी स्वतःहून पुढाकार घेत लाहोरलाही गेलो होतो, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. केंद्रशासनाला २ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकेच्या वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. यात त्यांनी पुढे स्पष्ट केले की, आतंकवाद हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे आणि आतंकवादासोबत कधीच तडजोड केली जाऊ शकत नाही. त्यांनी या मुलाखतीत अनेक विषयांवर चर्चा केली आहे.
       मोदी म्हणाले की, देशाच्या विकासाला गती देण्यासाठी त्यांच्या शासनाने अनेक सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर भारत आता कोपर्‍यात उभा नसून महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. येत्या ३ वर्षांत अजून बरेच काम करायचे आहे.

डोंबिवलीत रासायनिक आस्थापनात बॉयलरचा शक्तीशाली स्फोट

५ मृत्यूमुखी, १४० हून अधिक घायाळ
      डोंबिवली - येथील एम्आयडीसी परिसरातील प्रो-बेस एन्टरप्रायजेस या औषध-निर्मिती करणार्‍या आस्थापनात सकाळी ११.३० वाजता बॉयलरचा प्रचंड मोठा स्फोट झाला. या स्फोटात १४० हून अधिक घायाळ झाले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. घायाळांमधील ९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. घायाळांना विविध रुग्णालयांत प्रविष्ट करण्यात आले आहे. या स्फोटात या आस्थापनाची संपूर्ण इमारत कोसळली, तसेच आजूबाजूच्या सहा आस्थापनांची मोठ्या प्रमाणात हानी झाली.
       हा स्फोट इतका मोठा होता की, या परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्या, तसेच या इमारतींना हादरे बसले. डोंबिवली पश्‍चिम भागात पाच कि.मी. अंतरापर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिक भीतीने रस्त्यावर आले. या आस्थापनाजवळ गोठे असल्यामुळे अनेक गायी आणि बैल या स्फोटामुळे घायाळ झाले. त्यांनाही उपचारासाठी नेण्यात नागरिक साहाय्य करत होते. अनेक घंटे धुराचे प्रचंड लोट या परिसरातून येत होते. दीड-दोन कि.मी. अंतरापर्यंत धुराचे लोट दिसत होते. धुरामुळे नागरिकांना श्‍वास घेण्यास त्रास होत होता. स्फोटामुळे या परिसरातील भ्रमणभाषची सेवाही विस्कळीत झाली. स्फोटानंतर परिसरातील कारखान्यांतील काम सुरक्षेच्या कारणास्तव थांबवण्यात आले आहे.

स्वसंरक्षण प्रशिक्षणाच्या प्रकरणी बजरंग दलाच्या शहर संयोजकाला अटक

  • हिंदू स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाचा सराव उघडपणे करतात; मात्र जिहादी आतंकवादी त्यांच्या देशद्रोही कृत्यांची सिद्धता लपूनछपून करतात आणि पोलीस त्यांना पकडू शकत नाहीत ! 
  • देशातील सर्वाधिक दंगली उत्तरप्रदेशमध्ये होत असतांना हिंदूंचे रक्षण करण्यास अपयशी ठरलेले राज्यकर्ते हिंदूंना स्वसंरक्षण करण्यासही बंदी घालतात, हा अन्याय आहे !
  • उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाचा हिंदुद्वेष !
       लक्ष्मणपुरी / अयोध्या - अयोध्येतील करसेवकपुरम्मध्ये बजरंग दलाने स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाचे आयोजन केल्याच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट झाल्यानंतर पोलिसांनी बजरंग दलाचे येथील शहर संयोजक महेश मिश्रा यांना अटक केली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम १५३-ए अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. मिश्रा यांच्या अटकेनंतर बजरंग दल आणि विश्‍व हिंदु परिषद यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याच्या बाहेर जमा झाल्यावर पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बळ तैनात केले.

मुसलमान बहुसंख्य असलेल्या ठिकाणी लोकशाही नांदत नसल्याने भारतात लोकशाही टिकण्यासाठी हिंदू बहुसंख्य असणे आवश्यक ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

डॉ. स्वामी यांच्यासारखे परखड मतप्रदर्शन 
करण्याचे धाडस एकातरी खासदाराकडे आहे का ?
       नवी देहली - भारतात धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही नांदायची असेल, तर येथे हिंदू बहुसंख्येने असणे आवश्यक आहे. ज्या वेळी मुसलमान बहुसंख्येने असतात, मग ते काश्मीर असो किंवा केरळमधील मल्लपुरम्, तेथे लोकशाही किंवा धर्मनिरपेक्षता नांदत नाही. मुसलमानबहुल परिसरात हिंदूंचा जीव धोक्यात असतो, असे प्रतिपादन भाजपचे वरिष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले आहे. भारतात जोपर्यंत हिंदूंची लोकसंख्या ८० प्रतिशत आहे, तोपर्यंत भारताचे अस्तित्व टिकून राहील. समान नागरी कायदा या विषयावर बोलतांना त्यांनी वरील प्रतिपादन केले.
डॉ. स्वामी पुढे म्हणाले,
१. अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी ढाचा, वाराणसीतील काशी विश्‍वनाथ मंदिर आणि ग्यानवापी मशीद, तसेच मथुरेतील कृष्ण जन्मभूमी आणि शाही इदगाह मशीद या वादग्रस्त जागा आहेत. मोदी शासनाने याकडे लक्ष देऊन या समस्यांचे निराकरण केले पाहिजे. (मोदी शासन याची दखल घेईल का ? - संपादक)

नगर रस्त्यावर (पुणे) एकात्मिक वाहतूक प्रणालीमध्ये होणार्‍या अपघातांना पालिकाच उत्तरदायी ! - अभिषेक कृष्णा

       पुणे, २६ मे - येथील नगर रस्त्यावरील एकात्मिक वाहतूक प्रणाली मार्गावर (बीआर्टी) बेशिस्त वाहनचालक आणि अपुरी कामे यांमुळे अपघात होत आहेत. या मार्गावर पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएम्पीएल्) केवळ संचलन करत असून अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे दायित्व महानगरपालिकेचे आहे. महामंडळाने अपूर्ण कामांची माहिती लेखी स्वरूपात देऊनही बससेवा चालू करण्यात आली, असे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांनी स्पष्ट केले. (याविषयी कृष्णा यांनी पुढे जाऊन परिवहन प्राधिकरण अध्यक्षांची भेट घेऊन बीआर्टी रस्ता चालू करण्याला विरोध का केला नाही ? - संपादक) नगर रस्ता वाहतूक प्रणाली मार्गावर अल्पावधीत ११ अपघात झाले. या संदर्भात पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा २३ मे या दिवशी आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी अभिषेक कृष्णा यांनी सभेत ही माहिती दिली. सभेत काही राजकीय पक्षांकडून अपघातांमुळे हा मार्गच बंद करण्याची मागणी केली आहे.

राममंदिराचे सूत्र सोडलेले नाही ! - अमित शहा

राममंदिराच्या सूत्राविषयी शासनाची 
काही कृती दिसत नाही, त्यामुळे राममंदिराचे सूत्र 
सोडलेले नाही, या म्हणण्यावर कुणाचा विश्‍वास बसणार नाही !
       नवी देहली - राममंदिराची उभारणी हे आमच्या निवडणूक घोषणापत्रातील सूत्र आहे आणि ते आम्ही सोडून दिलेले नाही, असे भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकारांना सांगितले. राममंदिराचा निर्णय सर्वसहमती वा न्यायालयाचा निर्णय यांवरच अवलंबून राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी डिसेंबरमध्ये राममंदिराच्या उभारणीला आरंभ होईल, असे जे वक्तव्य केले, ते त्यांचे मत आहे, असे सांगून शहा यांनी डॉ. स्वामी यांच्या विधानाशी सहमती दर्शवणे टाळले. मी पक्षाध्यक्ष आहे, मी त्यांच्यासारखे बोलू शकत नाही ना ?, असा प्रतिप्रश्‍न त्यांनी केला.

नाशिक येथील श्री कपालेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात जाण्याचा अट्टाहास करणार्‍या धर्मद्रोही तृप्ती देसाई यांना पोलिसांनी नाशिक जिल्ह्याबाहेर सोडले !

धर्मपरंपरा वारंवार पायदळी तुडवू पहाणार्‍या 
आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवणार्‍या धर्मद्रोही 
तृप्ती देसाई यांना पोलिसांनी कारागृहात टाकावे आणि 
त्यांच्याकडून पोलीस बंदोबस्तासाठी येणारा सर्व खर्च वसूल करावा !
        नाशिक, २६ मे (वार्ता.) - धर्मद्रोही कृत्ये करणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यामुळे होणारी धर्महानी श्री कपालेश्‍वराच्या भक्तांवरील कृपादृष्टीमुळे पुन्हा एकदा टळली आहे. २६ मे या दिवशी श्री कपालेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात जाऊन दर्शन घेण्यासाठी अट्टाहास करणार्‍या तृप्ती देसाई यांना नाशिक पोलिसांनी कह्यात घेतले आणि सुरक्षितेत नाशिक जिल्ह्याच्या बाहेर नेऊन सोडले आहे.
१. २६ मे या दिवशी तृप्ती देसाई या दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास श्री कपालेश्‍वराच्या गाभार्‍यात जाऊन दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या.
२. या वेळी पोलिसांनी त्यांना त्या मंदिरात इतर भाविक ज्याप्रमाणे दरवाजाच्या जवळ जाऊन पादुकांचे दर्शन घेतात, त्या ठिकाणाहून महिला आणि पुरुष यांना दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून दर्शन घेण्यात यावे; परंतु यामुळे कायदा-सुव्यवस्था बिघडणार याची काळजी घ्यावी अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशा आशयाची नोटीस बजावली होती.

भाडे तत्त्वावरील औजारांच्या प्रकरणात शेतकरी आणि कृषी अधिकारी यांनी संगनमत करून अनुदान लाटले

अशा घोटाळेबाजांना समाजात छीःथू 
होईल, अशी कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे !
       पुणे, २६ मे - कृषी यांत्रिकीकरण अभियानाच्या अंतर्गत भाडे तत्त्वावरील औजारांच्या प्रकरणात पुण्यासह अन्य जिल्ह्यांतील शेतकरी आणि कृषी अधिकारी यांनी संगनमताने औजारांची देयके कागदोपत्री दाखवून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यांनी पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील विभागीय अधीक्षक आणि कृषी अधिकारी विनयकुमार आवटे यांची एकसदस्यीय समिती चौकशी करण्यासाठी नेमली आहे.
       कृषी औजारांच्या सेवा-सुविधा शेतकर्‍यांना प्रचलित भाडेदरापेक्षा अल्प दराने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कृषी औजारे सेवा-सुविधा केंद्रे (कृषी औजारे बँक) स्थापन करण्यात आली. त्यासाठी कृषी विभागाने ४ कोटी रुपयांची औजारे उपलब्ध करून दिली होती. संबंधित शेतकर्‍यांनी इतर शेतकर्‍यांना ती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची अट घातली. सेवा-सुविधा केंद्रानुरूप १० लक्ष किंवा २५ लक्ष रकमेच्या औजारे संचाची खरेदी करणे बंधनकारक केले आहे. अल्प-अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना प्रचलित भाडेदरापेक्षा किमान २५ प्रतिशत अल्प दराने देऊन संबंधित शेतकर्‍यांनी औजारे पुरवठ्याविषयी नोंदवही ठेवणे बंधनकारक होते; परंतु सध्या लाभ दिलेल्या अनेक शेतकर्‍यांकडे नोंदवही नसून औजारेही नसल्याचे उघडकीस आले आहे.
भारतीय राजकारणात मतांसाठी सर्वच राजकीय पक्ष मुसलमानांचे लांगूलचालन करतात 
आणि हिंदूंना वाटाण्याच्या अक्षता लावतात, तरीही या देशाला निधर्मी म्हटले जाते !
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की, आम्ही मुसलमानांना आरक्षण देण्याचे दिलेले आश्‍वासन पूर्ण करणार आहोत. यातील कायदेशीर समस्या लवकरच सोडवण्यात येईल. यासाठी घटनेत संशोधन करण्याची आवश्यकता आहे. त्यावर लवकर तोडगा काढू.
मुसलमानांना आरक्षण देण्याचे आश्‍वासन पूर्ण करणार ! - अखिलेश यादव

बंगालमध्ये भाजपच्या नेत्या रूपा गांगुली यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमण !

बंगालमध्ये तृणमूल आणि केरळमध्ये साम्यवादी सत्तेवर आल्यावर ते करत असलेल्या 
गुंडगिरीचा निषेध करण्यासाठी कोणीही पुरस्कार परत करत नाहीत, हे लक्षात घ्या !
तृणमूल काँग्रेसचा आतंकवाद !
     कोलकाता - बंगालमधील भाजपच्या नेत्या रूपा गांगुली यांच्यावर दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमण करण्यात आले. यात त्या घायाळ झाल्या. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीत घायाळ झालेल्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याला पहाण्यासाठी जात असतांना गांगुली यांच्या वाहनावर आक्रमण करण्यात आले.

मदरशांमध्ये आहेत आतंकवाद्यांना प्रशिक्षण देण्याची केंद्रे ! - विश्‍व हिंदु परिषदेचा आरोप

       नवी देहली - बजरंग दलाच्या स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरावरून झालेल्या वादावर बोलतांना विश्‍व हिंदु परिषदेचे महासचिव सुरेंद्र जैन यांनी आरोप केला आहे की, मदरशांमध्ये चालणारी आतंकवादी प्रशिक्षणाची केंद्रे आणि दारूल उल देवबंद आतंकवाद्यांचे प्रेरणास्रोत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपकीर्त करण्यासाठी विरोधी पक्ष बजरंग दलाचा संबंध मोदींशी जोडत असल्याची टीकाही त्यांनी केली.
        सुरेंद्र जैन म्हणाले की, गेल्या २५ वर्षांपासून चालू असलेल्या अशा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आयोजनात काहीही चुकीचे नाही. आतंकवादाविरुद्ध लढण्यासाठी आम्ही समाजाला सिद्ध करत आहोत. शासनाने आतंकवादाला प्रेरणा देणार्‍या आणि देशविरोधी फतवे काढणार्‍या दारुल उलूम देवबंदवर कारवाई करावी. इतिहास साक्षीदार आहे. आतंकवादाविरुद्ध लढलेली प्रत्येक लढाई ज्यावेळी नागरिकांनी सहकार्य केले, त्याच वेळी यशस्वी झाली. आतंकवादाविरुद्ध लढण्यासाठी समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचे काम बजरंग दल करत आहे.

सीवान (बिहार) येथील कारागृहातून १७ भ्रमणभाष संच आणि २० सिमकार्ड जप्त

बिहारमधील जंगलराज !
     सीवान (बिहार) - बिहार पोलिसांनी सीवानमधील मध्यवर्ती कारागृहात मध्यरात्री टाकलेल्या धाडीत १७ भ्रमणभाष आणि २० सिमकार्ड जप्त केली आहेत. या संचांची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे. फरशीच्या खाली हे संच लपवून ठेवण्यात आले होते. या कारागृहाच्या वॉर्डात राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार महंमद शहाबुद्दीनशी संबंधित ७ गुंडांना ठेवण्यात आले आहे. या छाप्यानंतर या सातही जणांना राज्यातील विविध कारागृहांत पाठवण्यात आले आहे. या जप्तीतून पत्रकार राजीव रंजन यांच्या हत्येविषयी काही माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.

इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी मुसलमान तरुण घेत आहेत बँकांकडून कर्ज !

बेरोजगार युवकांना व्यवसायासाठी कर्ज देतांना विविध गोष्टी तारण ठेवण्यासाठी रडकुंडीला 
आणणार्‍या बँका मुसलमानांना मात्र लगेच कर्ज कसे देतात ?
     नवी देहली - जिहादी आतंकवादाने प्रेरित झालेले भारतातील अनेक मुसलमान युवक बँकेकडून कर्ज घेऊन इसिसमध्ये सहभागी होत असल्याची माहिती समोर आली आहे. इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी जात असतांना अटक केलेल्या आतंकवाद्याने ही स्वीकृती दिली आहे. 
   जानेवारीमध्ये इस्लामिक स्टेटमधून प्रेरित होऊन स्थापन झालेल्या जनूद-उल्-खलिफा-ए-हिंदच्या आतंकवाद्यांना अटक करण्यात आली होती; मात्र यात राजस्थानमधील टोंक येथील अबू अनसने टेक्नो वर्ल्ड ग्रुपच्या साहाय्याने अ‍ॅक्सिस बँकेत कर्जासाठी अर्ज केला होता. त्याला अटक करण्यात आली, त्या वेळी तो भाग्यनगरमध्ये (हैदराबादमध्ये) नोकरी करत होता. त्याने भाग्यनगरचा रहिवाशी महंमद खदीर उपाख्य सुलेमानच्या खात्यात १ लाख ४९ सहस्र रुपये जमा केले होते. सुलेमान सध्या सिरियामध्ये आतंकवादी कारवाया करत आहे. अनसकडून जमा केलेले पैसे हे बँकेकडून मिळालेल्या कर्जाचे पैसे असू शकतात, असा अधिकार्‍यांना संशय आहे.

सुपा (जिल्हा नगर) येथे गोरक्षकांनी वाचवले

८ गोवंशियांचे प्राण, ३ धर्मांधांना अटक शासन गोवंश 
हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही केव्हा करणार आहे ? 
गोरक्षकांच्या जे लक्षात येते ते पोलिसांच्या का लक्षात येत नाही ? 
     नगर, २६ मे - येथील पारनेर तालुक्यातील सुपा येथे पुणे-नगर महामार्गावर गोवंशियांची अवैध वाहतूक करणारे मालवाहू वाहन गोरक्षकांनी पोलिसांच्या साहाय्याने पकडले. या वेळी ८ गोवंश पोलिसांनी शासनाधीन केले असून ३ धर्मांधाना अटक केली आहे. त्यांची नावे इरफान सादिक सौदागर, मुकरम सौदागर आणि शहारुक सौदागर अशी आहेत. 

रघुराम राजन यांना तात्काळ हटवा ! - डॉ. स्वामी

     नवी देहली - भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना हटवण्याची मागणी भाजपचे खासदार सुब्रमण्यम् स्वामी यांनी पंतप्रधान मोदी यांना दुसर्‍यांदा पत्र लिहून केली आहे. त्यांनी यासाठी राजन यांच्यावर ६ आरोप केले आहेत. 

पाप वाढल्याने जनतेकडून होणार्‍या दानामुळे आंध्रप्रदेशातील मंदिरांच्या उत्पन्नात वाढ ! - एन्. चंद्राबाबू नायडू

पापेच न होण्यासाठी राज्यकर्ते आणि जनता 
यांनी साधना आणि धर्माचरण करणे आवश्यक !
       विजयवाडा - लोक पाप करत आहेत. काही लोक समस्याग्रस्त आहेत आणि त्या पापातून आणि समस्येतून सुटका करून घेण्यासाठी मंदिरात जाऊन प्रार्थना करत आहेत. पाप आणि समस्या वाढल्याने लोक मंदिरात येऊन पैसे दान करत आहेत. ही वस्तुस्थिती आहे, असे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन्. चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले आहे. चंद्राबाबू पुढे म्हणाले, अधिकाधिक लोक आता अयप्पा स्वामींची दीक्षा घेतात आणि ४० दिवसापर्यंत दारूपासून दूर रहातात. त्यामुळे दारू विक्रीत घट होते. (दारूचे व्यसन सुटण्यासाठी विविध उपचार करणार्‍यांची असे व्रतच दारूपासून सुटका करू शकते, हे त्यांनी लक्षात घ्यावे ! - संपादक) लोक केवळ मंदिरांनाच भेट देत नाहीत, तर मन:शांतीसाठी चर्च आणि मशिदीतही जातात. मंदिर, मशीद आणि चर्च नसते, तर अनेक लोक वेडेच झाले असते. (विज्ञान नाही, तर अध्यात्मच लोकांना मनःशांती देऊ शकते, हेच चंद्राबाबू यांच्या बोलण्यातून दिसते ! पुरोगाम्यांना हे समजेल तो सुदिन ! - संपादक)

केंद्रशासनाने आक्षेप न घेतल्याने इटलीचा दुसरा खलाशीही मायदेशी परतणार !

इटलीच्या खलाशांनी दोन भारतीय 
मच्छीमारांची गोळ्या झाडून हत्या केल्याचे प्रकरण
      नवी देहली - २०१२ मध्ये केरळच्या किनारपट्टीवर दोघा भारतीय मच्छीमारांची गोळ्या घालून हत्या करणार्‍या इटलीच्या २ खलाशांपैकी दुसर्‍या खलाशालाही मायदेशी पाठवण्याची अनुमती सर्वोच्च न्यायालयाने काही अटींवर दिली आहे. केंद्रशासनाने यावर आक्षेप न घेतल्याने ही अनुमती देण्यात आली. सॅलवोटोरी गिरोनी असे या खलाशाचे नाव आहे. मास्सीमिलीआनो लाट्टोरी याला यापूर्वीच सप्टेंबर २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणास्तव मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

मटक्याच्या अड्ड्यावरील धाडीत सापडल्या सहा तलवारी : सोळा धर्मांधांना अटक

बजरंग दलाच्या प्रमुखांवर शस्त्रास्त्र प्रशिक्षण दिल्यावरून 
कारवाई करण्याची मागणी करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? 
     सांगली, २६ मे (वार्ता.) - शहरातील खणभागातील हिंदु-मुस्लीम चौकातील मुस्लीम अर्बन बँकेच्या इमारतीच्या तळघरातील एका गाळ्यात चालू असलेल्या मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धाड टाकली. या प्रकरणी सोळा युवकांना अटक करण्यात आली असून या वेळी सहा तलवारीही जप्त करण्यात आल्या आहेत. (हे गंभीर असून पोलिसांनी या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत ! - संपादक) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. 

अंबाजोगाईच्या तत्कालीन तहसीलदारांसह सहा जण निलंबित

भ्रष्टाचार्‍यांची समाजात छीःथू होईल, असे करायला हवे ! 
'रोहयोे'च्या कामात ७७ लक्ष रुपयांचा अपव्यवहार 
     अंबाजोगाई (जिल्हा बीड), २६ मे - तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामात ७७ लक्ष रुपयांचा अपव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंते यांसह सहा जणांना विभागीय आयुक्तांनी नुकतेच निलंबित केले. याविषयी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर याविषयी विभागीय आयुक्तांना अन्वेषणाचे आदेश देण्यात आले होते. ३७६ कामांपैकी ३०४ गावांतील ग्रामपंचायतीचे काम करण्याविषयी ठरावच घेतले नाहीत, तर ३३२ कामांसाठी वार्षिक आराखड्यात संमती घेतलेली नाही. केलेल्या कामाचे मोजमाप नोंदवहीत नोंदवले नाही. नोंदवह्या कोर्‍याच आढळून आल्या. अपव्यवहार लपवण्यासाठी एका कामासाठी ३ ते १० नोंदवह्या वापरल्या. एकूण २१ कामांपैकी १३ कामे असमाधानकारक आढळल्याचा ठपका समितीने अहवालात ठेवला आहे. (भ्रष्टाचार्‍यांची सर्व संपत्ती कह्यात घेऊन त्यांना आजन्म कारावासात ठेवणे अपेक्षित ! - संपादक)

पिंपरी-चिंचवड पालिकेतील नगरसेवकांच्या अभ्यास दौर्‍यांचा शिवसेनेकडून 'भीक मागा' आंदोलनाद्वारे निषेध

     पिंपरी (पुणे), २६ मे - सिक्कीम आणि केरळ येथे अभ्यास दौर्‍यांच्या नावाखाली करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करणार्‍या पिंपरी-चिंचवड पालिका नगरसेवकांच्या विरोधात शिवसेनेकडून 'भीक मागा' आंदोलन करून निषेध करण्यात आला. (राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या अभ्यास दौर्‍यांच्या विरोधात शिवसेना सोडल्यास इतर पक्ष आंदोलन करत नाहीत, हे आश्‍चर्यजनक आहे. याचा अर्थ इतर पक्षांचीही या दौर्‍यांना मूकसंमती आहे, असे वाटल्यास आश्‍चर्य ते काय ? - संपादक) हे आंदोलन २५ मे या दिवशी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आले. या वेळी शहरप्रमुख राहुल कलाटे, आमदार गौतम चाबुकस्वार, गटनेत्या सुलभा उबाळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक शिवसैनिक उपस्थित होते. 

भारतीय महिलांची आखातातील इस्लामी देशांत बाजारातील वस्तूंप्रमाणे विक्री

भारतीय नागरिकांविषयी असंवेदनशील असणारे केंद्रशासन ! 
आंध्रप्रदेशच्या मंत्र्यांचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पत्र
     भाग्यनगर - घरगुती कामासाठी आखातातील इस्लामी देशांत गेलेल्या भारतीय महिलांची तेथे बाजारातील वस्तूंप्रमाणे विक्री होत आहे. यांतील अनेक महिला छळवणूक करणार्‍या मालकांपासून वाचण्यासाठी पळून जाण्याच्या प्रयत्नात आणि व्हिसातील मर्यादेपेक्षा अधिक काळ राहिल्याने कारागृहात खितपत पडल्या आहेत, अशी माहिती आंध्रप्रदेशाचे अनिवासी भारतीय खात्याचे मंत्री श्री. पाळले रघुनाथ रेड्डी यांनी दिली आहे. श्री. रेड्डी यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांना पत्र लिहून या दुर्दैवी महिलांना भारतात परत आणण्यासाठी केंद्रशासनाच्या स्तरावर प्रयत्न करावेत, असे आवाहन केले आहे. (असे आवाहन का करावे लागते ? परराष्ट्र खात्याला ते का कळत नाही ? - संपादक)

सामाजिक संकेतस्थळावर पैसे मागतांनाचे चित्रीकरण आढळल्याने पोलिसाचे निलंबन

पोलीस झाले भक्षक ! 
     मालेगाव (जिल्हा नाशिक) - पोलीस वर्दीचा अपवापर करून दुचाकी चालकाकडे पैसे मागतांनाचे वाहतूक पोलिसाचे भ्रमणध्वनीवर केलेले चित्रीकरण सामाजिक संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले. याची नोंद घेत अप्पर पोलीस अधीक्षकांनी त्या वाहतूक पोलिसावर निलंबनाची कारवाई केली. दोन दिवसांपूर्वी शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले कर्मचारी भरत जगन्नाथ आहेर नवीन बसस्थानक येथे वाहतूक नियंत्रणासाठी तैनात होते. त्या वेळी एका दुचाकी चालकाची पडताळणी करतांना त्यांनी संबंधित चालकाकडे पैसे मागितले. वाहनचालकाने या संपूर्ण प्रकाराचे भ्रमणध्वनीवर चित्रीकरण केले. ते गेल्या दोन दिवसांत सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित झाले. या चलचित्राची नोंद घेत अप्पर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी भरत आहेर यांच्यावर निलंबनाचा बडगा उगारला. (अशाप्रकारे कितीतरी वाहतूक पोलीस पैसे घेतांना सर्रास दिसतात. वरिष्ठांनी स्वत:हून अशा पोलिसांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे. - संपादक)

मंत्रालयातील इ-मेलमध्ये विषाणू शिरल्यामुळे माहिती बाधित

अंतर्गत सुरक्षेप्रमाणे संगणकीय सुरक्षाही सांभाळू न शकणारे शासन !
     मुंबई - मंत्रालयातल्या संगणकांमधील इ-मेल सेवेमध्ये विषाणू (व्हायरस) गेल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून ही सेवा बिघडली असून इ-मेल वरील माहितीही बाधित झाली आहे. मंत्रालयातीले कर्मचारी आणि अधिकारी यांपैकी अनेकांचे व्यक्तिगत इ-मेल खाते असते; परंतु मंत्रालयातल्या संगणकावरून गेले चार दिवस इ-मेल खाते उघडत नाही. या सेवेत विषाणू शिरल्यामुळे ही यंत्रणा बंद पडली आहे. 

पुण्यातील पर्वती येथील जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी वाया

दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या वेळी 
जलवाहिनीतून लक्षावधी लिटर पाणी वाया जाणे, हा समाजद्रोह आहे. 
     पुणे, २६ मे - येथील पर्वती भागातील तावरे उद्यानाच्या मागे पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणी सोडतांना लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. हे पाणी १ घंट्यापासून वाया जात असतांना या कालावधीत पालिकेचे संबंधित अधिकारी अथवा कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले नाहीत. स्थानिक नागरिकांनी नगरसेवकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. आयुक्तांशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी तात्काळ पाहणी करण्याचे आश्‍वासन दिले; परंतु प्रत्यक्षात कोणीही पोहोचले नाही, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. स्वारगेट विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष जाधव यांनी सांगितले की, पाण्याची वाहिनी फुटलेली नाही. वाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी साठलेले पाणी व्हॉलद्वारे सोडण्यात आले आहे. (हे पाणी वाचवण्यासाठी कोणती उपाययोजना करता आली नसती का ? - संपादक)

पुण्यात काँग्रेसचा 'मोदी शासनाचा पर्दाफाश' सप्ताह !

देशात आतंकवाद आणि दुष्काळ यांसारख्या अनेक 
भीषण समस्या असतांना काँग्रेसची हास्यास्पद आंदोलने !
     पुणे, २६ मे (वार्ता.) - मोदी शासन शेतकरी, व्यापारीवर्ग, विद्यार्थी आणि अल्पसंख्यांक यांची फसवणूक करत आल्याचा आरोप पुणे शहर जिल्हा काँग्रेस समितीने २६ मे या दिवशी स्वारगेट येथे 'मोदी शासनाचा पर्दाफाश ' सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या आंदोलनाद्वारे केला. (हिंदी नाव देणारी मराठीद्वेषी काँग्रेस ! - संपादक) या वेळी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड म्हणाले की, हे शासन देशाची संरक्षण व्यवस्था सक्षम असतांना स्वत:च्या रक्षणासाठी तरुणांना बंदुका आणि तलवारी चालवण्याचा प्रशिक्षणवर्ग आयोजित करून लोकांच्या भावना भडकवून लोकांची मते मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. (मुसलमानांच्या विविध आक्रमणांमुळे हिंदू अल्पसंख्य होत असतांना त्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिल्यास चूक ते काय ? - संपादक)

कन्याकुमारी येथील ख्रिस्ती पोलिसांकडून मंदिराचे पावित्र्य भंग !

धर्मांध ख्रिस्ती पोलीस ! सहिष्णुतावाद्यांना ख्रिस्त्यांची असहिष्णुता दिसत नाही का ?
     कन्याकुमारी (तमिळनाडू) - ख्रिस्तीबहुल कन्याकुमारी जिल्ह्यामध्ये कोट्टालुमोडू भगवती अम्मन मंदिर आहे. प्रत्येक उन्हाळ्यात या मंदिरात उत्सव साजरा केला जातो. या वेळी मध्यरात्रीपर्यंत आतषबाजी केली जाते. यावर्षी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी आतषबाजी करण्यास अनुमती नाकारली; मात्र विनंती केल्यानंतर त्यांनी रात्र १० वाजण्याच्या आधी अर्धातास आषबाजी करण्यास अनुमती दिली. हिंदु भाविकांनी ही अट मान्य करून आतषबाजी केली. (धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच हिंदू मंदिरात आतषबाजी करतात ! राष्ट्र आणि धर्म हानी टाळण्यासाठी अशी कृत्ये रोखणे आवश्यक ! - संपादक) या वेळी काही हिंदु मुलेही आतषबाजी करत होते. त्यांना या अटीविषयी माहिती नव्हती. नियमांचा भंग केल्याने पोलीस बूट घालून मंदिरात शिरले आणि त्यांनी तेथे उपस्थित मुले आणि महिला यांना अमानुष मारहाण केली. (ख्रिस्ती पोलीस मशिदीत अशा प्रकारे शिरले असते का ? हिंदूंचे परिणामकारक संघटन नसल्यामुळेच धर्मांध पोलीस असे कुकृत्य करण्यास धजावतात ! - संपादक) या वेळी पोलिसांनी देवळातील मूर्तींवर लाठ्या मारल्या, तसेच पूजेच्या साहित्याची नासधूस केली. (प्रसारमाध्यमांना हे दिसत नाही का ? हिंदूंवर होणार्‍या आघातांकडे दुर्लक्ष करणार्‍या प्रसारमाध्यमांवर बहिष्कार घाला ! अशा पोलिसांवर कठोर कारवाई होण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक ! - संपादक)बंगालमध्ये पक्षनिष्ठ रहाण्यासाठी काँग्रेसने आमदारांकडून लिहून घेतली प्रतिज्ञापत्रे !

बंगालमध्ये पक्षांतर्गत बंडाळी रोखण्यासाठी काँग्रेसची केविलवाणी धडपड
     कोलकाता - बंगालमध्ये काँग्रेसला अंतर्गत बंडखोरीची समस्या सतावू लागली आहे. यावर उपाययोजना म्हणून प्रदेशाध्यक्ष अधीररंजन चौधरी यांनी निवडणुकीत जिंकलेल्या ४४ आमदारांकडून चक्क प्रतिज्ञापत्रे लिहून घेतली आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याप्रती प्रामाणिक रहाण्याचे वचन या प्रतिज्ञापत्रांमधून घेण्यात आले आहे. (जनताद्रोही, हिंदुद्रोही आणि राष्ट्रविघातक कृती करणार्‍या काँग्रेसकडे आता लोकांनी पाठ फिरवली आहे. भविष्यात पक्षातील नेते आणि कार्यकर्तेही पक्ष सोडतील. काँग्रेसला अखेरची घरघर लागली असल्याचे हे द्योतक आहे ! असले वचननामे लिहून पक्षातील नेत्यांमध्ये पक्षनिष्ठा येत नाही, हे काँग्रेसवाले जाणतील का ? - संपादक)

सत्ताधारी साम्यवाद्यांच्या त्रिपुरामध्ये इतिहासाच्या पुस्तकातून मोहनदास गांधी यांचा धडा वगळून हिटलर, कार्ल मार्क्स यांना स्थान !

भारताची भावी पिढी नासवण्याचा डाव्यांचा डाव ! 
साम्यवाद्यांना हिटलरचा पुळका कधीपासून आला ? 
     आगरताळा - भाजपशासित राजस्थानमधील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातून गांधी-नेहरू यांना वगळण्यात आल्यानंतर आता साम्यवादी सत्तेवर असणार्‍या त्रिपुरामध्येही नववीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मोहनदास गांधी यांचा धडा वगळण्यात आला आहे; मात्र असे करतांना या पुस्तकात आता हिटलर, कार्ल मार्क्स, सोव्हिएत क्रांती, फ्रेंच क्रांती आणि क्रिकेटवरील धड्यांचा समावेश करण्यात आला आहे.

वारजे जलशुद्धीकरण केंद्रात 'क्लोरीन' वायूची गळती

     पुणे, २६ मे - पुणे महानगरपालिकेच्या वारजे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये 'क्लोरीन' वायूची गळती झाली आहे. २५ मे या दिवशी मध्यरात्री २ वाजल्यापासून ही वायूगळती चालू होती. ही गळती रोखण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न केले. आतापर्यंत ८० प्रतिशत गळती रोखण्यास यश मिळाले असून वायूगळती पूर्णपणे थांबवण्यासाठी संबंधित आस्थापनाचे तांत्रिक पथक मुंबईहून दाखल झाले आहे. यामुळे पालिकेच्या २ कर्मचार्‍यांना त्रास झाला असून त्यांना संजीवनी रुग्णालयात उपचारांसाठी प्रविष्ट केले आहे.

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात नवे संचालक नियुक्त

     सांगली, २६ मे (वार्ता.) - येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नूतन संचालक म्हणून महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी (एम्.टी.ई.) ने डॉ. प्रा. एम्.जी. देवमाने यांची नियुक्ती केली आहे. वालचंद महाविद्यालय हे 'एम्.टी.ई.' संस्थेच्या मालकीचे असून शासनाच्या निर्णयानुसार संस्थेच्या नियामक मंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने डॉ. देवमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव प्रा. श्रीराम कानिटकर यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज देशमुख यांनी महाविद्यालयास भेट देऊन संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षक यांच्याशी चर्चा केली. महाविद्यालयाच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य रवी पुरोहित यांनी ही नियुक्ती अवैध असल्याचा आरोप प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. श्री. देशमुख यांनी हे आरोप फेटाळून लावत नियुक्ती कायदेशीरच असल्याचे पत्रकारांना सांगितले.

'लिव्ह इन रिलेशनशीपम'ध्ये अल्पवयीनांना जाण्यापासून रोखण्यासाठी कायदा करण्यासाठी पुढाकार घेणार - विजया रहाटकर, महिला आयोग

भारतीय विवाह संस्थेवर आघात करणारी ही कुप्रथाच
 दूर करण्यासाठी महिला आयोगाने पुढाकार घेणे अपेक्षित ! 
     नागपूर - 'लिव्ह इन रिलेशनशीप'च्या प्रकरणांमध्ये गेल्या काही वर्षांत वाढ होत असतांना त्यात अल्पवयीन मुला-मुलींचा समावेश अधिक असून ही समाजाच्या दृष्टीने चिंतेची गोष्ट आणि यावर अभ्यास करून काही कायदा करता येईल का, त्या दृष्टीने आयोग पुढाकार घेणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली. महिला आयोग आपल्या द्वारी या कार्यक्रमांतर्गत रविभवनमध्ये महिलांच्या संदर्भातील जनसुनावणी घेण्यात आली. नागपुरात ५८ प्रकरणे हाताळण्यात आली असून त्यात सर्वांत अधिक प्रकरणे ही कौटुंबिक हिंसाचाराची आणि लिव्ह इन रिलेशनशीपची होती. ग्रामीण भागातून ही प्रकरणे पुढे आलेली होती.

नाशिकमध्ये सापडला 'टॅब बॉम्ब'

सर्किट निष्क्रिय करताच छोटा स्फोट 
     नाशिक - द्वारका परिसरातील रवींद्र विद्यालय परिसरात २५ मे या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास एक बॉम्बसदृश वस्तू आढळून आली. याविषयी स्थानिक लोकांनी माहिती दिल्यानंतर बॉम्बशोधक-नाशक पथकाने हा 'टॅब बॉम्ब' कह्यात घेऊन मोकळ्या जागेत नेऊन तो निष्क्रिय केला. हा बॉम्ब नेमका कुठल्या प्रकारचा होता. त्याची तपासणी करण्यासाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (असुरक्षित नाशिक ! - संपादक)

जम्मूतील शैक्षणिक संस्थांत अभाविपवर अघोषित बंदी

पीडीपी-भाजपच्या राज्यात अभाविपची दयनीय स्थिती !
     जम्मू - जम्मू आणि काश्मीरच्या शिक्षण मंत्रालयाने जम्मूतील सर्व शैक्षणिक संस्थांना भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) या संघटनेच्या कुठल्याही कार्यक्रमाला अनुमती देऊन नये, असा आदेश निर्गमित केला आहे. हा आदेश जम्मू विश्‍वविद्यालयापुरताच सीमित असला, तरी इतर शैक्षणिक संस्थांनी त्याचे अनुकरण केले आहे. 
     अभाविप ही भारतातील सर्वाधिक सदस्य असलेली विद्यार्थी संघटना आहे. भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या राजकारणाचा प्रारंभ अभाविपपासूनच केला आहे. सध्याचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह हे अभाविपचे माजी अध्यक्ष होते. जम्मू आणि काश्मीर विधानसभेचे विद्यमान सभापती काविनदर गुप्त आणि आरोग्यमंत्री बळी भगत हे अभाविपचे माजी पदाधिकारी होते. (असे असतांनाही अभाविप निर्बंध लादले जातात याचाच अर्थ काय घ्यायचा ? - संपादक) येत्या काही दिवसातच जम्मूमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री निर्मल सिंह हे स्वागत समितीचे अध्यक्ष आहेत. अभाविपने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या स्वागतासाठी स्थानिक गांधीनगर येथील महिला महाविद्यालयात एक कार्यक्रम आयोजित केला होता; मात्र त्याला महाविद्यालयाने अनुमती देण्यास नकार दिला. असाच अनुभव मंत्र्यांच्या मध्यस्थीनंतरही इतर शैक्षणिक संस्थांत आला.ब्रेड बनवण्यासाठी पोटॅशियम ब्रोमेट वापरावर बंदीची शक्यता

     नवी देहली - अन्न सुरक्षा नियमन प्राधिकरणाने ब्रेड बनवतांना पोटॅशियम ब्रोमेट वापरण्यास ब्रेड उत्पादकांना बंदी घालणची शिफारस केली असून १५ दिवसांत ही बंदी लागू होण्याची शक्यता आहे. पोटॅशियम ब्रोमेटमुळे कर्करोग होत असल्याचे एका सर्वेक्षणातून उघडकीस आले आहे. अन्न उद्योगात अनुमती असलेल ११ सहस्र फूड अँडीटीव्हसमध्ये पोटॅशियम ब्रोमेटचा सध्या समावेश आहे. सेंटर फॉर सान्स अँण्ड एन्व्हार्नमेंटने बाजारात सर्वसाधारणपणे खपणार्‍या ३८ प्रकारांच्या ब्रेड्सपैकी ८४ टक्के ब्रेडमध्ये पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट असल्याचे आढळून आले आहे. अनेक देशात या अँडीटीव्हजवर बंदी आहे.

वेश्याव्यवसायातील ५० टक्के मुली बंगाल राज्यातील !

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईसारख्या महिलांच्या समानतेसाठी कार्य करणार्‍या संस्था 
आणि नेत्या महिलांवरील अशा अत्याचारांच्या विरोधात आंदोलन का करत नाहीत ? 
     कोलकाता - चाइल्ड राईटस् अँड यू (क्राय) या सेवाभावी संस्थेने राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेच्या आधाराने केलेल्या सर्वेक्षणात भारतातील वेश्याव्यवसायातील ५० टक्के मुली बंगाल राज्यातील असतात, असा निष्कर्ष काढला आहे. 
    वेश्याव्यवसायातील ८३ टक्के मुली या बंगाल, आसाम, बिहार आणि ओडिशा या राज्यांतील असून हरियाणा राज्यातील १४ टक्के मुली या व्यवसायात आहेत. म्हणजेच वेश्याव्यवसायातील ९७ टक्के मुली वरील ५ राज्यांतील आहेत. हरवलेली मुले आणि संघटित गुन्हेगारी यांचा घनिष्ट संबंध आहे. यातील ६० टक्के मुलीच असतात आणि त्यांना वेश्याव्यवसायात ढकलले जाते. बंगाल राज्यातील अपहरण झालेल्या मुलांच्या संख्येत गेल्या ५ वर्षांत ६०८ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे क्राय या संस्थेने म्हटले आहे.

करचुंडीत (जिल्हा बीड) धर्मांधाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

     बीड, २६ मे - तालुक्यातील करचुंडी येथे ऊरूसानिमित्त घेण्यात आलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमातून लघुशंकेसाठी बाहेर आलेल्या अल्पवयीन मुलीला उचलून नेऊन त्याच गावातील अशपाक बाबू याने तिला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. कार्यक्रम संपल्यानंतर आपली मुलगी गायब झाल्याचे तिच्या आई-वडिलांच्या लक्षात आले. त्यांनी शोध चालू केला. रात्री दोनच्या सुमारास ती मुलगी गंभीर अवस्थेत आढळून आली. सकाळी मुलीला जिल्हा रुग्णालयात प्रविष्ट करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणेश गावडे यांनी रुग्णालयात जावून त्या पीडित मुलीची विचारपूस केली. या प्रकरणातील आरोपी पसार आहे.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांची कोठडी जूनपर्यंत वाढली

     मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळ्यासह इतर गैरव्यवहारांच्या प्रकरणी तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दोन महिन्यांपासून छगन भुजबळ तुरुंगात आहेत. त्यांनी केलेला जामिनासाठीचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला होता. त्यावरून न्यायालयाने त्यांच्या कोठडीत पुन्हा वाढ केली. वृद्ध म्हणून नव्हे, प्रकृती खालावल्याने जामीन द्यावा, अशी विनंती भुजबळ यांनी केली होती; मात्र विशेष न्यायालयाने ती फेटाळली. भुजबळ यांच्या प्रकृतीची आवश्यक ती काळजी घेण्यात येत असून त्यांना या कारणासाठी जामीन देण्याची आवश्यकता नसल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केला आहे.

गायी-म्हशींना देण्यात येणार्‍या ऑक्सिटोसिन इंजेक्शनची अवैध विक्री

अवैध विक्री होऊ देणार्‍या अन्न-औषध प्रशासनावरही कारवाई व्हायला हवी !
     मुंबई - गायी-म्हशींच्या दुधाचे प्रमाण वाढण्यासाठी देण्यात येणार्‍या ऑक्सिटोसिन इंजेक्शनची सध्या मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. हे इंजेक्शन दिल्यावर दिवसाला सरासरी दहा लिटर दूध देणार्‍या गायी-म्हशी २० लिटरपर्यंत दूध देतात; मात्र ऑक्सिटोसिनचे हे दूध मानवी शरिराला घातक असून त्यामुळे पुरुषांमध्ये नपुंसकत्व येण्याची शक्यता असते. अन्न-औषध प्रशासनाने ऑक्सिटोसिनवर बंदी आणलेली असूनही त्याची विक्री चालूच आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने दैनिक सनातन प्रभातचा दुसरा विशेष रंगीत विशेषांक !

प्रसिद्धी दिनांक : ३१ मे २०१६ 
पृष्ठ संख्या : १० 
मूल्य : ५ रुपये 
 या अंकात अनुभवा ! 
* परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने करण्यात येणार्‍या धार्मिक विधींचा सविस्तर वृत्तांत 
* सर्व विधींचे छायाचित्रात्मक सादरीकरण 
     यांसह परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचे अन्य वैशिष्ट्यपूर्ण लिखाण 
आपली प्रत आजच नोंदवा ! 
 विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २९ मे 
या दिवशी सायं. ५ वाजेपर्यंत 'इआरपी प्रणाली'त भरावी.

महिलांच्या कथित लैंगिक शोषणाच्या प्रकरणी परमानंद महाराज यांना अटक !

हिंदूंनो, हिंदु संतांची अपकीर्ती आणखी किती दिवस सहन करणार ?
     नवी देहली - कथित लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली उत्तरप्रदेशातील देवा क्षेत्र येथील हर्रई येथील काली मां आश्रमाचे संचालक रामशंकर तिवारी उपाख्य परमानंद महाराज यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती बारांबकीचे पोलीस अधीक्षक अब्दुल हमीद यांनी दिली आहे. (अशा घटनांच्या संदर्भात मुसलमान पोलीस अधिकारी चौकशी करतात तेव्हा हिंदूंनी या कारवाईविषयी शंका उपस्थित केल्यास आश्‍चर्य वाटू नये ! - संपादक) या अटकेची माहिती बहुतेक प्रसारमाध्यमांनी दिली आहे. (चर्च आणि मदरशा यांमध्ये होणार्‍या महिलांच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या न छापणारी प्रसारमाध्यमे हिंदूंच्या धार्मिक नेत्यांच्या संदर्भात लगेच बातम्या छापतात ! - संपादक)


संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने बडोदा येथे मंदिर स्वच्छता उपक्रम

मंदिराची स्वच्छता करतांना संतकृपा
प्रतिष्ठानचे साधक
     बडोदा (गुजरात) - येथील गाजरावाडी भागातील श्री महालक्ष्मी मंदिरात संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने २२ मे या दिवशी मंदिर स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. मंदिराच्या विश्‍वस्तांनी प्रतिष्ठानच्या साधकांविषयीच्या विश्‍वासामुळे त्यांनी गाभार्‍याचीही स्वच्छता करण्यास सांगितले. या सेवेसाठी मंदिर प्रशासनाने स्वच्छतेसाठी लागणारे साहित्यही उपलब्ध करून दिले आणि संपूर्ण सहकार्य केले. (कुठे गाभार्‍यात प्रवेश करण्यासाठी आटापिटा करणार्‍या तथाकथित पुरोगामी संघटना, तर कुठे साधकांना स्वत:हून गाभार्‍याची स्वच्छता करण्यास सांगणारे मंदिर प्रशासन ! - संपादक)

प्राप्तीकर विभाग कर बुडव्यांची नावे घोषित करणार !

     नवी देहली - प्राप्तीकर विभागाने एक कोटी रुपयांहून अधिक कर बुडवलेल्या व्यक्तींची नावे येत्या आर्थिक वर्षापासून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षापासूनच प्राप्तीकर विभागाने करचुकवेगिरी करणार्‍यांची नावे वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध करण्यास प्रारंभ केला आहे. आतापर्यंत ६७ जणांची नावे जाहीर केली असून त्यांचे पत्ते, संपर्क, पॅन क्रमांक अशी माहिती छापण्यात येत आहे; मात्र हे सर्व २०-३० कोटी रुपये आणि त्याहून अधिक कर चुकवणारे आहेत. नव्या निर्णयामुळे एक कोटी आणि त्यापेक्षा अधिक रुपयांची करचुकवेगिरी करणार्‍या व्यक्ती आणि आस्थापने यांची नावे घोषित करण्याचा निर्णय झाल्याने अनेक लोकांची नावे घोषित होण्याची शक्यता आहे. ही नावे पुढील वर्षी ३१ जुलैपूर्वी घोषित करण्यात येतील.

भाग्यनगर महापालिका गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातील तलावांत वेगळी व्यवस्था करणार !

मूर्तीविसर्जनाद्वारे जलप्रदूषण होत असल्याचा स्तोम माजवणारी हिंदुद्रोही महानगरपालिका !
     भाग्यनगर - येथील उच्च न्यायालयाने केलेल्या सूचनेनुसार हुसेनसागर तलावातील गणेश आणि दुर्गा मूर्तींच्या विसर्जनामुळे होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी शहरातील आणि शहराबाहेरील १० तलावांत कुंपण घालून विसर्जनासाठी एक वेगळी जागा निश्‍चित करण्याचे ठरवले आहे. (वाहत्या जलात मूर्तींचे विसर्जन केल्यामुळे देवतांची पवित्रके दूरपर्यंत पोहोचतात आणि त्याचा समाजासाठी लाभ होतो. मूर्तीविसर्जनामुळे होणारे प्रदूषण अगदीच नगण्य आहे. असे असतांना प्रदूषण होत असल्याचे सांगणारी महानगरपालिका इतर वेळी होणार्‍या प्रदूषणाकडे लक्ष का देत नाही ? - संपादक) त्यासाठी महापालिकेच्या एका पथकाने बेंगळुरू येथे भेट देऊन तेथे करण्यात आलेल्या अशा व्यवस्थेचे निरीक्षण केले आहे. प्लास्टर ऑफ पॅरीसने बनवलेल्या मूर्ती, निर्माल्य आणि नारळ यांमुळे हुसेनसागर तलावात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे एका जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्यावर न्यायालयाने महापालिकेला वरील सूचना दिली. (कारखान्यांतील रसायनमिश्रित पाण्यामुळे नद्यांचे प्रदूषण होत आहे, यासाठी कोणी जनहित याचिका का दाखल करत नाही ? वर्षातून एकदा येणार्‍या गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी प्रदूषण होते असे म्हणणारे वर्षभर झोपा काढत असतात का ? - संपादक) त्याप्रमाणे महापालिकेने १० तलावांची निवड केली असून तेथे विसर्जनासाठी सोयी उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे.

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या वाहन ताफ्यावर आक्रमण

बिहारमधील जंगलराज !
      गया - बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या वाहनांच्या ताफ्यावर २६ मेच्या सकाळी गया जिल्ह्यातील डुमरिया येथे आक्रमण करण्यात आले. यात मांझी थोडक्यात बचावले, तर त्यांच्या ताफ्यातील एक गाडी पेटवून देण्यात आली. या वेळी पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी हवेत गोळीबार केला. डुमरिया येथे २५ मेला लोक जनशक्ती पक्षाच्या नेत्याची हत्या करण्यात आली होती. या नेत्याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मांझी आले होते.

हिंदु राष्ट्र-स्थापनेकरिता धर्मप्रेमी घडण्यासाठीचे अनमोल माध्यम : धर्मशिक्षणवर्ग

श्री. रमेश शिंदे
श्री. सुनील घनवट
      धर्माची हानी रोखायची असेल, तर धर्माचाच आधार घेतला पाहिजे. धर्मो रक्षति रक्षितः । या वचनानुसार धर्म हेच निर्गुण ईश्‍वराचे सगुण रूप आहे. त्यामुळे प्रथम धर्म समजून घेतला पाहिजे. त्याचे आचरण करून अनुभूती घेतली पाहिजे, तरच धर्मावर श्रद्धा बसून धर्मरक्षण करता येते. हे होऊ नये, यासाठी मोगल आक्रमकांनी हिंदूंची विश्‍वविद्यालये, ग्रंथ आणि संहिता जाळून टाकण्याचा प्रयत्न केला, तर ब्रिटिशांनी लॉर्ड मेकॉलेच्या माध्यमातून गुरुकुल शिक्षणपद्धतीवर बंदी आणून ख्रिस्ती कॉन्व्हेंट चालू केले आणि हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्यावरच प्रतिबंध आणला. याचा परिणाम म्हणून हिंदूंची आजची पिढी आपल्याच धर्माला नावे ठेवणारी आणि पाश्‍चात्त्य गैरप्रथांचे समर्थन करणारी बनली आहे. स्वतंत्र भारतातील हिंदु युवकांच्या मनात त्यांनी हिंदु धर्माच्या विरोधात केलेले बीजारोपण आता अंकुरत असल्याचे दिसत आहे. याच वेळी स्वतःला सेक्युलर म्हणवणारे मुसलमान मदरशांतून, तर ख्रिस्ती चर्च आणि कॉन्व्हेंट यांतून आपापल्या धर्माचे शिक्षण घेतच आहेत. यामुळे या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी उपाय काढायचा असेल, तर आता हिंदूंच्या धर्मशिक्षणाला दुसरा पर्यायच नाही. त्यातूनच हिंदूंच्या मनात धर्माभिमान निर्माण करून हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांना सिद्ध करता येईल.

रूपी बँकेच्या ३६२ कर्जबुडव्यांंवर गुन्हे प्रविष्ट करण्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे आदेश

      पुणे, २६ मे - रूपी को-ऑपरेटिव्ह बँकेला डबघाईस आणणार्‍या ३६२ कर्जबुडव्यांवर तातडीने गुन्हे प्रविष्ट करण्याचे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेच्या प्रशासकीय मंडळाला दिले आहेत. (इतक्या वर्षांनी गुन्हा प्रविष्ट करणे, म्हणजे कर्जबुडव्यांना पसार होण्यास मोकळे रान करून दिल्यासारखेच आहे. यावरून अजूनही प्रशासनाचा कूर्मगतीचा कारभार दिसून येतो. - संपादक) रूपी बँकेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रशासकीय मंडळ आणि सहकार आयुक्त यांची २४ मे या दिवशी मुंबईत बैठक आयोजित केली होती. या वेळी रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक विश्‍वनाथन, सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, रूपी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुधीर पंडित आदींसह अन्य काही जण उपस्थित होते.

सर्वांगाने विचार करणारे असा समज असलेल्या विकीपीडिया संकेतस्थळाचे खरे स्वरूप !

    इंटरनेटचा वापर करणार्‍यांना कोणताही विषय अथवा व्यक्ती यांविषयी माहिती हवी असेल, तर तो विकीपीडिया या संकेतस्थळाचा उपयोग करतो. विकीपीडिया हे संकेतस्थळ एखाद्या विश्‍वकोशासारखे (एनसायक्लोपीडियासारखे) आहे. यावरील माहिती इतर संकेतस्थळांच्या तुलनेत अधिक विश्‍वासार्ह असल्याचे मानण्यात येते, तसेच हे संकेतस्थळ विचारधारांच्या पलीकडे जाऊन सर्वांगाने विचार करून विषय मांडते, असा सर्वसाधारण समज आहे; परंतु हे खरंच आहे की एका विशिष्ट विचारधारेला चिकटून संकेतस्थळावर विषय मांडला जातो, याचा वेध घेणारा सदर लेख ओपीइंडिया या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यातील निवडक सूत्रे वाचकांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत. हा लेख प्रहरी या टोपण नावाने एका लेखकाने लिहिला आहे. - संपादक

फूटबॉल क्षेत्रातील महिलांचे शोषण !

     भारतीय महिला फूटबॉल संघाच्या माजी कप्तान सोना चौधरी यांनी नुकतेच काशी येथे गेम इन गेम पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकामध्ये महिला खेळाडूंचा प्रशिक्षक, संघ व्यवस्थापन आणि सचिव यांच्याकडून कसा छळ होतो, याचा खुलासा केला आहे. या पुस्तकामध्ये चौधरी यांनी जी माहिती दिली आहे, ती भीषण आहे.

सनातनचे कर्नाटकमधील २ साधक जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

श्री. अरविंद बाळिगा (उजवीकडे) (वय ५१ वर्षे) यांचा सत्कार
करतांना ६२ टक्के आध्यात्मिक स्तर असलेल्या सौ. तारा हर्षवर्धन शेट्टी
श्रीमती जानकम्मा मुरुगेश (डावीकडे) (वय ६५ वर्षे) यांचा सत्कार
करतांना ६२ टक्के आध्यात्मिक स्तर असलेल्या सौ. रेवती हरगी
        मंगळुरू (कर्नाटक) - कर्नाटक येथील २ साधक जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाले आहेत. बेंगळुरु येथील श्री. अरविंद बाळिगा यांनी ६३ टक्के आध्यात्मिक स्तर प्राप्त केल्याचे नुकतेच एका कार्यक्रमात घोषित करण्यात आले. तसेच चिक्कमगळुरू जिल्ह्यातील तरिकेरे येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी शिवमोग्गा येथील साधिका श्रीमती जानकम्मा मुरुगेश यांनी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर प्राप्त केल्याचे घोषित करण्यात आले.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
     हिंदूहिताचा राज्यकारभार चालवण्यासाठी जो पक्ष आणि जे उमेदवार प्रकटपणे प्रतिज्ञाबद्ध असतील, त्यांनाच निवडून देण्याचा कल हिंदूंकडून प्रकट झाला पाहिजे. - विक्रमराव सावरकर

साधकांवर अपार प्रीती करून त्यांना आपलेसे करून घेणार्‍या पू. (सौ.) अंजली गाडगीळ !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
      २५.४.२०१६ या दिवशी पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकू यांची मुलगी सौ. सायली करंदीकर (पूर्वश्रमीची कु. सायली गाडगीळ) हिचा विवाह सोहळा होता. या सोहळ्याच्या वेळी कु. माधवी पोतदार आणि कु. सोनाली खटावकर या साधिका पू. (सौ.) गाडगीळकाकूंच्या सेवेत होत्या. या वेळी साधिकांना पू. काकूंची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. स्वावलंबी
       पू. काकू बर्‍याच सेवा स्वतःच करतात. इतरांवर अवलंबून रहात नाहीत. साधक नियोजन आणि समन्वय करेपर्यंत पू. काकूंची सेवा पूर्ण होऊन त्या पुढील सेवा करण्यास सिद्ध असत.
       पू. काका आणि पू. काकू स्वतःची सर्व कामे स्वतःच करत असत. खोलीत प्रसादाची आणि चहाची भांडी असतील, तर ते दोघेही लगेच ती भांडी खोलीतील बेसिनवर घासून आणि स्वच्छ पुसून ठेवत. कपडे स्वतः धुऊन वाळत घालत. खोली झाडणे-पुसणे, पाणी भरणे आदी सर्वच सेवा पू. काका आणि पू. काकू दोघेही तत्परतेने करत असत.

प.पू. डॉक्टरांच्या भेटीच्या वेळी साधिकेचे शरीर, मन आणि बुद्धी यांनी सूक्ष्मातून दरवाजा ते आसंदीपर्यंत पायघड्या घालणे अन् प.पू. डॉक्टरांच्या चरणांचा त्यांना स्पर्श होताच हलकेपणा जाणवणे

सौ. अंजली झरकर
        एके दिवशी आम्ही काही साधक प.पू. डॉक्टरांच्या भेटीसाठी बैठक कक्षात बसलो होतो. सर्व साधक नामजप करत होते. त्या वेळी मला माझे शरीर, मन आणि बुद्धी यांनी दरवाजा ते प.पू. डॉक्टरांना बसण्यासाठी ठेवलेल्या आसंदीपर्यंत सूक्ष्मातून पायघड्या घातल्या आहेत, असे दिसले. दरवाज्याजवळ माझ्या स्थूल शरिराने लोटांगण घातले होते. मला मन आणि बुद्धी आसंदीजवळ बसलेली दिसली. प्रभु श्रीरामांच्या चरणस्पर्शाने ऋषिपत्नी अहिल्या हिचा उद्धार झाला, तसाच आता माझा होणार आहे, असे वाटत होते. त्या वेळी मन अस्वस्थ झाले आणि प.पू. डॉक्टरांच्या कोमल चरणांचा स्पर्श प्रथम मला व्हावा, असे मनाला वाटले. देवाला मन अर्पण झालेले आवडते; म्हणून दरवाज्याजवळ माझे मन, बुद्धी आणि शरीर पूर्णपणे थांबले. थोड्या वेळाने प.पू. डॉक्टर आले.
       प.पू. डॉक्टरांच्या चरणांचा स्पर्श होताच मन, बुद्धी आणि शरीर यांचा उद्धार झाला. मला पुष्कळ हलकेपणा जाणवायला लागला. हे सर्व अनुभवतांना स्थुलातून प.पू. डॉक्टर प्रत्यक्ष समोर कधी आले ?, हे समजलेच नाही. त्यांचा आवाज ऐकू आल्यावर डोळे उघडताक्षणी त्यांचे रूप डोळ्यांसमोर पाहून पुष्कळ कृतज्ञता वाटली.
प.पू. डॉक्टरांना अपेक्षित अशी घडण्यास आतुर झालेली,
- सौ. अंजली झरकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

प्रत्येक शब्दातील भावार्थ सांगून साधकांना योग्य दिशा देणार्‍या पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
१. पू. बिंदाताईंनी मागणी-पुरवठा विभाग याचा मागणी, म्हणजे भाव-भक्तीची देवाकडे मागणी करणे आणि पुरवठा म्हणजे आनंद आणि चैतन्याचा देवाने पुरवठा करणे, असा अर्थ सांगितल्याने आनंद होणे : २३.५.२०१५ च्या रात्री मी पू. बिंदाताईंना माझ्या मनाची स्थिती सांगत होते. मी त्यांना सांगितले, मागणी-पुरवठा विभागात सेवा करत असतांना ग्रंथांची मागणी काढायच्या वेळी माझ्या मनात विचार नसतात आणि सेवा संपली की, लगेच विचार येतात. त्यावर पू. बिंदाताईंनी विचारले, मागणी-पुरवठा विभाग म्हणजे काय ? मला काही उत्तर देता आले नाही. नंतर त्यांनी सांगितलेे, मागणी म्हणजे भाव-भक्तीची आपण देवाकडे मागणी करतो. पुरवठा म्हणजे आनंद आणि चैतन्याचा देव आपल्याला पुरवठा करतो. त्यांनी मागणी आणि पुरवठा यांचा भावार्थ सांगितल्याने मला पुष्कळ आनंद झाला.

भजने ऐकण्याची आवड असणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा जळगाव येथील कु. ऋषिकेष पाटील (वय ७ वर्षे) !

कु. ऋषिकेष पाटील
      वैशाख कृष्ण पक्ष पंचमी (२७.५.२०१६) या दिवशी जळगाव येथील कु. ऋषिकेष पाटील याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या वडिलांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
कु. ऋषिकेष पाटील याला सनातन
परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद !

१. जन्म ते १ वर्ष
१ अ. बाळाला पहिल्यांदा पहातांना बाळकृष्णाचे दर्शन घेत आहोत, असा भाव जागृत होऊन देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होणे : कु. ऋषिकेषचा जन्म उत्तररात्री ३.३० ते ३.४५ या कालावधीत झाला. त्याला प्रथम पहाण्याची संधी पहाटे ४.३० वाजता मिळाली. त्या वेळी बाळकृष्णाचेच दर्शन घेत आहोत, असा भाव जागृत झाला आणि देवाचरणी कृतज्ञता व्यक्त झाली. त्याच वेळी त्याचे नाव प.पू. गुरुदेवांच्या नावावरून जयंत ठेवले. घरी सर्व जण त्याला ऋषिकेष म्हणतात.

देव आणि धर्म यांविषयी अभिमान असणारा आणि धर्मपालन करणारा ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला रत्नागिरी येथील कु. जयवंत वेंगुर्लेकर (वय १३ वर्षे) !

कु. जयवंत वेंगुर्लेकर
      कु. जयवंत हरिश्‍चंद्र वेंगुर्लेकर याचा वैशाख कृष्ण पक्ष पंचमी (२७.५.२०१६) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आई वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
कु. जयवंत यास वाढदिवसानिमित्त
सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

१. जन्मापूर्वी
१ अ. गर्भावर चांगले संस्कार व्हावे यासाठी प.पू. डॉक्टरांवरील अपार श्रद्धेमुळे नामजप आणि सेवा करणे : जयवंतच्या जन्माच्या वेळी २००३ मध्ये प.पू. डॉक्टरांची साधकांसाठी नामजपाची वेळ ७.३० ते ७.४५ अशी होती. याच वेळेत जयचा जन्म झाला. त्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला. त्या वेळी सर्व साधकांना मोठ्याने २ घंटे, ८ घंटे इतका काळ नामजप करायला सांगितला होता. जय पोटात असतांना बसून आणि मोठ्याने नामजप करणे अशक्य होते. माझे पहिले सिझेरियन झाल्यामुळे जय पोटात असतांना टाक्यांवर ताण पडायचा. त्यातील एक टाका फारच नाजूक झालेला होता. त्यामुळे मला स्त्रीरोगतज्ञांनी विशेष काळजी घेण्यास सांगितली होती. बसून आणि मोठ्याने नामजप करतांना मला त्रास होत होता; परंतु तरीही मी केवळ देवावर असलेल्या अपार श्रद्धेने आणि गर्भावर चांगले संस्कार व्हावे, यासाठी नामजप पूर्ण करायचे. माझा नामजप आणि सेवाही भरपूर व्हायची.

ध्यानमंदिरात बसून मानसपूजा करतांना श्रीविष्णूचे दर्शन होऊन आनंद मिळणे आणि डोळ्यांतून थंड अश्रू येणे

सौ. नीला गडकरी
     ३०.१२.२०१५ या दिवशी सकाळी आरती झाल्यावर मी डोळे मिटून ध्यानमंदिरात नामजप करण्यासाठी बसले होते. त्या वेळी मी प.पू. डॉक्टरांची मानसपूजा करू लागले. मी प.पू. डॉक्टरांना मनोमन प्रार्थना केली, देवा, तू कुठे आहेस ? तेवढ्यात मला माझ्या डोक्यावर श्रीविष्णूची उभी मूर्ती दिसली. मूर्तीतून पांढरा प्रकाश बाहेर पडत होता आणि मूर्ती अतिशय तेजस्वी दिसत होती. त्या वेळी मला प्रकाशकिरणांसमवेत दैवी कण आणि फुले खाली पडतांना दिसत होती. त्या वेळी मला पुष्कळ हलके वाटत होते आणि आनंद होत होता. माझ्या डोळ्यांतून थंड अश्रू येत होते. खरंच देव सगळीकडे आहे. आपण त्याला अंतःकरणापासून हाक मारली की, तो आपल्याला दर्शन देतो, याची मला जाणीव झाली.
- सौ. नीला रमेश गडकरी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.१२.२०१५)

श्री. सिद्धेश करंदीकर आणि चि.सौ.कां. सायली गाडगीळ यांच्या विवाह सोहळ्याच्या वेळी प्रार्थना करत असतांना वातावरण स्तब्ध झाले असून आकाशाच्या पोकळीतून दैवी सुगंधाच्या अत्तराची मोठी धार पृथ्वीवर येत आहे, असे जाणवणे

        मी चि. सिद्धेशदादा आणि चि.सौ.कां. सायलीताई यांच्या विवाहाच्या वेळी हे दोघे गृहस्थाश्रमात प्रवेश करत आहेत. त्यांचे वैवाहिक जीवन साधनेला पूरक असो, अशी सर्व देवदेवता, साधुसंत, ऋषिमुनी आणि महर्षि यांच्या चरणी प्रार्थना करत होतो. त्या वेळी मला आकाशातील सर्व घडामोडी काही काळ थांबलेल्या आहेत. वातावरण स्तब्ध झाले आहे आणि आकाशाच्या पोकळीतून दैवी सुगंधाच्या अत्तराची मोठी धार पृथ्वीवर येत आहे, असे जाणवले. 
- श्री. विश्‍वास पाटील, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.४.२०१६)

पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकू मिरज आश्रमात आल्या असतांना आलेल्या अनुभूती

१. पू. (सौ.) गाडगीळकाकू आश्रमात येणार आहेत, असे कळल्यावर मन पुष्कळ आनंदी आणि उत्साही होणे : वर्ष २०१५ मध्ये दिवाळीत पू. (सौ.) गाडगीळकाकू मिरज आश्रमात आल्या होत्या. त्या आश्रमात येणार आहेत, असे कळले, तेव्हा माझ्या मनाची स्थिती फारच वेगळी होती. मी कोणत्या विश्‍वात होते, हे मला कळत नव्हते. तेव्हा मन पुष्कळ आनंदी आणि उत्साही होते. त्यांना भेटावे, त्यांच्याशी बोलावे, असा विचार मनात नव्हता. एकच वाटत होते की, त्यांना बघायला मिळाले, तरी चालेल.
२. महाप्रसादासाठी वरच्या माळ्यावर जातांना पू. काकूंचे चैतन्य खेचत वर काकूंकडे नेत आहे, असे जाणवणे : पू. काकू आल्या, तेव्हा मी स्वागतकक्षात सेवा करत होते. काही वेळाने मी रात्रीच्या महाप्रसादासाठी वरच्या माळ्यावर जातांना पू. काकूंचे चैतन्य मला खेचत वर काकूंकडे नेत आहे, असे जाणवले. मला पाहून पू. काकू ये, म्हणाल्या. त्या वेळी मला फार भरून आले. मी पू. काकूंना नमस्कार केला. त्या म्हणाल्या, काय प्रयत्न केलेस ? तोंडवळ्यात पालट झाला आहे. त्रासही न्यून झाला आहे.

महर्षींनी रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पदार्पणदिनाच्या निमित्त ९ दिवस सामवेदाचे गायन करण्यास सांगण्याचे कारण !

      भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये म्हटले आहे, वेदांमध्ये सामवेद मी आहे. (वेदानाम् सामवेदोऽस्मि । - श्रीमद्भगवद्गीता अध्याय १०, श्‍लोक २२) सामवेद हेच संगीताचे मूळ आहे. देवता या गायनप्रिय असतात. त्यामुळे सामवेदांचे गायन ऐकायला प्रत्यक्ष देवता येतात. सामवेदाच्या गायनामुळे देवता योगनिद्रेतून लवकर बाहेर येऊन भक्ताची प्रार्थना ऐकतात. २९.५.२०१६ या दिवशी असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पदार्पणदिनाच्या निमित्त सर्व साधकांना देवतांचे आशीर्वाद मिळावेत आणि सर्व संकटांचा परिहार व्हावा, यासाठी महर्षींनी २०.५.२०१६ ते २९.५.२०१६ पर्यंत रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात सामवेदाचे गायन करण्यास सांगितले. त्यानुसार सामवेदाची ध्वनीफित लावण्यात येत आहे.
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, लडाख, जम्मू-काश्मीर. (२१.५.२०१६)

आईमध्ये (पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामध्ये) अडकले नाही, असे सांगणार्‍या सौ. सायली करंदीकर (पूर्वाश्रमीच्या कु. सायली गाडगीळ) !

सौ. सायली करंदीकर
      पू. (सौ.) गाडगीळकाकू दैवी प्रवासासाठी रामनाथी आश्रमातून निघतांना सर्व साधक त्यांना सोडण्यासाठी आले होते. त्यानंतर प.पू. डॉक्टर मला म्हणाले, सर्व साधक काकूंना सोडण्यासाठी आले, सायली का नाही आली ? हे तिला विचार. हा प्रश्‍न विचारल्यावर सायलीने उत्तर दिले, मी आता आईमध्ये अडकले नाही. त्या प्रसंगी पू. गाडगीळकाकू म्हणाल्या, हो, माझ्यात अडकू नकोस. तू श्रीकृष्णाकडेच जा. हा प्रसंग सांगितल्यावर प.पू. डॉक्टर मला म्हणाले, सायलीचे हे कौतुक लिहून दे हं. सर्वांना बोलके करावे लागते. त्यानंतरच त्यांचे महत्त्व कळते !
- कु. दीपाली माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.६.२०१५)

समष्टी भाव असलेल्या पू. (सौ.) अंजली गाडगीळ !

        पू. (सौ.) अंजली गाडगीळ या सातारा येथे आल्या असतांना त्यांना जवळून पहाण्याची संधी देवाने दिली. त्या वेळी त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे श्री गुरुमाऊलीच्या चरणी अर्पण करते.
१. संत म्हणून वेगळेपणा न जपणे
       पू. अंजलीताईंच्या वागण्यात आपण कुणी संत आहोत, असे कुठेही जाणवले नाही. त्या सर्व साधकांमध्ये मिसळून रहातात, उदा. पू. ताई सर्वांना भोजनासाठी एकत्रित घेऊनच बसल्या होत्या. त्यांनी आमच्याशी स्वतःहून बोलून नाव विचारून आमची ओळख करून घेतली.

उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेले दैवी (सात्विक) बालक, तसेच युवा साधक यांच्या पालकांना सूचना !

       रामनाथी आश्रमातील संकलन विभागात अनेक जिल्ह्यांतील पालकांकडून स्वतःच्या पाल्याविषयीचे लिखाण येते. अनेकदा सूचना देऊनही या लिखाणात बरीच माहिती अपूर्ण असते, उदा. काही वेळा पूर्ण नाव नसणे, वय नसणे, गावाचे आणि जिल्ह्याचे नाव नसणे आदी त्रुटी असतात. त्यामुळे ही माहिती गोळा करण्यात संबंधित साधकांना बराच वेळ द्यावा लागतो. यासाठी पालकांनी कृपया खालील सूत्रांनुसार संकलन विभागात माहिती पाठवावी.
१. पाल्याची माहिती पाठवण्याचा तपशील
अ. पाल्याचे संपूर्ण नाव, गाव, जिल्हा, राज्य
आ. जन्मदिनांक, जन्मतिथी, अचूक जन्मवेळ, जन्मस्थान (गाव, तालुका आणि जिल्हा) आणि जन्मलग्न कुंडली (स्कॅन इमेज किंवा झेरॉक्स प्रत)

साधकांसाठी सूचना

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध 
असणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातच्या १४,०३२ 
वाचकांचे शेष नूतनीकरण १५.६.२०१६ या दिवसापर्यंत पूर्ण करा !
       नियतकालिक सनातन प्रभात म्हणजे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेले एकमेव वृत्तपत्र ! या नियतकालिकाद्वारे जिज्ञासू वाचकांची अध्यात्माविषयीची ज्ञानतृष्णा भागवली जाते, तसेच राष्ट्र अन् धर्म प्रेमी वाचकांना धर्मकार्य करण्याची प्रेरणा मिळते. अंतरंगात अंकुरलेल्या साधनारूपी बिजाचे वटवृक्षात रूपांतर करणारेे, तसेच अंतरातील हिंदुत्वाची मशाल पेटती ठेवणारे हे नियतकालिक सर्व वाचकांना नियमितपणे मिळणे आवश्यक आहे. असे असतांनाही काही राज्ये आणि जिल्हे यांमधील साधकांकडून या नियतकालिकांचे नूतनीकरण वेळेत होत नाही. त्यामुळे वाचकांना त्यातील अमूल्य ज्ञानापासून वंचित रहावे लागते.
         सर्व नियतकालिकांचे आवृत्तीनुसार शेष नूतनीकरण खाली देत आहे.
१. सर्व नियतकालिकांचे शेष नूतनीकरण 
       गोवा राज्याचे, तसेच अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यांचे मे मासापर्यंतचे नूतनीकरण अत्यल्प संख्येत राहिले आहे. नाशिक, पुणे, सोलापूर, नागपूर, मुंबई, जळगाव या जिल्ह्यांचे मे मासापर्यंतचे नूतनीकरण अधिक संख्येत शेष असल्याने त्यासाठी तळमळीने प्रयत्न करावेत.

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या 
वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !
       सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

फलक प्रसिद्धीकरता

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्यासारखे परखड 
मतप्रदर्शन करण्याचे धाडस एकातरी खासदाराकडे आहे का ?
       भारतात धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही नांदायची असेल, तर येथे हिंदू बहुसंख्येने असणे आवश्यक आहे. ज्या वेळी मुसलमान बहुसंख्येने असतात, तेथे लोकशाही किंवा धर्मनिरपेक्षता नांदत नाही, असे प्रतिपादन भाजपचे वरिष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Jab Musalman bahusankhyak hote hai, tab Loktantra, Dharmnirpekshata nahi rahti- Subramanian Swamy
Aisa hokar bhi Hinduoko hi Asahishnu kaha jata hai !
जागो ! : जब मुसलमान बहुसंख्यक होते हैं, तब लोकतंत्र अथवा धर्मनिरपेक्षता नहीं रहती ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी
ऐसा होकर भी हिन्दुआें को ही असहिष्णु कहा जाता है !
      हिंदु जनजागृती समिती ही अत्यंत मनापासून हिंदुसंघटनाचे काम करत आहे !
- पू. सुनील चिंचोलकर, पुणे
      पूर्वीच्या काळात माणसांचा एकमेकांवर विश्‍वास होता. त्या काळी घराला कुलुपे नसत. आज कुलुपे घातलेलीही घरेदारे फोडण्यात येतात. ही प्रगती आहे का ? (लोकजागर)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
संतांचे विश्‍लेषण करू नये
संतांचा शोध घेऊन काही सापडत नाही; कारण तेथे केवळ शून्य असते.
भावार्थ :
प्रकृतीतील गोष्टी पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्याद्वारे शोध घेऊन सापडणे शक्य आहे; पण पुरुष, शिव किंवा ब्रह्मतत्त्व यांचा शोध घेता येत नाही; कारण ते पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे आहे. संत ब्रह्माशी एकरूप झालेले असल्याने त्यांचा शोध घेऊन काही सापडत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
सनातन संस्थेला हिंदु राष्ट्राची 
स्थापना होण्याविषयी असलेल्या 
खात्रीचे कारण म्हणजे ईश्‍वराचा आशीर्वाद !
       सनातन संस्थेला हिंदूंचा पाठिंबा फारच अल्प आहे, असे बहुतेकांना वाटते; पण त्यांच्या लक्षात येत नाही की, सनातनला ईश्‍वराचा आशीर्वाद आहे. त्यामुळे सनातनचे हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय पूर्ण होणारच आहे. कौरवांच्या ११ अक्षौहिणी सैन्याचा केवळ ७ अक्षौहिणी सैन्य असलेल्या पांडवांनी पराभव केला, तो ईश्‍वराच्या, म्हणजेच श्रीकृष्णाच्या आशीर्वादामुळे ! मूठभर मावळ्यांच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी ५ मोगल पातशाह्यांचा पराभव केला, तोही त्यांचे गुरु समर्थ रामदासस्वामी यांच्या आशीर्वादामुळे ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सद्गुरूंवर दृढ श्रद्धा ठेवा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
परमेश्‍वराप्रमाणेच सद्गुरूंवर दृढ श्रद्धा असेल, तर सद्गुरूंच्या रूपात परमेश्‍वर दिसतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

हिंदूंना जगण्याचा अधिकार नाही का ?

संपादकीय 
     अयोध्येचे बजरंग दलाचे प्रमुख महेश मिश्रा यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट केला आहे. शस्त्रास्त्रांसह स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात समोर प्रतिस्पर्ध्यांना इस्लामी वेशात दाखवण्यात आल्यामुळे मुसलमानांच्या भावना दुखावल्या गेल्याचे कारण सांगण्यात आले आहे. ७९ कोटी हिंदूंच्या देशात हिंदुत्ववादी म्हणवल्या जाणार्‍या पक्षाचे शासन केंद्रात सत्तेत असतांना हिंदूंना किती दिवस असा तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागणार आहे, असा प्रश्‍न यामुळे उद्वेगाने विचारावासा वाटत आहे. हिंदूंवर अन्याय करणे आणि मुसलमानांना सर्व सुखसोयी देणे म्हणजे धर्मनिरपेक्षता अन् हिंदू जरा जरी काही त्यांच्यावरील होणार्‍या अन्यायाविषयी बोलले, तर ती सांप्रदायिकता किंवा जातीयवाद अशी गोबेल्स धारणा आपल्याकडे रूढ झाली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn