Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।


कोटी कोटी प्रणाम !

आज नारद जयंती

(म्हणे) बाबरी मशीद, मुझफ्फरनगर, गुजरात आणि काश्मीर येथील दंगलींचा सूड घेऊ !

ठाण्यातून इसिसमध्ये पळून गेलेल्या तरुणाची भारताला चलचित्राद्वारे धमकी
भाजप शासन आतंकवाद्यांच्या या धमकीचा सामना करण्यासाठी सिद्ध आहे का ?
    मुंबई - जगभरात दहशत निर्माण करणार्‍या इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेने आता भारताकडे लक्ष वळवले आहे. बाबरी मशीद, मुझफ्फरनगर, गुजरात, काश्मीर येथील दंगल यांचा सूड आम्ही घेऊ, अशी धमकी देणारे चलचित्र (व्हिडिओ) इसिसने प्रसारित केले आहे. त्याचप्रमाणे इस्लाम स्वीकारा नाही, तर जिझिया कर भरा आणि ते जमले नाही, तर मरायला सिद्ध व्हा अशीही एक धमकी देण्यात आली आहे. ठाण्यातून पळून जाऊन इसिसमध्ये दाखल झालेला फहाद शेख हा या चलचित्रामध्ये धमकी देतांना दाखवला आहे. वर्ष २०१४ मध्ये फहाद शेख सीरियात गेला होता. (हिंदूंनी या धमकीतून सावध होऊन जिहादी आतंकवाद संपवण्यासाठी व्यापक प्रमाणात कृतीशील व्हावे ! - संपादक)
     आम्ही लवकरच भारतात परत येऊ; पण या वेळी हातात तलवार घेऊन येऊ, असे शेख याने धमकी देतांना सांगितले आहे. भारतातील ही आक्रमणे स्थानिक जिहादींकडूनच इसिस घडवून आणील. (याचा अर्थ देशात इसिसचे हस्तक असून सुरक्षा यंत्रणांना ते सापडलेले नाहीत. शासन या आतंकवाद्यांना शोधण्यासाठी काही कृती करणार आहे कि आतंकवादी आक्रमणांत निष्पाप जनतेचे हकनाक बळी जाऊ देणार आहे ?- संपादक)

श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथे श्री हनुमानाच्या मूर्तीची अज्ञाताकडून विटंबना

अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांची अशा प्रकारची विटंबना झाल्याचे
 कधी ऐकले आहे का ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
     श्रीरामपूर (जिल्हा नगर) - येथील गिरमे चौकातील प्रवरा डाव्या कालव्याजवळच्या झाडाखाली असणार्‍या श्री हनुमानाच्या मूर्तीची विटंबना एका अज्ञाताकडून झाल्याचा प्रकार उघडकीस आला. सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन विटंबना झालेली मूर्ती विसर्जित करून तिच्या जागेवर नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. (हिंदूंनो, केवळ मूर्तीची प्रतिष्ठापना करून शांत राहू नका, तर गुन्हेगाराला शोधून काढून त्याच्यावर कठोर कारवाई होईपर्यंत पोलिसांचा पाठपुरावा घ्या ! - संपादक)
     २० मे या दिवशी सकाळी येथील एक दुकानदार दुकान उघडण्यास आले असता ते नेहमीप्रमाणे श्री हनुमानाच्या दर्शनासाठी गेले. त्या वेळी त्यांना मूर्तीची विटंबना झाल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे अशोक थोरे, शहरप्रमुख सचिन बडदे, भाजपचे अभिजित कुलकर्णी आदी कार्यकर्ते आणि परिसरातील अनेक दुकानदार जमा झाले. त्यांनी पोलिसांना माहिती देताच राज्य राखीव दलाचे पोलीस आणि स्थानिक पोलीस बंदोबस्तासाठी घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी मूर्तीची पूजा करणारे पुजारी प्रसाद कुलकर्णी यांचा जबाब नोंदवला असून तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

बिहारमध्ये गुटखा आणि पानमसाले यांवरील बंदीत वाढ

     पाटलीपुत्र - मद्यबंदीनंतर बिहार शासनाने आता गुटखा आणि पानमसाला यांची विक्री, वितरण, साठवण आणि प्रसिद्धी यांवरील बंदीत वाढ केली आहे. सार्वजनिक आरोग्यास होणारी हानी टाळण्यासाठी तंबाखु असलेले खाद्यपदार्थांवरील ही बंदी पुढील वर्षभरासाठी असणार आहे.

श्री साई संस्थानचा निधी शासकीय आणि निमशासकीय जिल्हा रुग्णालयांना देण्यास ग्रामस्थांचा विरोध

हिंदूंनो, मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा आणि ती भक्तांच्या स्वाधीन होण्यासाठी प्रयत्न करा !
     शिर्डी - राज्यातील सार्वजनिक विभागाच्या अखत्यारितील २४ शासकीय आणि निमशासकीय जिल्हा रुग्णालयांसाठी सीटी स्कॅन आणि क्ष-किरण यंत्रे खरेदीसाठी ४३ कोटी ६४ लक्ष रुपयांचे अर्थसाहाय्य करण्याचे आदेश शासनाने १९ मे या दिवशी श्री साई संस्थानला दिले आहेत. (शासकीय आणि निमशासकीय जिल्हा रुग्णालयांना निधी देण्याचे कार्य आरोग्य विभाग, अर्थ खाते आणि शासन यांचे असतांना साईभक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेला निधीचा उपयोग त्यासाठी कशाला ? भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या दानाचा विनियोग धर्मकार्यासाठीच झाला पाहिजे ! - संपादक) साई संस्थानने हा निधी देऊ नये, यासाठी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने २० मे या दिवशी संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांची भेट घेऊन तीव्र विरोध केला आहे. ग्रामस्थांचा विरोध डावलून निधी पळवण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन उभारण्यात येईल, अशी चेतावणीही गावकर्‍यांनी दिली आहे. (शासनाच्या चुकीच्या निर्णयाला विरोध करणार्‍या ग्रामस्थांचे अभिनंदन ! ग्रामस्थांनी शासनाला हा निर्णय घेण्यास भाग पाडावे ! - संपादक)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या जन्मोत्सवानिमित्त शेवगाव (जिल्हा नगर) येथे सोहळा

(डावीकडून पुढील ओळीत) श्री. शिरिष ओतुरकर, श्री. भारवी खरे, श्री. उमाकांत कुलकर्णी,
 प.पू. स्वामी सवितानंद, योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन, डॉ. रविंद्र नांदेडकर, सौ. विद्याताई लांडे 
आणि श्री. काकासाहेब नरवडे. १. मागे बसलेले पू. शरदजी वैशंपायन

संरक्षणमंत्री पर्रीकर यांना नारद संबोधणे म्हणजे नारदाची निर्भत्सना ! - ह.भ.प. उदयबुवा फडके, अध्यक्ष, हरिभक्त परिषद, गोवा

       भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या एका सार्वजनिक सभेत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचा उल्लेख मंचचे समन्वयक प्रा. सुभाष वेलींगकर आणि पदाधिकारी अरविद भाटीकर यांनी महाफटिंग आणि शनिवारी गोव्यात येणारा नारद असा केल्याचे स्वत:च्या वाचनात आले आहे. अशा प्रकारे नारदाची निर्भत्सना करणे चुकीचे असून मी या वक्तव्याचा निषेध करतो, असे मत हरिभक्त परिषद, गोवाचे अध्यक्ष ह.भ.प. उदयबुवा फडके यांनी व्यक्त केले.

राजा आम्हाला उपदेश करण्यासाठी आला होता, ज्ञान घेण्यासाठी नव्हे ! - शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी यांची पंतप्रधानांवर टीका

      उज्जैन (मध्यप्रदेश) येथील विचार महाकुंभमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि उपस्थित संत-महंतांना उपदेश करून निघून गेले. पूर्वी आपल्याकडे परंपरा होती की, राजे-महाराजे हे ऋषिमुनी यांच्या आश्रमात जाऊन त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्याचे आशीर्वाद घेत. ज्ञान घेत. आज मात्र राजा ज्ञान घेण्यासाठी नव्हे, तर उपदेश देण्यासाठी आला होता. हा विचार महाकुंभ नसून राजकीय मंथन आहे, अशी टीका द्वारका आणि ज्योतिष पीठाधीश्‍वर शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी यांनी केली.

विमान अपहरणाच्या वेळी प्रवाशाचा मृत्य झाल्यास अपहरणकर्त्यांना फाशीची शिक्षा !

     नवी देहली - जर एखाद्या प्रवाशाचा विमान अपहरणाच्या वेळी मृत्यू झाला, तर विमान अपहरणकर्त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली जाईल, अशी तरतदू नव्या कायद्यात करण्यात आली आहे. राष्ट्रपतींनी या नव्या कायद्याला संमती दिली आहे.

सरकारने उद्या आयुर्वेदावर बंदी घातली, तर आश्‍चर्य वाटणार नाही ! व्यक्तीस्वातंत्र्यवाले या संदर्भात का बोलत नाहीत ?

     आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकातून पुत्रप्राप्तीसाठीचे उपाय सुचवून त्याचा प्रचार आणि प्रसार करून प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा (पीसीपीएन्टीडी) भंग केल्याच्या आरोपावरून आयुर्वेदतज्ञ बालाजी तांबे यांच्या विरोधात संगमनेर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयाने तांबे यांच्यासह पुस्तकाचे प्रकाशक आणि नगर जिल्ह्याचे शल्यचिकीत्सक यांना न्यायालयात उपस्थित रहाण्याचे आदेश दिले आहेत. भाभासुमंच्या सभांना भाजपचा विरोध कायम !

सभेच्या दिवशी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आणि सभेच्या 
फलकाच्या बाजूनेच क्रिकेट स्पर्धेचे फलक लावले !
      भाभासुमंच्या (भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या) सांगे, गोवा येथे होणार्‍या जाहीर सभेला अल्प उपस्थिती लाभावी, यासाठी सांगे येथील क्रीडा मैदानावर आमदार क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे स्थानिक आमदार सुभाष फळदेसाई यांच्याच पुढाकाराने ही स्पर्धा घेतली जात असल्याचे बोलले जात होते, तसेच सांगे मतदारसंघात जेथे जेथे सभेचे फलक लावण्यात आले होते, त्याच्या बाजूला या क्रिकेट स्पर्धेचे फलक लावण्यात आले होते. सभास्थानी पोलीस कुमक ठेवून छावणीचे स्वरूप आणून भयग्रस्त वातावरण निर्माण केले होते. तरीही मातृभाषाप्रेमी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहिले. यासाठी प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी सर्वांचे आभार मानले. पुरी येथील जगन्नाथ मंदिर केव्हाही पडू शकते ! - पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍याची चेतावणी

     भारतीय पुरातत्व खात्याच्या तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष जी.सी. मित्रा यांनी म्हटले आहे की, पुरी, ओडीसा येथील जगन्नाथ मंदिर केव्हाही पडू शकते. त्यावर तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत, तर प्राचीन मंदिर नष्ट होऊ शकते. या चेतावणीनंतर मित्रा यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. (अशी चेतावणी देण्याची पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांना लाज वाटली पाहिजे. हे सांगण्यासाठी ते नोकरी करतात का ? - संपादक)

उज्जैन सिंहस्थातील अंतिम अमृत स्नान उत्साहात !

क्षिप्रा नदीत तिसरे अमृत स्नान करतांना नागा साधू
      उज्जैन - येथील हिंदूंच्या वैश्‍विक सिंहस्थपर्वातील तिसरे आणि शेवटचे अमृत (शाही) स्नान आज कृतज्ञतेच्या वातावरणात संपन्न झाले. शंकराचार्य, संत, महात्मे आणि साधू यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या क्षिप्रामाईने जणू सर्व भक्तांना प्रेमाने आपल्या कुशीत घेऊन त्यांच्यावर चैतन्याची उधळण केली. भाविकांनी चैतन्याने ओले चिंब होत क्षिप्रा मैयाकी जय, जय जय महाकाल अशी क्षिप्रामाईविषयी कृतज्ञता व्यक्त करत होते. पहाटे ३ वाजल्यापासून हर हर महादेव, जय जय महाकालचा जयघोष करत सर्व शैव आणि वैष्णव यांच्या १३ आखाड्यांनी तिसरे अमृत स्नान केले. यात नागा संन्यासी, आखाड्यांचे प्रमुख, महंत, महामंडलेश्‍वर, संत आणि अन्य साधू सहभागी झाले होते.
१. अमृत स्नानाचा प्रारंभ दत्त आखाडा घाटावर शैव पंथांचे जुना आखाड्याचे पीठाधीश्‍वर महंत स्वामी अवधेशानंदगिरी महाराज यांच्यासह सहस्रो नागा साधूंच्या स्नानाने झाला. त्याच वेळी दुसर्‍या तीरावर अर्थात् रामघाटावर वैष्णव पंथीय निर्वाणी अनी आखाड्याने झाला. या वेळी जय जय सियाराम, जय श्रीरामचा जयघोष करत अमृत स्नान केले.
२. त्यानंतर निर्मोही आणि दिगंबर आखाडे स्नानासाठी आले. दत्त आखाडा घाटावर आवाहन, अग्नि, आनंद, निरंजनी, अटल शंभू, तर रामघाटावर बडा उदासिन, नया उदासिन आणि निर्मल आखाड्यांनी अमृत स्नान केले. क्षिप्रा नदीच्या दोन्ही तिरांवर साधू-संत उत्साहपूर्वक स्नान करून अलौकिक आंनद घेतला. स्नानासाठी येतांना हत्ती, घोडे, उंट, रथ यांच्यावर स्वार होऊन शंखनाद करत संत-महात्मे येत होते. हातात तलवारी, भाले, त्रिशूल, परशू, डमरू, वाद्ये घेऊन नागासाधू आले होते. स्नान झाल्यावर नागासाधूंनी सर्वांगाला भस्मलेपन करून घाटावर ध्यानमग्न झाले होते. या वेळी मध्यप्रदेशचे प्रभारीमंत्री भूपेंद्र सिंह यांनी सर्व आखाड्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले.

अन्य धर्मियांच्या धार्मिक कारभारात ढवळाढवळ न करणारी आणि हिंदु धर्मावर मात्र आघात करण्याचे कार्य करणारी सर्वपक्षीय शासने !

    
पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
एका राज्यातील एका वैदिक संस्कृत पाठशाळेत गेलो असतांना बोलण्याच्या ओघात त्यांनी सांगितले, आमच्या वेद पाठशाळेतील मुलांना शासनाकडून शिष्यवृत्ती आणि भोजनाचा व्यय यांसाठी अंदाजे १ सहस्र ५०० रुपये अनुदान मिळते. राजकारणी किंवा शासकीय अधिकारी आमच्यावर दबाव आणतात. तुम्ही वेदपाठशाळेत मागासवर्गियांना प्रवेश देऊन त्यांना वेद शिकवावेत. तुम्ही असे केल्यास आम्ही तुम्हाला अधिकाधिक अर्थसाहाय्य देऊन तुमच्या पाठीशी राहू. याविषयी ते म्हणाले, मी त्याविषयी अभ्यास करून आणि धर्ममार्तंडांना विचारून निर्णय घेईन. यावरून असे लक्षात येते की, स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणार्‍या एका पक्षाप्रमाणे एक तथाकथित हिंदुत्ववादी पक्षही अन्य धर्मियांच्या धार्मिक कारभारात, त्यांच्या रुढी आणि परंपरा यांत ढवळाढवळ करत नाही; मात्र हिंदु धर्मात ढवळाढवळसुद्धा करतो आणि रुढी अन् परंपरा यांना विरोध करून हिंदु धर्मावर आघात करण्याचे कार्य करतो.
- (पू.) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (२५.२.२०१६)

गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या सिद्धतेला आरंभ !

     फोंडा (गोवा) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात हिंदु धर्म आणि समाज यांवर होणार्‍या आघातांचा प्रतिकार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती (संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, संपादक, लेखक) सहभागी होणार आहेत. हिंदु राष्ट्राची स्थापना, हे या अधिवेशनाचे प्रमुख ध्येय आहे. या अधिवेशनात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, केरळ, अंदमान, ओडिशा, आसाम, बंगाल, झारखंड, जम्मू-काश्मीर, हरियाणा, देहली, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत.
     या अधिवेशनात सहभागी होऊ इच्छिणारे हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, हिंदुत्ववादी अधिवक्ता, पत्रकार यांनी http://www.hindujagruti.org/hjs-activities/hindu-adhiveshan या मार्गिकेवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आयोजन समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.

फलक प्रसिद्धीकरता

भाजप शासन आतंकवाद्यांच्या या धमकीचा सामना करण्यासाठी सिद्ध आहे का ?
     बाबरी मशीद, मुझफ्फरनगर, गुजरात, काश्मीर येथील दंगलींचा सूड आम्ही घेऊ, अशी धमकी देणारा व्हिडिओ इसिसने प्रसारित केला आहे. त्याचप्रमाणे इस्लाम स्वीकारा, नाहीतर जिझिया कर भरा अन्यथा मरायला सिद्ध व्हा !, अशीही एक धमकी देण्यात आली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Babri masjid, Gujarat, Kashmirme hue dangoka hum badla lenge yah dhamkibhara video ISISne jaari kiya 
     ISISka saamna karneke liye kya sarkar tayyar hai?
जागो ! : बाबरी मस्जिद, गुजरात, कश्मीर में हुए दंगों का हम बदला लेंगे, यह धमकीभरा वीडियो इसिस ने जारी किया.
     इसिस का सामना करने के लिए क्या सरकार तैयार है ?

प्राणप्रिय गोवंशियांच्या रक्षणार्थ सदैव झटणारे आदर्श गोरक्षक !

गायीला सोडवतांना श्री. चेतन शर्मा
जिवाची पर्वा न करता गोरक्षण करणारे श्री. चेतन शर्मा !
'पीपल फॉर अ‍ॅनिमल्स्' या संघटनेचे श्री. चेतन शर्मा यांनी आतापर्यंत अनेकदा गोवंशियांची कसायांच्या कह्यातून सुटका केली आहे. गोवंशियांची वाहतूक होत असल्याचे लक्षात येताच श्री. शर्मा पोलिसांना त्याची कल्पना देतात, तसेच घटनास्थळी जाऊन गोवंशियांची सुटका करून त्यांना गोशाळेतही सुखरूप पाठवतात. मुसलमानबहुल भाग असो किंवा कसायांनी गोवंशियांचा केलेला रक्तपात असो, कोणत्याही प्रसंगात न डगमगता, तसेच स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कसाई, धर्मांध यांच्या तावडीतून गोवंशियांची रक्षण करणारे श्री. चेतन शर्मा यांच्यासारखे गोरक्षक हीच हिंदु धर्माची खरी शक्ती आहे !

आतंकवादी संघटनेच्या नेत्याची धर्मद्रोही कृती थांबवण्यासाठी स्वतःला अटक करून घेणारे भारत हिंदू मुन्नानीचे (हिंदूंची आघाडी संस्थेचे) तमिळनाडू राज्य अध्यक्ष तथा गोप्रेमी आर्.डी. प्रभु !

१. गोवंशहत्या बंदी कायदा मागे घ्यावा, यासाठी जिहादी आतंकवादी संघटनेच्या नेत्याने दिलेली चेतावणी !
महाराष्ट्रात 'गोवंशहत्या बंदी' कायदा पारित झाल्यावर तो कायदा मागे घ्यावा, यासाठी 'अल् उमा' या जिहादी आतंकवादी संघटनेचा नेता तडा अब्दूल रहीम याने राष्ट्रपतींना चेतावणी दिली, तसेच हा प्रश्‍न राष्ट्रपतींपर्यंत पोहोचण्यासाठी मी राज्यपाल भवनाच्या दारात गाय कापून या कायद्याच्या विरोधाला आरंभ करणार, अशी चेतावणी दिली. यासाठी त्याने भीत्तीपत्रके, होर्डींग, सामाजिक संकेतस्थळे यांच्या माध्यमांतून ५ दिवस प्रसार केला.

मांसनिर्मितीचे दुष्परिणाम !

अधिवक्ता
वीरेंद्र इचलकरंजीकर
मांस निर्मितीसाठी प्रचंड प्रमाणात लागणारे पाणी : काही उदाहरणे
हा हिशोब स्वयंस्पष्ट आहे. 
स्वस्त मांस कि भरमसाट महागाई ? 
     पशूचे मांस हे स्वस्त आहे, असे व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांचे म्हणणे आहे. हा अत्यंत फसवा आणि भोंगळ तर्क आहे. वस्तूस्थिती काय आहे ? सर्वाधिक पाण्याचा वापर बैल, रेडा इत्यादींचे मांस बनण्यासाठी होतो. अन्न निराळेच ! अमेरिकेतील एक गाय एक किलो प्रोटीनसाठी ७५ ते ३०० किलो गवत आणि अन्नपदार्थ खाते, तर आफ्रिकेतील गायीला ५०० किलोहून अधिक खाद्य लागते.

अरुणाचल येथील सैनिक आणि अधिकारी यांच्यातील हाणामारी म्हणजे बंड नव्हे ! - सैन्यदलाचे स्पष्टीकरण

        अरुणाचल प्रदेशमधील हलयूलियांग सैन्य तळातील एका पथकाच्या दैनंदिन पथसंचलनात एका सैनिकाचा मृत्यू झाला. त्यामुळे इतर सैनिक संतप्त झाले आणि त्यांनी संचलनाला विरोध केला. नंतर अधिकारी आणि सैनिक यांच्यात हाणामारी झाली. यासंदर्भात स्पष्टीकरण देतांना सैन्यदलाने म्हटले की, ही हाणामारी म्हणजे बंड नाही. वर्ष २०१२ मध्येही लडाख येथेही सैनिक आणि अधिकारी यांच्यात वाद होऊन हाणामारीची घटना घडली होती. (सैनिक आणि अधिकारी यांच्यात एकमेकांविषयी प्रेम आणि जिव्हाळा नसेल, तर अशा घटना यापुढेही होत रहातील आणि प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी त्याचा भारताला फटका बसू शकतो. हे टाळण्यासाठी सैन्याने या दोघांमधील संबंध चांगले रहावेत, यासाठी प्रयत्न करायला हवेत ! - संपादक)

सिंहस्थपर्वातून परतणार्‍या भाविकांकडून वसूल केले जात आहे ५ रुपये अतिरिक्त भाडे !

भाजप सरकारच्या 
रेल्वे प्रशासनाचे हिंदुद्रोही कृत्य !
         उज्जैन - येथे सिंहस्थपर्वासाठी आलेले भाविक परत जात असतांना रेल्वे प्रशासन त्यांच्याकडून सरचार्ज (अतिरिक्त भाडे) म्हणून ५ रुपये अधिक वसूल करत आहे. ही भाविकांची आर्थिक लुबाडणूक आणि फसवणूक आहे, असे सामाजिक कार्यकर्ता जयप्रकाश शर्मा यांनी सांगितले. (अन्य धर्मियांच्या सणाला असे कर लावण्याचे धाडस रेल्वे प्रशासन करणार का ? - संपादक) पहिल्या अमृतस्नानाला अपेक्षित गर्दी नसल्याने खूप सवलती देऊन भाविकांना सिंहस्थाला येण्याचे निमंत्रण राज्यातील भाजप सरकारकडून दिले जात आहे; मात्र केंद्राच्या रेल्वे प्रशासनाकडून सरचार्जच्या नावाखाली अधिकची रक्कम लुबाडली जात आहे, ही गोष्ट भाजपची दुटप्पी भूमिका दर्शवते, असे ते म्हणाले.

गोरक्षणासाठी काय करावे ?

गोरक्षणाची पूर्ण व्यवस्थाच उभारणे आवश्यक !
अनेक जण गोरक्षण या विषयाच्या संदर्भात भावनिक आहेत. गोशाळा स्थापित केल्या, म्हणजे गोरक्षणाच्या समस्येचे समाधान झाले, असे नव्हे. प्रत्यक्षात गोपालन करतांना चारा, पाणी, मनुष्यबळ अशा विविध समस्याही भेडसावत असतात. त्यामुळे आपल्याला पूर्ण व्यवस्थाच निर्माण करायला हवी.

गोवंशांची कत्तल थांबवणे
शासकीय आकडेवारीनुसार, देशात सध्या प्रतिमास २-३ लक्ष इतक्या गोवशांची कत्तल होत आहे. केरळमध्ये प्रतिमास २५,००० गोवंशाची कत्तल होत आहे. तेथे हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती सगळेच गोमांस भक्षण करत आहेत. हे सर्व थांबवायला हवे.
वृद्ध गाय पाळणे आर्थिकदृष्ट्या अशक्य असल्याचे शेतकरी सांगतात. अशा शेतकर्‍यांचे प्रबोधन करून त्यांना त्या गायी गोशाळेला अर्पण करण्यास सांगायला हवे.

मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिराकडून ४४ किलो सोने सुवर्ण ठेव योजनेत जमा

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम !
        मुंबई, २१ मे - येथील श्री सिद्धीविनायक मंदिराने ४४ किलो सोने केंद्रशासनाच्या सुवर्ण ठेव योजनेत जमा केले आहे. या योजनेत जमा केलेल्या सोन्यावर मंदिराला २.२५ टक्के व्याज मिळणार असल्याची माहिती मंदिराचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले. मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांनी सांगितले की, या योजनेतून शासनाकडून मिळणारी व्याजाची रक्कम समाजोपयोगी कामांसाठी व्यय केली जाईल. (मंदिरांचा पैसा केवळ धार्मिक गोष्टींसाठीच खर्च केला पाहिजे, हे शासन लक्षात घेईल का ? - संपादक) सध्या श्री सिद्धीविनायक मंदिराकडे १७१ किलो सोने असून यापैकी १० किलो सोने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा केले आहे. त्यावर मंदिराला १ टक्का व्याज मिळते.

मानवरूपातील दानवांनी गोवंशियांची निर्घृण हत्या करून पार केली क्रूरतेचीही परिसीमा !

        आज कृतघ्न झालेला मनुष्य अत्यंत लोभापायी मुक्या जनावरांवर किती अमानुष अत्याचार करत आहे, याविषयी वाचले, तरी सहृदय व्यक्तीच्या काळजाचे पाणी पाणी होईल. मनुष्याची स्वार्थी वृत्ती इतक्या पराकोटीला गेली आहे की, पैशासाठी तो अत्यंत नीच स्तरावर उतरतो. त्याने आपल्या स्वार्थापायी माणुसकीशी असलेले नाते तोडले. सहस्रो वर्षे सुजलाम् सुफलाम् असलेल्या वसुंधरेचा त्याने र्‍हास केला आहे. झुळझुळ वाहणार्‍या पवित्र नद्या अस्वच्छ करून टाकल्या. हवा, पर्यावरण सगळ्यांचे प्रदूषण करून टाकले, तरीही त्याचे समाधान झाले नाही; म्हणून हिंदूंना अती पवित्र असणार्‍या गायींची आणि अन्य गोवंशियांची तो अत्यंत निर्घृणतेने हत्या करत आहे. ही अत्यंत निंद्य कृती आहे.

गोहत्येविषयी प्रचंड चीड असून ते पाप आहे, असे मानणारे; परंतु प्रसंगी गोरक्षणापेक्षा राष्ट्ररक्षणाला प्राधान्य द्यावे, असे मत असलेले स्वा. सावरकर !

१. गायीची केवळ पूजा करण्याऐवजी गोरक्षण करणे महत्त्वाचे असणे : १९३८ साली नागपूरला हिंदुमहासभेचे अधिवेशन भरले होते. त्याला जोडूनच गोरक्षण परिषद झाली. या परिषदेत सावरकरांनी जे भाषण केले, ते दिनांक ६.१.१९४० च्या केसरीत छापून आलेले आहे. या भाषणात सावरकर म्हणाले, आईच्या खालोखाल गायीचे दूध माणसाला मानवते, असे वैद्यकशास्त्र सांगते. गोरक्षण चांगल्याप्रकारे व्हावे, त्यावरील फोलफट झाडून त्यातील कसदार सत्त्व रहावे, या हेतूनेच गोपूजनातील दुष्ट प्रवृत्तीवर मी टीका केली होती. गोरक्षणासाठी पूज्य भावना आवश्यक असते; पण पूजा करता करता रक्षणाचे कर्तव्य विसरणे योग्य नव्हे. केवळ पूजा करू नका. केवळ हा शब्द महत्त्वाचा आहे. आधी रक्षण करून मग हवी, तर पूजा करा !
२. हिंदूंनो, गायींचे कत्तलखाने चालवून केलेला हिंदूंचा अवमान सहन करू नका ! : कत्तलखाने आमचा अपमान करण्यासाठी, आमचे नाक कापण्यासाठी चालवले जात आहेत. मथुरेच्या कत्तलखान्यात गायीचेच मास कापले जाते असे नव्हे, तर हिंदूंच्या हृदयाचे मांस तोडले जात आहे. गोमांस त्या भक्षकांना सुखाने पचू देऊ नका.

गायीच्या चामड्यापासून बनवण्यात येणार्‍या चेंडूच्या चेंडूफळीवर (क्रिकेटवर) बहिष्कार टाका !

१. गायीच्या चमड्यापासून बनवण्यास पुरीच्या गोवर्धन मठाच्या शंकराचार्यांचा तीव्र आक्षेप !
'चेंडूफळी (क्रिकेट) या खेळासाठी जो चेंडू बनवण्यात येतो, तो गायीच्या चामड्यापासून बनवण्यात येतो. याला पुरीच्या गोवर्धन मठाच्या शंकराचार्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

२. चेंडूसाठी केवळ देशीच गायी मारल्या जातात !
चेंडूफळीचे चेंडू तयार करण्याच्या प्रत्येक कारखान्यात दिवसाला नऊ गायी मारल्या जातात आणि देशात असे १२५ कारखाने आहेत. विशेष म्हणजे या चेंडूसाठी जर्सी गायी इत्यादी चालत नाहीत. केवळ देशीच गायी चालतात. त्यामुळे तर शंकराचार्यांना अधिकच क्रोध आला आहे.

३. रॉकेट, संगणक यांचा शोध लावणार्‍यांना चेंडूला पर्यायी चामडे मिळणे अशक्य नाही !
'चेंडूफळी हा भारतीय खेळ नाही; म्हणून आपल्याला त्याला विरोध करायचा नाही. केवळ चेंडूला पर्यायी चमडे मिळाले म्हणजे बस, असे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती गुरुजींचे म्हणणे आहे. रॉकेट आणि संगणकाचा शोध लावणार्‍यांना ते अशक्य नाही', असेही गुरुजींचे म्हणणे आहे. (तरुण भारत, २९.४.१९९९)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अमृतमहोत्सवी वर्ष

समस्त मानवजातीच्या कल्याणार्थ सदैव झटणार्‍या ईश्‍वरस्वरूप परात्पर
 गुरु डॉ. आठवले यांची महती वर्णन करणारा दैनिक सनातन प्रभातचा रंगीत विशेषांक
प्रसिद्धी दिनांक : २९ मे २०१६
आपली मागणी आजच नोंदवा !
  •  आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ ते परात्पर गुरुपर्यंतचा प्रवास !
  •  परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विविध क्षेत्रांतील अद्वितीय कार्य !
  •  संत, संप्रदाय, हिंदुत्ववादी, देशभक्त आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे संघटन अन् त्यांना दिशादर्शन करणारे कार्य
  •  परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला गुरूंचे कृपाशीर्वाद !
  •  परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा विविध संतांनी केलेला सन्मान अन् त्यांना पुरस्कार देऊन केलेला गौरव !
  •  विशेष : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विविध भाव दर्शवणारी छायाचित्रे

हिदु राष्ट्र-स्थापनेकरिता धर्मप्रेमी घडण्यासाठीचे अनमोल माध्यम : धर्मशिक्षणवर्ग

श्री. रमेश शिंदे
        धर्माची हानी रोखायची असेल, तर धर्माचाच आधार घेतला पाहिजे. धर्मो रक्षति रक्षितः । या वचनानुसार धर्म हेच निर्गुण ईश्‍वराचे सगुण रूप आहे. त्यामुळे प्रथम धर्म समजून घेतला पाहिजे. त्याचे आचरण करून अनुभूती घेतली पाहिजे, तरच धर्मावर श्रद्धा बसून धर्मरक्षण करता येते. हे होऊ नये, यासाठी मोगल आक्रमकांनी हिंदूंची विश्‍वविद्यालये, ग्रंथ आणि संहिता जाळून टाकण्याचा प्रयत्न केला, तर ब्रिटिशांनी लॉर्ड मेकॉलेच्या माध्यमातून गुरुकुल शिक्षणपद्धतीवर बंदी आणून ख्रिस्ती कॉन्व्हेंट चालू केले आणि हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्यावरच प्रतिबंध आणला. याचा परिणाम म्हणून हिंदूंची आजची पिढी आपल्याच धर्माला नावे ठेवणारी आणि पाश्‍चात्त्य गैरप्रथांचे समर्थन करणारी बनली आहे. त्यांना स्वतःच्याच धर्माचा अभिमान नाही. त्यामुळे धर्मपरिवर्तन करणार्‍यांचे, तसेच हिंदु धर्मविरोधकांचे फावले आहे. आज तथाकथित सेक्युलर वाहिन्यांवरून केला जाणारा हिंदु धर्मविरोधी प्रचार, जे.एन्.यू. सारख्या विद्यापिठांतून हिंदु धर्मावर केली जाणारी टीका, तसेच महिषासुर जयंतीसारखे कार्यक्रम पाहिल्यावर हिंदु धर्मविरोधक यशस्वी झाल्याचे दिसत आहे. स्वतंत्र भारतातील हिंदु युवकांच्या मनात त्यांनी हिंदु धर्माच्या विरोधात केलेले बीजारोपण आता अंकुरत असल्याचे दिसत आहे. याच वेळी स्वतःला सेक्युलर म्हणवणारे मुसलमान मदरशांतून, तर ख्रिस्ती चर्च आणि कॉन्व्हेंट यांतून आपापल्या धर्माचे शिक्षण घेतच आहेत. यामुळे या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी उपाय काढायचा असेल, तर आता हिंदूंच्या धर्मशिक्षणाला दुसरा पर्यायच नाही. त्यातूनच हिंदूंच्या मनात धर्माभिमान निर्माण करून हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांना सिद्ध करता येईल.

इंग्रजांच्या पावलावर पाऊल ठेवून गोवंश नष्ट करणारे भारतीय !

भारतियांना दरिद्री करण्यासाठी इंग्रजांनी गायींची कत्तल आरंभली, हा इतिहास !
इंग्रज भारतात आल्यावर त्यांनी पाहिले की, मुसलमानांनी भारतियांना १ सहदा वर्षे लुटले, त्यांच्यावर 'जिझिया कर' लादला, तरीही ते गरीब झाले नाहीत. आता आम्ही यांच्यावर कर लादल्यावरही ते द्ररिद्री होत नाहीत. याचे काय कारण आहे ? अभ्यास केल्यावर इंग्रजांच्या लक्षात आले की, भारतीय लोकांजवळ गायी आहेत. एक गोमाता पूर्ण कुटुंबाचा व्यय भागवते. तुम्हाला बाहेरून काहीच आणावे लागत नाही. एका गोमातेमुळे इतके होते, हे पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले की, गायींची कत्तल केल्याविना पर्याय नाही. तुम्हाला खोटे वाटेल; परंतु इंग्रजांच्या 'गॅझेट'मध्येत तसा उल्लेख आहे.

हिंदूंनो, या गोष्टींवर बहिष्कार टाका !

१. मॅकडोनाल्ड, केएफ्सी यांसारख्या बहुराष्ट्रीय आस्थापनांच्या खाद्यउत्पादनांत गोमांस असते आणि या कंपन्यांमुळे गोहत्या अधिक प्रमाणात होतात. त्यासाठी यांसारख्या कंपन्यांच्या सर्वच उत्पादनांवर बहिष्कार टाका !

२. सध्या मिठाई सजवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या वर्खात गायीच्या आतड्यांपासून बनवण्यात येणार्‍या वर्खाची भेसळ केली जाते. त्यासाठी वर्ख असलेली मिठाई खरेदी करू नका !

३. चामड्यापासून बनवण्यात येणारे पट्टे, पर्स, बूट, चप्पल, गालीचे, शोभेच्या वस्तू या खरेदी करू नका ! या वस्तूंची मागणी घटली की, आपोआप गोहत्यांचे प्रमाणही न्यून होईल.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
 - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे
गोग्रास देता
बहुपुण्य आहे ।
गोग्रास देता
चिरसौख्य राहे ।
गोग्रास देता
चरतील गायी ।
गोपालने कृष्ण
प्रसन्न होयी ।
- श्री. दुर्गेश परुळकर (साप्ताहिक राष्ट्रपर्व, बेळगाव, १९.७.२०१०)


मंत्र्यांनी सांगणे नाही, तर कृती करणे अपेक्षित आहे !

     भजन, भावगीत, कीर्तन ही आपली संस्कृती आहे. कीर्तन ही अशी कला आहे, जी भगवंताकडे भक्ती पोचवण्याचे कार्य करते. कीर्तन परंपरा ही संतांनी चालू केलेली असून आजच्या पिढीने ही परंपरा राखून ठेवली पाहिेजे, असे प्रतिपादन गोव्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी एका कीर्तन संमेलनात केले. हिंदूंनो, नवीन मंदिरे बांधण्याआधी आहेत त्या मंदिरांचे रक्षण करण्यास सिद्ध व्हा ! उद्या अयोध्येत श्रीराम मंदिर बांधल्यावर त्याचीही अशीच गत झाली, तर आश्‍चर्य वाटणार नाही !

     बंगालमधील मयुरेश्‍वरजवळ असलेल्या रामनगर गावात हनुमान मंदिर उद्ध्वस्त करून श्रीहनुमानाची मूर्ती रस्त्याच्या कडेला फेकल्याचा संतापजनक प्रकार १२ मे या दिवशी घडला. या मूर्तीची ९ मे ला अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संत-महंतांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती.

मंत्र्यांनी जनतेसारखे बोलणे नाही, तर कृती करणे अपेक्षित आहे !

     प्रतिवर्षी गोव्याच्या समुद्रकिनार्‍यावर होणार्‍या आणि समाजद्रोही लोक आयोजित करत असलेल्या सनबर्न पार्ट्या अयोग्य आहेत. पाश्‍चिमात्य संस्कृतीचा पुरस्कार करणारा सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे सनबर्न पार्टी होय. पाश्‍चिमात्य संस्कृती हे एक भूत आहे, असे गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी म्हटले आहे.

भारत-बांगलादेश सीमेवर एका सोने-तस्कराला मारल्याच्या प्रकरणी ७ सैनिक निलंबित !

केंद्रशासन जनतेचे कि तस्करांचे ?
     भारत-बांगलादेश सीमेवर १४ मे या दिवशी सोने तस्करांच्या तावडीत सापडलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या एका सैनिकाची सुटका करतांना केलेल्या गोळीबारात एक तस्कर मृत्यूमुखी पडला म्हणून सुरक्षा दलाच्या ७ सैनिकांना निलंबित करण्यात आले आहे.

असे आहे, तर इतकी वर्षे यश का मिळाले नाही ? आता यश मिळेल याची हिंदूंना काय खात्री देणार ?

     विहिंपने राममंदिराचे सूत्र कधीही सोडून दिलेले नाही किंवा मागेही टाकलेले नाही, असे विहिंपच्या नेतृत्वाने म्हटले आहे.

एका कुटुंबातील असूनही विहिंपवाल्यांना भाजपच्या खासदारांना भेटावे लागते, हे दोघांना लज्जास्पद !

     संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात राममंदिराविषयी कायदा करण्यासाठी सर्व खासदारांची स्वतंत्रपणे भेट घेणार असल्याचे विहिंपने घोषित केले आहे.

जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा हिंदुद्वेष !

      जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी एन्आयए झाली भगवी, म्हणून सुटली का साध्वी ? या शीर्षकाखाली चर्चासत्र पार पडले. अधिवक्ता गणेश सोवनी यांनी यावर आक्षेप घेऊन त्याचे खंडण केले. ते म्हणाले, एन्आयए भगवी झाली असती, तर ३ आठवड्यांपूर्वी वर्ष २००६च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील मुसलमान आरोपींना एन्आयएने मुक्त केले नसते.

गोमांस, डुकराचे मांस आणि अल्कोहोल मिसळलेल्या खाद्यपदार्थांवर बहिष्कार घाला !

        सध्या बाजारात अनेक विदेशी पद्धतीचे खाद्यपदार्थ (उदा. पिझ्झा, बर्गर, चॉकलेट, सँडविच) मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. वरकरणी पहाता हे पदार्थ शाकाहारी वाटतात; पण त्यात गोमांस, डुकराचे मांस, अल्कोहोल तत्त्व मिसळलेले असते. या पदार्थांच्या वेष्टनावर मात्र या घटकांचा स्पष्ट उल्लेख न करता केवळ संकेतांक (कोड) लिहिलेले असतात. गोमांस, डुकराचे मांस, अल्कोहोल यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिश्रणांना दिले जाणारे संकेतांक खाली दिले आहेत. कोणताही पदार्थ खरेदी करण्यापूर्वी त्याच्या वेष्टनावर खालीलपैकी कोणताही एखादा संकेतांक असल्यास तो पदार्थ खरेदी करू नका.
E ३२२ : गोमांस
E ४७१ : गोमांस आणि अल्कोहोल यांचे तत्त्व
E ४८१ : गोमांस आणि डुकराचे मांस यांचे मिश्रण

चरकसंहितेला गोमांस निषिद्धच !

श्री. मेघराज पराडकर
वैज्ञानिक पी.एम्. भार्गव यांच्या गोमांसाविषयीच्या वक्तव्याचा प्रतिवाद

शास्त्रज्ञ (?) पी.एम्. भार्गव यांनी केलेले 'आयुर्वेदानुसार गोमांस हे अनेक व्याधींवर उपाय !', हे विधान अर्धसत्य आहे. चरकसंहितेमध्ये गोमांसाचे गुणधर्म सांगितलेले आहेत, तसेच त्याचे रोगांमधील उपयोगही सांगितले आहेत. हे संदर्भ जशास तसे आपण पुढे पाहूच; पण त्याआधी प्राचीन काळची परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे.

१. प्राचीन काळी आयुर्वेद शिकण्यापूर्वी धर्मशास्त्राचा अभ्यास होत असल्याने विद्यार्थ्याला गोमांस खाऊ नये, हे स्पष्ट असणे
प्राचीन काळी आयुर्वेद गुरुकुलांमधून शिकवला जात असे. आयुर्वेदासाठी प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्याला धर्मशास्त्राचे शिक्षण घ्यावे लागे. हिंदु धर्मामध्ये गोमांस खाणे सर्वथा निषिद्ध आहे, हे धर्मशास्त्रात ठिकठिकाणी सांगितलेच आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला 'गोमांस खाऊ नये', हे ज्ञात असे.

गोरक्षण हाच धर्म !

चांगल्या आणि वाईट ऑर्ब्जच्या संदर्भातील आध्यात्मिक विश्‍लेषण

७.३.२०१५ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या
आश्रमातील कलामंदिराच्या परिसरात दिसलेले लिंगदेह
एका हिंदु धर्मजागृती सभेच्या मैदानाच्या बाहेरील बाजूस
लावण्यात आलेल्या फलकाच्या ठिकाणी दिसणारे लिंगदेह
प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील देवघरासमोर दिसणारा
तेजस्वी लिंगदेह (गोलात मोठा करून दाखवला आहे)
धर्मसभेत पू. (कु.) स्वाती खाडये यांच्या मागे दिसणारा
पंचकोनी लिंगदेह (गोलात मोठा करून दाखवला आहे)
       या ठिकाणी उदाहरणासाठी काही त्रासदायक आणि चांगल्या लिंगदेहांची छायाचित्रे दिली आहेत. वाचक या छायाचित्रांकडे २ मिनिटे पाहून काय वाटते ?, ते अनुभवू शकतात. 
      जगात काही गोष्टी डोळ्यांनी दिसतात, तर काही दिसत नाहीत. काही गोष्टी डोळ्यांनी दिसत नाहीत, म्हणजे त्या अस्तित्वातच नसतात, असे नव्हे, उदा. वारा डोळ्यांना दिसत नाही, म्हणजे तो नसतो, असे नाही. डोळ्यांनी तो दिसत नसला, तरी आपल्याला त्याचे अस्तित्व जाणवते. स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. अशा सूक्ष्मातून घडणार्‍या घटनांचा व्यक्तीच्या देहावर स्थुलातून आणि सूक्ष्मातूनही परिणाम होतो किंवा जाणवतो.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांची श्री. रामानंद परब यांनी काढलेली चित्रे पाहिल्यानंतर जाणवलेली सूत्रे

चित्र क्र. १ : योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे आशीर्वाद देत असतांनाचे कमरेपर्यंतचे चित्र
चित्र क्र. २ : योगतज्ञ दादाजी मांडी घालून बसले आहेत.
डावा हात पायावर ठेवलेला आहे आणि उजव्या हाताने ते आशीर्वाद देत आहेत.
       योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांची काढलेली चित्रे पाहून हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
१. चित्र क्र. १
अ. जे साधक आणि संत इतरांची साधना करवून घेत आहेत, त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी अन् जे साधक चांगले साधक किंवा संत यांचे मार्गदर्शन स्वीकारून साधना करत आहे, त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी योगतज्ञ दादाजी ऊर्जा पुरवत असल्याचे जाणवले.

प.पू. काणे महाराज यांनी सांगितलेले गोमाता आणि पंचगव्य यांचे महत्त्व

ब्राह्मणांचे दायित्व
       त्रेतायुगात वेदांची, म्हणजेच चातुर्वर्णांची उत्पत्ती झाली. समाजात ज्ञानधारणेच्या स्थापनेचा प्रवाह अव्याहतपणे चालावा, याचे दायित्व ब्राह्मणाकडे दिले. ते दायित्व पेलण्याची क्षमता त्यांच्यात यावी, यासाठी त्याच्याकडे गोसंग दिला.

सनातनच्या एका आश्रमात सनातनची सात्त्विक उत्पादने खरेदीच्या बहाण्याने एका पोलीस अधिकार्‍याकडून चौकशी करण्याचा प्रयत्न !

       सनातनच्या एका आश्रमात अन्य राज्यातील एक पोलीस अधिकारी अचानक आले. त्यांना सनातनची दिनदर्शिका आणि काही इतर साहित्य हवे असल्याचे त्यांनी सांगितले; मात्र त्यांना सनातनचे कार्य जाणून घेण्यात किंवा सनातनचे साहित्य घेण्यात काही रस नव्हता, असे संबंधित साधकांना जाणवले. आश्रमात १५ मिनिटे कालावधीसाठी असलेले हे अधिकारी सनातनचे साहित्य घेण्याच्या बहाण्याने येऊन आश्रमाविषयी चौकशी करत असल्याचे साधकांच्या लक्षात आले.

जीवनातून आनंद गेला !

प.पू. परशराम पांडे महाराज
      शेती-प्रधान भारताच्या दृष्टीने गोरक्षा सत्त्व-वर्धमानाच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे; म्हणून आतापर्यंत गायीत ३३ कोटी देव रहातात, असा विश्‍वास निर्माण करून संवर्धन केले; परंतु आज यांत्रिक युगामुळे गायीचे महत्त्व आणि संवर्धन न्यून झाले. दुष्ट लोक गोहत्या करून त्यांचे प्रमाण आणखी कमी करत आहेत. जमिनीला शेणखत मिळत नसल्यामुळे आणि नवीन वैज्ञानिक खतासारखी खते वापरत असल्यामुळे जमीन नापीक होत आहे. भारत स्वतंत्र होऊन ६८ वर्षे होऊन गेली, तरी भौतिक वादामुळे, दैवी विचार शून्य झाल्यामुळे ऋषींचे विचार ज्या भूमीतून निर्माण झाले, तेथेच ते नाहीसे होत असल्यामुळे, दारिद्य्र, दुर्भिक्ष्य, अनाचार, भ्रष्टाचार, अनीती, दिखाऊपणा, भंपकपणा, बडेजाव आणि भौतिक सुखात वाढण्याची लालसा, हे दुर्गुण आले आहेत. त्यामुळे जीवनातून आनंद गेला आहे. सर्वत्र प्रदूषण झाले आहे. याला आम्ही प्रगती म्हणणार काय ? - प.पू. परशराम माधव पांडे
(श्री गणेश-अध्यात्म दर्शन, पृष्ठ ७५)

विकार-निर्मूलनासाठी नामजप

सनातनच्या भावी आपत्काळातील 
संजीवनी या ग्रंथमालिकेतील नूतन ग्रंथ !
भाग १ : महत्त्व आणि नामजपाच्या विविध प्रकारांमागील शास्त्र
भाग २ : विकारांनुसार देवतांचे जप, बीजमंत्र आदींसह मुद्रा अन् न्यासही !
       मनुष्याच्या बहुतेक विकारांमागील मूळ कारण आध्यात्मिक असते. हे कारण नष्ट होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय योजावा लागतो. नामजप हा एक उत्तम आध्यात्मिक उपाय आहे. देवतेचा नामजप केल्याने शरिरात निर्माण होणार्‍या त्या देवतेच्या विशिष्ट कंपनांमुळे विकाराद्वारे शरिरात निर्माण झालेली अनैसर्गिक किंवा प्रमाणबाह्य कंपने सुधारण्यास साहाय्य होते. प्रस्तुत ग्रंथात ३०० हून अधिक शारीरिक आणि मानसिक विकारांवर उपयुक्त असणारे विविध नामजप सांगितले आहेत (यात स्त्रियांचे विकार, लहान मुलांचे विकार आदींचाही स्वतंत्रपणे विचार केला आहे.), तसेच काही देवतांचे नामजप कोणकोणत्या विकारांत उपयुक्त आहेत, हेही दिले आहे. केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर नेहमीसाठीही उपयुक्त असलेला हा ग्रंथ (२ भाग) अवश्य संग्रही ठेवा !
(टीप - या नामजप उपचारपद्धतीविषयीची माहिती सांगणारा लेख लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)

हिंदूंनो, गोरक्षणासाठी संघटित व्हा आणि समाजालाही कृतीशील करा !

धर्मद्रोह्यांनो, गायीचे अनन्यसाधारण महत्त्व जाणून घ्या !

गायीपासून मिळणार्‍या घटकांमुळे माणसाला 
हानीकारक असलेल्या रेडिओ अ‍ॅक्टिव्हीटीचा प्रभाव न्यून होणे
       रशियन वैज्ञानिक एम्. शिरोविच म्हणतात, यशस्वी प्रयोगानंतर गाय आणि यज्ञ याविषयी जी माहिती मिळाली आहे, ती भारतीय लोकही जाणत नाहीत. त्यांनी गायीविषयी पुढीलप्रमाणे माहिती दिली.
अ. गायीच्या दुधात रेडिओ विकिरणांची (Radio Activity) प्रतिकारशक्ती असते.
आ. गायीच्या शेणाचा ज्या घरात नित्य उपयोग होतो, ते घर रेडिओ अ‍ॅक्टिव्हीटीपासून विमुक्त असते.
इ. गायीच्या दुधापासून काढलेले तूप अग्नीत आहुती म्हणून टाकले असता निघणारा धूर पुष्कळ प्रमाणात रेडिओ अ‍ॅक्टिव्हीटीला रोध करील. अग्नीत आहुती टाकण्याच्या क्रियेस यज्ञ म्हणतात.
- डॉ. त्र्यं.गो. पंडे (अणुस्फोट, संदेश, रविवारची खासपूर्ती या गुजराती नियतकालिकांतील वरील लेखाच्या आधारे (संदर्भ : त्रैमासिक प्रज्ञालोक, जानेवारी १९८०)

सनातन गोमूत्र-अर्क

देशी गायींपासून निर्मित
  • पंचगव्य बनवण्यास उपयुक्त
  • बाह्य शरीर-शुद्धीसाठी लाभ
  • पूजास्थळ वास्तू अन् वाहन यांच्या शुद्धीसाठी उपयुक्त
  • गोमूत्रमिश्रित पाण्याने आंघोळ केल्याने केस गळण्याचे प्रमाण अल्प होते !
५० आणि २०० मि.ली.मध्ये उपलब्ध
      जेथे प्रतिदिन गोमूत्र उपलब्ध होऊ शकत नाही, तेथे गोमूत्र-अर्क पाण्यात मिसळून वापरल्याने गोमूत्राएवढाच प्रभावी ठरतो. देशी गायींपासून बनवलेला आणि प्रक्रिया केल्यामुळे अनेक दिवस टिकणारा सनातन गोमूत्र-अर्क उपलब्ध आहे
संपर्क : ९३२२३१५३१७

हिंदूंनो, गोवंशरक्षणासाठी निर्धार करा !

१. दैनंदिन जीवनात आपण गायीचे दूध, तूप, दही यांचा वापर करू.
२. गोमयापासून बनवलेले उटणे, साबण, उदबत्ती यांचा वापर करू.
       हिंदूंनो, लक्षात घ्या, मागणी वाढली की, पुरवठा वाढतो, हे अर्थकारण आहे. गायीचे दूध, गोमय, गोमूत्र यांपासून बनवलेल्या वस्तूंची मागणी वाढली की आपोआप गोपालनही वाढेल.

गोहत्येचे प्रायश्‍चित्त म्हणून व्याघ्र किंवा पिशाच योनीत जन्म घ्यावा लागणे !

       त्या ठिकाणी तुझ्या हातून गोहत्या घडली आहे, त्या हत्येचे प्रायश्‍चित्त तुला भोगले पाहिजे. ते प्रायश्‍चित्त म्हणजे व्याघ्र किंवा पिशाच योनीत जन्म घेणे, हे होय. यापैकी तुला कोणते मान्य आहे, ते सांग ? असे यमराज बोलला. ते ऐकून मी विचार केला की, व्याघ्र योनी स्वीकारल्यास आपल्याला ज्ञान रहाणार नाही आणि त्या योनीत आणखीही नवनवीन हत्यारूपी पातकांचा संचय वाढत जाईल. ती योनी स्वीकारण्यापेक्षा पिशाच योनी स्वीकारणे चांगले; कारण त्या योनीत पूर्वकर्मांचे ज्ञान रहाते, नवीन चांगली कर्मे करून पुण्य संपादण्याचे ज्ञानही असते. त्यामुळे रुद्रगणापर्यंत जाऊन मिळवता येते. हा सर्व विचार करून मी यमधर्माजवळ ही योनी मागितली. या योनीत प्राणी अधिकाधिक १० सहस्र वर्षांपर्यंत जगतात. मला ही योनी प्राप्त होऊन २६६ वर्षे झाली, तेव्हापासून माझ्या दुष्कृत्याविषयी पश्‍चाताप करत लोकांवर जितके उपकार करता येईल, तितके करण्याविषयी झटत राहून मी दिवस घालवत आहे. - एक पिशाच्च

गोहत्या हे महाविनाशाचे आणि दुःखाचे कारण !

         काही वर्षांपूर्वी इंग्लंडमधून निर्यात होणार्‍या गोमांसाच्या सेवनाने पश्‍चिमी (युरोपीय) देशांमध्ये वेडेपणाचा रोेेग (मॅड काऊ रोग) पसरला होता. त्यामुळ लाखो गायींना भूमीमध्ये पुरले गेले होते. गायीमध्ये आईसारखी ममता, करुणा आणि वात्सल्य आहे. ती मानवमात्राचे हित करणारी आहे. त्या गोमातेचा पशूवधगृहांमध्ये प्रतिदिन लाखोंच्या संख्येने होणारा वध हा महाविनाश, नैसर्गिक असंतुलन, पूर, भूकंप, अतिवृष्टी, अनावृष्टी, हिंसा आणि क्रूरता इत्यादींचे प्रमुख कारण आहे. पशूवधगृहामध्ये निष्ठूरपणे केल्या जाणार्‍या हत्येमुळे, त्यांच्या करुण कंदनाने आणि चित्काराने संपूर्ण देशामध्ये एक नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते. गोहत्या हे महाविनाशाचे आणि दुःखाचे कारण आहे. 
(साप्ताहिक व्रजधारी, २४.२.२०११)

सनातनची ग्रंथसंपदा ऑनलाईन खरेदी करा !

सनातनच्या विक्रीकेंद्रांवर 
आणि वितरकांकडे उपलब्ध असलेले 
ग्रंथ आता SanatanShop.com वरही उपलब्ध !
विशिष्ट मूल्याच्या खरेदीवर विनामूल्य घरपोच सेवा !
स्थानिक वितरकाचा संपर्क : ९३२२३ १५३१७
नमो गोभ्यः सौर भेयीभ्य एवच ।
नमो ब्रह्मनुताभ्यश्च पवित्राभ्यो नमो नमः ॥
अर्थ : गायीला नमस्कार असो. सुरभी या देवांच्या गायींना (कामधेनूंना) नमस्कार असो. ब्रह्मादी देवता जिचे पूजन करतात, त्या पवित्र गायीला नमस्कार असो.

हिंदु धर्मशास्त्रातील अन्नदानाचे अनन्यसाधारण महत्त्व जाणून राष्ट्र-धर्म कार्यासाठी निष्काम आणि समर्पित वृत्तीने सेवा करणार्‍या सनातन आश्रमांतील शेकडो साधकांच्या अन्नदानाकरता धनरूपात साहाय्य करा !

वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
    राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध असणारी अन् त्यासाठी प्रभावीपणे कार्य करणारी सनातन संस्था ही एकमेव संस्था आहे. भारतात विविध ठिकाणी संस्थेचे आश्रम आहेत. तेथे अध्यात्म आणि धर्मशिक्षण यांविषयी ज्ञान देणारे ग्रंथ, नियतकालिके, ध्वनीचित्र-चकती यांच्या निर्मितीची सेवा चालू असते. हिंदु राष्ट्र स्थापनेचे उद्दिष्ट समोर ठेवून निष्काम आणि समर्पित वृत्तीने अखंड सेवारत असलेलेे शेकडो साधक आश्रमांत वास्तव्याला असतात. त्यांच्यासाठी अन्नदानाकरता धनरूपात साहाय्य करून आध्यात्मिक लाभ मिळवण्याची सुवर्णसंधी धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांना उपलब्ध आहे.
१. हिंदु धर्मशास्त्रानुसार अन्नदानाचे महत्त्व
     हिंदु धर्मशास्त्रानुसार जो गृहस्थ अर्थार्जन करतो आणि ज्याच्या घरी अन्न शिजते, त्याने अन्नदान करणे हे त्याचे कर्तव्यच आहे. अन्नदानामुळे भोक्ता तृप्त होऊन आशीर्वाद देतो; म्हणून अन्नदान करणे हे श्रेष्ठ कर्म मानले जाते. अन्नदान केल्यास कोणत्या ना कोणत्या रूपाने अन्नदानाच्या दुप्पट फळ अन्नदात्याला मिळते; परंतु अहंपोटी अन्नदान केल्यास फळ निम्मे होते. त्यामुळे धर्मकर्तव्य समजून अन्नदान करणे आवश्यक आहे.
२. साधकांना अन्नदान करणे, म्हणजे सत्पात्रे दानच !
     भिकारी, गरीब यांना अन्नदान केल्यास अक्षय्य सुख मिळते; परंतु अन्नदान सत्पात्रे दान असेल, तर अन्नदात्याचा पातकांतून उद्धार होऊन तो ईश्‍वराजवळ जातो, असे धर्मशास्त्र सांगते. सनातनच्या आश्रमांतील साधकांनी राष्ट्र-धर्म यांसाठी स्वतःचे जीवन समर्पित केले आहे. त्यांतील काही जण संतपदाला पोचले असून बरेच जण त्या दिशेने वाटचाल करत आहेत. आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत व्यक्तींसाठी अन्नदान करणे सत्पात्रे दानच ठरते !

सनातनच्या विविध आश्रमांमध्ये खालील उपकरणांची आवश्यकता !

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक 
आणि धर्माभिमानी यांना नम्र विनंती !
        सनातनच्या विविध आश्रमांमध्ये शेकडो साधक पूर्णवेळ साधना करत आहेत. राष्ट्र-धर्म यांच्या कार्यासाठी अधिकाधिक वेळ देता यावा, यासाठी पूर्णवेळ साधनेस आरंभ करणारे साधक, तसेच राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सध्या आश्रमांमध्ये खालील उपकरणांची तातडीने आवश्यकता आहे. 
       जे वाचक, हितचिंतक अथवा धर्माभिमानी वरील उपकरणे विकत घेण्यासाठी धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी श्री. विनायक आगवेकर यांना vaastunirmiti@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा ०८४५१००६०३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
        धनाच्या त्यागाद्वारे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्याची संधी दवडू नका !

२८ मे या दिवशी भिवंडी येथे हिंदु धर्मजागृती सभा

स्थळ : वर्‍हाळदेवी माता मंगल भवन, कामतघर, भिवंडी
शनिवार, २८ मे २०१६
वेळ : सायं ६ वाजता
संपर्क क्रमांक :
९९८७०२७४२७/
९९८७१२४५५९
हिंदूंनो, या धर्मजागृती 
सभेस प्रचंड संख्येने उपस्थित रहा !

गायीचे ध्यान करतांना करावयाची प्रार्थना

गावो ममाग्रतः सन्तु गावो मे सन्तु पृष्ठतः
गावो मे हृदये नित्यं गवां मध्ये वसाम्यहम् ॥
अर्थ : श्रीकृष्ण सांगतात, माझ्या समोर गायी असोत, पाठीमागे असोत, हृदयात नित्य असतात व गायींमध्येच मी असतो.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल पौर्णिमा झाली.
        आगामी भीषण काळात हिंदूंचे अस्तित्व टिकून रहाण्यासाठी त्यांचे धार्मिक, शारीरिक आणि मानसिक बळ वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदु जनजागृती समिती धर्मशिक्षणवर्ग आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग सर्वत्र चालू करत आहे. - श्री. विनय पानवळकर, धर्मशक्ती सेना

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला न उमजणे, 
स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था आल्यास तो जीव
 ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.
भावार्थ : दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. स्वतःचे स्वतःला न उमजणे म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

शिक्षणात साधना न शिकवल्याचा परिणाम म्हणजे देश रसातळाला गेला आहे आणि हिंदु राष्ट्रच रामराज्य असेल !

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
सर्वधर्मसमभाव, बुद्धीप्रामाण्यवाद इत्यादी विचारसरणींची सर्वपक्षीय सरकारे शाळेत साधना न शिकवता भाषा, गणित, इतिहास, भूगोल, विज्ञान इत्यादी प्रत्यक्ष जीवनात काही उपयोग नसलेले विषय शिकवतात. पुढे परिणामस्वरूप भ्रष्टाचार, व्यसने, गुंडगिरी, बलात्कार इत्यादी वाढल्यावर सरकारे त्यांवर वरवरचे उपाय करण्याचा हास्यास्पद प्रयत्न करतात. यामुळे राष्ट्र अधोगतीच्या चरमसीमेवर आले आहे. याउलट हिंदु राष्ट्रात साधना शिकवली जाणार असल्याने कोणाच्याही मनात अयोग्य कृती करावी, असा विचारही येणार नाही. त्यामुळे रामराज्याची स्थापना पुन्हा झालेली असेल.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गोरक्षणाच्या दृष्टीने प्रेरणादायी विचार

* गाय सोडून इतर कोणत्या जिवाचे मल-मूत्र सात्त्विक आहे ? माणसाचे तरी आहे का ? 
* भारतात इतके कायदे असतांना कायद्याचे राज्य नाही. असे असतांना गोवंश हत्या बंदीच्या कायद्याची अंमलबजावणी होईल का ? 
* गोहत्या आणि गोरक्षकांवरील हल्ले अशा घटनांचा हिंदू कधी प्रतिशोध घेत नाहीत, तर केवळ मारच खातात, याची कसायांना खात्री आहे ! 
* गोहत्या आणि गोरक्षकांवर आक्रमणे होतात, यांविषयी काही न वाटणारे हिंदूही जगण्याच्या लायकीचे नाहीत ! जेथे गोहत्या आणि गोरक्षकांवर आक्रमणे होतात, ते आसुरी राज्य आहे, ते नष्ट करून देवराज्य हिंदु राष्ट्र स्थापूया !

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

बुद्धीवाद संपल्यावर ईश्‍वरी शक्तीच्या उत्क्रांतीचा उगम होणे 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
बुद्धीवादाच्या मर्यादा जेथे संपतात, तेथेच ईश्‍वरी शक्तीच्या उत्क्रांतीचा उगम होतो. इथेच मनुष्य आध्यात्मिक विचार करू लागतो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विशद केलेले गोरक्षणाच्या कार्याचे महत्त्व

परात्पर गुरु डॉ. आठवले
१. गायीचे महत्त्व 
     बेलपत्रात शिवतत्त्व, तुळशीत विष्णुतत्त्व आणि जास्वंदीमध्ये गणेशतत्त्व असते. अशा प्रकारे विविध देवतांची तत्त्वे विविध वनस्पतींत असतात. ती ती वनस्पती त्या त्या देवतेला वाहिली की, त्या त्या देवतेचे तत्त्व संबंधित वनस्पतीद्वारे आपल्याला मिळते, उदा. शिवाला बेलपत्र वाहिले की बेलपत्रात शिवतत्त्व आकृष्ट होऊन आपल्याला मिळते. विविध वनस्पतींच्या तुलनेत गाय सर्वांत महत्त्वाची आहे; कारण तिच्यात ३३ कोटी देवतांची तत्त्वे आहेत आणि ती आपल्याला तिचे दूध, मूत्र, शेण इत्यादी माध्यमांतून मिळतात. यामुळे गाय मानवासाठी अतिशय महत्त्वाची आहे.

एक उत्तरदायी नागरिक !

संपादकीय 
      प्रसिद्ध चित्रपट अभिनेते ऋषी कपूर यांनी देशातील वस्तूस्थितीवर बोट ठेवले आहे. जे संसदेत आणि विधानसभेत बसणार्‍या लोकप्रतिनिधींना आजपर्यंत जमले नाही, ते त्यांनी केलेले आहे. देशाच्या अनेकविध संपत्तींना गांधीघराण्यातील व्यक्तींची नावे का ? देशाची संपत्ती त्या घराण्याला स्वतःची वाटते का ? असा प्रश्‍न त्यांनी केला आहे. केवळ देहली शहरातील तब्बल ६४ ठिकाणांना गांधी कुटुंबियांची नावे देण्यात आलेली आहेत.

सिंहस्थपर्वाची सांगता !

संपादकीय
     २२ एप्रिल या दिवशी चालू झालेला हिंदूंचा उज्जैन येथील सिंहस्थपर्व सोहळा २१ मे या दिवशी अमृत स्नानाने समाप्त झाला. जगभरातील अनुमाने ७ कोटी भाविकांनी या स्नानाचा लाभ घेतला. या आकडेवारीवरून लक्षात येणारे सूत्र म्हणजे भारतात ९० कोटी हिंदू असूनही केवळ १० टक्के हिंदूंनीही या सोहळ्याचा लाभ घेतला नाही. काय कारण असू शकते या दुःस्थितीचे ? हिंदूंची हलाकीची कौटुंबिक आर्थिक स्थिती कि या भव्य जागतिक सोहळ्याविषयीची अनभिज्ञता कि धर्मशिक्षणाचा अभाव ? काय अर्थ रहातो त्या आम्ही हिंदु म्हणून मिरवण्याला ? हिंदु म्हणवून घेणे म्हणजे हिंदु संस्कृती जपणे, असा साधा अर्थ आहे. संस्कृतीची जपणूक करण्याचे दायित्व हिंदूंचेच आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn