Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

सिंहस्थपर्वात स्नान करण्याच्या मागणीवरून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे उपोषण

अनुमती न मिळाल्यास २१ मेच्या रात्री ८ वाजता प्राणत्याग करणार !
  • प्राणत्याग करून सरकार जागे होणार नाही. त्याऐवजी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे. यासाठी हिंदूंनी संघटितपणे संत आणि साध्वी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाण्याची आवश्यकता आहे !
  • १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी संजय दत्त याला शिक्षा भोगतांना पत्नीच्या आजाराच्या कारणावरून जेथे महिनाभराची सुट्टी मिळते, तेथे आरोप सिद्ध न झालेल्या; परंतु अटकेत असलेल्या संतांना आणि धर्माभिमान्यांना सिंहस्थपर्वातील स्नानासाठी जामीन मिळायला हवा !
      उज्जैन - येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वात स्नान करण्याची मागणी करत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी १६ मेपासून रुग्णालयात उपोषणाला प्रारंभ केला. तसेच ही मागणी मान्य व्हावी यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेद्र मोदी यांना पत्रही पाठवले आहे. अनुमती न मिळाल्यास २१ मेच्या रात्री ८ वाजता प्राणत्याग करणार, असे त्यांनी घोषित केले आहे.
१. साध्वी प्रज्ञासिंह येथील खुशीलाल आयुर्वेदीक रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. सिंहस्थ पर्वात स्नान करण्यास अनुमती मिळावी, यासाठी त्यांनी देवास न्यायालयातही अर्ज केला होता.

भारत-बांगलादेश सीमेवर एका सोने तस्कराला मारल्याच्या प्रकरणी ७ सैनिक निलंबित

केंद्रसरकारकडून सैन्याचे खच्चीकरण !
केंद्रसरकार जनतेचे कि तस्करांचे ?
     ढाका - भारत-बांगलादेश सीमेवर १४ मे या दिवशी सोने तस्करांच्या तावडीत सापडलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या एका सैनिकाची सुटका करतांना केलेल्या गोळीबारात एक तस्कर मृत्यूमुखी पडला; म्हणून दलाच्या ७ सैनिकांना निलंबित करण्यात आले आहे.
१. १४ मे या दिवशी सकाळी १० वाजता भारत-बांगलादेश सीमेवर बंगालच्या कृष्णानगर जिल्ह्यातील बनपूर येथे
२४ तस्करांची एक टोळी सीमा सुरक्षा दलाच्या तुकडीला आढळून आली. (२४ तस्करांची टोळी येथे कार्यरत असतांना त्यांच्यावर कारवाई करणार्‍या सैनिकांना उत्तेजन देण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करणारे शासन काय कामाचे ! - संपादक)
२. त्यांना चेतावणी दिली असता तस्कारांनी प्राणघातक शस्त्रे दाखवून सुरक्षा दलाच्या सावंत या सैनिकास घेरले. या वेळी सावंतकडे केवळ एक लाठी होती. (यावरून सैनिकांना सरकारने आवश्यक शस्त्रेही पुरवली नसल्याचे लक्षात येते ! असे सरकार जनतेचे काय रक्षण करणार ? - संपादक)

सिंहस्थपर्वाचे पावित्र्य अल्प करून रज-तम वातावरण पसरवणार्‍या तथाकथित आध्यात्मिक संस्था, संप्रदाय आणि साधू !

सिंहस्थपर्वातील धर्महानी !
विशेष प्रतिनिधी 
श्री. अरविंद पानसरे, उज्जैन
     उज्जैन - सिंहस्थपर्वात भाविक राजयोगी (शाही) स्नान करून पुण्य प्राप्तीसाठी, तसेच साधूसंतांचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात. ठिकठिकाणी साधूसंतांच्या मांडवांमध्ये दिवसभर दर्शनासाठी, तसेच त्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी सहस्रावधी लोकांची गर्दी असते. तेथे यज्ञयागही चालू असतात; मात्र असे पवित्र वातावरण दूषित करण्याचे काम काही तथाकथित धार्मिक संस्थेतील लोकांकडून होत आहे. सर्वांना प्रवचन ऐकण्यासाठी लावलेल्या ध्वनीक्षेपकावर हिंदी चित्रपटाची अश्‍लील गाणी लावणे आदी प्रकार करत आहेत. त्यामुळे आपण सिंहस्थपर्वात आलो आहोत कि एखाद्या जत्रेला, असा प्रश्‍न येणार्‍या भाविकांना पडत आहे.

सिंहस्थपर्वातून परतणार्‍या भाविकांकडून वसूल केले जात आहे ५ रुपये अतिरिक्त भाडे !

भाजप सरकारच्या रेल्वे प्रशासनाचे हिंदुद्रोही कृत्य !
अन्य धर्मियांच्या सणाला असे कर लावण्याचे धाडस रेल्वे प्रशासन करणार का ?
     उज्जैन - येथे सिंहस्थ पर्वासाठी आलेले भाविक परत जात असतांना रेल्वे प्रशासन त्यांच्याकडून सरचार्ज म्हणून ५ रुपये अधिक वसूल करत आहे. ही भाविकांची आर्थिक लुबाडणूक आणि फसवणूक आहे, असे सामाजिक कार्यकर्ता जयप्रकाश शर्मा यांनी सांगितले. पहिल्या अमृतस्नानाला अपेक्षित गर्दी नसल्याने खूप सवलती देऊन भाविकांना सिंहस्थाला येण्याचे निमंत्रण राज्यातील भाजप सरकारकडून दिले जात आहे; मात्र केंद्राच्या रेल्वे प्रशासनाकडून सरचार्जच्या (अतिरिक्त भाड्याच्या) नावाखाली अधिकची रक्कम लुबाडली जात आहे, ही गोष्ट भाजपची दुटप्पी भूमिका दर्शवते, असे ते म्हणाले.

केव्हाही पडू शकते पुरी येथील जगन्नाथ मंदिर ! - पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍याची चेतावणी

ही स्थिती येईपर्यंत पुरातत्व खाते झोपले होते का ?
याला उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे !
     पुरी (ओडिशा) - भारतीय पुरातत्व खात्याच्या तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष जी.सी. मित्रा यांनी म्हटले आहे की, पुरी येथील जगन्नाथ मंदिर केव्हाही पडू शकते. त्यावर तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत, तर प्राचीन मंदिर नष्ट होऊ शकते. या चेतावणीनंतर मित्रा यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे.
     राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून या संदर्भात तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. त्यांनी यात म्हटले आहे की, पुरातत्व खात्याच्या हलगर्जीपणामुळे राज्यातील धर्मप्रेमींच्या भावना दुखावल्या जात आहेत. पुरातत्व खाते काम चालू करते; मात्र वेळेत पूर्ण करत नाही.
     या संदर्भात देहलीमध्ये पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा, पुरातत्व खात्याचे महासंचालक आणि अन्य अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात सांस्कृतिक मंत्रालयाच्या सचिवांच्या नेतृत्वाखाली एक पथक पुरी येथे दौरा करणार असल्याचे निश्‍चित झाले. धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, मंदिराच्या दुरुस्तीसाठी पैसा कमी पडू देणार नाही, कारण हा विषय कोट्यवधी लोकांच्या आस्थेशी संबंधित आहे.

उज्जैन सिंहस्थपर्वातील मांडव रिकामा होताच चोरट्यांकडून साहित्य लंपास !

  • मांडव सोडण्यापूर्वी अधिकार्‍यांना सूचित करण्याची प्रशासनाची साधूसंतांना सूचना !
  • १२ कोटी रुपयांच्या पाण्याच्या टाक्यांवर चोरांची वक्रदृष्टी !
आंधळं दळतंय अन् कुत्र पीठ खातंय अशी मध्यप्रदेश शासनाची अवस्था !
     उज्जैन - येथील सिंहस्थपर्व संपण्यासाठी अवघे ७ दिवस शेष राहिले आहेत. २१ मे या दिवशी सिंहस्थपर्वातील शेवटचे राजयोगीस्नान आहे. त्यानंतर सर्वजण आपापल्या प्रदेशात जातील. सदावल मार्गावरील नारायण विष्णु दंडी स्वामी यांच्या मांडवात थांबलेले सर्व साधूसंत निघून गेले आहेत. मांडव रिकामा झालेला पाहिल्यावर चोरट्यांनी तेथे डल्ला मारला. या मांडवात मध्यप्रदेश शासनाने पुरवलेले सर्व साहित्य गोळा करून चोरटे पसार झाले. चोरटे पाण्याच्या मोठ्या प्लास्टिकच्या टाक्या घेऊन जाण्याच्या बेतात असतांना प्रशासनाचे अधिकारी तेथे पोेचले. त्या वेळी आम्ही बांधकाम ठेकेदार आहोत, असे सांगितले. तथापि अधिकार्‍यांनी चोरट्यांकडील शासनाचे साहित्य पहाताच चोरट्यांंनी अधिकार्‍यांना धक्का देऊन पलायन केले.

८० टक्के काळा पैसा भारतातच ! - योगऋषी रामदेवबाबा


     नवी देहली - केवळ १०- २० टक्के काळा पैसा परदेशात असून उर्वरित ८० टक्के काळा पैसा देशातच आहे, असा दावा योगऋषी रामदेवबाबा यांनी केला आहे. हा पैसा देशात परत आणू न शकलेल्या अकार्यक्षम सरकारमुळे लोकांमध्ये निराशा निर्माण होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
योगऋषी रामदेवबाबा पुढे म्हणाले की,
१. आजकाल मी जिथे जातो तिथे लोक मला विचारतात की, बाबा काळा पैसा कुठे आहे ? हो मी मान्य करतो की, अजून काळा पैसा परत आलेला नाही. त्यामुळेच तो परत आणण्यासाठी मी एक नवे धोरण बनवले आहे.
२. खाणकाम, सोने, भूमी, राजकारण आणि अमली पदार्थ या क्षेत्रांत सर्वाधिक काळा पैसा आहे. जर आपण या ५ क्षेत्रांतील काळ्या पैशाला लगाम घातला, तर आपल्या अर्थव्यवस्थेसाठी लाभदायक ठरेल.
३. बँकिंग क्षेत्रावरदेखील लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.
४. गेल्या १५ वर्षांत एकदाही माझा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी वाद झालेला नाही. मी २-३ महिन्यांतून एकदा त्यांच्याशी बोलतो. मला जर देशासंबंधी एखाद्या महत्त्वाच्या सूत्रावर सल्ला द्यायचा असेल, तर मी जेटलींशीसुद्धा बोलतो. मी काळ्या पैशाच्या सूत्रावर त्यांच्याशी बोललो आहे.

योगदिनाच्या दिवशी ॐचा उच्चार बंधनकारक ! - केंद्रीय आयुष मंत्रालयाचा आदेश

केंद्रशासनाने गेल्या वर्षी केलेली चूक सुधारली !
ॐला योगासनांतून वगळणे हे माणसाच्या देहातून चेतना काढून घेण्यासारखे आहे. ॐविरहित 
योगासने म्हणजे योगासने केल्याचा केवळ देखावा, त्यापासून व्यक्तीला काहीच लाभ नाही !
मुसलमानांचा विरोध !
     नवी देहली - २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून गेल्या वर्षापासून साजरा करण्यात येत आहे. गेल्या वर्षी योगासनांमधून ॐचा उच्चार अन्य धर्मियांच्या भावना जपण्यासाठी केंद्रशासनाकडून काढण्यात आला होता; मात्र त्याला झालेल्या विरोधानंतर या वर्षी केंद्रीय आयुष मंत्रालयाने ॐचा उच्चार करणे बंधनकारक केले आहे. यामुळे अन्य धर्मियांकडून त्याला विरोध केला जात आहे.
१. आयुष मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, योगदिनी ४५ मिनिटांचा कार्यक्रम केला जाईल. त्यात ६ मिनिटे मान आणि खांदे यांची आसने, २ मिनिटे प्रार्थना आणि त्यानंतर २३ योगासने करण्यात येणार आहेत.
२. अभिनेता अनुपम खेर यांनी केंद्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, ज्यांना ॐचा उच्चार करायचा नाही, ते अन्य काही बोलू शकतात. काही जण प्रत्येक गोष्टीचे राजकारण करू इच्छितात.

सनातन संस्थेच्या प्रदर्शनास जागा देणारे स्वामी नारायण संप्रदायाचे पू. निरन्नमुक्तदासजी स्वामी (वकील स्वामी) !

पू. निरन्नमुक्तदासजी स्वामी (वकील स्वामी) यांचे 
आभार व्यक्त करतांना पू. (कु.) स्वाती खाडये
    उज्जैन - येथील सिंहस्थपर्व क्षेत्रात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रदर्शन लावण्यात आले आहे. या वेळी सनातनच्या साधकांनी विनंती केल्यावर जवळच असलेल्या स्वामी नारायण संप्रदायाचे पू. निरन्नमुक्तदासजी स्वामी (वकील स्वामी) यांनी स्वतःच्या मांडवात लगेच प्रदर्शन लावण्याची अनुमती दिली. त्यासह सकाळ आणि संध्याकाळ सर्व साधकांसाठी ते नि:शुल्क चहाची व्यवस्था करत आहेत.
     पहिल्या राजयोगी (शाही) स्नानानंतर वादळी पाऊस झाल्यामुळे स्वामी नारायण संप्रदायाच्या मंडपाला त्याची झळ पोहोचली होती. त्यामुळे एक दिवस त्यांना चहाची व्यवस्था करता आली नव्हती. याविषयीची खंत वकील स्वामी यांच्या बोलण्यातून जाणवली. खरे तर मोठी आपत्ती असल्यामुळे असे होणे साहजिक असतानांही त्याविषयी अपराधीपणा वाटणारे पू. निरन्नमुक्तदासजी स्वामी (वकील स्वामी) यांच्याविषयी कृतज्ञता वाटली. सनातनवर असलेले त्यांचे प्रेम यातून दिसून आले ! 
- श्री. आप्पासाहेब सांगोलकर, पंढरपूर, सोलापूर.

१५ सहस्र रुपयांची लाच घेतांना गुहागरचे तलाठी गजानन धावडे अटकेत

अशा लाचखोरांना त्यांच्या कुटुंबियांसमवेत कारागृहात पाठवा !
     गुहागर - सातबारा उतार्‍यावर सहहिस्सेदार म्हणून नावे लावण्यासाठी २० सहस्र रुपयांची लाच मागणारे येथील तलाठी गजानन धावडे यांना १५ सहस्र रुपयांची लाच घेतांना रत्नागिरीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी पकडले. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. 
     तक्रारदार यांची वडिलोपार्जित जमीन आहे. वडिलांच्या निधनानंतर तक्रारदाराच्या अन्य नातेवाइकांची नावे लागलेली होती; मात्र तक्रारदार आणि त्यांचे भाऊ यांची नावे सातबारा उतार्‍याला लागली नव्हती. ही नावे लावण्यासाठी त्याने तलाठी धावडे यांची भेट घेतली.

धर्मवीर संभाजी महाराजांचा आदर्श घेऊन हिंदु धर्माचे रक्षण करा ! - प्रा. श्रीकांत बोराटे

     निगडे (जिल्हा पुणे), १७ मे - धर्मवीर संभाजी महाराजांनी शेवटच्या क्षणापर्यंत अनन्वित अत्याचार सोसले. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता धर्माविषयी स्वाभिमान जागृत ठेवला, तसेच आपणही आपल्या धर्माप्रती स्वाभिमान आणि निष्ठा जागृत करून धर्मासाठी संघटित होणे आवश्यक आहे. त्यासाठी आज प्रत्येकाला धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे. धर्मवीर संभाजी महाराजांचा आदर्श घेऊन प्रत्येक हिंदूने आपल्या धर्माचे आणि संस्कृतीचे रक्षण करायला हवे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे प्रा. श्रीकांत बोराटे यांनी केले. ते धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. येथे चालणार्‍या धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमानी हिंदूंनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी निगडे गावातील ४० धर्माभिमानी उपस्थित होते. प्रारंभी श्री. किसन सुके यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. धर्मशिक्षण वर्गातील श्री. सचिन मालुसरे यांनी प्रास्ताविक केले, तर श्री. किशोर शेवाळे यांनी आभार मानले.

तारिहाळ (जिल्हा बेळगाव) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेने तणाव !

     बेळगाव, १७ मे (वार्ता.) - तारिहाळ येथे ८ दिवसांपूर्वीच प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली. अज्ञात समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातील तलवारीची मोडतोड करून ती लांबवली. ही घटना १६ मे या दिवशी कार्यकर्ते सकाळी पूजा करण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर गावात प्रचंड तणाव निर्माण झाला. गावातील सर्व व्यवहार त्वरित बंद करून ठिकठिकाणी रस्ते अडवण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकर्‍यांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. (विटंबना करणार्‍या धर्मद्रोह्यांना पोलीस तत्परतेने अटक न करता केवळ निषेध करणार्‍यांची समजूत काढतात. त्यामुळे हिंदूंनी पोलिसांवर विसंबून न रहाता समाजकंटकांविरुद्ध संघटित व्हावे. - संपादक)

(म्हणे) सी.पी.आर्. रुग्णालयासाठी १ कोटी रुपयांची तरतूद श्री महालक्ष्मी मंदिरातील दानपेटीतून करावी !

सी.पी.आर्. बचाव कृती समितीची जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी
मंदिरात भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेले दान हे धर्मकार्यासाठीच वापरले गेले पाहिजे.
 रुग्णालयाच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्याचे काम शासनाचे आहे !
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !
हिंदूंनो, मंदिरात जमा होणार्‍या धनाचा योग्य प्रकारे विनियोग 
होण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात देण्यासाठी शासनाकडे आग्रह धरा !
     कोल्हापूर - येथील छत्रपती प्रमिलाराजे (सी.पी.आर्.) शासकीय रुग्णालयाच्या विकासासाठी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरातील दानपेटीतील उत्पन्नातून १ कोटी रुपयांची तरतूद (प्रावधान) करावी, अशी मागणी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे सी.पी.आर्. बचाव कृती समितीने १६ मे या दिवशी निवेदनाद्वारे केली. या निवेदनाचा सकारात्मक विचार करण्याची ग्वाही जिल्हाधिकार्‍यांनी दिली.

शिवछावा शंभुराजे प्रतिष्ठानाकडून किल्ले शिवनेरीवर स्वच्छता मोहीम

     नवी मुंबई - नवी मुंबईतील शिवछावा शंभुराजे प्रतिष्ठानाकडून नुकतीच किल्ले शिवनेरीवर जलकुंड स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मोहिमेत संस्थापक श्री. सुनील सणस, अध्यक्ष श्री. अजित नवघणे, उपाध्यक्ष श्री. सागर बोबाटे आणि अन्य पदाधिकारी न् सदस्य कार्यरत होते. ही संपूर्ण मोहीम पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली झाली. पुरातत्व विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. या वेळी कार्यकर्त्यांनी परिसरातील प्लास्टिक कचरा आणि अन्य कचरा गोळा केला. तसेच गडावरील पाण्याच्या टाक्या स्वच्छ केल्या. राज्यातील अन्य किल्यांवरही हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, असे प्रतिष्ठानाच्या वतीने सांगण्यात आले. शिवछावा शंभुराजे प्रतिष्ठानने सर्व शिवप्रेमींनी शिवकार्यात सहभागी होऊन गडसंवर्धन मोहीम हातात घ्यावी, असे आवाहन केले आहे.

जूनपासून इंग्रजी शाळांचे अनुदान बंद न केल्यास भाजपवाल्यांना क्षमा नाही ! - प्रा. सुभाष वेलिंगकर

सांगे, गोवा येथे भारतीय भाषा सुरक्षा मंचची सभा !
सभेला उपस्थित मातृभाषाप्रेमी
     सांगे (गोवा), १७ मे (वार्ता.) - जे मातृभाषा पायदळी तुडवतात, सत्तेसाठी आईस्वरूप असलेल्या मातृभाषेच्या चारित्र्याचा सौदा करतात, अशा आमदारांमध्ये प्रजेसमोर ताठ मानेने फिरण्याची धमक आहे का ? ज्या ठिकाणी सत्य आहे, तेथे धर्म आहे. जेथे धर्म आहे, तेथेच ईश्‍वर आहे. येत्या जूनपासून इंग्रजी शाळांचे अनुदान बंद करा, नाहीतर परतीचा रस्ता धरा. भाजपवाल्यांना यापुढे क्षमा नाही. सत्ताधारी आमदारांना पोलिसांचा आधार घेतल्याशिवाय फिरणेच कठीण होणार आहे, अशी खणखणीत चेतावणी भारतीय भाषा सुरक्षा मंचचे (भाभासुमंचे)समन्वयक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या सांगे येथील सभेत दिली. सभेला २ सहस्रांहून अधिक मातृभाषाप्रेमी उपस्थित होते.

कोयना धरणात केवळ १५ टी.एम्.सी. पाणीसाठा !

     सातारा, १७ मे (वार्ता.) - पश्‍चिम महाराष्ट्राची पाण्याची तहान भागवणार्‍या आणि १०५ टी.एम्.सी. क्षमतेच्या कोयना धरणात केवळ १४.७९ टी.एम्.सी. इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. ७ जूनपर्यंत पाऊस न आल्यास वीजनिर्मितीसह पिण्याच्या पाण्याचीही गंभीर स्थिती निर्माण होणार आहे. चालू वर्षी १ जूनपासून अल्प पाऊस पडल्याने ८० टी.एम्.सी. पाणीसाठ्याची आवक झाली. त्यामुळे ३१ मेनंतर गंभीर परिस्थिती उद्भवण्याची दाट शक्यता आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

मागील ३ वर्षांत १५ वेळा धमक्या 
सातत्याने धमकीची पत्रे येणे, यावरून राज्यातील 
कायदा-सुव्यवस्थेचा गुन्हेगारांनी पोरखेळ केला आहे, हेच यावरून स्पष्ट होते. 
     नगर, १७ मे - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अंबादास लष्करे, रहाणार नेवासे या नावाच्या व्यक्तीने सहाव्यांदा जिवे मारण्याची धमकी एका पत्राद्वारे दिली आहे. गेल्या ३३ मासांत अण्णा हजारे यांना १५ वेळा गंभीर स्वरूपाच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्या धमकी पत्रात म्हटले आहे की, 'सुरेश जैन यांच्या विरोधातील न्यायालयीन खटला मागे घेण्यासाठी किती पैसे घेतले ? तसेच आपल्या पश्‍चात आपली संपत्ती कुणाच्या नावे करणार, हे पत्र मिळताच जाहीर करा.' याचसमवेत अण्णा हजारे यांना स्वार्थी, ढोंगी संबोधून आजारपणाचे नाटक करत असल्याचे पत्रात नमूद केले आहे. पत्राच्या शेवटी इंदिरा गांधींप्रमाणे गोळ्या घालण्याची धमकी देऊन अंबादास चिमाजी लष्करे, पांडे मिस्तरी, नारायण मापारी (रा. एटीएम् नेवासे) काळूराम ज्ञानेश्‍वर पिटेकर (नेवासे), या नावांसह भ्रमणभाष क्रमांकाचा उल्लेखही करण्यात आला आहे.

देशाचे खरे राष्ट्रपिता छत्रपती शिवाजी महाराज असतांना नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र का नाही ? - आचार्य आर्य जितेंद्रजी महाराज यांचा संतप्त प्रश्‍न

      सांगली  - मोहनदास गांधीची यांनी देशासाठी फार काहीतरी केले म्हणून सांगण्यात येते. प्रत्यक्षात त्यांनी काय केले हे देशापासून लपवून ठेवण्यात आले. गांधीजींमुळेच आज फाळणी आणि असंख्य समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यांना राष्ट्रपिता म्हणावे असे कोणतेही कार्य गांधीजींनी केलेले नाही. याउलट छत्रपती शिवाजी महाराज होते, म्हणून प्रत्येक हिंदू आज ताठ मानेने जगू शकतो. देशाचे खरे राष्ट्रपिता हे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यामुळे देशातील नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र का नाही, असा संतप्त प्रश्‍न आचार्य आर्य जितेंद्रजी महाराज यांनी उपस्थित केला. ते शिवतेज मंडळाच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित गणपती पेठ येथील जाहीर कार्यक्रमात बोलत होते. 
      या वेळी प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या हिंदु धर्मप्रसारक पू. साध्वी सरस्वती देवीजी, बह्मचारी अग्नीजी महाराज, डॉ. राजराजेश्‍वर महाराज यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मंडळाचे श्री. अंकुश जाधव यांनी केले. या वेळी आमदार श्री. सुधीर गाडगीळ, भाजपचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री. हणमंतराव पवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

म्हणे) 'साध्वी प्रज्ञासिंह यांना सोडणे अयोग्यच !'

धर्मांधांची तळी उचलणारे आणि हिंदुद्वेषाचा 
पोटशूळ उठलेले रामदास आठवले यांचा थयथयाट 
     पुणे, १७ मे - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांना ज्या सूत्रांंवर न्यायालयाने सोडले, त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एन्आयएच्या) विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. (वर्ष २००६ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुसलमान आरोपींना निर्दोष सोडण्यात आले, त्या वेळी रामदास आठवले यांनी असा प्रश्‍न उपस्थित केला होता का ? साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविषयीच्या वक्तव्यातून रामदास आठवले यांचा हिंदुद्वेषच प्रकट होतो ! - संपादक) यामध्ये भाजप शासनाकडून यंत्रणेचा अपवापर होत असल्याचे दिसते. (तत्कालीन काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात अन्वेषण यंत्रणेचा अपवापर होत असतांना आठवले गप्प का होते ? - संपादक) साध्वी प्रज्ञासिंहला सोडणे अयोग्यच असल्याची टीका 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'चे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी १६ मे या दिवशी एका पत्रकार परिषदेत केली.

गुप्तचर विभागाचा अभिनव भारत संघटनेत शिरकाव करण्याचा प्रयत्न फसला

धर्मांधांच्या संघटनांमध्ये नव्हे, तर राष्ट्र आणि धर्म प्रेमींच्या
 संघटनांमध्ये हेरगिरी करून वेळ वाया घालवणारा गुप्तचर विभाग !
     मुंबई - गुप्तचर विभागाच्या (आयबी) नवी देहलीतील युनिटने मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहित यांच्या अभिनव भारत संघटनेत शिरकाव करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍याला संघटनेच्या फरिदाबादमधील बैठकीत प्रवेशच मिळाला नाही. यामुळे हा प्रयत्न फसला. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एन्आयए) दाखल केलेल्या आरोपपत्रात ही माहिती देण्यात आली आहे. 

कोल्हापूरमध्ये सात नगरसेवकांचे जातीचे दाखले रहित करण्याच्या निर्णयाला स्थगिती !

महापालिकेकडून पोटनिवडणुकीची प्रक्रिया चालू ! 
     कोल्हापूर, १७ मे (वार्ता.) - महापौर सौ. अश्‍विनी रामाणे यांसह ७ नगरसेवकांचे जातीचे दाखले रहित करण्याच्या विभागीय जातपडताळणी समितीने दिलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयाने १६ मे या दिवशी स्थगिती दिली आहे. 

भारताच्या पृथ्वी-२ क्षेपणास्त्र चाचणीला पाकिस्तानचा आक्षेप !

जिहादी आतंकवादाला पोसणार्‍या पाकचा थयथयाट !
     इस्लामाबाद - संपूर्ण भारतीय बनावटीच्या पृथ्वी-२ या सुपरसॉनिक (ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक गतीचे) क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीला पाकने आक्षेप घेतला आहे. पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र सल्लागार सरताज अझीझ यांनी हे सूत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करणार असल्याचे सांगितले. या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येणार्‍या क्षेत्रामध्ये असंतुलन निर्माण होईल, असे अझीझ यांनी एका मुलाखतीत सांगितले. (पाककडून असा थयथयाट करणे काही नवीन नाही ! अर्थात् भारतामध्ये असंतुलन निर्माण करण्यासाठी पाकपुरस्कृत आतंकवादावर अझीझ काही बोलत नाहीत ! - संपादक)

पाकिस्तानमध्ये बलात्कार्‍यांना पोलिसांनी दिला १२ टन गहू देण्याचा दंड !

कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा झालेले इस्लामी राष्ट्र पाकिस्तान ! 
      इस्लामाबाद - पाकच्या सिंध प्रांतामधील उमरकोट जिल्ह्यात मुस्ताक मंगरियो आणि सुलेमान मंगरियो या दोघा भावांनी एका १४ वर्षांच्या मुलीवर केलेल्या बलात्काराच्या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता बलात्कार करणार्‍या या दोघांना १२ टन गहु मुलीच्या कुटुंबाला देण्याचा दंड सुनावला. या घटनेवर आशियातील मानवाधिकार संघटनेने स्वतः काहीही न करता केवळ सिंध शासनाला अनावृत्त पत्र लिहून जनतेला आवाहन केले की सरकारला कारवाई करण्यासाठी पत्र पाठवा. हे वृत्त दी इंडिपेंडेंट या दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. या वृत्तानंतर यापैकी एकाला अटक करण्यात आली, तर दुसर्‍याला सोडून देण्यात आले. आरोपी सिंध प्रांतातील मोठे जमीनदार असून त्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबातील १४ जणांना नोकरी दिल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथे होणारे बलात्कार कधीही समोर येत नाहीत, असे म्हटले जाते.

चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा कायदेशीर घटस्फोट

     पुणे - चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा वर्ष २०१४ कायदेशीर घटस्फोट झाला असल्याचे समोर येत आहे; मात्र सुनीता यांनी त्यांना फसवून घटस्फोट दिल्याचा आरोप केला आहे. मंजुळे यांची पत्नी धुणी-भांडी करून उदरनिर्वाह करत असल्याचे वृत्त चर्चेत होते. त्यावर घटस्फोटाचा खटला दाखल झाल्यावर सततच्या तारखांनी वैतागून गेल्याने सुनीता यांनी स्वाक्षर्‍या केल्याचे सुनीता यांचे वडील हरिश्‍चंद्र लष्करे यांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी बांधलेले स्वच्छतागृह गायब

     पिंपरी (पुणे), १७ मे - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने येथील अशोक चित्रपटगृहासमोर ४ वर्षांपूर्वी स्वच्छतागृह बांधले होते. त्यासाठी ९ लक्ष रुपये व्यय झाल्याचे पालिका अधिकार्‍यांकडून सांगितले जाते; परंतु प्रत्यक्षात तेथे स्वच्छतागृह नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून ठेकेदार आणि दोषी अधिकारी यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी भाजपचे कार्यकर्ते नेहुल कुदळे यांनी पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे. 

आधार क्रमांकाशी जोडल्याने पुणे शहर आणि जिल्ह्यात एकूण १ लक्ष खोट्या शिधापत्रिका आढळल्या

खोट्या शिधापत्रिका रहित करण्यासमवेत त्याचा अपलाभ घेऊन स्वस्तात धान्य 
घेऊन लुबाडणूक करणार्‍यांकडून त्याचे सव्याज पैसे वसूल करावेत, तसेच असे 
 अपप्रकार पुन्हा होऊ नयेत, यासाठी कठोर शिक्षा आणि उपाययोजना करायला हवी ! 
     पुणे, १७ मे - खोट्या शिधापत्रिकांना आळा घालणे आणि लाभार्थ्यांना थेट अनुदान मिळावे, यासाठी शिधापत्रिका आधार क्रमांकाशी जोडणी करण्याचे काम राज्यात चालू आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे ९ लक्ष शिधापत्रिकाधारक असून त्यातील ७२ प्रतिशत धारकांनी आधार क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यात सुमारे ४० सहस्र, तर पुणे शहरात ६० सहस्र शिधापत्रिका आढळून आल्या आहेत. (इतक्या मोठ्या प्रमाणात खोट्या शिधापत्रिका सिद्ध कशा झाल्या ? हे पुरवठा विभागाच्या वेळीच लक्षात का आले नाही ? एकूणच या प्रकरणात आर्थिक हितसंबंधाचा संशय आल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे शासनाने या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी. - संपादक) त्या सर्व शिधापत्रिका रहित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परिणामी त्या खोट्या शिधापत्रिकांवरील धान्य वाटप थांबवल्याने २० लक्ष किलो धान्याची बचत होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांनी दिली. 

इराणमध्ये इस्लामविरोधी कृत्यांमुळे ८ जणांना अटक

कुठे इस्लामविरोधी कृत्यांवरून संबंधितांवर 
कारवाई करणारा इराण, तर कुठे हिंदूंच्या धार्मिक भावना 
सातत्याने दुखावल्या जात असतांनाही निष्क्रीय रहाणारा भारत ! 
     तेहरान (इराण) - इस्लामविरोधी कृत्य केल्याच्या आरोपावरून ऑनलाईन मॉडेलिंग क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या ८ नागरिकांना इराणमध्ये अटक करण्यात आली आहे. 
१. इराणमध्ये सध्या महिलांकडून 'इन्स्टाग्राम' किंवा अन्य सामाजिक संकेतस्थळांवर हिजाब न वापरता (मस्तक आणि केस कपड्याने आच्छादून न घेता) प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या छायाचित्रांच्या विरोधात मोहिम चालू करण्यात आली आहे. 

मराठवाड्यात आतापर्यंत ४१८ शेतकर्‍यांच्या आत्महत्या

ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! 
     संभाजीनगर, १७ मे - मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. दुष्काळाच्या दाहकतेमुळे चालू वर्षाच्या १३ मेपर्यंत मराठवाड्यात ४१८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. शासनाकडून यातील १८७ आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आतापर्यंत साहाय्यता निधीचे वाटप करण्यात आले आहे. एकूण ४१८ शेतकर्‍यांपैकी २०१ शेतकर्‍यांची कुटुंबे शासनाकडून देण्यात येणार्‍या साहाय्यता निधीस पात्र, तर ९४ अपात्र ठरले आहेत. १२३ आत्महत्या प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहे. एप्रिल महिन्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्येची संख्या ३९० इतकी होती.

पाकचा जिहादी आतंकवादी मसूद अजहर याच्या विरोधात पुरावे असल्याने एन्आयएचे पथक पाकला जाण्याच्या सिद्धतेत !

पाककडून मसूद पोसला जात असतांना पाक त्याच्या विरोधातील गोळा केलेले पुरावे मान्य करील, 
असे म्हणणे केवळ दिवास्वप्नच नव्हे, तर दगडावर डोके आपटून घेण्यासारखेच आहे ! 
     नवी देहली - जानेवारी २०१६ मध्ये पठाणकोट विमानतळावर झालेल्या जिहादी आक्रमणाच्या प्रकरणी जिहादी आतंकवादी मौलाना मसूद अजहर विरोधात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अर्थात एन्आयएने काही पुरावे एकत्र केले आहेत. हे पुरावे घेऊन यंत्रणा पाकमध्ये जाऊ इच्छित आहे; परंतु त्यासाठी पाक शासनाच्या अनुमतीची आवश्यकता असल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. (भारतात फोफावलेला जिहादी आतंकवाद हा पाकपुरस्कृत असतांनाही आपण पाकच्या नाकदुर्‍या काढण्यात काय हशील ? उद्या यंत्रणेने पाकमध्ये जाऊन मसूद अजहरविरोधातील पुरावे सत्य असल्याचे सिद्ध केले, तरी भारताला काय लाभ होईल ? - संपादक) 
     मिळालेल्या माहितीनुसार, पुरावे एकत्रित करण्यासाठी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अमेरिकी अन्वेषण यंत्रणेसहित अन्य यंत्रणांशीही संपर्क साधला होता. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि अमेरिकी अन्वेषण यंत्रणा यांमध्ये या पुराव्यांसंदर्भात बैठकही झाली होती. सायबर पुरावे एकत्रित करण्यासाठी भारत अमेरिकी अन्वेषण यंत्रणेचे साहाय्य घेत आहे.

गुडगांवनंतर अन्य तीन शहरांची नावे पालटण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा केंद्रशासनाला सल्ला !

     नवी देहली - अहमदाबादचे नाव पालटून कर्णावती, हैद्राबादचे नाव पालटून भाग्यनगर आणि महाराष्ट्रातील औरंगाबादचे नाव पालटून संभाजीनगर करण्यात यावे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केंद्रशासनाला सुचवले आहे. एप्रिल २०१६ मध्ये हरियाणातील गुडगांवचे नाव पालटून गुरूग्राम करण्याविषयी संघाने भाजप राज्यशासनावर दबाव आणला होता. यावर शहरांची नावे पालटून संघ सांस्कृतिक दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, असे टीकाकारांचे म्हणणे आहे. संघाचे एक वरिष्ठ पदाधिकारी म्हणाले की, आम्ही शहरांना घुसखोरांनी दिलेल्या नावांनी नव्हे, तर पूर्वीच्या नावांनी ओळखतो. स्वतंत्र भारताच्या संस्कृतीविषयी आपल्याला अभिमान असायला हवा. 
       संघाने सुचवलेल्या नावांच्या सूचीमध्ये केरळचा ही समावेश आहे. हे नाव पालटून केरळम् करावे, असे यात म्हटले आहे.

देशांतर्गत अघोषित संपत्ती आणि काळा पैसा जाहीर करण्यासाठी ४ मासांची मुदत !

काळा पैसा धारकांना मुदत नको, तर त्यांची नावे जाहीर करून त्यांच्यावर त्वरित कारवाई हवी !
     नवी देहली - केंद्रशासनाने देशांतर्गत अघोषित संपत्ती आणि काळा पैसा जाहीर करण्यासाठी ४ मासांची मुदत दिली आहे. १ जून ते ३० सप्टेंबर असा या मुदतीचा कालावधी आहे. 
    याविषयी अर्थ मंत्रालयाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मुदतीच्या कालावधीत स्वेच्छेने अघोषित संपत्ती आणि काळा पैसा जाहीर करणारे लोक स्वत:वर होणारी दंडात्मक कारवाई टाळू शकतील. त्यासाठी त्यांना अघोषित संपत्ती आणि काळ्या पैशांच्या ४५ टक्के रक्कम आणि दंड प्राप्तिकर विभागाकडे जमा करावा लागणार आहे. त्यांची प्राप्तिकर कायदा किंवा संपत्ती कर कायदा या कायद्यांच्या अंतर्गत कोणतीही छाननी आणि चौकशी होणार नाही. ३० सप्टेंबरनंतर काळा पैसा जाहीर करणार्‍यांवर मात्र कर, अधिभार आणि दंड आकारला जाणार आहे. 
     शासनाने गत आर्थिक वर्षातही अशा प्रकारची मोहीम राबवली होती. त्या वेळी ६४४ लोकांनी ४ सहस्र १६४ कोटी रुपयांची संपत्ती घोषित केली होती. अशा व्यक्तींकडून ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत अनुमाने २ सहस्र ४२८ कोटी रुपयांचा कर आणि दंड वसूल करण्यात आला होता.

पूर्वी वाहतूक नियंत्रक दिव्याच्या ठिकाणी अडवल्याच्या कारणावरून वाहतूक पोलिसावर आक्रमण

कायदा आणि पोलीस यांचा धाक किती राहिला आहे, हेच यावरून दिसून येते !
     पुणे - पूर्वी वाहतूक नियंत्रक दिव्याच्या ठिकाणी अडवल्याच्या कारणावरून नितीन बापू जोगदंड यांनी साहाय्यक पोलीस फौजदार विरया सुतगुट्टी यांच्यावर आक्रमण केले. या वेळी जोगदंड यांनी सुतगुट्टी यांना अपशब्द वापरून त्यांना धक्काबुक्की केली, तसेच कट्यारसारख्या हत्याराने पोट आणि हात यांवर वार करून गंभीर घायाळ केले. ही घटना येथील बिबवेवाडी भागात १५ मे या रात्री घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नितीन जोगदंड याला अटक केली आहे.

फलक प्रसिद्धीकरता

पूज्यस्थानी असलेल्या साध्वींना असे उपोषण करावे लागते, हे हिंदूंसाठी लज्जास्पदच !
     उज्जैन येथे चालू असलेल्या सिंहस्थ पर्वात स्नान करण्याची मागणी करत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी १६ मेपासून रुग्णालयात उपोषणाला प्रारंभ केला. मागणी पूर्ण न झाल्यास २१ मेच्या रात्री ८ वाजता प्राणत्याग करणार असल्याचे त्यांनी घोषित केले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Ujjain Sinhasth snanki anumatike liye Sadhvi Pragya Singhji uposhanpar; pran tyagne ki chetavni di .
     Hinduo, unki mang puri honetak Sarkarpar dabav banao
जागो ! : उज्जैन सिंहस्थ स्नान की अनुमति के लिए साध्वी प्रज्ञासिंहजी उपोषण पर; प्राण त्यागने की चेतावनी दी.
     हिन्दुओ, उनकी मांग पूरी होने तक सरकार पर दबाव बनाओ !

पाणी येत नसल्याची तक्रार करणार्‍या नागरिकाला मनसे नगरसेवकाकडून मारहाण

     पुणे, १७ मे - शहरातील कसबा पेठेत गेल्या २ दिवसांपासून पाणी येत नसल्याची तक्रार करायला गेलेल्या तुषार माधव निजामपूरकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या कार्यकर्ते यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना त्यांच्या कार्यालयातच १५ मे या दिवशी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी निजामपूरकर यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार धंगेकर यांच्यासह अन्य दोघांवर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा प्रविष्ट केला आहे. (असे लोकप्रतिनिधी कायद्याचे राज्य देतील का ? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकाने असे वागणे, हे पक्षाला काळिमा फासण्यासारखेच आहे. अशांना पक्ष बाजूला करून नैतिकतेचे धडे देईल का ? - संपादक) 

गुरुवारी मिरज येथे सांगली जिल्हा वारकरी संप्रदाय सेवा मंडळाचा पाचवा वर्धापन सोहळा !

     मिरज, १७ मे (वार्ता.) - सांगली जिल्हा वारकरी संप्रदाय सेवा मंडळाचा पाचवा वर्धापन सोहळा १९ मे या दिवशी नदीवेस विठ्ठल मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सकाळी १० वाजता प्रारंभ होईल. या मेळाव्यात पैठण येथील अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज यांना पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते वारकरी भूषण पुरस्कार देण्यात येईल. या वेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब डांगे, आमदार श्री. सुरेश खाडे, संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प. रघुनाथ रामचंद्र पाटील, मुमुक्षू मंदिराचे डॉ. चिदानंद चिवटे, तसेच जिल्ह्यातील अनेक वारकरी उपस्थित रहाणार आहेत.

मुंबईतील १३ प्रतिशत अपघात दुचाकींमुळे

     मुंबई - यंदाच्या वर्षातील पहिल्या तीन महिन्यात मुंबईत ६ सहस्र ४०० अपघात झाले असून त्यातील १३ प्रतिशत अपघात दुचाकींमुळे झाले आहेत, अशी आकडेवारी पुढे आली आहे. याची गंभीर नोंद घेऊन वाहतूक पोलिसांनी रस्ते सुरक्षिततेकडे अधिकाधिक लक्ष पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.

मायावतींना श्री दुर्गादेवीच्या, तर पंतप्रधान मोदींना राक्षसाच्या रूपात दाखवले !

देवतांचा अवमान रोखण्यासाठी केंद्रशासनाने कठोर कायदा बनवावा, ही हिंदूंची मागणी आहे !
सामाजिक संकेतस्थळांवरून दुर्गादेवीचे विडंबन
     देहली - सध्या सामाजिक संकेतस्थळावर एक छायाचित्र प्रसारित होत आहे. यामध्ये मायावती यांना श्री दुर्गादेवीच्या रूपामध्ये, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राक्षसाच्या रूपात दाखवले आहे. बहुजन समाज पक्षाचे (बसपचे) चिन्ह असलेल्या हत्तीने मोदींच्या मानेवर तलवार धरली आहे. तसेच या छायाचित्रात सरसंघचालक मोहन भागवत मायावतींच्या समोर हात जोडून उभे असल्याचे दाखवले आहे. यामुळे वाद निर्माण झाला आहे. 
   यापूर्वी बसपच्या कार्यकर्त्यांनी एप्रिल मासामध्ये एका फलकावर केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांचे शिर हातात घेतलेल्या मायावतींना देवी कालीच्या रूपात दाखवले होते. यामुळेही वाद निर्माण झाला होता.

पर्यावरणाला होणार्‍या हानीमुळे ऑस्ट्रेलिया १ सहस्र ९०० कांगारूंना ठार करणार !

कुठे पर्यावरणाच्या रक्षणासाठी देशाची ओळख असणार्‍या प्राण्याला ठार करणारा ऑस्ट्रेलिया, तर 
कुठे मनुष्याच्या मृत्यूला कारण ठरणार्‍या बेवारस कुत्र्यांना ठार करण्यावर बंदी घालणारा भारत ! 
     मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) - ऑस्ट्रेलिया म्हटले की प्रथम डोळ्यांसमोर येतो तो कांगारू प्राणी! मात्र सध्या कांगारूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्याची स्थानिक पर्यावरणावर दुष्परिणाम होण्याची भीती आहे. हे टाळण्यासाठी तब्बल १ सहस्र ९०० कांगारूंची कत्तल करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाकडून घेण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये कांगारूंच्या संख्येला आळा घालण्याच्या उद्देशाने ४००० कांगारूंची हत्या करण्यात आली आहे.

मध्यप्रदेशमध्ये गेल्या ९ मासांत बलात्काराची एकूण ३ सहस्र ४०० प्रकरणे प्रविष्ट !

बिहारप्रमाणे आता मध्यप्रदेशातही जंगलराज ?
     भोपाळ - मध्यप्रदेशमध्ये गेल्या ९ मासांत ३४०० बलात्कारांची प्रकरणे प्रविष्ट करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच वर्ष २०१३ मध्ये झालेल्या बलात्कारांची संख्या (४३३५ प्रकरणे) ही वर्ष २००१च्या (२८५१ प्रकरणे) तुलनेत ५१ टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे राज्यात महिलांची सुरक्षा आणि पोलिसांची कार्यक्षमता यांवर प्र्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 
    राज्याच्या क्राइम रेकॉडर्स ब्यूरोनुसार गेल्या ९ मासांत १६०० हत्याही झाल्याचे उघड झाले आहे. तसेच राज्यात १५०० लूटमारीच्या घटना तर १९ सहस्र चोर्‍यांच्या घटना पोलिसांत प्रविष्ट करण्यात आल्या आहेत.या परशुरामभूमीत जोपर्यंत गायीचा सन्मान होत नाही, तोपर्यंत आंदोलने चालूच रहातील ! - प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी

प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य
स्वामी
     मोरजी (गोवा), १७ मे (वार्ता.) - परशुरामभूमी गोमंतक ही तपोभूमी, योगभूमी, यज्ञभूमी आहे. गोव्यात गायीला सन्मान नाही, तिची हत्या केली जाते. जोपर्यंत गायीचा सन्मान केला जात नाही, तोपर्यंत आंदोलने चालूच रहातील, असे प्रतिपादन पद्मनाभ शिष्य संप्रदायाच्या कुंइई पीठाचे पीठाधीश प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांनी गोवा येथील विठ्ठलदासवाडा, मोरजी येथे जनकल्याण महायज्ञाच्या कार्यक्रमात केले. 
     पद्मनाभ शिष्य संप्रदायाचा मोरजी संत समाज आणि ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित मोरजी जनकल्याण महायज्ञाच्या कार्यक्रमात प.पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी बोलत होते. स्वामी पुढे म्हणाले, मोरजी समुद्रकिनारा हा केवळ पर्यटकांना मौजमजा, उघडे किंवा मादक पदार्थाचे सेवन करून मुक्तपणे संचार करण्यासाठी नाही. हे चित्र पालटले पाहिजे. मोरजी किनारा सोमवती अमावास्येच्या पवित्र समुद्र स्नानासाठी प्रसिद्ध आहे. मोरजीवासीयांनी अमावास्येला समुद्रस्नान करून विदेशी पर्यटकांसमोर भारतीय संस्कृतीचे चित्र उभे करायला हवे.

भारतीय मच्छीमारांच्या सूत्रावर पंतप्रधान मोदी यांचा भर !

      मदुराई (तमिळनाडू) - भारतीय मच्छीमारांना श्रीलंकेच्या सीमेमध्ये मासेमारी करण्याच्या आरोपाखाली पकडले जात असल्याच्या सूत्रावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाला सिरिसेना यांच्यासोबतच्या बोलण्यांवर भर दिला आहे. ही माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांना दिली. या दोन नेत्यांच्या १३ मे या दिवशी नवी देहलीत झालेल्या भेटीत मोदी यांनी हा विषय मांडला होता.     हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला माझा मनापासून नमस्कार ! समितीचे कार्य खूप चांगले आहे. प्रथम आपण राजकारणी लोकांवर हल्ला चढवूया. हे राजकारणी मुसलमानांची जी चमचेगिरी करतात, ती बंद करू या. येथूनच या कार्याला आरंभ करूया ! - श्री. कृष्णराव बा. राणे, कुडणे, गोवा.
     हिंदूंचा देव विश्‍वात्मके असतो. दुरितांचे तिमिर जावो । विश्‍व स्वधर्म सूर्ये पाहो ॥, अशा प्रार्थना करत हिंदु लहानाचा मोठा झालेला असतो. आपल्याप्रमाणे सारे जग साधे आणि सरळ आहे, अशी समजूत तो करून घेतो आणि फसतो; कारण जग कधीच साधे आणि सरळ नसते ! - श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.
     पूर्वीच्या काळात माणसांचा एकमेकांवर विश्‍वास होता. त्या काळी घराला कुलुपे नसत. आज कुलुपे घातलेलीही घरेदारे फोडण्यात येतात. ही प्रगती आहे का ? (लोकजागर)
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी
 इंग्रजी, हिंदी आणि मराठी संकेतस्थळाला भेट द्या !
www.hindujagruti.org

सिंहस्थ क्षेत्री सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भेट देणार्‍या साधूसंतांनी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, त्यांचे कार्य, सनातनची ग्रंथसंपदा, तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

पू. (कु.) स्वाती खाडये
     उज्जैन (मध्यप्रदेश) येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मशिक्षण फलक आणि ग्रंथ यांचे भव्य प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन अखिल भारतवर्षीय धर्मसंघ आणि स्वामी करपात्री फाऊंडेशनचे श्रद्धेयप्रवर पू. श्री त्रंंंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज यांच्या शुभहस्ते २३ एप्रिल या दिवशी करण्यात आले. त्यानंतर देशभरातील अनेक साधूसंत, महंत, महामंडलेश्‍वर यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी, मान्यवर आदी प्रतिदिन या प्रदर्शनास भेट देत आहेत. ग्रंथप्रदर्शन पाहिल्यानंतर साधूसंत, महंत, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर आदींनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती, त्यांचे कार्य, सनातनची ग्रंथसंपदा, तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी पुढील गौरवोद्गार काढले.
www.sanatan.org वर वाचा आणि अध्यात्म अनुभवा !

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

     इस्लाम हा जर शांतताप्रिय धर्म आहे, तर कुराण आणि बंदुकांचा वापर या दोन्ही गोष्टी शिक्षण संस्थांमध्ये का शिकवतात ?
- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस (क्रमश:)

उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर !

सुट्टीतील परिपाठ !
     सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. हा सुट्टीचा कालावधी मुलांमध्ये विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालवाचकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
आचरण कसे असावे ?
१. इतरांना सुधारू शकत नसल्याने केवळ स्वतःला सुधारणे आवश्यक ! 
     एकदा एका राजाच्या मुलीच्या पायाला काटा टोचला. राजे काहीसे लहरी असतात. राजाने प्रधानांना सांगितले की, सगळी जमीन चामड्याने झाकून टाक, म्हणजे युवराज्ञीला काटा टोचणार नाही. प्रधान विचारात पडला की, एवढे चामडे आणायचे कोठून ? त्याने एक चामड्याचा सुंदर जोेडा युवराज्ञीला दिला. 
तात्पर्य : जगात काटे आहेत; परंतु ज्याच्या पायात जोडे (पादत्राणे) असतात, त्याला काटे बोचत नाहीत. त्याचप्रमाणे स्वतःला सुधारावे; कारण सर्व जगाला आपण सुधारू शकत नाही.

तृप्ती दे साई !

भंडारेसे तृप्त हो गये सब नरनारी । एक बेचारा कर्म का मारा रह गया हाथ खाली । तृप्ती दे साई, तृप्ती दे साई ॥ 
     राजकीय, आरोग्य, व्यावसायिक, सांस्कृतिक अगदी शिक्षणक्षेत्रही हक्क आणि अधिकार यांतून सुटलेले नाही. एक राहिले होते, ते अध्यात्मक्षेत्र. त्यासाठी कुणा संतांना आजतागायत आंदोलन करण्याची आवश्यकताच भासली नाही. देव भक्तीभावाने प्राप्त होतो. निर्विषयी बालकाप्रमाणे भक्ताचे मन भगवंताप्रती निर्मळ असते. तेथे असते केवळ निरपेक्ष प्रीती आणि समर्पण. भक्तीचे मूल्यही करता येत नाही. म्हणून ती अमूल्य असते. भक्तीची तुलना होऊ शकत नाही; म्हणून ती श्रेष्ठही असते. हे सर्व संतवाङ्मय सांगते. अध्यात्माचा गंध असलेला कुठलाही भाविक हे सांगू शकेल. भगवंतप्राप्तीसाठी प्रयत्न करणारा जीव हे नित्याच्या जीवनात अनुभवतही असतो. तृप्ती देसाई यांचे आंदोलन मंदिर प्रवेशासाठी असले, तरी त्यांना या उपासनापद्धती माहिती असायला हव्यात असे काही नाही. ज्यांना भगवंताची प्राप्ती करायची आहे, त्यांच्याकरता ही आवश्यक लक्षणे आहेत. जेथे अधिकार येतो तेथे भक्ती उरत नाही आणि जेथे भक्ती असते तेथे अधिकार उरत नाही. त्यामुळे मंदिर प्रवेशाचा हक्क आणि अधिकार यांची भाषा करणार्‍यांना देवाविषयी किती आत्मियता असेल, हे सांगण्यासाठी अधात्मातील कुणा जाणकाराची आवश्यकता नाही.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

      भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे
      हिंदु जनजागृती समिती व सनातन संस्था यांना धर्म, अध्यात्म आणि उपासना यांचे अधिष्ठान आहे ! - पू. मोहनबुवा रामदासी, सज्जनगड
     वैदिकांची संस्कारप्रक्रिया सुटली; म्हणून चोरपावलाने येणार्‍या इहवादी हिंदुत्वावर समाधान मानावे लागते आणि उजळ माथ्याने गोंधळ घालणार्‍या पाश्‍चात्त्यीकरणाला मूकसंमती द्यावी लागते !- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

कर्नाटकमध्ये सनातनचे १० साधक, तसेच १ धर्माभिमानी ६१ टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक स्तर गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले !

      मंगळुरू - कर्नाटकमधील विविध जिल्ह्यांचे सनातनचे १० साधक आणि १ धर्माभिमानी ६१ टक्के अथवा त्याहून अधिक आध्यात्मिक स्तर गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाले.
     बागलकोट जिल्ह्यातील गुलेडगुड्डा येथील सनातनच्या साधिका सौ. पुथलीबाई सेबीनकट्टे यांनी ६३ टक्के, तर सौ. सीता बन्नी, सौ. वीणा नायक आणि सौ. लता सुभास बन्नी यांनी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर प्राप्त करण्याचे घोषित करण्यात आले. ६४ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले सनातनचे साधक श्री. काशिनाथ प्रभु यांच्या हस्ते साधिकांचा सत्कार करण्यात आला.
कु. मंगला गौडा (वय ३२ वर्षे) (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना सनातनच्या संत पू. राधा प्रभु (आजी)  
 
दैनिक सनातन प्रभातचा रंगीत
गोरक्षण विशेषांक
प्रसिद्धी दिनांक
: २२ मे २०१६
पृष्ठ संख्या : १०
मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २१ मे या दिवशी दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !
     स्वयंपाकाची अनेक पुस्तके वाचूनही स्वयंपाक करता येत नाही. त्याप्रमाणे साधनेसंदर्भात शेकडो पुस्तके वाचूनही साधना होत नाही. स्वयंपाक करण्याप्रमाणे साधनेची कृती करणे आवश्यक असते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पावसाळ्यात सकाळी उन्हाचे उपाय (उन्हात बसून नामजप) करणे शक्य नसतांना त्याच वेळेत ॐ सूर्याय नमः । हा मंत्रजप केल्याने तेवढाच लाभ होऊन काळे आवरण दूर होऊन ऊत्साह वाटणे

     मला रात्री विलंबाने झोप लागत असे. त्यामुळे माझ्यावर काळे आवरण येऊन मी सकाळी विलंबाने उठत असे. मला डोके जड होणे, काही न सुचणे आणि अंग दुखणे, असे त्रास होत होते. गेल्या वर्षी एका संतांनी मला सकाळी १५ ते ३० मिनिटे उन्हाचे उपाय (उन्हात बसून नामजप) करायला सांगितले होते, ते मला आठवले. त्या वेळी मी ऊन्हाचेे उपाय केल्याने सकाळी लवकर उठू लागले होते.
     या वर्षी मला पुन्हा तसेच त्रास होऊ लागले होते. पावसाळा असल्याने सकाळी ऊन नव्हते आणि सूर्यदर्शनही होत नव्हते; म्हणून मी उन्हाचे उपाय करू शकत नव्हते. त्यामुळे पुन्हा मला सकाळी उठतांना होणार्‍या त्रासात वाढ झाली होती. मी श्रीकृष्णाला विचारले, सूर्य दिसत नाही, तर उन्हाचे उपाय कसे करू ? तेव्हा ॐ सूर्याय नमः । हा नामजप करावा, असा मनात विचार आला. त्याविषयी पू. पात्रीकरकाकांना विचारल्यावर त्यांनी सकाळी उठल्यावर किंवा जाग आल्यावर १५ मिनिटे येता-जाता, दैनंदिनी कृती करतांना ॐ सूर्याय नम: । हा जप करता येईल, असे सांगितले.

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
     सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.
शिवमोग्गा, कर्नाटक येथील जिज्ञासूंना रामनाथी आश्रमाविषयी 
जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
१ इ. श्री. योगीश जी.
१ इ १. मराठी भाषा समजत नसूनही चैतन्याच्या स्तरावर सर्व लक्षात येत होते.
१ इ २. दोषांची जाणीव होण्यासाठी सतत प्रार्थना करणे : सौ. कीर्तीताई यांनी स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन यांविषयी चांगले मार्गदर्शन केले. तेव्हा माझी सतत प्रार्थना होत होती, देवा, तूच मला समजावून दे, माझ्या दोषांची जाणीव करून दे; कारण मला दोषांविषयी लवकर जाणीव होत नाही.

बिनचूक सेवा झाल्यावर अनुभवलेला आनंद इतरांनाही मिळावा, यासाठी प.पू. डॉक्टरांना अपेक्षित अशीच सेवा करूया, असे सर्वांना सांगणारे घाडगेकाका !

   
कै. सुरेश घाटगे
काका सनातन प्रभात नियतकालिकांचा जिल्हास्तरीय खर्च अहवाल पहायचे. जिल्हा अहवाल सेवकांच्या ८ दिवसांपूर्वीच झालेल्या सत्संगामध्ये काका आले होते. तेव्हा काका पुष्कळ आनंदी दिसत होते. भावजागृतीचा प्रयोग घेतल्यानंतर काका प.पू. डॉक्टरांना भेटल्यासारखा आनंद व्यक्त करत होते. ते म्हणाले, माझ्याकडून नियमित असे प्रयत्न होतात. त्यामुळे सध्या मी पुष्कळ आनंदी आहे. माझ्याकडून सेवा बिनचूक होत असल्यामुळे मला वेगळाच आनंद मिळू लागला आहे. इथून पुढे आपण सर्वजण प.पू. डॉक्टरांना अपेक्षित अशीच सेवा करूया. असे ते सातत्याने आणि उत्साहाने म्हणत होते. तेव्हा काकांकडे पाहून आम्हालाही उत्साही वाटू लागले. - सौ. संगीता कडूकर, कोल्हापूर (२८.४.२०१६)

प.पू. डॉक्टरांनी पूर्वी वास्तव्य केलेल्या रामनाथी आश्रमातील खोली क्रमांक ३२४ मधील शौचालयाची स्वच्छता करतांना आलेली अनुभूती

१. प.पू. डॉक्टरांनी पूर्वी वास्तव्य केलेेल्या रामनाथी आश्रमातील खोली क्रमांक ३२४ मधील शौचालयाची स्वच्छता करण्याची सेवा करतांना शिवपिंडीवर अभिषेक घालत आहोत, असे दृश्य दिसून मन प्रसन्न होेणे : ७.७.२०१४ या दिवशी सकाळी प.पू. डॉक्टर पूर्वी रहात असलेल्या रामनाथी आश्रमातील खोली क्रमांक ३२४ मधील शौचालयाची स्वच्छता करण्याची सेवा मिळाली. सेवा करतांना शौचालयात पाणी ओतत असतांना आपण शिवपिंडीवर अभिषेक घालत आहोत, असे वाटू लागले आणि तसे दृश्यही दिसले. त्या वेळी मी शिवमंदिरातच आहे, असे वाटत होते आणि मन प्रसन्न झाले.
२. शिवपिंडी आणि शिवरूपी प.पू. डॉक्टर यांच्याविषयी कृतज्ञता वाटून भावजागृती होणे : ही स्वच्छतेची संधी दिल्याविषयी मनोमन शिवपिंडीला आणि शिवरूपी प.पू. डॉक्टर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त झाली. त्यानंतर अन्य वेळीही या अनुभूतीचे स्मरण होऊन माझी भावजागृती होते.
- श्री. निमिष म्हात्रे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२१.१२.२०१४)

रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात बसून उपाय करतांना झालेली विचारप्रक्रिया

    
श्री. निमिष म्हात्रे
२३.६.२०१४ या दिवशी दुपारी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात बसून उपाय करतांना प्रश्‍नोत्तराच्या स्वरूपात मनाची झालेली विचारप्रक्रिया येथे देत आहे.

१. कनिष्ठ देवता स्तुतीप्रिय, तर उच्च देवता जयघोषप्रिय असणे : सनातन संस्थेच्या आरतीच्या ध्वनीफितीत सांगितले आहे, उच्च देवता जयघोषप्रिय असतात. जेथे त्यांचा जयघोष होतो, तेथे त्या उपस्थित असतात आणि कनिष्ठ देवता स्तुतीप्रिय असतात.
२. मानव अनुभूतीच्या मार्गाने जात असल्यामुळे तो अनुभूतीप्रिय असणे : त्याविषयी मनात आलेले प्रश्‍न आणि मिळालेली उत्तरे पुढीलप्रमाणे आहेत.
प्रश्‍न : मानवाला काय प्रिय असते ?
उत्तर : मानव अनुभूतीप्रिय असतो. जेथे त्याला अनुभूती येतात, त्या मार्गाने तो जातो.
२ अ. मानवाला देवाविषयीचे प्रेम आणि ओढ अनुभवता येणे, ही देवाने दिलेली अनुभूतीच असणे

सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात रहाणारा कु. अर्चिष्मान सुराल (वय १६ वर्षे) याला उज्जैन येथील सिंहस्थपर्वात सेवेसाठी गेल्यावर तेथील साधूसंतांविषयी लक्षात आलेली सूत्रे !

उज्जैन येथील स्वतःचा मोठेपणा मिरवणारे काही साधूसंत आणि सहजावस्थेत रहाणारे 
आमचे प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) !
कु. अर्चिष्मान सुराल
       मला इयत्ता १० वीच्या परीक्षेनंतर लागलेल्या सुट्टीत उज्जैन (मध्यप्रदेश) येथील सिंहस्थपर्वात सेवेसाठी जाण्याची संधी मिळाली. मी प्रथमच सिंहस्थपर्वाचा अनुभव घेत होतो. तेथील राजयोगी (शाही) स्नान पहातांना मला लक्षात आलेली काही सूत्र येथे देत आहे. 
१. राजयोगी स्नानाच्या वेळी साधूसंत क्षिप्रा नदीत स्नानासाठी आले होते. त्यातील एक संत त्यांच्या शिष्यांसह आले होते. त्यांच्या समवेत कर्णकर्कश आवाजात ध्वनीवर्धक यंत्रणाही होती. यावर लावण्यात आलेल्या संगीताच्या तालावर हे संत आणि त्यांचे शिष्य क्षिप्रा नदीत स्नान करत होते. 
२. अन्य एक महाराज त्यांच्या मोठ्या गाडीत उंच सिंहासनावर बसून स्नानासाठी आले होते. त्याच्या सोबतही डी.जे. ध्वनीवर्धक यंत्रणा होती. त्यावर पाश्‍चात्त्य संगीताच्या चालीवर भजन लावण्यात आले होते. गाडीवर आणि खाली त्यांचे अनुयायी नाचत होते. महाराज मध्ये-मध्ये आशीर्वादाच्या मुद्रेत सर्वांना हात दाखवत होते.

श्रीकृष्णाविषयी ओढ आणि सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणारी उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेली ५६ टक्के आध्यात्मिक पातळीची पुणे येथील कु. मुक्ता चंद्रशेखर भोईटे (वय ७ वर्षे) !

कु. मुक्ता भोईटे
१. जन्मापूर्वी
     गर्भारपणी पत्नीकडून आधीच्या तुलनेत नामजप करणे, श्रीगणेशस्तोत्रांची आवर्तने करणे आणि बालसंस्कारवर्ग घेणे अशी व्यष्टी आणि समष्टी साधना अधिक प्रमाणात झाली.
२. जन्मानंतर
२ अ. जन्म ते १ वर्ष : जन्मानंतर बाळाच्या सर्व हालचाली जलद आणि लवकर होऊ लागल्या. बाळाला तेलाने मालिश करत असतांना बाळ पोटावर नौकासनात रहात असे आणि पाठीला मर्दन करत असतांना बाळ धनुरासन स्थितीत रहात असे.
२ आ. १ ते २ वर्ष : मुक्ता घरात आरती चालू असतांना शांतपणे प्रतिसाद देत असे. श्रीगणेशस्तोत्र तसे घरी नियमित म्हटले जात नसे, तरीही तिने एकदा स्तोत्र पूर्ण म्हणून दाखवले. मुक्ताच्या आईने गर्भारपणात अनेक वेळा आवर्तने केल्याचा तो परिणाम असावा.

गुरुकार्याची तळमळ आणि समष्टी भाव असलेल्या पू. विजयालक्ष्मी काळेआजी !

पू. श्रीमती विजयालक्ष्मी काळेआजी
     दैनिक सनातन प्रभातच्या वितरणाच्या सेवेनिमित्त आठवड्यातून २ - ३ वेळा पू. आजींकडे जाण्याचा योग येतो. त्या वेळी त्यांच्यातील अनेक गुणांचे मला दर्शन झाले. ते येथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

१. व्यवस्थितपणा
     पू. आजी नेहमी व्यवस्थित असतात. केसांचा छोटासा अंबाडा पिना लावून व्यवस्थित बांधलेला असतो. साडीही शक्यतो पांढरी आणि व्यवस्थित नेसलेली असते. पू. आजींना पुष्कळ शारीरिक त्रास आहे. मध्यंतरी त्यांचा डावा हात पुष्कळ दुखत होता; पण त्यांच्या व्यवस्थित राहणीमानावरून त्या कधीच कोणत्याही गोष्टीत सवलत घेत नाहीत, असे लक्षात येते.
२. प्रांजळपणा
     पू. आजींमध्ये प्रांजळपणा पुष्कळ जाणवतो. काही मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) आजोबा गेले, तेव्हाही त्यांनी प्रांजळपणे सर्वकाही लिहून दिले. (ते दैनिक सनातन प्रभातमध्ये छापूनही आले.) आपण आजोबांच्या सेवेत किती न्यून पडलो, हे त्या सांगत असतात. आम्ही त्यांना भेटतो, त्या वेळी त्यांचे साधनेतील प्रयत्न अल्प पडले, हेही त्या सांगतात.
सर्वकाही कृष्णाचे !
सौ. अनघा जोशी
ही काया असता कृष्णाची ।
का म्हणते मी ती माझी ॥ १ ॥
मनातील विचार असता कृष्णाचे ।
मी का म्हणते, ते सर्व माझे ॥ २ ॥
सर्वकाही असता कृष्णाचे ।
मी का म्हणते ते माझे माझे ॥ ३ ॥
मीचा किती अहं असे मनाला ।
मी असमर्थ आहे
तो तोडण्याला ॥ ४ ॥
केवळ कृष्णच सत्य आहे, हे सदा वसो मनी ।
हीच प्रार्थना करते कृष्णाच्या कोमलचरणी ॥ ५ ॥
- सौ. अनघा जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.९.२०१५)

अन्नपूर्णा कक्षात सेवा कशी करावी ?, याचा आदर्श घालून देणार्‍या पू. (कु.) रेखा काणकोणकर !

पू. (कु.) रेखा काणकोणकर
१. इतरांचा विचार करणे : मी आश्रमात प्रथमच आल्यावर मला सेवा जमेल कि नाही ?, अशी भीती वाटायची. तेव्हा पू. रेखाताई मला तू सेवा सावकाश कर आणि जमत नसेल, तर मला सांग, असे सांगायच्या.
२. भावपूर्ण सेवा होण्यासाठी उद्युक्त करणे : पू. ताई मला सेवा करतांना सर्व सेवा देवासाठी करत आहे, असा भाव ठेवायला सांगायच्या.
३. नियोजनकौशल्य : पू. रेखाताई एकाच वेळी सर्व साधिकांना सेवा सांगतात. त्यांच्याकडे अनेक सेवा असूनही कोणत्या साधिकेला कोणती सेवा द्यायची, याचा त्यांना विचार करायला लागत नाही.
४. तत्त्वनिष्ठ : साधकांकडून चूक झाल्यास पू. ताई त्यांना चुकीची लगेचच जाणीव करून देऊन सुधारण्यासाठी प्रयत्न करूया, असे सांगतात.
५. वेळेचे पालन करणे : पू. ताई त्यांचे वैयक्तिक आवरून वेळेत सेवेला येतात.
६. निर्णयक्षमता : कधी कधी स्वयंपाक अल्प पडला, तर त्या लगेचच उपाय काढतात.

भावजागृतीचे प्रयत्न केल्यास मन नकारात्मक स्थितीतून लवकर सकारात्मक स्थितीत येते !

     साधना करतांना मनाने परिस्थिती स्वीकारणे अवघड जात असेल, तरीही प्राथमिक स्तरावर उत्तरदायी साधक आणि सहसाधक यांचे ऐका अन् कृती करत असतांना कृतीला भावजागृतीच्या प्रयत्नांची जोड द्या. यामुळे काही वेळाने मन आपोआपच सकारात्मक स्थितीत येते; कारण सकारात्मक होण्यासाठी मनाला सत्त्वगुणी विचारांची आवश्यकता असते. भावजागृतीच्या प्रयत्नांतून मनात देवाचे विचार निर्माण झाल्याने देवच मनाला सकारात्मक स्थितीत आणण्यासाठी साहाय्य करतो; म्हणून प्रयत्न सोडू नका. देवाच्या साहाय्याने मनाला नकारात्मक स्थितीतून सकारात्मक स्थितीत आणा !
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, त्रिची, तमिळनाडू. (१.३.२०१६, सकाळी ९.२६)

साधकांनो, इतरांनी चुकांची जाणीव करून दिल्यानंतर नकारात्मकता, विकल्प आदी मनाच्या दुष्टचक्रात अडकण्याऐवजी योग्य दृष्टीकोन आत्मसात करून त्यातून बाहेर पडा !

   
पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
  साधकांकडून व्यष्टी आणि समष्टी स्तरांवर अनेक चुका होत असतात. काही वेळा उत्तरदायी साधक बैठक घेऊन चुकांची जाणीव करून देतात. बैठकीनंतर काही साधकांची अयोग्य विचारप्रक्रिया होते. बैठकीच्या माध्यमातून भगवंताने केलेल्या दिशादर्शनातून शिकून साधनेचे प्रयत्न वाढवण्याचा निर्धार करण्याऐवजी नकारात्मकता, निराशा, विकल्प अशा स्थितीत जाणार्‍या साधकांसाठी मार्गदर्शक सूत्रे पुढे देत आहे.
१. उत्तरदायी साधकांविषयी नकारात्मकता निर्माण होणे
     काही साधकांच्या मनात बैठक घेणार्‍या साधकाविषयी नकारात्मकता निर्माण होतेे. साधक किती कडकपणे चुका सांगतात, असे त्यांना वाटते. अशा वेळी साधकांनी माझ्यात हा दोष अनेक वर्षांपासून आहे; परंतु त्यावर मात करण्यासाठी मी उणा पडलो. त्यामुळे भगवंत मला गांभीर्याने जाणीव करून देत आहे, असा विचार ठेवून प्रयत्न करावेत.
२. साधनेत साहाय्य करणारे सहसाधक आणि कुटुंबीय यांच्याविषयी अयोग्य विचार मनात येणे
     सहसाधक अथवा कुटुंबीय यांनी बैठकीत चुकांची जाणीव करून दिल्यावर काही साधकांच्या मनात यांनी चुका सांगून माझ्या पाठीत सुरा खुपासला, मला धोका दिला, माझा विश्‍वासघात केला, असे साधकत्वशून्य विचार येतात. खरेतर आपल्या साधनेत साहाय्य करण्यासाठी समोरच्याला माध्यम बनवण्याची ईश्‍वराची ती लीलाच असल्याने अशा विचारशृंखलेत अडकणे अत्यंत चुकीचे आहे.

आपत्कालात अगदी शेवटपर्यंत मी तुमचे रक्षण करणार !, या अर्थाची श्रीकृष्णाने तिरुपती येथे पिंपळपानाच्या रूपात दिलेली प्रत्यक्ष साक्ष !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
पू. (सौ.) अंजली गाडगीळ 

१. तिरुपती येथे श्री बालाजीच्या देवळाबाहेरील वायूमंडलाला आपत्कालात रक्षण करण्यासाठी 
प्रार्थना होणे
      तिरुपती येथे श्री बालाजीचे अभिषेक दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही देवळाबाहेर आलो. देवळाबाहेरील वायूमंडलाला प्रार्थना केली आणि सांगितले, हे देवा या आपत्कालात तुम्ही सदैव आमच्या सोबत रहा. आम्हाला अजिबात अंतर देऊ नका. तुमच्या चरणांचे स्मरण आणि तुमच्या हाताची सोबत सतत आम्हाला असू द्या ! या प्रार्थनेची साक्ष महर्षींनी दुसर्‍याच दिवशी आम्हाला दिली. 
                        
आपत्काळात श्रीकृष्ण समवेत असणार याची
अनुभूती देणारे गाडीवर पडलेले पिंपळाचे पान

                          २. पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी शेषाद्री पर्वतावरील निसर्गाला, सर्व सिद्धांना, 
तसेच तेथे वास करणार्‍या श्रीविष्णूला साधकांच्या रक्षणाच्या संदर्भात 
आणि प.पू. डॉक्टरांच्या आरोग्यासंदर्भात प्रार्थना करण्यास सांगणे
     दुसर्‍या दिवशी, म्हणजे ६.५.२०१६ या दिवशी शेषाद्री पर्वतावर रहाणार्‍या या श्रीविष्णूला आणि तेथे निवास करणार्‍या अनेक सिद्धांना साधकांच्या रक्षणासंदर्भात प्रार्थना करण्यासाठी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी आम्हाला तिरुमला डोंगरावर सगळीकडे गाडीने फिरून येण्यास सांगितले. तसेच त्यांनी प.पू. डॉक्टरांच्या आरोग्यासंदर्भातही निसर्गदेवतेला प्रार्थना करण्यास सांगितली. ते स्वतःही आमच्या बरोबर आले होते. गाडीतून उतरून प्रत्येक ठिकाणी ते आम्हाला प्रार्थना करण्यास सांगत होते आणि निसर्गाकडे, डोंगराकडे, आकाशाकडे पाहून दोन्ही हात नमस्काराच्या मुद्रेत उंचावून मोठ्याने म्हणत होते, प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले.... जय गुरुदेव !

पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी फ्लेक्स, प्लास्टिक, सिलपोलीन इत्यादींची तातडीने आवश्यकता !

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
     सनातनच्या आश्रमांत पावसाळ्यापूर्वीच्या सिद्धतेसाठी आगाशी, पायर्‍या, तात्पुरत्या निवारा शेड, तसेच अन्य साहित्य झाकून ठेवण्यासाठी नवीन किंवा वापरलेले फ्लेक्स, प्लास्टिक, सिलपोलीन, मॅटिंग किंवा अन्य तत्सम साहित्याची तातडीने आवश्यकता आहे. वापरलेले किंवा किरकोळ दुरुस्तीने वापरण्यायोग्य होणारेे साहित्यही चालेल. नवीन फ्लेक्स किंवा सिलपोलीन सवलतीच्या दराने उपलब्ध होत असल्यास साधकांनी तसे कळवावे.
     वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि साधक यांना वरीलपैकी कोणतेही साहित्य अर्पण अथवा सवलतीच्या दराने देऊन धर्मकार्यास हातभार लावायचा असेल, त्यांनी श्री. विनायक आगवेकर यांना ८४५१००६०३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

सनातन पंचांगाची अभ्यासपूर्वक मागणी नोंदवून परिपूर्ण सेवा करा !

जिल्हासेवक, वितरक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना
     वर्ष २०१७ च्या सनातन पंचांगाची मागणी सर्व जिल्ह्यांनी २०.५.२०१६ या दिवसापर्यंत कळवणे अपेक्षित आहे. मागणी नोंदवतांना लक्षात घ्यावयाची महत्त्वाची सूत्रे देत आहे.
१. मागील वर्षीची मागणी आणि वितरण अन् जिल्ह्याची सद्य:स्थिती यांचा अभ्यास करून, तसेच समाजापर्यंत अधिकाधिक पंचांग पोचावेत, यासाठी साधकांना उद्युक्त करून जिल्हासेवकांनी अंतिम मागणी देणे आवश्यक आहे.
२. सर्वच पंचांगाचे वितरण १५.११.२०१६ या दिवसापर्यंत, तर त्याची येणे बाकी ३०.११.२०१६ या दिवसापर्यंत पूर्ण करावी. प्रायोजित केलेल्या पंचांगांची येणे बाकी पूर्ण झाली, तरी त्या पंचांगांचे वितरण ३०.११.२०१६ या दिवसापर्यंतच पूर्ण करण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यातील सर्वच पंचांगांचे वितरण आणि येणे बाकी दिलेल्या समयमर्यादेत पूर्ण होईल, अशा दृष्टीने अभ्यास करून जिल्हासेवकांनी मागणी नोंदवावी.
३. काही साधक आम्ही पंचांग वैयक्तिक स्तरावर विकत घेऊन नंतर सवडीने त्याची विक्री करू शकतो का ? असे विचारतात. नोव्हेंबर २०१६ पासून हिंदु धर्मजागृती सभांना आरंभ होणार आहे, तसेच साधकांना त्या कालावधीत अन्य उपक्रम राबवून धर्मप्रसार करण्याच्या अमूल्य संधीचाही लाभ करून घ्यायचा आहे. त्यामुळे साधकांनी नोव्हेंबर २०१६ नंतर केवळ पंचांग वितरणाची सेवा न करता अन्य सेवांमध्येही सहभागी व्हावे.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
योगी आणि भक्त
अ. मेणबत्तीचा प्रकाश म्हणजे भक्ती आणि मोठा प्रकाश म्हणजे योग. योग्याचे तेजही सहन होत नाही आणि भक्तीच्या मिणमिणत्या प्रकाशामुळे तिचे मूल्य कळत नाही. योग्याचे तेज दिसते; पण भक्तीचे सामर्थ्य लपलेले असते.
. ज्याच्याकडे श्‍वासोच्छ्वासाचे अनुसंधान आहे, तो खरा योगी.
भावार्थ : ध्यानयोग्याचे ध्यान संपले की, त्याचे अनुसंधान खंडित होते. ज्याचा नामजप श्‍वासोच्छ्वासावर होत असतो, म्हणजे नामाच्या ठिकाणी केवळ श्‍वासाची जाणीव असते, त्याचे श्‍वासाप्रमाणेच अखंड अनुसंधान असते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
चांगले काम करणार्‍याचे सरकार कौतुक करते, तसे वाईट काम करणार्‍याला कडक शिक्षा का करत नाही ? - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधक
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
साधक जेव्हा एखाद्या गोष्टीचा निर्धार करतो आणि निर्धाराला दृढतापूर्वक चिकटून राहतो, 
तेव्हा उद्दिष्टपूर्ती होणे लांब राहत नाही. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

शिक्षण सामर्थ्य वाढवणारे हवेे !

प.पू. पांडे महाराज
प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन
     मानव शिक्षण घेऊन असमर्थ होतो, तर त्याचा काय उपयोग ? गुरुकुल पद्धतीत समर्थता येत होती. देवव्रत (भीष्म) स्वतः शिक्षण घेऊन बाहेर पडले, तेव्हा एक शत्रू राज्यावर चालून येत आहे, हे समजल्यावर त्याने एकट्याने प्रतिकार करून शत्रूला पराजित केले. - प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.११.२०१४)

आसामच्या हिंदूंचा विश्‍वास !

संपादकीय 
    आसाम, बंगाल, पुद्दुचेरी, तमिळनाडू आणि केरळ राज्यांतील विधानसभेसाठीचे मतदान काल पूर्ण झाले. आता १९ मे या दिवशी मतमोजणी होणार आहे; मात्र तत्पूर्वी वृत्तवाहिन्यांकडून मतदानावरून करण्यात आलेले सर्वेक्षण प्रकाशित करण्यात आले आहे. यानुसार बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळणार असून भाजपचा नेहमीप्रमाणे येथे धुव्वा उडणार आहे. पुद्दुचेरी, तमिळनाडू आणि केरळ येथे सध्याचेच शासन पुन्हा सत्तेत येणार आहे. एकमात्र पालट आसाममध्ये होणार असून तेथे काँग्रेसचे सरकार जाऊन भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता आहे. भाजप केंद्रात सत्तेत आल्यापासून झालेल्या विविध राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकांपैकी काही राज्ये सोडली, तर प्रादेशिक पक्षांनाच विजय मिळाला आहे.

पाकचा जळफळाट !

संपादकीय
     भारताने कितीही वेळा पाकपुढे मैत्रीचा पुढे हात केला, तरी पाक मात्र त्यास प्रतिसाद द्यायला सिद्ध नाही. उलट तो भारताला सातत्याने पाण्यात पहात असतो. पाकचा भारतद्वेष इतका पराकोटीचा आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याच्या संधीची तो वाटच पहात असतो. याचा अनुभव भारताच्या वाट्याला पुन्हा एकदा आला आहे. भारताने १५ मे या दिवशी ओडिशाच्या तटावर स्वदेशी बनावटीच्या सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची चाचणी केली. भारताच्या या संरक्षणाविषयीच्या भरारीचा पाकला अर्थात्च पोटशूळ उठला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn