Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

एस्.एस्.आर्.एफ्.च्या दुसर्‍या संत पू. (सौ.) योया वाले यांचा आज वाढदिवसबांगलादेशमध्ये ७५ धर्मांधांचे ३८ हिंदूंवर प्राणघातक आक्रमण !

२ हिंदु महिलांवर बलात्कार !
बांगलादेशमधील अल्पसंख्य हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांची कोणतीही माहिती भारत शासन 
घेत नाही, तसेच त्यांना साहाय्य करत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
धर्मांधांच्या आक्रमणातील पीडित हिंदू
आक्रमणातील हानी दाखवतांना हिंदु महिला
     ढाका (बांगलादेश) - बांगलादेशमधील विजयनगरजवळील एरियाल गावात स्थानिक निवडणुकीत हरलेल्या अवामी लीग पक्षाच्या उमेदवाराने ७५ धर्मांधांच्या साहाय्याने गावातील ३८ हिंदूंवर प्राणघातक शस्त्रे आणि बंदुका यांद्वारे ७ मे या दिवशी आक्रमण केले. धर्मांधांनी हिंदूंच्या घरात बलपूर्वक घुसून त्यांची रोख रक्कम आणि दागिने लुटले, लहान मुलांना आगीत ढकलले, तसेच २ हिंदु महिलांवर बलात्कार केले. धर्मांधांच्या या आक्रमणात अनेक हिंदु गंभीर घायाळ झाले असून त्यांची १७ लक्ष रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली आहे. बांगलादेश मायनॉरिटी वॉच या हिंदुत्ववादी संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांनी ही माहिती दिली.

युद्धसामग्रीच्या संदर्भात भारत स्वयंपूर्ण बनण्याच्या मार्गावर ! - मनोहर पर्रीकर, केंद्रीय संरक्षणमंत्री

केवळ युद्धसामग्री असून काय उपयोग ? त्याचा शत्रूच्या विरोधात प्रभावीपणे वापर कधी करणार ?
     पुणे - आयात न करता आपण आपल्याच देशात युद्धसामग्री निर्माण करू लागलो, तर खरेदीमध्ये घोटाळे करता येणार नाहीत. अन्वेषण यंत्रणांचा जाच सहजासहजी मागे लागणार नाही; म्हणून भ्रष्टाचार करण्यासाठी या आयातीला गती मिळाली कि काय, असा प्रश्‍न पडतो; पण आता युद्धसामग्रीच्या संदर्भात स्वयंपूर्ण बनण्यावर भर देण्यात येत असून येत्या ४-५ वर्षांत क्षेपणास्त्रांच्या संदर्भात भारत स्वयंपूर्ण बनेल, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांनी केले. १५ मे या दिवशी येथील वसंत व्याख्यानमालेत संरक्षण उत्पादने, आत्मनिर्भरता आणि भविष्यातील वाटचाल या विषयावर ते बोलत होते. या प्रसंगी वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक उपस्थित होते. भारत देश स्वतःहून कुणावर आक्रमण करणार नाही; पण आमची कुणी खोड काढली, तर ती दुरुस्त करण्याची शक्ती आमच्यामध्ये आहे, असेही श्री. पर्रीकर यांनी सांगितले. (संरक्षणमंत्र्यांनी केवळ असे सांगणे नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतूनही दाखवून देणे अपेक्षित आहे ! - संपादक)

बंगालमधील धर्मांधांनी हनुमान मंदिर पाडून श्री हनुमानाची मूर्ती रस्त्याच्या कडेला फेकली !

ममता बॅनर्जी यांच्या राज्यात हिंदूंवरील अत्याचारांत वाढ झालेली असतांना
 बंगालमधील हिंदू पुन्हा त्यांनाच निवडून देऊन आत्मघात करून घेत आहेत !
     बंगालमध्ये प्रचाराच्या वेळी मशिदीमधून बांग चालू झाल्यावर भाषण थांबवणार्‍या पंतप्रधान मोदींकडे बंगालमधील पीडित हिंदू आशेने पहात आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे !
   
रस्त्याच्या बाजूला फेकलेली हनुमानाची मूर्ती
      मयुरेश्‍वर (बीरभूम, बंगाल) - बीरभूम जिल्ह्यातील मयुरेश्‍वरजवळ असलेल्या रामनगर गावातील धर्मांधांनी तेथील पोलीस ठाण्याचे प्रभारी अब्दुर रब याच्या साहाय्याने हनुमान मंदिर उद्ध्वस्त करून श्री हनुमानाची मूर्ती रस्त्याच्या कडेला फेकल्याचा संतापजनक प्रकार १२ मे या दिवशी घडला. त्यांना पंचायत समितीचे अध्यक्ष शमसुल आलम मल्लिक यांचीही साथ लाभली. या घटनेची माहिती राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी प्रसारित केली नाही.
१. या मंदिरातील श्री बजरंगबलीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अक्षय्य तृतीयेच्या म्हणजे ९ मे या दिवशी संत-महंतांच्या उपस्थितीत करण्यात आली होती.

सिंहस्थपर्वामध्ये सहभागी होऊन आनंदी होणार्‍या भाविकांवर भारतासह ५ देशांचे संशोधक करत आहेत संशोधन !

सिंहस्थपर्वामधून मिळणारा आनंद अनुभवण्यासाठी सिंहस्थपर्वाविषयी, देवतांविषयी, 
साधू-संतांविषयी भाव आणि कृतज्ञता असणे अत्यंत आवश्यक आहे, हे संशोधकांनी लक्षात घ्यावे !
सिंहस्थपर्वात सहभागी देशी आणि विदेशी
भाविकांच्या तोंडवळ्यावरील आनंद
     उज्जैन - उज्जैनमधील सिंहस्थपर्वामध्ये येणार्‍या भाविकांच्या आनंदाचे रहस्य काय ? यावर ५ देशांची पथके संशोधन करत आहेत. संशोधन करणार्‍या पथकांमध्ये भारतासह नेदरलॅण्ड, रशिया, सिंगापूर आणि स्वित्झर्लंड येथील संशोधकांना समावेश आहे. त्यांना इंदूर, उज्जैनसह परिसरातील महाविद्यालयांमधील माहिती आणि तंत्रज्ञानाचे (आयटीचे) १४५ विद्यार्थी साहाय्य करत आहेत. पवित्र क्षिप्रा नदीत स्नान, महाकालेश्‍वराचा निर्मळ जलाभिषेक, दर्शन, अध्यात्म, संतांचा चरणस्पर्श यांनी बहुतांश भाविक तृप्त झाल्याचा निष्कर्ष आतापर्यंतच्या संशोधनातून काढण्यात आला आहे. त्यासाठी २० सहस्र लोकांशी चर्चा करण्यात आली.

भारत लवकरच विश्‍वाचे नेतृत्व करील ! - डॉ. प्रणव पंड्या, प्रमुख, गायत्री परिवार

निनोरा (उज्जैन) येथील आंतरराष्ट्रीय विचार महाकुंभ !
     उज्जैन - वैज्ञानिक अध्यात्मवादाला स्वीकारण्याची वेळ आली आहे. विचार कुंभ ही जनतेची संसद असून ही संसद समस्यांचे निराकरण करण्याचे व्यासपीठ आहे. भारताचे भविष्य उज्जवल आहे. भारत लवकरच विश्‍वाचे नेतृत्व करील. वर्ष २०१६ ते वर्ष २०२६ हा भारताचा उत्कर्षाचा काळ आहे, असे प्रतिपादन गायत्री परिवाराचे प्रमुख डॉ. प्रणव पंड्या यांनी येथे केले. ते उज्जैन जवळील निनोरा येथील ३ दिवसीय आंतरराष्ट्रीय विचार महाकुंभामध्ये बोलत होते.

कालबाह्य परंपरांना तिलांजली द्या ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी

     उज्जैन - समुद्रोल्लंघन निषिद्ध मानणारी परंपरा पालटली जात असेल, तर इतरही कालबाह्य गोष्टी पालटायला हव्यात. आता संतही परदेशात जातात. पालट स्वीकारणे हा जिवंतपणा आहे. मृतप्राय गोष्टींमध्ये पालट होत नाही. केवळ आपली परंपरा आहे, असे म्हणून भागणार नाही; तर आपल्या चांगल्या गोष्टी जगाला समजतील, अशा भाषेत वैज्ञानिक आधारावर पटवून द्यायला हव्यात, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्जैन येथे सिंहस्थपर्वातील एका कार्यक्रमात केले. या वेळी श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपला सिरीसेना उपस्थित होते.

हिंदु राष्ट्र ल्याऊ (आणू) नेपाल बचाऊ (वाचवू) आंदोलनाचे बिष्णु प्रसाद बराल यांची सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनास भेट !

     उज्जैन - नेपाल हिंदु राष्ट्र पुनर्स्थापना मंचचे श्री. बिष्णु प्रसाद बराल यांनी ८ मे २०१६ या दिवशी सिंहस्थ क्षेत्री सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट दिली. १८ मे २०१६ या दिवशी उज्जैन येथील सिंहस्थ क्षेत्री नेपाळला हिंदु राष्ट्र करण्यासाठी नेपाल हिंदु राष्ट्र पुनर्स्थापना मंचकडून संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठीही हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित करण्यात आले. या वेळेस समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांना हिंदु राष्ट्र ल्याऊ - नेपाल बचाऊ याची प्रतिमा भेट देण्यात आली.


राजा आम्हाला उपदेश करण्यासाठी आला होता, ज्ञान घेण्यासाठी नव्हे ! - शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी यांची पंतप्रधानांवर टीका

    
शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी
उज्जैन (मध्यप्रदेश)
- येथील विचार महाकुंभमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि उपस्थित संत-महंतांना उपदेश करून निघून गेले. पूर्वी आपल्याकडे परंपरा होती की, राजे-महाराजे हे ऋषीमुनी यांच्या आश्रमात जाऊन त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्याचे आशीर्वाद घेत. ज्ञान घेत. आज मात्र राजा ज्ञान घेण्यासाठी नव्हे, तर उपदेश देण्यासाठी आला होता. हा विचार महाकुंभ नसून राजकीय मंथन आहे, अशी टीका द्वारका आणि ज्योतिष पीठाधीश्‍वर शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी यांनी केली.
ते पुढे म्हणाले की,
१. विचार महाकुंभाविषयी आम्हाला कोणती अडचण नाही; मात्र येथे राजकीय मंथन होत आहे. हे काम संसदेतही होऊ शकते.
२. पंतप्रधान इंग्लंड येथे गेल्यावर भारत हा गौतम बुद्ध आणि गांधी यांचा देश असल्याचे सांगतात. त्यांनी हा देश राम-कृष्ण आणि शंकराचार्य यांचा आहे, असे का सांगितले नाही ?
३. सनातन धर्माला अंतरबाह्य नष्ट करण्याचे षड्यंत्र चालू आहे. अशा स्थितीत आपण धर्माचे रक्षण कसे करू शकतो, यावर चर्चा व्हायला हवी.
४. विचार महाकुंभमध्ये अध्यात्मावर चर्चा झाली पाहिजे. धर्माचे रक्षण करण्यात येणार्‍या अडचणी दूर करण्यासाठी विचार व्हायला हवा.

नागा साधूने त्याच्या गुप्तांगाद्वारे ओढली २ चारचाकी वाहने !

     उज्जैन - सिंहस्थपर्वात आलेले पंचदशनाम जुना अखाड्याचे नागा साधू हनुमानगिरी महाराज यांनी सहस्रावधी लोकांच्या उपस्थितीत गुप्तांगाला दोरी बांधून त्याच्या साहाय्याने २ चारचाकी वाहने ओढून बर्‍याच अंतरापर्यंत ती पुढे नेली. त्यानंतर एका जीपच्या संदर्भातही असेच प्रदर्शन करून दाखवले. योग शक्ती आणि दैवी शक्ती यांमुळे हे शक्य झाले, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

पहिल्या अमृत (शाही) स्नानानंतरही क्षिप्रा नदीतील पाणी पिण्यायोग्य ! - प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नगरपालिका यांचा अहवाल

हिंदूंची शक्य तितकी अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे हे वृत्त मात्र दाखवत नाहीत, हे लक्षात घ्या !
हिंदूंचे सण, धार्मिक उत्सव आदींवर वारंवार चिखलफेक करणारे तथाकथित पर्यावरणवादी, बुद्धीप्रामाण्यवादी, पुरोगामी, साम्यवादी यांना सणसणीत चपराक !
     उज्जैन - २२ एप्रिल २०१६ या दिवशी झालेल्या पहिल्या अमृत (शाही) स्नानाचा १० लाख भाविकांनी लाभ घेतला. इतक्या मोठ्या संख्येने भाविकांनी पवित्र क्षिप्रा नदीत स्नान केले, तरी दुसर्‍या दिवशीही क्षिप्रा नदीतील पाणी आरोग्यदृष्ट्या चांगले, तसेच पिण्यायोग्य असल्याचे आढळून आले. याशिवाय या नदीतील पाणी स्नान आणि आचमन करणे यांसाठीही उपयुक्त असल्याचे अनेक विशेषज्ञांनी स्वीकारले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि येथील नगरपालिका यांच्या ऑनलाईन अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.कुर्दीश आतंकवाद्यांनी तुर्कस्थानच्या सैन्याचे हेलिकॉप्टर पाडले !

     अंकारा (तुर्कस्थान) - कुर्दीश आतंकवाद्यांनी तुर्कस्थानच्या सैन्याचे हेलिकॉप्टर पाडल्याचे चलचित्र (व्हिडिओ) समोर आले आहे. एएच्-१ डब्ल्यू सुपर कोबरा नावाचे हेलिकॉप्टर कुर्दीश पर्वतीय भागात आक्रमण करण्यासाठी सज्ज होते. त्या वेळी आतंकवाद्यांनी जमिनीवरून सोडलेल्या क्षेपणास्त्राद्वारे हे हेलिकॉप्टर पाडण्यात आले; मात्र ते कधी पाडण्यात आले ते या चलचित्रात स्पष्ट केलेले नाही.

उज्जैन येथील सिंहस्थपर्वात साधूसंतांचे विडंबन करणार्‍या टी-शर्टची विक्री !

साधूचे चित्र असलेला टी-शर्ट
    उज्जैन - येथील वैश्‍विक सिंहस्थपर्वामध्ये प्रतिदिन लाखोंच्या संख्येने भाविक स्नानासाठी आणि साधूसंतांच्या दर्शनासाठी येत आहेत. साधूसंतांचे अवमान करणारे टी-शर्ट घालून काही युवक फिरत असल्याचे दृश्य सर्वत्र दिसत आहे. अशा टी-शर्टची विक्रीही मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कपड्यांच्या दुकानात असे टी-शर्ट आणि तयार (रेडीमेड) भगवे वस्त्र, रुद्राक्षांच्या माळा सर्वांत पुढे विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या रुद्राक्षांच्या माळा घालून अंघोळ केल्यास त्यांचा रंग अंगावर उतरत असल्याचे निदर्शनास आले.

महामंडलेश्‍वर कृष्णानंदगिरी यांच्यासह चार साधूंना कोठडी !

सिंहस्थपर्वातील गोळीबाराचे प्रकरण
     उज्जैन - १२ मे २०१६ या दिवशी श्री पंच दशनाम आवाहन आखाड्याच्या छावणीमध्ये रमता पंचाच्या श्रीमहंत पदासाठी निवड करतांना साधूंमध्ये जीवघेणे आक्रमण झाले. अष्टकौशल महंत ब्रजेशपुरी हे एका साधूवर जिवघेणे आक्रमण करण्यासाठी बंदूक घेऊन धावले. (यांना कोण साधू म्हणणार ? - संपादक) या झटापटीत महंत ओमपुरी महाराजांच्या जांघेत गोळी लागली, तर १२ साधू घायाळ झाले. या संदर्भात महंत राघवपुरी गुरु महंत रसराजपुरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून महंत ब्रजेशपुरी, अमर सदानंदपुरी, विवेकपुरी आणि महामंडलेश्‍वर कृष्णानंदगिरी यांच्या विरोधात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

देहलीमध्ये निदर्शने करणार्‍या पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या समर्थकांवर पोलिसांचा लाठीमार !

समर्थकांच्या उद्रेकात ६ गाड्यांची हानी, ७ पोलीस घायाळ !
     मुंबईत सहस्रावधी धर्मांधांकडून मार खाणारे पोलीस, निरपराध हिंदु भाविकांवर मात्र मर्दुमकी गाजवतात ! भाजप शासनाचे पोलीस काँग्रेस शासनाच्या काळाप्रमाणेच वागतात, असे कुणाला वाटल्यास त्यात नवल काय ?
     नवी देहली - कथित लैंगिक शोषणाच्या प्रकरणी काही वर्षांपासून कारागृहात असलेले पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या सुटकेसाठी त्यांचे भक्त आणि समर्थक गेल्या काही दिवसांपासून जंतरमंतर येथे बेमुदत सत्याग्रह करत आहेत. १५ मेच्या रात्री संसद मार्गावरील पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने करणार्‍या भक्तांवर पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांच्या लाठीमारानंतर भक्तांचा उद्रेक झाला. त्यांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. यात ६ गाड्यांची हानी झाली, तर ७ पोलीस घायाळ झाले. पोलिसांनी या प्रकरणी काही भक्त आणि समर्थक यांना कह्यात घेतले आहे.

हिंदु राष्ट्राची संकल्पना म्हणजे भगवा दहशतवाद नाही !

भगव्या आतंकवादाची ओरड करणार्‍यांवर दैनिक सामनातून ओढलेले आसूड
     मुंबई - हिंदु राष्ट्राची संकल्पना म्हणजे भगवा दहशतवाद नाही. सत्याची आणि न्यायाची बूज राखणे म्हणजे दबाव असेल, तर आठ वर्षांपूर्वी ज्या बनावट पद्धतीने हिंदु आतंकवादाचा बागूलबुवा उभा केला गेला आणि निरपराध्यांना अडकवले गेले, त्यास काय म्हणायचे ? खरे आरोपी बहुधा पाकिस्तानातच पळाले असावेत, असे परखड मत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून मांडण्यात आले आहे.
या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की,
१. मालेगाव बॉम्बस्फोट हा हिंदु आतंकवादाचा प्रकार असल्याची डरकाळी तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधार्‍यांनी फोडली. हिंदु कट्टरवादी मंडळींनी हा बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा बोगस तपास तेव्हाच्या एटीएस्ने म्हणजे आतंकवादविरोधी पथकाने केला. साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यासह सात-आठ लोकांना या प्रकरणात नाहक गोवले. त्यांचा छळ केला. हिंदुत्ववादी संघटनांना अपकीर्त करण्याचा प्रयत्न झाला. त्याची भरपाई कधीच होणार नाही. साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांना मालेगाव स्फोटात गोवले. हे सर्व लोक हिंदुत्ववादी किंवा हिंदु राष्ट्र संकल्पना मानणारे असू शकतात; पण हा काही देशद्रोहासारखा गुन्हा ठरू शकत नाही.

काश्मीरमध्ये अटक करण्यात आलेल्या जिहादी आतंकवाद्याकडे आधारकार्ड !

काश्मीरमध्ये देशद्रोही भरले असल्याने आणि त्यातील काही शासकीय अधिकारी असण्याची 
शक्यता असल्यानेच अशी कागदपत्रे आतंकवाद्यांकडे मिळत असल्यास आश्‍चर्य वाटू नये !
     श्रीनगर - बारामुल्लामधून अटक करण्यात आलेल्या जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे भारतीय नागरिक असलेले आधारकार्ड मिळाले आहे. अब्दुल रहमान असे त्याचे नाव असून तो भारतात मोठे आक्रमण करण्याच्या सिद्धतेत होता, अशी माहिती मेजर जनरल जे.एस्. नैन यांनी दिली. आधारकार्डवर त्याचे नाव शब्बीर अहमद खान लिहिलेले असून वडिलांचे नाव गुलाम रसूल खान आहे. हे आधारकार्ड खरे कि खोटे याचे अन्वेषण चालू असून ते बनावट निघाल्यास हा मोठा गंभीर प्रश्‍न होऊ शकतो, अशी माहिती सैन्यातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

देहलीच्या आप शासनाने ९१ दिवसांत विज्ञापनांवर १४ कोटी ५६ लाख रुपये व्यय (खर्च) केले !

     नवी देहली - माहिती अधिकाराच्या अंतर्गत मिळालेल्या माहितीमध्ये देहलीतील आम आदमी पक्षाच्या शासनाने १० फेब्रुवारी २०१६ ते ११ मे २०१६ या कालाववधीत शासकीय विज्ञापनांवर १४ कोटी ५६ लाख रुपये व्यय (खर्च) केले आहेत. ही विज्ञापने केवळ नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाली आहेत. यात ओडिशा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडूसह अन्य राज्यांतील वृत्तपत्रांचाही समावेश आहे. यावर काँग्रेसचे नेते अजय माकन म्हणाले, एकीकडे देहली शासनाकडे स्वच्छता कर्मचार्‍यांना वेतन देण्यासाठी पैसे नाहीत, तर दुसरीकडे मात्र विज्ञापनांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे.

तमिळनाडूमध्ये ३ कंटेनरमधून जप्त केलेले ५७० कोटी रुपये स्टेट बँकेचे !

     नवी देहली - १४ मे या दिवशी तमिळनाडूतील तिरुपूर येथे निवडणूक आयोगाने ३ कंटेनरमधून जप्त केलेली ५७० कोटी रुपयांची रोकड स्टेट बँक ऑफ इंडियाची असल्याचे समोर आले आहे. बँकेने म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेच्या अनुमतीने हे पैसे विशाखापट्टणम् येथे नेण्यात येत होते.

पेंटागॉनच्या अहवालावर चीन संतप्त !

भारतात असहिष्णुता असल्याच्या अमेरिकेच्या अहवालावर भारत शासनाने 
अमेरिकेकडे अशीच तीव्र प्रतिक्रिया नोंदवणे अपेक्षित होते !
     बीजिंग - अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालय पेंटागॉनच्या वार्षिक अहवालामध्ये चिनी सैन्यासंदर्भात करण्यात आलेल्या उल्लेखाविषयी चीनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जाणीवपूर्वक करण्यात आलेल्या या माहितीच्या विपर्यासामुळे दोन देशांमधील परस्पर विश्‍वासास मोठा तडा गेल्याची प्रतिक्रिया चीनकडून व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिका अमाप संशयी देश असून या भागात लढाऊ विमाने आणि युद्धनौका पाठवत असल्याचा आरोपही चीनने केला आहे.

(म्हणे) याकूब आणि प्रज्ञासिंह या प्रकरणांत वेगवेगळा न्याय का ?

एम्आयएम्चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा कांगावा !
हिंदूंनो, देशद्रोही याकूब मेनन आणि देशभक्त साध्वी यांची
 तुलना करून ओवैसी हे देशद्रोह्यांची बाजू घेतात, हे लक्षात घ्या !
     हिंगोली - मुंबई बॉम्बस्फोटात मेमन कुटुंबियांतील महिलेच्या नावावर असलेल्या वाहनात स्फोटके, हत्यारे सापडल्याने याकूब मेमनला फासावर लटकवले; परंतु साध्वी प्रज्ञासिंहला मात्र याच प्रकारच्या वाहनाच्या परवान्याच्या सूत्रावरून मुक्त केले. ही प्रकरणे सारखीच असतांना प्रज्ञासिंह आणि मेमन कुटुंबाला वेगळा न्याय का, असा कांगावा ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलीमीनचे (एम्आयएम्चे) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी १५ मे या दिवशी हिंगोलीतील जाहीर सभेत केला.
     एम्आयएम्चे आमदार वारीस पठाण यांनी विधानसभेत वन्दे मातरम् म्हणण्यास विरोध केल्यामुळे महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप, दोन्ही काँग्रेस, तसेच समाजवादी एक झाले. दलित आणि मुसलमान यांची केवळ मते लाटणारे हे पक्ष जर एक होत असतील, तर अन्यायग्रस्त असलेले मुसलमान आणि दलित एक का होऊ शकत नाहीत, असा प्रश्‍न त्यांनी या वेळी केला. (हिंदूंमध्ये फूट पाडणारे ओवैसी ! मुसलमान सोडून इतर सर्व काफिर आहेत, अशी वृत्ती असणारे कधीतरी दलितांना सोबत घेऊन कार्य करतील का ? - संपादक)

मालेगाव बॉम्बस्फोटांचे अन्वेषण सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करावे ! - काँग्रेस

     नवी देहली - मालेगाव येथे वर्ष २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचे अन्वेषण सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी केली. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रामुळे आतंकवादाविरोधात लढण्याच्या देशाच्या धोरणापुढे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे, असा आरोप काँग्रेसने केला. (हिंदूंनो, मालेगाव येथे वर्ष २००६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील मुसलमान आरोपींना निर्दोष सोडल्यानंतर अवाक्षरही न काढणारी काँग्रेस हिंदूंशी संबंधित खटल्यांमध्ये मात्र नाहक हस्तक्षेप करते, हे लक्षात घ्या ! यातून काँग्रेसचा हिंदुद्वेष उघड होतो ! - संपादक)

(म्हणे) आरक्षणासाठी तलवारीची धार दाखवा !

नीलेश राणे यांचे चिथावणीखोर विधान !
     संभाजीनगर - महाराष्ट्रात मराठा बहुसंख्य आहेत. आपण एकत्र येऊन शक्ती दाखवली, तर विधानसभेवर आपलाच झेंडा फडकेल, पण आपण जागरूक नसल्याने आरक्षणासाठी झगडावे लागत आहे. आता घरात न बसता रस्त्यावर आले पाहिजे. रस्त्यावर उतरून आंदोलन करा, आपल्या तलवारीची धार दाखवून द्या, असे आवाहन आमदार नीलेश राणे यांनी १४ मे या दिवशी येथे केले. (आरक्षणासाठी हिंसक भाषा वापरणे हीच काँग्रेसची संस्कृती आहे ! आरक्षण संस्कृती निर्माण करून जातीजातींमध्ये भेदभाव करणारेच खरे जात्यंध आहेत. त्यामुळे आरक्षण त्याज्यच आहे. - संपादक) छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीराजे भोसले युवा मंचच्या वतीने मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मराठा आरक्षण महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. मराठा समाज राज्यात ३२ टक्के आहे, पण आपल्यामध्ये जागृती नाही. सर्वपक्षीय १४५ आमदार मराठा आहेत. आपण एकत्र आलो, तर राज्यात केवळ आपलीच सत्ता असेल, असे राणे यांनी सांगितले.

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे वसई येथे गोमांसाने भरलेला टेम्पो कह्यात

     वसई (जिल्हा पालघर) - वसई पूर्व भागातून गोमांस येते आणि ते तालुक्यातील इतर भागांत वितरीत होते, अशी माहिती वसई येथील गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार गोरक्षक सर्वश्री राजेश पाल, राकेश पाल आणि गौरव पिपाडा यांनी १४ मे या दिवशी सकाळी सापळा लावून वसई पश्‍चिम पंचवटी नाका येथे गोमांसाने भरलेला छोटा टेम्पो पकडला. त्यामध्ये जवळपास ३०० किलो गोमांस होते. अनधिकृत कत्तल करून वाहतूक करणारे धर्मांध आरोपी अक्तर शेख, बशीर कुरेशी आणि मोहम्मद कुरेशी यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या छळाला उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाई करा ! - श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर आयोजित चर्चासत्राद्वारे अभय वर्तक 
यांनी हिंदुत्वाची बाजू कणखरपणे मांडली !
श्री. अभय वर्तक
     मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्आयए) वर्ष २०११च्या पूर्वीपासून अन्वेषण करत आहे. मग त्यांना आरोपपत्र दाखल करायला वर्ष २०१६ का उजाडले ? वर्ष २०१३ मध्येच त्यांच्याकडून ते दाखल व्हायला हवे होते; मात्र तत्कालीन काँग्रेसी राज्यकर्त्यांच्या दबावामुळे ते दाखल झाले नाही. जे काही वास्तव आज समोर आले आहे, ते वर्ष २०१३ मध्येच समोर आले असते. आज साध्वी प्रज्ञासिंह यांची मरणासन्न अवस्था झाली आहे. कर्नल पुरोहित आणि मेजर उपाध्याय अशा उच्चपदस्थ सैन्याधिकार्‍यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. शाम साहू यांना जेव्हा न्यायालयात उपस्थित करण्यात आले, तेव्हा त्यांच्या मोठ्या भावाला हा धक्का सहन न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणातील आरोपींचे आयुष्य किती निर्दयीपणे उद्ध्वस्त केले आहे, ते यावरून लक्षात येते. ज्यांनी साध्वींना बेकायदेशीरपणे अटक केली, तसेच त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी येथे केली.

पुण्यातील वाढत्या घरफोड्यांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचा पायी गस्त घालण्याचा निर्णय

बंदोबस्तासमवेत पोलिसांनी सर्व प्रकारच्या गुन्हेगारांच्या मुसक्या कायमच्या आवळल्या, 
तरच सुरक्षित पुणे होऊ शकेल. पोलीस प्रशासन हे जाणून तशी उपाययोजना ते करील का ?
     पुणे - येथील डेक्कन आणि कोथरूड परिसरात घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. एकापाठोपाठ एक १४ सदनिका आणि २ दुकाने फोडून चोरट्यांनी २७ लक्ष रुपयांचा ऐवजही चोरीस नेला होता. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी चोरट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांना रात्री पायी गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच पोलीस घरफोडीच्या घटना रोखण्यासाठी निवासी गृहरचना संस्थांच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली. ते म्हणाले की, उन्हाळी सुट्टीमुळे नागरिक मोठ्या संख्येने परगावी जातात. त्यामुळे घरफोड्या करणार्‍या चोरट्यांचे फावते. चोरट्यांना रोखण्यासाठी पोलिसांची खास पथके सिद्ध करण्यात आली आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांकडून अभ्यास दौर्‍यांसाठी पैशाची उधळण !

जनतेने कररूपाने दिलेल्या पैशाची उधळपट्टी करणार्‍या अशा लोकप्रतिनिधींना 
पुढच्या निवडणुकीत जागा दाखवून द्यायला हवी !
गेल्या ५ वर्षांत देश-विदेशांत २९ लक्ष रुपये व्यय 
    पिंपरी (पुणे), १६ मे - प्रशिक्षण, अभ्यास दौरा अशी विविध कारणे देत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी गेल्या ५ वर्षांत २९ लक्ष रुपये व्यय केले आहेत. गेल्या ५ वर्षांत पालिकेतील पदाधिकार्‍यांनी युरोप, जपान, स्पेनसह देशात विविध ठिकाणी केलेल्या पर्यटनावर ही उधळण केली आहे. याविषयी पालिकेतील शिवसेना गटनेत्या सुलभा उबाळे यांनी सत्ताधारी राष्ट्र्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. (जनहितासाठी राष्ट्र्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून पैशांची होणारी उधळण उघड करणार्‍या सुलभा उबाळे यांचे अभिनंदन ! - संपादक)

(म्हणे) देशात मूठभर धर्ममार्तंड आणि सनातनी यांंनी केले धर्मसंसदेचे राज्य !

प्रा. एन्.डी. पाटील यांची गरळओक
     सांगली - आताच्या शासनास डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांच्या खुन्यांना शिक्षा करण्याची इच्छा नाही. सध्यात देशात असहिष्णु आणि अविवेकी वातावरण आहे. देशात लोकशाहीचे नाही, तर मूठभर धर्ममार्तंड आणि सनातनी यांनी केलेले धर्मसंसदेचे राज्य राबवण्याचा प्रयत्न चालू आहे. हे सरकार पुरोगामी विचारांच्या आणि लोकशाहीच्या मुळावर उठले आहे, अशी गरळओक प्रा. एन्.डी. पाटील यांनी केली. ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दोन दिवसांच्या साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. (धर्ममार्तंड आणि सनातनी यांच्या धर्मसंसदेचे राज्य म्हणणे, हा लोकनियुक्त शासनाचा अवमान आहे. अंनिस जर गेली २५ वर्षे कार्य करत आहे, तर त्यांची विचारसरणी लोक स्वीकारत का नाहीत ? इथेच त्यांच्या विचारांचा फोलपणा आणि खुजेपणा लक्षात येतो ! - संपादक)
प्रा. एन्.डी. पाटील यांनी केलेला कांगावा !
१. देशात अंधश्रद्धेला अनुकूल राज्यकर्ते सत्तेवर आले आहेत. गणपतीच्या निर्मितीवरून प्लास्टीक सर्जरीचा शोध लावणार्‍या पंतप्रधानांसमोर डोके आपटून घ्यायचे का ? (अहंकारी प्रा. एन्.डी. पाटील ! - पंतप्रधानांनी जे दाखले दिले आहेत, त्याचे सर्व पुरावे सध्या अस्तित्वात आहेत. त्यामुळे पंतप्रधानांपेक्षा स्वत:ला अधिक कळते, असे प्रा. एन्.डी. पाटील यांना म्हणायचे आहे का ? - संपादक)

रिंकू राजगुरु आंतरजातीय विवाह योजने ची राजदूत होणार ?

     मुंबई - सैराट या चित्रपटातील नायिका कु. रिंकू राजगुरु आंतरजातीय विवाह योजनेची राजदूत होणार असल्याची चर्चा आहे. शासनाचा सामाजिक न्याय विभाग आंतरजातीय विवाह योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी रिंकू राजगुरु हीचा विचार करत असल्याचे सांगितले जात आहे; पण रिंकू राजगुरु अल्पवयीन असल्याने, तसेच आंतरजातीय विवाहाच्या संदर्भात तिला स्वतःलाही पुरेशी माहिती असण्याची शक्यता नसल्याने तिच्या नावाच्या संदर्भात प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. (विवाहाच्या विज्ञापनांसाठी अल्पवयीन मुलीचा विचार करणे, ही चूक आहेच; पण खरे तर जातीअंताच्या लढ्याच्या नावाखाली आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेचाच शासनाने पुनर्विचार करणे अपेक्षित आहे. आज आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणारे उद्या सर्व धर्म समान आहेत, हे सांगण्यासाठी आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देणार नाहीत, हे कशावरून ? शासनाला खरेचच जातीअंत करायचा असेल, तर जातीआधारित दिले जाणारे आरक्षण सर्वप्रथम बंद करून गुणवत्तानिहाय भरतीचा आग्रह धरता येईल. पण त्याचा विचार न करता आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे, हा सामाजिक न्याय विभागाकडून केला जाणारा सामाजिक अन्यायच म्हणावा लागेल ! - संपादक)

साध्वी प्रज्ञासिंग आणि इतर हिंदुत्ववाद्यांच्या छळाला कारणीभूत असणार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा ! - अधिवक्ता गोविंद गांधी

सातारा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
     सातारा - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या आरोपपत्रात साध्वी प्रज्ञासिंग आणि कर्नल पुरोहित यांची नावे वगळण्यात आली आहेत. गेली ८ वर्षे साध्वी आणि कर्नल यांना अनन्वित छळ सोसावा लागला आहे. साध्वींना तर तत्कालीन निर्दयी शासनाने वैद्यकीय उपचारही मिळू दिले नाहीत. त्यांना सोसाव्या लागलेल्या छळाला कारणीभूत असणार्‍या सर्वांचीच चौकशी करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद गांधी यांनी केली. 
राष्ट्रीय हिंदू आंदोलनामध्ये सहभागी हिंदुत्ववादी
     कोरेगाव रस्त्यावरील बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनामध्ये ते बोलत होते. या वेळी पू. विजय महाराज यांची वंदनीय उपस्थिती होती. आंदोलनामध्ये हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. दत्ता सणस, कार्यकारणी सदस्य श्री. उमेश गांधी, विश्‍व हिंदू परिषदेचे शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर, बजरंग दलाचे श्री. मुकुंद पंडित, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे, श्री. सुनील दळवी, सनातन संस्थेच्या सौ. रूपा महाडिक, सौ. लिला निंबाळकर आदींसह ६० धर्माभिमानी हिंदू सहभागी झाले होते. या वेळी विविध मागण्या करण्यात आल्या.

केरळमध्ये साम्यवाद्यांनी दोन्ही पाय कापल्यावरही रा.स्व. संघ न सोडणारे सी. सदानंद मास्टर !

केरळमध्ये साम्यवाद्यांनी संघ स्वयंसेवकांच्या हत्या केल्या, त्यांचे हात पाय तोडले; मात्र त्यावर 
एकही ढोंगी निधर्मीवाद्याने कधीही तोंड उघडले नाही. दुसरीकडे रोहित वेमुलाच्या आत्महत्येवरून 
आणि दादरी हत्याकांडावरून हिंदूंना असहिष्णु ठरवण्यात तेच पुढे आहेत ! 
     तिरूवनंतपुरम् - २५ जानेवारी १९९४ म्हणजेच २२ वर्षांपूर्वी केरळच्या साम्यवाद्यांनी संघ स्वयंसेवक सी. सदानंद मास्टर यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात ते बचावले. परंतु या मारहाणीत त्यांना त्यांचे दोन्ही पाय गमवावे लागले. या आक्रमणानंतरही त्यांनी रा.स्व. संघाचा त्याग केला नाही. आज सदानंद कृत्रिम पायावर उभे आहेत. आता ते कुतपरम्बा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांना येथे जीवित हुतात्मा म्हटले जाते. 
     aसी. सदानंद पूर्वी साम्यवादी पक्षातच होते. परंतु साम्यवाद्यांची विचारसरणी न पटल्याने आणि रा.स्व. संघाचा स्वयंसेवक बनून संघाची शाखा स्थापन केल्याने साम्यवाद्यांनी त्यांचे पाय कापले. सी. सदानंद म्हणतात की, माझ्यावर अत्याचार करणार्‍या साम्यवाद्यांना एक संदेश द्यायचा होता की, जो कोणी साम्यवाद सोडून जाणार त्याची अशीच स्थिती केली जाईल. माझ्या सुदैवाने मी हे सांगण्यासाठी जिवंत आहे.

कोझीकोड (केरळ) येथील मंदिराजवळील भूमी बळकावण्याच्या मुसलमान अनाथालयाच्या प्रयत्नांना संघटित हिंदूंनी हाणून पाडले !

हिंदूसंघटनाचा विजय !
  • क्षेत्र भूमि संरक्षण वेदी या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने घेतला पुढाकार !
  • हिंदूंनो, या यशाविषयी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा !
      तिरुवनंतपुरम् - देवाचा स्वत:चा देश (गॉड्स ओन कन्ट्री) म्हणून ओळखले जाणारे केरळ राज्य ! आज मात्र येथील महिला आणि मुलांची तस्करी यांसारख्या गैरप्रकारांमुळे हे राज्य चर्चेत आहे. विशेषत: मल्लपुरम जिल्ह्यात अशा घटना आता मोठ्या प्रमाणात घडत आहेत. येथे प्रशासनाकडून अल्पसंख्यांक समुदायाला विशेष सुविधा पुरवल्या जात असून हिंदूंना मात्र सापत्नपणाची वागणूक दिली जाते. न्याय मागण्यासाठी आवाज उठवणार्‍यांवर आक्रमणे होत आहेत. येथील मलबार क्षेत्रात तर हिंदूंना वेगळ्याच प्रकारच्या आघातांचा सामना करावा लागत आहे. येथील हिंदु मंदिरांवर समाजाच्या विविध वर्गांकडून आक्रमणे होत आहेत. तसेच श्रद्धाळू हिंदूंच्या उपासनेच्या अधिकारावर गदा घालण्यात येत आहे.

फलक प्रसिद्धीकरता

बांगलादेशमधील अल्पसंख्यांक हिंदूंवरील अनन्वित अत्याचारांचे सत्र चालूच !
     बांगलादेशमधील विजयनगर जवळील एरियाल गावात एका राजकारण्याने ७५ धर्मांधांच्या साहाय्याने गावातील ३८ हिंदूंवर प्राणघातक शस्त्रे आणि बंदुका यांद्वारे आक्रमण केले. या वेळी त्यांनी १७ लक्ष रुपयांचा ऐवज लूटला तसेच २ हिंदु महिलांवर बलात्कारही केला.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Bangladeshme dharmandhoka 38 Hinduopar akraman, 2 Hindu mahilyaopar balatkaar.
     Hinduo, Bangladeshke Hinduoki raksha hetu Bharat sarkarpar dabav banao!
जागो !
: बांगलादेश में धर्मांधों का ३८ हिन्दुआें पर आक्रमण, २ हिन्दू महिलाआें पर बलात्कार !
     हिन्दुओ, बांगलादेश के हिन्दुआें की रक्षा हेतु भारत सरकार पर दबाव बनाओ !

क्रांतीकारकांचा अवमान करणार्‍या राष्ट्रद्रोह्यांवर कठोर कारवाई करा ! - धर्माभिमानी हिंदूंची एकमुखाने मागणी

     पुणे - सवंग लोकप्रियतेसाठी हिंदूंच्या परंपरांना आव्हान देणार्‍या आणि महाराष्ट्राच्या कन्हैया कुमार ठरलेल्या उपद्रवी तृप्ती देसाई यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणार्‍या क्रांतीकारकांना आतंकवादी संबोधणार्‍यांवर देशद्रोहाचे गुन्हे प्रविष्ट करण्यात येऊन त्यांना शिक्षा करण्यात यावी, तसेच कर्नाटकमधील रायचूर येथील हिंदु मंदिर तोडून त्या ठिकाणी मशीद उभारणार्‍यांवर कर्नाटक शासनाने कारवाई करून हिंदूंना न्याय द्यावा या मागण्यांसाठी पुणे आणि पिंपरी (जिल्हा पुणे) या ठिकाणी राष्ट्रीय हिंदू आंदोलने करण्यात आली. १५ मे या दिवशी पुणे येथे मंडईतील टिळक पुतळा आणि पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक या ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये अनुक्रमे ७० आणि ५० धर्मप्रेमी सहभागी झाले होते. पुणे येथे झालेल्या आंदोलनामध्ये सनातन संस्थेचे श्री. प्रवीण कर्वे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संदेश कदम आणि शिवसेनेचे कसबा प्रभाग प्रमुख श्री. मुकुंद चव्हाण, तर पिंपरी येथे सनातन संस्थेच्या कु. उज्ज्वला ढवळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी आणि श्री शिवप्रतिष्ठानचे श्री. दत्ताभाऊ गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे बालवयातच मुलांना राष्ट्र आणि धर्म कार्याचे बाळकडू पाजणे, ही काळाची आवश्यकता ! - सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

      
व्यासपिठावरून घोषणा देतांना डावीकडून श्री. सुमीत सागवेकर आणि अन्य मान्यवर
      नवी मुंबई - छत्रपती संभाजी महाराजांना ज्याप्रमाणे बालवयातच स्वराज्य आणि धर्मरक्षणाचे धडे दिले गेले, त्याचप्रमाणे आपणही आपल्या मुलांना बालवयातच राष्ट्र आणि धर्म कार्याचे बाळकडू पाजणे, ही काळाची आवश्यकता आहे; अन्यथा पुढील काळ कठीण जाईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमीत सागवेकर यांनी मुंबईत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएम्सी) संकुलात केले. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धर्मवीर संभाजी राजे बाजार संकुलातील धर्मवीर संभाजी राजे उत्सव मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या धर्मवीर संभाजी राजे यांच्या ३५९ व्या जयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
     या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर श्री. सुधाकर सोनावणे, क्रीडा सभापती प्रकाश मोरे, नवी मुंबई भाजीपाला व्यापारी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष सोपान मेहेर, राजे शिवाजी उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. गणेश म्हांगरे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला बाजारपेठेचे माजी संचालक श्री. शंकर पिंगळे, शिवसेना नगरसेवक श्री. रामदास पवळे, घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. वैैलास ताजणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. धर्मवीर संभाजी राजे उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. सूर्यकांत झेंडे, सचिव भाऊसाहेब भोर, सर्वश्री गणेश पावगे आणि वसंत सणस या सर्व पदाधिकार्‍यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतल्याने महापौरांच्या हस्ते या वेळी सर्वांचा विशेष सत्कार करण्यात आला. धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त महापौरांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या, तसेच उपस्थितांना संबोधित केले.

केंद्रशासनाविषयी खोटे वृत्त प्रसिद्ध करणार्‍या पत्रकारास अटक !

हिंदूंना अपकीर्त करणारी खोटी वृत्ते प्रसारित करणार्‍या प्रसारमाध्यमांवरही 
शासनाने अशीच कारवाई करणे अपेक्षित आहे ! 
     नवी देहली - केंद्रशासनाचे आयुष मंत्रालय मुसलमानांना नोकरी देत नाही, असे खोटे वृत्त प्रसिद्ध केल्याच्या प्रकरणी देहली पोलिसांनी पुष्प शर्मा नावाच्या पत्रकारास १४ मे या दिवशी अटक केली. आयुष मंत्रालयाने माहिती अधिकाराच्या अंतर्गत दिलेल्या माहितीचा विपर्यास करत शर्मा याने केंद्रशासनाला मुसलमानविरोधी ठरवले होते.
     पुष्प शर्मा याने मार्च २०१६ मध्ये मिल्ली गॅझेट या इंग्रजी पाक्षिकात आम्ही मुसलमानांना नोकरी देत नाही : मोदी शासनाचे आयुष मंत्रालय, या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर काही दिवसांनी आयुष मंत्रालयाने शर्मा याच्या विरोधात कोटला मुबारकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याला फसवणूक, खोटेपणा आणि जाती-धर्माच्या आधारावर २ समाजांत शत्रुत्व निर्माण करणे, या आरोपांखाली १४ मे या दिवशी सायंकाळी अटक करण्यात आली, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त नुपुर प्रसाद यांनी दिली. (प्रसिद्ध झालेल्या लेखाविषयी कारवाई करण्यास २ मास लागणार्‍या देहली पोलिसांची अकार्यक्षमता ! - संपादक)अरुणाचल येथील सैनिक आणि अधिकारी यांच्यातील हाणामारी म्हणजे बंड नव्हे ! - सैन्यदलाचे स्पष्टीकरण

     नवी देहली - अरुणाचल प्रदेशमधील हलयूलियांग सैन्य तळातील एका पथकाच्या दैनंदिन पथसंचालनामध्ये एका सैनिकाचा मृत्यू झाला. त्यामुळे इतर सैनिक संतप्त झाले. नंतर अधिकारी आणि सैनिक यांच्यात हाणामारी झाली. यासंदर्भात स्पष्टीकरण देतांना सैन्यदलाने म्हटले की, ही हाणामारी म्हणजे बंड नाही. (सैनिक आणि अधिकारी यांच्यात एकमेकांविषयी प्रेम आणि जिव्हाळा नसेल, तर अशा घटना यापुढेही होत रहातील आणि प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी त्याचा भारताला फटका बसू शकतो. यासाठी सैन्याने या दोघांमधील संबंध चांगले रहावेत, यासाठी प्रयत्न करायला हवेत. - संपादक)

हिंदु प्रेयसीसमवेत प्रेमसंबंध तुटल्यावर मुसलमान युवक झाला इसिसचा आतंकवादी !

अशा युवकाबरोबर हिंदु तरुणीचे लग्न झाले असते, तर ती ही 
कदाचित इसिसची आतंकवादी झाली असती !
इसिसचा विश्‍वास प्राप्त करण्यासाठी युवक मंदिरात बॉम्बस्फोट करणार होता ! 
     नवी देहली - जानेवारी महिन्यात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अर्थात एन्आयएने अटक केलेल्या इसिसच्या १४ आतंकवाद्यांपैकी आशिक अहमद उर्फ राजा नावाचा आतंकवादी मंदिरात बॉम्बस्फोट करणार होता, अशी माहिती त्याच्या चौकशीच्या वेळी मिळाली आहे. 
१. १९ वर्षीय अशिकचे एका हिंदु तरुणीवर प्रेम होते; मात्र लग्नासाठी ती धर्मांतर करू इच्छित नव्हती. त्यानंतर या दोघांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले. यानंतर आशिकने जिहादी आतंकवादी बनण्याचा निश्‍चय केला. 
२. अटक झालेल्या आतंकवाद्यांकडून पोलिसांनी काही छायाचित्रे जप्त केली होती. त्यातील काही छायाचित्रांद्वारे बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. ही छायाचित्रे त्यांनी संकेतस्थळांवरून डाऊनलोड केली होती.

युपीएस्सीच्या यशानंतरची वाटचाल !

     केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएस्सी) परीक्षेचा निकाल नुकताच लागला. प्रशासकीय सेवा, विदेश सेवा, पोलीस सेवा आणि केंद्रातील अ आणि ब दर्जाच्या सेवांसाठीच्या या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागत असल्याने जेव्हा अपेक्षित यश पदरी पडते, तेव्हा त्याचे समाधान निराळेच असते. उत्तीर्ण होत यशाची एक पायरी तर गाठली गेली आता त्यापुढील पायरी म्हणजे प्रत्यक्ष सेवेत दाखल झाल्यानंतर कामातून आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेची चुणूक दाखवणे.
     वैदिकांची संस्कारप्रक्रिया सुटली; म्हणून चोरपावलाने येणार्‍या इहवादी हिंदुत्वावर समाधान मानावे लागते आणि उजळ माथ्याने गोंधळ घालणार्‍या पाश्‍चात्त्यीकरणाला मूकसंमती द्यावी लागते !
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर !

सुट्टीतील परिपाठ !
     सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. हा सुट्टीचा कालावधी मुलांमध्ये विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालवाचकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
बालमित्रांनो, आपला अमूल्य वेळ खर्च करणार्‍या दूरचित्रवाहिनीच्या राक्षसाला दूर ठेवा !
       बर का विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अतीप्रिय असणारी दूरचित्रवाणी बघण्यात तुम्ही आयुष्याचा किती वेळ घालवता याची तुम्हाला कल्पना आहे का ? मित्रांनो, आम्हाला माहीत आहे की, तुम्हाला आयुष्यात कोणीतरी व्हायचे आहे, तुमचे ध्येय गाठायचे आहे. तुमच्या आयुष्यातील एवढे घंटे जर तुम्ही दूरचित्रवाणी निवळ मनोरंजनासाठी पाहण्यात वाया घालवलेत, तर मोठेपणी तुम्हीच तुम्हाला क्षमा करणार नाही ! मित्रांनो, दूरचित्रवाणी एक राक्षस आहे, तुमचे डोळे बिघडवणारा, तुमचे विचार खुंटवणारा, तुमची मती मंद करणारा ! काहींची दृष्टी बिघडवणारा, तर काहींचे डोके दुखवणारा ! धिम्या गतीने पसरणारे ते एक विषच आहे म्हणाना ! मित्रांनो, तुमच्या मर्यादित आयुष्याचा बहुमूल्य वेळ अमेरिकेत ज्याला इडियट बॉक्स म्हणतात, त्याच्या स्वाधीन करणार आहात का ? हे दिवस आहेत तुमचे मैदानी खेळ खेळायचे, नवनवीन गोष्टी शिकण्याचे, छंद जोपासण्याचे, भरपूर व्यायाम आणि भरपूर वाचन करण्याचे ! मित्रांनो, याची शिदोरी तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे, नव्हे याच पायावर तुमच्या व्यक्तिमत्वाची इमारत उभी राहणार आहे ! तेव्हा सारा तो रिमोट बाजूला आणि हाती धरा पुस्तकाला ! हा मूलमंत्र जगा आणि तुमचे व्यक्तीमहत्व बहुगुणी बनवा !

गुढीपाडव्यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोवा राज्यात विविध ठिकाणी सामूहिक गुढीपूजन आणि प्रसारफेर्‍या

१. पेडणे येथे सामूहिक गुढीपूजन आणि प्रभातफेरी 
यांत समितीच्या वतीने जनप्रबोधन 
     पेडणे येथील सामूहिक गुढीपूजन आणि प्रभातफेरी यावरून समितीच्या सौ. राजेश्री गडेकर यांनी गुढीपाडव्याची माहिती सांगितली. त्या वेळी यापुढे हस्तांदोलन न करता नमस्कार करणार आणि वाढदिवस तिथीनुसारच साजरा करणार, असा संकल्प सौ.गडेकर यांनी सर्वांकडून करवून घेतला.
२. फोंडा येथे ३४ संघटनांनी एकत्रितपणे काढलेल्या सामूहिक 
प्रभातफेरीत समितीच्या वतीने सूत्रसंचालन
    फोंडा येथील नववर्ष स्वागत समितीच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत ३४ संघटनांनी एकत्रितपणे सामूहिक प्रभातफेरी काढली. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे श्री. शैलेश बेहरे यांनी सूत्रसंचालन केले आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन केले.
     निधर्मी संकल्पनेचे अधिष्ठानच मूळ सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे उद्ध्वस्तीकरण हे आहे ! - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, ८.७.२०१०)
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी
 इंग्रजी, हिंदी आणि मराठी संकेतस्थळाला भेट द्या !

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

     जातीय दंगे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदु परिषद व बजरंग दल वगैरेंमुळे होत असतील तर बांगलादेश, पाकिस्तान, सौदी अरेबिया, इराक, टर्की, अफगाणिस्तान, इंडोनेशिया, चेचेन्या, चायना, रशिया, इंग्लंड, फ्रांस, स्पेन, सायप्रस वगैरे तेथे तर या संगठन नाहीत येथे ही दंगे का होतात?
- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस (क्रमश:)

आपले जीवन नाही सैराट होण्यासाठी ।

कु. मधुरा चतुर्भुज
मन होते जेव्हा ।
झिंग झिंग झिंगाट ।
सैराटचा वणवा ।
पेटतो जोरात ॥ १ ॥

लहान वयात प्रेम होते ।
पळून जाऊन संसाराचे गूढ उकलते ।
आरंभी वाटते सर्व गोड ।
सुडाने पेटलेल्या नजरेची ।
कुणाची तरी असते त्याला जोड ॥ २ ॥
     पाकिस्तानशी सर्व प्रकारचे राजनैतिक, आर्थिक, सामाजिक, तसेच व्यावहारिक संबंध त्वरित तोडून टाका. पाकिस्तान, बांगलादेश यांना शेजारी राष्ट्र्र असे म्हणणे बंद करा ! त्यांना शत्रूराष्ट्रच म्हणा ! - आचार्य स्वामी धर्मेंद्रजी महाराज (मासिक सावरकर टाइम्स, जून २०१०)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

कॅनडा येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची ५ वर्षीय चि. राधा गडोया !

चि. राधा गडोया
१. चि. राधाला श्रीविष्णूचे दर्शन होणे
     (चि. राधा गडोया हिची पातळी २०१४ मध्ये ६१ टक्के होती.) अनुमाने ३ आठवड्यांपूर्वी राधाला ही अनुभूती आल्याचे तिने मला सांगितले. एके दिवशी राधा खेळत असतांना तिला घराच्या खिडकीत श्रीविष्णूचे दर्शन झाले. काही काळानंतर श्रीविष्णु दिसेनासे झाले. श्रीविष्णूचे दर्शन झाल्याने राधाला पुष्कळ आनंद झाला असल्याचे तिने मला सांगितले. - सौ. राधा गडोया कॅनडा (२४.१.२०१६)
२. राधा सगळ्यांना साहाय्य करणारी आणि दयाळू मुलगी असून ती
 प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करते, असे तिच्या शाळेतील शिक्षकांनी कौतुक करणे
     ५.२.२०१६ या दिवशी आम्हाला चि. राधाच्या शालेय प्रगतीविषयी माहिती देण्यासाठी तिच्या शाळेत बोलावले होते. राधा ५ वर्षांची असून ती बालवाडीतील मोठ्या गटात शिकते. आम्ही तिच्या शिक्षकांना तिच्या प्रगतीविषयी विचारल्यावर ते म्हणाले, राधाची प्रगती पाहून आम्ही पुष्कळ आनंदी आहोत. राधा सगळ्यांना साहाय्य करणारी आणि दयाळू मुलगी असून ती प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करते. तिला शिकवणार्‍या आणखी एका शिक्षकाने सांगितले, जगातील सगळी मुले राधासारखी झाली, तर जग पुष्कळ सुंदर बनेल. शिक्षकांचे तिच्यावरचे प्रेम पाहून आम्ही आश्‍चर्यचकित झालो. हे सर्व प.पू. गुरुदेवांची कृपा आणि तिच्यावरील साधनेचे संस्कार यांमुळे झाले आहे, याची आम्हाला जाणीव झाली.

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
     सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.
शिवमोग्गा, कर्नाटक येथील जिज्ञासूंना रामनाथी आश्रमाविषयी 
जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती
१ आ. श्री. गोपालकृष्ण
१ आ १. साधनेचे टप्पे समजून घेतल्यावर आनंद होणे : स्वभावदोष निर्मूलन, अहं निर्मूलन, नामजप, सत्संग, सत्सेवा, त्याग आणि प्रीती यांविषयी समजून घेतल्यावर मला आनंद झाला अन् हा आनंद मनात भरून राहिला आहे.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या भक्तीरसात चिंब होऊन स्वत:च्या रुग्णालयाला मंदिराप्रमाणे चैतन्यमय बनवणारे नगर येथील आधुनिक वैद्य चिंतामण भालचंद्र कुलकर्णी आणि आधुनिक वैद्या (सौ.) गौरी कुलकर्णी !

चिंतामणी हॉस्पिटल झाले ब्रह्मचैतन्य रुग्णालय
१. मंदिराप्रमाणे मंगल वातावरण असणारे चिंतामणी रुग्णालय !
     रुग्णालय म्हणजे सर्वत्र औषधांचा वास आणि चहूकडे गंभीर वातावरण, तर मंदिर म्हणजे उदबत्तीचा सुगंध; सुविचार अन् श्‍लोक लिहिलेले ठिकाण, असे चित्र डोळ्यांसमोर येते. जर एका रुग्णालयात असेच मंगल वातावरण आहे, असे सांगितले, तर खरे वाटेल का ? पण हे खरे आहे. नगरचे ब्रह्मचैतन्य रुग्णालय अगदी एखाद्या मंदिरासारखे आहे.
     आधुनिक वैद्य चिंतामण भालचंद्र कुलकर्णी आणि आधुनिक वैद्या (सौ.) गौरी कुलकर्णी यांचे मूळ चिंतामणी हॉस्पिटल हे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या भक्तीरसाने भारावून जाऊन ब्रह्मचैतन्य रुग्णालय झाले आहे. या रुग्णालयाच्या मागे एक ३ मजली प्रशस्त मंदिरसुद्धा आहे.
२. चिंतामणी रुग्णालयाची वैशिष्ट्ये
अ. या रुग्णालयात नाममात्र शुल्क (केवळ रु. ३०) आकारून रुग्णांची तपासणी होते.
आ. बाह्य रुग्ण विभागामध्ये (OPD मध्ये) रुग्णांचे स्वागत मोठ्या प्रेमाने होते.
इ. प्रवेश केल्या केल्या मनाचे श्‍लोक दृष्टीस पडतात.
ई. आधुनिक वैद्यांना भेटण्यासाठी आपला क्रमांक येण्याची वाट बघणारे रुग्ण रिकामे बसत नाहीत. तिथे ब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने आणि इतर आध्यात्मिक पुस्तके वाचनासाठी उपलब्ध आहेत.

भाविकांना साधना सांगण्यासाठी प्रसार पद्धतींचा अवलंब !

प्रदर्शन बघायला जमलेली लोकांची गर्दी
      उज्जैन - येथील सिंहस्थपर्वाच्या समाप्तीला केवळ एक आठवडा शिल्लक असल्याने स्नानासाठी घाटावर भाविकांची जशी गर्दी होत आहे त्या प्रमाणेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या प्रदर्शनाकडेही भाविकांचा ओघ वाढत आहे. येणार्‍या सर्व जिज्ञासूंना साधनेची व्यवस्थित माहिती सांगता यावी, तसेच ग्रंथ बघता यावे म्हणून प्रदर्शनातील साधकांनीही ग्रंथ असलेले अंगफलक घालून जिज्ञासूंना माहिती सांगणे चालू केले आहे. याचा जिज्ञासूंवरही सकारात्मक परिणाम होऊन त्यांच्याकडूनही साधनेविषयक अजून जिज्ञासेने माहिती जाणून घेतली जात आहे. 
अंगफलक घालून सेवा करतांना साधकांना 
जाणवलेलीे वैशिष्ट्ये 
१. श्री. मिलिंद पोशे : अंगफलक घालून सेवा केल्यावर आध्यात्मिक उपाय होत असल्याचे जाणवले.

आपत्काळाच्या भयावह स्थितीतही श्रीकृष्णच रक्षण करणार असल्याचे पडलेले स्वप्न आणि सर्वव्यापी श्रीकृष्णाने दिलेली पूर्वसूचना !

सौ. शालिनी मराठे
१. तिसरे महायुद्ध पेटल्याने भयावह स्थिती निर्माण होणे
     १४.१०.२०१५ या दिवशी भयंकर स्वप्न पडले. तिसरे महायुद्ध पेटले आहे. आकाशात विमानांची घर्र...घर्र चालू आहे. काही इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. विजेचे खांब आणि काही ठिकाणी वृक्ष मार्गावर उन्मळून पडले आहेत. अनेक ठिकाणी आगी लागल्या आहेत. जीव वाचवण्यासाठी लोक मिळेल त्या मार्गाने पळत सुटले आहेत.
२. युद्धमुक्त प्रदेशात जाण्यासाठी श्रीकृष्णाने 
साहाय्य करणे; त्या ठिकाणी पुष्कळ साधक भेटणे
     या भयावह स्थितीत मी भीतीग्रस्त होऊन भरभर चालत आहे. ओळखीचे कोणीच नाही. अनुमाने ४-५ किलोमीटर अंतर चालून गेल्यावर एक नदी लागली; पण ती पाण्याने भरलेली होती. मला पोहता येत नसून तिथे होडी नव्हती. पलीकडे गेले की, वाचले; कारण तो प्रदेश युद्धमुक्त होता. आता काय करू ? एवढ्यात एक माणूस आला आणि मला म्हणाला, हे मोठे चक्र आहे ना (चक्राकार फलक होता.) त्याच्यावर सर्व साधक आणि भक्त यांची नावे लिहिलेली आहेत. तू तुझे नाव शोध आणि त्यापुढे बरोबरचे चिन्ह काढ. म्हणजे तुला साहाय्य मिळेल. मला माझे नाव काही केल्या सापडेना. तेव्हा तो म्हणाला, घाबरू नकोस.

साधकांनो, आपल्याला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे मोक्षदाते गुरु लाभले आहेत, हा कृतज्ञताभाव बाळगून तीव्र साधना करा !

पू. (कु.) स्वाती खाडये
१. सनातनच्या साधकांतील साधकत्वाचे विविध पैलू
 पाहिल्यानंतर काही संतांनी अशी सेवावृत्ती असणारे
 साधक, शिष्य आमच्याकडे असावेत, असे मत प्रदर्शित करणे
     अनेक संत सनातनच्या विविध ठिकाणच्या आश्रमांना आणि सेवाकेंद्रांना भेट देतात. त्या वेळी आश्रमातील साधकांचा सेवाभाव, नम्रता, प्रामाणिकपणा, व्यवस्थापन, आश्रमातील स्वच्छता, यांसमवेतच आश्रमातील चैतन्य आदी वैशिष्ट्ये त्यांना भावतात. त्यामुळे काही संत साधकांना आमच्या आश्रमात येऊ शकता का ? आमचे शिष्य व्हाल का ?, असे विचारत असल्याचे लक्षात आले. अशीच काहीशी स्थिती उज्जैन येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वाच्या वेळी लक्षात आली. सिंहस्थपर्वाच्या ठिकाणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात विविध माध्यमांतून धर्मप्रसार चालू आहे. या कार्यात सनातनचे साधक तन, मन, धन अर्पून अन् झोकून देऊन सेवा करत आहेत. सनातनच्या साधकांतील साधकत्वाचे विविध पैलू पाहिल्यानंतर काही संत अशी सेवावृत्ती असणारे साधक, शिष्य आमच्याकडे असावेत, असे मत प्रदर्शित करत आहेत. एवढेच नव्हे, तर काही संत साधकांना तुम्ही आमचे शिष्यत्व स्वीकाराल का ?, असेही विचारत आहेत. काही संतांना राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्याविषयी तळमळ असते. वैयक्तिक स्तरावर त्यांचे कार्य चालू असते; परंतु त्यांचा शिष्य परिवार नसतो. अशा संतांना सनातनच्या साधकांची सेवावृत्ती भावते अन् सनातनच्या साधकांसारखे शिष्य आपल्याला मिळावेत, अशी त्यांची सुप्त इच्छा असते.

गुरुमाऊली साधकांचे दोष अन् अहं स्वीकारून त्यांना गुणांची भेट देत असल्याने त्यांच्या आनंदासाठी प्रयत्नांची गती वाढवणे आवश्यक असल्याचे लक्षात येणे

      एकदा आमची प.पू. डॉक्टरांशी भेट झाली. त्या भेटीत एका साधिकेने सांगितले की, घरी भरपूर धन असूनही मी अर्पण देऊ शकत नाही. तेव्हा प.पू. डॉक्टर म्हणाले, अर्पण दिल्यावरून घरी वाद निर्माण होत असतील, तर आम्हाला अर्पण नको. तुमचे दोष द्या. हे वाक्य ऐकून दुसर्‍या दिवशी ध्यानमंदिरात बसल्यावर मी गुरूंना प्रार्थना केली, हे गुरुदेवा, माझ्यातील सर्व दोष आणि अहं आपल्या चरणी अर्पण होऊ देत आणि माझ्यातील गुण तुम्हाला अपेक्षित असे वाढू देत. त्यानंतर मला मी माझे दोष हातात धरले असून दोषांना सोन्याचे कोंदण केले आहे, असे दिसले; पण गुरुचरणी चांगले अर्पण करायचे सोडून मी दोष अर्पण करत आहे. या दोषांचे काटे गुरुचरणांना लागतील कि काय, अशा विचाराने मनाला वाईट वाटत नव्हते. हे सर्व विचार चालू असतांनाच दोष आणि अहं एकामागोमाग गुरुचरणांवर अर्पण होऊ लागले आणि अर्पण झालेले काटेरी दोष गुरुचरणांवर जळून ताजी टवटवीत फुले निर्माण होत आहेत आणि त्यानंतर ती गुरुचरणांमध्ये विलीन होत आहेत, असे दिसले.

साधिकेची स्वत:च्या लग्नाविषयी झालेली विचारप्रक्रिया, एखाद्या मुलासंबंधी आलेले विचार आणि त्यावर श्रीकृष्णाच्या कृपेने केलेली मात !

     एकदा छायाचित्रांचा संच (अल्बम) दाखवण्यासाठी मी एका संतांकडे गेले होते. त्या वेळी त्यांनी विचारले, आई-बाबांना तुझ्या लग्नाची काळजी वाटत नाही ना ? मी त्यांना नाही म्हणाले. त्यानंतर आमच्यामध्ये याविषयी संभाषण झाले. लग्नाविषयी माझी आधीपासून होत असलेली विचारप्रक्रिया, एखाद्या मुलासंबंधी आलेले विचार आणि त्यावर श्रीकृष्णाच्या कृपेने मात कशी करता आली, हे सर्व टप्प्याटप्प्याने आठवत गेले. ते सर्व लिहून देत आहे. खरेतर हे सर्व लिहूया, म्हणजे असे विचार आणखी कोणाच्या मनात येत असतील तर त्यांनाही साहाय्य होईल, असे मला वाटायचे; पण माझ्याकडून तशी कृती झाली नाही. शेवटी देवालाच हे सर्व लिहून दे, असे सांगावे लागले.
१. मनात मुलांविषयी विचार येणे आणि त्या वेळी फार अपराधी वाटणे
     माझ्या मनात मुलांविषयी विचार यायचे, त्या वेळी मला फार अपराधी वाटायचे. मी आश्रमात राहूनही असे विचार माझ्या मनात का येतात ?, असे वाटून मला ते स्वीकारता यायचे नाहीत. मी देवाला म्हणायचे, देवा, हे सर्व मी कोणाला सांगूही शकत नाही आणि यावर मला मातही करता येत नाही. मी काय करू ? मनामध्ये कोणा एका मुलाविषयी असे विचार नसायचे; पण कोणत्या ना कोणत्या मुलाविषयी असे विचार येत रहायचे.

भ्रमणभाषने शिकवला स्वेच्छा आणि परेच्छा यातील भेद !

    
सौ. वर्षा ठकार
     एके दिवशी मी भ्रमणभाषवर चंडीस्तोत्र ऐकत असतांना माझे त्याच्यावरील अनेक बटणांकडे लक्ष गेले. मी बटन दाबीन, तसे भ्रमणभाष विकल्प न येता, बुद्धीचा वापर न करता, विनाविलंब आणि तत्परतेने सर्व कार्य करत होता, म्हणजेच भ्रमणभाष परेच्छेने वागत सर्व सेवा आनंदाने करतो, असे माझ्या लक्षात आले.
     मी जेथे जाते, तेथे माझ्यासमवेत माझा भ्रमणभाष घेऊन जाते. मी त्याला जपून वापरते, काळजीपूर्वक ठेवते; कारण भ्रमणभाष परेच्छेने वागतो, हे मला जाणवले.
     माझ्याकडून माझी आणि भ्रमणभाषची तुलना झाली. तेव्हा मी विलंबाने कृती करणे, मनाने करणे आणि बुद्धीचा वापर करणे, अशा प्रकारे सांगितलेली सेवा करते, असे लक्षात आले.
     तेव्हा मनात भ्रमणभाषही माझ्याप्रमाणे स्वेच्छेने वागू लागला, तर मी काय करीन ?, असा प्रश्‍न आला. त्या वेळी भ्रमणभाष खराब झाला; म्हणून फेकून देईन ना ?, म्हणजे मलाही परेच्छेने वागणाराच आवडेल ना ?, असे मला वाटले.

सांग ना देवा !

देवराणा,
सांग ना देवा, पुष्पाला आवश्यकता असते का सुगंधाची प्रचीती देण्याची ? ।
पुष्पाला रंग दाखवता येईल, सुगंध कसा दाखवता येईल ? ।
चंद्राला आवश्यकता असते का शीतलतेची प्रचीती देण्याची ? ।
सूर्याला आवश्यकता असते का प्रकाशाची प्रचीती देण्याची ? ।
आकाशाला आवश्यकता असते का निळाईची प्रचीती देण्याची ? ।
प्रीतीला आवश्यकता असते का आनंदाची प्रचीती देण्याची ? ।
देवाला आवश्यक असते का देवत्वाची प्रचीती देण्याची ? ।
ईश्‍वराला आवश्यकता असते का चैतन्याची प्रचीती देण्याची ? ।
प्रत्येकाचे मूळ तत्त्व प्रकट होताच,
गुणधर्म आपोआप प्रकट होतो ना राणा ? ॥
- पुष्पांजली (१४.३.२०१६)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले
१. स्वभावदोष आणि अहंं निर्मूलन
 प्रक्रिया राबवतांना जिद्द महत्त्वाची !
एक साधक : ५ मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) मी प्रक्रियेला आरंभ करणार होतो. त्या वेळी मला पुष्कळ जडपणा जाणवत होता. त्यामुळे मला मला प्रक्रिया जमेल का ?, असे वाटले. मला सांगितले; म्हणून मी प्रक्रियेला आरंभ केला. पाच मासांनंतर (महिन्यांनंतर) माझ्या मनात पुन्हा तोच विचार आला, मला प्रक्रिया जमेल का ?
प.पू. डॉक्टर : ५ नाही, तर १० वर्षे लागली, तरी मी ते करणारच, ही जिद्द आपल्यामध्ये हवी.
२. स्वकौतुकाचे विचार मनात आल्यावर कृती करण्याचा विचार
 दिल्याबद्दल कृष्णाला श्रेय द्यावे आणि स्वयंसूचनाही द्यावी !
एक साधिका : मनात स्वकौतुकाचे पुष्कळ विचार येतात.
प.पू. डॉक्टर : स्वकौतुकाने सुख मिळते, आनंद मिळत नाही. आपल्याला सुख-दुःखात अडकायचे नाही. त्याच्या पलीकडे जायचे आहे. स्वकौतुकाचे विचार मनात आल्यावर चिंतन करायचे, कृती करण्याचा विचार कुणी दिला ? तर देवाने ! त्याने जर हा विचार दिला नसता, तर मी ही कृती केलीच नसती. त्यामुळे श्रेय कुणाला जाणार ? तर कृष्णाला. अशी स्वयंसूचना घ्यावी.

सनातन पंचांगाची अभ्यासपूर्वक मागणी नोंदवून परिपूर्ण सेवा करा !

जिल्हासेवक, वितरक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना
     वर्ष २०१७ च्या सनातन पंचांगाची मागणी सर्व जिल्ह्यांनी २०.५.२०१६ या दिवसापर्यंत कळवणे अपेक्षित आहे. मागणी नोंदवतांना लक्षात घ्यावयाची महत्त्वाची सूत्रे देत आहे.
१. मागील वर्षीची मागणी आणि वितरण अन् जिल्ह्याची सद्य:स्थिती यांचा अभ्यास करून, तसेच समाजापर्यंत अधिकाधिक पंचांग पोचावेत, यासाठी साधकांना उद्युक्त करून जिल्हासेवकांनी अंतिम मागणी देणे आवश्यक आहे.
२. सर्वच पंचांगाचे वितरण १५.११.२०१६ या दिवसापर्यंत, तर त्याची येणे बाकी ३०.११.२०१६ या दिवसापर्यंत पूर्ण करावी. प्रायोजित केलेल्या पंचांगांची येणे बाकी पूर्ण झाली, तरी त्या पंचांगांचे वितरण ३०.११.२०१६ या दिवसापर्यंतच पूर्ण करण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यातील सर्वच पंचांगांचे वितरण आणि येणे बाकी दिलेल्या समयमर्यादेत पूर्ण होईल, अशा दृष्टीने अभ्यास करून जिल्हासेवकांनी मागणी नोंदवावी.
३. काही साधक आम्ही पंचांग वैयक्तिक स्तरावर विकत घेऊन नंतर सवडीने त्याची विक्री करू शकतो का ? असे विचारतात. नोव्हेंबर २०१६ पासून हिंदु धर्मजागृती सभांना आरंभ होणार आहे, तसेच साधकांना त्या कालावधीत अन्य उपक्रम राबवून धर्मप्रसार करण्याच्या अमूल्य संधीचाही लाभ करून घ्यायचा आहे. त्यामुळे साधकांनी नोव्हेंबर २०१६ नंतर केवळ पंचांग वितरणाची सेवा न करता अन्य सेवांमध्येही सहभागी व्हावे.

पावसाळा चालू होण्यापूर्वी सर्वच संगणकांची ब्लोअर किंवा व्हॅक्युमक्लीनरनेे स्वच्छता करावी !

संगणकीय सेवा करणार्‍या साधकांसाठी महत्त्वाची सूचना
     संगणकात जमा झालेली धूळ आणि पावसाळ्यातील दमटपणा (आर्द्रता) यांमुळे संगणक आपोआप बंद होणे, रिस्टार्ट होणे आदी अडचणी येऊन सेवेतील वेळ वाया जाऊ शकतो. तसेच संगणकांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सर्वच आश्रमांमधील आणि घरी राहून संगणकीय सेवा करणार्‍या साधकांनी शक्य तेवढ्या लवकर सर्व संगणकांची (मॉनिटर, किबोर्ड आणि सी.पी.यू.ची आतून) ब्लोअर किंवा व्हॅक्युमक्लीनरने स्वच्छता करून घ्यावी. तसेच अशी स्वच्छता शक्यतो प्रत्येक मासातून एकदा करावी. - (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.५.२०१६)

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !

साधकांना सूचना
     सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
प्रेम आणि प्रीती
१. प्रेम असल्यावर सहवासाची ओढ लागते व मग प्रेम वृद्धींगत होते. ते केवळ प्रकृतीतीलच असते.
२. आपण अशाश्‍वतावर प्रेम करतो आणि ते सुटून जाईल म्हणून भितो. जे शाश्‍वत आहे, त्यावर प्रेम करीत नाही.
३. द्वैतात प्रेम असते; पण प्रेमात द्वैत नसते. प्रकृतीत प्रेम असते; पण ब्रह्मात द्वैत नसते.
४. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करीत असाल, तर मी प्रेमात आहे.
भावार्थ : येथे प्रेम हा शब्द प्रीती, म्हणजे पारमार्थिक प्रेम, या अर्थाने वापरला आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
कोणत्याही गोष्टीचे मूळ कारण न शोधता त्यावर आधुनिक वैद्य, न्यायाधीश, सरकार इत्यादी सर्वच केवळ वरवरचे उपाय करतात. याउलट व्यष्टी आणि समष्टी प्र्रारब्ध, देवाण-घेवाण हिशोब, काळ इत्यादी मूलभूत कारणे लक्षात घेऊन त्यांवरील उपाय फक्त अध्यात्मच सांगू शकते ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मानवी जीवन 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
जीवनाचा प्रवास करतांना ठामपणे मार्गक्रमण करून जीवनाला योग्य दिशा देऊन परिपूर्ण कर्म करणे, हे सर्वस्वी मनुष्याच्या स्वत:च्या हातात असते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

प.पू. पांडे महाराज
उपवासचा अर्थ
     उप म्हणजे जवळ. उपवास म्हणजे भगवंताच्या चरणी शरणागत भाव ठेवून वास, म्हणजे वस्ती करणे, म्हणजे रहाणे. २४ घंटे भगवंताच्या अनुसंधानात रहाणे म्हणजे उपवास. - प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.११.२०१४)

चीनवर अमेरिकेचे शरसंधान !

संपादकीय
     अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्ध रशियाच्या विभाजनानंतर संपुष्टात आल्यानंतर चीन एक नवीन महासत्ता म्हणून उदयास येण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक क्षेत्रात चीनने अमेरिकेला मागे टाकले आहे. त्यातच सैन्य शक्तीत चीन दिवसेंदिवस शक्तीशाली होत आहे. चीनच्या अतीमहत्त्वाकांक्षेचा परिणाम अमेरिकेच्या आधी भारताला भोगावा लागू शकतो. चीन आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्धाला जोर आला आहे. चीनचा भविष्यात होणार्‍या त्रासापासून साहाय्य मिळण्यासाठी भारताने अमेरिकेच्या बाजूने संबंध निर्माण केले आहेत. त्यातच चीन-जपान यांच्यातील जुन्या शत्रूत्वामुळे जपानशीही जवळीक साधली आहे.

आप सरकार म्हणजे निरोची वंशावळ !

संपादकीय
      देहलीतील आप सरकार देशभर बहुचर्चित आहे. चांगल्या निर्णयांपेक्षा वादग्रस्त निर्णयांमुळे हे सरकार अधिक (कु)प्रसिद्ध झाले आहे. यापूर्वी जनतेने सत्ता हाती दिल्यानंतर केलेल्या घोडचुकांनंतर आप पुन्हा सत्तेवर आला आहे. अनेक चांगल्या-वाईट निर्णयांनंतर आप सरकार पुन्हा चर्चेत आले, ते विज्ञापनांमुळे ! 
     १० फेब्रुवारी ते ११ मे २०१६ पर्यंत या ९१ दिवसांच्या कालावधीत आप सरकारने तब्बल १४ कोटी ५६ लाख रुपये विज्ञापनांवर खर्च केले आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn