Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

दिनविशेष

आज दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृतीदिन

धार्मिक नेते अन् संघाचे नेते यांच्या हत्या आणि चर्चवर करणार होता आक्रमण !

मोदी शासन अस्थिर करण्यासाठी दाऊदने रचलेला कट उघड
आतातरी केंद्रशासन दाऊदला पाकिस्तानात घुसून मारण्याचे धाडस
 दाखवणार का ? कि पाकबरोबर मैत्रीचे गुर्‍हाळ चालूच ठेवणार ?
     नवी देहली - देशातील धार्मिक नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते यांची हत्या आणि महत्त्वाच्या चर्चवर आक्रमण करून केंद्रशासनाला अस्थिर करण्याचा कट कुख्यात जिहादी आतंकवादी दाऊद इब्राहिम याने रचला होता, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) दिली आहे.
१. दाऊद टोळीच्या १० गुंडांच्या विरोधात एन्आयए शनिवारी म्हणजे ७ मे या दिवशी आरोपपत्र दाखल करणार आहे. केंद्रात मोदी शासन सत्तेत आल्यानंतर लगेचच देशात सामाजिक अस्थिरता, धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम या गुंडांना देण्यात आले होते.
२. गेल्यावर्षी २ नोव्हेंबरला गुजरातमध्ये डाव्या विचारसरणीच्या शिरीष बंगाली आणि प्रज्ञेश मिस्त्री या दोन नेत्यांची दाऊदच्या गुंडांनी हत्या केली होती.

नद्या कधीच कुणाच्या जाती विचारत नाहीत ! - शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

हिंदु धर्माच्या रक्षणासाठी हिंदु समाजाचे संघटन आवश्यक असतांना जातीच्या सूत्रावर 
वेगळ्या स्नानाचे आयोजन करणे, हे धर्मामध्ये फूट पाडण्यासारखे आहे ! 
दलित आणि आदिवासी यांच्यासाठी वेगळ्या स्नानावरून वादंग 
शंकराचार्य
स्वामी स्वरूपानंद सरस्वती
     उज्जैन - समरसता स्नानाच्या माध्यमातून भाजप राजकारण करत आहे. दलितांना क्षिप्रा नदीत स्नान करण्यापासून कोणीच थांबवले नाही, ते पाहिजे त्या वेळी स्नान करू शकतात. त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळा दिवस निर्धारित करण्याची काहीच आवश्यकता नाही. नद्या कधीच कोणाच्या जाती विचारत नाहीत, असे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी म्हटले. येथील सिंहस्थपर्वामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित पंडित दीनदयाळ विचार प्रकाशन या संस्थेने ११ मे या दिवशी दलित आणि आदिवासी लोकांसाठी वेगळे समरसता स्नान आणि शबरी स्नान यांचे आयोजन केले आहे. त्यासाठी वेगळ्या स्नानाची सोय करण्यात येणार आहे. यावर काँग्रेस, तसेच द्वारका आणि शारदापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी आक्षेप घेतला असून वादंग निर्माण झाला आहे. त्याअनुषंगाने ते बोलत होते.

द्वितीय अमृत (शाही) स्नानात सहभागी होण्याचा श्री पंचायती निर्मल आखाड्याचा निर्णय

     उज्जैन, ६ मे (वार्ता.) - श्री पंचायती निर्मल आखाड्याचे अध्यक्ष महंत ज्ञानदेवजी यांनी मध्यप्रदेशचे प्रभारीमंत्री भूपेंद्र सिंह यांच्यासह झालेल्या बैठकीत श्री पंचायती निर्मल आखाडा वैश्‍विक सिंहस्थ पर्वातील द्वितीय अमृत (शाही) स्नानात सहभागी होणार, अशी घोषणा केली. 
१. पहिल्या अमृत स्नानात प्रशासनाच्या चुकांमुळे १३ आखाडे असंतुष्ट झाले होते. त्यांनी योग्य व्यवस्था केल्याविना स्नान न करण्याचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्‍वभूमीवर शासनासमोर संकट उभे राहिले होते.

सनातन करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे ! - ज्योतिषाचार्य साध्वी गीता मिश्रा, अध्यक्ष, जय माता दरबार, बरेली, उत्तरप्रदेश

उज्जैन सिंहस्थ पर्वक्षेत्री सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे प्रदर्शन
साध्वी गीता मिश्रा यांना माहिती सांगताना
डावीकडून डॉ. (सौ.) साधना जरळी
     उज्जैन - सनातनच्या प्रदर्शनात येऊन मला आत्मिक आनंद झाला. माझे आणि सनातनचे कार्य एकच आहे. सनातनच्या माध्यमातून प्रत्यक्ष जीवनात कसे आचरण केले पाहिजे, ते शिकवले जात आहे, असे प्रतिपादन बरेली उत्तरप्रदेशच्या ज्योतिषाचार्य साध्वी गीता मिश्रा (अध्यक्ष, जय माता दरबार) यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उज्जैन सिंहस्थ क्षेत्री लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट दिल्यावर त्या बोलत होत्या. संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्र त्यांना दाखवल्यावर त्या म्हणाल्या तुमचे गुरूंमध्ये तेज दिसते. ते अलौकिक वाटतात. त्यामुळेच सनातनचे सर्व साधक एवढे नम्र आहेत. सनातनचे कार्य वाढतच जाणार आहे, यात काहीच शंका नाही. या वेळेस सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) साधना जरळी यांनी त्यांना प्रदर्शनाची माहिती सांगितली.

डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी राज्यसभेत राममंदिराचा प्रश्‍न उपस्थित केला !

संसदेतील भाजपच्या ३२५ हून अधिक खासदारांपैकी किती
 खासदारांना डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्यासारखी अयोध्येत भव्य
 श्रीराममंदिर लवकर उभारले जाण्याविषयी कृतीशील तळमळ आहे ?
      नवी देहली - भाजपचे राज्यसभेतील खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ६ मे या दिवशी राज्यसभेत राममंदिर उभारणीचा प्रश्‍न उपस्थित केला. राममंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रतिदिन सुनावणी होण्याविषयी केंद्रशासनाने संसदेत वक्तव्य करावे, अशी मागणीही त्यांनी केली. (राममंदिरासाठी राज्यसभेत प्रश्‍न उपस्थित करणारे डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांचे अभिनंदन ! - संपादक)
     डॉ. स्वामी पुढे म्हणाले, पंतप्रधान आणि भारताचे सरन्यायाधीश यांच्यात न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांसंदर्भात बोलणी झाली आहे. राम मंदिराचा विषय हा अत्यंत जटील असून दोन्ही पक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतील असे दोन्ही पक्षांनी म्हटले आहे. या वेळी विरोधी पक्षांकडून डॉ. स्वामी यांच्या वक्तव्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती.
     डॉ. स्वामी यांच्या वक्तव्याला प्रतिसाद देतांना राज्यसभेचे उपाध्यक्ष पी.जे. कुरियन म्हणाले, शासनाने राममंदिरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रतिदिन सुनावणी व्हावी, यासाठी संसदेत अधिकृत वक्तव्य करायला हवे.

सनातन सांगत असलेल्या ज्ञानाचा सर्वत्र प्रचार होणे आवश्यक आहे ! - श्री. प्रदीप पांडे, भाजपा उपाध्यक्ष

डावीकडून पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे, श्री. प्रदीप पांडे,
त्यांचे सहकारी आणि श्री. विनय पानवळकर
     हिंदु संस्कृतीनुसार कसे आचरण व्हायला पाहिजे आणि कसे नको त्याविषयी सनातन संस्था सांगत असलेले ज्ञान अमूल्य आहे. या ज्ञानाचा सर्वत्र प्रचार व्हायला पाहिजे. सिंहस्थानंतर या ज्ञानाच्या प्रसारासाठी आम्ही संस्थेच्या सहकार्याने कृती करू, असे प्रतिपादन भाजपचे उपाध्यक्ष श्री. प्रदीप पांडे यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उज्जैन सिंहस्थ कुंभक्षेत्री लावण्यात आलल्या प्रदर्शनाला भेट देण्याच्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळेस हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया यांनी प्रदर्शनाची माहिती सांगितली, तर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते ग्रंथ आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
क्षणचित्र : या वेळेस त्यांच्या समवेत आलेल्या राजस्थानच्या सहकार्‍यांचाही ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला.


सनातनच्या कार्यात अडचणी येणार; पण देव सनातनच्या पाठीशी आहे ! - पू. सत्विदानंदजी महाराज, निजानंद धाम, खाचरोड, उज्जैन

पू. सत्विदानंदजी महाराज यांचा सन्मान करतांना
 (डावीकडून) पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे
     राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्‍या प्रत्येकाला काही न काही अडचणींना समोरे जावेच लागणार. सनातनच्या पाठीशी प्रत्यक्ष देवच उभा आहे. तुम्ही तुमचे कार्य चालू ठेवा. देव तुम्हाला साहाय्य करत रहाणार. सर्व साधकांना माझा आशीर्वाद आहे, असे प्रतिपादन खाचरोड, उज्जैन येथील निजानंद धामचे पू. सत्विदानंदजी महाराज यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उज्जैन सिंहस्थ सिंहस्थक्षेत्री लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट दिल्यावर ते बोलत होते. या वेळेस हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया यांनी प्रदर्शनाची माहिती सांगितली, तर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

सनातनवर बंदी आणण्याचा प्रयत्न करणे, हा शासनाचा सर्वांत मोठा मूर्खपणा ! - पू. स्वपन महाराज, रामकृष्ण मिशन, बेलपहाडी, कोलकाता

डावीकडून पू. (कु.) स्वाती खाडये, पू. (डॉ.) चारुदत्त
पिंगळे  आणि पू. स्वपन महाराज
    सध्याच्या काळात व्यापारी देवतांचे चित्र व्यावसायिक कारणासाठी वापरतात, याला विरोध केलाच पाहिजे. लोकांमध्ये जनजागृतीचे हे स्तुत्य कार्य सनातन करत आहे. सनातनचे कार्य हे सत्यावर आधारित असल्याने ते वाढतच जाणार आहे. पूर्वी शासनाने सनातनवर बंदी आणण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे शासनाचा सर्वांत मोठा मूर्खपणा होता. स्वामी विवेकानंदानी केलेले कार्यच सनातन करत आहे, असे ओजस्वी विचार बेलपहाडी, कोलकाता येथील रामकृष्ण मिशनचे पू. स्वपन महाराज यांनी केले. ३ मे या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यामाने उज्जैन सिंहस्थ कुंभक्षेत्री लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट देण्याच्या प्रसंगी ते बोलत होते.

उज्जैन सिंहस्थक्षेत्री निसर्गाचा कोप असतांनाही सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनास संत अन् जिज्ञासू यांच्या भेटी चालूच !

     उज्जैन - उज्जैन सिंहस्थ पर्वक्षेत्री ५ मे २०१६ या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध संप्रदायांचे मांडव कोसळले. त्यात सनातन संस्थेच्या धर्मशिक्षण आणि ग्रंथ प्रदर्शनाला काही प्रमाणात छळ बसली असली, तरी दुसर्‍या दिवशी प्रदर्शन न थांबता भगवान श्रीकृष्ण, महर्षि आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे प्रदर्शनाला संत, भाविक आणि प्रतिष्ठित मान्यवरांच्या भेटी सकाळपासून चालू झाल्या. जणू काही झालेच नसून नित्यनियमाप्रमाणे पूर्ववत् प्रदर्शन चालू असल्याची अनुभूती ईश्‍वराच्या कृपेने सनातनचे संत आणि साधक यांना आली. त्या तुलनेत अन्य ठिकाणी तेथील दैनंदिन व्यवहार काही दिवसांसाठी ठप्प रहाणार आहेत.
स्वामी श्रद्धानंद महाराज आणि अन्य मान्यवर प्रदर्शन पहातांना

इंदूर (आंध्रप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समिती आणि इंडियन मेडिकल असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबीर

२०० हून अधिक ग्रामस्थांनी घेतला लाभ !
शिबिराला उपस्थित ग्रामस्थ
    इंदूर (आंध्रप्रदेश) - हिंदु जनजागृती समिती आणि इंडियन मेडिकल असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३० एप्रिल या दिवशी येथील माणिकभंडार गावामध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचा २०० ग्रामस्थांनी लाभ घेतला. या उपक्रमासाठी आयएम्एचे अध्यक्ष डॉ. सुरेश, युरोलॉजिस्ट डॉ. राघवेंद्र, बालरोग तज्ञ डॉ. गोपाल सिंह, स्त्रीरोग तज्ञ डॉ. पद्मजा आदींसह २० प्रसिद्ध डॉक्टरांनी योगदान दिले.

समाजामध्ये निर्माण झालेली नकारात्मक स्पंदने नष्ट करण्यासाठी स्वतःला ओळखणे आवश्यक ! - स्वामी संवित् सोमगिरीजी महाराज

      बिकानेर (राजस्थान) - येथे मानव प्रबोध न्यासाच्या वतीने जीवन विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी स्वामी संवित् सोमगिरीजी महाराज उपस्थित होते. महाराजांच्या हस्ते केलेल्या दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. कार्यशाळेमध्ये स्वामीजींच्या मार्गदर्शनासह सामूहिक ध्यान, गटचर्चा, जिज्ञासा समाधान, अभिव्यक्ति, व्यक्तीत्व आकलन इत्यादी विविध विषयांवरील सत्रांचाही समावेश होता. 
      कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करतांना स्वामीजी म्हणाले की, ईश्‍वराने निर्माण केलेल्या नियमांचे पालन केल्यास आपण आपल्या मनावर संयम ठेवू शकतो, त्याला एकाग्र करू शकतो, तसेच निश्‍चित केलेले ध्येयही साध्य करू शकतो. ईश्‍वराने बनवलेल्या या नियमांनाच धर्म म्हटले जाते. समाजामध्ये निर्माण झालेली नकारात्मक स्पंदने नष्ट करण्यासाठी स्वतःला ओळखणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या सकारात्मक उर्जेमध्ये सतत वाढ करायला हवी.

वादळी पावसामुळे उज्जैन सिंहस्थामध्ये मोठी हानी !

 •  ७ मृत्यू, १०० हून अधिक गंभीर घायाळ, ३०० हून अधिक मांडव जमीनदोस्त !
 •  दोन वेळा पूर्वसूचना देऊनही मध्यप्रदेश शासन आणि प्रशासन निष्क्रीय राहिले !
पूर्वसूचना मिळूनही सुरक्षेविषयी निष्क्रीय रहाणार्‍या शासन आणि 
प्रशासन यांमधील उत्तरदायींवर कठोर कारवाई झाली पाहिजे !
      उज्जैन - अमृत (शाही) स्नानाच्या तीन दिवस आधीच म्हणजे ५ मे या दिवशी दुपारी ४.३० वाजता उज्जैन सिंहस्थामध्ये झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे साधू, संत आणि धार्मिक संस्था यांच्या मांडवांना मोठा फटका बसला. यात ३०० हून अधिक मांडव आणि मोठ्या कमानी कोसळल्यामुळे ७ लोकांचा मृत्यू, तर १०० हून अधिक लोक गंभीर घायाळ झाल्याची माहिती आहे. या संदर्भात हवामान खात्याने प्रशासन आणि मध्यप्रदेश शासन यांना २ वेळा सांगूनही त्यांनी काहीही न केल्यामुळे ही गंभीर परिस्थिती ओढवली आहे. मृतांमध्ये एक साधू आणि गृहरक्षक दलाचा एक सैनिक यांचा समावेश आहे.
वादळामुळे एका संप्रदायाचा कोसळलेला मांडव

गोमांस बंदीच्या विरोधात देहली उच्च न्यायालयात जनहित याचिका

न्यायालयाने देहली शासनाकडे स्पष्टीकरण मागितले 
     नवी देहली - गोमांस बाळगणे आणि खाणे हा गुन्हा ठरवण्याच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेल्या जनहित याचिकेप्रकरणी देहली उच्च न्यायालयाने राज्यशासनाकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
     या याचिकेमध्ये देहली कृषी पशूधन संरक्षण कायद्यांतर्गत देहलीत गोमांस बाळगणे आणि खाणे गुन्हा ठरवण्यात आल्याच्या संदर्भातील काही तरतुदी रहित करण्यात याव्यात, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. या वेळी असेच एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही प्रलंबित असल्याचे न्यायालयाने सांगितले. या प्रलंबित याचिकेच्या एका प्रतीसह या प्रकरणात प्रतिवादींकडून दाखल करण्यात आलेल्या स्पष्टीकरणांची प्रतही सादर करावी, असे मुख्य न्या. जी. रोहिणी आणि न्या. जयंत नाथ यांनी सांगितले. पुढील सुनावणी १३ जुलैला ठेवण्यात आली आहे.

लखनऊ विद्यापिठाच्या खानावळीमध्ये मांसाहारी पदार्थांवर बंदी घातल्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला !

      लक्ष्मणपुरी (लखनऊ) - तथाकथित विचारवंत कांचा इलैया यांनी एप्रिल मासात गोमांस खाणे आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते, असे विधान केले होते. (डुकराचे मांस खाणे आरोग्यसाठी अतिशय उत्तम असते, असे विधान करण्याचे धाडस कांचा इलैया कधीही करणार नाहीत; कारण त्याचे परिणाम काय होतील, हे त्यांना ठाऊक आहे. - संपादक) त्यांच्या या विधानावरून लखनौ विद्यापिठामध्ये तणाव निर्माण झाल्याने खानावळीत मांसाहारी पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाविषयी अप्रसन्नता दर्शवून मांसाहारी पदार्थ बंद करण्याचा निर्णय दलितविरोधी असल्याचे सांगत अनुमाने २०० विद्यार्थ्यांनी मोर्चाही काढला.

जयललिता यांच्याकडून निवडणूक घोषणापत्रात आश्‍वासनांचा पाऊस

तमिळनाडू विधानसभा निवडणूक
 • भारतातील निरर्थक लोकशाही किती दिवस चालू देणार ? 
 • निवडणुकीत मतदारांना भुलवण्यासाठी आश्‍वासने देणे, हे मतांसाठी दिलेली लाचच आहे हे लक्षात घ्या ! एकही पक्ष सत्तेत आल्यावर राज्यातील नक्षलवाद, आतंकवाद संपवणार असे का म्हणत नाही ?
     चेन्नई - तमिळनाडूमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एआयएडीएम्केच्या (ऑल इंडिया अन्ना द्रविड मुनेत्र कळघम्च्या) प्रमुख आणि राज्याच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी त्यांच्या पक्षाच्या घोषणापत्रात १ कोटी ९२ लाख शिधापत्रिकाधारकांना विनामूल्य भ्रमणध्वनीसंच, नोकरी करणार्‍या महिलांना दुचाकी वाहन खरेदीसाठी ५० टक्के अनुदान, सार्वजनिक ठिकाणी विनामूल्य वाय-फाय अशा प्रकारच्या आकर्षक घोषणांचा पाऊस पाडला आहे. (निवडणुकीच्या तोंडावर जनतेला आश्‍वासने देणारा सत्ताधारी पक्ष शासन असतांना काय करतो ? - संपादक)
याशिवाय जयललिता यांच्या काही लोकप्रिय घोषणा
 • वर्ष २०१६ ते २१ या काळात शेतकर्‍यांसाठी ४० सहस्र कोटी रुपयांचे कर्जवाटप
 • दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना इंटरनेट सेवेसह विनामूल्य लॅपटॉपचे वितरण
 • १०० युनिटपर्यंतचा विनामूल्य विद्युत पुरवठा

(म्हणे) फलक उखडून फेका

तृप्ती देसाई यांचे चिथावणीखोर आवाहन
 • या चिथावणीविरुद्ध शासन तृप्ती देसाईंवर कारवाई करणार का ?
 • डोंबिवली येथे मंदिरात गाऊन (मॅक्सी) घालून प्रवेश न करण्यासाठी लावलेल्या फलकांचे प्रकरण
     डोंबिवली - येथील पश्‍चिमेकडील कोपरगावातील गावदेवी, महादेव आणि हनुमान मंदिरात गाऊन (मॅक्सी) घालून मंदिरात प्रवेश करू नये, असे फलक लावल्याने तथाकथित स्त्री-पुरुष समानतेसाठी लढणार्‍या तृप्ती देसाई संतप्त झाल्या आहेत. त्यांनी डोंबिवलीमधील स्थानिक महिलांनी हे फलक उखडून फेकून द्यावे. अन्यथा आपण स्वत: डोंबिवलीत येऊन फलक काढू, असे चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. (कुठलेही नियम, परंपरा न मानणार्‍या तृप्ती देसाई यांनी असे वक्तव्य करणे निषेधार्ह आहे. राज्यात हुंडाबळीची भीषण आकडेवारी नुकतीच उघड झाली असतांना त्याविषयी तृप्ती देसाई काही करत का नाहीत ? कि केवळ झटपट प्रसिद्धी मिळते म्हणून अशी आंदोलने त्या करत आहेत ? - संपादक)
    तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या की, हा फलक अत्यंत निषेधार्ह आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कुठल्याही निकषावर महिलांचा मंदिर प्रवेश रोखता येणार नाही, हे स्पष्ट केले असल्याने असे फलक लावणे हे पुरुषी मानसिकतेचे लक्षण आहे. मंदिर आणि देवाचे पावित्र्य कसे राखायचे, हे महिलांना कुणी शिकवण्याची आवश्यकता नाही. ९० टक्के घरांत पूजा महिलाच करतात. (साडी न नेसता महालक्ष्मी मंदिरात प्रवेश करणार्‍या तृप्ती देसाईंना मात्र ते शिकवण्याची निश्‍चितच आवश्यकता आहे. - संपादक)

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यांचेही काळा पैसा बाहेर ठेवणार्‍यांच्या सूचीत नाव !

पनामा पेपर्स प्रकरण 
देवगण यांनी दिले स्पष्टीकरण !
     नवी देहली - पनामा पेपर्स प्रकरणात आता बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यांचे नावही आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०१३ मध्ये ब्रिटिश वर्जिन आइलॅन्ड्स या देशातील मॅरीलेबोन एन्टरटेनमेंट लिमिटेड या आस्थापनाचे सर्व शेअर्स अजय देवगण यांनी विकत घेतले होते. 
     हिंदी चित्रपटांचे अधिकार विकत घेण्यासाठी त्यांनी असे केले असल्याचे स्पष्टीकरण देवगण यांनी दिले आहे. देवगण यांनी हेही स्पष्ट केले की, शासनाला याविषयी माहिती असून त्यांच्या कुटुंबाने आयकर परताव्यात (इन्कम टॅक्स रीटर्न्समध्ये) याची संपूर्ण माहिती दिली आहे.

शबरीमला देवस्थानाच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर हिंदु संघटनांची एकत्रित बैठक !

     नवी देहली - अखिल भारतीय हिंदु महासभेचे अध्यक्ष आणि युनायटेड हिंदु फ्रंटचे उपाध्यक्ष श्री. चंद्र प्रकाश कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली हिंदू संघटनांची एक बैठक हिंदु महासभा भवनात घेण्यात आली. या बैठकीत वारंवार हिंदूंच्या धार्मिक गोष्टींत ढवळाढवळ करणार्‍या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांवर टीका करण्यात आली. या वेळी दारा सेनेचे अध्यक्ष श्री. मुकेश जैन यांनी म्हटले की, फोर्ड फाउन्डेशनच्या ख्रिस्ती टोळ्या शबरीमला मंदिरात रजस्वला महिलांना प्रवेश देऊन मंदिरातील शक्तीला समूळ नष्ट करण्याचे षड्यंत्र रचत आहेत. केरळमध्ये ख्रिस्ती धर्माचा वेगाने प्रसार व्हावा, तसेच भगवान अयप्पा यांची शक्ती नष्ट व्हावी, या उद्देशाने हा कट रचण्यात येत आहे.केरळमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नामस्मरण आणि धर्माचरणाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन

मार्गदर्शन करतांना कु. रश्मी परमेश्‍वरन्
      एर्नाकुलम् (केरळ), ६ मे (वार्ता.) - एर्नाकुलम् जिल्ह्यातील कक्कानाड येथे १ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या कु. रश्मी परमेश्‍वरन् यांनी नामस्मरण आणि धर्माचरणाचे महत्त्व या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. येथील एन्.एस्.एस्. कार्ययोगम् हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाला संबोधित करतांना त्या म्हणाल्या, आज आपले मन काळजी आणि अनावश्यक विचारांनी ग्रासलेले आहे. आपल्या मनात येणार्‍या विचारांपैकी ८० टक्के विचार निरर्थक असतात. याने आपली ऊर्जा अनावश्यक वाया जाते. यावर उपाय म्हणजे, ईश्‍वराचे नामस्मरण !
     कु. परमेश्‍वरन यांनी धर्माचरणाचे महत्त्व विशद करतांना देवळात देवतेचे दर्शन शास्त्रोक्त पद्धतीने कसे घ्यावे ?, देवाला कृतज्ञता कशी व्यक्त करावी ? इत्यादी विषयांवरही सविस्तर विवेचन केले.

महाराष्ट्रात काही कलमे रहित करून गोवंश हत्याबंदी कायदा कायम

गोमांस अजाणतेपणामुळे बाळगणे गुन्हा ठरणार नाही !
गोहत्या रोखण्यासाठी केवळ कायदे करून उपयोग नाही, तर त्याची प्रभावी 
कार्यवाही शासनाने करणे आवश्यक आहे ! हिंदु राष्ट्रातच खर्‍या अर्थाने गोरक्षण होईल !
     मुंबई - राज्यशासनाच्या सुधारित गोवंश हत्याबंदी कायद्याची घटनात्मक वैधता मुंबई उच्च न्यायालयाने ६ मे २०१६ या दिवशी कायम केली; मात्र या कायद्यातील कलम ५ (क), ५ (ड) आणि ९ (ब) अवैध ठरवून रहित केले. कलम ५ (क) हे गोवंशातील प्राण्यांचे मांस (बीफ) बाळगण्याविषयी आहे, तर कलम ५ (ड) हे परराज्यात कत्तल झालेल्या गोवंशातील प्राण्यांचे मांस बाळगण्याविषयी आहे. कलम ९ (ब) हे गोमांस बाळगले नसल्याचे दायित्व आरोपीवर टाकण्याविषयीचे आहे. याचा अर्थ कोणी अज्ञानाने गोमांस बाळगले, तर त्याच्याविरुद्ध शासनाला थेट गुन्हा नोंदवून खटला चालवता येणार नाही. गोमांस बाहेरच्या राज्यातून कोणी आणले, तर ते गोमांस होते, हे आणणार्‍याला जाणीवपूर्वक माहीत होते, हे आधी पोलिसांना सिद्ध करावे लागेल आणि त्यानंतरच त्याच्याविरुद्ध खटला चालवावा लागेल. म्हणजेच कोणाकडे गोमांस आढळले, तर ते जाणीवपूर्वक बाळगले, हे सिद्ध करूनच पोलिसांना गुन्हा नोंदवता येईल. शासनाने या सुधारित कायद्यात कोणाकडे गोमांस आढळल्यास थेट गुन्हा नोंदवून फौजदारी कारवाईची तरतूद केली होती; शिवाय गोमांस नसल्याचे सिद्ध करण्याचे दायित्व आरोपीवरच टाकले होते; मात्र तसे आता करता येणार नाही.

मौलानाने केलेल्या ब्रेन वॉशनंतर बनला जिहादी आतंकवादी

 • देहली पोलिसांनी अटक केलेल्या जिहादी आतंकवाद्याने दिली माहिती
 • हिंदूंचे धर्माचार्य कधीही आतंकवादी होण्यासाठी कोणालाही प्रवृत्त करत नाहीत; मात्र मौलाना, इमाम, मुफ्ती आदी आतंकवाद्यांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करत असतात, तरीही ढोंगी निधर्मीवाद्यांकडून आतंकवाद्यांना धर्म नसतो, असे म्हटले जाते !
     नवी देहली - देहली पोलिसांनी देहली आणि उत्तरप्रदेश येथून अटक केलेल्या १२ जिहादी आतंकवाद्यांची चौकशी चालू आहे. त्यातील साजिद याने दिलेल्या माहिनुसार त्याला नृत्य कलाकार बनायचे होते; मात्र मौलानाने केलेल्या ब्रेन वॉशनंतर तो जिहादी आतंकवादी झाला. हे आतंकवादी उत्तरप्रदेशातील गाझियाबादच्या हिंडन वायूदल केंद्र आणि मॉल्स यांवर आक्रमण करण्याचा कट रचत होते.
१. साजिद याने दिलेल्या माहितीनुसार तो एका बागेमध्ये संगीताच्या तालावर नृत्याचा सराव करत असतांना एक मौलाना त्याच्याकडे आला. त्याने संगीत बंद केले आणि म्हणाला की, नृत्य आणि संगीत तुला नरकात घेऊन जाईल. तुझ्या जीवनाचा खरा उद्देश स्वर्ग प्राप्ती असला पाहिजे.

आर्थिक चणचणीमुळे इसिसच्या जिहाद्यांवर मासे आणि कोंबड्या यांची विक्री करण्याची वेळ !

     कैरो (इजिप्त) - आर्थिक चणचण भासत असल्याने लिबियामध्ये इसिस या आतंकवादी संघटनेला मासे आणि कोंबड्या विकाव्या लागत आहेत, असे वृत्त समोर आले आहे. मिडिल इस्ट आय या वृत्त संकेतस्थळानुसार, इसिसने लिबियातील सर्ट हे शहर कह्यात घेतल्यानंतर तेथील अनेक जागांवर संघटनेने नियंत्रण मिळवले. त्यामध्ये अनेक शेते आणि कुक्कुटपालन केंद्रांचाही समावेश होता. इसिसने सर्ट शहराला इसिसची उत्तर आफ्रिकेतील राजधानी म्हणून घोषित केले.
     परंतु इसिसचा आर्थिक पाया कोलमडू लागल्याने सर्टमधील जिहाद्यांना तेथील कोंबड्यांची विक्री करावी लागत आहे. दुसरीकडे, स्थानिक दुकानदारांची स्वतःच्या मालकीची दुकाने असूनही त्यांच्याकडून रस्त्यावर पडणारा कचरा स्वच्छ करण्यासाठी आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी इसिसकडून दुकानदारांवर प्रत्येक आठवड्यात १० लिबियन दिनार भरण्याची सक्ती केली जाते, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

केवळ शारीरिक, मानसिक नव्हे, तर आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम स्त्रीच खरी रणरागिणी ! - कु. प्रतीक्षा कोरगावकर

कु. प्रतीक्षा कोरगावकर
मुंबई, ६ मे (वार्ता.) - निर्भया प्रकरण झाल्यावर अनेक ठिकाणी मेणबत्ती मोर्चे काढण्यात आले. त्यातून केवळ भावना व्यक्त करता येते. त्यामुळे महिलांवरील अत्याचार थांबत नाहीत. ते दिवसेंदिवस वाढतच आहेत. महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतले, तरच त्यांच्यावरील अत्याचार रोखता येतील. यासाठी प्रत्येक स्त्रीने रणरागिणी होणे आवश्यक आहे. केवळ शारीरिक, मानसिक नव्हे, तर आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम स्त्रीच खरी रणरागिणी होय, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी केले. चुनाभट्टी येथील आगरी समाज विकास संघाच्या महिलांना महिलांचे सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.
      त्या पुढे म्हणाल्या, निर्भया, शक्ती मिल यांसारखी वारेमाप प्रकरणे घडत आहेत. प्रती ३४ व्या मिनिटाला बलात्कार होतात. कुणी हात मारून जातो, कुणी विनयभंग करतो, असे प्रकार रोखण्यासाठी महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यायला हवे. आज लव्ह जिहादच्या घटना वाढल्या आहेत. मुसलमान युवक हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करत आहेत. याविषयी रणरागिणी शाखा महिलांचे प्रबोधन करत आहे. महिलांवर अत्याचार होऊ नयेत, यासाठी रणरागिणी शाखा कार्यरत आहे.

जेजुरीत (जिल्हा पुणे) ग्रामस्थांकडून बंद आणि निषेध मोर्चा !

खंडोबा गडावरील त्रिकाल पूजेव्यतिरिक्त अन्य पूजा बंद
 करण्याच्या धर्मादाय सहआयुक्तांच्या फतव्याचे तीव्र पडसाद
     धर्मादाय सहआयुक्तांनी हिंदूंच्या प्रथा-परंपरावर बंदी घालण्याचा तुघलकी निर्णय घेण्यापूर्वी शंकराचार्य किंवा धर्माचार्य यांची अनुमती घेतली होती का ? आज पूजा बंद करणारे प्रशासन उद्या हिंदूंना मंदिरातही प्रवेश करण्यास बंदी करील ! भाजपच्या राज्यात असा निर्णय हिंदूंना अपेक्षित नाही !
      पुणे - स्वयंभू शिवलिंगावर सततचा होणारा जलाभिषेक, तसेच पूजा यांमुळे शिवलिंगाची झीज होण्याचा संभव असल्याचे सांगत जेजुरीच्या खंडोबा गडावरील मुख्य मंदिराच्या गाभार्‍यातील स्वयंभू लिंगावर त्रिकाल पूजेव्यतिरिक्त होणार्‍या अन्य पूजा करण्यास बंदी घालणारे निर्देश धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिले होते. या निर्णयाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी ६ मे या दिवशी कडकडीत बंद पाळला. या वेळी सकाळी ग्रामस्थांनी गावात निषेध मोर्चाही काढला, तसेच निषेध सभाही घेतली. पुजारीवर्गानेही मंदिरात न जाता देवाची पूजा, अभिषेक, तळी, जागरण आदी धार्मिक विधी बंद करून निषेध नोंदवला. हा निर्णय रहित होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थ आणि पुजारी यांनी व्यक्त केला आहे.

जिहाद्यांकडून बांगलादेशमधील उदारमतवादी प्राध्यापक, पत्रकार आणि राजकारणी यांची नवीन हिटलिस्ट सिद्ध !

बांगलादेशमध्ये इस्लामी मूलतत्त्ववादावर आधारित शासनयंत्रणा स्थापन करण्याच्या दिशेने पाऊल !
    ढाका - जिहाद्यांनी बांगलादेशमधील उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्षतावादी प्राध्यापक, पत्रकार आणि राजकारणी यांची नवीन हिटलिस्ट सिद्ध केली आहे. यामध्ये एका विश्‍वविद्यालयाचे प्रमुख, काही प्राध्यापक, पत्रकार आणि सत्ताधारी पक्षातील अधिकारी अशा १० जणांची नावे आहेत.
१. जिहाद्यांनी गेल्या वर्षी बांगलादेशमधील अनेक धर्मनिरपेक्षतावादी लेखक, ब्लॉगर आणि पत्रकार यांच्या हत्या केल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी या धमकीला गांभीर्याने घेतले असून या १० जणांना सुरक्षा पुरवली आहे.
२. पोलिसांना बांगलादेशमधील उत्तर पश्‍चिम भागात असलेल्या नटोर या छोट्याशा शहरामध्ये हे धमकीचे पत्र मिळाले. इस्लामी लिबरेशन फ्रंट या प्रसिद्धीझोतात नसलेल्या जिहादी संघटनेने ही सूची घोषित केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
३. या सूचीत राजशाही विश्‍वविद्यालयाच्या प्रमुखाचे नाव असून जिहाद्यांनी याच विश्‍वविद्यालयाच्या एका उदारमतवादी प्राध्यापकाची २ आठवड्यांपूर्वी हत्या केली होती. या हत्येचे दायित्व इस्लामिक स्टेटने स्वीकारले होते.
४. या घटनेनंतर लगेचच दोन समलैंगिक पुरुषांचीही हत्या करण्यात आली होती.

गुजरात पोलिसांकडून मुसलमानांवर अन्याय होत असल्याची धर्मनिरपेक्षतावादी वृत्त संकेतस्थळांकडून ओरड !

टाईम्स ऑफ इंडिया, दैनिक जागरण, नई दुनिया, जनसत्ता, कॅच न्यूज यांनी प्रसारित केले वृत्त !
 • गेल्या ७-८ वर्षांपासून साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित इत्यादी हिंदु नेत्यांवर कोणतेही आरोपपत्र प्रविष्ट न करता त्यांना कारागृहात सडत ठेवण्याच्या विरोधात मात्र हीच संकेतस्थळे मूग गिळून गप्प बसतात, हे लक्षात घ्या ! 
 • मुसलमानांना लक्ष्य केले जात नसून कायद्यांतर्गत कार्यवाही करण्यात येत असल्याचे गुजरातच्या गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे !
     नवी देहली - देशभरातून कह्यात घेतलेल्या मुसलमानांपैकी एक तृतीयांश मुसलमान हे गुजरातमधील आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या अहवालातून उघडकीस आल्याचे वृत्त काही प्रतिष्ठित वृत्त संकेतस्थळांनी प्रसिद्ध केले आहे. (कोणत्याही अहवालाचा विपर्यास कसा करायचा, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. अर्थात यामागे राजकारण आहे, हे एखादे शेंबडे पोरही सांगेल ! - संपादक) या वृत्तात पुढे म्हटले आहे की,
१. देशभरात विविध गुन्ह्यांखाली ६५८ मुसलमानांना कह्यात घेतले असून यातील २४० मुसलमान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील आहेत. (अशी भाषा वापरून मुसलमानांना पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात भडकवण्याचे हे कटकारस्थान नव्हे का ? - संपादक)

पिंपरे खुर्द (जिल्हा पुणे) येथे मोठ्या प्रमाणात गोवंशियांची हत्या उघड

 • गोवंशाची कातडी आणि मुंडकी भरलेली दोन चारचाकी वाहने शासनाधीन
 • आणखी किती घटना उघडकीस आल्यावर शासन गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोरात कठोर कार्यवाही करणार आहे !
पिंपरे खुर्द, ६ मे (वार्ता.) - पुरंदर तालुक्यातील पिंपरे खुर्द या गावातील एका शेतात धर्मांधांकडून गोवशियांची हत्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचा संशय स्थानिक नागरिकांना आला होता. त्यांनी गोरक्षकांना दिलेल्या माहितीनुसार नीरा पोलिसांनी तेथे धाड टाकली. त्या वेळी पोलिसांना गोवंशियांची कातडी आणि मुंडकी भरलेली २ चारचाकी वाहने आढळून आली. ती पोलिसांनी शासनाधीन केली आहेत.
१. येथील नामदेव कुंडलिक थोपटे यांची शेतभूमी अल्ताफ कुरेशी, अख्तर कुरेशी, अन्वर आणि मुजफ्फर यांनी भाड्याने घेतली होती. तेथे गोवंशियांंची हत्या करून गोमांस विक्रीसाठी पाठवले जात होते.
२. याविषयी स्थानिक नागरिकाला संशय आल्याने त्याने हिंदुस्थान गोरक्षक संघाचे
श्री. पंडित मोडक (दादा) यांना कळवले. त्यावर श्री. मोडक यांनी त्वरित ही माहिती भारत गोरक्षा दलाचे अध्यक्ष श्री. सतीश प्रधान आणि नीरा पोलीस यांना दिली. पोलिसांनी तेथे धाड टाकली; परंतु तत्पूर्वीच धर्मांध पसार झाले होते.

देशद्रोही विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणाला विद्यापिठातील १२० शिक्षकांचा पाठिंबा !

अशा शिक्षकांचा भरणा असलेल्या विद्यापिठांतून शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची मानसिकता 
कशी झाली असेल, ते सांगायलाच नको; अशा विद्यापिठांवर कठोर कारवाई व्हायला हवी, हे निश्‍चित !
जेएन्यू प्रकरण
      नवी देहली - देशद्रोही विद्यार्थ्यांवर जेएन्यू प्रशासनाकडून करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईच्या विरोधात जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएन्यू) आणि देहली विद्यापिठाच्या १२० शिक्षकांनी ४ मे या दिवशी उपोषण केले. (देशद्रोही विद्यार्थ्यांना पाठीशी घालणार्‍या शिक्षकांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करू नये ? अर्थात अशा देशद्रोही शिक्षकांचा भरणा असलेल्या विद्यापिठांवरच आता कठोर कारवाई व्हायला हवी ! - संपादक) याबरोबरच जेएन्यूचे २०० विद्यार्थी यांनीही कन्हैया कुमार, अनिर्बन भट्टाचार्य, उमर खालिद इत्यादी साम्यवादी विद्यार्थ्यांना समर्थनार्थ उपोषण केले.

जामखेड (नगर) येथे कह्यात घेतलेल्या गुटखा माफियाकडून पोलीस उपनिरीक्षकावर आक्रमण, दोघे अटकेत

पोलिसांवरील जीवघेणी आक्रमणेे हे कायदा-सुव्यवस्था संपल्याचे लक्षणच आहे !
     जामखेड - येथील गुटखामाफिया अनिल सुरेंद्र सानप आणि त्याचा सहकारी अविनाश बबन तोंडे हे दोघे मालवाहू रिक्शामधून गुटख्याची वाहतूक करत होते. याविषयी पोलिसांना लक्षात आल्यावर त्या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी कह्यात घेतले पोलीस ठाण्यात नेत असतांना वाटेतच सानप याने पोलीस उपनिरीक्षकावर गावठी कट्टा रोखून आणि गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि ते पसार झाले. ३ मेच्या रात्री ही घटना घडली असून पोलिसांनी ४ मे या दिवशी त्या दोघांना अटक केली.
१. पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर हे तीन कर्मचार्‍यांसह ३ मे या दिवशी पसार झालेल्या आरोपीच्या शोधात जामखेड पोलीस ठाण्यात जात होते. त्या वेळी त्यांनी एक मालवाहू रिक्शा चौकशीसाठी थांबवली.
२. रिक्शामधील सानप आणि तोंडे यांनी पोलिसांना त्या रिक्शात गुटखा असल्याचे सांगितले.

कोल्हापूर येथे ८ मे पासून मे. गोविंद नारायण जोग अ‍ॅण्ड सन्स्च्या नवीन सराफी पेढीचे दालन चालू होणार ! - अभिजीत जोग

कोल्हापूरकरांना सोने खरेदीत ५० टक्के सवलत !
     कोल्हापूर - सांगली येथील मे. गोविंद नारायण जोग अ‍ॅण्ड सन्स् या नामांकित तसेच विश्‍वसनीय सराफी पेढीने आपला ठसा उमटवत यशस्वी ११५ वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत. विश्‍वास, शुद्धता आणि प्रामाणिकपणा यांच्या जोरावर १९०१ पासून आजपर्यंत जनसामांन्यामध्ये आपुलकीचे व्यावसायिक नाते या सुवर्णापिढीने निर्माण केले आहे. सामान्यांकरिता विविध योजना राबवून त्यांचे सोनेरी स्वप्न पूर्ण केले आहे. आता येथील व्हिनस कॉर्नरजवळ भव्य दालन चालू करून सतत नाविन्यांच्या शोधात असणार्‍या पेढीने कोल्हापुरात सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. सांस्कृतिक वारसा लाभलेल्या करवीन नगरीत ही संधी मिळणे, हे आमचे भाग्य आहे, असे मत मे. गोविंद नारायण जोग अ‍ॅण्ड सन्स्चे मालक श्री. अभिजीत जोग यांनी ५ मे या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रसिद्धीप्रमुख श्री. प्रशांत कुलकर्णी उपस्थित होते.

मुसलमानांवर अमेरिकेत प्रतिबंध घालण्याच्या मतावर डोनाल्ड ट्रम्प ठाम; हिलरी क्लिंटन यांनी केली टीका !

     वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांसाठी रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मुसलमानांना अमेरिकेमध्ये प्रवेश नाकारण्याच्या आणि अनधिकृत प्रवासींना अमेरिकेतून बाहेर काढण्याच्या त्यांच्या मतावर ठाम असल्याचे पुन्हा एकदा म्हटले आहे. 
     रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य उमेदवार बनण्याच्या एका दिवसानंतरच ट्रम्प यांनी काही मासांपूर्वी निवडणूक प्रचाराच्या वेळी केलेल्या वरील वक्तव्यावर आपण ठाम असल्याचे म्हटले. सीएन्एन् या वृत्तसंकेतस्थळाने घेतलेल्या मुलाखतीत, ट्रम्प यांनी हेही म्हटले की, जिहादी आतंकवादाचा नायनाट करण्यासाठी ते मुसलमान देशांबरोबर काम करायला सिद्ध आहेत; परंतु त्याचे दायित्व मुसलमान देशांनी घ्यायला हवे. (भारताला जिहादी आतंकवादाने वेढलेले असतांना भारतीय राज्यकर्ते ट्रम्प यांच्यासारखा कणखरपणा न दाखवता पळपुटी भूमिका घेतात ! - संपादक)
       एका अन्य मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, आपण अशा लोकांना (सिरिया इत्यादी मुसलमान देशांतील शरणार्थींना) स्वीकारत आहोत, ज्यांना आपण जाणत नाही. सदैव योग्य गोष्टच करायला आवडते. जरी माझी त्यामुळे हानी होणार असली, तरी मला त्याचे काही वाटत नाही ! 
       डेमोक्रॅटिक पक्षाच्या संभाव्य उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी मात्र ट्रम्प यांच्या या भूमिकेवर टीका केली आहे.बेळगावातील मराठी शाळा भूमाफियांना विकण्याचा डाव मराठी भाषिकांनी उधळला !

शाळेसाठी मराठी भाषिकांचा भव्य मोर्चा 
शाळा वाचवण्यासाठीच्या मोर्च्यात सहभागी झालेल्या महिला
    बेळगाव, ६ मे (वार्ता.) - सीमाभागात मराठी भाषिकांची गळचेपी करण्यासाठी कानडी अधिकार्‍यांच्या संगनमताने घातलेला मराठी शाळा भूमाफियांना विकण्याचा घाट मराठी भाषिकांनी ५ मे या दिवशी उधळून लावला. बेळगावातील चव्हाट गल्लीतील १०० वर्षांपूर्वीची ही शाळा विकण्याचा घाट हाणून पाडण्यासाठी ५ क्रमांक शाळा वाचवा कृती समितीच्या वतीने मराठी भाषिकांनी प्रचंड मोठा मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयासह महापालिकेवरही मोर्चा काढून प्रशासनाला धारेवर धरले. अखेर भूमाफिया आणि त्यांना सहकार्य करणार्‍या अधिकारी यांच्यावर कारवाईचे ठोस आश्‍वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले, तर भूमाफियांच्या नावावर झालेली ही शाळा कायदेशीर प्रक्रियेने पुन्हा परत करण्याची खात्री महापालिका आयुक्तांनी दिली. (मराठी भाषा आणि मराठी शाळा यांची गळचेपी रोखण्यासाठी संघटितपणे लढा देणार्‍या मराठी भाषिकांचे अभिनंदन ! अशा प्रकारे कायमस्वरूपी मराठी भाषिक आणि हिंदूंनी संघटितपणे अन्यायाच्या विरोधात लढा दिल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यास वेळ लागणार नाही ! - संपादक) 

अमेरिकेत वैद्यकीय चुकांमुळे होणारे मृत्यू हे मृत्यूच्या कारणांपैकी ३ र्‍या क्रमांकाचे कारण !

भारतामध्ये असहिष्णुता वाढल्याचा कांगावा करणार्‍या अमेरिकेने आधी स्वत:च्या 
देशातील ही दु:स्थिती पालटण्यासाठी प्रयत्न करावेत !
      वॉशिंग्टन - वैद्यकीय चुकांमुळे होणारा मृत्यू हे अमेरिकेतील मृत्युच्या कारणांपैकी ३ र्‍या क्रमांकाचे कारण असल्याचे वृत्त ४ मे या दिवशी प्रकाशित झालेल्या ब्रिटीश मेडिकल जर्नलमधील एका लेखातून समोर आले आहे. एखाद्या रुग्णावर शस्त्रक्रिया करतांना अनावधानाने शरीराच्या चुकीच्या भागावर शस्त्रक्रिया करणे किंवा प्रमाणापेक्षा अधिक औषध देणे, अशा प्रकारच्या वैद्यकीय चुकांमुळे रूग्णांचा मृत्यू होतो. 
      जॉन्स हॉपकिन्स विद्यापिठाने केलेल्या अभ्यासानुसार, अमेरिकेत हृदयाशी संबंधित आजारामुळे प्रतिवर्षी ६ लाख ११ सहस्र जणांचा मृत्यू होतो. कर्करोगामुळे ५ लाख ८५ सहस्र आणि वैद्यकीय चुकांमुळे प्रतिवर्षी २ लाख ५१ सहस्र जणांचा मृत्यू होतो.जमात-इ-इस्लामीचा प्रमुख मोतीउर रहमान निझामीची फाशीची शिक्षा कायम !

सलमान खान, असदुद्दीन ओवैसी यांसारख्या याकूब मेमन समर्थकांनी जर मोतीउर रहमान 
निझामीलाही दया दाखवण्याची मागणी केली, तर त्यात कोणाला आश्‍चर्य वाटायला नको !
     ढाका - जमात-इ-इस्लामी या मूलतत्त्ववादी पक्षाचा प्रमुख मोतीउर रहमान निझामी याला सुनावण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेत कोणताही पालट होणार नसल्याचे बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने ५ मे या दिवशी स्पष्ट केले. निझामीला वर्ष १९७१ मधील बांगलादेश मुक्तीसंग्रामाच्या वेळी करण्यात आलेल्या मानवतेविरोधातील गुन्ह्यांच्या आरोपांतर्गत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 
    सरन्यायाधीश सुरेंद्र कुमार सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली ४ सदस्यीय खंडपिठाने हा निर्णय सुनावला. ७२ वर्षीय निझामीवर हत्या, बलात्कार आणि बुद्धिवंतांच्या हत्या सत्रामध्ये मुख्य भूमिका बजावण्यासंदर्भातील आरोप निश्‍चित करण्यात आले होते. निझामी याला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार करावा, अशा आशयाची याचिका न्यायालयाने स्पष्टपणे फेटाळून लावली. यामुळे फाशी टाळण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या निझामी याच्यापुढील न्यायालयीन मार्ग आता संपुष्टात आला असून, केवळ राष्ट्रपतींनी दया दाखवल्यासच त्याची फाशीपासून मुक्तता होऊ शकते.

आज अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाद्वारे शेतकरी मेळावा २०१६चे आयोजन

     कोल्हापूर - येथील छ. राजाराम टिंबर मार्केट, गंजीमाळ येथील पाटीदार भवन येथे शनिवार, ७ मे या दिवशी सकाळी १० ते ५ या वेळेत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने शेतकरी मेळावा २०१६ चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास ज्ञाती बंधूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्ह्याचे शेतकरी आघाडी प्रमुख अधिवक्ता सर्वश्री सुधीर जोशी-वंदुरकर आणि महासंघाचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार वेठे यांनी ५ मे या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
     श्री. नंदकुमार वेठे म्हणाले की, पंतप्रधानांच्या ग्रामीण विकास आणि जन पुनरुत्थानांच्या विधायक योजनांना प्रतिसाद देण्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या विद्यमाने पुगांव गाव दत्तक घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे. याच धर्तीवर ग्रामीण भागातील ज्ञाती बांधव असलेल्या कृषीवलांना सर्वांगीण मार्गदर्शन व्हावे आणि त्याचा लाभ सर्व शेतकरी बंधूंना होण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण मंत्री श्री. रामदास कदम आणि सहकारमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सकाळी १० वाजता उद्घाटन सोहळा होणार आहे.

संभाजीनगर येथे अरेरावी करणार्‍या एम्.आय.एम्.च्या शहराध्यक्षांना नागरिकांनी पलायन करण्यास भाग पाडले

अशाच प्रकारे जनतेने उद्दामपणे वागणार्‍या एम्आयएम्ला संघटितपणे विरोध 
केल्यास तिला देशातून निश्‍चितच हद्दपार करणे शक्य होईल, यात काही शंका नाही !
    संभाजीनगर, ६ मे - येथील खाम नदीतील अतिक्रमणांची पाहणी करण्यासाठी महापौर त्र्यंबक तुपे आणि पालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया ५ मे या दिवशी गेले होते. त्या वेळी महापौर आणि पालिकेचे अन्य पदाधिकारी यांना मजलिस-ए-इत्तेहाद- उल- मुस्लिमीनचे (एम्.आय.एम्.) शहराध्यक्ष अन्वर कादरी यांनी अरेरावी केली. त्यामुळे उपस्थित संतप्त नागरिकांनी कादरी यांना धक्काबुक्की करून पलायन करण्यास भाग पाडले. (एम्.आय.एम्.च्या उद्दाम पदाधिकार्‍यांना पलायन करण्यास भाग पाडणार्‍या नागरिकांचे अभिनंदन ! - संपादक) ही घटना हर्सूल परिसरातील एकतानगरात घडली. या वेळी कादरी हे नागरिकांऐवजी बांधकाम व्यावसायिकांची बाजू घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
१. पावसाळ्यापूर्वी खाम नदीतील अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासनाने गेल्या २ दिवसांपासून नदीपात्राची मोजणी चालू केली आहे. संपूर्ण पात्राची मोजणी करण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध होत आहे. त्यामुळे बकोरिया, महापौर तुपे आणि उपमहापौर राठोड हे ५ मे या दिवशी सकाळी पाहणी करण्यासाठी आले होते.

वाराणसी येथील विद्यालयात विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास आणि गुणसंवर्धन या विषयावर सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन

     वाराणसी - येथील धर्मदेव विद्यापीठ नाटी इमली येथे ३ मे या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास आणि गुणसंवर्धन या विषयावर सनातन संस्थेच्या सौ. स्मिता नवलकर यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयातील १८ शिक्षकांनी या विषयाचा लाभ घेतला. मुख्याध्यापिका श्रीमती विनीता सिंह यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. हा विषय ऐकल्यानंतर आतापर्यंत नकारात्मकतेकडे नेणार्‍या गोष्टींसंदर्भात आता सकारात्मक विचार वाढायला लागले, असे एका शिक्षिकेने सांगितले.

ऑल मेघालय मुस्लिम फ्रीडम ऑर्गनायझेशनच्या नेत्याच्या मुलीने धर्मांतर करून हिंदु प्रियकराशी केला विवाह !

हिंदूंचे धर्मांतर करण्याची मुसलमानांची धमकी, तर 
विहिंपची जशास तसे प्रत्युत्तर देण्याची चेतावणी !
      शिलाँग - मेघालयचे माजी कृषीमंत्री तसेच बंदी घातलेल्या ऑल मेघालय मुस्लिम फ्रीडम ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अश्रफ रफ्तार जहाँगीर गाजी यांची मुलगी असीमा जहाँगीर हिने धर्म पालटून सुबोधचंद्र पंडित नामक प्रियकराशी प्रेमविवाह केला आहे. त्यांचा विवाह आर्य समाजाच्या पद्धतीने झाला आहे. ऑल मेघालय मुस्लिम फ्रीडम ऑर्गनायझेशनने हत्या करण्याची धमकी दिल्यानंतर त्यांनी मेघालय सोडले आहे. 
१. ऑल मेघालय मुस्लिम फ्रीडम ऑर्गनायझेशनने या प्रकरणाला हिंदु जिहाद संबोधून त्याविषयी संपूर्ण मेघालयमध्ये भित्तीपत्रके लावून त्याचा प्रसार करण्यास आरंभ केला आहे.

फलक प्रसिद्धीकरता

दाऊदच्या मुसक्या आवळण्यासाठी आणखी किती वर्षे वाट पहावी लागेल ?
     देशातील धार्मिक नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि महत्त्वाची चर्च यांच्यावर आक्रमण करून केंद्रशासनाला अस्थिर करण्याचा कट जिहादी आतंकवादी दाऊद इब्राहिम याने रचला होता, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) दिली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Sarkarko asthir karne hetu dharmik neta aur churchopar akraman karneka Daudka shadyantra tha- NIA
     Daudka Bin Laden karneka sahas hum kab dikhayenge
जागो !
: सरकार को अस्थिर करने हेतु धार्मिक नेता एवं चर्चों पर आक्रमण करने का दाऊद का षड्यंत्र था - एनआयए
     दाऊद का बिन लादेन करने का साहस हम कब दिखाएंगे ?

हाजी अली दर्गा प्रवेश प्रकरणी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांना शुक्रवारी घ्यावी लागली माघार !

    मुंबई, ६ मे - स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली मंदिरांमध्ये घुसण्याची स्टंटबाजी झाल्यानंतर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्या शुक्रवार, ६ मे या दिवशी हाजी अली दर्ग्यात घुसण्यासाठी गेल्या. दर्ग्याच्या बाहेर बराच वेळ वाट पाहिल्यानंतर, तसेच ठिय्या आंदोलनाचा प्रकार केल्यानंतरही मुसलमानांकडून महिलांना दर्ग्यात प्रवेश करण्यास तीव्र विरोध होता. अखेर सायंकाळी ७.३० वाजता दर्गा बंद झाल्याने स्वराज्य संघटनेच्या वनिता गुट्टे आणि अन्य महिला कार्यकर्त्यांना माघारी फिरावे लागले. संघटनेच्या नेत्या वनिता गुट्टे यांनी २० ते २५ मे पर्यंत पुन्हा प्रवेशासाठी येणार, असे सांगितले.

मगो पक्षाचा भाषा आणि संस्कृती रक्षणास पोषक निर्णय ! - प्रा. सुभाष वेलिंगकर, समन्वयक, भाभासुमं

माध्यमप्रश्‍नी योग्य बाजू घेतल्याविषयी भारतीय भाषा 
सुरक्षा मंचकडून मगो पक्षाचे अभिनंदन ! 
      पणजी, ६ मे (वार्ता.) - माध्यम प्रश्‍नावर मगो पक्षाने घोषित केलेल्या पाठिंब्याचे भारतीय भाषा सुरक्षा मंचने (भाभासुमं) स्वागत केले आहे. भाभासुमंच्या केंद्रीय समितीच्या वतीने याविषयी मगो पक्षाचे आणि त्यांच्या नेत्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. राज्यातील भाजप शासनाकडून जाणीवपूर्वक अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठीच हा विषय चिघळवण्यात आला. भाषा हा विषय खरे तर शास्त्रीय आधार आणि भावनिक-सांस्कृतिक अधिष्ठानाशी जोडला गेलेला विषय आहे. हे मर्म ओळखून मगो पक्षाने भाभासुमंच्या आंदोलनास संपूर्ण पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय हा योग्य वेळी योग्य दिशेने घेतलेला निर्णय आहे. भाषा आणि संस्कृती रक्षणास पोषक, तसेच गोमंतकीय भारतीय अस्मितेस तारक असा हा मगो पक्षाचा निर्णय आहे, असे भाभासुमंचे समन्वयक सुभाष वेलिंगकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
     या पत्रकात पुढे म्हटले आहे की, भाभासुमंच्या कार्यक्रमात आणि सभांमध्ये सहभागी होण्याची पूर्ण मुभा आणि स्वातंत्र्य सर्व मगो पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्याचे घोषित करून भाभासुमंच्या आंदोलनावर बहिष्कार घालण्याचे दुर्दैवी आवाहन करणार्‍या विशिष्ट राजकीय पक्षाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालण्याचे काम मगो पक्षाने केले आहे. ही मातृभाषेच्या रक्षण कार्याची अत्यंत योग्य दिशा आहे.

मातृभाषेविषयी आपुलकी असल्यासच परमेश्‍वरासमोर आपण सिद्ध ठरतो ! - प.पू. श्रीमत् शिवानंद सरस्वती स्वामी, सद्गुरु श्री गौडपादाचार्य कैवल्य मठाधीश

      साखळी - आपणास मातृभाषेबद्दल आपुलकी असायला हवी. भाषा ही मन जोडते. आपल्या मातृभाषेबद्दल आपुलकी असल्यासच परमेश्‍वरासमोर आपण सिद्ध ठरतो. प्रत्येकाने आपली कुलदेवता आणि आपला धर्म याची जाण ठेवली पाहिजे, असे आवाहन सद्गुरु श्री गौडपादाचार्य कैवल्य मठाधीश प.पू. श्रीमत् शिवानंद सरस्वती स्वामी यांनी केले. विठ्ठलापूर, साखळी येथील गौडपादाचार्य मठाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या मठाच्या उद्घाटन सोहळ्यात आपले अनुयायी आणि भक्तगण यांच्यासमोर आशीर्वचन कार्यक्रमात बोलतांना प.पू. श्रीमत् शिवानंद सरस्वती स्वामी यांनी हे आवाहन केले.

ख्रिस्ती बिशप परिषदेचा डीएम्के-काँग्रेस युतीला पाठिंबा घोषित

तमिळनाडूमध्ये धर्मांतर बिनबोभाटपणे चालू ठेवण्यासाठी 
ख्रिस्त्यांकडून डीएम्के-काँग्रेस युतीशी तडजोड !
     धर्मनिरपेक्ष देशात ख्रिस्ती चर्चचे बिशप आणि जामा मशिदीचे इमाम त्यांच्या धर्मियांनी कोणाला मतदान करावे, हे सांगतात, तेव्हा एकही ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी यावर तोंड उघडत नाही; मात्र निवडणुकीत हिंदुत्वाचे सूत्र मांडल्यास हिंदुत्ववादी पक्षाचा विरोध केला जातो, हे लक्षात घ्या !
      मदुराई (तमिळनाडू) - तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तमिळनाडू ख्रिस्ती बिशप परिषदेने डीएम्के-काँग्रेस युतीला पाठिंबा घोषित केला आहे. तमिळनाडू राज्यात ख्रिस्ती मतदार मोठ्या संख्येने असल्यामुळे या निर्णयाचा लाभ डीएम्के-काँग्रेस युतीला होईल, असा अंदाज आहे. हा निर्णय परिषदेचे अध्यक्ष आर्चबिशप अंतोनी पप्पुसामी यांनी पत्रकार परिषदेत घोषित केला. 
     या वेळी पप्पुसामी म्हणाले डीएम्के आणि काँग्रेस पक्ष स्वच्छ चारित्र्याचे आहेत, असे नसून इतर पक्षांच्या तुलनेत अल्प वाईट आहेत, तसेच आम्हाला देशात धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही टिकवायची आहे. वरील निर्णय प्रत्येक चर्चला कळवून ख्रिस्ती मतदारांना मतदान करण्यास सांगितले जाईल.राममंदिरात बाबरीची बांग ऐकवण्याचे पाप भाजपने माथी घेऊ नये !

      काही दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते श्री. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी मुंबई येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात अयोध्येत राममंदिर बांधण्याचा कालावधी घोषित केला. या वेळी मंदिर वही बनायेंगे, लेकीन तारीख नही बताएंगे, अशी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य हिंदूंच्या मनातील व्यक्त केलेली बोलकी प्रतिक्रिया आठवली. श्री. स्वामी यांनी प्रसारमाध्यमांसमोर या वर्षाअखेर अयोध्या येथे राममंदिराच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात येईल. ३ मासांत मंदिराचे काम पूर्ण होऊ शकेल. पुढील रामनवमीला अयोध्या येथे राममंदिरात पूजा करू, असे सांगितले. नंतर पत्रकार परिषदेत श्री. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी हिंदुत्व हे भाजपच्या निवडणुकीच्या घोषणापत्रावरील सूत्र आहे.

उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर !

सुट्टीतील परिपाठ !
     सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. या सुट्टीचा कालावधी त्यांच्यात विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालवाचकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
मुलांनी चित्रकथा (कॉमिक्स) वाचण्यापेक्षा पुराणातील कथा वाचल्यास त्यांचा 
सर्वंकष विकास होईल !
    मुले कुठेही, केव्हाही, कुणाही बरोबर असू देत, त्यांना चित्रकथांचीच धुंद असते. चित्रकथा (कॉमिक्स) मुलांचा मानसिक, वैचारिक आणि चारित्र्यगत अधःपात करतात. चित्रकथा मुलांचे मन, बुद्धी आणि सगळे व्यक्तित्वच अपंग, एकाकी, संवेदनाहीन, रुक्ष बनवतात. त्या मुलांची धारणा जीवनात कोणतीही समस्या, अडचण येताच फॅन्टम वा सुपरमॅन पापणी लवताच दूर करील, अशी होते.
दैनिक सनातन प्रभातचा रंगीत स्त्रीशक्ती विशेषांक
प्रसिद्धी दिनांक
: ८ मे २०१६
पृष्ठ संख्या : १० मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ७ मे या दिवशी दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

१. जर ख्रिस्ती आणि मुसलमान त्यांच्या शाळांमध्ये बायबल अन् कुराण शिकवू शकतात, तर हिंदूंच्या शाळांमधून भगवद्गीता, रामायण का शिकवले जात नाही ?
२. अब्दुल रेहमान अंतुले यांना प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचे विश्‍वस्त केले होते. एखादा हिंदु, मुलायमसिंह यादव वा लालूप्रसाद यादव मशिदीचे वा मदरशाचे विश्‍वस्त कधीतरी होऊ शकतील का ?
- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस (क्रमश:)

धीरोदात्त, इतरांची काळजी घेणार्‍या आणि स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद देणार्‍या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. हर्षदा दातेकर !

कु. हर्षदा दातेकर
      कु. हर्षदा दातेकर या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात कला विषयासंबंधित सेवा करते. त्या काही दिवसांपासून गर्भाशयातील गाठीमुळे (फायब्रॉईडमुळे) रुग्णाईत होत्या. त्यांचे गोवा येथील रुग्णालयात ३०.४.२०१६ या दिवशी शस्त्रकर्म झाले. या गंभीर रुग्णस्थितीवरही त्यांनी आनंदी राहून मात केली. त्यांनी रुग्णाईत असतांनाही व्यष्टी साधना तळमळीने केली. रुग्णालयातही ती सर्वांशी गोड बोलून आणि सर्वांना साहाय्य करून तेथील कर्मचार्‍यांची लाडकी झाली. हे त्यांचे गुण वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या कालावधीत त्यांची आई आणि रामनाथी आश्रमातील साधिका यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. शस्त्रकर्म होण्यापूर्वी
१ अ. स्वतःला होणारा त्रास जाणवू न देणे : हर्षदाच्या पोटात फायब्रॉइड झाला होता. आधुनिक वैद्यांनी तो नक्कीच दोन-अडीच वर्षांपासून असावा, असे सांगितले, तरीही तिने त्रास होत असल्याचे कुणालाही जाणवू दिले नाही.
१ आ. दम्याचा त्रास असूनही स्वच्छतेच्या सेवा करणे : तिला दम्याचा त्रास आहे. त्यामुळे स्वच्छतेची सेवा केली की, तिला दुसर्‍या दिवशी त्रास होऊन श्‍वास घेण्यास कठीण व्हायचे, तरीही ती पहारा सेवा आणि आश्रम अन् विभाग स्वच्छता करायची.

साधिकेला आपल्यामुळे त्रास होतो, हे लक्षात आल्यावर शुकमुनींनी समजूतदारपणेे स्वतःच्या वागण्यात केलेले पालट आणि खोलीतील प्रसंगाच्या निमित्ताने लक्षात आलेली त्यांची वैशिष्ट्ये !

        मध्यंतरी मी २ - ४ दिवसांसाठी शुकमुनींना (पोपटाला) घेऊन एका सेवाकेंद्रात गेले होते. त्या वेळी शुकमुनींचे लक्षात आलेले समजूतदारपणा, ऐकण्याची वृत्ती, इतरांचा विचार, प्रेमळपणा आदी गुणांविषयी पुढे देत आहे.
१. खोलीतील सहसाधिकांनी 
शुकमुनींविषयी गार्‍हाणे केल्यामुळे ताण येणे
१ अ. प्रतिदिन सहसाधिकांनी तीच तीच सूत्रे सांगितल्याने पुष्कळ वाईट वाटून रडू येणे : चार दिवसांपूर्वी आमच्या खोलीत एक प्रसंग घडला. मी प्रतिदिन रात्री सेवा करून खोलीत गेल्यावर एक साधिका मला सांगत असे,
पहिली साधिका : शुकमुनींनी अनेक ठिकाणी शी करून ठेवली होती आणि ती सुकली होती. मला ती खरवडून काढावी लागते. मला डॉक्टरांनी वाकायचे नाही, असे सांगितले आहे; पण खोली अस्वच्छ दिसते; म्हणून मी स्वच्छ केली. तुम्हीही खोलीत त्यांना जेवण घेऊन येता किंवा इतर वेळी येता, तेव्हा लक्ष ठेवून त्यांची शी काढत जा.
मी : मी खोलीत आल्यावर मला दिसली की, ती काढते.

संयमी, गुरूंप्रती भाव आणि आज्ञापालन करण्याची तळमळ असणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली अन् महर्लोकातून पृथ्वीवर जन्म घेतलेली डोंबिवली येथील कु. स्वानंदी मांजरेकर (वय ६ वर्षे)

कु. स्वानंदी मांजरेकर
१. आठवणीने प्रार्थना करणे
           कु. स्वानंदी दुपारी १२.३० वाजता शाळेत जायला निघते. त्यामुळे १२ वाजता तिचे आवरणे आणि जेवण करणे याची घाई असते. त्यातही ती प्रत्येक दिवशी न चुकता १२ वाजता प.पू. पांडे महाराजांनी साधकांचे आणि सनातनच्या आश्रमांचे रक्षण व्हावे अन् साधकांच्या सेवेतील विघ्ने दूर व्हावीत, यासाठी करायची प्रार्थना करते. त्यामुळे आम्हालाही प्रार्थनेची आठवण होते.
२. संतांना भेटण्याची ओढ
        माझे बाबा जळगावला रहातात. ते दर दिवशी जळगाव सेवाकेंद्रात सेवेसाठी जातात. या सेवाकेंद्रातच पू. जाधवकाका रहातात. आम्ही घरी गेलो की, स्वानंदीला पू. जाधवकाकांना भेटण्याची ओढ लागलेली असते. घरी गेलो की, त्या दिवशीच हट्ट करून ती आजोबांसमवेत पू. काकांना भेटायला जाते.

प.पू. पांडे महाराज यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केलेले मार्गदर्शन !

प.पू. पांडे महाराज
       देवद , पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सर्व संत प.पू पांडे महाराज यांंना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळी ९ वाजता भेटायला गेले होते. त्या वेळी त्यांनी पुढील विचार व्यक्त केले.
१. वाढदिवसाच्या दिवशी आपण स्वतःवरील 
आवरण दूर करून आत्मप्रकाशाकडे जात असणे
         माझ्या जन्मदिवसानिमित्त आपण आलात, हे माझे परम भाग्यच आहे; पण हा माझा जन्मदिवस नाही. आपण सर्वजण येथे आत्ममीलनासाठी एकत्र आलो आहोत. आपण आपल्यावरील आवरण दूर करून आत्मप्रकाशाकडे जात आहोत. आज सर्वांच्या उत्कर्षाचा दिवस आहे. जे कायमस्वरूपी चैतन्यमय असते, अशा सनातनशी आपण संलग्न असल्याने वर्षानंतर त्या चैतन्याचे सादरीकरण करणे, म्हणजे खरा वाढदिवस होय.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे 
दर्शन झाले, तो दिवस म्हणजे खरा वाढदिवस !
        माघ शुद्ध दशमी, वर्ष २००५ या दिवशी मला प्रथम परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. तो माझा खरा वाढदिवस, म्हणजेच आत्मगौरव दिवस आहे. आपण साजरा करत असलेला वाढदिवस हा शरिराचा असतो; परंतु हा देह केवळ आत्मविकासासाठी प्राप्त झाला आहे. साधना करून गुरुकृपेने स्वभावदोष आणि अहं - निर्मूलन करून आत्मविकास करणे, म्हणजे खरा वाढदिवस होय ! तो आत्मगौरव दिन आहे.

कोल्हापूर येथील साधक कै. सुरेश घाटगे यांच्या अल्पावधीच्या सहवासात अनुभवलेले बहुमूल्य क्षणमोती !

कै. सुरेश घाटगे
        ७.५.२०१६ या दिवशी घाटगेकाकांच्या मृत्यूनंतरचा १२ वा दिवस आहे. मार्च २०१५ मध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत गेले असता कोल्हापूर येथील साधक सुरेश घाटगे यांच्या घरी जाण्याचा योग आला. आम्ही दीड ते २ घंटे तेथे असतांना जाणवलेली काकांची गुणवैशिष्ट्ये आणि अन्य सूत्रे पुढे देत आहे.
१. प.पू. डॉक्टरांनी वापरलेल्या खोलीतील चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी काका-काकूंनी तळमळीने प्रयत्न केल्याने तेथे गेल्यावर प.पू. डॉक्टरांच्या अस्तित्वाची अनुभूती येणे : काकांच्या घरी जाताक्षणीच शांत वाटले. प.पू. डॉक्टरांनी वापरलेली खोली पाहिल्यावर तेथे त्यांचे पुष्कळ अस्तित्व जाणवले. खोलीत निराळाच सुगंध दरवळत होता. त्यांनी वापरलेल्या सपाता (स्लीपर), पलंग, पटल-आसंदी आदी सर्व वस्तूंचा घाटगे काका-काकूंनी भावपूर्णरित्या करून ठेवलेला संग्रह पाहून भाव जागृत झाला.

साधकांचे त्रास अल्प व्हावेत, प.पू. डॉक्टरांना आरोग्य लाभावे, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला हिमालयातील सिद्धांचे आशीर्वाद लाभावेत, यांसाठी प.पू. आबा उपाध्ये यांनी हरिद्वारला जाण्याचे नियोजन केले आहे, असे वाटणे

         प.पू. आबा उपाध्ये आणि त्यांच्या पत्नी सौ. मंगला हे १३ ते २१ एप्रिल २०१६ या कालावधीत हरिद्वारला होते. निजामुद्दिन रेल्वे स्थानकावर पोचल्यावर मला प.पू. आबांचा भ्रमणभाष आला. ते म्हणाले, मी सुखरूप येथपर्यंत पोचलो आहे. आता दुपारी साडे तीन वाजता हरिद्वारला पोचीन. मी त्यांना विचारले, आबा, प्रवासात काही त्रास झाला नाही ना ? त्या वेळी ते लगेच म्हणाले, अहो, मी देवभूमीकडे निघालो असल्याने मला कसा त्रास होईल ?
        वयाच्या ८५ व्या वर्षीही त्यांचा हा उत्साह टिकून आहे. प.पू. आबा म्हणाले, मी सर्वांसाठी येथे प्रार्थना करणार आहे. तेव्हा त्यांच्या प्रार्थनेने हिमालयातील अनेक सिद्धांचा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला आशीर्वाद मिळेल, असे वाटले. केवळ त्यांच्या देवभूमीत जाण्यानेच साधकांना देवीदेवतांचे भरभरून आशीर्वाद मिळतील. संत आपल्यासाठी या वयातही किती करत आहेत, हेच यातून लक्षात येते आणि भगवंत आपल्याला सर्वच स्तरांतून किती सांभाळत आहे, हेही लक्षात येत आहे.

प.पू. आबा उपाध्ये यांनी पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सनातनच्या 
सर्व साधकांमध्ये नम्रता आणि लीनता रुजवली आहे !
       प.पू. आबांकडे गेलो असता सनातन संस्थेविषयी आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी ते कौतुकाने म्हणाले, पू. गाडगीळकाकूंमध्ये कमालीची नम्रता आणि लीनता आहे. तीच त्यांनी सर्व साधकांमध्ये रुजवली आहे. मी ज्या ज्या वेळी सनातनच्या आश्रमात जातो, त्या वेळी नमस्काराच्या नम्र आणि लीन मुद्रेत साधिकांना पाहून मला सर्वत्र पू. अंजलीकाकूच दिसू लागतात.
- श्री. निरंजन दाते, पुणे (१०.४.२०१६)

आकाशदेवाला प्रार्थना केल्यावर सौ. कस्तुरी भोसले यांना आलेल्या अनुभूती

१. आकाशदेवाला प्रार्थना करणे : मी काही दिवसांपासून ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ । हा जप करत आहे; परंतु तो करतांना माझा भाव जागृत होत नव्हता आणि आनंदही वाटत नव्हता. १०.३.२०१६ या दिवशी मी श्री आकाशदेवालाच प्रार्थना केली, तुझ्या नामातील चैतन्य आणि आनंद मला अनुभवता येऊ दे. नंतर मी गच्चीत सायंकाळी सहा ते सात या वेळेत आसंदीत बसून जप करत होते. समोर मोकळे आकाश आणि आल्हाददायक वातावरण पाहून मला बरे वाटत होते.

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
रामनाथी आश्रम पहायची संधी 
मिळाल्याचे समजल्यापासून आनंद अनुभवणे 
आणि आश्रमात आल्यावर चैतन्य जाणवणे
१. मला रामनाथी आश्रमात जायचे आहे, हे समजल्यापासून आनंद झाला आणि सर्व काही ईश्‍वर करून घेत आहे, असे वाटले. माझ्या यजमानांनीही मला आश्रमात जाण्यासाठी अनुमती दिली.

पुणे येथील संत प.पू. आबा उपाध्ये यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

१. उच्च आध्यात्मिक पातळीला असूनही 
शिकण्याच्या स्थितीत असलेले प.पू. आबा उपाध्ये ! 
प.पू. आबा उपाध्ये
         १०.४.२०१६ या दिवशी आम्ही पुणे येथील संत प.पू. आबा उपाध्ये यांच्याकडे गेलो होतो. एका प्रसंगात प.पू. आबांनी सांगितले, मी माझ्या सद्गुरूंना (प.पू. सदानंद महाराज यांना) विचारले, माझी आणि सनातनची भेट उशिरा झाली, असे वाटते. (प.पू. आबा त्यांचे २५०० वर्षांपूर्वी होऊन गेलेले सद्गुरु सदानंद महाराज यांच्याशी सूक्ष्मातून बोलतात.) त्यावर सद्गुरूंनी मला सांगितले, तुझे स्वतःचे एक विशिष्ट आध्यात्मिक बळ आहे. सनातनमध्ये कमालीची नम्रता आणि लीनता आहे. हा पुढचा भाग शिकण्यासाठी तुझी सनातनची भेट योग्य वेळीच झाली आहे. तुझ्यामध्ये जे काही न्यून आहे, ते तुला सनातनकडून शिकायचे आहे.
        प.पू. आबांचे हे उद्गार ऐकून एवढ्या उच्च आध्यात्मिक पातळीला असूनही संत कसे शिकण्याच्या स्थितीत असतात, हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळाल्याने पुष्कळ कृतज्ञता वाटली.

उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेले दैवी बालक, तसेच युवा साधक यांच्या पालकांना सूचना !

       रामनाथी आश्रमातील संकलन विभागात अनेक जिल्ह्यांतील पालकांकडून स्वतःच्या पाल्याविषयीचे लिखाण येते. अनेकदा सूचना देऊनही या लिखाणात बरीच माहिती अपूर्ण असते, उदा. काही वेळा पूर्ण नाव नसणे, वय नसणे, गावाचे आणि जिल्ह्याचे नाव नसणे आदी त्रुटी असतात. त्यामुळे ही माहिती गोळा करण्यात संबंधित साधकांना बराच वेळ द्यावा लागतो. यासाठी पालकांनी कृपया खालील सूत्रांनुसार संकलन विभागात माहिती पाठवावी.
१. पाल्याची 
माहिती पाठवण्याचा तपशील
अ. पाल्याचे संपूर्ण नाव, गाव, जिल्हा, राज्य
आ. जन्मदिनांक, जन्मतिथी, अचूक जन्मवेळ, जन्मस्थान (गाव, तालुका आणि जिल्हा) आणि जन्मपत्रिका (स्कॅन इमेज किंवा झेरॉक्स प्रत)
इ. पूर्वी पातळी आणि उच्च स्वर्गलोक किंवा महर्लोक घोषित केला आहे का ? असल्यास कोणत्या वर्षी ?

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल अमावास्या झाली.

अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांच्या जिल्हा दौर्‍याच्या वेळी आपल्या भागातील राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी अधिवक्त्यांशी त्यांची भेट घालण्याचे नियोजन करा !

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना
     हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता सुरेश कुलकर्णी हे ७ मे ते २४ मे कालावधीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या दौर्‍यावर जाणार आहेत. या दौर्‍यात त्यांची जिल्ह्यांतील राष्ट्र आणि धर्म कार्याची तळमळ असणारे अधिवक्ते, तसेच न्यायालयीन क्षेत्रात कार्य करणार्‍या व्यक्ती यांची भेट घालण्याचे नियोजन करावे. जेणेकरून राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या व्यापक कार्यात त्यांचे साहाय्य मिळेल. आपल्या भागातील कुणी अधिवक्ता भेटण्यास इच्छुक असल्यास त्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे महराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट यांना ९४०४९५६५३४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याचे नियोजन

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सनातनच्या ग्रंथांचे वितरण करण्यासाठी सुवर्णकारांना संपर्क करा !

साधकांना सूचना
     ९.५.२०१६ या दिवशी अक्षय्य तृतीया आहे. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने सुवर्णकारांच्या पेढीवर (दुकानावर) जातात. या दिवशी सोने खरेदी करणार्‍यांना सुवर्णकार ग्रंथ किंवा एखादी भेटवस्तूही देतात. यासाठी साधकांनी सुवर्णकारांना संपर्क करून त्यांना सनातनच्या अलंकारविषयीचे ग्रंथ, अध्यात्म, तसेच राष्ट्र-धर्म विषयक ग्रंथ-लघुग्रंथ यांची माहिती सांगून ते त्यांना खरेदी करण्यास सांगू शकतो आणि अक्षय्य तृतीयेला येणार्‍या ग्राहकांना भेट देण्याविषयी सूचवू शकतो.
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.५.२०१६)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

विवाह करणे किंवा विवाह न करणे यांची साधनेला असणारी पूरकता

        विवाह करावा कि नाही ? विवाहामुळे साधनेत अडथळा येईल का ? विवाह आध्यात्मिक प्रगतीसाठी किती पूरक ठरेल ?, असे प्रश्‍न अनेक विवाहेच्छुक साधक-साधिकांच्या मनात असतात. त्याचे उत्तर येथे दिले आहे.
       यावरून लक्षात येईल की, सर्वसाधारण व्यक्तीबरोबर विवाह करण्यापेक्षा विवाह न करणे साधनेला पूरक असते.
टीप : सत्ययुगात सर्वच पती-पत्नी एकमेकांना साधनेसाठी पूरक होते. त्रेता आणि द्वापर युगांत ऋषी-ऋषीपत्नी एकमेकांना पूरक होते. आता कलियुगात साधनेच्या दृष्टीने आदर्श पती-पत्नी सापडणे फारच दुर्मिळ झाले आहे. १० सहस्रांमध्ये एखादेच जोडपे तसे असते.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
जिवात्मा आणि शिवात्मा म्हणजे काय ?
बाबा : मी कशासाठी जन्माला आलो आहे आणि मला काय करायचे आहे, याचे ज्ञान जिवाला झाले, तर त्या आत्म्याला जिवात्मा म्हणतात. कोणीतरी माझ्याकडून कार्य करवून घेत आहे, याचे ज्ञान झाले की, त्या आत्म्याला शिवात्मा म्हणतात. शिवात्मा शोधणे, म्हणजे खरे ज्ञान. शिवात्मा कार्यकारणभावापुरता जन्माला येतो, तर जीव प्रारब्धभोगामुळे जन्माला येतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

    
परात्पर गुरु डॉ. आठवले
आधुनिक वैद्य, अभियंता, अधिवक्ता इत्यादींचे धर्माविषयी विचार काहीही असोत त्यांच्या कार्यावर विचारांचा परिणाम होत नाही; पण पोलीस आणि न्यायाधीश यांच्या धर्माविषयीच्या व्यक्तीगत दृष्टीकोनामुळे, उदा. पोलीस आणि न्यायाधीश बुद्धीप्रामाण्यवादी असल्यास त्यांच्या कार्यावर परिणाम होतो. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

यशप्राप्ती
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय कशाचीही प्राप्ती होत नाही. यश हे नेहमी प्रयत्नांनाच चिकटून रहाते. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)बोधचित्र

वेळेचे योग्य नियोजन करा !

संपादकीय 
     भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी घेतलेल्या नवीन पवित्र्यामुळे त्यांना आणखी थोडी प्रसिद्धी मिळण्याची चिन्हे आहेत. अर्थात् प्रसिद्धीमाध्यमांचे जाळे विस्तीर्ण असल्यामुळे प्रसिद्धी मिळवणे आजकाल सोपे झाले आहे. हाजी अली दर्ग्यात न सांगताच प्रवेश करणार, असे देसाई यांनी घोषित केले आहे. विषय कुठे चालू झाला, विषय काय होता, तो बाजूला कसा पडला ? या सूत्रांविषयी थोडे चिंतन केले, तर आपली राजकीय आणि सामाजिक व्यवस्था आपल्या लक्षात येईल. शनिशिंगणापूर येथील शनिदेवांच्या चौथर्‍यावर जाण्यास पुरुष अथवा महिला यांपैकी कुणालाही अनुमती नाही. हा धर्मपरंपरेचा भाग होता. देसाई यांचा आग्रह होता की, महिलांना त्या चौथर्‍यावर जाण्याची अनुमती हवी. मंदिर व्यवस्थापनाने धर्मपरंपरेच्या नियमांखाली त्यांना अनुमती नाकारल्यावर त्या मुंबई उच्च न्यायालयात गेल्या.

सर्वांचे शिवराय !

संपादकीय
     ८ मे या दिवशी परंपरेनुसार साजरी केली जाणारी शिवजयंती आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून इचलकरंजी शहरात समस्त जवाहर नगर मुस्लिम समाजाच्या वतीने एक डिजिटल फलक लावण्यात आला होता. या फलकावर शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे या मथळ्याखाली मुसलमान सरदार, मावळे, सेनापती, लष्करी अधिकारी इत्यादीं विषयीची माहिती होती. या उत्सवाच्या निमित्ताने शहरात हिंदुत्ववादी संघटनांनी सहा सहस्र डिजिटल आणि साधे फलक लावले आहेत. समस्त जवाहर नगर मुस्लिम समाजाच्या वतीने लावण्यात आलेला तो एकमेव फलक मात्र भव्यदिव्य होता. छत्रपती मुस्लिम हृदयसम्राट होते असे लिहिण्याइतपत आयोजकांचे छत्रपतींच्या विषयीचे प्रेम उतू जात होते. या फलकावरील सर्व लिखाण आक्षेपार्ह असल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी हा फलक उतरवून घेतला.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn