Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे संत पू. दत्तात्रेय
देशपांडे यांचा आज वाढदिवस

उज्जैन सिंहस्थस्थळी वादळी पावसामुळे अनेक मांडव कोसळून १ साधू आणि ५ भाविक यांचा मृत्यू !

  • सिंहस्थ प्रशासनाने वादळ आणि पाऊस यांच्या दृष्टीने काहीच काळजी घेतली नसल्याचे उघड !  
  • १३५ हून अधिक घायाळ
  • चांडाळ योगामुळे आपत्ती आल्याची काही साधू-संतांची प्रतिक्रिया
इतर संप्रदायांचे मांडव कोसळून मोठ्या प्रमाणात झालेली हानी
 उज्जैन - ५ मेच्या दुपारी ४.३० वाजता अकस्मात झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे येथील मंगलनाथ भागात असलेल्या सिंहस्थ मेळा क्षेत्राची मोठ्या प्रमाणात हानी झाली. यात एक साधू आणि ४ भाविक मृत्यूमुखी पडले, तर १३५ हून अधिक भाविक घायाळ झाले. एक घंट्याहून अधिक वेळ झालेल्या पावसात साधु-संतांचे अनेक तंबू कोसळले.
१. जूना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय संरक्षक महंत हरिगिरीजी आणि आखाडाप्रमुख महंत नरेंद्रगिरीजी महाराज यांनी या घटनेविषयी दु:ख व्यक्त केले आहे.

किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्‍वरपदी लक्ष्मी त्रिपाठी

    उज्जैन - किन्नरांच्या अधिकारांसाठी काम करणार्‍या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना उज्जैन सिंहस्थपर्वामध्ये किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्‍वर घोषित करण्यात आले. अनुमाने २० लाख किन्नरांच्या सर्वसंमतीने त्यांना या पदासाठी निवडण्यात आल्याचे समजते. या पदाच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या पदेशांमधून किन्नर पीठाधिश्‍वर, अर्ध पीठाधीश्‍वर आणि महंत यांचीही निवड करण्यात आली आहे.
      किन्नर आखाड्याचे मुख्यालय उज्जैन येथे असणार आहे. या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, गोरक्षण, स्त्रीभ्रूण हत्येचा विरोध आणि बालविवाहाला विरोध आदींसाठी कार्य करण्यात येईल, असे महामंडलेश्‍वर लक्ष्मी यांनी सांगितले. वर्ष २००८ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या एशिया पॅसिफिक संमेलनामध्ये प्रतिनिधीत्व करणार्‍या त्या पहिल्या किन्नर आहेत.

नागा साधू सर्वांगावर औषधीयुक्त विभूती अभिमंत्रीत करून लावतात !

     उज्जैन, ५ मे (वार्ता.) - बर्‍याचदा विभूतीचा उपयोग प्रसाद म्हणून खाण्यासाठी अथवा कपाळावर लावण्यासाठी केला जातोे; मात्र नागा साधू सर्वांगाला लावत असलेली विभूती ही केवळ यज्ञातील वा पूजेतील रक्षा नसून ती अनेक औषधींनी परिपूर्ण असते, अशी माहिती यमुना किनारी जन्मलेले नागा साधू निर्भयसिंहगिरीजी यांनी सांगितली.
१. सध्या कुंभमेळ्यातील नागा साधू हे सहस्रो भाविक आणि श्रद्धाळू लोकांचे आकषर्णाचे केंद्र झाले आहे. 
२. स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी, तसेच त्यांचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने लोक त्यांच्या दर्शनासाठी जात आहेत.

(म्हणे) धार्मिक शक्ती ब्रिटिशांपेक्षा वाईट !

पुरोगामी पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांची पोपटपंची
        कोल्हापूर, ५ मे (वार्ता.) - तुम्ही दिलेली तलवार ही आई जगदंबेची असून मला लढण्यास बळ देणारी आहे. समाजवादी लोकशाही सध्या संपुष्टात येत असून धार्मिक शक्ती वाढत आहे. ही शक्ती ब्रिटिशांपेक्षा वाईट असून तिला रोखण्यासाठी जागृत होण्याची आवश्यकता आहे, असे वक्तव्य पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांनी केले. (पुरोगामी संघटना आणि समाजवादी यांचे खरे स्वरूप ! असहिष्णुता वाढली आहे, असे म्हणून हिंदुत्ववाद्यांना हिणवणार्‍यांना ही चपराकच आहे. हिंदुत्ववाद्यांना अतिरेकी म्हणणारे पुरोगामी कसल्या संघर्षाची सिद्धता करत आहेत ? हिंदुत्ववादी त्यांना कसे तोंड देणार आहेत ? - संपादक) ३ मे या दिवशी येथील आई अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीद्वारे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. संघर्ष समिती आणि विविध पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या वेळी डॉ. सुभाष देसाई यांना आत्मसंरक्षणासाठी तलवार भेट दिली.
या आवाजी मतदानाने वेळी करण्यात आलेले ठराव असे...
१. महापौर आणि सर्व नगरसेवकांनी अंबाबाई देवीचे मूळ स्वरूप त्वरित घडवावे. शिवाय असा ठराव सर्वसाधारण सभेत करावा.

उज्जैन सिंहस्थपर्वात वादळी पावसाने झालेली हानी !

इतर संप्रदायाच्या मांडवाची कोसळलेली कमान
क्षिप्रा नदीच्या किनारी वाहणारे पाण्याचे लोट तसेच पाण्याची वाढलेली पातळी
सनातनच्या प्रदर्शनाची झालेली हानी

गेल्या ६८ वर्षांपासून भारतीय विमाने मिरवत आहेत इंग्रजांचे दास्यत्व !

असे केवळ भारतातच घडते ! देश स्वतंत्र होऊन ६८ वर्षे झाली; पण आपण दास्यत्वाचे प्रतीक 
असलेला साधा संकेतांक पालटू शकलो नाही, हे सर्वपक्षीय शासनांसाठी लाजिरवाणे आहे !
     नवी देहली - बिटिशांनी देश सोडून ६८ वर्षे झाली, तरी आपली विमाने कशा प्रकारे दास्यत्वाचे प्रतीक मिरवत आहेत, याचा अनुभव नुकताच संसदेने घेतला. भारतामध्ये सर्व विमानांवर व्हीटी या अक्षरांचा संकेतांक लिहिलेला आढळून येतो. या दोन अक्षरांचा अर्थ विक्टरी टेरीटोरी (व्हाइसरॉय यांचा प्रदेश) असा होतो. याविषयी भाजपचे खासदार तरुण विजय यांनी नुकतेच राज्यसभेत सूत्र उपस्थित केले. तोपर्यंत लोकांप्रमाणे खासदारांनाही याचा अर्थ माहीत नव्हता. जेव्हा त्यांना याचा अर्थ कळला, तेव्हा त्यांनाही माना खाली घालाव्या लागल्या.

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनला ३६० कोटी रुपयांचा दंड !

भारताने अशा विदेशी उत्पादनांवर बंदी घालावी ! 
  • आस्थापनाची टाल्कम पावडर वापरल्याने अंडाशयाचा कर्करोग झाल्याचा आरोप
  • आस्थापनाच्या विरोधात १२०० हून अधिक खटले !
      मिसौरी (अमेरिका) - जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन या जागतिक आस्थापनाची टाल्कम पावडर अनेक वर्षे वापरल्यानेच आपल्याला अंडाशयाचा कर्करोग झाला, हा अमेरिकेतील दक्षिण डकोटा येथील एका महिलेचा दावा सेंट लुइस न्यायालयाने ग्राह्य धरला आहे. मिसौरी राज्यातील या न्यायालयाने महिलेला ३६६ कोटी रुपयांची (५.५ कोटी डॉलर्सची) हानीभरपाई देण्याचे आदेशही आस्थापनाला दिले आहेत. या निकालाला आव्हान देण्याचा निर्णय आस्थापनाने घेतला आहे.

श्री विठ्ठलाच्या आणि गुगल लोकेशनच्या चिन्हामध्ये साम्य ! - आचार्य स्वामी स्वात्मनंद

        श्री विठ्ठलाच्या कपाळावरील गंध आणि गुगल लोकेशनचे चिन्ह


     नवी देहली - मुंबई येथील चिन्मय मिशनचे आचार्य स्वामी स्वात्मनंद यांनी श्री विठ्ठलाच्या कपाळावरील गंध आणि गुगल लोकेशनच्या चिन्हामध्ये साम्य असल्याचे म्हटले आहे. जगातील ठिकाणांची माहिती देणारे हे चिन्ह आणि देवाच्या कपाळावरील टिळा यातील साम्य सतत समवेत असणार्‍या गुगल लोकेशनप्रमाणे चराचरात ईश्‍वर आहे, हे दर्शवते. आपण सतत ईश्‍वराच्या अस्तित्वाची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करायला हवा, असेही ते म्हणाले.


पुणे येथे होत असलेल्या अवैध धंद्यांना पाठबळ देणार्‍या तीन पोलिसांचे निलंबन आणि अटक

जनतेचे रक्षक, नव्हे तर भक्षक बनलेल्या या पोलिसांचे 
केवळ निलंबन करून उपयोग नाही, तर कठोर कारवाई व्हायला हवी !
       पुणे, ५ मे - येथील हडपसर आणि विमाननगर भागामध्ये अवैध धंदे चालवण्यास पाठबळ देणार्‍या ३ पोलिसांना पुणे पोलीस प्रशासनाने निलंबित केले आहे. त्यांची नावे संतोष भीमय्या भंडारी, पोलीस हवालदार सुरेश काकडे, साहाय्यक फौजदार गुंगा जगताप अशी असून त्यांना अटकही करण्यात आली आहे.
१. भंडारी हे बिबवेवाडी पोलीस ठाण्यातहोते. भंडारी हे त्याचे साथीदार सचिन रावसाहेब साळुंके आणि देवीदास पुंडलिक सलगर यांच्या साहाय्याने हडपसर येथील शेवाळवाडी जकात नाक्याजवळ मटक्याचा धंदा चालवत होते. हडपसर पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक तासगांवकर यांनी ३ मे या दिवशी तेथे छापा टाकला. त्या वेळी भंडारी यांच्यासह साथीदारांना अटक केली. पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी भंडारी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

भारताचे परराष्ट्र धोरण विरोधाभास निर्माण करणारे !

चिनी माध्यमांची टीका
       बीजिंग - चीनसमवेत चर्चेसाठी पाऊल टाकतानाच अमेरिकेसह चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा भारत प्रयत्न करत आहे. त्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी विरोधाभास निर्माण होत आहे. असे धोरण कठीण परिस्थिती निर्माण करेल, अशी टीका चिनी प्रसारमाध्यमांनी केली आहे. (चीनही भारताशी संबंध ठेवत असतांनाच पाकिस्तानला साहाय्य करत असतो. त्यामुळे चीनची ही कृतीही विरोधाभास निर्माण करत नाही का ? - संपादक)

बांगलादेशातील धर्मनिरपेक्ष स्तंभलेखकांच्या हत्या : चिंतेचा विषय

भारतातील हिंदूंना असहिष्णु ठरवणार्‍या प्रसारमाध्यमांनी बांगलादेशातील 
बुद्धीवाद्यांच्या हत्यांविषयी कधी आवाज उठवला आहे का ?
     ढाका - बांगलादेशात मागील काही वर्षांमध्ये जिहादी धर्मांधांनी अनेक धर्मनिरपेक्ष ब्लॉगर्स (स्तंभलेखक), लेखक, प्राध्यापक आणि पत्रकार यांच्या निर्घृणपणे हत्या केल्या. या सर्व हत्या एकाच पद्धतीने करण्यात आल्या असून सुरीसारख्या धारदार शस्त्राचा यात वापर करण्यात आला आहे. त्यामुळे स्वतंत्र विचार करणार्‍या विचारवंतांसाठी हा चिंतेचा विषय झाला आहे. 
      फेब्रवारी २०१३ मध्ये धर्मनिरपेक्ष राजिब हैदरची हत्या करण्यात आल्यानंतर एका पाठोपाठ अनेक बुद्धीवाद्यांना जिहाद्यांच्या बळी व्हावे लागले. मागील वर्षी वशीकुर रहमान या ब्लॉगर ची घरून कार्यालयाकडे निघाले असतांना वाटेत हत्या करण्यात आली. त्यांनी त्यांचे नाव आणि छायाचित्र गुप्त ठेवले होते. असे असतांनाही जिहादींनी त्यांची हत्या केली होती. तज्ञांच्या मते हे घृणास्पद कृत्य करणारे देशाच्या वेगवेगळ्या भागातून असले, तरी त्यांना प्रशिक्षण आणि प्रेरणा एकाच संघटनेकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेले दोन्ही युवक मदरशांतील विद्यार्थी होते.


पुणे-लोणावळा मार्गावर लोकलमधील चोरट्यांना रोखण्यासाठी सशस्त्र बंदोबस्त

चोरट्यांची पाळेमुळे शोधून काढून ती नष्ट केल्यास 
बंदोबस्त ठेवण्याची आवश्यकताच भासणार नाही !
         लोणावळा (जिल्हा पुणे), ५ मे - पुणे-लोणावळा मार्गावर रात्रीच्या वेळी लोकलने प्रवास करणार्‍या प्रवाशांना धमकावून लूटमार करणार्‍या चोरट्यांना रोखण्यासाठी सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच धावत्या रेल्वेगाड्यांंवर पडणारे दरोडे रोखण्यासाठी आणखी १० ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
        लोणावळा ते पुणे या मार्गावर रात्री ११ नंतर प्रवाशांना चोरांनी लुटल्याच्या घटना घडतात. लोहमार्गालगत रहाणार्‍या झोपडपट्ट्यांमधील चोरटे लुटमारीचे गुन्हे करतात. (मग पोलीस तेथे कोम्बिंग ऑपरेशन का राबवत नाहीत ? - संपादक) रेल्वे स्थानकाजवळ गाडीचा वेग न्यून होत असतो. अशा वेळी चोरटे लोकलच्या डब्यात शिरून प्रवाशांना तीक्ष्ण शस्त्रांचा धाक दाखवून किंवा त्यांना मारहाण करून भ्रमणभाष आणि रोख रक्कम घेऊन पळून जातात. त्यामुळे रात्री उशिरा प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मळवली, कान्हेफाटा, वडगांव, कामशेत, आकुर्डी या रेल्वे स्थानकाच्या परिसरात सशस्त्र बंदोबस्त असणार आहे. बंदोबस्तामुळे लुटमारीच्या घटना अल्प झाल्या असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

छत्तीसगढमध्ये लीड इंडिया २०२० या प्रशिक्षण कार्यक्रमाला शुभारंभ !

      राजनांदगांव (छत्तीसगढ) - येथील मोहला तालुक्यात असलेल्या शासकीय कन्या उच्च माध्यमिक शाळेत स्वत: वाचा, देशाला वाचवा या मोहिमेअंतर्गत लीड इंडिया २०२० नावाने ५ दिवसीय प्रशिक्षणाला आरंभ झाला. काही वर्षांपूर्वी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत: वाचा, देशाला वाचवा या मोहिमेचा आरंभ करण्यात आला होता. कार्यक्रमाला मुख्य अतिथीच्या रूपात माजी खासदार प्रदीप गांधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे राष्ट्रीय समन्वयक मनीष मंजुल यांनी कार्यक्रमाचे महत्त्व सांगतांना म्हटले, ध्येय, व्यवहार, ज्ञान, मूल्य आणि कौशल्य यांच्या विकासावर आधारित या कार्यक्रमात आपल्यात असलेल्या न्यूनतेचा अभ्यास करून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्यानेच डॉ. कलाम यांना अपेक्षित असे विकसित भारताचे निर्माण होईल. प्रत्येक नागरिक पुढे गेला तरच देश पुढे जाईल.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाची अल्प प्रमाणात हानी

सनातनच्या प्रदर्शनस्थळी एका बाजूने काठ्या लावून दुसर्‍या
बाजूने छतावर साठलेले पाणी काढतांना सनातनचे साधक
जयघोष करून उत्साहाने आणि जिद्दीने सर्व पूर्ववत करण्यासाठी सेवेला आरंभ करणारे
सनातनचे साधक आणि संत १. पू. डॉ. चारुदत्त पिंगळे अन् २. पू. (कु.) स्वाती खाडये
         उज्जैन - येथील सिंहस्थपर्वात अचानक आलेले वादळ आणि मुसळधार पाऊस यांमुळे सहभागी आखाडे, संप्रदाय आणि आध्यात्मिक संस्था यांचा मांडव पडून मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. काही आखाड्यांचे मांडव जमीनदोस्त झाले आहेत. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी धर्मप्रसारासाठी उभारलेल्या प्रदर्शनालाही या मुसळधार पावसाची झळ पोचली आहे; मात्र तुलनेत अल्प प्रमाणात हानी झाली आहे.

स्मार्टफोनच्या साहाय्याने पाककडून भारताच्या सुरक्षा दलाची हेरगिरी !

सुरक्षा दलाची माहिती शत्रूराष्ट्राकडून हस्तगत होते, यासारखी लाजिरवाणी गोष्ट पूर्वीच्या 
काँग्रेसी राज्यकर्त्यांप्रमाणे केवळ लोकसभेत सांगण्यापेक्षा आताच्या राज्यकर्त्यांनी 
त्यावर ठोस उपाययोजना काढायला हवी !
      नवी देहली - पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएस्आयने भ्रमणभाषमधील गेमिंग आणि म्युझिक या अ‍ॅप्लिकेशनद्वारे भारताच्या सुरक्षा दलाची माहिती गोळा केल्याची माहिती गृहराज्यमंत्री हरीभाई चौधरी यांनी ३ मे या दिवशी लोकसभेत दिली. (पाक ही माहिती काढेपर्यंत भारतीय गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या ? - संपादक) 
     ते पुढे म्हणाले, आयएस्आयएस् भारताच्या माजी सैनिकांना नोकरी आणि आर्थिक साहाय्य देऊन त्यांचा हेरगिरीसाठी उपयोग करण्याचा प्रयत्न करत आहे. (पाक असे करत असतांना भारत पाकच्या विरोधात कृती का करत नाही ? - संपादक)


उत्तराखंड येथील आगीमुळे हिमनगांवर विपरीत परिणाम होऊन ते वितळण्याची शक्यता !

     डेहराडून - उत्तराखंड येथील जंगलात लागलेल्या आगीचा उत्तरेतील हिमनगांवर विपरित परिणाम होऊन ते वितळण्याची शक्यता अभ्यासक आणि शास्त्रज्ञ यांच्याकडून वर्तवली जात आहे. आगीमुळे वनसंपदेच्या होणार्‍या हानीसोबत अन्य समस्याही निर्माण झाल्या आहेत. 
१. वाडिया हिमालय भूविज्ञान संस्थेचे हिमनग विशेेषतज्ञ डॉ. डी.पी. डोभाल यांच्या मते, आगीतून निघणारा कार्बन डायऑक्साईड ओझोन वायूच्या थराला हानी पोहोचवत आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगची गती वाढत आहे. पाऊस पडल्यानंतर कार्बनचे कण हिमनगावर पसरतील. त्यामुळे बर्फ वितळण्याची गती वाढेल, अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.
२. हिमनगांवरील बर्फ वितळण्याच्या प्रक्रियेच्या वेगाचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासकांचा एक गट तैनात करण्यात येणार आहे.
३. गंगोत्री हिमनगांवर अभ्यास करणारे पंडित गोविंद वल्लभ पंत हिमालय पर्यावरण आणि विकास संस्थानाचे शास्त्रज्ञ कीर्ती कुमार यांनीही या आगीमुळे हिमनगांचे भवितव्य धोक्यात असल्याचे म्हटले आहे.


राष्ट्रीय संग्रहालयातील आगीनंतर तेथील पुराणवस्तू आणि कलाकृती यांच्या सुरक्षिततेवर प्रश्‍नचिन्ह !

      देहली - येथील राष्ट्रीय संग्रहालय हे देशातील सर्वांत मोठे संग्रहालय असून त्यामध्ये पुराणकालापासून आधुनिक काळापर्यंतच्या कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. जनपथ येथे असलेले हे राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली येते. या संग्रहालयामध्ये दोन दिवसांपूर्वी लागलेल्या आगीमुळे येथील कलाकृती आणि पुराणवस्तू यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
    या राष्ट्रीय संग्रहालयामध्ये गेल्या ५ सहस्र वर्षांपासून २ लक्ष कलाकृती आणि पुराणवस्तू ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये प्राचीन शस्त्रास्त्रे, चिलखत आणि रेशीम चित्रे यांचा समावेश आहे. हे संग्रहालय म्हणजे भारताची वैभवशाली परंपरा दर्शवणारा ठेवा आहे. या राष्ट्रीय संग्रहालयामध्ये ६० सहस्रांपेक्षा अधिक ग्रंथ आहेत. तसेच भारतीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिके ठेवण्यात आली आहेत. तळमजल्यावर पुरातत्व दालनामध्ये सुमारे ८०० शिल्पकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. भारतीय लिपी आणि नाणी यांचे एक वेगळे दालन आहे. मध्य आशियातील पुराणवस्तू या संग्रहालयाध्ये प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. या संग्रहालयामध्ये प्रसिद्ध चित्रकारांच्या सुमारे १७ सहस्र चित्रांचे वेगळे दालन आहे. तसेच यामध्ये विविध भाषांतील सुमारे १४ सहस्र हस्तलिखित नमुने ठेवण्यात आले आहेत.

अमली पदार्थांच्या तस्करीच्या संदर्भात अन्वेषण करण्यासाठी ब्राझीलमध्ये ३ दिवस व्हॉट्स अ‍ॅपच्या वापरावर बंदी !

      ब्रासिलिया - ब्राझीलमध्ये व्हॉट्स अ‍ॅपवर ३ दिवसांकरता बंदी घालण्यात आली आहे. अमली पदार्थांच्या तस्करीच्या संदर्भात अन्वेषण करण्यासाठी आवश्यक असणारी माहिती देण्यास व्हॉट्सअ‍ॅपने सहकार्य न करता तटस्थ भूमिका घेतल्याने ही बंदी घालण्यात आली आहे.
      फेसबूकने व्हॉट्सअ‍ॅप हे मेसेंजर अ‍ॅप्लिकेशन २०१४ मध्ये विकत घेतले आहे. दोन व्यक्तींमध्ये झालेला संवाद, संदेश पूर्णपणे गोपनीय ठेवण्याचे फेसबूकचे धोरण असल्याने सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण होतो, तेव्हाही आम्हाला व्हॉट्स अ‍ॅपचे संदेश उघड करता येणार नाहीत, अशी फेसबूकची भूमिका आहे. त्यामुळे ब्राझीलने ही बंदी घातली आहे. 
      व्हॉट्स अ‍ॅपमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाढले; मात्र सार्वजनिक किंवा राष्ट्रीय हित मर्यादित होत गेले आहे, असे सांगत न्यायालयाने ब्राझीलमध्ये भ्रमणभाष सेवा पुरवणार्‍या सर्व दूरसंचार आस्थापनांना व्हॉट्सअ‍ॅपवर बंदी घालण्याविषयी आदेश दिले आहेत.आता देहलीतही मिळणार कॅन बंद शुद्ध हवा !

देश स्वतंत्र होऊन ६८ वर्षांत लोकांना शुद्ध हवाही मिळवून देऊ न शकणारे 
सर्वपक्षीय राज्यकर्तेच या स्थितीला कारणीभूत आहेत !
     नवी देहली - चीननंतर आता भारतातही कॅनमधील शुद्ध हवा मिळणार असून त्याचा प्रारंभ देशाची राजधानी देहलीतून करण्यात येणार आहे. वाईटेलिटी एअर या कॅनेडियन आस्थापनेने हे शुद्ध हवेचे कॅन सिद्ध केले असून या कॅनचे मूल्य साडेबारा रुपये इतके असणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देहलीला सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे राजधानीत सर्वप्रथम अशी हवा देण्याचे आस्थापनेने ठरवले आहे. मागील वर्षीपासून अशा प्रकारे कॅन बंद शुद्ध हवा चीनमध्ये विकण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॉन्टी र्‍होड्स याचे भारतीय संस्कृतीनुसार आचरण !

भारतीय संस्कृती श्रेष्ठ असल्याने विदेशातील नागरिक भारतात येऊन तिच्यानुसार आचरण 
करतात, याउलट भारतातील काही पुरोगामी तिच्यावर टीका करण्यात धन्यता मानतात !
     मुंबई - दक्षिण अफ्रिकेचा माजी फलंदाज आणि आयपीएल्मधील मुंबई इंडियन्स संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जॉन्टी होड्स याने स्वत:च्या मुलीसाठी हिंदु शास्त्र आणि परंपरेनुसार पेजावर मठात तिच्या भविष्यासाठी आणि यशासाठी होमहवन केले. या वेळी त्याने भारतीय परंपरेनुसार धोतर परिधान केले होते. तसेच २२ एप्रिलला तिचा पहिला वाढदिवस असल्याने जॉन्टीने कुटुंबासह तमिळनाडूतील एका मंदिरात दर्शन घेऊन मुलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी देवाला प्रार्थना केल्याचे समोर आले आहे. या मुलीचा जन्म भारतात झाल्यामुळे तिचे नाव इंडिया असे ठेवले होते. 
      गेली ९ वर्षे मुंबई इंडियन्स सोबत जोडले गेल्याने जॉन्टी याला भारताविषयी जवळीक वाटू लागली आहे. येथे संस्कृती, परंपरा, भौगोलिक आणि जैविक विविधता आणि आधुनिकता अशा सर्वांचा समावेश असल्याने येथील लोकांचे संतुलित जीवन मला भावते, असे जॉन्टीने एका मुलाखतीत सांगितले होते.गांधी परिवाराला अडकवण्यासाठी केंद्रशासनाने माझ्यावर दबाव आणला ! - मध्यस्थ ख्रिश्‍चियन मिशेल यांचा दावा

गांधी परिवाराला वाचवण्यासाठी मिशेल असे 
आरोप करत असतील, अशी शंका आल्यास आश्‍चर्य वाटू नये !
       नवी देहली - ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात मध्यस्थाची भूमिका बजावणारे ख्रिश्‍चियन मिशेल यांनी केंद्रशासन आणि अन्वेषण यंत्रणा यांच्यावर आरोप केला आहे की, त्यांनी या प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना अडकवण्यासाठी दबाव आणला होता. केंद्रशासनाने यासाठी माझ्याबरोबर सौदेबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गांधी परिवराचे नाव घेतल्यास त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले जातील, असे अन्वेषण यंत्रणांच्या माध्यमातून शासनाकडून सांगण्यात आले होते, असे म्हटले आहे. मिशेल यांनी आंतरराष्ट्रीय लवादाला लिहिलेल्या पत्रात हे सर्व आरोप केले आहेत.
      मिशेल यांनी ऑगस्टा प्रकरणात गांधी परिवारातील कोणत्याही सदस्याची भेट घेतल्याचा आरोप फेटाळला आहे. त्यांनी भारतीय दूतावासाला या प्रकरणातील सर्व पुरावे देण्यास सिद्ध असल्याचेही म्हटले आहे.

क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या तथाकथित 'शहीद दिना'च्या निमित्त मुंबई येथे काँग्रेसकडून कार्यक्रम

हिंदूंचा वंशविच्छेदक टिपू सुलतानचा कार्यक्रम वारंवार आयोजित करणार्‍या 
काँग्रेसवर हिंदूंनी बहिष्कार का घालू नये ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! 
अनधिकृतरित्या स्थापन करण्यासाठी आणलेला  टिपू 
सुलतानचा पुतळा हिंदुत्ववाद्यांच्या विरोधानंतर पोलिसांनी हटवला ! 
जे हिंदुत्ववाद्यांच्या निदर्शनास येते, ते पोलिसांच्या 
निदर्शनास का येत नाही ? पोलिसांनी ही कृती स्वत:हून का केली नाही ?
 वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. धनाजी नलावडे यांना निवेदन देतांना (डावीकडे) श्री. नरेंद्र रोकडे

काश्मिरी हिंदूंच्या निवासी संकुलासाठी आवश्यक भूमीसाठी गृहमंत्रालयाची जम्मू-काश्मीर शासनाकडे पुन्हा मागणी !

काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाचे प्रकरण
  • काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी गृहमंत्रालयाने राज्यशासनावर दबाव 
  • जम्मू-काश्मीर शासनाचे मौन 
     नवी देहली - केंद्रीय गृहमंत्रालयाने काश्मिरी हिंदूंच्या स्वतंत्र निवासी संकुलासाठी आवश्यक भूमीची जम्मू-काश्मीर शासनाकडे मागणी केली आहे. गेल्या वर्षी मुफ्ती महंमद शासनाने यासंदर्भात भूमी उपलब्ध करून देण्याविषयी केंद्रशासनाला वचन दिले होते; परंतु फुटीरतावाद्यांच्या दबावामुळे हा विषय त्या वेळी मागे पडला. त्यामुळे गृहमंत्रालयाने जम्मू-काश्मीरच्या नव्याने नियुक्त झालेल्या मेहबूबा मुफ्ती शासनाकडे आता वरील मागणी नव्याने केली आहे. याबरोबरच मंत्रालयाने काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेले विशेष पॅकेज शीघ्र लागू करण्यासाठी राज्यशासनावर दबावही आणला आहे.

जम्मू-काश्मीरच्या राजधानी स्थित्यंतराच्या परंपरेवर शासनाकडून अब्जावधी रुपये खर्च !

जनतेच्या अब्जावधी रुपयांचा चुराडा करणार्‍या अशा परंपरा बंद केल्या पाहिजेत ! 
     जम्मू - जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या १४४ वर्षांपासून राजधानी स्थित्यंतराची परंपरा कायम राखण्यासाठी राज्याच्या निधीतून अब्जावधी रुपये खर्च केले जातात. हिवाळ्यात जम्मू, तर उन्हाळ्यात श्रीनगर अशी राज्याची राजधानी असते. (महाराष्ट्रातही उपराजधानी नागपूर येथे हिवाळ्यात विधीमंडळाचे अधिवेशन घेतले जाते. त्यातही अब्जावधी रुपयांचा चुराडा होतो. हेही थांबवले पाहिजे. - संपादक)
     या वेळी सचिवालय आणि त्याच्याशी संबंधित सर्व विभागांचे स्थलांतर करण्यात, त्याची सिद्धता करण्यात आणि घडी बसवण्यात पुष्कळ कालावधी लागत असल्याने ही परंपरा निरर्थक असल्याचे जम्मू-काश्मीरच्या सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.

पुन्हा पुन्हा समाजाला वेठीस धरणार्‍या तृप्ती देसाई म्हणतात,"हाजी अली दर्ग्यात न सांगताच प्रवेश करणार !"

     मुंबई - आता हाजी अली दर्ग्यामध्ये न सांगताच प्रवेश करणार असल्याची घोषणा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलतांना केली. या वेळी देसाई म्हणाल्या की, दर्ग्यात सहज प्रवेश करता यावा, यासाठी २८ एप्रिलला आम्ही सर्वांना सांगून आंदोलन केले होते; मात्र आता आम्ही गनिमी काव्याच्या पद्धतीने आंदोलन करून दर्ग्यात प्रवेश करणार आहोत. याची सूचना केवळ पोलिसांशिवाय कोणालाही देणार नाही. मुंबईच्या हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश मिळवून देण्यासाठी 'हाजी अली सब के लिए' (हाजी अली सर्वांसाठी) या संघटनेकडून २८ एप्रिलला धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात भूमाता ब्रिगेडलाही सहभागी होण्यास सांगण्यात आले होते; मात्र देसाई यांनी या आंदोलनात सहभाग घेतला नाही. या आंदोलनाच्या अंतर्गत दर्ग्यात प्रवेश करण्याची कोणतीही योजना नसतांना देसाई यांनी थेट दर्ग्यामध्ये घुसण्याचा दोन वेळा अयशस्वी प्रयत्न केला. आता देसाई यांनी दर्ग्यामध्ये घुसण्यासाठी स्वत:च्या बळावर गनिमी कावा करणार असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात 'हाजी अली सब के लिए'चे संस्थापक सदस्य जावेद आनंद यांनी आश्‍चर्य व्यक्त केले असून त्यांची संघटना अशा गनिमी काव्याच्या आंदोलनाला समर्थन देत नसल्याचे म्हटले आहे.

दुष्काळग्रस्तांकडून टँकरच्या पाण्यात अस्थीविसर्जन !

पंचमहाभूतातील महत्त्वाचे आपतत्त्व म्हणजे पाणी हे ईश्‍वराच्या अधीन असल्यामुळे 
जनतेला धर्माचरणासह ईश्‍वराची उपासना करण्याविना पर्याय नाही !
महाराष्ट्रातील जलसंकट
      नगर - लातूरमधील पाणीसंकट आणि मराठवाड्यातील दुष्काळाची चर्चा देशपातळीवर चालू असतांना पश्‍चिम महाराष्ट्रही दुष्काळाच्या वणव्यात होरपळून निघत आहे. नगर जिल्ह्यात सर्व नदी-नाले कोरडे पडले आहेत. अशा स्थितीत गावातील एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यास तिच्या अस्थींचे विसर्जन कुठे करायचे, याची समस्या निर्माण झाली आहे. काही जण या अस्थी कोरड्या नदीतच फेकत असल्याचे किंवा त्यांना भूमीत पुरत असल्याचे दिसून येत आहे, तर ज्यांच्याकडे पैसे आहेत, ते टँकरच्या पाण्यात अस्थीविसर्जन करत असल्याचे दिसून येत आहे.

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या विरोधात करण्यात आलेली तक्रार पोलिसांकडून अद्याप दाखल नाही !

     मुंबई - येथील एक सामाजिक कार्यकर्ता इम्रान खान यांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या विरोधात ताडदेव पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तृप्ती देसाई देशाची शांती बिघडवू पहात आहेत. तसेच विविध धार्मिक गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करत आहेत, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे; मात्र पोलिसांनी अद्याप तक्रार दाखल करून घेतलेली नाही. (किती हिंदूंनी तृप्ती देसाई यांच्या विरोधात अशी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला ? - संपादक)
      यासंदर्भात इम्रान खान म्हणाले की, तृप्ती देसाई या वेगळ्या धर्माच्या आहेत. त्यामुळे त्यांना इस्लामी समुदायाच्या भावना, नियम आणि चालीरिती यांविषयी काही माहिती नाही. महिलांना मशिदीमध्ये प्रवेश देण्यासाठी त्या प्रयत्नरत आहेत; मात्र इस्लाममध्ये त्याला अनुमती नाही. देसाई यांच्या इस्लाम धर्मातील हस्तक्षेपामुळे मुसलमान समुदायामध्ये चीड निर्माण झाली आहे.
      इम्रान खान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त डी.डी. पडसाळगीकर यांनाही पत्र पाठवून तृप्ती देसाई यांच्या विरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे.


आता पदोन्नतीसाठीही आरक्षण ठेवण्याचे केंद्रशासनाचे आश्‍वासन !

योग्यतेला तिलांजली आणि लांगुलचालनाला महत्त्व देऊन समाजात फूट पाडण्याचे षड्यंत्र !
    नवी देहली - केंद्रशासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अंदाजपत्रकीय मागण्यांवर लोकसभेत चर्चा चालू असतांना काँग्रेस पक्षाने या मंत्रालयासाठी निर्धारित केलेल्या निधीमध्ये कपात करण्याच्या शासनाच्या कृतीवर टीका करतांना अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीयांसाठी नोकरीत देण्यात येणार्‍या आरक्षणासोबतच त्यांना पदोन्नतीसाठीही आरक्षण राखून ठेवण्याची मागणी केली. त्यावर या खात्याचे मंत्री थावरचंद गहलोत यांनी विरोधी पक्षाचे सहकार्य लाभल्यास तशा प्रकारचे विधेयक संमत करण्याची सिद्धता दर्शवली.

विजय मल्ल्या यांच्या आस्थापनाची कॅसिनो चालू करण्याची मागणी गोवा शासनाने फेटाळली !

      पणजी, ५ मे (वार्ता.) - देशातील अधिकोषांचे सहस्रो कोटी रुपये बुडवल्याच्या आरोपावरून फरार असलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या मालकीच्या युबी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टस् लिमिटेड आस्थापनाने गोव्यातील मांडवी नदीत कॅसिनो जहाज चालू करण्याविषयी अनुमती मिळवण्यासाठी अर्ज केला होता. नवीन कॅसिनो जहाजाला अनुमती न देण्याचे धोरण शासनाने ठरवल्यामुळे सध्यातरी नवीन कॅसिनो चालू करण्याची मागणी फेटाळण्यात आलेली आहे.

रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प हे सार्वत्रिक निवडणूक लढण्याची शक्यता !

अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाची निवडणूक 
     वॉशिंग्टन - अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प हेच सार्वत्रिक निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. ३ मे या दिवशी अमेरिकेतील इंडियाना राज्यात झालेल्या 'प्रायमरी' निवडणुकीत टेड क्रूझ या जवळच्या प्रतिद्वंद्व्याला ट्रम्प यांनी पराभूत केले. यामुळे क्रूझ यांनी निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या विवादास्पद आणि टोकाच्या भूमिकांमुळे ट्रम्प यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आली आहे; परंतु ट्रम्प यांच्या विजयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

इचलकरंजी येथे हिंदुत्ववाद्यांच्या तक्रारीनंतर मुसलमान संघटनेने शिवजयंतीनिमित्त लावलेला आक्षेपार्ह डिजीटल फलक उतरवला !

     इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), ५ मे (वार्ता.) - ८ मे या दिवशी शिवजयंतीच्या निमित्ताने शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या डिजीटल फलकामध्ये 'समस्त जवाहर नगर मुस्लीम समाजा'ने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन आक्षेपार्ह फलक लावले होते. ही गोष्ट हिंदुत्ववाद्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित मुसलमान संघटनेला हा आक्षेपार्ह फलक काढावयास सांगितल्यानंतर मुसलमान संघटनेने हा फलक काढला आहे. (मुसलमान संघटनेने आक्षेपार्ह फलक लावल्यानंतर त्याविषयी तक्रार करणार्‍या सर्व हिंदुत्ववाद्यांचे अभिनंदन ! हिंदूंनो तुम्ही संघटित होऊन असा लढा दिल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यास वेळ लागणार नाही ! - संपादक) 

सर्व शक्यतांचा विचार करूनच पाणी सोडले ! - जिल्हाधिकारी सौरभ राव

दौंड आणि इंदापूर यांसाठी पाणी सोडल्याचे प्रकरण 
     पुणे, ५ मे - पुण्यासाठी १५ जुलैपर्यंत पाणी संरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. पालिका आयुक्तांची मागणी ३१ जुलैपर्यंतची आहे. १५ जुलैपर्यंत खडकवासला धरणात १.२० अब्ज घनफूट (टीएम्सी) पाणी शिल्लक रहाणार आहे. धरणात १ अब्ज घनफूट (टीएम्सी) पाण्याचा मृत साठा आहे, तोही उचलणे शक्य आहे. या सर्व शक्यतांचा विचार करून दौंड आणि इंदापूर यांसाठी पाणी सोडले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी ४ मे या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. खडकवासला धरणातून दौंड आणि इंदापूर या तालुक्यांसाठी १ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्यास प्रारंभ केल्याच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते. 

मॅपल ग्रुपच्या सचिन अग्रवाल यांच्या अटकपूर्व जामिनामध्ये ८ जूनपर्यंत वाढ

     पुणे, ५ मे - स्वस्तात घर देण्याचे आश्‍वासन देत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे छायाचित्र वापरून विज्ञापन करणार्‍या मॅपल ग्रुपचे संचालक सचिन अग्रवाल यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम अटकपूर्व जामिनामध्ये ८ जूनपर्यंत वाढ केली आहे. न्यायालयाने त्यांना सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन संमत केला आहे.

माहिती सेवा समितीकडून दुष्काळी भागातील जनावरांसाठी पुन्हा चारा वाटप

      पुणे - माहिती सेवा समिती महाराष्ट्रच्या वतीने दुष्काळी भागातील जनावरांसाठी पुन्हा १७२ टन उसाचा ओला चारा देण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडल्यामुळे, तसेच पिके जळल्याने जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शेतकरी चारा नसल्यामुळे आपली जनावरे कवडीमोल किंमतीत विकू लागला आहे. त्यामुळे माहिती सेवा समिती, बकोरी, पुणे यांच्या माध्यमातून बारामती, पुरंदर या तालुक्यांत पाहणी केली आणि काही दुष्काळी गावांतील गरजू गरीब शेतकर्‍यांना १५ एप्रिल या दिवशी ८० टन उसाचा हिरवा चारा देण्यात आला. तसेच १ मे या दिवशी पुन्हा १७२ टनापेक्षा अधिक चारा शेतकर्‍यांना देण्यात आला.

मद्यबंदी होण्यासाठी मद्याच्या दुकानासमोर रणरागिणींचे सनदशीर मार्गाने आंदोलन !

प्रशासन आणि पोलीस यांचे असहकार्य ! 
      इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), ५ मे (वार्ता.) - इचलकरंजी येथील शिवाजीनगर या नागरी वस्तीत असलेले देशी मद्याचे दुकान कायमस्वरूपी बंद करावे, या मागणीसाठी या परिसरातील रणरागिणी आता रस्त्यावर उतरल्या आहेत. २ मेपासून सलग तीन दिवस या भागातील महिलांनी आंदोलन चालूच ठेवले. गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत असतांना ४ मे या दिवशी या भागातील महिलांनी मद्याच्या दुकानासमोर बसून भजनाचा कार्यक्रम करून दुकानाकडे येणार्‍या मद्यपींना समजावण्यासाठी एक वेगळाच उपक्रम राबवला. (प्रशासन आणि पोलीस मद्यबंदी करत नाहीत आणि मद्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याने मद्यबंदीसाठी आता महिलांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. चंद्रपूर येथे मद्यबंदीप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांत मद्यबंदी का केली जात नाही ? - संपादक)

इचलकरंजी येथे गुन्हेगारांचे फलक हटवल्यामुळे तणाव; शीघ्र कृती दल दाखल

     इचलकरंजी, ५ मे (वार्ता.) - शहरात ठिकठिकाणी शिवजयंतीच्या निमित्ताने डिजिटल फलक लावण्यात आले होते. या फलकांची संख्या वाढतच असतांना त्या फलकांवर नेते, कार्यकर्ते आणि गुन्हे नोंद असणार्‍यांचे, गुंड आणि खंडणी मागणार्‍यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. अशा प्रकारचे फलक पोलिसांनी हटवण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे शहरात ५ मे या दिवशी तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे शीघ्र कृती दल (रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स) शहरात दाखल झालेे आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनीही शहरात संचलन केले. 

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील कोपरगाव येथे महिलांनी मंदिरात 'मॅक्सी' घालून न येण्याचे फलक

     ठाणे - डोंबिवलीमध्ये काही मंदिरांबाहेर महिलांना मॅक्सी घालून मंदिरात येऊ नये, असे फलक मंदिरांच्या प्रवेश दारावरच लावल्याने डोंबिवलीकरांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. याविषयी संबंधित मंदिर प्रशासनाने आम्ही श्रद्धाळू आहोत; मात्र अंधश्रद्धाळू नाही. मंदिरांची पवित्रता राखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असे सांगितले. (मंदिराच्या पावित्र्य रक्षणासाठी कृतीशील असलेल्या कोपरगाव येथील मंदिरांच्या व्यवस्थापनांचा अभिनंदनीय निर्णय ! - संपादक)

मराठी चित्रपटाच्या चाचेगिरीप्रकरणी (पायरसी) एका धर्मांधाला अटक

     पुणे, ५ मे - 'सैराट' या मराठी चित्रपटाची चाचेगिरी (पायरसी) केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी कासम दस्तगीर शेख याला ४ मे या दिवशी अटक केली आहे. (धर्मांध अशा गुन्ह्यांतही अग्रेसर ! - संपादक) शेख याच्यावर स्वारगेट पोलिसांनी अनुमती नसतांनाही चित्रपटाची नक्कल (कॉपी) प्रत बाळगणे आणि तिचा प्रसार करणे, याअंतर्गत गुन्हा प्रविष्ट केला आहे. शेख याचे स्वारगेट परिसरात भ्रमणभाष दुरुस्तीचे दुकान आहे. त्याच्या दुकानातून चित्रपटाची चाचेगिरी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खोटा ग्राहक पाठवून कासम शेख याला रंगेहात पकडले. या वेळी पोलिसांनी त्याच्याजवळील साहित्यही शासनाधीन केले आहे.

भाजप-मगोप युती कायम ठेवण्यासाठी माध्यम धोरण ही पूर्वअट !

गोव्यातील प्राथमिक शिक्षणातील माध्यमप्रश्‍न !
भाभासुमंला पाठिंबा दर्शवणारे मंत्री सुदिन ढवळीकर यांचे सूतोवाच
    पणजी - आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-मगोप युती कायम ठेवण्यासाठी माध्यम धोरण ही पूर्वअट रहाणार असल्याचे सूतोवाच मगोपचे नेते तथा सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले आहे.
     मंत्री सुदिन ढवळीकर पुढे म्हणाले, मातृभाषेतून शिक्षण हे मगोपचे प्रारंभीपासूनचे धोरण आहे. भारतीय भाषा सुरक्षा मंचचे (भाभासुमं) आंदोलन मगोपच्या भूमिकेशी जुळत असल्याने मगोपचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे. प्राथमिक स्तरावर इंग्रजीला प्रोत्साहन दिल्यास भविष्यात मातृभाषांतील लोककला, लोकसंस्कृती, तियात्र, नाटके आदी कला लुप्त होतील. प्राथमिक शिक्षणात इंग्रजीला प्रोत्साहन दिल्यास पुढील २५ वर्षांत कला अकादमीमध्ये केवळ पाश्‍चात्त्य संस्कृतीवर आधारित कार्यक्रम आम्हाला पहायला मिळतील. गोमंतकाची अस्मिता जपण्यासाठी मातृभाषेचे संवर्धन आवश्यक आहे. भाजप शासनाने इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना शासकीय अनुदान देणे चालूच ठेवल्यास मगोप शासनातून बाहेर पडणार का, या प्रश्‍नाला नकारात्मक प्रतिसाद देतांना मंत्री ढवळीकर म्हणाले की, जनतेने शासनासाठी पाच वर्षांचा कार्यकाळ दिला आहे. मगोपने भाजपप्रमाणे भाभासुमंच्या आंदोलनात सहभागी होऊ नये, असे पक्ष कार्यकर्त्यांना सांगितलेले नाही.

गोव्यातील माध्यमप्रश्‍नी तडजोड नाही ! - रा.स्व. संघाच्या प्रांतकार्यकारिणी बैठकीत निर्णय

      पणजी, ५ मे (वार्ता.) - प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच झाले पाहिजे. हा जागतिक सिद्धांत आहे. त्यामुळे भाषा सुरक्षा मंचच्या आंदोलनातून संघ माघार घेणार नाही. या आंदोलनात कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला आहे. याविषयीचे वृत्त दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले आहे. 
     २ मे या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत कार्यकारिणीची मुंबई येथे बैठक झाली. ही बैठक संघाची नियमित बैठक असल्याचे सांगून या बैठकीत झालेल्या चर्चेविषयी माहिती देण्यास गोव्याचे संघचालक आणि भाभासुमंचे (भारतीय भाषा सुरक्षा मंच) प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी नकार दिला.

कोणत्याही भारतीय नेत्याच्या विरोधात प्रत्यक्ष पुरावे नाहीत ! - इटलीच्या न्यायधिशांची स्पष्टोक्ती

ऑगस्टा वेस्टलॅण्ड 
हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा
       नवी देहली - ऑगस्टा घोटाळ्याच्या संदर्भात इटलीत चालू असलेल्या खटल्यातील न्यायाधिश मार्को मारिया मॅगा यांनी म्हटले आहे की, या लाचखोरीच्या प्रकरणात कोणत्याही भारतीय नेत्याच्या विरोधात प्रत्यक्ष पुरावे नाहीत. केवळ संशय आहे. ते एका दूरचित्रवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलत होते.
      मार्को यांनी हेही स्पष्ट केले की, त्यांनी दिलेला निकाल आस्थापनाचे अधिकारी आणि मध्यस्थ यांच्याशी संबंधित होता. या दोघांनी भारतातील अधिकार्‍यांना लाच दिली होती. भारतातील कोणत्या अधिकार्‍यांना किंवा कोणत्या नेत्यांना ती देण्यात आली याचा शोध भारतीय अन्वेषण यंत्रणांनी लावावा. निकाल केवळ कागदपत्रांच्या आधारे होता. त्यात माजी वायूदल प्रमुख एस्.पी. त्यागी यांना पैसे मिळाल्याचा संशय होता.

उन्हाळी सट्टीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर !

सुटीतील परिपाठ !
     सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. या सुट्टीचा कालावधी त्यांच्यात विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालवाचकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
मनाची एकाग्रता वाढण्यासाठी हे करा !
१. ध्यान
     कोणत्याही बाहेरच्या किंवा शरिरातील भागावर किंवा क्रियेवर मन एकाग्र करणे यास ध्यान असे म्हणतात. यात शरिरात होणार्‍या निरनिराळ्या संवेदनांकडे तसेच मनात येणार्‍या विचारांकडे साक्षीभावाने पहावे. ध्यानाच्या पुढील अवस्थेत व्यक्ती स्वतःलाही विसरून विचारशून्य अवस्थेत जाऊन आत्मानंद अनुभवते. बुद्धी आणि मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी गायत्रीमंत्र, त्रिबंध प्राणायाम आणि ध्यान हे निश्‍चितपणे उपयोगी पडतात.

पाण्याचा खाजगी टँकर भरण्यास विरोध केल्याने पाथर्डी पंचायत समितीच्या सभापतींवर प्राणघातक आक्रमण

       करंजी (जिल्हा नगर), ५ मे - शासकीय पाणी योजनेच्या उपसा केंद्रावर पाथर्डी पंचायत समितीचे सभापती संभाजी पालवे यांनी खाजगी टँकर भरण्यास विरोध केला. त्यामुळे झालेल्या वादावादिमध्ये टँकरचालकासह ६ जणांनी पालवे यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले. या हल्ल्यात पालवे हे गंभीर घायाळ झाले असून त्यांना उपचारासाठी नगरमधील खाजगी रुग्णालयात प्रविष्ट करण्यात आले आहे. (टँकरमाफियांचा वाढता उद्दामपणा - संपादक)

उसाचे उत्पादन आणि त्यासाठीचे पाणी यावर मर्यादा आणणार का ?

      मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ जाणवू लागला आहे. मराठवाड्याच्या दुष्काळाला ऊस उत्तरदायी आहे, असे म्हणून त्याच्या उत्पादनावर बंदी आणा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याचा विचार केल्यास ही मागणी करणार्‍यांविषयी हसावे कि रडावे, अशी स्थिती आहे. ऊस आणि त्याच्यामुळे होणारी आर्थिक उलाढाल विचारात घेता त्याच्यावर बंदी घालणे चुकीचे होईल आणि त्यातच सध्याच्या साखर कारखान्यांची स्थितीही दयनीय आणि मरणासन्न आहे. 
      आताच्या दुष्काळामुळे पश्‍चिम महाराष्ट्र वगळता संपूर्ण राज्यातील उसाचे पीक धोक्यात आले आहे. दुसरीकडे पश्‍चिम महाराष्ट्रात उसाचे पीक चांगले येऊन साखर कारखाने जोमाने चालत आहेत. गेल्या १० वर्षांत विदर्भ आणि मराठवाडा या भागातील धरणे पूर्ण भरलेली नाहीत. त्यामुळे जेवढे धरण भरले, तेवढ्या पाण्याचे वाटप योग्य पद्धतीने करणे आवश्यक असते; परंतु ते न करता पाण्याचे राजकारण करायचे आणि दुष्काळाचे खापर उसाच्या पिकावर फोडायचे, असा प्रकार सध्या चालू आहे.

पुरोगामी महिलांनो, मंदिरातील गाभार्‍यात प्रवेश करण्यापेक्षा मनमंदिरातील गाभार्‍यात ईश्‍वराला स्थान द्या !

मंदिर प्रवेश नव्हता, तरी......
१. माँसाहेब जिजाऊ राजमाता झाल्या. 
२. लक्ष्मीबाई झाशीच्या राणी झाल्या.
३. आनंदीबाई जोशी पहिल्या महिला डॉक्टर झाल्या.
४. लता मंगेशकर भारताच्या गानकोकिळा झाल्या.
५. कल्पना चावला पहिल्या महिला अंतराळवीर झाल्या.
६. प्रतिभाताई पाटील देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या.
७. सिंधुताई संकपाळ अनाथांच्या माय झाल्या.
८. मंदिर प्रवेश केला नसूनही गुरुदेवांच्या (प.पू. डॉक्टरांच्या) शिकवणीनुसार साधना करून सनातन गोकुळात ३१ महिला संत झाल्या. 
     तृप्ती देसाई, मंदिरातील गाभार्‍यात प्रवेश करण्याऐवजी मनमंदिरातील गाभार्‍यात ईश्‍वराला स्थान द्या. तुम्हाला मंदिरांत प्रवेश मिळालाच आहे, आता तुम्ही या महिलांसारखे काहीतरी बनून दाखवा !
- कु. मैथिली पाटील, कोल्हापूर (वय २० वर्षे) (१६.४.२०१६)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या खांद्यावर हात ठेवून भाजपच्या नगरसेविकेने छायाचित्र काढले

भाजपकडून हे अपेक्षितच नाही !
       मुंबई - भाजपच्या नगरसेविका आणि मुंबई महानगरपालिकेच्या महिला अन् बालविकास समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवडकर यांनी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या खांद्यावर हात ठेवून छायाचित्र काढले आहे. यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. हे छायाचित्र सामाजिक संकेतस्थळांवर फिरत आहे.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
     ज्या क्रांतीकारकांनी स्वतःच्या प्राणांचे मोल देऊन ही भूमी स्वतंत्र केली, त्या भूमीवर मद्यधुंद होऊन नाचतांना या दारूड्यांना त्यांची आठवणसुद्धा होऊ नये, हे या हिंदु राष्ट्राचे दुर्दैव ! (साप्ताहिक राष्ट्र्रपर्व, १७.१.२०११)

महर्षींची कृपा आणि सनातनच्या संतांनी केलेला जप यांमुळे सनातनच्या साधकांचे तीव्र आपत्काळातही रक्षण !

नामजपातील आध्यात्मिक शक्तीमुळे 
सनातनच्या प्रदर्शनस्थळाची हानी ३० टक्क्याने उणावली !
        १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७ मध्ये महर्षींनी हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे अन् याच कालावधीत उज्जैनमध्ये महाकालेश्‍वराचे स्थान असलेल्या ठिकाणी महाकुंभ होत आहे, असे सांगून आपत्काळाविषयी सूचित केले होते, तसेच ५.५.२०१६ या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे दोन घंटे आधी समजल्यानंतर सनातनच्या संत पू. (कु.) स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी महर्षींनी सांगितल्याप्रमाणे नामजप चालू केला. नामजप करण्यासाठी दोन घंटे एवढा अल्प कालावधी मिळाला, तरीही महर्षींच्या कृपेमुळे आणि संतांनी केलेल्या नामजपातील आध्यात्मिक शक्तीमुळे सनातनचे प्रदर्शन असलेल्या मांडवाची हानी ३० टक्के उणावली. पावसाने माजवलेल्या हाहाःकारामुळे इतर काही संप्रदायांचे मांडव पूर्ण कोसळले, तसेच जीवित आणि वित्त हानी झाली. सनातनच्या प्रदर्शनाची हानी तुलनेने कमी होणे, हा महर्षींची कृपा आणि संतांनी केलेला नामजप यांचा प्रत्यक्ष लाभ आहे. अध्यात्मशास्त्राप्रमाणे कृती केल्यास कसा लाभ होतो, याची प्रत्यक्ष अनुभूतीच संत आणि तेथे सेवेसाठी उपस्थित असलेले साधक यांना या वेळी घेता आली. सध्याच्या तीव्र आपत्काळात जसजसा उपायांसाठीच्या नामजपाचा कालावधी वाढत जाईल, तसतसे साधकांचे रक्षण होण्याचे प्रमाण ५० टक्के, ७० टक्के असे १०० टक्के होईल, हेच यातून स्पष्ट होते.

सोनपूर (बिहार) सेवाकेंद्रातील भिंतीवर चैतन्यामुळे पिवळी छटा दिसणे आणि सेवाकेंद्रातील साधक करत असलेली सेवा पाहून सनातनच्या दोन संतांनी सोनपूर सेवाकेंद्र हे रामनाथी आश्रमाप्रमाणे आहे, असे सांगणे

     सोनपूर (जिल्हा सारन, बिहार) येथील सनातन सेवाकेंद्रातील एका खोलीमध्ये घड्याळ लावलेली भिंत आणि घड्याळ यांवर पिवळी छटा स्पष्टपणे दिसते; पण इतर भिंतींवर तसा पिवळेपणा दिसत नाही.
     नोव्हेंबर २०१४ मध्ये सनातनच्या पू. (सौ.) अंजलीताई गाडगीळ आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळेकाका येथे सेवाकेंद्रात आले होते. तेव्हा तेथील साधक आणि ते करत असलेली सेवा पाहून दोन्ही संतांनी सांगितले, सोनपूर सेवाकेंद्र हे रामनाथी आश्रमाप्रमाणे आहे.
- श्री. राकेश श्रीवास्तव, सोनपूर, जिल्हा सारन, बिहार.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

प्रत्येक कृतीतून साधना व्हावी, अशी तळमळ असणारा आणि प.पू. डॉक्टरांनी सर्व काही दिले असल्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञताभावात रहाणारा कु. कन्हैय्या श्रीवास्तव !

     बाबा (प.पू. डॉक्टर), या घोर आपत्काळातही आपण आम्हाला या हिंदु राष्ट्रात (रामनाथी आश्रमात) ठेवले आहे. आपण आम्हाला व्यष्टी आणि समष्टी साधना कशी करायची ?, हेही शिकवले आहे; पण व्यष्टी आणि समष्टी साधना करण्यात आम्ही न्यून पडतो. माझ्या मनात प्रत्येक क्षणी मी जी कृती करतो, तिच्यातून माझी साधना होत आहे ना ?, याचे भान असू दे.
     बाबा, तुम्ही श्रीविष्णूचे अवतार आहात, असे नाडीपट्टीतही लिहिले आहे. मला तुमच्या चरणांवरचेे फूल व्हायचे आहे. मला तुमच्या सेवेत विलीन व्हायचे आहे. बाबा, मला प्रत्येक क्षणी तुमचे अस्तित्व जाणवू दे. बाबा, मन स्थिर कसे ठेवावे ?, हे आपणच शिकवले. माझ्या मनात येणार्‍या प्रत्येक चुकीच्या विचारावर आणि दोषांवर मात कशी करायची ?, हे आपणच शिकवले. गुणांची वृद्धी कशी करावी हेही शिकवलेत. हे सर्व शिकवल्यामुळे आणि हे पत्र लिहून घेतल्यामुळे आपल्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !
आपलाच,
कु. कन्हैय्या श्रीवास्तव (वय ११ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.३.२०१६)

मायेपासूनच्या अलिप्ततेमुळे खेळण्या-बागडण्याच्या वयात गुरुसेवेत रमलेला अवघ्या १२ वर्षांचा कु. कन्हैया श्रीवास्तव !

कु. कन्हैया श्रीवास्तव
    
पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
कु. कन्हैया (आशीष) श्रीवास्तव (वय १२ वर्षे) हा मूळचा सोनपूर (बिहार) येथील आहे. मागील ९ - १० मासांपासून तो रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहे. त्याच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.
१. कन्हैयाचे डोळे फार बोलके आहेत.
 त्याच्याकडे पाहून भाव जाणवतो.
२. आसक्ती अल्प असणे
     सर्वसाधारपणे लहान मुलांना आपण वेगवेगळा खाऊ खावा, नवनवीन कपडे घ्यावेत, असे वाटत असते; परंतु कन्हैयाला कसलीच आसक्ती नाही. वडिलांनी खर्चासाठी दिलेले पैसेही तो आवश्यकता असतांनाच व्यय करतो.

ईश्‍वरी ज्ञान प्राप्त होण्याची प्रक्रिया !

    
श्री. राम होनप
जिवाचा भौतिक जगताशी संपर्क तुटणे आणि सूक्ष्म विश्‍वाशी संपर्क जोडला जाणे, या दोन्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जिवाला ईश्‍वरी ज्ञान प्राप्त होते.- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.५.२०१५)

सहजभावात असल्याने समाजातील लोकांशीही जवळीक साधणारे पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा (वय ८१ वर्षे) !

पू. दत्तात्रेय देशपांडे
देवद आश्रमातील साधक श्री. गोपाळ जोरी यांना पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा यांच्यासमवेत कुडाळ, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांत प्रवासाला जाण्याची संधी मिळाली. चैत्र अमावास्या (६.५.२०१६) या दिवशी पू. देशपांडेआजोबांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त श्री. गोपाळ जोरी यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती येथेे देत आहोत.
पू. दत्तात्रेय देशपांडेआजोबा यांच्या चरणी सनातन परिवाराचा वाढदिवसानिमित्त कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. पू. देशपांडेआजोबांना मराठी, हिंदी आणि कन्नड या भाषा येतात, तसेच इंग्रजी अन् संस्कृत या भाषांचाही त्यांचा अभ्यास आहे.
२. प्रेमभाव
      पू. आजोबा माझ्या मनाची स्थिती जाणून घेऊन मला दृष्टीकोन देतात. एकदा मी त्यांच्या खोेलीतील प्रसाधनगृह स्वच्छ करत होतो. तेव्हा ते अल्पाहार करत होते. त्या वेळीही ते मध्येच येऊन मानसिक ताणातून बाहेर येण्यासाठी कसे प्रयत्न करावेत ?, हे मला सांगत होते. एकदा पू. देशपांडेआजोबा म्हणाले, तू दुःखी असलास, तर मीही दुःखी होतो.
३. पू. आजोबांनी त्यांना मिळणार्‍या निवृत्तीवेतनामधून पैसे साठवून अर्पण करण्यासाठी ठेवले असल्याने ते पैशांचा वापर स्वतःसाठी करतांना दिसत नाहीत.

संशोधनात्मक आणि शिकण्याची वृत्ती असलेले अन् साधकांवर प्रेमाने उपचार करणारे वैद्य अशोक शिंदे !

    
पू. राजेंद्र शिंदे
लोटे, चिपळूण, जि. रत्नागिरी येथील परशुराम रुग्णालयात नोकरी करणार्‍या वैद्य अशोक शिंदे यांच्या सहकार्याने सनातनचे काही साधक तेथे पंचकर्म उपचार घेत आहेत. या कालावधीत वैद्य अशोक शिंदे यांनी साधकांना पुष्कळ साहाय्य केले. ४.५.२०१६ या दिवशी वैद्य शिंदे यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त सनातनचे संत पू. राजेंद्र शिंदे आणि देवद आणि मिरज येथील आश्रमांतील साधकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. साधकांची सेवा करायला मिळावी, 
यासाठी रुग्णालयात अधिक वेळ थांबणे
     वैद्य शिंदेकाका यांचा रुग्णालयातील सेवाकाल सकाळी ८ ते रात्री ८ किंवा रात्री ८ ते सकाळी ८ असा १२ घंट्यांचा असतो; परंतु ते या वयातही तरुणांप्रमाणे उत्साहाने रुग्णांची सेवा करतात. रुग्णालयात आम्ही प्रारंभी ७ - ८ साधक होतो. नंतर ही संख्या २२ पर्यंत गेली. त्यामुळे काकांना साधकांसाठी अधिक वेळ द्यावा लागत होता, तरीही काका मला साधकांची सेवा करायला मिळत आहे. साधकांचा सत्संग मिळत आहे, याच भावाने रुग्णालयात अधिक वेळ थांबायचे. कधी-कधी ते रात्रीची ड्युटी करून दुसर्‍या दिवशी दुपारी १२-१ वाजेपर्यंत थांबत आणि रात्री ८ पूर्वीच रुग्णालयात येण्याचा प्रयत्न करत.

बैठक घेणार्‍या साधकाने बैठकीत आसंदीवर बसावे !

       आश्रमातील, तसेच प्रसारातील उत्तरदायी साधक समष्टी कार्याच्या संदर्भात अथवा अन्य कारणांसाठी साधकांची बैठक घेतात. बर्‍याच वेळा बैठक घेणारे साधक आसंदीवर बसण्याऐवजी अन्य साधकांसह खाली भूमीवर बसतात. त्यामुळे बैठकीत उपस्थित असलेल्या साधकांना त्यांचा तोंडवळा दिसत नाही. यापुढे सर्वत्रच्या उत्तरदायी साधकांनी बैठकीत आसंदीवर बसणे अपेक्षित आहे.
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.५.२०१६)
        
कु. संस्कृती बावणे
६१ टक्के आध्यात्मिक स्तर असलेली अमरावती येथील बालसाधिका कु. संस्कृती गजानन बावणे हिचा चैत्र अमावास्या (६.५.२०१६) या दिवशी तिथीनुसार पाचवा वाढदिवस आहे.
सनातन परिवाराकडून
कु. संस्कृती हिला अनेक शुभाशीर्वाद !

चिपळूण येथील परशुराम रुग्णालयातील वैद्य अशोक शिंदे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

वैद्य अशोक शिंदे यांचा सत्कार करतांना श्री. माधव साठे (डावीकडे)
     लोटे (रत्नागिरी) - सेवाभावी वृत्ती ठेवून साधक रुग्णांवर उपचार करणारे लोटे, चिपळूण येथील परशुराम रुग्णालयातील सनातनचे साधक वैद्य अशोक शिंदे यांचा ४ मे या दिवशी वाढदिवस होता. रुग्णालयात आयुर्वेदिक उपचारांसाठी दाखल झालेल्या साधकांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या सोहळ्याला रत्नागिरी जिल्ह्यात प्रसाराची सेवा पहाणार्‍या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. दीपाली मतकर यासुद्धा संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी कोल्हापूरच्या सौ. विजया वेसणेकर यांनी वाढदिवस कसा साजरा करावा ? आणि त्यामागचे शास्त्र विशद केले. त्यानंतर कर्नाटकच्या सौ. जयश्री हेगडे यांनी वैद्य अशोक शिंदे यांचे औक्षण केले. त्यानंतर रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील कु. रूपाली कुलकर्णी आणि श्री. सुरजित माथूर यांनी वैद्य अशोक शिंदे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्येे सांगितली. त्यानंतर कु. दीपाली मतकर यांनी वैद्य अशोक शिंदे यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्ममृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त झाल्याची घोषणा करून वाढदिवसाच्या कार्यक्रमातील आनंदात भर टाकली. हे ऐकल्यावर उपस्थित सर्व साधकांचा भाव जागृत झाला. वैद्य शिंदे यांचा सत्कार कल्याण येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. माधव साठेकाका यांनी श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन केला. या कार्यक्रमाला रुग्णालयातील वैद्य अलमान, वैद्य हिप्परकर, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि परिचारिका उपस्थित होत्या.

स्त्रीशक्ती विशेषांक

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत
प्रसिद्धी दिनांक : ८ मे २०१६
पृष्ठ संख्या : १० मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ७ मे या
दिवशी दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

फलक प्रसिद्धीकरता

अशा देशद्रोही लोकप्रतिनिधींना 
फाशीची शिक्षा देण्याची मागणी करा !
       काश्मिरी आतंकवाद्यांनी केलेला त्याग व्यर्थ जाणार नाही, असे देशद्रोही फुत्कार जम्मू आणि काश्मीरचे अपक्ष आमदार इंजिनीअर रशीद यांनी सुरक्षा सैनिकांशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या २ आतंकवाद्यांच्या कुटुंबियांना भेट दिल्यावर काढले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Kashmiri atankwadiyonka tyag vyartha nahi jayega - J&K ke vidhayak Engineer Rashid
Aise rashtradrohi janpratinidhiyonko faasi dilane ki maang karo !
जागो ! : कश्मीरी आतंकवादियों का त्याग व्यर्थ नहीं जाएगा - जम्मू-कश्मीर के विधायक इंजीनियर रशीद
ऐसे राष्ट्रद्रोही जनप्रतिनिधियों को फांसी दिलाने की मांग करो !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून 
घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या !
www.hindujagruti.org

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - चैत्र अमावास्या (६.५.२०१६) प. ४.४७ वाजता
समाप्ती - चैत्र अमावास्या (६.५.२०१६) उ.रा. १.०० वाजता
आज अमावास्या आहे.
       कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा संघटित हिंदूंचे सामर्थ्य खूप जास्त आहे. हे लक्षात ठेवून देशाला रसातळाला नेणार्‍या राजकीय पक्षांपासून देशाचे रक्षण करा !

साधकांना सूचना

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सनातनच्या 
ग्रंथांचे वितरण करण्यासाठी सुवर्णकारांना संपर्क करा !
        ९.५.२०१६ या दिवशी अक्षय्य तृतीया आहे. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने सुवर्णकारांच्या पेढीवर (दुकानावर) जातात. या दिवशी सोने खरेदी करणार्‍यांना सुवर्णकार ग्रंथ किंवा एखादी भेटवस्तूही देतात. यासाठी साधकांनी सुवर्णकारांना संपर्क करून त्यांना सनातनच्या अलंकारविषयीचे ग्रंथ, अध्यात्म, तसेच राष्ट्र-धर्म विषयक ग्रंथ-लघुग्रंथ यांची माहिती सांगून ते त्यांना खरेदी करण्यास सांगू शकतो आणि अक्षय्य तृतीयेला येणार्‍या ग्राहकांना भेट देण्याविषयी सूचवू शकतो.
- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.५.२०१६)

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !

साधकांना सूचना
     सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांमधील राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम यांच्या अभावामुळे देश रसातळाला गेला आहे ! : आग लागू द्यायची आणि मग ती विझवायचा प्रयत्न करायचा, अशी आहे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांची वृत्ती ! त्यामुळेच देश रसातळाला गेला आहे. हिंदु राष्ट्रात लहानपणापासूनच राष्ट्रप्रेमाचे आणि धर्मप्रेमाचे संस्कार केले जातील. त्यामुळे पुढे राष्ट्रद्रोहाची आणि धर्मद्रोहाची आग भारतात लागणार नाही !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणाचा नाही. माझा कुणी नाही.
ज्याचा त्याचा तोच मी; म्हणून मी सर्वांचा आहे.
भावार्थ : मी सर्वस्व गुरुचरणांवर वाहिल्यानंतर मी दुसर्‍या कुणाचा होऊच शकत नाही. गुरूंना अर्पण झाल्यानंतर माझा कुणी असायला मी शिल्लक राहिलोच कुठे ? परंतु सर्वांचा खरा मी एकच आणि सर्वव्यापी असल्यामुळे आता मी सर्वांचा आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

यशप्राप्ती
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
आयुष्यात यश, सुख आणि ईश यांची प्राप्ती होणे, या अतिशय कठीण गोष्टी आहेत, 
असे न मानता प्रयत्न करीत राहिले की, या गोष्टी प्राप्त होतात. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

घरी गेल्यावर वातावरणात होणार्‍या पालटाशी संघर्ष करण्यात शक्ती वाया जाऊ नये, यासाठी नामजपात वाढ करावी !

     सनातनच्या आश्रमात सात्त्विकता आणि चैतन्य असल्याने साधक आश्रमात रहातात, तेव्हा त्यांनी सांगितल्याप्रमाणे नामजप करावा. घरी तसे वातावरण नसल्याने वातावरणात होणार्‍या पालटाशी संघर्ष करण्यात शक्ती वाया जाऊ नये, यासाठी नामजपात वाढ करावी, उदा. एखाद्या साधकाला ३ घंटे नामजप करायला सांगितला असल्यास घरी असतांना न्यूनतम ४ घंटे नामजप करावा. प्रत्येक साधकाने आपल्या त्रासाची तीव्रता आणि जाणवणारे परिणाम यांनुसार नामजपात वाढ करावी. पू. मेनरायकाका आणि पू. मेनरायकाकू यांच्या नामजपाच्या वेळेत हा नामजप केल्यास अधिक लाभ होईल. कोणाला तसे करणे शक्य नसेल, तर शक्य असेल त्या वेळी नामजप करावा.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हाफिज सईदचा घातक वार

संपादकीय 
       पाकिस्तानातील मंदिरे आम्ही उद्ध्वस्त होऊ देणार नाही, असे वक्तव्य करून हाफिज सईद या शत्रूराष्ट्राच्या अत्यंत धूर्त म्होरक्याने भारतावर निशाणा साधून बाण मारला आहे. अनेकांच्या भुवया यामुळे उंचावल्या, तरी हे आश्‍चर्य वगैरे काही नसून त्याच्या आतापर्यंत केलेल्या वाराप्रमाणेच हाही एक घातक वार आहे, हे भारताच्या राजकर्त्यांनी, माध्यमांनी आणि जनतेने जाणून घेतले पाहिजे. २६/११ च्या मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार आणि पाकमधून भारतातील आतंकवादाची सूत्रे हालवणारा जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद हा क्रूर आतंकवादी एका दिवसात चमत्कार झाल्याप्रमाणे धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आणि निर्मळ होण्याचा चमत्कार व्हायला, हे काही सत्ययुग नव्हे. पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या मतली शहरातील एका सभेत एवढेच बोलून तो थांबलेला नाही, तर पुढे जाऊन तेेथे रहात असलेल्या हिंदु बांधवांच्या पवित्र स्थळांचे रक्षण करण्याचे दायित्व तेथील मुसलमानांचे असल्याचे त्याने सांगितले. भारताचा शत्रू क्रमांक एकच्या रांगेत असणारा आणि भारताविरोधात सतत गरळ ओकणारा हाफिज सईद पाकिस्तानातील मंदिरांच्या संरक्षणासाठी अचानक बोलू लागणे, यामागील गौडबंगाल समजून घेतले पाहिजे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn