Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

 • आज संत रोहिदास पुण्यतिथी 
 • आज श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी 
 • आज संत गोरोबाकाका पुण्यतिथी 
 • आज चिले महाराज पुण्यतिथी

काश्मीरप्रश्‍नी केंद्रशासनाची भूमिका पालटल्याने हिंदुत्ववादी आणि राष्ट्रभक्त अचंबित ! - उद्धव ठाकरे

पाकिस्तानशी चर्चा करण्याची 
हुर्रियतला अनुमती दिल्याचे प्रकरण
       मुंबई - सरडा किती वेळा आणि कसा रंग बदलतो याचा अभ्यास राजकारणी मंडळींनी आता करायलाच हवा. हुर्रियत आणि काश्मीरप्रश्‍नी जी पलटी केंद्रशासनाने मारली, तशी पलटी काँग्रेस राज्यकर्त्यांनी मारली असती, तर भाजप आणि संघपरिवाराने काँग्रेसला पाकिस्तानचे एजंट ठरवले असते. काश्मीर सोडून इतर सर्व विषयांवर पाकिस्तानशी चर्चा करू, असे मोदी शासनाचे म्हणणे कालपर्यंत होते. आता त्या भूमिकेत पालट झाला आहे आणि काँग्रेसनेही काश्मीरप्रश्‍नी घेतली नव्हती अशी बुळचट भूमिका विद्यमान शासनाने घेतल्यामुळे हिंदुत्ववादी आणि राष्ट्रभक्त अचंबित झाले आहेत (त्यांची वाचा गेली आहे). हुर्रियतप्रकरणी केंद्रशासनाचे हे घुमजाव म्हणजे अयोध्येतील राममंदिर बाबरीच होती, अशी पलटी मारण्यासारखाच प्रकार आहे, असे ठाम प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमध्ये केले.

हिंदु धर्माभिमानी प्रभाकर भोसले यांच्याकडून पोलिसांत तक्रार प्रविष्ट !

 • जे धर्माभिमानी हिंदूंच्या लक्षात येते, ते पोलिसांच्या लक्षात का येत नाही ? तक्रार नोंदवल्यावर पोलीस गुन्हा नोंदवतात; मात्र समोर गुन्हा घडत असतांनाही पोलीस काहीच कृती का करत नाहीत ? अशा घटनांच्या विरोधात पोलिसांकडून आधीच प्रतिबंधात्मक कारवाई का केली जात नाही ?
 • कन्हैया कुमारच्या मुंबई येथील सभेत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची अपकीर्ती करणार्‍या पुस्तकाचे वितरण केल्याचे प्रकरण
       मुंबई - भांडवलाचा ब्राह्मणी देव बाळ ठाकरे या सुधीर ढवळे नावाच्या व्यक्तीने लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन आणि वितरण कन्हैया कुमार याने त्याच्या कुर्ला (मुंबई) येथील आदर्श हायस्कूलमध्ये २३ एप्रिल २०१६ या दिवशी झालेल्या सभेत करून समाजात तेढ माजवण्याचा प्रयत्न केला. याविषयी सुधीर ढवळे, कन्हैया कुमार आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांना शिक्षा करण्याविषयी येथील नेहरूनगर पोलीस ठाण्यात शिवकार्य प्रतिष्ठान, विक्रोळीचे श्री. प्रभाकर भोसले यांनी तक्रार केली आहे.
तक्रार करतांना श्री. भोसले यांनी म्हटले आहे की,
१. हे पुस्तक म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेली गलीच्छ टीका आहे. त्याला कोणताही पुरावा अथवा आधार नाही.

(म्हणे) विदेशात किती काळा पैसा आहे, हे माहीत नाही ! - केंद्रशासन

 • काळ्या पैशाच्या सूत्रावरून निवडणुकीत मते मिळवून सत्तेवर आलेल्यांनी परदेशातील काळा पैसा माहीत नाही, असे म्हणणे हा जनतेचा विश्‍वासघात होत नाही का ?
 • आज विदेशात किती काळा पैसा आहे, हे माहिती नाही, असे सांगणार्‍यांनी उद्या आम्ही हा पैसा परत आणू शकत नाही, असे म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !
       नवी देहली - विदेशात भारतियांचा किती काळा पैसा जमा आहे, यासंदर्भात शासनाकडे कोणतीही अधिकृत माहिती नाही, अशी स्वीकृती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्‍नाला लिखित उत्तरात दिली. (विदेशात असलेला काळा पैसा भारतात आणून प्रत्येक भारतियाच्या खात्यात प्रत्येकी १५ लाख रुपये जमा करण्यात येतील, असे आश्‍वासन भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांना दिले होते. ते आश्‍वासन आणि आताचे उत्तर यातून जनतेने काय समजायचे ? - संपादक)
        सिन्हा उत्तर देतांना पुढे म्हणाले की, विदेशातील भारतियांच्या काळ्या पैशांसंदर्भात आयएम्एफ् आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट यांच्या आकड्यांचे विश्‍लेेषण करण्यात आले. त्यातूनच हा निष्कर्ष काढण्यात आला असावा.

कोहिनूर हिर्‍याला ब्रिटनमधून आणून पुरीच्या श्री जगन्नाथ मंदिराकडे सोपवा !

बीजदचे खासदार भूपेंद्र सिंह यांची शासनाकडे मागणी 
     नवी देहली - कोहीनूर हिर्‍याला ब्रिटनमधून परत आणून त्याला महाराजा रणजीत सिंह यांच्या इच्छेनुसार पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी बीजदचे खासदार भूपेंद्र सिंह यांनी राज्यसभेत केली.
      याविषयी शून्य काळात सूत्र उपस्थित करतांना खासदार सिंह म्हणाले, कोहीनूर हिरा पुरीच्या जगन्नाथ मंदिराला देण्यात यावा; कारण गुरूनानक देव पुरी येथे गेले होते, तसेच याविषयीचा उल्लेख गुरूग्रंथ साहेबमध्ये करण्यात आला आहे. हे म्हणणे अयोग्य आहे की, महाराजा रणजीत सिंह यांच्या वंशजांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता आणि त्यांनी इंग्रजांना कोहिनूर हिरा दिला होता. केंद्रशासनाने अलिकडेच सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हटले होते की, महाराजा रणजीत सिंह यांच्या वंशजांनी १०५ कॅरेटचा हा हिरा आंग्ल शीख युद्धाची भरपाई करण्यासाठी स्वत:च ब्रिटनला दिला होता. हा हिरा टॉवर ऑफ लंदनमध्ये एका प्रदर्शनात ठेवला आहे.

(म्हणे) काश्मिरी आतंकवाद्यांनी केलेला त्याग व्यर्थ जाणार नाही ! - जम्मू आणि काश्मीरचे आमदार रशीद यांचे देशद्रोही फुत्कार

लोकहो, आतंकवाद्यांचे समर्थन करणार्‍या अशा देशद्रोही 
लोकप्रतिनिधींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करा !
       श्रीनगर - काश्मिरी आतंकवाद्यांनी केलेला त्याग व्यर्थ जाणार नाही, असे देशद्रोही फुत्कार जम्मू आणि काश्मीरचे अपक्ष आमदार इंजिनिअर रशीद यांनी काढले. ७ एप्रिल या दिवशी सुरक्षा सैनिकांशी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या २ आतंकवाद्यांच्या कुटुंबियांना भेट दिल्यावर धर्मांधांसमोर रशीद बोलत होते. बिलाल अहमद भट आणि नसीर अहमद पंडित यांना हुतात्मा संबोधून आमदार इंजिनिअर रशीद म्हणाले की, काश्मीरची जनता कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित असली, तरीही आतंकवाद्यांच्या पाठीशीच उभी राहील.

धर्मशास्त्रात सांगितलेल्या कृतींना प्रायोगिक रूप देण्याचे सनातनचे कार्य कौतुकास्पद ! - आचार्य राघवकीर्ती, प्रमुख, श्रीमहागणपति आध्यात्मिक मिशन, उज्जैन, मध्यप्रदेश

उज्जैन सिंहस्थ पर्व विशेष !
उज्जैन सिंहस्थ पर्वक्षेत्री सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे प्रदर्शन
आचार्य राघवकीर्ती यांना सनातनच्या
उत्पादनांविषयी सांगतांना त्यांच्या डावीकडे
श्री. विनय पानवळकर
     उज्जैन, ४ मे (वार्ता.) - सध्या सर्वत्रच देवतांचे विडंबन चालू आहे. त्यात धर्मशास्त्र आणि धर्मजागृती करण्याचे सनातन संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. मी आतापर्यंत सनातन संस्थेद्वारे उज्जैन शहरात आणि सिंहस्थक्षेत्री भिंतीवर लिहिलेली प्रबोधनात्मक वाक्ये पाहिली होती; पण सनातनचे एवढे मोठे कार्य आहे, हे मला ठाऊक नव्हते. सनातनचे कार्य जाणून आणि या प्रदर्शनात येऊन मी धन्य झालो, असे मला वाटत आहे. सनातनने धर्मशास्त्रात सांगितलेल्या कृतीना प्रायोगिक रुप दिले आहे, हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन श्रीमहागणपति आध्यात्मिक मिशनचे प्रमुख आचार्य राघवकीर्ती यांनी केले. सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उज्जैन सिंहस्थक्षेत्री लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला २ मे या दिवशी भेट दिल्यावर ते बोलत होते. या वेळेस हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया यांनी प्रदर्शनाची माहिती सांगितली, तर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

केंद्रातील शासन पालटताच योगऋषी रामदेवबाबा यांचे वागणेही पालटले !

 • भारतीय गोरक्षा क्रांतीचे प्रेरक संत गोपालदास महाराजांचा आरोप
 • गाय वाचवण्याच्या संदर्भात रामदेवबाबा निष्क्रीयच !
 • पतंजलीच्या सुरक्षारक्षकांकडून गोरक्षकांवर लाठीमार
        नवी देहली - योगऋषी रामदेवबाबा गायीचे तूप विकण्याची गोष्ट करतात; मात्र गाय वाचवण्याच्या चळवळीचे समर्थन करत नाहीत. केंद्रामध्ये शासन पालटताच यांचे वागणेही पालटले आहे, असा गंभीर आरोप भारतीय गोरक्षा क्रांतीचे प्रेरक आणि गायीला राष्ट्रमाता घोषित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे संत गोपालदास महाराज यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलतांना संत गोपालदास महाराज यांनी सांगितले,
१. आम्ही नुकतेच गोरक्षा आंदोलनाला समर्थन मागण्यासाठी रामदेवबाबा यांना भेटण्यासाठी गेलो होतोे; मात्र ते आम्हाला भेटले नाहीत.

चीन अमेरिकेवर बलात्कार करत आहे ! - डोनाल्ड ट्रम्प

     वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन अमेरिकेवर बलात्कार करत आहे, असा आरोप केला आहे. अमेरिकेच्या व्यापारात चीनमुळे झालेल्या हानीविषयी बोलतांना ट्रम्प यांनी हा आरोप केला आहे. ट्रम्प यांनी २०११ मध्येही असे वक्तव्य केले होते. 
    ट्रम्प पुढे म्हणाले की, चीन अमेरिकेच्या व्यापाराची हत्या करत आहे. आपण चीनला आपल्या देशावर सतत बलात्कार करण्याची अनुमती देऊ शकत नाही. जर मी राष्ट्राध्यक्ष झालो, तर माझ्या पद्धतीने चीनला हाताळीन.

पाकिस्तानात शीख व्यक्तीला मारहाण करून पगडीची विटंबना

      मुलतान - पाकिस्तानातील पंजाब प्रांतात एका बसस्थानकावर झालेल्या हाणामारीत शीख व्यक्तीच्या पगडीची विटंबना करण्यात आली. या प्रकरणी ६ जणांवर ईश्‍वरनिंदा कायद्यान्वये गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. महिंदर पाल सिंग हा फैसलाबाद येथून मुलतानला जात असतांना बस चिचावटणी स्थानकापर्यंत पोहोचण्यास ५ घंटे लागले. तेथे कर्मचारी आणि प्रवासी यांच्यात वादावादी झाली. तेथे महिंदर पाल सिंह याला मारहाण करून त्याचा फेटा पायदळी तुडवला गेला.

हम लेकर रहेंगे आजादी अशा घोषणांनी पाकचा आसमंत दणाणत आहे !

पाकचे अनेक तुकडे होण्याच्या मार्गावर ?
      इस्लामाबाद (पाकिस्तान) - पाकमधील पंजाब प्रांत सोडला, तर अन्य सर्व प्रांतांमध्ये पाकविरोधी संघर्ष चालू असून पाकपासून स्वतंत्र होण्याची मागणी दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालली आहे. 
      पाकच्या सैन्यात आणि आयएस्आय या पाकच्या गुप्तचर यंत्रणेचे काही घटक कट्टर असून त्यांचे जिहादी आतंकवाद्यांशी संबंध आहेत. त्यामुळे उद्या पाकचे अनेक तुकडे झाले, तरी त्याचा धोका भारतालाही असणार आहे. तसेच पाकमधील जिहाद्यांच्या निर्मितीच्या कारखान्यांमधून सिद्ध झालेल्या जिहाद्यांची निर्यात जगभरात केली जात असल्याने जगालाही याचा धोका आहे.

कॉ. पानसरे हत्या प्रकरणी समीर गायकवाड यांच्यावर २० मे या दिवशी आरोप निश्‍चित करून खटल्याला प्रारंभ करण्यात येणार !

बंदुकीच्या गोळ्या 
पडताळणीसाठी स्कॉटलंडला पाठवणार !
        कोल्हापूर, ४ मे (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी २० मे या दिवशी संशयित आरोपी आणि सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्यावर आरोप निश्‍चिती करून या खटल्यास प्रारंभ करण्यात येईल, असा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल्.डी. बिले यांनी दिला. २० मे या दिवशी या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्याविषयी अथवा स्थगितीसंदर्भात शासकीय अधिवक्त्यांनी न्यायालयात कोणतीही सबब सांगू नये, असेही न्यायाधीश एल्.डी. बिले यांनी शासकीय पक्षाला कठोरपणे सुनावलेे. त्यामुळे या दिवशी श्री. गायकवाड यांच्यावर आरोप निश्‍चित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वेळी न्यायालयात श्री. समीर गायकवाड यांचे अधिवक्ता सर्वश्री समीर पटवर्धन आणि आनंद देशपांडे उपस्थित होते. शासकीय पक्षाच्या वतीने अधिवक्ता चंद्रकांत बुधले, विवेक घाडगे उपस्थित होते.

बांगलादेशमध्ये राष्ट्रीय स्तरावरील बैठकीत अल्पसंख्यांकांवरील अत्याचार रोखण्याची धार्मिक अल्पसंख्यांक गटांची मागणी

       ढाका - बांगलादेशच्या मानवाधिकार आघाडीच्या वतीने ढाका शहरात नुकतीच धार्मिक अल्पसंख्यांक गटांशी राष्ट्रीय स्तरावरील बैठक घेण्यात आली. विविध धार्मिक गटांमध्ये सहिष्णुता, धर्मस्वातंत्र्य, शांती आणि सहजीवन निर्माण करण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या आयोजनासाठी मायनॉरिटी राइट्स ग्रुप इंटरनॅशनलने सहकार्य केले, तर बंधु सोशियल वेल्फेेअर सोसायटीने समन्वयाची भूमिका पार पाडली. यात देशातील अल्पसंख्यांकांवरील अत्याचार रोखण्याची मागणी करण्यात आली.

नवा जिहादी जॉन पूर्वाश्रमीचा हिंदु तरुण असल्याचे सिद्ध !

धर्माचरणाअभावी हिंदू स्वतःच्या धर्माचा त्याग करून आतंकवादी कृत्ये करत आहेत, 
यासाठी जगभरातील हिंदूंना धर्मशिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे ! 
     लंडन - इसिसमधील नवीन जिहादी जॉन (इसिसविरोधी लोकांचा शिरच्छेद करणार्‍या आतंकवाद्याचे नाव जॉन होते. तो मूळचा ब्रिटिश नागरिक होता. तो ठार झाल्यावर दुसरा आतंकवादी शिरच्छेद करू लागला आहे.) हा पूर्वाश्रमीचा हिंदू तरुण सिद्धार्थ धर असल्याचे सिद्ध झाले आहे. काही काळासाठी इसिसच्या कह्यात असलेल्या निहाद बरकत या याझिदी तरुणीने सिद्धार्थ याने तिचे अपहरण केल्याची माहिती दिली आहे. बरकत हिला शारीरिक संबंधासाठी गुलाम म्हणून राबवण्यात आले होते.

बांगलादेशमधील स्थिती धोकादायक ! - अमेरिका

अमेरिका हे म्हणू शकते, तर मग भारतातील केंद्रशासन असे का म्हणत 
नाही आणि तेथील हिंदूंच्या साहाय्यासाठी कृती का करत नाही ? 
     वॉशिंग्टन - बांगलादेशमधील स्थिती पुष्कळ गुंतागुंतीची आणि धोकादायक आहे, असे मत अमेरिकेने व्यक्त केले. बांगलादेशमध्ये गेल्या काही मासांपासून धर्मनिरपेक्षतेचा विचार मांडणार्‍यांची निर्घृण हत्या केली जात आहे. या हत्यांचे दायित्व इसिस आणि अल् कायदासारख्या संघटनांनी स्वीकारली आहे. 
     अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मार्क टोनर म्हणाले, बांगलादेश शासनाने या घटनांची सखोल चौकशी करावी, अशी आमची इच्छा आहे. यामागे कोणत्या संघटना आणि व्यक्ती आहेत, त्यांचेही अन्वेषण करण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत अनेक संघटनांनी या आक्रमणांचे दायित्व स्वीकारल्याचे दावे केले आहेत. गेल्या काही मासांत तेथे निर्घृण हत्या झाल्या आहेत. बांगलादेशच्या शासनाने त्यांच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचललीच पाहिजेत.

दोन्ही हत्यांच्या अन्वेषणात काय प्रगती झाली ते दाखवा ! - उच्च न्यायालय

डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे 
यांच्या हत्यांच्या अन्वेषणावरून उच्च 
न्यायालयाने अन्वेषण यंत्रणांना फटकारले !
       मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या करणार्‍यांचा शोध लावण्यात अपयशी ठरलेल्या अन्वेषण यंत्रणांना २ मे या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा धारेवर धरले. अहवालामधून नवीन काहीच माहिती पुढे येत नाही. या दोन्ही हत्यांच्या अन्वेषणात काय प्रगती झाली, याचा सविस्तर अहवाल २३ जूनपर्यंत देण्याचे, तसेच आरोपींचा शोध घ्या, असे आदेश उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला (सीबीआयला) आणि विशेष अन्वेषण पथकाला (एस्आयटीला) दिलेले आहेत. डॉ. दाभोलकर आणि पानसरे कुटुंबियांनी केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली, तेव्हा हे आदेश देण्यात आले.

स्वा. सावरकरांना नव्हे, तर भारतरत्नाला त्यांची आवश्यकता आहे ! - अधिवक्ता विक्रम एडके

     सांगली, ४ मे (वार्ता.) - सध्या क्रांतीसूर्य स्वा. सावरकरांना भारतरत्न दिले पाहिजे, यावर चर्चा चालू आहे. अशी चर्चा होणे, हे आपण सर्वांचे दुर्दैव आहे. स्वा. सावरकर भारतरत्नापेक्षाही मोठे होते. त्यांना गौरवाची आवश्यकता नाही, तर भारतरत्नालाच स्वा. सावरकर यांची आवश्यकता आहे, असे मनोगत नगर येथील स्वा. सावरकरप्रेमी आणि भाषा समितीचे सल्लागार अधिवक्ता विक्रम एडके यांनी व्यक्त केले. ते गावभाग येथील विसावा चौक येथे आयोजित शिवोत्सवात न उमगलेले सावरकर या विषयावर दुसरे पुष्प गुंफतांना बोलत होते. अध्यक्षस्थानी अधिवक्ता किशोर लुल्ला होते. या वेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बांगलादेशातील गोमांस व्यापार्‍यांचा तगादा, काहीही करा, जनावरे पुरवा !

बांगलादेशातील गोमांस व्यापार्‍यांचा तगादा, 'काहीही करा, जनावरे पुरवा !' 
दुष्काळी महाराष्ट्रातील पशुधनाकडे तस्कर आणि व्यापारी यांची वक्रदृष्टी 

     संभाजीनगर, ४ मे - बांगलादेशातील गोमांस आणि पशूवधगृहाचे व्यापारी भारतातील स्थानिक कसायांकडे 'काहीही करा, जनावरे पुरवा', असा तगादा लावतात. त्यामुळे दुष्काळी महाराष्ट्रातील पशुधनाकडे गोमांस तस्कर आणि व्यापारी यांची वक्रदृष्टी पडली आहे. बांगलादेशातील मागणी पूर्ण करण्यासाठी हे व्यापारी शेतकर्‍यांना जनावरे विकण्यासाठी भाग पाडत आहेत. (छुप्या पद्धतीने चालणार्‍या गोमांस तस्करीला केंद्र आणि राज्य शासन कसा आळा घालणार आहे ? राज्यशासन गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाहीसाठी पोलीस प्रशासनाला निर्देश देईल का ? - संपादक)

बीड येथे पाण्याचा धंदा करणारे दोन कर्मचारी निलंबित

पाण्याचे दुर्भिक्ष्य असतांना शासकीय कर्मचार्‍यांकडून अशी कृती
 होणे, हे निषेधार्ह आहे. अशा कर्मचार्‍यांवर कठोर कारवाईही व्हायला हवी ! 
कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! 
 तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्यावर कारवाई प्रस्तावित 
     बीड, ४ मे - येथील दुष्काळी भागात टँकरने पाणीपुरवठा होत असतांना त्या पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून पाण्याचा धंदा होत आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी पंचायत समिती कार्यालयातील साहाय्यक कर्मचारी लक्ष्मीकांत सौदंतीकर आणि अनुलेखक गयासोद्दीन जुबेरी यांचे तात्काळ निलंबन केले, तसेच तहसीलदार नांदलगावकर, नायब तहसीलदार कुटे यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवला आहे. 

हिंदूंना कपटाने अल्पसंख्यांक बनवण्याचे षड्यंत्र ! - जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वतीजी

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी
निश्‍चलानंद सरस्वतीजी
      धनबाद (झारखंड) - स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणार्पण करणारे भगतसिंह, चंद्रशेखर आझाद, मंगल पांडे यांसारख्या वीरांनी स्वतंत्र भारताच्या ज्या स्वरूपाची कल्पना केली होती, त्याची उपेक्षा करण्यात येत आहे. हिंदूंना कपटाने अल्पसंख्यांक बनवण्याचा प्रयत्न सदैव होत आलेला आहे. व्यक्तीगत कायद्याचा (पर्सनल लॉचा) विचार केल्यास भारतात हिंदूंना समान अधिकार कुठे आहेत ?, असे प्रतिपादन पुरीच्या पूर्वाम्नाय पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वतीजी यांनी केले.
      शंकराचार्यांनी नुकतेच धनबाद जिल्ह्यातील झरियामधील गोशाळेला भेट दिली. तेव्हा ते बोलत होते. शंकराचार्य पुढे म्हणाले,
१. महाराष्ट्र आणि हरियाणा शासनांनी गोरक्षा होण्यासाठी योग्य पावले उचलून कौतुकास्पद काम केले आहे.

(म्हणे) सांस्कृतिक कार्यक्रमांवर खर्च करण्याचे थांबवा; शिक्षण, आरोग्य यांकडे लक्ष द्या !

मंदिरांचा पैसा हा धर्मशिक्षण आणि धर्मप्रसार यांसाठीच खर्च झाला पाहिजे, शिक्षण, आरोग्य या 
गोष्टींकडे लक्ष देण्याचे दायित्व राज्यकर्त्यांचे आहे ! राज्यकर्ते धर्मासाठी काहीही करत नाहीत, 
तर धर्माचा पैसा तेथे का वापरावा ?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मंदिरांना अनाहूत सल्ला !
     नागपूर - मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्याविषयी महिलांची बाजू उचलून धरल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता मंदिरांना उत्सवांच्या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमांवर खर्च करण्याचे थांबवून शिक्षण, आरोग्य यांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे, असे हिंदुस्थान टाइम्स्ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. १० एप्रिल या दिवशी पहाटे कोल्लमजवळील परवूर शहरात श्री पुट्टींगल देवीच्या मंदिरात फटाक्यांच्या स्फोटात ११४ जण ठार झाले होते, तर सुमारे ३५० जण घायाळ झाले होते. त्या अनुषंगाने हा सल्ला देण्यात आला आहे.

तीर्थक्षेत्र श्री भीमाशंकरच्या विकास आराखड्यास तत्त्वत: मान्यता - गिरीष बापट

     पुणे, ४ मे - श्री भीमाशंकर तीर्थक्षेत्राच्या सुमारे १८० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखालील समितीने २ मे या दिवशी तत्त्वत: मान्यता दिली आहे. शासकीय विश्रामगृह येथे श्री भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आणि हुतात्मा राजगुरु यांचे स्मारक याविषयी बापट यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली. त्या वेळी हा निर्णय घेण्यात आला. 
     या बैठकीस आमदार तथा भीमांशकर तीर्थक्षेत्र देवस्थान समितीचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, आमदार सुरेश गोरे, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप आदी उपस्थित होते. बैठकीच्या आरंभी कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील यांनी प्रस्तावित विकास आराखड्याचे सादरीकरण केले. या वेळी त्यांनी श्री भीमाशंकर देवस्थानाचा विकास तीन प्रमुख भागांमध्ये केला जाणार असल्याचे सांगितले.

पुणे शिक्षण मंडळाच्या अधीक्षकांसह ५ कर्मचार्‍यांचे निलंबन

पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळातील स्वेटर खरेदीचे प्रकरण
     पुणे, ४ मे - पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्वेटर खरेदी करण्यात आले होते. त्या स्वेटरचा दर्जा आणि किंमत यांमध्ये तफावत असणे, त्यासाठीची प्रक्रिया योग्य पद्धतीने न राबवणे या कारणांमुळे शिक्षण मंडळाच्या अधीक्षकांसह ५ कर्मचार्‍यांच्या निलंबनाचे आदेश पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहेत. (या प्रकरणी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर नुसती निलंबनाची कारवाई करून उपयोग नाही, तर आर्थिक दंडात्मक आणि कठोर कारवाई करायला हवी. - संपादक)

सुशिक्षित तरुण आतंकवादी होऊ लागल्याची परिस्थिती चिंताजनक - डॉ. शां. ब. मुजुमदार

आजच्या शिक्षणाचे हे खरे स्वरूप पालटण्यासाठी भाजप शासनाने प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !
     निगडी (पुणे), ४ मे - ज्या शिक्षणाने व्यक्ती, कुटुंब, समाज आणि पर्यायाने देशाचा विकास साधला पाहिजे, ते शिक्षण आज निराशा निर्माण करणारे झाले आहे. शिक्षणातून विविध प्रश्‍न सुटणे अपेक्षित असतांना नवीन प्रश्‍न निर्माण होत आहेत. अनेक सुशिक्षित आतंकवादाच्या मार्गावर जातांना दिसतात. अमेरिकेत इमारत (टॉवर) पाडणारे अतिरेकी उच्चशिक्षित होते. सुशिक्षित तरुण आतंकवादी होऊ लागल्याची परिस्थिती चिंताजनक आहे, असे मत सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले. निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी केंद्राचे प्रमुख वा. ना. अभ्यंकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित सोहळ्याच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी स्वामी सर्वलोकानंद, इंदिराबाई अभ्यंकर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, महापौर शकुंतला धराडे, आयुक्त राजीव जाधव, संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. विश्‍वास मेहेंदळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मेपल गटाचे संचालक सचिन अग्रवाल यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन

     पुणे, ४ मे - मेपल गटाचे संचालक सचिन अग्रवाल यांना उच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन संमत केला आहे. ५ मे या दिवशी या अर्जावरील अंतिम सुनावणी होणार आहे. अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाल्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यानंतर अग्रवाल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

बालभारतीच्या हिंदी विषयांच्या पुस्तकात 'धर्मनिरपेक्ष'च्या ठिकाणी 'पंथनिरपेक्ष' शब्द वापरण्यावरून चर्चा

प्रत्यक्षातही 'पंथनिरपेक्ष' हाच शब्द योग्य आहे, हे विरोध करणारे जाणतील का ? 
     पुणे, ४ मे - बालभारतीने प्रसिद्ध केलेल्या बालभारतीच्या मराठी विषयाच्या पुस्तकात 'धर्मनिरपेक्ष' असा शब्द आहे. हिंदी विषयांच्या पुस्तकातील संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष शब्दाच्या ठिकाणी 'पंथनिरपेक्ष' असा शब्द प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामुळे 'धर्मनिरपेक्ष' शब्द का वापरला नाही, असा प्रश्‍न उपस्थित करून शिक्षणक्षेत्रात उलटसुलट चर्चा चालू झाली आहे. (हिंदु धर्म हा अनादी-अनंत आणि अपौरुषेय असल्याने तो एकच धर्म आहे आणि अन्य पंथ हे त्यानंतर निर्माण झालेले असल्याने ते पंथ आहेत. शिवाय धर्मनिरपेक्ष असे काही असूही शकत नाही. त्यामुळे 'पंथनिरपेक्ष' हा शब्द योग्य आहे. - संपादक) 

केरळमध्ये आणखी एका विद्यार्थिनीवर बलात्कार : ही विद्यार्थिनीही दलित !

काँग्रेस आघाडी शासित राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! 
केरळमध्ये दलित विद्यार्थिनींवर होत असलेल्या
 बलात्काराच्या घटनांच्या संदर्भात दलितांचा कैवार घेणारे कुठे आहेत ? 
तथाकथित दलित विद्यार्थी रोहित वेमुला याने आत्महत्याकेल्यावर ते प्रकरण 
संसदेत जाते, मग या विद्यार्थिनींच्या बाबतीत साम्यवादी आणि निधर्मी गप्प का ? 
     थिरुवनंतपूरम् (केरळ) - एर्नाकुलम् येथील विधी महाविद्यालयाच्या ३० वर्षीय विद्यार्थिनीवरील बलात्कार आणि तिची हत्या या घटनेवरून राज्यातील जनतेत संताप आहे. ही घटना ताजी असतांनाच वडकरा जिल्ह्यात १९ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. वडकरा येथील अयांथी येथील बीएस्सी नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर रिक्षा चालकाने रिक्शामध्येच बलात्कार केला. रिक्शाचालक पीडित मुलीच्या ओळखीचा होता. एका निर्जन ठिकाणी नेऊन चालक आणि त्याच्या दोन मित्रांनी मिळून मुलीवर बलात्कार केला. 
     या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. या दोन्ही घटनेतील विद्यार्थिनी दलित आहेत. 

भाभासुमंच्या आंदोलनाला मगो पक्षाचा पूर्ण पाठिंबा ! - श्री. सुदिन ढवळीकर, सार्वजनिक बांधकाममंत्री, गोवा.

मगोव्यतिरिक्त एकही राजकीय पक्ष अशी संस्कृतीप्रेमी भूमिका उघडपणे का घेत नाही ?
पणजी येथे पत्रकार परिषद
श्री. सुदिन ढवळीकर
      पणजी, ४ मे (वार्ता.) - प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून झाले पाहिजे. इंग्रजी शाळांचे अनुदान रहित व्हावे, याविषयी भारतीय भाषा सुरक्षा मंचने उभारलेल्या आंदोलनाला मगो पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. भाभासुमंच्या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने इंग्रजी माध्यमाच्या शाळांना दिलेले अनुदान मागे घ्यावे, याविषयी अंतर्गत बैठकांमध्ये मी वारंवार शासनाला सांगितले आहे. या विषयावर चर्चाही केली आहे; मात्र शासनाने ते मनावर घेतले नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
    पणजी येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी माध्यमप्रश्‍नावर भाभासुमंच्या वतीने चालू असलेल्या तीव्र आंदोलनाविषयी विचारले असता श्री. ढवळीकर यांनी या आंदोलनाला पूर्वीपासून पाठिंबा असल्याचे सांगितले. श्री. ढवळीकर म्हणाले, माध्यम धोरणात बराच पालट होणे आवश्यक आहे. मराठी आणि कोकणी शाळांनाच अनुदान मिळावे, हे मगो पक्षाचे पूर्वीपासूनचे धोरण आहे.

जगात मुसलमानांच्या लोकसंख्येत जलदगतीने वाढ ! - प्यू रिसर्च सेंटरचा अहवाल

वर्ष २०५० पर्यंत मुसलमान आणि ख्रिस्ती यांची लोकसंख्या समान होईल
     नवी देहली - जगात मुसलमानांच्या लोकसंख्येत जलदगतीने वाढ होत असल्यामुळे लवकरच मुसलमान आणि खिस्ती यांची लोकसंख्या समान होईल. वर्ष २०१० मध्ये जगभरात १ अब्ज ६० कोटी मुसलमान होते आणि ख्रिस्त्यांची लोकसंख्या २ अब्ज १७ कोटी होती. वर्ष २०५० पर्यंत जगात मुसलमान २ अब्ज ८० कोटी आणि ख्रिस्ती २ अब्ज ९० कोटी असतील. असे प्यू रिसर्च सेंटरच्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. 
१. प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार अशाच प्रकारे स्थिती राहिली, तर वर्ष २०७० मध्ये मुसलमान धर्म सर्वाधिक लोकसंख्येचा धर्म म्हणून पुढे येईल. कोणत्याही दुसर्‍या देशाच्या तुलनेत भारतातील मुसलमानांची लोकसंख्याही अधिक असणार आहे, 
२. जगातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हिंदूंची लोकसंख्या १४.९ टक्के आहे. वर्ष २०५० पर्यंत या लोकसंख्येत ३४ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे त्यांची संख्या सध्याच्या १ अब्जाहून १ अब्ज ४० कोटी वर पोचण्याची शक्यता आहे. 
३. त्यामुळे वर्ष २०५० पर्यंत हिंदु धर्म जगात तिसरा सर्वांत मोठा धर्म बनेल. 
४. जगात केवळ बौद्ध धर्मांच्या अनुयायांचीच संख्या वाढण्याची शक्यता नाही.

लातूर येथे मागील सात वर्षांपासून अखंडितपणे चालू आहे पाणपोई !

श्री. नंदकिशोर पाठक यांचा प्रेरणादायी आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम !
      लातूर, ४ मे (वार्ता.) - भारत संचार निगम लिमिटेड या आस्थापनामध्ये साहाय्यक महाप्रबंधक या पदावर कार्यरत असलेले श्री. नंदकिशोर पाठक यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ सात वर्षांपूर्वी कुलश्री, देशपांडे कॉलनी, जुना औसा रोड, लातूर येथे माणसे आणि प्राणी यांसाठी दोन स्वतंत्र पाणपोई चालू केल्या आहेत. मागील सात वर्षांपासून वर्षातले बाराही महिने या पाणपोई अखंडितपणे चालू आहेत.

पालकमंत्र्यांचा निषेध करत पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा स्थगित

दौंड आणि इंदापूरला पाणी सोडल्याचे प्रकरण 
     पुणे, ४ मे - पालकमंत्री गिरीश बापट यांनी २ मे या दिवशी दौंड आणि इंदापूर या तालुक्यांना १ अब्ज घनफूट (टीएम्सी) पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे तीव्र पडसाद ३ मे या दिवशी पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. पाणी दिल्याच्या कारणावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी सर्वसाधारण सभेत आंदोलन केले. या वेळी बापट यांचा निषेध करत सभा स्थगित करण्यात आली. (राज्य दुष्काळाच्या खाईत असतांना पालिकेची सभा स्थगित करणे, हे परवडण्यासारखे नाही - संपादक)


     पनवेल - पेण अर्बन बँक घोटाळ्यातील दोन आरोपी प्रतोष रामबहादूर सिंग आणि शांताराम भिकू पाटील यांना पेण पोलिसांनी २ मे या दिवशी पेण येथून अटक केली. ४ मे या दिवशी दोन्ही आरोपींना अलिबाग येथील विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश के.आर्. पेठकर यांनी त्यांना १० मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता ५५ वर गेली आहे.

श्री. निवृत्ती पदमवार यांच्याकडून पुणे वेदपाठशाळेला गाय आणि वासरू दान

     पुणे, ४ मे (वार्ता.) - येथील सनातनचे हितचिंतक श्री. निवृत्ती पदमवार (वय ८४ वर्षे) यांनी ४ मे या दिवशी पुणे वेदपाठशाळेला गीर जातीची गाय आणि गोमातेचे वासरू दान केले. आयुष्यात एकदा तरी गोदान व्हावे, या भावनेने, तसेच आपल्या हातून सत्कार्य घडावे या दृष्टिकोनातून श्री. पदमवार यांनी गाय आणि वासरू दान केले. श्री. पदमवार हे नेहमीच धर्म आणि राष्ट्र कार्य करणार्‍यांना सढळ हस्ते आर्थिक साहाय्य करत असतात. (धर्मकार्याला हातभार लावणारे श्री. पदमवार यांचे अभिनंदन ! - संपादक)

तमिळनाडूमध्ये फटाके बनवणार्‍या कारखान्यात लागलेल्या आगीमध्ये ४ जणांचा मृत्यू !

     सालेम (तमिळनाडू) - चिन्नप्पामपत्ती येथील फटाके बनवणार्‍या कारखान्याला लागलेल्या आगीत आणि नंतर झालेल्या स्फोटात ४ जणांचा मृत्यू झाला, तर दोघे घायाळ झाले. पोलिसांनी सांगितले की, आग लागण्याच्या आणि स्फोट होण्याच्या घटनेची चौकशी केली जात आहे.

सर्व दूरचित्रवाहिन्या 'आदर्श' घोटाळ्याच्या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांच्यासमवेत चर्चासत्र का ठेवत नाहीत ?

     दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरात उभ्या असलेल्या वादग्रस्त ३१ मजली आदर्श इमारतीमधील सदनिका कारगिल युद्धातील शूर सैनिक आणि हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या विधवांना न मिळता त्या लष्कराचे अधिकारी, राजकीय नेतेमंडळी, सनदी अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्यांनी लाटल्या. त्यामुळे ही इमारत वादात सापडली आहे.

पाकिस्तानला शासकीय निधीतून एफ् १६ लढाऊ विमाने देण्याचा अमेरिकेचा निर्णय रहित !

स्वतःच्या पैशाने विमाने विकत घेण्याचा अमेरिकेचा पाकला सल्ला !
     वॉशिंग्टन - अमेरिकेतील काँग्रेसच्या सदस्यांनी केलेल्या विरोधामुळे अमेरिकेने पाकिस्तानला एफ् १६ विमानांच्या खरेदीसाठी शासकीय निधीतून साहाय्य करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विमानांच्या खरेदीसाठी पाकिस्तानने स्वत:च निधी उभारावा, असे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे.
१. फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेने पाकिस्तानला ८ एफ् १६ लढाऊ विमाने आणि रडार, तसेच अन्य साहित्य विकण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी ७०० मिलियन डॉलर इतका खर्च येणार होता.
२. यापूर्वीही ओबामा प्रशासनाच्या या निर्णयावरून अमेरिकेतील खासदारांनी, पाकिस्तान या लढाऊ विमानांचा उपयोग आतंकवादाविरुद्ध करण्याऐवजी भारताविरुद्ध लढण्यासाठी करील, अशी चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे पाकिस्तानला लढाऊ विमाने देण्यापूर्वी फेरविचार करावा, अशी मागणी करण्यात आली होती.


जर्मनीतील मशिदींवर गुप्तचर यंत्रणेचे लक्ष !

कुठे आतंकवादाला आळा घालण्यासाठी पावले उचलणारा जर्मनी, तर कुठे ३ दशके आतंकवादी 
आक्रमणे होऊनही त्याच्या विरोधात कोणतीही ठोस कारवाई न करणारा भारत !
     बर्लिन - जर्मनीतील अरबी भाषा बोलणार्‍या मशिदींवर बी.एफ्.वी. या गुप्तचर यंत्रणेकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. बीएफवीचे अध्यक्ष हैंस जॉर्ज मसीन यांनी जर्मनीतील प्रसारमाध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत हे सांगितले. 
१. गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांच्या म्हणण्यानुसार येथील मशिदींतील स्वयंघोषित इमाम स्वत:च्या शिष्यांना एकत्र करून चिथावणीखोर भाषणे देतात आणि जिहादसाठी त्यांना प्रवृत्त करतात. 
२. मशिदींवर लक्ष ठेवण्यात येत असले, तरी त्यांचे लक्ष देशातील मुसलमानांवर नसून धार्मिक आणि राजकीय कट्टरपंथीयांवर आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 
३. याचबरोबर जगभर थैमान घालणार्‍या इसिसचे देशातील आतंकवाद्यांशी संबंध आहेत का, याचाही शोध या गुप्तचर यंत्रणेकडून घेण्यात येत आहे. (देशातील आतंकवाद मुळापासून नष्ट करण्यासाठी भारतीय राज्यकर्ते जर्मनीप्रमाणे मशिदींवर लक्ष ठेवून कारवाई करतील, अशी अपेक्षा तरी भारतीय करू शकतात का ?- संपादक)

नायजेरियात बोको हरमच्या आतंकवाद्यांकडून ख्रिस्ती गावावर आक्रमण करून सर्वांची सामूहिक हत्या !

     अबुजा (नायजेरिया) - नायजेरिया देशातील ग्रामीण विभागात असलेल्या एका ख्रिस्ती खेड्यावर ५०० सशस्त्र धर्माधांनी आक्रमण करून संपूर्ण गाव जाळून टाकले, सर्व दुचाकी आणि चारचाकी वाहनांना आगी लावल्या, सर्व पशूंना मारून टाकले आणि तेथील चर्च भस्मसात करून टाकले. त्यानंतर त्यांनी ख्रिस्त्यांचा पाठलाग चालू केला. सर्वांना कुर्‍हाडीचे घाव घालून ठार मारले. त्यातूनही जे जिवंत राहिले त्यांना गोळ्या घातल्या. एका बसमध्ये प्रवास करत असलेल्या व्यक्तीस बसला आग लावून जिवंत जाळण्यात आले. या निर्घृण प्रकारातून जे जिवंत वाचले त्यांनी दिलेल्या माहिती वरून कळले की नायजेरियातील बोको हरम या आतंकवादी संघटनेने चालवलेल्या हत्याकांडातील हा प्रकार आहे. गेल्या आठवड्यात देशातील १०४ गावांमध्ये वीज प्रथमच पोहोचली !

स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही भारताची अशी दु:स्थिती देशासाठी लज्जास्पद नव्हे का ? 
सर्वाधिक काळ सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेसला जनतेने वैध मार्गाने याविषयी खडसवायला हवे !
       नवी देहली - दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेच्या अंतर्गत २५ एप्रिल ते १ मे या आठवड्यात देशातील १०४ गावांमध्ये वीज प्रथमच पोहोचल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत देशातील १८ सहस्र ४५२ गावांपर्यंत वीज पोहोचलेली नाही. त्यामुळे केंद्रशासनाने मोहीम हाती घेतली असून या संख्येपैकी आतापर्यंत ७ सहस्र ५४९ गावांमध्ये वीज पोहोचण्यात यश आले असून १ मे २०१८ पर्यंत सर्व गावांना वीज पोहोचवण्याचे शासनाचे ध्येय आहे, अशी माहिती मनी कंट्रोल या इंग्रजी वृत्त संकेतस्थळाने दिली आहे. शासनाच्या या कार्याचा आढावा प्रतिदिन गर्व नावाच्या शासकीय अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपवर देण्यात येतो.

पुणे रुग्णालयात महिलेचा अवैध गर्भपात !

    पुणे, ४ मे - अवैधरित्या गर्भपात केल्याप्रकरणी डॉ. नीला देसाई यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका महिलेच्या पोटात २१ आठवड्यांचा गर्भ असतांना, तसेच तिच्यावर कोणत्याही औषधांचा दुष्परिणाम होत नसतांनाही डॉ. देसाई यांनी गर्भवती महिलेचा पुना हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र येथे गर्भपात केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी डॉ. रूपाली बुधकर यांनी तक्रार दिली आहे. (कायदा मोडणारे सुशिक्षित (?) गुन्हेगार ! - संपादक)

फलक प्रसिद्धीकरता

भाजपने निवडणुकीच्या वेळी परदेशातील काळा पैसा आणण्याचे 
जनतेला दिलेले आश्‍वासन केव्हा पूर्ण होईल ?
     विदेशात भारतियांचा किती काळा पैसा जमा आहे, यासंदर्भात शासनाकडे कोणतीही अधिकृत माहिती नाही, अशी स्वीकृती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी राज्यसभेत दिली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! :
Videshme Bharatiyonka kitna kala dhan jama hai, iski jankari nahi. - Kendra sarkar
Kala dhan Bharatme laane ki janata ki aasha adhuri na rah jaye !
जागो ! :
विदेश में भारतियों का कितना काला धन जमा है, इसकी जानकारी नहीं ! - केंद्र सरकार
काला धन भारत में लाने की जनता की आशा अधूरी न रह जाए !

तीव्र विरोधानंतर पुण्यातील खडकवासला धरणातून दौंड आणि इंदापूर यांसाठी अखेर पाणी सोडण्यास प्रारंभ

 • पुणे ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त 
 • पाणी न सोडण्यासाठी मनसेचे धरणाच्या बाहेर निषेध आंदोलन 

     पुणे, ४ मे - भाजप वगळता सर्व पक्षांचा विरोध असतांनाही येथील खडकवासला धरणातून दौंड आणि इंदापूर या तालुक्यासाठी १ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्यास ४ मे या दिवशी प्रारंभ झाला. धरणातून हे पाणी दुपारी १ वाजता ३०० क्युसेक्स वेगाने नव्या मुठा उजव्या कालव्यात सोडण्यात येत आहे. पाणी सोडण्याच्या वेळी पुणे ग्रामीण पोलिसांनी दंगलविरोधी पथकाच्या पोलिसांसह चोख बंदोबस्त ठेवला होता. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धरणातून पाणी न सोडणेे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांचा निषेध व्यक्त करणे, यासाठी धरणाच्या बाहेर निषेध आंदोलन करण्यात आले. 

पुण्यातील प्रस्तावित गोलाकार रस्त्याचे (रिंग रोडचे) ड्रोनद्वारे सर्र्वेक्षण होणार !

     पुणे, ४ मे - पुणे, पिंपरी-चिंचवड ही शहरे, तसेच ग्रामीण भाग या ठिकाणी असणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या गोलाकार रस्त्याचे 'ड्रोन'चा वापर करून सर्वेक्षण होणार आहे. सर्वेक्षण होत असतांना खेड आणि अन्य तालुक्यांतील शेतकर्‍यांनी त्याला विरोध दर्शवला. त्यावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि जिल्हाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत पोलीस संरक्षणामध्ये सदर काम मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार ९६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम झाले होते, तर १० किलोमीटर मार्गाचे सर्वेक्षण थांबले होते. हे काम मार्गी लावण्यासाठी 'ड्रोन'चा वापर करण्याची अनुमती महामंडळाकडून मागण्यात आली होती. त्याला राज्यशासनाने मान्यता दिली आहे. वर्ष २००७ मध्ये गोलाकार रस्त्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला होता. (गोलाकार रस्त्याच्या संदर्भातील निर्णयाला १० वर्षे उलटूनही सर्वेक्षण होत नसेल, तर त्या रस्त्यावरून वाहने धावायला आणखी किती काळ वाट पहावी लागेल, याचा विचारच न केलेला बरा ! - संपादक)

अमेरिकेचे ७० सैनिक इसिसचे लक्ष्य !

     लंडन - इसिसने अमेरिकेच्या ७० सैनिकांच्या नावांची सूची प्रसारित केली आहे. या सूचीमध्ये सिरियावर ड्रोनद्वारे आक्रमण करणार्‍या सैनिकांचा समावेश आहे. या सैनिकांना ठार करण्याचा आदेश इसिसने दिला आहे. हे जिथे कुठे असतील, तिथे त्यांची हत्या करा, त्यांचे मुंडके छाटा, गोळ्या घाला, नाहीतर बॉम्बने उडवून द्या, असा संदेश इसिसनेे दिला आहे.

व्हॅटीकनकडून बलात्कारी पाद्य्राची भारतात नियुक्ती !

भारतातील पुरोगामी महिला संघटना व्हॅटीकनच्या या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवतील 
का ? देशातील डावे आणि निधर्मी बुद्धीवादी कारागृहातून शिक्षा भोगून आलेल्या या आरोपीला 
भारतात पाद्री होण्याला विरोध करतील कि त्यांचा बौद्धिक तोफखाना केवळ हिंदु संतांच्या 
विरोधासाठी सुरक्षित ठेवणार आहेत ? 
     नवी देहली - मागील काही वर्षांपासून पाश्‍चिमात्य देशांमध्ये चर्चच्या पाद्रींकडून लहान मुलांचे यौन शोषण होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे ख्रिस्त्यांची सर्वोच्च संस्था व्हॅटिकनच्या प्रशासनासह स्वत: पोपही पाद्य्रांच्या या मानसिक समस्येमुळे अतिशय त्रस्त आहेत. पोप फ्रान्सिस आणि यापूर्वीचे पोप यांनीही हे वास्तव प्रसारमाध्यमांसमोर स्वत: स्वीकारले असून त्यांच्या मते पाद्य्रांमध्ये बाल यौन शोषणाचा आजार महामारी बनला आहे. असे असतांना बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगलेल्या एका पाद्य्राला व्हॅटीकनने भारतात पाद्री म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामांमध्ये गेल्या ३ वर्षांमध्ये ४६ सहस्र ६५८ टन धान्य सडले !

देशातील अर्धीअधिक जनता अर्धपोटी जीवन जगत असतांना काँग्रेसच्या 
काळाप्रमाणे आताही धान्य सडू देणारे अकार्यक्षम केंद्रशासन !
याला उत्तरदायी असणार्‍या संबंधितांना उपाशी ठेवण्याचीच शिक्षा केली पाहिजे ! 
     बेंगळुरू - भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामांमध्ये गेल्या ३ वर्षांमध्ये ४६ सहस्र ६५८ टन धान्य सडून गेले, तर १४३.७४ टन धान्य चोरीला गेले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याखाली हे धान्य दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांतील सुमारे ८ लक्ष लोकांना वर्षभर पुरले असते. 
   गेली अनेक वर्षे भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामांमध्ये धान्य सडून जाण्याचे प्रकार घडत आहेत. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक योगेंद्र त्रिपाठी यांनी येत्या काही वर्षांमध्ये धान्य साठवण्याची क्षमता वाढवण्यात येणार असल्याचे सांगितले. आपल्याकडे अतिरिक्त धान्य आहे. अतिरिक्त धान्य वापरात आणले जाते. त्यामुळे धान्य सडण्याचे प्रमाण त्यामानाने अल्प आहे, असे त्रिपाठी यांनी सांगितले.तुर्कस्थानच्या संसदेमध्येच खासदारांची हाणामारी

     अंकारा - तुर्कस्थानमधील सत्ताधारी एके पार्टी आणि कुर्दीश विरोधक पक्षाचे सदस्य यांच्यामध्ये संसदेमध्ये लाथाबुक्यांनी हाणामारी झाली. त्यामध्ये अनेक जण घायाळ झाले आहेत. संसद सदस्यांना अटक करता येत नाही, या तरतुदीवरून झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीमध्ये झाल्याचे वृत्त वृत्तसंस्थांनी दिले आहे.

देहलीमध्ये जैश-ए-महंमदच्या १२ जिहादी आतंकवाद्यांना अटक

या आतंकवाद्यांवर तात्काळ 
खटला चालवून त्यांना कठोर शिक्षा 
दिल्यासच इतरांना त्याचा वचक बसेल !
      नवी देहली - देहली पोलिसांनी देहली आणि देहलीच्या बाहेर छापे मारून जैश-ए-महंमदच्या १२ जिहादी आतंकवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडे स्फोटके बनवण्याचे साहित्यदेखील सापडले आहे. ते शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी आक्रमण करण्याची योजना बनवत होते.

संरक्षण खरेदीची भरकटलेली उड्डाणे !

      राजा विक्रम आणि वेताळ यांची न संपणारी गोष्ट सर्वांच्याच परिचयाची आहे. राजाने वेताळाला पकडून ठेवण्याचे कितीही प्रयत्न केले, तरी शेवटी तो विक्रमाच्या हातून निसटून जायचाच ! भारताच्या शस्त्रास्त्र खरेदीच्या व्यवहारांविषयीही तसेच म्हणावे लागेल. प्रत्येक खरेदी व्यवहारापूर्वी शासनाकडून या व्यवहारात कोणताही भ्रष्टाचार होणार नाही, याची दक्षता घेतली आहे अशी ग्वाही दिली जाते; परंतु तो व्यवहार पूर्ण होता होता, त्यातील भ्रष्टाचाराची कुलंगडी हळूहळू उघडकीस येऊ लागतात. ज्या नेत्यांना आपण सचोटीचे आदर्श समजत होतो, त्यांचीच नावे अशा व्यवहारात गुंतल्याचे पाहून प्रश्‍न पडतो की, हे व्यवहार खरोखरीच देशाच्या सुरक्षिततेचा विचार करून केले जातात कि त्यामागे मिळालेल्या संधीचा लाभ उठवून, स्वतःची तुंबडी भरून घेण्याचा सत्ताधारी पक्षांचा आणि नेत्यांचा सुप्त हेतू असतो ? ऑगस्टा वेस्टलँड या इटलीच्या आस्थापनाबरोबर झालेल्या हेलिकॉप्टर खरेदीच्या व्यवहारात, इटलीच्या शासनानेच उघडकीस आणलेल्या भ्रष्टाचाराच्या निमित्ताने हा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शिक्षण विकणे आहे ?

     वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित प्रवेश पात्रता परीक्षेसंदर्भात राज्यात सध्या नीटचा गोंधळ चालू आहे. खाजगी शिक्षणसंस्थांच्या मनमानीला आळा बसावा, प्रवेश प्रक्रियेतील अपप्रकार रोखले जावेत, या उद्देशाने देशभरात राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) घेतली जावी, असा न्यायालयाने नुकताच आदेश दिला. नीटच्या अंमलबजावणीच्या विरोधात महाराष्ट्रासह ८ राज्यांनी पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली असली, तरी या निमित्ताने वैद्यकीय शिक्षण क्षेत्राशी संबंधित पुन्हा काही प्रश्‍न निर्माण झाले आहेत, हे नक्की ! आता अनायसे नीटचा विषय गाजत आहेच, तर त्या निमित्ताने सेवाभाव हा मूळ उद्देश हरवलेले वैद्यकीय शिक्षणक्षेत्र नीट होण्यासाठी शिक्षणतज्ञांकडून सखोल विचार होऊन काही कृतीशील उपाय निघाले, तर ते विद्यार्थ्यांच्या आणि पर्यायाने समाजाच्या हिताचे ठरेल.

उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर !

सुट्टीतील परिपाठ !
     सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. या सुट्टीचा कालावधी त्यांच्यात विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालवाचकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
व्यायाम करताना कोणती काळजी घ्यावी ?
    सर्वप्रथम संपूर्ण अंगाला तेल लावावे. यासाठी खोबरेल, तीळतेल, सरकीचे तेल यांपैकी कोणतेही तेल चालते. या प्रक्रियेला अभ्यंग असे म्हटले जाते. नियमित अभ्यंग केल्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते, तरतरी येते, दृष्टी सुधारते आणि अंग पुष्ट होऊन बळकटी येते.

स्वामी समर्थ यांच्या सहवासाने पावन झालेला अक्कलकोट येथील वटवृक्ष

स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने...
     आज स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी आहे. या निमित्त सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिराची छायाचित्रे प्रसिद्ध करत आहोत. स्वामी समर्थ या वटवृक्षाच्या कट्ट्यावर बसायचे. या वटवृक्षाच्या खाली स्वामींचे पादुका मंदिर आहे.
वटवृक्ष पहा घनदाट स्वामींचा थाट अक्कलकोटात !
                   
सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) दैनिक सनातन प्रभातचा रंगीत स्त्रीशक्ती विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : ८ मे २०१६
पृष्ठ संख्या : १० मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ७ मे या दिवशी 
दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !

श्री. कीर्तन भट यांना आलेल्या विविध अनुभूती !

१. ग्रंथ-विभागात सेवा करत असतांना पू. गाडगीळकाकांचे ध्यान आपोआप लागणे आणि त्यांच्या ध्यानावस्थेमुळे उपाय होऊन देहाची उजवी बाजू उष्ण झाल्याचे जाणवणे : मी ग्रंथांच्या संरचनेचा अभ्यास करण्यासाठी ग्रंथ विभागात पू. गाडगीळकाकांच्या शेजारी बसतो. एकदा सायंकाळी ६.३० वाजता मी सेवा करत असतांना पू. गाडगीळकाका अनुमाने १० मिनिटे डोळे मिटलेल्या अवस्थेत बसले आहेत, असे माझ्या लक्षात आले. मला तेव्हा पुष्कळ उष्णता जाणवत होती. कदाचित् पू. काका ध्यानावस्थेत असावेत. पू. काकांनी डोळेे उघडल्यावर माझ्या शरिराच्या उजव्या बाजूला होणारा दाह शमला.
२. विष्णु ग्रंथाची संरचना करत असतांना भगवंत भक्तांमध्ये वास करतो, या अर्थाचा श्रीविष्णुने नारद मुनींना उद्देशून सांगितलेल्या श्‍लोकासमवेत पिळसर रंगाचा प्रकाश असल्याचे जाणवणे : २३.१२.२०१५ या दिवशी सायंकाळी ५ वाजता विष्णु या ग्रंथाच्या संरचनेचा अभ्यास करत असतांना ग्रंथातील एका श्‍लोकापुढे मला पिवळसर रंगाचा प्रकाश दिसला. मी संरचना करण्यासाठी ग्रंथाचे पान वर-खाली केले, तरीही पिवळसर रंगाचा प्रकाश त्या श्‍लोकासमवेतच आहे, असे मला दिसले. मी तो श्‍लोक वाचल्यावर पिवळसर प्रकाश अदृश्य झाला. या श्‍लोकात श्रीविष्णु नारद मुनींना उद्देशून सांगतात, मी ना वैकुंठात आहे, ना तपस्वी योगींच्या मनात आहे. जेथे माझे भक्त माझे गुणगान करतात, केवळ तेथे मी वास करतो.

प.पू. डॉक्टरांनी वापरलेल्या वस्तूंचे भावपूर्ण जतन करून घरातही आश्रमाप्रमाणे चैतन्य निर्माण करणारे कोल्हापूर येथील सुरेश घाटगे !

प.पू. डॉक्टरांनी सुरेश घाटगे यांच्या घरातील वास्तव्याच्या कालावधीत 
वापरलेल्या आणि घाटगे कुटुंबियांनी भावपूर्णरित्या जतन केलेल्या वस्तू
प.पू. डॉक्टरांनी त्या काळी वापरलेली आसंदी आणि सपाता
        वर्ष २००१-२००२ मध्ये कोल्हापूर येथील साधक श्री. सुरेश घाटगे यांच्या घरी प.पू. डॉ. आठवले काही मास निवासासाठी होते. या कालावधीत प.पू. डॉक्टरांनी वापरलेल्या वस्तूंचे त्यांनी भावपूर्णरित्या जतन केले आहे. प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते या वस्तूंची भावपूर्ण मांडणी करून त्याचे पूजन करतात. या या वस्तूंकडे पाहून कोणाचाही भाव जागृत होतो. केवळ प.पू. डॉक्टरांनी वापरलेल्या वस्तूच नव्हे, तर ते आपल्या घराची व्यवस्थाही आश्रमाप्रमाणे ठेवतात. या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या घराला चैतन्यदायी आश्रमाचे स्वरूप आले आहे. त्यांच्या घरी गेल्यावर आध्यात्मिक उपाय होऊन उत्साह जाणवतो. श्री. घाटगे यांचा भावही चांगला असल्याने त्यांची आध्यात्मिक उन्नतीही चांगल्या प्रकारे होत असल्याचे जाणवले. तेथे आध्यात्मिक अनुभूती येतात. - श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती (२५.७.२०१०)
       (हे लिखाण सुरेश घाटगे यांनी देहत्याग करण्यापूर्वीचे आहे. - संपादक)

रामनाथी आश्रमातील लागवड विभागात तळमळीने आणि भावपूर्ण सेवा करून ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले श्री. रामचंद्र (दादा) कुंभार !

१. पूर्वसूचना 
श्री. रामचंद्र कुंभार
        काही दिवसांपूर्वी श्री. रामचंद्र (दादा) कुंभार कुंड्यांमध्ये रोपे लावत होते. तेव्हा त्यांच्याकडे पाहून माझी भावजागृती झाली. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, यांची प्रगती लवकरच होईल. नंतर मी काही दिवस घरी जाऊन आले. तेव्हा दादा भोजनकक्षात दिसल्यावर मला त्यांच्यात पुष्कळ पालट जाणवला आणि १८.२.२०१६ या दिवशी ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याची वार्ता कानावर आली. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला आणि माझ्याकडून श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होऊन माझी भावजागृती झाली. 
- सौ. अनुपमा जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२. गुणवैशिष्ट्ये
२ अ. सेवेची तळमळ असणे
१. दादा लागवड विभागातील सेवा भावपूर्ण करतात. ते रुग्णाईत (आजारी) असले, तरीही सेवेच्या ठिकाणी जाऊन तेथे असणार्‍या साधकाला सेवेविषयी माहिती देतात आणि योग्य प्रकारे त्याच्याकडून ती करवून घेतात.
- श्री. संजय पडेलकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे कोल्हापूर येथील श्री. सुरेश घाटगे यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे

        २६.४.२०१६ या दिवशी सनातनचे साधक सुरेश घाटगे यांचे निधन झाले. ५.५.२०१६ या ि दवशी त्यांच्या निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्यानिमित्त कोल्हापूर येथील डॉ. निवृत्ती रामचंद्र चव्हाण यांना घाटगेकाकांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत.
१. प.पू. डॉक्टर घाटगेकाकांच्या घरी काही मास (महिने) वास्तव्याला असतांनाच काकांमध्ये पालट होऊन त्यांचा नामजप आणि सत्सेवा यांना प्रारंभ होणे : श्री. सुरेश घाटगेकाका सनातनच्या संपर्कात येण्यापूर्वी सिद्ध समाधी योगानुसार (S.S.Y.) साधना करत होते. वर्ष २००० च्या श्रावण मासापासून (महिन्यापासून) काकांचे कुटुंब आणि आम्ही सनातन संस्थेच्या संपर्कात आलो होतो. घाटगेकाकांच्या घरी सत्संग चालू झाल्यापासून त्यांनी कधीही सत्संग चुकवला नाही. वर्ष २००१-२००२ मध्ये प.पू. डॉक्टरांचे वास्तव्य काही मास घाटगेकाकांच्या घरी होते. त्या काळात काकांमध्ये पालट होऊन नामजप आणि सत्सेवा यांना प्रारंभ झाला. स्वतःचे हार्डवेअरचे दुकान आणि नातेवाईक यांना सांभाळून काका परिपूर्ण सेवा करू लागले. मायेत राहून ब्रह्म कसे पहावे ?, हे काकांकडून शिकायला मिळाले. घाटगेकाका हे ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरे साधक होते.

सुरेश घाटगेकाकांनी उंचगाव येथील सत्संगात केलेले मार्गदर्शन

        २१.४.२०१६ या दिवशी उचगाव येथे सत्संग होता. त्या वेळी त्यांचा तोंडवळा पुष्कळ तेजस्वी दिसत होता. सकाळपासून काही खाल्ले नसल्यामुळे ते थकले होते, तरीही त्यांना काही त्रास होत आहे, असे जाणवत नव्हते. सत्संगात पुष्कळ चैतन्य आणि आनंद जाणवत होता.
१. जन्माला येणारा प्रत्येक जण जाणारच आहे, याची जाणीव ठेवूनच प्रत्येकाने साधना केली पाहिजे ! : मृत्यूनंतर आपण केवळ साधनाच समवेत घेऊन जातो. बाकी सर्व इथेच सोडून जातो; पण आयुष्यभर आपण हे माझे आहे. हे मला करायला हवे, यामध्येच गुरफटलेले असतो.
२. सेवा करत असतांना स्वतःला विसरले पाहिजे ! : आपला प.पू. गुरुदेव आणि श्रीकृष्ण यांच्याप्रती भाव अन् श्रद्धा पाहिजे. सेवा करत असतांना स्वतःला विसरले पाहिजे. नामजप करतांना सतत देवाशी अनुसंधान पाहिजे.
- श्रीमती करी, डॉ. अरुण करमळकर आणि सौ. संगीता पाटील
       सत्संगात प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे : सत्संगात आल्यानंतर काकांच्या ठिकाणी प.पू. डॉक्टरांचे अस्तित्व अखंडपणे जाणवत होते. मी प.पू. डॉक्टरांच्या चरणांशी बसलो आहे, असे वाटत होते. इतर वेळीही मी काकांच्या बाजूला बसत असे; पण त्या दिवशी पुष्कळ चैतन्य जाणवत होते. - डॉ. अरुण करमळकर

सुरेश घाटगे यांच्या निधनानंतर रक्षाविसर्जनाच्या वेळी लक्षात आलेले साधनेचे महत्त्व

       कोल्हापूर येथील सुरेश घाटगेकाका आणि श्रीमती स्मिता घाटगेकाकू यांच्याशी माझा वर्ष २००१ पासून संपर्क आला. त्यानंतर वर्ष २००७ मध्ये माझ्या विवाहाच्या वेळी त्यांनीच माझी पत्नी सौ. श्रद्धा निंबाळकर (पूर्वाश्रमीची कु. स्वाती चव्हाण) हिचे कन्यादान केले होते. त्यामुळे त्यांच्याशी धर्मदृष्ट्या माझे नाते निर्माण झाले होते. त्यांच्या निधनानंतर सद्यःस्थितीत साधना किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा ठळक करणारी काही सूत्रे गुरुकृपेने लक्षात आली. ती येथे देत आहे.
१. घाटगेकाकांच्या मृत्यूच्या संदर्भातील निरोप 
आल्यानंतर त्या प्रसंगाकडे साधनेच्या दृष्टीने पहाता येणे
१ अ. घाटगेकाकांच्या संदर्भात पहिला निरोप आल्यानंतर मन स्थिर रहाणे आणि त्यांनी ६१ टक्क्यांहून अधिक पातळी गाठलेली असल्याने गुरुकृपा साध्य केली असल्याचे बोलणे सहज होणे : घाटगेकाका सत्संग झाल्यानंतर निघत असतांना त्यांना भोवळ आली. ब्रेन हॅमरेज झाले असून ते रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत आहेत, असा निरोप श्रद्धाने मला दिला. एरव्ही एखाद्याच्या आजारपणाची किंवा मृत्यूची वार्ता ऐकल्यानंतर मनात त्याविषयी अरेरे, वाईट झाले, अशी प्रतिक्रिया यायची किंवा त्या व्यक्तीशी संबंधित आठवणी जाग्या व्हायच्या. वरील निरोप ऐकल्यानंतर तसे काही झाले नाही. मन स्थिर होते. सगळे शांतपणे ऐकून घेता आले. त्यानंतर सहज बोलून गेलो, त्यांनी ६१ टक्क्यांहून अधिक पातळी गाठलेली असल्याने जीवनात गुरुकृपा साध्य केली आहे.

शेवटच्या क्षणापर्यंत प.पू. डॉक्टरांच्या अनुसंधानात असणारे कै. सुरेश घाटगे !

१. मृत्यूपूर्वी जाणवलेली सूत्रे
१ अ. दैव कण पडत असल्याचे जाणवणे
१. २१.४.२०१६ या दिवशी घाटगेकाका सत्संगाला आले होते. त्या रात्री झोपल्यानंतर मला चांदण्यांप्रमाणे लख्ख प्रकाश जाणवला. त्या वेळी दैवी कण पडत आहेत, असे ५ मिनिटे जाणवले आणि नंतर काळोख पसरला. - सौ. सत्याशिला मसेकर, उंचगाव, कोल्हापूर.
२. लिखाण करतांना हवेत दैवी कण असल्याचे जाणवत होते.
१ आ. काकांचे शरीर हलके झाल्याचे जाणवणे : काकांना गाडीकडे नेत असतांना आणि गाडीत बसवतांना त्यांचे पूर्ण शरीर हलके जाणवत होते.

सात्त्विक ज्ञानाविषयी प.पू. डॉक्टरांनी आता सांगितलेले आणि पू. अप्पाकाकांनी १५ वर्षांपूर्वी सांगितलेले या दोन्हींमागील शास्त्र एकच असणे

        अनुमाने ५ - ६ मासांपूर्वी प.पू. डॉक्टरांनी मला सांगितले, तुला मिळत असलेले ज्ञान हे सात्त्विक ज्ञान आहे. तेव्हा मला सात्त्विक ज्ञान म्हणजे काय ? असा प्रश्‍न पडला; परंतु कधीतरी याचे उत्तर मिळेल, असा मी विचार केला. त्यानंतर १४.१.२०१६ या दिवसापासून पू. अप्पाकाका (देहत्याग केलेले सनातनचे संत पू. वसंत बाळाजी आठवले) यांनी १५ वर्षांपूर्वी केलेल्या मार्गदर्शनाचे ऑडिओऐकून टंकलेखन करण्याची सेवा मी करत आहे. त्यात एक सूत्र सत्त्व म्हणजे ज्ञान. सत्त्वाचे लहान कण ज्ञानस्वरूप आहेत, असे होते. या सूत्रातून मला माझ्या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले. प.पू. डॉक्टरांनी सात्त्विक ज्ञानाविषयी आता सांगितलेले आणि पू. अप्पाकाकांनी १५ वर्षांपूर्वी सांगितलेले या दोन्हींमागील शास्त्र एकच आहे, हे लक्षात आले.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१.२०१६)
       (यावरून आध्यात्मातील सिद्धांत हे त्रिकालबाधित सत्य असतात, याची प्रचीती येते. - संकलक)

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
       सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.

साधनेच्या बळावर पतीनिधनाच्या प्रसंगाला स्थिरतेने सामोर्‍या जाणार्‍या श्रीमती घाटगेकाकू !

       घाटगेकाकांना रुग्णालयात भरती केल्यावर घाटगेकाकूंना श्रीकृष्णाचा जप करायला सांगितला होता. काकूंनी सलग ३ दिवस हा जप केला. या कालावधीत त्यांनी झोपही क्वचित घेतली. १५ वर्षांपूर्वी काकूंचा मुलगा सुशांत याचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या वेळी काकूंना मोठा धक्का बसला होता. या दुःखातून बाहेर पडायला त्यांना बराच कालावधी लागला होता. या वेळी गेल्या १५ वर्षांतील काकूंची साधना आणि या ३ दिवसांत त्यांनी केलेला नामजप यांमुळे काकूंच्या मनाला स्थिरता आली होती, असे लक्षात आले. यामुळे काकांच्या निधनानंतरही काकू काही वेळ स्तब्ध होत्या; पण काही वेळाने त्या स्थिर झाल्या आणि या प्रसंगाला साधना म्हणून सामोरे जाण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले. पुढील दिवसात काही जण काकूंकडे आल्यावर रडत असत; पण काकू त्यांनाही शांतपणे समजावून सांगत असत. रडून काय होणार ? तुम्ही प्रार्थना करा, जप करा, असे त्या म्हणत असत. हे सर्व पहात असतांना प.पू. डॉक्टरांनी साधकांना जीवनातील कितीही कठीण प्रसंगाना सामोरे जाता यावे, यासाठी सक्षम बनवले आहे, याची तीव्रतेने जाणीव होऊन कृतज्ञता व्यक्त होत होती.
- सौ. मीनाक्षी हर्षे, कोल्हापूर (२७.४.२०१६)

जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत सत्मध्ये राहून सर्वांपुढे आदर्श ठेवणारे ६२ टक्के आध्यात्मिक स्तर असणारे कै. सुरेश घाटगे यांचा मृत्यूसमयी स्तर झाला ६६ टक्के !

सुरेश घाटगे
      कोल्हापूर येथील सनातनचे साधक सुरेश घाटगे यांच्या मेंदूत अकस्मात् रक्तस्राव (ब्रेन हिमोरेजमुळे) होऊ लागल्याने २२.४.२०१६ या दिवशी त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले. ४ दिवस ते पूर्ण बेशुद्धावस्थेत (कोमात) होते. त्यानंतर त्यांचे निधन झाले. सर्वसामान्यांप्रमाणे अंथरुणाला खिळून त्यांचा त्रासदायक मृत्यू झाला नाही. घाटगे यांच्यातील अनन्यसाधारण भाव, सेवेची तीव्र तळमळ आदी विविध गुणांमुळे वर्ष २०१२ मध्ये त्यांनी ६० टक्के आध्यात्मिक स्तर प्राप्त केला होता. घाटगे यांचे वैशिष्ट्य म्हणजे शेवटच्या श्‍वासापर्यंत त्यांचे नामस्मरण चालू होते. त्यांंचा आध्यात्मिक स्तर आता ६२ टक्क्यांवरून ६६ टक्के झाला आहे. त्यांची यापुढील प्रगतीही चांगली चालू असून ते लवकरच संतपद प्राप्त करतील !
        त्यांच्या पत्नी श्रीमती स्मिता घाटगे याही पतीच्या मृत्यूसमयी स्थिर आणि शांत होत्या. एवढ्या कठीण प्रसंगातही त्यांची भगवंतावरील श्रद्धा यत्किंचितही ढळली नाही. त्यामुळे त्यांच्या आध्यात्मिक स्तरात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कठीण प्रसंगातही आंतरिक साधनेद्वारे जलद आध्यात्मिक प्रगती करणार्‍या घाटगे पती-पत्नींचा आदर्श सर्वत्रच्या साधकांनी घ्यावा !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

        आपणास असे वाटते का की, संस्कृत भाषा जातीयवादी आहे आणि उर्दू भाषा ही धर्मनिरपेक्षतावादी आहे. मंदिर जातीय आणि मशीद सर्वधर्मसमतावादी आहे. साधू जातीय आणि इमाम सर्वधर्म समतावादी आहे. भाजप जातीय आणि मुस्लीम लीग धर्मनिरपेक्षतावादी आहे. डॉ. प्रवीण तोगडीया राष्ट्रविरोधी आणि बुखारी राष्ट्रीय आहे. वन्दे मातरम् जातीय आणि अल्ला-ओ-अकबर सर्वधर्म समानता वादी, श्रीमान हे जातीय आणि मियां हे धर्मनिरपेक्षतावादी, हिंदुत्व हे जातीय आणि इस्लाम सर्वधर्म समानतावादी, जिहादवादी धर्मनिरपेक्ष असतात अन् शेवटी भारत जातीयवादी आणि इटली सर्वधर्म समानतावादी आहे का ?
- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस
      या देशातील प्रत्येक समस्येवर ‘हिंदु हाच पर्याय आहे ! - आचार्य धर्मेंद्रजी, प्रमुख नेते, रामजन्मभूमी आंदोलन आणि विहिंप.

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सनातनच्या ग्रंथांचे वितरण करण्यासाठी सुवर्णकारांना संपर्क करा !

साधकांना सूचना
      ९.५.२०१६ या दिवशी अक्षय्य तृतीया आहे. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने सुवर्णकारांच्या पेढीवर (दुकानावर) जातात. या दिवशी सोने खरेदी करणार्‍यांना सुवर्णकार ग्रंथ किंवा एखादी भेटवस्तूही देतात. यासाठी साधकांनी सुवर्णकारांना संपर्क करून त्यांना सनातनच्या अध्यात्म, तसेच राष्ट्र-धर्म विषयक ग्रंथ-लघुग्रंथांची माहिती सांगून ते त्यांना खरेदी करण्यास सांगू शकतो आणि अक्षय्य तृतीयेला येणार्‍या ग्राहकांना भेट देण्याविषयी सूचवू शकतो. - (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.५.२०१६)


साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - चैत्र अमावास्या (६.५.२०१६) प. ४.४७ वाजता
समाप्ती - चैत्र अमावास्या (६.५.२०१६) उ.रा. १.०० वाजता
उद्या अमावास्या आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       काम न करणे, भ्रष्टाचार करणे इत्यादींची सवय झालेले बहुतेक पोलीस आणि सरकारी कर्मचारी अन् अधिकारी यांना एकही खाजगी आस्थापन एकही दिवस नोकरीत ठेवणार नाही !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला न उमजणे, स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, 
ही अवस्था आल्यास तो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
     भावार्थ : दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. स्वतःचे स्वतःला न उमजणे म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योग्य आचार-विचार
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
दुसर्‍याच्या आधाराची अपेक्षा करत राहिलो, तर कधीच उभे रहाता येणार नाही; म्हणूनच धडपडत का होईना; पण स्वत:च्या हिमतीवर उभे राहून स्वावलंबी होणे इष्ट ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

अमेरिकेचा भारतद्वेष !

संपादकीय 
     भारतात २०१५ मधे असहिष्णुता वाढली, असा निष्कर्ष अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने काढला आहे. अमेरिकेत हा आयोग आहे. अमेरिकेने जगभरातील देशांचा कैवार घेतल्याप्रमाणे प्रत्येक देशातील धार्मिक स्थिती आजमावण्यासाठी नेमलेला हा आयोग आहे. या आयोगाने संबंधित माहिती गोळा करावी आणि अमेरिकेने त्या त्या देशाला खडसवण्याच्या भाषेत विचारायचे, असे हे अमेरिकेचे धोरण आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष भारतात आले असता त्यांनी परत जातांना निरोप घेत असता सुचवले होेते की, भारतात धार्मिक सलोखा टिकला पाहिजे, त्याची काळजी घ्यायला हवी, म्हणजे भारतात कोणते वातावरण आहे, यावर अमेरिकेचे लक्ष आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn