Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

जेजुरीच्या खंडोबा गडावरील मुख्य मंदिरातील पूजा बंद !

गाभार्‍यातील स्वयंभू लिंगावर केवळ त्रिकाल पूजा !
पुणे विभागीय धर्मादाय सहआयुक्तांचा आदेश !
धर्मादाय सहआयुक्तांनी असा निर्णय घेण्यापूर्वी शंकराचार्य किंवा धर्माचार्य यांना त्याविषयी
 विचारले होते का ? आज पूजा बंद करणारे प्रशासन उद्या हिंदूंना मंदिरातही प्रवेश 
करण्यास बंदी करील ! भाजपच्या राज्यात असा निर्णय हिंदूंना अपेक्षित नाही !
     पुणे - जेजुरीच्या खंडोबा गडावरील मुख्य मंदिराच्या गाभार्‍यातील स्वयंभू लिंगाची पूजा बंद करून आता केवळ त्रिकाल पूजा करण्याचा आदेश पुणे विभागीय धर्मादाय सहआयुक्त शिवकुमार डिगे यांनी श्री मार्तंड देवस्थानला दिला आहे. इतर पूजा आणि अभिषेक गडकोटातील श्री पंचलिंग महादेव मंदिरात केले जावेत, असेही त्यांनी या आदेशात नमूद केले आहे.
     संस्थानचे मुख्य विश्‍वस्त दशरथ घोरपडे आणि व्यवस्थापक दत्तात्रेय दिवेकर यांना धर्मादाय आयुक्त कार्यालयात चर्चेसाठी बोलावण्यात आले होते. त्या वेळी धर्मादाय सहआयुक्तांनी हा निर्णय देऊन कार्यवाही करण्याचाआदेश दिला.

केरळमध्ये विद्यार्थिनीची अमानुष बलात्कारानंतर हत्या !

  •  या घटनेवर एकही ढोंगी प्रसारमाध्यम चर्चा करणार नाही, हे लक्षात घ्या !
  •  दलितांचे कैवारी असल्याचा आव आणणार्‍या सत्ताधारी काँग्रेसच्या राज्यातील सत्य स्थिती !
  •  महिलांसाठी कार्य करत असल्याचे आव आणणार्‍या भूमाता ब्रिगेड, स्वराज संघटनांसारख्या संघटना याविरोधात आवाज उठवणार का ?
      पेरुंबवूर - केरळमधील एर्नाकुलम् जिल्ह्यातील पेरुंबवूर येथील एका दलित विद्यार्थिनीवर ५ दिवसांपूर्वी भरदिवसा अमानुषपणे बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे; परंतु पोलिसांनी अजून कोणालाही अटक केलेली नाही. कोणतेही राजकीय नेते किंवा कार्यकर्ते आमच्या साहाय्यासाठी पुढे आले नाहीत, अशी व्यथा पीडित मुलीच्या नातेवाइकांनी मांडली. (दलित असल्याच्या कथित दाव्यावरून रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर त्याचे राजकारण करणारे एकजात ढोंगी निधर्मीवादी या घटनेच्या वेळी कुठे आहेत ? कि ही घटना काँग्रेसच्या राज्यात झाल्याने आणि यातून आपल्याला कोणताही लाभ होणार नसल्याने त्या सर्वांची तोंडे शिवली गेली आहेत का ? दलितांचा कैवार घेणार्‍या मायावती कुठे लपल्या आहेत, साम्यवादी सीताराम येच्युरी कुठे झोपले आहेत, केजरीवाल काय करत आहेत, हे देशातील जनतेला समजले पाहिजे ! - संपादक)

मानवी तस्करीपासून १४ सहस्र मुलींची सुटका

इतक्या मोठ्या प्रमाणावर मानवी तस्करी होत असतांना ती आतापर्यंत 
रोखू न शकलेली लोकशाही निरर्थकच होय !
     नवी देहली - गेल्या २ वर्षांत मानवी तस्करीच्या माध्यमातून वेश्याव्यवसायाकडे ढकललेल्या १४ सहस्रपेक्षा अधिक मुलींची सुटका करण्यात आली, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री श्रीमती मेनका गांधी यांनी लोकसभेत दिली. सर्व प्रकारची मानवी तस्करी समाप्त करण्यासाठी विधान आणि संस्थागत साचा सशक्त करण्यासाठी मंत्र्यांची एक समिती नेमण्यात आली होती. 
     श्रीमती गांधी पुढे म्हणाल्या की, नॅशनल क्राइम रेकॉडर्स ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार २०१४ मध्ये ४ सहस्र ७४३ मुलींची, तर २०१५ मध्ये ९ सहस्र ४८३ मुलींची मानवी तस्करीपासून सुटका करण्यात आली. लैंगिक शोषणापासून मुलींचे रक्षण करणे आणि या तस्करीला बळी पडलेल्या मुलींचे पुनर्वसन करणे यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीने उज्ज्वला योजना व्यापक स्तरावर राबवली जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने देशाच्या २३४ जिल्ह्यांमध्ये मानवीतस्करी विरोधी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना मानवी तस्करी समाप्त करण्यासाठी सल्ला केंद्रे उघडण्याविषयी मार्गदर्शक सूची पाठवली आहे.


चीनकडून होणारी आयात वाढल्याने सीव्ही रेडियल टायर्सच्या स्थानिक उत्पादनात घट

चीनचे असेही आक्रमण !
     नवी देहली - मार्च २०१६ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात चीनमधील ट्रक आणि बस रेडियल टायर्सची भारतात होणारी आयात ६४ टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे सीव्ही रेडियल टायर्सच्या स्थानिक उत्पादनात घट झाली आहे. भारतातील टायर उत्पादकांनी चीनमधून भारतात येणार्‍या ट्रक आणि बस रेडियल टायर्सच्या डंपिंगवर कर लागू करण्याची मागणी केली आहे. चीनमधून अगदी स्वस्त दरात आयात होत असल्याने त्याचा विपरित परिणाम भारतीय आस्थापनांवर झाला आहे आणि बरीच आस्थापने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, अशी माहिती टायर उत्पादक संघटनेने दिली.
    शासनाने डंपिंगच्या विरोधात लागू असलेला कर फेब्रुवारी २०१५ मध्ये हटवला. त्यामुळे चीनमधून होणारी ट्रक आणि बस रेडियल टायर्सची आयात मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दावा संघटनेने केला आहे. शासनाने ट्रक आणि बस रेडियल टायर्सच्या आयातीमध्ये झालेली वाढ रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी टायर उत्पादक संघटनेचे अध्यक्ष के.एम्. मामेन यांनी केली आहे.

पाकिस्तानमधील हिंदूंच्या मंदिरांना धक्का लागू देणार नाही !

आतंकवादी हाफीज सईदचे विधान !
  •  भारतात बॉम्बस्फोट करून हिंदूंचे बळी घेणार्‍या हाफीज सईदच्या या विधानावर कोण विश्‍वास ठेवणार ?
  •  पाकमधील बहुतेक मंदिरे पाडल्यानंतर आता पाडण्यासारखे काही राहिले नसल्याने हिंदूंची बाजू घेऊन त्यांना खुश करण्याचा हा प्रकार आहे !
  •  पाकमध्ये आतापर्यंत जी मंदिरे पाडण्यात आली, ती बांधण्याचा प्रयत्न हाफीज सईदने करावा आणि हिंदूंचे रक्षण करावे !
      इस्लामाबाद - आमची संघटना पाकिस्तानमधील हिंदूंच्या मंदिरांना आणि बिगर मुसलमानांच्या पवित्र धार्मिक स्थळांना धक्का लागू देणार नाही, अशी ग्वाही जमात-उल-दवा संघटनेचा प्रमुख आतंकवादी आणि मुंबईवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार हाफीज सईद याने दिली आहे. तो सिंध प्रांतातील माटली येथे एका बैठकीच्या वेळी बोलत होता.

देशांतील न्यायालयांत ३ कोटींहून अधिक खटले प्रलंबित

लोकशाहीची निरर्थकता दर्शवणारे आकडे !
     नवी देहली - देशांतील न्यायालयांमध्ये ३ कोटींपेक्षाही अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. २४ उच्च न्यायालयांमध्ये ३८ लाख ७० सहस्र, तर जिल्हास्तरीय आणि कनिष्ठ न्यायालयांमध्ये २ कोटी ७० लाख प्रकरणे प्रलंबित आहेत. केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांनी राज्यसभेत ही माहिती दिली आहे. (ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी केंद्रशासन काय करणार आहे, हेही गौडा यांनी सांगायला हवे, अन्यथा प्रतिवर्षी अशीच वाढती आकडेवारी सांगितली जाईल ! - संपादक) गतवर्षी उच्च न्यायालयाने १५ लाख ८१ सहस्र प्रकरणांवर सुनावणी घेऊन निर्णय दिला होता, तर कनिष्ठ न्यायालयांनी १ कोटी ७८ सहस्र प्रकरणी निकाल दिला होता.

बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई उच्च न्यायालय नामकरण करा ! - शिवसेनेच्या खासदारांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

    नवी देहली - बॉम्बे हायकोर्टाचे मुंबई उच्च न्यायालय असे नामकरण करावे, अशी मागणी शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
    शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. त्यांनी मोदी यांना निवेदन देऊन नामकरण करण्याची मागणी केली.
  महाराष्ट्र शासनाकडून २००५ पासून सातत्याने नामकरणाची मागणी करण्यात येत आहे; परंतु केंद्रशासनाकडून योग्य ती पावले उचलली जात नसल्यामुळे विलंब होत आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या नामकरणासंदर्भातील भावना लक्षात घेऊन आपण लवकर याविषयी कार्यवाही करावी, अशी मागणी खासदार विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी मोदी यांच्याकडे केली.


वर्ष २०१२-१३ मध्ये १ कोटी ६२ लाख लोकांनी आयकर बुडवला !

     नवी देहली - २०१२-१३ या आर्थिक वर्षापर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण २ कोटी ८७ लाख लोकांनी आयकर परतावा दाखल केला आहे. त्यातील केवळ १ कोटी २५ लाख लोकांनी कर भरला, तर १ कोटी ६२ लाख लोकांनी कर भरलेला नाही. त्या वेळच्या लोकसंख्येनुसार हे प्रमाण १ टक्का इतके आहे. प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी केंद्रशासनाच्या मोहिमेतील भाग म्हणून गत १५ वर्षांतील आयकराचा तपशील उघड करण्यात आला आहे.अनुमती न घेता भोंगे लावल्यास कारवाई करावी ! मुंबई उच्च न्यायालय

मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधातील याचिका
हे न्यायालयाला का सांगावे लागते ? शासन स्वत:हून कारवाई का करत नाही ?
     
     मुंबई - नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष पाचलग यांनी ठाणे आणि नवी मुंबई येथील मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर अनेक मुसलमान व्यक्ती आणि संघटना यांनी हस्तक्षेप याचिकाही दाखल केल्या आहेत, त्याचप्रमाणे पुणे येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ते श्री. शैलेंद्र दीक्षित यांच्या वतीने हिंदु विधीज्ञ परिषदेनेही याचिका दाखल केली होती. या वेळी काही मुसलमान हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी असा मुद्दा मांडला की, भोंग्यांसाठी अनुमती मागणारे अर्ज बराच काळ प्रलंबित रहातात. त्यावर न्यायालयाने असे आदेश दिले की, अशा प्रकारचे अर्ज लवकरात लवकर निकाली काढावेत आणि अर्ज प्रलंबित असतांना किंवा अनुमती नसतांनाही लावलेल्या भोग्यांवर कारवाई करावी. अधिवक्ता धनुरे हे श्री. पाचलग यांच्यावतीने काम पहात आहेत.

श्री शंकराचार्य जयंतीनिमित्त श्रीनगर येथील शंकराचार्य टेकडीवर एक भारत बळकट भारतचे दर्शन घडणार

     बेंगळुरू - श्री शंकराचार्य जयंतीनिमित्त ११ मे या दिवशी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर येथील शंकराचार्य टेकडीवरील २ सहस्र ३०० वर्षे जुन्या मंदिराला लोकांनी भेट द्यावी आणि एक भारत बळकट भारतचे दर्शन घडवावे, असे आवाहन देशभरातील लोकांना करण्यात आले आहे. देशाच्या इतर भागांतील लोकांनी काश्मीरला भेट दिल्यास स्थानिक लोकांना राष्ट्रीय ऐक्य साधण्यास उपयुक्त ठरेल. तसेच इतर लोकांचा जम्मू-काश्मीरशी एक भावनिक संबंध प्रस्थापित होईल. ११ मे या दिवशी एकत्र येऊन राष्ट्रासाठी प्रार्थना करूया. भगवान शिव आणि श्री आदिगुरु शंकराचार्य यांच्या कृपाशीर्वादाने सशक्त भारत निर्माण करण्यासाठी कटिबद्ध होऊया, असे आवाहन आयोजक पनींद्रकुमार यांनी केले आहे.

इसिसकडून २ वर्षांत ४ सहस्र १४४ जणांची हत्या

    लंडन - इसिसकडून गेल्या २ वर्षांपासून सिरियामध्ये नरसंहार चालू असून आतापर्यंत ४ सहस्र १४४ जणांची निर्घृण हत्या केल्याची माहिती ब्रिटनमधील मानवाधिकार संघटनेने दिली आहे. सीरियातील हा हिंसाचार संपवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने तातडीने पावले उचलावीत, अशी विनंती करण्यात आली आहे. शिरच्छेद, दगडाने ठेचून मारणे, गोळ्या घालणे, आग लावणे, इमारतींवरून फेकून मारणे अशा पद्धतीने इसिसकडून ४ सहस्र १४४ लोकांची हत्या करण्यात आली. यामध्ये शेकडो महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. सुन्नी आणि कुर्दीश नागरिकांचे तीन मोठे सामूहिक हत्याकांड करण्यात आले. इसिसचा नरसंहार थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने तातडीने हस्तक्षेप करून कारवाई करावी, अशी मागणीही या मानवाधिकार संघटनेने केली आहे.२ सहस्र ४०० पेक्षा अधिक वरिष्ठ अधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचे आरोप ! - केंद्रीय अन्वेषण विभाग

लोकशाहीची निरर्थकता स्पष्ट करणारी आकडेवारी !
भ्रष्टाचार्‍यांवर कठोर कारवाई होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
    नवी देहली - २ सहस्र ४०० पेक्षा अधिक वरिष्ठ राजपत्रित अधिकार्‍यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, असे केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हटले आहे. (अशा अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यासाठी शासन काय करणार, हे शासनाने स्पष्ट केले पाहिजे ! - संपादक) प्रत्येक प्रकरणाचे अन्वेषण पूर्ण करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाला ६ महिने लागतात. काही किचकट प्रकरणामध्ये अन्वेषण पूर्ण करण्यासाठी १ वर्षापेक्षा अधिक काळ लागतो, असे केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक अनिल सिन्हा यांनी संसदीय स्थायी समितीला सांगितले. भ्रष्ट अधिकार्‍यांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ८७ टक्क्यांनी वाढ झाल्याचे सिन्हा यांनी सांगितले. (काँग्रेसच्या काळातील भ्रष्टाचारापेक्षा आताच्या शासनाच्या काळात इतका भ्रष्टाचार वाढला कि तो आता उघडकीस आला ? - संपादक)व्हॅटिकनमध्ये मदर तेरेसा यांच्या मरणोत्तर संतपद बहाल होण्याच्या सोहळ्याला पंतप्रधान मोदी उपस्थित रहाण्याची शक्यता !

मदर तेरेसा यांनी समाजसेवेच्या नावाखाली गरीब हिंदूंचे 
आमिष दाखवून धर्मांतर केले. अशांना संतपद देणारे व्हॅटिकन !
     नवी देहली - पंतप्रधान मोदी यांनी सप्टेंबरमध्ये व्हॅटिकनमध्ये होणार्‍या मदर तेरेसा यांच्या मरणोत्तर संतपद बहाल होण्याच्या सोहळ्याला उपस्थित रहाण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती कॅथलिक्स बिशप्स काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अधिकार्‍यांनी दिली. आम्ही पंतप्रधान मोदी यांना भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची विनंती केली होती. त्यावर आपण या निमंत्रणाचा आदर करत आहोत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे, असे काऊन्सिलचे उपमहासचिव फादर चिन्नायन यांनी सांगितले.
     पोप यांना भारतात येण्याविषयी निमंत्रण देण्यासाठी भारत शासन विशेष अधिकार्‍याला व्हॅटिकनला पाठवणार असल्याचे मोदी यांनी फादर चिन्नायन यांना सांगितले. (हिंदूंच्या एकातरी शंकराचार्यांचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधानांनी गेल्या दोन वर्षांत काही केले असल्याचे ऐकिवात नाही. - संपादक) परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला याविषयी सूचना देण्यात आल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे, असे चर्चच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

अजमेर दर्ग्याच्या दर्शनासाठी लवकरच येईन ! - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्‍वासन

     नवी देहली - अजमेर दर्ग्याचे पीर सय्यद फख्र काजमी चिश्ती यांनी त्यांच्या शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांंच्या लोकसभेतील कार्यालयात भेट घेतली. त्यांनी मोदी यांना दर्ग्याच्या दर्शनासाठी येण्याचे आमंत्रण दिले. काजमी यांना मोदी यांनीच भेटण्यासाठी बोलावले होते. या वेळी मोदींना फेटा आणि शाल भेट देण्यात आली. मोदी यांनी गेल्या महिन्यातच अजमेर शरीफ दर्ग्यावर चढवण्यासाठी चादर पाठवली होती. मोदी यांच्या वतीने केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी ही चादर चढवली होती.

हिंदूंना स्वातंत्र्यापासून आजतागायत धर्मशिक्षण दिले गेले नाही, हे हिंदूंचे दुर्दैवच ! - प.पू. स्वामी परमानंद सरस्वती महाराज, धर्मजागरण समिती, उपाध्यक्ष, धार जिल्हा, मध्यप्रदेश.

उज्जैन सिंहस्थ पर्व विशेष !
उज्जैन सिंहस्थ पर्वक्षेत्री सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे प्रदर्शन
प.पू. स्वामी परमानंद सरस्वतीजी महाराज (डावीकडे)
यांना प्रदर्शन दाखवतांना श्री. विनय पानवळकर
      उज्जैन - हिंदूंना स्वातंत्र्यपासूनच धर्मशिक्षण द्यायला हवे होते; मात्र हे धर्मशिक्षण दिले गेले नाही, हे दुर्दैवी. धर्मशिक्षण नसल्याने आज हिंदु समाज आपापसांत भांडून धर्म आणि राष्ट्र यांची हानी करत आहे, असे प्रतिपादन धर्मजागरण समितीचे धार जिल्हा उपाध्यक्ष प.पू. स्वामी परमानंद सरस्वतीजी महाराज यांनी केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उज्जैन सिंहस्थ पर्वक्षेत्री लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट देण्याच्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी त्यांना प्रदर्शनाची माहिती सांगितली, तसेच पुष्पहार आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला.
क्षणचित्र : धार येथे संत संमेलन आयोजित करण्याचे प.पू. स्वामी परमानंद सरस्वतीजी यांचे नियोजन आहे. त्या वेळी धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन लावण्यासाठी त्यांनी हिंदु जनजागृती समितीला आमंत्रण दिले.

(म्हणे) भारतात २०१५ मध्ये असहिष्णुता वाढली ! - अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोग

इस्लामी राष्ट्रांतील हिंदूंवर आणि काश्मीर, आसाम, केरळ येथील हिंदूंवर गेली अनेक
 वर्षे अत्याचार होत असतांना या आयोगाला ही असहिष्णुता कधी दिसली नाही का ?
     नवी देहली - अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने (युएस्सीआयआर्एफ्ने) दिलेल्या अहवालानुसार, भारतात २०१५ मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करणार्‍या घटनांमध्ये वाढ झाली असून सहिष्णुतेला धक्का लागला आहे. वर्ष २०१५ मध्ये भारतातील धार्मिक स्वातंत्र्य नकारार्थी मार्गावर होते, असेही या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वॉशिंग्टन दौर्‍याच्या एक महिना अगोदर हा अहवाल मांडण्यात आला आहे.
१. धार्मिक समुदायावर अधिकारी आणि नेते यांनी उघडपणे वक्तव्ये केली. यामुळे शासनाला सार्वजनिक स्तरावर नाराजी व्यक्त करावी लागल्याचेही अहवालात म्हटले आले.
२. भारतातील सद्यस्थिती पहाता वर्ष २०१६ मध्ये भारतातील घटनांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार भारताकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे का ? याचा निर्णय घेण्यात येईल.

उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडून ब्राह्मण उमेदवार घोषित होण्याची शक्यता

जातीच्या राजकारणात अडकलेल्या राजकारण्यांमुळे निरर्थक ठरलेली लोकशाही !
     नवी देहली - आसाम, बंगाल, तमिळनाडू, पुड्डूचेरी आणि केरळ या राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल १९ मे या दिवशी घोषित झाल्यानंतर उत्तरप्रदेशात काँग्रेस मोठे संघटनात्मक पालट करणार आहे. त्या राज्यात पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत पक्षातील ब्राह्मण नेत्याला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्याची शक्यता आहे. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष, विधीमंडळ पक्षनेता आणि त्या राज्याच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत दायित्व सांभाळणारा प्रभारी यांना पालटण्यात येणार आहे.
     राज्यातील जातीच्या आणि राममंदिराच्या राजकारणामुळे तेथील काँग्रेसचा पारंपरिक ब्राह्मण मतदार भाजपकडे वळला आहे. त्याला पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठीच काँग्रेस हा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

वसई येथील पाणपोईवरील लिखाण मराठी सोडून अन्य भाषांत !

महाराष्ट्रातील पाणपोईवर मराठी भाषेचा उल्लेखच नसणे, 
यातूच मराठी भाषेला आलेली उतरती कळा प्रतीत होते !
पाणपोईवरील हिंदी, इंग्रजी आणि पलीकडच्या बाजूला उर्दू भाषेत लिहिलेला मजकूर
      वसई - येथील पोलीस ठाण्याच्या समोर बांधण्यात आलेल्या पाणपोईवर तिन्ही बाजूंवर अनुक्रमे हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषांमध्ये लिहिण्यात आला आहे; मात्र मराठी भाषेचा कोठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. (मराठीप्रेमींनो, महाराष्ट्रात सर्वत्र मराठी भाषेचाच उल्लेख केला जावा, यासाठी कृतीशील व्हा ! - संपादक)

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांची संख्या अल्प; मात्र स्थानिक देशद्रोह्यांमुळे अजूनही भयावह स्थिती !

  • प्रत्येक शुक्रवारी नमाजानंतर पाकचे झेंडे फडकवणार्‍यांना रोखू न शकणारे राज्यातील आणि केंद्रातील राज्यकर्ते ही स्थिती पालटतील, अशी हिंदूंनी अपेक्षा ठेवू नये, हेही तितकेच खरे ! 
  • काश्मीरमधील देशद्रोह्यांवर कारवाई करण्यासाठी राज्यशासन आणि केंद्रशासन कधी प्रयत्न करणार ? 
  • काँग्रेसच्या काळात त्यांना पाठीशी घातले गेले, तेच आता सध्याच्या शासनाकडूनही केले जाणार आहे का ?
    श्रीनगर - काश्मीर खोर्‍यात आता जवळपास २०० आतंकवादी शिल्लक आहेत. विशेषकरून आतंकवादी दक्षिण काश्मीरच्या भागात आहेत. केवळ २०० आतंकवादी शिल्लक असूनही काश्मीर खोर्‍यात भीतीचे सावट आहे. स्थानिकांकडून करण्यात येणारे आतंकवाद्यांचे समर्थन ही येथील सर्वांत मोठी समस्या आहे. श्रीनगरमधील एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार दाट लोकसंख्या असलेल्या भागात जर कोणता आतंकवादी लपला असेल, तर त्याच्यावर कारवाई करण्यापूर्वी मी १० वेळा विचार करेन. शक्य झाले तर त्याला सोडूनही देईन; कारण मला केवळ त्या आतंकवाद्याविरुद्धच लढावे लागणार नसून स्थानिकांच्या विरोधालाही सामोरे जावे लागणार आहे. आतंकवाद्यावर कारवाई केली तर लोक रस्त्यावर उतरून आमच्यावर दगडफेक करतील.

गेल्या २६ वर्षांत काश्मीरमध्ये १४ सहस्र नागरिक ठार, तर ५ सहस्र सैनिक हुतात्मा !

नागरिक आणि सैनिक यांच्या मृत्यूला तत्कालीन कणाहीन काँग्रेसी राज्यकर्तेच उत्तरदायी आहेत ! 
आताचे केंद्रशासन जर ही समस्या सोडवू शकले नाही, तर तेही काँग्रेसच्या 
बरोबरीने याला उत्तरदायी असतील ! 
     श्रीनगर - गेल्या २६ वर्षांत काश्मीर आणि जम्मूमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणांत १४ सहस्र नागरिक ठार झाले, तर ५ सहस्र सैनिक हुतात्मा झाले, अशी माहिती गृहमंत्रालयाने सिद्ध केलेल्या अहवालात दिली आहे; मात्र मानवाधिकार संस्था आणि फुटीरवादी संघटना यांच्या मते गेल्या २६ वर्षांत काश्मीर आणि जम्मूमध्ये झालेल्या आतंकवादी घटनांत १ लक्ष नागरिक ठार झाले.
१. गेली २७ वर्षे जम्मू आणि काश्मीरमध्ये हिंसेचा डोंब उसळला आहे. आतंकवाद्यांचे थैमान १९८९ पासून चालू आहे. 
२. गृहमंत्रालयाच्या अहवालानुसार या आतंकवादास भारत आणि पाकिस्तान यांच्यात असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमा आणि प्रत्यक्ष ताबा रेषा येथून होणारी आतंकवाद्यांची घुसखोरीच उत्तरदायी आहे.

स्वतःच्या विवाहाच्या निमित्ताने धर्मशिक्षणाचा प्रसार करणारे भोर येथील श्री. समीर घोडेकर !

      भोर (जिल्हा पुणे) - येथील भारतीय जनता युवा मोर्च्याचे भोर तालुका सरचिटणीस श्री. समीर घोडेकर त्यांच्या विवाहाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी सनातनच्या साधिका सौ. रुक्मिणी जाधव यांच्या घरी आले होते. सौ. जाधव यांनी त्यांना सनातनने प्रकाशित केलेल्या विवाह संस्कार या लघुग्रंथाची माहिती दिली, तसेच सद्यस्थितीला धर्मशिक्षण आणि धर्माचरण यांची आवश्यकता लक्षात घेता लग्नकार्याच्या माध्यमातून धर्मप्रसार करू शकतो, असे सुचवले. त्यावर श्री. समीर घोडेकर यांनी लगेचच १०० विवाह संस्कार लघुग्रंथ आणि १०५ विवाह संस्कार स्मरणिका खरेदी केल्या. विवाहात येणार्‍या धर्मप्रेमी व्यक्तींना लघुग्रंथ आणि स्मरणिका भेटस्वरूपात देणार असल्याचे त्यांनी सांगितले. (धर्मप्रसाराची संकल्पना त्वरित कृतीत आणणारे श्री. समीर घोडेकर यांचे अभिनंदन ! - संपादक)

सिंधुदुर्ग पोलीसदलाने जनतेच्या सुरक्षेसाठी बनवले अ‍ॅप !

     सिंधुदुर्ग - महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सिंधुदुर्ग पोलीसदलाने एफ्.आय.आर्. (FIR) नावाचे अ‍ॅप (संगणक प्रणाली) सिद्ध केले आहे. गंभीर गुन्ह्यांना पायबंद घालण्यासह जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, हा या अ‍ॅपचा उद्देश आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले. शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अ‍ॅपचा लोकार्पण सोहळा २९ एप्रिल या दिवशी जिल्हा पोलीस मुख्यालयात झाला. सध्या मुली आणि महिला यांची सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा अन् संवेदनशील विषय आहे. या सुरक्षेसह वृद्ध व्यक्ती आणि बालके यांनाही ते संकटात असतांना तात्काळ साहाय्य करता यावे, हाही हे अ‍ॅप बनवण्यामागील हेतू आहे.

काँग्रेसचे माजी खासदार अभिनेता गोविंदा यांनी घेतले होते दाऊदचे साहाय्य ! - राम नाईक यांचा आरोप

राम नाईक १२ वर्षांनंतर हे का बोलत आहेत ? 
त्याच वेळी त्यांनी हे का सांगितले नाही ? केंद्रात आणि महाराष्ट्रात 
त्यांच्याच पक्षाचे शासन आहे, तर त्यांनी याची चौकशी करण्यास सांगून सत्य समोर आणावे ! 
     लक्ष्मणपुरी - २००४ च्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला पराभूत करण्यासाठी काँग्रेस उमेदवार अभिनेता गोविंदा यांनी कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम आणि वसई-विरारमधील माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचे साहाय्य घेतले होते, असा आरोप उत्तरप्रदेशचे राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी केला आहे. हा पराजय आपण पचवू शकलो नव्हतो, असेही त्यांनी प्रांजळपणे मान्य केले. 

फुटीरतावादी पाकशी चर्चा करू शकतात ! - भारत

पाकविषयी धरसोड वृत्ती सोडून आतातरी काश्मीरचा प्रश्‍न कायमचा 
निकालात काढावा, अशी राष्ट्रप्रेमी जनतेची अपेक्षा आहे ! 
फुटीरतावाद्यांविषयी भारताचे गांधीगिरीचे धोरण !
     नवी देहली - काश्मीरप्रकरणी पाकिस्तानी नेत्यांशी चर्चा करण्यास फुटीरतावादी नेत्यांना प्रतिबंध करणार्‍या मोदी शासनाने यासंदर्भात आता सौम्य धोरण स्वीकारल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी संसदेत दिलेल्या लिखित उत्तरात परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि काश्मीरचे फुटीरतावादी नेतेही भारतीय नागरिक आहेत. त्यामुळे ते कोणत्याही देशाच्या प्रतिनिधींशी चर्चा करू शकतात, असे म्हटले आहे. सिमला करार आणि लाहोर घोषणा यांना अनुसरून भारत-पाक चर्चेच्या वेळी कोणताही तिसरा पक्ष असणार नाही, असेही सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

२० पत्रकारांमध्ये वाटले गेले ५० कोटी रुपये !

पत्रकारिता विकाऊ झाली आहे, हे आतापर्यंत केवळ म्हटले जात होते, आता ते प्रत्यक्ष समोर येऊ 
लागले आहे. असे पत्रकार हिंदूंच्या विरोधात बोलण्यासाठीही पैसे घेतात, असा हिंदूंचाही संशय आहे ! 
देश आणि धर्म द्रोही पत्रकारांना कठोर शिक्षा देऊन कारागृहात डांबले पाहिजे !
ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी लाच प्रकरण
    नवी देहली - ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यामधील कादगपत्रांद्वारे आता यात २० पत्रकारांनाही ५० कोटी रुपये वाटण्यात आल्याचे समोर आले आहे. या पैशांतून प्रसारमाध्यमांनी या विरोधात तोंड बंद ठेवण्यासाठी ही रक्कम वाटण्यात आली. 
   भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी आरोप केला आहे की, ख्रिश्‍चियन माइकल नावाच्या मध्यस्थाने हे पैसे वाटले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि कोणत्या पत्रकारांनी पैसे घेतले ते समोर आणले पाहिजे.

(म्हणे) इटलीच्या खलाशाला मायदेशात पाठवा ! - आंतरराष्ट्रीय न्यायालय

भारताच्या सीमेत येऊन भारतीय नागरिकांना ठार करणार्‍या विदेशी खलाशांविषयी 
आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या नव्हे, तर भारताच्या न्यायालयाचा निर्णय अंतिम असेल ! 
      रोम / नवी देहली - हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारतात अटक झालेल्या इटलीच्या खलाशाला खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत मायदेशी पाठवण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती इटलीच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली. न्यायालयाच्या आदेशाला इटली चुकीच्या पद्धतीने सादर करत आहे, असा आरोप भारताने केला आहे. इटलीच्या खलाशाला सोडण्याचा आदेश देण्यात आलेला नाही, तसेच त्याच्या जामीनाचा निर्णय भारतातील सर्वोच्च न्यायालय घेईल, असेही शासनाने म्हटले आहे. 
       केरळच्या किनार्‍यावर २०१२ मध्ये २ भारतीय मच्छीमारांना गोळ्या घालून त्यांचा खून केल्याचा आरोप मैसिमिलियानो लाटोर आणि सल्वाटोर जिरोन या इटलीच्या २ खलाशांवर आहे. २०१२ मध्ये त्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती. आरोग्याच्या कारणामुळे मैसिमिलियानो याला यापूर्वीच इटलीला पाठवण्यात आले आहे.अबकारी कराला मद्रास उच्च न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती

सुवर्ण व्यवसायावर लागू केलेल्या अबकारी कराचे प्रकरण
     नगर - केंद्र शासनाने सुवर्ण व्यवसायावर लागू केलेल्या अबकारी करास मद्रास उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. कोईम्बतूर सराफ संघटनेने मद्रास उच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवर २९ एप्रिल या दिवशी सायंकाळी अबकारी करास ३ जूनपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचा सराफ संघटनांनी स्वागत केले आहे.
     केंद्र शासनाने देशातील सराफ सुवर्णकार व्यवसायावर अबकारी कर लावण्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला होता़. या निर्णयाच्या विरोधात सर्व सराफ व्यावसायिकांनी विरोध करत ४५ दिवस संपाद्वारे आंदोलन केले होते.

श्री समर्थ सद्गुरु धोंडीराज महाराज यांच्या १०८ व्या पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ !

     पलूस (जिल्हा सांगली) - येथील पंचक्रोशीतील थोर संत श्री समर्थ सद्गुरु धोंडीराज महाराज यांच्या १०८ व्या पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ झाला आहे. २८ एप्रिलपासून अन्नदान सेवा प्रारंभ झाली असून बुधवार, ४ मे या दिवशी महाप्रसाद होत आहे. १४ मे या दिवशी दुपारी २.३० ते सायंकाळी ७ या वेळेत रथोत्सोव दिंडी सोहळा होईल, तर १५ मे या दिवशी समाधी पुण्यतिथी सोहळा होईल. उत्सव काळात पहाटे ५ ते ६ प्रतिदिन काकडा, गाथा वाचन, भजन, हरिपाठ, प्रतिदिन सायंकाळी ६ ते ७.१५ प्रवचन, नामावली, तसेच रात्री नामसंकिर्तन असे नैमित्तिक कार्यक्रम होतील.

महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणार्‍या श्रीहरि अणे यांच्यावर खटला प्रविष्ट करा ! - मनसेची वाहनफेरीद्वारे मागणी

     सांगली, ३ मे (वार्ता.) - देशात देशविरोधी वक्तव्य करणार्‍यांवर देशद्रोहाचा खटले दाखल करण्यात येतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणारे अधिवक्ता श्रीहरि अणे यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला प्रविष्ट करावा, अशी मागणी मनसेचे नेते आणि माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी केले. महाराष्ट्र अखंडच राहिला पाहिजे, या मागणीसाठी मनसेच्या वतीने १ मे या दिवशी शहरातून दुचाकीफेरी काढण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते. 
     या वेळी अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, सुनिता इनामदार, सर्वश्री आदित्य पटवर्धन, प्रियानंद कांबळे, रोहित घुबडे-पाटील, स्वप्नील शिंदे, चेतन भोसले, स्वप्नील कुंभोजकर, तसेच अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्राचा केक कापल्याविषयी श्रीहरि अणेंनी मागितली क्षमा

महाराष्ट्रद्रोह करून आता क्षमा मागण्याचे नाटक करण्याऐवजी 
वेगळ्या विदर्भाची भूमिका त्यागून अणे खरीखुरी क्षमा मागतील का ? 
     नागपूर - वाढदिवसाला महाराष्ट्राच्या आकाराचा केक कापणारे राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरि अणे यांनी क्षमा मागितली आहे. हे कृत्य करायला नको होते, असे म्हणत राज्यातील नागरिकांच्या भावना दुखावल्या असल्यास मी क्षमा मागतो, अशी प्रतिक्रिया दिली. 

(म्हणे) शासनाची धोरणे समजून न घेतल्यामुळे आपल्या माणसांकडून समस्या निर्माण होतात !

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचा विविध कार्यक्रमांत भाभासुमंच्या पदाधिकार्‍यांना अप्रत्यक्ष टोला 
     पणजी, ३ मे (वार्ता.) - भाजपला समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन गोव्याचा विकास साधायचा आहे. अहंकारामुळे आपलीच माणसे सारासार विचारांअभावी शासनाची दूरगामी धोरणे समजून घेऊ शकत नाहीत. विनाकारण लढण्याची खुमखुमी, अहंकार आणि कोत्या मानसिकतेमुळे अशा लोकांकडून विनाकारण समस्या निर्माण केल्या जातात, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर साळ, डिचोली येथे जलप्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमात भाभासुमंच्या आंदोलनांचा उल्लेख न करता म्हणाले. (शासनाची माध्यमप्रश्‍नासंदर्भातील धोरणे पहाता ती विकासाची नाहीत, तर दूरगामी दुष्परिणाम करणारी आहेत. त्यामुळेच शासन आपलेच असूनही भाषाप्रेमींवर आंदोलने करण्याची वेळ आली आहे ! शासनाने राजकीय ताळेबंद बाजूला सारून तज्ञांचे मत घेऊन योग्य निर्णय घेतल्यास भाषाप्रेमी कशाला आंदोलने करतील ? - संपादक)

सौरमालेबाहेरील जीवसृष्टी अस्तित्वात असलेल्या ३ ग्रहांचा शोध !

हिंदु धर्मानुसार अनंत कोटी ब्रह्मांडे असून त्यात पृथ्वीप्रमाणे जीवसृष्टी अस्तित्वात आहे, हे 
आधीच सांगितले आहे. त्याचे अस्तित्व पहाण्यासाठी साधना करून 
आध्यात्मिक उन्नती केली पाहिजे !
     पॅरिस - नेचर या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या संशोधनानुसार आपल्या सौरमालेच्या बाहेर जीवसृष्टी अस्तित्वात आहे का, याचा शोध घेणार्‍या आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या पथकाला जीवसृष्टीस अनुकूल असलेल्या आणि पृथ्वीशी साधर्म्य असणार्‍या ३ ग्रहांचा शोध लागला आहे. आपल्या सौरमालेपासून ३९ प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका अतिशीत लहान तार्‍याच्या भोवती हे तीन ग्रह परिभ्रमण करत असून आकार आणि तापमान या दोहोंच्या बाबतीत ते पृथ्वी आणि शुक्र यांच्यासारखे आहेत.

मराठवाड्यातील धरणांत केवळ २ टक्के पाणीसाठा

लोकहो, वाढत्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी साधना करा !
     मुंबई - मराठवाड्यातील धरणांत केवळ २ टक्के पाणीसाठा राहिला आहे. या भागामधील एकूण ११ धरणांपैकी ८ धरणांमधील पाणीसाठा हा नगण्य (मृतसाठा) असून धरणांमध्ये साठलेल्या पाण्यास बाहेर उपसून काढण्याची वेळ ओढवली आहे. मराठवाड्यातील मांजरा आणि लोअर तेरणा ही धरणे पूर्णत: कोरडी झाली आहेत. मराठवाड्यात गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा दुष्काळ पडला आहे.

फलक प्रसिद्धीकरता

रोहित वेमुलाप्रकरणी केंद्रशासनाला वेठीस धरणारे काँग्रेसी आता कुठे गेले ?
     काँग्रेसचे राज्य असलेल्या केरळमधील पेरुंबवूर येथे एका दलित विद्यार्थिनीवर भरदिवसा बलात्कार करून तिची क्रूर हत्या करण्यात आली. कोणतेही राजकीय नेते किंवा कार्यकर्ते आमच्या साहाय्यासाठी पुढे आले नाहीत, अशी व्यथा पीडितेच्या नातेवाइकांनी मांडली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Congress shasit Keralme dalit yuvatipar balatkaar kar uski nrushansa hatya ki gai.
     Rohit Vemula prakaranpar rajneeti karnewale ab chup kyon hain ?
जागो !
: कांग्रेस शासित केरल में दलित युवती पर बलात्कार कर उसकी नृशंस हत्या की गई.
     रोहित वेमुला प्रकरण पर राजनीती करनेवाले अब चुप क्यों हैं ?

स्वतंत्र मराठवाड्याची भूमिका घेणारे स्थापन करणार 'मराठवाडा जनता पक्ष'

राज्याची शकले पाडण्याची भूमिका घेणारे देश एकसंध काय राखणार ? 
     लातूर, ३ मे - 'स्वतंत्र मराठवाडा हवा', अशी भूमिका घेणारे आंदोलक संग्राम मोरे यांनी 'मराठवाडा जनता पक्ष' नावाचा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचे सांगितले. 'स्वतंत्र मराठवाडा'च्या मागणीसाठी येथील गांधी चौकात मोरे यांच्या नेतृत्वाखाली ३ मे या दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. 

अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या बैठकीत तृप्ती देसाईंवर कारवाई करण्याचा ठराव

     ठाणे - २८ एप्रिल या दिवशी अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाची प्रदेश कार्यकारिणी बैठक येथे ठाणे येथे पार पाडली. सर्व महाराष्ट्रातून आमंत्रित पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत विविध ठराव संमत करण्यात आले. महासंघाचे प्रवक्ते श्री. दिलीप अलोणी यांनी उच्च न्यायालयाच्या मंदिर प्रवेश निर्णय रहित करण्याविषयी मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकेविषयी त्यांचे अभिनंदन करण्यात आले. 

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे एक दिवसाआड पाणी अन् २५ प्रतिशत पाणीकपात

     पिंपरी, ३ मे - मावळच्या कुशीत वसलेल्या पवना धरणामुळे मुबलक पाणी मिळणार्‍या पिंपरी-चिंचवड शहरालाही यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा फटका बसला आहे. धरणातील पाण्याची उपलब्धता लक्षात घेता सध्या एक दिवसाआड पाणी देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी ३ मे पासून लागू झाली आहे. त्या पाठोपाठ एकूण २५ प्रतिशतपर्यंत पाणीकपात करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे भरपूर पाण्याचा वापर करण्याची सवय असलेल्या पिंपरी-चिंचवडकरांना आता पाण्याची काटकसर करावीच लागणार आहे. 

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या सोलर स्टीम कुकिंग प्रकल्पाला अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाकडून पुरस्कार !

     शिर्डी - येथील श्री साई प्रसादालयावर संस्थानाकडून उभारण्यात आलेल्या सोलर स्टीम कुकिंग प्रकल्पाला केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाकडून २९ एप्रिलला अपारंपरिक केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. पर्यावरणास पूरक आणि अपारंपरिक ऊर्जावापराचा हा देशातील सर्वांत मोठा प्रकल्प ठरला आहे.
      या प्रकल्पामुळे प्रतिदिन २ सहस्र ८०० किलो वाफ तयार होते आणि त्याद्वारे २० सहस्र साईभक्तांसाठी २ टन भात आणि डाळ शिजवण्यात येते. तसेच यामुळे १ लाख किलो एल्.पी. गॅसची बचत झाली असून संस्थानाची ६० लाख रुपयांची बचत झाली आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष बाजीराव शिंदे यांनी दिली.

शत्रूराष्ट्रांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय नौसेनेची नवीन युद्धनौका कलवरी सिद्ध !

     मुंबई - भारतीय नौदलातील स्कॉर्पीन या वर्गातील ६ युद्धनौकांपैकी पहिली आयएन्एस् कलवरी या नावाची युद्धनौका १ मे या दिवशी मुंबईतील समुद्रात चाचणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती भारतीय नौदल प्रमुख आर्.के. धवन यांनी दिली. ही युद्धनौका पाकिस्तान तसेच चीनच्या सागरी क्षेत्रात टेहळणी करणार आहे. कलवरीची निर्मिती ही आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असून याच प्रकारातील आणखी ५ युद्धनौका आगामी ९ महिन्यांच्या काळात समुद्रात सोडल्या जातील, असे धवन यांनी सांगितले.

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून झाले पाहिजे, असा जागतिक सिद्धांत असूनही गोवा फॉर्वर्ड पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर तिंबले म्हणतात, काळानुसार मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण हा सिद्धांत कोणावरही लादणे शक्य नाही !

     पणजी - मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण हा जागतिक सिद्धांत आहे, हे खरे आहे; परंतु पालटत्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत हा सिद्धांत कोणावरही लादणे शक्य नाही, असे मत गोवा फॉर्वर्ड पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर तिंबले यांनी माध्यमप्रश्‍नावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना केले. तिंबले पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी कोणत्या माध्यमातून शिक्षण घ्यावे, हा पालकांचा अधिकार आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांचे अनुदान रहित करा, अशी मागणी गोवा फॉर्वर्ड पक्ष करणार नाही. शाळांचा दर्जा वाढवल्यास माध्यमप्रश्‍नच उद्भवत नाही. उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण कोणत्याही भाषेत देणारी शाळा असल्यास पालक आपल्या पाल्यांना त्या शाळेत पाठवतात. (जनतेला काय आवश्यक (कशात हित आहे ते) ते देणारे नेते हवेत. जनता मागते ते योग्य आहे, असे म्हणणारे पक्षाचे नेते समाजसुधारणा काय करणार ? - संपादक) भाभासुमंने आरंभलेल्या आंदोलनावर मुळीच विश्‍वास नाही, असे ते पुढे म्हणाले.
गोव्यात परतण्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री पर्रीकर यांचे संकेत

     डिचोली - केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी साळ येथे १ मे या दिवशी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलतांना होय, मी परत येतोय असे सांगत केंद्रीय दायित्वातून मुक्त होऊन गोव्याच्या राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय भाषा सुरक्षा मंच यांनी प्राथमिक शिक्षणावरील माध्यमप्रश्‍नावरून भाजप विरोधात छेडलेल्या जनआंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी उपरोल्लेखित संकेत दिले आहेत. आगामी चार मासांत कधीही केंद्रीय मंत्रीमंडळात खातेपालट होण्याची शक्यता आहे. भाभासुमंने राज्यात ठिकठिकाणी आयोजित केलेल्या जाहीर सभांना मातृभाषाप्रेमींच्या मोठ्या प्रमाणावर लाभणार्‍या उपस्थितीमुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरलेली आहे. गोव्यात भाजपचे अस्तित्व टिकवण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री पर्रीकर यांनी गोव्याची धुरा परत सांभाळणे आवश्यक आहे, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घालणार का ?

      पुणे शहर असो वा भारतातील कोणतेही शहर वा ग्रामीण भाग असो, पान, तंबाखू किंवा राज्यात बंदी असलेला गुटखा खाऊन तोंडात भरलेला तोबरा किंवा गुळणी ही बाहेर थुंकतांनाचे चित्र सर्रास दिसते. एवढेच नव्हे, तर रस्त्यावरून येता-जाता त्या थुंकीचे थेंब अंगावर उडण्याचा अनुभव शहरात तर हमखास येतोच. शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये यांच्या वर्गातील कोपरे, चित्रपटगृहे, निवासी इमारती, उड्डाणपूल यांच्या भिंती, बसथांबे, रेल्वेस्थानक, पानाच्या टपर्‍या या सर्व ठिकाणी गुटखा आणि पान खाऊन थुंकलेले सर्रास आढळणारच. त्यातही पुढे जाऊन सांगायचे, तर येथे घाण करू नये अथवा थुंकू नये, असे लिहिलेली पाटी असेल, तर तेथे हमखास थुंकलेले आढळणारच. या सर्वामुळे रस्ते, भिंती, झाडाचे कठडे हे सर्व लाल भडक रंगाने रंगले गेले आहेत. असे विदारक चित्र हे पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीला आणि महान इतिहास लाभलेल्या आपल्या देशालाही शोभणारे निश्‍चितच नाही. त्यामुळेच पुण्यात थुंकण्याच्या विरोधात काही सामाजिक संघटनांनी मोहीम चालू केली आहे.

मुंबईसारख्या राजधानीच्या शहरात अवैध बांधकाम होते; म्हणजे भारतात शासन अस्तित्वात नाही !

     कुलाबा, मुंबई येथील आदर्श सोसायटीपाडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २९ एप्रिल २०१६ या दिवशी दिला. पर्यावरणाविषयीच्या नियमांचे उल्लंघन करून ही इमारत का बांधण्यात आली ? असा प्रश्‍नही न्यायालयाने विचारला. यापूर्वी वर्ष २०११ मधेही केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने आदर्श सोसायटी ही सीआर्झेडच्या (केंद्रीय राखीव क्षेत्राच्या) नियमांचे उल्लंघन करून बांधल्याचा ठपका ठेवत ती पाडण्याचा आदेश दिला होता.

न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणारे कारागृह प्रशासन !

     कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड यांना अतीसुरक्षा विभागाच्या (अंडासेलच्या) बाहेर इतर कैद्यांशी मनमोकळेपणाने बोलण्यासाठी न्यायालयाने यापूर्वी दुपारी १२ ते ३ अशी वाढीव वेळ दिली होती; मात्र कळंबा कारागृहातील पोलीस अधिकारी आवळे यांनी चार भिंतींच्या आतच समीर गायकवाड याला ठेवा. त्याला दुपारी बाहेर सोडू नका, असे तेथील पोलीस कर्मचार्‍यांना सांगून ठेवले.

कायदाद्रोही महाराष्ट्र शासन !

     एम्.आर्.टी.पी. कायदा, तसेच अन्य संबंधित कायद्यांचा विचार करता बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याचा राज्यशासनाचा प्रस्तावच अवैध असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हे धोरण आखण्यापूर्वी शासनाने इम्पॅक्ट अ‍ॅसेसमेंट स्टडी केला आहे का ? शहरांच्या नागरी सुविधांवर याचा किती परिणाम होईल, याचा विचार केला का ?, असे प्रश्‍न उच्च न्यायालयाने उपस्थित केले.

उज्जैन येथील प्रसिद्ध पंचक्रोशी यात्रेला भाविकांचा लाखोंच्या संख्येने प्रतिसाद !

      उज्जैन, ३ मे (वार्ता.) - पुराणकाळापासून अत्यंत महत्त्व असलेल्या पंचक्रोशी यात्रेला उज्जैनमध्ये प्रारंभ झाला असून प्रतिदिन लाखोंच्या संख्येने भाविक उज्जैनला येत आहेत. भाविकांची भगवान नागचाद्रेस्वर मंदिराजवळ निघालेली मिरवणूक सायंकाळ होण्यापूर्वी १२ किलोमीटरवर असलेल्या श्री पिंग्लेश्‍वर महादेव मंदिराजवळ पोचली. या पहिल्या टप्प्यात जवळजवळ २ लाख ५० सहस्त्र भाविक रात्री १२ पर्यंत पोहोचले होते.

उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने बालवाचकांसाठी विशेष सदर !

सुट्टीतील परिपाठ !
   सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी लागली आहे. या सुट्टीचा कालावधी त्यांच्यात विविध गुणांची जोपासना होण्यासाठी वापरला जावा, असे आम्हाला वाटते. येथे विविध कथा, लेख आणि चित्रे यांद्वारे बालसाधकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 
शरीर निरोगी राखण्यासाठी काय करावे ?
    मुलांनो, निरोगी अन् बलवान शरीरसंपदा, हा एक अलंकार आहे. शरीर निरोगी असेल, तरच तुम्ही अभ्यास नीटपणे करू शकाल, सहलीला जाऊ शकाल किंवा खेळांच्या स्पर्धांत भाग घेऊ शकाल. लोकमान्य टिळक आणि स्वा. सावरकर यांनी शरीर बलवान होण्यासाठी विद्यार्थीदशेतच विशेष प्रयत्न केले होते. त्यामुळेच ते अनुक्रमे मंडाले आणि अंदमान येथील जीवघेणा कारावास भोगून मायदेशी सुखरूप परत आले. शरीर निरोगी अन् बलवान राखण्यासाठी पुढे सांगितल्याप्रमाणे वर्तन ठेवावे.

सत्य कधीही पराजित होत नाही !

      वर्ष २००४ मधील ऐन दिवाळीचा दिवस. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या कांची कामकोटीचे पीठाधीश्‍वर स्वामी जयेंद्र सरस्वतीजी आणि त्यांचे शिष्य विजयेंद्र सरस्वतीजी या दोघांना खुनाच्या आरोपाखाली अटक करून कारागृहात डांबण्यात आले. देशभर संतापाची लाट पसरली. कित्येक प्रेश्यांनी (प्रेश्या म्हणचे नैतिक अधःपतन झालेल्या प्रसारमाध्यमांसाठी सोशल मीडियावर वापरला जाणारा वेश्या या शब्दासाठीचा प्रेस या शब्दावरून बनवलेला समानार्थी शब्द) हाच कळीचा मुद्दा बनवला होता. न्यायालयाची प्रक्रिया चालू होण्यापूर्वीच प्रेश्यांचे न्यायदान चालू झाले होते.

उगाचच सैराटच । उठवू नका रान ॥

सैराट सुटलेल्या पिढीला ।
गरज आहे संस्काराची ।
टाईमपाससाठी आयुष्य नाही ।
हे कान धरून सांगायची ॥
बालक पालकच जेव्हा ।
नको ते पहातात ॥
अभिव्यक्तीच्या नावाखाली ।
मूल्ये पायदळी तुडवतात ।
आयुष्याचा सिनेमा होतोय ।
लक्षात कुणी घेत नाही ॥
पुरस्काराच्या लेबलवर ।
सारं काही खपून जाई ॥
तुमचा होतो खेळ ।
पण आमचा जीव जातो ॥
मिसरूड फुटण्याआधी ।
पोरगा जीव देतो ॥
क्रांतिगीते ज्यांनी गावीत ।
ती झिंगाटवर नाचतात ॥
देशासाठी ज्यांनी मरावं ।
ती पोरींवर मरतात ॥
नवसाच्या लेकी ।
फँड्रीमागे उधळतात ॥
माकडाच्या हाती ।
मोती अलगद लागतात ॥
प्रेम हेच जगणं ।
प्रेम हेच मरणं ॥
प्रेमासाठी आईबापाचं ।
तोंड काळं करणं ॥
म्हणे आम्ही सुधारलो ।
संगणक युगात आलो ॥
कमरेचे सोडून डोक्याला ।
हेच सांगू लागलो ॥
आग लागली दुसरीकडे ।
या भ्रमात राहू नका ॥
घरातल्या तरुणाईकडे ।
दुर्लक्ष मात्र करू नका ॥
ज्या त्या वयात ।
हे सार शोभून दिसतं ॥
आजकाल मात्र ।
कळीआधीच फूल उमलतं ॥
आपल्या संस्कृतीचे ।
ठेवा जरा भान ॥
उगाचच सैराटच ।
उठवू नका रान ॥
- श्री. संजय तांबे पाटील, संभाजीनगर
(संदर्भ : व्हॉट्स अ‍ॅपवर आलेली कविता )
दैनिक सनातन प्रभातचा रंगीत स्त्रीशक्ती विशेषांक
प्रसिद्धी दिनांक
: ८ मे २०१६
पृष्ठ संख्या : १० मूल्य : ५ रुपये
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी ७ मे या दिवशी दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !

सिग्नलमधील पिवळ्या रंगाचा विरोधी अर्थ

     वाहतूक नियंत्रणासाठी शहरात चौकाचौकात लाल, पिवळा आणि हिरवा या रंगांच्या दिव्यांचे सिग्नल लावलेले असतात. त्यामध्ये लाल रंगांचा दिवा वाहनांना थांबण्याचे, तर हिरवा रंग पुढे जाण्याचे सूचित करतो. पिवळा रंग वाहनाची गती कमी करण्याचे सूचित करतो. प्रत्यक्षात मात्र पिवळ्या दिव्यानंतर लागणार्‍या लाल दिव्यामुळे थांबावे लागू नये म्हणून वाहनचालक कमी वेगाने नाही, तर अतिवेगाने वाहन चालवतात. त्यामुळे पिवळा दिवा वाहन हळू चालवण्यासाठी (Go Slow) आहे कि वाहन वेगाने हाकण्यासाठी (Go Fast) आहे, असाच प्रश्‍न होतो.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
     हिंदूंनो, आपल्यासमोर गांधी, नेहरू आणि सर्वपक्षीय राजकारणी यांचा आदर्श नको, तर धर्म अन् राष्ट्र यांसाठी त्याग केलेले छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, छत्रपती संभाजी महाराज, गुरु गोविंद सिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी धर्माभिमान्यांचा आदर्श हवा !

हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी धर्मशिक्षणाचे महत्त्व !

     धर्मशिक्षणाने कृती, म्हणजे साधना होईल, साधनेने अनुभूती येतील, अनुभूतींनी श्रद्धा वाढेल, श्रद्धेने अभिमान वाढेल, अभिमानाने संघटन वाढेल, संघटनाने संरक्षण निर्माण होईल व त्यानेच हिंदुराष्ट्राचे निर्माण आणि पोषण होईल ! - डॉ. दुर्गेश सामंत, माजी संपादक, सनातन प्रभात नियतकालिक समूह.

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

     हिंदुस्थानात मुसलमान समाज वर्ष १९५१ मध्ये १०.४ टक्के होता, तो आज १४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, तर हिंदु समाज १९५१ मध्ये ८७.२ टक्के होता, तो २००१ मध्ये ८१.५ टक्के इतका अल्प झाला आहे. एकातरी राजकारण्याची मुसलमानांना कुटुंब नियोजन करण्यास सांगण्याची हिंमत आहे का ?
- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस (क्रमश:)

गुरुदेवांवर अपार श्रद्धा असणारे आणि इतरांमध्येही तशीच श्रद्धा निर्माण करणारे श्री. शिवानंद प्रभु !

श्री. शिवानंद प्रभु
१. साधनेला प्राधान्य देणे
        श्री. शिवण्णा (शिवानंद प्रभु) आधीपासूनच अधिकाधिक वेळ धर्मप्रसारासाठीच प्राधान्याने देतात. ते अधिक वेळ व्यवहारात असूनही त्यांच्या मनात येणारा प्रत्येक विचार आणि जीवनाचा प्रत्येक क्षण गुरुकार्याशी जोडण्याचा प्रयत्न करतात. ते मलाही सेवेला अधिक वेळ मिळावा; म्हणून सहकार्य करतात. मला कधी काही विकल्प आले, तर योग्य दृष्टीकोन देऊन साधनेला प्राधान्य द्यायला सांगतात. ते धार्मिक कार्यक्रमाला गेल्यावर तेथे धार्मिक विचाराला महत्त्व देऊन तिथे असणार्‍यांना त्याचे महत्त्व समजावून सांगतात.
२. गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून 
जीवनातील घटनांचा स्वीकार करणे
       श्री. शिवण्णा यांची गुरुदेवांवर दृढ श्रद्धा आहे. ते जीवनात घडणारी प्रत्येक घटना स्थिर राहून ईश्‍वरेच्छा म्हणून स्वीकारतात. ते मलाही प्रत्येक प्रसंगात स्थिर रहाण्यास सांगतात. माझ्यातही श्रद्धा वाढावी म्हणून प्रोत्साहन देतात.

आध्यात्मिक उपाय करतांना ईश्‍वराचे अखंड अनुसंधान आणि चैतन्य यांद्वारे आनंद अनुभवणार्‍या सौ. राधा रवींद्र साळोखे !

१. भावसत्संगात बसण्याची संधी मिळूनही देवाचे अस्तित्व, त्याचे चैतन्य आणि आनंद अनुभवता न येऊन थकवा जाणवणे : रामनाथी आश्रमात आल्यापासून देवाने मला भावसत्संगात बसण्याची आणि त्याचे चैतन्य अनुभवण्याची संधी दिली; परंतु ती भावावस्था दिवसभर टिकत नव्हती. विशेषत्वाने उपायांच्या वेळेत, त्रासांशी लढतांना अथवा ग्लानी येण्यामुळे देवाचे अस्तित्व आणि त्याचा आनंद अनुभवताच येत नव्हता. त्यामुळे थकवा जाणवायचा.
२. उपायांच्या वेळेत नामजप करतांना देवाचे अस्तित्व आणि चैतन्य यांचा आनंद अनुभवता येण्यासाठी प्रार्थना होणे, सूक्ष्मातून प.पू. डॉक्टरांनी नामजपासहित फुलांची रचना करण्यास सांगणे अन् तसा भाव ठेवून नामजप केल्याने उपाय पूर्ण होऊन आनंदही अनुभवता येणे : प.पू. डॉक्टर पूर्वी रहात असलेल्या खोली क्र. ३२४ मध्ये उपायांसाठी बसून नामजप करत असतांना मला देवाचे अस्तित्व आणि त्याचा आनंद अनुभवता येत नसल्याची जाणीव झाली. तेव्हा माझ्याकडून आपोआप प्रार्थना झाली की, हे श्रीकृष्णा, उपायांच्या वेळी मला तुझे अस्तित्व अन् चैतन्य यांचा आनंद अनुभवता येऊ दे. उपाय भावपूर्ण होऊ देत. प्रार्थना करतांना प.पू. डॉक्टर माझ्यासमोर असून मी हे सर्व त्यांनाच सांगत आहे, असा माझा भाव होता. प्रार्थना झाल्यावर सूक्ष्मातून पुढीलप्रमाणे प्रक्रिया घडली.

पुणे येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. नागनाथ साळुंखेआजोबा यांच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाइकांना जाणवलेली सूत्रे

        पुणे येथील नागनाथ साळुंखेआजोबा (वय ९२ वर्षे) यांचे हनुमान जयंती म्हणजेच २२.४.२०१६ या दिवशी सायं. ७.१५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना स्मृतीभ्रंश झाला होता, तरीही त्यांना देवाप्रती ओढ होती. ४.५.२०१६ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा तेरावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या नातेवाइकांना त्यांच्याविषयी लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहोत.
१. मृत्यूपूर्वी जाणवलेली सूत्रे 
कै. नागनाथ साळुंखे
 १ अ. स्मृतीभ्रंश झाल्याने सर्व गोष्टींचा विसर पडला असला, तरी भगवंताशी अतूट नाते असल्याचे जाणवणे : आम्ही घरी सर्व जण आजोबांना दादा म्हणायचो. दादांना गेल्या २ वर्षांपासून स्मृतीभ्रंश झाला होता. त्यामुळे त्यांना काहीच समजत नव्हते. जेवण कसे करायचे ?, हेही ते विसरून गेले होते. त्यांना जेवण करण्यासाठी आग्रह करावा लागायचा. त्यांना कशाचेच भान उरले नव्हते, म्हणजे ते या जगाशी अनभिज्ञ झाले होते. त्यांच्या या स्थितीत ते प्रत्येक नात्याला विसरले असले, तरी देवाशी मात्र त्यांचे नाते अतूट होते. त्यांची भगवंताविषयीची ओढ वाढली होती. ते प्रत्येकाला सांगायचे, भगवंताची जशी इच्छा आहे, तसेच होणार आहे. त्याची इच्छा झाली की, आपण जायचे. ते नेहमी हात जोडूनच प्रत्येकाशी बोलायचे. त्यांचा तोंडावळा सतत हसतमुख आणि आनंदी असायचा.
१ आ. रात्री-अपरात्री नामजप करणे आणि जागृतावस्थेत आल्यावर तोंडवळा शांत अन् उत्साही जाणवणे : दादा रात्री-अपरात्री नामजप करत असत आणि नामजप करता करता ते ध्यानावस्थेत जात असत. त्या वेळी त्यांच्या शरिराची हालचाल होत नसे. त्यांचा श्‍वासोच्छ्वासही अधून-मधून बंद पडायचा. जागृतावस्थेत आल्यानंतर त्यांचा तोंडवळा शांत आणि उत्साही असायचा.

एका साधिकेने प.पू. डॉ. आठवले यांच्याशी झालेल्या भेटीविषयी सांगितले असता युगान्युगे ईश्‍वर सर्वत्रच्या साधकांची काळजी वहातो, याची जाणीव होणे आणि स्वतःला समर्थ रामदासस्वामींसारखे गुरु लाभल्याने प.पू. डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होणे

सौ. अनुपमा जोशी
       ईश्‍वरा, तू आम्हा सर्व साधकांसाठी किती करतोस रे ! तुझ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला आमच्या शरिरातील एक एक पेशीचे वा कातड्याचे जोडे केले, तरी ते अपुरे पडतील. समर्थ रामदासस्वामींनी शिवरायांना एका शिळेखाली बेडूक जिवंत असल्याचे दाखवून भगवंतच प्रत्येक जिवाची काळजी घेतो, हे दाखवून दिले. त्याप्रमाणे तुझे साधक कुठेही असले, तरी तुझे लक्ष त्यांच्याकडे असतेच. तू आठवणीने त्यांची विचारपूस करतोस. आमचे अहोभाग्य की, आम्हाला असे गुरु मिळाले. जन्माचे कल्याण झाले, जन्म कृतार्थ झाला.
       देवा, आज सौ. रेणकेताईंनी (सौ. सुजाता रेणके यांनी) तुझ्या भेटीविषयी सांगितले. तेव्हा मला वरील प्रसंग आठवला. (एकदा एका सत्संगात प.पू. डॉ. आठवले सौ. रेणके यांना भेटले. तेव्हा त्यांची प.पू. डॉक्टरांनी विचारपूस केली. - संकलक)
       घार हिंडते आकाशी । चित्त तिचे पिल्लापाशी ॥ याप्रमाणे आज सौ. रेणकेताईंविषयी झाले. श्रीकृष्ण जरी प्रत्येक वेळी कुणाशी बोलत नसला वा जवळ नसला, तरी त्याचे लक्ष सर्वांकडे असतेच. त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी बोलावून विचारपूस केली. धन्य ती ताई आणि धन्य ते प.पू. डॉक्टर ! ईश्‍वरा, असेच लक्ष सर्व साधकांकडे असू दे आणि सर्वांकडून तुला अपेक्षित अशी सेवा करवून घे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना.

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
       सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.

मिरज आश्रमातील साधकांसाठी आधारवड असणारे पू. जयराम जोशीआजोबा (वय ७८ वर्षे) !

१. प्रेमभाव 
पू. जयराम जोशी
अ. पू. आजोबा म्हणजे जणू प्रेमाचा सागरच ! ते प्रत्येकाशीच अतिशय प्रेमाने बोलतात. त्यांनी एक-दोन वाक्ये बोलून चौकशी केली, तरी आपुलकी, प्रेमभाव आणि जवळीकता जाणवते.
आ. अनेकदा मी एकटीच स्वयंपाकघरात सेवेला असते. तेव्हा ते म्हणतात, देवच तुमच्या पाठीशी आहे आणि तोच तुमच्याकडून ही सेवा करवून घेतो ! अशा प्रकारे ते आपुलकीने बोलत असल्याने सर्वच साधकांना त्यांचा पुष्कळ आधार वाटतो.
इ. त्यांना कितीही त्रास होत असला, तरी ते दिवसभर कधीच झोपून रहात नाहीत.
२. इतरांना साहाय्य करणे
अ. आगाशीमध्ये (गच्चीमध्ये) धान्य इत्यादी वाळत घातले असेल, तर ते ऊन जाण्यापूर्वी काढण्याची साधकांना आठवण करून देतात.

साधकांनो, फलकावर चुका लिहितांना सुस्पष्ट आणि अभ्यासपूर्ण लिहा !

       सनातनच्या आश्रमात साधकांना त्यांच्याकडून झालेल्या चुका लिहिण्यासाठी फलक ठेवलेले असतात. साधक या फलकांवर त्यांच्याकडून होणार्‍या चुका लिहित असतात. या चुका वाचून अन्य साधकांना त्यांच्याकडून अशा चुका होत नाहीत ना ?, याकडे अंतर्मुख होऊन लक्ष ठेवता येते आणि साधकांनी चुका स्वतःच लिहिल्याने त्यांचा अहं अल्प व्हायला साहाय्य होत असते. प्रत्येक दिवशी चुका लिहिणे, हा साधकांच्या साधनेचाच एक भाग आहे. या चुका लिहित असतांना अजाणतेपणी होणारे चुकीचे शब्दप्रयोग वा वाक्यरचना लक्षात आल्याने त्या येथे देत आहे.
१. मूळ चूक कोणती ?, हेच न समजणे
        केस कापण्याची फलकावरील सूचना वाचली नाही. नावाची नोंद केली नाही. (यात फलकवाचन केले नाही. त्यामुळे सूचना समजली नाही, ही चूक आहे. सूचनाच वाचली नाही, तर नावाची नोंद करायचा प्रश्‍नच कुठे येतो ? त्यामुळे दुसरे वाक्य अनावश्यक आहे.)

साधकांशी जवळीक साधणारी आणि संतांप्रती भाव असणारी नंदुरबार येथील उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. जागृती नरेंद्र पाटील (वय ३ वर्षे) !

चि. जागृती पाटील
१. जन्मापूर्वी
१ अ. स्तोत्र म्हणणे आणि नामजपास आरंभ करणे : माझी पत्नी सौ. नीता गरोदर असतांना श्रीरामरक्षास्तोत्र, दत्तस्तोत्र, श्री गणेशस्तोत्र वाचत होती, तसेच तिने दत्त आणि कुलदेवी यांचा नामजप करण्यास प्रारंभ केला. या नामजपाने नीताला त्रासही होत होता.
१ आ. आपले बाळ (जन्मापूर्वी) या ग्रंथाचे वाचन करणे : तिने सनातन संस्थेचे आपले बाळ (जन्मापूर्वी) या ग्रंथाचे वाचन केले. तिने गर्भारपणात ग्रंथात सांगितल्याप्रमाणे प्रयत्न केल्याने तिला पुष्कळ लाभ झाला.
१ इ. प्रसूतीपूर्वी शस्त्रक्रियागारात भगवान श्रीकृष्णाचे चित्र नेणे आणि कन्यारत्न प्राप्त झाल्याची वार्ता सर्वप्रथम पू. जाधवकाका यांना दूरभाष करून कळवणे : प्रसूतीपूर्वी शस्त्रक्रियागारात तिने आपल्यासमवेत भगवान श्रीकृष्णाचे चित्र नेले होते आणि ती नामजप करत होती. त्या वेळी नीताला कन्यारत्न झाले. प्रसूतीनंतर आधुनिक वैद्य बाहेर आल्यावर आम्हाला म्हणाल्या, अभिनंदन, आपके घर झांसीकी राणी आयी है । ही आनंदाची वार्ता सर्वप्रथम मी सनातनचे संत पू. जाधवकाका यांना दूरभाष करून कळवली.

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन !

मनाचे शुद्धीकरण ! 
प.पू. पांडे महाराज
         मनाला सकारात्मक करून उन्नत केल्यावर मन ब्रह्मांडाएवढे कार्य करू शकते. मनाला ब्रह्मांडात (समष्टीत) नेले की, म्हणजेच त्याला व्यापक केले की, अहं आणि दोष शून्य होतात. अहं शून्य झाला की, मनाला शक्ती प्रदान होते आणि ती तुमचे बलवर्धन करते. मनाचे कार्य फार महान आहे. आपण मनाला तेवढे व्यापक क्षेत्रच देत नाही. एखाद्याची क्षमता असेल, तेवढे त्याला वागवले की, तो तरतरीत रहातो. आपण मात्र मनाला खालच्या स्तरावर, म्हणजेच मायेत, घाणीमध्ये वापरतोे. त्यामुळे व्यापक स्तरावर ब्रह्मांडात जाण्याची क्षमता असतांना आपण त्याला खालच्या स्तरावर वापरतो. त्यामुळे ते अशुद्ध होते आणि तुम्हाला अशुद्ध करते. त्याला व्यापक स्तरावर अंतराळात न्या. मनाला जिथे न्याल, तिथे ते जाते. मन गेले म्हणजे शरीर जाते. मन व्यापक झाले की, शुद्धीकरण होते.
- प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

सनातनच्या प्रसारसेविका पू. (कु.) स्वाती खाड्ये यांची एका साधिकेला लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या सहवासात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

पू. (कु.) स्वाती खाड्ये
      सनातनच्या प्रसारसेविका पू. (कु.) स्वाती खाड्ये (पू. ताई) या सद्गुरुपदी विराजमान झाल्याचे वर्ष २०१५ मध्ये श्रीक्षेत्र नाशिक येथील सिंहस्थपर्वाच्या ठिकाणी घोषित करण्यात आले. त्यानंतर त्या देवद येथील सनातन आश्रमात आल्यावर त्यांच्याशी माझी पहिली भेट झाली. तेव्हा त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या सहवासात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती पुढे देत आहे.
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. सद्गुरुपदावर असूनही स्वतःचे वेगळेपण न जपणे : पू. ताईंमध्ये सहजता आहे. त्या सद्गुरुपदावर असूनही समष्टीशी एवढ्या एकरूप झाल्या आहेत की, त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटले, त्यांचे वेगळेपण कुठेच जाणवत नाही आणि या आपल्यातीलच एक आहेत.
१ आ. आश्रमात असतांना पू. ताईंना जेवणात काही उणे-अधिक हवेे असेल, तर त्या स्वतः स्वयंपाकघरात येऊन निरोप द्यायच्या.

हिंदु धर्माची पुनर्स्थापना होणारच ! - प.पू. आबा उपाध्ये

पुणे येथील प.पू. आबा उपाध्ये यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त 
शुभाशीर्वाद देऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत साधकांना केले आश्‍वस्त !

डावीकडून प.पू. आबा उपाध्ये यांची नात सौ. पल्लवी आठवले,
पू. (सौ.) अंजली गाडगीळ या प.पू आबा उपाध्ये आणि सौ. मंगला उपाध्ये यांचे औक्षण करतांना 
प.पू. आबा उपाध्ये आणि सौ. मंगला उपाध्ये यांना
 दैनिकातील माहिती सांगतांना पू. (सौ.) अंजली गाडगीळ
 

मागणी-पुरवठा अंतर्गत साहित्य देवाण-घेवाणीसाठी आवश्यक असणारी खोकी आणि प्लास्टिक अर्पण म्हणून किंवा अत्यल्प दरात देऊन धर्मकार्यात खारीचा वाटा उचलावा !

वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
     विविध जिल्ह्यांना सनातन-निर्मित ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांचा मागणीनुसार पुरवठा करण्याची सेवा सनातन संस्थेच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात, तसेच मंगळुरू सेवाकेंद्रात चालते. महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील राज्यांना देवदहून, तर दक्षिण भारतातील राज्यांना मंगळुरूहून साहित्य पाठवले जाते. ते पाठवण्यासाठी पुढील प्रकारची खोकी आणि प्लास्टिक यांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासत आहे.
१. ग्रंथ आणि प्रसारसाहित्य अन्य राज्यात पाठवण्यासाठी खोक्यांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता !
२. पावसाळ्यात साहित्य अन्यत्र पाठवतांना ते भिजू नये, यासाठी
 देवद येथे एच्डीपी वोव्हन फॅब्रिक प्लास्टिकची आवश्यकता !
     एच्डीपी वोव्हन फॅब्रिक प्लास्टिकचा तपशील खाली देत आहे.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - चैत्र अमावास्या (६.५.२०१६) प. ४.४७ वाजता
समाप्ती - चैत्र अमावास्या (६.५.२०१६) उ.रा. १.०० वाजता
दोन दिवसांनी अमावास्या आहे.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
कितीही कल्पनातीत आनंदलहरी असल्या,
 तरी त्यांची शीतलताच त्यांचा दाब उसळेल.
भावार्थ : आनंदलहरी कल्पनातीत आहेत; कारण साधारण व्यक्तीला आध्यात्मिक आनंदाची, आत्मानंदाची अनुभूती नसतेच, केवळ व्यावहारिक सुखाची असते. त्यांची शीतलताच त्यांचा दाब उसळेल म्हणजे आनंदाची अनुभूती घ्यावी, अशी प्रत्येक जिवाला नैसर्गिक ओढ असतेच, म्हणून आनंद मिळावा हा विचार कधी ना कधी उफाळून येतोच.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     विज्ञानाला माहिती एकत्र करून एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर शोधावे लागते. याउलट अध्यात्मात प्रगती झाल्यावर माहिती जमवावी लागत नाही, कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर तात्काळ कळते ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

योग्य आचार-विचार
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
संस्कृती म्हणजे विद्वत्तापूर्ण चर्चा नसून कायम स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणे आणि 
इतरांच्या दु:खाची जाणीव ठेवणे ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र,

वेगळा विदर्भ : चुकीच्या दिशेने जाणारी विचारप्रणाली !

संपादकीय
      गेल्या काही मासांपासून महाराष्ट्राचे तत्कालीन अधिवक्ता श्रीहरि अणे सातत्याने वेगळ्या विदर्भाची भूमिका मांडत आहेत. यासाठी त्यांनी आता निर्णायक लढा देणार असल्याचे सांगून विदर्भ आणि मराठवाडा यांचा दौरा चालू केला आहे. १ मे या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी स्वतंत्र विदर्भवाल्यांनी एकत्र येऊन काही कार्यक्रमांचे आयोजनही केले होते. भाजपने वेगळ्या विदर्भाचे आश्‍वासन न पाळल्यास भाजपच्या विरोधात आंदोलन करण्याची चेतावणीही दिली आहे. यापूर्वीही झारखंड, उत्तराखंड अशी लहान राज्ये करण्यात आली आहेत. त्यांचा किती विकास झाला, हेही आपल्यासमोरच आहे. लहान राज्य केल्यानेच विकास होतो का ? विदर्भ स्वतंत्र झाल्यास तो आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल का ? महाराष्ट्रात राहिल्यानेच विदर्भाचा विकास झाला नाही का ?, असे काही प्रश्‍न उपस्थित होत असून विदर्भ वेगळा झाल्यास देशात अन्य ठिकाणीही स्वतंत्र राज्याची मागणी जोर धरू शकते, याचा विचार करणे अगत्याचे आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn