Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

 आज मच्छिंद्रनाथ पुण्यतिथी

भारताचे माजी वायूदल प्रमुख एस्.पी. त्यागी यांना लाच दिली गेली ! - इटलीचे न्यायालय

  • काँग्रेसच्या काळातील आणखी एका भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब ! बोफोर्सनंतर पुन्हा एकदा इटलीशी संबंध !  
  • ऑगस्टा वेस्टलॅण्डच्या हेलिकॉप्टर खरेदीत भ्रष्टाचार !
       नवी देहली - सहा वर्षांपूर्वी ऑगस्टा वेस्टलॅण्ड या आस्थापनाची हेलिकॉप्टर खरेदी करण्यात यावीत, यासाठी भारतीय अधिकार्‍यांना ३६० कोटी रुपयांची लाच दिली गेल्याचे निष्पन्न झाले आहे, असे इटलीमधील मिलान कोर्ट ऑफ अपील्स या न्यायालयाने म्हटले आहे. यात भारताचे माजी वायूदल प्रमुख एस्.पी. त्यागी यांचा समावेश होता, असे मानावयास सबळ कारणे आहेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या २२५ पानी निकालामध्ये त्यागी यांच्यासंदर्भात स्वतंत्र १७ पानी अहवाल असल्याची माहिती सूत्रांनी या वेळी दिली. त्यागी वर्ष २००५ ते २००७ या कालावधीत वायूदल प्रमुख होते. त्या वेळी या हेलिकॉप्टरच्या खरेदीचा करार झाला होता.
१. व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर्सच्या खरेदीच्या संदर्भात असलेल्या स्पर्धेत ऑगस्टा वेस्टलॅण्ड आस्थापनास लाभ दिला जावा, यासाठी त्यागी यांना काही निधी दिला गेल्याचे आढळून आले, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

शबरीमला मंदिर प्रवेशाचा मासिक पाळीसंदर्भातील शुचिर्भूततेशी काय संबंध ? - सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्‍न

धर्माच्या संदर्भातील सूत्रांविषयी न्यायालय नव्हे, तर शंकराचार्य, 
धर्माचार्यच निर्णय देऊ शकतात, हेच या प्रश्‍नामुळे स्पष्ट होते !
       नवी देहली - केरळच्या शबरीमला मंदिर व्यवस्थापनाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, १० ते ५० वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश नाही; कारण त्या मासिक पाळीमुळे ४१ दिवसांच्या व्रताच्या कालावधीत शुचिर्भूत राहू शकत नाहीत. यावर न्यायालयाने प्रश्‍न विचारला की, मासिक पाळीचा शुचिर्भूततेशी संबंध कसा ? (मासिक पाळीच्या काळात महिलांमधील रजोगुण वाढतो. या कालावधीत त्या मंदिरासारख्या सात्त्विक आणि पवित्र स्थानी गेल्यास त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो; म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन अशा प्रकारचे शास्त्रीय नियम सांगितले आहेत. - संपादक)
       मंदिराचे व्यवस्थापन पहाणार्‍या त्रावणकोर देवस्वम बोर्डाचे अधिवक्ता के.के. वेणुगोपाल यांनी न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पिठाला सांगितले की, महिलांच्या प्रवेशावरील बंदी ही लैंगिक भेदभाव नाही, तर ते तर्कावर आधारित वर्गीकरण आहे. त्याद्वारे काही ठराविक महिलांना प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यावर न्यायालयाने वरील प्रश्‍न विचारला.

जर्मनीच्या औषधनिर्मिती आस्थापनाकडून मासिक पाळीच्या काळात महिलांना सुटी !

तथाकथित पुरोगामी महिला 
संघटनांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
       बर्लिन - मासिक पाळीच्या काळात महिलांची अपवित्रता वाढते आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम औषधांच्या गुणवत्तेवर होतो, तसेच ही औषधे रुग्णांना अपेक्षित लाभही देऊ शकणार नाहीत, अशी जर्मनीतील बेरींगर इंगलहेम या औषधनिर्मिती आस्थापनाची धारणा आहे. त्यामुळे या आस्थापनाने त्यांच्या महिला कर्मचार्‍यांना या काळात सुटी देण्याची घोषणा केली आहे.

मोदी शासनाच्या यशोगाथेत पठाणकोटचा उल्लेख आहे का ? - शिवसेनेचा प्रश्‍न

     मुंबई - केंद्रशासन त्याच्या दुसर्‍या वर्षपूर्तीनिमित्त विविध योजना आणि यशाचा प्रचार करत आहे. शासनाच्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोचावी, यासाठी चित्रपटगृहांत चित्रपट चालू होण्यापूर्वी एक चित्रपट दाखवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यावर शिवसेनेने त्याच्या मुखपत्रातून म्हणजे दैनिक सामनाच्या संपादकीयातून टीका केली आहे. शिवसेनेने विचारले आहे की, मोदी यांच्या यशाची चित्रे दाखवण्याची ही वेळ खरोखरच आहे का ? आणि हे चित्र चित्रपटगृहांत दाखवलेच जाणार असेल, तर मग त्यात पठाणकोट आक्रमणाचाही समावेश आहे का ? नक्षलवादी आणि काश्मीर खोर्‍यातील आतंकवादी आमच्या सैनिकांचे बळी घेत आहेत, हे दाखवणार का ? असा घणाघाती प्रश्‍नही विचारला आहे.
संपादकीयातील सूत्रे
१. पंतप्रधान मोदींसमोर देशाचे सरन्यायाधीश रडले. हे यश मानावे कि अपयश ?

सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात आंदोलन करण्याची चेतावणी देणारे श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर प्रेमानंदपुरी महाराज यांची प्रदर्शनाला भेट !

उज्जैन सिंहस्थ पर्वक्षेत्री सनातन संस्था 
आणि हिंदु जनजागृती समिती यांचा प्रदर्शनकक्ष 
सनातन संसदचे श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर
प्रेमानंदपुरीजी महाराज हिंदी पाक्षिक सनातन प्रभात पाहतांना
       उज्जैन (सिंहस्थपर्व), २६ एप्रिल (वार्ता.) - दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रातील तत्कालीन धर्मद्रोही काँग्रेस शासन सनातनवर बंदी आणण्यासाठी प्रयत्नरत होते. त्या वेळेस मी उपमुख्यमंत्र्यांना दूरभाष करून चेतावणी दिली की, सनातन संस्था आणि त्यांचे साधक चुकीचे कृत्य करूच शकत नाहीत. ते निरपराधी आहेत; परंतु शासनाने त्यांच्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न केल्यास सहस्रो साधूंना घेऊन तुमच्या कार्यालयासमोर आंदोलन करीन. सनातनची जरी प्रत्यक्ष ओळख नसली, तर कार्याच्या माध्यमांतून मी संस्थेला ओळखत होतो. मागील दोन वर्षांतून मला सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांना भेटायची तीव्र इच्छा होती. आज हे प्रदर्शन बघून माझी ती इच्छा पूर्ण झाली. सनातनच्या साधकांना उशिरा रात्रीदेखील काही साहाय्यता लागल्यास मी यथाशक्ती साहाय्य करण्यास सिद्ध आहे, असे आश्‍वस्तपूर्ण प्रतिपादन सनातन संसदचे श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर प्रेमानंदपुरीजी महाराज यांनी सनातन प्रदर्शनाचे अवलोकन केल्यावर केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

मुसलमान भोजशाळेत नमाज पठण करू शकतात, तर हिंदू मशिदीमध्ये हनुमान चालिसा का म्हणू शकत नाहीत ?

  • मध्यप्रदेशचे भाजप शासन शंकराचार्यांची मागणी मान्य करील का ?
  • सुमेरूमठ काशीचे शंकराचार्य जगद्गुरु नरेंद्रानंद सरस्वती यांचा मध्यप्रदेश शासनाला प्रश्‍न
      उज्जैन - धारमधील भोजशाळेत शुक्रवारी मुसलमानांना नमाज पठण करण्याची अनुमती आहे, तशी अनुमती हिंदूंना मशिदींमध्ये हनुमान चालिसा म्हणण्यास द्यावी, तरच खर्‍या अर्थाने देशात धार्मिक सद्भाव कायम राहू शकतो, असे प्रतिपादन सुमेरूमठ काशीचे शंकराचार्य जगद्गुरु नरेंद्रानंद सरस्वती यांनी एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी बोलतांना केले. या संदर्भातील निर्णय राज्य शासनाला पाठवण्यात येईल, असेही ते म्हणाले.

(म्हणे) काश्मीरचे सूत्र प्रथम सोडवा ! - पाकची मागणी

  • पाकशी चर्चा म्हणजे कुत्र्याची शेपूट सरळ करण्याचा प्रयत्न करणे होय !  
  • भारतातील सर्वच राजकीय पक्ष सत्तेवर असतांना हा प्रयत्न करतात आणि सत्ताच्युत झाल्यावर पाकवर आगपाखड करण्याचे नाटक करतात !
       नवी देहली - हार्ट ऑफ आशिया या परिषदेच्या निमित्ताने परराष्ट्र सचिव जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव ऐझाझ अहमद चौधरी यांच्यात २६ एप्रिलला दीर्घ चर्चा झाली. यात काश्मीरचे सूत्र पाकसाठी सर्वांत महत्त्वाचे आहे, असे पाककडून पुन्हा एकदा सांगण्यात आले. तसेच रॉ या भारताच्या गुप्तचर संस्थेच्या बलुचिस्तान भागातील राजकारणातील कथित सहभागाविषयीही पाकने गळा काढला. भारतासमवेत पाकला मैत्रीपूर्ण संबंध हवे असले; तरी काश्मीरप्रश्‍नी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा समितीच्या ठरावांशी सुसंगत असलेला संयुक्त तोडगाही काढला जाणे आवश्यक असल्याचे पाककडून सांगण्यात आले.

मद्य उद्योगांच्या पाण्यात ६० टक्के कपात करा ! - मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

  • जे न्यायालयाला सांगावे लागते, ते शासन आणि प्रशासन यांना कळत नाही कि स्वार्थापोटी ते असा निर्णय घेत नाहीत ?
  • दुष्काळग्रस्त जनतेचा विचार न करणार्‍या संबंधितांना कठोर शिक्षा केली पाहिजे !
       संभाजीनगर - मद्यनिर्मिती करणार्‍या उद्योगांना ६० टक्के, तर अन्य उद्योगांना २५ टक्के अशी दोन टप्प्यांत पाणीकपात करण्याचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाचे न्यायमूर्ती एस्.एस्. शिंदे आणि न्यायमूर्ती एस्.एस्. पाटील यांनी दिला आहे. मद्यनिर्मिती करणार्‍या उद्योगांसाठी २७ एप्रिलपासून १० मेपर्यंत ५० टक्के त्यानंतर १० जूनपर्यंत ६० टक्के पाणी कपात करावी. अन्य उद्योगांसाठी १० मेपर्यंत २० टक्के आणि त्यानंतर १० जूनपर्यंत २५ टक्के पाणीकपात करावी. उर्वरित पाण्याचे नियोजन विभागीय आयुक्तांनी करावे, तर जिल्हाधिकार्‍यांनी त्यावर देखरेख ठेवावी. तसेच कपात केलेल्या पाण्याचा वापर नेमका कुठे आणि कशासाठी करण्यात आला, याचा प्रत्येक आठवड्याला अहवाल सादर करावा, असा आदेश खंडपिठाने दिला आहे.

हिंदुत्वाला ठोकरण्यासाठी असहिष्णुतेचा विचार लादण्याचे राजकीय षड्यंत्र ! - अभय वर्तक

वसंत व्याख्यानमालेत उपस्थितांना संबोधित करतांना अभय वर्तक
आणि (बसलेले डावीकडून) फादर फ्रान्सिस दिब्रिटो, सुहास पळशीकर आणि रझिया पटेल 
     पुणे, २६ एप्रिल (वार्ता.) - स्वातंत्र्योत्तर गेल्या ६८ वर्षांच्या काळात विशेष ऐकिवात नसलेल्या 'असहिष्णुता' या शब्दाचा गेल्या दीड वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणावर भडिमार केला गेला. राज्यात आणि देशात हिंदुत्ववादी विचारसरणीचे शासन आल्यामुळे, तसेच प्रखर राष्ट्रभक्त व्यक्ती पंतप्रधान म्हणून लाभल्याने असे होत आहे. काँग्रेस आणि डावे यांची स्वतःचे अस्तित्व जपण्याची धडपड चालू असून त्यातूनच हिंदुत्वाला ठोकरण्यासाठी असहिष्णुतेचा विचार लादण्याचे राजकीय षड्यंत्र कार्यरत आहे, असे रोखठोक प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. वक्तृत्वोतेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत २५ एप्रिल या दिवशी 'असहिष्णुता आणि आमचा पंथ' या विषयावर ते बोलत होते. या प्रसंगी ख्रिस्ती धर्मगुरु फादर फ्रान्सिस दिब्रिटो, मुसलमान समाजाच्या रझिया पटेल आणि राजकीय विश्लेरषक सुहास पळशीकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन वैद्य श्री. मंदार बेडेकर यांनी केले. या प्रसंगी सुमारे ६०० हून अधिक श्रोते उपस्थित होते. 

देवडिया (उत्तरप्रदेश) येथील कारागृहात कैद्यांचा गोंधळ !

* कैदी कारागृह अधिक्षकांना मारण्यासाठी धावले 
* कैद्यांकडून पोलिसांवर दगडफेक, पोलिसांकडून गोळीबार 
उत्तरप्रदेशातील कारागृहांमध्ये अराजकाची स्थिती ! 
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - उत्तरप्रदेशच्या कारागृहांमधील कैद्यांमधील गोंधळ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. वाराणसी, आझमगड, फैजाबाद आणि मेरठ येथील कारागृहानंतर आता देवडिया येथील कैद्यांनीही गोंधळ घातला. देवडिया कारागृहातील जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांचा वाद सोडवण्यास गेलेल्या कारागृह अधीक्षकांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. परिस्थिती बिघडल्यावर पोलिसांची कुमक घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तेव्हा कैद्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली. त्यामुळे कैद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. 

कोणीच मिळत नाही; म्हणून सनातनला बळीचा बकरा बनवणे, ही मोडस ओपरेंडी पालटायला पाहिजे ! - श्री. अभय वर्तक, सनातन संस्था

श्री. अभय वर्तक
    ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक डॉ. सुभाष देसाई यांना निनावी व्यक्तीने धमकीचे पत्र पाठवल्याच्या आणि धमकीचे फोन आल्याच्या पार्श्‍वभूमीवर झी २४ तास या वृत्तवाहिनीवर २० एप्रिल या दिवशी चौथ्या गोळीची दहशत या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक, माजी आय.पी.एस् अधिकारी वाय.सी पवार, डॉ. सुभाष देसाई, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भरत पाटणकर, ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक कुमार सप्तर्षी सहभागी झाले होते. चर्चासत्राचे सूत्रसंचालन वाहिनीचे संपादक उदय निरगुडकर यांनी केले.
चर्चासत्रामध्ये सनातन संस्थेवर केलेल्या आरोपांचे 
श्री. अभय वर्तक यांनी केलेले खंडण
     दाभोळकर, कलबुर्गी आणि पानसरे यांच्या हत्यांनंतर डॉ. सुभाष देसाई यांना धमकीचे पत्र पाठवल्याच्या संशयाची सुई सनातन संस्थेकडचे का वळवण्यात येते ? या उदय निरगुडकर यांच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक म्हणाले की, कुणीच मिळत नाही, तर सनातनला बळीचा बकरा बनवा, ही मोडस ओपरेंडी पालटायला पाहिजे. वर्ष २००९ मध्ये मडगाव स्फोट प्रकरणात आमच्या ६ साधकांना अटक झाली. ते ४ वर्षे कारागृहात राहिल्यानंतर निकालपत्रात या प्रकरणी सनातन संस्थेला गोवण्याचा कट आहे, असे सांगत न्यायालयाने ६ साधकांची निर्दोष मुक्तता केली. याला कुणीही प्रसिद्धी दिली नाही. मा. न्यायाधिशांनी हे निकालपत्र दिल्यानंतर या मोडस ओपरेंडीविषयी कुणी बोलत नाही. याविषयी कुठेही कार्यक्रम झाले नाहीत.

कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्यांचची मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्या तील प्रवेशाचे प्रकरण 
     कोल्हापूर, २६ एप्रिल - येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्यापत पुजार्यांीविना इतरांना प्रवेश देऊ नये, या मागणीसाठीच्या याचिकेवर २५ एप्रिल या दिवशी दिवाणी न्यायाधीश प्रेमकुमार शर्मा यांच्यासमोर सुनावणी झाली. त्या वेळी जिल्हाधिकार्यांिच्या वतीने शासकीय अधिवक्त्यांनी सांगितले की, संबंधित याचिकेत जिल्हाधिकार्यांाना उपस्थित रहाण्यास दिलेल्या नोटिसीविषयी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. 

'व्हॉट्स अॅप'वर असाही विनोद !

     एका शेतकऱ्याच्या  शेतात काम करण्यासाठी महिला मिळत नव्हत्या, मग त्याने लढवली शक्कल!
घोषणा केली, आमच्या शेतात महिलांना काम करण्यास बंदी !
मग काय ? तृप्ती देसाई सहीत सर्व सहकारी महिलांचा फौजफाटा त्याच्या शेतात.....

धर्मद्रोही कायद्याला हद्दपार करा ! - मनोज खाडये

नंदिहळ्ळी, जिल्हा बेळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभा 
व्यासपिठावर डावीकडून सरपंच
श्री. शिवनगौडा पाटील आणि श्री. मनोज खाडये

     नंदिहळ्ळी (बेळगाव), २६ एप्रिल (वार्ता.) - हिंदु धर्माच्या परंपरा आणि श्रद्धा यांचे भंजन करू पहाणारा अंधश्रद्धा (श्रद्धा) निर्मूलन कायदा पारित होऊ देणे म्हणजे आपल्या धर्मातील पवित्र परंपरांपासून वंचित होण्यासारखे आहे. कर्नाटक शासन आणू पहात असलेल्या या धर्मद्रोही कायद्याच्या विरोधात संघटित होऊन हिंदूंच्या श्रद्धा पायदळी तुडवू पहाणार्याम या कायद्याला हद्दपार करा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी केले. येथे घेण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या सभेला ३०० हून अधिक हिंदू उपस्थित होते. या वेळी व्यासपिठावर नंदिहळ्ळी गावाचे सरपंच श्री. शिवनगौडा पाटील उपस्थित होते. 

काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे यांनी चिपळूण काँग्रेस अध्यक्ष संदीप सावंत यांचे अपहरण करून केली मारहाण !

लोकशाही निरर्थक ठरवणारे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते ! असे पक्ष आणि त्यांचे 
नेते जनतेला रावणराज्यच देतील. यातूनच हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात येते !
  • ठाणे पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट 
  • नीलेश राणे यांनी आरोप फेटाळले
     रत्नागिरी, २६ एप्रिल - काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचे पुत्र तथा माजी खासदार नीलेश राणे यांनी स्वपक्षाच्याच पदाधिकार्‍याला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. काँग्रेसचे चिपळूण अध्यक्ष संदीप सावंत यांनी नीलेश राणे यांच्यावर अपहरण आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मराठा आरक्षणासाठी २४ एप्रिल या दिवशी नीलेश राणे यांची रत्नागिरीमध्ये सभा होती. या सभेला संदीप सावंत त्यांच्या कार्यकर्त्यांसह आले नव्हते. या रागातून सावंत यांचे अपहरण करून त्यांना मुंबईला नेण्यात आले. प्रवासाच्या वेळी गाडीत आणि नंतरही नीलेश राणे अन् काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्याकडून सावंत यांना मारहाण करण्यात आली, असा आरोप सावंत यांनी केला आहे. या मारहाणीनंतर नीलेश राणे यांच्याविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात अपहरण आणि मारहाणीची तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर नीलेश राणे यांच्याविरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सनातनचे साधक श्री. गणेश पवार आणि सौ. सुहासिनी पवार यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

सनातन संस्थेचे श्री. गणेश पवार आणि सौ. सुहासिनी पवार यांचा
सत्कार करतांना राज्यपाल श्री. राम नाईक (डावीकडे) आणि अन्य मान्यवर
     मुंबई - येथील साधक दाम्पत्य श्री. गणेश लक्ष्मण पवार आणि सौ. सुहासिनी गणेश पवार यांनी आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याविषयी उत्तरप्रदेशचे राज्यपाल श्री. राम नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि तुळशी वृंदावन देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी उत्तर मुंबई जिल्ह्याचे खासदार श्री. गोपाळ शेट्टी, महाराष्ट्राच्या महिला बाल विकासमंत्री सौ. विद्या ठाकूर, आमदार आशिष शेलार आणि आमदार सौ. आसावरी पाटील उपस्थित होत्या.

सोलापुरात २ टन एफेड्रिन अमली पदार्थ कह्यात

    सोलापूर - सोलापुरातून आणखी दोन टन एफिड्रिन कह्यात घेण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत २०० कोटी रुपये असल्याची माहिती आहे. त्यासमवेत अडीच सहस्र लीटर अ‍ॅसेटिक अनहेड्रिड कह्यात घेण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. सहा दिवसांच्या शोध मोहिमेनंतर ठाणे पोलिसांच्या दोन पथकांनी हा साठा कह्यात घेतला आहे. सोलापुरातीलएव्हॉन ऑरगॅनिक आस्थापनात हा साठा कह्यात घेण्यात आला. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पुनित शर्मा फरार आहे. 
     काहीच दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी साडे १८ टन एफेड्रिन नावाचे ड्रग्ज पकडले. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २ सहस्र कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत होते. महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली ही पहिलीच कारवाई होती. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून यात एका नायजेरियन नागरिकाचाही समावेश आहे. गेल्या दीड वर्षापासून हे रॅकेट चालू असल्याची माहिती मिळत आहे.


छत्रपति शिवाजी टर्मिनस स्थानकावरील विश्रामगृहात महिलेचा संशयास्पद मृत्यू

     मुंबई - छत्रपति शिवाजी टर्मिनस (सीएस्टी) स्थानकावरील विश्रांतीगृहात एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे, तर तिचा पती अत्यवस्थ असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीएस्टीच्या विश्रामगृहात औषध फवारणी करण्यात आली होती. याचाच परीणाम या दांपत्यावर झाल्याचे बोलले जात आहे. औषधाच्या उग्र वासामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. (जनतेच्या जिवाची पर्वा नसणारे रेल्वे प्रशासन ! औषध फवारणीनंतर काळजी घेण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या नाहीत का ? - संपादक)

छगन भुजबळ यांच्या वैद्यकीय अहवालात फेरफार करणारे डॉ. घुले यांचे निलंबन

     मुंबई - काळापैसा प्रतिबंधक कायद्यान्वये न्यायालयीन कोठडीत असलेल्या माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या वैद्यकीय अहवालात फेरफार करणार्या् आर्थर रोड कारागृहातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल घुले यांचे निलंबन करण्यात आले आहे. 

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथे प्रथम मुलीला जन्म दिल्याने एका विवाहितेला पेटवले !

तृप्ती देसाई याविरोधात आंदोलन करणार का कि केवळ स्त्रियांच्या 
मंदिरप्रवेशाच्या आंदोलनात प्रसिद्धी मिळत असल्याने त्यांची समानता तेवढ्यापुरतीच आहे ? 
     अंबाजोगाई, २६ एप्रिल - येथील वानटाकळी भागातील मुलगी झाल्याने एका विवाहितेला पेटवून दिल्याची घटना २४ एप्रिलच्या रात्री घडली. पहिली मुलगी झाल्याने सासरच्यांनी ३ मासांपासून तिचा छळ केला. नंतर २४ एप्रिलला नवरा, सासू, सासरा आणि नणंद यांनी तिला पेटवले. यात ती ६० प्रतिशत भाजली असून तिच्यावर उपचार चालू आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला.

महाराष्ट्रातील सर्व वारकर्‍यांच्या वतीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन !

     महाराष्ट्र, वारकरी, विठ्ठलभक्त आणि सर्व संत यांची पापभंगा (पाप नष्ट करणारी) चंद्रभागा नदी आता प्रदूषण मुक्त होणार असल्याची वार्ता कानी पडताच, भक्तांच्या हृदयातून चंद्रभागेच्या पवित्र जलाचे कारंजे थुई-थुई करत उडू लागले, असे चित्र महाराष्ट्रात दिसून आले.
     राज्याचे वित्तमंत्री, सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व विठ्ठलभक्तांचे वतीने हार्दिक अभिनंदन ! अशी तळमळ राष्ट्र निर्माण कार्यास खर्‍या अर्थाने चालना देऊ शकते. २०२२ पर्यंत नाही, तर आजपासून येत्या आषाढी एकादशीपर्यंत चंद्रभागा प्रदूषण मुक्त झाली पाहिजे, असा संकल्प सोडून वारी निर्मल करून टाकावी, अशी भाविकांची अपेक्षा आहे. २० कोटी रुपयांचा निधी अल्प पडतो आहे. तेव्हा सर्व वारकरी बंधु-भगिनींनीसुद्धा चंद्रभागा अधिक पवित्र होण्यासाठी प्रत्येकी १० रुपयांचे दान देऊन पंढरपूरसह वारीचा मार्ग सर्व सुखसोयींनीयुक्त होण्यास राज्यशासनाच्या वित्तमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहून पंढरीच्या विठ्ठलाची कृपा संपादन करून घ्यावी. चंद्रभागा शुद्ध झाल्याबरोबर महाराष्ट्रातील पाण्याचा दुष्काळ संपेल, याची अनुभूती घ्यावी. असे उपाययोजना करणारे मंत्री सर्वत्र हवेत. - प्रा. श्रीकांत भट, अकोलामंत्रालयातील धुरावर नियंत्रण !

     मुंबई - येथील मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावरील खोलीतून येणार्‍या धुरावर आपत्कालीन प्रशासनाने वेळीच नियंत्रण मिळवले. अन्यथा आग लागण्याची शक्यता होती. प्रारंभी ज्या खोलीतून धूर येत होता, त्या खोलीची चावीच सापडत नव्हती, तसेच तेथपर्यंत पोहोचण्यासाठी शिडीही उपलब्ध नव्हती. काही वेळानंतर धुरावर नियंत्रण मिळवण्यात आले. (वारंवार लागणार्‍या आगीच्या संदर्भात मंत्रालय प्रशासनाने उपाययोजना कराव्यात ! - संपादक)

आभाळमाया संस्थेच्या वतीने आयुष हेल्पलाइन टीमला रुग्णवाहिका प्रदान

     कुपवाड (सांगली) - आभाळमाया संस्थेच्या वतीने 'आयुष हेल्पलाइन टीम'ला रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड आणि 'आभाळमाया'चे अध्यक्ष प्रमोद चौगुले उपस्थित होते. 
     या वेळी जिल्हाधिकारी म्हणाले, "आभाळमाया संस्थेने 'आयुष हेल्पलाईन'ला सामाजिक कार्यासाठी रुग्णवाहिका दिली, हे कौतुकास्पद आहे. आयुष संस्था ही अपघात अणि इतर आपत्कालीन काळात अवश्य साहाय्य करेल. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा." या वेळी आयुष सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील, अविनाश पवार, वैभव पवार, रामप्रसाद यादव, संजय विभूते, सूरज कासलीकर, अमोल घनवडे उपस्थित होते.

झवेरी बाजार बॉम्बस्फोट प्रकरणी एका धर्मांधाला अटक

     मुंबई - झवेरी बाजार बॉम्बस्फोटातील आरोपी झैनुल अबेदिन याला ५ वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या आतंकवादविरोधी पथकाने (एटीएस्) ही कारवाई केली आहे. झैनुल अबैदिन हा इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. मुंबईतील झवेरी बाजार येथे १३ जुलै २०११ या दिवशी घडवून आणलेल्या बाँबस्फोटामध्ये अबेदिन याचा हात होता. मुंबई विमानतळावरून झैनुल याला कह्यात घेण्यात आले आहे. अबेदिन याने इंडियन मुजाहिदीनला स्फोटके आणि इतर सामान पुरवले. त्याआधारे झवेरी बाजार आणि मुंबईतील इतर ठिकाणांवर १३ जुलै २०११ या दिवशी स्फोट घडवून आणण्यात आले. झैनुल देशाबाहेर पळून जाण्याची सिद्धता करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. (अस्तित्वात नसलेल्या हिंदु आतंकवादाविषयी ओरड करणारे आता गप्प का ? - संपादक)

पत्राद्वारे धमकी देणारा स्थानिक संशयित असण्याची शक्यता ! - पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे

पत्रकार डॉ. सुभाष देसाई धमकीचे प्रकरण 
     कोल्हापूर, २६ एप्रिल (वार्ता.) पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांना मिळालेल्या धमकीप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असल्याने अन्वेषणाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. ही धमकी देणारा संशयित स्थानिक असावा, अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी २५ एप्रिल या दिवशी दिली. ते म्हणाले की, निनावी पत्राद्वारे देण्यात आलेल्या धमकीचे पत्र मंगळवार पेठ येथील टपाल कार्यालयातील पेटीत टाकण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे स्थानिकांपैकीच कुणीतरी धमकी दिली असावी, अशी शक्यता आहे. दूरभाषवरून देण्यात आलेल्या धमकीचीही चौकशी चालू आहे. दूरसंचार आस्थापनाकडून 'कॉल डिटेल्स'चा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे दूरभाषवर देण्यात आलेल्या धमकीचा लवकर शोध लागेल.

देशात ध्वनीप्रदूषणात मुंबई प्रथम क्रमांकावर !

ही स्थिती पालटण्यासाठी शासन आणि प्रशासन यांनी तत्परतेने पावले उचलावीत !
     मुंबई - ध्वनीप्रदूषणात मुंबई प्रथम क्रमांकावर आहे, अशी माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या अहवालातून उघड झाली आहे. या मंडळाकडून देशातील सात शहरांतील हवा, पाणी, भूमी यांच्या प्रदूषणाची माहिती गोळा करून त्यावर अभ्यास करून अहवाल सिद्ध केला जातो. त्यानुसार मुंबई प्रथम क्रमांकावर, दुसर्याय क्रमांकावर लखनऊ आणि तिसर्या क्रमांकावर भाग्यनगर (हैद्राबाद) असल्याचे समोर आले आहे. चौथ्या क्रमांकावर देहली आहे.

फलक प्रसिद्धीकरता

देशाचे नाव कलंकित करणार्‍या अशा लाचखाऊ अधिकार्‍यांना कठोर शिक्षा करा ! 
     काँग्रेसच्या शासन काळात ऑगस्टा वेस्टलॅन्ड या आस्थापनाची हेलिकॉप्टर खरेदी करण्यात यावीत, यासाठी भारतीय अधिकार्‍यांना ३६० कोटी रुपयांची लाच दिली गेल्याचे इटलीमधील मिलान कोर्ट ऑफ अपील्स या न्यायालयाने म्हटले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! 
6 sal pahale helicopter kharidnekeliye Itali ki compani Augasta vestland ne Bhartiya adhikarionko diye 360 karod. - Aise adhikarionko ghar bhejo !
जागो !
६ साल पहले हैलीकॉप्टर खरीदने के लिए इटाली की कंपनी ऑगस्टा वेस्टलैंड ने भारतीय अधिकारीआें को दिए ३६० करोड. - ऐसे अधिकारीआें को घर भेजो !

श्रीनगरच्या एन्आयटीमधील हिंसाचाराला राष्ट्रप्रेमी विद्यार्थ्यांनाच ठरवले दोषी !

राष्ट्रध्वज फडकवणार्‍या राष्ट्रप्रेमी युवकांना 
दोषी ठरवणारे भारतीय कि पाकिस्तानी ?
       जम्मू - श्रीनगर येथील राष्ट्रीय तंत्रनिकेतन संस्थे (एन्आयटी) मध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचाराची चौकशी करणार्‍या अतिरिक्त आयुक्तांच्या अहवालात काश्मीरबाहेरील विद्यार्थ्यांनाच दोषी ठरवण्यात आले आल्याचे समजते. अजून हा अहवाल सार्वजनिक झालेला नाही. या अहवालात आरोप करण्यात आला आहे की, एन्आयटीमधील काही विद्यार्थ्यांनी अन्य राज्यांतून तिरंगा मागवला होता. ज्या कुरियरवाल्या मुलाने तिरंगा येथे पोहोचवला त्याला मारहाण करून भारतमाता की जयची घोषणा देण्यास सांगण्यात आले होते.
       एन्आयटीमध्ये २ सहस्र ७०० विद्यार्थी शिक्षण घेतात. यांतील बहुतांश विद्यार्थी काश्मीरबाहेरील आहेत. हिंसाचाराच्या घटनेनंतर यातील अनेक जण घरी गेले आहेत. त्यांना ५ मेपासून होणार्‍या परीक्षेला उपस्थित रहाण्यास कळवण्यात आले आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी उभारलेल्या प्रदर्शनास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

भृगु महर्षींनी केलेल्या भविष्यवाणीची साधकांनी घेतली प्रत्यक्ष अनुभूती !
डावीकडून श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांच्याशी
चर्चा करतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
हिंदी पाक्षिक सनातन प्रभात पहातांना पं. अनिल शर्मा

हिंदु धर्मावरील आघाताच्या प्रत्येक प्रसंगात बाजीप्रभूंप्रमाणे धर्मरक्षणाची खिंड लढवणारे सनातन प्रभात वृत्तपत्र एकमेव ! - सौ. समीक्षा गाडे, सहसंपादिका, सनातन प्रभात नियतकालिक समूह

सौ. समीक्षा गाडे
     २४.४.२०१६ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात दैनिक सनातन प्रभातच्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा १७वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सनातन प्रभात नियतकालिक समूहाच्या सहसंपादिका सौ. समीक्षा गाडे यांनी सनातन प्रभातच्या १७ वर्षांतील वाटचालीचा घेतलेला हा मागोवा.
१. दैनिक सनातन प्रभातचा वर्धापनदिन म्हणजे 
उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने केलेले सिंहावलोकन ! 
     केवळ सनातन प्रभातची सेवा करणार्‍या साधकांसाठीच नव्हे, तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे उत्तुंग ध्येय उराशी बाळगून सनातन प्रभातशी जोडलेल्या प्रत्येक हिंदुसाठी वर्धापनदिनाचा हा दिवस महत्त्वाचा असतो. या दिवसाच्या निमित्ताने वाचक, हितचिंतक, हिंदुत्ववादी यांच्याशी वार्तालाप करण्याची संधी मिळते.

उर्दू वर्तमानपत्रे आणि अन्य प्रसारमाध्यमे

   योग्यायोग्य विचारांची जाणीव करून देत समाजाला दिशादर्शन करण्याचे काम प्रसारमाध्यमांचे असते. आजची प्रसारमाध्यमे ज्या प्रकारे कार्यरत आहेत, त्यावरून ते लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची भूमिका बजावतांना दिसत नाहीत. उर्दू वर्तमानपत्रे याला अपवाद कशी ठरतील ? तीही स्वपंथातील लोकांना सत्यापासून अंधारात ठेवत चुकीच्या पद्धतीने विचार करण्यास चेतवत आहेत. त्यांच्या पंथातील लोकांच्या घोडचुकांवर बोट ठेवण्याचे धैर्य त्यांच्यात नाही; कारण तसे केले असता त्यांच्या कार्यालयाची काय बिकट स्थिती होईल, याची त्यांना चांगलीच कल्पना आहे. त्यामुळे जे चुकीचे चालू आहे, त्याची तळी उचलून धरत स्वपंथियांसाठी आम्हीही कार्यरत आहोत, हे दर्शवण्याचे दुष्कर्म उर्दू वर्तमानपत्रे करत आहेत.

दुर्लक्ष करण्याची वृत्ती धर्म अन् राष्ट्र हितासाठी मारक !

     देहली येथील जेएन्यू विद्यापिठात राष्ट्रद्रोही घोषणा देणार्‍या आणि देशद्रोही मोहमद अफझल याचे समर्थन करणार्‍या कन्हैय्या कुमारच्या सभेचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. हिंदूसंघटनाच्या कार्यांतर्गत विविध हिंदुत्ववाद्यांच्या भेटी घेत असतांना कन्हैयाकुमारचाही विषय चर्चेला आला. कन्हैय्या कुमार असो अथवा महिलांच्या मंदिर प्रवेशाच्या सूत्रावरून स्वतःच्या प्रसिद्धीची हौस भागवून घेणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई असोत, अशांच्या संदर्भात बहुतांश जणांचे मत असे आढळून आले की, या लोकांना महत्त्व देऊन कशासाठी आपणच त्यांना मोठे करायचे ? त्यापेक्षा अशांकडे दुर्लक्ष केलेले चांगले ! राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही यांना विरोध करण्याची वृत्ती हिंदुहितासाठी कशी मारक आहे, यासंदर्भात काही विचार सुचले.

कुंग फू युद्धकला ही भारताचीच देणगी !

     अनुमाने ३ सहस्र वर्षांपूर्वी भगवान परशुरामांनी शोधलेल्या युद्धकला आजही केरळमध्ये अस्तित्वात आहेत. हाँगकाँगचे प्रसिद्ध वृत्तपत्र साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने त्याच्या लेखात नॉट जस्ट किक्स (केवळ किक्स (कराटे युद्धकलेतील पायाने करावयाचा वार) नव्हेत) या ९ नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेल्या लेखात डेव्हिड मॉमफर्डने लिहिले, शावलीन (कुंग फू शिकवणारी चीनमधील मंदिरे) कुंग फूची पाळेमुळे बोधीधर्म नावाच्या बुद्ध साधूच्या शिकवणुकीत आहेत. तो इ.स. ५२७ पूर्वी येथील मंदिरांमध्ये आला होता. शरीर आणि मन यांची क्षमता वाढवण्यासाठी आणि ध्यानासाठी सिद्ध केलेला योगही त्याने येथे शिकवला. कुंग फू चा सराव करणार्‍यांना त्यांचे मूळ भारत असल्याचे लक्षात आले. जपानचे कराटे आणि कोरियाचे ताक्वांडो यांच्यावर चीनच्या कुंग फूचा प्रभाव आहे. याचा अर्थ भारत हेच या तीनही युद्धकलांचे माहेरघर आहे.
(त्रैमासिक संदेशभारती, जानेवारी-मार्च २००८)अधिकोष किंवा पोस्ट यांच्या खात्यातून मिळणार्‍या व्याजातून टी.डी.एस्. कपात झाल्याने होणारी आर्थिक हानी टाळण्यासाठी लवकरात लवकर पुढील प्रक्रिया करा !

साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची माहिती
     आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने १ एप्रिल ते ३१ मार्च असे आर्थिक वर्ष निर्धारित करण्यात आले आहे. (पुढील आर्थिक वर्ष १.४.२०१६ ते ३१.३.२०१७ या कालावधीत आहे.) टी.डी.एस्.च्या संदर्भातील महत्त्वाच्या सूचना पुढे देत आहे.
१. टी.डी.एस्. संदर्भातील माहिती 
     प्रत्येक आर्थिक वर्षात (उदा. २०१६ - २०१७) कायम ठेवीच्या (फिक्स डिपॉझिटच्या) एका खात्यातून १० सहस्र रुपयांपेक्षा अधिक व्याज मिळत असेल, तर त्यातील १० टक्के टी.डी.एस्. (TDS - Tax Deducted At Source) कापला जातो. 
    एखाद्याला १२,००० रुपये व्याज मिळत असेल, तर १२,००० रुपयांंवर १० टक्के म्हणजे १,२०० रुपये टी.डी.एस्. कापून घेतला जातो. (एखाद्या खातेधारकाला १०,००० रुपयांपर्यंत व्याज मिळत असेल, तर टी.डी.एस्. कापला जात नाही.) 
    टी.डी.एस्. कापल्यानंतर तो खातेधारकाच्या नावे आयकर विभागात भरला जातो आणि आर्थिक वर्षाच्या शेवटी 16A या पत्रकामध्ये त्याविषयी माहिती दिली जाते.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !

चौकशीच्या वेळी पोलिसांनी केलेला अतोनात छळ आणि त्यातून दिसून आलेली त्यांची आसुरी मनोवृत्ती

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना अटक केली. त्याही स्थितीत साधकांनी स्थिर राहून व्यष्टी आणि समष्टी साधना चालूच ठेवली. चौकशीपासूनच पोलिसांनी सनातनच्या साधकांचा पुष्कळ छळ केला. पोलिसांच्या या कृती म्हणजे मानवतेलाही कलंक ठरतील अशाच आहेत. यातून त्यांची मनोवृत्तीही उघड होते. 
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

पूर्वीपासूनच अध्यात्म जगणार्‍या पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या जीवनातील काही प्रसंग आणि त्यातून त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
१. शाळेची आणि 
अभ्यासाची आवड असणे
      पू. काकूंना अभ्यासाची आणि शाळेची फार आवड होती. एकदा लहान असतांना पू. काकूंना ताप आला होता; म्हणून त्यांच्या आईने त्यांना आज शाळेत जाऊ नकोस, असे सांगितले. त्यानंतर त्या हट्टाने शाळेचे दप्तर घेऊन घराच्या बाहेरच बसून राहिल्या आणि म्हणाल्या, मी शाळेत जाणारच. त्यांच्या शिक्षकांनाही एवढा ताप असूनही त्या शाळेत आल्याचे पाहून आश्‍चर्य वाटले. पू. काकूंनी शाळा आणि महाविद्यालयात असतांना कधीच अनावश्यक सुटी घेतली नाही. त्यांना शिक्षणाची पुष्कळ आवड होती आणि आताही त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात
२. तीक्ष्ण स्मरणशक्ती आणि अफाट बुद्धीमत्ता
       पू. काकू एकपाठी आहेत. बुद्धीमत्तेच्या अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा पहिला क्रमांक येत असे, उदा. वस्तू पाहून त्या ज्या क्रमाने रांगेत ठेवल्या आहेत, त्याच क्रमाने त्यांची नावे लिहिणे. पू. काकूंना शाळेची पुस्तके पाठ असत. त्या त्यांच्या आईला अभ्यासाचे पुस्तक देऊन प्रश्‍न विचारायला सांगत. पुढे प्रश्‍नासकट संपूर्ण उत्तर देत असत. परीक्षेचाही त्यांना कधी ताण आला नाही. प्रश्‍नपत्रिका हातात केव्हा येते आणि भरभर ती कधी लिहिते, असे त्यांना होई. ब्राह्ममुहूर्तावर ईश्‍वरी लहरी अधिक कार्यरत असल्याने पू. काकू त्या वेळी पहाटे लवकर उठून अभ्यास करत असत. रात्री जागून अभ्यास करण्याकडे त्यांचा कल नव्हता.

उज्जैन सिंहस्थपर्वात पुणे येथील साधक श्री. जयहिंद सुतार यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याविषयी सत्कार !

डावीकडे श्री. जयहिंद सुतार यांचा सत्कार
करतांना पू. डॉ. चारूदत्त पिंगळे
    उज्जैन, २६ एप्रिल (वार्ता.) - येथील सिंहस्थपर्वात लावलेले सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे प्रदर्शन साधकांसाठी आनंद देणारे नंदनवनच झाले आहे. पहिल्या दिवशी महर्षींच्या आदेशानुसार प्रदर्शनाचे उद्घाटन, दुसर्‍या दिवशी स्वत: भृगु ऋषींचे नाडीस्वरूपात प्रदर्शनस्थळी आगमन, तिसर्‍या दिवशी संत आणि मान्यवर यांच्या वंदनीय उपस्थितीत प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा झाला. अशा आनंद सोहळ्यांच्या मालिकेमुळे साधक जरी तृप्त झाले, तरी जणू गुरुमाऊलांच्या कृपेचा वर्षाव थांबला नाही; म्हणून सिंहस्थपर्वाच्या चौथ्या दिवशी प्रदर्शनस्थळी पुन्हा आनंदाचा वर्षाव झाला. निमित्त होते पुणे येथील साधक श्री. जयहिंद सुतार (वय ६३ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली मार्गदर्शक वचने

१. सेवा
अ. सेवा करतांना मनुष्यपण विसरावेच लागते.
आ. सेवा करतांना आपल्याला स्वपणा विसरून देवाकडून साहाय्य वा आधार घ्यावा लागतो.
इ. सेवेविषयी आपण श्रीमंत आहोत, धनवान आहोत, कसलीच न्यूनता नाही.
ई. जेव्हा आपण दुसर्‍यांना परिपूर्ण सेवा केली का ? असे विचारतो, तेव्हा त्या सेवेविषयी आपले दायित्व वाढते.
२. आनंद
२ अ. सहजता गेली की, तुम्ही आनंद गमावता ! : साधना आणि सेवा ही आनंदप्राप्तीसाठी आहे. त्यांचा ताण वा त्रास होत असल्यास आपण आपल्या सहजभावातून दूर जातो आणि साधनेतील आनंद गमावून बसतो. त्यासाठी जेवढा सहजभाव, तेवढा आनंद अधिक असतो.
२ आ. आपल्याच आनंदाला आपण जागृत करायचे, मग आनंद मिळतो.

पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून अधिकाधिक शिकून घेणारे त्यांचे सहप्रवासी साधक श्री. दिवाकर आगावणे !

श्री. दिवाकर आगावणे
     गेली ३ - ४ वर्षे पू. (सौ.) अंजली गाडगीळ सतत दौर्‍यावर आहेत. त्यांच्याबरोबर ४ - ५ साधक असतात. त्यांतील एक आहे श्री. दिवाकर आगावणे. पू. (सौ.) गाडगीळ यांचे वेळोवेळीचे उद्गार, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे इत्यादी सर्व श्री. दिवाकर आगावणे लिहून पाठवतो. पू. (सौ.) गाडगीळ यांच्या सोबत असणार्‍या आणि इतर साधकांनी दिवाकरची निरीक्षणक्षमता आणि सूत्रे तत्परतेने लिहिणे इत्यादी गुण शिकणे आवश्यक आहे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

लग्नाच्या वेळी पू. गाडगीळकाकांनी सासर्‍यांना दिलेले आश्‍वासन !

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
      पू. गाडगीळकाकूंचे लग्न झाले, तेव्हा पू. काकूंचे वडील पू. गाडगीळकाकांच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, आतापर्यंत मी हिला (पू. काकूंना) मुलगी म्हणून मोठे केले. आता तुम्ही तिला त्यापेक्षाही मोठी करा. त्या वेळी पू. गाडगीळकाका म्हणाले, तुम्ही काळजी करू नका. त्या वेळी पू. काकांनीही पू. काकूंच्या वडिलांच्या पाठीवरून हात फिरवला.
- श्री. दिवाकर आगावणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.१०.२०१५)

सहनशीलता आणि प्रेमभाव असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कोल्हापूर येथील कु. वेदराज निरंजन मगर (वय ८ वर्षे) !

कु. वेदराज मगर
    आज चैत्र कृष्ण पक्ष पंचमी (२७.४.२०१६) या दिवशी कोल्हापूर येथील बालसाधक कु. वेदराज निरंजन मगर याचा व्रतबंध आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.
कु. वेदराज निरंजन मगर 
याला व्रतबंधानिमित्त सनातन 
परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. जन्मापूर्वी - गर्भधारणा झाल्यावर
 सात्त्विक बाळ होण्यासाठी मांसाहार बंद करणे
       लग्न झाल्यानंतर मी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यास आरंभ केला. तेव्हा मी प्रतिदिन लहान लहान स्तोत्रे म्हणत असे. गर्भधारणा झाल्यानंतर मला पहिले तीन मास (महिने) मळमळ व्हायची. मला फोडणीचा वास सहन होत नसे. सात्त्विक बाळ व्हावे, यासाठी सात्त्विक आहार घ्यायचा असतो, हे कळल्यावर मी मांसाहार पूर्ण बंद केला. तेव्हा मी प्रतिदिन केवळ ताक आणि भात जेवत होते.
२. प्रसूतीच्या वेळी
        मी प्रसूतीगृहात यंत्रावर नामजप लावून ठेवला होता आणि उपायांसाठी अंगफलक घातला होता. गुरुकृपेने प्रसूतीच्या वेळी मला कोणताही त्रास झाला नाही.

मुलीचा विवाह म्हणचे यज्ञ आहे, असा भाव ठेवून प्रत्येक कृती आध्यात्मिक स्तरावर आणि भावपूर्ण करणार्‍या पू. (सौ.) अंजली गाडगीळ !

कु. प्रियांका जोशी
१. पू. काकू सायलीच्या विवाहानिमित्त करायच्या खरेदीला गेल्यावर त्यांनी देवकार्यासाठी लागणारे साहित्य प्रथम खरेदी करणे : पू. गाडगीळकाकू सायलीच्या विवाहानिमित्त खरेदीला गेल्यावर त्यांनी देवकार्यासाठी लागणार्‍या साहित्याची सर्वप्रथम खरेदी केली आणि मग सायलीचे कपडे, दागिने आणि विवाहानिमित्त द्यायच्या भेटवस्तू यांची खरेदी केली.
२. पू. काकूंनी त्यांच्या खोलीतील कपाटात सर्वप्रथम देवतांच्या चित्रांची स्थापना करणे आणि नंतर लग्नासाठी केलेल्या खरेदीचे साहित्य ठेवणे अन् सर्व वस्तूंना चैतन्य मिळण्यासाठी प्रार्थना करणे : विवाहासाठी लागणारी सर्व खरेदी झाल्यानंतर पू. काकूंनी आश्रमात त्या रहात असलेल्या खोलीतील कपाटात सर्वप्रथम श्रीकृष्ण आणि देवी यांच्या चित्रांची स्थापना केली, त्यांना उदबत्तीने ओवाळले अन् मगच खरेदीचे साहित्य कपाटात ठेवले. त्या वेळी पू. काकूंनी सर्व वस्तूंना चैतन्य मिळू दे, अशी प्रार्थनाही केली.

पू. (सौ.) अंजली गाडगीळ घरी येण्यापूर्वी आणि आल्यानंतर साधकाला आलेल्या अनुभूती

१. पू. काकू घरी 
येण्यापूर्वी एक पक्षी घराजवळ येणे
        काही मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) पू. (सौ.) गाडगीळकाकू आमच्या घरी आल्या होत्या. त्या येण्यापूर्वी दोन दिवस पिवळ्या रंगाचा एक पक्षी घराजवळ आला होता आणि त्या घरी आल्यानंतर तो पक्षी निघून गेला.
२. पू. काकू घरी 
आल्यानंतर आलेल्या अनुभूती
२ अ. सेवा करतांना समवेत असल्याचे जाणवणे : पू. काकू आमच्या घरी आल्या, तेव्हापासून मी सेवा करतांना त्या माझ्यासमवेतच आहेत, असे वाटते.
२ आ. नामजपाची आठवण करून देणे : जेव्हा माझा नामजप होत नाही, तेव्हा त्या मला नामजप करण्याची आठवण करून देतांना दिसतात.
२ इ. एकदा मला पुष्कळ त्रास होत होता, तेव्हा पू. काकूंनी माझ्यासाठी प्रार्थना केल्याचे मला दिसले.

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
      सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.

चि. सिद्धेश करंदीकर आणि चि. सौ. सायली यांच्या विवाहाच्या वेळी त्यांच्या नावांचा अर्थ मनात येताच तोंडात गोड चव येणे

       २१.४.२०१६ या दिवसापासून प्रतिदिन कु. सायली आणि श्री. सिद्धेश यांच्याविषयी दैनिकात चांगले चांगले लिहून येत आहे. ते वाचत असतांना सहजपणे माझ्या मनात उच्चार झाला, साय ली आणि विचार झाला, गाडगीळ कुटुंबाची साय म्हणजे दुधावरची साय. दुधावरच्या सायीलाच आपण फार जपतो. ली म्हणजे घेतली (करंदीकर कुटुंबाने) पाठोपाठ सिद्धेशचे स्मरण झाले. सिद्धेश = सिद्ध + ईश. जो साधनेत सिद्ध आहे, असा नारायणस्वरूप सिद्धेश पौराहित्यात पारंगत, म्हणजेच सिद्ध आहे. सिद्धेशसारखा सिद्ध जावई गाडगीळ कुटुंबाला लाभला. दोन्ही कुटुंबे या विवाह सोहळ्याने एकमेकांना बांधली गेली. असे हे नवदांपत्य साधनेत पुढे पुढे जावो, अशी श्रीकृष्णचरणी प्रार्थना ! हे लिखाणही त्यांच्या विवाहमुहूर्ताच्या वेळीच श्रीकृष्णाने लिहून घेतले. त्या वेळी तोंडात गोड चव आली. हे विचार येताच माझ्याकडून भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
- श्रीमती रजनी नगरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.४.२०१५)
       (या अंकातील काही लिखाण हे सौ. सायली सिद्धेश करंदीकर (पूर्वाश्रमीची चि. सायली गाडगीळ) यांच्या विवाहापूर्वीचा असल्याने त्यांचा उल्लेख कु. सायली असा आला आहे. - संपादक)

चि.सौ. सायली आणि श्री. सिद्धेश यांच्या विवाहसोहळ्यात साधकाला आलेल्या अनुभूती !

       भावाची अनुभूती शब्दांत सांगायला शब्द थिटे पडणारच, तरी चि.सौ.कां. सायली गाडगीळ आणि चि. सिद्धेश करंदीकर यांच्या विवाहसोहळ्याचे शब्दांत वर्णन करण्याचा हा अल्पसा प्रयत्न करत आहे.
१. विवाह सोहळ्यातून चैतन्य मिळू दे, अशी प्रार्थना 
होणे आणि त्याप्रमाणे सोहळ्यातून चैतन्याची अनुभूती येणे
       सोहळ्याचा प्रारंभ महर्षींनी केलेल्या दिव्य वाणीच्या कथनाने झाला. त्यानुसार या सोहळ्यात देवतांचे अस्तित्व प्रारंभीपासूनच जाणवत होते. या सोहळ्यातील चैतन्याचा लाभ होऊ दे, अशी प्रार्थना आपोआप आणि पुनःपुन्हा होत होती. विवाह सोहळ्यातून चैतन्य मिळू दे, अशी प्रार्थना पहिल्यांदाच झाली. विवाह सोहळ्यातून चैतन्य मिळू शकते, अशी कल्पनाही पूर्वी कधी केली नव्हती. आपण साधक असल्याने प्रत्येक कार्यक्रमातून चैतन्य मिळू दे, अशी प्रार्थना करतो; पण तशी चैतन्याची अनुभूती आपल्याला येतेच, असे नाही. या सोहळ्यात मात्र तशी अनुभूती आली. त्यानंतर कु. गायत्री बुट्टे यांनी स्वतः रचलेल्या आणि गायलेल्या भावपूर्ण मंगलाष्टकाने नयनी भावाश्रू दाटून आले अन् श्री. दामोदर वझे यांनी म्हटलेल्या गुरुपरंपरेतील मंगलाष्टकानंतर ते वाहू लागले.
        निधर्मी संकल्पनेचे अधिष्ठानच मूळ सनातन हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे उद्ध्वस्तीकरण हे आहे ! - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, ८.७.२०१०)

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

      मूळ भारतातील ३० टक्के प्रदेश मुसलमानांना पाकिस्तान निर्माण करण्यासाठी दिल्यानंतर हिंदूंना पवित्र असलेल्या अयोध्या, मथुरा आणि काशीसाठी भीक का मागावी लागते ? 
- पी. देवमुथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस
विवाह कसला ? हा तर भावसोहळा !
सिद्धेश आणि सायली, विवाहबद्ध जाहली ।
विवाहसोहळा नव्हे, सर्व जण भावसोहळा अनुभवती ॥ १ ॥
प्रारंभी दिव्य वाणी महर्षींची ऐकता होई भावजागृती ।
सोहळा संपेपर्यंत भावाश्रू नयनी दाटून रहाती ॥ २ ॥
काय वर्णू मी शब्दांतून या सोहळ्याची कीर्ती ।
ती असे अनुभूती, ती वर्णाया शब्द थिटे पडती ॥ ३ ॥
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
       हल्ली पाश्‍चात्त्य देशांत बहुधा भांडायला हक्काचे कोणी असावे; म्हणून लग्न करतात ! पुढे भांडणाचा कंटाळा आला की, घटस्फोट घेतात. नंतर पुन्हा लग्न करतात आणि पुन्हा घटस्फोट घेतात. असे चक्र चालू रहाते ! आपल्याकडे ही स्थिती होऊ नये; म्हणून साधना करा ! 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
आश्रमाविषयीचा दृष्टीकोन 
आश्रम माझा नाही; पण मी आश्रमाचा आहे.
भावार्थ: आश्रम माझा नाही म्हणजे आश्रमावर माझे स्वामित्व (मालकी) किंवा अधिकार (हक्क) नाही; कारण तो गुरूंचा आहे. मी आश्रमाचा आहे म्हणजे मी गुरूंच्या आश्रमाचा असल्याने आश्रमाची, आश्रमात आलेल्यांची काळजी घेणार व सेवा करणार. या दृष्टीकोनामुळेच आश्रमातील कामे करूनही आश्रमाविषयी प्रेम निर्माण होत नाही, तर प्रीती निर्माण होते. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

बोधचित्र


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

मनातील वादळे नकोत !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      समुद्रातील वादळ थोड्या काळात नाहीसे होते; पण मनातील वादळ एकदा निर्माण झाले की, ते आवरणे कठीण ! म्हणून मनातील ही वादळे निर्माण होऊ न देणेच श्रेयस्कर ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पालथ्या घड्यावर पाणी !

संपादकीय
     पाकशी चर्चा करणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी, हे केंद्रशासनाला गेल्या २ वर्षांत समजू शकले नाही. खरे तर समजले; पण वळले नाही. म्हणूनच भारताने पाकच्या सचिवांशी २६ एप्रिलला चर्चा केली. पाक भारताचे एकामागोमाग एक लचके तोडून या भूमीला रक्तबंबाळ करत असतांना भारताला चर्चा नावाच्या जीवघेण्या रोगाने पूर्ण जायबंदी केले आहे. पाककडून भारताच्या कुरापती काढण्याचे प्रकार गेल्या अनेक दशकांपासून चालू आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn