Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे संत पू. रत्नाकर मराठे 
यांची आज पुण्यतिथी, अमरावती
आज दैनिक सनातन प्रभातच्या (गोवा आणि 
सिंधुदुर्ग आवृत्तीचा) तिथीनुसार वर्धापनदिन

आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करून समाजात विद्वेष पसरवण्याचे कन्हैया कुमारचे षड्यंत्र ! - अभय वर्तक

कन्हैया कुमारसह आयोजकांवर गुन्हा नोंदवण्याची
 हिंदुत्ववादी संघटनांची पत्रकार परिषदेत मागणी
      पुणे, २४ एप्रिल (वार्ता.) - कन्हैया कुमारच्या मुंबई येथील सभेत भांडवलाचा ब्राह्मणी देव बाळ ठाकरे या विद्वेषी पुस्तकाच्या माध्यमातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करणारे पुस्तक वाटण्यात येत होते. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा अश्‍लाघ्य भाषेत अवमान करून हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी कन्हैया कुमारसह आयोजकांवर त्वरित गुन्हा नोंदवला जावा. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करून समाजात विद्वेष पसरवण्याचे कन्हैया कुमारचे षड्यंत्र आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी २४ एप्रिल या दिवशी शिवाजीनगर येथील स्पॅन एक्झिक्युटिव्ह या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले, अखिल पिंपरी-चिंचवड शिवजयंती महोत्सव समितीचे श्री. कुणाल साठे, हिंदु एकता आंदोलन पक्षाचे अधिवक्ता राजाभाऊ देशपांडे उपस्थित होते.

राष्ट्रभक्तीचा अग्नी धगधगत राहील ! - अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

देशद्रोही कन्हैया कुमारच्या 
विरोधात राष्ट्रभक्तांची निषेध सभा 
डावीकडून सर्वश्री विजय गावडे, अभय
वर्तक, अभिजीत देशमुख आणि अंकित काणे
        पुणे, २४ एप्रिल (वार्ता) - कन्हैयाला शिक्षा होईपर्यंत त्याने केलेल्या अपमानाची आग अंतःकरणात राहील. कन्हैयाला शिक्षा व्हावी, यासाठी ही सभा आहे. राष्ट्रद्रोहाचा विचार आम्हाला खोदून काढायचा आहे. राष्ट्रभक्तीचा अवमान कदापी सहन केला जाणार नाही. देश तोडण्यासाठी त्याने राष्ट्रनिष्ठेला आव्हान दिले आहे. कन्हैयाला शिक्षा होईपर्यंत राष्ट्रभक्तीचा अग्नी धगधगत राहील, असे सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक म्हणाले. हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने गुप्ते मंगल कार्यालय, केसरी वाड्यासमोर, नारायणपेठ येथे सायंकाळी ६.३० वाजता निषेध सभा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर श्री. विजय गावडे, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे अधिवक्ता राजाभाऊ देशपांडे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे श्री. अंकित काणे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत देशमुख उपस्थित होते.

वाराणसी न्यायालय परिसरात बॉम्ब सापडला !

     वाराणसी - २३ एप्रिल या दिवशी येथील न्यायालयाबाहेर असणार्‍या पानाच्या दुकानाखाली एक बॉम्ब सापडला. बॉम्बनाशक पथकाने तो निकामी केला. यानंतर संपूर्ण न्यायालय परिसराची तपासणी करण्यात आली. यापूर्वी येथे बॉम्बस्फोटाच्या दोन घटना घडल्या आहेत.

आज हिंदूंनी सिंहासारखे व्हायला हवे ! - श्रद्धेयप्रवर पू. श्री त्र्यंंंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज

उज्जैन येथील सिंहस्थपर्वामध्ये सनातन 
संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या 
धर्मशिक्षण फलक आणि ग्रंथप्रदर्शन कक्षांचे उद्घाटन ! 
ग्रंथप्रकाशन करतांना डावीकडून श्रद्धेयप्रवर पू. गुणप्रकाश चैतन्यजी
महाराज, श्रद्धेयप्रवर पू. श्री त्रंंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज, पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
प्रदर्शनाची माहिती देतांना (उजवीकडे) पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, त्यांच्या उजवीकडे श्रद्धेयप्रवर
पू. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज, श्रद्धेयप्रवर पू. श्री त्रंंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज आणि इतर मान्यवर
       उज्जैन, २४ एप्रिल (वार्ता.) - आज हिंदु धर्मियांची स्थिती ही बकर्‍यासारखी झाली आहे. इतिहासामध्ये सिंहाचा बळी गेला आहे, असे कधी ऐकले आहे का ? याचे उत्तर नाही असे असून कायम बकर्‍याचा बळी दिला जातो. त्यामुळे हिंदूंनी सिंहासारखे बनायला हवे. हिंदु आणि हिंदुत्व हे सिंहासारखे शक्तीशाली झाल्यास खर्‍या अर्थाने शांती आणि समृद्धी येईल, असे क्षात्रयुक्त प्रतिपादन श्रद्धेयप्रवर पू. श्री त्रंंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज यांनी केले. येथील उजाडखेडा हनुमान मंदिराजवळ सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने लावण्यात आलेल्या धर्मशिक्षण फलक आणि ग्रंथप्रदर्शन कक्षाचे उद्घाटन अखिल भारतवर्षीय धर्मसंघ आणि स्वामी करपात्री फाऊंडेशनचे श्रद्धेयप्रवर पू. श्री त्रंंबकेश्‍वर चैतन्यजी महाराज यांच्या शुभहस्ते २३ एप्रिल या दिवशी करण्यात आले. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.

देशातील न्यायाधिशांची संख्या वाढवा !

सरन्यायाधीश टी.एस्. ठाकूर यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे विनंती
  • देशात न्यायाधिशांची मोठ्या प्रमाणात कमतरता !
  • भाषण करतांना सरन्यायाधिशांना अश्रू अनावर झाले !
     लक्षावधी प्रलंबित खटले लवकर निकालात काढण्यासाठी न्यायाधिशांची संख्या वाढवण्यासाठी देशाच्या सरन्यायाधिशांना पंतप्रधानांकडे हात जोडून विनंती करावी लागते, हे लक्षात घ्या !
     नवी देहली - देशातील वाढते खटले लक्षात घेता मोठ्या प्रमाणात न्यायाधिशांच्या संख्येत वाढ होणे आवश्यक आहे; मात्र अनेक शासने या दृष्टीने ठोस पावले उचलण्यास असमर्थ ठरली आहेत. प्रलंबित खटल्यांच्या वाढत्या संख्येकरता केवळ न्यायालयांना दोषी ठरवता येणार नाही; कारण त्यांना मोठ्या दबावाखाली खटल्यांचा निकाल लावावा लागत आहे. त्यामुळे केवळ टीका करण्यापेक्षा सत्यस्थिती जाणून घ्या, तसेच न्यायाधिशांच्या वृद्धीसाठी प्रयत्न करा, अशी विनंती भारताचे सरन्यायाधीश टी.एस्. ठाकूर यांनी अतिशय भावूक होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हात जोडून केली. या वेळी ठाकूर यांना अश्रू आवरले नाही. सर्वसामान्य लोकांचा न्यायपालिकेवर विश्‍वास टिकून रहावा, यासाठी शासन स्वतःचे दायित्व पूर्ण करील, असे आश्‍वासन पंतप्रधान मोदी यांनी या वेळी दिले.

अलीगड मुस्लिम विद्यापिठात गोळीबार : १ ठार, १ घायाळ

ज्ञान देणारी विद्यापिठे बनली गुन्हेगारांचे अड्डे !
अशा विद्यार्थ्यांकडून कधीतरी देशहित साधले जाईल का ?
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - अलीगड मुस्लिम विद्यापिठाच्या आवारात मुसलमान विद्यार्थ्यांच्या दोन गटांत संघर्ष झाला. या संघर्षाच्या वेळी झालेल्या गोळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून एक गंभीर घायाळ झाला. सध्या विद्यापिठामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
     या विद्यापिठाच्या आफताब सभागृहात पूर्ववैमनस्यामुळे मोहसीन या विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी येथील प्रॉक्टर कार्यालय जाळले, तसेच २ वाहनांना आगी लावल्या. या संघर्षात अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात २ तरुण गंभीर घायाळ झाले. यातील एका तरुणाचा उपचाराच्या वेळी मृत्यू झाला, तर १ गंभीर घायाळ झाला. यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी संतप्त तरुणांना नियंत्रित करण्यासाठी हवेत गोळीबार केला. सध्या स्थिती नियंत्रणात आहे.

औरंगजेब मार्गाच्या नामांतराविषयी खेद !

हिंदूंनो, केजरीवाल यांचे खरे स्वरूप जाणा !
     नवी देहली - देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जमाअत इस्लामी हिन्द या मुसलमान संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या शिष्टमंडळाने राज्यातील मुसलमानांच्या समस्यांकडे केजरीवाल यांचे लक्ष वेधले. राज्यातील औरंगजेब मार्गाचे नाव पालटणे अयोग्य होते, असे या शिष्टमंडळाने म्हटले. तेव्हा केजरीवाल यांनी नामांतरावर खेद व्यक्त केला. काही महिन्यांपूर्वी देहलीतील औरंगजेब मार्गाचे नामांतर करून त्याला दिवंगत माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव ठेवण्यात आले आहे. (ए.पी.जे. कलाम यांच्यापेक्षा केजरीवाल यांना औरंगजेब अधिक महान वाटतो का ? - संपादक)

(म्हणे) आम्ही मनुस्मृतीला जाळू !

वैचारिक गोंधळ झाल्याने ताळतंत्र सुटलेल्या 
कन्हैयाकडून ब्राह्मण आणि मोदी द्वेषाचे प्रकटीकरण !
       पुणे - आम्ही जातीवाद आणि रुढी यांच्याविरोधात लढणारे लोक आहोत. परंपरांना पालटण्यासाठीच आमचे आंदोलन आहे. ही भूमी गोडसेंची आहे, तशी दाभोलकरांचीही आहे. ही समानतेची लढाई आहे. जितके रोहित माराल, तितके रोहित उभे रहातील. आमच्याजवळ आमचे ध्येय आहे. दारिद्य्ररेषेखालील लोकांना पूर्ण शिक्षण विनामूल्य करा. तंत्रज्ञानाचा वापर दुष्काळासाठी, लोकांच्या उत्थानासाठी करा. शासनाचा पैसा चुकीच्या पद्धतीने खर्च केला जात आहे. शासकवर्ग शोषित वर्गाला एकमेकांमध्ये लढवत आहे. शोषित आणि शोषण करणारे असा संघर्ष होईल. संविधानात पालट करणारे उद्या संविधानही जाळू शकतील. आम्ही संविधान पाळू आणि मनुस्मृती जाळू, असे जातीयवादी आणि विद्रोही वक्तव्य कन्हैया कुमार याने येथील बालगंधर्व सभागृहात संविधान सभेत बोलतांना केले. पंतप्रधानांवर टीका करतांना कन्हैया म्हणाला की, हा देश मोदींचा आहे म्हटले जाते; परंतु त्यांच्यापुढे आपली विचारधारा ठेवा. लोकांचे अधिकार आणि भविष्य यांचा सौदा केला जात आहे. महत्त्वाच्या संस्थांमध्ये रा.स्व. संघाचे लोक नेमण्यात येत आहेत. आंबेडकरांची जयंती साजरी करणारे आंबेडकरवादी लोकांना का घाबरत आहेत ? पंतप्रधानांच्या परदेशदौर्‍याची वृत्ते होतात; सामान्यांच्या अन्यायाची होत नाहीत. शिक्षणाच्या पैशातून मोदी सूट शिवत आहेत. योगतज्ञ रामदेवबाबांवर टीका करतांना तो म्हणाला की, हे महाग उत्पादने विकतात. महिलांचा द्वेष करतात. भारत माता कि जय म्हणण्याची ठेकेदारी यांना दिली आहे का ?

श्रीरामजन्मभूमीवर हिंदूंना कायमस्वरूपी पूजा करण्यास विशेष अनुमती द्या ! - हिंदु जनजागृती समिती

उपजिल्हाधिकारी श्री. संजीव देशमुख (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
     सातारा, २४ एप्रिल (वार्ता.) - केंद्रशासनाने विशेषाधिकार वापरून हिंदूंना कायमस्वरूपी श्रीराम जन्मभूमीस्थळी पूजा करण्यास विशेष अनुमती देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने सातारा शहरातील समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने राज्यपाल, केंद्रीय मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नावे उपजिल्हाधिकारी श्री. संजीव देशमुख यांना निवेदने देण्यात आली. या वेळी अखिल भारत हिंदु महासभेचे महाराष्ट्र्र प्रदेश उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद गांधी, जिल्हाध्यक्ष श्री. दत्ता सणस, कार्यकारणी सदस्य श्री. उमेश गांधी, विश्‍व हिंदु परिषदेचे शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे, प्रखर धर्माभिमानी हिंदू सर्वश्री विनायक पतंगे, सिद्धराज शेटे, राहुल कोल्हापुरे, विशाल कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

पुण्यात गोरक्षकांमुळे २१ गोवंशियांना हत्येपासून जीवदान

विविध घटनांमध्ये साडेबारा टन गोमांस शासनाधीन
     पुणे, २४ एप्रिल (वार्ता.) - हत्येच्या उद्देशाने गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍या गुन्हेगारांना पकडण्याची, तसेच मुक्या प्राण्यांना जीवदान देण्याची कामगिरी येथील गोरक्षकांनी बजावून गोमातेची सेवा केली. गोरक्षणाच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे साडेबारा टन गोमांस कह्यात घेऊन या संदर्भातील कायद्याच्या अंमलबजावणीची विदारक स्थितीच गोरक्षकांनी समोर मांडली आहे. मानद पशूकल्याण अधिकारी श्री. शिवशंकर स्वामी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. (धडाडीने गोरक्षण करणार्‍या सर्व गोरक्षकांचे अभिनंदन ! या प्रकरणी गोरक्षकांसह सर्व गोभक्तांनी संघटित होऊन गोहत्याबंदी कायदा, तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास पोलीस प्रशासनाला भाग पाडले पाहिजे. - संपादक)

कन्हैया कुमारसारख्या देशद्रोही प्रवृत्तीला मोठे करून देशात फुटीरता वाढवू नका ! - अभय वर्तक

देशद्रोही कन्हैया कुमारच्या विरोधात समस्त राष्ट्रप्रेमी आणि 
हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने मुंबईत निषेध सभा
     मुंबई, २४ एप्रिल (वार्ता.) - कन्हैया कुमार देशद्रोही प्रवृत्ती पसरवत आहे. आम्हाला कन्हैया कुमार याच्या प्रसिद्धीचे दु:ख नाही; मात्र अफझल, यासिन मलिक, साम्यवाद, नक्षलवाद आणि देशद्रोह यांचा पुरस्कार करणार्‍याला प्रसिद्धी देण्यात येत आहे. हे देशाच्या अखंडत्वाच्या दृष्टीने अतिशय हानीकारक आहे. कन्हैया कुमार याच्यासारख्या देशद्रोही प्रवृत्तीला मोठे करून देशात फुटीरता वाढवू नका, असे आवाहन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. २३ एप्रिल या दिवशी देशद्रोही कन्हैया कुमार यांच्या निषेधार्थ समस्त राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने मुंबईत टिळकनगर येथील सेल्वविनायनगर कामराज सभागृहात समस्त राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने घेण्यात आलेल्या निषेध सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. कैलास जाधव, हिंदु गोवंश रक्षा समितीचे श्री. वैभव राऊत आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर उपस्थित होते.

हिंदूंनी कबरीची पूजा न करता आपल्या देवतांची पूजा करावी !

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी 
स्वरूपानंद सरस्वती यांचे आवाहन
       बागपत (उत्तरप्रदेश) - काही हिंदू दर्ग्यात जाऊन तेथील कबरीची पूजा करतात, हे अयोग्य आहे. हिंदूंनी केवळ आपल्याच धर्मातील देवतांची पूजा केली पाहिजे. दर्ग्यात जाण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन द्वारका आणि शारदा पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी केले आहे. ते हरिद्वार अर्धकुंभ मेळ्यातून परत जात असतांना शामनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.
शंकराचार्य पुढे म्हणाले,
१. पूर्वी शाळांमध्ये मुलांना धार्मिक आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण दिले जात होते. त्यामुळे मुले संस्कारीत आणि धार्मिक बनत होती; परंतु आता मुसलमान आक्षेप घेतील, या भीतीमुळे शाळांमध्ये रामायण, गीता आदींचे ज्ञान दिले जात नाही.

भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे शासनाचा सारवासारव करण्याचा प्रयत्न !

मुख्यमंत्री पार्सेकर यांची मराठी आणि कोकणी शाळांच्या प्रतिनिधींशी बैठक
     पणजी, २४ एप्रिल (वार्ता.) - डायोसेसनच्या इंग्रजी शाळांना दिलेल्या अनुदानाविरोधात भारतीय भाषा सुरक्षा मंचने आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे जागे झालेल्या भाजप शासनाने सारवासारव करण्याचा प्रयत्न चालू केला आहे. मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी २२ एप्रिल या दिवशी राज्यातील मराठी आणि कोकणी शाळांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन शासनाने अर्थसंकल्पात घोषित केलेल्या अनुदानाविषयी माहिती दिली; मात्र या बैठकीला राज्यातील मोजक्या ९४ शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गोव्यातील शासकीय कार्यालयातील अधिकार्‍यांना स्थानिक भाषा येत नसल्याचे उघड !

मराठीतून केलेल्या अर्जाचे भाषा संचालनालयाकडून भाषांतर करून घेतले !
     सत्तरी (गोवा) - सध्या भारतीय भाषा सुरक्षेसाठी आणि मराठी राजभाषेसाठी वेगवेगळी आंदोलने चालू आहेत; मात्र मराठी आणि कोकणी या भाषा चक्क गोव्यातील काही अधिकार्‍यांनाच अवगत नाहीत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाळपई येथील माजी कृषी अधिकारी श्री. अनिरुद्ध जोशी यांनी उपनिबंधक कार्यालयात माहिती अधिकार कायद्याखाली मराठीतून केलेल्या अर्जाला मिळालेल्या उत्तरामुळे ही माहिती उघड झाली आहे. यामुळे गोव्यातील शासकीय कार्यालयांत इंग्रजीचे स्तोम मोठ्या प्रमाणात वाढल्याचे जळजळीत सत्य समोर आले आहे.

कळंबोली, नवी मुंबई येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरी !

     रायगड - ९ एप्रिल ते १५ एप्रिल २०१६ या दिवशी श्रीराम जन्मोत्सव, अखंड हरिनाम साप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्‍वरीचे सामुदायिक पारायण ठेवण्यात आले होते. लहान मुलांना देव, देश आणि धर्म यांचे आकर्षण अन् तरुणांना मार्गदर्शन, तसेच धर्माचे ज्ञान देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद, गोरक्षक दल, गुढीपाडवा सांस्कृतिक आणि सामाजिक सेवा संस्था, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांनी त्यात सहभाग घेतला.

मुंबईत विमानात कन्हैया कुमारवर तरुणाकडून कथित आक्रमण !

प्रसिद्धीसाठी आक्रमणाचा बनाव केल्याचा तरुणाचा आरोप
     मुंबई - जेएन्यू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारवर मुंबईत विमानात कथित आक्रमणाचा प्रयत्न झाला आहे. जेट एअरवेजच्या विमानात एका व्यक्तीने त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, असे कन्हैयाने त्याच्या ट्विटरवर सांगितले आहे. कन्हैयाचा गळा दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या व्यक्तीला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. कन्हैया कुमारवर आक्रमण केल्याचा आरोप धादांत खोटा असल्याचा दावा कथित हल्लेेखोर मानस डेका याने केला आहे. आपण विमानात खिडकीत बसलो होतो. त्या वेळी त्याला चुकून हात लागला; मात्र प्रसिद्धी आणि बातमी करण्यासाठी आपल्यावर आक्रमण झाल्याचा बनाव कन्हैयाने केला, असे मानसने म्हटले आहे. मानस टीसीएस् आस्थापनामध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे.

हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडणारे एकमेव दैनिक सनातन प्रभात ! - गो.रा. ढवळीकर, अध्यक्ष, मराठी राजभाषा समिती

दैनिक सनातन प्रभातच्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन करतांना डावीकडून
आमदार श्री. लवू मामलेदार, श्री. गो.रा. ढवळीकर आणि श्री. शशिकांत राणे
दैनिक सनातन प्रभातच्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा १७ वा,
साप्ताहिक सनातन प्रभातचा १८ वा, इंग्रजी मासिक सनातन प्रभातचा १० वा,
तर सनातन साधक पुरोहित पाठशाळेचा ८ वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा !
     सनातन आश्रम, रामनाथी, गोवा - आज हिंदूंवर अत्याचार झाले, तर सर्व वृत्तपत्रे मूग गिळून गप्प बसतात आणि मुसलमानांवर अत्याचार झाल्यास त्याला चांगली प्रसिद्धी दिली जाते. आज असहिष्णुता असल्याचे म्हटले जाते. तमिळनाडू आणि केरळ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे कार्यकर्ते यांची प्रतिदिन हत्या होत आहे आणि त्याचा प्रसारमाध्यमे साधा निषेधही करत नाहीत. हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडणारे सनातन प्रभात हे एकमेव दैनिक असून हे त्याचे मोठे वैशिष्ट्य आहे. भारतीय संस्कृती संवर्धनाचे कार्य सनातन प्रभात करत आहे. प्रचंड विरोध आणि कार्याची चिकाटी यांमुळेच सनातन प्रभात गेली १७ वर्षे खंबीरपणे मार्गदर्शन करू शकत आहे.

रा.स्व. संघाच्या शाखेत महिलांनाही प्रवेश हवा !

तृप्ती देसाई यांची आता नवी मागणी
       पुणे - भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मंदिर आणि दर्गा येथे प्रवेश देण्याची मागणी केल्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत महिलांना प्रवेश देण्याची मागणी केली आहे.
      पुरोगामी विचारांच्या संघनेतृत्वाने संघटनेत महिलांना बरोबरीचे स्थान आणि शाखांमध्ये महिलांना प्रवेश देऊन अच्छे दिनचा (चांगल्या दिवसाचा) प्रत्यय द्यावा, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. त्यासाठी तृप्ती देसाई सरसंघचालकांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार आहेत.

धर्मांधाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

     संभाजीनगर - नळाची दुरुस्ती करतांना अल्पवयीन मुलीचा हात धरून विनयभंग करणार्‍या धर्मांधाविरुद्ध जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. जिन्सीतील ३५ वर्षीय महिलेच्या घरातील स्नानगृहामधील नळ खराब झाला होता. त्यासाठी २० एप्रिलला रात्री साडेआठ वाजता सय्यद गफ्फार सय्यद रज्जाक या नळजोडणी करणार्‍याला दुरुस्तीसाठी बोलावले होते. या वेळी गफ्फारने त्यांच्या घरातील बारा वर्षीय मुलीला नळाचा कॉक दाखवण्याच्या निमित्ताने तिचा हात धरून विनयभंग केला आणि कोणाला सांगितल्यास जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

योगऋषी रामदेवबाबा वेदिक स्कूल बोर्ड स्थापणार !

    हरिद्वार - योगऋषी रामदेवबाबा वेदिक स्कूल बोर्ड स्थापन करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. त्यांनी याविषयीचा प्रस्ताव शासनापुढे ठेवला आहे. या प्रस्तावामुळे आपल्या मुलांना देशी तसेच अत्याधुनिक शिक्षण मिळणे शक्य होणार आहे. योगऋषी रामदेवबाबा यांनी २०१३ मध्ये आचार्यकुलम्ची स्थापना केली होती; मात्र या शाळा चालवतांना त्यासाठी वेगळा अभ्यासक्रम, वेगळी पाठ्यपुस्तके आणि परीक्षा यांची आवश्यकता त्यांच्या लक्षात आली. एखादे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळच ते करू शकते. त्यासाठी वेगळा वेदिक स्कूल बोर्ड स्थापन करण्याचा विचार योगऋषी रामदेवबाबा यांना चालवला आहे. (योगऋषी रामदेवबाबा यांचा स्तुत्य निर्णय ! यामुळे लक्षावधी हिंदु पालकांना त्यांच्या मुलांना वेद, उपनिषदे, शास्त्र आणि उच्च भारतीय साहित्य शिकवणे शक्य होणार आहे ! - संपादक) योगऋषी रामदेवबाबा यांनी वैदिक तथा अत्याधुनिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने आचार्यकुलम्ची स्थापना केली होती; मात्र ही शाळा सीबीएस्ईशी सलग्न असल्याने त्याचा उद्देश साध्य होत नाही. त्यामुळे वेगळ्या शिक्षण मंडळाची स्थापना करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. योगऋषी रामदेवबाबा यांच्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संमती देतील, अशी अपेक्षा आहे.१६ वर्षे निःस्वार्थी भावाने हनुमान मंदिराची स्वच्छता करणार्‍या सनातनच्या साधिका सौ. संगीता पाटील यांचा स्थानिकांकडून सत्कार

सौ. सुलोचना आहेर यांच्याकडून सत्कार
स्वीकारतांना उजवीकडे सौ. संगीता पाटील
     भोसरी, २४ एप्रिल (वार्ता.) - भोसरी येथील सनातनच्या ६२ प्रतिशत आध्यात्मिक स्तर गाठलेल्या साधिका सौ. संगीता पाटील या गेली १६ वर्षे अविरतपणे प्रत्येक शनिवारी इंद्रायणीनगर येथील हनुमान मंदिराची स्वच्छता करतात. या नि:स्वार्थी सेवाभावासाठी इंद्रायणी नगर रहिवासी मंडळाच्या वतीने हनुमान जयंतीच्या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला. येथील प्रतिष्ठित महिला सौ. सुलोचना आहेर यांच्या हस्ते सौ. पाटील यांना २ सहस्र ५०१ रुपये रोख आणि श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी सौ. पाटील यांच्या सेवेचे कौतुक केले, तसेच एका धर्माभिन्यांनीही साडी-चोळी देऊन सौ. पाटील यांचा सत्कार केला. माझी कोणतीही पात्रता नसतांना गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादामुळेच हा सत्कार झाला. हा सत्कार माझा नसून माझ्या गुरुमाऊलीचाच आहे, अशा भावना सौ. पाटील यांनी व्यक्त केल्या.

जेएन्यू : भारतीय स्वातंत्र्य आणि राज्यघटना यांवर प्रश्‍नचिन्ह

१. जेएन्यू भारतात कि त्यालाही ३७० वे कलम ? 
     काश्मीरमध्ये लागू असलेल्या कलम ३७० मुळे काश्मिरी सोडून अन्य कुठलीही व्यक्ती काश्मीरमध्ये घर खरेदी करू शकत नाही. जेएन्यूमध्ये झालेल्या गोंधळात प्रसिद्धीमाध्यमे आणि विरोधी पक्ष यांच्या मते काश्मिरी मुले जास्त होती आणि आता विद्यापीठ प्रशासनाने देहली पोलिसांना विशेषाधिकार दिला आहे. त्या अंतर्गत गुन्हा प्रविष्ट झाल्यावर ते कोणत्याही गुन्हेगाराच्या घरात घुसून त्याला पकडू शकतात. या अंतर्गत पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना अटक करण्यात आली होती; मात्र विद्यापीठ प्रशासनाने देहली पोलिसांना विद्यापीठ आवारात येण्यास आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी प्रतिबंध केला होता. त्यामुळे सर्व गुन्हेगार विद्यापीठ आवारातच होते.

मुंबई विद्यापिठाने राष्ट्रपुरुषांचा शॉर्टफॉर्ममध्ये उल्लेख करून केला अवमान !

राष्ट्रपुरुषांची नावेही नीट लिहू न शकणारे विद्यापीठ प्रशासन
विद्यार्थ्यांसमोर त्यांचा आदर्श काय ठेवणार !
     ठाणे - मुंबई विद्यापिठात सध्या चालू असलेल्या परीक्षेत कला शाखेच्या पदवी परीक्षेच्या राज्यशास्त्र या विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत थोर राष्ट्रपुरुषांच्या नावांचा शॉर्टफॉर्ममध्ये उल्लेख करून अवमान करण्यात आला आहे. यात उल्लेख केलेले म.गो., मो.क., भी.रा., रा.म. म्हणजे नेमके कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला असून या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

समानता आणि हक्क यांच्या नावाखाली तृप्ती देसाई हिंदु अन् मुसलमान यांच्या धार्मिक परंपरांशी खेळत आहेत ! - श्री. अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

श्री. अभय वर्तक
      मुंबई - मंदिरात देवाच्या प्राप्तीसाठी जातात. मंदिरे ही हक्काने घुसण्याची जागा नाही. तृप्ती देसाई करतात तशी आतातायीपणामुळे देवाची प्राप्ती होत नाही. त्यांची देवावर भक्ती नसून त्या कॅमेराप्रिय आहेत. समानता आणि हक्क यांच्या नावाखाली त्या हिंदु अन् मुसलमान यांच्या धार्मिक परंपरांशी खेळत आहेत, असे मत सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी टी.व्ही. ९ या वृत्तवाहिनीवरील एका चर्चासत्रात बोलतांना व्यक्त केले. या वेळी मुस्लिम अभ्यासक मुफ्ती अब्दुर रहेमान मिली, मुस्लिम विश्‍लेषक जावेद लोढिया, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, तसेच धर्मरक्षक मंचचे रमेश जोशी उपस्थित होते.

चंद्रभागेचे प्रदूषण थांबवण्यासाठी नमामि चंद्रभागा अभियान राबवणार ! - सुधीर मुनगंटीवार, वित्त मंत्री

     मुंबई/पंढरपूर - चंद्रभागा नदी ही महाराष्ट्राच्या निखळ आणि निरागस श्रद्धेचा मानबिंदू आहे. वारकरी आणि चंद्रभागा यांचे अतूट नाते आहे. चंद्रभागेच्या पावित्र्याचे आणि निर्मळतेचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन नमामि चंद्रभागा अभियान शासन आणि लोकसहभागातून राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येणारी आषाढी वारी ही अधिक निर्मल करणार असल्याचे आश्‍वासन वित्त आणि नियोजन मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. मंत्रालयात वारीमार्गावरील सर्व मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहे, रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करण्याविषयी वित्तमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते. 
    या अभियानांतर्गत वर्ष २०२२ पर्यंत चंद्रभागा प्रदूषणमुक्त करून तिचे जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहे. त्यासाठी वर्ष २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. चंद्रभागा नदीच्या पाण्याच्या प्रदूषणास कारणीभूत ठरणारे घटक नदीच्या प्रवाहात येण्यापासून रोखण्याच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

पाकमधील एका शीख नेत्याची गोळ्या झाडून हत्या !

* दादरी प्रकरण अथवा प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर भारतात असहिष्णुता वाढल्याची ओरड करणारे आता गप्प का ? 
* शिखांच्या अधिकारांसाठी लढल्यास राजकीय लाभ मिळणार नाही, असे भारतीय राजकारण्यांना वाटते का ?
पाकमध्ये अल्पसंख्यांकांच्या विरोधात अत्याचारांची मालिका चालूच !
     इस्लामाबाद (पाकिस्तान) - येथील प्रसिद्ध शीख नेते सरदार सूरन सिंह यांच्यावर अज्ञात आक्रमणकर्त्यांनी २२ एप्रिल या दिवशी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. आक्रमणकर्ते मोटार सायकलवरून आले होते. (ऊठसूट हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर निराधार आरोप करणार्‍या कथित पुरोगाम्यांनी जर या हत्येचे खापरही हिंदुत्वनिष्ठांवर फोडले, तर त्याचे कोणाला आश्‍चर्य वाटायला नको ! - संपादक)
        पाक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पख्तुनख्वा प्रांताच्या मुख्यमंत्र्याचे अल्पसंख्यांक प्रकरणात विशेष साहाय्यक म्हणून सरदार सूरन सिंह कार्यरत होते. अज्ञातांनी बुनेर जिल्ह्यात पीर बाबा यांच्या मजारीजवळ सिंह यांचे चारचाकी वाहन थांबवून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्या वेळी सिंह यांच्यासोबत कोणी सुरक्षारक्षक नव्हता. कोणत्याच संघटनेने या हत्येचे दायित्व घेतलेले नाही.

मुस्लीम पर्सनल लॉमुळे मुसलमान महिला न्यायापासून वंचित ! - सामाजिक कार्यकर्ते सय्यदभाई

     पुणे, २४ एप्रिल (वार्ता.) - सध्या अस्तित्वात असलेला मुस्लीम पर्सनल लॉ हा केवळ मुसलमान पुरुषांच्या बाजूचा आहे. मुसलमान पुरुषाला तलाक हवा असेल, तर तो तोंडी तलाक देऊ शकतो; मात्र मुसलमान स्त्रीला तलाकसाठी वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जावे लागते. वाटेल ते झाले, तरी मुस्लीम पर्सनल लॉला हात लावू द्यायचा नाही, असे काही धर्मांध मुसलमानांनी ठरवलेले आहे आणि राज्यकर्त्यांनी मतांसाठी अशांना वेळोवेळी गोंजारले आहे. मुसलमान महिलांना साधा न्याय मागण्याचाही हक्क मुस्लीम पर्सनल कायद्याने ठेवलेला नाही, असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यदभाई यांनी केले. वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत २२ एप्रिल या दिवशी मुस्लीम महिलांच्या प्रश्‍नांचे राजकारण या विषयावर ते बोलत होते.

श्रीनगरमध्ये मुसलमान धर्मगुरु १ सहस्र तिरंगे फडकवणार ! - बादिम पीर नसीम मिया चिश्ती

केवळ राष्ट्रध्वज न फडकवता 
राष्ट्रकार्यातही सहभागी व्हावे !
       नवी देहली - श्रीनगर येथील सूफी संत ख्वाजा साहेब यांच्या दर्ग्यामध्ये मुसलमान धर्मगुरु १ सहस्र तिरंगे फडकवणार असल्याची घोषणा या दर्ग्याचे प्रमुख बादिम पीर नसीम मिया चिश्ती यांनी केली आहे. या वेळी चिश्ती म्हणाले, ख्वाजा साहेबांच्या दर्ग्यात जाणारे मुसलमान आणि हिंदु यांच्यामध्ये देशभक्तीची भावना आहे. त्यामुळे दर्गाह दिवान जेव्हा येथे तिरंगा फडकवतील. त्यांचे समर्थकही १ सहस्र तिरंगे फडकवतील.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, दर्ग्यात जाण्यापेक्षा सर्वशक्तीमान हिंदु देवतांचे महत्त्व लक्षात घ्या ! 
     काही हिंदू दर्ग्यात जाऊन तेथील कबरीची पूजा करतात, हे अयोग्य असून त्यांनी केवळ आपल्याच देवतांची पूजा केली पाहिजे, असे आवाहन जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले आहे. हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : 
Hinduone majar par n jakar apnehi devtaonka pujan karna chahiye 
- Shankaracharya Swami Swarupanand Saraswatiji 
Hinduo, apne Dharma par abhiman karo !
जागो ! : 
हिन्दुओं ने मजार पर न जाकर अपने ही देवताओं का पूजन करना चाहिए. 
- शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी 
हिन्दुओ, अपने धर्म पर अभिमान करो !

आझमगडमध्ये धर्मांधांचा हैदोस

उत्तरप्रदेशात शासन आहे का ? हिंदूंनो, स्वरक्षणासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा निर्धार करा ! 
* नगरपालिकेच्या कार्यालयात तोडफोड 
* हिंदु व्यापार्‍याचे दुकान जाळले
     आझमगड (उत्तरप्रदेश) - येथील मुबारकपूर गावातील काही दुकानांमध्ये कुराणाच्या पानांपासून बनवलेल्या प्लेट आढळून आल्या. त्यामुळे संतप्त धर्मांधांच्या जमावाने नगरपालिकेत घुसून प्रचंड तोडफोड केली, तेथील कर्मचार्‍याची दुचाकी जाळली, तसेच प्लेटच्या घाऊक हिंदु व्यापार्‍याचे दुकान पेटवून दिले. दुपारी ३ वाजता चालू झालेला धर्मांधांचा हा हैदोस रात्री उशिरापर्यंत चालू होता.भारतातून चोरी केलेल्या बहुमूल्य वस्तूंची सोनिया गांधी यांच्या बहिणीकडून इटलीमध्ये विक्री ! - डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा आरोप

     नवी देहली - भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची बहीण भारतातून चोरी केलेल्या बहुमूल्य वस्तूंची आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री करते, असा आरोप ट्विटरवर केला आहे. यासंदर्भातील डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा व्हिडिओ प्रसिद्धीमाध्यमांमध्ये सार्वजनिक झाला आहेत.मध्यप्रदेशचे गृहमंत्री बाबुलाल गौर यांनी महिलेशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप

     भोपाळ - मध्यप्रदेशचे गृहमंत्री बाबूलाल गौर यांनी भोपाळमध्ये पालिकेच्या बसच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बसमध्ये चढणार्‍या महिलेशी अश्‍लील वर्तन केल्याचा आरोप केला जात आहे. बसमध्ये संबंधित महिला चढत असतांना बाबूलाल गौर यांनी छेड काढल्याचा आरोप आहे. या घटनेचे चित्रीकरणही करण्यात आले आहे; मात्र बसमध्ये चढतांना गर्दी होती. त्यामुळे आपण महिलांना चढण्यास सांगत होतो, असा दावा बाबूलाल गौर यांनी केला आहे.

पाकिस्तानी सैन्याकडून बलुचिस्तानमध्ये कार्यरत असणार्‍या ६ सैन्याधिकार्‍यांची हकालपट्टी !

     इस्लामाबाद - पाकिस्तानी सैन्याने तिच्या ६ सैन्याधिकार्‍यांची भ्रष्टाचाराच्या आरोपावरून हकालपट्टी केली आहे. यात लेफ्ट. जनरल उबैदुल्लाह खटक, मेजर जनरल एजाज शाहिद, ब्रिगेडियर असद शहजादा, ब्रिगेडर आमिर, ब्रिगेडियर सैफ आणि कर्नल हैदर यांचा समावेश आहे. हकालपट्टी करण्यात आलेले सर्व अधिकारी बलुचिस्तानमध्ये कार्यरत होते.

केरळमधील एका मशिदीमध्ये महिलांना प्रवेश !

      कोट्टयाम् - केरळमधील तझातंगाडी जुमा मशिदीतील १ सहस्र वर्षांची परंपरा तोडण्यात आली असून या मशिदीमध्ये २४ एप्रिल या दिवशी काही अटींवर महिलांना प्रवेश देण्यात आला. तसेच ८ मे या दिवशीही अशा पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहे. ही सुन्नी मशीद असून मोठ्या प्रमाणात विरोध डावलून हा निर्णय घेण्यात आला. या प्रवेशाचे मुसलमान महिलांनी स्वागत केले आहे. या मशिदीचे मौलवी सिराज-उद-दिन हसन म्हणाले, आम्ही महिला आणि पुरुष यांच्या एकत्र कार्यक्रमाला मान्यता देणार नाही. त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे. मशिदीत महिलांना नमाज पढता येणार नाही, तसेच येथील पारंपरिक कार्यक्रमामध्ये सहभागी होता येणार नाही.

चौकशीच्या वेळी पोलिसांनी केलेला अतोनात छळ आणि त्यातून दिसून आलेली त्यांची आसुरी मनोवृत्ती

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना अटक केली. त्याही स्थितीत साधकांनी स्थिर राहून व्यष्टी आणि समष्टी साधना चालूच ठेवली. चौकशीपासूनच पोलिसांनी सनातनच्या साधकांचा पुष्कळ छळ केला. पोलिसांच्या या कृती म्हणजे मानवतेलाही कलंक ठरतील अशाच आहेत. यातून त्यांची मनोवृत्तीही उघड होते. 
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

महिलांच्या मंदिर प्रवेशाचे आंदोलन म्हणजे प्रसिद्धीचा स्टंट !

अखिल भारतीय आतंकवादविरोधी मोर्च्याचे अध्यक्ष 
मणिंदरजीतसिंह बिट्टा यांची तृप्ती देसाई यांना चपराक
       शिर्डी - महाराष्ट्रामधील काही मंदिरांमध्ये प्रवेश करण्यासाठी महिलांकडून करण्यात येत असलेले आंदोलन, हा प्रसिद्धीचा स्टंट असून या महिला लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका अखिल भारतीय आतंकवादविरोधी मोर्च्याचे अध्यक्ष मणिंदरजीतसिंह बिट्टा यांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यावर केली आहे. बिट्टा येथील साई मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले होते.
       या वेळी बिट्टा म्हणाले, पूर्वजांपासून परंपरा चालत आल्या असून त्यांचे उल्लंघन करणे चुकीचे आहे. मी कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. आमची मंदिरे समाजाला बांधून ठेवतात. ज्या मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश नाही, त्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी महिलांच्या मागणीला माझा विरोध आहे. (शीख नेत्याला हिंदूंच्या मंदिराविषयी जी संवेदनशीलता आहे, तशी संवेदनशीलता किती हिंदु धर्मीय नेत्यांना आहे ? केवळ हिंदूंच्या मतांवर निवडून यायचे एवढेच माहीत असणार्‍या या नेत्यांना धर्मपरंपरांची काय किंमत ? - संपादक)

धर्मद्रोही तृप्ती देसाई यांचा पळपुटेपणा !

स्त्री स्वातंत्र्याचा आव आणून हिंदूंच्या धर्म-परंपरा मोडू पहाणार्‍या 
तृप्ती देसाई यांचा पळपुटेपणा पुढील सूत्रांवरून सिद्ध होईल.
१. निसर्ग नियमांचे भान तरी तृप्ती देसाई यांना आहे का ?
श्री. विक्रम डोंगरे
     निसर्ग नियमांनुसार शारीरिक, मानसिक आदी स्तरांवर स्त्री-पुरुष समान होऊच शकत नाहीत. एवढेच काय, तर पुरुष-पुरुष अथवा स्त्री-स्त्री यांच्यातही निसर्गाने भेद केला आहे. या सूत्राकडे तृप्ती देसाई डोळेझाक करतात, हा त्यांचा पळपुटेपणा नव्हे का ? कि त्यांच्या बौद्धिक क्षमतेला मर्यादा असल्याचे जनतेने मानावे ? असेच असले तर, अशा अविचारी व्यक्तीला हिंदूंच्या धर्मपरंपरा खंडित करण्याचा ठेका कुणी दिला ?
२. व्यक्ती तितक्या प्रकृती तितके प्रवृत्ती आणि निवृत्तीचे मार्ग !
    व्यक्ती तितक्या प्रकृती तितके प्रवृत्ती आणि निवृत्तीचे मार्ग आहेत, या सिद्धांताविषयी आता पाहू. एखादी व्यक्ती काळी आहे, तर एखादी सावळी. एखादी व्यक्ती हुशार आहे, तर एखादी ढ. एखादी व्यक्ती श्रीमंत आहे, एखादी गरीब. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगवेगळी असते. प्रत्येकातील स्वभाव वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. त्यांच्या आयुष्याची जडणघडणही वेगवेगळ्या पद्धतीने होते. त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांनुसार, त्यांच्या आयुष्याला वेगवेगळी कलाटणी मिळते. अर्थात् हा निसर्गनियमच आहे.

नेपाळमधील भूकंपानंतर देवभूमी नेपाळ साहायता अभियान पथकातील श्री. गुरुराज प्रभू यांनी प्रत्यक्ष साहाय्यकार्य करतांना आलेल्या अनुभवांचे वस्तूनिष्ठपणे केलेले वर्णन !

श्री. गुरुराज प्रभू
   २५.४.२०१५ या दिवशी मध्य नेपाळमधील सिंधुपाल चौक आणि दोलखा या जिल्ह्यांमध्ये ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप झाला. या जिल्ह्यांच्या शेजारी असलेल्या धादिंग, गोरखा आणि काठमांडू या जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणात हानी झाली. काही क्षणांतच होत्याचे नव्हते झाले. ८,५०० लोक मृत्यूमुखी पडले. सहस्रावधी घरे आणि वास्तू उद्ध्वस्त झाल्या. काही समजण्याच्या अगोदरच हे सर्व घडल्यामुळे नेपाळी जनता स्तब्ध झाली. 
   अशा वेळी भारत शासनाने शेजार धर्माचे उत्तम उदाहरण प्रस्तुत केले. भूकंपानंतरच्या काही घंट्यांतच आपत्कालीन साहाय्य पथके (Disaster Management force) आणि जीवनावश्यक सामुग्री पाठवून साहाय्याला विनाविलंब आरंभ केला. भारतीय सेनेच्या जवानांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपद्ग्रस्तांना साहाय्य आणि त्यांची सुटका हे कार्य अविरतपणे केले. कालांतराने इतर ५५ देशांनीही नेपाळला साहाय्य करण्यास आरंभ केला. मोठ्या भूकंपानंतर छोटे-मोठे भूकंपाचे धक्के सतत बसत होते. दोन दिवसांत असे २०५ धक्के बसले. अशा आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी नेपाळ हा छोटा देश सज्ज नव्हता; पण भारत आणि जगभरातून मदतीचा हात पुढे आल्यामुळे त्याला या कठीण प्रसंगाला तोंड देण्यास साहाय्य झाले. मागील लेखात आपण नेपाळमधील भूकंपानंतरची परिस्थिती तसेच प्रत्यक्ष साहाय्यकार्यातील अनुभव पाहिले. आता त्या पुढील भाग पाहूया.

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

उज्जैन येथील सिंहस्थपर्वात सेवारत साधकांसाठी फळांच्या रसाचा अर्क (स्क्वॅश), ओ.आर्.एस्. 
पावडर आदी तातडीने उपलब्ध करून देऊन राष्ट्र-धर्म कार्यात खारीचा वाटा उचला !
     सध्या उज्जैन (मध्यप्रदेश) येथे सिंहस्थ कुंभपर्व चालू आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने धर्मप्रसारासाठी कुंभस्थळी नानाविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध जिल्ह्यांतील शेकडो साधक त्यात सहभागी झाले आहेत. उज्जैन येथे कडक उन्हाळा असल्याने सेवेत सहभागी साधकांना उष्णतेचा तीव्र त्रास होऊ शकतो. त्या त्रासाची तीव्रता अल्प व्हावी, यासाठी फळांच्या रसाचा अर्क (स्क्वॅश), ओ.आर्.एस्. पावडर, ग्लुकोज पावडर, तसेच सनस्क्रीन लोशन यांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे डासांपासून संरक्षण होण्यासाठी ओडोमास आवश्यक आहे.
     जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील वस्तू अर्पण म्हणून देऊ शकतात, त्यांनी श्री. निषाद देशमुख यांच्याशी ९८२६७४२८३९ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी, 
हिंदी आणि मराठी संकेतस्थळाला भेट द्या !

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश) चि.सौ.कां. सायली झाली । सावली चि. सिद्धेशची ॥ आली समीप आली । घटिका शुभमुहूर्ताची ॥

      आज चैत्र कृष्ण पक्ष तृतीया (२५.४.२०१६) या दिवशी सनातन साधक-पुरोहित पाठशाळेतील चि. सिद्धेश प्रकाश करंदीकर आणि रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरात पूर्णवेळ सेवा करणार्‍या चि.सौ.कां. सायली मुकुल गाडगीळ हे विवाहबद्ध होत आहेत. त्यानिमित्ताने प.पू. पांडे महाराज यांनी भेटकार्डरूपी दिलेले शुभाशीर्वाद आणि अन्य लिखाण येथे देत आहोत.
चि. सिद्धेश करंदीकर आणि  
चि.सौ.कां. सायली गाडगीळ
यांना शुभविवाहानिमित्त सनातन
परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

प.पू. पांडे महाराज यांनी चि. सिद्धेश करंदीकर आणि चि.सौ.कां. 
सायली गाडगीळ यांच्या शुभविवाहाप्रीत्यर्थ दिलेले शुभाशीर्वाद !
प.पू. पांडे महाराज यांनी 
आशीर्वादरूपी दिलेल्या भेटकार्डातील लिखाण
समानी व आकूतिः समाना हृदयानि वः ।
समानमस्तु वो मनो यथा वः सुसहासति ॥ - ऋग्वेद, मंडल १०, सूक्त १९१, ऋचा ४
अर्थ : तुमचे संकल्प एकसमान असोत, तुमची हृदये एक होवोत, तुमची मने एकसमान होवोत, ज्यामुळे तुमचे परस्पर कार्य पूर्णरूपाने संगठीत होवो.

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
     सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.

चि. सिद्धेश करंदीकर आणि चि.सौ.कां. सायली गाडगीळ यांच्या विवाहाला महर्षींचा भरभरून आशीर्वाद !

     उद्या २५.४.२०१६ ला सकाळी चि. सिद्धेश करंदीकर आणि चि.सौ.कां. सायली गाडगीळ यांच्या विवाहाच्या प्रीत्यर्थ महर्षींनी केलेली दिव्यवाणी पुढीलप्रमाणे आहे.
     विवाहाच्या शुभमुहूर्ताच्या वेळी सर्व देव-देवता, सप्तर्षि, ८८ सहस्र ऋषी हे आकाशमंडळात उपस्थित असणार. या वेळी दक्षिण दिशेतून प्रकाशरूपी आशीर्वाद रामनाथी आश्रमाकडे येणार. आमचा आशीर्वाद म्हणजेच निसर्गाचा आशीर्वाद; म्हणून या वेळी वरुणाच्या रूपानेही आम्ही आशीर्वाद देऊ.
     हा विवाह म्हणजे देवलोकातील विवाह असाच असणार आहे. साक्षात श्रीमत् नारायणस्वरूप गुरूंच्या आश्रमात हा विवाहसोहळा पार पडणार. दोन्ही परिवारांना आमचे भरभरून आशीर्वाद असणार. आम्ही आकाशमंडळात मंगलवाद्ये वाजवू.
     गुरूंसाठी प्रवास करणारी कार्तिकपुत्री (पू. (सौ.) अंजली गाडगीळ) आणि सतत गुरूंसमवेत असणारी उत्तरापुत्री वृंदा (पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ) या दोघींना, तसेच यादव कुळाच्या राजाची (श्रीकृष्णाची) भक्ती करायला सांगणारे त्या महान गुरूंना आमचे भरभरून आशीर्वाद !

प.पू. डॉक्टरांवरील अतूट श्रद्धेच्या बळावर मुलीच्या जन्माच्या वेळी आलेल्या सर्व कठीण प्रसंगांना धिराने सामोरे जाणार्‍या सौ. मनीषा मोहन पाटील !

       आम्ही (मी आणि माझे पती) वर्ष १९९६ पासून साधनेला प्रारंभ केला. श्रीशैलचा जन्म १६.१०.२००१ या दिवशी झाला. तिच्या जन्माच्या वेळी आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
१. बाळाच्या जन्मापूर्वी
१ अ. नामजप करणे बंद केल्यावर गर्भाची हालचाल जोरात होऊन चक्कर येणे : मी गर्भधारणा झाल्यापासून सतत सत्संगाला जायचे, तसेच सेवा आणि नामजप करायचे. मी नामजप करत असेपर्यंत गर्भ शांत असायचा. माझा नामजप बंद झाला की, गर्भाची हालचाल एवढी असायची की, मला चक्कर यायची. मोठ्या मुलीच्या प्रसूतीच्या वेळीही मला पुष्कळ त्रास झाला होता.
१ आ. आठव्या मासात अकस्मात् बाळ गर्भाशयांत ताठ होत असल्याने त्रास होऊ लागणे आणि त्या वेळी मोठ्या मुलीला घेऊन प.पू. भक्तराज महाराज अन् प.पू. डॉक्टर यांच्या छायाचित्रांना वंदन करून रुग्णालयात जाण्यासाठी निघणे : गर्भारपणात माझा रक्तदाब वाढल्यामुळे मी योग्य ती काळजी घेत होते. गरोदरपणाच्या आठव्या मासात अकस्मात् बाळाभोवती असलेले सगळे पाणी निघून गेले. बाळ गर्भाशयात ताठ होत होते. त्याचा मला त्रास होऊ लागला. मी रुग्णालयात जाण्याचा विचार केला; पण घरी कुणीच नव्हते. माझे पती सत्संगासाठी कुडाळ येथे गेले होते. तेव्हा आमच्याकडे भ्रमणभाष नव्हता. घरच्या दूरभाषवरून संपर्क होऊ शकला नाही. मोठी मुलगी मैथिली पहिलीत शिकत होती. तिला मी शाळेतून घरी आणले. रुग्णालय (दवाखाना) थिवी, म्हापसा येथे होते. आम्ही देवघरातील प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. डॉक्टर यांच्या छायाचित्रांना वंदन करून रुग्णालयात जाण्यासाठी निघालो.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली धाडसी अन् हुशार, तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेऊनही धर्माचरण करणारी कोल्हापूर येथील कु. श्रीशैल मोहन पाटील (वय १४ वर्षे) !

१. आईने लहानपणापासून नामस्मरण, प्रार्थना आणि 
प.पू. डॉक्टरांप्रती श्रद्धा या गोष्टींचे महत्त्व मनावर बिंबवणे 
कु. श्रीशैल पाटील
       मी इयत्ता आठवीत शिकत आहे. माझ्या आईने लहानपणापासून नामस्मरण, प्रार्थना आणि प.पू. डॉक्टरांविषयीची श्रद्धा या गोष्टींचे महत्त्व माझ्या मनावर बिंबवले आहे. आई मला नेहमीच म्हणते, तू ईश्‍वराचा प्रसाद आणि आशीर्वाद आहेस. माझ्या संदर्भात गर्भावस्थेपासून जन्म, बाल्यावस्था ते आतापर्यंतच्या सर्व गोष्टी आई मला सांगत असे.
२. गुरुदेवांची भेट
२ अ. गुरुदेवांचे दिव्य रूप पाहून निःशब्द आणि निर्विचार होणे : मी ज्या गुरुदेवांमुळे आज जीवित आहे, त्यांना स्थूल रूपात पहाण्याची मला पुष्कळ इच्छा होती. एके दिवशी मला त्यांचे दर्शन घडले. मी त्यांना विचारण्यासाठी प्रश्‍न घेऊन गेले होते. गुरुदेव अगदी माझ्यासमोर बसले होते. मला त्यांच्या चरणांजवळ बसायला मिळाले. मी त्यांचे दिव्य रूप पाहून पूर्ण निर्विचार झाले. मी त्यांच्याकडे शांतपणे पहातच राहिले. मी आजपर्यंत केवळ त्यांच्या छायाचित्राशी बोलत असे. तेच गुरु माझ्यासमोर होते. मी अगदी निःशब्द आणि निर्विचार झाले होते.

एका संतांच्या सांगण्यानुसार अंतर्मनाला कृतज्ञतेची जाणीव होण्यासाठी कृतज्ञ या शब्दाचा अधूनमधून ५ वेळा जप केल्यावर कृतज्ञताभाव जागृत होऊन नामजपाची गुणवत्ता वाढणे

कु. गायत्री बुट्टे
१. कृतज्ञ या शब्दाचा जप केल्यावर अंतर्मनापासून कृतज्ञता व्यक्त होऊन ती देवापर्यंत पोचत असल्याचे जाणवणे : २५.१०.२०१५ या दिवशी कृतज्ञतेची जाणीव वाढावी, यासाठी कृतज्ञ हा शब्द ५ वेळा म्हणायचा, असे एका संतांनी सांगितल्याचे एका साधिकेकडून कळले. त्यानंतर मी अधूनमधून कृतज्ञ या शब्दाचा जप करतांना प.पू. डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करत असल्याचा भाव ठेवला. तेव्हा मला कृतज्ञता अंतर्मनापर्यंत आणि देवापर्यंत पोचत असल्याचे जाणवले आणि आतून कृतज्ञताभावही जागृत होऊ लागला.
२. एक आड एक आकाशदेव आणि कृतज्ञ असा नामजप केल्याने नामासह कृतज्ञताभाव जागृत होणे : काही वेळा ॐ ॐ श्री आकाशदेवाय नम: ॐ ॐ । आणि कृतज्ञ आहे । असे जप एक आड एक केले. त्या वेळी देवाच्या कृपेने मला त्याचे पवित्र, सुंदर, आनंदस्वरूप आणि प्रारब्ध नष्ट करणारे शुद्ध नाम घेण्याची मला संधी देऊन देवच नामजप करवून घेत आहे, असे वाटले. तसेच माझ्याकडून ही संधी मिळाल्याने कृतज्ञ, कृतज्ञ, कृतज्ञ, कृतज्ञ, कृतज्ञ आहे ! अशा प्रकारे भावपूर्ण नामजप होऊन कृतज्ञताभावही जागृत होऊ लागला.

रामनाथी आश्रमातून देवद आश्रमात सेवेसाठी आलेल्या श्रीमती गीता प्रभू यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१. शिकायला मिळालेली सूत्रे
१ अ. नेतृत्वगुण असणारे पू. भाऊ परब : ८.३.२०१५ या दिवशी देवद आश्रमात योगासनवर्ग चालू होण्यास विलंब झाला होता. योगासन घेणारे साधक त्या दिवशी वेळेवर आले नव्हते. तेव्हा पू. भाऊकाकांनी स्वतः पुढाकार घेऊन योगासनांचा वर्ग घेण्यास आरंभ केला. त्यांच्यातील नेतृत्वगुण शिकायला मिळाले.
१ आ. शौचालयाच्या भिंतीवरील घाण दिसल्यावर पूर्वी वाटणारी किळस आणि येणार्‍या प्रतिक्रिया नष्ट होऊन ती स्वच्छ करण्याची कृती सहजतेने करता येणे : २१.४.२०१५ या दिवशी मला शौचालयात भिंतीवर घाण दिसली. केवळ पाण्याने स्वच्छ करतांना ती स्वच्छ झाली नाही; म्हणून ब्रशचा वापर करावा लागला. पूर्वी असे करतांना मला किळस वाटत असे आणि प्रतिक्रिया येत असे.

पुणे येथे वसंत व्याख्यानमालेत असहिष्णुतेवरील परिसंवादात सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक यांचा सहभाग !

दिनांक : २५ मार्च
विषय : असहिष्णुता आणि आमचा पंथ
वेळ : सायंकाळी ६.३० ते ८
ठिकाण : टिळक स्मारक मंदिर, पुणे
       राजकीय विश्‍लेषक प्रा.डॉ. सुहास पळशीकर आणि फादर फ्रान्सिस दिब्रिटो हेही विचार मांडतील.

सायली-सिद्धेशच्या विवाहा, देवही आले शुभाशीर्वाद द्याया ।

ब्राह्ममुहूर्ताचे लग्न । देवही गं आले ।
पुष्पवृष्टी करोनिया । शुभाशीर्वाद दिले ॥ १ ॥
सप्तर्षींची उपस्थिती । वंदनीय असे बाई ।
लग्न लावी साधकाचे । कृपावर्षाव होई ॥ २ ॥
वधू सायली साजिरी । नेसली पिवळा शालू ।
म्हणे स्वयं माता लक्ष्मी । सुवासिनीचा साज तिज घालू ॥ ३ ॥
म्हणे पार्वतीमाई । घे गं सौभाग्याचे लेणे ।
जीव जोड गं शिवाशी । शिवशक्तीचे हे देणे ॥ ४ ॥

चि. सिद्धेश आणि चि.सौ.कां. सायली यांच्या विवाहाच्या वेळी म्हणावयाचे मंगलाष्टक

आली समीप आली । घटिका शुभमुहूर्ताची ॥
ॐ जयंतनाम महर्षि । अवतरे महिवरी ।
परम दयाळू परात्पर गुरु । कृपा त्यांची वधू-वरांवरी ॥ १ ॥
सर्व सिद्ध । अक्षता घेऊन हाती ।
आली समीप आली । घटिका शुभमुहूर्ताची ॥ धृ ॥
दिव्य लोकांतील महर्षि । देवताही येती भूवरी ।
सर्वत्रचे संत येती । साधकही येती सत्वरी ॥ २ ॥
सर्व सिद्ध । अक्षता घेऊन हाती ।
आली समीप आली । घटिका शुभमुहूर्ताची ॥ धृ ॥
कृष्णवेळेत कृष्णछायेतची । कृष्णप्रिया अनुराधा नभी ।
तेजोमय रवि साक्षी । उदितसे पूर्व क्षितिजावरी ॥ ३ ॥ 

नवरा-नवरी हिंदु राष्ट्रातली, जोडी देवाची पाहिली ।

आली हळद गं ओली । भोळ्या शिवशंकराची ।
लावितेे देवी पार्वतीला । दासी गुरुमाऊलीची ॥ १ ॥
आली हळद गं ओली । नारायण भगवंताची ।
लाविते देवी लक्ष्मीला । दासी गुरुचरणांची ॥ २ ॥
आली हळद गं ओली । प्रभु श्री रामचंद्राची ।
लाविते देवी सीतेला । दासी रामराज्याची ॥ ३ ॥
आली हळद गं ओली । भगवंत विठ्ठलाची ।
लाविते देवी रुक्मिणीला । दासी गुरुमाऊलीची ॥ ४ ॥
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      राजकारणी आणि आरक्षणवाले स्वार्थ शिकवतात, तर गुरु स्वार्थत्यागच काय, तर सर्वस्वाचा त्याग करायला शिकवतात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

देवाकडे ऐहिक सुख मागू नये

॥ हरि ॐ तत्सत् ॥
संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
      मुलाने विष मागितले, तरी आई आणि डॉक्टर त्याला विष देत नाहीत. तसेच देवही ऐहिक सुख देत नाही; कारण त्याला ठाऊक असते की, हे त्याला पेलवणार नाही. म्हणून देवाकडे भीक (ऐहिक सुख) मागण्यात अर्थ नाही.
भावार्थ : देव, म्हणजे गुरु, हे देवापासून दूर नेणारे ऐहिक सुख देत नाहीत. देवापासून दूर जाणे हे साधकाच्या दृष्टीने मरणच होय; म्हणून ऐहिक सुख हे विषासमान मानले आहे. 
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमार्थ म्हणजे काय ? 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
स्वार्थाची (स्वचा अर्थ जाणून घ्यायची) पराकाष्ठा, म्हणजे परमार्थ ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

कन्हैयाचा गळा.. तृप्तीला चप्पल !

संपादकीय
    वैशाख वणव्याच्या झळांनी देश त्रासला आहे. त्यातच महाराष्ट्रात सलग तिसर्‍या वर्षी दुष्काळ पडला आहे. देशात अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. दुष्काळामुळे महाराष्ट्रात होणारे आयपीएल्चे सामने अन्य राज्यांत हालवण्यात आले आहेत. दुष्काळग्रस्त नागरिकांची तहान भागवण्यासाठी, त्यांची भूक शमवण्यासाठी शासनाकडून हवे तसे प्रयत्न केले जात असल्याचे दिसत नाही. यातही शिवसेना वगळता अन्य राजकीय पक्षही काही प्रयत्न करत असल्याचे दिसत नाहीत. निवडणुकीच्या वेळी मात्र हेच पक्ष आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ, अशा भूलथापा मारण्यासाठी विमाने, हेलिकॉप्टर, गाड्या उडवत लोकांच्या घरापर्यंत पोहोचतात. यालाच या देशातील तथाकथित बुद्धीवंत लोकशाही म्हणतात. ही लोकशाही ज्या राज्यघटनेच्या आधारे चालवली जात आहे, त्या राज्यघटनेचा द्रोह करत जनतेची गेली ६६ वर्षे राजकारण्यांकडून फसवणूक केली जात आहे. हे राजकारणी इतके हुशार असतात की, त्यांच्या अंगावर दुष्काळ किंवा अन्य घटना शेकायला लागली की, जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतात किंवा सत्ताधारी पक्षांना अडचणी आणण्यासाठी अनावश्यक घटनांना मोठे करतात आणि याला जनताद्रोही प्रसारमाध्यमे साथ देतात. सध्या अशा दोन घटना देशात आणि महाराष्ट्रात दिसत आहेत. जणूकाही राज्यातील सर्व समस्या संपलेल्या आहेत, अशा आविर्भावात प्रमारमाध्यमे त्याकडे जनतेचे लक्ष वेधत आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn