Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

कोटी कोटी प्रणाम !

आज श्रीधरस्वामी पुण्यतिथी, सज्जनगड

आज प.पू. सत्यसाईबाबा पुण्यस्मरण (दिनांकानुसार)

आज प.पू. दत्तात्रेय जोशी यांची पुण्यतिथी, मुंबई.

तृप्ती देसाई हाजी अली दर्ग्यात आल्यास 'चपलांचा प्रसाद' देऊ !

* हिंदू नेते मुसलमान नेत्यांकडून धर्मप्रेम शिकतील का ?
* हिंदूंचा एकतरी धर्माभिमानी राजकीय नेता हिंदूंसाठी असे बोलण्याचे धाडस करतो का ?
* मुसलमानांमध्ये धर्मप्रेम असल्याने ते आज जगाला भारी पडत आहेत आणि हिंदूंना मात्र कोणीही भीक घालत नाही !

शिवसेनेचे धर्मप्रेमी मुसलमान उपनेते हाजी अराफत शेख यांची हिंदु धर्मद्रोही तृप्ती देसाई यांना चेतावणी !

मुंबई - भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेश केल्यास त्यांना चपलाचा प्रसाद देऊ, अशी चेतावणी शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांनी दिली आहे.
१. हिंदूंच्या शनिशिंगणापूर आणि महालक्ष्मी मंदिरात महिलांना प्रवेश मिळवल्याच्या अहंकारी विजयानंतर तृप्ती देसाई यांनी मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा; म्हणून आंदोलन चालू केले आहे.
२. यासाठी देसाई यांनी हाजी अली सबके लिए या संस्थेची स्थापना केली आहे. त्यांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेशासाठी येत्या
२८ एप्रिलपासून धरणे आंदोलन करण्याचे घोषित केले आहे. (हिंदूंच्या मंदिरात बळजोरीने घुसण्याचे आंदोलन करणार्‍या तृप्ती देसाई मुसलमानांच्या श्रद्धास्थानी मात्र धरणे आंदोलन करतात ! - संपादक)

ओडिशात गोतस्करीच्या विरोधात कार्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठाला १६ दिवसांच्या पोलीस कोठडीत पुष्कळ मारहाण !

गोतस्करीच्या विरोधात कार्य करणार्‍या सहिष्णु हिंदूंना मारहाण करणारी पोलीस यंत्रणा गोतस्करी, गोहत्या करून कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवणार्‍या धर्मांधांच्या विरोधात ब्रही काढत नाही, हे लक्षात घ्या !
निवेदनासहित श्री. अनिल धीर (१) आणि गो ज्ञान फाऊन्डेशन अन् भारत रक्षा मंच यांचे हिंदुत्वनिष्ठ
भुवनेश्‍वर (ओडिशा) - येथील गोतस्करी करणार्‍यांच्या विरोधात कार्य करणारे आणि देहली येथील गो ज्ञान फाऊन्डेशन संघटनेचे हिंदुत्वनिष्ठ तीर्थकुमार साहू यांना पोलीस कोठडीत डांबून अनुमाने १६ दिवस पुष्कळ मारहाण करण्यात आली. यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले. शेवटी २० एप्रिल या दिवशी रायगडा जिल्ह्याच्या जिल्हा न्यायाधिशांनी त्यांना जामीन संमत केला. येथील जिल्हाधिकारी जगन्नाथ मोहंती यांनी साहू यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून त्यांना पोलिसांच्या कह्यात दिले होते. पोलिसांनी साहू यांच्यावर विविध गंभीर आरोप नोंद केले.
१. केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री मेनका गांधी यांनी या प्रकरणात स्वत: नोंद घेऊन ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना जिल्हाधिकार्‍यांच्या संशयी भूमिकेच्या संदर्भात पत्र लिहिले. (मेनका गांधी यांच्यासारखी गोरक्षणाची तळमळ अन्य हिंदुत्वनिष्ठ नेत्यांमध्ये केव्हा निर्माण होणार ? - संपादक)

गोवा येथे पंचम 'अखिल भारतीय हिंदू अधिवेशना'च्या सिद्धतेला आरंभ !

फोंडा (गोवा) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत पंचम 'अखिल भारतीय हिंदू अधिवेशन' आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात हिंदु धर्म आणि समाज यांवर होणार्‍या आघातांचा प्रतिकार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती (संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, संपादक, लेखक) सहभागी होणार आहेत. 'हिंदु राष्ट्राची स्थापना', हे या अधिवेशनाचे प्रमुख ध्येय आहे. या अधिवेशनात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, केरळ, अंदमान, ओडिशा, आसाम, बंगाल, झारखंड, जम्मू-काश्मीर, हरियाणा, देहली, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत.

जपान १५० पंडितांकरवी शतचंडी संहिता महारुद्र यज्ञ करणार !

भारत शासन यातून काही बोध घेणार का ? हिंदु परंपरांना थोतांड म्हणून हिणवणारे बुद्धीप्रामाण्यवादी आता जपानच्या या कृतीला अंधश्रद्धा म्हणणार का ?
* वारंवार येणार्‍या नैसर्गिक आपत्ती, तसेच जपानी युवकांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी यज्ञ !
* भारताच्या दौर्‍यावर आलेले जपानचे पंतप्रधान शिंजो अबे हिंदु धर्माने प्रभावित झाले होते !
टोकियो (जपान) - जपानला भेडसावत असणार्‍या समस्यांचे निवारण करण्यासाठी ऑक्टोबर २०१६ मध्ये १५० भारतीय पंडितांकरवी शतचंडी संहिता महारुद्र यज्ञ करण्यात येणार आहे. काही मासांपूर्वी जपानचे पंतप्रधान शिंजो अबे भारताच्या दौर्‍यावर आले होते. त्या वेळी काशीत अबे यांचे पारंपरिक हिंदु पद्धतीने स्वागत करण्यात आले होते. अबे भारतातील महान वैदिक परंपरेने प्रभावित झाले.
१. अमेरिकेतील टेक्सास राज्यात असलेल्या 'वैदिक यज्ञ केंद्रा'च्या पुढाकाराने आणि जपान शासनाच्या अनुमतीने शतचंडी संहिता महारुद्र यज्ञ आयोजित करण्यात आला आहे.

तुम्ही सर्वधर्मसमानता मानता का ? मग या प्रश्‍नांची उत्तरे शोधा !

हिंदुविरोधकांनी इस्लाम, ख्रिस्ती, साम्यवाद इत्यादी हिंदुविरोधी धर्मपंथांच्या व्यतिरिक्त 'सर्वधर्मसमानता' हा आणखी एक हिंदुविरोधी धर्मपंथ निर्माण केला आहे. या पंथाचे अनुयायी स्वत:ला सर्वधर्मसमानतावादी म्हणतात; परंतु काही सर्वधर्मसमानतावादी वस्तूस्थितीविषयी खरोखरच अज्ञानी आहेत. व्यवहारातील वस्तूस्थितीची जाणीव करून देणारा यथार्थ देखावा जर त्यांना दाखवला, तर ते राष्ट्रवादीत्वामध्ये पालटतील. अशांपैकी तुम्ही असाल, तर या चौकटींची प्रबोधनमालिका खरोखरच आपणासाठी आहे. या प्रबोधनातून व्यवहारातही सर्वधर्मसमानता कशी पक्षपातीपणे आचरली जात आहे आणि ही सर्वधर्मसमानता दांभिक कशी आहे, याची जाणीव होईल.
१. भारतातील एकतरी मुल्ला-मौलवीने आतंकवाद्यांच्या विरोधात 'फतवा' काढला आहे का ?
२. हिंदु बहुसंख्य असलेल्या महाराष्ट्र, बिहार, केरळ, पांडेचरी इत्यादी राज्यांनी यापूर्वी मुसलमान मुख्यमंत्री निवडले आहेत. मुसलमानबहुल जम्मू-काश्मीर किंवा ख्रिश्‍चन प्रभाव असलेल्या नागालॅण्ड, मिझोराम या राज्यांमध्ये हिंदु मुख्यमंत्री होण्याची कल्पना तुम्ही करू शकता का ?
- पी. देवमथ्थु, संपादक, हिन्दू व्हॉईस (क्रमश:)

ब्राह्मणद्वेषी कन्हैयाची टीका
मुंबई - आम्ही जातीच्या विरोधात नाही, जातीव्यवस्थेच्या विरोधात आहोत. ती संपवा. ब्राह्मणावादाचा संबंध ब्राह्मणांशी नाही. देशात जी लूट चालू आहे, त्याविरोधात आम्ही आहोत. आम्ही समाजकारणाची लढाई लढतोय. आम्हाला वेमुलाला न्याय द्यायचा आहे. जे रोहित अ‍ॅक्ट आणण्याची गोष्ट करणार नाहीत, जे मुसलमानांना देशभक्तीचे प्रमाणपत्र मागतील त्यांना आम्ही सत्तेत येऊ देणार नाही. दंगल करणार्‍यांचा जात-धर्म नसतो. यांनी दाभोलकर, पानसरे यांच्यावर गोळ्या चालवल्या; परंतु अशा किती गोळ्या चालवणार, असे कन्हैया म्हणाला. कुर्ला सहकारनगर येथील आदर्श हायस्कूल येथे आंबेडकरवादी आणि कथित धर्मनिरपेक्षतावादी संघटनांच्या वतीने २३ एप्रिल या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी मेळाव्यात तो बोलत होता. या वेळी व्यासपिठावर माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील, अधिवक्ता इरफान इंजिनिअर, लेखक जयंत पवार उपस्थित होते.

भदोही (उत्तरप्रदेश) येथे भर रस्त्यात धर्मांधांनी हिंदु युवतीला मारहाण करून तिचे कपडे फाडले !

हिंदु युवतींनो, स्वत:च्या शीलरक्षणासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !
     येथील नगरपालिकेसमोर स्थानिक आमदार जाहिद बेग यांचा पुतण्या शादाब बेग आणि त्याच्या सहकार्‍यांनी एका हिंदु युवतीला भर रस्त्यात मारहाण केली आणि तिचे कपडे फाडले. त्यानंतर युवतीने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. याप्रकरणी गुन्हा प्रविष्ट होऊन २ दिवस उलटल्यानंतरही पोलिसांनी आरोपीला अटक केली नव्हती. याविषयी बजरंग दल आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना खडसवले आणि आरोपींना अटक करण्याची मागणी केली, तसेच अटक न केल्यास आंदोलन करण्याची चेतावणी दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शादाबला अटक केली. कन्हैया कुमारच्या सभेसाठी पूर्वनियोजित गाण्याचा कार्यक्रम रहित करून बालगंधर्व सभागृह उपलब्ध करून देण्याचे महापौरांचे आदेश

व्हॉटस् अ‍ॅपवर 
महापौरांच्या निषेधाची चळवळ
        पुणे, २३ एप्रिल (वार्ता.) - देशद्रोहाचा आरोप असलेला कन्हैया कुमार याची पुरोगामी विद्यार्थी युवक संघर्ष समितीच्या वतीने शहरात सभा आयोजित करण्यात आली आहे. आधी सिंहगड रस्त्यावरील राष्ट्र सेवा दलाच्या सभागृहात होणार्‍या या सभेला पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव अनुमती नाकारली. त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिर येथे सभा घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्यासाठी बालगंधर्व रंगमंदिर उपलब्ध करून देण्यासाठी महापौरांनी आदेश दिल्याचे समोर येत आहे. (अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशविरोधी, हिंदुत्वविरोधी वक्तव्ये करून समाजात दुफळी निर्माण करणार्‍या कन्हैया कुमारच्या कार्यक्रमाला शहराचे प्रथम नागरिक या नात्याने खरे तर महापौरांनी विरोध करायला हवा होता. तो न करता कन्हैया कुमारच्या सभेसाठी सहकार्य करण्याची भूमिका ही देशभक्त नागरिकांच्या भावना दुखावणारीच आहे. - संपादक)

देशद्रोही कन्हैयाच्या विरोधात हिंदुत्ववाद्यांची मुंबईत निषेध सभा

डावीकडून हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. कैलास जाधव, सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक, हिंदु गोवंश रक्षा समितीचे श्री. वैभव राऊत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर

कन्हैया कुमारच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीची निवेदने

कार्यक्रमाला अनुमती न 
देण्याची पोलीस-प्रशासनाकडे मागणी 
महापौर प्रशांत जगताप यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते
        पुणे, २३ एप्रिल (वार्ता.) - देशद्रोही महंमद अफजल याच्या स्मृतीप्रीत्यर्थ कार्यक्रम आयोजित करून भारतमातेला उद्ध्वस्त करण्याचे स्वप्न पहाणार्‍या कन्हैया कुमारच्या सभेचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. शहराची सामाजिक शांतता कायम राखण्यासाठी देशद्रोहाचे आरोप असलेल्या कन्हैया कुमारच्या कार्यक्रमाला अनुमती देण्यात येऊ नये, अशी मागणी विविध हिंदुत्ववादी आणि राष्ट्रप्रेमी संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वरील मागणीची निवेदनेही गेल्या २ दिवसांमध्ये पोलीस-प्रशासनाला दिली आहेत. (अशी मागणी देशभक्त नागरिकांना का करावी लागते ? कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याचे दायित्व असलेल्या पोलिसांनीच या प्रकरणी कन्हैया कुमारला स्वत:हून जिल्हाबंदी करणे आवश्यक आहे. - संपादक)

न्यायालयाची स्थगिती असतांनाही प्रशासनाने चंदीगडमधील आश्रम आणि मंदिर पाडले !

देहली येथील विविध चर्च यांवर हिंदुत्वनिष्ठांनी आक्रमणे करण्याच्या खोट्या आणि निराधार 
आरोपांना ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवणारी राष्ट्रीय स्तरावरील प्रसारमाध्यमे आता 
या प्रकरणाविषयी मूग गिळून गप्प का बसली आहेत ? हीच का त्यांची धर्मनिरपेक्षता ?
 • अनेक महिला संत आणि साधिका यांना आता रहायला छप्परही नाही ! 
 • महानगरपालिकेडून स्थगितीची प्रत मिळाली नसल्याचा कांगावा !
जेसीबीद्वारे (उजवीकडे) आश्रम पाडला जात
असतांना. शिवाचे मंदिर दिसत आहे.
     चंदीगड - येथील ४० वर्षे जुन्या श्री नांगली आश्रमाला पाडण्याच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती देऊनही चंदीगड महानगरपालिकेने आश्रमाची इमारत आणि तेथील शिवाचे मंदिर पाडले. या संदर्भात महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी स्थानिक न्यायालयाला स्पष्टीकरण देत म्हटले की, आश्रम पाडल्यानंतर आम्हाला स्थगितीची प्रत मिळाली. (हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते, हे तरी प्रशासनाला माहीत होते कि नाही ? प्रशासनाला काहीही करून मंदिर आणि आश्रम पाडायचाच होता, हे यातून सिद्ध होते. -
शिवाची पिंड इतस्तत: पडलेली दिसत आहे.
  संपादक)
यावर आश्रमाचे प्रमुख संत रामेश्‍वर नंद पुरीजी यांच्या अधिवक्त्याने महानगरपालिकेवर आरोप लावत न्यायालयात सांगितले की, आश्रमाला पाडण्याच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिल्याची कागदपत्रे आश्रम पाडण्याआधीच आम्ही अधिकार्‍यांना दाखवली होती; परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून आणि न्यायालयाचा अवमान करत आश्रम आणि तेथील शिव मंदिर पाडले. याचे आम्ही ध्वनीचित्रीकरणही केले आहे. (यावरून चंदीगड महानगरपालिकेचा हिंदुद्रोहच स्पष्ट होतो. अल्पसंख्यांकांच्या प्रार्थनास्थळांविषयी कधी महानगरपालिकेचे अधिकारी अशी भूमिका घेऊ धजावले तरी असते का ? - संपादक) प्रकरणाची पुढील सुनावणी ११ मे या दिवशी होणार आहे.

देशद्रोही कन्हैया कुमारच्या कार्यक्रमाला अनुमती आणि राष्ट्रप्रेमींच्या आंदोलनाला नकार, हा पोलिसांचा दुटप्पीपणा ! - हिंदुत्ववादी संघटना

        मुंबई - जेएन्यू (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारने केलेल्या देशद्रोही विधानांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यासाठी समस्त राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने पोलिसांकडे अनुमती मागण्यात आली होती. पोलिसांनी याठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केला असून कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत राष्ट्रप्रेमींच्या निषेध आंदोलनाची अनुमती नाकारली; मात्र देशद्रोही कन्हैया कुमारच्या कार्यक्रमाला अनुमती दिली. पोलिसांनी राष्ट्रप्रेमींना अनुमती नाकारणे आणि देशद्रोह्यांना अनुमती देणे, हा प्रकार संतापजनक असून यातून पोलिसांची दुटप्पी भूमिका दिसून येते, अशी टीका श्री. वैभव राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

श्री अंबाबाई मंदिरात पोलिसांची भाविक महिलांवर मोगलाई !

खालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
हिंदूंनो, या पोलिसांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रार करून कारवाईची मागणी करा !
    १३ एप्रिलला कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यामध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना दर्शन मिळावे, यासाठी पोलीस प्रशासनाने दर्शन घेण्यासाठी आलेल्या महिलांचे केस ओढून त्यांना बाहेर काढले. त्यांच्यावर लाठीमार केला. त्या संदर्भात काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे...
पोलिसांनी हातात बांगड्या भराव्यात ! - कु. कीर्ती बद्दनीमुरी
     आम्हा दर्शनासाठी गेलेल्या महिलांवर पुरुष पोलिसांनी अत्याचार केले आहेत. पोलिसांनी आम्हाला केस पकडून हाकलले. कोण होती ती मंत्री कि पंतप्रधान ? पोलिसांनी आम्हाला दिलेली वागणूक अशोभनीय असून त्यांनी हातात बांगड्या भराव्यात. 
तृप्ती देसाई आणि पोलीस यांना श्री अंबाबाई शिक्षा करेल ! 
- सौ. शेवंता जाधव
    आम्ही गेली ४५ वर्षांपासून प्रत्येक दिवशी देवीच्या दर्शनाला येतो. तृप्ती देसाई यांनी जी मागणी केली, तशी मागणी आजपर्यंत आम्ही स्थानिक महिलांनी कधीही केली नाही. श्री अंबाबाई तृप्ती देसाई आणि पोलीस यांचे वागणे खपवून घेणार नाही. त्यांना देवीच शिक्षा करील.

क्रिकेटच्या दौर्‍यांवर ६५० मुलींबरोबर केली शय्यासोबत ! - टिनो बेस्ट, क्रिकेटपटू, वेस्ट इंडिज

 • क्रिकेटमध्ये खेळाच्या व्यतिरिक्त असलेली ही अनैतिकता क्रिकेटप्रेमींना मान्य आहे का ? 
 • भावी खेळाडू याचेच अनुकरण करणार नाहीत, याची ग्वाही कोण देणार आणि अशी अनैतिकता अन्य खेळाडू करत नाहीत, असे म्हणण्याचे धाडस कोणी करणार का ? 
 • अशा अनैतिक कृत्य करणार्‍या खेळाडूंवर बंदी घातली पाहिजे ! 
     बार्बाडोस (वेस्ट इंडिज) - वेस्ट इंडिज क्रिकेट संघातील खेळाडू टिनो बेस्ट याच्या आत्मचरित्रात त्याने जवळपास ६५० मुलींसोबत शय्यासोबत केल्याचे म्हटले आहे. हे आत्मचरीत्र लवकरच प्रसिद्ध होत आहे. डिसेंबर २०१३ मध्ये शेवटची कसोटी खेळलेल्या टिनो याने ऑस्ट्रेलिया, अफ्रिका आदी दौर्‍यावर असतांना, शहरात फिरायचे, चांगल्या मुलींबरोबर मैत्री करायची आणि रात्री त्यांना हॉटेलवर घेऊन यायचे हा नित्यक्रम असल्याचे म्हटले आहे. टिनो याने एकेका वेळी २ ते ४ मुलींना सोबत आणल्याचा आणि काहीवेळी साहाय्यासाठी संघामधल्या अन्य खेळाडूंना सहभागी करून घेतल्याचेही यात लिहिले आहे. ऑस्ट्रेलियाच्या एका ११ आठवड्याच्या दौर्‍यात आपण ४० मुलींसोबत शय्यासोबत केल्याचा दावा त्याने केला आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये ढगफुटीनंतर दरड कोसळून १७ ठार

      इटानगर/नवी देहली - भारताच्या ईशान्येकडील राज्य असणार्‍या अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे २२ एप्रिलला पहाटे ढगफुटीनंतर दरड कोसळली. या दुघटनेत १७ लोक ठार झाले आहेत. दरड कोसळली तेव्हा सर्व लोक झोपेत होते. कित्येक लोक ढिगार्‍याखाली दबले गेले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर साहाय्यता कार्य चालू आहे. मृतांमध्ये आसामचे रहिवासी सर्वाधिक म्हणजे १३ जण असल्याचे सांगितले जात आहे. आसाम, सिक्किम आणि अरुणाचलच्या काही भागांत गेल्या आठवड्यापासून पाऊस चालू आहे. पावसामुळे आसाम आणि अरुणाचल या राज्यांत दोन दिवसांपूर्वी भुस्खलन झाले होते. भुस्खलनाच्या दृष्टीने तवांग सर्वात संवेदनशील भाग मानला जातो. हिमालयापासून ३५०० मीटर उंचीवर हा जिल्हा आहे.
महर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे
     १९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे. (२२ एप्रिलला अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या ढगफुटीनंतर दरड कोसळल्याच्या घटनेवरून प्रलयकालाविषयी महर्षींनी केलेले भाष्य किती सत्य आहे, हे लक्षात येते ! - संपादक)

कात्रज चौकात १ सहस्र ८०० किलो गोमांस कह्यात !

सतर्क गोरक्षकांची कारवाई
          पुणे, २३ एप्रिल (वार्ता.) - विजापूरवरून कात्रज-कोंढवा मार्गे मुंबईच्या दिशेने चाललेला एक ट्रक (एम्एच् ०४ एफ्क्यू १३४६) १९ एप्रिल या दिवशी गोरक्षकांनी कात्रज चौकात पकडला. या ट्रकमध्ये १ सहस्र ८०० किलो गोमांस होते. भारती विद्यापीठ पोलिसांना याची माहिती देऊन गोमांस नष्ट करण्यासाठी पाठवण्यात आले. दुसर्‍या एका प्रकरणात त्याच दिवशी २१ बछड्यांना हत्येसाठी घेऊन जाणार्‍या टेम्पोला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सर्व बछडे जांभुळवाडी येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहेत. येवलेवाडी येथील होय हिंदूच गटाच्या कार्यकर्त्यांनी तळमळीने हे गोरक्षण केले. विशेष म्हणजे बछड्यांची वाहतूक करणारा टेम्पो सलग चौथ्यांदा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला होता. (पहिल्याच वेळी कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली असती, तर वारंवार गुन्हे करण्याची गुन्हेगारांचे धैर्य झाले नसते. - संपादक) या सेवेमध्ये श्री. शिवशंकर स्वामी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. (गोरक्षण करणार्‍या सर्व गोरक्षकांचे अभिनंदन ! - संपादक)

बांगलादेशी घुसखोरास कुडाळ येथे अटक : पोलीस कोठडीत रवानगी

 • लाच देऊन सीमेवरून भारतात प्रवेश केला
 • दोन सहकारी फरार
 • सुरक्षायंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह
       कुडाळ रेल्वेस्थानक परिसरात फिरणारा जोई सॅम्युअल अब्राहम (वय २२ वर्षे, रा. नॉर्थ ढाका, बांगलादेश) या तरुणाने भारत-बांगलादेश सीमेवरील सुरक्षायंत्रणेला दलालांच्या माध्यमातून पैसे देऊन भारतात प्रवेश केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आपली सुरक्षायंत्रणा किती ढिसाळ आहे, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. या तरुणाजवळ पासपोर्ट, व्हिसा किंवा अन्य कोणतेही ओळखपत्र नाही. याप्रकरणी पोलिसांनी १० एप्रिल या दिवशी त्याला अटक करत गुन्हा प्रविष्ट केला आहे. त्याचे दोन सहकारी मात्र फरार आहेत. 
     अब्राहम याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याने जमशेद आणि उज्ज्वल नामक दोन सहकार्‍यांना भारतात प्रवेश मिळवून देणे आणि नोकरी मिळवून देणे यासाठी ७० सहस्र रुपये दिले होते. चार दिवसांपूर्वी त्याने भारताची सीमा अनधिकृतरित्या पार केली. यासाठी सीमेवरील एका भारतीय अधिकार्‍यालाही लाच दिल्याचे त्याने सांगितले.

नक्षलवाद्यांची पाटलीपुत्र (पाटणा) आणि गया रेल्वे स्थानक उडवण्याची धमकी !

देशाच्या विकासासाठी प्रयत्नशील असणार्‍या केंद्रशासनाने नक्षलवाद आणि 
आतंकवाद नष्ट करण्यासाठीही प्रयत्न करावेत, अशीच जनतेची इच्छा आहे !
     पाटलीपुत्र (पाटणा) - झारखंडमधील माओवादी संघटेने बिहारची राजधानी पाटलीपुत्र आणि गया येथील रेल्वे स्थानके डायनामाईटने उडवून देण्याची धमकी दिली आहे. यासंदर्भात स्थानकाच्या अधिकार्‍यांना नक्षलवाद्यांनी पाठवलेले पत्र मिळाले आहे. यात लिहिले आहे की, स्टेशन मास्तरांनी १५ दिवसांत नोकरी सोडून जावे अन्यथा येथे स्फोट घडवून आणण्यात येईल. या धमकीनंतर येथील सुरक्षेत वाढ केली आहे. धमकीच्या पत्रामध्ये रवींद्र वर्मा, अंजनी कुमार सिन्हा यांची नावे असून पत्ता म्हणून बरमसिया, गिरिडीह, झारखंड, असे लिहिले आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे धर्माप्रमाणे आचरण ! - परम चैतन्यजी महाराज

     उज्जैन, २३ एप्रिल (वार्ता.) सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य खूपच चांगले आहे. सध्या देशामध्ये अनेक आध्यात्मिक संस्था, संत, महंत हे लोकांना सुख, समृद्धी, शांती आणि आत्मनिर्भरता यांसाठी प्रयत्नरत आहेत. या सर्वांमध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे धर्मशिक्षण देणारे प्रदर्शन पाहिले. ते पाहिल्यावर असे दिसून आले की, या दोन्ही संस्था केवळ तसे मार्गदर्शन करतात असे नाही, तर त्या धर्माप्रमाणे आचरणही करतात. हे सर्व कार्य पाहून मन प्रसन्न झाले, असे भावयुक्त प्रतिपादन श्री वृंदावन धाम आश्रमाचे परम चैतन्यजी महाराज यांनी केले. २१ एप्रिल या दिवशी परम चैतन्यजी महाराज यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धर्मशिक्षण प्रदर्शन कक्षाला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.

सनातन संस्थेचे कार्य आताच्या काळासाठी आवश्यक ! पू. शिवचैतन्य महाराज

 प्रदर्शन दाखवतांना उजवीकडे श्री. प्रवीण नाईक,
त्यांच्या बाजूला उजवीकडून पू. शिवचैतन्य महाराज
आणि त्यांचे सहकारी
      उज्जैन, २३ एप्रिल (वार्ता.) सनातन संस्थेचे कार्य अत्यंत चांगले असून ते आताच्या काळासाठी आवश्यक आहे. धर्मावर सध्या होत असलेले आघात ही मोठी समस्या असून त्यासाठी धर्मशिक्षण आवश्यक आहे. सध्या हिंदुत्ववादी लोकांवरच गुन्हे प्रविष्ट होत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना सोडवण्यासाठी हिंदु विधीज्ञ परिषदेची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन संतश्री लक्ष्मण चैतन्यजी धामचे पू. शिवचैतन्य महाराज यांनी केले. जळगावमधील रावेर तालुक्यातील वृंदावन धामपाल येथे त्यांचा आश्रम आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने संप्रदायाच्या वतीने श्री हरि चैतन्य धाम या नावाने त्यांचा आखाडा उभारण्यात आला आहे.

होशियारपूर (पंजाब) येथील भृगु संहितेचे वाचक डॉ. विशाल शर्मा यांच्याकडून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनात भावपूर्ण नाडीवाचन !

उज्जैन सिंहस्थपर्वामध्ये 
अवतरली महर्षींची दिव्यवाणी ! 
भृगुऋषी
प्रदर्शन कक्षात पूजन केलेली भृगु नाडी
         उज्जैन, २३ एप्रिल (वार्ता.) - येथील सिंहस्थपर्वात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी लावलेला प्रदर्शनकक्ष २२ एप्रिलला चैतन्याने भरला. निमित्त होते होशियारपूर (पंजाब) येथील भृगु संहितेचे वाचक डॉ. विशाल शर्मा आणि त्यांचे भक्त यांचे नाडीसहित प्रदर्शनकक्षात आगमनाचे ! सकाळी ९.१५ वाजता डॉ. विशाल शर्मा आणि राजस्थानमधील नाथद्वार येथील डॉ. सुनील चोप्रा यांच्यासह त्यांच्या भक्तांचे सनातनच्या येथील प्रदर्शन कक्षात आगमन झाले. या वेळी ५ सुवासिनी साधिकांनी औक्षण आणि पुष्पवृष्टी करून नाडीचे स्वागत केले. त्यानंतर डॉ. विशाल शर्मा आणि अन्य सहकारी हे सर्वजण अमृत (शाही) स्नानासाठी गेले, त्या काळात उपस्थित साधकांनी भृगु नाडीचे दर्शन घेतले.

'हे भारती जय जननी! दुष्ट आणि देशद्रोही नेते आणि अधिकारी यांच्यापासून भारताला वाचवण्यासाठी आज पुन्हा प्रत्येक घरात एकेक मदनलाल धिंग्रा जन्माला घाल !' (सावरकर टाइम्स, एप्रिल २०१०)


(म्हणे) माझ्या विरोधात पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारींनाही मी घाबरत नाही, केवळ अल्लाहला घाबरतो !

धर्मांध झाकीर नाईक यांचा उद्दामपणा !
      मल्लका (मलेशिया) - मी केवळ अल्लाहला घाबरतो, अन्य कोणाला नाही. मी हिंद्राफला (हिंदुत्वनिष्ठ संघटनेला) घाबरत नाही, तसेच माझ्याविरोधात पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारींनाही मी घाबरत नाही, असे वक्तव्य इस्लामचे धर्मांध भारतीय प्रचारक झाकीर नाईक यांनी येथील तांत्रिक महाविद्यालयात नुकत्याच आयोजित एका कार्यक्रमात केले. (असा मुजोरपणा असणारे धर्मांध झाकीर नाईक मुसलमानांना नेमके काय शिकवत असतील ?, याचा तपास व्हायला हवा ! जिहादी आतंकवाद्यांना त्यांचा काही संबंध आहे का, हेसुद्धा पहायला हवे. - संपादक) हिंदु धर्म आणि हिंदूंच्या विरोधात मुसलमानांची मने कलुषित करणार्‍या नाईक यांच्या मलेशियातील कार्यक्रमांना हिंद्राफ इत्यादी स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला होता.

उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट कायम

     नवी देहली - उत्तराखंडमध्ये २७ एप्रिलपर्यंत राष्ट्रपती राजवट कायम राहणार आहे. कारण नैनीताल उच्च न्यायालयाने राष्ट्रपती राजवट हटवण्याचा दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केला आहे. पुढील सुनावणी २७ एप्रिलला होणार आहे.
    उत्तराखंड उच्च न्यायालयाने उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट हटवली होती. या निर्णयाविरोधात केंद्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. काँग्रेसचे हरिश रावत २९ एप्रिलला बहुमत सिद्ध करणार आहेत.

शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणार्‍या २५० मुलींची इसिसकडून हत्या

इस्लामिक स्टेटसाठी झटणार्‍यांचे इस्लामी राष्ट्र कसे असेल, हे लक्षात येते !
     लंडन - इसिसने इराकच्या मोसूल शहरामध्ये शारीरिक संबंधांसाठी गुलाम बनायला नकार देणार्‍या २५० मुलींची हत्या केल्याचे समोर आले आहे. इसिसने या मुलींना आतंकवाद्यांबरोबर विवाहबंधनामध्ये रहाण्याचा आदेश दिला होता. हा तात्पुरता विवाह असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते.

बायबलविषयी प्रश्‍नांची उत्तरे देण्यास अपयशी ठरलेल्या मुलाला ख्रिस्ती धर्मगुरूकडून मारहाण !

ख्रिस्ती धर्मगुरूंची धर्मांधता !
     मंगळुरू - येथील अवर लेडी ऑफ फातिमा चर्चमध्ये एका प्रश्‍नमंजुषेच्या वेळी बायबलविषयी प्रश्‍नांची उत्तरे देण्यास अपयशी ठरलेल्या एका मुलाला त्या चर्चच्या धर्मगुरूने मारहाण केली. आरोपी धर्मगुरू सध्या फरार आहे. या प्रकरणी वित्तल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
    पीडित मुलाच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा बायबलशी संबंधित काही प्रश्‍नांची उत्तरे देण्यास अपयशी ठरल्याने ख्रिस्ती धर्मगुरू अ‍ॅण्ड्यु डिकॉस्ता संतप्त झाले. नंतर त्यांनी मुलाला काठीने अमानुष मारहाण केली. ख्रिस्ती धर्मगुरूंच्या विरोधात बालहक्क कायद्याखाली तक्रार दाखल करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
गोवंश हत्याबंदी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची मागणी

जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन 
        जळगाव, २३ एप्रिल - येथे हिंदु राष्ट्र आयेगा - जय श्रीराम, जय श्रीराम, गोहत्या बंद करे, गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण बंद करा अशा घोषणांद्वारे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे प्रशासनाला जागे करण्यात आले. या वेळी ह.भ.प. वरसाळेकर महाराज, भाजपचे श्री. किशोर वाघ, हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रेयस पिसोळकर, सनातन संस्थेचे श्री. दत्तात्रेय वाघुळदे हे उपस्थित होते.

फलक प्रसिद्धीकरता

हिंदु परंपरांना थोतांड म्हणून हिणवणारे बुद्धीप्रामाण्यवादी आता गप्प का ?
जपानवर वारंवार कोसळणार्‍या नैसर्गिक आपत्ती, जपानी लोकांमध्ये वाढत असलेली चिंता आणि युवकांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी जपान शासन १५० पंडितांकरवी यज्ञ करणार आहे. पंतप्रधान मोदींनी जपानी पंतप्रधानांना या समस्यांवर आध्यात्मिक उपाय योजण्याचा सल्ला दिला होता.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Vividh gambhir samasyaonke nivaran hetu Japan sarkar 150 Bharatiya panditodwara yagya karvayegi
Kya yah Hindu Dharmki sarvashreshthata ka parichay nahi

जागो ! : विविध गंभीर समस्याआें के निवारण हेतु जपान सरकार १५० भारतीय पंडितों द्वारा यज्ञ करवाएगी.
क्या यह हिन्दू धर्म की सर्वश्रेष्ठता का परिचय नहीं ?


पाकिस्तानी मुसलमानांचा उद्देश भारतावर जय मिळवणे, हाच आहे. युद्ध करून त्यांना ते साध्य न झाल्याने हसके लिया पाकिस्तान, घुसके लेंगे हिंदुस्तान असे म्हणत हा जिहादी प्रकार त्यांनी चालवला आहे. - श्री. प्रमोद मुतालिक, अध्यक्ष, श्रीराम सेना.


राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही यांच्याकडून प्रचंड विरोध होऊनही काळाची पावले ओळखून आपल्या कार्यकक्षा विस्तारणारा सनातन प्रभात समूह !

दैनिक सनातन प्रभातची गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्ती आज तिचा 
१७वा वर्धापनदिन साजरा करत आहे. त्यानिमित्ताने...
श्री. शशिकांत राणे
       सनातन प्रभात हे सत्यनिष्ठ आणि प्रखर हिंदुत्ववादी दैनिक आहे. त्यामुळेच या कार्याला राष्ट्रद्रोही आणि धर्मद्रोही यांचा पुष्कळ विरोधही आहे. सनातन प्रभातमधील धर्मनिष्ठ विचार सहन न झाल्याने सनातनद्वेष्ट्यांकडून वारंवार नाहक चिखलफेकही करण्यात येते. असे असले, तरी सत्याचा विजय होतो, या उक्तीप्रमाणे सत्यनिष्ठ सनातन प्रभातने त्याची घोडदौड चालूच ठेवली आहे. दिवसेंदिवस विस्तारणार्‍या आमच्या कार्यकक्षा पाहिल्यास सनातन प्रभात समूहाचा वटवृक्ष याहून बहरेल, यात शंका नाही ! परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे सनातन प्रभात समूहाचे संस्थापक संपादक आहेत. ते २८ एप्रिल १९९८ ते १९ एप्रिल २००० या काळात संपादक होते.

शिवसेनेचा विरोध डावलून पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांना गुजरातमध्ये पुरस्कार प्रदान !

राष्ट्रप्रेमींचा विरोध असूनही पाकिस्तानी गझल 
गायकाला पुरस्कार देणारे देशभक्त आहेत का ?
       कर्णावती - २२ एप्रिल या दिवशी येथील एका कार्यक्रमात पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा विरोध डावलून हनुमंत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. (शत्रूराष्ट्राला आणि त्यांच्या पैसे कमावण्यासाठी भारतात येणार्‍या कलाकारांना केवळ शिवसेनाच प्रखर विरोध करते, अन्य राजकीय पक्ष ते करत नाहीत; कारण तसे करणे हे निधर्मीवादाच्या विरोधात आहे, असे त्यांना वाटते ! - संपादक)
१. प्रवचनकार मुरारी बापू यांच्या चित्रकूट धाम न्यासाकडून १९ ते २२ एप्रिल दरम्यान आयोजित अस्मिता पर्वाची भावनगर जिल्ह्यातील तलगजरदा गावात पुरस्कार कार्यक्रमाने सांगता झाली. त्यात गुलाम अली यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील भरीव योगदानाविषयी हनुमंत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. (अशा प्रवचनकारांवर हिंदूंनी बहिष्कार घातला पाहिजे ! - संपादक) या वेळी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवत निदर्शने केली. त्यातील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेऊन कार्यक्रम संपल्यानंतर सोडून दिले.

हिंदूंनो, हिंदु धर्माची विदारक स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कटीबद्ध व्हा !

कु. मानसी प्रभु
कु. समृद्धी जोशी
     हिंदुस्थान ! किती छान वाटते ना ऐकायला !! देशाचे नाव हिंदुस्थान आहे; पण या देशात अल्पसंख्यांकांची संख्या वाढत चालली आहे. मुसलमान हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करतात; पण अजूनही हिंदू झोपलेलेच आहेत. जर अल्पसंख्यांकांच्या प्रार्थनास्थळांकडे कुणी वक्र दृष्टीने पाहिले, तरी ते संघटित होऊन दंगली करतात. हिंदू जर संघटित झाले, तर सगळ्या हिंदूंवरील हे अन्याय ते सहज रोखू शकतात; पण आजही हिंदू झोपलेले आहेत. एवढेच नव्हे, तर धर्मासाठी काहीतरी करू इच्छिणार्‍या हिंदूंनाही ते विरोध करतात. असे हिंदू हिंदु म्हणण्याच्या पात्रतेचेे नाहीत.

देवनार क्षेपणभूमीला लागलेल्या आगीच्या प्रकरणी २ धर्मांधांना अटक

       मुंबई - बहुचर्चित देवनार क्षेपणभूमीला लागलेल्या आगीच्या प्रकरणी रफीक आणि अतिक या दोन सख्या भावांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. दोघे जण भंगार विक्रेते आहेत. देवनारला वारंवार लागणार्‍या आगीसाठी हेच दोघे उत्तरदायी असल्याचे पोलिसांनी सांगितले. २३ एप्रिलला दुपारी त्यांना शिवाजीनगर न्यायालयात उपस्थित केले असता २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

ओमानमध्ये भारतीय परिचारिकेची हत्या

        नवी देहली - ओमानमध्ये चिकू रॉबर्ट नावाच्या भारतीय परिचारिकेची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. २१ एप्रिलला तिचा मृतदेह अपार्टमेंटमध्ये आढळून आला. चिकूची हत्या चोरीच्या कारणामुळे झाल्याचे म्हटले जात आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चिकूच्या हत्येची कठोर शब्दांत निंदा केली असून या सर्व प्रकरणाचा अहवाल मागितला आहे. चिकू रॉबर्ट मूळची केरळची रहिवासी होती.

राजकारण्यांना बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले हे संतवचन ज्ञात नाही का ?

     प्राथमिक शिक्षण हे मराठी किंवा कोकणी म्हणजेच मातृभाषेतूनच हवे, असे वक्तव्य संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजपच्या एका कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना केले होते. यावर माध्यमप्रश्‍नी नुसत्या तोंडाच्या वाफा नको, तर भाजप नेत्यांकडून कृतीची अपेक्षा आहे, असे मत भारतीय भाषा सुरक्षा मंचचे नेते अधिवक्ता उदय भेंब्रे यांनी व्यक्त केले. भारताला ख्रिस्ती बनवण्याचा विडा उचललेल्यांकडून भारतातील स्वयंसेवी संस्थांना विदेशी ख्रिस्ती संस्थांचा पैसा !

     प्रतिवर्षी शासनाचे गृहमंत्रालय स्वयंसेवी संस्थांमधील विदेशी चलनाचा सहभाग या मथळ्याखाली एक अहवाल प्रसिद्ध करते. त्या अहवालातील पृष्ठ क्र. २० वर १५ सर्वोच्च देणगीदार संस्थांची नावे देण्यात आली आहेत. यामध्ये ८ ख्रिस्ती आणि ७ निधर्मी आहेत. त्यांपैकी गोस्पेल फेलोशिप ट्रस्ट इंडिया ही अमेरिकी संस्था मिशनर्‍यांना साहाय्य करते आणि भारतीय मंत्र्यांना आश्‍वासन देते की, देवाचे (म्हणजे धर्मांतराचे ! - संकलक) काम करण्यासाठी विश्‍वासाने बक्षिसे दिलेली आहेत. गॉस्पेल फॉर एशिया ही टेक्सास येथील ख्रिस्ती मिशनर्‍यांची संस्था आहे. ज्या लोकांनी येशूच्या प्रेमाचा अनुभव घेतलेला नाही, अशा ५० लाख खेड्यांपर्यंत आणि २७० कोटी लोकांपर्यंत पोेचण्याचे त्यांचे ध्येय आहे ! (त्रैमासिक संदेशभारती, जानेवारी-मार्च २००८)

कुठे संस्कृत भाषेकडे दुर्लक्ष करणारा भारत, तर कुठे संस्कृतचे महत्त्व जाणून त्याचा अभ्यास करणारे चिनी !

     चीनमधील भारतीय संस्कृतीचे अभ्यासक, ९७ वर्षीय वृद्ध विद्वान जी एक्सीअ‍ॅनलीन यांना भारताने मनमोहनसिंह पंतप्रधान असतांना पद्मभूषण देऊन गौरवले. त्यांनी रामायणाच्या संस्कृत श्‍लोकांचे चिनी पद्यामध्ये भाषांतर केले आहे, तसेच भारतीय परंपरेतील इतर गोष्टींचीही चिनी भाषेत ओळख करून दिली आहे. त्या वेळी प्रथमच एका अभारतीय व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आला. चीनमधील भारतीय संस्कृतीच्या अभ्यासकांचे ते गुरु आहेत. बीजिंग येथील विद्यापिठात भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला जातो. (त्रैमासिक संदेशभारती, जानेवारी-मार्च २००८) कुठे जगभरचे एक होणारे मुसलमान, तर कुठे महाराष्ट्राचे तुकडे तुकडे करायला निघालेले अधिवक्ता श्रीहरि अणे !

     विदर्भाच्या सूत्रावर महाधिवक्तापदाचे त्यागपत्र देणारे अधिवक्ता श्रीहरि अणे यांनी १३ एप्रिल २०१६ या दिवशी नागपूर येथे स्वतःचा वाढदिवस साजरा करतांना महाराष्ट्राचा नकाशा असलेला केक कापून त्यातून विदर्भ आणि मराठवाडा केला आणि हे प्रदेश वेगळे मागत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. अधिवक्ता अणे सध्या विदर्भाच्या दौर्‍यावर असून वेगवेगळ्या जिल्ह्यांत सार्वजनिक सभा घेत आहेत.

भारतात एकातरी छोट्या राज्याने प्रगती केली असेल तर दाखवा !

     स्वतंत्र विदर्भासह महाराष्ट्राचे चार भागांत विभाजन करण्याची मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा.गो. वैद्य यांनी केली.

राष्ट्रद्रोह्यांना पाठीशी घालणार्‍या जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती !

      काश्मीरमधील हंदवाडा येथे सैनिकांनी विद्यार्थिनीची छेडछाड केली, असा कांगावा करून १२ एप्रिलला ५०० धर्मांधांनी सैनिकांवर दगडफेक केली आणि सैन्याची चौकी जाळण्याचा प्रयत्न केला असता सैन्याने केलेल्या गोळीबारात २ जण ठार झाले होते. याविषयी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, या गोळीबाराला उत्तरदायी असलेल्या सुरक्षारक्षकांवर कडक कारवाई करण्यात येईल. शांततेसाठी प्रयत्न करणार्‍या राज्यशासनाची प्रतिमा अशा घटनांमुळे नकारात्मक असल्याचे संकेत जात आहेत. (धर्मांध मेहबूबा मुफ्ती ! सैन्याची चौकी जाळण्याचा प्रयत्न करणार्‍या आंदोलकांविषयी मौन बाळगून सैन्याला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करणार्‍या मेहबुबा भारताच्या कि पाकिस्तानच्या हे वेगळे सांगायला नको ! काश्मीरमध्ये पीडीपीसहित भाजपही सत्तेत आहे. भाजपने यावर त्याचे मत प्रदर्शित करावे, अशी हिंदूंची मागणी आहे. - संपादक)

सूचना न्यायालयाकडून मागवायची कि शंकराचार्यांकडून ?

     श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यामध्ये प्रवेश देण्याविषयीची मार्गदर्शक सूचना मागवण्याविषयी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात येणार आहे. - अधिवक्ता श्रीकांत गायधनी, विश्‍वस्त, त्र्यंबकेश्‍वर मंदिर

धर्मपरंपरांचे रक्षण करणारे मंदिर प्रशासक हवेत. मंदिर प्रशासकांनी धर्मपरंपरा मोडणार्‍यांचे स्वागत करून एकप्रकारे धर्मद्रोहच केला आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही !

     बीड शहरातील प्राचीन श्री शनिमंदिरातील चौथर्‍यावर महिलांनी प्रवेश करून श्री शनिदेवाला तैलाभिषेक केला आणि धर्मपरंपरा मोडली. महिलांच्या या कृतीचे स्वागत करून महिलांनी आता विश्‍वस्त मंडळात यावे, असे आवाहन मंदिर प्रशासक रामनाथ खोड यांनी केले.पालिका अधिकार्‍यांना संरक्षण न देणारे पोलीस कधी जनतेचे रक्षण करतील का ?

      अनधिकृत होर्डिंग काढणार्‍या पालिका अधिकार्‍यांना अनेक ठिकाणी मारहाण केली जाते; परंतु त्यांना पोलिसांकडून सहकार्य मिळत नाही. अशा तक्रारी सर्वच पालिकांनी केल्या. याची गंभीर नोंद घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी पालिका अधिकार्‍यांसमवेत शस्त्रधारी पोलीस तैनात ठेवा, तसेच संबंधितांवर कारवाई करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना आवश्यक त्या सूचना द्या, असे निर्देश पोलीस महासंचालकांना दिले.

हिंदुत्वनिष्ठांनी हिंदुत्वविरोधकांचे समूळ उच्चाटन करून संपूूर्ण विजय मिळवलाच पाहिजे !

हिंदूसंघटक विक्रमराव सावरकर यांचे जाज्वल्य विचार !
    हिंदु समाजाच्या आणि देशाच्या कठीण परिस्थितीच्या काळात सर्व हिंदुत्वनिष्ठांनी, जे या हिंदुस्थानचे पौराणिक काळापासून न्याय्य अधिकारांनी स्वामी आहेत, त्यांनी सर्व हिंदुत्वविरोधकांशी, मग ते कोणत्याही पक्षाचे वा धर्माचे असोत, स्वदेशी वा विदेशी असोत, त्यांच्याशी पराक्रमी संघर्ष करणे अपरिहार्य ठरते. इतकेच नव्हे, तर या संघर्षात हिंदुत्वविरोधकांचा पराजय करणे आवश्यक आहे.

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !

साधकांना सूचना
सनातन-निर्मित ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे.
समाजापर्यंत शीघ्रतेने पोहोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. या सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे एका लहान धर्मरथासाठी 'लाईट मोटर व्हेहिकल' (LMV), दुसर्‍या लहान धर्मरथासाठी 'लाईट ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल' आणि तीन मोठ्या धर्मरथांसाठी 'हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल' (HMV) असे परवाने असणे आवश्यक आहे.
जे साधक वरील सेवांमध्ये काही कालावधीसाठी किंवा पूर्णवेळ सहभागी होऊ शकतात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून श्री. माधव गाडगीळ यांच्याशी ०८४५१००६००८ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

रामनाथी आश्रमात रुग्ण साधकांना तैलमर्दन (तेलाने मालिश) करू इच्छिणारे सक्षम स्त्री-पुरुष साधक हवेत !

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमामध्ये पंचकर्म चिकित्सा विभागात रुग्ण साधकांना तैलमर्दन करण्यासाठी स्त्री-पुरुष साधकांची आवश्यकता आहे. या अंतर्गत प्रतिदिन १ - २ घंट्यांच्या अंतराने थोडा वेळ विश्रांती घेऊन दिवसभरात ७ - ८ घंटे सेवा उपलब्ध आहे. तैलमर्दनाचा अनुभव नसणार्‍या साधकांना 'ही सेवा कशी करावी ?', तेही शिकवण्यात येईल. जे सक्षम साधक पूर्णवेळ किंवा न्यूनतम १ मास (महिना) आश्रमात राहून ही सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून वैद्या (कु.) अपर्णा महांगडे यांना ८४५१००६०८१ या भ्रमणभाषवर संपर्क करावा.

अधिकोष किंवा पोस्ट यांच्या खात्यातून मिळणार्‍या व्याजातून टी.डी.एस्. कपात झाल्याने होणारी आर्थिक हानी टाळण्यासाठी लवकरात लवकर पुढील प्रक्रिया करा !

साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची माहिती
आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने १ एप्रिल ते ३१ मार्च असे आर्थिक वर्ष निर्धारित करण्यात आले आहे. (पुढील आर्थिक वर्ष १.४.२०१६ ते ३१.३.२०१७ या कालावधीत आहे.) टी.डी.एस्.च्या संदर्भातील महत्त्वाच्या सूचना पुढे देत आहे.
१. टी.डी.एस्. संदर्भातील माहिती
प्रत्येक आर्थिक वर्षात (उदा. २०१६ - २०१७) कायम ठेवीच्या (फिक्स डिपॉझिटच्या) एका खात्यातून १० सहस्र रुपयांपेक्षा अधिक व्याज मिळत असेल, तर त्यातील १० टक्के टी.डी.एस्. (TDS - Tax Deducted At Source) कापला जातो.
एखाद्याला १२,००० रुपये व्याज मिळत असेल, तर १२,००० रुपयांंवर १० टक्के म्हणजे १,२०० रुपये टी.डी.एस्. कापून घेतला जातो. (एखाद्या खातेधारकाला १०,००० रुपयांपर्यंत व्याज मिळत असेल, तर टी.डी.एस्. कापला जात नाही.)
टी.डी.एस्. कापल्यानंतर तो खातेधारकाच्या नावे आयकर विभागात भरला जातो आणि आर्थिक वर्षाच्या शेवटी 16A या पत्रकामध्ये त्याविषयी माहिती दिली जाते.

प.पू. डॉक्टरांचे धर्मसंस्थापनेचे अवतारी कार्य

श्री. यशवंत कणगलेकर
     आचारधर्माचे प्रास्ताविक, भाग ३, खंड ८ या सनातनच्या ग्रंथातील पृष्ठ क्र. ४२ ते ५२ चा अभ्यास करतांना प.पू. डॉक्टरांच्या धर्मसंस्थापनेच्या अवतारी कार्याची अल्पशी कल्पना आली. त्या वेळी माझ्याकडून हा विषय चित्रबद्ध केला गेला. प.पू. डॉक्टरांच्या या महान कार्यात आपल्याला अल्पसा सहभाग मिळाला, या जाणिवेने माझा कृतज्ञताभाव जागृत झाला.
१. धर्मो रक्षति रक्षितः ।

अ. ईश्‍वराने सृष्टीची रचना करतांना आपल्या निर्गुण शक्तीचे रूपांतर सगुण शक्तीत करून धर्मशक्तीची निर्मिती केली. ही धर्मशक्ती सृष्टीतील जिवांना सतत पुरवली जात असल्यामुळे जिवाला मायेतील आसक्ती सोडून सहजतेने सगुणातील ब्रह्माकडून निर्गुणातील ब्रह्माकडे जाणे शक्य होते.
आ. सृष्टीतील जिवांनी धर्मशक्तीच्या बळावर धर्माचरण केल्यामुळे निर्माण झालेले सत्त्वकण धर्मशक्तीला पुरवलेे जातात आणि धर्मशक्ती अविरत कार्यरत रहाते.
इ. धर्मो रक्षति रक्षितः । (मनुस्मृति, अध्याय ८, श्‍लोक १५) म्हणजे धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्म, म्हणजेच ईश्‍वर रक्षण करतो. आपण जर धर्माचे पालन केले, तर धर्मशक्ती आपल्याला सगुण शक्तीचा सतत पुरवठा करू शकते आणि जिवाचे रक्षण होते.
२. सृष्टीची अवकळा दूर करण्यासाठी आचारधर्माची उत्पत्ती होणे
अ. सध्याच्या कलियुगात जिवांकडून धर्मपालन न झाल्यामुळे सृष्टी रज-तम आणि त्रासदायक शक्तीने भारित होऊन धर्मशक्तीला सृष्टीकडून होणारा सत्त्व कणांचा प्रवाह खंडित होतो.

उज्जैन सिंहस्थपर्व (कुंभमेळा) २०१६

सौ. प्राजक्ता जोशी
     गुरु ग्रह सिंह राशीत आणि सूर्य ग्रह मेष राशीत असतांना श्रीक्षेत्र उज्जैन येथे कुंभमेळा भरतो (१४.७.२०१५ पासून ११.८.२०१६ पर्यंत १३ मास (महिने) गुरु ग्रह सिंह राशीत आहे आणि १३.४.२०१६ पासून १४.५.२०१६ पर्यंत १ मास (महिना) सूर्य ग्रह मेष राशीत आहे.); मात्र परंपरेप्रमाणे वैशाख स्नानाचे महत्त्व असल्याने चैत्र पौर्णिमा ते वैशाख पौर्णिमा (२२.४.२०१६ ते २१.५.२०१६) या काळात सिंहस्थ कुंभमेळ्यात श्रीक्षेत्र उज्जैन येथे स्नान, दान, तीर्थश्राद्ध इत्यादी कर्मे केली जातात.
श्रीक्षेत्र उज्जैन येथील स्नानाचे पर्वदिन 
 गुरु चांडाळ योग
       ९.१.२०१६ ते ११.८.२०१६ याकाळात गुरु-राहू सिंह राशीत एकत्र असल्याने याला गुरु चांडाळ योग म्हणतात. हा योग अत्यंत अनिष्ट आहे. भारतासह जगभरात या अशुभ योगाचे परिणाम दिसतील. उज्जैन कुंभमेळा याच कालावधीत असल्याने काही जणांच्या मते हा योग अतिशय अशुभ आहे. ९५ वर्षांपूर्वी वर्ष १९२१ मध्ये असा योग झाला होता. त्या वेळी सर्वत्र दुष्काळ आणि रोगराई झाली होती.

स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या प्रसारकार्याचा फेब्रुवारी २०१६ मधील आढावा

पू. मिलुटीन पांक्रात्स
१. संकेतस्थळाच्या संदर्भातील संख्यात्मक आढावा
१ अ. जानेवारी २०१६ मध्ये विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या
१ आ. संकेतस्थळाला मिळालेले मानांकन
१ आ १. गूगलने दिलेले मानांकन (टीप १) (फेब्रुवारी २०१६ नुसार) : ३
टीप १ : प्रत्येक संकेतस्थळाला गूगल १ ते १० यांपैकी क्रमांक देते. जेवढा क्रमांक जास्त, तेवढे मानांकन (पेज रँक) चांगले.
१ आ २. अलेक्सा क्रमांक (टीप २) (२९.२.२०१६ नुसार) : ७३,०६१
टीप २ : एखाद्या संकेतस्थळाचे अलेक्सा मानांकन जितके अल्प, तेवढे ते संकेतस्थळ अधिक लोकप्रिय समजले जाते. अलेक्सा मानांकन १ लक्षहून अल्प असणे, हे संकेतस्थळ अधिक प्रमाणात लोकप्रिय असल्याचे दर्शक असते.
२. संकेतस्थळावरील लेख
फेब्रुवारी २०१६ मध्ये १ लेख, तसेच ५ विशेष पाने (लँडिंग पेजेस) ठेवण्यात आली आहेत. ही विशेष पाने २ क्रोएशियन आणि ३ स्पॅनिश भाषांतील आहेत. ६ लेख अद्ययावत् करून या मासात ते संकेतस्थळावर ठेवण्यात आले.
२ अ. नवा लेख : सॅम्पल चार्ट फॉर अनॅलिसिस् अँड करेक्शन ऑफ पर्सनॅलिटी डिफेक्ट्स अँड इगो (स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेअंतर्गत लिहिण्यात येणार्‍या सारणीचा नमुना)
२ आ. अद्ययावत् करण्यात आलेले लेख १. व्हॉट इज स्पिरिच्युअल लेव्हल (आध्यात्मिक पातळी म्हणजे काय ?)
२. ड्रिम्स ऑफ डिपार्टेेड फॅमिली मेंबर्स अँड अ‍ॅन्सेस्टर्स (कुटुंंबातील मृत सदस्य आणि पूर्वज यांची स्वप्ने पडणे)
३. मेकॅनिझम बिहाईंड स्पिरिच्युअल हीलिंग मेथड्स - स्पिरिच्युअल हीलर्स (आध्यात्मिक उपचार पद्धतींमागील शास्त्र - आध्यात्मिक उपाय करणारे)
४. मॅनिफेस्ट व्हर्सस् अनमॅनिफेस्ट डेमॉनिक पझेशन (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे होणारे मोठ्या वाईट शक्तीचे प्रकटीकरण)
५. इज् किलिंग अ सिन् -

घरी असलेल्या सात्त्विक गावठी गायीविषयी आलेल्या अनुभूती !

१. शस्त्रकर्म करण्यासारखा आजार होऊनही त्रास न देणे
     एकदा गायीच्या शिंगातून रक्त येत होते. त्या वेळी तिच्या डोळ्यांतून पाणी गळत होते. तिची ही स्थिती पाहून माझ्या मनात ही किती सोसत आहे ? असा विचार आला. आपले मूल असते, तर आपण काय काय केले असते. आपण हिच्यासाठी काहीही करू शकत नाही, असे वाटून मला वाईट वाटत होते. त्या वेळी माझे यजमान ३ - ४ दिवस सेवेसाठी बाहेरगावी गेले होते. त्या वेळी तिला गुरांच्या आधुनिक वैद्यांना (डॉक्टरांना) दाखवले. आधुनिक वैद्यांनी सांगितले, तिला मगरी आजार झाला आहे. शस्त्रकर्म करावे लागेल.

अनावश्यक बोलणे टाळा !

पू. संदीप आळशी
       बरेच साधक सेवेसंदर्भात बोलतांना विषय नेमक्या शब्दांत मांडत नाहीत किंवा एखादा विषय पुन्हा पुन्हा सांगतात. बर्‍याचदा साधकांचे साधनेचा आढावा देतांनाही असेच होते. काही वेळा साधक दुसर्‍याला साधनेविषयी मार्गदर्शन करतांना त्याची ग्रहणक्षमता किंवा सांगण्याची आवश्यकता विचारात न घेता सांगतच रहातात. यासंदर्भात साधकांना वाटते, आम्ही साधनेविषयीच बोलत असल्याने यातून आमची साधनाच होत आहे; परंतु मोजके न बोलल्याने, काही बोलणे अनावश्यक ठरत असल्याने त्यात दोघांचाही वेळ जातो. सध्या आपत्काळ असल्याने साधनेसाठी एक एक क्षण मोलाचा आहे.
         अनावश्यक बोलण्याने शक्तीचाही व्यय होत रहातो. अनावश्यक बोलण्याचा वेळ नामजप, सेवा, भावजागृती अशा साधनेच्या प्रयत्नांसाठी वापरला, तर स्वतःतील चैतन्य वाढून अल्प बोलणेही अधिक परिणामकारक ठरते.

अमेरिकेतील अटलांटा येथील रुग्णालयात काम करतांना एका साधिकेला आलेले हृदय पिळवटून टाकणारे अनुभव !

     वर्ष १९९८ ते १९९९ या कालावधीत मी अमेरिकेतील अटलांटा येथील एका रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत फ्लेबोटोमिस्ट (चाचणी करण्यासाठी शरिरातील रक्त काढणारी) म्हणून काम करत होते. त्या वेळी या रुग्णालयात घडत असलेल्या काही अयोग्य गोष्टी माझ्या लक्षात आल्या. अमेरिकेतील जवळजवळ सर्वच रुग्णालयांची अशी स्थिती आहे, असेही मी ऐकले आहे.
१. रुग्णालयाच्या प्रयोगशाळेला आर्थिक लाभ व्हावा; म्हणून चाचण्या करण्यासाठी
मुदतीपूर्व जन्माला आलेल्या बाळांचे रक्त प्रतिदिन निर्दयपणाने काढणे
     नवजात बाळांसाठी असलेल्या अतिदक्षता विभागात ठरलेल्या मुदतीपूर्वी जन्माला आलेल्या बाळांचे रक्त प्रतिदिन पडताळणीसाठी काढले जाते. त्या इवल्या जिवांच्या पायातून बळजोरीने रक्त काढले जाते. ते रक्त ठेवायच्या परीक्षानळीचा आकार त्यांच्या चिमुकल्या पायाच्या आकाराएवढा असतो. प्रतिदिन रक्त काढल्यामुळे बाळाचा इवलासा पाय काळा-निळा पडत असला, तरी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेला आर्थिक लाभ व्हावा, यासाठी आधुनिक वैद्य प्रतिदिन रक्त काढायला सांगतच असत. त्यामुळे फ्लेबोटोमिस्टना त्या बाळाच्या चिमुकल्या काळ्या-निळ्या पडलेल्या पायातून बळजोरीने रक्त घ्यावे लागत असेे; परंतु अशा प्रकारे रक्त मिळवणे पुष्कळ कठीण असते. पुरेसे रक्त मिळेपर्यंत परीक्षानळीत काढलेले रक्त गोठून ते निरुपयोगी होेते.
२. आधुनिक वैद्यांनी रक्ताच्या चाचण्या करायला सांगण्याची कारणे
     रुग्णालयातील आधुनिक वैद्य २ कारणांसाठी रक्ताच्या चाचण्या करायला सांगत असल्याचे परिचारिकांनी सांगितले.
अ. अधिकाधिक चाचण्या करायला सांगून त्यातून पैसे मिळवून प्रयोगशाळेची आर्थिक स्थिती सुधारणे.
आ. काही बरे-वाईट घडले, तर आधुनिक वैद्य पुष्कळ काळजी घेत होते, हे दाखवण्यासाठी ही कागदपत्रे उपयोगी पडणार असणे.

नेपाळमधील भूकंपानंतर देवभूमी नेपाळ साहायता अभियान पथकातील श्री. गुरुराज प्रभू यांनी प्रत्यक्ष साहाय्यकार्य करतांना आलेल्या अनुभवांचे वस्तूनिष्ठपणे केलेले वर्णन !

श्री. गुरुराज प्रभू
     २५.४.२०१५ या दिवशी मध्य नेपाळमधील सिंधुपाल चौक आणि दोलखा या जिल्ह्यांमध्ये ७.८ रिश्टर तीव्रतेचा मोठा भूकंप झाला. त्यामुळे या जिल्ह्यांच्या शेजारी असलेल्या धादिंग, गोरखा आणि काठमांडू या जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणात हानी झाली. काही क्षणांतच होत्याचे नव्हते झाले. ८ सहस्र ५०० लोक मृत्यूमुखी पडले. सहस्रो घरे आणि वास्तू उद्ध्वस्त झाल्या. काही समजण्याच्या अगोदरच हे सर्व घडल्यामुळे नेपाळी जनता स्तब्ध झाली.
     अशा वेळी भारतातील केंद्रशासनाने शेजार धर्माचे उत्तम उदाहरण प्रस्तुत केले. भूकंपानंतरच्या काही घंट्यांतच आपत्कालीन साहाय्य पथके (Disaster Management force) आणि जीवनावश्यक सामुग्री पाठवून साहाय्याला विनाविलंब आरंभ केला. भारतीय सेनेच्या सैनिकांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपद्ग्रस्तांना साहाय्य आणि त्यांची सुटका हे कार्य अविरतपणे केले. कालांतराने इतर ५५ देशांनीही नेपाळला साहाय्य करण्यास आरंभ केला. मोठ्या भूकंपानंतर छोटे-मोठे भूकंपाचे धक्के सतत बसत होते. दोन दिवसांत असे २०५ धक्के बसले. अशा आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी छोटा देश नेपाळ सज्ज नव्हता;

चेन्नईमधील पूरसदृश परिस्थितीच्या कालावधीत भगवंताने काळजी घेतल्याची साधकांना आलेली अनुभूती

       वर्ष २०१५ मध्ये दिवाळीपासून तमिळनाडूमध्ये उत्तर-पूर्व मोसमी वार्‍यामुळे अतीवृष्टी होत होती. एका शतकानंतर चेन्नईमध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली होती. त्यामुळे जलसाठ्यांना पूर आल्याने शासनाने धरणांतील अतिरिक्त पाणी सोडले होते. पावसाचे पाणी आणि धरणांतून सोडलेले अतिरिक्त पाणी यांमुळे चेन्नई शहरात सर्वत्र पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. सर्वत्रचे प्रमुख रस्ते, इमारती आणि घरे यांमध्ये पाणी शिरले होते. या अनपेक्षित पुरामुळे लोक घरांमध्ये अडकून राहिल्यानेे त्यांची स्थिती दयनीय झाली होती. अनेकांना त्यांचे नातेवाइक आणि संपत्ती गमावावी लागली होती.
१. श्री. प्रेमनाथ, सौ. रागिणी आणि कु. रंजनी, चेन्नई
१ अ. साधक रहात असलेल्या ठिकाणी रस्त्यांवर पाणी न येणे : शहरातील बहुतेक ठिकाणी पूरपरिस्थिती असूनही शहराच्या सीमेवरील आमच्या कोलाथूर परिसराला त्याची विशेष झळ पोेचली नव्हती. तेथील रस्त्यांवर पाणी आले नव्हते.
१ आ. घरी विद्युत् पुरवठा नियमित असणे : विद्युत् पुरवठा खंडित होत असल्यामुळेे शहराच्या मध्यभागी रहाणार्‍या लोकांसाठी ३ - ४ दिवस वीजच उपलब्ध नव्हती; मात्र आमच्या घरी विद्युत् पुरवठा नियमित होता. एखाद्या वेळी वीज गेलीच, तर काही कालावधीतच ती पुन्हा येत असे.

भूमीवर पडलेले काळे डाग आणि कण म्हणजे वाईट शक्तींनी एका संतांवर केलेल्या सूक्ष्म आक्रमणांचे स्थुलातून झालेले प्रकटीकरण !

कु. प्रियांका लोटलीकर
१. वाईट शक्तींनी अनेक वर्षे सूक्ष्मातून केलेल्या आक्रमणांचे प्रकटीकरण आता स्थुलातून चालू होणे : एवढे दिवस बलाढ्य वाईट शक्तींनी एका संतांवर आणि त्यांच्या खोलीवर केलेल्या आक्रमणांचे आता भिंतीतून अन् लादीतून डाग आणि कण यांच्या माध्यमातून प्रकटीकरण होऊ लागले आहे. गेल्या १५ वर्षांहून अधिक कालावधीत जो सूक्ष्म लढा झाला, त्याचे प्रत्यक्ष स्थूल स्वरूप आता काळ्या डागांच्या आणि कणांच्या माध्यमातून सर्वांसमोर येऊ लागले आहे.
२. काळ्या कणांच्या माध्यमातून वाईट शक्ती पृथ्वीतत्त्वाच्या स्तरावर स्थूलदेहावर आक्रमण करून त्या जिवाची प्रत्यक्ष कार्य करण्याची शक्ती न्यून करत असणे : खोलीतील पलंगाच्या डाव्या बाजूला आसंदीच्या खाली पडलेले १०० ते १५० काळे कण हे बलाढ्य वाईट शक्तींनी यज्ञ करून त्यातून स्थूलदेहावर केलेल्या आक्रमणाचे दृश्य स्वरूप आहे. अधिकतर पृथ्वीतत्त्वाच्या स्तरावर स्थूलदेहावर आक्रमण करून त्या जिवाची प्रत्यक्ष कार्य करण्याची शक्ती न्यून केली जाते. या प्रकारच्या आक्रमणांमुळे थकवा येणे, अनिवार ग्लानी येणे, डोळे जड होणे, चालतांना तोल जाणे, तोंडाला कोरड पडणे, त्वचेवर फोड येणे, अंगात उष्णता निर्माण होणे, असे त्रास होतात.

देवाची आवड आणि सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला आणि ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा रत्नागिरी जिल्ह्यातील चि. पार्थ राजू जंगम (वय २ वर्षे) !

      चैत्र कृष्ण पक्ष द्वितीया (२४.४.२०१६) या दिवशी चि. पार्थ राजू जंगम याचा दुसरा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याच्या कुटुंबियांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
चि. पार्थ याला वाढदिवसानिमित्त सनातन 
परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याच्या आरंभाविषयी महर्षींनी करण्यास सांगितलेल्या जयघोषासंदर्भात साधकांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

       ६.३.२०१६ या दिवशी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी अवतारी कार्याला आरंभ केल्याप्रीत्यर्थ महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी आश्रमातील साधकांनी श्रीजयंत बाळाजी आठवले, जय गुरुदेव । हा जयघोष केला. या ऐतिहासिक घटनेच्या संदर्भात सनातनच्या काही साधकांना आधीपासूनच काही त्रास जाणवले. काहींना पूर्वसूचना मिळाल्या. काही साधकांना प्रत्यक्ष जयघोष होण्यापूर्वी आणि जयघोष करतांना अनुभूती आल्या. प.पू. डॉक्टरांचे कार्य ब्रह्मांडभर पसरत असतांना साधकांमध्ये भाव वृद्धींगत होऊन त्यांचीही वाटचाल प्रगतीच्या दिशेने व्हावी, यासाठी महर्षींची किती कृपा आहे, हे येथे दिलेल्या अनुभूतींवरून लक्षात येईल. भगवंताने साधकांना भाववृद्धीची ही अनमोल भेट दिली, यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे. या लेखाच्या मागील भागात आपण जयघोषाविषयी साधकांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये पाहिली. आता त्यापुढील भाग पाहूया. - संकलक

भावी आपत्काळात अन् नेहमीसाठीही उपयुक्त ठरणारी सनातनची ग्रंथमालिका : भावी आपत्काळातील संजीवनी !

भावी महायुद्धकाळात डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध नसतांना अन् नेहमीसाठीही उपयुक्त सनातनचा ग्रंथ !
रिफ्लेक्सॉलॉजी (हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन)
 • रिफ्लेक्सॉलॉजीतील अनेक पाठभेदांतून तज्ञांनी निश्‍चित केलेले बिंदू !
 • चित्रांच्या साहाय्याने नेमकेपणाने बिंदू शोधण्याविषयी मार्गदर्शन !
 • लहान-थोर कोणालाही, कधीही, कुठेही करता येण्याजोगे उपाय !
 • दैनंदिन जीवनात आढळणार्‍या १०० हून अधिक विकारांवर उपचार !
हा ग्रंथ वाचून स्वतःच स्वतःच्या रोगांवर उपचार करा आणि निरोगी रहा !
संपर्क : गोवा - (०८३२) २३१५९१९, पनवेल - (०२१४३) २३३१२० 
सनातनची ग्रंथसंपदा आता SanatanShop.com वर उपलब्ध !
     संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना (आजारांना) तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन भावी आपत्काळातील संजीवनी ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील ११ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या ग्रंथांचा अभ्यास आतापासूनच केला, तर प्रत्यक्ष आपत्काळात विकारांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होईल. यासाठी हे सर्व ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत !


साधकांना अनमोल संतसेवेची सुवर्णसंधी !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प.पू. दास महाराजांनी 
आरंभलेले मौनव्रत निर्विघ्नपणे पार पडावे, याकरिता 
पानवळ आश्रमातील विविध सेवांसाठी साधकांची आवश्यकता !
       पानवळ, बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वर्षभर मौनव्रत करत आहेत. हे व्रत निर्विघ्नपणे आणि परिपूर्णपणे पार पडावे, यासाठी पानवळ आश्रमातील सेवा करण्यासाठी साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी साधक-दांपत्यही चालू शकेल. आश्रमात पुढील सेवा उपलब्ध आहेत.
१. पूजा : पूजेची सिद्धता करून पूजा करणे
२. स्वच्छता : आश्रम, मंदिर, तसेच परिसर यांची स्वच्छता करणे

वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

हिंदु धर्मशास्त्रातील अन्नदानाचे अनन्यसाधारण 
महत्त्व जाणून राष्ट्र-धर्म कार्यासाठी निष्काम 
आणि समर्पित वृत्तीने सेवा करणार्‍या सनातन आश्रमांतील 
शेकडो साधकांच्या अन्नदानाकरता धनरूपात साहाय्य करा !
        राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध असणारी अन् त्यासाठी प्रभावीपणे कार्य करणारी सनातन संस्था ही एकमेव संस्था आहे. भारतात विविध ठिकाणी संस्थेचे आश्रम आहेत. तेथे अध्यात्म आणि धर्मशिक्षण यांविषयी ज्ञान देणारे ग्रंथ, नियतकालिके, ध्वनीचित्र-चकती आदींच्या निर्मितीची सेवा अविरतपणे चालू असते. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेचे उद्दिष्ट समोर ठेवून निष्काम आणि समर्पित वृत्तीने अखंड सेवारत असलेलेे शेकडो साधक या आश्रमांत वास्तव्याला असतात. त्यांच्यासाठी अन्नदानाकरता धनरूपात साहाय्य करून आध्यात्मिक लाभ मिळवण्याची सुवर्णसंधी सर्व धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांना उपलब्ध आहे.
       ज्या देशात विद्वानांना त्रास दिला जातो, तो देश तुटलेली नौका जशी पाण्यात नष्ट होते, त्याचप्रमाणे नष्ट होतो. - अथर्ववेद (मासिक अभय भारत)

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
दोन दिवसांपूर्वी पौर्णिमा झाली.

अध्यात्माच्या दृष्टीकोनातून सासू-सुनेचे नाते

      सुनेला सासरी जातांना सर्वांत अधिक भीती असते ती सासूची ! सासू-सुनेच्या नात्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
१. एकमेकींशी सतत संबंध
१ अ. पूर्वीच्या पिढ्या : पूर्वी स्त्रिया नोकरी करत नसल्यामुळे सासू आणि सून दिवसभर घरीच असत. त्यामुळे त्यांचा एकमेकींशी सतत संबंध यायचा.
१ आ. हल्लीच्या पिढ्या : आता बहुतेक सुना नोकरी करत असल्यामुळे सासू आणि सून यांचा एकमेकींशी विशेष संबंध येत नाही.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
ईश्‍वरालाच जिंकणे
विषयांपेक्षा विषयांच्या निर्मात्यालाच का जिंकू नये ?
भावार्थ : एकेक विषय जिंकत जायचे म्हटले तर वासना, आवडी-निवडी, स्वभावातील दोष, असे लाखो विषय जिंकायला, म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण मिळवायला लाखो जन्म लागतील. त्यापेक्षा त्या सर्वांच्या निर्मात्यालाच भक्तीने या जन्मात जिंकले, तर त्या सर्वांवर या जन्मातच नियंत्रण मिळविता येईल; म्हणूनच म्हटले आहे, 'एक साधै सब साधै । सब साधै सब जाय ॥' म्हणजे एका नामाला, भगवंताला (नाम आणि भगवंत एकच आहेत.) साध्य केले म्हणजे सर्वच साध्य होते. सर्व साध्य करायला गेलो, तर काहीच साध्य होत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण'.)

कुठे संप्रदाय, तर कुठे धर्म !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
परात्पर गुरु डॉ. आठवले
१. त्या त्या काळात त्या त्या ठिकाणी ते ते संप्रदाय निर्माण होण्याचे कारण हे की, त्या काळी तेथील लोकांची क्षमता तेवढीच होती. याउलट धर्म स्थळ आणि काळ यांच्या पलिकडचा आहे.
२. ज्याला उत्पत्ती आहे, त्याला स्थिती आहे आणि त्याचा लयही आहे. जगभरच्या विविध संप्रदायांची (हे धर्म नसतात, तर संप्रदाय असतात.) गेल्या काही हजार वर्षांत उत्त्पत्ती झाली आहे. ते काही काळ पृथ्वीवर टिकतात आणि पुढे त्यांचा लयही होतो. हिंदु धर्माचे तसे नाही. तो अनादि, म्हणजे विश्‍वाच्या उत्पत्तीपासून आहे आणि अनंत काळपर्यंत, म्हणजे विश्‍वाच्या अंतापर्यंत टिकणार आहे.
३. सर्व संप्रदायांत सर्वांना एकच साधना सांगितली जाते, तर धर्मात 'व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग' या सिद्धांतानुसार साधना सांगितली जाते.
असे असल्यामुळे कोणी एखाद्या संप्रदायानुसार साधना करत असला, तरीही त्याने धर्मातील तत्त्वांची ओळख झाल्यावर त्यानुसार साधना करणे लाभदायक ठरते. आपण शाळेत पहिलीतून दुसरीत जातो, तेव्हा आधीची पाठ्यपुस्तके विसरतो. तसे हे आहे. कोणी साधना करतच नसला, तर त्याने धर्मानुसार साधना करणे त्याला अधिक उपयुक्त ठरते; कारण सांप्रदायिक शिकवण नसल्यामुळे त्याच्या मनात धर्मातील शिकवणीच्या संदर्भात विकल्प निर्माण होत नाही.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा आनंद 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      आनंद हा कोणताही प्रसंग, वस्तू अथवा व्यक्ती यांच्याशी निगडित नसावा. ज्या गोष्टीमुळे दुःख होते वा होईल, असा कोणताही आनंद नसावा. आपला आनंद आपल्यात मिळावा, हा विचार प्रत्येकाने सांभाळून ठेवावा, म्हणजे कोणत्याही अवस्थेत शांती ढळणार नाही. तुझे आहे तुजपाशी या संतवाणीप्रमाणे ज्याचा त्याने शोध घेत जावा. मनाची स्थिती केवळ स्वतःशीच निगडित असावी. अन्य कुठेही संपर्क नसावा. हे प्रगत होऊ पहाणार्‍या साधकांना परत परत सांगू इच्छितो. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

... काळ सोकावतो म्हणून !

संपादकीय 
     कन्हैयाच्या भाषणाचे दौरे ठिकठिकाणी का नकोत ? याची एक नव्हे शेकडो कारणे देता येतील, ज्याचा ग्रंथ सिद्ध होऊ शकेल. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची विद्यार्थी संघटना ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचा अध्यक्ष कन्हैया हा साम्यवादी कुविचारांचा पुरस्कतार्र् आहे. धर्म ही अफूची गोळी आहे, हे शिकवणारा, तसेच रशियातून आलेला साम्यवाद, हा केवळ हिंदूंचा बुद्धीभेद करून त्यांचा हिंदु जीवनपद्धतीवरील विश्‍वास उडवणारा, त्यांच्यात फूट पाडणारा एवढाच नव्हे, तर हिंदुत्ववाद्यांच्या वेचून क्रूर हत्या करण्यापर्यंत मजल गेलेला आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn