Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

क्रांतीकारक मंगल पांडे यांचा आज बलीदानदिन 
लोकहो, सर्व राजकीय पक्ष क्रांतीकारकांना सोयीस्कररित्या 
विसरले असले, तरी तुम्ही असा कृतघ्नपणा करू नका !

(म्हणे) सनातन संस्थेने मला ठार मारण्याची धमकी दिली !

 • सनातन संस्थेकडून मांडण्यात येणार्‍या आध्यात्मिक सूत्रांचा प्रतिवाद करता न आल्याने स्वतःची स्टंटबाजी उघड झाल्यावर खालच्या स्तरावर जाऊन आरोप करणार्‍या तृप्ती देसाई ! 
 • धादांत खोटे आरोप करून सनातनची अपकीर्ती करणार्‍या तृप्ती देसाई यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्यासाठी सनातन अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे !
 • तृप्ती देसाई यांनी इंग्रजी वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत आरोप !  
       मुंबई - भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मुंबई मिरर वृत्तपत्राच्या पत्रकार अलका धुपकर यांना दिलेल्या मुलाखतीत सनातन संस्थेवर गरळ ओकतांना, मी (तृप्ती देसाई) कोल्हापूर येथे महालक्ष्मी मंदिरात प्रवेशासाठी आंदोलन करतांना मला सनातनने ठार मारण्याची धमकी दिली, ज्यामुळे दुसरे कुणी अशी आंदोलने करू शकणार नाहीत, असे सांगितले.
तृप्ती देसाई यांनी त्यांच्या मुलाखतीत म्हटले आहे कि,
१. सनातन संस्था मला तीव्र विरोध करत आहे. संस्था उघडपणे म्हणते की, त्यांच्याकडे बहुमत असून ते त्याद्वारे हिंदु राष्ट्राची स्थापना करणार आहेत. (सनातनकडे बहुमत वगैरे आहे, असे सनातनने कधीही म्हटलेले नाही. यावरून तृप्ती देसाई जाणूनबुजून सनातनची अपकीर्ती करत आहेत, हे दिसून येते ! - संपादक)

कर्नाटक पोलिसांकडून प्रमोद मुतालिक यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला !

 • राष्ट्रविरोधी प्रक्षोभक भाषणे करणार्‍या एम्आयएम्च्या नेत्यांना रोखू न शकणारे पोलीस राष्ट्रप्रेमी हिंदूंच्या नेत्यांवर तत्परतेने बंदी घालतात, हे लक्षात घ्या !
 • सामूहिक शनैश्‍वर पूजेच्या कार्यक्रमास उपस्थित रहाण्यास पोलिसांकडून बंदी !
 • १६ ते २२ एप्रिल या कालावधीतील सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग आणि भाषण यांवर बंदी !
       
श्री. प्रमोद मुतालिक
मंगळुरू (कर्नाटक) -
श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांना अलापे येथे १६ एप्रिल या दिवशी आयोजित केलेल्या वार्षिक सामूहिक शनैश्‍वर पूजेच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यास पोलीस आयुक्त चंद्रशेखर यांनी बंदी घातली आहे, तसेच १६ ते २२ एप्रिल या कालावधीत होणारी कोणतीही सार्वजनिक सभा आणि कार्यक्रम यांत सहभागी होणे अथवा प्रत्यक्ष किंवा इतर माध्यमांद्वारे भाषण करणे, यांवरही कलम १४४ नुसार बंदी घालण्यात आली आहे. श्री. मुतालिक येथे वर्ष २००९ मध्ये झालेल्या पबवरील आक्रमणाच्या खटल्यासंबंधी न्यायालयात उपस्थित रहाण्यासाठी आले होते.

हिंदु धर्माने शिकवलेल्या एकतेमधून मिरवणुकीची शोभा वाढवूया ! - एस्.ए. सुंदर, पालक, वज्रदल

धारावी येथे वज्रदलाच्या 
वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन 
शोभायात्रेत सहभागी धर्मप्रेमी
       मुंबई, १९ एप्रिल (वार्ता.) - प्रत्येकाने प्रभु श्रीरामाची भक्ती करून या मिरवणुकीची शोभा वाढवावी. आपल्यातील हेवेदावे विसरून मिरवणुकीत सहभागी व्हा. आपला हिंदु धर्म अनेकतेतून एकता शिकवतो. त्याचप्रमाणे या एकतेतून आपण मिरवणुकीची शोभा वाढवूया, असे प्रतिपादन वज्रदलाचे पालक एस्.ए. सुंदर यांनी केले. श्रीरामनवमीच्या निमित्ताने धारावी येथे ९० फुटीमार्गावरून वज्रदलाच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या शोभायात्रेत १ सहस्र ५०० धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

हंदवाडामधील सैन्याचे बंकर हटवले !

 • काश्मीरमधून सैन्य मागे घेण्याची मागणी देशद्रोही करत आहेत, त्यामुळे उद्या सैन्य मागे घेण्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतल्यास आश्‍चर्य वाटायला नको !
 • देशद्रोह्यांच्या मागणीवरून पीडीपी-भाजप शासनाच्या प्रशासनाची देशद्रोही कृती !
       श्रीनगर - हंदवाडा शहराच्या मुख्य भागात असलेले सैन्याचे ३ बंकर १९ एप्रिलला स्थानिक प्रशासनाकडून हटवण्यात आले. येथील देशद्रोही नागरिकांनी हे बंकर हटवण्यात यावेत, अशी मागणी केली होती; मात्र याला सैन्याने विरोध केला होता. बंकरचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सैन्याचे म्हणणे होते.
१. हंदवाडा येथे नुकताच तरुणीच्या विनयभंग प्रकरणावरून हिंसाचार झाला होता. या तरुणीचा विनयभंग सैनिकाने केल्याचा आरोप करत देशद्रोह्यांनी बंकरच्या दिशेने जोरदार दगडफेकही केली होती. या घटनेमुळे स्थानिक प्रशासनाने हे बंकर हटवले आहेत.
२. हंदवाडामधील मुख्य बाजारपेठेच्या नजीकच असलेला मुख्य बंकरही हटवण्यात आला आहे. प्रशासनाने येथील जागेचा ताबा घेतल्याचे एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले. या मोकळ्या जागेचे आता सार्वजनिक बागेमध्ये रूपांतर करण्यात येणार असल्याची माहिती देणारा फलक आता येथे लावण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरमधील बाबा गुलाम शाह बादशाह विद्यापिठात विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष !

श्रीनगरच्या एन्आयटीतील देशद्रोही आणि 
देशप्रेमी विद्यार्थ्यांमधील संघर्षाचा फैलाव !
       राजौरी (जम्मू) - श्रीनगरच्या एन्आयटीमध्ये काश्मिरी आणि भारतातील अन्य ठिकाणांहून आलेल्या विद्यार्थ्यांमधील वादाला अजून पूर्णविराम मिळालेला नाही, तोच जम्मूतील राजौरी जिल्ह्यात असलेल्या बाबा गुलाम शाह बादशाह विद्यापिठातील विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष झाला. १८ एप्रिल या दिवशी राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रद्रोही विद्यार्थ्यांमध्ये मारामारी झाली. त्याचे पर्यवसान मोठ्या प्रमाणातील दगडफेकीत झाले.
१. या संघर्षात ६ विद्यार्थी घायाळ झाले असून अनेक गाड्यांची तोडफोड आणि काही गाड्यांना आग लावण्यात आल्याची माहिती चंदीगड ट्रिब्यून या संकेतस्थळाने दिली आहे.

संशोधकांना फास्ट फूड सेवनाचे नवीन गंभीर दुष्परिणाम आढळले !

या संशोधनाची नोंद घेऊन भारत शासनाने फास्ट फूडवर 
कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी अपेक्षा आहे !
     लंडन - जॉर्ज वाशिंग्टन विश्‍वविद्यालयातील संशोधकांनी केलेल्या संशोधनात फास्ट फूडमध्ये असलेल्या रसायनांमुळे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असल्याने संपूर्ण समाजाचेच आरोग्य धोक्यात आले आहे, असे आढळून आले आहे. या फास्ट फूडमध्ये आढळणारे फॅलेट हे रसायन साबण आणि सौंदर्य प्रसाधने यांना मऊ करण्यासाठी वापरण्यात येते; मात्र त्याच्या सेवनाने आरोग्यावर अनेक गंभीर दुष्परिणाम होतात. त्यातील पुरुषांची प्रजनन शक्ती न्यून होणे हा एक महत्त्वाचा परिणाम आहे. 
१. शरिरावर होणारे दुष्परिणाम मूलत: फास्ट फूडमधील अन्नपदार्थांनी होत नसून ते सिद्ध करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या प्रक्रियेमुळे होतात, असे संशोधनात आढळून आले. या संशोधनाचे निष्कर्ष राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले आहेत.

अमेरिकेत प्रवाशाने विमानात इन्शाअल्ला म्हटल्यामुळे त्याला खाली उतरवले !

लॉस एंजिल्स - इन्शाअल्ला म्हटल्यामुळे एका विद्यार्थी प्रवाशाला साऊथ वेस्टर्न एअरलाइन्सच्या एका विमानातून खाली उतरवण्यात आले. खैरूद्दीन मखजूमी असे त्याचे नाव असून तो मूळचा इराण येथील रहिवासी आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापिठात तो शिकत आहे.
१. हा विद्यार्थी ६ एप्रिल या दिवशी ऑकलंड येथे जात होता. या वेळी तो स्वत:च्या काकांसमवेत भ्रमणभाषवर अरबी भाषेतून बोलत होता.
२. शेवटी त्याने इन्शाअल्ला असे म्हटले. त्याचे बोलणे ऐकून त्याच्या शेजारी बसलेल्या महिलेने वैमानिकाकडे त्याचे बोलणे संशयास्पद असल्याची तक्रार केली.

भूमाता ब्रिगेडकडून मंदिर प्रवेशाचे राजकारण ! - ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर

अभय वर्तक (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना ह.भ.प. सागर थोरात
     नवी मुंबई, १९ एप्रिल (वार्ता.) - 'लव्ह जिहाद', गोहत्या यांसारख्या भयानक विषयांवर भूमाता ब्रिगेड मौन बाळगते. स्वत:ला पुरोगामी समजणार्या भूमाता ब्रिगेडच्या मूठभर महिला हिंदूंच्या मंदिर प्रवेशाचे राजकारण करत आहेत, अशी टीका शिवचरित्रकार ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर यांनी केली. ऐरोलीनाका चिंचपाडा गणेशनगर येथे ११ ते १८ एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वेरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात १७ एप्रिल या दिवशी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या हरिनाम सप्ताहाला ह.भ.प ज्ञानेश्वपर महाराज सुतार (सावर्डेकर)आळंदी आणि ह.भ.प. शिवाजी महाराज पूरी (कळवा) यांची उपस्थिती लाभली. सप्ताहामध्ये ज्ञानेश्वारी पारायण, काकड आरती, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, महाजागर इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

(म्हणे) मुसलमान हेच खरे देशभक्त ! - असदुद्दीन ओवैसी, एम्आयएम्

श्रीनगरमध्ये प्रत्येक शुक्रवारी नमाजानंतर पाक आणि इसिसचे झेंडे 
फडकवणार्‍यांविषयी ओवैसी तोंड का उघडत नाहीत ? 
* काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांशी लढणार्‍या सैनिकांवर मशिदीतून दगडफेक का करण्यात येते, हे ओवैसी का सांगत नाहीत ? 
* काश्मीरमध्ये, एन्आयटी, जेएन्यू मध्ये पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा का दिल्या जातात ?
     परभणी - मदरशांमधून देशप्रेमाचेच धडे दिले जातात; पण मुसलमानांना अपकीर्त करण्यासाठी मदरशांमधून आतंकवादी बनवण्याचे शिक्षण दिले जाते, असा अपप्रचार केला जातो. मुसलमान हेच या देशाचे खरे देशभक्त आहेत, असे प्रतिपादन एम्आयएम्चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केले. (मदरशांमधून आतंकवादी बनण्याचे प्रशिक्षण दिले जाते, हा अपप्रचार आहे तर तो कशामुळे चालू झाला, हे ओवैसी यांनी सांगितले पाहिजे. - संपादक) अलफलाह इंटरनॅशनल इस्लामिक स्कूलचे उद्घाटन ओवैसी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. संभाजीनगरचे आमदार इम्तियाज जलील या वेळी उपस्थित होते. 
     ओवैसी पुढे म्हणाले की, १८५७ मध्ये सर्वप्रथम इंग्रजांविरोधात स्वातंत्र्याचे आंदोलन मदरशांमधूनच मौलांनानी चालू केले होते. (आवैसींचा नवा इतिहास ! - संपादक) आज या देशात आमच्याकडेच देशभक्तीचा पुरावा मागितला जातो. हा मुसलमानांवर अन्याय आहे.धर्मांध प्रियकराने त्रास दिल्याने एका हिंदु युवतीने केली आत्महत्या !

महाराष्ट्रात लव्ह-जिहाद नाकारणार्‍यांना चपराक !
        नांदेड, १९ एप्रिल - येथील एका १८ वर्षीय हिंदु युवतीने तिच्या धर्मांध प्रियकराने त्रास दिल्याने आत्महत्या केली आहे. त्या युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात प्रियकर साजिद खानच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या करत आहे, असे लिहिले आहे. (हिंदु युवती धर्मांधांच्या आमिषाला बळी पडतात आणि आत्महत्या करतात. अशा धर्मांधांना कठोर शिक्षा केल्यासच या घटनांना आळा बसेल. - संपादक) या प्रकरणी त्या युवतीच्या आईने शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी साजिद खान याला अटक केली आहे. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शेख सयफोद्दिन यांनी २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

विमाननगरमध्ये (पुणे) अल्पवयीन मुलीवर पोलिसांकडून बलात्कार

कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! 
     पुणे, १९ एप्रिल - पश्चिवम बंगालमधून आणलेल्या एका अल्पवयीन मुलीवर सौंदर्यवर्धनालयामध्ये चांगले वेतन देण्याच्या आमिषाने काही पोलिसांसह १०९ जणांनी बलात्कार केला. (या प्रकरणी संबंधित आरोपी पोलिसांवर तत्परतेने कठोर कारवाई होणे आवश्यक ! - संपादक) या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्वीकृती किरण खरेल (मूळ रा. नेपाळ) या महिलेला नुकतीच अटक केली आहे. येथील विशेष न्यायालयाने तिला २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

१ मे या दिवशी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सांगलीत जाहीर सभा !

     सांगली, १९ एप्रिल (वार्ता.) - पारंपरिक शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने श्रीशिवछत्रपतींना मानवंदना देण्याच्या निमित्ताने शिवसेनापक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, १ मे या दिवशी श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने जाहीर विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा सायं ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे होईल. या सभेपूर्वी दुपारी ४ वाजता टिंबर एरियातील मुख्य मार्गावरून भव्य वाहनफेरी काढण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक शिवप्रेमींनी यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

(म्हणे) कोल्लम मंदिरातील अपघातग्रस्तांना साहाय्य करणार !

ख्रिस्त्यांचा चितेवर पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न !
     कोल्लम (केरळ) - केरळ राज्यातील कोल्लम येथील परवूर मंदिरात १० एप्रिल या दिवशी झालेल्या फटाक्यांच्या स्फोटात घायाळ झालेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करण्यासाठी बिलिव्हर्स चर्चच्या वतीने संपूर्ण साहाय्य करण्यात येईल, असे चर्चच्या देहली येथील मुख्यालयाने म्हटले आहे. (मंदिरात आतषबाजी बघण्यासाठी गोळा झालेले हिंदू होते. त्यांना राज्य आणि केंद्र शासनाने तातडीचे साहाय्य केले आहे; मात्र धर्मांतर करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे, असे समजून बिलिव्हर्स चर्च या संधीचा अपलाभ घेण्यासाठी सिद्ध झाले आहे. अनेक नैसर्गिक आपत्तीत साहाय्य देण्याचे निमित्त करून हिंदूंचे धर्मांतर करायचा प्रयत्न या आधीही ख्रिस्त्यांनी केला आहेत. हिंदूंनी या पुतना मावशीच्या साहाय्यापासून सावध राहले पाहिजे. - संपादक)
      कोल्लमपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ख्रिस्ती रुग्णालयात घायाळ हिंदूंवर विनामूल्य उपचार करण्यात येतील. अपघातग्रस्तांसाठी ५ सहस्र मच्छरदाण्या, औषधे, अन्नाची पाकिटे, कपडे पुरवण्यात येतील, असे चर्चच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. साहाय्यासाठी अमृतसर, चंदिगड, लक्ष्मणपुरी (लखनौ), देहली, उदयपूर आणि कोलकाता येथून निधी गोळा करण्यात येत आहे. (या निधीचा हिशेब कसा देणार कि तो धर्मांतराची लालूच दाखवण्यासाठी चर्चच्या तिजोरीत जमा होणार, याचे स्पष्टीकरण चर्चने केले पाहिजे ! - संपादक)

(म्हणे) कोहिनूर भारतात परत आणता येणार नाही ! - केंद्रशासन

      नवी देहली - इंग्लंडमध्ये असलेल्या कोहिनूर हिर्‍यावर भारत दावा करू शकत नसल्याने तो भारतात परत आणणे शक्य नाही, अशी माहिती १८ एप्रिलला मोदी शासनाने सर्वोच्च न्यायालयात दिली. 
१. केंद्रशासनाने न्यायालयाला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, कोहिनूर हिरा इंग्लंडने चोरला नसून वर्ष १८४९ मध्ये युद्धात पराभव झाल्यामुळे दिलीप सिंह यांनी तो इंग्लंडला दिला होता. त्यामुळे शासन कोहिनूरवर दावा सांगू शकत नाही. आपण जर कोहिनूर परत मागितला, तर आपल्या संग्रहालयामध्ये असलेल्या वस्तूंवर इतर देश दावा करतील. (केंद्रशासनाचा हास्यास्पद युक्तीवाद ! कोणत्याही देशाला त्याच्या देशातील प्राचीन वस्तूंचा ठेवा कधीही महत्त्वाचाच असतो. अशा वेळी भारत जर कोहिनूर मागत असेल, तर त्यात अयोग्य काय ? आणि अन्य देश भारताकडे त्यांच्या वस्तू मागत असतील, तर भारतानेही त्या द्याव्यात. वास्तविक भारताच्याच अधिक वस्तू परदेशी संग्रहालयांमध्ये आहेत. त्यामुळे भारताचा तोटा कधीही होणार नाही ! - संपादक)
२. यावर न्यायालयाने म्हटले की, टिपू सुलतान याची तलवार परत आणली गेली आहे. हिर्‍याच्या बाबतीतही असे होऊ शकते; परंतु याचिका रहित व्हावी, अशी तुमची इच्छा आहे का ? असे झाल्यास भविष्यात कायदेशीर हक्क सिद्ध करणे तुम्हाला अवघड होईल, असे मत सरन्यायाधीशांनी मांडले. 
३. कोहिनूरला भारतात परत आणण्यासाठी केंद्रशासन काय प्रयत्न करत आहे?, याची माहिती देण्यासाठी न्यायालयाने केंद्रशासनाला सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. कोहिनूर भारताला परत करावा, अशी मागणी भारताने इंग्लंडकडे केली होती. भारताची ही मागणी ब्रिटीश शासनाने वर्ष २०१३ मध्ये फेटाळली होती.

साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे शेतातील बुजगावणेच ! - विश्‍वास पाटील, लेखक

     पिंपरी - साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे शेतात गाडग्या-मडक्यात उभ्या केलेल्या बुजगावण्याप्रमाणे आहे, अशी टीका लेखक विश्‍वास पाटील यांनी भोसरी येथे एका कार्यक्रमात बोलतांना केली. 
पाटील पुढे म्हणाले, 
१. विठ्ठल वाघ यांच्यासारखे महान साहित्यिक संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकत नाहीत. साहित्य क्षेत्रातील खर्‍या वाघाला संधी मिळत नाही म्हणूनच आम्ही बंड केले होते. 
२. साहित्य संमेलनात गुलजार यांना आणले गेले, त्यापेक्षा आपल्याकडील अनेक चांगले साहित्यिक आणणे शक्य होते. संमेलनासाठी मोठे नेते शोधले जातात. त्यागातून नव्हे, तर भोगातून मोठे झालेले नेते सध्या दिसून येतात. 
३. वास्तविक खर्‍याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. लेखकाने निर्भीडपणे विचार मांडले पाहिजेत. कामावर निष्ठा असली पाहिजे. 
४. यशस्वी होण्यासाठी लहान वयातील संस्कार आणि वाचन महत्त्वाचे आहे. आपल्या जडणघडणीत शिक्षकांचे मोठे योगदान आहे. शिक्षक कसा आहे, यावर विद्यार्थी घडतो. शिक्षकांशिवाय उत्तम राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही. ७०-८० टक्के साहित्यिक हे पूर्वी शिक्षक होते.


हजारीबाग (झारखंड) येथे श्रीरामनवमीच्या शोभायात्रेतील एका गाण्यामुळे धर्मांधांकडून हिंसाचार !

हिंदूंनो, उत्साह आणि शांततेच्या वातावरणात 
सण साजरे करण्यासाठी आता हिंदु राष्ट्राशिवाय 
पर्याय नाही, हे लक्षात घ्या आणि त्यासाठी सिद्ध व्हा !
       हजारीबाग (झारखंड) - येथे श्रीरामनवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रांवर धर्मांधांनी आक्रमण केल्याने उसळलेल्या हिंसाचारात ३ हिंदूंचा, तर १ मुसलमानाचा बळी गेला होता, तसेच अनेक दुकाने आणि वाहने यांची जाळपोळ करण्यात आली होती. या दंगलीला हिंसाचाराऐवजी वैयक्तिक कारणे होती, असे सांगून पोलिसांकडून धर्मांधांच्या हिंसाचाराची झळ मवाळ करण्याचा प्रयत्न चालवण्यात येत आहे. पोलिसांच्या मते शोभायात्रेमध्ये वाजवण्यात आलेल्या एका गाण्यामुळे हा हिंसाचार भडकला असावा. हे गाणे तसे मुळीच वादग्रस्त नव्हते. यापूर्वी याहून अधिक प्रक्षोभक गाणी लावली जात होती; मात्र तीही पाकिस्तानचा नाश करू या आशयाची असायची. त्यात जातीयवादाचा लवलेशही नसायचा, असे पोलिसांनी सांगितले. (याचाच अर्थ धर्मांधांना हिंदूंच्या सणांमध्ये हिंसाचार करण्यासाठी क्षुल्लक कारणही पुरेसे असते. त्याचबरोबर पाकिस्तानविरुद्ध गाणे लावले, तर ते हिंसाचार करतात. त्यावरून त्यांची निष्ठा कुठल्या देशाशी आहे हेही स्पष्ट होते ! - संपादक)

दुष्काळ निवारणाच्या कार्यक्रमाच्या नावाखाली आमीर खानच्या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून उत्तम बडदास्त !

जलसंधारण नियोजन कार्यक्रम वातानुकूलित सभागृहात ! 
     सातारा, १९ एप्रिल (वार्ता.) - दुष्काळ निवारणाच्या नावाखाली सातारा शहरात चित्रपट अभिनेता आमीर खान यांच्या झालेल्या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाकडून उत्तम बडदास्त ठेवण्यात आली. जिल्हा दुष्काळात होरपळत असतांना आणि जनता उन्हात तडफडत असतांना कार्यक्रम वातानुकूलित सभागृहात घेण्यात आला. जाणीवपूर्वक गोपनीय ठेवण्यात आलेल्या या कार्यक्रमातून आमीर खान यांच्याकडून ठोस असे जिल्ह्याला काहीच मिळाले नाही. यामुळे नागरिकांतूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

चिंचवड (पुणे) येथील श्री हनुमान चावडी हनुमान मंदिर येथे हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

     चिंचवड, १९ एप्रिल (वार्ता.) - येथील श्री काळभैरवनाथ उत्सव समिती, चिंचवडगाव यांच्या वतीने २२ एप्रिल या दिवशी श्री हनुमान चावडी हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या दिवशी पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यामध्ये पहाटे ५ वाजता रुद्राभिषेक, श्री हनुमान जन्माचे कीर्तन, महाआरती, सामूहिक मारुतिस्तोत्र पठण होणार असून विविध भजनी मंडळे भजनेही सादर करणार आहेत. दुपारी महाप्रसाद आणि रात्री ८ वाजता रामचरित मानस सुंदरकांडचा पाठ होईल. सर्व भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ करून घ्यावा, असे उत्सव समितीने आवाहन केले आहे.

नांदेड येथे हिंदु युवा शक्तीच्या वतीने रामनवमीनिमित्त वाहनफेरी आणि धर्मसभा यांचे आयोजन

     नांदेड - येथे हिंदु युवा शक्तीच्या वतीने रामनवमीनिमित्त वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले. या फेरीला १ सहस्र हिंदू उपस्थित होते. नंतर झालेल्या सभेत व्यासपिठावर अध्यक्ष म्हणून ह.भ.प. हनुमंत महाराज दापकेकर उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. धर्मसभा यशस्वी होण्यासाठी सर्वश्री नागनाथ दरर्डे, नंदकुमार गोंगडे, अमोल दापकेकर, संदीप दापकेकर, किरण गोरे, प्रशांत नाईक, कैलास गोंगडे यांनी परिश्रम घेतले.

वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वसंत व्याख्यानमालेस २१ एप्रिलपासून प्रारंभ !

अनेक दिग्गजांचे विचार ऐकण्याची संधी 
     पुणे, १९ एप्रिल (वार्ता.) - वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या १४२ व्या ज्ञानसत्रास प्रतिवर्षीप्रमाणे २१ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. २० मेपर्यंत प्रतिदिन सायंकाळी ६.३० ते रात्री ८ या वेळेत टिळक स्मारक मंदिर येथे व्याख्याने होणार असून 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे', या विषयावरील श्री. भारतकुमार राऊत यांच्या व्याख्यानाने व्याख्यानमालेस प्रारंभ होईल. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी वर्ष १८७५ पासून चालू केलेला विचार महोत्सव राज्यामध्ये मानाचा समजला जातो. १ मासाच्या ज्ञानसत्रात राजकीय, सामाजिक, कला क्षेत्रांतील मान्यवर व्याख्याने देणार आहेत. अधिकाधिक नागरिकांनी या व्याख्यानमालेत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन वक्तृत्वोत्तेजक सभेचे कार्यवाह वैद्य मंदार बेडेकर आणि डॉ. गीताली टिळक-मोने यांनी केले. 

बजरंग दल आणि ओशिवरा जिल्हा आयोजित श्रीरामनवमीच्या शोभायात्रेत ७ सहस्रांहून अधिक धर्माभिमान्यांचा सहभाग

श्रीरामनवमीच्या शोभायात्रेत सहभागी हिंदु धर्माभिमानी
     मुंबई, १९ एप्रिल (वार्ता.) - श्रीरामनवमीनिमित्त विश्व हिंदु परिषदेच्या अंतर्गत बजरंग दल आणि ओशिवरा जिल्हा यांच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. गोरेगाव (प.) लिंक रोड येथील आंबामाता मंदिराच्या येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. या शोभायात्रेत ७ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते. यामध्ये दुर्गा वाहिनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सिंह वाहिनी, दुर्गामाता मंदिर समिती, वीरसेना, पू. आसाराबापू संप्रदाय, पतंजली योग समिती, सनातन संस्था, शिवरत्न प्रतिष्ठान, हिंदु जनजागृती समिती, स्वराज्य मराठा पथक, व्ही.आर्. मेरीटाईम सर्विस प्रा. लि. आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.
क्षणचित्र - या शोभायात्रेत दैनिक 'सनातन प्रभात'च्या आतंकवादविरोध विशेषांकाचे वितरण करण्यात आले. 

तात्या टोपे यांच्या हुतात्मा दिनी त्यांच्या स्मरणार्थ नाण्यांचे अनावरण

     नवी देहली - तात्या टोपे यांच्या हुतात्मा दिनी त्यांच्या स्मरणार्थ १८ एप्रिलला नवी देहलीत सांस्कृतिक आणि पर्यटन तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांच्या हस्ते २०० रुपये मूल्याचे नाणे आणि चलनात वापरण्यासाठी १० रुपये मूल्याचे नाणे जारी करण्यात आले. 
     भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात तात्या टोपे यांनी उल्लेखनीय कार्य केले होते. ७ एप्रिल १८५९ या दिवशी ब्रिटीश सैन्याने त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला आणि १८ एप्रिल १८५९ या दिवशी मध्यप्रदेशच्या शिवपुरी येथे त्यांना फाशी देण्यात आली.
      २०१५-१६ या वर्षात महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यशासनाच्या सहकार्याने सांस्कृतिक मंत्रालय तात्या टोपे यांचे द्वीशतकी जयंती वर्ष साजरे करत आहे. केंद्रशासनाकडून महाराष्ट्रात येवला येथे तात्या टोपे यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारले जात असून भोपाळमध्येही मध्यप्रदेश शासनाच्या सहकार्याने युद्ध संग्रहालय उभारले जात आहे.अबू सय्यफ ही आतंकवादी संघटना उद्ध्वस्त करण्याची फिलिपीन्सची प्रतिज्ञा

     मनिला - फिलिपीन्सने त्याच्या सैन्यदलातील १८ सैनिकांना ठार मारणार्‍याअबू सय्यफ या जिहादी संघटनेला उद्ध्वस्त करण्याची प्रतिज्ञा केली आहे. फिलिपीन्सच्या बाजिलन बेटावर अबू सय्यफचे आतंकवादी आणि फिलिपिन्सचे सैन्यदल यांच्यात नुकत्याच उडालेल्या चकमकीत सैन्यदलाचे १८ सैनिक ठार झाले, तर ५३ जण घायाळ झाले. या चकमकीत ५ आतंकवाद्यांनाही कंठस्नान घालण्यात सैन्यदलाला यश आले होते.
    त्या वेळी फिलिपीन्सचे संरक्षणमंत्री वोल्टायर गाझमिन आणि संरक्षणखात्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. 
१. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर अबू सय्यफच्या विरोधात लढा चालू ठेवण्यात येईल, असे गाझमिन यांनी या वेळी सांगितले. 
२. फिलिपीन्सच्या सैन्यदलाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एदुआर्द आनो यांनी सांगितले की, अबू सय्यफचा नेमका ठावठिकाणा लागलेला आहे. हा आतंकवादी गट उद्ध्वस्त करूनच आम्ही थांबणार आहोत. 
३. या संघटनेची अनेक आतंकवादी संघटनांशी जवळीक आहे. हॅपिलॉनला पकडण्यास साहाय्य करणार्‍याला मोठे पारितोषिक देण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे.
महंत योगी आदित्यनाथ यांना उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार करा !

 • योगी आदित्यनाथांसाठी कार्यकर्त्यांनी दर्ग्यावर चादर चढवली !
 • भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाची मागणी
       गोरखपूर - भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी येथील भाजपचे खासदार महंत योगी आदित्यनाथ यांना उत्तरप्रदेशमध्ये होणार्‍या आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी नियुक्त करण्यात यावे, यासाठी स्थानिक हजरत अली शाह नक्कोबाबा यांच्या दर्ग्यावर चादर चढवली. या वेळी प्रदेश कार्यसमिती सदस्य इरफान अहमद यांच्यासह अल्पसंख्यांक मोर्चाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी ते म्हणाले, मुसलमानांना उत्तरप्रदेशमध्ये विकास हवा आहे आणि केवळ योगी आदित्यनाथच उत्तरप्रदेशात विकासकार्य करू शकतात. (प्रखर हिंदुत्ववादी योगी आदित्यनाथ राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, असे मुसलमानांना वाटते. यावरून मतांसाठी मुसलमानांचे लांगूलचालन करून हिंदूंना दडपणार्‍या नेत्यांनी बोध घ्यावा ! - संपादक)

पतीने बळजबरीने ६ वेळा गर्भपात करायला लावला ! - तलाकपीडित सायराबानोचा आरोप

       देहली - तलाक देण्याच्या पद्धतीस विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करणार्‍या सायराबानो या मुसलमान महिलेने स्वतःच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. पतीने आपल्याला ६ वेळा बळजबरीने गर्भपात करायला लावल्याचे तिने म्हटले आहे. गर्भपातामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम झाला आणि त्यामुळेच आपण सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याचे तिने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. (स्त्रियांना समान अधिकार मिळावेत, यासाठी लढणार्‍या (?) तृप्ती देसाई यांसारख्या स्त्रीवादी महिला आता गप्प का ? - संपादक)

काबूलमध्ये शक्तीशाली स्फोटात ७ ठार, ३२९ घायाळ !

        काबूल (अफगाणिस्तान) - येथील पूल-ए-महमूद या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भागात १९ एप्रिलला सकाळी करण्यात आलेल्या आत्मघातकी स्फोटात किमान ७ नागरिक ठार झाले, तर ३२९ हून अधिक घायाळ झाले. बीबीसी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट एवढा शक्तीशाली होता की, स्फोटाच्या ठिकाणापासून १ किलोमीटर अंतरावरच्या काचा फुटल्या. अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्रालय आणि गुप्तचर विभागाची कार्यालये येथून जवळच आहेत.
        अफगाणिस्तानमध्ये सत्तेसाठी हिंसक संघर्ष करणार्‍या तालिबानने अफगाण सैन्याच्या विरोधातील नव्या वार्षिक मोहिमेची घोषणा गेल्याच आठवड्यात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर हे आत्मघातकी आक्रमण अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.

इंदापूरच्या (जिल्हा पुणे) तहसीलदारांवर वाळू तस्करांचे आक्रमण

     पुणे, १९ एप्रिल - येथील इंदापूर तालुक्यात अवैध वाळू उपसा करणार्यास वाळू तस्करांची प्रशासकीय अधिकार्यां वर गुंडगिरी करण्याचे प्रकार अजून चालूच आहेत. एका वाळू वाहतूकदाराने तहसीलदार वर्षा लांडगे-खत्री यांच्यावरच आक्रमण केले; परंतु त्या थोडक्यात बचावल्या. अवैधरित्या वाळू वाहतूक करणार्यां वर १७ एप्रिलच्या दिवशी पहाटे कारवाई केली जात असतांना हा प्रकार घडला. (इंदापूर तालुक्यात आणि राज्यात वाळू तस्करांकडून प्रशासकीय अधिकार्यां वर होणारी जीवघेणी आक्रमणे ही कायदा-सुव्यवस्था संपल्याचे लक्षण आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. - संपादक)

एप्रिल अखेरपर्यंतच भविष्य निर्वाह निधीची ('पीएफ्' ची) संपूर्ण रक्कम काढणे शक्य !

     मुंबई - कर्मचार्यांना भविष्य निर्वाह निधीची म्हणजेच पीएफ् संपूर्ण रक्कम काढायची असल्यास एप्रिलच्या शेवटपर्यंतच काढता येणार आहे. १ मेनंतर मात्र कर्मचार्यां्ना वयाची ५८ वर्षे पूर्ण केल्यानंतरच भविष्य निर्वाह निधीची संपूर्ण रक्कम काढता येईल. 

प्रगत मेंदूविज्ञानाद्वारे समोर येणार्याल माहितीनुसार आध्यात्मिक सिद्धांतांना पुष्टी ! - डॉ. दीपक रानडे

     पुणे, १९ एप्रिल (वार्ता.) - प्रारंभीच्या काळातील विज्ञान ज्याला न्यूटनियन विज्ञान (Newtonian Science) असे म्हणता येईल, हे जरासे संकुचित असून त्याचा भर केवळ बाह्य जगतावर, तसेच पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून मिळणार्याे अनुभवांच्या अध्ययनावर होता. पुढील काळात सापेक्षतावाद (रिलेटिव्हिटी) आणि पुंजविज्ञान (क्वांटम मेकानिक्स) पुढे आल्यानंतर वैज्ञानिक प्रयोग करत असतांना केवळ निरीक्षणीय वस्तूचाच विचार करणे अयोग्य असून निरिक्षणकर्त्याचाही विचार करणे आवश्यक असल्याचे वैज्ञानिकांच्या लक्षात आले. येथूनच पुढे विज्ञान आणि अध्यात्मशास्त्र जवळ येण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर मेंदूविज्ञान या वैज्ञानिक शाखेचा झपाट्याने विस्तार झाला. आज कित्येक आध्यात्मिक सिद्धांतांना मेंदू विज्ञानाद्वारे पुष्टी मिळू लागली आहे, असे प्रतिपादन डॉ. दीपक रानडे यांनी केले. (अध्यात्माला विज्ञानाच्या विरोधात उभे करणार्यास कथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांना यासंदर्भात काय म्हणायचे आहे ? - संपादक)

लक्ष्मणाचा आदर्श ठेवून सेवा करा ! - श्रीनिवासाचार्यजी

     सांगली, १९ एप्रिल (वार्ता.) - लक्ष्मणाने १४ वर्षे झोप न घेता अखंडपणे श्रीरामाची सेवा केली. रावणाला पराभूत करून अयोध्येत आल्यावरही लक्ष्मणाने राज्यपद न घेता सेवक म्हणूनच रहाण्याची इच्छा व्यक्त केली. हाच आदर्श समोर ठेवून आपण सेवा केली पाहिजे. श्रीरामानुज स्वामीजी यांचे अवतारकार्य हे जिवाला मोक्ष प्रदान करून देण्यासाठीच आहे. त्याचा अधिकाधिक प्रसार करा, असे मार्गदर्शन पू. श्रीनिवासाचार्यजी यांनी केले. श्रीरामानुज स्वामीजी यांच्या अवतारकार्यास एक सहस्र वर्षे पूर्ण होत असल्याविषयी लक्ष्मीनारायण मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्रीरामानुज सहस्रमानोत्सव समितीच्या वतीने येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर, वखारभाग आणि श्री व्यंकटेश मंदिर, लाले प्लॉट येथे १८ एप्रिल या दिवशी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.

चीनमध्ये समलिंगी विवाहास अनुमती नाहीच !

चीन शासन आणि न्यायालय यांच्याकडून भारतीय राज्यकर्ते काही बोध घेतील का ? 
     चांगशा (चीन) - येथील समलिंगी विवाहाच्या संदर्भातील पहिल्याच प्रकरणाची सुनावणी करतांना न्यायालयाने १३ एप्रिल या दिवशी याचिकाकर्त्या पुरुष जोडप्याविरोधात निकाल दिला. चीनमध्ये बाळसे धरू लागलेल्या समलिंगी नागरिकांच्या अधिकारांच्या संदर्भातील मोहिमेच्या पार्श्‍वभूमीवर देण्यात आलेला हा संवेदनशील निकाल ऐतिहासिक मानला जात आहे. 
   चांगशामधील न्यायालयाने पुरुष जोडप्यास विवाहाच्या नोंदणीची अनुमती नाकारली. त्यामुळे सुन वेनलिन या याचिकाकर्त्याने न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. समलिंगी विवाहास चीनमध्ये बंदी असून नजीकच्या भविष्यकाळात यामध्ये पालट होण्याची शक्यता जवळपास नसल्याचे येथील शासनानेही स्पष्ट केले आहे.


नितीशकुमार यांच्या संघमुक्त भारतच्या घोषणेमुळे भाजप संतप्त !

     पाटलीपुत्र (पाटणा) - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी १६ एप्रिल या दिवशी लोकशाही वाचवण्यासाठी बिगर भाजप पक्षांना संघमुक्त भारतासाठी एक होण्याची हाक दिल्यानंतर भाजपमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. संघाच्या पाठिंब्यासाठी भाजप मैदानात उतरला असून नितीशकुमार यांनी एक दिवस तरी संघ शाखेत यावे, म्हणजे त्यांचे अपसमज आपोआप दूर होतील, असा सल्ला भाजपने दिला आहे.
    भाजपचे प्रवक्ता श्रीकांत शर्मा म्हणाले, भाजपविरोधी आघाडी निर्माण करण्याच्या प्रयत्नांना आम्ही घाबरत नाही. मोदी शासनाला देशाच्या विकासापासून रोखण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या पक्षाशी भाजपशी दीर्घकाळ आघाडी होती. त्यामुळे संघाच्या लोकांसमवेत तुम्ही दीर्घकाळ काम केले आहे; मात्र आताच संघमुक्त भारत घोषणा कशी देता ? नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी काम करण्यास सिद्ध आहेत का ? याचे उत्तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी द्यावे. भाजपचे नेते मुक्तार अब्बास नक्वी म्हणाले, नितीशकुमार यांनी यापूर्वी काँग्रेसविरोधी राजकारण केले. आता ते काँग्रेस समवेतच जात आहेत. आमचे शासन गरिबांच्या भल्यासाठी काम करत असल्याचे तुम्हाला सहन होत नाही. आम्हाला तुमच्या विरोधाची चिंता नाही; मात्र तुमची उद्दिष्टे यशस्वी होणार नाहीत.
      संघनेते मा.गो. वैद्य हे नितीश कुमार यांना उद्देशून म्हणाले, भाजपशी स्वबळावर तुम्ही लढू शकत नाही. एकत्र येण्याने तुम्हाला थोडा फार लाभ मिळेल. तथापि संघाला ज्या ज्या वेळी मोठा विरोध झाला आहे त्या त्या वेळी संघ वाढला आहे, हा इतिहास आहे. संघ कुणाच्याही दयेवर नव्हे, तर स्वयंसेवक करत असलेल्या कामावर वाढतो.


भारतात मानवाधिकारांचे हनन होत असल्याचे सांगत अमेरिकेची भारतावर टीका !

     नवी देहली - भारतात मानवाधिकारांचे तथाकथित उल्लंघन होत असल्याचे सांगत अमेरिकेच्या गृह राज्य विभागाकडून कडक शब्दांत टीका करण्यात आली आहे. या विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, भारतातील पोलीस यंत्रणा मनमानी करून अटक करते, असे म्हटले असून देशातील काही घटनांचे संदर्भ देऊन त्यावर टीका करण्यात आली आहे. (स्वतःच्या देशातील वर्णद्वेषाचे वाढते प्रकार रोखण्यासाठी काहीही न करता भारताच्या अंतर्गत प्रकरणात नाक खुपसण्यात रस घेणारी अमेरिका ! - संपादक)
१. या अहवालात ७ एप्रिल या दिवशी झालेल्या संशयित चंदन तस्करांच्या चकमकीचा तसेच २०१५ या वर्षी नालगोंडा येथे ५ नक्षलवाद्यांना कारागृहातून भाग्यनगर येथील न्यायालयात नेत असतांना त्यांच्यावर गोळीबार केल्याच्या घटनेचा समावेश करण्यात आला आहे. (अमेरिकेला नक्षलवाद्यांची चिंता आहे; मात्र गेली ५ दशके नक्षलवादामुळे होरपळणार्‍या भारतीय जनतेची नाही ! - संपादक)

वसईच्या बालगृहात सिस्टर्सकडून अल्पवयीन मुलींचा छळ !

 • हिंदूंनो, अशा प्रकारच्या बातम्यांवर प्रसारमाध्यमे कधी चर्चासत्रे घेत नाहीत, हे लक्षात घ्या !
 • काम न करणार्‍या मुलींना मारहाण
       वसई - येथील हॅण्डमेड्स ऑफ द ब्लेस्ड ट्रीनिटी रोझा मिस्टीका कॉन्हव्हेंट या बालगृहाच्या २ सिस्टर्सविरोधात अल्पवयीन मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे; मात्र बालगृहाच्या चालकांनी हे आरोप फेटाळून लावले असून बालगृहाला अपकीर्त करण्याचे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. या बालगृहात मुंबईसह विविध भागांतील अल्पवयीन शाळकरी मुली रहातात.
१. या बालगृहात मुलींना सिस्टर्स मारहाण करतात, तसेच शिळे आणि नासलेले अन्न देतात, अशी तक्रार सीमा क्रियाडो या महिलेने केली आहे.
२. क्रियाडो यांच्या अलायसा (वय ५ वर्षे) आणि ट्रिझिया (वय १५ वर्षे) या मुली गेल्या दोन वर्षांपासून आश्रमात रहात आहेत. माझ्या मुलींना सिस्टरचे कपडे धुणे, भांडी घासणे, बंगले स्वच्छ करणे आदी कामे करायला लावली जात. मुलींनी काम करण्यास नकार दिला, तर त्यांना चपलेने मारहाण करून त्यांचे केस ओढले जातात, असे क्रियाडो यांनी तक्रारीत म्हटले आहे.

इराणच्या राष्ट्रपतींसमोर सुषमा स्वराज यांचा हिजाबप्रमाणे वेश परिधान !

इराणी नेत्यांशी चर्चा करतांना सुषमा स्वराज. त्यांनी
डोके झाकण्यासाठी शाल वापरल्याचे दिसत आहे.
     बांगलादेशमध्ये गेल्यावरही सुषमा स्वराज यांनी एका कार्यक्रमात हिजाबप्रमाणे डोके झाकले होते आणि आता इराणमध्येही त्यांनी तसेच केले, काँग्रेसच्या इंदिरा गांधी यांनीही कधी अशा प्रकारचा वेश परिधान केल्याचे स्मरत नाही, यावरून सध्याच्या भारत शासनाचे इस्लामी राष्ट्रांविषयीचे परराष्ट्र धोरण लक्षात येते !
    नवी देहली / तेहरान - भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज इराण दौर्‍यावर आहेत. त्यांनी इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांची भेट घेतली, या वेळी स्वराज यांनी हिजाबप्रमाणे (डोके झाकण्यासाठी वापरण्यात आलेला स्कार्फ) वेश परिधान केल्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडिया वरून टीका होत आहे. स्वराज यांनी स्वतः त्यांच्या भेटीची छायाचित्रे ट्वीटर वर ठेवली आहेत.

(म्हणे) सौंदर्यवती बनून भारत जगाला भुलवतोय !

चिनी प्रसारमाध्यमांचा कांगावा
       बीजिंग (चीन) - सौंदर्यवती बनून जगातील सर्व देशांना, विशेषत: अमेरिका आणि चीन या महासत्तांना भुरळ घालण्याची भारताची रणनीती आहे, असा कांगावा चिनी प्रसारमाध्यमांनी भारताच्या परराष्ट्र धोरणांचे विश्‍लेषण करतांना केला आहे.
१. चीनच्या सागरी विस्तारवादाला वेसण घालू शकणार्‍या भारत आणि अमेरिका यांच्यातील सामरिक सहकार्य करारावर सध्या दोन्ही देशांची बोलणी चालू आहे. चीनचे या कराराकडे बारकाईने लक्ष आहे.
२. या पार्श्‍वभूमीवर चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समध्ये एक लेख प्रसिद्ध झाला आहे. यात म्हटले आहे की, भारत आणि अमेरिका यांच्यात आरंभीपासूनच अविश्‍वासाचे वातावरण आहे. तरीही त्यांच्यात करार होणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. दोन महासत्तांमध्ये झुलत रहाण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षी रणनीतीचा हा भाग आहे.
३. मुळात भारताला कायम एक सौंदर्यवती बनून रहायचे आहे, जी सगळ्या पुरुषांना भुरळ घालत राहील.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

(म्हणे) सनातन्यांच्या गोळ्यांची मी पर्वा करत नाही !

साहित्यिक श्रीपाल सबनीस यांचे हिंदुद्वेषी विधान
        सातारा - डॉ. आंबेडकरांनी समतेचा विचार मांडला. जाती-जातीतील अंतर न्यून होण्यासाठी आंतरजातीय विवाहाची संकल्पना मांडली; मात्र हिंदु धर्मातील सनातन्यांना त्यांचे हे विचार मान्य नसल्याने त्यांनी त्या विरोधात संघर्ष केला; मात्र आंबेडकरांनी हिंदूंच्या लोकांचा सूड घेतला नाही. ते बुद्धांच्या प्रेमात पडले अन् त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. असे असले, तरी त्यांनी देशभक्तीशी तडजोड केली नाही. बाबासाहेबांविषयी विचार मांडत असतांना समोरून सनातनी मंडळींच्या कितीही गोळ्या येऊ द्या, मी घाबरणार नाही, असे विधान ८७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी केले. (गोळ्या सनातनी मंडळींकडून येतात, हा जावईशोध सबनीस यांनी कसा लावला ? - संपादक) येथे डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीदेवीला अंबाबाई म्हणणारे पत्रकार सुभाष देसाई यांना अज्ञातांची ठार मारण्याची धमकी !

        कोल्हापूर - येथील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक सुभाष देसाई यांना एका निनावी पत्राद्वारे गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. कोल्हापुरातील श्री महालक्ष्मीदेवीविषयी एक लेख लिहिल्यामुळे देसाई यांना ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकारानंतर देसाई यांनी जुना राजवाडा पोलिसांत तक्रार दिली आहे. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी या घटनेची दखल घेत चौकशीचा आदेश दिला आहे, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून देसाई यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवला आहे.
देसाई यांना आलेल्या धमकीच्या पत्रात म्हटले आहे की,
१. महालक्ष्मी ही महालक्ष्मी नसून अंबाबाई आहे. शिवाय ती शिवपत्नी आहे. विष्णुपत्नी नाही, असे तुमचे म्हणणे आहे, ते तुमच्या पुरतेच ठेवा. याला तुम्ही प्रबोधन वगैरे म्हणत असाल; पण असले प्रबोधन करणार्‍यांचा शेवट कोल्हापुरात कसा झाला, हे सांगायला नको.

नांदेड येथे आमदार हेमंत पाटील यांना पेट्रोलसाठी वापरलेल्या बाटलीतून दिले पिण्याचे पाणी

       नांदेड, १९ एप्रिल - पेट्रोलसाठी वापरलेल्या बाटलीतून शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांना येथील विमानतळावर पिण्यासाठी पाणी देण्यात आले होते. ते पाणी प्यायल्यावर पाटील यांना जुलाब आणि उलट्या यांचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे विमानतळावरच आधुनिक वैद्यांना बोलावून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ही घटना १५ एप्रिल या दिवशी घडली. पाणी दिलेली बाटली पेट्रोलसाठी वापरल्याचे निदर्शनास आले. या घटनेप्रकरणी आमदार पाटील यांनी १६ एप्रिल या दिवशी विमानतळ पोलीस ठाणे, अन्न आणि औषध प्रशासन यांच्याकडे तक्रार देऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली. गोदावरी अर्बन बँकेच्या सिडको येथील शाखेच्या उद्घाटनासाठी राज्यमंत्री रवींद्र वायकर १५ एप्रिल या दिवशी नांदेड येथे येणार होते. तत्पूर्वी विमानतळावरील त्यांची व्यवस्था पहाण्यासाठी १ घंटा अगोदर आमदार पाटील आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. तेव्हा उपरोक्त प्रसंग घडला. (विमानतळावर सर्वसामान्यांना पिण्याचे पाणी कसे मिळत असेल, याचा विचारच न केलेला बरा ! या प्रकरणी विमानतळ व्यवस्थापनाने संबंधितांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. - संपादक)

देशातील २५४ जिल्ह्यांतील ३३ कोटी नागरिक दुष्काळग्रस्त !

समाजात अधर्माचरण 
वाढल्यामुळे देशाची झालेली स्थिती !
       नवी देहली - देशातील दुष्काळाच्या संदर्भात केंद्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या आकडेवारीनुसार १० राज्यांतील २५४ जिल्ह्यातील ३३ कोटी नागरिक दुष्काळग्रस्त आहेत.

मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता गंभीर, उपयुक्त पाणीसाठा ३ प्रतिशत

       संभाजीनगर, १९ एप्रिल - मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता गंभीर होत चालली असून या विभागातील ८१४ प्रकल्पांत केवळ ३ प्रतिशत उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे आगामी २ मासांमध्ये पाणीबाणीची स्थिती गंभीर होणार आहे. सध्या मराठवाड्यात २ सहस्र ८५६ टँकरद्वारे पाणी पुरवण्यात येत आहे.
राज्यात १९ प्रतिशत उपयुक्त पाणीसाठा !
      राज्यातील २ सहस्र ५४८ प्रकल्पांमध्ये ६ सहस्र ७५५ दशलक्ष घनमीटर, म्हणजेच १९ प्रतिशत उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी २०१५ मध्ये सर्व प्रकल्पांमध्ये ३२ प्रतिशत पाणीसाठा होता.

आक्षेपार्ह नसलेल्या उत्तरपत्रिका शिक्षण मंडळाच्या कह्यात देण्याचा उच्च न्यायालयाच्या खंडपिठाचा आदेश

जालना येथील १२ वीच्या 
उत्तरपत्रिका पुनर्लेखनाचे प्रकरण
      संभाजीनगर, १९ एप्रिल - जालना येथे १२ वीच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्लेखनाच्या प्रकरणी आक्षेपार्ह नसलेल्या उत्तरपत्रिका शिक्षण मंडळाच्या कह्यात परत देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने १६ एप्रिल या दिवशी दिला आहे. असे असले तरी या उत्तरपत्रिका पडताळण्यासाठी पोलिसांनी काही अटी आणि शर्ती मंडळापुढे ठेवल्या आहेत.

चि.सौ. अरुणा कौलकर यांच्या शुभविवाहानिमित्त कु. गायत्री बुट्टे यांनी दिलेले शुभेच्छापत्र !

कु. गायत्री बुट्टे
चि.सौ. अरुणाचा १९ एप्रिल या दिवशी विवाह पार पडला. त्यानिमित्त कु. गायत्रीने दिलेले शुभेच्छापत्र येथे देत आहोत.

अश्‍लील चित्रपट आणि संकेतस्थळ यांवर बंदी घातली पाहिजे, हे शासनाला कळत कसे नाही ?

     कर्नाटक राज्यातील महाविद्यालयांमधील ६६ टक्के विद्यार्थी आठवड्यातून ७ घंटे, तर ३० टक्के विद्यार्थिनी आठवड्यातून ५ घंटे अश्‍लील (पॉर्न) चित्रपट पहातात, अशी आकडेवारी रेस्क्यू या खाजगी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक क्लिफॉर्ड यांनी केलेल्या सर्वेक्षणानंतर समोर आली आहे. या सर्वेक्षणाच्या वेळी विद्यार्थ्यांनी पॉर्न पाहिल्यावर बलात्कार करण्याचे विचार येतात, असे सांगितले. 


सर्व गोष्टींचा आद्यकर्ता कोण आहे, तर भगवान श्रीकृष्ण आहे. मी युद्ध करणार नाही आणि माझ्याच बांधवांना मारून मला राज्य उपभोगायचे नाही, हा विचार अर्जुनाच्या मनात आला आणि हा विचार काढून टाकण्यासाठी श्रीकृष्णाने त्याचाही बुद्धीभेदच केलेला आहे. तोच माझा आदर्श असे सांगून सावरकरांनी पुढे पाऊल टाकायला प्रारंभ केला.

चीनच्या विस्तारवादाला काटशह केव्हा ?

पठाणकोट हवाई तळावरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरवर बंदी घालण्याचा भारताचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. मसूदच्या बंदीला चीनने विरोध केला असून भारताने संयुक्त राष्ट्र समितीकडे मसूदवर बंदी घालण्याची मागणी केली होती. संयुक्त राष्ट्र समिती मसूदच्या बंदीविषयी निर्णय देणार होती. संयुक्त राष्ट्र समितीतील १५ पैकी १४ देशांनी भारताला पाठिंबा दर्शवला आहे. केवळ चीनने विरोध केल्यामुळे समितीने हा निर्णय राखून ठेवला आहे. चीनने मसूदच्या बंदीला विरोध करण्याचे कारणही स्पष्ट केलेले नाही. संयुक्त समितीच्या बैठकीपूर्वी चीनने पाकिस्तानशी चर्चा केल्याचे भारत शासनाने म्हटले आहे. पाकिस्तान हा संयुक्त राष्ट्र समितीचा सदस्य नाही. चीन या समितीचा सदस्य असल्याने पाकिस्तानशी झालेल्या चर्चेवरून चीनने हा विरोध केला आहे.

हिंदूंच्या विनाशास हिंदूंतील बाणेदारपणाचा अभावच कारणीभूत ! - प्रा. सत्यविजया

          प्रा. सत्यविजया या आय.आय.टी. या सन्मानजन्य संस्थेत कार्यरत आहेत. त्यांचा हिंदुत्वावर सखोल अभ्यास आहे. त्यांच्या तीक्ष्ण निरीक्षणाचा आणि जागतिक भ्रमणात आलेल्या अनुभवाचा लाभ त्या वेगवेगळ्या व्यासपिठांवर भाषणे देऊन हिंदूंना करवून देतात. त्यांनी नुकत्याच दिलेल्या भाषणातील काही अंश देत आहोत.
हिंदु धर्मावर टीका 
करणारे साम्यवादी बुद्धीवंत !
        हिंदु धर्माच्या विनाशास आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या मार्गात अडथळे आणण्याचे कार्य करण्यात मुख्यत: भारतातील आय.आय.टी. संस्थांतून उच्च शिक्षण घेऊन अमेरिकेत गेलेले साम्यवादी विचाराचे बुद्धीवादी, भारतात सामाजिक सेवेच्या नावाखाली देशद्रोही कारवाया करणार्‍या आणि हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या सेवाभावी संस्था (एन.जी.ओ.) यांचा समावेश आहे. या तथाकथित बुद्धिवंतांना साम्यवादाची लागण झाली असल्याने टीका करण्यासाठी हिंदू व्यतिरिक्त इतर धर्म सापडत नाही. त्यांना अमेरिकेतील विश्‍वविद्यालयात कार्यरत असणार्‍या साम्यवादी शिक्षकवृंदाची फूस मिळते. तसेच भारतातील साम्यवादी त्यांना खोट्या घटनांची माहिती देऊन पुरेसे खाद्य पुरवतात. यावर उपाय म्हणून हिंदूंनी स्वत:तील लुप्त होत असलेली क्षात्रवृत्ती जोपासून लढा दिला पाहिजे. आधी मोगल राज्यकर्ते आणि नंतर ब्रिटीश राज्यकर्ते यांच्याशी हिंदूंनीच लढा देऊन त्यांच्यावर विजय मिळवला. आजही साम्यवादाशी लढा देण्यात हिंदूच पुढे आहेत. मात्र मला कणव येते ती हिंदुत्ववादी बुद्धीवंतांची. त्यांनी सहिष्णुता नावाचे झापड डोळ्यांवर बांधले आहे. तसेच हिंदू नेत्यांच्या रक्तातही बाणेदारपणाचा अभाव आढळून येतो.

धर्मप्रसाराची आत्यंतिक तळमळ असणारे फतेहपूर, राजस्थान येथील श्री. राजकुमार पारिख आणि श्री. सुनील केशान !

श्री. राजकुमार पारिख
श्री. सुनील केशान
राजस्थान येथील बिकानेरहून झुंझुनूला जातांना वाटेत फतेहपूर (शेखावटी) हे गाव लागते. नाशिक येथे झालेल्या सिंहस्थपर्वात संस्थेच्या धर्मशिक्षणाच्या प्रदर्शनाला फतेहपूर येथील श्री. राजकुमारजी पारिख आणि श्री. सुनीलजी केशान यांनी भेट दिली होती. आम्ही त्यांना भेटायचे ठरवले. त्यांना आम्ही येत असल्याचे कळवले. या भेटीचा अनुभव वेगळा होता; कारण सिंहस्थपर्वात मिळालेल्या धर्मशिक्षणाचा लाभ ग्रामस्थांना व्हावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
१. श्री. राजकुमारजी पारिख आणि श्री. सुनीलजी केशान यांची जाणवलेली सामायिक गुणवैशिष्ट्ये
१ अ. धर्मप्रसाराची तळमळ
१ अ १. काही घंट्यांतच ४ दिवसीय प्रदर्शनाचे नियोजन करणे : आम्ही श्री. राजकुमारजी यांना कल्पना देऊन बिकानेरहून निघालो. आम्ही निघाल्यापासून श्री. राजकुमारजी आमच्या संपर्कात होते. फतेहपूरमध्ये त्यांनी सांगितलेल्या ठिकाणापेक्षा अलीकडेच आम्हाला बसने सोडले; पण ते लगेच गाडीने तिकडे आले आणि त्यांनी आम्हाला घरी नेले.
श्री. राजकुमारजी यांच्या घरी गेल्यावर काही वेळातच श्री. सुनीलजी तेथे आले. श्री. सुनीलजींनी आम्हाला सांगितले, गावातील श्री लक्ष्मीनाथ मंदिरात आपले धर्मशिक्षणाचे प्रदर्शन लावावे, अशी आमची इच्छा होती. तसे आम्ही कुंभमेळ्यात सांगितले होते. आम्ही प्रदर्शनाच्या आयोजनासाठी होकार दिल्यावर काही गोष्टींची चर्चा करून श्री. सुनीलजी आम्हाला मंदिर आणि त्याच्याजवळ असलेले सभागृह पहाण्यासाठी घेऊन गेले. लगेचच मंदिराच्या व्यवस्थापकांना आमचा परिचय सांगून प्रदर्शनासाठी सभागृह निश्‍चित केले. श्री. राजकुमारजी आणि श्री. सुनीलजी यांच्या मनात अडचणी किंवा इतर कोणत्याही शंका नव्हत्या. अवघ्या १-२ घंट्यांतच ४ दिवसीय प्रदर्शनाचे नियोजन पूर्ण झाले आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आम्हाला पुढील बसमध्ये बसवेपर्यंत ते आमच्यासमवेत होते.

१८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील पहिले क्रांतीकारक मंगल पांडे !

क्रांतीकारक मंगल पांडे यांच्या बलीदानदिनानिमित्त...
       १८५७ मध्ये प्रज्वलित झालेले भारतीय स्वातंत्र्यसमराचे यज्ञकुंड १९४७ मध्ये देशगौरव सुभाषचंद्र बोस यांची जीवनरूपी समिधा घेऊन शांत झाले. ९० वर्षे या वीरप्रसवा भारतभूमीत हुतात्म्यांची मालिका उभी राहिली. स्वातंत्र्यलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेकांनी त्यांची जीवनपुष्पे देवी भगवतीच्या चरणांवर वाहिली. अनेकांच्या संसारांचे सारीपाट अवेळीच उधळले गेले. अनेक भगिनी विधवा झाल्या. कित्येक माता-पित्यांना कायमस्वरूपी पुत्रवियोग सोसावा लागला. पुरेपूर मोल चुकते झाल्यावरच भारताला स्वातंत्र्य मिळाले. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाच्या यज्ञवेदीवरील पहिली समिधा होती परमवीर मंगल पांडे यांची. आणि ती अर्पण झाली ८ एप्रिल १८५७ या दिवशी ! या निमित्ताने मंगल पांडे यांच्या चरित्राचा काही भाग आपण पाहूया !
संकलक : श्री. संजय मुळ्ये, रत्नागिरी.

पोलिसांनी केलेला छळ, तसेच कारागृहात असतांना मनाच्या स्थितीत होणारे पालट आणि जलद गतीने होणार्‍या आध्यात्मिक प्रगतीचे गमक

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील 
जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला ! 
         वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना अटक केली. त्याही स्थितीत साधकांनी स्थिर राहून व्यष्टी आणि समष्टी साधना चालूच ठेवली. कारागृहासारख्या प्रतिकूल वातावरणातही मनाच्या स्थितीत होणारे पालट आणि अंतर्गत साधनेच्या बळावर जलद गतीने होणारी आध्यात्मिक प्रगती यांविषयीचे विश्‍लेषण येथे करण्यात आले आहे.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

सर्वांवर निरपेक्ष प्रीती करून ज्ञान, आनंद आणि चैतन्य देणार्‍या पू. (सौ.) अंजली गाडगीळ !

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
       संगीतकला, लेखन, चित्रीकरण करणे, मुलाखती घेणे इत्यादी विविध विषयांच्या माध्यमांतून श्रीगुरूंची तळमळीने सेवा करतांना पू. (सौ.) अंजलीताई, तुम्ही विश्‍वातील आम्हा कोट्यवधी साधक आणि जिज्ञासू जिवांना भाव, आनंद अन् चैतन्य यांचा अखंड स्रोत असलेली आणि प्रचंड आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त करून देणारी अनेक चैतन्यस्थळे उपलब्ध करून दिलीत. या तुमच्या निरपेक्ष प्रीतीने दिलेल्या दिव्य देणगीसाठी तुमच्या चरणी वंदन करून कृतज्ञता व्यक्त करतांना हे निर्गुडीचे पान (लिखाण) अर्पण करत आहे. ते बिल्वपत्र मानून स्वीकाराल ना ?
१. आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त करून देणारी चैतन्यस्थळे
१ अ. संग्रह करणे
        श्रीमद् आद्य शंकराचार्यांप्रमाणे हिंदु धर्माची संस्थापना आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या एकमेव ध्येयाने प्रेरित होऊन आसेतु हिमालय भ्रमण करणार्‍या पू. (सौ.) अंजलीताई या एकमेव स्त्री संत आहेत.
१ अ १. हिंदूंच्या दैदीप्यमान वारशाचे दर्शन घडवणे : या भ्रमणातून त्यांनी आणलेल्या असंख्य वस्तू महर्षि आध्यात्मिक विश्‍वविद्यालयात संग्रह करून ठेवण्यात येणार आहेत. मंदिरे, त्यांचा परिसर, देवता आणि संत यांची छायाचित्रे, संतांचे ग्रंथ, पोथ्या, हस्तलिखिते, त्यांनी वापरलेल्या वस्तू, वस्त्रे, जपमाळा, वृक्षांच्या फांद्या (डहाळ्या), वृक्षांच्या साली, तसेच पवित्र स्थाने, नद्या आणि पर्वत येथील पवित्र जल, माती अन् विभूती, हिंदूंंची सांस्कृतिक शैली सारे सारे त्यांनी गोळा केले. घागरीत सागर भरून आणला. त्यामुळे चित्रीकरण आणि स्थूल वस्तू यांच्या रूपांत हिंदूंचा दैदीप्यमान आध्यात्मिक वारसा आम्ही पाहू शकलो. एखाद्या संग्रहालयाप्रमाणे नव्हे, तर त्यापेक्षाही अधिक असे संग्रहालयही केवळ एका व्यक्तीच्या (पू. ताईंच्या) प्रयत्नातून उभे रहाणार, त्यासाठी देवा, तुझ्या आणि पू. ताईंच्या चरणी आम्ही कोटी कोटी कृतज्ञ आहोत.

व्यष्टी साधनेसाठी घरी पाठवलेल्या साधकांविषयी प.पू. डॉक्टरांनी सांगितलेली कारणे आणि त्याविषयी साधिकेचे झालेले चिंतन

एक साधिका : देवद, मिरज इत्यादी आश्रमांत जी शुद्धीकरण प्रक्रिया होत आहे तिच्याद्वारे किंवा इतरही अनेक साधकांना व्यष्टी साधनेसाठी घरी पाठवले, याचा अर्थ काय ?
प.पू. डॉक्टर :
१. देवाचा प्रत्येक कृतीमागचा कार्यकारणभाव निराळा असतो.
२. देवाण-घेवाण हिशोबही असतो. पूर्वी आपण त्या साधकाशी जसे वागलेलो असतो, तसे या जन्मी घडते.
३. प्रत्यक्ष संतांच्या हातून प्रक्रिया राबवली जात आहे, तर कितीतरी जन्मांचे प्रारब्धाचे डोंगर संपत आहेत. संतांनी सांगितलेले ऐकल्याने साधना पुष्कळ जलद होते.
४. या सर्व परिस्थितीत मला एकाही साधकाने पत्र लिहून अथवा शंका विचारली नाही किंवा त्यामागील कार्यकारणभाव समजून घेतला नाही.
५. पूर्वीच्या काळची समर्थ रामदासस्वामींच्या कल्याणस्वामी इत्यादी शिष्यांची उदाहरणे आपण सत्संगात सांगतो; पण स्वतः शिष्य होण्याची वेळ येते, तेव्हा स्वतःतील दोष आणि अहं यांचे प्रकटीकरण होऊन आपली साधनेत हानी होते. एकानेही हात जोडून शरणागत भावाने विनंती केली नाही किंवा कोणी ढसाढसा रडलेही नाही. एकानेही मी खरंच अपराधी आहे; पण मला आश्रमातून घरी पाठवू नका, असे सांगितले नाही. साधक आणि संत घडवण्यासाठी मी आश्रम बांधला आहे; पण साधकांतील दोष आणि अहं यांमुळे त्यांतील काही बाहेर पडले; कारण त्यांना बाहेर आपण काहीतरी करू शकतो, असे वाटले.

प.पू. पांडे महाराज यांचे मार्गदर्शन

प.पू. पांडे महाराज
दृष्टी बहिर्मुख असल्यास 
स्वतःलाच त्रास होणे आणि साधनेमुळे 
अंतर्चक्षु जागृत होऊन चैतन्यशक्ती वाढणे
      डोळेे हे अधिक प्रभावी माध्यम आहे; कारण ते आत्मदर्शन घडवतात. जिवंतपणाचे लक्षण डोळ्यांत जास्त प्रतिबिंबीत होते; म्हणून चैतन्य अनुभवणे, हे खरे जीवन ! चैतन्य डोळ्यांना दिसले पाहिजे. ते अनुभवले पाहिजे. आम्ही ते अनुभवत नाही, पहात नाही; कारण आमची दृष्टी बहिर्मुख आहे; म्हणून आम्हाला त्रास होतो. याउलट साधनेमुळे अंतर्चक्षु जागृत होऊन त्यांच्यातील चैतन्यशक्ती वाढून ते प्रभावीपणे कार्यरत होतात. - प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य

प्रतिदिन वाचा नवे सदर...!
सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. हिंदु राष्ट्राची छोटी प्रतिकृतीच असलेल्या या आश्रमाला भेट देऊन हिंदुत्वनिष्ठांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रेरणा मिळते, तर साधकांना साधनेसाठी आध्यात्मिक ऊर्जा लाभते. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.
रामनाथी आश्रमात आल्यानंतर सातारा येथील साधकला आलेल्या अनुभूती !
श्री. बाळासाहेब जगन्नाथ करे 
अ. पुष्कळ वैद्यकीय उपचार करूनही होत असलेला कटीशूल
(कंबर दुखणे) आश्रमात आल्यानंतर नामजप आणि प्रार्थना केल्याने न्यून होणे
४.१०.२०१५ या दिवशी सहा वाजता रामनाथी आश्रमात आल्यानंतर मला चैतन्य जाणवत होते. आश्रमात येण्याआधी मी नामजप किंवा साधना करत नव्हतो; परंतु येथे आल्यावर नियमित प्रार्थना आणि नामजप केल्याने माझी कटीशूल (कंबर दुखणे) न्यून झाल्याचे मला जाणवले. या आधी मी पुष्कळ वैद्यकीय उपचार केले; परंतु आधुनिक वैद्यांनी माझा पाठीचा मणका जन्मतः अशक्त असल्याने त्यावर उपचार नसल्याचे सांगितले होते.

निर्मळ मनाची, पदोपदी साहाय्य करणारी आणि प.पू. डॉक्टरांना अपेक्षित अशी सेवा व्हावी, यासाठी सतत धडपडणारी माझी कृष्णसखी अरुणा !

१. अरुणाच्या भेटीची पूर्वपिठीका
१ अ. प.पू. डॉक्टरांना धारिका दाखवणार्‍या भाग्यवान अरुणाला साष्टांग नमस्कार करून तिचे चरणतीर्थ घ्यावेसे वाटणे : पूर्वी मी देवद आश्रमात रहात होते. प.पू. डॉक्टर ग्रंथलिखाणाची सेवा करतात, यासंदर्भात मला काहीच कल्पना नव्हती. मी रामनाथी आश्रमात येण्यापूर्वी साधारण १ - २ मास आधी सहज बोलतांना एका साधिकेने कु. अरुणा कौलकर नावाची साधिका प.पू. डॉक्टरांना धारिका दाखवण्याची सेवा कशी करते, हे सर्व सांगत होती. ते ऐकून मला प.पू. डॉक्टर स्वतः सेवा करतात, याचे अतिशय आश्‍चर्य वाटले आणि मनात विचार आले, प.पू. डॉक्टर स्वतः सेवा करतात !
प.पू. डॉक्टरांना धारिका दाखवायला अरुणाला मिळतात, किती भाग्यवान आहे ती ! मला कधी भेटली, तर तिला मी साष्टांग नमस्कारच करीन ! तिचे चरणतीर्थच घ्यायला हवे, असे वाटले.

नाशिक सिंहस्थपर्वाच्या सेवेसाठी गेलेल्या सौ. वैशाली मुद्गल यांना झालेले त्रास, आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे

१. सेवा करतांना झालेले त्रास
१ अ. आध्यात्मिक त्रास
१. सेवा करायला नकोसे वाटणे, मनामध्ये इतरांविषयी विकल्प येणे, ताण येणे, उदास वाटणे
२. नामजप आणि प्रार्थना मधे मधे बंद पडणे
३. सेवा करतांना मधेच दुर्गंध येणे, डोके दुखणे, इतरांविषयी राग येणे
१ आ. शारीरिक त्रास
१. अचानक पाठीत कळा येणे, काही वेळा बोलता न येणे, तर कधी मधेच मोठमोठ्याने बोलणे
२. सर्दी खोकला होणे, घसा बसणे
३. सिंहस्थपर्वातील साधूंचे शाही स्नान झाल्यानंतर ३ दिवस काही कारण नसतांना मी रुग्णाईत झाले आणि माझी सेवा थांबली.
        या सर्व त्रासांमुळे सेवा सोडून रामनाथी आश्रमात परत जाऊया, असे विचार माझ्या मनात सारखे येत होते. जसजसे सेवेचे प्रमाण वाढत होते, तसतसे त्रासांचेही प्रमाण वाढत होते.

साधकांना अनमोल संतसेवेची सुवर्णसंधी !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प.पू. दास महाराजांनी 
आरंभलेले मौनव्रत निर्विघ्नपणे पार पडावे, याकरिता 
पानवळ आश्रमातील विविध सेवांसाठी साधकांची आवश्यकता !
       पानवळ, बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वर्षभर मौनव्रत करत आहेत. हे व्रत निर्विघ्नपणे आणि परिपूर्णपणे पार पडावे, यासाठी पानवळ आश्रमातील सेवा करण्यासाठी साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी साधक-दांपत्यही चालू शकेल. आश्रमात पुढील सेवा उपलब्ध आहेत.
१. पूजा : पूजेची सिद्धता करून पूजा करणे
२. स्वच्छता : आश्रम, मंदिर, तसेच परिसर यांची स्वच्छता करणे
३. बागेची देखभाल करणे : आश्रम परिसरातील झाडांना पाणी घालणे आणि त्यांची निगा राखणे, तण वाढल्यास ते काढण्याचे नियोजन करणे, पाण्याची टाकी भरण्यासाठी पंप चालू करणे, आश्रमात पाळण्यात येणार्‍या गायीची देखभाल करणे

साधकांना सूचना

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !
      सनातन-निर्मित ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे.
      समाजापर्यंत शीघ्रतेेने पोहोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. या सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे एका लहान धर्मरथासाठी लाईट मोटर व्हेहिकल (LMV), दुसर्‍या लहान धर्मरथासाठी लाईट ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल आणि तीन मोठ्या धर्मरथांसाठी हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल (HMV) असे परवाने असणे आवश्यक आहे.
     जे साधक वरील सेवांमध्ये काही कालावधीसाठी किंवा पूर्णवेळ सहभागी होऊ शकतात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून श्री. माधव गाडगीळ यांच्याशी ०८४५१००६००८ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

साधकांना सूचना

       पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
प्रारंभ - चैत्र शुक्ल पक्ष चतुर्दशी (२१.४.२०१६) स. ८.२१ वाजता
समाप्ती - चैत्र पौर्णिमा (२२.४.२०१६) स. १०.५४ वाजता
दोन दिवसांनी पौर्णिमा आहे.
      राष्ट्रधर्म सर्वश्रेष्ठ राष्ट्रापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. जर भारताची एकता, अखंडता, धर्म आणि संस्कृती धोक्यात असेल, तर आपल्या सर्वस्वाचे बलीदान करून देश वाचवणे, हे प्रत्येक भारतियाचे आद्य कर्तव्य आहे. हाच सनातन धर्म आहे. 
- समर्थ रामदासस्वामी (छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु) (अभय भारत, १५ मे ते १४ जून २०१०)

विविध सेवांसाठी वाराणसी सेवाकेंद्रात साधकांची तातडीने आवश्यकता !

    वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात वाहन, संगणक देखभाल आणि दुरुस्ती, प्रसार, लेखा आदी दैनंदिन सेवा, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा यांसाठी साधकांची आवश्यकता आहे.
    जे साधक पूर्णवेळ किंवा काही कालावधीसाठी सेवाकेंद्रात राहून या सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून रामनाथी आश्रमात कु. प्रियांका जोशी यांच्याशी ०८४५१००६०६३ या क्रमांकावर अथवा dharmatej2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्य:स्थिती जाणून 
घेण्यासाठी इंग्रजी, हिंदी आणि मराठी संकेतस्थळाला भेट द्या !
www.hindujagruti.org

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Deshdrohiyoki maang par Handwara (Kashmir) prashasanne senake samarik drushtise avashyak 3 bunker hataye. - Deshdrohiyonke is shadyantra ka virodh karo !
जागो ! : देशद्रोहियों की मांग पर हंदवाडा (कश्मीर) प्रशासन ने सेना के सामरिक दृष्टी से आवश्यक ३ बंकर हटाएं. - देशद्रोहियों के इस षडयंत्र का विरोध करो !

विविध सेवांसाठी वाराणसी सेवाकेंद्रात साधकांची तातडीने आवश्यकता !

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात वाहन, संगणक देखभाल आणि दुरुस्ती, प्रसार, लेखा आदी दैनंदिन सेवा, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा यांसाठी साधकांची आवश्यकता आहे.
जे साधक पूर्णवेळ किंवा काही कालावधीसाठी सेवाकेंद्रात राहून या सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून रामनाथी आश्रमात कु. प्रियांका जोशी यांच्याशी ०८४५१००६०६३ या क्रमांकावर अथवा dharmatej2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.

साधकांना गुरुसेवा करण्याची सुसंधी !

विविध सेवांसाठी देवद आश्रमात साधकांची तातडीने आवश्यकता !
देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वाहन, स्वयंपाक, उत्पादन-बांधणी आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे. जड साहित्य उचलू शकणार्‍या साधकांसाठी मागणी-पुरवठा संबंधी विविध सेवा उपलब्ध आहेत. जे साधक पूर्णवेळ, काही कालावधीसाठी किंवा शनिवार आणि रविवार अन् अन्य सुटीच्या दिवशी आश्रमात येऊन सेवा करू शकतात, त्यांनी खालील सारणीनुसार माहिती भरून ती जिल्हासेवकांच्या माध्यमातून devadashram@gmail.com संगणकीय पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी. शाळा आणि महाविद्यालये यांना लवकरच सुटी लागणार असल्याने युवा साधकही या सेवेत सहभागी होऊ शकतात. 
 

फलक प्रसिद्धीकरता

आता काश्मीरमधील सैन्यही मागे घेण्याची
 देशद्रोह्यांची मागणी मान्य करणार का ?
        हंदवाडा (काश्मीर) येथे असलेले सैन्याचे ३ बंकर १९ एप्रिल या दिवशी स्थानिक प्रशासनाकडून हटवण्यात आले. बंकरचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सैन्याचे म्हणणे होते; परंतु येथील देशद्रोही नागरिकांनी हे बंकर हटवण्याची मागणी केली होती.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
      विज्ञान केवळ स्थूल पंचज्ञानेंद्रियांच्या संदर्भात संशोधन करते, तर अध्यात्म स्थूल आणि सूक्ष्मच नव्हे, तर सूक्ष्मतर, सूक्ष्मतमाचाही विचार करते !
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
कर्माचे महत्त्व 
कर्माविना तुम्हाला गती 
नाही; कारण कर्मालाच गती आहे.
भावार्थ : दैनंदिन जीवनव्यापार असो, सुखप्राप्तीच्या साधनांचा शोध असो, दुःख टाळण्याचे उपाय असोत... सारी जगरहाटी, सारे विश्‍वचक्र कर्मामुळेच चालते. आध्यात्मिकदृष्ट्याही मनुष्याचा जन्म ही त्याच्यासाठी कर्मभूमीच आहे; कारण मनुष्य कर्म (साधना) करूनच ईश्‍वरप्राप्ती करून घेऊ शकतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

कुठलेही कर्म मनःपूर्वक करणे हितकारक !
कर्म करतांना ते छोटे आहे का मोठे, हे पहाणे महत्त्वाचे नसून प्राप्त कर्म मनःपूर्वक करणे हितकारक आहे.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

पंजाबमधील धान्य घोटाळा !

अगोदरच १ लक्ष ८० सहस्र कोटी रुपयांची वसुली कशी करायची ? या विवंचनेत अडकलेल्या अधिकोषांसमोर (बँकांसमोर) नवे संकट उभे राहिले आहे. पंजाबमधील विविध गोदामांमधील १२ सहस्र कोटी रुपयांचे धान्य गायब असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याची खोलात जाऊन माहिती घेतली, तेव्हा अधिकोषांनी ज्या पैशांतून धान्य खरेदी केले होते, ते धान्य फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामांमध्ये नसल्याचे उघड झाले आहे. एकूण परिस्थितीचा आढावा घेतल्यावर ही रक्कम २० सहस्र कोटी रुपयांपर्यंतही जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रिझर्व्ह बँकेने याचे दायित्व हे आता संबंधित अधिकोषांवर टाकले असून त्यांनी परतावा न मिळणार्‍या गोष्टींमध्ये ही रक्कम टाकण्यास सांगितली आहे.

समान नागरी कायद्याची आवश्यकता !

मुसलमान समाजासाठी लागू असलेल्या मुस्लिम वैयक्तिक कायद्यामधील घटस्फोटाची पद्धत (तलाक) आणि बहुपत्नीत्व या प्रथा भारतीय राज्यघटनेतील कलम १४, १५, २१ आणि २५ चे उल्लंघन करणार्‍या असल्याने अवैध ठरवण्यात याव्यात, अशी याचिका शायरा बानो या मुसलमान महिलेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्रशासनाचे मत मागवले आहे. ही प्रथा रहित करण्यास मुस्लिम लॉ बोर्डाने मात्र प्रखर विरोध केला आहे. केंद्रशासन वा अन्य कोणाचीही मुस्लिम कायद्यामधील ढवळाढवळ खपवून घेणार नाही, अशी चेतावणी बोर्डाने दिली आहे. या याचिकेच्या निमित्ताने परत एकदा समान नागरी कायद्याची अत्यावश्यकता पुढे आली आहे. वास्तविक देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात सर्वांसाठी एकच कायदा असणे अपेक्षित होते; मात्र तत्कालीन काँग्रेस शासन हे मुस्लिम मतांसाठी अंध असल्याने त्यांनी तसे केले नाही !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn