Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !

क्रांतीवीर अनंत कान्हेरे यांचा आज बलीदानदिन
लोकहो, सर्व राजकीय पक्ष क्रांतीकारकांना सोयीस्कररित्या
विसरले असले, तरी तुम्ही असा कृतघ्नपणा करू नका !
बुलढाणा जिल्ह्यातील जामोद येथे धर्मांधांनी सुरुंग लावून मंदिर पाडले !

  • मूर्तींची तोडफोड 
  • श्रीरामनवमीचा भंडारा उधळला
  • हिंदूंची घरे लुटली
  • संचारबंदी लागू 
  • शिवसैनिकांचे साहाय्य 
  • ८७ धर्मांधांवर कारवाई
महिलांच्या मंदिर प्रवेशाला वारेमाप प्रसिद्धी देणारी प्रसारमाध्यमे, 
तसेच दादरी प्रकरणावरून ऊर बडवणारे ढोंगी निधर्मीवादी 
मंदिरांवरील आक्रमणाविषयी मात्र मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !
     बुलढाणा - जिल्ह्यातील जळगाव-जामोद येथे १६ एप्रिलच्या रात्री धर्मांधांनी प्राचीन बेंबळेश्‍वराचे मंदिर सुरूंग लावून पाडले आणि श्रीरामनवमीचा भंडारा उधळला. गावातील अनेक मंदिरांतील मूर्तींची विटंबना केली. हिंदूंची घरे लुटण्यात आली, दुकाने पेटवण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी ८७ धर्मांधांना कह्यात घेतले असून गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, असे वृत्त दैनिक सामनाने प्रसिद्ध केले आहे.
१. जामोद येथे श्रीरामनवमीनिमित्ताने प्रतिवर्षी भंडारा आयोजित करण्यात येतो. या महाप्रसादासाठी संपूर्ण गावातून भाकर्‍या गोळा करण्यात येतात.
२. १६ एप्रिलच्या रात्री ८ वाजता ट्रॅक्टरमध्ये भाकर्‍या गोळा करण्यात येत असतांना सिमीचा माजी जिल्हाध्यक्ष आसीफ इक्बाल, अलीम बब्बू, अजीज बब्बू निमकाडीवाले, उर्दू शाळेचा शिक्षक शरीफ मास्टर यांनी ट्रॅक्टर अडवून भाकर्‍या गोळा करणारे हरिदास ढगे, राम वानखेडे, बजरंग दलाचे नंदू दलाल यांच्याशी वाद घातला. त्यानंतर या धर्मांधांनी त्यांना अमानुष मारहाण केली.

झारखंडमध्ये श्रीरामनवमीच्या शोभायात्रांवर धर्मांधांचे आक्रमण, तिघांची हत्या !

  • पोलिसांवर दगडफेक 
  • घरे, दुकाने आणि वाहने पेटवली 
  • संचारबंदी लागू
* गुजरात दंगलीवरून हिंदूंना तालिबानी ठरवणारे ढोंगी निधर्मीवादी आता तोंड उघडतील का ?
* सत्ताधारी भाजपच्या राज्यातील हिंदूंची दयनीय स्थिती !
      हजारीबाग (झारखंड) - येथे विविध ठिकाणी श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रांच्या वेळी धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात २ हिंदूंसह तिघांची हत्या करण्यात आली, तर काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहेत.
१. श्रीरामनवमीच्या दिवशी म्हणजेच १५ एप्रिल या दिवशी हजारीबागजवळील केरेदारी या गावात काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर धर्मांधांनी आक्रमण करत दगडफेक केली. या आक्रमणात एका हिंदूची हत्या करण्यात आली. काही घरे, वाहने आणि दुकानांमध्ये जाळपोळ करण्यात आली.
२. दुसर्‍या घटनेत हजारीबाग येथे १६ एप्रिल या दिवशी काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या वेळी दोन गटांमध्ये दंगल झाली. या वेळीही धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. प्रिंस सिंह आणि अनुज कुमार सिन्हा या हिंदूंची हत्याही करण्यात आली.
३. तिसर्‍या घटनेत हजारीबाग येथेच १७ एप्रिल या दिवशी सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ग्वाला टोली मुख्य रस्त्यावर श्रीरामनवमीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती.

आसाममध्ये ४ जिहादी आतंकवाद्यांना अटक

      गोहत्ती - आसाम राज्यातील चीरंग येथे अतिरेक्यांचा प्रशिक्षण तळ स्थापन करण्यात उत्तरदायी असलेल्या ४ जिहादी आतंकवाद्यांना आसाम पोलिसांनी १६ एप्रिलला रात्री अटक केली. त्यांची नावे अबू बाकर सिद्दिकी, जहानुर आलम शेख, समल अली मंडल आणि अझीझुल हक अशी आहेत. (आतंकवाद्यांना धर्म नसतो, म्हणणार्‍यांना चपराक ! - संपादक) हे सर्व आतंकवादी जमात-उल- मुजाहिदिन (बांगलादेश) या संघटनेचे सदस्य आहेत.

निवडणुकांत अजूनही गुन्हेगार महत्त्वाची भूमिका का बजावतात ? - सर्वोच्च न्यायालयाचे न्या. कुरेशी

लोकशाहीची निरर्थकता दर्शवणारा न्यायाधिशांचा प्रश्‍न !
      नवी देहली - निवडणुकांमध्ये अजूनही गुन्हेगारी घटक महत्त्वाची भूमिका का बजावतात ? कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाने राजकारण गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले असतानांदेखील ही परिस्थिती का ?, असे प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस्.वाय्. कुरेशी यांनी विचारले आहेत. भोपाळ न्यायालयीन अकादमीमध्ये देशातील विविध क्षेत्रांतील प्रगती या विषयावर आयोजित कार्यक्रमात कुरेश बोलत होते. न्या. कुरेशी यांनी निवडणूक आयोगाचे माजी अध्यक्ष टी.एस्. ठाकूर यांच्याकडे याविषयी विचारणा केली.
१. मतदान प्रक्रियेत येण्यापासून गुन्हेगारी घटकांना रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणती पावले उचलली ? याची माहिती कुरेशी यांनी ठाकूर यांच्याकडे मागितली. त्यावर निवडणुकीतील आचारसंहितेचा भंग होऊ नये, तसेच सत्तेत असणार्‍या पक्षाला कोणताही चुकीचा लाभ मिळू नये, यासाठी निवडणूक आयोगाने पूर्ण प्रयत्न केले आहेत, अशी माहिती ठाकूर यांनी दिली आहे.
२. निवडणुकीच्या वेळी प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती देणार्‍या उमेदवारांवर कारवाई करण्यासाठी पाऊल का उचलले गेले नाही ? याविषयीही न्या. कुरेशी यांनी विचारणा केली. प्रत्येक उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र तपासून पाहण्याइतके मनुष्यबळ निवडणूक आयोगाकडे नाही.

नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट !

बेळगाव येथील श्रीरामनवमीची शोभायात्रा
     बेळगाव - येथे श्रीरामनवमीनिमित्त १५ एप्रिल या दिवशी आयोजित शोभायात्रेत हिंदुत्ववाद्यांकडून न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करण्यात येणे आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने हिंदुत्ववाद्यांना दिलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांखाली पोलिसांनी हिंदुत्ववादी आयोजकांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांनी दिली आहे. दैनिक तरुण भारतने दिलेल्या माहितीनुसार, श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. रमाकांत कोंडुस्कर आणि अन्य प्रमुख कार्यकर्त्यांवर गुन्हा प्रविष्ट केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
१. श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने रामनवमीनिमित्त प्रथमच भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
२. परंतु या शोभायात्रेला पोलिसांकडून अनुमती नाकारण्यात आली होती. (हिंदूंच्या उत्सवांना अनुमती नाकारण्यात येते, म्हणजे हा देश भारत आहे कि पाक ? - संपादक) ३. त्यामुळे आयोजकांना धारवाड उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. शेवटी न्यायालयाकडून शोभायात्रेची अनुमती मिळाल्याने यात्रेचा मार्ग मोकळा झाला.
४. न्यायालयाकडून सायंकाळी ५ वाजेपर्यंत यात्रेला अनुमती देण्यात आली होती; परंतु शोभायात्रा उशिरापर्यंत चालू राहिली. असे असले, तरी शोभायात्रा अत्यंत शिस्तबद्धरित्या पार पडली. (शिस्तबद्ध शोभायात्रेवर कायद्याचा बडगा का ? - संपादक) ५. शोभायात्रेला वेळेचे बंधन असल्याकारणाने पोलिसाकंडून शोभायात्रेत वेळोवेळी हस्तक्षेप चालू होता. त्यामुळे पोलीस आणि हिंदुत्ववादी यांच्यात वादावादीचे प्रसंग घडले.

पाकमध्ये दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमात तेथील अल्पसंख्य हिंदूंना कुत्रा संबोधले !

हिंदूंवरील या शेरेबाजीवर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दाद दिली
हा आहे पाकचा हिंदुद्वेष ! पाकमधील हिंदूंची परवड केंद्रशासन कधी रोखणार ?
      इस्लामाबाद - येथील दूरचित्रवाहिनीवरील एका कार्यक्रमात विनोद करतांना हिंदुद्वेषी निवेदकाने पाकिस्तानातील अल्पसंख्य हिंदूंविषयी आक्रमक आणि अपमानास्पद शेरेबाजी करत त्यांना कुत्रा असे संबोधले. या शेरेबाजीवर उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. (यावरून पाकमध्ये हिंदूंना कसे वागवले जात असेल, याची कल्पना येते ! - संपादक) याविषयीचे वृत्त येथील द नेशन या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असून या वृत्तपत्रानेही संबंधित दूरचित्रवाहिनीवर टीकेची झोड उठवली आहे.
     या वृत्तात पुढे म्हटले आहे की, जेव्हा या कार्यक्रमातील निवेदक हिंदूंविषयी कुत्रा यांसारख्या चुकीच्या शब्दांचा वापर करत होते, तेव्हा कार्यक्रमातील दर्शक मोठमोठ्याने हसत होते. दुर्दैवाने पाकिस्तानात पाठ्यपुस्तकांपासून टॉक शो पर्यंत हिंदूंना अपवित्र आणि हीन समजले जाते. मुसलमान येण्याच्या सहस्रावधी वर्षांपूर्वीपासून पाकमध्ये हिंदू रहात होते. तरीही मुसलमान हिंदूंशी कसा व्यवहार करत आहेत ? याचे त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची खरी आवश्यकता आहे. अशा धर्माच्या अनुयायांना सार्वजनिकपणे अपमानित करणे अतिशय अयोग्य आहे.

या वर्षी पुन्हा मोठे भूकंप होण्याची शक्यता ! - ज्योतिषांचा दावा

डिसेंबर २०१७ मध्ये ९ रिश्टर स्केलहून अधिक तीव्रतेच्या भूकंपाची शक्यता
      रुडकी (हरिद्वार) - जेव्हा सर्व ग्रह एका बाजूने आणि चंद्र दुसर्‍या बाजूने होतो, अशा स्थितीत भूकंप होतो. या वर्षी अशा प्रकारचा योग २९ मे आणि १७ सप्टेंबर या दिवशी, तसेच डिसेंबर २०१७ मध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे या तिन्ही दिवशी मोठे भूकंप होण्याची शक्यता आहे, अशी भविष्यवाणी येथील अखिल भारतीय ज्योतिष, धर्म आणि अध्यात्म महासंमेलनामध्ये सहभागी झालेल्या काही ज्योतिषांनी केली आहे.
१. देहलीतील फ्यूचर पॉईंट अखिल भारतीय ज्योतिष संस्थेचे अध्यक्ष अरुण बन्सल यांनी सांगितल्यानुसार २९ मे २०१६ या दिवशी होणार्‍या भूकंपाचे केंद्र भूमध्य रेषेजवळ असल्याने भूकंपाचा सर्वाधिक परिणाम इंडोनेशिया आणि श्रीलंका या देशांवर होईल.
२. १७ सप्टेंबर २०१६ या दिवशी भूकंप होण्याची शक्यता असून त्याचे केंद्र उत्तर भारतात असेल.
३. ३ डिसेंबर २०१७ या दिवशी होणारा भूकंप रिश्टर स्केलनुसार ९ हून अधिक तीव्रतेचा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भूकंपात मोठ्या प्रमाणात विध्वंस होण्याची शक्यता आहे.

(म्हणे) रा.स्व. संघ जातीयद्वेष पसरवून देशाची फाळणी करत आहे!

भारताची फाळणी करणार्‍या काँग्रेसच्या उलट्या बोंबा
      लक्ष्मणपुरी (लखनौ) - महंमद अली जिना यांच्या मुस्लिम लीगमुळे वर्ष १९४७ मध्ये भारताची फाळणी झाली आणि आता रा.स्व. संघ जातीय द्वेषाच्या आधारे देशाची फाळणी करू पहात आहे, अशी टीका काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मोहसीना किडवाई यांनी भीम ज्योती यात्रा कार्यक्रमाच्या वेळी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जातीय द्वेष पसरवत असून फुटीरतावादाचे राजकारण करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

अध्यात्मातील प्रत्येक का अन् कसे यांची शास्त्रशुद्ध उत्तरे

www.sanatan.org

हिंदु समाजाचा इतिहास पानोपानी ओरडून सांगतो की, अगोदर राजसत्ता हिंदूंच्या हातातून जाते, मग धर्म जातो आणि नंतर प्रदेश जातो. (साप्ताहिक राष्ट्रपर्व)

हिंदु आरोपीसमवेत झालेल्या भेदभावाच्या विरोधात लढणार्‍या हिंदु अधिवक्त्यावरच कारवाई करण्याची न्यायाधिशाकडून चेतावणी

बांगलादेशात एका हिंदु अधिवक्त्याची अशी स्थिती, तर तेथील 
सर्वसाधारण हिंदूंच्या व्यथेचा विचारच न केलेला बरा !
इस्लामी बांगलादेशातील न्यायालयाकडून हिंदु आरोपीला सापत्नपणाची वागणूक
     ढाका - बांगलादेश उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपिठाचे न्यायमूर्ती महंमद रुहुल कुद्दस यांनी हिंदूंच्या न्यायहक्कांसाठी लढणार्‍या बांगलादेशी मायनॉरेटी वॉचचे अधिवक्ता रवींद्र घोष यांना न्यायालयात चेतावणी देण्याचा प्रकार ११ एप्रिल या दिवशी घडला. अधिवक्ता घोष यांनी एका आर्थिक प्रकरणात असलेल्या हिंदु आरोपी नारायण चंद्र पॉल यांच्या वतीने खंडपिठासमोर अर्ज दाखल केला होता.

हिजाब घातलेल्या मुसलमान महिलेला अमेरिकेच्या विमानातून उतरवले !

     अमेरिका - सहप्रवाशाबरोबर आरामशीर वाटत नसल्याने आसन (सीट) फिरवण्याची मागणी केल्यानंतर हिजाब (डोके झाकण्याचा स्कार्फ) घातलेल्या एका मुसलमान महिलेला अमेरिकेच्या विमानातून उतरवण्यात आल्याची घटना अमेरिकेतील साऊथवेस्ट एअरलाईन्सकडून नुकतीच घडली. हकिमा अब्दुल्ले असे या महिलेचे नाव असून त्या मेरीलॅन्डच्या रहिवाशी आहेत. शिकागो ते सिऍटल असा प्रवास करणार्‍या विमानातून अब्दुल्ले यांना मध्येच खाली उतरवण्यात आले.
१. आपण केवळ आसन फिरवण्याची मागणी केली होती; मात्र कुठलेच समर्पक कारण न देता मला विमानातून खाली उतरवण्यात आले, असे अब्दुल्ले यांनी सांगितले.

(म्हणे) भारताकडून पाकला अस्थिर करण्याचा प्रयत्न ! - जनरल राहील शरीफ

चोराच्या उलट्या बोंबा !
     कराची - पाकिस्तानी सैन्यप्रमुख जनरल राहील शरीफ यांनी पाकिस्तानला अस्थिर करण्याचा आणि चीनसोबतच्या अब्जावधी रुपयांच्या आर्थिक योजनांना हानी पोचवल्याचा आरोप भारतावर केला आहे. येथील ग्वादर शहरामध्ये चीन-पाकिस्तान आर्थिक संबंधांवर आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.        राहील शरीफ पुढे म्हणाले की, शत्रूराष्ट्रांच्या गुप्तचर यंत्रणा या योजनांच्या विरुद्ध आहेत. विशेषत: भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ, जी पाकिस्तानला अस्थिर करण्यात स्पष्टपणे सहभागी आहे; परंतु आम्ही पाकिस्तानच्या कुठल्याही भागात अशांतता आणि गोंधळ निर्माण होऊ देणार नाही.हिंदूंची दु:स्थिती पालटण्यासाठी धर्मशिक्षण घेणे आवश्यक ! - उपस्थित मान्यवरांचे मत

नवी देहली येथे तमिळ नववर्षाचे स्वागत
डावीकडून इंग्रजी पाक्षिक सनातन प्रभातविषयी
डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांना माहिती देतांना
सनातनच्या साधिका सौ. क्षिप्रा जुवेकर आणि
स्वामी यांच्या डाव्या बाजूला निवृत्त
जनरल जी.डी. बक्शी
    नवी देहली - येथील कॉन्स्टीट्यूशनल क्लबमध्ये तमिळ कल्चरल फोरम्च्या वतीने तमिळ नववर्षाच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, हिन्दु मुनानीचे संस्थापक ८९ वर्षीय राजागोपालन्, निवृत्त रॉअधिकारी श्री. आर्. एस्. एन्. सिंह, निवृत्त जनरल जी.डी. बक्शी आणि श्रीमती राधा रमन् यांची प्रमुख उपस्थिती होती. 
     या वेळी उपस्थित मान्यवरांनी हिंदूंची दु:स्थिती पालटण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे, तसेच त्यांनी स्वधर्माचा गौरवशाली इतिहास आठवण्याचाही प्रयत्न केला पाहिजे, असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमामध्ये तमिळनाडूमध्ये हिंदूंवर कशाप्रकारे धर्मांध, ख्रिस्ती मिशनरी आणि राज्यशासन यांच्याकडून अत्याचार होत आहेत. याविषयी माहिती देणारी हिंदु मुनानी निर्मित एका ध्वनीचित्रतबकडीचे (सीडीचे) लोकार्पण करण्यात आले, तसेच उपस्थितांनाही ती दाखवण्यात आली.

वादविवाद स्पर्धेत सनातनचा साधक श्री. संकेत चंदूरकर याचा प्रथम क्रमांक

श्री. संकेत चंदूरकर
     पुणे - सनातनचा साधक श्री. संकेत चंदूरकर याने महाविद्यालयात झालेल्या वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. श्री. संकेत आकुर्डी येथील डी.वाय. पाटील महाविद्यालयात फार्मसी शाखेच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. स्पर्धेत युवकांची बदलती मानसिकता या विषयावर बोलतांना श्री. संकेतने सांगितले की, देव, धर्म, एकत्र कुटुंबपद्धत यांवर सध्याच्या तरुणाईचा विश्‍वास उडत चालला आहे; पण याच गोष्टी शाश्‍वत असून कल्याणकारीही आहेत. पारितोषिक समारंभाच्या वेळी सन्मानचिन्ह देऊन श्री. संकेत याचा सत्कार करण्यात आला. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेमुळेच हे यश मिळाल्याची भावना त्याने व्यक्त केली.
अमरावती येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात गोवंश हत्याबंदी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची मागणी

आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी
     अमरावती - महाराष्ट्र शासनाने सत्तेवर आल्यानंतर गोवंश हत्याबंदी कायदा केला; परंतु त्याची कठोरतेने अंमलबजावणी होतांना दिसत नाही. मुंबई, नाशिक, मालेगाव, नांदेड या मोठमोठ्या शहरांसमवेत अमरावती जिल्ह्यामध्येसुद्धा गोमांस तस्करी चालूच आहे. त्यामुळे शासनाने या कायद्याची कठोरतेने अंमलबजावणी करावी, तसेच कर्नाटक शासनाने कोट्यवधी रुपयांच्या अर्थसंकल्पात केवळ मुसलमानांच्या विकासासाठीच तरतुद केलेली असून हिंदूंच्या विकासासाठी एकही रुपयाची तरतुद नाही. याचा निषेध करण्यासाठी १७ एप्रिल या दिवशी अमरावती येथील राजकमल चौक येथे सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले. 

हृदयात देव नसणार्यां ना चौथर्या वर देव कसा भेटणार ? - पं. अतुलशास्त्री भगरेगुरुजी

चौथर्यादवर चढण्याचे आंदोलन करणार्यान प्रसिद्धीलोलुप महिलांना सणसणीत चपराक ! 
     पुणे, १८ एप्रिल (वार्ता.) - स्त्री ही शक्तीस्वरूप आहे. स्त्रियांनी शक्तीप्रमाणे राहिले पाहिजे. आज शनिदेवाच्या चौथर्यारवर चढण्यासाठी, तसेच मंदिराच्या गाभार्यालत जाण्यासाठी महिलांकडून आंदोलने केली जात आहेत. परंपरांना कात्री लावण्याचा हा भाग आहे. परंपरांचे पालन केले जावे. त्यातूनच समाधानाची प्राप्ती होते. हृदयातच देव नसणार्यांीना चौथर्या वर चढून कसा देव भेटेल, असा परखड प्रश्ने उपस्थित करत वेदशास्त्रसंपन्न अतुल शास्त्री भगरेगुरुजी यांनी चौथर्याावर चढण्यासाठी, तसेच गाभार्या्त शिरण्यासाठी आंदोलन करणार्याा महिलांवर टीका केली. आज रूढी, परंपरा, देवस्थाने, धर्म, राष्ट्र यांवर होणारी आक्रमणे वाढली आहेत. त्यामुळे विखुरलेले न रहाता संघटित रहाणे आवश्यक आहे, असे सांगत त्यांनी हिंदूसंघटनाचे आवाहन केले. विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने श्रीरामनवमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पं. भगरेगुरुजी यांचे श्रीरामचरित्रावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी विश्व् हिंदु परिषदेचे श्री. दादा वेदक, किशोर चव्हाण, शरद जगताप, तनिष्का गटाच्या सौ. ज्योती गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते

कोलकातामध्ये तोकडे कपडे घातल्यावरून युवतीला मारहाण

एक महिला मुख्यमंत्री असलेल्या बंगालमध्ये त्यांच्याच पक्षाच्या 
कार्यकर्त्यांकडून मुलींना मारहाण करण्यात येते, हे लज्जास्पद ! 
मारहाण करणारे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचा युवतीचा दावा
     कोलकाता - तोकडे कपडे घातले, तसेच सिगारेट ओढली म्हणून येथील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, असा दावा येथील एका २२ वर्षीय युवतीने केला आहे. या घटनेनंतर तिने त्वरीत पोलिसांना कळवून तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस तपास करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. 
     सदर युवती आणि तिचा मित्र येथील एका विद्यापिठात शिकत असून ते नेताजीनगर भागात असलेल्या मुलीच्या घरी परत जात होते. त्याचवेळी मुलीच्या घराजवळ दोघांनीही सिगारेट ओढण्यास थांबले. त्याचवेळी तृणमल काँग्रेसच्या सभेवरून परत येणार्‍या एका ६ जणांच्या टोळक्याने तिला तोकडे कपडे घातल्यावरून आणि सिगारेट पित असल्याविषयी स्पष्टीकरण मागितले अन् तिला मारहाण केली.

सांगली महापालिकेतील भ्रष्टाचाराची कागदपत्रे खासदार किरीट सोमय्यांकडे ! - वि.द. बर्वे

      सांगली - सांगली महापालिकेच्या विविध लेखापरीक्षणांतून ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या आढळते. या संदर्भात न्यायालयात चालू असलेल्या विविध दाव्यांमध्ये न्यायालयाने आदेश देऊनही अजून त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे भाजपचे लढाऊ आणि विविध भ्रष्टाचारांची प्रकरणे बाहेर आणणारे खासदार किरीट सोमय्या यांच्याकडे सांगली महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या संदर्भातील कागदपत्रे देण्यात आली आहेत. या प्रकरणी सोमय्या यांनी लक्ष घालून पुढील कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती नागरी हक्क संघटनेचे वि.द. बर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
     वि.द. बर्वे पुढे म्हणाले, सांगली नगरपालिका ते महापालिका या कालावधीत अनेक गैरकारभार झाले. या संदर्भात न्यायालयीन पातळीवर निर्णय होऊनही शासकीय यंत्रणेकडून त्यावर कोणतीच कार्यवाही होत नाही. सांगली महापालिका आता माहितीच्या अधिकारात मागितलेली कागदपत्रेही देण्यास टाळाटाळ करत आहे. यातील अनेक कागदपत्रांसाठी आता मोठ्या प्रमाणात शुल्काची मागणी केली आहे. या गैरकारभारातील काही प्रकरणांत लोकप्रतिनिधींकडून वसुलीही येणे आहे. त्यावरही पुढील कोणतीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे शेवटी खासदार सोमय्या यांच्याकडे दाद मागितली आहे.
कत्तलीसाठी जाणार्‍या सहा गायींची पोलिसांकडून सुटका !

      जत (जिल्हा सांगली) - सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथून कर्नाटकातील सिद्धापूरकडे सहा गायी घेऊन जाणारे वाहन पोलिसांनी पकडले. या गायी कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. अब्दुल कादिरभाई लालसाब शेख, अमिन इमाम शेख आणि हसन मकबूल शेख या धर्मांधांना अटक केली. (गायींची कत्तलीसाठी वाहतूक करण्यासाठी अटक केल्यावर नेहमी अल्पसंख्यांकांचीच नावे प्रत्येक वेळी का येतात ? यावरून नेहमीच अल्पसंख्य म्हणून ओरड करणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात ! - संपादक)

गुन्हे प्रविष्ट झालेले श्रीपूजक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २ कार्यकर्ते यांच्या घरांची झडती

श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्या त प्रवेश करू 
पहाणार्या२ तृप्ती देसाई यांना मारहाण केल्याचे प्रकरण 
धर्मांधांची अशी झडती पोलिसांनी कधी घेतली आहे का ? 
     कोल्हापूर - श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्याातील प्रवेश प्रकरणावरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना मारहाण केल्याच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट झालेले ५ श्रीपूजक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २ कार्यकर्ते फरार आहेत. १७ एप्रिलला त्यांच्या घरांची झडती घेण्यात आली, अशी माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली. 

सांगली येथील ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला भेट

दैनिक सनातन प्रभातविषयी जाणून घेतांना डावीकडून
ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर, माहिती सांगतांना श्री. कापशीकर
     पनवेल - मणदूर, तालुका शिराळा (जिल्हा सांगली) येथील प्रखर हिंदुत्ववादी ह.भ.प. श्री अनिल महाराज देवळेकर यांनी १७ एप्रिल या दिवशी सकाळी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांना आश्रमातील विविध विभागांची माहिती सनातनचे साधक श्री. आेंकार कापशीकर यांनी करून दिली. ह.भ.प. अनिल महाराज हे ह.भ.प. वक्ते महाराज यांचे अनुयायी असून प्रखर हिंदुत्ववादी विचार कीर्तनातून मांडतात. तसेच ते पू. भिडेगुरुजींच्या मार्गदर्शनानुसार हिंदु तरुणांचे संघटन आणि दुर्गामाता दौडीचे आयोजन करतात. "आश्रम पाहून त्यांना दैवी भूमीत आल्यासारखे वाटले", अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

बेळगाव येथील २ साधक जन्म-मृत्यूच्या फेर्यांातून मुक्त !

सौ. वनिता बिच्चू (उजवीकडे)
यांचा सत्कार करतांना पू. शंकर गुंजेकर
आधुनिक वैद्य समीर कुट्रे (उजवीकडे)
यांचा सत्कार करतांना पू. शंकर गुंजेकर

     बेळगाव - १७ एप्रिल या दिवशी बेळगाव येथील आधुनिक वैद्य समीर कुट्रे (वय ४५ वर्षे) आणि सौ. वनिता बिच्चू (वय ६१ वर्षे) यांनी ६१ प्रतिशत स्तर प्राप्त केल्याचे आधुनिक वैद्या सौ. शिल्पा कोठावळे यांनी छत्रे वाडा, अनसूरकर गल्ली येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या शिबिरात घोषित केले. रामनगर येथील सनातनचे संत पू. शंकर लक्ष्मण गुंजेकर यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 

   

     आधुनिक वैद्य समीर कुट्रे या वेळी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत म्हणाले, "हे माझ्यासाठी आश्चणर्यच आहे. असे काही झाले आहे, याचे मला खरे वाटत नाही. देवानेच हे सर्व करून घेतले." सौ. बिच्चू यांनी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली आणि म्हणाल्या, प.पू. गुरुदेवांच्या भेटीत "प.पू. गुरुदेवांनी सांगितले होते की, प्रगतीचा विचार नको, कर्ज फिटत आहे. लवकरच संपेल. हे कर्ज त्यांनीच फेडून घेतले आणि आज जे काही झाले ही त्यांचीच कृपा आहे." उपस्थित साधक अत्यंत आनंदी होते आणि २ साधक जन्म-मृत्यूच्या फेर्यांसतून मुक्त झाल्याविषयी सर्वच जण कृतज्ञतेने भारावून गेले होते.  

चेन्नईतील मंदिरात तमिळ नववर्षानिमित्त हिंदु जनजागृती समितीचा विशेष सत्संग

     चेन्नई, १८ एप्रिल (वार्ता.) - तमिळ नववर्षानिमित्त येथील कोलाथुर क्षेत्रात असलेल्या सेल्वा विनायगर मंदिरात हिंदु जनजागृती समितीचा विशेष सत्संग झाला. 
  या वेळी समितीच्या तमिळनाडु राज्य समन्वयक सौ. उमा रवीचंद्रन यांनी नामजप, प्रार्थना, श्रीरामनवमी इत्यादींचे उपस्थित जिज्ञासूंना महत्त्व सांगितले. सनातन निर्मित ग्रंथाचे प्रदर्शनही या वेळी लावण्यात आले होते.हिंदु राष्ट्र पुनर्स्थापना मंचाच्या वतीने उज्जैन येथे संतसंमेलन

     उज्जैन - हिंदु राष्ट्र पुनर्स्थापना मंचाच्या वतीने नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी येथील दत्ता आखाडा झोन सेक्टर-२ मध्ये १८ मे या दिवशी सकाळी १० वाजता संत संमेलन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती मंचाचे विष्णुप्रसाद बराल यांनी पत्रकार परिषदेत दिली. भगवान पशुपतिनाथांचे नेपाळ हे एकमेव हिंदु राष्ट्र आहे; परंतु त्याचेही अस्तित्व नष्ट करण्यासाठी प्रयत्न होत आहेत, असे बराल या वेळी म्हणाले.

सिंहस्थपर्वाच्या काळात शहरात मांस आणि दारू यांच्या विक्रीवर बंदी घाला ! - युवक काँग्रेस

जनतेने सांगण्यापूर्वीच शासनाने सिंहस्थपर्वाच्या काळात मांस 
आणि दारू यांवर बंदी घालणे अपेक्षित आहे !
     उज्जैन - संपूर्ण सिंहस्थ पर्वाच्या काळात शहरात मांस आणि दारू यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी, यासाठी येथील प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल चौधरी आणि उज्जैन लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमंतसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक जिल्हाधिकारी कवींद्र कियावत यांना निवेदन देण्यात आले. देश-विदेशातील पर्यटकांच्या मौजमजेसाठी शासन सिंहस्थामध्येही दारूची विक्री चालू ठेवत आहे, असा आरोप युवक काँग्रेसने या वेळी केला.

उज्जैन येथे उज्जयनी विद्वत परिषदेची स्थापना

      उज्जैन - भारतीय सनातन धर्माच्या मर्यादा, प्रथा आणि परंपरा यांच्याविषयी समाजात भ्रम असतो. त्यामुळे याच्या निरसनासाठी उज्जयनी विद्वत परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. स्वामी रंगनाथाचार्य पीठाधीश्‍वर रामानुजकोट यांना संरक्षक म्हणून मनोनीत करण्यात आले आहे. या परिषदेची प्रथम बैठक डॉ. मोहन गुप्त यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये सनातन परंपरांविषयी शास्त्रीय आधारावर निर्णय घेऊन त्यांना समाजासमोर ठेवण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला.

हिंदूंनो, संख्याबळ हे आमचे शस्त्र, या भ्रमात राहू नका; कारण मेलेल्या १०० जणांपेक्षा १ जिवंत राज्य करतो, हे लक्षात ठेवा !


फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंवरील अत्याचारांविषयी प्रसारमाध्यमे मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !
     जळगाव-जामोद (बुलढाणा) येथे धर्मांधांनी प्राचीन बेंबळेश्‍वराचे मंदिर सुरूंग लावून पाडले आणि रामनवमीचा भंडारा उधळला. एवढेच नव्हे, तर गावातील अनेक मंदिरांतील मूर्तींची विटंबना केली, हिंदूंची घरे लुटली आणि त्यांची दुकानेही पेटवून दिली.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! :  Maharashtrake Jamodme Kattarpanthione 1 mandirme visphot kiya aur mandiroki todphod ki. Hinduonke ghar, dukan lute.
Ab Media aur Secularvadi chup kyu ?

जागो ! :  महाराष्ट्र के जामोद में कट्टरपंथिआें ने एक मंदिर में विस्फोट किया, मंदिरों की तोडफोड की. हिन्दुआें के घर, दुकान लूटें.
अब मीडिया और सेक्युलरवादी चुप क्यों ?

लोणावळा (जिल्हा पुणे) शहरात हिंदु नववर्षाच्या स्वागतानिमित्त हिंदू समितीची भव्य शोभायात्रा


     लोणावळा, १८ एप्रिल - शहरात गुढीपाडवा आणि हिंदु नववर्षाच्या स्वागतानिमित्त हिंदू समिती लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसर यांच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत ६ सहस्र दुचाकी वाहनांसह १२ सहस्रांहून अधिक हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते. ही शोभायात्रा पुरंदरे ग्राऊंड लोणावळा ते खंडाळा, तुंगार्ली, वलवण, वरसोली, वाकसई चाळ, कार्ला फाटा या मार्गावर ३ घंटे शिस्तबद्धपणे चालू होती. प्रत्येक गावाची वेस आणि काही चौकांमध्ये शोभायात्रेचे पुष्पवृष्टी करत स्वागतही करण्यात आले. कार्ला गावातील ऐतिहासिक तलावाजवळ शोभायात्रेची सांगता झाली. या वेळी महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उपस्थित हिंदूंना हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.

भारतीय स्त्रीचे घरातील अस्तित्वच महत्त्वाचे ! - अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर

     सांगली, १८ एप्रिल (वार्ता.) - काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हिंदु मुली गायब होत असतांना आम्हाला मात्र दूरचित्रवाहिनीवरील 'देवयानी'चे काय होणार, हे महत्त्वाचे वाटते. भारतीय संस्कार, भारतीय संस्कृती यांची मृत्यूघंटा वाजत आहे, अशी स्थिती आहे. भारतीय संस्कृतीत स्त्रीमुक्तीच्या डांगोर्या ची आवश्यकता नाही. त्यामुळे भारतीय स्त्रीचे दिसणे महत्त्वाचे नसून तिचे घरातील अस्तित्वच महत्त्वाचे आहे, असे मत सोलापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अधिवक्त्या (श्रीमती) अपर्णा रामतीर्थकर यांनी व्यक्त केले. त्या लोकमान्य टिळक स्मारक येथे 'सत्यवेध फाऊंडेशन'च्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. 

गोप्रेमींच्या सतर्कतेमुळे अवैध गोमांस वाहून नेणारे वाहन शासनाधीन

धर्मांध वाहनचालकाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट 
असे गोप्रेमी सर्वत्र हवेत ! 

     मुंबई - नुकतेच देवनार गाव येथे हिंदुत्ववादी आणि गोप्रेमी श्री. मनोज वाल्मिकी यांच्या सतर्कतेमुळे अवैध गोमांस वाहून नेणारे वाहन शासनाधीन करण्यात आले आणि धर्मांध वाहनचालकाच्या विरोधात तक्रारही प्रविष्ट करण्यात आली. या वेळी गोरक्षक प्रमुख श्री. ए.पी. नाडर आणि श्री. संतोष हरी नारायण मिश्रा, बजरंग दलाचे मुंबई जिल्हा मंत्री श्री. कृष्णा बांदेकर, चेंबूर विभाग सहमंत्री श्री. लाल बहादूर यादव, श्री. रणजीत यादव, पिपल फॉर अॅ्निमल्सचे श्री. संदीप शर्मा, धर्माभिमानी श्री. गजानन परदेसी, श्री. संदीप बोरीचा, श्री. महेंद्र पवार आणि श्री. सुनील कुमार उपस्थित होते. 

केशव प्रसाद मौर्य यांना श्रीकृष्णानंतर आता अर्जुनाच्या रूपात दाखवले !

भाजपने हिंदूंच्या धर्मभावना दुखावणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, 
अशी धर्मप्रेमी हिंदूंची अपेक्षा आहे !
भाजप नेत्याकडून उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा एकदा हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन करणारा फलक 
    प्रयाग - काही दिवसांपूर्वी वाराणसी येथे भाजपच्या नेत्याकडून लावण्यात आलेल्या फलकावर द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग रेखाटण्यात आला होता. यात राज्याचे निवनियुक्त प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांना श्रीकृष्णाच्या रूपात दाखवण्यात आले होते. आता प्रयाग येथे लावण्यात आलेल्या कृष्णार्जुनाचे चित्र असणार्‍या फलकावर मौर्य यांना अर्जुनाच्या रूपात दाखवण्यात आले आहे. हा फलक भाजपचे नेते डॉ. विक्रमसिंह पटेल यांनी लावला आहे. यात त्यांनी स्वतःला श्रीकृष्णाच्या रूपात दाखवले आहे.

रा.स्व. संघ मुक्त भारतासाठी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधकांनी एकत्र लढले पाहिजे !

बिहारची वाटचाल जंगलराजच्या दिशेन चालू असतांना त्याकडे लक्ष न 
देता पंतप्रधानपदाची स्वप्ने पहाणारे राज्यकर्ते !
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडून भविष्यातील राजकारणाचे संकेत 
     पाटलीपुत्र (पाटणा) - देशाला रा.स्व. संघापासून मुक्त करायचे असल्यास आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल, तर अन्य भाजपविरोधी पक्षांनी वेगवेगळे न लढता एकत्र लढले पाहिजे, असे आवाहन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले आहे. यातून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीचे संकेत मिळाले आहेत. 
    राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करतांना मुख्यमंत्री नितीशकुमार पुढे म्हणाले, जे लोक कालपर्यंत भगवा झेंडा फडकवत होते, ते आज तिरंग्याविषयी बोलत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात संघाचा काय सहभाग होता ? लोकांना विनाकारण राष्ट्र्रवाद आणि घोषणा यांच्या चर्चेत गुंतवून ठेवण्याचा संघाचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे सध्या लोकशाही धोक्यात आली आहे. (राष्ट्रवाद आणि राष्ट्रप्रेमी घोषणांमुळे नव्हे, तर मतांसाठी अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणार्‍या नितीशकुमार यांच्यासारख्या राजकारण्यांमुळे लोकशाहीच नाही, तर देशही धोक्यात आला आहे ! - संपादक) अलीकडे संघाच्या पदाधिकार्‍यांकडून भारतमाता की जय या घोषणेविषयी विविध विधाने करण्यात आली होती. त्यावर नितीशकुमार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

रॉच्या २ हस्तकांना अटक केल्याचा पाकचा दावा

कथित हेरगिरीच्या आरोपावरून पाकच्या अटकेत असलेल्या भारतीय 
नागरिकांची भारत शासनाने त्वरित सुटका करावी, ही अपेक्षा !
     कराची - रॉ (रिसर्च अ‍ॅन्ड अ‍ॅनालिसिस विंग) या भारतीय गुप्तचर संस्थेच्या २ हस्तकांना सिंध प्रांतामधून अटक केली असल्याचा दावा पाकच्या आतंकवादविरोधी पथकाचे अधिकारी नवीन ख्वाजा यांनी तेथील पत्रकारांशी बोलतांना केला. ख्वाजा पुढे म्हणाले, सद्दाम हुसैन आणि बाचाल हे दोघे जण मच्छिमारांच्या वेषात रॉसाठी काम करत होते. आतंकवादविरोधी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून या दोघांना अटक केली आहे. पाकने नुकतीच कुलभूषण जाधव भारतीय नागरीकास रॉचे हस्तक असल्याच्या कथित आरोपावरून अटक केली आहे.

वयाच्या १८ व्या वर्षी मातृभूमीसाठी प्राणांचे बलीदान देणारे अनंत कान्हेरे !

क्रांतीवीर अनंत कान्हेरे बलीदानदिनामित्त...
     कोकणातील एक युवक माध्यमिक शिक्षणासाठी संभाजीनगरला (औरंगाबादला) जातो काय, तेथे क्रांतीकार्यात भाग घेतो काय, त्याच्या हातात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनहून पाठवलेले पिस्तुल पडते काय अन् तो एका कपटी आणि उच्चपदस्थ इंग्रजाचा वध करतो काय, सारेच आतर्क्य आणि अशक्य ! हे अशक्य कृत्य शक्य करून दाखवणार्‍या युवकाचे नाव होते, अनंत लक्ष्मण कान्हेरे !
क्रूर जॅक्सनवर ४ गोळ्या झाडल्या !
     नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी जॅक्सन नावाचा क्रूर आणि ढोंगी अधिकारी होता. त्याने खरे अधिवक्ता, कीर्तनकार तांबेशास्त्री, बाबाराव सावरकर आदी देशभक्तांना कारावासात धाडले होते. अशा अनेक कुकर्मांनीच जॅक्सनने आपला मृत्यूलेख लिहिला. या कामी नियतीनेच अनंतरावांची निवड केली. २१ डिसेंबर १९०९ या दिवशी जॅक्सनच्या सन्मानार्थ नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात किर्लोस्कर नाटक मंडळींचा शारदा नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. जॅक्सन दरवाजातून नाट्यगृहात प्रवेश करत असतांनाच आधीच येऊन बसलेल्या अनंतरावांनी जॅक्सनवर गोळी झाडली. ती त्याच्या काखेतून निघून गेली. चपळाई करून अनंतरावांनी जॅक्सनवर समोरून चार गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच कोसळला. अनंतराव शांतपणे पोलिसांच्या स्वाधीन झाले.

समाजाची सद्यस्थिती पालटण्यासाठी विचारवंत, राजकारणी आणि पुरोगामी यांच्यापेक्षा सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य कौतुकास्पद !

कु. ईशान जोशी
१. व्यष्टी आणि समष्टी साधना 
     स्वतःला सुधारण्यासाठी व्यष्टी साधना आणि समाजाला सुधारण्यासाठी समष्टी साधना आवश्यक असते. समाज सुधारतो, तेव्हाच आपण सुरक्षित जीवन जगू शकतो. आध्यात्मिक भाषेत रज-तम अल्प होऊन समाजातील वातावरण सात्त्विक होते आणि व्यक्तीला साधनेसाठी पोषक वातावरण मिळते; म्हणून सनातन संस्था समाजाला साधना करण्यास सांगते. 
२. आतंकवादावर ठोस उपाययोजना करण्यापेक्षा पाकने आतापर्यंत किती 
वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले ?, याची आकडेवारी सांगणारे 
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर ! 
     सध्याची स्थिती पाहिली, तर पाककडून प्रतिदिन होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि त्यामध्ये नागरिकांचे किंवा सैनिकांचे जाणारे बळी, यांची संख्या वाढतच आहे, तरी आपले संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर नुसते पाकने आतापर्यंत किती वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले ?, याचीच आकडेवारी सांगतात. ही आकडेवारी काढण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा आतंकवादावर ठोस उपाययोजना काढली असती, तर आज ही आकडेवारी काढण्यात वेळ गेला नसता.
      भारतीय सैनिकांचे प्राण जात असतांना आपण पाकला तुम्ही परत असे केले, तर आम्हीही उत्तर देऊ, एवढेच बोलतो; पण ठोस कृती करत नाही.

पाकिस्तानमध्ये हिंदू, ख्रिस्ती आणि शिया मुसलमान यांच्यावर प्रतिदिन आक्रमणे ! - प्रसिद्ध पाकिस्तानी लेखिका फराहनाझ इस्पाहनी

     अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनस्थित पाकिस्तानी लेखिका फराहनाझ इस्पाहनी यांचे एक नवीन पुस्तक प्युरिफाईंग द लॅन्ड ऑफ द प्युअर : पाकिस्तान्स रिलिजिअस मॉयनॉरिटीस नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. त्यानिमित्त जपानचे आंतरराष्ट्रीय मासिक द डिप्लोमॅटचे पत्रकार महंमद अकबर नोटेझाई यांनी फराहनाझ यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये बोलतांना त्यांनी पाकिस्तानमध्ये हिंदू, ख्रिस्ती आणि शिया मुसलमान यांच्यावर प्रतिदिन आक्रमणे होत असल्याचे विधान केले. त्यांच्यातील निवडक संवाद येथे देत आहोत.

केंद्रशासन अजूनही चिदंबरम् यांच्याविरुद्ध कारवाई का करत नाही ?

    मोदी शासनास २ वर्षे पूर्ण होत असतांना एअरसेल-मॅक्सीस प्रकरण, शारदा चीट फंड घोटाळा, २-जी स्पेक्ट्रम वाटप, उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता इत्यादी घोटाळ्यांत अडकल्याचे अनेक पुरावे उपलब्ध असतांनाही माजी अर्थ आणि गृह मंत्री चिदंबरम् अन् त्यांचे कुटुंबीय यांच्यावर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही, याचे गूढ वाढतच चालले आहे. 
१. एअरसेल-मॅक्सीस घोटाळ्यात केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सी.बी.आय.ने) यांच्या विरुद्ध ऑगस्ट २०१४ मध्ये २-जी न्यायालयासमोर दाखल केलेल्या आरोपपत्रात असे म्हटले आहे की, चिदंबरम् यांच्या विरुद्ध अन्वेषण लवकरच पूर्ण करून पुरवणी आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात येईल. या संबंधीची याचिका भाजप नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला तपासातील प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र अद्यापही या खटल्यात पुढे काहीच प्रगती झाली नाही.

शासकीय कार्यालये : कार्यपद्धतींचा अभाव आणि सौजन्याचा तुटवडा !

     कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये गेल्यावर सर्वसामान्य नागरिकांना येणारा अनुभव काही फारसा सुखावह नसतो. नागरिक ज्या कामासाठी आला आहे, ते काम कोणत्या अधिकार्‍याकडे येते, हे कळण्यातच व्यक्तीची बरीच पायपीट होते, त्यानंतर संबंधित अधिकारी जागेवर असल्यास आणि त्याला वेळ असल्यास पुढील प्रक्रिया चालू होते. त्यामध्ये या कामासाठी अमुक अमुक कागदपत्रांची आवश्यकता आहे. ती आधी आणा, मग पुढचे बघू अशा प्रकारच्या वाक्यांनी ग्राहकांशी एकतर्फी संवाद साधला जातो. दूरवरून आणि वेळ काढून आलेला नागरिक अधिकार्‍यांच्या प्रेमळ (?) प्रतिसादाने थोडासा बावचळतो. त्याविषयी अधिक शंकानिरसन करून घेण्याच्या इच्छेने काही विचारण्याचा प्रयत्न करतो; मात्र शंका विचारून नागरिकाने जणू काही गुन्हा केला असल्याच्या अविभार्वात समोरून प्रतिसाद मिळतो. त्यानंतर थोडीफार बोलणी खाऊन ग्राहक पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होतो. त्यामुळेच नागरिकांशी सौजन्याने वागल्यास अधिकार्‍यांचा पगार कापलो जातो कि काय अशीच शंका निर्माण होते.

जातीय राजकारणासाठी रोहित वेमुलाचा वापर केला जात आहे ! - अधिवक्ता संजीव पुनाळेकर

अधिवक्ता संजीव
पुनाळेकर
     टीव्ही ९ या वृत्तवाहिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मनुवाद आणि ब्राह्मणवाद यावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यात हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर, हिंदुत्ववादी उमेश गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. आशिष तांबे सहभागी झाले होते.
      आज ब्राह्मणवाद, मनुवाद पुढे करून त्यामुळे रोहित वेमुलावर अन्याय झाला, असे सांगण्यात येत आहे; पण प्रत्यक्षात रोहित वेमुलाच्या प्रकरणात ब्राह्मण, दलित, मनुवाद असे शब्द आलेच नव्हते. काश्मीरच्या आझादीवर निदर्शने होतात. संस्कृतीभेदाचे प्रतीक सांगून अखलाखच्या हत्येचे उदाहरण देण्यात येत आहे; मात्र महाराष्ट्रात आजपर्यंत ज्या हत्या झाल्या, त्यात ब्राह्मणवाद किती होता आणि एका समूहाची दादागिरी किती होती, हे पहायला हवे.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

संस्कार आणि संस्कृती यांतील भेद

     छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारल्यानंतर त्याच्यावर विधीवत संस्कार केले. त्याची कबर बांधली. औरंगजेबाने मात्र छत्रपती संभाजी महाराजांना मारल्यानंतर त्यांच्या देहाची विटंबना केली. हा आहे संस्कार आणि संस्कृती यांतील भेद ! - एक वाचक, सातारा

मोगल भारताबाहेरचेच असल्याचा पुरावा !

    भारतात मोगलांचे वंशज नाहीत. काझी, बाबर, औरंगजेब, अफझलखान, अदिलशहा, निजामशहा यांचा एकही वंशज नाही. हिंदु राजांचे मात्र वंशज आहेत. यावरून मोगल बाहेरून आले होते; म्हणून बाहेरच निघून गेले. हिंदु राजे इथलेच होते; म्हणून इथे राहिले, हे सिद्ध होते. - एक वाचक, सातारा

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
साधकांनी कारागृहात असतांना साधना, राष्ट्र, आणि धर्म 
(तात्त्विक विषय) यांच्या संदर्भात केलेले लिखाण
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका दुचाकीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे नाचणार्‍या पोलिसांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास, तसेच त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. या अशा कठीण प्रसंगांना साधकांनी केवळ साधनेच्या बळावर धीरोदत्तपणे तोंड दिले. यातून वाचकांच्या मनावर साधनेचे महत्त्व ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेच्या अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयी केलेले तात्त्विक चिंतन पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव असणारे ऐरोली, ठाणे येथील चि. अजित तावडे अन् सतत हसतमुख असणार्‍या मूळच्या मिरज येथील चि.सौ.कां. अरुणा कौलकर !

      चैत्र शुक्ल पक्ष त्रयोदशी (१९.४.२०१६) या दिवशी ऐरोली, ठाणे येथील चि. अजित तावडे आणि रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या मूळच्या मिरज येथील चि.सौ.कां. अरुणा कौलकर हे विवाहबद्ध होत आहेत. त्यानिमित्त श्री. अजित यांनी प.पू. गुरुदेवांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आणि चि.सौ.कां. अरुणा यांच्याविषयी साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
चि. अजित तावडे आणि चि.सौ.कां. अरुणा कौलकर यांना 
सनातन परिवाराच्या वतीने शुभविवाहानिमित्त हार्दिक शुभेच्छा !  
                           विवाह ठरल्यावर प्रतिदिन शुभसंदेशाद्वारे 
गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे श्री. अजित तावडे ! 
१. विवाह म्हणजे प.पू. गुरुदेवांनी दिलेला पुनर्जन्मच आहे, असा विचार मनात येणे : विवाह ठरल्यानंतर प.पू. गुरुदेवांप्रती अंतरात पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. ती व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतील, असेच वाटत होते. विवाहासोबतच रामनाथी आश्रमात सेवा करण्याची संधीही प्राप्त होणार होती आणि म्हणूनच हा जणूकाही प.पू. गुरुदेवांनी दिलेला पुनर्जन्मच आहे, असा विचार मनात येत होता. दिवसाचा आरंभ या कृतज्ञतेच्या स्मरणाने व्हावा, असे वाटत असे. तसेच प्रतिदिन शुभ-सकाळचे संदेश व्हॉटस्-अ‍ॅपवर येत असे, तेव्हा मनात विचार आला की, हे संदेश प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे असायला हवेत. प्रतिदिन सकाळी कार्यालयात जातांना प्रवासात प.पू. गुरुदेवांचे स्मरण करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतांना त्यांच्याच कृपेने काही पंक्ती सुचू लागल्या. त्या शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि हे संदेश कु. अरुणाला प्रतिदिन पाठवत असे. जेणेकरून प.पू. गुरुदेवांनी जे जुळवून आणले, ती कृतज्ञता आम्हा दोघांच्या मनात सतत जागृत राहील आणि तीच प्रार्थना प.पू. गुरुदेवांच्या चरणी होत असे. त्यांच्याच कृपेने सुचलेल्या काही पंक्ती पुढे देत आहे.

मनमोकळी आणि सतत हसतमुख असणारी चि.सौ.कां. अरुणा कौलकर !

१. रामनाथी आश्रमातील 
साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१ अ. कोणत्याही सेवेत साहाय्यासाठी तत्पर असणे : ताईकडे कोणत्याही सेवेच्या संदर्भात कधीही साहाय्य मागितल्यास ती साहाय्यासाठी तत्पर असते. त्यामुळे अडचणींच्या वेळी पहिले नाव कु. अरुणाचे आठवते. ताईचा कोणत्याही सेवेत आधार वाटतो. त्यामुळेच तिला सहजतेने सेवा सांगता येते. - कु. अर्चना सोनवणे
१ आ. मनमोकळेपणा : कु. अरुणा सर्व काही मनमोकळेपणाने आणि सहजतेने बोलते. त्यामुळे ती सतत हसतमुख असते. - कु. सोनल जोशी
१ इ. इतरांचा विचार करणे : आश्रमात व्यष्टी आणि समष्टी सेवा करतांना ती प्रत्येक वेळी सहसाधकांचा विचार करते. सहसाधकांच्या सेवांना प्राधान्य देऊन त्यांना साहाय्य करते. ती आश्रमात असो किंवा बाहेर कोणाशीही पटकन मिसळून जाते. इतरांशी जवळीकता साधण्याचे कौशल्य असल्याने ती सर्वांना आपलेसे करून घेते.

स्वतःला गोपी बनवण्यासाठी आणि कृष्णप्राप्तीचे ध्येय गाठण्यासाठी श्रीमती शिरीन चाइना यांनी परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांना पत्राद्वारे कळवळून विनवणे

श्रीमती शिरीन चाइना
       २५.२.२०१६ या दिवशी संध्याकाळी ५.३० वाजता श्रीकृष्णाच्या कृपेनेे माझी पुष्कळ भावजागृती होऊन मी दोन घंटे माझे भावाश्रू आवरू शकत नव्हते. त्या वेळी मी कसे ते मला ठाऊक नाही; परंतु आपणच मला गोपी बनवू शकता, असे प.पू. गुरुदेवांना भावाश्रूंसहित आळवत होते. नंतर मी प.पू. गुरुदेवांना पुढील पत्र लिहिले.
अत्यंत प्रिय प.पू. गुरुदेव यांच्या चरणी,
साष्टांग नमस्कार !
गोपी बनण्यासाठी पुष्कळ प्रयत्न 
करावे लागणार असल्याने त्यासाठी 
साहाय्य करण्यास प.पू. गुरुदेवांना विनवणे
        मला गोपी बनण्याची तळमळ लागली आहे. हे गुरुदेवा, कृपा करून मला एक गोपी बनवा. हे गुरुमाऊली, सध्या रामनाथी आश्रमात असणार्‍या गोपींकडून शिकण्यासाठी आणि त्यांच्यातील उत्कृष्ट गुणांचे माझ्यात संवर्धन करण्यासाठी मला साहाय्य करा; कारण त्यांच्यासारखे बनण्यासाठी मला पुष्कळ प्रयत्न करावे लागणार आहेत. हे गुरुदेवा, माझ्या अनेक इच्छांपैकी एक इच्छा मला येथे असलेल्या गोपींना भेटायचे आहे. श्रीकृष्णाला अपेक्षित असे घडण्यास स्वतःमध्ये आवश्यक ते पालट करण्यासाठी मला त्यांच्याकडून इंग्रजीमध्ये शिकायचे आहे. कसे ? ते मला ठाऊक नाही. गुरुदेवा, तेही आपणच मला शिकवू शकता.

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
      सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. हिंदु राष्ट्राची छोटी प्रतिकृतीच असलेल्या या आश्रमाला भेट देऊन हिंदुत्वनिष्ठांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रेरणा मिळते, तर साधकांना साधनेसाठी आध्यात्मिक ऊर्जा लाभते. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.

वाचकांना निवेदन

     १७ एप्रिल २०१६ या दिवशीच्या दैनिकात पृष्ठ १० वर आतंकवादग्रस्त इराक, आर्थिकदृष्टा बलशाली अमेरिका आणि आध्यात्मिक देश भारत यांतील आध्यात्मिक स्तरावरील भेद स्पष्ट करणारी पिप तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घेतलेली वातावरणातील प्रभावळींची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या छायाचित्रांतील रंगसंगतींविषयी वाचकांनी पुढील दृष्टीकोन लक्षात घ्यावा.
पिप संगणकीय प्रणालीतील रंगसंगतीचा अभ्यास करतांना खालील दृष्टीकोन लक्षात ठेवा !
     अध्यात्मशास्त्रानुसार भगवा रंग वैराग्याचे प्रतीक आहे. पिप या संगणकीय प्रणालीमध्ये विशिष्ट रंगाचा विशिष्ट प्रकारच्या स्पंदनाशी संबंध दर्शवला जातो, उदा. भगवा रंग - वातावरणातील नकारात्मकता, नारिंगी रंग - भावनिक तणाव. रंगांचा स्पंदनांशी असलेला हा संबंध पिप संगणकीय प्रणाली विकसित करणार्‍यांनी ठरवलेला आहे. त्याचा आणि अध्यात्मशास्त्रानुसार असलेल्या त्या रंगाच्या वैशिष्ट्याचा संबंध नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी.
     (पिप या संगणकीय प्रणालीविषयी विस्तृत माहिती पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. - http://www.electrocrystal.com/pip.html)

पू. मेनरायकाका आणि पू. मेनरायकाकू यांच्या आध्यात्मिक उपायांच्या वेळांत एरव्हीपेक्षा लवकर ध्यान लागून आनंद आणि शांती जाणवणे

श्री. अनित पिंपळे
       वर्ष २०१५ च्या गुरुपौर्णिमेपासून सर्व साधकांसाठी पू. डॉ. भगवंतराय मेनराय आणि पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांच्या आध्यात्मिक उपायांची सत्रे रामनाथी आश्रमात चालू करण्यात आली आहेत. पूर्वी मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपासाठी बसल्यावर मन एकाग्र होण्यासाठी १० ते १५ मिनिटे लागायची आणि नंतर माझे देवाशी अनुसंधान साधत असे. आता पू. मेनरायकाका आणि पू. मेनरायकाकू यांच्या उपायसत्रांच्या वेळांत ध्यानमंदिरात नामजपाला बसल्यावर माझे मन लगेच एकाग्र होऊन ध्यान लागते. त्या वेळी मनाला जाणवणारा आनंद आणि शांती अधिक खोल असते. मला नामजप करायला बसल्यावर अर्धा किंवा एक घंटा कधी झाला, ते समजतही नाही. 
- श्री. अनित पिंपळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.९.२०१५)

पू. (कु.) रेखा काणकोणकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. व्यष्टी साधनेतील गांभीर्य असणे
        कधीही स्वयंपाकघरात काही कामानिमित्त गेले, तर स्वयंपाकघराच्या सेवेव्यतिरिक्तच्या वेळेत पू. रेखाताई कुठल्यातरी कोपर्‍यात डोळे मिटून स्वभावदोष निवारण सत्र करत असतात. कधी त्या एकाग्रतेने आत्मनिवेदन करत असतात किंवा स्वभावदोष सारणी लिहित असतात, तर कधी त्या एकाग्रतेने दैनिक सनातन प्रभात वाचत असतात.
२. विचारून करणे
       सौ. सुप्रियाताई आणि पू. रेखाताई साधनेतील सख्या मैत्रिणी आहेत. रेखाताईकडून सेवेत काही चुका झाल्यास सुप्रियाताई तिला हक्काने सांगते. स्वयंपाकघरात कितीही मोठे नियोजन असेल, तरी दोघीही एकत्र येऊन नियोजन करतात आणि ती सेवा पूर्ण करतात.
- कु. सुषमा पेडणेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.४.२०१६)

पू. (कु.) रेखाताई काणकोणकर यांनी संतपद प्राप्त करण्याविषयी मिळालेली पूर्वसूचना

रेखाताईंचा तोंडवळा डोळ्यांसमोर येऊन 
त्या संत झाल्या असणार, असे विचार येणे
       दोन दिवसांपूर्वी अकस्मात् कु. रेखाताईंचा (पू. (कु.) रेखाताई काणकोणकर यांचा) तोंडवळा डोळ्यांसमोर आला आणि तीव्रतेने वाटले की, आता रेखाताई संत झाल्या असणार ! काही दिवसांतच त्या संत झाल्याचे घोषित केले जाईल ! माझ्या मनात रेखाताई संत झाल्याचे विचार येत आहेत, ते लवकरच लिहून देण्याची संधी मिळणार आहे, असे विचार मनात २ मिनिटे येत होते.
- सौ. श्रेया प्रभु, वाराणसी (१५.४.२०१६)

पू. (कु.) रेखा काणकोणकर यांच्या प्रगतीसंदर्भात जाणवलेली सूत्रे !

पू. (कु.) रेखा काणकोणकर
१. काही मासांपूर्वी विदेशी साधिका श्रीमती मारियाआजी त्यांच्या देशात जाण्यासाठी आश्रमातून निघत असतांना तेथे कु. रेखाताई आली. रेखाताईला पहाताच त्यांची भावजागृती होऊन त्यांनी तिला मिठी मारली.
२. विदेशातील संत प.पू. त्रिवेदी गुरुजींच्या पत्नीची रेखाताईला पहाताच भावजागृती होऊन त्यांनी तिची गळाभेट घेतल्यावर ताई संतपदाजवळ आली असेल, असा विचार मनात येणे :
विदेशातील संत प.पू. त्रिवेदी गुरुजी आपल्या पत्नीसमवेत रामनाथी आश्रमात आले होते. तेव्हा आश्रमदर्शन करतांना त्यांच्या पत्नीची रेखाताईला पहाताच भावजागृती झाली आणि त्यांनी तिची गळाभेट घेतली. आश्रमदर्शन करतांनाच पू. योयाताईंना पाहूनही त्यांची (संतपत्नींची) भावजागृती झाली आणि पू. योयाताईंचीही त्यांनी गळाभेट घेतली. तेव्हा पू. योयाताई संत असल्यामुळे त्यांच्याकडे पाहून त्यांना काहीतरी जाणवले असावे; म्हणून त्यांनी असे केले, असे वाटले. नंतर रेखाताईसंदर्भातील प्रसंग कळल्यावर ताईदेखील संतपदाजवळ आली असेल, असा विचार आला.

हिंदु धर्मजागृती सभा किंवा प्रदर्शने पहाण्यासाठी आलेल्या हिंदूंना प्रत्येक गावात हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी कृतीशील करणारा फलक उपलब्ध !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना
      हिंदु जनजागृती समितीच्या वतीने होत असलेल्या हिंदु धर्मजागृती सभा, राष्ट्रजागृतीपर प्रदर्शने इत्यादींना मोठ्या प्रमाणात हिंदूंचा प्रतिसाद लाभत असतो. या वेळी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने गावपातळीवरील पुढील उपक्रमांची दिशा देणारा ११ फूट ४ फूट आकारातील राष्ट्र-धर्म हितार्थ प्रतिदिन १ घंटा (तास) द्या ! - आपल्या गावातही हिंदु राष्ट्र स्थापन करा ! हा फ्लेक्स फलक नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आला आहे. या मोठ्या फलकामध्ये हिंदूसंघटनासाठी हे उपक्रम राबवा !, धर्मजागृतीचे कार्य, ही ईश्‍वरी सेवाच !, ग्रामहित साधा, गावात हिंदु राष्ट्र आणा ! आणि आपले ग्राम हिंदु राष्ट्राला पूरक बनवा ! या २.५ फूट ३ फूट आकारातील ४ फलकांचा समावेश आहे. जागेच्या उपलब्धतेनुसार या फलकातील केवळ डावी किंवा उजवी बाजूही लावता येऊ शकते.
     आज प्रत्येक छोट्या-छोट्या गावात हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यास पुढे संपूर्ण भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करणे सोपे होईल. त्यादृष्टीने बनवलेला हा फ्लेक्स फलक सभा आणि प्रदर्शने यांच्या अभिप्राय कक्षावर तथा बाहेर जाण्याच्या मार्गावर लावल्यास धर्मासाठी कार्यरत होऊ इच्छिणार्‍या हिंदूंना तो मार्गदर्शक ठरू शकतो. समितीच्या अन्य उपक्रमांसाठीही हा फलक अधिक परिणामकारकपणे उपयोगात आणता येईल, तरी जिल्ह्यातील नियोजनाच्या आधारे उत्तरदायींना विचारून या फलकाचे मुद्रण करण्याविषयी निर्णय घ्यावा आणि अधिकाधिक धर्मप्रसार करावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.
रणरागिणी शाखेच्या प्रसारासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !
     हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर रणरागिणी शाखेकडून धर्मपरंपरा रक्षण चळवळीचा शुभारंभ करण्यात आला.

श्रीरामनवमीला रामनाथी गोकुळात अन्नपूर्णा प्रगटली ।

रामनाथी गोकुळातील स्वयंपाकघर हे अन्नपूर्णेचे स्थान असे ।
सूक्ष्मातून वास करणारी देवी आता स्थुलातूनही तेथ स्थिरावे ॥ १ ॥
पू. रेखाताईच्या माध्यमातून आम्हा सर्वांना देवी लाभली ।
श्रीमत् नारायणाने दिलेली चैतन्यमय भेट सर्वांना भावली ॥ २ ॥
श्रीरामनवमीला रामनाथी गोकुळात प्रगटली अन्नपूर्णा ।
आमुचा शिरसाष्टांग नमस्कार या स्थुलातील देवीला ॥ ३ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु,
- श्री. अविनाश जाधव, सनातन आश्रम, गोवा. (१५.४.२०१६)

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प.पू. दास महाराजांनी आरंभलेले मौनव्रत निर्विघ्नपणे पार पडावे, याकरिता पानवळ आश्रमातील विविध सेवांसाठी साधकांची आवश्यकता !

साधकांना अनमोल संतसेवेची सुवर्णसंधी !
     पानवळ, बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वर्षभर मौनव्रत करत आहेत. हे व्रत निर्विघ्नपणे आणि परिपूर्णपणे पार पडावे, यासाठी पानवळ आश्रमातील सेवा करण्यासाठी साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी साधक-दांपत्यही चालू शकेल. आश्रमात पुढील सेवा उपलब्ध आहेत.
१. पूजा : पूजेची सिद्धता करून पूजा करणे
२. स्वच्छता : आश्रम, मंदिर, तसेच परिसर यांची स्वच्छता करणे
३. बागेची देखभाल करणे : आश्रम परिसरातील झाडांना पाणी घालणे आणि त्यांची निगा राखणे, तण वाढल्यास ते काढण्याचे नियोजन करणे, पाण्याची टाकी भरण्यासाठी पंप चालू करणे, आश्रमात पाळण्यात येणार्‍या गायीची देखभाल करणे
४. अन्य : आश्रमात येणार्‍यांचे आदरातिथ्य करणे आणि महाराज मौनव्रतात आहेत, याची त्यांना कल्पना देणे,
     प.पू. दास महाराजांना वेळेवर औषधे देणे, भोजन देणे, मर्दन (मालिश) करणे, पू. (सौ.) माईंना स्वयंपाकघरात साहाय्य करणे, मंडईत जाऊन आवश्यक साहित्य आणणे
     साधक स्वतःच्या सोयीनुसार शक्य तेवढे दिवस सेवेत सहभागी होऊ शकतात. जे साधक ही सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून dharmatej2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर पुढील माहिती पाठवावी.

विविध सेवांसाठी वाराणसी सेवाकेंद्रात साधकांची तातडीने आवश्यकता !

     वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात वाहन, संगणक देखभाल आणि दुरुस्ती, प्रसार, लेखा आदी दैनंदिन सेवा, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा यांसाठी साधकांची आवश्यकता आहे.
     जे साधक पूर्णवेळ किंवा काही कालावधीसाठी सेवाकेंद्रात राहून या सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून रामनाथी आश्रमात कु. प्रियांका जोशी यांच्याशी ०८४५१००६०६३ या क्रमांकावर अथवा dharmatej2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.


विविध सेवांसाठी देवद आश्रमात साधकांची तातडीने आवश्यकता !

साधकांना गुरुसेवा करण्याची सुसंधी !
      देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वाहन, स्वयंपाक, उत्पादन-बांधणी आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे. जड साहित्य उचलू शकणार्‍या साधकांसाठी मागणी-पुरवठा संबंधी विविध सेवा उपलब्ध आहेत. जे साधक पूर्णवेळ, काही कालावधीसाठी किंवा शनिवार आणि रविवार अन् अन्य सुटीच्या दिवशी आश्रमात येऊन सेवा करू शकतात, त्यांनी खालील सारणीनुसार माहिती भरून ती जिल्हासेवकांच्या माध्यमातून devadashram@gmail.com संगणकीय पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी. शाळा आणि महाविद्यालये यांना लवकरच सुटी लागणार असल्याने युवा साधकही या सेवेत सहभागी होऊ शकतात.

धर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता !

साधकांना सूचना
     सनातन-निर्मित ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच ! मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे.
     समाजापर्यंत शीघ्रतेने पोहोचण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शने लावली जात आहेत. या सेवेसाठी धर्मरथावर चालक-साधकांची आवश्यकता आहे. या सेवेसाठी इच्छुक असलेल्या साधकांकडे एका लहान धर्मरथासाठी लाईट मोटर व्हेहिकल (LMV), दुसर्‍या लहान धर्मरथासाठी लाईट ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल आणि तीन मोठ्या धर्मरथांसाठी हेव्ही ट्रान्स्पोर्ट व्हेहिकल (HMV) असे परवाने असणे आवश्यक आहे.
     जे साधक वरील सेवांमध्ये काही कालावधीसाठी किंवा पूर्णवेळ सहभागी होऊ शकतात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून श्री. माधव गाडगीळ यांच्याशी ०८४५१००६००८ या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.


॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
जिसने पायो उसने छिपायो । वो नर सच्चा, वोही गुरुका बच्चा ।
भावार्थ : पायो म्हणजे आत्मानुभूती झाली. छिपायो म्हणजे आत्मानुभूती झाल्याचे कोणाला सांगितले नाही. (अर्थात ती शब्दांत सांगताही येत नाही.) गुरुका बच्चा म्हणजे गुरूचा खरा शिष्य. एखाद्याकडे अनमोल हिरा असला, तर तो काही सर्वांना त्याविषयी सांगत नाही. तसेच अनमोल आत्मानुभूती आलेला त्याविषयी कोणाला काही सांगत नाही. अहंभाव नसल्यामुळेच त्याला ती अनुभूती आलेली असते व म्हणूनच तो तिच्याविषयी बोलत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     भ्रष्टाचार, बलात्कार, बुद्धीप्रामाण्यवाद, अनैतिकता, गुंडगिरी, देशद्रोह, धर्मद्रोह इत्यादींना आता जे उधाण आले आहे, त्याला कारणीभूत आहेत, स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची ६८ वर्षे जनतेला साधना, नैतिकता इत्यादी न शिकवणारी शासने ! यातूनच हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता लक्षात येते !- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरी संपत्ती !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     वेळ म्हणजे खरी संपत्ती ! ती एकदा गेली की, परत येत नाही; म्हणूनच प्रत्येक क्षणाचा उपयोग करा. कधीही वेळ वाया घालवू नका ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र

श्रीराममंदिराचे स्वप्न !

संपादकीय
    रांची (झारखंड) येथे श्रीरामनवमीनिमित्त काढलेल्या शोभायात्रेवर धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीनंतर दंगल उसळून १२ हिंदू घायाळ झाले. त्यांनी लावलेल्या आगीत ३ घरे पूर्णतः जळून खाक झाली. बोकारो (झारखंड) येथेही शोभायात्रेवर धर्मांधांनी आक्रमण केले. त्यात १९ हिंदू घायाळ झाले. या वेळी पोलिसांच्या वाहनालाही आग लावण्यात आली. महाराष्ट्रातील बुलढाण्यातही उद्दाम धर्मांधांनी रामनवमीचा भंडारा उधळला आणि हिंदूंची घरे लुटली. धर्मांधांकडून हिंदूंवर होणार्‍या विध्वंसक आक्रमणाच्या घटना हिंदूंसाठी पूजनीय असणार्‍या रामनवमीच्या काळात होणे, हे लज्जास्पद आहे. अर्थात् निधर्मी राज्यप्रणाली अस्तित्वात असलेल्या देशात याहून वेगळे काय घडणार ? अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले न जाणे, श्रीरामाला बंदिस्त कारागृहात ठेवल्याप्रमाणे स्थान देणे या गोष्टी म्हणजे आज हिंदूच काय, तर हिंदु धर्मालाही अडगळीतच टाकल्यासारखे आहे. वर्ष १५२८ मध्ये मोगल आक्रमक बाबराने राममंदिर पाडून तेथे मशीद उभारली. वर्ष १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडतांना करसेवेसाठी गेलेल्या असंख्य हिंदूंचा रक्तपात झाला. त्यानंतर झालेल्या दंगलीतही हिंदूंची हानी झाली. मशिदीच्या ठिकाणी केलेल्या खोदकामानंतर सापडलेले नक्षीदार आणि सुंदर अवशेष हे मंदिराचे असून मंदिर पाडून त्यावर मशीद उभारण्यात आली, हे पुराव्यानिशी सिद्ध झाले. सर्वोच्च न्यायालयानेही अयोध्येतील जागा ही रामजन्मभूमीचीच असल्याचा निकाल दिला; मात्र तरीही गेली ६ दशके कोट्यवधी हिंदूंच्या देशात राममंदिर काही उभारले जाऊ शकत नाही, हे सत्यच वारंवार समोर येत आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn