Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।


इसिसला पृथ्वीवरूनच नष्ट करणार ! - अमेरिका

 
     कुठे इसिसला पृथ्वीवरूनच नष्ट करण्याची बाणेदार प्रतिज्ञा करणारी अमेरिका, तर कुठे भारतात इसिसचे समर्थक मोठ्या प्रमाणात सापडत असतांना त्यांच्या मुसक्या आवळण्याऐवजी त्यांचे प्रबोधन करून त्यांना सोडून देणारा भारत ! भारताच्या या बोटचेप्या भूमिकेमुळेच कुणीही येऊन भारतात आतंकवादी आक्रमण करून जातो ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
     वॉशिंग्टन - इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरिया अर्थात् इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेने आतार्पंत इराक, सिरिया, पॅरिस, ब्रुसेल्स, इस्तंबूल आदी ठिकाणी आतंकवादी आक्रणे केली आहेत. यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. या आक्रमणांमुळे इसिसला त्यांच्या विरोधात असणार्‍या ६६ राष्ट्रांचे आतंकवादाविरुद्धच्या लढ्याचे सामूहिक प्रयत्न खिळखिळे झाले आहेत, असे वाटत आहे. तथापि या आक्रमणांमुळे सर्व ६६ राष्ट्रे अधिक संघटित झाली असून इससिला केवळ इराक आणि सिरियामधूनच नव्हे, तर पृथ्वीवरूनच नष्ट करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे, असे प्रतिपादन जागतिक महासत्ता असणार्‍या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी येथे केले.

आजच्या विशेषांकात प्रसिद्ध करण्यात आलेली इसिसकडून केल्या जाणार्‍या क्रूर अत्याचारांची छायाचित्रे ही आतंकवाद्यांची भयावह मानसिकता लक्षात यावी, याच हेतूने केवळ प्रसिद्ध करण्यात आली आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यावी ! - संपादक

  

आम्हाला भारतात रामराज्य हवे आहे ! - शंकराचार्य जगद्गुरु स्वामी स्वरूपानंद सरस्वती

     हरिद्वार (उत्तराखंड) - रामराज्यात एका श्‍वानालाही न्याय मिळाला होता. रामराज्य स्थापित झाल्यावर गाय आणि गंगेलाही न्याय मिळेल. त्यामुळे आम्हाला भारतात हिंदु राष्ट्र नव्हे, तर रामराज्य हवे आहे, असे प्रतिपादन ज्योतिष आणि द्वारका पिठाधीश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी यांनी केले. प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन केले पाहिजे. मुसलमानांनी दुसर्‍यांच्या धर्मात हस्तक्षेप करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. उत्तरप्रदेशचे मंत्री आजम खान यांनी महाराष्ट्रात गोहत्येवर लादण्यात आलेल्या बंदीवर म्हटले होते की, अशाप्रकारचे प्रयत्न भारतात हिंदु राष्ट्र आणण्यासाठी होत आहेत. यावर शंकराचार्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

हिंदूंना सुरक्षेसाठी एकजुटीने भगव्याखाली उभे रहावे लागेल !

दैनिक सामनातून हिंदूंना आवाहन
      मुंबई - हिंदूंना स्वत:च्या देशात नष्ट करण्याची भाषा होत असतांना हिंदूंच्या सुरक्षेविषयी एकही राज्यकर्ता, पुढारी उसळून बोलत नाही. पठाणकोटच्या आक्रमणाचा बदला घेऊ, असे एक विधान संरक्षणमंत्र्यांनी केले. तो बदला घेण्याचा दिवस जसा उजाडणार नाही, तशी हिंदु रक्षणाची आरोळीही कधी कोणी ठोकणार नाही. हिंदूंनाच एकजुटीने भगव्याखाली उभे रहावे लागेल, असे रोखठोक मत १६ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध झालेल्या सामनाच्या संपादकीयमधून केले.
संपादकीयमध्ये पुढे म्हटले आहे की,
१. कोणीही उठतो आणि भारताच्या कानफटात मारतो, असे नेहमीच घडतांना दिसत आहे. भारतातील हिंदूंचा खात्मा करण्याची भाषा इसिसने पुन्हा केली आहे.
२. हिंदू लोकांसह इस्लाम न मानणार्‍या लोकांचा खात्मा करू, संपूर्ण भारतात शरीयत कायदा लागू करू, असे या मंडळींनी सिरियात बसून जाहीर केले आहे. हिंदूंना नष्ट करण्याची भाषा यापूर्वी अल् कायदा, तोयबासारख्या अतिरेकी संघटनांनी अनेकदा केली आहे.
३. संपूर्ण जगात इस्लामच्या नावाने हिंसा घडवून अराजक माजवले जात आहे आणि हिंदूंच्या मानेवर तलवार ठेवून धर्मांध अतिरेकी धमक्या देत आहेत. हे सर्व चित्र भयंकर असले, तरी हिंदूंच्या बाजूने ठामपणे उभा रहाणारा एकही माईका लाल या भूमीत दिसत नाही.
४. राममंदिराच्या प्रश्‍नी भाजपने अलगद आपल्या काखा वर केल्या आहेत.

तृप्ती देसाई यांचा कोल्हापूरला अपकीर्त करण्याचा डाव ! - काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पी.एन्. पाटील

      कोल्हापूर - येथील श्री अंबाबाई देवीच्या मंदिरात प्रवेश करण्याऐवजी तृप्ती देसाई यांनी प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी केली. पुरुषांनी सोवळे आणि महिलांनी साडी नेसून गाभार्‍यात जाण्याची परंपरा आहे. त्यासाठी कुणाची अनुमती काढण्याची आवश्यकता नाही. मंदिर प्रवेशासाठी अनुमती असतांना फेरी काढूनच मंदिरात जाणार, असे सांगत देसाई यांनीच वाद वाढवला. कोल्हापूर हे शांत शहर असतांना येथील नागरिकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरला अपकीर्त करण्याचा त्यांचा डाव होता, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन्. पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केला. त्यांनी पुढे म्हटले आहे की, वेळप्रसंगी आम्ही परंपरा जपण्यासाठी जनहित याचिकाही प्रविष्ट करू.
तृप्ती देसाई यांना मारहाण केल्याच्या प्रकरणी ७ जणांवर गुन्हे नोंद
      कोल्हापूर - तृत्पी देसाई यांना मारहाण केल्याप्रकरणी ४ श्री पूजकांसह २ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. सर्वश्री केदार मुनीश्‍वर, शिरीष मुनीश्‍वर, चैतन्य अष्टेकर, निखिल शानभाग या श्री पूजकांसह श्री. जयकुमार शिंदे आणि श्री. किसन कल्याणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले.
हिंदूंनो, तुम्हाला भारतात अशी दृश्ये पहाण्याची इच्छा आहे का ?


इसिस करत असलेल्या शिरच्छेदाचे एक दृश्य !
ही स्थिती भारतात येऊ द्यायची नसेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना 
अपरिहार्य आहे ! हिंदु राष्ट्राला विरोध म्हणजेच इसिसला निमंत्रण !
इसिस विरोधात संघटित होण्याच्या चळवळीचा एक भाग म्हणजे हा विशेषांक होय !

इसिसपासून भारताचे रक्षण करायचे असेल, तर...
भेट द्या ! : IndiaAgainstIslamicState.com

आजपासून मुंबईत साग्निचित विश्‍वजीत अतिरात्र सोमयाग !

      मुंबई - कांदिवली (पश्‍चिम) येथे साग्निचित विश्‍वजीत अतिरात्र सोमयागाचे १७ ते २२ एप्रिल या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. सध्या असलेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीचे निवारण करून सुवृष्टी प्राप्त होण्यासाठी आयोजित या यज्ञाचे येथील रघुनाथजी महाराज यजमानपद भूषवित आहेत. बार्शी येथील प.पू. नाना काळे गुरुजी यांचे पुत्र योगेश काळे गुरुजी आणि अन्य पुरोहित हे या यज्ञाचे पौरोेहित्य करत आहेत.

जय श्रीराम ! म्हणण्यास लाजणारे हिंदुत्ववादी राज्यकर्ते कधी हिंदु राष्ट्र आणतील का ?

टी. राजासिंह
     आजकालच्या हिंदुत्ववादी राज्यकर्त्यांना जय श्रीराम म्हणायचीही लाज वाटते. आपण जर एखाद्याला भेटल्यावर मोठ्याने जय श्रीराम म्हणालो, तर ते आधी आजूबाजूला कुणी आहे का ?, ते पहातात. नंतर हळू आवाजात जय श्रीराम म्हणतात. अशी या हिंदु राज्यकर्त्यांची स्थिती आहे. हे लोक कधी हिंदुहिताचे काम करतील का ? - टी. राजासिंह, भाजप आमदार, गोशामहल, तेलंगण. (२७ डिसेंबर २०१५ या दिवशी जळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेत केलेल्या मार्गदर्शनातील सूत्र)


हिंदु जनजागृती समिती त्वरित एखाद्या घटनेची नोंद घेते. त्यामुळे समाजात प्रतिक्रिया उमटते. परिणामी विरोधकांना शह बसून समाजही जागृत होत आहे. समिती खूप चांगल्या प्रकारे करत आहे ! - सरसंघचालक श्री. के. सुदर्शन

गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या सिद्धतेला आरंभ !

      फोंडा (गोवा) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात हिंदु धर्म आणि समाज यांवर होणार्‍या आघातांचा प्रतिकार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती (संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, संपादक, लेखक) सहभागी होणार आहेत. हिंदु राष्ट्राची स्थापना, हे या अधिवेशनाचे प्रमुख ध्येय आहे. या अधिवेशनात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, केरळ, अंदमान, ओडिशा, आसाम, बंगाल, झारखंड, जम्मू-काश्मीर, हरियाणा, देहली, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत.
     या अधिवेशनात सहभागी होऊ इच्छिणारे हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, हिंदुत्ववादी अधिवक्ता, पत्रकार यांनी http://www.hindujagruti.org/hjs-activities/hindu-adhiveshan या मार्गिकेवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आयोजन समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.
अधिवेशनाच्या आयोजनासाठी धर्मदान करण्याची विनंती !
     अधिवेशनासाठी सभागृह, निवास, भोजन, प्रदर्शन, स्थानिक वाहतूक इत्यादी कारणांसाठी अनुमाने ४५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. धर्मप्रेमी दानशुरांनी या कार्यासाठी सढळ हस्ते अर्थसाहाय्य करावे.

शासन दहशतवाद्यांसोबत चर्चा करते; पण आमच्यासोबत करत नाही, हे आमचे दुर्दैव आहे ! - श्री. कुलदीप रैना, पनून कश्मीर या संघटनेचे महासचिवशुभविवाह

     आज चैत्र शुक्ल पक्ष एकादशी (१७.४.२०१६) या दिवशी पंढरपूर येथील श्री. केदार नाईक आणि कोपरगाव येथील चि.सौ.कां. वैष्णवी सारंगधर हे विवाहबद्ध होत आहेत. त्यांची गुणवैशिष्ट्ये १६.४.२०१६ या दिवशी प्रसिद्ध करण्यात आली आहेत. 
 
चि. केदार नाईक आणि चि.सौ.कां. वैष्णवी सारंगधर यांना सनातन परिवाराच्या वतीने 
शुभविवाहानिमित्त हार्दिक शुभेच्छा !


सूचना न्यायालयाकडून मागवायची कि शंकराचार्यांकडून ?

     श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यामध्ये प्रवेश देण्याविषयीची मार्गदर्शक सूचना मागवण्याविषयी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात येणार आहे. - अधिवक्ता श्रीकांत गायधनी, विश्‍वस्त, त्र्यंबकेश्‍वर मंदिर

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Keval Irak ya Siriya se nahi, Dharati par se hi ISIS ko nashta karenge ! - Barack Obama ISIS ko rokhanekie liye Bharat pichhe kyon ?
जागो ! : केवल इराक अथवा सिरिया से नही, धरती पर से ही हम इस्लामिक स्टेट को नष्ट करेंगे ! - बराक ओबामा इस्लामिक स्टेट को रोखने के लिए भारत पिछे क्यों ?

फलक प्रसिद्धीकरता

इस्लामिक स्टेटची आक्रमणे रोखण्यासाठी भारत सिद्ध आहे का ?
     इस्लामिक स्टेटच्या आक्रमणांमुळे त्यांच्या विरोधात असणारी सर्व ६६ राष्ट्रे संघटित झाली आहेत. इस्लामिक स्टेटला केवळ इराक आणि सिरियामधूनच नव्हे, तर पृथ्वीवरूनच नष्ट करू, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे.

दैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदार होण्यासाठी संपर्क क्रमांक !

राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !
* कोल्हापूर - ९४२२५८२८०२
* सोलापूर - ८३०८६५२३६३
* सांगली - ९०४९६१२२६२
* पुणे - ८१४९९ ८७८१८
* मुंबई - ८४५१००६११०
* ठाणे - ८४५०९५०५०३
* रायगड - ९८१९२४२७३३
* जळगाव - ९४०४९५६३११
* विदर्भ - ९४०४९५६२२५
* सनातन हेल्पलाईन - ९३२२३१५३१७

धर्मशास्त्राविषयी अज्ञानी असणार्‍या साध्वी प्राची यांच्याकडून शनिदेवाच्या चौथर्‍यावरील महिलांच्या प्रवेशाचे स्वागत

     गुढीपाडव्याच्या दिवशी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाचे साध्वी प्राची यांनी स्वागत केले. त्या म्हणाल्या, महिलांच्या धार्मिक अधिकारांचे हनन करण्यासाठी मोठे षड्यंत्र आखले गेले आहे.

देशभक्तांनो, इस्लामिक स्टेटच्या संकटाचा सामना एकजुटीने केल्यासच भारताचे अखंडत्व अबाधित राहील ! त्यासाठी सज्ज होणे, हेच खरे भारतीय असल्याचे द्योतक आहे !

इसिसची भयावह उद्दिष्टे !
प्राथमिक
 • शरिया कायद्यावर आधारित खलिफाची राजवट निर्माण करणे
 • त्यासाठी जागतिक पातळीवर फुटीरतावाद्यांना एकत्रित करणे
 • इस्लामचे निंदक आणि काफर (इस्लामेतर) यांचा नाश करणे

हिंदु ऐक्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या !

English : www.hindujagruti.org
हिंदी : www.hindujagruti.org/hindi/
मराठी : www.hindujagruti.org/marathi/


इसिस आपल्या दारात !

       भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होऊ देण्यास विरोध करणार्‍यांना ठणकावून विचारा की, तुम्हाला निष्पापांचे गळे चिरणारे आणि महिलांवर सामूहिक बलात्कार करणारे आसुरी इस्लामिक स्टेट हवे आहे कि पृथ्वीला वसुधैव कुटुम्बकम् । म्हणजे संपूर्ण पृथ्वीला एक कुटुंब समजणार्‍या आणि सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः । म्हणजे या जगातील सर्वच जण सुखी आणि निरोगी होवोत, अशी प्रार्थना करणार्‍या हिंदूंचे हिंदु स्टेट म्हणजेच हिंदु राष्ट्र हवे आहे ?
१. इसिसने पंतप्रधान मोदी 
यांना इस्लामचे शत्रू म्हटले असून भारतात 
घुसून कार्यरत रहाण्याचा मनसुबा रचणे
       इसिसचा भारतियांना सर्वांत अधिक धोका आहे; कारण ख्रिस्ती राष्ट्रांशी इसिस लढू लागले, तर त्यांना अन्य ख्रिस्ती राष्ट्रे साहाय्य करू शकतात. भारत हे एकमेव हिंदूंचे मोठे राष्ट्र असल्याने भारताच्या साहाय्यासाठी कुणी येणार नाही, हे इसिसला ठाऊक आहे. त्यामुळेच इसिसच्या फ्युचर इस्लामिक स्टेट बॅटल्स या ऑनलाईन पुस्तकात त्यांनी भारतात शिरकाव करण्याची धमकी दिली आहे. त्यात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्लामचे शत्रू आहेत. ते भारतातील मुसलमानांच्या विरोधात षड्यंत्र रचत आहेत. त्यामुळे इसिस पाक, बांगलादेश, अफगाणिस्तान यांच्यासह भारतात घुसून सक्रीय रहाणार आहे.

इसिसची क्रूरता दर्शवणार्‍या छळाच्या पद्धती !

       इसिस नागरिकांवर कशा पद्धतीने अत्याचार करते आणि त्याचा परिणाम सिरियातील नागरिकांवर कसा झाला आहे, याविषयी पाहूया...
पत्रकाराचा गळा चिरतांना आतंकवादी
ख्रिस्त्यांना कोंबड्यांपमाणे टांगून खालून आग लावणे
निष्पाप लोकांची हत्या करतांना आतंकवादी
बालशमीन नावाचे देऊळ
स्फोटकांनी मंदिराचा केलेला विध्वंस
स्थलांतरासाठी थांबलेले नागरिक
मुद्रमार्गे स्थलांतर करतांना नागरिक

इस्लामिक स्टेटच्या आतंकवादाचा विश्‍वाभोवतीचा भयावह विळखा

इसिसची अधिकृत स्थापना
     इसिसची स्थापना २९ जून २०१४ या दिवशी इब्राहिम अव्वद अल्-बद्री उपाख्य अबु बक्र अल्-बगदादी याने केली. या संघटनेने इराक आणि सीरिया यांना इस्लामिक स्टेट म्हणजेच इस्लामिक राज्य घोषित केले आहे.
१. खलिफा : महंमद पैगंबर यांच्या उत्तराधिकार्‍याला किंवा वारसदाराला खलिफा म्हणतात. त्यालाच राजकीय आणि धार्मिक नेता मानले जाते. एकाच वेळी एकच खलिफा असावा, असे महंमद पैगंबर यांनी सांगितले होते.
२. खिलाफत : शरिया कायद्यावर आधारित खलिफाचे राज्य म्हणजे खिलाफत होय. शरिया कायद्यानुसार मुसलमानेतरांचेे धर्मांतर करणे, धर्मांतरित न होणार्‍यांची कत्तल करणे, त्यांच्या महिलांचा उपभोग घेणे, स्वतःच्या महिलांचा सर्व प्रकारचा छळ करणे, बालविवाह या गोष्टी क्षम्य असतात. व्यभिचारी महिलेला फटके देणे, हात तोडणे इथपासून ठार मारण्यापर्यंतची तरतूद असते.

आयएआयएस्ची स्थापना कशासाठी ?

      इसिसचे आतंकवादी भारतावर लक्ष ठेवून आहेत. इंडियन फायटर्ससारखी संघटना इसिस आणि अल्-कैदा या दोघांचेही काम करणारी संघटना आहे. दादरी येथील अकलाखच्या हत्येनंतर त्यांनी धमकी दिली की, गुजरात दंगल, काश्मीर आणि दादरी यांचा बदला आम्ही घेऊ ! म्हणजे भारतातील केवळ काही तरुण नव्हे, तर काही संघटना या इसिसच्या हाताशी आयत्या लागल्या आहेत. म्हणजे इसिसचा आतंकवाद केवळ इराक आणि सीरिया यांच्यापुरता मर्यादित आहे, असे मांडणे ही फार मोठी चूक ठरू शकते. परिणामी राष्ट्रप्रेमींच्या संघटनासाठीचा शुभारंभ इस्लामिक स्टेटच्या विरोधात भारत म्हणजेच आयएआयएस्च्या माध्यमातून करण्यात आला आहे. या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य म्हणजे ते जगभरातील सर्व भाषांत उपलब्ध आहे.

धर्मपरंपरा रक्षण करणारे मंदिर प्रशासक हवेत. मंदिर प्रशासकांनी धर्मपरंपरा मोडणार्‍यांचे स्वागत करून एक प्रकारे धर्मद्रोहच केला आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही !

      बीड शहरातील प्राचीन श्री शनिमंदिरातील चौथर्‍यावर महिलांनी प्रवेश करून श्री शनिदेवाला तैलाभिषेक केला आणि धर्मपरंपरा मोडली. महिलांच्या या कृतीचे स्वागत करून महिलांनी आता विश्‍वस्त मंडळात यावे, असे आवाहन मंदिर प्रशासक रामनाथ खोड यांनी केले.


फ्रान्स, अमेरिका आणि जपान यांसारख्या विविध देशांतून इसिसला होत असलेला विरोध !

इसिसला सडेतोड उत्तर देणारा फ्रान्स
     १३ नोव्हेंबरला इसिसच्या आतंकवाद्यांनी पॅरिसमधील एका मैदानालाच घेराव घातला. १२९ निष्पाप नागरिकांना ठार केले. ३५२ लोक घायाळ झाले. मुंबईवर २६/११ जे आक्रमण झाले, त्याच प्रकारचे हे आक्रमण होते. त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी फ्रान्सने कुणाच्याही अनुमतीची वाट बघितली नाही. त्यांनी २२३५ धर्मांधांच्या घरावर धाडी टाकल्या. २३२ जणांना पकडून त्यांच्याकडून ३०२ हत्यारे आणि ३२ स्फोटके जप्त केली.
     १६० अनधिकृत मशिदी बंद करण्याचे आदेश दिले. या आक्रमणाला एक मास पूर्ण होण्यापूर्वीच फ्रान्सने इसिसच्या जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (युएई) या देशांतील तळांवर सरळ क्षेपणास्त्र टाकले. सीरियातील इसिसच्या तळांवरही फ्रान्सने बाँबवर्षाव केला. एक विमानवाहू जहाजच त्यांनी सीरियाजवळ तैनात केले.
इसिसच्या आर्थिक नाकेबंदीचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा ठराव !
     इसिसच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत ठराव करण्यात आला आहे. त्यासाठी त्यांनी इसिसला जे तेल किंवा मौल्यवान वस्तू तस्करीद्वारे पुरवतात, ते थांबवण्यासाठी तीव्र प्रयत्न करायचे ठरले आहे. याला जगातील बहुतांश राष्ट्राध्यक्षांनी एकमताने संमती दिली आहे.
अमेरिकेच्या आक्रमणात १ सहस्र ६०० आतंकवाद्यांना कंठस्नान
     अमेरिकेने इसिसला संपवण्यासाठी धडक कृती चालू आहे. अमेरिकेच्या ६२ लोकांना इसिसच्या अतिरेक्यांनी मारले; म्हणून अमेरिकेने विविध काळात आक्रमणे करून आजवर इसिसच्या १ सहस्र ६०० आतंकवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

इसिसच्या विरोधातील आंदोलनात असे सहभागी व्हा !

१. सैन्यात सहभागी व्हा ! एन्सीसीसारख्या अभ्यासक्रमाचा लाभ घ्या ! स्वतःमध्ये आणि आपल्या सहकार्‍यांमध्ये राष्ट्रप्रेम रूजवा !
२. स्वतः स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !
३. आयएआयएस्च्या कार्यात सहभागी व्हा !
४. सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात स्वतःचे योगदान द्या !
५. अग्निशमन प्रशिक्षण, आपत्कालीन साहाय्य प्रशिक्षण आदी स्वतः घ्या, इतरांना द्या ! 

पालिका अधिकार्‍यांना संरक्षण न देणारे पोलीस कधी जनतेचे रक्षण करतील का ?

      अनधिकृत होर्डिंग काढणार्‍या पालिका अधिकार्‍यांना अनेक ठिकाणी मारहाण केली जाते; परंतु त्यांना पोलिसांकडून सहकार्य मिळत नाही. अशा तक्रारी सर्वच पालिकांनी केल्या. याची गंभीर दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी पालिका अधिकार्‍यांसमवेत शस्त्रधारी पोलीस तैनात ठेवा,
     तसेच संबंधितांवर कारवाई करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना आवश्यक त्या सूचना द्या, असे निर्देश पोलीस महासंचालकांना दिले.अध्यात्मातील प्रत्येक का अन् कसे यांची शास्त्रशुद्ध उत्तरे मिळवण्यासाठी पहा : www.santan.org


जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरमध्ये दिलेल्या हिंदुद्रोही घोषणा !

       वर्ष १९८४ मध्ये जिहादी आतंकवाद्यांनी हिंदूंच्या वंशविच्छेदाच्या उद्देशाने काफिरांना मारा ! हा उद्घोष तेथील सर्वच मशिदींतील भोंग्यांतून मोठ्या प्रमाणात एकाच वेळी करण्यात आला. अशा प्रकारे भयावह आवाहन केल्याने हिंदूंना काश्मीर सोडून जाण्याविना गत्यंतरच नव्हते. यामुळे साडेचार लाखाहून अधिक हिंदू केवळ निर्वासितच झाले नाही, तर त्यांचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झाले. याचा परिणाम म्हणून काश्मिरातील हिंदूंची संख्या दिवसेंदिवस अत्यल्प होत आहे. हिंदूंना निर्वासित करण्यासाठी आतंकवाद्यांनी दिलेली आवाहने पुढीलप्रमाणे होती...
१. काश्मीरात रहायचे असेल, तर अल्ला हो अकबर म्हणायचे !
२. आम्हाला हवे पाकिस्तान, हव्यात काश्मिरी हिंदु स्त्रिया; पण नकोत त्यांचे पती !
३. अल्ला हो अकबर, मुसलमानांनो, उठा. जागे व्हा. जिहाद येत आहे. काफिरांनो, पळा !

धर्मशिक्षण फलक या ग्रंथाच्या चैतन्याने प्रभावित झालेले उज्जैनमधील धर्मप्रेमी !

श्री. निरंजन चोडणकर
      उज्जैन येथे कुंभमेळ्याच्या प्रसाराची प्रसिद्धी सेवा करतांना विविध प्रकारे समाजातील व्यक्तींना संपर्क करण्याची संधी मिळाली. १८.२.२०१६ या दिवशी मला सनातनचे ग्रंथ चैतन्याच्या स्तरावर कसे कार्य करतात ? हे अनुभवायला मिळाले. अनेक ठिकाणी संपर्क करतांना धर्मशिक्षण फलक हा ग्रंथ पाहून आम्हाला भिंतींवर लिखाण करण्याची अनुमती मिळाली आणि मोठे फलक लावण्यासाठी जागाही मिळाल्या.
१. दुकानदाराने भिंतीवर धर्मशिक्षणाविषयीचे लिखाण करण्यासाठी अनुमती देणे : एका दुकानदाराकडे संपर्कासाठी गेल्यावर आम्ही सनातन संस्थेकडून आलो, असे सांगून उद्देश सांगितला आणि त्यांना धर्मशिक्षण फलक हा ग्रंथ दाखवला. त्यांनी ५ मिनिटे ग्रंथ व्यवस्थित पाहिला आणि विचारले, तुम्हाला काय हवे आहे ? आम्ही त्यांच्याकडे त्यांच्या दुकानाच्या बाहेरच्या भिंतीवर धर्मशिक्षणाविषयीचे लिखाण करण्यासाठी अनुमती मागितली. तेव्हा त्यांनी लगेच अनुमती दिली आणि धर्मशिक्षण फलक हा ग्रंथ विकत घेतला. तो ग्रंथ पाहून ते उत्साहाने म्हणाले, हा ग्रंथ मी अनेकांना दाखवून त्याप्रमाणे कृती करण्यास सांगणार आहे.

इसिसचे भारतासमोरील आव्हान !

     भारतात इसिसचे असंख्य समर्थक असून तिचे स्वागत वा समर्थन करणार्‍या पुढील घटना घडल्या.
 • शेकडो युवक इसिसमध्ये भरती होण्यासाठी भारतातून इराकमध्ये गेले. (इंडिया टूडे, ७.११.२०१४)
 • तमिळनाडूच्या रामनाथपुरम् शहरात जिहादी तरुणांनी इसिसचेे टी-शर्ट घालून स्वागत केले. (दी हिंदू, ४.८.२०१४)
 • ७ ऑक्टोबर २०१४ या दिवशी काश्मीरमध्ये इसिसचा झेंडा फडकवला गेला. (टाइम्स ऑफ इंडिया, १७.१०.२०१४)
 • बंगलोरमध्ये इसिसचा ट्विटर खाते सांभाळणार्‍या तरुण अभियांत्रिकीला अटक झाली. (टाइम्स ऑफ इंडिया, १३.१२.२०१४)
 • मुंबई येथील विमानतळावर आक्रमण करण्याची इसिसने धमकी दिली. (इंडिया टूडे १६.१.२०१५)
     या सर्व घटना चिंताजनक आहेत. याचा अर्थ इसिसचे स्वागत भारतात होऊ लागले आहे. आज काश्मीरमध्ये, उद्या बंगालममध्ये, परवा हैद्राबादमध्ये असेच घडेल; त्यानंतर प्रत्येक गावात आणि शहरात इसिसचे झेंडे फडकतील ! हे जिहादी उद्या भारतात येतील, तेव्हा ते आम्हाला काफीर ठरवून आमचे गळे चिरतील ! बांधवांनो, सांगा ! तुम्ही या जिहाद्यांचे आव्हान स्वीकारणार आहात कि मृत्यूला कवटाळणार आहात ?

आतंकवाद्यांचे लक्ष्य : हिंदु स्त्री !

इस्लामच्या प्रारंभीच्या आक्रमणापासून 
हिंदु स्त्री आणि देवळे हेच त्यांचे लक्ष्य राहिले आहे. 
 • सहस्रो राजपूत स्त्रियांनी जोहार करून आपल्या शीलाचे रक्षण केल्याचा आपला इतिहास आहे.
 • काश्मीरमध्ये १९९० मध्ये जिहाद्यांनी घोषणा केली की, तुमच्या स्त्रियांना सोडून निघून जा !

भगवंताने मानवाची शरीररचना शाकाहारच करण्यायोग्य बनवली असूनही केवळ जिभेची विकृती पुरवण्यासाठी गोमांस भक्षण करणारा मानव हा शिंग आणि शेपूट नसलेला पशूच !

सौ. कमलिनी कुंडले
१. अतिप्राचीन काळापासून गोमाता पूजनीय असून गोपाल नाव धारण करून भगवान श्रीकृष्णाने गोप्रेमाचा आदर्शच आपल्यासमोर ठेवलेला असणे
     अतिप्राचीन काळापासून ते साधारण १०० वर्षांपूर्वीपर्यंत भारतात ज्याच्याकडे गोवंश अधिक, तो सर्वांत श्रीमंत आणि समाजात पूजनीय समजला जात असे. प्रभु श्रीरामाचा पूर्वज राजा दिलीप याने गायीच्या रक्षणासाठी वाघासमोर त्याचे खाद्य म्हणून स्वतःलाच अर्पण केले होते. तसेच राजा शिबीने त्याच्या आश्रयाला आलेल्या ससाण्याच्या रक्षणासाठी त्याच्या वजनाइतके स्वतःचे मांस दिले होते. भगवान श्रीकृष्ण तर गोपाल या नावानेच प्रसिद्ध आहे. त्यामुळे आजही हिंदु लोक गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला किंवा गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, असे भजन करून त्याच्या गोप्रेमाचा आदर्श आपल्यासमोर ठेवतात.
२. आजच्या प्रगत समाजातील तथाकथित बुद्धीवादी गोमांस भक्षण करणे हा आमचा 
अधिकार आहे, असे स्वतःही समजत असून इतरांनीही ते मान्य करावे, असा अट्टाहास 
धरत असणे आणि त्यासाठी झुंडशाहीने शासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करणे
     प्राचीन काळाच्या तुलनेत आज मानवसमाज अत्यंत प्रगत समजला जातो. भारतातील तथाकथित विचारवंत, साम्यवादी, समाजवादी, बुद्धीवादी, विज्ञानवादी इत्यादीही ऊठसूठ असेच (स्वतःला प्रगत) म्हणत असतात; परंतु सध्या भारतातील गोहत्या प्रतिबंधक दंडविधानाच्या (कायदा) निमित्ताने या अत्यंत प्रगत समजल्या जाणार्‍या मानवाचे एक अत्यंत किळसवाणे अंग समोर आले आहे, ते म्हणजे गोमांस भक्षण करणे, हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे,

इसिसचे म्होरके भारतात आल्यावर काय होईल ?...

 • ...इसिसला भारतात प्रवक्ते शोधावे लागणार नाहीत; कारण येथे लादेनला लादेनजी म्हणणारे दिग्विजय सिंग येथे आहेत !
 • ...इसिसला भारतात कोणाकडे साहाय्यासाठी हात पसरावे लागणार नाहीत; कारण इशरतजहाँच्या नावाने रुग्णवाहिका काढणारे आव्हाड येथे आहेत !
 • ...इसिसला स्वतःचे फतवे पसरवण्यासाठी कोणाचे पाय धरावे लागणार नाहीत; कारण आणि भारत की बरबादीसाठी कृती करण्यासाठी सिद्ध असलेले फुटीरतावादी विद्यार्थी येथे कार्यरत आहेत !
 • ...इसिसमध्ये महिलांना भरती करण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागणार नाहीत; कारण सर्वत्र स्त्री-पुरुष समानतेच्या किंकाळ्या फोडणार्‍या तृप्ती देसाई यांची ब्रिगेड येथे आहे ! 

भारतियांनो, क्रांतीकारकांचा आदर्श घेऊन त्यांचे बलीदान व्यर्थ जाऊ न देता स्वतःही क्रांतीकारक व्हा !

       आमच्या छावणीमध्ये मध्यंतरी १४ ते १५ वर्षांचा मुसलमान मुलगा औषध उपचारासाठी आला. (काश्मीरमध्ये जवळपास प्रत्येक सेनेच्या छावणीत काश्मिरी मुसलमान विनामूल्य उपचार घेण्यासाठी येतात.) मी त्याला त्याचे नाव, शाळा याविषयी चौकशी केली. मी त्याला विचारले, तू मोठे होऊन काय बनणार ? त्यावर त्याने मी मुजाहिदीन (आतंकवादी) बनणार, असे सांगितले. मी त्याला विचारले, तुला आतंकवादी का बनायचे आहे ? त्याने काय होईल ? त्या वेळी तो अभिमानाने म्हणाला, आतंकवादी झाल्यावर मला ३० सहस्र रुपये मिळतील आणि मी जिहादसाठी शहीद होईन. त्यामुळे मला जन्नत मिळेल आणि लोक म्हणतील, शहिद तेरे खुन से इन्कलाब आयेगा ।

हिंदूंनो, मोठ्या संख्येतील प्रशिक्षित मुसलमान महिला अतिरेक्यांशी लढण्यास तुम्ही सिद्ध आहात का ?

      पाक महिला अतिरेकी तयार करत आहे, असे वक्तव्य सेनाप्रमुख जन. दीपक कपूर यांनी केले होते. भारताच्या दृष्टीने हे फार मोठे संकट आहे. तालिबान तसेच इतर अतिरेकी संघटनांकडून फार पूर्वीपासून अशा प्रकारे महिला अतिरेक्यांची फौज निर्माण होत आहे. स्वतःचे घर, मुले-बाळे आणि संसार यांत रममाण झालेले हिंदू या नव्या संकटापासून अनभिज्ञ आहेत. या संकटाला सामोरे जाण्यासाठी आता हिंदूंना स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याविना पर्याय नाही ! या महिला अतिरेक्यांना कशा प्रकारे प्रशिक्षण दिले जाते, याची माहिती होण्यासाठी एका राष्ट्राभिमान्याने प्रसारित केलेली काही छायाचित्रे प्रसिद्ध करत आहोत. ती बघून तरी हिंदू जागृत होवोत, हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना !

आतंकवाद

      शत्रूराष्ट्रांनी भारताशी पुकारलेला आतंकवाद हे अघोषित युद्धच आहे. पाकिस्तान आणि चीन यांच्याशी झालेल्या युद्धांतही भारताची झाली नाही, इतकी हानी या आतंकवादामुळे झाली आहे.
आतंकवादाच्या समस्येची भयावह व्याप्ती !
१. एकट्या देहली नगरात (दिल्लीमध्ये) वर्ष १९९६ ते २००८ या काळात अतिरेक्यांनी १२ मोठे स्फोट करून कित्येक लोकांचे बळी घेतले.
२. भारतात गेल्या ८ वर्षांत मुसलमान अतिरेक्यांनी विविध ठिकाणी ३ सहस्र ५०० स्फोट करून २० सहस्र लोकांचे बळी घेतले आहेत.
३. अतिरेक्यांनी भारतातील बहुतेक सर्व शहरे, रेल्वे, मंदिरे, सैनिकी तळ, विधानसभा, संसद इत्यादी दाटीच्या (गर्दीच्या) ठिकाणांना लक्ष्य बनवले आहे.
- श्री. शंकर गो. पांडे

जम्मू-काश्मीर येथील हिंदूंच्या शिरकाणाच्या वेळी क्रूर मनोवृत्तीच्या आतंकवाद्यांनी हिंदूंना दिलेल्या मरणयातना

हिंदूंनो, काश्मिरी पीडितांना अशा पराकोटीच्या छळाला 
आणि क्रौर्याला सामोरे जावे लागले. अशा यातनांना सामोरे 
जाण्यापेक्षा आतंकवादाच्या विरोधात वेळीच संघटित व्हा ! 
 • लोखंडी तारांनी गळा आवळून मारणे
 • फासावर लटकवणे
 • तीक्ष्ण हत्याराने भोसकणे
 • तप्त लोखंडाचे चटके देणे

भारतीय राज्यकर्त्यांनो, आतंकवाद असा रोखावा !

      विश्‍वातील अनेक देशांत ज्यांनी आतंकवादी आक्रमणे होऊ दिली नाहीत, त्यांनी आपल्या न्यायव्यवस्थेतही सुधारणा केली आहे. भारतात जोपर्यंत आतंकवादी कारवाई करत असतांनाच एखाद्याला पकडले जात नाही, तोपर्यंत त्याला शिक्षा होत नाही. आतंकवादी कृत्य करणार्‍यांपेक्षा त्यांना साहाय्य करणारे, त्यांची मानसिकता घडवणारे, त्यांना सामग्री आणि आश्रय देणारे जास्त मोठे गुन्हेगार आहेत. हे लोक आतंकवादी वृत्तीला प्रोत्साहन देतात. अस्तनीतील निखारा कोण हे ओळखून त्याला शिक्षा केली पाहिजे. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये वारंवार आतंकवादी आक्रमणे का होत नाहीत ? तर तेथे न्यायप्रक्रिया आणि न्यायव्यवस्था यांत आवश्यक त्या सुधारणा वेळोवेळी केल्या जातात; म्हणून तेथे आतंकवाद रोखण्यात यश मिळते. अमेरिकेत असा निर्णय घेतलेला आहे की, आतंकवादी आक्रमण होण्याची वाट न पहाता ते होण्याची शक्यता दिसली, तरी त्वरित प्रतिबंधक कारवाई करावी. अशी कारवाई अमेरिकेत कोणत्याही कानाकोपर्‍यातसुद्धा जाऊन केली जाते. - दत्तात्रेय शेकटकर, निवृत्त लेफ्टनंट जनरल

आतंकवादाने केलेली भारताची अपरिमित हानी !

 • १९८० पासून चालू झालेल्या जिहादी आतंकवादामुळे देशाची ४५,००० कोटी रुपयांची हानी झाली आहे. 
 • आतंकवादामुळे ६ लाख कुटुंबे विस्थापित झाली आहेत. 
 • वर्ष १९९७ ते २००७ या १० वर्षांत आतंकवादाने ७१,००० लोकांचा बळी घेतला आहे. - श्री. साई मनोहर, वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा. 
 • आतंकवादामुळे सुरक्षादलाचे जवान आणि पोलीस असे एकूण ९,००० जण प्राणाला मुकले आहेत. 
 • एकट्या काश्मीरमध्ये सहदााो हिंदू स्त्रियांवर बलात्कार आणि ९३,००० हून अधिक हिंदूंच्या हत्या केल्या गेल्या आहेत. अतिरेक्यांनी तेथील हिंदूंच्या ९५ टक्के घरांची लूट केली आहे. काश्मिरी हिंदूंकडून १४,४३० उद्योगधंदे आणि दुकाने स्वतःच्या कह्यात घेतली आहेत. त्यांनी हिंदूंच्या शेकडो प्राचीन आणि ऐश्‍वर्यसंपन्न मंदिरांचा विध्वंस करून तेथील देवतांच्या मूर्तींची विटंबना केली आहे. या आतंकवादामुळे ४ लक्ष काश्मिरी हिंदु त्यांच्या मातृभूमीतून विस्थापित झाले आहेत. 
 • पाकशी युद्ध अन् पाकपुरस्कृत आतंकवाद यांच्याशी भारताला सामना करावा लागला नसता, तर भारताच्या प्रगतीचा वेग आणखी ३.५ ते ४ टक्क्यांनी वाढला असता ! - ज्येष्ठ पत्रकार श्री. अरुण रामतीर्थकर, सोलापूर

जिहाद्यांचे सर्वसाधारण नियम !

१. तुम्ही रस्त्याच्या कडेला उभे असणार्‍या माणसाला मारलेत, तरी त्याविषयी स्वत:ला दोषी समजू नका. कुराणात म्हटले आहे की, योग्य कारणाशिवाय जीव घेऊ नका; कारण अल्लाने जीवाला पवित्र केले आहे. तुमच्याशी जे लढत आहेत, त्यांच्याशी अल्लाच्या उद्दिष्टासाठी लढा; पण मर्यादा ओलांडू नका. कारण मर्यादा ओलांडणारे लोक अल्लाला आवडत नाहीत. कारबाँबच्या संबंधात काही इस्लामिस्ट म्हणतात की, कोणी काय करावे, हे देव ठरवतो.
२. तुम्ही लहान मुलांना मारू शकता. त्याबद्दल दु:ख मानण्याचे कारण नाही. दहशतवादी इस्लामिस्ट एलक्वायडाचे तत्त्वज्ञान नवीन जिहाद्यांना शिकवतांना म्हणतात, बालकांना मृत्यू झाल्यावर विशेष सुखसोर्यी मिळतात. वयात येण्यापूर्वी केलेल्या कृत्यांना पापी समजण्यात येणार नाही. जिहादी कार्यात मृत्यू पावल्यास तुम्ही लगेच स्वर्गात जाल. तिथली सर्व सुखे तुम्हास लगेच प्राप्त होतील.
(साभार : धर्मभास्कर)

भारताचे आध्यात्मिक स्तरावरील एकमेकाद्वितीयत्व स्पष्ट करणारी पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

आतंकवादग्रस्त इराक, आर्थिकदृष्ट्या बलशाली अमेरिका 
आणि आध्यात्मिक देश भारत यांतील आध्यात्मिक 
स्तरावरील भेद स्पष्ट करणारी पिप तंत्रज्ञानाच्या 
साहाय्याने घेतलेली वातावरणातील प्रभावळींची छायाचित्रे !
सूचना : ही वातावरणातील प्रभावळीची चाचणी असल्याने पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) छायाचित्र क्र. २, ३ आणि ४ यांची तुलना मूलभूत प्रभावळीशी (छायाचित्र क्र. १) करतांना छायाचित्रातील पटल, तसेच नकाशा यांवरील रंग येथे ग्राह्य धरलेले नाहीत.
       १५ ऑगस्ट २०१५ या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली. भारताच्या भविष्याचा विचार करता भारतियांसाठी एकीकडे भारताचे भविष्य उज्वल आहे, असे अनेक संत आणि द्रष्टे पुरुष यांचे सांगणे आश्‍वस्त करणारे आहे. भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. कलाम यांनी वर्ष २०२० पर्यंत भारताला जगातील आर्थिक महासत्तांपैकी एक बनवण्याचा दिलेला आराखडाही आशादायी आहे, तर दुसरीकडे भारतीय युवा पिढीचे अमेरिकेत जाण्याचे वाढते आकर्षण चिंताजनक बनले आहे. हिंदुस्थान टाइम्स या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा मिळवणार्‍या भारतियांची संख्या वर्ष २०२० पर्यंत वाढून तिप्पट म्हणजे २१ लाख होईल, असे म्हटले आहे.

मुल्ला-मौलवी यांनी आय.एस्.आय.एस्.च्या विरोधात मुसलमान समाजात जागृती करावी !

       आयएस्आयएस्ला इस्लामी स्टेट निर्माण करायचे आहे. त्यासाठी ते इस्लाम न मानणार्‍या निरपराध्यांना प्रतिदिन कंठस्नान घालत आहेत. या संघटनेचा धोका अखिल मानवजातीला असल्याने मुल्ला-मौलवी यांनी मुसलमान तरुणांना धर्मांध न बनवता योग्य मार्गाने नेण्याचा विडा उचलायला हवा. त्यातच सगळ्यांचे कल्याण आहे.

साधना करून आत्मबळ वाढवा !

       इसिसच्या बंदुका किंवा शस्त्रास्त्रे ही त्यांची शक्ती नसून त्यांची कट्टर धर्मांधता हेच त्यांचे प्रमुख शस्त्र आहे. धर्मांधतेला धर्मांधतेने नव्हे, तर धर्मशक्तीने उत्तर द्यावे लागते. रावणाला ठार करण्यासाठी राम व्हावे लागते. कंसाला ठार करण्यासाठी कृष्णाचे गुण अंगी आणावे लागतात; म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी ५ पातशाह्यांना उद्ध्वस्त केले. आपले राजे या सर्वांना पुरून उरले; कारण त्यांनी साधना केली होती. त्यांची कुलदेवी श्री भवानीदेवीचा ते अखंड नामजप करत असत. आपणही या धर्मांधांना तोंड देण्यासाठी धर्मशक्ती वाढवणे म्हणजे साधना करणे आवश्यक आहे. त्याविषयी तुम्ही सनातन संस्थेच्या संकेतस्थळांना भेट द्या ! येथील ग्रंथ घ्या, त्यातून धर्माचरण शिका, ते कृतीत आणा आणि धर्मबळ वाढवा !

प.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याचा आरंभ झालेल्या ६.३.२०१६ (माघ कृष्ण पक्ष द्वादशी, शके १९३७) या दिवसाची वैशिष्ट्ये !

      माघ कृष्ण पक्ष द्वादशी, शके १९३७ म्हणजे ६.३.२०१६ या दिवशी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या अवतारकार्याला आरंभ झाला आहे, असे महर्षींनी घोषित केले. या महत्त्वाच्या दिवसाचे ज्योतिषशास्त्रानुसार विश्‍लेषण त्यांच्याच कृपेने आणि सूक्ष्म प्रेरणेने लक्षात आले. ते पुढे दिले आहे.
१. श्री लावण्यास सांगणे, ही श्रीकृष्णाची लीला ! : द्वादशी या तिथीचा स्वामी (अधिपती) हरि (श्रीकृष्ण) आहे. यापूर्वी महर्षींनी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे स्वयं श्रीविष्णूचा अवतार आहेत, असे सांगितले. द्वादशी तिथीला त्यांच्या नावाच्या आधी श्री लावण्यास सांगितले, ही श्रीकृष्णाची लीलाच आहे, असे वाटले.
२. मकर रास आणि विविध दिनांकांचा संबंध : प.पू. डॉक्टरांची जन्मरास मकर आहे.
अ. ६.३.२०१६ या दिवशी मकर रास होती.
आ. प.पू. डॉक्टर हे स्वयं श्रीविष्णूचा अवतार आहेत, असे सांगितले, त्या दिवशी म्हणजे १०.५.२०१५ ला मकर रासच होती.

६.३.२०१६ या दिवसाचे ज्योतिषशास्त्रानुसार विश्‍लेषण करतांना आलेल्या अनुभूती

सौ. प्राजक्ता जोशी
१. प्रत्यक्ष नाडीवाचन कोणत्या वेळेत झाले असावे ? असे वाटून वेळेविषयीचा विचार मनात येणे आणि तो अचूक असणे : श्रीजयंत बाळाजी आठवले, जय गुरुदेव । असा जयघोष झाल्यानंतर मला त्याविषयी कळले. गुरुदेवांच्या कृपेने आणि प्रेरणेने प.पू. डॉक्टरांच्या कुंडलीत आजची ग्रहस्थिती अभ्यासावी, असा विचार आल्याने ते अभ्यासल्यावर वरील योग कळले. त्यानंतर प्रत्यक्ष नाडीवाचन कोणत्या वेळेत झाले असावे ? असा विचार मनात येताच सकाळी झाले असावे, असा विचार आला. प्रत्यक्ष कुंडली करण्याची सेवा करतांना एक वेळ मनात आली. मी तशी कुंडली अभ्यासली आणि कुतूहलापोटी नाडीवाचन सेवेच्या स्थळी असणार्‍या साधकांना विचारले. त्यांनी वेळ अचूक असल्याचे सांगितले. त्या वेळी महर्षि आणि प.पू. डॉक्टर यांच्या चरणी कृतज्ञतेने मनोमन नतमस्तक झाले.
२. शारीरिक त्रास वाढले, तरी सेवा करण्याचा उत्साह वाढणे आणि चंदनाचा सुगंध सतत येणे : या काळात शारीरिक त्रास वाढल्यावर झोपून सेवा करण्याचा उत्साह वाढला. टंकलेखन करण्याचे त्राण नसल्याने महत्त्वाचे अभ्यासलेले योग लिहून ठेवले. सेवा करतांना आणि झाल्यावर चंदनाचा सुगंध सतत येत होता. मन प्रसन्न होते.

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

 • स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
 • साधकांनी कारागृहात असतांना साधना, राष्ट्र, आणि धर्म (तात्त्विक विषय) यांच्या संदर्भात केलेले लिखाण
        वर्ष २००९ मध्ये मडगावला एका दुचाकीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे नाचणार्‍या पोलिसांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास, तसेच त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. या अशा कठीण प्रसंगांना साधकांनी केवळ साधनेच्या बळावर धीरोदत्तपणे तोंड दिले. यातून वाचकांच्या मनावर साधनेचे महत्त्व ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेच्या अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयी केलेले तात्त्विक चिंतन पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

पू. (सौ.) बिंदाताई या देवाच्या आभूषणांसारख्या असणे आणि त्यांच्या नावातच सुगंध असणे

महर्षींची शिकवण आणि कार्य !
महर्षींनी पू. (सौ.) बिंदाताई 
यांच्याविषयी काढलेले कौतुकोद्गार ! 
पू. (सौ.) अंजली गाडगीळ
      पू. (सौ.) बिंदाताईंचे जन्मनक्षत्र उत्तराफाल्गुनी असल्याने महर्षी नाडीत त्यांचा उल्लेख अत्यंत लडीवाळपणे आमची उत्तरापुत्री असा करतात. ५२ क्रमांकाच्या नाडीवाचनात महर्षी म्हणतात - तिच्या नावात सुगंध आहे. ती देवाच्या आभूषणांसारखी आहे. कृष्णासमवेत जशा गोपी असतात, तशीच ही आश्रमात श्रीकृष्णासोबत आहे. जसा फुलासोबत सुगंध असतो, तशीच ही आहे. हिची रास कन्या आहे. जन्मवार मंगळवार आहे. हिच्या आणि गुरूंच्या जन्माची वेळ जवळजवळ सारखीच, म्हणजे १ - २ मिनिटे मागेपुढे आहे. (हे सर्व सत्य आहे. - सौ. गाडगीळ) तिचा जन्म महालय अमावास्येच्या दिवशी जरी झाला असला, तरी तिला आम्ही असा जन्म का दिला, तर अनेक जणांना अमावास्येला जन्म असल्याने गती मिळत नाही; परंतु हिच्या आशीर्वादाने त्यांना गती मिळेल. ही उत्तरापुत्री गुरूंसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, त्रिची, तमिळनाडू. (१.३.२०१६, सकाळी १०.२८)
न हि प्रमादात् परमस्ति किञ्चित् वधो नराणामिह जीवलोके ।
प्रमत्तमर्था हि नरं समन्ततात् त्यगन्त्यनर्थाश्‍च समाविशन्ति ॥ - महाभारत
अर्थ : या लोकी मनुष्यांना बेसावधपणापेक्षा अधिक घातक असे काही नाही. बेसावध रहाणार्‍या मनुष्याला सर्व प्रकारची संपत्ती सोडून जाते आणि त्याच्यावर संकटे मात्र कोसळतात. अगदी याप्रमाणेच राजा रामदेव बेसावध राहिला आणि राज्य परकीय म्लेंच्छांच्या कह्यात गेले.

हिंदु धर्मशास्त्रातील अन्नदानाचे अनन्यसाधारण महत्त्व जाणून राष्ट्र-धर्म कार्यासाठी निष्काम आणि समर्पित वृत्तीने सेवा करणार्‍या सनातन आश्रमांतील शेकडो साधकांच्या अन्नदानाकरता धनरूपात साहाय्य करा !

वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
     राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध असणारी अन् त्यासाठी प्रभावीपणे कार्य करणारी सनातन संस्था ही एकमेव संस्था आहे. भारतात विविध ठिकाणी संस्थेचे आश्रम आहेत. तेथे अध्यात्म आणि धर्मशिक्षण यांविषयी ज्ञान देणारे ग्रंथ, नियतकालिके, ध्वनीचित्र-चकती आदींच्या निर्मितीची सेवा अविरतपणे चालू असते. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेचे उद्दिष्ट समोर ठेवून निष्काम आणि समर्पित वृत्तीने अखंड सेवारत असलेलेे शेकडो साधक या आश्रमांत वास्तव्याला असतात. त्यांच्यासाठी अन्नदानाकरता धनरूपात साहाय्य करून आध्यात्मिक लाभ मिळवण्याची सुवर्णसंधी सर्व धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांना उपलब्ध आहे.
१. हिंदु धर्मशास्त्रानुसार अन्नदानाचे महत्त्व
     हिंदु धर्मशास्त्रानुसार जो गृहस्थ अर्थार्जन करतो आणि ज्याच्या घरी अन्न शिजते, त्याने अन्नदान करणे हे त्याचे कर्तव्यच आहे. अन्नदानामुळे भोक्ता तृप्त होऊन आशीर्वाद देतो; म्हणून अन्नदान करणे हे श्रेष्ठ कर्म मानले जाते. अन्नदान केल्यास कोणत्या ना कोणत्या रूपाने अन्नदानाच्या दुप्पट फळ अन्नदात्याला मिळते; परंतु अहंपोटी अन्नदान केल्यास फळ निम्मे होते.

सनातन धर्मातील भविष्य लिखाण आणि अन्य धर्मीय, तसेच राष्ट्रे यांचे इतिहास लिखाण यांतील भेद !

पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे
ऋषींनी सांगितलेले सनातन धर्माचे 
(हिंदु धर्माचे) भविष्य, जो पुढे इतिहास झाला !
अ. वेद, चारही युगांविषयी, तसेच वाल्मीकिऋषींनी लिहिलेले रामायण असो, महर्षि व्यासांनी लिहिलेले महाभारत असो किंवा वर्तमानात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २०२३ मध्ये येऊ घातलेल्या हिंदु राष्ट्राविषयी केलेले लिखाण असो, ते भविष्यात काय घडणार ? यांविषयी लिहिले गेले.
आ. समाजाने ते सनातन धर्माचा इतिहास म्हणून स्वीकारले आहे.
इ. प्रत्यक्षात ते द्रष्ट्या ऋषीमुनींनी लिहिलेले भविष्य होते; किंबहुना ते ईशशक्तींचे संकल्प होते, जे भविष्यात साकार झाले आहेत आणि होणार आहेत.

सिंहस्थ कुंभपर्वात सेवेसाठी गेल्यावर नागा साधूंविषयी आलेले अनुभव

श्री. राजेश उमराणी
१. सिंहस्थाच्या मिरवणुकीतील काही क्षणचित्रे
१ अ. मिरवणुकीत सहभागी झालेल्या साधकांच्या हातातील कापडी फलक काढून घेऊन त्यांच्या गाडीत ठेवणे : नागा साधूंची मिरवणूक (पेशवाई) चालू असतांना त्यांच्या प्रमुखांनी आम्हाला मिरवणुकीत सहभागी व्हायला सांगितले; परंतु त्यांचे काही सहकारी साधकांना म्हणाले, तुम्ही दुसर्‍यांच्या कार्यक्रमात कशाला नाचायला येता ? आम्ही तुमच्या कार्यक्रमात नाचायला येतो का ? आम्ही पैसे व्यय केले आहेत आणि तुम्ही न बोलावलेल्या पाहुण्यांप्रमाणे आला आहात. त्यांनी आम्हाला मिरवणुकीत सर्वांत शेवटी रहायला सांगितले. त्याप्रमाणे आम्ही शेवटी राहिलो. मिरवणूक चालू झाल्यानंतर हळूहळू आम्ही मिरवणुकीत पुढे गेलो. एक साधू साधकांकडे असलेले कापडी फलक पाहून चिडले आणि त्यांनी इतर साधूंना बोलावून साधकांकडे असलेले १२ फुटीचे २ फलक काढून घेऊन त्यांच्या गाडीमध्ये ठेवून दिले. त्यानंतर आम्ही मिरवणूक संपेपर्यंत शेवटीच राहिलो.
१ आ. एका टॅ्रक्टरमध्ये सिंहासनावर बसलेले एक साधू परदेशी पाहुणे दिसले की, स्वतःहून त्यांना फूल द्यायचे; परंतु भारतीय भाविक महिलांनी पदर पसरून फूल मागितल्यावर त्यांच्याकडे मात्र ते क्वचितच् फूल द्यायचे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प.पू. दास महाराजांनी आरंभलेले मौनव्रत निर्विघ्नपणे पार पडावे, याकरिता पानवळ आश्रमातील विविध सेवांसाठी साधकांची आवश्यकता !

साधकांना अनमोल संतसेवेची सुवर्णसंधी !
      पानवळ, बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वर्षभर मौनव्रत करत आहेत. हे व्रत निर्विघ्नपणे आणि परिपूर्णपणे पार पडावे, यासाठी पानवळ आश्रमातील सेवा करण्यासाठी साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी साधक-दांपत्यही चालू शकेल. आश्रमात पुढील सेवा उपलब्ध आहेत.
१. पूजा : पूजेची सिद्धता करून पूजा करणे
२. स्वच्छता : आश्रम, मंदिर, तसेच परिसर यांची स्वच्छता करणे
३. बागेची देखभाल करणे : आश्रम परिसरातील झाडांना पाणी घालणे आणि त्यांची निगा राखणे, तण वाढल्यास ते काढण्याचे नियोजन करणे, पाण्याची टाकी भरण्यासाठी पंप चालू करणे, आश्रमात पाळण्यात येणार्‍या गायीची देखभाल करणे
४. अन्य : आश्रमात येणार्‍यांचे आदरातिथ्य करणे आणि महाराज मौनव्रतात आहेत, याची त्यांना कल्पना देणे,
     प.पू. दास महाराजांना वेळेवर औषधे देणे, भोजन देणे, मर्दन (मालिश) करणे, पू. (सौ.) माईंना स्वयंपाकघरात साहाय्य करणे, मंडईत जाऊन आवश्यक साहित्य आणणे
     साधक स्वतःच्या सोयीनुसार शक्य तेवढे दिवस सेवेत सहभागी होऊ शकतात. जे साधक ही सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून dharmatej2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर पुढील माहिती पाठवावी. साधकत्व आणि सेवाभाव असलेल्या साधकांना या सेवेसाठी पाठवण्याचे जिल्हासेवकांनी नियोजन करावे.
     साधकांनो, संतसेवेच्या माध्यमातून स्वतःचा उद्धार करण्याची अमूल्य संधी गुरुकृपेमुळे लाभत असल्याविषयी कृतज्ञता बाळगा !

वर्णाश्रमव्यवस्थेचा अर्थ जाणून न घेता सनातनची मानहानी करणारे तथाकथित जन्मब्राह्मण !

      सनातनची मानहानी करणारा खालील व्हॉट्स अ‍ॅप संदेश हेतुतः प्रसारित केला जात आहे.
     आत्ताच गोव्यातील काही ब्राह्मण युवा कार्यकर्त्यांचा फोन आला. त्यांनी अत्यंत धक्कादायक अशी माहिती दिली आणि मदतीचे आवाहन केले आहे. गोव्यातील सनातन आश्रमात एका ब्राह्मण मुलीचे इतर खालच्या जातीच्या मुलासोबत १ मे रोजी लग्न लावून देण्यात येणार आहे. मुलीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध असून आश्‍चर्य म्हणजे आई-वडील देखिल सनातनचे साधक आहेत.
     अशाच आशयाचा आणखी एक संदेश सनातनचे नाव न घेता प्रसारित केला जात आहे. हे व्हॉट्स अ‍ॅप संदेश पाठवणार्‍यांनी स्वतःचे धर्मशास्त्राविषयीचे अज्ञान प्रकट केले आहे. भगवान् श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे,
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।
- अध्याय ४, श्‍लोक १३
अर्थ : मी गुणकर्मानुसार चार वर्णांची निर्मिती केली आहे.
     भगवान् श्रीकृष्णाला अपेक्षित असलेला वर्ण म्हणजे जात नव्हे, हे लक्षात घेतले पाहिजे. अध्यात्माचे अध्ययन आणि अध्यापन ही ब्राह्मण-साधना होय. या अर्थाने पाहिल्यास सनातनचा प्रत्येक साधक अध्यात्माचा अभ्यास करतो, स्वतः साधना करतो आणि समाजातही अध्यात्मप्रसार करतो.

विविध सेवांसाठी वाराणसी सेवाकेंद्रात साधकांची तातडीने आवश्यकता !

सर्वत्रच्या साधकांना गुरुसेवेची सुवर्णसंधी
     वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात वाहन, संगणक देखभाल आणि दुरुस्ती, प्रसार, लेखा आदी दैनंदिन सेवा, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा यांसाठी साधकांची आवश्यकता आहे.
     जे साधक पूर्णवेळ किंवा काही कालावधीसाठी सेवाकेंद्रात राहून या सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून रामनाथी आश्रमात कु. प्रियांका जोशी यांच्याशी ०८४५१००६०६३ या क्रमांकावर अथवा dharmatej2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.

विविध सेवांसाठी देवद आश्रमात साधकांची तातडीने आवश्यकता !

साधकांना गुरुसेवा करण्याची सुसंधी !
     देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वाहन, स्वयंपाक, उत्पादन-बांधणी आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे. जड साहित्य उचलू शकणार्‍या साधकांसाठी मागणी-पुरवठा संबंधी विविध सेवा उपलब्ध आहेत. जे साधक पूर्णवेळ, काही कालावधीसाठी किंवा शनिवार आणि रविवार अन् अन्य सुटीच्या दिवशी आश्रमात येऊन सेवा करू शकतात, त्यांनी खालील सारणीनुसार माहिती भरून ती जिल्हासेवकांच्या माध्यमातून devadashram@gmail.com संगणकीय पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी. शाळा आणि महाविद्यालये यांना लवकरच सुटी लागणार असल्याने युवा साधकही या सेवेत सहभागी होऊ शकतात.

     देश केवळ अल्-कायद्याचेच नव्हे, तर १७३ आतंकवादी संघटनांचे लक्ष्य आहे.
- श्री. हरीश लखेडा (अमर उजाला, १५.७.२००७) (हिन्दी मासिक ठेंगेपर सब मार दिया, ऑक्टोबर २००७)

बोधचित्र


योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

साधकाचे शत्रू
     द्वेष, मत्सर आणि अहंकार हे साधकाचे प्रमुख शत्रू आहेत. त्यांच्यावर विजय मिळवला की, प्रगती झालीच !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥

(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
अढळपद
     अशा ठिकाणी बसा की, तुम्हाला जिथून कोणी ऊठ म्हणून सांगणार नाही. असे बोला की, हे खोटे आहे असे कोणी बोलणार नाही.
भावार्थ :
ब्रह्मस्थितीला पोहोचल्यावर ऊठ असे म्हणायला दुसरा कोणी उरतच नाही आणि ती सर्वव्यापी अवस्था असल्याने तिथून उठायचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. हे खोटे आहे असे कोणी बोलणार नाही, असा बोलण्याचा विषय म्हणजे ब्रह्माची किंवा परमेश्‍वराची अनुभूती. मायाच खोटी असल्याने मायेतील सत्य बोलणेही खोटेच असते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     धर्मद्रोही हिंदूंनी उद्या पुरुषांनाही बाळाला जन्म देण्याचा अधिकार असावा, या मागणीसाठी देवाकडे मोर्चा नेल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
इस्लामिक स्टेटला हिंदु राष्ट्र हेच उत्तर !

      कालपर्यंत सिरिया, इराक आणि त्याच्या आजूबाजूतील काही भागांत अस्तित्वात असणार्‍या इस्लामिक स्टेट (इसिस) या जिहादी आतंकवादी संघटनेने प्रथमच हिंदूंना ठार करण्याची भाषा केली आहे. इसिसचे मुखपत्र असणार्‍या दाबिकमधून बांगलादेशमधील इसिसचा प्रमुख शेख अबू इब्राहिम अल-हनीफ याने म्हटले आहे की, भारतावर पाक आणि बांगलादेशच्या बाजूने आक्रमण करून हिंदूंना ठार करण्यात येणार आहे. बांगलादेशातही हिंदूंना आणि इस्लाम न मानणार्‍यांना ठार करून शरीया लागू करणार आहे. इसिसकडून पहिल्यांदाच हिंदूंना ठार करण्याची भाषा उघडपणे करण्यात आली आहे. गेल्या एक सहस्र वर्षांपासून धर्मांध मुसलमानांचे भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचे स्वप्न राहिले आहे. ७०० वर्षे भारतावर राज्य करूनही भारताला ते इस्लामी राष्ट्र करू शकलेले नाही; मात्र भारताचे तुकडे करून पाक आणि नंतर बांगलादेश सारखे मुसलमानबहुल देश निर्माण झाले. या दोन्ही देशांत हिंदूचा गेल्या ६७ वर्षांपासून वंशसंहार होत आहे. त्यामागे इस्लामिक स्टेट इस्लामी आतंकवादी, जिहादी आहेत. तेच भारताला इस्लामी राष्ट्र करू पहात आहेत; मात्र त्यात ते अद्याप पूर्णपणे यशस्वी होऊ शकलेले नाही; कारण ईश्‍वरी चैतन्य आणि हिंदूंनी त्यांना केलेला विरोध.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn