Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !


आज श्रीरामनवमी
आज रामदासस्वामी जयंती

भारतावर पाक आणि बांगलादेश मार्गे आक्रमण करण्याचा इसिसचा कट !

हिंदूंवर आक्रमण करण्याची प्रथमच धमकी !
हिंदूंनो, इसिसचे आक्रमण परतवून लावण्यासाठी संघटित होऊन स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !
       नवी देहली - इसिसने भारतावर बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांच्या बाजूने गनिमीकाव्याद्वारे आक्रमण करण्याचा कट रचला आहे. (पठाणकोटमधील वायूदल केंद्राचे रक्षण करू न शकणारे केंद्रातील शासन इसिसपासून भारताचे रक्षण करणार का ? - संपादक) इसिसने दाबिक या ऑनलाईन मासिकाच्या माध्यमातून हा खुलासा केला आहे. यात प्रथम हिंदूंना लक्ष्य करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. हिंदूंना आणि इस्लामला न मानणार्‍यांना ठार करून बांगलादेशात शरीया लागू करणार असल्याचे म्हटले आहे. (आतंकवाद्यांना धर्म नसतो, असे म्हणणार्‍या ढोंगी निधर्मीवाद्यांना चपराक ! - संपादक) भारतावर आक्रमण करून बांगलादेशात इसिसचा गड बनवण्याचा आतंकवाद्यांचा कट आहे. भारतावर आक्रमण करण्यासाठी इंडियन मुजाहिदीन इसिसला सहकार्य करत असल्याची माहिती मिळाली आहे.
१. बांगलादेशमधील इसिसचा प्रमुख शेख अबू इब्राहिम अल-हनीफ याची एक मुलाखत दाबिकमध्ये प्रकाशित झाली आहे. यात अबूने भारतातील हिंदूंना पहिल्यांदा खुले आव्हान दिले आहे. तो म्हणाला की, भारतात हिंदूंनी इस्लामच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. भारतात मुसलमान समाजाला हिंदू लक्ष्य करत आहेत. बांगलादेशातही काही मुसलमान इस्लामच्या विरोधात काम करत आहेत. (चोरांच्या उलट्या बोंबा ! भारतात अल्पसंख्यांक धर्मांधच हिंदूंवर आक्रमण करत आहेत ! - संपादक) २. बांगलादेशातील शेख हसीना यांच्या शासनावर टीका करतांना अबूने म्हटले की, येथील निधर्मी शासनामुळे उच्च पदांवर हिंदूंच्या नियुक्त्या होत आहेत, ज्या चुकीच्या आहेत.

गडचिरोलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाच्या वेळी नक्षलवाद्यांनी केलेल्या आक्रमणात एक जण ठार !

      गडचिरोली - अहेरी तालुक्यात छीलेवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नक्षलवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात माजी आमदार दीपक अत्राम यांचा अंगरक्षक ठार झाला. या कार्यक्रमाला डॉ. आंबेडकरांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबई आणि पुणे येथील लष्करी कार्यालयांना इसिसपासून धोका

आतातरी पोलीस प्रशासन आणि गृह विभाग आतंकवाद्यांना 
शोधून काढण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबवणार का ?
      पुणे - इसिसचे (आयएसआयएसचे) आतंकवादी मच्छीमारांच्या वेशात मुंबई आणि पुणे येथील लष्करी कार्यालयांमध्ये घातपात घडवण्याची शक्यता आहे. यासंबंधी गुप्तचर यंत्रणांनी नव्याने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
     या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिसांनी लोहगाव विमानतळ, लष्कराचे दक्षिण मुख्यालय, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि अन्य लष्करी कार्यालये यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यास आरंभ केला आहे. मुंबईमध्ये २६/११ चे आक्रमण आतंकवाद्यांकडून सागरी मार्गाने करण्यात आले होते. पुन्हा तसे आक्रमण होऊ नये, यासाठी समुद्रातील पहारा वाढवण्यात आला आहे. दरम्यान पुणे आतंकवादविरोधी पथकाने लोहगाव विमानतळाचे सेक्युरिटी ऑडिट करण्याचा प्रयत्न केला होता; पण हे विमानतळ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अखत्यारित असल्याने त्यांच्या अनुमतीशिवाय हे ऑडिट करण्यात येणार नसल्याचे समजते.


पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारीच सर्व गोंधळाला उत्तरदायी ! - सर्व संघटनांचे मत

धर्माभिमान्यांच्या बैठकीस ५०० हून अधिक भाविकांची उपस्थिती
कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात तृप्ती देसाई यांनी घुसण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण
कोल्हापूर येथील बैठकीस उपस्थित विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते
  • तृप्ती देसाई यांना मोक्का लावण्याची सर्व भाविकांची संतप्त मागणी. तृप्ती देसाईंना दिलेल्या पोलीस संरक्षणाचे पैसे त्यांच्याकडून वसूल करा.
  • एकाही भाविकावर कारवाई झाल्यास प्रसंगी कोल्हापूर बंद
  • दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका घोषित करू.
      कोल्हापूर - १३ एप्रिल या दिवशी हिंदु धर्मश्रद्धाभंजक तृप्ती देसाई यांना कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन मिळण्यासाठी पोलीस प्रशासनाने आटापिटा केला. या वेळी पोलीस प्रशासनाने भाविकांना अवमानकारक वागणूक दिली. त्याचा निषेध व्यक्त करून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी येथील हिंदु एकताच्या कार्यालयातील पटांगणात श्री अंबाबाई देवस्थान शांतता समितीच्या पुढाकाराने १४ एप्रिल या दिवशी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी भाजप, शिवसेना, पथकरविरोधी कृती समिती, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट, रणरागिणी शाखेच्या संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर, बजरंग दल, श्री महालक्ष्मी मंदिरातील श्रीपूजक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी १३ एप्रिल यादिवशी झालेल्या गोंधळास पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारीच उत्तरदायी आहेत, असा एकमुखी सूर या बैठकीत निघाला.
* बैठकीत मान्यवरांनी व्यक्त केलेली मते... १. पथकरविरोधी कृती समितीचे श्री. बाबा पारटे म्हणाले, काल श्रद्धाळू महिला-पुरुष यांना दर्शन मिळाले नाही. या गोंधळास केवळ पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमित सैनी हेच उत्तरदायी आहेत.
२. श्रीपूजकांच्या वतीने श्री. अजित ठाणेकर म्हणाले, माझ्या ३३ वर्षांच्या आयुष्यात अशा प्रकारची स्थिती पहिल्यांदाच अनुभवास मिळाली.

धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या !

www.hindujagruti.org

मुसलमान महिलेला गाभार्‍यात घुसवून श्री महालक्ष्मी मंदिर भ्रष्ट करण्याचे तृप्ती देसाई यांचे षड्यंत्र ! - हिंदु जनजागृती समिती

      कोल्हापूर - १३ एप्रिलला कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी त्यांच्या मुसलमान महिला सहकार्‍यासह मंदिराच्या गाभार्‍यात घुसण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप करणारे प्रसिद्धी पत्रक हिंदु जनजागृती समितीने काढले आहे.
     या प्रसिद्धीपत्रकात समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी म्हटले आहे की,
१. १३ एप्रिलला तृप्ती देसाई यांनी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात घुसून दर्शन घेण्यासाठी जे आंदोलन केले होते, या आंदोलनासाठी तिने स्वतःसोबत पुण्यातून काही स्त्री-पुरुषांना आणले होते.
२. पोलिसांनी जमावबंदीची नोटीस देऊन या आंदोलकांना अटक केली. या अटक झालेल्या कार्यकर्त्यांची नावे अनेक दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाली आहेत. यात अतिशय धक्कादायक गोष्ट उघड झाली, ती म्हणजे तृप्ती देसाई यांच्यासोबत आलेल्या आंदोलनकर्त्यांमध्ये भूमाता ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सलीमा गुलाब मुल्ला या मुसलमान महिलेचाही समावेश होता.
३. पोलिसांनी जर त्यांना कह्यात घेतले नसते, तर तृप्ती देसाई या मुसलमान महिलेला घेऊन गाभार्‍यात घुसल्या असत्या आणि श्री महालक्ष्मी मंदिर धर्मभ्रष्ट केले असते.
४. या घटनेवरून तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाची भूमिकाच स्पष्ट होत असून त्यांना धर्मपरंपरांच्या विरोधात जाऊन केवळ गाभार्‍यात प्रवेश नको असून प्रत्यक्षात हिंदु धर्म भ्रष्ट करण्याचे तिचे षड्यंत्र आहे

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या शुभहस्ते दुसर्‍या साग्निचित् अश्‍वमेध महासोमयागाचा संकल्प !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावे आणि संपूर्ण विश्‍वात सुख अन् 
शांती नांदावी, यासाठी बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील योगीराज वेदविज्ञान
आश्रमाच्या वतीने द्वितीय साग्निचित् अश्‍वमेध महासोमयागाचे आयोजन
साग्निचित् अश्‍वमेध महासोमयागाचा संकल्प करतांना परात्पर गुरु 
डॉ. जयंत आठवले. सोबत वाजपेयीयाजी श्री. केतन काळे गुरुजी
      रामनाथी (गोवा) - हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत आणि संपूर्ण विश्‍वात सुख अन् शांती नांदावी, यांसाठी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कासारवाडी येथील श्री योगीराज वेद विज्ञान आश्रम येथे द्वितीय साग्निचित् अश्‍वमेध महासोमयागाचे आयोजन करण्यात आले आहे. या यागाचा संकल्प सनातनचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या शुभहस्ते १४ एप्रिल २०१६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात करण्यात आला. या वेळी अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळे गुरुजी यांचे ज्येष्ठ चिरंजीव वाजपेयीयाजी श्री. केतन काळे गुरुजी आणि वेदमूर्ती श्री. धनंजय गोडबोले उपस्थित होते. त्यानंतर त्याच्या अंगभूत अश्‍वीय होम करण्यात आला. या होमाचे पौरोहित्य वाजपेयीयाजी श्री. केतन काळे गुरुजी आणि वेदमूर्ती श्री. धनंजय गोडबोले गुरुजी यांनी केले. त्याचबरोबर श्री जगदंबेची कृपा व्हावी, यासाठी एका शप्तशती पाठाचे हवनही करण्यात आले.

कुठे राममंदिराचा एक तृतीयांश भाग मुसलमानांना द्यावा लागला, तरी त्यात आनंद मानणारे हिंदू, तर कुठे सर्व जग इस्लाममय करायला निघालेले मुसलमान ! - स्वामी विदितानंद (१.१०.२०१०)

पंतप्रधानांनी विशेष अधिकाराचा वापर करून रामनवमीच्या दिवशी श्रीरामाच्या पूजनाचा अधिकार मिळवून द्यावा ! - मोतीराम गोंधळी, अध्यक्ष, हिंदु राष्ट्र जनजागरण समिती

मुंब्रा-पनवेल मार्गावरील कल्याणफाटा येथील राष्ट्रीय 
हिंदू आंदोलनाला मंत्री, आमदार, खासदार यांची उपस्थिती ! 


बांधकाममंत्री श्री. एकनाथ शिंदे (वर्तुळात)
     मुंब्रा - आज हिंदूंनी निवडून दिलेले हिंदुत्ववादी भाजप शासन केंद्रात असतांना, तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबर २०१० या दिवशी ही भूमी श्रीरामलल्लाची आहे, असा निकाल दिला असतांनाही हिंदूंना रामजन्मभूमीवर श्रीरामाची पूजा करण्याचा अधिकार मिळू नये, ही एक शोकांतिकाच आहे. तरी पंतप्रधानांनी हिंदूंच्या भावनांचा आदर करून रामनवमीला श्रीरामाच्या पूजनाचा अधिकार मिळवून द्यावा. आज गोवंश हत्याबंदी कायदा महाराष्ट्रात लागू असूनही मोठ्या प्रमाणावर गोहत्या आणि गोमांस तस्करी होत आहे.

समीर गायकवाड यांची केंद्रीय अन्वेषण विभाग (सी.बी.आय.)कडून चौकशी !

      कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषणच्या पथकाने कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणातील संशयित सनातन संस्थेचे साधक समीर विष्णु गायकवाड यांची १३ एप्रिल या दिवशी कळंबा कारागृहात पावणेचार घंटे चौकशी केली. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांनी समीर यांना ५० प्रश्‍न विचारले. केंद्रीय अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस्.आर्.सिंग यांनी कळंबा कारागृहात ही चौकशी केली. त्यांच्यासमवेत केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचे साहाय्यक आयुक्त सतीश देवरे आणि पोलीस निरीक्षक कदम हे उपस्थित होते. त्यांनी कारागृह अधीक्षकांसमोर ही चौकशी केली.

(म्हणे) 'मला ठार मारण्याचा कट होता !'

धर्मपरंपरा मोडू पहाणार्‍या तृप्ती देसाई यांचा थयथयाट ! 
तृप्ती देसाई यांनी केलेला हा आरोप म्हणजे, 'चोर तो चोर, वर शिरजोर' असेच म्हणावे लागेल ! 

     कोल्हापूर, १४ एप्रिल - येथील श्री अंबाबाई मंदिरामध्ये मला पुष्कळ मारहाण करण्यात आली. माझे कपडे फाडणे, माझे केस ओढणे आदी अनेक प्रकार झाले. मला मारण्यास आलेले आक्रमणकर्ते ओरडत होते की, 'तृप्ती देसाईला जिवंत सोडू नका.' मला ठार मारण्याचाच त्यांचा कट होता, असा नवा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. 

मुसलमानांना धर्माच्या आधारावर नोकर्‍यांमध्ये आरक्षण नाही ! - मुख्यमंत्री

      मुंबई - मुसलमानांना धर्माच्या आधारावर नोकर्‍यांमध्ये आरक्षण देता येणार नाही. घटनेमध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची तरतूद नाही; मात्र मुसलमान समाजातील मागास जातींना जातीच्या आधारावर आजही आरक्षण मिळते, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत मांडली. काँग्रेसचे संजय दत्त यांनी मुसलमान, मराठा आणि धनगर समाजांना आरक्षण देण्याविषयीचा तारांकित प्रश्‍न विचारला होता.

तृप्ती देसाई यांच्या अंबाबाई मंदिर प्रवेशाच्या संदर्भात धादांत खोटी आणि एकांगी वृत्ते प्रसारित करणारी प्रसारमाध्यमे !

     कोल्हापुर, १४ एप्रिल (वार्ता.) - कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यामध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना १३ एप्रिल या दिवशी दर्शन देण्याचा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी प्रयत्न केला. या वृत्ताचे संपूर्ण दिवसाचे वार्तांकन करतांना वृत्तवाहिन्यांनी केवळ एकांगीपणे आणि वस्तुनिष्ठतेला धाब्यावर बसवून वार्तांकन केले. (यावरून अशा वृत्तवाहिन्या अन्य वृत्तांचे वार्तांकन कसे करत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! अर्थात, जनतेने मग विश्‍वास तरी कोणावर ठेवावा ? - संपादक) हे वार्तांकन करतांना वृत्तवाहिन्यांनी पुढील घटनांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली अथवा खोटी वृत्ते प्रसारित केली : 

'लव्ह जिहाद'द्वारे हिंदूंची लोकसंख्या घटवण्याचा प्रयत्न ! - कु. रागेश्री देशपांडे, रणरागिणी शाखा

चोपडा (जिल्हा जळगाव) येथे हिंदु धर्मजागृती सभा 
 ३ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती 
ग्रंथप्रकाशन करतांना उजवीकडून श्री. विजय पाटील, पू. नंदकुमार जाधव आणि कु. रागेश्री देशपांडे

     चोपडा - 'लव्ह जिहाद' म्हणजे हिंदूंची लोकसंख्या घटवण्याच्या प्रयत्न केला जात आहे. 'लव्ह जिहाद'मध्ये गुंतलेल्या हिंदु मुलींवर घोर अत्याचार केला जात आहे. ज्यांची देवांवर श्रद्धा नाही ते परंपरा पाळणार्‍या हिंदु महिलांना धर्मापासून दूर नेत आहेत. भारतातील महिलांवर अत्याचार वाढले आहेत. याला उत्तरदायी महिलाच आहेत. हिंदु मुलींना संस्कृतीची-वेशभूषेची लाज वाटते. पाश्‍चिमात्य संस्कृती आपण स्वीकारत आहोत. त्याउलट मुसलमान आणि ख्रिस्ती मुली त्यांचा धर्म पाळत आहेत, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी केले. त्या शबरीधाम येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत बोलत होत्या. या सभेला ३ सहस्रांहून अधिक हिंदू उपस्थित होते. 

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, इस्लामिक स्टेटच्या आक्रमणाला सामोरे जाण्यास आपण सिद्ध आहात का ?
     इस्लामिक स्टेटने भारतावर बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांच्या बाजूने गनिमी काव्याद्वारे आक्रमण करण्याचा कट रचला असून यात भारतातील हिंदूंना लक्ष्य करण्यात येणार आहे, असा खुलासा या जिहादी संघटनेने दाबिक या ऑनलाईन मासिकाच्या माध्यमातून केला आहे.


हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : ISISne Hinduopar akraman karneka shadyantra racha hai, aisa uske mukhpatrame prakashit hua hai.
Kya isse siddha nahi hota ki Atankwadka Dharm hota hai ?

जागो ! : इस्लामिक स्टेट ने हिन्दुआें पर आक्रमण करने का षड्यंत्र रचा है, ऐसा उसके मुखपत्र में प्रकाशित हुआ है.
क्या इससे सिद्ध नहीं होता कि, आतंकवाद का धर्म होता है ?


जेव्हा राष्ट्राचा प्रमुख अधर्माचरण करतो, तेव्हा दुष्काळासारखे संकट ओढवते ! - जगद्गुरु शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज

शंकराचार्यांना अपेक्षित असे राज्य केवळ हिंदु राष्ट्राच्या 
स्थापनेनेच शक्य आहे. त्यामुळे हिंदूंनो, ईश्‍वरी अधिष्ठानासह 
संघटित व्हा आणि विश्‍वकल्याणकारी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेस कटिबद्ध व्हा ! 
     हरिद्वार (उत्तराखंड) - जेव्हा राष्ट्र अथवा राज्याचा प्रमुख अधर्माचरण करतो, तेव्हा दुष्काळासारखे नैसर्गिक संकट येणे अपरिहार्य असते, असे प्रतिपादन द्वारका आणि शारदा पिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी हरिद्वार येथील त्यांच्या आश्रमात पत्रकारांना संबोधित करतांना केले. 

नागपूरमध्ये कन्हैया कुमारच्या वाहनावर दगडफेक, ५ राष्ट्रप्रेमी युवकांना अटक

राष्ट्रद्रोहाचा आरोप असलेली व्यक्ती देशभर उजळ माथ्याने
 भाषणे देत फिरते, हे समस्त भारतीय व्यवस्थेला लांच्छनास्पद आहे ! 
     नागपूर - राष्ट्रद्रोहाचा आरोपी कन्हैया कुमारच्या वाहनावर नागपूर येथे लोकांनी दगडफेक केली. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. आक्रमण करणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत आहे. कन्हैयाने देहली येथील 'जेएनयू' मध्ये राष्ट्रविरोधी घोषणा दिल्यानंतर त्याला पोलिसांनी राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली; मात्र त्यानंतर त्याची लवकरच जामिनावर सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर विरोधी पक्षांकडून देशात विविध ठिकाणी कन्हैयाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याअनुषंगाने तो नागपूर येथे आला होता. कन्हैयाच्या राष्ट्रद्रोही भूमिकेमुळे देशभरातील राष्ट्रप्रेमींमध्ये त्याच्या विरोधात क्षोभ निर्माण झाला आहे. यापूर्वीही जेएन्यूमध्ये त्याला एका युवकाने कानाखाली मारले होते. त्यानंतर भाग्यनगर (हैद्राबाद) येथे एका राष्ट्रप्रेमी युवकाने त्याच्या दिशेने जोडा फेकला होता.

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्याकडून पंतप्रधान कार्यालयाच्या सचिवांशी चर्चा !

रामनवमीच्या दिवशी अयोध्येतील रामजन्मभूमी 
येथे हिंदूंना पूजा करण्याची अनुमती मिळण्यासाठीची चळवळ 
     नवी देहली - रामनवमीच्या दिवशी अयोध्या येथील रामजन्मभूमी येथे हिंदूंना पूजा करण्याची विशेष अनुमती देण्यात यावी आणि राममंदिर पुन्हा उभारण्याच्या संदर्भात वचनपूर्ती करावी या मागण्यांसाठी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन आणि स्वाक्षरी चळवळ चालवण्यात येत आहे. या संदर्भात एकट्या मुंबई शहरातून ४८ सहस्राहून अधिक स्वाक्षर्‍या प्राप्त झाल्या आहेत. हिंदू जनजागृती समितीचे श्री. सुदर्शन गुप्ता आणि श्री. कार्तिक साळुंखे यांनी पंतप्रधान कार्यालय येथे सचिव अंबुज शर्मा यांची भेट घेऊन याविषयी चर्चा केली. रामनवमीला हिंदूंना रामजन्मभूमी येथे पूजा करण्यास अनुमती द्यावी आणि तेथे राममंदिर उभारण्यात यावे, अशी मागणी या वेळी त्यांनी केली. शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हा विषय प्राधान्याने घेऊन जाण्याचे आश्‍वासन दिले आहे.

वर्णाश्रमव्यवस्थेचा अर्थ जाणून न घेता सनातनची मानहानी करणारे तथाकथित जन्मब्राह्मण !

     सनातनची मानहानी करणारा खालील व्हॉट्स अ‍ॅप संदेश हेतुतः प्रसारित केला जात आहे.
     आत्ताच गोव्यातील काही ब्राह्मण युवा कार्यकर्त्यांचा फोन आला. त्यांनी अत्यंत धक्कादायक अशी माहिती दिली आणि मदतीचे आवाहन केले आहे. गोव्यातील सनातन आश्रमात एका ब्राह्मण मुलीचे इतर खालच्या जातीच्या मुलासोबत १ मे रोजी लग्न लावून देण्यात येणार आहे. मुलीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध असून आश्‍चर्य म्हणजे आई-वडील देखिल सनातनचे साधक आहेत.
     अशाच आशयाचा आणखी एक संदेश सनातनचे नाव न घेता प्रसारित केला जात आहे. हे व्हॉट्स अ‍ॅप संदेश पाठवणार्‍यांनी स्वतःचे धर्मशास्त्राविषयीचे अज्ञान प्रकट केले आहे. भगवान् श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे,
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।
- अध्याय ४, श्‍लोक १३
अर्थ : मी गुणकर्मानुसार चार वर्णांची निर्मिती केली आहे.
     भगवान् श्रीकृष्णाला अपेक्षित असलेला वर्ण म्हणजे जात नव्हे, हे लक्षात घेतले पाहिजे. अध्यात्माचे अध्ययन आणि अध्यापन ही ब्राह्मण-साधना होय. या अर्थाने पाहिल्यास सनातनचा प्रत्येक साधक अध्यात्माचा अभ्यास करतो, स्वतः साधना करतो आणि समाजातही अध्यात्मप्रसार करतो.

पाकिस्तानमधील अनुमाने ६ कोटी जनता दारिद्य्ररेषेखाली

  • भारतापासून फाळणी करून घेतल्यानंतर पाकने करून घेतलेली अधोगती !
  • या जनतेतील किती जण आतंकवादी आणि जिहादी विचारसरणीचे आहेत, याचेही सर्वेक्षण व्हावे !
      लाहोर - पाकिस्तानातील एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश म्हणजे ६ कोटी जनता दारिद्य्ररेषेखाली जीवन जगत असल्याचे नवीन मानकांच्या आधाराने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
      दारिद्य्ररेषा ठरवतांना आहारातील कॅलरीज्च्या प्रमाणासह शिक्षण, आरोग्य आणि भ्रमणभाषवर खर्च करण्याची ऐपत या गोष्टींचाही समावेश नवाज शरीफ शासनाने केला आहे. त्यानुसार वर्ष २०१३-१४ मध्ये नवीन नियम ठरवण्यात आले. त्या मोजणीत ७० लाख कुटुंब दारिद्य्ररेषेखाली असल्याचे दिसून आले. ज्यांचा मासिक खर्च ३ सहस्र ३० रुपयांहूनही अल्प आहे त्या कुटुंबांचा विचार केला गेला, असे केंद्रीय योजना विकास सुधारमंत्री अहसान इक्बाल यांनी सांगितले. यापूर्वी दारिद्य्ररेषा ठरवतांना केवळ आहारातील कॅलरीज्चे प्रमाण पाहून निश्‍चित केल्याने २०११ मध्ये दारिद्य्र रेषेखाली असलेल्या लोकांची संख्या २ कोटी होती.

शहरांमध्ये गर्भपात करण्यात २० वर्षांखालील तरुणींचे प्रमाण सर्वाधिक !

हा आहे शाळांमध्ये 
धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम !
       नवी देहली - शहरी भागात तरुणांसाठी शरीरसंबंध ठेवणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. अल्प वयातच तरुण-तरुणी यांच्यातील शारीररिक आकर्षण वाढत असून गर्भपात करण्यामागे २० वर्षाखालील तरुणींची संख्या सर्वाधिक असल्याचे वास्तव शासनाच्या आरोग्य विभागाने केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. (हिंदूंना लहानपणापासून त्यांचे पालक धर्मशिक्षण देत नाही, तसेच त्यांना शाळा महाविद्यालयांमधूनही धर्मशिक्षण मिळत नाही. अशा स्थितीत त्यांच्यात लहानपणापासूनच अनैतिकता वाढत आहे. त्यामुळे हे अध:पतन थांबवण्यासाठी लहानपणापासून धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे ! - संपादक)
      एन्एस्एस्ओ या सर्वेक्षण संस्थेच्या आकडेवारीनुसार ग्रामीण भागात गर्भवती रहाणार्‍या स्त्रियांचे प्रमाण ७७ टक्के असून गर्भपाताचे प्रमाण २ टक्के आहे. शहरी भागात गर्भवती रहाणार्‍या महिलांचे प्रमाण ७४ टक्के असून २० वर्षाखालील वयोगटातील गर्भपात करण्याचे प्रमाण सर्वाधिक १४ टक्के आहे.

धर्मांतर करणार्‍या पाद्य्राला संतप्त जमावाकडून चोप

  • हिंदूंनो, देशस्तरावर धर्मांतरविरोधी कायदा करण्यासाठी हिंदूसंघटन आवश्यक !
  • महिलांचे कुंकू पुसले
  • मांस-मच्छी खाण्यास भाग पाडले
      औरंगाबाद (बिहार) - चर्चमध्ये उपचार करण्याच्या निमित्ताने बोलावून धर्मांतर करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे लक्षात आल्यावर येथील ख्रिस्त्यांच्या नवजीवन केंद्रामध्ये संतप्त जमावाने गोंधळ घातला, तसेच पाद्य्राला चोप दिला. या केंद्रातील पाद्य्राकडून अनेक लोकांचे धर्मांतर करण्यात येत होते. या केंद्रात ख्रिस्ती धर्माचे शिक्षण देण्यात येत होते, महिलांचे कुंकू पुसण्यात आले, तसेच मांस-मच्छी खाण्यास भाग पाडले, असा आरोप संतप्त जमावाने केला. चर्चशी संबंधित लोकांनीही जमावाकडून त्यांच्या प्रार्थना सभेमध्ये अडथळा आणला, तसेच मारहाण करण्यात आली, असा आरोप केला आहे. (हिंदु धर्माविषयी चुकीची माहिती देऊन आणि भोळ्या हिंदूंना विविध आमिषे देऊन त्यांचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्तींना न रोखल्यास समाजातून उद्रेक झाल्यास नवल नाही ! - संपादक)

श्री अंबाबाई मंदिरात पोलिसांची भाविक महिलांवर मोगलाई !

हिंदूंनो, या पोलिसांच्या विरोधात वरिष्ठांकडे 
तक्रार करून कारवाईची मागणी करा !
       १३ एप्रिलला कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यामध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना दर्शन देण्याचा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी प्रयत्न केला. त्या वेळी पोलीस प्रशासनाने दर्शन घेण्यासाठी आलेल्या महिलांचे केस ओढून त्यांना बाहेर काढले. त्यांच्यावर लाठीमार केला. अशा प्रकारे देवळातच पोलिसांची रझाकारी वृत्ती दिसून आली. अशी हीन पातळीची वागणूक मिळालेल्या महिलांनी पोलिसांच्या सदर कृतीचा निषेध करत दैनिक सनातन प्रभातच्या वार्ताहराकडे व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया येथे देत आहोत.

भूमाता गोमातेचे रक्षण करतील का ?

     हिंदु धर्मात गोमातेस पूजनीय स्थान आहे. मुंबई पोलिसांनी धारावी येथून गोवंशांच्या मांसाची परदेशात तस्करी करणारे एक जाळे नुकतेच उद्ध्वस्त केल्याचे वाचनात आले. गोरक्षक मंडळी त्यांच्यापरीने गोमाता, गोमांस यांची अवैध वाहतूक अडवून प्राणपणाने गोमातेची सुटका करत असतात. असे प्रसंग सातत्याने घडत असूनही त्यास कायमस्वरूपी अटकाव होत नाही. महाराष्ट्रात राज्य शासनाने गोहत्या बंदी लागू केलेली असूनही गोमातेची अवहेलना चालूच आहे. असे करणार्‍यांना कायदा, पोलीस यांंचा अजिबात धाक राहिलेला नाही. जिथे धूर आहे तिथे आग ही आहेच. त्यामुळे गोमातेची जाणीवपूर्वक हेटाळणी कोण करत आहे, कायद्याची पायमल्ली करत कायद्याचा घोर अपमान करण्याची मुजोरी कोण करत आहे. याचे धागेदोरे शोधून कायद्याची पायमल्ली करणार्‍या त्या ठगांना, त्यांच्या मुख्य सूत्रधारांना शोधून जनतेसमोर त्याचे पितळ उघडे पाडण्यात यावे, अशी त्या पुरोगामी महिलांकडून अपेक्षा ठेवल्यास चूक ते काय ? गोमातेची पूजा करणारे बहुसंख्य असले, तरी तिच्या प्रत्यक्ष रक्षणार्थ फार अल्प मंडळी पुढे येतात. गोमातेपासून मानवाला अनेक लाभ असूनही त्याचा लाभ मानवाला होऊ नये यासाठी ज्यांचे पित्त खवळत आहे, त्यांना कायद्यानुसार कडक शासन हे झालेच पाहिजे आणि गोमातेवर होत असलेल्या अन्यायावर न्याय्य भूमिका असेल, असे वाटते. उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत ज्या प्रकारे शनिशिंगणापूर, कोल्हापूर येथे कायद्याची भाषा सांगण्यात आली, त्याचप्रकारे राज्यात गोहत्या बंदी लागू असतांनाही त्यास धुडकावून लावणार्‍यांना लागू असलेला नियम कसा महत्त्वाचा आहे, हे कृतीतून दर्शवणे अनिवार्य झाले आहे, असे वाटत नाही का ?

केवळ काही ठराविक मंदिरांमध्येच आणि तेही महिलांच्या हितासाठीच असलेले नियम पाळण्यात काय अडचण आहे ? - कु. प्रतीक्षा कोरगावकर, महाराष्ट्र राज्य संघटक, रणरागिणी शाखा

झी २४ तास 
वृत्तवाहिनीवरील चर्चासत्र 
चर्चासत्रात सहभागी झालेले डावीकडून वरच्या रांगेत डॉ. उदय निरगुडकर,
अधिवक्ता संजीव पुनाळेकर, शंकराचार्य स्वामी विद्यानृसिंह भारती, डावीकडून
खालच्या रांगेत कु. प्रतीक्षा कोरगावकर, डॉ. विश्‍वंभर चौधरी आणि विद्या बाळ
       महिलांच्या मंदिरातील गाभार्‍यातील प्रवेशावरून तसेच शनिदेवाच्या चौथर्‍यावरील प्रवेशाच्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर झी २४ तास या वृत्तवाहिनीवर १२ एप्रिल या दिवशी प्रश्‍न ज्याचा त्याचा या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात करवीर पिठाचे शंकराचार्य स्वामी विद्यानृसिंह भारती, हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्‍वंभर चौधरी तसेच सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ सहभागी झाल्या होत्या. सूत्रसंचालन वृत्तवाहिनीचे संपादक डॉ. उदय निरगुडकर यांनी केले. या चर्चासत्रातील महत्त्वाची सूत्रे येथे देत आहोत.

प्रभु श्रीरामाच्या अस्तित्वाचे स्मरण करून देणारा रामसेतूतील चैतन्यमय दगड आणि श्रीरामकालीन नाणे

रामसेतूचा तरंगता दगड. हा ४ किलो वजनाचा आहे, तर बाजूला
असलेले त्याच्यापेक्षा कमी वजनाचा दगड पाण्यात बुडाले आहेत.
प्रभु श्रीरामाच्या काळातील नाणे
      तमिळनाडू राज्याच्या पूर्वकिनार्‍यावर रामेश्‍वरम् हे तीर्थक्षेत्र आहे. रामेश्‍वरम्च्या दक्षिण बाजूस ११ कि.मी. अंतरावर धनुषकोडी हे नगर (शहर) आहे. रामसेतूच्या अलीकडील भागाला धनुषकोडी (कोडी म्हणजे धनुष्याचे टोक) असे म्हणतात; कारण साडेसतरा लाख वर्षांपूर्वी रावणाच्या लंकेत (श्रीलंकेत) प्रवेश करण्यासाठी श्रीरामाने त्याच्या कोदंड धनुष्याच्या टोकाने सेतू बांधण्यासाठी हे स्थान निश्‍चित केले. एका रेषेत मोठे दगड असलेल्या टापूंची शृंखला रामसेतूच्या भग्नावशेषांच्या रूपात आजही आपल्याला पहायला मिळते. रामसेतू नल आणि नील यांच्या वास्तूशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे. या रामसेतूची रुंदी आणि लांबी यांचे प्रमाण एकास दहा आहे, असे सविस्तर वर्णन वाल्मीकि रामायणात आहे. प्रत्यक्ष मोजमापन केल्यानंतरही त्यांची रूंदी ३.५ कि.मी एवढी असून लांबी ३५ कि.मी एवढी आहे. या सेतूच्या निर्माणकार्याच्या वेळी चिमुकल्या खारीने उचललेल्या वाट्याची कथा आणि पाण्यावर तरंगत असणारे तेथील दगड या गोष्टी आम्हा हिंदूंच्या पिढ्यान्पिढ्यांना माहीत आहेत.

सेतुबंध रामेश्‍वर माहात्म्य !

श्री. चेतन राजहंस
       भारताच्या दक्षिण-पूर्व किनार्‍यावरील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणजे रामेश्‍वरम् ! रामेश्‍वराच्या दर्शनाला हिंदु धर्मपरंपरेत विशेष महत्त्व आहे.
१. इतिहास
      दशग्रंथी ब्राह्मण असलेल्या रावणाच्या वधानंतर अगस्ती ऋषींनी प्रभु श्रीरामाला ब्रह्महत्यानिरसनार्थ सागरतीरावर ज्येष्ठ शुद्ध दशमीच्या मुहुर्तावर शिवलिंगाची स्थापना करण्याचा आदेश दिला. या कार्यार्थ शिवाचे दिव्य लिंग आणण्यासाठी मारुति कैलासावर गेला; परंतु शिवाचे दर्शन न झाल्याने त्याने तप आरंभले. कालांतराने शिवाने प्रगट होऊन हनुमंताला स्वतःचे दिव्य लिंग दिले. या प्रक्रियेला विलंब झाल्यामुळे मारुतीला मुहुर्ताची वेळ साधता आली नाही. त्या वेळी सीतेने एक वालुकामय लिंग बनवून दिले. ऋषींच्या आदेशानुसार रामाने मग त्याचीच स्थापना केली. हेच हे रामेश्‍वरलिंग होय. स्थानिक लोक त्याला रामनाथस्वामी असे म्हणतात.
        मारुति परतल्यानंतर जेव्हा त्याला श्रीरामाने लिंग स्थापन केलेले दिसले, तेव्हा त्याला फार दुःख झाले. मग रामाने त्याला स्थापित लिंगाच्या जवळच त्याने आणलेल्या लिंगाची स्थापना करण्यास सांगितले. तसेच त्याने स्थापलेल्या लिंगाचे दर्शन घेतल्यावाचून भाविकांना रामेश्‍वरदर्शनाचे फल मिळणार नाही, असेही सांगितले. या लिंगाला काशीविश्‍वनाथ किंवा हनुमदीश्‍वर असे नाव आहे.

मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्रांची कुंडली

महाराष्ट्राचा कुंडली-संग्रह या
ग्रंथातून घेतलेली प्रभु श्रीरामाची कुंडली
      १५.४.२०१६ या दिवशी श्रीरामनवमी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार प्रभु श्रीरामाच्या कुंडलीचा अभ्यास संक्षिप्त स्वरूपात देत आहे. प्रभु श्रीरामाच्या कुंडलीविषयी अनेक मते असल्याने भिन्न कुंडल्या आहेत. प्रभु रामचंद्रांची अभ्यासण्यासाठी घेतलेली कुंडली महाराष्ट्राचा कुंडली-संग्रह (लेखक म.दा. भट, व.दा. भट) या ग्रंथातून घेतली आहे.
      प्रभु श्रीरामाचा जन्म त्रेतायुगात चैत्र शुक्ल पक्ष नवमी या तिथीला अयोध्या नगरीत झाला.

प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चित्रकूट पर्वताचे समग्र दर्शन

     प्रभु श्रीरामचंद्र १४ वर्षांच्या वनवासानंतर रावणाचे पारिपत्य करून चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेला अयोध्येला परत आले; म्हणून त्या दिवशी गुढ्या-तोरणे उभारून त्यांचे आनंदाने स्वागत केले होते. श्रीरामचंद्रांनी वालीच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. जे मुक्त झाले, त्यांनी त्या दिवशी गुढ्या (ध्वज) उभ्या केल्या. श्रीरामाने वालीचा, आसुरी प्रवृत्तींचा नाश केला, त्याचे हे सूचक ! भगवान श्रीराम, सीता आणि लक्ष्मण हे १४ वर्षांच्या वनवास काळात उत्तरप्रदेशमधील चित्रकूट पर्वतावर निवासाला होते. चित्रकूट पर्वतावरील गुप्त गोदावरी, श्री भरत-राम मिलाप मंदिर, श्रीरामचंद्रांनी वालीचा ज्या ठिकाणाहून वध केला, ते ठिकाण अशी दुर्मिळ छायाचित्रे रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर वाचकांसाठी देत आहोत.

रामनाथी आश्रमात राहून प.पू डॉक्टरांच्या कृपेने सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुगातील काळानुसार साधना एकत्रित अनुभवण्यास मिळणे

सौ. सुजाता रेणके
     या घोर कलियुगात आपत्काळाची तीव्रता असतांना प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रामनाथी आश्रमात आम्हा सर्व साधकांना साधना करत असतांना सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापरयुग या युगांतील साधना अनुभवता येत आहे.
१. सत्ययुग
       सत्ययुगात सर्वच जीव सोऽहम् भाव असल्याने सगळे चराचरामध्ये देव आहे, असे अनुभवत होते; म्हणून त्या जिवांना ईश्‍वराकडून ज्ञान मिळत असे. आजही आश्रमात अनेक साधक मी करत नसून सर्व काही सेवा आणि साधना देवच करवून घेतो, या भावाने प्रत्येक कृती अन् कर्तेपणा सतत ईश्‍वराला अर्पण करत असल्यामुळे अनेक साधकांना ईश्‍वराकडून ज्ञान प्राप्त होत आहे. प.पू. डॉक्टरांनी अध्यात्मशास्त्रावरील लिहिलेल्या ग्रंथांचा साधक अध्ययन आणि अध्यापन करतात. त्याचे चिंतन करून त्यानुसार स्वतः कृती करून त्याचा अनुभव सार्‍या समाजापुढे मांडत आहेत. यातून सत्ययुगच अनुभवण्यास मिळते.

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
     सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. हिंदु राष्ट्राची छोटी प्रतिकृतीच असलेल्या या आश्रमाला भेट देऊन हिंदुत्वनिष्ठांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रेरणा मिळते, तर साधकांना साधनेसाठी आध्यात्मिक ऊर्जा लाभते. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी १ वर्ष मौनव्रत धारण करणार्‍या प.पू. दास महाराज यांना मौनकाळात आलेल्या दिव्य अनुभूती आणि त्यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन !

प.पू. दास महाराज
      प.पू. श्रीधरस्वामी महाराज यांच्या आज्ञेनुसार ३.३.२०१६ या दिवशी दासनवमीच्या सुमुहूर्तावर प.पू. दास महाराज यांनी १ वर्षासाठी मौनव्रत चालू केले. चैत्र मासातील श्रीराम नवमी, श्री हनुमान जयंती आणि प.पू. श्रीधरस्वामी महाराज यांची पुण्यतिथी हे महत्त्वाचे उत्सव पानवळ, बांदा श्रीराममंदिरात साजरे केले जातात. या पार्श्‍वभूमीवर प.पू. दास महाराज यांनी ८ ते २४.४.२०१६ या कालखंडात मौनव्रत स्थगित केले आहे. ३.३.२०१६ ते ७.४.२०१६ या एक मासाच्या मौन काळात त्यांना आलेल्या अनुभूती त्यांनी श्री गुरुदेवांच्या चरणी निवेदन केल्या आहेत.
१. मौन काळात आलेल्या अनुभूती
१ अ. मौन काळात जळी-स्थळी, काष्ठी-पाषाणी भगवंताचाच वास आहे, याची प्रचीती येणे : वातावरण सुगंधी होणे, मन सुप्रसन्न रहाणे, सर्व साधक श्री गुरूंच्या रूपात दिसणे आदी गोष्टी मौन काळात प्रकर्षाने जाणवल्या. जळी-स्थळी, काष्ठी-पाषाणी सर्वत्र भगवंताचाच वास आहे, हे शब्दांतून ऐकले होते. याची प्रचीती या काळात आली. आतून श्रीराम जय राम जय जय राम । हा त्रयोदशाक्षरी मंत्र अखंड चालायचा. सभोवताली पशू-पक्षांच्या किलबिलाटातून रामनामाचाच ध्वनी येत असे.
१ आ. आनंदाश्रू वहाण्यास आरंभ होणे : मौनव्रताचा पहिला मास चालू असतांना अष्टसात्त्विकभाव जागृत होत होता. अष्टसात्त्विक भावांपैकी एक आनंदाश्रू वहाणे यास आरंभ झाला. एक भाव जागृत व्हायला एक मास लागला. आठही भाव जागृत व्हायला वर्षाचा कालावधी लागेल. श्री गुरुदेवांच्या कृपेने याचीही प्रचीती येईल, याची मला निश्‍चिती आहे.

भाग्यनगर येथील साधिका सौ. पल्लवी गांगुली यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१. चोखून खाण्याच्या औषधीय गोळ्यांनी खोकल्याचा त्रास 
तात्पुरता थांबत असला, तरी त्या आवडत नसल्याने विकत 
न घेणे आणि दुसर्‍या आधुनिक वैद्यांनी लिहून दिलेल्या गोळ्या
घेण्यास आतून आवाज आल्याने त्या गोळ्या विकत घेणे
      २३.३.२०१५ या दिवशी मी थंडी, ताप, खोकला यांनी त्रस्त झाले होते. माझा घसाही बरेच दिवसांपासून दुखत होता. औषधे घेऊनही फारसा पालट जाणवत नसल्याने मी दुसर्‍या आधुनिक वैद्यांकडे (डॉक्टरांकडे) गेलेे. चोखून खाण्याच्या औषधीय गोळ्यांनी तात्पुरते बरे वाटत असले, तरी मला त्या गोळ्या घ्यायला आवडत नाही. त्यामुळे आधुनिक वैद्यांनी लिहून दिले, तरी मी त्या गोळ्या न आणता इतर सर्व औषधे आणते. या वेळीही मला आधुनिक वैद्यांनी त्या गोळ्या लिहून दिल्या होत्या आणि मी त्या गोळ्या घेणार नव्हते; मात्र त्या वेळी मला एक हलका आवाज ऐकू आला, डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्या आहेत, तर त्या घेतल्या पाहिजेत. का कुणास ठाऊक; पण मी ते ऐकून त्या गोळ्या विकत घेतल्या.

प.पू. दास महाराज यांनी मौनव्रत धारण केल्यापासून त्यांच्या धर्मपत्नी पू. (सौ.) माई (लक्ष्मी) नाईक यांना आलेल्या अनुभूती

पू. (सौ.) माई (लक्ष्मी) नाईक
१. प.पू. दास महाराज यांनी मौनव्रत धारण केल्यापासून आश्रमात एक वेगळीच आध्यात्मिक चेतना जाणवणे : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी झटणार्‍या साधकांना आध्यामिक बळ प्राप्त व्हावे, यांसाठी प.पू. दास महाराज यांनी बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील गौतमारण्य आश्रमात मार्च २०१६ पासून मौनव्रत धारण केले आहे. हे व्रत भगवान श्रीधरस्वामी महाराज आणि प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांच्या आशीर्वादाने चालू आहे. त्यांनी मौनव्रत धारण केल्यापासून आश्रमात एक वेगळीच आध्यात्मिक चेतना जाणवत आहे.
२. प.पू. गुरुदेवांनी गौतमारण्य आश्रमात येऊन मार्गदर्शन केल्याचे स्वप्नात दिसणे; पण त्यांचे मार्गदर्शन नीट न समजणे : प.पू. दास महाराज यांचे वडील प.पू. भगवानदास महाराज समाधीस्त होण्याच्या एक आठवडा अगोदर या आश्रमात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण हे भिल्लांच्या रूपात आले होते. त्या वेळी श्रीरामरायांनी एका झाडावर बाण सोडला होता. हे स्थान आश्रमाच्या मागच्या बाजूला आहे. २१.३.२०१६ या पहाटे मला एक स्वप्न पडले. त्यात प.पू. गुरुदेव आश्रमात आले आहेत आणि श्रीरामरायांनी भिल्लाच्या रूपात येऊन ज्या झाडावर बाण मारला होता, त्याच ठिकाणी झाडाखाली प.पू. गुरुदेव उभे आहेत, असे दिसले. तेव्हा मी त्यांना खायला एक चिकू दिला. त्यांनी तो ग्रहण करून काहीतरी मार्गदर्शन केले; पण मला ते नीटसे समजले नाही. इतक्यात मला जाग आली. - (पू.) सौ. माई (लक्ष्मी) नाईक, पानवळ-बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग. (९.४.२०१६)

आधुनिकांनी प्रभु श्रीरामाला मानव घोषित केल्यामुळे झालेली हानी !

१. आधुनिकांना (आंग्लाळलेल्या निधर्मवादी पंडितांना) स्वैराचार करायला श्रीरामाचे चरित्र आड येत असल्याने त्यांनी परंपरा नष्ट करण्यासाठी प्रभु श्रीरामाला मानव म्हणून घोषित करण्याचा डाव टाकणे : आधुनिकांना, म्हणजे इंग्रजी विद्येत अग्रेसर असणार्‍या सेक्युलरी (आंग्लाळलेल्या निधर्मवादी) पंडितांना परंपरा नको आहेत. ते श्रीराम शिकवणीच्या विरोधात आहेत; कारण त्यांना स्वतःच्या भोगवासना पुरवणे आणि स्वैराचार करणे यांसाठी रामाचेे चरित्र आड येते. त्यांना रामायण तसे नकोसे आहे; परंतु लक्षावधी वर्षांपासून रामकथा जनमानसात मुरली आहे. ती या नव-हिंदुत्ववाद्यांना नष्ट करता येत नाही; म्हणून त्यांनी हा डाव टाकला.

साधकांचा आदर्श केवळ श्रीरामच ! गुणसंवर्धनाच्या आधारे समाज संघटन होणार !

श्री. श्रीकांत भट
     सध्याच्या कलियुगात अधर्म सर्वत्र माजला असल्यामुळेच त्याच्या नायनाटासाठी धर्मरूपी शक्ती (प्रत्यक्ष प्रभुरामचंद्राची धर्ममूर्ती) आवश्यक झाली आहे. प्रभू रामचंद्र प्रत्येक क्षणी, प्रत्येक प्रसंगात धर्माला शरण गेले आहेत; म्हणूनच राम सदैव विजयी झाले आहेत. कोणतेही श्रेय प्राप्त करून घेण्यासाठीच धर्माला शरण गेले पाहिजे. हा निर्विवाद सिद्धांत प्रभु रामचंद्रांना ज्ञात होता.
१. सत्य, ज्ञान, धर्म आणि प्रकाश ही आयुधे वापरून 
अधर्मावर, धर्मशक्तीच्या आधारे विजय मिळवायला हवा !
       सध्या कोणताच आदर्श समोर नसल्याने आम्ही दिशाहीन झालो आहोत. असत्य, अज्ञान, अधर्म आणि अंधःकार ही शस्त्रे कलियुगातील मानवावर वार करत तुटून पडत आहेत; म्हणून त्यांचा नाश करण्यासाठी मनुष्याने सत्य, ज्ञान, धर्म आणि प्रकाश ही आयुधे वापरून धर्मशक्तीच्या आधारे अधर्मावर विजय मिळवलाच पाहिजे. आताही असेच युद्ध स्थूल आणि सूक्ष्मातून चालू आहे. बलाढ्य रावणाच्या तुलनेत प्रभु श्रीरामचंद्राजवळ भौतिक आधार, साधन-सामुग्री, सैन्यशक्ती नगण्य अशीच होती, तरीही केवळ आध्यात्मिक (धर्माच्या) शक्तीवर आणि उत्तम सद्गुणांच्या समुच्चयाच्या बळावर श्रीरामाने सर्वांना संघटित करून विजय प्राप्त करून घेतला होता.

हिंदूंनो, रामायणातील श्‍लोकाचा विपरीत अर्थ घेऊन हिंदूंच्या देवतांविषयी अपप्रचार करणार्‍या धर्मद्रोह्यांना खडसवा !

श्री. अमर जोशी
१. वाल्मिकी रामायणाचा संदर्भ देऊन धर्मद्रोही 
रामाविषयी करत असलेला अपप्रचार - राम 
दारू पीत होता आणि मांस भक्षण करत होता !
      सध्या बर्‍याचदा रामायणावर टीका करतांना काही टीकाकार राम दारू पीत होता आणि तो मांस भक्षण करत होता, असा अपप्रचार करतात. त्यासाठी धर्मद्रोही टीकाकार वाल्मीकि रामायणाचा संदर्भ देऊन म्हणतात, वाल्मीकि रामायणात सीतेच्या तोंडी मी मद्य, मांस अर्पण करीन, असा उल्लेख आहे. आपण जे नेहमी वापरतो, तेच आपण अर्पण करतो. त्यामुळे ज्याअर्थी रामायणात मद्य आणि मांस अर्पण करण्याचा उल्लेख आहे, त्याअर्थी मद्य आणि मांस त्या काळातही नेहमीच्या वापरातील असावेत. म्हणजेच राम, सीता आदी मद्य आणि मांस सर्रास भक्षण करत असावेत. याविषयी युक्तीवाद करतांना ते पुढील श्‍लोकाचा संदर्भ देतात.
सुराघटसहस्रेण मांसभूतौदनेन च।
यक्ष्ये त्वां प्रीयतां देवि पुरीं पुनरुपागता ॥
- वाल्मिकीरामायण, कांड २, सर्ग ५२, श्‍लोक ८९

समर्थ रामदासांची व्यष्टी आणि समष्टी साधना

रामदासस्वामी जयंतीच्या निमित्ताने...
       समर्थ रामदासांनी पुरश्‍चरणे आणि तपस्या केली. यात्रेच्या निमित्ताने आसेतुहिमाचल फिरले. जनमनाचा कानोसा घेतला. महाराष्ट्रात त्यांना स्वत्वाच्या अस्तित्वाची पुसट का होईनात लक्षणे आढळली. त्यांनी महाराष्ट्रात मारुति स्थापन केले. बलोपासनेची मुहूर्तमेढ रोवली. लोककल्याणाकरता निःस्पृह, निरिच्छ आणि निःस्वार्थ प्रयत्न कसे करावे, याचा आदर्श स्वतःच्या आचरणाने निर्माण केला. पारतंत्र्याच्या निर्मूलनाचा अन् स्वातंत्र्यप्राप्तीचा अंगार फुलवला. महाराष्ट्रभर पारतंत्र्य निर्मूलनार्थ वणवा पेटवला. त्याचा परिणाम होऊन महाराष्ट्र स्वतंत्र झाला. येथील लोक राज्य करू लागले.

लतांनो सांगू का तुम्हा, उद्या श्रीराम येणार ।

पू. कला प्रभुदेसाई
      सनातनच्या संत पू. कला प्रभुदेसाई यांनी ८.३.२०१६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात म्हटलेले काव्य. यात शबरीने निसर्गाशी केलेला संवाद आहे.
लतांनो सांगू का तुम्हा, उद्या श्रीराम येणार ।
वनाला सर्व या आता, खरा आनंद होणार ॥ १ ॥
तुम्हा कोठूनीया ठावा, कसा श्रीराम तो आहे ।
सुखस्यंदी झरा तेथे, सदाचा वाहतो आहे ॥ २ ॥
उद्या पहाल डोळ्यांनी, सुखाचा पूर्ण आराम ।
मुखे लागाल घोकाया, जय श्रीराम श्रीराम ॥ ३ ॥

सार्थ श्रीरामरक्षास्तोत्राच्या आरंभी असलेल्या श्‍लोकांमधील गुह्यार्थ आणि त्याचा लाभ !

१. गुह्यार्थ लक्षात घेऊन श्रीरामरक्षास्तोत्र 
म्हटल्यास अधिक लाभ होणे
प.पू. पांडे महाराज
       सार्थ श्रीरामरक्षास्तोत्र म्हणत असतांना आरंभीच्या ओळींमध्ये मंत्राविषयीचा इतिहास दिसून येतो. तसेच त्या मंत्रांमध्ये काय शक्ती आहे ?, ते स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे, तर त्याचा परिणामही दिसून येतो. आरंभीच्या ओळींमधील गुह्यार्थ लक्षात घेऊन श्रीरामरक्षास्तोत्र म्हटल्यास त्याची परिणामकारकता अधिक जाणवून त्याचा लाभ होतो.
२. श्रीरामरक्षास्तोत्राचा आरंभ 
श्री गणेशवंदनेने करण्याचे कारण
       श्री गणेशाय नमः । असे म्हणून श्री गणेशाला वंदन करून आरंभ केला आहे; कारण श्री गणेश विघ्नहर्ता आहे. वर्णाचा आरंभ त्याच्यापासूनच झाला असल्यामुळे पुढे वेदादी शब्दांचे भांडार बनले आहे; म्हणून प्रथम कोणत्याही कार्याचा आरंभ त्याच्या वंदनाने करतात. त्यामुळे कार्य सफल होते.

आश्रमाच्या सान्निध्याने शरीर झाले पवित्र ।

आश्रमाच्या सान्निध्याने शरीर झाले पवित्र ।
आश्रमात आहेत अनेक संतरत्न ॥ १ ॥
संतांच्या सहवासाने झाली आश्रमाची शुद्धी ।
गुरूंनी दिली बुद्धी म्हणून साधकांनी केली प्रगती ॥ २ ॥
प्रगतीच्या वाटेवर असती अनेक अडथळे ।
त्यावर मात करूनी साधक गुरूंच्या चरणी रुळे ॥ ३ ॥
- कु. कोमल विष्णु जाधव (वय १५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.१०.२०१४)

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प.पू. दास महाराजांनी आरंभलेले मौनव्रत निर्विघ्नपणे पार पडावे, याकरिता पानवळ आश्रमातील विविध सेवांसाठी साधकांची आवश्यकता !

साधकांना अनमोल संतसेवेची सुवर्णसंधी !
     पानवळ, बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वर्षभर मौनव्रत करत आहेत. हे व्रत निर्विघ्नपणे आणि परिपूर्णपणे पार पडावे, यासाठी पानवळ आश्रमातील सेवा करण्यासाठी साधकांची आवश्यकता आहे. सेवेसाठी साधक-दांपत्यही चालू शकेल. आश्रमात पुढील सेवा उपलब्ध आहेत.
१. पूजा : पूजेची सिद्धता करून पूजा करणे
२. स्वच्छता : आश्रम, मंदिर, तसेच परिसर यांची स्वच्छता करणे
३. बागेची देखभाल करणे : आश्रम परिसरातील झाडांना पाणी घालणे आणि त्यांची निगा राखणे, तण वाढल्यास ते काढण्याचे नियोजन करणे, पाण्याची टाकी भरण्यासाठी पंप चालू करणे, आश्रमात पाळण्यात येणार्‍या गायीची देखभाल करणे
४. अन्य : आश्रमात येणार्‍यांचे आदरातिथ्य करणे आणि महाराज मौनव्रतात आहेत, याची त्यांना कल्पना देणे, प.पू. दास महाराजांना वेळेवर औषधे देणे, भोजन देणे, मर्दन (मालिश) करणे, पू. (सौ.) माईंना स्वयंपाकघरात साहाय्य करणे, मंडईत जाऊन आवश्यक साहित्य आणणे
     साधक स्वतःच्या सोयीनुसार शक्य तेवढे दिवस सेवेत सहभागी होऊ शकतात. जे साधक ही सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून dharmatej2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर पुढील माहिती पाठवावी.

आतंकवादविरोध विशेषांक

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत
प्रसिद्धी दिनांक : १७ एप्रिल २०१६
पृष्ठ संख्या : १० मूल्य : ५ रुपये
या विशेषांकात काय वाचाल ?
१. इसिसची व्याप्ती आणि तिचे क्रौर्य
२. इसिसची प्रतिदिनची मिळकत किती ?
३. इसिसची क्रूरता दर्शवणार्‍या छळाच्या पद्धती ! (छायाचित्रांसह)
४. आतंकवादाला विरोध करण्यासाठी स्थापण्यात आलेल्या आयएआयएस्चे कार्य आणि वैशिष्ट्ये
५. इसिसला अन्य देशांनी केलेला विरोध
विशेषांक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा !
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १६ एप्रिलला दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी !
       लौकिकार्थाने समर्थ रामदासस्वामींना शरचापधारी दाशरथी रामाची आराधना अपेक्षित असली, तरी पारमार्थिकदृष्ट्या त्यांना आत्मारामाची उपासना (आत्मानुभूती देणारी आध्यात्मिक साधना) अभिप्रेत होती. 
- प्रा. मुरलीधर सायनेकर, ठाणे (जनहित न्याय विचार, अंक ६ वा, २४.२.२०१४)

विविध सेवांसाठी देवद आश्रमात साधकांची तातडीने आवश्यकता !

साधकांना गुरुसेवा करण्याची सुसंधी !
     देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वाहन, स्वयंपाक, उत्पादन-बांधणी आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे. जड साहित्य उचलू शकणार्‍या साधकांसाठी मागणी-पुरवठा संबंधी विविध सेवा उपलब्ध आहेत. जे साधक पूर्णवेळ, काही कालावधीसाठी किंवा शनिवार आणि रविवार अन् अन्य सुटीच्या दिवशी आश्रमात येऊन सेवा करू शकतात, त्यांनी खालील सारणीनुसार माहिती भरून ती जिल्हासेवकांच्या माध्यमातून devadashram@gmail.com संगणकीय पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी. शाळा आणि महाविद्यालये यांना लवकरच सुटी लागणार असल्याने युवा साधकही या सेवेत सहभागी होऊ शकतात.

विविध सेवांसाठी वाराणसी सेवाकेंद्रात साधकांची तातडीने आवश्यकता !

सर्वत्रच्या साधकांना गुरुसेवेची सुवर्णसंधी
      वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात वाहन, संगणक देखभाल आणि दुरुस्ती, प्रसार, लेखा आदी दैनंदिन सेवा, तसेच शारीरिक श्रमांच्या अन्य सेवा यांसाठी साधकांची आवश्यकता आहे.
     जे साधक पूर्णवेळ किंवा काही कालावधीसाठी सेवाकेंद्रात राहून या सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून रामनाथी आश्रमात कु. प्रियांका जोशी यांच्याशी ०८४५१००६०६३ या क्रमांकावर अथवा dharmatej2023@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.


राज्यकर्त्यांनी संतांच्या शिकवणीनुसार वागण्याचे महत्त्व

      रामदासांनी मराठा तितुका मेळवावा, असा मंत्र संभाजीस उपदेशिला; म्हणून मराठी राज्य अवरंगशाहीपुढे (औरंगजेबासमोर) तरले. पुढे तो दंडक सुटला; म्हणून इंग्रजांचे राज्य महाराष्ट्रावर सवाशे वर्षे चालले. हा इतिहास सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखा आहे.
- श्री. शेजवलकर (संदर्भ : श्री शिव छत्रपति, पृ. ४६)

समाजकंटकांचे सनातन आश्रमावरील आक्रमणांचे घृणास्पद कृत्य चालूच !

शिवीगाळ करणे, धमक्या देणे, अश्‍लील बोलणे आणि दगडफेक करणे 
या गोष्टी दखलपात्र ठरवणारे दंडविधान हिंदु राष्ट्रात असेल !
      सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांना धमक्या देण्याचा, अश्‍लील बोलण्याचा आणि आश्रमावर दगड फेकण्यास आरंभ केल्याचा कालचा ६ वर्षे १३९ वा दिवस !
     १३.४.२०१६ रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी आश्रमासमोरील रस्त्यावरून दोघे दुचाकीस्वार शिवीगाळ करत गेले.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

       भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

सत्याची कास कधीही सोडू नये !
       परमेश्‍वराची साथ नित्य रहावी, ही इच्छा असेल, तर कधीही सत्याची कास सोडू नये. सतत सत्याचे अधिष्ठान ठेवावे !
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे
       छत्रपती शिवाजी महाराजांनी निवडणूक जिंकून राज्य स्थापन केले नाही, तर गुरु समर्थ रामदासस्वामी आणि देवी तुळजाभवानी यांच्या आशीर्वादाने राज्य स्थापन केले. हल्ली एक तरी राजकारणी गुरु आणि देवता यांचे आशीर्वाद मिळण्यास लायक आहेत का ? 
 - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

समर्थ रामदासस्वामींच्या भक्तांना विनंती !

      आता दासबोधाचे वाचन, त्याची पारायणे, समर्थांच्या पादुका सर्वत्र नेणे इत्यादींच्या जोडीला समर्थांची राष्ट्र आणि धर्म विषयक शिकवण कृतीत आणणे आणि वारकर्‍यांप्रमाणे राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी क्रियाशील होणे अत्यावश्यक आहे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
तुम्ही दुःखी असाल, तेव्हा माझी आठवण करा. तुम्ही 
सुखी असाल, तेव्हा मी तुमची आठवण करीन.
     भावार्थ : दुःखी असतांना तुम्ही माझी आठवण केलीत की, मी तुमचे दुःख दूर करीन. तुम्ही सुखी असाल, तेव्हा मायेमुळे, पैशामुळे, बुद्धीभ्रष्ट होऊ शकता. तसे होऊ नये म्हणून त्या पैशाचे काय करायचे, जीवनात कसे रहायचे, हे मी तुम्हाला सांगेन.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     धर्मद्रोही, पुरोगामी आणि बुद्धीप्रामाण्यवादी यांनी उद्या विवाहित स्त्रियांनी मंगळसूत्र घालू नये, कुंकू लावू नये, मंगळागौर आणि वटपौर्णिमा करू नये इत्यादी फतवे काढल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! असे होऊ नये म्हणून पुढील पिढ्यांच्या कल्याणासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


बोधचित्र

उद्दाम अणेंचा महाराष्ट्रद्रोह !

    विदर्भाच्या सूत्रावर महाधिवक्तापदाचे त्यागपत्र देणारे अधिवक्ता श्रीहरि अणे यांनी १३ एप्रिलला नागपूर येथे स्वतःचा वाढदिवस साजरा करतांना महाराष्ट्राचा नकाशा असलेला केक कापून त्यातून विदर्भ आणि मराठवाडा वेगळे मागत असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. अधिवक्ता अणे सध्या विदर्भाच्या दौर्‍यावर असून वेगवेगळ्या जिल्ह्यांत सार्वजनिक सभा घेत आहेत.
       मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ता मा.गो. वैद्य यांच्या विदर्भवादी भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली होती. महाराष्ट्राचे चार भागही होऊ शकतात, अशी भूमिका वैद्य यांनी मांडली होती. त्यावर महाराष्ट्र म्हणजे वाढदिवसाचा केक नाही की, तो कापून खावा, या शब्दांत राज ठाकरे यांनी वैद्य यांच्या भूमिकेचा समाचार घेतला होता. तसेच अणेंवरही टीका केली होती. या पार्श्‍वभूमीवर अणे यांनी नागपूर येथील रविभवनात कुटुंबीय, तसेच सहकारी यांसमवेत वाढदिवसाचा केक कापला. त्यावर महाराष्ट्रातील वेगवेगळे प्रदेश दर्शवण्यात आले होते. महाराष्ट्राच्या आकाराचा केक कापून विदर्भ आणि मराठवाडा वेगळे करत राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत आहोत, असे त्यांना वाटले असावे. अणेंची ही कृती म्हणजे केवळ राजकीय स्पर्धेतील कुरघोडी नव्हे, तर पराकोटीच्या महाराष्ट्रद्रोहाची उद्दाम वृत्ती होय. वाढदिवसाचा हा कौटुंबिक कार्यक्रम होता, त्यामुळे त्याचा राजकीय अर्थ काढू नका, असे अणे यांनी स्पष्टीकरण दिलेे. मोठ्या व्यक्तींनी कौटुंबिक कार्यक्रमात राजकीय किंवा सामाजिक विषय आणले, तर कुटुंबापुरते मर्यादित न होता, अर्थातच समाजावर परिणाम करणारे होतात, हे न कळण्याइतके अणे काही भोळे नाहीत. आणि म्हणूनच केकच्या माध्यमातून राज्याचे दोन तुकडे करण्याची स्वप्ने पहाणारे राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरि अणे यांचा हा वाढदिवस आयुष्यभर लक्षात ठेवू, अशी धमकीवजा चेतावणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावर दिली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn