Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

त्र्यंबकेश्‍वर येथील शिवमंदिराच्या गाभार्‍यात घुसण्याचा पुन्हा प्रयत्न करणार्‍या महिलांना ग्रामस्थांनी रोखले !

मंदिराच्या दारात बसून भाविकांना दर्शनासाठी अडथळा निर्माण करणार्‍या महिला
देवदर्शनापेक्षाही गाभारा प्रवेशाला महत्त्व देणार्‍या प्रसिद्धीलोलुप महिला !
      त्र्यंबकेश्‍वर - १३ एप्रिल या दिवशी त्र्यंबकेश्‍वर येथील शिवमंदिराच्या गाभार्‍यात घुसू पहाणार्‍या स्वराज्य महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांना स्थानिक नागरिकांनी रोखले होते. त्यानंतर या संघटनेच्या वनिता गुट्टे आणि अन्य महिला आंदोलकांनी १४ एप्रिलला सकाळी पुन्हा मंदिराच्या गाभार्‍यात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्नही तेथे उपस्थित श्रद्धाळू भाविकांनी आणि मंदिर प्रशासनाने हाणून पाडत या महिलांना गाभार्‍यात जाण्यापासून अडवले.
     या वेळी या धर्मद्रोही महिला आंदोलकांनी भाविकांना धक्काबुक्की करत धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या महिलांना मंदिर प्रशासनाने मंदिराच्या बाहेर काढले. त्यानंतर या महिला आंदोलकांनी मंदिराच्या प्रवेशद्वारातच आपले ठाण मांडले. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची मोठी गैरसोय झाली

कोटी कोटी प्रणाम !

पू. द्वारावती रेडकरआजी यांचा आज वाढदिवस !

कोटी कोटी प्रणाम !

प.पू. बेजन देसाई यांची पुण्यतिथी, नाशिक
विनम्र अभिवादन !

घटनाकार, भारतरत्न डॉ. आंबेडकर यांची जयंती

पोलीस बंदोबस्तात श्री अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा तृप्ती देसाई यांचा प्रयत्न हिंदुत्ववाद्यांच्या प्रखर विरोधामुळे फसला !

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी चर्चा करतांना धर्माभिमानी !
  • गाभार्‍यात प्रवेश करू पहाणार्‍या तृप्ती देसाई यांच्यावर शाई फेकली !
  • धर्मद्रोह्यांना रोखण्यासाठी आलेल्या महिला भक्तांना मंदिरातून बाहेर काढण्याचा पुरुष पोलिसांचा अश्‍लाघ्य प्रयत्न !
  • पोलिसांनी आमच्यावर कारवाई केली, तरी आम्ही मागे हटणार नाही ! - संघटित देवीभक्तांची चेतावणी
  • तृप्ती देसाई यांच्या धर्मद्रोही आंदोलनामुळे देवीच्या आरतीला १ घंटा विलंब
तृप्ती देसाई यांना चोप आणि जिल्हाधिकार्‍यांच्या त्यागपत्राची मागणी !
     १३ एप्रिलला सायंकाळी उशिरा तृप्ती देसाई यांनी गाभार्‍यात पाऊल टाकण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना बाहेर खेचले. पोलीस संरक्षणात परत येतांना तृप्ती देसाई यांना संतप्त देवीभक्तांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या वेळी भक्तांनी जिल्हाधिकार्‍यांच्या त्यागपत्राचीही मागणी केली.
      कोल्हापूर - श्री शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळाल्यानंतर धर्मद्रोही भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी कथित विजयाचा जल्लोष करण्यासाठी आणि कोल्हापुरातील श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी १३ एप्रिल या दिवशी मंदिराच्या गाभार्‍यात जाण्यासाठी पोलीस बंदोबस्तात केलेले आंदोलन हिंदुत्ववादी महिला आणि पुरुष यांच्या प्रखर विरोधामुळे फसला. आंदोलन केले. साडी घालूनच महिलांना गाभार्‍यात प्रवेश देण्याच्या श्री अंबाबाई देवस्थान समितीच्या अटीच्या विरोधात जाऊन देसाई यांचा सलवार-कुर्त्यामध्येच दर्शन घेण्याचा अट्टाहास होता; परंतु पोलिसांनी श्री अंबाबाई मंदिरापासून ४ कि.मी. अंतरावरच तृप्ती देसाई आणि त्यांच्या कह्यात घेतले होते; मात्र काही वेळाने तृप्ती देसाई २-३ महिला कार्यकर्त्यांसह पोलीस बंदोबस्तात पुन्हा मंदिरात दाखल झाल्या आणि त्यांनाी गाभार्‍यात जाण्याचा प्रयत्न केला.

त्र्यंबकेश्‍वर येथे शिवमंदिराच्या गाभार्‍यात घुसू पहाणार्‍या महिलांना रोखले !

धर्म आणि राष्ट्र संकटात असतांना धर्मशास्त्र जाणून न घेता 
अनावश्यक विषयांवर आंदोलन करणार्‍या प्रसिद्धीलोलुप महिला !
      त्र्यंबकेश्‍वर - प्रसिद्धीच्या हव्यासापोटी, तसेच कथित समानतेच्या नावाखाली ठिकठिकाणच्या मंदिरांच्या गाभार्‍यांमध्ये प्रवेश करण्याचे महिला संघटनांचे पेव फुटले आहे. त्र्यंबकेश्‍वर येथेही स्वराज्य महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी १३ एप्रिल या दिवशी मंदिराच्या गाभार्‍यात घुसण्याचा प्रयत्न केला; मात्र धर्माभिमानी ग्रामस्थ आणि मंदिराचे विश्‍वस्त यांनी तो प्रयत्न हाणून पाडत महिलांना गाभार्‍यात जाण्यापासून रोखले. या वेळी ग्रामस्थ, मंदिर कर्मचारी आणि धर्मद्रोही महिला कार्यकर्त्या यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्यासाठी सुरक्षा पुरवण्याची मागणी स्वराज्य महिला संघटनेने जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. परिस्थितीचे गांभीर्य पहाता मंदिराच्या भोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.
१. गर्भगृहात घुसण्यासाठी स्वराज्य महिला संघटनेच्या महिला दाखल होताच ग्रामस्थांनी त्यांना तीव्र विरोध दर्शवला. त्यावर मंदिर प्रशासनाने महिला कार्यकर्त्यांना चर्चा करण्याचे आवाहन केले.
२. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने महिलांना गर्भगृहात जाता येणार नाही. त्या बाहेरून दर्शन घेऊ शकतात, असे मंदिर प्रशासनाने चर्चेच्या वेळी सांगितले.

चौथर्‍यावरील प्रवेशासाठी भांडण्यापेक्षा महिलांवरील बलात्कार आणि अन्य अत्याचार यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता ! - पंकजा मुंडे

धर्मद्रोही महिलांना परखड भाषेत सुनावत त्यांचे पितळ 
उघडे पाडणार्‍या पंकजा मुंडे यांचे अभिनंदन !
     मुंबई - शनिशिंगणापूरमध्ये महिला गेल्यामुळे महिलांचे कोणते प्रश्‍न सुटले आहेत ? अशा चळवळीमुळे महिलांचे खरे प्रश्‍न मागे पडू नयेत. पुढील २० वर्षांत कोणते प्रश्‍न निर्माण होणार आहेत, याचा विचार करून ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आज महिलांवरील बलात्कार रोखणे, महिलांची क्षमता वाढवणे, महिलांना सन्मान देण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यांच्यावरील अत्याचार रोखणे आवश्यक आहे, असे उत्तर महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकारांनी शनिशिंगणापूरविषयी विचारलेल्या प्रश्‍नावर दिले.
     विधान भवनात चक्की खरेदीविषयी झालेल्या आरोपांचा खुलासा करण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे बोलत होत्या. पत्रकारांनी शनिशिंगणापूरमध्ये महिलांनी प्रवेश केला आहे. तुमची भूमिका काय आहे, असा प्रश्‍न विचारला होता.
     त्यावर सौ. मुंडे पुढे म्हणाल्या, आधी जातीची भांडणे केली, धर्मांधर्मांची भांडणे केलीत, आता स्त्री आणि पुरुषांची भांडणे चालू झाली आहेत, हे मला मान्य नाही. माझ्या घरामध्ये जेवणासाठी डायनिंग टेबलवर बसल्यावर माझा नवरा मला जेवण वाढत नाही, तर मी त्याला जेवण वाढते. म्हणजे माझ्या नवर्‍याचा माझ्यावर दबाव आहे, असा याचा अर्थ होत नाही.

हंदवाडा (काश्मीर) येथे सैन्याची चौकी जाळण्याचा प्रयत्न करणार्‍या धर्मांधांवर सैन्याने केलेल्या गोळीबारात २ जण ठार !

सैनिकांनी तरुणीची छेड काढल्यावरून आंदोलन करणार्‍या धर्मांधांचा आरोप तरुणीनेच फेटाळला !
      श्रीनगर - काश्मीरमधील हंदवाडा येथे सैनिकांनी विद्यार्थीनीची छेडछाड केली, असा कांगावा करून धर्मांधांनी सैनिकांना लक्ष्य करत सैन्याची चौकी जाळण्याचा १२ एप्रिलला प्रयत्न केला होता, तेव्हा सैन्याच्या केलेल्या गोळीबात २ जण ठार झाले होते. या संदर्भात कोणत्याही सैनिकाने माझी छेडछाड केलेली नाही. सैनिकांना अपकीर्त करण्याचा हा कट आहे, असा खुलासा संबंधित विद्यार्थिनीने १३ एप्रिलला केला.
१. विद्यार्थिनीने सांगितले की, शाळेमधून घरी जात असतांना एका युवकाने माझे दप्तर हिसकावण्याचा प्रयत्न केला. या वेळी युवकाला विरोध केला असता त्याने मला एक थप्पड लगावली. पोलिसांनी जवळ येत मला चौकीत नेले. या घटनेनंतर संबंधित युवकाने मित्रांना एकत्र करत गोंधळ घालण्यास प्रारंभ केला. कोणत्याही सैनिकाने माझी छेड काढलेली नाही.
२. १२ एप्रिलला या छेडछाडच्या या घटनेनंतर ५०० धर्मांधांनी आंदोलन केले होते. त्यांनी सैनिकांवर दगडफेक केली. त्यांनी सैन्याच्या चौकीवर दगडफेक केली, तसेच चौकीला आग लावण्याचा प्रयत्न केला. या धर्मांध आंदोलकांना पांगवण्यासाठी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात इक्बाल अहमद आणि नईम भट या दोन धर्मांध आंदोलकांचा मृत्यू झाला. तसेच एका घायाळाचे उपचाराच्या वेळी निधन झाले. नईम एक क्रिकेटपटू होता.
३. या घटनेनंतर येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
४. सैन्याने या गोळीबाराच्या चौकशीचे आदेश दिले आहे.
५. मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, या गोळीबाराला उत्तरदायी असलेल्या सुरक्षारक्षकांवर कडक कारवाई करण्यात येईल.

आज गुरुपुष्यामृत योग

     १४ एप्रिल २०१६ या दिवशी दुपारी २.३६ पासून १५ एप्रिल २०१६ सूर्योदयापर्यंत गुरुपुष्यामृत योग आहे. (संदर्भ : दाते पंचांग)

एन्आयटी (श्रीनगर) येथून काश्मीरबाहेरील २ सहस्र राष्ट्रप्रेमी विद्यार्थी बाहेर पडले !

जम्मू-काश्मीर शासनचे अपयश !
      नवी देहली - श्रीनगर येथील एन्आयटीमध्ये शिक्षण घेणार्‍या जम्मू-काश्मीर राज्याबाहेरील २ सहस्र विद्यार्थ्यांनी विद्यालयाचे आवार सोडले आहे. काही दिवसांपूर्वी भारताचा झेंडा फडकवत भारत माता की जय म्हणत आंदोलन राज्याबाहेरील राष्ट्रभक्त विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला होता. केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृति इराणी यांनी हस्तक्षेप करून देखील या विद्यार्थ्यांना थांबवणे शक्य झाले नाही. (विद्यार्थ्यांचा मंत्र्यांवर आणि शासनावर विश्‍वास नसल्याचेच हे द्योतक आहे. याचा या मंत्र्यांनी विचार केला पाहिजे. - संपादक) यांमधील काही विद्यार्थी घरी, तर काही विद्यार्थी स्मृति इराणी यांची भेट घेण्यास गेले आहे.
१. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे की, हे सर्व विद्यार्थी आमची मुले आहेत आणि आमच्यावर त्यांचे दायित्व आहे. काश्मीर त्यांचे घर आहे आणि ते परत येतील, असा मला विश्‍वास आहे. या प्रकरणातील दोषींना शिक्षा देण्यात येईल आणि पीडितांच्या नातेवाइकांना भरपाई दिली जाईल.
२. विद्यार्थ्यांनी म्हटले आहे की, आमचे भवितव्य बिघडवण्याची धमकी देणार्‍या महाविद्यालयाच्या पक्षपाती कर्मचार्‍यांच्या विरोधात जोपर्यंत कारवाई केली जात नाही, तोपर्यंत आम्ही परत येणार नाही.
३. ११ एप्रिलला महाविद्यालयाच्या मंडळाने घेतलेल्या बैठकीनंतर जे विद्यार्थी आवारात थांबतील त्यांनाच परीक्षा देता येईल, अशी एक नोटीस विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.

शिवसेनेचे नेते खासदार श्री. संजय राऊत यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट

दैनिक सनातन प्रभातचा अंक पहातांना श्री. संजय राऊत. बाजूला सनातनचे श्री. चेतन राजहंस
     रामनाथी (गोवा) - शिवसेनेचे नेते आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार श्री. संजय राऊत यांनी १२ एप्रिल या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी आश्रमात चाललेल्या राष्ट्र आणि धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन या कार्याविषयी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी त्यांना अवगत केले. या वेळी श्री. राऊत यांनी दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयालाही आवर्जून भेट दिली. आश्रम पाहून श्री. राऊत म्हणाले, आश्रम अतिशय सुंदर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सुशिक्षित साधक येथे राहून सेवा करतात, हे पाहून चांगले वाटले. पुढच्या वेळी मी पुन्हा एकदा सहकुटुंब आश्रमाला भेट देईन, म्हणजे माझ्या मुलांनाही येथे नवीन शिकायला मिळेल. मी सनातन प्रभातचे नियमित वाचन करतो.

रामनवमीच्या कालावधीत झारखंडमध्ये मांस आणि दारू विक्रीवर बंदी !

     रांची (झारखंड) - झारखंड शासनाने रामनवमीच्या निमित्ताने १४ ते १६ या कालावधीत मांस आणि दारू यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मुख्य सचिव राजबाला वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निणर्र्र्र्य घेण्यात आला. याविषयी शासनाने प्रसिद्धी पत्रकही काढले आहे. नुकताच झारखंडमध्ये सांप्रदायिक घटनांमुळे तणाव निर्माण झाल्याने बैठकीत अतिरिक्त सुरक्षा ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

उच्च न्यायालयांचे निकाल मोठ्या कालावधींसाठी राखून ठेवले जातात !

उशिरा मिळणारा न्याय हा अन्यायच नव्हे का ?
     नवी देहली - देशातील विविध उच्च न्यायालयांच्या खटल्यांचे निकाल मोठ्या कालावधीसाठी राखून ठेवल्याचे धक्कादायक सूत्र समोर आले आहे. टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आजपर्यंतचा सर्वांत प्रलंबित निकाल कोलकाता उच्च न्यायालयाचा आहे. ७ वर्षांपासून तो ऑक्टोबर २०१३ पर्यंत राखून ठेवण्यात आला होता. सध्या त्या निकालाची काय स्थिती आहे, ते शासनालाही माहीत नाही. 
१. कोलकाता उच्च न्यायालयात एखाद्या खटल्याचा निकाल मिळण्यास सरासरी ८३५ दिवस लागतात. असे गृहीत धरले, तर वरील खटल्यातील निर्णय घोषित होण्यास किमान १० वर्षे तरी लागली असतील.

केवळ पाश्‍चात्त्यांचे अनुकरण हे देशाच्या आणि समाजाच्या एकात्मतेला पूर्ण मारक आहे. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, ६.८.२०१०)पुन्हा सत्तेत आल्यास राज्यात दारूबंदी करणार !

५ वर्षे सत्तेत असतांना दारूबंदी का केली नाही ? जनतेला मूर्ख बनवणार्‍या 
अशा राज्यकर्त्यांना जनतेने निवडणुकीत धडा शिकवावा !
तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे आश्‍वासन
     चेन्नई - तमिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांनी पुन्हा सत्तेत आल्यास राज्यात दारूबंदी करण्याचे आश्‍वासन येथील जाहीर सभेत दिले. तमिळनाडूत १६ मे या दिवशी होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे आश्‍वासन दिले आहे. केवळ एका दिवसात दारूबंदी शक्य नाही. प्रारंभी मद्यविक्री दुकानांची वेळ अल्प केली जाईल, नंतर परिस्थितीचा अभ्यास करून त्यांची संख्या न्यून करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
१. तमिळनाडूला मद्यविक्रीतून वर्षाला ३० सहस्र कोटी रुपये मिळतात. 
२. वर्ष १९७१ मध्ये करुणानिधी यांनी राजकीय कारणांसाठी दारूबंदीचा कायदा शिथिल केल्याचा आरोप जयललिता यांनी केला. द्रमुक सत्तेत असतांना राज्यात मद्यविक्रीत दुप्पट वाढ झाल्याचा आरोपही त्यांनी केला. 
३. बिहारमध्ये नितीशकुमार यांनी सत्तेत आल्यावर राज्यात दारूबंदी केली आहे. त्यावरून जयललिता यांनी तसे आश्‍वासन दिल्याचे म्हटले जात आहे.

सामाजिक संकेस्थळावर डिंकोइझम् नावाच्या धर्माची स्थापना !

धर्माचे काडीचेही ज्ञान नसणार्‍या अज्ञानींचा मूर्खपणा !
     नवी देहली - अंधश्रद्धा आणि अनिष्ट प्रथा यांच्या विरोधात असणार्‍या एका गटाने सामाजिक संकेस्थळावर डिंकोइझम् नावाचा एक धर्म स्थापन केला आहे. या धर्माचा विज्ञानावर विश्‍वास असून हा धर्म अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, चालीरिती आणि चमत्कार यांच्या विरोधात आहे. हा धर्म मानणार्‍यांना अल्पसंख्याक हा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी या गटाने केला आहे.
१. सामाजिक संकेस्थळावर त्यांनी बनवलेल्या पानाला ४० सहस्रांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. 
२. डिंकोइझम् चळवळीचे चलचित्र सामाजिक संकेस्थळावर सर्वत्र प्रसारित झाले आहे. सुपरहिरोच्या रूपातील उंदराला डिंकोइझम् धर्माचा देव म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याला लॉर्ड डिंकन म्हणूनही संबोधले जात आहे.

माझ्या छायाचित्राचा वापर थांबवा ! - गुजरात दंगल पीडित कुतुबुद्दीन अन्सारीचे आवाहन

अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी त्यांचा वापर करणारी काँग्रेस म्हणे निधर्मीवादी !
बंगाल आणि आसाममध्ये निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसकडून छायाचित्राचा वापर
     कर्णावती (अहमदाबाद) - वर्ष २००२ मध्ये झालेल्या गुजरात येथील दंगलीच्या वेळचे पीडित कुतुबुद्दीन अन्सारी यांच्या छायाचित्राचा वापर काँग्रेसकडून बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केला जात आहे. काँग्रेसच्या अधिकृत फलकावर अन्सारीचे छायाचित्राच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना लक्ष्य केले जात आहे. प्रचारासाठी आपल्या चेहर्‍याचा वापर केल्यामुळे अस्वस्थ झालेल्या अन्सारीने माझ्या छायाचित्राचा असा वापर थांबवावा, अशी विनंती केली आहे.

चित्तोडगड (राजस्थान) येथे काश्मिरी विद्यार्थ्यांकडून भारतविरोधी घोषणा !

     चित्तोडगड (राजस्थान) - नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील सामन्याच्या वेळी येथील मेवाड विद्यापिठातील काही काश्मिरी विद्यार्थ्यांनी भारतविरोधी घोषणा दिल्या. (अशा देशद्रोह्यांना भारताबाहेर हाकला ! - संपादक) त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या जम्मूमधील विद्यार्थ्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केली. या प्रकरणी सर्व १६ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली असून त्यांची जामिनीवर सुटका करण्यात आली. या घटनेनंतर मेवाड विद्यापीठ प्रशासनाने १६ दोषी विद्यार्थ्यांना २५ एप्रिलपर्यंत निलंबित केले आहे. यापैकी ७ विद्यार्थी जम्मूमधील, तर ९ काश्मीर येथील आहेत.

आपला देश पुष्कळ मोठा आहे, तोही छोटा करा ! - मनसेची मा.गो. वैद्य यांच्यावर टीका

     मुंबई - लोकांच्या सोयीसाठी राज्ये छोटी करायला हवीत, असे म्हणता; मग आपला देशही पुष्कळ मोठा आहे. तोही छोटा करा, अशी उपरोधिक टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ता अनिल शिदोरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा.गो. वैद्य यांच्यावर केली आहे. स्वतंत्र विदर्भासह महाराष्ट्राचे चार भागांत विभाजन करण्याची मागणी वैद्य यांनी केली होती. शिदोरे यांनी ५० लाख ते तीन कोटींपर्यंतच्या संख्येची छोटी राज्ये स्थापन करून महानगरपालिकांचे संघराज्य स्थापन करायचे आहे का ? असा प्रश्‍नही वैद्य यांना केला आहे.

हिंदू जागृत झाले नाही, तर तमिळनाडूचीही स्थिती काश्मीरप्रमाणे होईल ! - श्री. राहुल कौल, पनून काश्मीर

तमिळनाडू विधानसभा निवडणूक
      चेन्नई - १९९० मध्ये जेव्हा आम्हा काश्मिरी हिंदूंना काश्मिरातून हाकलण्यात आले, तेव्हा केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच आम्हाला आधार दिला. जर आपण जागृत झालो नाही, तर आमच्यावर ओढवलेली परिस्थिती तमिळनाडूमध्येही यायला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन पनून काश्मीरचे श्री. राहुल कौल यांनी येथे केले. शहरातील मयलापूरमध्ये शिवसेना तमिळनाडूच्या वतीने आयोजित निवडणूक प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. शिवसेनेचे राज्य अध्यक्ष श्री. राधाकृष्णन यांनी मयलापूर मतदारसंघातून श्री. विजय कृष्ण यांना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेतेही सभेमध्ये सहभागी झाले होते. या सभेत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे आणि सनातन संस्थेच्या सौ. सुगंधी जयकुमार सहभागी झाल्या होत्या.
     पनून काश्मीरचे श्री. राहुल कौल पुढे म्हणाले, मयलापूरचे पावित्र्य राखण्यासाठी हिंदु धर्माची सेवा करणारा उमेदवारच निवडून यायला हवा. धर्म आणि संस्कृती यांवर आक्रमण करणार्‍या शक्तींच्या विरोधात कार्य करणार्‍या धर्माभिमान्यांना आपण समर्थन द्यायला हवे. धर्म आणि अधर्मात युद्ध चालू असल्याने आपण धर्मरक्षणासाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायलाच हवा.
     शिवसेना तमिळनाडूचे श्री. राधाकृष्णन् म्हणाले, हिंदूंच्या वेगाने होत असलेल्या धर्मांतरावर नियंत्रण नाही. श्रीलंकेतील तमिळी हिंदूंचे मूळ अधिकार हिरावून घेण्यात आले आहेत

मधुचंद्र आणि सहल यांसाठी येणार्‍या लोकांमुळे आला होता केदारनाथ येथे जलप्रलय ! - शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

शंकराचार्यांचे हे विधान तथाकथित बुद्धीवाद्यांना 
पटणार नाही; कारण बुद्धीच्या पलीकडे काही असते, हेच त्यांना कळलेले नाही ! 
     नवी दिल्ली - केदारनाथ येथे वर्ष २०१३ मध्ये आलेला जलप्रलय हा मधुचंद्र आणि सहल यांसाठी येणार्‍या लोकांमुळे आला होता, असे प्रतिपादन द्वारका आणि शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले आहे. उत्तराखंडात आलेल्या जलप्रलयामध्ये पाच सहस्र भाविक आणि स्थानिक लोकांचा मृत्यू झाला होता. याआधी श्री शनिशिंगणापूर येथील शनिमंदिरात महिलांना प्रवेश मिळाल्यामुळे महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होईल, असे विधान शंकराचार्यांनी केले होते. 

विद्यापिठातील धर्मांध कर्मचार्‍याकडून अनैतिक कृत्ये करण्यासाठी हिंदु विद्यार्थिनींवर दबाव

शिक्षणासारख्या पवित्र ठिकाणी अनैतिक कृत्ये करण्यास हिंदु विद्यार्थिनींवर 
दबाव टाकणार्‍या धर्मांध कर्मचार्‍याला निलंबित करा ! 
पोलिसांनी तक्रार न घेताच विद्यार्थिनींना परत पाठवले !
     सागर (मध्यप्रदेश) - स्वामी विवेकानंद या खाजगी विद्यापिठातील प्रयोगशाळा साहाय्यक म्हणून कार्यरत महंमद दानिश खान येथील विद्यार्थिनींवर अनैतिक कृत्ये करण्यासाठी दबाव टाकत असल्याचे समोर आले आहे. या विरोधात दोन विद्यार्थिनींनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला; (मुसलमानधर्जिणे पोलिस ! - संपादक) मात्र पोलिसांनी त्यांना मानहानी होण्याची भीती दाखवली. त्यानंतर या विद्यार्थिनी तक्रार दाखल न करताच परत गेल्या.

हिंदु धर्म भेदभाव करत नाही, तर महिलांच्या मंदिर प्रवेशावर बंदी का ? - सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्‍न

शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशबंदीचे प्रकरण 
     नवी देहली - हिंदु धर्मात महिला आणि पुरुष यांच्यासाठी वेगळेपण नाही. हिंदू केवळ हिंदू आहेत. हिंदु धर्म जर मंदिरात प्रवेश करण्यासाठी प्रत्येकाला अनुमती देतो, तर महिलांना कसे रोखता येईल, असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. (हिंदूंनी कधीही मंदिरात महिलांना प्रवेश करण्यास रोखलेले नाही; मात्र शबरीमला येथील मंदिराच्या संदर्भात तो धर्मशास्त्रामुळे अपवाद आहे. हिंदूंची धर्मशास्त्रावर श्रद्धा आहे. त्यामुळे त्याचे पालन केले जात आहे. अन्यथा मंदिरांचे पावित्र्य कसे रोखणार ? - संपादक) केरळच्या शबरीमला मंदिरात मासिक पाळी असणार्‍या महिलांना मंदिरात प्रवेश करण्यास बंदीच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हा प्रश्‍न केला. 

देशात यावर्षी चांगला पाऊस पडण्याची शक्यता ! - हवामान विभागाचा अंदाज

     अश्‍वमेधयाजी प.पू. काळेगुरुजी २०१६ मध्ये देशात चांगला पाऊस पडण्यासाठी मागील वर्षापासून १२ ज्योतिर्लिंग आणि अन्य ठिकाणी यज्ञ करत आहेत. त्यांनी 'हवामान खात्याच्या अंदाजापूर्वीच २०१६ मध्ये चांगला पाऊस पडणार', हे सांगितले आहे. ते करत असलेल्या यज्ञांचाच हा परिणाम आहे, अशीच हिंदूंची श्रद्धा आहे ! 

पतंजलीच्या विज्ञापनामध्ये देशभक्तीपर हा शब्द वापरल्यामुळे मुसलमान अधिवक्त्याला पोटशूळ !

जे जे देशहिताला प्राधान्य देणारे आहे, त्याला विरोध करण्याची कावेबाज 
मुसलमानांची वाढती मानसिकता देशासाठी धोकादायक !
     बरेली (उत्तरप्रदेश) - पतंजलीच्या दंतकांती या टूथपेस्टच्या विज्ञापनामध्ये केलेल्या आवाहनात देशभक्तीपर हा शब्द वापरल्याने वाद निर्माण झाला आहे. या विज्ञापनामध्ये कोट्यवधी देशभक्त भारतियांप्रमाणे आपणही पतंजलीच्या उत्पादनांना प्राधान्य द्या. तुमच्या दुकानांत, हृदयात स्थान द्या. त्याद्वारे देशाच्या सेवेत आणि समृद्धीत योगदान द्या. पतंजलीची उत्पादने वापरून स्वदेशीचा आग्रह धरणारे म. गांधी, भगतसिंह आणि रामप्रसाद बिस्मिल यांचे स्वप्न पूर्ण करा असे आवाहन करण्यात आले आहे. बरेली येथील अधिवक्ता महंमद खालिद जिलानी यांनी या विज्ञापनावर आक्षेप घेऊन त्याविरोधात अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टॅँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाकडे (एएस्सीआयकडे) तक्रार दाखल केली आहे. (अनेक क्रांतीकारकांनी आणि स्वातंत्र्यसैनिकांनी विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्यास सांगून स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे लोकांना आवाहन केले होते. विज्ञापनाद्वारे त्याची लोकांना आठवण करून दिल्यास त्यात चूक ते काय ? देशभक्ती या शब्दावर आक्षेप घेऊन शेवटी भारतियांच्या मनातील देशभक्ती मिटवण्याचा हा मुसलमानांचा कट आहे. हिंदूंनो, हा कट वैध मार्गाने हाणून पाडा ! - संपादक)

श्री अंबाबाई देवस्थान शांतता समितीने आयोजित केलेल्या फेरीला पोलिसांनी अनुमती नाकारली !

      कोल्हापूर - भूमाता ब्रिगेडच्या वतीने तृप्ती देसाई यांनी १३ एप्रिलला कथित विजयी फेरी आयोजित केली होती. या फेरीच्या मार्गावर त्याच वेळी प्रति (विरोधाची) फेरी काढण्याची अनुमती देण्याविषयीचे पत्र श्री अंबाबाई देवस्थान शांतता समितीचे श्री. श्रीनिवास साळुंखे यांनी जुना राजवाडा पोलिसांना १२ एप्रिल या दिवशी दिले होते. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, या कारणाने या फेरीला अनुमती नाकारली. महत्त्वाचे म्हणजे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही १३ एप्रिलला विजयी फेरी काढण्यासाठी पोलिसांकडे कोणत्याही प्रकारचे निवेदन सादर केलेले नव्हते. (असा चालतो तृप्ती देसाई यांचा कायदाद्रोही कारभार ! कायद्याला न जुमानणार्‍या म्हणे स्त्री-पुरुषांमध्ये समानता आणणार ! संपादक)
पोलिसांकडून कोल्हापूर शहरात जमावबंदी आदेश लागू !
     भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या येथील श्री अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याला येथील देवीभक्त, तसेच विविध हिंदुत्ववादी संघटना यांनी कडाडून विरोध दर्शवला होता. एकूणच परिस्थिती पहाता, कोल्हापूर पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये; म्हणून १३ एप्रिलला शहर परिसरात जमावबंदी आदेश लागू केला होता.
      या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगितले, कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या १ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ९ साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, ९० पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त मंदिर परिसरात तैनात करण्यात आला होता.

धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या !

www.hindujagruti.org

भदोही (उत्तरप्रदेश) येथे भर रस्त्यात धर्मांधांनी हिंदु युवतीला मारहाण करून कपडे फाडले !

उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाच्या शासनकाळात धर्मांधांचा उद्दामपणा ! 
     भदोही (उत्तरप्रदेश) - येथील नगरपालिकेसमोर स्थानिक आमदार जाहिद बेग यांचा पुतण्या शादाब बेग आणि त्याच्या सहकार्‍यांनी एका हिंदु युवतीला भर रस्त्यात मारहाण केली आणि तिचे कपडे फाडले. त्यानंतर युवतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा नोंद होऊन २ दिवस उलटल्यानंतरही पोलिसांनी आरोपीला अटक केली नव्हती. याविषयी बजरंग दल आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना जाब विचारला आणि आरोपींना अटक करण्याची मागणी केली, तसेच अटक न केल्यास आंदोलन करण्याची चेतावणी दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शादाबला अटक केली. या प्रकरणात आमदार बेग त्यांच्या पुतण्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

नागरिकांची फसवणूक करणार्‍या बांधकाम व्यावसायिकांवर मोक्का लावणार !

पनवेलमध्ये सदनिका विकण्याची खोटी विज्ञापने 
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्‍नावर 
गृहराज्यमंत्री रणजीतसिंह पाटील यांनी दिले आश्‍वासन 
     मुंबई, १३ एप्रिल (वार्ता.) राज्यात विशेषत: पनवेल (जिल्हा रायगड) परिसरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांकडूून वृत्तपत्रांतून सदनिका विकण्याची खोटी विज्ञापने देऊन सहस्रो नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे. जनतेला फसवणार्‍या बांधकांम व्यावसायिकांवर मोक्का लावण्यात येईल, असे आश्‍वासन राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीतसिंह पाटील यांनी १३ एप्रिलला विधानसभेत लक्षवेधीवर बोलतांना दिले. याविषयीची लक्षवेधी सूचना पनवेलचे भाजपचे आमदार श्री. प्रशांत ठाकूर यांनी मांडली होती. या वेळी भाजपचे आमदार श्री. आशिष शेलार यांसह अन्य सदस्यांनी जनतेची फसवणूक करणार्‍या बांधकाम व्यावसायिकावर मोक्का लावण्याची आग्रही मागणी केली होती. 

आफ्रिकी देशांतील जिहादी आतंकवादी संघटनांकडून आत्मघातकी आक्रमणे करण्यासाठी लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात उपयोग !

शेकडो मुलींचा जिहादसाठी वापर
* कॅमरून, नायजेरिया, नायगर आणि चाड या ४ देशांमधील अनुमाने १ सहस्र ८०० शाळा बंद 
* १३ लाख मुले बेघर
     याओन्दे (केमरून) - सीएन्एन् इंटरनॅशनल या वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार आफ्रिकेत जिहादी आतंकवादी संघटनांकडून लहान मुलांना आत्मघातकी आक्रमणासाठी वापरण्यात येण्याचे प्रमाण गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या युनिसेफ या लहान मुलांसाठी कार्य करणार्‍या जागतिक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०१४ मध्ये ही संख्या जिथे ४ होती, ती वर्ष २०१५ मध्ये ४४ झाली. तसेच यात तीन चतुर्थांश आत्मघातकी आक्रमण करणारे जिहादी म्हणून मुलींना वापरण्यात आले.

आतंकवादी हे इस्लाम धर्माला मानतात, हे आपण स्वीकारले पाहिजे ! - नदीने अल्-बुदैर, पत्रकार, सौदी अरेबिया

भारतातील ढोंगी निधर्मीवादी पत्रकार कधीही असे बोलणार नाहीत ! 
आतंकवाद्यांना धर्म नसतो, असे म्हणणार्‍या भारतातील ढोगी निधर्मीवाद्यांना चपराक !
    रियाध - आतंकवादी हे इस्लाम धर्माला मानतात हे आपण स्वीकारले पाहिजे, असे सौदी अरेबिया येथील पत्रकार नदीने अल्-बुदैर यांनी म्हटले आहे. सौदी येथील रोताना खालिजियाह या वाहिनीवरील कार्यक्रमात ते बोलत होते. आपण आपल्याच अंतरात्म्याचा आवाज का लपवत आहोत ?, असा प्रश्‍नही त्यांनी केला. 
नदीने अल्-बुदैर म्हणाले की,
१. जेव्हा आतंकवादी सामान्य जनतेचा नरसंहार करतात, तेव्हा कथित बुद्धीवादी पुढे येऊन म्हणतात की, ते इस्लाम किंवा मुसलमान नाहीत; परंतु त्यातील कोणी आम्हाला हे सांगू शकेल का की, इस्लाम आणि मुसलमान यांचे प्रतिनिधित्व कोण करत आहे ?

आतंकवादी हाफीझ सईद याच्याकडून समांतर शरिया न्यायालयाची स्थापना

पाकिस्तानमध्ये शरिया लागू होणार ?
पाकच्या पंजाब प्रांतात अशा प्रकारची पहिलीच यंत्रणा
     लाहोर (पाकिस्तान) - मुंबईवरील २६/११ च्या जिहादी आक्रमणाचा सूत्रधार असलेला आतंकवादी हाफीझ सईदयाच्या जमात-उद-दवा या संघटनेने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात शरिया न्यायालय स्थापन केले आहे. तालिबानच्या धर्तीवर लोकांना सोपा आणि शीघ्र न्याय देण्यासाठी हे न्यायालय स्थापन करण्यात आल्याचे जिहादी संघटनेकडून सांगण्यात येत आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात स्थापन झालेली ही अशा प्रकारची पहिलीच समांतर न्यायव्यवस्था आहे.

पू. रेडकरआजी, किती किती गुण वर्णावे तुमचे ?

पू. रेडकरआजी
सतत भावावस्थेत
अन् हसतमुख असता तुम्ही ।
पू. आजी, तुमचे किती किती
गुण वर्णावे आम्ही ॥ १ ॥

टापटीप, प्रेमभाव,
व्यवस्थितपणा अन् चपळता ।
वेळेचे पालनही सदोदित
करता तुम्ही न चुकता ॥ २ ॥

तव चैतन्याने रामनाथी आश्रम अनुभवला तव समीप राहूनी ।
तुमच्या रूपाने प्रत्यक्ष गुरुदेवांनाच अनुभवलेे मी क्षणोक्षणी ॥ ३ ॥

आश्रमातील सर्व ठिकाणी चौफेर दृष्टी असते तुमची ।
तुमची अष्टांगसाधना येईल का हो आमच्याही अंगी ?

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याला तृप्ती देसाई उत्तरदायी असतील !

१२ एप्रिलला झालेल्या बैठकीत हिंदुत्ववाद्यांनी दिली होती चेतावणी
  • धर्मद्रोही भूमाता ब्रिगेडच्या विरोधात हिंदुत्ववादी, महिला भक्त आणि स्थानिक पुरोगामी मंडळी एकवटली !
  • कोल्हापूर येथे जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये हिंदुत्ववादी, पुरोगामी, शांतता समिती आणि पोलीस यांची एकत्रित बैठक
      कोल्हापूर - येथील जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये १२ एप्रिल या दिवशी विविध हिंदुत्ववादी संघटना, पुरोगामी, श्री अंबाबाई देवस्थान शांतता समिती आणि पोलिसांमध्ये एक बैठक झाली. या बैठकीमध्ये हिंदुत्ववाद्यांनी पोलिसांना चेतावणी दिली होती की, जर तृप्ती देसाई या (कथित) विजयी फेरी काढणार असतील, तर आम्हीही त्यांच्या विरोधात त्या काढणार असलेल्या मार्गावर त्याच वेळी प्रति (विरोधाची) फेरी काढू. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास तृप्ती देसाई या उत्तरदायी असतील.
     येथील श्री अंबाबाई मंदिराच्या गाभार्‍यात महिलांना ११ एप्रिल या दिवशी प्रातिनिधीक स्वरूपात प्रवेश देण्यात आला आहे. असे असतांना भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या १३ एप्रिल या दिवशी विजयी फेरी काढून त्याचे श्रेय लाटण्याचा आणि स्वतःच्या प्रसिद्धीचा स्टंट करण्याचा प्रयत्न करणार आहेत. देसाई यांच्या या फेरीमुळे कोल्हापूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.

हिंदु समाज हा देहाने जरी पुरुष असला, तरी राष्ट्रीयत्वाच्या संदर्भात मात्र नपुंसकच आहे. - पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान

शनिशिंगणापूर येथील माजी महिला सरपंचांची देवद (पनवेल) येथील आश्रमाला भेट !

दैनिक सनातन प्रभातविषयी जाणून घेतांना
 उजवीकडून दुसर्‍या माजी सरपंच आणि अन्य महिला
     देवद, पनवेल (वार्ता.) - श्री शनिशिंगणापूरच्या माजी सरपंच सौ. पुष्पाताई बानकर आणि सौ. कमलाबाई साबळे यांनी येथील सनातनच्या आश्रमाला ११ एप्रिलच्या रात्री सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासमवेत सौ. जनाबाई बानकर, सौ. संगीता साबळे, सौ. भीमाबाई साबळे, सौ. लहानुबाई डांगे, सौ. उषाताई ढोले, सौ. मंगलाताई बानकर, सर्वश्री दादासाहेब घायाळ, पांडुरंग साबळे, भीमराज महाले, भाऊसाहेब फलके हेही आश्रमदर्शनासाठी आले होते. त्या दिवशी दुपारी आझाद मैदान येथे रणरागिणीच्या वतीने घेण्यात आलेल्या धर्मपरंपरा रक्षणासाठीच्या आंदोलनातही त्या सहभागी झाल्या होत्या. 

काही रुपयांसाठी शेतकर्‍यांवर कारवाई होते; मात्र 'सहस्रो कोटी रुपये थकवणार्‍या श्रीमंत व्यक्ती मजा मारतात' ही शोकांतिका ! - सर्वोच्च न्यायालय

लोकशाहीची निरर्थकता स्पष्ट करणारे न्यायालयाचे बोल ! 
     नवी देहली - काही सहस्र रुपयांच्या कर्जासाठी गरीब शेतकर्‍यांच्या मागे वसुलीचा तगादा लावला जातो. त्यांच्यावर कारवाई केली जाते, दुसरीकडे सहस्रो कोटी रुपये थकवणारे, स्वत:ची आस्थापने आजारी घोषित करणारे मजा मारतात, ही शोकांतिका आहे. देशातील उद्योगपती आणि मोठ्या श्रीमंत व्यक्ती यांनी बुडवलेल्या कर्जाची आकडेवारी डोकं भिरभिरायला लावणारी आहे. मोठ्या लोकांची ही बुडवेगिरी संशयास्पद आहे. त्यांच्याकडून कर्ज वसूल करण्यासाठी केंद्रशासन आणि रिझर्व्ह बँक नेमके काय करत आहेत, असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने १२ एप्रिलला केला. न्यायालयाने या प्रकरणी केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागवले आहे. न्यायमूर्ती टी.एस्. ठाकूर आणि न्या. आर्. भानुमती यांच्या खंडपिठापुढे यावर सुनावणी झाली. बिघडलेली ही व्यवस्था रुळावर आणण्यासाठी आता न्यायालयालाच काहीतरी करावे लागेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. 

नाशिकच्या जिल्हाधिकार्‍यांची गाडी आणि खुर्ची शासनाधीन

खुर्ची आणि गाडी शासनाधीन करण्याची वेळ येऊ देणारे प्रशासकीय अधिकारी ! 
     नाशिक - मालेगाव दिवाणी न्यायालयाच्या आदेशानंतर नाशिकचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची गाडी आणि खुर्ची शासनाधीन करण्यात आली आहे. १५ वर्षे उलटूनही शेतकर्‍यांना संपादित जमिनीचा मोबदला न मिळाल्याने न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई झाली आहे. मालेगावच्या १४ शेतकर्‍यांची जमीन २००१ साली पाझर तलावासाठी संपादित करण्यात आली होती. त्या मोबदल्यात या १४ शेतकर्‍यांना नऊ कोटी ६४ लाख रुपयांची भरपाई संमत करण्यात आली होती; मात्र पंधरा वर्षे झाली तरी हा मोबदला मिळालेला नाही.

लंडन येथील एका मशिदीतून अहमदी मुसलमानांची हत्या करण्याचा आदेश असणार्‍या पुस्तिका जप्त !

     लंडन - शहरातील दक्षिण भागातील स्टॉकवेल ग्रीन मशिदीमधून छोट्या पुस्तिका जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अहमदिया मुसलमानांच्या हत्येचे आदेश देण्यात आले आहेत. यात अहमदी मुसलमानांना अधर्मी म्हटले आहे. ते जर इस्लामच्या मुख्य प्रवाहात येण्यास नकार देत असतील, तर त्यांची हत्या केली पाहिजे, असे म्हटले आहे. या पुस्तिकांचे लिखाण खत्मे नबुव्वात या संघटनेच्या एका माजी प्रमुखाने केले आहे.
१. ही पुस्तके इंग्रजी भाषेतून प्रकाशित झाली आहेत. पुस्तिका लिहिणार्‍याचे नाव यूसुफ लुधियानवी असे आहे. खत्मे नबुव्वातचा मशिदीची असलेल्या संबंधाविषयी विचारल्यावर मशिदीचे विश्‍वस्त तोआह कुरैशी म्हणाले काही विशेष साहित्य आणि मार्गदर्शनसाठी या संघटनेचा मशिदीशी संपर्क आहे. आम्ही कुठलेही पत्रक प्रकाशित केलेले नाही. हे आमच्या मशिदीतून प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.

इसिससाठी आत्मघातकी आतंकवादी बनवणार्‍या आणि मुंबईतील आक्रमणात सहभागी असणार्‍या आतंकवाद्याला ऑस्ट्रियात अटक !

     लंडन - बॉम्बविषयी तज्ञ असणारा पाक आतंकवादी महंमद उस्मान गनी याला ऑस्ट्रियात अटक करण्यात आली आहे. प्रसिद्धीमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार तो इसिससाठी कार्यरत होता. युरोपमध्ये घातपाताच्या कारवाया घडवून आणण्यासाठी आत्मघातकी आतंकवाद्यांचे पथक बनवण्याचा त्याचा उद्देश होता. उस्मानने वर्ष २००८ मध्ये मुंबईवरील आक्रमणाच्या वेळी आतंकवाद्यांना साहाय्य केले होते. तो विस्थापित म्हणून युरोपमध्ये घुसला होता. उस्मानचे लष्कर-ए-तोयबा आणि लष्श्कर-ए-झांगवी यांसारख्या संघटनांच्या आतंकवाद्यांशी संपर्क असल्याचे उघड झाले आहे.

युक्रेनमध्ये ३ भारतीय विद्यार्थ्यांना भोसकले, २ ठार १ घायाळ

     नवी देहली - युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या ३ भारतीय विद्यार्थ्यांना अज्ञातांकडून भोसकण्यात आले. या आक्रमणात प्रणव शांडिल्य आणि अंकुर सिंह या विद्यार्थ्यांन जागीच मृत्यू झाला, तर इंद्रजित चौहान हा गंभीर घायाळ झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३ आक्रमणकर्त्यांना अटक केली आहे. आक्रमणकर्त्यांनी प्रथम या विद्यार्थ्यांना अडवून त्यांच्याकडील रक्कम काढून घेतली आणि नंतर त्यांच्यावर आक्रमण केलेे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे नातेवाईक युक्रेनमधील पोलीस आणि भारतीय यांच्या संपर्कात आहेत.

जेव्हा राष्ट्राचा प्रमुख अधर्माचरण करतो, तेव्हा दुष्काळासारखे संकट ओढवते ! - जगद्गुरु शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज

शंकराचार्यांना अपेक्षित असे राज्य केवळ हिंदु राष्ट्राच्या
 स्थापनेनेच शक्य आहे. त्यामुळे हिंदूंनो, ईश्‍वरी अधिष्ठानासह 
संघटित व्हा आणि विश्‍वकल्याणकारी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेस कटिबद्ध व्हा ! 
     हरिद्वार (उत्तराखंड) - जेव्हा राष्ट्र अथवा राज्याचा प्रमुख अधर्माचरण करतो, तेव्हा दुष्काळासारखे नैसर्गिक संकट येणे अपरिहार्य असते, असे प्रतिपादन द्वारका आणि शारदा पिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी हरिद्वार येथील त्यांच्या आश्रमात पत्रकारांना संबोधित करतांना केले. 
शंकराचार्य पुढे म्हणाले, 

फलक प्रसिद्धीकरता

भारतीय सैन्यावर आक्रमण करणार्‍यांना भारतात रहाण्याचा अधिकार नाही !
     जम्मू-काश्मीरमध्ये एका मुलीची छेडछाड केली, असा सैनिकांवर खोटा आरोप करत ५०० धर्मांधांनी सैनिकांवर आणि त्यांच्या चौकीवर दगडफेक केली, तसेच चौकीला आग लावण्याचाही प्रयत्न केला. याला विरोध करतांना सैन्याकडून दोन धर्मांध ठार झाले.
हिंदू तेजा जाग रे !

Jago ! - Kashmir me 1 ladki se chedchad karne ka jhutha arop lagakar dharmandhone sainikopar akraman kiya. - Sainikopar akraman karnewale Bharat ke hai ya Pak ke ?

जागो ! - कश्मीर में एक लडकी से छेडछाड करने का झूठा आरोप लगाकर धर्मांधों ने सैनिकों पर आक्रमण किया. - सैनिकों पर आक्रमण करनेवाले भारत के हैं या पाक के ?छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

     मुंबई - ८७० कोटींच्या महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत १३ एप्रिल या दिवशी २७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशेष न्यायालयाने या दोघांच्या कोठडीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी त्यांना आजपर्यंत (१३ एप्रिल) न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ३१ मार्चला झालेल्या सुनावणीच्या वेळी देण्यात आले होते. आज झालेल्या सुनावणीच्या वेळी कोठडीत वाढ करण्यात आली.

सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचार्‍यांना लवकरच अटक होणार ! - सहकारमंत्री चंद्रकांत पाटील

     सोलापूर - आजवर सहकार क्षेत्रात भ्रष्टाचाराविषयी कोणालाच भीती नव्हती; पण राज्यातील भाजप शासनाने या क्षेत्रातील अनिष्ट गोष्टींना पायबंद घालण्याच्या दृष्टीने कडक पावले उचलली. अपप्रकाराच्या संदर्भातील अनेक अधिकोषांचे अन्वेषण पूर्ण झाले असून लवकरच दायित्व निश्‍चित झाल्यावर दोषींना अटक करण्यात येईल. या कारवाईमुळे यापुढील काळात या क्षेत्रात भ्रष्टाचाराविषयी निश्‍चितच दहशत बसेल, असे प्रतिपादन राज्याचेे सहकारमंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. कन्ना चौकातील तोगटवीर सांस्कृतिक भवनात राज्य सहकारी बँक कर्मचारी महासंघाच्या चौथ्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

महिलांच्या मंदिर प्रवेशाविषयी शासन असंवेदनशील ! - सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ

राज्य शासनाला चपराक ! 
     पुणे, १३ एप्रिल - श्री शनिशिंगणापूर मंदिरातील महिलांच्या प्रवेशाविषयी शासनाची भूमिका असंवेदनशील आहे. घटनेतील तत्त्वे आणि न्यायालयाने दिलेला निकाल यांची अंमलबजावणी करण्यामध्ये शासनाला अपयश आले आहे, असे टीका सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी केले. 

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत आतंकवादविरोध विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : १७ एप्रिल २०१६ 
पृष्ठ संख्या : १० मूल्य : ५ रुपये 
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी 
१६ एप्रिलला दुपारी ३ पर्यंत 'इआरपी प्रणाली'त भरावी !

रासायनिक बॉम्बही बनवत आहे इस्लामिक स्टेट !

     मोसुल (इराक) - इराक आणि सिरिया या देशांमध्ये आतंकवादाचे भय माजवणार्‍या इसिसने (इस्लामिक स्टेटने) भयानक स्फोटकांबरोबरच आता रासायनिक बॉम्बही बनवणे चालू केले आहे. यासाठी संघटना इराकमधील मोसुल विद्यापिठाच्या रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेचा उपयोग करत आहे. 
१. वॉल स्ट्रीट जर्नलनुसार इसिस या प्रयोगशाळेचा उपयोग गेल्या वर्षभरापासून करत आहे. येथे आतंकवाद्यांना बॉम्ब आणि स्फोटके बनवण्यासंबंधीचे प्रशिक्षणही देण्यात येते. 
२. पेरॉक्साइडने बनवण्यात येणारे रासायनिक बॉम्बही प्रयोगशाळेत बनवले जातात.
३. इराकच्या एका उच्चपदस्थ अधिकार्‍यानुसार प्रशिक्षण घेतलेले आतंकवादी आपापल्या देशात परत जात आहेत.
४. ब्रुसेल्स येथे झालेल्या जिहादी आक्रमणात अशाच प्रकारचे रासायनिक बॉम्ब यांचा वापर करण्यात आला होता, असेही या अधिकार्‍याने वॉल स्ट्रीट जर्नलला सांगितले आहे.
महिलांनी तोकडे कपडे परिधान करणे हे वेष्टन नसलेल्या चॉकलेटप्रमाणे ! - थायलंडचे पंतप्रधान प्रयूत चान ओचा

नेहमीच परदेशी लोकांचे अनुकरण करणार्‍या भारतीय महिलांना चपराक ! 
     बँकॉक - थायलंडचे पंतप्रधान प्रयूत चान ओचा यांनी तोकडे कपडे घालणार्‍या महिला वेष्टन नसलेल्या चॉकलेटप्रमाणे असतात, असे विधान केले आहे. वेष्टन नसलेले चॉकलेट लोकांना आवडत नाही. देशातील महिलांनी अंगप्रदर्शन होईल, असे कपडे घालू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (योग्य आवाहन असभ्य भाषेत केले तर परिणाम चुकतात आणि वाद निर्माण होतात. त्यामुळे पंतप्रधानांनी योग्य भाषेत आवाहन करणे अपेक्षित आहे ! - संपादक ) थायलंडमध्ये लवकरच पारंपारिक नववर्षानिमित्त सोन्क्रान या सणाला प्रारंभ होणार आहे. या वेळी लोक एकमेकांवर पाणी उडवतात तसेच महिलांची छेडछाड होण्याचे प्रकारही घडतात. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे विधान केले. सान्क्रोनच्या वेळी महिलांनी थायलंडच्या संस्कृतीला शोभतील, असे योग्य कपडे परिधान करावेत. या कपड्यांमुळे महिला अधिक सुंदर आणि त्यांचा सभ्य दिसतील, असेही ते म्हणाले. यापूर्वीही त्यांनी महिलांसंदर्भात वक्तव्य केली आहेत.माध्यमप्रश्‍नी गोव्यातील भाजप शासनाने आश्‍वासन पाळावे ! - श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

गोव्यातील प्रूडंट वाहिनीवर श्री. रमेश शिंदे यांचा वार्तालाप 
श्री. रमेश शिंदे
     पणजी, १३ एप्रिल (वार्ता.) - माध्यमप्रश्‍नी भारतीय भाषा सुरक्षा मंचने (भाभासुमंने) घेतलेल्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. भाजप शासनाने मातृभाषाप्रेमींना दिलेले आश्‍वासन पाळले पाहिजे. भाजप हा संस्कृतीला प्रोत्साहन देणारा आणि तत्त्वाच्या आधारावर चालणारा पक्ष असे म्हटले जाते; मात्र भाजपकडून जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. मांडवी नदीतून कॅसिनो हटवण्याच्या बाबतीतही शासनाने आश्‍वासन पाळलेले नाही. शासनाने ही आश्‍वासने पाळली पाहिजेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी प्रूडंट वाहिनीवर वाहिनीचे संपादक प्रमोद आचार्य यांच्याशी वार्तालापाच्या वेळी केले.

पैशाच्या हव्यासापोटी समाजमनाच्या भावना बोथट !

     भीषण दुष्काळामुळे मराठवाड्यात लोकांना १२ /१२ दिवस पाणी मिळत नाही. त्यामुळे तेथे पाण्यासाठी जमावबंदीचा आदेश देण्याची वेळ राज्य शासनावर आली आहे. एकूणच राज्यातील दुष्काळ आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य पहाता शासनाने इंडियन प्रिमीअर लीगचे सामने अन्य राज्यांत हलवायला हवेत, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य शासनाला केली. दक्षिणात्य अभिनेता (?) रजनीकांत यांना पद्मविभूषण मिळाल्यावर चाहत्यांनी अतिउत्साहाच्या भरात त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करू नये, म्हणून उच्च न्यायालयाने त्यासंबंधी आधीच सूचना दिल्या. या घटना, परिस्थिती आणि त्याचे गांभीर्य कुठल्याही सामान्य नागरिकांच्या लक्षात येण्याजोगी आहे. समाजजीवन जगतांना समाजातील सर्वसाधारण नियम आणि कर्तव्य हे प्रत्येक व्यक्तींचे सारखेच असतात, म्हणून कोणतीही कृती अथवा प्रतिक्रिया व्यक्त करतांना ती समाजासाठी हानीकारक नाही ना, यासंबंधी विचार करणे, हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्यच आहे. सध्या मला माझा हक्क आणि पैसा पाहिजे, असा विचार दिसून येतो. त्याचा समाजावर काहीही परिणाम होवो, याविषयी कोणाला काही घेणे-देणे नाही, अशी मनोवृत्ती पुष्कळ प्रमाणात बळावली आहे. त्यामुळे समाजमनाची सारासार विचार करण्याची वृत्तीच लोप पावली आहे. त्यामुळे साध्या सूत्रांसाठीही न्यायालयाला हस्तक्षेप करून आदेश द्यावे लागत आहेत.

मुसलमान आणि कट्टर मुसलमान यांत भेद करता येणार नाही !

     २२ मार्च २०१६ या दिवशी बेल्जियममधील ब्रुसेल्स येथे झालेल्या इसिसच्या आक्रमणानंतर अमेरिकेतील राजकीय नेते आणि ओहायो राज्याचे गव्हर्नर जॉन कॅसीच म्हणाले, आम्ही मुसलमानांच्या विरोधात नव्हे, तर कट्टर मुसलमानांच्या विरोधात आहोत. या विधानाचा वस्तूनिष्ठपणे विचार करणे आवश्यक आहे.
जिहादी आतंकवाद जाणून घेण्यासाठी इस्लामचा अभ्यास करणारे अमेरिकेतील अधिवक्ता !
     वर्ष १९९३ मध्ये अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर घातपात करण्याचे नियोजन केल्याच्या आरोपावरून शेख ओमार अब्दुल रहमान या अरब मौलानाविरुद्ध खटला चालवण्यात आला. त्यात अधिवक्ता अँड्यूू मॅकार्थी यांनी शासनाची बाजू मांडली. अमेरिकेच्या शासनाने अब्दुल रहमान हा खर्‍या इस्लाम धर्मापासून पदभ्रष्ट झालेला वेडा आहे, असे सांगितले. तथापि अधिवक्ता मॅकार्थी यांना अब्दुल रहमान हा इस्लाम धर्मापासून विचलित झाला आहे, असे वाटत नव्हते. त्यामुळे त्याच्याविषयी सखोल अभ्यास करून खरी परिस्थिती त्यांनी जाणून घेतली. अब्दुल रहमान हा उच्चशिक्षित होता. त्याने इस्लाम धर्माचा सखोल अभ्यास करून डॉक्टरेट पदवी मिळवली होती. तो मी माझ्या धर्माने दिलेल्या आदेशाचे पालन केले, असेच सांगत होता. विशेष म्हणजे अब्दुल रहमानविरुद्ध शासनाच्या वतीने पुरावे म्हणून जे मवाळ मुसलमान लोक न्यायालयात उपस्थित राहिले त्यातील एकानेही अब्दुल रहमान सांगतो ते खोटे आहे, असे म्हटले नव्हते.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)
     घडून गेलेले सत्य दडपून ठेवण्याची पुरातत्व खात्याची मानसिकता आहे. जे घडले आहे, ते लोकांना कळू द्यायचे नाही. स्वातंत्र्योत्तर काळानंतरही सत्य इतिहास लोकांपर्यंत आला नाही. त्यामुळे लोक सत्य इतिहासापासून वंचित राहिले ! - श्री. फ्रान्सुआ गोतिए, फ्रेंच पत्रकार
     शास्त्रविधी उल्लंघून मनमानी वागणारा अधर्माला धर्म करतो. हिंदूंनी त्याची उपेक्षा करावी ! - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
साधकांनी कारागृहात असतांना साधना, राष्ट्र, आणि धर्म 
(तात्त्विक विषय) यांच्या संदर्भात केलेले लिखाण
      वर्ष २००९ मध्ये मडगावला एका दुचाकीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे नाचणार्‍या पोलिसांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास, तसेच त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. या अशा कठीण प्रसंगांना साधकांनी केवळ साधनेच्या बळावर धीरोदत्तपणे तोंड दिले. यातून वाचकांच्या मनावर साधनेचे महत्त्व ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेच्या अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयी केलेले तात्त्विक चिंतन पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

प्रतिदिन वाचा नवे सदर...!

रामनाथी आश्रमाचे माहात्म्य
      सात्त्विकता आणि चैतन्य यांची अनुभूती देणारा अन् विश्‍वदीप असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, साधक, हितचिंतक आणि जिज्ञासू भेट देत असतात. हिंदु राष्ट्राची छोटी प्रतिकृतीच असलेल्या या आश्रमाला भेट देऊन हिंदुत्वनिष्ठांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रेरणा मिळते, तर साधकांना साधनेसाठी आध्यात्मिक ऊर्जा लाभते. अशा या एकमेवाद्वितीय रामनाथी आश्रमाच्या भेटीच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती या सदरातून नियमित प्रसिद्ध करत आहोत.

स्वप्नातही प.पू. डॉक्टरांच्या भावविश्‍वात रंगलेल्या कु. सायली वाघुळदे हिने त्यांच्याप्रतीच्या कृतज्ञताभावात ओथंबून लिहिलेले पत्र !

प.पू. डॉक्टर,
तुमच्या चरणी हे पत्र अर्पण !
       १२.१२.२०१४ या दिवशी सकाळी ९.३० वाजता मी झोपले असतांना प.पू. डॉक्टर माझ्या स्वप्नात आले. ११ वाजता मला जाग आली; पण अजून थोडा वेळ झोपूया, असे वाटून मी पुन्हा झोपले. तेव्हा मला हेच स्वप्न पुन्हा पडले. हे स्वप्न ३ घंटे चालू होते. या स्वप्नात पुष्कळ प्रसंग घडत होते.
१. स्वतःचे घर हे आश्रम असून 
त्यात प.पू. डॉक्टर रहात असल्याचे दिसणे
         एका घरात मी, आई-बाबा आणि प.पू. डॉक्टर रहात होतो. ते घर नसून आश्रमच होता. पुष्कळ साधक तेथे येऊन-जाऊन सेवाही करत होेते. माझे बाबा आश्रमाचे नियोजन आणि संतांना कोण अन् कधी भेटणार ?, याचे नियोजन पहायचे. आई स्वयंपाकाचे नियोजन पहायची. माझ्याकडे प.पू. डॉक्टरांना जेवण, औषधे देणे, त्यांची खोली आवरणे इत्यादी सेवा होत्या. त्यातून देवाने मला पुष्कळ शिकवून घडवले आणि साधनेसाठी नवीन उत्साह दिला.

समजूतदार, हसतमुख आणि स्वतःहून साहाय्य करणार्‍या कु. सायली वाघुळदे हिची कु. दीपाली पवार हिने टिपलेली गुणवैशिष्ट्ये !

कु. सायली वाघुळदे
      चैत्र शुक्ल पक्ष अष्टमी (१४.४.२०१६) या दिवशी रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करणारी कु. सायली वाघुळदे हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात कु. दीपाली पवार यांनी श्रीकृष्णाला लिहिलेले पत्र पुढे देत आहोत.
कु. सायली वाघुळदे हिला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
कृष्णा (प.पू. डॉक्टर),
       आज तुझ्या एका गोड साधिकेचा वाढदिवस आहे. त्या साधिकेचे नाव आहे, कु. सायली वाघुळदे ! सायली माझ्यापेक्षा वयाने पुष्कळ लहान आहे, तरीही ती माझी जवळची मैत्रीण झाली आहे. आम्ही दोघी गेल्या ८ मासांपासून एकमेकींसमवेत रहात आहोत. या सहवासातून ती पुष्कळ वेगळी मुलगी आहे, हे माझ्या लक्षात आले. ती बाहेरून जशी दिसते, तशी आतून मुळीच नाही. ज्याप्रमाणे फणस वरून काटेेरी; पण आतून गोड असतो. नारळ वरून कडक; पण आतील पाणी मधुर असते, त्याप्रमाणेच सायली आहे. सायली वरून दिसायला पुष्कळ कडक, गर्विष्ठ आणि बहिर्मुख मुलगी वाटते; पण प्रत्यक्षात तशी नाही. तिच्यासमवेत राहिले, तरच तिला खर्‍या अर्थाने ओळखता येईल !

झोपलेल्या पत्नीच्या डोक्यावर मण्यार जातीचा विषारी साप पडणे आणि तिने हाताने झटकल्यावरही सापाने दंश न करणे अन् मृत्यूचे संकट टळल्याने देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होणे

       ८.३.२०१६ या रात्री १०.५५ वाजता माझी पत्नी सौ. श्रावणी श्रीपाद डेगवेकर ही झोपली होती. तेव्हा तिच्या डोक्यावर मण्यार जातीचा विषारी साप पडला. तत्क्षणी तिने तो हाताने झटकला. तेव्हा जर तो चावला असता, तर मरण अटळ होते; परंतु भगवान श्रीकृष्ण आणि गुरुदेव यांच्या कृपेने हे संकट टळले, यासाठी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.
- श्री. श्रीपाद डेगवेकर (पू. (सौ.) माई नाईक यांचा भाचा), पानवळ, बांदा, जिल्हा सिंधुदुर्ग. (९.३.२०१६)

सूक्ष्मातून आढावासेविकेच्या चरणांवर डोके ठेवून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केल्यावर १५ दिवसांनी आढावा देतांना वाटणारी भीती न्यून होऊन आनंद मिळणे

       मी एप्रिल २०१५ पासून सनातन आश्रम, रामनाथी येथे स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवत आहे. मला स्वतःच्या आढावासेविकेला चुकांचा आढावा देतांना पुष्कळ ताण यायचा. मला आढावासेविकेची सतत भीती वाटायची. यामुळे आढाव्यातून शिकण्याचा भाग आणि त्यांनी सांगितलेले प्रयत्न करण्याचा भाग होत नव्हता. आढावासेविका आश्रमात कुठेही दिसली आणि भेटली, तरी माझ्या मनात भीती निर्माण व्हायची. यावर उपाय म्हणून एक दिवस मी ध्यानमंदिरात बसून श्री गुरूंना मनापासून आळवले आणि त्यांना मला माझ्या या नकारात्मक स्थितीतून बाहेर काढण्यासाठी याचना केली. तेव्हा त्यांनी मला प्रतिदिन स्वयंसूचना आणि प्रसंगाचा सराव करण्यास सुचवले. मी पुढीलप्रमाणे प्रसंगाचा सराव केला.
      मी प्रतिदिन आढावासेविकेच्या चरणांवर डोके ठेवून पुढीलप्रमाणे म्हणत असे, आढावासेविका (सौ. सुप्रिया माथूर) माझी पुष्कळ जवळची मैत्रीण आहे. माझे स्वभावदोष आणि अहं दूर होऊन मी गुरुदेवांना अपेक्षित असे घडावे; म्हणून ती मला साधनेत साहाय्य करत आहे. मी तिच्याप्रती कृतज्ञ आहे. मी तिच्यातील गुरुतत्त्वाला शरण आले आहे. हे म्हणत असतांना सूक्ष्मातून कान धरून मी तिच्या चरणांवर नतमस्तक झालेले दिसत होते. अशा प्रकारे सराव केल्यामुळे १५ दिवसांमध्ये माझा ताण न्यून होऊन मी सकारात्मक झाले. मला आढावासेविकेची वाटणारी भीती न्यून झाली आणि आढावासेविकेनी सांगितलेले दोष अन् करावयाचे प्रयत्न स्वीकारता येऊ लागले, तसेच माझ्या मनाची नकारात्मकता जाऊन आनंद मिळण्याचे प्रमाण वाढले.
- सौ. अर्पिता देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.८.२०१५)

आई-वडिलांची सेवा भावपूर्ण करून त्यातून गुरुसेवेचा आनंद मिळवणारे ६१ टक्के आध्यात्मिक स्तर असलेले श्री. तुकाराम लोंढे !

१. आई-वडिलांच्या सेवेसाठी प्राधान्य देण्यास सांगून 
त्यासमवेत धर्मप्रसाराचीही सेवा करवून घेणारे प.पू. डॉक्टर ! 
श्री. तुकाराम लोंढे
 १ अ. सेवा आणि गावातील घरची कामे या दोन्हीकडे लक्ष देऊन साधनाही नीट होणार नाही, असा विचार मनात येणे आणि प.पू. डॉक्टरांनी प्रथम आई-वडिलांच्या सेवेला प्राधान्य देण्यास सांगणे : माझ्या आई-वडिलांचे वय झाल्याने ते सारखे आजारी असतात. गावाला जाणे-येणे कठीण आणि खर्चिक आहे. मी देवद आश्रमात भंगार विकणे आणि बांधकाम विभागात सेवा करत आहे. सर्व कुटुंबीयही सनातन संकुलात रहातात आणि सेवेसाठी आश्रमात येतात. नेहमी मी आई-वडील आजारी असल्याचा दूरध्वनी आल्यावर गावाला जाऊन त्यांचे औषधपाणी करून परत देवद आश्रमात सेवेसाठी येतो. एक दिवस वडील म्हणाले, गावालाच येऊन आमची काळजी घे. शेती आणि साधनाही कर. त्या वेळी सेवा आणि गावातील घरची कामे या दोन्हीकडे लक्ष देऊन साधना नीट होणार नाही, असा विचार मनात येत होता; म्हणून उत्तरदायी साधकांना विचारले. ते म्हणाले, गावाला राहून प्रथम वयस्कर आई-वडिलांची सेवा करा. नंतर अशी सेवा परत मिळणार नाही.
१ आ. आई-वडिलांची सेवा केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळून गुरुसेवेचाही आनंद मिळणे आणि नामजप चांगला होऊन सुगंधाची अनुभूती येणे : तेव्हापासून मी गावालाच रहातो. घर हे आश्रम आहे, असे समजून गुरुसेवा समजून त्यांची सेवा करतो. स्वच्छता, स्वयंपाक, त्यांना दवाखान्यात घेऊन जाणे, औषधे देणे आदी सेवा आवडीने करतो. त्यामुळे आई-वडील पुष्कळ आनंदात आहेत. मला त्यांचा आशीर्वाद आणि गुरुसेवेचा आनंद मिळत आहे, तो मला शब्दात सांगणे कठीण आहे. नामजप चांगला होऊन सुगंधाची अनुभूती येत आहे. हे केवळ श्रीकृष्णाच्या कृपेने होत आहे.

प्रेमळ, प्रांजळ, साधकांची प्रगती व्हावी, याची तीव्र तळमळ असलेली आणि चुकांविषयी तीव्र खंत वाटणारी गोपी दीपाली मतकर !

कु. दीपाली मतकर
१. लोणी खाणार्‍या बाळकृष्णाच्या चित्रातील लोणी चित्राखाली बसलेल्या साधकाच्या अंगावर खरोखरच पडेल, असे सांगणार्‍या गोपी दीपालीचा खट्याळपणा ! : श्री. विनायक आगवेकर यांच्या आईची पातळी ६३ टक्के झाल्याचे घोषित झाल्याच्या दिवशी आम्ही काही साधक त्यांच्या घरी होतो. एक साधक जेवायला बसल्यावर दीपालीताई त्यांना म्हणाली, दादा, सांभाळून बसा, नाहीतर अंगावर लोणी पडेल. दादांनी वर पाहिल्यावर कळाले की, त्यांच्या डोक्यावर बाळकृष्णाचे गोड चित्र होते. त्यामध्ये तो लोणी खात असतो आणि त्यातील काही लोणी खाली पडत असते. तेव्हा आम्ही सर्वजण भरपूर हसलो.

प.पू. पांडे महाराज यांनी साधकाला आजारपणाच्या काळात केलेले अनमोल मार्गदर्शन

१. ईश्‍वर सोडून सर्व मायाच आहे. त्या मायेत अडकल्यामुळे दुःख होते. मायेतील गोष्टींविषयी सुख-दुःखात अडकणे म्हणजे एक पापच आहे.
२. मानसिक स्वास्थ्य ठीक असेल, तर शरीर स्वस्थ रहाते. त्यासाठी चिंता करणे सोडले पाहिजे. त्यासाठी श्रीविठ्ठलाची मूर्ती डोळ्यांसमोर आणावी. कमरेवर हात याचा अर्थ अखिल ब्रह्मांडाचा भार असूनही निश्‍चिंत आणि विटेवर दोन पाय म्हणजे स्थिर अन् सम वृत्ती. आपलेही आचरण असेच ठेवले पाहिजे.
३. श्रीविठ्ठलाची मूर्ती काळी आहे. ती कष्टाने काळी झाली आहे. आतला आत्मा स्वच्छ आणि निर्मळ आहे. शरिराला आराम मिळावा; म्हणून आपण विज्ञानातील वेगवेगळी उपकरणे वापरतो. त्याने बाह्य शरीर चांगले दिसते; पण आतील आवरण मात्र वाढत जाते.
      माझ्यासारख्या अत्यंत सामान्य, अत्यल्प सेवा करणार्‍या साधकावर श्रीगुरूंनी केवढी कृपा केली. श्रीगुरुचरणी कोटी कोटी प्रणाम आणि अत्यंत कृतज्ञता !
- श्री. मिलिंद भिडे, पुणे (२३.१.२०१६)

तीव्र आजारपण आणि शस्त्रकर्म होऊनही प.पू. पांडे महाराज यांच्या उपायांमुळे सुसह्य होणे

प.पू. पांडे महाराज
१. ट्रायजेमिनल न्युराल्जीया 
(Trigeminal neuralgia) 
हा आजार म्हणजे काय ?
       तोंडवळ्यावरील संवेदना मेंदूकडे पोचवणार्‍या चेतनावाहिनीला (नस) ट्रायजेमिनल नर्व्ह (Trigeminal nerve) म्हणतात. ती मेंदूमध्ये जेथे प्रवेश करते, तेथील एखाद्या रक्तवाहिनीचा दाब तिच्यावर पडतो. त्यामुळे तिच्यावरील संरक्षक आवरण निकामी होते आणि मेंदूला खर्‍या संवेदनांऐवजी चुकीच्या संवेदना पोचतात. त्यामुळे तोंडवळ्यावर कसलाही त्रास नसतांना अकारण कुठेही दुखते. अत्यंत वेदनादायी आजार असे या आजाराचे वर्णन आहे. तसेच मेंदूतूनच वेदना निर्माण होत असल्यामुळे त्यावर नेहमीची वेदनाशामक औषधे लागू पडत नाहीत. अपस्मार (फीट) या आजाराची नसांचे काम मंद करणारी अशी अ‍ॅन्टी कॉन्व्हल्झंट (Anti Convulsant) औषधे यावर देतात. त्यामुळे सारखी झोप येते आणि चक्करसुद्धा येऊ शकते. तसेच या औषधांची मात्रा उत्तरोत्तर वाढतच जाते.

कृष्णलीलेचा हा सोहळा याची डोळा पाहिला !

कृष्णजन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला ।
आनंदी आनंद झाला ॥ १ ॥
भगवंताने गुरुकृपेचा वर्षाव हा केला ।
शब्दही नसे आता कृतज्ञता व्यक्त करण्याला ॥ २ ॥
गुरुमाऊलीने सर्व गुणांनी नटलेला पती मज दिधला ।
ज्या क्षणाची वाट पहात होते तो क्षण हा आला ॥ ३ ॥
जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून हा जीव सुटला ।
कृष्णलीलेचा हा सोहळा याची डोळा पाहिला ॥ ४ ॥
      (श्री. विलास वेसणेकर यांची ६१ आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर त्यांच्या धर्मपत्नीला सुचलेले काव्य)
- सौ. विजया वेसणेकर, कोल्हापूर (२०.८.२०१४)

साधकांच्या धीमी लोकलची गंमत !

        एकदा खोलीतील साधक श्री. प्रकाश मराठेकाका आणि मी वैयक्तिक आवरत होतो. त्या वेळी खोलीत श्री. दिनेश शिंदे (दिनेशदादा) आले अन् परत निघून गेले. काही वेळाने दिनेशदादा परत खोलीत आले आणि आम्हाला वैयक्तिक आवरतांना बघून सहजतेने म्हणाले, अरे ! अजून तुम्ही खोलीतच का ? मला थकवा असल्यामुळे अन् काकांचे जास्त वयोमान यांमुळे आवरण्यास विलंब होतो. याचे वर्णन करतांना मराठेकाका म्हणाले, आमची सुपरफास्ट एक्स्प्रेस नसून धीमी लोकल आहे. त्यानंतर आम्ही सर्व जण हसलो.
- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१०.२०१४)

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !

साधकांना सूचना
     सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान
विश्‍वास आणि विकल्प
      परमेश्‍वरावर नितांत विश्‍वास असू द्या. तो मला देईलच, असे वाटू द्या; मात्र तो मला देईल का, हे शक्य होईल का, असे विकल्प मनात आले की, विकल्पच काम करतील ! तुमच्या मिळण्यात अडथळे निर्माण होतील.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     हिंदु धर्म आणि भारत यांची काहीच माहिती नसलेले धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही होतात, तर त्यांच्या संदर्भात माहिती असलेले त्यांच्यापुढे नतमस्तक होतात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

परमेश्‍वरावर श्रद्धा ठेवा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     एखादी सुसंधी हातातून निसटली, तर परमेश्‍वरावर श्रद्धा ठेवून याची निश्‍चिती बाळगा की, याहीपेक्षा चांगली संधी मला मिळणार आहे. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)सैन्याविरुद्धची अंतर्गत युद्धे !

संपादकीय
     काश्मीरमध्ये एका सैनिकाने तेथील तरुणीची छेड काढल्याच्या कथित प्रकरणावरून धर्मांधांनी तेथे चालू केलेल्या हिंसाचाराने रौद्र रूप धारण केले आहे. काश्मीरमध्ये पाककडून करण्यात येणारा आणि काश्मीरमधील देशद्रोही धर्मांधांकडून करण्यात येणारा, असे २ प्रकारचे हिंसाचार कायम होत असतात. १२ एप्रिलला झालेल्या हिंसाचाराला तेथील देशद्रोही धर्मांधांनी तोंड फोडले. जगभरात घडणार्‍या घटनांच्या बातम्या देणारी प्रसारमाध्यमे काश्मीरमधील घटनांविषयी वस्तूनिष्ठ वार्तांकन करतांना आढळत नाहीत. केलेच तर ते एकांगी असते. म्हणूनच भारतियांना एकवेळ अमेरिकेत काय चालू आहे, हे ठाऊक असते; पण काश्मीरमधील घटनांविषयी ते अनभिज्ञ असतात. ही अतिशयोक्ती नव्हे, तर वस्तूस्थिती आहे. म्हणूनच काश्मीरमधील हिंसाचाराची पार्श्‍वभूमी जाणून घेतली पाहिजे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn