Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

नववर्षारंभ विशेषांक

सर्व वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते, अर्पणदाते,
हिंदुत्ववादी आणि साधक यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे संत पू. सत्यवान कदम यांचा आज वाढदिवस

विनम्र अभिवादन !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांची आज जयंती
बंकीमचंद्र चट्टोपाध्याय (चॅटर्जी) यांचा आज स्मृतीदिन !

गुढीपाडव्याला गंगाजलाभिषेक शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊनच करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार !

      नगर - गुढीपाडव्याला करण्यात येणारा गंगाजलाभिषेक शनि देवाच्या चौथर्‍याखालून करावा, असा विश्‍वस्त मंडळाचा प्रस्ताव ग्रामस्थांनी अमान्य केला आहे. रूढीपरंपरेनुसार चौथर्‍यावर जाऊनच अभिषेक करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
१. गुढीपाडव्याला या ठिकाणी गंगा आणि गोदावरी या नद्यांचे पाणी कावडीने आणून श्री शनिदेवाला अभिषेक करण्याची प्रथा आहे.
२. तालुक्यातील प्रत्येक गावातून युवक कावडीने पाणी घेऊन येतात. रात्री २ वाजल्यापासून चालू होणारा हा अभिषेक सकाळी ९ वाजेपर्यंत चालतो. या काळात सहस्रावधी युवक चौथर्‍यावर जाऊन मूर्तीवर पाणी घालतात आणि दर्शन घेतात.
३. चौथर्‍यावर पुरुषांना जाण्यास मागील ३ मासांपासून बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे शनिशिंगणापूर येथे महिला आणि पुरुष दोघेही चौथर्‍याखालून दर्शन घेत असून त्यांना समान दर्जा मिळत असल्याचे देवस्थानच्या विश्‍वस्तांचे मत आहे.
४. गुढीपाडव्याला पुरुषांना चौथर्‍यावर सोडले, तर न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होण्याची शक्यता असल्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये गुढीपाडव्याला चौथर्‍यावर प्रवेश दिला जाणार नाही, या निर्णयावर देवस्थान न्यास ठाम आहे; मात्र ग्रामस्थ आणि देवस्थान बचाव कृती समितीने यास विरोध केला आहे.
५. गेल्या २ दिवसांपासून प्रशासनाच्या साहाय्याने यासाठी बैठका घेण्यात येत आहेत;

खरे सण आणि व्रते !

     हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत त्यासाठी अखंड प्रयत्न करणे, हे खरे व्रत; तर स्थापना झाल्यावर साजरे केले जातील, ते खरे सण आणि उत्सव होय !

संपत्तीच्या वादातून तंजील अहमद यांची हत्या !

      लक्ष्मणपुरी (लखनौ) - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे उपअधीक्षक तंजील अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मुनीर आणि रिजवान या दोघांना अटक केली आहे. ही हत्या संपत्तीच्या वादातून करण्यात आल्याचे चौकशीतून समोर आले आहे. तंजील यांच्या गावातील जवळच्या व्यक्तीने देहलीतील संपत्तीच्या वादातून सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली.

स्वित्झर्लंडमध्ये नगरपालिकेच्या शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांना शिक्षिकांशी हात न मिळवण्याची सूट !

     जिनेव्हा - उत्तर स्वित्झर्लंडच्या एका शाळेत शिकणार्‍या मुसलमान विद्यार्थ्यांना आता त्यांच्या शिक्षिकांशी हात न मिळवण्याची सूट देण्यात आली आहे. बसेल प्रांतामध्ये थेरविल नगरपालिकेच्या एका शाळेत १४ आणि १५ वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांनी शिक्षिकांशी हात मिळवण्याची स्विस संस्कृती त्यांच्या धार्मिक विश्‍वासांच्या उलट असल्याची तक्रार केली होती.

गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेकडून धर्मपरंपरा रक्षण चळवळीस शुभारंभ !

     कोल्हापूर - हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी या महिला शाखेचे कार्य गेली ७ वर्षेे चालू आहे. सध्या महिला अधिकारांच्या नावाखाली हिंदु धर्मातील प्राचीन परंपरा, धर्मशास्त्र आदींवर आघात करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर आणि कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवस्थान येथील शेकडो वर्षांच्या धार्मिक परंपरा मोडण्याचा प्रयत्न होत आहे. आंदोलनांचे स्टंट केले जात आहेत. यामुळेच हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेने या दुष्प्रवृत्तींना रोखण्यासाठी आणि धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर धर्मपरंपरा रक्षण चळवळीस शुभारंभ करण्याचे नियोजन केले आहे.
     कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेेवीच्या आशीर्वादाने शुक्रवार, ८ एप्रिल २०१६ या दिवशी दुपारी ४ वाजता खरे मंगल कार्यालय, सायबर रोड, कोल्हापूर येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भगिनी मंचच्या संस्थापक-अध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर (शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांच्या धर्मपत्नी), रणरागिणीशाखेच्या राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर आणि सनातन संस्थेच्या संत पू. (कु.) स्वाती खाडये या मार्गदर्शन करतील, अशी माहिती रणरागिणी शाखेच्या (हिंदु जनजागृती समितीची महिला शाखा) महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगांवकर यांनी दिली. त्या कोल्हापूर येथील हिंदू एकताच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेच्या संत पू. (कु.) स्वाती खाडये उपस्थित होत्या.

नववर्षाचे भव्य स्वागत ।

नववर्षाचे भव्य स्वागत करूया घरोघरी गुढी उभारून ।
हेवेदावे भेदभाव विसरून एक होऊया फक्त हिंदु म्हणून ॥
लवकरात लवकर हिंदु राष्ट्र आणूया अपार कष्ट करून ।
सर्व हिंदु बांधवांना हार्दिक शुभेच्छा सनातन परिवाराकडून ॥
- श्री. अनिल कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

फलक प्रसिद्धीकरता

१ जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन !
     गुढीपाडव्याला आरंभ होणारे कालचक्र विश्‍वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित आहे. या दिवशी सृष्टी नवचेतनेने भारित होते. निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मानवाला हितकारक असतात. म्हणून गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन आहे, हे जाणा !

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Chaitra Shukla 1 prithvika vastvik varsharambhdin hai. Isliye 1 Jan ki apeksha aaj Navvarsh manaye
Hinduo aaiye, Hindu Rashtraki Sthapnaka sankalp kare 

जागो ! :  चैत्र शुक्ल १ पृथ्वी का वास्तविक वर्षारंभदिन है । इसीलिए १ जनवरी की अपेक्षा आज नववर्ष मनाए.
हिन्दुओ आइए, हिन्दू राष्ट्रकी स्थापना का संकल्प करें ।

साधकांनो, गुढीपाडवा म्हणजे संकल्पसिद्धीची मुहूर्तमेढ असून ब्राह्म तेजाचे वर्धन अन् कृण्वन्तो विश्‍वमार्यम् हा उद्घोष करून प्रत्येक क्षणी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आटोकाट प्रयत्न करा !

१. गुढीपाडव्याच्या तिथीचे महत्त्व
     उत्तरायण, वसंत ऋतू आणि चैत्र मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा ! हा पूर्ण दिवस शुभ मुहूर्त म्हणून मानला जातो. 
१ अ. उत्तरायण : गीतेत उत्तरायणाला शुभ मानले आहे. उत्तरायणाचा काल म्हणजे त्यागमय जीवनाचा संदेश देणारा काल ! 
१ आ. वसंत ऋतू : भगवंताने मी ऋतूंमध्ये कुसुमाकर, म्हणजे वसंत ऋतू आहे, असे म्हटले आहे. 
१ इ. चैत्र मास : हा जीवनात चैतन्य निर्माण करणारा आहे. 
१ ई. शुक्ल पक्ष : हा चंद्राच्या कला वर्धमान होऊन आणि पूर्णत्वाला जाऊन पौर्णिमारूपी पूर्ण आनंदमय प्रकाशाला प्रदान करणारा, तसेच उन्नतीदर्शक आहे. 
१ उ. शुक्ल पक्षातील प्रथमा : प्रथमा म्हणजे प्रतिपदा ! आता आमचे प्रत्येक पाऊल हे प्रगतीपथावर जाणारे राहील, ते यशोशिखर गाठल्याविना रहाणार नाही, हे दाखवणारी प्रथमा आहे. असा हा शुभ संकेत दाखवणारा नूतन संवत्सरारंभ दिवस आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दैवी विचार देऊन जीवनाला सुगंधी करण्यासाठी प.पू. पांडे महाराज यांनी केलेली प्रार्थना !

 प.पू. पांडे महाराज
    प.पू. पांडे महाराज सनातनशी संलग्न होण्यापूर्वी अनेक आध्यात्मिक विषयांवर साहित्याचे लिखाण करत असत. त्याच साहित्यातील एक लिखाण म्हणजे गुढीपाडव्यासाठी दिलेला हा संदेश आहे. वर्ष २००४ च्या गुढीपाडव्याला दिलेला हा संदेश ही भगवंताला केलेली प्रार्थनाच आहे.
     हे आत्मन् ! तुझा सत्-चित्-आनंद असा ज्ञानरूप प्रकाश आणि दिव्य प्रेम यांच्या आत्मीयतेने निर्माण झालेले चैतन्य आमच्या रोमारोमांतून प्रकट होऊ दे. तुझी ही आत्मीय दिव्य शक्ती तुझ्या आशीर्वादाने आमच्याद्वारा सत्कार्यासाठी, ईश्‍वरी कार्यासाठी कारणी लागू दे. 
     या जगात तू केवळ मानवाच्या रूपानेच कार्य करत नसून या जगातील सर्व प्राणीमात्र, पंचमहाभूते, वृक्ष-वेली आणि इतर यांच्या रूपांत नटून कार्य करत आहेस. त्यामुळे यात सर्वांचाच वाटा आहे. या भूमीचा प्रत्येक भूभाग निसर्गाने नटलेला आहे, जसे समुद्राचा वाळूचा किनारा, काळोख्या जंगलातील धुके, गुंजारव करणारा प्रत्येक कीटक, झाडांतून वहाणारा जीवनरस, नद्यांतून वहाणारे पवित्र जल, वातावरणातील मंद आल्हाददायक वायू हे सर्व आम्हाला पवित्र वाटू दे. ही झाडे, पशू-पक्षी यांच्याविना माणसाचे अस्तित्व राहू शकेल का ? हे निसर्गाचे जाळे केवळ माणसाने विणलेले नाही. तो त्यातील एक धागा आहे. तो जेव्हा हे विस्कटू पहातो, तेव्हा तो स्वतःचाच नाश करत असतो, हे त्याच्या लक्षातच येत नाही.

सामूहिक गुढी उभारण्याच्या वेळी करावयाची प्रतिज्ञा आणि प्रार्थना

  • गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभु श्रीरामचंद्र रावणाचा आणि अनेक असुरांचा वध करून अयोध्येला परत आले.
  • या राजाने शत्रूवर विजय मिळवला.
  • हुणांचा पराभव केला.
     त्यामुळे गुढीपाडवा हा हिंदूंच्या यशाचा आणि विजयोत्सवाचा दिवस आहे. या शुभमुहूर्ताच्या दिवशी केलेली प्रतिज्ञा (संकल्प) आणि प्रार्थना फलद्रूप होत असल्याने पुढीलप्रमाणे प्रतिज्ञा आणि प्रार्थना करावी.
प्रतिज्ञा
१. आम्ही समस्त हिंदू गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केवळ भारतातच नव्हे, तर पृथ्वीवर सर्वत्र हिंदु धर्म प्रस्थापित करून अखिल मानवजातीला सुसंस्कृत आणि सुख-समृद्धीयुक्त जीवन देण्याचा निश्‍चय करतो. 
२. हिंदु धर्माच्या रक्षणासाठी आम्ही सदैव ढाल बनून उभे राहू.
३. देव, धर्म, संत आणि राष्ट्रपुरुष यांच्या होणार्‍या विडंबनाला प्राणपणाने विरोध करू.
४. व्यष्टी साधना म्हणजे नामजपादी धर्माचरण करू आणि समष्टी साधना, म्हणजे राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करून हिंदु धर्माची पताका संपूर्ण विश्‍वभर फडकवू. अशी आम्ही ब्रह्मध्वजासमोर प्रतिज्ञा करतो.
प्रार्थना
     हे ब्रह्मदेवा आणि हे प्रतिपालक श्रीविष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य आणि सात्त्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत. त्यांतून मिळणार्‍या शक्तीतील चैतन्य आमच्यामध्ये सातत्याने टिकू दे. आम्हाला मिळणार्‍या शक्तीचा वापर आमच्याकडून साधनेसाठी, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी केला जाऊ दे, हीच आपल्या चरणी प्रार्थना !

गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी संकल्प करूया !

श्री. सिद्धेश करंदीकर
१. गुढी उभारणे ही धार्मिक कृती आहे, टूम (फॅशन) नव्हे ! : धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदू शास्त्रात सांगितल्याप्रमाणे गुढी उभारत नाहीत. अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या काठीला खोट्या फुलांचा हार घालून वर प्लास्टिकचा पेला ठेवला जातो. येथे हिंदूंनी हे लक्षात घेतले पाहिजे की, गुढी उभारणे ही काही टूम (फॅशन) नव्हे; त्याचे विशिष्ट शास्त्र आहे. सध्या पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे ती टूम (फॅशन) झाली आहे. अनेक ठिकाणी घरातील शोकेसमध्ये शोभेची गुढी ठेवलेली असते. त्यामुळे अशी गुढी असल्याने वेगळी गुढी कशाला हवी ?, असेही लोक म्हणतात. माझी हिंदूंना एक नम्र विनंती आहेे की, शास्त्रानुसार गुढी उभारण्याचा प्रयत्न करा; पण तसे करण्यास अडचण असेल, तर वरीलप्रमाणे चुकीच्या कृती तरी आपल्याकडून होऊ देऊ नका.

गुढीपाडव्याला श्री सरस्वतीदेवीचे पूजन करण्याचे आणि तिचे यंत्र पाटीवर काढून त्याचे पूजन करण्याचे महत्त्व

     गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी ब्रह्मतत्त्वासमवेतच श्री सरस्वतीतत्त्वही पृथ्वीवर इतर दिवसांच्या तुलनेत ३० टक्के इतके जास्त प्रमाणात येते. या शुभदिनी अनेक जण विद्या संपादनाच्या शुभकार्याला प्रारंभ करतात. त्यामुळे या दिवशी तिची आणि तिच्या यंत्राची पूजा अन् उपासना आवर्जून केली जाते. - कु. मधुरा भोसले (११.३.२००५)

हिंदूंनो, धर्मद्रोह्यांच्या दिशाभूल करणार्‍या विचारांना बळी न पडता सणांमागील धर्मशास्त्र समजून घ्या !

पू. (कु.) स्वाती खाडये
     एका जिल्ह्यात सभेनंतर घेतलेल्या आढावा बैठकीत एकाने सांगितले, गुढीपाडवा म्हणजे संभाजी महाराजांचे धड शरिरापासून वेगळे केले, तो दिवस. त्यामुळे तुम्ही गुढीपाडवा साजरा करू नका, असा आम्हाला व्हॉट्स अ‍ॅपवर संदेश आला आहे. आम्ही नेमके काय करायचे ? तेव्हा गुढीपाडवा साजरा करण्यामागील शास्त्र समजावून सांगितल्यावर त्यांना ते पटले. त्यांना सनातन-निर्मित सण, धार्मिक उत्सव आणि व्रते या ग्रंथाविषयी सांगितल्यावर म्हणाले, आम्हाला खरे शास्त्र समजले. आम्ही हा ग्रंथ घेतो. आम्ही अशा प्रचाराला बळी पडतो; कारण आम्हाला धर्मशिक्षण नाही. तुम्ही आम्हाला धर्मशिक्षण द्या. आम्ही सर्व जण एकत्र यायला सिद्ध आहोत. 
- (पू.) कु. स्वाती खाडये, सनातन संस्था 

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

    भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. 
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

उभारूया गुढी राष्ट्राची आणि ऐक्याची ।

गुढी उभारू चैतन्याची । 
गुढी उभारू मांगल्याची ।
गुढीची काठी असे ती शिडी साधनेची । 
वर वर चढूनी झेप घेऊया प्रगतीची ॥ १ ॥

गुढीचे वस्त्र असे सत्सेवेचा शेला । 
प्रत्येकानेच लपेटून घ्यावे त्याला ।
गुढीच्या फुलांचा हार असे अष्टांग साधनेची माळ ।
नामजप वाढवूया सारे समोर ठेवूनी आपत्काळ ॥ २ ॥

नववर्षारंभी उद्घाटन कसे करावे, याचे शास्त्र समजून घ्या !

      गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वास्तूचे, दुकानाचे उद्घाटन करतात. आजकाल दुकानांचे, नवीन उद्योगांचे वा कार्यक्रमांचे उद्घाटन फीत कापून करण्याची पद्धत रूढ झाली. भारतीय परंपरेनुसार चालत आलेल्या उद्घाटनाच्या पद्धतीद्वारे वाईट शक्तींचे निवारण तसेच चांगल्या शक्तींचे आवाहन, अशी दोन उद्दिष्टे साध्य होतात. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी दुकानाचे वा तत्सम उद्योगाचे उद्घाटन करतांना वाईट शक्तींचे निवारण करण्यासाठी दुकानाबाहेर फीत कापण्याऐवजी नारळ वाढवावा. दुकानाच्या आत मात्र चांगल्या शक्तींचे आवाहन करण्यासाठी गुरुप्राप्ती झाली असल्यास त्या गुरूंचे छायाचित्र, नसल्यास आपल्या कुलदेवतेचे किंवा इष्टदेवतेचे चित्र वा मूर्ती यांच्यासमोर दीप प्रज्वलित करावा आणि उदबत्त्या लावाव्यात. व्यासपीठावरील कार्यक्रम असल्यास मात्र नारळ वाढवण्याची आवश्यकता नाही. तसेच देवतेचे चित्रही ठेवण्याची गरज नाही. ते व्यासांचे पीठ असल्यामुळे तेथे नुसतेच दीपप्रज्वलन पुरेसे आहे.

वर्णभेद न ठेवता उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरे केले जाणारे सण अन् धार्मिक उत्सव म्हणजे हिंदुऐक्याची ग्वाही !

      हिंदु धर्मातील सणांची वर्णनिहाय जी वर्गवारी केली आहे, त्यात गुढीपाडवा हा ब्राह्मणवर्णीय, दसरा अर्थात विजयादशमी हा क्षात्रवर्णीय, दिवाळी हा वैश्यवर्णीय आणि होळी हा शूद्रवर्णीय सण ठरतात. आज वर्णसंकर झाला असल्याने प्रत्येक सण हिंदु धर्मीय कुठलाही वर्णभेद न ठेवता तेवढ्याच उत्साहाने व भक्तीभावाने साजरा करतात आणि नकळत हिंदुऐक्याची ग्वाही देतात. (२७.३.२००९))

गुढीपाडव्याच्या शुभदिनी स्वतःतील विकारांवर विजय मिळवून कृतीशील उपासनेला प्रारंभ करा !

   
   चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेला ब्रह्मध्वजारोहण करतात, म्हणजेच गुढी उभारतात. तेव्हा वेळूच्या काठीला तेल लावून अभ्यंगस्नान घालतात, हळद-कुंकू लावतात.
१. गुढीपाडव्याचे महत्त्व
      ब्रह्मपुराणानुसार ईश्‍वराने या दिवशी विश्‍वाची निर्मिती केली. श्रीरामचंद्र १४ वर्षांच्या वनवासानंतर रावणाचे पारिपत्य करून चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेला अयोध्येला परत आले; म्हणून त्या दिवशी गुढ्या-तोरणे उभारून त्यांचे आनंदाने स्वागत केले जाते. या दिवसापासून रामाचे नवरात्र चालू होते. पैठणच्या सातवाहन (शालीवाहन) वंशातील गौमतीपुत्र आणि पुसुयार्मी या पराक्रमी राजांनी शत्रूचा पराभव करून मिळवलेल्या विजयाची आठवण म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो.

गुढीपाडव्याच्या दिवशी पृथ्वीवर येणार्‍या प्रजापती लहरी ग्रहण करण्यासाठी आवश्यक गुण

    सर्वसाधारण व्यक्तीत ईश्‍वराकडून येणार्‍या लहरी ग्रहण करण्याची क्षमता पुष्कळ अल्प असते. खालील गुण असणारा जीव या लहरी अधिकाधिक प्रमाणात ग्रहण करू शकतो.
अ. अंतर्मनापासून सातत्याने ईश्‍वराचे स्मरण करणारा 
आ. गुरु आणि ईश्‍वर यांच्यावर अढळ श्रद्धा असणारा
इ. ईश्‍वराची संकल्प शक्ती कार्यरत असणारा
ई. शक्तीचा वापर राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यांसाठी करणारा

भारतियांनो, महान भारतीय संस्कृतीचा विसर नको, तर तिचे जतन करा !

१ जानेवारी खरेतर ख्रिस्ती नववर्षाचा आरंभ आहे. जगभरात ख्रिस्ती राष्ट्रे बहुसंख्य असल्याने आणि या राष्ट्रांनी जगातील बहुसंख्य देशांवर आपले अधिपत्य गाजवल्याने तेथील संस्कृतीचा पगडा जगभर पहायला मिळतो. त्यामुळे १ जानेवारी हे जागतिक नववर्ष आहे, असा अपसमज निर्माण झाला आहे. 
     भारतीय संस्कृतीनुसार नववर्षाचा आरंभ गुढीपाडव्याच्या दिवशी होतो. पृथ्वीच्या निर्मितीचा दिवसही हाच आहे. समस्त भारतियांनी नववर्षाचा आरंभ गुढीपाडव्यापासून करायला हवा. आपल्यालाच आपल्या महान अशा संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. भारतियांनी आतातरी गुढीपाडव्याचे महत्त्व जाणून कृतीशील व्हावे !

गुढीपाडव्याच्या दिवशी देशकालकथन का करावे ?

     गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंगस्नान करतांना देशकालकथन केल्याने आपल्याला काळाच्या व्यापकतेची जाणीव होऊन अहंनिर्मूलन होते !


हिंदूंनो, पाश्‍चात्त्यांप्रमाणे नव्हे, तर शास्त्रोक्त पद्धतीने सण साजरे करून आध्यात्मिक स्तरावर लाभ करवून घ्या !

१. पाश्‍चात्त्यीकरणाचे भूत स्वार झाल्याने गुढीपाडवा
 आणि दिवाळी हे सण हॅपी गुढीपाडवा अन् हॅपी दिवाली या पद्धतीने साजरेहोणे
      हिंदूंनो, तुम्ही-आम्ही हिंदू आहोत, असे आपण अभिमानाने सांगतो; पण खरोखरच ही कुणाची संस्कृती आहे ? हॅपी गुढीपाडवा किंवा हॅपी दिवाली ही संस्कृती हिंदु धर्मातील आहे कि पाश्‍चात्त्य, हे तुम्हीच सांगा. सणासुदीचे दिवस आले की, घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. त्या वेळी सण चांगल्या प्रकारे साजरे करायला हवेत, असे आपल्याला वाटते; पण आता पाश्‍चात्त्यीकरणाचे हे भूत (प्रभाव) आपल्यावर स्वार झाले असून त्याचा सर्वत्र प्रादुर्भाव झाला आहे.

स्वर्गीय बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त...

अमर गीत वन्दे मातरम्ची रचना करणारे स्वर्गीय बंकिमचंद्र चॅटर्जी !
         वन्दे मातरम् हे राष्ट्रगीत वर्ष १८८० मध्ये बंगाली देशभक्त स्व. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी आनंदमठ या एका ऐतिहासिक सत्य घटनेवर आधारित कादंबरीत लिहिले आहे. स्वर्गीय बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त वन्दे मातरम्विषयीचे विचार येथे देत आहोत.
वन्दे मातरम्विषयी व्यक्त केलेले विचार
वन्दे मातरम् : पवित्र मंत्र ! - श्री योगी अरविंद
       श्री योगी अरविंद सुप्रसिद्ध अलिपूर बॉम्ब खटल्यात गोवले जाऊन पकडले जाण्यापूर्वी ३ मास अगोदर म्हणजे २९ जानेवारी १९०८ या दिवशी अमरावती येथे केलेल्या भाषणातील विचार पुढे देत आहोत.

वर्षारंभी जास्तीतजास्त शुद्ध मराठीत बोलण्याचा प्रयत्न करून स्वभाषाभिमान जोपासा !

     चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला हिंदूंच्या नववर्षाचा प्रारंभ होतो. त्या निमित्ताने या वर्षी मराठी भाषिकांनी शुद्ध मराठी भाषेत बोलण्याचा संकल्प सोडून तो पूर्णत्वास नेला पाहिजे. भाषा, बोली आणि लेखन या तिन्ही संदर्भात मराठी भाषेची सद्यस्थिती किती केविलवाणी झाली आहे, हे घरीदारी उच्चारल्या जाणार्‍या मराठीवरून कोणाच्याही लक्षात येईल.
     मराठी मायबोलीतील शुद्ध आघातजन्य उच्चारातील शब्दशक्ती ही मन आणि बुद्धी यांच्यातील रज-तमात्मक धारणांना नष्ट करून चित्तावर चांगले विचार आणि आचार यांचे संस्करण करते. भाषाशुद्धीने समाज घडतो. समाजात विकसनशील मन आणि बुद्धी यांचा संयोग असेल, तरच राष्ट्र घडते. भाषाशुद्धीचे व्रत अंगीकारणे, म्हणजेच प्रत्येक जिवाने योग्य, म्हणजेच शुद्ध भाषाउच्चारांसह स्वतः भाषेतील देवरूपी चैतन्य ग्रहण करण्याचा प्रयत्न करून वायूमंडलाची परिणामी समाजाची शुद्धी साधणे. शुद्ध भाषा उच्चारूनच जिवात चैतन्याचे बीज रोवले जाऊन ईश्‍वरी गुणांचे संवर्धन होऊ लागते. यासाठी परकीय भाषांची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी कृतीशील व्हा !
भाषाशुद्धी हा राष्ट्रहिताचा आणि स्वत्वरक्षणाचा असा विषय 
आहे की, जो प्रत्यक्षात आणतांना रक्तही (तन) सांडावे लागणार 
नाही वा द्रव्यही खर्च होणार नाही. त्यासाठी फक्त मनोनिग्रह हवा !
       गुढीपाडवा हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे. हिंदूंचे नववर्ष या दिवसापासून चालू होते. या दिवशी पृथ्वीतलावर ब्रह्मदेवाचे आणि विष्णूचे तत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत असते. याच दिवशी प्रभु श्रीराम वनवास संपवून परत आले. प्रजाजनाने त्यांचे स्वागत दारात गुढ्या उभारून केले. तेव्हापासून गुढी उभी करण्यात येते. या दिवशी प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. या लहरींच्या माध्यमातून प्रत्यक्ष ईश्‍वराचे तत्त्व कार्यरत असते. या दिवशी रामतत्त्व १०० पटींनी अधिक कार्यरत असते. गुढीच्या माध्यमातून कार्यरत असलेली ईश्‍वराची शक्ती जिवाला फायदेशीर असते.

गुढी उभारू क्षात्रवृत्तीची, हिंदुत्वाच्या महतीची !

कु. मधुरा भोसले
गुढी उभारू चैतन्याची, समर्पणभावाची ।
नववर्षाच्या स्वागताची, सांघिक भावाची ॥ धृ. ॥
गुढी उभारू प्रेमाची, नूतन पर्वाच्या शुभारंभाची ।
शुभकाळाच्या आगमनाची, नववर्षाच्या शुभागमनाची ॥ १ ॥
गुढी उभारू क्षात्रवृत्तीची (टीप १), हिंदुत्वाच्या महतीची ।
पराक्रमाच्या कीर्तीची, समर्पित देशभक्तीची ॥ २ ॥
गुढी उभारू ब्राह्मतेजाची, नाविन्यपूर्ण ज्ञानाची ।
निर्मळ जीवनाची, उज्ज्वल भविष्याची ॥ ३ ॥
गुढी उभारू नाविन्याची, सर्वत्र फुलणार्‍या वसंताची ।
बहरणार्‍या जीवनाची, उमलणार्‍या कळ्यांची ॥ ४ ॥

योगः कर्मसु कौशलम् । या वचनाची प्रचीती देणार्‍या सनातनच्या रामनाथी आश्रमातील साधकांच्या परिपूर्ण सेवाभावातून साकारलेल्या कलाकृती !

पाण्याच्या पाईपची वैशिष्ट्यपूर्णरित्या केलेली आणि मनाला आनंद देणारी गुंडाळी
कपड्यांच्या चिमट्यांपासून सिद्ध केलेली श्रीकृष्ण आणि गोपी यांची संकल्पना
रस्त्यावर पडलेल्या प्राजक्ताच्या फुलांपासून मंदिराची आकृती 
बनवतांना कु. वैभवी झरकर (चौकोनात मंदिर दाखवले आहे.)
आगकाड्यांपासून केलेली कृष्णाची आकृती, चिमटा म्हणजे कु. रोहिणी
           कला हे ईश्‍वरप्राप्तीचे एक माध्यम आहे. ती कोणती कला आहे ?, यापेक्षा त्या कृतीतून आनंद अनुभवणे हे महत्त्वाचे ठरते. योग्य प्रकारे साधना केल्यामुळे साधकांच्या प्रत्येक कृतीमध्ये परिपूर्णता येते आणि त्या परिपूर्णतेतूनच सुंदर कलेची उत्पत्ती होते. अशाच काही कलाकृती पाहूया.

महर्षींनी साधकांना हातात सप्तरंगी धागा बांधायला सांगितल्याची प्रत्यक्ष शिव असणार्‍या अण्णामलई पर्वताने प्रकाशाची उधळण करून दिलेली अशीही एक आकाशरूपी साक्ष !

महर्षींची शिकवण आणि कार्य !
पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचे तीर्थयात्रेतील अनुभव 
तिरुवण्णामलई येथे अण्णामलई पर्वताच्या मागून अचानक
आलेले शेंदरी रंगाचे प्रकाशाचे सात पट्टे (एका छायाचित्रात पट्टे
एकाच वेळी येऊ न शकल्याने तीन छायाचित्रामध्ये चित्रीत केले आहेत.) 
१. अनुभूतीची पार्श्‍वभूमी : महर्षींच्या आज्ञेनुसार सप्तरंगी धागा सर्व साधकांनी हाताला बांधावा, असे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सांगितले होते. काही धागे मंत्रून चेन्नईहूनच साधकांना पाठवून दिले होते. महर्षींनी सांगितले की, पुढचे धागे कधी द्यायचे ते आम्ही ठरवू. या सप्तरंगी धाग्यांसंदर्भात आलेली अनुभूती येथे देत आहे.
पू. (सौ.) अंजली गाडगीळ
२. अण्णामलई पर्वताचे दर्शन घेत असतांनाच अचानक या पर्वताच्या मागून शेंदरी रंगाच्या प्रकाशाचे सात पट्टे रंगांची उधळण करत संपूर्ण आकाशात किरणांसारखे फाकणे आणि हे दृश्य अतिशय सुंदर असणे : आम्ही ज्या वेळी ४ मार्च २०१६ या दिवशी तिरुवण्णामलई येथे अण्णामलईश्‍वराच्या दर्शनासाठी देवळात गेलो, त्या वेळी देवळात प्रवेश करताक्षणी तेथे असलेल्या शेंदूर गणपतीचे आधी दर्शन घेतले. या मंदिराच्या मागेच प्रत्यक्ष शिव असणार्‍या अशा अग्नीक्षेत्रातील अण्णामलई पर्वताचे विहंगम दर्शन होते. या पर्वताचे आम्ही दर्शन घेत असतांनाच अचानक या पर्वताच्या मागून शेंदरी रंगाच्या प्रकाशाचे सात पट्टे रंगांची उधळण करत संपूर्ण आकाशात किरणांसारखे फाकले असल्याचे लक्षात आले. हे दृश्य इतके सुंदर होते की, जणुकाही अण्णामलई पर्वतातूनच या शेंदरी प्रकाशरूपी सात पट्ट्यांच्या रंगांची उधळण आमच्यासाठीच प्रत्यक्ष शिव करत आहे, असे वाटत होते. आम्ही ज्या शेंदरी रंगाच्या गणपतीसमोर उभे होतो, अगदी त्याच शेंदरी रंगाचे हे प्रकाशमान पट्टे अण्णामलई पर्वतातून बाहेर पडत आहेत, असे ते दृश्य होते. हे दृश्य पाहून तेथे जमलेले अनेक जण आश्‍चर्यचकीत होत होते.

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
काल अमावास्या झाली.


सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !

साधकांना सूचना
     सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
 ॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मायेचे आकर्षण
सततच्या दिव्याकडे कोणाचे लक्ष नसते. लुकलुकणार्‍या दिव्याकडे लक्ष जाते.
भावार्थ : सततचा दिवा म्हणजे आत्मज्योत (ब्रह्म). ही स्थिर असते. लुकलुकणारा दिवा म्हणजे माया. तिच्याकडे सर्वांचे लक्ष चटकन वेधले जाते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)


हिंदूंनो, भावी काळात धर्माच्या बाजूने उभे रहाण्यासाठीची पात्रता स्वतःत निर्माण करा !

परात्पर गुरु डॉ. आठवले
गुढीपाडव्याचा संदेश
     गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर नववर्षाचे संकल्प केले जात असल्याने हिंदूंच्या धर्मजीवनात या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आगामी काळ हा भीषण असून त्याचे संकेत अलीकडे घडत असलेल्या देश आणि धर्म यांच्याशी संबंधित घटनांमधून दिसत आहेत. आज देशविरोधी आणि धर्मविरोधी बोलणे याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटले जात आहे. राजकीय पक्षांकडून हिंदूंच्या हत्या आणि त्यांच्यावरील वाढते अत्याचार दुर्लक्षिले जात असतांना दुसरीकडे धर्मांध अहिंदूंचे उदात्तीकरण चालू आहे. परिणामतः येत्या काळात या देशात मोठ्या प्रमाणात देशप्रेमी विरुद्ध देशद्रोही, तसेच धर्मप्रेमी विरुद्ध धर्मद्रोही अशा दोन प्रकारांत हे धु्रवीकरण होईल. अशा संकटकाळात देशभक्त हिंदूंनी धर्माच्या बाजूने उभे रहाणे आवश्यक आहे; कारण आगामी काळातील संघर्ष हा पूर्णतः धर्म विरुद्ध अधर्म असा असणार आहे. आज देशहिताचे कार्य करणार्‍या मोठ्या संघटना अधर्माला उत्तेजन देणारी भूमिका घेतांना दिसून येत आहे. या संघटनांनीही धर्मविरोधी भूमिका घेतल्याने उद्या आपण अधर्माच्या पक्षात असणार आहोत, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. यतो धर्मस्ततो जयः।, म्हणजेच जेथे धर्म असतो, तेथे विजय असतो.
     हे धर्मवचन असल्याने या धर्मसंघर्षात जे धर्माच्या बाजूने नसतील, त्यांचे धर्म, म्हणजे ईश्‍वर रक्षण करणार नाही; परिणामी त्यांचा नाश अटळ आहे.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

कुणाचेही वाईट चिंतू नये !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
वाईट बोलणे हे केव्हाही अयोग्यच; पण कुणाचेही वाईट चिंतणे आणि त्याच्या र्‍हासाची इच्छा करणे, हे अधिक अयोग्य ! 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

हिंदु राष्ट्राची संकल्पगुढी !

विशेष संपादकीय
उठा हिंदूंनो, जागृत व्हा रे राज्य आपुले स्थापा रे ।
पाश्‍चात्त्यांच्या प्रभावाचे अचेतन जोखड उखडा रे ।
पिचून गेले बंधू-भगिनी धर्मांध क्रौर्याची परिसीमा रे ।
धर्मशिक्षित अन् संघटित व्हा, विजयध्वज हाती धरा रे ॥
     हिंदूंनो, आपत्काल उंबरठ्यावर येऊन ठेपलेला असतांना कलियुगांतर्गत ६ व्या कलियुगातील शके ५११८ चा हा प्रथमदिन उगवला आहे ! विश्‍वात सर्वप्रथम निर्माण झालेल्या आपल्या सनातन संस्कृतीचा म्हणजेच सृष्टीचा प्रथमदिन, म्हणजेच आजचा चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेचा दिवस ! गुढीपाडव्याच्या या चैतन्यमयदिनी प्राचीनतम हिंदु संस्कृतीचे पाईक असल्याची सार्थ अस्मिता जागृत ठेवूया आणि ईश्‍वरचरणी कृतज्ञतेने नतमस्तक होऊया. आजच्या शुभसंकल्पदिनी गुढीदेवतेच्या साक्षीने येऊ घातलेल्या काळातील राष्ट्र आणि धर्म संकटे निधड्या छातीवर घेऊन त्यांचा निःप्पात करण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे सामर्थ्य भगवंताकडे मागूया ! हिंदूंनो, आज आपण आणि आपला देश आंतरर्बाह्य संकटांनी घेरला आहे. छत्रपतींच्या काळातील अस्मानी-सुलतानी परत एकदा नव्या रूपात अवतरली आहे. या पार्श्‍वभूमीवर धर्मसंस्थापनेचे अवतारी कार्यही होऊ घातले आहे. यामध्ये आपल्या सर्वंकष पुनरुत्थानासाठी आपल्या परीने पुढाकार घेणे, हे आपले आद्यकर्तव्य आहे, हे जाणून घ्या. आज आपण उभारलेली राष्ट्र आणि धर्मध्वजाचे प्रतीक असलेली गुढीही आपल्याला हाक देत आहे, उठा हिंदूंनो, जागृत व्हा रे, राज्य आपुले स्थापा रे ।
      गुढीपाडव्याच्या मंगलदिनी ब्रह्मदेव आणि विष्णु यांचे तत्त्व मोठ्या प्रमाणावर कार्यरत असते. या दिवशी प्रजापति लहरी पृथ्वीवर सर्वांत अधिक प्रमाणात येतात. या लहरींमुळे वनस्पती अंकुरण्याची भूमीची क्षमता वाढते. त्रेतायुगात अयोध्येत श्रीराम रावणवध करून परतल्याने अयोध्यावासियांनी या दिवशी गुढ्या उभारल्या होत्या.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn