Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

  आज तुकारामबीज 

 प.पू. साटम महाराज, सिंधुदुर्ग यांची आज पुण्यतिथी  
 
 
सनातनचे पू. अशोक पात्रीकरकाका यांचा आज वाढदिवस 
 
एस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. मिलुटीन पांक्रात्स यांचा आज वाढदिवस 

नंदुरबार येथे दुसर्‍या दिवशीही दंगल !

देशातील वाढत्या दंगली शासनाच्या अस्तित्वावर प्रश्‍न निर्माण करतात !
  • पोलीस अधिकारी घायाळ
  • पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर
  • ८ जणांना अटक
  • होळीच्या दिवशी बाजारपेठ बंद
      नंदुरबार - येथे २२ मार्चनंतर सलग दुसर्‍या दिवशी म्हणजे २३ मार्चलाही हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये दंगल झाली. या वेळी जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत उपअधीक्षक (गृह) शिवाजीराव गावीत आणि त्यांचा अंगरक्षक दोघेही गंभीर घायाळ झाले. २३ मार्चला पोलिसांनी जमावावर अश्रूधुराचा वापर केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. याचा परिणाम होळीच्या सणावर होऊन व्यापार्‍यांनी त्वरित बाजारपेठ बंद केली. या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. हिंदु आणि मुसलमान या दोघांच्या प्रत्येकी २५० जणांवर सार्वजनिक मालमेत्तेची लूट आणि हानी करणे, पोलिसांवर जीवघेणे आक्रमण करणे या आरोपाखाली गुन्हे नोंदवण्यात आले.
१. शहरातील माळीवाडा भागामध्ये एका किरकोळ कारणावरून हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये २२ मार्च या दिवशी वादावादी झाली होती. त्याचे पर्यावसान मोठ्या दंगलीत होऊन यात पोलीस निरीक्षक ए.बी. कटके आणि ५ पोलीस कर्मचार्‍यांसह १० हून अधिक लोक घायाळ झाले होते.

मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड म्हणतो, मुसलमानांचे कायदे न्यायालयाच्या कक्षेबाहेर !

  • आतापर्यंतच्या शासनांनी मुसलमानांच्या केलेल्या लांगूलचालनाचे फलित ! मुसलमान जर त्यांचे कायदे मानणार असतील, तर हिंदूंनी त्यांच्या धर्मातील नियम मानण्यास प्रारंभ केल्यास त्यात चुकीचे काय ?
  • हिंदूंना सातत्याने निधर्मीपणाचे डोस पाजणारे पुरोगामी आणि साम्यवादी या विषयी तोंड उघडणार नाहीत; कारण त्यांच्या लेखी मुसलमानांच्या विरोधात बोलणे म्हणजे निधर्मीपणाच्या विरोधात बोलण्यासारखे आहे !
      नवी मुंबई - मुसलमानांचे वैयक्तिक कायदे हे संसदेत कुठलेही विधेयक आणून बनवण्यात आलेले नाहीत, तर मुसलमानांचा धर्मग्रंथ असलेल्या कुराणचा आधार घेऊन बनवण्यात आले आहेत. त्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत येत नाहीत, असे मत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने मांडले आहे.
१. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, मुसलमान समाजातील तलाकसारखे काही कायदे या समाजातील महिलांवर अन्याय करणारे असून घटनेने महिलांना दिलेल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली करणारे आहेत.
२. यावर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आक्षेप नोंदवला आहे. लॉ बोर्डाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असून संसदेत करण्यात आलेला कायदा आणि धर्माचे अधिष्ठान असलेला कायदा किंवा संकेत हे वेगळे असल्याचे म्हटले आहे.
३. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने समान नागरी कायद्याच्या मागणीचा विरोध केला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आक्रमणाचा प्रयत्न झाला होता !

हेडलीची माहिती
हिंदुत्ववादी नेते आणि कार्यकर्ते यांना वेचून ठार मारण्याचा 
जिहादी आतंकवादी आणि धर्मांध यांचा कुटील डाव जाणा !
      मुंबई - लष्कर-ए-तोयबाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र आक्रमण करण्यासाठी गेलेला आतंकवादी पकडला गेला , अशी माहिती २६/११ च्या मुंबईवरील आक्रमणातील सूत्रधारांपैकी एक डेव्हिड कोलमन हेडली याने त्याच्या उलटतपासणीच्या वेळी दिली.
      अमेरिकेतील कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या हेडलीची मुंबईच्या विशेष न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उलट तपासणी घेतली जात आहे. विशेष शासकीय अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर उत्तर देतांना हेडली याने ही माहिती दिली. हेडली म्हणाला की, तोयबाने बाळासाहेबांवर आक्रमणाचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला होता. आक्रमणासाठी गेलेल्या आतंकवाद्याला पोलिसांनी अटक करून कट उधळला होता; मात्र पोलिसांनी अटक केलेला आतंकवादी नंतर कोठडीतून पसार होण्यातही यशस्वी ठरला होता. (पोलिसांची अकार्यक्षमता ! - संपादक) साजिद मीर याच्या सांगण्यावरून मी दादर येथील शिवसेना भवनाची २ वेळा रेकी (अवलोकन) केली होती. बाळासाहेबांची हत्या घडवून आणण्याच्या कटाचा तो भाग होता, असेही हेडलीने सांगितलेे.

जलरक्षकांची खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी

 हिंदु जनजागृती समितीची खडकवासला जलाशय रक्षण चळवळ १०० टक्के यशस्वी !
कमिन्स इं.लि. आणि अभिनव महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचा सहभाग
खडकवासला जलाशयाभोवती केलेली मानवी साखळी
      पुणे - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी राबवण्यात येणारी खडकवासला जलाशय रक्षण चळवळ यंदाच्या वर्षीही १०० टक्के यशस्वी झाली. धूलिवंदनाच्या दिवशी रंगाने माखलेली एकही व्यक्ती पाण्यात उतरली नाही. जलाशयाच्या ठिकाणी येणार्‍या नागरिकांनीही या चळवळीचे कौतुक केले. मोहिमेच्या अंतर्गत कार्यकर्त्यांनी जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करून कुणालाही जलाशयात उतरू दिले नाही. समितीच्या वतीने गेली १४ वर्षे हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
      सध्या महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे सावट आहे. त्यातच पाण्याची नासाडी करत जलस्रोत प्रदूषित करणे, हा सामाजिक अपराधच आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारा हा जलस्रोत प्रदूषणमुक्त रहावा; म्हणून या मोहिमेत सहभागी झालेले कार्यकर्ते जलाशयाच्या भोवती कडे करून उभे होते. या वेळी या ठिकाणी येणार्‍या तरुणांच्या गटांचे प्रबोधन करण्यात येत होते. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रबोधनात्मक फलक धरून कार्यकर्ते सहभागी झाले होते.
     या चळवळीसाठी शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख आणि माजी पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय टेमघरे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार श्री. भीमराव तापकीर, खडकवासला पाटबंधारे खात्याचे शाखा अभियंता श्री. एन्.डी. गायकवाड, कार्यकारी अभियंता श्री. बा.भ. लोहार, युवासेनेचे जिल्हाप्रमुख आणि गोर्‍हे गावचे सरपंच श्री. सचिन पासलकर, गोर्‍हे गावचे माजी सरपंच कुंडलिक खिरीड, सनातन संस्थेचे श्री. निरंजन दाते आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील उपस्थित होते.

जळगाव येथे रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या शासकीय पथकावर धर्मांध फळविक्रेत्यांकडून दगडफेक !

धर्मांधांच्या वाढत्या उद्दामपणाला आळा घालण्यासाठी
हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच एकमेव उपाय होय !
अतिक्रमण हटवण्यासाठी आलेले पोलीस आणि त्यांना विरोध करणारे धर्मांध
     जळगाव - जळगाव महापालिकेने येथील शिवाजी रस्त्यावरील अतिक्रमण हटवले होते; मात्र धर्मांध फळविक्रेत्यांनी त्यांच्या गाड्या रस्त्यावर लावल्या. त्यांना अगोदर समज देण्यात आली. तरीही त्यांचा उद्दामपणा कायम होता. मनपाचे अतिक्रमण पथक पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यास गेले असता या अतिक्रमणधारकांनी उद्दामपणा करत दगडफेक केली. (यावरून धर्मांधांना पोलिसांचा कोणताही धाक वाटत नाही, हे लक्षात येते ! असे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ? - संपादक) या प्रकरणी पोलिसांनी ७ धर्मांधांना कह्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे नोंदवले आहेत.
     जळगाव महापालिकेच्या वतीने अतिक्रमण हटवा ही मोहीम गेल्या काही दिवसांपासून चालू आहे. काही अतिक्रमणधारकांनी आणि हातगाडीवर खाद्य व्यवसाय करणार्‍यांनी स्वतःहून त्यांच्या गाड्या हटवल्या आणि महानगरपालिकेने दिलेल्या जागेवर ते स्थायिक झाले. त्याचप्रमाणे शिवाजी रस्त्यावर फळविक्रेत्यांकडून होणारे अतिक्रमणही महापालिकेने हटवले होते. अतिक्रमण हटवल्याच्या प्रकरणी काही फळविक्रत्यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती; मात्र न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला.

काँग्रेसकडून 'ट्विटर'वर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा 'देशद्रोही' म्हणून उल्लेख !

     नवी देहली - काँग्रेसने पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करत त्यांचा 'देशद्रोही' म्हणून उल्लेख केला आहे. हुतात्मा भगतसिंह यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 'ट्विट' करतांना काँग्रेसने म्हटले आहे की, जेव्हा भगतसिंह इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी लढा देत होते, तेव्हा सावरकर इंग्रजांकडे त्यांचा गुलाम होण्यासाठी दयेची भीक मागत होते. (स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाणीवपूर्वक अपकीर्ती करण्याचा प्रयत्न काँग्रेस सातत्याने करत आहे. या प्रकरणी केंद्रशासनाने काँग्रेसवर कारवाई करावी, अशीच राष्ट्रप्रेमी जनतेची मागणी आहे. - संपादक) या 'ट्विट'समवेत भगतसिंह आणि सावरकर यांची छायाचित्रेही वापरण्यात आली आहेत, ज्यामध्ये सावरकरांच्या छायाचित्रावर 'देशद्रोही' असे लिहिण्यात आले आहे. यापूर्वीही काँग्रेसने तिच्या 'ट्विटर' खात्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर हे नकली देशभक्त होते, अशी टिप्पणी केली होती. 

हिंदु जनजागृती समितीची होळी आणि रंगपंचमीच्या काळात होणारे विविध अपप्रकार रोखण्याविषयीची चळवळ

१. पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदन देतांना
     हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गेली अनेक वर्षे होळी आणि रंगपंचमीच्या काळात होणारे अपप्रकार रोखण्याविषयी चळवळ राबवली जाते. यासंदर्भात पोलीस आणि प्रशासन यांना निवेदने दिली जातात. यात समितीचे कार्यकर्ते, सनातन संस्थेचे साधक आणि हिंदुत्ववादी यांचाही सहभाग असतो. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देण्यात आलेल्या निवेदनांचा संक्षिप्त वृतांत येथे देत आहोत.
पेण येथे पोलीस उपनिरीक्षक आणि 
तहसीलदार यांना निवेदन
      पेण - येथे पोलीस उपनिरीक्षक धोंडीराम म्हापणकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांनी होळी आणि रंगपंचमी या काळात अपप्रकार होऊ नयेत, याची दक्षता घेऊ, तसेच आवश्यकता वाटल्यास बंदोबस्तात वाढ करू, असे आश्‍वासन दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भारत हे हिंदु राष्ट्र असल्याची घोषणा करावी ! - साध्वी सरस्वतीजी

दैनिक सनातन प्रभातचे वाटप करतांना हिंदुत्ववादी
     कराड (जिल्हा सातारा) - छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवे वस्त्र परिधान करून आपले गुरु रामदास स्वामी यांच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला; मात्र गुरूंनी त्यांना सांगितले, तुझा जन्म भगवे वस्त्र परिधान करण्यासाठी नव्हे, तर विश्‍वावर भगवा ध्वज फडकवण्यासाठी झाला आहे. देहलीत पाकिस्तान जिंदाबाद आणि हिंदुस्थान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या जात आहेत. आज ४० - ५० वर्षांनंतर देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखे नेतृत्व मिळाले आहे. ते गर्वाने स्वत:ला हिंदू म्हणून सांगत आहे. आज संपूर्ण विश्‍वावर ते धर्मध्वज फडकवू इच्छित आहेत. आता नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून भारत हे हिंदु राष्ट्र असल्याची घोषणा करावी, असे आवाहन देहली येथील विश्‍व हिंदू परिषदेच्या प्रचारक साध्वी सरस्वतीजी यांनी केले. येथील श्रीकृष्णाबाई घाटावर हिंदु एकता आंदोलनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य हिंदू संघटन मेळाव्यात त्या बोलत होत्या. कराडसह पश्‍चिम महाराष्ट्रातील ५० सहस्रांहून अधिक धर्माभिमानी हिंदूंनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. 

कलबुर्गी यांची हत्या सुपारी देऊनच केली गेली ! - कर्नाटक सी.आय.डी.

     बेंगळुरू - कर्नाटकमधील धारवाड येथे गेल्या ३० ऑगस्ट या दिवशी झालेली प्रा. एम्.एम्. कलबुर्गी यांची हत्या सुपारी देऊन धंदेवाईक अथवा सामान्य गुन्हेगारांकडून केली गेली असावी, असा तर्क राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सी.आय.डी.ने) लावला आहे. हे मारेकरी गोवा अथवा महाराष्ट्रातील असावेत, असा संशय व्यक्त करण्यात येत असल्याचे वृत्त 'इंडिया टुडे' या वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

मतांची भीक मागणार्‍या राज्यकर्त्यांना हिंदूंवरील अन्याय उघड्या डोळ्यांनी बघतांना लाज कशी वाटत नाही ? - जितेंद्र वाडेकर

श्री. जितेंद्र वाडेकर
आंदोलनात सहभागी धर्माभिमानी हिंदू आणि
आंदोलनाला संबोधित करतांना 
     सातारा, २४ मार्च (वार्ता.) - देशाची सद्य परिस्थिती अत्यंत वाईट असून विविध विद्यापिठांतील विद्यार्थी देशविरोधी घोषणा देऊन शत्रूराष्ट्राचा उदो-उदो करत आहेत. जेएनयू प्रकरणातील कन्हैय्या कुमार, उमर खालिद, तसेच रोहित वेमुला ही त्याचीच उदाहरणे आहेत. भारतातील बहुसंख्य हिंदूंकडे मतांची भीक मागणार्‍या राज्यकर्त्यांना हिंदूंवरील अन्याय उघड्या डोळ्यांनी बघतांना लाज कशी वाटत नाही ?, असा प्रश्‍न विश्‍व हिंदू परिषदेचे सातारा शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर यांनी उपस्थित केला.

नाशिक सिंहस्थ कुंभपर्वाच्या विविध कामांत आर्थिक अपव्यवहार झाल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळला !

विधान परिषद प्रश्‍नोत्तरे...
     मुंबई - गेल्या वर्षी नाशिक येथे झालेल्या सिंहस्थ कुंभपर्वात त्र्यंबकेश्‍वर देवस्थानने कोणत्याही कामाची निविदा न काढता लक्षावधी रुपयांची कामे केली असल्याने जिल्हाधिकारी अडचणीत आले आहेत, असे जानेवारी २०१६ मध्ये निदर्शनास आले होते. त्यानुसार लक्षावधी रुपयांची थकित देयके समोर येत असल्याने आर्थिक अपव्यवहार झाल्याचा आरोप सदस्य माणिकराव ठाकरे, संजय दत्त यांसह आदी सदस्यांनी केला होता; मात्र अपव्यवहार केल्याचा आरोप मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे. २३ मार्च या दिवशी विधान परिषदेच्या लेखी प्रश्‍नोत्तरात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.
     त्र्यंबकेश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्तांनी दिलेल्या तोंडी आदेशानुसार कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे थकित रुपयांची देयके समोर येत असल्याने या कामात अपव्यवहार झाला आहे. या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्र्यंबकेश्‍वरचे ग्रामस्थ आणि देवस्थानचे विश्‍वस्त सौ. ललिता शिंदे यांनी केली आहे, असे वरील सदस्यांनी म्हटले होते. याला उत्तर देतांना मुख्यमंत्री म्हणाले की, सिंहस्थ कुंभपर्वाच्या वेळी भाविकांच्या सुविधेसाठी क्युरेलिंग करणे, भूमीगत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणे आणि शहरात विविध ठिकाणी पिलर्स उभे करणे, अशी कामे करण्याविषयी त्र्यंबकेश्‍वर देवस्थान समितीला सुचवले होते.

समीर गायकवाड यांचा जामीन अर्ज न्यायालयाने दुसर्‍यांदा फेटाळला !

कॉ. पानसरे हत्या प्रकरण ! 
पुढील सुनावणी २९ मार्चला 
     कोल्हापूर, २४ मार्च (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात अटकेत असलेले सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना जामीन मिळावा, या मागणीसाठी ८ मार्च या दिवशी न्यायालयात दुसर्‍यांदा आवेदन (अर्ज) सादर करण्यात आले होते. या आवेदनावर युक्तीवाद होऊन २३ मार्च या दिवशी त्यावर निर्णय देण्याचे न्यायाधिशांनी घोषित केले होते. समीर यांचे जामिनासाठी असलेले आवेदन फेटाळत असल्याचे न्यायाधिशांनी २३ मार्चला सांगितले. ही सुनावणी न्यायाधीश श्री. एल्.डी. बिले यांच्यासमोर चालू आहे. या वेळी श्री. समीर गायकवाड यांच्या बाजूने अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन, अधिवक्ता श्री. आनंद देशपांडे आणि अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते. न्यायाधिशांनी दिलेल्या निकालाचा अभ्यास करून उच्च न्यायालयात जाण्याच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. दरम्यान या प्रकरणाची नियमित सुनावणी २९ मार्च या दिवशी होणार आहे. 

गोमांस भरलेल्या दोन गाड्या पेटवल्या !

     पुणे, २४ मार्च (वार्ता.) - हडपसर पोलीस ठाण्यात शासनाधीन केलेल्या गोमांसाच्या दोन गाड्या पोलिसांनी बोपदेव घाटात नेल्या होत्या. पोलिसांनी गोमांस पुरण्यासाठी खड्डा केला होता. त्यामध्ये गाडीतील अर्धे मांस टाकल्यानंतर अज्ञातांनी दोन गाड्या पेटवून ते पसार झाले. अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आगीवर नियंत्रण आणले. (गोवंशरक्षणासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! - संपादक)

जनावरांची छुपी वाहतूक करणार्‍यांवर ४ वर्षांत ६० तक्रारी ! - मुख्यमंत्री

      मुंबई - जनावरांच्या छुप्या पद्धतीने वाहतुकीविषयी पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात वर्ष २०१३ पासून २०१६ पर्यंत एकूण ६० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी २३ मार्च या दिवशी विधानसभेत लेखी प्रश्‍नोत्तरात दिली. या संदर्भात आमदार सौ. मेधा कुलकर्णी यांनी तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. (जनावरांची छुपी वाहतूक करण्याच्या घटना घडूच नयेत यासाठी शासनाने जनावरांची छुपी वाहतूक करणार्‍यांवर कठोर शिक्षा देण्याचा कायदा सिद्ध केला पाहिजे. - संपादक)      श्री. फडणवीस म्हणाले की, २०१५ मध्ये दगडफेकीच्या २ तक्रारींच्या अनुषंगाने खडकी पोलीस ठाण्यात गुन्हे प्रविष्ट करण्यात आले असून त्यात १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर खटले न्यायप्रविष्ट आहेत. छुप्या पद्धतीने गोमांस विक्री आणि जनावरांच्या वाहतुकीच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तात्काळ गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत. तसेच अशा प्रकारच्या घटना घडू नयेत; म्हणून योग्य ती काळजी घेण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

फर्ग्युसन महाविद्यालयातील हाणामारी आणि धक्काबुक्की प्रकरणी अज्ञातांच्या विरोधात दंगलीचा गुन्हा प्रविष्ट

     पुणे - फर्ग्युसन महाविद्यालयात काही विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्याचे पुरावे सादर करा, अशी मागणी पोलिसांनी केल्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्रसिंह परदेशी यांनी आमच्याकडून टंकलेखनाची चूक झाली आहे. विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या असल्यास त्यांच्यावर कारवाई करा, असे आमचे म्हणणे होते, असेही त्यांनी सांगितले. परदेशी यांनी क्षमाही मागितली आहे.
     २३ मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड महाविद्यालयात आले असता भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांविरोधात घोषणाबाजी केली. आव्हाडांच्या गाडीवर आक्रमण करण्यात आले, तसेच राष्ट्र्रवादी काँग्रेसचे आणि भाजयुमा यांच्या कार्यकर्त्यांनी हाणामारी केली.
     २२ मार्चला फर्ग्युसन महाविद्यालयात अभाविपचा विद्यार्थी नेता आलोकसिंह आला असता आंबेडकरी चळवळीशी संबंधित विद्यार्थ्यांनी कन्हैया कुमारच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. त्यामुळे दोन्ही गटांत बाचाबाची झाली. महाविद्यालय व्यवस्थापनाने कन्हैया कुमारच्या समर्थकांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली. नंतर काही विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या.

राज्यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लक्ष ५५ सहस्र विद्यार्थ्यांची गळती !

     मुंबई, २४ मार्च (विशेष प्रतिनिधी) - राज्यात गेल्या वर्षभरात पहिली ते आठवी इयत्तेतील १ लक्ष ५५ सहस्र विद्यार्थ्यांची गळती झाली आहे, अशी माहिती राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली आहे. अजूनही राज्यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची गळती होत असल्याचे उघडकीस आले आहे. वर्ष २०१४-१५ मध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण देणार्‍या १ लक्ष ५ सहस्र शाळा होत्या. पटावरील विद्यार्थ्यांची संख्या १ कोटी ६१ लक्ष ७२ सहस्र ४२० होती. २०१५-१६ मध्ये ही संख्या घटून १ कोटी ६० लक्ष १६ सहस्र ७५४ झाली आहे. शासकीय आणि खाजगी शाळांमध्ये केलेल्या प्रत्यक्ष पाहणीवरून हे वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद विभागाच्या माहितीच्या आधारे आर्थिक पाहणी अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

राज्यातील ६६ सिंचन चौकशांचा अहवाल मे मासात सादर होणार !

     
     मुंबई, २४ मार्च (विशेष प्रतिनिधी) - राज्यातील ६६ सिंचन प्रकल्पांच्या चौकशांसाठी नियुक्त करण्यात आलेली ४ सदस्यीय समिती मे मासात अहवाल सादर करेल, अशी माहिती शासनाच्या वतीने २३ मार्च या दिवशी विधानसभेत देण्यात आली. शिवसेनेचे आमदार श्री. सुनील प्रभु यांनी हा प्रश्‍न विचारला होता. त्याला शासनाने लेखी स्वरूपात उत्तर दिले आहे.
यासंदर्भात जलसंपदामंत्री श्री. गिरीश महाजन म्हणाले की... 
१. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाच्या आदेशानुसार जलसंपदा खात्याचे जलविद्युत् प्रकल्प आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाचे मुख्य अभियंता आर्.व्ही. पानसे यांच्या नेतृत्वाखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. 

दुष्काळी भागातील वीजदेयके मागे घेणार ! - ऊर्जामंत्री

     मुंबई, २४ मार्च (विशेष प्रतिनिधी) - विजेच्या क्षेत्रात संपूर्ण देशात आघाडीवर रहाण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. वर्ष २०१७ पर्यंत विजेच्या संदर्भात राज्य स्वयंपूर्ण होईल. मराठवाडा आणि विदर्भ येथील दुष्काळी भागात वीजपंप बंद असतांनाही १५ सहस्र ८०० गावामंध्ये वीजदेयके देण्याच्या प्रकाराची जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने चौकशी करून ही देयके मागे घेतली जातील, अशी माहिती ऊर्जामंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी २३ मार्च या दिवशी विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी राज्यातील विजेच्या संदर्भातच उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देतांना ते बोलत होते.

मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) येथे २२ गोवंशियांना पशूवधगृहाकडे नेणारा टेम्पो पोलिसांनी पकडला

      मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) - सांगोला येथील बाजारातून खरेदी करून विजापूर येथील पशूवधगृहाकडे २२ गोवंशियांना घेऊन जाणारा टेम्पो येथील पोलिसांनी पकडला. या टेम्पोत ४ बैल, ७ देशी गायी आणि ११ जर्सी गायी यांचा समावेश होता. याप्रकरणी टेम्पो चालक धर्मांध मुस्तफा महिबूब बागवान आणि वाहक मुतलीन अकील कुरेशी यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

होळी सणाविषयी बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे अज्ञान !

     काही दिवसांपूर्वी होळीमुळे एरंडाची झाडे नष्ट होतात, असे पुण्यातील एका तथाकथित पर्यावरणवाद्याने (अधिवक्ता असीम सरोदे) म्हटले होते. खरे तर एरंड, उस, पोफळी, माड या होळीसाठी वापरण्यात येणार्‍या वनस्पतींच्या फांद्या किंवा जेठा (मुख्य देठ) कापल्यावर त्या वनस्पतीला अधिक प्रमाणात फुटवे फुटतात. स्वतःला पर्यावरणवादी म्हणवून घेणार्‍यांना एवढेही ठाऊक असू नये, हे त्यांच्या ढोंगीपणावर शिक्कामोर्तब करणारे आहे. प्रत्यक्ष निसर्गात कधीही न जाता दूरचित्रवाहिनीच्या वातानुकूलित खोलीत बसून अशा प्रकारची हिंदुविरोधी वक्तव्य करणे, हा पराकोटीचा हिंदुद्वेष म्हणावा लागेल. असे हिंदुद्वेषी तथाकथित पर्यावरणवादी आणि बुद्धीभेद करणारे बुद्धीप्रामाण्यवादी यांना सर्वत्रच्या हिंदूंनी संघटित होऊन सनदशीर मार्गाने विरोध केला पाहिजे, तरच आपण हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकू. - श्री. विठ्ठल जाधव, भोर (जिल्हा पुणे)

संभाजीनगर येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने वाहनफेरी

     संभाजीनगर, २४ मार्च - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात आला आहे. यानिमित्त २२ मार्च या दिवशी काढण्यात आलेल्या वाहनफेरीत ३०० हून अधिक धर्माभिमान्यांनी सहभाग घेतला. 
       सभेच्या प्रचारानिमित्त सिडको भागातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. फेरीची सांगता झाल्यानंतर तिचे सभेत रूपांतर झाले. या वेळी शिवसेनेचे ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख श्री. अनिल अर्डक यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर समितीच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी धर्मजागृती सभेची आवश्यकता या विषयावर धर्माभिमान्यांना मार्गदर्शन केले.

बौद्ध धर्म स्वीकारण्यामागे भारतीय संस्कृतीशी द्रोह न करण्याची वृत्ती ! - अविनाश धर्माधिकारी

     पुणे, २४ मार्च (वार्ता.) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या अनुयायांना कोणत्याही परिस्थितीत हिंसा न करण्याची शिकवण दिली. डॉ. आंबेडकर यांची वागणूक संयमपूर्णच होती. बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या त्यांच्या निर्णयामागेही भारतीय संस्कृतीशी द्रोह न करण्याचीच वृत्ती दिसून येते, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी श्री. अविनाश धर्माधिकारी यांनी केले. राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने येथील जय शिवराय चौकात शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी माजी खासदार श्री. प्रदीप रावत, सामाजिक न्यायमंत्री श्री. दिलीप कांबळे, आमदार सौ. मेधाताई कुलकर्णी यांनी केले. 
     भारतावर स्वातंत्र्य गमावण्याची वेळ फंदफितुरीमुळे आली. हे संकट भविष्यातही डोके वर काढू शकते. राष्ट्रभावनेचा अभाव हे या फंदफितुरीचे कारण आहे, या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानातून त्यांचे द्रष्टेपण लक्षात येते, असे श्री. रावत यांनी सांगितले. 

महिलांना मंदिरप्रवेशासाठी संघ समन्वयकाची भूमिका बजावेल - प्रा. नाना जाधव, प्रांत संघचालक

     पुणे, २४ मार्च - महिलांना मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश देण्याच्या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका ठाम आहे. हिंदु धर्मामध्ये स्त्री-पुरुष समानता आहे. त्यामुळे महिलांना मंदिर प्रवेश द्यावा, यासाठी मंदिर प्रशासन आणि आंदोलकांनी चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा. आवश्यकता भासल्यास मंदिर प्रवेशासाठी संघ समन्वयकाची भूमिका निभावेल, असे मत रा.स्व. संघाचे पश्‍चिम महाराष्ट्र्र प्रांत संघचालक प्रा. नाना जाधव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. संघाच्या शाखांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून वर्ष २०१२ मध्ये संघाच्या ४० सहस्र ९२२ शाखा होत्या, तर यंदा ५६ सहस्र ५६९ इतक्या एकूण शाखा आहेत, असेही त्यांनी सांगितले. (संघाने धर्मशास्त्र समजून घेऊन समन्वयकाची भूमिका धर्माच्या बाजूने निभवावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! - संपादक)

होळीच्या सणानिमित्त भुजबळ यांनी मागितलेला तात्पुरता जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !

     मुंबई, २४ मार्च (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्र सदनसह अन्य आर्थिक अपव्यवहार प्रकरणांमध्ये सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कुटुंबियांसमवेत होळी साजरी करायची असल्याने त्यासाठी तात्पुरत्या जामिनाची मागणी केली होती. भुजबळ यांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावल्याने भुजबळांना यंदाची होळी-धुळवड आर्थर कारागृहातच साजरी करावी लागली. 

भाग्यनगर येथे गोरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी कन्हैया कुमारवर बूट फेकले !

देशद्रोहाचा आरोप असणार्‍यांच्या विरोधातील जनतेचा हा उद्रेक होय ! 
     भाग्यनगर - जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याच्यावर येथील उस्मानिया विद्यापिठातील एका कार्यक्रमात बूट फेकण्यात आले. कार्यक्रम चालू असतांना गोरक्षा दलाच्या २ कार्यकर्त्यांनी 'भारतमाता की जय' अशा घोषणा देत कन्हैया कुमारच्या दिशेने बूट फेकले. या प्रकरणी पोलिसांनी पवनकुमार रेड्डी आणि नरेश कुमार या २ कार्यकर्त्यांना कह्यात घेतले आहे. कन्हैया कुमार सध्या भाग्यनगरचा दौरा करत आहे. २३ मार्चला तो उस्मानिया विद्यापिठाला भेट देण्यासाठी गेला होता. या वेळी त्याला प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले होते. रोहित वेमुला आत्महत्येप्रकरणी कन्हैयाने डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.

फलक प्रसिद्धीकरता

दुहेरी कायदाप्रणाली देशात शांतता राखील का ?
     मुसलमानांचे वैयक्तिक कायदे हे संसदेत कुठलेही विधेयक आणून बनवण्यात आलेले नाहीत, तर कुराणचा आधार घेऊन बनवण्यात आले आहेत. त्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत येत नाहीत, असे मत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने मांडले आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Musalmanonke kanoon Nyayalay ki kaksha ke bahar ! - Muslim personal law board.
Hindu Rashtra par baval karanewale ab chup kyo?

जागो ! : मुसलमानों के कानून न्यायालय की कक्षा के बाहर ! - मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड
हिंदु राष्ट्र पर बवाल करनेवाले अब चूप क्यो ?

कोल्हापूर येथे क्षत्रिय मराठा रियासत फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. सावंत (उजवीकडे)
यांना निवेदन देतांना क्षत्रिय मराठा रियासत
फाऊंडेशनचे कार्यकर्ते
     कोल्हापूर, २४ मार्च (वार्ता.) - एम्.आय्.एम्. या पक्षाचे खासदार असदुद्दीन औवेसी आणि आमदार वारिस पठाण यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशा मागणीचे निवेदन क्षत्रिय मराठा रियासत फाऊंडेशनचे श्री. प्रसादसिंह मोहिते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. सावंत यांना दिले. या वेळी सर्वश्री जगन्नाथ बावडेकर, स्वप्नील कोळी, विपुल घाटगे, शाहूराज काटे भोसले, दया पाटील, सदाशिव पाटील, अनिकेत पोवार, अजिंक्य पाटील, सचिन भोसले, अवधूत चौगुले, पराग मोहिते, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे, शिवसेनेचे सर्वश्री पद्माकर कापसे, किशोर घाटगे यांसह अन्य उपस्थित होते. 
     मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वीही असदुद्दिन यांचे भाऊ अकबरुद्दीन औवेसी यांनी १५ मिनिटात हिंदूंना संपवण्याची भाषा केली होती. इतके सगळे असूनही त्यांच्यावर आजतागायत काहीच कारवाई झालेली नाही. यामुळे अशा प्रकारे देशद्रोही आणि धर्मभेदी खासदार असदुद्दिन औवेसी यांच्यावर पोटा, मोका अथवा नवीन कायद्याची निर्मिती करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

मिरज येथे शिवसेनेच्या वतीने निवेदन

(मध्यभागी) पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांना
निवेदन देतांना शिवसैनिक
     मिरज, २४ मार्च (वार्ता.) - भारतमाता की जय म्हणण्यास नकार देणारे एम्.आय.एम्. पक्षाचे खासदार असदुद्दीन औवेसी आणि आमदार वारिस पठाण यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करावा, अशा मागणीचे निवेदन मिरज येथील शिवसेनेचे मिरज तालुका उपप्रमुख पै. विशालसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांना देण्यात आले. या वेळी सर्वश्री कुबेर राजपूत, गिरीश जाधव, तानाजी सातपुते, पप्पू शिंदे, सागर गस्ते, अमोल रणधीर यांसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते. (देशविरोधी विधाने करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्याची मागणी करणारे पै. विशालसिंह राजपूत आणि शिवसैनिक यांचे अभिनंदन ! - संपादक)

एम्.आय्.एम्.चे खासदार असदुद्दीन औवेसी आणि आमदार वारिस पठाण यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून अटक करण्याची हिंदुत्ववाद्यांची मागणी

फलटण (जिल्हा सातारा) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !
आंदोलनाच्या अंतर्गत उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन
(उजवीकडे) नायब तहसीलदार श्री. प्रकाश कांबळे
यांना निवेदन देतांना धर्माभिमानी
     फलटण (जिल्हा सातारा), २४ मार्च (वार्ता.) - भारतमातेच्या जयघोषाच्या संदर्भात एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि त्याच पक्षाचे आमदार वारिस पठाण यांनी देशद्रोही वक्तव्य केले होते; मात्र केवळ पठाण यांच्यावरच निलंबनाची कारवाई झाली. त्याप्रमाणे ओवैसी यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, यासाठी येथे २३ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नगरपालिका चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला फलटण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे श्री. रोहित राऊत, मिरगावचे ह.भ.प. जालिंदर महाराज वाघमोडे, मुधोजी हायस्कूल फलटणचे माजी प्राचार्य श्री. रवींद्र येवले, हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. अलका व्हनमारे यांसह अनेकांनी निषेध व्यक्त केला. या वेळी अमोल सस्ते, आशिष कापसे, अभिजित कापसे, उदय ओझर्डे, प्रदीप जाधव यांसह ५० जण उपस्थित होते. 
    आंदोलनानंतर पंतप्रधानांच्या नावे फलटणचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार श्री. प्रकाश कांबळे यांनी निवेदन स्वीकारले.

कम्युनिस्टांचा देश तोडण्याचा डाव हाणून पाडणार ! - आलोक सिंघ

     पुणे, २४ मार्च (वार्ता.) - मोदीविरोध, संघविरोध करणारी डावी मंडळी आता देशविरोधही करू लागली आहेत. फाशी देण्याला विरोध असल्याचे हे लोक सांगतात, मग केवळ आतंकवादी अफजल गुरु, याकूब मेमन यांच्या फाशीलाच आक्षेप का घेतात ? भारतात आतापर्यंत अनेक जणांना फाशी देण्यात आली आहे. इतर जणांच्या फाशीच्या विरोधात हे लोक का बोलत नाही ? आतंकवाद्यांचे उदात्तीकरण करण्याचा आणि देश तोडण्याचा कम्युनिस्टांचा डाव आहे. तो आम्ही हाणून पाडू, असे सांगत जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील अभाविपचे अध्यक्ष श्री. आलोक सिंघ यांनी कम्युनिस्टांच्या देशविरोधी कृत्यांचा समाचार घेतला. प्रबोधन मंचच्या वतीने पेरुगेट येथील भावे शाळेच्या सभागृहात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जेएन्यू या विषयावरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी श्री. सिंघ यांनी जेएन्यूमध्ये अफजल गुरुच्या बाजूने आणि भारताच्या विरोधात घोषणाबाजी होण्याच्या प्रकरणाचा इतिवृत्तांत उपस्थितांना सांगितला. डॉ. शांतीश्री पंडित यांनीही मनोगत व्यक्त केले.

आयुर्वेद उपचारपद्धतीचे मोल जाणा !

    शासनाने नुकतेच आरोग्यासाठी अपायकारक असलेल्या ३४४ प्रतिजैविके औषधांवर प्रतिबंध घातला. त्यावर उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगितीही आणली आहे. पुढील सुनावणीच्या वेळी त्या औषधांवरील ही बंदी रहाते कि जाते, ते कळेलच. यापूर्वीही अनेक प्रतिजैविकांवर मानवी शरीरास अपायकारक म्हणून प्रतिबंध घातलेला आहे. त्याच शृंखलेत आणखी या औषधांची भर पडली आहे. विदेशात ज्या औषधांवर कित्येक वर्षांपासून प्रतिबंध आहे, ती औषधे भारतात सहजरीत्या विकली जातात आणि त्यांचे सेवन केले जाते. यावरून आपली शासकीय यंत्रणा किती उथळ आहे, हेच दिसून येते. हा सर्व प्रकार भारतीयांचे अज्ञान, अन्न आणि औषध प्रशासन यांच्याकडे उपलब्ध करून दिलेली अवास्तव, तसेच चुकीची माहिती आणि रंजक विज्ञापनांचा भडीमार यांमुळे घडतांना दिसते.

स्वतःचे लष्करी तळ अबाधित राखण्यासाठी आतंकवादी पाकिस्तानला अर्थसाहाय्य पुरवणारी अमेरिका !

१. अमेरिकेला भारतापेक्षा पाकिस्तान अधिक जवळ
     पाकिस्तानात अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. गेली ६६ वर्षे त्या तळांचे भाडे अमेरिका देत आली आहे. भाड्याला ते फॉरेन एड (विदेश साहाय्य) म्हणतात. भारतियांना हे सत्य अजून समजलेले नाही. त्यांना सतत प्रश्‍न पडतो की, अमेरिका या पाकी आतंकवादी लोकांना साहाय्य का करते ? वेड्यांनो, हे साहाय्य नाही, तर भाडे आहे. 
२. स्वहितार्थ प्रसंगी स्थानिकांचा रोष ओढवून घेणारी अमेरिका !
     अमेरिका लोकशाहीची पुजारी म्हणवते; पण स्वहित चांगले जाणते. अमेरिकेला जगावर लक्ष ठेवण्यासाठी तळ लागतात. ती त्या देशाला वाटेल तेवढे भाडे देण्यास सिद्ध असते. अमेरिकेने ओकिनावा बेट दुसर्‍या महायुद्धात जिंकून घेतले.

पाकच्या विरोधातील रणनीती अधिक व्यापक हवी !

     पाकपुरस्कृत आतंकवादाच्या विरोधात भारत कित्येक दशके लढत आहे. पाकला रोखण्यासाठी आतापर्यंत वेगवेगळी रणनीती अवलंबण्यात आली; मात्र त्याला अपयश आले. पाकच्या विरोधात जसा दोन देशांच्या स्तरावर लढा द्यावा लागेल, त्याच प्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याची कुकृत्ये वारंवार उघड करावी लागतील. असे करतांना पाकला वारंवार त्याच्या कच्च्या दुव्यांची आठवण करून देऊन त्याचे मानसिक खच्चीकरण करणे आवश्यक आहे. 
लेखक : कर्नल (नि.) अनिल आठल्ये

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

रंग उधळू गुणांचे । येण्या हिंदु राष्ट्र सत्वर ॥

श्री. वीरेंद्र मराठे
होळीच्या दिवशी उधळती रंग । 
कुणी लाल, कुणी पिवळा ।
आश्रमातील साधक वेशभूषेतून ।
उधळती सप्तरंग ।
कन्या आणि भार्या ।
खेळती गुलाल सप्तरंगांतून ।
सहसाधक खेळती पिवळा सात्त्विक रंग ॥ १ ॥

चला करू वर्षभर होळी ।
स्वभावदोष आणि अहंची ।
रंग उधळू गुणांचे ।
येण्या हिंदु राष्ट्र सत्वर ॥ २ ॥
- श्री. वीरेंद्र मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.३.२०१६)

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, हे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या 
वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !
         सनातनच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

साधकांना सूचना

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
दोन दिवसांपूर्वी पौर्णिमा झाली.

दैनिक सनातन प्रभातमधील सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचल्यावर वाचकांना लक्षात आलेली भीषणता आणि त्यातही स्थिर राहून साधना करणार्‍या साधकांचे कौतुक वाटणे

     गेल्या काही दिवसांपासून दैनिक सनातन प्रभातमधून प्रसिद्ध होत असलेले सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचनात आले. ते वाचून मनात पुढील विचार आले.
१. कारागृहातील वातावरण नरकासमान असल्याचे वाटणे : सध्याच्या सर्वच यंत्रणांची कार्यपद्धत कशी आहे ?, ते पहायला मिळाले. आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्याची पद्धत, निरपराध लोकांनाही शारीरिक आणि मानसिक यातना भोगाव्या लागणे, यावरून हे सर्व नरकासमान कसे आहे ?, ते लक्षात आले. 
२. साधकांनी दाखवलेले अतुलनीय धैर्य वाखाणण्याजोगे ! : कारागृहातील अधिकार्‍यांची कार्य करण्याची पद्धत आणि त्यामुळे होणारे कैद्यांचे हाल या सर्व गोष्टी वाचून खरंच सुन्न व्हायला होते. अशा भयंकर वातावरणातही सनातनच्या साधकांनी दाखवलेले अतुलनीय धैर्य हे खरोखरच वाखाणण्याजोगे आहे.

देहू येथील नांदुरकी वृक्ष हलण्यामागील अध्यात्मशास्त्र आणि त्याविषयीच्या घटनेमागील पार्श्‍वभूमी

आज तुकाराम बीज त्यानिमित्ताने... 
नांदुरकी वृक्षाचे दर्शन घेतांना भाविक
१. देहूला वैकुंठ गमन केलेल्या स्थानी असलेला 
वृक्ष तुकाराम बीज या दिवशी बरोबर दुपारी 
१२:०२ वाजता हलणे
     देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या स्थानावर आजही एक वृक्ष आहे. त्याचे नाव नांदुरकी. आजही तो तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता तुकोबाराया वैकुंठाला गेले, त्या वेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती सहस्रो भक्तगण घेतात.
२. प्रत्येक गोष्टीचे उत्तर अध्यात्मात असते; कारण अध्यात्म हेच एकमेव असे परिपूर्ण शास्त्र असणे
     प्रत्येक गोष्टीचे उत्तर अध्यात्मात असते; कारण अध्यात्म हेच एकमेव असे परिपूर्ण शास्त्र आहे. देवाच्या भक्तीमुळे संत विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांच्याशी, म्हणजेच ईश्‍वरी मनाशी आणि बुद्धीशी एकरूप झालेले असल्याने संतांना सर्व ज्ञात असते, असे म्हटले जाते; कारण ईश्‍वरी बुद्धीला सर्वच माहीत असते. नांदुरकी वृक्षाचे मिळालेले ज्ञानही याला अपवाद नाही. भक्त प्रार्थना करतात, त्या वेळी ईश्‍वर त्यांना त्याचे विचार सुचवतो. हे विचार भक्ताकडून लिहिले जातात, यालाच ईश्‍वरी ज्ञान म्हणतात. गुरुकृपेमुळे अशाच मिळालेल्या ईश्‍वरी ज्ञानातून तुकाराम बिजेच्या दिवशी नांदुरकी वृक्ष हलण्याविषयी मिळालेले विचार येथे लिहिले आहेत.

कार्यकर्त्यांनो, हिंदु धर्मजागृती सभेची सेवा केल्यामुळे २५ गुरुपौर्णिमांचे फळ लाभते, हे लक्षात घेऊन सभेत होणार्‍या गंभीर चुका टाळा !

            हिंदु धर्मजागृती सभा म्हणजे हिंदूंचा धर्माभिमान जागृत करणारे यज्ञकुंड ! हिंदुत्वाचे दर्शन घडवणार्‍या या सभेमुळे राष्ट्र-धर्म प्रेमींपर्यंत अल्पावधीत पोचता येते. विविध ठिकाणी पार पडलेल्या या सभांंना आतापर्यंत समाजातून उदंड प्रतिसाद लाभला आहे.
         सभेची सेवा करतांना कार्यकर्त्यांकडून झालेल्या चुका पुढे देत आहे.
१. आयोजनाच्या सेवेतील चुका
१ अ. पुष्कळ विलंबाने मैदान आरक्षित करणे : सोलापूर येथील श्री. विनोद रसाळ यांनी सभेचा दिनांक निश्‍चित होऊनही पावणेदोन मास उशिरा मैदान आरक्षित (बूक) केले. परिणामी सभेच्या प्रसारादरम्यान स्थानिक लोकांना स्थळ सांगता न आल्याने संभाव्य उपस्थितीपेक्षा ५० टक्के एवढेच धर्मप्रेमी सभेला उपस्थित राहिले.

त्यागातूनच ईश्‍वरप्राप्ती शक्य !

      संत तुकाराम महाराजांची विठ्ठलावर नितांत श्रद्धा होती. त्यामुळे ते सर्व गोष्टींचा त्याग अगदी सहजतेने करू शकले. तुकाराम महाराजांची थोरवी समजल्यानंतर लोक त्यांचा सन्मान करू लागले. तेव्हा ते दूर अरण्यात जाऊन एकांतात ईशचिंतन करू लागले. एकदा दोन मास ते घरी गेलेच नव्हते. एक दिवस त्यांची पत्नी नदीवरून पाणी आणत असतांना वाटेत तिला तुकाराम महाराज भेटले. ती पटकन त्यांना वाटेत अडवून म्हणाली, तुम्ही घरी येत नाही. आमची वाट काय ? तेव्हा तुकाराम म्हणाले, पांडुरंग हाच माझा पिता आणि रुक्मिणी हीच माझी माता. तूही त्यांचे पाय धर, म्हणजे ती तुलाही अन्न-वस्त्र पुरवतील. तेव्हा ती म्हणाली, मी हरिचरणांचे स्मरण करीन; पण तुम्ही घरी बसा. तुकाराम महाराज म्हणाले, तू तसे वचन देत असलीस, तर मी घरी येतो. तिने तसे वचन दिले आणि दोघे जण घरी आले. तुकाराम महाराज घरी आले त्या दिवशी एकादशी होती. तुळशी वृंदावनाजवळ बसून त्यांनी आपल्या पत्नीला उपदेश केला. त्या उपदेशाने ती प्रभावित झाली. तिने दुसर्‍या दिवशी सूर्योदयी स्नान करून देवपूजा केली आणि ब्राह्मणांस बोलावून सर्व घर लुटवले. नंतर दुपारच्या वेळी घरात अन्न नाही, असे पाहून मात्र ती विचारात पडली. आदल्या दिवशी एकादशीचा उपवास असल्यामुळे ती आणि मुले भुकेने अगदी व्याकुळ झाली.

अधिकोष किंवा पोस्ट यांच्या खात्यातून मिळणार्‍या व्याजातून टी.डी.एस्. कपात झाल्याने होणारी आर्थिक हानी टाळण्यासाठी १५.४.२०१६ या दिवसापर्यंत पुढील प्रक्रिया करा !

साधक, वाचक, हितचिंतक आणि 
धर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची माहिती
          आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीने १ एप्रिल ते ३१ मार्च असे आर्थिक वर्ष निर्धारित करण्यात आले आहे. (पुढील आर्थिक वर्ष १.४.२०१६ ते ३१.३.२०१७ या कालावधीत आहे.) टी.डी.एस्.च्या संदर्भातील महत्त्वाच्या सूचना पुढे देत आहे.
१. टी.डी.एस्. संदर्भातील माहिती
         प्रत्येक आर्थिक वर्षात (उदा. २०१६ - २०१७) कायम ठेवीच्या (फिक्स डिपॉझिटच्या) एका खात्यातून १० सहस्र रुपयांपेक्षा अधिक व्याज मिळत असेल, तर त्यातील १० टक्के टी.डी.एस्. (TDS - Tax Deducted At Source) कापला जातो.
        एखाद्याला १२,००० रुपये व्याज मिळत असेल, तर १२,००० रुपयांंवर १० टक्के म्हणजे १,२०० रुपये टी.डी.एस्. कापून घेतला जातो. (एखाद्या खातेधारकाला १०,००० रुपयांपर्यंत व्याज मिळत असेल, तर टी.डी.एस्. कापला जात नाही.)

भारतातील बुद्धीप्रामाण्यवाद्यांची शोकांतिका आणि खर्‍या शहाण्यांची व्याख्या !

         आपल्याकडचे अतिशहाणे लोक विदेशात स्थायिक होण्यासाठी जातात. देव देतो आणि कर्म नेते, अशी यांची स्थिती आहे. याउलट भारताचे आध्यात्मिक महत्त्व पटलेले विदेशातील लोक देवाला शोधण्यासाठी आणि मनाला शांती मिळवण्यासाठी आता भारतात येत आहेत. तेच खरे शहाणे आहेत. 
- (पू.) सौ. अंजली गाडगीळ, तिरुवण्णामलई, तमिळनाडू. (८.३.२०१६, सकाळी ८.४३)

पू. अशोक पात्रीकर यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी अमरावती येथील साधकांना झालेला त्रास आणि आलेल्या अनुभूती

           पू. अशोक पात्रीकर डिसेंबर २०१५ मध्ये अमरावती येथे गेले असता त्यांनी २१.१२.२०१५ या दिवशी तेथील साधकांना व्यष्टी साधनेतील अडचणी या विषयावर मार्गदर्शन केले. त्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. झालेला त्रास
         मार्गदर्शनाला येण्यापूर्वी मनामध्ये नकारात्मक विचार होते. मार्गदर्शनाला जाऊ नये, असे वाटत होते. - श्री. हेमंत खत्री
२. आलेल्या अनुभूती
२ अ. पोटदुखी न्यून होऊन मार्गदर्शनाला बसता येणे : २७ दिवसांपासून मला पोटदुखीचा तीव्र त्रास होत होता. मी १० मिनिटेसुद्धा बसू शकत नव्हते. मी पू. पात्रीकरकाकांच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थना केली आणि देवाने मला सुखरूप आश्रमापर्यंत पोचवले. मी पू. काकांच्या मार्गदर्शनात अडीच घंटे बसू शकले. संपूर्ण मार्गदर्शनामध्ये एका लयीत आणि श्‍वासाला जोडून नामजप होऊन उपाय होत होते. - सौ. छाया टवलारे

पू. पात्रीकरकाकांच्या म्हापसा येथील मार्गदर्शनातील चैतन्यामुळे साधकांची भावजागृती होऊन व्यष्टी साधनेला गती येणे

१. श्री. बाजी परब, पेडणे
१. पू. पात्रीकरकाकांचे मार्गदर्शन संपेपर्यंत उत्साह, आनंद आणि चैतन्य मिळत होते.
२. पू. काकांनी व्यष्टी साधनेविषयी मार्गदर्शन केल्यावर पुन्हा जोमाने व्यष्टी साधना करण्याचा उत्साह निर्माण झाला.
३. आपण सवलत घेऊन वेळ वाया घालवतो, त्यापेक्षा आपण सातत्याने मनाकडे लक्ष द्यायला हवे, असे मी ठरवले. तसे केल्याने मला अधिक लाभ झाला. माझ्या मनातील प्रतिक्रियांचे आणि सवलत घेण्याचे प्रमाण न्यून झाले.
४. मधल्या वेळात वैयक्तिक सेवा करतांना मनात विकल्प, अनावश्यक विचार, प्रतिक्रिया येऊ नयेत; म्हणून पू. काकांनी वैखरीतून नामजप करण्यास सांगितले.

साधकांत साधनेचा उत्साह निर्माण करणार्‍या पू. अशोक पात्रीकरकाका यांच्या प्रेरणादायी सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पू. अशोक पात्रीकर
        गोव्यातील प्रसारसेवा करणार्‍या साधकांना व्यष्टी साधनेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी पू. अशोक पात्रीकर वेगवेगळ्या ठिकाणी जात असत. त्यांनी गोव्यात एकूण ५ ठिकाणी मार्गदर्शन केले. २५ मार्च २०१६ या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि अनुभूती पुढे देत आहोत.
पू. अशोक पात्रीकरकाका
यांच्या वाढदिवसानिमित्त सनातन
परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. शिकायला मिळालेली सूत्रे
१ अ. वक्तशीरपणा : पू. पात्रीकरकाका गोव्यातील वेगवेगळ्या भागांत जाण्यासाठी नियोजित वेळेत नेहमीच उपस्थित रहायचे. ते सत्संग वेळेत चालू करून वेळेतच संपवायचे.
१ आ. तत्त्वनिष्ठ : पू. काका सर्व साधकांचा प्रेमाने आणि आपुलकीने आढावा घेत. एका साधकाचे प्रयत्न व्यवस्थित होत नव्हते. त्याविषयी उत्तरदायी साधकाला यांना या वर्गाला का बोलावलंत ? असे त्यांनी विचारले. (त्यापेक्षा त्यांनी घरी राहून साधना करावी, असा त्यांचा विचार होता.)

साधकांच्या साधनेची सर्वतोपरी काळजी घेऊन त्यांच्यावर निरपेक्ष प्रेम करणार्‍या पू. (कु.) स्वाती खाडये यांच्या सहवासात ६८ टक्के पातळीच्या कु. तृप्ती गावडे यांनी अनुभवलेले क्षणमोती !

पू. (कु.) स्वाती खाडये
१. साधकांना सर्व 
सेवांमध्ये सामावून घेणे
         आम्ही नाशिक येथे सिंहस्थपर्वाच्या सेवेला गेलो होतो. तेव्हा पू. ताई साधकांना सेवेत साहाय्य करत होत्या. पू. ताईंची तळमळ साधकांच्या मनात आणि कृतीतही उतरून त्याचा आनंद प्रत्येक साधकाला मिळत होता. नाशिक सिंहस्थपर्वाची सेवेची व्याप्ती पुष्कळ होती. ती सेवा एकट्याने न करता सगळ्यांना सामावून घेऊन करायची होती. साधकांनी सगळ्या सेवा शिकाव्यात, साधकांच्या सेवेची फलनिष्पत्ती वाढावी, त्यांची साधना व्हावी, गुरुकार्य वाढावे, यासाठी पू. ताईंनी सगळ्या साधकांना सर्व सेवांमध्ये सामावून घेतले.
२. साधकांचा वेळ वाया 
जाऊ नये, याची काळजी घेणे
        प्रत्येक जिल्ह्यातून साधक ८ ते १० दिवसांसाठी, तर काही १५ दिवसांसाठी सेवेला आले होते. त्या साधकांचा कुठेही वेळ वाया न जाता त्यांच्या सेवांचे नियोजन करत होत्या.

विविध सेवांसाठी देवद आश्रमात साधकांची तातडीने आवश्यकता !

साधकांना गुरुसेवा करण्याची सुसंधी !
     देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वाहन, स्वयंपाक, उत्पादन-बांधणी आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे. जड साहित्य उचलू शकणार्‍या साधकांसाठी मागणी-पुरवठा संबंधी विविध सेवा उपलब्ध आहेत. जे साधक पूर्णवेळ, काही कालावधीसाठी किंवा शनिवार आणि रविवार अन् अन्य सुटीच्या दिवशी आश्रमात येऊन सेवा करू शकतात, त्यांनी खालील सारणीनुसार माहिती भरून ती जिल्हासेवकांच्या माध्यमातून devadashram@gmail.com संगणकीय पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी. शाळा आणि महाविद्यालये यांना लवकरच सुटी लागणार असल्याने युवा साधकही या सेवेत सहभागी होऊ शकतात.

पू. मिलुटीन पांक्रात्स यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन

(पू.) श्री. मिलुटीन पांक्रात्स
       युरोप मधील एस्.एस.आर्.एफ्.चे पू. मिलुटीन पांक्रात्स यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी साधनेविषयी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.
पू. मिलुटीन पांक्रात्स यांच्या चरणी 
वाढदिवसानिमित्त कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. मला कळत नाही, ही जाणीव असणे महत्त्वाचे आहे.
२. एखाद्या प्रसंगाचे विविध पैलू किंवा मिळालेले अनेक दृष्टीकोन समजून घेण्याइतके व्यापक झालो, तरच त्यातून शिकल्याने प्रगती करणे शक्य होते.
३. साधनेत लहान लहान उद्दिष्टे ठेवून प्रयत्न करा ! :
आपल्यामध्ये पालट व्हावा, असे वाटत असल्यास आपण त्या दिशेने लहान लहान उद्दिष्टे ठेवावीत. उपाय करतांना त्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. नियोजन करतांना नियोजनाकडेच लक्ष हवे आणि प्रार्थना करत असल्यास ती भावपूर्ण केली पाहिजे.
- (पू.) श्री. मिलुटीन पांक्रात्स, युरोप (ऑगस्ट २०१५)

तिरुवण्णामलई येथे असणार्‍या अरुणाचल पर्वतक्षेत्राच्या परिसरातील त्रिशुली नावाच्या झाडाची कथा आणि त्यातून आम्हाला शिकायला मिळालेला ईश्‍वरी कार्यकारणभाव

महर्षींची शिकवण आणि कार्य ! 
पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांचे तीर्थयात्रेतील अनुभव 
त्रिशुली झाडाचे रोप
त्रिशुली झाडाच्या वाळलेल्या पानाची गुंडाळी
 १. अरुणाचल पर्वताच्या अग्नीक्षेत्रात साधना करतांना अनेक सिद्ध त्रिशुली नावाच्या झाडाच्या वाळलेल्या पानाची गुंडाळी दिव्याची वात म्हणून उपयोगात आणणे : महाशिवरात्रीच्या दिवशी तिरुवण्णामलई येथे असणार्‍या अरुणाचल पर्वताला प्रदक्षिणा घालतांना वाटेतच काही झाडांची रोपे घेऊन बसलेल्या एका संन्याशाची भेट झाली. त्याने छोटी छोटी रोपे तेथे विक्रीसाठी ठेवली होती. काही वाळलेल्या पानांच्या गुंडाळ्याही त्याने एका पाकिटात ठेवल्या होत्या. सहजच आम्ही याविषयी कुतुहलाने त्याला विचारले असता, त्याने सांगितले की, या पर्वतरूपी अग्नीक्षेत्रात बरेच सिद्ध लोक साधना करत असतात. साधना करतांना त्यांच्याकडून जी दीपाराधना केली जाते, त्यासाठी ते या त्रिशुली झाडाच्या वाळलेल्या पानाची गुंडाळी दिव्याची वात म्हणून उपयोगात आणतात. दिव्याच्या वातीसाठी अगदी पूर्वापार या झाडाची पाने या सिद्धांकडून उपयोगात आणली जात आहेत. त्याने त्रिशुली झाडाचे रोपही विक्रीसाठी ठेवले होते.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥ 
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

साधकांनो आध्यात्मिक त्रासासाठी वेगळा जप करा !

         महर्षींनी ॐ निसर्गदेवो भव । ॐ वेदम् प्रमाणम् । हरि ॐ जयमे जयम् । जय गुरुदेव । हा जो जप सांगितला आहे, तो समष्टीसाठी आहे. एखाद्याला वाईट शक्तींमुळे त्रास होत असेल, तर व्यष्टीसाठीचा जप, मुद्रा आणि न्यास शोधून त्यानुसार उपाय करणे आवश्यक असते.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
घरघर नसणे
एकदा घर सुटले की तो दारोदार होतो, दारोदार झाला की घरोघर होतो आणि 
घरोघर झाला म्हणजे तो सर्वत्र असतो; म्हणून त्याला घरघर नाही.
भावार्थ : एकदा घर सुटले येथे घर हा शब्द माया या अर्थाने वापरला आहे. दारोदार होतो .... सर्वत्र असतो येथे सर्वव्यापी ब्रह्म किंवा ईश्‍वर या अर्थाचे वर्णन आहे. म्हणून त्याला घरघर नाही म्हणजे त्याला मृत्यूची घरघर नाही. तो अमर झालेला असतो.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     जिहादी आतंकवादी हिंदूंच्या रक्ताने प्रतिदिन रंगपंचमी खेळत असतांना हिंदू मात्र धूलिवंदन ते रंगपंचमी या काळात एकमेकांवर आणि वाटसरूंवर रंग उडवण्यात दंग असतात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

-


बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

नेहमी सत्संगात रहावे
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     व्यक्तीचा मित्रपरिवार कसा आहे, यावरून त्याची ओळख ठरते; म्हणूनच आपल्याभोवती सात्त्विक वृत्तीच्या व्यक्तींचा वावर असेल, याची दक्षता कटाक्षाने घ्यावी.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

जेएन्यू ते फर्ग्युसन !

संपादकीय
     २२ मार्च या दिवशी देशाची शैक्षणिक राजधानी असणार्‍या पुण्यात धक्कादायक घटना घडली. फर्ग्युसन महाविद्यालयात अभाविपच्या कार्यक्रमाला विरोध करत डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी देशद्रोही घोषणांचे थैमान घातले. जेएन्यू, अलीगड मुस्लीम विद्यापीठ यांच्या रांगेत फर्ग्युसनने क्रमांक लावावा, ही पुणेकर आणि अवघ्या महाराष्ट्रासाठी चिंताजनक गोष्ट आहे. लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारखे महापुरुष ज्या महाविद्यालयाने घडवले, त्या महाविद्यालयातून आज देशद्रोह्यांचा सूर ऐकावा लागणे, ही शोकांतिकाच आहे. प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी या घटनेची लिखित माहिती पोलिसांना दिली. नंतर मात्र टंकलेखनात चूक झाल्याचे सांगत त्यांनी तक्रार मागे घेतली.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn