Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

सनातन संस्थेचे स्फूर्तीस्थान प.पू. रामानंद महाराज यांची आज पुण्यतिथी

जाट आरक्षणाचे आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता !

आरक्षणाचा भस्मासूर !
रोहतक (हरियाणा) - हरियाणा विधानसभेत जाट समुदायाला आरक्षण देण्याचे वादग्रस्त विधेयक मांडले जाण्याची धुसर शक्यता असल्याने राज्यात जाटांचे पुन्हा एकदा हिंसक आंदोलन चालू होण्याची शक्यता आहे. जाट समुदायाला आरक्षण देण्यासाठी त्या समाजाच्या नेत्यांनी राज्यशासनाला दिलेली ७२ घंट्यांची मुदत १७ मार्चला रात्री संपली. 
१. आरक्षणाच्या मागणीवरून जाटांनी गेल्या मासात हिंसक आंदोलन केले. या आंदोलनात १९ जणांना प्राण गमवावे लागले होते. याशिवाय आंदोलनकर्त्यांनी देहलीचा ६० टक्के पाणीपुरवठाही रोखून धरल्याने देहलीत पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती.
२. त्यानंतर राज्यशासनाने जाटांना आरक्षण देण्यासाठी विधेयक आणण्याचा निर्णय घेतला होता.
३. जाट समुदायाने केंद्रशासनाच्या नोकर्‍यांमध्येही आरक्षण मागितले आहे. या मागणीसाठी केंद्रीयमंत्री व्यंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची कारागृहात रवानगी !

अशांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या कारकीर्दीत घेतलेले सर्व निर्णय शासन पडताळणार का ?
      मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ३१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यांची आर्थर रोड कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी भुजबळ यांना अटक करण्यात आली होती. दोन दिवसांच्या कोठडीनंतर त्यांना १७ मार्च या दिवशी न्यायालयात उपस्थित करण्यात आले. आतापर्यंत घोटाळ्यासंबंधीच्या प्रत्येक प्रश्‍नाला छगन भुजबळ मला काही माहीत नाही, हे एकच उत्तर देत होते. त्यामुळे त्यांच्याकडून माहिती मिळवण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना त्यांच्यासमोर बसवून दोघांची एकत्र कसून चौकशी केली. छगन भुजबळ त्यांच्या उत्तरात काही गोष्टी समीर यांना माहीत आहेत, असे सांगत होते आणि समीर भुजबळ यांनी काही गोष्टी छगन भुजबळ यांना माहीत आहेत, असे सांगितले होते.

हिमायत बेगच्या फाशीची शिक्षा रहित करून मुंबई उच्च न्यायालयाने दिली जन्मठेप !

जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण
एका न्यायालयाने दिलेला निकाल दुसर्‍या न्यायालयात पालटला जाणे, हा चक्रावणारा न्याय नव्हे का ?
मुंबई - पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी असलेला मिर्झा हिमायत इनायत बेग याला पुणे सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रहित करून जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. न्या. नरेश पाटील आणि न्या. एस्.बी. शुक्रे यांच्या खंडपिठाने हा निकाल दिला आहे. आतंकवादविरोधी पथकाला त्यामुळे धक्का बसल्याची चर्चा आहे. जर्मन बेकरी प्रकरणातील अन्य आरोपी रियाज भटकळ आणि अबू जिंदाल राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्आयएच्या) कोठडीत आहेत.
     १३ फेब्रुवारी २०१० या दिवशी जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटात १७ जण ठार, तर ५८ जण गंभीर घायाळ झाले होते. इंडियन मुजाहिदीनचा सदस्य असलेल्या बेगला वर्ष २०१३ मध्ये फाशीची शिक्षा झाल्यावर त्याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
    बेगवर ९ खटले होते. त्यांपैकी ८ आरोपांतून त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. त्याच्यावर जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाची योजना आखणे, स्फोटके घेऊन जाणे आणि बॉम्बस्फोट करणे, असे आरोप होते. त्याच्या विरोधात साक्ष दिलेल्या त्याच्या खोलीत रहाणार्‍या मुसलमान साक्षीदाराने न्यायालयात त्याची साक्ष खोटी असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते.

पुणे येथील सनातनच्या श्रीमती विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८१ वर्षे) संतपदी विराजमान !

पू. श्रीमती काळेआजींचा सन्मान करतांना पू. (कु.) स्वाती खाडये

शेतकर्‍यांमध्ये कर्ज फेडण्याची क्षमता निर्माण करणार ! - मुख्यमंत्री

  •  विपरीत परिस्थितीतही राज्याची अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे !
  •  कर्जमाफी दिल्याने शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत !
विधीमंडळ अधिवेशन २०१६
     मुंबई, १७ मार्च (विशेष प्रतिनिधी) - सध्याच्या विपरीत परिस्थितीमध्येही राज्याची अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे. राज्याचा विकास दर आणि उद्योगक्षेत्रात चांगली वृद्धी झाली आहे. राज्याचा ८ टक्के हा विकास दर देशाच्या विकासदरापेक्षाही अधिक आहे. दुसरीकडे उद्योगक्षेत्राचा विकास दरही ४.६ टक्क्यांवरून ६.४ टक्क्यांवर गेला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी १७ मार्च या दिवशी विधानसभेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देतांना ते बोलत होते.
    मुख्यमंत्री म्हणाले, राज्यशासन कर्जमाफीच्या विरोधात नाही. कर्जमाफी आणि कर्जमुक्ती या गोष्टी आहेत; परंतु शेतकर्‍यांना नुसती कर्जमाफी देऊन शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा प्रश्‍न सुटणार नाही. त्याऐवजी तोच पैसा सिंचन, शेततळे अशा मूलभूत उपाययोजना करण्यासाठी वापरला, तर त्यांच्यात कायमस्वरूपी परिवर्तन घडेल. शेतकर्‍यांमध्ये कर्ज फेडण्याची क्षमता निर्माण करणे महत्त्वाचे आहे. त्यांना पुन्हा कर्जमाफी करण्याची वेळ येऊ नये त्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न रहातील, असेही श्री. फडणवीस यांनी या वेळी स्पष्ट केले.
आघाडी शासनाच्या काळात विविध योजना आणि विकास कामे करण्यासाठी माजी अर्थमंत्री जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेले निर्णय कसे फोल ठरले, या संदर्भात त्यांचे वाभाडे काढून युती शासनाने त्याच योजना कशा कार्यान्वित केल्या, याची अतिशय अभ्यासपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. या वेळी सत्ताधारी सदस्यांनी भारत माता की जय, अशा घोषणा देऊन त्याला अनुमोदन दिले.

केंद्रशासनाने भारत-पाक चर्चा चालू ठेवावी ! - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

आपण पाकशी चर्चा करत रहायची आणि त्याने जिहादी 
आतंकवाद्यांच्या माध्यमातून भारताचे सैनिक ठार मारायचे, असे किती दिवस चालू ठेवणार ?
जम्मू - शेजारच्या देशाशी आमचे मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावेत, हे फुटीरतावाद्यांना नको आहे; मात्र आम्हाला शेजारी देशांसह चांगले संबंध हवे आहेत. त्यामुळे केंद्रशासनाने कोणत्याही चिथावणीकडे लक्ष न देता भारत-पाक चर्चा चालूच ठेवायला हवी, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जम्मू-काश्मीरमधील प्रांत संघचालक ब्रिगेडियर सुचेत सिंह यांनी व्यक्त केले आहे. २३ मार्च या दिवशी होणार्‍या पाकिस्तान दिनासाठी पाकिस्तानने फुटीरतावादी नेते सईद अली गिलानी, असिया अंद्राबी आणि जम्मू-काश्मीर लिबरल फ्रंटचा प्रमुख यासीन मिरवैझ आदी फुटीरतावाद्यांना पाकच्या देहलीस्थित उच्चायुक्तालयात आमंत्रित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर संघाकडून उपरोक्त मत नोंदवण्यात आले आहे. आपण पाकिस्तानशी सकारात्मक भूमिकेतून चर्चा चालूच ठेवली पाहिजे. फुटीरतावाद्यांना काय करायचे ते करूदे, असेही सिंह म्हणाले. (फुटीरतावाद्यांचे धोरण देशाचे तुकडे करण्याशी निगडित आहे, ही गोष्ट त्यांच्या नावातूनच स्पष्ट होते. त्यामुळे त्यांच्या कृत्यांवर अंकुश ठेवण्याचे काम देशाच्या शासनाने करायलाच हवे ! - संपादक)

देशद्रोहाच्या कायद्याचा फेरआढावा घेणार

    नवी देहली - कायदा आयोगामार्फत देशद्रोहाच्या कायद्याचा फेरआढावा घेणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत नुकतीच दिली. हा फेरआढावा घेतल्यानंतर सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशद्रोहाचा कायदा ब्रिटीश काळातील असून, तो रहित करण्यात यावा, अशी मागणी राज्यसभेतील विरोधी सदस्यांनी केली. त्यावर सिंह यांनी उत्तर दिले.
    राजनाथ सिंह पुढे म्हणाले, देशद्रोहाच्या कायद्याची व्याख्या व्यापक आहे. कायदा आयोग या कायद्यासह अन्य बाबींवर अहवाल सादर करणार आहे. जेएन्यूमध्ये देशद्रोहाचा कायदा अपवादात्मक स्थितीत वापरण्यात आला. देशद्रोहाचे गुन्हे हे अधिक करून देहलीबाहेर नोंदले गेले आहेत. कायदा आयोगाच्या ४२ व्या अहवालात देशद्रोहाच्या कायद्यात त्रुटी असल्याचे मान्य करण्यात आले आहे; पण तो कायदाच रहित करावा, असे त्यात म्हटलेले नाही, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. दुसर्‍या एका अहवालातही या कायद्यात पालट करण्याची शिफारस आहे; पण तो कायदा रहित करण्याची शिफारस केली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

देहलीतील ओवैसींच्या घराबाहेर हिंदु सेनेची निदर्शने

    नवी देहली - देशद्रोही वक्तव्य करणारे एम्आयएम्चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या देहलीतील अशोक रोड येथील घरासमोर हिंदु सेनेने आंदोलन करत त्यांच्या विरोधातील फलक लावले. (भारतमाता की जय म्हणण्यास नकार देणार्‍यांचे भारतावर किती प्रेम असेल, हे उघड आहे. अशा देशद्रोह्यांना पाकमध्ये हाकला ! - संपादक) हे फलक लावल्यानंतर ते काढून टाकण्यात आले. या घटनेविषयी हिंदु सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता म्हणाले की, हे फलक लावण्यामागे आमचा देशद्रोह्यांना देशात थारा असू नये, असा उद्देश आहे. पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत.
माझ्या मानेवर सुरी ठेवली, तरी मी भारतमाता की जय म्हणेन ! - नजमा हेपतुल्ला
    नवी देहली - जरी कुणी माझ्या मानेवर सुरी ठेवली, तरी मी भारतमाता की जय म्हणणार, असे म्हणत केंद्रीयमंत्री नजमा हेपतुल्ला यांनी भारतमाता की जय म्हणण्यास नकार देणारे एम्आयएम्चे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर पलटवार केला आहे. लातूर जिल्ह्यात एका कार्यक्रमाच्या वेळी खासदार ओवैसी यांनी माझ्या गळ्यावर सुरी ठेवली, तरी मी भारतमाता की जय म्हणणार नाही, असे वक्तव्य केले होते. याप्रकरणी त्यांच्या विरोधात देशद्रोहाच्या आरोपाखाली एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

पाकमध्ये प्रथमच होळी आणि दिवाळीची सुट्टी !

पाकने हिंदूंच्या सणांना केवळ सुट्या देऊन सहानुभूती न मिळवता
प्रथम तेथील अल्पसंख्य हिंदूंचे रक्षण करणे आवश्यक आहे !
     इस्लामाबाद - पाकमधील अल्पसंख्यांक हिंदूंसाठी प्रथमच होळी, दिवाळी, तसेच ख्रिस्त्यांचा ईस्टर या सणांनिमित्त सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आली आहे. पाकच्या संसदेने १५ मार्च या दिवशी याविषयीचा ठराव संमत केला. पाकमधील पीएम्एल्-एन् या पक्षाचे हिंदु खासदार रमेश कुमार वांकवानी यांनी संसदेत हा प्रस्ताव मांडला होता.

पाकमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये १५ जण ठार

पाकने जे पेरले, तेच उगवले !
     पेशावर - येथे एका बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात १५ जण ठार, तर ३० जण घायाळ झाले आहेत. मृतांमध्ये शासकीय कर्मचार्‍यांची संख्या अधिक आहे. बॉम्बस्फोटाच्या वेळी बसमध्ये अनुमाने ५० जण होते. बस पेशावरच्या सद्दर भागातील मुख्य रस्त्यावरून शासकीय कार्यालयाच्या दिशेने जात असतांना हा स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मल्ल्या यांच्याकडून एक एक पैसा परत मिळवला जाईल ! - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली

   नवी देहली - देशातील १७ बँकांचे ९ सहस्र कोटी रुपये थकवून विदेशात निघून गेलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या विषयी भूमिका स्पष्ट करतांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मल्ल्या यांच्याकडून एक एक पैसा परत मिळवला जाईल, तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे म्हणतात, हिंदुहृदयसम्राट नावाची योजना संविधानविरोधी !

भारतात हिंदु नावाने योजना चालणार नाही, तर काय पाकमध्ये चालणार का ?
     मुंबई, १७ मार्च - बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने शासनाने कितीही योजना चालू कराव्यात. त्याला आमचा आक्षेप रहाणार नाही; परंतु हिंदुहृदयसम्राट असा शब्द वापरणे ही घटनेतील धर्मनिरपेक्षता तत्त्वाची पायमल्ली आहे आणि त्याला आमचा विरोध राहील. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एखादी योजना चालू करणे, हे संविधानविरोधी आहे. राज्याचे घटनात्मक प्रमुख राज्यपालांच्या अभिभाषणात त्याचा उल्लेख व्हावा, ही गोष्ट अत्यंत आक्षेपार्ह आहे, असे टीकात्मक प्रतिपादन राष्ट्र्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी १६ मार्च या दिवशी विधान परिषदेत केले. 
   राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या ठरावावर बोलतांना तटकरे यांनी युती शासनाच्या वर्षभरातील कारभारावरही टीका केली. विशेषतः मराठवाड्यात पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले असतांना ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये आणि नगर परिषदांमध्ये केल्याची कारणे सांगून शासनाने ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद केल्या, असा आरोपही त्यांनी केला.

शासकीय कर्मचार्‍यांच्या सातव्या वेतन आयोगाचे पैसे शेतकर्‍यांना द्या ! - नाना पाटेकर

शासकीय कर्मचार्‍यांनी स्वत:च्या कोशातून बाहेर पडून शेतकर्‍यांच्या 
हितासाठी पुढे यावे, अशी अपेक्षा आहे !
     धाराशिव (उस्मानाबाद) - सर्व शासकीय कर्मचार्‍यांना मिळणार्‍या सातव्या वेतन आयोगाची रक्कम शेतकर्‍यांना देण्यात यावी, अशी मागणी अभिनेते नाना पाटेकर यांनी केली आहे. नाम फाऊंडेशनने नुकतेच तुळजापूरमधील अणदूर येथील शेतकर्‍यांना आर्थिक साहाय्य केले. याप्रसंगी पाटेकर बोलत होते. (जे नाना पाटेकर यांना कळते, ते शासनाला कळत नाही का ? - संपादक)
     नाना पाटेकर म्हणाले, सातव्या वेतन आयोगामुळे सर्व शासकीय कर्मचार्‍यांना मिळणारा पैसा फार मोठा आहे. अनेक कर्मचार्‍यांना न मागता पैसा मिळतो, तर मग गरजू शेतकर्‍यांनाही पैसा का मिळू नये ? त्यामुळे तो पैसा शेतकर्‍यांना द्यावा. याशिवाय नाना पाटेकर यांनी श्रीमंतांच्या संपत्तीवर एक टक्का अधिभार लावण्याचेही समर्थन केले आहे. अभिनेते अक्षय कुमारने एका वृत्तवाहिनीवर श्रीमंतांवर एक टक्के अधिभार लावण्याचे सूत्र उपस्थित केले होते.

सनातन संस्था कोल्हापूर आणि सनातन संस्था ठाणे या न्यासाअंतर्गत महिलादिनानिमित्त मार्गदर्शन

मार्गदर्शनाचा लाभ घेतांना उपस्थित महिला
     पनवेल (जिल्हा रायगड) - जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्चला दिघोडी, अलिबाग येथे सुहासिनी महिला मंडळ, दिघोडी यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सनातन संस्था कोल्हापूर या न्यासांतर्गत सौ. पुष्पा चौगुले यांनी सध्या महिलांची होणारी मानसिक कुचंबणा, स्त्रीभ्रूण हत्या, स्वसंरक्षणार्थ करावयाचे उपाय, तसेच चाळीशीनंतर उद्भवणार्‍या समस्यांवरील उपाययोजना यांविषयी माहिती दिली. या वेळी दिघोडी ग्रामपंचायत सरपंच सौ. सुुस्मिता घरत, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला मंडळाच्या महिला, प्राथमिक शाळेच्या शिक्षिका आदी मान्यवर उपस्थित होते.

पाकिस्तानी गायक गुलाम अली यांना पू. मुरारी बापू यांचे निमंत्रण

अली यांना हनुमंत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार 
     कर्णावती (अहमदाबाद) - पाकिस्तानचे गझलगायक गुलाम अली यांना भावनगर येथे होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कथावाचक पू. मुरारी बापू यांच्या 'श्री चित्रकूटधाम' न्यासाकडून निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन १९ ते २२ मार्चमध्ये कर्णावतीपासून १७५ किलोमीटर लांब असलेल्या तलगाजरदा या गावात करण्यात आले आहे. पू. मुरारी बापू हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय समजले जातात. 

आतंकवाद्यांच्या लहानातील लहान कृतीकडेही युद्ध म्हणूनच पाहिले पाहिजे ! - संरक्षणमंत्री

     नवी देहली - आतंकवाद्यांच्या लहानातील लहान कृतीकडेही आपण युद्ध म्हणूनच पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पठाणकोट आक्रमणावरील चर्चेच्या वेळी लोकसभेत केले.
     संरक्षणमंत्री पर्रीकर म्हणाले, "आम्ही भारताच्या शत्रूंना सहीसलामत जाऊ देणार नाही; परंतु प्रसारमाध्यमांनीही एखाद्या सैनिकी कारवाईविषयी जनतेला सतत माहिती पुरवत रहाणे चुकीचे आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलांसाठी धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. पठाणकोटच्या प्रकरणात एक लहानशी चूक घडली होती; मात्र ती तातडीने सुधारण्यात आली होती." २ जानेवारी या दिवशी पठाणकोट आक्रमणाच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून 'पाचही आतंकवादी ठार झाले', असे सांगण्यात आले होते; परंतु नंतर त्यांना त्यांच्या वक्तव्यात पालट करावा लागला होता.

विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थांकडून प्राध्यापकांच्या वेतनातून राजरोस लूट

उच्च तंत्रशिक्षण विभागाचा भ्रष्टाचारी आणि अनागोंदी कारभार !
     पुणे, १७ मार्च - विनाअनुदानित तंत्रशिक्षण क्षेत्रातील संस्थांमधील प्राध्यापक आणि इतर कर्मचारी यांची अक्षम्य फसवणूक होत आहे. कागदोपत्री वेतन ३८ सहस्र रुपये असतांना शिक्षकांना १२ सहस्र रुपये इतकेच वेतन दिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हा अपप्रकार चालू असून शिक्षक आणि कर्मचारी यांच्या हक्काचे कोट्यवधी रुपये ३४६ संस्थांनी लाटले आहेत. शासन आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची फसवणूक करणार्‍या संस्थाचालक आणि प्राचार्य यांच्यावर रीतसर गुन्हे प्रविष्ट करण्यात यावेत, अशी मागणी टीचर्स असोसिएशन फॉर नॉन-एडेड पॉलिटेक्निक्स संघटनेचे सचिव प्रा. श्रीधर वैद्य यांनी पत्रकार परिषदेत केली. (या प्रकरणी राज्य शासन संबंधितांची चौकशी करून कठोर कारवाई करेल का ? - संपादक) टीचर्स असोसिएशन फॉर नॉन-एडेड पॉलिटेक्निक्स (टॅफनॅप), सिटिझन फोरम आणि प्रहार विद्यार्थी संघटना या संघटनांच्या वतीने मुंबई येथे आंदोलनही करण्यात येणार आहे.

पंकजा मुंडे सदस्यांना अवमानकारक बोलल्याच्या कारणावरून विरोधकांचा गोंधळ !

२०६ कोटी रुपयांचा चिक्की घोटाळ्याचा आरोप फेटाळला !
विधीमंडळ अधिवेशन २०१६
     मुंबई, १७ मार्च (विशेष प्रतिनिधी) - विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या वेळी आदिवासी विभागातील शाळांमध्ये निकृष्ट चिक्कीच्या पुरवठ्याविषयी माहिती देत असतांना महिला आणि बालकल्याण मंत्री सौ. पंकजा मुंडे-पालवे यांनी विरोधी सदस्यांच्या स्मरणशक्तीविषयी शंका येते, असे वक्तव्य केले. असे वक्तव्य करणे, हा सदस्यांचा अवमान आहे, असा आरोप करून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांसह विरोधी सदस्यांनी सौ. मुंडे यांनी क्षमा मागण्याची मागणी केली. त्यानंतर सौ. मुंडे यांनी हे शब्द मागे घेऊन क्षमा मागितल्यानंतर या प्रश्‍नाच्या वादावर पडदा पडला. आज प्रश्‍नोत्तरात आदिवासी विभागातील शाळांमध्ये निकृष्ट चिक्कीचा पुरवठा करणार्‍या ठेकेदारावर कारवाई करण्याच्या विषयावर चर्चा चालू असतांना हा गोंधळ झाला. सौ. पंकजा मुंडे यांनी २०६ कोटी रुपयांचा चिक्की घोटाळा झाल्याचा विरोधकांनी केलेला आरोप फेटाळून लावला. चिक्की पुरवठा प्रकरणाची त्यांनी सविस्तर माहिती सभागृहात दिली.

फलक प्रसिद्धीकरता

आरक्षणाच्या कुबड्यांवर चालणारा समाज कुठवर विकास करील ?
     जाट समुदायाला आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयक हरियाणा विधानसभेत मांडले जाण्याची शक्यता धुसर झाली असून त्यांच्या नेत्यांनी राज्यशासनाला दिलेली ७२ घंट्यांची मुदतही संपली आहे. त्यामुळे जाटांचे पुन्हा एकदा हिंसक आंदोलन चालू होण्याची शक्यता आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
Jat Arakshanke liye Hariyana shasan ko di hui muddat samapt
hone par punha hinsak andolan ki sambhavana hai.
kya Hinsak andolan karna samajdroha nahi ?
जागो !
जाट आरक्षण के लिए हरियाणा शासन को दि हुयी
मुद्दत समाप्त होने पर पुन: हिंसक आंदोलन आरंभ होने की संभावना है.
क्या हिंसक आंदोलन करना समाजद्रोह नही ?

नेहरूनगर (पुणे) येथे भाजपकडून ओवैसींच्या पुतळ्याचे दहन

     पुणे, १७ मार्च - खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी 'भारत माता की जय' म्हणणार नाही, असे विधान केले होते. त्याचा निषेध म्हणून भाजपच्या वतीने पिंपरीतील नेहरूनगर येथे १७ मार्च या दिवशी आंदोलन करण्यात आले. या वेळी ओवैसींच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. भाजपचे पश्‍चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख एकनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी शिवसेनेच्या नगरसेविका सीमा सावळे आणि भाजपचे अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

हिंदूंमध्ये धर्मतेज जागृत करण्यासाठी वाई येथे हिंदु धर्मजागृती सभा ! - हणमंत कदम

(डावीकडून) सौ. स्मिता भोज, श्री. हेमंत सोनवणे, श्री. हणमंत कदम आणि श्री. संदीप जायगुडे
     वाई (जिल्हा सातारा), १७ मार्च (वार्ता.) - हिंदूंमध्ये धर्मतेज जागृत करून नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आणि धर्माचे स्फुल्लिंग चेतवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २० मार्च या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता येथील श्रीमहागणपति घाटावर जाहीर हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे कार्यकर्ते श्री. हणमंत कदम यांनी दिली. येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. स्मिता भोज, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. संदीप जायगुडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातील ही समितीची ३२ वी सभा पार पडत आहे.

प्रशासनाने श्री महालक्ष्मीदेवीचा प्रसाद म्हणून लाडूचा हट्ट सोडावा ! - बजरंग दल

     कोल्हापूर, १७ मार्च (वार्ता.) - करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचा मूळ प्रसाद हा खडीसाखर-फुटाणे असा असतांना काही व्यावसायिक कारणांमुळे अचानकपणे तिरुपती बालाजीच्या धर्तीवर श्री महालक्ष्मीदेवीचा प्रसाद लाडू असल्याचे भासवत आहेत; मात्र याचे अयोग्य व्यावसायिक राजकारण पहाता 'लाडू' हा प्रसादच बंद करून मंदिराच्या दोन्ही बाजूला साखर-फुटाणे भाविकांना विनामूल्य पुरवावा. प्रशासनास हे करणे शक्य नसल्यास बजरंग दलाच्या वतीने त्याचे दायित्व घेण्यात येईल, असे प्रसिद्धीपत्रक बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. संभाजी साळुंखे आणि शहरप्रमुख श्री. महेश उरसाल यांच्या वतीने काढण्यात आले आहे. यावर सर्वश्री प्रमोद सावंत, सुधाकर सुतार, राजेंद्र सूर्यवंशी, सागर कलघटगी, प्रशांत कागले, तसेच अन्य स्वाक्षर्‍या आहेत. 

अलीपूरद्वार (बंगाल) येथील राभा जनजातीच्या वसाहतीला हिंदु जनजागृती समितीची भेट !

राभा जनजातीच्या वसाहतीमध्ये ग्रामस्थांशी
चर्चा करतांना (डावीकडे) हिंदु जनजागृती समितीचे
श्री. चित्तरंजन सुराल
     अलीपूरद्वार, १७ मार्च (वार्ता.) - येथील राभा जनजातीच्या वसाहतीला हिंदु जनजागृती समितीचे पूर्व-उत्तर भारत समन्वयक श्री. चित्तरंजन सुराल आणि श्री. आनंद जाखोटिया यांनी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. राभा जनजातीमध्ये कार्य करणारे श्री. दीपक पाण्डेय यांनी ही भेट घडवून आणली. या वेळी श्री. सुराल यांनी उपस्थितांना नमस्कार करण्याची योग्य पद्धत समजावून सांगितली. 
    या वेळी श्री. पाण्डेय म्हणाले, येथील राभा जनजातीच्या ८४ घरांपैकी ४३ कुटुंबांचे ख्रिस्ती मिशनर्‍यांनी दिशाभूल करून धर्मपरिवर्तन केले आहे. या जमातीतील लोक अत्यंत भोळे असून मिशनरी त्यांना ते हिंदु नाहीत, हे सांगून त्यांची दिशाभूल करतात. ख्रिस्ती अशा जमातीतील लोकांना हिंदु तुम्हाला भेटत नाहीत किंवा तुमच्या घरी काही घेत (खात) नाहीत, असा गैरसमज पसरवून त्यांना धर्मांतरित करतात. त्यामुळे त्यांच्याकडे हिंदू आले आणि त्यांनी काही घेतले, तर यांना आत्मियता वाटते. त्याचबरोबर हिंदू खरोखरच आपल्याला स्वीकारत आहेत का ?, अशी त्यांच्या मनातील शंकाही दूर होते.

कंत्राटदाराकडील १७६ बसगाड्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या योग्यता प्रमाणपत्राविना रस्त्यावर

महामंडळासारखे शासकीय आस्थापन परिवहन खात्याचे नियम पाळत नसेल, तर इतर शासकीय संस्था 
आणि जनता सदर नियमाचे किती पालन करत असतील, याचा विचारच न केलेला बरा !
पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादितचा कायदाद्रोही कारभार !
     पुणे, १७ मार्च - पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएम्पीएल्) डिसेंबर २०१५ अखेर कंत्राटदाराकडून घेतलेल्या एकूण बसगाड्यांपैकी १७६ बसगाड्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या योग्यता प्रमाणपत्राविना रस्त्यावर धावत असल्याची माहिती उघड झाली आहे. (ही माहिती प्रादेशिक परिवहन खाते आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ यांच्या लक्षात का आली नाही ? या प्रकरणी परिवहन खाते महामंडळाकडील बसेसची पडताळणी करून महामंडळ आणि कंत्राटदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करेल का ? - संपादक) त्याचसमवेत महामंडळाकडे असलेल्या भाडेतत्त्वावरील ८५० बसगाड्यांची माहिती महामंडळाच्या प्रशासनाकडे अनुपलब्ध आहे. (या प्रकरणी महामंडळाचे प्रशासन संबंधितांवर कोणती कारवाई करणार आहे ? - संपादक) सजग नागरिक मंच प्रणित पीएम्पी प्रवासी मंच आणि सामाजिक कार्यकर्ते जुगल राठी यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत केलेल्या अर्जामुळे ही माहिती समोर आली आहे. (समाजहितासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाचा ढिसाळ कारभार उघड करणार्‍या जुगल राठी यांचे अभिनंदन ! - संपादक)

हिंदु जनजागृती समितीची होळी-रंगपंचमीतील अपप्रकारांविरुद्ध मोहीम

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन जाधव (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी
रंगपंचमीच्या काळात अपप्रकार होऊ नये,
याची दक्षता घेऊ !
- पोलीस निरीक्षक मोहन जाधव
     विटा (जिल्हा सांगली), १७ मार्च (वार्ता.) - होळी आणि रंगपंचमी या काळात अपप्रकार होऊ नयेत, याची दक्षता घेऊ, तसेच पोलीस बंदोबस्तातही वाढ करू, असे आश्‍वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रंगपंचमीनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी त्यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी श्रीराम मंदिरचे श्री. महेश देशपांडे, श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. अमित गुळवणी, इस्कॉनच्या सौ. रोहिणी माने, निरंकारी संप्रदायाचे श्री. नरेश दुधाणे, श्रीमान हिंदवी प्रतिष्ठानचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते. सांगली येथे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. त्रिगुण कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.

पनवेल येथे होळी आणि रंगपंचमी यानिमित्त होणारे अपप्रकार रोखण्याविषयी पोलीस प्रशासनाला निवेदन

      पनवेल - येथील खांदा वसाहत आणि कळंबोली येथे पोलीस प्रशासनाला होळी आणि रंगपंचमी यानिमित्त होणारे अपप्रकार रोखण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. खांदा वसाहतीतील पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस महानिरीक्षक श्री. अमर देसाई यांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे सर्वश्री अजय खोत, विलास डुबे आणि दीपक कुलकर्णी उपस्थित होते. कळंबोली येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. संजय पाटील, तसेच एस्.व्ही. बिले यांना निवेदन दिल्यावर त्यांनी समितीच्या कार्याची प्रशंसा केली. या वेळी समितीचे श्री. उमेश किचंबरे आणि धर्माभिमानी सर्वश्री संभाजी जावीर, कालिदास काविळ, मारुति गुरव, सागर चिंचवले, अमोल कालेकर आणि तेजस सोनावणे उपस्थित होते.

नंदुरबार येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जिल्हाधिकार्‍यांना (उजवीकडे) निवेदन देतांना धर्माभिमानी
     नंदुरबार - नंदुरबार येथे १६ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी श्री. नीलेश सागर यांना होळी आणि रंगपंचमी यांच्या काळात होणार्‍या अपप्रकारांवर आळा घालणे आणि महिला सुरक्षेसाठी सहकार्य करण्याविषयीचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी शिवप्रतिष्ठानचे श्री. दिलीप ढाकणे-पाटील, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सतिष बागुल, मयुर चौधरी, गणेश पाटील, अमोल ठाकरे, शुभम कलाल, नीलेश अहिरे उपस्थित होते.

अवैध वाळू उत्खनन प्रकरणी जळगाव येथे संघटित गुन्हेगारी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद ! - एकनाथ खडसे

     मुंबई, १७ मार्च (विशेष प्रतिनिधी) - अवैध वाळू उत्खननात तहसीलदार, तलाठी यांसारख्या शासकीय अधिकार्‍यांवर होत असलेल्या आक्रमणांविषयी शासनाने कठोर कारवाईचे प्रावधान केले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी (एम्.पी.डी.ए.) कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती महसूलमंत्री श्री. एकनाथ खडसे यांनी १७ मार्च या दिवशी विधानसभेत दिली. 
     पालघर जिल्ह्यातील वैतरणा, सूर्या नदी आणि खाडीपात्र येथे अवैध वाळू उत्खनन होत असल्याविषयी आमदार पास्कल धनारे यांनी तारांकित प्रश्‍न विचारला होता. त्यावर उत्तर देतांना ते बोलत होते. पालघर आणि वसई तालुक्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणार्‍यांवर २०१५-१६ मध्ये एकूण ३६२.७० लक्ष इतका दंड संबंधितांकडून वसूल करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील खाडीपात्रात सक्शन पंपाद्वारे अवैध वाळूच्या उत्खननाची २ प्रकरणे दृष्टोत्पत्तीस आली आहेत. 

विभागीय आयुक्तांच्या अहवालात दोषी आढळल्यास सोलापूर येथील जिल्हाधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार ! - एकनाथ खडसे

अर्थसंकल्पीय अधिवेशन २०१६ 
     मुंबई, १७ मार्च (विशेष प्रतिनिधी) - सोलापूरचे जिल्हाधिकारी मुंढे यांचे वर्तन बेशिस्तपणाचे आहे. ते इतरांचा अवमान करतात. पालकमंत्री आणि विभागीय आयुक्त यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली करतात. जिल्हाधिकार्‍यांच्या वर्तनामुळे पालकमंत्र्यांसह ग्रामस्थ नाराज आहेत. त्यामुळे त्या जिल्हाधिकार्‍यांवर कधी कारवाई करणार आहे, असा प्रश्‍न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपस्थित केला. या वेळी महसूलमंत्री श्री. एकनाथ खडसे म्हणाले की, विभागीय आयुक्तांना सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍यांविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. सोलापूर येथे विभागीय आयुक्त स्वतः जाऊन सर्व घटनांची माहिती घेणार आहेत. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍यांवर कारवाई करण्यात येईल. 

(म्हणे) चुकीच्या घोषणांवरून जेएन्यूला अपकीर्त केले जात आहे ! - राम पुनियानि

     कोथरूड, १७ मार्च (वार्ता.) - जवाहरलाल नेहरू विद्यापिठात देशविरोधी घोषणा दिल्याचे निमित्त करून विद्यापिठाला अपकीर्त केले जात आहे. हे विचारस्वातंत्र्यावरील आक्रमण आहे. या विद्यापिठातून बाहेर पडणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सेवांमध्ये भरती होतात. रोहित वेमुला प्रकरणी, तसेच निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरले. त्यामुळे लोकांचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी जेएन्यू प्रकरण तापवण्यात आले, असा कांगावा कथित विचारवंत राम पुनियानि यांनी केला. (विद्यापिठात भारतविरोधी घोषणा देणार्‍यांविरोधात विद्यापिठाने कारवाई करावी, अशी सामान्य जनतेची अपेक्षा असल्यास ते विचारस्वातंत्र्यावरील आक्रमण कसे काय होते ? प्रकरण तापवण्याच्या सूत्रापेक्षा देशद्रोही घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी हे प्रकरण घडूच का दिले, या संदर्भात पुनिया यांनी संबंधितांवर ताशेरे ओढावेत ! - संपादक) महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या वतीने १४ मार्च या दिवशी गांधी भवन येथे हिंदु राष्ट्र या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी राम पुनियानि यांनी रोहित वेमुलाच्या बीफ फेस्टिवलचे समर्थनही केले. (हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांचे समर्थन करणार्‍यांचा निषेध ! - संपादक)

प्रभु श्रीरामचंद्रांच्या विडंबनाच्या निषेधार्थ एका मुसलमान युवकाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

     शहाजानपूर (उत्तरप्रदेश) - प्रभु श्रीरामचंद्रांचे आक्षेपार्ह चित्र सामाजिक संकेतस्थळावरून प्रसारित झाल्याच्या निषेधार्थ उत्तरप्रदेशातील शहाजानपूर येथील एक मुसलमान युवक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेे. महंमद सलमान असे या युवकाचे नाव असून तो लोधीपूर येथील एका मोहल्ल्यातील रहिवासी आहे. (हिंदूंच्या देवतांच्या विडंबनाविषयी मुसलमान संवेदनशील आहे, अशी संवेदनशीलना हिंदूंमध्ये का नाही ? विडंबन रोखण्यासाठी आंदोलन करणार्‍या मुसलमानाकडून नतद्रष्ट हिंदू काही बोध घेतील, तो सुदिन ! - संपादक) काही दिवसांपासून एक व्यक्ती प्रभु श्रीरामचंद्रांचे चित्र जाळत असल्याचे छायाचित्र सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित होत आहे. ९ मार्च या दिवशी महंमदला भ्रमणभाषद्वारे ते प्राप्त झाले. 
     महंमदने निषेध करतांना म्हटले आहे की, सर्वांनी अन्य धर्मातील चित्रांचा अथवा धर्मध्वजांचा मान राखायला हवा. मानवता ही कोणत्या एका धर्माची नसून सर्व धर्मांची मुख्य धारणा आहे. दोषींवर कारवाई करण्याची महंमदने मागणी केली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीचे बांधकाम आणि सिमेंटचे रस्ते यांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर

पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असतांना त्याचाच वापर बांधकामासाठी केला जाणे हा जनताद्रोहच !
     पुणे, १७ मार्च - येथील महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीचे बांधकाम आणि शहरात अनेक ठिकाणी सिद्ध करण्यात येत असलेले सिमेंटचे रस्ते यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचे उघड झाले आहे. शहराच्या धरणांमध्ये पाणीसाठा अल्प झाल्याने १ सप्टेंबरपासून शहराच्या पाण्यात ३० प्रतिशत कपात करून सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकाम, वाहन धुलाई केंद्र या ठिकाणी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. ऐन पाणीटंचाईच्या काळात पालिकेकडूनच पाण्याची मोठी नासाडी केली जात आहे. (या संदर्भात पालिका आयुक्त काही कारवाई करणार का ? - संपादक)

कानपूर येथे एका कार्यक्रमात औवेसी यांच्या पुतळ्याचे दहन !

     कानपूर (उत्तरप्रदेश) - एम्आयएम्चे प्रमुख आणि खासदार असद्दुदीन ओवैसी यांनी मी भारतमाता की जय म्हणणार नाही, असे देशद्रोही विधान केल्याच्या निषेधार्थ कानपूर येथे त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी पुतळ्याची आग विझवण्याचा प्रयत्न करणार्‍या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याला भाजले. त्याला प्राथमिक उपचारानंतर स्थानिक रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

पाक आणि तालिबानी आतंकवाद्यांमुळे तेथील गांधार कला नामशेष होण्याच्या मार्गावर !

     गांधार कला ही प्राचीन शिल्पकला होय. ज्या भूमीवर ही कला साकार झाली, ती पुरातन संस्कृतीने समृद्ध असणारी भूमी दुर्दैवाने कलेचा द्वेष करणार्‍या कट्टर पाक आणि तालिबानी आतंकवाद्यांच्या कह्यात गेली. तेथील शासनाला या कलेविषयी किंवा पुरातन संस्कृती असणार्‍या ठेव्याविषयी जतन करण्याची आवड नव्हती. उलट या पुरातन संपत्तीचा द्वेष नसानसांत भिनलेल्या आतंकवाद्यांनी तिचे समूळ उच्चाटन करण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला. या भूमीशी हिंदूंच्या हृदयाचा संबंध होता. ही कला जतन होण्याऐवजी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यातील उरल्या-सुरल्या पुरातन वस्तूंचे जतन व्हावे, यासाठी भारत शासनाने प्रयत्न करावयास हवेत. या दुर्मिळ कलेची ढोबळ माहिती वाचकांना ज्ञात व्हावी, यासाठी श्री. संजय गोडबोले यांनी मांडलेला वृत्तांत देत आहोत.

कर्नाटकातील भटकळ येथील हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त धर्माभिमान्यांनी मांडलेली आणि सर्वच हिंदूंना अनुकरणीय असलेली महत्त्वपूर्ण सूत्रे

पू. सत्यवान कदम
      हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त कर्नाटकातील भटकळ या ठिकाणी जाण्याचा योग आला. सभा संपल्यानंतर सभेला संबोधित करणारे वक्ते आणि सभेला उपस्थित असणारे धर्माभिमानी यांच्यात संवाद साधला गेला. त्यामध्ये धर्माभिमान्यांनी प्रामुख्याने महत्त्वाची पुढील दोन सूत्रे मांडली. 
१. सरकारीकरण झालेल्या मंदिरात पैसे अर्पण न करता ते 
पैसे धर्म कार्य करणार्‍या हिंदुत्ववादी संघटनांना द्यावेत !
     मंदिरांचे सरकारीकरण झाल्यामुळे मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या पैशांचा विनियोग शासन हिंदू किंवा त्यांची मंदिरे अथवा हिंदूंना धर्मशिक्षण देणे यांसाठी करत नाही, तर तो पैसा इतर धर्मियांसाठी वापरला जातो. त्यामुळे सरकारीकरण झालेल्या मंदिरात पैसे अर्पण न करता तेच पैसे राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्‍या हिंदुत्ववादी संघटनांना द्यावेत.

समाजऋण फेडणे निकडीचे !

      हिंदी चित्रपट जगतातील सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या उत्पन्नातील अर्धे उत्पन्न शेतकर्‍यांसाठी देण्याचा मानस एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलून दाखवला आहे. याआधीही त्याने दुष्काळग्रस्तांसाठी ९० लाख रुपयांचे साहाय्य राज्यशासनाच्या माध्यमातून केले आहे. केवळ आपल्या जगात मग्न न रहाता त्यातून बाहेर पडून आपण ज्या समाजात रहातो, त्याकडेही लक्ष ठेवत समाजाप्रती असलेले आपले दायित्व कसे पार पाडावे, हे अक्षयकुमारच्या कृतीतून लक्षात येत आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या गोव्यातील धर्मप्रसाराच्या कार्यातील जिज्ञासूंचा उल्लेखनीय सहभाग

१. पाण्याच्या अभावामुळे विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्तींची उघड्यावर 
पडून विटंबना होणे आणि शिरसई येथील सरपंच श्री. आनंद टेमकर 
यांनी मूर्तींचे नदीतील खोल पाण्यात विसर्जन करणे
    श्री गणेशचतुर्थीच्या काळात शिरसई येथील तलावात विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्ती पाण्याच्या अभावामुळे उघड्यावर पडून विटंबना होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर तेथील सरपंच श्री. आनंद टेमकर यांनी तत्परतेने एका वाहनाचे आयोजन केले. ग्रामस्थ आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्या सहकार्याने त्यांनी जवळच्या नदीतील खोल पाण्यात या मूर्तींचे विसर्जन केले. आगामी काळात श्री गणेशचतुर्थीला शिरसई येथील तलावात प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास बंदी घालण्यात येईल, अशी माहिती श्री. आनंद टेमकर यांनी दिली.

हिदूंनो, पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण टाळा आणि धर्माचरणाद्वारे कर्महिदू बनून आनंदी व्हा !

कु. शर्वरी बाकरे
१. पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणाचे दुष्परिणाम 
    सध्या प्रत्येक क्षेत्रात पाश्‍चात्त्य संस्कृतीने स्वतःचे असे वेगळे (मानाचे ?) स्थान प्राप्त केले आहे. मग ती वेशभूषा असो, आहार असो किंवा शिक्षण असो, सर्वच ठिकाणी पाश्‍चात्त्य संस्कृतीचे ठसे उमटतांना दिसत आहेत. 
१ अ. वेशभूषा : आपली संस्कृती, चालीरिती आदी लोप पावत आहेत. साडी आणि धोतर यांची जागा जीन्स आणि शॉर्टस् यांनी, तर अंबाडा अन् शेंडी यांची जागा बॉबकट आणि पोनीटेल यांनी घेतली आहे.
१ आ. आहार : आजकालच्या मुलींना साधी धान्ये वा कडधान्येही ओळखता येत नाहीत; कारण आज बाजरी, कुळीथ आणि मूग यांची जागा जॅम, सॉस आणि पिचकू यांनी; तर भाकरी-पिठल्याची जागा पिझ्झा आणि बर्गर यांनी घेतली आहे. या पालटलेल्या आहाराचा परिणाम म्हणजे विविध नवीन व्याधींशी जोडलेली घनिष्ठ मैत्री आणि घटत चाललेले आयुर्मान ! आज माणूस शतायुषी सोडाच; पण साठी झाली की, आकाशाला हात टेकल्याच्या समाधानात वावरत असतो. त्याच्या समवेत औषधरूपी साथीदार असतातच ना !

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

पंडित नथुराम गोडसे यांनी गांधीहत्या करण्यामागे न्यायालयात सांगितलेल्या १५० प्रमुख कारणांपैकी एक कारण !

     महंमद अली जिना आणि इतर राष्ट्रवादी मुसलमान यांच्या विरोधाला न जुमानता वर्ष १९२१ मध्ये गांधींनी खिलाफत आंदोलनाला समर्थन घोषित केले असतांनाही केरळमध्ये मुसलमानांनी तेथील हिंदूंना मारहाण केली आणि अनुमाने १ सहस्र ५०० हिंदू ठार मारले अन् २ सहस्रांहून हिंदूंचे धर्मांतर केले. गांधीनी याचा निषेध न करता याचे वर्णन खुदा के बहादूर बंदो की बहादुरी असे केले. 
हा इतिहास ज्ञात नसलेले काँग्रेसवाले राष्ट्रद्रोहीच नव्हेत का?

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेअंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, याविषयी अन्य सूत्रे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

निपाणी येथे हिंदूसंघटन मेळाव्यासाठी प्रसार करतांना आलेले अनुभव

१. प.पू. भक्तराज महाराजांना ओळखणार्‍या एका 
व्यक्तीचे बोलणे ऐकून तेच बोलत आहेत, असे वाटणे
        ८.८.२०१५ या दिवशी निपाणीतील गुरुवार पेठेत घरोघरी हिंदूसंघटन मेळाव्याविषयी माहिती सांगतांना श्री. अजित कोठारी नावाचे गृहस्थ (अंदाजे वय ६५-७० वर्षे) भेटले. आम्ही त्यांना निमंत्रण दिल्यावर लगेच त्यांनी सांगितले, मी तुमच्या प.पू. भक्तराज महाराजांना ओळखतो. जवळजवळ १० ते १५ वर्षे मी त्यांच्यासोबत अनेकदा फिरलो आहे. भंडार्‍यात सहभागी झालो आहे. ते सतत कुणा ना कुणावर ओरडायचे. ओरडल्यावर त्या माणसाचा दिवस चांगला जायचा. प.पू. डॉक्टर आणि प.पू. रामानंद महाराज यांची आठवणही ते काढत होते. त्या गृृहस्थांनी सनातन प्रभातचा विशेषांक विकत घेतला आणि अर्पणही दिले. त्यांचे बोलणे ऐकून आम्ही एकदम भावविभोर होऊन प.पू. भक्तराज महाराजच बोलत आहेत, असे अनुभवत होतो.

पुणे येथील श्रीमती विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८१ वर्षे) संतपदी विराजमान

आज सोनियाचा दिन उगवला, श्रीकृष्णाने संतांच्या मांदियाळीत आणखी एक तुरा खोवला ! 
पू. काळेआजी यांनी साधकांना दिलेला संदेश
साधनेत आल्यानंतर अष्टांगमार्गाने आपली साधना होत नाही.
कधी कधी आपले मन मायेत इतके गुरफटले जाते की, त्यातून बाहेर
कसे पडायचे, हे आपल्याला कळत नाही. कोणाच्या मायेत अडकायचेच
असेल, तर गुरूंच्या मायेत अडकूया. त्यातूनच पुढे मोक्षाचा प्रवास चालू राहील. साधना
आणि सेवा करत असतांना गुरुदेवांची कृपा (वाहवा) संपादन करून त्यांच्या कृपेस पात्र ठरूया.

साधकांना गुरुसेवा करण्याची सुसंधी !

विविध सेवांसाठी देवद आश्रमात साधकांची तातडीने आवश्यकता !
        देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वाहन, स्वयंपाक, उत्पादन-बांधणी आदी सेवांसाठी साधकांची तातडीने आवश्यकता आहे. जड साहित्य उचलू शकणार्‍या साधकांसाठी मागणी-पुरवठा संबंधी विविध सेवा उपलब्ध आहेत. जे साधक पूर्णवेळ, काही कालावधीसाठी किंवा शनिवार आणि रविवार अन् अन्य सुटीच्या दिवशी आश्रमात येऊन सेवा करू शकतात, त्यांनी खालील सारणीनुसार माहिती भरून ती जिल्हासेवकांच्या माध्यमातून devadashram@gmail.com संगणकीय पत्त्यावर लवकरात लवकर पाठवावी. शाळा आणि महाविद्यालये यांना लवकरच सुटी लागणार असल्याने युवा साधकही या सेवेत सहभागी होऊ शकतात.

भावरूपी सगुण मूर्ती - गोपी दीपाली

कु. दीपाली मतकर
       कु. दीपाली मतकरताईंच्या मार्गदर्शनाला दुचाकीवरून जात होते. तेव्हा मनात श्रीकृष्णाने दीपालीताईला रत्नागिरीत का पाठवले ?, असा विचार आला. यावर सुचलेले विचार आणि मनाची अवस्था येथे देत आहे.
दीपालीताईला रत्नागिरीत पाठवणे,
त्यातून दीपालीने प्रगती करणे,
अन्य साधक गुरुकृपेस(टीप १) पात्र होणे,
गुरुपौर्णिमा आणि धर्मसभा होणे,
साधकांना देवाविषयी प्रेम वाटणे,
देवत्वाचा आनंद अनुभवता येणे,
कृष्णाचे अस्तित्व जाणवणे,
ही सर्व सर्व तुझीच कृष्णलीला भगवंता...
फार फार केलेस...

उत्साही आणि आनंदी असलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली यवतमाळ येथील चि. जागृती मंगेश खांदेल (वय २ वर्षे) !

      फाल्गुन शुक्ल पक्ष दशमी (१८.३.२०१६) या दिवशी यवतमाळ येथील चि. जागृती मंगेश खांदेल हिचा वाढदिवस आहे. यानिमित्त तिचे आई-वडील, आजी आणि यवतमाळ केंद्रातील साधक यांना तिच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
चि. जागृती मंगेश खांदेल हिला सनातन 
परिवाराकडून वाढदिवसानिमित्त अनेक शुभाशीर्वाद !
१. गर्भारपणात
चि. जागृती खांदेल
१ अ. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी गर्भधारणा झाल्याचे कळल्यावर देवाने गुरुकृपेचा प्रसादच पाठवला आहे, असे वाटणे : गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्हा दोघांना गुरुपूजन करण्याची सेवा मिळाली होती. गर्भधारणा झाली असल्याचे आदल्या दिवशीच कळले होते. जणूकाही देवाने गुरुकृपेचा प्रसादच पाठवला आहे, असा भाव त्या वेळी निर्माण झाला.
१ आ. प्रार्थना, नामजप, उपाय आणि ग्रंथवाचन केल्याने मळमळणे, अशक्तपणा, जेवणाची इच्छा न होणे, हे त्रास उणावणे : २ मास (महिने) मळमळणे, अशक्तपणा, जेवणाची इच्छा न होणे, हे त्रास होत होते. एका साधिकेला मी मला होणारे त्रास सांगितल्यावर त्यांनी जास्तीत जास्त प्रार्थना, नामजप आणि उपाय करायला सांगितले. त्याप्रमाणे करणे चालू केले. यांसह ज्ञानेश्‍वरी, भगवद्गीता, गजानन विजय, स्वामी विवेकानंदांचे चरित्र, प.पू. भक्तराज महाराज यांचे चरित्र इत्यादी ग्रंथांचे वाचन करत होते. असे प्रयत्न केल्यावर मला होणारा त्रास उणावला.

साधकांना सूचना !

महर्षींनी पूर्वी साधकांना काही लिहिण्यापूर्वी कागदावर आरंभी
नारायणस्मृति लिहा !, असे सांगितले होते, त्याऐवजी आता
गायत्री मंत्राची शक्ती आकृष्ट करणार्‍या यंत्राचे चिन्ह काढण्यास सांगणे
     महर्षी नाडीवाचन क्रमांक ६६मध्ये म्हणतात - पूर्वी आपण काहीही लिखाण करण्याच्या आरंभी कागदावर ॥ नारायणस्मृति ॥ असे लिहित होतो; परंतु आता काळानुसार आपल्याला गायत्री मंत्राच्या शक्तीची आवश्यकता असल्याने तो मंत्र आपण कागदाच्या आरंभी लिहायचा आहे. गायत्री मंत्र २४ अक्षरांचा आहे. एवढा मोठा मंत्र प्रत्येक वेळी लिहिणे आपल्याला कठीण होणार आहे. त्याऐवजी आम्ही तुम्हाला एक यंत्र देत आहोत. या यंत्राचे चिन्ह तेवढेच कागदावर लिखाणाच्या आरंभी काढले, तरी चालेल. या यंत्रात ब्रह्मांडातील गायत्री मंत्राची शक्ती आकृष्ट करण्याची क्षमता आहे. (या यंत्राला तमिळमध्ये उ असे म्हणतात. या यंत्राचे चिन्ह मराठीतील २ या अंकासारखे आहे आणि त्याखाली दोन रेघा मारलेल्या आहेत.
- (पू.) सौ. गाडगीळ) (या यंत्राच्या आकृतीचे छायाचित्र वर दिले आहे. - (पू.) सौ. गाडगीळ) संदर्भ : नाडीवाचन क्रमांक : ६६, जिल्हा ईरोड, राज्य तमिळनाडू. (१२.३.२०१६, रात्री ९.२७)

प.पू. डॉक्टरांच्या देहाचा सांभाळ करणे, सर्व साधकांच्या आरोग्याची काळजी घेणे, तसेच आश्रमांना संरक्षण देणे, हे आमचेच कार्य असल्याचे महर्षींनी नाडीवाचनातून सांगणे आणि त्यासाठी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना विविध प्रकारचे उपाय करण्याचे सूचित करणे

महर्षींची शिकवण आणि कार्य !
महामृत्यूंजय होमाच्या वेळी प्रार्थना करतांना पू. (सौ.) अंजली गाडगीळ
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमावर लावणार असलेले कळस
 १. शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांसारखी प.पू. डॉक्टरांच्या देहाची 
सध्याची स्थिती असणे, असा देह जिवंत तरी कसा ?, असा 
प्रश्‍न सामान्यांना पडणे आणि याचे उत्तर म्हणजे हा देह मानवी 
शक्तीवर नाही, तर ईश्‍वरी चैतन्यावरच चालला असल्याने तो 
समष्टीसाठी अखंड कार्यरत आहे, याचेच हे प्रत्यक्ष उदाहरण असणे 
       १.२.२०१६ या दिवशी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी प.पू. डॉक्टरांना होणार्‍या शारीरिक त्रासांची संगणकीय धारिका रामनाथी आश्रमातून मागवण्यास सांगितली. तशी त्यांना महर्षींनी आज्ञा दिली होती. या त्रासांचे लिखाण असलेल्या धारिकेची एक कागदी प्रत त्यांनी महर्षींच्या नाडीपट्टीवर ठेवली आणि प.पू. डॉक्टरांचे त्रास दूर व्हावेत, यासाठी त्यांनी रात्रभर बसून जपही केला. महर्षींना प.पू. डॉक्टरांच्या आरोग्याविषयी काळजी का वाटते, ते पुढील कारणांमुळे थोडेफार समजण्यास साहाय्य होईल.

दत्तमाला मंत्रपठण करत असतांना साधकांना आलेल्या विविध अनुभूती !

योगतज्ञ दादाजी वैशंपायन
      योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या सांगण्यानुसार रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात दत्तमाला मंत्रजपाचे पठण चालू झाले. हे मंत्रपठण करतांना साधकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
दत्तमाला मंत्रपठण करून झाल्यावर अकस्मात् 
कटी आणि मांड्यांमध्ये असह्य वेदना होऊ 
लागल्याने प.पू. गुरुदेवांचा धावा चालू करणे आणि 
देवीकवचातील १० श्‍लोक लिहून झाल्यावर वेदना थांबणे
       मी ध्यानमंदिरात दत्तमाला मंत्रपठण करण्यासाठी ३ - ४ दिवसांपासून जात होते. अकस्मात् माझी कटी आणि मांड्या दुखायला लागल्या. ७.१२.२०१५ या दिवशी मंत्रपठण करून झाल्यावर माझी कटी आणि मांड्या दुखण्याचे प्रमाण वाढले. मला असह्य वेदना होत होत्या; म्हणून मी प.पू. गुरुदेवांचा धावा चालू केला. मला आसंदीवरही बसता येत नव्हते. माझ्या शेजारी बसलेल्या साधिकेकडे देवीकवच असलेला कागद होता. मी ते मंगळवारपासून म्हणूया, असे ठरवून ते लिहायला घेतले. त्यातील १० श्‍लोक लिहून झाल्यावर माझ्या वेदना पूर्ण थांबल्या.

सर्व काही गुरूंचेच, गुरूंसाठी आणि गुरुच करवून घेतात, असा भाव असणारे सहजावस्थेतील संत : प.पू. रामानंद महाराज !

सनातन संस्थेचे स्फूर्तीस्थान प.पू. रामानंद महाराज यांच्या 
पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
        प.पू. रामानंद महाराज यांच्या सहवासात असतांना त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे देत आहे.
प.पू. रामानंद महाराज
१. प.पू. रामानंद महाराज यांच्यामध्ये 
एक आदर्श शिष्य, गुरु, परात्पर गुरु 
अशी अनेक रूपे पहाण्याचे भाग्य लाभणे
       वर्ष १९९२ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांची मुंबई येथे गुरुपौर्णिमा झाली. तेव्हापासून मला प.पू. रामानंद महाराज यांचा सत्संग आणि सहवास लाभला. त्यांच्यामध्ये एक आदर्श शिष्य, गुरु, परात्परगुरु अशी अनेक रूपे पहाण्याचे मला भाग्य लाभले. प.पू. भक्तराज महाराज यांचा गुरुपौर्णिमा महोत्सव आणि भंडारे या निमित्ताने प.पू. रामानंद महाराज यांच्यासारखे सहजावस्थेतील संत कसे असतात ? हे अनुभवता आले. मी, माझे याऐवजी सर्व काही गुरूंचेच, गुरूंसाठी आणि गुरुच करवून घेतात, असा त्यांचा भाव असायचा.

सार्वजनिक भिंतींवर भडक मनोरंजनात्मक लिखाण करण्यापेक्षा प्रबोधनात्मक आणि धर्मशिक्षण देणारे लिखाण करा !

     मी एका गावातील यात्रेची प्रसिद्धी आणि प्रसार यांचे नियोजन बघण्यासाठी गेले होते. तेथे पुष्कळ भिंती रंगवण्यात आल्या होत्या. भिंतींवर वेगवेगळी चित्र-विचित्र चित्रे काढण्यात आली होती. ती चित्रे पाहून चित्रातील रंग आणि मनुष्यबळ वाया गेले. यापेक्षा धर्माविषयीचे लिखाण लिहिले असते, तर त्यातून अनेक जणांना धर्मशिक्षण मिळाले असते, असे वाटले.
     सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी मिळून एका कुंभमेळ्यातील भिंती रंगवल्या होत्या. त्या वेळी तेथून येणारे-जाणारे अनेक जण ते लिखाण वाचून त्याला नमस्कार करत होते. अनेकांनी लिखाण आवडले, काहीतरी चांगले शिकायला मिळाले, अशा प्रतिक्रिया दिल्या.
- (पू.) कु. स्वाती खाडये
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
मी कोणाचा नाही. माझा कुणी नाही.
ज्याचा त्याचा तोच मी; म्हणून मी सर्वांचा आहे.
भावार्थ : मी सर्वस्व गुरुचरणांवर वाहिल्यानंतर मी दुसर्‍या कुणाचा होऊच शकत नाही. गुरूंना अर्पण झाल्यानंतर माझा कुणी असायला मी शिल्लक राहिलोच कुठे ? परंतु सर्वांचा खरा मी एकच आणि सर्वव्यापी असल्यामुळे आता मी सर्वांचा आहे.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व आणि भारतात
रहायला मिळते म्हणून भारतमातेच्या चरणी कृतज्ञ रहा !
ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करायची असल्यास जगातील भारत सोडून इतर कोणत्याही देशात राहू नका; कारण भारतियांची स्थिती वाईट असली, तरीही भारताइतका सात्त्विक देश जगात कुठेही नाही. इतर सर्व देशांत रज-तमाचे प्रमाण अत्याधिक आहे. ५० टक्के आध्यात्मिक पातळीहून अधिक पातळी असलेले मात्र जगात कुठेही राहून साधना करू शकतात. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

न्यूनगंड बाळगू नका !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     आपल्या उणिवांची जाणीव ठेवून त्यांविषयी न्यूनगंड न बाळगता त्यांवर मात करण्यासाठी सदैव प्रयत्नशील रहा. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)


राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचारी चेहरा उघड !

संपादकीय
      गेले वर्षभर चाललेल्या नाट्यानंतर १४ मार्चला रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)ने अटक केली. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळ यांचे पुतणे आणि माजी खासदार समीर यांना या अगोदरच अटक झाली आहे. छगन भुजबळ यांच्याकडे जी संपत्ती आहे, ती कोणत्याही सामान्य माणसाचे डोळे दीपवून टाकणारी आहे. आयुष्याच्या प्रारंभी केवळ भाजी विकणारा माणूस एवढी संपत्ती कशी मिळवू शकतो, याची उत्तरे आता मिळण्यास प्रारंभ होतील. अब्दुल करीम तेलगी प्रकरणात भुजबळ यांचे नाव घेतले गेले; मात्र अर्थातच त्या वेळी सत्ता ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याने केवळ मंत्रीपदावर पाणी सोडून ते यातून बाहेर पडले होते. त्यांच्या साहेबांच्या पाठिंब्यामुळे ते त्या वेळी वाचले. भुजबळ यांच्या कार्यकाळात अनेक वेळा भ्रष्टाचाराचे आरोप झाले; मात्र सत्तेचे कवच असल्याने ते नेहमीच यातून वाचले. आत मात्र सत्तांतर झाल्याने आणि थेट पंतप्रधान कार्यालयाचे आदेश असल्यानेच भुजबळ यांना कारागृहाची हवा खायला लागली आहे !
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn