Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा आज स्मृतीदिन

भारतमातेचा जयजयकार करण्यास नकार देणारे एम्.आय.एम्.चे आमदार वारिस पठाण निलंबित !

केवळ निलंबन नको, तर भाजप शासनाने अशांना 
देशद्रोही ठरवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी !
      मुंबई - मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीनचे (एम्आयएम्चे) संभाजीनगरचे आमदार वारिस पठाण यांनी भारतमाता की जय म्हणणार नाही, असे वक्तव्य केल्यानंतर विधानसभेचे सभागृह भाजप-शिवसेनेच्या आमदारांनी दणाणून सोडले. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवला. भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणार्‍या आमदारांना विधानसभेत स्थान नाही. त्यांना निलंबित करा, अशी जोरदार मागणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केली. या वेळी संसदीय कामकाज मंत्री श्री. गिरीश बापट यांनी सभागृहात वारिस पठाण यांना निलंबित करण्याचा ठराव मांडण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर पठाण यांना अधिवेशन काळापर्यंत निलंबित करण्याचा, तसेच विधानपरिषदेच्या परिसरात येण्यास बंदीचा ठराव या वेळी एकमताने संमत करण्यात आला.

महिला कैद्यास प्रायोगिक तत्त्वावर प्रसादाचे लाडू बनवण्यास देण्यावर चर्चा !

श्री महालक्ष्मी देवस्थान समितीची बैठक
     कारागृहातील वातावरण आरोग्याच्या दृष्टीने अस्वच्छ असते ही वस्तुस्थिती आहे. शिवाय ते आध्यात्मिकदृष्ट्या तमप्रधानही असते. धर्मशास्त्रानुसार कोणताही प्रसाद बनवतांना शुचिर्भूततेचे सर्व नियम पाळणे आवश्यक असते. कारागृहातील महिला कैद्यांकडून या नियमांचे पालन होईल, याचे दायित्व कोण घेणार ? त्यामुळे महिला कैद्यांकडून लाडू बनवून घेण्याचा निर्णय सर्वथा अयोग्य आहे. - संपादक
      कोल्हापूर - तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर महिला कैद्यांकडून श्री महालक्ष्मीच्या प्रसादाचे लाडू सिद्ध करून घेता येतील, असे सूत्र १६ मार्च या दिवशी झालेल्या देवस्थान समितीच्या बैठकीत मांडण्यात आले. देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
     या बैठकीत लाडूच्या प्रसादाच्या संदर्भात नव्याने निविदा प्रसिद्ध करणे, महिला कैद्यांकडून लाडू करून घेणे, यंत्राच्या साहाय्याने लाडू बनवणे किंवा देवस्थान समितीने स्वतःच लाडू पुरवणे या चार पर्यायांवर चर्चा झाली. कळंबा कारागृह प्रशासनाच्या महिला कैद्यांकडून प्रतिलाडू साडेसात रुपये या दराने लाडू पुरवण्याचा हा प्रस्ताव आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखडा, तिरुपति देवस्थान यांच्याकडून आलेल्या महावस्त्राचा लिलाव आदी विषयांवरही बैठकीत चर्चा झाली.

भारतमाता की जय म्हणणे आमचे केवळ कर्तव्यच नाही, तर अधिकारही आहे !

प्रसिद्ध गीतकार तथा खासदार जावेद अख्तर यांनी ओवैसी यांना फटकारले
ओवैसी यांच्या देशद्रोही विधानाच्या विरोधात देशभरातून प्रतिक्रिया 
व्यक्त होत असतांना अन्य खासदार काही बोलत का नाहीत ?
खासदार अख्तर यांनी सभागृहात दिल्या भारतमाता की जयच्या घोषणा !
     नवी देहली - हिंदुद्वेषी मुक्ताफळे उधळण्यात कुप्रसिद्ध असलेले एम्आयएम्चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना प्रसिद्ध गीतकार तथा राज्यसभा सदस्य जावेद अख्तर यांनी भारतमाता की जय म्हणणे आमचे केवळ कर्तव्यच नाही, तर अधिकारही आहे, असे ठामपणे सांगत राज्यसभेत चांगलेच फटकारले. एवढेच नव्हे, तर त्यांनी सभागृहात भारतमाता की जयच्या ३ वेळा घोषणा देऊन ओवैसी यांना चांगलीच चपराक लगावली. मी भारतात रहात असलो, तरी भारतमाता की जय कधीच म्हणणार नाही, असे देशद्रोही विधान एम्.आय.एम्. या धर्मांध पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लातूर येथील एका भाषणात नुकतेच केले होते. त्यावर अख्तर यांनी वरील विधान केले.
     अख्तर यांचा राज्यसभेतील खासदारकीपदाचा कालावधी संपला आहे. त्यानिमित्त सभागृहात निरोपाचे भाषण करतांना खासदार अख्तर बोलत होते. ते पुढे म्हणाले, आपण राष्ट्रीय नेते आहोत, याची ओवैसी यांना फारच घमेंड आहे; परंतु त्यांची खरी पात्रता मात्र गल्लीतील नेत्यासारखी आहे.

मते मिळवण्यासाठी साम्यवादी नेत्यांचा हिंदूंच्या उत्सवांमध्ये सहभाग !

साम्यवाद्यांची मंदिराकडेही धाव !
हिंदूंची मते मिळवण्याची डाव्यांची नवी क्लृप्ती जाणा !
      कोलकाता - बंगाल आणि केरळ या राज्यांत पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी साम्यवादी नेते आता हिंदूंच्या मतांच्या आशेने त्यांच्या उत्सवांमध्ये सहभागी होत आहेत. धार्मिक उत्सवांमध्ये भाग घेतल्याने मूळ तत्त्वप्रणाली अल्प होत नसल्याचा दावा करत ही नेतेमंडळी निवडणुकीत हिंदूंची आणि मुसलमानांची मते मिळवण्यासाठी मंदिर अन् मशीद यांकडे धाव घेत आहेत.
     बंगालमधील मुसलमानांचा पाठिंबा मिळवण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते बिमन बोस, गौतम देब, सूर्ज्यकांत मिश्रा, अब्दुस सत्तार आदींनी हुघली येथील फर्फुरा शरीफ दर्ग्याला नुकतीच भेट दिली. याशिवाय कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलीट ब्युरोचे सदस्य पिनराई विजयन् हे हिंदु संसदेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वर्ष २०१५ मध्ये साम्यवाद्यांनी त्यांच्या तत्त्वप्रणालीला फाटा देत श्रीकृष्ण जयंती साजरी केली होती. शबरीमाला उत्सवाच्या वेळीही साम्यवाद्यांनी यात्रेकरूंचा निवास आणि अल्पाहार यांची सोय केली होती. डाव्यांच्या या पालटत्या भूमिकेविषयी बोलतांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येच्युरी म्हणाले, कुठल्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याने त्या धर्माची तत्त्वप्रणाली मान्य केली, असे होत नाही.

गुजरात शासनाकडे धर्मांतरासाठी १ सहस्र ७३५ हिंदूंची आवेदने

शीख आणि बौद्ध धर्मातील एकाही नागरिकाचे आवेदन नाही !
एकही हिंदु धर्मांतर करणार नाही म्हणून हिंदूंना 
धर्मशिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक !
     गांधीनगर - गुजरातमध्ये धर्मांतराच्या कायद्यानुसार धर्मांतर करायचे असल्यास कायदेशीर परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार धर्मांतर करण्यासाठी राज्यशासनाकडे गेल्या ५ वर्षांत १ सहस्र ८३८ आवेदने आली आहेत. त्यात १ सहस्र ७३५ म्हणजे ९४.४ टक्के हिंदूंचा समावेश असून त्यांनी धर्मांतर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
     एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार राज्यशासनाकडे ५७ मुसलमान, ४२ ख्रिश्‍चन आणि ४ पारशी नागरिकांनीही धर्मांतरासाठी आवेदने दिली आहेत. विशेष म्हणजे धर्मांतरासाठी शीख आणि बौद्ध धर्मातील एकाही नागरिकाने आवेदन दिलेले नाही. शासनाकडे आलेल्या एकूण आवेदनांपैकी ८७८ इच्छुकांना राज्यशासनाने धर्मांतराची अनुमती दिली आहे. धर्मांतर करण्यामागे वैवाहिक कारणही असू शकते, असे तज्ञांचे मत आहे. अनेकदा पती-पत्नी भिन्न धर्माचे असल्यामुळे त्यांना धर्मांतर करणे भाग पडते.

पाकमधून गुजरातमध्ये घुसखोरी करणारे ३ आतंकवादी ठार

सोमनाथ मंदिरावर आक्रमण करण्यासाठी केली होती घुसखोरी
हिंदूंनो, आतंकवाद्यांपासून तुमच्या श्रद्धास्थानांचे रक्षण करण्यासाठी आता तरी संघटित व्हा !
      नवी देहली - पाकिस्तानातून समुद्रमार्गे गुजरातमध्ये घुसलेल्या १० आतंकवाद्यांपैकी ३ जणांना ठार मारण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. अन्य ७ आतंकवाद्यांचा सुगावा लागला असल्याची माहितीही सुरक्षा दलातील सूत्रांनी दिली. हे आतंकवादी गुजरातमधील सोमनाथ मंदिरावर आक्रमण करण्यासाठी आले होते.
     पाकिस्तानमधून आलेल्या या आतंकवाद्यांविषयी गुप्तचर यंत्रणांना आधीच माहिती मिळाली होती. त्यामुळे सतर्क झालेल्या सुरक्षा यंत्रणांनी या आतंकवाद्यांना शोधण्यासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम हाती घेतली होती. सात आतंकवादी कुठे लपले आहेत, याची खात्रीशीर माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळालेली आहे. त्यांच्या विरोधात लवकरच निर्णायक कारवाई करण्यात यश येईल, असे सुरक्षा अधिकार्‍याने म्हटले आहे. हे सर्व आतंकवादी लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद या संघटनांचे सदस्य असण्याची शक्यता आहे.

(म्हणे) 'दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या सत्यनिष्ठ विचारांचा खून सनातनी प्रवृत्तींनी केला !'

महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या निदर्शनांत हिंदुद्वेषी गरळओळ ! 
     सातारा, १६ मार्च (वार्ता.) - सध्या देशामध्ये जगण्याचा हक्क मागणारे शेतकरी, आदिवासी, अल्पसंख्यांक, दलित मुले यांच्यावर देशप्रेमाचे मुखवटे चढवून दडपशाही चालू आहे. दडपशाही करणारे मोकाट असून पाणी, आरोग्य, शिक्षण, सुरक्षित जीवन यांची मागणी करणार्‍या सर्वसामान्यांना देशद्रोही ठरवण्याचे मानवताविरोधी कार्य वेगाने चालू आहे. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि कलबुर्गी यांच्या सत्यनिष्ठ विचारांचा खून सनातनी प्रवृत्तींनी केला, असा आरोप महाराष्ट्र लोकशाही आघाडी या पक्षाने जाहीर निदर्शनांद्वारे केला. (या तिघांचा खून कोणी केला, हे अद्याप सिद्ध झालेले नसतांना अशा प्रकारे आरोप करणे, ही कुठली सहिष्णुता आणि मानवता आहे ? - संपादक) 

गहाळ धारिकांच्या शोधासाठी समिती स्थापन

शासनाने चौकशी करण्यासह संवेदनशील विषयांच्या संदर्भात दायित्वशून्य वर्तन 
करणार्‍या उत्तरदायींना कठोर शिक्षा करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची घोषणा !
इशरत जहाँ प्रकरण
    नवी देहली - इशरत जहाँ प्रकरणातील गहाळ झालेल्या धारिकांचा शोध घेण्यासाठी केंद्रशासनाकडून गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव बी.के. प्रसाद यांची एकसदस्यीय समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. या गहाळ धरिकांसाठी दुसरा पर्याय ठरवणे किंवा यांचा शोध घेणे यांवर ही समिती कार्य करणार आहे.
१. याप्रकरणी गृहमंत्रालयाने दाखल केलेल्या अनेक पुराव्यांची कागदपत्रे बेपत्ता आहेत. इतक्या संवेदनशील प्रकरणातील धारिका गहाळ कशा झाल्या ? याचीही ही समिती चौकशी करणार आहे. 
२. ही समिती वर्ष २००४ मध्ये चकमकीत ठार झालेल्या इशरतविषयीची कागदपत्रे जतन करणार्‍या यंत्रणेची चौकशी करणार आहे.

छगन भुजबळ यांना अटक म्हणजे काळाने उगवलेला सूड !

दैनिक सामनामधून भुजबळ यांच्यावर शिवसेनेने ओढले आसूड
     मुंबई - राज्याचे गृहमंत्री असतांना छगन भुजबळ यांनी अनेकांना कारागृहात पाठवले. ज्यांनी त्यांचे ऐकले नाही, अशा अनेकांना खोटी प्रकरणे तयार करून, पोलिसी यंत्रणेचा अपवापर करून कारागृहात पाठवले. मुंबई विद्यापिठाचे तेव्हाचे कुलगुरु शशिकांत कर्णिक हे त्यांच्याच कारस्थानाचे बळी ठरले. आज भुजबळही कारागृहात गेले आहेत. हा राजकीय सूड नसून काळाने उगवलेला सूड आहे, अशा शब्दात दैनिक 'सामना'च्या अग्रलेखातून भुजबळ यांच्यावर शिवसेनेने आसूड ओढले आहेत. 

शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसंगी कर्जही काढू ! - गिरीश महाजन

     मुंबई, १६ मार्च (विशेष प्रतिनिधी) - राज्यात पाण्याची समस्या गंभीर होत आहे. अनेक वर्षांपासून सिंचन प्रकल्प रखडल्याने प्रकल्पाच्या किमती पुष्कळ वाढल्या आहेत. सध्या ९० सहस्र कोटी रुपये यांचे बांधकामाधीन प्रकल्प आहेत. अर्थसंकल्पात विभागाला ८ सहस्र कोटी रुपयांचे प्रावधान होते; मात्र ते पर्याप्त नाहीत. त्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता आहे. प्रसंगी कर्ज काढू; मात्र शेतकर्‍याला शाश्‍वत पाणी, वीज मिळाल्यास खर्‍या अर्थाने शेतकरी सुखी आणि समृद्ध होऊ शकेल, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री श्री. गिरीश महाजन यांनी १५ मार्च या दिवशी केले. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते.

इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट या चळवळीत सहभागी व्हा !

     इसिसच्या भारतप्रवेशामुळे इस्लामी राज्य कि हिंदु राष्ट्र ?, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशांच्या विरोधात लढण्यासाठी हिंदूंनी भारतीय पोलीस आणि सैन्य यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे. प्रत्येक भारतियाने इस्लामी राज्याच्या (इस्लामिक स्टेटच्या) विरोधात लढण्यासाठी १४ हिंदुत्ववादी संघटना एकत्र येऊन सिद्ध झालेल्या इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट या चळवळीत सहभागी झाले पाहिजे. - श्री. मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

पथकरामध्ये वाहनसंख्या अल्प दाखवून कंत्राटदारांकडून शासनाची फसवणूक

पथकर वसुलीच्या प्रकरणाची राज्य शासनाने निष्पक्षपणे चौकशी 
करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, ही अपेक्षा !
     पुणे - मुंबईत प्रवेश करतांना ५ पथकर नाक्यांवर पथकर द्यावा लागतो; मात्र तेथे कंत्राटदारांकडून वाहनांची संख्या अल्प दाखवली जाते. कंत्राटदारांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वाहनांची संख्या दाखवतांना जुलै २०१३ ते जुलै २०१४ या १ वर्षाच्या कालावधीतील ६ दिवसांच्या वाहनांची संख्या दाखवलीच नाही. तरीही महामंडळाने कंत्राटदाराकडून वाहनांच्या संख्येविषयीचा अहवाल स्वीकारला. त्यामुळे अप्रत्यक्षपणे शासनाच्या उत्पन्नावर परिणाम होत असून वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या सर्व गोष्टींना महामंडळ आणि शासन कारणीभूत असल्याचा आरोप पथकर अभ्यासक संजय शिरोडकर यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे.
     ते पुढे म्हणाले की, वाशी, मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), दहिसर, ऐरोली, मुलुंड (शास्त्री रस्ता) येथे असणार्‍या ५ पथकर नाक्यांतून जाणार्‍या वाहनांच्या संख्येची माहिती मिळवण्यासाठी महामंडळाने जुलै २०१५ मध्ये वाहनांचे चित्रीकरण केले होते.

संगमनेरमध्ये (जिल्हा नगर) गोवंशासमवेत गायींचीही उघडपणे हत्या - पोलिसांची स्वीकृती

शासन आणि पोलीस प्रशासन यांनी गोवंश हत्या बंदी कायद्याची
कठोरात कठोर अंमलबजावणी करावी, ही अपेक्षा !
      संगमनेर - शहरातील अवैध पशूवधगृहातून गोवंश हत्येसमवेत गायींचीही हत्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. तसेच गोवंश हत्या बंदी १०० प्रतिशत होत असल्याचा दावाही त्यांनी पत्रकात केला आहे. ओमासे यांनी अवैध पशूवधगृहांवर केलेल्या कारवाईची माहिती पत्रकारांना दिली.
     यात म्हटले आहे की, २० जानेवारी २०१६ या दिवशी संगमनेरमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या वेळी धर्मांधांनी १० गायींची हत्या केल्याचे आढळले होते. त्यानंतर पोलिसांनी शहरातील विविध भागांमध्ये पुन्हा ७ वेळा धाडी टाकल्या.

जेएन्यूतील कन्हैया कुमारसह ४ विद्यार्थ्यांना विद्यापिठातून काढून टाकण्याची उच्चस्तरीय समितीची शिफारस

     नवी देहली - देशद्रोही घोषणा देणार्‍या जेएन्यूतील कन्हैया कुमार याच्यासह ४ विद्यार्थ्यांना विद्यापिठातून काढून टाकण्याची शिफारस विद्यापिठाच्या उच्चस्तरीय समितीने विद्यापिठाच्या कुलगुरूंकडे केली आहे. या प्रकरणाविषयी जेएन्यूचे कुलगुरु एम्. जगदीशकुमार अंतिम निर्णय घेणार आहेत.
   कन्हैया कुमार याच्यासह २१ जणांना या विषयी नोटीस पाठवण्यात आली असून १६ मार्चपर्यंत या नोटिशीला उत्तर देण्यास सांगितले आहे, अशी माहिती कुलगुरु एम्. जगदीशकुमार यांनी १४ मार्च ला एका पत्रकाच्या माध्यमातून दिली. या विद्यार्थ्यांपैकी उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांचा भ्रमणसंगणक जप्त करण्यात आला आहे.

विहिंपचे कार्यकर्ते राजू यांच्या मारेकर्‍यांवर त्वरित कारवाई करा ! - निपाणी येथे निवेदन

तहसीलदार पुजारी (मध्यभागी निवेदन स्वीकारतांना)
यांना निवेदन देतांना विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते
     निपाणी (जिल्हा बेळगाव), १६ मार्च (वार्ता.) - १४ मार्च या दिवशी म्हैसूर येथे विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते राजू यांच्या मारेकर्‍यांना तात्काळ अटक करावी, त्याचप्रकारे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हत्यांच्या वाढत्या घटना पहाता त्यांना संरक्षण देण्यात यावे. भाग्यनगर येथील खासदार असदुद्दीन औवेसी याने 'भारतमाता की जय' म्हणण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्याची खासदारकी रहित करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन निपाणी येथे तहसीलदार पुजारी यांना विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने देण्यात आले. या वेळी सर्वश्री नीलेश हत्ती, योगेश चौगुले, अजित पाटील, राजेश मुरंत, सागर श्रीखंडे, दुर्गा सेनेच्या सुचित्रा कुलकर्णी, श्रीराम सेना, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदु जनजागृती समिती, बजरंग दल, विहिंप यांसह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

बोधेगाव (जिल्हा नगर) येथील दोन मंदिरांतील दानपेट्या फोडून रकमेची चोरी

     आणखी किती घटना झाल्यावर मंदिरातील दानपेट्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन उपाययोजना करणार आहे ? वारंवार मंदिरात होणार्‍या चोरीच्या घटना या कायदा सुव्यवस्था मोडीत निघाल्याचे लक्षण आहे. 
     शेवगाव (जिल्हा नगर), १६ मार्च - येथील बोधेगावमधील श्री बोधेश्‍वर मंदिर आणि जैन मंदिर या दोन्ही मंदिरांतील दानपेट्या चोरांनी १४ मार्च या दिवशी रात्री चोरून नेल्याची घटना घडली आहे. श्री बोधेश्‍वर मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चोरून नेऊन ती जवळच असलेल्या शेतात नेऊन फोडली. त्यानंतर त्या चोरट्यांनी जैन मंदिराचे लोखंडी प्रवेशद्वार तोडून मंदिरातच दानपेटी फोडली. सदर दोन्ही घटना १५ मार्च या दिवशी पहाटे उघडकीस आल्या. या दोन्ही दानपेट्यांमधून चोरट्यांनी लक्षावधी रुपये चोरले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनचे संकेतस्थळ आतंकवादी संघटनेकडून 'हॅक'

गृह विभाग आतंकवाद्यांच्या 'सायबर' 
युद्धाला कसे सामोरे जाणार आहे ?आतंकवाद्यांकडून होणारी
 ही 'सायबर' चाचेगिरी रोखण्यासाठी गृह विभागाने सज्ज रहाणे आवश्यक ! 
पुणे, १६ मार्च - येथील हिंजवडीमधील माहिती-तंत्रज्ञान आणि संगणकीय आस्थापनांसाठी असलेल्या हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनचे 'hiapune.in' हे संकेतस्थळ एका आतंकवादी संघटनेकडून 'हॅक' करण्यात आले आहे. ते संकेतस्थळ मुसलमानविरोधी आतंकवादाविरुद्ध कार्यरत असलेल्या 'फल्लागा समूह' ने 'हॅक' केले आहे. हिंजवडी असोसिएशनच्या संकेतस्थळावर 'हॅक्ड बाय फल्लागा टीम' असा मजकूर दाखवण्यात येत आहे. यामुळे जागतिक दर्जाचे 'आयटी पार्क'ही आतंकवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

देशापुढील समस्यांकडे भांडवलशाही व साम्यवाद यांच्या दृष्टीकोनातून न पहाता सनातन हिंदु धर्माच्या दृष्टीने पहायला हवे. तरच राष्ट्राचा उद्धार होऊ शकेल ! - डॉ. दुर्गेश सामंत.हिंदूंच्या देवतांना सेल्फी काढत असतांना दाखवले !

सध्या कुणीही यावे आणि टपली मारून जावे, अशी हिंदूंची स्थिती झाली आहे.
सहिष्णुतेच्या नावाखाली वावरणार्‍या हिंदूंना कुणीही भीक घालत नाही, हे लक्षात घ्या !
सेल्फीगॉडस् डॉट टम्बलर डॉट कॉम या संकेतस्थळाचा हिंदुद्रोह
     मुंबई - सध्या भ्रमणभाषवरून स्वत:ची छायाचित्रे काढण्याची (सेल्फी) जी टूम निघाली आहे, त्यावर आधारित सेल्फीगॉडस् डॉट टम्बलर डॉट कॉम या संकेतस्थळावर हिंदूंच्या देवता सेल्फी काढत असतांनाची चित्रे प्रकाशित करण्यात आली आहेत. ही चित्रे येथील अद्रिता दास या चित्रकार महिलेने काढली असून या चित्रांमध्ये हनुमान, राधा आणि श्रीकृष्ण आदी देवतांच्या चित्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दास यांनी इतर धर्मियांच्या श्रद्धास्थानांची चित्रे काढण्याचे टाळले आहे. (इस्लामच्या प्रेषिताचा अवमान केल्याविषयी केरळमध्ये एकाचा हात तोडण्यात आला, तर फ्रान्समध्ये चार्ली हेब्दो वृत्तपत्राच्या कार्यालयावर आक्रमण करण्यात आले. यामुळे अशा धर्माच्या वाटेला कुणी जात नाही. हिंदु धर्मीय मात्र गांधींच्या अहिंसेच्या मार्गाने चालत असतांनाही असहिष्णुतेची टीका सहन करतात. असे प्रकार रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे ! - संपादक)


भारतीय सैनिक करणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनीतीचा अभ्यास !

भारतीय सैनिकांनी युद्धनीतीचा अभ्यास करण्यासह शत्रूच्या 
विरोधात त्याचा प्रत्यक्ष वापर करावा, ही अपेक्षा !
     पुणे, १६ मार्च - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनीतीचा अभ्यास करण्याचा निर्णय भारतीय सैन्याने केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून १४ मार्च या दिवशी हिंदवी स्वराज्याची तीर्थक्षेत्रे असलेल्या दुर्गांना (किल्ल्यांना) सायकलवरून भेट देण्यासाठी भारतीय सैनिकांचा एक गट अभ्यासाच्या मोहिमेस निघाला आहे. औंध येथील सैन्यतळावर नियुक्त असलेले माहिती अधिकारी ब्रिगेडियर आलोक चंद्रा यांनी सदर मोहिमेचा प्रारंभ केला. सदर संघात मराठा लाईट इन्फ्रंट्रीच्या १० सैनिकांचा त्यात सहभाग आहे. 
     पुढील १० दिवसांत हा संघ लोहगड, रायगड, तोरणा, राजगड आणि सिंहगड अशा ६ दुर्गांना सायकलवरून भेट देणार आहे. या मोहिमेत सुमारे ३७५ किलोमीटर अंतर कापले जाणार असून २५ मार्च या दिवशी मोहिमेची सांगता होणार आहे.

जर ठरवले, तर ३६ घंट्यांमध्ये पाकिस्तान नष्ट होईल ! - भानुप्रताप बर्गे, साहाय्यक पोलीस आयुक्त, आतंकवादविरोधी पथक

     पिंपरी, १६ मार्च (वार्ता.) - भारतावर गेल्या ५ वर्षांमध्ये झालेल्या दीडशेहून अधिक आतंकवादी आक्रमणांमध्ये ८०० हून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. या प्रत्येक आतंकवादी कारवायांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे जगासमोर स्पष्ट झाले आहे. भारत हा लोकशाही तत्त्वावर चालणारा देश असल्याचा पाकिस्तान अपलाभ घेत आहे; मात्र जर भारताने ठरवले, तर अवघ्या ३६ घंट्यांमध्ये जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचे नाव नष्ट होईल, असे प्रतिपादन आतंकवादविरोधी पथकाचे साहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी केले. अखिल पिंपरी शिवजयंती महोत्सवांतर्गत आयोजित केलेल्या शिवचरित्र व्याख्यानमालेत ते बोलत होते.

अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणारे शासन धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यासाठी तत्पर का ? - मनसे

      पुणे - राज्य शासनाने नुकताच अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा तोडगा काढणारे शासन धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यासाठी तत्पर कशासाठी झाले, असा प्रश्‍न उपस्थित करत मनसेचे शहराध्यक्ष श्री. अजय शिंदे यांनी महानगरपालिकेने सिद्ध केलेल्या अनधिकृत धार्मिक संस्थांच्या यादीवर आक्षेप नोंदवला आहे. महानगरपालिकेने धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले होते. ते कोणत्या कालावधीत केले ? सर्वेक्षण करतांना धार्मिक स्थळांच्या प्रतिनिधींना विश्‍वासात घेतले होते का ?, असे प्रश्‍न मनसेने उपस्थित केले आहेत. (अनधिकृत बांधकामे नियमित करणारे शासन धार्मिक स्थळांनाही नियमित करणार का ? - संपादक)

होळीच्या वेळी 'रेन डान्स' करणार्‍यांना ५० सहस्रांचा दंड करा ! - अमित साटम, आमदार, भाजप

     'रेन डान्स' हा धर्मशास्त्रानुसार होळी या सणाचा भाग नाहीच. त्यामुळे वरील अपप्रकार करून होळी साजरी करणे हे चुकीचे आहे. राज्यात सहस्रो लिटर पाणीगळती होत असतांना आणि अवर्षणामुळे पिण्याच्या पाण्याचीही समस्या असतांना शासनाने त्या संदर्भातही तात्काळ उपाययोजना करावी, अशी अपेक्षा आहे. - संपादक 
     मुंबई - होळीच्या निमित्ताने 'रेन डान्स' करत पाण्याची नासाडी करणार्‍यांवर जरब बसवण्यासाठी कारवाई करा. मुंबईसारख्या शहरामध्ये पाण्याची नासाडी करणार्‍यांना ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठवा, अशी मागणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी केली आहे. मुंबई महापालिका आयुक्त अजय मेहता यांना या संदर्भात पत्र लिहून पाण्याची नासाडी करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी साटम यांनी केली आहे. 

विमानतळावर उतरतांना विमानाचे टायर फुटले, प्रवासी सुखरूप

      मुंबई - मुंबई विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली. विमानतळावर विमान उतरवतांना एअर इंडियाच्या विमानाचे टायर फुटले; मात्र क्रू मेंबरसह विमानातील सर्व १६८ प्रवासी सुखरूप आहेत. ही घटना १५ मार्चच्या रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली. एअर इंडियाचे हे विमान नागपूरहून मुंबईला आले होते. तेव्हा विमानाच्या डाव्या बाजूचे टायर अचानक फुटले.

कॉ. पानसरे हत्येप्रकरणी तक्रारदाराला न्यायालयात दाद मागण्याची समज देण्यात आली ! - मुख्यमंत्री

     मुंबई, १६ मार्च (विशेष प्रतिनिधी) - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी साक्षीदारास खुनाची धमकी दिल्याविषयी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा गुन्हा अदखलपात्र असल्याकारणाने त्यातील साक्षीदाराला धमकी देण्यात आल्याच्या संदर्भातील तक्रारीची दाद फिर्यादींनी संबंधित न्यायालयात मागायला हवी, अशी समज त्यांना देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी १६ मार्च या दिवशी विधान परिषदेत लेखी प्रश्‍नोत्तरात दिली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य सुनील तटकरे, हेमंत टकले, जयवंतराव जाधव आणि अनिल भोसले यांनी हा प्रश्‍न विचारला होता. 

मिरज, जत, ईश्‍वरपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने निवेदन

होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा ! 
     सांगली, १६ मार्च (वार्ता.) - होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी मिरज, जत आणि ईश्‍वरपूर येथे निवेदने देण्यात आली. जत येथे तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु धर्माभिमानी श्री. अजिंक्य राक्षे, श्री. बी.आर्. पाटील, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक उपस्थित होते. मिरज येथे प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. या वेळी भाजपचे सर्वश्री सतीश नलवडे, प्रकाश जोशी, शिवसेनेचे सर्वश्री गजानन मोरे, संदीप कदम, भास्कर पवार, शशिकांत वाघमोडे, अजित दाणेकर, शिवसेना उद्योग आघाडीचे श्री. तात्या कराडे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

महाराष्ट्रातील विविध समस्यांविषयी विधानसभेत झालेली प्रश्‍नोत्तरे

वैतरणा नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम चालू असल्याचे शासनाचे स्पष्टीकरण
     मुंबई, १६ मार्च (विशेष प्रतिनिधी) - वैतरणा नदीवरील पारगावचा पूल खचल्यामुळे दुरुस्तीअभावी तो कोसळण्याच्या अवस्थेत आहे. हा पूल १४ डिसेंबर २०१४ पासून रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. त्याची शासनाने पाहणी केली आहे का, अशी विचारणा आमदार विलास तरे यांनी विधानसभेतील तारांकित प्रश्‍नोत्तराच्या माध्यमातून केली. त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लेखी उत्तराद्वारे म्हटले आहे, हा पूल अवजड वाहतुकीसाठी डिसेंबर २०१४ पासून बंद करण्यात आला आहे. या पुलाच्या दुरुस्तीचे काम चालू आहे.

विक्स अ‍ॅक्शन ५०० एक्स्ट्रा या गोळ्यांवर बंदी !

    नवी देहली - पॅरासिटामॉल, फेनिलफ्राईन आणि कॅफिन या औषधांच्या एकत्रीकरणातून विक्स अ‍ॅक्शन ५०० एक्स्ट्रा या गोळ्या सिद्ध करण्यात येतात. या औषधांवरच केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे प्रॉक्टर अ‍ॅन्ड गॅम्बल या आस्थापनानेही विक्स अ‍ॅक्शन ५०० एक्स्ट्रा या गोळ्यांची विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिजैविक आणि वेदनाशामक औषधांसह एकूण ३४४ औषधांवर शासनाने नुकतीच बंदी घातली होती. भारत शासनाकडून नेमण्यात आलेल्या आरोग्य समितीनेही ही औषधे उपचारासाठी योग्य नसल्याची टिप्पणी केली आहे.

केरळ येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या

केरळमधील हिंसाचाराच्या वाढत्या घटना पाहून तेथे शासन 
नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे का, असा प्रश्‍न पडतो !
माकपच्या कार्यकर्त्यांवर संशय
     थिरुवन्तपुरम् - केरळ येथील काँग्रेसचे कार्यकर्ते सुनील कुमार यांची हत्या करण्यात आली. या हत्येमागे डेमोक्रॅटिक यूथ फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेेच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा संशय आहे. ही संघटना माकपची युवा शाखा आहे. आक्रमणकर्त्यांनी सुनील कुमार यांना दूरभाष करून घराच्या बाहेर बोलावले आणि त्यांच्यावर आक्रमण केले. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना कह्यात घेतले आहे. सुनील कुमार पूर्वी डेमोक्रॅटिक यूथ फ्रंट ऑफ इंडियाचे सदस्य होते. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सुनील कुमार यांच्या निर्णयावर माकपचे नेते असंतुष्ट असल्याचे सांगितले जाते.

कुठे निवडणुका आल्यावरच निवडून येण्यासाठी सभा घेणारे सर्व राजकीय पक्ष, तर कुठे केवळ राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात जागृती होण्यासाठी सभा घेणारी हिंदु जनजागृती समिती !

फलक प्रसिद्धीकरता

अशा राष्ट्रविरोधी लोकप्रतिनिधींना माघारी बोलवा !
     एम्आयएम्चे आमदार वारिस पठाण यांनी भारतमाता की जय म्हणणार नाही, असे वक्तव्य केले. याला भाजप-शिवसेनेच्या आमदारांसह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभेत तीव्र विरोध दर्शवला. त्यानंतर पठाण यांना विधानसभेतून अधिवेशन काळापर्यंत निलंबित करण्यात आले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Mai Bharatmata ki jay nahi kahunga ! - Maharashtrake vidhayak Varis Pathan 
Aise deshdrohi vidhayak ko Janata jawab puchhegi ?

जागो ! : मै भारतमाता की जय नही कहूंगा ! - महाराष्ट्र के विधायक वारिस पठाण
ऐसे देशद्रोही विधायक को जनता जवाब पुछेगी ?

आज गाजरवाडी, ता. निफाड (नाशिक) येथे हिंदु धर्मजागृती सभा

स्थळ : मारुति मंदिरासमोरील मैदान, गाजरवाडी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक 
वेळ : रात्री ८ भ्रमणभाष क्रमांक : ९४०४९ ५६४८१ 
हिंदूंनो, या धर्मजागृती सभेत अधिकाधिक
 संख्येने सहभागी होऊन आपले धर्मकर्तव्य बजावा !

आमदार प्रशांत ठाकूर यांना खारघर येथील हिंदुत्ववादी संघटनांकडून निवेदने

गोवंशहत्या आणि गोमांस वाहतूक करणार्‍यांवर कारवाईची 
आणि 'मुजफ्फरनगर अभी बाकी है' या हिंदुद्रोही लघुपटावर बंदी घालण्याची मागणी 

आमदार ठाकूर (उजवीकडून तिसरे) यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते

     मुंबई - मागील वर्षी भाजप-सेना शासन सत्तेवर येताच हिंदूंच्या धार्मिक भावनांची नोंद घेऊन अनेक वर्षे प्रलंबित असलेला 'गोवंशहत्या बंदी कायदा' राज्यात लागू केला; पण प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून कायद्याची म्हणावी तशी अंमलबजावणी होत नाही त्यामुळे गोहत्या करणारे उद्दाम झाले आहेत. नुकतेच २१ फेब्रुवारी २०१६ या दिवशी खारघर येथे १,८०० किलो गोमांस घेऊन जाणारे तीन टेम्पो, एक चारचाकी खारघर पथकरनाका परिसरात पकडले गेले होते. अवैधरित्या वाहतूक करण्यार्‍या तीन धर्मांधांना कह्यात घेण्यात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर आमदार श्री. प्रशांत ठाकूर यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. श्री. ठाकूर यांनी विषय समजून घेऊन कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. त्यांनी सदरील निवेदनांवर शेरा देऊन गुन्हेगारांच्या मागे कोणाचे वजन आहे, हे पाहणे आवश्यक असल्याचे सांगून विधानसभेत हे प्रश्‍न मांडणार असल्याचे सांगितले.

म्यानमारच्या अध्यक्षपदी क्याव यांची निवड

     नैपिताव (म्यानमार) - म्यानमारच्या अध्यक्षपदी तिन क्याव यांची निवड झाली आहे. संसदेतील कनिष्ठ सभागृहात मतदान घेऊन क्याव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. देशात वर्ष १९६२ पासून म्यानमारची सूत्रे सैन्याच्या कह्यात होती. त्यानंतर ५४ वर्षांनी प्रथमच लोकशाही पद्धतीने निवडून आलेले शासन सत्तेवर आले आहे.

रशिया सिरियातील सैन्य मागे घेणार

     मॉस्को - सिरियातील शांतता प्रक्रिया चालू होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सिरियातील रशियन सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाच्या सहकार्यामुळेच सिरियाचे राष्ट्र्राध्यक्ष बाशर अल् असद यांना इसिसविरोधी लढ्यात यश मिळाले आहे. तथापि सिरियातील हवाई आणि नाविक तळांवरील ताबा रशिया सोडणार नाही, असेही पुतीन यांनी स्पष्ट केले. अर्थात् रशियन सैन्य मागे घेण्यात आल्यानंतरही आतंकवाद्यांच्या विरोधातील लढाई जोमाने चालू ठेवण्याचा निर्धार सिरियन सैन्याने व्यक्त केला आहे.

आसारामजी बापू खटल्यातील तिघा साक्षीदारांची हत्या करणारा अटकेत

     कर्णावती - पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावरील कथित आरोपाच्या प्रकरणात तिघा साक्षीदारांच्या हत्या केल्याच्या प्रकरणी कार्तिक हलदार यास रायपूर (छत्तीसगड) येथून अटक करण्यात आली. हलदार याच्यावर अमरूत प्रजापती, कृपाल सिंह आणि अखिल गुप्त या तिघांची हत्या केल्याचा आरोप आहे. हलदारची चौकशी अजून चालू असून आणखी धरपकड होण्याची शक्यता आहे.


तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या मदर टेरेसा यांना सप्टेंबर २०१६ मध्ये संतपद बहाल करणार

समाजसेवेच्या नावाखाली गोरगरीब हिंदूंचे धर्मांतर करणारी व्यक्ती म्हणे संत !
पोप फ्रान्सिस यांची केली घोषणा
     व्हॅटिकन सिटी - तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या मदर टेरेसा यांना रोमन कॅथॉलिक चर्चकडून येत्या ४ सप्टेंबर २०१६ या दिवशी संतपद बहाल करण्यात येणार आहे. ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी १५ मार्चला येथे ही घोषणा केली. ख्रिस्त्यांमध्ये संत ही उपाधी मिळवण्यासाठी संबंधित व्यक्तीचे २ चमत्कार असणे, आवश्यक असते.प्रकल्प पूर्ण न करणार्‍या इयत्ता चौथीतील हिंदु विद्यार्थिनीला वर्गशिक्षिकेकडून मारहाण

हिंदूंनो, आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायचे कि नाही, ते आताच ठरवा !
  • मालाड येथील सेंट फ्रान्सिस शाळेचा हिंदुद्रोह
  • युवा सेनेच्या कारवाईनंतर शाळेकडून क्षमापत्र
     मुंबई - प्रकल्प पूर्ण न करणार्‍या इयत्ता चौथीतील हिंदु विद्यार्थिनीला पुष्कळ मारहाण केल्याच्या निषेधार्थ युवा सेनेने मालाडच्या सेंट फ्रान्सिस शाळा प्रशासनाला खडसवले, तसेच आंदोलनही केले. त्यानंतर शाळा प्रशासनाने क्षमापत्र देत संबंधित वर्गशिक्षिकेवर कारवाई करणार असून पुन्हा असा प्रकार घडणार नाही, असे आश्‍वासन दिले. संबंधित विद्यार्थिनीची आई रुग्णालयात असल्याने ती प्रकल्प पूर्ण करू शकली नाही, तरीही वर्गशिक्षिकेने विद्यार्थिनीला पुष्कळ मारहाण केली होती. विद्यार्थिनीच्या पालकांनी युवा सेनेकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी वरील कारवाई केली.

आपल्या देशात कार्व्हर का निर्माण होत नाहीत ?

     जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होते. गुलामगिरीच्या काळात सभोवताली आपल्या समाजबांधवांवर होणारे अत्याचार पाहून मन खिन्न झाले, तरी मनाचा तोल ढासळू न देता त्यांनी शिक्षण जिद्दीने पूर्ण केले. स्वतःच्या कार्याचा उपयोग इतर कृष्णवर्णीय बांधवांना व्हायला पाहिजे, या जाणिवेने त्यांनी आपले आयुष्य शेतीविषयक संशोधनाला वाहून घेतले. आयुष्यभर कोणत्याही पदाची, पैशाचा मोबदला यांचा हव्यास न धरता आपले कार्य करत राहिले. अमेरिकेला घडवणार्‍या महानायकांमध्ये आज कार्व्हर यांचा उल्लेख केला जातो. या लेखात लेखिकेने वापरलेला कार्व्हर हा शब्द जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनाच उद्देशून वापरला आहे, असे लक्षात येते.

ओवैसी, तर मग तुम्ही काय बोलणार ?

     उदगीर (जिल्हा लातूर) येथील एका जाहीर सभेत एम्आयएम्चे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी माझ्या गळ्याला सुरी लावली, तरीही भारतमाता की जय म्हणणार नाही. तसे बोलावे असे घटनेत कुठेही नमूद नाही, असे विखारी प्रतिपादन केले आहे. असे बोलणार नाही, तर मग काय बोलणार, हे का नाही सांगितले ? तसे बोलणार नाही, हे सांगतांनाही अशांकडून भारतमाता की जय हे आपसूकच बोलले जात आहे ! ओवैसींनी आजपर्यंत अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत आणि त्यांची ती मालिका आजही तशीच असल्याचे अधोरेखित होत आहे.

महाराष्ट्रातील थोर हिंदु आणि मराठी पत्रकारितेचे पितामह विष्णुशास्त्री चिपळूणकर !

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने...
विष्णुशास्त्री चिपळूणकर
    महाराष्ट्रातील थोर हिंदूंची सूची सिद्ध केली, तर पत्रकारितेच्या क्षेत्रातील योगदानासाठी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल ! अवघे ३२ वर्षे आयुष्य लाभलेल्या या विचारशास्त्र्यांनी स्वधर्म अन् स्वदेश निष्ठा यांच्या बळावर महाराष्ट्रात विचारक्रांती घडवली ! त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा लोकमान्य टिळकांसारखा शिष्य घडवला. शालापत्रक, निबंधमाला, काव्येतिहास संग्रह आदी मासिकांचे क्रमाने संपादन करणारे आणि मराठा आणि केसरी या दैनिकांचे एकाच वेळी संपादकपद भूषवणारे विष्णुशास्त्री मराठी पत्रकारितेतील पितामह होते. त्यांचे स्थान मराठी पत्रकारितेत आणि विचारवंतांत शककर्त्यासारखे आहे. या थोर हिंदूने भारतियांसाठी दिलेले योगदान येथे देत आहे.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

पंडित नथुराम गोडसे यांनी गांधीहत्या करण्यामागे न्यायालयात सांगितलेल्या १५० प्रमुख कारणांपैकी एक कारण !

     ६ मे १९४६ या दिवशी समाजवादी कार्यकर्त्यांच्या संमेलनाला संबोधित करतांना गांधींनी मुस्लीम लीगच्या हिंसेसमोर जनतेला आहुती देण्याचे आवाहन केले होते.
हा इतिहास ज्ञात नसलेले काँग्रेसवाले राष्ट्रद्रोहीच नव्हेत का?

जात्यंध आणि ब्राह्मणद्वेष्टे तथाकथित विचारवंत !

     वन्दे मातरम् हे गीत बंकीमचंद्र या ब्राह्मणाने मुसलमानांच्या द्वेषापोटी लिहिले आहे. असे गीत राष्ट्रगीत म्हणून मी का म्हणावे, असा प्रश्‍न राष्ट्रद्रोही प्रा. कांचा इलाय्या यांनी केला आहे.

स्त्रियांना समानाधिकार मिळूनही त्यांच्यावरील अत्याचार आणि बलात्कार यांचे प्रमाण न्यून न होण्याची काही कारणे

     आज स्त्रियांना समानाधिकार मिळाला. समानतेची वागणूक मिळावी; म्हणून अनेक दंडविधी (कायदे) झाले; परंतु स्त्रियांवरचे अत्याचार आणि बलात्कार थांबले नाहीत. स्त्रिया आणि मुली यांवर ओळखीच्या माध्यमातूनच बलात्कार होतात. याची काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. मुलींना मिळणारे अवाजवी स्वातंत्र्य
२. मुलामुलींची अतिरेकी मैत्री
३. मुलींची संख्या अल्प झाल्याने अनेक मुलांचे विवाहच होत नाहीत. त्यामुळे ते असे चुकीचे मार्ग शोधतात.
(संदर्भ : सदाचार आणि संस्कृती, एप्रिल २०१३)

साधकांनी कारागृहात राहून केलेली साधना

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव !
    वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेअंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, याविषयी अन्य सूत्रे येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

कु. विश्‍व आय्या (वय ९ वर्षे) याच्या जन्मापूर्वी त्याच्या आईला आणि जन्मानंतर त्याला झालेले त्रास

कु. विश्‍व आय्या
१. कु. विश्‍वच्या जन्मापूर्वी त्याच्या आईला झालेले त्रास
१ अ. गर्भारपणात दिवस-रात्र उलट्या होणे : ज्या दिवसापासून मला दिवस राहिले आहेत, हे कळले, त्या दिवसापासून मला उलट्यांचा पुष्कळ त्रास चालू झाला. प्रारंभी असा त्रास होतो, असे सगळे जण मला सांगून धीर देत होते; परंतु तीन महिन्यांनंतरही (मासांनंतरही) उलट्यांचा त्रास न्यून झाला नाही. विश्‍वचा जन्म होईपर्यंत उलट्यांचा त्रास झाला. या काळात मी कधी आवडीने काही खाल्ले, असे झाले नाही. अगदी पाणी प्यायले, तरी उलटी व्हायची. प्रतिदिन ८ ते १० उलट्या व्हायच्या. रात्रीही उलट्यांचा त्रास व्हायचा.
१ आ. कुठल्याही आध्यात्मिक कृती करायला न आवडणे, हा जीव नकोच, असा विचार येणे : गर्भधारणा झाल्यानंतर साधारण तीन महिन्यांनंतर मला कुठलेही उपाय करावेसे वाटत नव्हते. मंदिरात जावेसे वाटत नव्हते. घरी यजमान गजानन महाराजांचे पारायण करायचे, तेही आवडत नव्हते. पुष्कळ चिडचिड व्हायची. हा जीव नकोच, असे विचार माझ्या मनात यायचे. त्यानंतर आपण चुकीचे वागत आहोत, हे कळायचे आणि प.पू. गुरुदेवांजवळ क्षमा मागून तुमच्या या जिवाचे रक्षण करा, अशी प्रार्थना व्हायची.

नम्र, आश्रमाप्रती भाव असणारे आणि परिपूर्ण सेवा करून साधकांचा विश्‍वास संपादन करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. बाबूलाल चौधरी !

श्री. बाबूलाल चौधरी
      श्री. बाबूलाल चौधरी हे वर्ष २००६ पासून रामनाथी आश्रमात बांधकामाच्या कामानिमित्त येत आहेत. ते बिहार राज्यातील आहेत. साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. नम्रता
       दादा आश्रमात आल्यावर प्रत्येकाला जय श्रीराम म्हणायचे. आता ते कृष्णाचा जप करू लागले आहेत. ते त्यांना भेटणार्‍या लहान-मोठ्या प्रत्येक व्यक्तीला नमस्कार म्हणतात.
२. सर्वांचे आवडते दादा !
      बांधकामाच्या प्रत्येक उपविभागात साधकांना बाबूलालच सेवेसाठी हवे असतात. सर्वांचे ते आवडते आहेत. आता जागा अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छ करण्यासाठी त्यांचे मतही विचारात घेतले जाते.
- श्री. सुरेश कदम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

जलद गतीने ईश्‍वरप्राप्ती होण्याची दैवी गुरुकिल्ली : साधनेतील पंचसूत्री !

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ
    काही साधक अनेक वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार पूर्णवेळ साधना करत असूनही त्यांची अपेक्षित अशी आध्यात्मिक प्रगती झाली नसल्याचे लक्षात येतेे, तसेच काही जणांनी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर प्राप्त करूनही त्यानंतर त्यांची साधनेत घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे अनेक साधक साधनेत प्रगती होण्यासाठी मी काय प्रयत्न करणे अपेक्षित आहे ? असे उत्तरदायी साधकांना सातत्याने विचारत असतात.
      अशा साधकांनी त्यांच्या साधनाप्रवासामध्ये मन, बुद्धी आणि कृती यांच्या स्तरावरील विविध अडथळ्यांवर मात करण्यासाठी पुढील पंचसूत्रीनुसार प्रयत्न करून जलद आध्यात्मिक उन्नती होत असल्याची अनुभूती घ्यावी.
१. स्वतःमध्ये विचारण्याची वृत्ती निर्माण करणे
        सेवेच्या संदर्भातील महत्त्वाची, तसेच अन्य सूत्रे उत्तरदायी साधकांना विचारून न घेता साधक स्वतःच्या मनानुसार सेवा करत रहातात. त्यामुळे त्यांच्याकडून सेवेत अनेक अक्षम्य चुका होत असल्याने साधनेची अपरिमित हानी होते. परिपूर्ण आणि भावपूर्ण गुरुसेवा हे शीघ्रतेने प्रगती करण्याचे माध्यम आहे, हे लक्षात घेऊन साधकांनी सेवेतील प्रत्येक सूत्र विचारून घेतल्यास त्यांच्यामध्ये विचारण्याची वृत्ती अल्पावधीत निर्माण होईल.

उज्जैन येथील सिंहस्थ पर्वानिमित्त धर्मप्रसारासंबंधी सेवेतील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करणे आणि त्या वेळी मोर अन् कुत्रे यांच्या कर्कश ओरडण्यावरून सूक्ष्मातून आक्रमण झाल्याचे लक्षात येणे; पण श्रीकृष्णाच्या कृपेने साधकांचे रक्षण होणे

पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
१. नेहमी सकाळी मोर आनंदाने ओरडत असल्याचा आवाज ऐकू येणे; पण २२.२.२०१६ या दिवशी सकाळी उठल्यावर सिंहस्थ पर्वासाठी प्रार्थना करतांना अचानक मोर आणि कुत्रे यांचे कर्कश ओरडणे ऐकू येणे : माघ पौर्णिमा, कलियुग वर्ष ५११७ (२२.२.२०१६) या दिवशी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास मी झोपेतून उठल्यावर भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना केली, आजपासून उज्जैन येथील भिंतींवर पर्वानिमित्त धर्मप्रसारासंबंधी लिखाण लिहिण्यास प्रारंभ होणार आहे. त्यात प्रशासन, तसेच अन्य संस्था यांच्याकडून कोणतीही अडचण येऊ नये. आम्ही रहात असलेल्या ठिकाणी अन्य दिवशी सकाळी मोर आनंदाने ओरडत असल्याचा आवाज ऐकू येत असे; पण २२.२.२०१६ या सकाळी माझी प्रार्थना संपता-संपता मला अनेक मोरांचा कर्कश ओरडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. नंतर काही क्षणांतच सर्व दिशांनी एकाएकी कुत्र्यांचे ओरडणे चालू झाले. त्याच दिवशी दुपारी प्रत्यक्षात धर्मप्रसारासंबंधी लिखाण लिहायच्या भिंतीच्या ठिकाणी एका व्यक्तीने ते लिखाण लिहिणार्‍या साधकांकडे त्याविषयी चौकशी केली. नंतर दुसर्‍या दिवशी एका नेत्याने तेथील भिंतीवर धर्मप्रसाराविषयी लिखाण करण्यास विरोध केला.

साधकांनो, २०.३.२०१६ या दिवसापर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रलंबित येणे बाकी पूर्ण करा !


      जिल्हासेवक, लेखासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना
     संस्था स्तरावर सर्व जिल्ह्यांची येणे बाकी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे. येणे बाकी वेळेत पूर्ण न झाल्यामुळे ती रक्कम, तसेच त्या रकमेवरील व्याज यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यांनी विशेष प्रयत्न करून २०.३.२०१६ या दिवसापर्यंत येणे बाकी पूर्ण करावी.
प्रलंबित येणे बाकीचा जिल्हानिहाय आढावा पुढे देत आहे. 
 १. नियतकालिक सनातन प्रभातच्या विज्ञापनांची येणे बाकी
 
२. सनातन पंचांग २०१४च्या विज्ञापनांची येणे बाकी
३. वर्ष २०१५ च्या गुजराती भाषेतील पंचांगाच्या विज्ञापनांची येणे बाकी
मुंबई 
४. सनातन पंचांग २०१६च्या विज्ञापनांची येणेबाकी
५. गुरुपौर्णिमा २०१५ च्या स्मरणिका आणि विशेष स्मरणिका यांच्या विज्ञापनांची येणे बाकी
नाशिक, अकोला,

मृत्यूनंतर व्यक्तीच्या समवेत घर आणि ऐवज नव्हे, तर त्याने या जन्मी केलेली साधनाच रहाते !

श्री. कोंडिबा जाधव
      एका कुटुंबातील व्यक्तींचा प.पू. डॉक्टरांशी भेटीचा योग आला. त्या कुटुंबातील सर्वांची ते रहात असलेल्या गावातील घर विकून गोव्याला स्थलांतरित होण्याची सिद्धता (तयारी) होती; पण कुटुंबातील केवळ एका व्यक्तीने तिची ते घर विकण्याची सिद्धता नाही, असे प.पू. डॉक्टरांना सांगितले. त्या वेळी प.पू. डॉक्टर म्हणाले, एखादी वास्तू सोडतांना इतक्या यातना होत असतील, तर देह सोडतांना किती यातना होतील !
        यावरून आपण कधीतरी जग सोडून जाणार आहोत, हे त्रिवार सत्य आहे आणि त्या वेळी स्वतःच्या समवेत काहीच नेता येणार नाही, याचा आपल्याला विसर पडतो. आपण उगीच भावनेपोटी आयुष्यभर माझे माझे करत असतो. आपल्या समवेत येणार ती केवळ आपण आयुष्यभर केलेली साधनाच !, हे शिकायला मिळाले.
       प.पू. डॉक्टरांनी ही जाणीव करून दिली, याविषयी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे !
- श्री. कोंडिबा जाधव, ठाणे (२.५.२०१५)

प.पू. पांडे महाराज यांनी सांगितल्यानुसार प्रत्येकात देव आहे, याची अनुभूती घेणारी कु. सुप्रिया उकिरडे !

प.पू. पांडे महाराज, 
प.पू. पांडे महाराज
साष्टांग नमस्कार !
१. आत्म्याचे खरे स्वरूप ओळखणे आवश्यक ! : योगः कर्मसु कौशलम् । प्रत्येक कर्म ही आपली परीक्षा असते. केवळ महाविद्यालयातील शिक्षण हा आपला अभ्यास नसून प्रत्येक कर्म हे परिपूर्ण करणे, हा अभ्यास आहे. एकदा तुम्ही मला सांगितले, खोबरे हे करवंटीला चिकटलेले असते आणि ते वाळल्यानंतर करवंटीपासून दूर होते. आपल्यातील आत्म्याला असेच शरिरापासून दूर केल्यावर आपली साधना वाढेल. आपण काहीतरी पुण्य केले आहे; म्हणून देवाने आपल्याला साधनेत आणले.
२. प्रकृती विकारांनी भरलेली असते आणि आत्म्यात देव दिसतो, असे जाणवणे : प.पू. पांडे महाराज, एकदा तुम्ही मला सांगितले, आपण प्रत्येकाशी बोलतांना त्याच्या प्रकृतीकडे लक्ष न देता त्याच्यातील अंतरात्म्याला जाणून बोलायचे. मी तसे केल्यावर मला प्रकृती विकारांनी भरलेले असते आणि आत्म्यात देव दिसतो, असे जाणवले.

आपत्काळाविषयी महर्षींनी सतर्क करणे; पण राजकारण्यांनी त्याकडे दुर्लक्ष करणे, तर साधकांनी श्रद्धेने त्याप्रमाणे कृती करणे आणि त्या त्या प्रमाणे त्यांना फळ मिळणे

महर्षींची शिकवण आणि कार्य !
१. नाडीवाचन क्रमांक ५१मध्ये महर्षींनी देशाच्या राजाला शासन देण्याविषयी केलेले भाष्य आणि महर्षींची मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करण्याची तळमळ दर्शवणारे उदाहरण : महर्षि म्हणतात, हे कार्तिकपुत्री ((पू.) सौ. अंजली गाडगीळ यांना उद्देशून) पुढे भीषण प्रलयकाळ येणार आहे. आम्ही तुला साधकांच्या रक्षणासाठी प्रार्थना करण्यास सांगितली होती. तशी तू केलीस. आम्ही या संदर्भात राजालाही सांगून बघणार. जर त्याच्यात पालट झाला, तर ठीक आहे. नाहीतर त्यालाही आम्ही क्षमा करणार नाही. संकटकाळी राजाने आमच्याकडे यायला हवे; परंतु तसे तो करणार नाही.
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥

या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज 
सनातनचे श्रद्धास्थान
दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला न उमजणे, स्वतःचे 
दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था आल्यास तो जीव 
ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.
भावार्थ : दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. स्वतःचे स्वतःला न उमजणे म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो.
(संदर्भ :  सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     भारतातील हिंदूंनाच नव्हे, तर जगातील मानवजातीला आधार वाटतो हिंदु धर्माचा ! त्यामुळे जगभरचे जिज्ञासू अध्यात्म शिकण्यासाठी भारतात येतात. बुद्धीप्रामाण्यवादी, धर्मद्रोही आणि साम्यवादी यांचे तत्त्वज्ञान शिकण्यासाठी भारतात कोणीही येत नाही; पण हेही त्यांच्या लक्षात येत नाही ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

बोधचित्र

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

दुसर्‍याच्या चांगल्या गुणाचा अंगीकार करा !
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
गुणग्राहकता हा सद्गुण अंगिकारून दुसर्‍याच्या चांगल्या गुणाचा अंगीकार करावा. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

डाव्यांचा मंदिरप्रवेश !

संपादकीय
     सध्या महाराष्ट्रात महिलांचा मंदिरप्रवेश हा विषय जसा चर्चेचा आहे, तसा बंगाल आणि केरळ या राज्यांमध्ये डावे करत असलेल्या मंदिरप्रवेशाचा विषय घरोघरी चर्चेत आहे. भेद इतकाच की, महाराष्ट्रातील काही मूठभर पुरोगामी आणि शनीशिंगणापूरप्रेमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरलेला हा विषय सर्वत्र टीकेचा धनी ठरला, तर बंगाल अन् केरळ येथील डाव्यांचा मंदिरप्रवेश हा तेथील जनतेसाठी कुतुहलाचा विषय ठरला आहे. 
     भारत हा आध्यात्मिक देश आहे. या देशाला सर्वांत प्राचीन धर्म, मार्गदर्शक धर्मग्रंथ, थोर ऋषिमुनी, संत आदींची परंपरा आहे. म्हणूनच हा देश विश्‍वगुरुपदी आरूढ झाला आहे. आजची प्रणाली निधर्मी असली, तरी बहुसंख्य हिंदू आजही आस्तिक आहेत आणि हिंदु धर्मात सांगितल्याप्रमाणे साधना करून स्वत:च्या जीवनाचे कल्याण करून घेत आहेत. यातच हिंदु धर्माची महानता स्पष्ट होते. डाव्यांचे सर्वच उलटे असल्याचे म्हटले जाते. यास केरळ आणि बंगालमधील डावे अपवाद कसे असू शकतील ? त्यांना देवाचा प्रचंड तिटकारा. डावे आणि हिंदुद्वेष हे समीकरण गेल्या कित्येक दशकांपासून रूढ आहे. इतकेच नव्हे, तर प्रखर राष्ट्रवादी भूमिकाही त्यांच्या पचनी पडत नाही. अशा मंडळींना सध्या मंदिरांतील देवाच्या मूर्तीसमोर डोके टेकवतांना पाहून कुणाच्या भुवया उंचवणार नाहीत ? होय, हे खरे वाटत नसले, तरी ते सध्या घडत आहे आणि लाखो लोक उघड्या डोळ्यांनी हे दृश्य बघत आहेत.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn