Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

आज दासनवमी
पू. चत्तरसिंह इंगळे यांचा आज वाढदिवस
पू. विक्रम सावरकर यांची आज पुण्यतिथी

संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !

साधकांना सूचना 
     संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात इतर साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विनम्र अभिवादन !

तानाजी मालुसरे यांचा आज बलीदानदिन

इशरत जहाँ प्रकरणात खोटेपणा करण्यासाठी गृहविभागाच्या तत्कालीन अधिकार्‍याला सिगारेटचे चटके !

असहिष्णुता आणि लोकशाही यांचा डांगोरा पिटणार्‍या काँग्रेसचा आसुरी चेहरा उघड !
जिहादी आतंकवाद्यांचे समर्थन करण्यासाठी शासकीय अधिकार्‍याला
सिगारेटचे चटके देणारी काँग्रेस देशद्रोहीच होय ! काँग्रेसच्या या
देशद्रोहासाठी तिच्यावर बंदी घालून नेत्यांना कारागृहात डांबा !
     नवी देहली - इशरत जहाँ लष्कर-ए-तोयबाची जिहादी आतंकवादी असल्याची माहिती लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार्‍या तत्कालीन काँग्रेस शासनाचा खोटेपणा माजी गृहसचिव जी.के. पिल्लई यांनी नुकताच उघड केला. आता गृहविभागाचे निवृत्त अधिकारी आर्.व्ही. मणी यांनीही या संदर्भात गौप्यस्फोट केला आहे. एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, माझ्यावर या प्रकरणात राजकीय दबाव टाकण्यात येऊन न्यायालयात सादर करण्यासाठी दुसरे शपथपत्र लिहून घेण्यात आले होते. मी असे करायला सिद्ध नव्हतो, तेव्हा विशेष अन्वेषण पथकाच्या संतोष वर्मा या अधिकार्‍याने माझ्या पायाला पँट असतांनाच सिगारेटचे चटके दिले होते. केंद्रीय अन्वेषण विभागाची (सीबीआयची) एक महिला अधिकारी माझ्या मागे लागली होती. यामुळे माझे कुटुंब दहशतीखाली वावरत होते. या वेळी मणी यांनी सिगारेटचे चटके दिल्यामुळे भोके पडलेली पँट दाखवली.
मणी यांनी पुढे म्हटले की,
१. इशरत प्रकरणातील शपथपत्र ऑगस्ट २००९ मध्ये मीच बनवले होते. इशरत जहाँ आणि तिचे चार साथीदार लष्कर-ए-तोएबाशी संबंधित असल्याचे त्यात म्हटले होते.

सनातन संस्थेकडून मुंबई मिररला कायदेशीर नोटीस

दैनिक मुंबई मिररने प्रकाशित केलेल्या खोट्या वृत्ताचे प्रकरण
मनस्ताप झाल्याने हानीभरपाई देण्याची मागणी
      मुंबई - मुंबईहून प्रकाशित होणारे टाइम्स ग्रुपचे दैनिक मुंबई मिररने २५ फेब्रुवारी २०१६ या दिवशी प्रकाशित केलेल्या वृत्ताद्वारे सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी त्यांच्या अधिवक्त्यांच्या माध्यमातून मुंबई मिररला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या वृत्तामुळे श्री. मराठे यांना मानसिक त्रास झाल्याने हानीभरपाई देण्याची मागणी या नोटिशीद्वारे करण्यात आली आहे. ही नोटीस बातमी करणार्‍या अलका धूपकर, धर्मेंद्र तिवारी, बेनेट अ‍ॅण्ड कोलमन कंपनी लि., श्रीमती इंदू जैन आणि विनीत जैन यांना पाठवण्यात आली आहे.
या नोटिसीत म्हटले आहे की,
१. या वृत्तामुळे आमच्या अशिलांची (श्री. वीरेंद्र मराठे यांची) अपकीर्ती झाल्याचे दिसून येते. मृत्यू झालेले डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि प्रा. एम्.एम्. कलबुर्गी यांच्याशी आमच्या अशिलांचा काहीही व्यक्तीगत संबंध नाही.

माझ्या विरोधात षड्यंत्र रचण्यासाठी विदेशातून कोट्यवधींचे साहाय्य ! - पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू

     जोधपूर - १ मार्च या दिवशी येथील न्यायालयाबाहेर पत्रकारांना पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू म्हणाले, माझ्या विरोधात षड्यंत्र रचले गेले आहे. जम्मू-कश्मीरमधून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून आणखी माहिती मिळेल. या षड्यंत्रासाठी विदेशातून कोट्यवधी रुपये आले आहेत. लवकरच खरे-खोटे उघड होईल.

पेडेस्ट्रियन पिक्चर्स या संघटनेकडून सिद्ध करण्यात आलेल्या हिंदुद्वेषी ध्वनीचित्रफितींच्या विरोधात हिंदु विधीज्ञ परिषदेने शासनाला पाठवले पत्र !

२८ फेब्रुवारीला डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया या हिंदुद्वेषी 
संघटनेने मुंबईत विविध ठिकाणी या ध्वनीचित्रफिती दाखवल्या !
     मुंबई - पेडेस्ट्रियन पिक्चर्स या बेंगळुरू स्थित स्वयंसेवी संघटनेद्वारे राष्ट्रविरोधी आणि सांप्रदायिक हिंसा भडकवणार्‍या ध्वनीचित्रफिती (व्हिडिओ) आणि माहितीपट (डॉक्यूमेंटरी) प्रसारित करण्यात येत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे अन्वेषण करण्यात यावे, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेने शासनाकडे केली आहे.
     केंद्रीय गृह सचिव, राज्य गृह सचिव, मुंबई आणि बेंगळुरू येथील पोलीस आयुक्त यांना परिषदेने पत्र लिहिले आहे.
परिषदेने लिहिलेल्या पत्रातील निवडक सूत्रे !
१. हिंसेस उद्युक्त करणार्‍या या ध्वनीचित्रफितींमध्ये २०१४ या वर्षी उत्तरप्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगलींचे एकतर्फी वृत्तांकन करण्यात आले आहे. या दंगलींमध्ये हिंदूंकडून मुसलमानांवर अत्याचार करण्यात आले आणि सर्वच मुसलमान निष्पाप असल्याचे भासवण्याचा भयंकर प्रयत्न त्याद्वारे करण्यात आला आहे.

दूरचित्रवाहिनीवर स्मृती इराणी यांचे भाषण वाचले म्हणून धमकीचे २ सहस्रांहून अधिक दूरध्वनी !

जेएन्यूतील देशद्रोहाचे प्रकरण
५ जणांना अटक 
     थिरुवनंतपुरम् - जेएन्यू प्रकरणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे संसदेतील भाषण वृत्तवाहिनीच्या एका निवेदिकेने वाचून दाखवल्यावर तिला २ सहस्रांहून अधिक दूरध्वनी आले आहेत. या प्रकरणी ५ हिंदुत्ववाद्यांना अटक करण्यात आली आहे.
     महिषासुराची जयंती साजरी करणे, देशद्रोह मानला जाऊ शकतो का ? या विषयावर एशियानेट न्यूज या दूरचित्रवाहिनीने चर्चा ठेवली होती. या चर्चेच्या वेळी सूत्रसंचालन करणार्‍या निवेदिकेने दुर्गादेवीविषयी अपशब्द उच्चारल्याचा आरोप विविध हिंदुत्ववादी गट आणि कार्यकर्ते यांच्याकडून करण्यात आला आहे. 
      केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी मागील आठवड्यात संसदेत भाषण करतांना वर्ष २०१३ मध्ये जेएन्यूमध्ये दुर्गाष्टमीच्या वेळी महिषासुरदिन साजरा करण्यात आल्याची माहिती देतांना तेथे वितरित करण्यात आलेले पत्रक वाचून दाखवले होते. त्यामुळे काँग्रेसने केंद्रीय मंत्री ईराणी यांच्यावर दुर्गादेवीचा अवमान केल्याचा आरोप केला होता.

इसिसला बॉम्बसाठी रसद पुरवणार्‍या आस्थापनांत ७ भारतीय आस्थापने !

आतंकवाद नष्ट करण्याची भाषा करणार्‍या भारताचे भयानक वास्तव !
२० देशांच्या सूचीत भारत दुसर्‍या क्रमांकावर 
     अंकारा (तुर्की) - कॉनफ्लिक्ट आर्मामेन्ट रिसर्च (सीएआर्) या संघटनेने प्रसारित केलेल्या एका अहवालानुसार, इस्लामिक स्टेट (इसिस) घातक बॉम्ब आणि इतर दारूगोळा २० देशांतील आस्थापनांकडून होत असलेल्या साहित्य पुरवठ्यातून सिद्ध करीत आहे. या पुरवठा साखळीत ७ भारतीय आस्थापनांंचा समावेश असून २० देशांच्या सूचीत भारत दुसर्‍या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. (संबंधित भारतीय आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यासाठी केंद्रशासन काय पाऊले उचलणार आहे ? - संपादक)

शिक्षकाने विद्यार्थ्यांना लिहिण्यास सांगितले, मला मुसलमान बनायचे आहे !

असे धर्मांध शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करत असतील ? 
युरोपमधील ग्रुईन्सी देशातील घटना
      सेंट पीटर पोर्ट (ग्रुइन्सी, युरोप) - येथील बीकेंन्स माध्यमिक शाळेतील एका शिक्षकाने वर्गातील धार्मिक शिक्षणाच्या अंतर्गत १२-१३ वयोगटातील मुलांना गृहपाठ करून आणण्यास सांगितला. त्यात पालकांना पत्र लिहायला सांगून त्यात मला मुसलमान बनायचे आहे, असे लिहायला सांगितले. त्यामुळे पालक संतप्त झाले आहेत. ब्रिटनमधील तरुण सिरियामध्ये जिहादी बनण्यासाठी जात असतांना अशा प्रकारचा गृहपाठ मुलांना देणे अतिशय धोकादायक असून असा शिक्षक या शाळेत रहाण्याच्या लायकीचा नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

(म्हणे) कारागृहातील कैद्यांनी प्रसाद बनवला, तर त्यांनाही शांती मिळेल !

  • ढोंगी तृप्ती देसाई यांना कारागृहातील कैद्यांची नव्हे, तर स्वतःच्या प्रसिद्धीची काळजी आहे ! 
  • तृप्ती देसाई यांची बौद्धिक दिवाळखोरी ! 
      पुणे, २ मार्च (वार्ता.) - कळंबा कारागृहातील महिलांकडून कोल्हापूरच्या महालक्ष्मीदेवीसाठी प्रसादाचे लाडू बनवण्याचा तेथील जिल्हाधिकार्‍यांनी प्रस्ताव ठेवला आहे. कारागृहात गांजा सापडल्याचे कारण देत काही संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे. खरे तर गांजाचा आणि लाडूचा काय संबंध ? (ज्या ठिकाणी गांजा सापडतो, त्या ठिकाणचे पावित्र्य ते काय असणार ? साधी देवपूजा जरी करायची असेल, तरी शुचिर्भूतपणाला महत्त्व दिले जाते. इथे तर शक्तीपिठाच्या देवीचा प्रसाद बनवण्याचे सूत्र आहे. - संपादक) तेथील महिला कैद्यांनी प्रसाद बनवला, तर त्यांना शांती मिळेल. कैद्यांना चांगले काम मिळाले, तर समाजात चांगला संदेश जाईल, अशा शब्दांत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आपली बौद्धिक दिवाळखोरी (कैद्यांना अन्य कोणतेही चांगले काम देऊ शकतो. धर्मविषयक ज्ञान नसणार्‍या व्यक्तीने धर्मविषयक निर्णय चांगले कि वाईट यासंदर्भात सल्ले देणे हास्यास्पद आहे ! - संपादक)

सर्वोच्च न्यायालय पोलीस अधिकार्‍यांवरील खटला रहित करण्याच्या सुनावणीस सिद्ध

इशरत जहाँ प्रकरण
     नवी देहली - इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी आतंकवादी डेव्हिड हेडलीने दिलेल्या साक्षीनंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात पोलिसांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हेगारी खटला संपवण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सिद्धता दर्शवली आहे.
     हेडलीने इशरत जहाँ आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबाची आत्मघातकी आतंकवादी असल्याचा खुलासा केला होता. १५ जून २००४ या दिवशी कर्णावती (अहमदाबाद) येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीत इशरत मारली गेली होती. त्यानंतर मानवाधिकार संघटनांनी या चकमकीला बनावट ठरवले होते आणि इशरत आतंकवादी नव्हती, असा दावा केला होता. त्यानंतर काही गुजरात पोलिसांच्या विरोधात खटला दाखल दाखल करण्यात आला होता. नुकतेच माजी गृहसचिव जी.के. पिल्लाई यांनी या प्रकरणात तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिंदबरम् यांच्याकडून या प्रकरणी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात पालट करण्यात आला होता, असा गौप्यस्फोट केला होता. गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार या वादग्रस्त चकमक प्रकरणातील धारिकांचा नव्याने तपास करण्यात येणार आहे.

गुंटुरच्या (आंध्रप्रदेश) तेनाली महापालिकेत तेलगु देसमच्या दोन नगरसेवकांमध्ये हाणामारी !

निरर्थक लोकशाही !
     भाग्यनगर - आंध्रप्रदेशात गुंटुरमधील तेनाली महापालिकेत गुम्मादी रमेश आणि पासुपुलेती त्रिमुथुलु या तेलगु देसमच्या दोन नगरसेवकांमध्ये महापालिका सभागृहात हाणामारी झाली. रमेश यांनी पासुपुलेती यांचा शर्ट फाडला. अखेर महिला नगरसेवकांच्या मध्यस्थीनंतर ही हाणामारी थांबली. महापालिकेच्या इतिवृत्तातील नोंदीसंदर्भात दिशाभूल केली जात असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये वाद झाला. या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री आणि तेलगु पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी दिली आहे.

अमेरिकेतील शीख सैनिकांकडून सैन्याच्या विरोधात धार्मिक भेदभाव केल्याचा खटला !

     वॉशिंग्टन - अमेरिकेच्या सैन्यात कॅप्टन पदावर असणार्‍या सिमरत सिंह यांनी सैन्याच्या विरोधात खटला दाखल केला आहे. त्याने आरोप केला आहे की, कायम स्वरूपात धार्मिक परिधानाची अनुमती मिळण्यासाठी अनेक चाचण्यांना सामोरे जावे लागत आहे आणि त्या त्रासदायक आहेत. मागच्या वर्षी सिमरत याला तात्पुरत्या स्वरूपात दाढी वाढवणे आणि पगडी घालणे यांसाठी अनुमती मिळाली होती. अमेरिकेच्या सैन्याधिकार्‍यांना यांची निश्‍चिती करायची आहे की, दाढी वाढवल्याने आणि पगडी घातल्याने ते गॅस मास्क आणि शिरस्त्राण घालू शकतील, अथवा नाही. जर ते साध्य झाले, तर सिमरत यांना कायमस्वरूपी अनुमती देण्यात येईल.

स्वस्त स्मार्ट फोन देणारी कंपनी निघाली बोगस !

नोंदणीकृत पत्त्यावर आस्थापनाचे कार्यालयच नाही ! 
     नवी देहली - जगात सर्वात स्वस्त स्मार्ट फोन फ्रीडम-२५१ देण्याचा दावा करणारी रिंगिंग बेल्स कंपनीचे नोएडा येथील कार्यालय बंद आहे. त्याच बरोबर रिंगिंग बेल्सने ज्या पत्त्यावर आस्थापनाची नोंदणी केली होती, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे भ्रमणभाष संचाचे दुकान किंवा आस्थापनाचे कार्यालय नाही. त्यामुळे स्वस्त भ्रमणभाषची नोंदणी करणार्‍या लक्षावधी लोकांचा हिरमोड झाला आहे.
     या संदर्भात जेव्हा नोएडाच्या बी-४४, सेक्टर-६३ या पत्त्यावरील कार्यालयात जाऊन विचारले असता तेथे उपस्थित चौकीदाराने मागील काही दिवसांपासून कंपनीचे लोक कामावरच आले नसल्याचे सांगितले. या प्रकरणी वाणिज्य मंत्रालयाकडून चौकशी करण्यात येणार आहे. दूरसंचार मंत्रालयाने यापूर्वीच एक चार सदस्यीय समिती नेमली असून या आस्थापनाच्या विरोधात कारवाई चालू केली आहे.

मानवाधिकार आयोगाचे रिक्त पद त्वरित भरण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश !

  • अधिवक्ता प्रकाश सालसिंगीकर यांच्या याचिकेचे यश !
  • हिंदु विधीज्ञ परिषदेचा लढा
      मुंबई - महाराष्ट्र राज्याच्या मानवाधिकार आयोगाचे न्यायिक सदस्य हे पद रिक्त होते. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता श्री. प्रकाश सालसिंगीकर यांनी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. कानडे आणि न्या. मोहिते-डेरे यांच्या खंडपिठाने याची गंभीर दखल घेत राज्य शासनाला रिक्त सदस्यपदावर त्वरित नेमणूक करण्याचे आदेश दिले आहेत. या याचिकेची सुनावणी जानेवारी आणि फेब्रुवारी २०१६ मध्ये झाली होती.

कुठे निवडणुका आल्यावरच निवडून येण्यासाठी सभा घेणारे सर्व राजकीय पक्ष, तर कुठे केवळ राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात जागृती होण्यासाठी सभा घेणार्‍या हिंदु जनजागृती समिती व सनातन संस्था !


मध्य रेल्वेच्या संकेतस्थळाचे वेबपेज अल् कायदाकडून हॅक !

  • भारतातील मुसलमानांना अल् कायदा भारतीय उपमहाद्वीप या संघटनेकडून सूचना असा मजकूर संकेतस्थळावर प्रसिद्ध !
  • केंद्रशासनाच्या अंतर्गत येणार्‍या रेल्वेच्या संकेतस्थळासारखे संवेदनशील संकेतस्थळ हॅक होणे हे देशासाठी लज्जास्पद !
  • संबंधित शासकीय अधिकार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !
  देहली - मध्य रेल्वेच्या प्रशासकीय कामकाजासाठी सिद्ध करण्यात आलेल्या साहाय्यक संकेतस्थळाचे (मायक्रोसाईटचे) एक पान (वेबपेज) अल् कायदा या जिहादी संघटनेने हॅक केल्याचे १ मार्च या दिवशी लक्षात आले. त्यामुळे केंद्रशासनाच्या अखत्यारितील संकेतस्थळे हॅक झाल्यामुळे शासनाचे इंटरनेट कवच तकलादू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
१. मध्य रेल्वेच्या भुसावळमधील प्रशासकीय कामासाठी सिद्ध करण्यात आलेले पान (वेबपेज) अल कायदाच्या हॅकर्सकडून हॅक करण्यात आले.

साधक कारागृहात असतांना येणार्‍या अनंत संकटांना स्थिर राहून खंबीरपणे तोंड देण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील 
जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला ! 
       वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास आपण पाहिले. आता आपण या प्रसंगांना खंबीरपणे तोंड देणार्‍या साधाकांच्या कुटुंबियांनी साधनेच्या बळावर केलेले प्रयत्न येथे पाहूया.
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

मुंबईत २२ हून अधिक ठिकाणे नो सेल्फी झोन म्हणून घोषित

किती ठिकाणांना असे घोषित करणार ?
त्यापेक्षा धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणार्‍यांवर कठोर कारवाईच व्हायला हवी !
      मुंबई - मुंबई पोलिसांनी शहरातील २२ हून अधिक ठिकाणांना नो सेल्फी झोन म्हणून घोषित केले आहे. या झोनवर पोलीस लक्ष ठेवून असतील. वांद्रे येथे बँड स्टँडच्या समुद्रात दोघांना जीव गमवावा लागला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी अशा प्रकारे झोनची सूची घोषित केली आहे.
     यामध्ये बँडस्टँड, सायनचा किल्ला, वांद्रे किल्ला, वरळी सीफेस, जुहू बीच, दादर चौपाटी, मढ-मार्वे बीच, गोराई बीच, वरळीचा किल्ला, मरीन ड्राइव्ह, ससून डॉक, कार्टर रोड येथील ऑटर्स क्लब, माहिम किल्ला, पवई लेक, गिरगाव चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया, हाजी अली, एम्.बी. राऊत मार्ग, पवई हिरानंदानी हॅलीपड, माहिम चौपाटी या ठिकाणांचा समावेश आहे. पालिकेकडून अशा ठिकाणी जीवरक्षक तैनात करण्यात येणार असून धोक्याचे फलकही लावण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्‍याने दिली.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सभापतीपदावरून जिल्हाधिकारी मुंढे यांना हटवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश !

वारकर्‍यांच्या पाठपुराव्याला यश 
      मुंबई - अधिक महिना आणि माघी वारीमध्ये मंदिर समितीच्या टेम्पल अ‍ॅक्टमध्ये नमूद नसलेला पलंग (राजोपचार) काढून मंदिर समितीचे सभापती असलेले जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे स्वत:च्या पदाचा दुरुपयोग केला. त्यांना सभापतीपदावरून दूर करण्याचे लेखी आदेश मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वारकरी संप्रदाय पाईक संघटनेच्या शिष्टमंडळाने १ मार्च या दिवशी दिले. सोलापूरचे पालकमंत्री श्री. विजयकुमार देशमुख, दैनिक निर्भीड आपले मतचे संपादक श्री. संजय वाईकर यांच्यासह मुख्यमंत्र्यांची मंत्रालयातील दालनात भेट घेतली. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले.

(म्हणे) गोळ्या घालीन !

सत्ताधारी पक्षाचे आमदार नरेंद्र कुमार यांची पुन्हा विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकी
बिहारमध्ये जंगलराज !
      भागलपूर (बिहार) - राज्यातील गोपालपूर मतदारसंघातील सत्ताधारी संयुक्त जनता दलाचे आमदार नरेंद्र कुमार नीरज उर्फ गोपाल मंडल यांनी २९ फेब्रुवारीला भागलपूरच्या नवगछिया येथे एका कार्यक्रमात विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमकी देतांना म्हटले होते की, मला बनिया म्हणून चिडवणार्‍या नेत्यांची जीभ कापून टाकीन. गोळ्या घालीन. माझा एक पाय कारागृहात, तर एक बाहेर असतो. मी कारागृहात गेल्यानेच नेता झालो आहे. आधी मी गोपाल मंडल आणि नंतर आमदार आहे. (असे गुंडगिरी करणारे आमदार देणारी लोकशाही निरर्थक ठरते ! नितीश कुमार अशा आमदारांवर कारवाई करणार कि लालूप्रसाद यांच्या संगतीत राहून त्यांच्या गुंडगिरीचे कौतुक करणार ? - संपादक) यानंतर १ मार्चला त्यांनी त्यांच्या विधानावर ठाम रहात परत म्हटले की, माझ्या कार्यकर्त्यांना कोणी धमकवण्याचा प्रयत्न केला, तर मी त्यांची जीभ कापेन आणि डोळे काढून घेईन. ते भागलपूर येथील नवगछिया येथे एका कार्यक्रमात बोलत होते. नरेंद्र कुमार यांच्या या विधानावर मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी निरर्थक म्हटले आहे, तर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, त्यांची विधाने अयोग्य आहेत.

इसिसचे लक्ष्य होते बंगालमधील तारकेश्‍वर मंदिर ! - अटक करण्यात आलेल्या इसिसच्या आतंकवाद्याने दिली माहिती

हिंदूंनो, जिहादी आतंकवाद्यांनी भारताला इस्लामी देश करण्यापूर्वी जागृत व्हा ! 
     कोलकाता - बांगलादेशाच्या सीमेवर असणारा बंगालही आता इसिसच्या रडारवर आला आहे. दुर्गापूरच्या गोपालपूर येथून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अटक करण्यात आलेला इसिसचा आतंकवादी आसिफच्या चौकशीतून राज्यातील हुगळी येथील प्रसिद्ध तारकेश्‍वर मंदिरावर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, असे उघडकीस आले आहे. (इसिसचे आतंकवादी राज्यात कारवाया करण्याचा प्रयत्न करत असतांना तृणमूल काँग्रेसच्या राज्यातील पोलीस झोपले आहेत का ? - संपादक) आसिफ दुर्गापूरच्या राजेंद्र अ‍ॅकेडमीमध्ये अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी होता. धनियाखाली (हुगळी) येथे रहाणारा आसिफ इंटरनेटच्या माध्यमातून सिरियातील इसिसच्या आतंकवाद्यांच्या संपर्कात होता. त्याने तारकेश्‍वर मंदिराची रेकी (अवलोकन) केली होती. तसेच मंदिराच्या प्रवेशद्वाराचा नकाशा बनवून तो सिरियातील इसिसच्या आतंकवाद्यांना पाठवला होता. आसिफला आतंकवादी जरीरने एक भ्रमणभाष संचही दिला होता.

कोरेगाव पार्क (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलिसाला मारहाण करणार्‍या २ इराणी महिलांना अटक

पोलिसांवर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी नागरिकांमध्ये कायद्याचा
धाक निर्माण होणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाने आरोपींना कठोर 
शासन केल्यासच अशा घटनांना काही प्रमाणात आळा बसेल !
       पुणे - तक्रार देण्यासाठी आलेल्या सारा मोरावताली चालिमी आणि मिर्झाई महासा अली या दोन इराणी महिलांनी १ मार्च या दिवशी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गोंधळ केला, तसेच तेथील महिला पोलीस कर्मचारी पल्लवी गौड यांना मारहाण केली. या प्रकरणी त्या महिलांना अटक करण्यात आली आहे.
१. पल्लवी गौड या बिनतारी संदेशवहन यंत्रणेच्या खोलीत आपले कर्तव्य बजावत होत्या. त्या वेळी उपरोक्त दोन इराणी महिलांनी तेथे जाऊन मोठमोठ्याने ओरडत गोंधळ घातला. त्यांनी तेथे असलेली नोंदवही फाडली आणि गौड यांचा भ्रमणभाष संच फेकला.
२. गौड यांनी खडसवताच दोघींनी त्यांना मारहाण केली.

पंढरपूर येथील हिंदु धर्मजागृती सभा !

 सभेला १ सहस्र हिंदूंची उपस्थिती
 
     डावीकडून हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे, दीपप्रज्वलन करतांना सनातन संस्थेचे श्री. दैवेश रेडकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलींद धर्माधिकारी
(सभेचे वृत्त लवकर प्रसिद्ध करत आहोत.)

भुतांचे अस्तित्व आहे कि नाही याचा काडीचाही अभ्यास न करणार्‍या अंनिसवाल्यांना पुरोगामी म्हणावे का ? - सनातन संस्था

झी मराठी वाहिनीवरील रात्रीस खेळ चाले 
या भुतांवर आधारीत मालिकेला अंनिसचा विरोध
       मुंबई - अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली राष्ट्रविरोधी घोषणा दिल्या, तरी त्याचे समर्थन करणारी मंडळी आपण अलीकडेच पाहिली. याचा निषेध करायला अंनिसवाले पुढे आले नाहीत; (कदाचित् त्यांनाही ते मान्य असावे) मात्र भुतांच्या काल्पनिक कथांवर आधारित मालिकेला विरोध करणारे अंधश्रद्धा निर्मूलनाचे भूत झी मराठी वाहिनीला सध्या पछाडत आहे. जगभरात भुतांवर संशोधन करणार्‍या शेकडो संस्था अस्तित्वात असतांना स्वतः भुतांचे अस्तित्व आहे कि नाही याचा काडीचाही अभ्यास न करता, असे काही नसतेच असे म्हणणारी अंनिसची मंडळी खरेच पुरोगामी म्हणावीत का ?, असा प्रश्‍न सनातन संस्थेने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

बलात्काराचा प्रयत्न करणार्‍याचे महिलेने लिंग कापले !

बलात्कार्‍यांना पुढे अशीच शिक्षा देण्याची मागणी कोणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !
      भोपाळ (मध्यप्रदेश) - राज्यातील उमारिया जिल्ह्यातील गोवार्दे गावात २८ फेब्रुवारीच्या रात्री आदिवासी महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्‍या रामकरण प्रजापती (वय २९) याचे या महिलेने धारदार चाकूने लिंग कापल्याची घटना समोर आली आहे. यामुळे रक्तबंबाळ झालेला रामकरण स्वतःहून रुग्णालयात दाखल झाला होता. या वेळी डॉक्टरांनी माहिती घेऊन पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या पाद्रीला ४० वर्षांचा सश्रम कारावास !

अशा घटनांवर ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी प्रसारमाध्यमे चर्चासत्रे घेत नाहीत, हे लक्षात घ्या !
     त्रिचूर (केरळ) - येथील एका न्यायालयाने पीचीमधील सैल्वेशन आर्मी चर्चचे पाद्री सानिल के जेम्स याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी ४० वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. भादंविनुसार २० वर्षे आणि पोक्सो कायद्यानुसार २० वर्षे, अशी ४० वर्षांची ही शिक्षा असून दोन्ही एकत्र भोगण्यात येणार असल्याने पाद्री जेम्स याला २० वर्षे कारावास भोगावा लागणार आहे. तसेच त्याला २० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. पीडित मुलीला ३ लाख रुपयांचे साहाय्य देण्याचा शासनाला आदेश देण्यात आला आहे. (जनतेच्या पैशातून पीडित मुलीला साहाय्य कशासाठी ? हे साहाय्य पाद्य्राकडून अथवा त्याला पाद्री बनवणार्‍या चर्च संस्थेकडून मुलीला देण्यात यावे. - संपादक) २०१४ मध्ये या पाद्य्राने १२ वर्षांच्या मुलीवर स्वतःच्या घरात बलात्कार केला होता. (अशी कामांध व्यक्ती पाद्री कशी काय बनते ? अर्थात व्हॅटिकनमधीलही पाद्री अशा अनेक प्रकरणांत गुंतले असल्याने भारतातील पाद्य्रांवर लक्ष कोण ठेवणार ? - संपादक)

(म्हणे) मोदी शासनाच्या विरोधात संघटित झाले पाहिजे !

धर्मांध नेत्यांचा भरणा असलेला आम आदमी पक्ष !
मुख्यमंत्री केजरीवाल या आमदारांवर कारवाई करतील का ?
आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांचे फुत्कार
     नवी देहली - मौलाना मुफ्ती अब्दुस सामी कासमी यांची सुटका न केल्यास देहलीतील सर्व मुसलमान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या घराला घेराव घालतील. देहलीत मोठ्या संख्येने मुसलमान रहातात. त्यांनी सिंह यांना घेराव करणे चालू केले, तर शासन त्यांना हात लावू शकणार नाही, असे फुत्कार आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांनी भाषण देतांना सोडले. या भाषणाची एक ध्वनीचित्रफीत नुकतीच प्रसारित झाली आहे. या चित्रफीतीत मोदी शासन देशात आतंकवादी वातावरण निर्माण करत आहे. त्यामुळे याविरोधात आपल्याला संघटित झाले पाहिजे, असेही खान म्हणाले. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गोंधळ माजवण्याचा कट रचणार्‍या १५ इसिसच्या आतंकवाद्यांशी संबंध असल्याचा मौलाना कासमी यांच्यावर आरोप आहे. देशविरोधी कारवायांच्या आरोपाखाली त्यांना गेल्या मासात उत्तरप्रदेशच्या हरदोई येथून अटक करण्यात आली होती.


शासनाला सळो कि पळो करू ! - भाभासुमं

गोव्यातील प्राथमिक शिक्षणातील माध्यमप्रश्‍न !
      पणजी - सत्ता हाती आल्यानंतर भाजप शासनाने माध्यमप्रश्‍नी निवडणूक घोषणापत्रात दिलेल्या, तसेच भारतीय भाषा सुरक्षा मंचला (भाभासुमं) दिलेल्या आश्‍वासनाला दुर्दैवाने हरताळ फासला आहे. अल्पसंख्यांकांच्या एकगठ्ठा मतांच्या लोभापायी इंग्रजी शाळांना अनुदान चालूच ठेवल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत शासनाला सळो कि पळो करू, अशी चेतावणी भाभासुमंचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी दिली आहे. पर्वरी येथे विद्याप्रबोधिनी सभागृहात आयोजित केलेल्या भाभासुमं गोवा प्रदेश समितीच्या बैठकीत प्रा. वेलिंगकर यांनी ही चेतावणी दिली. या वेळी व्यासपिठावर सुभाष देसाई, प्रा. रत्नाकर लेले, उदय भेंब्रे आदींची उपस्थिती होती.
     प्रा. वेलिंगकर पुढे म्हणाले, माध्यमप्रश्‍नी भाजपने अखेर इंग्रजी शाळांना अनुदान देण्यावर शिक्कामोर्तब करून विश्‍वासघात केला.

हा देश हिंदुस्थान असून येथील अणूरेेणूवर आमचा अधिकार आहे !

पू. विक्रम सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ...
     १९४७ या वर्षी हिंदू समाजाने केवळ एक चतुर्थांश भूभागच गमावला नसून देशाची फाळणी स्वीकारतांना हिंदुस्थान या नावाचाही त्याग केला. देशाची आणि हिंदु समाजाची अस्मिताच गमावली. त्यामुळे आत्मस्वरूपाचे विस्मरण झाले. हा देश हिंदुस्थान आहे. येथील अणूरेेणूवर आमचा अधिकार आहे. अन्य ज्या गोष्टी येथे आहेत, त्या केवळ आमची इच्छा असेपर्यंत अस्तित्वात रहातील. अगदी दिल्लीची जामा मशीद आमची अनुमती असेल तोपर्यंतच दिसेल, अन्यथा क्षणातच ती बाबरीसारखी नामशेष होईल.
- श्री. विक्रम सावरकर यांच्या भाषणातून (संदर्भ : प्रज्वलंत, मे १९९४)
बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचे नगर रेल्वे प्रशासनाला पत्र

      नगर, २ मार्च - अयोध्या येथील राम मंदिराचे बांधकाम करण्यासाठी शिवसेना-भाजप या पक्षाशी संबंधित रोहिदास भालेराव आणि रामदास भालेराव हे रेल्वेतून प्रवास करत आहेत. आम्हाला रेल्वेचा प्रवास विनामूल्य करू दिला नाही, तर भारतात बॉम्बस्फोट घडवले जातील, असे लिखाण असलेले धमकीचे पत्र १ मार्च या दिवशी नगर रेल्वे स्थानकातील रेल्वे प्रशासनाला मिळाले. धमकीचा हा प्रकार खोडसाळपणा असल्याचे रेल्वे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मेरठमध्ये गोहत्या करणार्‍या धर्मांधांकडून पोलिसांवर गोळीबार !

अशा गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा दिल्याविना या घटना बंद होणार नाहीत ! 
     मेरठ (उत्तर प्रदेश) - येथील परतापूरच्या सोलाना गावातील जंगलात २७ फेब्रुवारीला सार्वजनिक ठिकाणी गोहत्या करून गोमांस विकणार्‍या कसायांच्या अटकेसाठी गेलेल्या पोलिसांवर त्यांनी गोळीबार करत पलायन केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मंसूर सौलाना हा कसाई घायाळ झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. उर्वरित ५ जणांचा पोलीस शोध घेत आहेत. घटनास्थळी गायीचे कातडे, गोमांस, तराजू आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहे. फरार आरोपी फल्लू सौलाना, त्याचा मुलगा शाहनवाज, जाकिर, तसलीम आणि राकिब यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेता पतींना पान मसाल्याचे विज्ञापन करण्यापासून रोखा !

अशा गांधीगिरीमुळे हे अभिनेते ताळ्यावर येणार का ? स्वत:चे खिसे भरण्यासाठी 
समाजहिताकडे दुर्लक्ष करणार्‍या अभिनेत्यांवर कठोर कारवाई करा !
देहली शासनाने बॉलिवूड अभिनेत्यांच्या पत्नींना केले आवाहन
     नवी देहली - देहली शासनाच्या स्वास्थ्य विभागाकडून बॉलिवूड अभिनेत्यांच्या पत्नी गौरी खान, काजोल, मलायका अरोरा-खान आणि सुनीता आहुजा यांना पत्र लिहून, तुमच्या पतीला पानमसाल्याचे विज्ञापन करण्यापासून परावृत्त करा, अशी पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेत्यांना पान मसाल्याचे विज्ञापन न करण्याचे आवाहन करूनही काही प्रतिसाद न मिळाल्याने देहली शासनाला हे पाऊल उचलावे लागले आहे. (अभिनेत्यांना हे सांगावे लागते, हे त्यांच्यासाठी लज्जास्पदच ! पैसा आणि प्रतिष्ठा यांसाठी हपापलेल्या अशा अभिनेत्यांचा आदर्श का घेऊ नये, हे आतातरी तरुण पीढीला लक्षात येईल, अशी अपेक्षा ! - संपादक)

इंग्लंडमधील मुसलमान मुलींचे स्काईपद्वारे बळजोरीने विदेशी मुसलमानांशी करण्यात येतात विवाह !

     लंडन - इंग्लंडमधील अल्पवयीन मुसलमान मुलींना विदेशातील मुसलमान तरुणांशी इंटरनेटद्वारे त्यांच्या इच्छेविरुद्ध विवाह करण्यास बाध्य केले जात आहे. हे विवाह स्काईप यंत्रणेद्वारा दोन्ही बाजूंना इमामांना बसवून पार पाडले जातात. विवाह झाल्यावर मुलीला त्वरित विमानाने पतीच्या देशात पाठवून विवाहोत्तर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास प्रवृत्त केले जाते. (इस्लाम धर्मात अशा विवाहाला मान्यता आहे का ? इमामांना पैसे देऊन असे विवाह वैध ठरवले जातात का ? अशा प्रश्‍नांवर मुसलमान धर्मगुरु काहीच का बोलत नाहीत ? भारतातही असे होते का, याची शासनाने चौकशी करायला हवी ! - संपादक)

फलक प्रसिद्धीकरता

हिंदूंनो, तुम्हाला दंगलखोर ठरवण्याचा साम्यवाद्यांचा प्रयत्न जाणा !
      डीवायएफ्आयया साम्यवादी मुंबई येथील वरळी, घाटकोपर, अंधेरी आणि भांडुप यथे मुझफ्फरनगर दंगलींमध्ये हिंदूंना अत्याचारी दाखवणार्‍या ध्वनीचित्रफितींचे ( व्हिडिओजचे) प्रसारण कले.

दैनिक सनातन प्रभातमधील फलक प्रसिद्धीचे लिखाण हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावर ए ४ आकारात उपलब्ध !

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् हिंदुत्ववादी यांना विनंती !
     दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रतिदिन फलक प्रसिद्धीच्या अंतर्गत राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रबोधन करणारे लिखाण प्रसिद्ध करण्यात येते. हे लिखाण ठिकठिकाणच्या फलकांवर लिहून त्यामाध्यमातून जागृती करण्याचे कार्य वाचक, हितचिंतक, हिंदुत्ववादी आणि साधक करत आहेत; मात्र काही जणांना हे फलक लिखाण करण्यासाठी वेळ देणे शक्य नसते, यासाठी फलकप्रसिद्धीचे लिखाण आता ए ४ (A 4) कागदाच्या आकारात हिंदु जनजागृती समितीच्या www.hindujagruti.org या संकतस्थळावर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांना फलक लिहिणे शक्य होणार नाही, त्यांनी संकेतस्थळावरून हे लिखाण डाऊनलोड करून त्याची कागदावर प्रत काढून ते कार्यालये, सार्वजनिक प्रसिद्धीफलक, आदी ठिकाणी संबंधितांच्या अनुमतीने लावू शकतात. या फलक प्रसिद्धीच्या अंतर्गत राष्ट्र-धर्म विषयक लिखाणाबरोबरच धर्मशिक्षणविषयक लिखाणही असणार आहे. यातील कोणत्या लिखाणाला फलकांवरून प्रसिद्धी द्यायची, हे परिस्थितीनुरूप ठरवता येईल.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : DYFI is samyavadi sanghatan ne Mumbaime Muzaffarnagar dangoke videosdwara Hinduo ko atyachari dikhaya.
Kya sarkar DYFIpar karyavahi karegi ?

जागो ! : डीवायएफ्आयइस साम्यवादी संगठन नेमुंबईमें मुझफ्फरनगर दंगों के विडिओज द्वारा हिन्दुआें को अत्याचारी दिखाया.
क्या सरकार डीवायएफ्आय पर कार्यवाही करेगी ?

पैठण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचारी यांच्यामध्ये मारामारी

स्वतःच पोलीस ठाण्यात मारामारी करणारे पोलीस 
जनतेपुढे कायद्याचा धाक निर्माण काय करणार ?
       पैठण (जिल्हा संभाजीनगर), २ मार्च - पैठण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे आणि पोलीस कर्मचारी सचिन बिडकर यांच्यामध्ये २९ फेब्रुवारी या दिवशी मारामारी झाली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बिडकर यांच्या विरोधात काकडे यांनी गुन्हा प्रविष्ट केला आहे.
     हिंदुस्थानात हिंदूंना स्वतःला हिंदु म्हणण्याची लाज वाटते आणि ते सर्वधर्मसमभावी किंवा निधर्मी असल्याचे अभिमानाने सांगतात ! - प्रा. दिलीप बेतकीकर, गोवा

राष्ट्र्रगीतामधून सिंध शब्द काढा !

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची लोकसभेत मागणी 
     नवी देहली - देशामध्ये सिंध नावाचे कोणतेही राज्य नाही. संसदेने राष्ट्र्रगीताचा स्वीकार केला असल्याने त्यामधून सिंध शब्द काढून त्या जागेवर पर्यायी योग्य शब्दाची रचना करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत केली. रवींद्रनाथ टागोर यांनी वर्ष १९११मध्ये जन गण मन... या गीताची रचना केली होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता देण्यात आली होती.

पुण्यात बांगलादेशी महिला घुसखोराला अटक

बांगलादेशी घुसखोरीने त्रस्त झालेला भारत !
     पुणे - भारतात अनधिकृतरित्या वास्तव्य केल्याप्रकरणी बांगलादेश येथील एका महिलेला एक वर्ष साधी शिक्षा आणि एक सहस्र रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या नियमांनुसार कारवाई करून तिला बांगलादेशमध्ये परत पाठवण्यात येणार असल्याचे समजते. (सदर बांगलादेशी महिलेला बांगलादेशातून भारताच्या पश्‍चिम भागात पोेचवण्यात कोणी कोणी साहाय्य केले, त्या महिलेसह अन्य कोण कोण रहात होते, इत्यादी सूत्रांचीही कसून चौकशी व्हायला हवी. - संपादक)

बिहारमध्ये दीडशे डॉक्टरांना हवी आहे शस्त्र बाळगण्याची अनुज्ञप्ती !

ज्या राज्यात डॉक्टर असुरक्षित असतील, तेथे सामान्य लोकांचा विचारच न केलेला बरा !
     पाटलीपुत्र (पाटणा) - बिहारमधील दीडशे डॉक्टरांनी जीवाला धोका असल्याचे सांगत स्वरक्षणासाठी शस्त्र बागळण्याची अनुज्ञप्ती मिळण्याची मागणी केली आहे. यात मधेपुरा, सुपौल आणि सहरसा येथील ५० डॉक्टरांनी अर्ज केला आहे. गेल्या ५ महिन्यांत १५ डॉक्टरांवर झालेल्या आक्रमणामुळे इंडियन मेडिकल असोसिएशननेही त्यांना शस्त्र बागळण्याची अनुज्ञप्ती देण्याची मागणी केली आहे. असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांच्या माहितीनुसार अररिया, खगडिया, पाटलीपूत्र, कटिहार, सीवान, गोपालगंज, मोतीहारी, हाजीपूर आणि गया जिल्ह्यांतील डॉक्टरांनी संबंंधित जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज केले आहेत.भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी असलेले इस्रायलचे माजी पंतप्रधान एहुद ऑलमर्ट कारागृहात !

गेल्या ६९ वर्षांत भारताच्या तिजोरीवर डल्ला मारणार्‍या राज्यकर्त्यांना कधीतरी शिक्षा होईल का ?
     जेरुसेलम - इस्रायलचे माजी पंतप्रधान एहुद ऑलमर्ट यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात दोषी घोषित करण्यात आले असून या प्रकरणात त्यांना कारागृहाचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यांना १९ मासांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. देशातील मासियाहु कारागृहात ऑलमर्ट यांनी शिक्षा भोगण्यास आरंभ केला आहे. (भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या अनेक भारतीय राज्यकर्त्यांवर अशी कार्यवाही का होत नाही ? - संपादक)
१. कारागृहात जायच्या आदल्या दिवशी त्यांनी इस्रायली जनतेला उद्देशून साडे-तीन मिनिटांचा एक व्हिडिओ प्रसारित केला. मला शिक्षा ठोठावण्यात येणे, माझ्यासाठी क्लेषदायक आणि विचित्र आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला मोठे मूल्य मोजावे लागत आहे; परंतु न्यायाच्या पलीकडे कोणीही नाही. मी ही शिक्षा स्वीकारतो, असे या व्हिडिओत बोलतांना ऑलमर्ट दिसतात.

रामदासनवमीच्या निमित्ताने समर्थ रामदासस्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सज्जनगडावरील स्थानांचे छायाचित्रात्मक दर्शन

या छायाचित्रांचे भावपूर्ण दर्शन घेऊन समर्थांच्या प्रत्यक्ष अस्तित्वाची अनुभूती घ्या !
समर्थ रामदासस्वामी
समर्थांच्या पूजेतील श्रीरामपंचायतन (श्री क्षेत्र सज्जनगड)
भावभक्तीने श्रीरामास पूजिले । हिंदवी स्वराज्यरूपी रामराज्य घडविले ॥
भावपूर्ण वंदन त्या रामरायाच्या चरणी । हिंदु राष्ट्र स्थापना व्हावी भूमंडळी सत्वरी ॥

जगात इस्लाम असेपर्यंत आतंकवाद थांबणे कठीण ! - अनंतकुमार हेगडे, खासदार, भाजप

      बेंगळुरू - जगभरात इस्लाम धर्म अस्तित्वात असेपर्यंत आतंकवादी कारवायांना थांबवणे कठीण आहे, असे विधान भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केले आहे. कर्नाटकातील शिर्सी येथे बोलतांना हेगडे पुढे म्हणाले की, भटकळमध्ये शांतता हवी असल्यास इस्लामला हद्दपार केल्याशिवाय पर्याय नाही. इस्लाम धर्मावरच बंदी घातली पाहिजे. या प्रकरणी काँग्रेसचे पदाधिकारी लुकमान बंटवाल यांनी पोलिसांत २९५ (अ) अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. (अशी तत्परता काँग्रेसवाल्यांनी कधी हिंदूंच्या संदर्भात ओवैसी, आझम खान आदी नेते बोलल्यावर दाखवली आहे का ? - संपादक)

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे धर्मांधांकडून क्षुल्लक कारणावरून हिंदूंवर प्राणघातक आक्रमण

हिंदूंनो, तुमच्यावर धर्मांधांकडून होणारी आक्रमणे किती 
काळ सहन करणार आहात ? यासाठीच हिंदु राष्ट्र स्थापा !
       हुपरी (जिल्हा कोल्हापूर) - येथे एका हिंदूवर धर्मांध शाहरूख, मोहिद्दीन मुजावर, मुन्ना मुजावर, बबलू मुल्ला, राजू मुल्ला यांनी सशस्त्र प्राणघातक आक्रमण केले. या प्रकरणी चौघांवर गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत; मात्र त्यांना अजूनपर्यंत अटक केलेली नाही. (हिंदूंनो, या धर्मांधांना अटक होण्यासाठी पोलिसांना खडसवा ! - संपादक)

सर्वसामान्यांचे जीवन सुकर करावे !

      केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २९ फेब्रुवारी या दिवशी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. जागतिक आर्थिक आव्हाने आणि मंदावलेली देशी अर्थव्यवस्था या पार्श्‍वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा होता. या अर्थसंकल्पात कृषी आणि त्यासंबंधित रोजगार, ग्रामीण अर्थव्यवस्था यावर भर दिला आहे, हे निश्‍चितच कौतुकास्पद. असे असतांना त्यांनी अनेक छोट्या योजना आणि तरतुदींच्या आधारे शेतकरी, उद्योजक, नोकरदार यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला; पण खरेखुरे चांगले दिवस (?) (अच्छे दिन) येण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागेल. अर्थात एका दिवसात ही परिस्थिती पालटणार नाही, हेही महत्त्वाचे.

मनसे कार्यकर्ते मराठी पाट्यांसाठी पुन्हा आक्रमक

      मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी २ मार्च या दिवशी मराठी पाट्यांच्या सूत्रावरून कांदिवलीमध्ये आक्रमक मोहीम राबवली. इंग्रजी पाट्यांवर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली, तसेच धारदार वस्तूच्या साह्याने इंग्रजीत असलेले कापडी फलकही फाडण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांकडून मराठी पाट्या लावल्याच पाहिजेत, अशी घोषणाही देण्यात येत होती. अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसेनेही ही मोहीम राबवल्याची चर्चा आहे.

पुणे शहरात एम्पीसी न्यूजच्या कार्यालयाचे उद्घाटन

       पुणे, २ मार्च - येथील पिंपरी-चिंचवड या भागामध्ये एम्पीसी न्यूज हे संकेतस्थळ दैनिक चालवले जाते. या दैनिकाच्या पुणे शहरातील कार्यालयाचे उद्घाटन २७ फेब्रुवारी या दिवशी माजी आमदार आणि शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष श्री. विनायक निम्हण यांच्या हस्ते करण्यात आले.
       या वेळी ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद गोखले उपस्थित होते. या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरही उपस्थित होते.

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)      जो क्षात्रधर्म आणि राजधर्म यांचे पालन काटेकोरपणे करतो, त्याला धर्मराज असे म्हणतात. - समर्थ रामदासस्वामी

सनातन डॉट ऑर्ग या संकेतस्थळाच्या फेसबूकवरील मराठी पानाने १०,००० लाईक्सचा टप्पा गाठला !

      वाचकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे सनातन डॉट ऑर्ग या संकेतस्थळाच्या फेसबूकवरील मराठी पानाने (www.facebook.com/sanatan.org) १०,००० लाईक्सचा टप्पा (माईलस्टोन) गाठला आहे. कठीण परिस्थितीत खंबीरपणे सोशल मिडियामध्ये सनातनच्या पाठीशी रहाणार्‍या फेसबूक वाचकांचे आम्ही मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

महर्षींनी २२.२.२०१६ या दिवशी तमिळनाडू राज्यातील कुंभकोणम् या गावी होणार्‍या महामहम् उत्सवाच्या वेळचे कुंडातील तीर्थ मिळवून देणे आणि त्याचा अपेक्षित लाभ होण्यासाठी स्वतःच उपाययोजना करणे

पू. (सौ.) अंजली गाडगीळ
महर्षींची शिकवण आणि कार्य !
     प्रत्येक १२ वर्षांनी तमिळनाडू राज्यातील कुंभकोणम् या गावी महामहम् उत्सव होतो. या दिवशी कुंभकोणम् या गावी असलेल्या महामहम् तीर्थाच्या ठिकाणी सप्तनद्यांचे पाणी एकत्रित येते. या दिवशी येथे स्नान करण्याचे महत्त्व पुष्कळच आहे. 
१. कुंभकोणम् या स्थानी महामहम् तीर्थात स्नान करण्याचे महत्त्व
      पुराणकाळात अमृतकुंभाचा पुष्कळ मोठा भाग या ठिकाणी पडला असल्याची आख्यायिका दिली आहे. प्रत्येक १२ वर्षांनी होणार्‍या या उत्सवासाठी लाखो लोकांचा समुदाय या ठिकाणी जमतो आणि स्नानाचा आध्यात्मिकदृष्ट्या लाभ घेतो. या वेळी या कुंडात सातही नद्यांचे पाणी एकत्रित येते. हेही मोठे आश्‍चर्य आहे. या उत्सवाचा शेवटचा दिवस सर्वांत महत्त्वाचा असतो. यावर्षीचा तो दिवस म्हणजे २२.२.२०१६.

ज्ञानाचा अहंभाव आणि संतांची परीक्षा नको

पू. डॉ. वसंत बाळाजी आठवले
     चाफळपासून काही अंतरावरच्या गावी आलेल्या शंकराचार्यांच्या एका शिष्याच्या कानी समर्थ रामदासस्वामींची कीर्ती गेली. आध्यात्मिक क्षेत्रातील त्यांच्या अधिकाराची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने त्या शिष्याने एका ब्राह्मणाला रिकामी वाटी घेऊन समर्थांकडून वाटी भरून ब्रह्म आणायला सांगितले. त्यानुसार तो ब्राह्मण रिकामी वाटी घेऊन समर्थांकडे गेला आणि त्याने शंकराचार्यांच्या शिष्याचा निरोप सांगितला. समर्थांनी त्या वाटीचा स्वीकार न करता त्या ब्राह्मणाकरवी शंकराचार्यांच्या शिष्याला निरोप पाठवला, त्या वाटीत अगोदरच असलेले ब्रह्म काढून टाकून ती रिकामी करून माझ्याकडे पाठवा, म्हणजे मी त्या वाटीत ब्रह्म भरून पाठवीन.

व्हॉट्सअ‍ॅप आणि तत्सम प्रणाली हाताळण्यात साधनेतील अमूल्य वेळ वाया घालवणारे साधक !

    सध्या अनेक साधकांच्या भ्रमणभाष संचावर व्हॉट्सअ‍ॅप असल्याचे लक्षात आले आहे. या संदर्भात साधकांकडून होणार्‍या अक्षम्य चुका पुढे देत आहे.
१. स्वतःच्या मनाने साधकांचे गट बनवणे 
     प्रसार अथवा आश्रम यांतील बरेच साधक व्हॉट्सअ‍ॅपवर गट (ग्रुप) सिद्ध करतात. त्यामध्ये आपले सहसाधक, परिचित साधक यांना समाविष्ट (अ‍ॅड) करतात. गट बनवण्यापूर्वी असे करणे योग्य आहे का ?, असे उत्तरदायी साधकांना विचारून घेत नाहीत. 
      आश्रम आणि प्रसार यांतील ज्या साधकांनी आतापर्यंत असे गट सिद्ध केले आहेत, त्यांनी ते यापुढे चालू ठेवण्याविषयी दायित्व असणार्‍या साधकांना विचारून घ्यावे.

हसतमुख, आनंदी आणि सात्त्विकतेची आवड असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची अन् महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली शिवडी, मुंबई येथील चि. नैवेद्या संदीप वैती (वय १ वर्ष) !

     माघ कृष्ण पक्ष नवमी (३.३.२०१६) या दिवशी शिवडी, मुंबई येथील चि. नैवेद्या संदीप वैती हिचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचे आजोबा श्री. नरेंद्र वैती यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत. 
चि. नैवेद्या संदीप वैती हिला वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. हसतमुख 
      नैवेद्या नेहमी सर्वांकडे बघून हसत असते. 
२. प्रेमळ आणि आनंदी
        तिच्या वयाची लहान मुले दिसल्यास ती फार आनंदी होते. त्यांच्याकडे झेपावते आणि त्यांची पापी घेते.

प.पू. डॉक्टरांनी सूक्ष्मातून गोष्ट सांगून कु. श्रावणीरूपी हिरा सांभाळण्याचे दायित्व घेऊन साधकाला आश्‍वस्त करणे

कु. श्रावणी पेठकर
डॉ. श्रीपाद व्यं. पेठकर
    माझी मुलगी कु. श्रावणी श्रीपाद पेठकर (वय १३ वर्षे) हिचा आज माघ कृष्ण पक्ष नवमीला कु. श्रावणीचा वाढदिवस आहे.
    कु. श्रावणी मे २०१४ पासून रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधिका होऊन साधना करत आहे. प्रारंभी मी तिच्या आठवणीने कासावीस होत असे. त्या वेळी तिच्याविषयीचे माझ्या मनातील विचार हे मायेतील प्रेमाचे असत. आताही मला तिची आठवण येते, त्या वेळी तिने केलेला मायेचा त्याग, तिची प.पू. डॉक्टरांवरील श्रद्धा, साधनेची तळमळ, निरपेक्ष प्रेम हे आठवून कधी कधी माझे मन भरून येते आणि डोळ्यांतून अश्रू ओघळतात.
कु. श्रावणी हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

समर्थ रामदासस्वामी यांच्या हस्ताक्षरातील वाल्मीकि रामायणाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये उलगडणारी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

यू.टी. स्कॅनरद्वारे नोंद घेतांना
     श्रीरामाचे जन्मापासून ते अवतारसमाप्तीपर्यंतचे जीवन सांगणारे रामायण हे ७ कांडांत विभाजित केले आहे. समर्थ रामदासस्वामींनी वयाच्या १४ व्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील टाकळी येथे संस्कृत भाषेत वाल्मीकि रामायण लिहिण्यास आरंभ केला. या रामायणाची एकूण ७ कांडे आहेत. समर्थांनी लिखाणाचा आरंभ बालकांडाने केला. समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे, महाराष्ट्र येथे असलेल्या समर्थ रामदासस्वामींनी लिहिलेल्या वाल्मीकि रामायणाच्या प्रतीचे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने परीक्षण करण्यात आले. यात समर्थ रामदासस्वामी यांच्या हस्ताक्षरातील रामायणातील ७ कांडांचे स्वतंत्र आणि नंतर सर्व कांडे एकत्रित करून परीक्षण करण्यात आले, तसेच बालकांडातील साधारण पान आणि समर्थांनी लिहिलेल्या बालकांडातील मालामंत्राचे पान असे एकूण १० घटक वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्याच्या उद्देशाने यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

दैवी बालक म्हणून मुलीचा सत्कार केल्यावर तिला मिळालेल्या भेटवस्तूने उपाय केल्यावर ढोपरांमध्ये होणार्‍या असह्य कळा थांबणे

     मला बराच वेळ मांडी घालून बसता येत नाही. ३१.७.२०१५ या दिवशी माझ्या उजव्या पायाच्या ढोपरामध्ये जास्त वेळ मांडी घालून बसल्यामुळे वेदना होत होत्या. त्या असह्य होऊन माझे मन अस्थिर झाले होते; पण वक्त्यांचे संभाषण ऐकण्याची उत्सुकता होती. कु. दीपाली मतकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यात जन्माला आलेल्या दैवी बालकांचा सत्कार केला. तेव्हा माझी मुलगी कु. दिशा विनोद गादीकर हिचा सत्कार केला. तिला देवाने (प.पू. डॉक्टरांनी) दिलेली अमूल्य भेट तिने माझ्याकडे ठेवायला दिली. त्यानंतर मनात आले की, देवाला प्रार्थना करून देवाने दिलेल्या भेटवस्तूने उपाय करूया. त्याप्रमाणे उपाय केल्यानंतर माझ्या ढोपरामध्ये होणार्‍या असह्य कळा थांबल्याचे मला जाणवले. त्यासाठी मी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. 
- सौ. वैष्णवी विनोद गादीकर, राजापूर, जिल्हा रत्नागिरी.

शांत, आनंदी आणि सूक्ष्मातील कळण्याची क्षमता असणारा ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा अन् उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. अवधूत आशिष सेलूकर (वय १ वर्ष) !

        ३.३.२०१६ (माघ कृष्ण पक्ष नवमी) या दिवशी पुणे येथील चि. अवधूत आशिष सेलूकर याचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे आई-बाबा, आजी-आजोबा, मामा-मामी यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
चि. अवधूत सेलूकर
चि. अवधूत आशिष सेलूकर याला प्रथम 
वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !
१. गर्भारपणी
१ अ. बाळ गर्भात असतांना नामजप आपोआप चालू होणे : गर्भधारणा झाल्यानंतर माझा नामजप आतून चालू व्हायचा. बर्‍याचदा मला पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकूंच्या आवाजातील नामजप ऐकू यायचा. प्रारंभी मला वाटायचे, माझाच नामजप होत असेल; पण अवधूतचा जन्म झाल्यावर मला प्रयत्नपूर्वक जप करावा लागत होता; मात्र तो गर्भात असतांना माझा नामजप कुठलाही प्रयत्न न करता चालू होता.

५३ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. अंबिका हंबर्डे (वय ९ वर्षे) हिला सुचलेल्या भावपूर्ण कविता

कु. अंबिका हंबर्डे
देवा तुझ्याविण कोणी नाही ।
देवा तुझ्याविण कोणी नाही ।
कोणी नाही, कोणी नाही ॥
गोपी होऊनी तुझी मी ।
नाचू तुझ्याभोवती मी ॥ १ ॥
पायात माझ्या घालसी घुंगरू ।
हातात माझ्या घालसी कंकण ॥
ओठात माझ्या देसी बासरी ।
केसात माझ्या माळसी मोरपीस ॥ २ ॥
करूनी दे अहं-निर्मूलन ।
करूनी दे गुणसंवर्धन ॥
करूनी दे हिंदु राष्ट्राची पहाट अन् ।
मनातूनी भेटसी रे कृष्णा ॥ ३ ॥
- कु. अंबिका हंबर्डे, सनातन आश्रम, रामनाथी 

साधकांनो, १५.३.२०१६ पर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रलंबित येणे बाकी पूर्ण करा !

जिल्हासेवक, लेखासेवक आणि साधक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना
     संस्था स्तरावर सर्व जिल्ह्यांची येणे बाकी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे. येणे बाकी वेळेत पूर्ण न झाल्यामुळे ती रक्कम, तसेच त्या रकमेवरील व्याज यांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यांनी विशेष प्रयत्न करून १५.३.२०१६ या दिवसापर्यंत येणे बाकी पूर्ण करावी.
प्रलंबित येणे बाकीचा जिल्हानिहाय आढावा पुढे देत आहे.
१. नियतकालिक सनातन प्रभातच्या विज्ञापनांची येणे बाकी
 
२. सनातन पंचांग २०१४च्या विज्ञापनांची येणे

समष्टी सेवा करणार्‍या साधकांनो, सध्या समष्टी त्रासांची तीव्रता वाढलेली असल्याने स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी सांगितलेले उपाय नियमित आणि भावपूर्ण करा !

     सध्या समष्टी त्रासांची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे समष्टी सेवा करणार्‍या साधकांना होणार्‍या त्रासांची तीव्रताही वाढली आहे. एका साधकाचा २ - ३ मासांच्या (महिन्यांच्या) कालावधीत ३ वेळा अपघात झाला. यासंदर्भात त्या साधकाने सांगितले, देवाने प्रारब्धाची तीव्रता न्यून करून साधकांचे साहाय्य त्वरित दिल्याने ते सहजतेने भोगता आले. त्यावर मी म्हणालो, प्रारब्धभोगापेक्षा समष्टी सेवेत असल्याने जास्त त्रास होतो. हा प्रारब्धाचा भाग नसून समष्टी त्रासाचा भाग आहे. होणारा त्रास प्रारब्धामुळे कि समष्टी त्रासामुळे आहे ?, हे ओळखायला हवे, तसेच समष्टी सेवा करणार्‍या साधकांनी स्वतःभोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी सांगितलेले उपाय नियमित आणि भावपूर्ण करायला हवेत. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


जागो हिंदु या गटात समाविष्ट असणार्‍यांसाठी सूचना

१. जागो हिंदु या हिंदु जनजागृती समितीच्या अधिकृत गटांचे दायित्व जिल्ह्यातील २ - ३ जणांना दिलेले असू शकते. त्यामुळे त्यांचे अ‍ॅडमिन असलेल्यांना वरील सूत्रे लागू नाहीत. 
२. या गटांसाठी निश्‍चित केलेले छायाचित्रच सर्व गटांनी डी.पी. म्हणून वापरणे अनिवार्य आहे.
३. जिल्ह्यातील व्हॉट्सअ‍ॅप प्रसार पहाणार्‍या समितीसेवकांनी एका गटाच्या नियंत्रणाची सेवा आवश्यकतेपेक्षा अधिक जण करत नाहीत ना, तसेच त्यात अनावश्यक वेळ दिला जात नाही ना, असे पहावे. या सेवेसाठी दिल्या जाणार्‍या वेळेचा आढावा आपल्या उत्तरदायी सेवकांना द्यावा.

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
गुरु-शिष्य नात्याविषयी गुरूंचा दृष्टीकोन
मी कोणाचा गुरु नाही; पण शिष्य केल्याविना सोडणार नाही.
भावार्थ १ : मी कोणाचा गुरु नाही, यातील मी प्रकृतीतील मीविषयी आहे. शिष्य केल्याविना सोडणार नाही, म्हणजे पुरुषतत्त्वाचा किंवा बाबांच्या गुरूंचा, म्हणजे प.पू. अनंतानंद साईश यांचा शिष्य केल्याविना सोडणार नाही किंवा असा नामजप चालू करून देईन की, सर्वजण नामाचे शिष्य होतील.
भावार्थ २ : गुरु म्हणजे शिव. शिवदशेत मनात विचार येत नाहीत; म्हणूनच मी गुरु आहे हा विचार मनात येऊ शकत नाही. जीवदशेत आल्यावर मी शिष्य आहे एवढाच विचार मनात येतो; म्हणूूनच माझ्या गुरूंकडे मी साधकांना घेऊन जाईन, त्यांना माझ्या गुरूंचे शिष्य करीन.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
          हिंदूंना स्वतःची काळजी घेता आली नाही; म्हणून ते मोगल आणि इंग्रज यांच्या पारतंत्र्यात सहस्रो वर्षे राहिले. अशा हिंदूंच्या मतानुसार लोकशाहीत निवडून आलेल्यांनी स्वातंत्र्यापासून ६८ वर्षे भारतात राज्य करणे यांसारखी हास्यास्पद, तसेच भारत आणि हिंदु धर्म यांचा नाश करणारी दुसरी गोष्ट कोणती नसेल ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले


प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

आत्मप्रौढी नको ! 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     स्वतःच्या प्रगतीचा विचार करावा; पण अहंकाराची जोपासना करू नये. आत्मप्रौढीपेक्षा अधिक कोणता वेडेपणा नाही. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

बोधचित्र


मोदीद्वेषाचा राष्ट्रद्रोही प्रवास !

संपादकीय 
      काँग्रेसचे नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् आणि त्यांचा मुलगा कार्ती हे पिता-पुत्र सध्या वेगवेगळ्या कारणामुळे संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. पी. चिदंबरम् यांनी जिहादी आतंकवादी इशरत जहाँ ही आतंकवादी असल्याची माहिती लपवून ठेवली, असा खळबळजनक गौप्यस्फोट तत्कालीन केंद्रीय गृहसचिव पिल्लाई यांनी केला. पी. चिदंबरम् यांच्यावरील हा आरोप अत्यंत गंभीर आणि काँग्रेसी मानसिकतेचा खरा तोंडवळा समोर आणणारा आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn