Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

कोटी कोटी प्रणाम !

श्री गजानन महाराज प्रकटदिन
 प.पू. दास महाराज यांचा आज वाढदिवस 

महागाईने पिचलेल्या सामान्य जनतेवर नवीन ओझे न टाकणारा अर्थसंकल्प सादर !

     नवी देहली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २९ फेब्रुवारीला लोकसभेत २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. जागतिक अर्थमंदी आणि नैसर्गिक संकटे या दोन्हीच्या कचाट्यात भारतीय अर्थव्यवस्था सापडली असल्याचे सांगत जेटली यांनी विविध योजना आणि तरतुदी यांच्या आधारे शेतकरी, उद्योजक, नोकरदार यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे श्रीमंतांच्या हौसेच्या वस्तूंच्या मूल्यात वाढ करून त्यांच्या खिशातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय प्रत्येक करपात्र सेवेवर आता ०.५ टक्के कृषी कल्याण कर (सेस) लागू करून सेवाकरात वाढ करण्यात आली आहे. काँग्रेसच्या काळात महागाईचा निर्देशांक ९.६ होता, तो आता ५.४ झाला, तर काँग्रेसच्या काळात ६.३ असलेला विकास दर (जीडीपी) ७.६ टक्के झाल्याचे जेटली यांनी या वेळी स्पष्ट केले. येत्या वर्षभरात देशातील ५ राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने मतदारांना नाराज न करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे, अशी टीका या अर्थसंकल्पावर केली जात आहे.

(म्हणे) अफझलविषयी उघडपणे नव्हे, तर खाजगीत चर्चा करा !

फारूक अब्दुल्ला यांचा जेएन्यूच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रद्रोही सल्ला
जिहादी आतंकवाद्यांचे उदात्तीकरण करणारे
अब्दुल्ला यांच्यावर शासन काय कारवाई करणार आहे ?
     जम्मू - संसदेवर आक्रमण करणार्‍या महंमद अफझलविषयी उघडपणे चर्चा करणे योग्य नाही. अशा नाजूक प्रश्‍नांवर विद्यार्थ्यांनी खाजगीत चर्चा करावी, असा सल्ला नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी जेएन्यूच्या विद्यार्थ्यांना दिला. (देशद्रोह करा; मात्र उघडपणे नको, असाच सल्ला फारूक अब्दुल्ला यांना द्यायचा आहे का ? यातून अब्दुल्ला यांची राष्ट्रद्रोही मानसिकताच उघड होते ! - संपादक) जम्मू येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले,
१. जेएन्यूच्या कुलगुरूंनी ही घटना त्यांच्या स्तरावर हाताळली पाहिजे होती. पोलिसांना हस्तक्षेप करण्यास अनुमती द्यायला नको होती. (म्हणजे चोरांनी चोरी करणे आणि मग ती लपवणे, असाच हा प्रकार झाला. परंतु अब्दुल्ला यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की ही साधी चोरी नसून देशाच्या मूळावर उठणार्‍या अफझलच्या समर्थनामध्ये केलेला राष्ट्रद्रोह आहे. उद्या हेच विद्यार्थी अफझलचे अनुकरण करणार नाहीत, हे कशावरून ? परंतु अब्दुल्ला यांच्या वक्तव्याच्या माध्यमातून त्यांना देशामध्ये जिहादी आतंकवाद वाढवायचा आहे, असेच दिसून येते. - संपादक)

सलमान रश्दी यांच्या हत्येसाठीच्या रकमेत वाढ !

     नवी देहली - इराणचे तत्कालीन सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खोमेनी यांनी भारतीय वंशाचे ब्रिटीश लेखक सलमान रश्दी यांची हत्या करण्याचा फतवा काढला होता. त्यासाठी घोषित केलेल्या १८ कोटी ५० लाख रुपयांच्या रकमेत आता आणखी ४ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. वर्ष १९८९ मध्ये रश्दी यांच्या सॅटनिक व्हर्जेस (सैतानी आयते) या कादंबरीतून ईशनिंदा केल्याच्या आरोपावरून हा फतवा काढण्यात आला होता. (कुठे १९८९ मध्ये करण्यात आलेल्या ईशनिंदेचा अजून सूड उगवण्यासाठी प्रयत्नशील असणारे मुसलमान, तर कुठे वैयक्तिक स्वार्थासाठी स्वतःहून देवतांचा अवमान करणारे जन्महिंदू ! - संपादक)

गुजरातमध्ये २४ लाख पाटीदार कोट्यधीश !

कधी नव्हे एवढी हिंदूंची एकजूट आवश्यक असतांना आरक्षणाच्या मागे 
लागून वेळ आणि शक्ती व्यर्थ घालवणारे जात्यंध राष्ट्रद्रोहीच आहेत !
जाटही आर्थिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सबळ !
     कर्णावती (अहमदाबाद) - मागील वर्षी गुजरातमध्ये (पाटीदार) पटेल आरक्षणाच्या मागणीवरून मोठे हिंसक आंदोलन झाले होते, तर अलीकडे आरक्षणाच्याच मागणीवरून झालेल्या या आंदोलनात २० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. या दोन्ही आंदोलनांच्या वेळी उसळलेल्या आगडोंबात अब्जावधी रुपयांच्या खाजगी आणि शासकीय संपत्तीची राखरांगोळी झाली; परंतु आरक्षणाची मागणी करणार्‍या या दोन्ही समाजांची वस्तुस्थिती जाणून घेतल्यावर हे दोन्ही समाज आर्थिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या सुस्थितीत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

बिहारच्या सुपौल येथे धर्मांधांनी मंदिरात घुसून भगवान हनुमानाच्या मूर्तीची केली तोडफोड

देशात अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर आक्रमणाची
अफवा पसरली, तरी एकजात सर्व पक्ष त्यांच्या साहाय्यासाठी आणि प्
रसारमाध्यमे बातमीसाठी धावून जातात; मात्र हिंदूंसाठी कोणीही येत नाही !
     सुपौल (बिहार) - येथील रामपूरमध्ये २६ फेब्रुवारीच्या रात्री धर्माधांनी शिव मंदिरात घुसून भगवान हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड केली. ही घटना पहाटे ५ वाजता पूजेसाठी आलेले पुजारी ज्योतिष गिरी यांच्या लक्षात आल्यावर ती सर्वत्र पसरली. यानंतर येथे शेकडो हिंदू जमा झाल्याने तणाव निर्माण झाला. यासंदर्भात माहिती देतांना गिरी म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी धर्मांधांनी मंदिरावर ध्वनीक्षेपक लावण्याचा विरोध केला होता. १३ फेब्रुवारीच्या रात्री धर्मांधांनी मंदिरात चोरी करून दान पेटीतील २ सहस्र रुपये आणि काही भांडी नेली होती. (अशा घटना होत असतांनाही पोलिसांनी या मंदिराला संरक्षण का दिले नाही ? या धर्मांधांवर वेळीच कारवाई का केली नाही ? - संपादक)

देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट झाल्यावर केजरीवाल म्हणतात, मी मोदी यांच्यापेक्षा अधिक मोठा देशभक्त !

     नवी देहली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मी अधिक मोठा देशभक्त आहे, असे विधान देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याने संतापलेले देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले. मी दलित, गरीब आणि मागासलेल्या वर्गासाठी संघर्ष करत आहे; म्हणूनच मी भाजपसाठी देशद्रोही ठरलो आहे. मात्र माझा आवाज दडपता येणार नाही. मी त्यांच्यासाठी लढतच राहीन, असेही केजरीवाल म्हणाले. (केजरीवाल देशद्रोह्यांसाठी लढत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जर ते खरे देशभक्त असते, तर देशासाठी हुतात्मा झालेल्या एकातरी सैनिकांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले असते.  एकदा तरी पाक आणि जिहादी आतंकवाद्यांच्या विरोधात तोंड उघडले असते, कश्मीरमधील विस्थापित हिंदूंसाठी आवाज उठवला असता, क्रांतीकारकांचा जयजयकार केला असता; मात्र त्यांनी एकदाही असे केलेले नाही ! - संपादक) केजरीवाल पुढे म्हणाले की, जेएन्यूमध्ये देशद्रोही घोषणा देणारे हे काश्मिरी होते. या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आल्यास पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती यांना राग येईल, या भीतीने त्यांना अटक करण्यात आलेली नाही. सीमारेषेवर आपले सैनिक प्रतिदिन हुतात्मा होत आहेत आणि मोदी काश्मीरमध्ये सरकार स्थापन करावयाचे असल्याने देशद्रोही घटकांना पाठिंबा देत आहेत.

हरियाणामध्ये ३५ समुदाय करणार जाटांचा सामजिक बहिष्कार !

समाजद्रोही कृत्ये करणार्‍यांना हीच शिक्षा योग्य आहे, असे कुणाला वाटल्यास आश्‍चर्य नको !
हरियाणा येथे जाळपोळ करतांना आंदोलक
   गुडगांव - जाटांना आरक्षण देण्याच्या मागणीवरून हरियाणात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर येथील ३५ समुदायांनी जाटांवर सामाजिक बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची मागणी आहे की, हिंसाचार करणार्‍यांवर हत्येचे गुन्हे दाखल करण्यात यावेत. राज्यातील १०० हून गावांनी महापंचायत बोलावून हा निर्णय घेतला आहे.
१. महापंचायतीचे म्हणणे आहे की, जाटांचे आंदोलन आरक्षणासाठी नव्हे, तर जाट नसलेले राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या विरोधात होते.

हिंदुत्ववादी संघटनांकडून मुंबई मिररच्या वैचारिक आतंकवादाचा विरोध

देहली येथील जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन 
जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करतांना हिंदु धर्माभिमानी 
     देहली - हिंदुद्वेषी मुंबई मिरर या दैनिकाच्या २५ फेब्रुवारीच्या मुखपृष्ठावर सुपारीबाज पत्रकार अलका धूपकर आणि धर्मेन्द्र तिवारी यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या संदर्भात अवमान करणारे खोटे वृत्त प्रकाशित केले. या वैचारिक आतंकवादाच्या विरोधात येथील जंतरमंतर येथे विविध हिंदुत्ववादी संघटनांनी २८ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले. या वेळी हिंदु धर्माभिमान्यांनी या सुपारीबाज पत्रकारांना त्यांच्या पदावरून त्वरीत काढावे, अशी मागणी केली. या आंदोलनानंतर धर्माभिमान्यांकडून सूचना अन् प्रसारण मंत्रालयाचे सचिव आणि इंडियन प्रेस कॉन्सिल यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीसह, सनातन संस्था, वैदिक उपासना पीठ, गौरक्षा दल झुंझुनू, राजस्थान योग वेदांत समिती आदी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह अनेक हिंदुत्ववादी उपस्थित होते.

विजय मल्या कारागृहाच्या बाहेर कसे ? - भाजपचे खासदार वरुण गांधी यांचा प्रश्‍न

देशात सर्वांना समान न्याय आहे, असे म्हणणार्‍यांना काय म्हणायचे आहे ?
याजागी एखादी सामान्य व्यक्ती असती, तर तिला अशीच वागणूक मिळाली असती का ?
     वाराणसी - जेव्हा एक शेतकरी किंवा सामान्य माणूस कर्ज घेण्यासाठी बँकेत जातो, तेव्हा त्याची भूमी किंवा अन्य संपत्ती गहाण ठेवली जाते. मग मोठे व्यावसायिक आणि उद्योगपती यांना कोणत्या आधारावर कर्ज दिले जाते ?, असा प्रश्‍न भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी केला आहे. 
    खासदार गांधी येथील एका खाजगी तंत्र संस्थेच्या दीक्षांत समारंभानिमित्त अतिथी म्हणून उपस्थित होते. या वेळी प्रसिद्ध व्यावसायिक विजय मल्या यांच्यावर आरोप करतांना ते म्हणाले, मल्यासारख्या देणेदारांमुळे बँकांना १४ लाख कोटी रुपयांची हानी सहन करावी लागली आहे. कर्जरूपाने मोठी रक्कम घेतल्यावरही मल्या त्याच्या कर्मचार्‍यांना वेतन देत नाहीत. असे असतांनाही ते कारागृहाच्या बाहेर आहेत, हे संतापजनक आहे. विजय मल्यांनी शासकीय बँकांचे अब्जावधी रुपये थकवले आहेत.

भारतीय सैन्य अत्यावश्यक शस्त्रे आणि साधनसामुग्री मिळवण्यासाठी झुंजत आहे !

     नवी देहली - सैन्याला आवश्यक शस्त्रे आणि साधनसामुग्री यांच्या खरेदीसाठी असणारी किचकट प्रक्रिया आणि प्रशासकीय यंत्रणेची लालफीतशाही यांमुळे सैन्याच्या आधीच उशीर झालेल्या आधुनिकीकरणाचे ध्येय लांबणीवर पडत आहे. त्यामुळे अत्याधुनिक बंदुका, बुलेट प्रूफ जॅकेटस्, रात्रीच्या वेळी मारा करू शकणार्‍या तोफा, क्षेपणास्रे, हेलीकॉप्टर्स इत्यादी साधने मिळवण्यासाठी सैन्याला झगडावे लागत आहे. (पाकच्या आतंकवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे मिळाल्याची वृत्ते आपण वाचत आणि ऐकत आलो आहोत. अशा अत्याधुनिक शस्त्रांस्त्रांसाठी भारतीय सैनिक धडपडत आहेत, ही गोष्ट देशाच्या शासनासाठी दुर्भाग्यपूर्ण आहे. - संपादक)
१. सैन्याच्या तुलनेत नाविकदल आणि वायूदल यांची परिस्थिती चांगली आहे.
२. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २६ फेब्रुवारी या दिवशी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत गेल्या ३ वर्षांत या दोन दलांसाठी १.३३ (एक लक्ष तेतीस सहस्र) लक्ष कोटी रुपयांचे १६२ करार अंतिम झाले आहेत आणि जवळपास ४० सहस्र कोटी रुपयांचे ४४ करार यंदाच्या वर्षी विचाराधीन आहेत.

हिंदूंनो, केवळ हिंदुवादी न होता धर्मांधांच्या विरोधात संघटित व्हा ! - श्री. पारस राजपूत

नालासोपारा येथे हिंदु धर्मजागृती सभेला १ सहस्र ३०० हिंदु धर्माभिमान्यांची उपस्थिती
धर्मसभेनंतर राष्ट्र आणि धर्मरक्षणासाठी धर्मकार्य करण्याचा उपस्थित हिंदूंचा निर्धार !
डावीकडून सौ. नयना भगत, श्री पारस राजपूत,
श्री प्रसाद वडके आणि पू. राहुलेश्वारानान्दजी महाराज 
    नालासोपारा (ता. वसई, जिल्हा पालघर), २९ फेब्रुवारी (वार्ता.) - आज केवळ जेएन्यूच नव्हे, तर भारतातील १५० विद्यापिठांमध्ये देशविरोधी प्रचार चालू आहे. मोठ्या संख्येने भारतातील मुसलमान युवक इसिसमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान श्री. मोदी यांनी मन की बात यात इसिसच्या आतंकवादाचा विषय घ्यावा; कारण हा तरुण वर्ग आणि देश यांचा प्रश्‍न आहे. पंतप्रधान आणि विद्यमान शासनाने देशात आतंकवादविरोधी कायदा लागू करावा, तसेच मदरसे, मशिदी यांतून इस्लामच्या नावाखाली होणारा विखारी आणि चुकीचा प्रचार थांबवावा, अशी विनंती आम्ही करत आहोत. हिंदूंनी आता केवळ हिंदुवादी होऊन चालणार नाही, तर धर्मांधांच्या विरोधात संघटित व्हायला हवे, असे प्रतिपादन इंडिया अगेंस्ट इस्लामिक स्टेट या संकेतस्थळाचे संपादक श्री. पारस राजपूत यांनी केले. येथे घेण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या सौ. नयना भगत आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सभेला १ सहस्र ३०० धर्माभिमानी उपस्थित होते. वसई येथील सनातन गोशाळा आश्रमाचे पू. राहुलेश्‍वरानंदजी महाराज आणि सनातन संस्थेच्या पू. (कु.) अनुराधा वाडेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

धैर्य असल्यास ब्रिगेडी महिलांनी मशिदीत घुसून दाखवावे ! - पू. (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

अमरावती येथे ४ सहस्रांहून अधिक हिंदूंच्या उपस्थितीत हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी
    अमरावती, २९ फेब्रुवारी (वार्ता.) - भूमाता ब्रिगेडच्या महिला शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथर्‍यावर घुसण्याचा प्रयत्न करत होत्या. आता त्या येत्या महाशिवरात्रीपर्यंत त्र्यंबकेश्‍वर येथील मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या ब्रिगेडी महिलांमध्ये जर धैर्य असेल, तर त्यांनी मंदिराच्या गाभार्‍यात शिरण्यापेक्षा मशिदीत घुसून दाखवावे, असे आवाहन पू. (कु.) स्वाती खाडये यांनी केले. २८ फेब्रुवारी या दिवशी येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत त्या बोलत होत्या. या सभेला ४ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती लाभली.
मान्यवरांची भाषणे
हिंदू संघटित झाल्यासच जनआंदोलन उभे राहील ! - पू. नंदकुमार जाधव, सनातन संस्था
     गेल्या काही वर्षांच्या काळात राज्यकर्ते, पोलीस, प्रशासन आणि पत्रकारिता या लोकशाहीच्या स्तंभांवरील आमचा विश्‍वास उडाला आहे; म्हणूनच आम्ही यापुढे त्यांच्या विरोधात जागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्यापैकी अनेकांनीही हफ्तेवाले पोलीस अनुभवले असतील, आपल्यापैकी अनेक जणांनी वाहन चालवतांना रस्त्यात लुबाडणारे ट्रॅफीक पोलीस पाहिले असतील. येथे अनेक पीडित उपस्थित असतील, ज्यांच्या तक्रारी पोलिसांनी लिहून घेतल्या नसतील. काहींना पोलिसांनी खोट्या गुन्ह्यांत अडकवले असेल. कोणावरही असा अन्याय झाला असेल, तर तो आम्हाला कळवा. आपण सर्व जण एकत्र या दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढा देऊया. मी एकटा काय करणार ?, असा विचार करू नका; कारण थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीनुसार सर्व एकटे एकत्र आल्यानंतर मोठे जनआंदोलन उभे राहील !

श्री महालक्ष्मी मंदिरातील प्रसाद महिला कैद्यांकडून नको, तर देवीप्रती सेवाभाव असणार्‍या भक्तांकडून बनवून घ्या !

निवासी उपजिल्हाधिकार्‍यांशी (उजवीकडे) चर्चा करतांना श्री. मधुकर नाझरे आणि अन्य
निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन
   कोल्हापूर, २९ फेब्रुवारी (वार्ता.) - कारागृहातील वातावरण हे आरोग्याच्या दृष्टीने अस्वच्छ तर असतेच, त्यासह आध्यात्मिकदृष्ट्या तमप्रधानही असते. असे असतांना भाविकांना विश्‍वासात न घेता मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी कोणाशीही चर्चा न करता कारागृहातील महिला कैद्यांकडून श्री महालक्ष्मी देवी मंदिरासाठी लागणारे प्रसादाचे लाडू बनवून घेण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आहे. त्यामुळे श्री महालक्ष्मी मंदिरातील प्रसाद महिला कैद्यांकडून नको, तर देवीप्रती सेवाभाव असणार्‍या भक्तांकडून बनवून घ्या, असे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने निवासी उपजिल्हाधिकारी श्री. बर्गे यांना देण्यात आले. हे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे आहे.

हेडलीवर संसदेत एकमत होत नाही, हे देशाचे दुर्दैव ! - विशेष शासकीय अधिवक्ता उज्ज्वल निकम

आतंकवादाविषयी कठोर पावले उचलण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य आहे !
   कुर्डूवाडी (जिल्हा सोलापूर), २९ फेब्रुवारी - जो आतंकवाद करतो, त्याला कायद्याचा बडगा दाखवावाच लागतो. डेव्हिड हेडली हा माफीचा साक्षीदार आहे; परंतु त्याच्या विरोधात कारवाईसाठी पाकिस्तान पुरावे मागत होता. त्यामुळे आम्ही त्याला बोलते केले; मात्र या डेव्हिड हेडलीवर संसदेत सत्ताधारी आणि विरोधक यांचे एकमत असू नये, हे या देशाचे दुर्दैव आहे, अशी खंत पद्मश्री आणि विशेष शासकीय अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली. (राजकारण्यांच्या अशा बोटचेप्या धोरणामुळेच आतंकवाद्यांचे फावते ! - संपादक)

पंढरपूर येथे वाहन फेरीने पंढरपूरकरांचे धर्माप्रती स्फुल्लिंग चेतवले !

वाहनफेरीत सहभागी धर्माभिमानी
पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २९ फेब्रुवारी (वार्ता.) - येथे २ मार्च या दिवशी होणार असलेल्या सभेच्या प्रसारानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ फेब्रुवारीला वाहन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. फेरीची सांगता छत्रपती शिवाजी चौकात कोपरा सभेत झाली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ यांनी २ मार्च या दिवशी होणार असलेल्या सभेला अधिकाधिक संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन केले, तर सनातन संस्थेच्या सौ. सुनिता दीक्षित यांनीही धर्मशिक्षणाची आवश्यकता मांडली.
वाहन फेरीचा प्रारंभ टिळक स्मारक मैदान येथून पू. नंदकुमार हरिदार आणि त्यांच्या धर्मपत्नी यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करून झाला, तसेच त्यांनी धर्मध्वजाला नारळही वाढवला. श्री. हिवलकर गुरुजी यांनी पूजन सांगितले.
    धर्मध्वजाचे स्वागत घोंगडे गल्ली येथे पुरोहित महासंघाचे अध्यक्ष विद्याधर वांगीकर, काळा मारुति येथे भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब बडवे, कृष्ण मंदिर चौफाळा येथे प्रतिष्ठित व्यापारी श्री. अरुण बट्टेवार आणि आमदार प्रशांत परिचारक यांच्या घरासमोर प्रणव परिचारक यांनी केले.

अभाविपकडून पनवेल येथे जेएन्यूमधील देशद्रोही कृत्याच्या विरोधात निदर्शने

निदर्शनात सहभागी अभाविपचे कार्यकर्ते
   २९ फेब्रुवारी - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नुकताच पनवेल येथील शिवाजी चौकात जवाहरलाल नेहरू विद्यापिठात घडलेल्या देशविरोधी कृत्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी भारताच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली, तसेच काही महाविद्यालयाच्या प्रतिनिधींनी त्यांचे विचार व्यक्त केले. या प्रकरणात गुन्हेगार असणार्‍या दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी अभाविपकडून करण्यात आली. प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हा संयोजक श्री. मयुरेश नेटकर, सर्वश्री कोमल कोळी, चिन्मय समेळ, राहुल गोस्वामी, तेजस सोनावणे, रवींद्र अभिमाने आणि स्नेहा साळवे यांनी भाषण केले.
या प्रकरणातील गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करणारे निवेदन आम्ही तहसीलदारांना देत आहोत, अशी माहिती अभाविप पनवेलचे शहर मंत्री श्री. सोमेश कोलगे यांनी दिली आहे.

क्रिकेट सामन्यात भारताकडून पाकचा पराभव झाल्याचे पाकमध्ये हिंसक पडसाद

भारताकडून झालेला खेळातील पराभवही पचवू न शकणारे पाक 
नागरिक युद्धात पराभूत झाल्यावर काय करणार ?
     कराची - बांगलादेशात चालू असलेल्या आशिया चषक टी-२० स्पर्धेत २७ फेब्रुवारीला झालेल्या सामन्यात भारताने पाकचा पराभव केला. या पराभवामुळे संतापलेल्या पाक नागरिकांनी हिंसक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पराभवामुळे संतप्त झाल्यानंतर अनेक नागरिकांनी दूरचित्रवाणी संच फोडले, अनेकांनी खेळाडूंविरुद्ध घोषणाबाजी केली, तर काही खेळाडूंचे पुतळे जाळले. पंजाबमधील काही भागांत कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि अन्य खेळाडू यांचे पुतळे आणि चित्रे जाळली.

समाजवादी पक्ष उत्तरप्रदेशला काश्मीर बनवत आहे ! - साध्वी प्राची

केंद्रशासनाने उत्तरप्रदेशला काश्मीर होण्यापासून वाचवावे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
साध्वी प्राची
      संभल (उत्तरप्रदेश) - आग्रा येथील मंटोलमध्ये सुमारे २५० हिंदू परिवारांनी येथून पलायन केले आहे. ज्या प्रकारे काश्मीरमधून हिंदूंना पलायन करावे लागले, तशी स्थिती समाजवादी पक्षाच्या उत्तरप्रदेशमध्ये आहे, अशी टीका विश्‍व हिंदु परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी येथे केली. आग्रा येथे विश्‍व हिंदु परिषदेचे दलित नेते अरुण माहोर यांच्या धर्मांधाकडून करण्यात आलेल्या हत्येनंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाइकांचे सांत्वन करण्यासाठी साध्वी प्राची येथे आल्या होत्या. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. 
     साध्वी प्राची पुढे म्हणाल्या की, माहोर दलित असतांनाही दलितांच्या नावाने राजकारण करणार्‍या बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी त्यांच्या घरी भेट दिली नाही. साध्वी यांनी राज्याचे मंत्री आझम खान यांच्यावरही टीका केली. त्यांनी आरोप केला की, खान आरोपींना सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि प्रशासन त्यांना यात सहकार्य करत असते.

सध्या आरोप निश्‍चित करू नका ! - मुंबई उच्च न्यायालय

कॉ. पानसरे हत्या प्रकरण
    मुंबई - अन्वेषण चालू असल्यामुळे समीर गायकवाड यांच्यावर आताच आरोप निश्‍चित केल्याने त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे आताच आरोप निश्‍चित करू नये, याकरिता शासनाने कोल्हापूर न्यायालयात अर्ज करावा, असे २९ फेब्रुवारी या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले. न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि व्ही.एल्. अचलिया यांच्या खंडपिठाने वरील सुनावणी केली. ८ मार्च या दिवशी कोल्हापूर न्यायालयात कॉ. पानसरे हत्याप्रकरणी समीर गायकवाड यांच्यावर आरोप निश्‍चित केले जाणार होते.

ठाण्यातील हत्याकांडाचे कारण अद्याप अस्पष्ट

    ठाणे - कासारवडवली येथील हसनैन वरेकर यांनी स्वत:च्या कुटुंबातील १४ जणांना २८ फेब्रुवारी या दिवशी धारदार सुर्‍याने ठार केले. या हत्याकांडाचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही; मात्र पोलीस तपास अद्यापही चालू आहे. याविषयी ठाण्याचे पोलीस सहआयुक्त श्री. आशुतोष डुम्बरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
हसनैन स्वत: सनदी लेखापाल होते. या हत्याकांडात जखमी झालेली त्यांची बहीण मात्र वाचली आहे. या घटनेचे वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेले छायाचित्रकार रतन भौमिक यांचाही घटनास्थळी हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला.

सर्व शिक्षण मंडळांच्या (बोर्ड) शाळांमध्ये इतिहास सक्तीचा करणार ! - विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री

     पुणे, २९ फेब्रुवारी - जून २०१६ पासून अभ्यासक्रमांत १८५७ चे बंड याऐवजी १८५७ चा पहिला स्वातंत्र्यलढा या प्रकरणाचा समावेश करण्यात येईल. देशाचा खरा इतिहास पुढच्या पिढीला ठाऊक होण्यासाठी अभ्यासक्रमात संत आणि स्वातंत्र्यसेनानी यांच्या कार्याचा समावेश असला पाहिजे. यासाठी शिक्षण मंडळांच्या (बोर्ड) शाळांमध्ये इतिहास हा विषय सक्तीचा करण्याविषयीचा ठराव येत्या अधिवेशनात करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. विनोद तावडे यांनी सांगितले. तसेच केंद्र आणि राज्य शासन यांच्याकडून १२ कोटी ५० लक्ष रुपये निधी देऊन स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे यांचे येवला या त्यांच्या जन्मगावी स्मारक उभारण्यात येईल, असेही ते म्हणाले.

जळगाव येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण

     जळगाव - येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला जिल्हा वकील संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. लक्ष्मण व्हि. वाणी साहेब आणि जळगाव महापालिकेचे कनिष्ठ अभियंता श्री. प्रसाद पुराणिक यांच्या हस्ते माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.
     या वेळी जळगाव वकील संघाचे सचिव आणि हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अधिवक्ता गोविंद तिवारी, अधिवक्ता श्री. रमाकांत पाटील, तसेच जळगाव जिल्हा हिंदु महासभेचे माजी अध्यक्ष सुनिल जोशी, जिल्हा संघटक श्री. रमेश सुशीरसाहेब, दशरथ सोनवणे, राजेंद्र पवार, हिंदु महासभेचे प्रदेश सदस्य श्री. विनोद गवांदे, बाळु विदुर, लक्ष्मण सोनार, लहू कोल्हे, तुळशीराम वायरमन, मकळाकर राणे, सुरेश कोळी, सुरेश कोल्हे, रवी पाटील, तसेच सनातन संस्थेचे प्रितम पाटील, अधिवक्ता गिरीश औटगीर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना पहिलीपासून पराक्रमाचा इतिहास शिकवा ! - रा.स्व. संघ

     नवी देहली - देशाचा जाज्वल्य इतिहास, येथील पराक्रमी वीर, स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि इतर थोर विचारवंत यांच्याविषयी भावी पिढीला आदर-अभिमान वाटावा, या उद्देशाने शाळेमध्ये पहिलीपासूनच इतिहास शिकवला जावा, अशी सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केली आहे. नव्या शैक्षणिक धोरणात हा पालट करण्याबाबत अखिल भारतीय इतिहास संकलन योजना या संघटनेने मनुष्यबळ विकास खात्याला पत्र पाठवले आहे. 

मदरशात बेड्या घालून मुलांना यातना देण्याचा प्रकार उघडकीस, मौलवीला अटक

अशा मदरशांची चौकशी करून ते बंद करण्याची कारवाई शासन करेल का ?
राजस्थानमधील घटना
     जयपूर - अलवर जिल्ह्यातील रामग येथील मदरशामध्ये लहान मुलांना बेड्यांनी बांधून यातना देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मदरशाचे मौलवी अयूब खानच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. (हिंदूंच्या आश्रमांविषयी कथित खोट्या बातम्या रंगवून त्याचा अपप्रचार करणारी प्रसारमाध्यमे मदरशांच्या संदर्भात मूग गिळून गप्प का बसतात ? - संपादक)
     काही ग्रामस्थांना बेड्यांनी जखडलेली दोन अल्पवयीन मुले श्याम रामग रेल्वे स्थानक मार्गच्या दिशेने पळतांना आढळून आली. त्यांची ही स्थिती पाहून ग्रामस्थांनी त्यांना थांबवले आणि माहिती विचारली. मुले काहीही सांगण्यास घाबरत होती. या सदंर्भात ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस मुलांना येऊन घेऊन गेले. या प्रकरणी पोलिसांनी मौलीवीची चौकशी करून त्याला अटक केली. या दोन्ही मुलांचे नाव मुशर्रफ आणि साहिल अशी आहेत. मुलांनी सांगितले की, या मौलवीने मदरशात १० मुलांना अशा पद्धतीने बेड्यांमध्ये जखडून ठेवले होते.

इशरत जहाँचे जिहादी आतंकवाद्यांशी संबंध होते कि नाही हा आमच्या अन्वेषणाचा भाग नव्हता !

सीबीआय शासनाचा पोपट आहे, असे म्हणणारे सिन्हा याहून वेगळे काय सांगणार !
नवी देहली - केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआयचे) माजी संचालक रणजीत सिन्हा यांनी म्हटले आहे की, आमच्यावर फक्त इशरत जहाँ चकमक खरी होती कि खोटी, याचे अन्वेषण करण्याचेच दायित्व होते. इशरतचे जिहादी आतंकवाद्यांशी संबंध होते कि नाही हा आमच्या अन्वेषणाचा भाग नव्हता. जेव्हा न्यायालयीन चौकशीदरम्यान ही चकमक खोटी असल्याचे समोर आले, त्यानंतर आमच्याकडे अन्वेषण सोपवण्यात आले होते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. (यावरून काँग्रेसच्या काळात सीबीआयचे अधिकारी म्हणजे काँग्रेसचे घरगडी असल्याप्रमाणेच होते. काँग्रेस शासन सांगेल, तितकेच काम करणार्‍या सीबीआयने किती निरपराध्यांना आतंकवादी आणि आतंकवाद्यांना निरपराध ठरवले याची चौकशी झाली पाहिजे. - संपादक)

मुलांना मार्कवंत नको, तर कौशल्यवंत बनवणे आवश्यक !

     मुरुड (जिल्हा रायगड) येथील समुद्रातील दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या घटनेतून एकाही विद्यार्थ्याला पोहता येत नसल्याचे उघड झाले, तसेच आपत्कालीनप्रसंगी बचावाचे कौशल्यही कोणात नव्हते. केवळ गुण मिळवण्याच्या नादात मुले आणि पालक जीवरक्षक कौशल्याकडे दुर्लक्ष करतात, हे अनाकलनीय आहे. मुलांना पोहणे, सायकलिंग, वाहन चालवणे, स्वसंरक्षणासाठी ज्यूडो, कराटे शिकवणे आणि समाजात वावरण्याचे ज्ञान देणे आवश्यक आहे. सहलीला जातांना आवश्यक उपाययोजनांचे प्रशिक्षणही द्या. अशा प्रसंगातूनच मुलांना निसर्गभ्रमंती आणि धाडस यांचा अनुभव येतो. त्या कौशल्यामुळे अपघातप्रसंगी पश्‍चात्तापाची वेळही येणार नाही. त्यामुळे मुलांना मार्कवंत नको, तर कौशल्यवंत बनवणे आवश्यक आहे.
- श्री. चंद्रकांत वारघडे, अध्यक्ष, माहिती सेवा समिती, महाराष्ट्र

अपंग मुलीला चित्रल परिवाराकडून साहाय्य

     पेरणे फाटा (तालुका हवेली), पुणे - येथे उच्चदाब वाहिनीच्या जोरदार धक्क्याने दोन्ही हात गमावलेल्या ज्ञानेश्‍वरी बढे हिला पुण्यातील चित्रल परिवाराने ७५ सहस्र रुपये रोख रक्कम दिली, तसेच कृत्रिम हात आणि पुढील शिक्षणासाठी साहाय्य करण्याची सिद्धताही दर्शवली. या वेळी प्रा. हनुमंत मेमाणे, माहिती सेवा समितीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत वारघडे, महालक्ष्मी डेव्हलपर्सचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय गीते आणि महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष श्री. नवनाथ काकडे उपस्थित होते.

संभाजीनगर येथे एका विद्यार्थिनीचा धर्मांधाकडून विनयभंग

अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीत अग्रेसर !
     संभाजीनगर, २९ फेब्रुवारी - येथील एका १७ वर्षीय विद्यार्थिनीचा मोहम्मद शफीक शेख अब्दुल हमीद याने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. ही विद्यार्थिनी २६ फेब्रुवारी या दिवशी रात्री खाजगी शिकवणी संपल्यावर घरी जात होती. त्या वेळी मोहम्मद शफीक हा तिचा पाठलाग करत होता. ही विद्यार्थिनी घराजवळ आल्यावर त्याने तिला अडवले आणि तिच्या हातात विदेशी चलन असलेले २ डॉलर देत विनयभंग केला. या वेळी त्या युवतीने आरडाओरड केल्याने तिचे नातेवाईक आले आणि त्यांनी मोहम्मद शफीक याला चोप दिला. त्यानंतर त्याला सिटीचौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मोहम्मद शफीक याच्यावर विनयभंगाचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

पिंपरी (पुणे) येथील प्रसिद्ध श्री वैष्णोदेवी मंदिरात चोरी

राज्यातील असुरक्षित मंदिरे !
     पिंपरी - येथील पिंपरी लष्कर भागात प्रसिद्ध असलेल्या श्री वैष्णोदेवी मंदिरात २९ फेब्रुवारी या दिवशी पहाटे चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील देवीच्या मूर्तींवरील सोन्या-चांदीचे मुकुट, ९ मंगळसूत्रे असे एकूण ४० सहस्र रुपयांचे दागिने आणि दानपेटीतील २५ सहस्र रुपयांची चोरी केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

फलक प्रसिद्धीकरता

राहुल गांधी यांना पूजनीय संबोधणार्‍या सीबीएस्ईचे डोके ठिकाणावर आहे का ?
     सीबीएस्ईच्या इयत्ता ५ वी साठी शिफारस केलेल्या पुस्तकात राहुल गांधी यांच्यावर पूजनीय, आकर्षक व्यक्तीमत्त्व असलेले आणि शक्तीशाली नेता अशी स्तुतीसुमने उधळण्यात आली आहेत.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
CBSEki pustakne Rahul Gandhiko Pujya, akarshak vyaktitva wale
evam Shaktishali neta kaha hai. - Kya CBSEka dimag thikane par hai ?
जागो !
सीबीएस्ई की पुस्तक ने राहुल गांधी को पूज्य, आकर्षक व्यक्तित्ववाले
एवं शक्तिशाली नेता कहा है. - क्या सीबीएस्ई का दिमाग ठिकाने पर है ?

भारतात चेन्नई एक्स्प्रेस या गुप्त संकेतांकाच्या नावाने इसिसच्या हस्तकांना देणगी !

भारतात इसिसची पाळे-मुळे झपाट्याने पसरत असून ती खणून 
काढण्यासाठी शासनाने पावले उचलावीत, हीच अपेक्षा ! 
     लक्ष्मणपुरी (लखनौ) - उत्तरप्रदेशमध्ये इसिसशी संबंधित लोकांनाचेन्नई एक्स्प्रेस या नावाचा गुप्त संकेतांक (कोड) देण्यात आला असून त्याद्वारे त्यांना देणग्या मिळत आहेत. अलीकडे कुशीनगर येथून अटक करण्यात आलेल्या रिझवान या इसिसच्या हस्तकाच्या चौकशीतून ही बाब उघड झाले आहे. चेन्नई एक्स्प्रेस या गुप्त संकेतांकाच्या निर्मितीमागे आणि पैसे पाठवण्यामागे मुख्य सूत्रधार कोण आहे, याचाही शोध मुंबई आतंकवादविरोधी पथकासह इतर गुप्तचर संस्था आणि सुरक्षा संस्था घेत आहेत. देशात इसिसचे जाळे पसरवणे आणि त्यासाठी सामग्री जमवण्यासाठी रिझवानला ऑनलाईन १ लाख ५ सहस्र रुपये पाठवण्यात आले होते. ज्या लिंकवरून (मार्गिकेवरून) त्याला हे पैसे वाठवण्यात आले होते, त्या लिंकचा संकेतांक चेन्नई एक्स्प्रेस होता. रिझवानच्या चौकशीतून त्याने तमिळनाडूच्या पत्त्यावर एक ओळखपत्रही सिद्ध केल्याचेही समोर आले आहे.

आर्ट ऑफ लिव्हींगला १२० कोटी रुपयांचा दंड आकारण्याची राष्ट्रीय हरित लवादाला शिफारस !

       नवी देहली - आर्ट ऑफ लिव्हींगकडून येत्या ११ ते १३ मार्च या कालावधीत देहलीत यमुना नदीच्या पात्रात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला श्री श्री रविशंकर यांचे देश-विदेशातून तीन लाखाहून अधिक अनुयायी येण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाचे व्यासपीठ ७ एकर एवढ्या आकाराचे असणार आहे. या प्रकरणी या आध्यात्मिक संस्थेकडून १२० कोटी रुपयांचा दंड आकारला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या एका समितीने हा दंड आकारण्याची शिफारस लवादाला केली आहे. समितीने म्हटले आहे की, एवढ्या मोठ्या कार्यक्रमामुळे नदी पात्राची हानी होण्याची शक्यता आहे. ती भरून काढण्यासाठी सुमारे १०० ते १२० कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. (पर्यावरणाची कथित हानी होणार असल्याचे सांगत हिंदूंच्या संतांकडे हानीभरपाईची मागणी करणारा लवाद कधी ईदच्या काळात उघड्यावर प्राण्यांची हत्या करून मांस इतस्तत: टाकणार्‍या पर्यावरणद्रोही मुसलमानांकडे कधी हानीभरपाई मागतात का ? - संपादक) समितीच्या या अहवालावर लवादाचे अध्यक्ष न्या. स्वतंत्र कुमार १ मार्चपासून सुनावणी आरंभ करणार आहेत.

एकत्र मिळून मंगळावर मानवयान पाठवू !

नासाचे भारताला आमंत्रण !
     नवी देहली / कोलंबिया - भारतीय मंगळ मोहिमेने प्रभावित झालेली अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने भारताला एकत्रितपणे या संदर्भात संशोधन करण्यासाठी आमंत्रित केले आहे. या लॅबोरेटरीचे संचालक चार्ल्स इलाची यांनी हे आमंत्रण पाठवले आहे. ते म्हणाले की, मंगळावर मानवयान पाठवणे हा या मोहिमेचा महत्त्वाचा भाग आहे. भारत आणि अमेरिका दोघे मिळून असे यान पाठवू शकतात.

विदर्भ, मराठवाडा, नगर येथे अवकाळी पाऊस आणि गारपीट

पुणे, २९ फेब्रुवारी - पश्‍चिम महाराष्ट्र्र, पुणे, मराठवाडा, नाशिक, नगर आणि विदर्भ या ठिकाणी अवकाळी पाऊस अन् गारपीट होत आहे. या भागात पाऊस झाल्याने पीक आणि फळबागा यांची पुष्कळ हानी झाली आहे. या अवकाळी पावसामुळे हरभरा, गहू, ज्वारीसह भाजीपाला, कांदा, द्राक्षे, संत्री, डाळिंब, केळी यांचीही हानी झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि चांदूरबाजार तालुक्यांत गारपिटीसह आलेल्या वादळाने अनेक घरांची पडझड झाली आहे.
अतिवृष्टि: अनावृष्टि: शलभा मूषका: शुका: ।
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतय: स्मृता: ॥

- कौशिकपद्धति
अर्थ : धर्माचे पालन न केल्यामुळे अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात. तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत. तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा आपत्काळ सुसह्य होईल.

हिंदुत्वाचा आदर म्हणजे आपल्या प्राचीन आध्यात्मिक मूल्यांचा आणि अध्यात्मात उच्चस्तरापर्यंत पोहोचण्याच्या क्षमतेचा आदर करणे होय ! - डॉ. डेव्हिड फ्रॉली

जे अमेरिकेतील एका मूळ ख्रिस्ती व्यक्तीला कळते, ते भारतातील कोणत्याच 
हिंदु लेखकाला अथवा नागरिकाला का कळत नाही ? 
डॉ. डेव्हिड फ्रॉली यांची संक्षिप्त ओळख
     डॉ. डेव्हिड फ्रॉली हे मूळचे अमेरिकेतील असून त्यांनी आचार्यपद (आचार्य वामदेवशास्त्री) धारण केले आहे. त्यांनी वेद, सनातन धर्म, योग, आयुर्वेद आणि वैदिक भविष्यशास्त्र या विषयांवर ३० पेक्षा अधिक ग्रंथांचे लेखन केले आहे. ते अमेरिकेतील सांता फे येथील वैदिक अभ्यासावर आधारित संस्थेचे संस्थापक आणि संचालक आहेत. या संस्थेत योगिक तत्त्वज्ञान, आयुर्वेद आणि वैदिक भविष्यशास्त्र या विषयांवर शिक्षण दिले जाते.
लेखक : डॉ. डेव्हिड फ्रॉली 
(आचार्य वामदेवशास्त्री)

पाकिस्तानचा उघड धिक्कार हा प्रत्येक देशभक्ताचा अधिकारच !

श्री. विक्रम भावे
     ज्या देशाच्या रक्षणासाठी एका बाजूला काही सैनिक प्राणार्पणासाठी सिद्ध आहेत, बलीदान देतही आहेत, त्या देशात दुसर्‍या बाजूला तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली याच देशाविरुद्ध घोषणा दिल्या जातात. या देशाच्या संसदेवर आक्रमण करणारा इस्लामी अतिरेकी काही जणांचा हिरो ठरतो आहे. राजकारण्यांना सैनिकांच्या हौतात्म्याची किंमत नसल्याचे हे निदर्शक आहे.
पम्पोर येथील मशिदींवरील भोग्यांतून आतंकवाद्यांचे 
कौतुक आणि पाकिस्तानचे समर्थन !
    २० फेब्रुवारी २०१६ या दिवशी तीन आतंकवाद्यांनी राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर आक्रमण केले. नंतर ते जवळच्या शासकीय इमारतीत जाऊन लपले. त्यानंतर भारतीय सैन्याशी त्यांची चकमक चालू झाली. ४८ घंटे चकमक चालल्यानंतर तीन आतंकवाद्यांना ठार मारण्यात यश आले; पण तोपर्यंत भारतमातेच्या पाच सुपुत्रांनी त्यांचे प्राण गमावले होते. भारतीय नागरिकाला आतंकवादी आक्रमण, स्फोट यांसारख्या गोष्टी या दैनंदिन जीवनाचा भाग झाल्यासारख्या वाटतात; पण पम्पोर येथे (काही लोकांना) धक्कादायक वाटणारी गोष्ट समोर आली आहे. ती चकमक चालू असतांना गावातील ३-४ मशिदींवरील भोंग्यांतून पाकिस्तान आणि स्वतंत्र काश्मीरच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात होत्या. शासकीय इमारतीत लपलेल्या आतंकवाद्यांचे कौतुक त्या भोंग्यांवरून केले जात होते. इतकेच नव्हे, तर ही चकमक थांबावी आणि आतंकवाद्यांना ठार मारू नये; म्हणून स्थानिक मुसलमान युवक शेकडोंच्या संख्येने जमून भारतीय सैन्याशी झटापट करत होते.

समाजावरील आरक्षणाचे भूत उतरवणार का ?

     देशभरातले राजकारणी शासकीय चाकरी, शैक्षणिक आणि अन्य प्रकारे आरक्षणाचे गाजर दाखवून जातींमध्ये गुंतवण्याचे तंत्र सर्रासपणे वापरतात. निवडणूक आली की, कोणताही पक्ष असो, तो आरक्षण देण्याचे वचन जाहीर करतोच. त्याला सर्वसामान्य जनता बळी पडते. देश आणि विविध राज्ये यांठिकाणी कोणत्याही पक्षाची सत्ता असो वा त्या भागातील कोणतीही जात असो, आरक्षणाचे सूत्र हे चालूच आहे. सध्या गुजरातमध्ये पटेल समाज, महाराष्ट्रात मराठा आणि हरियाणामध्ये जाट समाज, यांचे आरक्षण मागणारी आंदोलने होत आहेत.

अशिक्षित कालीदासांना तळमळीने शिकवून त्यांना स्वतःप्रमाणेच विद्वान बनवणारी त्यांची विदुषी पत्नी विद्योत्तमा !

      पत्नीच्या सहकार्याने विद्वान बनलेल्या साहित्यिकांमध्ये कालीदासांचे नाव अजरामर राहील. ते आरंभीपासून अशिक्षित होते. विदुषी विद्योत्तमा शास्त्रार्थ करून पतीला स्वतःप्रमाणेच विद्वान बनवू इच्छित होती. धूर्त पंडितांनी कट रचून तिचा विवाह कालीदासांशी करून दिला. जेव्हा तिला वास्तव लक्षात आले, तेव्हा तिलाही दुःख झाले; पण ती स्वतः त्यांना शिकवू लागली. ती त्यांना म्हणाली, जेव्हा तुम्ही विद्वान बनाल, तेव्हाच मी तुम्हाला माझा पती मानीन. कालीदासही पूर्ण तळमळीने शिकू लागले आणि एक दिवस ते या देशातील नामवंत विद्वान आणि राजकवी बनले. त्यांच्या संस्कृतमधील रचना अतिशय भावपूर्ण आहेत. स्त्रिया आपल्या पतीला सुयोग्य बनवू शकतात, याचे कालीदास हे प्रत्यक्ष उदाहरण आहे. (संदर्भ : अखण्ड ज्योति, जनवरी २००१)

राष्ट्रप्रेमी भारतियांनो, सावधान ! संसद पुन्हा एकदा धोक्यात !!

श्री. संदीप जगताप
१. जवाहरलाल नेहरू विद्यापिठात देशद्रोह्याच्या समर्थनार्थ घोषणा 
दिल्या जाणे आणि स्वार्थी राजकीय पक्षांनी त्यास पाठिंबा देणे 
     जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये अफजल गुरूच्या समर्थनार्थ आंदोलन करून एक अफजल को क्या मारोगे, घरघरमें अफजल निर्माण होगा । अशा स्वरूपाच्या घोषणा दिल्या गेल्या. काही राजकीय पक्षांनीही याला दुजोरा देऊन पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. ज्या राजकीय पक्षांनी यांना पाठिंबा दर्शवला त्यांच्या राजनीतीशून्य असण्याला आणि स्वार्थी वृत्तीला मोजमाप नाही. संसदेवर अफजलने केलेल्या आक्रमणामध्ये हुतात्मा झालेल्या सैनिकांना क्षणभर एखाद्या १० - १२ वीत शिकणार्‍या मुलाने जरी आठवले, तरी त्याने यांचा निषेध केला असता !
प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. 
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

तुम्हाला हे माहीत आहे का ?

     आक्रमकांनी जाळल्यानंतरही नालंदाचे वाचनालय ६ मासांपर्यंत जळत होते.
(संदर्भ : विवेक विचार, एप्रिल २०१५)

साधकांनो, आध्यात्मिक प्रगतीतील अडथळा ठरणारा अहं नष्ट करण्यासाठी शरणागत भाव वाढवा !

प.पू. दास महाराज यांनी वाढदिवसानिमित्त साधकांना दिलेला संदेश !
प.पू. दास महाराज
     माघ कृष्ण पक्ष सप्तमी (१.३.२०१६) या दिवशी प.पू. दास महाराज यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी साधकांना दिलेला संदेश पुढे देत आहोत. 
प.पू. दास महाराज यांच्या चरणी वाढदिवसानिमित्त 
सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
      वैकुंठात निवास करणारे अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक श्रीहरि विष्णु परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपात अवतरले आहेत. सनातन हिंदु धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी हा अवतार झाला आहे. हा परमेश्‍वर सनातन संस्था स्थापन करून नित्य नूतन लीला करत अनेक जिवांचा उद्धार करत आहे. लक्षावधी वर्षांपूर्वीच भगवंताचे हे रूप त्रिकालदर्शी महर्षींनी जाणले. या अवतारकार्याची सविस्तर माहिती महर्षींनी आपल्या नाडीपट्टीत लिहून ठेवली आहे. पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून आज ती जगासमोर आली. या अवतारकार्यात भगवंताने ज्या जिवांची निवड केली, ते सर्व जीव भाग्यवान आहेत.

उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या वेळी प.पू. दास महाराज (पानवळ, बांदा) यांना आलेल्या अनुभूती

     १५ ते १७.१.२०१६ या कालावधीत गोवा येथील रामनाथी आश्रमात तंजावूर, तमिळनाडू येथील प.पू. रामभाऊस्वामी यांनी उच्छिष्ट गणपति यज्ञ केला. यज्ञाच्या वेळी पानवळ, बांदा येथील संत प.पू. दास महाराज यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. तंजावूर, तमिळनाडू येथील प.पू. रामभाऊस्वामी यांना भेटण्याची ओढ लागणे, पू. (सौ.) बिंदाताई 
यांनी यज्ञाला येण्याचे आमंत्रण देणे आणि पू. (सौ.) बिंदाताईंच्या माध्यमातून प.पू. गुरुदेवांनीच 
आमंत्रण दिले, असे वाटून मन भरून येणे
     १४.१.२०१६ या दिवशी सनातन संस्थेच्या रामनाथी आश्रमात तंजावूर, तमिळनाडू येथील प.पू. रामभाऊस्वामी आले होते. समर्थ रामदासस्वामी यांनी १६ व्या शतकात तंजावूर येथे मठ स्थापन करून शिष्य मेरूस्वामींना मठाधीश म्हणून नेमले होते. त्या मेरूस्वामींच्या मठात वर्ष १९६१ मध्ये मी माझ्या वडिलांसमवेत (प.पू. भगवानदास महाराज यांच्यासमवेत) गेलो असता प.पू. रामभाऊंची भेट झाली होती. दैनिक सनातन प्रभातमधील वृत्त वाचल्यानंतर त्यांच्याशी पूर्वी झालेल्या भेटीचे स्मरण झाले आणि त्यांच्या दर्शनाची ओढ लागली. त्या वेळी पू. (सौ.) लक्ष्मी (सौ. माई) यांनाही यज्ञाला जाण्याची ओढ लागली. सर्वांभूती वास करणार्‍या प.पू. गुरुदेवांनी आम्हा उभयतांच्या मनातील विचार ओळखला. पू. (सौ.) बिंदाताईंनी यज्ञाला येण्याचे आमंत्रण दिले. पू. (सौ.) बिंदाताईंच्या माध्यमातून जणू प.पू. गुरुदेवांनीच आमंत्रण दिले, असे वाटून आमचे मन भरून आले.

प.पू. दास महाराजांचा प.पू. डॉक्टरांप्रतीचा दास्यभाव !

     पानवळ, बांदा येथील श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या सेवांविषयी प.पू. दास महाराजांशी बोलणे झाले. तेव्हा ते म्हणाले, प.पू. डॉक्टर ईश्‍वरस्वरूप आहेत. त्यांनीच सार्‍या सृष्टीची निर्मिती केली आहे. जसे मारुतीराया प्रभु श्रीरामाचे दास होते, तसा मी प.पू. डॉक्टरांचा दास आहे. त्यामुळे मला माझ्या मनानुसार काहीच करायचे नाही. मंदिराच्या संदर्भात प.पू. डॉक्टर सांगतील, तसे करूया. त्यांनी जर तुम्हाला सांगितले, या संदर्भात मला (प.पू. महाराजांना) विचारा, तर त्यांना सांगा की, मला यातील काहीच समजत नाही. तुम्ही जो निर्णय घ्याल, तोच मला आवडेल. बर्‍याचदा प.पू. दास महाराज म्हणतात, मी (प.पू. महाराज) संत आहे, असे प.पू. डॉक्टर सांगतात; पण मी तर दासच आहे ! 
     प.पू. दास महाराज अध्यात्मातील एवढ्या उच्च टप्प्याला असूनही किती लीन आहेत, तसेच त्यांचा अहं किती अल्प आहे, हे वरील उद्गारातून लक्षात येते. - (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.२.२०१६)

सर्वांमध्ये मिळून-मिसळून रहाणारी आणि परिस्थितीशी जुळवून घेणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. अदिती आशिष भोज (वय ५ वर्षे) !

चि. अदिती भोज
१. गर्भारपणात
१ अ. मूतखड्याचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात भरती करावे लागणे : मला गर्भारपणाच्या पहिल्या ३ मासांत (मासांत) उलट्यांचा त्रास होत होता. मला दुसर्‍या मासात (महिन्यात) अकस्मात् मूतखड्याचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात भरती करावे लागले; पण त्यावर केलेल्या औषधोपचाराने गर्भाला काही इजा झाली नाही.
- सौ. दीपा भोज (अदितीची आई), पुणे
१ आ. सुनेला मुतखड्याचा त्रास झाल्याच्या रात्री भयानक स्वप्न पडणे : सुनेला ज्या दिवशी मुतखड्याचा त्रास झाला, त्या रात्री मला एक स्वप्न पडले. मला त्या स्वप्नात पुढील दृश्य दिसले. एक पडके घर असलेला परिसर होता. त्यातील एका भागात माझी सूून एक भयानक जागेत होती. तिला विचित्र आणि भयंकर दिसणार्‍या माणसांनी पकडले होते. ते तिला ओढत नेत होते. त्यानंतर हालचाल करणारी एक वस्तू काचेच्या बशीत ठेवलेली दिसली, ती हालचाल करत होती; पण हळूहळू विरघळत होती. त्यानंतर मला प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन होऊन मी त्यांना नमस्कार करत आहे, असे दृश्य दिसले.

साधक आणि त्यांचे कुटुंबीय यांनी एकमेकांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !
     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात आली. यातून साधनेचे महत्त्व आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे वाचकांच्या लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास पाहिले. साधकांच्या निर्दोष सुटकेनंतर त्यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या स्वागत पाहिले. आज आपण साधक आणि कुटुंबीय यांची गुणवैशिष्ट्ये पाहूया. 
संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका !


साधकांना सूचना 
     संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात इतर साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत. 
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना

श्रीरामनवमीनिमित्त प्रबोधनासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !
     हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीरामनवमीच्या निमित्ताने प्रबोधनासाठी नेहमीच्या संगणकीय पत्त्यावर प्रसारसाहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. या प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचा श्रीरामनवमीच्या उत्सवाची ठिकाणे, देवस्थाने आदी सुयोग्य ठिकाणी प्रबोधनासाठी वापर करावा, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे. उपलब्ध प्रसारसाहित्य खालीलप्रमाणे -
१. प्रभु श्रीराम यांच्या उपासनेमागील शास्त्र सांगणारे ए-५ आकारातील हस्तपत्रक
२. १० फूट X ८ फूट या आकारातील १ फलक (याची कलाकृती खाली दिली आहे.)
३. २.२५ फूट X ३.५ या आकारातील श्रीरामाचे पूजन कसे करावे ? आणि रामराज्य साकारणे तुमच्याच हाती हे २ फलक

साधकांना सूचना

पुढील ग्रंथ वितरणासाठी उपलब्ध !
     गुरुकृपायोगानुसार साधना या ग्रंथाच्या पुढील आवृत्त्या आणि पुनर्मुद्रणे यांमध्ये दिलेल्या सुधारणा करून त्यांचे वितरण करावे. या सुधारणा नेहमीच्या ठिकाणी ठेवल्या आहेत.
१. आवृत्ती पहिली (११ जुलै २००६)
२. आवृत्ती पहिली, पहिले पुनर्मुद्रण (२३ सप्टेंबर २००६)
३. आवृत्ती दुसरी (३ मार्च २००७)
४. आवृत्ती तिसरी (२७ मे २०११)
५. आवृत्ती चौथी (१४ जानेवारी २०१३)
६. आवृत्ती चौथी, प्रथम पुनर्मुद्रण (३० जून २०१३)
     यासह इतर ५ विषयांच्या ग्रंथांमध्ये करायच्या सुधारणाही नेहमीच्या ठिकाणी ठेवल्या असून तेही ग्रंथ वितरणासाठी उपलब्ध आहेत.

सर्वत्रचे वाचक, हितचिंतक, धर्माभिमानी, तसेच साधक यांना गुरुसेवेची सुवर्ण संधी !

वातानुकूलित यंत्रे, शीतकपाट आदी उपकरणांची
दुरुस्ती करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता !
     सनातनच्या रामनाथी आश्रमातील काही वातानुकूलित यंत्रे (विंडो ए.सी., तसेच स्प्लिट ए.सी.), शीतकपाट (फ्रिज) नादुरुस्त स्थितीत आहेत. ही उपकरणे वापरण्यायोग्य होण्यासाठी त्यांची दुरुस्ती करण्याची सेवा उपलब्ध आहे.
     अशा उपकरणांची दुरुस्ती करण्याचा अनुभव असलेले जे वाचक, हितचिंतक, धर्माभिमानी, साधक, तसेच साधकांचे परिचित अथवा नातेवाईक सेवा म्हणून करण्यास इच्छुक असतील किंवा सेवामूल्य घेऊन वरील सेवांमध्ये सहभागी होऊ शकतील, त्यांनी जिल्हासेवकांद्वारे vaastunirmiti@gmail.com या संगणकीय पत्त्यावर खालील माहिती पाठवावी. या संदर्भात काही शंका असल्यास रामनाथी आश्रमात श्री. संभाजी माने यांच्याशी ०८४५१००६०४७ या क्रमांकावर संपर्क साधावा. 
    या सेवेत सहभागी होऊन ईश्‍वराने दिलेले कौशल्य त्याच्या चरणी समर्पित करण्याची संधी दवडू नका !
 

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
अडचणी दूर करण्याचे मूलभूत चार उपाय ज्ञात नसलेले हिंदू कधी जिंकतील का ?
१. साम (सामोपचाराने अडचण दूर करणे)
२. दाम (पैसे देऊन अडचण दूर करणे)
३. दंड (शिक्षा करून अडचण दूर करणे)
४. भेद (विरोधकांत फूट पाडून अडचण दूर करणे)
हे अडचणी दूर करण्याचे चार उपाय आहेत. ते ज्ञात नसलेले सर्वधर्मसमभाववाले हिंदू कधी जिंकतील का ?
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
जिसने पायो उसने छिपायो । वो नर सच्चा, वोही गुरुका बच्चा ।
भावार्थ : पायो म्हणजे आत्मानुभूती झाली. छिपायो म्हणजे आत्मानुभूती झाल्याचे कोणाला सांगितले नाही. (अर्थात ती शब्दांत सांगताही येत नाही.) गुरुका बच्चा म्हणजे गुरूचा खरा शिष्य. एखाद्याकडे अनमोल हिरा असला, तर तो काही सर्वांना त्याविषयी सांगत नाही. तसेच अनमोल आत्मानुभूती आलेला त्याविषयी कोणाला काही सांगत नाही. अहंभाव नसल्यामुळेच त्याला ती अनुभूती आलेली असते व म्हणूनच तो तिच्याविषयी बोलत नाही.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

अहंभाव-निर्मूलनाचे महत्त्व 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
    अहंभाव, म्हणजे मीपणा. हा अहंभाव सोडला, तर माणसांच्या समूहात तुम्ही आश्‍चर्यकारक एकांताचा अनुभव मिळवाल. 
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

सलाहुद्दिन याला उपरती आली का ?

संपादकीय
    पम्पोरमधील आतंकवादी आक्रमणाच्या वेळी भारतीय सैनिकांनी हिजबुल मुजाहिदिनचा प्रमुख सैय्यद सलाहुद्दिन याच्या कनिष्ठ पुत्राचे प्राण वाचवले. सलाहुद्दिन काश्मीरमधील बडगामचा. सध्या हा पाकमध्ये लपून बसला आहे. त्याची अख्खी हयात काश्मीरला मुक्ती मिळावी, यासाठी गेली. या मुक्तीची मागणी मोर्चे अथवा उपोषण यांद्वारे नव्हे, तर हिंसक मार्ग अवलंबून करण्यात येत होती. काश्मीरमधील बहुतांश बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात त्याचा हात आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn