Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

श्रीनगरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर जेएन्यूतील देशद्रोह्यांच्या समर्थनार्थ हिंसक आंदोलन !

ढोंगी आणि निधर्मी प्रसारमाध्यमे यावर चर्चासत्र घेत नाहीत, हे लक्षात घ्या !
प्रत्येक शुक्रवारी एकाच मशिदीत नमाजपठण केल्यानंतर देशद्रोह्यांकडून आंदोलन केले जाते, हे रोखण्यासाठी केंद्रशासन या मशिदीला टाळे का ठोकत नाही ?
श्रीनगर - येथील नौहट्टा भागातील जामिया मशिदीमध्ये शुक्रवारच्या दुपारच्या नमाजानंतर नेहमीप्रमाणे देशद्रोह्यांनी हिंसक आंदोलन केले. (काश्मीरमध्ये बहुसंख्य मुसलमान असल्यामुळे तेथे निर्माण झालेल्या स्थितीवर ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांनी उत्तर दिले पाहिजे ! - संपादक) या वेळी त्यांनी जेएन्यूतील देशद्रोही घोषणा देणार्‍यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले. या वेळी पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यात आले. (गेले अनेक महिने अशा प्रकारे शुक्रवारच्या नमाजानंतर पाकचे झेंडे फडकवले जात असतांना त्यांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश राष्ट्रप्रेमी केंद्रशासन का देत नाही ? - संपादक) देशद्रोही आणि पोलीस यांच्यात या वेळी चकमक उडाली. त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी ६ हून अधिक देशद्रोह्यांना अटक केली. आंदोलनाच्या वेळी देशविरोधी घोषणा देण्यासह पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. तसेच प्रा. एस्.ए.आर्. गिलानी आणि कन्हैया कुमार यांच्या सुटकेची मागणी केली.

१५५ वर्षे जुन्या भारतीय दंड संहितेची समीक्षा करणे आवश्यक ! - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांत दंड संहितेत पालट करण्यासाठी प्रयत्न न करणारी आतापर्यंतची शासने ब्रिटीश शासनाप्रमाणेच राज्य चालवत होती आणि आहेत, हेच लक्षात येते !
कोची (केरळ) - गेल्या १५५ वर्षांत भारतीय दंड संहितेत अनेक पालट झाले आहेत. पूर्वी गुन्ह्यांच्या सूचीत पुष्कळ अल्प गुन्ह्यांची नावे होती आणि त्यावर शिक्षा होती. आताही यात अनेक गुन्हे असे आहेत की, ज्यांना ब्रिटीश शासनाने स्वत:साठी आवश्यक ठरवले होते. आता असे नवीन गुन्हे आहेत त्यांची योग्य व्याख्या करून त्यांना संहितेत समाविष्ट केले पाहिजे. २१ व्या शतकानुसार या संहितेची समीक्षा झाली पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी येथे केले. भारतीय दंड संहितेला १५५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने वर्षभर देशात कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होते.

आग्रा येथे विहिंप नेत्याच्या हत्येप्रकरणी शाहरुख, इम्तियाज, आबिद आणि राजा यांना अटक !

धर्मांध लोक हिंदूंना आणि त्यांच्या नेत्यांना वेचून वेचून ठार करतात; मात्र दादरी प्रकरणी ऊर बडवणारे नेते यावर मौन बाळगतात !
आग्रा - २५ फेब्रुवारीला येथील मंटोलामध्ये विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष असणारे ५२ वर्षीय अरुण कुमार महोर यांची धर्मांधांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. महोर हे दलित होते. (या हत्येनंतर राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, सीताराम येच्युरी यांच्यापैकी एकाही राजकीय नेत्याने दुःख व्यक्त केले नाही कि त्यांच्या नातेवाइकांची भेट घेतली नाही. कारण मरणारे महोर दलित असले, तरी हिंदुत्ववादी होते. यावरून या नेत्यांचे ढोंगी दलितप्रेम आणि हिंदुद्वेष परत उघड होतो ! - संपादक) या हत्येनंतर येथे हिंसाचार झाला होता. पोलिसांनी या हत्येप्रकरणी राजा, शाहरुख, इम्तियाज आणि आबिद यांना अटक केली असून दिलशान फरार आहे. महोर त्यांच्या मीरा हुसैनी चौकात असणार्‍या फर्निचरच्या दुकानात जात असतांना या धर्मांधांनी त्यांच्यावर शिवीगाळ करत गोळ्या झाडल्या होत्या. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी महोर यांच्या कुटुंबाला १० लाख रुपये आणि जिल्हाधिकारी पंकज कुमार यांनी ५ लाख रुपये दिले आहेत.

अफझलच्या फाशीला 'न्यायालयीन हत्या' संबोधणे मर्यादेचे उल्लंघन ! - माजी न्यायमूर्ती पी.व्ही. रेड्डी

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला थेट आव्हान देणार्‍या देशद्रोह्यांवर काही कारवाई होणार आहे का ?
नवी देहली - आतंकवादी महंमद अफझलच्या फाशीला न्यायालयीन हत्या असे संबोधणे हे मर्यादेचे उल्लंघन आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्या. पी.व्ही. रेड्डी यांनी न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात गरळओक करणार्‍या देशद्रोही विद्यार्थ्यांना फटकारले. माजी न्या. रेड्डी आणि न्या. पी.पी. नावलेकर यांच्या खंडपिठाने वर्ष २००५ मध्ये उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत महंमद अफझलच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले होते. या आक्रमणातील दुसरा आरोपी शौकत हुसेन याला फाशीऐवजी १० वर्षांची शिक्षा ठोठावली होती, तर अन्य दोन संशयित एस्.ए.आर्. गिलानी आणि अफसान यांना निर्दोष मुक्त करण्यात आले होते. जेएन्यूत देशद्रोही विद्यार्थ्यांनी अफझलच्या फाशीला 'न्यायालयीन हत्या' असे संबोधले होते. त्यावर न्या. रेड्डी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, "न्यायालयाचा निकाल स्वत:च सर्व काही सांगतो. "

बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या घरात बॉम्बस्फोट : एक ठार

वीरभूम (बंगाल) - बंगालमधील वीरभूम जिल्ह्यात २७ फेब्रुवारीला सकाळी झालेल्या गावठी बॉम्बच्या स्फोटात एक जण ठार, तर दोन जण घायाळ झाले आहेत. घायाळांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरभूम जिल्ह्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या घरात गावठी बॉम्ब सिद्ध करण्यात येत होते. त्या ठिकाणी हा स्फोट झाला. (तृणमूल काँग्रेस पक्षात कार्यकर्ते आहेत, कि आतंकवादी ? अशी शंका यावी, अशा पद्धतीने त्यांचे नेते देशद्रोही कृत्यांत सापडत आहेत ! अशा पक्षावर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी कुणी केल्यास त्यात नवल काय ? - संपादक) या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हिंदुत्ववादी लेखक श्री. अनुप सरदेसाई यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

(डावीकडून) श्री. अनुप सरदेसाई यांना सनातन प्रभात
नियतकालिकांविषयी माहिती देतांना सनातनचे
श्री. महावीर श्रीश्रीमाळ
     रामनाथी (गोवा) - हिंदुत्ववादी लेखक श्री. अनुप सरदेसाई यांनी नुकतीच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांना सनातनचे साधक श्री. महावीर श्रीश्रीमाळ यांनी आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि धर्म यांविषयी कार्याचा परिचय करून दिला. या वेळी श्री. सरदेसाई म्हणाले, सनातनचे कार्य अतिशय चांगले आहे. या कार्याला माझे नेहमीच सहकार्य राहील.
श्री. अनुप सरदेसाई यांचा परिचय 
    गोवा येथील श्री. अनुप सरदेसाई हे सरदेसाई ग्रूपचे प्रमुख आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यात त्यांनी अभियंता म्हणून सेवा बजावली आहे. स्वेच्छानिवृत्तीनंतर त्यांनी या लेखनास आरंभ केला. गेली ५ वर्षे देशातील धार्मिकदृष्ट्या राजकीय समस्यांचा त्यांनी प्रदीर्घ अभ्यास केला आहे. त्यांनी नथुराम गोडसे-स्टोरी ऑफ अ‍ॅन असॅसिन (नथुराम गोडसे-वधाची कथा) आणि महात्माज ब्लंडर्स-व्हाय डिड गोडसे किल गांधी ? (महात्म्याची घोडचूक - गोडसे यांनी गांधींना का मारले ?) ही पुस्तके लिहून पं. नथुराम गोडसे यांची सकारात्मक बाजू जगासमोर आणली आहे.

(म्हणे) 'जन गण मन'ऐवजी 'वन्दे मातरम्'ला राष्ट्र्रगीताचा दर्जा देण्याचा प्रयत्न होत आहे ! - जेएन्यूच्या माजी प्राध्यापिका तनिका सरकार

ज्यांच्या देशप्रेमावरच शंका आहे, त्यांनी 'वन्दे मातरम्'वर आक्षेप घेणे, यात आश्‍चर्य ते काय !
नवी देहली - 'जन गण मन'च्या ऐवजी 'वन्दे मातरम्'ला राष्ट्र्रगीताचा दर्जा देण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटना सातत्याने करत आहेत. त्या दिशेने प्रयत्नही चालू आहेत. त्यामुळे भविष्यात 'जन गण मन' हे राष्ट्रगीत राहीलच याची खात्री नाही, असे मत इतिहासकार आणि जेएन्यूच्या माजी प्राध्यापिका तनिका सरकार यांनी व्यक्त केले. ('जन गण मन'ला राष्ट्रगीत ठरवण्याऐवजी 'वन्दे मातरम्'ला राष्ट्रगीत बनवावे, अशी देशातील बहुसंख्य देशप्रेमींची मागणी होती; मात्र हिंदुद्वेषी नेहरूंनी ती जाणीवपूर्वक डावलून जन गण मनला राष्ट्रगीत घोषित केले. जर यात राष्ट्र्रप्रेमी पालट करण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्याच चुकीचे काय ?- संपादक) जेएन्यूमध्ये 'राष्ट्रवाद' या विषयावर खुले चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यात जेएन्यूच्या इतिहास विभागातून सेवानिवृत्त झालेल्या सरकार यांनी गांधींचा देश या विषयावर त्यांचे विचार मांडले. देशद्रोही घोषणेचा आरोप असणारे उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य हे या विभागाशी संबंधित होते. (धर्मशिक्षण आणि राष्ट्रभक्ती यांचे शिक्षण मिळाल्यास विद्यार्थी राष्ट्र आणि धर्म प्रेमी होतो; मात्र या उलट शिक्षण मिळाले, तर तोच विद्यार्थी धर्म आणि राष्ट्र द्रोही होतो, हे उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांच्या उदाहरणावरून लक्षात येते ! - संपादक)

आक्षेपार्ह मजकूर असल्याचे कारण पुढे करून हिंदु जनजागृती समितीचे प्रबोधनपर फलक हटवले !

     गोवा शासनाच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याने फर्मागुडी, गोवा येथे आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात येणार्‍या शिवभक्तांचे प्रबोधन करणारी माहिती असावी, याअनुषंगाने हिंदु जनजागृती समितीने कार्यक्रमस्थळी शिवरायांचा प्रताप आणि शिवरायांची शोभायात्रा यासंबंधी दोन फ्लेक्स फलक आयोजकांची अनुमती घेऊन लावले होते. या फलकावर पुढील माहिती हिंदी भाषेत लिहिली होती. 
भारतात आता छत्रपतींचा सत्य इतिहास सांगणेही कठीण !
हिंदूंनो, हा इतिहास खोटा आणि चुकीचा आहे का ?
फलक क्र. १ 
छ. शिवाजी महाराजांचा आठवा प्रताप ! 
    हिंदु राज्य स्थापनेच्या हेतूने ५ मुसलमान राज्यांशी लढून आतंकवाद मिटवला. आतंकवाद आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे हिंदु राष्ट्र्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे.

श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्यात लैंगिक संबंध असल्याचे लिहिणारे डॉ. यरल्लगदा लक्ष्मी प्रसाद यांना मिळणार पद्मभूषण पुरस्कार !

केंद्रशासनाने डॉ. प्रसाद यांचा सन्मान करून बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, अशी 
हिंदूंची अपेक्षा आहे ! अशा लेखकांचा सन्मान नव्हे, तर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी 
त्यांना कारावास व्हायला हवा !
     या वर्षी देण्यात येणार्‍या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये आंध्रप्रदेशातील लेखक डॉ. यरल्लगदा लक्ष्मी प्रसाद यांना पद्मभूषण या देशातील तिसर्‍या सर्वाधिक प्रतिष्ठित नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
१. डॉ. प्रसाद यांनी काही वर्षांपूर्वी द्रौपदी, पांडव आणि भगवान श्रीकृष्ण यांचे अश्‍लाघ्य विडंबन करणारे द्रौपदी नावाचे तेलुगु पुस्तक लिहिले होते. 

शिवाजीनगर बसस्थानकावर मराठी दिन साजरा

पुणे - यंदाच्या वर्षी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवाजीनगर येथील एस्.टी. स्थानक येथे पुस्तक प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रसंगी कुसुमाग्रज यांच्या एका मराठी काव्य फलकाचे अनावरण करण्यात आले.

संकेश्‍वर येथे हिंदु मुलीला पळवून नेणार्‍या धर्मांधाला श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिले पोलिसांच्या कह्यात

लव्ह जिहादच्या तावडीतून हिंदु मुलीची सुटका
करणार्‍या श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन !
    संकेश्‍वर (जिल्हा बेळगाव), २७ फेब्रुवारी (वार्ता.) - येथील गावात इयत्ता ८ वीत शिकणार्‍या हिंदु मुलीला फूस लावून पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या धर्मांध अझरुद्दीन नूर रपूगार (वय २२ वर्षे) याला श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कह्यात दिले. या वेळी कार्यकर्त्यांनी त्याला पुष्कळ चोपही दिला. मुलीला तिच्या वडिलांकडे सोपवले. हा धर्मांध १ मासापासून मुलीच्या मागे असल्याचे वडिलांनी श्रीराम सेनेला कळवले होेते. त्यानुसार कार्यकर्त्यांनी पाळत ठेवून त्याला पकडले. मुलीच्या सुटकेसाठी वडिलांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. (हिंदूंनो, केवळ आभार मानू नका, तर आपल्या मुलींना धर्मशिक्षण देऊन लव्ह जिहादपासून वाचवा ! - संपादक)

स्थायी समितीचे २७१ ठराव अवैध ! - वि.द. वर्बे

सांगली, २७ फेब्रुवारी (वार्ता.) - गेल्या चार वर्षांत स्थायी समिती सभांमध्ये २७१ अवैध ठराव करण्यात आले आहेत. कागदपत्रे मागितल्यावर एका प्रतिसाठी ५० रुपये याप्रमाणे ७० सहस्र रुपयांची मागणी केली. महापालिकेतील गैरकारभार दडपण्यासाठी हे चालू असून याविरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल करणार आहे, अशी माहिती नागरिक हक्क संघटनेचे कार्यवाह श्री. वि.द. बर्वे यांनी दिली. (सांगली महापालिकेच्या अनागोंदी कारभाराचा नमुना ! - संपादक)

पंढरपुरात २ मार्चला हिंदु धर्मजागृती सभा !

वाहन फेरीच्या पूर्वसिद्धतेसाठी आयोजित दुसर्‍या आढावा बैठकीला हिंदुत्ववाद्यांचा सक्रीय सहभाग !
बैठकीला उपस्थित धर्माभिमानी
पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २७ फेब्रुवारी (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ मार्च २०१६ या दिवशी टिळक स्मारक मैदान, वीर सावरकर पथ येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. धर्मसभेच्या पूर्वसिद्धतेसाठी आणि वाहन फेरीसाठी आयोजित दुसर्‍या आढावा बैठकीत धर्मजागृती सभा यशस्वी होण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी सक्रीय सहभाग घेतला, तसेच वैयक्तिक स्तरावर संपर्क करून धर्मसभा आणि वाहन फेरी यांची उपस्थिती वाढवण्याचा निर्धार केला आहे.

राजकीय हस्तक्षेप न करता पोलिसांना संपूर्ण अधिकार द्या ! - विक्रम गोखले

     पुणे, २७ फेब्रुवारी (वार्ता.) - पोलीस दलातील कर्तृत्ववान अधिकारी चांगले कार्य करत असतांना दुर्दैवाने त्यांच्या कामात राजकीय हस्तक्षेप केला जातो. तो थांबवून पोलिसांना संपूर्ण अधिकार द्या. त्यांच्या सर्व आवश्यकता पूर्ण करा. सीमेवर लढणारे सैनिक आणि अंतर्गत शत्रूंशी लढणारे पोलीस यांच्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करा, असे सांगत ज्येष्ठ रंगकर्मी श्री. विक्रम गोखले यांनी भाजप शासनाने पोलिसांसाठी चांगले कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुक्तछंद या संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. देशात असहिष्णूतेच्या नावाने बोंबाबोंब केली जाते. आपल्या देशात पाकिस्तानसारखी परिस्थिती नाही, ही सहिष्णुता नाही का, असा प्रश्‍नही श्री. गोखले यांनी या वेळी उपस्थित केला.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून पाणीटंचाईची तक्रार करणार्‍या महिलेच्या घरावर दगडफेक

गुंड प्रवृत्तीचे लोक असणारा पक्ष कायद्याचे राज्य काय देणार ?
    भिवंडी - पाणीटंचाईची तक्रार करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या घरावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरेसवकाकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना भिवंडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक विकास बाळू पाटील यांच्यासह १३ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
    भिवंडी शहरातील भंडारी कम्पाऊंड परिसरात राहणार्‍या वैशाली झा पाणीटंचाईच्या संदर्भात तक्रार करण्यासाठी नगरसेवक विकास पाटील यांच्या कार्यालयात गेल्या होत्या. त्या वेळी विकास पाटील यांनी अपशब्द वापरून वैशाली झा यांना परतावून लावले. तसेच विकास पाटील यांनी गुंडांना पाठवून घरावर दगडफेक केली, असा आरोप वैशाली झा यांनी केला आहे.

जेएन्यूतील आतंकवाद्यांच्या वावराविषयीची माहिती प्राध्यापकांनी पत्र लिहून कळवली होती !

    मुंबई - जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (जेएन्यूच्या) जर्मन विभागातील साहाय्यक प्राध्यापक चक्रवर्ती यांनी ७ फेब्रुवारी १९९६ या दिवशी रजिस्ट्रारला पत्र लिहून विद्यापिठातील देशविघातक शक्तींची चेतावणी दिली होती, अशी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. या प्रकरणाची गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी प्रा. चक्रवर्ती यांनी पत्राद्वारे केली होती. २१ डिसेंबर १९९५ या दिवशी कुलगुरूंच्या उपस्थितीत अकॅडमिक कौन्सिलच्या बैठकीत चक्रवर्ती यांनी विद्यापिठातील आतंकवाद्यांचा वावर रोखा हे सूत्र उपस्थित केले होते. या संदर्भात कुलगुरूंनी लेखी मागितल्यावर त्यांनी हे पत्र पाठवले.

न्यायालयात अद्यापही इंग्रजी भाषेतून निकाल !

    पुणे, २७ फेब्रुवारी - सर्वसामान्य पक्षकारांना आपल्या खटल्याचा निकाल अधिक चांगल्या रितीने समजावा, यासाठी उच्च न्यायालयाने त्यांचे निकाल मराठीत द्यावेत, असे आदेश राज्यशासनाने दिले आहेत. असे असूनही प्रत्यक्षात बहुतांश न्यायाधीश अद्यापही इंग्रजी भाषेतच निकाल देतात, असे चित्र आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मराठी भाषेतील निकालासाठी अद्यापही प्रतिक्षेत आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना नजरकैदेत ठेवण्याविषयीची कारणे उघड करा !

स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात ठराव
     नाशिक - स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, तसेच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्याची कारणे सर्वांसाठी उघड करावीत, असा ठराव येथे आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय साहित्य संमेलनात करण्यात आला. संभाजीनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मित्र मंडळ, ठाणेस्थित कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, भगूर नगरपालिका आणि मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५० व्या आत्मार्पणदिनाचे औचित्य साधून त्यांच्या मूळ गावी भगूर येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणार्‍या विविध क्रांतिकारकांच्या वारसांच्या हस्ते करण्यात आले.
   सावरकर यांना भारतरत्नने सन्मानित करावे, सावरकरांचे विचार आणि कविता या प्राथमिक, माध्यमिक अन् महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकांमध्ये मांडावेत, असे काही ठराव या वेळी संमत करण्यात आले.

जुन्नर येथे मुक्तादेवी मंदिरातील दानपेटीची चोरी

हिंदूंनो, आपल्या मंदिरांचे रक्षण करण्यासाठी हिंदु राष्ट्राविना पर्याय नाही !
     जुन्नर - येथील मुक्तादेवी मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. मंदिरात कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी हे कृत्य केले असल्याची चर्चा होत आहे.

न समजलेले सावरकर या विषयावर आज कोल्हापूर येथे व्याख्यान

    कोल्हापूर, २७ फेब्रुवारी (वार्ता.) - स्वा. सावरकर यांच्या आत्मार्पण दिनास ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त येथील
स्वा. सावरकर साहित्य आणि विज्ञान मंडळाच्या वतीने २८ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता प्रायव्हेट हायस्कूलच्या सभागृहात श्री. विक्रम एडके यांचे न समजलेले सावरकर या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

गोवा अबकारी विभागाकडून सुमारे अडीच कोटी रुपयांचे विदेशी सिगारेट कह्यात

कोट्यवधी रुपयांच्या उत्पादनांची तस्करी होत असतांना प्रशासन काय करत आहे ? 
     वास्को - गोवा अबकारी विभागाने मुरगाव बंदरावर एका कंटेनरमध्ये असलेले अडीच कोटी रुपयांचे डनहील कंपनीचे विदेशी सिगारेट कह्यात घेतले. दुबई येथून एका विदेशी बोटीने हा कंटेनर गोव्यात आणण्यात आला होता. या घटनेच्या तपासाची सूत्रे अबकारी खात्याने खात्याअंतर्गत एका विशेष विभागाकडे सुपुर्द केली आहेत. या कंटेनरच्या मालकी हक्काचा दावा कोणीही केलेला नाही, अशी समजते.

भुसावळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी
     भुसावळ - इसिसच्या आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करा आणि अमरनाथ यात्रेच्या अल्प करण्यात आलेल्या कालावधीला विरोध करा, या मागण्यांसाठी येथे २२ फेब्रुवारीला राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. या प्रसंगी ४० हून अधिक हिंदुत्ववादी उपस्थित होते. आंदोलनानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या वेळी भुसावळ येथील अधिवक्ता मनीष तिवारी, सर्वश्री हिरामण वाघ, शशी सुरवाडकर, उमेश जोशी, यशवंत पाटील आदी हिंदुत्ववादी उपस्थित होते.

लिंब-गोवे (जिल्हा सातारा) येथील युवकांचा हिंदु ऐक्याचा निर्धार

धर्मासाठी कृतीशील होणार्‍या धर्माभिमान्यांचे अभिनंदन !
हिंदु जनजागृती समितीच्या मार्गदर्शनाखाली हिंदु धर्मजागृतीचे कार्य करणार !
    सातारा, २७ फेब्रुवारी (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून हिंदु धर्मावर होणार्‍या दैनंदिन आघातांची माहिती मिळाली. येत्या काळात टिकण्यासाठी संघटन महत्त्वाचे आहे, याची जाणीव झाली. समितीचे कार्य अत्यंत प्रेरणादायी असून दिशादर्शक आहे. यापुढे समितीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हिंदु धर्मजागृतीचे कार्य करणार आहोत, असा निर्धार लिंब-गोवे येथील युवकांनी एका बैठकीत प्रभु श्रीरामचंद्रांच्या साक्षीने केला.

इपीएफ्च्या निवडणुकीत नवी मुंबई येथील सनातनच्या साधिका सौ. प्रविणा पाटील देशातील पहिल्या महिला म्हणून विजयी

     नवी मुंबई, २७ फेब्रुवारी (वार्ता.) - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वाशी येथील उपविभागीय कार्यालयाच्या कर्मचारी संघटनेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत लोकाधिकार पॅनल विजयी झाले आहे. यात नेरूळ येथील सनातनच्या साधिका सौ. प्रविणा पाटील यांनी सुयश मिळवले आहे. सचिवपदासाठी सौ. प्रविणा पाटील यांनी दुसर्‍यांदा निवडणूक लढवली असून सलग दुसर्‍या वेळी निवडून येणार्‍या त्या महाराष्ट्रासह देशातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वर्ष २०१६-१७ साठी झालेल्या निवडणुकीत अशोक कुमार सिंह उपाध्यक्ष, सौ. प्रविणा पाटील सचिव, मोहन भोईर सहसचिव, तसेच एच्.एन्. सिंह कोषाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.

हिंदुत्ववादी संघटनांच्या शिष्टमंडळाची मुंबई मिररच्या निवासी संपादकांकडे कारवाईची मागणी !

दैनिक मिररमध्ये सनातनच्या संस्थापकांची
अपकीर्ती करणारे खोटे वृत्त प्रसिद्ध केल्याचे प्रकरण
    मुंबई - २५ फेब्रुवारीच्या दैनिक मिरर या दैनिकाच्या मुखपृष्ठावर सुपारीबाज पत्रकार अलका धूपकर आणि धर्मेंद्र तिवारी यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्परगुरु डॉ. आठवले यांचा अवमान करणारे वृत्त प्रसिद्ध केले आहे. या निषेधार्थ २६ फेब्रुवारी या दिवशी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आझाद मैदानात आंदोलन केले. या आंदोलनानंतर हिंदुत्ववाद्यांच्या शिष्टमंडळाने दैनिक मुंबई मिररचे निवासी संपादक पंकज उपाध्याय यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. या शिष्टमंडळात सनातनचे कायदेविषयक सल्लागार अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर, हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक वैद्य उदय धुरी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राजेंद्र सावंत, धर्माभिमानी डॉ. उपेंद्र डहाके आणि सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांची उपस्थिती होती. या वेळी या संदर्भात कारवाई करू, असे आश्‍वासन निवासी संपादक उपाध्याय यांनी दिले.

जमावाला खूश करण्यासाठी पोलिसांनी मला अटक केली ! - सुशील कुमार पिल्ले यांचा पोलिसांवर आरोप

धर्मांधांच्या दबावामुळे पोलिसांकडून निरपराध्यांवर गुन्हे प्रविष्ट केले जातात ! त्याऐवजी गुन्हेगाराला 
समर्थन देणार्‍यांवर गुन्हे प्रविष्ट करून पोलीस कायदा आणि सुव्यवस्था का राखत नाहीत ?
गोव्यात येथे मौलवीने विनयभंग केल्याचे प्रकरण
    वास्को - येथील मौलवीने विनयभंग केल्याच्या प्रकरणी मी साक्षीदार होतो, तरीही पोलिसांनी पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या जमावाला खूश करण्यासाठी मला अटक केली. वास्तविक पोलिसांना या प्रकरणी मी साहाय्य करत आहे; मात्र मला अटक करून पोलिसांनी त्याची परतफेड केली, असा आरोप या प्रकरणी वास्को पोलिसांनी अटक करून पुढे सुटका केलेले सुशील कुमार पिल्ले यांनी पत्रकारांशी बोलतांना केला आहे. (धर्मांधांचे बटीक बनलेले पोलीस ! अशा पोलिसांना साहाय्य करावे, असे पुन्हा कुणाला वाटेल का ? - संपादक)

रेल्वेत मिळणार्‍या चादरी दोन मासांनी धुतल्या जातात !

जनतेच्या आरोग्याविषयी उदासीन असलेले रेल्वे प्रशासन !
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांची माहिती
     नवी देहली - रेल्वेत प्रवाशांना देण्यात येणार्‍या चादरी दर दोन मासांनी धुतल्या जातात, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी सभागृहात दिली. त्यामुळे राज्यसभा सभापती हमीद अन्सारी यांच्यासह अख्खे सभागृह चकीत झाले. प्रवाशांनी आता स्वत:च्या चादरी घेऊन प्रवास करायला हवा, अशी प्रतिक्रियाही अन्सारी यांनी या वेळी दिली. अशा प्रकारे जनतेच्या आरोग्याविषयी रेल्वे प्रशासनाची असलेली उदासीनता समोर आली. (देश स्वतंत्र होऊन ६८ वर्षे उलटल्यावरही रेल्वे प्रवासात जनतेला स्वच्छ चादरीही देऊ न शकणारे रेल्वे प्रशासन ! - संपादक)

राहुल गांधी यांच्या जिवाला धोका असल्याची अघोरी महिला तांत्रिकाची भविष्यवाणी

आता अंनिसवाल्यांनी याच्या विरोधात रान पेटवल्यास नवल ते काय ?
     उज्जैन - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या जिवाला धोका असल्याची भविष्यवाणी येथील सिंहस्थासाठी आलेल्या शिवानी दुर्गा या महिला अघोरी मांत्रिकाने केली. या सिंहस्थात आतंकवादी आक्रमण होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. मांत्रिक दुर्गाने सिंहस्थ महाकुंभ यशस्वी व्हावा, यासाठी स्मशानात तंत्रक्रिया केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलतांना दुर्गा म्हणाली, राहुल गांधी यांच्यावर आक्रमण होणार असून त्यांच्या जिवाला धोका असल्याचा आभास ध्यानमुद्रेत असतांना मला एका दिव्य शक्तीकडून झाला आहे.

सात्त्विकता आणि पावित्र्य जपले जात नसल्याने महिला कैद्यांना प्रसादाचा लाडू बनवण्याचा ठेका देऊ नये ! - महेश उरसाल, बजरंग दल, कोल्हापूर शहरप्रमुख

खडीसाखर आणि फुटाणे हाच श्री महालक्ष्मीदेवीचा प्रसाद असल्याचा पुराणात उल्लेख
कोल्हापूर, २७ फेब्रुवारी (वार्ता.) - कळंबा कारागृहातील महिला कैद्यांना प्रसादाचे लाडू बनवण्याचा ठेका दिला, तरी त्या प्रसादातून सात्त्विकता मिळणार नाही. त्यामुळे महिला कैद्यांना लाडवाच्या प्रसादाचा ठेका देऊ नये. करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचा प्रसाद हा लाडू नसून खडीसाखर-फुटाणे हाच असल्याचे पुराणात सांगितले आहे. त्यामुळे लाडवाच्या प्रसादाचा घाट घालू नये, अशी मागणी बजरंग दलाचे शहरप्रमुख श्री. महेश उरसाल यांनी केली आहे. (श्री महालक्ष्मी मंदिरातील लाडवाच्या प्रसादाविषयी आध्यात्मिकदृष्ट्या मत प्रदर्शित करणारे श्री. महेश उरसाल यांचे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनीच अशा प्रकारे धर्मशास्त्राचा अभ्यास केल्यास धर्मावर होणारे आघात रोखता येतील ! - संपादक) जिल्हाधिकार्‍यांच्या लाडवाच्या प्रसादाच्या आदेशाला बजरंग दलाचा विरोध आहे, असेही श्री. उरसाल यांनी सांगितले.

आंदोलने संयत असावीत, आक्रमक नकोत ! - प्रा. गोपाल गुरु

    पुणे, २७ फेब्रुवारी (वार्ता.) - आंदोलने ही संयत असावीत. डाव्या चळवळीशी संबंधित आंदोलने आक्रमक असतात. आंदोलने करतांना आग्रह असावा; पण आक्रमकता नको, असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील प्राध्यापक गोपाल गुरु यांनी केले. प्रा. राजेंद्र व्होरा स्मृती व्याख्यानमालेच्या अंतर्गत २५ फेब्रुवारी या दिवशी येथील पत्रकार संघात आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. सध्याची आंदोलने ही इव्हेंट झाली असल्याची टीकाही त्यांनी केली. (डाव्या विचारांशी संबंधित मंडळी याचा गांभीर्याने विचार करतील का ? - संपादक)

बहिणीने रिमोट काढून घेतल्याने ११ वर्षीय मुलाची आत्महत्या !

धर्माचरणाच्या अभावी क्षुल्लक कारणावरून जीवन संपवणारी देशाची भावी पिढी !
    ठाणे - मोठ्या बहिणीने दूरचित्रवाणी संचाचा रिमोट हिसकावून घेतल्याने ११ वर्षीय मुलाने आत्महत्या केली आहे. कल्याणजवळच्या वालधुनी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. दुर्गेश प्रभुनाथ सोनी असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. २४ फेब्रुवारी या दिवशी दुर्गेश रात्री अभ्यास करत असतांना त्याचा १२ वर्षीय बहिणीशी वाद झाला. यातच त्याच्या हातातील दूरचित्रवाणी संचाचा रिमोट काढून घेतल्याने त्याने रात्रीच्या सुमारास घराच्या शयनगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

नालासोपारा येथे धर्मजागृती सभेचा व्यापक प्रसार

     नालासोपारा (जिल्हा पालघर), २७ फेब्रुवारी - येथे २८ फेब्रुवारी या दिवशी होणार असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचा प्रचार व्यापक प्रमाणात करण्यात आला आहे. आतापर्यंत विविध ठिकाणी ५० बैठकांच्या माध्यमातून १ सहस्र ६०० धर्माभिमान्यांपर्यंत विषय पोहोचवला आहे. तसेच ३४ ठिकाणी फलकप्रसिद्धी, १६ ठिकाणी मोठी होर्डिंग आणि ८० पेक्षा जास्त भित्तीफलक लावण्यात आले आहेत.

नालासोपारा (जिल्हा पालघर) आणि अमरावती येथे आज हिंदु धर्मजागृती सभा !

नालासोपारा (जिल्हा पालघर)
स्थळ : एच्.डी.एफ्.सी. बँकेजवळ, पाटणकर पार्कसमोर, नालासोपारा (प.)
वेळ : सायं. ५.३० वाजता   संपर्क : ७०२८६६६७८९    
अमरावती
स्थळ : संत गाडगेबाबा मंदिरासमोरील मैदान, गाडगेनगर, अमरावती वेळ : सायंकाळी ५.३० वाजता

मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी ! - श्रीनिवास नागे

    सांगली, २७ फेब्रुवारी (वार्ता.) - मराठीची सर्वत्र कुंचबणा होते, असे आपण सर्वजण नेहमी म्हणतो; मात्र मराठी भाषा ही जर ज्ञानभाषा झाली, तर असे होण्याचा प्रश्‍नच येणार नाही. मराठी भाषा आजही इंग्रजीपेक्षाही अधिक सक्षम आणि समृद्ध भाषा आहे. मराठी भाषेसाठी शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे मत दैनिक लोकमतचे सांगली आवृत्तीप्रमुख श्री. श्रीनिवास नागे यांनी व्यक्त केले. ते मनसेच्या वतीने मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित मराठी साहित्यिकांच्या सत्कार समारंभात बोलत होते.

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन बेबी पावडर मुळे महिलेला कर्करोग

अशा घातक उत्पादनांविषयी भारताने वेळीच योग्य भूमिका घ्यावी !
    मिसूरी (अमेरिका) - जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन बेबी पावडर पासून महिलांना अंडाशयाचा कर्करोग होण्याचा धोका असल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर येथील न्यायालयाने जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन या आस्थापनेला ७२ मिलियन डॉलर्सचा (४९४ कोटी रुपयांचा) दंड ठोठावला आहे. जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनचे उत्पादन आणि एका महिलेचा कर्करोग यांचा संबंध असल्याचे समोर आले होते. या प्रकरणात ६२ वर्षीय जॅकलीन फॉक्स या पीडित महिलेचा कर्करोगाने मृत्यू झाला. त्यानंतर महिलेच्या नातेवाइकांकडून न्यायालयात दावा करण्यात आला की, पीडित महिलेने जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनची बेबी पावडर आणि शॉवर टु शॉवर पावडर ही उत्पादने ३५ वर्षे वापरली आहेत. या पावडरचा आणि कर्करोगाचा संबंध आहे. या संदर्भात या आस्थापनाने त्यांचे उत्पादन सुरक्षित असल्याचा दावा केला असला, तरी आस्थापन त्यांचे म्हणणे सिद्ध करू शकले नाही. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयाने पीडित जॅकलीन फॉक्स यांच्या कुटुंबाला ७२ मिलियन डॉलर्स हानीभरपाई देण्याचा आदेश दिला.

गोव्यात अखिल भारत हिंदू महासभा पक्ष कृतीशील होणार !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार 
अर्पण करतांना श्री. अनुप सरदेसाई, बाजूला 
श्री. सिद्धार्थ याजी, श्री. चेतन राजहंस 
आणि डॉ. मनोज सोलंकी
सर्व पक्ष अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करत असल्याने प्रखर हिंदुत्ववादी पक्षाची आवश्यकता ! 
- श्री. अनुप सरदेसाई
    मडगाव, २७ फेब्रुवारी (वार्ता.) - हिंदुत्वाविषयीच्या समस्यांवर लढा देण्यासाठी गोव्यात अखिल भारत हिंदू महासभा पक्ष कृतीशील होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त या पक्षाची गोव्यात शाखा उघडण्याची घोषणा पक्षाचे गोवा अध्यक्ष आणि हिंदुत्वादी लेखक श्री. अनुप सरदेसाई यांनी केली. या वेळी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. सिद्धार्थ याजी, तसेच सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी उपस्थित होते.

दैनिक गोमन्तकचे संपादक श्री. श्रीराम पचिंद्रे यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

डावीकडून श्री. संजय घुग्रेटकर, श्री. श्रीराम पचिंद्रे यांना
सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती
देतांना डॉ. दुर्गेश सामंत
     रामनाथी, २७ फेब्रुवारी (वार्ता.) - गोव्यातील दैनिक गोमन्तकचे निवासी संपादक श्री. श्रीराम पचिंद्रे यांनी २१ फेब्रुवारीला सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला भेट दिली आणि आश्रमात चालणारे राष्ट्र अन् धर्म विषयक कार्य जाणून घेतले. श्री. श्रीराम पचिंद्रे यांच्यासोबत दैनिक गोमन्तकचे उपसंपादक तथा ग्रंथपाल श्री. संजय घुग्रेटकर यांनीही आश्रमातील कार्य पाहिले. सनातन प्रभात नियतकालिकांचे माजी समूहसंपादक डॉ. दुर्गेश सांमत यांनी त्यांना आश्रमात चालणार्‍या कार्याविषयी माहिती दिली.

फलक प्रसिद्धीकरता

काश्मीरातील देशद्रोह्यांना आपण केव्हा धडा शिकवणार ?
श्रीनगरमधील जामिया मशिदीत शुक्रवारच्या नमाजानंतर नेहमीप्रमाणे देशद्रोह्यांनी हिंसक आंदोलन केले. जेएन्यूतील देशद्रोही घोषणा देणार्‍यांचे समर्थन करत त्यांनी पाकचे झेंडे फडकावले. या प्रकरणी पोलिसांनी ६ हून अधिक देशद्रोह्यांना अटक केली आहे.

हिंदू तेजा जाग रे !

Jago ! : Srinagarki masjidme namazke paschat logone JNUme deshdrohi ghoshna denewaloke samarthanme andolan kiya.
JNU ki bhaati kya inpar bhi karyavahi hogi ?

जागो !: श्रीनगर की मस्जिद में नमाज के पश्‍चात लोगों ने जेएन्यू में देशद्रोही घोषणा देनेवालों के समर्थन में आंदोलन किया. - जेएन्यू की भांति क्या इन पर भी कार्यवाही होगी ?

आतंकवादी मकबुल भट्ट आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी !

     देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात देशविरोधी घोषणा देतांना विद्यार्थ्यांनी संसदेवर आक्रमण करणारा आतंकवादी महंमद अफझल आणि मकबुल भट्ट यांना हुतात्मा ठरवले. या मकबुलचा विसर देशाला पडला असेल; कारण देशात प्रतिदिन नवनवे आतंकवादी जन्म घेतात; परंतु आतंकवादी त्याला विसरले नाहीत ! 
     १४ सप्टेंबर १९६६ या दिवशी आतंकवादी मकबुल भट्ट याने पोलिसांवर आक्रमण केले होते. ज्यात पोलीस निरीक्षक अमरचंद मारले गेले होते. त्यानंतर वर्ष १९७१ मध्ये इंडियन एअरलाईन्सचे विमान पळवून लाहोरला नेण्यात याच मकबुलचा मुख्य हात होता. त्यावेळी तो पाकिस्तानात रहात होता. या प्रकरणी त्याला वर्ष १९७६ मध्ये भारतीय सैन्याने अटक केली. कालांतराने त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. ही शिक्षा रहित करावी, यासाठी त्याच्याकडून तत्कालीन राष्ट्रपती झैलसिंह यांच्याकडे दयेची भीक मागण्यात आली होती; मात्र शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. ही शिक्षा ठोठावण्यामागे ब्रिटनमधील भारतीय अधिकारी रवींद्र म्हात्रे यांची हत्या निमित्त ठरले!

धर्मप्रसार करून हिंदूंचे धर्मांतर करण्याची ख्रिस्त्यांची नवी क्लृप्ती !

ख्रिस्ती धर्माची माहिती असलेल्या पुस्तिका हिंदूंना विनामूल्य पाठवून केला जात आहे धर्मप्रसार !
     आज विविध माध्यमांतून हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मियांकडून षड्यंत्र रचले जात आहे. मुसलमान हिंदु युवतींचे लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्मांतर करत आहेत, तर ख्रिस्ती विविध आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. कथित चमत्कार करून आजार बरे करण्याची भूलथाप देणे, तसेच पैशांचे आमिष दाखवून ख्रिस्ती मिशनरी आणि धर्मगुरु यांच्याकडून हिंदूंना ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित केेले जात आहे. आतातर ख्रिस्त्यांकडून ख्रिस्ती धर्माविषयी माहिती असलेल्या पुस्तिका टपालाद्वारे विनामूल्य पाठवून त्या माध्यमातून धर्मप्रसार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रकार काही जागृत हिंदूंच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. 
      हिंदूंनो, अन्य धर्मियांकडून हिंदु धर्मावर होणारे आघात जाणा आणि धर्मशिक्षण घेऊन या आघातांपासून स्वतःचे अन् हिंदु धर्माचे रक्षण करा ! 

नथुराम गोडसे - द स्टोरी ऑफ ऍन असॅसिन (नथुराम गोडसे - एका हत्यार्‍याची कथा) आणि द ब्लंडर्स ऑफ महात्मा (महात्म्याच्या घोडचुका)

गांधींच्या हत्येमागील सत्य कारण सांगणारी श्री. अनुप सरदेसाई लिखित इंग्रजी पुस्तके !
पुस्तक क्रमांक १ - नथुराम गोडसे : द स्टोरी ऑफ अ‍ॅन असासिन 
(Nathuram Godse : The Story of Assassin)
     गांधी हत्येमुळे चोहोबाजूंनी माझ्यावर होत असलेल्या टीकेने या कृत्यामागील माझ्या नैतिक हेतूविषयी असलेला माझा आत्मविश्‍वास यत्किंचितही ढळू दिला नाही. मला यात जराही शंका नाही की, प्रामाणिक इतिहासतज्ञ माझ्या या कृत्याला योग्य महत्त्व देतील. या कृत्याचे खरे मूल्य भविष्यात एके दिवशी मोजले जाईल ! नथुराम गोडसे यांच्या याच शब्दांतून प्रेरणा घेऊन लेखक श्री. अनुप सरदेसाई यांनी नथुराम गोडसे - द स्टोरी ऑफ ऍन असॅसिन (नथुराम गोडसे - एका हत्यार्‍याची कथा) हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे.
१. आज शाळेमध्ये मुलांना नथुराम गोडसे यांनी गांधींची हत्या केली एवढेच शिकवले जाते; परंतु गोडसे यांनी हे कृत्य का केले, याविषयी माहिती दिली जात नाही. 
२. नथुराम गोडसे यांना गांधींची हत्या करायला हवी, असे का वाटले ?
३. नारायण आपटे, विष्णु करकरे, मदनलाल पहवा आणि गोपाळ गोडसे यांनी या हत्येत कोणती कामगिरी बजावली ?

विज्ञानाप्रमाणे बहुधा (Probably), असे शब्द आपल्या धर्मग्रंथांत नाहीत. ठामपणे सर्व सत्य मांडले आहे. - श्री. शिवकुमार ओझा, ठाणे.


महर्षि व्यासांचे द्रष्टेपण सिद्ध करणारी श्रीमद्भागवतामध्ये सांगितलेली कलियुगाची भयानक लक्षणे !

व्यक्ती आत्ममग्न आणि स्वार्थी झाल्याने ती वृद्ध माता-पित्यांना सोडून देणार असणे 
अन् माता-पिताही मुलांना वेगळे ठेवणार असणे
न रक्षिष्यन्ति मनुजाः स्थविरौ पितरावपि ।
पुत्रान्भार्यां च कुलजां क्षुद्राः शिश्‍नोदरम्भराः ॥
- श्रीमद्भागवत, स्कंध १२, अध्याय ३, श्‍लोक ४२
     अर्थ : परिक्षिता ! कलियुगातील क्षुद्र माणसे केवळ कामवासनापूर्ती आणि आपले पोट भरणे यातच मग्न असतील. ती आपल्या म्हातार्‍या आई-वडिलांचे रक्षण करणार नाहीत आणि आई-वडीलसुद्धा सर्व कामांत कुशल अशा पुत्रांना वेगळे ठेवतील.

हिंदूंनो, तुमचे निरपराध संत आणि धर्मप्रेमी यांना कथित आरोपांवरून अनेक वर्षे कारागृहात नाहक खितपत ठेवण्याचे षड्यंत्र जाणा !

    हिंदूंचे संत आणि धर्मप्रेमी यांना कथित आरोपांवरून षड्यंत्र रचून पोलिसांकडून अटक करण्यात येत आहे अन् कोणताही पुरावा मिळालेला नसतांना त्यांना अटक करून अनेक वर्षे नाहक कारागृहात खितपत ठेवण्यात येत आहे. याची काही उदाहरणे येथे दिली आहेत. 
     हिंदूंना न्याय मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही.

सनातनची ग्रंथसंपदा ऑनलाईन खरेदी करा !

सनातनच्या विक्रीकेंद्रांवर आणि वितरकांकडे उपलब्ध 
असलेले ग्रंथ आता SanatanShop.com वरही उपलब्ध !
विशिष्ट मूल्याच्या खरेदीवर विनामूल्य घरपोच सेवा !
स्थानिक वितरकाचा संपर्क : ९३२२३१५३१७

भारतात प्रत्येक तिसरा खासदार गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचा असणे लज्जास्पद !

     तत्कालीन खासदारांत भाजपच्या ९८, काँग्रेसच्या ८, अण्णाडीएम्केच्या ६ आणि शिवसेनेच्या १५ जणांवर फौजदारी गुन्हेगारी खटले (क्रिमिनल केसेस) आहेत. थोडक्यात प्रत्येक तिसरा खासदार क्रिमिनल रेकॉर्डवाला (गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचा) आहे. - दादूमिया (संदर्भ : धर्मभास्कर, जून २०१४) -

हिंदुत्वाच्या अभ्युदयासाठी अखिल भारतीय हिंदू अधिवेशनास उपस्थित रहाणे आवश्यक !

     केवळ हिंदुत्वाच्या अभ्युदयाचा विचार करणारे प.पू. (डॉ.) आठवले यांचे हात हिंदू बांधव सबळ आणि सधन करतील. त्यांनी भोगलेल्या, सोसलेल्या यातनांचे खरे चीज करायचे असेल, तर त्यासाठी एकच उपाय आहे मोठ्या संख्येने अखिल भारतीय हिंदू अधिवेशनास उपस्थित रहाणे. - दादूमिया (संदर्भ : धर्मभास्कर, जून २०१४)

देशात शासन आहे का ? देशद्रोह्यांविरूद्ध शासन कृती करत नसल्यानेच जनतेला कायदा हातात घ्यावा लागत आहे !

     नवी देहली येथील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयात देशद्रोही घोषणा दिल्याच्या प्रकरणी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याला अटक करण्यात आली होती. त्याला देण्यात आलेली पोलीस कोठडी १५ फेब्रुवारी २०१६ या दिवशी संपल्यावर त्याला पटियाला हाऊस न्यायालयात आणण्यात आले. या वेळी त्याच्या समर्थनार्थ न्यायालय परिसरात जमा झालेले साम्यवादी विद्यार्थी आणि येथील अधिवक्ता यांच्यात हाणामारी झाली. अधिवक्त्यांनी या वेळी एका विद्यार्थ्याला बेदम चोप दिला. या वेळी अधिवक्ता भारतमाता की जय अशा घोषणा देत होते.

नास्तिकवादी भूमाता ब्रिगेडने मंदिर प्रवेश करणे, म्हणजे मंदिराचे पावित्र्य नष्ट करणे !

     श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील आंदोलन अयशस्वी झाल्यानंतर नास्तिकवादी भूमाता ब्रिगेडने श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या गाभार्‍यात महिलांना प्रवेश द्या अन्यथा आंदोलन करू, अशी मागणी केली आहे. त्या आशयाचे पत्र भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी श्री त्र्यंबकेश्‍वर मंदिर देवस्थानला पाठवले आहे. त्या पत्रात पुढे म्हटले आहे की, श्री काशी विश्‍वेश्‍वराच्या मंदिरात महिलांना प्रवेश दिला जातो, तर मग त्र्यंबकेश्‍वरमध्ये का नाही ? त्यामुळे महाशिवरात्रीच्या आधी याविषयी निर्णय घेण्यात यावा, नाहीतर महिला मंदिरात प्रवेश करतील

देशभक्ती लुप्त होण्याला स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची शासने उत्तरदायी आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे !

     देशात आज अराजक वाढत चालले आहे. लोकांमध्ये देशभक्ती लुप्त पावत चालली असल्याचे दिसून येते. अशा वेळी शिवरायांच्या देशभक्तीच्या शिकवणीची आज आवश्यकता आहे. - लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्यमंत्री, गोवा.

शिवरायांच्या महाराष्ट्र राज्यात त्यांच्याच पुतळ्याचे धर्मांधांनी शिर तोडण्यापर्यंत स्थिती येते, हे शासनाला लज्जास्पद !

शिर तोडणार्‍यांना शिक्षा होण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन होणे आवश्यक आहे ! 
    वर्सोवा, अंधेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित क्रिकेट स्पर्धेत जिंकलेल्या इम्रान इलेव्हन या संघाने पारितोषिक स्वरूपात मिळालेल्या छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्याचे शिर तोडून तो पुतळा शौचालयाजवळ ठेवला.

सनातनवर बंदीची मागणी करणारे काँग्रेसवर बंदीची मागणी का करत नाही ?

     पानसरे हत्या प्रकरणात केवळ संशयित म्हणून एका साधकाला कह्यात घेण्यात आल्यावर लगेचच सनातन संस्थेवर बंदी घाला, अशी आवई उठवली. चर्चासत्रांतून सनातनला दोषी ठरवण्यात आले. त्याच आवई उठवणार्‍या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पद्मसिंह पाटील यांच्यावर खुनाचा आरोप सिद्ध झाला, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर बंदी घालण्याची मागणी का केली नाही ? वर्ष १९८४ मध्ये शिखांचे हत्याकांड घडवून आणणार्‍या काँग्रेस पक्षावर बंदी का नको ? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे सनातनवर बंदीची मागणी करणारे देतील का ? 
- पू. (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

हिंदूंचा पैसा घेऊन त्यांना वार्‍यावर सोडणारे शासन !

     जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थानात प्रतिवर्षी ३ सहस्र १०० कोटी रुपयांचे अर्पण जमा होते. त्यातील ८५ टक्के निधी शासकीय तिजोरीत जमा होतो. यातील काही निधी हा हिंदूंशी काहीच संबंध नसलेल्या कारणांवर व्यय (खर्च) होतो. - स्टीफन नॅप, लेखक, अमेरिका. (ते आता श्री नंदनानंद दास या नावाने ओळखले जातात)

प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय (रोगनिवारणासाठी प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळे स्वतः शोधून दूर करणे)

सनातनच्या भावी आपत्काळातील संजीवनी या ग्रंथमालिकेतील नूतन ग्रंथ !
      सनातनच्या प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय या नूतन ग्रंथाचा परिचय क्रमशः करून देत आहोत. ही उपायपद्धत केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर एरव्हीसाठीही उपयुक्त आहे. वाचकांनी आतापासूनच हे उपाय करून पहावेत. असे केल्याने या उपायपद्धतीचा सराव होईल, तसेच तिच्यातील बारकावेही कळतील. यामुळे प्रत्यक्ष आपत्काळात विकारांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होईल. या ३ भागांतून वाचकांना या उपायपद्धतीची ओळख होईल. सविस्तर विवेचन ग्रंथात केले आहे. तो ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावा. 
भाग ३
३. प्राणशक्तीच्या प्रवाहातील अडथळ्यांवर उपाय करणे
३ अ. न्यास कसा करावा ? : प्रयोगाद्वारे प्राणशक्तीच्या प्रवाहातील अडथळ्याचे स्थान, तसेच मुद्रा आणि नामजप शोधल्यानंतर अडथळ्याच्या स्थानी नामजप करत उपाय करावे लागतात. यासाठी न्यास कसा करावा, हे समजून घेणे आवश्यक आहे.

तमिळनाडू येथील तिरुवण्णामलई या अग्नीक्षेत्रात महर्षींनी २३.१.२०१६ या पौर्णिमेच्या दिवशी गाभण गायीची पूजा करण्यास सांगणे आणि यामागचा कार्यकारणभाव

महर्षींचे कार्य आणि शिकवण
पू. (सौ.) अंजली गाडगीळ
     प्रत्येक पौर्णिमेला तिरुवण्णामलई या अग्नीक्षेत्रात शिवरूपी असणार्‍या अण्णामलई या पर्वताला प्रदक्षिणा घालण्यासाठी सहस्रोंच्या संख्येने लोक येतात. या दिवशी महर्षींनी दिलेल्या आज्ञेनुसार सनातनच्या साधकांच्या वतीने पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या घराच्या बाहेर असणार्‍या मुकाम्बिका देवीला आणि बालाजीला नेहमी अभिषेक केला जातो. 
१. पौर्णिमेच्या दिवशी गाभण गायीची पूजा करतांना गाईने मूत्रविसर्जन करणे, 
हे प्रार्थना फलद्रूप झाल्याचे दर्शक असणे
    २३.१.२०१६ या दिवशी विशेष म्हणजे या ठिकाणी देवीच्या आणि बालाजीच्या मूर्तींसमोर गाभण गायीला (ज्या गायीला वासरू होणार आहे, अशी गाय) आणून तिची पूजा कार्तिकपुत्रीकडून (पू. सौ. अंजली गाडगीळ यांच्याकडून) करवून घेण्याची आज्ञा महर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना दिली. त्याप्रमाणे गायीची पूजा करतांना तिने मूत्रविसर्जन केले. हे प्रार्थना फलदायी झाल्याचे सूचक आहे. या वेळी आम्ही तिची आरती करून तिला गोग्रासही (तिला केळ्याचा घास) दिला.

पू. शंकर गुंजेकर आणि बेळगाव जिल्ह्यातील साधक यांच्या छायाचित्रांकडे पाहून मनाला काय जाणवते किंवा अनुभूती येते, याचे निरीक्षण करा !

प्रयोग १
पू. शंकर गुंजेकर यांना संत म्हणून घोषित केल्यानंतर 
काढलेले हे छायाचित्र आहे. त्याकडे २ मिनिटे पहा !

काँग्रेसने नागरिकांना कायम भीतीच्या वातावरणात ठेवलेले असणे

भीतीचे प्रकार
     भीती दोन प्रकारची. उपजत आणि घालून दिलेली. तुम्ही हिंदू, त्यामुळे तुमच्या मनाला दोन्ही भीती भेडसावत असतात. डाव्या बाजूस भीती, उजव्या बाजूस भीती, समोर भीती, वर भीती आणि तुमच्या खाली भीती, अशी तुमच्या मनाची स्थिती झाली आहे. मूर्तीमंत भीती उभी. ती समोर होती. ही काँग्रेसची भीती अष्टपैलू (ऑलराउंड) आहे; पण घाबरू नका, सारे चांगलेच होणार आहे. (आता काँग्रेस पक्ष सत्तेतून पायउतार झाला आहे. - संपादक) - दादूमिया (संदर्भ : धर्मभास्कर, जून २०१४)

एका शासकीय रुग्णालयात रुग्णाची होणारी अक्षम्य हेळसांड !

आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे
१. एका शासकीय रुग्णालयात हाताच्या अस्थिभंगाची शस्त्रक्रिया 
सायंकाळी करण्याचे ठरलेले असूनही आपत्कालीन 
शस्त्रक्रियांमुळे रुग्णाला पहाटे ४ वाजेपर्यंत वाट पहावी लागणे
     एका रुग्ण साधकाच्या डाव्या हाताचा अस्थिभंग झाल्याने त्याला एका शासकीय रुग्णालयात तपासण्यासाठी नेले. तेथील आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) त्याच दिवशी संध्याकाळी शस्त्रक्रिया करू, असे सांगितले आणि त्यानुसार सिद्धता केली. सायंकाळी ७ वाजता शस्त्रक्रिया करण्याचे निश्‍चित झाले असूनही प्रत्यक्षात पहाटे ४ वाजेपर्यंत शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. शेवटी रुग्णाला झोपायला पाठवले. तेथील वैद्यांना रात्रभर आपत्कालीन शस्त्रक्रिया कराव्या लागल्यामुळे ही शस्त्रक्रिया पुढे पुढे ढकलली गेेली. शेवटी दुसर्‍या दिवशी पहाटे ४ वाजता शस्त्रक्रिया पार पडली.
२. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला लघवीचा त्रास होत असतांना त्याकडेही दुर्लक्ष 
करणे आणि दुसर्‍या दिवशी रात्री बाहेरील आधुनिक वैद्यांकडे न्यावे 
लागून मुत्राशयात तुंबलेली ८०० मि.ली. लघवी बाहेर काढावी लागणे
     शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला लघवीचा त्रास होेऊ लागला. लघवी नीट होत नाही; म्हणून त्याला सकाळीच दुसर्‍या वैद्यांना (UROLOGIST) दाखवण्याचे ठरले; पण संध्याकाळी ७ वाजेपर्यंत त्याला त्या वैद्यांकडे नेले नाही.

प्रतिकूल परिस्थितीतही देवाच्या अखंड अनुसंधानात रहाणारे पू. शंकर गुंजेकर !

 पू. शंकर गुंजेकर
    घरची परिस्थिती हालाखीची असतांनाही त्यावर ईश्‍वरावरील श्रद्धेने मात करून सतत इतरांचा विचार करणारे, प्रत्येक क्षण ईश्‍वरी अनुसंधानात रहाणारे सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर यांच्याविषयी त्यांची बहीण सौ. सुमित्रा विठ्ठल गावडे आणि रामनगर येथील साधक श्री. ज्ञानेश्‍वर गावडे यांना जाणवलेली सूत्रे येथे पाहूया.
१. शंकरदादांनी हालाखीत काढलेली १५ वर्षे !
१ अ. मिळवलेले सर्व पैसे कर्ज फेडण्यासाठी व्यय झाल्याने घरी खाण्यासाठी काहीच नसणे
    पू. शंकरदादांच्या घरी स्वयंपाक करून खाण्यासाठी मूठभर तांदूळ नसायचे; कारण त्या काळात त्यांच्यावर कर्ज होते. ते फेडण्यासाठी मिळवलेले पैसे त्यातच व्यय होत होते. त्यामुळे ते खाणार काय ? ज्यांच्याकडून कर्ज घेतले होते, ते सर्व जण घरी यायचे.
१ आ. अंगावर कपडे नसल्यामुळे सकाळी गावातले उठण्यापूर्वी कामाला जाणे आणि अंधार झाल्यावर घरी येणे
    सकाळी गावातले कुणी उठण्यापूर्वी ते कामाला जात होते आणि संध्याकाळी अंधार झाला की, घरी यायचे. याचे कारण म्हणजे त्यांच्या अंगावर कपडे नसायचे. दादांनी शेतामध्ये जे बुजगावणे लावतात, त्याला घातलेला शर्ट एक वर्ष वापरला आहे. तो शर्ट फाटलेला असायचा.

प्रत्येकाला साधना सांगून आनंद देणारे पू. शंकर गुंजेकर !

१. सजीव आणि निर्जीव वस्तूंना साधना सांगणे
    काका त्यांच्या संपर्कात येणारी माणसे, जनावरे, पक्षी आणि निर्जीव वस्तू या सर्वांनाच साधना सांगतात. ते २४ घंटे साधनेतच असतात. काका उद्याची काळजी करीत बसत नाहीत. उद्या काय होणार ?, त्याचे नियोजन ईश्‍वराने अगोदरच केलेले असते, असे ते म्हणतात.
२. जनावरांचेही मन जाणणारे शंकरकाका !
    शंकरकाकांचे मन आणि त्यांचे बोलणे जनावरांनाही कळते, हे मला अनुभवायला मिळाले. एकदा मी काकांसह त्यांच्या शेतात गेलो होतो. तेथेच त्यांचे दोन रेडे चरत होते. काका आपल्या रेड्यांविषयीच काहीतरी बोलत होते. बोलता-बोलता आम्ही थांबलो. तेवढ्यात दोन्ही रेडे आवाज करून काकांकडे बघतच राहिले. तेव्हा काकांनी त्यांना (रेड्यांना) उद्देशून सांगितले, नाही रे बाबांनो, तुमची काहीही निंदा-चहाडी करत नाही. असे सांगितल्यावर ते परत चरायला लागले. नंतर काकांनी दोन्ही रेड्यांना बोलावल्यावर ते चरायचे सोडून काकांकडे आले.

दूरचित्रवाहिन्या सनातन संस्थेला अपकीर्त करण्याचा प्रयत्न करत असतांना श्री अरविंद आश्रमातील भक्तांनी सनातनवर दाखवलेला विश्‍वास !

      कोणत्याही वाहिन्या सनातनविरोधी कितीही प्रचार करू दे. आम्ही सनातनच्या आश्रमात गेलो होतो. आम्ही आश्रम पाहिला आहे. आम्ही साधकांना भेटलो आहोत. आम्हाला शंभर टक्केे निश्‍चिती आहे की, सनातन संस्था चांगले कार्य करत आहे. या वाहिन्यांच्या अपप्रचाराचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. - श्रीमती भानुदीदी, श्री अरविंद आश्रम, झुंझूनू, राजस्थान (कु. पूनम चौधरी यांच्याशी संभाषण (१.१२.२०१५))
      या आश्रमात सनातनचे साधक केव्हाही येऊन धर्मप्रसार करू शकतात. हरिद्वार कुंभमेळ्यात प्रसार किंवा अन्य कोणत्याही गोष्टीसाठी हा आश्रम सनातनच्या साधकांसाठी नेहमी उघडा राहील. - संजनादीदी, श्री अरविंद आश्रम, झुंझूनू, राजस्थान (कु. पूनम चौधरी यांच्याशी संभाषण (१.१२.२०१५))

धर्मप्रसाराची सेवा करतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांना आलेले अनुभव

रामनाथी आश्रम आणि सनातन संस्था यांमध्ये ईश्‍वरी राज्याची 
(हिंदु राष्ट्र्राची) प्रत्यक्ष अनुभूती घेणारे सनातनचे साधक !
पू. डॉ. चारुदत्त पिंगळे
      काही वेळा समाजातील जिज्ञासू किंवा हिंदुत्ववादी विचारतात, वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र येईल का ? किंवा काही जण म्हणतात, आम्ही पाहू अथवा न पाहू; पण हिंदु राष्ट्र येणारच आहे. परंतु चिंतन केल्यास लक्षात येते की, प्रत्यक्षात संस्थेचा कारभार असो, रामनाथी आश्रम असो किंवा राष्ट्र्रीय हिंदू अधिवेशन असो, सनातनचे साधक सर्वत्र ईश्‍वरी राज्याची अनुभूती घेत आहेत. अनेक साधकांना रामनाथी आश्रम म्हणजे हिंदु राष्ट्राची एक प्रतिकृती आहे, असे अनुभवयास येते. साधक साधनेच्या माध्यमातून स्वतःत (अंतरात, वृत्तीस्वरूप) हिंदु राष्ट्र स्थापनेचा निरंतर प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना भविष्यात हिंदु राष्ट्र्र्राची स्थापना होण्याची वाट पहावी लागत नाही. वर्ष २०२३ मध्ये भारतात हिंदु राष्ट्र स्थापन होणार का ?, असे विचारणार्‍यांना साधक निश्‍चिती देत विचारणार्‍यांतील उत्साह टिकवून ठेवत आहेत. - (पू.) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती. (१.१२.२०१५)

अन्यायाविरुद्ध थोडा जरी प्रतिकार केला, तरी देव परिस्थिती अनुकूल करत असल्याविषयी आलेल्या अनुभूती !

श्री. यशपाल वाडकर
            काही दिवसांपूर्वी दैनिक सनातन प्रभातमध्ये बेळगाव येथील श्री. यशवंत राणे यांचा लेख आला होता. एक कसाई गायीला कापण्यासाठी नेत असल्याचे पाहिल्यावर त्या गायीला वाचवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यासंदर्भातील अनुभूती त्या लेखात दिल्या होत्या. तो लेख वाचल्यानंतर काही वर्षांपूर्वी माझ्यासमवेत घडलेले दोन प्रसंग आठवले.
           अन्याय झाल्यावर कसे वागावे, हे यशपाल वाडकर यांनी कृतीतून दाखवले आहे. सर्वांनी त्यांचे अनुकरण केल्यास रामराज्य येण्यास वेळ लागणार नाही. यशपाल वाडकर यांचे कौतुक करावे तेवढे थोडे ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सांगितल्याप्रमाणे दत्तमाला मंत्रजप केल्यावर रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रम परिसरात उगवलेल्या औदुंबराच्या रोपांचा आणि अन्य ठिकाणी उगवलेल्या औदुंबराच्या रोपांचा अभ्यास करण्यासाठी लोलक-चिकित्सेद्वारेे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली परीक्षणे !


महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !
सौ. मधुरा कर्वे
     देवाने ही चराचर सृष्टी निर्माण केली. मनुष्य, प्राणी, पक्षी आणि झाडे-झुडपे यांचा परस्परांशी जवळचा संबंध आहे. प्राचीन काळातील ऋषीमुनी वनामध्ये रहायचे. वनातील वनस्पतींचे, फुलांचे आणि झाडांचे महत्त्व त्यांनी ओळखले. माणसाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि रोगराई दूर होण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारच्या वनौषधी निर्माण केल्या.
     भारतीय संस्कृतीत या वृक्षांपैकी काही वृक्षांना देववृक्ष या नावाने संबोधले जाते. त्यामधील एक म्हणजे औदुंबर ! अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितले आहे, या झाडामध्ये त्रिमूर्तींचे वास्तव्य असते. या वृक्षाच्या मुळामध्ये ब्रह्मा, मध्यभागात विष्णु आणि अग्रभागात शिवाचे अस्तित्व असते. त्यामुळे या झाडाची पूजा करावी, असे सांगितले जाते.

अध्यात्मे घडतो उद्योगी आणि उद्योगे घडतो समाज !

पिंताबरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी 
ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्समध्ये केलेले मार्गदर्शन
श्री. रवींद्र प्रभुदेसाई
     पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांनी १३ आणि १४ फेब्रुवारी या दिवशी पुणे येथे झालेल्या ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्समध्ये अध्यक्ष म्हणून उद्योजकांना मार्गदर्शन केले. उद्योग जगतात गरुडभरारी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत, उद्योग आणि अध्यात्म यांची सांगड कशी घालावी, स्वतःची मानसिकता पालटण्यासाठी उद्योजकांनी काय करावे, यांसारख्या अनेक गोष्टींचे कानमंत्र श्री. प्रभुदेसाई यांनी उद्योजकांना दिले. उद्योगजगताशी संबंधित त्यांनी केलेले मार्गदर्शन आमच्या वाचकांसाठी येथे सविस्तर प्रसिद्ध करत आहोत. लेखाच्या पूर्वार्धात उद्योजकांसाठीच्या मार्गदर्शक सूत्रे, ब्राह्मण समाजाची स्थिती, आदी सूत्रे पाहिली. या लेखात त्यापुढील भाग पाहूया.
६. उद्योग चळवळीला अध्यात्माची बैठक द्या !
     सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥ आपल्या उद्योग चळवळीला अध्यात्माची बैठक देणे आवश्यक आहे. अध्यात्म हा म्हातारपणी करायचा आणि आचरायचा विषय नाही. त्याची तत्त्वे उद्योगात आणि स्वत:त रुजवल्यासच चमत्कार घडतो, हे मी स्वानुभवातून सांगू शकतो.
६ अ. विहंगम गतीने उद्योगात प्रगती साधा !      साधना प्रगतीच्या तीन गती आहेत - पिपलिका (संथ, मुंगीची गती), कपी (मध्यम, माकडाची गती) आणि विहंगम गती (जलद, पक्षाची गती)

सौ. कुंडलेआजींनी पेन्सिलचे गुण सांगून नातवाला दिलेले जीवनाविषयीचे दृष्टीकोन !

सौ. कमलिनी कुंडले
१. पेन्सिलला स्वतःच्या सामर्थ्यापेक्षा
कर्ता करविता निराळा असल्याची जाणीव असणे
    पेन्सिलला हे ठाऊक असतं की, आपल्यात अत्यंत सामर्थ्य आहे. आपण वाट्टेल ते लिहू शकतो. ते वाचून मोठमोठ्या सत्ता आणि सत्ताधिशांना हादरे बसतात; पण ती हे कधीही विसरत नाही की, लिहिण्याचे सामर्थ्य तिच्यात असले, तरी ते लिहून घेणारा हात वेगळा असतो. त्या हाताच्या सामर्थ्यावरच ती सारे लिहित असते. आपल्याही जगण्याला असाच एक हात सतत मार्गदर्शन करत असतो. आपल्याला मान्य असो वा नसो तो हात आपले जीवन घडवून त्याला दिशा देतो. आपल्याला बळ देतो. त्यालाच आपण देव म्हणतो; म्हणून हे कधीही विसरू नकोस की, कर्ता करविता तो आहे. आपण केवळ पेन्सिल !

साधकांना सूचना

मनाची अशांतता, चिडचिड होणे, विनाकारण राग येणे
अशा मानसिक त्रासांवर चंद्रनाडी चालू करणे, हा उपाय करा !
    मन अशांत झाले असेल, मनाची चिडचिड होत असेल किंवा विनाकारण राग येत असेल, तर अशा मानसिक त्रासांवर स्वरोदयशास्त्रानुसार आपली चंद्रनाडी चालू करावी. त्यासाठी उजव्या कानात कापसाचा बोळा घालणे किंवा / आणि उजव्या कुशीवर झोपणे, असे उपाय करावेत. हे उपाय करतांना आपला नेहमीचा नामजपही प्रयत्नपूर्वक चालू ठेवावा. यामुळे स्वरोदयशास्त्रानुसार केलेल्या उपायाचा अधिक परिणामकारक लाभ होईल आणि मानसिक त्रासांतून लवकरात लवकर सुटका करून घेता येईल. - (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षी अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१७.२.२०१६)
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ स्वरोदयशास्त्रानुसार उपाय)

स्वरोदयशास्त्र मानसिक असंतुलनावरही परिणामकारक असणे

पू. डॉ. मुकुल गाडगीळ
    मनाची अस्वस्थता, चिडचिड होणे, विनाकारण पुष्कळ राग येणे, अशा मनाच्या अवस्थेवर उपाय विचारण्यासाठी माझ्याकडे काही साधक आले होते. तेव्हा त्यांच्यावर स्वरोदयशास्त्राचा काय परिणाम होतो, हे पाहूया, असा विचार देवाने मला दिला. मी त्यांना आता तुमची कोणती नाडी चालू आहे ?, हे विचारले. आश्‍चर्य म्हणजे सर्वांची सूर्यनाडी, म्हणजे उजव्या नाकपुडीने श्‍वास चालू होता. मी त्यांना उजव्या कानात कापसाचा बोळा घालायला सांगितले. यामुळे सूर्यनाडी बंद होऊन चंद्रनाडी, म्हणजे डाव्या नाकपुडीने श्‍वास चालू होतो, असे स्वरोदयशास्त्रात सांगितले आहे. त्या सर्व साधकांनी हा उपाय केल्यावर ५ - १० मिनिटांतच सर्वांना लाभ झाला आणि त्यांच्या मनाची चिडचिड थांबून मन शांत झाले. स्वरोदयशास्त्रानुसार केलेल्या या उपायामागचे शास्त्र असे आहे की, सूर्यनाडी चालू असल्यामुळे आपण जो श्‍वास घेतो, त्यातील प्राणामध्ये शक्ती, म्हणजे उष्णता प्रवाहित होते. यामुळे अशांत मन अधिक अशांत होते. जसे आगीत तेल ओतले की, आग अधिकच भडकते, तसे हे आहे. याउलट चंद्रनाडी ही शीतल असल्याने त्या नाडीने श्‍वास चालू झाल्यास शीतल प्राणामुळे अशांत मन
शांत होते.
- (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षी अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१७.२.२०१६)

अ‍ॅल्युमिनीयम आणि हिंडालियम यांच्या भांड्यात शिजवलेले अन्न खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन पर्यायी भांड्यांचा वापर करा !

साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
बरेच जण स्वयंपाक करण्यासाठी अ‍ॅल्युमिनीयम अथवा हिंडालियम (अ‍ॅल्युमिनियमपासून बनवलेला एक मिश्रधातू) यांपासून बनवलेली भांडी वापरतात. या भांड्यात अन्न शिजवणे शरिरासाठी अपायकारक असते. ५ वर्षे अथवा त्याहून अधिक कालावधीसाठी ही भांडी वापरली, तर त्याचा शरिरावर होणारा दुष्परिणाम दिसून येतो. या संदर्भातील महत्त्वाची सूत्रे पुढे देत आहे.
१. दोन्ही धातू शरिरासाठी अपायकारक असण्याची कारणे
१ अ. अन्नाद्वारे धातूंचा अंश शरिरात जाऊन विविध आजार बळावणे : अ‍ॅल्युमिनीयमच्या भांड्यांवर स्टीलचा साधा चमचा जरी जोरात ओढला, तरी या धातूचे कण बाहेर पडतात. या भांड्यांत बनवलेले अन्न खाल्ल्यास धातूंचा अंश जेवणातून शरिरात जातो. प्रतिदिन अन्नातून साधारणतः ५ मिलिग्रॅमएवढे अ‍ॅल्युमिनीयम सेवन केले जाते.

नवीन सदनिका विकत घेतांना तळमजला, पहिला अथवा दुसर्‍या मजल्यावरील सदनिका घेण्यास प्राधान्य द्या !

साधकांसाठी महत्त्वाची सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
काही जण नवीन सदनिका (फ्लॅटस्) विकत घेतांना इमारतीमध्ये उद्वाहन यंत्राची (लिफ्टची) सुविधा असल्यास वरच्या मजल्यावरील सदनिका बूक करतात. संभाव्य आपत्काळात विजेची उपलब्धता नसल्यास वरच्या मजल्यावरील सदनिकेत रहाणार्‍यांची असुविधा (गैरसोय) होऊ शकते. त्यामुळे सदनिका विकत घेण्यास इच्छुक साधक, तसेच वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांनी शक्यतो तळमजला, पहिला अथवा दुसर्‍या मजल्यावरील सदनिका घेण्यास प्राधान्य द्यावे.

आपत्काळामुळे भूमी, घर आदींच्या किमती न्यून झाल्यास होणारी आर्थिक हानी टाळण्यासाठी अपेक्षित अशा किमतीत संपत्ती विकली जाण्याकरता तत्परतेने प्रयत्न करा !

स्वतःची स्थावर संपत्ती विकण्यास इच्छुक साधक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी सूचना !
संभाव्य आपत्काळामुळे स्थावर संपत्तीच्या (मालमत्तेच्या) (उदा. भूमी (जमीन), बंगला, सदनिका, दुकान यांच्या) किमती दिवसेंदिवस न्यून होण्याची शक्यता आहे. स्वतःची संपत्ती विकण्यास इच्छुक असणार्‍यांंची आर्थिकदृष्ट्या हानी होऊ नये, याकरता त्यांनी भूमी, घर आदींना अपेक्षित किंमत मिळण्यासाठी सर्व प्रयत्न करावेत. तशी किंमत मिळाल्यास त्या किमतीला ती विकावी. अपेक्षित किंमत मिळण्यात अडचणी येत असतील, तर त्यासाठी पुष्कळ कालावधी थांबून न रहाता जास्तीतजास्त मिळणार्‍या किमतीत तत्परतेने विक्री करावी.

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

झोप लागत नसल्यास पुढीलपैकी एखादा नामजप झोप येईपर्यंत करा !
सध्या अनेक साधकांना रात्री पहुडल्यावर बराच वेळ झोप येत नाही किंवा मध्यरात्री वा उत्तररात्री जाग आल्यावर पुन्हा झोप लागत नाही. अशा साधकांनी झोप लागेपर्यंत एक-आड-एक पद्धतीने श्री दुर्गादेव्यै नमः । आणि श्री गुरुदेव दत्त । हे नामजप किंवा श्री हनुमते नमः । किंवा श्री दुर्गादेव्यै नमः । हा नामजप करावा. तरी झोप लागत नसल्यास नामजपाला आरंभी आणि शेवटी एक ॐ लावावा. त्यानंतरही लवकर झोप लागत नसल्यास नामजपाला आरंभी आणि शेवटी दोन ॐ लावावेत. नामजपाच्या आरंभी श्री निद्रादेवी, तसेच ज्या देवतेचा नामजप करणार, ती देवता यांना भावपूर्ण प्रार्थना केल्यामुळे वरील आध्यात्मिक उपायाची परिणामकारकता वाढते. 
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ नामजपाचे उपाय)

पूर्णवेळ साधना करण्यास इच्छुक साधकांसाठी महत्त्वाची सूचना साधनेतील अडचणींवर बुद्धीच्या निश्चजयाद्वारे मात करण्यासाठी स्वयंसूचना घ्या आणि पूर्णवेळ साधनेचे जीवनोद्धारक पाऊल शीघ्रतेने उचला !

     आध्यात्मिक स्तर ५६ टक्क्यांच्या पुढे गेल्यावर पूर्णवेळ साधक होण्याच्या संदर्भात मनात विकल्प निर्माण होत नाहीत. त्याच्या खालील स्तरावरील साधकांना निर्णय घेणे कठीण जाते. त्यांनी निर्णय घेता येण्यासाठी काय करावे, याचे मार्गदर्शन पुढे केले आहे.
१. पूर्णवेळ साधना करण्यास इच्छुक साधकांनी बुद्धीचा निश्‍चय करणे आवश्यक !
अनेक साधक स्वतःचे शिक्षण, नोकरी अथवा व्यवसाय सोडून पूर्णवेळ साधना करण्यास इच्छुक असतात आणि तशी इच्छाही उत्तरदायी साधकांकडे व्यक्त करतात. आंतरिक इच्छा असतांनाही कौटुंबिक अडचणी, तसेच मनाच्या स्तरावरील अडथळे यांमुळे ते पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय लवकर घेऊ शकत नाहीत. अशा साधकांनी बुद्धीचा निश्‍चय केल्यास ईश्‍वरकृपेने त्या अडचणी सहज दूर होतील, यात तीळमात्रही शंका नाही !

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
अढळपद
अशा ठिकाणी बसा की, तुम्हाला जिथून कोणी 'ऊठ' म्हणून सांगणार नाही. असे बोला की, 'हे खोटे आहे' असे कोणी बोलणार नाही.
भावार्थ : ब्रह्मस्थितीला पोहोचल्यावर 'ऊठ' असे म्हणायला दुसरा कोणी उरतच नाही आणि ती सर्वव्यापी अवस्था असल्याने तिथून उठायचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. 'हे खोटे आहे' असे कोणी बोलणार नाही, असा बोलण्याचा विषय म्हणजे ब्रह्माची किंवा परमेश्‍वराची अनुभूती. मायाच खोटी असल्याने मायेतील सत्य बोलणेही खोटेच असते.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण'.)

'भारत भ्रमंती'सारख्या पर्यटन फेर्‍या काढून प्रबोधन होईल', या भ्रमात रहाणारे आणि स्वत:सह इतरांचाही वेळ घालवणारे भ्रमंतीवीर !

परात्पर गुरु डॉ. आठवले
'सध्या काही जण विश्‍वशांतीसाठी सायकलवरून भारत भ्रमंती, सामाजिक एकोप्यासाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत दुचाकीवरून भ्रमंती, असे उपक्रम राबवत असतात. अशा भ्रमंत्यांमधून सामाजिक एकोपा, विश्‍वशांती, सद्भावना जागरण, राष्ट्रजागरण, असे काहीही होत नाही. त्यामुळे अशा भ्रमंत्यांमधून काहीही साध्य होत नाही, तरीही काही भ्रमंतीवीर अशा भ्रमंत्यांचे कार्यक्रम अजूनही आयोजित करतात. त्यांची भ्रमंती एखाद्या शहरात पोहोचल्यावर राजकारण्यांना सांगून स्वत:चे सत्कार करून घेतात. अशा उपक्रमांना प्रसारमाध्यमेही चवीने प्रसिद्धी देत असल्यामुळे अशा भ्रमंतीविरांचा राजकारणी, प्रसिद्धीलोलुप समाजकारणी उदोउदो करतात. थोडक्यात कोणतीही फलनिष्पत्ती नसलेल्या अशा अनेक उपक्रमांमध्ये भारताचे अमूल्य मनुष्यबळ नाहक खर्च होत आहे. याची खंत समाजातील कोणत्याच घटकाला वाटत नाही, हे आश्‍चर्यच आहे.
- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

बोधचित्र


राष्ट्राची सहस्रो वर्षांची भौतिक आणि आध्यात्मिक समृद्धी स्वातंत्र्यानंतर नष्ट करून राष्ट्राला सर्व क्षेत्रांत भुकेकंगाल करणारी राज्यपद्धती नको, तर सत्त्वप्रधान हिंदु राष्ट्र हवे ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

(परात्पर गुरु) डॉ. आठवले
१. भौतिक सद्यस्थिती
   एखाद्या उधळ्या व्यक्तीने आपली पूर्वजांची सर्व संपत्ती उधळून टाकून आपल्या मुलांना आणि नातवंडांना भिकारी करावे, तशीच स्थिती स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सर्वपक्षीय शासनांनी भारताची केली आहे, उदा. शेकडो वर्षांची गोवंश-समृद्धी तात्कालिक लाभासाठी सर्वत्र कत्तलखाने उभारून, गोहत्या करून गोवंश नष्ट करत आणला आहे. पुढे दूधही विदेशातून आयात करावे लागेल ! पिढ्यान्पिढ्या वाढवलेल्या वृक्षांची तोड करून भारताचे पर्यावरण इतके बिघडवले आहे की, आता अवर्षणाचे प्रमाण वाढत चालले आहे. एके काळी पृथ्वीवरील अनेक देशांतून शिक्षणासाठी विद्यार्थी येणारा देश म्हणून भारताची ओळख होती. भारत जगद्गुरु होता. आता भारतातील विद्यार्थी शिक्षणासाठी विदेशांत जातात !

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

खरा आनंद 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
     आनंद हा कोणताही प्रसंग, वस्तू अथवा व्यक्ती यांच्याशी निगडित नसावा. ज्या गोष्टीमुळे दुःख होते वा होईल, असा कोणताही आनंद नसावा. आपला आनंद आपल्यात मिळावा, हा विचार प्रत्येकाने सांभाळून ठेवावा, म्हणजे कोणत्याही अवस्थेत शांती ढळणार नाही. तुझे आहे तुजपाशी या संतवाणीप्रमाणे ज्याचा त्याने शोध घेत जावा. मनाची स्थिती केवळ स्वतःशीच निगडित असावी. अन्य कुठेही संपर्क नसावा. हे प्रगत होऊ पहाणार्‍या साधकांना परत परत सांगू इच्छितो.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

दोषी कोण ?

     वर्ष २००१ च्या डिसेंबर मासात संसदेवर आतंकवादी आक्रमण झाले. या आक्रमणाचा सूत्रधार महंमद अफझल याला ९ फेब्रुवारी २०१३ या दिवशी फाशी देण्यात आले. हेच निमित्त साधून ९ फेब्रुवारी २०१६ या दिवशी देहलीतील जवाहरलाल नेहरू (जेएन्यू) विद्यापिठात विद्यार्थ्यांनी कार्यक्रम केला. या कार्यक्रमात अफझलच्या प्रती आदर आणि देशाप्रती अनादर व्यक्त करणार्‍या घोषणा देण्यात आल्या. हे प्रकरण सध्या केंद्रशासनाच्या विचाराधीन असून काही विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, असा जनतेचा कयास आहे. महंमद अफझल याला फाशीची शिक्षा ठोठवणारे देहली उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती एस्.एन्. ढिंगरा यांनी त्यांचा संताप व्यक्त करतांना एका वृत्तवाहिनीला सांगितले की, आज अफझलचे समर्थन करणार्‍यांपैकी ४०-५० जण तेव्हाच्या आक्रमणात मारले गेले असते, तर आजचे चित्र वेगळे दिसले असते. अफझल हा भयानक आतंकवादी होता.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn