Blogger Widgets


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।

विनम्र अभिवादन !


चंद्रशेखर आझाद बलीदानदिन
------
आज मराठी राजभाषादिन

(म्हणे) स्मृती इराणी यांनी दुर्गादेवीचा अवमान केला !

  • जेएन्यूमध्ये महिषासुरदिन साजरा करणार्‍यांना विरोध न करणारी काँग्रेस आणि माकप यांसारख्या हिंदुद्वेषी पक्षांचा कांगावा !
  • महिषासुरावरून संसदेत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी घातला गोंधळ !
     नवी देहली - जेएन्यूप्रकरणी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी दोन दिवसांपूर्वी लोकसभेत आणि राज्यसभेत उत्तर दिले होते. यात त्यांनी वर्ष २०१३ मध्ये जेएन्यूमध्ये दुर्गाष्टमीच्या वेळी महिषासुरदिन साजरा करण्यात आल्याची माहिती देतांना तेथे वितरित करण्यात आलेले पत्रक वाचून दाखवले होते. या पत्रकात देवीच्या संदर्भात अवमानकारक मजकूर होता. यावरून २५ फेब्रुवारीला काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी इराणी यांच्यावर दुर्गादेवीचा अनादर करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांनी क्षमा मागण्याची मागणी केली. (वर्ष २०१३ मध्ये केंद्रात काँग्रेसचे राज्य होते. तेव्हा महिषासुरदिनाला हिंदुत्ववाद्यांनी विरोध केला होता. तेव्हाच हे पत्रक प्रकाशित करण्यात आले होते; मात्र काँग्रेसने तेव्हा काहीच केले नाही आणि आता काँग्रेस अन् माकप दुर्गादेवीचा अनादर होत असल्याचा कांगावा करत आहेत. म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची नग्न आणि अश्‍लील चित्रे काढली, तेव्हाही काँग्रेसने काही केले नव्हते. - संपादक) तसेच यासाठी लोकसभेत आणि राज्यसभेत गोंधळ घातला. २६ फेब्रुवारीलाही याच विषयावरील गोंधळामुळे लोकसभा आणि राज्यसभा दोन वेळा स्थगित करण्यात आली.

इशरतचे आतंकवाद्यांशी असलेले संबंध उघड होऊ नयेत, असे काही जणांना वाटत होते ! तत्कालीन केंद्रीय गृहसचिव जी.के. पिल्लाई

  • हे पदावर असतांनाच का उघड केले नाही ?
  • इशरतला शहीद ठरवून तिचे उदात्तीकरण करणार्‍यांना राष्ट्रद्रोही ठरवून त्यांच्यावर कठोर कारवाई करा !
    नवी देहली - जिहादी आतंकवादी इशरत जहाँ हिचे लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेशी असलेले संबंध उघड होऊ नयेत, असे काही जणांना वाटत होते, असा खळबळजनक खुलासा तत्कालीन केंद्रीय गृहसचिव जी.के. पिल्लाई यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. लष्कर-ए-तोयबाकडून पाठवण्यात आलेल्या शूटर्सविषयी माहिती मिळवणे, हे आपल्या गुप्तचर यंत्रणांचे मोठे यश होते, असेही पिल्लाई यांनी सांगितले. यापूर्वी गुप्तचर संस्थेचे माजी विशेष संचालक राजेंद्र कुमार यांनीही तत्कालीन शासनाच्या काळात इशरतविषयी माहिती लपवली गेली होती, असे म्हटले होते.

टी.आर्.पी.साठी संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती केली जात आहे ! - ब्राह्मण एकता सेवा संघाचे अखिलेश तिवारी

आझाद मैदान येथील आंदोलनाला उपस्थित धर्माभिमानी हिंदू
हिंदुद्वेषी मुंबई मिररच्या निषेधार्थ मुंबईतील
आझाद मैदानात हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन !

४०० हून अधिक धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती !
    मुंबई - झोपलेल्या हिंदु समाजाला जागे करण्याचे कार्य सनातन संस्था करत आहे. प.पू. डॉ. आठवले हे जीवन कसे जगावे ?, धर्माचरण कसे करावे ?, हे शिकवतात. अशा गुरूंचा हे पत्रकार अवमान करतात. टी.आर्.पी.साठी भारतातील संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती केली जात आहे, असे परखड विचार ब्राह्मण एकता सेवा संघाचे श्री. अखिलेश तिवारी यांनी व्यक्त केले. हिंदुद्वेषी मुंबई मिरर या दैनिकाच्या २५ फेब्रुवारीच्या मुखपृष्ठावर सुपारीबाज पत्रकार अलका धूपकर आणि धर्मेन्द्र तिवारी यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्परगुरु डॉ. आठवले यांचा अवमान करणारे खोटे वृत्त प्रकाशित करण्यात आले. या वैचारिक आतंकवादाच्या विरोधात विविध हिंदुत्ववादी संघटनांनी २६ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ३.३० वाजता आझाद मैदान येथे आंदोलन केले. त्या वेळी ते बोलत होते.
    मुंबई - अनधिकृत फलक लावल्याच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्र्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नेते छगन भुजबळ, सचिन अहिर, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, सपाचे नेते मुलायमसिंह यादव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह एकूण ४७ जणांना प्रत्येकी २५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास त्यांच्याविरूद्ध न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस जारी केली जाईल.

संजय दत्त स्वातंत्र्यलढ्याची शिक्षा भोगून आलेला नाही ! - शासकीय अधिवक्ता उज्ज्वल निकम

प्रसिद्धीमाध्यमे हे लक्षात घेतील का ?
    पंढरपूर - संजय दत्त कोणत्याही स्वातंत्र्यलढ्याची शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आलेला नाही. त्यामुळे स्वत:चे उदात्तीकरण करून तो स्वातंत्र्यसैनिक होऊ शकत नाही. त्याच्या घरी शस्त्रास्त्रे असल्याची माहिती त्याने वेळीच दिली असती, तर मुंबईत बॉम्बस्फोटच झाले नसते. या प्रकरणी त्याच्यावर टाडाखाली खटला चालला नाही याविषयी मला काहीही म्हणायचे नाही; पण असे वक्तव्य करण्यापूर्वी आपण खरंच निष्पाप होतो का, हे पहायला हवे, असे प्रतिपादन विशेष सरकारी अधिवक्ते उज्ज्वल निकम यांनी केले आहे. पंढरपूर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. स्वातंत्र्याचा मार्ग सोपा नव्हता, अशी प्रतिक्रिया अभिनेते संजय दत्त यांनी कारागृहातून बाहेर आल्यावर दिली होती, तसेच माध्यमांनी मला आतंकवादी ठरवू नये, अशी विनंती केली होती.

अफझलचे समर्थन करणारेच त्याच्या आक्रमणात मारले गेले असते ! - तत्कालीन न्यायाधीश एस्.एन्. ढिंगरा

आतंकवादी अफझलच्या समर्थकांना चपराक !
    नवी देहली, २६ फेब्रुवारी - महंमद अफझलला फाशीची शिक्षा सुनावणारे देहली उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश एस्.एन्. ढिंगरा यांनी अफझलचे समर्थन करणार्‍यांना फटकारले आहे. अफझलचे समर्थन करणारे राजकारणीदेखील त्याच्या आक्रमणात मारले गेले असते हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे विधान त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. ते पुढे म्हणाले, जे राजकारणी अफझलचे समर्थन करत आहेत. त्यांच्यापैकी आणखी ४०-५० जण आक्रमणात मारले गेले असते, तर आज चित्र वेगळे असते. समाजघातकी घटकांना ठार करण्याचा अधिकार आपल्याला न्यायव्यवस्थेने दिला आहे. महंमद अफझलची हत्या जर न्यायालयीन असेल, तर मग कारावासाची शिक्षा सुनावण्यात आल्यावर तुम्ही न्यायालयाने जीवनाचा केलेला विनाश म्हणणार का ?

राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करा ! - बरेली न्यायालयाचा आदेश

जेएन्यूतील राष्ट्रद्रोही वक्तव्यांचे प्रकरण
    बरेली (उत्तरप्रदेश) - राष्ट्रविरोधी घोषणाबाजी करणार्‍या जेएन्यूच्या विद्यार्थ्यांचे समर्थन करणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि माकपचे सचिव डी. राजा यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्याचा आदेश जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांनी पोलिसांना दिला आहे. बरेलीतील प्रेमचंद्र पाल यांनी राष्ट्राच्या भावना दुखावल्याचे कारण देत प्रविष्ट केलेल्या याचिकेची सुनावणी करतांना न्यायालयाने हा आदेश दिला. (राष्ट्रद्रोह्यांचे समर्थन करणार्‍यांच्या विरोधात कृतीशील झालेले प्रेमचंद्र पाल यांचे अभिनंदन ! असे राष्ट्राभिमानी नागरिकच भारताची खरी शक्ती होय ! - संपादक) पुढील सुनावणी २ मार्चला असणार आहे. प्रेमचंद्र पाल यांनी गांधी आणि राजा यांच्यावर पोलिसांत गुन्हा प्रविष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु शक्तिशाली राजकारण्यांच्या भीतीने पोलिसांनी अपराध प्रविष्ट केला नव्हता. (राजकारण्यांना घाबरणारे पोलीस जनतेला कधीतरी शांत आणि सुरक्षित जीवन जगण्याची हमी देऊ शकतील का ? - संपादक)

भारतीय सैन्याने वाचवलेल्या १६० जणांत जिहादी आतंकवादी सल्लाहुद्दीनचा मुलगा !

पम्पोर आतंकवादी आक्रमणाचे प्रकरण
     श्रीनगर - पम्पोर येथे झालेल्या जिहादी आक्रमणाच्या वेळी येथील उद्योजक विद्यापिठाच्या इमारतीतून १६० हून अधिक नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले होते. युनायटेड जिहाद काऊन्सिल या आतंकवादी संघटनेचा अध्यक्ष सय्यद सल्लाहुद्दीनचा मुलगा सय्यद मुईद युसुफ हा त्यांच्यापैकी एक होता. 
१. याच सल्लाहुद्दीनने आक्रमणात मेलेल्या आतंकवाद्यांना श्रद्धांजली वाहिली आणि भविष्यात अशाच प्रकारच्या आतंकवादी आक्रमणाची धमकीही दिली आहे. 
२. पम्पोर येथे झालेल्या जिहादी आक्रमणाच्या वेळी येथील उद्योजक विद्यापिठाच्या इमारतीत जिहादी घुसले होते. त्या वेळी भारतीय सैनिकांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता इमारतीत असलेल्या सर्व नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले होते.
३. काश्मीरचे पोलीस संचालक एस्जेएम् गिलानी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची आयकर खात्याकडून चौकशी होणार

     जोधपूर (राजस्थान) - न्यायालयाने पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या संपत्तीच्या संदर्भात आयकर विभागाला चौकशी करण्याची अनुमती दिली आहे. यामुळे या विभागाकडून बापूजी यांची चौकशी करण्यात येणार आहे. येथील मध्यवर्ती कारागृहात बंद असणार्‍या बापूजींना खटल्याच्या सुनावणीनिमित्त न्यायालयात नेण्यात आले होते. त्या वेळी पत्रकारांनी त्यांच्याकडील संपत्तीविषयी प्रश्‍न विचारला. त्यावर बापूजी म्हणाले की, हो माझ्याकडे प्रचंड संपत्ती आहे, हवे तर आयकर विभागाकडून माझी तपासणी करू शकता.

(म्हणे) देशद्रोहाचा कायदाच रहित करा !

भारतविरोधी विद्यार्थ्यांचा कळवळा असणार्‍यांची देशविरोधी मागणी
      पुणे, २६ फेब्रुवारी (वार्ता.) - जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असणार्‍या विद्यार्थ्यांचा कळवळा येणार्‍या संघटनांनी देशद्रोहाचा कायदाच रहित करण्याची मागणी केली आहे. हा कायदा ब्रिटिशकालीन असून त्याचा राजकीय विरोधासाठीच वापर केला जात असल्याचे या मंडळींचे म्हणणे आहे. २४ फेब्रुवारी या दिवशी येथील श्रमिक पत्रकार भवन येथे पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज आणि जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय या संस्थांच्या वतीने शिक्षणसंस्था आणि पत्रकारांवरील दडपशाही आणि देशद्रोहासंबंधी कायद्याचा गैरवापर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कायद्याचे अध्यापक डॉ. नितीश नदसागरे, तसेच डॉ. रमेश अवस्थी यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई अन्याय्य असल्याचे सांगत वरील मागणी केली. या वेळी पत्रकार दिलीप पाडगावकर, राजकीय विश्‍लेषक प्रा. सुहास पळशीकर, स्त्रीवादी कार्यकर्त्या डॉ. मनिषा गुप्ते उपस्थित होत्या. (देशद्रोहाचा कायदा देशद्रोह्यांना शिक्षा देण्यासाठी आहे. कुठल्याही देशभक्ताला हा कायदा रहित व्हावा, असे वाटणार नाही. त्यामुळे हा कायदा रहित करण्याची मागणी करणार्‍यांची मानसिकता कशी असेल, हे निराळे सांगण्याची आवश्यकता नाही. - संपादक)

पाकिस्तानी सैन्याकडून आतंकवाद्यांचे समर्थन ! - सैन्यदलप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग

काश्मिरात वारंवार होत असलेल्या देशद्रोहाच्या घटनांवर चिंता व्यक्त !
     नवी देहली - पाकिस्तानी सैन्य लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद या जिहादी संघटनांचे समर्थन करत आहे, असे महत्त्वूपर्ण वक्तव्य भारतीय सैन्यदलप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग यांनी केले आहे. सैन्याने आयोजित केलेल्या एक कार्यक्रमाच्या वेळी जनरल यांनी हे वक्तव्य केले. यामुळे हे स्पष्ट झाले आहे की, काश्मीर घाटीतील वातावरण बिघडवण्यामागे पाकिस्तानचाच हात आहे.
१. पम्पोर येथे झालेल्या चकमकीच्या वेळी देशविरोधी घोषणाबाजी आणि सैन्यावर दगडफेक करण्यात आली होती.
२. अशा घटना आता वारंवार घडू लागल्याने हा चिंतेचा विषय आहे. (जिहादी आतंकवादाला नष्ट करण्यासाठी केंद्रशासनाने ठोस उपाययोजना आखायला हवी ! - संपादक)

कॉ. पानसरे हत्या प्रकरणातून सनातनचे निर्दोषत्व सिद्ध होईल, याची निश्‍चिती बाळगा ! - पू. नंदकुमार जाधव, सनातन संस्था

पुसद (जिल्हा यवतमाळ) येथे हिंदु धर्मजागृती सभा 
५ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती !
दीपप्रज्वलन करतांना डावीकडून पू. जाधवकाका, 
मध्यभागी पू. (कु.) स्वाती खाडये आणि 
श्री. सुनील घनवट
     पुसद (यवतमाळ), २६ फेब्रुवारी (वार्ता.) - सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणारे इशरत जहाँ यांसारख्या आतंकवादाचे समर्थन करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसवर बंदी घालण्याची मागणी करणार का ? मडगाव बाँबस्फोट प्रकरणी सनातनच्या ६ साधकांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली त्याप्रमाणे कॉ. पानसरे हत्या प्रकरणातून सनातनचे निर्दोषत्व सिद्ध होईल, याची निश्‍चिती बाळगा, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे पू. नंदकुमार जाधव यांनी केले. पुसद येथे २५ फेब्रुवारीला झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या पू. (कु.) स्वाती खाडये आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट व्यासपिठावर उपस्थित होते. सभेला ५ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
     पू. जाधवकाकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुसद येथील वेदमूर्ती भागवताचार्य श्री. गोविंद गुरु शास्त्री आणि पुरोहित श्री. जोशी गुरुजी यांनी वेदमंत्रपठण केले. हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी समितीच्या कार्याची माहिती दिली. 

धर्मांधांनी संघाच्या शाखेत येऊन स्वयंसेवकांना धक्काबुक्की केली !

संभाजीनगर येथे रा.स्व. संघाची शाखा भरवण्यास धर्मांधाचा विरोध
     संभाजीनगर - येथील शिवाजीनगर परिसरात संघाची सायं शाखा नियमित चालू असतांना काही धर्मांध नागरिक आणि महिला यांनी तेथे आवाजामुळे त्रास होतो, असे कारण सांगून शाखा भरवण्यास विनाकारण विरोध केला. काही दिवसांपूर्वी धर्मांध मुसलमान गुंडांनी या शाखेत घुसून स्वयंसेवक आणि प्रसारक यांना धक्काबुक्की केली. 
    या घटनेनंतर या मैदानावर शहरातील स्वयंसेवकांचे मोठ्या संख्येने एकत्रीकरण करण्यात आले होते. त्यामुळे असुरक्षिततेची भावना निर्माण होऊन काही राजकीय नेत्यांनी संघाच्या शाखेला आडून विरोध चालू केला. पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला.
     संघाचे देवगिरी प्रांत सहकार्यवाह हरीश कुलकर्णी या प्रकरणाविषयी म्हणाले की, देशभर सहस्रो संघशाखा चालतात; मात्र संघशाखेचे अस्तित्व समाजाला आश्‍वासकच आहे. मनात दुसराच हेतू ठवून संघशाखेला विरोध निर्माण करणार्‍यांचा अपसमज दूर करू. (ज्यांचा अपसमज झाला असेल, त्यांचा तो दूर करता येतो. धर्मांध जाणीवपूर्वक आक्रमण करत असतांना त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल, हे संघ कधी लक्षात घेईल ? - संपादक)

पाकिस्तानातील २५४ मदरसे बंद !

केंद्रातील मोदी शासन नवाज शरीफ शासनाप्रमाणे कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का ?
चिथावणीखोर भाषणे देणार्‍या मशिदींवरील कारवाईत १० सहस्र जणांना अटक, 
तर २ सहस्र ६६४ ध्वनीक्षेपक जप्त
     इस्लामाबाद - आतंकवाद्यांच्या विरोधातील कारवाईच्या अंतर्गत पाकिस्तानी अधिकार्‍यांनी देशभरातील संशयित आणि नोंदणी न झालेले असे २५४ मदरसे बंद केले आहेत. मशिदींवरील ध्वनीक्षेपकाद्वारे भडकवणारी भाषणे देण्याच्या प्रकरणी ९ सहस्र ९४५ गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणी १० सहस्र १७७ जणांना अटक करण्यात आली आहे. यात २ सहस्र ६६४ ध्वनीक्षेपक जप्त करण्यात आले आहेत. ही माहिती राज्यमंत्री बलिगुर रहमान यांनी संसदेत दिली.

जम्मू-काश्मीरच्या आतंकवाद्याला मिळत होते हवालाद्वारे पैसे !

अनेक वर्षांपासून आतंकवाद संपवू न शकलेला भारत शत्रूने आक्रमण केल्यावर कसा लढणार ?
     नवी देहली - जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद्यांना हवालाद्वारे पैसे पुरवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. बठिंडी येथून ३ मासांपूर्वी लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी शब्बीर मलिक याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून हवालातून मिळालेले ४२ सहस्र २६३ रुपये जप्त केले. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला कोणकोण पैसे पुरवत होते, याचे अन्वेषण करण्यात येत आहे. तो जम्मू येथे आतंकवादी आक्रमण करण्याच्या उद्देशाने रेकीसाठी आला होता. शहरातील मंदिरे आणि सैन्याचे शिबिरांना लक्ष्य करण्याचे त्याचे षड्यंत्र होते.

पुण्यातील हनुमान टेकडीवर एका महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार करून लुटले

महिलांसाठी असुरक्षित बनलेले पुणे ! विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून प्रसिद्ध 
असलेल्या पुणे शहरात अशी घटना होणे, हे लज्जास्पद आहे. 
     पिंपरी, २६ फेब्रुवारी - येथील सिम्बॉयसिस महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या हनुमान टेकडीवर एका महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार करून लुटण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना २४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी घडली असून चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विजय विकास कांबळे याला अटक केली आहे. 
    एक महाविद्यालयीन तरुणी हनुमान टेकडीवर एका झाडाखाली पुस्तक वाचत बसली होती. त्या वेळी एका अज्ञात व्यक्तीने तिला पकडून ठेवत पैशांची मागणी करत तिच्यावर बळजोरी केली. त्यानंतर त्याने तिच्याजवळील पैसे काढून घेतले. २५ फेब्रुवारी या दिवशी रात्री उशिरा त्या तरुणीने तक्रार दिली आहे. पीडित तरुणी ही मूळची पश्‍चिम बंगाल येथील आहे.

वाखरी, ता. पंढरपूर येथे हिंदु धर्मजागृती सभा

सभेला उपस्थित धर्माभिमानी
    पंढरपूर (जिल्हा सोलापूर), २६ फेब्रुवारी (वार्ता.) - येथे २ मार्च या दिवशी होणार असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी २५ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजता वाखरी येथे लहान स्वरूपातील धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी २ मार्चच्या धर्मसभेला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार असल्याचे सांगून तत्परतेने नियोजनही केले. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अलका व्हनमारे यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांचा सत्कार सौ. छाया आगलावे यांनी केला. 

झारखंडच्या आमदारांना मिळणार प्रवास खर्चापोटी प्रतिवर्ष ५ लाख रुपये

     रांची - झारखंडच्या आमदारांना आता प्रवास खर्चापोटी वर्षाला ५ लाख रुपये मिळणार आहेत. यामध्ये डिझेल, ट्रेन आणि विमानप्रवास यांचा खर्च अंतर्भूत आहे. झारखंडचे संसदीय व्यवहार मंत्री सरयु रॉय यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. आमदारांच्या प्रवास खर्चात ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मार्क्सवादी समन्वय समितीचे आमदार अरूप चटर्जी यांनी आमदारांच्या प्रवास खर्चात वाढ करण्याची मागणी केली होती.

इसिसची फेसबूक आणि ट्विटर यांच्या संस्थापकांना धमकी

     नवी देहली - आतंकवादी संघटना इसिसने सामाजिक संकेतस्थळ फेसबूकचे मुख्याधिकारी मार्क जुकरबर्ग आणि ट्विटरचे मुख्याधिकारी जॅक दोर्से यांना धमकी दिली आहे, तसेच इसिसने सार्वजनिक केलेल्या २५ मिनिटांच्या एका ध्वनीचित्रफितीत या दोघांची छायाचित्रेही वारंवार दाखवली आहेत. अलीकडे या संकेतस्थळांनी त्यांच्या बळाचा वापर आतंकवादाला विरोध करण्यासाठी वापरणे चालू केल्यामुळे त्यांच्या विरोधात इसिसने ही ध्वनीचित्रफीत सार्वजनिक केली आहे. या चित्रफितीत म्हटले आहे, जुकरबर्ग, दोर्से आणि त्यांची शासने प्रतिदिन आमची खाती बंद केल्याच्या घोषणा करतात. तुम्ही एवढेच करू शकता. तुम्ही एक बंद कराल, तर आम्ही १० नवीन खाती सिद्ध करू आणि तुमचे नाव संपवून टाकू इसिसने अनुमाने १० सहस्र फेसबूक खाते, १५० ग्रुप आणि ५ सहस्र ट्विटर खाती हॅक केली आहेत.

पोलिसांच्या कारवाईमुळे उज्जैनमध्ये ५५ गायींना वाचवण्यात यश !

     उज्जैन (मध्यप्रदेश) - पशूवधगृहात नेण्यात येणार्‍या गोतस्करांच्या दोन ट्रकांचा पोलिसांनी पाठलाग केला आणि त्यांना अडवले. पोलिसांनी या ट्रकमधून ५५ गायींची सुटका केल्याची घटना उज्जैनच्या उन्हेल येथे घडली.

देशासाठी मुलीलाही सैन्यात पाठवणार ! - हुतात्मा हुनमंतप्पा यांच्या पत्नी महादेवी यांचा निर्धार

कुठे देशासाठी पतीने हौताम्य पत्करल्यानंतरही मुलीला देशासाठी सैन्यात पाठवण्याचा निर्धार 
व्यक्त करणार्‍या महादेवी, तर कुठे देशद्रोह्यांचे समर्थन करणारे राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, 
साम्यवादी सीताराम येच्युरी यांच्यासारखे समाजद्रोही नेते !
    नागपूर - माझे पती हनुमंतप्पा हुतात्मा झाले असले, तरी मी माझ्या मुलीला मुलाप्रमाणे वाढवीन, शिकवीन आणि तिला देखील मी भारतमातेच्या सेवेसाठी सैन्यात पाठवीन, असे उद्गार देशासाठी प्राणत्याग करणारे लान्सनायक हनुमंतप्पा यांची पत्नी महादेवी यांनी काढले आहेत. येथे हनुमंतप्पा यांच्या परिवाराचा युवा जागरण समितीच्या वतीने मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. सियाचिनमध्ये बर्फाच्या खाली अडकून सैन्याचे मद्रास रेजिमेंटचे १० सैनिक हुतात्मा झाले होते. त्यांच्यापैकीच एक असलेले हनुमंतप्पा ६ दिवसांनीही २५ फुट बर्फाच्या खाली जीवित राहिल्याचे लक्षात आले. आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) त्यांना वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले; परंतु त्यांना वाचवता आले नाही. काही विद्यापिठांमध्ये देशविरोधी घोषणा देण्यात येत आहेत, ते ऐकून संताप येतो, अशी तीव्र प्रतिक्रियाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. महादेवी यांची मुलगी नेत्रा ही अवघी १ वर्षांची आहे. या कार्यक्रमात नेत्रा हिच्यासाठी एक लाख रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला.

राष्ट्रीय जनता दलाचे आमदार राजवल्लभ यादव यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास विद्यार्थिनीला भाग पाडले !

वासनांध आमदार देणारी निरर्थक लोकशाही आता पुरे ! अशा लोकप्रतिनिधींवर 
तात्काळ खटला चालवून कठोरातील कठोर शिक्षा द्या !
महिलेसह ४ जणांना अटक, आमदार यादवांनाही होणार अटक !
     बिहारशरीफ (बिहार) - सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे आमदार राजवल्लभ यादव यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास एका शाळकरी मुलीला भाग पाडणार्‍या सुलेखादेवी या महिलेसह तिची आई राधादेवी, मुलगी छोटी कुमारी, लहान बहीण तुलसीदेवी आणि मोतीराम नामक व्यक्तीला अटक केली आहे. ६ फेब्रुवारी या दिवशी सुलेखादेवी तिच्या शेजारी रहाणार्‍या या मुलीला वाढदिवसाच्या मेजवानीच्या आमिषाने बाहेर घेऊन गेली आणि तिने त्या मुलीला राजवल्लभ यादव यांच्याकडे नेले होते. या मुलीने धैर्य दाखवत घडल्या प्रकाराविषयी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. आता राजवल्लभ यादव यांनाही अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. राजद पक्षाने वल्लभ यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनीही आरोपी आमदार पळून पळून किती लांब जातील, त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे म्हटले आहे.

फर्ग्युसन महाविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांची खोली सर्वांसाठी खुली !

     पुणे, २६ फेब्रुवारी (वार्ता.) - स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहात वास्तव्य होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे वास्तव्य असलेली येथील वसतिगृहातील १७ क्रमांकाची खोली २६ फेब्रुवारी या दिवशी सर्वांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली होती. त्या निमित्ताने अनेक सावरकरप्रेमींनी या खोलीला भेट देऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूर्तीला अभिवादन केले. या वेळी अनेकांनी सावरकर यांना अपेक्षित अखंड हिंदुस्थान लवकर निर्माण व्हावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

स्वा. सावकरांना मारुति चौक येथे विनम्र अभिवादन !

     सांगली, २६ फेब्रुवारी (वार्ता.) - मारुति चौक येथे विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने स्वा. सावरकर यांना त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले. या वेळी उद्योजक श्री. अरुण दांडेकर, सर्वश्री शंकरराव काळे, अनिल पोंक्षे, सदाभाऊ माळी, फडके स्नेह मंडळाचे श्री. शरद फडके, क्रांतीवीर बाबाराव सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे श्री. सुहास जोशी, ह.भ.प. रमाकांत बोंगाळे महाराज, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय रेठरेकर यांच्यासह अनेक स्वा. सावरकरप्रेमी उपस्थित होते.मेलमरुवतूर स्वयंभू आदिशक्ती आध्यात्मिक ज्योतीचे सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात स्वागत

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी भक्तांची प्रार्थना !
ज्योतीचे औक्षण करून हार घालतांना मध्यभागी
सौ. स्मिता नाणोसकर अन् आदिशक्तीचे भक्त
    पनवेल - तमिळनाडू राज्यातील मेलमरुवतूर येथील आदिपराशक्ती या स्वयंभू देवीच्या मंदिराच्या वतीने मेलमरुवतूर आदिशक्ती आध्यात्मिक चळवळीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात आलेली या देवीची आध्यात्मिक ज्योत २५ फेब्रुवारीला देवद येथील सनातनच्या आश्रमात आणण्यात आली. या वेळी ही ज्योत घेऊन आलेल्या भक्तांनी हिंदु राष्ट्राची लवकरात लवकर स्थापना होऊ दे. अध्यात्मप्रसारातील सर्व अडथळे दूर होऊ दे, असा संकल्प करून प्रार्थना केली. 
    सनातनच्या साधिका सौ. स्मिता नाणोसकर यांनी ज्योतीचे औक्षण करून सन्मानपूर्वक तिला आश्रमातील प्रवेशद्वारापासून ध्यानमंदिरापर्यंत आणले. त्यानंतर ज्योतीसमवेत आलेल्या भक्तांनी मंत्रोच्चारण करून तिला ध्यानमंदिरात स्थानापन्न केले. आश्रमातील साधकांनी ज्योतीला तेल अर्पण करून तिचे दर्शन घेतले.

मुंबई मिररच्या विरोधात हिंदु धर्माभिमान्याने लिहिले निषेधपत्र

    मुंबई, २६ फेब्रुवारी - २५ फेब्रुवारी या दिवशी बेनेट कोलमन आस्थापनाच्या मालकीच्या मुंबई मिररने प्रकाशित केलेल्या अंकामधून सनातनचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर धादांत खोटे आरोप लावले गेले. एका धर्माभिमानी हिंदूने याविषयी बेनेट कोलमन आस्थापनाच्या अध्यक्षा श्रीमती इंदुमती जैन आणि मुंबई मिररचे संपादक यांना निषेधपत्र लिहिले आहे.
पत्रात मांडण्यात आलेली निवडक सूत्रे
१. मी तुमच्या मुंबई मिरर या नियतकालिकाचा वाचक असून मला त्यातील बातम्या आणि संपादकीय यांच्याविषयी आदर आहे; मात्र मुंबई मिरर या दैनिकाच्या २५ फेब्रुवारी २०१६ च्या अंकात तुमच्या वार्ताहरांनी पहिल्या पानावर सनातन संस्थेविषयी प्रकाशित केलेल्या बातमीमुळे मला धक्काच बसला.

मेरठ येथे हिंदु धर्माच्या विरोधात घोषणाबाजी

  • हिंदु धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणा देण्याचे धाडसच कोणी करणार नाही, असे संघटन हिंदूंनी उभारणे आवश्यक !
  • हिंदुत्ववादी संघटना संतप्त
     लक्ष्मणपुरी - जाट आरक्षणाच्या विरोधात आंदोलन करतांना मेरठच्या सरधना येथे हिंदु धर्माच्या विरोधात घोषणा देण्यात आल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. या घटनेमुळे हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाल्या आहेत. या प्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घोषणाबाजीच्या घटनेनंतर विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार संगीत सोम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी ब्रीजेशकुमार सिंंह यांना घेराव घातला आणि आरोपींना अटक करण्याची मागणी केली. समाजवादी पक्षाचे नेते मुमताज अली यांनीही पोलिसांना निवेदन देऊन आरोपींच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

मणिपूरमधील एका शाळेत डोके झाकण्यावर बंदी !

मुसलमान विद्यार्थ्यांचा आक्षेप
     इंफाळ - येथील ब्राइटर अकॅडमी या खाजगी शाळेने त्यांच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरात डोके झाकून येण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर मुसलमान विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. शाळा प्रशासनाकडून हा नवीन डे्रस कोड येत्या नवीन सत्रापासून लागू करण्यात येणार आहे. या निर्णयाला ऑल मणिपूर मुस्लिम गर्ल स्टूडंन्ट्स यूनियनच्या अध्यक्षा रुखसार चौधरी विरोध करतांना म्हणाल्या, भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून धार्मिक परंपरेनुसार डोके झाकणे अनिवार्य आहे. जोपर्यंत हा निर्णय परत घेतला जात नाही, तोपर्यंत विरोध कायम राहील.
-

वीरमरण आलेल्या हनुमंताप्पा यांच्या परिवाराचे पुण्यात अभाविपकडून स्वागत

       पुणे, २६ फेब्रुवारी (वार्ता.) - सियाचीन या जगातील सर्वात उंच आणि प्रतिकूल युद्धभूमीवर भारताच्या सीमेचे रक्षण करत असतांना झालेल्या हिमस्खलनामुळे हुतात्मा झालेल्या वीर हनुमंताप्पा यांच्या परिवारातील सदस्यांचा अभाविपच्या वतीने सत्कार करण्यात आला. हनुमंताप्पा यांचे कुटुंबिय नागपूर येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला जाण्यासाठी पुण्यात आले असतांना हा सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांची वीरमाता, वीर पत्नी आणि दीड वर्षाची चिमुकली नेत्रा उपस्थित होत्या. माझी मुलगीसुद्धा सैन्यात जाऊन देशाची सेवा करेल, अशी भावना हनुमंताप्पा यांच्या वीरपत्नीने व्यक्त केली. या वेळी व्यर्थ न हो बलिदान अशा घोषणा देण्यात आल्या.

लहान मुलांचे पॉर्न चित्रपट पहाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग होऊ शकत नाही ! - सर्वोच्च न्यायालय

प्रत्येक अनुचित गोष्टीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली 
खपवण्याचा प्रयत्न करणार्‍यांना शासन कधी रोखणार ?
     नवी देहली - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपक मिश्रा आणि एस्.के. सिंह यांनी २६ फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीत लहान मुलांच्या पॉर्न चित्रपटांच्या विरोधात केंद्र शासनाला कठोर पावले उचलण्याविषयी सुचवले आहे. न्यायालयाने म्हटले की, हे चित्रपट अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग होऊ शकत नाही. मुलांना याचा बळी बनवण्यात येऊ शकत नाही. केंद्रशासनाकडून या संदर्भात म्हटले गेले होते की, व्यक्तिगत स्वातंत्र्यामुळे शासन यांवर बंदी घालू शकत नाही. त्यावरही न्यायालयाने कठोर शब्दांत शासनाला फटकारत म्हटले की, व्यक्तीगत स्वातंत्र्य काय असते ? न्यायालयाने या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश केंद्र शासनाला दिला आहे. पुढील सुनावणी २० मार्चला होणार आहे. 

भोंग्यांच्या समर्थनासाठी अर्ज करून निर्णय लांबवण्याचा प्रयत्न ! - अधिवक्ता संजीव पुनाळेकर

     मुंबई - नवी मुंबई येथील मशिदींवरील भोग्यांच्या संदर्भातील याचिका अंतिम टप्प्यात असतांना निर्णयाच्या दिवशीच भोंग्यांच्या समर्थनासाठी इस्लामी संघटना, तसेच मुसलमान व्यक्ती अर्ज करून निर्णय लांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप याचिकाकर्त्यांचे अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर आणि अधिवक्ता श्री. दीनदयाळ धनुरे यांनी करून तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली.

महापालिका आणि धार्मिक स्थळे उडवण्याची धमकी देणार्‍या तरुणास अटक !

    सांगली, २६ फेब्रुवारी (वार्ता.)   सांगली, मिरज आणि कुपवाड शहर मुख्यालय आणि शहरातील धार्मिक स्थळे पत्राद्वारे बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्‍या सांगली शहरातील शामरावनगर येथील प्रमोद खेत्रे (वय ४४ वर्षे) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. प्रमोद यांना एका दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. खेत्रे याच्या कुटुंबियांना महापालिकेच्या कोणत्याही सुविधा मिळत नव्हत्या. त्यामुळे खेत्रे याने महापालिकेला वारंवार पत्रव्यवहार केला होता. याची नोंद घेतली जात नव्हती. त्यामुळे अखेर वैतागून खेत्रे यांनी महापालिकेला धमकीची ११ पत्रे पाठवली.

जैन उद्योग समुहाचे भवरलाल जैन यांचे निधन

    मुंबई, २६ फेब्रुवारी - जळगाव येथील प्रसिद्ध जैन इरिगेशन समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांचे २५ फेब्रुवारी या दिवशी दुपारी चार वाजून सात मिनिटांनी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचार चालू होते. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे सनातनच्या कार्याला सहकार्य लाभले होते. सनातन परिवार जैन कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

फलक प्रसिद्धीकरता

अफझलप्रेमींचे उदात्तीकरण करणार्‍या राजकीय पक्षांना चपराक !
    अफझलचे समर्थन करणारे राजकारणीदेखील त्याच्या आक्रमणात मारले गेले असते, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे विधान अफझलला फाशी सुनावणारे तत्कालीन न्यायाधीश एस्.एन्. ढिंगरा यांनी केले.

हिंदू तेजा जाग रे !

Jago !
    Mohammad Afzalka samarthan karnewale rajyakarta usike
akraman mein mare jaate. - Tatkalin Judge SN Dhingra
    Kya ab Afzalpremi samarthakoki ankh khulegi ?
जागो !
    मोहम्मद अफजल का समर्थन करनेवाले राज्यकर्ता उसी के
आक्रमण में मारे जाते । - तत्कालीन न्यायाधीश एस्.एन्. ढींगरा
    क्या अब अफजलप्रेमी समर्थकों की आँख खुलेगी ?

धर्मांधांच्या धमक्यांमुळे पीडित मुलगी आणि तिची आई यांची सुरक्षा पुरवण्याची मागणी

धर्मांधांची दडपशाही !
गोव्यात मौलवीने विनयभंग केल्याचे प्रकरण
     वास्को, २६ फेब्रुवारी (वार्ता.) - मौलवी सर्फराज अहमद यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दिलेली १३ वर्षांची मुलगी आणि तिची आई यांना तक्रार दिल्याच्या दिवसापासून सतत धर्मांध मुसलमानांकडून धमक्या येत आहेत. या धर्मांधांपासून रक्षण करण्यासाठी सुरक्षा पुरवली जावी, अशी मागणी या मायलेकीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. (इस्लाम म्हणजे शांती, अशी बतावणी करणारे आता कुठे आहेत ? पीडितेला तक्रार मागे घेण्यासाठी धमकावणे, ही शांती आहे का ? - संपादक)

देशाचा अपमान करणार्‍यांची गय केली जाणार नाही ! - किरण कांदोळकर, आमदार, भाजप

जेएन्यूतील देशद्रोहाचा निषेध करण्यासाठी गोव्यात भाजपची निषेध फेरी
     म्हापसा - देशाला स्वातंत्र्य फुकट मिळालेले नाही. अनेकांनी प्राणार्पण केल्याने, तसेच त्यांच्या श्रमातून आम्हाला स्वातंत्र्य मिळाले आहे. हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी देशप्रेमी नागरिकांनी एकसंध रहावे. जेएन्यूत घडलेल्या प्रसंगाचा सर्वांनी निषेध करायला पाहिजे. राहुल गांधी देशद्रोही कृत्याचे समर्थन करत आहेत. देश आणि तिरंगा यांचा अपमान करणार्‍यांची गय केली जाणार नाही, अशी चेतावणी भाजपचे आमदार किरण कांदोळकर यांनी दिली. नवी देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी घातलेल्या देशद्रोही धिंगाण्याचा निषेध करण्यासाठी भाजपच्या म्हापसा गटाच्या वतीने शहरातून दुचाकी वाहनांची फेरी काढण्यात आली. या फेरीची सांगता टॅक्सी स्थानकावर झाली. या निषेधसभेत आमदार कांदोळकर यांनी ही चेतावणी दिली. या वेळी म्हापसा पालिकेचे नगराध्यक्ष संदीप फळारी आदींची उपस्थिती होती.

बाबाराव सावरकर यांच्या ख्रिस्त परिचय या पुस्तकावर बंदी घालण्याची युनायटेड ख्रिश्‍चन कौन्सिलची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे आता मूग गिळून गप्प का ?
     मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर यांनी येशू ख्रिस्तावर लिहलेल्या वादग्रस्त पुस्तकावर आणि त्याच्या प्रकाशनावर बंदी घालावी, यासाठी युनायटेड ख्रिश्‍चन कौन्सिल या ख्रिस्ती संस्थेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
     या संस्थेच्या मते बाबाराव सावरकर लिखित ख्रिस्त परिचय या पुस्तकात येशू ख्रिस्ताच्या संदर्भात अनेक आक्षेपार्ह बाबींचा समावेश करण्यात आला आहे. सारवरकर यांच्यानुसार येशू ख्रिस्त जर तामिळी ब्राह्मण होते, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाशी संबंधित हिंदुत्ववादी संघटनांचा ख्रिस्ती धर्मियांना विरोध का आहे ? या पुस्तक प्रकाशनामुळे तमाम ख्रिस्ती समाजाच्या भावना दुखावल्या जाणार आहेत. त्यामुळे या प्रकाशनाला अनुमती नाकारण्यात यावी आणि सदर पुस्तकावर कायमची बंदी घालावी.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्या !

मराठीप्रेमी नागरिकाने पंतप्रधानांना लिहिलेले पत्र
प्रति,
पंतप्रधान, 
       ७ वी अभिजात भाषा म्हणून मराठी भाषेची खालील सूत्रांच्या आधारे थोडक्यात ओळख करून देत आहे.
१. इतिहास 
     मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. इ.स. १२०० पूर्वपासून ही भाषा अस्तित्वात असल्याचे पुरावे तत्कालीन ताम्रपट आणि शिलालेख यांमध्ये उपलब्ध आहेत. विवेकसिंधू ग्रंथ याच काळात निर्माण झालेला आहे. यादवकाळापासून इंग्रजांपर्यंत मराठी भाषेने अनेक पालट अनुभवलेले आहेत. याच काळात अनेक संत, तंत, आणि पंत कवींची निर्मिती झालेली आहे, उदा. मुकुंदराज, श्री चक्रधरस्वामी, संत ज्ञानेश्‍वर, संत रामदास, होनाजी बाळा, तसेच मराठी पंडित आणि मराठी भाषेचे अभ्यासक मेजर कँडी. या आंग्ल अधिकार्‍याने मराठी भाषेला विराम, अर्धविराम, प्रश्‍न आदी चिन्हांनी बांधले. यामुळे मराठी लिखाण सुकर झाले.

गोमन्तक : मराठीची गंगोत्री !

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने...
     मंगेशी येथे वर्ष १९८२ मध्ये भरलेल्या १७ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलतांना गोमंतकाचे ज्येष्ठ साहित्यिक कै. बा.द. सातोस्कर म्हणाले होते, गोव्यात ज्या साहित्याचा फुलोरा यावा, अशी माझी इच्छा आहे, ते अल्प आहे आणि सामान्यही आहे, असे माझ्या काही मित्रांचे म्हणणे आहे; परंतु मला हे पटत नाही. पाच कोटींच्या महाराष्ट्रात लेखके आणि ग्रंथ प्रकाशक यांचे जे प्रमाण आहे, त्याहून अधिक प्रमाणात गोमंतकात लेखक आणि ग्रंथ यांची निर्मिती होते. 
     श्री. सातोस्कर पुढे म्हणतात, गुणदृष्ट्याही गोमंतकियांचे मराठी निकृष्ट नाही. साहित्याच्या प्रत्येक प्रकारात गोमंतकियांनी छाप पाडलेली आहे.
     (असे असूनही गोमंतकात मराठीला राजभाषेचा दर्जा नाही आणि येथील विद्यार्थीही इंग्रजी माध्यमांच्या शाळांत शिकतात, शासन त्या इंग्रजी शाळांना अनुदान देऊन प्रोत्साहन देते, हे गोमंतकियांना लज्जास्पद आहे ! - संपादक)

गोध्रा येथील धर्मांधांचा हिंदुविरोधी आणि राष्ट्रविरोधी इतिहास

१. गोध्रा येथे मुसलमानांचे वास्तव्य असल्यानेच वर्ष १९४७ ते २००२ 
या काळात १४ मोठ्या दंगली झाल्या असणे 
     गोध्रा आणि जातीय दंगे यांचा फार जवळचा संबंध आहे. गोध्रा येथे वर्ष १९४७, १९५२, १९५९, १९६१, १९६५, १९६७, १९७२, १९७४, १९८०, १९८३, १९८९, १९९०, १९९२ आणि २००२ इतक्या दंग्यांचा इतिहास जगजाहीर आहे. कदाचित आपणास माहीत नसेल की, १९४७ या वर्षी विभाजनाच्या वेळेस जुनागढप्रमाणे गोध्रा येथील कट्टर मुसलमानांची पाकिस्तानात सामील होण्याची इच्छा होती; पण सरदार पटेलांमुळे ते जमले नाही. पाकिस्तानात जाण्याची मनीषा बाळगणारे तर कबरीत जाऊन झोपले; पण त्यांचे वंशज आणि शुभेच्छुक अजूनही पाकिस्तानवर प्रेम करणारे आहेत.

गोध्रा हत्याकांडाची क्रूरता आणि हिंदूंचा ऐतिहासिक प्रतिशोध

२७ फेब्रुवारी या दिवशी गोध्रा हत्याकांडाला १४ वर्षे झाल्याच्या निमित्ताने...
     कर्णावती (अहमदाबाद), २७ फेब्रुवारी २००२, बुधवार ! राज्यभर जनजीवन सामान्य होते ! दैनंदिन व्यवसायात व्यस्त लोकांना अचानक समजते की, साबरमती एक्स्प्रेसवर आक्रमण झाले असून त्यात अनेक माणसे मारली गेली आहेत. लोकांना धक्का बसतो; परंतु भारतात चालू असलेल्या आतंकवादी हैदोसात अशा बातम्या आता सामान्य झाल्या आहेत. त्यामुळे लोकांनी विशेष लक्ष न देता आपले दैनंदिन कामकाज चालू ठेवले. साबरमती एक्स्प्रेस बडोद्याला दुपारनंतर आली. तेथे रामभक्तांना भेटण्यास आलेल्या विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांना गोध्रा स्थानकावर घडलेल्या घटनांचे यथार्थ वृत्त मिळाले आणि त्यांचे हृदय विदीर्ण झाले. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी उत्तेजित गर्दीच्या हातात गोध्रा हत्याकांड करणार्‍या मुसलमान समाजाचे दोन सदस्य सापडले आणि हिंदू प्रत्याघाताचा आरंभ झाला !

जिवंतपणी इंग्रजांच्या हाती न लागण्याची शपथ घेऊन ती निभावणारे चंद्रशेखर आझाद !

चंद्रशेखर आझाद यांचा आज बलीदानदिन ! त्यानिमित्ताने...
    एकदा भगतसिंग म्हणाले, आझादांना पकडण्यासाठी दोन दोरखंड लागतील. एक त्यांच्या मानेसाठी आणि दुसरा त्यांच्या पोटासाठी. त्यावर आझाद एकदम गंभीर झाले आणि भगतसिंग यांना म्हणाले, देख फांसी जानेकी इच्छा मुझे नहीं, तुझे है । इसलिये रस्सी तुम्हारे लिए है । जब तक मेरे पास यह बमतुल बुखारा है (म्हणजे त्यांचे लाडके पिस्तुल) तब तक कोई मुझे पकड नहीं सकता । त्यानंतर त्यांनी खिशातून आपले लाडके मॉवजर पिस्तुल काढले, त्याच्यावर उजवा हात ठेवला आणि गंभीर आवाजात शपथ घेतली, जोपर्यंत हे पिस्तुल माझ्या हातात आहे, तोपर्यंत मला कुणीही जिवंत पकडू शकणार नाही. मी कधीच जिवंतपणी इंग्रजांच्या हाती लागणार नाही. तसा प्रसंग आलाच, तर याच पिस्तुलाने मी माझा अंत करून टाकीन. बघता बघता वातावरण एकदम गंभीर झाले. आझादांनी आपली ही शपथ पाळली. ते शेवटपर्यंत इंग्रजांच्या हाती लागले नाहीत. तसा प्रसंग आला, तेव्हा त्यांनी स्वतःच्याच हाताने आपल्या जीवनाला पूर्णविराम दिला.
(संदर्भ : मासिक धर्मभास्कर, मार्च २०१५)

मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा अधिकार आहे का ? - भागवताचार्य वा.ना उत्पात

    महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने २७ फेब्रुवारी २०१६ या दिवशी री मराठी भाषा गौरव दिन साजरा होत आहे. ही आनंददायी आणि गौरवाची गोष्ट आहे. मात्र मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा आम्हाला अधिकार आहे का ? राज्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळा भरमसाट वाढत आहेत. इंग्रजांच्या राज्यातसुद्धा एवढ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा नव्हत्या. त्याच्या सहस्रोपटीने इंग्रजी माध्यमाच्या शाळा आज आहेत. महाराष्ट्रातील मुलांना मराठी नीट बोलता येत नाही. मराठी बोलतांना ९० प्रतिशत शब्द इंग्रजी वापरतात. प्रसार माध्यमांतील भाषा तर इंग्रजाळलेली आहे. न्यायालयातही इंग्रजीचे प्राबल्य आहे. कुठे आहे माझी माय मराठी ?
    मुख्यमंत्र्यांचीच मुलगी जर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आहे, तर ते मराठीचा गौरव काय करणार ? बहुसंख्य मंत्री, नेते, आमदार, खासदार, व्यापारी, नोकरदार, प्रगत शेतकरी यांची मुले तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आहेत, तर त्यांना मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा अधिकार आहे का ? कवी म्हणाले होते, हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू. स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली. तरी आम्ही माय मराठीचे चांगले पांग फेडले !

पुणे येथे हिंदु धर्मजागृती सभा

स्थळ - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, येवलेवाडी, गावठाण, कोंढवा बुद्रुक, पुणे 
दिनांक - २८ फेब्रुवारी २०१६
वेळ - सायंकाळी ५.३० वाजता 
हिंदु धर्माभिमान्यांनी सभेला अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून धर्मकर्तव्य बजावावे !

सनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत

     भाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)

साधक आणि त्यांचे कुटुंबीय यांनी एकमेकांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला !

     वर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात आली. यातून साधनेचे महत्त्व आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे वाचकांच्या लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना केली आणि त्यांनी इतर कैद्यांनाही साहाय्य केले, त्यानंतर साधकांच्या कुटुंबियांना पोलीस प्रशासन, अधिवक्ते, समाज आणि नातेवाईक यांच्याकडून भोगावे लागणारे त्रास पाहिले.

शांत, प्रेमळ आणि बालवयातच देवाची ओढ असलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कोल्हापूर येथील चि. सानवी श्रीकांत शिंदे (वय ३ वर्षे) !

चि. सानवी शिंदे
१. गर्भारपण
१ अ. आधुनिक वैद्यांनी रक्तदाब आणि ज्योतिषांनी पितृदोष असल्याचे सांगणे : आमच्या लग्नाला चार वर्षे होऊनही अपत्यप्राप्तीत अडथळे येत होते. मला आधुनिक वैद्यांचे उपचार चालू होते. आधुनिक वैद्यांनी मला रक्तदाब आहे, असे निदान केले. बाकी सर्व चाचण्यांत काही दोष नव्हते. माझा दोन वेळा गर्भपात झाला होता. ज्योतिषांना माझी पत्रिका दाखवली असता पितृदोष आहे, असे समजले. 
१ आ. साधना
१ आ १. वैभवलक्ष्मी व्रत करणे
१ आ १ अ. संकल्प करून व्रताचा आरंभ श्रावण शुक्रवारपासून करणे : माझी देवी महालक्ष्मीवर श्रद्धा आहे. त्यामुळे लक्ष्मीमातेचे वैभवलक्ष्मी व्रत करावे, असा विचार मनात आला आणि संकल्प करून श्रावण शुक्रवारपासून व्रताचा आरंभ केला. तत्पूर्वी मी चार मास आधुनिक वैद्यांचे सर्व उपचार बंद केले होेते. मी कोणतीही औषधे घेत नव्हते. 
१ आ १ आ. पहिल्याच शुक्रवारी सकाळी पूजा करत असतांना मला देव्हारातील सर्व देवतांच्या चित्रांमध्ये आणि गुरुचरित्र ग्रंथाच्या मुखपृष्ठावर दैवी कण आढळले. त्याच मासात मला गर्भधारणा झाली. 
१ आ १ इ. स्वप्नात रेणुकादेवी आणि परशुराम यांची पूजा करत असून रेणुकामातेच्या मूर्तीला मळवट भरला असल्याचे दिसणे : एका मंगळवारी पहाटे मला स्वप्न पडले. त्यात मी स्वतः एका पुजार्‍यासमवेत एका नवीन वास्तूत सुपात नवीन वस्त्र अंथरून त्यावर रेणुकादेवी आणि परशुराम यांची पूजा करत आहे.

देव कुणाच्यातरी माध्यमातून साधकाची इच्छा पूर्ण करतो, याची साधिकेला आलेली अनुभूती

सौ. पिरोज जाधव
१. मंदिरातील देवाच्या वस्त्रांच्या लिलावातून आश्रमात अर्पण
 करण्यासाठी धोतर-उपरणे घेण्याची इच्छा होणे आणि 
सहसाधिकेने सांगितल्याप्रमाणे ठराविक रकमेपेक्षा अधिक
 रुपयांची बोली लावली जात असल्याने वस्त्र खरेदी न करणे
     ५.४.२०१५ या हनुमान जयंतीच्या दिवशी गोव्यातील श्री नागेशी मंदिरात ग्रंथप्रदर्शनाची सेवा करत असतांना संध्याकाळी पावणीचा (लिलावाचा) (टीप १) कार्यक्रम चालू झाला. तो कार्यक्रम ग्रंथप्रदर्शनासमोरच असल्यामुळे मला त्यातील धोतर आणि उपरणे घेण्याची इच्छा झाली. आश्रमात बरेच संत येत असल्यामुळे त्यांना देण्यासाठी ही वस्त्रे घ्यावी, असे प्रकर्षाने वाटले. कपडे सुती असावेत, असेही वाटत होते. त्या वेळीसौ. सुमनमावशी म्हणाल्या, २१० रुपयांपर्यंत बोली करायची. त्यापेक्षा अधिक बोलायचे नाही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी बर्‍याचदा बोली केली; परंतु कुणी ना कुणी २१० रुपयांपेक्षा अधिक बोली करत.

खंडोबाची भक्ती करणारे दिंडोरी (नाशिक) येथील श्री. मार्तंड महाजन यांची त्यांच्या मुलीला जाणवलेली वैशिष्ट्ये

श्री. मार्तंड महाजन
     माझे वडील श्री. मार्तंड भिकाराम महाजन, जन्म ५.५.१९३५ (अक्षय्य तृतीया) या दिवशी झाला. ते कुलाचाराचे पालन करतांना त्यांच्या परंपरेने आलेल्या कृती करतात त्याविषयी अनेकांना चांगल्या अनुभूतीही येतात. 
१. साधना 
अ. माझे वडील वर्ष १९४७ पासून खंडोबाची भक्ती करतात. वर्ष १९७० पासून ते चंपाषष्ठीला बारा गाड्या ओढायचे. बारा गाड्यांत माणसे आणि मुले बसलेली असायची. त्यांचे गुरु चांदोरी येथील श्री दत्तात्रेय नारायण शिंदे यांच्या प्रेरणेने ते बारा गाड्या ओढणे, तसेच अंगात येणे इत्यादी करीत असत. या कृती कुलाचाराच्या संदर्भात असायच्या. त्याप्रमाणे केल्यावर बर्‍याच जणांना चांगला अनुभवही यायचा. 
आ. चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी ते चांदोरीला जातात. पहाटे गंगेवर अंघोळ करून चांदोरीच्या मंदिरात देवाच्या सान्निध्यात बसतात. नंतर देवाची आरती होते. तेव्हा अंगात आलेलेच असते. त्यानंतर हातावर भंडारा घेऊनच कापराची आरती करतात. कापूर भक्षण करतात आणि ते शांत होतात. त्यानंतर गंगेचे पाणी कळशीत घेऊन परत दिंडोरीला येतात. गावातील इतरही लोक त्यांच्यासमवेत असतात. दारापुढे सुवासिनी त्यांना ओवाळतात. पाणी घेऊन नाचतात. 
इ. यानंतर ६ दिवस घट बसतात. चंपाषष्ठीला त्यांना पाण्याने अंघोळ घालून उठवतात. त्यानंतर ते उपवास सोडतात.

ईश्‍वर आणि प.पू. डॉक्टर यांतील एकमात्र भेद !

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
      प.पू. डॉक्टर नेहमी म्हणतात, मी देव नाहीत, अवतार नाही अथवा ईश्‍वरी अंशही नाही आणि साधक म्हणतात, ते आहेत आणि आहेतच ! (साधकांचा हा वैयक्तिक भाव आहे. - संपादक)
    प.पू. डॉक्टरांचे ते देव, अवतार आणि ईश्‍वरी अंश नसल्याचे प्रतिपादन केवळ एकाच सूत्रावर खरे आहेे; ते म्हणजे ईश्‍वर आणि देव हे स्तुतीप्रिय असतात आणि प.पू. डॉक्टर मात्र स्तुतीप्रिय नाहीत. तेव्हा हा आणि एवढाच निश्‍चित भेद आहे.
- अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद. (१९.२.२०१४)

जेथे जातो तेथे, तू माझा सांगाती, या उक्तीप्रमाणे रुग्णालयातही श्री. शरदचंद्र तावडे यांची देवाने घेतलेली काळजी !

     काही दिवसांपूर्वी मी घराच्या पायरीवर उभा असतांना माझा तोल गेला आणि मी कटीवर आपटलो. प्राथमिक वैद्यकीय चिकित्सेनंतर मला शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी रहावे लागले. काही दिवसांनी मला घरी जाण्याची अनुमती मिळाली. ज्या दिवशी मी रुग्णालयातून घरी जाणार होतो, त्या दिवशी पहाटे झोपेत मी उजव्या कुशीवर वळल्यावर माझ्या पाठीला अदृश्य शक्तीच्या हाताचा स्पर्श झाल्याचे जाणवले. मी वळून पाहिल्यावर मला एक पुसटशी आकृती दिसली. मी डोळे विस्फारून पाहिल्यावर सूक्ष्मातून प.पू. डॉक्टर आल्याचे दिसले. सहसाधक माझ्याजवळ येईपर्यंत ते अदृश्य झाले होते. मी ही घटना लगेचच सहसाधकाला सांगितली. मला ही अनुभूती आल्यामुळे पुष्कळ आनंद झाला. 
- श्री. शरदचंद्र तावडे, सनातन संकुल, देवद, पनवेल. (२०.७.२०१५)

आजारपणाच्या कालावधीत सर्वतोपरी साहाय्य करणारे संत आणि साधक यांच्याप्रती साधकाने व्यक्त केलेली पत्ररूपी कृतज्ञता !

आदरणीय प.पू. डॉक्टर, 
      सर्व संत आणि सनातन परिवार यांना सादर वंदन करून ऋणनिर्देशाच्या काही ओळींना वाट करून देतो. ६.८.२०१४ ते १२.८.२०१४ या कालावधीत योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या सूचनेनुसार देवद आश्रमात प.पू. डॉक्टरांच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी महामृत्यूजंय जपाचे अनुष्ठान झाले. त्यासाठी ६१ टक्के किंवा त्याहून अधिक पातळी गाठलेले ९ साधक प्रतिदिन ३ घंटे जप करत होते. त्यात मीही होतो. 
१. प.पू. डॉक्टरांच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी महामृत्यूजंय जप करतांना उजव्या 
हाताला कुणाचातरी स्पर्श झाल्याचे जाणवणे आणि त्यातून आनंद अन् उत्साह मिळणे 
     प्रत्येक दिवशी जप आणि प्रार्थना झाल्यावर ध्यानमंदिरात थांबून मी प.पू. डॉक्टरांच्या स्वास्थ्यासाठी श्री गणेश, श्रीकृष्ण आणि महादेव यांना प्रार्थना करून आळवत असेे. जप करत असतांना माझ्या उजव्या हाताला कुणाच्या तरी हाताचा आशीर्वादपर स्पर्श होत असल्याचे मला जाणवत असे. त्यातून मला आनंद आणि उत्साह मिळत असे; पण ११.८.२०१४ या दिवशी शेवटच्या सत्राच्या वेळी (दुपारी ३.१५ ते ४.१५) जपासाठी जाण्याची सिद्धता करत असतांनाच घराची पायरी उतरतांना मला चक्कर आल्यासारखे झाले.

सतत आनंदी असलेले आणि प्रत्येक कृतीला भावाची जोड देणारे पू. शंकर गुंजेकरकाका !

पू. शंकर गुंजेकर
१. पू. शंकर गुंजेकरकाका यांचा तोंडवळा आनंदी असतो. 
ते कधीच थकलेले दिसत नाहीत.
२. साधनेविषयीच बोलणे 
     पू. गुंजेकरकाका साधक, नातेवाईक, राज्यकर्ता वा इतर कुणी आले, तरी त्यांच्याशी साधनेविषयीच बोलतात. साधनेत सर्व जण पुढे गेले पाहिजेत, असे त्यांना वाटते. ते दुसर्‍यांचे पूर्ण ऐकून घेतात आणि त्यांना टप्प्याटप्प्याने साधना सांगतात.
३. प्रत्येक कृतीला भावाची जोड देणे 
अ. पू. काका निर्जीव वस्तूंसमवेतही भावाच्या स्तरावर बोलतात.
आ. अंघोळ करतांना साबण, तांब्या आणि टॉवेल यांच्याप्रती ते कृतज्ञता व्यक्त करतात. ते कृष्णाला विचारूनच कपडे घालतात. 
इ. दैनिक सनातन प्रभात वाचतांना ते साधकांशी बोलत आहेत, असे वाटते.
ई. ते शेतात कामाला जाण्यापूर्वी आपल्या कुलदेवीला सांगून जातात

लग्नाचा एक उद्देश आहे परेच्छेने वागायला शिकणे; पण फारच थोडे ते शिकतात ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सनातनच्या साधकांनो, साधकांचे किंवा हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन चालू असतांना मार्गदर्शन ऐकणारे आणि करणारे यांनी लक्षात घ्यावयाची सूत्रे

१. मार्गदर्शन ऐकणारे 
उत्तरदायी साधकांकडून झालेल्या चुका पुढे सांगणे आवश्यक 
     बरेच साधक आपले उत्तरदायी साधकांकडून काही चुका झाल्यास त्या पुढे सांगत नाहीत. त्यांना वाटते, आपण त्यांच्या चुका कशा सांगायच्या ? यासंदर्भात त्यांनी पुढील सूत्रे लक्षात घेतली पाहिजेत. त्यांनी उत्तरदायी साधकांकडून झालेल्या चुका (?) त्यांच्याही उत्तरदायींना सांगणे पुढील कारणांसाठी आवश्यक असते.
अ. आपल्याला ज्या चुका झाल्या असे वाटते त्या खरोखरच चुका होत्या कि आपली समज अल्प असल्यामुळे तसे वाटले, हे उत्तरदायींना सांगण्यामुळे समजते. काही वेळा संतांची भाषा कळत नाही. त्यामुळेही संतांचे बोलणे चुकीचे आहे, असे वाटते.
आ. काही वेळा उत्तरदायींकडून अयोग्य बोलले जाणे, हे त्यांच्यात अहंभाव निर्माण झाल्यामुळे होते. 
इ. सनातनच्या साधकांची पातळी ५९ टक्क्यांहून अधिक असते, म्हणजे त्यांना १०० टक्के पातळीच्या ईश्‍वराप्रमाणे सर्व कळत नाही. पातळी ९० टक्क्यांच्या पुढे गेल्यावर चुका होत नाहीत.

साधकांसाठी सूचना

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध
असणार्‍या नियतकालिक सनातन प्रभातच्या १२ सहस्र ८६४
वाचकांचे शेष नूतनीकरण १५.३.२०१६ या दिवसापर्यंत पूर्ण करा !
    नियतकालिक सनातन प्रभात म्हणजे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेले एकमेव वृत्तपत्र ! या नियतकालिकाद्वारे जिज्ञासू वाचकांची अध्यात्माविषयीची ज्ञानतृष्णा भागवली जाते, तसेच राष्ट्र अन् धर्म प्रेमी वाचकांना धर्मकार्य करण्याची प्रेरणा मिळते. अंतरंगात अंकुरलेल्या साधनारूपी बिजाचे वटवृक्षात रूपांतर करणारेे, तसेच अंतरातील हिंदुत्वाची मशाल पेटती ठेवणारे हे नियतकालिक सर्व वाचकांना नियमितपणे मिळणे आवश्यक आहे. असे असतांनाही काही राज्ये आणि जिल्हे यांमधील साधकांकडून या नियतकालिकांचे नूतनीकरण वेळेत होत नाही. त्यामुळे वाचकांना त्यातील अमूल्य ज्ञानापासून वंचित रहावे लागते.
    सर्व नियतकालिकांचे आवृत्तीनुसार शेष नूतनीकरण खाली देत आहोत.

बोधचित्र


परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले
     व्यक्तीपेक्षा समाज आणि समाजापेक्षा राष्ट्र महत्त्वाचे आहे, हे न समजणारे व्यक्तीस्वातंत्र्यवाले स्वतःला, समाजाला आणि देशाला विनाशाकडे नेत आहेत ! - (परात्पर गुरु) डॉ. आठवले

॥ हरि ॐ तत्सत् ॥

संत भक्तराज
सनातनचे श्रद्धास्थान
आनेवालेको कहना नहीं, जानेवालेको
रोकना नहीं और पूछे बिगर रहना नहीं ।
भावार्थ : आनेवालेको कहना नहीं मधे कहना हे विचारणे या अर्थी आहे. येणार्‍याला, म्हणजे जन्माला आलेल्याला तू जन्माला का आलास ? असे आपण विचारू शकत नाही. सृष्टीचे निर्माण बंद होऊ शकत नाही. जानेवालेको, म्हणजे मृत्यू पावणार्‍याला रोकना नहीं, म्हणजे आपण थांबवू शकत नाही. पूछे बिगर रहना नहीं, म्हणजे तू खरोखर कोण आहेस ? हे स्वतःला विचारल्याविना राहू नये. या प्रश्‍नाने तरी तो स्वतःच्या खर्‍या रूपाची ओळख करून घ्यायचा प्रयत्न करील.
(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)
 प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी
॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥
॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥
या मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार !

बुद्धीवाद संपल्यावर ईश्‍वरी शक्तीच्या उत्क्रांतीचा उगम होणे 
योगतज्ञ दादाजी वैशंपायन
    बुद्धीवादाच्या मर्यादा जेथे संपतात, तेथेच ईश्‍वरी शक्तीच्या उत्क्रांतीचा उगम होतो. इथेच मनुष्य आध्यात्मिक विचार करू लागतो.
ॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ ।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥
(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)

देशद्रोहाचे उदात्तीकरण !

संपादकीय 
    संजय दत्तच्या सुटकेच्या विरोधात पुणे येथील संघर्ष समिती या संघटनेने २५ फेब्रुवारी या दिवशी येरवडा कारागृहाबाहेर काळे झेंडे दाखवून तीव्र निदर्शने केली. त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले. २४ फेब्रुवारी या दिवशी त्यांनी तसे पत्रकार परिषद घेऊन घोषित केले होते. अभिनेता आणि प्रसिद्ध व्यक्ती असल्यामुळेच देशद्रोही संजय दत्तला वारंवार रजा संमत झाल्या आहेत. संजय दत्त याच्या संमत केलेल्या सर्व रजा त्याच्याकडून भरून घेण्यात याव्यात, अशी मागणी कर्जदार, जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब हंगरगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. या प्रकरणी संघटनेच्या वतीने राज्यपालांनाही निवेदन पाठवण्यात आले आहे. संजय दत्त याला वारंवार पॅरोल रजा संमत होण्याच्या संदर्भात तत्कालीन गृहमंत्री रा.रा. पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्या संदर्भातील अहवाल जनतेसमोर सादर करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
धर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा !
धर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या ! English : http://hindujagruti.org हिंदी : http://hindujagruti.org/hn